आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
सार
पु.न. १ सत्त्व; तथ्यांश. २ साय; नवनीत; रस; अर्क. ३ तत्त्वांश; तात्पर्य. 'तेंही अति आदरें मानुनी । सार निव- डूनी घेतसे ।' ४ सत्य. 'जरि केवळ सोडिला अहंकार । तरि होय शीघ्र सर्व व्यवहारोच्छेद हें नव्हे सार ।' -मोशांति ३.५२. ५ बल; शक्ति. ६ एक अलंकार. एखाद्या वस्तूचा उत्कर्ष किंवा अप- कर्ष चढत्या किंवा उतरतया पायर्यांनीं झाला आहे असें वर्णन असल्या हा अलंकार होतो. उदा॰ 'वाहे महीतें स्वशिरीं फणीन्द्र तो । पाठीवरी कूर्म तयास वाहतो । त्यालाहि घे सागर मांडियेवरी । थोराचिये थोरिव जाण यापरी ।' -वामन. -वि. १ श्रेष्ठ; प्रधान; मुख्य. 'अमृतरसाहूनि हे कथा सार ।' -मोकर्ण २३.१. २ उत्कृष्ट; अतिशुद्ध. 'सार हिर्याला गार म्हणति सोनार देत पावली.' -राल ११०. ३ शाश्वत; नित्य. 'सार म्हणिजे शाश्वत । जयास होईल कल्पांत । तें सार नव्हे ।' -दा १४.९. ५. [सं.] ॰वत्ता-स्त्री. श्रेष्ठता; योग्यता. 'आमच्या देशी भाषेचा विस्तार व तिची सारवत्ता.' -भागवत-देशीभाषा ३. ॰वान्- वि. तथ्य, सार असलेला; सरस; भरींव. सारासार-पु. सत्या. सत्य; नित्यानित्य; श्रेष्ठनिष्ठ; तथ्यातथ्य; चांगलेंवाईट. इ॰. 'जे नेणती परदोषगुण । सदा सारासार विचारण ।' [सार + असार] सारासारविचार-पु. सार किती व कोणतें तसेंच असार कोणतें याविषयीं विचार; चांगल्यावाईटाचें तारतम्य दान. -दा १३.१.३१.
न. चिंच, अमसूल इ॰ अंबट पदार्थ पाण्यांत कोळून त्याला हिंग, मसाला इ॰ लावून करतात तें कालवण; एक प्रका- रचें अंबट वरण. 'वडे नसती वावडे, सार आवडे ।' -अमृ ३५. [द्रा. साऊ; सं. सार]
सार sāra n A dilute mixture of tamarinds, mango-steins, and similar fruits squeezed in any pulse-decoction or in water, with salt, assafœtida &c. 2 The ring or band or rope by which the yard (of boats and small sailing vessels) is secured to the mast. 3 A term for सोंकट्या in enumerating the objects upon which money is lavished; viz. टार, गार, नार, सार. See टार &c.
हिंदी अर्थ : वाला, पूर्ण, स्थान मराठी अर्थ : समान, पूर्ण, स्थान उदाहरण : खाक सार, कोह सार
स्त्री. (व.) सुरुंगाची दारू भरण्यासाठीं केलेलें छिद्र, खांच, पोकळी. 'सार करून ती विहीर फोडली.'
क्रिवि. (व.) बिदा; पोंचती; पावती. (क्रि॰ करणें). 'बहिण सार केली । मांग परतले लोक । भाऊ जागचा हालेना । भावाला बहिण एक ।।' -वलो ५०. [सरणें]
सार sāra f Commonly साईर.
सार m n Essence; sap. n A dilute mixture of tamarinds, &c.
पु. कलंक; काळिसा.? 'तूं रावाचा धर्मंपुत्र । सुमती नामें महापवित्र । तुवां फेडावा सार । आमुचें मुखींचा ।' -कथा ३.१२.३९. [सारा?]
सार sāra m n (S) Essence, substance, the essential or vital part (of a thing generally); sap, pith, marrow, cream, spirit, lit. fig.
(सं) न० तत्व, अर्क, तात्पर्य. २ एक प्रकारची कढी, आम्लपदार्थविशेष. ३ अर्थालंकारविशेष.
पु. गाभा; झाड. नार (झाडाचा).
न. सोंगट्या, द्यूत याअर्थी टार, गार, नार (धोडा, जवाहीर, स्त्री) या शब्दांबरोबर वापरतात. या गोष्टींवर पैसा उधळला जातो. टार पहा.
स्त्री. साईर पहा.
(प्रत्य.) हिंदी अर्थ : वाला, समान,. मराठी अर्थ : पूर्ण असणारा, सारखा, पूर्ण.
(पु.) हिंदी अर्थ : अूँट. मराठी अर्थ : अुंट.
शार
न. शहर (अप.) 'आली शार पुण्याला शोभा दाटली पागा मिळेना जागा पुण्याभोवतेला ।' -ऐपो ४३२.
वि. घनदाट; गहन; दृढ. काळा शब्दाबरोबर प्रयोग, हिरवागार प्रमाणें. 'वावरांत काळ्या शार । मोठी हरणी निजून । पारध्या दादा धांव । टाक जाळे रे शेजून ।' -वलो ५२.
पु. (व.) शेराचें झाड; हुरा. 'शाराचें कुंपण आवा- राला आहे !'
न. (व. खा.) भोंक पाडण्याचें हत्यार; सामता. शारणें-क्रि. लांकडांस भोंक पाडणें. शारी-स्त्री. १ छोटा लहान सामता.
गर; मगज; दळ; गाभा; सार. पहा : गर
गीर पु.
का(कां)सार
पु. १ एक जात व तींतील व्यक्ति; पितळ, तांबें, कांसें वगैरेंचीं भांडीं घडविणारा व विकणारा. 'चार शेर तांब्याला कां भ्याला म्हणे कासार देत आधेली ।' ऐपो ३७२. ॰डा-पु. कासारास निंदार्थानें म्हणतात. ॰थळ-न. बांगडी- वाले, भांडीवाले कासार आणि पटवेकरी यांच्या वरील कर. ॰भट्टी-स्त्री. बांगडीवाले, भांडीवाले यांच्या भट्टीवरील सर- कारी कर. ॰भांडें-न. (व.) तांब्यापितळेचें भांडे. ॰भात-पु. (राजा.) जाडेभरडे व अर्धवट सडिक अशा तांदुळांचा, फडफ- डीत शिजलेला भात. [सं. कांस्यकार-कांसआर]
नमक सार
(पु.) हिंदी अर्थ : जहाँ नमक वनता हो वह स्थान. मराठी अर्थ : आश्रित, मिठागार.
शआर
(पु.) हिंदी अर्थ : रंगढंग, आदत. मराठी अर्थ : पद्धत, संवय.
सार बान
हिंदी अर्थ : अूँट हाँकनेवाला. मराठी अर्थ : अुंट हाकणारा, अुंटाड्या.
सार करणें
क्रि. (व.) बोळवण, पाठवणी करणें
सर शार
(वि.) हिंदी अर्थ : लबालब. मराठी अर्थ : काठोकांठ.
संबंधित शब्द
तत्त्व
न. १ सत्य; वास्तविक स्वरूप; वस्तुस्थिति. 'असे हा कोणाचा कवण मजला तत्त्व न कळें ।' -सारुह ७.८२. 'जाणें त्या जिष्णुलाहिं तत्त्वानें ।' -मोकर्ण २७.१८. २ (ल.) प्रत्यक्ष अस्तित्व; उलट अर्थीं माया. ३ (वेदांत). ब्रम्ह; तेंचपण; जीवपण; विश्वाला चेतना देणार्या परमात्मरूपाशीं एकरूप असलेलें जीवात्म्याचें स्वरूप. 'तैसें विचारितां निरसलें । तें प्रपंचु सहजें सांडवलें । मग तत्त्वता तत्त्व उरलें । ज्ञानियासी ।' -ज्ञा २.१३१. ४ पंचमहाभूतें, पंचविषय, दशेंद्रियें, मन, अहंकार, महत्तत्त्व, माया, ईश्वर यांना सामान्य संज्ञा. यांपैकीं प्रत्येकाला म्हणतात. ५ (शब्दश: व लक्षणेनें) (एखाद्या पदार्थांतील) उत्कृष्ट अंश; सत्त्व; सार; मगज. ६ सारांश; तात्पर्य; सार. ७ (रसा.) मूलद्रव्य, धातु. (इं.) एलेमेंट्. [सं. तत् = तो + त्व = भाववाचक नामाचा प्रत्यय] सामा- शब्द- ॰ग्रह-पु. १ सत्य, यथार्थ स्वरूपाचा बोध होणें. २ सार, मुख्यांश ग्रहण करणें; [तत्त्व + ग्रह = घेणें] ॰चिंता-स्त्री. ब्रह्माचिंतन; वेदांत. 'क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादें ।' -राम ५२. [तत्त्व + चिंता = विचार, मनन] ॰त:, तत्त्वता-तां-क्रिवि. खरोखर; वास्त- विक पहातां; नि:संशय; वस्तुत: 'समस्त देव माता पिता । गुरुचि असे तत्वता ।' -गुच २.२३८. [तत्त्व + तस् प्रत्यय] ॰निरसन- न. (अक्षरश: व ल.) (एखाद्या वस्तूंतील, गोष्टींतील) सार काढून घेणें; तत्त्वग्रह. [तत्व + निरसन] ॰निष्ठ-वि. १ ब्रह्मनिष्ट. 'कीं तत्त्वनिष्ठु जैसा । नागवे भ्रांतिलेशा ।' -ज्ञा ३.१२४. २ तत्त्वाला न सोडणारा; सत्यनिष्ठ. ३ विशिष्ठ तत्त्वाप्रमाणें चालणारा; ध्येय- वादी. [तत्त्व + निष्टा] ॰मीलन-न. मूलतत्त्वांचा मिलाफ, संमिश्रण. [तत्त्व + मीलन = एकत्र येणें] ॰वर्तक-वि. (एखाद्या) तत्त्वाचा पुरस्कार करणारा; तत्त्व काढणारा, सांगणारा. 'कोणतीहि सुधारणा करणें ती तत्त्ववर्तकांनीं आधीं केलीं पाहिजे.' -टि ४.१०२. [तत्व + वर्तक = निष्ठावचन] ॰वाद-पु. १ ईश्वराच्या अस्तित्वा- विषयीं वाद; ब्रह्म सत्य कीं माया सत्य वगैरे संबंधींचा वाद. २ तत्त्वाचा, तत्त्वासंबंधीं वाद. [तत्त्व + वाद] ॰वादी- वि. तत्त्ववाद करणारा. ॰ज्ञान-विद्या-नस्त्री. १ परमात्मस्वरूपाचें ज्ञान; ब्रह्मज्ञान; यथार्थज्ञान; वेदांत. एक शास्त्र. (इं.) फिलॉसॉफी. २ एखाद्या विषयाच्या सामान्य तत्त्वांचा अभ्यास. ॰ज्ञानी-ज्ञ-वि. १ ब्रह्मस्वरूपाचें ज्यास ज्ञान झालें आहे तो. २ तत्त्वज्ञान शास्त्राचा अभ्यासी; त्या शास्त्रांतील तज्ज्ञ. तत्त्वार्थ-पु. १ सारभूत अंश; सत्त्व; सार; मगज; गाभा. २ सत्य; खरेपणा; सत्य अस्तित्वानें युक्त अशी वस्तु; खरें अस्तित्व. ३ ब्रह्म; ब्रह्मरूप घन. 'आंतु बाहेरि चोखाळु । सूर्य तैसा निर्मळु । तत्त्वार्थाचा पायाळु । देखणा जो ।' ज्ञा १२.१७९. [तत्त्व + अर्थ = सार; धन]
(सं) न० सत्य. २ सत्व, अर्क, सार. ३ पदार्थ, द्रव्य.
सत्त्व
न. १ प्रत्येक वस्तुजातांत असलेल्या तीन गुण किंवा धर्म यांपैकीं (सत्त्व, रज, तम) पहिला. हा सर्व सद्गुणांचा द्योतक आहे. 'सत्त्वाथिलियां आंतु । सत्त्व मी म्हणे अनंतु ।' ज्ञा. १०.२८७. २ अस्तित्व; स्थिति; भाव; अर्थत्व. ३ पदार्थ; वस्तु; द्रव्य (ज्याविषयीं कांहीं गुणधर्मांचें विधान करतां येईल असें द्रव्य, वस्तु). ४ कस; सार; अर्क; सारभूत अंश; तत्त्वांश. 'नराच्या ठायीं नरत्व । जें अहंभाविये सत्त्व ।' ज्ञा ७.३५. 'गुळवेलीचें सत्त्व'. ५ बल; तेज; अभिमान; शक्ति; तत्त्व; जीवंतपणा; पाणी. 'दिसतें सत्त्व असें कीं पडतां न चळेल हेमनगहि वर ।' -मोवन ४.२६०. ६ स्वभाव; स्वभाविक गुण- धर्म. 'सत्त्व टाकिती भाग्यवंत सकळ । चोर पुष्कळ सूटले ।' -ह २९.३२. ७ खरेपणा; सद्गुण; थोरपणा. 'आलिया अतितां म्हणतसां पुढें । आपलें रोकडें सत्त्व जाय ।' -तुगा १२४८. 'याचें स्थिर असो सदा सत्त्व ।' -मोसभा. ६.४२. [सं.अस्]सत्त्व घेणें-पाहणेंकसून परीक्षा घेणें; प्रचीति घेणें; एखाद्याचा बाणा किंवा अभिमान किती टिकतो याची परीक्षा पाहणें. सत्त्व सोडणें-बल, कस, जोर, भरीवपणा, स्वाभाविक गुणधर्म नाहींसे होणें (जमीन, औषध, मंत्र, देव, मूर्ति वगैरे संबंधीं योजतात). सत्त्वास जागणें-सत्त्व राखणें; अडचणीच्या प्रसंर्गींहि आपला मूळ स्वभाव, सद्गुण, अभिमान, नीतिधैर्य, वर्तन यांपासून न ढळणें. 'सत्परिचयेंच जडही समयीं सत्त्वास जागलें हो तें ।' -मो. ॰गुण-पु. पदार्थमात्रांतील तीन गुणांपैकीं पहिला गुण. 'शुद्ध नेणीव तमोगुण । शुद्ध जाणीव सत्त्व गुण ।' -दा २०.३.७. ॰गुणी-वि. सत्त्वगुण ज्यांत विशेष आहे असा.॰धीर-वि. सत्य, इमान, औदार्य,पातिव्रत्य इत्यादि सद्गुण निश्चयानें राख णारा; सत्त्व कधींहि न सोडणारा; सद्गुणी; धैर्यशील; दृढनिश्चयी. ॰निष्ठ-वि. सत्त्व न सोडणारा; सद्गुणी; सचोटीचा; प्रमाणिक वगैरे. ॰पर-वि. सत्त्वास जागणारे. 'जे जे असा सत्त्वपर ।' -उषा ६२. ॰मूर्ति-स्त्री. सत्त्वशील; सत्त्वनिष्ठ, सद्गुणी; प्रामाणिक असा मनुष्य. ॰रक्षण-न. सद्गुण, सत्य, मान, इत्यादि गुणांचें परिपालन; अडचणींतहि सत्त्व न सोडणें. ॰वान- वंत-वि. सत्त्वगुणी; बल, धैर्य, कस, सार, तत्त्व असलेला. ॰शील-सीळ-वि. १ सद्गुणी; प्रामाणिक; नीतिनियमानें वागणारा, सत्प्रवृत्त. 'पवित्र आणि सत्त्वसीळ ।' -दा १.८.१९. २ ज्यांतील कस, किंवा गुणधर्म दिर्घ कालपर्यंत टिकतात असा (पदार्थ, वस्तु). ॰शुद्ध-वि. शुद्ध केलेलें; आंतील निकस भाग काढून सतेज केलेलें (औषध वगैरे). ॰शुद्धि -शोधन-स्त्रीन. औषधी, अथवा वनस्पती वगैरेंची विशुद्धि, स्वच्छ करणें; निकस भाग काढून टाकून सतेज करणें. 'तैसी ते सत्त्वशुद्धि । आगळी ज्ञानेंसी वृद्धि ।' -ज्ञा १४.२२२. २ अंतःकरणशुद्धि. 'आतां सत्त्व शुद्धि म्हणिजे । ते ऐशा चिन्हीं जाणिजे । तरी जळे ना विझे । राखोडीं जैसी ।' -ज्ञा १६.७४. ॰संपन्न-वि. सद्गुणी; सद्वर्तनी; बलयुक्त; सत्त्वांशानें परिपूर्ण. ॰स्थ-वि. १ सद्गुणी; नीतिमान्; सदाचारसंपन्न. २ पथ्यकर; पुष्टीकारक; हितकर; शक्तिवर्धक (अन्न,पदार्थ वगैरे) ॰हरण-न. (शब्दशःव ल.) सदगुण, उत्कृष्टपणा, शील, कीर्ति, मान वगैरेची नागवणूक, हिरावून घेणें; त्याचा त्याग करणें; सदाचाराविषयीं लौकिकाची हानि. ॰हानि- स्त्री. (शब्दः व ल.) सद्गुण, सत्यनिष्ठा, निष्कर्ष, सार वगैरेचा नाश. ॰हीन-वि. निकृष्ट; निकस; गुण,तेज, बल रहित; निःसत्त्व; तेजोहीन; तत्त्वभ्रष्ट. 'सत्त्वहीन मी बहुतापरी । बुद्धि अघोर असे, माझी ।' ॰क्ष(क्षे)मु-वि. सत्त्वगुणसंपन्न. 'देहीं सत्त्वक्षेमु । आरु जैसा । '-भाए ३३५. सत्त्वागळा- वि सत्त्विक; 'सत्त्वधीर सत्त्वागळी ।' दा १.८.२२ सत्त्वाथिला-वि. सत्त्वस्थ; सद्गुणी; सत्त्वगुणयुक्त; सात्त्विक. 'सत्त्वाथिलिया आंतु । सत्त्व मी म्हणे अनंतु ।' -ज्ञा १०.२८७. 'सत्त्वथिला शिबिनृपाळा ।' -आशिबि ६६.४. 'त्यागुणें विष्णुभक्त सत्त्वा- थिला' -ह ३४.१०. सत्त्वान्न-न. पथ्यकर व पौष्टिक खाद्य. सत्त्वापत्ति-स्त्री. ज्ञानी जीवाच्या सप्तभूमिकांतील चौथी भूमिका. -हंको. सत्त्वाशुंठी-स्त्री. १ निरनिराळीं औषधी द्रव्यें घेऊन तयार केलेली एक प्रकारची सुंठ. २ आंतील सर्व कस कायम राहील अशा प्रकारें आल्याची बनविलेली सुंठ. ३ ज्यास नेहमीं औषधें द्यावीं लागतात असें रोगट मूल (विशेषणाप्रमाणें उपयोग). सत्त्वाश्रित-वि. सुद्गुणी व सचोटीचा; प्रामाणिक; विश्वासु; नीतिमान; शुद्ध वर्तनाचा. सत्त्वाची चांगुणा-स्त्री. साध्वी, सद्गुणी स्त्री. [श्रियाळस्त्री चांगुणा या विशेषनामावरून] सत्त्वाची सावित्री-स्त्री. पतिव्रता व सद्गुणी स्त्री. [सावित्री या प्रसिद्ध पतिव्रता स्त्रीवरून]
अर्क
पु. १ संत्त्वांश; तत्वांश (औषधादिकांचा); रस; मद्य; सार; कस; निष्कर्ष; काढा. २ गड्डा; गाभा; गाळींव सार. (ल.) अट्टल सोदा; चोर; लबाड. 'हा लबाडाचा अर्क; चोराचा अर्क.' तुल॰ इं. आर्च. [सं. अर्क; अर. अरक् = रस; सत्त्वांश]
(सं) पु० सूर्य. २ रुईचें झाड. ३ तात्पर्य. ४ तेजाब, सार.
अर्क
पु. १. सत्त्वांश; तत्त्वांश (औषधादिकांचा); रस; मद्य; सार; कस; निष्कर्ष; काढा. २. गड्डा; गाभा; गाळीव सार. ३. (ल.) अट्टल सोदा; चोर; लबाड. [सं.]
काळीशार
वि. काळीभोर; काळीकुट्ट. ‘बाज़री काळी- शार दिसते.’ [काळें + शार]
नवनीत
न. १ लोणी; ताजें लोणी. -ज्ञा १.५१. 'घरा- मधें अर्भकरूप रंगे । पदोपदीं जो नवनीत मागे ।' -सारुह १. ६१. 'मंथनेंवीण जरी निवडे नवनीत । तरी सद्गुरुवांचोनि पर- मार्थ । ठायीं न पडे जीवांसी ।' रवि १.४३. २ सार; सार बहुत अंश. [सं.] ॰नीटवत्-वि. लोण्यासारखा (मऊ, गुळ- गुळीत). विशेषतः स्तनांना उद्देशून प्रयोग. -क्रिवि. लोण्या- प्रमाणें. [सं. नवनीत + सं. वत् प्रत्यय = प्रमाणें, सारखा]
साय
स्त्री. १ दुधावरची मलई; दूध तापविलें असतां वर येणारा स्नेहयुक्त पापुद्रा. 'ऐसें काय म्हणेल साय न लगे, लोणीच दे खावया ।' -मोकृष्ण २६९. २ उकळून घट्ट होणार्या उसाच्या रसावरचा वगैरे सायीसारखा पदार्थ, मळी. ३ नदींतील गाळ; खळमळ; साका. ४ सार; सत्त्वांश. ५ तात्पर्य; सारांश. [सं. सार?] सायटी-टें-स्त्री.न. १ पाक दूध, दहीं इ॰ वर येणारी पातळसर साय. २ गुळावरचा साका, मळी. [साय अल्प. रूप]
साय sāya f (सार S) Cream. Applied also to the rich and creamlike skimmings of sugarcane-juice under inspissation by boiling.
तत्त्वमसि
स्त्री. १ (तूं ब्रह्मच आहेस) सर्व वेदांताचें सार या चार अक्षरांच्या एक वाक्यांत आहे. यावरून २ (ल.) जगां- तील सर्व व्यवहारांचा आदिकारण जो पैसा तो; सार; मूल्यवान वस्तु. (सामा.) द्रव्य. [तत् = तें + त्वभ् = तूं + असि = आहेस]
वेद
पुअव. १ भारतीयांचे पवित्र आद्य धर्मग्रंथ; श्रुति; जगां- तील अत्यंत प्राचीन वाङ्मय. वेद चार आहेत. ऋग्वेद, यजुर्वेंद, सामवेद व अथर्ववेद. यांतील मूळचे तीन हे मुख्य वेद होत आणि इतिहास व पुराणें यांना पांचवा वेद म्हणण्यांत येतें'. २ ज्ञान. ३ (महारांत) मंगलाष्टकें. -बदलापूर १६९. -वि. चार ही संख्या. 'दोन अक्षौहिणी पांडवदळ । वेदइक्षौहिणी हें त्याचें बळ ।' -जै ८३.२७. [सं. वेद; विद्-जाणणें] एखाद्याचे वेद हरणें-सर्व युक्त्त्या, बेत इ॰ फसून कर्तव्यमूढ होणें; कांहीं एक मार्ग न सुचणें; तंत्रमंत्र हरणें. ॰त्रय-न. ऋग्वेद, यजु- र्वेद व सामवेद. -ज्ञा ७.८४. ॰त्रयी-स्त्री. १ धर्म, अर्थ व काम ह्यांचा समुच्यय. २ संहिता, ब्राह्मण व आरण्यकें मिळून होणारे ग्रंथ. ३ ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद हे तीन वेद. ॰निंदक-पु. वेदांची निंदा करणारा; बौद्ध, जैन इ॰ अन्य धर्मीय मनुष्य. ॰पद्यन. वेदवाक्य; वेदांतील ऋचा. 'घुमघुमिती घोषा । वेदपद्यांचा ।' -ज्ञा १५.१८८. ॰पुरुष-पु. वेदरूपी पुरुष; वेद. 'वेदपुरुष तरि नेती कां वचन । निवडूनि भिन्न दाख- विलें ।' -तुगा १६५३. ॰प्रतिपाद्य-वि. वेदाच्या प्रतिपाद- नाचा असणारा (विषय). 'ॐ नमो जी आद्या । वेदप्रति- पाद्या ।' -ज्ञा १.१ ॰मुख-वि. वेद तोंडपाठ येत असलेला; चांगले वेदपठण केलेला. ॰मूर्ति-स्त्री. (मूर्तिमंत वेद) वेदविद्या- संपन्न, विद्वान् भिक्षुक, शास्त्री इ॰ च्या नांवामागें लावण्याची सन्मानदर्शक पदवी. ॰रक्षण-न. वेदांचा प्रतिपाळ. हा ब्राह्मणांचा आचार मानला आहे. ॰लोक-कु-पु. वेद आणि जग किंवा वेद हेंच जग; श्रुतिशास्त्र. 'तो गा मी निरुपाधिक । क्षराक्षरोत्तमु एकु । म्हणोनि म्हणे वेदलोकु । पुरुषोत्तमु ।' -ज्ञा १५.५५७. ॰वती-स्त्री. पृथ्वी; वेद (अन्न) युक्त पृथ्वी. 'जयाचेनि सौरभ्ये जीवित जोडे । वेदवतीये ।' -ज्ञा ११.२२४. ॰वाक्य-न. १ वेदश्रुतिसंहिता; वेदांतील वचन. 'वेदवाक्यांतून आगगाडी, तारा- यंत्र काढण्याचा प्रयत्न जितका असमंजस...' -टिले ४.५२. २ ज्याच्या प्रामाण्याला निराळा आधार लागत नाहीं असें वेदांतील वाक्य. ३ (ल.) प्रमाण वचन. ॰वादरत-वि. वेदांतील अर्थ- वादांमध्यें मग्न असलेला. 'म्हणोनि हे पार्था । दुर्बुद्धि देख सर्वथा । तयां वेदवादरतां । मनीं वसे ।' -ज्ञा २.२५५. ॰विद्-वि. वेद जाणणारा; विद्वान्. -ज्ञा ८१०३. [सं.] ॰शास्त्रसंपन्न-वि. वेदमूर्ति. शास्त्रपुराणादि जाणणार्या प्रतिष्ठित ब्राह्मणाच्या नावापूर्वी कागदोपत्रीं लिहावयाची पदवी. याचा संक्षेप वे॰ शा॰ सं॰ असा करतात. ॰सार-नपु. वेदांचें सार किंवा रहस्य; वेदांचें सार असलेली देवता. 'जयजय जगद्वंद्या वेदसारा ।' वेदांगें-नअव. वेदानुषंगी शास्त्र; वेदांचाच भाग म्हणून गणलेलें शास्त्र; उपवेद. हीं अंगें सहा आहेत. शिक्षा, कल्प, व्याकरण, छंद, ज्योतिष व निरुक्त. षडंगें पहा. [वेद + अंग] वेदांत-पु. (वेदांच्या अंतीं असलेला) वेदांचें सार. १ ब्रह्मज्ञान सांगणारा वेदानंतरचा भाग; उपनिषदें; उत्तरमीमांसा; षड्दर्शनांतील सहावें दर्शन; उपनिषदां- तील तत्तवज्ञान. 'वेदांतु तो महारसु । मीदकु भिरवे ।' -ज्ञा १.११. -एभा १७.४०. २ प्रपंचाचें ऐहिक सुखदुःखांचें मिथ्यात्व आणि ब्रह्माचें सत्यत्व प्रतिपादिणारी साधुसंत, हरिदास इ॰ सांगतात ती गोष्ट; उपदेश; ब्रह्मज्ञान. ३ ब्रह्म हेंच सत्य आहे; बाकी जगःनिथ्या आहे असें सांगून ईश्वराच्या सच्चिदानंद स्वरूपाचें निरूपण कर- णारें मत; जीवात्मा आणि परमात्मा यांचे ऐक्य दाखविणारे अद्वैतमत. वेदांताचे द्वैत, अद्वैत व विशिष्टद्वैत असे मुख्य तीन पंथ आहेत. [वेद + अंत] वेदांती-वि. १ उपनिषदांतील ब्रह्मज्ञान अभ्यासणारा किंवा त्याप्रमाणें वागणारा; ब्रह्मज्ञानी; वेदांतमताचा. २ ज्ञानमार्गी; ज्ञानकांडप्रतिपादक. याच्या उलट पादांती. -गीर २८७. म्ह॰ वेदांत्यापेक्षां धादांती बरा. वेदाध्ययन-न. वेद पठण; वेद शिकणें. पंचमहायज्ञांतील एक यज्ञ. -गीर २८८. [वेद + अध्ययन] वेदाभ्यास-पु. १ वेदांचें अध्ययन; वेदपठन. २ ॐ काराचा जप. [वेह + अभ्यास] वेदाज्ञा-स्त्री. वेदानें सांगितलेलें कर्तव्य; वेदाची आज्ञा; वेदवचन. [वेद + आज्ञा] वेदोक्त-वि. १ वेदांत कर्तव्य म्हणून सांगितलेलें. २ वेदमंत्रोच्चारपूर्वक. ३ (ल.) वेदमंत्रोच्चारपूर्वक करावयाचा (धर्मविधि). याच्या उलट पुराणोक्त. 'बगंभट, तुला काय काय वेदोक्त करतां येतें ?' -तोबं ६१. वेदोक्तकर्म-न. वेदोक्त; वेदोक्त मंत्रानें करावयाचा गृह्यसंस्कार. जुन्या शास्त्रांप्रमाणें हा अधिकार फक्त त्रैवर्णिकांना असे. 'अली- कडे इंग्रजीविद्येनें व पाश्चिमाच्य शिक्षणानें संस्कृत झालेल्या मराठे मंडळीच्या मनांत जीं कांहीं खुळें शिरलीं आहेत त्यांपैकींच वदो- क्तकर्माचें खूळ एक होय.' -टिले ४.३१६. वेदोदित-वि. वेदोक्त पहा. [वेद + उदित] वेदोनारायण-पु १ वेदस्वरूपी परमेश्वर. वेदविद्यासंपन्न ब्राह्मणाला सन्मानद्योतक लावावयाची पदवी. [सं.]
अईन
स्त्री. १ चांगली कुळी-चाल-वर्तणूक. 'हा अ॰ चा गृहस्थ'; 'हा अ॰ नें चालतो'; 'याची मोठी अ॰ आहे'. म्ह. १ अ॰ ला मरावें, खरवडीला झुरावें (जेवणाचें आमंत्रण एटीनें नाका- रावयाचें परंतु त्यांतील शिळ्या तुकड्यांसाठीं हपापावयाचें). २ अ॰ रावणाची व आस लेंडुकाची (रावणाप्रमाणें ऐट पण आकांक्षा भिकाऱ्याची). [फा. आयीन = सार; सत्त्व.].२ ऐन पहा.
अित्र
(पु.) हिंदी अर्थ : फूलोंकी सुगंधीका सार. मराठी अर्थ : पुष्पसार, अत्तर.
अनुसार
अनुसार anusāra a (S) Like or according to; agreeable or conformable with. In comp. Ex. श्रमानुसार- लाभ, पापानुसारक्लेश, आज्ञानुसार, कालानुसार, सा- मर्थ्यानुसार, योग्यतानुसार, समयानुसार, दैवानुसार, कर्मानुसार, प्रारब्धानुसार, प्रसंगानुसार. Additionally to the above, a multitude of lax or popular compounds occur; as कामानसार (Ex. कामानसार मा- णसाची गरज लागती or का0 खर्चवेच करावा), काळा- नसार, देशानसार, दिवसानसार, आचारानसार (as आ0 फळप्राप्ति), अर्थानसार, स्वभावानसार, छंदानसार, अन्नानसार (Pr. अ0 बुद्धि We learn to imitate him whose bread we eat), भक्तिनसार, बुद्धिनसार, वृत्तिन- सार (After the manner, mood, or disposition of), मर्जिनसार and others. For all let the principle of the formation be studied here.
आंब
स्त्री. १. हरभऱ्याला घाटा येण्यापूर्वी त्या रोपांवर संध्याकाळच्या वेळी एक फडके पसरून ठेवतात. सकाळी दवाने ते भिजते व त्यामध्ये हरभऱ्याचे आम्ल शोषून घेतले जाते. हे फडके पिळून जो द्रव मिळतो तीच आंब होय. ही पोटदुखी, मोडशी आणि पटकी यावर देतात. २. लांबट फळे येणारी आंब्याची एक जात. ३. आंबण्याचा धर्म, शक्ती. ४. आंबटपणा; आंबट पदार्थ (चिंच इ.)(गो.); आंबोण; आम्लरस : ‘जाणपणे न पिएति आंब ।’ − शिव ८४. ५. साधे आंबट वरण; सार; चिंचवणी; कढी. [सं. अम्ल] (वा.) आंब ओरपणे – १. दळ, मगज, गीर, काढून घेणे. २. (ल.) एखाद्या पदार्थातील सत्त्वांश काढून घेणे; चांगले तेवढे घेणे. (गो.) आंब रंगात घालणे– (चर्मकारी) बाभळीची साल व हिरडा यांचा रंग रापून थोडा हिणकस झाल्यानंतर त्यात चामडे ठेवणे. आंब पिणे– मूग गिळून बसणे; मौन धरणे : ‘जाणिवा आंब न पिया : तरि हे (चक्रधरस्वामी) काइ होए ऐसें तुम्हीचि विचारा पां’ − लीचउ ५३६.
आंब
स्त्री. १ हरभर्याच्या झाडावर घाटा येण्यापूर्वीं संध्या- काळच्या वेळीं हरभर्याच्या ढाळ्यांवर फडकें पसरून जें अम्ल दवाबरोबर उत्पन्न होतें तें फडकें पिळून काढतात ती. ही पोट- दुखी, मोडशी आणि पटकी यांवर देतात. २ लांबट फळ येणार्या आंब्याची एक जात. ३ आंबण्याचा धर्म, शक्ति (ही शक्ति हवा आणि उष्णता यांत जात्याच असतें). 'थंडीच्या दिवसांत आंब कमी म्हणून दहीं फार आंबत नाहीं.' ४ आंबटपणा. (गो.) आंबटपदार्थ (चिंच इ॰); आंबोण; अम्लरस. 'जाणपणें न पिएति आंब ।' -शिशु ८४. ५ (गो.) मासळी नसलेली कांद्याची आमटी; साधें आंबट वरण , सार. [सं. अम्ल] ॰ओर- पणें-(गो.) १ दळ, मगज, गीर काढून घेणें. २ (ल.) एखाद्या पदार्थांतील सत्त्वांश काढून घेणें; चांगलें तेवढें घेणें. आंब रंगांत घालणें-(चांभारी) बाभळीची साल व हिरडा यांचा रंग रापून थोडा हिणकस झाल्यानंतर त्यांत चामडें ठेवणें.
अंबवणी
न. १ हिरवा आंबा भाजून पाण्यांत कालवून आंत गूळ किंवा साखर घालून केलेलें सार किंवा पन्हें. [सं. आम्र + वन]
अंबवणी
न. १. कैरी भाजून पाण्यात कालवून आत गूळ किंवा साखर घालून केलेले सार किंवा पन्हे.
अंतर्गर्भ
पु. १. आतला भाग; गाभा; गर; मगज; दळ; सार. २. (ल.) गर्भितार्थ; आतील हेतू; गूढार्थ. [सं.]
अंतर्गर्भ
पु. १ आंतला भाग; गाभा; गर; मगज; दळ; सार. [सं.] २ (ल.) गर्भितार्थ; आंतील हेतु; गूढार्थ.
अश्आर
माहिती. –मुधो [अर. श्आर अव.]
असार
वि. १. निःसत्त्व; सारहीन; शुष्क. २. खोटे; मिथ्या; निकामी; पोकळ : ‘असार म्हणिजे नाशिवंत । सार म्हणिजे ते शाश्वत ।’ – दास १४·९·५. [सं.]
असार
वि. १ निःसत्व; सारहीन. २ खोटें; मिथ्या; निकामी; पोकळ. 'असार जीवित.' 'येथें एक वर्म पाहिजे धीर । परि म्या लेखिलें असार ।' -तुगा ७११. 'असार म्हणिजे नासिवंत । सार म्हणिजे तें शाश्वत' -दा १४.९.५. [सं.]
अश्मसार
पु. १ लोखंड; लोह. २ हिरा. [सं. अश्मन् + सार]
आशय
पु. १. उद्देश; हेतू; अभिप्राय; मनीषा. २. ठिकाण; स्थान; आगर; साठा. सामा. शब्द− अन्नाशय, जलाशय, मूत्राशय इ. ‘अमुच्या अशुभाशयाचा धातु । करिता चरणधूमकेतू ।’− एभा ६·१११. ३. सार; तात्पर्य; गाभा. ४. शयनस्थान. ५. उदर; पोट; कोठा. ६. आतील भाग, पोकळी. ७. संस्कार; वासना. ८. (भाषा.) मानवी अनुभव, आचारविचार, संस्कृती, भौतिक जग इत्यादींबद्दलचा भाषिक घटकांतून व्यक्त झालेला अर्थ. ९. एखाद्या कलाकृतीची शैली व बाह्यरूप वगळून असलेला भाग; कलाकृतीची अन्वर्थकता; कलाकृतीची विषयवस्तू; गाभा. [सं.]
अटपाअटप
स्त्री. अवराअवर; विल्हेवाट; निरवानिरव; वारा- सार; विसकटलेल्या वस्तूंची जमवाजमव. [अटप द्वि.]
आवाका
पु. १. शक्ती; सामर्थ्य; आकारमान; अवसान; धैर्य; उमेद : ‘बहुतीं मांडिले आवांके । वीरश्री म्लानमुखें । म्हणती पातलों कौतुकें । महोत्साह पहावया ।’ − मुआदि ४१·४८. २. विचार; सारासार विचार; मर्यादा; रीत : ‘अहो जी आइका । तुमतें नाहीं कृपेचा आवांका । तरि येथें बीज करोनि कां । मातें चुकविले. ।’ − ऋ ३२. ३. अभिमान : ‘मी एक चतुर बोलका । हाही नुठी त्या आवांका । बोल बोलूं नेणें फिका । बोलोनीं नेटका अबोलपणा ।’ − एभा २८·४४९. ४. सार; अभिप्राय; गोळाबेरीज : ‘तया अर्थजातां अशेषां । केला तात्पर्याचा आवांका । तो हा आठरावा देखा । कलशाध्यायो ।’ − ज्ञा १८·१४५५. ५. आटोका; कबजा : ‘तेथ एरादळांचा आवांका । कवणुकरी ।’ − शिव ९०७. ६. अंदाज; तर्क : ‘तैसा धरूनि आवांका । म्हणे स्वर्गु जोडेल असिका ।’ − ज्ञा १७·१८७. ७. सवड; फुरसत : ‘काल कांहीं त्यास आवाका जाहला नाहीं.’ − ऐलेसं ६९. ८. (ग.) चलाचे मूल्य ज्या मर्यादेत कोणतेही असते, ते मर्यादित अंतर.
आवांका
अवांका पहा. १ शक्ति; सामर्थ्य; आकारमान; अवसान; धैर्य; उमेद. 'बहुतीं मांडिलें आवकि । वीरश्रीम्लान- मुखें । म्हणती पातलों कौतुकें । महोत्साह पहावया ।' -मुआदि ४१.४८. 'जयसिंगालाहि आपला आवांका काय आहे तें समजेल' -सूर्यग्रहण ८४. २ विचार; सारासार विचार; मर्यादा; रीत. 'अहो जी आइका । तुमतें नाहीं कृपेचा आवांका । तरि येथें बीजे करोनी कां मातें चुकविलें ।' -ऋ ३२. -एभा ३१.५५५. ३ अभिमान. 'मी एक चतुर बोलका । हाही नुठी त्या आवांका । बोल बोलूं नेणें फिका । बोलोनि नेठका अबोलणा ।' -एभा २८.४४९. ४ सार; अभिप्राय; गोळाबेरीज. 'तया अर्थजातां अशेषां । केला तात्पर्याचा आवांका । तो हा आठरावा देखा । कलशाध्यायो ।' -ज्ञा १८. १४.४५. 'एवं भारताचा आवांका । आणूनि श्लोका एका ।' -ज्ञा १८.१६५९. ५ आटोका कबजा. 'तेथ एरादळांचा आवांका । कवणुकरी ।' -शिशु ९०७.
बांधरा
पु. बांध: धक्का; मोर्चा. 'कीं भीमकिये सार- खिये धुरे । कुसुम बाणांचें हाथियेर गोरें । तया बांधले बांधरे । मदनें मेळैनि पैं ।।' -नरुस्व ५२४. [सं.बंध्]
बा-वकूफ
[फा. बा-वुकूफ्] शाहणा. “एक सार बा-वुकूफ” (राजवाडे १२।२७).
बियवणी
न. (राजा.) पिकलेलीं कोकंबें फोडून त्यांतील गिराचें करतात तें सार, पन्हें. [बीं + पाणी]
बोय
स्त्री. १ वास; गंध. २ (ल.) वासाची लकेर; रुचि, छटा. 'इंग्रजांचे मगजांतील बोय येती कीं तुम्ही कुमकेस न आलां तरी गेलें?' -ख ८.४३५२. ३ सार; अंश. [फा. बोय्]
बुंध
न. १ (झाड, गवत, केरसुणी इ॰ चा) मुळाकडचा भाग; बुडखा. २ पायथा; तळ; बूड; खालचा भाग. बुंधा पहा. [सं. बुध्न; प्रा. बुंध. तुल॰ फा. बुन] बुंधट-न. पेंढावर सार- वण्यासाठी वापरतात ती जीर्ण व आंखूड फड्यांची केरसुणी.बुध- नाल-स्त्री. झाडाच्या बुंध्याशीं नालाप्रमाणें वांकवून बांधून मारणें 'टांगणे टिपर्या पिछोडे । बेडी बुधनाल कोलदंडे ।' -दा ३.७. ६७. [बुध + नाल] बुंधा, बुंधारा-पु. १ (झाड इ॰ चा) खालचा भाग, बूड, तळ, पायथा. २ (ल.) मूळ; पाया; उगम; आरंभ; उत्पत्तीचें कारण. [बुंध] बुंधाड-न. (विरू.) बुडखा पहा. बुंधारणें-उक्रि. केरसुणीच्या बुडख्यानें मारणें. [बुंधा]
बुंथ
बुंथ buntha m f बुंथी f A cloth thrown, or prepared to be thrown, over the head and body as a cloak, or over the head and face as a muffler. v घे, मार, ओढ, सार. Ex. कनकांबराची घेऊन बुंथी ॥ बैसली सती कौशल्या ॥.
चाथा
पु. सार : ‘कथित सुरस गाथा, सर्व संसार चाथा ।’ – आमा ९. [सं. चुस्त = चोथा]
चाथा
पु. सार 'कथित सुरस गाथा, सर्व संसार चाथा ।' -आमा ९. [चोथा]
चौसार
चौसार causāra a Referring to the four सार. A term at draughts or सोंगट्या. 2 P Square.
चोवीस
वि. १ २४ ही संख्या; वीस आणि चार. २ (सांकेतिक) अठरा पुराणें व सहा शास्त्रें मिळून. 'वेदश्रुति तुज नेणती कोणी । चोवीस ठेंगणीं धांडोळितां ।' -तुगा ८७०. [सं. चतुर्विंशति; प्रा. चउवीस; हिं चौवीस; गु. चोवीस] ॰अवतार- पु. मत्स्य, कच्छ, वराह इ॰ दहा अवतार व नारायण, शौनक, नारद, स्वायंभू, कपिलमुनि, दत्तात्रेय, ऋषभदेव, हंस, हयग्रीव, पृथुराजा, ध्रुव, धन्वंतरी, मोहिनी, व्यास असे अनेक कारणास्तव विष्णूनें घेतलेले १४ अवतार. -भागवंत स्कं १ अ. २ श्लोक ५ ते २६ मध्यें वर्णिले आहेत. 'भगवंताचे वर्णी पुरुषाद्यवतार सार चोवीस ।' -मोमंभा १.३. ॰अक्षरीमंत्र-पु. गायत्री मंत्र. ॰मावळें-नअव. जुन्नरपासून चाकण पर्यंत १२ मावळें घांटावरील व पुण्यापासून शिरवळपर्यंत १२ मावळें कोंकणांतील. मावळ पहा.
चर
भुयार, गुहा, बीळ, खळी, विवर, छिद्र, भोक, खड्डा, खळगा, खबदाड, भोसका, विहीर, रंध्र, भेग, चीर, खांच, पन्हाळी, फांटा, खोबण, चकारी, चाकोरी, घट्टा, चरा, रेषा, फरा, खोल धार, धडी, शार, खोलपट्टी, दुमड, वळचण, खंदक, दरी, घळई, गल्ली, मार्ग, खिंडार, खिंड, खिडकी, गटार, खोरें, दरड, भगदाड, घळण, नेटें, बसलेला भाग, पंचपात्रे, आंत गेलेली तळी, कोनाडा, द्रोण, दबलेली बाजू, खिसा, कप्पा, भांडे, खालवर-खालीं सरलेला भाग, बसका तुकडा, मारती बाजू, उतार, उतरंड.
चुडि
स्त्री. चूड; पुढे आलेले लांबट तोंड : ‘तेथचें सार तेंही अमेध्यूचि कीं : सोरू असे : तें बोडी आंतु चुडि खोवी :’ − लीचउ ३०३.
डाचाड or डांचाळ
डाचाड or डांचाळ ḍācāḍa or ḍāñcāḷa a Disproportionately long, large, big, bulky, roomy, spacious: opp. to अटोप- सार Compressed, compact. Used of men, animals, and objects freely.
दळ
न. १. पहा : दल. २. ओव्याचे औषधी चूर्ण. ३. सत्त्व; सार; मगज; गर; गाभा; (फळे, पाने, जमीन यांतील) रस. ४. फळातील गर; (कागद, पान, हिरा इ. ची) जाडी. ५. कीट; घाण; फळातील आठळी. ६. कवच. - हंको. ७. वर्ख; मुलामा : ‘ब्रह्मविद्येचा वोरकली : देवतास्वरूपें कसिली : तंव जाली दळाची तीयें’ - उगी ५४७. ८. सुगंधी फुलाचे काढलेले तेल. ९. सैन्य. [सं. दल]
दळ
न. १ दल अर्थ १ ते ४ पहा. २ ओंव्याचें औषधी चूर्ण. ३ सत्त्व; सार; मगज; गर, गाभा; रस (फळें, पानें, जमीन यांतील). ४ फळांतील मगज; गर; जाडी (कागद, पान, हिरा इ॰ ची). ५ कीट; घाण; फळांतील आठळी (टाकून देण्याची). ६ कवच -हंको. [सं. दल] ॰खुंट-पु. (विणकाम) वैलीच्या पुढचा खुंट. ॰दार-वि. जाड; गिरदार; सत्त्वांशयुक्त भरदार; कसदार (फळ इ॰). ॰भार-पु. १ सर्व सैन्य. २ पायदळ. ॰वयी-वई- वायी, दळवै-वी-पु. १ सेनापती. 'असोहे आठइ । भाव राउ- ळीचे दळवइ ।' -ऋ ६६. २ एक आडनांव. ३ हैदरच्या पूर्वीं म्हैसूर- च्या मुख्य प्रधानाची पदवी. [सं. दलपति; दलवाही] ॰वट-वटा- पु. १ तुडविलेली स्थिति; वर्दळ; तुडवणी; राबता. 'ह्या वाटेला फौजेचा दळवटा आहे.' २ दळणवळण; एकेमेकांशीं संबंध; येजा. ३ तुडवणीची खूण; माग. (क्रि॰ काढणें; लावणें; निघणें; लागणें). ॰वाड-वाडें-पु (काव्य) समुदाय; सैन्य; गर्दी; जमाव 'ढांडो- ळितां उपमेचें दळवाडें ।' -ऋ ३८. -वि. संपूर्ण. ॰वेपण-न. सेनापतित्व. ॰शिंगार-पु दलशिंगार पहा.
दुर्ति, दुर्ती
स्त्री. १. अर्क; सार; रहस्य : ‘तया आवडी एकवटली दुर्ती : मदनमाणकांची’ – मूप्र ६०५. २. स्वाद : ‘कालनासि दुर्ति दीधली : परिमळाची’ – नरुस्व १७९९.
धादांत
पु. (यमकानें वेदांत या शब्दशीं जुळणारी पण उलट अर्थाचा बनविलेला शब्द). प्रत्यक्षप्रमाण; अनुभवसिद्ध, बुद्धिग्राह्य सिद्धांत; आत्म प्रतीति; स्वानुभव; स्वतःचा तर्क; वैय- क्तिक मत. 'जें वेदशास्त्राचें सार । सिद्धांत धांदात विचार ।' -दा ५.६. २७. 'आम्हास तुमचें वेदांत न कळे आम्ही आपले धादां- तावर चालतो.' -क्रिवि. धडधडीत; उघडउघड; मूर्तिमंत; प्रत्यक्ष; स्पष्ट 'हा धादांत चोर, लबाड, सोदा.' [वेदांत या शब्दाशीं यमकानें जुळणारा, उलट अर्थाचा, बनविलेला शब्द] म्ह॰ धादां- ताला सिद्धांताची गरज नाहीं = जी गोष्ट उघड दिसत आहे ती सांगण्याला. दाखविण्याला शास्त्राच्या पुरव्याची जरूरी कशाला ?
धादांत
पु. प्रत्यक्षप्रमाण; अनुभवसिद्ध, बुद्धिग्राह्य सिद्धांत; स्वानुभव; आत्मप्रतीती; स्वतःचा तर्क; वैयक्तिक मत : ‘जें वेदशास्त्राचें सार। सिद्धांत धादांत विचार।’ - दास ५·६·२७.
एकुणात, एकुनात, एकुणहात
स्त्री. १. हिशेब पुरा केल्यावरची,अखेरची, एकूण रक्कम; हिशेबा अखेरी रक्कम, शिल्लक : ‘शेवटी एकुणात देत जावो.’-खाजगी खातें अंमलदाराचे अधिकार (बडोदे) १८५. २. या पुऱ्या केलेल्या रकमेवर मालकाने करायची सही किंवा रेघ, लेख. ३. या सहीवर एक विशिष्ट खूण म्हणून काढतात ती रेघ.४. (ल.) भाषणातील प्रमाणभूत सार; सार-सिद्धांत; तात्पर्य.
एकुणात-नात, एकुणहात
अशी रेघ. रेघ पहा. ४ (ल.) भाषणांतील प्रमाणभूत सार; सारसिद्धांत; तात्पर्य. [एकूण]
एपिफनी
स्त्री. (ख्रि.) १ (विदेशी लोकांसमोर) ख्रिस्ताचें प्रकट होणें; आविर्भवन. २ ख्रिस्त दर्शनोत्सव; हा जानेवारीच्या ६ व्या तारखेला करतात. 'वरील सार प्रार्थंना, पत्र व शुभवर्तमान हीं एपिफनीपर्यंत प्रतिदिवशीं वाचावीं.' -साप्रा ४२. [इं. प्री. एपि = वर + फायनो = मी प्रगट करतों.]
एवाका, एवांका
पु. अधिकाराची व्याप्ती; आवाका; विस्तार; सार : ‘ते महासिध्दांचा एवाका। सिद्धांतकक्षा अनेका ।’–राज्ञा१८·१२३६.
गाभा
पु. १ मगज; गर; गर्भ; नार; पोटांतील अंश (लांकूड अथवा केळीचा). ३ बोखा; शेंडा (ताड, नारळी यांचा) ४ पागोट्यांतील बताणा. आंतील भाग; पागोट्यांच्या आंतील लहान पागोटें; फडकें. ५ (ल.) मतलब; सार. 'बुद्धीचिया भाजि । बोलाचा न चाखतां गाभा ।' -ज्ञा ७.२०७. ६ मधला भाग; मध्य; गर्भागार (देऊळ इ॰ चा). [सं. गर्भ; प्रा. गब्भ]
गाभा
पु. १. मगज; गर; गर्भ; नार; पोटातील अंश (लाकूड, ताटे, मुळे यांच्या). २. मोना; कोका; ताडक (ताडवृक्षाचा अथवा केळीचा). ३. बोखा; शेंडा (ताड, नारळी यांचा). ४. पागोट्यातील बताणा, आतील भाग; पागोट्याच्या आतील लहान पागोटे; फडके. ५. (ल.) मर्म; रहस्य; मतलब; सार : ‘बुद्धीचिया जिभा । बोलाचा ना चाखतां गाभा ।’ –ज्ञा ७·२०७. ६. मध्य; गर्भागार (देऊळ इ. चा) [सं. गर्भ]
गार
गार gāra f A flint. 2 A hailstone. 3 A term for gems and jewels, in enumerating the things which run away with money; viz. टार, नार, गार, सार. See under टार. 4 A hole or pit. 5 fig. The belly.
स्त्री. १ एक कठिण पांढरा दगड; करका; गारगोटी. 'कां रत्ने म्हणोनि गारा । वेची जेविं ।' -ज्ञा ९.१४८. २ पावसांतून पाणी गोठून पडणारा खडा. ३ (ल.) जडजवाहीर, रत्न इ॰. 'टार, नार, गार, सार.' टार पहा. [सं. प्रावन्; प्रा. दे. गार = पाषाण, कंकर]
गड
गड gaḍa f A difficulty, perplexity, trouble; an ex- tremity, emergency, strait. v ये, लाग, पड, वार, टळ, चुक, सर; also टाळ, चुकव, संभाळ, सार, वार.
गीर
पु. १ गर; मगज; दळ; गाभा; सार; गर पहा. २ गाईची एक जात. -शे ११.२६.
गीर
पु. गर; मगज; दळ; गाभा; सार. पहा : गर
गिरि
पु. १ पर्वत; डोंगर. २ (दसनाम) गोसावी जातीं- तील एक शाखा; गोसाव्यांत एक भेद. [सं. गिरि] ॰कंदर रा-पुस्त्री. डोंगर-पर्वतांतील गुहा; दरीखोरीं; कपार. 'कपी सांडिती युद्ध. १६०. ॰गीता-स्त्री. (ख्रि.) येशूख्रिस्ताचा पर्वतावरील उपदेश (इं.) सर्मन ऑन दी माउंट. -मतया ५.७. अध्याय. 'ख्रिस्ती धर्माचें सार गिरिगीतेंत आहे असें पुष्कळ विद्वानांचें म्हणणें आहे.'
गोम
स्त्री १. पुष्कळ पायांचा एक किडा; गोंब; घोण : ‘गोमीस पाय बहुत, एक पाय मोडला तरी उणें पडत नाहीं.’ – भाब ८२. २. घोड्याच्या बहात्तर खोडींपैकी एक; शेपटीकडे रोख असलेल्या परतलेल्या केसांची रेष, भोवरा. हे अशुभ चिन्ह मानतात. ३. सरळ केसांची गोमाकार रेषा; डोक्याकडे रोख असलेली गोम. ही शुभ मानतात, पण डोक्यावर असेल तर अशुभ. (ल.) दोष; ऐब; व्यंग; खोड; गुणामध्ये एखादी उणीव. ४. किनारीतील गोमेसारखी नक्षी. ५. (ल.) खुबी; मर्म; सार; गुह्य. [का. गोमु = अश्वदोष]
गोम
स्त्री. १ पुष्कळ पायांचा एक किडा; गोंब; घोण. 'गोमीस पाय बहुत, एक पाय मोडला तरी उणें पडत नाहीं.' -भाब ८२. २ घोड्याच्या ७२ खोडीं पैकीं एक; शेपटीकडे रोंख असलेल्या परतलेल्या केसांची रेघ, भोंवरा. अशुभचिन्ह-लक्षण पहा. ३ सरळ केसांची गोमाकार रेषा; डोक्याकडील रोखाची असलेली गोम. ही शुभ मानतात. पण डोक्यावर असेल तर अशुभ. ४ (ल.) दोष; ऐब; व्यंग; खोड; गुणामध्यें एखादी उणीव. ५ लुगडें, धोतर इ॰ च्या कांठांतील गोमेसारखा वाण; किनारींतील गोमे सारखी नक्षी. ६ खुबी; मर्म; सार; गुह्य. [प्रा. दे. गोमी; का. गोंबे = शाखा] म्ह॰ गोमेचे पाय तिला भारी नसतात. सामाशब्द- ॰चिवळ-पुन. दोन फाट्यांच्या शेपटीची काळसर चिमणी. ॰पठाडी-स्त्री. १ मोठी गोम. २ (ल.) मोठा दोष; मुख्य मर्म, खुबी. गोमीकांठ-पु. गोमेसारखी वीण अस- लेला वस्त्राचा कांठ. गोमीकांठी-वि. गोमीच्या विणीचें कांठ असलेलें (लुगडें, धोतर इ॰).
ग्राह
पु. १ नक्र; मगर; सुसर. २ पाणहत्ती. ३ (सामा.) समुद्रांतील कोणताहि मोठा प्राणी, जलचर. 'गज करवडी महा- ग्राह ।' -एरुस्व १०.८०. ग्राहक, ग्राही, ग्राहिक-वि. १ धरणारा; घेणारा; स्वीकारणारा. २ (ल.) योग्य गुणग्रहण करणारा; चाहता. ३ ज्ञाता; जाणता. 'येथें कोणी ग्राहक असल्यास न्यायशास्त्रांतील विषय काढूं.' (समासांत) गुणग्राहक-रस- ग्राहक इ॰ ४ गिर्हाईक; माल विकत घेणारा. 'ग्राहीक पातला परमनिका ।' -मुआदि १८.१२९. ग्राहकबुद्धि-स्त्री. विषय ग्रहणाविषयीं कुशल बुद्धि. -वि. तद्विशिष्ट मनुष्य. ग्राहकी- हिकी, ग्राहिकै-स्त्री. १ गिर्हाइकी. २ खरेदी. 'आतां सुखेंसि जीविता । कैची ग्राहिकी किजेल पंडुसुता.' -ज्ञा ९.४९७. ग्राहय-वि. १ मान्य; कबूल. २ स्वीकारणें, घेणें, धरणें, पकडणें वगैरेस योग्य, शक्य, जरूर, पात्र. ग्राह्यांश-पु. तथ्य; सार; मुख्य भाग; चांगला किंवा उपयोगी पडण्याजोगा अंश; तात्प- र्यार्थ. [सं.]
ग्राह्यांश
पु. तथ्य; सार; मुख्य भाग; चांगला किंवा उपयोगी पडण्याजोगा अंश; तात्पर्यार्थ; मान्य करण्यासारखा भाग : ‘(ते) त्यातील ग्राह्यांश शोधून काढीत असत.’ –निअ ४८.
गरगटणें
उक्रि. १ (दगडी खलांत) खलणें; घोटणें; उगा ळणें; चूर्ण करणें; वाटणें. 'तूं एवढें पुरण गरगटून दे म्हणजे मी पोळ्या भाजीन.' [गरगटा = खल] २गरगाटानें (भिंत इ॰ सारवण्यासाठीं केलेलें शेण व पाणी यांचें मिश्रण, त्यानें) सार- वणें; पोतेरें घालणें; शेणमाती इ॰ नीं लेपाटणें. ३ (माण.) चुलीवर शिजत असलेल्या पदार्थास ढवळणें; आटविणें; घाटणें. [गर्र = वाटोळें + गटणें = घाटणें]
गुंती
स्त्री. १. प्रतिबंध; अडचण; गुंता; बंधन : ‘ज्ञानदेवा सार सांवळिये मूर्ति निवृत्तीनें गुंति उगविली ।’ - ज्ञागा १४६. २. गरज. ३. (ल.) ओढा; पाश : ‘ज्यांची तुज गुंती । ते तों मोकलिती अंतीं ।’ - तुगा २६८०. (वा.).गुंती पाडणे - अडचण आणणे; संकटात ढकलणे : ‘मग बोले प्रभावती । त्वांचि मजसी पाडिली गुंती ।’ - कथा १·५·२१४.
गुंति-ती
स्त्री. १ प्रतिबंध; अडचण; गुंता; बंधन. 'ज्ञानदेवा सार सांवळिये मूर्ति निवृत्तीनें गुंति उगविली ।' -ज्ञागा १४६. -मुआदि २२.२६. २ गरज. -शर. ३ (ल.) ओढा; पाश. 'ज्यांची तुज गुंती । ते तों मोकलिती अंतीं ।' -तुगा २६८०. ॰पाडणें-अडचण आणणें; संकटांत ढकलणें. 'मग बोले प्रभावती । त्वांचि मजसी पाडिली गुंती ।' -कथा १.५.२१४. [गुंतणें]
गवनसार
क्रिवि. सोईस्कर; किफायतशीर; गवसार. [गवणें + सार]
गवसार
क्रिवि. १ (वेळेच्या दृष्टीनें) फायदेशीरपणें; सरिफेवार. गव पहा. 'जो बाजारांत नेहमीं बसतो त्याला पदार्थ गवसार मिळतात.' २ (सामा.) नफ्यानें; फायदेशीर. [गव + सार प्रत्यय]
होळबंदी
स्त्री. (बडोदें) नांगरावर बसविलेली शेत- साऱ्याची पद्धत. -बडोद्याचे राज्यकर्तें ३५७. [सं. हल्य, हल]
इत्यर्थ
पु. सारांश; तात्पर्य; सिद्धांतरूप अर्थ : ‘तरीं तूं इत्यर्थाचें सार । इतुलें जाण ।’ − ज्ञा १८·१४६. [सं.]
इत्यर्थ
पु. सारांश; तात्पर्य; सिद्धांतरूप अर्थ. 'तरी तूं इत्य- र्थाचें सार । इतुलें जाण' -ज्ञा १८.१४६. -ख ४३०४. [सं. इति + अर्थ]
जीव
पु. १. प्राण : जीवित. २. प्राण असणारा जिवंत प्राणी. ३. लहान कीटक; प्राणी (चिलट, घुंगरडे, पिसू, किडा इ.). ४. तेज; वीर्य; जोम; धमक; पाणी; शक्ती, धैर्य; कार्यक्षमता; सत्त्व; सार (माणूस, घोडा, बैल इत्यादींचे). ५. अंतरात्मा; सचेतन आत्मा. पहा : जीवात्मा [सं.] (वा.) जीव अधांत्री उडणे - संकटात पडणे; भांबावून जाणे; घाबरून जाणे. जीव अर्धा करणे - मनुष्याला अतिशय त्रास देणे. सर्व शक्ती खर्च करणे (श्रम, व्यर्थ शिकवण इ.). जीव अर्धा होणे - भिणे; त्रासले जाणे; गर्भगळित होणे; श्रमणे; दमणे; अर्धमेले होणे. जीव अडकणे, जीव टांगणे, जीव टांगला असणे - आवडत्या वस्तूच्या प्राप्तीसाठी घाबरे होणे, काळजी लागणे. जीव आटणे - १. मरेमरेतो काम करणे. २. अतिशय थकून जाणे (मेहनत, काळजी इ.नी). जीव आंबणे - त्रासून जाणे; कंटाळणे. जीव उडणे - १. प्रेम नाहीसे होणे; विटणे. २. भीतिग्रस्त होणे. जीव कयंगटीस येणे - १. मेटाकुटीस येणे. २. मुरगळून पडणे. (कर.) जीव कालविणे - गलबलणे; अतिशय क्षोभ होणे; घाबरणे; गडबडणे. जीव की प्राण करणे - अतिशय प्रेम करणे. जीव कोड्यात पडणे - बुचकळ्यात पडणे; काही न सुचणे : ‘हे ऐकून भागाचा जीव कोड्यांत पडला.’ - ऊन १७. जीव कोरडा होणे, जीव कोरडा पडणे - घसा वाळणे; थकणे; अतिशय दमणे; (आजार, श्रम, भूक यांनी). जीव कोंडाळणे - गुदमरणे (ना.). जीव खरडून बोलणे, जीव सुकणे, जीव रडणे - आकांत करणे; ओक्साबोक्सी रडणे. जीव खाऊन - सर्व शक्ती एकवटून किंवा मनापासून; जोरजोरात : ‘ताशा वाजंत्रीवाले सकाळपासून दाराशी येऊन दोन पायांवर बसले होते आणि जीव खाऊन वाजवीत होते.’ - भुज १२२. जीव खाऊन काम करणे - मनापासून काम करणे; कसून काम करणे. जीव खाणे, जीव घेणे, जिवास खाणे - एखाद्याच्या जिवास त्रास देणे; झुरविणे. जीव खाली पडणे - उत्कट इच्छा पूर्ण होणे; साध्य गाठणे; मनाजोगे होणे. जीव गंगाजळ होणे - धन्य होणे; कृतार्थ होणे : ‘मळवट भरून त्येंच्यासंगं गेली असती. जीव गंगाजळ झाला असता माझा.’ - खळाळ ७४. जीव गोळा होणे - १. अधीर होणे. २. मरणोन्मुख होणे. अतिशय घाबरणे : ‘जों जों देखे देव काखेंत बोळा । तों तों त्याचा होतसे जीव गोळा ।’ - आसुच २६. जीव घेऊन पळणे - जीव वाचविण्यासाठी पळून जाणे. जीव जाळणे, जीव मारणे - निग्रह करणे; दमन करणे (कामेच्छा, पाप वासना, मनोविकार यांचे). जीव टाकणे - १. प्राण सोडणे. २. निराश होणे; चित स्वस्थ नसणे. ३. फार उत्कंठा लागणे; अतिशय हट्ट, छंद घेणे. ४. खूप प्रेम करणे; लुब्ध होणे : ‘त्यासाठी मी जीव टाकतो.’ - अआबांदे ११. जीव टाकून पळणे - अतिशय त्वरेने, घाईने, एकदम पळणे; भिऊन पोबारा करणे. जीव टांगणीस लागणे - १. एखाद्या वस्तूवर प्रीती बसणे. २. चिंताग्रस्त होणे. जीव टांगणे - काळजीत असणे : ‘लवकर ये रे बाबा - माझा जीव टांगलेला आहे.’ - एल्गार १२८. जीव टांगून ठेवणे - तिष्ठत ठेवणे; काळजीत ठेवणे : ‘चार वर्षं बिचारीचा जीव टांगून ठेवलात.’ - ऑक्टोपस ६१. जीव ठिकाणी नसणे - अस्वस्थ असणे; चैन न पडणे. जीव डहळणे, जीव मळकणे - (ना.) मळमळणे. जीव तुटणे - १. अतिशय थकणे. २. तळमळ लागणे. एखाद्याचा ध्यास लागणे; एखाद्याबद्दल अतिशय काळजी वाटणे. जीव तोडणे - दुःखाने सचिंत होणे. जीव तोडून करणे - अतिशय मेहनतीने करणे. (काम, धंदा). जीव थारी असणे - स्वस्थपणा असणे. जीव थारी नसणे - अस्वस्थ असणे; चैन न पडणे. जीव थोडा थोडा होणे - (ग्लानी, देणे इत्यादी कारणांनी) अतिशय चिंताग्रस्त होणे; काळजी लागणे; भीती वाटणे; फार दुःख होणे; धैर्य खचणे. जीव देणे - १. आत्महत्या करणे. २. सगळे लक्ष घालणे; लक्ष देऊन करणे; पुष्कळ प्रयत्न करणे. जीव धडधड करणे - काळजी, भीती वाटणे. जीव धरणे - नवीन शक्ती मिळविणे; रंगारूपास येणे; बरे व्हावयास लागणे. जगणे, वाढीस लागणे (झाड वगैरे). जीव धरून - १. धैर्य धरून; उत्सुकतेने; उत्साहाने (कृत्य करणे.) २. जिवंत राहून; अस्तित्व टिकवून (कसा तरी याला जोडून योजना.). जीव धागधूग करणे - घाबरणे; वरखाली होणे : ‘निकालाचा दिवस जो जो जवळ येऊ लागला तो तो माझा जीव धागधूग करू लागला.’ - पलको ४९१. जीव धुकुडपुकुड करणे - घाबरणे. (ना.) जीव नाकास येणे - नाकी नव येणे; नाकी नळ येणे; दमछाक होणे. जीव पछाडणे - मोठ्या कळकळीने, लाचारीने नम्र होणे. जीव पडणे - एखाद्या गोष्टीत मनापासून शिरणे; गोडी लागणे; तत्पर होणे. जीव पाखडणे - १. अतिशय मेहनत करणे; प्रयत्न करणे. २. जळफळणे; तडफडणे. जीव पोळणे - १. दुःख होणे. २. चट्टा बसणे; धडा मिळणे. जीव प्यारा असणे - जिवाविषयी अति प्रीती दाखविणे. जीव फुटणे - अतिशय उत्सुक होणे : ‘तुझे भेटीसाठी निशिदिवस माझा जिव फुटे ।’ - सारुह ६·१५८. जीव बसणे - (एखाद्यावर) मन बसणे; प्रेम करणे. जीव भांड्यात पडणे - जीव स्वस्थ होणे. जीव मट्ट्यास येणे - दमणे, अगदी थकून जाणे. जीव मुठीत धरणे - १. काळजीपूर्वक स्वतःचे संरक्षण करणे (धोक्यामुळे). जीव मोठा करणे - १. जोराचा प्रयत्न करणे; धैर्य धरणे. २. उदार होणे (खर्च करण्यात); मन मोठे करणे. जीव रखमेस येणे - कंटाळा येणे; त्रासणे. (कु.) जीव राखणे - जिवाचे रक्षण करणे; आळसाने काम करणे. जीव लावणे - प्रेम करणे; माया लावणे. जीव वर धरणे, जीव वरता धरणे - अतिशय उत्सुक होणे; उत्कंठा लागणे. जीव वारा पिणे - उदास भासणे; भयाण वाटणे. जीव सुकणे - अशक्त, व्याकूळ होणे. जीव सुचिंत नसणे - काळजीत असणे. जीव सोडणे - १. मरणे. २. जीव धोक्यात घालणे; स्वतःच्या जिवाची आहुती देणे. ३. अतिशय इच्छा दर्शविणे. ४. आजारी माणसावरून कोंबडे ओवाळून टाकणे (याने आजाऱ्याचा रोग कोंबड्यावर जाऊन ते मरते अशी समजूत). जिवाचं काय पांढ्ढ (कांळ-पांढरं) करणे - जिवाचे बरेवाईट करणे : ‘कोन्या आडशइरीवर जावं आन् आपल्या जिवाचं काई काय पांढ्ढ करून टाकावं.’ - शिळान ७८. जिवाचा कान करणे - लक्षपूर्वक कान देऊन ऐकणे : ‘वयातीत वृद्धही त्यांचे बोलणे ऐकण्यासाठी जिवाचा कान करीत असत.’ - लोसंक्षि १२१. जिवाचा घात करणे - १. आटोकाट प्रयत्न करणे; जिवापाड मेहनत करणे. २. अतिशय छळणे; गांजणे (जीव जाईपर्यंत). जिवाचा घोट घेणे - जिवाचा घात करणे; मरेपर्यंत छळणे. जिवाचा धडा करणे - साहसाचा प्रयत्न करण्यास तयार होणे. जिवाचा निधडा करणे - जिवावर उदार होणे : ‘तेव्हा त्याणें जिवाचा निधडा करून शिपाइगिरी म्हणावी तैशी केली.’ - ऐको ४४५. जिवाचा लोळ करणे - १. फार श्रम करणे; जिवाला त्रास देणे. २. फार मेहनत घेणे. जिवाची कोयकोय करणे - (कुत्र्यासारखे भुंकावयास लावणे म्हणजे) अतिशय छळणे. जिवाची ग्वाही देणे, जिवाची पाखी देणे - खात्रीपूर्वक सांगणे. जिवाची घालमेल होणे - जीव अस्वस्थ होणे : ‘तुझ्या जिवाची आता जी घालमेल चालली होती’ - असा ८१. जिवाची बाजी - जिवाची पर्वा न करता : ‘येसाजींनी जिवाच्या बाजीनं वाटा रोखल्या.’ - श्रीयो २४७. जिवाची मुंबई करणे - चैन करणे : ‘मोटारी उडवून जिवाची तात्पुरती मुंबई करतात.’ - शेले ३८. जिवाची राळवण करणे - अतिशय काम करणे (राळ्याच्या काडीसारखे होणे); त्रास घेणे. जिवाची हुल्लड करणे - मोठा नेटाचा प्रयत्न करणे. जिवाची होड करणे - प्राण पणास लावणे; एखादे कार्य सर्व सामर्थ्यानुसार करणे : ‘जिवाची होड करून चालविलेल्या त्या स्वातंत्र्यसंगराने.’ - मसासंअभा ४४६. जिवाचे चार - चार करणे - थेर करणे; नाचणे; चैन, विलास करणे. जिवाचे रान करणे - अतिशय कष्ट सोसणे. जिवाच्या आकांताने - गर्भगळित होऊन; अतिशय घाबरून; सर्व शक्तीनिशी : ‘ते जिवाच्या आकांताने बाहेर पडले.’ - माचू ३७३. जिवाच्या गाठी बांधणे - मनात नीट ठसवून किंवा बिंबवून घेणे. जिवात जीव आहे तोपर्यंत - मरण येईपर्यंत; जन्मभर; सदासर्वदा. जिवात जीव घालणे - १. उत्तेजन देणे; सांत्वन करणे; धैर्य देणे. २. आपले व दुसऱ्याचे मन एक करणे; आपले विचार दुसऱ्यास नीट समजावणे. जिवात जीव नसणे - धीर नसणे - अस्वस्थ्य होणे : ‘घरी येईपर्यंत तिच्या जिवात जीव नव्हता.’ - रथचक्र १७३. जिवात जीव येणे - गेलेली शक्ती, धैर्य पुन्हा येणे; धीर येणे. जिवानिशी - जिवासकट. जिवानिशी जाणे - मरणे (जुलमाने, अकाली). जिवाला करवत लागणे - अतिशय चिंता लागणे. जिवाला काही तरी करून घेणे - आत्महत्या करणे; जीव देणे. जिवाला खाणे - मनाला लागून राहणे; झुरणे; झिजणे. तडफडणे. जिवाला चरका लावून जाणे - बेचैन करणे : ‘हे पद जिवाला चरका लावून जात असे.’ - मास्मृग्रं १४२. जिवावर आंगेजणी करणे - जिवावर उदार होऊन कार्यभाग अंगीकारणे : ‘लढाई होईलसी दिसती ते बहूत हे थोडे परंतु हे जिवावर आंगेजणी करितील श्री यश कोन्हास देईल पहावे.’ - ऐको ४४५. जिवावर उठणे - दुसऱ्याच्या जिवाची काळजी न करणे; त्याचा जीव घ्यायला याला तयार होणे. जिवावर उड्या मारणे - दुसऱ्याच्या पैशावर, मदतीवर चैन बढाई मारणे. जिवावरची होड - प्राणावर बेतलेले संकट; प्राणाची पैज; प्राणपणाला लावणे. जिवावर द्वारका करणे - एखाद्याच्या आधारावर, आश्रयावर चैन करणे; महत्कृत्य करणे; मोठा उपकार करणे : ‘तुमच्या जिवावर एवढी द्वारका केले घरदार दोमजली ।’ - पला ८५. (दुसऱ्याच्या) जिवावर (आपले) पोट भरणे - दुसऱ्यावर अवलंबून आपला उदरनिर्वाह चालविणे. जिवावर येणे, जिवावर बेतणे, जिवाशी गाठ पडणे - १. जीव धोक्यात पडणे; मोठे संकट ओढवणे. २. दुष्कर वाटणे. ३. चिडणे. जिवावरचे आधण उतरणे - कठीण प्रसंगांतून बचावणे, निभावणे. ९८. जिवाशी धरणे, जिवाशी बांधणे, जिवी धरणे, जिवी बांधणे - अतिशय प्रीती करणे; बहुमोल वाटणे : ‘काय इणें न धरावें अधनत्वें भूप - जन - वरा जीवीं ।’ - मोवन १३·१८ जिवाशी बेतणे - प्राण जाण्याची वेळ येणे : ‘जिवाशी बेतल्यावर तरी शुद्धींत याल असं वाटलं होतं.’ - एल्गार ११२. जिवास जहानगिरी करणे, जिवास जहानगिरी होणे - जिवावर मोठे संकट येणे, आणणे; संकटाचा प्रसंग ओढवणे. जिवास जीव देणे - प्रिय माणसासाठी आपला जीव देणे. अतिशय सख्य करणे. जिवास पाणी घालणे - जिवावर उदार होणे : ‘अवघे लोक पळाले, ऐसा प्रसंग लोकांचा या भरोसियावर रहावे तरी आपल्या जीवास पाणी घालोन रहावे लागते.’ - ऐको ४४५. जिवास मुकणे - मरणे; मृत्यू पावणे. जिवी लागणे - १. आवडीचा असणे; प्रिय वाटणे. २. मर्मभेद होणे; जिवाला लागणे. जिवे धुस जाणे - धस्स होणे; जिवात धडकी भरणे : ‘तुमते एतां देखिलें । तेंची माझां जीवे घुस गेले ।’ - शिव १२५. जीवे प्राणे उभे राहणे - जिवावर उदार होणे : ‘हें जीवें प्राणें उभे राहिलें तेव्हां त्याणीं अमल दिल्हा व तह केला.’ - ऐको ४४७. जिवे मारणे - जीव जाईपर्यंत मारणे. जिवे वाचणे - एखादे संकट टळून जिवंत राहणे; जीव जाण्याचा प्रसंग असता जीव न जाता बचावणे.
जिवाळी
स्त्री. आत्मा; सार; मुख्य तत्त्व; जिव्हाळा : ‘आत्मेयांची जिवाळी : मिं कृपाकटाक्षे निहाळिं’ - उगी १०६·७९४.
जिव्हाळा
पु. १. आत्मा; सार; मर्म; मुख्य तत्त्व : ‘नेणती मुक्तीचा जिव्हाळा ।’ - एरुस्व ७·४३. २. मर्मस्थल; वर्म. ३. जीवित; प्राण; चैतन्याचे उगमस्थान; आधार : ‘नामरूपा तूंचि जिव्हाळा ।’ - एरुस्व १६·९२.
जिव्हाळा
पु. १ उगम; उत्पत्ति; मूळ; झरा. 'या विहि- रीचा जिव्हाळा लहान आहे यामुळें पाणी थोडें.' २ आत्मा; सार; मर्म; मुख्य तत्त्व. 'नेणती मुक्तीचा जिव्हाळा ।' -एरुस्व ७.४३. 'जाणें भक्तीचा जिव्हाळा ।तोचि दैवाचा पुतळा ।' -तुगा, कीर्तन १.१२. ३ पोहोंच; आवांका; धारणाशक्ति. 'मुलाचा जिव्हाळा पाहून अभ्यास सांगा.' ४ कळवळा; काळजी; उत्कंठा; जीव लागणें; मन जडणें. 'दुखणेकर्याच्या शुश्रूषेस जिव्हाळ्याचा माणूस असावा' ५ (वीणा, इतर तंतुवाद्यें) घोडी आणि तारा जेथें एकत्र होतात त्या बिंदूवर जो कापूस लावतात तो; झारा. ६ मर्मस्थल; वर्म. ७ जीवित; प्राण; चैतन्याचें उगमस्थान; आधार. 'नामरूपा तूंचि जिव्हाळा ।' -एरुस्व १६.९२. 'विश्वाचा जिव्हाळा, व्यवहा- राचा जिव्हाळा.' ८ लाभ. 'तेतुला जिव्हाळा । मानावा हा ।' -ज्ञा १३.१०८९. ९ माया; ममता. [सं. जीव + आलय] जिव्हाळी- स्त्री. १ एखाद्या मर्माची जागा; नाजुक, वर्माचा भाग (नखाच्या, शिंगाच्या खालचा किंवा कानाच्या मागचा); सचेतन मांसाचा भाग; मर्मस्थान (क्रि॰ लावणें; लागणें). २ विण्याचा झारा. जिव्हाळा अर्थ ५ पहा. [जीव + आलय] जिव्हाळी-जिव्हाळीला लावणें-लागणें-मर्मभेद होणें; (अक्षरशः व ल॰) जिवाला लागून राहणें. जिव्हाळ्याचा-वि. अत्यंत मैत्रीचा; जिवलग; मायेचा; काळजीचा; कळकळीचा. 'तो गाजुदीखान याच्या जिव्हाळ्याचा होता.' -भाब २०. 'माझ्या जिव्हाळ्याचा एथें कोण्ही नाहीं म्हणून तूं मला मारतोस.'
जमाखर्च विवरण
(वाणिज्य) जमाखर्चाचा गोषवारा, संक्षेप, सार. जमाखर्ची
जो(जों)जार
पु. १ कुटुंबादिरूप मोठा संसारखटला, मंडळी, पसारा, व्याप (मोठा त्रासदायक व पोसण्यास कठिण). 'जोंजार प्रसवलासि बहुवसु ।' -ऋ ३२. 'नसोनि कांहीं जोजार । संन्यासा- श्रम शुद्ध सार ।' -निमा १.१६७. २ (ल.) बोजा; त्रास; जंजाळ; भार; कष्ट; ओझें. 'तरी जन्मौनि जोजारु साहिजे ।' -ज्ञा ४.३४. कर्जाचा-कुटुंबाचा-घेण्यादेण्याचा इ॰ जोजार. (व.) जोजवार. ३ कटकट; त्रास; कष्ट; खटपट. 'कायसा करिसी जोजार ।' दा- ३.१०.४८. म्ह॰ ज्याचा भार त्याला जोजार. जोजारणें, जोजावणें-अक्रि. १ मोठें कुटुंब, खटला असणें; त्याच्या जबाबदारीखालीं वांकून जाणें. २ त्रासणें; कष्टणें. 'प्रलय- काळीं जोजावलासि ।' -कथा ७.७.१४३.
जुब्द(बद)तुल्-आमासील(एकान्)वल्
थोरांत व समवयस्कांत श्रेष्ठ. 'जुबदतुल अमासील बल एकरान दत्ताजी देशमुख.' -रा २०.२१४. [अर. झुब्द = सार, नवनीत; फा.]
काढा
(सं) पु० कषाय, सार.
काळाई
काळाई kāḷāī f (कालिका S) A name amongst the कां- सार- people and other vulgar for काळी or देवी. 2 (Amongst agriculturists. From काळा Black, i. e. Black earth.) A term for the ground or soil. Ex. यंदा का0 नें हातचें सोडलें. 3 unc See काळवंडी.
काळीरेघ
स्त्री. समुद्राचा पृष्ठभाग व आकाश ज्या ठिकाणीं मिळालेलीं दिसतात त्या ठिकाणीं समुद्राचें पाणी काळें शार दिसतें यावरून त्या भागास म्हणतात; क्षितिज. ‘महा- राज आपण सांगितल्याप्रमाणें समुद्रांत काळ्या रेघेपाशीं बुड- विला’ (प्रल्हादास). –दशावतार. –मसाप १४.
कातऱ्या
वि. कापणारा : ‘कातऱ्या बाण सोडला, जंगल सार तोडला.’ - एहोरा २·१२१.
कचवा
पु. एक वाद्य. 'सतार, कचवा, सरोद आणि सार- मंडळ वाजविणारें.' -(बडोदें) कलावंत खातें ४९. कछवा पहा.
कचवा
पु. एक वाद्य : ‘सतार, कचवा, सरोद आणि सार मंडळ वाजविणारे.’ – (बडोदे) कलावंत खाते ४९. पहा : कछवा
कढी
स्त्री० कढलेली, एक प्रकारचें सार.
किचकट-काड
वि. १ बारीक; रोड; पातळ (शरीर, वांसा, खांब वगैरे). 'हें स्थित्यंतर युद्धकलेंत अलीकडे झाल्या- मुळें.........उंचापुरा जवान आणि किचकट पोरहि सार- खेंच.' -नि ९७१. २ किरटें; वाचावयास कठिण; गिचमीड (अक्षर, लेख). ३ फार बारीक; चिरचिरें (लेखणीचें टोंक). ४ (सामान्यतः) किचर, किचरट पहा. ५ भानगडीचें. 'श्री सिद्धारूढस्वामींच्या मिळकती संबंधानें असला किचरट वाद उप- स्थित झाल्याचें प्रसिद्धच आहे.' -सासं २.४१०. [सं. कृच्छ्]
किंकर
पु. १. चाकर; सेवक; दास : ‘नाम साराचेंही सार । शरणागत यमकिंकर ।’ – तुगा २५३२. [सं.]
किंकर
पु. १ चाकर; सेवक; दास. 'नाम साराचेंही सार । शरणागत यमकिंकर ।' -तुगा २५२२. 'वर्णिती राव किंकर' -ऐपो १४५. [सं.]
किर्द
स्त्री. १ रोजनिशी २ रोजचा जमाखर्च लिहिण्याची वही. ३ लावणी (जमिनीची). 'पावसाळा, कौल देऊन आज्ञा केली तर रयत उभेद धरून किर्दी करितील.' -रा ६.१४८. ४ लागवड केलेली जमीन. [फा. कर्द् = काम] ॰आबादानी-स्त्री. लावणी संचणी. 'गांवीं राहून वसाहत करून किर्द आबादानी करणें.' -रा १६.५५. ॰महामुरी-मामुरी-स्त्री.लावणी संचणी; लागवड; वसाहत. 'त्यांणीं तेथें किर्द महामुरी केली.' -रा १५. २०२. [फा कर्द् + अर. मअमुर = आबाद] ॰सार-वि. लागवडी- खालील, लागवडीला योग्य (जमीन). [फा. कर्द् + सार]
किर्दसार
वि. लागवडीखालील, लागवड योग्य (जमीन). [फा. कर्द + सार]
कलितसार
न. (ग्रंथ.) एखाद्या विशिष्ट भूमिकेकडे कल असणारे लेखाचे सार.
कणदार
वि. १ कणीदार; कण्या असलेलें (तूप वगैरे). २ भरपूर कणसें आलेलें (पीक); दाण्यांनीं गच्च भरलेलें (कणीस). ३ सकस; कसदार; ज्यांत अधिक सार, सत्त्व आहे असा (कडबा, गवत, धान्य, तूप इ॰). [कण = दार प्रत्यय]
कणदार वि.
१. कणीदार; कण्या असलेले (तूप वगैरे). २. भरपूर कणसे आलेले (पीक); दाण्यांनी गच्च भरलेले (कणीस). ३. सकस; कसदार; ज्यात अधिक सार, सत्त्व आहे असा (कडबा, गवत, धान्य, तूप इ.). कणपट्टी
कंवठ
स्त्री. एक फळझाड. हें दमट प्रदेशांत होतें. झाड मोठें असून याच्या फळास कंवठ म्हणतात. हें फळ वाटोळें असून याच्यावरील कवच कठिण असतें. हिरव्या कवठाच्या मगजाचें सार आणि पिकलेल्याचा मुरंबा करतात. -वगु २.३०. कवठ हत्तीस फार आवडतें. पाल्याचा रस पित्तविकारावर उपयोगी आहे. झाडा- पासून उत्तम गोंद निघतो. -कृषि ७६८. -स्त्री. २आणिक एक निराळें झाड; याचें फळ कवठासारखेंच असतें. परंतु हें फळ कडू असतें म्हणून खात नाहींत. याच्या बिया सुपारीएवढ्या असतात व त्यांचे तेल काढतात. तें खरजेवर औषधी आहे. हें झाड कोंक- णांत होतें. -न. (कोंबडीचें) अंडें. [सं. कपिथ्थ; प्रा. कवित्थ; कपिथ्थ-कविट्ठ-कवीठ-कवठ-रा. ग्रंथमाला हिं. कैथ] - ठाचा तकू-पु. (व.) कवठाची चटणी.
कोळणे
१. सक्रि. कालवणे; कुस्करून सार काढून घेणे : ‘जाड कोंडा वापरणे शक्य नसेल तर तो पाण्यात तास - दोन तास घालून कोळावा.’ - पाक ६२. उक्रि.
कोळणें
उक्रि. कुसकरणें; (पाण्यांत) हातानें चुरगडणें; गर काढणें; पिळणें (चिंच, आंबा); सार, सत्त्व काढून घेणें. [कोळ]
अ० कुवळणें, कालविणें, सार काढून घेणें.
करणीसार
क्रिवि. कृतीप्रमाणें; कर्मासारखें. [करणी + (अनु)सार] म्ह॰ करणीसार फळ = कर्मासारखें बक्षीस.
कृपाक्लिन्न
कृपाक्लिन्न kṛpāklinna a S Melting with tender kindness; streaming with gracious emotions. Ex. सखीसिं असें बोलतां सार साक्षी ॥ कृ0 हा होय संसारसाक्षी ॥.
कषाय
(सं) पु० काढा, कढलेला पदार्थ, सार, तत्त्व.
कसदार
वि. ज्यांत सार, सत्त्व, बळ, जोम, चांगुलपणा आहे असें; सत्त्वयुक्त; सरस; बलिष्ठ; भरींव; सकस. [कस + दार]
कसदार
वि. ज्यात सार, सत्त्व, बळ, जोम, चांगुलपणा आहे असे; सत्त्वयुक्त; सरस; बलिष्ठ; भरीव; सकस; दर्जेदार.
कुद्वह
सार. -आफ. [फा.]
खांकरवसा or खांकरवासा
खांकरवसा or खांकरवासा khāṅkaravasā or khāṅkaravāsā m Scolding or rating vehemently. v घाल, सार, काढ, कर g. of o.
खदिर
पु. खैर; खैराचें झाड. ॰सार-पु. कात. 'सर्व सारांचें शुद्ध सार । तो मी होईन खदिरसार ।' -एभा १२.५५१. [सं.] खदिरांगार- पु. खैराचा निखारा. 'अथवा निधान हें प्रगटलें । म्हणोनि खदिरांगार खोळे भरिले ।' - ज्ञा ९ १४९.
खदिरसार
पु. कात : ‘सर्व सारांचे शुद्ध सार । तो मी होईन खदिरसार ।’ - एभा १२·५५१. [सं.]
खेडेयेडे
न. एक छोटेसे खेडे : ‘पंढरी म्हनू शार दुरून दिसतं खेडंयेडं ।’ - जसा ६२९.
खुलास
वि. मोकळीक; सार. -मुधो. [फा.]
खुलासा
पु. १. अर्थ; मतलब; उद्देश; आशय; धोरण; अभिप्राय; उकल. (भाषण, लेख याचा). (क्रि. काढणे, निघणे). २. निवाडा; निकाल; निर्णय. ३. स्पष्टीकरण. ४. सार; निष्कर्ष; सारांश : ‘त्याचा खुलासा हाच कीं अंतर्वेदींत मऱ्हाटे न आणावे.’ - मइसा ६·३०८. [फा.]
खुलासा
पु. १ अर्थ; मतलब; उद्देश; झोंक; आशय; धोरण; अभिप्राय (भाषण, लेख याचा). (क्रि॰ काढणें; निघणें). २ निवाडा; निकाल; निर्णय. ३ स्पष्टीकरण. ४ सार; निष्कर्ष, सारांश. 'त्यांत खुलासा हाच कीं अंतर्वेदिंत मर्हाटे न आणावे.' -रा ६.३०८. [अर.]
खुलासा
(पु.) [अ. खुलासा] सार; निष्कर्ष; स्पष्टीकरण; सारांश. “नबाबांनीं एकान्तीं गांठोन कितेक शब्दारोप ठेविले; त्यांत खुलासा हाच की अन्तर्वेदींत मऱ्हाटे न आणावे” (राजवाडे ६।३०८) “खुलासा, उद्याचे परवांचे दिवसांत कामकाज उरकून घांट चढून जाऊं” (सानेपयाव ९०)
खुलासह
पु. सार. -मुधो. [फा.]
लब्बे लुबाव
(पु.) हिंदी अर्थ : सार, भाव,. मराठी अर्थ : तत्त्व.
लुब
(पु.) हिंदी व मराठी अर्थ : सार, आत्मा.
माफ
वि. क्षमा केलेला; क्षांत; सोडलेला (अपराध, अप- राधी, कर्ज, एखादें येणें). (क्रि॰ करणें; होणें). [अर. मुआफ्] माफी-स्त्री. १ क्षमा; सूट. २ (माळवी) दानरूपानें दिलेली जमीन अगर पैसा. [अर. मुआफी] ॰चिठ्ठी-स्त्री. जकात माफ असल्याबद्दलचा दाखला, चिठ्ठी, पत्र. [हिं.] ॰जमीन-स्त्री. साऱ्याची सूट मिळालेली जमीन. हिचे दोन प्रकार आहेत- एक अजी माफ आणि दुसरा अपूर्ण माफ. [हिं.] ॰साल-न. लाग- वडीस आणण्याच्या जमिनीवरील शेतसाऱ्याची सूट मिळालेलें वर्ष. 'माफीसाल गुदरल्यानंतर धारा पडेल.' [अर. मआफ + फा. साल] माफीचा साक्षीदार-पु. (कायदा) गुन्हा माफ करून इतर आरोपीविरूद्ध साक्षीदार केलेला आरोपी इसम.
मगज़
(पु.) [फा. मघ्झ] गीर; सार; मेन्दू; प्रतिष्ठा; बोज़. “इङ्जाचे मग ज़ातील बोय येती कीं तुम्ही कुमकेस न आला तरी काय गेलें? (खरे ८|४३५२). “आपला मगज़ राखणें । कांहीं तरी” (दासबोध ११।१०।२७).
मगज
पु. १ गीर; गाभा; रसाळ पदार्थ. 'मग पाहतां दिसें सगळें । परि मगज हारपे ।' -कथा ७.६.५३. २ शेंगेच्या आंतील दाणा, गर इ॰ मऊ पदार्थ. ३ भाकरींतील मऊ भाग. ४ हाडांतील मृदु अंश. ५ बोज; प्रतिष्ठा; महत्त्व. 'आपला मगज राखणें । कांहीं तरी ।' -दा ११.१०.२३. ६ डोक्यांतील मेंदु. ७ सार; तथ्य. [फा. मघ्झ; तुल. सं. मज्जा]
मंड
पु. १ आजाऱ्याला देण्यासाठीं भाताच्या लाह्या शिजविलेलें पाणी. २ भाताची पेज (औषधी). ३ कोणत्याहि पदार्थाचें सत्त्व, सार, तवंग, निवळी, साय. ४ मद्य. [सं.]
निकरा
पु. अर्क; सार : ‘कस्तुरीचेया निकरा : नोळखवे पासरा’ – उगी ६७२. [सं. निष्कर्ष]
निर्यास
पु. १ रस, पाणी, चीक, डिंक इ॰ नैसर्गिक स्त्राव. (समास) खदीर-गुग्गुल-पिप्पल-वृक्ष निर्यास. २ सार; काढा; अर्क. 'कामतत्त्व निमालें । संगीत सुख बुडालें । निर्यास गेलें । रसरायाचें ।' -भाए ९९. [सं.]
निर्यास
पु. १. झाडांपासून मिळणारा गोंद, राळ इ. नैसर्गिक स्राव. २. सार; काढा; अर्क : ‘निर्यास गेलें । रसरायाचें ।’ - भाए ९९. [सं.]
नीस
पु. १ सारांश; तात्पर्य; तत्वार्थ; निष्कर्ष; निवडून काढलेला चांगला भाग; सार; निवड. (क्रि॰ काढणें; निघणें). 'आदि वर्तमान जाणसी भविष्य । मागें पुढें नीस संचिताचा ।' -तुगा १२९३. २ बारीक चवकशी, तपास; छाननी;विचक्षणा. (क्रि॰ करणें; काढणें; पहाणें; पुरविणें). [निसणें]
नीस
पु. १. निवडून काढलेला चांगला भाग; सारांश; तात्पर्य; तत्त्वार्थ; निष्कर्ष; सार. (क्रि. काढणे, निघणे) : ‘आदि वर्तमान जाणसी भविष्य । मागें पुढें नीस संचिताचा I’ - तुगा १२९३. २. बारीक चौकशी, तपास; छाननी. (क्रि. करणे, काढणे, पाहणे, पुरवणे.).
निष्कर्ष
पु. १ सार; तात्पर्य; सारांश (भाषण वगैरेचा). 'निष्कर्ष दोहींही । देखिला असे ।' -ज्ञा २.१३२. २ तत्त्व; सारांश; मुख्य हेतु; निश्चय; सिद्धांत. 'जयांचे कां निष्कर्ष प्राप्ति- वेरीं ।' -ज्ञा ६.३२५. ३ शेवट; परिणाम. 'सर्व शून्याचा निष्कर्षु । तो जिया बाइला केला पुरुषु ।' -अमृ १.२७. ४ कसो- टीचा दगड; कसोटी; निकष.
निष्कर्ष
पु. १. सार; तात्पर्य; सारांश (भाषण इ. चा). २. तत्त्व; मुख्य हेतू; निश्चय; सिद्धान्त. ३. शेवट; परिणाम. ४. कसोटीचा दगड; कसोटी; निकष. [सं.]
निष्पत्ति
स्त्री. १ पूर्णता; समाप्ति; सिद्धि. 'जया का आथि पूर्ण निष्पत्ती । जेथ रसु धरी व्यक्ति ।' -ज्ञा १७.१५७. २ परि- पाक; परिणाम; सार; शेवट. ३ उत्पत्ति. ४ (भूमिति) मापन. ५ (सामा.) फळ; लाभ; उपयोग; निष्पन्न पहा. [सं.]
निष्पत्ती
स्त्री. १. पूर्णता; समाप्ती; सिद्धी : ‘जया का आथि पूर्ण निष्पती । जेथ रसु धरी व्यक्ती ।’ - ज्ञा १७·१५७. २. परिपाक; परिणाम; सार; शेवट. ३. उत्पत्ती. ४. (भूमिति.) मापन. ५. (सामा.) फळ; लाभ; उपयोग; पहा : निष्पन्न. ६. (द्रव्याची) ठेव : ‘बंभी निष्पत्ती सोनेया साहस्रु’ - एकु (पळस शिलालेख १, २). [सं.]
नकादह
सार. -आफ. [फा.]
नवनीत
न. १. लोणी; ताजे लोणी. २. सार; सारभूत अंश. [सं.]
ओंट
ओंट ōṇṭa f m (ओष्ठ S) A tree, and n its fruit. The fruit is much used in making सार or sour sauce.
ओंट, ओटंब
पुस्त्री. ओटआंबा; गोमांतक व कर्नाटक- मधील एक आंब्यासारखें झाड; याचीं पानें कुड्याच्या पाना- सारखीं असून फळें कार्तिकांत येतात, त्यास ओटआंबा म्हणतात. त्याच्या सुकविलेल्या कापट्यांना ओटाचीं सालें म्हणतात. चिंच किंवा कोकंबाऐवजीं सारांत तीं वापरतात. पिकलेल्या ओटांचें लोणचें, रायतें व सार करतात. [सं. ओष्ठ; का. ओटे; लॅ. गार्सिना कांबोगिआ]
ओंटवणी
न. ओंटाच्या तुकड्यांचें सार. [ओंट + वणी = पाणी]
परिणाम
पु. १ शेवट; निकाल; अखेरी; सार; फळ; निष्पत्ति. 'पापचा परिणाम नर्क.' २ (व्यापक. सामा.) सुख- कारक शेवट (धंदा, काम वगैरेचा); सिद्धि. ३ अडचणींतून निभा- वून गेलेली गोष्ट; यशस्वी निकाल; धडगत (नकारार्थी प्रयोग). (क्रि॰ लागणें). 'पांचशे रुपये दिल्यावाचून माझा परिणाम लागणार नाहीं.' ४ आकार, स्थिति यांचे रूपांतर; बदल; अवस्थांतर स्थित्यंतर. 'पाण्याचा धूमरूप परिणाम होऊन त्याचा पुन्हा पर्जन्यरूप परिणाम होतो. ५ अंतिम अवस्था; अखेर; चरमा- वस्था. ६ (ल.) ब्रह्म. 'जो निजानंदें धाला । परिणामु आयुष्या आला । पूर्णते जाहला । वल्लभु जो ।' -ज्ञा १२.१७१. [सं.] परिण(णा)मणें-१ परिणामाला पावणें. 'ऐसे स्वानुभवविश्रामें । वैराग्यमूळ जें परिणमे । तें सात्त्विक येणें नामें । बोलिजे सुख ।' -ज्ञा १८.७९३. २ पालटणें; बदलणें. 'चुकलें मत्प्राप्तीचें वर्म । तो धर्म अधर्म परिणमे ।' -एभा १४.२९९. ३ परिपक्व होणें. ४ विस्तारणें. 'सोनें परिणामलें सांखळें । कीं साडे पन्हरें जालें कडि- वळें ।' -ऋ ९३. ॰कार्य-न. पूर्व कारणाचा लोप होऊन जें त्यास रूपांतर प्राप्त होतें त्याचें नांव. जसें-दूध मूळ कारण लोपून त्याचें झालेलें दहीं हे रूपांतर. -हंको. ॰दाह-पु. १ मरण्याच्या वेळीं शरीराची होणारी आग, जाळ, भडका, दाह. २ अन्नपचन होत आल्यावर पोटांत उठणारी आग (रिकाम्या पोटांत ही उठते). ॰शुद्ध-वि. ज्याचा शेवट गोड होतो तें; सुपरिणामी; सुखपर्यवसयी. ॰शूल-पु. १ चांगलें अन्नपचन झालें नसतां पोटांत उठणारी कळ. २ अन्नपचन पुरें झालें असतां पोटांत होणारी आग. परिणामदाह अर्थ २ पहा. ३ मरणाच्या वेळच्या वेदना; शेवटची धडपड. ४ कोणताहि असाध्य रोग.
फोलारा
पु. १ फूल; पुष्प. फुल्लार पहा. २ फुलासारखा दागिना. 'फोलार वाजती सार ।' -ऐपो २.१९६.
रग
स्त्री. १ इंगा; नांगा. २ ईर्षा; मिजास; मस्ती; जोर; गुर्मी; ताठा; मग्रूरी. 'मराठ्यांची रग जिरविल्याशिवाय ते गप्प बसावयाचे नाहींत.' (क्रि॰ धरणें; बाळगणें; येणें; मोडणें; जिरवणें) ३ उत्साह; जोर; सहनशक्ति. ४ तीव्रता; कडकपणा; प्रभाव; वेग; सोसाटा. 'गळवाचें रक्त काढतांच त्याची रग मोडली.' 'उन्हाची-पावसळ्याची -वाऱ्याची रग.' ५ कळ; वेदना; दुःख; अवघडणें. (क्रि॰ लागणें; येणें). 'टवकारूनि दृष्टि लावूनिया रग । दावी झगमग डोळ्यापुढें । ' -तुगा ४०७. ६ धमनी; नस; स्नायु; शीर; नाडी. 'मिठी मारा सळसळती साऱ्या रगा । ' -प्रला १३१. ७ वेदना; पोट, हातपाय, डोकें, डोळे इ॰ अवयवांमध्यें सारख्या होणाऱ्या कळा. [फा. रग = धमनी] (वाप्र.) ॰जिरविणें-मोडणें-खोडकी जिरविणें; खोड मोडणें; शासन करून एखाद्याचा ताठा नाहींसा करणें. ॰जिरणें-उतरणें- मस्ती शमणें; नरम येणें. 'मदनरगा या त्वरितगती जिरुं देरे । ' -प्रला १८७. (मणगटाला) रग लावणें-मनगट घट्ट पकडणें; अवळून धरणें; पिळणें; वेदना होतील अशा रीतीनें दाबणें. कामाची रग-कामाची आच, त्रास, घाई; जाचणूक. (क्रि॰ लावणें; लागणें) सावकाराची रग, देणेदाराची रग-स्त्री. सावकारानीं किंवा देणेंदारांनीं मागें लाविलेली टोचणी, तगादा, त्रास, दुःख; छळणूक. सामाशब्द-रगदार-वि. १ जोरदार; पाणीदार; मस्त; रगेल, उन्मत्त; मिजासखोर; ऐटबाज. २ जिवंत; उत्साही; इर्षेबाज, तगडा (मनुष्य, पशु इ॰). रग पहा. रगदारी-स्त्री. उत्साह; ईर्षा; कस; जिवंतपणा; चैतन्य. रगमोड-स्त्री. गर्वहरण; मानहानि; नाक खालीं होणें; मस्ती घालविणें; जाणें. रगेल-वि. अंगात पुष्कळ रग असलेला. (मनुष्य; घोडा); ताठलेला; गर्विष्ठ; मस्त; गुर्मीखोर, अहंमन्य; मिजासखोर; बेगुमान; दिमाखी
रोखा
पु कर्जखत; कर्ज घेतल्याचा लेख. २ दस्तऐवज; करारनामा; करारपत्र; लेख; कागद; पत्र. 'अझुनी वरि तऱ्ही रडे तीचा फाडुनि टाका रोखा हो ।' -मध्व ५५. ३ आज्ञा- पत्र; साऱ्याचा अथवा माल पुरवठ्याचा सरकारी हुकूम; करारमाफक तगादा व वरात काढणें तें; मागणीपत्र; ताकीदपत्र; जरूरीचा हुकूम. 'त्यांनीं महाराजांस न भेटतां स्वार व रोखा गेला....' -मराचिथोशा १२. [अर. रुक्आ] रोखेबाजार-पु. रोखे व भाव यांची देवघेव पद्बतशीर रीतीनें होण्यासाठीं मोठ- मोठ्या शहरांतून त्यांचे विशिष्ट बाजार निर्माण होतात व ज्या- मध्यें ऋणलेखांची खरेदीविक्री चालते अशा बाजारविषयक संस्था. (इं.) स्टॉक एक्स्चेंज. -काळेकृत व्यापारी उलाढाली. रोखा- रोखी-स्त्री. उधारी न ठेवतां मालाची रोख किंमत घेऊन केलेला व्यवहार. 'उधारीपेक्षां रोखारोखींत सुख आहे.' -क्रिवि. १ रोखीनें; उधार न ठेवतां (एखादा व्यवहार करणें). २ ताबड- तोब; एकदम, जलदीनें; तेव्हांच (बोलणें, करणें). [रोख द्वि.] रोखी-स्त्री. १ ताबडतोब पैसे देऊन किंवा घेऊन केलेला व्यवहार; उधार न ठेवतां केलेला व्यवहार. 'आम्ही काय बाजारांत घेणें तें रोखीनें घेतों, उधार करीत नाहीं.' २ नाणें; पैसा; नगदी (पैशाचा व्यवहार याअर्थीं). 'कापड, किरणा ह्याचे उदमापेक्षां रोखीचे उदमास योग्यता अधिक.' (ह्या शब्दाचा रोखीचा, रोखीनें इ॰ प्रत्ययांत रूपांतच विशेष उपयोग होतो).
रयत-रय्यत
स्त्री. १ प्रजा (राजाची). लोक; जनता. 'कौल देऊन आज्ञा केली तर रयत उमेद धरून किर्दी करतील.' -रा ६.१४८. 'रानांत कोठें पिकें आहेत तेथें उपद्रव बहुत होतो. रयता दिल्गीर.' -ख ११.६१३. २ कूळ (शेतमालकाचें); शेतकरी; जमीन कसणारे लोक. [अर. रईयत्] ॰भाग-पु. रयतेचा, कुळाचा वांटा, मेहेनताना. ॰रजावन्ती-स्त्री. रयतेची खुशी. 'पाऊस कमी, पिकें तमाम वाळतात, त्यामध्यें रयत रजावंतीनें वसूल घेतच आहों' -ख ५.२४०१. ॰वार-क्रिवि. कूळ अगर प्रजा यांशीं प्रत्यक्ष रीतीनें; प्रत्येक कुळाशीं स्वतंत्रतः ॰वारी-वारी, ॰पध्दत-स्त्री. रयतेनें जमीनीचा वंशपरंपरेनें उपभोग घ्यावा अशी व्यवस्था; प्रत्येक कुळाशीं सरकारनें साऱ्याचा स्वतंत्र ठराव करण्याची पद्धति. याच्या उलट जमीनदारी. [फा. रईयत्वारी] रयतानी-स्त्री. रयत; कुळें, शेतकरी, (समुच्चायानें). [रयत] रयतावा-पु. १ रयतानी पहा. 'त्या राज्यांतील रयतावा सुखी आहे.' २ रयत, कूळ यांची स्थिति, कामें, कर्तव्यें वगैरे. ३ जमीनीचा सारा-चावडी (कुळांवर बसविलेली). [रयत]
साड
साड sāḍa m (सार S) The heart or core (of wood &c.)
पु. गाभा; मर्मस्थान (लाकूंड, झाड इ॰ चें); नार. -मोआश्रम ४.१३. [सं. सार]
साहित्य
न. १ सामुग्री; साधनें; उपकरणें (एखाद्या वस्तूच्या, कार्याच्या उत्पादन-निर्मिति-उभारणी इ॰ ला लाग- णारीं). उदा॰ लग्नाचें-मुंजीचें साहित्य. -मोकर्ण २०.३९. २ सहवास; संगत; स्नेह. 'साहित्य भंगलें येणें बोलें । म्हणती एक ।' -दा ८.२.३९. ३ संबंध; ऐक्य; संघ. ४ साहाय्य; मदत. 'संस- प्तक मथुन जय हि साहित्य करी जपोनि धर्माचें ।' -मोशल्य २.१४. 'अडल्याचें साहित्य करावें' -सिंब ५१. ४ (सांके- तिक) तेल (विशष प्रसंगीं, प्रभातसमयीं इ॰). ५ अलंकार- शास्त्र; अलंकार. ज्ञा १.६. ६ काव्य, नाट्य, कथा, लालित्य यांचा समावेश असलेली वाङ्मयशाखा. 'साहित्यचिया खेड- कुलिया ।' -शिशु २६. -एभा १.१०१. ७ (व्यापक) वाङ्मय; सार- स्वत. [सं.] ॰पत्र-न. मदतीची शिफारस करणारें पत्र, दाखला. नव्या अमंलदाराच्या मदतीसाठीं अशीं पत्रें देत. -भाअ १८२२. 'मारवाडी भीमसिंग आणखी बहुत छोटे मोठे सरदार यांस साहित्य पत्रें दिलीं.' -भाव १४. ॰शास्त्र-न. काव्य, नाट्य इ॰ तील अलंकारलक्षणें, गुण, दोष, पद्धति, वगैरे विवेचिणारें शास्त्र; अलं- कारशास्त्र; भाषासौंदर्यशास्त्र. ॰संमेलन-न. साहित्यिक चर्चा, ठराव इ॰ साठीं भरणारा साहित्यिकांचा मेळावा; वाङ्मयसभा; वाङ्मयपरिषद्. ॰साहित्य-न. साहित्य समुच्चयार्थीं. [साहित्यद्वि.]
साक्षेप
साक्षेप sākṣēpa m (स & आक्षेप) Intent and persevering prosecution or pursuit of; ardent or assiduous application (of the mind or affections) unto. v कर, धर. Ex. त्या गृहस्थाला अत्यंत विद्येचा सा0 आहे or तो विलक्षण सा0 करतो; तुला पुस्तकांचा सा0 आहे तुझ्या भावाला पैक्याचा सा0. 2 Strong bent or bearing; determined and stedfast purpose; setness towards of heart and soul with full swing. Ex. हा साक्षेपानें संध्याकाळचे वेळेस निजतो; कोण्हाला चोरी करण्याच्या सा0 कोण्हाला शिंदळकीचा सा0 फळ सार- खेंच. The above two meanings are substantially one, mere variations of acceptation of a word formed and fixed by the commonalty. साक्षेप, as used adverbially or in the third case, साक्षेपानें or साक्षेपें, agrees well with मुद्दाम, मुजरद, दाटून, उदमेखून &c.
सारा
पु. १ जमिनीवरील कर, पट्टी. 'नाहीं वेठी जेवा सारा । जाहाती नाहीं म्हणियारा ।' -तुगा ३६०. २ खंड. 'हेस्टिंग्ज साहेवानें हा प्रांत सार्यानें तरी आपणास वहिवाटीस द्यावा म्हणून बोलणीं लाविलीं ।' -विवि ८.६.११३. ३ भाडें. [अर्. साइर्] ॰दोरा-पु. सार, कर पट्ट्या वगैरे. [सारा + दोरा आधिक्यार्थी] ॰बंदीस्त्री. सरकारास सारा न देणें. एक सत्या- ग्रह. 'बाळकृष्ण मथुरादास गुजर यांनीं सारबंदीचें उपदेशपर भाषण केल्याबद्दल ४ महिने कैद झाली.' -के २.१२.३०. सारेकरी-पु. सारा भरणारा इसम; खंडकरी.
सारांश
पु. १ सार; सत्त्व; अर्क (लक्षणेनें व शब्दशः) 'गोगोरस मंथन करितां । चोरिशी सारांश नवनीता ।' -एरुस्व ८.२९. २ तात्पर्य; मथितार्थ; गोषवारा. ३ (कायदा) निर्णय; निकाल (न्यायाधिशाचा, पंचाचा). ४ हुकूमनामा; निवाडपत्र.
सारासार
सारासार sārāsāra m (सार & असार) The fat and the lean; the cream and the serum; the spirit and the dregs; the good and the bad, lit. fig. (of a substance, or of a matter generally.) Ex. जे नेणति परदोषगुण ॥ सदा सारासारविचारण ॥ तेथें दूषणासं- चार नव्हे ॥.
सारासारबुद्धि
विवेक, तारतम्य, सर्व नियमांचे सार असा नियम म्हणजे सारासारबुद्धि, बरेंवाईट ओळखणे, सदसद्विवकबुद्धि, भल्यावाईटाची जाणीव, व्यवहारबुद्धि, चार लोक काय करतात व काय करणें पचतें तें ओळखणें.
सारभागी
वि. शहाणा; गुणज्ञ. 'म्हणसी सारभागी जे जन । माझीया गुणागुणांचें गायन । करूनियां ते शांतमन । निवांत होती ।' -रास ३.२७८. [सं. सार + भज्]
सारभोक्ता
वि. ज्याच्याकरितां दुसर्यांनी कष्ट केले आहेत अशा चांगल्या गोष्टीचा आयता उपयोग घेणारा. [सार + भोक्ता]
सारढेंकर
पु. (राजा.) करपट ढेंकर. 'आज जडान्ना- मुळें मला सारढेंकरा येतात.' [सार + ढेंकर]
सारें
न, (गो.) १ माशाचें खत (शेतासाठीं). २ जिभे- वरचा पांढरा साका. [सं. सार ?]
सारोधार
पु. (महानु) सारांश. 'तयांचा सारोधारु । आंता आइक तुं ।' -भाए ६९५. [सं. सार + उध्दृ-उद्धार]
सारस
न. कमल. 'सेवा श्रीपतिच्या पदा अलि जसा अत्यादरें सारसा ।' -मोअंबरीष. [सं.] सारसाक्ष-वि. कमल- नयन. 'श्रीमूर्ति तुझी हरि सारसाक्षी । हे जाणते सार असार- साक्षी ।' -वामन हरिविलास ६.२८. [सारस + अक्ष]
सारवण
सारवण sāravaṇa n (सार Good, pure &c., and वन Water. Cowdung being esteemed as pure and purificatory. ) Smearing (of the ground, a wall &c.) with cowdung-wash. v घाल. 2 The cowdung-wash, mixture of goats' dung and earth &c. prepared for the purpose. 3 Smearedness (of the ground &c.) with the dung-wash: also the coating applied.
शेजून
क्रिवि. (व.) जवळून; निकट अंतरावरून. 'वावरांत काळ्या शार । मोठी हरणी निजून । पारध्या दादा! धांव । टाक जाळें रे शेजून ।' -वलो. [शेज]
शहारा; शारा
(पु.) [अ. शअर्] रोम. “तया प्रस्तावाच्या अङ्गी शारे भरे सुमनाचे” (मुक्तेश्वररम्भाशुक संवाद ४४०).
शहर-रा-रें
पुन. १ कांटा; रोमांच; भीतीनें होणारा थरकांप. (क्रि॰ येणें). 'मऊ सेजेवरती निजतां उठती अंगीं शहर.' -पला १७९. २ हिमज्वर; हिंवताप. [सं. सीत्कार; प्रा. सीक्कार सिआर; तुल॰ अर. शअर = रोम]
सिध्दांत
पु. १ प्रमाणानुरोधानें ठरलेला निर्णय; विचार- संशोधनादिकांचें फल. २ प्रतिपादित तत्त्व; प्रस्थापित सत्य. ३ तत्त्वाचें कथन; परमतत्त्व. 'जे वदे शास्त्राचें सार । सिद्धांत धादांत विचार ।' -दा ५.६.२७. ४ निश्चय; निर्णय. 'अखेरीस त्याच्या मनांत सिद्धांत होऊन तो म्हणाला...' -मराठी ६ वें पु. (१८७५) १८६. ५ नियम; प्रमेय; सारणी. (इं.) थिअरम्. ६ ज्योतिष- ग्रंथ. उदा॰ सूर्यसिद्धांत. ७ (ल.) पक्की, वज्रलेप, गोष्ट. [सं.] ॰मार्ग-पु. गुरुभक्तिमार्ग. -दा ४.१.९. सिध्दांतित-वि. सिद्धांत म्हणून निश्चित केलेला, प्रस्थापित. सिध्दांती-वि. १ सिद्धांत ग्रंथ पढलेला. २ प्रयोग करून पाहणारा; सिद्धांत ठरविणारा. ३ कोणतेंहि सत्य, तत्त्व वगैरे प्रस्थापित करणारा.
शिलक-ख
स्त्री. बत्ती; सरबत्ती; फैर. 'त्या वेळेस इक- डून दोन शिलका म्हणजे फैरा एक क्षणांत केल्या' -रा ३.१९१. 'तोफखान्याला शिलक दिली ।' -ऐपो २१३. [अर. शल्क] शिलक(ग)णें-अक्रि. पेट घेणें; पेटणें; आग लागणें; चेतणें. शिलका(गा)वणें-विणें-सक्रि. १ पेटविणें; आग लावणें; चेतविणें; बत्ती देणें. २ (ल.) चेतना देणें; उठावणी देणें; भडक- विणें. शिलका(गा)वण-णी-स्त्री. १ पेटविण्याची, आग लावण्याची क्रिया. २ (ल.) साऱ्यासाठीं तगादा करावयास पाठ- विलेल्या मनुष्यानें स्वतःकरितां जबरीनें कांहीं रक्कम घेणें. ३ अशा प्रकारें घेतलेली रकम. ४ मुदतींत काम न केल्याबद्दल दररोज घ्यावयाचा दंड. ५ वसूल केलेला पैसा जवळ ठेवल्याबद्दल, अफरा- तफर केल्याबद्दल घ्यावयाचा दंड. शिलगून देणें-(व.) पेट- विणें.
शिनहाळ
वि. (अप. झिंदल) विधवा; गतधवा; पतिरहित. 'शिनहाळ माझी पागा दिसती सार. ' -ऐपो २. १८४.
सईसुमार
पु. एखाद्या गोष्टीविषयीं, कार्याविषयीं सारा सार, ग्राह्याग्राह्य विचार; कोणत्यावेळीं किती बोलावें, खावें, प्यावें इ॰ संबंधीचा सुमार; अंदाज; अटकळ [अर. सहीह् + फा. शुमार]
सत
न. सत्त्व याचें संक्षिप्त रूप. सार; सद्गुण; तत्त्व; बल; सामर्थ्य; तेज. (वाप्र.) सत घेणें, सोडणें, सतास जागणें-सत्त्व पहा.
सत्व
(सं) न० सार. २ सत्यत्व. ३ स्निग्धपणा, भाव, अस्तित्व. ४ प्राणी. ५ गुणविशेष.
शुआर
(पु.) हिंदी व मराठी अर्थ : देखो 'शआर'.
टार
पु घोडा. (घोड्याची, त्याचप्रमाणें नार, गार, सार म्हणजे बायको, जवाहीर, द्यूत यांची किंमत नेहमीं बदलते किंवा कल्पनेच्या बाहेर पडते; यावरून). टार-न. शिंगरूं किंवा दमडी किंमतीचा व रोकडा घोडा. 'वाहावया पोथी वृद्ध टार ।' -एभा १८.३४८. त्यावरून खोडकर मुलास म्हणतात. -वि. खोडकर; द्वाड; टारगट.
टार ṭāra m A term for a horse in mentioning the four things of which the price or value is ever varying, or which carry off money beyond all computation; viz. टार, नार, गार, सार, horses, women, jewelry, draughts (i. e. dice). टार n is A puny or sorry horse, and answers to rip, jade, hack. Hence applied angrily to a little and mischievous child.
टार
पु. घोडा. (घोड्याची, त्याचप्रमाणे नार, गार, सार म्हणजे बायको, जवाहीर, द्यूत यांची किंमत नेहमी बदलते किंवा कल्पनेच्या बाहेर पडते यावरून.).
तात्पर्य
आशय, संदेश, सार, भावार्थ, तथ्यांश, बोध, सारांश, मथितार्थ, गोषवारा, ध्वन्यर्थ, सूचितार्थ, थोडक्यांत गोळाबेराज, काय म्हणावयाचें आहे तें, ग्रथित नीतितत्त्व, घ्यावयाचा धडा, थोडक्यांत अर्थ सांगण्याचे सूत्र, लेखांतला ध्वनि, लेखकाचा सल्ला, लेखनहेतु, त्यांतील सूत्र.
तात्पर्य
(सं) न० सार, सारांश, हाशील, तत्व.
न. १ (भाषण, गोष्ट, लेख, वृत्तांत इ॰ कांतील) सारांश; मथितार्थ; भावार्थ; मतलब; अभिप्राय. २ हेतु; धोरण; उद्देश; कारण. [सं.] तात्पर्यार्थ-पु. (लेख, भाषण, हकीकत इ॰ कां- तील) सार; रहस्य; निष्कर्ष; तात्पर्य; गोळाबेरीज. [तात्पर्य + सं. अर्थ]
तात्त्विक
न. (तात्विक हें चुकीचें रूप) सार; सारांश; निष्कर्ष; भावार्थ; तत्त्व; तत्त्वांश. -वि. १ तत्त्वाला, सत्याला धरून असलेला; खरा; वास्तविक; न्याय्य; प्रामाणिक. २ तत्त्वशास्त्रासंबंधीं; तत्त्वविषयक. ३ तत्त्वशास्त्रज्ञ. [सं. तत्त्व]
टिंवाळ
न. (गो.) सार (आमसोलांचे).
टिवाळ
न. सार (आमसोलांचे). (गो.)
त्राण
न. १ रक्षण; सांभाळ. २ रक्षण करण्याचें साधन; आधार. 'एवंगुण लक्षण । सात्त्विक भोज्य जाण । आयुष्याचें त्राण । नीच नवें हें ।' -ज्ञा १७.१३१. ३ नरकापासून तारण; मुक्ति; मोक्ष. ४ अतिशय जोराचा, नेटाचा, सर्व शक्ति एकवटून केलेला प्रयत्न. 'एक शर सोडोनियां त्राणें । कर्णनंदन उडविला ।' -जै १८.७९. ५ संतापानें, त्वेषानें केलेली आदळआपट, आरडाओरड इ॰; हातपाय झाडणें व चडफडणें. ६ (जीर्ण वस्त्र, वस्तु, दुबळा मनुष्य, जनावर इ॰ कांत) राहिलेला, शिल्लक अस- लेला दम; जीव; जोर; धडधाकटपणा; सत्त्व; ताकद; सार. [सं. त्रा-त्राण]
त्राण
न. १. रक्षण; सांभाळ. २. रक्षण करण्याचे साधन; आधार : ‘...आयुष्याचें त्राण । नीच नवें हें । – ज्ञा १७·१३१. ३. नरकापासून तारण; मुक्ती; मोक्ष. ४. अतिशय जोराचा, नेटाचा, सर्व शक्ती एकवटून केलेला प्रयत्न : ‘एक शर सोडोनियां त्राणें कर्णनंदन उडविला ।’ – जै १८·७९. ५. संतापाने, त्वेषाने केलेली आदळआपट, आरडाओरड इ.; हातपाय झाडणे व चडफडणे. ६. (जीर्ण वस्त्र, वस्तू, दुबळा मनुष्य, जनावर इ.त) शिल्लक राहिलेला दम, जीव, जोर, धडधाकटपणा, सत्त्व, ताकद, सार. [सं.त्रा]
तरुणी (छटेल )
चटोर, थिल्लर, ती पुरुषांच्या वाह्यात संभाषणांत रस घेण्यास शिकली होती, हें पाणी निराळेंच आहे, काय त-हात-हा करते ! निव्वळ मौजमजेची भोक्ती, हिला लाज-विनय यांचा संपर्कहि झालेला दिसत नाहीं ! नलगे नलगे बळेंच विलगे अशापैकी, अशी नतद्रष्ट पोर, चंचल अस्थिर व थिल्लर, सर्वांना पुरेवाट केली उच्छृंखल वृत्तीने ! फुलपांखरां- सार खी वागते, भलतेंच टीपेंत काम आहे, भुलावण्या दाखविण्यांत पटाईत, छचोर आणि स्वच्छंदी मुलगी, डोळे मोडत, लाडिक झोंबाझोंबी करते, कंबर लचकत लचकत ती गुलछडी बोलत असते, उगाचच भाव खाते, तिची ती लाडेलाडे बोलण्याची लकब व सैल बोलणे.
तरुणी (वर्णन )
निरभ्र गात्रें, सर्व जेथल्या तेथें व प्रमाणबद्ध गव्हाळ गोरी, नितंबिनी, सुमध्यमा, तिचें ढोबळ सौंदर्यही मन वेधी, सिंहकटी व गजगामिनी, कमनीय देहयष्टि, सुडौल बांधा, सुंदर तनुयष्टि, गोंडस अंगलट, घट्ट बांधा, ही गोड लांच, बेफाम रूप, हें प्रीतीचें तारूं, नक्षत्रा- सारखी मुलगी, असीम रूपसंपदा, हें मखमली सुख, लावण्यमदिरा , नजरांची खंडणी घेत जाणारी, प्रेक्षकांच्या मनांत प्रीतीचीं चोर-पावलें उमटवी, हिचें दर्शन हे दुःखावर उताराच, प्रफुलयौवना, तिच्या तनुलतेला यौवनसुलभ भर आला होता, तारुण्याच्या उंबरठ्यावर पदार्पण करणारी. बांधेसूद हात, भुजलतांची गोलाई व नितळपणा, हंसरे डोळे, चांफेकळी- सार खें नाक, गाेड वाटाेळा चेहरा, केसांच्या दोन सैलसर वेण्या, सुरळीत मुलगी, सुवाच्य चेहरा, आरशासारखें मन चित्तांत उबदार स्वप्नें, हृदय-सिंहासनाचा मानकरी शोधणारी, विनयाचें हृद्य झिरझिरीत वस्त्र ल्यालेली, लाजेनें चूर, बुजरी नजर, लाजरी बुजरी शांत व सौम्य, नयनांतला लोभसवाणा भाव, देहवीणा हेलकावीत नेत्रांचे शरसंधान करीत निघे, स्मिताची चिथावणी देई.
तत्तामाल
पु. (एखाद्या पदार्थातील) उत्कृष्ट अंश; सत्त्व; मगज; सार. [हिं. तत्त+माल]
तत्तामाल
पु. (एखाद्या पदार्थांतील) उत्कृष्ट अंश, सत्त्व; मगज; सार. [सं. तत्त्व; प्रा; हिं. तत्त + माल]
तत्त्व
न. १. सत्य; वास्तविक स्वरूप; वस्तुस्थिती : ‘असे हा कोणाचा कवण मजला तत्त्व न कळे ।’ – सारुह ७·८२. २. (ल.) प्रत्यक्ष अस्तित्व; उलट अर्थी माया. ३. (वेदान्त.) ब्रह्म; तेचपण; जीवपण; विश्वाला चेतना देणाऱ्या परमात्मरूपाशी एकरूप असलेले जीवात्म्याचे स्वरूप : ‘मग तत्त्वता तत्त्व उरलें । ज्ञानियासी ।’ – ज्ञा २·१३१. ४. पंचमहाभूते; पंचविषय; दशेंद्रिये, मन, अहंकार, महत्तत्त्व, माया, ईश्वर यांना सामान्य संज्ञा. ५. (एखाद्या पदार्थातील) उत्कृष्ट अंश; सत्त्व; सार; मगज; सारांश; तात्पर्य. ६. (रसा.) मूलद्रव्य; धातू. ७. (ल.) पैसा : ‘वरचेवर तरतूद पाहिजे तैसी करावयाची होती परंतु एक तत्त्वाचे पेचात आलो.’ –ऐलेसं २६६४.
थिता
वि. १. अल्प; थोडेही : ‘म्हणोनि सार थिता, सुगुण न लोपीं ।’ – मोकर्ण २१·३७. २. स्थिर : ‘जें थितें हें डहुळलें । मानस माझें ।’ – ज्ञा ३·१४. ३. व्यर्थ; वाया. [सं. स्थित]
थितें
वि. १ अल्प; थोडे सुद्धां. म्हणोनि सार थिता, सुगुण न लोपीं ।' -मोकर्ण २१.३७. २ स्थिर. 'जें थितें हें डहु- ळलें । मानस माझें ।' -ज्ञा ३.१४. [सं. स्थित]
उदासीनता
स्त्री. १. वैराग्य; विरक्ती : ‘उदासीनता तत्त्वता सार आहे॥’ – राम ५७. २. बेपर्वाई.
उदासीनता
स्त्री. वैराग्य; विरक्ति. 'उदासीनता तत्त्वता सार आहे. ।।' -राम ५७.
उळीग
उळीग uḷīga n sometimes उळग n & उळिगी f (Poetry.) An obligation or a burden; some duty, task, or necessity lying pressingly; esp. some unpleasant obligation from favors conferred. v वार, सार, फेड, दवड.
उमाळा-ळी
पुस्त्री. १ मळमळ; पोटांतील खळबळ; कळ- मळ; उमळ. २ हुंदका; उकळी; आवेग; उसळी; लहर (राग, प्रेम, दुःख, शोक वगैरे विकारांची). 'स्वानंदाचे उमाळे देती । सारा- सार विचारें तळपति ।' ३ तीव्र इच्छा. 'देहे खंगतां सर्व जाळी उमाळी.' -दावि १७८. ४ उकळी; कढ; ऊत (पाणी, दूध वगैरे पदार्थांचा). ५ सुटका; सोडवणूक; मुक्तता; मोकळीक (एखादा धंदा, कार्य वगैरेतून). (क्रि॰ पडणें). ६ लोट; गर्दी; हल्ला; उठाव. 'तो देखौनि यादवांचा उमाळा । एरी सिंहनादु दीन्हला ।।' -शिशु १०४१; 'तैसे दृश्याचे डाखळे । नाना दृष्टीचे उमाळे ।' -अमृ ७.१४३. ७ उद्भव; जोर; प्रभाव. 'जेयांचा देखौनि उमाळा । पळे महामोहाचा पाळा ।' -शिशु ३८४. 'भंगोनि विघ्नांचा उमाळा.' -मुआदि ३५.१०२. [सं. उद् + मूल; तुल॰ का. उम्मलु = श्वास घेण्यास येणारी अडचण, कफ] ७ (काव्य.) ज्वाला; झोत; लोळ; तरंग (आग, वीज वगैरेचा). 'कोटी रविशशि तेज उमाळा ।।' -दावि ३३५. 'जैसे कल्पांतविजूचे उमाळे ।' -रावि १.१२. [का. उम्मळ = उष्णता] ॰पडणें-अतिशय पाऊस झाल्या- मुळें पिकें कुजावयास लागणें. उमळ पडणें पहा. उमाळीं-उमा- ळीस-उमाळ्यां-उमाळ्यास पडणें-येणें-उघडकीस येणें; माहीत होणें; दिसणें; आढळणें; बभ्रा होणें.
उत्सर्गतः
क्रिवि. १ सामान्यतः; साधारण मानानें. 'उत्स- र्गतः पहिलें असतां अहिंसारूप धर्म निर्दष्ट आहे.' २ नियमानु- सार [सं.]
विदळ
वि. १ डाकलग; डाक लावलेलें; हीणकस. 'विदळ बहु चोखा । मीनलिया वाला एका ।' -ज्ञा १३.१००८. २ ज्यांत दळ, गर, सार नाहीं असें. [सं. वि + दल]
विलग
पुन. १ वैगुण्य; उणेपणा; व्यंग; विसंगति; वैपरीत्य; अंतर. 'विलग पडों नेदावें । कथेमध्यें ।' -दा १२.९.२०. २ उपद्रव; त्रास. 'कानक्रोधांचे विलग । उठावती अनेक ।' -ज्ञा १२.६२. -वि अलग; भिन्न; विसंगत; अयोग्य; असंबद्ध; न जुळणारें; तुटक; अलिप्त. 'हे लोक साऱ्या गांवापासून कांही काळ विलग राहिले होते.' [सं. वि + लग्] विलगट-वि. वेगळा; अलिप्त; भ्रष्ट. -स्त्री. फार लगट; विशेष लगट. 'विलगट हट नाहीं चाट मोकाट नाहीं ।' -दावि ७.२. 'ते देवत्रयांची खटपट । सूक्ष्मरुपें विलगट ।' -दा १२.८.९. विलगणें-अक्रि. दूर होणें; नाहींसा होणें; धुऊन निघणें. 'पदी श्रीरामाच्या दृढ- तर महादोष विलगे ।' -सारुह ६.१६३. विलगेस लावणें- दूर करणें; बंदोबस्त करणें; बाजूस काढणें. ' ही किरकिर विलगेस लावा ।' -पला ६.१३.
वळाण
न. (व. ना.) शेताची वाफ; शेतांत पाऊस पडल्या- नंतर शेत कोरडें होणें; वाफसा. [वाळणें] ॰पडणें-औत चालण्या- इतकी जमीन कोरडी होणें; वाफसा येणें. ॰सार, वळाणी-नी- वि (व.) पाणी धरून न ठेवणारी व वाहण्यास लवकर योग्य होणारी (जमीन).
वर्म
न. १ नाजुक, हळवा, दुखरा भाग. २ (ल.) नाजुक जागा; मर्म. 'वर्मीं खोंचला रुक्मिया ।' -एरुस्व ६.४४. ३ ज्याचा उल्लेख केल्यास राग येतो अशी गोष्ट; बिंग; जिव्हार. ४ रहस्य; तत्त्व च सार. -ज्ञा ५.९६. 'तो आत्यंतिक क्षेमाचें वर्म । भागवत- धर्म उपपादी ।' -एभा २.२७७. ५ मख्खी; खुबी; गुह्य. 'देव सख्यत्वें राहे आपणाशीं । हें तों वर्म आपणाचिपासीं ।' -दा ४.८.१२; -अमृ ५.५०. ६ बळी पडण्याचें, वश होण्याचें साधन. 'बायकांचें वर्म म्हणजे दागिने.' -शारदा ३२. ७ महत्त्वाची गोष्ट. 'सर्व काहीं धर्म आणि कर्माऽकर्म । चुकलिया वर्म व्यर्थ जाती ।' -रामदास स्फुट अभंग (नवनीत पृ. १५१) [सं. मर्म] ॰कर्म-न. १ उखाळीपाखाळी. 'हांसोनियां काढिति वर्मकर्मा ।' -आ उमारमासंवाद १. २ छिद्र; व्यंग. (बहुधां अनेकवचनी प्रयोग, उदा॰ वर्मे कर्में). ॰स्पर्श-वि. मनाला झोंबणारें; लाग- णारें (भाषण) -ज्ञा १३.२७०; 'कां वर्मस्पर्शवचनीं निंदितां । मुक्तासी व्यथा उपजेना ।' -एभा ११.४६७. वर्मणें-क्रि. वर्म जाणणें ? -अमृ ५.५०. वर्मी-वि. १ मर्मभेदक; बोंचक; टोंच- णारें (भाषण इ॰). २ मर्में, बिंगें, व्यंग, दोष जाणणारा. ३ गूढ, मर्म, रहस्य जाणणारा (एखाद्या धंद्याचें, यंत्राचें, कृतीचें); तज्ज्ञ. ४ मर्मज्ञ; मार्मिक; आंतला अर्थ, रहस्य जाणणारा (एखाद्या ग्रंथां- तील, वचनांतील). ५ कांहीं गुह्य गोष्टी, बिंगें असणारा; वर्म काढ- लेलें खपत नाहीं असा. 'वर्मी पुरुषास चौघामध्यें सभाकंप सुटतो.'
वृथा
क्रिवि. व्यर्थ; विनाकारण; निष्फळ. [सं.] ॰दान- न. निष्फळ, बिन किफायतशीर देणगी (खुशामत्या, वेश्या, मल्ल इ॰ स दिलेलें बक्षीस, खेळांत घालविलेला पैसा). [सं.] ॰पुष्ट-पु. (व्यर्थ खाऊन माजलेला) १ आळशी; निरुद्योगी निरुपयोगी. 'सार सेविजे श्रेष्ठीं । असार घेइजे वृथापृष्टी ।' -दा ६.९.१०.२ फुकटखाऊ; भोजनभाऊ; खाऊपासरी. [सं.]
अशुभ
न. १ अमंगलपणा; अनिष्ट; दुर्भाग्यता; दु्र्दैव; अक- ल्याण म्ह॰ अशुभस्य कालहरणं । शुभस्य शीघ्रम. २ अनिष्ट कार्य; अमंगल कार्य. ३ पातक. 'आमुच्या अशुभाशयाचा घातु । करिता चरणधूमकेतू ।' -एभा ६.१११. [सं.] -वि. १ अमंगल; अभद्र; अनिष्ट; प्रतिकूळ (देखावा, सूचना, मतलब, अर्थ, योग, क्रिया, शब्द, खुणा, चिन्हें, लक्षणें वगैरे). ॰कर्म-न. अमंगल किंवा तिरस्करणीय विधि. ॰आचार-पु. १ ज्यांत उत्सव-सुखसोहळा नाहीं अशा तर्हेचें कार्य किंवा समारंभ; विशेषतः औध्वदैहिक क्रिया- उत्तर क्रिया. २ पापाचरण; अनाचार; दुष्कर्म. [सं.] ॰चिन्ह- ॰लक्षण-न. १ अमंगल, अनिष्ट, चिन्ह-लक्षण, छाया, व्यंजन; दुश्चिन्ह; अनिष्ट सूचक गोष्ट. 'अशुभचिन्हें अत्यंत । लंकेमाजि होति बहुत ।'. घोडयाचीं कांहीं अशुभलक्षणें-'अंसुढाळ किंवा अंसुपात, शृंगी, अंजनी (चांदणी), द्वयखुरी, कुखावर्त, एकांगुळ, त्रिकर्णी, थनी, हीनदंती, अंडावर्त, अधिकदंत, काळवदन, विक्राळ, पंचनखी, कराळ, अहीमुख, तुटपट्टा, वाणिया, वाशिंग, आसनखऊ, सर्पिण, कृष्णां- जनी, खानखऊ, गोमीपांच, हरिणांग, पितअंजनी, काखावर्त, सार- भूकण (सारभाजन), एकांडी, काळांजनी, अंगावर्त, दाढशृंखळ, पुसावर्त, श्वेतांजली, लेंडावर्त, शून्यमस्तक, हृदावर्त, नासावर्त, पोटा- वर्त, तळावर्त, शिळावर्त, नेत्रावर्त, भाळलोचन, व्याघ्रकांत, कृष्ण- टाळू, कपिमुख, जानूवर्त, आर्जळ, कर्णमूळ, शिंपला, पंचनखी, मेंढसुख, खरमुख, रावामुख, कौस्तुकी, हयभंग, केरसुण्या, मध्य- दंती, खुंटीउपाड, अश्रुपात, सेनाभंजन, ढाशी, पोटसूळ, खळतो, रातांधळ, लीदखातो, माथेशूळ, पडमुत, रक्तमुततो, पाण्यांत बसतो, चर्हाटें खातो, डसतो, बुजतो. याशिवाय इतर खोडी-उत- रड, चिमटा, डंकी, बोंबल्या, एका अंगावर झुलणें, बसला असतां उठतांना गुडघे टेकून उठणें, मगरूरी करणें, फार हिंसणें, भित्रे पणा, उड्या मारणारा, पळण्याची खोड, लाथ मारणें व भांडखोर, पुढें आलेल्या जिनसावरून उडून जाणें, चावणें, दोन पायावर उभें राहणें, नालबंदी करूं न देणें, पंचवाख, बांधरीनाख (हरिनाख), उपानयन, जीनपाठक, तंगावर्त, मांडवर्त, चित्री, शाखी, दोसीना, रुईकांती, जंबावर्त, पंचपर्व गुदक, पापवर्ण. घोड्याचे कांही अशुभ भोंवरे-असलि, यकूब, सार्फान, सिपलक, सिंगन, कनहसलि, च्छपर- खट (जनाजा), इतलसार, डंखउजाड, संगिनमाक, कुलुंज, सफा- दारा, गातदार, मुरापा, चवडाशुंभ, मुत्लककूलफेदान, मुत्लकूल- लर्जेन, मुलकूलयेसार, मुलकूलयोजान, मुलारत, चारगुल, खालदार, चवदस्त, सिकल, गोवस्तान, कच्छि, तबरंगु, तस्मागर्दन, औसि- कम, मर्दजान, मोथेवाला, चपरहडी, पोतेअलग, पोपेला, पेरोसोन, अक्रबपेसानी, मापिरू, ढपल, सिकालपेसानी, सिकाल, खुंटेउखाड, चांदसुरज, गजदंत, चकावळ, उंटाच्या दांतासारखे दांत असणारा, उंच कपाळाचा, चालतांना बाहेर जीभ काढणारा, पाणी पितानां पाण्यांत फार तोंड बुडविणारा, दाणा खाऊन शिल्लक कांहीं न ठेवणारा, अंडावर गाईसारखें थान, सड व त्यावर केंस असणारा, एकांड्या, अंडांत कोय नसणारा, काळ्या जिभेचा, एका अंगास झुलणारा, छातीवर भोंवरा (वेड फोड) असलेला, कुसगोम, किरका- वदाल, अदमचसव, खांडकुहा, हृदावळ, विषानैनी, पितानी' वगैरे. -अश्वप ९३-१०६. या शब्दांच्या अर्थासाठीं ते ते शब्द पाहणें. ॰वर्तमान-न. वाईट बातमी; अमंगल, अनिष्ट बातमी. '(बिपश- साहेबांच्या) अशुभवर्तमानानें फसून जाण्याइतके मूर्ख आतां आम्ही राहिलों नाही. '-टिले २.५६२. [स.]
भराका
भराका bharākā m (भर!) The whirr, flurr, or sudden and noisy vibration of wings;--used of birds rising or flying. v मार, उड, चाल. 2 A whizzing whirl (as with a sling or from the hand). v मार. 3 A run or rush, lit. fig.; an eager or a smart sally, start, spurt, stretch, go; any rapid and forceful effort or action. Ex. घोड्यावर बसलों आणि भराक्यासरसाच पुण्यास दाखल झालों. 4 A blast or overpowering afflatus of a god or devil (--पिशाचा- चा-भूताचा-देवाचा भ0); a paroxysm of rage (--रागाचा भ0); a flurry or gust of wind (--वाऱ्याचा भ0); the animation and bustle or brisk progress of any business or work (--कामाचा-लिहि- ण्याचा-म्हणण्याचा-बोलण्याचा-चालण्याचा-मारण्याचा- गाण्याचा भ0). 5 Close or thick showering (as of stones, arrows, darts). 6 Whisk, whirl, stoop, swoop, spring, dash, any movement of suddenness and impetus. Ex. पिशाच संसरतांच ह्या भराक्या- सरसेंच विहिरींत उडी टाकली; घारीच्या भराक्यानें पोराची भाकर गेली; हाताचा-पदराचा-अंगाचा भ0. 7 Ventris crepitus cum strepitû. v सोड, सार. 8 भराका, although having other senses, well agrees with the common word झपाटा, where see further illustration. भराक्यासरसा उठणें To start up, spring up, jump up, bounce up. भराक्यासरसा येणें-जाणें-पडणें To come, go, fall with a whirr, whiz, or similar sound, or with a rush or other form of suddenness and impetus.
पुष्प
न. १ फूल. २ स्त्रियांचा विटाळ; स्त्रीरज; आर्तव; ऋतु. ३ डोळयाचा एक रोग; फूल. ४ गर्भाशय; गर्भकोश. [सं.] (वाप्र.) ॰ठेवणें-दोष काढणें; नावें ठेवणें. सामाशब्द- ॰कोश- पु. फुलाच्या पांच भागांपैकीं एक ॰द्रव-पु. फुलांतील मध. ॰धरी-पु. जयदत्तानीं सांगितलेल्या घोड्याच्या बारा प्रकारच्या लगामांपैकीं एक. -अश्वप १.१८५. ॰निर्यास-सार-स्वेद-पु. फुलांतील मध. ॰पण-न. मोठेपण. [पुष्प + पण] ॰पुट-न. (नृत्य.) उजवा हात सर्पशीर्ष करून त्याच्या तळहातावर डाव्या हाताचीं बोटें चिटकवून ठेवणें. पुष्पांजलि पहा. [पुष्प + पुट] ॰मुकुट-पु. फुलाच्या पांच भागांपैकीं एक. [पुष्प + मुकुट] ॰रेणु- पु. फुलांतील पराग. ॰लिट्-पु. (काव्य) मधमाशी; भुंगा. [सं. पुष्प + लिट् = चाटणारा] ॰वती-स्त्री. विटाळशी स्त्री; रजस्वला; ऋतुमती. ॰वती-पु. लगामाच्या बारा प्रकारांपैकीं एक. -अश्वप १.१८५. ॰वर्खाव-पु. पुष्पवर्षाव; फुलें उधळणें. 'मोतियांचा सायारू बांधिला । कीं देवीं पुष्पवर्खाओ केला ।' -शिशु ७१५. [सं. पुष्प + वर्षाव] ॰वा(व)टिका, वाटी-स्त्री. फुलबाग; उद्यान. 'नानाजातीचे वृक्ष तें वन । फळभक्षी वृक्ष तें उपवन । पुष्पवाटीका तें उद्यान । कृष्णार्पण पूजेसी ।' -एभा ११.१२९२. 'तोडुनि पुष्पवटिका फळवृक्षयाती । राखिती बाभळा करूनि सार ।' -तुगा ३१५८. ॰वृष्टि-स्त्री. १ फुलांचा वर्षाव. २ (ल.) अस्खलित व अर्थपूर्ण भाषण किंवा वादविवाद. ३ (ल.) शिव्या; अपशब्द यांचा भडिमार. 'महाराजांची जांवई न शालकमंडळी राहिली त्यांच्यावर पुष्पवृष्टि पडत असते.' -विक्षिप्त १६५. ॰संकोच- पु. फुलाचें मिटणें. ॰सारा-पु. पराग; परिमल; सुगंध. 'नाना पुष्पांचिया उदरा । न येतां पुष्पसारा । आपणचि भंवरा । होआवें पडे ।' -अमृ ५.४२. पुष्पांजलि-जुळी-स्त्री. १ पूजेच्या शेवटीं दोन्ही हातांच्या ओंजळींत फुलें घेऊन देवास वाहतात ती. (क्रि॰ वाहणें; करणें; टाकणें; घालणें; सोडणें). 'पुष्पांजुळी मंत्रघोष जयजयकार । दुमदुमी अंबर तेणें नादें ।' -तुगा ८१. २ (महानु.) उजवा हात सर्पशीर्ष करून त्याच्या तळहातावर डाव्या हाताचीं बोटें चिटकवून ठेवणें. पुष्पपुट पहा. 'तें रंगी उभी ठेली । सवेंचि विचारें लागि केली । तेथ पुढां जुझे पुष्पांजुळि । खैवंगी मनकटाचां ।' -भाए ४५१. ॰(मंत्र)पुष्पांजलि-ळी-स्त्री. मंत्र- पुष्प. पूजा, आरती झाल्यानंतर मंत्र म्हणून देवाला फुलें वाहतात तो विधी. [सं. पुष्प + अंजलि] (वर) ॰करणें-देणें-शिव्या देणें; अपशब्द बोलणें; लाखोली वाहणें. पुष्पासव-पु. फुलांपासून काढलेली दारू. [सं. पुष्प + आसव] पुष्पास्तरण-न. शय्येवर फुलें पसरण्याची कला. फुलांचा गालिचा करणें. चौसष्ट कलांपैकीं एक. [सं. पुष्प + आस्तरण] पुष्पाळी-स्त्री. फुलांची पंक्ति. 'अहो वाक्युष्पाळी भरुनि रसनेच्या करतळीं ।' -निमा १.९२. [सं. पुष्प + आलि]
विषय
पु. १ इंद्रियें किंवा मन यांस गोचर वस्तु; ज्ञानाच्या कोणत्याहि साधनानें माहीत होणारी गोष्ट. (याअर्थीं सामासांत) विषयभोग, विषयत्याग, विषयासक्ति, विषयाभिरुचि, विषय- सेवा-सेवन-प्रीति-तिरस्कार-संबंध-कथन-निंदा-ज्ञान-सुख- दुःख. २ एखाद्या क्रियेचा कर्ता अथवा कार्य; एखादा विकार अथवा भावनेशीं संबद्ध गोष्ट; (कर्ता, करण, शक्ति अथवा कार्याचा) प्रदेश, टप्पा, आटोका, स्थान वगैरे. उदा॰ कामाचा विषय स्त्री; मोहाचा विषय पुत्र; लोभाचा विषय वित्त; रोगाचा विषय शरीर; तसेंच क्रोध, हर्ष, दंड इत्यादींचा विषय. (याअर्थीं सामासांत) विवाद-व्याख्या-गायन-लेखन-गमन-विचार-धर्म-ज्ञाति- हास्य-काम-संकल्प-विधि-निषेध-विषय. 'निजस्मृतिस जाहलीं विषयी तीं तव श्रीपदें' -केका ८. ३ कार्य; कर्तव्य; कार्यक्षेत्र; अधिकार; व्यवसाय; योग्य धंदा, काम. उदा॰ बोलणें हा वागिं- द्रियाचा विषय; मामलत करणें हा भिक्षुकाचा विषय नव्हें; रफू करणें हा दाभणाचा विषय नव्हे. ४ उद्देश; हेतु; ध्येय; मनां- तील गोष्ट. 'तुम्ही जो हा उद्योग करीत आहां याचा विषय कोण?' ५ मुद्दा; प्रकरण; बाब; संबंध. 'शब्द साधनारूप विषय ज्यांत असतो त्याला व्याकरण म्हणावें.' ६ द्रव्य; ऐवज; माल. 'त्यास साऱ्या वर्षांत शंभर रुपयांचा विषय पोंचतो.' ७ महत्व; पर्वा; दरकार. 'स्वामीचा आशीर्वाद असतां इतरांचा विषय मांनीत नाहीं.' -रा ३.३२४. ८ कामेच्छा. 'जैसे थोर विषय सुभगे अंगी । अंगसानें ।' -ज्ञा १६.२५३. 'रुचे विषय ज्या मिळे अमृत ते न मद्या पिती ।' -केका ४३. [सं.] ॰द्वार-न. इंद्रिय. 'बहु हीं दुस्तर विषयद्वारें ।' -तुगा १८७४. ॰नियामक समिति-स्त्री. सभेपुढें मांडावयाचे विषय ठरविणारी, निश्चित कर- णारी, निवडणारी मंडळी. ॰पंचक-न. पांच इंद्रियांचे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पांच विषय. 'शब्दस्परुषरूपरसगंध । ऐसें हें विषय पंचक ।' -दा १७.८.१४. ॰बद्ध-वि. इंद्रिय विषय लोलुप; कामी; भोगी; आसक्त. (याचअर्थीं सामासांत) विषय- तत्पर-लंपट-लीन-लुब्ध-वश-दास-आसक्त-आधीन-आविष्ट- अंध. ॰भोगोडा-पु. विषयाचा उपभोग. 'विषयभोगोडा करा- वया ।' -दावि ४१. ॰वासना-स्त्री. भोगेच्छा; इंद्रियसुखेच्छा; ऐहिक वस्तूंच्या उपभोगाची इच्छा. 'विषयवासना नावडो' ॰विरक्त-वि. ऐहिक भोगांस विटलेला; भोगांचा त्याग केलेला. ॰व्यापार-पु. व्यवहार; धंदा; ऐहिक व्यवसाय; सुखसाधनांचें संपादन. 'विषयव्यापारीं सदा सादर । आपपर नावडे त्या ।' ॰सुख-न. इंद्रियजन्यसुख; रतिसुख; सृष्टींतील निरनिराळ्या भोगांपासून निरनिराळ्या इंद्रियांस मिळणारा आनंद. विषया- चरण-न. इंद्रियभोग; विषयोपभोग. 'पतंगा दीपीं आलिंगन । तेथ त्यासी अचुक मरण । तेंवी विषयाचरण । आत्माघाता ।' -ज्ञा ३.२०१. विषयानंद-पु. भोगसुख; निरनिराळ्या पदार्थांच्या उपभोगापासून मिळणारें सुख. विषयोपभोग-पु. भोग्य वस्तूंचें सेवन; इंद्रियांस सुख देणाऱ्या वस्तूंचें सेवन. विषयी-वि. १ विषयासक्त; भोगसुखास लालचावलेला; कामी; गोडघाश्या. 'जरी विषयीं विषयों सांडिजेल ।' -ज्ञा ५.१२५. २ इंद्रियांस अगोचर वस्तूंचें अस्तित्व न मानणारा. ३ ज्या गोष्टीचें एखादी वस्तु कार्य अथवा कर्ता असतो ती (गोष्ट). विषयीकरण-न. इंद्रियांकडून स्वविषयाचें ग्रहण; इंद्रियाकडून त्या विषयाचें ज्ञान होणें. विषयीं- शअ. संबंधी; संबंधानें; बद्दल; धरून; अनुसरून; अनुलक्षून. पूर्वीं षष्ठ्यंत नामापुढें लावीत हल्लीं सामान्यरूप करून जोडतात. उदा॰ घराचेविषयीं, युद्धाचेविषयीं = घराविषयीं, युद्धाविषयीं. [विषय- सप्तमी] विषी, विषीं-शअ. विषयीं पहा. 'अगा आत्मजेच्या विषी । जिवु जैसा निरभिलाषी ।' -ज्ञा १२.१३२. विषो-पु. विषय पहा. 'अमाइक तंव नव्हसी । कवणा ही विषो ।' -अमृ २.३६.
माप
न. १ प्रमाणानें मोजून निश्चित करण्याचें साधन; (वजन, सांठा, लांबी, वेळ इ॰) मोजण्याची, गणण्याची क्रिया. (क्रि॰ करणें; चालवणें; घेणें; मांडणें; लावणें.) 'आज भाताचें माप चालले आहें.' २ गणना; गणनेनें निश्चित करणें. 'आंब्याचें माप झालें म्हणजे खुरद्याचें माप घे.' ३ (सामा) मापण्यानें निश्चित केलेलें मान, करिमाण. 'दहा खंडी माप भरलें; (सामा.) माप- ण्याचें साधन. (वजन, सांठा, लांबी इ॰चें) उदा॰ वजनी माप, कैली माप, धान्य माप, कापडाचें माप. इ॰, मापण्याचें कोणतेंहि साधन. ४ मापलेला, परिमित भाग. 'त्या खाचरांत चार मापें आहेत.' ५ (खा.) बारा डोळे किंवा चार पायली. डोळा अर्थ १० पहा. [सं. मा = मोजणें] ॰देणें-घेणें-मापून देणें, घेणें. ॰कुतऱ्यानें नेणें-एखादी गोष्ट गतगोष्टींपैकीं एक होणें; एखाद्या गोष्टीची गतगोष्टींत गणना होणें. (पदरी) ॰घालणें-एखादी गोष्ट अमान्य करणारास ती अनेक प्रमाणांनी खरी करून पटवून देणें. ॰लागणें-मापी लागणें-कमी कमी होणें. 'मापीं लागलें शरीर ।' -दा ३.९.१. (आपल्या) मापानें मोजणें-आपल्या स्वतःच्या (प्रमाण असलेल्या) मापानें मोजणें. माप आणि महापाप-खोटें माप घालणें महापाप होय. सामाशब्द- ॰पट्टी- ऐनजिनसी सारा घेतांना धान्य मापण्याबाबत शेतकऱ्यावर बस- विलेला कर. ॰वरताळा-वर्ताळा-पु. १ धान्याच्या साऱ्याच्या खंडीमागें सरकारनें हक्कानें मागितलेला वरकतावळा. २ (कों.) कुळांकडून धान्य घेतांना माप घेण्यासाठीं हक्क म्हणून ठरीव खंडा- पेक्षा एकचौसष्टांश किंवा एकअष्टमांश जास्त घेतलेला माल, रकम. मापटें-न. साठप्याचें माप; अर्धा शेर, एक अषटमांश पायली; निठवें. म्ह॰ (व.) आपलं तें मापटं दुसऱ्याचं तें दीड पायली. मापणें- सक्रि. (वजन, साठपा, लांबी, वेळ यांच्या) मापानें निश्चित करणें; मोजणें; तोल करणें; मेंज घेणें. [सं. मा; झें. मा; ग्री. मेजिओ; लॅ॰ मेतिओर] मापन-न. मापणें; मोजणें; माप घेणें. मापड्या, मापारी, मापेली-वि. १ (सरकारी कोठ्या, बाजार माल यांतील) सरकारी धान्य मापणारा. २ (सामा.) मापणारा. 'आयुष्य मोजायाला बैसला मापारी । तूं कांरे व्यापारीं संसाराच्या ।' मापारकी-स्त्री. मापाऱ्याचा धंदा. मापारी- स्त्री. धान्य इ॰ मोजण्याचें फरा नावाचें एक मांप. मापी-वि. १ साठप्याच्या मापानें निश्चित केलेला. २ मापानें मोजण्यासारखें; साठप्याचें; वजनीच्या उलट. माप दाखविणाऱ्या शब्दांच्या पूर्वी हा शब्द जोडून येतो. जसें मापी खंडी-मण-शेर. मापीव, मापित-वि. मापलेला. ह्याच्या उळट तोलीव, मोजीव.
साल
स्त्री. १ त्वचा; वरचें जाड आवरण (झाड, फळ, इ॰ चें). २ घांसल्यानें, चोळवटल्यानें निघालेलें कातडें (माणूस, जनावर याचें); -न. १ बारीक त्वचा; फोल; तूस; टरफल (धान्य, दाणे इ॰ वरचें). 'कलियुगातीं कोरडीं । चहूं युगांचीं सालें सांडी ।' -ज्ञा १५.१२९. २ कोकंबीचें टरफल; आमसूल. ३ भात जमीन नांगरल्यानंतर तींतील ढेकळें फोडून जमीन साफ करण्याकरितां जमीनीवर फिरवावयाचा लांकडी जाड ओंडा, गुठें. [सं. छाल; दे. प्रा. सालणा] ॰(पाठीचें) जाणें-चट्टा लागणें; नुकसान येणें. ॰ट-वि. १ थोडेंबहुत साल ज्याच्या अंगीं आहे असा (डाळ, कणीक, तांदूळ, लांकूड इ॰ पदार्थ). २ आंब्याचा एक प्रकार. -न. १ फोल; टरफल (धान्य बी इ॰ चें). २ पोकळ शेंग (आंत दाणा नसलेली). सालटें असा अनेकवचनी प्रयोगी बहुधां येतो. ॰टी-डी-स्त्री. १ सबंध कातडें (मनुष्य, जनावर याचें); शरीरावर. २ खरचटून, घासून निघालेलें कातडें. ३ (तुच्छतार्थीं) एखाद्या माणसाचें कातडें. ४ (सामा.) साल; त्वचा; पातळ कवच. 'आकाशाची सालडी । काढुनि घेइजे आंतुली गोडी ।' -सिंस ४.१९६; -विउ ४.६२. ॰टें- डें-न. सालटी-डी (१-२) पहा. ॰दाटा-वि. जाड सालाचा (आंबा, केळें, इ॰). 'सालदाटी केळ' नांवाची एक केळ्याची जात आहे. [साल + दाटणें] ॰दोडा-पु. १ जाड साल असणारा एक जातीचा आंबा. २ अतिशय जाड साल असणारें शेंदाडाचें फळ. ॰पट-न. १ साल (वृक्ष, मनुष्य, धान्य, फळ इ॰ ची) २ घांसून, खरचटून निघालेला कातड्याचा तुकडा. साल पहा. ३ कोंडा; तूस; फोल. ॰पा.-पु. ढलप्यांची रास. ॰मोठा-ठावि. जाड सालीचा (वृक्ष, फळ, वनस्पति इ॰). ॰वणी-न. अमसूलाचें सार; सोलवणी. ॰सूल-नस्त्री. (व्यापक) साल, इ॰.
बोर
स्त्री १ एक कांटेरी फळझाड. याचें फळ सुपारीएवढें, वाटोळें व रूचकर असतें. झाडास उत्तम डिंक (लाख) येतो. लांकूड नांगर, गाडे इ॰स उपयोगी असतें. याच्या दांडेबोर, चणेबोर इ॰ जाती आहेत. २ बोराच्या आकाराचा बायकांचा वेणींत घालण्याचा सोन्याचा दागिना. 'राखडि सुंदर मूद बोरही ।' -अमृत ५५. ३ काळसर, तांबूस रंग; बोरासारखा रंग (घोड्याचा). याचे प्रकार दोन:- तेल्या बोर आणि तांबडा बोर. 'भला घोडा अस्सल काबूलचा लाल बोर टाकमतुर्की ।' -पला. -न. १ वरील झाडाचें फळ. २ बोराएवढें भजें. -वि. काळसर तांबूस असा; बोराच्या रंगाचा (घोडा). 'भाऊसाहेब बोर घोडीवर स्वार झाले.' -भाब ११५. [सं.बदरी = बोरीचें झाड; बदर = बोर (फळ); प्रा. बोअर, बोर; हिं. बेर] म्ह॰ ज्या गांवच्या बोरी त्याच गांवच्या बाभळी. (वाप्र) बोरांतील कीड, आळी- १ (ल.) नाजुक व फार सुंदर स्त्री. २ लठ्ठ व आत्मसंतुष्ट मनुष्य. बोरीस बोरें आणणें- १ (खोडकर मुलास) बोराप्रमाणें झाडास कटकवून देणें; झाडास टांगणें; झाडाला बांधून ठेवणें. २ अशक्य म्हणून समजण्यांत आलेली गोष्ट शक्य कोटींतील करणें. 'रामड्या पैसे देत नाहीं म्हणतां ठीक आहे, मी बोरीस बोरें आणीन' (त्याच्याकडून पैसे वसूल करीन). सामाशब्द- ॰कंडा, कंठा- पु. एक कंठा; घोड्याच्या अंगावरील सामान. ॰कांटी, बोराटी, बोरांटी-स्त्री. बोरीची कांठी, फांदी, काठी; बोरीचें शिरें. [बोर + काठी] ॰कूट-बोरें वाळवून सार इ॰ करण्याकरितां करून ठेवलेली पूड. ॰खडा-पु. मुलींच्या सागरगोट्यांच्या खेळांतील एक पारिभाषिक शब्द. ॰न्हाण-न. फाल्गुन शुद्ध पौर्णिमा किंवा रंग- पंचमीच्या दिवशीं वर्षाच्या आंतील मुलास बोरें, द्राक्षें, चुरमुरे व मिठाई एकत्र करून त्यानें स्नान घालणें. ॰माळ-स्त्री. बोराच्या आकाराच्या सोन्याच्या मण्यांची गळ्यांत घालण्याची माळ.
घोर
पु. १ वीणा इ॰ वाद्यांतील खर्ज स्वराची तार. (वाद्यांतील) खर्ज स्वर. २ झोपेंतलें घोरणें; मृत्युसमयीं होणारा घशांतील घरघर असा आवाज. 'हा वेदार्थसागरु । जया निद्रि- ताचा घोरु । तो स्वयें सर्वेंश्वरु । प्रत्यक्ष अनुवादला ।' -ज्ञा १. ७२. 'आपण गाढ झाले निद्रिस्त । चलनवलन सांडूनि स्थित । कंठीं घोर वाजवी ।' -नव १३.१६२. ३ काळजी; धासरा; मानसिक अस्वस्थता; खुणखूण; चिंता. (क्रि॰ करणें; लागणें). 'त्याचा नित्याचा घोर नाहींसा होऊन त्याची स्वभाववृत्ति प्रबळ झाली.' -नि ७०३. 'निरउपाय झाली गोष्ट कंबर बसली घोरानें ।' -ऐपो ४१२. ४ अन्य स्थळीं गेलेल्या माणसा- बद्दल घेतलेली खंत; घोकणी. (क्रि॰ घेणें; कर्माची षष्टी). 'पोरानें आईचा घोर घेतला.' ५ आक्रोश; आकांत; रडारड; कोलाहल. 'तो मरतांच पोराबाळांनीं एकच घोर केला.' ६ आरडाओरड; गलबला; गिल्ला; गलका; गोंगाट; कल्ला. 'हा काय मजुरदारांचा घोर पडला' ७ हल्ला. 'केला मखीं घोर निशाच- रांनीं ।' -आविश्वा २०. 'तेनी धरला सवता घोर' -ऐपो ३५२. ८ मरण्याच्या वेळची घरघर. ९ संकट. 'घोर हा नको । फार कष्टलों ।' 'मानअपमानाचे पडिले । भ्रांतीचे घोरीं ।' -दावि २६०. -वि. अघोर. १ भयंकर; भयप्रद; भयानक; विक्राळ (मुद्रा, आवाज, काम, घडणार्या गोष्टी) 'म्हणऊनि संशयाहूनि थोर । आणिक नाहीं पाप घोर ।' 'नव्हे सार संसार हा घोर आहे ।' -राम ६६. २ गाढ; घनघोर (निद्रा); 'त्यास घोर निद्रा लागली.' ३ निबिड; दाट; घनदाट; गाढ; भयाण (अंधार, अरण्य इ॰). 'मी राजाच्या सदनीं अथवा घोर रानीं शिरेन ।' -खरे, जन्मभूमि. ४ घनघोर; तुंबळ; हातघाईचें; निकराचें (युद्ध लढाई, इ॰). 'कलह उत्पादी अति- घोर ।' -एभा १.२०४. ५ अचाट; अवाढव्य; जगडव्याळ (इमारत). ६ अफाट (भरलेली नदी) [सं. घोर] घोरंदर, घोरांदर-वि. (काव्य.) भयंकर; घोर शब्दांतील विशेषणाचे सर्व अर्थ पहा. 'झोटी धरूनि पाडिती अपार । घोरांदर मांडिलें ।' -एरुस्व ८.४४. 'युद्ध मांडिलें घोरंदर ।' -मुआदि १३.३२. 'युद्ध जाहलें घोरांदर । सकळ राजे पराभविले ।।' -ह २६.५७. [सं. घोरतर] घोरवेळ-स्त्री. (ज्यो.) १ अशुभ, अनिष्ट, भयसूचक वेळ. २ (अनिष्टतेच्या ध्वनितार्थावरून) करकरीत तिन्ही सांजा, टळ- टळीत मध्यान्ह. घोरासुराचें आख्यान-न. (उप.) डाराडूर झोपं; घोर झोपं. 'घालून ठेवलेलें अंथरूण पायानंच उलगडून ही अश्शी घोरासुराच्या अख्यानाला सुरवात.' -फाटक नाट्यछटा २.
लटपट
स्त्री. १ चलाखी; जलद हालचाल. २ (पेंच घालून खेळतांना, मुलांचे खेळ रंगांत आले असतांना चिमण्या इ॰ पक्षी भांडतांना, वादविवादांत वगैरे दिसून येणारी). धडपड; खळबळ. ४ घाई;उतावीळपणा; धांदल. ४ तळमळ; अस्वस्थता. ५ मोठ्या भयानें होणारा थरकांप; घाबरगुंडी. 'वाघ पाहतांच त्याची लटपट झाली.' ६ हमरीतुमरी; अरेतुरे; बोलाचाली; भांडण. (क्रि॰ झडणें; होणें; लागणें). 'काल देवळांत त्याची आमची लटपट झाली.' ७ ओढाताण; झटापट. 'प्रत्येक पदर्थांत तिन्ही गुणांची लटपट चाल- लेली असते. -गीर १५६. (निंदार्थी) लबाडी; फसवेगिरी. -क्रिवि. ढिला बसविलेला खांब, खुंटा, खुंटी, खिळा इ॰कांच्या हलण्याच्या रितीचें किंवा शब्दाचें अनुकरण होऊन. (क्रि॰ हालणें; करणें). [ध्व.] लटपटणी-स्त्री. डगडगणें; डकडकणें; लटलट हालणें. लटपट पहा. [लटपटणें] लटपटणें-अक्रि. १ ढिलेपणामुळें डग- मगणें; डकडकणें; हालणें (खांब, खुटी, खिळा). २ फसणें; फिसकटणें; बिघडणें; नासणें; चुलींत किंवा रसातळास जाणें; नष्ट होणें (काम, जागा, अधिकार, मसलत, संपत्ति). 'मामलतीचे छंदास पडला तेणें करून पहिली सावकारी होती ती लटपटली.' ३ (निरुपयोगी, व्यर्थ म्हणून) दूर; बाजूला फेंकला जाणें; नापसंत, रद्द केला जाणें; गाळला जाणें; रद्द पडणें. 'पहिला कार- भारी येतांच नबे कारभारी झाले होते ते लटपटले.' ४ निस्तेज, फिकें पडणें; वजन न पडणें. 'त्याचे वक्तृत्वापुढें आमचीं साऱ्याचीं वक्तृत्वें लटपटली.' ५ गोंधळणें; घाबरणें. [लटपट] लटपट पंची-उद्गा. (पोपट, डोल) पोपटास म्हाणायला शिकवितात तो शब्द. -स्त्री. १ (ल.) घोटाळा; गोंधळ. २ फसविण्याच्या उद्दे- शानें केलेलें धरसोडीचें, गोंधळविणारें भाषण. 'खव्या मार्मिक श्रोत्यांस केवळ लटपट केल्यानें लेशामात्रही द्रव येणार नाहीं.' -नि. ३ लबाडी; फसवेगिरी. ४ बढाई; शेखीच्या गोष्टी (अंगीं तादृश सामर्थ्य नसतां केलेल्या). 'एवढें डौलानें कशाला बोलतां, तुमची लटपटपंची चालायाची नाहीं.' [लटपटणें + पंची + पोपट] लटपटीत-वि. १ आवाज करून डगमगणारा; डगडगणारा, खिळ- खिळा (ढिला बसलेला खांब, खुंटा,खुंटी इ॰). २ (ल.) डळ- मळीत; अस्थिर; अनिश्चित; चंचल (अधिकार, नेमणूक, काम, मसलत, भाषण, वर्तन). [लटपट] लटपट्या-वि. १ चपल; चलाख; झटपट्या (मनुष्य). २ धांदरा; गडबड्या. ३ पुढें पुढें नाचणारा; लडबड्या; लुडबुड्या ४ लबाडी करणारा; फसव्या. [लटपट] लटापटी-स्त्री. लटपट पहा.
अंबट
वि. १ आंबट; खट्टा; आम्ल; चवीला, वासाला हिरवा आंबा, चिंच, लिंबू यांच्यासारखा. २ (ल.) निरूत्साही; वाईट; खिन्न. [सं. अम्ल; प्रा. अंब; अम्लवत् अम्ल = आंब + ट (लघुत्वदर्शक)] 'अंबटतोंड' ॰करणें-(ल.) निराश करणें; होणें. ॰होणें-होऊन येणें-पडणें-निराश होणें; हताश होणें. ॰मागणें-दुसर्याचें भांडण स्वतःवर ओढून घेणें. ॰ओलें-वि. अर्धवट ओलसर; दमट; किंचित् ओलें. ॰चिंबट-अंबट द्वि. अंबट, तेलकट इ॰ अपथ्यकारक; विवक्षित मधुरपणा नसलेला. ॰ढाण-ढस-(व.) अंबट डहन; अतिशय अंबट (ताक, दहीं, चिंच इ॰); ठसका लागण्याइतकें आंबट. [अंबट + ढाण, ढस = अतिशयार्थी (ध्वनिवाचक), सं. ध्वनित; प्रा. ढणिय] ॰तोंड- न. निराश; खिन्नमुद्रा, (क्रि॰ करणें; होणें). 'महात्मा गांधींच्या स्वातंत्र्यकूचाच्या बातम्या...नोकरशाहीला आंबट तोंड करून वाचाव्या लागतात.' -केसरी २५.३.३. ॰निंबू-न. कागदी लिंबूं. ॰मिर्सांग (लावप)-(गो.) १ तिखटमीठ लावणें. २ बहारीनें वर्णन करणें. 'तॉ गॅलें कितेंय सांगता तें आंबट मिर्सोग लावून सांगप' ॰वणी-न. (निंदायुक्त) अंबट पाणी; आमटी. [अंबट + वन = पाणी] ॰वाणा -वि. १ अतिशय अंबट. २ (ल.) निराश केलेला; खट्टू; रुसलेला; खिजलेला. [अंबट + वर्ण] ॰वेल-स्त्री. आंबोशीची वेल; हिचा रस अंबट असतो, वेलाचा रंग पांढरा, पानें जाड, अस- तात, ही सारक व अग्निदीपक आहे; कडमडवेल. -शे ६.२६. [सं. आम्लपर्णी; अंबष्टवल्ली]. ॰शोक-पु. नसती आवड; भलतीच चैन. 'त्याचा उद्योग म्हणजे निव्वळ आंबट शोक' -तोबं २२१. ॰शोकी-वि. भलतीच चैन करणारा. 'राजेश्री मोठे आंबटशोकी खरे.' ॰वरण-न. चिंचगुळाचें, फोडणीचें पातळ वरण (साध्या वरणाच्या उलट); मंदोसरी. 'या नाटकांत सार कळेना का अंबट वरण कळेना ।' -नाकु ३.७०. ॰पण-न. (व.) चिंच, आम- सूल वगैरे अंबट पदार्थ. 'वरणांत आंबटपण टाक' ॰सर-वि. थोडेंसें अंबट (ताक वगैरे). वईवरून अंबट होणें-थोडक्यासाठीं रागावून मनुष्यास तोडणें.
बंद
पु. १ बांधण्याचें साधन; दोरी; फीत; नाडी. २ बंध; बंधन; मर्यादा; शिस्त. ३ (ल.) बेडी; श्रृंखला; आळा; कोंडी. ४ अटक; कैद. 'बळें तोडिला, बंद त्या त्रीदशांचा ।' ५ अंगरखा, बंडी इ॰ स बांधण्यासाठीं लावलेला कसा. ६ नियम; कायदा; अट; शासन. '...लिहिण्यास कांहीं नियम व बंद असतील असें सांप्रतचे दफ्तराचे स्थितीवरून वाटत नाहीं.' -इनाम ४८. ७ संधि; बोटांचा सांधा; पेरें. ८ देशी कागदाच्या तावाची घडी; दोन वरखी कागदाचा ताव; कागद दुमडल्यावर त्याचे प्रत्येकी होणारे दोन भाग, घड्या. त्यावरून दुबंदी, तिबंदी, चौबंदी इ॰ 'बंद कागदाचा कोरा असे ।' -चांगदेवचरित्र ३.२०. ९ (गंजि- फांचा खेळ) हातांतील एका रंगांतील अगदीं खालचा हुकूम; राजा, वजीर यांच्या शिवाय वरच्या दरजाचें पान. १० (ल.) जमाव; रांग; टोळी. 'बंद कापिला गोसाव्याचा ।' -ऐपो ३९२. ११ (इमारत) भिंतीच्या रुंदीचा एक दगड किंवा वीट. (इं.) हेडर. -मॅरट ४६. १२ (बैलगाडी) सुंभाची दोरी. १३ (हिं.) भरती. -शर. [सं. बन्ध; फा. बन्द] -वि. १ रोधलेला; अड- विलेला; मना केलेला (रस्ता, वाट). २ थांबलेलें (काम). ३ लावून घेतलेलें (दार इ॰). (वाप्र.) ॰बंदा खालीं बसणें, सहस्त्र बंदाखालीं बसणें-बंधांनीं, कर्तव्यतेनें (विशे- षतः शपथेच्या, वचनाच्या) बांधलें जाणें. ॰भरल्या बंदांत- बंदाखालीं-बसणें-जाणूनबुजून, नांदत्या घरांत, भरल्या घरांत बसून, वचन पुरें न केल्यास, खोटें बोलल्यास अनिष्टाचा प्रसंग येणार असें माहीत असूनहि शपथ घेणें, वचन देणें, खातरीनें सांगणें या अर्थी (स्वतःचें म्हणणें खरें आहे हें शपथप्रमाण करून दाखविणार्या मराठी वाप्र. पैकीं हा एक आहे. याच्या सार- खेच पुढील वाप्र. आहेत-ही काळीरात्र झाली (चालली) आहे; हा रामपहारा आहे; भरल्या तिन्हीसांजा; मरती रात्र झाली; सूर्य तपतो आहे; मी अन्नावर बसलों आहे; रक्ताची आण; खोटें बोलेल तर जीभ झडेल; तुमचे पाय समक्ष इ॰). ॰भरल्या बंदांत-बंदा खालीं-क्रिवि. भरल्या, वसत्या घरांत, घराखालीं (रडणें, भांडणें इ॰ चा निषेध कर्तव्य असतां प्रयोग). सामाशब्द- ॰खण- खाना-पु. बंदीखाना; कैदखाना; तुरुंग. ॰ख(खु)लास-सी- पु. बंधन, कैद यांतून मुक्तता. -वि. कैदेंतून सोडलेला; बन्धमुक्त. 'अगोदर...गुलामाची बंदखलासी करून.' -दिमरा १.३०७. [अर. खलास् = सुटका] ॰छोड-पु. बनछोड पहा. ॰लेख-पु. नियम, कायदे यांचा ठरावबंद, तक्ता. ॰शाळ-ळा-स्त्री. तुरंग; बंदीखाना. 'वसुदेवदेवकीची बंद फोडिली शाळ ।' -तुगा ४८२.
वेळ
पुस्त्री. १ कालविभाग; काळ. २ आतांचा काळ व कांहीं कार्य होण्याचा काळ यांमधील अवकाश, अंतर. 'पेरे होण्यास अझून वेळ आहे म्हणून अधीं घरें शाकारून घ्या.' ३ फुरसत; न गुंतलेला, रिकामा वेळ. 'माझे पाठीसीं काम आहे वेळ सांपडल्यास येईन.' ४ अपेक्षित किंवा योग्य कालापेक्षां जास्त काळ; उशीर (क्रि॰ लावणें, लागणें). 'मला शाळेंत जाण्यास वेळ झाला.' 'वेळ लावला-ली, वेळ लागला-ली.' ५ (स्त्री.) समय; हंगाम; विशिष्ट काल. 'ही वेळ पोथी वाचा- वयाची नव्हे.' ६ दिवसाचा अर्ध भाग; सकाळ किंवा दुपार. ७ तीस घटिकांच्या (रात्रीं किंवा दिवसां.) आठ विभागांपैकीं एक. अमृत, उद्योग, काळ (मृत्यु), चंचळ (चोर), रोग, लाभ, शुभ आणि स्थिर वेळ. यांखेरीज इतर पुष्कळ प्रकारच्या वेळा आहेत, उदा॰ अंधेरी-घोर-घात-राक्षस-वेळ, जाती-येती वेळ इ॰. ८ मुहूर्त. ९ प्रसंग; संधी. -क्रिवि. वेळां पहा. 'तो दिव- सास तीन वेळा जेवतो.' [सं. वेला] ॰दवडणें-व्यर्थ, निष्फळ वेळ घालविणें. ॰मारून नेणें-प्रसंगीं कमीपणा येऊं न देणें; युक्तीनें प्रसंग साजरा करणें; वाणी राखणें. 'केवळ शब्दामात्रें वेळ मारून न नेतां कृति करून दाखविली पाहिजे.' -निचं. ॰वाहणें-बरें किंवा वाईट होण्यास समय अनुकूल होणें. सामा- शब्द- ॰अवेळ-स्त्री. उचित किंवा अनुचित, अनुकूल किंवा प्रतिकूल असा काळ, प्रसंग (विवक्षित कामाविषयींचा). 'वेळ अवेळ आहे चार रुपये जवळ अधिक अंसु द्या.' -क्रिवि. वेळ किंवा अवेळ न पाहतां; वाटेल त्यावेळीं. 'वेळ अवेळ बाहेर जातोस परंतु एथें पिशाचांचा उपद्रव भारी आहे.' ॰काळ-पु. काळ- वेळ पहा. (क्रि॰ येणें; जाणें; गुदरणें; पडणें; टळणें). वेळा काळाला कामास येणें-प्रसंगविशेषीं, अडीअडचणीला उपयोगी पडणें. वेळणेवारचा, वेळणेवारी-विक्रिवि. वेळेप्रमाणें; वेळेनुसार; वेळेच्या चांगल्यावाईट गुणांप्रमाणें व भाषा किंवा कृति याच्या प्रकारानुसार घडणारी (गोष्ट इ॰). अनिष्ट परि- णामाच्या, कृतीच्या, वचनाच्या प्रसंगीं योजतात. 'वेळणेवारचा उगाच तूं बोलतोस काय म्हणून.' [वेळ आणि वार] ॰(अ)न- सार-(वेळेनसार) -वेळेनुसार पहा. ॰नावारीं-क्रि. बरी- वाईट वेळ न पाहतां. वेळअवेळ पहा. म्ह॰ वेळ ना वारीं गाढव आलें पारीं. [वेळ + ना + वार] ॰प्रसंग-पु. काळकल्ला, बळकुबल, वेळअवेळ पहा. ॰भर-क्रिवि. १ सारा दिवस; वरचेवर. 'वेळ भर करसी वेरझारा धाक याचा वाटे मजप्रती ।' -होला ९८. २ अर्धा दिवस पर्यंत. ३ बऱ्याच वेळपर्यंत. ॰मारणारा-माऱ्या- वि. समयसूचक; प्रसंगावधानी. ॰वारींक्रिवि. वेळवारीं पहा. ॰साधणारा-साधु-वि. १ संधी साधून काम करणारा. २ वक्तशीर. वेळा-स्त्री. १ हंगाम; समय; विशिष्ट काळ. २ आवृत्ति- वाचक गणनाकाळ. वेळां-क्रिवि. संख्याचक किंवा गुणवाचक उपसर्ग लावून आवृत्ति दाखविण्यासाठीं योजतात. उदा॰ एक- तीन-बहुत-किती-वेळां. 'एक वेळां सोसीन, दोन वेळां सोसीन, तिसऱ्यानें बोलशील तर तोंडांत खाशील.' वेळाईत-वि. वेळेवर, संकटप्रसंगीं सहाय्य करणारा, मदततीस धांवणारा; कैवारी. -विउ ११.२८. 'तुका म्हणे देव भक्तां वेळाईत । भक्त ते निश्चित त्याचि यानें ।' -तुगा २२७५. [वेळ + आगत ? तुल॰ सिं. वेलाइतो = वेळेवर] वेळपत्रक-न. आगगाड्या, आगबोटी, शाळा इ॰ च्या कार्याचा वेला दाखविणारा तक्ता. (इं.) टाईम-टेबल. वेळाप्रकाशक-पु. (गणित) पट दाखविणारी संख्या; वार संख्याक; गुणक. वेळायित-वेळाईत पहा. 'धावला राघव वेळायितु ।' -दावि १४३. वेळावणें-अक्रि. आबाळणें; वेळेवर गरजेच्या गोष्टी न मिळाल्यानें खंगणें (पीक, जनावर, मूल इ॰). वेळवेळ-स्त्री. १ वेळअवेळ पहा. २ (क) विलंब; उशीर. 'तो अलीकडे वेळावेळानें येऊं लागला आहे.' [वेळ + अवेळ] वेळेन(नु)सार-क्रिवि. १ वेळ, प्रसंग याला अनु- सरून. २ वेळप्रसंगीं; कधींकधीं. वेळेवारचा-वि. वेळेवर अस- लेला. कधीं वेरेवाळचा असा अशुद्ध प्रयोग येतो. वेळेवारीं- क्रिवि. योग्य वेळीं; वेळ टळण्याच्या आधीं; वेळेचा अतिक्रम न होतां. 'तुला चाकरी सोडणें असल्यास वेळेवारींच सांग, नाहींतर आयते वेळेस फसवशील.' वेळोवेळां-क्रिवि. १ वरचेवर; वारं- वार. २ वेळ येइल त्याप्रसंगीं; प्रत्येक वेळीं. [वेळ द्वि.]
मूठ
स्त्री. १ मुष्टि या शब्दाचे सर्व अर्थ पहा. २ मुष्टि- प्रयोग; मंत्रप्रयोग; मंत्रानें भारून मुठींत घेतलेले उडीद इ॰. हे दुस- ऱ्याच्या नाशाकरितां फेकावयाचे असतात. (क्रि॰ मारणें; टाकणें). ३ मुठींत राहतील इतक्या भाताच्या रोपांची जुडी; भाताची लावणी करण्यापूर्वीं रोपें उपटून त्यांची जुडी करतात ती. ४ मुठीनें पेर- लेलें भात. (क्रि॰ पेरणें; टाकणें). ५ हत्ती, घोडा वगैरे जना- वरांच्या रोजच्या अन्नांतून त्यांच्या रखवालदारास द्यावयाचा मुठीच्या परिमाणाचा (पगाराहून अधिक) भाग. ६ घोड्याच्या पायाच्या खुराला लागून असलेला सांधा (ह्या सांध्याशीं घोड्याचा पाय लहान घेराचा असल्यामुळें येथें बांधलेली दोरी खालीवर होत नाहीं). ७ एक मुलींचा खेळ. -मखेपु ३३६.८ गर्भ (हातानें चांचपून पाहील्यास गर्भाचा आकार मुठीसारखा लागतो असें म्हण- तात यावरून). 'ही मूठ मुलाची किंवा मुलीची आहे.' ९ (कों.) शेतांतील पीक कापण्याच्या वेळीं करावयाचें कुणबी लोकांचें देव- कृत्य. [सं. मुष्टि; प्रा. मुठ्ठि; पं. मुठ्ठ; सिं. मुठि; उरि. मूठि; बं. मूठ; हि. गु. मूठ, मुठ्ठि] म्ह॰ झांकली मूठ सवा लाखाची उघ- डली मूठ फुकाची = आपण बोललों नाहीं तोंपर्यंत आपलें अज्ञान झांकून राहील, बोलल्यास तें लोकांना दिसून येईल. (वाप्र.) ॰आळवणें-दुसऱ्यास देण्याचें थांबणें; चिक्कूपणा करणें, करूं लागणें ॰दाबणें-चेपणें-गार करणें-भरणें-लांच देणें; लांचाची रक्कम मुठींत किंवा हातांत देणें. 'त्यानें पन्नास रुपयांनीं फौजदा- राची मूठ दाबली तेव्हां तो सुटला.' ॰भर मास चढणें- वाढणें-लठ्ठ होणें; गर्विष्ठ होणें; फायदा झाल्यानें अत्यानंद होणें. ॰मारणें-मंत्रसामर्थ्यानें दुसऱ्याचा नाश करणें; प्राण घेणें. मुठींत असणें-(एखाद्याला) पूर्णपणें किंवा सर्वथैव ताब्यांत, कह्यांत, अधिकारांत असणें. 'श्रोत्यांच्या साऱ्या मनोवृत्ति या वक्त्याच्या जशा काय मुठींत होत्या.' -नि. मुठी-मुठेळ्या-मुठ्या मारणें-मुष्टिमैथुन करणें. मुठ्या मारीत बसणें-(व.) माशा मारीत बसणें; निरुद्योगी राहणें; आळसानें वेळ घालविणें. एका मुठीचीं माणसें-एकाच कायद्याखालीं किंवा हुकमतीखालीं येणारी माणसें. एका मुठीनें-एकदम; एकाच हप्त्यानें, एकाच वेळीं. (रुपये देणें, घेणें, फडशा पाडणें). झांवल्या मुठीनें-गुप्त- पणें; खरी गोष्ट बाहेर पडूं न देतां; कोणाजवळ काय आहे किंवा कोण कसा आहे तें बाहेर फुटूं देतां. सामाशब्द- ॰पसा-पु. पसामूठ पहा. ॰मर्दाई-स्त्री. १ अन्यायानें व दांडगाईनें किंवा पाशवी सामर्थ्यानें दुसऱ्याचा पैसा इ॰ लुबाडणें. २ दांडगाई; जुलुमजबरदस्ती. ३ चोर, भामटे इ॰नीं एका जुटीनें हल्ला करून लुबाडणें. ॰माती-स्त्री. (प्रेत इ॰) पुरणें; पुरण्याचा अंत्य संस्कार. (क्रि॰ देणें). मुठवा-पु. (नाविक) भुरड्याच्या थोडें मागें दोन बोडतास दोन लांकडी जाडे खुंट ठोकतात त्यापैकीं प्रत्येक. याचा उपयोग टांकणीचें शेवट अडकविण्यासाठीं घोंस नाळीस चेपणीच्या वेळीं अगर पागर बांधण्यासाठीं होतो. मुठळी-स्त्री. १ मूठ. २ मुठींत धरून हलविणें. मुठा-पु. १ पाणी भरण्याचें पखालीचें तोंड. २ (राजा.) चुलीतींल विस्तव विझून जाऊं नये म्हणून तींत पुरून ठेविलेला शेणाचा गोळा. (क्रि॰ घालणें; पुरणें). ३ वातविकारानें किंवा भयानें पोटांत उठणारा गोळा. ४ रेशीम, सूत इ॰चा गुंडा, लड. मुठाण-न. एकजूट; संघ; टोळी; चांडाळ- चौकडी. मुठाळणें-सक्रि. हातीं धरणें; मुठींत धरणें. 'झाला सकोप, परजाळा मुठाळुनि भुजालागि थापटिच करें ।' -आमा ४५. मुठियो-पु. १ (गो.) तांदुळाच्या पिटाचें गूळमिश्रित पिंडाकृति एक पक्वान्न. २ (गो.) सोनाराचें एक हत्यार मुठी- स्त्री. (राजा.) खोबऱ्याची गोणी; खोबरें भरलेलें पोतें. मुठीचा खेळ-पु. मंत्रानें भारलेलें धान्य मुठींत घेऊन तें एखाद्या पदार्था- वर टाकून केलेला जादूचा खेळ. मांगगारूड पहा. मुठ्ठा-वि. १ रेशीम, कलाबतू इ॰ पुष्कळ प्रकारचे धागे एकत्र बांधून केलेला बिंडा. मुठ्या-पु. १ एका जातीचा खेंकडा. २ नांगराच्या रुम- ण्यांत बसविलेली, हातांत धरावयाची खुंटी; मूठ. [म. मूठ; का. हिडी; गुज. हडेली] मुठ्याल-न. (हेट.) मुठेल पहा. मुठ्यो- पु. (कु.) १ काथ्या ठोकण्याचें लांकूड. २ (कु.) लाह्या, उमलें इ॰ भाजतांना तें ढवळण्याकरितां काठीच्या टोकाला फडकीं गुंडा- ळून केलेलें चेंडूच्या आकारचें साधन; घाटणा. मुडका-पु. (व.) पेंढी; गठ्ठा. मुडगा-पु. १ मूठभर धान्य. २ केरसुणीची मूठ.
वर
क्रिवि. १ पर्यंत; काल मर्यादा किंवा प्रमाण यापावेतों. उदा॰ आजवर; वर्षावर; पायलीवर; खंडीवर. २ उंच; उच्च प्रदेशीं; उपरि. याच्या उलट खालीं. ३ नंतर; मागून. 'औरंगजेब मेल्यावर कोण गादीवर आला?' ४ अधिक; जास्त. 'त्या सभेंत शंभरावर लोक नव्हते.' ५ शिवाय; आणखी. 'आम्हाकडून काम करून घेतलेंच, वर आम्हाला शिव्या पण दिल्या.' ६ मुळें; कारणानें. 'पुरुषोत्तमरावांचें घर आपणांवरच चाललें आहे.' -इप ३२. ७ अनुरोधानें लक्ष्यविषय करून. 'वाघावर एकटा कसा चालला आहे तो पहा.' 'या विषयावर चार घटका बोलत होता.' ८ परंतु 'हे सारि ते वर थोडे । आणीकही साधील गाढे ।' -ज्ञा १६.३५२. वरता, वरी पहा. [फा. वर; सं. उपरि; प्रा. उवरि तुल॰] ॰डोकें काढणें-ऊर्जितावस्थेस येणें. 'तारा- बाईनें नातवाला सातारची गादी साधून देऊन वर डोकें काढलेलें जिजाबाईला मानवलें नाहीं.' -भक्तमयूर केका ५. ॰तोंड करणें- निर्लज्ज बनणें; लाज न वाटणें. ॰पडणें-(वस्तू, गोष्टी) तत्परतेनें करूं लागणें. 'अलीकडे तो कादंबऱ्यांवर पडला आहे.' ॰पाहणें- लज्जा, शंका, भीति न वाटणें; धीटपणा असणें; उजागरीनें बघणें. 'पापाला वर पाहण्याचा धीर होत नाहीं.' -पुण्यप्रभाव १३७. सामाशब्द- ॰उपचार-पु. अव. १ वरवर सभ्यपणा; शिष्टपणा दाखविणें; खोटी नम्रता; शिष्टचार. २ रोगनिवारणासाठीं बाहेरून शरीराला केलेले उपचार. ॰कडी-वर्चस्व; वरचढपणा. 'राज्यांत मुघोजीची वरकडी झाली कीं आपला तो सूड उगवील अशी कारभाऱ्यांस भीति पडली.' -विवि ८.६.११०. ॰करणी-वि. बाह्य; औपचारिक; कृत्रिक; दिखाऊ; वरकांती; पोकळ (भाषण, कृत्य, इ॰). ॰कर्मी-वि. १ वरकणी पहा. 'याचें असलें बरकर्मी बोलणें तुम्ही जमेस धरूं नका हो !' २ बाहेरचा; आंत ज्याचा प्रवेश नाहीं असा (रोग, औषध). ३ मूळचा झरा नसलेलें (जल इ॰). ४ मूळ नसलेला; उपरी; स्थिरपणा, कायमपणा नसलेला. ५ पोकळ; दिखाऊ; खोंटें. ॰कर्मी आदर-पु. पोकळ, कृत्रिम आदर, भाव; आदरसत्काराचा खोटा देखावा. ॰कांती-कांतीचा-वि. १ दिखाऊ; सुंदर; सुरेख दिसणारा. २ वरकरणी पहा. 'नाहीं शब्द रे बोललास वर- कांतिचा ।' -प्रला १५६. ॰काम-न. प्रत्यक्ष बनावाचें काम न करतां त्याला साधनीभूत असणाऱ्या गोष्टी करणें. उदा॰ स्वयंपाकाला लागणारें साहित्य पुरविणें, धुणेंपाणी इ॰. ॰कोट- पु. थंडी, पाऊस इ॰ साठीं कोटावर घालावयाचा लांब कोट. (इं.) ओव्हरकोट. 'उलट वरकोट आणि हातमोजे हा नेहमींचाच पोषाक होऊन बसला आहे.' -सांस २.२३४. ॰खर्च-पु. १ अधिक, योजलेल्यापेक्षां जास्त खर्च. २ इतर किरकोळ खर्च. ॰खाल-क्रिवि. खालवर; उंचसखल; विषमरीतीनें. ॰घडी-स्त्री. १ वस्त्राची घडी करतांना दर्शनी चांगला भाग यावा म्हणून अमळ बारीक विणून काढलेला पट्टा; वरची चांगली बाजू. २ (शिंपी- काम) बाहेरच्या बाजूला असलेली दुमड. 'वरघडीच्या तळाची ट्रावझर करावयाची असल्यास पांच इंच कापड अधिक घ्यावें.' -काटकर्तन ८. ॰घडीचा-वि. १ बाह्य; वरचा. २ वरघडी असलेलें (वस्त्र). ३ (ल.) दिखाऊ; भपकेदार. ४ कृत्रिम; खोटें. ॰घाट-पु. १ बाहेरचा आकार, घडण; बाह्य; स्वरूप. २ घाटावरचा प्रदेश; सह्याद्रिच्या पूर्वेकडील मुलूख. ॰घाटी-वि. बरघाटासंबंधीं (माणूस, पदार्थ इ॰). ॰घाटीण-स्त्री. घाटा- वरची स्त्री. ॰घाला-पु. जोराचा हल्ला, घाला. 'षड्रिपूवरता वरघाला ।' -दावि ३७९. ॰चढ-वि. सरस; श्रेष्ठ; जास्त; वरच्या दर्जाचा. ॰चढपणा-पु. सरसपणा; श्रेष्ठपणा. ॰चष्मा- श्मा-पु. १ वरचढपणा; वर्चस्व. (क्रि॰ करणें; होणें). 'काके- शियन वर्गाचा दुसऱ्या वर्गावर नेहमी वरचष्मा असे' -मराठी ६.३०६. २ देखरेख करणारा; तपासनीस; वरचा अधिकारी. ३ वर्चस्व गाजविणारा; अधिकार चालविणारा. ॰जोर-वि. श्रेष्ठ. 'सीरजोर वरजोर जोर हा ।' -दावि ३१०. ॰डगला-पु. (वडोदें) वरकोट पहा. -खानो ३. ॰डोळ्या-ळा-वि. १ उलट्या- बाहुल्या असणारा; अदूरदृष्टि; नेत्ररोगी. 'परपुरुषातें नयनीं पाहे । उपजतां वरडोळी होये ।' -गुच ३१.८५.२ आढ्यताखोर; रागीट. ३ टक लावून वर पाहणारा; वर दृष्टि असणारा (निंदार्थीं उपयोग). ॰तडग-न. दागिन्यावरचा तगडाचा अंश. ॰दळ-न. भाजी- बरोबर चव येण्यासाठीं शिजविलेली डाळ. [वर + दाळ] ॰दळ- न. १ घरावर कौलें, गवत इ॰ घालण्यापूर्वीं वांसे, पांजरण इ॰ पसरतात तें. २ वरचें कवच, साल. 'येक वरदळ बरें असतें । कठिण अंतर्त्यागि दिसतें ।' -ज्ञानप्रदीप ८३४. ३ वरचा भाग. 'अंग साजिरें नाकहीन । वरदळ चांग चरण क्षीण.' -एभा ११.१२८५. ४ मुलामा. 'हावभावाचेनि वरदळें ।' -भाए ३४५. -वि. १ वरवरचा; बाहेरचा. 'दाऊनियां वरदळ वेष । मना अंगीं आशा- पाश ।' -निगा २८०. 'वरदळभक्तीं करोनिया नमन ।' -नव १८.१६३.२ दांभिक. 'तुका म्हणे आम्हां तुमचेचि फंद । वरदळ छंद कळों येती ।' -तुगा ५०७. ३ हलकें; नीरस; किरकोळ. [वर + दल] ॰दळ-स्त्रीन. १ उपयोगांत, वहिवाटींत असलेले जिन्नस. 'चोर आले आणि वरदळ नेली.' २ नफा; वर मिळणारा फायदा. 'लाख रुपयें मूळ पुंजी. जें वरदळ मिळेल तें खातों.' ॰दळखर्च-पु. जास्त खर्च. ॰दळ जिंदगी-दौलत-स्त्री. सामान; जंगम माल. वरदळा-ळें-क्रिवि. वरून; बाहेरून. 'सेवन हें शिरसा धरीं । अंतरीं ही वरदळा ।' -तुगा ३२२३. 'तेविं मनुष्य वेशाचें रूपडें । वरदळें दिसे चोखडें ।' -ज्ञाप्र ७५०. वरदळ सामान-१ जंगम माल. २ किरकोळ माल. सामान. ॰दक्षिणा-स्त्री. चोरी इ॰ कानें गेलेला पैसा, पदार्थ परत मिळ- विण्यासाठीं व्यर्थ खर्चलेला पैसा. ॰दूध-न. अंगावरील दुधाखेरीज इतर दूध (लहान मुलास दिलेलें). वरचें दूध पहा. ॰नट-क्रिवि. वरून; वरकांती. 'लई अंतरची खोल मोठी वरनट केवळ सात्विक दिससी ।' -होला ८९. ॰पंग-क-वि. वरवरचा; बाह्यात्कारी (देखावा). 'अथवा वरपंग सारा । पोटीं विषयाचा थारा ।' -तुगा २८३२. ॰पंकाचा-पंगीचा-वि. क्रिवि. वरकरणी; वरकांती पहा. 'कीं वरपंगी जेवि जारीण । दावी भ्रतारसेवा करून ।' ॰पंकी- पंगी-पांगी-क्रिवि. वरवर; बाह्यात्कारी; बाह्यतः 'सामाजिक व धामिंक रीति इंग्रजी शाळेंतला मनुष्य वरपांगी पाळीत असतो.' -टि ४.३७८. [वर + पंख] ॰पंगतीचा-वरपंकी पहा. वर- कांती. 'हा स्नेह नाहीं वरपंगतीचा ।' -सारुह १.३६. ॰पिका- पीक-वि. झाडावर पिकलेला (फलादि पदार्थ) याच्या उलट कोनपिका. ' वरपिका फणस असला तर मला दे. कोनपिका नको, ' [वर + पिकणें] ॰बुजारत-क्रिवि. वरबर; बाह्यतः [वर + हिं. बुझारत] ॰बट्टा-पु. नाणें मोडतांना पडणारा बट्टा. बाहेरबट्टा पहा. ॰वंचाई-स्त्री. बाह्य भपक्यावरून झालेली फसवणूक. [वर + वंचणें] ॰वंचाईचा-वि. वरकर्मी पहा. ॰वर-वरता-वरतीं- क्रिवि. वि. १ आंत प्रवेश न होतां-करतां; बाहेरूनच (खोदणें, चोळणें इ ॰). २ थोडें फार, खोल नव्हे, अंतर्यामी नव्हे अशा रीतीनें. ३ वरकांती-वरपांगी; कृत्रिम; खोटें. 'तो मला वरवर प्रेम दाख- वितो. ' म्ह॰-वरवर माया करती आणि तोंड झांकूनी खाती. ॰वर करणें-केल्यासारखें दाखविणें; करण्याचें ढोंग करणें. वरवर बोलणें- रडणें-हांसणें-रागें भरणें-कृपा करणें इ॰ प्रयोग होतात. ॰वर उपचार-पुअव. बाह्य, दिखाऊ आदरसत्कार; नुसता, पोकळ शिष्टाचार. ॰वळा-पु. वर्चस्व; बलाधिक्य. 'देखोनि वैरियांचा वरवळा । कांपिन्नली भीमकबाळा । ' -एरुस्व ८.५१. ॰वेष-पु. बाह्य वेष; बुरखा; ढोंग. ॰शेर-सर-सांड-स्त्री. भरपूरपणा; महामुरी; तुडुंब होऊन सांडणें. -वि. भरपूर; तुडुंब. ॰सार, ॰सार- पारसार-स्त्री. (व.) संसारोपयोगी सामानसुमान, चीजवस्तु. ॰सोस-पु. श्वास; ऊर्ध्व. (क्रि॰ लागणें). [वर + श्वास] वरचा- वि. बाह्य; वरच्या भागाचा. ॰चें दूध-न. लहान मुलाला आईच्या दुधाऐवजीं-शिवाय गाईम्हशीचें जें दूध घालतात तें. -टि १.२९७. वरता-तीं-तें-शअ. क्रिवि. सर्व अर्थीं वर पहा. १ वर. 'त्यानें जे समयीं वरतें बसावें ते समयीं त्याची बुद्धि मोठी उदार व्हावी. ' -सिंहासनबत्तीशी १. २ आणखी. ३ अधिक. ' त्याहूनि कोटि- योजना वरता । ' -भारा किष्किंधा ११.७९. ४ हून; पेक्षां. ' तरी स्त्री आणि स्त्रैणावरता । दुःसंग सर्वथा असेना । ' -एभा २६.३०२. ५ श्रेष्ठ; उच्चतर. ६ (किनाऱ्याच्या बाजूनें ) उत्तरेकडचा. ७ किनाऱ्यापासून आंत. वरला-वरचा पहा. वरावरी-क्रिवि. १ वरचेवर; वारंवार. -तुगा. -शर. २ झपाट्यानें; निषिमांत. वरि- री-शअ. क्रिवि. वर पहा. १ वर; उंच. 'तूं काइसयावरी आहासि ऐसें । पाहिलें मियां । ' -ज्ञा ११.२७५. २ आणखी. 'ऐसा जात्यंधु अधस्तु । वरि भवरोगी ग्रस्तु । ' -ऋ २. ३ वरवर; बाह्यतः 'सत्य धनंजय कर्मे रूपें दिसतो उगाचि वरि नरसा । ' -मोभीष्म ११.७२. ४ पर्यंत. 'तैसें आस्थेच्या महापुरीं । रिघतांति कोटि- वरि । ' -ज्ञा ७.१३. ' देव जवळ अंतरीं । भेटीं नाहीं जन्मवरी । ' -तुगा. ५ (तृतियेचा प्रत्यय) नें; मुळें. 'तो निर्मत्सरू का म्हणिजे । बोलवरी । ' -ज्ञा ४.११३. वरिवरी-क्रिवि. वरवर पहा. 'अवघे देखिले अधर्मरत । वरीवरी आचार दावित । जैसी शांति मैंदाची । ' -वरीव-वि. श्रेष्ठ; उत्कृष्ट. ' प्रेम देखतांचि दिठीं । मीं घें आपुलियें संवसाठीं । नव्हतां वरीव दे सुखकोटी । नये तरी उठाउठी सेवक होय ।' -एभा १४.१५८. वरिवा-पु. १ वरचढपणा; श्रेष्ठपणा. 'जियें आपुलियां बरवां । नंदनवनातें मागती वरिवां । ' -शिशु २४९. २ शोभा; उत्कृष्टपणा. वरिष्ट-ष्ठ-वि. विद्या, वय इ॰ कानीं श्रेष्ठ; सर्वांत मोठा; श्रेष्ठ. -ज्ञा १.३०. 'ईश्वर तो अति वरिष्ठ । येरू भूतभौतिक अति कनिष्ठ । ' -भाराबाल ११. १६५. ३ अत्यंत मोठे, जड. [सं वरिष्ठ] वरीयान्-वि. श्रेष्ठ (मनुष्य, प्रश्न इ॰;) अत्युत्तम; अत्युत्कृष्ट. -पु. (ज्यो.) १८ वा योग. वरील-वि. वरच्या भागासंबंधीं; वरचा. वरुता-तें- शअ. क्रिवि. वर, वरता-तें पहा. 'पाळा मांडिला शरीरावरुता । ' -नव. ११.१२०. वरून-शअ. १ वरच्या भागापासून. २ साहा- य्यानें; साधनानें; कारणानें. 'तुला म्यां शब्दांवरून ओळखलें. ' ३ परिणामतः; प्रसंगानें; मुळें. ' तूं सांगितल्यावरून मी गेलों. ' ४ पुढून; समोरून; जवळून. 'तो माझे गांवावरून गेला.' ५ पृष्ठ- भागास धरून. ६ नंतर; मागाहून. (कालसापेक्ष प्रयोग). 'स्नान केल्यावरून भोजनास बसलो. ' ७ वर; उपरि. 'झाडांवरून पांखरें बसलीं.' 'घोड्यांवरून सगळीं माणसें बसलीं.' (फक्त अनेक- वचनांत प्रयोग). ८ प्रमाणें. 'आपणांवरून दुसऱ्याला । राखीत जावें । ' -दा १२.१०.२४. ' आपणांवरून जग ओळखावें ' ९ वरील बाजूस; बाह्यप्रदेशीं. 'अंतर्वसन बाह्यवसन कंचुकीवरून प्राव- रण । ' -ह ३४.१६३. वरौता-ती-वि. वर; वरता पहा. -ज्ञा ४.२०९. ' वरौति ऐऔनि आनंदभरें । ' -दाव १८८. ' सुकुमार- पणें भूपति भृंग । धरोनि झेली वरौतें । ' -मुआदि १८.३४. वरौनी-वरून पहा. 'वरौनि कापूरकेळीं । भ्रमरांची झांक ऊठिली । ' -शिशु ६०५.
नवा
वि. १ नवीन; नूतन; अस्तित्वांत येऊन फार दिवस झाले नाहींत असा. २ (एखाद्या कार्यांत, व्यवहारांत, धंद्यांत) नवशिका; अनभ्यस्त; (नवशिक्या माणसास अनुलक्षून) अंग- वळणी न पडलेलें (त्याचें कार्य). 'या कामांत तो नवा आहे आणि हें कामहि त्यास नवें आहे.' ३ उपयोग इ॰कानीं मलिन, अस्ताव्यस्त, जर्जर, जुना न झालेला. 'ही शालजोडी नवी आहे.' ४ अभूतपूर्व; अपूर्व; अपरिचित; अदृष्टपूर्व. 'आज नवें झाड पाहिलें' 'आज यांनीं नवाच श्लोक म्हटला.' ५ न उपभोगिलेला, उपयोगिला गेलेला. 'ही स्त्री अझून नवी आहे कोणी भोगिली नाहीं. ६ नुकतीच ज्यानें (कार्याचीं, कारभाराचीं) सूत्रें हातांत घेतलीं आहेत असा (कारभारी, त्याचा कारभार) -शास्त्रीको. ७ तरुण. नव पहा. [सं. नव; प्रा. नवओ; सिं. नओ; हिं. नया; फ्रें. जि. नेवो] (वाप्र.) ॰जुना करणें-जुना बदलून नवा घेणें, करणें (करारनामा, हिशेब, करार, अंमलदार इ॰). ॰जुना होणें- नवीनपणा, नवखेपणा नाहींसा होणें; परिचित होणें; वहिवाटला जाणें. नवीजुनी ओळख-स्त्री. पुन्हां नव्यानें करून घेतलेला, नवा केलेला जुना परिचय. नवीजुनी सोयरीक-स्त्री. पुन्हां नव्यानें जोडलेला (एखाद्या व्यक्तीचें मरण इ॰सारख्या कांहीं कारणामुळें तुटलेला) संबंध, सोयरीक. नवी नवती-स्त्री. नव- यौवन; तारुण्याचा भर; ऐन ज्वानी; नवनवती पहा. नवी नवरी- स्त्री. १ नुकतेंच लग्न झालेली मुलगी. २ (उप.) स्वाभाविकपणें जी गोष्ट माहीत असायला पाहिजे ती माहीत नसलेला, माहीत नसल्याचा आव आणणारा, लाजाळु मुलगा, मुलगी. नवी नवाई, नवी नवा(व्हा)ळ, नवी नवलाई, नवी नवाळी-स्त्री. १ नव्यानें, नुकतेंच निघालेलें (प्रतिवर्षीं होणारें) धान्य, फळ इ॰; नवान्न. ' हे पेरू पाठवायाजोगे नव्हेत परंतु नवीनवाळ म्हणून पाठवावे.' २ वर्षाच्या नवधान्याच्या, नवीन, अपूर्व व सुंदर वस्तु. नवें जग-न. अमेरिका व ओशियानिया हीं दोन खंडें. यांचा शोध अलीकडेच लागल्यानें त्यांस हें नांव आहे. नवेंजुनें-न. १ (राज्य इ॰कांत) जुने अधिकारी काढून नवीन नेमण्याचा प्रकार. २ जुन्या वस्तू देऊन नवीन घेण्याचा, परस्पर बदलण्याचा प्रकार. नवें टाकणें-(ना.) नवीन उपक्रम सुरू करणें; दीर्घकालानंतर एखादी गोष्ट करणें. नव्या उमेदीचा-वि. तारुण्याच्या जोमानें, उत्साहानें व महत्वाकांक्षांनीं परिपूर्ण; (अजून) जगाचे कटु अनुभव ज्याला आले नाहींत असा उत्साही व महत्वकांक्षी (तरुण मनुष्य). नव्याची पुनव-स्त्री. आश्विनांतील व माघी (मार्गशीर्ष-शास्त्रीको?) पौर्णिमा; नवान्नपूर्णिमा पहा. नव्याच्यानें, नव्यानें-क्रिवि. प्रथमच; नवीन म्हणून. 'या रणपटु योद्ध्याची ओळख आमच्या स्वराज्या- वरील कादंबऱ्या वाचणारांना नव्यानें करून देण्याची आवश्यकताच नाहीं. ' -स्वप ५९. नव्याजुन्याचा मेळ-नवे आचार, नवे विचार त्यांचें सार व जुन्या आचारविचारांचा विचार करून योग्य असेल तें घेऊन ऐक्य करणें. नव्या(वे)ताण्याचा-वि. १ विणून तयार होऊन फार दिवस झाले नाहींत असें (वस्त्र इ॰). २ अशा वस्त्राचें सूत इ॰म्ह॰ १ नवें नवें जेवी सवें = पाहुणा नवीन आहे तोंपर्यंत घरमालक त्याला बरोबर पंक्तीला घेऊन कांहीं दिवस जेवतो, पुढें परिचय झाल्यावर मात्र हेळसांड व्हावयास लागते. २ नवें नवें नि खाटल्याभवतें भवें. ३ नवी विटी नवें राज्य, नवी विटी नवा डाव. (विटीदांडूच्या खेळांत विटी बदलून नवी घेतली तर सर्वच बदलतें त्याप्रमाणें) = एखाद्या कारभारांत नवीन कारभारी आला तर त्याचें सर्वच तंत्र नवीन असतें. ४ जुने डोळे आणि नवे चाळे, तमाशे. ५ नवां दिवशीं नवी विद्या. ६ नव्याचे नऊ दिवस = कोण- तीहि गोष्ट नवी आहे तोंपर्यंत (कांहीं दिवस) लोक तिचें कौतुक करितात. त्या वस्तुचा नवेपणा व लोकांचें कौतुक फार दिवस टिकत नाहीं. सामाशब्द- ॰आडसाली-वि. उंसाचा एक प्रकार. नवीन लागवड केलेला एक वर्षाआड पीक देणारा ऊंस. ॰करकरीत-वि. अगदीं नवा; पूर्णपणें नवा; कोरा करकरीत; करकरीत पहा. ॰तरणा-तरणाफोकवि. जवानमर्द; ज्वानींत असलेला; तारुण्याच्या भरांत असलेला (पुरुष). ॰नूतन-वि. अगदीं नवा; कोरा करकरीत. [नवा + सं. नूतन = नवा]
भार
पु. १ गुरुत्व; जडपणा. ज्या योगानें पदार्थ निराधार असतां खालीं येतो तो पदार्थाचा धर्मविशेष. २ वजन तोलून काढलेलें परिमाण. ३ कोणतीहि वजनदार वस्तु; वस्तु; दाब; दडपण. 'कागद वार्यानें उडतात त्यावर कांहीं भार ठेव.' ४ (ल.) (काम, उपकार, मेहेरबानी इ॰ चें) वजन; ओझें. 'तो भारु फेडावेआ जगन्नाथा । अवतरलासी तूं ।' -शिशु १४७. ५ (ल.) ओझ्याप्रमाणें मानलेलें काम; दयेचें कृत्य; उपकार. ६ (ल.) महत्त्व; गौरव; धन्यता; वजन ७ शैत्यादि विकरामुळें डोक्यास भासणारा जडपणा. 'आज माझे मस्तकास भार पडला आहे.' ८ एक रुपयाच्या वजनाइतकें वजन; एक तोळा वजन. 'ही वाटी पंचवीस भार आहे.' ९ (समासांत पदलोप होऊन) विशिष्ट वजन. 'पैसाभार लोणी, ढबूभार साखर, वीस रुपये भार गूळ.' १० ओझें; वजन उदा॰ काष्ठ-तृण-पर्ण-भार. 'सोनसाखळीचा झाला भार ।' -मसाप २.१. ११ (सैन्याचें एक अंग म्हणून) संख्या- बल. जसें-अश्वभार, कुंजलभार, दळभार, रथभार इ॰. १२ (काव्य) कळप; तांडा; समूह. 'वाटेसि गडगडतां व्याघ्र । थोकती जैसे अजाचे भार।' १३ समूह; समुदाय; मेळा; गर्दी. उदा॰ गोभार, द्विजभार, भृत्यभार इ॰. 'आशीर्वचनीं जयजयकार । करूनि बैसला ऋषींचा भार ।' -मुआदि १६.११०. १४ सेना; समूह. 'दळ- व्याचा भार कुरडूंच्या मैदानीं गेला ।' -एपो ६८. १५ भर; बहर.'मग हें रसभावफुलीं फुलैल । नानार्थ फळभारें फळा येईल ।' -ज्ञा ११.२०. 'नम्र होती फळभारें तरुवर सारे' -शाकुंतल. १६ ओझें; काळजी; जबाबदारी; आधार. 'सखे, मी सर्व भार परमेश्वरावर ठेविलेला आहे.' -रत्न २.१. १७ व्यूह; बेत. 'ते पाहोन राजभुवरानें लष्कर पायदळ फौज करून भार रचिले.' -इमं ९. १८ आठ हजार तोळे वजन. (चार तोळे = १ पल; १०० पला = १ तुला; २० तुला = १ भार. 'रत्नें प्रस्थ भार एक एक कनक । ऐसी दक्षिणा आरंभीं ।' -जै १.९१ -वि. जड. 'मत्प्रश्न भार कां गमला?' -मोअश्व २.३०. [सं. भार; फा. बार] ॰कस-नपु. १ गाड्यावर किंवा उंट, हत्ती इ॰च्या पाठीवर सामान कसून बांधण्याचा सोल, दोर. २ वादळांत तंबू डळमळूं नये ,म्हणून त्याच्यावरून टाकून जमिनीस खिळविलेली दोरी. [तुल॰ फा. बारकश्] ॰ग्रस्त-पीडित, भाराकुल, भाराक्रांत, भारान्वित, भारार्त-वि. (शब्दशः व ल.) ओझ्यानें पीडि- लेला, त्रासलेला. ॰दडीचावि. वजनदार; भारदस्त. ॰दर्शक- वि. वजन दाखविणारें (परिमाण). उदा॰ मण, पौंड, तोळा, मासा इ॰. ॰दस्त-दस्ती-दास्त-दार-वि. १ वजनदार; मह- त्त्वाचा. २ बहुमोलाचा; मूल्यवान्. [भार + फा.दस्त इ॰] ॰दस्ती- दारी-स्त्री. १ वजन; महत्व. २ हुकमत चालविण्याचें सामर्थ्य, अधिकार, सत्ता. भारंदाज-वि. वजनदार; फायदेशीर; भरभरा- टीचा (माणूस, धंदा). [फा. बार + अंदाज] भारंदाजीस्त्री. सार; महत्त्व; भरीवपणा; फायदेशीरपणा (मनुष्य, काम इ॰चा). ॰दार-वि. निष्णात; प्रवीण; वाकबगार; महत्त्वाचें काम कराव- याला जबाबदारी घेण्याला लायक, समर्थ. [हिं.] ॰दारी-वि. ओझें वाहणारा; ओझ्याचा. 'जरूरियात प्रसंगीं भागीदारी गाडे लागल्यास...' -राजमहाल कामगारी कारकुनांच्या कर्तव्या- संबंधीं नियम पृ. ६. ॰धडी-स्त्री. १ जड वस्तु; भारी सामान. 'भारधडी झाडून गेली परंतु वस्तीस मनुष्यें होतीं.' -भाब ३०. २ गैरलढाऊ लोक. 'मल्हारराव यांचीं मुलेमाणसें भारधडी इंदुरास राहिली.' -भाब ९६. ॰ब(बा)रदारी-क्रिवि. लवा- जम्यासह. 'औरंगाबादेहून देखील भारबारदारी दिल्लीस जात आहेत.' -शाछ १.२७. [भार + बरदार = वाहक] भारंभार-वि. सारख्या वजनाचें; भारोभार. 'हे रुपये द्यावे आणि भारंभार चांदी घ्यावी.' [भार + आणि + भार] ॰भूत-वि. १ जड; भार झालेला. 'भारभूत होय जीणें...।' -विक ८२. २ (ल.) निरुपयोगी; निरर्थक. ॰मान-न. १ गुरुत्व; जडपणा. याच्या उलट आकारमान. २ हवेचा दाब मोजण्याचें यंत्र; भारमापक यंत्र. (इं.) बॅरोमीटर. ॰वाहक-वि. १ ओझें वाहणारा (मनुष्य, गाडी, जनावर इ॰) 'कीं आले खर, भारवाहक असे पोटीं मनुष्याकृती ।' -विक १२. २ (संसार, कामधंदा इ॰चा) भार, जबाबदारी सहन करणारा. ३ अंगीं असलेल्या विद्यादि गुणांचा-द्रव्य मिळविणें इ॰ कामीं उपयोग न करणारा (माणूस); ओझ्याचा बैल. ॰शांखळ-ळा- स्त्री. (महानु.) शृंखला. 'तो जुझारां गडे । पाईं भारशांखळ काढे ।' -भाए ३५९. [भार + शृंखला] भारोभार-क्रिवि. सारख्या वजनाचें; भारंभार. [भार द्वि.] भारकी-कें-स्त्रीन (काटक्या, गवत, पानें इ॰चा) लहान भारा, ओझें. [भारा अल्प.]
खांड
स्त्री. १ ताली, बंधारा, भिंत यांतील भेग, तडा, चीर भोंक. 'खाचरास खांड पडली.' २ कातरा: सड: दांता; खरा (तरवार, विळा यांच्या धारेवरील). ३ दांतांमधील खिंड. ४ पिवळसर व भरड, हस्तकृतीची साखर. ही थोडी अंबूस असते. 'खाये खीर खांड ।' -तुगा ४२९. -न. १ भक्कम व चौरस किंवा साधी तुळई, तुळवट. २ एखाद्या वस्तूचा तुकडा (सुपारी, बिब्बा, हळकुंड, चंदन, गोवरी इ॰) 'ऐसें ह सेंड्या कडिल खांड ।' -दा २०.३. ४. ३ टोळी; दाटी; कळप (बकरीं, मेंढ्या यांचा). ४ झाडाचा ठोकळा, भाग. ५ शेताचा तुकडा. ६ धान्याचा चुरा; कळण. -वि. १ दाट. २ भंगलेलें. 'असावें का खांड देउळीं ।' -भाए ४९३. [सं. खंड] सामाशब्द-॰क(ग)ळी शिवी-खांड- गाळी-स्त्री. सुवासिनी स्त्रीस रांड, बोडकी या अर्थाची शिवी. [तुल॰ सं. खंडालि = जिचा नवरा दुराचारी आहे अशी स्त्री]. ॰कापी सुपारी-स्त्री. क(का)चरी सुपारी; सुपारी कोंवळी असतां शिजवून व राप (सुपारीच्या काचर्या शिजविलेलें पाणी) शिंप- डून उन्हांत वाळवितात. व काचर्या काढतात अशा सुपारीला खांडकापी म्हणतात. हिलाच चुकीनें 'लवंग काचरीसुपारी' म्हण- तात. खांडकी-स्त्री. दगडाचा फोडलेला मोठा तुकडा; चीप; कळपा; फाडी; इमारतकामांतील खांडकीची पुढील चौरस बाजू घडीव, असून मागील उतरती व अणकुचीदार असते. खांडकें- न. उसाचें कांडे. खांडक्या-वि. (गुर्हाळ) उसाचे तुकडे करणारा; पेरुळ्या. खांडडोह-हो-पु. १ उन्हाळ्यांत नदीचा प्रवाह आटल्यामुळें मध्यें मध्यें प्रवाहाला पडलेले खंड; खंडित डोह. खांडवा; भाट-टी. २ (चुकीने) पाण्याच्या प्रवाहांतील खोल जागा (कोठली तरी). सामान्यतः अनेकवचनी प्रयोग. (क्रि॰ पडणें) ॰तुळई -स्त्री. तुळवट; खांड अर्थ ५ पहा. ॰तोळी -स्त्री. (राजा.) एक पक्वान्न; खांडवी. हें तांदुळाच्या कण्याचें करतात. ॰दोर-पु. (व.) बैलासबांधावयाचा दोर. ॰पासोळा-पु. खुनशी, आकसखोर मनुष्य. [खांड + फासळी] ॰फाडोळी-वि. (व.) एका बाजूस फांसळी कमी असलेलें (जनावर). रागखांडव-पु. एका प्रकारचा मोरंबा. कृति-साल काढलेल्या हिरव्या आंब्याच्या फोडी तुपांत पर- तून खडीसाखरच्या पाकांत शिजवून, मिरीं, वेलदोडे, कापूर यांचा वास लावून बरणींत ठेवणें. -योर १.८०. खांडव-पु. (संगीत) अवरोह. (क्रि॰ करणें). खांडव-पु. लग्नांत विडे, सुपारी वाटण्यासाठीं केलेली कापडाची (खणाची) झोळी. [खंडवस्त्र] खांडव-वा-पु. नदीच्या प्रवाहांत पडलेली भाटी; खांडडोह. ॰वी-स्त्री. वाळविलेल्या खार्या मासळीचा तुकडा. खांडवी- वें-वे-पोळी-बोळी-स्त्रीनपुअवस्त्री. १ (कों.) तांदुळाचा रवा काढून त्यांत गूळ, खोबरें, लवंगा, वेलदोडे इ॰ घालून त्याच्या वाफे वर शिजवलेल्या वड्या, या तुपाबरोबर खातात. २ गूळ, पीठ, नार- ळाचें दूध एकत्र करून शिजवून करतात तें पक्वान्न. ३ (क. सार- स्वत) कानोले. ॰वेल-स्त्री. एक मोठी वेल. ॰साखर-स्त्री. १ एक प्रकारची गुळी साखर. खांड अर्थ ४ पहा. २ खडीसाखर.
ध्रुव
पु. १ पृथ्वीच्या उत्तरेस असणारा एक अढळ तारा. 'नोहेचि समुद्रा प्रवाहो । नुटीचि ध्रुवा जावों ।' -ज्ञा १८.४२१. २ पृथ्वीच्या किंवा खगोलाच्या आसांच्या दोन टोकांपैकीं प्रत्येक. 'उत्तर-दक्षिण ध्रुव' ३ (ज्यो.) सत्तावीस योगांपैकीं बारावा योग. ४ सूर्य वंशातील उत्तानपाद राजाचा पुत्र. 'धृव धृव खरा स्तवा उचित होय विश्वास तो ।' -केका ६५. ५ गाणें, पद इ॰ काचें पालुपद; ध्रुपद; अकडकडवें. ६ (ताल.) एक मात्रा प्रमाण. ध्रुवताल पहा. -वि. १ शाश्वत; निरंतन. 'ध्रुव सुख नसेचि कैंसा जय कैचें राज्य कीर्ति जोडावी ।' -मोशल्य १.५२ 'श्रीगुरु म्हणे त्या अवसरी । सुवासिनी होय ध्रुव ।' -गुच ३२.१३७. २ स्थिर; अढळ; अचल. 'हृदय शुद्धीचिया आवारीं । आराध्यु तो निश्चल ध्रुव करी ।' -ज्ञा १३.३८५ [सं.] सामशब्द- ॰ताल-पु. (संगीत) कर्नाटक संगीत पद्धतींतील एक ताल. याचें मात्रा प्रकार पांच आहेत ते येणें प्रमाणें. ११, १४, १७, २३, २९. [ध्रुव + ताल] ॰पद-न. १ ध्रुवाला दिलेलें अचल स्थान; ध्रुव तार्याचें स्थान. रुसला ध्रुव कवतिकें । बुझाविला देऊनि भातुकें । ध्रुवपदाचें ।' -ज्ञा १०,१८. २ (ल) शाश्वत टिकणारें, वैभवाचें उच्च स्थान, पद. ३ (संगीत) पद, गाणें इ॰ कांचें पालुपदाचें कडवें; (विरू.) ध्रुपद. ४ (संगीत) चीजेचा एक प्रकार. ह्यांत देवतांची स्तुति, ऋतुवर्णनें, सृष्टिसौदर्य, वीर-शृंगारादि रस इ॰ विषय असतात. ही चीज बहुधा गंभीर प्रकृतीच्या रागांत व पौढ भाषेंत रचिलेली असतें व चौताल, सूलताल, तीव्रा, ब्रह्मताल इ॰कांत गाइली जाते. [ध्रुव + सं. पद = स्थान देणें. ॰पदीं बसविणें-उक्रि. १ (एखाद्यास) शाश्वत, स्थिर असें स्थान देणें. २ उच्चस्थानीं बसविणें; वैभवाला पोंचविणें. ॰मत्स्य-पु. (ज्यो.) लघुऋक्ष किंवा लघुऋक्षांतील दोन मुख्य तार्यांपैकीं एक. दुसरा मुख्य तारा ध्रुव होय. 'सप्तर्षि, नरतुरं- गम ध्रुवमत्स्य, ययाति वगैरें राशींची ओळख मुलांना करुनि देतां येईल.' -अध्यापन २००. [ध्रुव + सं. मत्स्य = मासा] ॰लोक- पु. स्वर्गलोकाप्रमाणें असलेला ध्रुव तार्याचा लोक. [ध्रुव + लोक = जग] ॰वृत्त-न. ध्रुवापासून २३ ।। अंशावर असलेलें विषुववृत्ताशीं समांतर असें कल्पितवृत्त. विषुववृत्तापासून उत्तरेस व दक्षिणेस अस- लेलें ६६ ।। अंशांवरील अक्षांशवृत्त. [ध्रुव + सं. वृत्त = वलय, वर्तुळ] ध्रुवाकर्ष प्रेरणा-स्त्री. (ज्यो. पदार्थ) मध्यबिंदूकडे ओढणारी प्रेरणा, शक्ति. (इं.) सेंट्रिपीटल फोर्स. [ध्रुव + आकर्ष = ओढणें + सं. प्रेरणा] ध्रुवात्मक-वि. (पदार्थ) ज्यामध्यें चुंबकासारस्त्रें आक- र्षण उत्पन्न केलें आहें असा; ध्रुवसंपन्न झालेला, केलेला (धातु- मय पदार्थ, शलाका इ॰). [ध्रुव + आत्मा] ॰ध्रुवांश-पु. (ज्यो.) खस्य गोलाचें (त्याला जवळ असलेल्या) ध्रुवापासूनचें अंशांत्मक अंतर. [ध्रुव + अंश] ध्रुवीभवन-न. १ (एखाद्या पदार्थाची, धातूची, दुसर्या पदार्थाववर रासायनिक क्रिया होऊन तो पदार्थ) ध्रुवसंपन्न चुंबकासारखा आकर्षणयुक्त बनणें. २ प्रकाशलहरींच्या कंपनामध्यें फरक होणें. (इं.) पोलरायझेशन. 'ध्रुवीभूत किरण वेगवेगळ्या बाजूमध्यें निरनिराळे गुणधर्म दाखवितो. -ज्ञाको ध ८६. [सं.] ध्रुवोत्सारप्रेरणा-स्त्री. मध्यापासून दूर लोटणारी प्रेरणा. (इं.) सेंट्रिफ्यूगल फोर्स. [ध्रुव + उत् + सार् = दूर, वर लोटणें + प्रेरणा = शक्ति, जोर] ध्रुवोन्नति-स्त्री. (ज्यो.) ध्रुवाची (एखाद्या) पातळीपासून अंशात्मक उंची; ध्रुवाचा उन्न- तांश. [ध्रुव + सं. उन्नति = उंची] ध्रुवोन्मुखता-स्त्री. (चुंबकाचीं दोन टोकें अनुक्रमें) उत्तर व दक्षिण या दिशांकडे आकर्षिलीं जाण्याचा चुंबकाचा गुण. -मराठी ६ वें (१८७५) पुस्तक, पृ. ७८. [धृव + सं. उन्मुखता = तोंड समोर, असणें]
भू
स्त्री. पृथ्वी; जलस्थलमय गोल. 'हांसोनि म्हणे नारद भूवरि तों हेचि दिव्यरुचि राजा ।' -मोसभा १.२२. [सं.] सामाशब्द- ॰कंपपु. धरणीकंप. [सं.] ॰कमळ-न. महाबळेश्वर येथें होणारें एक जातीचें फूल. ॰खंड-न. भूलोकाचा भाग, तुकडा. [सं.] ॰खळें-न. पृथ्वीरूप अंगण, खळें. 'राशी झाल्या भूखळीं ।' -मुआदि ४९.११४. ॰गर्भ-न. १ भुयार. 'कित्येक काळाचे उपवासी । इच्छित होते पंगतीसी । ते पावले मनोरथासी । भूगर्भीचें आले ।' -वेसीस्व १२.५८. २ पृथ्वीचा आंतील भाग, पोट. ॰गर्भवास-पु. गुहा इ॰ स्थलीं राहणें. [सं.] ॰गर्भशास्त्र-न. पृथ्वीच्या पोटांत असणार्या पदार्थांसंबंधीं शास्त्र; भूस्तरशास्त्र. (इं.) जिऑलजी. [सं.] ॰गर्भक्षितिज-न. मूळ, वास्तविक क्षितिज; खगोलक्षितिज. [सं.] ॰गोल-ळ-पु. १ जलस्थलमय गोल. २ पृथ्वीरूप गोल; पृथ्वी. ३ पृथ्वीवरील देशांची माहिती; भूवर्णन. [सं.] ॰गोलशास्त्र-न. पृथ्वीसंबंधीं माहिती देणारें शास्त्र. यांत भूस्तरशास्त्र, वातावरण शास्त्र, निरनिराळ्या देशांची भूस्तरदृष्ट्या सांस्कृतिक व राजकीय विविध माहिती व व्यापारी माल, साधनें, इ॰ माहितीचा समावेश होतो. [सं.] ॰चंपक-पु. भुईचाफ्याचें झाड व त्याचें फूल. [सं.] ॰चर-वि. जमिनीवर फिरणारा, राहणारा; स्थलचर. (जलचर, जलस्थलचर, खेचर, यांच्या उलट). [सं.] ॰चरी-स्त्री. योगाच्या चार मुद्रांपैकीं एक. [सं.] ॰चरी- नयन-पुअव. अधोदृष्टि. 'मूर्ति करावी अति दीन । खेचरी भूचरी जिचे नयन ।' -एभा ११.१२८४. ॰चरी मुद्रा-स्त्री. नासिकाग्रा- वरून भूमीकडे नजर लावणें अशी एक योगांतील मुद्रा. 'कीं भूचरीमुद्रा योगेश्वर ।' -ह ६.८९. [सं.] ॰चुंबकत्व-न. पृथ्वीचा आकर्षण करण्याचा धर्म. (इं.) टेरिस्ट्रिअल् मॅग्नेटिझम्. [सं.] ॰ज्या-स्त्री. भूमध्यापासून भूपृष्टाचें जें अंतर तें. [सं.] ॰तल- ळ-न. १ पृथ्वीचा पृष्ठभाग. २ (सामा.) भूलोक; पृथ्वी. [सं.] ॰तलविद्या-स्त्री. भूपृष्ठासंबंधीं शास्त्र; (इं.) फिजिकल् जॉग्रफी. [सं.] ॰तैल-न. पृथ्वीतून पाझरणारें तेल; शिलातैल. (इं.) पेट्रोलियम्. ॰दिन-नपु. सावनदिन पहा. [सं.] ॰देव-पु. पृथ्वी- वरील देव; ब्राह्मण. 'मिळविली कीर्ति आजवरी । ती बुडेल कीं भूदेवा ।' -विक १६. [सं.] ॰देवी-स्त्री. गांव, शेत, जागा यांची रक्षक देवता. [सं.] ॰धर-पु. १ पर्वत; डोंगर. २ भूगोल मस्तकीं धारण करणारा शेष नामक सर्प. ३ राजा. [सं.] ॰प-पु. १ राजा. २ भूपकल्याण राग. 'दीप भूपकल्याण तूं गातां प्रकाश सार्या स्थळीं पडती ।' -प्रला २३७. ॰पकल्याण-पु. एक राग. ॰पति-पाल(ळ)-पु. राजा. [सं.] म्ह॰ भूपतिर्वा यतिर्वा = मी राजा तरी होईन नाहीं तर यति तरी होईन. ॰परिघ- पु. भूपृष्ठावरून जाणारें मोठें वर्तुळ. [सं.] ॰परिमाण-न. भूमान पहा. [सं.] ॰पृष्ठ-न. १ पृथ्वीचा पृष्ठभाग. २ सपाट जमीन; समथळ. (इं.) ग्राउंडलेव्हल. [सं.] ॰पृष्ठवर्णन-न. (भूशास्त्र) पृथ्वीवर असणार्या दोन मुख्य गोष्टी पाणी व जमीन, त्यांवरील सर्व बाजूनें असणारें वातावरण, याविषयीं शास्त्रीय माहिती व वर्णन; तसेंच त्यांमध्यें दृग्गोचर होणारे निरनिराळे चमत्कार याविषयीं विवेचन ज्यांत केलें असतें तें वर्णन, शास्त्र. [सं.] ॰पृष्ठक्षितिज-न. दृश्य असें क्षितिज. [सं.] ॰भा-स्त्री. (ज्यो.) १ पृथ्वीची छाया. २ शंकुच्छाया. [सं.] ॰भाग-पु. भूगोलाचा एक भाग. [सं.] ॰भा बिंब-न. पृथ्वीच्या छायेचें बिंब. [सं.] ॰भार- पु. भूमीस झालेला (पातकी जनांचा) भार. 'भूभार हराया सार, घेउनि अवतार, अत्रिच्या पोटीं ।' -दत्ताची आरती. [सं.] ॰भुज- पु. राजा. [सं. भू + भुज्] ॰भुजेंद्र-पु. सार्वभौम राजा; राजाधिराज. [सं. भूभुज + इंद्र] ॰भृदरि-पु. इंद्र. [सं. भूभृत् + अरि] ॰भ्रम- पु. पृथ्वीचें भ्रमण, गति (ग्रहांप्रमाणें). [सं.] ॰मकपु. (ना) ग्रामाधिकारी; हा गावांच्या सीमेच्या देवतेची पूजा करतो व सर- कारी कामगार गावीं आले असतां त्यांची व्यवस्था ठेवतो. ॰मंडल-ळ-न. जलस्थलमय पृथ्वीरूप गोल. [सं.] ॰मान- परिमाण-न. पृथ्वीचें मान, माप. [सं.] ॰मिति-स्त्री. (गणित) जमिनीची मापणी; रेखागणित; भूमितींत शास्त्रीय पद्धतीनें चौरस, काटकोन, त्रिकोण वगैरे आकृति काढण्याचे नियम व सिद्धांत यांचें विवेचन केलेलें असतें. [सं.] ॰मितिप्रमाण-मितिश्रेधी- मितिप्रमाणश्रेधी-मितिश्रेढी-स्त्री. (गणित) जींत कांहीं एका विवक्षित पटीनें संख्या वाढतात किंवा कमी होतात ती पंक्ति; रेखागणितश्रेढी. गुणोत्तरानें सारख्या संख्या वाढणें तें. जसें- २, ४, ८, १६ इ॰ [सं.] ॰रमलविद्या-स्त्री. जमिनीवर रेघा किंवा आकृति काढून शकुन पाहण्याची विद्या. ॰रुह-पु. (काव्य) वृक्ष; वनस्पति. 'ठाण न चळे रणींहून । कुठारघायें भूरुह जैसा ।' [सं.] ॰लोक-पु. इहलोक; पृथ्वी. सप्तलोक पहा. [सं.] ॰वैकुंठ-पु. पृथ्वीवरील वैकुंठ; विठ्ठलाचें (कृष्णाचें, विष्णूचें) नित्य वसतिस्थान असलेलें पंढरपूर इ॰ क्षेत्र. 'सकळ तीर्थांचें माहेर । भूवैकुंठ निर्वि- कार ।' -तुगा २५९१. [सं.] ॰व्यास-पु. भूमध्यांतून जाऊन भूपृष्ठास दोहों बाजूस मिळणारी रेषा. ॰शलाका-शिर-स्त्रीन. जमिनीच समुद्रांत गेलेलें टोंक; जमिनीचा चिंचोळा भाग. [सं.] ॰सुर-पु. भूदेव; ब्राह्मण. 'मानुनि वेषें स्नातक भूसुर पूजावया उठे भावें ।' -मोसभा १.९२. [सं.] ॰स्तरशास्त्र-न. यांत पृथ्वी- वरील जमीन, पाणी, खडक यांमध्यें होणार्या घडामोडी व संशोधन, पृथ्वीच्या उदरांत असलेल्या स्थितीबद्दल व द्रव्याबद्दल माहिती, वनस्पति, प्राणी यांचा इतिहास इ॰ गोष्टींचें विवेचन केलेलें असतें, भूगर्भशास्त्र. (इं.) जिऑलजी.
राम
पु. १ परशुराम, रामचंद्र, बलराम यांस सामान्य संज्ञा. २ (ल) सामर्थ; तथ्य; जीव. 'त्या उपरण्यांत आतां कांहीं राम उरला नाहीं.' ३ (सांकेतिक) सीता किवा सीताबाई हें जसें अधेलीस त्याप्रमाणें राम हें रुपयास नांव आहे. ४ वाईट बातमी ऐकली असतां किंवा दुसर्यानें बोललेल्या दोषादिकांचा निषेध कर्तव्य असतां हा शब्द उच्चारतात. [सं. रम् = रमणें] (वाप्र.) ॰नसणें-(मारुतीला सीतेंनें प्रसन्न होऊन दिलेल्या तिच्या गळ्यांतील रत्नहाराचें एक एक रत्न त्यानें फोडून पाहिलें पण त्यांत रामाची मूर्तीं त्यास दिसेना म्हणून तें व्यर्थ समजून तो सर्व हार त्यानें फोडून टाकला ह्या कथेवरून) सत्व, अर्थ नसणें. ॰म्हणणें-होणें-(मरतांना माणसाच्या तोंडांत रामाचें नांव यावें अशी हिंदूची समजूत आहे ह्यावरून) मरणें; मरण्यास सिद्ध होणें; मरणोन्मुख होणें. रामाचें नांव, रामचर्चा-एखाद्या गोष्टीचा पूर्ण अभाव होता असें जोरानें सांगावयाचें असतां योज- तात. 'अजून तरी त्याला पश्चात्ताप झाला होता म्हणाल, तर रामाचें नांव.' सामाशब्द- ॰कली-ल्ली(भैरव)-स्त्री. (राग) ह्या रागांत षडूज, कोमल ऋषभ, तीव्र गांधार, कोमल मध्यम, पंचम, कोमल धैवत, तीव्र निषाद हे स्वर लागतात. जाति संपूर्ण- संपूर्ण वादी पंचम. संवादी ऋषभ. गानसमय प्रात:काल. वरील स्वरांशिवाय तीव्र मध्यम व कोमल निषाद ह्या स्वरांचा विशिष्ट प्रयोग रागवाचक असाच दिसतो. 'प्रभात समयीं रामकली ।' -दावि १८६. [रामकेलि] ॰कां(का)टी-ठीं-स्त्री. बाभळीची एक जात. हिला पुळाटी किवा रामबाभळ असेंहि म्हणतात. ही सामान्य बाभळीपेक्षां अधिक उंच, सरळ व गेंददार असते. ॰कांठी-वि. पांढरे रेशमी कांठ असलेलें (वस्त्र). ॰कुंड-न. १ नाशकास गोदावरीवर असलेलें एक कुंड, तीर्थ (स्नान करणें, मृताच्या अस्थी टाकणें इ॰ करितां). २ (यावरून) कोणत्याहि नदीकाठी असलेलें असें कुंड, तीर्थ. ॰कोदंड-न. रामाचें धनुष्य. 'जसें चातकाला घनाचें चि पाणी । स्वभक्तां तसे राम कोदंड- पाणी ।' [सं.] ॰कृष्णपंथ-पु. आराध्य देवाचीं नावें (राम, कृष्ण, गोविंद, हरि इ॰) उच्चारण्याचा पंथ, संप्रदाय. 'ज्ञानदेवा जिणें नामावीण व्यर्थ । रामकृष्ण पंथ क्रमियेला ।' गोळा-पु. (रामनव- मीच्या फराळाकरितां केलेला) ताकांत भिजविलेल्या लाहीपिठाचा गोळा. ॰चंद्र-पु. दशावतारांतील सातवा अवतार; दाशरथी राम ॰चर्चा-क्रिवि. पूर्णपणें एखाद्या गोष्टीची नाकबुली किंवा अभाव जोरानें दाखवावयाचा असतां भाषण-संप्रदायांत योजावयाचा शब्द. 'तो तुम्हाला किती सांगो, पण मी त्याला रामचर्चा एक अक्षरहि बोललों नाहीं.' [सं. राम + चर्चा = उच्चारणें, नाव घणें] ॰जन्म-नपु १ रामाचा जन्मदिवस. २ रामनवमीचा उत्सव. [सं.] ॰जनी-स्त्री. गाणारी कसबीण, वेश्या. 'गावांत गाणार्या राम- जन्या पांचपंचवीस होत्या.' -विक्षिप्त १.५९. [राम + जानी] ॰जयंती-स्त्री. १ रामजन्माचा वार्षिक उत्सव. २ चैत्र शु॰ ९. [सं.] ॰टेकी-वि. रामटेक नामक गांवासंबंधीं (विड्याचीं पानें इ॰). ॰टोला-पु. १ विटीदांडूच्या खेळांत विटीवर दांडूनें मारलेला पहिला टोला. (क्रि॰ मारणें.) २ (ल.) जोराचा प्रहारा (काठीचा, मुठीचा). ३ मोठी व जाड भाकरी. ४ (सामा.) मोठी, प्रचंड वस्तु. [राम = प्रकर्ष, जोर] ॰त(ती)ळ-न. (गुज. कों.) कारळे. ॰तुरई-स्त्री. एक भाजी. ॰तुळस-स्त्री. तुळशीची एक जात. ॰थडी-स्त्री. पितळेचे मोहरे मणी. -गुजा १७. ॰दास-पु. १ एक प्राचीन महाराष्ट्रीय राजकारणी साधु ह्यानीं ठिकठिकाणीं मठ स्थापून धर्मजागृति केली. ह्यांचे दासबोध, मनाचे श्लोक, राम- गीता, दासगीता इ॰ ग्रंथ प्रसिद्ध आहेत. २ (सांकेतिक) एक- आणा. ॰दासी-शी-पु. श्रीसमर्थ रामदास यानीं स्थापिलेल्या संप्रदायांतील मनुष्य. दासी मल्लार-पु. (संगीत) एक राग. यांत षड्ज, तीव्र ऋषभ, कोमल गांधार, कोमल मध्यम, पंचम, तीव्र धैवत, कोमल निषाद हे स्वर लागतात. जाति संपूर्ण-संपूर्ण. वादी मध्यम, संवादी षड्ज गानसमय रात्रीचा दुसरा प्रहर. ॰दूत-पु. मारुती; वानर. [सं.] ॰नगरी-वि. १ रामनगर संबंधीं. २ तांबडे पंख असलेला व आकारानें जाड असलेला (राघू). ॰नवमी-स्त्री. चैत्र शुद्ध नवमी; रामाचा जन्म दिवस. ॰नामी-वि. रामाचें नांव असलेली (आंगठी). ॰पंचायतन- न. राम, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्न आणि मारुती यांचा समु- दाय. ॰पत्री-स्त्री. खोटी, नकली जायपत्री. मायपत्री व ही एकच. ॰पाहरा-पाहरा पारा-पु. सूर्योदयापासून पहिले तीन तास; पहिला प्रहर; पवित्र, देवाधर्माचा काल. 'रामपहार्यांत खोटें बोलूं नको, खरें सांग.' ॰पात्र-न. पाणी पिण्याचें पितळी भांडें; फुलपात्र. [सं.] ॰पुरी लडी-स्त्री. रेशमाची एक जात. -मुंव्या ९७. ॰प्रतिज्ञा-स्त्री. सत्य व खात्रीचें वचन. [सं.] ॰फळी-फळ-स्त्री एक फळझाड व त्याचें फळ. हें झाड बरेंच उंच असतें. पानें अशोकाच्या पानांसारखीं लांबट असतात फळ मोठें असून रंग तांबूस असतो. चवीस सीताफळापेक्षां किंचित् गोड. हें वातहारक आहे. [सं. गुज. रामफल] ॰बाण-पु. १ रामानें सोडलेला बाण. हा कधींहि व्यर्थ जात नसे. (यावरून ल.) २ खात्रींचें, ठाम, अचूक वचन, करार, भविष्य इ॰ 'त्याची प्रश्न म्हणजे रामबाण, कधीं खोटा व्हावयाचा नाहीं.' -वि. कधीं न चुकणारें, अचुक गुणकारी (औषध इ॰) [सं.] ॰बाण औषध-न. हटकून गुण करणारें औषध ॰बाभळ- स्त्री. बाभळीचा एक भेद. रामकांटी पहा. राम बोलो भाई राम-पु. (गुज.) प्रेतास नेतांना मोठ्यानें म्हणावयाचे शब्द. ॰मं(मां)-दार-पु. एक वृक्ष; मांदाराचा, रुईचा एक भेद. 'डाळिंब सावरी राममांदार ।' [सं.] ॰रग(गा)डा-पु. पराकाष्ठेची दाटी, गर्दी (लोकांची, काळजींची, कामांची, उद्यो- गांची). [राम = पुष्कळ + रगडा] ॰रट्टा-पु. १ मोठा प्रहर; रपाटा (काठीचा, मुठीचा). (क्रि॰ दाखविणें; देणें). ३ कचका; भार (अवाढव्य उद्योगाचा, कामाचा). ४ घोटाळ; गोंधळ. ५ दाटी; चेप; गर्दीं. [राम = अतिशय + रट्टा] ॰रस- पु. मीठ. [प्रा.] ॰रक्षा-स्त्री. १ रामाचें एक सुप्रसिद्ध स्तोत्र. २ हें स्तोत्र म्हणून अभिमंत्रिलेली विभूति, राख. ३ (निंदार्थीं) लाहीपीठ, बाळंतलिंबाचीं पानें, मिरच्या इ॰ कांची रास. [सं.] ॰राज्य-न. १ ज्यांत लोकांचें सर्व शत्रूंपासून रक्षण केलें जातें व त्यांजवर न्यायानें व चांगल्या रीतीसें राज्य केलें जातें असें राज्य; श्रीरामचंद्रानें केलें तसें उत्कृष्ट, सुखाचें व शांततेचें राज्य. २ रागें भरण्यास कोणी नसल्यामुळें (मुलनीं) केलेंलें स्वैर वर्तन. 'घरांत तीन दिवस कोणी वडील मनुष्य नव्हतें. तेव्हां मुलांनीं रामराज्य चालविलें होतें.' [सं.] (वाप्र.) ॰राज्य करणें-१ सुरक्षितपणें व सुखानें राहणें. २ निर्भयपणें वागणें. ॰राम-पु. ब्राह्मणाशिवाय इतर लोक दुसर्याच्या सत्कारार्थ एका हातानें वंदन करतांना जो शब्द उच्चारतात तो; अशा प्रका- रच्या नमस्कारासंबंधीं शब्द. हा पत्रलेखनांतहि योजितात. [राम] ॰राम ठोकणें-एखाद्याचा निरोप घेणें; त्यास सोडून जाणें. 'परीक्षा झाल्यानंतर शाळेला रामराम ठोकला.' ॰रामी- स्त्री. १ परस्परानीं परस्परास रामराम करणें. २ रामराम करतां येण्यापुरती ओळख. ३ सामान्यत: रमारमी. [रामराम] ॰रोट-पु. (ना.) जाड पोळी, रोटी. -वि. धटिंगण; आडदांड. ॰लीला-स्त्री. आश्विन महिन्यांत उत्तरहिंदुस्थानांत काहीं ठिकाणीं रामाच्या चरित्राचे केलेले नाटकप्रयोग. [सं.] ॰वचन- न. सत्य भाषण, वचन. [सं.] ॰वरदा(यि)येनी-स्त्री. तुळजा पूचरी भवानी. 'रामवरदायेनी ते कुळस्वामिणी ।' -रामदासीं २.१. [रामवरदायिनी] रामाचें राज्य-न. रामराज्य पहा. रामानुज-पु. वैष्णवांमधील एक पंथ, भेद. [सं.] रामानु- जाचार्य-पु. वैष्णव धर्मपंथांतील एक पंथप्रवर्तक. ह्यानें वेदांत- सार, वेदार्थसंग्रह, वेदांतदीप, ब्रह्मसूत्रें व भगवद्गीतेवरील भाष्य हे ग्रंथ रचिले. रागानुजाचार्याच्या पंथांतील लोक दक्षिण हिंदुस्थानांत पुष्कळ आहेत. -ज्ञाको (र) १८. [सं.] रामायण-न. १ राम- चरित्रवर्णनपर वाल्मीकीनें लिहिलेलें महाकाव्य; रामकथा; राम- कथावर्णनपर काव्य. २ (ल.) लांबलचक, कंटाळवाणी गोष्ट; चव्हाट. 'आमचें एकदा रामायण संपू द्या. मग तुम्ही दुसरी गोष्ट काढा.' ४ अस्ताव्यस्त पसारा; घालमेल; गोंधळ. 'ह्या पोरानें धान्याचें आणि कागदापत्राचें रामायण केलें.' [सं.] म्ह॰ ताकापुरतें रामायण = आपलें कार्य साधण्यापुरतें आर्जव करणें. रामेश्वर-पु. शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकीं दक्षिणेंतील एक स्थान. [सं.] रामा-स्त्री. १ सुंदर, रमणीय स्त्री. २ (सामा.) स्त्री. 'पीडित दशाननाला त्या श्वेतद्वीपवासिनी रामा ।' -मो रामायणें १.१५३. [सं.]
सर्व
वि. १. सगळा; सगळे भाग मिळून; सारी रास, संख्या, प्रमाण. २ प्रत्येकजण मिळून; सगळा गट; जमाव; समूह. ३ सगळा काल, अवधि, विस्तार वगैरे. ४ पूर्ण; संपूर्ण; अवघा; पुरता; परिपूर्ण; सबंध; न वगळतां पूर्णांश. [सं. सर्; प्रा. सब्ब; सिं. सभु; पं. सभ; हि. सब. सं. षर्द् = जाणे] ॰कर्ता-वि. सगळें करणारा; उत्पत्तिकर्ता; सगळें बनविणारा; अवघ्याची रचना करणारा. ॰काल-क्रिवि. १ सगळा वेळभर; सर्व अवधि संपेपर्यंत; सर्व वेळीं; विवक्षित सगळा कालभर. २ सतत; नेहमीं; सर्वदा; सदोदित. ॰कालीन-वि. शाश्वत; सर्वकाल टिकणारें. ॰खपी-वि. १ ज्याच्या ठिकाणीं कोणत्याहि वस्तूचा उपयोगी अथवा निरुपयोगी, अवश्य अथवा अनवश्यक अशा सर्व वस्तूंचा खप होतो असा. २ ज्याला कोणतीहि, कसलीहि वस्तु चालते असा. ३ सर्वांकरितां खपणारा, काम करणारा; कोणा- साठींहि परिश्रम करण्यास तयार असा. ॰गत-वि. सर्वव्यापक; सर्वव्यापी; सर्व ठिकाणीं ज्याचें अस्तित्व, वास्तव्य आहे असा. 'चैतन्य आहे सर्वगत । तें तत्त्वज्ञ संत । स्वीकारिती ।' -ज्ञा २. १२६. ॰गामी-वि. सर्वव्यापक; सर्वत्र ज्याचें गमन आहे असा; सगळीकडे जाणारा. ॰गुणसंपन्न-वि. सगळ्या गुणांनीं युक्त; सर्व तऱ्हेनें पूर्ण; सर्व चांगल्या गुणांचें अधिष्ठान. ॰जनीन-वि. सार्वजनिक; सर्व लोकांसंबंधी. ॰जाण-वि. सर्वज्ञ; सगळें ज्ञान असणारा; सर्व जाणणारा. 'काय पूजातें मी नेणें । जाणावें जी सर्व जाणें ।' -तुगा ११५८. ॰जित् वि. १ सर्व जिंकणारा; सर्वांचें दमन करणारा; सर्वांस ताब्यांत ठेवाणारा. २ सर्वांहून श्रेष्ठ; वरिष्ठ. ॰त:-क्रिवि. १ सर्व दिशांनीं; सगळीकडे; सर्व बाजूंनीं; दशदिशां. २ सर्वत्र; पूर्णपणें; विश्वभर. ॰तंत्रस्वतंत्र-वि. अनिर्बंध; स्वैर. 'अशा अघांत्री व सर्व- तंत्रस्वतंत्र लोकांनीं हिंदु महासभेच्या निर्णयाकडे पाहून नाकें मुरडावीं यांत आश्चर्य नाहीं.' -सांस २.१६४. ॰तीर्थ-पु. समुद्र; सागर. 'गंगा न सांडितां जैसा । सर्वतार्थ सहवासा । वरपडा जाला ।' -ज्ञा १८.९०९. ॰तोभद्र-पुन. १ देवता स्थापनेसाठीं एक विशिष्ट मंडल काढतात तें. २ चारी दिशांस द्वारें असलेला प्रासाद, राजवाडा, मंदिर. 'रेखिलीं परिकरें । सपुरें सर्वतो- भद्रें ।'-ऋ ७३. ३ सैन्यरचनेचा एक प्रकार; एक विशिष्ट व्यूह. ४ अनेक प्रश्नांस एकच उत्तर योग्य असतें असें कोंडें, कूट. ५ एक प्रकारचें चित्रकाव्य; कोणत्याहि दिशेनें वाचलें तरी एकच प्रकारचा श्लोक व अर्थ येईल अशी रचना. ॰तोमुखपु. एक सोम- याग, यज्ञ. -वि. सर्व बाजूंनीं तोंड असलेला; कोणत्याहि वाजूनें पाहिलें तरी समोर तोंड येईल असा (देवता, पाणी, आकाश, गोल). ॰त्र-क्रिवि. सर्व ठिकाणीं, स्थळीं, जागीं; सगळीकडे; सर्व दिशांस. 'ईश्वर सर्वत्र आहे.' -वि प्रत्येक; सगळे; सर्व. 'सर्वत्रांस दक्षिणा दिली.' ॰था-क्रिवि. सर्व बाजूंनीं; सर्व मार्गांनीं, दिशांनीं; सर्व उपायांनीं; पूर्णपणें; मुळींच; नि:शेष; निश्चित; खचित; केव्हांहि. 'मज आपणपें सर्वथा नाहीं । मन बुद्धिठायीं । स्थिर नोहे ।' -ज्ञा १.१९५. 'मना सर्वथा पापबुद्धि नको रे ।' -राम ॰थैव-क्रिवि. केव्हांहि; सर्व प्रकारें, दिशांनीं, बाजूंनीं. ॰दर्शी-द्रष्टा-वि. सर्वसाक्षी; सर्व पाहणारा; ज्यास सगळें दिसतें असा. ॰दा-क्रिवि. नेहमीं; सतत; सर्वकाळीं. ॰दु:खक्षय-पु. सर्व दु:खांपासून मुत्त्कता; मोक्ष. ॰धन-न. (गणित) श्रेढींतील सर्व पदांची बेरीज. -छअं १७३. ॰नाम-न. (व्या.) स्वत: विशिष्टार्थद्योतक नसतां पूर्वापरसंबंधानें कोणत्याहि नामाबद्दल योजतां येतो असा शव्द. ॰नियंता-वि. सर्वांवर ताबा चालविणारा; सर्वांचें नियमन करणारा. ॰न्यास-पु. सर्वसंगपरित्याग; सर्वधन, कुटुंब, आप्तेष्ट, संसार वगैरे सर्व गोष्टी सोडून देणें; सर्व ऐहिक गोष्टी टाकून देणें, त्यांपासून अलिप्तता, मुक्तता. ॰पाक-पु. खीर; क्षीर. ॰पित्री अमावास्या-स्त्री. भाद्रपद महिन्यांतील अमावास्या (या दिवशीं सर्व पितरांचें श्राद्ध करितात यावरून). ॰प्रायश्चित-न. सर्व पातकांबद्दल एकाच वेळीं घ्यावयाचें प्रायश्चित्त; सर्व पापांचें परिमार्जन, क्षालन; सर्व दोषां- पासून मुत्त्कता. 'सर्वप्रायश्चित्त घेण्याचा त्यांनीं जो निश्चय केला ...' -आगर ३.१३५. ॰प्रिय-वि. सर्वांचा आवडता; लोकप्रिय; विश्वमित्र. ॰ब्रह्मी-वि. सर्व विश्व ब्रह्मरूप आहे जसें केवळ तोंडानें बोलून एकंकार करणारा आचारभ्रष्ट. 'लेकुरें सर्व ब्रह्मी झालीं.' -सप्र १९.४०. ॰भक्ष-भक्षक-भोत्त्का- वि. वाटेल तें खाणारा; खाण्याच्या कामीं कोणताहि निर्बंध न पाळणारा; स्वच्छ अस्वच्छ, भक्ष्य, अभक्ष्य न पहातां अघोरी- पणें खाणारा. अग्नि, शेळी, कावळा वगैरेसहि हा शव्द लावतात. ॰भांवें-क्रिवि. काया-वाचा-मनें करून; सर्व भावयुक्त. 'तैसा स्त्रीदेहीं जो जीवें । पडोनिया सर्वभावें ।' -ज्ञा १३.७९०. 'जगीं वंद्य तें सर्वभावें करावें' -राम ॰भूतभूतांतर-वि. सर्व वस्तूंच्या ठिकाणीं वास करणारा; सर्वव्यापी; विश्वव्यापीं; विश्वव्यापक (ईश्वर). ॰मय-वि. सर्वव्यापी; सर्वगत (ईश्वर). ॰मान्य-वि. सर्वांस संमत, पसंत, कबूल. ॰मान्य-मान्य इनाम-न. सर्व कर माफ असलेलें इनाम; सर्वांना कबूल असें इनाम; गांवसंवंधीं इनाम; याबद्दल सनद नसते. ॰राष्ट्रीय कायदा-पु. राष्ट्रांराष्ट्रांतील व्यवहार नियंत्रण करणारा नियम. ॰रूप-रूपी-वि. सर्वव्यापी; सर्वांचें स्वरूप आहे असा; विश्वरूपी (ईश्वर) 'अनादि अविकृतु । सर्वरूप ।' -ज्ञा २.१५०. ॰लिंगी- पु. कोणताहि विशिष्ट पंथ न अनुसरणारा बैरागी. ॰वल्लभा-स्त्री. वेश्या; वारांगना. ॰विध-क्रिवि. सर्वप्रकारें. ॰वेत्ता-वेदी-वि. सर्वज्ञ; सर्वसाक्षी; त्रिकालज्ञ. ॰वेषी-वि. बहुरूपी; अनेक प्रका- रचे वेष धारण करणारा. ॰व्यापक-व्यापी-वि. सर्वत्र असणारा; विश्वव्यापी; सर्वत्र भासणारा. ॰व्रणपु. गळूं; करट. ॰श:-क्रिवि. सर्व दिशांनीं, बाजूंनीं, मार्गांनीं, रीतीनीं; पूर्णपणें; निखालस; दरोबस्त; नि:शेष. ॰शाक-ख-स्त्री. १ अनेक प्रकारच्या भाज्या एकत्र करून केलेली भाजी. २ आलें. ॰शास्ता-वि. सर्वांवर सत्ता, अधिकार गाजविणारा. ॰शोधी-वि. सर्वोचें निरी क्षण करणारा; सर्व वस्तूंची परीक्षा घेणारा; जिज्ञासु; चिकित्सक; परीक्षक; शोधक. ॰संगपरित्याग-पु. सर्वसंन्यास; सर्व ऐहिक वस्तूंचा त्याग; पूर्ण वैराग्य, विरक्ति. ॰संग्रह-पु. सर्व वस्तूंचा साठा, संचय; संकीर्ण, मिश्र संचय. ॰सपाट-क्रिवि. अभेद; सर्वत्र सम स्थिति; मोकळें. 'आत्मा नसतां सर्व सपाट चहूंकडे ।' -दा १६.८.१०. ॰संमत-वि. सर्व मान्य; सर्वांस पसंत, कबूल असलेलें. ॰समर्थ-वि. सर्वशक्तिमान; सर्वसत्ताधारी; सर्वा- धिकारी. ॰सह-वि. सर्व सहन करणारा; सर्व गोष्टींचा भार वाहणारा. ॰सहवर्तमान-वि. सर्वांसह; सर्वांस बरोबर घेतलेला; सर्वांनी युक्त. ॰साधन-न. सर्व गोष्टींची सिद्धता; सर्व गोष्टी घडवून आणणें; सर्व कार्यें साधणें, करणें, बनाव बनविणें. ॰साधन- साधनी-वि. सर्व गोष्टी साधणारा, सिद्ध करणारा, घडवून आणणारा. ॰साधारण-सामान्य-वि. सर्वांस लागू होणारा; सर्वांस सम असा; सर्वांचा समावेश करणारा. 'मला नाहीं तुमचे सर्वसामान्य सिद्धांत समजत.' -सुदे ३७. ॰साक्षी- वि. सर्व पाहणारा; सर्व भूतांच्या ठायीं असणारा; ज्यास सर्व दिसतें असा (ईश्वर). 'नसेन दिसलों कसा नयन सर्वसाक्षी रवि ।' -केका ४. ॰सिद्ध-वि. सर्व परिपूर्ण; (सर्व गुणादि- कांनीं युक्त; सर्व लक्षणांनीं युक्त; संपूर्ण; सर्वांग परिपूर्ण (ईश्वर). ॰सिद्धि-स्त्री. सर्व इच्छांची पूर्ति; सर्वकाम पूर्ति. ॰सिद्धार्थ- वि. सर्व इच्छापूर्ति झालेला; सर्व हेतु साध्य झालेला. ॰सुखा- नंद-वि. सर्व सुख व आनंद प्राप्त झालेला; सुखांचा आनंद ज्याच्या ठिकाणीं आहे असा (ईश्वर). ॰सोंवळा-वि. १ नेहमींचा शुद्ध, सोंवळा, पवित्र. जन्मसोंवळा (एखादा मनुष्य स्नान न करतांच सोंवळें नेसला असतां त्यास उपरोधिकपणें म्हणतात). २ नेहमींच पवित्र, शुद्ध, सोंवळें असलेलें (रेशमी वस्त्र, धाबळी वगैरे) (हीं कधीं न धुतलीं तरी सोंवळीं मानण्यांत येतात यावरून). ॰स्पर्शी-वि व्यापक; सर्वांचा समावेशक. 'एकंदर ठराव सर्वस्पर्शी समाधानका- रक केला.' -केले १.३०९. ॰स्व-न. १ सर्व धन; सर्वसंपत्ति; सर्व मालमत्ता, चीजवस्त वगैरे; स्वत:च्या मालकीचें सर्व. 'सर्वस्व हारवावें की जिकावें न भीरु तूं पण हो.' -मोसभा ६.९५. २ तन, मन, धन; 'तैसें सर्वस्वें कर्म अनुष्ठी । परि फळ न सुखे दिठी ।' -ज्ञा १८.५९० मी सर्वस्वयां तैसें । सुभटांसी ।' -ज्ञा १.१११. ३ तत्त्वांश; सार; ॰स्वदंड-पु. सर्व संपत्ति जप्त करणें; सर्व मालमत्ता खालसा करणें; सर्व हिरावून घेणें. ॰स्वहर-हर्ता-हारक-हारी-पु. सर्व धन हरण करणारा, घेणारा, लुबाडणारा. ॰स्वहरण-हार-नपु. सर्व संपत्तीची लूट; सर्व धन हिरावून घेणें; सर्व नाश. ॰स्वामी-पु. १ सर्व बिश्वाचा प्रभू; सर्व सत्ताधारी, जगत्पति; सार्वभौम. २ सर्वस्वाचा मालक, धनि; सर्व वस्तूंचा धनि. ॰स्वीं-स्वें-क्रिवि. १ तनमनधनेंकरून; सर्व वस्तुमात्रासह. २ पूर्णपणें; पुरतेपणीं; एकंदर; अगदीं; सर्व प्रकारें; निखालस. उदा॰ सर्वस्वीं सोदा, लुच्चा, लबाड, हरामी वगैरे. ॰हर- हर्ता-हारक-हारी-वि. सर्व हरण करणारा; लुबाडणारा. ॰हरण-न. संपूर्ण नागवणूक; नाडणूक. ॰ज्ञ-वि. सर्व जाणणारा; त्रिकालज्ञ; पूर्ण ज्ञानी;सर्वसाक्षी; सर्व वेत्ता. 'तुम्हां सर्वज्ञांच्या समाजीं । देयावें अवधान हे माझी । विनवणी सल- गीची ।'-ज्ञा ९.२ सर्वंकष-वि. सर्वांस कसोटीस लावणारा. सर्वाग-न. १ सर्व शरीर; देह; शरीराचे सर्व अवयव. २ सांग- वेद; षडंगसहित वेद. सर्वांगरोग-वात-पु. पक्षघाताप्रमाणें सर्व शरीरास वातविकार होतो तो. -योर १.७५५. सर्वांगा- सन-न. साफ उताणें निजून हात जमीनीवर टेकणें व त्यांवर जोर घेऊन खांद्यापर्यंतचा भाग व पाय वर उचलून ताठ करून स्थिर होणें. -संयो ३५०. सर्वांगीण-वि. सर्व शरीर व्यापणारा; सर्व अंगांसंबंधीं. सर्वांगें-क्रिवि. एकचित्तानें; एकाग्रतेनें. 'जो सर्वांगें श्रोता ।' -दा ७.१.२८. सर्वांची मेहुणी-स्त्री. १ मुरळी; भावीण. २ वेडसर स्त्री. सर्वांतर- वि. सर्वांच्या अंतकरणांत राहणारा. 'मज सर्वांतरानें कल्पिती । अरि मित्र गा ।' -ज्ञा ९.१६६. सर्वांतोडीं-क्रिवि. सर्वां- मुखीं; प्रत्येकाच्या मुखांत; ज्याच्या त्याच्या तोंडांतून. सर्वा- त्मना-क्रिवि. १ मनोभावें करून; अंत:करणपूर्वक; तनमन- धनें करून. 'धन कामासि निजमुख । सर्वात्मना नाहीं देख ।' -एभा २३.४३५. २ पूर्णपणें; सर्वस्वी; निखालस. 'हा सर्वात्मना लबाड आहे.' ३ मुळींच; अगदीं; केव्हांहि; कोण- त्याहि तऱ्हेनें; साफ (नाहीं-निषेधार्थक शब्दाबरोवर उपयोग). 'मजपासून ही गोष्ट सर्वात्मना घडावयाची नाहीं.' -रा ३. ३०१. सर्वात्मा-पु. सर्व प्राणिमात्राच्या ठिकाणीं असलेला जीवात्मा, चैतन्य, (ईश्वर). सर्वाथाई-क्रिवि. सर्वथा (अप- भ्रंश). 'अशा पुण्यरूपें नृप न सोडी भोग सर्वाथाई ।' -ऐपो ४०९. सर्वाधिकार-पु. पूर्ण सत्ता; सर्वांवर सत्ता, ताबा, वर्चस्व. सर्वाधिकारी-पु. प्रमुख; मुख्य; सर्वासत्ताधीश; (म्हैसूरच्या राजाचा हैदरपूर्वी मुख्य प्रधान). सर्वांधीत- वि. सर्व अध्ययन झालेला; सर्व विषय शिकलेला; निष्णात. -शिदि ११८. सर्वानुभूति-स्त्री. सर्व जगाचा, अनेक प्रका- रचा, अनेक गोष्टींचा अनुभव. सर्वान्नभक्षक-भक्षी-भोजी- वि. १ वाटेल तें खाणारा; सर्व प्रकारचें अन्न ज्यास चालतें असा. २ अधाशी; अधोरी. सर्वाबद्ध-वि. सर्व तऱ्हेनें स्वतंत्र; मोकाट; स्वैर; पूर्ण स्वतंत्र; असंबद्ध; नियमांनीं बद्ध नव्हे असे; विसंगत; (मनुष्य, चाल, वागणूक, कार्य, काव्य, भाषण वगैरे). सर्वांर्थीं-वि. सर्व वस्तूंची इच्छा करणारा; लोभी; महत्त्वाकांक्षी वगैरे. सर्वार्थी, सर्वार्थें-क्रिवि. सर्व प्रकारामें; सर्वस्वी; हरतऱ्हेनें; प्रत्येक दृष्टीनें 'वैश्य व्यव- सायांत जाण । दिसतो निपुण सर्वार्थीं ।' सर्वाभ्य-वि. क्रिवि. सर्व प्रकारें; सर्व तऱ्हेचा; सर्व कामांतील. 'सर्वाभ्य कारभारी.' -चित्र २. सर्वारिष्ट-न. सर्व जगावरील सामान्य संकट; सर्वसामान्य पीडा; अनेक लोकांस बाधक किंवा अनेक प्रका- रचें संकट, पीडा, बाधा. सर्वांशिक, सर्वांशी-वि. सर्व भागांशीं संबंध असलेलें; एकदेशीयाच्या उलट. सर्वांशीं- क्रिवि. पूर्णपणें; सर्व प्रकारें; सर्व तऱ्हेनें. सर्वाशीं संपूर्ण, सर्वावयवीं संपूर्ण-वि. सर्व विभागांनीं, अवयवांनीं युक्त; परिपूर्ण; सबंध. सर्वाशुद्ध-वि. अनेक अशुद्धें असलेला; सर्वं प्रकारें दोषयुक्त; चुक्यांनीं भरलेला (ग्रंथ वगैरे). सर्वीय- वि. सर्वांचा; सर्वाशीं संबंध असलेला; सगळ्यांचा; विश्वाचा; जागतिक. सर्वें-नअव. सगळीं. 'दु:ख भोगिलें आपुलें जीवें । तेथें कैचिं होतीं सर्वें ।' -दा ३.१०.४४. सर्वेश, सर्वे- श्वर-पु. १ परमेश्वर; जगदीश. 'तया स्वधर्मी सर्वेश्वरीं । न भजेल जो ।' -ज्ञा ३.१०४. २ सम्राट; सार्वभौम; सर्वाधीश. सर्वेश्वर(री)वाद-पु. विश्वांत सर्वत्र परमेश्वर भरलेला आहे असें मत. (इं.) पॅन थीइझम्. सर्वै-क्रिवि. सर्वहि; पूर्णपणें; सर्वस्वीं. 'अकस्मात तै राज्य सर्वै बुडालें ।' -राम. सर्वो- त्कर्ष-वि. अत्यंत महत्त्वाचें; सर्वोत्तम. 'सांप्रत हे येश आगाध भ्रीनें आपले पदरीं सर्वोत्कर्ष घातलें.' -पेद ३.१८१. सर्वोत्कृष्टवि. १ अत्युत्तम; सर्वोत्तम; सर्वश्रेष्ठ (ईश्वर). २ सत्य; न्याय्य; रास्त. सर्वोपकार-पु. सर्वांचें कल्याण; सर्वावर केलेले उपकार; जमदुपकार सर्वोपकरी-वि. जगास कल्याणकारक: सर्वांस उपकारक लाभदायक. सर्वोपयोगी- वि. सर्व कार्यांस उपयुक्त; कोणत्याहि कामास उपयोगी. सर्वोपरी-क्रिवि. सर्व प्रकारानीं; सर्व रातीनीं; सर्व पद्धतीनीं; सर्व तऱ्हानीं. [सर्व + परी] 'समर्थ जाणोनि सर्वोपरी ।' -मुआदि ३३. २ सर्वोपरी-वि सर्वश्रेष्ठ; वरिष्ठ; उत्कृष्ट; उत्तम. 'शिखराथिलियां सर्वोपरी । मेरु तो मी ।' ज्ञा १०. २२७. -क्रिवि. श्रेष्ठपणें; वरिष्ठपणें; उत्तम रीतीनें. [सर्व + उपरि] सर्वौषधि-स्त्री. शतावरी; एक वनस्पति. सर्ब्यांस- ला-सनाम द्वि. (अशिष्ट) सर्वांचा. 'तो सर्व्यांला मुजरे करतो ।' -ऐपो ४३१.
पंच
वि. पांच; ५ संख्या. [सं.] ॰उपप्राण-पुअव. पांच वायु:-नाग = शिंक येणारा वायु, कूर्म = जांभई येणारा, कृकल = ढेंकर येणारा, देवदत्त = उचकी येणारा व धनंजय = सर्व शरीरांत राहून तें पुष्ट करणारा व मनुष्य मेल्यावर त्यांचे प्रेत फुगविणारा वायु. 'नाग कूर्म कृकल देवदत्त । पांचवा धनंजय जाण तेथ ।' -एभा १३.३२०. ॰कन्या-स्त्रीअ. पांच सुविख्यात पतिव्रता स्त्रिया; अहल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी. ॰कर्में-नअव. शरीराचीं मुख्य पांच कामें-ओकणें, रक्तस्त्राव होणें, मलोत्सर्ग, मूत्रोत्सर्ग, नाक शिंकरणें इ॰. किंवा गतीचे पुढील पांच प्रकार:-उत्क्षेपण (वर करणें), अपक्षेपण (खालीं करणें), आकुंचन (आखडणें), प्रसारण (पसरणें) व गमन (जाणें). ॰कर्मेंद्रियें-हात, पाय, वाणी, शिश्न व गुद. कर्मेंद्रिय पहा. ॰कल्याण-णी-वि. १ गुडघ्यापर्यंत पांढरे पाय व तोंडावर पांढरा पट्टा असलेला (घोडा) हा शुभ असतो. -अश्वप १.९०. 'पंच कल्याणी घोडा अबलख ।' ३ (उप.) सर्व अवयव विकृत असलेला (माणूस). ३ (उप.) भाड्याचें तट्टू, घोडा (याला दोन्ही टाचांनीं, दोन्हीं मुठींनीं व दांडक्यानें मारून किंवा तोंडानें चक् चक् करून चालवावें लागतें म्हणून). ४ (उप.) ज्याच्या नाकाला निरंतर शेंबूड असून तो वारंवार मणगटांनीं काढून टिरीस पुसत असणारा असा (पोर). ॰काजय-स्त्री. (गो.) पंचखाद्य पहा. ॰कृष्ण-पुअव. (१) महानुभाव संप्रदायांतील ५ कृष्ण-कृष्णचक्रवर्ती, मातापूर येथील दत्त, ऋद्धिपूरचा गुंडम राउळ, द्वारावतीचा व प्रतिष्ठानचा चांग- देव राउळ. -चक्रधर सि. सूत्रें पृष्ठ २१. (२) हंस, दत्त, कृष्ण, प्रशांत व चक्रधर. -ज्ञाको (म) ७७. ॰केणें-न. मसाल्यांतील मिरी, मोहरी, जिरें, हिंग, दगडफूल इ॰ पदार्थ. ॰केण्याचें दुकान-न. छोटेसें किराण्याचें दुकान. ॰केदार-पुअव. केदार, ममद, तुंग, रुद्र, गोपेश्वर. ॰कोटी-स्त्री. उत्तर हिंदुस्थानांतील शंकराचें तीर्थक्षेत्र. ॰कोण-पु. पांच कोनांची एक आकृति. -वि. पांच कोनांची. ॰कोश-ष-पुअव. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय अशीं देहाचीं पांच आवरणें. या कोशांचा त्रिदेहाशीं पुढीलप्रमाणें समन्वय करतात-अन्नमयाचा स्थूलदेहाशीं, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, यांचा सूक्ष्म किंवा लिंगदेहाशीं व आनंदमयाचा कारणदेहाशीं. ॰क्रोशी-स्त्री. १ चार, पांच कोसांच्या आंतील गांवें; एखाद्या क्षेत्राच्या भोंवतालची पांचकोस जमीन. 'पुरलें देशासी भरलें शीगेसी । अवघी पंचक्रोशी दुम- दुमीत ।' -तुगा २६१०. ३ (ल.) या गांवांतील जोशाची वृत्ति. ४ पंचक्रोशी यात्रा पहा. ॰क्रोशी यात्रा-स्त्री. क्षेत्राची विशे- षतः काशी क्षेत्राच्या भोंवतालच्या पांच कोसांतील देवस्थानांना प्रदक्षिणा, तार्थाची यात्रा. ॰खंडें-नअव. आशिया, यूरोप, अमे- रिका, अफ्रिका, ओशियानिया. ॰खाज-जें-खाद्य-नपुन. १ ख या अक्षरानें प्रारंभ होणारे खाण्यायोग्य असे पांच पदार्थ (खारीक, खोबरें, खसखस (किंवा खवा) खिसमिस व खडी साखर). -एभा १.०.४९२. 'पूर्ण मोदक पंचखाजा । तूं वऱ्हाडी आधीं ।' -वेसीस्व ३. २ (गो.) नारळाचा खव, गूळ. चण्याची डाळ इ॰ पांच जिन्नसांचा देवाला दाखवावयाचा नैवेद्य. ३ (कों.) तांदूळ किंवा गहू, काजळ, कुंकू, उडदाची डाळ व खोबरें यांचा भूतपिशाचांना द्यावयाचा बळी; या पांच वाणजिनसा. ॰गंगा- -स्त्री १ महाबळेश्वरांतील एक तीर्थ. येथें कृष्णा, वेणा, कोयना, गायत्री (सरस्वती) व सावित्री यांचा उगम आहे. २ काशी क्षेत्रां- तील एक तीर्थ. 'गंगा भारति सूर्यसूनु किरणा बा धूतपापा तसे । पांची एकवटोनि तीर्थ निपजे ते पंच-गंगा असें ।' -नरहरी, गंगा- रत्नमाला १५७ (नवनीत पृ. ४३३). ३ पंचधारा पहा. (क्रि॰ वाहणें). ॰गति-स्त्री. घोड्याच्या पांच चाली-भरपल्ला किंवा चैवड चाल; तुरकी किंवा गाम चाल, दुडकी, बाजी, आणि चौक चाल. यांचीं संस्कृत नावें अनुक्रमें:-आस्कंदित, धौरितक, रेचित, वल्गित, प्लुत. ॰गव्य-न. गाईपासून निघालेले, काढलेले पांच पदार्थ दूध, दहीं, तूप, गोमूत्र, शेण यांचें मिश्रण (याचा धार्मिक शुद्धिकार्याकडे उपयोग करतात). ॰गोदानें-नअव. पापधेनु, उत्क्रांतिधेनु, वैतरणी, ऋणधेनु, कामधेनु. हीं पंचगोदानें और्ध्वदेहिक कर्मांत करतात. ॰गौड-पु. ब्राह्मणांतील पांच पोट जाती-(अ) गौड, कनोज (कान्यकुब्ज), मैथिल, मिश्र व गुर्जर; किंवा सारस्वत, कान्य- कुब्ज, गौड, उत्कल आणि मैथिल. ॰ग्रंथ-पुअव. यजुर्वेदाचे पांच ग्रंथ-संहिता, ब्राह्मण,आरण्यक, पदें आणि क्रम. ॰ग्रही- स्त्री. एका राशींत पांच ग्रहांची युति. [पंच + ग्रह] ॰तत्त्वें-नअव. पंचमहाभूतें पहा. ॰तन्मात्रा-स्त्रीअव. पंचमहाभूतांचीं मूलतत्त्वें, गंध रस, रूप, स्पर्श, शब्द हे गुण. 'प्रकृति पुरुष महत्तत्त्व । पंच, तन्मात्रा सूक्ष्मभाव ।' -एभा १९.१६८ ॰तीर्थ-नअव. हरिद्वार किंवा त्र्यंबकेश्वर येथील गंगाद्वार, कुशावर्त, बिल्वक, नीलपर्वत आणि कनखल हीं पांच तीर्थें. ॰दंती-वि. पांच दांत असलेला (घोडा), सप्तदंती व अशुभलक्षण पहा. ॰दाळी-स्त्रीअव. तूर, हर- भरा, मूग, उडीद व वाटाणा या पांच धान्यांच्या डाळी. ॰देवी- स्त्रीअव. दुर्गा, पार्वती, सावित्री, सरस्वती व राधिका. ॰द्रविड- पुअव. ब्राह्मणांतील पांच पोटजाती-तैलंग, द्राविड, महाराष्ट्रीय, कर- नाटकी व गुर्जर. ॰द्वयी-स्त्री. १ दक्षिणा द्यावयाच्या रकमेचे (ती कमी करणें झाल्यास) पांच भाग करून त्यांतील दोन किंवा तीन ठेवून बाकीचे वाटणें. २ अशा रीतीनें शेत, काम, रक्कम, वस्तु इ॰ची वांटणी करणें. ॰धान्यें-नअव. हवन करण्यास योग्य अशीं पांच धान्यें-गहूं, जव, तांदूळ, तीळ व मूग. महादेवाला याची लाखोली वाहतात. ॰धान्याचा काढा-पु. हा धने, वाळा, सुंठ, नागर- मोथा व दालचिनी यांचा करतात. ॰धार-स्त्री. १ जेवतांना तूप पडलें न पडलें इतकें कमी वाढणें; तुपाच्या भांड्यांत पांच बोटें बुडवून अन्नावर शिंपडणें. २ झाडास पाणी घालण्याची पांच धारांची झारी. 'जगजीवनाचिया आवडी । पंचधार करी वरी पडी ।' -ऋ ७३. ॰धारा-स्त्री. (विनोदानें) तिखट पदार्थ खाल्ला असता किंवा नाकांत गेला असतां दोन डोळे, दोन नाक- पुड्या व तोंड यांतून वाहणाऱ्या पाण्याच्या पांच धारा. ॰धारें -न. देवावर अभिषेक करावयाचें पांच भोंकांचें पात्र. [पांच + धारा] ॰नख-नखी-वि. १ पांच नखें असलेला (मनुष्य, माकड, वाघ). २ ज्यांचें मांस खाण्यास योग्य मानिलें आहे असे पांच नखें असणारे सायाळ, घोरपड, गेंडा, कांसव, ससा इ॰ प्राणी. 'पंचपंच नखा भक्ष्याः ।' -भट्टिकाव्य ६.१३१. ३ छातीवर, खुरावर पांच उभ्या रेषा असणारा (घोडा). हें अशुभलक्षण होय. -अश्वप १.९५. ४ ज्याच्या चार पायांपैकीं कोणत्याहि एका पायाला फाटा फुटल्या- सारखी आकृति असते असा (घोडा). -अश्वप १.९८. ॰नवटे- पुअव. (राजा. कु.) संसारादिकांचा अनेकांनी मिळून अनेक प्रका- रचा केलेला नाश; (एखाद्या संस्थेंत, मंडळांत झालेली) फाटा- फूट; बिघाड. (क्रि॰ करणें). २ गोंधळ; घालमेल; अडचण. [पंच + नव] ॰पक्वान्नें-नअव. १ लाडू, पुरणपोळी इ॰ पांच उंची मिष्टान्नें. २ भारी, उंची खाद्यपदार्थ, जेवण. ॰पंचउषःकाल- पु. सूर्योदयापूर्वीं पांच घटिकांचा काळ; अगदीं पहाट. 'पंच पंच- उषःकालीं रविचक्र निघोआलें ।' -होला १७ ॰पदी-स्त्री. देवापुढें नित्य नियमाने पांच पदें, अभंग भक्तगण म्हणतात ती. 'पंचपदी राम कलिसंकीर्तन ।' -सप्र २१.३६. ॰पर्व-वि. कोणत्याहि एका पायास फरगड्याची आकृति असणारा (घोडा). -अश्वप १.१०२. १०२. ॰पल्लव-पुअव. आंबा, पिंपळ, पिंपरी, वड व उंबर या किंवा इतर पांच वृक्षाचे डहाळे (किंवा पानें). स्मार्त याज्ञिकांत हे कलशामध्यें घालतात. 'पंचपल्लव घालोनि आंत । आणि अशोकें केलें वेष्टित । नरनारी मिळाल्या समस्त । लग्नसोहळिया कारणें ।' -जै ५६.१४. ॰पाखंड-न. जैन, बौद्ध, चार्वक इ॰ पांच मुख्य प्रकारचीं अवैदिक मतें, संप्रदाय. ॰पाखंडी-वि. वरील पाखंड मतांपैकीं कोणत्याहि मताचा अनुयायी. ॰पात्र-पात्री-नस्त्री. पाणी पिण्याचें किंवा इतर उपयोगाचें नळ्याच्या आकाराचें मोठें भांडें. ॰पाळें-न. लांकडाचें, किंवा धातूचें पांच वाट्या अथवा खण असलेलें पात्र. हळद, कुंकु, इ॰ पूजासाहित्य ठेवण्याच्या उपयोगी; किंवा फोडणीचें सामान ठेवण्याच्या उपयोगी पात्र. (गो.) पंचफळें. ॰पुरुषार्थ-पु. धर्म, अर्थ, काम, मोक्ष (सलोकता, समीपता, सरूपता सायुज्यता) व परमप्रेमरूपा-परानुरक्ति- पराभक्ति हें पांच पुरुषार्थ. 'जैसा ज्यासी भावार्थ । तैसा पुरवी मनोरथ । पढिये पंचपुरुषार्थ । तो हरि नांदत वैकुंठी ।' एभा २४.२७०. ॰प्रमाणें-नअव. शब्दप्रमाण, आप्तवाक्यप्रमाण, अनुमानप्रमाण. उपमानप्रमाण व प्रत्यक्षप्रमाण. ॰प्रयाग-पुअव. नंदप्रयाग, स्कंदप्रयाग, रुद्रप्रयाग, देवेंद्रप्रयाग व कणप्रयाग हे पांच प्रयाग. ॰प्रलय-पु. निद्राप्रलय, मरणप्रलय, ब्रह्म्याचा निद्राप्रलय, ब्रह्म्याचा मरणप्रलय, व विवेकप्रलय. ॰प्रवर-पुअव. ब्राह्मणांत कांहीं पंचप्रवरी ब्राह्मण आहेत त्याचे पांच प्रवर असे-भार्गव, च्यावन, आप्नवान, और्व व जामदग्न्य. प्रवर पहा. ॰प्राण- पु. १ प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. हे पांच प्राण प्राण्याच्या आयुष्यास कारणीभूत आहेत. यांचीं स्थानें आणि कार्यें भिन्न भिन्न आहेत. (क्रि.॰ ओढणें; आकर्षणें; सोडणें; टाकणें लागणें). 'देह त्यागुन पंचप्राणीं । गमन केलें तात्कळीं ।' -मुआदि २८.२४. २ (ल.) अतिशय आवडती, प्रियकर वस्तु. 'तो पंचप्राण धन्याचा ।' -संग्रामगीतें ११९. (एखाद्यावर) पंच- प्राण ओवाळणें-पंचप्राणांची आरती करणें-दुसऱ्या- करितां सर्वस्व, प्राणहि देणें; सर्व भावें करून आरती ओवाळणें; खरी, उत्कटभक्ति किंवा प्रेम दाखविणें. 'पंच प्राणांची आरती । मुक्तीबाई ओवाळती ।' ॰प्राणाहु(व)ती-स्त्री. पांच प्राणांना द्याव- याच्या लहान लहान आहुती किंवा घास या त्रेवर्णिकांनीं भोज- नाच्या आरंभीं द्यावयाच्या असतात. पांच आहुती घेणें म्हणजे घासभर, थोडेंसें खाणें. (क्रि॰ घेणें). [पंच + प्राण + आहुती] ॰बदरी- स्त्रीअव. योग, राज. आदि, वृद्ध, ध्यान. या सर्व बदरी बदरी नारा- यणाच्याच रस्त्यावर आहेत. ॰बाण-पु. (काव्य) मदन; कामदेव. मदनाच्या पाच बाणांसाठीं बाण शब्द पहा. ॰बेऊळी-स्त्री. पांच नांग्यांची इंगळी. -मनको. ॰बेळी-स्त्री. बोंबिल, कुटें इ॰ विक्री- करितां एकत्र मिसळलेले लहान मासे. ॰भद्र-वि. सर्व शरीर पिवळें असून पाय आणि तोंड मात्र श्वेतवर्ण असणारा (घोडा). अश्वप १. २१. ॰भूतातीत-वि. १ पंचभूतांपासून अलिप्त, सुटलेला (मुक्त मनुष्य, लिंगदेह). २ निरवयव; निराकार (ईश्वर). ॰भू(भौ)तिक-वि. पांच तत्त्वांनीं युक्त; जड; मूर्त; सगुण. ॰भूतें-नअव. पंचमहाभूतें पहा. भे(मे)ळ-पुस्त्री. पंचमिसळ पहा. अनेक पदार्थांचें मिश्रण -वि. पांच प्रकार एकत्र केलेलें. 'मोहोरा पंचमेळ बरहुकूम पत्र पुरंदर.' -वाडसमा ३.८३. ॰मघा-स्त्रीअव. १ मघा नक्षत्रांत सूर्य आल्या- नंतरचे पांच दिवस. २ मघापासून पुढचीं पांच सूर्यसंक्रमणाचीं नक्षत्रें. ॰महाकाव्यें-नअव. रघुवंश, कुमारसंभव, माघ, किरात, नैषध हीं पांच मोठीं संस्कृत काव्यें. ॰महातत्त्वांचीं देवस्थानें- १ पृथ्वी = कांचीवरम् (कांची स्टेशन). आप-जंबुकेश्वर (श्रीरंगम् स्टेशनपासून १२ मैल). तेज = अरुणाचल (एम्. एस्. एम्. रेलवेच्या मलय स्टेशन नजीक). वायु = कालहस्ती (वरील रेलवेच्या रेणीगुंठा स्टेशनपासून गुडुर रस्त्यावर). आकाश-चिदांबरम् (चेंगलपट रस्त्यावर). ॰महापातकें-नअव. ब्रह्महत्या, मद्यपान, सुवर्णचौर्य, मात्रागमन किंवा गुरुस्त्रीसंभोग व वरील चार महापात- क्यांची संगत. ॰महापातकी-वि. वरील महापातकें करणारा. ॰महाभूतें-नअव. पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश हीं पांच. गंध, रस, रूप, स्पर्श व शब्द हीं यांचीं अनुक्रमें सूक्ष्मरूपें होत. यांना पंचसूक्ष्मभूतें असें म्हणतात. पंचमहाभूतांचीं हीं मूलकारणें आहेत. ह्यावरून जगदुत्पत्तिविषयक ग्रंथांतून पंचभूत व पंचतन्मात्रा अशा संज्ञा ज्या येतात त्यांचा अर्थ पंचमहा(सूक्ष्म)भूतें असाच होय तन्मात्र पहा. ॰महायज्ञ, पंचयज्ञ-पुअव. ब्रह्मयज्ञ (वेदाध्ययन), पितृयज्ञ (तर्पण), देवज्ञ (होम, वैश्वदेव), भूतयज्ञ (बलि), मनुष्ययज्ञ (अतिथिसंतर्पण). भोजनाच्यापूर्वी ब्राह्मणानें नित्य करावयाचे हे पांच यज्ञ आहि्नकांपैकीं होत. ॰महासरोवरें- नअव. बिंदुसरोवर (सिद्धपूर-मातृगया), नारायणसरोवर (कच्छ- प्रांतीं मांडवी), मानस सरोवर (हिमालयामध्यें उत्तरेस), पुष्कर (अजमीर), पंपासरोवर (एम्. एम्. एस् रेलवेच्या होसपेट स्टेशननजीक). ॰महासागर-पुअव. उत्तर, दक्षिण, हिंदी, पॅसिफिक व अटलांटिक महासागर. ॰माता-स्त्रीव. स्वमाता, सासू, थोरली भावजय, गुरुपत्नी व राजपत्नी. ॰मिसळ-मेळ- पुस्त्री. १ पांच डाळींचें केलेलें कालवण, आमटी. २ पांचसहा प्रकारच्या डाळी किंवा धान्यें यांचें मिश्रण. ३ (ल.) एका जातीच्या पोटभेदांतील झालेल्या मिश्रविवाहाची संतति, कुटुंब, जात; कोण- त्याहि वेगवेगळ्या जातीच्या संकरापासून झालेली जात; संकर- जात. ४ भिन्न भिन्न पांच जातींतील लोकांचा समाज. ५ (ल.) निरनिराळ्या जातींचा एकत्र जुळलेला समाज. -वि. मिश्र; भेस- ळीचें. 'हे तांदूळ पंचमिसळ आहेत.' ॰मुख-पु. १ शंकर. 'चतुर्मुख पंचमुख । वेगें षण्मुख पातला ।' -एभा ६.२५. २ सिंह ॰मुखी-वि. १ उरावर भोंवरा असून त्यांत पांच डोळे असणारा (घोडा). -मसाप २.५५. २ पांच तोंडांचा (मारुती, महादेव, रुद्राक्ष). ॰मुद्रा-स्त्रीअव. (योग) भूचरी, खेचरी, चांचरी, अगोचरी आणि अलक्ष अशा पांच मुद्रा आहेत. 'योगी स्थिर करूनियां तेथें मन । शनै शनै साधिती पवन । पंचमुद्रांचें अतर्क्य विंदान । तें अभ्यासयोगें साधिती ।' -स्वादि ९.३.६२. ॰रंगी-वि. १ पांच रंगांचें (रेशीम, नाडा इ॰). २ धोतरा, अफू, इ॰ पांच कैफी पदार्थ घालून तयार केलेला (घोटा). ॰रत्नीगीता-स्त्री. भगवद्गीता, विष्णुसहस्त्रनाम, भीष्मस्तवराज, अनुस्मृति व गजेंद्र- मोक्ष हे पांच अध्यात्म ग्रंथ. ॰रत्नें-नअव. सोनें, हिरा, नीळ, पाच व मोतीं किंवा सोनें, रुपें, पोवळें, मोतीं, राजावर्त (हिऱ्याची निकृष्ट जात). ॰रसी-वि. १ पांच (किंवा जास्त) धातूंच्या रसापासून तयार केलेली (वस्तु). २ तोफांचा एक प्रकार. 'पंचरशी आणि बिडी लोखंडी ।' -ऐपो २२५. ॰राशिक- राशि-पुस्त्री. (गणित) बहुराशिक; दोन त्रैराशिकें एकत्र करून तीं थोडक्यांत सोडविण्याचा प्रकार; संयुक्त प्रमाणांतील चार पदांपैकीं संयुक्त गुणोत्तरांतील दोन पदें आणि साध्या गुणोत्तरांतील एक पद हीं दिलीं असतां साध्या गुणोत्तरांतील दुसरें पद काढण्याची रीत. ॰रुखी-रुढ-वि. साधारण; सामान्य; रायवळ; अनेक प्रकारचें; जंगली (लांकूड-सागवान, खैर, शिसवी इ॰ इमारतीस लागणाऱ्या पांच प्रकारच्या लांकडाशिवाय). ॰लवणें-नअव. मीठ, बांगडखार, सैंधव, बिडलोण व संचळ. ॰लवी-वि. (गो.) पंचरसी पहा. ॰लोह-न. तांबें, पितळ, जस्त, शिसें व लोखंड यांचें मिश्रण. ॰वकार-पुअव. व नें आरंभ होणारे व प्रत्येकास लागणारे पांच शब्द शब्द म्हणजे विद्या, वपु, वाचा, वस्त्र आणि विभव. 'विद्यया वपुषा वाचा वस्त्रेण विभवेन वा । वकारैः पंच- भिर्हीनो नरो नाप्नोति गौरवम् ।' ॰वक्त्र-वदन-पु. महादेव. 'भक्तोत्सल पंचवदन । सुंदर अति अधररदन ।' -देप २००. याच्या पांच तोंडांचीं नावें:-सद्योजात, तत्पुरुष, अघोर, वामदेव आणि ईशान. ॰वर्ज्यनामें-नअव. आत्मनाम, गुरुनाम, कृपणनाम, ज्येष्ठापत्यनाम व पत्निनाम. या पांच नामांचा उच्चार करूं नयें. ॰विध-वि. पांच प्रकारचें. ॰विशी-स्त्री. १ पंचवीस वर्षांचें वय. २ पंचवीस वस्तूंचा समूह. पहिल्या पंचवीशींतलें पोरगें-तरणाबांड. ॰विषय-पुअव. (कर्ण, त्वचा, चक्षु, रसना, घ्राण या) पांच ज्ञानेंद्रियांचे अनुक्रमें पांच विषय:-शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध. पंचवीस-२५ संख्या; वीस आणि पांच. ॰विसावा-वि. सांख्य मताप्रमाणें मूल-प्रकृत्यादि जीं चोवीस तत्त्वें आहेत त्यांपलीकडील पंचविसावा (आत्मा). 'तूं परम दैवत तिहीं देंवा । तूं पुरुष जी पंचवीसावा । दिव्य तूं प्रकृति- भावा- । पैलीकडील ।' -ज्ञा १०.१५०. ॰शर-पु. पंचबाण पहा. ॰सार-न. तूप, मध, तापविलेलें दूध, पिंपळी व खडीसाखर हे पदार्थ एकत्र घुसळून तयार केलेलें सार. हें विषमज्वर, हृद्रोग, श्वास, कास व क्षय यांचा नाश करतें. -योर १.३५३. ॰सूत्र-सूत्री-वि. १ पांच दोऱ्यांचें, धान्यांचें, रेषांचें. २ सारख्या लांबीच्या पांच सुतांमध्यें केलेलें, बसविलेलें (शाळुंकेसह बनविलेलें शिवलिंग). 'पंचसूत्री दिव्य लिंग करी । मणिमय शिवसह गौरी ।' ॰सूना-स्त्रीअव. कांडण, दळण, चूल पेटविणें, पाणी भरणें, सारवणें यापासून जीवहिंसादि घडणारे दोष. 'पंचसूना किल्बिषें म्हणूनि । एथें वाखाणिती ।' -यथादी ३.२३. ॰सूक्तें-नअव. ऋग्वेद संहितेंतील पुरुषसूक्त,देवासूक्त, सूर्यसूक्त (सौर), पर्जन्यसूक्त व श्रीसूक्त हीं पांच सूक्तें. ॰सूक्ष्मभूतें-नअव. पंचमहाभूतें पहा. ॰स्कंध-पुअव. सौगतांच्या अथवा बौद्धांच्या दर्शनाला अनुसरून मानवी ज्ञानाचे पांच भाग. म्हणजे रूप, वेदना, विज्ञान, संज्ञा व संस्कार. या शब्दांचे विषयप्रपंच, ज्ञानप्रपंच, आलयविज्ञान संतान, नामप्रपंच आणि वासनाप्रपंच ह्या अनुक्रमें पांच शब्दांनीं स्पष्टी- करण केलें आहे. ॰स्नानें-नअव. पांच स्नानें-प्रातः-संगव- माध्यान्ह-अपराण्ह-सायंस्नान. ॰हत्यारी-वि. १ ढाल, तरवार, तीरकमान, बंदूक, भाला किंवा पेशकबज या पांच हत्यारांनीं युक्त. २ चार पाय व तोंड यांचा शस्त्राप्रमाणें उपयोग करणारें (जनावर-सिंह, वाघ इ॰). ३ (ल.) हुशार; योग्य; समर्थ; संपन्न; सिद्ध असा (मनुष्य). ४ (व्यंग्यार्थी) शेंदाड शिपाई; तिसमारखान. ॰हत्त्या-स्त्रीअव. ब्रह्महत्त्या, भ्रूणहत्त्या, बालहत्त्या, गोहत्त्या व स्त्रीहत्त्या. पंचाग्नि-ग्नी-पुअव. १ चारी दिशांना चार पेटविलेले व डोक्यावरील तप्त असा सूर्य मिळून पांच अग्नी. 'पंचाग्नी गोरांजनें । जें प्राप्त नव्हे ।' -दा ५.६.२९. २ शरीरांतील पांच अग्नी. ३ -वि. पांच श्रौताग्नि; धारण करणारा गृहस्थाश्रमी ब्राह्मण. हे पांच अग्नी-दक्षिणाग्नि; गार्हपत्य, आहवनीय, सभ्य व आवसथ्य हे होत. -ग्नि साधन-न. चारी दिशांनां चार कुंडें पेटवून दिवसभर उन्हांत बसणें. हा तपश्चर्येचा एक प्रकार आहे. याला पंचाग्निसेवन, धूम्रपान असेंहि म्हणतात. 'चोहींकडे ज्वलन पेटवुनी दुपारीं । माथ्यावरी तपतसे जंव सूर्य भारी । बैसोनियां मुनि सुतीक्ष्ण म्हणोनि हा कीं । पंचाग्निसाधन करी अबले विलोकी ।' पंचादुयी- दिवी-दुवी-देवी-स्त्री. पंचद्वयी पहा. [अप.] पंचादेवी-स्त्री. शेताच्या उत्पन्नाचे ५ वांटे करून ज्याचे बैल असतील त्याला ३ व दुसऱ्याला (मालकाला) २ वांटे देण्याची रीत. पंचानन-पु. १ शंकर. २ (सामा.) पांच तोंडांची किंवा बाजूंची वस्तु. ३ सिंह. पंचामृत-न. १ दूध, दहीं, तूप, मध आणि साखर या पांचांचें मिश्रण. यानीं देवाच्या मूर्तीला स्नान घालतात. 'पय दधि आणि घृत । मधु शर्करा गुड संयुक्त । मूर्ति न्हाणोनि पंचामृतें । अभिषेक करिती मग तेव्हां ।' २ शेंगदाणे, मिरच्या, चिंच, गूळ, खोबऱ्याचे तुकडे इ॰ पदार्थ एकत्र शिजवून त्यास तेलाची फोडणी देऊन केलेला पदार्थ. ३ एक पक्वान्न; मिष्टान्न. [सं.] म्ह॰ १ जेवावयास पंचामृत आंचवावयास खारें पाणी. २ पंचामृत खाई त्यास देव देई. ॰मृत सोडणें-(बायकी) चातुर्मासांतील पहिल्या महिन्यांत दूध, दुसऱ्यांत दहीं, तिसऱ्यांत तूप, चौथ्यांत मध व पाचव्यांत (अधिकांत) साखर किंवा पांचवा (अधिक) नस- ल्यास चौथ्यांतच मध व साखर यांनीं युक्त असे पदार्थ न खाणें. ॰मृतानें-पंचामृतें न्हाणणें-पंचामृताच्या पदार्थानीं देवास स्नान घालणें. पंचायतन-न. १ शिव, विष्णु, सूर्य, गणपति व देवी या पांच देवता व त्यांचा समुदाय. या पांच देवतांपैकी प्रत्येक देव- तेस प्राधान्य देऊन शिव, विष्णु, गणपति इ॰ चीं पांच पंचायतनें मानण्याचीहि पद्धत आहे. (गो.) पंचिष्ट २ (ल.) एकचित्त असलेले पांच जण. ३ पंचमहाभूतांचें स्थान; शरीर. 'तें अधिदैव जाणावें । पंचायतनीचें ।' -ज्ञा ८.३६. पंचारती, पंचारत- स्त्री. १ तबकांत पांच दिवे ठेवून आरती ओवाळणें. २ आरती करितां लावलेले पांच दिवे. ३ असे दिवे ठेवण्याचें पात्र. पंचाक्षरी-वि. पंचाक्षरीमंत्र म्हणणारा व अंगांतील भूतपिशाच्च काढणारा; देव- ऋषी. 'पंचाक्षरी काढिती समंध ।' ॰क्षरीकर्म-न. पंचाक्षरीमंत्र म्हणून अंगांतील भूत काढणें. ॰क्षरीमंत्र-पु. १ भूतपिशाच्च काढ्ढन टाकण्याचा पांच अक्षरांचा मंत्र. २ ॐ नमःशिवाय हा मंत्र. पंचास्त्र-न. पंचकोण. -वि. पंचकोणी. [सं.] पंचाळ-स्त्री. (विणकाम) १ पांच पंचांकरितां लावलेला ताणा. २ एक शिवी. -वि. १ फार तोंडाळ, बडबड करणारी (स्त्री). पंचीकरण-न. १ पांच महाभूतांपैकीं प्रत्येकाचा कमीजास्त भाग घेऊन त्या सर्वांच्या मिश्रणानें नवा पदार्थ तयार होणें. -गीर १८१. २ आका- शादि पंचभूतें, त्यांचे देहादिकांच्या उत्पत्तीसाठीं ईश्वरशक्तीनें झालेलें परस्पर संमिश्रण. तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ. हा देह किंवा विश्व हें पंचमहाभूतात्मक कसें आहे याचें विवरण करणारा ग्रंथ. पंचीकृत- वि. पांच मूलतत्वें एकत्र झालेली (स्थिती). पंचेचाळ- चाळीस-ताळ-ताळीस-वि. चाळीसामध्यें पांच मिळवून झालेली संख्या; ४५. पंचेंद्रिय-नअव. पांच इंद्रियें. डोळे, कान, नाक, जिव्हा व त्वचा. यांचीं कामें अनुक्रमें-पहाणें, ऐकणें, वास घेणें, चव घेणें व स्पर्श करणें. पंचोतरा-पु. १ दरमहा दरशेकडा पांच टक्के व्याजाचा दर. २ शेंकडा पांच प्रमाणें द्यावयाचा कर. ३ सरकारसारा वसूल करतांना पांच टक्के अधिक वसूल करण्याचा हक्क. ४ सरकाराकरितां शंभर बिघे किंवा एकर जमीन लागवडी- खालीं आणली असतां पाटलाला पांच बिघे किंवा एकर सारा- माफीनें द्यावयाची जमीन. पंचोतरा, पंचोतरी-पुस्त्री. गव- ताच्या शंभर पेंढ्या किंवा आंबे विकत देतांना पांच अधिक देणें. पंचोपचार-पुअव. गंध, पुष्प, धूप, दीप व नैवेद्य या वस्तू व त्या देवाला समर्पण करणें. पंचोपप्राण-पुअव. नाग, कूर्म, कृकल, देवदत्त व धनंजय हे पांच उपप्राण. कूर्म अर्थ ३ पहा. पंचो- पाख्यानी-वि. १ (पांच प्रकरणांचे पंचोपाख्यान नांवाचा विष्णु- शर्म्याचा नीतिपर एक ग्रंथ आहे त्यावरून) अनेक कथा, संदर्भ, उदाहरण, दृष्टांत इ॰ नीं परिपूर्ण. २ कल्पित; विलक्षण; अद्भुत. ३ अभद्र; शिवराळ (स्त्रिया संबंधीं योजितात). पंच्याऐशी- पंच्याशी-वि. ८५ संख्या. पंच्याण्णव-वि. ९५ संख्या. पंच्याहत्तर-वि. ७५ संख्या.
हात
पु. १ हस्त; बाहु; खांद्यापासून बोटांपर्यंत शरीराचा भाग. कोपरापासून बोटांपर्यंतचा भाग. २ कोपरापासून मधल्याबोटाच्या टोकापर्यंतचें माप. 'हा पंचा साडेचार हात भरला.' ३ उजवी किंवा डावी बाजू, तरफ. 'आमचें घर वाड्याचे उजव्या हातास आहे.' ४ ताबा; आटोका; अधिकार; खातें. 'तुझें काम करणें माझ्या हातीं नाहीं.' (कारक विभक्तींत प्रयोग). ५ स्वतः व्यक्तिगत मनुष्य. 'अपराधावांचून शिवी देणें हें माझ्या हातानें घडणार नाहीं.' ६ स्वामित्व; कबजा; मालकी; ताबा. 'साप्रंत माझ्या हातीं पैसा नाहीं.' ७ हातानें वाजविण्याच्या वाद्यावर मारलेली हाताची थाप. ८ डाव; खेळ (काठी, लाठी, पट्टा इ॰ शस्त्रांचा). 'पट्ट्याचे दोन हात करून दाखव.' ९ कर्तृत्वशक्ति; अंग; हस्तकौशल्य (एखाद्या विषयांतील, कलेंतील). 'त्याचा चित्र काढण्याचा हात चांगला आहे.' १० कुलुपाची किल्ली; चावी. 'कुलवाचा हात इकडे दे बघूं.' ११ सोंगट्या, पत्ते इ॰ खेळांतील डाव, खेळण्याची पाळी, खेळ; खेळणारा गडी. 'अजून आमच्यांतील एक हात खेळवयाचा आहे.' १२ हस्तक; मदतनीस; साहाय्यक; हाताखालचा मनुष्य. १३ ज्यावर दंड, जोर काढावयाचे तो लांकडी, दगडी ठोकळा; हत्ती १४ (रंग देणें, सारवणें इ॰ कामीं) वरून हात फिरविणें; हातानें दिलेला थर, लेप. १५. ठोंसा; तडाखा; हस्तक्रिया (भिन्नभिन्न प्रसंगीं त्या त्या अर्थांनीं) १६ (तेली-घाणा) कातरीस जोडलेला वांकडा लाकडी तुकडा. १७ हात टेकावयासाठी, हातानें धरावयाचा कोणताहि पदार्थाचा भाग. 'खुर्चींचे-रहाटाचे-हात. १८ हाताच्या आका- राची कोणतीहि वस्तु. १९ (सोनेरी) हातांतील दागिना सैल करण्याचें एक हत्यार. २० (नृत्य) दोन हातांनीं मिळून करा- वथाचे अभिनयाचे प्रकार. हे ४० प्रकारचे आहेत. २१ (शिंपी) कापड मोजण्याचें बारा तसूंचें एक माप; गज. २२ पान्हा (नट- बोलट फिरविण्याचा). [सं. हस्त; प्रा. हत्थ; हिं. गु. हाथ; ब. हात; आर्में. जि. हथ, अथ; पॅलेस्टाईनजि. हस्त; पोर्तुंजि. बस्त] म्ह॰ १ हात ओला तर मैत्र भला-नाहींतर पडला अबोला- जोपर्यंत माणूस दुसर्यास देत असतो तोंपर्यंत त्याच्याशीं सगळे मित्रत्वानें वागतात. २ हात घशांत घातला तरी कोरडाच = कितीहि मदत केली तरी बेइमान राहणारा. ३ हातपाय रोड्या, पोट लोड्या; हातपाय काड्या, पोट ढेर्या = पोटाचा तटतटीतपणा व अवयवांचा रोडकेपणा. ४ हात फिरे तेथें लक्ष्मी फिरें, तोंड फिरे तेथें अवदसा फिरे = उद्योगी माणसाचा हात श्रीमंती आणतो तर नुसत्या बडबड्याच्या हातून कांहींच होत नाहीं उलट दारिद्र्य येतें. ५ आपला हात जगन्नाथ (जगन्नाथपुरीस आपल्या हातानें वाटेल तेवढा प्रसाद घेतां येतो त्यावरून) वाटेल तेवढें व तसें घेणें; प्राचुर्य. ६ हातचें सोडून पळत्याचे पाठीस लागूं नये = जें खात्रीनें आपलें आहे (आपणांस मिळावयाचेंच आहे) तें सोडून जें अनिश्चित आहे तें मिळविण्याच्या नादीं लागूं नये. ७ हातच्या कांकणास आरसा कशाला ? (हातांतील कांकण डोळ्यानें दिसण्या- सारखें आहे, आरसा आणणें वेडेपणा) = जी गोष्ट उघड सिद्ध आहे ती दाखविण्यास पुराव्याची जरूरी नाहीं. ८ हातपाय र्हावलें काम करूं वायले = नाइलाज होणें. ९ हातपाय लुलें तोंड चुरचुरां चाले = अशक्त पण तोंडाळ, मुजोर माणूस. १० हातभर लांकूड नऊ हात ढलपी = अतिशयोक्ति करणें. ११ हातांत नाहीं अडका बाजारांत चालला धडका = जवळ कवडीं नाहीं पण डौल बादशहाचा. (वाप्र.) ॰आंखडणें-देण्यासाठीं पुढें केलेली वस्तु एकदम मागें घेणें; देण्याचें प्रमाण कमी करणें, बंद करणें. ॰आटोपणें-मारणें इ॰ हातांनीं करावयाची कोणतीहि क्रिया बंद करणें. ॰आवरणें-१ हात आटपणें. २ कोणत्याहि कृत्यापासून परावृत होणें. 'ऐकेल वचन माझें आवरिल द्वेषिकाळ हात रणीं ।' -मोकर्ण ४६.४४. ॰इचकणें-(व.) हात मोडणें. ॰उगारणें-उचलणें-(एखा- द्यास) मारावयास प्रवृत होणें. ॰उचलणें-१ स्वयंस्फूर्तीनें, आपण होऊन बक्षीस देणें. २ हातीं घेणें (काम, धंदा). ॰ओढविणें- १ घेण्यासाठीं झांप टाकणें. २ विटंबना, करण्यासाठीं तुच्छता दर्शविण्यासाठीं तोंडापुढें हात करणें. ॰ओंवाळणें-तुच्छता दर्शविणें. ॰करणें-१ लाठी मारणें; शस्त्राचा वार करणें. हात टाकणें. 'स्त्रीचे अंगावर हात करूं नये.' २ पट्टा, बोथाटी वगैरेचे डाव करणें; फिरविणें. ३ वादविवाद, युद्ध करणें. ॰कापून-देणें- गुंतणें-लेखी करारकरून स्वतःस बांधून देणें. ॰खंडा असणें- एखादें कार्य (हुन्नर) हमखास पार पाडण्याचें कौशल्य, पटाईत- पणा अंगीं असणें. ॰गहाण ठेवणें-उजवा हात देवास वाहून कोणत्याहि कामीं त्याचा उपयोग करावयाचा नाहीं असा नवस करणें. २ कोणत्याही कामास हात न लावणें. ॰घालणें-१ (एखादें काम) पत्करणें; करावयास घेणें. २ एखादी वस्तु घेणें, धरणें, शोधणें यासाठीं हात पुढें करणें. 'मग विभु वसनासी त्याचिया हात घाली ।' -आनंदतनय. ३ (एखाद्या कामांत, व्यवहांरांत) ढवळाढवळ करणें; आंत पडणें. ॰घेणें-(पत्त्यांचा खेळ) हुकूम मारून अगर भारी पान मारून दस्त करून घेणें. ॰चढणें-प्राप्त होणें. 'अनुताप चढविया हात । क्षणार्धं करी विरक्त ।' -एभा २६.२०. हाताचा आंवळा-मळ, हातचें कांकण-उघडउघड गोष्ट; सत्य. ॰चा मळ-अत्यंत सोपें कृत्य; हात धुण्यासारखें सोपें काम; अंगचा मळ. ॰चालणें-१ हातांत सत्ता, सामर्थ्य, संपत्ति असणें, मिळविणें, मिळणें. १ एखादी गोष्ट करतां येणें. 'कशिद्यावर माझा हात चालत नाहीं.' ॰चाल- विणें-हत्यार चालविणें (संरक्षणार्थ). 'न्यायाच्या अभावीं ज्याला त्याला हात चालवावेसें वाटणें रास्तच होईल.' -टि १. २२. ॰चेपणें-लांचाचे पैसे मुकाट्यानें एखाद्याचे हातांत देणें. ॰चोळणें-फार राग आला असतां तळहात एकमेकांवर घासणें; कुंठितगति होऊन स्वस्थ बसावें लागणें. 'शल्य सुयोधन वाक्यें कोपे चोळी करें करा...।' -मोकर्ण २१.१३. ॰जोडणें-१ नमस्कार, प्रार्थना, विनंति करणें. २ शरण जाणें, येणें. 'अपराध फार केले परि आतां हात जोडिले स्वामी ! ।' -मोआर्याकेका. ३ नको असलेला पदार्थ हात जोडून आर्जवानें दूर सारणें; अव्हे- रणें. 'दानश्री त्याहुनि बहु दुग्धासहि हात जोडितो मीन ।' -मोबृहद्द ८. ॰झाडणें-१ झिडकारणें; नापंसत ठरविणें. २ निराशेनें सोडून देणें. ३ एखादें काम उरकून मोकळें होणें. ॰टाकणें-१ पोहतांना पाण्यावर हात मारणें. २ (एखाद्यावर) प्रहार करणें; मारणें. 'बायकोमाणसाच्या अंगावर हात टाकणें तुम्हाला शोभत नाहीं.' ॰टेकणें-१ काम करण्यास असमर्थ असल्यानें पराभव पावल्याचें कबूल करणें. २ म्हातारपणानें अशक्त होणें. ३ दमणें; थकणें; टेकीस येणें. ॰तोडणें-स्वतःच्या लेखानें आपणांस बांधून घेणें. ॰थावरणें-हात आवरणें; आटो- पणें. '...थावरूनि हातरणीं ।' -मोस्त्री ६.५१. ॰दाखविणें- दावणें-१ हस्तसामुदिक जाणण्यासाठीं जोशापुढें तळहात करणें. २ अहितकारक परिणाम करणें. ३ स्वतःची शक्ति, सामर्थ्य दाख- विणें. 'शक्रादि देव असते तरि त्यांसहि दावितोंचि हात रणीं ।' -मोभीष्म ३.४. ४ नाडीपरीक्षा करण्यासाठीं वैद्यापुढें हात करणें. ५ हातानें एखादी वस्तु दर्शविणें. ६ बडवून काढणें; पारिपत्त्य करणें; सूड घेणें; उट्टें काढणें. म्ह॰ हात दावून अवलक्षण चिंतणें, करणें. ॰दाबणें-लांच देणें. 'त्यानें आपल्यास मदत करावी म्हणून त्याचे हात दाबावे असें एकदां मनांत येतें.' -विवि १०. ९ २१०. ॰देणें-१ मदत करणें; तारणें. 'घडतां अधःपतन मज पुण्यें देतिल न हात परिणामीं ।' -मोआदि १९.३२. २ चोरणें; उचलेगिरी करणें. ३ खाद्यापदार्थावर ताव मारणें. ४ (बायकी, छप्पापाणी) छप्पू घातलेल्या मुलीस इतर मुलीनीं (तिनें उठावें म्हणून) हस्तस्पर्श करणें. ॰धरणें-१ अडविणें; हरकत करणें; स्पर्धा करणें; बरोबरी करणें. २ लांच देणें. ॰धरून जाणें- विवाहित स्त्रीनें एखाद्या परपुरुषाबरोबर पळून जाणें; जाराबरोबर निघून जाणें. ॰धुणें-(ल.) एखाद्या कामांतून आपलें अंग काढून घेणें. ॰धुवून पाठीस लागणें-एखाद्या नाश करण्याविषयीं हट्टानें प्रवृत्त होणें; चिकाटी धरून एखाद्याचा पाठलाग करणें. ॰न बनणें-(व.) विटाळशी होणें; गुंता येणें. ॰नाचविणें-चेष्टा करण्यासाठीं दुसर्याचे तोंडापुढें हातवारे करणें. हात ओवाळणें पहा. ॰पडणें-१ एखादें काम अनेकांनीं लागून संपविणें; एखादा खाद्यपदार्थ अनेकांनीं एकसमयवच्छेनेंकरून फन्ना करणें. २ (ना.) जिवंतपणीं भेट नाहीं पण दहनापूर्वी तरीं प्रेताचें दर्शन होणें. ॰पसरणें-भीक मागणें. ॰पाय खोडणें-१ अवयव आंख- डणें; विव्हल होणें. २ एखाद्यास प्रतिबंध, अडचण करणें. ॰पाय गळणें-गाळणें-१ अशक्त होणें; रोडावणें. २ खचून जाणें; नाउमेद होणें; गलितधैर्य होणें. ॰पाय गुंडाळणें-१ अंत- काळच्या वेदनांनीं हातपाय आंखडणें; कियाशक्ति रहित होणें. २ हरकत, अडथळा करणें. ॰पाय चोळणें-१ सूड घेण्याची प्रतिज्ञा करणें; चरफडणें. २ रागानें तरफडणें; शिव्याशाप देणें. ॰पाय झाडणें-१ हातपाय गुंडाळणें अर्थ १ पहा. २ सुटकेसाठीं हातापायांचा उपयोग करणें. ३ धडपड करणें; चरफडणें. ॰पाय ताणणें-सुखानें, निष्काळजीपणानें हातपाय पसरून पडणें. ॰पाय धोडावप-(गो.) आटापिटा करणें. ॰पाय पसरणें- १ हातपाय गुंडाळणें अर्थ १ पहा. २ मर्यादेच्या, आटोक्याच्या बाहेर जाणें; जास्त जास्त व्याप वाढविणें; पसारा वाढविणें. म्ह॰ भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी. ३ काम होत नसल्यास सबबी सांगणें; कामांत आळस करणें (काम करीन असें वचन दिलें असतां). ४ मागणी वाढत जाणें, अधिकाधिक आक्रमण करणें. ॰पाय पाखडणें-अंतकाळच्या वेदनेनें, फार संतापानें हातपाय झाडणें. ॰पाय पांघरून-पोटाळून बसणें-आळशा- सारखें बसणें; जेठा मारून बसणें. ॰पाय फुटणें-१ उधळपट्टी सुरू होणें; संपत्तीला (जाण्यास) पंख फुटणें. 'दौलतीला अलीकडे हातपाय फुटुं लागले आहेत.' ३ लुच्चेगिर्या करण्यांत तरबेज होणें. २ थंडीनें हातपायास भेगा पडणें. ॰पाय फोडणें-लावणें- फुटणें-लागणें-१ मूळ गोष्टींत, अंदाजांत भर घालणें; वाढ विणें. २ नटविणें; थटविणें; अलंकृत करणें. ३ मागून वाढविणें (काम, दर, खर्च इ॰). ४ लबाड्या इ॰ नीं सजवून उजळून दाखविणें. ॰पाय मोकळे करणें-फेरफटाका करून हातपाय सैल, हलके करणें; फिरणें; सहल करणें. ॰पाय मोडणें-मोडून येणें-टाकणें-१ तापापूर्वीं अंग मोडून येणें; निरंगळी येणें. २ बलहीन, निःसत्त्व करून टाकणें; हरकत घेणें. ॰पाय सोडणें -अंतकाळच्या वेदनांनीं हातपाय ताणणें, ताठ होणें. ॰पाय हालविणें-उद्योग, परिश्रम, कष्ट इ॰ करणें; स्वस्थ न बसणें. ॰पोचणें-कृतकृत्य होणें (ढुंगणाला हात पोंचणें असा मूळ प्रयोग). ॰फाटणें-रुची वाढणें. 'जेथें जिव्हेचा हातु फाटे ।' -ज्ञा १८.२४९. ॰फिरणें-लक्ष जाणें; व्यवस्थित ठेवण्याची काळजी घेणें; साफसफाई करणें. ॰फेरविणें-१ लहान मुलास प्रेमानें कुरवाळणें. 'प्रेमें मजवरुनि हात फिरवूनी ।' -मोउद्योग १३.१८३. २ पुन्हां उजळणी, उजळा देणें. ॰बसणें-१ एक- सारखें लिहीत, वाचीत इ॰ राहणें. २ अक्षरांचें वळण बसणें; तें पक्कें होणें. ३ एखादें काम उत्तम प्रकारें करतां येणें; मनांत ठसणें; विशिष्ट क्रिया करण्याची सफाई हातास प्राप्त होणें. ॰बांधणें-१ मर्यादा घालणें; स्वैर होऊं न देणें. २ अडथळा आणणें. ॰बोट लावणें-भार लावणें-मदत करणें. ॰भिजणें-१ दक्षणा देणें; (गो.) हात भिजविणें. २ लांच देणें; हात ओले करणें. ॰मारणें-१ बळकाविणें (पैसा इ॰) देणें. २ अधाशीपणानें खाणें; ताव मारणें. ३ एखाद्या वस्तूवर विविध क्रिया करणें. ॰मिठ्ठीला येणें-(माण.) हाताहातीं होईपर्यंत भांडणें. ॰मिळविणें-१ घाव घालणें. 'तस्कारानें जलदीकरून हात मिळविला जाऊन ।' -ऐपो ३९०. २ (कुस्ती) सलामी घेणें. ॰मोडणें-१ असहाय्य, मित्रहीन होणें. २ मिळत असलेली देणगी, बक्षीस नाकारणें. ॰राखणें- कुचराई करणें. ॰राखून खर्च करणें-काटकसरीनें खर्च करणें. ॰लागा ना-(गो.) विटाळशी होणें. ॰लावणें-मदत करणें. ॰वसणें-क्रि. हस्तगत होणें. 'ते ज्ञाननिष्ठा जेथें हातवसे ।' -ज्ञा १८.१२४८; -भाए २४०. ॰वहाणें-१ हत्यार चालविणें. 'परि परमप्रिय अर्जुन त्यावरि याचा न हात वाहेल ।' -मोउद्योग १२.५४. २ प्रवृत्त होणें; कार्य करणें. ॰वळणें-१ सराव, परि- पाठ इ॰ नें हातास सफाई येणें. २ (एखाद्या गोष्टीस, कृत्यास) प्रवृत्त होणें. ॰सैल सोडणें-सढळपणें खर्च करणें. ॰सोडणें-१ पूर्वीप्रमाणें कृपा, लोभ न करणें. २ संगति. ओळख सोडणें. ॰हातांत देणें-लग्न लावणें. 'एखाद्या तरुणीचा हात माझ्या हातांत दे.' -भा ४९. ॰हालवीत येणें-काम न होतां रिकामें परत येणें. हातणें-क्रि. सारवणें. हाताखालीं घालणें-देख. रेखीखालीं, अंमलखालीं, कबज्यांत, ताब्यांत घेणें. हातां चढणें- प्राप्त होणें. 'जरी चिंतामणी हातां चढे ।' -ज्ञा ३.२३; -एभा १०.२८२. हाताचें पायावर लोटणें-आजची अडचण उद्यां- वर ढकलणें; आजचें संकट लांबणीवर टाकणें. हाताचे लाडू होणें-खरजेनें हाताच्या मुठी वळणें, त्या न उघडणें. हाताच्या धारणेनें घेणें-मारणें; बुकलणें. हातांत कंकण बांधणें- एखाद्या गोष्टीची प्रतिज्ञा करणें; चंग बांधणें (यजमानानें यज्ञ करावयाच्या पूर्वी हातांत दीक्षासूत्र बांधण्याच्या चालीवरून). हातांत हात घालणें-१ लांच देणें. २ मैत्रीच्या भावानें वागणें, प्रेम करणें. ३ विवाहसंबंध घडवून आणणें. ४ विवाहित स्त्रीनें परपुरुषाशीं संबंध ठेवणें; निघून जाणें. हातातोंडाशीं गांठ पडणें-१ घास तोंडांत पडणें; खावयास सुरुवात करणें; जेवणा- खेरीज इतरत्र लक्ष न जाणें. २ एखाद्या कार्यास घाईनें आरंभ होणें. ३ बोंब मारणें. हातातोंडास येणें-१ तारुण्यावस्था प्राप्त होणें (लग्न झालेली स्त्री, तरुण मुलगा इ॰). २ फल देण्याच्या स्थितीस येणें. हातापायांचा चौरंग होणें-पेटके वगैरेमुळें हातपाय आंखडणें. हातापायांचे डगळें होणें- पडणें-मोडणें-अशक्तपणानें अंगास कंप सुटणें; अंग शिथिल होणें. हातापायांचे ढीग पडणें-होणें-भीतीनें, आजारानें अशक्त असहाय्य होणें. हातापायांच्या फुंकण्या होणें- अशक्ताता, निर्बलता येणें. हाता(तीं) पायां(यीं) पडणें- १ गयावया करणें; प्रार्थना करणें. २ शरण जाणें; नम्र होणें; दया याचिणें. हाताबोटावर येणें, हातावर येणें-आतां होईल, घटकाभर्यानें होईल अशा स्थितीस येणें; हस्तगत कबज्यांत, साध्य होण्याच्या अगदी बेतांत असणें. हाताला चढणें-प्राप्त होणें. 'संसार कशाचा जरि न हाताला चढली ।' -राला ११२. हाताला येईल तें-जें कांहीं हातांत सांपडेल तें; ज्याचेवर हात पडेल तें. हाताल लागणें-गमावलेल्या, फुकट गेलेल्या, नासलेल्या, बिघडलेल्या वस्तूंतून अल्प अंश मिळणें. 'कापडांत पैसें घालूं नका, त्यांतून हाताला कांहीं सुद्धां लागणार नाहीं.' हाताला वंगण लावणें-लांच देणें. -राको १३३७. हाताला हात लावणें-१ पति पुण्याहवाचनादि धर्मसंस्कारास बसला म्हणजे पत्नीनें त्याच्या हातास नुसता हात लावणें (म्हणजे तिलाहि त्याचें फळ मिळतें). २ स्वतः कांहीं न करतां दुसर्यानें केलेल्या कामाच्या फळांत वांटेकरी होणें; दुस- र्याच्या कार्याला अनुमति देणें. हातावर असणें-पूर्णपणें साध्य असणें. हातावर घेणें-आणणें-काढणें-तारण, गहाण न ठेवतां पैसे उसनें आणणें, काढणें, घेणें. हातावर तुरी देणें-देऊन पळून जाणें-हातावर हात देऊन-मारून पळणें-पळून जाणें-फसविणें; डोळ्यादेखत फसवून पळून जाणें; देखत देखत भुल- विणें. 'सुभद्रा काबीज करण्यासाठीं श्रीकृष्ण परमात्म्याच्या मदतीनें बलिरामाच्या हातावर ज्या तुरी दिल्या... तें पाहून तरी आम्हांस कधीं विषाद झाला आहे काय ?' -आगर. हातावर दिवस काढणें-लोटणें-मोठ्या कष्टानें संसार चालविणें. हातावर धरणें-हातांवर संभाळीत राहावयास लावणें (मुलीनें). 'यानें मला सकाळपासून हातावर धरिलें.' हातावर पाणी पडणें- भोजनोत्तर आंटवणें. 'हातावर पाणी पडलें कीं चालला बाहेर.' हातावर पिळकणें-लांच देणें. हातावर पोट भरणें-संसार करणें-अंगमेहनत, भिक्षा, नौकरी करून उपजीविका करणें. हातावर मिळविणें-मिळवावें व खावें अशा स्थितींत राहणें. हातावर येणें-जवळ येऊन ठेपणें. हातावर येणें-लागणें- दूध देऊं लागणें-थानास वासरूं न लावतां किंवा पान्हवण (सरकी इ॰) पुढें न ठेवतां जनावरानें दूध देणें, पान्हवणें. हातावर शीर घेऊन असणें-कोणतेंहि धाडसाचें कृत्य कर- ण्यास सदां सिद्ध असणें. हातावर हात चोळणें-रागानें तळ- हात एकमेकांवर घासणें; चरफडणें. 'इंद्रें स्वतातघातक पाठीसीं घातला म्हणोनि करें । कर चोळी...' -मोआदि ७.४०. हाता- वर हात मारणें-१ एखादी गोष्ट, सट्टा इ॰ पटला म्हणजे दुस- र्याचे हातावर आपला हात मारणें. २ वचन देणें. हातास हात लावणें-(देणार्याच्या, घेणार्याचे हातास स्पर्श होणें) द्रव्यलाभ होणें. हातास-हातां-हातीं चढणें-प्राप्त होणें. 'तो किल्ला माझ्या हातीं चढला.' 'नवनींत मंथनावांचून । हातां न चढे सहसाहि ।' हातीं धरणें-१ स्वतःच्या देखरेखीखालीं घेणें; एखाद्यास आपल्या आश्रयाखालीं घेणें. २ निरंकुशपणें मोकाट सोडणें (जीभ, तोंड, पोट इ॰ इंद्रियें). हातीं धोंडे घेणें-१ विरुद्ध उठणें. २ वेड्यासारखें करणें. हातींपायीं (अन्न इ॰) डेवणें-धावणें-येणें-रेवणें-जाड्य, सुस्ती येणें; शिव्या देण्यास तयार होणें. हातींपायीं उतरणें-सुटणें-मोकळी होणें-सुखरूपपणें बाळंत होणें हातींपायीं पडणें, लागणें- अतिशय विनवण्या, काकुळत्या करणें. हातीं भोपळा घेणें- देणें-भिक्षा मागणें, मागावयास लावणें. आडव्या हातानें घेणें-१ चोरून; चोरवाटेनें घेणें. २ झिडकारणें; भोसडणें; तुच्छता दाखविणें; कचकावून खडकाविणें; मारणें. आडव्या हातानें घेणें, चारणें-बाजूनें, तोंडांत हात घालून खाऊं घालणें; औषधोपचार करणें (घोडा इ॰स). (देणें-चोरून देणें-मारणें- मागल्या बाजूनें मारणें-ठोकणें). एका हाताचीं बोटें पण सारखीं नाहींत-सारख्या परिस्थितींतील माणसें असलीं तरी त्यांच्यांत थोडाफार फरक असतो. दोहों हाताचे चार हात करणें-होणें-लग्न करणें, होणें या हाताचे त्या हातावर- क्रिवि. ताबडतोब; जेव्हांचे तेव्हांच (दुष्कृत्याची फेड लवकर व खात्रीनें मिळते या अर्थीं). या हाताचें त्या हातास कळूं न देणें-अत्यंत गुप्तपणें करणें. रिकाम्या हातानें-जरूं- रीच्या साधनां-उपकरणां-सामग्रीखेरीज; कांहीं काम न करतां. याचा हात कोण धरीसा आहे ? -याच्या वरचढ, बरो- बरीचा कोण आहे ? याचा हात धरण्याची शक्ति कोणास आहे ? हातांत काय तागडू मिळाला-(व) कोणता फायदा झाला ? हातांत नारळाची आई (नरोटी) देणें-भिक्षा मागावयास लावणें. सामाशब्द- ॰अनार-पु. शोभेच्या दारूचा एक प्रकार. ॰इंद-न. (कों.) खेंकडे पकडण्याचें जाळें. ॰उगावा-पु. १ एखाद्या किचकट, अडचणीच्या कामांतून, धंद्यांतून अंग काढून घेणें. २ सूड; पारिपत्य. (क्रि॰ करणें). ३ कर्जाची उगराणी; घातलेलें भांडवल परत मिळविणें. [हात + उगवणें] ॰उचल-स्त्री. १ पेढींतून स्वतःची रक्कम आतां थोडी मग अशा रीतीनें खर्चण्यास घेणें. २ मूळ भांडवल; मुद्दल. उचल मध्यें पहा. ॰उचला-वि. १ आप- खुषीनें, हात उचलून दिलेला (पदार्थ). २ ज्याचा स्वतः करण्याबद्दल पत्कर घेतला आहे असा (व्यवहार, उद्योग). ॰उसना-ना-वि. थोडा वेळ उसना घेतलेला; लवकर परत करण्याच्या बोलीनें आणलेला (त्यामुळें लेख इ॰ लिहून न घेत दिला-घेतलेला). ॰उसणें-नें-न. थोड्या मुदतींत परत कर- ण्याच्या बोलीनें (लेख करून न देतां) उसनी घेतलेली रक्कम. ॰कडी-स्त्री. हातांतील बेडी. 'मन सिंतरील विवेकासीं । यालागी हात कडिया दोहींसीं ।' -एभा २३.९५१. ॰कर- वत-पुस्त्री. हातानें चालविण्याची लहान करवत. ॰करवती- स्त्री. लहान हात करवत. ॰करीण-स्त्री. अचळाला हात लावतांच (वासरूं न सोडतां किंवा आंबोण न ठेवतां) पान्हा सोडून दूध देणारी गाय; म्हैस. इच्या उलट पान्हावणकरीण. ॰कापें-न. (गो.) लांडी, बिन बाह्यांची बंडी. ॰काम-न. हस्तकौशल्याचें काम (यांत्रिक कामाच्या विरुद्ध); हस्तव्यवसाय. (इं.) हँडफ्रॅक्ट. ॰कैची-कचाटी- स्त्री. आलिंगन; मिठी. ॰खंड-वि. १ मधून मधून कामांत सोडवणूक करणारा; मदतनीस (मूल, मित्र, शेजारी); अडल्या वेळीं आपल्या कामीं उपयोगी पडणारा. २ हात खंडा पहा. [हात + खंड = खळ, विसावा] ॰खंडा-वि. निष्णात, करतलामलकवत् असलेली; म्हणाल त्यावेळीं तयार (विद्या, कला). ॰खर्च-पु. किरकोळ खर्च; वरखर्च. ॰ख(खं)वणी- स्त्री. लहान खवणी. ॰खुंट-खुंटा-पु. (विणकाम) वशारन पसरलेल्या लांबीपाशीं असलेल्या समोरच्या खांबापासून मागा पाशीं बसण्याच्या जागेजवळ उजवीकडे दोरी बांधावयाची खुंटी. ॰खुरपणीचें लोणी-न. हातखुरप्या नारळाचें खोबरें. ॰खुरपा-वि. हातानेंच आंतील खोबरें खरवडून काढण्याजोगा (कोंवळा नारळ). ॰खुरपें-न. १ हातखुरपा नारळ. २ गवत काढण्याचा लहान विळा. ॰खे(खो)रणें-न. कलथा; उलथणें; झारा. (क्रि॰ लावणें-अन्नास, पैक्यास = पैका उकळण्याचा सपाटा). म्ह॰ हातखेरणें असतां हात कां जाळावा. ॰खेवणें-न. १ हातवल्हें. २ मदतनीस; हाताखालचा माणूस. ॰खेव्या-व्या-पु. हातखेवणें अर्थ २ पहा. ॰खोडा-पु. हात अडकविण्याचा सांपळा. 'चंद्रसूर्याचा हातखोडा । काळा कैसेनि घालिजे ।' -भाए ५४९. ॰गाडी-स्त्री. हातानें ढकलून चालविण्याची गाडी. ॰गुंडा-धोंडा-पु. १ हातानें फेकण्या-उचलण्या-जोगा दगड. 'कुश्चीतभावाचे हातगुंडे ।' -ज्ञाप्र २६५. २ असला दगड हातानें जेथवर फेंकला जाईल तितकें अंतर. ॰गुण-पु. (बरेंवाईट करण्याचा योग, गुण) नशीब; हातीं (काम, माणूस) धरणाराचा प्रारब्धयोग. हस्तगुण पहा. ॰घाई-स्त्री. १ हातानें वाजवावयाचें वाद्य जोराजोरानें, आवेशानें वाजविणें. २ (ल.) उतावळेपणा; जोराची हाल चाल. (क्रि॰ हातघाईवर, हातघाईस येणें-मारामारी करणें). ॰चरक-पु. १ हातानें फिरवून रस काढावयाचा चरक. २ हात घाणी. ॰चलाख-वि. चोर; उचल्या. ॰चलाकी-खी-स्त्री. हस्तचापल्य; लपवाछपवी; नजरबंदीचा कारभार (गारुडी, सराफ इ॰ चा). ॰चाळा-पु. १ हाताचा अस्थिरपणा; चुळबुळ; हातानें कांहीं तरी उगीच करीत रहावें अशी लागलेली खोड; हातचेष्टा. (क्रि॰ लागणें). २ अशा प्रकारानें होणारें नुकसान. (क्रि॰ करणें). ३ सदोदित हात गुंतलेला असणें; त्यांत निमग्न असणें (वाढता धंदा, व्यापार, खेळ इ॰ त); देवघेवीचा मोठा उद्योग. ॰चिठी-चिटी-ट्टी-स्त्री. १ अधिकार्यानें शिक्का- मोर्तब न करतां आपल्या हातच्या निशाणीनेंच पुरी केलेली चिठी, हुकूम. २ कोणाहातीं पाठविलेली चिठी-चपाटी. ॰चे हातीं- च्या हातीं, हातोहातीं-किवि. लेगच; ताबडतोब; आतांचे आतां; क्षणार्धांत पटकन् (करणें, घडणें). 'ही गडी हाताचे हातीं जाऊन येईल.' 'हाताचे हातीं चोरी-लबाडी-शिंदळकी' इ॰. ॰चोखणें-चुंफणें-न. तान्ह्या मुलास चोखण्यासाठीं हातांत देण्याची वस्तु. ॰जतन-स्त्री. हातानें केलेली मशागत (मालीस इ॰); रोज वक्तशीर घेतलेली काळजी. 'हा घोडा नुसत्या हातजतनानें इतका हुशार आहे.' ॰जुळणी-स्त्री. (ठाकुर) लग्न लागल्यानंतर मुलानें मुलीचे दोन हात धरणें. -बदलापूर १३८. ॰झाड-स्त्री. आपोआप उगवलेलें नसून मुद्दाम लाविलेलें झाड. ॰झाडणी-स्त्री. राग, तिरस्कार इ॰ नें हात झटकणें. ॰झालणा-पु. हातजाळें; हातविंड. ॰झोंबी-स्त्री. परस्परांचे हात धरून केलेली झटापट; हिसकाहसकी; झगडा. ॰तुक-न. १ हातानें वजन करणें. 'नव्हती हाततुके बोल ।' -तुगा ३४२३. २ अटकळ; अजमास. 'मग त्यागु कीजे हात- तुकें ।' -ज्ञा १८.१३१. ॰दाबी-स्त्री. लांच. 'मालकानें हात- दाबी केली म्हणजे माल त्यांना परत देतात.' -गुजा ६७. ॰धरणें-न. (खा.) सोधणें; स्वयंपाकघरांतील भांडीं उतरणें इ॰ चें फडकें. ॰धरणी माप-न. माप भरतांना त्याचे शेवटास डावा हात धरून, मापापेक्षां थोडें जास्त धान्य घेऊन केलेलें माप. बोटधरणी माप पहा. ॰धुणी-स्त्री. १ राजाच्या हात- धुणारास दिलेलें इनाम इ॰. २ स्वयंपाकघरांतील मोरी. ॰धोंडा- पु. १ हातानें उचलण्याजोगा धोंडा. २ धोंडा हातानें फेंकला असतां जेथवर जाईल इतकें अंतर; टप्पा. ॰नळा-पु. हातांत धरून सोडण्याचा, शोभेची दारू भरलेला नळा. ॰नळी-स्त्री. चपटें कौल. ॰निघा-गा-हातजतन पहा. हातजपणूक. ॰नेट- क्रिवि. १ (व.) हाताचा जोर, भार देऊन. २ (व.) हाता- जवळ. ॰पडत-पात-वि. हातीं असलेलें; अगदीं जवळ असणारें; लागेल त्यावेळीं ताबडतोब मिळणारें. ॰पहार-स्त्री. हातभर लांबीची पहार. ॰पा-हातोपा-पु. अंगरखा इ॰ ची बाही. ॰पाटिलकी-स्त्री. १ हातानें ठोकणें; चोपणें, बदडणें. तोंड- पाटिलकीचे उलट. २ बोलण्यापेक्षां प्रत्यक्ष कृति, काम. 'तोंड- पाटिलकी सगळ्यांस येते हातपाटिलकी कठीण.' ३ हस्तचापल्य; उचलेगिरी. ॰पाणी-न. १ लग्नांत रासन्हाणीचे वेळीं वधूच्या सासूनें तिचे हातांवर ओतावयाचें पाणी. (क्रि॰ घालणें). २ लग्नांत मांडव परतण्याचे दिवशीं सासूनें सुनेची बोहोल्यावर ओटी भरून, किंवा मांडवांत न्हातेवेळीं नवर्यानें केशरी रंगांत बुडवून तिचे हातांत घालवयाची अंगठी. ३ लग्नांत मुलाच्या हाताखालीं मुलीचा हात ठेवून त्यांवर समंत्रक पाणी घालणें. -बदलापूर २०५. ॰पान-पु. कोंका पडण्यापूर्वींचें केळीचें पान. ॰पान्हा- पु. हातकरीण गाय, म्हैस इ॰ नें सोडलेला पान्हा (वासरूं किंवा अंबोण दाखविल्याशिवाय). हातपान्ह्यास लगाणें, येणें, हातपान्ह्याची गाय इ॰ प्रयोग. ॰पालवी-स्त्री. हात पोंहो- चेल इतक्या उंचीवरील पाला. ॰पावा-वि. (कों.) हाताच्या आटोक्यांतील, हात पोहोंचेल इतक्या उंचीवरील (वेलीचें फूल इ॰ किंवा खोली-विहिरींतील पाणी इ॰). [हात + पावणें] ॰पिटीं-स्त्री. १ झोंबाझोंबी; गुद्दागुद्दी. २ (ल.) हातघाईची मारामारी. 'तंव राउतां जाली हातपीटी ।' -शिशु ९६८. [हात + पिटणें] ॰पेटी-स्त्री. हातानें भाता चालवून वाजवावयाची बाजाची पेटी; हार्मोनियम. २ सरकारी कामाचे कादगपत्र ठेवण्याची पेटी. -स्वभावचित्रें २४. ॰पाळी-स्त्री. चेंडूफळीचा एक प्रकारचा खेळ. -मखेपु ५६. ॰फळ-न. (बे.) मेर ओढण्याचें फळ. ॰फळी, हातोफळी-क्रिवि. हातोहातीं; लवकर. ॰बळ-न. हस्तसामर्थ्य. 'हातबळ ना पायबळ, देरे देवा तोंडबळ.' ॰बांधून डंकी-स्त्री. (कुस्ती) जोडीदारास खालीं आणल्यावर त्यानें आपला एक पाय धरला तर आपण दुसर्या पायानें जोडीदाराचे पाठीवरून झोंका घेऊन उडी मारून त्यास चीत करणें. ॰बेडी-स्त्री. कैद्याच्या हातांत अडकवावयाची बेडी; हातकडी. ॰बोनें-न. हातांत घेत- लेलें भक्ष्य. 'बुद्धीचेनि शाकें । हातबोनें निकें ।' -ज्ञा ६.२८२. ॰बोळावन-स्त्री. हातांनीं मार्गाला लावणें. 'जाणो नेदी योग्यता । ग्रहीं हातबोळावन करितां ।' -भाए ३४९. ॰भाता-पु. हातांत घेऊन फुंकावयाचा भाता; लहान भाता. ॰भार-पु. मदत; साहाय्य (विशषतः द्रव्याचें). (क्रि॰ लावणें). ॰भुरकणा- भुरका-वि. हातानें भुरकून खावयाजोगा (पेयपदार्थ). ॰भुर- कणें-भुरकें-वरील प्रकारचा पातळ पदार्थ. ॰भेटी-स्त्री. प्रेमानें हातांत हात घालणें. -एभा २८.५९२. ॰मांडणी-स्त्री. पैसे पावल्याची पोंच म्हणून पैसे नेणार्याची खतावणीवर घेतलेली सही. ॰मात-स्त्री. हात टेकणें. ॰मेटी हेटीमेटी-क्रिवि. आळसांत; निरुद्योगीपणानें; हातांवर व गुडघ्यावर टेकून रमतगमत (दिवस इ॰) घालविणें. 'दिवस गेला हातमेटीं चांदण्या खाली कापूस वेटी.' ॰रगाडा-पु. उसाचा हातचरक. ॰रवी-स्त्री. घुसळखांब, मांजरी यांचे विरहित हातानेंट फिरविण्याची लहानरवी. ॰रहाट- पु. हातानें ओढून पाणी काढण्याचा लहान रहाट. ॰रिकामी- स्त्री. विधवा स्त्री. -बजलापूर १७४. ॰रिती-वि. (महानु.) रिकामी विधवा. -स्मृतिस्थळ. ॰रुमाल-पु. १ तोंड वगैरे पुसण्याचा लहान रुमाल. २ नित्योपयोगी कागदपत्रें ठेवण्याच्या दप्तराचा रुमाल; चालता रुमाल; त्यांतील कागदपत्रांचें बंडल. ॰रोखा- पु. दस्तक; चिठी; आज्ञापत्र. 'पाराजीपंत वाघ यांस हातरोखा वरचेवर पाठवून अति आग्रहें अंतरवेदींत घालविलें.' -भाव १०२. ॰लाग-पु. हाताचा टप्पा. ॰लागास-लागीं येणें-असणें- कक्षा, आंवाका, आटोका, अवसान इ॰ त येणें, असणें. ॰लागा- लाग्या-वि. अनुकूल असणारा. 'तुमचे हातलागे लोक असतील.' -वाडबाबा १.६. ॰लावणी-स्त्री. १ वेश्येचा चिरा उतरणें; कौमार्यभंग. (क्रि॰ करणें). २ हाताची पेरणी; लागवण. -वि. हातपेरणीचें. ॰लावा-व्या-वि. हाताळ; चोरटा; चोरी करण्या- साठीं हात फुरफुरत असलेला. ॰वजन-न. १ जिन्नस हातांत घेऊन केलेलें वजन. २ अशाप्रकारें वजन काढण्याची लायकी. ॰वटी- हातोटी-स्त्री. १ हस्तकौशल्य; हस्तचातुर्य. २ (सामा.) कसब; नैपुण्य; चलाखी. 'अहो चंद्रकांतु द्रवता कीर होये । परि ते हात- वटी चंद्री कीं आहे ।' -ज्ञा ९.२९. ३ विशिष्ट पद्धत, रीत, प्रकार. [हिं.] भाषणाची-पोहण्याची-व्यापाराची इ॰ हातोटी. ॰वडा- हातोडा-पु. सोनार, कासार इ॰ चें ठोकण्याचें हत्यार. ॰वडी हातोडी-स्त्री. लहान हातोडी. ॰वणी-न. १ हात धुतलेलें पाणी. २ (कों.) हातरहाटाचें पाणी पन्हाळांतून जेथें पडतें तेथील जमीनीचा उंच केलेला भाग; हातणी. ॰वल्हें-न. हातानेंच वल्हवावयाचें लहान वल्हें. ॰वश-वि. हस्तगत. ॰वशी-स्त्री. हात उगारणें. -शर. ॰वळा, हातोळा-पु. हातवटी पहा. म्ह॰ गातां गळा; शिंपता मळा, लिहितां हातवळा. ॰वारे-पु.अव. हातानीं केलेलें हावभाव; हाताची हालचाल. ॰विंड-न. (राजा.) हाता झालणा पहा. ॰विरजण-न. अजमासानें घातलेलें विरजण ॰विरजा-विरंगुळा-वि. कामांत मदत करण्याच्या लायक, लायकीस झालेला (पुत्र, शिष्य, उमेदवार इ॰) [हात + विरजणें] ॰शिंपणें-न. सोडवणी न देतां शेलणें इ॰ साधनानें भाजी- पाल्यास उडवून द्यावयाचें पाणी; असें पाणी शिंपणें. ॰शेकणें-न. (उसाचा चरक) चुलाण्यांत जाळ घालणारास त्याच्या मेहनती बद्दल द्यावयाचा गूळ. ॰शेवई-स्त्री. हातानें वळलेली शेवई; याचे उलट पाटशेवई. ॰सर-न. बायकांचा हातांतील एक दागिना, गजरा. 'हे पाटल्या हातसरांस ल्याली ।' -सारुह ६.२६. ॰सार- वण-न. खराटा, केरसुणी न घेतां हातानें जमीन इ॰ सारवणें. ॰सुख-न. १ दुसर्यास, शत्रूस हातानें मारूंन त्यामुळें अनुभवि- लेलें सुख (क्रि॰ होणें). २ हातानें दिलेला मार. ॰सुटका-स्त्री. १ एखाद्या व्यवहारांतून, धंद्यांतून स्वतः अंग काढून घेणें; मोकळें होणें. २ हातविरजा पहा. ३ हाताचा सढळपणा. ॰सुटी-स्त्री. औदार्य. 'हे हातसुटीक्षीरसागरा । वांचौनि नाहीं ।' -भाए ७६९. ॰सुतकी-स्त्री. पाथरवटाचें दगड फोडण्याचें हत्यार. ॰सूत-न. चातीवर हातानीं काढलेलें सूत. ॰सोकी(के)ल-सोका-वि. हाताच्या संवयीचा; अंगाखांद्यावर घेण्यास संवकलेला. 'केल कुत्रा हातसोंका ।' 'घडो नेदि तीर्थयात्रा.' -तुगा २९५४. ॰सोडवण-नस्त्री. हातसुटका अर्थ १,२ पहा. ॰सोरा-र्या सुरा-र्या-पु. कुरड्या इ॰ करण्याचा सांचा. ॰हालवणी-स्त्री. प्रवाशांवरील एक जुना कर (त्यांच्या हात हालवण्याच्या क्रियेबद्दल हा कर असे). हातचा-वि. १ हातानें दिलेला; स्वाधीनचा; हातांतला; हातानें निर्मिलेली, मिळविलेली, दिलेली (वस्तु, काम, उत्पादन इ॰). 'शुद्राचे हातचें पाणी स्नानसंध्येस घेऊं नये.' 'रोग्यास औषध देणें मनुष्याच्या हातचें आहे-आयुष्य घालणें नाहीं.' २ (अंकगणित) पूर्णांकाची बेरीज करतांना बेरजेच्या संख्येंतला अंक ज्या स्थानाचा त्या स्थानीं मिळविण्याकरितां उरलेला अंक. (क्रि॰ येणें; रहाणें; ठेवणें). ३ लवकर हातीं येणारें; अवसानांतील. ४ ताब्यांतील; कबजांतील. म्ह॰ 'हातचें सोडून पळत्याचे पाठीस लागूं नये.' ॰चा पाडणें-१ हातां- तील सोडणें. २ एखाद्यास त्याचे ताब्यांतील वस्तू्स मुकविणें. ॰चा-धड-नीट-वि. नीटनेटकें काम करणारा (लेखक, कारागीर). ॰चा फोड-पु. फार प्रिय माणूस. तळहाताचा फोड पहा. ॰चा मळ-पु. सहज घडणारी गोष्ट. 'सरळ, सोपी आणि बालिकाबोध भाषा कशी वापरावी हें म्हणजे माझ्या हाताचा मळ आहे.' -कीच. ॰चा सुटा-वि. सढळ हाताचा. हातवा-पु. १ (बायकी) गौरीपूजनाचे सणांत हळदीकुंकवानें हात भिजवून जमिनीवर छाप मारणें. २ लग्नांत नवर्याच्या मिरवणुकीच्या मागें धरावयाचा कणकेचा दिवा. ३ घोड्याचा खरारा, साफ करण्याचा काथ्याचा पंजा. ४ काडवात मनको. ५ (कर्हाड) न्हाणवली बसवितांना, मखर बांधावयाचे ठिकाणीं, कुंकू पाण्यांत भिजवून हातानें पांच उलटे पांच सुलटे ठसें उठविणें. हातळ, हाताळ-ळु-वि. चोरण्याची संवय असलेला; चोर; भामटा. हातळणें, हाताळणें-उक्रि. १ हात लावणें; चोळ- वटणें; चिवडणें, २ हाताळ माणसानें वस्तू् चोरणें. हातळी, हाताळी, हाताळें-स्त्रीन. १ घोड्याचा काथ्या इ॰ चा खरारा. २ भात्याची बोटांत, हातांत अडकवावयाची चामड्याची वादीं. ३ (कर.) भाकरी. हाता-पु. हातांत राहील इतका जिन्नस, पसा (फळें, फुलें इ॰ पांच-सहा इ॰ संख्येचा संच एकेक वेळ हातांत घेऊन बाजूस ठेवतात). हाताखालचा-वि. १ मदतनीस; हाता- खालीं काम करणारा. २ उत्तम परिचयाचा; माहितींतील. ३ हातां- तील; कबज्यामधील; स्वाधीन. ४ दुय्यम; कमी दर्जाचा. हाता- खालीं-क्रिवि. १ सत्तेखालीं; दुय्यम प्रतींत. २ स्वाधीन. ३ जातांजातां; हातासरशीं; सहजगत्या. 'मी आपला घोडा विका वयास नेतोंच आहे, मर्जीं असली तर हाताखालीं तुमचाहि घोडा नेईन आणि विकीन.' हाताचा उदार, मोकळा, सढळ- वि. देणगी इ॰ देण्यांत सढळ. हाताचा कुशल-वि. हस्त कौशल्यांत निपुण, प्रवीण. हाताचा जड-बळकट-थंड-वि. १ चिक्कू; कृपण. म्ह॰ हाताचा जढ आणि बोलून गोड. २ मंद (लेखक). हाताचा जलद-वि. काम करण्यांत चलाख हाताचा फटकळ-वि. फटाफट मारणारा; मारकट. हाताचा बाण-पु. वर्चस्व, पगडा, वजन पाडणारें कृत्य, गोष्ट (क्रि॰ गमावणें; दवडणें; सोडणें). हाताजोगता-वि. १ हातांत बसेल; मावेल; धरतां येईल असा. २ हात पोहोचण्याजोगें. हाता- निराळा-वेगळा-वि. १ पूर्ण; पुरा; सिद्ध केलेला; पुन्हां हात लावण्याची जरूरी राहिली नाहीं असें (काम, धंदा इ॰). 'हा दुर्निवह कोश एकदां हातानिराळा झाला म्हणजे दुसरें काम घेतां येईल.' २ -क्रिवि. एकीकडे; बाजूस. 'कामापुरती भांडीं वहिवाटींत ठेवा वरकड हातानिराळीं ठेवा.' हातापद्धति-स्त्री. दलाल माल घेणार्याच्या हातावर रुमाल टाकून गुप्तरीतीनें मालाची किंमत माल घेणार्याकडून अजमावतो ती पद्धत. हाताची थट्टा-स्त्री. थट्टेंनें मारणें (थापटी इ॰); चापट देणें. (तोंडी थट्टा नव्हे्). हाता(तो)फळी-स्त्री. गुद्दागुद्दी; मारामारी; कुस्ती; हातझोंबी; धक्काबुक्की. 'मजसीं भिडे हातोफळी ।' -ह १९.१४३. -क्रिवि. पटकन्; चट्दिशी; तत्काळ; हातावर हात मारून. [हात + फळी] हातावरचा संसार-हातावरचें पोट-पुन. मजुरी, कामधंदा करून स्वतःचें कसेंतरी पोट भरणें (क्रि॰ करणें; चालविणें) थोड्या पगाराची, कष्टाची नोकरी करून उदरनिर्वाह. हातावीती- क्रिवि. हातोहात पहा. 'सर्वज्ञ हातावीती पुढें जाती ।' -पुच. हातासन-न. हातवटी. 'अन्योपदेशाचेनि हातासनें ।' -ज्ञा ६.११९. हातासरसां-क्रिवि. त्याच हातानें, प्रकारानें; तसेंच; त्याच बरोबर; चालू कामांत आहे तोंच. 'उष्टी काढतो आहेस तों हातासरशीं भांडीं घास मग हात धू.' हातिणें-अक्रि. मारणें. -मनको. हातिवा-स्त्री. काडवात. 'उजळोनि दिव्य तेजा हातिवा ।' -ज्ञा १६.२३. हातुवसीया-विय एक हात अंतरा- वरील. 'हातवसिया कळागंगा पार्वती ।' -धवळे ३१ हातोणी- स्त्री. (व.) खरकटें पाणी; हातवणी. हातोपा-हातपा पहा. हातोपात-ती-क्रिवि. एका हातांतून दुसर्या हातांत. वरचेवर; हातोहात. -ज्ञा १८.१५६. हातोरी-क्रि. (ना.) हातानें; साहा- य्यानें. हातोवा-पु. (महानु.) अंजली; ओंजळ. 'हातोवा केवि आटे अंभोनिधि ।' -भाए २१७. हातोसा-पु. मदत; हातभांर. (क्रि॰ देणें), हातोहात-ती-क्रिवि. १ हातचेहातीं; हातोपात. २ चटकन्; भरदिशीं. (क्रि॰ येणें = मारामारी करणें). 'हिंवांळ्याचे दिवसांत दुपार हातोहात भरतें.' हातोळा-हात- वळा पहा. हातोळी-स्त्री. (व.) लग्न. हात्या-पु. १ पाणर- हाटाचा दांडा. २ घोडा घासण्याची पिशवी; खरारा. हाताळी अर्थ १ पहा. ३ मागाच्या फणीची मूठ. ४ काहिलींतील गूळ खरवड- ण्याचें खुरपें. ५ (कर.) मोठी किल्ली.