आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
स्खलन
स्खलन n Stumbling; falling (morally).
स्खलन n Stumbling; dropping; tripping in speech.
स्खलन skhalana n (S) Stumbling or tripping. 2 Dropping, dripping, falling generally. 3 (For रेतस्खलन) Emissio seminis. 4 fig. Tripping in speech; blundering (whether in the sense or in the pronunciation). 5 Falling (morally); deviating from rectitude; sinning.
(सं) न० खळणें, निघणें. २ चूक, दोष. ३ अडखळणें.
न. १ अडखळणें; घसरणें. २ ठिबकणी; पडणें; गळून पडणें. ३ वीर्यपात. ४ (ल.) तोतरें बोलणें; बोलतांना अडखळणें. ५ नीतिबाह्य वर्तन करणें; पाप करणें. स्खलित-वि. १ दोषी; पातकी; दुर्वर्तनी. २ चुकलेला; अडखळलेला. [सं. स्खल् = पडणें]
संबंधित शब्द
अडख(खु)ळणें
अक्रि. १ ठेंचकळून थांबणे; ठेंचकळणें; धडपडणें; गतिरोध होणें; अडणें. 'अडखुळलों भ्यालों म्हणती ते पतिव्रते।' -वसा ४.२ जिव्हादोषामुळें बोलतांना लागणें, अडणें; चावळणें; चांचरणें; गुटमळणें. 'तिनें भिऊन अडखळत आपलें वर्त- मान सांगितलें.' -पाव्ह ४८. ३ कामांत कचरणें; धरसोड करणें; कांकूं करणें; नानू करणें (अडचणींत) सांपडणें; ४ गुंतणें: हात अड- कणें. [सं. अर्ध + स्खलन; का. अड्ड + खळण].
अडमड
पु. (कों.) लहान मुलाची चळवळ; चुळबूळ; अंगवळा; खोडकरपणा. -ड्या-वि. चपळ; वळवळ्या. ॰णें १ खोड्या करणें; चुळबूळ करणें (लहान मुलाबद्दल वापरतात). २ धडपडणें; ठेंचाळणें; त्रासांत, संकटांत असणें 'मर! राहा मेल्या- सारखा अडमडत.' -झांमू ९. [प्रा. अडवडण = स्खलन; का. आडु माडु = खेळकर]
आखळ
पु. पाऊस नसलेला दिवस; खळ असलेला (पावसाचा) दिवस. [सं. आ+स्खलन]
आखोळ, आखळ
पाऊस नसलेला दिवस; खळ असलेला (पावसाचा) दिवस. [सं. आ + स्खलन]
अवखुळा
पु. आडकाठी; अडथळा. [सं. अव + स्खलन]
अवखुळा
पु. आडकाठी; अडथळा. [सं. अव +स्खलन्]
चूक
गफलत, गल्लत, गलती, गाफिली, राहिलेला दोष, खाडा, स्खलन, अनवधानानें उद्भवलेली विसंगति, घोडचूक, हिमालयाएवढी चूक, अक्षम्य गल्लत, विधान सपशेल चुकीचें आहे, हें गृहीत-वाक्यच ठार चुकीचे आहे, त्यांच्यांत मुळांत एकवाक्यता नाहीं, बरोबर नाहीं, असायला नको तसें, बुद्धीला पटत नाहीं, यांत गलती होत आहे, हें नियमांप्रमाणें नाहीं, अयोग्य, तसें नव्हे, मेळ बसत नाहीं, येथें कांहीं तरी बिघडले आहे, उत्तराचा ताळा जमत नाहीं, दोन आकड्यांत तफावत पडत आहे, अंदाजाप्रमाणें निष्पत्ति नाहीं, कांहीं तरी हुकलें आहे, पोरबुद्धीनें भलतेच करून बसला !
ढालणे
सक्रि. स्खलन करणे; ओतणे : ‘जी बुद्धितें सली । निश्चयातें ढाली ।’ –ज्ञा ६·४१३.
धात
स्त्री. १ (पुरषाचें) वीर्य; रेत. २ धातु; मूळ. 'गुंड वेष्टण ऐसें धात । हें व्याकरण जाणावें संस्कृत ।' -राजवाडे (ग्रंथ- माला शके १८२७) ४. [सं. धातु] ॰फुटणें-१ वयांत येणें. २ कांहीं रोगामुळें मूत्रनिसर्गादिप्रसंगीं रेत स्खलन होणें.
ढळ
पु. १. घसरण; निसरडे; घसरलेली अवस्था. २. चूक; एखादी गोष्ट करण्याची राहून जाणे; खंड; स्खलन. (वा.) ढळ फोडणे –जरब बसविणे; दहशत घालणे : ‘कच्च दिल बाळगून नि ढळ फोडून घेऊन उपेगाचं न्हाय.’ –रैत ३०.
ढळ
पु. १ घसरण; निसरडें; घसरणें; घसरलेली अवस्था. २ चूक; एखादी गोष्ट करण्याची राहून जाणें; खंड; स्खलन. 'मनापासून कामांत कधींहि ढळ पडावयाचा नाहीं.' [ढळणें]
गळती
स्त्री. १. अभिषेकपात्र; देवावर अभिषेक करण्याचे, तळाशी छिद्र असलेले धातूचे किंवा मातीचे भांडे : ‘कीं त्या भूलिंगास निर्मळा । गळत्या लाविल्या अधोपंथी ।’ - पांप्र ४·१२३; ज्यातून पाणी गळत असते असे कोणतेही पात्र. २. देवावरील पाण्याची संतत धार; अभिषेक. ३. ठिबकणी; पाझरणी; पाघळणी : ‘तापार्तांची गळती जी पासुनि अमृतबिंदु शीतल गळती ।’ - मोरा १·३४२. ४. गळ (डोळ्याला लागणारी). ५. पहा : गळते. (वा.) गळती लागणे - १. पाणी गळणे. २. संख्या कमी होत जाणे. ‘राष्ट्रीय शाळेलाही गळती लागली.’ - माजी २३२. ६. झुरणी; निचरा; स्खलन; पतन.
खळणे
अक्रि. वीर्यपात होणे (माणूस, पशू यांचा). [सं. स्खलन]
खळणें
खळणें khaḷaṇēṃ v i (खळ) To intermit or pause--wind, rain &c., any work or course: also to be obstructed in course--a stream: also to stop, forbear, pause; to cease for a season--a person. 2 (स्खलन S) To make seminal emission--man or beast.
अक्रि. १ मध्येंच थांबणें (वारा, पाऊस, उद्योग, काम- धंदा इ॰). 'मनुष्याच्या शरीरांतले व्यापार जसे कधीं खळत नाहींत.' -नि ५८. २ गतीला अटकाव होणें; मार्ग खुंटणें (प्रवा- हाचा). 'बारा वर्षांत तिच्या डोळ्यांचे पाणी खळलें नाहीं.' -इंप ५६. ३ हात आंखडणें; थोपविणें; कांहीं वेळपर्यंत राहणें, थांबणें (माणूस). ४ वीर्यपात होणें (माणूस, पशू यांचा). 'तो घोडा हमेशा खळतो.' [सं. स्खलन; प्रा. खलण]
खळणी
स्त्री. (गो.) खळ; खंड. [सं. स्खलन]
खळणी
स्त्री. खळ; खंड (गो.) [सं. स्खलन]
खोळंबा(ब)
पु. खोटी; थांबविलेली किंवा खोटी केलेली स्थिति; विलंब; उशीर. २ मोडता; अडवणूक. -वि. अक्रिय, कांहीं न करणारा. 'देव खोळंबा देव खोळंबा । मज झळंबा म्हुण कोंडी ।' -तुगा. ३६७९. [सं. स्खलन; का. कोळंब = आडकाठी]
ओखळणे
अक्रि. ओसरणे. (कु.) [सं. उत्+स्खलन]
संचार
पु. १ हिंडणें; फिरणें; भ्रमण; वापर. 'जेथें संचार राक्षसांचा ।' -गुच २९.८. २ अंगांत येणें; भूतपिशा- च्चादिकानीं व्यापणें. 'भूतसंचार, विषयसंचार, वातसंचार.' 'भूत- समंधीं संचार अंगीं वसे ।' -दा २.३.२४. 'देखा मंत्रज्ञु बरळु जाय । मग तेथ का तैसा संचारु होय ।' -ज्ञा १.१९०. ३ प्रवेश; रिघाव; गति. 'म्हणोनि वर्तता तेथ पापा । संचारु नाहीं ।' -ज्ञा ३.८१. ४ दूरान्वय; स्खलन; दोष; विस्तार; विषयांतर. 'आत्मस्तुती होतां । संचार असे ।' -ज्ञा १२.२१७. ५ पाठांतरांतील चूक; दोष (क्रि॰ जाणें). [सं. संचर्] संचारणें-उक्रि. प्रवेश करविणें; शिरकावणें; घुसविणें. -अक्रि. संचरणें पहा. संचारलेखन-न. मध्यस्थाकडून आपोआप केलेलें लेखन. (इं.) ऑटोमॅटिक राइटिंग. संचारिका-स्त्री. भव्यस्थ स्त्री; दूती. संचारित-धावि. गति दिलेलें; भ्रामित; व्यापिलेलें; घुसलेलें. संचारी-पु. (संगीत) चीजेचा तिसरा भाग. संचारी वर्ण-पु. (संगीत). स्थायी, आरोही व अव- रोही यांच्या मिश्रणानें झालेला वर्ण.
संचरणें
अक्रि. १ प्रवेश करणें; शिरणें; रिघाव करणें. २ भिजणें; मुरणें; आंत जाणें. 'कीं संचरलें हलाहल । हृदयीं वाटे दशरथा ।' -रावि ४.५०. ३ व्यापणें; शिरून राहणें; भुताखेतादि- कांचा शरीरांत प्रवेश होणें; अंगांत येणें. 'काम संचरलें नेणों देहीं ।' -दावि ३४. 'ते योगनिद्रा न संचरे ।' -विपू १.१०४. ४ संचार करणें; फिरणें. ५ चुकणें; भलतीकडे जाणें; स्खलन होणें; मार्ग भ्रष्ट होणें. [सं. सम् + चर] संचरित-धावि. शिरलेला; व्यापलेला; प्रवेश केलेला.
स्रवन
न. स्खलन; स्रवणें. 'वारंवार करी मैथुन । विलंबें पाववी स्रवन ।' -रास १.१२३०. [सं. स्त्रु-स्रव्]
उखळणें
उक्रि. १ पहिल्यानें शेत नांगरणें; फाळणें (जमीन); उकरणें; खणणें. २ उलगडणें; काढणें; मोडणें; निखळून टाकणें; उपटून काढणें (स्क्रू, खिळे, अडसर, पाय, हात, यंत्राचे भाग इ॰). 'तो रावणाचा उखळला हस्त । शास्त्र पडिलें धरणीवरि ।।' 'उख- ळीन ईश्वराच्या हरिच्याही महाभयावह रदासा' -मोउद्योग ११.११७. ३ (ल.) उच्चाटण करणें (स्थान, नोकरी यावरून); निर्मूलन करणें; हांकलणें; नाहीसें करणें. 'उखळा धर्मासि म्हणसि तरि म्हणसिल बालिशा नभा उखळा ।' -मोभीष्म ७.४३. ४ (ल.) उधळणें; पराभव करणें. ५ फोडणें; फाडणें; विलग करणें. 'तयानें लखोटा उखळुनि असें जें उकलिलें ।' -सारूह ५.८३. -अक्रि. सैल होणें; तुकडे पडणें; (यंत्र वगैरेचे भाग) वेगळे होणें. [सं. उत् + स्खलन]
विभ्रम
पु. १ चूक; दोष; स्खलन. २ भ्रम; भ्रांति; गोंधळ. 'संभोह विभ्रम भासे । गिळित धैर्याचीं आविसें ।' -ज्ञा ७.७७. ३ स्त्रियांचा प्रेममूलक हावभाव, चाळा, चेष्टा, विलास. भाव पहा. [सं. वि + भ्रम] विभ्रांत-पु. गोंधळ, गडबड, दर्शक अभिनय. -वि. गोंधळलेला; घोंटाळलेला; चुकलेला; गडबडलेला. [सं.]
विभ्रमण
न. प्रकाशकिरणांच्या गतींतील स्खलन, मार्ग- च्युति. -सूर्य २६. [सं.]
व्यभिचार
गैरव्यवहार, स्खलन, जारकर्म, वाममार्गाला जाणे, पापाचरण, चारित्र्यस्खलन, पापांत पडणें, भ्रष्ट जीवन, कुकर्म, अनीतीचा कर्दम, स्वैरता, निरर्गल जीवन, स्वैराचार, नीति उल्लंघिली, भानगड केली, बेताल वर्तन, स्वच्छंद स्वेच्छाचार.
धातु
पुस्त्री. १ पुरुषाचें रेत; वीर्य; धात. २ सोनें, रुपें, तांबें; लोखंड इ॰ जास्त विशिष्ट गुरुत्वयुक्त, अपारदर्शक व एक प्रकारच्या चकाकीनें युक्त अशा खनिज पदार्थांपैकीं प्रत्येक. ३ पैसा; द्रव्य; धन. 'कोणी धातूचा न करिती स्पर्श ।' -दावि ४०१. 'तेव्हां कळेल कीं अमके महाल अमके धातु ।' -ऐपो २५३. ४ शरीरां- तील कफ, वात, पित्त या तत्त्वांपैकीं प्रत्येक. ५ शरीरांतील रक्त, मज्जा, वसा, मांस, अस्थि मेद व रेत या सात घटकांपैकीं प्रत्येक 'धातूंचें समुद्र उलंडी । मेदाचे पर्वत फोडी । आंतली मज्जा काढी अस्थिगत जे ।' -स्वानुदिन ९.४. ७५. ६ पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश इ॰ पंचमहाभूतांपैकीं प्रत्येक. ७ पंचमहाभूतांच्या स्पर्श, रूप, रस, गंध व तेज या गुणधर्मांपैकीं प्रत्येक. ८ मनशीळ, काव, पारा, गंधक, अभ्रक इ॰ सारखा पदार्थ. ९ (महानु.) गेरू, काव. 'एकें धातुचिआं उटी घेतें ।' -दाव ७७. १० (तत्त्व.) अहंकार. 'या अहंकारासच तैजस, अभिमान, भूतादि, धातु अशीं दुसरीं नांवें आहेत.' -गीर १७२. ११ (संगीत.) चिजेचें निरनिराळे भाग. अवयव ५ अर्थीं पहा. [सं.] (वाप्र.) ॰फुटणें-१ कांहीं रोगामुळें मूत्रविसर्जनादि प्रसंगीं आपोआप गळण्याइतकें वीर्य पातळ होणें. २ वयांत येणें. सामाशब्द- ॰कर्मविद्या-स्त्री. धातूंचें शोधन करण्याची विद्या; शास्त्र; (इं.) मेटॅलर्जी. [धातु + कर्म + विद्या] ॰काम-न. धातू ओतून अगर हातोड्यानें ठोकून त्याच्या निरनिराळ्या सुंदर वस्तू बनविण्याचें कारागिरीचें काम. [धातु + काम] ॰क्रिया-स्त्री. किमया. 'हातींचा परीस टाकोनियां । साधूं जावें धातुक्रिया । सगुण मूर्ति सांडोनियां । निर्गुण वायां कां कथिसी ।' -ह २१.२२० [धातु + क्रिया] ॰जन्यपदार्थ-पु. (रसा.) धातूपासून बनलेला संमिश्र रासायनिक पदार्थ; (इं.) मेटॅलिक् कॉम्पाउंड. -सेपू २.१००. [धातु + सं. जन्य = उत्पन्नहोणारा + पदार्थ] ॰पात-पु. वीर्यस्खलन; रेत गळणें. [सं. धातु + सं. पात = पडणें] ॰पुष्ट ॰पोषण-वि. धातु पुष्ट करणारें, बलवर्धक, पौष्टिक (खाद्य, औषध). [धातु + सं पुष्ट = वाढलेलें; सं. पोषण = वाढणें, पोसणें] ॰पोषण-न. १ (शरीरांतील) सप्त धातूंचें पोषण, वर्धन; बलवर्धन. २ (ल.) खुशामत; तोंडपुजे- पणा; टाळाटाळ, बकवा, गोड गोड भाषण इ॰ करून खोटा उत्साह उत्पन्न करणें, धीर देणें. 'लोभ भय दम्भ मानार्थ । धातुपोषण बोलती बहुत ।' -मुसभा ५.१२४. 'धातुपोषणार्थ समाधान केलें.' -जोरा १७. -वि. बलवर्धक; पौष्टिक. [सं. धातु + पोषण] ॰पोपणाचें बोलणें-पोषणाच्या गोष्टी ॰ पोषण-बोलणें- गोष्ट-भाषण-थापेबाजी; खुशामत, आर्जव इ॰ युक्त बोलणें; गूळखोबरें; गुळगुळथापडी. ॰मय-वि. सोनें, चांदी, तांबें इ॰ सारख्या धातूंचें बनविलेलें. [धातु + सं. मय प्रत्यय] ॰माक्षिक- न. लोखंड व गंधक यांच्या संयोगापासून बनलेलें एक खनिज द्रव्य. [धातु + माक्षिक] ॰मेह-पु. १ मूत्रावाटे धातु, वीर्य गळण्याचा मूत्ररोग. २ वीर्यमिश्रित मूत्र. [सं. धातु = वीर्य + सं. मेह = मूत्र, मूत्ररोग] ॰योग-पु. रसायन. 'येक औषधी प्रयोग । येक देती धातुयोग ।' -दावि ६४. [धातु + सं. योग = जुळणें, जोडणें] ॰राशी-पु. अस्थि रक्त, मांस वगैरे सप्त धातूंचा समुदाय; (ल.) शरीर; देह. 'अथवा एकांतरा कृच्छ्री । चाद्रायणें मासोपवासीं । शोषोनि गा धातुराशी । करिती तपें ।' -ज्ञा १७.३६४. [सं. धातु + राशी = समुदाय] ॰रूप-वि. (रसा.) ज्यांस धातूचें स्वरूप आहे (असें मूल द्रव्य). 'सोयीकरितां एकाकी पदार्थाचे धातूरूप व अधातुरूप असे दोन वर्ग करितात.' -रसापू ६. [सं. धातु + रूप] ॰वाद, धातुर्वाद-पु. १ किमया; सुवर्णविद्या; सोनें करण्याची विद्या. 'नातरी जें धातुवादाही न जोडे । तें लोहींचि पंधरें सांपडे ।' -ज्ञा ६.३४. 'अतर्क्य नेत्रांतरें नेणें । कां धातूवादें सर्वस्व घेणें ।' -एभा २३.२०७. २ अशोधित धातु शुद्ध करणें. -ज्ञाको क १५३. ३ रसायनशास्त्र. [धातु + वाद] ॰वादी, धातुर्वादी-वि. १ किमया करणारा. 'जो सोधोनि भवपारदु । अनादि रससिदध्दु । तो लाधला शब्दवेधु । जेणें धातुर्वादिये ।' -ऋ ५. 'टिपरे धातुर्वादी खोटे ।' -दावि ४७४. २ रसायनशास्त्रज्ञ; खनिजपदार्थांचें, रसायनांचें ज्ञान असणारा. [धातुवाद] ॰विकार-क्षय-पु. धातुक्षीणतेचा, क्षय- रोगाचा एक प्रकार. [सं. धातु + सं. विकार = रोग; क्षय = क्षीण होणें] ॰विद्या-स्त्री. (रसा.) अशुद्ध धातूपासून शुद्ध धातु काढण्याची विद्या. [धातु + विद्या] ॰शलाका-स्त्री. धातूची सळई, कांब. [म. धातु + सं. शलाका = सळई] ॰साम्य-न. कफवातादि शरी- रांतील धातूंची समता, योग्य स्थिति. 'जागणें जरी जाहलें तरी व्हावे ते मितलें । इतुकेनि धातुसाम्य संचलें । असेल सुखें ।' -ज्ञा ६.३५१. [सं. धातु + सं. साम्य = सारखेपणा] ॰स्खलन- न. रेतस्खलन; वीर्यपात. [सं. धातु + सं. स्खलन = गळणें] ॰स्तंभक- वि. वीर्याचें स्तंभन करणारें (औषध इ॰). [सं. धातु + सं. स्तंभक = थांबविणारें] ॰स्पर्श-पु. तांबें, पितळ, सोनें, रुपें इ॰ धातूंचा स्पर्श. (ल) (अकरणरूपीं प्रयोग केल्यास) १ अठरा विश्वे दारिद्रय. 'याच्या घरांत धातुस्पर्श नाहीं.' २ (अकरणरूपीं प्रयोगांत) दागदागिने मुळींच नसणें. 'त्या बायकोच्या अंगास धातुस्पर्श म्हटला तर नाहींच.' [धातु + स्पर्श] ॰क्षय-पु. धातुविकार पहा.