मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

सारंग

सारंग m A mode of music. a Variegated.

वझे शब्दकोश

सारंग sāraṅga a S Variegated.

मोल्सवर्थ शब्दकोश

सारंग sāraṅga m (S) A Rág or mode of music. See राग. 2 In Sanskrit this word signifies numerous animals and things, for some of which it will frequently appear in Prákrit poetry; viz. A deer, a peacock, a serpent, a lion, the bird Chátaka, an elephant, the flamingo, a tree, a garment, Kámadewa or Cupid, a bow, a lotus, a jewel, gold, sandal, a flower, light, a cloud, camphor.

मोल्सवर्थ शब्दकोश

सारंग sāraṅga f (Properly सारण) A mango-netting &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

वि. चित्रविचित्र; शबल; बहुरंगी. [सं.] सारंग- पु. घोड्याचा एक रंग तांबूसकाळा. -वि. तांबूस काळसर रंगाचा. 'तेव्हां सारंगा वारू । राव आणवित ।' शनि ९६.

दाते शब्दकोश

पु. १ खलाशी; नावाडी. -वाडथोमा १.३४४. २ तांडेलांवरील अधिकारी; खलाशांचा नायक. ३ कोंकणांतील नावाड्यांची एक जात. [फा. सरंग = सैन्यांतील अधिकारी]

दाते शब्दकोश

(सं) पु० रागविशेष. २ पक्षी.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

स्त्री. आंब्याचें मोठें जाळें; सारण पहा.

दाते शब्दकोश

बिंद्रबनी सारंग

पु. (संगीत) एक राग. ह्या रागांत षड्ज्, तीव्र ऋषभ, कोमल मध्यम, पंचम, कोमल निषाद, तीव्र- निषाद, हे स्वर येतात. गांधार व धैवत वर्ज्य. जाति. औडुव- औडुव. वादी ऋषभ, संवादी पंचम, गानसमय मध्यान्ह. ह्याचे अवरोहांत धैवताचा अल्पप्रयोग विवादी या नात्यानें क्कचित् होतो

दाते शब्दकोश

शारंग

न. शार्ङ्ग पहा.

दाते शब्दकोश

संबंधित शब्द

सारंग

पु. १ (संगीत) एक राग. 'उदासधुन सारंग ऐकतां ब्रह्मचारी वेळा चळती ।' -प्रला २३६. (या शब्दाचे संस्कृतांत अनेक अर्थ आहेत. त्यांपैकीं जे कांहीं मराठींत येतात ते असे) २ भ्रमर. -ज्ञा १८.१६३५; -एभा १.१०३. ३ हरण. ४ मोर. ५ सर्प. ६ सिंह. ७ चातक. ८ हत्ती. ९ हंसक. १० वृक्ष. ११ वस्त्र. १२ कामदेव. १३ धनुष्य. १४ कमळ. १५ रत्न. १६ सोनें. १७ चंदन. १८ पुष्प. १९ प्रकाश. २० मेघ. २१ कापूर. इ॰ [सं.] ॰धर-पाणी-पु. विष्णु; कृष्ण 'भीमकी नाकीचें सुपाणी । सहज देखेल सारंगपाणी ।' -एरुस्व ७.३३. -एभा २५.४९२.

दाते शब्दकोश

राग

पु. (संगीत) पांच स्वरांपेक्षां कमी नाहीं असा वादी- संवादी स्वर व आरोह-अवरोह यानीं शोभा आल्यानें जो जन- मनरंजनास योग्य होतो असा स्वरसमुदाय. षड्जादि स्वरांची परस्पर जुळणी केल्यानें गायनास योग्य होणारे त्यांचा रचना- विशेष. हल्ली प्रचारांत सुमारें दीडशें राग मानितात त्यांचीं नांवें:- अडाणा, अभिरी, अल्लैया, अहीरभैरव, आसावरी, कानडा, काफी, कामोद, कालिंगडा, कुकुभबिलावल, केदार, कौशी, खट, खमाज, खंबायती, गारा, गुजरी तोडी, गुणकली, गौडमल्लार, गौडसारंग, १ गौरी, २ गौरी, चंद्रकांत, चांदणीकेदार, छायानट, जयजयवंती, जयंत, जयत्कल्याण, जलधरकेदार, जेताश्री, जैमिनीकानडा, जोगिया, जौनपुरी, झिंझूटी, झीलक, टंकी, तिलककामोद, तिलंग, तोडी, त्रिवणी, दरबारीकानडा, दीपक, दुर्गा (१), दुर्गा (२), देव- गांधार, देवगिरीबिलावल, देवसाख, देशकार, देस, देसगौड, देसी, धनाश्री, धानी, नट, नटबिलावल, नटमल्लार, नायकी कानडा, नारायणी, नीलांबरी, पंचडा, पटदीप, पटदीपिका, पटमंजरी (१), पटमंडरी (२), परज, पहाडी, पीलू, पूरिया; पूर्या धनाश्री, पूर्वी, प्रतापवराळी, प्रभात, बंगालभैरव, बडहंस, बरवा, बहादुरी- तोडी, बहार, बागेसरी, बिंद्रावनी सारंग, बिभास (१), बिभास (२), बिलाचल, बिलाखानी तोडी, बिहाग, बिहागरा, भंखार, भटि- यार, भीमपलासी, भूपाळी, भैख, भैखी, मधुमादसारंग, मलुहा- केदार, मांड, मारचा, मालकौंस, मालवी, मालश्री, मालीगौरा, मियांमल्लार, मियांसारंग, मुलतानी, मिरामल्लार, मेघमल्लार, मेघरंजनी, मोटकी, यमनकल्याण, यमनीबिलावल, रागेश्वरी, रामकली, रामदासीमल्लार, रेवा, लंकादहनसारंग, लच्छासाग, ललित, ललित पंचम, लाचारीतोडी, वराटी, वसंत, वसंतमुखारी, शंकरा, शहाणा, शिवभैरव, शुक्लबिलावल, शुद्ध कल्याण, शुद्ध मल्लार, शुद्ध सामंत, शुद्ध सारंग, श्याम, श्री, श्रीरंजनी, सर्पर्दा बिलावल, साजागिरी, सामंत सारंग, सावनी कल्याण, सावेरी, सिंधभैरवी, सिंधुग; सुघ- राई, सुहा, सूरदासीमल्लार, सोरट, सोहनी, सौराष्ट्रभैरव, हमीर, हंसकंकणी, हंसध्वनि, हिजेज, हिंदोल, हुसेनी कानडा, हेम. 'श्री, रागोऽथ वसंतश्वभैरव: पंचमस्तथा । मेघरागो बृहनाटो षडेते पुरुषा: स्मृता: ।' या संगीतरत्नाकर ग्रंथांतील श्लोकाप्रमाणें श्री, वसंत भैरव, पंचम, मेघ किंवा मेघमल्हार, बृहनाट किंवा नटनारायण असे सहा पुरुष राग आहेत (मोल्स्वर्थ कोशांत वरील श्लोक संगीतरत्ना- करांत असल्याबद्दल उल्लेख आहे परंतु उपलब्ध संगीतरत्नाकर ग्रंथांत हा श्लोक आढळत नाहीं). काव्यांत व पुराणांत यांवर चेतनधर्माचा आरोप केला असून प्रत्येकाला रागिणीनामक सहा (कांहींच्या मतें पांच) स्त्रीरूपें मानिलीं आहेत. सामाशब्द- ॰माला-ळा, मालि(ळि)का-स्त्री. १ गीताचा एक प्रकार; स्वरांची किंवा अनेक रामभेदांची मालिका; निरनिराळया रागांत म्हणतां येण्या- सारखें गीत. २ किल्ली दिली असतां अनेक रागांचे सूर ज्यामधून निघतात असें यंत्र; पियानोफोर्ट नामक वाद्यासहि म्हणतात. [सं. राग + माला] ॰मालेचीं चित्रें-नअव. राग गाइले जात असतां त्यांचा प्रभाव काय दिसतो हें ज्या चित्रांवरून दिसतें तीं चित्रें उदा॰ मेघमल्हार हा राग घेतला तर मोर हर्षभरित होऊन आपला रमणीय पिसारा उभारतो. इ॰ -पेशवेकालीन महाराष्ट्र १६१. ॰रंग-पु. १ गाणें व खेळणें; खेळ, मौज व ख्यालीखुशाली. २ लक्षणें व चिन्हें; साधारण स्वरूप, सुमार (कामांचा, गोष्टीचा). ३ संभव; पूर्वसूचना; बरेंवाईट स्वरूप. 'पावसाचा रागरंग पहा, तसे निघा.' [राग + रंग] ॰वाचक तान-स्त्री. (संगीत) ज्या रागामध्यें तान ध्यावयाची असेल त्या रागाच्या जीवभूत स्वरांची तान. ॰संकर-पु. गातांना एका रागांत दुसर्‍या रागांतील स्वर मिश्रित करून गाणें. [सं.] ॰ज्ञान-न. रागांचें, स्वरांचें किंवा गीताचें ज्ञान. [सं.] रागांग राग-पु. (राग) शुद्ध शास्त्रीय राग. ह्याच्या लक्षणांत सांगितल्याप्रमाणेंच हा गाइला पाहिजे असा कडक नियम आहे. [सं.] रागालप्ति-स्त्री. (प्रबंध) वर्ण, अलं- कार, गमक, स्थाय, ह्यांच्या साहाय्यानें रागाचें पूर्ण स्वरूप दृष्टीस पाडणें व त्यांत रागाचे आविर्भाव व तिरोभाव दाखविणें. [सं.] रागालाप-पु. (प्रबंध) ग्रह, अंश, न्यास, मन्द्र, तार, अप- न्यास, अल्पत्व, बहुत्व, षाडवत्व, औडुवत्व, ह्या रागाच्या विशे- षांचें प्रकाशन ज्यांत होतें अशी स्वररचना. [सं.] रागिणी-स्त्री. १ मिश्र किंवा पोट राग; मंजुल स्वर असलेला गायनांतील राग. प्रत्येक रागास रांगिणी सहा अथवा पांच मानिलेल्या आहेत. पुरा- णांत रागिणी ही रागाची स्त्री असें मानिलें आहे. राग पहा. कांहीं ग्रंथकार रागांचें वर्गीकरण पुरुषराग, भार्याराग, पुत्रराग, स्नुषाराग असें करितात त्यावेळीं कांहीं रागांस भार्याराग म्हणतात. तेव्हां त्यांस रागिणी म्हणून संबोधितात. वस्तुत: राग, रागिणी ह्यांमधील भेद कोणत्याहि ग्रंथक्रारानें स्पष्ट सांगितला नाहीं. २ विलासिनी, अनुरक्त स्त्री. [सं. राग] रागेश्वरी-स्त्री. एक राग. यांत षड्ज, तीव्र ऋषभ, तीव्र गांधार, कोमल मध्यम, तीव्र धैवत, कोमल निषाद हे स्वर लागतात. आरोहांत ऋषभ व पंचम वर्ज्य. अवरोहांत पंचम वर्ज्य. जाति औडुव-षाडव. मध्यम, संवादी षड्ज. गानसमय रात्रीचा दुसरा प्रहर.

दाते शब्दकोश

अस्ताई

अस्ताई astāī अंत्रा आभोग राग- रागिणी- राग- बहिरव रामकली माज बिलावर बहिरवी मल्हार बिभास असावरी मेघमल्हार खट गुणकली श्यामकल्याण सारंग तोंडी मालकंस गौडसारंग सुग्राई ललत कृष्णसारंग मुलतानी खमास or ज मारवा धनाश्री शंकराभरण श्रीराग पूर्याधनाश्री There are yet शुद्धकल्याण पूर्वी others wherein दीपकल्याण गौडी (as likewise in यमनकल्याण काफी some of the a- भूपकल्याण बागेसरी bove) the dis- हमीरकल्याण सोनी or सोहनी tinction betwixt कमोदकल्याण झिंजोटी राग & रागिणी विहंग नीलांबरी is disregarded. छायानाट बिहाग केदारा कानडा दरबारी कानडा अडाणा परज कालिंगडा देस हिंडोल बसंत बहार रागास येणें-भरणें-पेटणें-चढणें To be excited into anger; to be inflamed, exasperated, incensed. राग येणें in. con. or रागें भरणें (Lit. To be filled with anger.) To be angry. रागें भरून घेणें To bring anger upon one's self. रागाच्या हातीं देणें To give up to anger; to throw up (an office, a possession, a purpose) in a fit of passion. राग मानणें g. of o. To allow one's self to be angry at. राग नाकावर असणें g. of s. To have one's anger always ready; to be highly irritable. रागानें हिरवा पिवळा होणें To be livid from rage. राग आणणें -धरणें -करणें g. of o. or राग येणें in. con. and g. of o. To conceive anger against or at. रागें भरणें with ला of o. To vent or express one's anger upon.

मोल्सवर्थ शब्दकोश

दर्यासारंग      

पु.       नौसेनाधिपती [फा. दर्या + सारंग]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

धून

स्त्री. १ लांबलेला घुमणारा ध्वनि; गुणगुण; झणकार (वाद्यतंतूचा किंवा लांबच्या संगीताचा ). २ ध्वनिमिश्रण; ध्वनीची छटा, झांक. 'हा शुद्ध सारंग नव्हे ह्यांत किंचित मल्लाराची धून मारते.' ३ लोकांत गुणगुण, कुणकुण. (क्रि॰ निघणें, उठणें) [सं. ध्वनि]

दाते शब्दकोश

धून dhūna f (ध्वनि S) A prolonged or continuing sound; the hum or twang (as of struck chords or of distant music); a dying away and blending sound. Ex. हा शुद्ध सारंग नव्हे ह्यांत किंचित् मल्ला- राची धून मारती. 2 fig. Popular hum or whisper. v निघ, उड.

मोल्सवर्थ शब्दकोश

कुमाइत, कुमायत      

वि.       सारंग रंगाचा; दांडी, आयाळ, गुडघे, पाय, कान हे काळे असून बाकीचे शरीर तांबूस असणारा (घोडा) : ‘परम रागीट कुमार्इत । बदकश्याम स्थिर चालत ।’ - हरि २२·४५. [फा. कुमैत]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कुमाईत-यत

वि. सारंग रंगाचा; दांडी, आयाळ, गुडघे, पाय, कान हे काळे असून बाकीचें शरीर तांबूस असणारा (घोडा) 'परम रागीट कुमाईत । बदकश्याम स्थिर चालत ।' -ह २२.४५. 'अबलक पंचकल्याणी कुमाइत ।' -ऐपो १३९. [अर. कुमैत] ॰अबलक-वि. अर्धे शरीर तांबडे व अर्धे पांढरें असा (घोडा).

दाते शब्दकोश

शार्ङ्ग

न. १ विष्णूच्या धनुष्याचें नांव. २ शृंगाचें धनुष्य. [सं. शृंग. अप. शारंग] ॰धर-पाणी-पु. विष्णु. 'तया- परी तो पांडुकुमरु । महामोहें अति जर्जरु । देखोनी श्रीशार्ङ्गधरु । काय बोले ।' -ज्ञा २.५. 'पायां लागोनि बुझावणी । तुझ्या ठायीं शार्ङ्गपाणी ।' -ज्ञा ११.५४६. शार्ङ्गी-पु. विष्णु; कृष्ण. 'हेंच समर्थावयालागीं । एक दोन चांगी । उपपत्ती शार्ङ्गी । दाविता जाहला ।' -ज्ञा ११.७०४.

दाते शब्दकोश

सारंगा

सारंगा sāraṅgā a (सारंग S) Dark-bay. A color of horses.

मोल्सवर्थ शब्दकोश

संगरग

पु. (गो.) समुद्रांतून प्रवास करणारा. [सारंग ?]

दाते शब्दकोश