आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
सराई
सराई f A caravansary.
सराई sarāī f ( P) A house (built in towns or by the way-side) for travelers to alight and refresh themselves; a caravansary ().
स्त्री० हंगाम, ऐन वेळ, ऋतु. २ धर्मशाळा.
स्त्री. धर्मशाळा; मुशाफरखाना; विश्रांतिस्थान. [फा. सराय्]
सराई, सरांई
सराई, सरांई f Harvest-time; the season.
सराई or सरांई
सराई or सरांई sarāī or sarāṃī f The time of ripening (of fruit, corn, or other product of the earth); harvesttime, the season. Hence 2 The season or period of peculiar fitness or greatest prevalence for or of certain ceremonies, rites, or practices.
सराई(इ)त
वि. निष्णात; पटाईत; कुशल; सुग्रण; पटु; तरबेज; दक्ष; सराव असलेला; अभ्यस्त; अनुभवी. 'सराइत होता बाजी ज्याचा मारा संभाळिला ।' -ऐपो ७०. 'मी आहे सराईत सख्यारे बाळपणाची । पुरवावी हौस मनाची ।' -पला २८. [सराव]
सराई
(स्त्री.) [फा. सराय्] धर्मशाळा. मुशाफर-खाना.
शरअी डाढी
हिंदी अर्थ : खूब लम्बी डाढ़ी मराठी अर्थ : लांब दाढी. (पिळदार मिशाच्या प्रयोगा प्रमाणें. )
शरअी पाजामा
हिंदी अर्थ : टखनोंतकका पाजामा मराठी अर्थ : पायघोळ विजार.
सरई, सराई
स्त्री. धर्मशाळा; उतरण्याची जागा. [फा. सरा]
स्त्री. सुगी; हंगाम; धान्याचा मोसम. [सं. शरद्]
संबंधित शब्द
गायवाणा
वि. केविलवाणा : ‘(त्यांचा) गायवाणा चेहरा पाहून...’ –सामा (सराई) १५०.
गर्वा
पहा : गरवा : ‘फुलावर आलेले गर्वे भात दूध घेत होते.’ - सराई २.
गव्हारी
पु. गुराखी : ‘गव्हाऱ्यांनी बाप्पाजींच्या राखीव खपांत चारणीस घातलेली जनावरें रानाच्या आडोशाला नेली.’ - सराई ५.
घबड
स्त्री. पोकळ जागा : ‘धबधब्याच्या आतल्या अंगाला एक मोठी घबड होती.’ –सराई १२.
घुमसुला
पु. धिंगाणा. (क्रि. घालणे.) : ‘कमरेवर हात ठेवून ती घुमसुला घालू लागली.’ – सराई.
हंगाम
पु. मोसम; ऋतु; सुगी (पीक पाणी इ॰ ची); योग्य काळ (एखाद्या व्यवहाराचा); ऐन सराई (उद्योग-धंदा इ॰ ची). [फा. हंगाम्] ॰शीर-क्रिवि. हंगाम चालू असतां (विकणें, विकत घेणें इ॰); -वि. ऋतु, समय याला योग्य; यथाकालोचित; वक्तशीर. 'या गांवावरी हंगामशीर प्रजन्य पडला नाहीं.' -रा ६.१८५. हंगामी-वि. १ हंगामापुरता; तात्पुरता (चाकर, नोकर इ॰). २ हंगामासंबंधीं; हंगामाच्या वेळचा; हंगामशीर.
कारवट
न. कारवीचे रान : ‘कारवटात घुसलेल्या गुरांच्या अंगाला कारवीचा सुगंधी मध लागला होता.’ - सराई २३. कारवट
कणंग
स्त्री. धान्य साठविण्यासाठी बांबूचे किंवा फोकाट्याचे केलेले पात्र; लहान खोली; पेव; कणगा; ठिकी; कणिंग : ‘कोपऱ्यात नाचणीची बारिकशी कणंग होती.’ - सराई २४.
कोंबडबाउल
पु. अंडी विकत घेणारा : ‘मघाशी कोंबडबाउल आला होता.’ - सराई २२.
कोथिरे, कोथेरे
न. एक प्रकारचे गवत : ‘आकाशात तारे कोथिराच्या आणि पोह्याच्या तुऱ्याप्रमाणे चमकू लागले.’ - सराई ६२.
क्षिती
स्त्री. कमाल; मर्यादा; अखेर; अंत; शेवट. 'फिरंगी ते ठिकाणाहून मारीत मारीत बाग सराई सोमेश्वराचे खिंडीत क्षिती केली.' -ऐपो २.५२. [सं. क्षति]
खरपट, खरपड
न. १. खडपा; मुख्यतः जे भाजल्यासारखे दिसतात ते पर्वताचे मोठे खडक २. मुरूम, दगड यांनी बनलेली जमीन; कातळवट जमीन. ३. डोंगरावरील सपाटी. ४. फोड. (क्रि. येणे, उठणे.) ५. नापीक, खडकाळ जमीन : ‘मला चांगलं तरी शेत द्यावं. तर माझ्या गळ्यात खरपट बांधलं.’ - सराई २५.
लगीन
न. (प्र.) लग्न पहा. [अप. लग्न] लगनी गोष्ट, लगीन घटका, लगीन घर, लगीन चिठी, लगीनचुडा, लगीनटका, लगीनटीप-लग्नगोष्ट, लग्नघटका इ॰ पहा. लगीन न्हावप-क्रि. (गो.) लग्नाचा सोहळा उपभोगणें. ॰सराई- साडा-स्त्री. लग्नसराई-साडा पहा.
मुशाफर
पु. प्रवासी; वाटसरू; फिरस्ता; सफर करणारा. [अर. मुसाफिर्] ॰खाना-पु. १ धर्मशाळा; सराई; वाटसरूंस उतरण्याची जागा. २ खाणावळ. ३ डाकबंगला. मुशाफरी- स्त्री. १ प्रवास; देशाटन. 'मुशाफरींत वय न्यावें, नित्य नवें उदक व नवें स्थळ व डेरियाची सावली अनुभवावी.' -पया ४३७. २ प्रवासीपण. -वि. प्रवासासंबंधींचा; प्रवाश्यासंबंधींचा; प्रवासी. [फा. मुसाफिरी]
ओठाण
न. पडवी; सोपा; ओटी : ‘लाडीने ओठाणातील दाराला खिळामारून अडकवलेले घासलेट तेलाचे टमरेल काढले.’- सराई २२.
पराई
स्त्री. १ मानवी आयुष्याचे दोन भाग; तारुण्य आणि वार्धक्य प्रत्येकीं; चढतें आणि उतरतें वय. 'चढती पराई जाऊन उतरती पराई लागली.' २ ज्वानी. 'निरोगी आपली समसमान ऐन पराई हो । कसुन भोगावी पलंगावर सौख्य सराई हो ।' -प्रला १५३. [सं. परार्ध]
सराए
पु. राजवाडा; सराई. [फा. सरा]
सराइ-सरांई
स्त्री. सुगीचा काल; हंगाम; मोसम; पिकें गोळा करावयाचा पर्जन्यानंतरचा काळ; हिंवाळा. 'सराई सर्व- काळ । वायां न वजे घटिकापळ ।' -तुगा ३६०. [सं. शरद्- शारदी]
सराय
स्त्री. सराई पहा.
उखळीबार
पु. धातूच्या नळीत ठेवलेल्या कोरड्या दारूवर लोखंडी सळई मारून केलेला बार : ‘डुकरांना भीति दाखविण्याकरिता शेतातून उखळीबार होत होते.’ − सराई.