आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
स्वयंपाक
स्वयंपाक m Cooking; the food dressed.
स्वयंपाक svayampāka m (S) Cooking one's food with one's own hands. 2 Popularly. Dressing of food, cooking. 3 The food dressed.
स्वैंपाक (स्वयंपाक) m Cooking.
(सं) पु० सैपाक, पाक, शिजविलेलें अन्न, रसाई.
संबंधित शब्द
रांधण-न
न. १ शिजविणें; रांधणें; पाकक्रिया. २ रांध- ण्याचें भांडें, मडकें. 'रांधण नाहीं आमुचे धरीं' -भवि ९. १७०. ३ स्वयंपाक. ४ (गो.) चूल. [सं. रध्-रंधन] रांदा- यणी-स्त्री. स्वयंपाकीण बाई. [सं. रंधन] रांधचेकुड-स्त्री. (कु.) स्वयंपाकघर. रांधणी-स्त्री. (व.) स्वयंपाकघर. रांधणें- सक्रि. शिजविणें; उकडणें. [सं. रंधन] म्ह॰ सारी रात्र जागली आणि शेंगावांगीं रांधलीं. रांतें घर-न. १ स्वयंपाक घर; रांधतें- घर. २ माजघर. रांधतेंघर-स्त्रीन. (ना.) स्वयंपाकघर; पाक- शाला. रांधनीपल्ल-न. (गो.) चुलखंड. रांध(दा)प-न. १ शिजविणें; उकडणें. २ रांधलेले पदार्थ; स्वैंपाक. [रांधणें] रांधपखण-न. (हेट.) स्वैंपाकघर. रांधपी-पु. १ सैंपाकी; आचारी. २ (हेट. नाविक) जहाजावर जेवण तयार करणारा इसम. [रांधस] रांधपीण-स्त्री. (गो.) स्वयंपाकीण. [रांधण] रांधय-न. (गो.) एक आमटीचा प्रकार. रांधवणा-पु. सैंपाकी; आचारी. 'बल्लव रायाचा रांधवणा ।' -मुविराट २.४४ रांध- वणी-स्त्री. स्वयंपाक करणारी सुगरंण स्त्री. 'जैसी रांघवणी रस- सोय निकी ।' -ज्ञा २.२५४. -वि. स्वयंपाक करण्याची(चूल). 'रांधवणी चुलीपुढें ।' -ज्ञा १३.५६२. रांधवणी-न. स्वयं- पाकाचीं खरकटीं भांडीं व हात धुतलेलें पाणी. [रांधणें + पाणी] रांधापघर-न. (रत्नागिरी) स्वयांपाकघर. रांधिये उणें-वि. पुरतेपणीं किंवा मुळींच न शिजविलेलें. रानपीण-स्त्री. (कु.) स्वयंपाकीण. [रांधण]
भात(तु)कली
स्त्री. १ लहान मुली स्वयंपाक, जेवण इ॰ संसारातील गोष्टीचें अनुकरण करून खेळतात तो खेळ; खेळांतला स्वयंपाक. २ ह्या खेळांत करून खातात तीं खाद्यें (समुच्चयानें). [भात अल्पार्थी]
एकसैंपाक
पु. (बायकी) १ दिवसाचा एकच, एकदांच स्वयं- पाक. २ सर्व घराचा एक स्वयंपाक. [एक + स्वयंपाक]
गणान्न
न. १. अनेकांच्या मालकीचे (भात अथवा इतर) धान्य; सगळ्यांनी करून ठेवलेला धान्याचा पुरवठा, बेगमी. २. समाराधनेसाठी तयार केलेला स्वयंपाक; अनेकांचा एकत्र स्वयंपाक. [सं.]
कढई
स्त्री. स्वयंपाक; रसोई. (कढईमध्यें स्वयंपाक करतात यावरून लक्षणेनें). 'नर्मदा प्रदक्षिणावासी मंदिरासमोर असलेल्या पटांगणावर उतरतात तेथें नर्मदेची कढई करितात' -के ६.७.३७. [ सं. क्कथ् ]
कढई
स्त्री. स्वयंपाक; रसोई (कढईमध्ये स्वयंपाक करतात यावरून लक्षणेने) : ‘नर्मदा प्रदक्षिणावासी मंदिरासमोर असलेल्या पटांगणावर उतरतात तेथे नर्मदेची कढई करितात.’ − ६·७·३७.
मारग
पु. १ (काव्य) रस्ता; मार्ग. 'पाहा त्या मारगें । कोण येतो आमच्या लागें ।' २ (माण.) रानांत जाऊन तेथें स्वयंपाक करून देवीस नैवेद्य समर्पण करणें व या रीतीनें देवीचा नवस फेडणें. [सं. मार्ग; प्रा. मग्गो] ॰मळणें-एखाद्या देवतेला जाऊन आल्यावर पुन्हां त्याच मार्गामर जाऊन स्वयंपाक करून कुलदेवतेस नैवेद्य दाखवून सवाष्ण व ब्राह्मण जेऊं घालणें.
रंधन
न. १ शिजविणें; रांधणें; पाकक्रिया. २ शिजलेले पदार्थ; स्वयंपाक. 'किं धाला बैसे पाठीं । रंधनाच्या ।' -अमृ ५.६४. रंधप-न. (कों.) १ शिजवून केलेला स्वयंपाक. २ शिजविलेले पदार्थ. रांधप पहा. रधंपी-पु. आचारी, स्वयंपाकी. रांधपी पहा.
संपाक
पु. स्वयंपाक; अन्न शिजविणें; उकडणें; रांधणें. [स्वयंपाक]
संपाक sampāka m (Corr. from स्वयंपाक) Dressing of food, cooking.
आचारी
पु. (प्र.) आचार्य. १ गुरु; उपद्रष्टा; उपदेश करणारा. 'जैसी तैसी असो पुढिलांचे सोई । धरिती हातींपायीं आचा- रिये ।।' -तुगा १९०३. रामाचारी, कृष्णम्माचारी वगैरे नांवांत आचारी हें पद आचार्याचें अप. असतें. [सं. आचार्य.] २ स्वयं- पाक करणारा; स्वयंपाकी; दुसर्याच्या घरीं स्वयंपाक्याची नोकरी करणारा (विशेषतः ब्राह्मण जातीचा). [सं. आचार्य] ॰पाणक्या- पु. १ स्वयंपाक करणारा व पाणी भरणारा. २ (ल.) जड बुद्धीचा; अशि- क्षित; ठोंब्या माणूस.
आचारी
पु. (प्र.) आचार्य. १. गुरू; उपद्रष्टा; उपदेश करणारा : ‘जैसी तैसी असो पुढिलांचे सोर्इ । धरिती हातींपायीं आचारिये ॥’ − तुगा १९०३. रामाचारी, कुष्णम्माचारी वगैरे नावांत आचारी हे पद ‘आचार्य’ चे अपभ्रष्ट रूप आहे. २. स्वयंपाक करणारा; स्वयंपाकी; दुसऱ्याच्या घरी स्वयंपाकाची नोकरी करणारा. [सं. आचार्य]
आचारी पाणक्या
पु. १. स्वयंपाक करणारा व पाणी भरणारा. २. (ल.) जड बुद्धीचा; अशिक्षित; ठोंब्या माणूस. [सं.]
अन्नपूर्णा
स्त्री. १. दुर्गा; पार्वती; भवानी; अन्नदात्री; अन्नाधिष्ठित देवता; समृद्धिदेवता. २. (ल.) जिच्या हातचा स्वयंपाक, अन्न पुरवठ्यास येते अशी बाई; स्वयंपाकीण. ३. (उप.) भिक्षेची, माधुकरीची झोळी.
आंतवर-वार
न. १ (चि. कों.) स्वयंपाक घर; माजघर; घराचा मध्यभाग; याच्या उलट बाहेरवार. 'आम्ही पुरुष बाहेर निजूं बायकांस आंतवार जागा पाहिजे!' [सं. अंतर् + वर्ती]
अपक्व
वि. १ कच्चा; हिरवा; न पिकलेला (फळ). २ न शिजलेला; अशिजा; कच्चा; अर्धवट (भात, स्वयंपाक वगैरे). ३ अननुभविक; कच्चा; अडाणी; कोरा. [सं. अ + पच् = शिजणें; पिकणें]
अपक्व
वि. १. कच्चा; हिरवा; न पिकलेले (फळ वगैरे). २. न शिजलेला, कच्चा, अर्धवट, (भात, स्वयंपाक वगैरे.). ३. अननुभविक; कच्चा; अडाणी; कोरा. [सं.]
अपरवासी
वि. (व.) विटाळशी; रजस्वला; अस्पर्श. 'आई अपरवासी असल्यामुळें स्वयंपाक करावा लागला.' [अपर + वास?]
अवध
अवध avadha f (Vulgar for अवधि S) End, termination, conclusion (of a term or period). 2 Interval; time yet to pass over; time intervening (between the present moment and a moment or matter stated). Ex. स्वयंपाक होण्यास मध्यें चार घटका अ0 आहे. 3 Intermediate space; distance; extent of ground yet remaining to be crossed.
अवजणें
अक्रि. (व.) उपयुक्त होणें; बनणें; चालणें; उपयोगी पडणें. 'आईचा हात अवजत नाही आजच्या दिवस.' 'आमच्या हातचें अन्न त्याला अवजत नाही म्हणून तो स्वतः स्वयंपाक करतो.' [सं. आ + वज् = जाणें, हालणें; गो.वचणें = जाणें]
बात
क्रिवि. (व.) लवकर; जलद. 'बात स्वयंपाक कर.'
भटा(ट्या)रखाना
पु. १ जेवणावळींत किंवा मेजवानींत पवित्र व अपवित्र, उच्च व नीच, किंवा पृथक् स्वयंपाक करणाऱ्या लोकांच्या मिश्रणानें होणारी अव्यवस्था. २ भंडारखाना; खाणावळ; हॉटेल. ३ स्वयंपाकघर. [हिं. भटियारखाना] भटा(ट्या)री, भटियारी-पु. भटारखाना चालविणारा; खाणावळवाला. [हिं.] भटारीण-स्त्री. खानावळवाली.
भटारी
पु० आचारी, स्वयंपाक करणारा.
भट्टी
स्त्री. १ चुलाण. २ लोहाराची साळ; सामान्यतः विस्तवाच्या भोंवतीं केलेलें मातीचें आवार (हलवायाचें, भड- भुंज्याचें); धोब्याच्या सतेल्याचा चुला. ३ भबकारा. ४ (ल.) भट्टींत तयार केलेलें द्रव्य, एकदां तयार केलेलें परिमाण, घाणा. ५ तयार करण्याची युक्ति; खुबी; पद्धति; रीति; रचना; घडण; ढब. 'ही भट्टी चांगली उतरली.' 'ह्या रसायणाची भट्टी त्या वैद्यास चांगली ठाऊक आहे.' 'शरीराची-पागोट्याची-मसलतीची-भट्टी.' ६ (केळीं, विड्याचीं पानें इ॰) पिकविण्यासाठीं त्यांभोंवतीं गवत, केळीचें पान इ॰ गुंडाळून दाबून किंवा लिंपून ठेवण्याची क्रिया. ७ दारूचा कारखाना, गुत्ता. [सं. भृष्टि; हिं.] ॰बिघडणें- बिनसणें-एखाद्या गोष्टींत क्रमभंग, चूक इ॰ झाल्यामुळें ती व्हावी तशी चांगली न होणें. ॰साधणें- १ स्वयंपाकाच्या पदार्थांवर अग्निसंस्कार योग्य प्रमाणांत होणें. स्वयंपाक इ॰ उत्तम साधणें. २ (ल.) एखादें काम करण्याची खुबी, हातोटी साधणें, प्राप्त होणें. ॰कुंभार-पु. कुंभारांवरील कर. ॰खुमार-न. दारू, मद्य तयार करणारावरील कर. ॰भाजणारा-पु. भडभुंज्या; कुंभार; भट्टी पेटविणारा.
चालता स्वैपाक
वि. साधा, सोपा, सहज होण्याजोगा; शिजत असता फारसे लक्ष द्यावे लागत नाही असा (स्वयंपाक).
चासणीकार
पु. राजे लोकांचा स्वयंपाक आधी खाऊन पाहणारा अधिकारी; चोख्या. [फा. चास्नी]
चौका
पु. प्रवासांत स्वयंपाकासाठीं साफ केलेली व सारवि- लेली चौकोनी जागा. 'आपला आमचा चौका निराळा, सगळें निराळें.' -सूर्यग्र ११३. [चौक; हिं. चौका = स्वयंपाकघर] ॰बासन-न. प्रवासांत जागा साफ करून चूल मांडून स्वयंपाक वगैरे करून जेवण तयार करणें, भांडी घसणें, इ॰ काम; स्वयं- पाकपाणी. 'देशचा गडी असला म्हणजे चौकाबासन करतो.' [हिं. चौका + बासन = भांडें, पात्र]
चौकी
स्त्री. १. शहराच्या, रस्त्याच्या विशिष्ट भागात चोर, भामटे इत्यादिकांच्या बंदोबस्तासाठी ठेवलेली शिपायांची तुकडी : ‘हे स्वयंपाक करून जेवतात तो चौकी आली.’ − स्वप १४९. २. पहाऱ्याकरिता, बंदोबस्ताकरिता ठेवलेल्या पोलिसांचे ठाणे; गेट; नाके. ३. पहारा; राखण : ‘तयाभोंवती चौकी बळकट ।’ − दावि ३९१. ४. देवडी; आल्यागेल्याची चौकशी, वर्दी जेथे होते ती जागा; पहारा. ५. मांड; ठाणे; बैठक : ‘जव माणकोबांनीं चौकी मांडुनी । सभोंवतीं भावें रंग भरूनी ।’ − दावि ७८६. [सं. चतुष्किका](वा.) चौकी देणे − पहारा करणे; राखण करणे. चौकी बसविणे − अंमल बसविणे; पहारा ठेवणे : ‘तुम्ही विशाळगडाखालीं चौकी बसविली आहे म्हणून वर्तमान आइकोन स्वामी संतोषी जाले.’ − शारो १·१८.
चौकी
स्त्री. १ शहराच्या, रस्त्याच्या विशिष्ट भागांत चोर, भामटे इ॰ कांचा बंदोबस्त करण्याकरितां ठेवलेली शिपा- यांची तुकडी. -पया ५१. 'हे स्वयंपाक करून जेवतात तों चौकी आली.' -स्वप १४९. २ पाहार्याकरितां, बंदोबस्ता- करितां ठेवलेल्या शिपायांचें ठाणें; गेट; नाकें. ३ पाहारा; राखण. 'तयाभोंवती चौकी बळकट ।' -दावि ३९१. 'माझ्या घराची चौकी तुम्ही करा.' ४ (वीणा इ॰ तंतुवाद्यांतील) घोडी; तारदान; अट. ५ चौरंग; घडवंची; देव वगैरे ठेवण्यासाठीं केलेली लांकडी, चौकोनी बैठक; आसंदी; तक्त. 'मुकुट काढुनी मस्तकिं वरले । चंदनचौकीवरि विस्तरिले ।' -अमृत ३१. 'ते मांडिली रत्नजडीत चौकी ।' -सारुह ६.१७. 'गजरथ तुरुंग सिहांसनें । चौकिया सिबिका सुखासनें ।' -दा ४.७.६. ६ चार ध्रुपदांचा समुदाय. ७ (बायकी) प्रकार; विधि; संस्कार. 'चवथ्या दिवशीं चवथी चौकी । बाळबाळंतिणिचीं न्हाणी हो होती ।' -पाळणेसंग्रह पृ. ३. ८ (गो.) घराची ओसरी. ९ दुधाचे दांत; (माणसाची) पुढील दांतांची चौकडी. १० देवडी; आल्या गेल्याची चौकशी, वर्दी जेथें होते ती जागा; पाहारा. ११ मांड; ठाणें; बैठक. 'जवं माणकोबांनीं चौकी मांडुनी । सभोंवतीं भावें रंग भरुनी ।' -दावि ७८६. [सं. चतुष्किका; प्रा. चउ- क्कीआ = चौक; हिं. चौकी = बसण्याचा पलंग; पहारा] (वाप्र.) ॰देणें-पहारा करणें; राखण करणें. सामाशब्द- चे दांत-पुअव. (माणसाचे, मुलाचे) दुधाचे दांत, पुडील दांत. ज्यांचा पदार्थ फोडण्याकडे उपयोग होतो ते, चौकडीचे दांत. हे प्रत्येक जाभा- डांट चार असे एकंदर आठ असतात. 'कर्णी कुंडलें तळपती । लघुदंत चौकीचे झळकती ।' -ह ४.१७२. ॰दार-पु. पहारेकरी, रखवालदार; चौकीवरील शिपाई. 'नजीबखान रोहिला याणे चौकीदारांचा शिरच्छेद केला.' -भाव २९. [हिं. चौकी + दार] ॰दारी-स्त्री. १ पहारा ठेवण्याचें, रखवालदाराचें काम. २ पहारा ठेवण्याबद्दलचें वेतन. ३ चौकीदाराबाबत गांवकर्यांवर बसविलेला कर. [चौकीदार हिं.] ॰पहारा-पाहरा-पाहारा- पु. राखण; रखवाली; बंदोबस्त. (क्रि॰ असणें; होणें; करणें). -पया १०५. 'त्या किल्ल्याभोंवता चौकीपाहरा चांगला आहे.' [हिं. चौकी + पहरा] ॰यात-पु. पहारेकरी; रखवालदार. 'प्रत्येक जलाशयावर दोन चौकीयात ठेवावे.' -मरळ माशांची पैदास (बडोदें) ६. [चौकी]
चोचोवणीधोधोवणी
न. बेचव जेवण : ‘आईने कसाहि स्वयंपाक केला तरी चोचोवणीधोधोवणी केलंस असे म्हणून ते आईच्या अंगावर ओरडत असत.’ − आआशे १९५.
चरु
पु. १ शिजवलेले तांदुळ; भात. 'कीं होमशाळेंतून श्वान । जाय चरूपात्र घेऊन ।' २ (गो.) पिशाच्यास अर्पण कर- ण्यासाठीं शिजविलेला भात. ३ पिंड (भाताचे). ४ (खा.) तांब्या. [सं. चरु; हिं. चरुआ] चरुस्थाली स्त्री. १ भात ठेवण्याचें भांडें; हवि ठेवण्याचें पात्र. २ स्वयंपाक; पाकनिष्पत्ति; पाकक्रिया. [सं. चरु + स्थाली = भांडें]
चरुस्थाली
स्त्री. १. भात ठेवण्याचे भांडे; हवि, आहुती ठेवण्याचे पात्र. २. स्वयंपाक; पाकनिष्पत्ती; पाकक्रिया. [सं.]
चुलीची आराधना, पूजा
स्त्री. स्वयंपाक; अन्न शिजविणें वगैरे काम.
चुल्लिकापूजन
न. १ चुलीची पूजा, आराधना, सेवा. २ (ल.) स्वयंपाक. 'त्यानें आपलें अन्न तयार करण्यास चुल्लिका- पूजन केलें.' -चंद्र ४१.
चुल्लिकापूजन
न. १. चुलीची पूजा, आराधना, सेवा. २. (ल.) स्वयंपाक : ‘त्यानें आपले अन्न तयार करण्यास चुल्लिकापूजन केलें.’ − चंद्रगुप्त ४१.
चूल
स्त्री. पदार्थास उष्णता देण्यासाठी, अन्न शिजवण्यासाठी केलेली मातीची वीत−दीड वीत उंचीची, चार बोटे जाडीची अर्धवर्तुळाकार रचना. हिच्या पोकळीत लाकडे पेटवून वर भांडे ठेवतात. [सं. चुल्ली] (वा.) चूल अडणे – पैशाची अत्यंत अडचण भासणे; स्वयंपाक करून जेवण्याइतकेही पैसे नसणे; भूकमार होणे. चूल थंड पडणे – शिजवायला काही नसणे. चुलीजवळ शौर्य दाखविणे – घरकोंबडेपणा करणे; रांड्याराघोजी बनणे. चुलीत जाणे – नाश पावणे; विध्वंस होणे; निरुपयोगी ठरणे. चुलीत मांजरे व्यालेली असणे – १. एखाद्याची अतिशय विपन्नावस्था, दारिद्र्यावस्था होणे. २. कारणपरत्वे चूल पेटविण्याचे बंद पडणे. चुलीतून निघून वैलात पडणे – आगीतून निघून फोफाट्यात पडणे; एका संकटातून वाचल्यावर दुसऱ्या त्यासारख्या संकटात पडणे. चुलीला अक्षत देणे – एखाद्या घरची सर्व मंडळी जेवायला बोलावणे. चुलीला अक्षत लागणे – घरातील सर्व मंडळींना दुसरीकडे जेवायला जायचे असल्याने चूल बंद असणे. कोणतेही धर्मकृत्य संपले म्हणजे ब्राह्मण इष्टदेवतांवर अक्षता टाकून ते संपले असे सूचित करतात. त्या वरून चुलीचे त्या दिवसापुरते काम नसणे असे वरील वाक्प्रचाराने दाखवितात. चुलीला विरजण घालणे – चुलीतील अग्नि विझणे. चुलीशी डोके खुपसणे – स्वयंपाकाची जिगजिग सहन करणे.
चूल
स्त्री. पदार्थास उष्णता देण्यासाठीं, अन्न शिजविण्या- साठीं केलेली मातीची वीत-दीड वीत उंचीची, चार बोटें जाडीची अर्धवर्तुलाकार रचना. हिच्या पोकळींत लाकडें पेटवून विस्तव घालतात व माथ्यावर भांडें ठेवितात. [सं. चुल्ली; प्रा. चुल्ली; तुल॰ हिं चुल्हा-चुल्ही; गु चुलो] (वाप्र.) ॰अडणें-पैशाची अत्यंत अडचण असणें; स्वयंपाक करून जेवण्याइतकेही पैसे नसणें. 'आज चूलच अडली म्हणून दुसर्याजवळ पैसे मागणें भाग झालें,' चुलींत जाणें-अक्रि. नाश पावणें; विध्वंस होणें; निरुपयोगी ठरणें. 'त्यांच्या अकला चुलींत कां जातात ?' -एक. चुलींतून निघून वैलांत पडणें-आगींतून निघून फोफाट्यांत पडणें; एका संकटांतून वांचल्यावर दुसर्या त्यासारख्याच संकटांत पडणें. चुलींत मांजरें व्यालेलीं असणें-१ (ल.) एखाद्याची अतिशय विपन्नावस्था, दारिद्रावस्था होणें. २ कारणपरत्वें घरांतील सर्व माणसें परगांवीं गेल्यानें चूल पेटविण्याचें बंद पडणें चुलीला अक्षत देणें-एखाद्या घरची सर्व मंडळी जेवावयास बोलावणें. चुलीला अक्षत लागणें-घरांतील सर्व मंडळींस दुसरीकडे जेवा- वयास जावयाचें असल्यामुळें चुलीनें न पेटतां राहणें. कोणतेंही धर्मकृत्य संपलें म्हणजे ब्राह्मण इष्ट देवतांवर अक्षता टाकून तें संपलें असें सूचित करितात. त्यावरून चुलीचें त्या दिवसापुरतें काम नसणें असें वरील वाक्प्रचारानें दर्शवितात. चुलीला विरजण पडणें- चुलींतील अग्नि विझणें. चुलीजवळ शौर्य दाखविणें-घर- कोंबडेपणा करणें; रांड्याराघोजी बनणें. चुलीशीं डोकें खुप- सणें-स्वयंपाकाची जिगजिग सहन करणें. 'घरांतील किती तरी कामें करावीं लागतात, याची कांहीं दाद आहे कां ? दोन्हीवेळां चुलीशीं डोकें खुपसावें...' म्ह॰ १ घरोघर मातीच्या चुली = सर्व घरीं वागण्याचा सारखाच प्रकार सांपडावयाचा. २ बायकांचें शहाणपण चुलीपुरतें-पाशीं = बायकांना जगांतील व्यवहाराच्या खुब्या ठाऊक असणें शक्य नाहीं. सामाशब्द- ॰खंड-न. (उप.) (बायकी) चूल. 'घरांत चुलखंड थंडावलं आहे, तिथं माझी हाडं लावूं कां तुमचीं ?' -एक ॰जाळ्या-वि. ऊंसाच्या गुर्हा- ळांत काहिलीखालील भट्टींत ऊंसाच्या चिपाडांचें जळण घालणारा; जाळव्या. [चूल + जाळणें] ॰दान-न. १ चुली ज्यावर घातल्या आहेत तो मातीचा ओटा. २ चूल. ॰पोतेरें-न. चूल झाडणें, सारवणें इ॰ स्वयंपाकाच्या तयारीच्या पूर्वींचें काम; याच्या उलट चूलभुई. या दोन्ही शब्दांची वरील अर्थीं अदलाबदल होते. चूलपोतेरें करणें-चूल झाडून, सारवून स्वयंपाकाची तयारी करणें. म्ह॰ सर्वसिद्ध आणि चुलीस पोतेरें = सांगायला मात्र सर्व (जेवण) सिद्ध, तयार आहे पण पाहूं गेलें असतां चुलीला पोतेरें घालणें चाललेलें आहे. (वरवर कांहीं अव्वाच्या सव्वा थापा मारणें पण वस्तुस्थिति अगदीं निराळीं असणें या अर्थीं ही म्हण वापरतात). ॰भानवशा-वि. घरघुश्या; रांड्याराघोबा; चुलीपाशीं बसण्याची आवड असणारा. [चूल + भानवस = चुलीच्या मागील बाजूस भांडीं वगैरे ठेवण्यासाठीं केलेला ओठ्यासारखा भाग] ॰भान(ण)वस-भान(नो)स-स्त्रीपु. १ चुलीच्या मागील मातीचा, चुन्याचा ओटा. २ चूल सारवणें, चुलींत पेटवण घालणें, वर भांडीं ठेवून स्वयंपाकास लागणें इ॰ चुली- पुढील कामें. चूलभानवस झाडली-सारविली-लिंपली -अटपली-जेवण तयार आहे याअर्थीं. [चूल + भानवस] ॰भुई- स्त्री. स्वयंपाकानंतर, जेवणानंतर चुलीजवळील भांडीं आणि ताटें काढून टाकून जागा साफ करणें, सारवणें इ॰ काम. या अर्थीं चुकीनें चूलपोतेरें या शब्दाचाहि उपयोग करतात. [चूल + भूई = जमीन]
चूलभाणस
न. वधूवर वरातीनंतर वरगृहीं आल्यावर होणार्या लक्ष्मीपूजनानंतर वरमातेनें नववधूस स्वयंपाक गृह दाखविण्याचा विधी. [चूल + भानवस]
दत्त
पु. १. ब्रह्मा, विष्णु, महेश या त्रिमूर्तीचा अवतार; दत्तात्रेय. २. दैवप्राप्त वस्तू; प्रारब्ध; नशीब : ‘तुका म्हणे भितो पुढिलिया दत्ता । म्हणऊनि चिंता उपजली ।’ – तुगा २८६७. ३. देणगी : ‘हरी दत्त देईल तें शीघ्र घ्यावें ।’ – कचेसुच १३. ४. नेमलेले काम, धंदा; वृत्ती; नशिबाने आलेले (काम). [सं.] (वा.) दत्त म्हणून उभे राहणे – अकल्पित रीतीने येऊन उपस्थित होणे; (स्वयंपाक सिद्ध होताच दत्तात्रेय कोल्हापुरात अकस्मात भिक्षेला येतात अशी दंतकथा आहे, त्यावरून) एखाद्या कार्याच्या सिद्धीसाठी खटपट न करता केवळ उपभोगापुरते किंवा दुसऱ्याच्या मनात नसताना एकाएकी आयते वेळी येऊन हजर होणे. दत्तात्रेयाची फेरी, दत्तात्रेयाची स्वारी –जो मनुष्य नेहमी भटकतो व जो नक्की कोठे सापडेल ते सांगता येत नाही, अशा माणसाचे भटकणे अथवा अवचित आगमन.
धाराणें
न. धुराडें, चुलीचा धूर स्वयंपाक घरांतून बाहेर जाण्यासाठीं भिंत, छप्पर इ॰मध्यें ठेविलेलें असतें तें भोंक. धारें पहा.
एकसैपाक
पु. १. दिवसाचा एकच स्वयंपाक. २. सर्व घराचा एकस्वयंपाक.
गणान्न
न. १ अनेकांच्या मालकीचें (भात अथवा इतर) धान्य; सगळ्यांनीं करून ठेवलेल्या धान्याचा पुरवठा, बेगमी. २ समाराधनेसाठीं तयार केलेला स्वयंपाक, अनेकांचा एकत्र स्वयं पाक. [सं. गण + अन्न]
गरगडा
पु. १. गोंधळ; घोटाळा; गर्दी; गडबड; अव्यवस्था; अंदाधुंदी (स्वयंपाक, लग्न, देणेदार, काम इ. ची). २. पहा : गरगट १
गरगडा
पु. १ गोंधळ; घोंटाळा; गर्दी; गडबड; अव्य- वस्था; अंदाधुंदी (स्वयंपाक, लग्न, दणेदार, काम इ॰ ची). २ गरगट अर्थ १ पहा.
जेवण
न. भोजन; खाणें; अन्न भक्षण करण्याचा व्यापार. (क्रि॰ जेवणें; करणें). २ जेवणाचे पदार्थ; वाढलेलें अन्न. ३ आहार; खाण्याचें प्रमाण. [सं. जेमन. पं. जेंउणा] ॰कार-पु. (कु.) श्राद्धाच्या दिवशीं पितरांच्या नांवें जेवावयास बोलाविलेला मनुष्य (हा शब्द ब्राह्मणेतरांत रूढ आहे). ॰खाण, जेवणें खाणें- न. १ अन्न; खाद्य; खाण्याचे पदार्थ. २ (सामा.) भोजन; खाणें. 'त्याच्या घरीं जेवण्याखाण्याची सोई नाहीं' ३ खाण्यापिण्याचा व्यापार. 'आमचें जेवणखाण आटपेतों अजून चार घटका लाग- तील.' ॰घर-न. १ (कों.) घरांतील भोजनाची जागा; स्वयंपाक- घर. 'ती जेवणघरांत गेली' -बाळ. २ हॉटेल; खाणावळ. सन १८५३ सालीं मुंबईस हिंदूंच्या फराळाच्या दुकानांस जेवणघर म्हणत असत. ॰रात्र स्त्री. (व.) जेवणाची वेळ होण्याइतकी रात्र; सुमारें ८।९ वाजण्याची वेळ. जेवणवेळ पहा. ॰वत-न. जेवण्याच्या उपयोगाचें पान (केळ वगैरेचें). 'केळीची डांग मोठी असली तर चांगलीं पांच जेवणवतें होतात.' [जेवण + पत्र] ॰वार-पु. ज्या दिवशीं उपवास करावयाचा नसतो असा दिवस, तिथि. [जेवण + वार] ॰वेळ स्त्री. भोजनकाल. थोरली जेवण वेळ = रात्रीं ९ वाजतां. धाकली जेवण वेळ = सकाळीं ७ वाजतां. जेवणाईत-पु. १ जेवणारा माणूस २ पंगतीस घेतलेला आश्रित. जेवणावळ-स्त्री. १ मेजवानी; भोजनसमारंभ. (क्रि॰ करणें). २ जेवण्याबद्दचा खर्च. ३ (मुंबईस, जुन्या काळीं) जेवणघर; खाणावळ; हॉटेल. [जेवणें]
(सं) न० अन्न, खाणें, भोजन, स्वयंपाक.
झाकपाक, झाकापाक, झाकापाकी
स्त्री. १. जेवण झाल्यानंतरची स्वयंपाकघरातील उरलीसुरली कामे; सर्व पदार्थ झाकून जागच्या जागी ठेवणे इ. : ‘स्वयंपाक घरातील झाकपाक करून त्याही वर गेल्या.’ – कोकि ३०३. २. जलदीने, गडबडीने आवरणे, उरकणे. [झाकणे द्वि.]
झिंजाळी
वि. झिप्री; केस पसरून बसणारी : ‘न्हाऊन धुऊन स्वयंपाक केला, झिंजाळ्या कारटीने उष्टा केला.’ – एहोरा.
कावण, कावाण
न. १. लग्न इ. समारंभाचा स्वयंपाक वगैरे कामासाठी घराबाहेर बांधलेली झोपडी किंवा झावळ्यांचा मांडव; तात्पुरता मांडव; गुऱ्हाळाकरिता घातलेला कुडाचा मांडव : ‘अण्णा खोत झाडपाल्याच्या कावणात डोके धरून बसला होता.’ - तोरण ११८. २. पशूंचा गोठा (उन्हाळ्यातील); कोंडवाडा; छप्पर. (को.) [क. कावण्ण]
कावण-वाण
न. १ (कों.) लग्न वगैरे समारंभाचा स्वयंपाक वगैरे कामासाठीं घराबाहेर बांधलेली झोपडी किंवा झावळ्या वगैरेचा मांडव; तात्पुरता मांडव; गुर्हाळाकरितां घातलेला कुडाचा मांडव वगैरे. २ पशूंचा गोठा (उन्हाळ्यांतील); कोंड- वाडा; छप्पर. [का. कावण्ण]
कोळवे
न. १. ठेंगण्या घराला आत जाताना वर डोके लागू नये म्हणून कमानीसारखा आकार आणून उंच वाढविलेला पाख्याचा भाग. २. चांधईला लागून काढलेली खोली; घराची पडवी. हिचा उपयोग भांड्यांची खोली, स्वयंपाक घर, न्हाणीघर वगैरेसाठी होतो. (कु. को.)
कोळवें
न. (कु. कों.) १ ठेंगण्या घरास आंत जातांना वर डोकें न लागावें म्हणून कमानीसारखा आकार आसून उंच वाढवि- लेला पाख्याचा भाग. २ चांधईला लागून काढलेली खोली; घराची पडवी. हिचा उपयोग भांड्यांची खोली, स्वयंपाक घर, न्हाणीघर वगैरे कामाकडे होतो. ॰म्ह-कोळव्याचा वांसा घडी- घडी लागे = नेहमीं ज्याचा संबंध येतो त्याला दुखवून चालत नाहीं.
करणे
सक्रि. अनेक नामांना जोडून येणारा व त्या संबंधीचा क्रिया दर्शविणारा धातू. जसे :- तो अभ्यास करतो, ती स्वयंपाक करते, तो काम करतो, गारुडी सापाचा खेळ करतो - अशा वाक्यात नाम (कर्ता) + नाम (कर्म) + करणे अशी रचना असते. नामाच्या अर्थानुसार करणे याच्या अर्थालाही विविध छटा प्राप्त होतात. उदा. मूर्तिकार मूर्ती करतो. (घडवतो, बनवतो), राजा युद्ध करतो (लढतो), तो अन्न भक्षण करतो (खातो, जेवतो). अनेक इंग्रजी नामांना किंवा धातूंना हा धातू लावून बोलण्याची पद्धत आहे. असा धातू अकर्मक असल्यास त्याला होणे या धातूची रूपे लागतात. जसे :- मालकांनी त्याला डिसमिस केलं, पंचांनी त्याला डिस्क्वालिफाय केलं, हे रिराइट करून द्या.
खाट्या
वि. १ आंबट; आंबटतुरट (विशिष्ट फळें व फळ- झाडें). २ आंबट (स्वयंपाक, पदार्थ). उदा॰ खाट्या वरण- डाळ-आंबटी-भाजी-फळें इ॰. [खाटा]
खाट्या
वि. १. आंबट; आंबटतुरट (विशिष्ट फळे व फळझाडे.) २. आंबट (स्वयंपाक, पदार्थ).
खिस्त
स्त्री. १ हप्ता. २ हप्त्यांची किंवा हप्त्यानीं फेड; हप्ते- बंदी ३ हप्त्यांची मुदत, अवधि. 'खिस्त भरल्यानंतर रुपये राहिले तर व्याज पडेल.' ४ पैसे कर्जाऊ घेण्याचे अनेक प्रकार हा शब्द दर्शवितो. जसें-प्रत्येक संध्याकाळी थोडें थोडें मुद्दल परत करणें व त्यावरील व्याज देणें; दररोज व्याजाबरोबर मुद्दलाचा कांहीं भाग देणें आणि अशा रीतीनें सर्व मुद्दल फिटेपर्यंत सर्व रकमेवरचें व्याज देत जाणें; दररोज इतकी रक्कम आणि इतक्या मुदतीपर्यंत देणें कीं दररोजच्या फेडींची बेरीज केली असतां ती मुद्दलापेक्षां अर्ध्यानें, चौथ्या हिश्शानें इत्यादि जास्त होईल; दर- रोज सकाळीं कर्ज घेऊन रोज सायंकाळीं व्याजमुद्दलासह फेडणें. इ॰ ५ (ल.) कामाचा हिस्सा; खिसा अथवा लक्ष पुरविण्याची भिन्न बाब. असले घोटाळयाचे अनेक अर्थ या शब्दांचे रूढ आहेत. त्रास, त्रासदायक काम 'हें खिस्तीचें काम आहे' 'हा खिस्तीचा रोजगार.' 'हा खिस्तीचा स्वयंपाक.' ६ (ल.) विशिष्ट गोष्ट, बाब, रक्कम; निमित्त; खोटी सबब. 'हा पाटील हजार खिस्तीनें छळतो.' ७ (गो.) आक्षेप. [अर.किस्त] ॰बंदी- स्त्री. कर्जाची हप्तेबंदी; हप्त्यानीं कर्ज देण्याचा करार. [अर. किस्तबंदी] खिस्ती खांदा- पु. १ खिस्त अर्थ ४ पहा. (क्रि॰ करणें; लावणें; देणें; घेणें; वारणें). २ खांदवडा. [खिस्त द्वि.] खिस्तीचा-वि. १ पुष्कळ खिस्ते, भिन्न बाबी, रकमा अणारा; यावरून. २ (ल.) त्रासदायक; खडतर; कंटाळवाणें (काम, गोष्ट.).
खरकटे
न. १. खरकट्या अन्नाचा शेष; शिजविलेल्या अन्नाचा (भाकरी, भात इ. चा) कण, चाराचुरा. मात्र हे शिजवलेले अन्न पाण्यात मिसळण्यापूर्वी तळलेले किंवा भाजलेले नसले पाहिजे, त्याचप्रमाणे शिजविण्यापूर्वी ज्या अन्नात पाणी, मीठ अथवा नुसते पाणी मिसळलेले आहे असल्या अन्नाच्या अवशेषालाही खरकटेच म्हणतात. २. न भाजलेल्या पदार्थाचा स्वयंपाक, निर्लेप नसणारे अन्न. ३. (ल.) अपुरा व्यवहार, देवघेव (पैशाची); बिनहिशेबी धंदा; लडथड; भिजत घोंगडे. ४. अपूर्ण राहिलेली व त्रासदायक गोष्ट, काम. पहा : लांझा. (वा.) खरकटे सावडणे - खरकटे गोळा करणे; खरकटे काढणे; अपूर्ण राहिलेली त्रासदायक गोष्ट पूर्ण करणे.
खरकटें
न. (हिं.) खरकट्या अन्नाचा शेष; शिजविलेल्या अन्नाचा (भाकरी, भात इ॰ चा) कण, चाराचुरा. मात्र हें शिज- विलेलें अन्न पाण्यांत मिसळ्यापूर्वीं तळलेलें किंवा भाजलेलें नसलें पाहिजे, त्याचप्रमाणें शिजवण्यापूर्वीं ज्या अन्नांत पाणी, मीठ अथवा नुसतें पाणी मिसळलेलें आहे असल्या अन्नाच्या अवशेषा- लाही खरकटेंच म्हणतात. २ (देशस्थांत रूढ) न भाजलेल्या पदार्थांचा स्वयंपाक, निर्लेप नसणारें अन्न. ३ (ल.) अपुरा व्यवहार, देवघेव (पैशाची); बिनहिशेबी धंदा. लडथड; भिजत घोंगडें. 'मागलें खरकटें काढून टाका मग दुसरा पैका देईन.' ४ अपूर्ण राहिलेली व त्रासदायक गोष्ट, काम. लाझा पहा. (वाप्र.) ॰सांवडणें-खरकटें गोळा करणें; खरकटें काढणें. खरकट्या हातानें कावळा न हाकणें-(कदाचित् हाताचें खरकटें कावळ्याला मिळेल म्हणून) परक्यास थोडी सुद्धां मदत न करणें. (कंजूष माणसास ही म्हण लावतात).
मुखशाळा
स्त्री. १ स्वयंपाक घर. -आडिवऱ्याची महा- काळी १०. २ (कु.) देवळांत स्त्रियांना बसण्यासाठीं केलेली विशिष्ट जागा. [मुख + शाळा]
नळपाक
पु. १ स्वादिष्ट व उंची पदार्थांची, खाद्यांची पाक- निष्पत्ति. २ सात्विक व पौष्टिक पदार्थांचें बनविलेलें पक्कान्न; याच्या उलट भीमपाक, तामस पदार्थांचा पाक (नळ व भीम हे दोघेहि पाकक्रियेंत कुशल होते. त्यांच्या कुशलतेंतील भेद वरील अर्थांत दाखविला आहे). [नळ = नळ राजा + सं. पाक = स्वयंपाक]
ओंवरा
पु. स्वयंपाक घर. ओयरा पहा. 'ओवरा ओसरी भूमि माळिवरी उपरिया.' -वसा १४. [ओवरी]
ओटा
पु. १. दगड, विटा वगैरेंनी बांधलेला घरापुढील कट्टा, चबुतरा; स्वयंपाक करण्यासाठी बांधलेला कट्टा. २. ओटी; ओसरी. ३. गच्चीपुढील वरवंडी किंवा लहानशी भिंत. ४. पार; वरंबा; उंच ताटवा : ‘ओटे लावी रविकांतू । पार्यातकांचे ॥ − शिव २५४. [क. ओट्टु = एकत्र करणे; ढीग, रास]
पाचक
वि. १ स्वयंपाक करणारा; आचारी. २ जेणें करून अन्नाचें चांगलें पचन होतें असें (औषध इ॰). ३ (फोड, गळूं इ॰) पिकविणारा पूयजनक (पदार्थ). [सं.]
पाक
(सं) पु० पक्केपणा, स्वयंपाक. २ पक्वता. ३ चाचणी. ४ वि० शुद्ध, पवित्र.
पु. १ अग्निसंस्कारानें (अन्न इ॰) शिजवणें; स्वयं- पाक; भोजनाकरितां अन्न सिद्ध करण्याची क्रिया. 'पाक सिद्ध करितां सीताबाई ।' -दावि ४४. 'मग सावकारे करविला पाक ।' -शनि १२०. २ फळें इ॰ (आढींच घालून) पिकविण्याची क्रिया. ३ पक्वता; पिकलेली स्थिति; परिपक्वपणा; पक्केपणा. 'केली फळे तंव वाढे वाढी । फळपाकें माळी झाड तोडी ।' -एभा १.२२४. ४ पोटांत अन्नपचन होण्याची क्रिया; अन्नावर होणारा जाठररसाचा परिणाम. ५ गळूं इ॰ पिकणें, पुवळणें. ६ पक्वान्न; शिजवून तयार केलेला खाद्यपदार्थ. 'इंद्रियरुचीसारखे । करविती पाक निके ।' -ज्ञा ३.१२९. ७ (धान्याचें) पीक. 'मार्गशीर्ष मी मासां आंतू । जो धान्यपाक युक्तू आल्हादी ।' -एभा १६.२२०. ८ परि- णाम; पर्यवसान; फळ. 'जेव्हां द्राक्षीं दूध घातलें । तेव्हा वायां गेलें गमलें । परी फळपाकीं दुणावले । देखिजे जेवीं ।' -ज्ञा १५.५९१. ९ दहापांच औषधें एकत्र करून केलेला काढा. १० महाकवि इ॰ कांच्या वाणीच्या, काव्याच्या ठिकाणीं असणारा रसोत्पादक गुण- विशेष, शोभा, सौंदर्य. 'कालीदासाच्या काव्याचा पाकच निराळा.' ११ (सल्ला, योजना इ॰कांची) परिणति; सिद्धि; सफळता. १२ साखरेंत पाणी घालून उकळून केलेला रस. [सं. पच् = शिजणें; तुल. गुज. पाक = पीक] ॰कंडू-स्त्री. पोटांतील अन्नाचें पचन झाल्यावर उठणारी कंडू. [पाक + कंडू] ॰निष्पत्ति-स्त्री. १ स्वयं- पाक करणें; अन्न शिजविणें. २ स्वयंपाकांतील कौशल्य. [सं. पाक = स्वयंपाक + सं. निष्पन्नि = तयार करणें, होणें] ॰शाला-ळा- साळ-स्त्री. स्वयंपाकघर. [पाक + सं. शाला = घर, खोली]
पाकनिष्पत्ति
(सं) स्त्री० स्वयंपाक, जेवण.
पाक-शास्त्र
न. सूपशास्त्र; स्वयंपाक करण्याचें शास्त्र. [सं.]
पाक-सिद्धि
स्त्री. स्वयंपाक. [सं.]
पाक्या
वि. स्वयंपाकी; बबर्जी. 'कांहीं पाके आपल्या इच्छेप्रमाणें पाणी कमी किंवा अधिक प्रमाणांत आटवितात.' -गृशि २.१२. [पाक = स्वयंपाक]
पापकष्ट
पापकष्ट pāpakaṣṭa m pl (S) Great pains or labor; heavy toiling and drudging. v कर. Spoken in anger or vexation. Ex. म्यां पापकष्टानें स्वयंपाक केला तो कुत्र्यानें विटाळला. पापकष्टें With much ado; with fagging and weary working.
पुरण
नस्त्री. १ सारण; करंजी, पोळी, मोदक इ॰ खाण्याच्या पदार्थांत नारळाचा चव, शिजवून वाटलेली डाळ; खवा इ॰ घाल तात तें. २ सोन्याच्या पाटल्या, गोठ वगैरे पोकळ दागिन्यांत तांबें, रुपें इ॰ हलका धातु घालतात तें. ३ कोणत्याहि पदार्थाचा आकार मोठा करण्यासाठीं त्याच्या आंत जें घालतात तें 4 भिंत, जोत्याची आंतील बाजू इ॰ मध्यें दगड, धोंडे, माती इ॰ समुच्च यानें घालतात तें. ५ नुकत्याच लाविलेल्या रोपटाभोंवतीं जी माती घालतात ती; भर. ६ (सामा.) आंत भरण्याची, समाविष्ट कर- ण्याची वस्तु क्रिया. [सं. पूरण] सामाशब्द- ॰पोळी-स्त्री. पुरण घालून केलेली गव्हाची पोळी; एक प्रकारची गोड पोळी. [पुरण + पोळी; तुल॰ का. हूरण होळगी] ॰भरण-न. वरचेवर घातलेली भर; भिंत इ॰ कांत घातलेली दगड; विटा, चिखल इ॰ची भर; झाडाच्या मिळाशीं घातलेली माती. (क्रि॰ करणें; घालणें). [पुरण + भरण] पुरणावरणाचें-न. पाहुणें, देवधर्म यांसाठीं नेहमीं- पेक्षां अधिक केलेला स्वयंपाक. [पुरण + वरण]
फुगाव
पु. (नाविक.) गलबतांतील स्वयंपाक कर- ण्याची जागा. -किर्लो. आक्टो १९३८.२७४.
रसोई
स्त्री. स्वयंपाक. [म. रससोई; हिं रसोई]
सैंपाक
(सं) पु० स्वयंपाक, रसई.
सैंपाक or सैपाक
सैंपाक or सैपाक saimpāka or saipāka m (स्वयंपाक S) Dressing of food. 2 The food dressed.
सैपाक / सैंपाक
(सं) पु० स्वयंपाक, रसई.
सानवणें-विणें
क्रि. मुरणें, मुरूं देणें. 'शुद्ध स्वयंपाक पानें आपें आप उतरलीं । निजबोध मवाग्नीनें सानविलीं ।' -सप्र १५.७.
संस्कार
पु. १ हिंदु धर्मांतील कांहीं विशिष्ट आवश्यक विधि. हे त्रैवर्णिकांकरितां आवश्यक मानतात. हे सोळा प्रमुख मानतात पण त्यांचीं नांवें निरनिराळीं आढळतात. उदा॰ गर्भाधान, पुंसवन, अनवलोभन, विष्णुबलि, सीमंतोन्नयन, जात- कर्म, नामकरण, निष्कमण, सूर्यावलोकन, अन्नप्राशन, चूडाकर्म, उपनयन, महानाम्नी, समावर्तन, विवाह, और्ध्वदेहिक. 'विदेशी मेले मरणें । तयास संस्कार देणें ।' -दा २.७.७७. २ शुद्धि- करण; पवित्र करणें; कोणत्याहि गोष्टीच्या शुद्धीकरतां कराव- याचा विधि; दोषापकार व गुणजनन. -केसरी २४.१.३६. ३ तयार करण्याची कृति; क्रिया; परिपाक (स्वयंपाक, औषधि, रसायन वगैरे पचन, भाजणें, चूर्ण करणें, पुट देणें, भावना देणें वगैरे क्रियांनी). ४ उजळा देणें; पूर्ण करणें; साफ करणें; विशदीकरण करणें (क्रिया, वस्तु वगैरे). ५ रूपांतर, बदल, नवीन विशेष गुण उत्पन्न करणें; कोणतेंहि कार्य करणें. ६ एखाद्या गोष्टीचा छाप, ठसा (उठणें); कार्य, परिणाम (दिसणें). [सं. सम् + कृ] ॰रहित-विरहित-वि. ज्याचें संस्कार झाले नाहींत असा. संस्कारणें-क्रि. संस्कार करणें; क्रिया, कार्य करणें. संस्कर्ता-पु. संस्कार करणारा. संस्कार्य-वि. ज्याचा संस्कार करावयाचा आहे तो; संस्कार करण्या योग्य. संस्का- रित-धावि. संस्कार झालेला. संस्कृतस्त्रीन. गीर्वाण भाषा; व्याकरणनियमांनीं बद्ध अशी भाषा. धावि. १ ज्यावर संस्कार, कृति, क्रिया घडली आहे असा. २ शुद्धीकृत; पक्क. ३ अलं कृत; व्याकरणशुद्ध; उजळा दिलेलें; विद्वत्तापूर्ण. संस्कृति- स्त्री. १ संस्कार; क्रिया; पूर्णत्व. २ मनुष्यांचे जाति अथवा राष्ट्रस्वरूपी जे संघ त्यांचें भाषा, शास्त्रज्ञानादि रूपानें व्यक्त होणारें चरित्र. 'ज्ञातिराष्ट्रादि संघाना साकल्यं चरितम् ।' मानवी जातीची वौद्धिक, धार्मिक, नैतिक, सामजिक, सुधार- लेली स्थिति.
सुगर
वि. सुगड (-वि.) पहा. [सं. सुघड] ॰ण, सुग- रीण-स्त्री. १ एक जातीचा पक्षी. २ एक जातीचें जंगली झाड. ३ चांगला स्वयंपाक करणारी स्त्री. ४ (व.) खळवाडीतील गवताच्या काडांची केरसुणी, खराटा. -वि. सुगर, निष्णात (चुकीनें पुरुषासहि लावतात) सुगरणीचें घर-न. सुगरीण पक्ष्याचें कोठें. सुगरीण, सुगराई, सुगरावा, पणा-पु.स्त्री. हुशारी; दक्षता; कौशल्य; चतुराई. सुगरावा-पु. थाटमाट. 'जयाचा सुगरावा देखे ।' -ज्ञा १३.८१२. म्ह॰(व) सुग्रीण साताची शेवहातीं ळल्या हाताची = मोठी सुगरीण पण घर स्वच्छ ठेवतां येत नाहीं अशी स्त्री.
शुष्क
वि. १ कोरडें; वाळलेलें; सुकलेलें. 'शुष्क काष्टीं गुरगुरी । लाज हरि न धरितां ।' -तुगा ३७५३. २ (ल.) रोड (शरीर); कृश. [सं. शुष्] ॰अन्न-न. कोरान्न; कोरडें अन्न; शिधा; धान्य. 'तयेसि म्हणे बाहुक । आम्ही करूं स्वयंपाक । शुष्क अन्न देइंजे सम्यक । आम्हालागी ।' -कथा १. १०.१३५. ॰ऊर्ध्वपात-न. (शाप) कोरड्या पदार्थांस उष्णता देऊन केलेलें ऊर्ध्वपातन. (इं.) ड्राय डिस्टिलेशन-सेपूं २.६९. ॰काष्ठ-न. चुकीनें शुक्ल काष्ठ पहा. ॰कूप-पु. कोरडी विहीर. ॰वाद-पु. रिकामा, निष्फळ वाद, चर्चा; कोरडा वाद. 'शुष्क- वाद वृथा गोष्टी । त्यांतही वाग्वाद उठी ।' -एभा १८.२०९. ॰वैर-न. १ अकारण शत्रुत्व; अहेतुक वाकडेपणा. २ निष्फळ, बेफायदा शत्रुत्व, भांडण. ३ शत्रुत्वाचा आविर्भाव; दिखाऊ भांडण. शुष्काशुष्की-क्रिवि. रिकामपणीं; निष्फळ; बेफायदा; निरु- पयोगी (श्रम करणें, काम करणें, यातायात करणें, परिश्रम घेणें). शुष्केष्टि-स्त्री. अभ्यासाकरितां, शिकण्याकरितां, प्रत्यक्ष अनुभव घेण्याकरितां, करावयाच्या संस्कार, विधि अथवा प्रयोगाची तालीम, मांडणी; पूर्व प्रयत्न. [सं. शुष्क + इष्टि] शुष्कोपचार-पु. अव. १ कोरडे, निष्फळ, व्यर्थ उपाय, योजना; बेफायदा तपतूद. २ (ल.) निरर्थक, पोकळ, प्रतिकार, आश्वासन, शुभेच्छाप्रदर्शन शुभचिंतन.
सूप
न. वरण. [सं.] ॰कर्म-न. पाकक्रिया; स्वयंपाक. ॰कार-पु. स्वयंपाकी. ॰शास्त्र-न. स्वयंपाकाचें शास्त्र, रीत, विद्या; पाकशास्त्र.
स्वैंपाक, स्वैंपाकघर, स्वैंपाकी
स्वयंपाक इ॰ पहा.
स्वेंपाक
स्वेंपाक svēmpāka m (स्वयंपाक S) Cooking. 2 The food cooked.
स्वयंपाकी
स्वयंपाकी svayampākī m (स्वयंपाक) A cook, a male cook.
सयंपाक, सयंपाकघर, सयंपाकी, सयंपाकीण
स्वयंपाक, स्वयंपाकघर वगैरे पहा. 'तिकडे झाला सिद्ध सयं- पाक ।' -दावि ७.२.५५.
तारोळा
पु. १. अडथळा; खोळंबा; प्रतिबंध; खोळंब्याने, अडथळ्याने उत्पन्न झालेली अडचणीची स्थिती; (जेवण, स्नान, स्वयंपाक वगैरेत) गोंधळ; त्रास; घोटाळा. उदा. पावसाचा, धान्याचा तारोळा. २. दुर्दशा; कष्टमय स्थिती; विपन्नावस्था.
तळझाडा
पु. १. (घर, खोली इ.) पूर्णपणे रिकामे करणे. २. खालपासून वरपर्यंत, कानाकोपऱ्यांतून केलेली, घेतलेली (घर इ.कांची) झडती. ३. (खाद्यपदार्थ, धान्याची बेगमी) खाऊन फस्त करणे; (सामा.) (अशा रीतीने केलेला) चट्टामट्टा, फन्ना, फडशा. ४. (स्वयंपाक, यज्ञ, इमारत इ.करिता) जमीन झाडून, सारवून साफसूफ करण्याची क्रिया. ५. (सैन्य इ.कांचा) मुक्काम उठल्यानंतर ज्या ठिकाणी तळ असेल तेथे काही जिन्नस वगैरे राहिला आहे का ते पाहण्याकरिता केलेला शोध.
उगतभान्या
पु. (खा.) कानबाई देवीच्या रोटाचा एक प्रकार. याबद्दल नवस केला असतां शनिवारी गहूं दळून मोठ्या पहाटे उठून स्वयंपाक करतात व देवीला नैवेद्य दाखवून भानु उगवण्याच्या आंत खाऊन संपवितात. –संशोधक पृ. २४३. [उगळणें]
उपास
पहा : उपवास (वा.) उपासाची चूल करणे– जेवणाचा स्वयंपाक झाल्यावर निराहाराचे पदार्थ शिजवण्यासाठी सारवून चूल सोवळी करणे. उपास पडणे– वेळेवर जेवायला, खायला न मिळणे. उपासअनास, उपासतापास
उपास
पु. उपवास पहा. [सं. उपवास; प्रा.उआस.] उपा- साची चूल करणें जेवणाचा स्वयंपाक झाल्यावर निराहाराचे पदार्थ शिजविण्यासाठीं पोतरें घालून चूल सोंवळी करणें.
दत्त
पु. १ ब्रह्मा, विष्णु, महेश या त्रिमूर्तींचा अवतार; दत्ता- त्रेय. २ वाणी जातींतील एक आडनांव. ३ दैवप्राप्त वस्तु; प्रारब्ध; नशीब. 'तुका म्हणे भितो पुढिलिया दत्ता । म्हणऊनि चिंता उप- जली ।' -तुगा २८६७. ४ देणगी. 'हरी दत्त देईल तें शीघ्र घ्यावें ।' -कचेसुच १३. ५ नेमलेलें काम, धंदा; वृत्ति; नशिबानें आलेलें (काम). 'दान मागणें हें भिक्षुकाचें दत्तच आहे.' [सं.] ॰जयंती- स्त्री. मार्गशीर्ष शु. पौर्णिमा; दत्तात्रेयाचा जन्मदिवस. दत्तात्रेय, दत्तात्रय, दत्त अवधूत-पु. दत्त १ पहा. अत्रि ऋषीचा पुत्र. हा काशीला स्नान, कोल्हापुरास भिक्षा व माहूरला निद्रा करतो अशी दंतकथा आहे. -वि. (ल.) दिंगबर; उघडा बंब. दत्तात्रेयाची फेरी-स्वारी-जो मनुष्य नेहमीं भटकतो व जो नक्की कोठें सांप- डेल तें सांगता येत नाहीं, अशा माणसाचें भटकणें अथवा अवचित आगमन यास म्हणतात. दत्त म्हणून उभें-वि. अकल्पित रीतीनें येऊन उपस्थित झालेलें. -न. दैव; लाट; भाग्य; भोक्तृत्व; दैवगति; साथ. ॰म्हणून उभें राहणें-(स्वयंपाक सिद्ध होतांच दत्तात्रेय कोल्हापुरास अकस्मात् भिक्षेस येतात अशी दंतकथा आहे. त्यावरून) एखाद्या कार्याच्या सिद्धीसाठीं खटपट न करतां केवळ उपभोगापुरतें किंवा मनीं-मानसीं नसतां एकाएकीं आयते वेळीं येऊन हजर होणें असा अर्थ.
रास
स्त्री. (ज्यो.) राशि पहा. रासकूट-घटित- नाम-राशिकूट इ॰ पहा. रास-स्त्री. १ ढीग; राशि. राशि पहा. २ सरसकट ढीग. 'तुम्ही आंबे निवडून घेणार तर सवादोन रुप- यांनीं मिळतील व रास घ्याल तर रुपयानें.' ३ (व.) खळ्यांतील धान्याचा ढीग; (कु.) कणसें मळून वारवून स्वच्छ केलेला धान्याचा ढीग. ५ (गणित) मुद्दल व व्याज मिळून झालेली रक्कम. [सं. राशि] (वाप्र.) ॰भरणें-न. खळ्यांतील जमीनीवर धान्याची रास करणें. सामाशब्द- ॰पुजा-स्त्री. मळलेल्या धान्याच्या राशीची पूजा. ॰माथा-पु. खळवट; शेतमाल तयार होऊन खळ्यांत धान्याच्या राशी पडण्याचा हंगाम. ह्या शब्दांचा प्रथमाविभक्तींत उपयोग करीत नाहींत. [रास + माथा] ॰माथां -माथ्यास-क्रिवि. शेतांतील धान्य काढून, मळून, त्याची रास केल्यानंतर (सावकार देणें, वारणें, घेणें इ॰) 'हा पैका हरभ र्याच्या रासमाथ्यास फढशा करीन.' ॰वट-वि. १ राशी; राशीचा; मधल्या पायरीचा, गुणाचा; मध्यम; सामान्य. २ हलक्या दराचा, दणगट. ३ (व.) अडदांड. [रास] ॰वटा- पु. रासोटा पहा. ॰वळ-वि. १ समायिक. २ (कों.) साधारण प्रतीचा. रासिवा-पु. राशि. 'सुखाचा कीर निखळु । रासिवा मीची ।' -ज्ञा १६.३५६. [रास] रासी-वि. मध्यमप्रतीचें राशी पहा. रासुं(सों)डा-पु. (व.) धान्याची मळणी पूर्ण झाल्यानंतर गडी-माणसे खळ्यावर स्वयंपाक करून धान्याच्या राशीला नैवेद्य दाखवून जेवतात तो समारंभ. पूर्वीं क्वचित राशीला बकर्याचा बळी देण्याची चाल असे. रासोटा-पु. रास काढून नेल्यानंतर राहणारा खळ्यावरील धान्याचा अवशेष. ह्यावर महा- राचा हक्क असतो. [रास + ठाय]
लौकिक
पु. १ किर्ति; प्रसिद्धि; नांव; बोलबाला; एखा- द्याच्या संबंधानें लोकांत रूढ असलेलें मत. २ चांगल्या किंवा वाईट रीतीची लोकांमधील वाच्यता; लोकांत एखादी गोष्ट जाहीर होणें. ३ सामाजिक व्यवहार; सार्वजनिक काम. ४ समाजांतील लोकांची व्यवहारांत वागण्याची सरणी; प्रपंच; लोकाचार. 'हा गृहस्थ लौकिकांत हुशार आहे.' -वि. या लोकांतील; ऐहिक; अवैदिक; केवळ लोकप्रसिद्ध. २ सामान्य; नेहमीचें. ३ रूढ; प्रचारां- तील. ४ लोकाचाराला अनुसरून असलेलें. [सं.] लौकिकांत येणें-मुलगा वयांत येऊन संसार करूं लागणें; कामधंदा इ॰ची जबाबदारी वाहूं लागणें; प्रपंचांत पडणें. लौकिकावर येणें-वाद इ॰ मध्यें पराभव झाल्याकारणानें किंवा अंगावर डाव आल्या- कारणानें चिरडीस जाऊन अद्वातद्वा बोलूं लागणें; शिव्याशाप देणें; एखाद्याबद्दल अचकटविचकट बोलणें. सामाशब्द- ॰ऋण-न. लोकांचे कर्ज. 'पूर्वींच्या ऋषींनी वरील श्रुतींत अनुक्त असें जें एक नवीन लौकिक ऋण उपस्थित झालेलें आहे...' -टि २.१. ॰चतुर-वि. लोकांशी वागण्यांत किंवा त्यांना काबूंत आणण्यांत हुषार; लोकव्यवहारांत तरबेज. ॰चातुर्य-न. लोकांशी वागण्यां- तील शहाणपण. ॰रीति-स्त्री. रूढीनें चालत आलेली रीत; सर्व- साधारण पद्धत; सर्व लोकांची चाल; लोकांतील सामान्य चाल. ॰ज्ञान-न. लोकांचें ज्ञान; लोकांसंबंधी ज्ञान. लौकिकाग्नि-पु. स्मार्ताग्नि किंवा श्रौताग्नि नव्हे असा अग्नि; ज्यावर स्वयंपाक इ॰ करतात तो विस्तव. लौकिकाचार-पु. शिष्टाचार; शिष्ट संप्रदाय; शिष्ट लोकांची वागण्याची सरणी. [लौकिक + आचार] लौकिका- नुसरण-न. लोकांना अनुसरणें; लोकांप्रमाणें वागणें; लोकांच्या वहिवाटीप्रमाणें किंवा लोकरीतीप्रमाणें वागणें. [लौकिक + अनु- सरण] लौकिकी-वि. १ लोकांत रूढ असलेलें; लोकांत प्रचलित असलेलें; लोकप्रसिद्ध; पुष्कळ दिलसांपासून चालत आलेलें; पूर्वा- पार चालू असलेलें. २ व्यवहारचतुर; व्यवहारांत हुशार; प्रापं- चिक बाबतींत निष्णांत.
झां(झा)कणें
उक्रि. १ आच्छादणें; झांकण घालणें. 'त्या- माजीं बाणांच्या संधानें । झांकिन्नली यादवसैन्यें ।' -मुवन ३.७०. २ लपविणें; छपविणें; दाबून, लपवून ठेवणें; दाबादाबी करणें. ४ (उपकार इ॰) न फेडतां तसेच ठेवणें, राखणें. 'तुझा ऐसा उपकार मी न झांकीं ।' -र १३. [सं झष् = (आच्छादणें)-झाँख-झाँक -भाअ १८३४. प्रा. झंप = झांकणें. सं. शाख् = पुर्णपणें व्यापणें किंवा सं. छादन] म्ह॰ न्हातीचे बाल व खातीचें गाल झांकत नाहींत.' (वाप्र.) झाकउघड-स्त्री. झांकणें आणि उघडणें. उघडझांक पहा. झांकली मुठ-स्त्री. (एखद्याची अप्रकट) स्वाभाविक स्थिति; परिस्थिति; स्वरूप. म्ह॰ झांकली मुठ सव्वा लाखाची = आपण होऊन आपली (ज्ञान, संपत्ती इ॰ कांची) स्थिती उघडी करून दाखवूं नयें. त्यांत आपली अब्रू राहतें. झाकलें माणीक- न. (ल.) दिसायला साधा पण खरोखर गुणी व विद्वान् मनुष्य. झांकल्या पाठीचा-वि. ज्याला कांही सबब सांगता येईल किंवा जो फारसा अक्षम्य समजला जाणार नाहीं असा (अपराध इ॰). झाकल्या पाठीनें-क्रिवि. अब्रू गमावून न घेतां; प्रतिष्ठितपणानें; बोज कायम ठेवून. झाकल्या मुठीं-मुठीनें-क्रिवि. गुपचूप; बभ्रा न करितां; बोभाटा न होऊं देतां; कोणालाहि कळूं न देतां; गुप्तपणें. झांकसापा करणें-सक्रि. (व.) दाबादाबी करणें. झांकून-क्रिवि संक्षेपानें. शर. झां(झा)कापाक-की-स्त्री. १ जेवण झाल्यानंतरचीं स्वयंपाकघरांतील उरलीसुरलीं कामें (समुच्च- यानें)'स्वयंपाक घरांतील झाकापाक करून त्याही वर गेल्या.' -कोरकि ३०३. २ जलदीनें, गडबडीनें आवरणें, उपरकणें. [झांकणें द्वि.] झांकीव- वि. १ झांकण, ढांपण असलेला (डबा, पेटी इ॰)- २ ज्यावर झांकण, आच्छादन ठेवलें आहें असा. ३ झांकून ठेवलेला; लपवून ठेवलेला; लपवून ठेवलेला; बंद करून ठेवलेला. [झांकणें] झांक्या- वि. झाकणारा. [झांकणें]
पाप
न. १ अपराध; कुकर्म; दुष्टपणा; दोष; पातक; नीति- बाह्य वर्तन 'पापापासून ईश्वरक्षोभ, ईश्वरक्षोभापासून नरक- प्राप्ति, नरकप्राप्तीपासून स्वहितनाश.' याच्या उलट पुण्य. २ वाईट हेतु; कुकल्पना; कुढा भाव; दुष्ट वासना. 'मनांत कांहीं पाप आलेसें वाटतें.' ३ -पुस्त्रीन. (ल.) दुष्ट, त्रासदायक, पापी मनुष्य. 'संसप्तक थोडेसे असति न धरतील तेहि पाप तग ।' -मोकर्ण ४२.७१. ४ व्याधि; पीडा; अडचण; संकट; लचांड. [सं.] (वाप्र.) ॰उभें राहणें-पाप भोगणें; पाप उघडकीस येणें; मार्गांत आडवें येणें. ॰खाणे-पश्चात्तापानें मन खाणें; मनास हुरहुर लागणें. ॰बोंब मारून-देऊन उठणें, ज्याचें पाप त्याचे पुढें येऊन नाचणें-स्पष्टपणें पाप उघडकीस येणें. पापाचा वांटा उचलणें-पापकृत्याचे परिणाम भोगण्यास सिद्ध असणें किंवा नाइलाजानें तयार होणें (मागील जन्मांतील पापाचीं फळें भोगावी लागतात अशी समजूत आहे त्यावरून). पापानें पाय धुणें- सर्वदा पापचरण करणें. पापानें पाय धुतलेला-वि. अतिशय पापी; दुष्ट; महान्पातकी (मनुष्य) तो पाप देणार नाहीं तर पुण्य कोठून देईल-तो फारच कृपण आहे. वाईट वस्तु देखील दुसर्याला त्याच्यानें देववत नाहीं, मग चांगली देववत नाहीं, यांत काय नवल ? सामाशब्द- ॰कर्मी-वि. दुष्कर्मी; वाईट कृत्यें करणारा; दुष्ट; पापी. कष्ट-पुअव. अतिशय श्रम, कष्ट; अत्यंत दुःख; काबाडकष्ट (रागानें, त्रासानें वैतागून बोलतांना योज- तात). 'म्यां पापकष्टानें स्वयंपाक केला तो कुत्र्यानें विट ळला.' ॰कळी-स्त्री. कलियुग. ऐसी आली पापकळी । आश्चिर्य मानिलें सकळीं ।' -दा ३.५.२२. [पाप + कलि] ॰खाण-स्त्री. अत्यंत, भयंकर, पापी मनुष्य; महान् पातकी; पापाचें आगार. ॰ग्रह-पु. मंगळ, शनि, राहु, केतु हे अशुभ मानलेले ग्रह; आकाशांतील ग्रहांची अपशकुनकारक, दुश्चिन्हकारक युति, योग. ॰दृष्टि-स्त्री. पापी नजर; काम, मत्सर इ॰नीं युक्त अशी दृष्टि, पाहण्याचा प्रकार. -वि. कामुक; पापी; कलुषित, दुष्ट, दोषी नजरेचा. ॰द्वेष्टा- वि. पापाचा तिरस्कार करणारा. ॰धुणी-स्त्री. पाप धुतलें जाणें; पापापासून मुक्तता. 'जें श्रवण करतां पापधुणी । होय एकदां सर्वांची ।' -ह ४.४४. [पाप + धुणें] ॰निरास-पु. पाप धुवून टाकणें, दूर करणें. ॰पिंड-पु. (स्त्री रजस्वला असतांना गर्भ राहतो. यावेळीं मातेचें अशुद्ध रक्त वाहत असतें, त्यावरून या काळांतील) गर्भ पिंड; गर्भ. ॰पुत्र-पु. कुपुत्र. 'बाप तयाला ताप वृद्धपणिं पापपुत्र हा करी ।' -ऐपो ३६८. ॰बुद्धि-मति-वि. कुबुद्धि; दुष्ट, वाईट मनाचा; पापी वृत्तीचा. ॰भी(भे)रु-वि. पापाला भिणारा, भिऊन वागणारा. ॰मूर्ति-राशि-रूप-स्वरूप-वि. घोर, महान् पातकी; मूर्तिमंत पातकी. ॰योनि-नी-स्त्री. १ पापजाति. 'तिथे पापयोनींही किरीटी । जन्मले जे ।' -ज्ञा ९.४४३. २ गुन्हेगार जाती. 'पापयोनि शब्दानें अलीकडे सरकारदरबारांत ज्यांना गुन्हे- गार जाती असें म्हणतात तशा प्रकारचा अर्थ विवक्षित असून....' -गीर ७४८. -वि. पापी; पातकी (माणूस). ॰वासना-स्त्री. अपवित्र, पापी इच्छा; दुष्ट वासना. ॰वेळ-स्त्री. रात्रीं अकरा वाजल्या पासून तों पहाटे तीन वाजेपर्यंतचा काळ. धार्मिक व पवित्र कार्याला ही वेळ अयोग्य समजतात. ॰संग्रह-पु. पापांचा सांठा, संचय. ॰संताप-पु. पापामुळें होणारें दुःख; मनस्ताप; कांचणी. पापाचा बाप-पु. जन्मदाता बाप (कारण तो मुला- मुलीचा उत्पत्तिकारण असल्यामुळें त्यांच्या पापांची त्याच्यावर जबाबदारी येते). याच्या उलट पुण्याचा, धर्माचा बाप पापाचे पर्वत-पुअव मोठीं आणि पुष्कळ पापें. 'अपार जीव मारले । पापांचे पर्वत सांचले ।' -रावि १.११०. पापात्मा-पु. अत्यंत पापी; दुष्ट मनुष्य; पापमूर्ति, पापाचा केवळ अर्क. पापापूर्व- न. अनीतीच्या कृत्यांपासून उत्पन्न होणारें वाईट फळ, परिणाम इ॰. अपूर्व पहा. पापिष्ट, पापी-वि. अतिशय पापचरणी; दुष्ट; अनीतीनें वागणारा; पातकी; पापयुक्त. पाप्याचा पितर-न. (ल.) अतिशय रोड, दुर्बल व क्षीण, मनुष्य (पापी माणसानें दिलेले पिंड त्याचें पितर खात नाहींत त्यामुळें ते रोड बनतात त्यावरून).
चालता
वी. १ चालू असणारा; गीतत, उपयोगांत असणारा; सुरु असलेला. २ उपयोगांत येण्यासारखें, तीक्ष्ण (धार किंवा घार लाविलेलें हत्यार, शस्त्र). ३ प्रचारांत असणारा; अस्ति- त्वात असलेला; वर्चस्व असलेला. [चालणें] सामाशब्द- ॰कज्जा, मोकदमा-पु. सुरु असलेला. तंटां, भांडण किंवा प्रकरण. ॰काळ- पु. भरभराटीचा काळ; उत्कर्षाचे दिवस. 'बा तुझा चालता काळ । खायाला मिळती सकळ ।' -अमृत ११८. ॰गाडा- पु. सरळ चाललेला गाडा; सुरळीत चाललेल्या क्रम, परिपाठ, एखादें काम. म्ह॰ चालत्या गड्यास खीळ घालणें = सुरळीतपणें चाललेल्या कामांत विघ्न करणें. ॰घोडा-पु. कामांत असलेला, वापरण्यांत असलेला, जिवंत घोडा. चालत्या घोड्यावरच्या गोमाशा-घोडा जिवंत असतांनाच त्याच्या अंगावर गोमाशा बसतात, मेल्यावर बसत नाहींत, यावरून लक्ष- णेंने माणसाजवळ पैसा, अधिकत असतो तोपर्यंतच लोक त्यास चाहतात; आश्रयाला असणारे कार्यसाधु लाळघोटे लोक यांना म्हणतात. चालत्या पायीं-क्रिवि. चालत असतांनाच; न थांबतां; ताबडतोब. 'चालत्या पायीं परतणें ' ॰बोलता-वि. १ मूर्तिमंत. २ ज्याला चालतां बोलतां येतें असें (मूल). बोलतां, चालतबोलत असतां-क्रिवि. १ चटकन; सहजा- सहजीं; लवकर; अनायसें. 'तो म्हातारा चालतां बोलतां मेला.' २ अल्पकाळांत; एकाएकीं; तात्काळ. 'इतक्यांत चालतांबोलतां दौत कोणी नेली.' 'हे आठ महिने राहिले ते चालतां बोलतां जातील.' ॰रुपया-नाणें-पुन. व्यवहारांत चालू असलेला रुपया अगर नाणें. ॰रुमाल-पु. (कचेरीकामांत, प्रकरणांत) चालू प्रकरणांचा समूह. ॰चालतीतबलक, चालतें पुडके- हेहि शब्द याच अर्थानें वापरतात. ॰सैपाक-पु. साधा, सोपा, सहज होण्याजोगा सैपाक; शिजत असतां फारसें लक्ष्य द्यावें लागत नाहीं असा स्वयंपाक.
अड
अ. कमीपणा, उणेपणा, दुय्यमपणा, न्यूनता, गौणता दर्शविणारें उपपद. हें लागून कित्येक सामासिक शब्द बनतात; जसें अडघोडा, अडधोतर; अडलंड, अडसर. इ॰ अडच्या ऐवजीं. कधींकधीं 'आड' असें रूप येतें सामन्यातः देशावरील लोक अडअसें योजितात; कोंकणांत आडअसें वापरतात तेव्हां अड आणि आड यांनीं आरंभ होणारे शब्द एकमेकांत घुसडले जातात. त्याकरित इष्ट शब्द एकाखालीं नसल्यास दुसऱ्याखालीं सांपडेल. सूचना:- संकृत अर्ध या ब्दापासून बनलेले व कानडी अड्ड ( = अडवा, हट्ट; दुराग्रह) या शब्दापासून बनलेले सामासिक शब्द यांचा घोंटाळा होऊं देऊं नये, म्हणून प्रथम अड-अर्ध पासून संभवलेले शब्द दिलेले आहेत; नंतर कानडी अड्ड पासून साधलेले शब्द घेतले आहेत. कांहीं शब्द या दोन्ही वर्गांतहि पडतील; पण ते कोठेंतरी एका ठिकाणीं दिले आहेत. ज्यांचा संबंध या दोहों अडशीं नाहीं किवा जे महत्त्वाचे वाटले, ते स्वतंत्रच दिले आहेत. [सं. अर्ध; प्रा.अड्ढ]. ॰कणी-स्त्री. तांदूळ, डाळ. इत्यादिकांची मोठी कणी; प्रसंगविशेषीं ही तांदूळ-डाळींतहि मोडते; फुटका, अर्धवट दाणा; कणी. 'कापुरांचिआं भांजनियां । वाटौनि मौत्त्किकांचिआ अडकणियां ।।' -शिशु ५९१. ॰काष्टा- पु. धोतर वगैरेचा आखुड किंवा अपुरा मुडपा, काष्टा. आडकाष्टा पहा. कुडतें-न. लहान कुडतें; कुडतें पहा. ॰खंड-पु. तुकडा; अर्ध- वट, अपुरा भाग. 'मालांत माती नसून अडखंड नसावेत. ' -मुंव्या २६. ॰खंड-वि. १ अंगमेहनतीनें कांहीं कामें करून पोट भरणारा मुलगा; पोऱ्या. २ किरकोळ काम करणारा नोकर; आडकाम्या; बगल्या; दुसऱ्याच्या हाताखालीं काम करणारा. ॰खोल-न. १ बांधून न काढलेली , सरासरी खणलेली विहीर; रेताड जमिनींत खणलेली व न बांधलेली विहीर; अर्धीच खणून टाकलेली विहीर. ॰गडी-पु. काम- कऱ्याच्या हाताखालचा गडी किंवा मजूर; मदतनीस; हस्तक; अड- खप्या. ॰गांव-पु.न. लहान खेडेंगांव; मोठी बाजार पेठ नसलेलें पण ज्याच्या जवळपास मोठे रहदारीचे रस्ते नाहींत असा भररस्त्या वर नसलेला गांव; खेडें; वाडी; गांवढें गांव. ॰गोखमा-अडबाप्या; पोरगा; गोखमा पहा. ॰गोण-स्त्री. बैल वगैरेवरून वाहून नेतात ती धान्याची लहान गोणी. ॰घर-न. मुख्य घराजवळ बांध- लेलें लहानसें घर किंवा छप्पर; झोंपडें; सोपा; पडवी. आउट हौस ॰घोडापु. लहान घोडा; प्रसंग-विशेषीं मोठ्या घोड्यांचेहि काम करणारा घोडा; तट्टू. ॰जात-आडजात पहा. ॰जिनापु. दुसरा लहान जिना; मागील जिना; चोर जिना. ॰जुना-जून-वि. अर्ध- वट जुना; उपयोगानें कांहींसा नादुरुस्त झालेला. वापरलेला; निरु- पयोगी. ॰दाणा-पु. घोड्यास खावयास हरभऱ्याव्यतिरिक्त, दिलेलें धान्य, दाणा; (घोड्याचा दाणा म्हणजे हरभरा). ॰दाळ- स्त्री. डाळीमधला मोठा किंवा जाड चुरा; अडकणी. ॰धोतर-न. लहान धोतर किंवा मोठा पंचा. अडपंचा पहा. ॰नर-स्त्री. स्त्रीत्व नसणारी; स्त्री-इंद्रिय असून ॠतु प्राप्त होत नाहीं अशी. ॰पंचा-पु. अगदीं लहान पंचा; ॰पडदणी-स्त्री. न्हाताना वेढून घेण्याची लहान पडदणी, वस्त्र; जुनेर. ॰पन्हळ-पु. अडनळ पहा. ॰पेठ-स्त्री. अडगांव; छोटासा बाजारगांव. ॰फळें-न. अव. अट- पळें पहा. ॰बंदर-न. १ लहान किंवा विशेष व्यापारी महत्त्व नसलेलें बंदर. २ गलबतांना तात्पुरतें नांगरण्याला पुरेसें, लहान, किंवा सुरक्षित नसणारें बंदर. ॰बाप्या-पु. बालपण गेलें पण अजून बाप्या झाला नाहीं असा जवान पोऱ्या; तरणा बांड; सोळा सतरा वयाचा मुलगा; प्रौढपणा न आलेला माणूस. ॰बायको-स्त्री. वधूटी; नुकतीच वयांत आलेली मुलगी (बारा-तेरा वर्षांची ); अर्धवट प्रौढ बायको. ॰मुलगा-पु. मुलगा; पोऱ्या ;छोकरा; अडबाप्या. ॰म्हातारापु. म्हातारपणांत प्रवेश करणारा; जरा उतार वयाचा माणूस; मध्यमवयस्क. ॰शहर-न. लहान शहर. 'देऊळ जवळच हांकेवर होतें. आडशहरांतलें तें, किती मोठें असणार?' -सुदे २४. सोंग-न. नाटकांतील दुय्यम किंवा हलका नट; हलकें, गौण पात्र. ॰स्वयंपाक-सैंपाक-पु, चटण्या, कोशिंबिरी, भाज्या वगैंरे; मुख्य पदार्थांखेरीज इतर किरकोळ स्वयंपाक.
रस
पु. १ चव; रुची; स्वाद; जिव्हेनें खारट, तुरट, गोड इ॰ जो पदार्थाचा धर्म समजतो तो. 'सुरभिदुग्धपान रस मजला समजे ।' -मोअनु २.७. २ चीक; द्रव; पान, फूल, फळ इ॰तील पातळ अंश. ३ ऊंस, आंबा यांतून निघणारा द्रवपदार्थ. ४ अर्क. ५ अन्नाचें रक्त व्हावयापूर्वींचें रूपांतर; शरीरांतील ज्या अन्नापासून रक्त व घाम बनतो ती अन्नाची अवस्था. ६ धातूचें द्रवरूप; कोणत्याहि धातूचा वितळून केलेला द्रवपदार्थ; सोनें, चांदी इ॰ची अग्निसंयोगानें झालेली द्रवरूप स्थिति. ७ (साहित्य) अंतःकर- णाच्या वृत्तीचें कांहीं कारणानें उद्दीपन होतें आणि त्या उद्दीपित झालेल्या वृत्तीच्या अनुभवानें किंवा अवलोकनानें अनुरूप विचार प्रकट करण्याची प्रेरणा होते तिला रस म्हणतात. रस नऊ आहेत- शृंगार, वीर, करुण, अद्भुत, हास्य, भयानक, बीभत्स, रौद्र व शांत. 'तैं नवरससुधाब्धीचा । थावो लाभे ।' -ज्ञा १०.७. ८ (ल.) गोडी; आवड; राम; मनोरमता; मोहकता (प्रसंग, साहित्य, भाषण, व्यापार इ॰ तील.) 'वचनांत कांहीं, रस नाहि पाही ।' -लीलावती. ९ प्रीति; प्रेम; अनुराग. १० कस; योग्यता. 'ऐसि- यांचा कोण मानितो विश्वास । निवडे तो रस घाईं डाईं' -तुगा ३३६२. ११ खाणींतील मीठ; खनिजक्षार; (गंधक, मोर्चूत इ॰). १२ पारा. १३ पुरुषाचें वीर्य किंवा रेत. १४ विष. १५ उत्तेजक द्रव्य (तेल, मसाला, साखर, मीठ इ॰) (संस्कृतमध्यें असे अनेक प्रतिशब्द या शब्दाला आहेत). १६ पाणी. 'तरी नुरोनि वेगळेंपण । रसीं भजिन्नलें लवण ।' -ज्ञा १७.१८. १७ दूध. 'कथा सुरभिंचा रस स्वहित पुष्कळ स्वादुहि ।' -कैका. १८ रसायन; औषध. 'पैं कळांतर गांठीं बांधिजे । मग पुढिलांचे काज कीजे । पूजा घेऊनि रसु दीजे । पीडितांसी' -ज्ञा १७.२८७. १९ नारळाच्या रसांत गूळ मिळवून तयार केलेलें पातळ पेय. [सं.] सामाशब्द- ॰कस-पु. १ रसज्ञता. -शर. २ रसाचा कस; रंग; बहार; गोडी. (क्रि॰ जाणें; घेणें). 'भोग आतां रसकस घे बरी ही संधी साप- डली ।' -प्रला १९९. [रस + कसणें] ॰केळी-स्त्री. (महानु.) रसकेलि; नवरसाची क्रीडा. 'जेही रसकेळि खेळति मनें । कळा- विदांची.' -भाए २७२. [सं. रस + केलि = क्रीडा] ॰गुल्ला- गोल्ला-पु. (व.) एक बंगाली गोड खाद्य पदार्थ; एक प्रकारची मिठाई. ॰द-पु. मेघ. [सं.] ॰पूजा-स्त्री. औषधाबद्दलची किंमत; वैद्याची फी. 'रसपूजा धरोनि पोटीं । वैद्य औषधांच्या सोडी गांठी ।' -एभा ११.१०४४. ॰बाळ-बाळी-बेळी-बेळ-स्त्री. केळयाची एक जात (सोनकेळयाप्रमाणें). [रस + का. बाळे = केळ; का. रसबाळे] ॰भंग-पु. १ गोडी जाणें; काव्यग्रंथ गानादिसंबंधीं वाचकश्रोत्यांचा विरस. २ बेरंग; सौंदर्यनाश. ३ उत्साह, उमेद, यांवर विरजण पडणें. [सं.] ॰भरित-वि. १ रसानें युक्त अगर भरलेलें; रसपूर्ण; (फळ इ॰). २ (ल.) चटकदार; गोड; मनोरंजक; सुंदर (भाषण, वर्णन, इ॰). [सं.] ॰भरू-वि. रसानें भरलेला (फलादि पदार्थ); रसपूर्ण; रसाळ. [रस + भरणें] ॰भावना-स्त्री. पुटें देण्याची रीत; किमयेची रीत. 'परी मात्रेचेनि मापें । दिव्यौषध जैसैं घेपे । कां कथिलाचें कीजे रूपें । रसभावनी ।' -ज्ञा १८.७७४. ॰भोजन-न. ज्या जेवणांत आंबरस हें मुख्य पक्कान्न आहे असें जेवण. ॰मय-वि. (रसपूर्ण) जलमय. 'अद्व- यानंदस्पर्शे । दिठी रसमय जाली असे । ते अश्रु नब्हती जैसें । द्रवत्वचि' -ज्ञा १८.१६०४. ॰रंग-पु. मकरसंक्रांतीचे दिवशीं कुंकु आणि गूळ हीं दोन पात्रांत भरून ब्राह्मणांस, सुवासनीस देतात तो; संक्रातीचें हळदीकुंकू. [रस आणि रंग] ॰राय-पु. (महानु) शृंगारस. 'निर्यास गेलें । रसरायाचें ।' -भाए ९९. ॰वडी-स्त्री. तोंडीलावण्याकरितां मसाल्याच्या रसानें युक्त हरभऱ्याच्या पिठाच्या वड्या करतात त्या; पाटवडी. ॰वंती-स्त्री. १ (प्र.) रसवती; वाणी; वाचा (रसाचें अधिष्ठान मानली जाणारी); वक्तृत्व. २ गोड भाषण. ३ जीभ. ४ एक वनस्पति. ॰वांगें-न. मसालेदार रसानें युक्त असें शिजवून तयार केलेलें सगळें वांगें; भरलेलें वांगें (भाजी). ॰वान्-वि. १ रसभरित-युक्त-पूर्ण. २ चवदार; स्वादिष्ट; मिष्ट. [सं.] ॰विक्रय-पु. (तेल, मीठ, लोणी, साखर, दूध, तूप, इ॰) रसाळ, पोषक पदार्थींची विक्री. शास्त्रांत हा दोष मानला आहे. [सं.] ॰वृत्ति-स्त्री. शृंगारादिक रसभाव. (क्रि॰ प्रकट करणें). 'येथ विभूती प्रतिविभूती । प्रस्तुत अर्जुना सांगिजेती । ते विद्गदा रसवृत्ती । म्हणिपैल कथा ।' -ज्ञा १०.४१. ॰सोय-स्त्री. स्वयंपाक; पक्कान्न. 'जैसी रांधवणी रससोय निकी । करूनियां मोले विकी ।' -ज्ञा २.२५४; -अमृ ५.४३. ॰स्वादन- न. स्त्रियांच्या शृंगारचेष्टांचें वैगरे वर्णन ऐकण्यामध्यें असलेली श्रद्धा, गोडी. 'हावभाव कटाक्षगुण । सुरतकाम निरूपण । तेथ ज्याचें श्रद्धा श्रवण । रसस्वाद त्या नांव' -एभा ११.७०७. ॰ज्ञा-वि. १ रस जाणणारा; रसिक; मर्मज्ञ. 'पुष्पाच्या मकरंदाचा रसज्ञ भ्रमरा- सारखा दुसरा कोणी नाहीं.' २ योग्यता जाणणारा; महत्त्व ओळ- खणारा. ३ रस, भावना, वृत्ति ओळखणारा. [सं.] ॰ज्ञता-स्त्री. रस जाणण्याचा गुण, पात्रता. ॰ज्ञतावात-ज्ञानवात-स्त्रीपु. रस जाणण्याखेरीज बाकी सर्व इंद्रियांची ज्ञानशक्ति यांचा नाश करणारा वात. रसरसणें-अक्रि. १ रसानें पूर्ण भरून असणें. २ (अग्नि) प्रज्वलित असणें; धगधगणें; प्रखरणें. ३ तापणें; जळजळीत असणें; जळजळणें (तापांत अंग, डोळे, उष्णतेनें पाणी, तवा इ॰. ४ ऐन तारुण्यांत, भर ज्वानींत असणें. ५ भर-भरांत असणें (देवी, गोवर, ज्या त्या हंगामांत उत्पन्न होणारे पदार्थ) किंवा संतापानें. 'संजयो विस्मयें मानसीं । आहा करूनी रसरसी । म्हणे कैसे पा देवेसी । द्वंद्व यया' -ज्ञा १४.४११. [रस ध्व.] रसरसीत- शीत-वि. १ रसाळ; रसपूर्ण. २ भर ज्वानीनें युक्त; तारुण्यानें मुसमुसलेली. ३ प्रखर; प्रज्वलित; तापून लाल झालेलें. ४ पिवळा शब्दामध्यें पहा. रसा-रस्सा-पु. १ पुष्पळ रस असलेली भाजी; मसाला इ॰ घालून केलेलें पातळ तोंडीलावणें (बटाटा इ॰चें). २ मांसाचें कालवण. [सं.] रसाधिपति-पु. वरुण. [सं.] रसाभास-पु. १ कृत्रिम, खोटी भावना; अनुचितपणें प्रवृत्त केलेला रस. उदा॰ पशुपक्ष्यादिकांचा शृंगार वर्णन करणें. हा शृंगार- रसाभास झाला. २ अशा तऱ्हेचें काव्य अगर नाटक. ३ स्थायी- भाव नांवाखालीं येणाऱ्या अष्टरसांपैकीं एकाचें केलेलें खोटें आवि- ष्करण; अशा रसाचें (काव्य, नाट्य रूपानें) केलेलें दिग्दर्शन. ४ कांहीं खोट्या बतावणीनें खरी भावना दडवून ठेवणें. [सं.] रसाल-ळ-वि. १ रसभरित; ज्यामध्यें रस पुष्कळ आहे असा (फलादि पदार्थ). २ रसयुक्त; मधुर; गोड. 'केळीचें दळवाडें । हळू पोकळ आवडे । परि फळोनिया गाढें । रसाळ जैसें ।' -ज्ञा १३.२१२. ३ चटकदार; मनोरंजक; आवडेलसें (भाषण). 'आतां टाकून बहुत शब्दजाळ । बोले रामकथा रसाळ ।' ३ बरका फणस यास दुसरें नांव. ४ गमतीचें; विनोदी; हास्यजनक (भाषण). ५ खमंग; चांगलें; मुरलेलें; चमचमीत (पाक, लोणचें, ओला पदार्थ) ७ रसिक; रसज्ञ. 'तूं सांग तो वर तुला रुचला रसाळे ।' -नल ९१. रसाळी-स्त्री. १ (व.) आंबरसाचें जेवण. 'अंबादासपंत खाड्याच्या येथें दरवर्षी एक रसाळी होते.' २ (कों.) उंसाच्या चरकाचें खालचें लांकूड, काठवट, रसिक-वि. १ मर्मज्ञ; गान, काव्य इ॰ रसावर विशेष प्रीति असून त्यांतील मर्म जाणतो तो; सहृदय. २ थट्टा-मस्करी, भाषण इ॰ द्वारा दुसऱ्याच्या आणि आपल्या अंतःकरणप्रवृत्तीस विनोद उत्पन्न करील असा. ३ गमत्या; विनोदी. ४ भावनाप्रधान. ५ चंवदार; स्वादिष्ट; मधुर. ६ (ल.) (काव्य) आल्हाददायक; सुखोत्पादक. [सं.] रसिकत्व-न. १ माधुर्य. २ रसिकता. -ज्ञा १८.३४७. रसिक रसीला-वि. रसाचा खरा खरा भोक्ता; इंष्कबाज. [रसिक + हिं. रसीला = रसदार] रसोत्पत्ति-स्त्री. १ रसाची उत्पत्ति, निर्मिति. २ विनोद; हास्य; करमणूक. [सं.]