मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

सौम्य

सौम्य saumya m S The planet Mercury or the Regent of it. He is the same with Buddh and the son of Som the moon. 2 One of the nine खंड or divisions of the continent as known to or feigned by the Hindús.

मोल्सवर्थ शब्दकोश

सौम्य a Mild; quiet. Lunar.

वझे शब्दकोश

सौम्य saumya a (S) Mild, gentle, clement, soft;--as a person or a disposition: mild or gentle; not acrid, acrimonious, harsh, rough, violent &c.;--as a medicine, an operation, a measure, an act. 2 Quiet, still, calm, composed. 3 Belonging or relating to सोम or the moon, lunar.

मोल्सवर्थ शब्दकोश

पु. १ सोमाचा, चंद्राचा पुत्र वधु (देव व ग्रह). २ नवखंड पृथ्वींतील एक खंड. ३ ४३ वा संवत्सर. -न. मृग- नक्षत्र. -वि. १ मृदु; नरम; हलकें; तीक्ष्ण नसलेलें; साधें (औषध, मनुष्य, स्वभाव, कृति, उपाय). २ शांत; स्थिर; स्तब्ध; समा- धानी. ३ चंद्रासंबंधी. [सं.] ॰ग्रह-पु. बुध, गुरु, शुक्र हे ग्रह. ॰वार-वासर-पु. बुधवार. सौम्यगोल-पु. उत्तरेकडील एक प्रदेश. सौम्या-स्त्री. उत्तरदिशा. [सं.]

दाते शब्दकोश

(सं) वि० हलकें, साधें.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

सौम्य ग्रह

सौम्य ग्रह saumya graha m (S) A good or benign planet (as Mercury, Venus, Jupiter).

मोल्सवर्थ शब्दकोश

सौम्य कृचछ्र

सौम्य कृचछ्र saumya kṛcachra n S A particular religious penance.

मोल्सवर्थ शब्दकोश

सौम्य

सात्त्विक, शान्त बिनपीडेचें, मृदु, मृदुल, कोमल, मऊ, मंद, शान्तदान्त, शीतल, थंड-कडक-तीव्र - जालीम- अघोरी नव्हे, रेशमी, हलका, न रागावणारा, न त्रासणारा, कधी खळबळ नाहीं, सुसह्य.

शब्दकौमुदी

संबंधित शब्द

मंद

पु. शनि हा ग्रह. -वि. १ ज्यास फारसा वेग, चलाखी नाहीं असा; संथ; धिमा. २ (ल.) मूर्ख; मठ्ठ; निर्बुद्ध. 'रजरागी महा मंद । जाण प्रसिद्ध उद्धवा ।' -एभा १३.२४०. ३ जड; आळशी; सुस्त. ४ अस्पष्ट; किंचित् अंध (दृष्टि). ५ अंधुक; प्रभाहीन; निस्तेज (प्रकाश). 'जेवीं सूर्योदयापुढें चांदू । होय मंदू निजतेजें ।' -एभा १३.४७०. ६ सौम्य; गालांतल्या गालांत केलेलें (हास्य). 'वदन मिरवे मंदहसितें ।' ७ हळुहळु वाहणारी; सौम्य (वाऱ्याची झुळुक). ८ नक्षत्रांच्या अंधमंदादि प्रकारांपैकीं एक वर्ग. यांत मृग, आश्लेषा, हस्त, अनुराधा, उत्तराषाढा, शततारका व अश्विनी हीं नक्षत्रें येतात. हें नक्षत्र असतांना हरविलेली वस्तु लवकर सांपडत नाहीं. ९ बारीक; हलका (आवाज, ध्वनि). १० सामर्थ्यहीन; असमर्थ; कमजोर. 'त्याचे उपदेशीं ब्रह्मा मंदू । माझेनिही बोध न करवे ।' -एभा १३.१५८. [सं.] ॰पडणें-१ संथपणानें सुस्ताईनें चालणें (काम, धंदा). 'हल्लीं तुमचे कामाचें मंद पडलें आहे.' -शाको. २ कमजोर होणें (सांथ, आजार). ॰केंद्र-न. (ज्यो.) मंदोच्च पहा. [सं.] ॰गति-गामी-वि. ज्यास फारसा वेग नाहीं असा; कमी वेगाचा. [सं.] ॰फल-न. (ज्यो.) मध्यम ग्रहाला ज्या फलाचा संस्कार केला असतां मंदस्पष्ट ग्रह होतो असें गणितागत अंशात्मक फल. -माधवचंद्रोबा कोश. [सं.] ॰बुद्धि-मति-वि. जड बुद्धीचा; मठ्ठ. [सं.] ॰भाग्य-वि. कमनशिबी; दुर्दैवी. ॰मधुर-वि. १ गोड; आल्हददायक (फळ, वास, आवाज, वाद्य, काव्य इ॰). २ सौम्य; मोहक; रम्य (वारा, हास्य, गाणें, बोलणें). ॰रूप-न. १ सूक्ष्मरूप. -मनको. 'जो हा ठाववेऱ्ही मंदरूपें । उवायिलेपणे हारपे ।' -अमृ १.३५. २ स्थिरपणा; अचलपणा. ॰वाणी-स्त्री. भाषणांत सावकाशी; ओघ, किंवा आकर्षकता नसणें; वक्तृत्वाचा अभाव. 'माझी अतिमंदवाणी । तयाची महिमा काय वाणी ।' -वि. सावकाश, छाप न पडण्यासारखें बोलणारा; बोलण्यांत अकुशल. [सं.] ॰वात-पु. सौम्य, झुळु झुळु वाहणारा वारा; वाऱ्याची झुळूक. 'गंगातटीं सेविती मंदवातें ।' [सं.] ॰वार-वासर-पु. शनि- वार [सं.] ॰वाहकता-स्त्री. (शाप.) पदार्थांतून उष्णता लवकर जात नाहीं असा पदार्थाचा गुणधर्म. (इं.) बॅड कंडक्शन. ॰विसर्जक-वि. (शाप.) जो लवकर उष्णता बाहेर टाकीत नाहीं असा (पदार्थ). (इं.) बॅड रेडिएटर. ॰वीर्य-वि. सौम्य गुणाचें, प्रभावाचें (औषध इ॰). ॰वेळ-वेळ-स्त्री. (ज्यो.) ज्या समयीं आरंभिलेलें कार्य लवकर तडीस जात नाहीं तो समय; प्रतिकूळ वेळ. (क्रि॰ लागणें). ॰शोषक-वि. (शाप.) जो लवकर उष्णता शोषित नाहीं असा (पदार्थ). (इं.) बॅड अ/?/ब्सॉ- र्बर. ॰सुगंध-वि. सौम्य व सुवासिक (वारा, वाऱ्याची झुळुक). ॰स्मित-हास्य-न. गालांतल्या गालांत हसणें. 'मंदस्मित वदनीं मिरवे ।' -वि. गालांतल्या गालांत हंसणारा; हसतमुख. ॰स्मित- वदन-न. हास्यमुख; प्रसन्नमुख. मंदणें-अक्रि. १ कमी, मंद होणें; 'मती मंदली पातकांचें नि गुणें ।' -राक १ पृ. १५. २ थांबणें. 'मी वंदीन पदारविंद म्हणुनी जातां पंथी मंदली ।' -आ शबरी ४. ३ मंद होणें; थकणें. 'मथितां मंदले देव दैत्य ।' -मुआदि ४.११२. मंदवा-पु. (प्रां.) मंदाई पहा. मंदा-पु. मंदी, मंदाई पहा. -वि. १ स्वस्त. २ चलती, मोसम, हंगाम नसलेला. मंदाई- स्त्री. १ सुस्तपणा; धीमेपणा; स्वस्थणा; ढिलाई (काम, धंदा, इ॰ मध्यें) २ कमजोरपणा (सांथ, रोग इ॰चा). ३ स्वस्ताई; उतार (भाव इ॰ मध्ये) मंदाग-स्त्री. सौम्य अग्नि. [मंद + आग] मंदागीं-क्रिवि. १ सौम्य अग्नीवर (शिजविणें, भाजणें.) 'ती भाजी मंदागीं शिजूं दे.' २ सौम्य; बारीक ज्योतीनें (दिवा जळणें). मंदाग्नि-पु. (ल.) मंद जठराग्नि; पचनशक्ति कमजोर असणें. -वि. ज्याचा जठराग्नि प्रदीप्त नाहीं असा (मनुष्य). मंदावणें-अक्रि. (शब्दशः व ल.) मंद होणें; कमी होणें; रेंगाळणें; आळसावणें. 'मग सुखानुभूतीचीं घेणीं देणीं । मंदावों लागती ।' -ज्ञा १६.१२. मंदाविणें-सक्रि. सौम्य, मंद, कमी करणें. मंदावा-पु. (शब्दशः व ल.) मंदपणा; सुस्त- पणा; आळस. मंदाळणी-वि. ज्यांत मीठ कमी घातलें आहे असा (पदार्थ.) [मंद + अलवण-अळणी] मंदी-स्त्री. मंदाई पहा. मंदोच्च-नपु. ग्रहाच्या कक्षेंतील सूर्यापासून अति दूरचा बिंदु; सूर्योच्च. याच्या उलट शीघ्रोच्च. [सं. मंद + उच्च] मंदोष्ण- वि. साधारण उष्ण; कोंबट. [सं. मंद + उष्ण]

दाते शब्दकोश

मेण

न. १ मधाच्या पोळ्यांतून निघणारा चिकट, घट्ट, चरबीसारखा पदार्थ; मधूच्छिष्ट. २ जनावराच्या शरीरांतून किंवा वनस्पतीपासून काढण्यांत येणारा वरील सारखा पदार्थ; तेलाची बेरी. ३ (कु.) मासे मारण्याकरितां केलेलें विषारी औषध. -वि. (ल.) मऊ व चांगला शिजलेला पदार्थ (तांदूळ डाळ, इ॰). [फा. मोम्] (वाप्र.) ॰काढणें-(ल.) खूप चोपणें, झोडणें, मारणें. ॰घालणें-(कु.) मासे धरण्यासाठीं त्रिफळे, गेळफळ, निवळकांडें इ॰ कुटून पाण्यांत घालणें. ॰स्वस्त होणें-(मनुष्य) लठ्ठ व गुलगुलीत होणें. ॰होणें-१ नरमावून सौम्य, शांत होणें. २ शिजून मेणाप्रमाणें होणें (भात, डाळ इ॰). मेणाची चोटली कढयता-ओढून चंद्रबळ आणणें. मेण(णा)वणें-विणें-१ मेण, तेलाच्या तळची बेरी, तेलांत भिजवलेली चिंध्यांची राख इ॰ नीं सूप, टोपलीं इ॰ मढविणें; त्यांस लेप देणें. २ (ल.) गोंडस, लठ्ठ बनणें. सामाशब्द. ॰कट-न. १ (समई, तेलातुपाचें भांडें यांस चिक- टून असणारी) तेलाची घाण, मळ, चिकटा, बेरी. -वि. १ घाण तेलानें, तुपानें माखलेला; मेणचट; तेलकट; ओशट (वास). [मेण + कट] मेणक(कु)टणें-अक्रि. मेणकट लागणें; घाण तेला- तुपानें माखलें जाणें (भांडें). ॰कापड-न. मेण लावलेलें एक प्रकारचें कापड. ॰गट, मेण-कुटला-वि. अतिशय शिजविल्यानें मऊ व मेणासारखा झालेला (भात). [मेण] ॰गट, ॰कुटलें-न. जास्त शिजविल्यानें बिघडलेला भात. ॰गटी-स्त्री. जास्त शिजवि लेल्या भाताचा मऊपणा व मेणचटपणा. [मेणगट] ॰गुट होणें- अक्रि. एकजीव होणें; मिसळणें. ॰गोळी-स्त्री. १ मेणाची गोळी. २ (ल.) मऊ, नरम, सौम्य मनुष्य. ॰घुणा-ण्या-वि. सौम्य, शांत, गंभीर मुद्रेचा पण मनाचा कुढा, लबाड मनुष्य; न बोलणारा, आंतल्या गांठीचा इसम. ॰चट-वि. १ मेणचट; कण्या न पडलेलें (तूप). २ मऊ व मेणासारखा शिजलेला (भात). ३ गिच्च व पचपचीत (शिजविण्यांत बिघडलेलें अन्न). ४ मंद; ढील; गयाळ; सुस्त; निर्जीव; उत्साह, धैर्य, पाणी नसणारा. ५ कृपण; कंजूष (मेणचाटणारा). ॰चोट-चोट्या-वि. १ नपुसंक; निर्बल; नामर्द. २ जड; रेंगाळणारा; मेंग्या मारवाडी. ३ भोळ- सट; भोळानाथ. ॰तेल-न. (गो.) तेलांत शिजवलेलें मेण; (स्त्रिया कुंकु लावतांना हें मेणतेल कपाळास लावून त्यावर पिंजर लावतात). ॰बत्ती-स्त्री. मेणानें मढविलेली वात; मेणाचा दिवा. [फा. मोम, मूम + बत्ती] ॰बाजार-पु. जररोज दुकानासाठीं पालें द्यावयाचीं व तीं रात्रीं काढावयाचीं अशीं दुकानें असलेला बाजार; जुना बाजार. हा मुख्य रस्त्यांत नेहमीच्या दुकानाशीं समांतर ओळींत भरवितात. आयते तयार केलेले कपडे व जुनेपाने जिन्नस यांत विक्रीस मांडतात. ॰बाजारी-पु. १ मेणबाजारांतील दुकानदार, माल विकणारा. २ (ल.) पत नसलेला, बेअब्रूचा माणूस. ॰बावली-स्त्री. १ (ल.) लहान, सुबक, नेटकी व चपल स्त्री. २ गरीब, दुसऱ्याच्या तंत्रानें चालणारी नवरी, बायको. ॰वला-वि. (प्र.) मेणोला; मेणा पहा. ॰वात-स्त्री. मेणबत्ती पहा. मेण्या-ण्या-वि. मेण, तेलाचा-तुपाचा गाळ, जाळलेल्या चिंध्या, शेण्यांची राख इ॰ कांच्या मिश्रणानें लेपलेला (हारा, टोपलें, सूप, पाटी, इ॰). [मेण] मेणाचा-वि. १ मऊ; अशक्त; कम- कुवत. २ नरम; निर्जीव. ३ अयोग्य; अक्षम. ४ धिक्कार, तिरस्कार दाखविण्याकरितां नेहमीं योजतात. उदा॰ तूं कोण मेणाचा मला सांगायला ? ॰मेणाळ-स्त्री. (जरतारी धंदा) मेण असलेली, मेणयुक्त तार. मेणी-स्त्री. १ तेलकट काजळ; मस; घाण. २ केसांच्या वळलेल्या जटा. ३ (ठाणें) काकडीची एक जात. -कृषि ४८२. मेणी मोडशी-स्त्री. जुनाट, फार दिवसांची मोडशी. [मेण्या + मोडशी] मेणें-न. १ (कों.) जिच्या चिकानें मासे आंधळे होऊन सहज सांपडतात अशी नदी इ॰च्या प्रवाहांत टाकतात ती एक वनस्पति; कांड्याहुरा. २ माशांना मारण्याकरितां, गुंगी आणण्याकरितां नदींत टाकलेटा चिकचिकीत द्रव्याचा पदार्थ. मेणे डोळे-पुअव. डोळे आले असतां त्यांतून अतिशय पू वाहणारे, फार बरबरणारे डोळे; बरबरीत, पुवाचे डोळे; शेणे डोळे; याच्या उलट काटे डोळे. मेणें वावर-न. (रब्बीच्या पेरणीकरितां) नांगरून, खत घालून, राखून ठेवलेलें वावर. मेणोला, मेणोल-वि. मेणा पहा. मेण्या-वि. १ मऊ; दुबळा; नामर्द; गरीब. २ मंद; धारिष्ट नसलेला; निर्जीव. [मेण] मेण्यामारवाडी-पु. दिसण्यांत भोळा पण कावेबाज इसम; सौम्य मुद्रेचा पण शठ मनुष्य. मेण्या साप- पु. १ सापाची एक जात. २ (ल.) गुप्तपणें आकस धरून नाश करणारा मनुष्य.

दाते शब्दकोश

शिवशितळ

वि. १ थंड; ताजें; शुद्ध. (हवा, पाणी वगैरे). २ सौम्य; कडक नव्हे तें. ३ भूतपिशाच्चादि बाधे पासून सुरक्षित (रस्ता, भाग, प्रदेश). ४ सौम्य; सुलभच सोपें; सुसाध्य सुरक्षित (रस्ता, भाग, प्रदेश). ४ सौम्य; सुलभ; सोपें; सुसाध्य; खाष्ट, खडतर नव्हे असें. (दैवत, मूर्ति, देव). ५ भूतपिशाच्चादि रास, वगैरे). ६ शांत; थंड; कोमल (मन, जीव वगैरे. [सं. शिव + शीतल]

दाते शब्दकोश

शीत

न. थंडी; शैत्य; सर्दी. [सं. शीत] वि. १ थंड; गार. २ (ल.) मंद; जड; उदासीन; आळशी. शीतक-पु. पदार्थ थंड करण्याचें, थिजविण्याचें यंत्र. (इं.) कन्डेन्सर. शीत कटिबंध-पु. ध्रुव व ध्रुववृत्तें यांमधील प्रदेश. शीतकर- पु. चंद्र. ॰काल-पु. १ हिंवाळा; हेमंत व शिशिरऋतूंचा काळ २ हिंवाळ्यांतील व पावसाळ्यांतील मिळून सहा महिन्यांचा काळ. [सं.] ॰ज्वर-पु. थंडीपासून आलेला ताप; हिंवताप. [सं.] ॰पित्त-न. १ एक प्रकारचें कोरडें कुष्ट. २ पित्तदोषामुळें येणारें पडसें, होणारी सर्दी, शैत्यविकार. [सं.] ॰भानु-पु. चंद्र. 'जैसा नभीं न भी घन गर्जे झांकोनि शीतभानु रवी -मोकर्ण ११.२४. 'चौगुणीनें जरि पूर्ण शीतभानु' -र. [सं.] ॰मंगळ-वि. दोन्ही कुशाखालीं दोन भोंवरे असणारा (घोडा). -अश्वप १२४. [सं.] ॰मेह-पु. १ मूत्रावरून ज्ञात होणारा शैत्यविकार, सर्दीं, पडसें. २ अशा विकारांत होणारी लघवी. [सं.] ॰वास-पु. थंडीच्या वेळीं पाण्यांत उभें रहाणें; एक प्रकारची तपस्या. [सं.] ॰वीर्य-वि. ज्याचे गुणधर्म थंड आहेत असा; शैत्यकारक; सर्दी उत्पन्न करणारा. ॰सुगंध-पु. थंड व सौम्य असा सुवास. -वि. थंड व सौम्य अशा सुवासयुक्त (वाऱ्याची झुळुक) [सं.] शीतांशु-पु. चंद्र. शीतोष्ण-वि. कोंबट; अर्धवट उष्ण. शीतता-स्त्री. थंडी; सर्दी; शैत्य. शीतल-ळ-वि. १ थंड; गार. २ मऊ; सौम्य; सुखकारक. शीतळशाई-क्री. एक मुलांचा खेळ. 'हमाम्या शीतळशाई । पोरा मेली तुझी मायी ।' -भज ३३. शीतला-ळा-स्त्री. १ देवी; अंगावर उठणारा फोड्यांचा रोग. (क्रि॰ येणें; निघणें; मावळणें; कानपणें). २ या रोगाची देवता. शीतला(ळा)देवी-स्त्री. देवी या रोगाची देवता. शीतळचिनी-पाटी-शिमगा-शितळ पहा. शीत- ळावो-पु. थंडावा; गारवा.

दाते शब्दकोश

गोड

न. १ षड्रसांतील मधुर रस. २ (व. खा.) मीठ. 'वरण अलोणी झालें गोडाशिवाय बरें लागत नाहीं.' [तुल॰ सं. मिष्ट-मीठ] ३ (वैद्यक) पथ्याला अनुसरून मधुर किंवा साखरेनें युक्त असा पदार्थ 'त्या औषधास गोड वर्ज्य.' -पु. (गो. कों.) गुळ. -वि. १ मधुर (आंबट, तिखट, खारट नव्हे असें); स्वादिष्ट. २ सुवासिक. ३ मंजुळ; सुंदर; साजिरें. ४ मृदु. ५ सौम्य. ६ सुखकारक; संतोषदायक. 'मनास गोड वाटत नाहीं.' ७ नीटनेटकें; नियमित; योग्य; चांगलें; शुद्ध (भ्रष्ट नसलेलें). जसें:-गोड-प्रयोग-उदाहरण-वाक्य-कवन इ॰ ८ (तंजा.) चांगलें; सुरस, चवदार. 'चटणी गोड आहे.' ९ औरस (लग्नाच्या स्त्रीची) संतति; हिच्या उलट कडू (दासीपुत्र-कन्या). १० शुभदायक; मंगलकारक. 'सत्वाचा गोड जाहला अंत ।' -विक ८. [सं. गुड; प्रा. गोडु; फ्रें. पो. जि. -गुडलो, गोळास] (वाप्र.) ॰करून घेणें-कसेंहि असलें तरी गोडीनें, चांगल्या हेतूनें स्वीकारणें; मान देणें; अव्हेर न करणें. ॰गोड गुळचट- अतिशय गोड. दिल्हें घेतलें गोड-मिळून मिसळून वागणें चांगलें. ॰वणें, गोडावणें सक्रि. १ गोड करणें; होणें, खारट, आंबट नाहींसें करणें (जमीन, पाणी, फळें इ॰). २ मिठ्ठी बसणें (गोड पदार्थ खाल्ल्यानें जिभेस). ३ (काव्य) गोडी लागणें; लुब्ध होणें; लालचावणें. 'भक्तीचिया सुखां गोडावली ।' ४ पाड लागणें; पिकणें (फळ). म्ह॰ १ गोड करून खावें मऊ करून निजावें = अडचणींतहि सोय करून घ्यावी. २ गेले नाहीं तंव- वर जड, खाल्लें नाहीं तंववर गोड = माहीत नसलेलें सर्वच चांगलें असतें. सामाशब्द- ॰उंडी-स्त्री. एक झाड. ॰करांदा-पु. खाण्याला गोड लागणारा करांदा; करांदा पहा. ॰गळा-पु. १ (संगीत) गाण्याला मधुर आवाज. २ मधुर गायन, गाणें. ॰घांस-पु. १ जेवणाच्या शेवटीं खाण्यासाठीं ठेवलेला आव- डत्या पदार्थाचा घांस. २ सुग्रास; मिष्ट भोजन. 'त्याचे एथें गोड घांस मिळतो, तो टकून तुमचेकडे कशाला येऊं?' ३ अप्रिय, दुःखद गोष्टीचा शेवट गोड करणारा मुद्दा, प्रकार. ॰घाशा-खाऊ-वि. १ सदां गोड खाण्यास पाहिजे असा; गोड गोड खाण्याची आवड असलेला. २ चोखंदळ; मिमाजी. ॰जेवण-तोंड न. १ वधूपक्षानें वरपक्षास अथवा वरपक्षानें वधूपक्षास दिलेली मेजवानी. २ मृत माणसाचें सुतक धरणार्‍या नातेवाइकांस आणि इष्टमित्रांस, सुतकाच्या १४ व्या दिवशीं (सुतक फिटल्यावर) मुख्य सुतक धरणार्‍यानें दिलेलें (विशेषतः गुळाच्या पक्वान्नांचें) जेवण. ३ पक्वान्नाचें जेवण. 'गोड जेवण केलें तर पाण्याचा शोष लागणारच.' ॰दोडकी स्त्री.(भाजी) घोसाळी; घोषक यांची एक जात हिचीं फुलें पांढरीं असतात. ॰धड-न. नेहमींच्या पेक्षां थोडेसें गोंडाचें चांगलें जेवण; पक्वान्न; मिष्टान्न. 'उद्यां सण आहे, तर कांही तरी गोडधड करा.' ॰निंब-पु. (व.) कढीनिंब. ॰बोल्या-वि. मृदु, सौम्य भाषण करणारा; तोंडचा गोड; दुसर्‍याला आवडेल असेंच बोलणारा. म्ह॰ गोड बोल्या साल सोल्या = बोलणारा मिठ्ठा परंतु मानकाप्या. ॰गोडरें-वि. गोड; गोडवें. 'बायकां गोडरें प्रिय अन्न।' -गीता २.१७५. गोड लापशी-स्त्री. दुधांतील लापशी (ताकांतील नव्हे). ॰वणी स्त्री. गाडें पाणी. 'हिंग पडतांचि रांजणीं । गोडवणी होय हिंगवणी ।' -भारा बाल १०.३६ ॰वा-गोडा-वि. १ सापेक्षतेनें गोड; विद्यमान पदार्थांत-गोष्टींत अधिक, विशेष गोड. २ (ल.) कोरा; असाडा; अपेट; अस्पष्ट; कोंवळा इ॰. ३ ताजें (पाणी, खारट नव्हे असें); क्षारयुक्त नसणारें; मधुर. ४ बिन कांटेरी; किड्यांना प्रिय (झाड, वनस्पति). ५ मऊ; नरम (लांकडाचा नारावांचून बाहेरचा भाग). ६ बिन खारवट; क्षार, लोणा नसणारी (जमीन). ७ गोडें (तीळ, कारळें यांचें तेल याच्या उलट उंडी, करंज यांचें कडवें तेल). ८ सात्त्विक; सुस्वभावी; सौम्य (माणूस). ९ जितें; जीवंत(मांस-मुरदाड, मृत नव्हे असें). १० सौम्य (खाजर्‍या, उष्ण, तिखट, नव्हत अशा सुरण इ॰ भाज्या). ११ मादक नसणारी (हरीक, खडसांबळी इ॰ वनस्पतींतील प्रकार). १२ निर्विष (साप). १३ कोमल; नाजुक; रोगाला बळी पडणारें (शरीर, अवयव), १४ नदींतील, गोड्या पाण्यांतील (मासा). १५ खारवणांतील नस- लेलें; गोड्या जमीनींत तयार केलेलें (गोडें भात). १६ जिव्हा- ळ्याचें; नाजूक; मर्माचें (अंग, गोडें अंग-जांघ, बस्ती, अंड इ॰). १७ खारट नसलेला (दाणा-धान्यांतील). १८ शुद्ध; नेक- जात; भेसळ रक्ताचा नसलेला (मराठा माणूस), कडव्याच्या उलट). गोडवा-पु. स्तुति; प्रशंसा. ॰गोडवा(वे)गाणें- सांगणें-१ दुसर्‍याच्यासाठीं आपण केलेल्या चांगल्या कृत्यांचा पाढा वाचणें; (उपकृत कृतघ्न झाला असतां विशेषतः) दुसर्‍या- वर केलेले उपकार किंवा अनुग्रह यांचा उपन्यास करणें; आपलें एखाद्यावर प्रेम असून तों तें विसरला असतां त्याच्यासंबंधानें आपल्या मुखांतून निघणारें उद्गार. 'जिष्णु म्हणे त्वद्रचितें मज मिळतिल हे न गोडवें दास्यें ।' -मोआदि ३६.७४. २ एका- द्याच्या कृत्यांची स्तुति करणें; प्रशंसा करणें; नांवाजणें. गोडवे-गाणें (सांगणें नव्हे)-औप.) कुरकुर करणें; निंदा करणें. गोडवी--गोडी-स्त्री. भूक व तोंडास रुचि असल्यानें जेवण्या- संबंधींची इच्छा; रुचि; याच्या उलट वीट; कंटाळा; तिरस्कार; गोडशें-न. (गो.) मिठाई. गोडसर-सा-वि. थोडेसें गोड; मधुर. 'जे आंगेचि पदार्थ गोडसे ।' -ज्ञा १७.१२६. ॰सांद (ध)णें-न. दुधांत, गर्‍यांच्या रसांत तयार केलेलें (ताकांतील नव्हें) सांदणें. गोडसाण-स्त्री. (गो.) गोडी.

दाते शब्दकोश

अघोर

वि. १ अचाट; फार भयंकर; भीतिप्रद; अमंगळ; (वस्तु, क्रिया, स्थान). २ अक्राळविक्राळ; अकटोविकट. ३ निष्का- ळजी; बिनघोर; निर्भय; स्वस्थ; बेफिकीर. ४ सौम्य; घोर नाहीं असा. 'अघोरचुक्षुः अपतिघ्न्येधि ।' -ॠग् १०.८५.४४ -अंतरपाट काढल्यानंतर 'ही वधू सौम्य दृष्टीची असावी ' असें म्हणतात. -पु. १ संकट; घोर. 'माझी हरिली त्वां जरा । आणि देहींच्या अघोरा दवडिलें ।।' -कथा २.५.१७७. २ शंकर. यावरून अघोरपंथ निघाला. 'या ते रुद्र शिवा तनूरघोरा पापकाशिनी ।' -तैसं॰ रुद्र. ३ एक नरक. 'जो द्विजदेवांची वृत्ति हरी...ते तिघे अघोरीं पचिजेति ।' -एभा २७.३९३. ॰अरण्य-न. भयंकर अरण्य. ॰कर्म-न. भयं- कर, धाडसी किंवा अमंगळ काम. ॰जप-पु. पिशाच मंत्राचा जप. ॰दंड-पु. जबरदस्त दंड. ॰निद्रा-स्त्री. गाढ झोंप. ॰पंथ-पु. गोसाव्यांचा एक पंथ; हे लोक हातांत नरकपाल घेणारे व नरमांस भक्षण, मलभक्षण व इतर अघोर (अमंगळ) कृत्यें करणारे असतात. ॰पंथी-वि. वरील पंथाचे अनुयायी. [सं. अघोर + पथिन्]. ॰मत-मार्ग-अघोरपंथ पहा. -॰मार्गी-अघोरपंथी पहा. ॰योग- गी-पु. अघोरपंथ व त्याच्या अनुयायांचा समाज. 'शाक्त आगम आघोरयोगी । कैसे ते ऐकावे ।। -दा ४.१.१३. [सं.]

दाते शब्दकोश

गोडवा, गोडा      

वि.       १. सापेक्षतेने गोड; विद्यमान पदार्थात - गोष्टीत अधिक, विशेष गोड. २. (ल.) कोरा; असडा; अस्पष्ट; कोवळा इ. ३. ताजे (पाणी, खारट नव्हे असे); क्षारयुक्त नसणारे; मधुर. ४. बिनखारवट; क्षार, लोणा नसणारी (जमीन). ५. गोडे (तीळ, कारळे यांचे तेल). ६. सात्त्विक; सुस्वभावी; सौम्य (माणूस). ७. जिते; जिवंत (मांस - मुरदाड, मृत नव्हे असे). ८. सौम्य (खाजऱ्या, उष्ण, तिखट नव्हेत अशा सुरण इ. भाज्या). ९. निर्विष (साप.). १०. कोमल; नाजूक; रोगाला बळी पडणारे (शरीर, अवयव). ११. नदीतील, गोड्या पाण्यातील (मासा). १२. खारवणातील नसलेले; गोड्या जमिनीत तयार केलेले (भात). १३. जिव्हाळ्याचे; नाजूक; मर्माचे (अंग, जांघ, बस्ती अंड इ.). १४. खारट नसलेला (दाणा - धान्यातील). १५. शुद्ध; नेकजात; भेसळ रक्ताचा नसलेला (मराठा).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गरम-नरम

(न.) कडक अगर सौम्य भाषण; कडक अगर सौम्य वर्तन.

फारसी-मराठी शब्दकोश

मवाग

स्त्री. मंदाग्नि; सौम्य आंच. [मऊ + आग] मवागीं टाकणें-मंद अग्नीवर ठेवणें, धरणें. मवागी-ग्नी-स्त्रीपु. मंद अग्नि. 'निजबोध मवाग्नीनें सानविलीं ।' -सप्र १५.७. मवागीत- वि. सौम्य; मंद (विस्तव, आंच). मवागींत, मवागीं-क्रिवि. शेक लागेल असें; मंदाग्नीवर (शिजविणें इ॰); मंद ज्योतीनें; सौम्यपणें (विस्तव पेटणें, जळणें).

दाते शब्दकोश

सामोपचार, सामोपाय

पु. १ विशेष त्रास, दुःख न देणारा औषधोपचार; सौम्य उपचार, उपायक्रिया. २ सामाचा, गोडीगुलाबीचा प्रकार, उपाय; सौम्य, शांत शब्दांनीं वळविणें. सामोपचारें, सामोपचारानें असाच बहुधां प्रयोग होतो. [साम + उपचार, उपाय]

दाते शब्दकोश

वासर

पु. १ दिवस. 'होती वासर दीर्घ जे धनपति द्वारीं तयां प्रार्थितां ।' -वामन, स्फुटश्लोक (नवनीत पृ. १४१). २ वार. 'वासर असत सौम्य ।' -रामदासी २.६०. 'ते मध्य शार्वरिचा वासर सौम्य जागा ।' -देपद ४६. ॰मणि-पु. सूर्य [सं.]

दाते शब्दकोश

नरम

वि. १ मृदु; कडक नसलेलें; गुलगुलीत; मुलायम. २ (ल.) कठोर, जहाल नसणारा; गरीब; सौम्य; लीन; मवाळ. ३ भोळा; साधा; बावळट. 'असल्या नरम पुढार्‍यांमुळें लोकांच्या फायद्यापेक्षां त्याचें नुकसानच जास्त होतें...' -टि २.१२९. ४ बायकी; बुळा. ५ स्वाभाविक तेज, कडकपणा, तीक्ष्णपणा इ॰ कांत कमी असलेला उदा॰ कोंबट (पाणी इ॰), तीक्ष्ण धार नसलेलें (शस्त्र इ॰). 'शस्त्राचें पाणी नरम आहे.' कमी चका- कीचा; मंद कांतीचा (रुपाया, मोत्यें इ॰). 'हा रुपाया नरम आहे.' [फा. नर्म्. गुज. नरम] ॰पडणें-होणें-(बाजारभाव इ॰) कमी होणें; उतरणें; मंदीस येणें. बँकेच्या व्याजाचे दर वाढविण्याचा अंतस्थ हेतु नरम पडणार्‍या हुंडणावळीला हात देण्याचा आहे' -के २,१२. ३०. शेअर्सचे भाव नरम पडले.' -के १०.६. ७.३०. ॰येणें-(एखादा मनुष्य इ॰) स्वभावानें गरीब बनणें; सौम्यपणानें वागूं लागणें. 'आतां हा फारच नरम आला.' -पारिभौ २३. (एखादें) काम नरम करणें-काम फत्ते करणें. -इमं २५३. सामाशब्द- ॰गरम-वि फार ऊन्ह किंवा फार थंड नाहीं असें गरम नरम पहा. ॰चारा-पु. १ कोंवळा चारा; गवत. २ (ल.) खावयास नरम, मृदु असलेला, फार चावावा न लागणारा खाद्यपदार्थ. ३ उंची व नाजुक खाणें, अन्न. [नरम + चार] ॰छापी-वि. जुना झालेला व ज्यावरील छाप, ठसा विरूप, खराब झाला आहें असा (रुपाया इ॰ नाणें). [नरम + छाप] ॰डोकें-न. मऊ केंस असलेलें व हजामत करतांना मुळींच त्रास न पडणारें डोकें. -मानरम-वि. अतिशय नरम; फार गुलगुलित; अत्यंत कोमल; सौम्य. [नरम द्वि.] -मानरमी- स्त्री. मृदुपणा; सौम्यपणा; कोमलता; मवाळपणा; याच्या उलट गर- मागरमी. [नरम द्वि.]

दाते शब्दकोश

शम

पु. १ शांतता; शांति; स्थिरता; स्तब्धता. २ (राग आणि विकार यासंबंधी) इंद्रियदमन; मनोनिग्रह (वेदांती लोकां- वर शम, दम, तप, तितिक्षा, श्रद्धा, आणि समाधान अशी एकं- दर सहा कर्तव्यें लादलीं आहेत). 'ऐसा बुद्धीचा उपरमु । तया नाम म्हणिपे शमु ।' -ज्ञा १८.८३४. शांति; अक्षुब्धता; अक्षोभ. ३ आत्यंतिक सुख; मोक्ष; निर्वाण. ४ औदासीन्य; संन्यस्तवृत्ति; निवृत्ति. ५ योगसिद्धि. 'कर्म हेंच शमाचें कारण होतें.' -गीर ६९६. [सं. शम् = मनोनिग्रह करणें] ॰दम- दमादि-न. वेदांती लोकांची शम, दम आदिकरून कर्तव्य; शम पहा. शमदमादि साधनसमुच्चय. ॰विषम-वि. (पाऊस, भाव, गोग वगैरेसंबंधी लोकरूढ) १ हलके व जाड; कमजास्त; कमी- अधिक; थोडेंफार; मागेंपुढें होणारें. २ थोड्याबहुत फरकाचें; थोडीफार चूक असलेले (हिशेब, विधान, रीत). ३ किंचित् मतभेद असलेलें; थोडेफार गैरसमज झालेलें. शमणें-अक्रि. १ शांत होणें; स्थिर, स्तब्ध, निश्चल होणें; संतुष्ट होणें; समाधान पावणें. 'अत्युग्र भीम काळचि, हें वचन यथार्थ मान रे ! शम रे !' ।' -मोभाष्म १२.२७. ३ ओसरणें; कमी होणें. ४ मरण पावणें; मंरणें. 'जो अधिप कोसलांचा भासत नव्हता रणीं शमा- वासा ।' -मोकर्ण ३.२७. ४ दमणें; थकणें. 'शमले मद्बंधु बहु...' -मोभीष्म १०.१३. [सं. शम्] शमविणें-क्रि. १ शांत करणें; स्थिर करणें; दमन करणें. २ मारणें; नाहीसें करणें. [शम प्रयोजक] शमन-न. १ शांति; शांतता; स्थस्थता; स्तब्धता. २ (वैद्यक) शांतवन; उपशमन; उपशम; तीव्रता कमी करणें; थंडावा आणणें. 'सप्तोपचार' पहा. ३ उपशमक; उपशांतक; उपशमन करणारें औषध; तीव्रता कमी करणारें, वेदना हलक्या करणारें औषध; दुःखहारक औषध. उदा॰ 'पित्याचें शमन सुंठसाखर'. ४ शांत होणें; स्तब्ध होंणे; उपशम होणें; स्थिर होंणे; निवारण. ५ यम. [सं.] शमनीय-वि. शांत होणारें; शांत करण्यासारखें. [सं.] शमित-वि. १ शमलेलें; शांत झालेलें. २ कमी झालेलें; दबलेलें. ३ उपशम पावलेलें; संतुष्ट. [सं.] शमी-वि. सौम्य; शांत; स्तब्ध, स्थिर; सौम्य स्वभावाचा. 'नमिला शमि-लास्य-प्रद शांति-जल-धि एकनाथ तो भावें ।' -मोसन्मणिमाला (नवनीत पृ. ३४७.) [सं.]

दाते शब्दकोश

बाल, बालक

न. १ लहान मूल; अर्भक; अज्ञान मूल. २ -पु. मुलगा (दांत आल्यापासून शेंडी राखीपर्यंतचा). -वि. (सामासांत) लहान; अल्पवयी; अज्ञान; कोंवळा; नुकताच उदय पावलेला (सूर्य इ॰). [सं.] म्ह॰ सं. बालादपि सुभाषितं ग्राह्यम् । -चांगलें भाषण मग तें लहान मुलाच्या तोंडांतून निघालें असलें तरी ग्रहण करावें. ॰क्रीडा, लीला-स्त्री. खेळ. ॰गोपाळ- -पुअव. लहानमोठीं मुलें. ॰ग्रह-पुअव. १ लहान मुलांना पीडा करण्यांत आनंद मानणार्‍या देवता या नऊ आहेत:-स्कंद, स्कंदा- पस्मार, शकुनि, रेवती, पूतना, गंध पूतना (अंधपूतना), शीतपूतना, मुखमंडिका व नैगमेय. -योर २.६५५. २ आंकडी; एकरोग. ॰चंद्र-पु. शुक्ल पक्षांतील पंचमी-षष्ठीचा चंद्र. [सं.] ॰चरित-त्र- न. लहानपणच्या क्रिडा किंवा खेळ; बाळलीला. [सं.] ॰त्व-न. बाल्य; बालपणा. 'बालत्व आहे वय वाढण्याचें ।' ॰परवेशी- संगोपनासाठीं सरकारानें दिलेला पगार. वर्षासन, नेमणूक इ॰; बाल- परामर्ष. 'चौघे सरंवंत पाणपतावर पडले सबब त्यांचे बायकांस बालपरवेशी सालीना रुपये...' -वाडमा २.२५७. २ बाळ- पणापासून जोडलेली चाकरी, मित्रत्व, आश्रितत्व इ॰चा संबंध किंवा तत्संबंधीं चाकर, मित्र, आश्रित इ॰. [सं. बाल + फा. परवरिश् = पालन] ॰बुद्धि-स्त्री. पोरबुद्धि; पोरसमजूत. -वि. अज्ञान; पोरकट समजुतीचा. ॰बोध-वि. लहान मुलांना देखील समजेल असें; सोपें; सुगम; सुलभ; याच्या उलट प्रौढबोध. 'यांतील विषयाची रचना मूळ ग्रंथकर्त्यानेंच बालबोध ठेविला.' -यंस्थि १. ॰बोध, बाळबद-स्त्री. १ देवनागरी लिपि (मुलांनाहि समजण्या- सारखी) याच्या उलट मोडी लिपी. -वि. १ साधा; निरुपद्रवी; प्रामाणिक; शुद्ध; द्वेष, अवगुण विरहित (माणूस इ॰). २ स्पष्ट; सरळ; खुल्या दिलाचा; जुन्या चालीचा (व्यवहार, भाषण, वर्त- णूक; वळण). ३ मुलांना शिकण्यास सोपी (भाषा, लिपि इ॰). ॰बोध घर-न. ज्या घरांत सर्व माणसें सरळमार्गी आहेत व ज्यांत आधुनिक ढंग, चारगटपणा इ॰ शिरलेले नाहींत असें घर. याप्रमाणेंच बालबोध घराणें; बालबोध कुटुंब हे प्रयोग रूढ आहेत. ॰बोध माणूस-पु. सरळ मार्गानें चालणारा, छक्केपंजे माहीत नसलेला; साधा माणूस. ॰ब्रह्मचारी-पु. लहानपणापासून ज्याला स्त्रीसंग घडला नाहीं व ज्याचें लग्नहि झालेलें नाहीं असा मनुष्य. ॰भाषा-स्त्री. १ लहान मुलांची भाषा; त्यांची बोलण्याची पद्धत- उदा॰ हम्मा = गाय. पापा- = भाकरी इ॰ एखाद्याची लहानपणा- पासून बोलण्याची भाषा; मातृभाषा. ३ संस्कृताची अपभ्रंश होऊन झालेली भाषा (ही नाटकांतून स्त्रिया व हलक्या दर्जाचीं पात्रें यांच्या तोंडीं घातलेली असते). ॰मित्र-पु. १ लहानपणापासूनचा मित्र; लहानपणीं असलेला मित्र. २ नुकताच उगवलेला सूर्य; कोंवळ्या किरणांचा सकाळचा सूर्य. ॰रंडा-रांड-विधवा- स्त्री. लहान वयांत, नहाण येण्यापूर्वीं जिचा नवरा मेला अशी स्त्री. [सं.] ॰रोग-पु. लहान मुलांना होणारा रोग किंवा विकार. [सं.] ॰वाचा-स्त्री. लहान मुलांची भाषा; बालभाषा. [सं.] ॰सरस्वती-पु. लहानपणापासून अत्यंत बुद्धिवान् असलेला पुरुष. ॰सूर्य-पु. उदयकालचा सूर्य. 'बालसूर्याचेनि उजाळें । तैसी कवळें टांचांचीं ।' -एरुस्व १.२१. [सं.] ॰हत्या-स्त्री. बालहिंसा; बालवध; लहान मुलाला ठार मारणें. [सं.] ॰हत्यारा- पु. लहान मुलाला मारणारा; बालहत्या करणारा. [बाल + हन्तृ] ॰हरीतकी-स्त्री. कोंवळे कोवळे वाळविलेले हिरडे; बाळहिरडा. [सं.] बालातप-न. सकाळचें सूर्यकिरण; सकाळचें कोवळें ऊन. [बाल + आतप] बालाभ्यास-पु. लहानपणीं करावयाचा अभ्यास; लहानपणीं केलेला अभ्यास. [सं.] बालाभ्यासी-वि. लहानपणा- पासून अभ्यास केलेला, शिकलेला. [सं.] बालार्क-पु. १ बाल सूर्य. २ त्याचें कोवळें ऊन; कोवळे किरण. बालि(ले)श-वि. अज्ञानी; अननुभवी; अल्पवयी; पोरकट; मूर्ख. 'स्वपर बळाबळ नेणुनि बालिश बहु बायकांत बडबडला' -मोविराट ३.३९. [सं.] बालिशता-स्त्री. मूर्खपणा; पोरकटपणा. 'अस्मदहितहित इच्छिसि लाविसि आम्हां दहांत बालिशता ।' -मोसभा ४.३३. बालोप- चार-पु. लहान मुलांना योग्य असें औषध किंवा औषधाची योजना; हलकें व सौम्य औषध; उपचार इ॰. [सं.] बालोप- चारी-वि. सौम्य, लहान मुलांना देखील योग्य असें औषध इ॰ बालोपवीत-न. लहान मुलाचें जानवें. [सं.] बाल्य, बाल्या- वस्था-नस्त्री. १ बालत्व; बालपण; वयाच्या पांच वर्षांपर्यंतचा काल. २ कौमार्यावस्था; तारुण्यप्राप्तीपर्यंतचा काल (सोळा वर्षां- पर्यंतचा काल). [सं.]

दाते शब्दकोश

ऊं      

उद्गा.       १. (प्रश्नार्थी) काय; असे कसे. २. नको या अर्थाचा सौम्य असंमतिदर्शक अनुनासिक ध्वनी. ३. (अवमानार्थी) थू; हट्; वा, शू: ‘ऊं ! तो काय मूर्ख आहे.’ − मृ २०. ४. असे; अँ; बेसावधपणापुळे गोष्ट घडल्यानंतर ती स्पष्ट ध्यानात आली असताना निघणारा उद्गार. ५. धिक्कारदर्शक, तुच्छतादर्शक उद्गार. त्यात विशेष काय, या अर्थी.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अभ्याग

वि. (कों.) सौम्य; नरम; भ्याड;भेकड;निरु- पद्रवी. [अम्म = किंचित्;अमळ + सं. आग = अपराध?]

दाते शब्दकोश

अभयंकर      

वि.       भयप्रद नसलेले; भीती वाटण्यासारखे नसलेले; सौम्य. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अभयंकर

वि. भीति वाटण्यासारखें नसलेलें; सौम्य. [सं.]

दाते शब्दकोश

अघोर      

वि.       १. अचाट; फार भयंकर; भीतिप्रद; अमंगळ (वस्तु, क्रिया, स्थान). २. अक्राळविक्राळ; अकटोविकट. ३. निष्काळजी; बिनघोर; निर्भय; स्वस्थ; बेफिकीर. ४. सौम्य; घोर नाही असा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अक्षोभ्य      

वि.       क्षुब्ध न करता येण्यासारखा; न खवळणारा; शांत; सौम्य; गंभीर; न रागावणारा (स्वभाव, खोल पाणी). [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अक्षोभ्य

वि. अक्षोभ; क्षुब्ध न करतां येण्यासारखा; खव- ळतां न येण्यासारखा; शांत; सौम्य; गंभीर; न रागावणारा (स्वभाव, खोल पाणी). [सं.]

दाते शब्दकोश

अम्याग      

वि.       १. सौम्य; नरम. २. भ्याड; भेकड; निरुपद्रवी. ३. स्वभावाने अति गरीब, कर्तुत्वशून्य (असा माणूस.) (कों.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

बापडा,बापडीक

वि. १ गरीबबिचारा; सौम्य; निरुपद्रवी. २ मूर्ख; वेडगळ; दुर्बल; दीनवाणा; अनाथ. 'जयास ब्रह्मदिक वंदिती । तेथें मानव बापुडें किती । -दा १.२.२७. ३ बाप नस- ल्यानें पोरका. -उद्गा. औदासिन्य किंवा निष्काळजीपणा दाख- वितांना योजितात. 'करणार तर कर बापडें, माझें काय गेलें.' [देप्रा. बप्पुड; गु. बापडुं] म्ह॰ आपलें तें बापडें आणि दुसर्‍याचें तें कातडें = आपलें मूल मात्र गरीब व कोंवळें आणि दुसर्‍याचें मार खाण्याला धडधाकड. बापुडवाणा-णी-वि. १ गरीब; निराधार; निराश्रित. 'कशी टिकावी तेथें वाणी मग बापुड- वाणी ।' -विक ३. २ केविलवाणा; कींव येण्याजोगा (आवाज, भाषण इ॰). बापुडा, बापुडीक-वि. बापडा पहा. [बाप + उडॉ = टाकलेला]

दाते शब्दकोश

बावडा

वि. १ (कों.) बापडा; दीनवाणा; गरीब; वेड- गळ; मूर्ख. २ सौम्य; निरुपद्रवी. [बापडा]

दाते शब्दकोश

भिळभिळ-ळां

क्रिवि. सौम्य अशा वाहणार्‍या अश्रू इ॰च्या शब्दाचें अनुकरण होऊन. [ध्व.]

दाते शब्दकोश

भवानी

स्त्री. १ सौम्य रूप धारण केलेली पार्वती देवी 'देउनि विजय-वर असा झाली अन्तर्हिता भवानी ती ।' -मोभीष्म १.५०. २ बोहणी पहा. [सं.] म्ह॰ सवा रुपयाची भवानी व सोळा रुपयांचा गोंधळ. ॰कवडी-स्त्री. सामान्य कवडी. दही- कवडी, सगुणी कवडी व भवानी कवडी अशा कवडीच्या तीन जाती आहेत.

दाते शब्दकोश

चतुर

वि १ अत्यंत हुषार; बुद्धिमान; तीव्र बुद्धीचा; चुण- चुणीत; वाकबगार; चाणाक्ष; युक्तिवान्; हरहुन्नरी; कुशल; धूर्त: सूज्ञ; समंजस. 'चतुर तो चतुरांग जाणे । इतर तीं वेडीं ।' -दा १३.१०.२५. २ लेखन, चित्रें, कला, शास्त्रें इ॰ विद्यांत प्रवीण. ३ व्यवहारज्ञ; व्यावहारिक. ४ (संगीत) गायनशास्त्रापेक्ष गायनकलेमध्यें जो अधिक प्रवीण तो. [सं.] चतुर(करण)-न. (नृत्य) डावा हात वांकवून छातीसमोर आणणें व उजव्या हाताचीं करंगळीशिवाय सर्व बोटें मिटविणें व उजवा पाय जमीनीवर हळू हळू आपटणें. [सं.] चतुर(भुवई)-न. (नृत्य) भुवया मोहक दिसतील अशा तर्‍हेनें दोन्ही बाजूंस लांबविणें. सौम्य स्पर्श व ललित शृंगाराच्या वेळीं हें भ्रूकर्म करावें. [सं.]

दाते शब्दकोश

चुरचुरून      

क्रिवि.       धीम्या गतीने, सतत आणि सौम्य आवाज करीत : ‘अवकाळी पावसाची सर चुरचुरून येत होती.’ − बएरा १८.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चूं

नस्त्री. १ धनुष्याचा टणत्कार. २ बंदुकीच्या गोळीचा सणसणाट. ३ नाजुक, सौम्य आवाज, शब्द. उदा॰ उंदराचें चुंचा- वणें, आजारी माणसाचा दुःखाच्या चमकेचा उद्गार. [ध्व. चूं = सूं] ॰म्हणणें-करणें-सक्रि. चुंचावणें; गोंगावणें; सणसणणें.

दाते शब्दकोश

चूं      

न. स्त्री.       १. धनुष्याचा टणत्कार. २. बंदुकीच्या गोळीचा सणसणाट. ३. नाजूक, सौम्य आवाज, शब्द. उदा. उंदराचा चूं चूं असा आवाज. (क्रि. म्हणणे, करणे.) (वा.) चूं करणे – बोलणे; तोंडातून शब्द काढणे : ‘पण स्टालीन हयात असेपर्यंत कोणाची चूं करण्याची टाप लागली नाही.’ − आआआ १६.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दादा      

पु. वडील-बंधू; धनी; मालक; प्रतिष्ठित गृहस्थ; वडीलधाऱ्या माणसासाठी आदराचे संबोधन, व्यावहारिक नाव. [ध्व., सं. तात] (वा.) दादा, बाबा, पुता करणे - सौम्य, गोड भाषणाने एखाद्याचा राग घालवण्याचा प्रयत्न करणे. दादा      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दाळ

स्त्री. १ डाळ; द्विदल धान्य भरडून, फोलकटें काढून तयार करितात ती. २ डाळकण; चुरी. ३ डाळीचें वरण. [सं. दल] (वाप्र.) ॰गळणें-शिजणें-विकणें-(एखाद्याच्या) लबाड्या, कावे, कपट, डावपेंच इ॰ फलद्रूप होणें; भरभराटीस येणें; काम साधणें; लाग लागणें. सामान्यतः अकरणरूपीं योजि- तात (एखाद्यानें) दाळ नासणें-व्यर्थ खाऊन गमाविणें-१ (मूल, बायको इ॰ कानीं) निरुपयोगी आळशी बनणें, २ उर्मट, बेमुर्वतखोर बनणें. आपल्या पोळीवर दाळ ओढणें-स्वतः- चाच फायदा करून घेणें; स्वार्थी, आपलपोटें बनणें. सामाशब्द- ॰कण-चुरी-पुस्त्री. दाळीचे कण, चूर. ॰गपु-वि. १ डाळभात गट्ट करणारा. २ (ल.) गलेलठ्ठ; लठ्ठनिरंजन; मूर्ख. 'रजोगुणाचा पडला पडप । अवतारिकाचें नेणतां स्वरूप । दाळगपु हा वदतां भूप । अवघे हांसती विनोदी ।' -दावि २५४. [दाळ = अन्न + ध्व. गप् = खाण्याचा आवाज] ॰गोटा-पु. डाळींतील न भरडला गेलेला सबंध दाणा, गोटा. [दाळ + गोटा] ॰पिठिया-वि. अतिशय सौम्य स्वभावाचा; गरीब (मनुष्य). [दाळ + पीठ] ॰पीठ-रोटी-नस्त्री. साधें जेवण; (पोटाला अवश्य असलेली) भाजीभाकर. (क्रि॰ देणें; चालविणें; मिळविणें). ॰भाजी-स्त्री. डाळ घालून केलेली भाजी ॰भोपळा-पु. भोपळा घालून केलेलें डाळीचें वरण, आमटी; डाळ घालून केलेली भोपळ्याची भाजी. म्ह॰ दाळरोटी सब बात खोटी ॰वांगें-न. वांगीं घालून केलेलें डाळीचें वरण.

दाते शब्दकोश

दाळपिठिया      

वि.       अतिशय सौम्य स्वभावाचा; गरीब (मनुष्य).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

डोंबल, डोंबले      

न.       १. (निंदार्थी किंवा थट्टेने) डोके; डोकसे. २. सौम्य शिवी : ‘चला! खेळ हे मांडले डोंबलाचे ।’ –केक ४९.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

डोंबल-लें

न. (कों.) १ (निंदार्थी किंवा थट्टेनें) डोकें; डोकसें. २ सौम्य शिवी. 'चला! खेळ हे मांडले डोंब- लाचे ।' -केक ४९. [डोंबें]

दाते शब्दकोश

ध्यान

न. १ मनन; चिंतन. २ (विशेषतः) अष्टांग योगां- तील वृत्तिनिग्रहरूप अंग, प्रकार; मनाची एकाग्रता. ३ विषयाचें आकलन करण्याची शक्ति; लक्ष्य. 'हि गोष्ट ध्यानांत येत नाहीं.' ४ ईश्वराची मूर्ति किंवा चित्र इ॰ कांत आयुधभेद, वीरासनादि स्थितिभेद, उग्रता, सौम्यपणा इ॰ विशिष्ट गुणयुक्त दाखविलेलें स्वरूप, मुद्रा. 'हें ध्यान उग्र आहे, तें ध्यान सौम्य आहे.' 'सुंदर तें ध्यान उभें विटेवरी । कर कटावरी ठेवूनिया ।' -तुगा १. ५ परमेश्वराचें, एखाद्या देवेतेचें स्वरूपवर्णन करणारी कविता, पद इ॰ ६ (व्यापक) विशिष्ट रूप; ढब; मोडणी; डौल; चिन्ह; तर्‍हा; पद्धत. 'दोघे जण सावकारी करितात परंतु तें ध्यान निराळें हें ध्यान निराळें.' 'आमच्या गाण्याचें ध्यानच कांहीं निराळें.' ७ (उप.) गबाल व भोळसट मनुष्यः द्वाड व घाणेरडा मुलगा. 'श्रीमंताच्यापुढें हें ध्यान कां उभें राहणार?' -अस्तभा १९१. ८ लक्ष्य; सावधगिरी; अवधान. 'हे गडी खेळतील, विरं- गुळतील तिकडे ध्यान असूं द्या.' ९ स्मरण; आठवण स्मृति. 'हि गोष्ट मी ध्यानांत ठेविली.' १० शरीरावयवांची विषयग्रहणाविषयीं जागृति; भान जाग्यावर असणें; शुद्धि. 'मी निजून उठलों आहें अजून पुरता ध्यानावर आलों नाहीं.' ११ आवड; पसंति. 'म्यां जें केलें तें त्याच्या ध्यानास येत नाहीं.' [सं.] ध्यानांत घेणें, येणें-(एखादी गोष्ट) विचारांत, लक्ष्यांत घेणें. ध्यानांत येणें-(एखादी गोष्ट) पसंत पडणें; आवडणें; बरी अशी वाटणें. 'हें ऐकून मसलत सर्वांचे ध्यानांत आली.' -भाब ५ ध्यानास लागणें-(एखाद्या गोष्टीचा) ध्यास लागणें; (एखादी गोष्ट) डोक्यांत घोळविणें ध्यानींमनीं-क्रिवि. (ध्यानांत-मनांत) १ अंतःकर- णाच्या अनेक अवस्थाभेदांच्या ज्या वृत्ती त्यांपैकीं एका वृत्तींत (अकरणरूपीं प्रयोग). 'आज पाऊस पडेल हें माझ्या ध्यानींमनीं नढ तें म्हणून मी छत्रीवांचून बाहेर पडलों.' २ अवस्थाभेदांनीं होणार्‍या ज्या अंतःकरणाच्या अनेक वृत्ती त्या सर्वाना व्यापून. याच्या ध्यानींमनीं सर्वदा खेळ, म्हणून स्वप्नांत चावळला तरी बारा, तिरपगडें इ॰ बोलतो.' [ध्यान + मन] सामाशब्द- ॰धारणा- स्त्री. १ (एखाद्या वस्तूचें, मनुष्याचें) बाह्य स्वरूप, चर्या, मुद्रा. २ एकाग्रतेनें केलेलें चिंतन, मनन. (क्रि॰ धरणें; करणें). [ध्यान + धारणा] ॰निष्ठ-वि. ईश्वर स्वरूपाचें ध्यान करण्यांत तत्पर, गढ लेला; एकनिष्ठ, [ध्यान + सं. निष्ठा = निश्चययुक्त श्रद्धा] ॰मुद्रा- स्त्री. १ देवतेचें ध्यान करतेवेळीं धारण करावयाची मुद्रा, शरी- राची ठेवावयाची विशिष्ट स्थिति, बैठक, आसन. २ ध्यान करतें- वेळीं होणारी भ्रुकुटी वाकड्या होणें इ॰ प्रकारयुक्त मुद्रा; चर्या. [ध्यान + सं. मुद्रा = चर्या़] ॰योग-पु. ईश्वरप्राप्तीचें ध्यानरूप, साधन; अमूर्तचिंतन. [ध्यान + योग] ॰ध्यानस्थ-वि. १ ईश्वराचें ध्यान करण्यांत निमग्न झालेला, गढून गेलेला. 'देव आणि भक्त । तन्मय अति ध्यानस्थ ।' २ (अशिष्ट ध्यानस्त) विचार करण्यांत गुंग झालेला; विचारमग्न. 'तुम्हीं गोष्ट सांगितली तेव्हां मी घ्यानस्त होतों म्हणून ऐकिली नाहीं.' [ध्यान + सं. स्था = उभें राहणें]

दाते शब्दकोश

ध्यान dhyāna n (S) Meditation or reflection, esp. that profound and abstract contemplation, the favorite religious exercise of secluded Bráhmans. 2 Mind, apprehension, understanding. Ex. ही गोष्ट ध्यानांत येत नाहीं. 3 Attention, advertence, heed, regard. Ex. ते गडी खेळतील विरंगुळतील तिकडे ध्यान असूं द्या. 4 Mind, memory, remembrance. Ex. ही गोष्ट म्यां ध्यानांत ठेविली आहे. 5 Presence of the senses and faculties. Ex. मी निजून उठलों आहें अझूण पुर- ता ध्यानावर आलों नाहीं. 6 Liking, approval, mind. Ex. म्यां जें केलें तें त्याचे ध्यानास येत नाहीं. 7 Form, figure, the aspect, air, appearance;--esp. used of the images of the deities as they are represented in different attitudes and under different dispositions (of their arms, legs, weapons &c.) Ex. हें ध्यान उग्र, तें ध्यान सौम्य. Hence, laxly, Air, cast, manner, style, fashion; general bearing or character. Ex. दोघे जण सावकारी करतात परंतु तें ध्यान निराळें हें ध्यान निराळें; आजचे गाण्याचें कांहीं ध्यानच निराळें. 8 The piece of poetry describing any dhyán or representation of a god. 9 Applied to a crazy or idiotic person, to a mischievous child &c. ध्यानास लागणें g. of o. To think upon or pursue fondly, intently, devotedly &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

गायरू      

न.       १. (निंदार्थी किंवा लडिवाळपणे) गाय. पहा : गायरट. २. (ल.) सौम्य, गरीब, निरुपद्रवी माणूस. ३. वयात आलेली गाय. (गो.) ४. अगदी लहान जातीची कोकणी गाय. (बे.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गहि(ही)न

वि. गरीब; दीन; सात्विक; थंड; धिम्मा; शांत; सौम्य; सालस; क्षमाशील (माणूस). -शास्त्रीको [सं. गहन]

दाते शब्दकोश

गहिन, गहिण, गहीन, गहिण      

वि.       गरीब, दीन; सात्त्विक; थंड; धिम्मा; शांत; सौम्य; दयाळू सालस; क्षमाशील (माणूस). [सं. गहन]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गोगलगाय

स्त्री. १ एक जठरपादवर्गांतील कीटक. हिचें शरीर मांसल, थंड, नरम असून वर कवच असतें. हिला दोन शिगें व त्यांच्या शेवटीं डोळे असतात. २ (ल.) सौम्य; गरीब; कष्टाळु-प्राणी माणूस. ३ एक प्रकारची खुबडी; पाण्यांतील प्राणी. [दे. प्रा. गोआलिका] म्ह॰ गोगलगाय आणि पोटांत पाय = बाहेरून गरीब व आतून दुष्ट.

दाते शब्दकोश

गोगलगाय      

स्त्री.       १. जठरपादवर्गातील एक कीटक. हिचे शरीर मांसल, थंड, नरम असून वर कवच असते. हिला दोन शिंगे असतात व त्यांच्या शेवटी डोळे असतात. २. (ल.) सौम्य; गरीब; कष्टाळू - प्राणी, माणूस. ३. एक प्रकारची खुबडी; पाण्यातील प्राणी.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गोमुखव्याघ्र      

पु.       १. दिसण्यात गाईसारखा सौम्य पण अतिशय क्रूर असा वाघ. २. गाईचे कातडे पांघरलेला लांडगा. ३. (ल.) वरून गरीब पण आतून लुच्चा माणूस. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गरम

वि. १ ऊष्ण; ऊन. (शब्दशः व ल.) २ कडक; तिखट; रागीट. ३ लोंकरीचें उबदार (कापड इ॰). 'थंडीचे दिवसांत गरम कपडे अंगांत घालावे.' ४ दाट (बातमी इ॰). 'डेरेदाखल होतात म्हणून आवई गरम होती.' -रा १.५४. ५ रुष्ट; संतप्त. 'तो मजवर फार गरम झाला.' [फा. गर्म्] (वाप्र.) ॰होणें-(ल.) रागावणें; संतापणें. सामाशब्द- ॰नरम-वि. १ फार ऊन किंवा थंड नाहीं असें (वस्तु इ॰). २ (ल.) कडक व सौम्य; निष्ठुर व दयाळु; कधीं कडक व कधीं शांत (मनुष्य, स्वभाव, भाषण). ३ नवेंजुनें; उत्तममध्यम; चांगलें व सामान्य. ॰बाजारी-स्त्री. १ फार मागणी; भारी किंमत; व्यापारांत तेजी. २ श्रीमंत होण्याची संधि साधणें. 'मध्यस्थ लोकांनीं गरमबाजारी करून ...' -दिमरा २.२८२. [फा. गर्म् + बाझारी] ॰मसाला-पु. १ भाजीला घालण्याचा धने, हळकुंड, दालचिनी, हिंग इ॰चा कच्चा मसाला. २ उष्ण व शक्तिवर्धक औषधें, मसाले. [हिं.]

दाते शब्दकोश

गरमनरम      

वि.       १. फार ऊन किंवा थंड नाही असे. (वस्तू इ.) २. (ल.) कडक व सौम्य; निष्ठुर व दयाळू; कधी कडक व कधी शांत (मनुष्य, स्वभाव, भाषण.). ३. नवे जुने; उत्तम मध्यम; चांगले व सामान्य.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गुलाबी थण्डी

=सौम्य गारठ.

फारसी-मराठी शब्दकोश

गुलाबी थंडी      

सौम्य प्रकारची, सुखावह थंड हवा; पहाटेची थंडी. गुलाम      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

हलका

वि. १ वजनांत कमी; जड नसलेला. २ लहान; न्यून (प्रमाण, वजन, लांबी इ॰ मोजतांना). ३ कमीप्रतीचा; कडक नसलेला (गुण, प्रभाव इ॰ त). 'अंमलाच्या बाबतींत अफूपेक्षां भांग हलकी.' ४ सौम्य; मंद; कमजोर (थंडी, पाऊस इ॰). ५ जड नसलेलें; पचण्यास सोपें (अन्न). ६ शरीरास गुण- कारी, (अन्न) पचण्यास सोपें (पाणी). ७ सहन करण्याजोगा; फारसा मोठा नसलेला; क्षुल्लक (रोग, विकार. काम). ८ कमी महत्त्वाचें; किरकोळ (काम, बाब). ९ कमी दर्ज्याचा, अधि- काराचा, वजनाचा (माणूस). १० कमी किंमतीची (वस्तु). ११ बेताची; प्रमाणशीर; कमी (किंमत, अट). १२ क्षुल्लक; गौण (विषय). [सं. लघु; प्रा. हलुअ; हिं हलका; तुल॰ सं. क्षुल्लक] कानाचा हलका-वाटेल त्याचें ऐकून त्यावर विश्वास ठेवणारा. जिवाचा मनाचा हलका-संकुचित दृष्टीचा; क्षुद्र; हलकट. बुद्धीचा हलका-कमी बुद्धीचा; मठ्ठ डोक्याचा; मूर्ख. ॰पतला-वि. (व) कमकुवत; दुर्बळ; किरकोळ. ॰फराळ-पु. थोडें अन्न व पुष्कळ पाणी पिणें. ॰फूल-वि. अत्यंत हलका. ॰भार-पु. कमी पत, नांव. हलक्यानें-क्रिवि. हळूं; लवूप्रमा- णानें; सावकाश (बोलणें, चालणें इ॰). 'हलक्यानें-बोल, चाल इ॰.'

दाते शब्दकोश

हळु-ळू

वि. १ हलका; अजड. २ हल्लक; मोकळें. 'डोळे काढले कपाळ हळू झालें.' ३ (इतर अर्थीं) हलका पहा. [सं. लघु = लहू-हळु] हळु-ळू, हळूहळू, हळूच-कण- कन-कर-दिशी-१ सावकाश; हलकेंच; आस्ते; मंदगतीनें. २ सहज; सौम्यतेनें (बोलणें, चालणें, हलणें, वागणें). म्ह॰ (व.) हळु बोल्या गोंधळ घाल्या हळूच चुगली खाऊन कलागत लावणारा. हळुमळ-माळ-वार-वि. नाजूक; मऊ; कोमल (व्यक्ति, प्रकृति, फूल झाड इ॰). अरुवार पहा. हळुवट- वि. १ (काव्य) साधारण हलकें, मऊ, नाजूक, सौम्य. 'उपमे तुळितां निर्जर नगर । चढे हळुवट आकाशीं ।' २ क्षुद्र; क्षुल्लक; तिरस्करणीय. ३ हळवट पहा. ४ लहान; लघु. 'श्री. गुरु ते वस्तु घनवट । लघुते बोलिजे हळुवट ।' ५ उणें; न्यून. ॰वाय-क्रिवि. (गो.) हळुहळू. हळुवें-वि. हलकें.

दाते शब्दकोश

कान्नी, कान्न्या

स्त्री. कांजिण्या; एक देवींसारखा पण सौम्य रोग. [कांजिणी ?]

दाते शब्दकोश

कान्नी, कान्न्या      

स्त्री.       कांजिण्या; देवींसारखा पण एक सौम्य रोग.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कानपिचकी      

स्त्री.       ताकीद; सौम्य शिक्षा; कानाला चिमटा येणे. (क्रि. बसणे.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कानपिचकी

स्त्री. ताकीद; सौम्य शिक्षा; कानास चिमटा घेणें. [कान + पिचकी = पिळणें]

दाते शब्दकोश

किल      

पु.        लहान पक्ष्याने काढलेला सौम्य व गोड असा आवाज. [ध्व.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

को(कों)वळा

वि. १ लहान; कच्चा; अपक्व; हिरवा. २ ताजा. (कोंबडीचें अंडें, इ॰) याच्या उलट निबर. ३ (ल.) सौम्य. (सकाळ, सूर्यकिरण, ऊन). ४ कच्ची, अडाणी; अप्रगल्भ (ग्रहणशक्ति, समजूत). अर्धवट; कोता; अप्रौढ; पुरतेपणाचा नव्हे असा (सल्ला मसलत, विचार). ६ कमी बळकट; नाजूक; कोमल. [सं. कोमल; सीगन. कोवळो. फ्रेंच. जि. कोवलो] ॰किरळा-वि. लहान आणि नाजूक (अंकूर फुटलेला). [कोवळा + किरळ] ॰दुपार, दोनप्रहर-स्त्रीपु. दोनप्रहर होण्याच्या आधींचा काळ. नुकतीच सुरवात झालेली दुपार, मध्यान्ह.

दाते शब्दकोश

कोमल, कोमळ      

वि.       १. मृदू; सुकुमार; नाजूक; सुंदर. २. गरीब; सौम्य; हळव्या मनाचा. ३. मधुर; रमणीय, प्रसादयुक्त. (शब्द, नाव, आवाज) : ‘सकोमल सरिसे ।’ - राज्ञा ६·१८३. ४. अपरिपक्व (ज्ञान). ५. बेअक्कल. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कोमल-ळ

वि. १ मृदु; सुकुमार; नाजुक; सुंदर. २ गरीब; सौम्य; हळव्या मनाचा. ३ मृदु; मधुर; रमणीय (शब्द, नांव, आवाज). 'रामनाम जपे कोमल.' कोमलच्या उलट कठोर. [सं.] ॰चित्ताचा किंवा चित्ताचा कोमल-वि. कोंवळ्या, हळव्या मनाचा; दयार्द्र मनाचा, अंतःकरणाचा. ॰ऋषभ-पु. (संगीत) पांच विकृत स्वरांपैकीं पहिला स्वर; विकृतस्वर पहा. ॰गांधार-पु. पांच विकृत स्वरांपैकीं दुसरा स्वर. ॰धैवत-पु. पांच विकृत स्वरां- पैकीं चौथा स्वर. ॰निषाद-पु. पांच विकृत स्वरांपैकीं पांचवा स्वर. ॰मध्यम-पु. कोमल मध्यम व शुद्ध मध्यम हे ध्वनीनें एकच आहेत. नामभेद मात्र आहेत. मध्यम शब्द पहा. ॰स्वर-पु. (संगीत) शुद्ध स्वरांपेक्षां ध्वनीनें नीच स्वर. हल्लींच्या संगीत पद्धतींत कोमल स्वर पांच मानतात. (कोमल) ऋषभ, गांधार, मध्यम, धैवत. निषाद.

दाते शब्दकोश

कोवळा      

वि.       १. लहान; कच्चा; अपक्व; हिरवा. २. ताजा. ३. (ल.) नाजूक; सौम्य (सकाळ, सूर्यकिरण, ऊन). ४. कच्ची; अडाणी; अप्रगल्भ (ग्रहणशक्ती, समजूत). ५. अर्धवट; कोता; अप्रौढ; अपूर्ण (सल्लामसलत, विचार). ६. कमी बळकट; नाजूक; कोमल. ७.ज्याची नुकतीच सुरुवात झाली आहे असा. [सं. कोमल]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कुटकी

स्त्री. औषधी वनस्पति; हें लहान झाड हिमालयावर ९ ते १५ हजार फुट उंचीवर विपुल होतें. हें फार वर्षें जगतें. याचें मूळ नरम असून पानें अर्धगोल, देंठाकडे बारीक व टोंकाकडे रुंदट, गुळगुळीत, कातरलेलीं असतात. झाडास निळ्या रंगाचे दाट घोस येतात. कुटकी फार कडू असून बहुतेक ज्वरावर काढयांत देतात. -वगु ७.६७. बाळकडू; हें सौम्य रेचक आहे. पाण- थरी, जलोदर, कावीळ यांवर उपयोगी आहे. [सं. कटुका; हिं. कुटकी; गु. कडु; बं. कटूकी; का केदारकटकी]

दाते शब्दकोश

लाड

पुअव. लालन; मुलांबाळांवर केलेलें प्रेम; त्यांचें कोड- कौतुक; प्रेमानें केलेलें लालनपालन; प्रेमाची भाषा, कृति. [सं. लड्; प्रा. लड्डिय; हिं लाड] म्ह॰ लाडानें वेड गुळानें बोबड. (वाप्र.) ॰चालविणें-पुरविणें-हौस पुरविणें; भागविणें; मागितलेली वस्तु देणें. ॰देणें-लाड करणें. 'कां लाड देशी हो! कान्हयातें बाई. ।' -आपद ८८. सामाशब्द- ॰झगडा-डें-पुन. मित्रत्वाचें भांडण; प्रेमकलह. ॰पुरवा-व्या-वि. लाड पुरविणारा; हौस भागविणारा. लाडकें; लाडका-वि. १ प्रेमाचा; प्रिय; आवडता. २ एखाद्याच्या विशेष प्रेमांतील. ३ लाडिक; प्रेमळ; लडिवाळपणाची (मुलांची भाषा; बोलण्याची पद्धत व त्यांची वागण्याची रीत याबद्दल केलेला उपयोग). ४ प्रेमाचे; विलासी; गोडीगुलाबीचे; स्वार्थी; मनोवेधक (शब्द, रीत). 'आत्तां द्या, पैका मिळाला म्हणजे देऊं अशा लाडक्या गोष्टी कशाला सांगता?' ५ अविनयी; धीट; दांडगी (लाडांमुळें). ६ सौम्य; मन वळ- विणारे; अधिकार दाखवून केलेलें नव्हें असें; राजीखुषीचें. जसें- लाडका धंदा-व्यवहार-काम-गोष्ट इ॰ म्ह॰ १ लाडकं पोर देवळीं हगे, गांड पुसायला महादेव मागे. २ लाडकी सई, दाल्ल्यानं घेतली डोईं.' लाडकणें-१ लाड करणें; कोड पुरविणें. २ काळजी घेणें; लालनपालन करणें. लाडकाविणें, लाडावणें-१ लाड करून बिघडविणें. २ लाड करणें. 'मी लेकरूं त्वां मज लाडंवावें ।' -अकक २. -देप २२. लाडणें-अक्रि. लाडावला असणें; लाड, कौतुक होणें. लाडला, लाडिला, लाडेला-वि. लाडका; प्रिय; प्रेमी. लाडसपणा-पु. लडिवाळपणा. 'असों हें भवमोचना । देवरायाचें लाडसपणा ।' -ऋ २७. लाडाचा तांब्या-पु. विवाहानंतर मुलीच्या बापानें जावयास दिलेलें पात्र (विशेषतः मिठाईनें भरलेलें); वरदक्षिणा. लाडिकपणा-पु. लडिवाळ- पणा. लाडीगुडी-गोडी-स्त्री. एखाद्याकडून आपलें काम करून घेण्याकरितां त्याच्याशीं गोड बोलणें; लाडिकपणा करणें; कांहीं लालूच दाखवून अनुकूल करून घेणें. (क्रि॰ दाखविणें). 'लाडीगुडी चालव लाडकीशीं ।' -केक ७. लाडुकपण-पणा- नपु. लाडीगोडी; लाडकेपणा. लाडूबाई-वि. लाडावलेली; लाडांत वाढलेली (स्त्री, मुलगी). 'टेवायची होती लाडुबाई आपल्या घरीं, म्हणजे आमच्या घरीं हे पांढरे पाय लागले नसते.' -संदानंद. पुल्लिंगी. लाडोबा-लाडेंकोडें-क्रिवि. लडिवाळपणें; लाडीगोडीनें. 'निज प्रीतीनें होऊनि वेडें । त्याशीं खेळे लाडेंकोडें ।' लाडैजणें-क्रि. लडिवाळपणा करणें. 'तैसें संत माहेर माझें । तुम्ही मिनलिया मी लाडैजे ।' -ज्ञा १५.५९७.

दाते शब्दकोश

लाघवी

पु. नट; नाटकी; जादूगार; मात्रिक. 'जसीं लाघवियें वेडीं चाळविलीं ।' -ऋ २९. 'कां लाघवियाचें विचित्र । विनोदले ।' -ज्ञा १८.७९७. -वि. १ लडिवाळपणा करणारा; मन ओढून घेणारा; आर्जवी; प्रेमळ. २ नम्र; सौम्य. ३ हांजी हांजी करणारा; लघळ. ४ चतुर; कुशल. 'ऋषि जात होते स्वाश्रमासी । त्यांतें लाघवी हृषीकेशी । तीर्थमिषें समस्तांसी । पिंडारकासी स्वयें धाडी ।' -एभा १.३१८; -तुगा २२५. ५ धूर्त; ठकबाज; कपटी. 'न गुरु तो ठक दांभिक लाघवी ।' -वामन, भरतभाव ३७. [लाघव]

दाते शब्दकोश

लीन

वि. १ मिसळून गेलेला; एकजीव झालेला; गुप्त; लय पावलेला. 'प्रलयीं सर्व प्रपंच ब्रह्मस्वरुपीं लीन होती.' २ नम्र; आदरशील; सौम्य वृत्तीचा. 'साधूपाशीं लीन व्हावें.' [सं. ली = भेटणें; चिकटून असणें] लीनकरण-न. (नृत्य) हाताची पता- कांजलि करुन वक्षःस्थलावर ठेवणें, मान उन्नत करणें, खादे किंचित् वांकडे करणें.

दाते शब्दकोश

लकड

स्त्री. (कों.) १ अतिशय उंच वाढलेलें माडाच्या जातीचें झाड. २ (ल.) शरीरानें कृश, सोटासारखा उंच असलेला मनुष्य. [लांकूड] सामाशब्द- ॰कोट-पु. मोठमोठीं लाकडें जमिनींत उभीं पुरून भिंताडासारखें केलेलें आवार; लाकडाची तटबंदी; मेढेकोट. [लाकूड + कोट; हिं. लकडकूट] ॰खाना-पु. १ इमारतीचीं किंवा जळाऊ लाकडें ठेवण्याची घरांतील स्वतंत्र जागा; लांकूडघर. २ लाकडांची वखार [लाकूड + खाना हिं. लकड- खानह्] ॰दिवी-वि. रोडका; लुकडा; उंच व कृश. [लाकूड + दिवा + ] ॰वाला-पु. इमारतीचीं किंवा जळाऊ लांकडें विकणारा. [हिं.] लकडा-पु. १ मोठी काठी. २ वाळलेला, रोड झालेला मनुष्य. 'त्याचा लकडा वळला.' ३ वाळलेला व लाकडासारखा कडकडीत झालेला पदार्थ (कपडा, भाकर, वाळलेलें काड इ॰). लकडी-स्त्री. १ लाकडाप्रमाणें घट्ट होईतोंपर्यंत कढविलेला उंसाचा रस; लाकडासारखा कडक झालेला गुळाचा पाक; गुळाचा एक प्रकार. २ लाकूड; काठी. जोंधळ्याचा एक प्रकार. [हिं.] (वाप्र.) लकडी वांचून मकडी वठ(ळ)त नाहीं-माकडेचेष्टादि सौम्य उपायांनीं बंद होत नाहींत, त्याला मारच पाहिजे. [लाकूड + माकड] लकडी कोट-पु. लकडकोट पहा. लकडी पूल-पु. नदी इ॰कांवर बांधलेला लाकडांचा पूल । लकडी पेंढी-स्त्री. (कों.) होळीकरितां मुलांनीं घरोघर फिरून मागितलेलीं लांकडें, ओंडके व गवत इ॰ (व्यापकार्थी). लकडया-वि. उंच आणि लुकडा. [लकड]

दाते शब्दकोश

लोणी

न. दूध, दही घुसळलें अमतां त्यांतून जो स्निग्धांश निघतो तो. [सं. नवनीत; प्रा. नोणीअ; पं. नौणी; हिं. नौनी] ॰खाऊन ताक देणें-स्वतःचा स्वार्थ साधून मग परार्थ पाहणें; मुख्य भाग आपण घेऊन निःसत्व व किरकोळ स्वरूपाचा भाग उदार होऊन दुसऱ्यास देणें. 'हजार युरोपियन कामगार सर्व लोणी खाऊन ताक मात्र आमच्या वाट्यास देतात.' -टि २.५१२. ॰लावणें-खिशामत करणें; मनधरणी करणें; मिनत्या करणें. लोण्याची कडी करणें-लोणी वाटेल तितकें किंवा विपुलतेनें वाढणें. लोण्याची सवत न साहणें-शांत आणि लोण्या- प्रमाणें मऊ अशीहि सवत असह्य होणें; विरोध सदन न करणें. न घडणाऱ्या गोष्टीही चिकित्सा करणें. लोण्यांत दांत फुटणें- अत्यंत सौम्य स्वभावाचा मनुष्य असभ्य, रागीट आणि कठोर असा होणें. लोण्यास दांत फुटणें-आपण ज्याचें लालन, पालन, पोषण केलें त्यानें आपणाशीं कृतघ्नपणें किंवा अमर्याद- पणें वागूं लागणें. लोण्याची कणी, लोण्याचें बोट--स्त्रीन. अगदी किंचंत् लोणी; कणीएवढें लोणी; बोटाला चिकटलेलें लोणी; इवलेसें लोणी. लोण्याचें आयसिंग-न. लोण्यापासून चोटी चुरम्याची तुकडे पाडून केलेली बर्फि. -गृशि १.४४४. लोण- कढा-वि. ताजा; अगदी नवा; कोरा करकरीत; नवीन; साजूक. (अगदी ताज्या कढविलेल्या लोण्याप्रमाणें). [लोणी + कढणें] लोणकढी, लोणकढीथाप-वार्ता-बातमी-गोष्ट-खबर, लोणकढें वर्तमान-स्त्रीन. समयानुसार ठेवून दिलेली थाप; खोटी बातमी; गंमतीखातर आणि गंभीर मुद्रेनें सांगितलेली खोटी खबर. 'पण मला आपण तसबीर द्यायची कबूल केली ना? कां लोणकढी दिलीत?' फाल्गुनराव. लोणकढी दौलत- स्त्री. नवीनच मिळालेली दौलत. लोणकढें(डें)तूप-न. शुद्ध लोणी कढवून तयार केलेलें ताजें तूप; साजूप तूप. लोणकढें दारिद्र्य-न. नुकतेच आलेलें दारिद्र्य. लोणकाप्या, लोणी- काप्या-वि. बोथट; धार नसलेला (चाकू, सुरी इ॰). लोणट- वि. लोण्याच्या वासाचें चवीचें. लोणणें-सक्रि. (व.) घोटणें; आहाटणें; घाटणें; वरणाची डाळ शिजल्यानंतर ती लोण्या- सारखी मऊ करणें. लोणस-वि. (कों.) १ सत्वस; कसदार; ज्यामध्ये लोण्याचा अंश पुष्कळ आहे असें (दूध, दहीं). २ जीच्या दुधापासून पुष्कळ लोणी मिळतें अशी (गाय, म्हैस इ॰).

दाते शब्दकोश

मौ

वि. मऊ; नरम. २ मृदु; लवचीक; नमनशील. ३ (ल.) मऊ; सौम्य; नरम. [सं. मृदु = मऊ] मौआळ, मौवाळ- वि. मऊ; कोमल; मवाळ.

दाते शब्दकोश

मिस. मिसक, मिसकट-टें

म. १ निमित्त. २ रूप; आकार. 'पै अष्टधा भिन्न ऐसें । जें दाखविलें प्रकृतिमिसें ।' -ज्ञा १५.४८४. ॰करा-खोर-वि. ढोंगी; बतावणी करणारा; तोतया. मिसकीन-ल-वि. १ गरीब; अशक्त. २ निरुपद्रवी; शांत (गाय, म्हैस). ३ (ल.) बाहेरून दिसण्यांत गरीब पण आंतून लबाड. [अर. मिस्कीन् = गरीब] ॰बगळा-मात्रागमनी- मादरचोद-मारवाडी-वि. बाहेरून सौम्य, गरीब परंतु आंतून हरामखोर; मुद्रा बावळी परंतु पक्का लबाड असा (इसम).

दाते शब्दकोश

मळमळ

स्त्री. १ पित्तामुळें, कळकट पदार्थ खाण्यांत आल्या- मुळें वाती होईलसें वाटणें; उमासा (क्रि॰ येणें). २ (ल.) कांहीं संशय आल्यामुळें मनास वाटणारी अस्वस्थता; चित्ताची संशया- त्मकता. (क्रि॰ फेडणें; घालणें; फिटणें; जाणें). 'माझ्या घराचा झाडा घेईन तुम्ही आपल्या मनाची मळमळ फेडून टाका.' [ध्व.] मळमळणें-अकर्तृकक्रि. वांती होईल अशा भावनेनें युक्त होणें- उमदळणें; उमसणें. 'मला मळमळतें'; 'पोटांत मळमळतें. मळ; मळी-स्त्री. वीट; तिटकारा; उमासा. मळमळीत-वि. १ बेचव; पाणचट; योग्य प्रमाणापेक्षां कमी मालमसाला असलेला (खाद्य- पदार्थ). २ पाणचट; कवकवीत (फळ) ३ बेंगरूळ; सौम्य; बेडौल (मनुष्य). ४ नीरस; तडफ नसलेलें (गाणें, भाषण, वागणूक). ५ ओंगळ; तेजहीन; घाणेरडें दिसणारें; बोजड (धातूचें भांडें, शस्त्र, हत्यार). ६ ढिला; सैल; अव्यवस्थित; नीटनेटका नसलेला (पदार्थ, कामाची पद्धत). म्ह॰ मळमळीत सौभाग्यापेक्षां झळझळीत वैधव्य बरें.

दाते शब्दकोश

मंजुल-ळ, मंजूळ, मंजुळवाणा

वि. १ कानास गोड लागणारा; मधुर, (आवाज, ध्वनि). २ सौम्य; झुळुझुळु वाहणारा; मंद (वारा). [सं. मंजुल]

दाते शब्दकोश

मृदु, मृदुल

वि. १ मऊ; नरम; खरखरीत नसलेला. २ कोमल; नाजुक, लवचीक; नम्रता; शिथिलावयव. ३ (ल.) सौम्य; सोपें; साधें; शांत; न लागणारें; गोड, नम्र; कठोर नसलेलें (भाषण इ॰). [सं.] ॰काय-पु. अपृष्ठवंश प्राणिसंघांतील मृदुकाय हा एक संघ आहे. गोगलगाय, पिकूळ, खुबडी, कवडी, कालवे, शिंप वगैरे प्राणी या संघांत मोडतात. -ज्ञाको. (म.) १९०. ॰वर्ण-पु. वर्णांचा एक वर्ग; कठोर नव्हे असा वर्ण. ग, द, ज, वगैरे. मृदुली, मृदोली-ळी-स्त्री. मऊ गिरदी. 'विचित्रु घातलीं आसनें । सुकुमार मृदुपणें । गाद्यापडगाद्या टेंकणें । वोठंगणें मृदोळिया ।' -एरुस्व १५.४०.

दाते शब्दकोश

मऊ

मृदु, मऊमऊ, मृदुल, कोमल, नाजूक, गुलगुलीत छुसछुशीत, सौम्य, लवचिक्र, हळुवार, सैलसैल, भुसभुशीत, प्रतिकारशून्य, मुलायम, पुष्पवत्, परागाप्रमाणें, विसतंतुवत्, नरम, मोरपंखी, हलकें फुलकें, नवनीतासमान, लोण्यासारखें, शिवरीच्या कापसाप्रमाणें, विरोधहीन, मेणासारखें, परांसारखें, मऊ पिसासारखें, मखमलीसारखे, पुष्पराशीप्रमाणें, शिरीष कुसुमाप्रमाणें, काठिण्याचा पूर्ण अभाव, पिसाच्या गिरदीप्रमाणें कापूसच जणूं ! पल्लवासारखें, पाय टाकला तर दबेल, रबरासारखें, कठीणपणा कसा तो नाहीं, गुलाबाच्या पाकळ्या जणू ! दबत जाते, घर्षेण किंवा प्रतिरोध नाहींच, ताठरपणा गांवींहि नाहीं.

शब्दकौमुदी

मऊ

वि. १ कोमल; मृदु; शिथिल (अवयवाचा). २ गुळगुळीत; खरखरीत, खडबडीत नव्हे असें. ३ (ल.) सौम्य; शांत; नम्र; रागीट नसलेला; कठोर नसलेला (माणूस, भाषण) [सं. मृदु; प्रा. मउ] म्ह॰ मऊ सांपडलें म्हणून कोंपरानें खणूं नये. = एखाद्याच्या चांगुलपणाचा फार फायदा घेऊं नये. ॰पायांचा-वि. (स्त्रियांचे पाय मऊ असतात त्यावरून ल.) नपुंसक. ॰रेशीम-सूत-वि. १ रेशमासारखा किंवा सुतासारखा मऊ; अतिशय मऊ २ (ल.) अतिशय गरीब, दीन; नरम. ॰सर-वि. किंचित् मऊ; साधारण मृदु.

दाते शब्दकोश

नाजूक

नरम, मऊ, सौम्य, मखमली, मोरपंखी, हळुवार, तरल, मृदुल, मृदु, कोमल, व्हेल्व्हेट्-साटिनासारखें मऊ, वेलदोड्यानें सर्दी लवंगेने उष्णता होईल, हात लावला की कोलमडेल, जरा ऊन लागलें की लालीलाल ! त्याचा जीव केवढासा ? थोडासाही बदल चटकन् टिपणार, नाजूक साजूक कोमलांगी.

शब्दकौमुदी

निबळ, निबळी      

वि.       १. दुबळा; अशक्त; बलहीन; कमकुवत : ‘सर्वांगें होति निबळें । विकळपणें ।’ – भाए २०५. २. सौम्य; मऊ : ‘आकरें न होती उगळें स्पर्शां अति निबळें ।’ – माज्ञा १७·१२७.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निबळ-ळी

वि. १ दुबळा; अशक्त; बलहीन; कमकुवत; नाताकद. 'सर्वांगें होति निबळें । विकळपणें ।' -भाए २०५. २ सौम्य; मऊ 'आकारें न होती उगळें स्पर्शीं अति निबळें ।' -माज्ञा १७.१२७. [सं. निर्बल]

दाते शब्दकोश

निर्व्यसन-व्यसनी, निर्वेसन

वि. १ वाईट संवयी, व्यसनें नसलेला. 'सौम्य सात्त्विक शुद्ध मार्गी । निःकपट निर्वे- सनी ।' -दा २.८.१८. २ (ल.) संकट, अरिष्ट इ॰ पासून मुक्त (ईश्वर). [सं.]

दाते शब्दकोश

निवळ

स्त्री. १ पातळ पदार्थांतील जडांश खालीं बसून वर राहिलेला द्रवांश; गाळ बुडाशीं बसून वर राहिलेला शुद्ध, स्वच्छ पदार्थ. २ (गो. कु.) भाताची पेज किंवा पेजेचें पाणी. ३ ठोक रकम. -वि. १ स्वच्छ; शुद्ध; निर्मळ (पाणी, डोळे, आकाश इ॰). २ (ल.) अकपट; अकृत्रिम; शुद्ध; प्रांजळ. ३ नुसतें; फक्त; केवळ. -क्रिवि. स्पष्टपणें; स्वच्छपणें; केवळ; निःसंशय; निर्विवाद; प्रांजळ- पणें; अकृत्रिमपणें; ढोंग, अवडंबर इ॰ न करतां. 'या पदार्थाचे निवळ दाहा रुपये येतील.' [सं. निर्मल] ॰गांठ-स्त्री. स्वस्थ- तेची, शांतपणाची गांठ, भेट. २ दिलसफाईची, मोकळेपपणाची मुलाखत. ॰नितळ-वि. १ स्वच्छ; शुद्ध; घाण, गदळ याविरहित. २ थंड आणि शांत; संथ व प्रसन्न; स्वस्थ आणि सौम्य. ॰शंख- वि. १ शुद्ध व शंकासारखें स्वच्छ (पाणी, लोणी). २ (ल.) शुद्ध मूर्ख अथवा टोणपा; अत्यंत दरिद्री (माणूस).

दाते शब्दकोश

निवळणे      

अक्रि.       १. स्वच्छ, तेजस्वी, चकचकीत होणे (डोळे, चेहरा, आकाश इ.). २.(ल.) थंड, शांत, स्वस्थ, सौम्य, गरीब होणे; विचारी, विनीत, नम्र होणे; सुधारणे (दुर्वर्तनी तरुण). ३. पूर्ण तयार झाल्यावर चांगले बनणे (कोवळ्या झाडाचा पहिला बहर वाईट निघतो, पण नंतर चांगला निघू लागतो त्यावरून); मुरणे (कोवळे फळ बेचव असते त्यावरून). ४. भिजल्यामुळे मादकता, उत्तेजकता कमी होणे (तंबाखू इ. ची). ५. निपुण, हुशार होणे; चांगला जम बसणे (एखाद्या कामात, कलेत, शास्त्रात). ६. (चर्मकार.) केस, कान्ही इ. काढून टाकल्यावर (कातडे) पाण्यात ठेवल्याने स्वच्छ होणे. ७. (गोष्ट) स्पष्ट होणे. [सं.निर्मलन]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निवळणें

अक्रि. १ स्वच्छ, तेजस्वी, चकचकीत होणें (डोळे, चेहरा, आकाश इ॰). 'डोळे निवळले' 'रात्र निवळली.' २ (ल.) थंड, शांत, स्वस्थ, सौम्य, गरीब होणें (रागावलेला माणूस, जनावर), विचारी, विनीत होणें; सुधारणें (दुर्वर्तनी तरुण). ३ पूर्णावस्थेंत आल्यानंतर चांगलें बनणें (कोवळ्या झाडाचा पहिला बहार वाईट निघतो पण पुढें उत्तम निघावयास लागतो त्यास म्हणतात); मुरणें (कोवळें फळ बेचत असतें त्यावरून); 'सुपारी निवळली.' ४ भिजण्यानें मादक गुण कमी होणें (हरीक, तंबाखू इ॰ कांचा); स्पष्ट होणें (गोष्ट). ५ निपुण, हुशार होणें; चांगला जम बसणें (एखाद्या कामांत, कलेंत, शास्त्रांत). ६ (चांभारी) केस, कान्ही, वगैरे काढून टाकल्यावर (कातडें) पाण्यांत ठेवल्यानें स्वच्छ होणें. [सं. निर्मलन] निवळण-न. १ (कों.) निवण अर्थ १ पहा. २ एखाद्या मिश्रणाचा निवळल्यानंतर वर येणारा द्रव; स्वच्छ रस. ३ गढूळ, द्रव शुद्ध करण्याकरितां त्यांत टाकलेला तुरटीसारखा एखादा पदार्थ.

दाते शब्दकोश

नम्र

वि. १ (भार, ओझें इ॰ कानीं) वांकलेला, लवलेला. 'तरुवर सुफलांच्या आगमीं नम्र होती ।' -वृक्षान्योक्ति, कृष्ण- शास्त्री चिपळुणकर. २ विनयशील; लीन; आज्ञाधारक. [सं.] नम्रता-स्त्री. विनय; लीनता. [सं.] नम्रतु-स्त्री. (महानु) नम्रता. 'तरूंची देखौनि नम्रतु ।' -दाव १२८. नम्रबुद्धि-स्त्री. विनयशीलता; लीनपणा; मनाचा सौम्यपणा; गरीबपण. -वि. विनयशील; लीन; सौम्य स्वभावाचा; आज्ञाधारक. [नम्र + बुद्धि = मन] नम्राय-स्त्री. (गो.) नम्रता; विनय. [नम्राई]

दाते शब्दकोश

नरम      

वि.       १. मृदू; कडक नसलेले; गुलगुलीत; मुलायम. २. (ल.) कठोर, जहाल नसणारा; गरीब; सौम्य; लीन; मवाळ. ३. भोळा; साधा; बावळट. ४. बायकी; बुळा. ५. स्वाभाविक तेज, कडकपणा, तीक्ष्णता कमी असलेला. उदा. कोमट पाणी इ. [फा. नर्म; गु.] (वा.) नरम पडणे, नरम होणे– (बाजारभाव इ.) कमी होणे, उतरणे, मंदीस येणे. नरम येणे– (एखादा मनुष्य इ.) स्वभावाने गरीब बनणे; सौम्यपणाने वागू लागणे. (एखादे) काम नरम करणे–काम फत्ते करणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नरम

[फा. नर्म्] मृदू; मऊ; सौम्य; लीन. काम नरम करणें (इम २५३) =काम फत्ते करणें नरमणें मऊ होणें; लीन होणें.

फारसी-मराठी शब्दकोश

नरमावणे      

अक्रि.       १. नरम, सौम्य होणे. २. (ल.) शांत, सुसह्य, कमी, मंद होणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नरमला

पारा-ताठा उतरला, मिजास उतरली, अक्कड गेली, ऐट जिरली, निशाण खालीं केलें, दिमाख संपला, रग जिरली , जोस संपला, टेव ओसरले, नजर वांकली, भाव खालीं आला, मऊ आला- पडला ! कडकपणा-पूर्वीचा रंग गेला, सातव्या पट्टीवरून पांचव्या पट्टीवर आला, मान जरा खाली झाली, भाषा बदलली, वांकला, निवला, खचला, विरघळला, सौम्य झाला, जेरीस-वठणीवर-ताळ्यावर आला, भाषा नरम झाली, अभिमानाला सुरुंग लागला कोमलपणा आला, गर्वहरण झाले, थोडेफार सौजन्य दिसूं लागलें.

शब्दकौमुदी

नरमणे      

अक्रि.       (वारा, पाऊस, विकार, संताप, ताप इ.) कमी, मंद, सौम्य होणे; मंदावणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नरमणें

आक्रि. (वारा, पौउस, विकार, संताप, ताप इ॰) कमी. मंद, सौम्य होणें; कमी तीव्र होणें; मंदावणें. 'वारा- पाऊस-राग-नरमला.'

दाते शब्दकोश

नरमविणें

अक्रि. १ नरम, शांत, सौम्य, होणें. २ (ल.) शांत, सुसह, कमी, मंद होणें; मंदावणें; थंडावणें. नरमणें पहा. [नरम]

दाते शब्दकोश

सक्रि. शांत, सौम्य, मंद करणें; शमविणें; नरम, हलका, सुसह करणें. [नरमणें]

दाते शब्दकोश

ओपळी, ओपाळी

स्त्री. हिंवाळ्यांतील सौम्य ऊन; उन्हाची तिरीप. ओप अर्थ ४ पहा. (क्रि॰ घेणें; बसणें). 'ओप- ळीस बस.'

दाते शब्दकोश

ओपळी, ओपाळी      

स्त्री.       हिवाळ्यातील सौम्य ऊन; उन्हाची तिरीप; प्रातःकाळचे कोवळ ऊन. पहा : ओप ४ (क्रि घेणे, बसणे.) (वा.) ओपळीस बसणे- प्रातःकाळचे कोवळ ऊन खायला बसणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पुळपुळीत, पुळपुळा

वि. १ बेचव; निःसत्व; पचपचीत (खाद्य). २ सौम्य; नीरस; कंटाळवाणें; मिळमिळीत आवेश नस लेलें (भाषण). ३ इष्ट कार्य घडवून आणीलच अशी खात्री ज्यांत नाहीं अशी; मुळमुळीत (वागणूक; युक्ति; माणूस इ॰). ४ भित्रा; नेभळट; कर्तुत्वशून्य; नपुंसक; निःसत्व. 'नाहींतर हल्लींचीं मुलें पुळपुळींत.' -विवि ८.१.८. [पुळपुळ]

दाते शब्दकोश

फांट

पु. कढत पाण्यांत औषधें घालून ठेवून निवाल्या- वर त्यांचा गाळून घेतलेला सौम्य काढा.

दाते शब्दकोश

राजस सी

वि. १ (काव्य) सुकुमार व देखणा; सुरेख; सुंदर. 'हे राजस बाळे । किती करशील चाळे ।' 'परमसकुमार राजसी ।' २ शृंगारिक नायक. [राजा + सा] राजसवाणा-वि. राजस; सुंदर; सुकुमार आणि देखणा. ॰राजसी-वि. राजकीय थाटाचें; बादशाही; उमदा; भव्य; खासा; नामी (मनुष्य, कृत्य, वस्तु). [राजस; राजा + सा] राजसी उपचार-पु. रोग घाल- विण्याचा राजस (मृदु, सौम्य, सुखावह) उपचार.

दाते शब्दकोश

रेशीम

न. तुतीच्या किंवा एरंडाच्या पानांवर उपजीविका करणाऱ्या एका जातीच्या किड्यापासून निघणारा वस्त्रें इ॰ कर- ण्याच्या उपयोगी असा धागा, दोरा, कृमिज तंतू. [फा. रेशम्- अब्रीशम्] ॰भरणें-न. १ कापडावर रेशमानें नक्षी काढणें. २ (चांभारी) तजास रेशीम शिवणें. रेशमाची आरी-स्त्री. (चांभारी) रेशीम भरण्याचें हत्यार. रेशमाची गांठ, रेशी- (षि)मगांठ-स्त्री, (पतिपत्नी, जीवात्मा व देह इ॰ मधील) कधींहि नष्ट न होणारा संबंध; जन्माची गांठ. २ सुखकर बंधन. 'जगन्निवासा कां अंतरलों रेषिम गांठिला ।' -एपो ४१०. रेश- माचा किडा-पु. ज्या किड्यांपासून रेशीम मिळतें तो किडा. यांनां एकंदर चार अवस्थांतून जावें लागतें (१) अंडें. (२) अळी. (३) कोश व (४) पतंग. अळीची पूर्ण वाढ झाली म्हणजे तो किडा स्वत:ला आपल्या तोंडांतून धागा काढून गुर- फटवन टाकतो. हा धागा म्हणजेच रेशीम. रेशमी-वि. रेशमाचें. २ (ल.) रेशमासारखें मऊ; खरखरीत नव्हे असा. ३ रेशमासारखा; सौम्य; गरीब. रेशमी कांठी, रेशीम काठी- वि. कांठांस रेशीम घातलेलें; रेशमाचे कांठं असलेलें. रेशमी गज-पु. जमीन मापण्याचा गज. ह्यांची लांबी १८ तसू होती. रुमाली गज पहा. ॰जोडा-पु. रेशमाचे कांठ असलेली धोतर जोडी. ॰नारिंग-न. नारिंगाची एक जात. याची साल फार पातळ असते. ॰मुसलमान-पु. मुसलमान योध्यांची एक जात. ह्यांना दंडाला रेशमी गंडा बांधून शत्रूवर सोडेलि जात. ॰संत्रा- पु. संत्र्याची एक जात. या जातीचे फळ कौला संत्र्यासारखें असतें. फळ अति लहान असून त्यांत रस कमी व बिया पुष्कळ असतात. याचा तेल काढण्याशिवाय दुसरा उपयोग होत नाहीं -उद्यम, मार्च १९३६. रेशमीदाल्-सूत्रतंतु; रेशमाचे तंतु; रेशमी धागे.

दाते शब्दकोश

साबळा

वि. १ साधा; सौम्य; शांत; धीमा. साबडा पहा. २ गरीब; भोळा. 'कसें करिल लेंकरूं निपट हें पहा सावळें ।' -केका ७०. [साबडा] ॰भाबळा-साबडा- भावडा पहा.

दाते शब्दकोश

साळढाळ

वि. १ साधा; सरळ; निगर्वी; मनमिळाऊ. २ प्रांजळ; मोकळा; खुल्या दिलाचा. 'सगळ्या आपल्या सरळ न साळढाळ.' -खरादे ३८. ३ सौम्य प्रकृतीचा; विचारी. ४ कपट, कारस्थान न करणारा; सालस. ५ दुसर्‍याच्या दोषांकडे दुर्लक्ष करणारा; उदार मनाचा. 'या बरोबरच बारिकसारिक मतभेदाचें कांहीं कानेकोपरे असले तर त्यांकडे कानाडोळा करण्याला मनाची जी एक साळढाळ वृत्ति असावी लागते तीही त्यांजपाशीं मोठीच आहे.' -अस्पृ ३. ६ वरील वृत्तीच्या माणसाच्या वर्तन-व्यव- हार-भाषण इ॰ ला लावतात. [सढळ ? धवल-ढाळ द्वि.]

दाते शब्दकोश

सात्त्विक-सात्त्विक

पु. सात्विकभाव. एकभाव, किंवा मनाची अवस्था (काव्यनाटकांतील). ही स्थायी आणि व्यभि- चारी या भावांमधील असून हिच्या ठिकाणीं सहज, अकृत्रिम, सत्य अशा भावना व्यक्त असतात. स्वेद, स्तंभ, रोमांच, स्वरभंग, वेपथु (कंप), वैवर्ण्य, अश्रु आणि प्रलय हे अष्ट- सात्त्विकभाव आहेत. 'आपुलेनि शिहाणपणें । आंगींचे सात्वीकु लपओ जाणें ।' -शिशु १८९. [सं.] -वि. (शुद्ध रूप सात्त्विक.) १ सत्य; पवित्र; प्रामाणिक; उत्कृष्ट; सत्त्वगुणांनीं युक्त. 'म्हणोनि उपनिषदादि समस्त । सात्त्विक ते ।' -ज्ञा २.२५६. २ सौम्य; हितकार; रोगनिवारक (औषध, पथ्य, इ॰). ३ अर्थ- युक्त; भरींव; ससत्त्व. ४ उत्साह, चैतन्य, बल, तेज इ॰ गुण असलेला. ५ सत्; सत्य; अस्तित्व असलेला; वास्तवपूर्ण. ॰चांडाळ-पु. सौभ्य वृत्तीचा चांडाल. ॰प्रेम-न. खरें, शुद्ध प्रेम. 'निराशेंत सात्त्विक प्रेम करुणवृत्तीचें रूप घेतें.' -एक १०७. ॰भाव-पु. सुखादि भावानें भावित होणार्‍या अंतःकरणापासून उत्पन्न होणारें भाव. हे आठ आहेत. सात्त्विक पहा. 'म्हणोनि सात्त्विक भावांची मांदी । कृष्णा आंगीं अर्जुना- आधीं ।' -ज्ञा ८.५६.

दाते शब्दकोश

सात्वती

स्त्री. नाटकाच्या चार मोठ्या प्रकारांपैकीं एक. यांत सौम्य व सात्त्विक भावना दिग्दर्शित केलेल्या असतात [सं.]

दाते शब्दकोश

सौम्योपचार

सौम्योपचार saumyōpacāra m (S सौम्य & उपचार) A mild or gentle remedy or measure in general. See उपचार, सप्तोपचार, षोडशोपचार.

मोल्सवर्थ शब्दकोश

सदगरम

वि. (ना.) (प्र) सरदगरम; समशीतोष्ण; सौम्य; कोंबट. [सर्द + गरम]

दाते शब्दकोश

सद्गृहस्थ

पु. प्रतिष्ठित, मला, प्रामाणिक, विश्वासु, सन्मान्य, सद्वर्तनी, प्रेमळ, सौम्य मनुष्य. [सं. सत् + गृहस्थ]

दाते शब्दकोश

शेव

क्रिवि. १ उभ्या लंबरेषेंत; सरळ खालीं (क्रि॰ चालणें,) धरणें. याच्या उलट करळ. २ (व.) हलकेच, सौम्य- पणें. -वि. (वि) ठेंगणें.

दाते शब्दकोश

शिबें

न. १ एक सौम्य कुष्टरोग; त्वचारोग. ३ याचे डाग, ठिपके इ॰.

दाते शब्दकोश

शितळ, शीतळ

वि. शीतळ पहा. १ थंडच गार. २ सौम्य; सुलभ; सोपा; खर नव्हे असा (उतार वगैरे) [सं. शीतल] ॰चंद-पु. मद्दड; मठ्ठ; रेंगाळणारा; सुस्त मनुष्य. ॰शिमगा-पु. १ शिमगी पौर्णीमेच्या पुढील दिवस; धुळवडीचा दिवस; होळी थंड करण्याचा दिवस. २ शिमग्यामध्यें (वसंत- पंचमीस) गांठ्या, बसंती रंगाचीं आंगडींटोपडीं मुलांस द्यावयाचा सण. शितळाई-स्त्री. १ थंडपणा; थंडावा. २ शितळता; थंडाई. [सं. शीतळ]

दाते शब्दकोश

स्निग्ध

वि. १ तेलकट. चरबीयुक्त; तुपट; ओशट. २ चिक- टणारा; तुळतुळीत. ३ मृदुत्व, मऊपणा आणणारें (औषध). ४ सौम्य; प्रेमयक्त; स्नेहाळ. [सं.]

दाते शब्दकोश

संत

वि. स्थिर; शांत; सौम्य; गंभीर; मृदु; नरम. 'तें असंतचि असिजे जगें । मानिजे संत ।' -ज्ञा १५.१३३. 'तसेंच संत वायूंतल्यापेक्षां वाहत्या वायूंत पाणी जलद सुकतें ।' -मराठी सहावें पुस्तक पृ. १६०. [सं. शांत]

दाते शब्दकोश

संवत्सर

पु. साठ वर्षांच्या कालचक्रांतील वर्षास संज्ञा. या साठ वर्षांचीं नांवें:-प्रभव, विभव, शुल्क, प्रमोद, प्रजापति, अंगिरा, श्रीमुख, भाव, युवा, धाता, ईश्वर, बहुधान्य, प्रमाथी, विक्रम, वृष, चित्रभानु, सुभानु, तारण, पार्थिव, अव्यय, सर्वजित्, सर्व- धारी, विरोधी, विकृति, खर, नंदन, विजय, जय, मन्मथ, दुर्मुख, हेमलंबी, विलंबी, विकारी, शार्वरी, प्लव, शुभकृत्, शोभन, क्रोधी, विश्वावसु, पराभव, प्लवंग, किलक, सौम्य, साधारण, विरोधकृत्, परिधावी, प्रमादी, आनंद, राक्षस, नल, पिंगल, काळयुक्त, सिद्धार्थी, रौद्र, दुर्मति, दुंदुभि, रुधिरोव्दारी, रक्ताक्षी, क्रोधन, क्षय. २ वर्ष; साल; अब्द; विक्रमाचा शक. [सं.] ॰प्रति- पदा-स्त्री. वर्षप्रतिपदा; चैत्र शुद्ध प्रतिपदा; वर्षारंभाचा दिवस; पाडवा. ॰वृद्धि-स्त्री. वर्षावृद्धि पहा.

दाते शब्दकोश

संवत्सर saṃvatsara m (S) A common term for the sixty years composing the Indian cycle, each bearing a peculiar name. These names never occurring but with the indicant word संवत्सर prefixed (e. g. संवत्सरप्रभव) cannot come before the learner as ordinary words bearing signification and demanding to be interpreted: they therefore do not appear in the columns, but are presented together here:--प्रभव, चित्रभानु, हेमलंब, परिधावी, विभव, सुभानु, विलंब, प्रमादी, शुक्ल, तारण, विकारी, आनंद, प्रमोद, पार्थिव, शार्वरी, राक्षस, प्रजापति, अव्यय, प्लव, नल, अंगिर, सर्वजित्, शुभकृत्, पिंगल, श्रीमुख, सर्वधारी, शोभन, कालयुक्त, भाव, विरोधी, क्रोधी, सिद्धार्थ, युव, विकृति, विश्वावसु, रौद्र, धातृ, खर, पराभव, दुर्मति, ईश्वर, नंदन, प्लवंग, दुंदुभि, बहुधान्य, विजय, किलक, रुधिरोद्गारी, प्रमाथी, जय, सौम्य, रक्ताक्ष, विक्रम, मन्मथ, साधारण, क्रोधन, वृष, दुर्मुख, विरोधकृत्, क्षय. 2 A year in general; yet, especially, of the era of Wikramáditya. मनुसंख्यासंवत्सर Years numbered by the (duration of the) Manu; as मनुसंख्यासंवत्सर ॥ राज्य करील माझा पुत्र ॥.

मोल्सवर्थ शब्दकोश

सोम

पु. १ चंद्र. २ सोमवल्ली; तिचा रस. ३ धुपणी रोग. ४ सोमचाग; (यांच सोमरसपान होतें त्यावरून) ५ शंकराचें एक नांव. ६ (ल.) अमृत. ७ -वि. चुकीनें (सौम्य पासून) थंड. [सं.] ॰कांत-पु. चंद्रकांत मणी. सोमकांती-वि. सोमकांत मण्याचा केलेला (आरसा इ॰). ॰दिन-वार-वासर-पु. चंद्राचा वार; रविवारच्या पुढील दिवस. ॰नाथ-पु. बारा ज्योति- लिंगापैकी काठेवाडांतील एक शंकराचें लिंग. ॰प-वि. सोमरस पिणारा (यज्ञकर्ता, देव इ॰). ॰याग-पु. यज्ञ; सोम अर्थ ४ पहा. ॰याजी-पु. सोमयाग करणारा दीक्षित. ॰रोग-पु. सोम अर्थ ३ पहा. ॰लता-स्त्री. सोमवल्ली. ॰वती-वि. सोमवारी आलेली (अमावस्या); बायकांचें एक व्रत, यांत १०८ फळें ब्राह्मणास देतात, (यावरून). ॰वती घालणें-पुष्कळ संख्या असणें ॰वल्ली-वेल-स्त्री. १ सोम अर्थ २ पहा. २ (विनोदानें) भांगेचें झाड व भांगेचें पेय. ॰वंश-पु. चंद्रापासून निघालेला एक क्षत्रिय वंश. ॰वार्‍या तेली-पु. शंकरभक्त तेल्यांचा एक वर्ग. हे सोमवारीं घाणा चालवीत नाहींत. ॰सिद्धांत-पु. शैवांतील एक पंथ व त्याचें तत्त्वज्ञान. ॰सूत्र-न. शिवाचें तीर्थ गाभार्‍या- बाहेरील ज्या कुंडांत पडतें तें कुंड; गायमुख. ॰सूत्री प्रदक्षिणा- स्त्री. शंकराला प्रदक्षिणा घालतांना वरील कुंडापर्यंत घेऊन परता- वयाचें व उलट दिशेंनें जाऊन पुन्हां या कुंडापर्यंत यावयाचें व परत शंकरासमोर यावयाचें अशा प्रकारें कुंड न ओलांडता केलेली प्रदक्षिणा.

दाते शब्दकोश

टिक्षा      

पु.       शेंडा; शेंड्याची पाने : ‘माडांच्या आणि सायांच्या टिक्षांवरच काय ती समुद्रांत डुबणाऱ्यां सूर्याची सौम्य दृष्टि किंचित स्थिर झाली आहे.’ – काभिं ५३.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तिरीम

न. दुष्टीमांद्य. -पु. सौम्य प्रकाश.

दाते शब्दकोश

तुरूप

स्त्री. सौम्य व कोमल (सकाळचें किंवा संध्याकाळचें) ऊन. तिरीप पहा.

दाते शब्दकोश

थीर

वि. १ (काव्य) शांत; स्तब्ध; सौम्य; निवांत, गंभीर (मनुष्य, वारा, समुद्र, पाणी). 'सोहं दुडी वाहोनी चाले थीर ।' -ब २९४. २ शांत झालेली (साथ, भांडण). स्थिर पहा. [सं. स्थिर] ॰थीर-क्रिवि. हळू हळू. 'रामरथ गजभारीं । थीर थीर मिरवे ।' -वेसीस्व ७.८०. ॰थावर-नस्त्री. कायमपणा; स्थिरता; स्तब्धता. -वि. स्थिर; निश्चित; कायम; विश्रान्ति असलेला. [स्थिर + स्थावर]

दाते शब्दकोश

थंड

वि. १ गार; शीत. २ दाहशामक (औषध, जेवणांत पदार्थ). ३ (ल.) सुस्त; धीमा; मंद; सावकाशीचा; आळशी; सौम्य; समप्रकृतीचा. ४ शांत; स्वस्थ (देश, वस्तु स्थिति). ५ शांत झालेले; स्थिर (डोळे, मन इ॰). ६ कमजोर (ताप); ढिलें (काम). ७ भूतखेत इ॰ उपद्रवरहित (घर, जागा). ८ (ल.) नपुंसक (मनुष्य). [सं. स्तब्ध; प्रा. थड्ड] (वाप्र.) ॰करणें- १ विसर्जन करणें. २ ताबूत वगैरे नदींत बुडविणें. ॰पाणी ओतणें-(ल.) एखादें कार्य बंद पडणें. एखाद्याचा उत्साह भंग करणें. [हिं.] ॰होणें-पडणें-पावणें-मरणें. 'उत्तम लोकासि तुझा सेवक होऊनि थंड पावेल ।' -मोअनु ८.४१. थंडक-न. दाहशामक औषध किंवा उपाय. [हिं.] सामाशब्द- थंडगार- वि. १ अति शीतल (वारा, हवा, पाणी, वस्तु); गार. २ स्थिर; शांत. ३ संतोषी; समाधानी (हृदय, आत्मा). ४ मेल्यामुळें थंड झालेला, गारठलेला. [थंड + गार] ॰वेळ-स्त्री. १ सकाळ, संध्या- काळचा समय. २ (ल.) स्थिर व शांत वेळ (स्वतःचा प्रकृ- तीची वगैरे). थंडा-वि. थंड (अर्थ २ ते ८) पहा. [हिं.] थंडाई-स्त्री. १ शीतलता. २ (ल.) तापहारकता; दाहहारक गुण (औषधांचा). २ सालसपणा; सौम्यता; मंदी; सुस्तता; औदासिन्य; दुर्लक्ष्य. ४ उपशम; शांति; उतार. ५ थंड औषध. ६ कुसुंबा. ७ बदाम, गुलाबकळी, खसखस, काकडीच्या बिया व संवयीप्रमाणें भांग वगैरे एकत्र वाटून दूध साखर घालून केलेलें एक पेय. थंडाफराळ-पु. केवळ थंड पाणी पिऊन, हवा खाऊन राहणें (थंड उपहार). थंडाय-(गो.) ओलावा; गारठा. थंडा- वचें-(गो.) थंड करणें; समाधान करणें. थंडावचें लिखित-न. शांततेचा तह. थंडावणें-अक्रि. १ थंड, शांत होणें (मनुष्य, विकार, इच्छा, प्रकृति इ॰). २ दमट होणें; सरदून ताठरपणा नाहींसा होणें (कागद, कापड यांचा). थंडावा-पु. (उन्हानं- तरचा) हवेचा थंडपणा; सुख; आराम; स्वस्थता; सुटका (दुःख अथवा क्षोभ यानंतर). उतार; उपशम; प्रशभ. [हिं.] थंडेथंडे- क्रिवि. १ सवकाश; हलकें हळकें; ढिलाईनें. २ थंडवेळीं (रात्रीच्या, सकाळच्या वगैरे वेळीं प्रवास करणें). [थंड] थंडोसा-पु. थंडावा पहा. [थंड] थंड्यापोटानें-क्रिवि, शांतपणानें; रागांत नसतांना. थंडी-स्त्री. १ थंडपणा; गारठा (हवेचा, पदार्थांचा); सर्दी. 'खंडी बळ बहु कांपवि, पडसी जाणों सदुःसहा थंडी ।' -मोकर्ण ३३.२. २ थंडीची भावना. (क्रि॰ भरणें; वाजणें). ३ तापहारकता (औषधांची अथवा पदार्थाची). ४ उपशम, उतार (रोगाचा); त्या पासून होणारें सुख, स्वस्थता. [हिं.] ॰कातरा- पु. थंडीनें होणारा त्वग्निकार. थंडीचा ताठा-पु. कडकडीत गारठा (हवेचा). थंडीचें पिळूं(लूं)-न. थोडा वेळ पडलेली किंवा साधारण बेताची थंडी. थंडीवार्‍याचा-क्रिवि. थंड व सर्द वारा वहात असतांना; गारठा पडला असतांना. 'तुला ताप येतो थंडीवार्‍याचा बाहेर हिंडू नको.' [थंडी + वारा]

दाते शब्दकोश

ऊदिल अल्कहल

न. (रसा.) (इं.) बेंझिल अल्कोहोल. हा जाई, मोगरा इ॰च्या अत्तरांत सांपडतो. यास सौम्य सुगंध येतो. भानिल कर्बिनल (फेनिल कर्बिनोल).

दाते शब्दकोश

ऊदिल अल्कहल      

न.       (रसा.) हा जाई, मोगरा इत्यादींच्या अत्तरात सापडतो. याला सौम्य सुगंध येतो. भानिल कर्बिनल.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तरुणी (वर्णन )

निरभ्र गात्रें, सर्व जेथल्या तेथें व प्रमाणबद्ध गव्हाळ गोरी, नितंबिनी, सुमध्यमा, तिचें ढोबळ सौंदर्यही मन वेधी, सिंहकटी व गजगामिनी, कमनीय देहयष्टि, सुडौल बांधा, सुंदर तनुयष्टि, गोंडस अंगलट, घट्ट बांधा, ही गोड लांच, बेफाम रूप, हें प्रीतीचें तारूं, नक्षत्रा- सारखी मुलगी, असीम रूपसंपदा, हें मखमली सुख, लावण्यमदिरा , नजरांची खंडणी घेत जाणारी, प्रेक्षकांच्या मनांत प्रीतीचीं चोर-पावलें उमटवी, हिचें दर्शन हे दुःखावर उताराच, प्रफुलयौवना, तिच्या तनुलतेला यौवनसुलभ भर आला होता, तारुण्याच्या उंबरठ्यावर पदार्पण करणारी. बांधेसूद हात, भुजलतांची गोलाई व नितळपणा, हंसरे डोळे, चांफेकळी- सार खें नाक, गाेड वाटाेळा चेहरा, केसांच्या दोन सैलसर वेण्या, सुरळीत मुलगी, सुवाच्य चेहरा, आरशासारखें मन चित्तांत उबदार स्वप्नें, हृदय-सिंहासनाचा मानकरी शोधणारी, विनयाचें हृद्य झिरझिरीत वस्त्र ल्यालेली, लाजेनें चूर, बुजरी नजर, लाजरी बुजरी शांत व सौम्य, नयनांतला लोभसवाणा भाव, देहवीणा हेलकावीत नेत्रांचे शरसंधान करीत निघे, स्मिताची चिथावणी देई.

शब्दकौमुदी

हिंव

न. १ थंडी; वस्तु, हवा यांतील गारवा; गारठा. २ शिरशिरी; सर्दी. ३ हिंवताप. ४ थंडीच्या कडाक्यानें खराब झालेलें पीक. (क्रि॰ जाणें; फिरणें). [सं. हिम] ॰ज्वर-ताप-पु. थंडीचा ताप; हिमज्वर. हिंवडणें, हिवणें-अक्रि. थंडीनें कुडकुडणें; हुडहुडी भरणें; गारठणें; कांपणें. 'एकां उभयांचि प्राण गेले । चांगांचे दांत बैसले । बिरुदांचे दादुले । हिंवताती ।' -ज्ञा १.१३५. हिंवडी-स्त्री. (को.) थंडीची हुडहुडी. हिंवत हिंवत जमीन- पुस्त्री. १ हिंवाळ्यांत नांगरून पावसाळ्यापर्यंत तशीच ठेवलेली पड जमीन. 'हें नवरान हिंवताकडे टाकलें.' २ (डांगी) एकवेळ पड टाकून पहिल्या हंगामांत लागवडीस आणलेली माळजमीन. हिंव- ताची नांगरणी-स्त्री. वरील जमीनीची नांगरट. हिंवताड-न. (तिरस्कारानें) हिंवत. हिंवताळा-पु. (व.) हिंवाळा. हिंवली- स्त्री. थंडी. 'हिंवली जैसी आंगिकें । हिंवो नेदी निजांग ।' -ज्ञा १७ २२९. हिंवशी-स्त्री. (व.) थंडी. हिंवशी पटक-स्त्री. (व.) फार थकवा. हिंवश्या पाण्याच्या भाकरी खाणें-(व.) काळजी नसणें. हिंवस-स्त्री. १ (कों.) सर्द हवा. २ शीत तुषार. -वि. (व.) थंडगार. हिंवसणें-अक्रि. १ थंडीची, सर्दींची बाधा होणें. २ (ल.) निराश होणें; हिरमुसणें; म्लान-मलूल होणें; थिजणें; उत्साहहीन होणें. हिंवसा-वि. १ थंड; सर्द (पाणी हवा इ॰). २ रागीट नसलेला, सौम्य (माणूस). हिंवसाण-स्त्री. सर्द झालेल्या व बिघडलेल्या वस्तूची घाण. [हिंव + घाण] हिंवाडीहिंवडी पहा. हिंवारें-न. हिंवताप. 'जळसोस आणि हिंवारें ।' -दा ३.६.२६. हिंवांळा-ळी-पुस्त्री. थंडीचा ऋतु

दाते शब्दकोश

नव

वि. नऊ. नऊ संख्या. 'हे नवरत्नमाळा गोमटी । जो घाली सद्गुरुच्या कंठीं ।' -एभा १०.२३८. [सं. नव; गुज. नव; झें. नवन्; ग्री. एन्नेअ; लॅ. नोव्हेम्; गॉ. निउन; अँसॅ. निगन्, प्राज. निउन; अज. नेउन; प्राप्र. नेविन्त्स; स्लॅ. देवन्ति; लिथु-देव्यन्ति; हिब्र्यू; नओइ; कँब्रि-नव्] ॰कुलपांचें तारूं- न. लढाऊ गलबत. 'विलायत जंजिरा नवकुलपांचें तारूं ।' -विवि ८.३. ५४. ॰तुकड्यांची चोळी-स्त्री. नऊ तुकडे जोडून केलेली चोळी; इच्या उलट अखंड चोळी, तीन तुकड्यांची चोळी. म्ह॰ नवव्या दिवशीं नवी विद्या. सामाशब्द- ॰कोट (टी)नारायण-पु. १ कोट्याधीश; अतिशय श्रीमंत मनुष्य. 'पण हे विचारांचे नवकोटनारायण आचाराच्या बाबतींत मात्र सुदाम्यापेक्षां दरिद्री आसतात.' -प्रेम २१. २ (विपरीत लक्ष- णेनें) अतिशय दरिद्री; कंगाल मनुष्य. -शास्त्रीको. [नव + कोट नारायण] ॰कोटी कात्यायनी(येणी)-चामुंडा-स्त्रीअव. नऊ कोट देवी, कात्यायनी, चामुंडा. 'नवकोटी कात्यायेणीचा विचार । पिंडीं कोठें ।' -दा ९.५. ३१. 'पहावया श्रीकृष्णाचें लग्न । सकळ दैवतें निघालीं सांवरोन । नवकोटी चामुंडा संपूर्ण । चालती वेगें तेधवां ।' -ह २४.१०५. [नव + कोटी + कात्यायनी, चामुंडा] ॰कोण-पु. (भूमिति) नऊ कोपरे असलेली व नऊ बाजूंनीं मर्या- दित आकृति. -वि. नऊ कोन असलेली. [नव + सं. कोण] ॰खंड- खंडें-नअव. १ पृथ्वीच्या नऊ खंडांचा समुदाय. इलावृत्त, भद्राश्व, हरिवर्ष, किंपुरुष, केतुमाल, रम्यक, भरत, हिरण्मय व उत्तरकुरू हीं नवखंडें होत. दुसरेहि पाठभेद आहेत. (अ) भरत, वर्त्त?, राम?, द्रामाळा (द्रमिल, द्रामिल?), केतुमाल, हिरे (हीरक?), विधि- वस?, महि आणि सुवर्ण. (आ) इंद्र, कशेरु, ताम्र, गभस्ति, नाग, वारुण, सौम्य, ब्रह्म, भरत हे नऊ भाग. -हंको. 'नवखंडें सप्तद्वीपें । छपन्नदेशींच्या रायांचीं स्वरूपें ।' -ह २८.६४. [नव + सं. खंड = तुकडा, पृथ्वीचा भाग] ॰खंड पृथ्वी-स्त्री. जींत नऊ खंडें आहेत अशी पृथ्वी. 'नवखंड पृथ्वी व दहावें खंड काशी.' 'नवखंड पृथ्वीचें दान.' ॰खणी-वि. नऊ खणांची. 'दुखणी काय नवखणी माडी नलगे धरा नखेंदु खणी ।' -मोकृष्ण ८३.१३. 'लावण्याची सकळ संपदा सहज उभी नवखणी ।' -पला ४.३४. [नव + खण] ॰गजी-पुस्त्री. १ (नऊ गजी) नऊ गज लांबीचा सोपा. राजदरबारचा भव्य दिवाणखाना; कचेरी; सदर. 'राजा नवगजींत बैसला ।' -ऐपो १७.२ तंबू; डेरा. 'बाडें सुंदर खाबगे नवगज्या सिद्धाच होत्या घरीं ।' -सारुह ३.४५. 'तमाम येऊनु नऊ गजी आसपास येऊनु उतरीले' -इमं ७. नवगोजी पहा. [नव + गज = एक परिमाण] ॰गुणपुअव. बुद्धि, सुख, दुःख, प्रयत्न, इच्छा द्वेष, संस्कार, पुण्य व पाप असे न्यायशास्त्रांत सांगितलेले नऊ गुण. 'बुद्धि सुख दुःख प्रयत्न । इच्छा द्वेष संस्कारण । पुण्य पाप नवगुण । बोलिजेती ।' -विउ ३.४. -वि. नऊपट. ॰गुण-वि. नऊ दोर्‍यांचें (यज्ञोपवीत इ॰). नऊ फेर्‍यांचें. 'नवगुण तव कंठी ब्रह्मसूत्र प्रभा जे ।' -मुरा बालकांड ११३. [नव + सं. गुण = दोरा] ॰गोजी-पु. डेरा. शामियाना. 'उतर तर्फेसी नवगोजी देऊनु उतरिले.' -इमं ७. ॰ग्रह-पुअव. १ सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहू, व केतु हे नऊ ग्रह. २ (उप. निंदार्थी) जूट; टोळकें; टोळी; कंपू. ३ -न. मंगलकार्यारंभीं करतात ती नऊ ग्रहांची पूजा; ग्रहमख. 'दोन्हीं घरीं नवग्रहें झालीं । देवदेवकें पूजिलीं । -कालिका १६.४१. [नव + ग्रह] ॰चंडी-स्त्री. १ देवीची आराधना (विशेषतः तिच्या स्तोत्राचें, सप्तशतीचें नऊ वेळां पठण करून केलेली). 'जर मला पुत्र- प्राप्ति झाली तर देवीची नवचंडी करीन.' -रत्न १.३. २ नवरात्र; नवरात्र पहा. [नव + सं. चंडी = देवी] ॰छिद्रें-नअव. नवद्वारें पहा. ॰जणी-स्त्रीअव. १ नऊ स्त्रिया. २ (ल.) नवविधाभक्ति. 'अत्यंत शहाण्या सुवासिनी । आणिक आल्या नवजणी । कृष्णाची खुतखावणी । त्या जाणोनी वर्तती ।' -एरुस्व १६.४३ ॰ज्वर- पु. दूषित तापाचा एक अतिशय तीव्र प्रकार; हा ताप नऊ दिवसांच्या मुदतीचा व प्रायः घातुक असतो. [नव + सं. ज्वर = ताप] ॰टकें- न. शेराच्या अष्टमांशाचें, (कैली) अर्ध्या पावशेराचें माप. [नऊ + टांक] ॰टांक-न. अदपावाचें वजन. नवटकें पहा. [नव + टांक; गुज. नवटांक; गो नवटांग] ॰द्वारें-नअव. दोन डोळे, दोन कान, दोन नाकपुड्या, तोंड, गुदद्वार व मूत्रद्वार अशीं मानवी शरीराचीं नऊ द्वारें, छिद्रें. 'नवद्वारें देहीं । तो असतुचि परि नाहीं ।' -ज्ञा ५.७५. ॰नाग-पुअव. १ पुराणांतरीं वर्णिलेले अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक व कालीय ह्या नांवांचे नऊ नाग, सर्प. २ नऊ हत्ती. [नव + सं. नाग = सर्प, हत्ती] ॰नाग- सहस्त्रबळी-वि. नऊ हजार हत्तींचें बळ असलेला. [नव + सं. नाग = हत्ती + बळी = बलवान] ॰नागसहस्त्रशक्ती-स्त्री. नऊ हजार हत्तींचें बळ. 'अंगीं जियेस नवनागषस्त्रशक्ति ।' -आपू ३९ [नव + सं. नाग = हत्ती + सं. सहस्त्र = हजार + सं. शक्ति = बळ] ॰नागोर्‍या-पु. (ना.) चेंडूलगोर्‍यांचा खेळ. ॰नाथ-पुअव. मच्छिंद्र, गोरक्ष, जालिंदर, कानीफा, चरपटी, नागेश, भरत, रेवण व गीहिनी हे नवनारायणाचे अवतार मानतात. प्रकाश, विमर्श, आनंद, ज्ञान, सत्यानंद, पूर्णानंद, स्वभावानंद, प्रतिभावानंद, व सुभगानंद असहि पाठभेद आहे. -नव १.३९. ते ४३. -ज्ञाको (न) ३७ ॰नारायण-कवि, हरि, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पला- यन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस, व करभाजन. -नव १.२९ ते ३०. ॰नारीकुंजर-पु. नऊ स्त्रियांनीं आपल्या शरीरन्स निरनिराळ्या प्रकारें पीळ व मुरड देऊन (कृष्णाच्या पुयोगसाठीं) बनवि- लेली हत्तीची आकृती. [नव + सं. नारी = स्त्री + सं. कुंजर = हत्ती] ॰निधि-धी-पुअव. कुबेराचे नऊ खजिने. त्याचीं नावें:-महा- पद्म, पद्म, शंख, मकर, कच्छप, मुकुंद, कुंद, नील, आणि खर्व. 'मोल तुमचिया या श्रीचरणरजाचे न होय निधिनवही ।' -मोमंभा १.११२. [नव + सं. निधी = खजिना, सांठा] ॰महाद्वारे-नअव. नवद्वारें पहा. ॰महारोग-पुअव. राजयक्ष्मा, कुष्ट, रक्तपिती, उन्माद, श्वास, मधुमेह, भगंदर, उदर व मुतखडा हे नऊ दुर्धर व भयंकर रोग. [नव + सं. महायोग = मोठा, भयंकर रोग] ॰रंगी-वि. नऊ रंगांनी युक्त (पदार्थ.) ॰रत्नराजमृगांक-पु. (वैद्यक) एक औषधीं रसायन. [नव + रत्न + राजन् + मृग = हरिण + अंक = चिन्ह] ॰रत्नें-नअव. हिरा, माणिक, मोतीं, गोमेद, इंद्रनील, पाच, प्रवाळ, पुष्कराज, वैडूर्य किंवा तोर्लल्ली हिं नऊ प्रकारचीं रत्नें 'नवरत्नांची आंगठी.' ॰रत्नांचा हार-पु. स्त्रियांचा गळ्यांत घालण्याचा एक बहुमोल हार. ॰रस-पुअव. (साहित्य) साहित्य- शास्त्रांत वर्णिलेले शृंगार, विर, करूण, अद्भुत, हास्य, भया- नक, बीभत्स, रौद्र आणि शांत या नांवांचें नऊ रस. जी दैविकीं उदार वाचा । जैं उद्देशु दे नाभिकाराचा । तैं नवरससुधाब्धीचा । थावो लाभे ।' -ज्ञा १०.७. ज्ञाता जो सरसावला, नवरसां-माझिरि शृंगारसा ।' -रा ५ [नव + सं. रस] ॰रसिका-वि. चलाख; त्र- तरीत; आवेशयुक्त; नऊ रसांनीं भरलेलें, पूर्ण (गान, कवन, कथा, वर्णन, ग्रंथ, श्लोक, गवई, कवि, वक्ता इ॰). [नवरस] ॰रात्र-न. १ (सामा.) नऊ अहोरात्रांचा समुदाय. २ (विशेशार्थाणें) चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंतचा काल (रामाचें नवरात्र); तसेंच अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंतचा नऊ दिवसांचा काल. (देवीचें नव- रात्र) यास प्रतिपदेपासून चंपाषष्ठीपर्यंत सहा दिवस खंडोबाचें नवरात्र असतें. ३ वरील कालांत करतात तो देवाचा, देवीचा उत्सव, पूजा. [नव + सं. रात्रि = रात्र] ॰लख-वि. (काव्य) नऊ लक्ष. 'आकाशांत नवलख तारे आहेत.' [नव + लक्ष = शंभर हजार] ॰लक्षणें-नअव. आचार, विनय, विद्या, प्रतिष्ठा, तीर्थदर्शन, निष्ठा वेदपठन, तपस्या व दान हिं ब्रह्मणाचीं नऊ लक्षणें. -शर. ॰लाखा-ख्या-वि. ज्याच्याजवळ नऊ लक्ष रुपये आहेत असा; लक्षाधीश; अतिशय श्रीमंत. 'अपुल्या पुम्ही घरचें नवलाखे मिजाजी ।' -प्रला १७५ [नव + लाख = शंभर हजार] ॰विध- वि. नऊ प्रकारचें. [वन + सं. विधा = प्रकार, भेद] ॰विधभजन- न. नवविधा भक्ति पहा. 'नवविधभजन घडो । तुझिये स्वरूपें प्रीति जडो ।' ॰विध रत्नें-नअव. नवरत्ने पाह. ॰विधा भक्ति-स्त्री. श्रवण = ईश्वराचें गुणवर्णन, चरित्रें इ॰ ऐकणें; कीर्तन = ईश्वराचें चरित्र वर्णन करणें, वाचणें; स्मरण = ईश्वराचे गुण, चरित्र इ॰ आठवणें; पादसेवन = ईश्वराचे पाय धुणें, चेपणें इ॰ सेवा; अर्चन = पूजा करणें; वंदन = नमस्कार करणें; दास्य = चाकरी करणें; सख्य = ईश्वराशीं सलगी करणें; आत्मनिवेदन = ममत्व सोडून ईश्वरास सर्वस्व, स्वतःला अर्पण करणें. या नऊ प्रकारानीं करावयाची ईश्वराची भक्ति, सेवा. 'श्रवण कीर्तन स्मरण । पाद- सेवन अर्चन वंदन । दास्य सख्य आत्मनिवेदन । हे भक्ति नव- विधा पै ।' -विपू ५.२३. -दा १.१. ३. [सं. नवविधा = नऊ प्रकारची + भक्ति = सेवा] ॰सर-वि. नऊ सरांचा (हार इ॰). नव + सर] ॰सुती-स्त्री. जानवें करण्यासाठीं नऊ पदरी वळून केलेला दोरा. [नव + सुत = दोरा] ॰नवांकित-वि. पुठ्ठ्यावर नवाच्या आंकड्यानें चिन्हित (घोडा). [नव + सं. अंकित = चिन्हानें युक्त] नवास्त्र-वि. नवकोण पहा. [नव + सं. अस्त्र = कोण, कोपरा]

दाते शब्दकोश

गुलाब

पु. १ एक फुलझाड. हें सरळ वाढतें. याचीं पानें सुंदर असून झाडाच्या सर्वांगांस कांटे असतात. फुलाचा रंग तांबडा, गुलाबी, पिंवळा, पांढरा असतो. फुलांपासून अत्तर काढतात व गुलकंद तयार. २ त्यांचे फूल. ३ गुलाबपाणी व अत्तर. ' गुलाबशिसे उत्तमसे तीन चार पाठविलेत तर बरें होतें.' -ब्रच २५३. [फा.गुल् = फुल + आब = पाणी; हिं. गुलाब = गुलाबाचें फूल] ॰कंद-पु. गुलकंद. 'गुलाबकंद वजन पक्के एक शेर पाठविला तो घेणें.' -ब्रच १२९. ॰कळी-स्त्री. गुलाबाची कळी; ही औषधी असते. ॰चक्री-छकडी-स्त्री. साखरेच्या पाकांतील गुलाबाची मिठाई. ॰छकडी-स्त्री. १ चटकचांदणी स्त्री; एक प्रकारचें गाणें. ॰छडी-पु. खडीसाखरेची कांडी. ॰जांब-जामून-पुन. मैद्यामध्ये तूप व खवा मिसळून तुपांत तळून आणि नंतर जिलबीसारखी पाकांत मुरत टाकून केलेली मिठाई. -गृशि १.४३६. [फा. गुलाबजामन् = एक फळ] ॰दान-दाणी-नस्त्री. गुलाबपाणी ठेवण्याची व तें शिंपड- ण्याची झारी, [फा. गुलाब्दान्] गुलाबदान- पु. द्राक्षाची (पांढर्‍या रंगाच्या) एक जात. -कृषि ५१२. ॰पाणी-न. गुलाबाच्या फुलापासून तयार केलेलें सुंगधी पाणी. 'हें पानसुपा- रीच्या वेळीं अंगावर शिंपडतात. ॰पाश-पु. गुलाबदाणी. [फा.] ॰शकर-स्त्री. गुलाबपाक. 'गुलाब-शकरीच्या वड्या सुमार पन्नास पाठविल्या त्या पावल्या.' -ख १२.६६३६. ॰शेवतें- न. (गो.) सोन्याचें गुलाबाचें फूल; एक दागिना. गुलाबचें फूल-न. १ गुलाब. २ गुलजार. ३ (ल.) नाजूक स्त्री, मूल. 'बाईसाहेब, हें ऊन फार कडक आहे बरें ...आपण आपलें हें गुलाबाचें फूल घरांत नेऊन जपून ठेवा.' -त्राटिका. गुलाबी- -स्त्री. १ (कोल्हाटी, डोंबारी) दोरावर काम करणारी मुलगी, हिला लाडकें नांव. २ एक लहान झुडुप. -वि गुलाबविषयक; गुलाबाचा (रंग, वास, अत्तर). ॰अत्तर-न. गुलाबाच्या फुलांपासून काढलेलें अत्तर. ॰चंदन-न. गुलाबासारख्या वासाचें चंदन; चंदनाची एक जात. ॰जांब-जाम-पु. एक फळ; राय- जांभूळ. [फा. गुलाब्-जामन्] ॰झोंप-स्त्री. पहांटेची, थंड वेळेची झोंप. ॰थंडी-स्त्री. सौम्य प्रकारची, सुखावह थंड हवा (ही गुलाबांना हितावह असते असें म्हणतात); पहांटेची थंडी.

दाते शब्दकोश

रांड

स्त्री. १ (निंदार्थी) विधवा. २ दासी; कलावंतीण; वेश्या. ३ (तिरस्कार, राग किंवा अनाथ स्थिति दाखवावयाची असतां) स्त्रीजात; बायको. 'तुझी रांड रंडकी झाली.' -नामना १२. ४ (निरुद्योगीपणा, नवरा मेलेल्या स्त्रीच्या स्थिती- प्रमाणें) बिघडलेली, अतिशय खलावलेली स्थिति; दुर्दशा. 'यंदा शोतों चांगलीं आलीं होती पण आंत पाणी शिरून अवधी रांड झाली.' ५ (निंदेनें) भित्रा, नीच, नामर्द मनुष्य; युद्धांतून पळून जाणारा सौनिक. 'म्यां न वधावें पळतां चाला मारूनि काय रांडा या ।' -मोकर्ण ३५.६०.[सं. रंडा] म्ह॰ रांडेच्या लग्नाला छत्तीस विघ्नें. (वाप्र.) रांडेवा-वि. १ बेकायदेशीर संबंधापासून झालेला. २ (ग्राम्य.) पादपूरणार्थक किंवा उद्गारवाचक शब्द. ३ एक ग्राम्य शिवी. रांडेचा, रांडचा मारलेला-वि. स्त्रीवश; स्त्रीलंपट रांडे(डि)च्यानो-उद्गा॰ (बायकी) रखेली पासून झालेल्या मुलांना उद्देशून बोललेल्या शब्दावरून पुष्कळदा आश्वर्य व्यक्त करण्याकरितां पण क्वचित् निर्थकपणें निघणारा उद्गार. रांडवोचून पाणी पीत नाहीं-आपल्या बायकोला एखादा कठोर शब्द बोलल्यावांचून तो पाण्याचा थेंब सुद्धां पीत नाहीं (सतत शिव्या देणार्‍या नवर्‍यासंबंधीं म्हणतात). रांडेहून रांड- वि. बुळा; अतिशय बायक्या (मनुष्य). सामाशब्द- ॰अंमल-पु. १ स्त्रीराज्य. २ नेभळा, अयशस्वी कारभार. ॰काम-न. १ बायकोचें काम; गृहकृत्य. २ विधवेचें काम; बाहेरील आडकाम किंवा रानांतील गवत कापणें व सर्पण गोळा करणें इ॰ काम. ॰कार- भार-पु. १ बायकी कारभार. २ स्त्रियांचा कारभार; स्त्रियांचीं कृत्यें. ३ (निंदेनें) भिकार, मूर्खपणाचीं कृत्यें; दुबळीं कृत्यें. ॰खळी-वि. (गो.) विधवा झालेली. खांड-स्त्री. स्त्रियांस लाववयाचा रांड, बाजारबसवी, बटीक इ॰ अर्थाचा अभद्र शब्द, शिवी. 'मी त्याची कांहीं गोष्ट बोलिलें नसतां उगीच मेला मला रांडखांड म्हणतो.' [रांड द्धि.] ॰गळा-पु. १ टिपेचा सूर; तृतीय सवन. २ बायकी आवाज. [रांड] ॰गांठ-स्त्री. विशिष्ट आका- राची गांठ; ढिली गांठ. बाईलगांठ पहा. याच्या उलट पुरुषगांठ. ॰गाणें-गार्‍हाणें-न. पिरपिर; बायकी कुरकूर; बायकी विनंति; रडगाणें. (क्रि॰ गाणे; सांगणें). रांडगो-पु. (गो.) वेश्येचा मुलगा, किंवा विधवेस अनीतीच्या मार्गानें झालेला मुलगा. ॰चाल-स्त्री. भित्रेपणा; नामर्दपणा; बायकीपणा. ॰छंद-पु. रंडीबाजीचा नाद; रांडेचें व्यसन. ॰छंदी-वि. रंडीबाजीची संवय लागलेला; रांडगा. ॰तगादा-पु. (कुण.) (सार्‍याच्या किंवा कर्जाच्या) पैशाची (पिठ्या शिपायानें नव्हे) कुळाकडे सौम्य रीतीनें केलेली मागणी. ह्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यास आपणास मुखत्यारी आहे असें कुणबी मानतो. बडग्याच्या विनंतीशिवाय दुसर्‍या कोणत्याहि विनंतीस दाद न देण्याबद्दल हा वर्ग कित्येक पिढ्या प्रसिद्ध आहे. कुणबी पहा. ॰पण-न. १ (कों.) वैधव्य. २ नाश; नादानपणा. 'कां घेतां रांडपण ठरून भाऊ नाना ।' -ऐपो ११६. ॰पाटा-पु. वैधव्य. (क्रि॰ भोगणें; येणें; मिळणें; प्राप्त होणें; कपाळीं येणें). [रांड + पट्ट] ॰पिसा-वि. रांडवेडा; अतिशय रांडछंदी; रंडीबाज; बाईलवेडा; स्त्रैण. ॰पिसें-न. रांड- वेड; रांडेचा नाद. ॰पोर-न. १ (व्यापक) बायकामुलांसह एखाद्या ठिकाणचे सर्व रहिवासी; गांवांतल्या बायकोपारांसुद्धां सर्व लोक. 'आज कथेला झाडून रांडपोर आलें होतें.' २ एखा- द्याच्या पदरीं असलेलें. बायको, मुलें इ॰ कुटुंब, खटलें. ३ रंडकीचें मूल. ४ दासीपुत्र; वेश्यासुत. [रांड + पोर] रांडपोर- कीं राजपोर-रंडकीचा मुलगा किंवा राजाचा मुलगा हे दोघेहि- अनियंत्रित व अशिक्षित असतात; दोघेहि बेबंद व निर्धास्त असतात. ॰पोरें-नअव. घर, गांव, देश यांतील मुख्य कर्त्या पुरुषाहून इतर बायका, मुलें इ॰ सर्व माणसें. ॰बाज-वि. रंडीबाज; बाहेरख्याली. [हिं.] ॰बाजी-स्त्री. बाहेख्याली- पणा; रंडीबाजी. [हिं.] ॰बायल-स्त्री. (गो.) विधवा स्त्री. ॰बेटा-पु. रांडलेक. 'तुका म्हणे कोरान्न रांड । बेटा भांड मागेना कां ।' -तुगा २९८३. ॰बोडकी-स्त्री. विधवा स्त्री. 'त्या रांडबोडकीनें लन्न जुळलन् ।' -मोर ११. ॰भांड-स्त्री. (निंदार्थीं) रंडकी; बाजारबसवी; बटीक. [रांड द्वि.] ॰भांडण- न. १ बायकांचें भांडण. २ (ल.) बिन फायदेशीर, निरर्थक गोष्ट. ॰भाषण-न. बायकी, नामर्द, दीनवाणें भाषण. ॰मस्ती- स्त्री. १ पतिमरणानंतर विधवेस येणारा लठ्ठपणा व जोम. २ (ल.) नियंता न हींसा झाल्याबरोबर एखाद्या माणसास येणारी टवटवी; चपळाई, धिटाई. ॰माणूस-न. १ (दुर्बलत्व दाखवावचें असतां) स्त्री; स्त्रीजाति; स्त्रीमात्र. २ (तिरस्कारार्थीं) बुळा, निर्जीव, बायक्या मनुष्य; भित्रा मनुष्य. [रांड + माणूस] ॰मामी- स्त्री. (करुणेनें) विधवा स्त्री. ॰मांस-न. (निदार्थीं) पतीच्या मृत्यू- नंतर विधवा स्त्रियांस एकटें राहतां आल्यामुळें व मोकळेपणा मिळाल्यामुळें कधीं कधीं येणारा लठ्ठपणा. (क्रि॰. चढणें; येणें). [रांड + मांस] ॰मुंड-स्त्री. १ केशवपन केलेली, अनाथ न अनु- कंप्य अशी विधवा. २ (शिवी) रांड; बोडकी; अकेशा थेरडी; विधवा. [रांड + मुंड] ॰रळी-स्त्री. विधवा किंवा विधवेसा- रखी; (व्यापक.) विधवा. 'रांडरळी म्हणती हा मेला बरें झालें' [रांड + रळी] ॰रागोळी-स्त्री. (व्यपक.) रंडीबाजी व बदफैली. [रांडद्वि.] ॰रांडोळी-स्त्री. १ विधवा किंवा तिच्या सारखी स्त्री. रांडरळी पहा. २ शिंदळकी. ३ बायकांशीं संगत ठेवणें; रंडीबाजी. ॰रूं-न. विधवा स्त्री. ॰रोट-रोटा-पु. आपल्या मरणानंतर बायको विधवा होईल यासाठीं लग्नाच्या वेळीं नवर्‍यानें तिच्या तर्तुदीकरितां दिलेलें वेतन; बाइलवांटा; रांडरोट्याची चाल मुख्यत्वें गुजराथेंत आहे. [हिं.] ॰रोटी-स्त्री. लढाईंत पडलेल्या किंवा सरकारकामी आलेल्या माणसाच्या बायकोस निर्वाहाकरितां दिलेली जमीन इ॰. [हिं.] ॰लें(ल्यों)क-पुन. १ रंडापुत्र; विधवेचा मुलगा; एक शिवी. 'काय केलें रांडलेंका । तुला राजी नाहीं तुका ।' २ (व.) मेलें या शब्दाप्रमाणें वाक्याच्या आरंभीं किंवा मध्यें निरर्थक योजतात. 'आम्हास नाहीं रांडलेक असं येत !' ॰वडा-पु. सर्व बायकामाणसें; घरांत सत्ताधारी पुरुष नसल्यामुळें होणारें स्त्रियांचें प्राधान्य. २ बाजारबसवी, रांड, बटीक इ॰ शब्दप्रचुर शिच्या; शिवीगाळ; गालिप्रदान. (क्रि॰ गाणें; गाजविणें; ऊठविणें) 'किती रांडवडे । घालुनि व्हालरे बापुडे ।' -तुगार २ ७४६. [रांड + वाडा] ॰वळा-पु. स्त्रियांच्या कडाक्याच्या भांडणांतील शिवी; रंडकी; रांड, भटकी, बाजारबसवी इ॰ शिव्यांची माळता. (क्रि॰ गाणें; वाजवणें). [रांड + आवलि] ॰वांटा-पु. वैधव्य. ॰वांटा कपाळीं येणें-विधवा होणें. ॰वाडा-पु. कुंटणखाना; वेश्यांची आळी. ॰व्यसन-न. रांडेचा नाद, छंद. ॰व्यसनी-वि. रांडबाज. ॰सांड-स्त्री. विधवा. [रांड + सांडणें किंवा रांड द्वि.] ॰सांध-स्त्री. विधवेचा कोपरा. [रांड + संधि] ॰सांधीस बसणें-घरांत उदास होऊन बसणें (रागानें एखा- द्यास म्हणतात). रांडक-वि. (कों.) विधवा झालेली. 'सडा मफलीस व रांडक बायको व भिकारी बैरागी हे निमदस्ती.' [रांड] रांडका-पु. विधुर; ज्याची बायको मेली आहे असा पुरुष. [रांड] रांडकी-स्त्री. विधवा. (तिरस्कार दया दाखवितांना). [रांड] रांडगा-वि. (राजा. तंजा.) रंडीबाज. २ -पु. (बे.) महार जातीचा बलुतेदार. याला वतन इनाम जमीन असते. याचा हक्क कर्णाटकांतील लक्ष्मीच्या जत्रेंत रेडा मारण्याचा असतो. हल्लीं ह्या शब्दास अपभ्रष्टता येऊन तो शिवीदाखल योजिला जातो. रांडरूं-न. (तिरस्कारानें) विधवा स्त्री. [रांड] रांडव-वि. १ रंडकी झालेली; विधवा (स्त्री). २ बायकोच्या मरणानें उघडा झालेला; मृतपत्नीक; विधुर. [रांड] रांडवणें-अक्रि. विधवा होणें; रांडावणें पहा. [रांड] रांडवा-स्त्री. विधवा स्त्री. 'रांडवा केलें काजळ कुंकूं ।' -एभा ११.९६६. रांडा पोरों-नअव. १ कुटुंबांतील कनिष्ठ दर्जाचीं माणसें (बायका, मुलें व कुणबिणी). २ समाजांतील हलक्या दर्जाचे लोक. ॰रोटा-पु. विधवांनीं करा- वयाचें सामान्य आडकाम. (दळण, कांडण, मोल मजुरी इ॰). रांडाव-वि. (गो.) विधवा. रांडावणें-अक्रि. १ विधवा- पणाच्या केविलवाण्या स्थितीस प्राप्त होणें. २ (ल.) फिसकटणें; मोडावणें; नासणें; बिघडणें; भंग पावणें (व्यापार, मसलत, काम) (विशेषत: या लाक्षणिक अर्थानेंच हा शब्द योजतात). 'त्याणीं मागें संसार चांगला थाटला होता पण थोरला भाऊ मेल्यापासून रांडावला.' [रांड] रांडावा-स्त्री. (माण.) बालविधवा; बाल- रांड. रांडरांड-स्त्री. १ रंडक्यांतली रंडकी; अतिशय अनाथ व असहाय रंडकी. २ (ल.) नामर्द, बुळा, अपात्र, नालायक, मनुष्य. ३ पराकाष्ठेचा अनाथ किंवा निराधार मनुष्य. रांडुल-स्त्री. (गो.) (अनीतीच्या मार्गानें) विधवेस झालेला मुलगी. रांडूल- स्त्री. (कों.) विधवा स्त्रीला उपहासानें म्हणतात. रांडे-उद्गा. एक शिवी. 'भांडे तृष्णेसीं द्विज भारार्त, म्हणे यथेष्ट घे रांडे !' -मोअश्व ६.७५. [रांड, संबोधन] रांडचा-वि. रांडलेक. -उद्गा. आश्वर्यवाचक उद्गार. 'अग रांडेचें ! पांच वर्षांचें पोर पहा किंग कशी पोथी वाचतो.' रांडेचा आजार-पु. गर्मी. रांडेच्या- उद्गा. (प्रेमळ) एक शिवी. 'आहा रांडेच्या !...' -देप ६२. रांडोळी-स्त्री. १ (करुणेनें, तिरस्कारानें) विधवा स्त्री. २ विधवे- प्रमाणें वागवणूक. ३ कुचाळी, थट्टा. 'करितां गोपिकांसी रांडोळी ।' -एभा ६.३६५. ४ मारामारी; कत्तल. 'निकरा जाईल रांडोळी ।' -एरुस्व ६.९. ५ क्रीडा. ६ नाश. 'कीं भीष्मदेवें चरणातळीं ।' केली कामाची रांडोळी ।' -जै २४.७ [रांड] रांड्या, रांड्या राऊजी, रांड्या राघोजी-वि. १ रंडीबाज; रांडव्यसनी; रांडछंदी. २ बायक्या; बाइल्या; नामर्द. ३ बाईलवेडा. ४ रांड्याराघोबा, रांड्यारावजी, बायकांत बसून किंवा त्यांजबरो- बर फिरून गप्पा मारण्यांत आनंद मानणारा (मनुष्य); गप्पीदास; चुलमावसा. म्ह॰ रांड्या रावजी आणि बोडक्या भावजी. [रांड] रांढरुं, रांढूं-न. (तिरस्कारार्थीं) विधवा स्त्री. रांडरू पहा. [रांड]

दाते शब्दकोश

गाय

स्त्री. १ धेनु. दूध देणारा एक माणसाळलेला चार पायांचा सस्तन प्राणी. २ (ल.) गरीब. ३ स्वभावानें गरीब; सात्विक; अनाथ; दीन माणूस. ४ एका जातीचें काळ्या रंगाचें झुरळ; एक पक्षी. ५ पारी पहा. ६ एक वनस्पति; लहान इंद्रा- वण; कडुंवृदावन. (अव. गायी रूप एव. हि वापरतात). [सं. गो- गाव(म्); प्रा. गावी; झें-गाओ] (वाप्र.) ॰गोवणें-आक्षे- पित, अयोग्य स्थळी मुलगी देणें. ॰चिखलांत अडकणें- अडचणीत, पेंचांत सांपडणें. ॰माय सारखी-दोन्हीहि आपल्या दुधानें पोषण करतात म्हणून. ॰गायवाना करणें-(व.) काकळूत करणें गयावया करणें पहा. 'गया गायवाना करू लागला तेव्हां सोडलें.' ॰होणें-दीन, दुबळा होणें; (दुर्दैवानें, दुखण्यानें) रंजीस येणें. 'उगिच अबोला धरिला । कांही भिउन असावें हरिला । झालें मी गाय ।' -प्रभाकर, पदें. गायीचा खूर तिखट-अनाथाचा वाली ईश्वर. गायीनें माणीक गिळणें- जेथें फार मोठा तोटा सोसल्यावांचून किंवा पाप केल्यावांचून बूड भरून येत नाहीं तेथें योजतात. गायी पाण्यावर आणणें-गाल फुगवून रडणें. गायीवासराची ताडातोड करणें-नातेवाईकांत भेद करणें; त्यांचा संबंध तोडणें (विशेषतः मायलेकरांची ताडातोड). गायीवासराची भेट करणें- जवळचे आप्त, स्नेही, नातेवाईक भेटविणें; त्यांना एकत्र आणणें. गायीसारखां हंबरडा फोडणें-मोठयानें कळवळून आक्रोश करणें (मुलाने). म्ह॰ १ गायीनें गाय फळत नाहीं = एका गरिबाला दुसर्‍या गरिबास मदत करवत नाहीं. २ दुभत्या गाईच्या लाथा गोड = लाभसाठी माणूस अपमनहि सहन करतो. ३ अल्लाची गाय = फार गरीब माणूस इ॰ ४ अडकली गाय फटके खाय = अडचणीत सांपडल्यावर हालअपेष्टा सोसाव्याच लागतात. ५ कसा- यास गाय धारजिणी = दुष्टापुढें निमूटपणें वावरतात पण गरीबाला मात्र छळतात. सोनाराने कान टोंचणें याअर्थीं. ६ एकानें गाय मारली तरी दुसर्‍यानें वासरूं मारूं नये = एकानें चुकी केली तर दुसर्‍यानें तरी करूं नये. सामाशब्द- ॰कवाड-कैवारी-पु. एक आडनांव. गायक्या-वि. गुराखी. ॰चाळा-पु. लहान मुलांचा एक खेळ. ॰तुरी-स्त्री. (गो.) गायत्री. ॰तोंड्या-डा-वि. लाजाळू; भितरा. ॰दूम-वि. गोपुच्छासारखा निमुळता. [फा. गांवदूम] ॰नाखें-वि. १ (गो.) निर्लज्ज. २ अर्धकच्चे. ॰पारख-स्त्री. गुरांची परीक्षा किंवा वैद्यकी. ॰पारखी-पु. गुरांचा परीक्षक किंवा वैद्य. ॰मुख-न. गाईचें तोंड, पाणी वहाण्यासाठीं केलेलें (लांकूड, दगड यांचे). ॰रट-न. (निंदार्थीं) गाय. गायरा-पु. गुराखी. गायरान-न. १ गोचार; कुरण. २ नापीक, माळ जमीन. गायरूं-न १ (निंदार्थीं किंवा लडि वाळपणें) गाय. गायरट पहा. २ (ल.) सौम्य, गरीब, निरुप द्रवी माणूस. 'तो गरीब बापडा गायरूं.' ३ (गो.) वयांत आलेली गाय. ४ (बे.) अगदीं लहान जातीची कोंकणी गाय. ॰वट-न. (चांभारी) गोचर्म. ॰वाडा-पु. गोठा. 'गंगा आपली पाटी (शेणाची) घेऊन गायवाड्यांत गेली.' -माझे हाल मीच सोसूं जाणें ६ (उषा ग्रंथमाला). गायीचा गो(ह)रा-पु. १ कृतघ्न माणूस. २ मूर्ख; ढ मनुष्य. ३ वासरूं; बैल. ४ (ल.) गांगरलेला माणूस; वेडा. गायीचा पुत्र पहा. 'गाईचे गोरे जाले' -भाब १२३. गायीचा पुत्र, गायीचें बाळ-मूल, गायीचा बाप-पु. नपु. बैल. (ल.) टोणपा; मूर्ख माणूस.

दाते शब्दकोश

रंग

पु. १ केवळ चक्षुरिंद्रियानां जाणतां येतो असा पदार्थांच्या ठिकाणीं जो पांढरेपणा, तांबडेपणा इ॰ वर्ण तो; एखद्या वस्तूवर प्रकाश पडला असतां ती वस्तु ज्या रंगाची असेल त्या रंगाच्या किरणाशिवाय इतर किरण शोषले जाऊन त्या रंगाचे किरणच फक्त बाहेर टाकते. त्यास रंग म्हणतात. -ज्ञाको (र) २. २ रंगाची पूड; पदार्थाला तांबडा, काळा इ॰ कोणताहि वर्ण देण्याचें द्रव्य; रंगविण्याचें द्रव्य. ३ (ल.) तेज; तेजस्विता, चकाकी; भपका; गायन, कीर्तन, तमाशा, भाषण, इ॰ चा लोकांचीं अंतःकरणें रमण्याजोगा पडणारा शोभाविशेष; मजा; शोभा; आनंद. 'आजचे गाण्यास रंग चांगला आला. ' ४ देखणेपणा; उत्कृष्टता; चांगली स्थिति (मनुष्य, वृक्ष, बाग, शेत इ॰ पदार्थांची किंवा संसार, व्यवहार इ॰ ची). 'नुकता संसार रंगास आला तों बायको मेली. ' ५ देखावा; आकार; ढब; डौल; घाट; अंदाज; चिन्ह; परिस्थिति; प्रसंग; संधी. (क्रि॰ दिसणें). 'आज गरमी होती तेव्हां पाऊस पडेलसा रंग दिसतो.' 'उन्हाचा-वाऱ्याचा-आभाळाचा-दिव- साचा-काळाचा-धारणेचा-भावाचा-पिकाचा-चाकरीचा-रंग. ' 'तूं शालजोडी मागशील तर पहा, मागण्याचा रंग आहे. ' ६ सोंगट्यांचे चार भिन्न प्रकार; गंजिफांचे निरनिराळे दहा प्रकार; पत्त्यांच्या चार बाजू प्रत्येकीं. ७ गंमत; मजा; तमाशा; खेळ. 'भंगकरी रंग, अफू करी चाळा, तंबाखू बापडा भोळा. ' ८ रंगण; क्रीडास्थान (नाट्य, नृत्य इ॰ चें); हौदा; आखाडा; रंगभूमी; सभागृह; सभामंडप. 'असें बोलून इकडे तिकडे फिरते आणि रंगांतून पडद्यांत निघून जाते.' -क्रमं २; -मोआदि २६.२१. ९ नवरा; पति (समासांत स्त्रीच्या नांवापुढें योजतात). 'सीतारंग.' १० विचार; बेत. 'जाणत्याचे जाणावे प्रसंग । जाणत्याचे घ्यावे रंग ' -दा १८.२.१२. ११ तऱ्हा; ढोंग. 'बहु शिकला रंग चाळे । खरें खोटें इचे वेळे. -तुगा १३५९. १२ गाणें, बजावणें, नृत्य इत्यादि करमणुकीचा प्रकार. 'आजि कुमारिकेच्या महा- लासी । रंग होतो दिवसनिशीं । ' -शनि २४६. १३ थाटमाट. ' रंग स्वर्गीचा उतरे । ' -दावि ५०४. १४. महत्त्व ' या कारणें कांहीं रंग । राखोन जावें ' -दा १७.७.२१. १५ विवाह, शिमगा इ॰ प्रसंगीं एकमेकांच्या अंगावर केशर इ॰ चें रंगीत पाणी टाकतात तें किंवा तें टाकण्याचा समारंभ. १६ प्रेक्षकांचा किंवा श्रोत्यांचा समुदाय. १७ चुना; सफेती; उजळा. (क्रि॰ देणें). [सं. रञ्ज्-रंग देणें; फा. रङ्ग; हिं. रंग] (वाप्र.) ॰उडणें- १ मूळचा रंग जाणें, फिका होणें; तेज कमी होणें. ॰करणें- मजा मारणें; मौज करणें. ॰खेळणें-विवाहादि प्रसंगीं एकमेकांच्या अंगावर रंग उडविणें. ॰चढणें-अंमल, निशा, मद, धुंदी येणें. ॰दिसणें-एखादी गोष्ट होईलशी वाटणें, आकारास येणें; संभव असणें. 'तरी यापुढें जें एकंदर अवस्थांतर होण्याचा रंग दिसत आहे.' -नि. ॰भरणें-१ भरास येणें; जोमांत येणें; मजा येणें. 'भलत्या प्रसंगीं भलत्या तालाची चीज सुरू केलीत तर रंग भरेल कां ? ' -नाकु ३.४६. २ रंग आणणें. 'रंग भरिती अद्भूत । ' -सप्र १०.८८. ३ तडजोड करणें. -पया १४०. ॰मारणें-- बाजी मारून नेणें. 'रहस्य राखून रंग मारला । ' -ऐपो २५३. ॰राखणें, रंगाची मोट बांधणें-विजयानें, वैभवानें हुरळून न जातां सभ्य आणि सौम्य वर्तन कायम ठेवणें; आपल्या प्रति पक्ष्यांवर वादांत किंवा कांहीं कामांत आपण सरशी मिळविली असतां आपण दिलदारीनें त्याच्याशीं वागणें; त्या सरशीच्या जोरावर त्याच्याशीं कठोरपणा न करणें; त्याला न हिणविणें; अधिक पेंचांत ढकलण्याचा प्रयत्न न करणें. ' त्यानें मी चुकलों असें कबूल केलें तें बस झालें, आतां काय रंगाच्या मोटा बांधा- वयाच्या आहेत ? ' ॰शिंपणें-होळीचे अगर लग्नाचे वेळी रंगाचें पाणी उडविणें, फेकणें; रंग खेळणें. रंगाचा भंग करणें-आनं- दाचा बिरस करणें. रंगांत येणें-तल्लीन होणें; रंगून जाणें. चढणें- शोभा प्राप्त होणें; खुलून दिसणें; पूर्णतेस येणें; विकास पावणें; भरास येणें. रंगास-रंगारूपास आणणें-येणें-चढणें-१ फलद्रूप होणें-करणें; वैभवशाली, सुखावह करणें; आरंभिलेलें कार्य अनुकूल संस्कारादिकांनीं चांगल्या स्थितीला आणणें, येणें. 'माझ्या ग्रंथाचा मी नुसता कच्चा खरडा तयार केला आहे. तो रंगारूपास आणावयास वर्ष दीड वर्ष तरी लागेल. ' २ (तिरस्का- रार्थी) एखाद्या तऱ्हेस, आकृतीस, विशिष्ट अवस्थेस पोंचणें, पोचविणें. ' हा आतां राम म्हणावयाचे रंगास आला. ' सामा- शब्द- ॰आखाडा-पु. कुस्ती खेळण्याची जागा. 'धनुर्याग आरंभिला । मल्लें रंगआखाडा केला । ' -कथा ४.६.३७. ॰काम- न. १ रंग देण्याचें, रंगाचें काम. २ (रंगारी धंदा) धाग्यावर रंग चढवून तो पक्का बसविण्याची क्रिया; (इं.) डाइंग. ॰डाव- बाजी-पुस्त्री. गंजिफा, पत्ते खेळण्याचा एक प्रकार. ॰डी, रंगडी ढंगडी-धंगडी-स्त्री. १ ढंग; चाळा. २ फसगंमत; फसवेगिरी; खोडी; लबाडी; डावपेंच इ॰ (अनेक वचनी उपयोग). [रंग + ढंग] ॰ढंग-नपु. १ युक्ति; कारवाई; फंद; चाळा; लटपट; कावा. (क्रि॰ करणें; मांडणें; चालविणें). २ रागरंग; स्वरूप; एकंदर देखावा. ३ नाचरंग वगैरे; स्वच्छंदी आचरण. रंगणावळ-स्त्री. रंगविण्याबद्दलची मजुरी; रंगविण्याचा खर्च. [रंगणें] ॰दार-वि. १ मनोहर रंग असणारा (पदार्थ, फूल, वस्त्र इ॰) २ रंगेल गमत्या; विनोदी विषयी; चैनी; (माणूस) ३ रंगीत; रंगविलेले; रंगीबेरंगी. ॰देवता-स्त्री. गाणेंबजावणें, कथा पुराण, प्रवचन, व्याख्यान इ॰ कांस जिच्या प्रसादानें रंग येतो, यश मिळतें अशीं एक कल्पित देवता; खेळांत रमणीयता आणणारी देवता. २ खेळांची अधिष्टात्री देवता. [सं.] ॰द्रव्यें-नअव. (रसा.) जीं द्रव्यें सूर्यकिरणांचा कांहीं विशिष्ट भागच फक्त आरपार जाऊं देतात अथवा परावृत्त करतात व बाकीचा भाग नष्ट करून टाकतात तीं द्रव्यें. -ज्ञाको (र) ३. २ रंगविण्याच्या कामीं लागणाऱ्या वस्तू, पदार्थ. ॰नाथ- पु. कृष्ण; श्रीकृष्णाची बालमूर्ति. [सं.] ॰पंचमी-स्त्री. फाल्गुन वद्य पंचमी. या दिवशीं एकमेकांवर रंग उडवितात. ॰पट-पु. रंग- ण्याची खोली; पात्र रंगून तयार होण्याकरितां केलेली जागा; (इं.) ड्रेसरूम, ग्रीनरूम. [सं.] ॰बहार-पु. १ मौज. कमालीचा आनंद; सुख; आनंदाची लूट (क्रि॰ करणें मांडणें; होणें) ' रंगबहार एकांतीं लुटा । घर सुंदर कर पोपटा । ' -प्रला १४०. २ भव्य, आनंददायक दृष्य; थाटमाट. ३ नानाप्रकारच्या करमणुकी, खेळ, कसरती किंवा त्या जेथें चालतात तें ठिकाण. ४ मुबलकता; पीक इ॰ ची आनंदप्रद रेलचेल. 'पिकांचा-धान्याचा-आंब्यांचा-लाड- वांचा-जेवणांचा-रंगबहार. [रंग + बहार] ॰बाजी-स्त्री. पत्त्यांनीं खेळण्याचा एक प्रकार; पत्त्यांतील एक खेळ; रंगडाव. ॰भंग- पु. विरस; आनंदाचा नाश; मध्येंच एकदम येऊन खेळ थांबविणें, बंद करणें; खेळांतील आनंद, गोडी न वाटेल असें करणें. ॰भूमि-स्त्री. १ नाटकगृह; प्रयोग किंवा नाटक करून दाख- विण्याची जागा; सभागृह; सभामंडप. २ मर्दानी खेळांचें मैदान; रणांगण. [सं.] ॰मंडप-पु. कुस्त्या वगैरे खेळण्यासाठीं घातलेला मांडव. [सं.] ॰मंडपी-स्त्री. खेळाची अथवा करमणुकीची जागा. [सं.] ॰महाल-पु. विलासमंदिर; दिवाणखाना; आरसे व तजबिरी लावून सुखोपभोग घेण्यासाठीं केलेलें घरांतील दालन; श्रीमंत लोकांची आरशांनीं, रंगीबेरंगी चित्रांनीं सुशोभित केलेली विलास करण्याची खोली; (विशेषतः) निजण्याची खोली. [फा.] ॰माळ-स्त्री. लग्न वगैरे समारंभाच्या मिरवणुकीपुढची नक्षत्रमाळा; रंगीबेरंगी कागदांचीं अथवा बेगडांचीं फुलें कातरून दोऱ्यांत ओवून काठीला बांधून लग्नकार्यांत धरण्याच्या माळा. [सं. रंग + माला] ॰माळा-स्त्री. १ रांगोळीचीं चित्रें; रांगोळी. 'प्रवर्तोनि गृहकामीं रंगमाळा घालुं पाहती ।' -भूपाळी घनश्यमाची २०. २ सिंहासन अथवा मूर्तीचें देवालय याचे भोवतीं तिन्ही बाजूंनीं बसविलेल्या लाकडी अगर धातूच्या सोंगट्या अथवा निरनिराळ्या आकृतीचीं चिन्हें. ३ नक्षत्रपुंज; तारे. ४ नक्षत्रमाळा; (सामा.) रंगमाळ ॰मूर्तिं-स्त्री. ज्याच्यामुळें समारंभास विशेष शोभा येते असा मनुष्य अथवा मूर्ति; कृष्णाचें बालस्वरूपी लांकडी अथवा धातूचें छायाचित्र; श्रीकृष्णाची मूर्ति. [सं.] ॰मोड-स्त्री. रंगभंग; ऐन भरांत खेळ आला असतां विरस होणें; हिरमोड; उत्साहभंग; आनं- दाचा नाश; खेळाचा चुथडा. ॰रस-पु. आनंद; हर्ष. 'हस्ती सेवकांसुद्धां सकळही लाल रंगसी । ' -हो २०३. ॰राग-पु. राग- रंग पहा. ॰रूप-न. आकार, रंग, वर्ण, चर्या, देखावा इ॰ (फळ, व्यापार, व्यक्ति, इ॰चा); बाह्यस्वरूप. [सं.] ॰रूपास आणणें- चांगल्या स्थितीस आणणें; निरोगी करणें; ऊर्जित दशेस आणणें. ॰रूपास येणें-चढणें-चांगल्या स्थितीस किंवा पूर्णतेस येणें. पोहोचणें. ॰रेज-पु. रंगारी. [फा. रंग्रेझ] ॰रेजी-स्त्री. रंग देणें; रंगविणें; सफेती. [फा.] ॰रोगण-न. १ तेलिया रंग. २ सामान्यतः रंग देणें; साफसूफ करणें वगैरे क्रिया. [रंग-इ-रौघन्] ॰लाल-वि. चैनी (मनुष्य). [रंग] ॰लूट-स्त्री गंजिफांचे खेळां- तील एक शब्द; गंजीफांचे डावांत सर्वांचीं पानें एक रंगाचीच पडलीं असतां तो हुकूम फुकट जातो आणि पानें सर्वांनीं लुटून घ्यावीं असा एक प्रकार आहे ती. ॰लेला ऊंस-पु. गाभ्यांत लाल पड- लेला ऊंस. ॰वट-स्त्री. खेळण्याची जागा; क्रीडांगण; रंगण. 'द्राखे घोंस लांबटी । रंगवटामाजी मिरवती । ' -ख्रिपु १.८.२३. ॰वणी-न. रंगाचें पाणी. [रंग + पाणी] ॰वल्ली-स्त्री. रांगोळीचें चित्र; रांगोळी पहा. [सं.] ॰शाला, रंगांगण-स्त्रीन. नाटकगृह; खेळाचें मैदान; तालीम; नर्तनशाला; जेथें नाटकांतील पात्रें रंग- वितात ती जागा. [सं.] ॰शिला, रंगशिळ-स्त्री. १ दगडी पाटा. २ देवाच्या मूर्तीपुढील मोठी शिळा; पंढरपूरच्या विठोबाच्या पुढील मोठी शिळा (यावर भक्त नाचतात). 'नाचा रंगशिळेवरी । भेट देईगा मुरारी । रामचंद्रहो । ' -भज ८२. [सं.] ॰सभा-स्त्री. १ खेळ अथवा करमणूक यासाठीं असलेली जागा. २ खेळाडू अगर विनोदी मंडळी. (क्रि॰ जमणें; भरणें; मांडणें; चालणें; उठण; मोडणें). ॰सही-स्त्री. तिफांशी खेळांत पक्क्या रंगाच्या चारी सोंगट्या पटाच्या चारी बाजू हिंडून आपल्या पटाच्या डाव्या बाजूकडील घरांच्या ओळींत येऊन बसणें. ॰स्थल-न. रंगण; रंग- भूमि पहा. ' विचक्षणा पडद्यांतून रंगस्थलांत येते. ' -कमं २. रंगाई-स्त्री. (हिं.) रंगणावळ; रंग देण्याची मजूरी, किंमत. 'रंगाऱ्याला कपडे रंगविण्याबद्दल रंगाई द्यावी लागते. ' -विक्षिप्त १.१२. [फा. रंगाई] रंगांगण-न. कुस्त्या, खेळ इ॰ करून दाख- विण्यास योग्य स्थळ; रंगशाला पहा. रंगाचळ-न. (महानु.) रंगाचा भर; आनंद; उत्साह; भर. 'निरुपनांचा रंगाचळी । त्यागाचें आढाळ चाळी । ' -भाए २३७. [रंग + अचल] रंगाची (रंगीत) तालीम-स्त्री. रंगभूमीवर नाटक होण्यापूर्वीं खाजगी रीतीनें सालंकृत प्रयोग करून पाहणें. [इं.] रंगाथिणें-क्रि. रंगविणें; रंगविशिष्ट करणें. 'यया भूतांचेनि संगें । जीवें घेतलीं अनेक सोंगें । विपरीत वासना संगे । रंगाथिला ।' -सिसं ३५.२२२. रंगामेज-पु. १ चितारी २ ढोंगी; दांभिक इसम. [फा. रंगामेझ] रंगामेजी-स्त्री. १ आरसे, चित्रे; इ॰ नीं सुशोभित करणें; दिवाणखाना इ॰ स्थलास नानाप्रकारचे रंगांनीं, चित्रें, वेलबुट्टी काढून शोभेसाठीं चितारण्याचा केलेला संस्कार. 'भीमनाथ केदार राममंदीर रंगामेजींचें ।' -प्रला ७८. २ (ल.) दांभिकता; कृत्रिमता; कुटिलता. रंगारी-पु. कपडे रंग- विणारा; वस्त्रें रंगवून उपजीविका करणाऱ्यांची एक जात. [सं. रंज्; फा.] रंगारीहिरडा-पु. एक प्रकारचें हिरड्याचें झाड व त्याचें फळ (पिवळसर रंगाचें). यालाच जंगली किंवा चांभारी हिरडा म्हणतात. सुरवारी हिरडा हा दुसऱ्या जातीचा आहे. रंगालय-न. नाट्यशाला. [सं.] रंगालां-न. (राजा.) चामडें ताणून घोटण्याचें साधन (हें सुताराच्या पटाशीसारखें पण बोथट धारेचें असतें). [रंगाळें] रंगिन-न. चांदीवर सोन्याचा पत्रा चढवून तयार केलेलें जरतार. रंगिला-वि. रंगेल; ख्यालीखुशा- लीचा; चैनी; विषयी; खेळाडू. [हिं.] रंगी-स्त्री. (बे.) जुगार; जुवा; पत्त्यांतील खेळाचा एक प्रकार. रंगी, रंगीन, रंगील-वि. १ रंगीत; रंगविलेलें. 'तुम्ही रंगीन फेटा पाठविला तो पावला. ' -रा ३२.८९. २. रंगेल पहा. [रंग; महानु] रंगीढंगी-वि. रंगेल; चंगीभंगी; व्यसनी. 'मुलगा रंगीढंगी असूनहि केवळ पैसा पाहून पांचmohsinहजार हुंडयासह त्याच्या ताब्यांत देऊन चाकली.'-हाकांध १८२. रंगीत-वि. रंगी; रंगविलेलें; रंग असलेले; रंग लाविलेला कुसुंबा, हिंगूळ इ. रंगानीं रंगविलेला (पदार्थ, पस्त्र, काष्ठ इ.). रंगीबेरंगी-वि. अनेक रंगाचा. रंगीला-वि. रंगीन; रंगेल; गुलहौशी. रंगेरी-स्त्री. (गंजीफांचा खेळ) अखेरीस म्हणजे सर्व खेळाच्या शेवटीं खेळणाराची अखेरी दोघानीहि मापली, तिघांचेंहि पान एकाच रंगाचें निघालें तर त्यास रंगेरी म्हणतात. रंगेल-ला-ली-वि. १ आनंदी; विनोदि; खेळाडू; खेळकर; चैनी; विषयी; विलासी; ललितकलाप्रिय; गाणें, तमाशा, इ. विषयांचा उपभोग, मस्करी, या विषयावर ज्याची अधिक रुचि असा आनंदी; रसिक; इष्कबाज. रंगविणें-क्रि. १ रंग लावणें, देणें; रंगानें वस्त्रादिक विशिष्ट करणें; शोभिवंन करणें. २ (ल.) तोंडांत देणें; भडकाविणे; मारणें. 'त्याचें तोंडांत दोन रंगविल्या म्हणजे कबूल होईल.' (तोंड) रंगविणें-१ विडा खाणें. २ (ल.) थोबाडांत मारणें. [रंग; रंजू = रंग देणें]

दाते शब्दकोश

सम

स्त्री. तालाची पहिली टाळी; तालाच्या प्रारंभींचें मुख्य ठिकाण; गायनवादनाचें महत्त्वाचें स्थान. -न. १ एक अर्था- लंकार; यामध्यें दोन समान वस्तूंची तुलना केलेली असते. २ कोण- त्याहि आकाशस्थ उभ्या वर्तुळाचा ज्या बिंदूंत क्षितिजाशीं छेद होतो तो बिंदु. ३ (भूमिति) मध्यमप्रमाण. ४ साम्य; सारखेपणा. 'ऐसें बोधा आलें जया सम । तया कर्तव्य तें नैष्कर्म्य ।' -ज्ञा ४. १२१. ५ ब्रह्म. -ज्ञा ६.४३. वि. १ सारखा; तुल्य; समान; सदृश. उदा॰ समकाल, समदेश, सम-गति-क्रांति-गुण-गोत्र-जाति-धन-विभाग-शील-बल वगैरे. 'सकळकाळीं समा । सर्व- रूपा ।' -ज्ञा ११.५३३. 'तुळे घालितां वो नये कनकरासी । सम तुकें एक पान तुळसी वो ।' -तुगा १२१. २ एका पातळींतील; सपाट; सरळ; नीट; थेट; एकरूप. ३ दोन या संख्येनें विभाग्य (संख्या) ४ निःपक्षपाती; समदृष्टि; समान अधिकारी. ५ तटस्थ; मित्रत्व अगर शत्रुत्व नसलेला. ६ शांत. 'तैसा आत्मबोधीं उत्तमु । करितां होय जो श्रमु । तोही जेथें समु । होउनि जाय ।'-ज्ञा १८. १०९४. [सं.] ॰उदर-न. (नृत्य) नृत्यप्रसंगीं श्वासोच्छ्वास अजिबात बंद ठेवणें. ॰कपोल-पु. (नृत्य) गालांची स्वाभाविक स्थिति. ॰ग्रह-पु. (ताल) गाण्यास व ताल देण्यास जेथें एकदम सुरुवात होते तें ठिकाण. ॰चिबुक-पु. (नृत्य) खालचे-वरचे दांत मागें पुढें न होतील, हनुवटी सारखी राहील असे ठेवणें. ॰दर्शन-न. (नृत्य) दोन्ही डोळ्यांचीं बुबुळें एका रेषेंत ठेवणें. ॰पाद-न. (नृत्य) पायांची स्वाभाविक ठेवण; जुळलेले पाय. ॰पुट-न. (नृत्य) पापण्यांची स्वाभाविक स्थिति. ॰मान-स्त्री. स्वाभाविक स्थितींत मान ठेवणें. ॰यति-पु (ताल) गायनाचा प्रारंभ, मध्य व अंत या तीन ठिकाणीं लयीची गति सारखी ठेवणें. ॰वक्षःस्थल-न. (नृत्य) उरोभागाची स्वाभाविक स्थिति. ॰अपूर्णाक-पु. (गणित) छेदापेक्षां अंश लहान असतो असा अपूर्णांक. ॰कर्णतुल्य चतुर्भुज-पु. ज्याचे कर्ण व बाजू सारख्या असतात असा चौकोन; समचतुष्कोण; इ. र्‍हाँबस. ॰कर्णायत- पु. दीर्घचतुरस्त्र; दीर्घ चौकोन. ॰कक्ष-वि. समान; बरोबरीचें; सारखे; जोडीचे. ॰कालीन-क-वि. एकाच काळचे; एकाच वेळचे; एककालीन. ॰केंद्र-वि. ज्यांचा मध्यबिंदु एक आहे अशीं (वर्तुळें). ॰कोण-पु. काटकोन; ९० अंशांचा कोन. ॰खात- पु. (भूमिति)चौरस घन पदार्थ. विटेसारख्या आकाराची आकृति. ॰गुणन-न. एका संख्येस त्याच संख्येनें गुणण्याचा प्रकार; संख्येचा वर्ग करणें. ॰घटक-पु (शाप.) सारख्या आकाराचे पदार्थ, (इं.) आयसोमेरॉइड. -वि. सारख्या आकाराचे, रूपाचे. (इं.) आयसोमेरिक. ॰घटकत्व-न. समरूपता. (इं.) आयसोमेरिझम. ॰घर-न. माजघर; मध्यगृह; मधलें दालन, वठार. ॰चतुरस्त्र- वि. (रूढ) समचौरस; चौकोनी; चारी कोन सारखे असलेला. -नपु, चारी कोन सारखे असलेली आकृति. [सं. सम + चतुर् + अस्त्र] ॰चित्त-वि. १ समतोल स्वभावाचा; समदृष्टि; मनाचा कल ढळूं न देणारा. २ तटस्थ; कोणत्याहि विशिष्ट बाजूस मनाचा ओढा नसलेला; उदासीन. ॰चौरस-समचतुरस्त्र पहा. ॰च्छेद-पु. (गणित) सारखा छेद; सामान्य छेद. -वि. ज्यांचे छेद सारखे आहेत असे (अपूर्णांक). ॰च्छेदरूप-न. ज्या- सर्व अपूर्णांकांस सामान्य असा एकच अंक छेदस्थानीं असतो असे अपूर्णांक. ॰तळणें-अक्रि. (सोनारी) सारखी तोलून मध्यावर खूण करणें (सोन्याची कांब वगैरे). [सम + तोलणें] ॰ता-स्त्री. १ सारखेपणा; बरोबरी. २ अभेदबुद्धि; समबुद्धि; तुल्य मानणें. 'पै भय आणि निर्भयता । अहिंसा आणि समता । तुष्टि तप पांडुसुता । दान जे गा ।' -ज्ञा १०.८५. ३ निःपक्ष- पातपणा. ४ ब्रह्मरूपता; तादात्म्य. ॰तुक-वि. समतोल; सारख्या वजनाचें; सारख्या महत्त्वाचें; सारखें. 'तुका म्हणे तुजमध्यें एक भाव । समतुके भार घेऊं पावो उंच ठाव ।' -भज ३३. ॰तुक भाव-पु. बरोबरी; समतोलपणा. घ्या संभाळून समतुकभावें । आपणहि खावें त्याच तुकें द्यावें ।' ॰तोल-वि. १ सारख्या वजनाचा; समभार. २ सारखा; सम; जोडीचा; बरोबरीचा; सारख्या गुणांचा, मोलाचा, रंगाचा, दर्जाचा. ३ शांत; सौम्य; न क्षोम पावणारा (स्वभाव, प्रकृति). समाधान (प्रकृति). ४ सारख्या शक्तीच्या (प्रेरणा). -क्रिवि. दोहींकडे सारखा भार, वजन असलेला. 'होडीमध्यें समतोल बसावें.' ॰पणा-अवस्था-स्थिति-पुस्त्री. एखाद्या पदार्थावर सर्व बाजूंनीं कार्य करणार्‍या प्रेरणा जेव्हां परस्पर समान असतात अशी स्थिति; तुल्यबलता; (इं.) इक्विलिब्रिअम. ॰त्रिभुज-पु. ज्याच्या तिन्ही बाजू सारख्या लांबीच्या आहेत असा त्रिकोण. ॰त्रैराशिक-पुन. ॰त्रैराशि-स्त्री. (गणित) ज्यामध्यें सम प्रमाणें असतात असें त्रैराशिक. याच्या उलट व्यस्त त्रैराशिक. ॰त्व- न समता पहा ॰स्थळ-न. सपाट जागा; मैदान; सपाटी. [सं. सम + तल] ॰दर्शी-वि. निःपक्षपाती; तटस्थ; कोणत्याहि एका बाजूस मनाचा कल नसलेला. ॰दुःख-समदुःखी-वि. ज्यांस एकाच प्रकारची पीडा, त्रास वगैरे आहे असा; दुःखाचा भागी- दार, वांटेकरी. ॰दृष्टि-स्त्री. समानवृत्ति; निःपक्षपातीपणा; निःस्पृहवृत्ति; उदासीन. ॰द्विभुज त्रिकोण-पु. ज्याच्या दोन बाजू सारख्या आहेत असा त्रिकोण. ॰धात-समधातु- वि. समशीतोष्ण; फार थंड नाहीं व उष्ण नाहीं अशी; निरोगी. 'तशी काया समधात सुगंधिक अमोल फुंदाची ।' -प्रला ९०. [सं. सम + धातु] ॰नख(करण)-न. (नृत्य.) पाय जोडून नखें एका रेषेंत ठेवणें. ॰नर-समशंकु पहा. ॰पाद(स्थान)- न. (नृत्य.) सर्व अंग सरळ, सारखें व सौष्ठवांत ठेवून दोन्ही पाय एक ताल अंतरावर व एकाच रेषेंत ठेवणें. ॰पाद भौमि- चारी-स्त्री. (नृत्य.) दोन्ही पावलांत अंतर न ठेवतां तीं एक- मेकांस चिकटवून जमीनीवर एकाच रेषेंत ठेवणें. ॰पादी-वि. (प्राणि) दोन्ही पाय दोहों बाजूस सारखे असणारा (प्राणि). ॰प्रमाण-वि. (गणित) सारख्या प्रमाणांत वाढणारा अथवा कमी होणारा. -छअ १८. ॰फळि-ळी-स्त्री. बरोबरी; स्पर्धा. 'तयासि मांडितां समफळी । न दिसे दुजा ।' -कथा ४.१४. ५. -वि. समबल; समतोल. 'ज्ञाप्र २७५. ॰बुद्धि- स्त्री. सारखे विचार; सारख्या भावना. -वि. १ सारख्या मताचे, कलाचे, वृत्तीचे. २ सर्वांबद्दल सारखीच वृत्ति असणारा; सम- दृष्टि; कोणासहि कमी अधिक, जवळचा दूरचा वगैरे न मानणारा. ॰भाग-पु सारखा वांटा, हिस्सा, पाती. ॰भाग-समभागी- वि. १ सारखा हिस्सा, वांटा, भाग असणारा; सारखा पातीदार. २ सारख्या प्रमाणाचे, आकाराचे, वजनाचे. ॰भाव-पु. १ सारखेपणा; समरूपता; साम्य; एकरूपता. २ बरोबरी; समता. ३ सारखा स्वभाव, वृत्ति, मनोधर्म, प्रकृति, घटना असलेला; साधर्म्य; प्रकृति-प्रवृत्तिसाम्य. -वि. १ सारखा; एकरूप; समवृत्ति; सारख्या स्वभावाचा. २ सहमत; सहकारी; सहोद्देशी. ॰भाररेषा-स्त्री. ज्या ठिकाणीं वातावरणाचा दाब सारखा असतो अशीं पृथ्वीवरील ठिकाणें दाखविणारी रेषा. ॰भुज- चौकोन-पु. ज्या चौकोनाच्या सर्व बाजू सारख्या असतात असा चौकोन. ॰भुजत्रिकोण-पु. ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू सारख्या असतात असा त्रिकोण. ॰मंडल-न. (ज्यो.) समवृत्त; खस्वस्तिक व पूर्व-पश्चिम बिंदू यांमधून जाणारें वृत्त ॰मात्र-वि. सारख्या वजनाचा, आकाराचा, मापाचा. ॰मिति-स्त्री. १ मध्यम माप; दोन मापांमधील काढलेलें मध्यम माप. २ मापाचा सारखेपणा. ॰मूल्यत्व-न. (रसा.) मूल द्रव्यांचा इतर मूलद्रव्यांशीं संयोग होण्याच्या प्रमाणांतील सारखेपणा. (इं.) ईक्वलव्हलेन्सी. ॰योग-पु. उत्तम योग; चांगला जुळून आलेला प्रसंग. 'ऐशिया समयोगाची निरुती ।' -ज्ञा ८.२२१. ॰रस-पु. ऐक्य; तादात्म्य; एकरूपता; ब्रह्मसारूप्य. 'म्हणे तुका समरशी मिळाला जर । तरी कोणासीं उत्तर बोलावें ।' 'तेथ अवभृत समरशीं । सहजें जहालें ।' -ज्ञा. ४. १३८. -वि. १ समतोल वृत्तीचा, प्रकृतीचा, स्वभावाचा; शांत; गंभीर; सुमनस्क. २ समानधर्मी; सारख्या स्वभावाचा, गुण- धर्मांचा, वृत्तीचा. ॰रसणें-अक्रि. १ ऐक्य पावणें; तादात्म्य पावणें; विलीन होणें; तल्लीन होणें. 'तदा महासुखासी सम- रसे तो ।' २ एक होणें; मिसळणें; विरून जाणें; पूर्णपणें एक- रूप होणें. 'जैसा लवणाचा पुतळा । समुद्रामाजीं समरसे ।' -ह २१.२७. 'अलंकारीं हेम समरसे ।' -यथादी २.१२५६. ॰रस्य-न. ऐक्यभाव. 'चित्तगुणी प्रवेशे । चित्तीं असती समरस्यें ।' -भाए ६८२. ॰रास-स्त्री. शेतांतील पिकांची अविभक्त रास; एकत्रित संपत्ति; एकत्र मालमत्ता, जिंदगी. ॰रूप-वि. सारख्या आकाराचे, आकृतीचे, रूपाचे. ॰रूप्य-न. आकारसादृश्य; आकृतीचा, ठेवणीचा सारखेपणा. ॰लंबचतु- र्भुज-पु. ज्याच्या दोन बाजू समांतर आहेत असा चौकोन. ॰वय-वयी-वयस्क-वि. सारख्या वयाचे, उमरीचे. ॰वर्ति- वि. समतेनें वागणारा, असणारा. ॰विषम-न. विसंगति; अप्र- योजकता. 'जो नावरे समें विषमें । चर्मचक्षूंचेनि चामें ।' -ज्ञा १८. ४०१. 'तेथ समविषम न दिसे कांहीं ।' -ज्ञा ८.१७. -वि. बरें- वाईट; अनियमित; योग्यायोग्य; सदोष. ॰वीर्य-वि. १ सारख्या गुणाचें; सारख्या तीव्रतेचें (औषध, वगैरे.) २ सारखे परा- क्रमी, प्रभावी, शूर. ॰वृत्त-न. (ज्यो.) सममंडल; खस्व- स्तिक व पूर्व-पश्चिम बिंदू यांमधून जाणारें वृत्त. (इं.) प्राइम- व्हर्टिकल. ॰शंकु-पु. (ज्योति.) समवृत्तावर सूर्य असतां पडणारी शंकुच्छाया किंवा त्याच्या अक्षांशत्रिज्या. ॰शीतोष्ण -वि. जेथें हवामानांत थंडी व उष्णता यांचें प्रमाण बहुधा सारखें असतें असा (प्रदेश). ॰शीतोष्णकटिबंध-पु. अयनवृत्त व ध्रुववृत्त यांमधील उत्तरेकडील व दक्षिणेकडील त्रेचाळीस अंशांचा पृथ्वीचा भाग. ॰शील-वि. सारख्या स्वभावाचे, प्रवृत्तीचे, वृत्तीचे; एकमेकांस अनुकूल. ॰समान-वि. १ अगदीं सारखा; तुल्य. 'तुकयाची समता जाण । शत्रुमित्र समसमान ।' २ हुबेहुब; एकरूप. ३ सपाट; सारखी; समतल. 'समसमान साधुनि भुई।' दावि २४.५०. ॰सरीवि. सारखे.'राव प्रधान समसरी । दोन पुत्र दोघांसी ।' -शनि २८६. 'प्रपंच परमार्थ समसरी । होय श्रीहरिकृपें ।' -ह २४.७६. [सम + सर] ॰सीम-वि. ज्यांची सीमा, मर्यादा सारखी आहे असे; एकाच ठिकाणीं संपणारे. [सम + सीमा] ॰सूत्र-न. (ज्यो.) समवृत्ताच्या ध्रुवबिंदूमधून जाणारें महावृत्त; क्षितिज. ॰स्थल- न. पटांगण; मैदान; सपाट जमीन; माळ. ॰स्थान-न. क्षिति- जाचा उत्तर किंवा दक्षिण ध्रुवबिंदु. ॰स्वभाव-वि. सारख्या वृत्तीचा; सारख्या प्रकृतीचा; सजातीय; सारख्या घटनेचा; समान गुणधर्मांचा.

दाते शब्दकोश

गो

स्त्री. १ गाय. २ बैल (पशु). समासांत-गाईपासून झालेलें; गाईसंबधीं (दुध, चामडें, मांस इ॰). 'अगा गोक्षीर जरी जाहलें । तरी पथ्यासि नाहीं म्हणितलें ।' -ज्ञा २.१८४. [सं.] सामाशब्द- ॰कर्ण- ॰क्रण-न. १ मुलाला दूध पाजावयाचें (गाईच्या कानाच्या आकाराचें) बोंडलें. २ एक वेल व तिचें फूल. ३ बारा ज्योतिर्लिंगांपैकीं एक. हें कुमठें (कानडा जिल्हा) तालुक्यांत आहे. ४ (तजा.) दांड्याचें सारपात्र; कावळा. याचा आकार गोकर्णासारखा असतो. -पु. गाईचा कान. गोकर्णांत येणें- संपुष्टांत, गाकुळांत येणें; संपणें; दरिद्री होणें. गोकर्णिका- कर्णी-स्त्री. एक प्रकारचा लगाम. गोकर्णी-स्त्री. एक वेल, हिचीं फुलें (पांढरीं, निळीं) गाईच्या कानासारखीं असतात. [सं.] गोकु(कू)ल ळ-न. १ श्रीकृष्णाच्या लहानपणच्या वसतीचें गांव. २ गोकुळाष्टमीस नंद, यशोदा, गोप-गोपी, गाईवासरें इ॰ ची पूजा करण्यासाठीं केलेलीं मातीचीं चित्रें. ३ (ल.) स्वैरसं- भोग; व्यभिचार. (क्रि॰ माजविणें). [सं. गा + कुल] गोकु ळांत येणें-१ संकोचित होणें; संपुष्टांत येणें; संपणें. २ आटा- क्यांत येणें (व्यवहार). [विश्वव्यापी कृष्णपरमात्मा ज्याप्रमाणें गोकुळाच्या मर्यादेंत आला त्याप्रमाणें] गोकुळाष्टमी-स्त्री. श्रावण वद्य अष्टमी; या दिवशीं भगवान् श्रीकृष्णाचा जन्म झाला. [सं.] गोकुळासारखें घर-न. मुलाबाळांनीं सुखसंपत्तीनें भरलेलें घर. गोकोश-पु. जमीन मोजण्याचें एक माप: गायीच्या हंबरण्याचा टप्पा; गोरुत; दोन कोसांचें अंतर. गोखडी-स्त्री. गाई उभ्या राहण्याची जागा; गोठण. 'गिलच्यानीं गोखडींत दहा-पांच बैरागी सत्पुरुष होते तेहि बसले ठिकाणीं लबे कले.' -भाब २८ गोखमा-पु. १ गुराखी. २ (ल.) गांवढळ खेड- वळ; शेत्या; नांगर्‍या. गोखरें, गोखोण-रेब/?/-न. (कों) गुरांनीं खाऊन शिल्लक राहिलेलें गुरांच्या पायाखालचें. निरुपयोगी गवत. 'केळीला गोखरेडाचें खत चांगलें [गौ + खूर] गोखाना- पु. १ सरकारी किंवा एखाद्या मोठ्या माणसाचा गायवाडा; गुरांचें खातें. २ गायठाण; गोठा. [सं. गो + फा. खाना] गोग्र- हण-न. गाईचें हरण, चोरी. 'उत्तरगोग्रहण.' 'तृवां गोग्रह- णाचेनि अवसरें । घातलें मोहनास्त्र एकसरें ।' -ज्ञा ११.४६९. [सं.] गोग्रास-पु. १ जेवण्यास बसण्यापूर्वीं गायीसाठीं राखन ठेवलेला अन्नाचा नैवेद्य. २ गाईसाठीं भिक्षा. [सं.] गोचर-न. गुरचरण; गुरचराई. [सं.] गोचर्म-न. १ गाईच कातडें. २ (ल.) जमीन मोजण्याचें एक माप. गाईच्या चामड्याइतकी जमीन; (गाईच्या कातड्याची वादी काढून तिनें वेष्टिलेली जमीन एका माणसानें राजापासून मागून घेतल्याची एक जुनी गोष्ट आहे तिच्यावरून) तीनशें फुट लांब व दहा फूट रुंद या मानाचें क्षेत्र (यांतील धान्य एका माणसास एक वर्ष पुरतें असा हिशोब आहे). [सं.] गोजरूं गोजी-नस्त्री. (प्रेंमानें किंवा तिरस्कार करतेवेळीं योजना) कालवड; वासरी. गोजिव्हा-स्त्री. एक वनस्पति; गोजबान पाथरी; दवली. [सं.] गोठ(ठा)ण-स्त्रीन,. दुपारीं सावलीसाठीं पाण्याजवळ झाडाखालची बसण्याची गुरांची आखर. जागा; गोठा. 'पशु पीडती पर्जन्यें । गळती गाईंची गोठणें ।' -मुसभा ३.७९. [सं. गोष्ठ, गोस्थान म्ह॰ गोठणीच्या गाई माभळभट दान घेई. = हलवायाच्या घरांवर तुळशीपत्र. गोठण घालून बसणें-सभेत अस्ताव्यस्त बसणें. गोठा-ठो-पु. गुरें बांधण्याची जागा; जना- वरे रहाण्याची जागा. [सं. गोष्ठ; प्रा. गोट्ट] गोठापाणी-न. सकाळीं गोठा झाडणें. गुरांच शेण, मूत काढणें इ॰ गोठ्यांतील व्यवस्थेचें काम गोठाव(वि)णें-सक्रि. गोठणांत गुरें जमविणें; गोठ्यांत गुरें घालणें. गोठी-स्त्री. (कों.) वासरांचा लहान गोठा. गोठ्यौचें-क्रि. (गो.) पशूंचें बसणें. [गोठा] गोथवड-स्त्री. (कों.) गुरांची दावण, ठाण; लांब पडळ; कोटंबा. [सं. गोष्ठ- वत्] गोदंती हरताळ-स्त्री. पिवळा हरताळ. गोदण-स्त्री. (बे.) गुरापुढें वैरण टाकण्याची जागा. [गवादणी] गोदन- न. (माण.) लहान गोठा. गोंदरड-स्त्री. (राजा.) गोठ्यांतील केरकचरा, घाण. गोदान, गोप्रदान-न. ब्राह्मणास गाईचें दिलेलें दान. 'प्राचीन काळीं गाय दान मिळणें सोपें होतें, पावली मिळणें कठीण, पण हल्लीं चार आण्यांत गोप्रदान.' -गांगा १४४. गोदान-न. सोळा संस्कारांपैकीं व समावर्तनाच्या वेळीं करावयाचा एक संस्कार. [सं.] गोधन-न. गुरढोरे किंवा त्यांच्या रूपानें संपत्ति. 'धन्य तीं गोधनें कांबळी काष्ठीका ।' -तुगा २०८. गोधूल मुहूर्त, गोंधळिक, गोंधुळूक-पुन. १ सायंकाळचा (गुर रानांतून परत घरी येत असतां त्यांच्या) चालण्यानें उडालेली धूळ दिसते तेव्हांचा) काळ. २ सुर्यास्ता- पूर्वींची व नंतरचीं ३० पळें यामधील काळ; हा लग्नास शुभ मान- तात. गोरज मुहूर्त. गोधूल लग्न-न. १ गोरज लग्न. गोधूल पहा. २ सूर्यास्तसमयीं उदय पावणारी राशी, लग्न. गोधूलिक-वि. गोधूलसंबंधीं (कार्य. लग्न-मुहूर्त). गोधूळ-ळी-स्त्री. गोधूल पहा. गोप-पु. गुराखी, गवळी जात. व तींतील एक व्यक्ति. 'पूजिति सांग नगा ती रीति । सुखाचीच गोप सांगन गाती ।' -मोकृष्ण २४.७. गोपचार-पु. गायरान; गोचरण. गोपद-न. १ गाईचें पाऊल. २ गाईच्या पावलाचा मार्ग, खूण. ३ आंत पाणी भरलेली गोपदाची खूण, डबकें. गोपद्म-न. चातुर्मास्यांत रांगो- ळीनें गाईचीं पावलें नववधू काढतात व पूजा करतात तें. गोपद- चिन्ह. [सं.] गोपवाडा-पु. गवळीवाडा. ' जो नांदवी उत्कट गोपवाडे ।' -सारुह १.७८. गोपाल-ळ-पु. १ गुराखी; गुरें पाळणारा. २ राजा. ३ भगवान श्रीकृष्ण. ४ एक जात व तींतील व्यक्ति; डोंबारी; हे मनगटानें दगड फोडतात, मोठालीं वजनें उचलतात व कसरतीचे खेळ खेळतात, हें गांवकर्‍यांचीं गुरें राखो- ळीला घेतात. -गांगां १२२. गोपाष्टमी-स्त्री. कार्तिक शुद्ध अष्टमी या दिवशीं त्यांची व गाईची पूजा करतात. गोपाळकाला-पु. गोकुळअष्टमीच्या उत्सवाच्या व श्रीकृष्णाच्या इतर उत्सवाच्या शेवटीं करावयाचे खेळ, द्यावयाचा प्रसाद,जेवण इ॰; गोकुळा- ष्टमीच्या पारणेच्या दिवशीं दहीहंडी फोडून तींतील प्रसाद वाट- तात तो. गोपाळखेळ-पु. गोपाळ लोकांची कसरत, खेळ; डोंबार्‍यांचा खेळ. गोपाळीं-क्रिवि. गोरजीं; गोधूललग्नीं. गोपिका, गोपी-स्त्री. गोपालस्त्री; गवळण. 'तुझे कथिति गोपिका विविध तीस बोभाट ते ।' -केका ८६. [सं.] गोप्र- दान-१ गोदान पहा. २ (थट्टेने) शिव्या. 'त्यानें त्यास गोप्र- दानें केलीं.' गोप्रसव-पु. कुनक्षत्रीं जन्मलेलें मूल गाईच्या तोंडापुढें धरतात व असें केल्यानें तें गाईचें मूल होऊन अशुभा- पासून मुक्त होतें, अशा मुलाला म्हणतात. गोप्रसवशांति-स्त्री. कुयोगीं जन्मलेलें मूल गाईच्या मुखांतून जन्मलें अशी भावना धरून कुयोगदोषनाशार्थ करावयाची शांति. गोब्राह्मण-पु. १ गाय आणि ब्राह्मण. २ (ल.) अगदीं साधाभोळा, गरीब ब्राह्मण. गोमय-नपु. गाईचें शेण. 'शुद्ध करूनिया गोमय गोळा । मृति- काकण विरहित ।' [सं.] गोमाशी-स्त्री. घोडे, गाई इ॰ च्या अंगावरील एक मोठी माशी; माशीची एक जात. गोमांस-न. गाईचें मांस; शपथेसारखा किंवा निषेध दाखवीतांना याचा उपयोग करतांत. कारण हिंदूंना गोमांस अगदीं निषिद्ध आहे. 'ही तुमची ठेव मला गोमांसाप्रमाणें आहे.' गोमुख-न. १ तीर्थ इ॰ पवित्र पाणी खालीं पडण्यासाठीं बांधलेलें किंवा बनविलेलें दगडी किंवा धातूचें गाईचें तोंड. २ एका प्रक्रारचें गाईच्या तोंडासारखें वाद्य.'तों वाद्यें शंखभेर्यादी पणवानक गोमुखें ।' -वामन गीतासमश्लोकी १.१३. गोमुखव्याघ्र-पु. १ दिसण्यांत गाई- सारखा सौम्य पण अतिशय क्रूर असा वाघ. २ गाईचें कातडे पांघ- रलेला लांडगा. ३ (ल.) वरून गरीब पण आंतून लुच्चा माणूस. [सं.] गोमुखी-स्त्री. गाईच्या तोंडासारखी काटकोनी जपमा- ळेची पिशवी; हिच्या आंत हात घालून जपाची माळ ओढतात. 'काय मौन धरुनिया गोमुखिला जाळिसी ।' -राला ८७. -पु. (कों.) एक प्रकारच्या नवसांत नियम केल्यामुळें हात न लावतां तोंडानें अन्न उचलून जेवणारा माणूस [सं.] गोमूत्र-न. गाईचें मूत; हे पवित्र मानतात व अपवित्र वस्तूंवर शिंपडून त्या पवित्र करतात. गोमूत्रिका, गोमूत्रिकन्यायगुणाकार-पु. (ज्यो.) गुणाकराचा एक प्रकार. गोमुत्रिकाबंध-पु. काव्याचा एक प्रकार याच्या द्वितीय चरणांत पहिल्या चरणांतील बहुतेक अक्षरें येतात. गोमूत्रवायु-पु. एक नवयुक्त वायु. (इं) आमोनिया. गोमेघ- पु. ज्यामध्यें गाय मारतात तो यज्ञ. [सं.] गोरखी-पु. गुराखी; गुरें (गाई) पाळणारा. 'कवळाचिया सुखें । परब्रह्म झालें गोरखें ।' -तुगा १८१. गोरज पु. गाईची धूळ. गोधूल पहा. 'गोरजें डवरला, मुखचंद्र ।' -ह १८.६३. गोरजमुहूर्त-गोधूलमुहूर्त पहा. गोरस-पु. गाईचें दूध, दहीं, तूप इ॰ गाईपासून होणारे पदार्थ. [सं.] गोरक्ष-रक्षक-पु. १ गुराखी. २ गुरांची रक्षक देवता. ३ नाथपंथांतील गोरखनाथ नांवाची एक प्रसिद्ध व्यक्ति गोरख-गोरखनाथ पहा. गोरक्षण-न. कसायापासून गाय वांच- विणें; गोपालन. गोरा-र्‍हा-पु. गाईचा पाडा, खोंड; धांडा. गोरुव-न गोवत्स. गोरूं, गोरवा, गोरें-न. (राजा. गो.) ढोर, गुरूं, 'गोरु खडबडी बाहिरी ।' -भाए ३९४. गोरो- चन-ना-नस्त्री. गोवर्धन; हें गोमूत्रापासून किंवा कुपित्थाच्या रूपानें गाईच्या ओकण्यापासून, किंवा गाईच्या डोक्यांत उत्पन्न होतें याचा रंग पिवळा. हें रंग, चित्रें औषधें यांत उपयोगी आहे. 'गोरोचनापरिस गौर असें गणावें ।' -र. ६. (लोक समजूत अशी कीं वाजीकरण किंवा स्त्रियांस मोहविण्यांत गोरो- चनाचा उपयोगी होतो). [सं.] गोवंड-डी, गोवडी-पुनस्त्री. जंगल किंवा डोंगरावरील जनावरांची चरण्यास जाण्याची पाऊ- लवाट; गायवाट.[सं. गोवर्तनी] गोवंडास लागणें-येणें- सरळ रस्त्यास लागणें; चालीस लागणें (माणूस, काम). गोवत्स- पुन. गाईचें वांसरूं. गोवत्स द्वादशी-स्त्री. आश्विन वद्य द्वादशी; या दिवशीं गाईची पूजा करितात. गोवपा-स्त्री. गाईच्या आंत- ड्यावरील आवरण; सामान्यतः गाय, बैल यांच्या चरबीस व हाडांतील मगजासहि म्हणतात. [सं.] गोंवर-पु. १ शेणी; न थापलेलें वाळलेलें शेण, वाळलेल्या शेणाचा चुरा. २ गाईनें खाल्यानंतर उरलेला चारा, गळाठा. ३ (कों.) राब. ४ (हेठ.) उकि- रडा. [सं. प्रा. गोवर] गोवरर्कोडा-पु. गोठ्यांतील केरकचरा; शेणमूत. गोवरी-स्त्री. १ वाळलेल्या शेणाची थापडी; शेणी; गोवर अर्थ १ पहा. २ (कु.) शेणखत. ३ राब भाजण्यासाठीं वाळविलेला शेणगोळा. गोवरीची आग-स्त्री. गोवरी जाळली असतां वर राख दिसते परंतु आंत विस्तव असतो यावरून गुप्त परंतु भंयकर वैर. गोवर्‍या मसणांत जाणें-वृद्धपण येणें. मरण जवळ येणें; वय होणें. गोवर्धन-पु. १ मथुरेजवळील टेकडी; इंद्रानें पाडलेल्या पावसापासून गोकुळाचें रक्षण करण्यासाठीं श्रीकृष्णनें याला करंगळीवर धारण केलें व याच्या खालीं गोकु- ळांतील सर्व माणसें आणि पशू सुरक्षित राहिलें. २ कार्तिक शुद्ध प्रतिपदेच्या (बलिप्रतिपदेच्या) दिवशीं भात, शेण, भाजी- पाला इ॰ चा वल्लभसंप्रदायी लोक गोवर्धनासारखा पर्वत करून त्याची पूजा करतात तो. -न. १ गोरोचन. २ महाराष्ट्रांतील एक प्राचीन राष्ट्र हल्लींच्या नाशिक जवळच्या भागांत हें असावें. ॰ब्राह्मण-पु. एक महाराष्ट्रीय ब्राह्मण जात. गाईच्या तोंडें गोवर्धन निवडणें-पंचाईत इ॰ प्रकरणीं ज्याचा विषय त्याच्याच तोंडानें निवाडा करणें. गोवळ, गोवळगोठा-पु. (कों.) गोशाला; गायवाडा; गोठा. गोवळ, गोवळा, गोवाळ- ळी-पु. १ गुराखी; गवळी. ' उगला राहे न करी चाळा । तुज किती सांगों रे गोवळा । -तुगा १२९. २ (राजा.) वयानें मोठा पण पोरकट माणूस; दुधखुळा (निंदार्थीं). [सं. गोपाल; प्रा. गोवाल] गोवारी-पु. गुराखी; गवळी. 'तव गाई आलिया रात्रीं । कच नाहीं आला गोवारी ।' -कथा १.५.८२. गोवाल- पुअव. गंगावन; गाईच्या शेंपटीचे केंस.[सं.] गोवेल-पुस्त्री. एक वेल; ही गुरांना विषकारक असते म्हणतात; भारे बांधण्याच्या कामीं हिचा उपयोग होतो. गोवैद्य-पु. गाईचा वैद्य; गुरांचा वैद्य; पशुवैद्य. गोशत-न. १ शंभर गाई. २ शंभर गाई दान देण्याचें कर्म. [सं.] गोशाला-ळा-स्त्री. गोखाना; गोठा पहा. गोष्ठ-पुन. गोठा. गोष्पद-न. १ गाईचें पाऊल, पावलाचें चिन्ह. २ गोवंडी. ३ गोपदाइतकें माप; गाईच्या खुराखालीं समावेश होईल इतकी जमीन. ४ चिखलांत उमटलेलें वं पाण्यानें भरलेलें गाईचें पाऊल. 'गज गोष्पदीं बुडाला हा दैवा सिंधु शोषिला मशकें ।' -मोद्रोण १.२३. 'गोष्पद मानुनि दिनांत शतदां यमुना वोलांडिली । ' -राला ८१. गोष्पदोपम-वि. गोष्पदाप्रमाणें (४) ओलांडून तरून जाण्यास सुलभ; सहजसुलभ; क्षुद्र; सुगम. 'ईश्वरभजन केलें असतां भव गोष्पदोपम होतो.' गोस्फुरण- न. गाईचें अंग थरारणें, गाईनें भोंवरा करणें. [सं.] गोहण- स्त्री. गव्हाण पहा. गाताडी. गोहन-न. (व.) गाईंच्या कळप. [गोधन] गोहण्या-पु. (व.) गुराखी. गोहत्त्या -हनन- स्त्रीन. १ गाईचा वध. २ गोवधाचें पातक. गोहरा-गोहोरा- पु. गोर्‍हा पहा. म्ह॰-'गोहर्‍याच्यानें शेत पोराच्यानें संसार होता तर मग काय?' गोहोत-न. (राजा.) १ दाणा, कोंडा, पेंड इ॰ गुरासाठीं शिजविलेलें आंबोण, मिश्रण. २ (ल.) घोंटाळा; खिचडी; गोंधळ. गोक्षुर-पु. १ गोखरू; सराटा. २ गाईचा खूर. ३ गाईची पाऊलवाट; गोवंडी. [सं.]

दाते शब्दकोश

पाणी

न. १ उदक; जीवन; जल; सलिल. 'पाणियां छाय दुनावली । परिमळाचि ।' -शिशु ६२८. 'चोखे पाणिया न्हाली ।' -वसा २५. २ पाऊस; पर्जन्य. ३ हत्यारें भट्टींत तापवून नंतर तीं पाण्यांत बुडवून त्यांच्या आंगीं आणिलेली दृढता. (क्रि॰ देणें; चढविणें; उतरणें). ४ (ल. एखाद्याच्या अंगांतील) धमक; अवसान; वीर्य; शक्ति; तेज. 'आलें न रजपुतांचें परि यवनां सर्व हरवितां पाणी ।' -विक ६८. ५ (मोत्यें, रत्न, हिरा इ॰कांचें) तेज; कांति; झकाकी. 'नाना मुक्ताफळांचें पाणी ।' -दा १६.४.१६. ६ चेहऱ्यावरील टवटवी; कांति; तजेला. ७ धातूंचें भांडें इ॰कांस सोनें, चांदी इ॰कांचा देतात तो मुलामा; झिलई. ८ शस्त्र इ॰ घासून त्याच्या धारेस आणलेली तीक्ष्णता; कडकपणा.(क्रि॰ देणें; पाजणें). 'नाना शस्त्रांमधें पाणी ।' -दा १६.४.१६. ९ अब्रू; लौकिक, कीर्त्ति. (क्रि॰ जाणें; उतरणें; चढणें). १० (राग, गाणें इ॰कांची) नीरसता; रुक्षपणा; रसहीनता. ११ (डोळ्यांतील) चमक; तेज. १२ अश्रू. 'दुर्गा देवीच्या डोळ्यांतून पाणी येऊं लागलें.' -विवि ८.३.४९. पाणी याचें समासांत पूर्वपदीं 'पाण' असें रूप होऊन अनेक सामासिक शब्द होतात. उदा॰ पाणकोंबडा, पाणघोडा, पाणलोट इ॰ सामासिक शब्द पहा. [सं. पानीय; प्रा. पाणिअ; गुज. पाणी; हिं. पानी; फ्रें. जिप्सि. पनी; पोर्तु जिप्सी. पानी] (वाप्र.) ॰उतरणें-१ पराभूत, पराजित होणें. 'पाणिपतच्या लढाईनंतर मराठ्यांचें पाणी उतरल्या- नंतर निजमास संधी सांपडली.' -विवि ८.६.१०९. २ अब्रू जाणें; अपकीर्ति होणें. 'ज्या स्नेहानें पाणी उतरतें, तो स्नेह रुपयें पाण्यांत टाकून राखावा, त्यापेक्षां रुपये राखावे हें फार चांगलें आहे.' -बाळ २.३. ३ (डोळे इ॰कांतील) तेज, चमक, कमी होणें. 'तिच्या सतेज डोळ्यांचें पाणी उतरूं लागलें.' -पाव्ह ५४. ॰ओळखणें- जोखणें-(एखाद्याच्या अंगांतील) गुण, धमक, धैर्य, विद्वत्ता इ॰ कल्पनेनें ताडणें. (अंगाचें, रक्ताचें) ॰करणें-अतिशय खपणें; कष्ट करणें; फार मेहनतीनें (एखादें काम, कर्तव्य इ॰) करणें. म्ह॰ रक्ताचें पाणी हाडाचा मणी. ॰काढून टाकणें-सक्रि. (रसा.) (एखाद्या पदार्थांतील) द्रव, द्रवांश नाहींसा करणें, घालविणें. (इं.) डीहायड्रेट्. ॰कोंडणें-(सैन्य इ॰कांचें) पाणी बंद करणें; त्यास पिण्यास पाणी मिळूं न देणें. 'कडबा दाणा बंद कोंडिलें पाणी कहर वर्षला ।' -ऐपो २३६. ॰घालणें-१ (बायकी) (विटाळशी इ॰ स्त्रीस जेवतांना) पाणी वाढणें, देणें. २ (बायकी) (विटाळशीस, बाळंतिणीस स्नान घालून शुद्ध करून घेणें. ३ नाश करणें; खराबी- करणें; गमावून बसणें. 'ह्यानें आपल्या हातानें आपल्या रोजगारावर पाणी घातलें,' ४ (ल.) (एखाद्या गोष्टीच्या) अभिवृद्ध्यर्थ प्रयत्न करणें, जोपासनेबद्दल उपाय करणें. ५ (एखाद्या वस्तूवर) पाणी सोडणें; त्याग करणें. ६ (कों.) सर्पाचें विष उतरविण्यासाठीं सर्प चावलेल्या मनुष्यास मंत्रित पाणी पिण्यास देणें व अंगावर घालणें ७ वृक्ष इ॰कांच्या वाढीला जरूर तें पाणी त्यांच्या मुळांशीं ओतणें. ॰चढणें-महत्त्व प्राप्त होणें; वीरश्री, त्वेष संचरणें. 'थोरासंगें दुर्बळास पाणी चढे ।' -पला ४.१९. ॰छाटणें-कापणें-१ (पोहणारानें, बोटीनें आपल्या अंगच्या जोरानें) पाणी दुभंगलें पुढें सरणें. २ (पोहणाराच्या, नावेच्या) गतीमुळें पाणी दुभंगलें जाणें. ॰जाळणें-(ल.) करडा अंमल चालविणें; क्रूरपणाचीं कृत्यें करणें. ॰जोखणें-ओळखणें-(एखाद्याची) कर्तृत्वशक्ति, धमक, विद्वत्ता, पराक्रम इ॰ अजमावणें. ॰तावणें-(एखाद्याच्या नांवानें, नांवा- वर, नावांविषयी इ॰ शब्दांसह प्रयोग असल्यास-एखाद्याचें) मरण, अनिष्ट इच्छिणें. (शवदहनासाठीं नेतांना तें उचलण्यापूर्वी, पाणी तापवून त्यास स्नान घलितात त्यावरून हा अर्थ). ॰तुटणें-(पोहणाराच्या, नावेच्या गतीनें) पाणी दुभंगलें जाणें. 'पेनोवेणां दळ बहुतें मीनलें । वाटे पाणी तुटलें ।' -शिशु ५७८. ॰तुंबविणें-(धरण इ॰ बांधून) पाणी कोंडून धरणें. ॰तोडणें- पाणी छाटणें अर्थ १ पहा. ॰दाखविणें-(कर.) (शेतकऱ्यांत रूढ) (गुरांस) पाणी पाजून आणणें; पाण्यावर नेणें ॰देखील न घोटणें-(एखाद्याचे) प्राण कंठीं येणें; मरणासन्न होणें; पाणी घशाखालीं उतरण्याइतकाहि अवकाश, धीर नसणें. ॰देणें-१ पोलादाच्या अंगी नरमपणा, कडकपणा, चिवटपणा इ॰ निरनिराळे गुण आणण्यकरितां तें भिन्न भिन्न ठराविक प्रमाणांत तापवून पाण्यांत बुडविणें. या क्रियेचे कडक पाणी, नरम पाणी, जांभळें पाणी, पिवळें पाणी इ॰ निरनिराळे भेद आहेत. -ज्ञाको प ७४. 'पाणी देण्याच्या कृतीनें लोखंडांत फेरफार होतात.' पदाव १.१५५. २ शस्त्र इ॰कांस धार लावणें. ३ (मृताचा) श्राद्धविधि करून (त्याला) तिलांजलि देणें; (सामा.) तर्पण करणें. ॰देणें-सोडणें-१ (एखादी वस्तु इ॰) गमावून बसणें. २ सोडून देणें; आशा सोडणें; (वस्तू इ॰कांचा) उत्सर्ग करणें (एखाद्या वस्तूचें दान देतांना तीवर थोडेसें पाणी-आपला हक्क नाहींसा करण्याचें द्योतक म्हणून-सोडण्याचा प्रघात आहे त्यावरून हा अर्थ). (कर्माला 'वर' अथवा 'ला' हे प्रत्यय लावून प्रयोग). 'मागें एक पुढें एक । दोनी मिळुनि विठ्ठल देख । ऐसी होतांचि मिळणी दिलें संसारासि पाणी ।' -एकनाथ ॰पडणें-फुकट जाणें; निरुपयोगी होणें; खराब होणें; दर्जा, गुण, महत्त्व, उपयुक्तता इ॰ बाबतींत मागें पडणें; नाश पावणें. कर्म- स्थानीं असलेल्या शब्दास 'वर' हें शब्दयोगी अव्यय जोडून प्रयोग जसें:-रोजगारावर-पोटावर-संसारावर-कामावर-स्नेहावर-पाणी पडलें. 'त्या कार्यावर तर सर्वस्वीं पाणीच पडलें असतें .' -इंप ८. ॰पाजणें-१ (मृतास) तिलांजली देणें; प्रेतदहन होत असतांना प्रेताच्या कपाळमोक्षानंतर चितेभोवतीं सच्छिद्र मडक्यानें पाण्याची धार धरणें; श्राद्ध इ॰ करून तर्पण करणें. २ (ल.) (एखाद्यास) मरेमरेतों खूप मारणें, बडवणें. (१ ल्या अर्थावरून रूढ). ३ पराजित करणें; जिंकणें; चीत करणें. ॰पाणी करणें-१ तहानेनें 'पाणी द्या' 'पाणी द्या' असें म्हणत सुटणें; एकसारखें पाणी मागत राहणें. २ (एखादें जनावर मनुष्य इ॰कांस फार) राबवून, पादाडून बेदम करणें. ३ (अन्न, वस्त्र, पदार्थ इ॰कांची) पूर्णपणें नासाडी करणें. ॰पाणी होणें-१ पुनःपुन्हां पाणी पिण्याची प्रवृत्ति (मिष्ठान्न खाण्यानें, उन्हाच्या त्रासानें) होणें. २ (एखाद्या वस्तूचा) नाश, खराबी होणें. 'हे कठोर मांस झडून जाईल तर किंवा याचें पाणी पाणी होईल तर किती बहार होईल.' -विकार- विलसित ॰पिऊन भांडणें-वाद करणें-(ल.) नेटानें व जोराजोरानें, आवेशानें भांडणें. ॰फिरणें-(बडोदें) व्यर्थ, फुकट जाणें; पाणी पडणें पहा. 'सेनापतीच्या चातुर्यावर व सैनिकांच्या शौर्यावर पाणी फिरतें.' सेवामाहात्म्य १०. ॰भरणे-वाहणें- घालणें-(एखाद्याच्या घरीं विद्वत्ता, संपत्ति, विशिष्ट व्यक्ति इ॰कानीं) बटकीप्रमाणें राबणें; दास्य पत्करून राहणें; वश असणें (एखाद्याच्या घरीं या शब्दासह प्रयोग). 'रूपाचेनि आहे । ऐरावतु पाणि वाहे ।' -शिशु ५०८. 'उद्योगाच्या घरीं ऋद्धिसिद्धि पाणी भरी ।' ॰मरणें-१ (एखाद्याचें) धैर्य गळणें; गर्भगळित होणें; धाबें दणाणणें. २ एखाद्या गोष्टींत किंवा हिशेब, भाषण इ॰कांत) खोटेपणा, पोकळपणा, लबाडी इ॰ असणें. ॰मागूं न देणें-एकदम, तडाक्यासरशीं ठार करणें (मरतांना पाण्याकरितां मनुष्य तडफडतो, पाणी मागत असतो त्यावरून हा वाक्प्रचार). 'तुला मी बडविलें तर पाणी मांगू देणार नाहीं.' ॰मारणें- पाणी कापणें-छाटणें पहा. ॰मुरणें-१ (एखाद्याचें भाषण, वर्तन इ॰कांत कांहीं तरी संशयास्पद असा) कमीपणा, वैगुण्य, दोष, मर्मस्थान असणें. २ भिंत वगैरेंत पाणी जिरणें. ॰लागणें-१ वाईट पाणी पिण्यांत आल्यानें आजारी होणें; पाणी बाधणें. 'कैक जणाला पाणी लागलें मासोळी मागें खारी ।' -ऐपो ३५४. २ ज्याची संगति धरली असेल त्याचे किंवा जेथें कांहीं काळ रहिवास आला असेल त्या ठिकाणचे गुणदोष, ढंग अंगीं जडणें. (आंत) ॰शिरणें-(धंदा, रोजगार, काम इ॰कास) अवदशा; उतरती कळा येणें; नासाडी होणें; फसगत होणें; आंत बट्यांत येणें. ॰शोषून घेणें-(रसा.) (एखाद्या पदार्थांतील) द्रव रस शोषून घेणें; (इं.) डेलिक्विस्. ॰सारणें-(व.) आंघोळीसाठीं पाणी उपसणें. ॰सोडणें-१ (ब्राह्मणास दिलेल्या दानावर पाणी सोडलें म्हणजे दानाची सांगता होऊन त्यावरचें आपलें स्वामित्व नाहींसें होऊन ब्राह्मणाकडे जातें या धार्मिक कल्पनेवरून पुढील अर्थ) (एखादी वस्तु) स्वेच्छेनें कायमची देऊन टाकणें; (एखाद्या वस्तूचा) त्याग करणें. 'हे स्त्री नव्हे प्रतिष्ठा तुमची जरि ईस सोडितां पाणी ।' -मोविराट १.१०३. २ (ल.) (एखाद्या वस्तूची) आशा सोडणें, ती गेली असें समजून स्वस्थ बसणें. ३ (एखादी वस्तु, भावना इ॰) नाइलाजास्तव सोडण्यास, तिच्याकडे दुर्लक्ष कर- ण्यास, विसरून जाण्यास, नाश करावयास तयार व्हावें लागणें. 'परि त्याहीं आम्ही त्या प्रेमासि रणांत सोडिलें पाणी ।' -मोद्राण १७.९०. ॰होणें-(एखाद्या वस्तूची) खराबी, नाश होणें; नाहींसें होणें. 'त्या दुःखाचें तुमच्या दर्शनानें पाणीच होऊन गेलें.' -रत्न ५.२. पाण्याआधीं वळण बांधणें-नदी, ओढा इ॰कास पूर येण्यापूर्वींच पुराच्या पाण्याचा निकाल लाव- ण्याची व्यवस्था करणें. २ (ल.) भावी संकटाची उपाययोजना आधींच करून ठेवणें. 'पाण्याआधीं वळण बांधितां उत्तम. नाहीं तर शेणामेणाचे लोखंडाचे जालियावर पुढें भारी पडेल.' -भाव ८३. पाण्याचा कांटा मोडणें-अग्निसंयोगानें पाणी कोमट होणें, करणें (अतिशय थंड पाणी अंगावर घेतल्यास अंगावर कांटा उभा राहतो, किंवा तें अंगाला कांट्याप्रमाणें बोचतें ह्यावरून वरील अर्थ). पाण्यची गार गोठणें-पाणी गोठून बर्फ होणें. पाण्यांत घाम येणें-(एखाद्यानें) अतोनात संतापणें; रागानें अंगाचा भडका होणें. पाण्यांत घालणें-बुडविणें; नाश करणें; खराब करणें. 'संसार घातला पाण्यांत । स्वतें समस्त बुडविलें ।' पाण्यांत जाणें-व्यर्थ होणें; फुकट जाणें. 'नानाची मुत्सद्देगिरी सारी पाण्यांत जात असली तर ...' -नि. पाण्यांत दिसणें-(ल. एखादी व्यक्ति एखाद्याच्या) द्वेषास पात्र होणें, असणें.पाण्यांत पडल्यासारखें होणें-फजीत होणें; लाजिरवाणें होणें. 'मग देवाला लाज वाटली. पाण्यांत पडल्यासारखें झालें.' -नामना ६९. पाण्यांत पाहणें-(एखाद्याचा एखाद्यानें) अतिशय द्वेष करणें (एखाद्याचा कट्टा शत्रु किंवा त्याला ज्याचा अतिशय दरारा आहे अशी व्यक्ति भीतीमुळें त्यास सर्वत्र जळीं, स्थळीं, काष्ठीं, पाषाणीं दिसूं लागते त्यावरून). पाण्यानें वाती पाजळणें-(महानु.) अशक्य गोष्ट शक्य करूं पाहणें. 'अवो दुजी कनुधार लागती । तरि पाणिअ/?/ वाति पाजळती ।' -शिशु ६७५. पाण्यापेक्षां, पाण्याहून पातळ करणें-(एखाद्याची) फजिती, पाणउतारा, तेजोभंग करणें; फार लाजविणें. 'नामचि करि पाण्याहुनि पातळ यश भास्करादि तेजांचे ।' -मोवन १२.५०. पाण्यावर घालणें- नेणें-(कर.) (गुरांना) पाणी पाजण्यासाठीं विहीर, नदी इ॰कांवर नेणें. पाण्यावर लोणी काढणें-(कर. ल.) अतिशय कंजूषपणा करणें. गळ्याशीं पाणी लागणें-१ पाणी गळ्यापर्यंत येणें. २ (कर्ज इ॰ गोष्टींची) पराकाष्ठा होणें. दुसऱ्याच्या ओंजळीनें पाणी पिणें-१ दुसरा पाजील तेवढेंच पाणी पिऊन स्वस्थ बसणें. २ (ल.) दुसरा सांगेल तसें मुकाट्यानें वागणें. उन्हा पाण्यानें घर जाळणें-जळणें-(ल.) खोट्या आरोपानें, निंदेनें रसातळास नेणें, जाणें; (एखाद्याचा) नाश करणें, करूं पाहणें, होणें (अकरण- रूपांत योजितात व हें घडणें अशक्य असें दर्शवितात). खोल पाण्यांत शिरणें-१ आपल्या आवांक्याबाहेरचें काम शिरावर घेणें. २ (एखाद्या गोष्टीची) फाजील चिकित्सा करणें. ३ (एखादें गूढ, गुपित) उकलण्याचा प्रयत्न करणें. पाणी केस तोडतें- पाण्याच्या अतिशय जोराच्या प्रवाहाचें वर्णन करतांना योजितात. पाणी खाल्लेला-वि. पाण्यांत ठेवल्यामुळें आंत पाणी मुरलेला. पाण्यांतील पावप्यादे-जलसंचारांत प्रवीण; आरमारांतील प्रबळ लोक. 'इंग्रज लोंक पाण्यांतील पावप्यादे.' -इतिहाससंग्रह-ऐति- हासिकचरित्र ११५. पाण्यापाण्यानें-क्रिवि. नदीच्या कांठा- कांठानें. पाण्यापेक्षां शीतळ-वि. अत्यंत सोशीक; सौम्य; शांत; गंभीर स्वभावाचा. पाण्यावर-क्रिवि. नदीच्या कांठीं. 'कऱ्हेच्या पाण्यावर.' -ख ३१९३. पाण्यावरचा बुडबुडा, पाण्या वरची रेघ-पुस्त्री. (ल.) क्षणभंगुर, अशाश्वत वस्तु. क्षणभंगुरता- दर्शक इतराहि वाक्प्रचार आहेत ते पुढें दिले आहेत:-जलबुद्बुद; धुळीवरचें सारवण; दुपारची सावली; विजेचें चमकणें; विजेसारखा; वीजच; अभ्रच्छाया; आभाळाची सावली; कमलिनीवरचा बिंदु; काजव्याचा उजेड; खुंटावरचा कावळा; तेरड्याचा रंग (तीन दिवस); शिराळशेटाचें राज्य; आवाहन व विसर्जन बरोबर; औट घटिकेचें राज्य; घडीचें, घटिकेचें घड्याळें; उपळवणी; तृणाचा शेक; पुष्करपत्रतोयतरल; पळतें पीक इ॰. 'चिताडसी कां? चित्र जिवाचें पाण्यावरच्या रेघांनीं ।' -वाग्वैजयंती-गोविंदाग्रज. पाण्यास आश्रय-आसरा-पु. अतिशय तहानेल्यानें उपाशे पोटीं पाणी पिणें आरोग्यदृष्ट्या अनिष्ट असतें, म्हणून आधीं अन्नाचे एक दोन घांस खाऊन नंतर पाणी पितात. अन्नाच्या ह्या दोन-तीन घांसांस, अल्पांशास उद्देशून हा वाक्प्रचार योजतात.म्ह॰ १ पाण्यांत राहून माशांशीं वैर करूं नये = आपल्या कार्यक्षेत्रांतील मंड- ळीशीं वैर करूं नये. त्यांच्याशीं मिळूनमिसळून वागण्यांतच फायदा असतो. २ (हिं.) पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाया वैसा = जशी वेळ येईल तसें वागणें. ३ पाण्यापासून जवळ सोयऱ्यापासून दूर = मनुष्यानें पाण्याच्या जवळ राहणें सोईचें असतें, तसेंच सोयऱ्या- पासून दूर रहावें म्हणजे प्रेमांत बिघाड करणाऱ्या गोष्टी टाळतां येतात. ४ पाण्यांत म्हैस बाहेर मोल = अनिश्चित, आगामी गोष्टी- विषयीं, निरर्थक चर्चेस, चिकित्सेस उद्देशून ही म्हण योजितात. सामाशब्द- पाणआघाडा-पु. आघाड्याची एक जात. हा आघाडा सूज, कफ, खोकला, वायु, शोष यांचा नाश करतो. -वगु १.९. [पाणी + आघाडा] ॰उतार-पु. १ नदींतून चालून जातां येण्याजोगा, कमी पाणी असलेला मार्ग. २ (नदी इ॰काचें) ओसरणें; कमी होणें. 'गंगेसि भंग बहु पाणउतार होतो ।' -र २. [पाणी + उतार] ॰उतारा-पु. १ मानखंडना; तेजोभंग; अपमान; क्षुद्रपणानें लेखून (एखाद्याची) केलेली विडंबना; अवहेलना. २ (क्व) पाणउतार पहा. [पाणी + उतरणें] ॰कणीस-न. ओहळांत, ढोंपरभर पाण्यांत कसईच्या झाडाप्रमाणें होणारें पुरुषभर उंचीचें एक झाड. याचीं पानें बाजरीच्या पानांसारखीं असून याचें कणीस बाजरीच्या कणसासारखेंच असतें. हें कणीस वाळवून त्यावरील कापूस चकमक पेटविण्यास घेतात. हें तेलांत बुडवून पेटविलें असतां काकड्याप्रमाणें जळतें. -वगु ४.६२. रामबाण. ॰कसर-स्त्री. पाटस्थळाच्या पाण्याकरील कर, पट्टी. 'गांवची पाणकसर गेल्यावर्षापासून दीडपट वाढविण्यांत आली.' -के १९.७.३०. [पाणि + कसर] ॰काठी- स्त्री. १ (गो.) विहीरींतून पाणी बाहेर काढण्याचें एक साधन. ओकती पहा. २ (ल. गो.) उठाबशी. [पाणी + काठी] ॰काडो- पु. (कु.) शेतांस पाणी काढून पैरीप्रमाणें आळीपाळीनें वाटून देणारा; पाणकाढा. हा शेतकऱ्यांनीं आपसांत पाण्याविषयी तंटा होऊं नये म्हणून निवडलेला असतो. [पाणी + काढणें] ॰कापड- न. जखमेवर, शरीराच्या कापलेल्या भागावर बांधतात ती ओल्या वस्त्राची चिंधी. [पाणी + कापड] ॰कांदा-कंद-पु. नदींत होणारा एक विशिष्ट कंद. यास नागदवणीच्या फुलासारखीं फुलें येतात. -वगु ४.६३. [पाणी + कांदा] ॰कावळें-न. (विशेषतः गुरांची) गर्भोदकाची पिशवी. पाणकी-स्त्री. पाणी भरण्याची मजुरी कर- णारी स्त्री. 'कुणि विधवा ठेविता घरामधें पाणकी ।' -ऐपो ३६९. पाणकुकडें-कोंबडें-न. घशांत किंवा जिभेच्या खालच्या बाजूस होणारा एक विकार. ॰कुक्कुट-पु. (महानु.) पाणकोंबडा. 'चंद्र चकोरा चोखटीं । वोळे अमृतधारी आतुटी । ते गोडपणें पाण- कुक्कुटी । लाहिजे कैसा ।' -ऋ ५२. [पाणी + सं. कुक्कुट = कोंबडा] ॰कोंबडा-डें-पुन. १ जलचर पक्षी. 'पाणकोंबडे कोंबडे । वडवाघुळा घुबडे ।' -दावि २४४. २ चंद्राभोवतालीं पडणारें खळें. [पाणी + कोंबड] ॰केश-पुअव. शेवाळ. ॰कोंबडी-स्त्री. एक जलचर कोंबडी. ॰कोळी-पु. मासे खाणारा एक पक्षी. -प्राणिमो ५७. ॰क्या-पु. १ लोकांच्या घरीं पाणी भरून त्यावर उपजीविका करणारा मनुष्य. 'एखादा पाणक्या नवरा मिळता तरी पतकरता.' -मोर ३४. २ (ल.) निरक्षर व धटिंगण मनुष्य. [सं. पानीयक-पाणकअ-पाणका-पाणक्या. -राजवाडे (ग्रंथ- माला).] ॰खार-पु. (कों.) उकडआंबे इ॰ खारविण्यासाठीं पाण्यांत मीठ घालून केलेला खार. [पाणी + खार] ॰गहूं-पु. मोटेच्या, पाटाच्या पाण्यानें होणारा गहूं. [पाणी + गहूं] ॰घर- न. १ पाणी तापवून स्नान करण्याकरितां असलेली खोली; न्हाणी- घर. २ विहीर इ॰ खणतांना जेथें पाणी लागतें तो जमिनींतील खोल थर. [पाणी + घर] ॰घोडा-पु. आफ्रिका खंडांत मोठ्या नद्यांत, सरोवरांत आढळणारा एक अजस्त्र पण निरुपद्रवी प्राणी. याचा रवंथ करणाऱ्या प्राण्यांत समवेश होतो. याचा रंग काळसर तपकिरी असतो. याच्या कातड्याच्या ढाली करतात. -ज्ञाकोप ६७. (इं) हिपॉपोटेमस् [पाणी + घोडा] ॰घोणस-पु. पाण्यांत असणारी सापाची एक निरुपद्रवी जात. [पाणी + घोणस] ॰चक्की- स्त्री. पाण्याच्या जोरानें, साहाय्यानें चालणारी चक्की. [पाणी + चक्की] ॰चट-वि. १ ज्यास गोडी कमी आहे असा (द्रव पदार्थ); बेचव. २ (ल.) शुष्क; बाष्कळ; नीरस; अर्थशून्य (बोलणें, लेखन, गाणें, बोलणारा, लिहिणारा, गाणारा इ॰). 'शेवटीं आपल्या निस्सीम भक्तांकडूनहि वरच्या सारख्या पाणचट प्रशंसे- पेक्षां अधिक कांहीं सर्टिफिकीट मिळूं नये ...' -टि १.१.२६४. [पाणी + छटा] ॰चूल-स्त्री. पाणघरांतील, स्नानाचें पाणी इ॰ तापविण्याची चूल. 'तेथें पाणचुलींत विस्तव घालून त्यावर पाणी तापत ठेविलें.' -कोरकि ५१२. [पाणी + चूल] ॰चोरा-रा-पु. गारोड्याजवळील पाणी भरण्याचें सच्छिद्र पात्र. 'पाणचोऱ्याचें दार । वरील दाटलें तें थोर ।' -तुगा २५८३. [पाणी + चोर] ॰जंजाळ-न. (कों.) पर्जन्य, पाण्याचा पूर इ॰कानीं जिकडे तिकडे होते ती जलमय स्थिति. 'बहू पाणजंजाळ देखोनि डोळां ।' -राक १.३२. [पाणी + जंजाळ] ॰जांवई-पु. (थट्टेनें) जांवयाचा भाऊ; पडजांवई. [पाणी + जांवई] ॰झुकाव-पु. पाणी बाजूनें टिपकवून लावण्यासाठीं दरवाज्यावर केलेलें झुकाऊ कारनिस, गलथा; पाणकारनिस. -राको ५९२. [पाणी + झुकविणें] ॰झेली- स्त्री. (चेंडू, विटीदांडू इ॰ खेळांत) झाडावरून खालीं पडतांना किंवा पाण्यांतून चेंडू, कोललेली विटी इ॰ जमिनीवर पडण्यापूर्वीं झेलणें. याच्या उलट आणझेली. [पाणी + झेलणें] ॰टका- टक्का-पु. पाटस्थळ जमिनीवरील एक लहानसा कर. [पाणी + टक्का] ॰टिटवी-स्त्री. तांबडा कल्ला असलेली टिटवीची एक जात. पाणड्या, पाणाडी-ड्या-वि. जमीनींत कुठें किती खोल खणलें असतां पाणी लागेल हें काहीं आडाख्यांच्या सहाय्यानें जाणणारा. [पाणी] पाणढाळ-पु. पाणी वाहून जाण्याजोगा जमीन, छपराचें पाखें इ॰कांस दिलेला, असलेला उंचसा उतार; सखलपणा. -वि. पाणी वाहून जाण्यायोग्या उतारानें युक्त, उंच उतारीची (जमीन इ॰). [पाणी + ढाळ = उतार] ॰ताव-पु. सोनें, चांदी इ॰ तापवून पाण्यांत बुडवून त्याचा कस पाहण्याची पद्धत; याच्या उलट सुकताव = सोनें इ॰ तापवून नुसतेंच थंड करणें. [पाणी + ताव] ॰तीर-पु. (युद्धशास्त्र) स्फोटक व ज्वालाग्राही पदार्थांनीं भरलेलें चिरूटासारखें निमुळत्या आकाराचें एक युद्धोपयोगी साधन. याचा व्यास दीड-दोन फूट असून लांबी सहा यार्ड असते. याच्या आघातानें मोठमोठीं जहाजें समुद्राच्या तळाशीं जातात. (इं.) टॉर्पेडो. -ज्ञाको (प) ६७. 'गेल्या महायुद्धांत योजलेल्या अनेक शस्त्रास्त्रांत पाणतीराचा पहिला नंबर लागेल.' -ज्ञाको. प ६७. [पाणी + तीर = बाण] ॰तुटी-वि. जींतील रसांश, द्रवांश कमी झाला आहे अशी, कांहींशी पिकलेली (पालेभाजी). [पाणी + तुटणें] ॰थरा-पु. घराच्या जोत्याच्या सर्वांत वरच्या थरांतील दगड, चिरा; पाटथर पहा. ॰थरी-स्त्री. १ आंत्रपेशी; प्लीहा. २ प्लीहेचा एक विकार; पोटांतील चीप. ३ प्लीहा, आंत्रपेशी वाढणें. [पाणी + थर] ॰थळ-स्त्रीन. १ पाऊस गेल्यानंतरहि जेथील ओल जात नाहीं व उन्हाळ्यांतहि खणलें असतां पाणी लागतें अशी जमीन. 'आणि पाणथळ असे तेथें भात लावी.' -पाव्ह ११. २ पाटाच्या पाण्यानें भिजणारी जमीन. [पाणी + थळ] ॰दळ-न. (क्व.) पाणथळ अर्थ १ पहा. [पाणी + दळ] ॰दिवड-स्त्रीन.. (कों.) पाण्यांतील सापाची निर्विष जात. [पाणी + दिवड] ॰दोरी-स्त्री. विहीरींतून पाणी काढण्याच्या उपयोगाची दोरी; बारीक दोर. [पाणी + दोरी] ॰नेचा-पु. पाण्यांत. दलदलींत उगव णारी एक वनस्पति; (इं.) हायड्रोटेरिडि. -ज्ञाको. अ २२१. [पाणी + नेचा] ॰पट्टी-स्त्री. पाणकापड पहा. ॰पिकलें, पाण- पीक-न. (कों.) ज्या पिकास सबंध पावसाळ्यांतील पावसाची जरूरी असतें तें पीक; पहिलें पीक; खरीप. याच्या उलट रब्बीचें पीक. [पाणी + पिकणें, पीक] ॰पिता-वि. १ फार पाणी खाल्लेलें; फाजील पावसानें नासलेलें (पिकाचें कणीस इ॰). २ (ल.) पचपचीत; पाणचट; पचकळ; मुळमुळीत (भाषण, कारभार, मस- लत, व्यवहार, गोष्ट, काम इ॰). ३ (झटकन् पाणी पिण्यासारखें) तलख; चलाखीचें; तडफेचें (कृत्य, कृति इ॰). ४ रोखठोक, चोख; स्पष्ट (जबाब, जाब, उत्तर इ॰). [पाणी + पिणें] ॰पिशी-स्त्री. फाजील पावसामुळें न भरलेलें, पोचट राहिलेलें धान्याचें कणीस. ॰पिसा-वि. पर्ज्यनातिरेकामुळें पोंचट, दाणें झडून गेलेलें, दाण्यांनीं न भरलेलें (कणीस इ॰). ॰पिसें-न. वेड; वेडगळपणा; भ्रमिष्टपणा. -शर. -मनको. -वि. वेडगळ; खुळचट. -मनको. [पाणी + पिसें] ॰पेटी-स्त्री. (स्थापत्यशास्त्र) पाण्यांत काम करतेवेळीं पाणी आंत येऊं नये म्हणून कामाभोंवतीं बसविलेली उभ्या फळ्यांची मुंढे मारून केलेली पेटी. (इं.) कॉफरडॅम्. -राको ३६/?/ [पाणी + पेटी] ॰पोई-स्त्री. १ वाटसरूंना, आल्यागेल्यांना पाणी पाजण्या- साठीं केलेली सोय; पन्हेरी. 'येइ भाई येथ पाही । घातलीसे पाणपोई ।' -यशोधन. २ अशा ठिकाणीं आल्यागेल्यांस पाणी देण्याची क्रिया. [पाणी + पोई] ॰फोल-न. (राजा.) भाताच्या फुलांवर पाऊस अतिशय पडल्यामुळें त्यामध्यें होणारें फोल, पोचटपणा; असलें न भरलेलें पोचट कणीस. [पाणी = पाऊस + फोल = पोचटपणा] ॰बुड-स्त्री. पाटाच्या पाण्यानें भिजणाऱ्या जमीनी- वरील कर. [पाणी + बुडणें] ॰बुड-पु. (कों.) पाणकोंबड्यासारखा एक पक्षी. [पाणी + बुड] ॰बुडा-ड्या, पाणिबुड्या- पाणबुड्यी-पु. १ मासे धरणारा कोळी. 'तरी माशालागीं भुलला । ब्राह्मण पाणबुडां रिघाला ।' -ज्ञा १६.४५१. २ पाण्याच्या तळाशीं असलेल्या वस्तू वर काढण्याकरितां पाण्यांत बुडी मारून बराच वेळ पाण्यांत राहण्याचा सराव ज्यास आहे तो; समुद्रांत बुडी मारून मोत्यें वर काढणारा. 'ते वाक्समुद्रिचे पाणबुडे । कीं सारासारसीमेचे गुंडे ।' -ऋ २४. ३ एक प्रकारचा पक्षी. [पाणी + बुडणें] ॰बुडी-स्त्री. १ पाण्यांत मारलेली बुडी; सुरकांडी. (क्रि॰ मारणें). २ पाण्याच्या पृष्ठभागाखालून संचार करणारी युद्धोप- योगी नौका. (इं.) सब्मरीन्. 'तें आरमार पाणबुड्यांच्या आघातामुळें इतउत्तर आपली पूर्वकामगिरी देण्यास कितपत समर्थ राहील....' -टि ३.३.३४८. [पाणी + बुडी] ॰बुडीत-वि. पुरानें, पावसानें जलमय झालेली (जमीन, पीक). [पाणी + बुडणें] ॰बोदाड-वि. (ना.) पाणथळ; दलदलीची (जमीन). [पाणी + बुडणें] ॰भर-भरजमीन-स्त्री. १ नवीनच खोदलेल्या विहि- रीच्या पाण्यानें, ओढ्याच्या, पाटाच्या पाण्यानें भिजणारी शेत जमीन. २ पुराच्या पाण्यानें भिजणारी जमीन. ३ असल्या जमीनीवरील सरकारी सारा. [पाणी + भरणें + जमीन] ॰भर जिराईत-स्त्री. पाटाच्या पाण्यानें भिजणारी परंतु कोरड म्हणून गणली गेलेली जमीन. [पाणभर + जिराईत] ॰भरणीचा- भरीत-भरिताचा-वि. १ पाटाचें पाणी मिळणारें (शेत, मळा इ॰). याच्या उलट कोरडवाय-वाही. २ पाटाच्या, विहिरीच्या पाण्यानें तयार झालेलें, काढलेलें (पीक इ॰). ॰भरा-वि. १ विहिरीच्या, पाटाच्या पाण्याची जरूरी असलेला (गहूं, जोंधळा इ॰). २ सदर पाण्यानें भिजणारी (जमीन). [पाणी + भरणें] ॰भऱ्या-भर्या-पु. पाणक्या; पाणी भरण्याचा धंदा करणारा. [पाणी + भरणें] ॰भाकरी-स्त्री. नदीच्या, तलावाच्या पाण्याच्या पृष्ठभागावर खापऱ्या फेकण्याचा मुलांचा खेळ; भाकरीचा खेळ. 'तें गलबत वाऱ्याच्या सोसाट्यांत सांपडून मुलांच्या पाणभाकरीच्या खेळांतल्या खापरीप्रमाणें भलतीकडे गेलें.' -कोरकि ७७. [पाणी + भाकरी] ॰मांजर-न. मांजरासारखा एक जलचर प्राणी. [पाणी + मांजर] ॰मोट, पाणमोटली-की-मोटळी, पाण्याची मोट-स्त्री. प्रसूतीसमयीं गर्भ बाहेर पडण्यापूर्वी गर्भोदकानें भर- लेली गर्भाशयांतून बाहेर पडणारी पिशवी. (क्रि॰ येणें; पडणें; फुटणें; निघणें) [पाणी + मोट, मोटली = चामड्याची मोठी पिशवी] ॰रस-पु. पूर्वीं रस काढून घेतलेल्या आंब्यांवर पाणी ओतून ते हालवून, चेंदून पुन्हां त्यांपासून काढलेला पाणचट रस. [पाणी + रस] ॰रहाट-पु. पाण्याच्या साहाय्यानें चालणारा रहाट; पाणचक्की. [पाणी + रहाट] पाणरॉ, पाणसर्प-पु. (गो.) पाण्यांत असणारी सापाची एक जात. [पाण + सर्प] पाणलव्हा-पाणलांव-पु. (कों.) पक्षिविशेष; यास निबुड असेंहि म्हणतात. [पाणी + लाव, लांव्हा = पक्षिविशेष] ॰लोट-पु. १ पाणी; वाहून जाईल असा उतार; पाणढाळ २ टेकडीची, डोंगराची उतरती बाजू; उतरण. ३ पाण्याचा जोराचा प्रवाह; लोंढा; झोत; धोत. ४ डोंगरमाथा; जेथें पाणी पडलें असतां तेथें न थांबतां दोहोंबाजूंस वाहून जातें अशी डोंगर माथ्याची धार. उदा॰ सह्याद्रीचा पाणलोट. [पाणी + लोट] ॰वटा-ठा, पाणवथ-वथा-पु. नदी इ॰कांवर गांवचे लोक जेथें पिण्यासाठीं पाणी भरणें, वस्त्रें धुणें इ॰ क्रिया करतात तें ठिकाण. 'दिवसा पाणवठा म्हणुनियां रात्र आम्ही ही धरली ।' -रासक्रिडा १२. 'पौलपट्टणीं येऊनि शुद्ध । पाणवथीं बैसला ।' -नव १८.४३. [पाणि + वर्त्तिकः-वटा] म्ह॰ बारा कोसांवरचा पाऊस, शिंवेचा राऊत, पाणवठ्याची घागर बरोबर गांवांत येतात. ॰वड-स्त्री. पाण्याचे रांजण, घागरी, डेरे इ॰ भरून ठेवण्यासाठीं (घरांत) केलेला ओटा, ओटली. [पाणी + ठाव] पाणवडा- वाडा-पु. पाणवठा पहा. 'क्लेशगांविंचा उकरडां । भवपुरिचां पानवाडां ।' -राज्ञा १६.४०५. [पाणि + वर्त्तिकः] पाणवसा-पु. (कों.) गाई, म्हशी इ॰ गुरांच्या जीवनास हेतुभूत असणारें (गांवचें) पाणी, गवत इ॰ समुच्चयानें; पाणसा. [पाणी + वास] ॰वळ-न. (कों.) पावसाळ्यानंतर कांहीं काळपर्यंत जींत ओलावा टिकून राहतो अशी जमीन; पाणथळ अर्थ १ पहा. २ -वि. बेचव; पाणचट. पाणचट अर्थ १ पहा. [पाणी + ओल] ॰वाट-स्त्री. १ पाणी वाहून जाण्यासारखा उतार; सखल पृष्ठभाग; ओहळ; पाणलोट. 'पाणी पाणवाटें जैसें । आपणचि धांवे ।' -दा ७.९.११. २ पाण्याची वाट. [पाणी + वाट] ॰वारू-पु. (प्राचीन पौराणिक कथांत रूढ) होडी; नाव. [पाणी + वारू = घोडा] ॰शाई- स्त्री. तारस्वार काढण्याकरितां मृदंग इ॰कास लोहकीट इ॰काच्या लुकणाचा, शाईचा देतात तो पातळ थर; याच्या उलट भरशाई. [पाणी + शाई] ॰शेंग-स्त्री. (ल.) मासळी. [पाणी + शेंग] ॰शोष-पु. पाणपोस पहा. [पाणी + सं. शोष = सुकणें] ॰सरकी- स्त्री. पाणसर्‍याचें काम, हुद्दा. पाणसरा पहा. [पाणसरा] ॰सरडें- न. पाण्यांत असणारी एक निर्विष सापाची जात. [पाण + सरडा] ॰सरडें-न. रहाटाची माळ सरूं नये म्हणून बसवितात तें प्रति- बंधक लांकूड. [पाणी + सरा = आडवीतुक्ई] ॰सरा-पु. डोंगराच्या घाटांतील वंशपरंपरागतचा जकातदार. याला वतन व ठराविक हक्क असत. घाटदुरुस्तीचें काम याच्याकडे असे. [पाणी + सरणें ?] ॰सळ-साळ-स्त्री. १ (गवंड्याचा धंदा) बांधकाम इ॰ सम- पातळींत आहे कीं नाहीं हें पाहण्याचें गवंड्याचें साधन; साधणी. (इं.) लेव्हल् बॉटल. २ समपातळी. 'भिंतीचें बांधकाम थराचें असेल तर भिंतीच्या प्रत्येक १८ इंच उंचीस माथा पाणसळींत आणावा व त्यावर पातळ चुन्याचा रद्दा करून घालावा.' -मॅरट १४. ३ पाणी वाहून जाईल असा उतार. [पाणी + सळ] पाणसा-पु. गुराढोरांच्या जीवनोपयोगी असें (एखाद्या ठिका- णचें) गवत व पाणी; पाणवस. 'ह्या गांवचा पाणसा गुरांस मानवत नाहीं.' ॰साप-पु. पाण्यांत असणारी सर्पाची जात. [पाणी + साप] ॰सापूड-स्त्री. घर इ॰कांच्या छपराच्या खालच्या बाजूस वाशांच्या टोंकांजवळ कामट्यांच्या, रिफांच्या, ओंबणाच्या शेवटीं बांधतात ती जाड कामटी; सापूड. [पाणी + सापूड] ॰सासरा-पु. (विनो- दानें) जांवयाच्या भावानें आपल्या भावाच्या सासर्‍यास विनोदानें, थट्टेनें उल्लेखण्याची संज्ञा. जांवयाच्या भावास पाणजांवई असें थट्टेनें म्हणतात त्याप्रमाणेंच हाहि शब्द आहे. ॰सासू-स्त्री. पाण- जांवयानें स्वतःच्या भावाच्या सासूस थट्टेनें उल्लेखण्याची संज्ञा. [पाणी + सासू] ॰साळ-वि. (क्व.) समपातळींत असलेली (जमीन इ॰) [पाणसळ] ॰साळ करणें-जमीन इ॰ समपातळींत आहे कीं नाहीं तें पाहणें. ॰साळ-स्त्री. प्रवासी, वाटसरू इ॰कांना पाणी पुरविण्याच्या सोयीकरतां रस्त्याच्या बाजूस बांधलेली छपरी इ॰; पाणपोई. [पाणी + सं. शाला = घर] ॰साळ, पाण- सळी भात-स्त्रीन. पाटच्या, विहीरीच्या पाण्यावर केलेलें (मळा इ॰तील) भाताचें पीक. [पाणी + साळ] ॰सुरुंग-पु. समुद्रांतील आगबोटी इ॰कांचा नाश करण्याकरितां समुद्राच्या पृष्ठभागाखालीं योजून ठेवण्याचें सुरुंगासारखें आधुनिक युद्धो- पयोगी साधन. 'बंदरांत घातलेल्या पाणसुरुंगांनीं व पाण- बुड्यांनीं हें समुद्रावरील वर्चस्व पोखरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.' -टि ३.३.३५०. [पाणी + सुरुंग] ॰सोस, पाणशोष, पाणसोक-पु. १ ताप इ॰कांत पुनः पुनः लागणारी अतिशय तहान; घशास पडणारी कोरड. २ प्रकृतीला होणारा एक (पुनः पुनः तहान लागण्याचा) विकार. [पाणी + शोष = कोरडें पडणें, होणें] ॰सोळा-पु. दिवडाच्या जातीचा, बांड्या रंगाचा, पाण्यांत राहणारा एक निर्विष साप. -बदलापूर ३४७. पाणि- ढाळ-पु. १ ओहोटी. 'अनुरागाचा निरु ताउनी । पाणिढाळु ।' -ज्ञा ७.९९. २ पाण्याचा ओघ खालीं सोडून देणें. 'पाणिढाळु गिरीशें । गंगेचा केला ।' -ज्ञा १८.१६८८. [पाणी + ढाळणें] पाणीपद-न. (महानु.) तेजाचें स्थान; गांभीर्य; ढाळ. 'परि जाणतां उपहासावें । बोलांचें पाणिपद निहाळावें ।' -शिशु ३६५. [पाणी = तेज + पद = स्थान] पाणिपात्र-न. पाणी प्यावयाचें भांडें. 'एकें हरितलें पाणिपात्र । एकें नेलें पीठ पवित्र ।' -एभा २३.५२०. [पाणि + पात्र = भांडें] पाणिय(ये)डा-पु. (महानु.) पाणवठा. 'आत्मगंगेचां पाणियेडां । थोकला अज्ञान-सीहांचा दडा ।' -भाए १०६. [पाणी + वटा, ठाव] पाणियाडा-डें-ढें- पुन. १ पाण्याचा सांठा; तळें. 'सतरावियेचें पाणियाडें । बळिया- विलें ।' -ज्ञा ९.२१४. 'शुक्रें धरिलें पाणियाडें । अवर्षण पडे बहुकाळ ।' -भाराबाल १.७८. २ जलपात्र. -माज्ञा-कठिणशब्दांचा कोश. [पाणीवडा] पाणिलग-वि. पाण्याच्या सान्निध्यानें राहणारा. 'पाणिलगें हंसें । दोनी चारी सारसें ।' -ज्ञा ६.१७७. [पाणि + लग] पाणिवथा-पु. पाणवठा पहा. पाणिवैद्य-पु. (कों.) विषार इ॰ उपद्रवावर पाणी अभिमंत्रून देणारा वैद्य. [पाणि + वैद्य] पाणीकांजी-न. (व्यापक.) पाणी काढणें व भरणें इ॰ गृहसंबंधीं कामांविषयीं व्यापक अर्थीं योजावयाचा शब्द. [पाणी + कांजी] पाणीचोर-पु. पाणचोर पहा. 'जैसें पाणी चोराच्या द्वारीं । वरील रंध्र दाटिजे जरी ।' -विपू २.६६. [पाणी + चोर] पाणीटाळ-पु. ओहोटी. -हंको, -शर, -मनको. पाणिढाळ अर्थ १ पहा. [पाणी + ढाळ] पाणी तावणें-न. (ना.) आंघोळीचें पाणी तापविण्याचें भांडें किंवा जागा. [पाणी + तावणें] पाणी- दाम-पु. पाणीपट्टी. [पाणी + दाम = किंमत] पाणीदार-वि. १ ज्याच्या अंगीं चांगलें पाणी, तेज आहे असा (हिरा, रत्न, मोत्यें इ॰). २ तीक्ष्ण; चांगल्या धारेचें (शस्त्र इ॰). ३ तेजस्वी; स्वाभिमानी; रग, धमक इ॰कानीं युक्त (मनुष्य, पशु इ॰). [पाणी + फा. दार = युक्त] पाणीपट्टी-स्त्री. म्युनिसिपालिटी इ॰ स्थानिक संस्था नगरवासीयांकडून पाणीपुरवठ्याबाबत घेतात तो कर. 'म्युनिसिपालिटीनें पाणीपट्टी वाढविली.' -के १७.६.३०. [पाणी + पट्टी = कर] पाणीपण-न. पाण्याचा भाव. 'कां गंगा- यमुनाउदक । वोघबळें वेगळिक । दावि होऊनि एक । पाणीपणें ।' -ज्ञा १८.५२. [पाणी + पण = भाववाचक नामाचा प्रत्यय] पाणीपाऊस-पु. १ नद्या, तळीं, विहीरी इ॰कांना पाण्याचा पुरवठा करून देणारा पाऊस. 'पीकपाऊस आहे, पाणीपाऊस अझून नाहीं.' २ पाऊस, पीक इ॰; पाऊसपाणी. [पाणी + पाऊस] पाणीपिसा-वि. स्नान करणें, कपडे धुणें इ॰ पाण्याच्या व्यापारांचें ज्यास वेड आहे असा. पाणीपिसें पहा. 'एक राखे एक शंखे । एक ते अत्यंत बोलके । पाणीपिशीं झाली उदकें । कुश- मृत्तिकें विगुंतलीं ।' -एभा १४.२०९. [पाणी + पिसा = वेडा] पाणीभरा-वि. पाणभरा पहा. पाणीवळ-पु. पाण्यांतला मळ. 'तेणें बहुतीं जन्मीं मागिलीं । विक्षेपांचीं पाणिवळें झाडिलीं ।' -ज्ञा ६.४७१. पाणीशेणी-न. झाड-सारवण, पाणी भरणें इ॰ गृहसंबंधीं स्त्रीनें करावयाचीं कृत्यें समुच्चयानें. [पाणी + शेण] पाणेरा-रें-पुन. पाणी भरलेलीं भांडीं ठेवण्याकरितां केलेली चिरेबंदी ओटली. [पाणी] पाणोटा-ठा, पाणोथा-पु. १ पाणवठा पहा. २ (बे.) नदीचा उतार. [पाणी]

दाते शब्दकोश

राजा

पु १ नृप; नृपति; भूपाल; नरेंद्र; छत्रपति; लहान राज्यें व थोडक्या प्रजा असलेलें संस्थानिक व सरदार यांसहि हा शब्द लागतो. २ (मंडळीचा, टोळीचा) नायक; मुख्य. ३ सजातीय पदार्थसमुच्चयांत श्रेष्ठ मानलेला तो. ४ अन्न, वस्त्र इ॰ पदार्थ यथास्थित असल्यामुळें ते मिळविण्याचे कष्ट किंवा काळजी ज्यास करावी लागत नाहीं असा मनुष्य. ५ गंजिफांच्या बांजूतील मुख्य. पत्त्यांतील एक चित्राचें पान. ६ बुद्धिबळाच्या खेळांत डावांतील मुख्य मोहरा. ७ वर्षांचा शास्ता म्हणून मानलेला ग्रह; वर्षेशग्रह. ८ (ल.) वेडा; मूर्ख; स्वेच्छ वर्तन करणारा मनुष्य. ९ कसरीच्या राणीस म्हणतात. (समासांत) राजपत्नी; राजपुत्र; राजकन्या; राजगुरु; राजपुरोहित; राजोपाध्याय; राजसभा इ॰ ह्याचे मराठी शब्दाशींहि समास झाले आहेत. जसें- राजपसंत; राजदरबार इ॰. राजपद उत्तरपदीं येणारे नायक या अर्थाचे कांहीं सामासिक शब्द- मृगराज = मृगश्रेष्ठ; तीर्थराज = तीर्थांपैकीं मुख्य, सागर किंवा प्रयाग; तसेंच गजराज; सर्पराज; अश्वराज; द्विजराज; देवराज; कविराज; वैद्यराज; पंडितराज; स्वामिराज; गणराज; भूतराज; यक्षराज; वनराज (आपटा किंवा शमी), वृक्षराज, राज- पद पूर्वंपदीं असलेले कांहीं सामासिकशब्द-राजक्रांति; राजशोभा; राजकृपा; राजचित्त; राजमित्र; राजप्रिय; राजाश्रय; राजाश्रित; राजबुद्बि; राजसखा; राजरंग; राजमहाल; राजवटी इ॰. [सं. राज् = प्रकाशेणें] (वाप्र.) राजापासून रंकापर्यंत-श्रीमंतापासून तों गरीबापर्यंत; सर्व दर्जाच्या लोकांत. 'ब्राह्मणाला राजापासून रंकापर्यंत मान मिळत असे.' राजा याचें राज असें रूप होऊन झालेले कांहीं सामाशब्द- ॰अंबीर-पु. १ (शृंगारिक काव्य) गंभीर स्वभावाचा, सभ्य नायक. -वि. बादशाही; भव्य; नामी; उत्कृष्ट (मनुष्य, देश, पोषाख, बोलण्याची ढब, कोणतीहि गोष्ट). [सं. राजा + अर. अमीर] ॰आवळी-स्त्री. आवळीचा एक प्रकार. या झाडास फळें लहान येतात. हीसच हरपररेवडी, रानआवळी असेंहि म्हणतात. ॰कडी-स्त्री. विशिष्ट प्रकारची कानांतील कडी; एक कर्णभूषण. ॰कवि-पु. दरबारी कवि. [सं.] ॰काज-कारभार- नपु. राज्यकारभार; राज्यासंबंधीं सर्व प्रकारचें काम. ॰कारण- १ राज्यासंबंधीं मसलत; खोल व गूढ मसलत, कल्पना. 'राज- कारण बहुत करावें ।' -दा ११.५.१९. २ गुप्त निमित्त, गूढ (एखाद्या गोष्टीचें). 'भिंतीस किती सारवलें, लिंपिलें तरी चीर पडते याचें राजकरण कांहीं समजत नाहीं.' ३ शासनसंस्थे- संबंधीं गोष्टी; राजनीती; (इं.) पॉलिटिक्स. 'बिझांटबाई तरुण मुलांनीं राजकरणांत पडूं नये असें सांगतात.' -केले १.१९. ॰कारणी-वि. खोल मसलत कारणारा; मुत्सद्दी. ॰कारभार- पु. राज्यव्यवस्था. ॰कारस्थान-न. राजकीय मसलत, कल्पना, बेत, चतुराई; राज्याची मसलत. ॰कार्य-न. १ राजकीय कर्तव्यें, काम; राज्याचीं कामें. २ राजाचें काम. ३ राजाचें शासन, कायदा, कृत्य. [सं.] ॰किंकर-पु. राजाचा चाकर; सरकारी नोकर, शिपाई, जासूद इ॰ [सं.] ॰किशोर-पु. राजाचा मुलगा. [सं.] राजकी-पु. राजाचा नोकर. 'राजकी म्हणती आमुचें घर ।' -दा १.१०.४६. -वि. राजापासून उत्पन्न होणारी; राजाच्या संबंधाची (सत्ता, जुलूम, कृत्यें). याच्या उलट देवकी. 'दुसर्‍या राज्यांत गेल्यानें राजकी उपद्रव टाळायास येईल पण देवकी उपद्रवापुढें उपाय चालत नाहीं.' [राजीक] राजकीय- वि. राजासंबंधीं; राजाचा; राजविषयक (व्यवहार, कारभार, मनुष्य इ॰) [सं.] ॰कीय कैदी-पु. राजद्रोहामुळें तुरुंगांत कद केलेला राजकरणी पुरुष; सरकारविरुद्ध अराजकता माजविणारा म्हणून कैद केलेला मनुष्य. ॰कीय बंदी-पु, सरकारी कैदेंत अडकलेला कैदी; राजद्रोही बंदिवान. ॰कीय व्यवहार-पु. १ राज्याचें काम. २ राजनीति. [सं.] ॰कीय सभा-स्त्री. राजका- रणासंबंधीं सभा; (इं.) पोलिटिकल मिटिंग. 'क्वचित एखादा सरकारी नोकर आपल्या मुलांना राजकीय सभांना जाण्यास प्रति- बंध करतो.' -केले १.२३३.[सं.] ॰कुमर-कुंवर-री- कुमारी-स्त्री. राजाची कन्या. [प्रा.] ॰कुमार-कुंवर-पु. १ राजाचा मुलगा; राजपुत्र. २ पुनर्वसु नक्षत्र. [सं.] ॰कुल-न. राजघराणें; राजवंश. [सं.] ॰केळ-ळी-ळें-स्त्रीन. केळीची एक जात व तिचें फळ. ॰क्रांत-क्रांती-स्त्रीन. १ राज्याची उलथापालथ; राज्यव्यवस्थेंत मोठी उलाढाल, खळबळ, बदल. २ युद्ध, शत्रूचें आक्रमण इत्यादीमुळें माजलेली गडबड, गोंधळ, वगैरे नासधूस. ३ राजाचा जुलूम, अन्याय. [सं.] ॰गादी-स्त्री. राजाची गादी; सिंहासन. ॰गुह्य-न. राजाचें किंवा राज्यासंबंधीं गुपित, गुढ; गुप्त गोष्ट. ॰गोंड-स्त्री. (शहराचा, गांवचा) मोठा रस्ता. ॰गोंड-पु. गोंडांतील एक श्रेष्ठ जात. ॰गोंडा-पु. पाल- खीच्या दांडीला मध्यभागीं लोंबता बांधलेला, हातांत धरावयाचा गोंडा. ॰घोस-स्त्री एक वेल. हिच्या पानांच्या काढ्याचा देवी इ॰ आजारांत उपयोग करितात. ॰घोळ-स्त्री. घोळ नामक भाजीची एक जात. ॰चिन्ह-न. १ राजेपणाचें चिन्ह; राजाचें छत्र, चामर इ॰ वैभव. २ (सामुद्रिक) नशीबीं सिंहासनावर बसण्याचा योग आहे असें दाखविणारी खूण, लक्षणविशेष किंवा विशेष गोष्ट. (आजानुबाहुत्व इ॰) ३ राजाची मोहोर, शिक्का, किंवा सही (नाणें, पत्र इ॰ कांवरील). ४ (राजाच्या सह्या अस्पष्ट, वाचण्यास कठिण असतात यावरून ल.) फरपट्यांचें, बिरखुडी, वाईट लपेटीचें, दुर्बोध अक्षर. [सं.] ॰टिटवी-स्त्री. पिवळसर रंगाची टिटवी. ॰तिलक-पु. १ राजांमध्यें श्रेष्ठ; सार्वभौम राजा. २ राजाटिळा. ३ राज्याभिषेक. [सं. राजा + तिलक] ॰तुरा-पु. एक फुलझाड व त्याचें फूल. ॰तेज-न. राजाचें तेज, वैभव, ऐश्वर्य. [सं.] ॰तख्त-न. १ राजाचें सिंहासन. २ राजधानी. 'किल्ला रायगड राजतख्त.' -चित्रगुप्त १६७. ॰त्व-न. राजेपणा; राजाधिकार; राजपद. [सं.] ॰दंड-पु. १ राजानें केलेली शिक्षा. २ राजानें बलविलेला दंड. ३ जातिबहिष्कृत केलेल्या मनुष्यास जातींत परत घेतांना त्यानें राजास द्यावयाचा दंड. ४ राजाच्या हातांतील अधिकारदर्शक काठी. ॰दंत-पु. चौकडीचे दांत; पदार्थ तोडावयाचे दांत; पुढील दांत. [सं.] ॰दरबार-१ राजाची कचेरी; न्यायसभा. २ प्रजेचीं गार्‍हाणीं ऐकण्याकरितां बसावयाची राजाची जागा. ॰दरबारी-वि. राज्यासंबंधी. ॰दर्शन-न. राजाचें दर्शन; राजाची भेट. 'राजदर्शन म्हणजे मोटा लाभ.' [सं.] ॰दुहिता-स्त्री. राजाची मुलगी. 'वर शिशुपाळ ऐकतां । दचकली ते राजदुहिता ।' -एरुस्व २.४१. [सं.] ॰दूत-पु. राजाची नोकर हुजर्‍या, सेवक; जासूद. [सं.] ॰द्रोह-पु. १ सरकाराबद्दल अप्रीति; राजाविरुद्ध कट, बंड; फितुरी. २ राज्य व राजसत्ता याविरुद्ध गुन्हा. ३ (कायदा) बादशाहाविरुद्ध किंवा ब्रिटिश अमलाविरुद्ध द्वेष, तिरस्कार किंवा बेदिली बोललेल्या किंवा लिहिलेल्या शब्दांनीं किंवा खुणानीं किंवा इतर रीतीनीं उत्पन्न करणें; (इं.) सिडिशन्. ॰द्वार-न. १ न्यायाच्या कचेरीचा राजवाडा; राजदरबार. २ राजवाड्याचा दरवाजा. [सं.] ॰धन- न. राजाचा महसूल, उत्पन्न. [सं.] ॰धर्म-पु. १ राज्यकारभार चालविण्याकरितां मार्गदर्शक असा शास्त्रांत सांगितलेला कायदा, अनुशासन. २ राजास योग्य किंवा शोभणारा गुण, राजगुण. कार्योपदेशकैशल्य, प्रागलभ्य इ॰). 'जे राजधर्म सुरतरू सख मखसे सुखद उत्सवद नाकीं ।' -मोसभा १.१५. ३ राजाचें कर्तव्य विशेष काम. [सं.] ॰धातु-पु. कित्येक कवींनीं लोखंडास हें नांव दिलें आहे । ॰धानी-नगरी-स्त्री. राजाचें राहण्याचें मुख्य शहर. [सं.] ॰धान्य-न. एक धान्य; सांवा. [सं.] ॰धारी- पु. एक प्रकारचा तमाशा. -कलावंतखातें (बडोडें) १३८. ॰निष्ठ- स्त्री. राजाविषयीं, सरकाराविषयीं आदर दाखविणारा. ॰निष्ठा- स्त्री. राजासंबंधीं, सरकारसंबंधीं आदर, पूज्यबुद्धि. 'राज्यपद्धतीं- तील दोष अधिकार्‍यांच्या नजरेस आणणें हीच खरी राजनिष्ठा.' -टिसू २१५. [सं.] ॰नीति-स्त्री. १ राजव्यवहारशास्त्र. आन्वी- क्षिकी किंवा तर्कविद्या, त्रयी किंवा धर्म विद्या, वार्ता किंवा अर्थ- विद्या व दंडनीति असे चार राजनीतीचे भेद आहेत. २ नीति; नीतिशास्त्र. [सं.] ॰नील-नीळ-न. नीलमणी. [सं.] पंचक- न. ज्यांत राजपासून जुलूम किंवा नासधूस होते असा ज्योति- षीय गणितानें येणाके काल. अग्निपंचक, चौरपचक, मृत्युपंचक, हानिपंचक इ॰ पहा. [सं.] ॰पट्ट-पु. राजाचा शित्ताज; राजाचें ललाटपट्ट. [सं.] ॰पत्नी-स्त्री. राजाची स्त्री; /?/. [सं.] ॰पत्र-न. राजाचें पत्र; देणगीपत्र; सनद. 'ब्राह्मण स्थापिले वृत्ति- क्षेत्रीं । ते ते अक्षयीं राजपत्रीं ।' -मुसभा ६.५६. [सं.] ॰पद- न. राजाचा अधिकार, दर्जा; राजत्व. ॰पद्धति-त-स्त्री. राजास योग्य अशी रीति, चाल, वहिवाट. [सं.] ॰पसंत-द-वि. राजे व अमीर उमराव यांस असणारा; सर्वोत्कृष्ट; उंची; खासा; नामी. [सं. राजा + फा. पसन्द] ॰पिंडा-पु. देखणा व छबी- दार मनुष्य; राजबिंडा. [सं. राजा + पिंड] ॰पीठ-न. १ राजाचें आसन; राजाचें सिंहासन. २ राजाधानीचें शहर. [सं.] ॰पीढी- पु. (महानु.) राजपुरुष. 'रवमदें पातले राजपीढी ।' -गस्तो ४६. [राजा + पिढी] ॰पुत्र-पु. १ राजाचा मुलगा. २ क्षत्रिय. [सं.] ॰पुरी-स्त्री. बादशाही शहर; राजधानी. [सं.] ॰पुरुष-पु. १ सरकारी अधिकारी, नोकर. २ राजाच्या चाकरींतील कोणीहि लहान- मोठा मनुष्य. [सं.] ॰बंदी-पु. राजकैदी; राजकीय गुन्हेगार, बंदिवान. ॰बनसी-वि. राजवंशाचा. हा हिंदुस्थानी शब्द मराठी लावण्यांतून नेहमीं येतो. [राजवंशी; हिं. राजबनसी] ॰बाबती- स्त्री. राजास द्यावयाचा वसुलाचा चौथा भाग. चौथ पहा. ॰बिडा- वि. अतिशय सुंदर व नाजुक पुरुषास म्हणतात; राजसारखा अथवा अत्यंत देखणा; सुंदर आणि तेजस्वी (मनुष्य). [राजा + पिंड] ॰बिदी-स्त्री. राजमार्ग. 'इंद्रियग्रामींचा राजबिंदी ।' -ज्ञा ७.१०६. ॰बीज-वि. १ राजाच्या बीजाचा, वंशाचा. २ (ल.) सुस्वभावी व सुंदर मुलास म्हणतात. ॰बीध-स्त्री. (शहराचा) मुख्य; मोठा रस्ता; राजबिदी. ॰बेत-(को.) राजदंड. [राज वेत्र] ॰भाग-पु. राजाचा भाग; सरकारस द्यावयाचा कोणत्याहि उत्पन्नाचा भाग. [सं.] ॰भार्या-भाजा-स्त्री. राजाची पत्नी; पट्टाभिषिक राणी. 'येरु बोले पाहीन पिता माझा । नको जाऊं मारील राजभाजा ।' -ध्रुवाख्यान ४ (नवनीत पृ. ४११). [सं.] ॰भोग-पु. सरकारचा हक्क. [सं.] ॰भ्रष्ट-वि. राज्यावरून निघा- लेला. ॰मंडल-ळ-न. १ राजांचा समुदाय. २ राजकीय मंडल; राजभृत्य; राजपुरुष; बादशाहा भोंवतालचे अमीरउमराव इ॰ [सं.] ॰मंत्र-पु. राजाचा बेत, उद्देश. [सं.] ॰मद-पु. राज्याचा गर्व, दर्प. [सं.] ॰मंदिर-न. १ सौध; राजवाडा. २ (लावणी, शृंगारविषयक काव्य इ॰ कांत) विलासंमदिर; रंगमहाल; अंत: पुर इ॰ [सं.] ॰महाल-पु. राजवाडा. ॰मान्य-वि. १ राजानें मान देण्यास योग्य; पूज्य; श्रेष्ठ; वरिष्ठ; २ ज्याला पत्र पाठवा- वयाचें असतें किंवा ज्याचा उल्लेख करावयाचा असतो त्याला सन्मानार्थ कागदोपत्रीं हें विशेषण लावतात. ३ सर्वांस पसंत पडेल असें. 'हा एक राजमान्य उपाय आहे ।' [सं.] ॰मार्ग- पु. १ राजाचा हमरस्ता; सार्वजनिक रस्ता. २ (ल.) सर्व लोकांनीं मान्य व पसंत केलेली चाल, वहिवाट, रहाटी. [सं.] ॰माष-पु. एक कडधान्य. [सं.] ॰मुद्रा-स्त्री. १ राजाची मोहार; चिता शिक्का; ठसा. २ राजाच्या छापाचें नाणें. [सं.] ॰मोहरा-मोहोरा-वि. १ शहाणा; शूर किंवा विद्वान् (मनुष्य); विद्या, शौर्य इ॰ गुणांनीं प्रसिद्ध असलेला, तेजस्वी (पुरुष). 'या राज्यांत नानाफडनवीस एक राजमोहरा होता.' २ देखणा व छबीदार (मनुष्य); राजबिंडा. ॰यश-न. राजाचें, राज्याचें यश; कीर्ति. 'राजयश वर्णितां वर्णितां भाट शिणले ।' [सं.] ॰यक्ष्मा- पु. क्षयरोगाचा एक भेद; कफक्षय. [सं.] ॰योग-पु. १ हठयो- गाहून भिन्न असा योगाचा साधा व सोपा प्रकार; प्राणनिरोध इ॰ न करितां अंत:करण एकाग्र करून भगवत्स्वरूपीं लावण्याचा उपाय. 'राजयोगतुरंगीं । आरूढला ।' -ज्ञा १८.१०४७. २ राज्य मिळ- वून देणारा पत्रिकेंतला ग्रहयोग. ३ श्रेष्ठ, सर्वोत्कृष्ठ योग; प्रापं- चिक वैभव व संपत्ति हीं उपभोगीत असतांहि त्यांहून आत्म्याची भिन्नता ओळखून आत्मचिंतनाचा अभ्यास चालू ठेवणें. [सं.] ॰योगी-पु. राजयोग करणारा मनुष्य; हठयोगीच्या उलट. [सं.] ॰रा-स्त्री. (नेहमीं अनेकवचनी उपयोग) कुलाचारच्या प्रसंगीं तबकांत ठेविलेल्या देवीच्या सात मूर्ती. [सं. राजश्वेरी = एक देवी] ॰राज-पु. राजाधिराज; राजांचा राजा; बादशाहा. [सं.] ॰राजेश्वर-पु. सम्राट; बादशाहा; सार्वभोमराजा. [सं.] ॰राणी- स्त्री. राजाची मुख्य पत्नी; पट्टराणी. [सं.] ॰रीति-स्त्री. १ राजांस योग्य अशा रीति, पद्धति, सरणी, मार्ग. २ सर्वमान्य पद्धति. [सं.] ॰रु(रो)शी-स्त्री. सार्वजनिक आणि स्वतंत्र परवानगी; उघड व पूर्ण स्वतंत्रता; मुभा. 'पोरांस सुटीच्या दिवसीं खेळायास राजरूशी असती.' [सं. राजा + फा. रूशन] ॰रू(रो)स- श-ष-क्रिवि. उघडपणें; प्रसिद्धपणें; स्वतंत्रपणें; अनियंत्रितपणें; बेधडक. 'तो राजरोस इराणीच्या दुकानांत जाऊन चहा पितो' २ दिवसाढवळ्या. [सं. राजा + फा. रूशन, रोशन्; रोश-इ-रौशन] राजर्षि-पु. तपश्चर्येनें ज्यानें ऋषि ही उच्च पदवी मिळविली आहे असा क्षत्रिय; तपस्वी क्षत्रिय; राजांमधील ऋषि. 'राजर्षि महर्षि सकळ येथें न्यूनाचि भूमिपाळ सभा ।' -मोसभा १.१०. [सं. राजा + ऋषि] ॰लव्हा-न. १ पक्षिविशेष. याचे मोठा व लहान असे दोन भेद आहेत. ॰लक्षण-न. १ राजत्वाचें सूचक एखादें स्वाभाविक चिन्ह. २ (छत्र, चामर इ॰) राजाचिन्हांपैकीं कोणतेंहि चिन्ह. [सं.] ॰लेख-पु. राजाचें पत्र; सनद. [सं.] ॰वट-वटा-टी-पुस्त्री. १ एखाद्या राजाचा, राज्याचा, अंम- लाचा, कारकीर्दीचा काल; कारकीर्द. 'विक्रमाचे राजवट्यांत सर्व लोक सुखी होते.' २ अंमलाचा, वजनाचा काल; (सामा.) चलतीचा काल. ३ सामान्य चाल, रीत, संप्रदाय, वहिवाट. 'आमचा सकाळीं जेवण्याचा राजवटा नाहीं.' -क्रिवि. राज्यांत; अमलांत; कारकीर्दीत. 'वडिलांचे राजवटा ही गोष्ट घडली नाहीं.' [राज्य + वर्ति] ॰वंटा-पु. हमरस्ता; राजमार्ग. [राजा + वाट] राजवर्खी बांगडी-स्त्री. एक प्रकारची बांगडी. ॰वंश-पु. राजाचें कुल. [सं.] ॰वंश्य-वि. राजाच्या कुळांतील, वंशांतील. [सं.] ॰वनसी-वि. राजघराण्यांतील. [सं. राजवंशी] ॰वळ, राजावळी-स्त्री. राजाचीं अक्षरें (सही); राजाचा शिक्का; राजमुद्रा. 'तर्‍ही राजावळीचीं अक्षरें ।' -ज्ञा १७.३२२. ॰वांटा-पु. १ मुख्य वांटा, मोठा हिस्सा. 'तो सुखदु:खाचा राजवांटा ।' -ज्ञा ८.१८४. २ राजाचा भाग. ॰वाडा-पु. राजाचा वाडा; राजमंदिर; प्रासाद. ॰विद्या-स्त्री. सर्व विद्यांमध्यें श्रेष्ठ विद्या. 'या दोन्ही कारणांमुळें राजविद्या शब्दानें भक्तिमार्गच या ठिकाणीं विवक्षित आहे असें सिद्ध होतों.' -गीर ४१५. [सं.] ॰विलास-पु. राजाचीं सुखें व करमणुकी; उच्च प्रकारचीं सुखें व क्रीडा. [सं.] ॰विलासी-वि. राजासारखीं सुखें भोगणारा; राजविलास करणारा; राजविलासांचा शोकी. [सं.] ॰वेत्र-न. राजदंड. [सं.] ॰वैद्य-पु. १ वैद्यशास्त्रपारंगत असा उत्तम वैद्य. २ राजाचा वैद्य. [सं.] ॰व्रत बांगडी-स्त्री. बांगडीची एक जात. ॰शक-पु. ज्येष्ठ शुद्ध १३, आनंदनाम संवत्सर, शके १५९६. या वर्षी शिवाजी महाराजांनीं आपल्या राज्योराहणानिमित्त सुरू केलेला शक. कोल्हापूर व इतर कांहीं संस्थानांत हा चालतो. [सं.] ॰शय्या-स्त्री. सिंहासन; राजाची शेज. [सं.] ॰शासन-न. १ राजाची आज्ञा. २ राजा अपराध्यांना जें शासन करतो तें. [सं.] ॰शोभा-स्त्री. राजाची शोभा; राजाचें तेज, कांति इ॰. [सं.] ॰श्रियाविराजित-वि. १ राजाच्या तेजानें व शोभेनें विभूषित; लक्ष्मीनें राजासारखा सुशोभित असा. २ बरोबरीच्या गृहस्थास पत्र लिहावयाचें असतां त्याच्या सन्मानार्थ हा शब्द त्याच्या नांवापूर्वीं विशेषणाप्रमाणें योजतात; पत्राचा मायना. [सं.] ॰श्री-पु. १ राजाची पदवी; राजाचें वैभव; राजासंबंधीं बोलतांना सन्मानार्थ योजावयाचा शब्द. 'एव्हां राजश्रीची स्वारी कचेरीस आहे.' २ सामान्य माणसास पत्र लिहितांना त्याच्या नांवांपूर्वीं हा शब्द आदरार्थं योजतात. ३ (विनोदार्थी) विचित्र, तर्‍हेवाईक माणूस. ४ (सामा.) गृहस्थ. 'आतां हे राजश्री माज्या भीमास पाणि लावून ।' -मोस्त्री २.२९. ॰सत्ता-स्त्री. १ राजाची सत्ता, कायदे- शीर अधिकार. २ राजाची थोरवी, कदर, भारदस्ती. [सं.] ॰सदन-न. राजवाडा. [सं.] ॰सभा-स्त्री. राजाची सभा, कचेरी; राजाचा दिवाणखाना; दरबार. [सं.] ॰स्थान-न. राजाची राहण्याची जागा. ॰सूय-पुन. सार्वभौम राजानें करावयाचा यज्ञ (हा यज्ञ सार्वभौमत्वाच्या द्योतनार्थ राज्याभिषेक समयीं मांडलिक राजांसह करावयाचा असतो). अथवा राजा (सोम- लता) याचें सवन, (कंडन) ज्यांत करताता तो यज्ञ. 'देवर्षि म्हणें नृप तो सम्राट् प्रभु राजसूयमखकर्ता ।' -मोसभा १.४६. [सं.] ॰हत्या-स्त्री. राजाची हत्त्या; खून. [सं.] ॰हत्यारा-वि. राज- हत्त्या-करणारा. ॰हंबीर-पु. राजअंबीर पहा. ॰हंस-पु. १ चोंच आणि पाय तांबडे व वर्ण पांढरा असा पक्षी. दूध व पाणी एकत्र केलीं असतां त्यांतून दूध तेवढें वेगळें करण्याची शक्ति याला आहे असें मानितात. 'राजहंसाचा कळप पोहताहे ।' -र ९. २ (लावण्या, शृंगारिक काव्य) प्रियकर; नायक. ३ एक झाड. हीं झाडें लहान भुइसरपट असतात; पानें बारीक व जोडलेलीं; यास तांबूस रगाचीं बारीक फुलें व बारीक शेंगा येतात. [सं.] राजांगण-गणें-न. १ राजाच्या, श्रीमंत लोकांच्या वाड्यापुढें रिकामी राखलेली मोकळी जागा. २ राजवाड्याच्या समोरचा चौक. ३ चौसोपी घरास मध्यें असलेलें चतुष्कोणी अंगण. 'पैस नाहीं राजांगणीं ।' -दावि ५०४. [सं.] राजागर-न. १ राजाचा बाग. 'सुटली तरी राजागरीं मरें ।' -एभा ११.५५८. २ रायभोग तांदुळाचें शेत. 'तेणें पिंकती केवळ राजागर ।' -एभा २७.२०२. ॰धिकार- पु. राजाचा अधिकार. [सं.] राजाधिपति, राजाधीश-पु. राजाधिराज. [सं.] राजाधिराज-पु. राजांचा राजा; सार्वभौम; अनेक मांडलिकांवरचा मुख्य राजा. [सं.] राजानुकंपा-स्त्री. राजाची कृपा, दया. [सं.] राजानुग्रह-पु. राजाची प्रसन्नता. [सं.] ॰पुरी-वि. राजापूर गांवासंबधीं (गूळ, हळद, भाषा इ॰). राजाप्रधान सोडणें-(बायकी) चातुर्मासांत भात व वरण हे मुख्य पदार्थ वर्ज्य करणें. राजाभिषेक-पु. राज्यारोहणप्रसंगीं महानद्या, समुद्र इ॰ कांचें पाणी आणून त्यानें अमात्य, पुरोहि- तादिकांनीं मिळून राजावर विधिपूर्वक अभिषेक करावयाचा, राजाला, गादीवर बसविण्याचा समारंभ. [सं.] राजाम्लक-की-पुस्त्री. रायआवळा-ळी पहा. [सं.] राजावर्त, लाजवर्द-पु. हलका, कमी प्रतीचा हिरा (इं.) लपिसलॅझूली. याचा मुख्य रंग निळा; कधीं तांबूस पिवळाहि सांपडतो. [सं.] राजावली-स्त्री. राजांची परंपरा; राजाचें घराणें; राजवंश. [सं.] राजावळ-स्त्री. १ तांदुळाची एक जात. २ तांबड्या रंगाच्या लुगड्याचा एक प्रकार. ३ वर्षाचा अधिपति; मंत्री इ॰ ग्रह दाखविणारा पचांगाच्या आरंभीचा भाग; संवत्सर फल. राजावळी-वि. राजानें काढ- लेली (ओळ). 'तर्‍ही राजावळीचीं अक्षरें ।' -ज्ञा १७.३२२. राजासन-न. राजाचें सिंहासन; तख्त. [सं.] राजाळूं-न. पांढर्‍या अळवाची जात. ह्याच्या पानाचा देठ लांब व जाड आणि कांदा मोठा असतो. राजाळें-न. केळ्याची एक जात. राजाज्ञा- पु. राजाच्या प्रधानांपैकीं (अष्टप्रधानांपैकीं नव्हे) एक. -स्त्री. १ राजाची आज्ञा, शासन. २ निखालस व खसखशीत हुकूम; आदेश; आज्ञा. राजिक-वि. राजकीय. 'राजिक देविक उद्वेग चिन्ता ।' -दा ११.३.५. राजी-स्त्री. गंजिफांतील शब्द; राजेरी देणी. [राजा] राजीक-न. १ राजाचा जुलूम; अन्याय; राजापासून उत्पत्र होणारीं सतटें व दु:खें; याच्या उलट दैविक. २ सैन्याच्या स्वार्‍यांमुळें होणारी नासधूस; धूळधाण. ३ राजाचें काम; लढाई व तिच्यामुळें होणारी अव्यवस्था. ४ क्रांति; बंड. [राजा] राजी बेराजी, राजीक बेराजिक-स्त्रीन. निर्नायकी; बेबंदशाही; एक राजा गादीवरून दूर झाल्यापासून दुसरा येईपर्यंतचा मधील काळ. [राजीक] राजेंद्र-पु. १ राजांचा राजा; बलाढ्य राजा. २ राजअंबीर. [सं.] राजेरजवाडे-पुअव. राजे; संस्थानिक; सरदार इ॰. राजेश्री-वि. १ राजश्री याचें अशुद्ध रूप. २ (ल.) मूर्ख माणुस. 'हे राजेश्री दुसर्‍याला तोंडघशी पाडण्याऐवजीं आप- णच पडेल.' -के २४.६.३०. राजेश्वरी-स्त्री. शिवाची अथवा ईश्वराची पत्नी; देवी. [सं.] राजेळ-ळी, राजकेळ-स्त्री. न. केळीची एक जात व फळ. हे केळें ६ ते १२ इंच लांब व तिधारी असतें. ह्याचीं सुकेळीं करतात. राजैश्वर्य-न. राजाचें ऐश्वर्य, वैभव, थाटमाट. [राजा + ऐश्वर्य] राजोट-टी, राजोटा-स्त्रीपु. राजवट; राजवटा पहा. राजोट्या-पु. १ कुटुंबांतील कर्ता पुरुष; घरांतील मुख्य कारभारी. २ (ना.) लुडबुड करणारा, चोंबडा मनुष्य. राजोपचार-पु. १ राजत्वास योग्य असे आदर, उपचार; राजास उचित असे उपचार (छत्र धरणें, चवरी-मोरचेल वारणें इ॰). २ सात्विक, सौम्य औषधयोजना, शस्त्रक्रिया इ॰ नाजूक प्रकृतीच्या माणसास सोसण्याजोगा ओषधादि उपचार. [सं. राजा + उपचार] राज्य-न. १ प्रजेपासून कर घेऊन तिचें पालन करणें असा राजाचा अधिकार किंवा काम. २ राजाचा अंमल; हुकमत. ३ राजाच्या सत्तेखालवा प्रदेश. ४ राष्ट्र; कायद्यानें राहण्यासाठीं संघटित झालेलें व एका विशिष्ट देशांत राहणारें लोक (ही व्याख्या वुड्रो विल्सन यांची आहे); किंवा एका ठराविक प्रदेशांत दंडशक्तीच्या सहा- य्यानें न्याय व शांतता प्रस्थापित करण्यासाठीं स्थापित केलेला मनुष्यांचा समाज. ५ कोणत्याहि व्यवहारांत दुसर्‍यास न जुमा- नतां स्वतंत्रपणें वागण्याजोगें एखाद्याचें आधिपत्य असतें तें. त्याचें घरांत सारें बायकांचें राज्य झालें आहें.' ६ खेळांतील डाव, हार. [सं. राजन्] ॰क्रांत-क्रांति-स्त्री. राज्याधिकार्‍यांत आणि राज्यपद्धतींत जबरदस्तीनें घडवून आणलेली उलथापालथ. [सं.] ॰घटना-स्त्री. राज्यव्यवस्थेसंबंधीं मूलभूत कायदे वगैरे. ॰घटना मोडणें-राज्यघटनेच्या कायद्यांत ज्या पद्धतीनें राज्य- कारभार चालवा असें नमूद केलें आहे त्याप्रमाणें कारभार चाले- नासा होणें. -के ५.१.३७. ॰घटना राबविणें-मंत्रिमंडळास जे अधिकार दिले आहेत त्यांचा उपयोग लोकहितवर्धनार्थ कराव- याचाच. पण प्रत्यक्ष कायद्याच्या कलमांतील शब्दानें जो अधिकार दिला नसेल तोहि प्रत्यक्ष व्यवहाराला आवश्यक म्हणून पर्यायानें दिला गेला आहे असें म्हणून त्यांचाहि पायंडा पाडणें.' -के ५.१.३७. ॰पद्धति-स्त्री. राज्यकारभाराचा प्रकार. हिचे राज- सत्ताक, प्रजासत्ताक व राजप्रजासत्ताक असे तीन प्रकार आहेत. [सं.] ॰भार-पु. राज्याचा कारभार करण्याची जबाबदारी, भार, ओझों. [सं.] ॰रीति-स्त्री. शासनपद्धति. 'ज्या राष्ट्राची राज्यरीति उत्कृष्ट आहे त्यास धनसमृद्धि अपायकारक होत नाहीं.' -नि ५३. ॰लोट-स्त्री. राज्यक्रांति; राज्य बुडणें. 'झालिया राज्य- लोट ।' -एभा ३०.३५९. ॰व्यवहार-पु. राज्याचें काम. [सं.] राज्यांग-न. राज्याचीं मुख्य अंगें. हीं स्वामी, अमात्य, सुहृत्, कोश, दुर्ग, राष्ट्र, व बल अशीं सात आहेत. यांतच कोणी पौर- श्रेणी व पुरोहित यांचा समावेश करतात. [सं.] राज्याभिलाष-पु. राज्याचा अभिलाष; दुसरे देश जिंकण्याची किंवा त्यावंर राज्य कर- ण्याची महत्त्वाकांक्षा. [सं.] राज्याभिलाषी-वि. राज्याचा अभि- लाष करणारा. [सं.] राज्याभिषिक्त-वि. सिंहासनावर बसविलेला; ज्यास राज्याभिषेक झाला आहे असा; राजश्रीनें युक्त केलेला. [सं.] राज्याभिषेक-पु. राजाला गादीवर बसविण्याच्या वेळीं विधिपूर्वक करावयाचा अभिषेक; राज्याधिकाराचीं वस्त्रें देणें. [सं.] राज्यासन-न. सिंहासन; राजासन पहा. [सं.] राज्योपचार- पु. सरकारी अधिकार्‍याचें कृत्य. [सं.]

दाते शब्दकोश