आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
साकी
साकी sākī f (Better साख) Mercantile credit: also honorable character generally.
साकी f A particular measure of poetical composition.
साकी f Mercantile credit. Honourable character generally.
(पू.) [अ. साकी] गुत्त्यांतील दारूचा पेला भरून देणारा पोर्या.
साकी sākī f A particular measure of poetical composition.
पु. दारूचा पेला भरून देणारा (गुत्त्यांतील) पोर्या. [अर.]
स्त्री० छंदविशेष.
वि. (जुन्नरी) मागचे दोन पाय घोट्याखालीं पांढरे असणारी (मेंढी).
स्त्री. एक मराठी वृत्त. यांत दोन चरण असून शेवटीं यमक असतें. प्रत्येकांत चार मात्रांचा एक असे सात गण असतात. उदा॰ 'जनकमखातें मुनिसह जातां, प्रभुनें गौतम भार्या ।.'
स्त्री पत; साक-ख पहा.
शाकी
(वि.) हिंदी अर्थ : शिकायत करने वाला, चुगल खोर. मराठी अर्थ : तक्रार करणारा, चहाडखोर.
संबंधित शब्द
रोहपोह
पु. उगवणी; वसूली; जमवाजमव. 'यैसे यास माहालो माहली बाकी साकी राहिली आहे त्याचा रोहपोह करावा लागतो.' -पेद १७.३९ [सं. रुह्-रोह द्वि.]
साख
स्त्री. १ पत (व्यापारी); साक; अब्रू. (क्रि॰ वाढणें). २ लौकिक; अब्रू. [सं. साक्ष्य ?] ॰बाज-वि. पतीचा; अब्रूचा. ॰बाजी-स्त्री. (व्यापारांत) पत, अब्रू असणें. साखी- स्त्री. १ पत; अब्रू. २ सचोटी; प्रमाणिकपणा. साकी पहा. 'तुम्ही चांगली साखीचीं माणसं.' -ख २९५. ३ प्रमाण; साक्ष्य. 'मंत्रतंत्र नहिं मानत साखी । प्रेमभाव नहिं अंतर राखी ।' -तुगा ४३२. साखसुरतवि. १ टुमदार; प्रमाणशीर. २ सुरेख; नीट- नेटकें. 'साखसुरत पोशाख बिषाग केला कीं मोठा संभावित देसतो.' -विवि ८.८.१५५. ३ पद्धतशीर; सशास्त्र; योग्य. ४ पटेल असें तयार केलेलें, बांधलेलें, रंगविलेलें (जागा, भाषण, लेखन, इ॰). साकसुरत पहा. क्रिवि. १ उघडपणें; राजरोस. 'सहज साख- सुरत जनाना चालला असता.' -सुर्यग्र ११. २ प्रत्यक्ष; साक्षात्. -ख्रिपु १.१५. [साख + सूरत]
सांकणें
क्रि. (खा.) चाखणें. 'रामा ई बोंरें मायुंञ पयलें मांआ हारा दाताकीं साकी विईनें.' -भिल्ली २७.