मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

सूत

न. १ धागा; दोरा; तार; रेषा, तंतु (विशेषतः कापसाचा). २ (ल.) संधान; संबंध (आश्रय, आधार इ॰ चा); मार्ग; उपाय (मिळविण्याचा, संपादण्याचा, साध्य करण्याचा) नात्यागोत्याचा संबंध. ३ नासकें फळ. ४ जखम इ॰ मध्यें धाग्याप्रमाणें आढळणारा एक जंतु. ५ कापडाचें वीण- काम; वीण. ६ (ल.) समेट; स्नेहभाव; मित्रत्वाचा संबंध. ७ अगदीं थोडी लांबी दाखविणारें माप; एकअष्टामांश इंच. ८ लांकूड कापण्यासाठीं त्यावर खूण करावयाची दोरी. ९ चातुर्य; शहाणपण. [सं. सूत्र] (वाप्र.) सुताचा तो़डा-१ दोर्‍याचा तुकडा. २ (ल.) क्षुल्लक रकम, वस्तु. 'शंभर रुपये दिले त्यांपैकीं सुताचा तोडा हातीं लागला नाहीं.' सुतानें सूत लागणें-एका गोष्टीच्या शोधानें दुसरीचा शोध लागणें. सुतानें स्वर्गास जाणें-स्वर्ग गांठणें-किंचित सुगावा लागतांच त्यावरून तर्कानें एकंदर सर्व गोष्टीचें स्वरूप ओळखणें. सुतास (सूर्तीं) किंवा सुतींपातीं लागणें-सुरळीतपणें चालू लागणें; नीट व्यवस्था लागणें. सुतास-सुतीं-सुतीपातीं चालणें, लावणें-सुरळीत असणें, लावणें. ॰बांधणें-संबंध जोडणें; धागा लावणें (नातेंगोतें, मित्रत्व इ॰ चा). (मूठभर)सूत बांधणें-देणें(स्नेहदर्शक चिन्ह म्हणून एखाद्यास). पागोटें देणें. ॰असणें-स्नेहसंबंध असणें; जुळतें असणें. ॰जमणें-मैत्री जमणें. (नाकाशीं) सूत धरणें-(मरणोन्मुख अवस्थेंत श्वासो- च्छ्वास चालला आहे कीं नाहीं हें पाहण्यास नाकाशीं सूत धरतात. यावरून) मरणोन्मुख अवस्था. सूत नसणें-मैत्री नसणें. सामा- शब्द- ॰काडी-स्त्री. (कोष्टी) जिच्या भोंवतीं सूत गुंडाळलेलें असतें ती काडी; गणा; रिकांडी. सुतणें-सक्रि. वेष्टणें. -शर. ॰परमें-न. परम्याचा एक प्रकार; लघवींतून सुतासारखे जंतू जाणें ॰पाड-पु. न. सणंगाची वीण व किंमत. 'हें सणंग सुतापाडास बरें आहे.' ॰पात-पोत-पु. कापडाचें विणकाम, बनावट; वीण.

दाते शब्दकोश

सूत sūta n (सूत्र S) A thread generally; any string, wire, line, fibre, filament, but a cotton thread or cotton threads particularly and eminently. Ex. रेशमाचे सनंगापेक्षां सुताचे सनंगास ऊब फार असतो. 2 fig. A line or cord (of patronage, support &c.); a resource or means (of obtainment, accomplishment, access &c.); a line of connection with freely. 3 An animalcule or thread-like maggot or worm (as appearing in rotten fruits or sores). 4 Texture or weftage. 5 fig. Holding amicably together; good terms with. सुताचा तोडा (Bit of thread.) A term for a thing considered as of the very lowest value; a flock, straw, hair. Ex. शंभर रूपये दिल्हे परंतु त्यापैकीं सु0 हातीं लागला नाहीं; सु0 देखील कोठें घरीं राहिला नाहीं. सुतानें सूत लागणें To be traced or found by means of a clew. सुतानें स्वर्गास जाणें (To mount to the zenith upon a thread.) To apprehend, through acuteness or quickness, the whole of a subject upon obtaining the knowledge of the smallest portion of it; to tell the tune upon hearing a string sounded. सुतास or सुतीं or सुतींपातीं लागणें To come into regularity and order; to get into train and course; or under easy government or management;--used of persons, animals, business. Also सुतास, सुतीं, or सुतींपातीं चालणें To proceed or flow on in regularity and order. Also सुतास, सुतीं &c. लावणें To set or put into regularity &c. सूत बांधणें To lay, form, or establish a thread, line, or means of connection or communication with. मूठभर सूत बांधणें or देणें (Familiarly or lightly.) To give a turban.

मोल्सवर्थ शब्दकोश

सूत sūta m S A caste or an individual of it,--the offspring of a Kshatriya male with a Bráhman female. Their occupation is the management of horses and charioteering. 2 A charioteer. 3 A carpenter. 4 A bard, minstrel, professional encomiast.

मोल्सवर्थ शब्दकोश

सूत n A thread. Texture. A line. Fig. Holding good terms with. m A charioteer. A bard. p Born. सुतानें स्वर्गास जाणें To apprehend the whole on knowing the smallest portion of it. सुतास or सुतींपातीं लागणें To come into order.

वझे शब्दकोश

सूत sūta p S Born or engendered.

मोल्सवर्थ शब्दकोश

वि. जन्मलेला; झालेला. [सं.]

दाते शब्दकोश

पु. १ बाप क्षत्रिय व आई ब्राह्मण अशांची संतति अशी जात व तींतील व्यक्ति; यांचा धंदा सारथ्याचा. (त्यावरून) २ सारथी. ३ सुतार. ४ भाट; पुराणिक. [सं.] ॰उवाच- उद्गा. सगळ्या पौराणिक कथा वरील जातींतील एका पुराणिकानें सांगितल्या आहेत म्हणून प्रत्येक कथेच्या प्रारंभीं हा शब्द असतो, (यावरून) प्रारंभ करणें.

दाते शब्दकोश

(सं) सारथि. २ धागा, दोरा.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

निभावणी सूट      

१.       खेडे किंवा जिल्हा उत्कर्षाला यावा म्हणून जमाबंदीतून दिलेली पैशाची सूट. २. अडचणीच्या प्रसंगी (प्रजेला) दिलेली सूट; प्रसंगातून निभावले जावे म्हणून दिलेली सूट.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

सूट

सूट sūṭa f (सुटणें) Remission or abatement (of a debt or just claim): also the sum or matter remitted, the abatement. 2 Release from bondage; freedom granted (to a slave, bondman &c.); manumission or emancipation. 3 Space between bodies in a line or row, interval. Ex. इतकी सूट ठेवूं नको.

मोल्सवर्थ शब्दकोश

सूट f Remission. Release from bondage. Interval.

वझे शब्दकोश

स्त्री० माफी, मोकळीक.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

कोळ्याचे सूत      

१. लांब सूत. २. (ल.) लांबच लांब, नीरस व कंटाळवाणे भाषण. कोंकणा      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कोळ्याचें सूत

कोळ्याचें सूत n A long yarn; a tiresome A spider. speech.

वझे शब्दकोश

कोळ्याचें सूत kōḷyācē ṃsūta n A long yarn; a prosing, tiresome speech.

मोल्सवर्थ शब्दकोश

संबंधित शब्द

सूट

स्त्री. १ (कर्ज इ॰ तून) माफ केलेली, सोडलेली रकम. २ (गुलाम, बंदी इ॰ स) बंधनांतून मुक्तता; सुटका; सोडवणूक. ३ रांगेंत मध्यें पडणारा खंड; दोन पदार्थांतील अंतर; फट. ४ (ना.) वीर्यस्खलन. ५ (व.) वाळलेली मिरची. [सुटणें] ॰पत्र-न. सोडचिठ्ठी; सांडपत्र; सांडखत. ॰मोकळ- स्त्री. १ कांहीं काळापुरती केलेली सुटका. (क्रि॰ असणें; होणें; चालणें; भोगणें; देणें). २ कर, दस्तुरी, कर्ज इ॰ तून मिळालेली सूटरकम; सोडमोकळ. [सुटणें + मोकळें होणें] ॰साट = सांड- तूट-स्त्री. सूट अर्थ १ पहा; सूटमोकळ अर्थ २ पहा.

दाते शब्दकोश

सु(सू)त

न. १ दोरा. धागा; सूत्र. २ नाकांत (नथ- घालण्यापूर्वीं भोंक रहावें म्हणून) घालावयाचा दोरा, धागा (त्या- वरून). ३ -वि. सुताप्रमाणें सरळ, नीट. [सं. सूत्र] सुतानें चंद्राला ओंवाळणें-शुद्ध द्वितीयेच्या संध्याकाळीं भाविक लोक आपल्या वस्त्राचें सूत (दशा) काढून तें चंद्राला अर्पण करतात आणि तूं जसा पुन्हां नवा झालास तशीं आमचीं वस्त्रें नवीं होऊं दे अशी प्रार्थना करतात त्यावरून. सुतानें सुत लागणें-एका गोष्टीच्या योगानें दुसरी गोष्ट समजणें. (गो.) सुतान डोंगर खेडावप-डोंगराला सूत वेढणें. सुतानें स्वर्गास गाठंणें- जाणें-चढणें-एखाद्या गोष्टीचा यत्किंचित् अंश समजल्यानें बुद्धिप्रभावानें ती गोष्ट पूर्णपणें तर्कानें जाणणें. सुतास लागणें- सुरळीतपणें चालू लागणें. सुतासाठीं मणि फोडणें बरो- बर नाहीं-क्षुल्लक वस्तु बचावण्यासाठीं मूल्यवान वस्तूचा नाश करणें योग्य नाहीं. सुतासुतानें-लहरीनें; कलानें. ॰काडी- स्त्री. (कोष्टी) सूत गुंडाळावयाची काडी. ॰कुडें-न. (गो.) सुताचें गुडाळें. सुतड गोतड जुळणें-असणें-एकमेकांचें गुह्य जमणें; (लांबचा) संबंध असणें. ॰णें-अक्रि. १ (व.) एखाद्या वस्तूभोंवतीं सूत गुंडाळणें. २ (ल.) मारणें; ठोकणें. ॰पुती-पुतळी-स्त्री. (कर.) १ कापसाचा (जखमेवर लावा- वयाचा) मणी. २ स्त्रिया मंगलगौर, शिवामूठ इ॰ पूजेमध्यें वस्त्राकरितां विशिष्ट आकृतीचा कापूस करून वाहतात ती. ॰पोत- न. कापडाची वीण, पोत. सुतर फेणी-स्त्री. एक गुजराथी खाद्य पदार्थ. सुतरा-वि. शहाणा; धूर्त, तीक्ष्ण. सुतव(वि) णें-अक्रि. १ सुतांत गुफंणें, ओवणें; गोवणें. २ भोवतीं सूत गुंडाळणें (संक्रातीचीं सुगडे, वधुवर, पिंपळ इ॰ च्या). 'विप्रीं त्या सुतवूनियां निज करीं ते कंकणें बांधिती ।' -अकक २ सी. स्व. १०२. लग्नांतील तेलफळ, रुखवतांतील लाडू इ॰ स सूत गुंडाळणें. सुतळी(ळ)-स्त्री. सुताची जाड दोरी. ॰ळ्या लागाम-पु. एक प्रकारचा लगाम. सुताचा तोडा-पु. १ सुताचा तोडलेला तुकडा, दोर्‍याचा तुकडा. २ (ल.) कःपदार्थ; अत्यंत हलक्या किंमतीची वस्तु. सुताड पुनव-स्त्री. (गो.) श्रावणी पौर्णिमा. सुताडा-पु. कापसाच्या सुताचें विणलेलें जाड वस्त्र (लुगडें इ॰), झोर्‍या, बोर्‍या. सुताडें-न. १ (निंदार्थी) सुताडा. २ फार दूरचें नातेंगोतें, आप्तसंबंध; नात्यागोत्याचें जाळें; घरोबा; निकटचा संबंध. सुताडेंगुताडें-गोताडें- गाताडें, सुताडगुताड-१ सुताडें अर्थ २ पहा. २ दूरचे व्यापारी संबंध; एकमेकांचे गुंतागुंतीचे व्यवहार किंवा संबंध. ३ सुतांची गुंतागुंत. [सूत + गुतणें, किंवा गोत] सुतार बांधणें- (कर.) पतंगास दोरा बांधण्यासाठीं फांसी करणें. सुतारा-पु. (कोष्टी) मागाचा एक भाग; गुलड्याशीं समांतर असलेली काठी. सुती-स्त्री. १ प्रवेश, विस्तार-शर. २ (व.) एखाद्यावर दाब, वजान पाडणें; एखाद्याच्या धाकानें निमूटपणें वागणें, ऐकणें. -वि. १ कापसाच्या सुताचें केलेलें, तत्संबंधीं. २ (ल.) सरळ; नीट; बिनचूक; पद्धतशीर; चोख. ३ ओळीनें, सम पातळींत असलेलें, कुशलतेनें मांडणी केलेलें; आवांक्यांतील. ४ (संख्यावाचक शब्द जोडून समासांत) कापडाचा पोत, वीण, तलमपणा दाखविणें. जसें-एकमुती, दोन सुती, जाड सुती, बारीक सुती. सुतीव-वि. वरील अर्थ २,३, पहा. सुतेरा-पु. कोळी नांवाचा किडा व त्याचे गुदापासून उत्पन्न होणारा तंतु, दोरा.

दाते शब्दकोश

असारा, असारी      

पु. स्त्री.       (वस्त्रोद्योग) १. परता किंवा फाळका यावरून सूत उकलून ज्या कामटीच्या केलेल्या हंडीच्या आकाराच्या चक्रावर घेतात तो. यावर सुमारे एक धोक सूत उकलतात; सूत गुंडाळण्याचे चाक; त्यावर गुंडाळलेले सूत किंवा रेशीम; वळीव रेशीम.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

असारा-री

पुस्त्री. (विणकाम) १ परता किंवा फाळका (किंवा असारा) यावरून सूत उकलून ज्या कामटीच्या केलेल्या हंडीच्या आकाराच्या चक्रावर घेतात तो. यावर सुमारें एक थोक सूत उकलतात; सूत गुंडाळण्याचें चाक; त्यावर गुंडाळलेलें सूत किंवा रेशीम; वळीव रेशीम. [सं. आ + सृ-सर; द्रा. आसु = पसरणें, ताणा] ॰परती- स्त्री. पतंगाचा मांजा (दोरा) ज्यावर गुंडाळतात तें चाक.

दाते शब्दकोश

सोड

स्त्री. १ कर्ज इ॰ ची सूट; अशी सूट दिलेली रकम. २ मोकळीक देणें; अटकाव करतां जाऊं देणें; उपेक्षेची मोक- ळीक; सवलत; मुक्ताता; ३ परवानगी. ४ काडीमोड; सोडचिठ्ठी (लग्नाची). [सोडणें] ॰खत-चिठ्ठी-पत्र-स्त्री. १ सोड- णुकींचे पत्र; सांडखत; आपल्या मालकींतून सोडलेल्या (गांव, शेत, किल्ला इ॰ च्या) वस्तूच्या मोकळिकेविषयीचें आज्ञापत्र; सांड- पत्र; सूटपत्र. २ ज्यावरून कोणी मनुष्य आपला विवाहित संबंध तोडतो असा लेख. ॰धांव-स्त्री. (उद्योग धंदा) सोडून, निघून जाणें; टाकून, पळून जाणें; धरसोड करणें. ॰पेंढी- स्त्री. मोठ्या (गवत इ॰ च्या) भार्‍यांतून विक्रीसाठीं बांधलेली लहान पेंढी. ॰बांध-स्त्री. १ वरचेवर मोकळें करणें व बांधणें. २ असल्या प्रकरचा धंदा, नोकरी. 'घोड्यांची सोडबांध मजकडे होती, आंता निराळा घोडक्या ठेवला.' ॰मुंज-स्त्री. मुलाच्या उपनयनाचे वेळीं त्याचे कमरेस जी मुंज (गवताची दोरी) बांधलेली असते ती सोडण्याचा विधि; गृहस्थाश्रमांत प्रवेश करण्याची मोकळीक; समावर्तन संस्कार. ॰मोकळ-स्त्री. १ सोडून मोकळें करणें (गवताचा भारा इ॰). २ काम इ॰ ची साधारण मोकळीक; सोडवणूक; पशु, नोकर इ॰ वर फारसा दाब न ठेवणें. (क्रि॰ करणें; देणें). ३ कर्ज; सारा इ॰ पैकीं कांहीं रकम सोडून देणें. ४ सोडमोकळीक; विसकटलेली; मोकळीक दिलेली, विसाव्याची, फुरसतीची स्थिति. ॰वण-वणी-वणूक- स्त्री. १ मुक्तता; मुक्त होणें; मुक्ततेची स्थिति; मोकळीक; स्वतंत्रता; सुटका. २ मुक्ततेचा कोणताहि उपाय. ३ पळवाट; छिद्र; अपवाद. ४ सोडवणी; मळ्यांतील पाटांतून वहाणारें पाणी (शेलण्यानें शिंपडलेलें नव्हे). ॰व(वि)णें-१ जाऊं देणें; सुटे असें करणें; मोकळें करणें; बंधमुक्त करणें. २ कांहीं प्रसंगीं भिंतीवर चित्रें, रांगोळी, आकृति; प्रतिमा इ॰ काढणें; रेघोट्या ओढणें. ३ मालकाडून काढून घेणें. ४ गूढ, उखाणा इ॰ उक- लणें. ५ (गणित) प्रश्नाचें बरोबर उत्तर देणें. ॰वून ठेवणें- हातचा राखून ठेवणें; पळवाट काढून ठेवणें; सुटण्याच्या उपा- याची तरतूद पूर्वींच करून ठेवणें. ॰सांड-स्त्री. कर्ज इ॰ ची सूट; या सुटीची रकम. सोडण-न. १ (कों.) नारळाचें चोड; नारळावरील तंतुमय आवरण. २ (ल.) हट्टी; चिकट माणूस. सोडणी-स्त्री. १ सोडवणूक. २ (ल.) मोक्ष. -ज्ञा १८.४४. सोडणूक-स्त्री. १ मुक्तता. २ ताटातूट; वियोग; संबंध सोडणें. ३ जाऊं देणें. ४ पळवाट; सुटण्याचा मार्ग. सोडणें-उक्रि. १ मोकळें करणें; खुलें करणें; बंधन, करार यांतून मुक्त करणें; वचक, घोटाळा, त्रास; संकट यांतून वांचविणें. २ वेगळें, विभक्त होणें; ताटातूट करणें; गांठ, बंधन इ॰ खुलें करणें; उलगडणें;संबंध, जोडणी, मांडणी इ॰ विजोड करणें. ३ सामन्यतः जाऊं देणें; असूं देणें; राहूं देणें; सूट (कर्ज, दोष) देणें; सोडून देणें; हात काढून घेणें; मुक्त, सहन, माफ, क्षमा करणें; शरण येणें; टाकणें; फेकणें; ओतणें; गाळणें; निथळणें (घाम, इ॰); शिलगाविणें (तोफ, बंदूक इ॰); सुटणें पहा. ४ धावविणें; पळविणें; दमविणें (घोडा, इ॰). ५ कोणत्याहि धातूच्या ऊन प्रत्ययांत रूपापुढें हें क्रियापद योजल्यास ती क्रिया पूर्णपणें करणें असा अर्थ होतो. टाकणें पहा. उदा॰ करून सोडणें; देऊन सोडणें इ॰ ६ प्रगट करणें. 'विश्वविकासित मुद्रा । जया सोडी तुझी योगनिद्रा ।' -ज्ञा १७.१. म्ह॰ (व.) सोडला तर पळतो, धरला तर चावतो (साप). दुष्टाशीं निकट संबंध ठेवल्यास आपली इज्जत घेतो, न ठेवल्यास तो शेफारतो. [सं. छोरणम्]

दाते शब्दकोश

चात      

स्त्री. न.       १. सूत कातण्याच्या चरख्याला लावलेला एक भाग, त्यावर सूत गुंडाळले जाते. हाताने गरगर फिरवून सूत काढण्याचे साधन. २. सोनाराची भोके पाडण्याची लोखंडी सळई, सामता; भोके पाडण्याचे साधन. ३. चातीच्या आकाराचा लांबट मळसूत्रासारखे करवे असलेला शिंपला, शंख. [सं. कृत्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

माफ

वि. क्षमा केलेला; क्षांत; सोडलेला (अपराध, अप- राधी, कर्ज, एखादें येणें). (क्रि॰ करणें; होणें). [अर. मुआफ्] माफी-स्त्री. १ क्षमा; सूट. २ (माळवी) दानरूपानें दिलेली जमीन अगर पैसा. [अर. मुआफी] ॰चिठ्ठी-स्त्री. जकात माफ असल्याबद्दलचा दाखला, चिठ्ठी, पत्र. [हिं.] ॰जमीन-स्त्री. साऱ्याची सूट मिळालेली जमीन. हिचे दोन प्रकार आहेत- एक अजी माफ आणि दुसरा अपूर्ण माफ. [हिं.] ॰साल-न. लाग- वडीस आणण्याच्या जमिनीवरील शेतसाऱ्याची सूट मिळालेलें वर्ष. 'माफीसाल गुदरल्यानंतर धारा पडेल.' [अर. मआफ + फा. साल] माफीचा साक्षीदार-पु. (कायदा) गुन्हा माफ करून इतर आरोपीविरूद्ध साक्षीदार केलेला आरोपी इसम.

दाते शब्दकोश

निभावणी, निभावणूक

स्त्री. १ टिकाव धरणें; तगणें; पार पडणें; निभाव; संकटांतून पार पडणें; बचाव; निर्वाह. निभावणी जामीन-पु. इनाम दिलेल्या जमिनीची लागवड योग्य प्रकारें केली जाईल म्हणून दिलेली हमी, जामीन निभावणी सूट-स्त्री. १ खेडें किंवा जिल्हा उत्कर्षाला, भरभराटीला यावा म्हणून जमाबंदींतून दिलेली पैशाची सूट. २ अडचणीच्या प्रसंगीं (प्रजेला) दिलेली सूट; प्रसंगांतून निभावलें जावें म्हणून दिलेली सूट. [निभाविणें]

दाते शब्दकोश

पा(पां)जणी-नी

स्त्री. १ पाणी पाजणें. ३ शस्त्र इ॰कांस धार लावण्याची क्रिया. ३ विणावयाचें सूत बळकट होण्याकरितां त्यास खळ लावण्याचा, पाजण करावयाचा संस्कार. 'ऊर्ण तंतु- चिया विणवणी । करौनि चंडवाताची पाजनी ।' -ज्ञाप्र ६४८. 'साड्याही नौपटीच्या कतिपय लुगडीं जे नवे पाजणीचीं ।' -सारुह ३.४१. 'पाजणीच्या यंत्राची अडचण दूर झाली असतां लहान कारखाने उपयोगी पडतील.' -टि ३.३.५४. ४ नवें सूत, वस्त्र इ॰कास लावण्याची खळ; पाजण. ५ (ल.) खळ लावून विणण्या- करितां मागावर लावलेलें सूत. [पाजणें]

दाते शब्दकोश

सूटसाट, सूटसांड, सूटतूट

सूटसाट, सूटसांड, सूटतूट sūṭasāṭa, sūṭasāṇḍa, sūṭatūṭa f Formations, the first by reduplications from सूट, the second by composition with सूट & सांड, the third with तूट, expressing the first sense of the word सूट with implication of generalness or indefiniteness. 2 By speciality. Remission or release (in matters of toll or duties).

मोल्सवर्थ शब्दकोश

तलम

वि. १ बारीक व मृदु (सूट इ॰). २ बारीक विणीचें, व मृदु सुताचें; फार पातळ (वस्त्र इ॰). ३ नाजूक; सुकुमार; पोशाखी (प्रकृति इ॰). [?] सामाशब्द- ॰सुती-वि. तलम सुताचें; बारीक विणीचें (कापड, धोतरजोडा इ॰) [तलम + सूत] -माई- स्त्री. (कापड, सूत इ॰ कांचा) बारीकपणा; तलमपणा; तलमपणा. [तलम]

दाते शब्दकोश

दोर

पु. १ काथ्या, वाक, अंबाडी, ताग इत्यादि झाडांच्या सालीचे लांब तंतू. २ (राजा.) केळ, अंबाडी, भेंडी इ॰ कांच्या सालीची किंवा तंतूची वळलेली दोरी. ३ (ल.) नसलेलें दहीं, गूळ इ॰ मधील तार, तार येण्याची अवस्था; चिकटण. [सं. दोरक; प्रा. दे. दोर; हिं. दोर; फ्रेंजि. दोरी] दगडाचे दोर काढणारा-वि. युक्तिवान्; उद्योगी. दोरक-पु. १ शिवण्याचा दोरा. २ दोर अर्थ १ पहा. दोरखंड; दोरी. [सं.] ॰कस-पु. १ गाडी, मोट इ॰ नां बांधावयाचा दोर; नाडा; चर्‍हाट. २ बारीक दोरी. -न. एकत्र बांधलेल्या पुष्कळशा दोर्‍या. ॰खंड-न. १ जाड दोर; सोल. २ दोराचा तुकडा. ३ कालाचा(केळीच्या गाभ्याचा) तंतु. ॰खंडें-नअव. गलबताचे दोर; जाड दोर.॰गुंडापु. सालींचें किंवा दोरोचें भेंडोळें (शाकारण्याच्या कामीं उपयोगी). दोरडेंन. (कों.) १ जाड किंवा मोठा दोर; दोरखंड. २ (निंदार्थीं) दोराचा तुकडा (वाईट, निरुपयोगी दोरासंबंधीं योजतात). दोरणी-स्त्री. दोरी. दोरत्व-न. दोरपणा; दोर असण्याची स्थिति. 'दोरत्व दृष्टि अचळ झालें ।' -सिसं ९.९७. दोरवा-पु. १ अंगांत उभ्या जाड रेघा असलेला कपडा; कापडाचा एक प्रकार. २ (कों.) तडा; चीर; भेग; दगड इ॰ कामध्यें असणारा दोरा. ॰दोरा-पु. १ सूत (शिवण्याचें); वळीव, पिळदार सूत. २ तडा, भेग. दोरवा अर्थ २ पहा. ३ (ल.) लहान झरा; झिरण. 'या विहिरीस तळ्याचे दोरे आहेत.' ४ (ल.) जोड; संबंध; आप्तपणा; धागा- दोरा. 'हे जर आमचे जातीचे असतील तर यांचा आमचा कांहीं तरी दोरा असेल.' 'त्या दरबारांत आमचा कांहीं दोरा होता म्हणून जातांच पाय शिरकला.' ५ (ल.) गुप्त कारस्थान. 'हळूच लावले सारे दोरे ।' -ऐपो २५१. ६ नारूचा किडा; तंतु. ७ वृषणापासून शिश्नापर्यंतचें सूत्र. ८ (पदार्थ इ॰ च्या) शरीरास लागलेल्या किडीचा मार्ग; किडीच्या संचाराची रेषा. ९ गोगलगाई- सारख्या चिकट द्रव टाकणार्‍या प्राण्याची उमटलेली रेषा. १० एक प्रकारची बांगडी, दागिना. 'वेगळें निघतां घडीन दोरेचुडा ।' -तुगा २९५९. ११ (ना.) पोटांतील आंतडी [दोर] ॰वंजणें-(चांभारी धंदा) दोरा, घांसणें. [वंजणें = चोपडणें] दोरावणें-अक्रि. १ दोरा रेषा, शिरा, तड असणें (लांकूड, धोंडा, माती इ॰ मध्यें). २ दोराळ, चिकाळ होणें; तंतु सुटणें (नासलेला पदार्थ, तिंबलेली कणीक इ॰ मध्यें). दोराळ-वि. (राजा.) दोरमय; तंतुमय. (गरा, दहीं इ॰). दोरी-स्त्री. १ बारीक दोरा. २ जमीन मोजणीचें एक परि- माण. २० परतन, ८० किंवा १२० बिघे. ३ एक लहान मासा. ४ (सोनारी-सुतारी धंदा) चाचा एक अष्टमांश भाग; सूत. [दोर] ॰सैल देणें-सोडणें-ढिली करणें-लगाम, ताबा, नियम इ॰ ढिला करणें; स्वतंत्रता देणें. ॰सूत-क्रिवि. सरळ; ओळंब्यांत; सरळ रेषेंत. (क्रि॰ जाणें; असणें). 'हा मार्ग येथून दोरीसूत पुण्यास जातो.'

दाते शब्दकोश

बारीक

वि. १ सूक्ष्म; ज्याची जाडी कमी आहे असा; पातळ; कृश (खांब, शरीरावयव सूत इ॰) २ एकंदरींत आकारानें लहान असलेला (दाणा; सुपारी, लवंग, डोळा इ॰) ३ तलम सूत असलेलें (वस्त्र इ॰) तलम, पातळ (कण, अवयव) जाड भरड नसलेलें (पीठ इ॰). ४ (ल.) गुप्त; गूढ (बातमी). ५ (ल.) 'श्रीमंत स्वामींची बहुतच मर्जी बारीक जाली आहे.' -रा १.२२८. [फा. बारीक्] म्ह॰ (व.) बारिकगळी सकनयळी = फार हळू बोलणार्‍या सुनेला सासू असें म्हणते. ॰कातणें- १ हिशेबांत किंवा वागण्यांत फार बारकाईनें पाहणें; कांटेकोरपणानें वागणें; फाजील चोखपणा करणें. २ अत्यंत कृश किंवा किडकिडीत होणें. (एखाद्यावर) बारीक कातणें-गोड गोड बोलून फस- विणें; दयालुत्वाचा व सभ्यतेचा आव आणून एखाद्याला बुडविणें, त्याचा नाश करणें. ॰पहाणें-पैसे किंवा खर्च यांकडे फार बार- काईनें पाहणें; खर्चाच्या अगदीं क्षुल्लक किंवा किरकोळ गोष्टींकडे लक्ष पुरविणें; चिक्कूपणा करणें. ॰कुटाळ-वि. सभ्यपणाचा आव आणून निंदा करणारा; धूर्तपणानें व गुप्तपणानें बालंट घेणारा; आळ घालणारा (उपरोधिक बोलण्यानें). ॰कुटाळी-स्त्री. गुप- चुपपणें घेतलेलें बालंट. ॰जोर-पु. (गो.) क्षयरोग. [बारीक + सं. ज्वर] ॰दृष्टि-नजर-स्त्री. (ल.) फाजिल हिशोबी पाहणी; चिक्कूपणा. ॰निरीक-सारीक-शिरीक-वि. किरकोळ; बारीक. [बारीक द्वि.] ॰मोठा-वि. बारीक आणि मोठा; कांहीं बारीक कांहीं मोठा. ॰रडणें-रडें-न. हळू आवाजानें रडणें; मुसमुसणें; मुळुमुळु रडणें. ॰राव-पु. काडीपहिलवान; सडपातळ कृश मनुष्य. ॰साय, साण-पु. (गो.) चौकसपणा; सूक्ष्म दृष्टि. ॰हंसणें, हंसें-न. स्मित करणें; गालांतल्या गालांत हसणें; मोठा आवाज न करतां हसणें.

दाते शब्दकोश

चात

पुस्त्रीन. १ सुत काढण्याचा चाकाचा जो गरगर फिरणारा अवयव, भाग असतो तो; ज्यावर सुत गुंडाळले जातें ती सळई, सुई. चात चातीपेक्षां मोठा असून तो रहाटाला जोड- लेला असतो. परंतु चाती ही स्वतंत्रहि फिरकीसारखी वाटोळी व हातानें सूत काढण्यास उपयोगी अशी चकती असते. २ सोना- राची भोकें पडण्याची लोखंडी सळई, सामता; भोक पाड्याचें साधन. ३ चातीच्या आकाराचा लांबट मलसूत्रासारखें करवें असलेला शिंपला, शंख. [प्रा. दे. चत = सूत काढण्याचें साधन; तुल॰ सं. तुर्कू; सं. कृत् = सुत कांतणें]

दाते शब्दकोश

चाती      

स्त्री.       १. धातूचा वाटोळा व चपटा तुकडा, चकती. २. वजन म्हणून उपयोगात येणारी (शिसे इत्यादीची) वाटोळी चकती. ३. लाटण्यासाठी केलेली पिठाची वाटोळी दामटी; एखाद्या पदार्थाची थापटी, वडी, चकती, लाटी. ४. सूत काढण्याच्या चरख्याचे चाक; चकतीला मधोमध भोक पाडून त्यात दांडा घालून केलेले यंत्र, टकळी, ५. सूत भरलेली सुताची कांडी; बॉबीन. ६. (मानस) मानवी शरीरात पेशी विभाजनाच्या क्रियेत, पेशीकेंद्राच्या बाहेर एखाद्या नळीसारखा परंतु मध्यभागी फुगीर असा जो आकार तयार होतो त्याला चाती म्हणतात. ७. (विअ.) यंत्राचा स्वतःभोवती फिरणारा लांबट नळीसारखा भाग.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चाती

स्त्री. १ छाप मारून नाणें पाडण्यासाठीं (सोनें, रुपें, तांबे या धातूचा) केलेला वाटोळा व चपटा तुकडा; चकती. २ वजन म्हणून उपयोगांत येणारी (शिसें इ॰ ची) वाटोळी चकती. ३ लाटण्यासाठीं जी वाटोळी वर्तुळाकार दामटी; एखाद्या पदार्थाची थापटी, वडी, चकती, लाटी. ४ सूत काढण्याच्या रहाटाचें चाक; त्या चाकाचा लोखंडी दांडा; सुत काढण्यासाठी, पीळ देण्यासाठीं पैशाला किंवा धातूच्या चकतीला मधोमध भोक पाडून त्यांत दांडा घालून केलेले यंत्र; टकळी. ५ सूत भरलेली सुताची कांडी; बॉबीन. [प्रा. दे. चत्त; मं. चात पहा]

दाते शब्दकोश

स्त्री० सूत काढण्याचें साधन.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

चरखा

पु. सूत काढण्याचें यंत्र, रहाट. [फा. चर्खा; सं. चक्र] ॰कारागिरी-स्त्री. चरख्यावर सूत काढण्याची कला. 'हिंदुस्थानची प्राचीन चरखाकारागिरी कशी बुडाली याबद्दल ऊर बडवावा.' -नाकु ३.१६.

दाते शब्दकोश

दोरा      

पु.       १. सूत (शिवण्याचे); वळीव, पिळदार सूत. २. तडा; भेग. ३. (ल.) लहान झरा; झिरण. ४. (ल.) जोड; संबंध; आप्तपणा; धागादोरा. ५. (ल.) गुप्त कारस्थान : ‘हळूच लावले सारे दोरे ।’ – ऐपो २५१. ६. नारूचा किडा; तंतू. ७. वृषणापासून शिश्नापर्यंतचे सूत्र. ८. (पदार्थ इ.ला) लागलेल्या किडीचा मार्ग; किडीच्या संचाराची रेषा. ९. गोगलगार्इसारख्या चिकट द्रव टाकणाऱ्या प्राण्याची उमटलेली रेषा. १०. एक प्रकारची बांगडी, दागिना : ‘वेगळें निघतां घडीन दोरेचुडा ।’ – तुगा २९५९. ११. पोटातील आतडी. (ना.) [सं.दोरक]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

धेडीसूत

न. पूर्वी बाजारांत धेड लोकांनीं कांतलेलें सूत विकावयास येत असे त्यास म्हणत. [धेड + सूत]

दाते शब्दकोश

गर्भसुती      

वि.       ताणा (उभे सूत) सुताचा व बाणा (आडवे सूत) रेशमाचा असे (वस्त्र).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जु(जुं)पण-णी

स्त्री. १ जुंपण्याची क्रिया. २ जुंपणी. ३ जुंपण्याचा सोईस्करपणा, योग्यता; संवगड्याशीं जुळतें असणें. 'ह्या बैलाची त्या बैलाची जुंपण आहे.' ४ (कु.) बैलास बांधण्याची दोरी. -न (राजा.) गाडीची धुरी; इसाड व जूं याना बांधणारी दोरी. २ जाड, मजबूत पदरांची-दुपेडी तिपेडी दोरी. ३ (विण- काम) मागाच्या दुसर्‍या टोकाजवळचें सूत ताणणारें धनुष्याकृति लाकूड; ह्या लाकडानें व गुलड्यानें हें सूत ताणलें जातें. गुलडा पहा. ॰जु(जुं)पणें-उक्रि. १ जोडणें. २ (ल.) गुंतविणें; कामास लावणें, लागणें. ३ प्रारंभ करणें; व्यवस्था लावून देणें (काम, उद्योग, इ॰ ची). ४ प्रवृत्त होणें (युद्ध, वाद इ॰स); सुरू होणें. 'त्याची बोलतां बोलतां अकस्मात लढाई जुंपली.' [सं. युज्; प्रा. जुप्प] -न. १ जुंपण अर्थ ३ पहा. २ (विणकाम) कापड विणून झाल्यावर उरणारीं एक ताण्याचीं शेवटें दुसर्‍या कापड विणावयाच्या ताण्यास जोडण्याचे साधन. ३ (ल.) उत्पत्ति; रचना. 'जै पहिलें सृष्टीचें जुंपणे ।' -ज्ञा १४.५७. ४ बैलाच्या गळ्यांतील दोरी; जोखडाचा पट्टा;, दोरी; जुवणी, जुंवाली पहा. [सं. युज्; प्रा. जुप्प]

दाते शब्दकोश

झुळकी

वि. (क.) आलवणी रंगाचें आडवें सूत व कुंकवा- सारख्या भडक रंगाचें उभें सूत घालून विणलेलें अशा रंगाचें (लुगडें). 'झुलकी रंगाचें लुगडें लवकर विकतें.'

दाते शब्दकोश

झुळकी      

वि.       आलवणी रंगाचे आडवे सूत व कुंकवासारख्या भडक रंगाचे उभे सूत घालून विणलेले (लुगडे). (कर.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कांडी

स्त्री. १ वेखंड, सुंठ, आलें, हळद इ, चीं मुळें व तुकडा; मोड; अंकूर; ऊंस वगैरेंचीं पेरें. २ त्या आकाराचा धातूचा लांबट तुकडा. ३ वस्त्र विणण्यासाठीं ज्या काडीला सूत गुंडाळलेलें असतें ती काडी. ४ (विणकाम) धोट्याच्या आंतील दोर्‍याचें गुंडाळें, बाबीण; धोठ्यामध्यें बसेल अशा लांकडी अगर बोरूच्या तुक- ड्यावर भरलेल्या सुताची गुंडाळी. ५ लसणीचा गड्डा. ६ (गो.) चंदनाचें खोड. 'गंधा कांडी बरी वासाची आसा.' ७ (कों. नाविक) दोन्ही रोजांस सांधणारे व दोन्ही रोजांसहित भागाचें लांकूड, हा गलबताचा पाया होय. या लांकडास वरच्या अंगास दोन्ही बाजूंस खांचा पाडून त्यांत फळ्या बसवितात. ८ (छाप- खाना) फर्मा ठोकतांना पान (पेज) व सामान (फर्निचर) हें चौकटीला आंवळून बसण्याकरितां ठोकावयाचा लांकडाचा तुकडा. [सं. कांड] -चें लांकूड-धोट्यांतील सूत ज्या बोरूच्या कांडीवर गुंडाळतात ती, गन्या. ॰पिरगाळणें-फिरविणें-गारुडी आपल्या हातांतील लांकडाची लहान काठी आपल्या डाव्या हाताभोंवतीं अथवा अंगाभोंवतीं फिरवितो ती. (यक्षिणीची) कांडी फिरविणें-चमत्कार घडवून आणणें, अवचित एकादी गोष्ट घडवून पूर्वीं घडलेल्या कृत्याच्या उलट घडून येणें.

दाते शब्दकोश

कौल

पु. १ वचन; आश्वासन; अभय २ जमिनीची लाग- वड करण्यास किंवा व्यापार करणार्‍यास सरकार जें अभयपत्र, करार, कबुलायतीचा कागद देतें तो. हा जमाबंदींतील नेहमीचा शब्द आहे. मालक, सरकार किंवा जमीनदार कुळाला ज्या कांहीं सवलतीच्या अटी देतो किंवा त्याच्याशीं जे करार करतो त्यांस कौल म्हणतात. कौल केल्यानंतर सारा इ॰ वाढत नाहीं. पडीत जमिनीबद्दल सार्‍याची सूट घेण्याकरितां कौल देण्यात येतो; सरकारी करारनामा; कबुलायत; कौलनामा. 'तुम्हांस चि. रा. माधवराव नारायण याचा कौल.' -रा १२.१३७. -शिच ४५. 'बंदरोबंदरीं कौल पाठवून आमदरफ्ती करावी.' -मराआ २१. ३ परवाना; अभयपत्र (शत्रूला आपल्या प्रांतांतून जाण्यासाठीं दिलेलें); माफी देणें; सूट देणें. 'दगेखोर गनीम आपण जर झालों असें जाणून दगाबाजीनें कौल घेतो, म्हणून जवळ बोलावूं नयें.' -मराआ ३६. ४ ईश्वरी वचन; ईश्वराची आज्ञा मिळविणें; प्रश्न; साक्ष; प्रसाद; देवाजवळ गार्‍हाणें सांगूण त्यावर अमुक उपाय करावा किंवा नाहीं हें विचारतांना देवाच्या अंगास लावावयाचे तांदूळ, सुपार्‍या इ॰; देवाची संमति. 'इंद्रियांचे पेटे भला कौल देती ।' -तुगा ४०८. 'या मनोदेवतेस कौल लावावा.' -गीर १२३. [अर. कौल्. सर्व भाषांतून थोड्याफार अपभ्रंशानें आला आहे] (वाप्र.) कौलास येणें-शरण येणें; तह करण्यास कबूल होणें. 'झालें मोंगल बेजार मरूं लागले, आले कौलाला ।' -ऐपो २३६. सामाशब्द - ॰अहद-पु. वचन; कौल. 'त्यावरून म्यां त्याजला कौलअहद दिधला.' -रा ६.५७०. [कौल् + अहद] ॰करार-पु. लेखी करारमदार; कबुली; ठराव; वचन; आश्वासन; अटींना संमति. [कौल + करार] ॰करारदाद-पु. वचन. 'हज्रतसाहेबाचा तरी कौलकरारदाद आपल्यास आहे कीं तुमचे जागीरपैकीं एक चावर कसोदगी करणें नाहीं.' -इम ६७. ॰नामा-पु. १ सरकारनें शेतकर्‍याला करून दिलेलें करारपत्र; लेखी करार; कबुलायत. २ (कायदा) भाडे- पट्टा. (इं.) लीज. ॰पत्रक-न. कमी सार्‍यानें ज्या जमिनी केल्या त्यांचा हिशेब. (गांवचा). ॰प्रसाद-पु. १ (कों.) गुर- वानें देवतेचें अनुमोदन मिळविण्याकरतां तिच्या अंगाला लाव- लेले कळे, फुलें वगैरे खालीं पडून प्रश्न विचारणारास दिलेलें उत्तर अथवा प्रसाद. २ कौल मागतांना लावलेलीं फुलें वगैरे. कौल अर्थ ४ पहा. (क्रि॰ लावणें; लागणें).

दाते शब्दकोश

कोळी

पु. १ एक जात व तींतील माणूस. हे मासे पकड- ण्यांत पटाईत असतात. हे मासे विकण्याचा व नावाड्याचा धंदा करतात. याच जातींतील दुसरे लोक डोंगरांत, अरण्यांत राहून शिकार व चोरी करून उदरनिर्वाह करतात. प्राचीन ग्रामसंस्थेंत कोळ्या- कडे पाणी पुरविण्याचें काम असे; धीवर. ही एक गुन्हेगार जात समजली जाते. पण त्यांच्यापैकीं फक्त महादेवकोळी (राजकोळी) व गुजराथकोळी याच दोन पोटजाती गुन्हे करतात. २ कोळी नांवाचा किडा; हा आपल्या अंगांतून सूत काढतो व त्याचें जाळें बनवितो. [प्रा. कोलिअ] ॰ण-स्त्री. १ कोळी जातींतील बाई. २ कोळी किड्याची मादी. ३ शिमग्याच्या सणांत कोळ- णीचें सोंग आणतात त्यांत स्त्रीवेषांत नाचणारा पुरुष. ॰लांकडी- स्त्री. जंगलांतून तोडून आणलेल्या लांकडावरील कर, दस्तुरी. ॰वडा-पु. कोळवाडा पहा. ॰ष्टक-न. कोळशीट; कोश. ॰कोळ्याचें सूत-न. १ लांब सूत. २ (लांबच लांब, निरस व कंटाळवाणें भाषण.

दाते शब्दकोश

कोरडिके, कोरडीक, कोरडुके, कोरडूक, कोरुडके, कोरुडगे, कोडके, क्वाडका, क्वाडके      

न.       १. अडसर, अडचण (गज, दाराचे कुत्रे, कुसे, तसेच कुळव, पाभर यांचे एले किंवा कोयंडा याचे कुसू). २. अर्धगोल किंवा अंतर्गोल लाकडी मणी, पुली. (यातून दोर ओढून घेऊन शेतकीची अवजारे बांधतात.) दोर तुटू नये म्हणून ही बांधतात. ३. सूत काढण्याच्या रहाटाला बसविलेले (कण्याच्या शेवटी) एक लाकडी चाक. या चाकाला एक बोट जाईल असे भोक असून त्यात बोट घालून ते फिरविले असता रहाट फिरतो. ४. सनगर लोकांचे बिनचाकाचे सूत उलवण्याचे साधन; कोरीटक. (को.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कोरडिकें-डीक, कोरडुकें, कुरडूक, कोरुडकें-रुडगें, कोडकें, काडका-कें

न. १ अडसर; अडकण (गज, दाराचें कुत्रें, कुसें, तसेंच कुळव, पाभर यांचे एलें किंवा कोयंडा याचें कुसूं). २ अर्धगोल किंवा अंर्तगोल लांकडी मणी, पुली (यांतून दोर ओढून घेऊन शेतकीचीं अवजारें बांधतात.) दोर तुटूं नये म्हणून हीं बांधतात. ३ सूत काढण्याच्या रहाटास बसवि- लेलें (कण्याच्या शेवटीं) एक लांकडी चाक. या चाकाला एक बोट जाईल असें भोंक असून त्यांत बोट घालून तें फिरविलें असतां रहाट फिरतो. ४ सनगर लोकांचें बिन चाकाचें सूत उलव- ण्याचें हत्यार. (कों.) कोरीटक. (वरील तिन्ही अर्थ वस्तुतः एकच आहेत परंतु स्थलपरत्वें त्याचे तीन भेद मानतात.) याचीं भिन्न भिन्न रूपें आढळतात. [का. कोरडु]

दाते शब्दकोश

कर्तन

न. १ छेदन; कापणें; कातरणें; कातरकाम. २ (विण- काम) सूत कातणें; सूत काढणें. ३ (शिंपी) कापडाचें कातरकाम; बेतकाम. (इं.) कटिंग [सं. कृत्] कर्तनीय-वि. कापण्यास, कातरण्यास, छाटण्यास योग्य. [सं.]

दाते शब्दकोश

कर्तन      

न.       १. छेदन; कापणे; कातरणे; कातरकाम. २. (वस्त्रो.) सूत कातणे; सूत काढणे. ३. (शिंपी) कापडाचे कातरकाम; बेतण्याचे काम. [सं. कर्त्र्, कृत्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

न्हाणी

स्त्री. स्नानगृह. 'जेथें असे रत्न जडीत न्हाणी ।' -सारुह ६.१८. [सं. स्नान] (वाप्र.) न्हाणी पाह्यला विटाळ येणें-(बायकी) बाळंतीण झाल्यापासून पहिल्या तीन महि- न्यांच्या आंतच बाहेरची होणें. न्हाणी पाह्यला साप येणें- (गर्भवती स्त्रीनें साप पाहिल्यास त्याचे डोळे जातात अशा सम- जुतीवरून) बाळंतिणीचे न्हाणींत साप निघणें (असा साप आला म्हणजे त्याची गेलेली दृष्टि फिरून येते म्हणतात). न्हाणीचा चौक-पु. (बायकी) लग्नमुंजींत न्हाण्यासाठीं चार पाट मांडून त्यांचे चारही बाजूस चार भांडीं रंग घालून, ठेवून प्रारंभीं एका भांड्यास सूत गुंडाळून चारी पाटाभोंवती त्या भांड्यांच्या भोवतीं तीन वेळां सूत गुंडाळून केलेला चौक. न्हाणीपूजन-न. (बायकी) प्रसूत झाल्यापासून तिसरें दिवशीं बाळंतिणीकडून न्हाणीची पूजा करून भिजलेल्या हरभर्‍यानीं ओटी भरून मग न्हाणीवर पांढर्‍या चाफ्याचीं पानें व हरळी वाहतात तो विधि.

दाते शब्दकोश

न्हाणीचा चौक      

(बायकी)लग्नमुंजीत न्हाण्यासाठी चार पाट मांडून त्यांच्या चारही बाजूंना चार भांडी रंग घालून ठेवून प्रारंभी एका भांड्याला सूत गुंडाळून चारी पाटांभोवती त्या भांड्यांच्या भोवती तीन वेळा सूत गुंडाळून केलेले चौक. न्हाणीपूजन      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पांजणें

उक्रि. १ सूत, नवीन वळलेली दोरी, दोर इ॰ गुळगुळीत, मऊ करण्याकरि/?/तां एखादें लांकूड, खांब इ॰कांवर घासणें. २ विणावयाचें सूत खळीनें युक्त करणें. [दे]

दाते शब्दकोश

पोत

पोत pōta n m ( H Quality; or formed by redup. out of सूत with which word it is generally conjoined in use.) Weftage or texture (of cloth); quality as respects closeness, firmness, body. Ex. सूत- पोत पाहून धोत्र घ्यावें.

मोल्सवर्थ शब्दकोश

नपु. वीण; वीणकाम (वस्त्राचें); खेटणी; घट्टपणा; विणकामाची सफाई. 'सूत पोत पाहून धोतर घ्यावें.' [हिं.]

दाते शब्दकोश

परदेशी-शी, परदेशी खुंटा

पु. (विणकाम) उभाराचें पसरलेलें सूत (वशारन) यास जो ताण देतात त्याची दोरी ज्या खुंटावरून मागाच्या उजव्याबाजूस आणली असते ती खुंटी; ताण्याचें सूत (वशारणें) ज्या भोंवतीं गुंडाळतात ती खुंटी.

दाते शब्दकोश

रहाट

पु. १ पाणी ओढण्यासाठीं दोन चाकांचें एक साधन. २ यंत्राचें चाक (पाणी काढण्याच्या. सुतास पीळ देण्याच्या, दोव्या वळणाच्या). (सामा.) एखाद्या यंत्राचें चाक. ३ यंत्र. ४ कांड्यावर सूत भरण्याचें साधन. ५ सूत कातण्याचा चरखा. [सं. अरघट्ट; प्रा. अरहड्ड-रहट] ॰गोडगें-न. १ वर गाडग्यांची अगर पोहर्‍यांची माळ असलेलें रहाटाचें मोठें चक्र. २ (ल.) नशीबाचें नेहमीं होणारे फेरफार, चांगली किंवा वाईट परिस्थिति; ऐहिक व्यापार; खालींवर होणें; (प्रपंच, व्यवहरा इ॰ ची). ३ एकसारखी दवघव व्यवहार. ॰घटिका-स्त्री. रहाटगाडगें. 'न चुके संसार स्थिति । रहाटघटिका जैसी फिरतचि राहिली ।' -तुगा २४८३. ॰पाळण-पु. यात्रेंत चार पाळणे बांधलेलें फिरतें चक्र उभारतात तें; जत्रेंतील खालींवर फिरणारा पाळण. ॰वड-स्त्री. (कों.) रहाट तयार करण्यास लागणारीं साधनें (कणा, रवे, खापेकड, लोटे, तुंबे इ॰) ॰वणी-न. (को.) रहाटाचें पाणी; रहाटगाडग्यानें काढिलेलें पाणी; याच्या उलट ओढ्या-विहिरीचें पाणी. 'या एवढे मोठे आगरा, रहाटवणी किती म्हणून शिंपाल.' [रहाट + वणी = पाणी] रहाटागर-पु. न. रहाटानें पाणी देऊन तयार केलेलें पीक, मळा, शेत. [रहाट + आगर] रहाट्या-वि. १ रहाट चालविण्यास नेमलेला नेमण्यास लायक मनुष्या; पशु. २ दोन्ही बाजूच्या वतीनें खेळणारा खेळाडू. ३ एकदा एक तर एकदा दुसरी बाजू घेणारा; दुटुप्पी; वेळ येईल तसें वागणारा. ४ (ल.) व्यवस्थापक; प्रमुख. ५ (लग्र इ॰ समारंभांत) वेतन न घेतां काम करणारा. ६ ओझें वाहून शिवाय वाट दाखविणारा वाटाड्या; हमाल व वाटाडया. [रहाट]

दाते शब्दकोश

पु० पाणी किंवा सूत काढण्याचें चक्र.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

रिकांडी

स्त्री. (विणकाम) कापडामध्यें आडवें सूत भर- ण्याकरितां सूत गुंडाळलेली कांडी.

दाते शब्दकोश

साळ

साळी (विणकर) पहा. ॰घालणें-(रेशीम, सूत इ॰ कांची) जितकें लांब सणंग विणावयाचें असेल तितक्या अंतरा- वर खुंट्या मारून त्यांच्याभोंवतीं सूत गुंडाळून तितका लांब ताणा होई असें करणें. ॰वट-टी, साळवी, साळाऊ-वि. साळ्यांनीं विणलेलें. याच्या उलट कोष्टी, कोष्टाऊ. ॰वाडा-पु. विणकार लोक राहतात तो भाग.

दाते शब्दकोश

साळ sāḷa f ए (शाला S) A school. 2 A work-shop. 3 In composition with the designating noun prefixed, Place; as घोडसाळ Place for horses, a stable, टंकसाळ A mint. साळ घालणें (रेशीम, सूत, इत्यादिकांची) To lay or form a warp. 2 also साळ मांडणें To set up a school.

मोल्सवर्थ शब्दकोश

सुताडें

सुताडें sutāḍēṃ n A contemptuous or vilifying form of the word सुताडा. 2 (A figurative application of the meaning of सुताडा) The web, contexture, or connected body as formed through numerous intermarriages, the web of affinities. Ex. तुम्ही आम्ही परकीय नव्हों एकच सुताड्यांतले आहों; त्याचें आमचें सु0 एकच आहे: also such state, extensive affinity or connection. Also सुताडेंगुताडें or -गोताडें or -गाताडें and सुताडगुताड n (सूत & गुतणें or गोत) in this sense; and sometimes in the sense of Extensive engagement in trade or business; also confused engagement of many, every one with every other; and sometimes in the sense of Common understanding or agreement of numerous parties; and sometimes (the formations being viewed as composed of सूत & गुतणें) in the sense of Literal complication or entanglement.

मोल्सवर्थ शब्दकोश

सुतौवाच

उद्गा. सांगण्यास किंवा बोलण्यास सुरुवात करणें या अर्थीं वाक्प्रचार. बहुतेक पुराणें सूतानें शौनकादिक ऋषीस सांगितलीं आहेत त्यामुळें त्यांतील अनेक अध्यायांच्या, आरंभीं 'सूत उगाच' असे शब्द असतात त्श्रावरून. [सं. सूत + उवाच]

दाते शब्दकोश

ताणा      

पु.       १. (विणकाम) (मागावर ताणून लांब केलेले) उभे सूत; धागा. २. वेल; वेली. (राजा., को.) ३. वेलाच्या प्रत्येक पेराला फुटणाऱ्या कोवळ्या तंतूंपैकी प्रत्येक. यांनी वेल खांब, वृक्ष वगैरेंना वेटाळून धरून राहतो. पागोरा; वेलाची फूट. ४. (दुधाळपणा, भलेपणा इ. सद्गुणांना कारणीभूत घोडा, बैल इ. जनावराचे) बिजवट; अवलाद; मातृपरंपरा; जात. ५. कोळ्याच्या (कीटक) जाळ्याचा लांब तंतू. [सं. तन्] (वा.) ताणा काढणे –सूत मागावर घालण्यासाठी तयार करणे; उभे दोरे लावून घेणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ताणा

पु. १ (विणकाम) (मागावर ताणून लांब केलेलें) -भ सूत; धागा. याच्या उलट बाणा. 'कां तांथुवाचा ताणा । तांथु घालिता /?/रणा । तो तंतूचि विचक्षणा । होय पटु ।' -ज्ञा १८.३६०. २ (राजा. कों.) वेल; वेली. ३ (राजा.) वेलाच्या प्रत्येक पर्वास फुटणार्‍या कोंवळ्या तंतूपैकीं प्रत्येक. यांनीं वेल वृक्ष इ॰ कांस वेंटाळून धरून राहतो; पागोरा; वेलाची फूट. ४ (दुधाळपणा, भलेपणा इ॰ सद्गुणांना कारणीभूत घोडा, बैल इ॰ जनावराचें) बिज- वट; अवलाद; मातृपरंपरा; जात. ५ कोळ्याच्या घराचा, जाळ्याचा लांब तंतु. [सं. तान = तंतु, धागा; म. ताणणें] (वाप्र.) ॰काढणें- (माण.) सूत मागावर घालण्याकरितां तयार करणें; उभे दोरे लावून घेणें. सामाशब्द- ॰पाजणी-स्त्री. १ ताण्यास ताठपणा आणण्याकरितां खळ लावण्याची क्रिया. २ (ल.) जिकीरीचें, दगदगीचें, त्रासाचें काम. ३ त्रास, दगदग, जाच, कुतरओढ, ओढाताण याअर्थीं जिवाची ताणापाजणी असाहि शब्दप्रयोग कर- तात. [ताणा + पाजणें]

दाते शब्दकोश

तखफीक

स्त्री. सूट; तसल्ली; तकावी; सवलत. ‘मामि- लतेंत तखफीक घेऊन नारनोर व आगरे याचा इजारा करून घ्यावा व रामसिंगजीचीहि मामिलत करून देऊन बखतसिंग- जीसहि येहसानमंद करावें.’ –पेद २.१६. [अर. तख्फीफ = सूट; कमी करणें]

दाते शब्दकोश

त्रिसुती

स्त्री. (कर.) जानव्याचें सूत तीन पदरी करून त्यास पीळ घालण्याची क्रिया. तिसुती पहा. [त्रि + सूत]

दाते शब्दकोश

वळ

पु. १ दोरी, सूत इ॰ स असणारा पीळ. २ (बुरूड- काम) टोपलीच्या तोंडाला तीन कामट्यांचा देतात तो गोठ. ३ वळवळ; तळमळ; अतिशय उत्कंठा. [सं. वल्; म. वळणें] वळई-स्त्री. १ भूस इ॰ ठेवण्यासाठीं करतात ती वाटोळी, भोंवतालून बंद केलेली जागा. २ भूस इ॰ ची वाटोळी, भोंवतालून कडब्याच्या पेंढ्या लावलेली रास. ३ कडबा, गवत, कणसें न खुड- लेली ताटें इ॰ ची रास, गंज, गंजी. 'तृणाचे वळई माजी देखा । कैशी उगी राहे दीपकलिका । ' -रावि १५.११८. ४ वळी; वळकटी. [सं. वलय, वलयित; प्रा. वलइय] वळकटी-कुटी- कोटी-स्त्री. १ गुंडाळी (कागद, कपडा, इ॰ ची); गुंडाळलेली वस्तु. २ घडी; दुमड; मोड; सुरकुती. ॰कुटी-सुरकुटी-स्त्री. वळकची अर्थ २ पहा. (अव. प्रयोग) वळकुट्या सुरकुट्या. ॰खर- वि. पीळ घातलेली; पीळदार (दोरी, सूत इ॰). ॰वट-न. १ खिरीसाठीं पिठाचा वळून केलेला बोटवा, शेवया इ॰ पदार्थ. 'वळ- वटाची नवलपरी । एक पोकळें अभ्यंतरीं । एकें वर्तुळें साजिरीं । सुमनाकारीं पै एक । ' -एरुस्व १४.१११; -मुवन ११.१२४. २ दळणवळण; घरोबा; परस्पर व्यवहार. ॰वटी-वंटी-स्त्री. गुंडाळी; वळकटी पहा. ॰वळ-ळा-ळी-स्त्रीपु. १ साप, किडा इ॰ च्या अंगास मोडी पडत असें त्याचें चलनवलन. २ (ल.) एका कुशीवरून दुसऱ्या कुशीस वळावें, लोळावें इ॰ चळवळ. ३ चुट- पुट; अस्वस्थ करणारी उत्कंठा; तळमळ. (क्रि॰ करणें; येणें). 'मार्थ पाहे घरिंची राटावळी । करी भोजनाची वळवळी ।' -ख्रिपु २.३६.१६. ४ चडफड; धुसफुस. ५ कंड; खाज (गळूं, इ॰ ची). (क्रि॰ सुटणें; येणें). ६ हालचाल; तंटा; कुरापत. 'फिरंगी वळवळ करतां राहत नाहींत.' -पया १२२. ७ चप- ळाई; एकसारखें चलनवलन. ८ (कु) रग. (क्रि॰ जिरणें; जिरविणें). ॰वळ-ळां-क्रिवि. १ नागमोडीनें; किड्याप्रमाणें वळवळ करून. २ गडगडत; लोटांगणें घालीत; चक्करें खात (जाणें). ३ भरभर; घाईघाईनें; तोंडाला येईल तसें; अचावचा (बोलणें, खाणें, लिहिणें). ॰वळणें-१ नागमोडीप्रमाणें अंगविक्षेप करणें; आळेपिळे देणें. २ वेदनांनीं तडफडणें; तळ- मळणें; विवळणें. ३ अस्वस्थ असणें (दुःख, उत्कंठा इ॰ मुळें). अत्युत्सुक होणें. ॰वळाट-पु. अतिशय वळवळ; चुळबुळ; अस्वस्थता. ॰वळ्या-वि. १ गडबड्या; धांदऱ्या. २ अस्वस्थ; बेचैन असणारा. ॰शेण-शेणी-शिणी-नस्त्री. गोंवरी (थाप- लेली). याच्या उलट रानशेण-णी. वळापिळा-पु. आळा- पिळा; अंगविक्षेप (पिशाचसंचारादि कारणामुळे होणारा). [वळणें + पिळणें] ॰वळावळ-स्त्री. उत्कंठा; चुळबुळ; अस्वस्थता. वळावळी-क्रिवि. तडकाफडकीं; त्वरेनें. -शर.

दाते शब्दकोश

वजा

स्त्री. वर्जन; वजाबाकी; उणें करणें. -वि. उणा केलेला; कमती; कमी; काढून टाकलेला, घेतलेला. [अर. वझ्आ] ॰करणें-कमी करणें; काढून टाकणें. 'नोकरीवरून लोक वजा केले.' ॰ई-स्त्री. १ वजा घातलेली, सूट दिलेली रक्कम. २ खालीं आणणें; बढतीच्या उलट. 'रिसाल्यासंबंधानें बहाली, बडतर्फी, तरकी किंवा वजाई करण्याचा पूर्ण हक्क तुम्हांकडे राहील.' -रा ७.१५. ३ न्यून; उणीव. ॰बाकी-स्त्री. १ (गणित) मोठ्या संख्येंतून लहान संख्या कमी करुन बाकी काढण्याचा व्यापार. २ वर्जन; वजा करणें. ३ हिशेबाची शिल्लक बाकी. (क्रि॰ करणें). ४ वजा करून आलेलें उत्तर. [अर. वझ्आ + बाकी] ॰बाकी बेरीज-स्त्री. वजाबाकी आणि बेरीज. एकदम एकाच उदाहरणांत हे दोन्ही गणिताचे प्रकार शिकविणें. ॰वाट-स्त्री. १ देणेंघेणें चुकतें करून, बाकी काढून हिशेबाचा केलेला उलगडा; हिशेबाचा वांधा मिटविणें. २ उधळपट्टी. (व.) वजावाटोळें. ३ एकंदर रकमेंतून विशिष्ट रक्कम वजा घालून काढलेली बाकी. ॰शिरस्ताबाद-पु. शिवाजीच्या काळीं जमाबंदींत दर बिघ्यास ३ पांड जमीन वजा टाकण्याची असलेली पद्धत. ॰सूट-स्त्री. वजनामापांत विशिष्ट प्रमाणांत दिलेली सूट.

दाते शब्दकोश

नाक

नाक nāka n (नासिका S) The nose. 2 fig. The spot at which a grain, a potato &c. germinates, the eye. 3 The eye of a needle, bodkin &c. 4 The principal person (as of a family or an assembly); the chief town or fort (of a country). 5 The bore made for nose-rings. 6 Boldness, assurance, brazen-facedness. Ex. तेथें मी कोणत्या नाकानें जाऊं With what face can I go there? 7 Honorableness or fair reputation; as माझें नाक गेलें-गमावलें &c. 8 (नायक S) An affix of courtesy to the names of Mahárs or Parwárís; as भागनाक, राम- नाक. आपलें नाक कापून दुसऱ्यास अपशकुन or अवलक्षण करणें To ruin one's self in order to injure another. उंच्या नाकानें (करणें-बोलणें-वागणें-फिरणें) Impudently, with a brazen face. नाक ओरबडणें To rifle the nose; to strip or tear off its jewels. नाक कापणें To take the conceit out of. नाक खालीं पडणें g. of s. To have one's high and proud looks brought low. नाक गुंडाळणें To acknowledge one's own inferiority; to succumb, to truckle, to draw in one's horns. नाक घासणें To pay servile court; to crouch, cringe, truckle. नाक जळणें g. of s. To be oppressed under a sense of stench. नाक तोंड मुरडणें To turn up the nose at. नाक तोडून कडोस्त्रीस खोविणें To throw off all sense of shame, and persist (in begging &c.) although constantly refused and spurned. नाक धरणें To hold by the nose; i. e. to keep waiting: also to obstruct or hinder gen. नाक धरून बसणें To be always engaged in religious meditation or performing ceremonies. Used reproachfully of one who sits in vacant stillness neglecting his duties. नाकपुड्या पिंजारणें-फुलविणें-फुग- विणें-फुरफुरविणें-फेदरणें &c. To draw in, dilate, and swell one's nose with anger; to snort, to storm, to bluster. नाक फेडणें To blow the nose. नाक मोडणें To turn up one's nose daintily or haughtily. नाक मोडणें g. of o. To nip, blast, foil, put down. नाक लावून (करणें &c.) To put on a bold face; to brazen out. नाक वर करणें or वर करून चालणें To turn up one's nose; to sneer at, or to be disdainful. 2 To hold one's head high; i. e. to look bold and lofty when (for one's crimes or follies) one ought to be walking humbly and softly. नाकांत काड्या घालणें To tease, to twit, to gibe, to fling sarcasms at. नाकांत बोलणें To speak through the nose, to snuffle. नाकानें कांदे or वांगीं सोलणें To vaunt perfect purity from, and to be stern in reproving, a vice to which one's self is addicted with all devotedness. 2 Used often in agreement with To swallow a camel and strain out a gnat. नाकाला झिमोटा घालणें To turn up one's nose; to sneer at. नाकावर निंबु घासणें or पिळणें g. of o. To triumph over (an opponent); to succeed in spite of his opposition. नाकावर पाय देणें g. of o. To brave another; to do in the teeth of. नाकावर माशी बसूं न देणें To be very touchy and irritable; to be very jealous of (honor, character &c.) नाकाशीं सूत धरणें To hold a thread before the nostrils of (as of one in the last moments). नाकास चुना लावणें To dare and defy; to brave or challenge; to do in open defiance of. ना- कास पदर येणें To be abashed or confounded; to become ashamed. नाकासमोर जा Go straight forwards; follow your nose. नाकीं दुराही काढणें To supplicate earnestly and humbly. नाकीं वेसन घालणें g. of o. To lead by the nose; to put one's bridle in the jaws of and govern. नाक मुक्यापुढें खाजविणें To irritate, exasperate, excite, inflame. नाक मुठींत धरून जाणें To sneak off with the tail between the legs. To the above add the following. नाक गेलें तरीं भोकें राहिलीं or आहेत (म्हणणें &c.) To be utterly unashamed of one's shame; to show extreme effrontery; (to point to or talk about one's stigma). नाक झाडणें g. of o. To lower one's swelling and puffing; to take the conceit out of. नाक झाडणें To blow the nose. 2 To snort. 3 To flout, scout, hoot at contemptuously. नाक धरल्यास तोंड उघडतें Apply or maintain some constraint or check, and you shall obtain your demand. नाक वर असणें g. of s. To be high in society or the world; to be above (in learning, wealth, station &c.) one's neighbors. नाकाची घाण मरणें or जाणें To lose one's sense of offensive smells. नाकांत काड्या जाणें g. of s. To take pain or offence at. नाका तोंडाची गुंजडी करणें To draw up one's nose and mouth in sulks or in anger; to make a purse of one's nose and mouth. नाकापेक्षां मोतीं जड Used of one coming short of his fame or display or pretensions. नाकाला जीभ लावणें To express disdain. नाकाला पदर लावणें (or, as v i, लागणें) To cover one's face (as under shame from some obloquy or dishonor). नाकावर टिचणें (शंभर रूपये &c.) To tip the nose with, i. e. to cast at; to toss to; to give (money &c.) without reserve or hesitation. नाकावर बोट ठेवणें To impress secresy or silence; to put the finger upon the lip. नाकावर पदर येणें To become a widow: also to be shamed into retirement and concealment. नाकावर वाट करणें g. of o. To do maugre or in defiance of; to do in the teeth of. नाकाशीं or नाकीं सूत धरणें To hold a thread in the nostril (of a dying person) in order to determine whether there is life or not. Hence नाकाशीं सूत धरिलें g. of s. He is in articulo mortis. नाका होंटावर जेवणें To eat fastidiously. नाकीं नव m pl येणें (To have the nine senses or powers come into the nostrils.) To be in articulo mortis: also to be knocked up or wearied out.

मोल्सवर्थ शब्दकोश

नाक n The nose. The spot at which a grain, a potato &c. germinates, the eye. The eye of a needle, bodkin &c. The principal person (as of a family or an assembly); the chief town or fort (of a country). The bore made for nose-rings. Boldness, assurance, brazen-facedness. Ex. येथें मी कोणत्या नाकानें जाऊं? With what face can I go there? Honourableness or fair reputation; as माझें नाक गेलें-गमावलें &c. An affix of courtesy to the names of Mahars &c. as भागनाक, रामनाक. आपलें नाक कापून दुसऱ्यास अपशकुन or अवलक्षण करणें To ruin one's self in order to injure another. उंच नाकानें ( करणें-बोलणें-वागणें-फिरणें) Impudently, with a brazen face. नाक ओरबडणें To rifle the nose; to strip or tear off its jewels. नाक कापणें To take the conceit out of. नाक खालीं पडणें To have one's high and proud looks brought low. नाक गुंडाळणें To acknowledge one's own inferiority; to succumb, to truckle, to draw in one's horns. नाक घासणें To pay servile court; to crouch, truckle. नाक जळणें To be oppressed under a sense of stench. नाक तोंड मुरडणें To turn up the nose at. नाक तोडून कडोस्त्रीस खोविणें To throw off all sense of shame, and persist (in begging &c.) although constantly refused and spurned. नाक धरणें To hold by the nose, i.e. to keep waiting: also to obstruct or hinder gen. नाक धरून बसणें To be always engaged in religious meditation or performing ceremonies. नाकपुड्या पिंजारणें-फुलविणें-फुगाविणें-फुरफुरविणें-फेदाणें &c. To draw in, dilate, and swell one's nose with anger; to snort, to storm, to bluster. नाक फेडणें To blow the nose. नाक मोडणें To turn up one's nose daintily or haughtily. नाक मोडणें To nip, blast. नाक लावून (करणें &c.) To put on a bold face; to brazen out. नाक वर करणें or वर करून चालणें To turn up one's nose; to sneer at, or to be disdainful. To hold one's head high. नाकांत काड्या घालणें To twit, to urge on. नाकांत बोलणें To speak through the nose, to snuffle. नाकानें कांदे or वांगी सोलणें To vaunt perfect purity from, and to be stern in reproving, a vice to which one's self is addicted. To swallow a camel and strain a gnat. नाकाला झिमोटा घालणें To turn up one's nose; to sneer at. नाकावर निंबू घासणें or पिळणें To triumph over (an opponent); to succeed in spite of his opposition. चाकावर पाय देणें To brave another, to do in the teeth of. नाकावर माशी बसू न देणें To be very touchy and irritable; to be very jealous of (honour, character &c.) नाकाशीं सुत धरणें To hold a thread before the nostrils of (as of one in the last moment). नाकास चुना लावणें To dare and defy; to brave or challenge. नाकास पदर येणें To be abashed or confounded; to become ashamed. नाकासमोर जा Go straight forwards; follow your nose. नाकीं दुराही काढणें To supplicate earnestly and humbly. नाकीं वेसण घालणें To lead by the nose. नाक मुक्यापुढें खाजविणें To irritate, exasperate. नाक मुठींत धरून जाणें To sneak off with the tail between the legs. नाक गेलें तरी भोकें राहिली or आहेत (म्हणणें &c.) To be utterly unashamed of one's shame; to show extreme effrontery; (to point to or talk about one's stigma) नाक झाडणें To lower one's swelling and puffing; to take the conceit out of. नाक झाडणें To blow the nose. To snort. To flout. नाक धरल्यास तोंड उघडतें Apply or maintain some constraint or check, and you shall obtain your demand. नाक वर असणें To be high in society or the world; to be above (in learning, wealth, station &c.) one's neighbours नाकाची घाण मरणें or जाणें To lose one's sense of offensive smells. नाकांत काड्या जाणें To take pain or offence at. नाकातोंडाची गुंजडी करणें To draw up one's nose and mouth in sulks or in anger; to make a purse of one's nose and mouth. नाकापेक्षां मोतीं जड A tail wagging the dog. नाकाला जीभ लावणें To express disdain. नाकाला पदर लावणें (or, as v. i. लागणें) To cover one's face (as under shame from some obloquy or dishonour). नाकावर टिचणें (शंभर रूपये &c.) To tip the nose with, i. e. to cast at; to toss to; to give (money &c) without reserve or hesitation. नाकावर बोट ठेवणें To impress secrecy or silence; to put the finger upon the lip. नाकावर पदर येणें To become a widow: also to be shamed into retirement and concealment. नाकावर वाट करणें To do in defiance of; to do in the teeth of. नाकाशीं or नाकीं सूत धरणें To hold a thread in the nostril (of a dying person) in order to determine whether there is life or not. Hence नाकाशीं सूत धरिलें He is in articulo mortis. नाकाहोंटावर जेवणें To eat fastidiously. नाकी नव m pl येणें (To have the nine senses or powers come into the nostrils.) To be in articulo mortis: also to be knocked up or wearied out.

वझे शब्दकोश

न. १ घ्राणेंद्रिय; नासिका. २ (ल.) धान्य, बटाटे इ॰काला ज्या ठिकाणीं मोड येतो ती जागा; डोळा. ३ सुई, दाभण इ॰काचें भोंक; नेडें. ४ (कुटुंब, सभा इ॰कांचा) मुख्य उत्कृष्ट मनुष्य; देशांतील मुख्य शहर किंवा किल्ला. 'पुणें हें देशाचें नाक आहें. ५ नथेकरितां नाकास पाडलेलें भोंक, छिद्र. 'नाक तुटणें, बुजणें.' ६ धीटपणा; दम; खात्री. निलाजरेपणा; उजळ माथा. 'तेथें मी कोणत्या नाकानें जाऊं.' ७ अब्रू; चांगली कीर्ति, नांव. 'माझें नाक गेलें, गमावलें.' [सं. नासिका; प्रा. णक्क; फ्रेंजि. नख; पोजि. नकी] (वाप्र.) ॰ओरबडणें-नाकांतील अलंकार हिसकून घेणें. ॰कापणें-खोडकी, गर्व जिरविणें; पराभव करणें; ॰(आपलें) कापून दुसर्‍यास अपशकून, अवलक्षण करणें-दुसर्‍याचें नुकसान व्हावें म्हणून आपला स्वतःचा नाश करून घेणें. ॰कापून पाटावानें पुसणें-एखाद्याची मोठी अप्रतिष्ठा करून नंतर थोडा सन्मान करणें. ॰खाजविणें-चिड- विणें. ॰खालीं पडणें-पाडणें-होणें-गर्व नाहींसा होणें, करणें; मानहानि होणें. ॰गुंडाळणें-आपला कमीपणा, पराभव कबूल करणें; शरण जाणें; क्षमा मागणें. ॰गेलें तरी भोकें राहिलीं आहेत असें म्हणणें-पुन्हां निर्लज्जपणें बोलणें, वागणें; मागील गुन्ह्याची लाज सोडून चालणें. ॰चिरून मीठ भरणें-एखाद्यास फजीत करणें; नकशा उतरविणें. ॰घासणें-१ आर्जव, खुशामत करणें; हांजी हांजी करणें. २ क्षमा मागणें; चूक कबूल करणें. ॰चेचणें- ठेचणें-१ फजीती, पारिपत्य होणें, करणें. २ नक्षा उतरणें; खोड मोडणें. ॰जळणें, नाकांतले केस जळणें-फार दुर्गंधि येणें. ॰झाडणें-१ नाक चेचणें; तिरस्कार दाखविणें; ताठा, गर्व, उतरविणें. २ नाक शिंकरणें. ३ घोडा इ॰ जनावरानें नाकां- तून वारा काढणें. ॰तोंड मुरडणें-नापसंति दर्शविणें; नावें ठेवणें. ॰तोडून कडोस्त्रीस खोवणें-भीक मागण्याकरितां लाजलज्जा सोडून देणें; अगदीं लोंचट बनणें. ॰धरणें-वाट पहावयास लावणें; खोळंबा करणें. ॰धरल्यास किंवा दाबल्यास तोंड उघ- डणें-एखाद्यास पेंचांत धरल्याशिवाय तो आपल्या म्हणण्यास कबूल होत नाहीं या अर्थीं. (नाक व तोंड यानीं श्वासोछ्श्वास होतो. त्यापैकीं एक दाबलें तर दुसरें उघडावेंच लागतें). ॰धरून बसणें- (प्राणायामावरून) धार्मिक कृत्यांत गुंतलेला असणें, वेळ घालविणें. (ल.) कर्तव्य न करतां वेळ गमावीत बसणें. ॰पुडया पिंजा- रणें-फुलविणें-फुगविणें, फुरफुरविणें-फेंदरणें-रागानें खेंकसणें; अंगावर जाणें; नाक फुगवून राग दाखविणें. ॰फेडणें- नाक शिंकरणें. ॰मुठींत धरून जाणें-निरुपायास्तव, नाइला- जानें शरण जाणें; अभिमान सोडून जाणें. ॰मुक्यापुढें खाज- विणें-चिडविणें; क्षोभविणें. ॰मुरडणें-मोडणें-नाक वाकडें- तिकडें करून नापंसति दाखविणें. ॰मुष्ट्या हाणणें-(व.) हिण- विणें; नाराजी दर्शविणें. 'नाकमुष्ट्या हाणूं हाणूंच बेजार, स्वतः तर काम होईना.' ॰मोडणें-फजीती उडविणें; गर्व उतरविणें. ॰लावून(करणें)-क्रिवि. धिटाईनें; निलाजरेपणें. ॰वर करणें- वर करून चालणें-वर असणें-१ दिमाख, ताठा, गर्व, निर्लज्जपणा दाखविणें; वरचढ असणें. २ स्वतः दोषी असतांनाहि दिमाख दाखविणें; शरम न वाटणें. ॰वाहणें-पडसें येणें. ॰सावरणें-(बायकी) मूल जन्मल्याबरोबर त्यास न्हाऊ घाल- तांना त्याच्या नाकांत तेलाचे एकदोन थेंब सोडून त्याच तेलाच्या हातानें नाकाच्या वरच्या भागापासून शेवटपर्यंत हलकें चोळणें. नाकाची घाण मरणें-जाणें-१ संवईमुळें किंवा पडशामुळें वास न येणें; संवय होणें. २ (ल.) वाइटाचा तिरस्कार न येणें. नाकांत काड्या घालणें-चिडविणें; टोमणे मारणें; कुरापत काढणें; (एखाद्यास) चीड येईल असें कृत्य करणें. 'हरिच्या पुनःपुन्हां कां काड्या नाकांत घालिशी शशका' -मोसभा ४.८४. नाकांत काड्या जाणें-रुसणें; चिडणें; राग येणें. नाकांत दम येणें- (माळवी) नाकीं नऊ येणें. नाकांत बोलणें-नाकांतून, गेंगाण्या स्वरांत शब्द काढणें; अनुस्वारयुक्त बोलणें (कोंकणी लोकांप्रमाणें). नाकातोंडाची गुजंडी करणें-(नाक, तोंड आवळून, चंबू- सारखें करून) राग किंवा नापसंति दाखविणें. उंच्या नाकानें (करणें, बोलणें, वागणें, फिरणें)-मिजासीनें, निलाजरे- पणानें, (करणें इ॰). नाकानें कांदे-वांगीं सोलणें-१ नसता, खोटा शुचिर्भूतपणा दाखविणें; उगीच पावित्र्याच्या गोष्टी सांगणें. २ एखादे वेळीं फार चोखंदळपणा करणें पण एरवीं वाटेल तसें वागणें (ढोंगीपणा दाखवितांना वापरतात). नाकापेक्षां मोतीं जड होणें-(एखाद्याच्या अंगचा खरा गुण लोकांच्या अपेक्षेहून कमी आहे असें निदर्शनास आल्यावर योजतात) एखाद्या गौण वस्तूला अधिक महत्त्व प्राप्त होणें; कनिष्ठ दर्जाचा मनुष्य वरिष्ठा- हून वरचड होणें; (नाकास शोभा आणण्याकरितां मोतीं असतें पण तें जड झालें तर नाकास इजा होईल यावरून). तुल॰ सासूपेक्षां सून अवजड. नाकाला जीभ लावणें-तिरस्कार दाखविणें; गर्व, ताठा, दिमाख दाखविणें; नाक मुरडणें. नाकावर झिमोटा घालणें-तिरस्कार दाखविणें; नाक मुरडणें. नाकावर असणें- अगदीं तयार असणें. 'राग कसा त्याच्या अगदीं नाकावर आहे.' नाकावरची माशी तरवारीनें हाणणें-(व.) लवकर राग येणें. नाकावर निंबु घासणें-पिळणें-प्रतिपक्ष्यास न जुमानतां आपलें कार्य साधणें; प्रतिपक्ष्यास चीत करणें. नाकाला- पदर लावणें, लागणें-१ लज्जेनें, अपकीर्तीमुळें तोंड झाकणें. २ घाणीचा तिरस्कार करणें. नाकावर टिचणें-१ एखाद्याचे पैसे ताबडतोब देणें. २ काकूं न करतां, अडथळ्यास न जुमानतां एकदम देणें, करून टाकणें. नाकावर पदर येणें-१ वैधव्य येणें. २ लाजेनें लपून एकांतवासांत बसणें. नाकावर पाय देणें- विरोधाची पर्वा न करणें; प्रतिपक्ष्यावर मात करणें. नाकावर बोट ठेवणें-गुप्त ठेवण्यास किंवा गप्प बसण्यास सांगणें; (रागानें किंवा अन्य कारणानें एखाद्यास) दबकावणें. नाकावर माशी बसूं न देणें-अतिशय चिडखोर, क्रोधी असणें; अपमान किंवा तिरस्कार अगदीं सहन न होणें; थोडें देखील उणें बोलणें न सोसणें. 'जागृदवस्थेंत जसी नासाग्रीं बैसली नरा माशी ।' -मोगदा ५.२ नाकावर म्हशीनें पाय देणें-नाक नकटें, बसकें, चपटें असणें. नाकावर वाट करणें-विरोधास न जुमा- नतां काम सिद्धीस नेणें, करणें; नाकावर पाय देणें. नाकाशीं सूत धरणें-अगदीं मरणोन्मुख होणें (मरतांना श्वास आहे कीं नाहीं हें पाहण्याकरितां नाकाशीं सूत धरतात). नाकास चुना लावणें-नाकावर लिंबू पिळणें, पाय देणें पहा. 'सोसे कुलजा मृत्यु, न अयशाचा सोसवे चुना नाकीं ।' -मोद्रोण २१.५८. नाकास पदर येणें-बेअब्रू होणें; लाज वाटणें; मानखंडना होणें. नाकास मिरची झोंबणें-एखादी गोष्ट मनास लागणें; वर्मी लागणें. नाकासमोर जाणें-अगदीं सरळ मार्गानें जाणें. नाका- होंटावर जेवणें-चाखतमाखत खाणें; चोखंदळपणानें जेवणें. ॰दुराही, नाकधुर्‍या काढणें-१ अति नम्रपणानें विनविणें; शरण जाणें; क्षमा मागणें. 'सद्गति दे म्हणुनिच तो जाणा काढी मयूर नाकधुर्‍या ।' -भक्तमयूरकेकावली प्रस्तावना. २ कृताप- राधाबद्दल प्रायश्चित्त भोगणें. नाकीं नव-नळ येणें-१ अति- शय कंटाळणें; दमणें; भागणें (कामानें, श्रमानें). २ (नऊ इंद्रि- यांची शक्ति नाकांत येणें) मरणाच्या दारीं असणें. नाकीं वेसण घालणें-एखाद्यास कबाजांत, कह्यांत ठेवणें. नाकीं-नाक(का)चा बाल-अत्यंत आवडता, जिवलग, मोलवान् माणूस; गळ्यांतील ताईत; मोठ्याच्या परम प्रीतींतील दुर्जन (नाकांतील केंस काढतांना फार त्रास होतो म्हणून त्यांस फार जपतात त्यावरून). म्ह॰ (व.) १ नाक नकट तोंड वकट = कुरूप, अष्टावक्र अशा माणसास उद्देशून म्हणतात. २ नाकांत नाहीं कांटा, रिकामा ताठा-(बायकी, सोलापुरी) ३ (गो.) नाक गेल्यावर काय माझा चवरी गोंडा हाय = निलाजरा मनुष्य आपली कितीहि अब्रू गेली तरी पुन्हां नाक वर करतोच. सामा- शब्द- चिंबा-वि. बसल्या नाकाचा; नकटा. ॰तोडा-ड्या- पु. १ एक मोठ्या जातीचा टोळ. २ गवत्या टोळ (नाक तोडतो यावरून). ॰दुर-राई, ॰धुराई-धुरी-स्त्री. १ पश्चात्ताप दाखविण्यासाठीं नाक घासणें. 'माझ्या अपमानाबद्दल त्यानें किती जरी नाकधुर्‍या काढल्या तरी...बोलायची नाहीं.' -बाबं ४.३. २ (ल.) नम्रतेची विनंति (क्रि॰ काढणें). ॰पट्टी-स्त्री. (मल्लविद्या) जोडीदाराच्या कानावरून व गालावरून आपल्या हाताची पोटरी जोडीदाराच्या नाकपुडीवर दाबून वर दाब देऊन त्याला चीत करणें. ॰पुडी-स्त्री. नाकाचें एक पूड; नासारंध्र. [सं. नासापुट] म्ह॰ (व.) नाकपुडींत हरिकीर्तन = लहान जागेंत मोठें कार्य करा- वयाचें झाल्यास म्हणतात. ॰भुंकन-वि. नाकावर भोवरा अस- लेला (घोडा). नासिकावर्त पहा. -मसाप २.५७. ॰मोड-स्त्री. नकार दर्शविणें; तिरस्कारयुक्त नापसंती. ॰वणी-न. १ तपकीर; नस्य. २ नाकांत ओतावयाचा तीक्ष्ण पदार्थ. 'नाकवणी चुनवणी ।' -दा ३.७.६८. 'एका देती नाकवणी । काळकुटाचे ।' -ज्ञाप्र २९५. [नाक + वणी = पाणी] ॰शिंकणी-स्त्री. एक वनस्पति; भुताकेशी; हिच्या पानाच्या वासानें शिंका येतात. ॰शिमरो- वि. १ (गो.) नकटा. २ निलाजरा. [नाक + शिमरा = बसकें] ॰सूर- पुअव. नाकांतून बाहेर पडणारी हवा, श्वास. (क्रि॰ वाहणें; बंद होणें). ॰सुरॉ-वि. (गो.) नाकांतून येणारा (आवाज); गणगणा; गेंगाणा. नाकाचा दांडा-वासा-पु. नाकाचें लांबट हाड. नाकाचा पडदा, नाकाची पडदी, नाकाची भिंत-पुस्त्री. दोन नाकपुड्यांतील पडदा. नाकाचा शेंडा-नाकाची बोंडी- पुस्त्री. नाकाचा अग्रभाग. नाकाचो कवळो करप-(गो.) कंटा- ळणें. नाकाटणी, नाकाटी-स्त्री. रग जिरविणें; नक्षा उतरविणें; खरडपट्टी काढणें; नाक खालीं करावयास लावणें. (क्रि॰ करणें). [नाक + काटणी] नाकाटणें-नाकाटणी करणें. नाकाड-डा-नपु. (निंदार्थी) १ मोठें नाक. २ डोंगराचा पुढें आलेला नाकासारखा भाग. 'या नाकाडाचे पलीकडे आपला गांव आहे.' ३ भूशिर; जमीनीचें टोंक. ४ आंब्याच्या फळाचा मागील बाजूचा नाका- सारखा उंच भाग. नाकाड-ड्या-वि. मोठें आणि कुरूप नाक असणारा. नाकाडोळ्याचा(कानाचा)वैद्य-पु. साधारण, कामचलाऊ वैद्य. वैद्यकविद्येंत फारसा वाकबगार नसलेला वैद्य; वैदू. नाका डोळ्यानें सुरेख-वि. सुस्वरूप; देखणा; रेंखीव बांध्याचा. नाकादाई-स्त्री. (व.) खोड. खरडपट्टी. (क्रि॰ काढणें). 'खूप नाकादाई काढली आधीं, मग जेवूं घातलें.' नाका- वर रडें-न. रडण्याची तयारी, तत्परता; लवकर रडूं येणें. नाका- वर राग-पु. चिडखोरपणा; ताबडतोब रागावणें. नाकीचें मोतीं-न. नथ; बुलाख. 'नाकींचें मोतीं सुढाळ ।' -ह ५.१९७. नाकील-वि. सरळ, लांब व सुंदर नाक असणारा. नाकेला पहा. नाकु(को)स्ती, नाकु(को)ष्टें-स्त्रीन. नापंसति; नकार दाखवि- ण्याकरितां तिरस्कारानें नाक मुरडणें. (क्रि॰ मारणें; देणें; हाणणें). नाकेल-ला-वि. नाकील पहा. 'नाकेला अन् गुलजार । सांवळा नि सुंदर भासे ।' -बाल शिवाजी. नाकोटा-टें-पुन. (निंदार्थी) नाक.

दाते शब्दकोश

गर्भ

पु. १ पोटांतील जीव; पुरुषवीर्य व स्त्रीरज यांपासून तयार झालेला व स्त्रीच्या गर्भाशयांत असणारा पिंड. २ मगज; गीर; मेंदू; काळजाचा बोका; (सामा.) आंतील भाग. ३ (ल.) तत्त्व; कस; तात्पर्य; हांशील; सारांश; ऐवज. 'त्याजवरून येथील गर्भ सर्व अवगत जाहलाच असेल.' -पेद १.४४. ४ व्यापलेली जागा; क्षेत्रफळ. ५ मध्य; केंद्र; मध्यबिंदु. ६ अर्थ; भाव. 'ग्रंथ- श्लोक-वाक्यगर्त' ७ आंतील प्रदेश, बाजू. 'या चौकटीचा गर्म साधा.' ८ गर्भाशयः पोट. 'नाना भरते सिंधुगर्मीं ।' -ज्ञा ११. ६५०. ९ आंतील खाली; बाळंतिणीची खोली. १० देवळाच्या गाभारा समासांत-गर्भ-कवि-गायक-बृहस्पति = उपजत-कवि- गायक-वक्ता इ॰ [सं.] (वाप्र.) ॰गर्भगाळ कोसळणें-गर्भगळित होणें.'गभगळ कोसळला.' -ऐपो ५८. [गभ] ॰संभवणें-समा वणें-राहणें-पोटांत राहणें; गर्भार राहणें; गरोदर होणें. गर्भाचें करणें-होणें-चैनीनें जेवणें; पोटपूजा करणें; आपल्या पिशव्या भरणें. सामाशब्द-॰कर-कर्ता-कारक-जनक-वि. गर्भ धारणेस कारणीभूत होणारा; गर्भस्थापना करणारा. ॰कोश-पु. गर्भाशय; पोटांतील गर्भ राहण्याचें ठिकाण. [स] ॰ग(गि)ळीत- गीळ-वि. १ जिनें गर्भ टाकला आहे किंवा जिचा गर्भ गळाळा आहे अशी. १ ज्याची पांचावर धारण बसली आहे असा; घाबरा; भ्यालेला (बहुधा लाक्षणिक अर्थीं प्रयोग. [गर्भ + गळणें] ॰गलित होणें-(भीतीनें गरोदर स्त्रियांचा गर्भ गळतो त्याव- रून) फार घाबरणें. 'वाघ दृष्टीस पडतांच तो गर्भगळित झाला. ॰गुल्म-न गार्भाच्या वाढीच्या आनुषंगिक मांसग्रंथीची वृद्धि. [स.] ॰गृह-न. गाभारा; माजघर. [सं.] ॰गोळ-पु. गर्भातील मूल. 'जैसा गर्भगोळु उद्यमातें । कोणाही नेणे ।' -ज्ञा ९.३३५. ॰ग्रहण-न. गर्भधारण; गाभ धरणें. [स] ॰घाती-पाती-वि. ज्याने गर्भाचा (वेताचा) घात होतो ते; गर्भाचा घात करणारा. [सं.] ॰चलन-न. गर्भाशयांतील गर्भाची हालचाल, चळवळ किंवा त्यांत प्राणशक्ति येणें. [सं.] ॰च्युत-वि. गाभ पडलेली; धुपावलेली. ॰च्युति-स्त्री. गाभ पडणें; धुपावणें. ॰छाट-पु. १ गर्भाशयांत गर्भाचा नाश. त्यावरून २ (ल समूळ नाश; संहार; गर्भाशयांतील मूल सुद्धां कापणें.-पुस्त्री १ निवड; वेचंणी; टिपणी; निवडलेला भाग. २ कुलुपी गाळ्यांचा स्फोट, धडाका. -वि. गाळ्या, छरे, खिळे, दगड इ॰ नीं भरलेला (कुलुपी गोळा, तोफ). -स्त्री. १ कुलुपी गाळा. २ गरनाळी तोफ. [सं. गर्भ + हिं. छाटना = कापणें, तोडणें] ॰छाट गोळा-पु स्फोटक द्रव्ये भरलेला गाळा; कुलुपी गोळा. ॰छाट ताफ-स्त्री. कुलुपी गोळे भरलेली तोफ; तसले गोळे भरावयाची तोफ; गरनाळी ताफ. ॰छाया-स्त्री. गर्भ- धारणा झाल्याची सूचक खूण, चिन्ह, दर्शन (मुखावरील टवटवी इ॰). 'तत्काळ आली तिस गर्भछाया ।' -सारुह २.२७. 'आंगीं नसतां गर्भछाया । वंध्या डोहळे स गतसे वायां ।' [सं.] ॰दास- दासी-पुस्त्री. जन्मापासून एखाद्याची बटीक, दासी, कुणबीण; तिचें मूल, लेकवळा (मुलगा, मुलगी); दासदासीचा पुत्र किंवा कन्या; दासीपुत्र-पुत्री. [सं.] ॰द्वार-न. गर्भाशयाचें मुख, तोंड. ॰धनी-वि. (चंद्रपुरी) गर्भार. 'हरणी एकटी वनीं । असे रेगभ- धनि । पारधी आला ।' -मासिक मनोरंजन, जुलै १९३२. [गर्भ + धनी] ॰धारणा-न. गर्भ राहणें; गाभण होणें; गरोदर होणें. [सं.] ॰नाडा-स्त्री. नाळ; वार. [सं.] ॰पंडित-पु. १ गर्भात असतांच विद्वान झालेला पुरुष. २ (ल.) अतिशय मूख, अक्षरशत्रु मनुष्य. [सं.] ॰पतन, पात-न. गर्भच्युति; धुपाव; पूर्ण महिने न भरतां गर्भ बाहेर येणें, बाळंत होणें, विणें हा होऊं नये म्हणून लाजाळु धायटीचीं फुलें, कमळाचीं फुलें, मध. लोध्र यांचा काढा कमळाचा कल्क घालून घ्यावा. -योर २.६२५. ॰पोषण- न. गर्भाशयांत गर्भाचे संगोपन. [सं.] ॰पत्र-न. आंतून निघणारें कोंवळ पान. 'तियें अंगवसां गर्भपत्रें ।' -ज्ञा १५.९९. ॰पुट- न. गाभ्याचा पडदा; ज्यांतून सुयरा बाहेर येतो तो भाप. 'कर्पूरकेळीचीं गर्भपुटें ।' -ज्ञा ११.२५०. [सं.] ॰भाव-पु. तात्पर्य; गोषवारा. 'त्या कथेचा गर्भभावो । सांगा मज ।' -कथा १.२.२८. ॰यातना-स्त्री. गर्भांत असतांना त्या प्राण्यानें भोगलेले क्लेश. [सं. गर्भ + यातना] ॰रेशमी-वि. (कांठाशिवाय अंगांत रेशमाचे धागे असलेल (वस्त्र). याच्या उलट गभसुती. ॰वती-स्त्री. गर्भार, गर्भारशी स्त्री. [सं.] ॰वायु-पु. गर्भाचा किंवा गुल्माचा वात. [सं.] ॰वास-पु. १ गर्भाशयांत राहणें. 'नवमास गर्भवासीं । कष्टविलें त्या मातेशीं ।' २ जन्माचा फेरा; मुक्ति नसण. 'तुका म्हणे गर्भवासीं । सुख घालावें आम्हासीं ।' -तुगा ११९३. [सं.] ॰वासी-निवासी-वि. गर्भाशयांत राहणारा; पोटांत असणारा. [सं.] ॰विक सशास्त्र-न. गर्भाची वाढ कसकशी होते इ॰ शिकविणारें शास्त्र. ॰वेदना- स्त्री. स्त्री बाळंत होतांना तिला होणारे कष्ट; प्रसूतियातना. [सं.] ॰वेष्टन-न. गर्भास लपेटणारी अंतरत्वचा; खोळ; वार. [सं.] ॰वोवरा-पु. गर्भ; गर्भांत असलेला जीव. 'देवकीचा गर्भवोवरा । माझा अवताररूप होय ।' -ह ३.२५. [गर्भ + वोवर = घर] ॰शंकु-पु. मृतगर्म बाहेर काढण्याचें शस्त्र. [सं.] ॰शय्या- स्त्री. गर्भाचे विश्रातिस्थान; गर्भाशय. [सं.] ॰शूर-वि. जन्मा पासून धीट; स्वाभाविक धैर्याचा. [सं.] ॰श्राव, स्त्राव-पु. गर्भपात; धुपणें. [सं.] ॰श्रावी-वि. गर्भपात करणारें; गर्भ घाती. [सं.] ॰श्रीमंत, श्रीमान्-वि. जन्मापासून श्रीमंत; वाडवडिलांपासून ज्याच्या घरीं संपत्ति आहे असा पिढी जात श्रीमान. [सं. गर्भ + श्रीमान] ॰संभव-पु. गर्भधारण. [सं.] ॰सुखी-वि. गर्भश्रीमंत; जन्मापासून कशाचीहि ददात नसलेला. 'शिष्य नसावा गर्भसुखी।' -दा ५.३. ३३. ॰सुती-वि. ताणा (उभें सूत) सुताचा व वाणा (आडवें सूत) रेशमाचा असें (वस्त्र) [गर्भ + सूत] ॰सूत्र-न. १ मध्यरेषा; मध्यापासूनची रेषा. २ (ज्यो.) भूम व्यापासन ओढलेली रेघ. ३ केंद्रातून जाणारी कोणतीहि रेघ. [सं.] ॰स्थ-वि. १ गर्भाशयांत असलेला २ मध्यवर्ती आंतील; आंत किंवा मध्यांत बसलेला. ३ (काव्य) गर्भार. 'तिघी राण्या जाहल्या गर्भस्था ।' -रावि ४.२७. ॰स्थान-न. गर्भाशय. [सं.] ॰ज्ञानी-वि. गर्भपंडित; जन्मतः ज्ञानी, विद्वान असलेला. ॰गर्भीं-क्रिवि. पोटात असतांना; जन्मापासून; जन्मास येण्यापूर्वीं. समासांत-गर्मीं अंधळा-रोगी-ज्ञानी- शहाणा-श्रीमंत. गभीं-रोग-राज्य-वैराग्य-पुन. जन्मा पासून रोग इ॰ ॰रोजमुरा-जन्मास येणार्‍या मुलाची पोटगी इ॰

दाते शब्दकोश

अढ्या

अढ्या aḍhyā m A common term for the two pegs around which is wound सूत in drawing or clearing thread.

मोल्सवर्थ शब्दकोश

पु. सूत काढण्यासाठीं किंवा मोकळें करण्यासाठीं ज्या दोन खुंट्यांभोंवतीं तें गुंडाळतात त्यापैकीं प्रत्येक. [अढे]

दाते शब्दकोश

अढ्या      

पु.       सूत काढण्यासाठी किंवा मोकळे करण्यासाठी ज्या दोन खुट्यांभोवती ते गुंडाळतात त्यापैकी प्रत्येक.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अंबर, अंबरी      

पु . १. (लोहारी) खिळे उपसून काढावयाचा चिमटा, पकड. २. (सोनारी) अडकित्त्यासारखा दोन पायांस एका खिळ्याने सांधून वरच्या बाजूस वर्तुळाकार असलेला, धातूचे सूत, तार ओढण्याचा चिमटा. अंबर      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अंबर चरखा      

पु.       हाताने सूत काढण्याच्या चरख्याचा एक प्रकार.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अंबर-री

पुस्त्री. १ (लोहारी) खिळे उपसून काढावयाचा चिमटा. २ (सोनारी) अडकित्त्यासारखा दोन पायांस एका खिळ्यानें सांधून वरच्या बाजूस वर्तुळाकार असलेला, धातूचें सूत अगर तार ओढण्याचा चिमटा.

दाते शब्दकोश

अपूर्णमाफी      

स्त्री.       साऱ्यात थोडीशी सूट असते अशी जमीन.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आरसड      

न.       (वस्त्रो.) लावगण (उभा ताणा) तरंगून राहावे म्हणून लावगणाखाली असलेला दोन−तीन हात लांब व एक−दोन सूत जाडीचा लाकडी तुकडा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आरसड

न. (विणकाम) लावगण (उभा ताणा) तरंगून रहावें म्हणून लावगणाखालीं असलेला २-३ हात लांब व १-२ सूत जाडीचा लाकडी तुकडा.

दाते शब्दकोश

आसन्नमरण

अत्यस्वस्थ, परलोकच्या प्रवासाची तयारी केली, त्याच्यावर मृत्यूची झापड पड़ूं लागली, मृत्यु यायचा तो मात्र थांबत थबकत येत आहे असे वाटत होते, त्याची प्राणज्योत मालवत होती, टांचा घाशीत मृत्युमुखीं पडतांना पाहिली, ती आतां फार दिवसांची सोबतीण नाहीं, देहाची व मनाची तगमग चालूं होती, नाकाशीं सूत धरलें होते, निरवानिरवीची वेळ आली होती, मृत्यूच्या दारीं, तिचीं पावलें या धरतीवरून सुटत चाललीं होतीं, यमदेव एक एक पाऊल टाकीत जवळ जवळ येत होता, मृत्यु घिरट्या घालीत होता, जीवन-मरणाच्या सीमेवर, मृत्यु 'आ' पसरून उभा राहिला, अंत्यशय्येवर असतांना त्या देहांतलें चैतन्य इहलोकाच्या सीमेकडे झपाट्याने जात होतें, शेवटची घरघर लागली, आसन्नमरण स्थितींत अंतकाळींच्या वेदना अनुभवीत, मरणाच्या पंथाला लागले, जवळ जवळ मसणवटीत जाऊन पोहोचलेले माणूस.

शब्दकौमुदी

असुरवेळ, असुरवेळा      

स्त्री.       संध्याकाळ : ‘दश मास झालिया प्राप्त । मेधावती झाली प्रसूत । असूर वेळायोगे सूत । तिचे तामस जाहले ।’ – जै ७८·६२.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आठकी      

स्त्री.       १. पहा : आठका २. आठ बैलांमागे जकातदाराने दिलेली एका बैलाच्या जकातीची सूट. ३. सागरगोट्यांच्या खेळातील एक टप्पा. आठ खडे एकाच वेळी गोळा करून उचलून वर उडवलेला नववा खडा झेलणे. ४. आठ माणसांची टोळी; आठांचा समुदाय. [सं. अष्टक]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आठकी

स्त्री. १ आठका पहा. [अष्ट] २ आठबैलांमागें एका बैलाच्या जकातीची जी सूट जकातदार देतो ती. ३ सागरगोट्यांच्या खेळांतील एक प्रकार. आठ खडे एका खडे एका वेळीं गोळा करून वर उड- विलेला नववा खडा झेलणें. अटकी पहा.

दाते शब्दकोश

आवापन      

न.       कोष्ट्याचा माग; सूत कातण्याचे यंत्र. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अवर्जित      

वि.       सूट सवलत नसलेले; न सोडलेले; न टाकलेले.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अवसुती

अवसुती avasutī a (अव & सूत Contrary to the line.) Awkward, irregular, disorderly, slovenly: also clumsy, bungling &c.--workman or work. Also अवसुत्या a Awkward or bungling,--of persons only.

मोल्सवर्थ शब्दकोश

बाबिन-ण

स्त्री. सूत गुंडाळण्याची लाकडाची अगर पत्र्याची पोकळ कांडी; फिरकी. [इं.]

दाते शब्दकोश

बादला

पु. सोन्याची किंवा चांदीची तार. मुलाम दिलेली रुप्याची तार; विस्तवावर पिवळी केलेली तांब्याची तार (कला- बतूकरतां काढलेली व चपटी केलेली). [हिं.] बादल्याचा तुरा-पु जुन्या जरीच्या सोन्यापासून तयार केलेल्या टिकल्या. बादलो-वि. सोनें, रुपें, तांबें यांच्या तारांचें, कांहीं सूत, रेशीम व कांहीं जर मिळून विणलेलें; मध्यें जरीच्या काडया असलेलें; भरजरी. 'बेगमेनें श्रीमंतास उंची पोशाख देऊन एक बदली वस्त्र दिलें.' -थोरले मल्हारराव होळकर चरित्र पृ. २६.

दाते शब्दकोश

बैला, बैली

पुस्त्री. १ डोकीवरून ओझें नेतांना तें समतोल राखण्याचें एक लांकडी साधन. एक लांब दांड्याच्या मध्यभागीं एक खुंटी आणि जाळी असते, जाळींत ओझें ठेवतात. हा दांडा हातांत धरतां येतो व त्यामुळें ओझें डोक्यावरून उचलतां येतें व जमिनीवरहि सहज उतरितां येतें. बेला पहा. २ सुताच्या ताण्यास पाजण करतेवेळीं सूत खळ लावणार्‍याच्या छातीइतक्या उंचीवर लांबबर ताणले जाण्यास सुताच्या दोन्ही बाजूस दोन उभ्या कर- तात त्या चौकटी; खळ लावलेलीं ताण्याचीं सुतें ताणलेल्या स्थितींत ठेवण्याचे जे दोन घोडे ते प्रत्येक, हे घोडे दोन काठ्या गुणिले- चिन्हाच्या (x) आकारांत मध्यावर बांधून त्यांच्या वरच्या शेवटास एक आडवी काठी बांधून केलेले असतात. ३ तिफणीची दोरी.

दाते शब्दकोश

बाणा

पु. १ अभिमान; शेखी; आढ्यता; डौल (एखाद्या विशेष गुणाचा, अधिकाराचा इ॰). (क्रि॰ बाळगणें). २ पोषाक; वेष; पोषाकाची तर्‍हा. ३ एक प्रकारचा दारूचा बाण. ४. (विणकाम) वस्त्रांतील आडवा धागा; आडवें सूत; आडवट; आडवण. ५ जरतारी धंदा) बिन वळलेलें रेशीम. ६ लांकडी मूठ व जाड धारेचें पान असलेला पट्टा; एक हत्यार. [हिं.] बाणाईत, बाण्याचा-वि. प्रतिष्ठा मिरविणारा; आढ्यता बाळगणारा; मोठा दिमाख दाखविणारा (प्रावीण्य, विशेष गुण यांचा) अभिमान सांगणारा. [बाणा] बाणी-स्त्री. १ बाणा; अभिमान; शेखी; डौल, (क्रि॰ बाळगणें). २ आणीबाणीची वेळ; निकाराचा प्रसंग. ३ जन्म- स्वभाव; मनःस्थिति. [बाणा] ॰वर येणें-आपला रागीट स्वभाव दाखविणें; चिडून जाऊन रागावणें. ॰चा-वि. बाण्याचा; बाणे- दारपणा दाखविणारा; मोठी आढ्यता दाखविणारा. ॰दार, बाणेदार-वि. अभिमान राखणारा; दिमाख दाखविणारा (एखादें कार्य पार पाडून); दुसर्‍याचें चित्त वेधून घेणारा.

दाते शब्दकोश

बाना

पु. बाणा; वस्त्रांतील आडवें सूत,रेशीम आडवण.

दाते शब्दकोश

बारका

वि. (कों.) बारीक. बारकाई-बारकी-स्त्री. १ बारकावा; सूक्ष्मदृष्टि; बारीकपणा; गुप्तपणा; चौकसपणा; नाजुक- पणा. २ कंजूषपणा; कृपणता. (गो.) बारकाय, बारीकसाण. [फा.] बारकावणें-अक्रि. कृश होणें; बारीक होणें. 'शरीर बारका- वलें.'' पाऊस बारकावला.' [बारीक] बारकावर-वि. (कु.) मध्यम; बारीक (सूत धान्य इ॰) बारकावा-पु. बारकाई; चौकसपणा

दाते शब्दकोश

बडीव

वि. बडविलेला; सूत भरण्यासाठीं बडवून साफ केलेला (जोठ इ॰ वस्त्र). बडवीव, (प्र.) [बडविणें]

दाते शब्दकोश

बिंडा

पु. १ (दोरी, सूत इ॰ चें) वेटोळें; भेंडोळें. २ (गवत, काटक्या इ॰ चा ) भारा; गठ्ठा. 'पत्रावळीचे किती बिंडे आहेत?' ३ खडक, जमीन इ॰ वरचा उंचवटा; टेकाड. ४ डोंग- राचा सुळका; कडा. ५ (समासांत) सौंदर्यवाचक पद. उदा॰ राजबिंडा = राजासारखा बिंड असणारा. [सं. पिंड; हिं, बींडा]

दाते शब्दकोश

बळी

पु. (कोष्टी, कर.) सुत उकलण्याच्या रहाटावरील सुताचे पांचशें पंचवीस (दोर्‍यांचे) फेरे; सात तोबे; थोक. 'आठ लुगडीं विणलीं म्हणजें एक बळी सूत शिल्लक राहतें.'

दाते शब्दकोश

बुचका

पु. १ (केस, तंतु, सूत इ॰ चा)पुंजका; जुमडा; गुंता. 'घेऊं गालगुचका उपटित शेंडीचा बुचका रे ।'-सला ८३. २ (पानें, अंकूर इ॰चा) झुपका. [सं. पुंज; तुल॰ इं. बंच] बुचक(कु,को)ली, बुचुकली, बुचकी-स्त्री. १ लहान बुचका. २ मांजराच्या पुढच्या पायाचा पंजा. ३ लहान मुलाचा पंजा.

दाते शब्दकोश

बुरकूल

न. १ कापड फार धुतलें गेल्यामुळें त्याचे निघा- लेले तंतू; वस्त्रावरचें फूल. २ डोक्यावरचे पिंजारलेले केस. ३ कच्चें सूत, दोरी इ॰चीं धसकटें. ४ वाळलेला दोडका, घोसाळें इ॰ च्या सालीच्या आंतील तंतुमय भाग. [बूर?]

दाते शब्दकोश

भांडण

खटका, बखेडा, तंटा, तिढें होतें, वाकडें, वितुष्ट, घर्षण, झंझट, झक्कड, बेबनाव, झगडा, कटकट, तंटाबखेडा, झकाझकी, कलह, भाऊबंदकी, जमत नव्हतें, सूत नव्हतें, भांडीं आपटत, जुळत नसे, वांधा निघे, बिनसे, परस्परांचें ठीक नसे, ३६ चा आंकडा, बरें नसे, बनलें नाहीं, फाटलें, एकमेकांवर बिघडले, खटके उडत, घोळ पडला, मैत्रींत मिठाचा खडा पडला, असा प्रकार घडला, सास्वासुनांचे बराच वेळ चालले होतें, भांड्याला भांडें लागतेंच, गृहकलह, अहिनकुलवत् मैत्री, एकाचें तोंड पूर्वेला तर एकाचें पश्चिमेला, पाण्यांत पाहतात, एकोपा गेला, परस्परांवर तापत, वाकड्यांत शिरला, संबंध बिघडले, स्नेह नासवला, वैरभाव उद्भावला.

शब्दकौमुदी

भोंपळसुती

भोंपळसुती bhōmpaḷasutī a (भोंपळा & सूत) That evidences or that requires no neatness, refinement, delicacy, skill, in the administration, management, or conduct of it--a state, a trading concern, a business, a work. 2 Slovenly or disorderly--dress, doings. 3 Coarse, gross, rude, rough--material or workmanship.

मोल्सवर्थ शब्दकोश

भसाडा

वि. १ भरड व जाड (गवत, सूत इ॰). २ बेढव व बोजड (अक्षर, आकृति, चिन्ह, दागिना, वस्तु). ३ भरड; राठ; ओबडधोबड (काम). ४ झोडकामी; धसक्या; रगड्या (कारागीर). ५ खाण्यापिण्यांत अशिष्ट आणि अर्वाच्य संवयीचा. ६ गव्हार वर्तनाचा, चालीचा. ७ (खा.) मोठा; कर्कश. [सं. भस्; भस !] भसाळ-वि. १ जंगी; अफाट; अवाढव्य; राक्षसी. २ ओबडधोबड; बेढव; भसाडी (इमारत, जिन्नस). [भस!]

दाते शब्दकोश

भसकापुरी

स्त्री. १ भरभरीत; नीरस तपकीर, तंबाखू. २ वाळलेल्या मिरच्यांची पूड; भगवती. ३ हलका व भुसभुसीत, कवडीमोल जिन्नस (धान्य,लांकूड, कपडा, सूत इ॰). ४ भाज- लेल्या धान्याचें पीठ.

दाते शब्दकोश

चाटा      

पु.       (विणकाम) गन्या; बॉबिनवर सूत गुंडाळण्यासाठी बॉबिन ज्या कांडीवर बसवतात ती.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चक्र

न. १ रथ, गाडी, इ॰चें चाक; कुंभाराचें चाक. 'मग भवंडीचें दंडे । भ्रमे चक्र ।' -ज्ञा १८.३१०. २ चाकासारखें एक आयुध; विशेषतः विष्णूचें सुदर्शन चक्र. 'कैसें चक्र हन गोविंदा । सौभ्यतेजें मिरवे ।' -ज्ञा ११.६०४. ३ एक खेळणें; चक्री; चकीर; चक्कर. ४ बोटावरच्या वर्तुलाकार रेषा; या शुभ गणतात (याच्या उलट शंखाकृति रेषा अशुभ समजतात). ५ सैन्य; सेनासमूह; जथा; जमाव. 'स्वचक्र, परचक्र.' 'पालाणिजे त्वरित चक्र अशा रवा हो !' -वामन, विराट ५.११. ६ राष्ट्र; देश; भू- प्रदेश; प्रांत; जिल्हा. ७ (संकेत) वडे (खाद्य पदार्थ). ८ (विणकाम) मागाच्या कपाळकाठीच्या शेवटाला अडकविलेलीं दोन चाकें; अथवा कपाळकाठी किंवा ढेकणी यांच्या ऐवजीं ज्या चाकाचा उपयोग करतात तें. नकशीच्या कामाच्या दोर्‍या-कठांचा चाळा आहे असें लांकडी चाक; ज्यावर सूत गुंडाळतात तें चाक (रीळ). ९ चक्राकार सैन्यरचना; व्यूह. 'चक्रव्यूह.' १० पाण्याचा भोंवरा; आवर्त. ११ भविष्यकथनासाठीं किंवा जातक वर्तविण्याकरितां काढलेली आकृति; कुंडली. १२ (शारीरशास्त्रांत) शरीराचे विभाग; प्राणस्थानें प्रत्येकी एकंदर सहा आहेत; आधार-लिंग-नाभि-हृत्-कंठ-भू-चक्र. षट्चक्रभेद पहा. 'येक सांगती अष्टांग योग । नाना चक्रें ।' -दा ५.४. २४. १३ संवत्सरांचें मंडल, राहाटी, आवृत्ति. १४ (ज्यो.) मंडल; वर्तुल, राशिचक्र; ज्योतिषचक्र. १५ (कुण.) संकट; गोंधळ; घोंटाळा; कोडे; फास. (क्रि॰ चक्रांत घालणें-येणें = फसणें.) १६ (सामा.) मंडलाकार भ्रमण करणारा, खालचा वर-वरचा खालीं होणारा रहाटगाडग्या- प्रमाणें फिरणारा पदार्थ, वस्तु, स्थिति. 'वायुचक्र.' 'संसारचक्र.' १७ राज्यक्रांति. १८ (शाप.) पेशी; पिंड, (इं.) सेल. १९ योगमार्गांत कल्पिलेलें एक चक्र. हीं चक्रें सहा जाहेत. मूलाधार; स्वाधिष्ठान; मणिपूर; अनाहत, विशुद्ध; सहस्त्रार. 'ऊर्ध्व तळौतें खाचें । तया खेवामाजि चक्रांचे । पदर उरती ।' -ज्ञा ६.२३७. २० चक्रवाक पक्षी. 'चक्रापरीच सजलों असतां फिराया ।' -र १७. [सं.] सामाशब्द- ॰गति-स्त्री. वर्तुळाकार (आपल्या भोंवतालीं व पातळींत) गति; चक्रावर्त व गरगर फिरणें. 'नित्य जे उदयास्त होतात ते चक्रगतीनें आणि ग्रहांस राश्यंतर होतें हें स्वगतीनें.' [सं.] ॰चाळ-वि. चमत्कार करणारा; लीलानाटकी. 'तुका म्हणे चक्रचाळें । वेड बळें लाविलें ।' -तुगा २१२४. 'स्वर्ग माळा अंगीं लेईला सुढाळ । कान्हो चक्रचाळ पंढरीचा ।' -निगा ११९. [चक्र + चाळणें] ॰दंड-पु. एक व्यायामपद्धति. दोन्ही हातांचे तळवे जमिनीवर टेकून ते स्थिर ठेवून पायांनीं वर्तुलाकृति फिरणें-व्यायाम मासिक ४.१९२३. चकरदंड पहा. ॰धर-पु. १ सुदर्शन चक्र धारण करणारा; विष्णु. २ महानुभाव पंथांतील प्रमुख महात्मा. [सं. चक्र + धर] ॰नेमीक्रम-पु. फिरणार्‍या चाकाच्या धांवेचा वरचा भाग खालीं व खालचा भाग वर जातो व पुनः वर खालीं होतो याप्रमाणें परिस्थिति बदलणारा क्रम; उच्च- नीच स्थित्यंतरें; जगाची चांगल्या दिवसांमागून वाईट, नंतर पुन्हां चांगले दिवस अशी रहाटी. [चक्र + नेमि = परीघ + क्रम] ॰पाणी-पु. सुदर्शनचक्र धारण करणारा विष्णु; चक्रधर. 'मनुज तनुज जैसा भूतळीं चक्रपाणी ।' -वामन रुक्मिणीपत्रिका १५. [सं.] ॰पाळणा-पु. यात्रेच्या, जत्रेच्या प्रसंगी टांगलेलें फिरते पाळणे. २ गोलाकार फिरणारा पाळणा, झोला. ॰पाळ-पु. १ प्रांताचा मुभेदार. २ चक्ररक्षक; रथी युद्ध करीत असतां रथाच्या चाकांचें रक्षण व योग्य गतिमध्यें चलन यावर देखरेख करणारा योद्धा. 'कीं दों पार्श्वीं दोघे भीमार्जुन चक्रपाळ जेविं रवी ।' -मोभीष्म ११.५१. [सं. चक्रपाल] ॰भेंड-डी-स्त्री. एक झाड, याचें फळ चक्राकार असतें. चक्करभेंडी पहा. ॰पूजा- स्त्री. चक्राची पूजा करण्याचा खानदेशांतील कुलाचार. ॰भेद-पु. युक्ति; हिकमत; डावपेंच; छक्केपंजे; युक्तिप्रयुक्ति; कावा. [सं. चक्र + भेद; शकटभेद याचा प्रतिशब्द] ॰मंडल(करण)-न. (नृत्य,) ओणवें होऊन गुडघ्याच्या आंतील बाजूनें दोन्ही हातांनीं पायांस विळखा घालणें. [सं.] ॰रक्षक-पु. चक्रपाल पहा. ॰वत्-क्रिवि. चक्रप्रमाणें-सारखा; वर्तुलाकार; गरगर; चक्रा- कार. 'पायीं धरोनि अवलीळा । तारक चक्रवत् भोवंडिला ।' [सं.] ॰वर्तीं-र्त्ती-पु. चक्राचा अधिपति; एका समुद्रापासून दुसर्‍या समुद्रापर्यंत असलेल्या पृथ्वीचा राजा; समुद्रवलयांकित पृथ्वीचा राजा; सार्वभौम राजा; बादशहा. 'जे चैतन्यचक्रव- र्तींची शोभा । जिया विश्वबिजाचिया कोंभा ।' -ज्ञा ६.२७२. 'पुढें पुढें राघव चक्रवर्ती । संगें प्रिया मानसतापहर्ती ।' -मुरामा [सं.] ॰वर्तिंनी-स्त्री. बादशाहीण; सार्वभौमराज्ञी. 'चक्र- वर्तिंनी श्री महाराणी व्हिक्टोरिया यांस आमची... अशी प्रार्थना आहे कीं.' -टि १.६६७. [सं.] ॰वर्तीघोडा-पु. घोड्याचा एक प्रकार. याच्या नाकाच्या मध्यभागीं भोंवरा असतो. -अश्वप १.२५. ॰वाक-पु. एक पक्षी. यांमध्यें दिवसां नरमादीचें संमीलन व रात्रीं वियोग होतो असा कविसंकेत. 'तया चक्रवाकांचें मिथुन । सामरस्याचें समाधान ।' -ज्ञा १८.८ ॰वाक घोडा- पु. घोड्याचा एक प्रकार. सर्व अंग पिवळें, चारी पाय पांढरें व डोळे श्वेतरंगाचे असा घोडा. -अश्वप १.२५. [सं.] ॰वाट- स्त्री. रथाच्या चाकाची चाकारी. 'परसैन्य देखोनि दृष्टिं । वेगें चालिला जगजेठी । घडघडिल्या चक्रवाटी । उठाउठीं पातला ।' -एरुस्व १०.४४ ॰वाटी-स्त्री. वावटळ. (क्रि॰ धडधडणें). 'घडघडीत चक्रवाटी ।' -उषा ८३१. ॰वाढ-॰वाढ व्याज- स्त्रीन. दर वर्षास अथवा ठरविलेल्या मुदतीस व्याजाचा हिशेब करून तें व्याज मुदलांत मिळवितात आणि ती रक्कम (रास) दुसर्‍या वर्षाचे किंवा मुदतीचे व्याजासही मुद्दल धरतात, अशा रीतीनें जें व्याज होतें तें; व्याजाला व्याज आका- रणें. ॰वात-पु. सोसाट्याचा वारा; वावटळ. [सं.] ॰वाल-पु. १ क्षितिज; काळी धार २ पृथ्वीच्या भोंवतीं कल्पिलेली पर्व- तांची ओळ, मंडळ. [सं.] ॰वाल-पु. एक पक्षी. [सं.] ॰वाहा-वि. १ चक्र बाळगणारा. २ चक्रधर; विष्णु (कुंभार); 'चक्र वाहा कां देवेंसी । केंवि कुलाळा करूं सरिसी ।' -ऋ ४७. [सं. चक्र + वह्] ॰वृद्धि-स्त्री. चक्रवाढव्याज पहा. [सं.] ॰वेला-स्त्री. (रूढ) चक्रवेळ. फलज्योतिषशास्त्रांतील एक वेळ, मुहुर्त; यावेळीं आरंभ केलेलें कोणतेंहि कार्य फार दिवस रेंगाळत राहतें. [सं.] ॰व्यूह-विभू-विहू-पु. १ एक विशिष्ट प्रकारची सैन्याची वाटोळी रचना; या सैन्यरचनेंत शत्रूचा प्रवेश होऊं शकत नाहीं. 'चक्रव्यूह गुरु द्रोण ।रचिता झाला अद्भुत ।' -पांप्र ४५.४. २ मोठी मसलत; कपटकारस्थान; कट; संकटाचा डाव रचणें; जाळें पसरणें, फार खोल, भानगडीचा, गुंतागुंतीचा केलेला बेत. 'आंक- ड्याचा भ्रामक चक्रव्यूह रचून अभिमन्यूप्रमाणें बुद्धिमान... नेटिव लोकांचा छल व वध करण्यास लॉर्ड कर्झन यांच्या कारकीर्दींत हिंदुस्थानसरकारनें तयार व्हावें...' -टि २.५२३. [सं. चक्र + व्यूह; म. विभू, विहू = व्यूह] चक्राकार-पु. वर्तुळ, चक्रासारखी आकृति. -वि. वाटोळी; चक्राप्रमाणें गोल. [सं.] ॰कार मासा-पु. एक प्रकारचा मासा; (इं.) स्टार फिश. -प्राणिमो १३६. चक्रांकित, चक्रांगीत, चक्रांगद-पु. १ चक्राकार रेषांचीं वर्तुळें, चिन्हें अस- लेला पांढरा दगड; याची देवांश मानून पूजा करण्यांत येते; हा समुद्रकांठी सांपडतो. 'चक्रांगीत चक्रतीर्थाहुनी । घेऊन येती ।' -दा १९.५. ३. 'सीळा सप्तांकित नवांकित । शालिग्राम शकलें चक्रांकित ।' -दा ४.५.६. २ (थट्टेनें) अंगावर देवीचे वण किंवा इतर कांहीं विद्रूपता असणारा इसम. [सं. चक्र + अंकित] चक्रांत- पु. कट; कारस्थान. 'किल्लेदारसाहेबांच्या विरुद्ध त्यानें चक्रांत केला.' -कोराकि ६१. चक्रावळ-चक्रावाळ-१ चक्रवाढ पहा. चक्रावाळ-२ स्त्री. घोड्याचें एक लक्षण; अंगावर अनेक केसांचें भोंवरे असणें; हें घोड्याचें अशुभ लक्षण मानितात. [सं. चक्र + आवलि] चक्रावळ-स्त्री. घोड्याचा एक रोग. -अश्वप २.२५८.

दाते शब्दकोश

चक्र      

न.       १. रथ, गाडी इत्यादीचे चाक; कुंभाराचे चाक : ‘मग भवंडीचें दंडे । भ्रमें चक्र’ – ज्ञा १८·३१०. २. चाकासारखे, वर्तुळाकार एक आयुध; विशेषतः विष्णूचे सुदर्शनचक्र : ‘कैसें चक्र हन गोविंदा । सौम्यतेजें मिरवे ।’ – ज्ञा ११·६०४. ३. एक खेळणे; चक्री; चकीर; चक्कर. ४. बोटाच्या वर्तुळाकार रेषा; या शुभ असतात असे म्हणतात. ५. (विणकाम) मागाच्या कपाळकाठीच्या शेवटाला अडकवलेली दोन चाके; अथवा कपाळकाठी किंवा ढेकणी यांच्याऐवजी ज्या चाकाचा उपयोग करतात ते. नकशीच्या कामाच्या दोऱ्या - काठांचा चाळा आहे असे लाकडी चाक; ज्यावर सूत गुंडाळतात ते रीळ. ६. चक्राकार सैन्यरचना; व्यूह. ७. पाण्याचा भोवरा; आवर्त. ८. भविष्य-कथनासाठी किंवा जातक वर्तविण्यासाठी काढलेली आकृती; कुंडली. ९. संवत्सराचे मंडल, राहाटी, आवृत्ती. १०. (ज्यो.) सूर्यमंडल; वर्तुल; राशिचक्र; ज्योतिषचक्र. ११. (सामा.) मंडलाकार भ्रमण करणारा, फिरणारा पदार्थ, वस्तू, स्थिती. उदा. वायुचक्र, संसारचक्र. १२. योगमार्गात कल्पिलेली चक्रे, प्राणस्थाने : ‘उर्ध्व तळौतें खाचें । तया खेवामाजि चक्रांचे । पदर उरती ।’ - ज्ञा ६·२३७. पहा : षट्चक्र भेद. १३. (ल.) भाकर. १४. आवर्तन. १५. वडा हे खाद्य (भिक्षुकांच्या भाषेत). १६. तेल्याचा घाणा. [सं.] चक्र फिरणे – हालचाली सुरू होणे; खटपट होणे : ‘तिचे लग्न जुळण्याची चक्रे जोरात जोरात फिरू लागली होती.’ - वासुनाका ११.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चंद्र      

पु.       १. आकाशात दिसणारा, कला असलेला एक सूर्यप्रकाशित गोल; पृथ्वीचा उपग्रह; नवग्रहांतील दुसरा ग्रह; चंद्रमा; चांद; चांदोबा; सोम. २. मुसलमानी तारीख. ३. (ल.) गाई, म्हशी इत्यादिकांच्या कपाळावरील पांढरा ठिपका. ४. स्त्रियांच्या कपाळावर गोंदलेली अर्धचंद्राकृती कोर. ५. मोराच्या पिसातील डोळा. ६. चंद्रामृत : ‘तैसें शरीर होये । जै वेळीं कुंडलिनी चंद्र पिये ।’ – ज्ञा ६·२·५९. ७. स्त्रियांच्या नाकातील किंवा डोक्यातील एक चंद्राकार दागिना. –(तंजा) [सं.] (वा.) (सुताने) चंद्र ओवाळणे – द्वितीयेच्या दिवशी दिसणाऱ्या नूतन चंद्रावरून सूत किंवा दशी ओवाळणे. यामुळे नवीन वस्त्रे मिळतात अशी समजूत आहे. चंद्र पिकणे – पूर्ण चंद्रबिंबाचा प्रकाश पडणे : ‘चंद्र पिकलासे अंबरीं । तें पिक घ्यावे की चकोरीं ।’ – कक १·८·६२. (माण.) चंद्राने कोंबडा करणे – चंद्राला खळे पडणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चंद्र

पु. आकाशांत दिसणारा एक कलायुक्त व सूर्यप्रकाशित गोल; पृथ्वीचा उपग्रह; नवग्रहांतील दुसरा ग्रह; चंद्रमा; चांद; चांदोबा; सोम. २ मुसलमानी तारीख. 'आज चंद्र तेरावा माहे मोहरम.' ३ (ल.) कित्येक गाई, म्हशी इत्यादिकांच्या तोंडा- वर जो पांढरा ठिपका असतो तो. ४ स्त्रिया कपाळावर जी अर्ध- चंद्राकृति गोंदतात ती कोर. ५ मोराच्या पिसांतील डोळा. ६ चंद्रामृत. 'तैसें शरीर होये । जे वेळीं कुंडलिनी चंद्र पिये ।' -ज्ञा ६.२५९. ७ (तंजा.) स्त्रियांच्या नाकांतील एक अलंकार. ८ डोक्यांतील एक चंद्राकार दागिना. [सं.] (वाप्र.) (सुतानें) चंद्र ओवाळणें-द्वितीयेच्या दिवशीं दिसणार्‍या नूतन चंद्रावरून सूत किंवा दशी ओवाळणें. यामुळें नूतन वस्त्रे मिळतात अशी समजूत आहे. ॰पिकणें-पूर्ण चंद्रबिंबाचा प्रकाश पडणें. 'चंद्र पिकलासे अंबरीं । तें पिक घ्यावें कीं चकोरीं ।' -कथा १.८.६२. ॰मोहरणें- (माण.) चंद्र उगवणें. चंद्रानें कोंबडा करणें-चंद्राला खळें पडणें. म्ह॰ चंद्रम् दिवटे दिवम् थाळी = (व्यंगोक्तीनें) अत्यंत दरिद्रावस्था; ज्याच्या घरांत चंद्र हा दिवटीचें काम करतो व नागवेलीचें पान थाळीच्या ऐवजीं उपयोगी पडतें. सामाशब्द-॰कर-पु. १ चंद्र- किरण. 'हारपती कां चंद्रकर । फांकतां जैसे' -ज्ञा १८.४०६. २ चंद्रकळा लुगडें. 'थाट करुनि मार नेसली चंद्रकरकाळी ।' -मसाप १.१.२. ॰कला-ळा-स्त्री. १ चंद्राची कला; चंद्रबिंबाचा षोडशांश. २ एक प्रकारचें एक रंगी लुगडें (तांबडे अथवा काळें). चंद्रकला गंगा जमुना = उभार व आडवण काळें, किनार एक बाजू हिरवी, एक बाजू तांबडी असें एक स्त्रियांचें वस्त्र. ३ चंद्राचा प्रकाश, किरण. 'जैसें शारदीयेचें चंद्रकळे- । माजीं अमृत कण कोंवळे ।' -ज्ञा १.५६. ॰कांत-पु. एक काल्पनिक रत्न, मणि; चंद्राचे किरण यावर पडले असतां यास पाझर फुटतो असा समज आहे. 'अहो चंद्रकांतु द्रवतां कीर होये । परि ते हातवटी चंद्रीं कीं आहे ।' -ज्ञा ९.२९. ॰कांती-वि. चंद्रकांताचा बनविलेला (चष्मा). [सं.] ॰कोर-स्त्री. चंद्राची कोर; किनार. (कु.) १ चंद्रको- रेच्या आकाराचें एक सुवर्णाचें शिरोभूषण. या कोरेला लागूनच नाग व विष्णुमूर्ति कोरण्याची हल्लीं नवी तर्‍हा निघाली असून याच्या पुढच्या बाजूस घागर्‍या लावितात. २ (कों.) कपाळा- वरची कुंकवाची अगदीं बारीक लहान कोर. [चंद्र + कोर; तुल॰ सं. चंद्रकेयूर (-राजवाडे भाअ १८३४)] ॰ग्रहण-न. चंद्रास लाग- णारें ग्रहण. ग्रहण पहा. पृथ्वीच्या छायेंत चंद्र आला असतां त्याला ग्रहण लागतें तें. [सं.] ॰घार-घारी-स्त्री. (विनोदार्थीं) कानशिला- वर लावलेली चपराक; चापटी; मार. (क्रि॰ दाखवणें, देणें). 'मुष्टि- मोदक चंद्रघार्‍या दिल्या म्हणजे विद्या येते.' [चंद्र + घार (पक्षी)] ॰चकोरन्याय-पु. चंद्र अमृतबिंदु स्त्रवतो व चकोर सेवन करतो त्यावरून असणारा चंद्र व चकोर यांमधील संबंध. ॰चूड- शेखर-पु. महादेव; शंकर. याच्या जटेंत चंद्रकला असते यावरून. [सं.] ॰जोत, ज्योति-स्त्री. १ चंद्रासारखा प्रकाश देणारें दारू- काम; हवाई; याचे निरनिराळे प्रकार आहेत-सफेत, तांबडी, लाल, हिरवीगार, पिवळी, अस्मानी, किरमिजी, गुलेनारा, आबाशाई, जांभळी, नारिंगी, प्याजी. 'चंद्रज्योती चंद्रकार । तेजें अंबर प्रकाशे ।।' -ह २.१२९. २ (व.) मोंगली एरंड. याच्या बिया विषारी असतात, परंतु जाळल्या असतां चंद्राप्रमाणें प्रकाश पडतो. ३ चांदणें; चंद्रप्रकाश. ४ (उप.) कुटुंबांदिकाला लाग- लेला कलंक, डाग. ५ डोळ्यांत घालावयाचें एक औषध. [चंद्र + ज्योति] ॰ज्योत्स्ना-स्त्री. (काव्य) चंद्रप्रकाश, चांदणें. 'मुखीं चंद्रज्योत्स्ना अवयव यथापूर्व बरवे ।' ॰धणी-स्त्री. मनाची तुप्ति. 'जाऊं चोरूं लोणी । आजी घेऊं चंद्रधणी ।' -तुगा २२८. ॰नक्षत्र-न. चंद्राधिष्ठित नक्षत्र [सं.] ॰पर्व-न. चंद्रग्रहणाचा काल, अवधि. [सं.] ॰प्रभा वटी-स्त्री. रससिंदूर, सुवर्णभस्म, अभ्रकभस्म हीं सर्व समभाग, सर्वांबरोबर खैराचा कात, मोचरस घेऊन सर्वांचा एकत्र खल करून सावरीच्या मुळ्यांच्या रसानें एकत्र दोन प्रहर खलून हरभर्‍याएवढी गोळी करतात ती. ही अतिसारावर गुणकारी आहे. -योर १.४३४. ॰फूल- न. सोन्याचा एक दागिना. -ऐरापु विवि ४२९. ॰बल-ळ- न. १ चंद्राची अनुकूलता. माणसाच्या जन्मराशीला चंद्राचें साहाय्य. २ (ल.) मदत; साहाय्य 'नेदावें चोराशीं चंद्रबळ ।' -तुगा ३२५३. ओढून चंद्रबळ आणणें-१ एखादी गोष्ट इष्ट असतांहि वरपांगीं तिच्याविषयीं अनिच्छा दाखविणें; आढे- वेढे घेणें. 'आजीनें मला हांका मारल्या मी बराच वेळ ऊं ऊं करून ओढून चंद्रबळ आणिलें... शेवटी दुर्गीनें मला ओढून नेलें.' -पकोघे. २ अंगीं प्रतिष्ठा नसतां बळेंच धारण करणें. (एखाद्यास) चंद्रबळ देणें-एखाद्यास कांहीं कार्याविषयीं उत्ते- जन देणें. -तुगा ३२५३. ॰बाळी-स्त्री. (कु.) कानांतील एक मोत्यांचा दागिना. चंद्रपश्वा. यामध्यें चंद्रकोरेप्रमाणें हिरकणी बसवितात. ॰बिंब-न. चंद्राचें बिंब, मंडल, गोल. [सं.] ॰मजकूर-पु. (व.) (विनोदानें) रोजची चंदी. ॰मंडळ-न. १ चंद्रलोक; चंद्रभुवन; चंद्राचें राज्य. २ चंद्रबिंब. 'शुद्ध चंद्रमंडल पाहून स्नान करावे.' [सं.] ॰मणि-पु. एक काल्पनिक रत्न. चंद्रकांत पहा. चंद्रमा-पु. १ चंद्र. 'मुखचंद्री चंद्रमा ।' -एरुस्व ७.१७. २ (तंजा.) एक शिरोभूषण. [सं.] ॰मुखी-वदना- स्त्री. चंद्रासारखें जिचें तोंड आहे अशी रूपवती स्त्री; सुंदर स्त्री. [सं.] ॰मूलिका, मूळ-स्त्रीन. एक वनस्पति. [सं.] ॰मौळी- पु. शंकर. 'उठोनियां प्रातःकाळीं । वदनी वदा चंद्रमौळी ।' -भूपाळी गंगेची ६. 'नाम जपतां चंद्रमौळी । नामें तरला वाल्हा कोळी ।' -तुगा २५२२. -वि. (डोक्यावर चंद्र धारण करणारा) ज्याच्या छपरांतून चंद्रकिरणांचा प्रवेश आंत होतो असें (म्हणजे मोडकळीस आलेलें, जीर्ण झालेलें) घर इमारत; पडक्या घराला व्याजोक्तीनें म्हणतात. [स. चंद्रमौलि = शंकर] म्ह॰ केळीवर नारळी आणि घर चंद्रमौळी. ॰रेखा-स्त्री. चंद्राची कोर. 'पाडि व्याची चंद्ररेखा । निरुती दावावया शाखा ।' -ज्ञा १५.४७०. [सं.] ॰वंती-स्त्री. चांदणें. 'नदीतटीं रात्री न चंद्रवंती ।' -जगन्नाथ (शके १६६९.) राजवाडे ग्रंथमाला ॰विकासी-वि. चंद्रोदयानंतर उमलणारें (कमलादि पुष्प). शाला-स्त्री. उंच माडी; गच्ची. 'चंद्रासही स्पर्शति चंद्रशाळा ।' -सारुह ५.२०. ॰समुद्रन्याय-चंद्रोदयानें समुद्रास भरती येते या न्यायानें. 'वॉसवेल यास या महापंडिताचें (जॉन्सनचें) वक्तृत्वसेवन कर- ण्याची...अतोनात इच्छा होती व इकडे जॉन्सन यासहि कोणी भाविक श्रोता मिळाला असतां चंद्रसमुद्र न्यायानें त्याच्या वाणीस मोठें भरतें येई.' -नि ६८६. ॰सूर-पु. (योगशास्त्र) डाव्या नाकपुडीनें श्वास सोडणें. याच्या उलट सूर्यसूर. ॰सूर्य-पु. (चंद्र आणि सूर्य) इडा व पिंगला या दोन नाड्या. 'चंद्रसू्र्यां बुझा- वणी । करूनि अनुहताची सुडावणी ।' -ज्ञा १२.५४. ॰सूर्य- संपुट-न. वरील दोन नाड्यांचें संगमस्थान. 'बंधत्रयाचीं घरटीं । चंद्रसूर्य संपुटीं । सुये चित्त ।' -ज्ञा १३.५०८. ॰हार-पु. स्त्रियांच्या गळ्यांतील एक अलंकार; सोन्याच्या कड्यांची माळ.

दाते शब्दकोश

चपडाई

स्त्री. (जरतारी धंदा) १ सूत चापट करणें. २ चपण्याचें यंत्र.

दाते शब्दकोश

चपडार्इ      

स्त्री.       (जरतारी धंदा) १. सूत चापट करणे. २. चपण्याचे यंत्र.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चरी

स्त्री. (कों) १ लहानसा चर; खंदक; खांच; मोरी; नहर; गटार. २ लोंकर किंवा सूत हातावर वळून केलेली दोरी. 'दोन हजार वांव लांब चर्‍याची शिडी तयार करून बरोबर घेतली.' -नरवीरमालुसरे ४६. [चर पासून अल्पत्वदर्शक]

दाते शब्दकोश

चरी      

स्त्री.       लोकर किंवा सूत हातावर वळून केलेली दोरी; जुन्या कपड्यांची पट्टी, चिंधी, दोरी इत्यादी : ‘ती (चिटोऱ्यांची गाठोडी) चऱ्यासुतळ्यांनी बांधलेली होती.’ – हातभट्टी १३.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चर्का

(पु.) [फा. चर्खा] सूत काढण्याचा रहाट.

फारसी-मराठी शब्दकोश

चरखा      

पु.       सूत काढण्याचे यंत्र, रहाट. [फा.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चरणे      

अक्रि.       (लोकरीचे सूत, पेड) हातावर पिळणे; गुंडाळणे; वळणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चरणें

उक्रि. (लोकरींचे सूत, पेड) हातावर पिळणें, गुंडा- ळणें, वळविणें, वळणें.

दाते शब्दकोश

चुळचुळ

चुळचुळ cuḷacuḷa f (Imit.) Urging, hurrying, rousing impatiently. v लाव. 2 also चुळचुळा m Restless eagerness, impatience, fidgetiness; itching, fig. yet sometimes lit. v सूट. 3 also चुळाचुळा m Remorse or regret; mental disquietude.

मोल्सवर्थ शब्दकोश

चुटका

पु. (क.) रहाटाला गुंडाळलेल्या पंचवीस फेर्‍याचें सुत. 'कितिही व्यवस्थेनें कोष्ठी लोकांवर नजर ठेवली तरी ते एक चुटकाभर सूत काढून ठेवल्याशिवाय राहणार नाहींत.' [हिं.]

दाते शब्दकोश

चुटका      

पु.       (कर.) रहाटाला गुंडाळलेल्या पंचवीस फेऱ्यांचे सूत. [हिं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दांडगा

वि. १ भक्कम; मजबूत; राकट. २ धटिंगण; मस्त व आडदांड; दंडेल; रगड्या; अडमुठ्ठा. 'अहर्निशहि भांडला त्रिनवरात्र जो दांडगा ।' -केका ३५. ३ हटवादी; हेकेखोर; हेकड. ४ धीट; साहसी. ५ प्रचंड; राक्षसी; आवढव्य; अजस्त्र (प्राणी, वस्तु इ॰). ६ जाडेंभरडें; ओबडधोबड; तलम नसणारें (सूत, वस्त्र इ॰). ७ भरपूर; विपुल; पुष्कळ; जोराचा (पाऊस, पीक,वारा इ॰). [दांड + गा प्रत्यय] ॰उतार-पु. फक्त उंच व बळकट मनुष्यासच कसें तरी उतरून जातां येण्याजोगे नदी, खाडी इ॰ कांचा उतार; खोल व कठिण उतार [दांडगा + उतार] ॰धिंग-वि. आडदंड; रानवट; अडमुठ्ठा; रगड्या; धटिं- गण.

दाते शब्दकोश

दांडगा      

वि.       १. भक्कम; मजबूत; राकट. २. धटिंगण; मस्त व आडदांड; दंडेल; रगड्या; अडमुठा. ३. हटवादी; हेकेखोर; हेकट. ४. धीट; साहसी. ५. प्रचंड; राक्षसी; अवाढव्य; अजस्र (प्राणी, वस्तू इ.). ६. ओबडधोबड; जाडेभरडे (सूत, वस्त्र इ.). ७. भरपूर; विपुल; पुष्कळ; जोराचा (पाऊस, पीक, वारा इ.).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

देवाणघेवाण      

न.       १. देवघेव; व्यवहार; व्यापार; देण्याघेण्याची क्रिया. २. उसने वाण; उसने फेडणे (फायदा, तोटा इ.). ३. थोडे–फार देणे किंवा घेणे; थोडीफार सूट देऊन वगैरे केलेली तडजोड.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

देवाणघेवाण

न. १ देवघेव; व्यवहार; व्यापार; देण्या- घेण्याची क्रिया. २ उसनें वाण; उसनें फेडणें. (फायदा, तोटा, इ॰). ३ थोडें फार देणें किंवा घेणें; थोडीफार सूट देऊन वगैरे केलेली तडजोड. [देणें घेणें]

दाते शब्दकोश

दगला सामान

पुअव. नरमिना, छीट, शेले, सूत, ताफता वगैरे वस्त्रें. [हिं.]

दाते शब्दकोश

दिढी

स्त्री. एक आणि अर्धा; दीडपट. [दीड] ॰काढी- वाढी-स्त्री.पेरणीच्या वेळीं दिलेलें धान्य पीक आल्यानंतर दीड- पटीनें घेण्याचा करार किंवा अशा करारावर दिलेलें कर्ज ॰बाद- वजा सूट-स्त्री. (मुलकी, वसुलीमध्यें) एकतृतीयांश सूट. दिढें- शअ. दिडक्यांमध्यें दिडानें गुणतांना योजलेला शब्द. उदा॰ दहा दिढें पंधरा. दिढोतरा-त्रा-पु. दरमहा दर शेंकडा दीड प्रमाणें व्याजाचा दर.

दाते शब्दकोश

दिढीबाद, दिढीवजासूट      

(मुलकी, वसुलीमध्ये) एकतृतीयांश सूट. दिढे      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दोरी      

स्त्री.       १. बारीक दोर. २. जमीन–मोजणीचे एक परिमाण. २० परतन, ८० किंवा १२० बिघे. ३. एक लहान मासा. ४. (सोनारी – सुतारी धंदा) इंचाचा एक अष्टमांश भाग; सूत. [सं.दोरक] (वा.) दोरी सैल देणे, दोरी सैल सोडणे, दोरी ढिली करणे – बंधन, नियम इ. शिथिल करणे; स्वातंत्र्य देणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दोरीसूत

दोरीसूत dōrīsūta ad (दोरी & सूत A thread.) Straightly, directly, in a right line.

मोल्सवर्थ शब्दकोश

दशी      

स्त्री.       कापडाच्या टोकाचा न विणलेला दोरा, सूत. (विणकाम) रक्टनच्या पुढे चार बोटे नुसता असलेला उभार. [सं. दशा; क. दशे] (वा.) दशी वाहणे –शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी चंद्राकडे जुन्या वस्त्राची दशी फेकतात व ‘जुने वस्त्र घे व नवे वस्त्र दे’ असे म्हणतात ती पद्धत.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दुट्टा

पु. (कों.) १ घडी केलेला कागद; दुंडा. (इं.) फोलिओ. २ (विणकाम.) सुताची दूण, दुमड; दुहेरी सूत.

दाते शब्दकोश

दुट्टा      

पु.       १. घडी केलेला कागद; दुंडा; (इं.) फोलिओ. २. (विणकाम) सुताची दूण, दुमड; दुहेरी सूत. (को.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दुट्टपी

दुतोंड्या, दुरंगी व दुहेरी, आंत एक बाहेर एक, बाहेर गोरा आंत काळा, दोन डगरीवर हात, चिमणीबरोबर आणि ससाण्याबरोबरही पळणारा, मनांत एक बाहेर एक, चाेरावरोबर चोर व सावाबरोबर साव, एका दगडानें दोन पक्षी मारूं जाणार, तुमच्याशीं मैत्री; शत्रूशीं सूत, तरला तर म्हणणार कावळा बुडाला तर बेडूक, नरो वा कुंजरो वा पंथाचे, साधलें तर पाहणार; नाहीं तर आमची इच्छाच नव्हती म्हणून मोकळे !

शब्दकौमुदी

धागा

पु. १ दोरा सूत; दोरी; सूत्र. २ नातें, संबंध सोय. रीक धागादोरा. ३ हरवलेल्या वस्तूचा तपास लावण्याचें साधन. माग. खाणाखुणा. 'सोडली पुण्याची जागा तोडिल्या धागा भडकल्या पागा कालवा झाला ।' -ऐपो ४३३ -[हिं. धागा; सिं. धागो] कच्या धाग्याची रयत = अतिशय आज्ञाधारक व गरीब रयत. कच्या धाग्यांत असणें-वागणें-दास होणें; अति- शय आज्ञाधारक; गरीब असणें. कच्या धाग्यानें बांधणें-अगदीं आज्ञेत, कह्यांत ठेवणें. धाग्यावरून ताग्याची परीक्षा-शिता- वरून भाताची परीक्षा याप्रमाणें. ॰दोरा-पु. १ संबंध (नात्याचा, स्नेहाचा, सारखेपणाचा). (क्रि॰ असणें). २ पत्ता; ठावठिकाण. (क्रि॰ लागणें).

दाते शब्दकोश

पु० दोरा, सूत.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

धागा      

पु.       १. दोरा; सूत; दोरी; सूत्र. २. नाते; संबंध; सोयरीक; धागादोरा. ३. हरवलेल्या वस्तूचा तपास लावण्याचे साधन; माग; खाणाखुणा. [हिं.] (वा.) धागा भरणे – फाटका कपडा शिवणे. धाग्यावरून ताग्याची परीक्षा करणे – अल्पशा नमुन्यावरून, संबंधावरून पूर्ण वस्तू, गोष्ट ओळखणे, तपासणे. कच्च्या धाग्याची रयत – अतिशय आज्ञाधारक व गरीब रयत. कच्च्या धाग्यात असणे, कच्च्या धाग्यात वागणे – दास होणे; अतिशय गरीब, आज्ञाधारक असणे. कच्च्या धाग्याने बांधणे – अगदी आज्ञेत, कह्यात ठेवणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

धांगड

वि. १ जाडेंभरडें; खरबरीत (कापड, सूत, इ॰). २ दांडगा, अकुशल; धसमुसळा (माणूस, काम). ३ धिप्पाड; मोठाड; जाडजूड; बळकट (माणूस, जनावर). ४ अगडबंब, गैर- वाजवी मोठा (पदार्थ). ॰धिंगड-वि. ओबडधोबड; अडाणी; बेडौल (काम). ॰धिंगा-पु. १ ज्यास ताळतंत्र नाहीं असें वर्तन; दांडगाई; गोंधळ; चाळे; धिंगामस्ती. 'पिंगाबाई पिंगा गे । अवघा धांगडधिंगा गे ।' -एकनाथ. २ धांगड मुलगी; आडदांड, धस- कट्या पोर. 'धीट धांगड्या धांगडधिंगा ।' -अमृत २४. धांग- डणें-उक्रि. धिंगडणें; नाचणें; उड्या मारणें; खिदळणें; बागडणें इ॰ धांगड धिंगा घालणें. धांगडा, धांगडो, धांगला-पु. दांडगाई; गोंधळ; दंगा; आरडाओरड. (क्रि॰ करणें; वाजणें; लावणें; मांडणें; उठवणें).

दाते शब्दकोश

धांगड      

वि.       १. जाडेभरडे; खरबरीत (कापड, सूत इ.). २. खोडकर; दांडगा; अकुशल; धसमुसळा (माणूस, काम). ३. धिप्पाड; मोठाड; जाडजूड; बळकट (माणूस, जनावर). ४. अगडबंब; गैरवाजवी मोठा (पदार्थ).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

धावता धोटा      

(विणकाम) हातांनी दिलेल्या यांत्रिक धक्क्याने फेकला जाणारा, मागावर आडवे सूत घालीत भरभर फिरणारा धोटा; सटर. धावती      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

धेडीसूत      

न.       धेड लोक पूर्वी कातून बाजारात विकायला आणीत ते सूत.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

धोटा-टें

पुन. १ (विणकाम) उभ्या सुतांत आडवे धागे टाकण्याचें साधन; कापडांत आडवें सूत घालण्यास ज्यांत कांडी भरून ठेवतात व जें उभ्या दोर्‍यांतून इकडून तिकडे आडवें फेंक- तात तें. २ गुरांना औषध पाजण्याचें नळकांडें. 'बैलाला धोट्यानें तेल पाजा.' ३ पोकळ नळा; पिचकारी. 'घेओनी कनकाचे धोटें । सिंपताती एकें जवटें ।' -शिशु ६६९.

दाते शब्दकोश

धसाडा      

वि.       १. जाड; खरबरीत (सूत, गवत, कोणताही पदार्थ). (व.) २. दांडगा; धसमुसळ्या.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

एकेरा, एकेरी      

वि.       १. दुहेरी, घडीचा किंवा पिळलेला नव्हे असा; एक पदरी (कापड, कागद, सूत वगैरेला लावतात); विरळ विणीचे (सणंग). २. कोता; बारीक; दुबळा (गाण्याच्या कामी गळा आवाज वगैरे). ३. एकवचनी; अरेतुरे असा सलगीचा (उल्लेख, संबोधन) : ‘तूंमला शिवकुमारी या एकेरी नांवाने हाक मार गडे !’-विवि ८·२·३०.४. एक एक; स्वतंत्र, दोन दोन, तीन तीन अशा प्रकारे संबद्ध नव्हेअसा. (वा.) एकेरीवर येणे–अरे तुरे म्हणणे, एकेरी नावाने संबोधणे (अनादरयुक्त) २. (ल.) चिरडीस जाणे, चिडणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

एकेरा-री

वि. १ दुहेरी, घडीचा किंवा पिळलेला नव्हे असा; एकपदरी (कापड, कागद, सूत वगैरेला लावितात); विरळ विणीचें (सणंग). उ॰ 'एकेरी फुलें गुंफून केलेली माळ ती एकेरी माळ.' २ कोता; बारीक; दुबळा. (गाण्याच्या कामीं गळा, आवाज वगैरे). ३ एकवचनी; अरेतुरे असा (उल्लेख, संबोधन). 'तूं मला शिवकुमारी या एकेरी नांवानें हांक मार गडे !' -विवि ८.२.३०. 'थोरास एकेरी शब्द बोलूं नये.' ४ एकएक; स्वतंत्र. दोन दोन, तीन तीन अशा प्रकारें संबद्ध नव्हे असा. एकेरीवर येणें-१ अरेतुरे म्हणणें; एकेरी नांवानें संबोधणें (अनादरयुक्त). २ (ल.) चिरडीस जाणें; चिडणें.

दाते शब्दकोश

एकसुती

एकसुती ēkasutī ad (एक & सूत) In an uniform manner; without variation or interruption.

मोल्सवर्थ शब्दकोश

एकसूत

न. एक रांग, पद्धत, व्यवस्था, रीत वगैरे; एक मासला; एक फरमा. [एक + सूत]

दाते शब्दकोश

गैरदस्त, गैरदस्ती      

वि.       सरकारसाऱ्याची सूट असलेली (जमीन).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गांठणें, गांठविणें

उक्रि. १ गांठीनें सांधणें; जोडणें; गांठ देणें-मारणें; गांठळणें (दोरी, सूत इ॰ नीं). २ गांठीनें बंद किंवा सुरक्षित करणें; दोरींत ओंवून हालेनासें करणें (माळेंतील मणी इ॰). ३ ऐन वेळीं जाणें; अवचित धरणें किंवा अडविणें; ऐन संधि साधणें व पकडणें. 'त्याला चोरांनीं ऐन खिंडींत गांठलें.' ४ (ल.) आकळणें; वश करून घेणें; वठणीवर आणणें; कह्यांत आणणें. 'हा पराकाष्ठेचा दुराग्रही, याला गाठेल तो धन्य ।' ५ मिळविणें; संपादणें. 'सर्वत्र तूं यशस्वी त्वद्दासें यश सुखेंचि गांठावें ।' -मोसभा १.६८. ६ संपविणें; साधणें; पोहोंचणें (प्रवास, मजल, मुक्काम, गांव). ७ ताब्यांत आणणें; कबजा घेणें (देश, प्रांत यांचा). ८ भेटणें; भिडणें; सन्मुख होणें. [गांठ]

दाते शब्दकोश

गाठविणे      

उक्रि.       १. गाठीने सांधणे; जोडणे; गाठ देणे; गाठमारणे; गाठळणे (दोरी, सूत इ. नी.). २. गाठीने बंद किंवा सुरक्षित करणे; दोरीत ओवून हालेनासे करणे (माळेतील मणी इ.). ३. एखादा दागिना वगैरे रेशमाने पटविणे (पटवेकरी). [सं. ग्रथन]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गावई, गवई      

स्त्री.       १. सरकारी जुलुमामुळे आपले गाव सोडून दुसऱ्या गावी केलेली वस्ती. २. सरकारीं हुकुमाची अमान्यता; सरकारी अटींना प्रतिरोध (साऱ्यात सूट, तहकुबी इ. मिळविण्यासाठी गावचे सर्व लोक हा उपाय अमलात आणीत असत).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गडी      

पु.       १. मनुष्य : ‘आम्ही ज्ञानी सुज्ञ गडी ।’ - विक ९५. २. हाताखालचा माणूस; हस्तक; बगल्या; आडकाम्या माणूस; मुलगा; छोकरा; मोलकरी; मजूर; चाकर इ. ३. सहचर, सोबती (सहाध्यायी, गुरुबंधू, वर्गबंधू, खेळगडी, एका धंद्यातील सहकारी); मित्र : ‘मला माझा तूं हंस गडी राया ।’ - र १८. ४. (धंदेवाचक शब्दाच्या पुढे) व्यक्ती; असामी; माणूस, जसे :- ब्राह्मण- भट्ट - मुशाफीर - शिपाई गडी : ‘येतांचि विक्रम लवे श्रीहरिचा दयितदास वीरगडी ।’ - मोविराट ४·८९. ५. खेळातील भागीदार; भाग घेणारी मंडळी. ६. (सोंगटी इ. खेळ) भिडू; जोडीदार. (क्रि. धरणे, मिटणे, तोडणे, फुंकणे). : ‘पुरे पुरे तुझी कान्हो गडी रे।’ - मध्व १७३. [क. गडी] (वा.) गड्याने गडी साधणे - आधी एक नंतर त्याच्या सहाय्याने दुसरा अशी साखळी बांधणे; सुताला सूत जोडणे : ‘गड्यानें गडी बांधून कर्नाटक आपले करावें’ - पेदभा २८ पत्र ८४.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गिरण, गिरणी      

स्त्री.       कापसाचे सूत काढण्याचा, गठ्ठे बांधण्याचा, दळण दळण्याचा इ. कारखाना; सामान्यतः यंत्रावर चालणारा उद्योग.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गिरण-णी

स्त्री. कापसाचें सूत काढण्याचा, गठ्ठे बांधण्याचा, दळण दळण्याचा इ॰ कारखाना; सामान्यतः यंत्रांनीं चालणारा कारखाना.

दाते शब्दकोश

गजर      

पु.       चांदीच्या सळईवर बारीक सूत गुंडाळून केलेला एक दागिना : ‘रामलक्ष्मण दोन्ही काठाचे पदर । सावळी सीताबाई मधीं ठुशीचा गजर ।’ - लोसामा ५·६.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गजरा

पु. १ पुष्पहार; वेणींतील, हातांतील लहान हार; पुष्पगुच्छ. २ मोती इ॰ चें कांकण, बांगडी; करभूषण. ३ (सोनारी) दाभणाच्या जाडीच्या एका घोट्याच्या मापाच्या व दोन्ही टोकांस फांसे केलेल्या अशा चांदीच्या सळईवर एक बारीक सूत गुंडाळून तयार होणारा दागिना. ४ पखवाज किंवा तबला यांच्या तोंडांच्या कांठाबरोबर जाड व अरुंद चामड्याच्या वादीचा वळलेला वेठ, वेष्टण, वेणीचें कडें; याला भोंकें घेऊन त्या कातड्यासह भोंकातून वादी आवळतात. [हिं.] गजरेदार-वि. गज- र्‍याच्या आकाराचा (अंगरखा) गजर्‍याची आकृतियुक्त. 'गजरेदार आंगरखे जाऊन पोकळ आंगरख्यांची भास पडली,' -नि २८.

दाते शब्दकोश

गजरा      

पु.       १. फुले दोऱ्यात गुंफून करतात ती माळ. हा केसात, हातात घालतात. २. मोती इ. चे काकण, बांगडी. ३. (सोनारी) दाभणाच्या जाडीच्या एका घोट्याच्या मापाच्या व दोन्ही टोकांना फासे केलेल्या अशा चांदीच्या सळईवर एक बारीक सूत गुंडाळून तयार केलेला दागिना. [हिं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गना      

पु.       (विणकाम) कापड विणताना आडवे घालायचे सूत धोट्यातील ज्या कांडीवर गुंडाळतात ती कांडी; गणा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गणा      

पु.       १. जोंधळा किंवा बाजरीच्या ताटाचा शेंडा अथवा शेंड्याचा भाग. २. साळ्या- कोष्ट्यांची चाकावरील सूत गुंडाळण्याची बोरूची किंवा वेताची कांडी, कांडीकरिता घेतलेला ताटाचा तुकडा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गणा

पु. जोंधळा किंवा बाजरीच्या ताटाचा शेंडा अथवा शेंड्याचा भाग; बोरूचें किंवा वेताचें कांडें (कोष्टी लोक कांडी करावयास घेतात तें), साळ्या-कोष्ट्यांची चाकावरील सूत गुंडाळ- ण्याची कांडी; कांडीकरितां घेतलेला ताटाचा तुकडा.

दाते शब्दकोश

गण्या      

पु.       १. खंड्या; पाणकावळा; ढिसा; मासे खाणारा एक पक्षी. २. गणा कोष्ट्याची सूत गुंडाळण्याची कांडी.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गण्या

पु. १ खंड्या; पाणकावळा; ढिसा; मासे खाणारा एक पक्षी. २ गणा; कोष्ट्याची सूत गुंडाळण्याची कांडी.

दाते शब्दकोश

गंठवा      

पु.       १. सोन्याचा मणी. २. गंडा, हळकुंड व घोंगडीची दशी बांधलेले कच्चे सूत. [सं. ग्रंथी]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गंठवा

पु. गंडा; सोन्याचा मणी, हळकुंड व घोंगडीची दशी बांधलेलें कच्चें सूत. -बदलापूर २१२. [सं. ग्रंथी]

दाते शब्दकोश

गपई      

स्त्री.       सूत गुंडाळण्याची पट्टी.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गर्भसुती

गर्भसुती garbhasutī a (गर्भ & सूत) Of which the warp is cotton and the woof silk--a web.

मोल्सवर्थ शब्दकोश

गुं(गु)त

स्त्री. गुंतणें; गुंता पहा. 'या सेताची गुत सिलक असेल त्याची किंमत...' -मसाप २.१७७. [सं. ग्रथित; प्रा. गुत्थ] गुंतणु(णू)क-स्त्री. (क्व.) अडवणूक; गुंतागुंत; गोंध- ळाची, घोंटाळ्याची स्थिति. [गुंतणें] गु(गुं)तणें-अक्रि. १ एकमेकांत गुरफटलें जाणें (दोरा); अडकणें. 'सूत सुतें गुंतलें ।' -ज्ञा १८.१३०६. २ गुरफाटणें; अडचणींत सांपडणें; मोकळे- पणा खुंटणें. ३ गुंग असणें; गढून जाणें; व्यापृत असणें; अडकणें (कामांत, उद्योगांत-मनुष्य, पशु, वस्तु, जागा). 'यदुतिलक जिचे हा गुंतला पूर्ण भाके ।' -सारुह ४.४७. ४ फसणें. [सं. ग्रथन] गुंतत बोलणें-अडखळत, घुटमळत बोलणें; अडखळणें. गुंतलें-न. गुंता; गुंतागुंत; गुंताड-डा. 'तुटे बंधमोक्षाचें गुंतलें एथ ।' -माज्ञा १८.३१९. गु(गुं)तवळ-स्त्री. १ केंस विंचर- तांना गळालेल्या केसांचा (गुंतवळांचा) गुंजडा, समुदाय. २ (अव. प्रयोग) (ल.) तुरळक, थोडे वाढणारे खुंट. -पु. १ डोकीच्या केसांतून गळलेला केस; गुंतवळी पैकीं केंस. २ गुंतागुंत (केंस, दोरी इ॰ची). गुतविणें-उक्रि. (ल. व शब्दशः) गुरफाटणें; गोंवणें; अडकविणें.

दाते शब्दकोश

गुं(गु)ता

पु. १ अटकाव; अडथळा; खोटी; प्रतिबंध. २ (ल.) अडचण; हरकत; नड. 'ह्यामधिं कांहीं गुंता नाहीं ।' -ऐपो ३२. ३ शेंडी-वेणींतील गुंतवळ; विंचरतांना बाहेर निघा- लेले केंस. ४ (ल.) सुतक. ५ गुंतागुंती (केस, दोरा इ॰ची). ६ (भात, सावा, हरीक वगैरेचें) मळणीनंतरचें तृण, गवत, कचरा. ७ (ना.) ब्याद; लचांड. ८ लढा; तंटा. ॰गुंत-गुत, गुता- मूत-स्त्री. १ गुंता; गुंताड. २ गळफाटा; घोंटाळा; गोंधळ; घोळ. गुंताड; गुताड-नस्त्रीपु. १ गुंता; गुंतलेली स्थिति (विशेषतः केसांची). २ गुंतवळ. ३ गुंता अर्थ ६ पहा. ४ शिवर्‍यावरून आयंडा काढला व बुंध्याची दोरी सोडून शेंड्याला बांधून तो हालवल्यावर खालीं पडतात त्या भाताच्या बारींक पाती -बद- लापूर २९१. ५ गुंतागुंत; घोंटाळा; गोंधळ. गुंतारुंता, गुता- रुता-पु. १ अडथळा; अटकाव; अडचण (क्रि॰ घालणें; पाडणें). २ अडथळा केलेली स्थिति. (क्रि॰ करणें; होणें). [गुतणें + रुतणें] गुंतापणें-क्रि. (बे.) गुंतणें. गुंतापा, गुंतोळा-पु. (बे.) गुंताड-डा (सूत, केस, इ॰ चा) पहा.

दाते शब्दकोश

गुंडे      

न.       चेंडू; गोळा; बिंडा; पिंडा (सूत, सुंभ, दोरी वगैरेचा). (कु.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गुंडें

न. (कु.) चेंडू; गोळा; बिंडा; पिंडा (सूत, सुंभ, दोरी वगैरेचा). [गुंड]

दाते शब्दकोश

गुंडी      

स्त्री.       १. लहान गुंड, भांडे; लहान चरवी; कासंडी. [ते. क.] २. बिरड्यात अडकवण्याची गोळी, गाठ; बटन (अंगरखा, कोट यांचे). ३. पेंढी (पेंढा, गवत इ. ची). (को.) ४. बिंडा; गुंडा; गुंडाळा (दोरा, सूत इ. चा). (को.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गुंडी

स्त्री. १ लहान गुंड, भांडें; लहान चरवी; कासंडी. २ बिरड्यांत अडकविण्याची गोळी; भूतावें; बटन (अंगरखा, कोट यांचें). ३ (कों.) पेंढी (पेंढा, गवत इ॰ ची). ४ (कों.) बिंडा; गुंडा; गुंडाळा (दोरा, सूत इ॰ चा). 'नवारीची गुंडी करून ठेव म्हणजे पलंग वळायास बरें पडेल.' [गुंड]

दाते शब्दकोश

गुंजावा      

पु.       बिंडा; गुंडाळी (सूत, दोरा यांची) : ‘सुताचा गुंजावा करी शुद्धला ।’ - वसा ५८. [का. गुंजु = गुंता]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गुंजावा

पु. बिंडा; गुंडाळी (सूत, दोरा यांची). 'सुताचा गुंजावा करी शुद्धला ।' -वसा ५८. [का. गुंजु = गुंता]

दाते शब्दकोश

गुतणे, गुंतणे      

अक्रि.       १. एकमेकात गुरफटले जाणे (दोरा); अडकणे : ‘सूत सूतें गुंतलें ।’ –ज्ञा १८·१३०६. २. गुरफटणे; गुणफाटणे; अडचणीत सापडणे; मोकळेपणा खुंटणे. ३. गुंग असणे; गढून जाणे; अडकणे (कामात, उद्योगात – मनुष्य, पशु, वस्तू, जागा). ४. फसणे. [सं. ग्रथन] (वा.) गुता काढणे, गुंता काढणे – अडचण दूर करणे; प्रश्न सोडवणे : ‘एवढा गुता काढलास का मंग झालंच तुजं काम.’ –पेरणी १४९.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गय      

स्त्री.       १. माफी; क्षमा. २. उपेक्षा; दुर्लक्ष; हयगय. (वा.) गय करणे - १. चूक, अपराध माहीत असूनही दुर्लक्ष करणे; क्षमा करणे; दया दाखवणे : ‘पोराबाळांचे नाव काढलेस म्हणूनच एक वेळ गय केली.’ - भाबं ६२. २. सूट देणे : ‘इतके दिवसाची मला गय करा म्हणजे झालं.’ - मस्थि २३९. ३. झोपी जाणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

इनाम नोकरी      

स्त्री.       गाव, महाल, परगणा यांची महसुली, फौजदारीसंबंधाने गावकीची कामे करणाऱ्या गावकामगारांना व परगणे अंमलदारांना देण्यात आलेले इनाम; काळीचे उत्पन्न (स्वामित्व नव्हे) म्हणजे महसूल घेण्याचा अधिकार किंवा इनामजमीनधारकांना महसूलाची पूर्ण किंवा अंशतः देण्यात आलेली सूट. इनाम मिळकती दोन प्रकारच्या असतात. प्रत्यक्ष (दुमाला) आणि अप्रत्यक्ष (परभारा).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

इसमवार कमजास्ती      

स्त्री.       पगार नोंदीसह नावाचा तक्ता. सामा. शब्द − इसमवार− अर्जी. नावनिशी, पट्टा, पत्रक, पाहणी, पावती, फाजील, वसुलीबाकी, सूट, हाजरी, रुजवात इ.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जाडसुती

जाडसुती jāḍasutī a (जाड & सूत) Of coarse thread or

मोल्सवर्थ शब्दकोश

जव्हारी

१ तंबोर्‍याच्या तारांचा ध्वनि गोड निघावा म्हणून घोडीवर ज्या ठिकाणीं तारा टेकतात त्याखालीं थोडा कापूस अथवा सूत घालून तारेचा ध्वनि खुलविण्याची जागा. २ सतारीची तार घोडीवर ज्या ठिकाणीं टेकते ती जागा. [हिं. जुवरी]

दाते शब्दकोश

जव्हारी      

स्त्री.       १. तंबोऱ्याच्या तारांचा ध्वनी गोड निघावा म्हणून घोडीवर ज्या ठिकाणी तारा टेकतात त्या खाली थोडा कापूस अथवा सूत घालून तारेचा ध्वनी खुलविण्याची जागा. २. सतारीची तार घोडीवर ज्या ठिकाणी टेकते ती जागा. [हिं. जुवारी]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

झडझडीत, झडझडून      

क्रिवि.       झिडकारून; झाडून : ‘सोडुनि सूत सुयोधनपक्षांतें झडझडोनि बा । निघ रे ।’ - मोउद्यो ११·१५. [ध्व.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

झडझडीत, झडझडून

क्रिवि. १ अर्थाला अधिक जोर आणण्याकरितां झाडणें या क्रियापदापूर्वीं योजतात. उदा॰ खोली झडझडीत, झडझडून झाड.' २ जलदीनें; त्वरेनें; झडकरी पहा. (क्रि॰ बोलणें; चालणें; पळणें; धावणें; देणें; मारणें; करणें इ॰). ३ झिडकारून; झाडून. 'सोडुनि सूत सुयोधनपक्षांतें झडझडोनि बा ! निघ रे ।' -मोउद्योग ११.१५. [ध्व. झड द्वि.]

दाते शब्दकोश

कांडी      

स्त्री.        १. वेखंड, सुंठ, आले, हळद इत्यादींची मुळे व तुकडा; मोड; अंकुर; ऊस वगैरेची पेरे. २. त्या आकाराचा धातूचा तुकडा. ३. (वस्त्रोद्योग) वस्त्र विणण्यासाठी ज्या काठीला सूत गुंडाळलेले असते ती काठी. ४. (वस्त्रोद्योग) धोट्याच्या आतील दोऱ्याचे गुंडाळे, बाबीण; धोट्यामध्ये बसेल अशा लाकडी अगर बोरूच्या तुकड्यावर भरलेल्या सुताची गुंडाळी. ५. लसणीचा गड्डा. ६. चंदनाचे खोड.(गो.) ७. (नाविक) दोन्ही रोजांना सांधणारे व दोन्ही रोजांसहित भागाचे लाकूड. हा गलबताचा पाया होय. या लाकडाच्या वरच्या अंगाला दोन्ही बाजूंनी खाचा पाडून त्यात फळ्या बसवतात. (को.) ८. (छापखाना) फर्मा ठोकताना पान (पेज) व सामान (फर्निचर) हे चौकटीला आवळून बसण्याकरता ठोकायचा लाकडाचा तुकडा. ९. ओळ; चरण : ‘ब्राह्मणु एकु कांडि म्हणतु होता ।’–गोप्र ४५. [सं. कांड] (वा.) कांडी चिरगाळणे, कांडी फिरवणे– गारुड्याने आपल्या हातातील लाकडाची लहान काठी आपल्या हाताभोवती अथवा अंगाभोवती फिरवणे. (यक्षिणीची) कांडी फिरवणे – चमत्कार घडवून आणणे, अवचित एखादी गोष्ट घडवून पूर्वी घडलेल्या कृत्याच्या उलट होणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कांडसोट      

पु.        सहा मुठी सोन्याच्या एका सुतावर मधील भागाच्याच सुमारे २॥ – ३ मुठीच्या भागावर दुसरे एक सोन्याचे सूत पिळून पहिल्या सुताच्या एका टोकाला वाटोळा फासा व दुसऱ्या टोकाला नागफासा करून गजरे बेटण्यापूर्वी जो सरीचा भाग तयार होतो तो.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कांडुळणे      

अक्रि.        तुकडे तुकडे पडणे (दोरा, सूत, धागा इत्यादीचे). [सं. कांड]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कांडुळणें

अक्रि. तुकडे तुकडे पडणें (दोरा, सूत, धागा इ. चे) [सं. कांड]

दाते शब्दकोश

कांतणें

उक्रि. १ चाती, रहाट वगैरेवर सूत काढणें. २ चर- कावर धरून विशिष्ट गोलाकार देणें. ३ करंज्या वगैरेचे कांठ कांत ण्यानें कापणें. ४ (ल.) (खोडी किंवा दुष्कृत्य करण्याबद्दल) शक्कल लढविणें, युक्ति काढणें. 'त्यानें मजवर-विवयीं फारसें कातलें ।' ५ छळणें; गांजणें; बेजार करणें; पाठीस लागणें; पिळणें. 'काय कातलें भगवंता वेळोवेळा ।' -ऐपो १४२. ६ (गो.) नारळ खवणें. ७ जुंपणें. 'जेथ गरुडाचिये जावळियेचे । कांतले चार्‍ही ।' -ज्ञा १.१३८. 'उच्चैश्रवेयाचिअ/?/ जावळिके । कातळें साब्राअणीचें ।' -शिशु ९३६. ८ पिसाळणें. 'कांतलेंसे श्वान । तैसें दिशा हिंडे मन ।' -तुगा २९००. ९ (जरतार) पीळ देणें; वळणें. [सं. कृत्] कातून पिंजणें-काढणें-पुष्कळ श्रम घेऊन तयार करणें; नांवरूपास आणणें.

दाते शब्दकोश

कापड      

न.       १. वस्त्र; कपडा; लुगडे : ‘जी किरवू तरी कापडाचे ।’ - ज्ञा ११·५४. २. (वस्त्रोद्योग) उभार सुतात आडवण सूत घातले म्हणजे त्याला कापड म्हणतात. (गो.) [सं. कर्पट]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कापड

न. १ वस्त्र; कपडा; (गो.) लुगडें. २ (विणकाम) उभार सुतांत आडवण सूत घातलें म्हणजे त्यास कापड म्हणतात. [सं. कर्पट; प्रा. कप्पड; सिं. कपडु; हिं. कपडा] ॰आंख-पु. कापडावरील त्याच्या किंमतीची चिट्ठी, आंकडा; आंख अर्थ ३ पहा. ॰करी-पु. कापड विकणारा; बजाज; चाटी. ॰गज, कापडाचा गज-पु. हा दोन फूट तीन इंचपासून दोन फूट अकरा इंच असतो. ॰चोपड-न. (व्यापक) वस्त्रे व इतर पदार्थ (तूप, तेल इ॰); कापड व दुसर्‍या किरकोळ वस्तू. [कापड द्वि.] ॰चौकी- स्त्री. कापडाचा तंबू. 'राजगिरी मांडविया । सुरंगा कापड चौकिया ।' -शिशु ५७२. 'दारवंटा बाह्यप्रदेशीं । कापड चौकी उभविली कैसी ।' -कथा ४.१८.२१७. ॰ताका-पु. कापडाचा वीस ते चाळीस वारांचा तुकडा. ॰निशी-निवीशी- स्त्री. कपडासंबंधीं लिहावयाचें काम; कापडनिसाचें काम, हुद्दा. ॰नीस-निवीश-पु. फरासखान्यावरील अधिकारी; राजाच्या वस्त्रागारावरील अधिकारी. ॰लेप-पु. मात कापड पहा.

दाते शब्दकोश

कापूस, कापुस      

पु.       १. कपाशीच्या बोंडातील तंतुमय पांढरा पदार्थ. ह्यापासून सूत काढतात व सुताची वस्त्रे करतात. आखूड धाग्याचा व लांब धाग्याचा इ. याचे अनेक प्रकार आहेत. (क्रि. पिंजणे, कातणे, लोढणे, वठणे) रुई, सावरी, कुडा व इतर काही झाडे यांच्यापासूनही असाच पदार्थ निघतो : ‘कां पटत्व कापुसा । मातू होय ॥’ - ज्ञा १४·१६०. २. (ल.) अवाळू, चामखीळ वगैरेमधील पांढरे कापसासारखे फुसफुशीत मांस. ३. केळीच्या कालातील तंतू. ४. तवसे, भोपळा इ. नासल्यामुळे आत होणारा पांढरा पदार्थ. [सं. कार्पास] (वा.) कापूस वठणे - लोढणे, कापसातील सरकी काढणे. कापूस महाग करणे - (ल.) कृश, अशक्त होणे. (गो.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कातणे      

उक्रि.       १. चाती, रहाट वगैरेवर सूत काढणे. २. चरकावर धरून विशिष्ट गोलाकार देणे. ३. करंज्या वगैरेचे काठ कातण्याने कापणे. ४. (ल.) (खोडी किंवा दुष्कृत्य करण्याबद्दल) शक्कल लढवणे, युक्ती काढणे. ५. छळणे; गांजणे; बेजार करणे; पाठीला लागणे; पिळणे : ‘काय कातला भगवंतीं वेळोवेळा ।’ - ऐपो १४२. ६. नारळ खवणे. (गो.) ७. जुंपणे : ‘जेथ गरुडाचिये जावळियेचे । कांतले चाऱ्ही ॥’ - ज्ञा २·१३८. ८. पिसाळणे : ‘कातलेसे श्वान । तैसें दिशा हिंडे मन ।’ - तुगा २९००. ९. (जरतार) पीळ देणे; वळणे. [सं. कृत्] १०. सुरकुतणे. (वा.) कातून पिंजणे, कातून काढणे - पुष्कळ श्रम घेऊन तयार करणे; नावारूपाला आणणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कौल      

पु.       १. वचन; आश्वासन; अभय; संरक्षणाची हमी : ‘मी तुला कौल देतो, सरदारकी देतो’ - श्रीयो १·४२२. २. जमिनीची लागवड करण्यासाठी किंवा व्यापार करणाऱ्याला सरकार जे अभयपत्र, करार, कबुलायतीचा कागद देते तो. सरकारी करारनामा; कबुलायत; कौलनामा : ‘तुम्हांस चि. रा. माधवराव नारायण याचा कौल.’ - मइसा १२·१३७. ३. जहाजांना सर्व समुद्रातून फिरण्याचा मुख्य सत्तेने दिलेला परवाना. ४. परवाना; अभयपत्र. (शत्रूला आपल्या प्रांतातून जाण्यासाठी दिलेले); माफी देणे; सूट देणे : ‘दंगेखोर गनीम आपण जेर झालों असें जाणून दगाबाजीनें कौल घेतो, म्हणून जवळ बोलावूं नये. - मराआ ३६. ५. ईश्वरी वचन; ईश्वराची आशा मिळविणे; प्रश्न; साक्ष; प्रसाद; देवाजवळ गाऱ्हाणे सांगून त्यावर अमुक उपाय करावा किंवा नाही हे विचारताना देवाच्या अंगाला लावायचे तांदूळ, सुपाऱ्या, फूल इ.; देवाची संमती : ‘इंद्रियांचे पेटे भला कौल देती ।’ - तुगा ४०८. ६. अभिप्राय; मत; कल (क्रि. मागणे, देणे.) [फा.] (वा.) कौलास येणे - शरण येणे; तह करायला कबूल होणे : ‘झालें मोंगल बेजार मरूं लागले आले कौलाला ।’ - ऐपो २३६.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कौशेय      

वि.       रेशमी (वस्त्र, सूत). [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कौशेय

वि. रेशमी (वस्त्र, सूत). [सं.]

दाते शब्दकोश

कायदेकानु      

पु. अव.       कायदे, नियम इ. बंधनकारक गोष्टी : ‘वसुलीची सूट, तहकुबी, तगाई, अतिक्रमण वगैरेसंबंधाने सरकारने कायदेकानू केले आहेत.’ - गांगा ५८.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

केबरा      

पु.       १. शेतातून कोठारात भात नेत असताना येणारी तूट भरून निघावी म्हणून दिलेली सूट, भत्ता. २. विक्रीसाठी साठवलेल्या सरासरी पिकाची नुकसानभरपाई करण्यासाठी बसवलेली पट्टी.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

केळ

स्त्री. केळीचें झाड. हें पुष्कळ दिवस टिकणारें, कंदरूप आहे. ह्याला मोठीं पानें येतात. ह्याच्या अनेक जाती आहेत. गोवें, कर्नाटक, वसई इकडे यांचें पीक फार. कच्च्या केळ्यांची, व केळफुलांची भाजी होते. सोपटांची राख कोष्टी व धनगर लोक सूत रंगविण्याकडे वापरतात. पानांचे दांडोरे वाळवून त्यापासून उत्पन्न होणारा क्षार कोंकणांत परीट लोक साबणासारखा वापरतात. -वगु २.५७. वैष्णव लोक कपाळास जी अक्षत (काळा टिकला) लाव- तात टी हळकुंड उगाळून त्यांत सोपटाची राख खलून करतात. केळीच्या मुठेळी, तांबेळी, बसराई, वेलची, सोन, राजेळी, म्हशेळी इ जाती आहेत. आगाशीकडे केळीं वाळवून तयार करतात त्यांस सुकेळीं म्हणतात. 'फेडून केळ्याची सालडी ।' -विउ ४.६२. 'घिवर जिलब्यांनीं केळ पोसल्यें ।' -प्रला २२९. २ केळीचें फळ. ३ ब्राह्मणी पागोट्यावरील कपाळपट्टीवरचा भाग, बिनी. ४ स्त्रिया लुगड्याच्या निर्‍या पोटाजवळ खोवून केळ्याच्या आकाराचा भाग करतात तो. [सं. कदली; प्रा. कयल-केल] (वाप्र.) केळें खाणें-साखरखाणें-(ल.) खोटें बोलणारा, मुर्खासारखी बडबड करणारा वगैरेना औपरोधिक शब्द. शेण, गू खाणें, झक मारणें तूं किंवा तो तर आपल्या घरचा राजा. असे याच अर्थाचे कांही वाक्प्रचार आहेत. सामाशब्द- ॰खंड-न. न भरणारें केळें; वांझ केळें. याची भाजी करतात. ॰फूल-बोंड-कमळ-न. केळीच्या कोंक्यापासून निघालेलें फूल; हें कडू, तुरट, ग्राहक, अग्निदीपक, उष्ण, वीर्य व कफनाशक आहे. याची भाजी करतात. ॰केळंबा-भा-पु. १ केळीचें पोर; पासांबा; नवीन फुटलेला कोंब; केळीचें रोप. (क्रि॰ फुटणें.) २ चवेणीचा पोगा, पोगाडा; काल. ॰वंड-वडी-केळावली- स्त्री. (कों.) केळ्यांचा घड, लोंगर; त्यांच्या देठांचा झुबका. 'बारा महिने नेहमीं केलवंडी पिकत.' -पाव्ह ११. ॰वत्तर निरी-स्त्री. परवंट्यांची सर्वांत वरची निरी. 'केळवत्तर निरी झळकैली ।' -शिशु ४३. ॰वली-स्त्री. पिकलेलीं केळीं मोदकपात्रांत साली- सकट उकडून काढून, तीं सोलून, कुसकरून त्यांत साखर, नारळाचा खव इत्यादि घालून त्या पुरणाचें मोदकासारखें पक्वान्न तुपांत तळून करतात तें. -गृशि १.४६४. ॰वा-पु. (कों.) केळंबा भा- पहा. केळीचा कांदा-पु. केळीचा गड्डा; हा वातनाशक व स्त्रियांच्या प्रदेर रोगावर औषधी आहे. -योर १.४६. केळ्याचा हलवा-पु. राजेळी केळीं मोठालीं तीन घेऊन चुरावीं व त्यांत साखर, तूप मिसळून, थोडें चुलीवर आटवून तें ताटांत ओतावें व त्याच्या वड्या पाडून त्यावर बदामबीं पसरावें. -गृशि १. ४२३.

दाते शब्दकोश

कोचमन, कोचमीन, कोचमिल, कोचमेल      

पु.       गाडीवान; गाडीहाक्या; सारथी; सूत : ‘कोचमीन (महाराजांचा) मराठे जातीचा ... होता.’ - विक्षिप्त २·११८ [इं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कोचमन-मिल, कोचमीन

पु. गाडीवान; गाडीहांक्या; सारथी; सूत. 'गाडींत बसले असतां कोचमिलास स्वतःच्या पदवीस चढवून जातीनें सारथ्य...' -नि ९७. 'कोचमीन (महाराजांचा) मराठेजातीचा ... ... होता.' -विक्षिप्त २. ११८. [इं. कोच = गाडी + मॅन = (हांकणारा) माणूस]

दाते शब्दकोश

कोष्टी      

पु.       १. एक विणकर जात. ह्यांचा धंदा सूत कातणे व विणणे. साळ्यापेक्षा यांची जात निराळी. २. (ल.) कोळी, किडा. हा तंतू काढून जाळे विणतो. ३. एक पक्षी. [सं. कोश]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कोष्टी

पु. १ एक विणकर जात; ह्याचा धंदा सूत कातणें व विणणें; साळ्यापेक्षां यांची जात निराळी. २ (ल.) कोळी-किडा- हा तंतू काढून जाळें विणतो. [कोश, कोशेटी]

दाते शब्दकोश

कसर      

स्त्री.       १. न्यूनता; उणीव; कच्चेपणा; अपुरेपणा; चूक (मापात, वजनात, काम पुरे करण्यात, हिशेबात इ.) : ‘औषधोपचारात अर्थातच आम्ही कांहीं कसर राहू दिली नाहीं.’ - गाणे ३३. (क्रि. राहणे, येणे, निघणे.) २. अंश; लेश; किंचित भाग; थोडीशी बाकी. ३. आधिक्य; नफा; फायदा. ४. (हिशेबात) दोन्ही बाजूंच्या बेरजा बरोबर होण्याकरिता कोणत्या तरी बाजूतून काढलेली किंवा मिळवलेली रक्कम : ‘जमेंत कसर होऊन’ - मइसा १०·३४१. ५. चिक्कूपणाची काटाकाट; छाटाछाट; काट; कपात. ६. अप्रामाणिक, अयोग्य मार्गाने मिळवलेला पैसा; उपटलेली रक्कम; मधल्यामधे खाल्लेला पैसा; लाच; गैरवाजवी फायदा. ७. कटमितीचे व्याज; जसजसे मुद्दल जमा होईल तसतसे त्यावरील व्याज बंद करण्याचा प्रकार. ८. कमी करणे; सूट देणे, मिळणे. ९. कामामध्ये कुचराई, चालढकल : ‘आपला निरपेक्ष उत्तम सल्ला देण्यास कसर केली नाहीं.’ - नि ९९७. [फा. कस] (वा.) कसर करणे - काटकसर करणे. कसर काढणे - कमीपणा भरून काढणे; एखाद्या धंद्यात किंवा गोष्टीत आलेला किंचितसा तोटा किंवा उणीव दुसऱ्या धंद्यात भरून काढणे. कसर होणे - कमी पडणे; दुर्लक्ष होणे : ‘त्यात कधी कसर व्हायची नाही.’ - माबा २५०.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कसरवर्ताळा      

पु.       ऐनजिनसी वसुलात जे कमीजास्त होईल त्याच्याबद्दलची सूट.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कुंचा      

पु.       १. मोराच्या पिसांचा कुंचला, मोर्चल : ‘उभिला जैसा देउळीं । जाणोनि कुंचा ॥’ - ज्ञा १३·६५९. २. मोळगवत, डुकराचे केस, ताड व इतर झाडांची पाने यांची केरसुणी. ३. विणकरांचा सुताला खळ लावण्याचा कुंचला. हा झाडाच्या बारीक मुळ्यांचा केलेला असतो. सुताला पांजण केल्यावर ह्याने सूत साफ करतात. सामान्यतः चिताऱ्यांच्या कुंचल्यासही म्हणतात. [सं. कुर्च]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कुंचा

पु. १ मोराच्या पिसांचा कुंचला, मोर्चेल. 'उभिला जैसा देउळीं । जाणोनि कुंचा ।' -ज्ञा १३.६५८. २ मोळ गवत, डुकराचे केस, ताड व इतर झाडांची पानें यांची केरसुणी. ३ विण- करांचा सुतास खळ लावण्याचा कुंचला, हा झाडाच्या बारीक मुळ्यांचा केलेला असतो. सुतास पांजण केल्यावर ह्यानें सूत साफ करतात. सामान्यतः चितार्‍यांच्या कुंचल्यासहि म्हणतात. [सं. कूर्च; कुच् = संकोच पावणें; सीगन कुच = पुंजका; ते. कुंचे; का. कुच्चु = गोंडा]

दाते शब्दकोश

कुटीर उद्योग      

पु.       खेड्यात लहान प्रमाणावर घरीच करता येण्यासारखा धंदा. (कोंबड्या पाळणे, मधमाशा पाळणे, सूत कातणे इ.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

क्वाडका      

१. अडसर, अडकण. २. अर्धगोल, अंतरगोल मणी-पुली. ३. सूत काढण्यासाठी रहाटास बसविलेले लाकडी चाक. क्वाथ      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कव्हळ      

न.       कोहळा. (वा.) कव्हळ सुतवून घेणे - १. (शब्दशः) कोहळ्याला सूत गुंडाळणे. २. (ल.) मुलीला पदरात घेणे; उजवणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कव्हळ सुतवून घेणें

(शब्दशः कोहळ्याला सूत गुंडाळणें) (ल.) मुलीला पदरांत घेणें; उजवणें.

दाते शब्दकोश

खांजणी

स्त्री. पाढे इत्यादींचा मिळवणीचा एक प्रकार; एक प्रकारची बेरीज. ही पूर्वीं शाळेंत शिकवीत. [सं. खंडन] ॰भांजणी-स्त्री. १ बेरीज आणि वजाबाकी; गुणाकार आणि भागाकार (अनेकवचनी प्रयोग). 'मी खांजण्याभांजण्या शिकलों.' २ (ल.) देवघेवीमध्यें नफातोटा सोसून एकमेकांचे विचारें केलेली सरासरी तोड. ३ अडचणींत सांपडलेल्या गिर्‍हाकास वगैरे त्याजकडून येणार्‍या रकमेंत दिलेली सूट. ४ (ल.) क्षय- वृद्धि; उत्पत्ति-संहार. 'खांजणीभांजणीचें समजावें । मूळ तैसें ।' -दा १५.४.१८. [सं. खंडन + भंजन]

दाते शब्दकोश

खांजणीभांजणी      

स्त्री.       १. बेरीज आणि वजाबाकी; गुणाकार आणि भागाकार (अनेकवचनी प्रयोग.) २. (ल.) देवघेवीमध्ये नफातोटा सोसून एकमेकांच्या विचारे केलेली सरासरी तोड. ३. अडचणीत सापडलेल्या गिऱ्हाइकाकडून येणाऱ्या रकमेत दिलेली सूट. ४. (ल.) क्षयवृद्धी; उत्पत्तिसंहार : ‘खांजणीभांजणीचे समजावें । मूळ तैसें ।’ - दास १५·४·१८.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खळ      

स्त्री.       १. बटाट्याचे सत्त्व, गहू, तांदूळ, उडीद, साबुदाण्याचे पीठ इ. पासून डकवण्यासाठी, वस्त्रास ताठपणा यावा म्हणून किंवा कागद चिकटविण्यासाठी तयार केलेली पेज, चिकी, राप, कोळ, गोंद. २. (कोष्टी) कपडा विणण्यापूर्वी सुताला बळकटी येण्यासाठी तांदूळ, ज्वारी, मका किंवा बाजरी यांचे पीठ शिजवून, त्याची करतात ती लापशी. ही सुतास कुंचल्याने लावतात अथवा तिच्यात सूत बुडवून काढतात. ३. घारगे करण्यासाठी गुळवण्यात शिजवलेले पीठ. ४. आम्लयुक्त खारट पाणी; खार (लोणच्याचा.) (गो.) ५. चिंचोके वाटून केलेली अंबील. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खळ

स्त्री. १ बटाट्याचें सत्त्व, गहूं, तांदूळ, उडीद, साबू- दाण्याचें पीठ इ॰ पासून डकवण्यासाठीं, वस्त्रास ताठपणा यावा म्हणून किंवा कागद चिकटविण्यासाठीं तयार केलेली पेज, चिकी, राप, कोळ, गोंद. २ (कोष्टी) कपडा विणण्यापूर्वीं सुतास बळकटी येण्यासाठीं तांदूळ, ज्वारी, मका किंवा बाजरी यांचे पीठ शिजवून त्याची लापशी करून ती सुतास कुंचल्यानें लावतात अथवा जींत सूत बुडवून काढतात ती. ३ घारगे करण्यासाठीं गुळ- वण्यांत शिजविलेले पीठ. ४ (गो.) अम्लयुक्त खारट पाणी; खार (लोणच्याचा). [सं. खल् = एकत्र करणें?] ॰म्ह-परटाची खळ, ब्राह्मणाची सळ (बायको) लागलीच आहे. ॰गट-न. १ पातळ व भिकार कालवण (पीठ, भाजीपाला, चिंच इ॰ मिसळलेलें), (निंदाव्यंजक). २ (ल.) कोणतेंहि अतिशय पातळ व आंबट, खारट कालवण; आंबटी; सांबांरें.

दाते शब्दकोश

खंब्बा

स्त्रीअव. (विणकाम) सूत खालींवर करून त्यास पेच (सांध) पाडण्याकरितां उपयोगांत आणलेल्या लांकडी बारीक व सरळ काठ्या. या विणतांना जागजागीं ताण्यांत सरकविलेल्या असतात. [खांब]

दाते शब्दकोश

खंब्या      

स्त्री.       अव. (विणकाम) सूत खालीवर करून त्यास पेच (सांध) पाडण्याकरिता उपयोगात आणलेल्या लाकडी बारीक व सरळ काठ्या. विणताना या जागजागी ताण्यात सरकविलेल्या असतात.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खोबळा      

पु.       १. पट्टा या शस्त्राची पोकळ मूठ. ही कोपरापासून पुढील सर्व हाताचे रक्षण करते. २. अभ्यासासाठी, शिकण्यासाठी केलेला लाकडी पट्टा (हत्यार). ३. गाडीच्या आखाची पेटी. ४. कुसवाचे घर. ५. जमिनीतील ओबडधोबड खाच, खळगा; भोक, खळी, खळगा (भिंत, ताल, दगड, फळी यांतील). ६. (विणकाम) ज्यामध्ये नक्षीचे दोरे (तार) ओवलेले असतात व ज्याला चाळले म्हणजे नक्षी उमटते तो; चाळा. ७. (सोनारी) खोबऱ्याच्या वाटीसारखा पण लांबट चांदीच्या जरासारखे सूत ओढण्यासाठी केलेला व बारीक भोके असलेला द्रोण. ८. फरा; खुबा; बाहुटा. ९. तुकडा; पापुद्रा; झिलपी. (व.) १०. टोपण; अस्तर; बुजवण : ‘घालूनि नखाचे खोबळे । अग्नीं अग्रबळें बूजिले ।’ - एभा ८·२३४.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खरपा

पु. बारीक सूत ओढण्याची पट्टी. -शर.

दाते शब्दकोश

खरपा      

पु.       बारीक सूत ओढण्याची पट्टी.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खुदरती

वि. पिवळ्या रंगाचें कापसाचें (सूत). -देहु १५२.

दाते शब्दकोश

खुदरती      

वि.       पिवळ्या रंगाचे, कापसाचे (सूत)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खुमाच

पु. चंग कांचन गंजीफांतील चौथा रंग किंवा उत- रत्या बांजवांतील रंगांपैकी पहिला. -स्त्री. १ वस्त्रादिकांची सफाई, सूत, पोत. २ बंगला, घर इ॰ वस्तूंचा सुरेखपणा; तेज; नीटनेटकेपणा; छबदारी; देखणेपणा; घवघवीतपणा; तेज; सौंदर्य (रंग, रंगीत पदार्थांचा). [खुमास]

दाते शब्दकोश

खुष्कसाली

स्त्री. अवर्षणाचें वर्ष; दुष्काळाचें वर्ष ‘सालमारी खुष्कसाली आहे त्यास रयतेस कांहीं सुट जागीर- दार देतील.’-रा २२.९३. ‘साल हालची चुकोती करून वसूल घ्यावा व सालमा/?/री खुष्कसाली जाली आहे रयतीस कांहीं सूट देतील.’-रा २२.९४. [फा.]

दाते शब्दकोश

लगा

पु. १ धिरा; लग. २ (ल.) संबंध; नातें; धागा दोरा; सूत; संबंधाचें, दळणवळणाचें साधन. (क्रि॰ लावणें). ३ (संधी, लक्ष, उद्देश या अर्थी) लाग पहा. (क्रि॰ लावणें) ४ आश्रय; आधार. 'रक्षी द्रौणीतें जो दृढ होतो आयुचा लगा मरणीं ।' -मोकर्ण ११.६९. [लग् = संयोग होणें] ॰बांधा- दा-पु. १ संबंध; अंग; बंधन (नात्याचें, मित्रत्वाचें). २ आश्रय; आधार. 'आम्हास एथें कोण्हाचा लगाबांधा असता तर भिक्षा कशास मागितली असती?' ३ दैवयोग; नेमानेम; लागाबांधा पहा. 'लगाबांधा जसा लागला असतो तसें घडतें.' ४ पूर्वजन्मींचा संबंध; ऋणानुबंध. [लागणें + बांधणें]

दाते शब्दकोश

लकीरी, लकेरी

स्त्री. १ तेज; चकाकी; जिल्हई. २ (ल.) माधुर्य; मोहकता; छबदारी; चित्ताकर्षक गुण (गाण्यांत, बोल- ण्यांत इ॰) (क्रि॰ मारणें). ३ चुणुक; छटा; वास; गंध (रंग, स्वाद, राग इ॰ मध्यें एखाद्या परक्या गुणाचा). (क्रि॰ मारणें). 'ओल्या रंगांत कोणत्याहि रंगाची लकेरी पाहिजे असल्यास...' -मॅरट २३. ४ कांठ; किनारी (किनखाबाची, जरीची, रेशमाची इ॰). 'या दुपट्याचें सूत चांगलें आहे पण लकेरी चांगली नाहीं.' [लक्!]

दाते शब्दकोश

लूता

पु. कोळी; कांतीण. 'बहुधा बद्ध करीलचि लूतेचें जिष्णुवारणा सूत ।' -मोविराट ४.३६.

दाते शब्दकोश

मागध

पु. १ बंदी; भाट; कवि. 'अठरा मागध करिती वर्णन । सगुण निर्गुण चरित्रें ।' -स्वादि १०.१.६. २ क्षत्रिय स्त्रीस वैस्यापासून झालेला सुलगा; एक संकर जात. 'तेचि संतति प्रसिद्ध । सूत वैदेह मागध । ऐशिया नामाचें जें पद । तें जाण शुद्ध प्रतिलोमज ।' -एमा २०.३१. [सं.] ॰देश-पु. गया जिल्हा. -अश्वप १.३४. मागधी-स्त्री. (साहित्य) एक पदरचना पद्धती; हीस रीति असें साहित्यशास्त्रांत नाव दिलें आहें. ही रीति कोमल, कठोर, मध्यम अशी तीन प्रकारची आहे; यांपैकीं एक. 'वैदर्भी तशि मागधी स्फुरु अम्हां घेवोत रीती अशा ।' -कम १.२. [सं.]

दाते शब्दकोश

माज

पु. १ मैथुनेच्छा; उधान; मस्ती (गोमहिष्यादिकांस ऋतु प्राप्त झाला असतां उत्पन्न होणारी). (क्रि॰ येणें; करणें). २ मद; फुगा; तोरा; धुंदी; गर्व; अहंभाव. ३ आधिक्य; रेलचेल; वृद्धि. 'तैसी रजतमें हारवी । जै सत्त्व माजु मिरवी ।' -ज्ञा १४.१९९. ४ (औषधांतील) मादक गुण, कैफ. 'कनकाचिया फळा । आंतु माज बाहेरी मौळा ।' -ज्ञा १८.६५८. ५ खळबळ. 'तरि सिंधू- चेनि माजे । जळचरा भय नुपजे ।' -ज्ञा १२.१६५. ६ हात- मागाच्या सुतास पाजण करतेवेळीं ज्या बैलीस सूत ताणतात त्या बैलीचा ताणण्याची दोरी. ७ गाण्यांतील एक राग. राग पहा. [सं. मद; प्रा. मज्ज] ॰करणें-पशूंना ठराविक मुदतीने मैथुनेच्छा उत्पन्न होणें; माजास येणें. ॰माज मोडणें-(कर्त्याची षष्ठी) माज शांत होणें; पशूंना ठराविक मुदतीने मैथुनेच्छा होण्याचें बंद होणें. २ (ल.) खोड मोडणें; गुरमी जिरणें. ॰मोडणें-(कर्माची षष्ठी) खोड मोडणें; गुरमी जिरविणें. माजावर येणें-फळणीस येणें. सामाशब्द- ॰क-वि. मत्त; धुंद झालेला (मद्य, औषध, मान इ॰ कानीं). [सं. मादक] ॰गेला-वि. सहज शेफारणारा; मगरूर; मस्तवाल. ॰मोड-पु. (विशेषतः म्हैस, घोडी यांची) मैथुनेच्छा शमविणें. [माज + मोड] माजरा-माजिरा-वि. १ मादक. विशिष्ट धान्यें व वनस्पतींसंबंधीं योजतात. उदा॰ माजरा हरीक, माजरा गोंवल, माजरी खडसांबळी, इ॰ यांच्या उलट. गोडा हरीक; गोडा गोंवल इ॰ २ बेहोष; उन्मत्त; शेफारलेला; मगरूर. 'जो सावध धे मदिरा । तो होउनि ठका माजिरा ।' -ज्ञा १७. ११३. ३ चोखंदळ्या; चवचाल. माजऱ्या हरीक-पु. हरकाची मागक काळ्या टरफलाची जात. यांच्या उलट गोडाहरीक. माजरु-रू-वि. (व.) १ मस्तवाल. २ माजलेला. माजरें-न. मादक असलेलें धान्य, वनस्पति खाल्ल्यानें उत्पन्न होणारा कैफ, धुंदी. -वि. कैफ उत्पन्न करणारें. माजवण-न. उन्मत्तपणा. २ मादक पदार्थ. 'कां माजवण दीजे मर्कटा ।' -ज्ञा ३.९. ३ अधिकता. 'चंचळपणाचें माजवण । धेतलें जेणें ।' -स्वादि १.५. १८. ॰वणें-अक्रि. माजणें. ॰विणें-सक्रि. उन्माद आणणें; जास्त, अधिक करणें. माजिवटा-पु. १ उन्माद; गुंगी. 'पातलिया मरणाचा माजिवटा ।' -ज्ञा ८.२०८. २ मरण. माजिवडें-वि. मस्त.

दाते शब्दकोश

माळ

माळ māḷa f (माला S) A garland, a wreath, a string of flowers. 2 A row of petals, a corol. Esp. in comp. with the numerals; as एकमाळ, दुमाळ, तिमाळ. 3 A string of gems or beads; a necklace; a rosary. 4 fig. A string, line, series; a regular succession or concatenation of things in general (as of waterpots around a waterwheel, of laborers to pass from hand to hand, of persons, legend-expounders, priests &c. to officiate by turns): also the rope of a waterwheel to which the pots are fastened. v लाव, लाग. 5 A day of the नवरात्र;--because a fresh string of flowers is used every day of this period. Ex. आजची कितवी माळ आहे. 6 The roll of सूत around the wheel passing on to the चात or whirler. In spinning or drawing threads.

मोल्सवर्थ शब्दकोश

माफ

[अ. मुआफ्] क्षान्त; सूट.

फारसी-मराठी शब्दकोश

माफी

(आ) स्त्री० क्षमा. २ सूट, मोकळीक.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

माफी

(स्त्री.) [फा. मुआफी] क्षमा; सूट.

फारसी-मराठी शब्दकोश

मदार

मदार madāra f ( A) The bunch on a dromedary's back. 2 Regard, view, attention; application towards of the mind or affections. Ex. अक्षरावर म0 नाहीं अर्थावर आहे; रंगावर म0 नाहीं सूत मात्र चांगलें असावें; पगारावर म0 नाहीं आपली कृपा असली तर पुरे. 3 ( A) Musalmán's tomb, esp. the ताईत or amulet-portion of the mass erected over it.

मोल्सवर्थ शब्दकोश

मिलागार

स्त्री. चर्च; ख्रिस्ती मंदिर. 'कमरेंतील चांदीचा गोफ व मिलागरींत जाण्याचा आपला सूट.' -मशा ३६.१२.

दाते शब्दकोश

मजुरा

पु. मुजरा पहा. [अर. मुज्रा] ॰करणें-देणें- (मूळ, मुख्य रकमेंत) वजा घालणें; सूट देणें. 'त्याप्रमाणें शिबंदीचा खर्च सरकारांतून मजुरा दिला जाईल.' -थोमारो १.८ ॰जकात-स्त्री. आयात मालावरील घेतलेल्या जकाती- पैकीं तोच माल बाहेर देशीं पाठविल्यावर परत मिळणारा भाग. ॰दास्त-स्त्री. शेतवाडीसंबंधीं जें सरकारला द्रव्य द्यावयाचें त्या द्रव्यांतून सरकारला प्रत्यक्ष दिलेल्या धान्य, गवत इ॰ मालाच्या किंमतीची वजा केलेली रक्कम.

दाते शब्दकोश

मोदळा, मोधळा

पु. चिटाचें सूत उकलण्यासाठीं तें ज्या रहाटावर घालतात त्या रहाटावर खांबण्या ज्या मातीच्या गोळ्यामध्यें उभ्या करतात, बसवितात त्या गोळ्यांपैकीं प्रत्येक. २ (सामा. मोधळा) सैल बांधलेला गवत, काटक्या इ॰ चा भारा; गुरांनीं खाऊन उरलेल्या कडब्याचा भारा. ३ (ल.) अगडबंब, जड, किंवा ज्याला आपलें शरीर पेलतां येत नाहीं असा माणूस, पशु, किंवा वस्तु. ४ मातीचा गोळा; डिखला; चिखलाचा गोळा. ' कैंचा लोंवेवीण कांबळा । मातियेवीण मोदळा ।' -ज्ञा १०. ८१४. ५ गांठोडें, ओझें. 'देह नश्वरत्वें देखिळा । विष्टामूत्रांचा मोदळा ।' -एभा १०.१८९. ६ मोहाळें; धार काढण्याच्या वेळे शिवाय इतर वेळीं दूध पिऊं नये म्हणून वासराच्या तोंडावर काटे असलेलें तरट बांधतात तें. ७ मुद्गल. -अमृ ६.४९. ८ शिररहित देह. 'निरंजन तो जना वेगळा । आधार पाहतां न दिसे डोळां । अवयवहीन केवळ मोदळा । याहूनि भिन्न ।' -स्वादि ६.१.३८. [सं. मृद् + गोलक]

दाते शब्दकोश

मोटसुती

वि. जाड धाग्याचें किंवा जाडेंभरडें कापड. [मोट + सूत]

दाते शब्दकोश

मोटसुती mōṭasutī a (मोटा & सूत) Of large threads, coarse--cloth.

मोल्सवर्थ शब्दकोश

ना दावा अधिलाभांश      

(मोटार विमा क्षेत्र) विमा उतरवणाऱ्या व्यक्तीने दीर्घकाळ नुकसानभरपाई न मागितल्यास पुढील हप्त्यात विमाकंपनीकडून मिळणारी सूट. नादाळ, नादाळ्या, नादिष्ट, नादी, नाद्या      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नाडापुडी

स्त्री० सूत व पुडी (अबीर शेंदूर इत्यादि.)

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

निभावणी जामीन      

इनाम दिलेल्या जमिनीची लागवड योग्य प्रकारे केली जाईल म्हणून दिलेली हमी, जामीन. निभावणी सूट      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नवसुती

नवसुती navasutī f (नव & सूत) A string composed of nine threads loosely twisted. Made to be used as a जानवें.

मोल्सवर्थ शब्दकोश

नव्या ताण्याचा      

१. विणून तयार होऊन फार दिवस झाले नाहीत असे वस्त्र. २. अशा वस्त्राचे सूत. नव्वद      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ओबरट      

वि.       (प्रां.) खडबडीत; जाडेभरडे (कापड, सूत वगैरे).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ओबरट

वि. (प्रां.) खडबडीत; जाडेंभरडें (कापड, सूत वगैरे). [अरबट?]

दाते शब्दकोश

ओत      

पु.       (वस्त्रोद्योग) मागावर विणण्याचे आडवे सूत : ‘मी आघवियेचीसृष्टी। आदिमध्यातीं किरीटी । ओतप्रोत पटीं। तंतु जेवीं॥’- ज्ञा१०·२६४. [सं. ओतु]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ओत

पु. मागावर विणण्याचें आडवें सूत. 'ये अंता यावती; सिचो य ओतवो येच तंतवः ।' -अथर्ववेद १४.२. ५१. 'मी आघवियेचि सृष्टी । आदिमध्यांतीं किरीटी । ओत प्रोत पटीं । तंतु जेवीं ।' -ज्ञा १०.२६४. [वै. ओतु]

दाते शब्दकोश

पाल

न. १ एखाद्या जाड कापडास दोन बाजूंस उतार देऊन पुढील व मागील भाग उघडा ठेवितां येईल अशा तऱ्हेनें तंबूप्रमाणें उभारलेलें लांबरुंद कापड; उघड्या जागेंत दुकानें मांड- ल्यास त्यांवर आच्छादनासाठीं केलेलें तरट; गोणपाट किंवा जाड कापड. २ पांच-दहा सुताडे एकत्र जोडून-बैठक घालणें, छाया करणें इ॰ करितां केलेलें मोठें वस्त्र; जाजमाचा एक प्रकार. ३ पहिल्या प्रकारचा लहानसा तंबू; राहुटी. 'देवोनियां पाल राहिले तेथेंचि ।' -रामदासी २.७५. ४ -पु. लढाऊ गलबताचा एक प्रकार. 'इंग्रजाचे पाल आहेत त्यांजवर बेजरब घालून पाल शिकस्त केले तर...' -समारो २.२१. ५ शीड; कनात; पडम. ६ (ल.) दुकान 'यात्रेंत ठिकठिकाणचे दुकानदार पाल लावतात.' -मसाप २.३८. ७ कराची सूट; माफी. 'तरी आकार होईल त्यापैकीं चौथाई याशीं पाल देणें.' -वाजबाबा २.११२. 'देशपांडे कुळकर्णी यांची दुकानें असल्यास पाल द्यावयाची चाल आहे.' -मसाप २.१८३. ८ (कों.) मासे पकडण्याचें एक जाळें. ९ रताळ्यावरील एक प्रकारची कीड. -कृषि ५५१. १० झाडाचीं कोंवळी पानें; अंकुर. (क्रि॰ फुटणें; निघणें; येणें; होणें). [सं. पल्लव] ॰घालणें-मांडणें-(ल.) स्त्रीनें. उघडपणें व्यभि- चारावर पैसा मिळविणें. ॰करी-पु. पाल उभारून त्यांत आपला माल मांडणारा वाणी किंवा त्यांत राहणारा मनष्य. ॰कोण्ती- स्त्री. जहाजावरील तांडेलाचा टहाळ तोडण्याचा लहान कोयता; सावंतवाडीकडे याचा शस्त्रासारखा उपयोग करीत. त्याचा दांडा लांब असतो. [पाला + कोयती] ॰घर-न. कर माफ असलेलें घर. -बदलापूर ३६१. [पाल + घर] ॰छत्र-न. मराठ्यांत लग्नप्रसंगीं काठीच्या टोंकास मोकळें व लोबतें पागोटें बांधून गुढीसारखें जें नवरदेवापुढें धरतात तें. [पाल + छत्र] ॰जत्रा-स्त्री. कापणी व मळणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनीं शेतांत एकत्र जमून केलेली मेज- वानी; डवरा. ह्यावेळीं शेताच्या संरक्षक देवतेस कोंबडी, बकरा इ॰ अर्पण करितात. ही देशांतील चाल झाली. कोंकणांत, छपरावर घालण्यासाठीं किंवा भाजावळीकरितां झाडाच्या लहान फांद्या किंवा पाला इ॰ टहाळ आणण्यासाठीं लोक जंगलांत जातात त्यावेळीं वनदेवतेची आराधना करण्यासाठीं केलेला जमाव, पालेजत्रा. [पाला + जत्रा] ॰पट्टी-स्त्री. १ प्रवासांत लहान राहुटीसाठीं किंवा बैठकीसाठीं वापरावयाचें जाडेंभरडें कापड. २ लहान पाल; अगदीं लहान तंबू. [पाल + पट्टी] ॰पडदळ-न. पाल व तदनुषंगिक इतर वस्तू यांचा समुदाय; पाल वगैरे. [पाल + पडदळ]

दाते शब्दकोश

पाष्ट-ष्टें, पाष्टा, पाष्टी

नपुस्त्री. पाटापासून काढलेलें (अर्धें चिवट लांबीचें) सूत; सुताची गुंडी. 'बुरूड होउनि दुरड्या केल्या । कोष्टी होउनि पाष्टा विणिल्या ।' -अमृत १५. [पाट]

दाते शब्दकोश

पाट

पु. १ गोणपाट, पडम इ॰ विणतांना जी रुंदी धरलेली असते त्या रुंदीचा कापडाचा लांब पट्टा, तागा. 'चादर पाट पांच, वार १५ ची.' -ऐरापुप्र ३.१९५. २ (सामा.) (महानु.) वस्त्र. 'मृणाळसुताचेनि पाटें विणिलें ।' -शिशु ७७४. ३ शेतांतील, बागाइतांतील पिकाचा, भाजीचा लांब पट्टा, वाफा. ४ एखाद्याची धिंड काढतांना त्याच्या डोक्यावर शेंडीपासून डोक्याच्या शेव- टापर्यंत वस्तऱ्यानें तासलेल्या पट्ट्यांसारख्या लांबट भागांपैकीं प्रत्येंक. हा शिक्षेचा अथवा मानखंडना करण्याचा एक प्रकार आहे. (क्रि॰ काढणें). 'अर्धेंदुशरें त्याच्या माथां काढूनि पांच पाट वदे ।' -मोवन ९.५३. ५ गोणपाट. [सं. पट्ट] ॰सुत-न. नवार. 'आगम ठाउए जेथें । सामवेदांदि गाते । सत्वाचेनि पाट- सुतें । वीणिला जो ।' -ऋ ८५. 'अवचित पाळणा आणिला विश्वकर्म्यानें । तो विणिला पाटसुतानें ।' -वसा ३५. [पाट + सूत]

दाते शब्दकोश

पु. १ चौकोनी लहान लांकडी फळीला खालीं आंखुड पाय जोडून बसण्यासाठीं केलेलें आसन; बैठक. 'तेव्हा धांवुनि बैसे पार्थ सुभद्रारथीं जसा पाटीं । सुचिर क्षुधित ब्राह्मण हां हां म्हण- तांहि वाढिल्या ताटीं ।' -मोकृष्ण ८६.२२. २ सिंहासन; गादी; पीठ. 'ते वेळीं विजयश्रियेच्या पाटीं । एकुचि बैसे ।' -ज्ञा ७.१२. 'योगसाम्राज्य शेष पाट । तुजचि साजे ।' -विपू ७.१०५. ३ श्रेष्ठपणाचा मुख्य मान, अधिकार. 'वरी क्षत्रियांमाजी श्रेष्ठु । जो जगजेठी जगीं सुभटु । तया दळवैपणाचा पाटु । भीष्मासि पै ।' -ज्ञा १.११५. 'एकाएकीं इच्छी पाट । नेणे चाट काउळें ।' -तुगा २८७०. ४ श्रेष्ठपणा; मोठेपणा. 'कां बाळका एकी माये-। वांचोनि जिणें काय आहे । म्हणौनि सेविजे कीं तो होये । पाटाचा धर्मु ।' -ज्ञा १८.९०८. ५ (खडीकामाचा धंदा). ठसे उठ- विण्यासाठीं खालीं धरावयाचें फळीसारखें साधन. ६ (विणकामाचा धंदा) सूत उकलण्यासाठीं ताणा घालण्यासाठीं फळीवर खुंट्यांच्या रांगा ठोकून केलेलें साधन. ७ खांबाची उंची वाढावी म्हणून त्याच्या माथ्यावर तुळईखालीं बसविलेली लांकडी बैठक. चौकोनी तुकडा. [सं. पीठ; पट्ट] ॰बांधणें-पट्टाभिषेक, सिंहासनाभिषेक, करणें. 'इया गुरुचरणसेवा । हों पात्र तया दैवा । जे सकळार्थ- मेळावा । पाटू बांधे ।' -ज्ञा १५.९. पाटीं बसणें-अक्रि. १ कोणत्याहि विधि अथवा संस्काराच्या वेळीं पत्नीनें पती शेजारीं उजवे बाजूस बसणें. २ (एखादी स्त्री) रजस्वला, विटाळशी होणें. ३ अधिकाराचें, मानाचें स्थान प्राप्त होणें, मिळविणें. 'कीं तयाही पाठीं । जे वेळीं लोह मांसातें घाटी । ते वेळीं विजयश्रियेच्या पाटीं । एकुचि बैसे ।' -ज्ञा ७.१२. पाटीं बसविणें-मान देणें; प्रतिष्ठेचें स्थानं देणें. 'सकळां ज्ञानाचां सेवटीं । करूनि आगमा ठी । निगमा बैसवी पाटीं । परज्ञानाचा ।' -ऋ ३. पाटाचा-वि. १ सर्वोत्कृष्ट; मुख्य. 'तें माझें निजधाम पाहीं । पाटाचें गा ।' -ज्ञा १५.३१६. २ ऐक्याचा. -मनको. ३ (महानु.) अधिकारपत्र मिळा- लेला; हक्काचा. 'वसंतां वाउगें बीकु । तें सुख चौ-गुणां अधिकु । भणॐनि ते पाटाचे अंकु । मन्मथाचें ।' -शिशु ६२२. सामाशब्द- ॰पाणी-न. १ (जेवावयास आलेल्या) पाहुण्यास, इष्टमित्रास बसण्यास पाट व पाय धुण्यास पाणी वगैरे देऊन करावयाची सर- बराई. (क्रि॰ देणें). २ भोजनास बसणाऱ्या मंडळीकरितां पाट मांडून, त्यांपुढें ताटें मांडून व पाण्यानें तांबे भरून ठेवून कराव- याची (भोजनाची) पूर्वतयारी. (क्रि॰ करणें). [पाट + पाणी] ॰पासोडा-पु. विवाह, मुंज इ॰ मंगल कार्यांत वधूवरें, बटु इ॰कांना बसण्याकरितां केलेली शालजोडी, सखलाद इ॰कानीं आच्छादित अशी दोनतीन पाट जोडून मांडलेली बैठक. या बैठकीवर धान्य इ॰कांचा चौक भरतात. [पाट + पासोडा] ॰पिढें-न. १ (व्यापक) खुर्ची, मेज, पाट इ॰ संसारोपयुक्त लांकडी सामान, जिन्नस. २ पाट वगैरे आसन. 'तूं देत जा पाटपिढें बसाया ।' -सारुह ७.१११. [पाट + सं. पीठ] ॰रस-पु. (राजा.) आंब्यांचा एकदां रस काढून झाल्यावर पुनः त्या साली व कोया यांच्यांत पाणी घालून (पाटावर दाबून) काढतात तो रस. [पाट + रस] ॰वडी-स्त्री. हरभऱ्याच्या पिठांत तिखट, मीठ, मसाला इ॰ घालून तें उकडून पाट इ॰कावर थापटून कलेली वडी. 'वड्या पाटवड्या शाखा बहुत ।' -नव ९.११८. [पाट + वडी] ॰वर्धन-वि. अधिकार, पदवी वाढविणारा. 'सकल- मुकुट-पाटवर्धन । वन-माला विराजमान ।' -दाव ३६१. [पाट + सं. वर्धन = वाढविणारा, वाडविणें] ॰शेवई-स्त्री. पाट, लांब फळी इ॰ कांच्या मदतीनें केलेला शेवयांचा एक प्रकार. याच्या उलट हातशेवई. ही केवळ हातांनींच करितात. [पाट + शेवई] ॰सरी-स्त्री. जेथें भिंत छपरास मिळते त्या ठिकाणची आंतील बाजूस राहिलेली जागा; जई.

दाते शब्दकोश

पड

पु. १ दोराचा एक पेड; एका पदराचा दोर; अनेक पदरांचा दोर; अनेक धागे एकत्र करून पीळ घातलेलें सूत. २ (व.) पिळा; पीळ. (क्रि॰ घालणें).

दाते शब्दकोश

पडत

स्त्री. (जकाती शब्द) जकात, कर यांची माफी, सूट (संख्या, परिमाण यांतून).

दाते शब्दकोश

पिढें

न. १ बसावयाचा पाट; आसन; बसण्याची चौकी. २ घिरट ठेवण्यासाठीं असलेले लांकडी तीन ठोकळे. ३ तुळई आणि खांब यांच्या मध्यें असलेला लांकडाचा तुकडा; खांबाखालीं घाल- तात ती उथळी. ४ सूत कांतण्याच्या चरख्याखालीं असलेली लांक- डाचा तुकडा, बैठक. ५; गाडीच्या साटीच्या पुढच्या बाजूला जोड- लेला आडवा लांकडाचा तुकडा. ६ (बुरु़ड काम) कळक तोडण्यास व फोडण्यास आधार म्हणून घेतलेला लांकडी ओंडा. [सं. पीठ] ॰दान-न. पाट, मुसळ, काठी इ॰चा मार. 'तंव पिढेदान त्या प्राप्त झालें.' -निगा १०. पिढयाचें काम, पिढयापाटाचें काम-ज्यांत घराचें छप्पर पिढयावर ठेविलेलें असतें अशी इमारत. ह्याच्या उलट लगीचें काम.

दाते शब्दकोश

पीक

न. १ पेरलेलें धान्य इ॰कांची परिपक्वता. २ शेतांत उभें असलेलें किंवा नुकतीच कापणी केलेलें काडासह धान्य. 'सेवटीं पीक होतां घनदाट । कुणबट अंतरीं संतोषे ।' ३ मळून तयार झालेलें धान्य. [सं. पच्, पक्व] (वाप्र.) ॰जळणें-अतिशय उन्हानें पीक वाळणें; पिकाचें नुकसान होणें. ॰सोडणें-जमीनीची पीक देण्याची शक्ति कमी होणें; जमीनीची सुपीकता कमी होणें. पिकाचा फुफाटा उडणें-पिकाची धूळधाण होणें; पिकाची राखरांगोळी होणें. सामा- शब्द- ॰नुकसान-न. पिकास (अतिशय पाऊस, उष्णता, थंडी इ॰मुळें ) झालेली नुकसानी; पिकाची नासाडी. ॰नुकसानी- स्त्री. १ पिकाची नासाडी; पीकनुकसान. २ पीक बुडाल्यामुळें सरकारनें दिलेली सूट. ॰पाऊस-पु. पीक पिकावयास योग्य असा पाऊस. ॰पाणी-न. पिकाबद्दल सामान्यपणें बोलतांना योजावयाचा शब्द. 'यंदा पीकपाणी बुडालें.' पावसाचें एकदंर मान लक्षांत घेऊन पिकाबद्दल योजावयाचा शब्द. 'तुमच्या गांवा- कडे पीकपाणी कसें आहे बरे ?' ॰पाहणी-स्त्री. पिकाची तपासणी, अंदाज, आणेवारी.

दाते शब्दकोश

पिळू

पुस्त्री. सूत काढण्यासाठीं केलेला कापसाचा वेळू; पेळू (पिळवटून केलेला काथ्या, कापूस इ॰चा ). 'पिंजून पिंजून केला पिळू ।' -भज ५६.[प्रा. पिडली]

दाते शब्दकोश

पिंडा

पु. सूत, रेशीम, सुंभ इ॰चा गोळा; बिंडा. [सं. पिंड]

दाते शब्दकोश

पिंपळी

स्त्री. १ एक औषधोपयोगी वनस्पति; हिचीं फळें हिरव्या रंगाचीं असतात. त्यांना तिखट-गोड स्वाद येतो; पिंप- ळीचे गांठी पिंपळी व लेंडीपिंपळी असे दोन प्रकार आहेत. पिंपळी वातनाशक व उष्ण आहे. २ पिंपळाची शेंग. ३ पिंपळीच्या शेंगे- सारखा जानव्यास पडलेला पीळ. ४ मोत्यांनी मढविलेला एक कानांतीलं किंवा नाकांतील पिंपरी सारखा दागिना; भिकबाळीचें मधलें मोतीं. ५ (सोनारी) झेलरव्याचें सूत मोत्यांत ओवून तें मोतीं झेलरव्याच्या गोलाकाराजवळ बसवल्यावर मोत्याच्या दुसऱ्या बाजूस जो फासा किंवा मुदनी करतात ती. [सं. पिप्पली; हिं. पिप्पल-र; बं. पिपुल; गु. लिडिंपीपळ; कर्ना. हिप्पली; तेल. पिप्पलु; ता. पिंपिल; फा. पिल्पिल्दराज; अर. डार फिल्फिल्; इं. लाँग पेप्पर; लॅ. पाइपर लाँगम्] ॰पाक-पु. पिंपळी घालून तयार केलेलें एक औषध.

दाते शब्दकोश

पिटपिटें

वि. (गो.) तुटणारें. 'पिटपिटे सूत' [ध्व.]

दाते शब्दकोश

पोंथ

पु. १ क्षत-छिद्रांत सूत घालून वाहविण्याची वात खीळ; सूत्रण. पोत; वात. २ फाळानें पडणारें भोंक. [पोत]

दाते शब्दकोश

पोपती

स्त्री. (विणकाम) १ मागावर सूत ताणून बसविण्या- पूर्वीं कुंच्यानें तें साफ करण्याची क्रिया; (क्व.) सांदणी. २ (नाशिक) दहाबारा लुगड्यांसाठीं तयार केलेला गुंडाळलेला उभाराचा ताणा.

दाते शब्दकोश

प्रेम

स्नेह, मर्जी, आपलेपण, आपुलकी, प्रीति, माया, माझेपण, आप्तभाव, ममता, अनुराग, जिव्हाळा, असक्ति, हृदयदान, सौहार्द, मन जाणें, हृदय अर्पिणें, कामप्रेरणा, मनजुळणी, आवड, मोहब्बत, जीव जडणें, मानसिजाची पीडा, जवळीक, पोटतिडीक, कळवळा, कळकळ, मन बसणे, लुब्ध होणें, लट्टू होणे, फिदा होणें, हृदय देणें, सूत जमणें, वर खूष होणे, आरक्त होणे, मन आसक्त होणें, मनाने एकमेकांचें होणें, मर्जी बहाल होणें, अंतःकरण जडणें, मनानें स्वाधीन, आषक होणें, हवें हवें वाटणें, त्यावर जीव होता, मनांत भरणे.
अनिवार ओढ, अंत:करणाचा ओलावा, जिव्हाळा नी प्रेमळपणा, अंतर्यामींची पसंती, हृदयाची स्निग्ध भूक, रेशमी पाश, मायेची पखरण, हृदयांची अदलाबदल, इष्काचा खेळ, अंतःकरणांतील खोल व्यथा, दोन शरिरें पण मन एक अशी स्थिति, प्रीतीचें मृणाल बंधन, गोड फसगत, गुलाबी प्रकरण, एक नवा जीवनरस, आत्म्याचा प्रतिहुंकार, समृद्ध जीवनाचा सोपान.

शब्दकौमुदी

परती

स्त्री. (विणकाम) लडीचें सूत ज्यावर गुंडाळतात ती कांडी, नळकांडी; बॉबीन. (इ.) [परत] परतीचेंकाम-दोन्ही कांठासाठीं दोन व मधील पोतासाठीं एक अशा तीन धोट्यांनीं काम करणें. यामुळें आडवणाचें रेशीम काठांत जात नाहीं. परतण पहा.

दाते शब्दकोश

पत्ति

पु. १ (सैन्याची) एक लहान तुकडी. यांत एक हत्ती, एक रथ, तीन घोडेस्वार व पांच पायदळ शिपाई असतात. २ पदाति; पायदळस्वार. 'हय सूत मथुनि झाले ते यदुकुरुवंशनलिन- रवि पत्ती ।' -मोभीष्म ६.६४. [सं.]

दाते शब्दकोश

पुरणी

स्त्री. १ (खांब, झाडें इ॰ ) जमीनींत पुरणें; रोवणें; जमिनींत गच्च बसविणें. २ भर; भरकाम पुरण (२ ते ५) पहा. ३ दशा असलेलें पागोटें. (याला मागाहून कांठ लावितां येतो). ४ (कर.) सूत ताणण्याची लांकडी नळी. ५ (व.) हाताचें किंवा पायाचें लांब हाड. ६ (बडोदें) रेशीम, दोरा यांत मोतीं, मणी ओंवण्याची कृति. साधी, गांठीची व फांदीची असे पुरणीचे तीन प्रकार आहेत. -जनि (पारिभाषिक शब्द) ८. ७. सांठा; पुरवठा; पुरवणी. 'केली मळमुत्राची पुरणी ।' -भाए ७६२. [पुरणें] (वाप्र.) पुरणीचा ऊंस-लावणी केल्यानंतर पाण्याशिवाय वाढीस लागून परिपक होणारा ऊंस ह्याच्या उलट शिंपणीचा ऊंस. पुरणीग(गा)र-पु. (बडोदें) दागिन्यांची दुरुस्ती, पुरणी करणारा; पटवेकरी.

दाते शब्दकोश

फाळका

पु. १ मोठा तुकडा (लांकूड, फळ इ॰ चा). २ केळीच्या पानाचा (डांगेचा) एका अंगाचा तुकडा (जेवण्याकडे उपयोगी). ३ (विणकाम) सूत उकलण्याचें बांबूचें केलेलें रहाटवजा साधन. यावर सुताची कळी घालून उकलतात. ४ (कु.) नौकेचा खालचा भाग. [फाळ] फाळकी-स्त्री. १ लहान फाळका. २ जमिनीचा अरुंद भाग; पट्टी. [फाळका अल्पत्व]

दाते शब्दकोश

फिरकी

स्त्री. कोष्टयाचें सूत उकलून गुंडाळण्याचें साधन. [फिरणें]

दाते शब्दकोश

फीत

स्त्री. नाडी; पट्टी; लेस; रेशीम, सूत इ॰ विणून दाली- सारखा पट्टा करतात तो; मगजी. [पोर्तु. फिता]

दाते शब्दकोश

फुलार

वि. १ फुलासारखा हलका; सैल; न दाटणारा. २ हलकी व फुगीर (भाकरी इ॰). ३ हलक्या जातीचें, दर्जाचें (सूत इ॰). ४ हलका; दिखाऊ; नाजूक. ५ (गो.) गोटे (तांदूळ) उत्तम प्रकारें शिजलेली (प्रेज) [फुलणें]

दाते शब्दकोश

राट

पु. १ (राजा.) रहाट; पाणी ओढण्याचें चाक. २ (खा. अहिराणी) सूत कातण्याचा रहाट; चरखा. [रहाट]

दाते शब्दकोश

रेवड

स्त्री. १ कांबळें, घोंगडें इ॰ च्या दशा वळून, गुंफून किंवा दुसरें रंगीत सूत, रेशीम इ॰ भरून गुंफलेला गोफासारखा पट्टा. (क्रि॰ घालणें; वळणें). २ (कों.) (लपेट. ३ परवड.

दाते शब्दकोश

रहाटी

स्त्री. १ पायरहाट; पायानें चालविण्याचें रहाटगाडगें. २ सूत उकलण्याकरितां ज्यावर प्रथमत: सुत ताणतात ती.

दाते शब्दकोश

रील

न. सूत गुंडाळण्याचें चक्र; रीळ; बाबीन. [इं.]

दाते शब्दकोश

रया; रयात; रयायत

(स्त्री.) [अ. रिआयत्] कींव; कृपा; क्षमा; सूट; अदब; भीड. “परन्तु तुम्ही आतां शास्त्रांची आज्ञा उलट करून आपले मग्रूरीनें रया सोडून देऊन त्या सतीस मारितां” (ऐटि २|३४). “बे कैदी जाली आहे...मनस्वी भाषणें आहेत, सर्वांनी रया सोडली" (खरे ६।२९६२). “त्यांचीं घोडीं अवघीं तबेल्यास लावणें, ये विषयीं रयात् न करणें” (सभासद ४८). “या कालीं आम्हांवर रयात केली तर आम्हीही बहुत कामास येऊं” (खरे ५९६). “रयात जालिया रयत तज़ावज़ा होणार नाहीं, पुढें उमेदीनें लावणी करार-वाके करितील” (चन्द्रचूडदप्तर १|५१). “साल मज्कुरीं खण्डणीची रयात करावी” (खरे ४|८१७). “महिपतरावांनीं क्रूरपणा धरून जेथें सांपडेल तेथें पैका घेतला; कोणाची रू-रयात अगर वळख धरिली नाही” (खरे ९६३). “कोण्ही कांहीं रयायत करील ऐसें नाहीं; काम होय तोंवर कोरडी मिनत करितात; मन्सब द्यावयासी तयार; जागीर कपर्दिकेची न देत” (राजवाडे ६|३३१). “राजश्रीस जागीर सरन्ज़ामी आलियावर तुम्हांस रयायत पांच हज़ाराची पर्गणाचे पैकीं करार होईल” (राजवाडे १५।१००).

फारसी-मराठी शब्दकोश

सांडसूट

सांडसूट sāṇḍasūṭa f (सांडणें & सूट) A small quantity (of a sum of money, or of any amount in kind, due from a person) remitted or waved to him.

मोल्सवर्थ शब्दकोश

सारगी

स्त्री. (कोष्टी. कर्ना.) सूत वाळविण्याची जागा. [का. सारे]

दाते शब्दकोश

सद्री

स्त्री (गो.) सूत व लोंकर यांनीं विणलेलें कापड; अर्धसुती, अर्ध लोंकरी कापड.

दाते शब्दकोश

समाईक ( हितसंबंध)

परस्परावलंबित्व, एकमेकांचे गुंतलेले हितसबंध, याचा जोर त्याला त्याचा याला, साटेलोटे आहे, एका झाडाच्या या दोन फांद्या खोड एकच, फायद्या-तोट्यांत उभयतांची भागीदारी आहे, याला हवें व इष्ट तेंच त्यालाहि , ताटांत काय वाटींत काय ? वळलेल्या दोन धाग्यांचें हें सूत आहे, दोघांचें हि हित एकाच गोष्टींत, दोन शेंड्यांचें पण एकच बुडख्याचे हें झाड आहे, तुझे माझे जमेना तुझ्यावांचून चालेना, एकाच नावेंत दोघे, एका आढ्याचीं हीं दोन पाखी, एकाला हात लावला तर दुसरें कोलमडेल, त्यांची फिफ्टी फिफ्टी पाती आहे, फायद्याची रक्कम एकाच पेटींत पडते व त्याच्या चाव्या दोघांच्याकडे आहेत, त्याला बुडवून याचें चालणार नाहीं.

शब्दकौमुदी

सोत

सोत sōta f C सोंती f (सूति or सूत S) The pudendum of a female animal.

मोल्सवर्थ शब्दकोश

स्पेस

स्त्री. (मुद्रण.) सूट; दोन शब्दांत अंतर ठेवण्या- साठीं योजावयाचा खिळा.

दाते शब्दकोश

सर्बसर

सरासरी. “तिजाई सूट सर्बसर पाहून द्यावी” (वाड-समा १|१५७).

फारसी-मराठी शब्दकोश

सरबसर, सरबासर

वि. क्रिवि. १ सरासरी; मिश्रित; एकंदर; बिजोड; लहान मोठें एकत्र केलेलें. 'सगळीं मोत्यें सारखीं नाहींत सरबसर आहेत. 'तिजाई सूट सरबसर पाहून द्यावी.' -धाडसमा १.२५७. २ मध्यम; सरासरी.

दाते शब्दकोश

शत्रुत्व

तेढ, बेबनाव, वैमनस्य, गट्टी-फू, वैर, हाडवैर, वितुष्ट, मनांत आकस, द्वेष व अदावत असणें, न बनणे, दुश्मनी, वैरबुद्धि, विद्वेष, अहिनकुलवत् सख्य, भक्ष्य व भक्षक या दृष्टीनें एकमेकांकडे पाहणारे, गरुडाच्या कुशीत सापाने झोंपावे त्याप्रमाणे, विळ्याभोपळ्याइतकें सूत, विस्तव आणि पाणी यांची जोडी कधीं जमते का ? त्यांच्यांत तेढ आहे, पाण्यांत पाहतात, त्यांचें वांकडे आहे, शत्रू लेखतो, बरें पहात नाहीं, दांत आहे, परस्परांत मुळींच रहस्य नाहीं, माया पातळ झाली, शत्रुत्वाचें विष भिनलें, मनांत अढी धरली.

शब्दकौमुदी

सुताडा

सुताडा sutāḍā m (सूत) A thick and strong stuff of cotton. Used as carpeting, sacking &c. 2 A female garment of Nágpúr-manufacture.

मोल्सवर्थ शब्दकोश

सुतार

सुतार sutāra m (सूत or सूत्रधार S) A carpenter. They form a distinct caste. 2 A bird, the woodpecker. 3 A bird, Hoopoe, Upupa minor.

मोल्सवर्थ शब्दकोश

सुतारा

सुतारा sutārā m (सूत) A member of a loom. The cross or connecting piece of the बैला (frame of two sticks meeting transversely) in which are received and fastened the threads of the warp. It is the bar or cross-piece parallel with गुलडा q. v.

मोल्सवर्थ शब्दकोश

सुताटी

स्त्री. खांद्यापासून मान वर निघते तो भाग. 'राणोजी जाबूलकर मानेच्या सुताटी जवल गोली जखम भारी' -पेद २१.७७. [सूत]

दाते शब्दकोश

सुतौवाचा

सुतौवाचा Cor. from सूत उवाच. f n Beginning to say or speak.

वझे शब्दकोश

सुतेरा

सुतेरा sutērā m (सूत) A spider. 2 The thread which it spins; a filament of a cobweb.

मोल्सवर्थ शब्दकोश

सुती

सुती sutī a (सूत) Made or composed of cotton; belonging or relating to cotton. 2 Straight, perpendicular, direct, level (i. e. along which a thread or line laid would lie evenly or equally). Hence Regular, orderly, right. 3 Unerring, correct, skilful, masterly; that works by line and rule;--as an artist, a workman. 4 Tractable. 5 In comp. with a numeral prefix, or with an adjective expressing multitude, quality of texture &c., it corresponds with Threaded or stringed. Ex. एकसुती, दोनसुती, तीनसुती, बहुसुती, अनेकसुती, जाडसुती, बारीकसुती.

मोल्सवर्थ शब्दकोश

सुतळी

वि. (व.) सुतासारखें बारीक; नाजूक. 'मागे बाळकृष्ण जेऊं । तूप पुरणाची पोळी ।दुध सेवया सुतळी ।' -वलो ३५. [सूत सं. सूत्र]

दाते शब्दकोश

सुतळी sutaḷī f sometimes सुतळ f (सूत्र S through सूत or H) Twine, packthread, string.

मोल्सवर्थ शब्दकोश

सुतविणें

सुतविणें sutaviṇēṃ v c (सूत) To encircle with a string (a new house, a Pimpal-tree, the pile of pitchers on मकरसंक्रांति &c., during the performance of certain ceremonies in purification or preparation; or sweetmeats &c. on certain festive occasions).

मोल्सवर्थ शब्दकोश

सूत्र

न. १ सूत; धागा, तंतु; दोरा. २ कळसूत्री बाहुलीची दोरी, तार, (यावरून) एकाद्या यंत्रांतील किंवा भानगडीच्या धंद्या-उद्योगांतील मख्खी. चावी, किल्ली, युक्ति, संधान, फिरकी; तसेंच त्या रचनेची युक्ति, पूर्वीं करून ठेवलेली योजना; यंत्राच्या कृतीची पद्धत, रीत उ॰ मनसूत्र म्हणजे मनाचा कल, इच्छा, आवड. ३ नियम, कायदा, तत्त्व; सूचना, शिकवण यांची ठरीव पद्धत, ठाराविक रीत. ४ व्याकरण, तर्क इ॰ शास्त्रां- तील नियम, शास्त्राप्रवर्तक आचार्यांनीं त्या त्या शास्त्रावर लिहि- लेले मूलग्रंथ; त्यांतील सुटीं वाक्यें. ५ (कायदा) हुकुमनामा; निर्णायक मत. ६ जानवें. ७ ओळंबा. ८ वात (कापसादिकांची) ९ (ल.) सरळ ओळ; रांग. 'तैसें दिसें सैन्यसूत्र ।' -एरुस्व ६.५५. १० (ल.) मैत्री; संधान. [सं.] ॰जमणें-गट्टी जमणें. सामाशब्द- ॰क-वि. १ बिनचूक; सरळ; सुतामध्यें; निश्चित; बरोबर. २ सरळ; एका रेषेंत, लंबरेषेंत, समपातळींत असलेली (रस्ता, भिंत, काठी, खांब). ३ बरोबर; नियमित; (त्यावरून) नीटनेटका, छानदार. ॰काठी-स्त्री. मागच्या हात्यास लाविलेली किंवा जोडलेली काठी. ॰जंत-पु. एक प्रकारचा बारीक जंताचा किडा. ॰धार-पु. नाटकाध्यक्ष; नाटकासंबंधी माहिती करून देणारें मुख्य पात्र. २ कळसूत्री बाहुल्यांच्या खेळांत, ज्याच्या हातांत बाहु- ल्यांच्या दोर्‍या असतात तो माणूस. ३ मंडळ, समाज, संघ इ॰ चा मुख्य चालक. ॰धारी-पु. सूत्रधार अर्थ २, ३ पहा. ॰प्राय-क्रिवि. थोडक्यांत; संक्षेपानें. सूत्रात्मा-पु. हिरण्यगर्भ. [सं.] सूत्रा-त्री-वि. सूत्रक पहा. शहाणा; तरबेज; चतुर; चलाख, निष्णात; धूर्त; तीक्ष्ण बुद्धीचा. 'व्यासु सहजें सूत्री बळी ।' -ज्ञा १८.३५. [सं.]

दाते शब्दकोश

(सं) न० सूत, धागा, दोरा.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

सवा

वि. पावपटीनें अधिक; चतुर्थांशानें अधिक; एक पूर्णांक एक चतुर्थांश. उदा॰ सवाचार = म्हणजे चारपूर्णांक एकचतु- र्थांश; सवाशें = एकशेंपंचवीस; सवालाख = एकलक्ष पंचवीस हजार. [सं. सपाद]. सवाई-स्त्री. १ सवापट; एकचतुर्थांशानें अधिक. २ एक वृत्त, छंद. याचे अनेक प्रकार आहेत. उदा॰ एक गजा- वरि एक हयावरि एक रथावरि बैसुनि आले । -वि. सवापट; चतु- र्थांशानें अधिक. 'कोंकणचें मापापेक्षां देशचें माप सवाई आहे.' 'सवाई माधवराव.' सवाईची मिती-स्त्री. दरमहा दरशेंकडा सवारुपयाप्रमाणें व्याजाचा करार. 'सवाईच्या भितीनें कर्ज काढून देतात' -व्यनि ४०. सवाईजमास्त्री. अवांतर जमा; शेतकरी व इतर गांवकरी यांवरील एक सालपट्टी अथवा जास्त पट्टी. -गांगा ५६. सवाईसूट-वजा-बाद-स्त्री. सार्‍याच्या पंचमांशाची सूट. सवाकींस्त्री. सवाचे पाढे. एक उजळणीचा प्रकार; एकसवा सवा, बेसवा अडीच याप्रमाणें. सवाहाती-स्त्री. (खाटिक) मेंढीचें आंतडें, (हें सवा हात लांब असतें यावरून).

दाते शब्दकोश

सवलत

स्त्री. सोहलत, सौलत पहा. सूट; सवड; मेळ; मान्यता.

दाते शब्दकोश

सवलत

कांहीं टक्के कमी घेतले, सूट, सवलतीचा दर लावला, आकारणी थोडी कमी केली, कमीवर भागविलें, कमी दरांत दिलें, खालचें तिकिट देऊन वर बसू दिलें, हसे करून दिले, स्वतःचे थोडें सोडलें, धारेवर धरले नाहीं, कडक अंमलबजावणीतून थोडी पळवाट ठेवली, म्हटलें तेवढ्याची सक्ति केली नाहीं. सर्वच मागितलें नाहीं, कांहीं कारणें बाद केलीं, कांहीं मागण्या मागे घेतल्या, न करून चालू दिलें.

शब्दकौमुदी

तां(ता)तू

पु. १ धागा; दोरा; तंतु; तार; सूत. 'जैसा फुलाचेनि सांगातें । तांतु तुरंबिजे श्रीमंतें ।' -ज्ञा १८.८२२. २ पिंजलेल्या कापसाचा तार. ३ (बायकी) मुळांसकट उपटलेली व सोळापेक्षां कमी कांडीं नसलेली हरळी गवताची काडी. लग्ना- नंतर पांच वर्षें मुली ह्याची नवरात्रांत अष्टमीच्या दिवशीं पूजा करितात व हा देवीस अर्पण करितात. ३ (बायकी) एक एक हात लांबीचा रेशमी दोरा. लग्नानंतर नवपरिणीत वधूनें त्याची महालक्ष्मीव्रत म्हणून पांच वर्षे पूजा करावयाची असते. ही पूजा प्रतिवर्षी आश्विन शु. १४, वद्य ८ व १४ या दिवशीं करितात व शेवटल्या दिवशीं हा दोरा बोळवितात. मुलीनें ह्या दोर्‍यास आपल्या लग्नाचें जितकें वर्ष असेल तितक्या गांठी द्यावयाच्या असतात. [सं. तंतु]

दाते शब्दकोश

ताना

पु. (व.) पुष्कळशा सुताचा पिंडाळा; गुंडी. [सं. तान = सूत]

दाते शब्दकोश

तानवट

न. (विणकाम) कुकडें (चातीवरील सूत) गुंडा- ळण्यासांठी व चिवट (सुताची गुंडाळी) तयार करण्यासाठीं केलेली खुंट्यांची, मेखांची चौकोनी रचना. [सं. ताण = तंतू + वट प्रत्यय]

दाते शब्दकोश

तानवट      

न.       (विणकाम) कुकडे (चातीवरील सूत) गुंडाळण्यासाठी व चिवट (सुताची गुंडाळी) तयार करण्यासाठी केलेली खुंट्यांची, मेखांची चौकोनी रचना. [सं. ताण + म. वट]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तातू, तांतू      

पु.       १. धागा; दोरा; तंतू; तार; सूत : ‘जैसा फुलाचे नि सांगातें । तांतु तुरंबिजे श्रीमंतें ।’ – ज्ञा १८·८२२. २. पिंजलेल्या कापसाचा तार. ३. (बायकी) मुळासकट उपटलेली व सोळापेक्षा कमी कांडी नसलेली हरळी गवताची काडी. लग्नानंतर पाच वर्षे मुली ह्याची नवरात्रात अष्टमीच्या दिवशी पूजा करतात व देवीला अर्पण करतात. ४. (बायकी) एक हात लांबीचा रेशमी दोरा. नवपरिणीत वधूने त्याची महालक्ष्मी व्रत म्हणून पाच वर्षे पूजा करायची असते. आपल्या लग्नाच्या वर्षाइतक्या गाठी त्या दोऱ्याला द्यायच्या असतात. (वा.) तातू करणे –आहेर करणे. [सं. तंतु]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

टेरिकॉट      

न.       सूत व कृत्रिम धागा यांच्या मिश्रणाचे कापड.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

टीप      

स्त्री.       १. शिस्त; रेखीवपणा : ‘बाई चालणं टीपीचं । काय सांगूं राजसाचं ।’ – वलो १०९. (व.) २. जम; मेळ; मिलाफ : ‘अस्तुरीकां पुरुषांची । ख्याली खुशाली दिसेना । टीप दोघांची बसेना । सूत घरांत जमेना ।’ – वलो ४४.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

टीप

स्त्री (व.) १ जम; मेळ; मिलाफ. 'अस्तुरीकां पुरुषांची । ख्याली खुशाली दिसेना । टीप दोघांची बसेना । सूत घरांत जमेना ।' -वलो ४४.२ शिस्त; रेखीवपणा. 'रेशीम काठी जोडा । कसं पाहणं रोखाचं । बाई चालणं टीपीचं । काय सांगूं राजसाचं ।' -वलो १०९. [टिपणें]

दाते शब्दकोश

तिपांडी      

स्त्री.       प्रत्येक वीस पांडांच्या बिघ्यामागे तीन पांड भातजमिनीची रयतेला दिलेली सूट.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तिस्ती

स्त्री. १ तिपदरी सूत. २ (गो.) चिंधी. [सं. त्रिसुती]

दाते शब्दकोश

तिस्ती      

स्त्री.       १. तिपदरी सूत. २. चिंधी. (गो.) [सं.त्रिसुती]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तिसुती

तिसुती tisutī a (तीन & सूत) Of three strands or strings--a cord.

मोल्सवर्थ शब्दकोश

टकळी      

स्त्री.       (ल). १. कापसाचे सूत काढण्याची चाती : ‘म्हातारे बाजीनाना टकळीवर लोकर कातीत बसत.’ – घरदार ७. २. डोके; डोक्याची कवची. ३. तीव्र इच्छा. [द्रा. टक]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

टकळी

स्त्री. कापसाचें सूत काढण्याची चाती. [टिकली?]

दाते शब्दकोश

तलम      

वि.       १. बारीक व मृदू (सूत इ.). २. बारीक विणीचे व मृदू सुताचे; फार पातळ (वस्त्र इ.). ३. नाजूक; सुकुमार; पोशाखी (प्रकृती इ.). [ते. तरमु; ता. तेरिम]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तलमई      

स्त्री.       (कापड, सूत इ.कांचा) बारीकपणा; तलमपणा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तलमसुती

तलमसुती talamasutī a (तलम & सूत) Of fine texture, fine.

मोल्सवर्थ शब्दकोश

तणणे      

सक्रि.       १. ताणणे; घट्ट करणे. २. रेशीम, सूत इ.चा ताणा घालणे; सुताला वर–खाली अशा अढ्या पाडणे. पहा : ताणणे [सं. तन्‌]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तणणें

सक्रि. १ ताणणें; घट्ट करणें. २ रेशीम, सूत इ॰ चा ताणा घालणें; जवळजवळच्या सुतास वर खालीं अशा अढ्या पडण्याची क्रिया. ताणणें पहा. [सं. तन् = ताणणें; पसरणें]

दाते शब्दकोश

तनसळ      

स्त्री.       (विणकाम) सूत उकळून त्याचा ताणा करण्यासाठी केलेली चौकट. फासे (धागे) घालण्यासाठी या चौकटीवर खुंट्या बसविलेल्या असतात. [सं.तन्तु+शलाका]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तनसळ

स्त्री. (विणकाम.) सूत उकलून त्याचा ताणा कर- ण्यासाठीं केलेली चौकट. फासे (धागे) घालण्यास या चौकटीवर खुंट्या बसविलेल्या असतात. [सं. तन् + सळई]

दाते शब्दकोश

तंतु      

पु.       १. सूत; दोरा; धागा; सूत्र. २. (कातड्याची, सालीची, आतड्याची) तात, तार. ३. (फुलातील) केसर; ताणा; अगारी; तार : ‘पद्माचा जो तंतु वारणाला । वारायाला पैं म्हणे सिद्ध झाला ।’ – वामन नीतिशतक १० (नवनीत पृ. १३४). ४. दोरासारखा किडा. ५. (ल.) धागादोरा; धागासंबंध; लागाबांधा. (क्रि. लागणे.). ६. एखाद्या कुटुंबातील एकच शिल्लक उरलेला पुरुष. ७. वंश; संतती; मुलेबाळे; अपत्य. ८. धोरण; सूत्र. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तंतु

पु. १ सूत; दोरा; धागा; सूत्र. 'कां वस्त्रपणाचेनि आरोपें । मूर्खाप्रति तंतु हारपे ।' -ज्ञा १८.५४४. २ (कात- ड्याची, सालीची, आंतड्याची) तात; तार. ३ (फुलांतील) केसर; ताणा; अगरी; तार. 'पद्माचा जो तंतु तो वारणाला । वारायाला पैं म्हणे सिद्ध झाला ।' -वामन-नीतिशतक १० (नवनीत पृ. १३४). ४ दोरासारखा किडा. ५ (ल.) धागादोरा; धागा; संबंध; लागाबांधा. (क्रि॰ लागणें). ६ एखाद्या कुटुंबांतील एकच अवशिष्ट राहिलेला पुरुष. ७ वंश; संतति; मुलेंबाळें; अपत्य. ८ धोरण; सूत्र. [सं.] ॰कार-पु. तंतुवाद्य वाजविणारा. 'म्हणजे तो इसम सुप्रसिद्ध गवई तंतुकार असेल अगर...' -ऐरापु ११. [तंतु + कार] ॰पटन्याय-पु. तंतूवांचून पट नाहीं, किंबहुना तंतु विशिष्ट प्रकारें जोडले असतां त्यांना पट हें नांव देतात. अशा प्रकारें तंतूचा व पटाचा स्वभावसिद्ध व अभेद्य संबंध आहे, हें दाख- विणारा न्यायशास्त्रांतील एक सिद्धांत. कायमचा स्वाभाविक लागा- बांधा. [तंतु = धागा + पट = वस्त्र + न्याय] ॰मेह-पु. (वैद्यक) १ लघवींतून धातूची तार जाण्याचा विकार. २ वरील प्रकारच्या विकाराचें मूत्र,रोग. [तंतु + मेह = विकार] ॰वाद्य, तंत- वाद्य, तंतोवाद्य-न. वीण, तंबोरा, इ॰ तारा, तात लावलेलें वाद्य; तंतोवाद्य पहा. ॰वाय-पु. १ विणकर; कोष्टी. २ कोळी (किडा). [सं.]

दाते शब्दकोश

तराक

स्त्री. (जरतारी धंदा) बादलें (चपटें सूत) गुंडाळणारें पोलादी यंत्र; चाती; (इं.) स्पिंडल.-पु. चातीवर काम करणारा मनुष्य.

दाते शब्दकोश

तराक      

स्त्री.       (जरतारी धंदा) बादले (चपटे सूत) गुंडाळणारे पोलादी यंत्र; चाती; (इं) स्पिंडल.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

त्रिक

न. (कर.) (विणकाम) रहाटाच्या तीन फेर्‍या होतील इतकें सूत. 'एक त्रिकभर दोरा मला दे.' [त्रि]

दाते शब्दकोश

त्रिक      

न.       (विणकाम) रहाटाच्या तीन फेऱ्या होतील इतके सूत.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

त्रोटणें

उक्रि. (काव्य.) तोडणें; विभागणें; निराळें, वेगळें वेगळें करणें; तुकडे करणें. [सं. त्रुट्-त्रोटन] त्रोटन-न. (सूत इ॰) तोडण्याची क्रिया; तुकडे करण्याची क्रिया; विभागणी. [सं.] त्रोटित-वि. तोडलेला; विभागलेला; निराळा, वेगळा केलेला; तुकडे केलेला. [सं.]

दाते शब्दकोश

तुळसवात      

स्त्री.       (बायकी) कापसाच्या सुताची चार बोटांच्या रुंदीवर सूत गुंडाळून केलेली बारा सुतांची एक वात. या वाती तुळशीच्या लग्नापासून दररोज दोन वाती याप्रमाणे वर्षभर लावतात.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उद्वर्तनफलक

पु. तार किंवा सूत ओढण्याची पट्टी, जंत्री.

दाते शब्दकोश

उद्वर्तनफलक      

पु. तार किंवा सूत ओढण्याची पट्टी, जंत्री.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उणावळ      

स्त्री.       उणीव; सूट; कमीपणा; टंचाई; कमतरता.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उन्मुक्ति, उन्मुक्ती      

स्त्री. मोकळीक; करातून, कायदेशीर आरोपातून, शिक्षेतून किंवा नोकरीतून मिळालेली सूट. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उपशम      

पु. १. उतरणे; कमी होणे. २. मंदावणे; ओसरणे; शांत होणे. ३. घट; सूट. [सं. उप + शम्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

वादलें

न. (जरतार) चपटें केलेलें धातूचें सूत. [बादला]

दाते शब्दकोश

वैदेह

पु. १ विदेह देशाचा. २ ब्राह्मण स्त्रीस वैश्यापासून झालेला मुलगा. 'उत्तम वर्णाची जे नारी । हीन वर्णाचा गर्भ धरी ।...। तेचि संतति प्रसिद्ध । सूत वैदेह मागध ।' -एभा २०. ३०-३१. [सं.] वैदेही-स्त्री. सीता.

दाते शब्दकोश

वाणा

पु. वस्त्रांतील आडवा दोरा, सूत; बाणा. 'दुबंधा क्षीरोदकीं । वाणे परी अनेकी '-अमृ ७.१४७. [सं. वाणि = विणणें, माग] ॰ताणा-पु. वस्त्राचे आडवे उभे तंतू.

दाते शब्दकोश

वारें

न. सूत व रेशीम यांच्या मिश्रणांत जें रेशीम असतें तें.

दाते शब्दकोश

वात

स्त्री. १ बत्ती; दिव्यांतील कापसाची, सुताची पेळू; देवापुढें लावावयाच्या निरनिराळ्या फेऱ्यांच्या वळ्या. उदा॰ बोटवात-१ सूत; बेलवात-३ सुतें; विष्णुवात-५ सुतें; माणिकवात- १ सुत; रुद्रवात-११ सुतें; पुरुषोत्तमवात-१५ सुतें; गणेशवात-२१ सुतें; गोकुळवात-८ सुतें; रामवात-१२ सुतें; शिवरात्रवात-१००० सुतें. इतर वाती-फुलवात, काडवात, पंचरत्नवात, अनंतवात, अधिक वात. 'घरोघरी दीप अखंड त्यांच्या सरसावुनि वाती ।' -घनः- शामाची भूपाळी. २ कोवळें बारीक पडवळ, शेंग, काकडी वगैरे. ३ (ल.) (नाविक) गुंडाळलेलें शीड. ४ दिव्याचें नाक, निमूळता भाग; समईंतील वाती ठेवण्याची जागा. ५ तेलवात या शब्दाचें संक्षिप्त रूप; नंदादीपासाठीं लावून दिलेला जमीन. ६ (ल.) दिवा. 'रश्मि वातीविण न देखती ।' -ज्ञा ९.३०१. [सं. वर्त्ति] ॰दोरा-पु. गाभण प्राण्याच्या योनींतून स्त्रवणारा चिकट द्रव. ॰पोत-पु. (दिव्याची वात व देवीचा पोत) (ल.) सरळ सडसडीत, किरकोळ, बारीक लव लांब वस्तु. 'अवयव आकृति खिली वातपोतसारखी । निवडणार निवडील असे जो रत्नाचा पारखी ।' -पला ४.३४. वातरें, वातेरें, वात्येरें-न. १ समईं- तील वाती लावण्याची खोबण. 'दोन वातेऱ्यांत दोन जुळ्या वाती जळत होत्या.' -कोरकि ५४. २ वाती करावयाच्या उपयोगी फडकें. ३ (ल.) फाटकें वस्त्र; लकतऱ्या; चिंध्या. [वात]

दाते शब्दकोश

वचन

न. १ भाषण; बोललेली गोष्ट. २ शब्द; भाष; निश्चयपूर्वक सांगणें. ३ विधान. ४ उक्ति; सूक्त. ५ प्रमाणभूत आधार; प्रामाण्य. 'मुख्य प्रभुचें लक्षण प्रत्यक्ष ज्यास वचन भारती ।' -ऐपो ३२०. ६ (कायदा) करार; प्रतिज्ञा. ७ अव- तरण; ग्रंथांतील उदाहरण. 'सर्व देवांसि नमस्कारिलें । तें एका भगवंतासि पावलें । येदर्थीं येक वचन बोलिलें । आहे तें ऐका ।' -दा ४.६.११. ८ (व्या.) नामाच्या ठिकाणीं एकत्वरुपानें अथवा अनेकत्वरुपानें असलेली अर्थाची उपपत्ति. 'एकवचन; द्विवचन, अनेक -बहुवचन.' [सं.] म्ह॰ वचने किं दरिद्रता = नुसतें बोलण्यांत कमी- पणा कशाला? बोलायला काय जातें? चिठी-ठ्ठी-स्त्री. कर्ज घेतांना लिहून दिलेला रोखा. (इं.) प्रॉमिसरी नोट. 'एखाद्या चुकार ऋणकोनें हिशोबाची भानगड दाखवून बरीचशी सूट घेऊन वचन- चिठी लिहून द्यावी.' -सासं २.१६६. ॰भंग-पु. करार, शपथ मोडणें. ॰भाक-स्त्री. तोंडी करार, व्यवहार. ॰विरोध-पु. वच- नाच्या विरुद्ध वागणें. वचनाचा खरा-धड-वि. वचनाप्रमाणें वागणारा; वचन पाळणारा. 'खरा लोककल्याणेच्छु व देशा- भिमानी पुरुष म्हटला म्हणजे......तो वचनाचा धड असला पाहिजे.' -नि. वचनाच्या आज्ञेंत, अर्ध्या वचनांत असणें, वागणें-अतिशय आज्ञाधारक, विनीत असणें. वचनीं गोवणें-एखाद्याला त्याच्याच शब्दांत, वचनांत गुंतविणें; वचना- नुसार करावयास भाग पाडणें. 'म्हणती श्रीकृष्ण आमुचें जीवन । सत्यभामेसी वचनीं गोवून । कैसें नेतोसी दयार्णवा ।' -ह ३०. १४३. वचनीं राहणें-आज्ञेंत वागणें. 'वचनीं राहुनि काम मनांतिल पुरवी ऐशी त्यजिली रामा ।' -मराठी ६ पु. (१८७५) १७६. वचनावचनी-स्त्री. तोंडी करार, व्यवहार; वचनभाक. वचनीय-वि. १ बोलण्या-सांगण्यासारखें. २ शब्दांनीं व्यक्त करण्यासारखें; वर्णनीय.

दाते शब्दकोश

विश्वासघात

तोंडघशीं पाडलें, फंदफितुरी व घात, आयत्या वेळीं माघार, दाखवावयाचे दांत वेगळे खायचे दांत वेगळे, विश्वास पानिपतमध्ये गारद झाला ! अचानक रंग बदलला, नूर फिरला, पायांत पाय घातला, परपक्षाला मिळाला, टोपी फिरविली, पगडी फिरविली, हा साप उलटला, साक्षींत फिरला, विश्वास दाखवून घोळविलें व अखेर फशी पाडलें.
टांग मारली, मंडपांतून माघार घेतली, पडद्याआड्रून सुरुंग लावला, जेवायला बोलावून विष घातलें, भाषा मैत्रीची कृति शत्रूची, केसाने गळा कापला, आंतून फितला, शत्रूशीं संगनमत मित्रांशी द्रोह, आंतून वै-याशी सूत जमविलें; इकडे सर्वांना झुलत ठेवलें, हंसतां हंसतां दांत पाडले.

शब्दकौमुदी

वस्त्र

न. १ कापूस, रेशीम, लोंकर इ॰ चें कापड. २ कपडा; अंगावर घेण्याची, नेसण्याची वस्तु; प्रावरण; चिरगूट. ३ पोषाख. म्ह॰ १ लाभ पांचाचा आणि वस्त्र दाहाचें. २ वस्त्राआड जन नागवें. ४ देवास वाहतात ती सूत पुतळी. [सं.] (वाप्र.) ॰आड करणें-लज्जारक्षणासाठीं नेसणें. 'जुनेर आड करून चार लोकांत कसें बरें यायचें बाहेर !' -एकचप्याला. एका वस्त्रानें निघणें- (अंग शब्दाच्या पोटांत) एका अंगवस्त्रानें निघणें पहा. वस्त्रें देणें-दिवाणगिरी इ॰ चा अधिकार देणें. काळीं वस्त्रें देणें- पदच्युत करणें; काढून टाकण. (शब्दशः व ल). वस्त्रें होणें-१ अधिकार प्राप्त होणें. २ (विपरीतल.) अधिकारावरून दूर होणें. वस्त्रांतर होणें-करणें-पोषाख बदलणें. ॰गाळ गाळीव- वि. कपड्यांतून गाळून घेतलेलें. ॰गोपन-न. एक कला; वस्त्रें नेहमीं नवीं राहतील अशा युक्तीनें ठेवणें. ॰परिधान-न. पोषाख चढविणें, करणें. ॰पात्र-न. नेहमीच्या व्यवहारांतील भांडीं कुंडीं, कपडे लत्ते इ॰; सामानसुमान. ॰प्रावरण-न. (व्यापक) कपडा- लत्ता; वापरण्याचे कपडे. ॰प्रासाद-पु. तंबू. 'वस्त्रप्रासादीं शुभशयनीं जातांचि भागला पहुडे ।' -मोकर्ण ३९.४. ॰लोचन- न. (प्र.) वस्त्रलुंचन; वस्त्रें लुबाडणें, चोरून नेणें; नागविणें. ॰विलास-वि. नटवा; उंची, सुंदर पोषाख करण्यांत आनंद मान- णारा. ॰हरण, वस्त्राहरण-१ वस्त्र बुचाडणें, फेडणें. 'द्रौपदी- वस्त्रहरण.' २ वस्त्रें चोरून नेणें, लुबाडणें. वस्त्रागार-न. तंबू. 'निर्मऊन पैलाडी वस्त्रागार ।' -दावि ३९१. वस्त्राचा ताणा- पु. वाळत घातलेल्या कपड्यांची रांग. (क्रि॰ लावणें). -वस्त्रें भूषणें-न. अव. कपडें; अलंकार; कपडेलत्ते, दागदागिने. 'तिला वस्त्रेंभूषणें घालून संतोषित केलें ' -कमं २.

दाते शब्दकोश

भोंपळा

पु. १ एक प्रकारचें भाजीचें फळ. ह्याचे काळा, पांढरा व तांबडा असे प्रकार आहेत. उंदराच्या विषयावर काळ्या भोप- ळ्याचा देठ उगाळून लावतात. कडू भोपळा म्हणून एक भोपळ्याची जात आहे. वीणा, सतार यांच्या डेर्‍यास याचा उपयोग करतात. २ वीणा इ॰चा डेरा. ३ (व.) नाट व खांबाच्या वरचें टोंक यामधील ठोकळा. ४ (ल.) कमंडलु; तुंबा. (वाप्र.) (भ्रमाचा) भोपळा फुटणें-एखाद्या गोष्टींत कांहीं अर्थ असेल अशी जी समजूत ती कांहीं करणानें त्या गोष्टीचें खरें स्वरूप उघडकीस येऊन दूर होणें. (हातीं) भोंपळा येणें-दरिद्री होणें; भीक मागूं लागणें. भोपळ्या एवढें शून्य-अत्यंत अभाव. भोपळ देवता-स्त्री. लहान मुलाप्रमाणें खोड्या करणारी, भटक्या मारणारी वयस्क स्त्री. [भोंपळा + देवता] भोंपळसुती-वि. १ जें चालविण्यांत बंदोबस्त, व्यवस्थितपणा, बारकाई, कुशलता इ॰ नाहीं असें (राज्य, कारभार, सावकारी, व्यवहार इ॰). २ अव्यवस्थित; अजागळ; निष्कळजीपणानें केलेला (पोषाख, कामकाज). ३ जाडेभरडें; राकट; ओबडधोबड (सामान- सुमान, कामकाज). [भोंपळा + सूत] भोंपळी-स्त्री. भोंपळ्याचा वेल. भोंपळी खरबूज-न. एक प्रकारचें खरबूज. भोंपळी मिरची-स्त्री. एक प्रकारची जाड मिरची ही कमी तिखट असते. हिची भाजी करतात. भोंपळ्या रोग-अंगांत मेदोवृद्धि करणारा एक रोग; फोपसेपणा.

दाते शब्दकोश

घोडी      

स्त्री.       १. सतार, तंबोरा इ. तंतुवाद्यांच्या भोपळ्यावर एकदीड इंच उंचीची हस्तिदंती अगर लाकडी पट्टीची बैठक. हिच्यावरून तारा पुढे खुंटीला गुंडाळलेल्या असतात. २. पूर्वी शाळेत मुलांना देण्यात येणारी एक शिक्षा. वर उंच आढ्याला बांधलेल्या दोरीवर मुलाला लोंबकळत ठेवण्यात येई. अशा प्रकारच्या शिक्षा देण्याच्या प्रकाराला घोडी देणे असे म्हणत असत : ‘एखाद्या मुलाशी माझं वाकडं झालं की, रचलंच त्याच्यावर किटाळ आणि दिलीच त्याला पंतोजीकडून घोडी.’ – चंद्रग्र ८० (क्रि. घेणे, देणे). ३. उभे राहून पखवाज वाजविता यावा म्हणून तयार केलेली घडवंची : ‘इतक्यात देवळाच्या एका कोपऱ्यात मृदंग ठेवावयाची उंच घोडी सुनंदाला दिसली.’ – सुदे २५. ४. गवत इ. वाहण्याकरिता खटाऱ्यावर उभारलेला सांगाडा, चौकट. ५ जमिनीपासून फळा उंच ठेवण्याकरिता व त्याला उतार देण्याकरिता केलेली लाकडी चौकट, सांगाडा. ६. (सुतारी) जे लाकूड तासायचे असते ते हलू नये म्हणून त्याला आधार देणारे दुसरे लाकूड, चौकट इ. हे लाकूड एका विशिष्ट तऱ्हेने सोयीस्कररीत्या बसवतात. ७. (विणकामात) सूत उकलण्यासाठी केलेले लाकडी चौकटीसारखे साधन. ८. (सोनारी) पायात घालण्याच्या साखळ्यांच्या कड्या वाकविण्यासाठी असलेला बोटाइतका निमुळता खिळा, मोळा. (हेट. नाविक) ९. छोटे शीड उभे करण्यासाठी असलेले कमानीसारखे लाकूड. १०. बंधाऱ्याच्या मुखाशी (पाणी सोडण्याच्या ठिकाणी) पडद्यासारखी बांधलेली भिंत. या भिंतीवरून पाणी जात असते. ११. गलबताच्या कडेला शौचाला बसण्याकरिता टांगलेली लाकडी चौकट (हेट.). १२. साकटणे; सकोटण. १३. दाराच्या दुहेरी चौकटीच्या वरच्या बाजूचे, परस्परांना जोडणारे दोन लाकडी तुकडे. १४. तीन पायांचे दिवा ठेवण्याचे बुरडी तिकाटणे, तिवई. १५. पाटाला खाली मारतात ते (दोन) आडात. १६. हत्तीवरील हौदा, चौकट : ‘साहेब नौबतीकरिता हत्तींवर लाकडी घोडी घालून…’ – ऐरा ९·५०६. १७. उभे खुंटाळे; स्टँड : ‘तिकोनी खुंट्यांची घोडी आणि रुमाल ठेवावे.’ – स्वारीनियम ७०. १८. सामान ठेवण्याचा घोडा. १९. गोट्यांच्या खेळात हरणाराला खेळाच्या शेवटी मिळणारी शिक्षा. [क. कानगुडी = हातपाय बांधणे]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

वेज-जें, वेझ-झें

न. १ मोतीं, मणी, रत्नें इ॰ ना पाडलेलें भोंक; छिद्र. 'तया ब्रह्मस्वरूपाचा गुणीं । भणौनि सुवेंझु भरले मुक्तामणी ।' -ऋ २४. -उषा १७२९. २ सुई, दाभण इ॰ चें भोंक; नेढें. (क्रि॰ पाडणें). ३ (सामा.) छिद्र; भोंक. 'पडलें काळिजा वेज देवौघनागाचें तेज ।' -मोरामायणें १. २५२.९६. ४ वर्म; लक्ष्य; केंद्र. 'चुकलिया त्यागाचें वेझें । केला सर्व त्यागुही होय वोझें । निषिद्धें त्या सर्वत्र जुंझे । वीतराग ते ।' -ज्ञा १८.१३४. [सं. वेध; प्रा. वेज्झ; का वेज्ज] वेझ देणें- भोंक पाडणें. 'प्रज्ञा फळतया अर्था वेझ देणे जें ।' -ज्ञा १८. ८६३; -शिशु १०३७. वेजीं पडणें-वेजीं उतरणें पहा. 'आतां नथ नका लपवूं. तीं उतरलेली वेजीं पडलेलीं मोतीं दिसूं देत सर्वांना.' -भाऊ ४८. वेजीं उतरणें-मोतीं, माणिक इ॰ चें भोंक, तार, रेशीम इ॰च्या सततच्या घर्षणानें मोठें होणें (वेज मोठें झाल्यास किंमत कमी होते). 'शिंदे होळकर एवढे लढते सरदार असतां त्यांची केवळ हिंमत हरली. वेंजीं उतरलीं.' -भाब १०४. वेज टिकली-स्त्री. (सोनारी) ज्यांतून तार ओढली जाते तें लोखंडीपट्टीला पांडलेलें भोंक. वेझपट्टी-स्त्री. (सोनारी) चांदी-सोन्याचें सूत अगर तार ओढण्याची, भोकें असलेली पट्टी; जंतरपट्टी.

दाते शब्दकोश

तुळस-शी

स्त्री. हिंदु लोकांत पूज्य मानिलेलें एक झाड; काळी व पांढरी आथवा रामतुळस असे हिचे भेद आहेत. तुळस ही हिंदुस्थानांतच आढळते. (हा शब्द तुळस-सी असाहि वापरला जातो). [सं. तुलसी] (वाप्र.) ॰उचलणें-शपथ घेणें. ॰उपटून भांग लावणें-वाईट मनुष्य पदरीं ठेवण्याकरितां चांगल्या मनुष्यास काढून टाकणें. तुळसीचे मुळांत कांदा लावावा लागणें-चांगले हेतु सिद्धीस नेण्यास वाइट साधनांचा उपयोग करण्याविषयींची सबब सांगणें. तुळशींत भांग- चांगल्याच्या समुदायांत चुकून एखादा वाईट माणूसहि आढळतो. तुळशींत भांग व भागेंत तुळस-चांगल्या व वाईट गोष्टी एका ठिकाणींच पिकतात. तुळशीपत्र कानांत घालून बसणें- ऐकले न ऐकलेसें करून स्वस्थ राहणें. तुळशीपत्र ठेवणें-हक्क सोडणें. (हलबायाच्या घरावर) तुळशीपत्र ठेवणें-परभारें दुसर्‍याची वस्तु तिसर्‍याला देऊन टाकणें. सामाशब्द- ॰काष्ट-न. तुळशीचे लांकूड. (प्रेंताचें दहन करण्यास, उगाळून गंध करण्यास किंवा माळेचे मणी करण्यास याचा उपयोग करतात). ॰पत्र-न. तुळशीचें पान. (ल. सामान्यतः लहान मानलेली दक्षिणा किंवा देणगी). ॰मंजरी-स्त्री. तुळशीचा शेंडा-तुरा. 'कासें दिव्या पितांबर । गळां तळसीमंजर्‍यांचे हार ।' ॰वर्ग-पु. तुळस, सब्जा सारख्या पुष्पांतील दोन आंखूड व दोन लांब असे पूंकेसर असलेल्या झाडांचा वर्ग. ॰वात-स्त्री. (बायकी) कापसाच्या सुताची चार बोटांच्या रुंदीवर सूत गुंडाळून केलेली १२ सुतांची एक वात. ह्या वाती तुळशीच्या लग्नापासून दररोज दोन वाती या प्रमाणें वर्षभर लाव- तात. ॰विवाह-पु. कार्तिक शुद्ध द्वादशीस विष्णूची मूर्ती व तुळ- शींचें झाड यांचा जो विवाह होतो तो. ॰वृंदावन-न. तुळशीचें झाड लावण्याकरितां केलेली विशिष्ठ रचना, ओटा, स्थान.

दाते शब्दकोश

नाक      

न.       १. श्वास व वास घेण्याचे इंद्रिय; श्वासनलिकेची सुरुवात; घ्राणेंद्रिय; नासिका. २. (ल.) धान्य, बटाटे इ.ला ज्या ठिकाणी मोड येतो ती जागा; डोळा. ३. सुई, दाभण इ.चे भोक; नेडे. ४. (कुटुंब, सभा इ.तील) मुख्य उत्कृष्ट मनुष्य; देशातील मुख्य शहर किंवा किल्ला. ५. नथीकरता नाकाला पाडलेले भोक, छिद्र. ६. धीटपणा; दम; खात्री. ७. निलाजरेपणा. ८. अब्रू; चांगली कीर्ती, नाव; उजळ माथा. [सं. नासिका] (वा.) नाक ओरबाडणे–नाकातील अलंकार हिसकून घेणे. नाक कापणे–खोडकी, गर्व जिरविणे; पराभव करणे. (आपले) नाक कापून दुसऱ्याला अपशकुन, अवलक्षण करणे–दुसऱ्याचे नुकसान व्हावे म्हणून आपला स्वतःचा नाश करून घेणे. नाक कापून पाटावाने पुसणे–एखाद्याची मोठी अप्रतिष्ठा करून नंतर थोडा सन्मान करणे. नाक खाजवणे–चिडवणे; वेडावणे; खिजवणे. नाक खाली पडणे, नाक पाडणे, नाक होणे–गर्व नाहीसा होणे, करणे; मानहानी होणे. नाक गुंडाळणे–आपला कमीपणा, पराभव कबूल करणे; शरण जाणे; क्षमा मागणे. नाक गेले तरी भोके राहिली आहेत असे म्हणणे–मागील गुन्ह्याची लाज सोडून पुन्हा निर्लज्जपणे बोलणे, वागणे. नाक घासणे–१. आर्जव, खुशामत करणे; हांजी हांजी करणे. २. क्षमा मागणे; चूक कबूल करणे. नाक चढवून बोलणे–उद्धटपणाने बोलणे. नाक ठेचणे –फजिती करणे; नक्षा उतरणे; खोड मोडणे. नाक जळणे,नाकातले केस जळणे–फार दुर्गंधी येणे. नाक झाडणे–१. तिरस्कार दाखवणे; ताठा, गर्व उतरविणे. २. नाक शिंकरणे. ३. घोडा इ. जनावराने जोराने नाकातून वारा काढणे. नाक तोडून कडोस्त्रीला खोवणे–१. भीक मागण्यासाठी लाजलज्जा सोडणे; अगदी लोचट बनणे. २. नापसंती दाखवणे; नावे ठेवणे. नाक धरणे–वाट पाहायला लावणे; खोळंबा करणे. नाक धरल्यास, नाक दाबल्यास तोंड उघडणे–एखाद्याला पेचात धरल्याशिवाय तो आपल्या म्हणण्याला कबूल होत नाही म्हणून त्याला पेचात धरणे. नाक धरून बसणे–१. (प्राणायामावरून) धार्मिक कृत्यांत गुंतलेला असणे. २. कर्तव्य न करता वेळ दवडणे. नाक मुठीत धरून जाणे–निरुपायाने, नाइलाजाने शरण जाणे; अभिमान सोडून जाणे.नाक मुरडणे, नाक मोडणे–नाक वाकडे करून नापसंती दर्शविणे; फजिती उडवणे; गर्व उतरवणे. नाक लावून (करणे)–धिटाईने; निलाजरेपणाने (करणे). नाक वर करणे, नाक वर करून चालणे, नाक वर असणे–१. दिमाख, ताठा, गर्व, निर्लज्जपणा दाखवणे; वरचढ असणे. २. स्वतः दोषी असतानाही दिमाख दाखवणे; शरम न वाटणे. नाक वाहणे–पडसे येणे. नाक सावरणे– (बायकी) मूल जन्मल्याबरोबर त्याला न्हाऊ घालताना त्याच्या नाकात तेलाचे एकदोन थेंब सोडून त्याच तेलाच्या हाताने नाकाच्या वरच्या भागापासून शेवटपर्यंत हलके चोळणे. नाकधुऱ्याकाढणे, नाकदुऱ्या काढणे–१. अतिनम्रपणाने विनवणे; शरण जाणे; क्षमा मागणे. २. केलेल्या अपराधाबद्दल प्रायश्चित्त भोगणे. नाकपुड्या पिंजारणे, नाकपुड्या फुलविणे, नाकपुड्या फुगविणे, नागपुड्या फुरफुरविणे, नाकपुड्या फेंदरणे–रागाने खेकसणे; अंगावर जाणे; नाक फुगवून राग दाखविणे. नाकमुष्ट्या हाणणे–हिणवणे; नाराजी दाखवणे. नाकाचा कानवला करणे–नाक मुरडणे. नाकाची घाण मरणे, जाणे –१. सवयीमुळे, पडशामुळे वास न येणे; सवय होणे. २. (ल.) सवयीमुळे वाईटाचा तिरस्कार न वाटणे. नाकात काड्या घालणे–चिडवणे; टोमणे मारणे; कुरापत काढणे; चीड येईल असे वागणे. नाकात दम येणे–निरुपाय होणे; अत्यंत थकणे. नाकात बोलणे– नाकातून, गेंगाण्या स्वरात बोलणे; (कोकणी लोकांप्रमाणे) अनुस्वारयुक्त बोलणे. नाकातोंडाची गुंजडी करणे– (नाक, तोंड आवळून, चंबूसारखे करून) राग, नापसंती दाखवणे. नाकाने कांदे, वांगी सोलणे–१. नसता, खोटा शुचिर्भूतपणा दाखवणे; उगीच पावित्र्याच्या गोष्टी सांगणे. २. एखादे वेळी फार चोखंदळपणा करणे पण एरवी वाटेल तसे वागणे. नाकापेक्षा मोती जड होणे–गौण वस्तूला अधिक महत्त्व प्राप्त होणे; कनिष्ठ दर्जाचा मनुष्य वरिष्ठाहून वरचढ होणे. नाकाला चुना लावणे, नाकाला चुना लागणे– १. बदनाम करणे, होणे : ‘सोसे कुलजा मृत्यु, न अयशाचा सोसवे चुना नाकीं ।’ – मोद्रोण २१·५८. २. डिवचणे. नाकाला जीभ लावणे, झिमोटा घालणे – तिरस्कार दाखवणे; गर्व, ताठा, दिमाख दाखवणे; नाक मुरडणे. नाकाला पदर लावणे– १. लज्जेने, अपर्कीतीमुळे तोंड झाकणे. २. घाणीचा तिरस्कार करणे. नाकाला मिरच्या झोंबणे–एखादी गोष्ट मनाला, वर्मी लागणे. नाकावर असणे–अगदी तयार असणे. नाकावरची माशी तरवारीने हाणणे–लवकर राग येणे. (व.) नाकावर जीव येणे–कमालीचे कष्ट पडणे. नाकावर टिचणे–१. एखाद्याचे पैसे ताबडतोब देणे. २. काकूं न करता, अडथळ्याला न जुमानता एकदम देणे, करून टाकणे. नाकावर निंबू घासणे,नाकावर निंबूपिळणे– प्रतिपक्षाला न जुमानता आपले काम साधणे; प्रतिपक्षाला चीत करणे. नाकावर पदर येणे–१. वैधव्य येणे. २. लाजेने लपून एकांतवासात बसणे. नाकावर पाय देणे–विरोधाची पर्वा न करणे; प्रतिपक्षावर मात करणे. नाकावर बोट ठेवणे–१. गुप्त ठेवायला, गप्प बसायला सांगणे. २. (रागाने किंवा अन्य कारणाने एखाद्याला) दबकावणे. नाकावर माशी बसू न देणे–अतिशय चिडखोर असणे; अपमान किंवा तिरस्कार अगदी सहन न होणे; थोडेदेखील उणे बोलणे सहन न होणे. नाकावर वाट करणे –विरोधाला न जुमानता काम सिद्धीला नेणे. नाकाशी सूत धरणे–अगदी मरणोन्मुख होणे. (मरताना श्वास आहे की नाही ते पाहण्यासाठी नाकाशी सूत धरतात). नाकासमोर जाणे, चालणे–अगदी सरळ मार्गाने जाणे. नाकाहोटांवर जेवणे–चाखतमाखत, चोखंदळपणाने जेवणे. नाकीचा बाल, नाकाचा बाल–१. अत्यंत आवडता, जिवलग माणूस; गळ्यातला ताईत. २. मोठ्यांच्या परमप्रीतीतला दुर्जन. नाकी नऊ, नळ, नव येणे–१. अतिशय दमणे, कंटाळणे, भागणे (श्रमाने). २. (नऊ इंद्रियांची शक्ती नाकात येणे) मरणाच्या दारीअसणे. नाकी वेसण घालणे–एखाद्याला कह्यात, कबजात ठेवणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

महार

पु. एक अंत्यज, अस्पृश्य जाति; अतिशूद्र; परवारी पहा. [सं. महा + अरि किंवा आर्य; महा + अर (पर्वताच्या गुहेंत राहणारा); मृत + हर = मेलेलें जनावर ओढणारा; मेर = गांवाची कड?] ॰म्ह महाराची आई चांभार घेऊ (मला काय त्याचें). ॰कचका- पु. जोराजोराचें, आरडाओरड्याचें भांडण (महार नेहमीं भांडतात त्याप्रमाणें). ॰कवडी-स्त्री. एक जातीची कवडी. ॰कावळा- पु. डोंबकावळा. ॰कीस्त्री. १ गांवच्या महाराचें काम, हक्क, वतन, अधिकार. २ (ल.) कोणतेंहि हलकें, नीच, कष्टाचें कामं. ॰गजालस्त्री. गडबड; गोंगाट; दंगल; आरडाओरड. ॰चावडीस्त्री. अस्पृश्यांना गांवच्या चावडींत येऊन बसता येत नाहीं म्हणून बहुतेक खेड्यांत गांवचावडीखेरीज दुसरी एक चावडी असते ती. -गांगा ५५. ॰पुंज-पु. शेतकऱ्यांनीं आपल्या उत्पन्नांतील जो भाग गांवच्या महाराचा हक्क म्हणून सरकारांत भरावयाचा तो. ॰पोर-पु. न. गांवांतील हलक्या जातीचे लोक ॰पोरगा-पु. पागेमध्यें घोड्याची नोकरी करण्यासाठीं ठेवलेला महारजातीचा मनुष्य. ॰भादवीस्त्री. भाद्रपद महिन्यांत देवीच्या यात्रेकरितां येणारा खर्च भागावा म्हणून महाराला जमिनीच्या उत्पन्नापैकीं द्यावयाचा भाग, किंवा कांहीं देणगी. ॰महारकी- स्त्री; महाराच्या इनाम जमिनीवरील कर. ॰व(वा)डा-वण-पुन. १ महार लोकांची राहण्याची जागा. २ (ल.) सोंवळ्याओवळ्या- संबंधानें अतिशय अव्यवस्था. 'त्याचे घरीं सारा महारवाडा आहे. मी कांहीं जेवावयास जात नाहीं.' म्ह॰ जेथें गांव तेथें महारवडा. ॰शिसोळा-हडीळा-हडकी-रहाटीपुस्त्री. गांवचीं मेलेलीं गुरें टाकण्यासाठीं महाराला नेमून दिलेली जागा. महारडा-पु. (तिरस्कारार्गी) महार. ॰महारवी-वि. महार लोकांनीं तयार केलेली (टोपली, केरसुणी, सूत इ॰).

दाते शब्दकोश

सांड

स्त्री. १ उपेक्षा; विस्मरण. (क्रि॰ करणें). 'सांड कर माझी दोन दिवस स्वस्थ निजल्यानें ।' -प्रला १६३. २ सोडणें; टाकणें; त्याग (विषयीं-करणें). 'पुत्राविषयीं- संसाराविषयीं-कामाविषयीं सांड केली.' ३ हरविण्याची, गमविण्याची खोड. (क्रि॰ लागणें). 'काय हो, तुमच्या भावाला रुपयांची सांड लागली.' ४ नांव सोडणें; वाटेल तें करण्याची मुभा देणें. ५ टाकलेली बायको. ६ -न. हरवलेली, सांड- लेली वस्तु. ७ दृष्ट, बाधा इ॰ साठीं ओंवाळून टाकावयाचा पदार्थ. 'म्हणतीं लेंकरें आलीं भिओन । सांडी ओंवाळून सांडणें ।' -ह १३.१६०. -वि. रस्त्यांत पडलेली; बेवारसी (वस्तु). [सं. शद्-शन्न? सं. छर्द्; प्रा. छड्ड; हिं. छांड] ॰जाणें-शेतांतील पाणी जाण्यासाठीं ठेवलेल्या सांडीची खिंड वाहून जाणें. -कृषि २०९. ॰देणें-करणें-१ (अमक्यास- ला) जाऊं देणें; जाण्यास परवानगी देणें. 'मग टाकीं सांड देऊनि त्यासीं । पाठवीं मजपासीं सत्वर ।' -भवि ५६.७७. २ दुर्लक्ष, कानडोळा करणें (दोषाकडे). ३ टाकून देणें; फेंकणें. 'बाह्य कुटुंबा करी सांड ।' -सामाशब्द. ॰उपड-उबड- स्त्री. (ना.) सांडलवंड; नासधूस. ॰खत-चिठ्ठी-पत्र-नस्त्री. सोडचिठ्ठी (बायकोस, गुलामास, घरादारास इ॰). सोडचिठ्ठी पहा. ॰घर-वि. घर सोडून जाणारी, नवरा सोडणारी (स्त्री). सांडवर पहा. ॰पाणी-न. धुणें, भांडीं घासणें इ॰ केल्यामुळें सांड- लेलें पाणी; मोरीचें पाणी. 'सांडपाण्याचा निकाल होण्यासाठीं गटारें व मोर्‍या बांधतात.' -आरोशा १.१.१. ॰भोळा-वि. विसरभोळा पहा. ॰रांड-स्त्री. नवर्‍यानें टाकलेली बाई; सांडरूं. ॰लवंड, सांडासांड-स्त्री. सांडणें, पालथे करणें, नासणें या अर्थीं व्यापक शब्द; नासधूस; उधळमाधळ. ॰वर-वि. नवरा टाकलेली; घर सोडून गेलेली (स्त्री.) 'सांडवर कोणी न धरिती हातीं । प्रारब्धाची गति भोगू आतां ।' -तुगा ३१७. [वर = नवरा] ॰सूट-स्त्री. कोणाकडून यावयाचा पैसा, माल इ॰ त दिलेली सूट. ॰सांडण-णी-णें-नस्त्री. १ ओंवाळून टाकलेला जिन्नस; बळी (दृष्ट, भूतबाधा काढण्यासाठीं). (क्रि॰ टाकणें). 'साक्षात पिशाच येऊन । घेऊनि गेलें जैसें सांडण ।' -भवि ९.१००. 'अगणित तिज हातीं सांडणी टाकवीती ।' -सारुह २. ८७. -ज्ञा ८.२६०. २ भूतबाधा, दृष्ट काढणें; ओंवाळणी. ३ कुरवंडी; ओंवाळून टाकणें; तुच्छ, कःपदार्थ असणें. 'अष्टभोग मू्र्तिमंत । सांडणें करीत तुजवरून नित्य ।' -मुआदि १६.३१. सांडणी-स्त्री. १ सांडण्याची क्रिया; त्याग. 'तेवीं अविद्या सांडणी ।' -एभा १२.२२५. २ उपेक्षा. केली प्रपंचाची सांडणी ।' -एभा १०.२५१. ३ बिरणें; लय. सांडणीस टाकणें-घालणें-पाडणें-मनांतून घालविणें; विसरणें.सांड- णीस पडणें-विसरलें जाणें. सांडणें-उक्रि १ बाहेर पडणें, पाडणें; लवंडणें; उपडें होणें. २ हरवणें; गहाळ करणें, होणें. 'भक्ति पांघरूण तें माझें सांडलें ।' -नवनीत पृ. १५३. ३ सोडणें; टाकणें; त्याकरणें. -ज्ञा ४.१२९. 'भीम म्हणे सांडिता मूढा । शिखा उपटीन ।' -मुसभआ ९.९०. सांडरा-वि. १ उघळ्या; उडव्या. २ हरव्या; नेहमीं सांडणारा. ३ (ल.) निष्काळजी; विसरभोळा. सांडरूं-वि. नवर्‍यानें टाकलेली; घरदार सोडलेली (स्त्री. शिवी प्रमाणें उपयोग). सांडवणें-अक्रि. १ क्षीण, जर्जर होणें; खंगणें. 'सांडवला भला माणूस याची कोणी कुमक करीनात.' -भाव ८३. २ मुकणें; आंचवणें. 'सुग्रीव स्त्रीराज्यें सांडवला । बंधूच्या रोषें मज शरण रिघाला ।' -स्नानु १२.३११. सांडाव-वा-पु. सांडणी; सांडण्याची क्रिया; सांड पहा. 'असे सांडाव देत आले अटक उतरून नऊ कोशांवर ।' ऐपो १२१. सांडी-स्त्री. त्याग; अव्हेर. 'समर्था मनीं सांडि माझी नसावी ।' -राक (करुणाष्टक); -तुगा ५७३. सांडी-पडणें-धरणें-हार खाणें; मागें राहणें. 'पदोपदीं त्वां धरिजेत सांडी ।' -सारुह ७.११९. सांडी मांडी-स्त्री. १ घेण्या-टाकण्याचा व्यापार. 'मग हें सांडीमांडी नलगे तुज ।' २ यातायात; त्रास; धरसोड. 'सांडीमांडी मागें केल्या भरोवरी । अधिकचि परी दुःखाचिया ।' -तुगा ३०८. सांडीविखुरीं-क्रिवि. सांडण्यालवंडण्यांत; इकडेतिकडे. 'मुडा- हूनि बीज काढिलें । मग निर्वाळलिये भूमीं पेरिलें । तरि तें सांडी- विखुरीं गेलें ।म्हणों ये कायी ।' -ज्ञा ९.३९. सांडोर-वि. (जुन्नरी) पोर न पाजणारी (मेढें). सांडोवा-पु. कुरवंडी; सांडणें; उतारा. 'यालगीं शरींर सांडोवा कीजे । सकळ गुणांचें लोण उतरिजे ।' -ज्ञा ९.३८१. सांडोसांड-क्रिवि. कांठोकांठ; भरून वाहील अशा रीतीनें.

दाते शब्दकोश

ति

वि. (प्र.) तीन; संख्यावाचक उपसर्ग, प्रत्यय; जसें- तिमजला, तिकोनी = तीन मजल्यांचा, तीन कोपर्‍यांचा. [सं. त्रिः; प्रा. ति] सामाशब्द-तिकटणें-न. १ शेतामध्यें तीन बांध (वरोळ्या) एका ठिकाणीं असतात तें ठिकाण. २ तीन रस्ते एकत्र मिळ- तात तें ठिकाण. ३ तीन काठ्या वगैरे एकत्र बांधून केलेली रचना; तिकटी. [त्रिकूट] तिकटी-स्त्री. १ तीन काठ्या जुळवून केलेली एक त्रिकोणाकृति रचना. २ त्रिकोण. [सं. त्रिकाष्ठ; प्रा. तिकठ्ठ. त्रिकूट] तिकटें-न. १ लांकडी त्रिकोण (स्मशानांत अग्नि नेण्यासाठीं, विहिरीतून पदार्थ काढण्यासाठीं इ॰ केलेला तीन कामट्या, लांकडे यांचा). २ त्रिदळ; त्रिखंड पान (पळस, बेल, निगुडी इ॰चें). ३ तीन पानांची पत्रावळ. ४ (पंढरपूरकडे) तिफण; तीन नळकांड्यांची पाभर. ५ लांकडाची तिवई. (गो.) तीन काठ्यांची घडवंची. [सं. त्रिकाष्ठ; प्रा. तिकट्ठ. तुल. त्रिकूट] तिकडी-वि. तीन कड्यांची. 'जैं कहीं अवचटें । हे तिकडी सांखळ तुटे ।' -ज्ञा १६. ४३८. [ति = तीन + कडी] तिकळा-ळी-ळें-वि. तिखुळा पहा. तिकांडी-स्त्री. एक गवत. 'तिकांडी घोडेकुसळी ।' -गीता २. ५२८६. [ति = तीन + कांडें = पेर] तिकांडें-ढ्या-न. मृगशीर्ष नक्षत्रपुंजांतील तीन तारे; शिवाचा बाण. लुब्धक पहा. [सं. त्रिकांड] तिकुटी-स्त्री. त्रयी; तिघांची जोडी; त्रिकूट. 'गुणीं देवां त्रयी लाविली । गुणीं लोकीं तिकुटी पाडिली ।' -माज्ञा १८.८१७. [सं. त्रिकूट] तिकोनी-वि. तीन कोपर्‍यांचा-कोरांचा-कोनांचा. [सं. त्रिकोण] तिक्कई-स्त्री. तिर्खई; एकदम तीन तीन खडे घेऊन सागरगोटे; खडे इ॰ खेळण्याचा मुलींचा खेळ. याप्रमाणें दुर्खई; पांचखई इ॰ संज्ञा. [सं. त्रिक; म. तिक + ई प्रत्यय] तिक्कल- स्त्री. गंजिफांच्या खेळांत अनुक्रमानें लागलेलीं एकाकडे आलेलीं तीन पानें. तिक्का-पु. तीन चिन्हें असलेलें गंजिफांचें पान; तिव्वा. तिखणी-स्त्री. (घराचे) तीन खण, भाग. -वि. तीन खण अस- लेलें; तीन खणी (घर इ॰). [ति = तीन + खण] तिखळा-ळी- ळें-तिखुळा-ळी-ळें पहा. तिखुळा-ळी-ळें-वि. तीन मुलगे अथवा मुलींच्या पाठीवर झालेला (मुलगा, मुलगी किंवा सामा- न्यतः मूल). तिगस्त-न. १ गेल्या वर्षाच्या मागचें वर्ष. 'तिगस्त बाकी-वहिवाट इ॰.' २ गंजिफांच्या खेळांतील एक संज्ञा, डावां- तील एक विशिष्ट काल; गंजिफांच्या खेळांत तिन्ही खेळणारांचा एक तरी हात होणें. [तीन + फा. गस्त = गत] तिगस्तां-क्रिवि. गेल्याच्या मागील सालीं. [तिगस्त] तिगुण-वि. १ त्रिगुण. २ तिप्पट. [सं. त्रिगुण अप.] तिगुणी-वि. तिहेरी; त्रिगुणात्मक. 'जो अविद्येचिया चिंधिया । गुंडूनि जीव बाहुलिया । खेळवीतसे तिगुणिया । अहंकाररज्जु ।' -ज्ञा १८.९१५. तिघई-वि. तीन गस्ते असलेलें, एकापुढें एक तीन वठारें असलेलें (घर). तिघड- पु. (राजा) तीन आंबे, नारळ इ॰चा घड. तिघड-वि. (कों.) दर तीन लोटे बांधून झाले म्हणजे एक खापेकडाची जुळी वग- ळावी अशा रीतीनें लोटे बांधलेली (रहाटाची माळ). -क्रिवि. माळ तिघड होईल अशा रीतीनें (बांधणें). तिघडी-स्त्री. १ तिहेरी घडी (कापड, कागद इ॰ची). २ तिहेरी घडी घातलेली, तिपदरी वस्तु. -वि. तीन घड्या घातलेली. [ति = तीन + घडी] तिघस्त-न. तिगस्त अर्थ २ पहा. तिजवर-पु. १ तिसर्‍यांदा लग्न करीत असलेला माणूस. २ तीन लग्नें केलेला मनुष्य. [तिजा + वर] तिधारा-री-वि. १ तीन धारा-कडा असलेला. 'तिधारां अंदु फीटलियां । चरणींचिआ ।' -शिशु ७१६. २ तीन कांठ किंवा काड्या असलेलें (धोतर इ॰). [ति + धारा] तिधारी- निवडुंग-पुन. एक जातीचा निवडुंग. याच्या पेरास तीन कांट्यांच्या रांगा असतात; याच्या उलट फड्यानिवडुंग. तिधारें- न. नकसगाराचें एक हत्यार. तिपट-वि. (सामा.) तिप्पट पहा. तिपटी-स्त्री. तिप्पट संख्या अथवा परिमाण. तिपडें-न. (नाट्य) बकर्‍याचे केंस वळून गंगावनाच्या आकाराची स्त्री नटाकरितां तयार केलेली तीनपदरी वेणी. -पौराणिक नाटकाचा काळ. तिपदरी- वि. तीन घड्यांचें किंवा तीन पदर असलेलें (कापड; दोर इ॰). तिपाई-(व.) तीन पायांची घडवंची; तिवई. (बिडाचा कार- खाना) डेरा तयार करण्यासाठीं मातींत रोंवण्याचे लांकडी धीरे व गोलाकार लोखंडी गज. तिपाठी-वि. तीन वेळां वाचून, ऐकून पाठ म्हणणारा. तिपांडी-स्त्री. (कों.) तीन पांड भातजमीनीची प्रत्येक वीस पांडांच्या बिघ्यामागें रयतेस दिलेली जमीनीची सूट. तिपानी-स्त्री. एक लहान वेल. श्वास, व्रण, विष यांची नाशक. -वगु ४.१. -वि. तीन पानें असलेलें; त्रिदल (झाड, अंकुर). [सं. त्रिपर्णी] तिपायी-स्त्री. तिवई. -वि. तीन पाय असलेलें (जनावर; वस्तु). [तीन + पाय] तिपिकी-वि. एका वर्षांत तीन पिकें देणारी (जमीन). तिपुडी-वि. १ तीन कप्पे, खण असणारी (पेटी). २ तीन पूड असलेला मृदुंग. [सं. तिपुटी] तिपेडणें- सक्रि. तीन पेड देणें; वळणें. तिपेडी-ढी-वि. तीन पेडांनीं केलेली (दोरी, वेणी इ॰). तिपेरीस्त्री. नाचणीची एक हळवी जात. हिच्या काडास तीन पेरें आलीं म्हणजे कणीस येतें. -वि. तीन सांधे, पेरीं असलेलें (बोट इ॰). तिप्पट-स्त्री. तीन पट संख्या; तिप्पटपणा. -वि. १ तीनदां जमेस धरलेली (संख्या) त्रिगुणित. २ तीन घड्यांचे; तिपदरी (कापड इ॰) तिफण-णी-न.स्त्री. तीन नळ्या, फण असलेली पाभर, पेरण्याचें यंत्र. [ति + फण] तिफण- स्त्री. (व.) चार एकर (जमीन). तिफसली-वि. तीन पिकें ज्या जमिनींत निघतात ती जमीन. तिफांटा-पु. जेथें रस्ता, नदी. किंवा झाडाच्या खोडाच्या तीन बाजू फुटतात ती जागा. तिफांशी- सी-वि. १ तीन फाशांनी खेळावयाचा (सोंगट्यांचा एक खेळ). २ तीन फाशांनीं युक्त (दोरी इ॰). [ति + फास] तिबक-स्त्री. खेळांत विटी उडली असतां खालीं पडण्यापूर्वी दांडूनें तीनदां मारणें. 'हबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडूं । खेळू विटी दांडू ।' -भज ११३. [ति + ध्व. बक्?] तिबंदी-स्त्री. दोन वरखां (पानां) चा एक बंद याप्रमाणें तीन बंदांची केलेली कागदाची घडी. तिब्राद- वि. (पोर्तु.) तिप्पट. [पोर्तु. त्रेस्दो ब्रादो] तिमजला-ली- वि. १ तीन मजल्यांची (इमारत). २ तीन, तिहेरी काठांचा (शेला, धोतर इ॰). ३ तीन तळ (डेक) असलेलें (जहाज). तिय्यम-वि. तिसर्‍या दर्जाचें. 'दुय्यम, तिय्यम अधिकारी.' -सूर्यग्र ३४. तिय्या-पुस्त्री. (पत्त्यांचा खेळ). तिर्री; तीन ठिपक्यांचे पान. [ति = तीन] तिरकानी-रेघ-ओळ-स्त्री. कागदाच्या पडलेल्या चार मोडींपैकीं तीन मोडींमध्यें काढलेली रेघ. [सं. त्रि-तिर् + कान, रेघ] तिवई-स्त्री. १ तीन पायांची घडवंची; तिपाई. २ (कों.) तिवटें; भाताचीं रोपें उपटतांना शेतांत बसण्याठीं घेतात ती पायांची तीन घडवंची. तिपाई पहा. [सं. त्रिपदी; प्रा. तिवई] तिवटणां-(महानु) तीन वाटा मिळ- तात ती जागा; चौक; नाका; तिवठा. 'कलियुगाचा तिवटणां.' -भाए १०९. [सं. त्रि + वर्त्मन्; प्रा. तिवट्ट] तिवटी-स्त्री. (गो. कों.) अवयवाची वक्रता. 'पाय तिवटीं पडला.' [सं. त्रिवर्कि; प्रा. तिवट्टी] तिवटें-तिवई अर्थ २ पहा. तिवठा-पु. १ तीन रस्ते मिळतात ती जागा. २ तिवडा अर्थ १,२ पहा. [सं. त्रि + वर्त्मन्; प्रा. तिंवट्ट] तिव(वं)डा-पु. १ मळणी कर- ण्याकरितां खळ्याच्या मध्यभागीं पुरलेला खांब. 'हनुमंत तिवडा मध्यें बळें । पुच्छ पाथी फिरवितसे ।' -रावि २०.१९५. ३ शेतांत धान्य वारवण्यासाठीं उपयोगांत आणावयाची एक तीन पायांची घडवंची. ३ एक ताल अथवा गति. [सं. त्रि + पद] तिवण-१ त्रिदळ. २ तिहेरी घडी, पदर (कापडं, कागद इ॰ ची). तिव- णता-वि. (राजा.) तिघडी; तिहेरी; तिपदरी (कागद; कापड वगैरे). तिवणा-वि. तीन पानांचा; त्रिदळ. 'त्रिविध अहं- कारु जो एकु । तो तिवणा अधोमुखु । डिरु फुटे ।' -ज्ञा १५.९५. -एभा ११.१८८. [सं. त्रिपर्ण; प्रा. तिवण्ण] तिवधां-पु. अनेक गांवांच्या सीमा ज्या ठिकाणीं मिळतात ती जागा. [सं. त्रि + बंध किंवा वृंद; प्रा. तिबंद] तिवनी-स्त्री. (व.) (पळसाचें) त्रिदळ; तिवण. तिवनें-न. तिघांचा समुदाय. तिवनें-वि. तीन पानांचें. तिवण-णा पहा. [सं. त्रिपर्ण; प्रा. तिवण्ण] तिवल-पु. (तीन वेळ) दीड आणा. [तीन + वेळ = अर्धा आणा] तिवळी- स्त्री. (गो.) पोटावर पडणारी तीन वळ्यांची आठी. त्रिवळी पहा. [सं. त्रि + वली] तिंवा-पु. (गो.) दगडाचा अगर मातीचा केलेला चुलीचा पाय. २ तिव्हा; तिवई; तिनपायी; तिवारी (ज्यावर उभें राहून उपणतात ती). तिवडा अर्थ २ पहा. [सं. त्रि + पदा; प्रा. तिवय] तिवाट-ठा-पु. तीन रस्ते एकत्र मिळण्याची जागा. तिवठा पहा. फाटाफूट; ऐक्यभंग. 'केला तुवां देखत भर्तृघात । क्षणें तिवाटा रचिल्या तिघांत ।' -वामन, भरतभाव ७. [त्रि + वर्त्मन्; प्रा. तिवट्ट म. तिवाट] तिवारा-पु. (माळवी) तीन दारें असलेला दिवाणखाना. [सं. त्रि + द्वारिका; प्रा. ति + वारिआ; हिं. तिबारा] तिवारी-स्त्री. (व.) तिवडा अर्थ २ पहा. तिन- पायी (जीवर उभें राहून उपणतात ती) तिवा पहा. तिवाशी- वि. तीन वाशांचें केलेलें (घर, खोपट इ॰ उपहासार्थी). [तीन + वांसा] तिवाळ-स्त्री. एकसंध विणलेले तीन पंचे; तीन पंच्यांचें कापड; चवाळें पहा. तिवाळी-स्त्री. एक कापडाची जात. -मुंव्या १२३. [ति + आळें] तिवेती-वेत-वि. तीनदां व्यायलेली (गाय इ॰) [ति + वेत] तिवेळा-ळां-ळीं-क्रिवि. तिन्हीवेळां; सकाळीं, दुपारी, संध्याकाळीं; त्रिकाळ. तिव्वा-वा-पु. (गंजिफा, पत्त्यांचा खेळ) तिर्री; तीन ठिपके असलेलें पान. तिव्हडा, तिव्हा-पु. तिवडा अर्थ २ पहा. तिव्हाळ-पु. (महानु.) तीन रस्ते एकत्र होतात ती जागा; तिवाठा. 'तेथचि तिव्हाळां प्रकास- दर्शन ।' -ॠ ११८. तिशिंगी-वि. तीन शिंगांचा (पशु). [तीन + शिंग] तिशेंड्या-पु. (डोक्यावरच्या तीन शेंड्यांवरून) मारवाडी (निंदाव्यंजक शब्द). [ति + शेंडी] तिसडी-स्त्री. १ तीन वेळां अथवा तिसर्‍यांदा तांदूळ कांडणें. तिसडीनें सडणें. २ (ल.) बारीक चौकशी; छडा [तीन + सडणें] तिंसड-डा- डी-वि. तीन वेळ सडलेले (तांदूळ). [ति = तीन = सडणें] तिसढ-स्त्री. तिसर्‍यानदां करणें (काम इ॰) तिसड-वि. तीन थानांचें (जनावर). [तीन + सड] तिसाला-लां-विक्रिवि. लागो- पाठ तीन वर्षांसंबंधीं; तीन वर्षांकरितां; त्रैवार्षिक (हिशेब, बाकी इ॰). [हिं.] तिस(सा)रणी-स्त्री. तिसारणें पासून धातुसा- धित नाम. -क्रिवि. तिसर्‍यांदा. तिस(सा)रणें-सक्रि. तिस- र्‍यांदा करणें. -अक्रि. (कोंबडा) तिसर्‍यांदा आरवणें. [तिसरा] तिसुती-स्त्री. १ तिहेरी, तीन पदरी-फेरी दोरा; दोरी (जानवे इ॰ चा). 'तिसुतीला पीळ भरून झाला आहे, आतां नऊसुती करा- वयाची आहे.' २ तीन कुटुंबांचा आपापसांतील लग्नसंबंध. तिर- कूट अर्थ ३ पहा. -वि. तीन सुतांची, धाग्यांची, पदरांची (दोरी). [तीन + सुती] तिस्ती-स्त्री. (प्र.) तिसुती. (कों.) (जानव्याचें) पातीवर मोजलेलें सूत गुंडाळून ठेवतात ती गुंडाळी. [सं. त्रि + सूत्र, त्रिसुती] तिहोत्रा-पु. दरमहा दरशेंकडा तीन असा व्याजाचा दर. [तीन + उत्तर]

दाते शब्दकोश

बनणें

अक्रि. १ केलें जाणें; घडून येणें; सिद्ध होणें; साधलें, संपादलें जाणें; अनुकूल होणें. 'गतवर्षीं घर बांधणार होतों पण साहित्य मिळालें नाहीं म्हणून बनलें नाहीं.' २ फुरसत मिळणें. ३ (भांडण वगैरे) जुंपणें; पेटणें. ४ एखाद्या स्थितींत येणें; केलें- उतरलें जाणें, होणें. 'त्याचा रंग चांगला बनला.' ५ लठ्ठ व बळ- कट होणें; द्रव्यवान्, भाग्यवान् होणें. ६ जुळणें; जमणें; पटणें. 'ह्याचें बाहेरचे माणसाशीं बनतें पण घरचे माणसाशीं बनत नाहीं.' ७ नटणें; शृंगारणें. 'असी चट्टी पट्टी करून बनून कोणीकडे गे चाललीस.' ८ खांदा बदलणें (हमाल, गडी यानीं). ९ घटनेस येणें; योग्य स्वरूपांत, स्थितींत येणें (व्यापार, चाकरी, हातीं घेतलेलें काम, चालू बाब). १० (ल.) फसणें. [सं. बन् किंवा भूत; प्रा. भन; हिं. बनाना] (वाप्र.) बनीं बनणें- १ सजणें. २ सज्ज होणें; कंबर बांधून तयार असणें (चाकरीस, कामास). बनून ठनून चालणें- उंची व घवघवीत पोषाखानें मिरविणें. बनून राहणें-वि. होऊन राहणें. 'त्यांतील प्रत्येकजण केवळ धर्ममूर्ति बनून राहिला आहे.' -नि ६२९. बनेल-वि. (ना.) स्वयंसिद्ध; उघड; स्पष्ट; कायम टिकणारा. बनेल तेथपर्यंत-क्रिवि. होईल तेथपर्यंत. बनेल तेव्हां-क्रिवि. फावेल त्या वेळीं. बनाव-पु. १ परस्परांचा चांगला समज; ऐकमत्य; मेळ; जम. संघटितपणा; अनुकूलभाव; सख्य (मनुष्य, गोष्टी, गुण यांचा). 'आणि अतःपर बासवाडेकराचा त्याचा बनाव बसत नाहीं.' -वाडबाबा १.२८. २ भव्य रचना; थाटमाटाची मांडणी; सुसंघटितपणा. ३ प्रसंग. ४ तहाचें बोलणें. [हिं.] बनावट, बनोट-स्त्री. १ मांडणी; रचना; घाट; बांधणी; धाटणी (इमारतीची, कवितांची इ॰). 'कवनीं ज्यांच्या बंद बनोटे ।' -ऐपो २२७. २ सूत; वीण; पोत (कपडाचा). ३ रचना; मांडणी; ठेवण; मांडण्याची पद्धत, व्यवस्था; करण्याचा अनुक्रम (जागा, काम, विधि, उत्सव यांचा). ४ बनावणी; सजवणूक; नटणें; भव्य पोशाखानें निघणें. वक्तृत्वाच्या डौलानें व अलंकारिक रीतीनें कथन करणें. ५ (ल.) कुभांड; थोतांड; कृत्रिम, बनाऊ गोष्ट. -वि. बनाऊ; नकली; खोटी; रचलेली; कृत्रिम. (समासांत) बनावट-अर्जी-साक्षी-साक्षीदार-मुद्दा-वही-जमा- खर्च इ॰ 'बनावट सबब सांगून माझा घात केला.' [हिं.] बना- वणी-स्त्री. बनविण्याची क्रिया; अलंकृत करणें इ॰ बनावट अर्थ ४ पहा. [बनविणें] बना(न)विणें-वणें-सक्रि. १ शोभविणें; सज- विणें; नटविणें. २ तयार करणें; नमुनेदार घडणें, वळविणें. ३ थाटानें मांडणें, निघणें. ४ प्रशस्त शब्दविस्तारानें, पुष्कळ अलं- कार व अर्थवादयुक्त असें सांगणें. 'गोष्ट जरी नीरस असली तरी बनवून सांगितली म्हणजे गोड लागत्ये.' ५ फसविणें. 'हे लोक आपल्याला बनविताहेत.' [बनाव] बनाऊ(वट)लेख, बनीव- -पुवि. १ खोटी सही किंवा मोहर करून दस्त करणें, खर्‍या दस्तांत लबाडीनें फेरफार करणें, किंवा वेड्या, अंमल चढलेल्या रचलेला; घडलेला. ३ (ल.) खोटी रचलेली; पदरची (गोष्ट). ४ बनावट; कृत्रिम. ५ थाटलेला; नटलेला. ६ परिष्कृत भाषापद्धतीनें व मोहक अभिनयानें अलंकृत (दंतकथा, व्याख्या, निवेदन. भाषण). [बनणें, बनविणेचें धातुसाधित नाम]

दाते शब्दकोश

गां(गा)व

पुन. १ वस्तीचें ठिकाण; ग्राम; मौजा; खेडें. २ (व्यापक) नगर; शहर. ३ गांवातील वस्ती; समाज. 'यंदा दंग्यामुळें कितीक गांव पळून गेलें.' ४ आश्रय. ५ (दोन गांवांमधील अंतरावरून) चार कोस; योजन; चार ते नऊ मैल अंतर. 'मारीचातें प्रभू शत गांवें पुंखसमीरें उडवी' -मोरा १.१९९. हा शब्द कोंकण आणि देशांत पुल्लिंगी व सामान्य- पणें नपुंसकलिंगी योजतात. समासांत-गांव-कुलकर्णी-चांभार- न्हावी-भट इ॰ याप्रमाणें बारा बलुत्यांच्या नांवापूर्वीं गांव हा शब्द लागून सामासिक शब्द होतात व त्या शब्दावरून त्या त्या बलुतेदाराच्या एक वर्षाच्या कामगिरीवरील हक्काचा बोध होतो. [सं. ग्राम; प्रा. गाम; हिं. गु. गाम; सिं. गांउ; फ्रेंजि. गांव; पोर्तुजि. गाऊ] (वाप्र.) (त्या)गांवचा नसणें-दुसर्‍यावर लोटणें; टाळणें (काम); (त्या) कामाशीं आपला कांहीं अर्था- अर्थी संबंध नाहीं असें दर्शविणें. ॰मारणें-लुटणें; खंडणी बसविणें. 'दौड करून गांव मारूं लागलें' -पया १८८. गांवानांवाची हरकी देणें-सांगणें-(तूं कोठून आलास, तुझें नांव काय आहे सांग इ॰) ज्याच्या अंगात भूतसंचार झाला आहे अशा मनु- ष्यास (भुतास, किंवा झाडास) विचारतात. यावरून पाहुण्यास आपण कोठून आलांत इ॰ नम्रपणें विचारणें. ॰गांवाला जाणें- १ जवळ नसणें. २ (ल.) निरुपयोगी असणें. जसें-'माझे हात कांहीं गांवाला गेले नाहींत' (जवळच आहेत, वेळ आली तर तुला रट्टा मारतील). गांवीं नसणें-पूर्ण अभाव असणें; अज्ञानी असणें; दरकार नसणें; खिजगणतींत नसणें. सामाशब्द- ॰आखरी-क्रिवी. (व.) गांवालगत-शेवटीं-लागून. गांवई- स्त्री. सरकारी जुलुमामुळें आपलें गांव सोडून दुसर्‍या गांवीं केलेली वस्ती; सरकारी हुकुमाची अमान्यता; सरकारी अटींना प्रति- रोध (सार्‍यांत सूट, तहकुबी इ॰ मिळविण्यासाठीं गांवचे सर्व लोक हा उपाय अंमलांत आणतात). ॰कंटक-वि.गांवाची पीडा; गांवाला त्रास देणारा. [सं. ग्राम + कंटक] ॰कबुलात-स्त्री. १ (कों.) वहिवाटदार खोतानें गांवांतील जमिनीचा सारा भर- ण्याबाबत दिलेली कबुली. २ गांवांतील गांवकर्‍यांनीं वहीत किंवा पडीत जमीन कोणती ठेवावी याबद्दल केलेला निश्चय, ठराव. ॰कर पु. १ गांवांतील वृत्तिवंत. -कोंकणी इतिहाससाहित्य लेख ४००. २ (राजा.) गांवच्या शूद्रांतील देवस्कीच्या मानपाना- संबंधातील एक अधिकारी. ३ भूतबाधा नाहींशी करणारा, देवस्की करणारा माणूस; धाडी. -झांमू १०२. ४ गांवचे लोक; रहिवासी; गांवांत घरदार शेताभात असणारा. 'गांवकर म्हणती हो पेटली आग ।' -दावि ३५०. ५ (कु. कों.) पाटील; खोत; पुढारी. ६ (रत्नागिरी) कुणबीवाड्याचा व्यवस्थापक; कुणबी. ॰करी-पु. १ एखाद्या गांवांत ज्याचें घरदार आहें तो त्या गांवचा रहिवासी; गांवांत राहणारा. 'त्या गांवचे सर्व गांवकरी आज देवळाजवळ मिळाले होते.' २ शेतकरी. गांवकी-स्त्री. १ गांवाच्या संबंधीचा हरयेक अधिकार (अमंगल इ॰); गांवचा कारभार. २ गांवसभा; तींत झालेले ठराव. ३ गांवचा विचार; गांवकरी व पुढारी यांनी एकत्र जमून केलेला विचारविनिमय. ४ वतनदारांचा गांवासंबंधाचा परस्पर संबंध व त्यांचा समाईक अंतर्बाह्य व्यवहार. -गांगा १६७ [सं. ग्रामिक] गांवकुटाळ- वि. गांवकुचाळ; गांवांतील निंदक; टवाळ; लोकांची निंदा करणारा. ॰कुठार-वि. १ गांवांतील लोकांवर संकट आणणारा (चहाडी, वाईट कर्म इ॰ करून); गांवभेद्या; कुर्‍हाडीचा दांडा. २ गांवांतील सामान्य लोक. 'दिल्लींतील वाणी, बकाल, बायका देखील गांवकुठार (हे) लश्करच्या लोकांस मारूं लागलें. ' -भाब १६०. ॰कुंप-कुसूं-कोस-नपु. १ गावाच्या भोंवतालचा तट. २ (ल.) वस्त्राचा (रंगीत) कांठ (धोतरजोडा, शेला इ॰ चा रेशमी, कलाबतूचा). ॰कुळकर्णी-पु. गांवचा वतनदार पिढीजात हिशेबनीस; याच्या उलट देशकुळकर्णी (जिल्हा, प्रांत, यांचा कुळकरणी).॰खर न. गांवाची सीमा, हद्द; सीमाप्रदेश; परिकर. [गांव + आखर] ॰खर्च-पु (जमीनमहसुली) गांवचा (धार्मिक समारंभ, करमणूक इ॰चा) (खर्च; पंडित, गोसावी, फकीर इ॰ स द्रव्य, शिधासामुग्री इ॰ देतात त्याचा खर्च. ॰खातें-न. १ (पोलीस; कुळकर्णी वगैरे गांवकामगार लोक. २ गांवचा हिशेब. ॰खिडकी-स्त्री. गांवकुसवाची दिंडी; हिच्या उलट गांव- वेस (दरवाजा). ॰खुरीस-क्रिवि. गावानजीक; जवळपास. ॰गन्ना-क्रिवि. दर गांवास; प्रत्येक गांवाकडून-गणिक-पासून. 'गांवगन्ना चार रुपये करून द्यावे.' 'गावगन्ना ताकीद करून सर्व लोक बोलावून आणा.' ॰गरॉ-वि. (गो.) गावठी. ॰गाडा- पु. गांवांतील सर्व प्रकारचें (तंटे, प्रकरणें, बाबी इ॰) कामकाज; गांवचा कारभार; गांवकी. (क्रि॰ हांकणें; चालविणें; संभाळणें). ॰गाय-स्त्री. आळशी व गप्पिष्ट स्त्री; नगरभवानी. ॰गांवढें- न. गांवें; खेडीं (व्यापक अर्थीं). ॰गिरी-वि. गांवांत उत्पन्न झालेलें, तयार केलेलें; गांवराणी; गांवठी; याच्या उलट घाटी; तरवटी; बंदरी इ॰. ॰गुंड-गुंडा-पु. १ गांवचा म्होरक्या. २ विद्वानांस आपल्या हुशारीनें (वास्तविक विद्या नसतां) कुंठित करणारा गांवढळ. ३ जादुगारांची मात्रा चालूं न देणारा पंचा- क्षरी; गारुड्यास त्याच्याच विद्येनें जिंकणारा. 'जेवी गारुडी- याचें चेटक उदंड । क्षणें निवारीत गांवगुंड ।' -जै २४.९. ४ गांवांत रिकाम्या उठाठेवी करणारा; त्रासदायक माणूस; मवाली; सोकाजी; फुकट फौजदार; ढंगबाजव्यक्ति; खेळ्या. ॰गुंडकी- स्त्री. १ गांवगुंडाचा कारभार; गांवकी. २ (ल.) फसवेगिरी; लबाडी. ॰गुंडांचा खेळ-पु. पंचाक्षरी किंवा जादूगार यांच्याशीं गांवगुंडांचा चढाओढीचा सामना; मुठीचा खेळ. ॰गोहन-पु. (व.) सबंध गांवांतील गाई एकत्र असलेला कळप. ॰गौर-स्त्री. सबंध गांवांत भटकणारी स्त्री. गांवभवानी. 'पोरीबाळीसुद्धां हिणवून पुरेसें करतील कीं, या गांवगौरीला हें भिकेचें वाण कुणी वाहिलें म्हणुन?' -पुण्यप्रभाव ॰घेणी-स्त्री. दरवडा; हल्ला. 'समुद्राचें पाणी सातवा दिसीं करील गांवघेणी ।' -भाए ६९. ॰चलण-णी, गांव चलनी-वि. गांवांत चालणारें (नाणें). ॰चा डोळा-पु. गांवचा वेसकर, महार, जागल्या. ॰चा लोक-पु. गांवांतील कोणी तरी; कोणास ठाऊक नसलेला; परका; अनोळखी. ॰चावडी-स्त्री. गांवांतील सरकारी कामकाजाची जागा; चौकी. ॰जाण्या-वि. गांवदेवतेस वाहिलेलें (मूल). ॰जेवण- जेवणावळ-भोजन-स्त्रीन. १ गांवांतील सर्व जातींना घात- लेलें जेवण. २ गांवांतील स्वजातीस दिलेली मेजवानी. म्ह॰ हें गांव- जेवण नव्हे कीं घेतला थाळातांब्या चालला जेवायला (महत्त्वाच्या गोष्टीची थट्टा करणारास उपरोधिकपणें म्हणतात). ॰जोशी- पु. गांवांतील वृत्तिवंत जोसपण करणारा. ॰झाडा-पु. गावां- तील (शेत इ॰) जमीनींचा कुळकर्ण्यानें तयार केलेला वर्णनपर तक्ता; कुलकर्णीदप्तर. ॰झोंड-पु. १ सर्व गांवापासून कर्ज काढून नागविणारा. २ गांवांतील खट्याळ, खाष्ट माणूस; गांवास त्रास देणारा माणूस. ॰ठण-ठण-न. स्त्री. गांवांतील वस्तीची जागा (अस्तित्वांत असलेली किंवा उजाड झालेली); आईपांढर. [सं. ग्राम + स्थान = म. गांव + ठाण] गांवठा-पु. १ गांवचा एक वतनदान. म्ह॰ गांवचा गांवठा गांवीं बळी. २ खेडवळ; गांवढळ गांवठी-ठू-वि. १ गांवचें; स्थानिक. गावगिरी अर्थ १ पहा. 'बाजारी तुपापेक्षां गांवठी तूप नामी.' २ गांवढळ; खेडवळ. ३ (विशेषतः गांवठू) रानटी; खेडवळ (माणूस, चालरीत). ॰गांवठी- वकील-पु. देशी भाषेंत वकिलीची परीक्षा दिलेला माणूस. इंग्रजी न जाणणारा किंवा वकिलीची मोठी परीक्षा न दिलेला साधा मुखत्त्यार वकील. गांवडुकर-पु. डुक्कराची एक जात; गांवांतच राहणारें डुक्कर; याच्या उलट रानडुक्कर. गांवडें-ढें-पु. अनाडीपण; अडाणीपणा. गांवढ(ढा)ळ-गांवढ्या-वि. १ खेड- वळ; मूर्ख; रानवट; अडाणी, 'खंती करिती कर्माची । ते गावंढे गा ।' -ज्ञा ३.१४५. २ खेड्यांत राहणारा; शेतकरी. ॰ढळकर-पु. (गो.) गांवढळ; खेडवळ; शूद्र. गांवढें-न. लहान खेडें, गांव; शेतकर्‍यांची वाडी; शेतवाडी; 'मला माझें गावर्डेच बरें.' -इसाप- नीति (छत्रे) [सं. ग्रामटिक प्रा. गामड] गांवढेकर-वि. खेडवळ; गांवढ्या. 'तेथें कोणी गांवढेकर कुणबी बसला होता.' -नि १४९. गांवढेकरी-पु. खेड्यांत राहणारा माणूस; गांवकरी. गांवढें गांव-पुन. वाडी; पाडा; खेडें; निवळ शेतकरी राहतात तें गांव. म्ह॰-गांवढे गांवांत गाढवी सवाशीण (गाढवी बद्दल गांवठी असा पाठभेद) = लहान गांवांत क्षुद्र माणसासहि महत्त्व येतें. ॰थळ-न. गांवठण पहा. [सं. ग्राम + स्थल] ॰था-वि. गांवढळ. -शर. ॰दर-री-स्त्री. गांवांच्या लगतची जागा. 'आतांशीं वाघ रात्रीचा गांवदरीस येत असतो.' ॰देवता-देवी-स्त्री. गांवची संरक्षक देवता; ग्रामदेवता. [सं. ग्राम + देवता] ॰धणें-न. गांवचीं गुरें. -शर. [गांव + धन?] गांवधें-न. १ वाडी; खेडें; गांवढें पहा. २ दुसर्‍या खेड्यांतील कामकाज. 'मला गांवधें उपस्थित झालें.' गांवधोंड-स्त्री. १ गांवावर बसविलेली जबरदस्त खंडणी. २ (सामा.) गांवावर आलेलें संकठ, अरिष्ट. [गांव + धोंडा] ॰निसबत इनाम-न. निरनिराळ्या प्रासंगिक खर्चाकरितां किंवा सरकारी खर्चाकरितां काढिलेल्या सार्वजनिक कर्जाच्या फेडीकरितां गांवकर्‍यांनीं गहाण ठेवलेली जमीन. ॰निसबत मिरास-स्त्री. जिचा मालकीहक्क सर्व गांवकर्‍यांकडे मिळून आहे अशी जमीन. ॰नेमणूक-स्त्री. गांवखर्चाकरितां तोडून दिलेला पैका. ॰पडीत-न. गांवांतील बिन लागवडीची, पडीत जमीन. ॰पण-(गो.) ग्रामसभा; गांवकी. 'गांवपण मांडलिया वायसें ।' -सिसं ८.१५७. ॰पाणोठा-था-पु. गांवची नदी- तळ्यावरील पाणी भरण्याची जागा. ॰पाहणी-स्त्री. गांवांतील पीक किंवा शेतजमीन यांची पाटलानें केलेली पाहणी, मोजणी; (सामा.) गांवाची सर्वदृष्टीनें पाहणी. ॰बंदी-वि. गांवांत वस्ती करून असलेला (फिरस्ता नव्हे). ॰बैल-पु. (पोळ्याच्या दिवशींचा) पाटलाचा बैल; हा सर्व बैलांच्या पुढें असतो; हा पाट- लाचा एक मान आहे. ॰महार-पु. (बिगारी इ॰च्या) गांवच्या चाकरीवर असलेला वतनदार महार. ॰मामा-पु. गांवांतील शहाणा माणूस; गांवकर्‍यांवर चरितार्थ चालविणारा व सर्वांशीं मिळूनमिस- ळून असणारा माणूस (उपहासात्मक). ॰मावशी-स्त्री. गांवां- तील कुंटीण; (सामा.) वयस्क व स्वैरिणी स्त्री. ॰मुकादम-पुअव. गांवचे सारे श्रेष्ठ वतनदार. -गांगा ४५. ॰मुकादमी-स्त्री. वतनी ग्रामव्यवस्था. ॰मुनसफ-पु. शेतकर्‍यांचे १० रु. च्या आंतील दावे चालविण्यासाठीं, शेतकी कायद्याप्रमाणें नेमलेला बिनपगारी मुनसफ. -गांगा ७२. ॰मेव्हणी-स्त्री. गांवांतील वेश्या. ॰म्हसन- न. गांवांतील स्मशान. ॰रस-न. गांवांतील घाणेरडें पाणी; लेंडी नाला; लेंडे ओहोळ. 'हां गा गावरसें भरलें । पाणी पाठीं पाय देत आलें ।' -ज्ञा १६.२५. ॰रान-न. १ गांव व त्याच्या आस- पासचा प्रदेश, जमीन. २ गांवची व आसपासची लोकसंख्या. ॰रान-नी-राणी-वि. स्थानिक; गांवठी; घरगुती; रानवट (भाजी, पदार्थ इ॰); याच्या उलट शहरी, पेठी. ॰वर्दळ- स्त्री. गायरानाखेरीज गांवच्या दिमतीस असलेली इतर जमीन. ॰वसाहत-वसात-स्त्री. १ गांवची वसलेली स्थिति, वसती. २ गांवचा वसलेला भाग. ३ गांवची लोकसंख्या. ॰वहीत-न. गांवची लागवडीखालची जमीन. ॰वेस-स्त्री. गांवाच्या तटाचा मोठा दरवाजा. ॰वेसकर-पु. गांवाच्या वेशीवर पहारा करणारा पाळीचा महार; याच्याकडे गांवाचें निकडीचें काम कर- ण्याचें असतें. ॰शाई-स्त्री. खडबडीत चपटें मोतीं, ॰शीव- स्त्रीन. गांव किंवा गांवें (यांना सामान्य संज्ञा); नांवगांव वगैरे माहिती. 'त्याची गांवशीव मला ठाऊक नाहीं.' ॰सई-स्त्री. १ गांवच्या भुताखेतांना दरसाल द्यावयाची ओंवाळणी, बळी (नारळ, कोंबडें इ॰). २ एकूणएक गांववस्ती; गांवकरी; अखिल ग्रामस्थ. ३ भगत सांगेल ते सात किंवा नऊ दिवस गावां- तील यच्चावत् माणसांनीं बाहेर जाऊन राहणें. -बदलापूर ३२०. ॰समाराधना-स्त्री. गांवजेवण पहा. ॰सवाशीण-सवाष्ण- स्त्री. १ (गोंधळ, मोहतूर इ॰ प्रसंगीं) पाटील किंवा चौगुला याच्या बायकोस म्हणतात. २ (ल.) गांवची वेश्या. गांवळी- क्रिवि. गांवोगांव; सर्व गावांतून. 'जेवी निळहारयांची नासे निळी । तो मिथ्यामात उठवी वायकोळी । ते देशीं विस्तारें गांवळी । सांचा सारिखी ।' -ज्ञाप्र ६२७. गांवाची खरवड- स्त्री. गांवास त्रास देणारा, द्वाड माणूस. गांवा-देशानें ओंवा- ळलेला-वि. द्वाड, वाईट म्हणून गांवानें दूर केलेला; कुप्रसिद्ध; गांवाची खरूज (ओवाळणें पहा). गांवांबाहेरचा, गांवा भायला-वि. महार; परवारी. (कु.) गांवाभायला. गावार- न. गांवजेवण गांवीक-वि. (राजा.) सार्वजनिक; गांवचें (शेत, पाणी, खर्च, पट्टी, कधा). गावुंडगो-वि. (गो.) गांवांत राहणारा.

दाते शब्दकोश

कसर

स्त्री. १ न्यूनता; उणीव; कच्चेपणा; अपुरेपणा; चूक (मापांत, वजनांत, काम पुरें करण्यांत, हिशेबांत इ॰). 'तूं मोजण्यामध्यें कसर करूं नको' (क्रि॰ राहणें; येणें; निघणें). २ अंश; लेश; किंचित् भाग; थोडीशी बाकी. 'पागोट्याचा रंग पुरतेपणीं गेला नाहीं, कांहीं कसर आहे.' ज्वर गेला परंतु कांहीं कसर राहिली आहे.' ३ आधिक्य; नफा; फायदा. 'दहा तोळे घेऊन विक्री केली त्यांत मासाभर कसर राहिली.' 'त्या रुपयांत कसर मिळाली.' 'ह्या व्यापारामध्यें माझी कसर बुडाली.' ४ (हिशे- बांत) दोन्हीं बाजूंच्या बेरजा बरोबर होण्याकरितां कोणत्या तरी बाजूंतून काढलेली किंवा मिळविलेली रक्कम. 'जमेंत कसर होऊन ......' -रा. १०.३४१. ५ तापाची कणकण; कडकी (ताप येण्यापूर्वींची किंवा ताप गेल्यानंतरची). 'सरदीची हवा यामुळें कसर येते.' ६ चिक्कूपणाची काटाकाट; छाटाछाट; काट; कपात. ७ अप्रामाणिक, अयोग्य मार्गानें मिळविलेला पैसा; उपटलेली रक्कम; मधल्यामध्यें चावलेला पैसा; लांच; गैरवाजवी फायदा. ८ कागद किंवा कापड खाणारी एक कीड. 'कपड्यास कागदास, भातास पिठास तंदुळास वगैरेस खाणार्‍या कसरीच्या आळ्या भिन्न भिन्न जातींच्या असतात.' -प्राणिमो ११४. ९ कर्टामत्तीचें व्याज; जसजसें मुद्दल जमा होईल तसतसें त्यावरील व्याज बंद करण्याचा प्रकार. १० कामामध्यें कुचराई, चालढकल. 'कोणीहि लढाईमध्यें अणुमात्र कसर केली नाहीं.' 'आपला निरपेक्ष उत्तम सल्ला देण्यास कसर केली नाहीं.' -नि ९९७. [अर. कस्त्र] ॰काढणें-क्रि. कमीपणा भरून काढणें; एखाद्या धंद्यांत किंवा गोष्टींत आलेला किंचितसा तोटा किंवा उणीव दुसर्‍या धंद्यांत किंवा गोष्टींत भरून काढणें. ॰करणें -(व.) १ काटकसर करणें. २ ज्वरांश येणें. ॰येणें-अंगावर कांटा उभा राहाणें; बारीक ताप येणें (गो.) कसरचें. ॰लागणें-कसरीच्या किड्यानें पदार्थ खाणें. ॰कुसर-कुसरात-स्त्री. उणीव; न्यूनता; कसर अर्थ १ पहा. [कसर द्वि.] ॰णें-अक्रि. १ एका बाजूस घसरणें; निसरणें; जागेवरून थोडेसें बाहेर जाणें. 'भ्रमांतुनि कसराल, आदि पुरुषाला अनुसराल हो' -सोहिरोबा (नवनीत पृ. ४४९) २ (ल.) कमी होणें; उतार पडणें (ताप, पाऊस, दुष्काळ यांस); कमी होणें; उतरणें (दिवस). ॰दिढी-स्त्री. ऐन जिनसी सारा भर- णार्‍या रयतेवर त्या धान्याचा बसविलेला अधिक कर. ॰पट्टी- स्त्री. १ जादा कर (प्रत्येक कुळावरील). २ तोटा भरून काढण्या- साठीं बसविलेला कर. ॰वर्तळा -पु. ऐन जिन्नसी वसुलांत जें कमीजास्त होईल त्याबद्दलची सूट.

दाते शब्दकोश

कांड

न. १ दोन संध्यांमधील भाग, पेरें. २ झाडाचें खोड; सोट; बुंधा. ३ वेदाच्या त्रिकांडांपैकीं प्रत्येक. (उपास- नाकांड, कर्मकांड, ज्ञानकांड) अध्याय; प्रकरण; अंक; परि- च्छेद; विभाग. 'एवं हिंसाचि अहिंसा । कर्मकांडी हा ऐसा ।' -ज्ञा १३.२३६. 'धनुर्भंग नाटिकेंत अंकाऐवजीं कांड हा शब्द वापरला आहे.' ४ बाण; तीर. ' थोरु कांडांचा घाई मातला ।' -शिशु ४३९. 'तो माझे आं कांडा । सदां भिए ।' -शिशु ८९४. 'कुबोलांचीं सदटें । सूति कांडें ।' -ज्ञा १६.४०४. 'हरि- नामाचें धनुष्यकांडें ।' -तुगा २१५९. 'केली निर्माण कसी हाणुनि वसुधेंत कांड वनधारा ।' -मोभीष्म १२.२२. ५ गलबताचें शीड उभारण्याचा दोर; परभाणास अडकविलेली जाडी दोरी; परभाण, डोलकाठीला ज्या दोरखंडानें बांधलेलें असतें तो दोर. हा खालींवर सरकतो. ६ गहूं, नाचणी हरभरा इ॰ चें कांड, ताट, (दाणा काढल्यानंतरचें). ७ (कों.) माडाचा सोट; खोड. ८ (व.) मातीच्या भिंतीचा एक थर. 'त्यानें एक कांड नवीन बसविलें.' ९ (गो.) कमरेस घालण्याचा चांदीचा गोफ. १० (सोनारी) सरीचा आंतील गाभा. ११ संधि; सांधा. १२ (महानुभावी) ज्ञान (?) 'येणेशी कांड गुंडा कव्हणी घेना ।' -भाए ५२०. काढणें-खारीच्या आंत ज्या पाट्या (जमी- नीचे लहान लहान तुकडे) पाडतात त्यांच्या बांधास मातीची भर देणें. हें काम वैशाखांत करतात. ॰क-(व.) १ वेळूचें पेर. २ मातीच्या भिंतीचा एक थर. ॰का-कोंडका-पु. लांकडाचा ओंडका, ठोकळा. ॰कें-न. १ कांडक अर्थ २ पहा. २ कांडका- कोंडका पहा. 'कांडकें डवचितां कृष्णसर्प ।' -भुवन १२.२१. ३ उंच; धिप्पाड; लठ्ठ; अगडबंब; ठोंब्या. (मनुष्य). ४ कुडें. 'कांडकें मोठें म्हणजे जाड व लांब असावें.' -मुंव्या २०७. ॰त्रय-न. वेदांचीं तीन कांडें, भाग; कर्म-उपासना-ज्ञान कांड. 'तरी कांडत्रयात्मकु । शब्दराशी अशेखु ।' -ज्ञा १८.१४३१. [सं.] ॰पा-पु. (गो.) मुसळ. म्ह॰ कांडपाक कोंब फुटणें = मुसळाला अंकुर फुटणें. ॰रू-न. १ बोटाचीं पेरें व अग्रें यांस होणारें उठाणूं. २ तीन चार पेरांचें उंसाचें कांडें. ॰वेल -स्त्री. एक औषधी निवडुंगाप्रमाणें पण बारीक वेल. वई. त्रिधारी, चौधारी अशा हिच्या दोन जाती आहेत. हिला पेरें असतात. त्रिधारी कांड वेलीस हाडसंधि असेंहि म्हणतात. [सं. कांडवल्लि] ॰शेर-पु. शेराभोंवतीं आढळणारी लांब नाजुक पेरांपेरांची एक वेल. ॰सोट-पु. सहा मुठी सोन्याच्या एका सुतावर मधील भागा- च्याच सुमारें २।।, ३ मुठीच्या भागावर दुसरें एक सोन्याचें सूत पिळून पहिल्या सुताच्या एका टोकास वाटोळा फासा व दुसर्‍या टोकास नागफासा करून गजरे बेठण्यापूर्वीं जो सरीचा भाग तयार होतो तो. (कांड १० पहा).

दाते शब्दकोश

बिन

क्रिवि. (अ.) शिवाय; खेरीज; वांचून; विना. हा शब्द पुष्कळ वेळां नामाच्या मागें लावतात. जसें-बिन अपराध- घोर-तोड-दिक्कत इ॰. (आ) कधीं कधीं हा शव्द क्रियापदाच्या भूतकालाच्या रूपापुढें येतो. जसें-'मी रुपये घेतल्याबिन जाणार नाहीं. ' (इ) कधीं कधीं हा शब्द (राहित्याचा बोध असतांहि) ॰आफत-क्रिवि. (जमाबंदी) कांहीं अडचण किंवा हरकत न आल्यास (कामगिरी करतां येईल). ॰कद(दे)ली-स्त्री. दुफाशीं खेळांत जुगल्यानंतर कदली पडावी तीन पडल्यानें झालेला पराजय, -वि. ज्याला कदली पडली किंवा पडत नाहीं असा ( खेळणारा. खेळ) बिन कदलीवर येणें-(ल.) भांडणाला सुरवात करणें; तिरगीमिरगीवर येणें; चिरडीस जाणें. ॰कामी-खाली-क्रिवि. (ना.) विनाकारण; व्यर्थ. ॰खोट-क्रिवि. १ निःसंशय. २ बिनधोक. ॰घोर-धोक -क्रिवि. भीति, शंका किंवा कचर न बाळगतां; निश्चित. 'मुलानें संसार संभाळल्यानें मी आतां बिनघोर झालों.' ॰जोड-वि. १ जोड नसलेलें; एकसंधी. २ अद्वितीय. ॰जोरी- वि. १ बुद्धिबळें) दुसर्‍या मोहर्‍याचा किंवा प्याद्याचा आधार नसलेलें. २ मारामारीचा (डाव). ॰डाकिल-वि. १ बिन डाकाचें; एकसंधी; अखंड २ (ल.) शुद्ध. ' बिनडाकिल दागिने अमोलिक प्रभाकराचें ठरले ।' -ऐपो २२७. ॰तक्रार-क्रिवि. तक्रार न करतां; मुकाट्यानें; निमूटपणें. ॰तोड-स्त्री. सोंगट्यांच्या खेळां- तील दुसर्‍याची एकहि सोंगटी न मरतां येणारी हार; पराजय. -वि. १ ज्यावर उपाय किंवा इलाज चालत नाहीं असा; आणी बाणीचा. 'प्रसंग बिनतोड आहे.' -चंग्र ६. २ बरोबर लागू पडणारे; बिनचूक. ३ सर्वोत्कृष्ट; अप्रतिम. बिनजोड पहा. ॰दाद- क्रिवि. दाद न लागतां; बेधडक; प्रतिकाररहित. 'त्याजवर धनवान लोक अनेक वेळां जुलूम बिनदाद करूं शकतात.' -नि ५२. ॰दिक्कत-क्रिवि. १ बेधडक; अविचारानें; बेलाशक. 'घरच्याघरीं बसून जगांत चाललेल्या लहान मोठ्या गोष्टींवर बिनदिक्कत टीका करण्याची... प्रो. गोळ्यांची हौस अनावर आहे कीं...' -टि ४.२३७. २ बेफिकर. बिनघोर पहा. ॰धोक-क्रिवि. बिनघर पहा. ॰पोटी-वि. पगार किंवा मजुरी घेतल्यावांचून केलेली; निर्वेतन (नोकरी, मजूरी). -क्रिवि. पोटाला न मिळतां (नोकरी करणें). ॰भाड्याचें घर-न. (उप.) तुरुंग; कैदखाना. ॰मजुरी-वि. १ पगार न घेतां केलेली; बिनपगारी (नोकरी). २ श्रमाचें काम, मजुरी इ॰ माफ असलेली साधी (कैद, ठेप, सजा). ॰मोजबा-बी- वि. १ ज्याबद्दल हिशेब द्यावा लागत नाहीं असें. २ सरकारांत रुजू न झालेलें; न नोंदलेलें (घर, शेत इ॰). ३ बेजबाबदार; बिनहिशेबी (बदली माणूस). ॰रेष-रेषा-रेषी-वि. रेषा किंवा केसर नसलेला (आंबा). ॰वार(री)स-वि. वारस, कायदेशीर हक्कदार किंवा मालक नसलेला. ॰वारसा-पु. वारसाचा किंवा इतर हक्काचा अभाव. निवारसा पहा. ॰शर्त-क्रिवि. कांहीं अट न घालतां. ॰शाई-स्त्री. (ना. व.) शिसपेनसील ॰सूट-क्रिवि. १ (बे.) विचार न करतां; एकदम; बेछूट. २ सूट, मोकळीक न देतां. ॰हुली-स्त्रीवि. फाशांच्या खेळांतील एक पारिभाषिक शब्द. हूल म्हणून सोंगट्या खेळण्याचा एक प्रकार आहे.

दाते शब्दकोश

प्रमाण

न. १ पुरावा; दाखला; आधार; साक्ष; वादग्रस्त विषयाचा निर्णय करणारा लेख भाग साक्ष इ॰. 'आणि उदो अस्ताचेनि प्रमाणें । जैसें न चलतां सूर्याचें चालणें ।' -ज्ञा ४.९९. प्रमाणाचे आठ प्रकार आहेत:-१ प्रत्यक्ष, २ अनुमान, ३ उपमान, ४ शब्द, ५ अर्थापत्ति, ६ अनुपलब्धि, ७ संभव, ८ ऐतिह्य (किंवा ५ भोग, ६ लेख, ७ साक्ष्य, ८ दिव्य). २ यथार्थ ज्ञानाचें साधन; निश्चिय; प्रमा उत्पन्न होण्यास कारणीभूत जें आप्तवाक्य, अनुमान इ॰. 'अर्थापत्ति उपमान । इतिहास परिशेषादि प्रमाण । तयासी हि स्वतंत्र कवण । प्रमाण तो बोलेल ।' -विवेकसिंधु ३ आधार; प्रत्यंतर; पुरावा; निश्चितपणा; खात्री. 'तो आज येईल उद्यां येईल हें सांगवत नाहीं. त्याचें येण्याचें प्रमाण नाहीं.' ४ कसोटी; कठिण प्रसंग; तप्त दिव्य. ५ सीमा; मर्यादा, इयत्ता; निश्चितपणा; तंतोतत बरोबर संख्या इ॰ 'शब्द किती आहेत ह्याचें प्रमाण कोण्हास लागलें नाहीं.' ६ परिमाण; आकार; विस्तार; (औषधाचा) टक; मात्रा. ७ माप (वजन, लांबीरुंदी, वेळ इ॰ चें). ८ एखाद्या वस्तूचा निश्चितपणा, विभाग इ॰ ठरविण्याचा नियम. ९ (गणित) त्रेराशिकांतील पहिला संख्या; दोन समान गुणोत्तरांची मांडणी. १० सर्वमान्य, ग्राह्य, आज्ञा, उपदेश, सल्लामसलत घ्यावयास योग्य असा शब्द, माणूस, वचन, ग्रंथ इ॰ 'धर्म म्हणे गा भीमा! तुज जरि आम्ही प्रमाण तरि सोडी ।' -मोवन ९.६४. ११ शपथ; वचन. 'वैश्य म्हणे तियेसी । प्रमाण द्यावें आम्हांसी ।' -गुच ३३.७१. १२ ज्ञान; यथार्थ ज्ञान. 'तैसें प्रमाता प्रमेय । प्रमाण जें त्रय । तें अज्ञानाचें कार्य । अज्ञान नव्हे ।' -अमृ ७.४६. १३ (चुकीनें) फर्मान हुकूम. 'बाच्छाय पाठविलें प्रमाण । वजीर बोलावा तमाम ।' -ऐपो १०.१४ अंतःकरण. -हंको. -वि. खरें; योग्य; बरोबर; सत्य; न्याय. 'हें माझें भाषण प्रमाण आहे.' -क्रिवि. मान्य; कबूल. 'सेवकासी आज्ञा स्वामीची प्रमाण.' [सं.] म्ह॰ नैको ऋषिर्यस्यवचः प्रमाणम् । सामाशब्द- ॰गणित-न. त्रैराशिक. ॰चैतन्य-न. सप्त चैतन्यांतील आभासचैतन्याचें अंतःकरणचैतन्य नामक तिसरें अंग. ॰दिवा-पु. प्रमाणरूपी दिवा; लामणदिवा. 'प्रमाणदिवेयांचेनि बंबाळें । पांतां तरळैले वेदांचे डोळे ।' -शिशु ९. ॰पत्र-न. अधिकारपत्र; मुख्याच्या सहीचें पत्रक. 'ज्यांच्या- जवळ प्रमाणपत्रें असतील त्यांनाच वर्गणी द्यावी.' -के १२.७. ३०. ॰फल-न. त्रैराशिकांतील चौथी संख्या; उत्तर. ॰भूत- वि. १ प्रमाण म्हणून घेतां येईल असें; इयत्ता ठरविणारें. २ (यावरून) खरें; सत्याला धरून असलेलें. भूत पहा. ॰मद्यार्क-पु. (प्रमाणाइतकी) पुरी तेजदारू; पुरी कडक दारू. (इं.) प्रुफ स्पिरीट. ॰सूत्र-न. लग्नाचे वेळीं वधू व वर यांची उंची ज्यानें मोजतात तें सूत. प्रमाणांक-पु. त्रैराशिकांतील पहिली राशि. बाकीच्या दोन राशींस मध्यांक आणि इच्छांक अशीं नावें आहेत. प्रमाण + अंक] प्रमाणालंकार-पु. प्रमाण अर्थ १ पहा. [प्रमाण + अलंकार] प्रमाणीभूत-वि. प्रमाणभूत पहा.

दाते शब्दकोश

आकार

पु. १ आकृति; ठेवण; रूप; घडण; मूर्ति. ‘पै ब्रह्मबीजा जाहला अंकुरु । घोषध्वनी नादाकारु ।’ –ज्ञा ९.२७५. २ बाह्यस्वरूप; देखावा. ३ (ल.) साम्य; साद्दश्य; तुल्यता. ४ मना- वर ठसलेली आकृति-ठसा-मूर्ति; मनावर झालेल्या परिणाम- कल्पना-ग्रह. ५ (पूर्णतेस येणाऱ्या कामाच्या, धंद्याच्या किंवा योजलेल्या गोष्टीच्या, मसलत इ०च्या) स्वरूपाचा निश्चितपणा. ६ खर्च, नफा, उत्पन्न, वसूल इत्यादि गोष्टींचा अजमास-अंदाज; जमाबंदीचा अंदाज, ठरावणी, ७ खूण; चिन्ह; अंदाज; दिग्दर्शन. ‘या व्यवहारांत शंभर रुपये मिळतील असा आकार दिसतो.’ ८ मनोविकारांचा शरीरावर होणारा परिणाम; विकारदर्शक स्थिति, भाव. जसें-कांपणें, हंसणें, रोमांच उभे राहणें-भीतीनें, आनंदानें वगैरे ९ (भूमिति) आकृति; चित्र. (इं.) फिगर. १० (भूमिति) आकृतिमान; परिमाण. (इं.) व्हाल्युम. ११ पद्धत; वागणूक; राहणी; चाल; ढब; रीत; तऱ्हा. ‘मी परब्रह्म येणें आकारें । जेथें जीवस्वरूप स्फुरे ।।’ ‘या रीतीं बहुत आकारें तिनें झाडितां ।’ -पंच ३६. १२ पृथ्वींतील एकंदर वस्तुजात, विश्र्व. ‘तरी ती हरीची ज्ञान कळा केवळ । हा आकार अवघा तुझा खेळ ।’ –ह २४.८७. १३ सारा (जमिनीचा). १४ किंमत. १५ (कर.) आव, आविर्भाव. ‘आकार तर एखाद्या वकिलाचा आणला आहेस’. एखाद्या वस्तूचा अमुक एक आकार आहे हें दाखविण्यासाठीं हा शब्द योजून सामासिक शब्द बनवितात उ॰ मंडलाकार; चक्राकार; गोला कार, वर्तुलाकार इ॰ [सं. आ + कृ] -रातजाणें- (नाग.)व्यर्थ जाणें; असफल होणें. ‘एवढी उठाठेव करूनही अखेरीस ती गोष्ट आका- रांतच गेली कीं नाहीं?’ ॰दाखविणें- १ मिष करणें; आव आणणें; ढोंग करणें; बहाणा करणें. २ एखाद्या गोष्टीचें स्वरूप, मान दाख- विणें-व्यक्त करणें. -रास येणें- १ एखादी गोष्ट, धंदा, दुखणें, काम कांहीं विवक्षित स्वरूपास येणें, रंगास येणें, मूर्त स्वरूपांत येणें; दृग्गोचर होणें. ‘कर्म आलें हो आकारा’-विष्णूची भूपाळी २५. फळास येणें. ‘त्यांची अवस्था तीच तुमची पुढें येईल आकारास’ –ऐपो. ३॰६. २ कमी प्रमाणावर-संख्येवर येणें; खालावणें. ॰गोपन- न. १ खऱ्या स्वरूपाची, आकृतिची, मनोविकाराची छपवणी; लप- विणें; गुप्त ठेवणें; पडदा पाडणें. २ ढोंग; छद्मीपणा; छद्मी व्यवहार. ॰जमा- स्त्री. अंदाजानें ठरविलेला वसूल; वसुलीजमेच्या उलट. ॰जात- न.वस्तुजात; उत्पन्न झालेल्या सर्व वस्तू; विश्र्व. ‘जे आकारजाताचें दुस । घडी केलें ।’ –ज्ञा १५.८३. ॰बंद- पु. १ लिहिलेला, तयार झालेला मसुदा (वसूल, जमीन, पट्टया, वराती इ॰ चा). २ जमाबंदीचें सरकारी वार्षिक अंदाजपत्रक (सारा, जमीन पट्टया, सूट, इनामें वगैरेचें). ३ सामान्य अंदाज पत्रक-खर्डा. [आकार + बंद] ॰मान- न. १ विस्तारमान; बाह्य स्वरूपावरून केलेला अंदाज. २ आकृतिमान; परिमाण. (इं.). व्हाँल्युम. (प्र.) आकारमहत्त्व ॰शुद्ध- वि. नीटनेटक्या, व्यवस्थित, पाहिजे तशा आकृतीचें, प्रमाणबद्ध (भांडें, घर, माणूस). [सं.] ॰शुद्धि- स्त्री. आकृतीचा, स्वरूपाचा, बांधेसूदपणा; अंगसौष्ठव; प्रमाणबद्धता [सं.] म्ह॰ ‘आकारे रंगती चेष्टा’ ‘आकारैरिंगितेर्गत्या चेष्टया भाषणेन च । नेत्र वक्त्रविकाराभ्यां ल्क्ष्यतेऽन्तर्गतं मनः ।। (आकार, इंगित, चालचलणूक, कृति, भाषण, डोळे; मुद्रा, इत्यादि गोष्टींवरून मनु ष्याच्या मनांत साधारणपणें काय चाललें आहे तें कळतें.) या श्लोकाचा आरंभीं दिलेला पहिला चरण अपभ्रष्ट होऊन मराठींत आला आहे. मनुष्याच्या बाह्यस्वरूपावरून त्याच्या हातून घड- णाऱ्या कृतीचें स्वरूप ताडतां येतें; जसें-‘आकारेंचि परेंगित कळलें बोलोनि काय हो कळतें ।’- मोवन १.१२.

दाते शब्दकोश

नवा

वि. १ नवीन; नूतन; अस्तित्वांत येऊन फार दिवस झाले नाहींत असा. २ (एखाद्या कार्यांत, व्यवहारांत, धंद्यांत) नवशिका; अनभ्यस्त; (नवशिक्या माणसास अनुलक्षून) अंग- वळणी न पडलेलें (त्याचें कार्य). 'या कामांत तो नवा आहे आणि हें कामहि त्यास नवें आहे.' ३ उपयोग इ॰कानीं मलिन, अस्ताव्यस्त, जर्जर, जुना न झालेला. 'ही शालजोडी नवी आहे.' ४ अभूतपूर्व; अपूर्व; अपरिचित; अदृष्टपूर्व. 'आज नवें झाड पाहिलें' 'आज यांनीं नवाच श्लोक म्हटला.' ५ न उपभोगिलेला, उपयोगिला गेलेला. 'ही स्त्री अझून नवी आहे कोणी भोगिली नाहीं. ६ नुकतीच ज्यानें (कार्याचीं, कारभाराचीं) सूत्रें हातांत घेतलीं आहेत असा (कारभारी, त्याचा कारभार) -शास्त्रीको. ७ तरुण. नव पहा. [सं. नव; प्रा. नवओ; सिं. नओ; हिं. नया; फ्रें. जि. नेवो] (वाप्र.) ॰जुना करणें-जुना बदलून नवा घेणें, करणें (करारनामा, हिशेब, करार, अंमलदार इ॰). ॰जुना होणें- नवीनपणा, नवखेपणा नाहींसा होणें; परिचित होणें; वहिवाटला जाणें. नवीजुनी ओळख-स्त्री. पुन्हां नव्यानें करून घेतलेला, नवा केलेला जुना परिचय. नवीजुनी सोयरीक-स्त्री. पुन्हां नव्यानें जोडलेला (एखाद्या व्यक्तीचें मरण इ॰सारख्या कांहीं कारणामुळें तुटलेला) संबंध, सोयरीक. नवी नवती-स्त्री. नव- यौवन; तारुण्याचा भर; ऐन ज्वानी; नवनवती पहा. नवी नवरी- स्त्री. १ नुकतेंच लग्न झालेली मुलगी. २ (उप.) स्वाभाविकपणें जी गोष्ट माहीत असायला पाहिजे ती माहीत नसलेला, माहीत नसल्याचा आव आणणारा, लाजाळु मुलगा, मुलगी. नवी नवाई, नवी नवा(व्हा)ळ, नवी नवलाई, नवी नवाळी-स्त्री. १ नव्यानें, नुकतेंच निघालेलें (प्रतिवर्षीं होणारें) धान्य, फळ इ॰; नवान्न. ' हे पेरू पाठवायाजोगे नव्हेत परंतु नवीनवाळ म्हणून पाठवावे.' २ वर्षाच्या नवधान्याच्या, नवीन, अपूर्व व सुंदर वस्तु. नवें जग-न. अमेरिका व ओशियानिया हीं दोन खंडें. यांचा शोध अलीकडेच लागल्यानें त्यांस हें नांव आहे. नवेंजुनें-न. १ (राज्य इ॰कांत) जुने अधिकारी काढून नवीन नेमण्याचा प्रकार. २ जुन्या वस्तू देऊन नवीन घेण्याचा, परस्पर बदलण्याचा प्रकार. नवें टाकणें-(ना.) नवीन उपक्रम सुरू करणें; दीर्घकालानंतर एखादी गोष्ट करणें. नव्या उमेदीचा-वि. तारुण्याच्या जोमानें, उत्साहानें व महत्वाकांक्षांनीं परिपूर्ण; (अजून) जगाचे कटु अनुभव ज्याला आले नाहींत असा उत्साही व महत्वकांक्षी (तरुण मनुष्य). नव्याची पुनव-स्त्री. आश्विनांतील व माघी (मार्गशीर्ष-शास्त्रीको?) पौर्णिमा; नवान्नपूर्णिमा पहा. नव्याच्यानें, नव्यानें-क्रिवि. प्रथमच; नवीन म्हणून. 'या रणपटु योद्ध्याची ओळख आमच्या स्वराज्या- वरील कादंबऱ्या वाचणारांना नव्यानें करून देण्याची आवश्यकताच नाहीं. ' -स्वप ५९. नव्याजुन्याचा मेळ-नवे आचार, नवे विचार त्यांचें सार व जुन्या आचारविचारांचा विचार करून योग्य असेल तें घेऊन ऐक्य करणें. नव्या(वे)ताण्याचा-वि. १ विणून तयार होऊन फार दिवस झाले नाहींत असें (वस्त्र इ॰). २ अशा वस्त्राचें सूत इ॰म्ह॰ १ नवें नवें जेवी सवें = पाहुणा नवीन आहे तोंपर्यंत घरमालक त्याला बरोबर पंक्तीला घेऊन कांहीं दिवस जेवतो, पुढें परिचय झाल्यावर मात्र हेळसांड व्हावयास लागते. २ नवें नवें नि खाटल्याभवतें भवें. ३ नवी विटी नवें राज्य, नवी विटी नवा डाव. (विटीदांडूच्या खेळांत विटी बदलून नवी घेतली तर सर्वच बदलतें त्याप्रमाणें) = एखाद्या कारभारांत नवीन कारभारी आला तर त्याचें सर्वच तंत्र नवीन असतें. ४ जुने डोळे आणि नवे चाळे, तमाशे. ५ नवां दिवशीं नवी विद्या. ६ नव्याचे नऊ दिवस = कोण- तीहि गोष्ट नवी आहे तोंपर्यंत (कांहीं दिवस) लोक तिचें कौतुक करितात. त्या वस्तुचा नवेपणा व लोकांचें कौतुक फार दिवस टिकत नाहीं. सामाशब्द- ॰आडसाली-वि. उंसाचा एक प्रकार. नवीन लागवड केलेला एक वर्षाआड पीक देणारा ऊंस. ॰करकरीत-वि. अगदीं नवा; पूर्णपणें नवा; कोरा करकरीत; करकरीत पहा. ॰तरणा-तरणाफोकवि. जवानमर्द; ज्वानींत असलेला; तारुण्याच्या भरांत असलेला (पुरुष). ॰नूतन-वि. अगदीं नवा; कोरा करकरीत. [नवा + सं. नूतन = नवा]

दाते शब्दकोश

गैर

अ. निराळेपणा, भिन्नपणा दाखविणारा परंतु सामा- न्यतः अभाव किंवा अन्यथाभावदर्शक अरबी अव्ययशब्द किंवा प्रत्यय. याचा मनसोक्त (विशेषतः हिंदुस्थानी शब्दांबरोबर) उपयोग करितात. या शब्दाचें पुढील कांहीं अर्थ होतात- १ इतर; अन्य. 'गैर पथकें येऊन मोर्चेबंदी केली आहे.' -रा १२.१२५. २ अयोग्य; अन्यायाचा. 'हें तुम्हीं गैर केलें' -मदरु १.१०६. ३ (नामाच्या किंवा विशेषणाच्या प्रारंभीं जोडल्यास) अवास्त- विक, उलट; विपरीत. ४ विना; वांचून. 'गैर अन्याय मला गांजतो.' 'गैर अपराध दंड घेऊं नये.' [अर. घैर = निराळा, व्यतिरिक्त] (वाप्र.) ॰अदबी-स्त्री. असभ्यता; अपमान; अनादर. 'गैर अदबी बोलला सबब पातशाहा यास राग येऊन डोळे काढिले.' -मदरु २.७०. ॰अदा-वि. रद्द; न पटलेलें. 'शिंदे कडील वरात आली तर मग गैरअदाही व्हावयाची नाहीं.' -ख १०. ५२.७९. ॰अब्रू स्त्री. अप्रतिष्ठा. 'गैर-अब्रू फारशी न करणें.' -वाडबाबा २.७५. ॰अमली-वि. परस्वाधीन; दुसर्‍याचें. 'चार लक्षाचे भरतीस अमली महालांपैकीं बेरीज कमी आल्यास गैर- अमली महाल आहेत त्यांपैकीं भरतीस कमाल आकाराचे बेर- जेचा महाल लावून देणें.' -रा १०.३२१. ॰आबादी-वि. ओसाड; उजाड; बेचिराख. ॰आरामी-स्त्री. अवस्थता. 'हज्र- तांचे शरिरास दोन दिवस गैरआरामी] आहे.' -दिमरा २.३२. ॰इतबार-पु अविश्वास. 'तमाम फौजेस गैरइतबार जाहला.' -भाब ८०. ॰इमान-न. इमान नसणें; द्रोह; अनिष्ठा. 'आमचें गैरइमान असतें तरी आम्हीं आजपर्यंत येथें तुम्हापाशीं न ठरतों.' -भाब १११. ॰कबजी-वि. परस्वाधीन; गैरअमली पहा. 'सरं- जाम गैरकबजी, कांहीं सुटला त्यांत वस्ती नाहीं.' -ख २.९४२. ॰कायदा-वि. बेकायदेशीर; असनदशीरे. (इं.) इल्लीगल. ॰कायदा मंडळी-स्त्री. (कायदा) गुन्ह्याचें कृत्य करण्याच्या इराद्यानें पांच किंवा पांचाहून अधिक एकत्र जमलेले इसम. (इं.) अन्लॉफुल असेंब्ली. ॰किफायत-स्त्री. तोटा; नुकसान. 'किफायत, गैरकिफायत समयासमयास चित्तांत आणून किफा- यतीचीं कामें करीत आलां, पुढें त्याचप्रमाणें करावीं' -रा १. ३४६. ॰कौली-वि. परवाना किंवा अभयपत्र न दिलेलें; बिगर परवाना. -मराआ. ॰खर्च-पु. १ जादा, किरकोळ खर्चं. २ गैर- वाजवी, अयोग्य खर्च. ॰खुशी-षी-वि. नाकबूल; नाखूष; रुष्ट. 'खुषी किंवा गैरखुषी असा हा कौल बायकांशी ।' -पला १०४. ॰चलन-नी-वि. १ चालू नसलेलें (नाणें). २ (ल.) अव्यव- स्थित; बेशिस्त; अशिष्ट (वर्तन). ॰चलन-स्त्री. १ चलनाचा अभाव; चलन नसणें. २ (क्व.) गैर वर्तन; बदचाल. ॰चाकर- वि. बडतर्फ; माजूल. 'जखमी जाहले त्यांस गैरचाकर करून जागिरा तगीर करविल्या.' -जोरा ७५. ॰जप्त-वि. गैरअ- मल; गैरकबजी; परस्वाधीन. 'गैरजप्त देश साधावें.' -चित्रगुप्त ११०. ॰जबाब-पु. उद्धटपणाचें, अनादराचें उत्तर. ॰दस्त- स्ती-वि. सरकारसार्‍याची सूट असलेली (जमीन). ॰नफा- फायदा-पु. तोटा; नुकसान. 'येणेंकडून तुमचा गैरनफा जाहला.' -जोरा १४. 'अत्यंत वोढ केल्यास पाटीलबावांचा गैर फायदा आहे.' -जोरा ४७. ॰प्रकारचा-वि. १ इतर; भिन्न; दुसरा. २ चमत्कारिक; हास्यापद; तर्‍हेवाईक; विलक्षण. ॰बर्दार-वि. बहार नसलेला; फळहीन. 'पोकळी गैर-बर्दार, शेंडे वाळलेल्या आहेत.' -रा ११.७९. ॰मजुरा-क्रिवि. (हिशेब) मजुरा (वजा) टाकल्याशिवाय; वजावाट न करितां. [गैर + मजुरा-मुजरा] ॰मंजूर-वि. नामंजूर; रद्द. 'अप्टणांनीं जापले जागा वाजवी असतां गैरमंजूर करून एकपक्षी तह केला.' -रा १२.१२२. ॰मर्जी-स्त्री. अवकृपा; रुष्टता; इतराजी; नाराजी. ॰मसलत- मनसुबा-स्त्रीपु. मूर्खपणाचा, वेडगळपणाचा बेत, कट, योजना. ॰महसर्दार-वि. अप्रतिष्ठित. -रा ८.४३. [अर. मआसिर = थोरवी] ॰महसूल-पु. जुलमी करांपासून किंवा अन्याय्य मार्गानें काढलेला वसूल; योग्य सरकारसार्‍याविरहीत वसूल. 'विजा- पुराहून एक हवालदार गैरमहसूल पैदागिरी कबुल करून आला.' -इऐ ५.१००. ॰माकूल-मूर्ख; अडाणी; गैर; वाईट. 'कार्बारास खलेल करणें हें गैरमाकूल गोस्टी आहे.' -रा १८.३३. -क्रिवि. मूर्खपणें. 'लोक गैरमाकूल आम्हांस न कळत वर्तले तरी त्याची बद्लामी आपणावरी न ठेववी.' -रा ८.१०. ॰मान्य-वि. अमान्य; असमंत. ॰मार्ग-पु. गैरशिस्त आचार, रीत; दुराचरण. ॰माहीत-वि. १ अपरिचित; अनोळखी. २ अजाण; नेणता. 'साठे आहेत ते गैरमाहीत.' -ख ७.३५५१. ॰माहीतगार- वि. अज्ञानी; अडाणी. ॰मिराशी-वि. वंशपरंपरा मालकी नस- लेला. 'मातकदीम मिरासी खरी जाहली. काणव मजकूर गैर- मिरासी मुतालीक ऐसे जाहले.' -इऐ ५.१०२. ॰मेहनत- स्त्री. निरुद्योग. 'परंतु मेहनत, गैर-मेहनत सर्व एक ईश्वरी क्षोभानें वायां गेल्या.' -ऐ ५. ॰मेहेरबानी-स्त्री. अवकृपा; इतराजी. 'सांगितल्यावरून मनांत गैर मेहेरबानी न धरावी.' -रा ८. १०. ॰मोसम-हंगाम-पु. अवेळ. 'गैर मोसमांत (पौष वद्य १२ स) आंबे आले यावरून कौतुक वाटलें.' -रा २२.५. ॰रजावंद-वि. नाराज; नाकबूल. 'तो क्रियेस गैररजावंद जाहला.' -वाडशाछ १३२. [फा.] ॰रहा-रीत-स्त्री. बद- चाल; अयोग्य रीत; वाईट आचरण. -वि. बदचालीचा-सलु- काचा. 'भुजंगराव याची वर्तणूक गैररहा दिसते.' -ख ११. ५७७६. ॰राजी-वि. असंतुष्ट; नाराज. 'पाटसकर गैर-राजी जाले.' -रा ६.२६. ॰राबता-वि. १ बंदी; मनाई; खंड (मार्ग, मिळणें, येणें-जाणें, वहिवाट, चाल यांमध्यें). 'नाना फडणीस लष्करांतून आल्यापासून गैरराबता बहुत करूं लागले. कोणाचीच गांठ पडत नाहीं.' -ख ८.४१५१. २ वहिवाट, चाल यामध्यें अनभ्यास; अपरिचय; अवापर; वळण नसणें. ॰रास्त-वि. गैर- वाजवी; असत्य; खोटा. ॰रुजू-वि. १ गैरहजर. २ मंजूर किंवा दाखल किंवा मान्य न केलेले (हिशेब). ॰लायक वि. अयोग्य; नालायक; अनुचित. ॰वळण-न १ गैरराबता. 'त्या मार्गास सध्यां गैरवळण जाहे.' २ एकीकडे असणें; आडवळण; दळण- वळण नसणें. 'हा गांव गैरवळणांत पडला.' ३ गबाळ, वाईट लिखाण. ४ सरावांत नसणें; सवंय नसणें; निरुपयोग. ॰वाका- पु. खोटी किंवा बनावट गोष्ट; गैरसमजूत; लबाडी. 'ऐसा गैर- वाका सांगितला.' -रा ८.५२. -वि. वेडावांकडा -शर [फा. घैर्-वाकिअ] ॰वाजवी-वाजिवी-वि अयोग्य; अनुचित; फाजील; अन्याय्य. 'त्याचा अभिमान गैर-वाजवी याणीं नच- धरावा.' -रा १२.७९. [फा. घैर् + वाजिवी] ॰वाजवी दाब- पु. (कायदा) अयोग्य वजन. (इं.) अनड्यू इन्फ्लुअन्स. ॰वास्तविक-वि. खोटा; असत्य; वस्तुस्थितीस सोडून. ॰विलग-क्रिवि. आडबाजूस; आडवळणी. -वि. (विलगसाठीं चुकीनें योजलेला) न मिळणारा; न जुळणारा. ॰विल्हईस- विल्हेस-विल्हे- क्रिवि. आपल्या (योग्य) ठिकाणाच्या विरुद्ध जागी; भलतीकडे. ॰विल्हेस लागणें-पडणें-१ दुसरीकडे किंवा चुकीच्या ठिकाणी लागण; क्रमवार नसणें. २ योग्य ठिकाणाहून गहाळणें; गमावणें. ३ गोंधळ होणें, अव्यवस्थित असणें, ॰शर्ती- स्त्री. माफीजमीन म्हणून ठरविल्यानंतर जिला इतर दुसर्‍या कोणत्याही अटी पाळावयाच्या नसतात अशी जमीन. ॰शिस्त- वि. बेशिस्त; अव्यवस्थित; विना रीतभात; नियमबाह्य; असभ्य; फाजील (माणूस, वर्तन, भाषण). -स्त्री. बेशिस्तपणा; अव्यवस्थितपणा; अयोग्यपणा. अनियमितपणा. ॰शेरा- शरा-वि. धर्मशास्त्रविरहीत. 'काजीपासून गैरशेरा अमल होऊन आला.' -वाडसनदा १५- [अर.घैर् + शरअ = धर्मशास्त्र] ॰संधी- स्त्री. अवेळ; गैरमोसम; अवकाळ. ॰सनदी-वि. १ बेसनदशीर; बेकायदेशीर; सनदेनें अधिकृत नसलेलें. २ जादा मंजुरीशिवाय. 'गैर-सनदी खर्च करावयाची सरकारची आज्ञा नाहीं.' -ख ५. २३५३. ॰समजाविशी-स्त्री. (कायदा) गैरसमजूत; (इं.) मिस्रिप्रेझेंटेंशन. ॰समजूत-स्त्री. उलट, चुकीची समजूत; चूक. ॰सल्ला-सलाह-गैरमसलत पहा. 'हे कंपणी इंग्रजबहादूर यांचे सलाहानें अगर गैर सलाहानें ...' -रा २२.१२५. ॰साल-वि. अनिश्चित वेळेचा; वर्ष नमूद नसलेला. 'गुणनवरे यांनी कागद एक काढिला, तो बहुतां दिवसांचा, गैर-साल ।' -रा ६.८९. ॰सावध-वि. १ बेसावध; गाफील. २ बेशुद्ध; मूर्छित. ॰साळ- वि. १ खोटसाळ; सरकारी टांकसाळींतून न पाडलेलें. इतर ठिकाणाचें म्हणजे हिणकस, कमी किंमतीचें (नाणें). 'गैरसाळ तामगिरी । कोणी नवी मुद्रा करी ।' -दा १०.८.१४. (त्यावरून) खोटा; बनावट; लबाडीचा. २ (ल.) बेशिस्त; अनभ्यासी; गांवढळ; अडाणी; (माणूस); अयोग्य; अनुचित (वर्तन). ३ अशिष्ट; अडाणी; हलका; राकट; बेडौल; गावठी इ॰ ॰सोई-य-स्त्री. अडचण; त्रास; हाल; अप्रशस्तता. ॰सोईचा-वि. अडचणीचा; सोईचा, सुखकर नसलेला. ॰हंगाम-पु. गैरमोसम पहा. 'त्यास गैरहंगाम, हल्ली खरबुजीं तयार मिळालीं ते आठ सेवसी पाठ- विलि असेत.' -रा ३.३१२. ॰ह(हा)जीर-वि. मोजदादीच्या वेळीं समक्ष नसलेला; अविद्यमान; अनुपस्थित. [फा.] ॰हिसा (शे)बी-स्त्री. अन्याय; अव्यस्थितपणा. -क्रिवि. अन्यायानें. 'आपले जागिरींत नाहक गैरहिसाबी पादशाह खलल करवि- ताती ।' -इमं ६७. ॰हुकुमा-वि. अनधिकृत; संमति, आज्ञा नसलेले; नामंजूर. ॰हुर्मत-स्त्री. अप्रतिष्ठा; बेअब्रू.

दाते शब्दकोश

इनाम

न.१ कोणत्याहि अटीशिवाय शाश्वत, वंशपरंपरेची स्थावर अशी देणगी; वृत्ति; इनामांत पुढील प्रकार आहेत. -वतनी (सनदी) व गांवनिसबत. वतनींत गैरउपयोगी (न्हावी, सुतार, चांभार, चौघुला, शेट्या, मांग, कुंभार, पोतदार, महाजन, कुडबुडे जोशी इ॰) व उपयोगी (उपाध्याय, गुरव, गांवज्योतिषी, जंगम, काजी, मुलाणा, मुजावर इ॰), परगणे वतनदार (देशमुख, देशपांडे, देश- कुलकर्णी, नाडगौडा, नाडकर्णी, सरदेसाई, सरदेशपांडे, सरदेशमुख, सरपाटील, निरखीदार, देशगत, घाटपांडे, देसाई), गांवनौकर (पाटील, कुलकर्णी, मतादार, माधवी, महार, तराळ, बळीकर इ॰), क्षेत्रोपाध्ये. गांवनिसबत (पासोडी, देवस्थान, हाडोळी, मावळी, धर्मादाय, देणगी, वतनदारी इ॰). सनदी म्हणजे सरकारी करा- पासून मुक्त व कायमचें दिल्याबद्दल सनद मिळते तें. शराकती दुमाला म्हणजे गांवांतील उत्पन्नांतून गांवकामगाराचा खर्च वजा जातां बाकी राहणार्‍या उत्पन्नांत सरकाराची हिस्सेरस्सी असते ती. शिवाय अग्रहार, भाकरी, चोळीबांगडी, देवस्थान, कदीम, जदीद, जात, जुडी, कोल्हाटी, मळीकी, राजकीय, साधणूक शेतसनदी, योगक्षेम, इसाफत, नौकरी, वतनीवजीफा, आलतमघा इ॰ इ॰ ऐन इनामतीमध्यें ब्राह्मणांचीं अग्रहारें व बादशहाचे पीर आणि थडगीं, मशिदी आणि देवस्थानें, फकीर इनाम, मोईन, काजी-मुलाणा, फकीर-तपस्वी, अन्नछत्र वगैरे बाबी येत. -भाअ १८३३.१३८. २ देव,ब्राह्मण वगैरेंना दिलेली भूमि वगैरे. ३ मालकी हक्क न देतां देणें, घेणें, खाणें, सोडणें. 'हा माड यानें इनाम खाल्ला.' 'आम्ही गाईचें दूध काढीत नाहीं, वासरे इनाम पितात.' ४ (सामा.) कोणतेंहि बक्षीस; नजर; देणगी. [अर. इन्आम] ॰इक्राम-पु. भेट; देणगी, बक्षीस, वृत्ति. -वाडसभा २.१९६. [अर.] ॰इजाफत- न. देणगी वाढवून देणें; देणगीची वाढ; इनामांत घातलेली भर (कांही कामगिरी केल्याचा मोबदला म्हणून वाढवून दिलेलें इनाम.) ॰इजाफतदार-वि. इनाम इजाफत मिळालेला; वाढलेलें इनाम उपभोगणारा. ॰चिटणावळ-स्त्री. इनामावरील सरकारी बाब किंवा कर. [हिं.] ॰चिठ्ठी-पु १ वेगवेगळ्या इनामांची यादी, तपशील (जिल्ह्यातील किंवा तालुक्यांतील). २ इनामपत्र; इनामपट्टा, इनामखत. ॰चौकशी स्त्री. इनामपाहणी पहा. ॰चौथाई-स्त्री. इनामाचा चौथा हिस्सा (सरकारांत भरणा करा- वयाचा). ॰जमीन स्त्री. एखाद्या मोठया कामगिरीबद्दल सरका- रांतून बक्षीस मिळालेली सारामाफीची जमीन. ॰तिजाई-स्त्री. १ इनाम जमिनीच्या उत्पन्नाचा तिसरा हिस्सा. हा कर सरकार सहा किंवा दहा वर्षांनी वसूल करी. -शारो ४०.२ पूर्ण अथवा सर्वस्वी इनाम नसलेल्या इनामी जमिनीवरील सार्‍याचा तिसरा भाग. 'इदलशाही दिवाणांत हक्कचौथाई व इनामतिजाईच नव्हती' -रा ३.११७. [फा.] ॰दार-पु. इनाम धारण करणारा; इनामी जमिनीचा मालक; वतनदार. [फा. इन् + आम् + दार] ॰नोकरी-स्त्री. गांव, महाल परगणा यांची महसुली, फौजदारीसंबंधानें गावकी, घरकी कामें करणार्‍या गांवकामगांरांनां व परगणे अमलदारांना इनाम जें देण्यांत आलें तें; काळीचें उत्पन्न, (स्वामित्व नव्हे;) म्हणजे महसूल घेण्याचा अधिकार; किंवा इनाम जमीन धारण करणार्‍यांना महसुलाची सर्वस्वीं अथवा अंशतः सूट देण्यांत आली ती. इनाम मिळकती दोन प्रकारच्या असतात. -प्रत्यक्ष (दुमाला) आणि अप्र- त्यक्ष (परभारा). पहिल्या प्रकारांत इनामदारांना सबंध गांव, महाल किंवा गांवांतील सर्व जमीन दुमाला करून देत आणि धारा वसूल करण्याचा राजाधिकार हा त्यांना देत. दुसर्‍या प्रकारचें इनाम ऐन किंवा नक्त किंवा ऐनजिनसी असे. धारा वसूल करून आपल्या खजिन्यांतून सरकार इनामदारांना जी ठराविक नेमणूक रोकडीनें आदा करी तिला नक्त इनाम म्हणत आणि जमीन धारण करणाराकडून इनामदार परस्पर ठराविक घुगरी म्हणजे दर बिघ्यास किंवा नांगरास धान्याचीं अमुक मापें घेत ती; अथवा बाजारहाटांत विकावयास आलेल्या मालाची शेव-फसकी किंवा वाणगी घेत ती, यांना परभाराहक्क किंवा ऐनजिनसी इनाम म्हणतात. -गागा २९.४०. ॰पट्टी-ताजम-स्त्री. पु. इनामदारावर बसविलेली पट्टी, कर. हा कर दर तीन वर्षांनी जेवढें उत्पन्न असेल तेवढा बसवीत, जेवढें त्या वर्षाचें उत्पन्न असेल तेवढा घेत. ॰पत्र-न. इनाम दिल्यासंबंधींचें खत, सनद; इनाम दिल्याचें राजपत्र; सर- कारनें कोणास इनाम दिल्यास त्याबद्दल पुढील चार सरकारी हुकूम निघत-(अ) खुद्द इनाममदारास, (आ) इनाम गांव अथवा जमीन ज्या परगण्यांत आहे त्या परगण्याच्या मामलेदारास, (इ) त्याच परग- ण्याच्या देशमुख देशपांड्यास, (ई) इनाम असलेल्या गांवच्या पाटील-कुलकर्णी वगैरे मुकदमास. ॰परभारा-पु. सरकारांतून न घेतां परभारें गांवाकडून वसूल करण्यांत येणारें इनाम ॰पासोडी- स्त्री. गांवकामगारांना जी किरकोळ जमीन इनाम देतात त्याबद्दल व्यापकतेनें योजावयाचा शब्द. जसें:-पाटलास पासोडीसाठीं; कुल कर्ण्यास रुमालासाठीं, पोतदारास घोंगडीसाठीं; महारास जोडया- साठीं; भठास धोतरासाठीं, वगैरे इनाम दिलेल्या जमिनीबद्दल. ॰पाहणी-स्त्री. दिलेल्या इनामजमिनींची पाहणी, तपासणी. ॰फैजावी-स्त्री. जमिनीवरील सरकारसार्‍याच्या एकतृतीयांशाइतका दरसाल सरकारांत करावयाचा भरणा. [अर.]

दाते शब्दकोश

मूठ

स्त्री. १ मुष्टि या शब्दाचे सर्व अर्थ पहा. २ मुष्टि- प्रयोग; मंत्रप्रयोग; मंत्रानें भारून मुठींत घेतलेले उडीद इ॰. हे दुस- ऱ्याच्या नाशाकरितां फेकावयाचे असतात. (क्रि॰ मारणें; टाकणें). ३ मुठींत राहतील इतक्या भाताच्या रोपांची जुडी; भाताची लावणी करण्यापूर्वीं रोपें उपटून त्यांची जुडी करतात ती. ४ मुठीनें पेर- लेलें भात. (क्रि॰ पेरणें; टाकणें). ५ हत्ती, घोडा वगैरे जना- वरांच्या रोजच्या अन्नांतून त्यांच्या रखवालदारास द्यावयाचा मुठीच्या परिमाणाचा (पगाराहून अधिक) भाग. ६ घोड्याच्या पायाच्या खुराला लागून असलेला सांधा (ह्या सांध्याशीं घोड्याचा पाय लहान घेराचा असल्यामुळें येथें बांधलेली दोरी खालीवर होत नाहीं). ७ एक मुलींचा खेळ. -मखेपु ३३६.८ गर्भ (हातानें चांचपून पाहील्यास गर्भाचा आकार मुठीसारखा लागतो असें म्हण- तात यावरून). 'ही मूठ मुलाची किंवा मुलीची आहे.' ९ (कों.) शेतांतील पीक कापण्याच्या वेळीं करावयाचें कुणबी लोकांचें देव- कृत्य. [सं. मुष्टि; प्रा. मुठ्ठि; पं. मुठ्ठ; सिं. मुठि; उरि. मूठि; बं. मूठ; हि. गु. मूठ, मुठ्ठि] म्ह॰ झांकली मूठ सवा लाखाची उघ- डली मूठ फुकाची = आपण बोललों नाहीं तोंपर्यंत आपलें अज्ञान झांकून राहील, बोलल्यास तें लोकांना दिसून येईल. (वाप्र.) ॰आळवणें-दुसऱ्यास देण्याचें थांबणें; चिक्कूपणा करणें, करूं लागणें ॰दाबणें-चेपणें-गार करणें-भरणें-लांच देणें; लांचाची रक्कम मुठींत किंवा हातांत देणें. 'त्यानें पन्नास रुपयांनीं फौजदा- राची मूठ दाबली तेव्हां तो सुटला.' ॰भर मास चढणें- वाढणें-लठ्ठ होणें; गर्विष्ठ होणें; फायदा झाल्यानें अत्यानंद होणें. ॰मारणें-मंत्रसामर्थ्यानें दुसऱ्याचा नाश करणें; प्राण घेणें. मुठींत असणें-(एखाद्याला) पूर्णपणें किंवा सर्वथैव ताब्यांत, कह्यांत, अधिकारांत असणें. 'श्रोत्यांच्या साऱ्या मनोवृत्ति या वक्त्याच्या जशा काय मुठींत होत्या.' -नि. मुठी-मुठेळ्या-मुठ्या मारणें-मुष्टिमैथुन करणें. मुठ्या मारीत बसणें-(व.) माशा मारीत बसणें; निरुद्योगी राहणें; आळसानें वेळ घालविणें. एका मुठीचीं माणसें-एकाच कायद्याखालीं किंवा हुकमतीखालीं येणारी माणसें. एका मुठीनें-एकदम; एकाच हप्त्यानें, एकाच वेळीं. (रुपये देणें, घेणें, फडशा पाडणें). झांवल्या मुठीनें-गुप्त- पणें; खरी गोष्ट बाहेर पडूं न देतां; कोणाजवळ काय आहे किंवा कोण कसा आहे तें बाहेर फुटूं देतां. सामाशब्द- ॰पसा-पु. पसामूठ पहा. ॰मर्दाई-स्त्री. १ अन्यायानें व दांडगाईनें किंवा पाशवी सामर्थ्यानें दुसऱ्याचा पैसा इ॰ लुबाडणें. २ दांडगाई; जुलुमजबरदस्ती. ३ चोर, भामटे इ॰नीं एका जुटीनें हल्ला करून लुबाडणें. ॰माती-स्त्री. (प्रेत इ॰) पुरणें; पुरण्याचा अंत्य संस्कार. (क्रि॰ देणें). मुठवा-पु. (नाविक) भुरड्याच्या थोडें मागें दोन बोडतास दोन लांकडी जाडे खुंट ठोकतात त्यापैकीं प्रत्येक. याचा उपयोग टांकणीचें शेवट अडकविण्यासाठीं घोंस नाळीस चेपणीच्या वेळीं अगर पागर बांधण्यासाठीं होतो. मुठळी-स्त्री. १ मूठ. २ मुठींत धरून हलविणें. मुठा-पु. १ पाणी भरण्याचें पखालीचें तोंड. २ (राजा.) चुलीतींल विस्तव विझून जाऊं नये म्हणून तींत पुरून ठेविलेला शेणाचा गोळा. (क्रि॰ घालणें; पुरणें). ३ वातविकारानें किंवा भयानें पोटांत उठणारा गोळा. ४ रेशीम, सूत इ॰चा गुंडा, लड. मुठाण-न. एकजूट; संघ; टोळी; चांडाळ- चौकडी. मुठाळणें-सक्रि. हातीं धरणें; मुठींत धरणें. 'झाला सकोप, परजाळा मुठाळुनि भुजालागि थापटिच करें ।' -आमा ४५. मुठियो-पु. १ (गो.) तांदुळाच्या पिटाचें गूळमिश्रित पिंडाकृति एक पक्वान्न. २ (गो.) सोनाराचें एक हत्यार मुठी- स्त्री. (राजा.) खोबऱ्याची गोणी; खोबरें भरलेलें पोतें. मुठीचा खेळ-पु. मंत्रानें भारलेलें धान्य मुठींत घेऊन तें एखाद्या पदार्था- वर टाकून केलेला जादूचा खेळ. मांगगारूड पहा. मुठ्ठा-वि. १ रेशीम, कलाबतू इ॰ पुष्कळ प्रकारचे धागे एकत्र बांधून केलेला बिंडा. मुठ्या-पु. १ एका जातीचा खेंकडा. २ नांगराच्या रुम- ण्यांत बसविलेली, हातांत धरावयाची खुंटी; मूठ. [म. मूठ; का. हिडी; गुज. हडेली] मुठ्याल-न. (हेट.) मुठेल पहा. मुठ्यो- पु. (कु.) १ काथ्या ठोकण्याचें लांकूड. २ (कु.) लाह्या, उमलें इ॰ भाजतांना तें ढवळण्याकरितां काठीच्या टोकाला फडकीं गुंडा- ळून केलेलें चेंडूच्या आकारचें साधन; घाटणा. मुडका-पु. (व.) पेंढी; गठ्ठा. मुडगा-पु. १ मूठभर धान्य. २ केरसुणीची मूठ.

दाते शब्दकोश

धस

पु. १ खुंटी; टोंक; अग्र; खिळा; कुसळ किंवा दुसरा एखादा पुढें आलेला, अणकुचीदार पदार्थ (ज्यामध्यें अडकून वस्त्र इ॰ फाटेल असा). 'या कुंपणाचा धस लागून धोतर फाटलें.' २ अविचारी, उद्धट, आडदांड माणूस. 'जसा न कळे उपदेश । धस ऐसें त्या नांव ।' तुगा २९१३. ३ दरड; कपारी; उभा उतार नदी तीर, डोंगराची बाजू इ॰ प्रमाणें). 'दोन्ही बाजूचा कडा उंच असून त्याचे धस अगदीं उभे तुटलेले.' -विवि ८.१.१९. ४ ज्वारीचें ताट, खुंट, अवशिष्ट मुळखंड; थोंठ; फण. 'नसे पल्लव लंबित धस उभा परि कोण छ्याया ।' -दावि १८६. ५ भीति, दुःख इ॰ हृदयाला जो धक्का बसतो तो. (क्रि॰ होणें). ६ (व.) बीळ; भोंक. 'आजवर केलें तें धसांत गेलें.' -स्त्री. जोराची मुसंडी; हल्ला; चाल (क्रि॰ मारणे). [ध्व. धस ! प्रा. धस] धशीं-धसास-धसावर-घालणें- लावणें-देणें- १ साहसी, कठोर उपाय योजून एखादें काम बिघडविणें; युक्ति न लढविणें. २ अपकार करणें; छळणें. धसास लावणें-शेवट करणें; कड पाहणें; तडीस नेणें. धस देणें-मारणें- धज देणें, मारणें पहा. धसावर धस घालणें-अपकारावर अप कार करणें; एकसारखें छळणें. धसक-धसकफसक पहा. धस- कट-न. लहान धस; कुसळ; धस अर्थ ४ पहा. 'रुतले अंगांगीं कांटे धसकट ।' -विवि ८.९.२२०. -वि. १ जाडेंभरडें; भसाड. २ (ना) अडाणी; आडदांड. धसकधट्या, धसकनंदन-पु. १ दांडगाईनें कोणतेंहि काम करणारा माणूस; आडदांड माणूस; आदळआपट करणारा माणूस. २ अकुशल कामकरी; हेंगाडा, अडाणी कारागीर. धसकट्या, धसक्या, धसकटराव-पु. १ दांडगेश्वर; आड- दांड; अडाणी (मजूर, कामकरी). २ धश्चोट पहा. धसमुसळ्या; धसफसा. [धसकट, धस] धसकणें-उक्रि. १ हिसकणें; जोरानें ओढणें; हासडणें (कांट्याकुट्यावरून वस्त्र इ॰). २ जोरानें घालणें; खुपसणें; भोंसकणें; आडदांडपणें शिरकवणें. -अक्रि. अड- कणें व फाटणें; आवाज होऊन फाटणें. २ काडदिशी मोडणें (काटकी, फांदी). ३ दगड इ॰ उलथून पडणें. [प्रा. धस; हिं. धसकना] धसकफसक-स्त्री. बेदरकार, बेफाम वर्तणूक. धसाफशी पहा. -क्रिवि. घाईघाईनें; निष्कळजीपणानें; उद्धटपणानें (बोलणें; लिहिणें; वाचणें वगैरे). [धसक द्वि.] धसकमुसळा-पु. (ना.) आडदांड (मनुष्य); धसमुसळा पहा. धसका-पु. १ आकस्मित भीति, दुःख, इ॰ नें मनाला बसलेला धक्का, चरका. २ तलवारीचा फटकारा; काठीचा तडाखा; हाताचा रट्टा; धबका. ३ हिसका, हिसडा. [धस; धसक प्रा. धसक्क] धसकावणी-स्त्री. तासणी; तोडणी; छाटणी. धसकाविणें-उक्रि. १ जोरानें, रागानें खच्ची करणें; तोडणें; ओढणें; सपासप तोडणें; छाटणें; खच्ची करणें. २ अडथळ्यांना न जुमानतां हिसडे देऊन ओढणें; फरपटणें. धस- कावून बोलणें-भीडभाड न ठेवतां स्पष्ट, निर्भीडपणानें बोलणें. [धस] धसणें-अक्रि. १ जोरानें शिरणें; घुसणें; जाणें; एकदम बसणें; भोंक पाडणें. 'शपथ पुरःसर दीप्तज्वलनज्वालांत जाहली धसती ।' -मोमंत्रयुद्ध ७४०. २ धजणें पहा. ३ धसाला लावणें. ४ अतिशय मन, लक्ष लावणें (अभ्यास, काम याकडे). -उक्रि. जोरानें (आंत, पुढें, कडे) ठोकणें; घासणें; ठासणें; शिरकवणें; सारणें. [धस; हिं. धसना; गु. धसको] धसदार, धसाव, धसावणें- धजदार, धजाव वगैरे पहा. धसधस-स्त्री. १ धडधड. (जिवाची- उराची-धसधस). २ (ल.) भीति; धास्ति. 'मला त्या वाटेनें जायाला धसधस वाटतें.' [ध्व. धस द्वि.] धसधस-सां- क्रिवि. १ उडून; जोरजोरानें (उडणें). 'काळीज धसधस करतें, उडतें' जीव धसधस करतो, ऊर उडतो.' 'गांवढेकरी उंद- राचा ऊर धाकानें धसधसां उडूं लागला.' -छत्रे (इसाबनीति). २ कडाडदिशीं मोडून, फाटून, तुटून, कोसळून, पडून, फुटून, इ॰. धसधसणें-अक्रि. धसधस होणें; धडधडणें, उडणें. (जीव, काळीज, ऊर, छाती, हृदय) [धस + धस] धसफस-फूस- स्त्री. (भांडण सुरू होण्याची आधींची) चरफड, आदळआपट; घालून पाडून बोलणीं; कुढें भाषण. [ध्व. धस द्वि.] धसमस- (कों.) धामधूम. धसमुसळा-ळ्या-वि. १ गलेलठ्ठ; ढोण्या; ठोंब्या. २ दांडगाईनें निष्काळजीपणें काम करणारा; आडदांड. धसक्या पहा. 'हा धसमुसळ्या दिसतो.' -नाम ८. [धस + मुसळ] धसरड-स्त्री.(कों.) नदीकांठची, टेकडीवरची उभी उतरण; दरड. [धस = पडण्याचा आवाज + रड प्रत्यय] धसाडा-वि. (व.) जाड; खरबरीत (सूत, गवत, कोणताहि पदार्थ). २ दांडगा; धसमुसळ्या (माणूस). -पु. १ (ल.) चापटी; धपाटां; रपाटा २ (ना.) रागानें बोलणें; धमकावणें. 'कमळी फार हट्ट करूं लागली पण मी जेव्हां एक धसाडा दिला तेव्हां बसली गप.' ३ बाटूक; खुंट; धस; चोय. ४ हिसका; धका. धसाधशा-स्त्री कापाकापी तुकडे तुकडे ( रणें); छाटाछाटा; एकदम, जोरजोरानें कापणें तोडणें. [ध्व.] धसाधस-सां-क्रिवि. १ खसाखस, सपासप फटाफट, तडातड (तोडणें, मोडणें, फाडणें; इ॰). 'परि तोडिलेचि वदनीं तृण धरितेही अगा धसाधस ते ।' -मोऐषिक १.४. २ धड- धड होऊन (जीव-काळीज करणें, उडणें). ३ ओक्साबोक्सीं (रडणें). ४ चटकन (निसरणें). [ध्व. धसधसचा अतिशय] धसा फशा-स्त्री. १ हिसकाहिसकी; निष्काळजीपणाचें काम; ओढाताण; आदळआपट. २ भांडणापूर्वींची चरफड; धसफस पहा. ३ कापा कापी; छाटाछाटी (करणें-तासणें) [ध्व. धस द्वि.] धसा फसा-क्रिवि. धसाफशा पहा. धसाल-ली-ल्या-वि. धसक धट्या पहा. धसासा-पु. धसधस; छातीचा टोका. 'पडति बहुत तेव्हां रुक्मियाचे धसासे ।' -सारुह ७.४ [धस द्वि.] धसाळ-पु. १ विसराळू. धसाळ जाणें-विसरून जाणें. 'परि बोलत बोलत प्रेमभावें । धसाळ गेलों ।' -ज्ञा ११.१६१. २ दांडगा; आडदांड; धसाल; धसकनंदन. ३ अविचारी; वेडा. 'केवी धसाळ म्हणो देवा तूंत । तरी अधिक हा बोलू ।' -ज्ञा १०.३२०. ४ मोठा; प्रचंड. 'नामें एवढें धसाळ देणें ।' -एभा ६.६. [धस + आळ प्रत्यय. (तुल॰) प्रा. दे. धसल = विस्तीर्ण] धसी- वि. उतावीळ. धशा पहा.धस्स-न. भीति, दुःख यांचा हृदयास, मनाला बसलेला धक्का; आघात, धडकी. धक्का पहा. [ध्व. धस] धस्समसूळ-वि. धसमुसळा पहा.

दाते शब्दकोश

बोट

न. १ हाताची किंवा पायाची अंगुलि किंवा आंगठा. २ बोटाच्या रुंदी, जाडी किंवा लांबीइतकें परिमाण. ३ बोटभर, अगदीं थोडें, बोटाला चिकटेल इतकें परिमाण. उदा॰ मधाचें बोट; तुपाचें बोट. ४ (ल.) डाग; काळिमा; अपकीर्ति; बोटाचा ठिपका उठेल एवढा डाग. उदा॰ गालबोट. 'रूपसा उदयलें कुष्ट । संभा- विता कुटीचें बोट । तया लाजा प्राणसंकट । होय जैसें ।' -ज्ञा १६.१७८. [का. बोट्टु; सं. पुट?] म्ह॰ पांच बोटें कोठें सारखीं असतात काय? किंवा पांचीं बोटें सारखीं नसतात = एक वस्तु दुसरीसारखी कधीं नसतें. (वाप्र.) ॰करणें-दाखविणें- बोटानें एखाद्या वस्तूचा निर्देशकरणें; सुचविणें. (॰एखाद्याकडे) दाखविणें-भलत्यालाच दोषी ठरविणें. ॰शिरकणें-एखाद्यां कामांत प्रवेश मिळणें; चंचुप्रवेश होणें (पुढील मोठ्या फायद्याच्या दृष्टीनें). ॰लावल्यानें पोट येणें-(व.) (ल.) थोडक्या बोलण्याचा राग येणें. बोटावर नाचविणें-आपणाला पाहिजे त्या- प्रमाणें एखाद्याकडून सर्व गोष्टी करून घेणें; एखाद्यास पूर्णपणें ताब्यांत ठेवणें; हवें तसें खेळविणें. बोटें मोडणें- १ बोटांचीं पेरें किंवा सांधे मोडून त्यांचा आवाज काढणें, करणें. २ (ल.) जागच्या- जागीं चरफडणें; निभर्त्सना करणें; शापणें; ठपका ठेवणें. 'विधिवरि बोटें मोडुनि कोपें खातात दांत बाहेर ।' -मोस्त्री ४.२६. दोन बोटें स्वर्ग उरणें-अभिमानानें फुगून जाणें; गर्वानें ताठून जाणें; अतिशय श्रीमंत असणें. त्याची बोटें त्याच्याच डोळ्यांतं घालणें-त्याच्याच सांपळ्यां त्याला पकडणें; त्याच्याच युक्तीनें त्याला धरणें. या बोटाची थुंकी त्या बोटावर करणें- लटपटपंचीनें एखाद्या वस्तुचें स्वरूप निराळें भासविणें; फसविणें; बोलण्यांत किंवा कृतींत मेळ नसणें. (मुलें पालथा हात करून मधल्या बोटाला थुंकी लावतात व मग अलिकडचें एक बोट एकदां व पलीकडचें एक बोट एकदां अशीं बोटें त्या मधल्या थुंकी लाव- लेल्या बोटास जुळवून दाखवितात. या योगानें जी थुंकी एकदां अलीकडील बोटावर दिसते तीच दुसर्‍यांदां पलीकडील बोटावर दिसल्याचा भास होतो यावरून). सामाशब्द- ॰का-वि. १ बोथट; बुटका; ठेंगणा. २ बोटूक; आंखुड व सरळ चिंच येणारें (झाड). ॰काम-न. घरांतील किंवा संसाराचें अगदीं बारीकसें काम, उद्योग. ॰खत-न. हिशोबाच्या निरनिराळ्या बाबींचे किंवा खात्यांचें केलेलें पत्रक किंवा टांचण; या बाबी लिहिण्या- करतां आंखलेला कागद. ॰घेवडा-डी-पुस्त्री. एक प्रकारचा घेवडा आणि त्याचा वेल. ॰चेपा-वि. १ बोटानें दबला किंवा चेपला जाणारा; चेपला जाईल इतका शिजलेला किंवा पिक- लेला (भात, फळ, आंबा इ॰). २ (ल.) थोडयाशा प्रयत्नानें साध्य होण्याच्या स्थितीस आलेलें (काम). [बोट + चेपणें] ॰धरणी माप-न. धान्य मोजतांना मापाच्या वर डाव्या हातांचे बोट धरून भरलेलें माप. अशा रीतीनें अधिक माप भरून घेणें हा एक हक्क असे; वरीलप्रमाणेंच पण बोटाऐवजीं आडवा हात धरणें. या दोन्ही मापांच्या उलट रास्ती माप. ॰धारी-वि. बोटाच्या रुंदीइतका रुंद व ज्यांत काहीं नक्षी नाहीं असा कांठ किंवा किनार असलेलें (धोतर). 'कासे कसिला पितांबर । बोट- धारी ।' -कथा २.११.९०. बोटवापु. १ गव्हाच्या पिठाचा तांदुळाच्या आकाराचा खिरीकरितां केलेला गव्हाला. २ सुमारें करंगळीच्या टोंकाइतकें लांब व रुंद असें कपाळास लावलेलें कुंकू. बोटवातस्त्री. बोटांवर पीळ देऊन एक प्रकारची वळलेली, देवापुढें जाळण्याची कापसाची वात. बोट(टा)ळ(ल)णेंउक्रि. फळें इ॰ बोटांनीं दाबून टणक किंवा मऊ आहेत हें पाहणें; चिवडणें; दाबलीं गेल्यानें बिघडणें; चिवडल्यानें वाईट होणें. बोटावरील जोर- पु. फक्त बोटें टेंकून काढण्याचा दंडाचा एक प्रकार. बोटांचे ठसे- पुअव. वहिमी गुन्हेगारांच्या हातांच्या बोटांचे छाप घेण्याची सरकारी रीत. यांवरून गुन्हेगारांचा शोध लावतां येतो. बोटा एवढें पोर-न. अगदीं लहान वयाचें मूल. बोटी-स्त्री. १ बोटवे किंवा शेवया करण्याकरतां गव्हाच्या पिठाची केलेली गोळी; लाटी. २ सूत काढण्यासाठीं घेतलेली कापसाची लडी. ३ सुकवून खारवलेला मासा. ४ (कोंबड्याचें इ॰) शिजवलेलें मांस. [हिं.; फा.] बोटूक- न. १ आंखूड व सरळ चिंच; कोंगाळेंच्या उलट. २ एक चिंचोका असलेला एकच पेर्‍याचा चिंचेचा तुकडा. ३ थोंटूक; बुंठण; थोंटण; ठुंगण (वात, दोरी इ॰ चें). [का. बोट्टग]

दाते शब्दकोश

घोडा

पु. १ खूर असलेला एक चतुष्पाद प्राणिविशेष. ह्याचा उपयोग ओझे वाहण्याच्या, गाडी ओढण्याच्या व बसण्याच्या कामीं करतात. ह्याच्या जाती अनेक आहेत. अरबी घोडे जग- प्रसिद्ध आहेत. लहान घोड्यास तट्टू व घोड्याच्या पोरास शिंगरूं म्हणतात. घोड्याच्या आकृतीवरून, गतीवरून, उपयोगा- वरून व लक्षणेनें हा शब्द अनेक वस्तूंस लावतात. २ बुद्धिबळाच्या खेळांतील एक मोहरा. हा सर्व बाजूंनीं दोन सरळ व एक आडवें (अडीच) घर जातो. या मोहर्‍याचा विशेष हा आहे कीं हा इतर मोहर्‍यांच्या डोक्यावरून उडून जातो, तशी गति इतर मोहर्‍यांना नसते. ३ बंदुकींतील हातोडीच्या आकराचा अव- यवविशेष. हा दाबला असतां ठिणगी उत्पन्न होते व बंदूकीचा बार उडतो; चाप. ४ (मुलांचे खेळ) दोन पायांत काठी घालून (तिला घोडा मानून) मुलें धांवतात तो काठीचा घोडा. ५ (उप.) मूर्ख व ठोंब्या असा वयस्क मुलगा; वयानें मोठा पण पोरकट मनुष्य. ६ वस्त्रें, कपडे ठेवण्यासाठीं खुंट्या ठोकलेला खांब; स्नान करणार्‍या माणसाचे कपडे ठेवण्याकरितां जमिनींत रोंवलेली काठी, खांब; (इं.) स्टँड. ७ (ल.) शरीर वाहून नेतात म्हणून पायांस लक्षणेनें (दहाबोटी) घोडा असें संबोधितात; तंगड्या. 'आमचा दोन पायांचा घोडा आम्हाला हवें तेथें वाहून नेईल.' ८ पाळणा टांगण्यासाठीं एका आडव्या लांकडाला चार पाय लावून करतात ती रचना; घोडी. ९ पालखीचा दांडा ज्याला बसविलेला असतो तें दुबेळकें बेचक; पालखीं तबे- ल्यांत वगैरे ठेवतांना ज्यावर ठेवतात तीं दुबळकें असलेलीं लाकडें प्रत्येकीं. १० गाड्याच्या बैठकीच्या चौकटीचीं दोन बाजूंचीं लांब लांकडें प्रत्येकी; गाडीच्या दांडयास आधार द्याव- याचें दुबेळकें. ११ मूल रांगावयास लागलें असतां दोन हात व दोन गुडघे जमीनीला टेकून करतें ती घोड्यासारखी आकृति. (क्रि॰ करणें). १२ मृदंग; पखवाज ठेवण्याची घडवंची; घोडी; (दिवे इ॰ लावण्याची) दोन बाजूस पायर्‍या असलेली घडवंची; (पिंपे, पेट्या ठेवण्याची) लांकडी घडवंची. १३ नारळ सोलण्याचा, शेंड्यास सुरी बसविलेला खांब; नारळ सोलण्याचा एक प्रकारचा सांचा. १४ समुद्राच्या भरतीच्या पाण्याचा चढ, फुगोटी, फुगारा; लाटेचा उंच भाग; नद्यांच्या मुखांतून वर गेलेलें समुद्राच्या भरतीचें पाणी. -सृष्टि ५७. १५ ओबडधोबड असा आंकडा, फांसा, पकड. १६ (ल.) घोडेस्वार. 'तीन हजार घोडा पेशव्यांचे तैनातींत ठेवावा.' -विवि ८.७.१२९. १७ दाराच्या दुहेरी चौकटीच्या वरच्या बाजूचे, परस्पराला जोडणारे दोन लाकडी तुकडे (त्यांच्याच जोडीच्या खालच्या बाजूच्या तुकड्यांस छिली म्हणतात). १८ (खाटीक इ॰ कांचें) साकटणें, सकोटन; खाटकाचा ठोकळा. १९ (मुद्रण) केसी व ग्याली ठेवण्यासाठीं केलेली घडवंचीवजा चौकट. २० फळा, चित्रफलक इ॰ उभा ठेवण्याची लाकडी उभी चौकट. २१ (कों.) रहाटगाडग्याचें कोळबें ज्यावर ठेवतात ती लांकडी चौकट. २२ (पोहोण्याचा) चार भोपळ्यांचा तराफा. २३ (गो.) (विटी दांडूचा खेळ) विटी मारण्याचा एक प्रकार. (क्रि॰ मारणें). [सं. घोटक; प्रा. घोड; गु.घोडो; सिं. घोडो; स्पॅनिश जि. गोरो; अर. घोरा] घोडी-स्त्री. १ घोडा या जातीच्या प्राण्याची मादी. २ सतार, तंबोरा इ॰ तंतुवाद्यांच्या भोपळ्याच्या मध्यावर हस्ती- दंती अगर लांकडाची पाटाच्या आकृतीची एक इंची किंवा दीड- इंची पट्टीची बैठक; तिच्यावरून तारा पुढें खुंटीस गुंडाळलेल्या असतात. ३ मुलांना शिक्षा देण्याकरितां जिला हातानें धरून शिक्षा दिलेला लोंबकळत असतो अशी आढ्यापासून लोंबणारी दोरी, फांसा; मुलांस टांगण्यासाठीं उंच बांधलेली दोरी. अशी शिक्षा पुर्वीं शाळांतून फार देत. (क्रि॰ घेणें; देणें). 'एखाद्या मुलांशी माझं वांकडं आलं कीं, रचलंच त्याच्यावर किटाळ आणि दिलीच त्याला पंतोजीकडून घोडी.' -चंद्रग्र ८०. ४ उभें राहून पखवाज वाजविण्याकरितां पखवाज ठेवावयाची घडवंची. 'इत- क्यांत देवळाच्या एका कोंपर्‍यांत मृदंग ठेवावयाची उंच घोडी सुनंदाला दिसली.' -सुदे २५. ५ गवत इ॰ वाहण्याकरितां खटार्‍यावर उभारलेला सांगाडा, चौकट. ६ फळा जमीनीपासून उच ठेवण्याकरितां व त्याला उतार देण्याकरितां केलेली लांकडी चौकट, सांगाडा. ७ वयस्क असून पोरकटपणा करणारी, खिदड- णारी मुलगी; खिदडी; धांगडधिंगी; भोपळदेवता; घोडकुदळ. ८ (सुतारी) तासावयाचें लांकूड हलूं नये म्हणून त्याला आधार- भूत असें दुसरें लांकूड, चौकट इ॰ सोईनें बसवितात तें. ९ (विणकामांत) सूत उकलण्यासाठीं केलेलें लांकडी चौकटीसारखें साधन. १० (सोनारी) पायांत घालावयाच्या सांखळ्यांच्या कड्या वांकविण्यासाठीं असलेला बोटाइतका जाड असा निमु- ळता मोळा. ११ (हेट. नाविक) पोरकें (लहान) शीड उभें करण्यासाठीं असलेलें कमानीसारखें लांकूड. १२ बंधार्‍याच्या मुखाशीं (पाणी सोडण्याच्या ठिकाणीं) पडद्यासारखी बांधलेली भिंत. हिच्यावरून पाणी जात असतें. १३ (हेट.) गलबताच्या कडेस शौच्यास बसण्याकरितां टांगलेली लांकडी चौकट. १४ सांकटणें; सकोटण. घोडा अर्थ १७ पहा. १५ तीन पायांचें दिवा ठेवण्याचें बुरडी तिकाटणें, तिवई. १६ पाटास जे दोन आडात मारितात ते प्रत्येकी. १७ हत्तीवरील चौकट; हौदा. 'साहेब नौबतीकरितां हत्तींवर लाकडी घोडी घालून...' -ऐरा ९.५०६. १८ उभें खुंटाळें. (इं.) स्टँड. 'तिकोनी खुंट्यांची घोडी आणि रुमाल ठेवावे ' -स्वारीनियम ७०. १९ सामान ठेवण्याचा घोडा. घोडें-न १ सामा (लिंगभेद न धरतां) घोडा या जातीं- तील जनावर. ' कृष्णाकांठचीं घोडीं सडपातळ पण चपळ अस- तात.' २ खटार्‍याच्या साटीच्या चौकटीचीं दोन बाजूंचीं उभीं लाकडें; घोडा अर्थ ९ पहा. घोडकें अर्थ १ पहा. ३ चार भोंपाळे लावलेला पाण्यावर तरंगणारा तराफा. घोडा अर्थ २१ पहा. ४ (व.) गाडीचे दांडे-जूं ज्यावर ठेवतात तें दुबेळकें. घोडा अर्थ ९ पहा. [सं. घोडा] (वाप्र.) घोडा आडवा घालणें- (एखाद्या कार्यात) अडथळा, विघ्न आणणें. 'आणि म्हणूनच तुम्ही घोडा आडवा घातलांत वाटतं ?' -चंद्रग्र ६८. ॰उभा करणें-बांधणें-(घोडा) थोडा वेळ थांबवणें; जरासें थांबणें; घाई न करणें (घाईंत व धांदलींत असणार्‍या मनुष्यास उद्देशून ह्या वाक्प्रचाराचा उपयोग करतात.) ॰काढणें-१ (बांधून ठेव- लेला घोडा बाहेर नेणें) घोडा हांकारणें, पिटाळणें २ (ल.) (एखाद्यानें) पळ काढणें; पोबारा करणें; निसटणें. ॰चाल- विणें-(कर.) (ल.) डोकें खाजवणें; युक्ति लढविणें. ॰टाकणें- घोडा फेंकणें; उडवणें; अंगावर घालणें. 'आरेरे टाकौनि घोडा । भणती यांचिआं जटैं उपडा । ' -शिशु १४१. ॰मैदान जवळ असणें-(घोडा धांवण्यांत कसा काय आहे याची परीक्षा त्यास मैदानांत पळवून करतां येते यावरून) ज्याची परीक्षा करा- वयाची तो पदार्थ, मनुष्य व परीक्षेस लागणारी सामग्री हीं दोन्ही जवळ असणें असा अर्थ होतो; एखाद्या गोष्टीची निरर्थक चर्चा न करतां तिला कसोटीला लावणें, कसोटीचा वेळ किंवा सामुग्री जवळ असणें; हा सूर्य हा जयद्रथ. 'कोरडी बढाई कशाला पाहिजे ? घोडामैदान जवळच आहे.' ॰हांकणें-पळून जाणें; निघून जाणें; पोबारा करणें; घोडा काढणें पहा. 'पंतोजीबुवास पाहून त्या पोरानें घोडा हांकला. 'घोडी काढणें-भरविणें- सक्रि. (माण.) घोडीस घोडा दाखविणें, देणें; घोडी फळविणें. घोडी घेणें-(एखाद्याशीं) घांसणें; कटकट करणें; मत्सरबुद्धीनें दोष काढणें. घोडें उभें करणें-अडथळा आणणें. 'बाळासाहेब नातूसारख्यांनीं विशेष प्रसंगीं एखादें घोडें उभें केलें तरी त्याकडे दुर्लक्ष्य करून ज्यानें त्यानें आपला पंथ सुधारावा.' -आगर ३.१४४. (एखाद्याचें) घोडें थकणें-एखाद्यानें (प्रवास, धंदा, व्यापार, अभ्यास इ॰ कांत) थकून जाणें; हतबल होणें; पुढें रेटण्याची शक्ति न उरणें. (एखाद्यानें आपलें) घोडें पुढें दामटणें-ढकलणें-हांकणें-घालणें-१ इतरांच्या पूर्वीं आपला कार्यभाग साधून घेण्याचा घाईने प्रयत्न करणें. 'या शर्यतींत जो तो आपलें घोडें पुढें दामटायला पहात आहे. -नि. 'ब्रिटिश वसाहतीनीं आपल्या हक्कांचें घोडें पुढें दामटलें.' -सासं २.४४६. २ लुब्रेपणानें दुसर्‍यांच्या संभाषणांत तोंड घालून त्यांच्यावर आपले विचार लादणें. (एखाद्याचें) घोडें मारणें-एखाद्याचें नुकसान करून त्याला राग आणणें (पूर्वीं प्रवासाचें मुख्य साधन घोडें असे. प्रवासाचें घोडें ठार केल्यास त्याचा प्रवास थांबत असे व त्यामुळें त्याचें फार नुकसान होई यावरून) एखाद्याचें फार नुकसान करणें. 'मी काय तुझें घोडें मारलें आहे ?' (आपलें) घोडें पुढें ढकलणें-आपलें काम प्रथम करूं लागणें; आपल्या कामाला महत्व देणें. गांडी- खालचें घोडें-संसारादि निर्वाहक मालमत्ता, वाडी इ॰ आधारभूत मुख्य साधन. म्ह॰ आपले गांडीखालचें घोडें गेलें, मग त्यावर महार बसो कीं चांभार बसो. घोडीं आडवीं घालणें-१ शत्रूवर तुटून पडून त्याच्या चालीला, पळाला अड- थळा करणें. २ (ल.) (एखाद्यास त्याच्या कामांत) संकट, अडथळा, व्यत्यय आणणें. 'जर त्यांणीं आपल्यावर चालून घेतलें तर आम्ही आडवीं घोडीं घालतों. ' -ख ४२९७. घोडीं घालणें-घोड्यांच्या अनीना उचलणें-घोडदळांतील सर्व स्वारांनीं इर्षेनें शत्रूवर एकदम तुटून पडणें. -होकै ३. घोड्याच्या, हत्तीच्या पायांनीं येणें व मुंगीच्या पायांनीं जाणें-(आजार, संकट, अडचण इ॰ च्या संबंधांत हा वाक्प्र- चार योजतात) जलदीनें येणें व धिमेधिमे जाणें; आजार इ॰ जलदीनें येतात पण अतिशय हळू हळू नाहींसे होतात यावरून वरील वाक्प्रचार रूढ आहे. (एखाद्याच्या) घोड्यानें पेण (पेंड)खाणें-या वाक्प्रचारांत पेण = प्रवासांतील टप्पा, मुक्का- माची जागा या ऐवजीं चुकीनें पेंड हा शब्द उपयोगांत आणतात. लांबच्या प्रवासांत निरनिराळ्या टप्प्यांच्या ठिकाणीं घोडीं उभीं राहत. त्यामुळें टप्प्याचें ठिकाण आलें कीं घोडें तेथें अडे, पुढें जात नसे. यावरून वरील वाक्प्रचार एखादें कार्य करतांना कोणी अडून बसल्यास त्यास. 'तुझें घोडें कुठें पेण खातें' असें विचारतांना उपयोगांत आणतात. घोड्यापुढें धावणें-जिकीरीचें, दगदगीचें; कष्टाचें काम करणें. (एखा- द्याच्या) घोड्यापुढें धावणें-एखाद्याची कष्टाची सेवा, चाकरी करणें; (उप.) एखाद्याची ओंगळ खुशामत करणें; एखाद्याची थुंकी झेलणें. घोड्यावर घोडा घालणें-(लिलांव इ॰ कांत) चढाओढ करणें; एखाद्यानें केलेल्या किंमतीपेक्षां अधिक किंमत पुकारणें; उडीवर उडी घालणें. घोड्यावर बसणें-दारू पिऊन झिंगणें;ताठ्यांत असणें. घोड्यावर बसून येणें-घाईनें येणें; आपलें काम तांतडीनें करण्यास दुसर्‍यास घाई करणें. सर घोड्या पाणी खोल किंवा पाणी पी-(घोड्या मागें हट, पाणी खोल आहे. तेथूनच पाणी पी) गोष्ट मोठी कठिण आहे, मागें परततां येणें शक्य आहे तोंच परतावें याअर्थी. म्ह॰ १ घोडा आपल्या गुणानें दाणा खातो = चांगला घोडा खूप काम करून आपल्याला खाद्यहि जास्त मिळवतो. त्याला जास्त देण्यास मालक असंतुष्ट नसतो. यावरून चांगला चकर आपल्या गुणानें व मेहनतीनें मालकाकडून पगार वाढवून घेतो. २ घोडा स्वार (मांड) ओळखतो = बसणारा कच्चा कीं पक्का आहे हें घोडा ओळखूं शकतो. (यावरून), आपला मालक कडक कीं नरम आहे हें हाताखालचीं माणसें ओळखूं शकतात. ३ (व.) जाय रे घोड्या खाय रे हरळी = घोड्याला हरळी खावयास मोकाट सोडल्यास (घोड्याला) तें चांगलेंच होईल, पथ्यावरच पडेल. म्ह॰-१ घोडा मरे भारें शिंगरूं मरे येरझारें = घोडी ओझें किंवा माणूम वाहून नेत असतां तिचें शिंगरूंहि तिच्याबरोबर जात असतें. घोडीच्या प्रत्येक हेलपाट्याबरोबर शिंगरूंहि हेलपाटा खातें. यावरून प्रत्यक्ष काम करणारास श्रम होतातच पण त्याच्या सहवासांत असणारांना सुध्दां जवळ जवळ तितकेच श्रम होतात. २ वरातीमागून घोडें = लग्नाच्या वरातीच्या मिरवणुकींत सर्वांच्या पुढें श्रृंगारलेलें कोतवाली घोडें चालवण्याची चाल आहे. यावरून वरात निघून गेल्यावर मागाहून श्रृंगारलेलें घोडें नेणें व्यर्थ होय किंवा औचित्यास धरून होत नाहीं. त्याप्रमाणें एखादी गोष्ट होऊन गेल्यावर मागाहून तत्संबंधीचीं साधनें जुळविणें व्यर्थ होय. २ माझें घोडें आणि जाऊं दे पुढें = इतरांचें कांहींहि होवो, माझें काम आधीं झालें पाहिजे. स्वार्थी माणसाची निंदा कर- तांना या म्हणीचा उपयोग करतात. समासांत घोडा शब्द पूर्व- पदीं आल्यास त्याचीं घोड किंवा कधीं कधीं घोडे अथवा घोड व घोडे, अशीं दोन्ही रूपें होतात. उ॰-घोडचूक; घोडेखोत; घोड (डे) चिलट इ॰. सामाशब्द-घोडकट, घोडकें-न. (घोड्याला तिरस्काराने लावावयाचा शब्द) रोडकें, अशक्त व थिल्लर घोडें; भटाचा तट्टू. घोडकुदळ-पु. १ (उप.) मुंजीचें वय झालेलें असून मुंज न झालेला मुलगा; घोडमुंज्या. २ -स्त्री. (उप.) उपवर असून लग्न न झालेली दांडगट नाचरी मुलगी; घोडी; घोडगी; भोपळ- देवता; घोडनवरी; घोडी पहा. घोडकूल-न. १ (गो.) लहान घोडें; तट्टू. २ (खा.) ओट्याच्या खांबावर तिरपा टेंकू (कर्ण) देऊन त्यावर कोरलेली घोड्याची आकृति. घोडकें-का-नपु. १ ज्याच्या भरीला करळ्या व तरसे घालून गाड्याची तक्तपोशी, बैठक तयार करतात अशीं चौकटींतील दोन बाजूचीं दोन उभीं लांब लांकडें. २ तेल्याच्या घाण्याच्या कातरीला खिळलेलें व जुंवाचा दोर बांधावयाचें लांकूड. घोडके-ढोरांचा गुरु. -गांगा २६. घोडकेळ-न. (क्क.) एक हलक्या जातीचें भसाडें केळें. [घोडा + केळें] घोडक्या-का-पु.-१ घोड्याचा खिजमतगार; मोतद्दार. 'घोड्यास शिपाई काय करिल घोडका ।' -ऐपो ३७२. २ चाबुकस्वार; अश्वशिक्षक; घोडा अर्थ ९ मधील शेवटचा अर्थ पहा. घोडकोस-पु. (गो.) तीन मैलांचा कोस. घोडगा-गी- पुस्त्री. (उप.) वयानें प्रौढ पण पोरकटपणा, नाचरेपणा अंगीं असलेला मुलगा, मुलगी; घोडा अर्थ ५ पहा. घोडी अर्थ ७ पहा. घोड(डे)गांठ-स्त्री. (बुद्धिबळांचा खेळ). एकमेकांच्या जोरांत असलेली घोड्यांची दुक्कल. घोडचवड-स्त्री. घोडदौड; घोडा चौफेर उडविणें; चवडचाल. 'घोडचवडीखालीं नाना पुण्याला आला.' -ऐपो १६२. [घोडा + चवड = विशिष्ट चाल] घोडचाल-स्त्री. घोड्याची चाल. (ल.) जलद चाल. [घोडा + चाल] घोड(डे)चिलट-न. मोठें चिलट; डांस; मच्छर. घोड- चूक-स्त्री. मोठी व अक्षम्य चूक. घोडचोट्या-वि. १ (मनुष्य). (अश्लील) घोड्याच्या चोटासारखा मोठा चोट ज्याचा आहे असा २ (निंदार्थीं) मुंज न झालेला, वाढलेला मुलगा; घोडकुदळ; घोड- मुंज्या. घोडजांवई-पु. (उप.) मोठ्या वयाचा नवरामुलगा; घोडनवरा. घोडजाळी-स्त्री.(भोंवर्‍यांचा खेळ) विरूद्ध पक्षाच्या भोंवर्‍याला खोंचा देऊन आपला भोंवरा दूर जाऊन फिरत राहील अशा रीतीनें भोंवरा फेकण्याचा प्रकार. [घोडा + जाळी = दोरी] घोडतोंड्या-वि. घोड्याच्या तोंडासारखा लांबट चेहरा अस- लेला; कुरूप; लांबट, ओबडधोबड तोंडवळ्याचा. [घोड + तोंड = चेहरा] घोडदळ-न. १ घोडेस्वारांचें सैन्य; फौज. २ सैन्यां- तील घोडेस्वारांचें पथक, तुकडी. [घोडा + दळ = सैन्य] घोड- दौड-स्त्री. घोड्यासारखें पळणें; घोड्याची दौड; जलद जाणें. [घोडा + दौड = पळणें] घोडनट-न. ज्याचें एक तोंड आढ्यावर व एक लगीवर येऊन दरम्यान तिरपें राहतें असें लांकूड ठोकतात तें. घोडनवरा-पु. (उप.) प्रौढवयाचा नवरामुलगा; घोडजांवई. घोड(डे)नवरी-स्त्री. (उप.) मोठ्या वयाची नवरी मुलगी, वधू; योग्य व सामान्य वयोमर्यादेबाहेर अविवाहित राहिलेली मुलगी. 'हे मोठमोठ्या घोडनवर्‍या घरांत बाळगल्याचे परि- णाम बरं !' -झांमू. घोड(डे)पाळणा-पु. घोड्याला (लांकडी चौकटीला) टांगलेला पाळणा; हलग्याना न टांगतां जमीनीवर घोड्यास अडकविलेला पाळण्याचा एक प्रकार. घोडा ८ अर्थ पहा. घोड पिंपळी-स्त्री. पिंपळीची मोठी जात; हिच्या उलट लवंगी पिंपळी. घोडपुत्र-पु. घोड्याला (विशेषतः बुद्धि- बळांतील घोड्याला) प्रेमानें किंवा प्रतिष्ठेनें संबोधण्याचा शब्द. [घोडा + पुत्र = मुलगा] घोडपेटें-न. १ दोन भोपळे पुढें व दोन मागें बांधून केलेला तराफा; घोडा अर्थ २१ पहा. २ भोंपळ्यावर दोन्ही बाजूस पाय टाकून घोड्यासारखें बसून पाण्यावर तरणें, तरंगणें. घोडबच्य-न. दुबळा घोडा पुष्ट होण्यास एक औषध. 'घोडबच्य पावशेर, राई पावशेर भाजलेलीं काळीं मिरें पावशेर ... मिश्रणापैकीं आतपाव दररोज देत जावें.' -अश्वप १.१७५. घोडबांव-स्त्री. (कु.) घोड्यांना पाणी पितां येईल अशा तर्‍हेनें बांधलेली विहीर. [घोड + बांव = विहीर] घोडबाही- स्त्री. १ दाराच्या दुहेरी चौकटीच्या आंतल्या चौकटींतील दोन्ही बाजूचे खांब. २ खटार्‍याच्या बैठकीच्या चौकटीच्या दोन बाजूंच्या लांब लांकडांपैकीं प्रत्येक; घोडकें, घोडें पहा; [घोडा + बाही = बाजू] घोडबाळ-वि. (उप.) पोरचाळे करणारा प्रौढ पुरुष, स्त्री; पोरकट माणूस. [घोडा + बाळ] घोडब्रह्म- चारी-पु. (उप.) लग्नाचें वय कधींच झालें असूनहि अविवाहित राहिलेला मुलगा; घोडनवरा. [घोडा + ब्रह्मचारी] घोडमल्ली- स्त्री. (बुद्धिबळांचा खेळ) घोड्यानें मात करण्याचा प्रकार. प्रतिपक्षाचें घोडें व राजा आणि आपलें घोडें, राजा व एकच प्यादें राखून प्यादेमात करणें; घोडमात. घोड(डे)मात -स्त्री. (बुद्धिबळांचा खेळ) घोड्यानें राजाला दिलेली मात; घोडमल्ली पहा. [घोडा + फा. मात् = कोंडणें] घोडमाशी-स्त्री. १ मोठ्या आकाराची हिरवी, काळसर माशी. २ (सामा.) मोठी माशी. घोडमासा-पु. एक प्रकारचा मासा; सागराश्व. ह्याचें तोंड कांहींसें घोड्यासारखें दिसतें. यास लांब शेपूट असतें. हा नेहमी उभा पोहतो. घोडमुख-ख्या-पु. १ घोड्याचें तोंड असलेला किन्नर नांवाच्या देवयोनींतील पुरुष. याचें वर्णन पुराणांतरीं सांपडतें. २ (ल.) अगदीं कुरूप, घोडतोंड्या माणूस. 'एक मीर- वलें भुरळें पींगळें । घोडमुखें ।' -दाव २८५. घोडमुंगळा-पु. मोठा व काळा मुंगळा. घोडमुंगी-स्त्री. मोठी, काळ्या जातीची मुंगी. घोड(डे)मुंज्या-पु. उप. १ मुंज होण्याचें वय झालें असून मुंज न झालेला मुलगा. २ लग्न न झालेला प्रौढ मुंज्या. [घोडा + मुंज्या] घोडला-पु. मूल रांगत असतांना त्याची होणारी घोड्यासारखी आकृति. घोडा अर्थ १० पहा. घोडली-स्त्री. (कों. हेट.) (नाविक) शौचास बसण्याकरितां वर्‍यास एक चौकट चार दोर्‍यांनी अडकवितात ती. [घोडा] घोडवळ-स्त्री. १ बांधलेल्या घोड्यांची ओळ, रांग. २ घोड्यांचा तबेला; घोडशाळा; घोडसाळ; यावरून (सामा.) तबेला; 'रोडोला हत्ती घोडवळींतून जाणार नाहीं.' ३ लांबचलांब, ठेंगणें व बेढब घर; मागरघर; दांडसाळ; केवळ तबेल्यासारखें असलेलें घर; कोठडी. ४ (उप.) घोडनवरी. ५ न. झोडपलेल्या, झोडपून दाणे न काढलेल्या धान्याच्या पेंढ्यांची रास, गंजी. [घोडा + ओळ] घोड(डे)वाट-स्त्री. घोड्यांकरितां केलेली, फक्त घोड्याला जातां येईल अशी वाट, रस्ता (विशेषतः डोंगर इ॰ याच्यावरून); उलट गाडीवाट. [घोडा + वाट] घोडविवाह- पु. विषमविवाह. 'आपली नात शोभेल अशा दहा वर्षांच्या पोरीशीं लग्न लावण्यास तयार असतात व असा घोडविवाह करूनहि फिरून समाजांत हिंडण्यास ... त्यांस दिक्वत वाटत नाहीं' -टि ४.९६. [घोडा + विवाह] घोडवेल-स्त्री. (सांकेतिक) घोड्याची लीद; (औषधांत घोड्याच्या लिदीचा उपयोग करा- वयास असल्यास तिचा निर्देश ह्या शब्दानें करतात). घोड- शह-पु. (बुद्धिबळांचा खेळ) घोड्यानें दिलेला शह. [घोडा + शह] घोडशाळा, घोडसाळ-स्त्री. १ घोड्यांचा तबेला; घोडवळ अर्थ २ पहा. [घोडा + शाळा = घर] घोडशिष्य- पु. (निंदार्थीं) विद्यार्जन करूं पाहणारा मोठ्या वयाचा विद्यार्थीं, मोठेपणीं शिकावयास लागणारा मनुष्य. घोडशीर- स्त्री. १ पायाच्या टांचेच्या वरच्या बाजूस असलेली शीर, नाडी; दवणशीत्त; धोंडशीर पहा. २ (क्व.) पायाचा किंवा हाताचा स्नायु. घोडसटवी-स्त्री. १ उग्र स्वरूप धारण केलेली देवी. (क्रि॰ लागणें). २ घोडी व्याल्यापासून सहाव्या दिवशीं करा- वयाची सटवीची पूजा. (एखादीला) ॰लागणें-१ घोडसट- वीप्रमाणें उग्र व विकाळ दिसणें. २ घोटसटवीची बाधा होणें. घोडेखाद-स्त्री. १ घोड्यांचें चरणें; हरळी खाणें. 'या घोडे खादीमुळें माळावर एक काडी राहिली नाहीं.' २ फक्त घोड्यांना चरतां, खातां येईल इतक्या वाढीचें गवत. 'ह्या माळावर मोठें गवत नाहीं, घोडेखाद कोठें कोठें आहे.' [घोडा + खाद = खाणें] घोडेखोत-पु. घोडे भाड्यानें देण्याचा धंदा करणारा; भाड्याच्या घोड्यांचा नाईक. [घोडा + खोत = मक्तेदार] घोडेघाटी-स्त्री. एक प्रकारचें रेशमी कापड. घोडेघास-न. १ विलायती गवत; लसून- घास. २ घोडकुसळी पहा. [घोडा + घास = गवत] घोडेपाऊल- न. एक वनस्पतिविशेष. [घोडा + पाऊल] घोडेराऊत, घोडे- स्वार-पु. घोड्यावरील शिपाई. घोड्याएवढी चूक-स्त्री. फार मोठीचूक; ढोबळ चूक; घोडचूक पहा. घोड्या गोंवर-पु. एक प्रकारचा गोंवराचा आजार; याच्या पुटकुळ्या मोठ्या असतात. [घोडा = मोठा + गोवर] घोड्याचा-पु. (निंदार्थीं) घोड्यावर बसलेला मनुष्य; घोडेस्वार. 'ते पहा घोड्याचे चालले. मागून स्वारी येतीसें वाटतें.' घोड्याचा दाणा-पु. १ (उप.) हरभरा. २ (ल.) बुंदीच्या लाडवास तिरस्कारानें म्हणतात. घोड्याचा पूत-लेंक-पु. (उप.) मूर्ख; गाढव; गद्धा. घोड्याची चाकरी-स्त्री. घोड्यांना दररोज चोळणें, खरारा करणें इ॰ काम. घोड्याची जीभ-स्त्री. (राजा.) एक वनस्पति- विशेष. घोड्याची मुंज, घोड्याचें बारसें-स्त्रीन. एखादा कोठें जावयास निघाला असतां एखाद्या अधिक प्रसंगी व फाजिल चौकशी करणार्‍या माणसानें त्यास कां, कुठें जातां असें विचारलें असतां म्हणतात. घोड्यांचें नाटक-न. (ना.) सर्कस. घोड्याचें मूत-न. १ कुतर्‍याचें मूत; अळंबें; भुईछत्री. २ कुजलेल्या लांकडांतून फुटलेलें अळंबें. घोड्याच्या पाठीवर- क्रिवि. भरधाव; झरकन; त्वरेनें. (क्रि॰ जाणें; करणें). घोड्याच्या पाठीवरचा कोस-पु. कंटाळवाणा व लांब- णीचा कोस; घोड्यावरून गेल्यासच कोसाएवढें व कंटाळवाणें न वाटणारें अंतर.

दाते शब्दकोश

पांढरा

वि. १ सफेत; शूभ्र; श्वेतवर्ण. २ (ल.) (महानु.) लुच्चा; सोदा; कपटी; अमंगळ. 'हा पांढरा संन्यासी । तूं कांहीं जाणैसी ना ।' -शिशु २२०. [सं. पाण्डुर] (वाप्र.) पांढऱ्याचा काळा-पांढऱ्यावर काळें करणें-१ (एखादी गोष्ट करार इ॰ पांढऱ्या कागदावर काळ्या शाईनें) लिहून नमूद करणें; लेखबद्ध करणें. (सामा.) लिहिणें. 'ज्यास पांढऱ्यावर काळें करतां येत नव्हतें ते हल्लीं मानसशास्त्राच्या गोष्टी सांगू लागले आहेत.' -ओक. पांढऱ्या कपाळाची-वि. विधवा; (कपाळा- वरील) कुंकुमतिलकहीन; गतभर्तृका. पांढऱ्या पायाचा-वि. (ल.) जेथें जाईल तेथें वाटोळें करील असा; अपशकुनी; वाईट पायगुणाचा (मनुष्य). उखळ पांढरें होणें-दारिद्र्य जाऊन श्रीमंती येणें. सामाशब्द- ॰अभ्रक-पु. अभ्रकाची पांढरी जात. ॰ऊंस-पु. पिवळसर पांढऱ्या उंसाची एक जात (वेडा किंवा विलायती ऊंस याहून निराळा). ॰कांदा-बटाटा-पु. (उप.) (कु.) कोंबडीचें अंडें. ॰कावळा-पु. निसर्गांत अविद्यामान, अप्राप्य वस्तु. जसें-शशशृंग, खपुष्प, वंध्यापुत्र इ॰ कावळा हा काळ्या रंगाचा असतो त्यावरून हा अर्थ. पांढऱ्या कावळ्या- कडे जाणें-देशांतर करून भीक मागणें. 'आम्हांस पांढऱ्या कावळ्याकडे जावें लागेल.' -हरिवंशबखर ५४. जिकडे पांढरे कावळे असतील तिकडे जा-'येथून काळें कर' या अर्थीं लोचट मनुष्य इ॰कांस उद्देशून योजावयाचा वाक्प्रचार. ॰गहूं-पु. गव्हाची एक जात. ॰चित्रक-पु. चित्रकाची पांढरी जात. ॰तित्तिर-पु. कपिंजल. -योर १.५९. ॰धोतरा-पु. पांढरीं फुलें येणरी धोत्र्याची एक जात. ॰परीस-पु. (उप.) १ दगड; पांढऱ्या पायाचा मनुष्य; कपाळकरंटा. 'आईबापांच्या पोटीं असला पांढरा परीस जन्माला आला.' -नामना ९९. २ अट्टल सोदा; लुच्चा. [पांढरा + परीस] म्ह॰ (व.) पांढरा परीस नर्मद्या गणेश = आंत निराळें व बाहेर निराळें असें ज्याचें वर्तन असतें त्यास उद्देशून म्हणतात. ॰पाल-वि. आजार इ॰कांमुळें शरीर रक्तहीन झाल्यामुळें पांढऱ्या पालीसारखा दिसूं लागलेला. ॰फटफटीत-सफेत-शुभ्र-फेक-वि. अतिशय पांढरा; केवळ पांढरा; पांढरा स्वच्छ. ॰फटफटीत-फिटूक-वि. अतिशय फिक्का; निस्तेज. 'त्याचा चेहराहि पांढराफिटुक दिसायला लागला आहे.' -कमला नाटक अक १. प्र. २. ॰भोपळा-पु. दुध्या भोंपळा. ॰राळा-पु. राळ्याची पांडरी जात. कांहीं लोक खसखस व हें धान्य यांचा अंतर्भाव अठरा उपधान्यांत करून एकूण उपधान्यांची संख्या वीस मानतात. ॰वडस-पु. डोळ्याच्या बुबुळ्यावर पांढऱ्या रंगाचा होणारा रोग. सं. शुक्लार्म. -योर २.५३३. ॰सफेत-द-वि. पांढरा स्वच्छ; अतिशय पांढरा (वस्त्र, कागद इ॰ पदार्थ). [पांढरा + फा. सफेद् = पांढरा] ॰हत्ती-पु. (ल.) मोठ्या खर्चानें पाळतां, पोषितां येण्यासारखें, पोसण्यास जड असें जनावर, मनुष्य इ॰ (इं.) व्हाइट् एलेफंट् यास प्रतिशब्द. ॰हत्या-वि. तांदुळाचा एक भेद. पांढरपायी-वि. मागचा एक पायपांढरा असलेला (घोडा). हा अयब मानतात. अशुभ चिन्हें पहा. [पांढरा + पाय] -र पाल-स्त्री. (ल.) अति- शय रोड, निस्तेज मनुष्य. -र पोटा-वि. १ गव्हाची एक हलकी जात. ह्या जातीच गहूं एका बाजूस तांबडा व दुसऱ्या बाजूस पांढरा असतो. २ अव्यवस्थितपणें भाजलेली व मध्यभागीं पांढरी राहिलेली (भाकरी). [पांढरें + पोट] -फळी-स्त्री. एक तृणधान्य व त्याचें तृण. पांढरफळीचीं काडें लहान असून हात-दीड हात उंच असतात. या झाडांचा रंग पांढरा असतो. यास मोहरीहून जरासें मोठें असें पांढरें बीं येतें. हें बीं गुरें खातात. दुष्काळांत माणसेंहि या बियांच्या भाकरी करून खातात. -वगु ४.६२. [पांढरें + फळ,] -रमाती-स्त्री. १ पांढऱ्या रंगाची माती. २ पांढरी जमीन. -रवट-वि. किंचित् पांढरा; पांढुरका. [पांढरा + वत्] -रवणी-नी-न. पांढरा प्रदर. 'पांढरवनी पडे तें राहे.' -वैद्यक ८५.८६. [पांढरें + पाणी] पांढरे केश-स-पुअव. १ पिकलेले पांढरे झालेले केस. २ (ल.) म्हातारपण; उतारवय. -रे गोलक-पुअव. रक्तांतील पांढऱ्या पेशी. -रे तारे-पु. (शोभेचें दारूकाम) दारू कामाचा एक प्रकार. 'बाण, नळे वगैरे सामानांत पांढरे तारे तयार होतात.' -अग्निक्रिडा ११. -रे तीळ-पु. तिळाची पांढरी जात. -रे पिशी-विअव. गव्हाची एक जात. या जातीच्या गव्हाचा दाणा गिड्डा असून भरींव व चमकदार असतो. -मुंव्या ४२. पांढरी-स्त्री. १ (गांवठाणावरील) लोकवस्ती. 'ययापरी उद्वस समस्त । पांढरी पडली ।' -गीता २.२२७१. २ गांवची सीमा; शिवारांतील (गाळाची मळी साचून तयार झालेली) जमीन; गांवठाण. 'गांवची पांढरी सोडून लोकांनीं वस्ती लांब नेली' -खेया २५. ३ पांढर (-स्त्री.) इतर सर्व अर्थी पहा. [सं. पाण्डुर] पांढरी घेटूळ-घेटोळी-स्त्री. घेटोळीची, पुनर्नव्याची पांढरी जात. -री जमीन-स्त्री. पांढरसर जमीन. ही आवळ व निबर असून पाणी ढाळते. -गांगा १. -री झीक- स्त्री. (भरतकाम) रुपेरी जरतार असलेली मखमल. -री तुळस- स्त्री. रामतुळस; हिच्या उलट कृष्णतुळस. ही काळसर रंगाची असते. -री पोळी-स्त्री. गव्हाची साधी पोळी. पुरणपोळी, गुळाची पोळी इ॰कांच्या उलट. -री माठ-स्त्री. माठ या पाले- भाजीची पांढरी जात. तांबडी व काटे माठ असे हिचे दुसरे प्रकार आहेत. -री माती-स्त्री. चिकणमातीचा एक प्रकार; चिनी माती. पांढर माती पहा. -पदाव ३५. -री रुई-स्त्री. फिकट पांढऱ्या रंगाची रुईची जात. -री साल-स्त्री. तांदुळाची एक जात. याच्या उलट काळी साल. -री सुरळी-स्त्री. (विणकाम) १ फणींतील एका घरांत काळें व एका घरांत पांढरें उभार सूत असून आडवण सर्व काळें व कोणतीहि किनार असलेलें लुगडें. २ फणींतील एका घरांत तांबडें व एकांत पांढरें असें उभार आणि आडवण सर्व तांबडें असून कोणत्याहि किनारीनें युक्त असा लुगड्याचा प्रकार. पांढरें अळूं-न. अळवाची पांढरी जात. हें अग्निदीपक व सारक असून मूळव्याध, कृमि, पित्त यांचें नाशक आहे. -योर १.४७. -रें निशाण-न. (ल.) मुसलमानांचे, मोंगलांचें निशाण. 'नऊशें पठाण कापिला । पांढरें निशाण उपटलें ।' -ऐपो ६१. -रें पाणी- न. अगदीं पातळ, पाणचट ताक; ताकवणी. -रें पातळ-न. (विणकाम) सर्व पो पांढरें व कोणतीहि किनार असें विणलेलें पातळ. -रें फेक-वि पांढरें शुभ्र. -रें बुबुळ-न. डोळ्यांतील पांढरा भाग; याच्या उलट काळें बुबुळ. -रें मीठ-न. समुद्राच्या पाण्यापासून बनविलेलें मीठ; याच्या उलट मातीमीठ, खाणींतील मीठ; काळें मीठ -रें वांगें-न. (सांकेतिक) (क.) कोंबडीचें अंडें.

दाते शब्दकोश

बारा

वि. १२ हीं संख्या. [सं. द्वादश; प्रा. बारह] (वाप्र.) ॰करणें, बाराचें करणें-म्हणणें, बाराचा फाडा वाचणें, बाराचे लेख वाचणें-सफाईनें किंवा धूर्ततेनें पळून जाणें; पोबारा करणें. ॰गोष्टी-कथा सांगणें-करणें-गाणें, बारापंधरा करणें-सांगणें, बाराबत्तिशा लावणें-असंबद्ध बोलणें; खोट्या सबबी सांगणें; कांहीं तरी सांगणें; धरसोडीनें बोलणें; उघवाउडवी करणें; भाकडकथा सांगणें. ॰वाजणें-(ल.) उतरती कळा लागणें; समाप्त होणें; नाश होणें; दिवाळें निघणें. ॰वाजविणें-(ल.) नाश करणें; विध्वंस करणें. ॰वाटा करणें-उधळून लावणें; उध- ळणें. ॰वाटा पळणें-होणें- १ अजिबात नाहींसा होणें. २ चारी दिशांनीं सैरावैरा पळणें; दाणादाण होऊन पळत सुटणें; (सैन्य इ॰) 'फजिलखान बारा वाटा ।' -ऐपो २१ ॰वाटा उधळिला- जाणें-पैसा, संपत्ति, सांठा इ॰ खर्च होणें. ॰वाटा मोकळ्या होणें-मनमानेल तसें वागण्यास पूर्ण मोकळीक असणें. म्ह॰ पळणारास एक वाट; शोधणारास बारा वाटा. ॰गांवचा(पिंपळा- वरचा) मुंज्या-एके ठिकाणीं न राहतां सदां भटकत असणारा. ॰गांवचें(बंदरचें)पाणी प्यालेला-लफंग्या; वस्ताद; चवचाल; बारा बंदराचें पाणी प्यालेला; फार प्रवास केल्यानें चतुर व धूर्त बनलेला. ॰घरचे बारा-भिन्न भिन्न स्थळांचे भिन्न भिन्न प्रकृतीचे एकच जमलेले लोक; परस्परांशीं कोणत्याहि नात्यानें संबंध नाहीं असे लोक. ॰मांडवांचा वर्‍हाडी-पु. सदोदित अनेक ठिकाणीं अनेक तर्‍हेचीं कामें असलेला इसम. बारावें वर्ष पालटणें किंवा लागणें-(ल.) बारा वर्षांच्या मुलाप्रमाणें वर्तन करणें. म्ह॰ १ उदीम करतां सोळा बारा; शेती करतां डोईवर भारा. बारनायकी-स्त्री. १ अव्यवस्थित राज्य; बंडाळीः अराजकता. २ शिरजोर लोकांच्या कारभारामुळें कामांत होणारा घोटाळा बार- भाई-स्त्री. (ल.) १ अनेक मतांच्या, स्वभावांच्या लोकांनीं मिळून केलेलें काम; अनेकांच्या हातीं असलेली सत्ता. २ गोंधळ; अव्य- वस्था. बारभाईचा कारखाना-कारभार-खेती-पुस्त्री. १ अव्यवस्थित कारभार किंवा स्थिति. २ लोकप्रतिनिधींचा कारभार (नारायणराव पेशव्यांच्या वधानंतर नाना फडणवीस, सखाराम बापू इ॰ मुत्सद्यांनीं चालविलेला कारभार). 'बाभाईंचा कारभार दिल्लीस आजपर्यंत कोणत्याहि गृहकलहानंतर चालला नाहीं.' -भाऊ ९६. ३ (ल.) गोंधळ; ज्या कामांत किंवा उद्योगांत पुष्कळ मंडळींचें. अंग असतें आणि प्रत्येक जण यजमानासारखे हुकूम सोडीत असतो परंतु त्या हुकुमांची बजावणी मात्र कोणी करीत नाहीं अशा तर्‍हेचा गोंधळ.म्ह॰ (व.) बारभाईची खेती प्रजा- पती लागला हातीं = घरांत कारभार करणारे पुष्कळ असले व किणीच जबाबदार नसला तर फायदा होत नाहीं. बारभाईची गाडी- स्त्री. उतारूंची व टपालाची घोडागाडी (इंग्रज कुंपिणीच्या पहिल्या अमदानींत ही गाडी मुंबई-पुणें याच्या दरम्यान होती). बार- भाईचें कारस्थान-न अगदीं भावासारखी एकमतानें वागणारी जी मंडळी तिनें केलेलें कारस्थान; श्री. नारायणराव पेशवे मारले गेल्यानंतर राघोबादादांच्या विरुद्ध कारभारी मंडळीनें केलेला कट. बारमास, बारमहां, बारमाही-क्रिवि. वर्षभर; बारा महिने; सतत. -वि. बारामहिन्यांचें. [बारा + सं. मास; फा. माह्] बार- वर्षी(रशी)सोळवर्षी(रशी), बारावर्षे, सोळावर्षे-पुअव. (बारावर्षींचे व सोळा वर्षांचे) अननुभवी तरुणांची सभा; ज्या व्यवहारांत एकहि प्रौढ मनुष्य नाहीं व सर्व एकजात तरुण आहेत अशी मंडळी. सामाशब्द- बारा अक्षरी- १ रेशमाची एक जात. २ बाराखडी. ॰आदित्य-पुअव. (बारा सूर्य) वर्षांतील सूर्याचीं बारा रूपें. ॰कशी-स्त्री. बार(रा) बंडी-दी; बारकशी. [कसा = बंद] ॰कारू-पुअव. बलुतेदार पहा. बाराखडी, बारस्क(ख)डी- स्त्री. व्यंजनापासून १२ स्वरांच्या मिश्रणानें पूर्ण होणार्‍या अक्षरांची मालिका. [बारा + अक्षरी] ॰गणी-स्त्री. जमीन मोजण्याचें साठ बिघ्यांचें एक माप ॰जन्म-क्रिवि. बारा जन्मांत; कधींहि नाहीं. ॰जिभ्या, बारजिभ्या-वि. अतिशय खोटें बोलणारा; बडबड्या; विसंगत बोलणारा. [बारा + जीभ] ॰ज्योतिर्लिगें-नअव. शंकराचीं प्रसिद्ध १२ लिंगें तीं: १ सोरटी सोमनाथ (काठेवाड २ मल्लि- कार्जुन (मोंगलाई). ३ महाकालेश्वर (उज्जनी). ४ ओंकार अमलेश्वर (ओंकार मांघाता). ५ परळी वैजनाथ (मोंगलाई). ६ भीमाशंकर (पुणें जिल्हा). ७ अवंढ्या नागनाथ (मोंगलाई). ८ काशीविश्वनाथ (काशीस) ९ त्र्यंबकेश्वर (त्र्यंबक-नाशीक). १० केदारेश्वर (हिमालय). ११ घृष्णेश्वर (वेरूळ-मोंगलाई). १२ रामेश्वर (मद्रास इलाखा). ॰तेरा-पु. भाषणांतील असंबद्धता. (क्रि॰ लावणें; सांगणें; बोलणें). ॰द्वारी, दारी-स्त्री. १ बारा दारें असलेला एक प्रकारचा उन्हाळ्यांत राहण्याचा हवाशीर बंगला किंवा १२ पायवाटा असलेली विहीर. २ (ल.) धंदाउद्योगांतील अव्यवस्थितपणा, पसारा. [हिं. बारादारी] ॰पांच-पु. (कु.) कुडाळदेशकर ब्राह्मण राजवटींतील बारा नाईक व पांच देसाई मिळून एकंदर सतरा मानकरी. ॰बंदी, बारबंदी-डी-स्त्री. बारा- बंद असलेला अंगांत घालण्याचा एक कपडा; बारकशी. ॰बलुतीं- तें-नअव. बलुतेदार पहा. ॰बळी-वळी-पु. जन्मापासून बाराव्या दिवसाचा एक विधि; बारसें. 'गरोदरेसि प्रसूति होये । पुत्रजन्में सुखावली ठाये । तेही बाराबळी जैं पाहे । तैं भौगूं लाहे पुत्रसुख ।' अधिकार्‍याचे वसुलापैकीं बारा हक्क. २ विवाह किंवा मोहतूर इ॰ कांच्या वेळचे पाटलाचे बारा हक्क (विडा, टिळा, शेला, वाटी, गणसवा- शीण इ॰). ३ शेतकरी किंवा महार यांचे लग्न इ॰ बाबतींतील बारा हक्क. ४ बारा बलुतेदारांपैकीं प्रत्येकाचे बारा हक्क. ५ (ल.) लंगड्या सबबी; पाल्हाळिक व मूर्खपणाचें भाषण; गडबडगुंडा. (क्रि॰ सांगणें). ॰बाबू-बापू-भाई(बारभाई)-घरचे बारा- निरनिराळ्या उद्देशांचा व भिन्नभिन्न स्वभावांचा परंतु एका कार्याकरतां एकत्र झालेला लोकसमूह; तसेंच या लोकांचा (घोटाळ्यांचा) कार- भार; अनेकांच्या हातीं असलेली सत्ता. ॰बाविशा-स्त्रीअव. ग्रामाधिकार्‍यांचे हक्क. 'गांवामध्यें बाराबाविशा रामजी पालटाच्या आहेत.' [बारा + बावीस] ॰बोड्याचा-वि. (कुण.) एक शिवी; जारज. ॰भट-वि. सदोदित आंगतुकी करणारा. ॰भुजां- भुजांबळ-न. (गो.) पुष्कळ शक्ति. [बारा + भुज = हात] ॰महाल- पुअव. राज्यकारभाराच्या सोयीसाठीं केलेलीं सरकारी कामांचीं निरनिराळीं १२ खातीं. हीं पुढील प्रमाणें:-पोतें, कोठी, पागा, दरजी, टंकसाळ, सौदागिरी, इमारत, हवेली, पालखी, थट्टी, चौबिना व शरीमहाल. ॰महिने-पुअव. वर्षाचे महिने:-चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ (आखाड). श्रावण, भाद्रपद (भादवा), आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष(शीर), पौष(पूस), माघ, व फाल्गुन(शिमगा). हीं नावें अनुक्रमें पुढील नक्षत्रांवरून पडलीं आहेत:-चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, आषाढा, श्रवण, भाद्रपदा, आश्विनी, कृत्तिका, मृगशीर्ष, पुष्य, मघा, फाल्गुनी दर पौर्णिमेस या या नक्षत्रीं चंद्र असतो. बारा महिन्यांचीं प्राचीन संस्कृत नावें:-मधु, माधव, शुक्र, शुचि, नभस्, नभस्य, इष, ऊर्ज, सहस, सहस्य, तपस्, तपस्य. -क्रिवि. बाराहि महिनेपर्यंत; सगळ्यां वर्षभर. बारा महिने तेरा काळ-क्रिवि. सदोदित; नेहमीं ॰मावळें-नअव. पुण्या पासून शिरवळपर्यंतचीं सह्याद्रीच्या पूर्व उतरणीवरील १२ खोरीं तीं:-अंदर, नाणें, पवन, घोटण, पौड, मोसें, मुठें, गुंजण, वेळवंड, भोर, शिवतर व हिरडसमावळ. -मुलांचा महाराष्ट्र २०. ॰माशी- वि. वर्षाच्या सगळ्या महिन्यांत येणारें किंवा असणारें (आंबा, फणस, फूल इ॰). ॰माशी खरबूज-न. खरबुजाची एक जात. ॰रांड्या-पु. रंडीबाज मनुष्य. ॰राशी-स्त्रीअव. (ज्यो.) क्रांतिवृत्ताचे बारा विभाग. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धन, मकर, कुंभ व मीन. ॰लग्नेंनअव. (ज्यो.) ज्या वेळीं जी रास क्षितिजावर उदयस्थानीं असते तें त्या वेळचें लग्न. याप्रमाणें १२ लग्नें आहेत. बाराराशी पहा. ॰वफात-पु. रबिउ- लावल महिन्यांतील बारावा दिवस. या दिवशीं महमद पैगंबराची पुण्यतिथि असल्यानें हा दिवस मुसलमान लोक सण म्हणून साजरा करतात. [अर. वफात् = मृत्यु] ॰वा-पु. माणसाच्या मृत्यूच्या बाराव्या दिवशीं करावयाचा श्राद्धादि विधि. -वि. अनुक्रमानें मोजलें असतां ११ च्या पुढील. ॰वा बृहस्पति असणें-(ल.) वैर असणें; उभा दावा असणें (जन्म राशीपासून बाराव्या राशींत गुरु असल्यास तो त्या माणसास फार दुःख देतो त्यावरून). ॰वादी-स्त्री. चपलांची, वाहणांची एक जात, प्रकार. ॰सहस्त्री- पु. बाराहजार फौजेचा सरदार. 'आटोळे सेना-बारा सहस्त्री ।' -मराचिथोरा ५२. ॰सोळा-स्त्रीअव. सूर्याच्या बारा व चंद्राच्या सोळा कळा. 'आटूनियां हेमकळा । आटणी आटल्या बारासोळा ।' -एरुस्व ७.५०. ॰हक्कदार-पुअव. हक्क असलेले खेड्यांतील वंशपरंपरेचे बारा हक्कदार:-देशमुख, देशपांडे, कुळकर्णी, पानसरे, शेट्या इ॰ ॰क्षरी-स्त्री. बाराखडी पहा. 'बाराक्षरि एका सारखी ।' -ऋ ७६. [बारा + अक्षर] बारु-रो-ला-ली, बारोला-ली, बारोळा-वि. बारा पायल्यांचा (मण, खडी, माप). बारोत्तर-वि. एखाद्या संख्येहून अधिक बारा. 'शके बाराशतें बारोत्तरें ।' -ज्ञा १८.१८१०. [बारा + उत्तर] बारोत्रा-पु. १ व्याजाच्या रकमेचा बारावा भाग (या भागाची सूट देतात). २ दरसालदरशेंकडा बारा या दराप्रमाणें व्याज. [बारा + उत्तर]

दाते शब्दकोश

हात

पु. १ हस्त; बाहु; खांद्यापासून बोटांपर्यंत शरीराचा भाग. कोपरापासून बोटांपर्यंतचा भाग. २ कोपरापासून मधल्याबोटाच्या टोकापर्यंतचें माप. 'हा पंचा साडेचार हात भरला.' ३ उजवी किंवा डावी बाजू, तरफ. 'आमचें घर वाड्याचे उजव्या हातास आहे.' ४ ताबा; आटोका; अधिकार; खातें. 'तुझें काम करणें माझ्या हातीं नाहीं.' (कारक विभक्तींत प्रयोग). ५ स्वतः व्यक्तिगत मनुष्य. 'अपराधावांचून शिवी देणें हें माझ्या हातानें घडणार नाहीं.' ६ स्वामित्व; कबजा; मालकी; ताबा. 'साप्रंत माझ्या हातीं पैसा नाहीं.' ७ हातानें वाजविण्याच्या वाद्यावर मारलेली हाताची थाप. ८ डाव; खेळ (काठी, लाठी, पट्टा इ॰ शस्त्रांचा). 'पट्ट्याचे दोन हात करून दाखव.' ९ कर्तृत्वशक्ति; अंग; हस्तकौशल्य (एखाद्या विषयांतील, कलेंतील). 'त्याचा चित्र काढण्याचा हात चांगला आहे.' १० कुलुपाची किल्ली; चावी. 'कुलवाचा हात इकडे दे बघूं.' ११ सोंगट्या, पत्ते इ॰ खेळांतील डाव, खेळण्याची पाळी, खेळ; खेळणारा गडी. 'अजून आमच्यांतील एक हात खेळवयाचा आहे.' १२ हस्तक; मदतनीस; साहाय्यक; हाताखालचा मनुष्य. १३ ज्यावर दंड, जोर काढावयाचे तो लांकडी, दगडी ठोकळा; हत्ती १४ (रंग देणें, सारवणें इ॰ कामीं) वरून हात फिरविणें; हातानें दिलेला थर, लेप. १५. ठोंसा; तडाखा; हस्तक्रिया (भिन्नभिन्न प्रसंगीं त्या त्या अर्थांनीं) १६ (तेली-घाणा) कातरीस जोडलेला वांकडा लाकडी तुकडा. १७ हात टेकावयासाठी, हातानें धरावयाचा कोणताहि पदार्थाचा भाग. 'खुर्चींचे-रहाटाचे-हात. १८ हाताच्या आका- राची कोणतीहि वस्तु. १९ (सोनेरी) हातांतील दागिना सैल करण्याचें एक हत्यार. २० (नृत्य) दोन हातांनीं मिळून करा- वथाचे अभिनयाचे प्रकार. हे ४० प्रकारचे आहेत. २१ (शिंपी) कापड मोजण्याचें बारा तसूंचें एक माप; गज. २२ पान्हा (नट- बोलट फिरविण्याचा). [सं. हस्त; प्रा. हत्थ; हिं. गु. हाथ; ब. हात; आर्में. जि. हथ, अथ; पॅलेस्टाईनजि. हस्त; पोर्तुंजि. बस्त] म्ह॰ १ हात ओला तर मैत्र भला-नाहींतर पडला अबोला- जोपर्यंत माणूस दुसर्‍यास देत असतो तोंपर्यंत त्याच्याशीं सगळे मित्रत्वानें वागतात. २ हात घशांत घातला तरी कोरडाच = कितीहि मदत केली तरी बेइमान राहणारा. ३ हातपाय रोड्या, पोट लोड्या; हातपाय काड्या, पोट ढेर्‍या = पोटाचा तटतटीतपणा व अवयवांचा रोडकेपणा. ४ हात फिरे तेथें लक्ष्मी फिरें, तोंड फिरे तेथें अवदसा फिरे = उद्योगी माणसाचा हात श्रीमंती आणतो तर नुसत्या बडबड्याच्या हातून कांहींच होत नाहीं उलट दारिद्र्य येतें. ५ आपला हात जगन्नाथ (जगन्नाथपुरीस आपल्या हातानें वाटेल तेवढा प्रसाद घेतां येतो त्यावरून) वाटेल तेवढें व तसें घेणें; प्राचुर्य. ६ हातचें सोडून पळत्याचे पाठीस लागूं नये = जें खात्रीनें आपलें आहे (आपणांस मिळावयाचेंच आहे) तें सोडून जें अनिश्चित आहे तें मिळविण्याच्या नादीं लागूं नये. ७ हातच्या कांकणास आरसा कशाला ? (हातांतील कांकण डोळ्यानें दिसण्या- सारखें आहे, आरसा आणणें वेडेपणा) = जी गोष्ट उघड सिद्ध आहे ती दाखविण्यास पुराव्याची जरूरी नाहीं. ८ हातपाय र्‍हावलें काम करूं वायले = नाइलाज होणें. ९ हातपाय लुलें तोंड चुरचुरां चाले = अशक्त पण तोंडाळ, मुजोर माणूस. १० हातभर लांकूड नऊ हात ढलपी = अतिशयोक्ति करणें. ११ हातांत नाहीं अडका बाजारांत चालला धडका = जवळ कवडीं नाहीं पण डौल बादशहाचा. (वाप्र.) ॰आंखडणें-देण्यासाठीं पुढें केलेली वस्तु एकदम मागें घेणें; देण्याचें प्रमाण कमी करणें, बंद करणें. ॰आटोपणें-मारणें इ॰ हातांनीं करावयाची कोणतीहि क्रिया बंद करणें. ॰आवरणें-१ हात आटपणें. २ कोणत्याहि कृत्यापासून परावृत होणें. 'ऐकेल वचन माझें आवरिल द्वेषिकाळ हात रणीं ।' -मोकर्ण ४६.४४. ॰इचकणें-(व.) हात मोडणें. ॰उगारणें-उचलणें-(एखा- द्यास) मारावयास प्रवृत होणें. ॰उचलणें-१ स्वयंस्फूर्तीनें, आपण होऊन बक्षीस देणें. २ हातीं घेणें (काम, धंदा). ॰ओढविणें- १ घेण्यासाठीं झांप टाकणें. २ विटंबना, करण्यासाठीं तुच्छता दर्शविण्यासाठीं तोंडापुढें हात करणें. ॰ओंवाळणें-तुच्छता दर्शविणें. ॰करणें-१ लाठी मारणें; शस्त्राचा वार करणें. हात टाकणें. 'स्त्रीचे अंगावर हात करूं नये.' २ पट्टा, बोथाटी वगैरेचे डाव करणें; फिरविणें. ३ वादविवाद, युद्ध करणें. ॰कापून-देणें- गुंतणें-लेखी करारकरून स्वतःस बांधून देणें. ॰खंडा असणें- एखादें कार्य (हुन्नर) हमखास पार पाडण्याचें कौशल्य, पटाईत- पणा अंगीं असणें. ॰गहाण ठेवणें-उजवा हात देवास वाहून कोणत्याहि कामीं त्याचा उपयोग करावयाचा नाहीं असा नवस करणें. २ कोणत्याही कामास हात न लावणें. ॰घालणें-१ (एखादें काम) पत्करणें; करावयास घेणें. २ एखादी वस्तु घेणें, धरणें, शोधणें यासाठीं हात पुढें करणें. 'मग विभु वसनासी त्याचिया हात घाली ।' -आनंदतनय. ३ (एखाद्या कामांत, व्यवहांरांत) ढवळाढवळ करणें; आंत पडणें. ॰घेणें-(पत्त्यांचा खेळ) हुकूम मारून अगर भारी पान मारून दस्त करून घेणें. ॰चढणें-प्राप्त होणें. 'अनुताप चढविया हात । क्षणार्धं करी विरक्त ।' -एभा २६.२०. हाताचा आंवळा-मळ, हातचें कांकण-उघडउघड गोष्ट; सत्य. ॰चा मळ-अत्यंत सोपें कृत्य; हात धुण्यासारखें सोपें काम; अंगचा मळ. ॰चालणें-१ हातांत सत्ता, सामर्थ्य, संपत्ति असणें, मिळविणें, मिळणें. १ एखादी गोष्ट करतां येणें. 'कशिद्यावर माझा हात चालत नाहीं.' ॰चाल- विणें-हत्यार चालविणें (संरक्षणार्थ). 'न्यायाच्या अभावीं ज्याला त्याला हात चालवावेसें वाटणें रास्तच होईल.' -टि १. २२. ॰चेपणें-लांचाचे पैसे मुकाट्यानें एखाद्याचे हातांत देणें. ॰चोळणें-फार राग आला असतां तळहात एकमेकांवर घासणें; कुंठितगति होऊन स्वस्थ बसावें लागणें. 'शल्य सुयोधन वाक्यें कोपे चोळी करें करा...।' -मोकर्ण २१.१३. ॰जोडणें-१ नमस्कार, प्रार्थना, विनंति करणें. २ शरण जाणें, येणें. 'अपराध फार केले परि आतां हात जोडिले स्वामी ! ।' -मोआर्याकेका. ३ नको असलेला पदार्थ हात जोडून आर्जवानें दूर सारणें; अव्हे- रणें. 'दानश्री त्याहुनि बहु दुग्धासहि हात जोडितो मीन ।' -मोबृहद्द ८. ॰झाडणें-१ झिडकारणें; नापंसत ठरविणें. २ निराशेनें सोडून देणें. ३ एखादें काम उरकून मोकळें होणें. ॰टाकणें-१ पोहतांना पाण्यावर हात मारणें. २ (एखाद्यावर) प्रहार करणें; मारणें. 'बायकोमाणसाच्या अंगावर हात टाकणें तुम्हाला शोभत नाहीं.' ॰टेकणें-१ काम करण्यास असमर्थ असल्यानें पराभव पावल्याचें कबूल करणें. २ म्हातारपणानें अशक्त होणें. ३ दमणें; थकणें; टेकीस येणें. ॰तोडणें-स्वतःच्या लेखानें आपणांस बांधून घेणें. ॰थावरणें-हात आवरणें; आटो- पणें. '...थावरूनि हातरणीं ।' -मोस्त्री ६.५१. ॰दाखविणें- दावणें-१ हस्तसामुदिक जाणण्यासाठीं जोशापुढें तळहात करणें. २ अहितकारक परिणाम करणें. ३ स्वतःची शक्ति, सामर्थ्य दाख- विणें. 'शक्रादि देव असते तरि त्यांसहि दावितोंचि हात रणीं ।' -मोभीष्म ३.४. ४ नाडीपरीक्षा करण्यासाठीं वैद्यापुढें हात करणें. ५ हातानें एखादी वस्तु दर्शविणें. ६ बडवून काढणें; पारिपत्त्य करणें; सूड घेणें; उट्टें काढणें. म्ह॰ हात दावून अवलक्षण चिंतणें, करणें. ॰दाबणें-लांच देणें. 'त्यानें आपल्यास मदत करावी म्हणून त्याचे हात दाबावे असें एकदां मनांत येतें.' -विवि १०. ९ २१०. ॰देणें-१ मदत करणें; तारणें. 'घडतां अधःपतन मज पुण्यें देतिल न हात परिणामीं ।' -मोआदि १९.३२. २ चोरणें; उचलेगिरी करणें. ३ खाद्यापदार्थावर ताव मारणें. ४ (बायकी, छप्पापाणी) छप्पू घातलेल्या मुलीस इतर मुलीनीं (तिनें उठावें म्हणून) हस्तस्पर्श करणें. ॰धरणें-१ अडविणें; हरकत करणें; स्पर्धा करणें; बरोबरी करणें. २ लांच देणें. ॰धरून जाणें- विवाहित स्त्रीनें एखाद्या परपुरुषाबरोबर पळून जाणें; जाराबरोबर निघून जाणें. ॰धुणें-(ल.) एखाद्या कामांतून आपलें अंग काढून घेणें. ॰धुवून पाठीस लागणें-एखाद्या नाश करण्याविषयीं हट्टानें प्रवृत्त होणें; चिकाटी धरून एखाद्याचा पाठलाग करणें. ॰न बनणें-(व.) विटाळशी होणें; गुंता येणें. ॰नाचविणें-चेष्टा करण्यासाठीं दुसर्‍याचे तोंडापुढें हातवारे करणें. हात ओवाळणें पहा. ॰पडणें-१ एखादें काम अनेकांनीं लागून संपविणें; एखादा खाद्यपदार्थ अनेकांनीं एकसमयवच्छेनेंकरून फन्ना करणें. २ (ना.) जिवंतपणीं भेट नाहीं पण दहनापूर्वी तरीं प्रेताचें दर्शन होणें. ॰पसरणें-भीक मागणें. ॰पाय खोडणें-१ अवयव आंख- डणें; विव्हल होणें. २ एखाद्यास प्रतिबंध, अडचण करणें. ॰पाय गळणें-गाळणें-१ अशक्त होणें; रोडावणें. २ खचून जाणें; नाउमेद होणें; गलितधैर्य होणें. ॰पाय गुंडाळणें-१ अंत- काळच्या वेदनांनीं हातपाय आंखडणें; कियाशक्ति रहित होणें. २ हरकत, अडथळा करणें. ॰पाय चोळणें-१ सूड घेण्याची प्रतिज्ञा करणें; चरफडणें. २ रागानें तरफडणें; शिव्याशाप देणें. ॰पाय झाडणें-१ हातपाय गुंडाळणें अर्थ १ पहा. २ सुटकेसाठीं हातापायांचा उपयोग करणें. ३ धडपड करणें; चरफडणें. ॰पाय ताणणें-सुखानें, निष्काळजीपणानें हातपाय पसरून पडणें. ॰पाय धोडावप-(गो.) आटापिटा करणें. ॰पाय पसरणें- १ हातपाय गुंडाळणें अर्थ १ पहा. २ मर्यादेच्या, आटोक्याच्या बाहेर जाणें; जास्त जास्त व्याप वाढविणें; पसारा वाढविणें. म्ह॰ भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी. ३ काम होत नसल्यास सबबी सांगणें; कामांत आळस करणें (काम करीन असें वचन दिलें असतां). ४ मागणी वाढत जाणें, अधिकाधिक आक्रमण करणें. ॰पाय पाखडणें-अंतकाळच्या वेदनेनें, फार संतापानें हातपाय झाडणें. ॰पाय पांघरून-पोटाळून बसणें-आळशा- सारखें बसणें; जेठा मारून बसणें. ॰पाय फुटणें-१ उधळपट्टी सुरू होणें; संपत्तीला (जाण्यास) पंख फुटणें. 'दौलतीला अलीकडे हातपाय फुटुं लागले आहेत.' ३ लुच्चेगिर्‍या करण्यांत तरबेज होणें. २ थंडीनें हातपायास भेगा पडणें. ॰पाय फोडणें-लावणें- फुटणें-लागणें-१ मूळ गोष्टींत, अंदाजांत भर घालणें; वाढ विणें. २ नटविणें; थटविणें; अलंकृत करणें. ३ मागून वाढविणें (काम, दर, खर्च इ॰). ४ लबाड्या इ॰ नीं सजवून उजळून दाखविणें. ॰पाय मोकळे करणें-फेरफटाका करून हातपाय सैल, हलके करणें; फिरणें; सहल करणें. ॰पाय मोडणें-मोडून येणें-टाकणें-१ तापापूर्वीं अंग मोडून येणें; निरंगळी येणें. २ बलहीन, निःसत्त्व करून टाकणें; हरकत घेणें. ॰पाय सोडणें -अंतकाळच्या वेदनांनीं हातपाय ताणणें, ताठ होणें. ॰पाय हालविणें-उद्योग, परिश्रम, कष्ट इ॰ करणें; स्वस्थ न बसणें. ॰पोचणें-कृतकृत्य होणें (ढुंगणाला हात पोंचणें असा मूळ प्रयोग). ॰फाटणें-रुची वाढणें. 'जेथें जिव्हेचा हातु फाटे ।' -ज्ञा १८.२४९. ॰फिरणें-लक्ष जाणें; व्यवस्थित ठेवण्याची काळजी घेणें; साफसफाई करणें. ॰फेरविणें-१ लहान मुलास प्रेमानें कुरवाळणें. 'प्रेमें मजवरुनि हात फिरवूनी ।' -मोउद्योग १३.१८३. २ पुन्हां उजळणी, उजळा देणें. ॰बसणें-१ एक- सारखें लिहीत, वाचीत इ॰ राहणें. २ अक्षरांचें वळण बसणें; तें पक्कें होणें. ३ एखादें काम उत्तम प्रकारें करतां येणें; मनांत ठसणें; विशिष्ट क्रिया करण्याची सफाई हातास प्राप्त होणें. ॰बांधणें-१ मर्यादा घालणें; स्वैर होऊं न देणें. २ अडथळा आणणें. ॰बोट लावणें-भार लावणें-मदत करणें. ॰भिजणें-१ दक्षणा देणें; (गो.) हात भिजविणें. २ लांच देणें; हात ओले करणें. ॰मारणें-१ बळकाविणें (पैसा इ॰) देणें. २ अधाशीपणानें खाणें; ताव मारणें. ३ एखाद्या वस्तूवर विविध क्रिया करणें. ॰मिठ्ठीला येणें-(माण.) हाताहातीं होईपर्यंत भांडणें. ॰मिळविणें-१ घाव घालणें. 'तस्कारानें जलदीकरून हात मिळविला जाऊन ।' -ऐपो ३९०. २ (कुस्ती) सलामी घेणें. ॰मोडणें-१ असहाय्य, मित्रहीन होणें. २ मिळत असलेली देणगी, बक्षीस नाकारणें. ॰राखणें- कुचराई करणें. ॰राखून खर्च करणें-काटकसरीनें खर्च करणें. ॰लागा ना-(गो.) विटाळशी होणें. ॰लावणें-मदत करणें. ॰वसणें-क्रि. हस्तगत होणें. 'ते ज्ञाननिष्ठा जेथें हातवसे ।' -ज्ञा १८.१२४८; -भाए २४०. ॰वहाणें-१ हत्यार चालविणें. 'परि परमप्रिय अर्जुन त्यावरि याचा न हात वाहेल ।' -मोउद्योग १२.५४. २ प्रवृत्त होणें; कार्य करणें. ॰वळणें-१ सराव, परि- पाठ इ॰ नें हातास सफाई येणें. २ (एखाद्या गोष्टीस, कृत्यास) प्रवृत्त होणें. ॰सैल सोडणें-सढळपणें खर्च करणें. ॰सोडणें-१ पूर्वीप्रमाणें कृपा, लोभ न करणें. २ संगति. ओळख सोडणें. ॰हातांत देणें-लग्न लावणें. 'एखाद्या तरुणीचा हात माझ्या हातांत दे.' -भा ४९. ॰हालवीत येणें-काम न होतां रिकामें परत येणें. हातणें-क्रि. सारवणें. हाताखालीं घालणें-देख. रेखीखालीं, अंमलखालीं, कबज्यांत, ताब्यांत घेणें. हातां चढणें- प्राप्त होणें. 'जरी चिंतामणी हातां चढे ।' -ज्ञा ३.२३; -एभा १०.२८२. हाताचें पायावर लोटणें-आजची अडचण उद्यां- वर ढकलणें; आजचें संकट लांबणीवर टाकणें. हाताचे लाडू होणें-खरजेनें हाताच्या मुठी वळणें, त्या न उघडणें. हाताच्या धारणेनें घेणें-मारणें; बुकलणें. हातांत कंकण बांधणें- एखाद्या गोष्टीची प्रतिज्ञा करणें; चंग बांधणें (यजमानानें यज्ञ करावयाच्या पूर्वी हातांत दीक्षासूत्र बांधण्याच्या चालीवरून). हातांत हात घालणें-१ लांच देणें. २ मैत्रीच्या भावानें वागणें, प्रेम करणें. ३ विवाहसंबंध घडवून आणणें. ४ विवाहित स्त्रीनें परपुरुषाशीं संबंध ठेवणें; निघून जाणें. हातातोंडाशीं गांठ पडणें-१ घास तोंडांत पडणें; खावयास सुरुवात करणें; जेवणा- खेरीज इतरत्र लक्ष न जाणें. २ एखाद्या कार्यास घाईनें आरंभ होणें. ३ बोंब मारणें. हातातोंडास येणें-१ तारुण्यावस्था प्राप्त होणें (लग्न झालेली स्त्री, तरुण मुलगा इ॰). २ फल देण्याच्या स्थितीस येणें. हातापायांचा चौरंग होणें-पेटके वगैरेमुळें हातपाय आंखडणें. हातापायांचे डगळें होणें- पडणें-मोडणें-अशक्तपणानें अंगास कंप सुटणें; अंग शिथिल होणें. हातापायांचे ढीग पडणें-होणें-भीतीनें, आजारानें अशक्त असहाय्य होणें. हातापायांच्या फुंकण्या होणें- अशक्ताता, निर्बलता येणें. हाता(तीं) पायां(यीं) पडणें- १ गयावया करणें; प्रार्थना करणें. २ शरण जाणें; नम्र होणें; दया याचिणें. हाताबोटावर येणें, हातावर येणें-आतां होईल, घटकाभर्‍यानें होईल अशा स्थितीस येणें; हस्तगत कबज्यांत, साध्य होण्याच्या अगदी बेतांत असणें. हाताला चढणें-प्राप्त होणें. 'संसार कशाचा जरि न हाताला चढली ।' -राला ११२. हाताला येईल तें-जें कांहीं हातांत सांपडेल तें; ज्याचेवर हात पडेल तें. हाताल लागणें-गमावलेल्या, फुकट गेलेल्या, नासलेल्या, बिघडलेल्या वस्तूंतून अल्प अंश मिळणें. 'कापडांत पैसें घालूं नका, त्यांतून हाताला कांहीं सुद्धां लागणार नाहीं.' हाताला वंगण लावणें-लांच देणें. -राको १३३७. हाताला हात लावणें-१ पति पुण्याहवाचनादि धर्मसंस्कारास बसला म्हणजे पत्नीनें त्याच्या हातास नुसता हात लावणें (म्हणजे तिलाहि त्याचें फळ मिळतें). २ स्वतः कांहीं न करतां दुसर्‍यानें केलेल्या कामाच्या फळांत वांटेकरी होणें; दुस- र्‍याच्या कार्याला अनुमति देणें. हातावर असणें-पूर्णपणें साध्य असणें. हातावर घेणें-आणणें-काढणें-तारण, गहाण न ठेवतां पैसे उसनें आणणें, काढणें, घेणें. हातावर तुरी देणें-देऊन पळून जाणें-हातावर हात देऊन-मारून पळणें-पळून जाणें-फसविणें; डोळ्यादेखत फसवून पळून जाणें; देखत देखत भुल- विणें. 'सुभद्रा काबीज करण्यासाठीं श्रीकृष्ण परमात्म्याच्या मदतीनें बलिरामाच्या हातावर ज्या तुरी दिल्या... तें पाहून तरी आम्हांस कधीं विषाद झाला आहे काय ?' -आगर. हातावर दिवस काढणें-लोटणें-मोठ्या कष्टानें संसार चालविणें. हातावर धरणें-हातांवर संभाळीत राहावयास लावणें (मुलीनें). 'यानें मला सकाळपासून हातावर धरिलें.' हातावर पाणी पडणें- भोजनोत्तर आंटवणें. 'हातावर पाणी पडलें कीं चालला बाहेर.' हातावर पिळकणें-लांच देणें. हातावर पोट भरणें-संसार करणें-अंगमेहनत, भिक्षा, नौकरी करून उपजीविका करणें. हातावर मिळविणें-मिळवावें व खावें अशा स्थितींत राहणें. हातावर येणें-जवळ येऊन ठेपणें. हातावर येणें-लागणें- दूध देऊं लागणें-थानास वासरूं न लावतां किंवा पान्हवण (सरकी इ॰) पुढें न ठेवतां जनावरानें दूध देणें, पान्हवणें. हातावर शीर घेऊन असणें-कोणतेंहि धाडसाचें कृत्य कर- ण्यास सदां सिद्ध असणें. हातावर हात चोळणें-रागानें तळ- हात एकमेकांवर घासणें; चरफडणें. 'इंद्रें स्वतातघातक पाठीसीं घातला म्हणोनि करें । कर चोळी...' -मोआदि ७.४०. हाता- वर हात मारणें-१ एखादी गोष्ट, सट्टा इ॰ पटला म्हणजे दुस- र्‍याचे हातावर आपला हात मारणें. २ वचन देणें. हातास हात लावणें-(देणार्‍याच्या, घेणार्‍याचे हातास स्पर्श होणें) द्रव्यलाभ होणें. हातास-हातां-हातीं चढणें-प्राप्त होणें. 'तो किल्ला माझ्या हातीं चढला.' 'नवनींत मंथनावांचून । हातां न चढे सहसाहि ।' हातीं धरणें-१ स्वतःच्या देखरेखीखालीं घेणें; एखाद्यास आपल्या आश्रयाखालीं घेणें. २ निरंकुशपणें मोकाट सोडणें (जीभ, तोंड, पोट इ॰ इंद्रियें). हातीं धोंडे घेणें-१ विरुद्ध उठणें. २ वेड्यासारखें करणें. हातींपायीं (अन्न इ॰) डेवणें-धावणें-येणें-रेवणें-जाड्य, सुस्ती येणें; शिव्या देण्यास तयार होणें. हातींपायीं उतरणें-सुटणें-मोकळी होणें-सुखरूपपणें बाळंत होणें हातींपायीं पडणें, लागणें- अतिशय विनवण्या, काकुळत्या करणें. हातीं भोपळा घेणें- देणें-भिक्षा मागणें, मागावयास लावणें. आडव्या हातानें घेणें-१ चोरून; चोरवाटेनें घेणें. २ झिडकारणें; भोसडणें; तुच्छता दाखविणें; कचकावून खडकाविणें; मारणें. आडव्या हातानें घेणें, चारणें-बाजूनें, तोंडांत हात घालून खाऊं घालणें; औषधोपचार करणें (घोडा इ॰स). (देणें-चोरून देणें-मारणें- मागल्या बाजूनें मारणें-ठोकणें). एका हाताचीं बोटें पण सारखीं नाहींत-सारख्या परिस्थितींतील माणसें असलीं तरी त्यांच्यांत थोडाफार फरक असतो. दोहों हाताचे चार हात करणें-होणें-लग्न करणें, होणें या हाताचे त्या हातावर- क्रिवि. ताबडतोब; जेव्हांचे तेव्हांच (दुष्कृत्याची फेड लवकर व खात्रीनें मिळते या अर्थीं). या हाताचें त्या हातास कळूं न देणें-अत्यंत गुप्तपणें करणें. रिकाम्या हातानें-जरूं- रीच्या साधनां-उपकरणां-सामग्रीखेरीज; कांहीं काम न करतां. याचा हात कोण धरीसा आहे ? -याच्या वरचढ, बरो- बरीचा कोण आहे ? याचा हात धरण्याची शक्ति कोणास आहे ? हातांत काय तागडू मिळाला-(व) कोणता फायदा झाला ? हातांत नारळाची आई (नरोटी) देणें-भिक्षा मागावयास लावणें. सामाशब्द- ॰अनार-पु. शोभेच्या दारूचा एक प्रकार. ॰इंद-न. (कों.) खेंकडे पकडण्याचें जाळें. ॰उगावा-पु. १ एखाद्या किचकट, अडचणीच्या कामांतून, धंद्यांतून अंग काढून घेणें. २ सूड; पारिपत्य. (क्रि॰ करणें). ३ कर्जाची उगराणी; घातलेलें भांडवल परत मिळविणें. [हात + उगवणें] ॰उचल-स्त्री. १ पेढींतून स्वतःची रक्कम आतां थोडी मग अशा रीतीनें खर्चण्यास घेणें. २ मूळ भांडवल; मुद्दल. उचल मध्यें पहा. ॰उचला-वि. १ आप- खुषीनें, हात उचलून दिलेला (पदार्थ). २ ज्याचा स्वतः करण्याबद्दल पत्कर घेतला आहे असा (व्यवहार, उद्योग). ॰उसना-ना-वि. थोडा वेळ उसना घेतलेला; लवकर परत करण्याच्या बोलीनें आणलेला (त्यामुळें लेख इ॰ लिहून न घेत दिला-घेतलेला). ॰उसणें-नें-न. थोड्या मुदतींत परत कर- ण्याच्या बोलीनें (लेख करून न देतां) उसनी घेतलेली रक्कम. ॰कडी-स्त्री. हातांतील बेडी. 'मन सिंतरील विवेकासीं । यालागी हात कडिया दोहींसीं ।' -एभा २३.९५१. ॰कर- वत-पुस्त्री. हातानें चालविण्याची लहान करवत. ॰करवती- स्त्री. लहान हात करवत. ॰करीण-स्त्री. अचळाला हात लावतांच (वासरूं न सोडतां किंवा आंबोण न ठेवतां) पान्हा सोडून दूध देणारी गाय; म्हैस. इच्या उलट पान्हावणकरीण. ॰कापें-न. (गो.) लांडी, बिन बाह्यांची बंडी. ॰काम-न. हस्तकौशल्याचें काम (यांत्रिक कामाच्या विरुद्ध); हस्तव्यवसाय. (इं.) हँडफ्रॅक्ट. ॰कैची-कचाटी- स्त्री. आलिंगन; मिठी. ॰खंड-वि. १ मधून मधून कामांत सोडवणूक करणारा; मदतनीस (मूल, मित्र, शेजारी); अडल्या वेळीं आपल्या कामीं उपयोगी पडणारा. २ हात खंडा पहा. [हात + खंड = खळ, विसावा] ॰खंडा-वि. निष्णात, करतलामलकवत् असलेली; म्हणाल त्यावेळीं तयार (विद्या, कला). ॰खर्च-पु. किरकोळ खर्च; वरखर्च. ॰ख(खं)वणी- स्त्री. लहान खवणी. ॰खुंट-खुंटा-पु. (विणकाम) वशारन पसरलेल्या लांबीपाशीं असलेल्या समोरच्या खांबापासून मागा पाशीं बसण्याच्या जागेजवळ उजवीकडे दोरी बांधावयाची खुंटी. ॰खुरपणीचें लोणी-न. हातखुरप्या नारळाचें खोबरें. ॰खुरपा-वि. हातानेंच आंतील खोबरें खरवडून काढण्याजोगा (कोंवळा नारळ). ॰खुरपें-न. १ हातखुरपा नारळ. २ गवत काढण्याचा लहान विळा. ॰खे(खो)रणें-न. कलथा; उलथणें; झारा. (क्रि॰ लावणें-अन्नास, पैक्यास = पैका उकळण्याचा सपाटा). म्ह॰ हातखेरणें असतां हात कां जाळावा. ॰खेवणें-न. १ हातवल्हें. २ मदतनीस; हाताखालचा माणूस. ॰खेव्या-व्या-पु. हातखेवणें अर्थ २ पहा. ॰खोडा-पु. हात अडकविण्याचा सांपळा. 'चंद्रसूर्याचा हातखोडा । काळा कैसेनि घालिजे ।' -भाए ५४९. ॰गाडी-स्त्री. हातानें ढकलून चालविण्याची गाडी. ॰गुंडा-धोंडा-पु. १ हातानें फेकण्या-उचलण्या-जोगा दगड. 'कुश्चीतभावाचे हातगुंडे ।' -ज्ञाप्र २६५. २ असला दगड हातानें जेथवर फेंकला जाईल तितकें अंतर. ॰गुण-पु. (बरेंवाईट करण्याचा योग, गुण) नशीब; हातीं (काम, माणूस) धरणाराचा प्रारब्धयोग. हस्तगुण पहा. ॰घाई-स्त्री. १ हातानें वाजवावयाचें वाद्य जोराजोरानें, आवेशानें वाजविणें. २ (ल.) उतावळेपणा; जोराची हाल चाल. (क्रि॰ हातघाईवर, हातघाईस येणें-मारामारी करणें). ॰चरक-पु. १ हातानें फिरवून रस काढावयाचा चरक. २ हात घाणी. ॰चलाख-वि. चोर; उचल्या. ॰चलाकी-खी-स्त्री. हस्तचापल्य; लपवाछपवी; नजरबंदीचा कारभार (गारुडी, सराफ इ॰ चा). ॰चाळा-पु. १ हाताचा अस्थिरपणा; चुळबुळ; हातानें कांहीं तरी उगीच करीत रहावें अशी लागलेली खोड; हातचेष्टा. (क्रि॰ लागणें). २ अशा प्रकारानें होणारें नुकसान. (क्रि॰ करणें). ३ सदोदित हात गुंतलेला असणें; त्यांत निमग्न असणें (वाढता धंदा, व्यापार, खेळ इ॰ त); देवघेवीचा मोठा उद्योग. ॰चिठी-चिटी-ट्टी-स्त्री. १ अधिकार्‍यानें शिक्का- मोर्तब न करतां आपल्या हातच्या निशाणीनेंच पुरी केलेली चिठी, हुकूम. २ कोणाहातीं पाठविलेली चिठी-चपाटी. ॰चे हातीं- च्या हातीं, हातोहातीं-किवि. लेगच; ताबडतोब; आतांचे आतां; क्षणार्धांत पटकन् (करणें, घडणें). 'ही गडी हाताचे हातीं जाऊन येईल.' 'हाताचे हातीं चोरी-लबाडी-शिंदळकी' इ॰. ॰चोखणें-चुंफणें-न. तान्ह्या मुलास चोखण्यासाठीं हातांत देण्याची वस्तु. ॰जतन-स्त्री. हातानें केलेली मशागत (मालीस इ॰); रोज वक्तशीर घेतलेली काळजी. 'हा घोडा नुसत्या हातजतनानें इतका हुशार आहे.' ॰जुळणी-स्त्री. (ठाकुर) लग्न लागल्यानंतर मुलानें मुलीचे दोन हात धरणें. -बदलापूर १३८. ॰झाड-स्त्री. आपोआप उगवलेलें नसून मुद्दाम लाविलेलें झाड. ॰झाडणी-स्त्री. राग, तिरस्कार इ॰ नें हात झटकणें. ॰झालणा-पु. हातजाळें; हातविंड. ॰झोंबी-स्त्री. परस्परांचे हात धरून केलेली झटापट; हिसकाहसकी; झगडा. ॰तुक-न. १ हातानें वजन करणें. 'नव्हती हाततुके बोल ।' -तुगा ३४२३. २ अटकळ; अजमास. 'मग त्यागु कीजे हात- तुकें ।' -ज्ञा १८.१३१. ॰दाबी-स्त्री. लांच. 'मालकानें हात- दाबी केली म्हणजे माल त्यांना परत देतात.' -गुजा ६७. ॰धरणें-न. (खा.) सोधणें; स्वयंपाकघरांतील भांडीं उतरणें इ॰ चें फडकें. ॰धरणी माप-न. माप भरतांना त्याचे शेवटास डावा हात धरून, मापापेक्षां थोडें जास्त धान्य घेऊन केलेलें माप. बोटधरणी माप पहा. ॰धुणी-स्त्री. १ राजाच्या हात- धुणारास दिलेलें इनाम इ॰. २ स्वयंपाकघरांतील मोरी. ॰धोंडा- पु. १ हातानें उचलण्याजोगा धोंडा. २ धोंडा हातानें फेंकला असतां जेथवर जाईल इतकें अंतर; टप्पा. ॰नळा-पु. हातांत धरून सोडण्याचा, शोभेची दारू भरलेला नळा. ॰नळी-स्त्री. चपटें कौल. ॰निघा-गा-हातजतन पहा. हातजपणूक. ॰नेट- क्रिवि. १ (व.) हाताचा जोर, भार देऊन. २ (व.) हाता- जवळ. ॰पडत-पात-वि. हातीं असलेलें; अगदीं जवळ असणारें; लागेल त्यावेळीं ताबडतोब मिळणारें. ॰पहार-स्त्री. हातभर लांबीची पहार. ॰पा-हातोपा-पु. अंगरखा इ॰ ची बाही. ॰पाटिलकी-स्त्री. १ हातानें ठोकणें; चोपणें, बदडणें. तोंड- पाटिलकीचे उलट. २ बोलण्यापेक्षां प्रत्यक्ष कृति, काम. 'तोंड- पाटिलकी सगळ्यांस येते हातपाटिलकी कठीण.' ३ हस्तचापल्य; उचलेगिरी. ॰पाणी-न. १ लग्नांत रासन्हाणीचे वेळीं वधूच्या सासूनें तिचे हातांवर ओतावयाचें पाणी. (क्रि॰ घालणें). २ लग्नांत मांडव परतण्याचे दिवशीं सासूनें सुनेची बोहोल्यावर ओटी भरून, किंवा मांडवांत न्हातेवेळीं नवर्‍यानें केशरी रंगांत बुडवून तिचे हातांत घालवयाची अंगठी. ३ लग्नांत मुलाच्या हाताखालीं मुलीचा हात ठेवून त्यांवर समंत्रक पाणी घालणें. -बदलापूर २०५. ॰पान-पु. कोंका पडण्यापूर्वींचें केळीचें पान. ॰पान्हा- पु. हातकरीण गाय, म्हैस इ॰ नें सोडलेला पान्हा (वासरूं किंवा अंबोण दाखविल्याशिवाय). हातपान्ह्यास लगाणें, येणें, हातपान्ह्याची गाय इ॰ प्रयोग. ॰पालवी-स्त्री. हात पोंहो- चेल इतक्या उंचीवरील पाला. ॰पावा-वि. (कों.) हाताच्या आटोक्यांतील, हात पोहोंचेल इतक्या उंचीवरील (वेलीचें फूल इ॰ किंवा खोली-विहिरींतील पाणी इ॰). [हात + पावणें] ॰पिटीं-स्त्री. १ झोंबाझोंबी; गुद्दागुद्दी. २ (ल.) हातघाईची मारामारी. 'तंव राउतां जाली हातपीटी ।' -शिशु ९६८. [हात + पिटणें] ॰पेटी-स्त्री. हातानें भाता चालवून वाजवावयाची बाजाची पेटी; हार्मोनियम. २ सरकारी कामाचे कादगपत्र ठेवण्याची पेटी. -स्वभावचित्रें २४. ॰पाळी-स्त्री. चेंडूफळीचा एक प्रकारचा खेळ. -मखेपु ५६. ॰फळ-न. (बे.) मेर ओढण्याचें फळ. ॰फळी, हातोफळी-क्रिवि. हातोहातीं; लवकर. ॰बळ-न. हस्तसामर्थ्य. 'हातबळ ना पायबळ, देरे देवा तोंडबळ.' ॰बांधून डंकी-स्त्री. (कुस्ती) जोडीदारास खालीं आणल्यावर त्यानें आपला एक पाय धरला तर आपण दुसर्‍या पायानें जोडीदाराचे पाठीवरून झोंका घेऊन उडी मारून त्यास चीत करणें. ॰बेडी-स्त्री. कैद्याच्या हातांत अडकवावयाची बेडी; हातकडी. ॰बोनें-न. हातांत घेत- लेलें भक्ष्य. 'बुद्धीचेनि शाकें । हातबोनें निकें ।' -ज्ञा ६.२८२. ॰बोळावन-स्त्री. हातांनीं मार्गाला लावणें. 'जाणो नेदी योग्यता । ग्रहीं हातबोळावन करितां ।' -भाए ३४९. ॰भाता-पु. हातांत घेऊन फुंकावयाचा भाता; लहान भाता. ॰भार-पु. मदत; साहाय्य (विशषतः द्रव्याचें). (क्रि॰ लावणें). ॰भुरकणा- भुरका-वि. हातानें भुरकून खावयाजोगा (पेयपदार्थ). ॰भुर- कणें-भुरकें-वरील प्रकारचा पातळ पदार्थ. ॰भेटी-स्त्री. प्रेमानें हातांत हात घालणें. -एभा २८.५९२. ॰मांडणी-स्त्री. पैसे पावल्याची पोंच म्हणून पैसे नेणार्‍याची खतावणीवर घेतलेली सही. ॰मात-स्त्री. हात टेकणें. ॰मेटी हेटीमेटी-क्रिवि. आळसांत; निरुद्योगीपणानें; हातांवर व गुडघ्यावर टेकून रमतगमत (दिवस इ॰) घालविणें. 'दिवस गेला हातमेटीं चांदण्या खाली कापूस वेटी.' ॰रगाडा-पु. उसाचा हातचरक. ॰रवी-स्त्री. घुसळखांब, मांजरी यांचे विरहित हातानेंट फिरविण्याची लहानरवी. ॰रहाट- पु. हातानें ओढून पाणी काढण्याचा लहान रहाट. ॰रिकामी- स्त्री. विधवा स्त्री. -बजलापूर १७४. ॰रिती-वि. (महानु.) रिकामी विधवा. -स्मृतिस्थळ. ॰रुमाल-पु. १ तोंड वगैरे पुसण्याचा लहान रुमाल. २ नित्योपयोगी कागदपत्रें ठेवण्याच्या दप्तराचा रुमाल; चालता रुमाल; त्यांतील कागदपत्रांचें बंडल. ॰रोखा- पु. दस्तक; चिठी; आज्ञापत्र. 'पाराजीपंत वाघ यांस हातरोखा वरचेवर पाठवून अति आग्रहें अंतरवेदींत घालविलें.' -भाव १०२. ॰लाग-पु. हाताचा टप्पा. ॰लागास-लागीं येणें-असणें- कक्षा, आंवाका, आटोका, अवसान इ॰ त येणें, असणें. ॰लागा- लाग्या-वि. अनुकूल असणारा. 'तुमचे हातलागे लोक असतील.' -वाडबाबा १.६. ॰लावणी-स्त्री. १ वेश्येचा चिरा उतरणें; कौमार्यभंग. (क्रि॰ करणें). २ हाताची पेरणी; लागवण. -वि. हातपेरणीचें. ॰लावा-व्या-वि. हाताळ; चोरटा; चोरी करण्या- साठीं हात फुरफुरत असलेला. ॰वजन-न. १ जिन्नस हातांत घेऊन केलेलें वजन. २ अशाप्रकारें वजन काढण्याची लायकी. ॰वटी- हातोटी-स्त्री. १ हस्तकौशल्य; हस्तचातुर्य. २ (सामा.) कसब; नैपुण्य; चलाखी. 'अहो चंद्रकांतु द्रवता कीर होये । परि ते हात- वटी चंद्री कीं आहे ।' -ज्ञा ९.२९. ३ विशिष्ट पद्धत, रीत, प्रकार. [हिं.] भाषणाची-पोहण्याची-व्यापाराची इ॰ हातोटी. ॰वडा- हातोडा-पु. सोनार, कासार इ॰ चें ठोकण्याचें हत्यार. ॰वडी हातोडी-स्त्री. लहान हातोडी. ॰वणी-न. १ हात धुतलेलें पाणी. २ (कों.) हातरहाटाचें पाणी पन्हाळांतून जेथें पडतें तेथील जमीनीचा उंच केलेला भाग; हातणी. ॰वल्हें-न. हातानेंच वल्हवावयाचें लहान वल्हें. ॰वश-वि. हस्तगत. ॰वशी-स्त्री. हात उगारणें. -शर. ॰वळा, हातोळा-पु. हातवटी पहा. म्ह॰ गातां गळा; शिंपता मळा, लिहितां हातवळा. ॰वारे-पु.अव. हातानीं केलेलें हावभाव; हाताची हालचाल. ॰विंड-न. (राजा.) हाता झालणा पहा. ॰विरजण-न. अजमासानें घातलेलें विरजण ॰विरजा-विरंगुळा-वि. कामांत मदत करण्याच्या लायक, लायकीस झालेला (पुत्र, शिष्य, उमेदवार इ॰) [हात + विरजणें] ॰शिंपणें-न. सोडवणी न देतां शेलणें इ॰ साधनानें भाजी- पाल्यास उडवून द्यावयाचें पाणी; असें पाणी शिंपणें. ॰शेकणें-न. (उसाचा चरक) चुलाण्यांत जाळ घालणारास त्याच्या मेहनती बद्दल द्यावयाचा गूळ. ॰शेवई-स्त्री. हातानें वळलेली शेवई; याचे उलट पाटशेवई. ॰सर-न. बायकांचा हातांतील एक दागिना, गजरा. 'हे पाटल्या हातसरांस ल्याली ।' -सारुह ६.२६. ॰सार- वण-न. खराटा, केरसुणी न घेतां हातानें जमीन इ॰ सारवणें. ॰सुख-न. १ दुसर्‍यास, शत्रूस हातानें मारूंन त्यामुळें अनुभवि- लेलें सुख (क्रि॰ होणें). २ हातानें दिलेला मार. ॰सुटका-स्त्री. १ एखाद्या व्यवहारांतून, धंद्यांतून स्वतः अंग काढून घेणें; मोकळें होणें. २ हातविरजा पहा. ३ हाताचा सढळपणा. ॰सुटी-स्त्री. औदार्य. 'हे हातसुटीक्षीरसागरा । वांचौनि नाहीं ।' -भाए ७६९. ॰सुतकी-स्त्री. पाथरवटाचें दगड फोडण्याचें हत्यार. ॰सूत-न. चातीवर हातानीं काढलेलें सूत. ॰सोकी(के)ल-सोका-वि. हाताच्या संवयीचा; अंगाखांद्यावर घेण्यास संवकलेला. 'केल कुत्रा हातसोंका ।' 'घडो नेदि तीर्थयात्रा.' -तुगा २९५४. ॰सोडवण-नस्त्री. हातसुटका अर्थ १,२ पहा. ॰सोरा-र्‍या सुरा-र्‍या-पु. कुरड्या इ॰ करण्याचा सांचा. ॰हालवणी-स्त्री. प्रवाशांवरील एक जुना कर (त्यांच्या हात हालवण्याच्या क्रियेबद्दल हा कर असे). हातचा-वि. १ हातानें दिलेला; स्वाधीनचा; हातांतला; हातानें निर्मिलेली, मिळविलेली, दिलेली (वस्तु, काम, उत्पादन इ॰). 'शुद्राचे हातचें पाणी स्नानसंध्येस घेऊं नये.' 'रोग्यास औषध देणें मनुष्याच्या हातचें आहे-आयुष्य घालणें नाहीं.' २ (अंकगणित) पूर्णांकाची बेरीज करतांना बेरजेच्या संख्येंतला अंक ज्या स्थानाचा त्या स्थानीं मिळविण्याकरितां उरलेला अंक. (क्रि॰ येणें; रहाणें; ठेवणें). ३ लवकर हातीं येणारें; अवसानांतील. ४ ताब्यांतील; कबजांतील. म्ह॰ 'हातचें सोडून पळत्याचे पाठीस लागूं नये.' ॰चा पाडणें-१ हातां- तील सोडणें. २ एखाद्यास त्याचे ताब्यांतील वस्तू्स मुकविणें. ॰चा-धड-नीट-वि. नीटनेटकें काम करणारा (लेखक, कारागीर). ॰चा फोड-पु. फार प्रिय माणूस. तळहाताचा फोड पहा. ॰चा मळ-पु. सहज घडणारी गोष्ट. 'सरळ, सोपी आणि बालिकाबोध भाषा कशी वापरावी हें म्हणजे माझ्या हाताचा मळ आहे.' -कीच. ॰चा सुटा-वि. सढळ हाताचा. हातवा-पु. १ (बायकी) गौरीपूजनाचे सणांत हळदीकुंकवानें हात भिजवून जमिनीवर छाप मारणें. २ लग्नांत नवर्‍याच्या मिरवणुकीच्या मागें धरावयाचा कणकेचा दिवा. ३ घोड्याचा खरारा, साफ करण्याचा काथ्याचा पंजा. ४ काडवात मनको. ५ (कर्‍हाड) न्हाणवली बसवितांना, मखर बांधावयाचे ठिकाणीं, कुंकू पाण्यांत भिजवून हातानें पांच उलटे पांच सुलटे ठसें उठविणें. हातळ, हाताळ-ळु-वि. चोरण्याची संवय असलेला; चोर; भामटा. हातळणें, हाताळणें-उक्रि. १ हात लावणें; चोळ- वटणें; चिवडणें, २ हाताळ माणसानें वस्तू् चोरणें. हातळी, हाताळी, हाताळें-स्त्रीन. १ घोड्याचा काथ्या इ॰ चा खरारा. २ भात्याची बोटांत, हातांत अडकवावयाची चामड्याची वादीं. ३ (कर.) भाकरी. हाता-पु. हातांत राहील इतका जिन्नस, पसा (फळें, फुलें इ॰ पांच-सहा इ॰ संख्येचा संच एकेक वेळ हातांत घेऊन बाजूस ठेवतात). हाताखालचा-वि. १ मदतनीस; हाता- खालीं काम करणारा. २ उत्तम परिचयाचा; माहितींतील. ३ हातां- तील; कबज्यामधील; स्वाधीन. ४ दुय्यम; कमी दर्जाचा. हाता- खालीं-क्रिवि. १ सत्तेखालीं; दुय्यम प्रतींत. २ स्वाधीन. ३ जातांजातां; हातासरशीं; सहजगत्या. 'मी आपला घोडा विका वयास नेतोंच आहे, मर्जीं असली तर हाताखालीं तुमचाहि घोडा नेईन आणि विकीन.' हाताचा उदार, मोकळा, सढळ- वि. देणगी इ॰ देण्यांत सढळ. हाताचा कुशल-वि. हस्त कौशल्यांत निपुण, प्रवीण. हाताचा जड-बळकट-थंड-वि. १ चिक्कू; कृपण. म्ह॰ हाताचा जढ आणि बोलून गोड. २ मंद (लेखक). हाताचा जलद-वि. काम करण्यांत चलाख हाताचा फटकळ-वि. फटाफट मारणारा; मारकट. हाताचा बाण-पु. वर्चस्व, पगडा, वजन पाडणारें कृत्य, गोष्ट (क्रि॰ गमावणें; दवडणें; सोडणें). हाताजोगता-वि. १ हातांत बसेल; मावेल; धरतां येईल असा. २ हात पोहोचण्याजोगें. हाता- निराळा-वेगळा-वि. १ पूर्ण; पुरा; सिद्ध केलेला; पुन्हां हात लावण्याची जरूरी राहिली नाहीं असें (काम, धंदा इ॰). 'हा दुर्निवह कोश एकदां हातानिराळा झाला म्हणजे दुसरें काम घेतां येईल.' २ -क्रिवि. एकीकडे; बाजूस. 'कामापुरती भांडीं वहिवाटींत ठेवा वरकड हातानिराळीं ठेवा.' हातापद्धति-स्त्री. दलाल माल घेणार्‍याच्या हातावर रुमाल टाकून गुप्तरीतीनें मालाची किंमत माल घेणार्‍याकडून अजमावतो ती पद्धत. हाताची थट्टा-स्त्री. थट्टेंनें मारणें (थापटी इ॰); चापट देणें. (तोंडी थट्टा नव्हे्). हाता(तो)फळी-स्त्री. गुद्दागुद्दी; मारामारी; कुस्ती; हातझोंबी; धक्काबुक्की. 'मजसीं भिडे हातोफळी ।' -ह १९.१४३. -क्रिवि. पटकन्; चट्दिशी; तत्काळ; हातावर हात मारून. [हात + फळी] हातावरचा संसार-हातावरचें पोट-पुन. मजुरी, कामधंदा करून स्वतःचें कसेंतरी पोट भरणें (क्रि॰ करणें; चालविणें) थोड्या पगाराची, कष्टाची नोकरी करून उदरनिर्वाह. हातावीती- क्रिवि. हातोहात पहा. 'सर्वज्ञ हातावीती पुढें जाती ।' -पुच. हातासन-न. हातवटी. 'अन्योपदेशाचेनि हातासनें ।' -ज्ञा ६.११९. हातासरसां-क्रिवि. त्याच हातानें, प्रकारानें; तसेंच; त्याच बरोबर; चालू कामांत आहे तोंच. 'उष्टी काढतो आहेस तों हातासरशीं भांडीं घास मग हात धू.' हातिणें-अक्रि. मारणें. -मनको. हातिवा-स्त्री. काडवात. 'उजळोनि दिव्य तेजा हातिवा ।' -ज्ञा १६.२३. हातुवसीया-विय एक हात अंतरा- वरील. 'हातवसिया कळागंगा पार्वती ।' -धवळे ३१ हातोणी- स्त्री. (व.) खरकटें पाणी; हातवणी. हातोपा-हातपा पहा. हातोपात-ती-क्रिवि. एका हातांतून दुसर्‍या हातांत. वरचेवर; हातोहात. -ज्ञा १८.१५६. हातोरी-क्रि. (ना.) हातानें; साहा- य्यानें. हातोवा-पु. (महानु.) अंजली; ओंजळ. 'हातोवा केवि आटे अंभोनिधि ।' -भाए २१७. हातोसा-पु. मदत; हातभांर. (क्रि॰ देणें), हातोहात-ती-क्रिवि. १ हातचेहातीं; हातोपात. २ चटकन्; भरदिशीं. (क्रि॰ येणें = मारामारी करणें). 'हिंवांळ्याचे दिवसांत दुपार हातोहात भरतें.' हातोळा-हात- वळा पहा. हातोळी-स्त्री. (व.) लग्न. हात्या-पु. १ पाणर- हाटाचा दांडा. २ घोडा घासण्याची पिशवी; खरारा. हाताळी अर्थ १ पहा. ३ मागाच्या फणीची मूठ. ४ काहिलींतील गूळ खरवड- ण्याचें खुरपें. ५ (कर.) मोठी किल्ली.

दाते शब्दकोश