मराठी बृहद्कोश

तेरा मराठी शब्दकोशांमधील ३,००,८७५ शब्दांचा एकत्रित संग्रह

संबंधित शब्द

शेप

न. एक फळ. 'शेपें शिताफळेंही खरबुज खिरणी सुंदरें तूत बोरें ।' -सारुह ३.४९. [फा. सेब = सफरचंद]

दाते शब्दकोश

शेव

-स्त्री. एका फळझाडाचें नांव. -न. या झाडाचें फळ; सफरचंद. [अर. सेब] शेवीचें झाड-न. शेव.

दाते शब्दकोश

सेव

पु. सफरचंद फळ. 'विलायती मेवा सेव दाणे पंधरा...' -दिमरा १.२२. शेव पहा. [फा.]

दाते शब्दकोश