मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

हरभरा

हरभरा harabharā m. sometimes हरबरा m (हर Name of Shiva, and भरणें To fill. Supposed to be full of the deity.) A vetch, Gram, Cicer arietinum. Note. This word, like तांदूळ, गहूं, and others of this class, is used in this (viz. singular) number when simple designation or mention of the vetch is intended; but, otherwise, i. e. when any heap or collection of it is to be spoken of, or any quantity is to be bought, sold, used &c., it is put into the plural number: accordingly, हरभरा signifies A grain of gram. हरभऱ्याचे झाडावर चढविणें To tickle and exhilarate a person by flattery &c. (so as to accomplish one's purpose through him).

मोल्सवर्थ शब्दकोश

हरभरा, हरबरा

हरभरा, हरबरा m A vetch, gram; a grain of gram. हरभऱ्याचे झाडावर चढविणें Tickle and exhilarate a person by flattery.

वझे शब्दकोश

हरभरा / हरबरा

पु० चणा, धान्यविशेष.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

संबंधित शब्द

अडदाणा      

पु.       हरभरा खेरीजकरून घोड्याला जे इतर धान्य खायला देतात ते. (हरभरा हे घोड्याचे उत्तम पौष्टिक धान्य समजले जाते. त्याला नुसता दाणा हा शब्द लावतात.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

मोघड्या

स्त्री. (खा.) दोन फणी पाभर; खानदेशांत गहूं, हरभरा या पाभरीतून पेरतात. मोघणा-पु. मुख्य धान्यांत मोगण म्हणून दुसरें धान्य पेरण्याचा नळा. मोघड किंवा मोघण ह्या अर्थी उपयोग. २ ह्या नळ्यानें किंवा मोघण्यानें पेरलेलें तास. मोघणी, मोंघणी-स्त्री. १ जोंधळा, बाजरी वगैरे मध्यें तूर, हरभरा इ॰ ची केलेली पेरणी. ३ असें पेरणीचें काम ज्या नळयानें केलें जातें तो नळा. मोघणा पहा. मोघणें-क्रि. मोघणाच्या साधनानें शेतांत तास पाडून त्यांत बीं पेरणें. [मोघण]

दाते शब्दकोश

अपुष्क      

वि.       (वन.) गर्भपोषहीन; पुष्क नसलेले. उदा. चिंच, हरभरा, वाटाणा यांची बीजे. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अश्व

पु. घोडा. एक चतुष्पाद प्राणी; हा मनुष्यास बसाव- याचे व गाडी वगैरे ओढण्याचे उपयोगास येतो. [सं. अश्व (अश् = व्यापणें; अ = नाहीं + श्वन् = कुत्रा?). झेंद अश्प; फा. अस्प; ग्री. इप्पॉस; लॅ. इक्कस; लिथुआनि. अस्झ्व; ओल्ड आयरिश इश]. ॰क्रांत(स्थान)-न. (नृत्य) एक पाय समस्थित ठेवणें, दुसरा पाय अग्रतलसंचर करून पाय अंगठ्यावर टेंकून दुसर्‍या पायाजवळ ठेवणें. अडखळणें, वस्त्र उचलणें, झाडाच्या फांद्या ओढणें वगैरे दर्शक हें स्थान आहे. ॰खाद्य-न. हरभरा; घोडखाद्य; अश्व्जीवन ॰गति-स्त्री. स्त्री. घोड्याची चाल-गति. ॰गंधा-ह्या झाडाच्या काद्यांस आस्कंद म्हणतात. ही फार पौष्टिक औषधि आहे. यास आस्कंद, अजगंध, ढोरगुंज अशीं निरनिराळीं नांवें आहेत. हें झाड खानदेश, नाशीक, वर्‍हाड आणि घाटावर आढळतें. उंची दोन फूट. झाड ४।५ वर्षें जगतें. पानें कोरांटीसारखीं असतात. हरभर्‍याएवढीं लाल फळें येतात. पाक धातुपौष्टिक आहे. इतर अनेक रोगांवर याचा पाक गुळवेलीचें सत्व व मध यांबरोबर देतात. ॰गुण-पु. १ घोड्याचा गुण-धर्म. २ घोडयाचा विशेष-सुलक्षण-उत्कृष्ट गुण. ॰गुटिका- घुट-टि-का-स्त्री. एक विवक्षित वाजीकरण(औषध, मंत्रसिध्दि, ताईत या द्वारें). ॰चिकित्सा-स्त्री. घोडयाचे औषधी उपचार. ॰चिकित्सक-पु. शालिहोत्रज्ञ; अश्ववैद्य; घोडयाचा वैद्य. ॰दोष- अशुभ चिन्हें पहा. घोडयाचे दुर्गुण. ॰धाटी-स्त्री. एक वृत्त. याला मंदारमाला असेंही म्हणतात. उ॰ ‘वाचाळ मी नीट पाचारितों धीट याचा नयो वीट साचा हरी ।’ –वृत्तदर्पण ३२. या दोहोंत फरक म्हणजे अश्वघाटींत बाराव्या अक्षरावर पदसमाप्ति, तर मंदार मालेंत अकराव्या अक्षरावर असते. मंदारमाला पहा. ॰धाटीयमक-न. हें मागें व पुढें निराळें व्यंजन असल्यामुळें घोडयाप्रमाणें उडया मारीत चाललें आहे असा भास होतो. उ॰ ‘गाजत वाजत साजत आज तया जतन करुनि आणहो’ –मोविराट ६.७५. ॰परीक्षक-पु. घोड्याच्या शास्त्रांत प्रवीण. ॰परीक्षा-स्त्री. १ घोड्यासंबंधानें ज्ञान, परीक्षा. २ घोड्याच्या मासाचें ज्ञान; अश्वमांसज्ञान. ॰भार-पु. १ अश्वसेना; घोडदळ; घोडेस्वारांचे सैन्य. २ घोड्यांचा जमाव, समूह. [सं.] ॰मूत्राम्ल-न. (इं.) हिप्यूरिक अॅसिड. हें अम्ल वनस्पत्याहारी जनावरांच्या मूत्रांत सांपडतें. ॰मेध-पु. सार्वभौम राजानें कराव- याचा यज्ञ. हा यज्ञ केल्यानें पृथ्वीचें सार्वभौमत्व मिळतें व असे शंभर यज्ञ केल्यानें इंद्रपद मिळतें, अशी समजूत आहे. [सं.] ॰राती-स्त्री. एक वनस्पति. हरितालिका पूजेंतील पत्रीपैकीं एक. ॰वाहक-पु. सारथी; घोडे हांकणारा; चाबूकस्वार. ‘जेथ अश्व- वाहकु आपण’ –ज्ञा १.१४०. [सं.] ॰वैद्य-पु. घोड्यांचा वैद्य; शालिहोत्रज्ञ; घोडाडाक्टर. ॰शक्ति-स्त्री. घोड्याचें बल, सामर्थ्य. (इं.) हॉर्सपावर. ॰शाणी-साहणी-पु. चाबूकस्वार; घोड्यांची परीक्षा करणारा; अश्ववैद्य, परीक्षक. ‘बोलावोनिया अश्व शाणी । म्हणती घोडे निवडी गा ये क्षणीं ।’-कथा ४.९.१५. ‘जैसा वारु उपलाणी । वश्य करी अश्वसाहणी’ –एभा २०.२१६. [सं. अश्व + म. शहाणा] ॰शाला-स्त्री. १ घोड्यांची पागा; तबेला. २ घोड्यावर बसविण्यास जेथें शिकवितात तें गृह. शिक्षक- सारथी-पु. घोड्यांना शिकविणारा; चाबूकस्वार; घोडे हांकणारा. ॰शिक्षा-स्त्री. घोड्यांना शिकविणें, शिक्षा लावणें, (गति, चाल वगैरे ). ॰सारथ्य-न. रथ किंवा त्याला जुंपलेले घोडे चालविणें- हांकणें; रथांची व्यवस्था. [सं.] ॰हृदय-न. १ घोड्यासंबंधीं रहस्य किंवा गुप्त गोष्टींचें ज्ञान; अश्वशास्त्रं; अश्वविद्या; घोडयावर बसण्याची विद्या. २ घोड्यांच्या प्रकृतीचें निदान किंवा त्यासंबं- धाचें शास्त्र; शालिहोत्र. [सं.]

दाते शब्दकोश

अश्वखाद्य      

न.       हरभरा; घोडखाद्य. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

बद्धान्न

बद्धान्न baddhānna n S Corn or grain of difficult digestion;--used of wheat, उडीद, हरभरा &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

बिवड

बिवड bivaḍa m (बी) Any offspring or offshoot of; a (man, beast, plant,) sprung from. 2 In field-sowing. The seed or crop antecedent (to any other). Ex. तागाचा बि0 सर्व मालास चांगला. Also f or with जमीन as बिवडजमीन f The field of any particular produce in the preceding season. बिवड हरभरा &c. Gram grown on such ground. 3 See बेवड.

मोल्सवर्थ शब्दकोश

बोळणें

अक्रि. १ दाट होणें; गोठणें; सांकळणें; गोळे बनणें; वुळवुळीत होणें (रक्त, दहीं, काजळ, अळित्याची शाई). २ (गहूं बाजरी, हरभरा इ॰ तींल) सत्वांश पूर्ण पोसलेला असणें. ३ (ल.) (ओळख, माहिती, परिचय) विसरली जाणें; स्मृतिपटलावरून पुसली जाणें; मंद होणें. ४ (व.) शांत होणें; तीव्रपणा नाहींसा होणें, ५ (शस्त्र इ॰) बोथट होणें. ६ पाभरीमधील बीं चाड्यांतून घसरून खालीं पडणें. ७ (ना.) फळ परिपक्व होऊन लुसलुशीत होणें. -सक्रि. १ तेल तूप इ॰ नीं (एखादा पदार्थ) चोपडणें; माखणें. २ (राजा.) शाई, दहीं, दूध इ॰ मध्यें (लेखणी, भाकरी इ॰) बुचकळणें; बुडविणें. ३ भोंकामध्यें खुंटी, खिळा इ॰ घालून तें मोठें करणें.

दाते शब्दकोश

बोंड

पु. १ कापूस, अफू इ॰ झाडाचें फळ; बीजकोश; अशा आकाराच्या निरनिराळ्या वस्तू. २ बिब्बा, काजू इ॰ च्या मागील फळ, अवयव. ३ वरील आकाराचें हरभरा इ॰ च्या पिठाचें तळून खाण्यासाठीं केलेलें खाद्य; भजें. ४ पळीचें टवळें; ठाणवईचें चाडें. ५ केळफूल. ६ मक्याचें कणीस. ७ शिस्नाची किंवा स्तनाची बोंडी, अग्र; टोंक. ८ (को.) लहान नारळ. ९ सुरुंगाच्या पहारीस भोक घेण्यासाठीं जें पोलाद भरतात तें. १० (नाविक कों.) जहाजाच्या शिडाचें आखूड व जाडें टोंक. याच्या उलट पात; परभाणाचा खालचा भाग. ११ कर्णफुलाप्रमाणें कानांत घालण्याचा बायकांचा दागिना. [का. बोंडु] बोंडें वेंचणें-(ल.) (अप- राधाची जाणीव असल्यानें) तोतरें बोलणें; बोलतांना अडखळणें. बोंडगहूं-पु. खपल्या गहूं. ॰ग-गी-स्त्री. केतकीचें झाड. ॰चोळी- स्त्री. एक वनस्पति. ॰निवडुंग-पुन. फड्यानिवडुंग; बोंडें येणारा निवडुंग. ॰फळ-पु. १ डावांत मारलेली किंवा मेलेली सोंगटी. २ (निंदेनें) नारळ; ज्या ठिकाणीं कांहीं तरी मूल्यवान वस्तु द्यावयाची त्या ऐवजीं दिलेला नारळ. 'तुझ्या हातास काय बोंडफळ लागा- वयाचें आहे ! ॰बाहुलें-न. (लाडिकपणें) लहान मूल. ॰बाळी- स्त्री. कानांत घालण्याचा स्त्रियांचा दागिना. ॰यारी, बोंड्यारी- स्त्री. (नाविक) शिडाच्या कोपर्‍यांना ते ताणण्याकरितां बांधलेली दोरी; परभाणाचें बोंड घोंसाखालीं दबण्यासाठीं बोंडास अडकवि- लेली यारी. ॰लें-न. लहान मुलास दूध पाजण्याचें गोकर्णासारखें पात्र. ॰वेल-स्त्री. (वांई) हरळीसारखें तांबडें गवत. ॰शी-स्त्री. बोंडी; टोंक. बोंडा, बोंडारा-पु. (कों.) कोंवळा नारळ; लहान नारळ. (कु.) कोंवळा गळलेला, खराब झालेला नारळ. बोंडू- न. (को.) काजूवें रसभरित फळ, हें बीच्या मागें असतें. बोंडें- खाऊ-वि. नामर्द; फटलंडी; भागूबाई; भित्रा.

दाते शब्दकोश

चणा      

पु.       १. हरभरा (मोठ्या दाण्याचा) : ‘वानराचें ठेवणें । गालफडां भरावे चणे ।’ - भाराकि १२·१०६. २. घुंगुरात घालायचा खडा : ‘घागुऱ्या चरणिं चारू चण्याच्या ।’ - शशिसेना. (व.) [सं. चणक] (वा.) चण्याच्या झाडावर चढविणे – खुशामत करून किंवा तोंडापुरते बोलून एखाद्याला चढवणे, फुगवणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चणा

पु. १ हरभरा (मोठ्या दाण्याचा). ' वानराचें ठेवणें । गालफडां भरावे चणे । ' -भारा किंष्किधा १३.१०६. २ (व.) घागर्‍यांत घालावयाचे खडे प्रत्येकी; चणे घातलेल्या घागर्‍या पूर्वीं मुलांच्या पायांत घालीत असत. 'घागुर्‍या चरणिं चारु चण्याच्या । ' -शशिसेना. [सं. चणक; प्रा. चण,चणअ] चणेफुटाणे-पु. अव. भाजलेले हरभरे, फुटाणे. [चणा + फुटाणा] एखाद्याचे चणेफुटाणे करणें-उधळणें; उधळपट्टीनें खर्च, व्यय करणें (पैसा. द्रव्य, सामग्री). चण्याचे झाडावर चढविणें-(हरभर्‍याच्या झाडावर चढविणें) खुशामत करून किंवा तोंडापुरतें बोलून एखाद्यास चढविणें, फुगविणें, उन्मत करणें.

दाते शब्दकोश

चणी      

स्त्री.       १. बारीक हरभरा. (गो.) २. मसूर. (बे.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चणी

स्त्री. १ (गु.) बारीक हरभरा. २ (बे.) मसूर. [चणा]

दाते शब्दकोश

चणक

पु. हरभरा. [सं.]

दाते शब्दकोश

चणक      

पु.       चणा; हरभरा : ‘चणक, मसुर, मूग, उडीद... दश द्विदल जाणावे ॥’- मुआदि १४·११२. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चणवणी

न. हरभर्‍याच्या पिठाचें पिठलें किंवा आमटी. [चणा + पाणी. सं. चण = हरभरा + वण = पाणी] ॰मिठवणी-न. गरीबी जेवण; कदान्न; आलापाला; कोंडामोंडा. ॰मिठवणी पिऊन असणें-केवळ अन्नोदकावर राहण्याची पाळी येणें; वाईट अवस्था येणें.

दाते शब्दकोश

डाहळा

डाहळा ḍāhaḷā m A plant of हरभरा, वाटाणा, or लांख esp. the first. 2 (dim. डाहळी f A sprig or twig.) A leafy branch. Pr. धरायाला डाहळी न बसायाला सावली Used expressively of the destitution of a woman who has lost both husband and father, and hence of a forlorn person gen.

मोल्सवर्थ शब्दकोश

डाळ      

स्त्री.       भरडलेले द्विदल धान्य (हरभरा, तूर इ.). (वा.) डाळ गळणे, शिजणे –चालणे; अनुकूलता असणे; दाद लागणे; म्हणण्याप्रमाणे होणे : ‘एका नानांची श्रीमंतांपाशी मात्र डाळ गळत नाहीं.’ –ऐको. डाळ नासणे –१. होत असलेले काम बिघडणे : ‘सर्वत्र यानं डाळ नासली.’ –रानगंगा ७५. २. (मूल, बायको इ.नी) निरुपयोगी, आळशी बनणे. ३. उर्मट बेफिकीर बनणे. डाळ महाग करणे –मस्तीला येणे; माजणे. आपल्या पोळीवर डाळ ओढणे –स्वतःचा फायदा करून घेणे, स्वार्थी, आप्पलपोटे बनणे. (कर.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

डाळ

स्त्री. हरभरा इ॰ द्विदळ धान्य भरडून द्विभाग करतात ती. देशावर डाळबद्दल दाळ शब्द रूढ आहे. दाळ पहा. [सं. दल] ॰शिजणें-(ल.) चालणें; अनुकूलता असणें; दाद लागणें; म्हणण्या- प्रमाणें होणें. ॰महाग करणें-(क.) मस्तीला येणें; माजणें.

दाते शब्दकोश

डाळे      

न.       हरभरा इ. भाजून त्याचे फोल काढून टाकून तयार केलेली डाळ.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

डाळें

न. हरभरा इ॰ भाजून त्याचें फोल काढून टाकून जी डाळ करतात ती. [डाळ]

दाते शब्दकोश

डाळिंबी

(सं) स्त्री० डाळिंबाचें झाड. २ दल, हरभरा इत्यादींचा अर्धा भाग.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

दुडाळ      

न.       ज्यामध्ये दोन डाळिंब्या असतात असे तूर, हरभरा इ. सारखे धान्य; द्विदल धान्य. [क. दुड]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

धान्य

न. १ भात, गहूं, बाजरी, इ॰ मनुष्याच्या शरीर- पोषणाच्या उपयोगाचा पदार्थ; दाणागोटा. तांदूळ, गहूं, ज्वारी इ॰ तृणधान्यें हरभरा, तूर, उडीद इ॰ द्विदल धान्यें व करडई, तीळ, जवस इ॰ तैलधान्यें असे धान्याचे तीन मुख्य वर्ग आहेत. २ नवरात्रांत देवीपुढें किंवा चैत्रांत गौरीपुढें थोड्याशा मातींत गहूं किंवा भात यांचीं जीं लहान रोपें करतात तीं समुच्चयानें. ३ दसर्‍याच्या दिवशीं पागोट्यांत, टोपींत, खोवण्यांत येणारा गहूं, भात इ॰कांच्या रोपांचा तुरा. ४ धणे. [सं. धान्य; गु; धान्य] (वाप्र.) ॰झटकणें-धान्य साफ करणें, वारवणें. ॰हुडकणें- सक्रि. शोधणें; निवडणें; धुंडणें. पद्धति-एक लांब लोखंडी गज जमीनींन मारून व त्याचा वास घेऊन अमुक ठिकाणीं धान्य पुरलें आहे. असें नेमकें सांगणें. 'लष्करांतील कित्येक लोकांचा धान्य हुड- कून काढण्याचा धंदाच होता.' -ख १०५५. अठरा धान्यांचें कडबाळें-न. अठरा पहा. सामाशब्द- ॰देश-पु. पुष्कळ धान्यें पिकणारा, सुपीक देश. [सं.] ॰पंचक-न. गहूं, तांदूळ, सातू, तीळ व मूग हीं शंकरास लाखोली वाहण्यास योग्य अशीं धान्यें. [धान्य + सं. पंचक = पाचांचा समूह] ॰पंचकाचा काढा- पु. धणे, वाळा, सुंठ, नागरमोथा आणि दालचिनी यांचा काढा. [धान्य = धणे + सं. पंचक = काढा] ॰पलाल न्याय-पु. धान्य म्हटलें म्हणजे त्यामध्यें त्याचा पेंढाहि अंतर्भूत होतो. त्यास वेगळें महत्त्व नसतें. राजाला जिंकल्यावर प्रजाहि स्वभाविकपणें जिंकल्या गेल्या असें मानण्यास हरकत नाहीं. यावरून एखादी मुख्य गोष्ट साध्य, सिद्ध, झाल्यावर तदनुषंगिक बारीकसारीक गोष्टी आपोआपच साध्य, सिध्द होतात. [धान्य + सं. पलाल = पेंढा, गवत] ॰फराळ- पु. उपवासाच्या दिवशीं धान्य भाजून केलेले, कोरडे खाद्य पदार्थ इ॰कानें केलेला फराळ. [धान्य + फराळ] ॰भिक्षा-स्त्री. धान्याची मळणी होत असतांना भिक्षुक गांवोगांव फिरून मिळवितात ती धान्याची भिक्षा, बलुतें. [धान्य + भिक्षा] ॰माप-न. धान्य मोजा- वयाचें माप, परिणाम. उदा॰ शेर, पायरी इ॰. ॰वणवा, वी- पुस्त्री. अकस्मात् धान्य जळून खाक होणें. 'अग्न लागला शेतीं । धान्य वणव्या आणि खडखुती । युक्ष दंड जळोनि जाती । अक- स्मात ।' [सं. धान्य + म वणवा]

दाते शब्दकोश

ढोकळा

ढोकळा ḍhōkaḷā m A thick cake of coarsely ground gram. 2 A ball made of flour of हरभरा or उडीद or of several pulses mixed. 3 A double pysá. 4 (In नंदभाषा) A term for a पैसा.

मोल्सवर्थ शब्दकोश

न. १ चण्याच्या भरड्याचा वडा. २ हरभरा, उडीद किंवा इतर कडधान्यें यांच्या मिश्रणाच्या पिठाचें बनवि- लेलें भजें, बोंड. ३ मोठा (ढब्वू) पैसा. ४ (नंदभाषा) पैसा. ५ तांबड्या किंवा दुध्या भोपळ्याच्या किसांत डाळीचें पीठ घालून तें अळवाच्या किंवा कोबीच्या पानावर थापून तळून केलेली वडी. -गृशि. १.३६२.

दाते शब्दकोश

एकसडी

वि. एकदेंठी; एकच टाहाळा, खांदी असणारा (हरभरा, तूर, मेथीची भाजी वगैरे ). [ एक + सं. सट् = पृथक करणे; प्रा. सड]

दाते शब्दकोश

एकसडी ēkasaḍī a (एक & सडणें) Once-husked--rice. 2 (एक & सड) Of but one stalk or stem;--as हरभरा, तूर, मेथीची भाजी &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

एकसडी      

वि.       एकच टाहाळा, खांदी असणारा (हरभरा, तूर, मेथीची भाजी वगैरे).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गाठी      

स्त्री.       १. अळव्याच्या पानांची सुपारीएवढ्या गाठींची दह्यातील भाजी; अळूवडी. (राजा) २. दाण्यांची भाजी. (गो.) ३. मूग इ. कडदणांची पातळ भाजी. (गो.) ४. फरसाणमधील हरभरा डाळीचा एक पदार्थ.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घोड्याचा दाणा      

१. (उप.) हरभरा. २. (ल.) बुंदीच्या लाडवाला तुच्छतेने म्हणतात. घोड्याचा पूत, घोड्याचा लेक      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

हौळा

पु. हुळा पहा; भाजलेला ओला हरभरा. [सं. होला]

दाते शब्दकोश

हावळा

पु. हिरवा वाटाणा, हरभरा यांचा केलेल हुरडा. हुळा पहा.

दाते शब्दकोश

हुळहुळा, हुळा

पु. भाजलेल्या हरभऱ्याचे घाटे; भाज- लेला ओला हरभरा. [सं. हालक; हिं.]

दाते शब्दकोश

कांड      

न.        १. दोन सांध्यांमधील भाग, पेरे. २. झाडाचे खोड; सोट; बुंधा. ३. वेदाच्या त्रिकांडांपैकी प्रत्येक कांड. (उपासनाकांड, कर्मकांड, ज्ञानकांड); अध्याय; प्रकरण; अंक; परिच्छेद; विभाग : ‘एवं हिंसाचि अहिंसा । कर्मकांडी हा ऐसा ।’ – ज्ञा १३·२३७. ४. बाण; तीर : ‘थोरू कांडांचा घाई मातला ।’ – शिव ४३९. ५. गहू, नाचणी, हरभरा इत्यादींचे कांड, ताट (दाणा काढल्यानंतरचे). ६. माडाचा सोट; खोड. (को.) ७. संधी; सांधा. (वा.) कांड काढणे – खारीच्या आत ज्या पाट्या (जमिनीचे लहान लाहन तुकडे) पाडतात त्यांच्या बांधाला मातीची भर देणे. हे काम वैशाखात करतात.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कांड

न. १ दोन संध्यांमधील भाग, पेरें. २ झाडाचें खोड; सोट; बुंधा. ३ वेदाच्या त्रिकांडांपैकीं प्रत्येक. (उपास- नाकांड, कर्मकांड, ज्ञानकांड) अध्याय; प्रकरण; अंक; परि- च्छेद; विभाग. 'एवं हिंसाचि अहिंसा । कर्मकांडी हा ऐसा ।' -ज्ञा १३.२३६. 'धनुर्भंग नाटिकेंत अंकाऐवजीं कांड हा शब्द वापरला आहे.' ४ बाण; तीर. ' थोरु कांडांचा घाई मातला ।' -शिशु ४३९. 'तो माझे आं कांडा । सदां भिए ।' -शिशु ८९४. 'कुबोलांचीं सदटें । सूति कांडें ।' -ज्ञा १६.४०४. 'हरि- नामाचें धनुष्यकांडें ।' -तुगा २१५९. 'केली निर्माण कसी हाणुनि वसुधेंत कांड वनधारा ।' -मोभीष्म १२.२२. ५ गलबताचें शीड उभारण्याचा दोर; परभाणास अडकविलेली जाडी दोरी; परभाण, डोलकाठीला ज्या दोरखंडानें बांधलेलें असतें तो दोर. हा खालींवर सरकतो. ६ गहूं, नाचणी हरभरा इ॰ चें कांड, ताट, (दाणा काढल्यानंतरचें). ७ (कों.) माडाचा सोट; खोड. ८ (व.) मातीच्या भिंतीचा एक थर. 'त्यानें एक कांड नवीन बसविलें.' ९ (गो.) कमरेस घालण्याचा चांदीचा गोफ. १० (सोनारी) सरीचा आंतील गाभा. ११ संधि; सांधा. १२ (महानुभावी) ज्ञान (?) 'येणेशी कांड गुंडा कव्हणी घेना ।' -भाए ५२०. काढणें-खारीच्या आंत ज्या पाट्या (जमी- नीचे लहान लहान तुकडे) पाडतात त्यांच्या बांधास मातीची भर देणें. हें काम वैशाखांत करतात. ॰क-(व.) १ वेळूचें पेर. २ मातीच्या भिंतीचा एक थर. ॰का-कोंडका-पु. लांकडाचा ओंडका, ठोकळा. ॰कें-न. १ कांडक अर्थ २ पहा. २ कांडका- कोंडका पहा. 'कांडकें डवचितां कृष्णसर्प ।' -भुवन १२.२१. ३ उंच; धिप्पाड; लठ्ठ; अगडबंब; ठोंब्या. (मनुष्य). ४ कुडें. 'कांडकें मोठें म्हणजे जाड व लांब असावें.' -मुंव्या २०७. ॰त्रय-न. वेदांचीं तीन कांडें, भाग; कर्म-उपासना-ज्ञान कांड. 'तरी कांडत्रयात्मकु । शब्दराशी अशेखु ।' -ज्ञा १८.१४३१. [सं.] ॰पा-पु. (गो.) मुसळ. म्ह॰ कांडपाक कोंब फुटणें = मुसळाला अंकुर फुटणें. ॰रू-न. १ बोटाचीं पेरें व अग्रें यांस होणारें उठाणूं. २ तीन चार पेरांचें उंसाचें कांडें. ॰वेल -स्त्री. एक औषधी निवडुंगाप्रमाणें पण बारीक वेल. वई. त्रिधारी, चौधारी अशा हिच्या दोन जाती आहेत. हिला पेरें असतात. त्रिधारी कांड वेलीस हाडसंधि असेंहि म्हणतात. [सं. कांडवल्लि] ॰शेर-पु. शेराभोंवतीं आढळणारी लांब नाजुक पेरांपेरांची एक वेल. ॰सोट-पु. सहा मुठी सोन्याच्या एका सुतावर मधील भागा- च्याच सुमारें २।।, ३ मुठीच्या भागावर दुसरें एक सोन्याचें सूत पिळून पहिल्या सुताच्या एका टोकास वाटोळा फासा व दुसर्‍या टोकास नागफासा करून गजरे बेठण्यापूर्वीं जो सरीचा भाग तयार होतो तो. (कांड १० पहा).

दाते शब्दकोश

काट      

न.       १. शाई बनवण्यासाठी नाचणी, बाजरी इत्यादी जाळून त्यात पाणी ओतून केलेले शिरे. २. कुळीथ, हरभरा इत्यादी कडधान्याचे शिजवून काढलेले पाणी, कढण; कट; सुपाऱ्या, रंगीत पदार्थ किंवा कडधान्य शिजवलेले पाणी. (मांस शिजवून केलेले पाणी) ३. आमसुले तयार करण्यासाठी, त्यांना पूट देण्यासाठी काढलेला रातांब्याच्या फळांचा रस. [सं. क्वथ् = कढविणे]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

काट

न. शाई बनविण्यासाठीं नाचणी, बाजरी इत्यादि जाळून त्यांत पाणी ओतून केलेलें शिरें. कुळीथ हरभरा इ॰ कडधान्यांचें शिजवून काढलेलें पाणी, कढण; कट; सुपार्‍या रंगीत पदार्थ किंवा कडधान्य शिजविलेलें पाणी; आमसुलें तयार करण्या- साठीं त्यांनां पूट देण्यासाठीं केलेलें रातांब्यांचें पाणी; (गो.) मांस शिजवून तयार केलेलें पाणी. [सं. क्कथ् = कढविणें]

दाते शब्दकोश

काठण

काठण kāṭhaṇa n (काष्ट Wood, दाणा Grain. Grain produced on stalks.) Pulse or legumes gen. By some the term is not applied to the रबी crops, and, hence, not to हरभरा, वाटाणा, मसूर, लाख &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

काठण, काठाण      

न.       कडदण; कडधान्य. काहींच्या मते हरभरा, वाटाणा, मसूर, लाख इत्यादी रब्बीच्या पिकांना हा शब्द लागत नाही. बाकीच्या खरीपातील द्विदल धान्याला लावतात : ‘काठाणी, तीळ, उडीद, तुरी वगैरे पावसाळी.’ - मसाप २·२·६९. [सं. काष्ठ+अस्त्र]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कडदण, कडदाण, कडधण, कडधन, कडधान्य      

न.       द्विदल जातीय, डाळी करण्याचे धान्य. (मूग, मठ, उडीद, तूर, मसूर, हरभरा, पावटा, वाटाणा इ.) : ‘दीड विद्या अडीच पांड जमिन गिलाबस (गिमवस) कडधन …’ – समोरा ४·६०. [सं. काष्ठ + धान्य]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कडदण, कडधण, कडधान्य

कडदण, कडधण, कडधान्य kaḍadaṇa, kaḍadhaṇa, kaḍadhānya n (कड from काष्ट S through कट, & धान्य S through दाणा. Growing on little trees.) A general name for leguminous plants and legumes, viz. मूग, मठ, उडीद, तूर, मसूर, हरभरा, करडई, पावटा, वटाणा, लांव &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

कडदण-दाण-धण-धान्य

न.द्विदलजातीय, डाळी करण्याचे धान्य (मूग, मठ, उडीद, तूर, मसूर, हरभरा, पावटा, वाटाणा इ॰) [सं. काष्ठ + धान्य; प्रा. कट्ट + धन्न]

दाते शब्दकोश

मोघें

मोघें mōghēṃ n Pulse (esp. तूर Cytisus cajan, or हरभरा Gram) sown, by means of the tube described under मोघणा, amongst जोंधळा or बाजरी or wheat.

मोल्सवर्थ शब्दकोश

नागाणा      

पु.       फुटाणा; भाजलेला हरभरा : ‘नागांची पूजा केली, जवळ नागाणे, लाह्या, दुध इ. ठेविलं.’ – नागाची कहाणी २२.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नागाणा

पु. फुटाणा; भाजलेला हरभरा. 'नागांची पूजा केली, जवळ नागणे, लाह्या, दूध इ. ठेविलें' -नागाची कहाणी २२.[नाग + दाणा]

दाते शब्दकोश

निधा

निधा nidhā m Glow (of a fire or heated thing). Ex. त्या शेकाचा निधा एथपावत लागतो. Also sense of glow or burning; as निधा उमटेस्तोंवर शेक; or sense of glow from a load or long continuance in a posture. v ये, उमट, भिन. 2 Steamy heat of the soil. Ex. जमिनीला निधा उमटतो म्हणून हरभरा जीव धर- तो. 3 The swift spinning (of a top) upon one spot, sleeping. v धर.

मोल्सवर्थ शब्दकोश

पु. १ धग; आहळी (विस्तवाची अथवा तापवि- लेल्या वस्तूची). 'घायें केली रांगोळी । निध पाताळीं उमटला ।' -एरुस्व १०.७० 'त्या शेकाचा निध एथ पावत लागतो.' २ धगीची, उष्णतेची जाणीव; आंच; शेक. 'निधा उमटेस्तोंव शेक.' ३ पुष्कळ ओझें वाहून नेल्यामुळें अथवा एकाच स्थितींत पुष्कळ वेळ राहिल्यापासून येणारा सुन्नपणा. (क्रि॰ येणें; उमटणें; भिनणें). ४ शेत जमीनीचा वाफसा, वाफ. 'जमिनीला निधा उमटतो म्हणून हरभरा जीव धरतो.' ५ त्रास. -शर. (विठ्ठल सीतास्वयंवर ४.४९

दाते शब्दकोश

पेटा

पेटा pēṭā m (पेट S through H Belly.) Sphere, compass, comprehension, including quality or power: e. g. that of the provincial or county town over the minor towns and villages, that of a key-fort over the circumjacent country, that of a person of authority over his subordinates. Ex. एका नगराच्या पेट्यांत शंभर गांव असतात; मोठ्या पुरुषास आमंत्रण केलें म्हणजे त्याच्या पेट्यांत लाहनसाहन येतात. 2 A division of country consisting of a number of small towns and villages; a subdivision of a परगणा or तालुका. See under देश. 3 A box-trap for tigers. 4 C (Or पेटें) A float composed of gourds &c. to cross rivers. 5 (Or पेटा from H) A kind of gourd. 6 A bundle or head-load of thorny loppings or of uprooted plants (esp. of करडई or हरभरा or of barked अंबाडी or ताग): also a stack or heaped mass of such plants. 7 A cub of a tiger or lion. 8 Used by some, with the designating noun preceding, of the cub or whelp or young one (esp. as sleek and pretty) of a dog, cat, sow, hare &c. 9 In algebra. The side of an equation.

मोल्सवर्थ शब्दकोश

पु. १ वर्तुळ; घेर; पोट. २ (ल.) ताबा; अधिकार. ३ अनेक गांवांचा समुदाय व त्यांचें मुख्य ठिकाण; सांप्रतचा तालुक्या- हून लहान देशविभाग; बरींचशीं लहान गावें आणि खेडीं ज्यांत आहेत असा देशाचा विभाग; परगण्याचा, तालुक्याचा पोटाविभाग. देश पहा. ३ किल्लयाच्या घेरांतील गांवांचा समुदाय व तो किल्ला. 'एक नगराच्या पेटयांच शंभर गांव असतात.' ४ अधिकारी पुरुष व त्याचे हाताखालील नौकर किंवा लवाजमा. 'मोठ्या पुरुषास आमंत्रण केलें म्हणजे त्याच्या पेट्यांत लहानसहान येतात.' ५ वाघाचा पेटीसारखा पिंजरा; सांपळा. ६ (कों.) नदी वगैरे तरून जाण्यासाठीं केलेला भोपळ्यांचा तराफा. पेटें पहा. ७ पेटा; एक प्रकारचा भोपळा. ८ मुळासकट उपटलेल्या कांटेरी झुडुपांचा (मुख्यत्वें करडई, हरभरा, अंबाडी, ताग इ॰ चा) केलेला भारा; ओझें; काट्यांचा भारा; तसल्या झुडुपांची रास; गंजी. ९ वाघाचा किंवा सिंहाचा बच्चा. 'व्याघ्रींचे अविकुळीं जसे पेटे ।' -मोआदि २१.१३. १० ज्या जातीचें पिलू असेल त्या (कुत्रा, मांजर, ससा इ॰ ) जातीचा शब्द पाठीमागें योजून हा शब्द योजितात. जसें- कुत्र्याचा पेटा; डुकराचा पेटा ।. ११ (बीजगणित) समीकरणाची एक बाजू. [हिं. पेट = पोट]

दाते शब्दकोश

फोल

न. १ हलका, पोकळ दाणा. २ टरफल; आंतील दाणा काढून घेतल्यावर राहिलेलें दाण्याचें (भात, हरभरा इ॰) साल; कडधान्याच्या दाण्यावरील साल. ३ कोंडा; भुसा; तूप. ४ (ल.) पोकळ व अविश्वासाचें बोलणें, वचन; निरर्थक बडबड. ५ निष्कल श्रम, प्रयत्न. -वि. खोटें; व्यर्थ; कोरडें; निःत्व. 'दुःशासना न याचे ऐकावे बोल फोल हा बाळ ।' -मोसभा ५.६२. [का. पोळ्ळु] ॰कट-न. टरफल; इलकें, पोकळ, पोचट धान्य. 'जैसें सांडिजे फोलकट ।' -विउ ७.२१. -वि. व्यर्थ; पोकळ. 'बाकीच्या शास्त्रांचा फोलवट पसारा काय करावयाचा ?' -गीर ११. [फोल]

दाते शब्दकोश

सातू

पु. १ गव्हासारखें एक धान्य. २ भाजलेले सातू, गहू व हरभरा यांचें पीठ. [सं. सक्तु]

दाते शब्दकोश

सोड्याळा

पु. (गो.) चणा; हरभरा. सोडीया-वि. (काव्य) सोडणारा. सोड्याळ-वि. १ चोखंदळ; खोडी काढणारा. २ ज्याचा लवकर कंटाळा येतो असें.

दाते शब्दकोश

सोल

पु. अमसुल; कोकमसोल. ॰नारिंगन. नारिंगाची एक जात. ॰वणी-न. आमसुलें कोळून केलेलें पाणी (काल- वणासाठीं). सोलणें-उक्रि. १ वरील पापुद्रा, साल, कातडी इ॰ काढून टाकणें. २ टरफल, फोलपट काढणें; शेंगाच्या आंतील बीज काढणें. [का. सुलि] सोला, सोलपणा-पु. हरभरा, पावटा इ॰च्या ओल्या शेंगांतील सोलून काढलेला दाणा; शेंगदाणा. सोलाट-वि. (ल.) फटिंग; सडासोट. 'घरकुटुंब ना अभवो । गांब ना तुज ठाव । सोलाट तूं पहा हो । लागला जगीं ।' -एभा २७७१. सोलीव-वि. १ त्वचा इ॰ सोलून काढलेलें. २ (ल.) पक्का, पूर्ण (लुच्चा, लबाड; लवंगा). ३ (ल. काव्य) स्वच्छ; अंतर्गाभ्यांतील; अस्सल. 'सोलींव निर्वंचूं । फलितार्थुचि ।' -ज्ञा १६.१३.१०४९. सोलीवदारिद्र्य-अत्यंत गरीबी.

दाते शब्दकोश

सोला / लाणा

पु० सोललेला ताजा हरभरा.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

सरम, सरमट, सरमड, सरमाड

न. बाजरीचें काड, ताट, कडबा. 'कोणापासून कडबा, कोणापासून सरमड तर कोणापासून बांसे' -खरादेश २८०. -कृषि २७७. सरमाडी- वि. सरमड काढून झाल्यावरचें शेत किंवा अशा शेतांतील. 'सर- माडी जमीन, शेत, वावर' 'सरभाडी हरभरा.'

दाते शब्दकोश

सरमाडा, सरमाडी, सरमडी

सरमाडा, सरमाडी, सरमडी saramāḍā, saramāḍī, saramaḍī a Relating to सरमाड Culm or haum of बाजरी; as सरमाडी हरभरा Gram raised on ground on which Bádzrí has just been reaped; सरमाडी जमीन-शेत-वावर &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

टापू

न. १ झुडपांचा कोंवळा देंठ, शेंडा; लहान झुडूप किंवा भाजी (खावयास उपयोगी); त्याचा कोंब. २ हरभर्‍याचा टहाळा, दाणा; दाणे काढून घेतलेली शेंग किंवा असल्या पोकळ शेंगेचा समूह. ४ हरभरा, तूर, वाटाणा, मसूर, हुलगा, करडई, कोंथिंबीर यांचें रोप किंवा गवत; चारा; कोणताहि चारा, गवत; लव्हाळें; हरळी; बाजरी किंवा जोंधळ्याचें ताट. [हिं.]

दाते शब्दकोश

टापू ṭāpū m ( H) An island: also an insulated realm or territory. 2 A tender tip or end (of a plant). 3 P A gram-pod. 4 A plant (of हरभरा, तूर, वाटाणा, मसूर, हुलगा, करडई, कोथिंबीर &c.); also of grass, of any weed, and, generally, of any herb (See Eng. Dict.): also a stalk (as of बाजरी or जोंधळा).

मोल्सवर्थ शब्दकोश

टापू      

न.       १. झुडपांचा कोवळा देठ, शेंडा; लहान झुडूप किंवा भाजी (खावयास उपयोगी); त्याचा कोंभ. २. हरभऱ्याचा टहाळा, दाणा; दाणे काढून घेतलेली पोकळ शेंग किंवा त्यांचा समूह. ३. हरभरा, तूर, वाटाणा, मसूर, हुलगा, करडई, कोथिंबीर यांचे रोप; गवत; चारा; लव्हाळे; हरळी; ज्वारीचे किंवा बाजरीचे ताट. [हिं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

टहाळ

टहाळ ṭahāḷa m n ( or H) Loppings of trees. 2 m A plant of हरभरा, लांख, or वाटाणा, esp. of the first.

मोल्सवर्थ शब्दकोश

पुन. १ डहाळी; फांदी (झाडाची). २ लाख, वाटाणा, विशेषतः हरभरा या द्विदल धान्याचें झुडूप. [हिं.]

दाते शब्दकोश

टहाळ      

पु.       १. डहाळी; फांदी (झाडाची). २. लाख, वाटाणा, विशेषतः हरभरा या द्विदल धान्याचे रोपटे, झाड.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

टहाळा

टहाळा ṭahāḷā m टहाळें n ( H) A leafy branch, a sprig, a leafy lopping from a bush. 2 A plant of हरभरा, वाटाणा or लांख esp. of the first.

मोल्सवर्थ शब्दकोश

उळा

पु. हवळा; हुळा; भाजलेला हरभरा. [का. उळगु = जाळणें; म. हुळा]

दाते शब्दकोश

उळा      

पु.       हवळा; हुळा; भाजलेला ओला हरभरा : ‘तैसा बरवा उळेया जोगा चणा : असे’ − लीचउ १३. [क. उळगु = जाळणे.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उरदाणा      

पु.       घोड्याच्या तोबऱ्यातील शिल्लक राहिलेला हरभरा, घास.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

वरकस

वरकस varakasa a An epithet in common for the inferior cereal grains, i. e. for all except rice, wheat, barley, holcus sorghum, holcus spicatus; also for all the pulses except तूर, हरभरा, वटाणा, मूग, मठ. 2 Fit only for the culture of वरकस--land.

मोल्सवर्थ शब्दकोश

वि. १ तांदूळ, गहूं, बाजरी, जोंधळा इ॰ मुख्य धान्यें व तूर, हरभरा, वाटाणा, मूग, मठ हीं कडधान्यें सोडून इतर हलकें, गौण (धान्य). नाचणी, वरी, हरिक वगैरे. २ अशा हलक्या धान्याला योग्य (जमीन); नापीक; माळरानाची. ३ (विशेषतः भातशेताभोवतालची, गवताची (जमीन). वरकसल-स्त्री. वरकस धान्यें, कडधान्यें यांना सामान्य संज्ञा. वरकशी-वि. वर- कस धान्याच्या पिकालाच योग्य अशी (जमीन). [वर + सं. कृष्]

दाते शब्दकोश

भिजक(ग)ट, भिजट, भिजका

वि. किंचित् भिजलेला (भिजण्यानें अपकार होईल तेव्हां योजतात). [भिजणें] भिजण- स्त्री. १ भिजत घातलेली डाळ, धान्य (भाजण्याकरितां, भरडून डाळ करण्याकरितां). २ उसळीसाठीं भिजत घातलेली असली डाळ, धान्य. भिजणूक-स्त्री. भिजणें; ओलें होणें; भिजल्याची स्थिति. (क्रि॰ पडणें, होणें). भिजणें-अक्रि. १ ओलें होणें; आर्द्र होणें. २ (ल.) ओलसर, दमट, सर्द, भरभराटीचें उत्कर्षाचें होणें (काम, स्थिति). ओला व कोरडा पहा. ३ लांच घेणें. [सं. अभिषेचनम् (सिंच् = शिंपडणें); हिं. भीजना] (वाप्र.) (एखाद्याच्या घरीं) हात भिजणें-जेवण्याचा प्रसंग येणें. भिजत कांबळें-(कांबळें लोंकरीचें असल्यामुळें तें फार वेळ पाण्यांत ठेवल्याशिवाय भिजत नाहीं यावरून ल.) (एखादें काम) लोंबत, अनिश्चित ठेवणें. (क्रि॰ घालणें, ठेवणें) भिजत पडणें, भिजतकांबळें-घोंगडें पडणें-(एखादें काम) लोंबत, अनिश्चित पडणें. भिज पाऊस- पु. जमीन चांगली भिजवणारा पाऊस. याचे उलट फटकर्‍याचा पाऊस. भिजवण-न. १ भांड्यास चिकटलेलें अन्न, खरकटें इ॰ ओलें करून काढण्याकरितां भांड्यास लावलेली भिजलेली राख, माती. २ भाकरी इ॰ कोरडा पदार्थ सुलभतेनें खातां येण्यासाठी त्याबरोबर घेतात तें दूध, ताक इ॰. ३ ज्यांत दुसरा कोणताहि पदार्थ भिजविला जातो असा पदार्थ. [भिजविणें] भिजवणी, भिजवणूक-स्त्री. १ भिजविणें; भिजत ठेवणें. २ भिजविलेपणा; आर्द्रपणा. भिजवणी करणें-सक्रि. (कु.) नांगरण्यासाठीं जमीन भिजविणें. भिजवाण-स्त्री. (कु.) जमीन भिजवून भात पेरणें. भिजविणें-सक्रि. १ ओलें करणें. २ (ल.) एखाद्याचा हात ओला करणें; लांच देणें. [भिजणें] हात भिजविणें-सक्रि. (ल.) लांच देणें. भिजाणा-पु. भिजलेला दाणा; पाण्यांत घालून फुग- विलेला हरभरा इ॰. (अनेकवचनी योजतात.) [भिजणें + दाणा] भिज्वण-स्त्री. (गो.) तांदुळांशिवाय स्वैंपाकास लागणारें सामान; शिधा.

दाते शब्दकोश

बद्ध

वि. १ बांधलेला; जखडलेला. २ (ल.) कंबर बांधलेला; तयार. [सं.] ॰क-पु. १ मलावरोध; बद्धकोष्ठ. २ जाचणारें कृत्य; दुष्टकर्म. -वि. १ कोंडणारा; अडविणारा. २ त्रासदायक, उपद्रवी. ३ बद्धकोष्ठ असलेला. ४ कृपण; चिक्कू. 'नविसंबे भांडारा । बद्धकु जैसा ।' -ज्ञा १३.५०१. [सं.] ॰कटाक्ष-न. १ (रोंखलेली, आणि क्रोधाची दृष्टि) कायम व प्राणांतिक वैर; हाडवैर; वैमनस्य. २ एकाग्र लक्ष, दृष्टि. -वि. असला द्वेष, असलें लक्ष असणारा. [सं.] सांखळा. -वि. कोठा साफ नसलेला; अवरुद्धमल. [सं.] ॰ता-स्त्री. बंधन. [सं.] ॰पद्मासन-न. आसनाचा एक प्रकार. पद्मासन घालून हात पाठीकडून फिरवून उजव्या हातानें उजव्या पायाचा व डाव्या हातानें डाव्या पायाचा आंगठा धरणें. याच्या योगानें शिरा साफ होतात, पाठीला पोक काढून बसण्याची संवय नाहींशी होते, श्वासोच्छ्वास चांगला होऊं लागतो. -संयोग ३१७. [सं.] ॰भौमिचारी-न. (नृत्य) पोटर्‍यांचें स्वस्तिक करून उभें राहणें व मांड्या हालविणें. [सं.] ॰मंत्र-वि. मंत्र म्हणून बद्ध केलेला; जखडलेला. [सं.] ॰मुष्टि-वि. १ मूठ मिटलेला. २ (ल.) कृपण; कंजूष; चिक्कू. [सं.] ॰मूल-वि. १ खोल व दृढ मुळें असलेला; मुळें खोल गेलेला. २ पक्का; दृढ व सुरक्षित झालेला (वृक्ष, रोग, अधिकारी). [सं.] ॰वैर-न. बद्धकटाक्ष अर्थ १ पहा. -वि. बद्धकटाक्ष असलेला. [सं.] ॰शस्त्र-वि. हत्यारबंद; सन्नद्ध; सायुध. [सं.] बद्धांज(जु)लि-ळी-वि. १ हात जोडलेला (विनंति करण्याकरितां किंवा आदर दाखविण्याकरितां). २-स्त्री. हात जोडण्याची क्रिया. 'पुढें उभा असा मारुति । बुद्धांजुळी करो- निया ।' [सं.] बद्धान्न-न. पचण्यास कठीण पदार्थ (गहूं, उडीद, हरभरा इ॰ चा). [सं.] बद्धायु-वि. आयुष्याची नियमित मुदत असलेला. [सं.] बद्धि-वि. बांधलेला; अडकलेला. [सं.]

दाते शब्दकोश

मुका

वि. १ बोलता येत नसलेला; न. बोलणारा; वाचा नसलेला. २ रागानें किंवा हिरवटपणानें बोलत नाहीं असा; स्तब्ध. ३ शांत बसलेला. ४ तोंड नसलेलें (गळूं, फोड) डोकें किंवा तोंड नसलेला (नारू). ५ न वाजणारा; अगदीं कोंवळा; आंत गर नसून पाणी भरलेला (नारळ). ६ चाड; न भिजलें जाणारें; मोड न येणारें (कडधान्य). ७ न उमललेली; न फुललेली (कळी). ८ आवाज न करता चालणारें (रहाटगाडगें, चरक, यंत्र इ॰) [सं. मूक; का मुत्तु, मुद्दु] म्ह॰ मुक्याचे मनी मंगळवार (मंगळवारी कोणताहि बेत करूं नयें अशी समजूत आहे त्यावरून). (वाप्र.) ॰मुलगा होणें-प्रथम न्हाण येणें. ॰रहाणें-(बागलाणी) गप्प बसणें. मुकावणें-मुकें होणें; स्तब्ध बसणें. 'मुकावल्या वेदश्रुती ।' -परमा १.१८. सामाशब्द- ॰गोवर-पु. ज्यांत अंगावर पुटकुळ्या पुरळ योत नाहीं असा गोंवर. ॰दंद-पु. मुका दाबा पहा. ॰दावा-पु. गुप्त द्वेष; डूक. ॰नारळ-पु. कोंवळा असल्यामुळें न वाजणारा नारळ. ॰मार- मारा-पु. १ वैरामुळें किंवा दुष्टपणानें जादूटोण्याच्या योगानें किंवा शापांनीं केलेला गुप्त नाश हानि. २ पुराव्याला कांहीं खुणा वगैरे राहाणारा नाहीत असा दिलेला अंगावर मार. ॰मैद- म्हसोबा, मुकी मण्यार-पुस्त्री. (निदार्थी) हिरवट, तिरसट मनुष्य. मुकी अर्जी-स्त्री. एखाद्याची नालस्ती करण्यासाठीं बिन- सहीचा किंवा खोट्या सहिनें केलेला अर्ज. मुकी कमान-स्त्री. चपटी कमान. मुकी वस्तु, मुकें जनावर-स्त्रीन. गाय म्हैस इ॰ जनावरें. 'मुकी वस्तु निघातें मारी ।' -दा २.१.६६. मुके गळूं-न. तोंड न पडलेलें गळूं. ॰गाळ-न. एक मुलींचा खेळ. ॰दंद-मुका दावा पहा. ॰फळ-फूल-पान-न. कोंवळें किंवा पक्क न झालेलें फळ; न उमलेलें, कळीच्या स्थितींत असलेले फूल, पान. ॰फुल-न. एक मुलींचा खेळ. ॰भिजाणे-पुअव. भजलेले परंतु मोड न फुटलेले दाणे (हरभरा, पावटा इ॰चे) मुकाणा-पु. मुकणा पहा.

दाते शब्दकोश

भाजणें

अक्रि. पोळणें; चटका बसणें; जळणें; होरपळणें, -सक्रि. १ अग्नीवर तवा, खापर इ॰ ठेवून भाकर, धान्य इ॰ शेकणें; पक्व करणें, पोळणें; परतणें. २ पोळणें; होरपळणें. ३ (ल.) गांजणें; छळणें; सतावणें; त्रास देणें. 'भरता तरि राज्य करिन जरि तूं म्हणसिल न ईस भाजीन ।' -मोवन १२.१५८. ४ (कों.) (सामा.) जाळणें. ५ (राजा. कु.) छकणें; खोडणें (हिशेब). [सं. भ्रस्ज्; प्रा. भज्ज] म्ह॰ दुधानें भाजला तो ताक फुंकून पितो. भाजकट, भाजट-वि. १ किंचित् भाजलेलें. २ भाज- ल्याचा वास येत असलेलें. भाजका-कें- १ भाजलेलें, शेक- लेलें (धान्य इ॰). २ भाजलेली; तापाविलेली (जमीन, शेत इ॰). ३ तापविलेला; शेकलेला; भाजलेला; परतलेला; पक्व केलेला (कोण- ताहि पदार्थ). भाजण-न. १ भाजणें; शेकणें. २ खापर इ॰ त भाजण्यासाठीं घेतलेलें धान्य इ॰ ३ भाजावयासाठीं एकवार घाला- वयाचें धान्यादिकाचें परिणाम, हप्ता; घाणा. ४ एकदा भाजण्याची क्रिया. [सं. भ्रज्जन; प्रा. भज्जण] भाजणावळ-स्त्री. भाज- ण्याची मजुरी. भाज(जा)णी-नी-स्त्री. १ चार पांच तर्‍हेचीं धान्यें भाजून एकत्र दळून केलेलें पीठ. याचें थालपीठ, कडबोळीं इ॰ करतात. २ भाजणें; शेकणें; भाजण्याची क्रिया. ३ पेरणीच्या अगो- दर जमीन भाजण्याची क्रिया. ४ (महानु.) किंचित उष्ण करणें, शेकणें; मिश्रित करणें. 'ब्रह्मविद्येचेनि कसें । कामतत्वा भाजनी दीसे ।' -भाए ३४. भाजणूक-स्त्री. (ल.) छळणूक; पीडा; त्रास; गांजणूक. भाजणें, भाजप-न. भाजणपहा. भाजणें-न. ज्यांत धान्य भाजतात तें खापर. भाजपी-पु. (राजा.) पोहे, लाह्या इ॰ भाजणारा; (स्त्रीलिंगीरूप भाजपीण). भाजपोळ-स्त्री. १ भात शेतकी साठीं जमीन भाजणें इ॰ कामें. २ जाळपोळ; लूट करतांना घराला आग लावणें, माणसांस भाजणें इ॰ क्रिया. 'त्या गावांत पेंढार्‍यांनीं फार भाजपोळ केली.' [भाजणें + पोळणें] भाजभूज-स्त्री. १ भाजणें; शेकणें. २ भाजलेलें धान्य. [भाजणें द्वि.] भाजलेलें- न. भाजून केलेले, धान्यादिकउपहार पदार्थ. भाजवट-स्त्री. १ बीं पेरण्यापूर्वीं जमीन भाजण्याची क्रिया. २ भाजलेली जमीन वि. १ भाजलेली (जमीन). २ भाजावयास पाहिजे अशी (जमीन). ३ (क्व.) भाजलेलें; शेकलेलें (धान्य). भाजा-पु. (कों.) एका वेळीं भाजलेलें; धान्याचें परिमाण, हप्ता; घाणा. भाजाणा- पु. भाजलेला हरभरा इ॰ चा दाणा (सामान्यतः अनेकवचनी प्रयोग). [भाजणें + दाणा] भाजावळ-स्त्री. (कों.) भाजवट पहा. भाजीव-न. भाजलेलें, पक्व केलेलें धान्यादिक. -वि. भाजलेलें; शेकलेलें. भाजुक-वि. १ पक्कें; भाजलेलें. २ (ल.) चांगलें. 'भाजुक साजुक नाजुक राजसवाणें ।' -अमृत ३५.

दाते शब्दकोश

अड

अ. कमीपणा, उणेपणा, दुय्यमपणा, न्यूनता, गौणता दर्शविणारें उपपद. हें लागून कित्येक सामासिक शब्द बनतात; जसें अडघोडा, अडधोतर; अडलंड, अडसर. इ॰ अडच्या ऐवजीं. कधींकधीं 'आड' असें रूप येतें सामन्यातः देशावरील लोक अडअसें योजितात; कोंकणांत आडअसें वापरतात तेव्हां अड आणि आड यांनीं आरंभ होणारे शब्द एकमेकांत घुसडले जातात. त्याकरित इष्ट शब्द एकाखालीं नसल्यास दुसऱ्याखालीं सांपडेल. सूचना:- संकृत अर्ध या ब्दापासून बनलेले व कानडी अड्ड ( = अडवा, हट्ट; दुराग्रह) या शब्दापासून बनलेले सामासिक शब्द यांचा घोंटाळा होऊं देऊं नये, म्हणून प्रथम अड-अर्ध पासून संभवलेले शब्द दिलेले आहेत; नंतर कानडी अड्ड पासून साधलेले शब्द घेतले आहेत. कांहीं शब्द या दोन्ही वर्गांतहि पडतील; पण ते कोठेंतरी एका ठिकाणीं दिले आहेत. ज्यांचा संबंध या दोहों अडशीं नाहीं किवा जे महत्त्वाचे वाटले, ते स्वतंत्रच दिले आहेत. [सं. अर्ध; प्रा.अड्ढ]. ॰कणी-स्त्री. तांदूळ, डाळ. इत्यादिकांची मोठी कणी; प्रसंगविशेषीं ही तांदूळ-डाळींतहि मोडते; फुटका, अर्धवट दाणा; कणी. 'कापुरांचिआं भांजनियां । वाटौनि मौत्त्किकांचिआ अडकणियां ।।' -शिशु ५९१. ॰काष्टा- पु. धोतर वगैरेचा आखुड किंवा अपुरा मुडपा, काष्टा. आडकाष्टा पहा. कुडतें-न. लहान कुडतें; कुडतें पहा. ॰खंड-पु. तुकडा; अर्ध- वट, अपुरा भाग. 'मालांत माती नसून अडखंड नसावेत. ' -मुंव्या २६. ॰खंड-वि. १ अंगमेहनतीनें कांहीं कामें करून पोट भरणारा मुलगा; पोऱ्या. २ किरकोळ काम करणारा नोकर; आडकाम्या; बगल्या; दुसऱ्याच्या हाताखालीं काम करणारा. ॰खोल-न. १ बांधून न काढलेली , सरासरी खणलेली विहीर; रेताड जमिनींत खणलेली व न बांधलेली विहीर; अर्धीच खणून टाकलेली विहीर. ॰गडी-पु. काम- कऱ्याच्या हाताखालचा गडी किंवा मजूर; मदतनीस; हस्तक; अड- खप्या. ॰गांव-पु.न. लहान खेडेंगांव; मोठी बाजार पेठ नसलेलें पण ज्याच्या जवळपास मोठे रहदारीचे रस्ते नाहींत असा भररस्त्या वर नसलेला गांव; खेडें; वाडी; गांवढें गांव. ॰गोखमा-अडबाप्या; पोरगा; गोखमा पहा. ॰गोण-स्त्री. बैल वगैरेवरून वाहून नेतात ती धान्याची लहान गोणी. ॰घर-न. मुख्य घराजवळ बांध- लेलें लहानसें घर किंवा छप्पर; झोंपडें; सोपा; पडवी. आउट हौस ॰घोडापु. लहान घोडा; प्रसंग-विशेषीं मोठ्या घोड्यांचेहि काम करणारा घोडा; तट्टू. ॰जात-आडजात पहा. ॰जिनापु. दुसरा लहान जिना; मागील जिना; चोर जिना. ॰जुना-जून-वि. अर्ध- वट जुना; उपयोगानें कांहींसा नादुरुस्त झालेला. वापरलेला; निरु- पयोगी. ॰दाणा-पु. घोड्यास खावयास हरभऱ्याव्यतिरिक्त, दिलेलें धान्य, दाणा; (घोड्याचा दाणा म्हणजे हरभरा). ॰दाळ- स्त्री. डाळीमधला मोठा किंवा जाड चुरा; अडकणी. ॰धोतर-न. लहान धोतर किंवा मोठा पंचा. अडपंचा पहा. ॰नर-स्त्री. स्त्रीत्व नसणारी; स्त्री-इंद्रिय असून ॠतु प्राप्त होत नाहीं अशी. ॰पंचा-पु. अगदीं लहान पंचा; ॰पडदणी-स्त्री. न्हाताना वेढून घेण्याची लहान पडदणी, वस्त्र; जुनेर. ॰पन्हळ-पु. अडनळ पहा. ॰पेठ-स्त्री. अडगांव; छोटासा बाजारगांव. ॰फळें-न. अव. अट- पळें पहा. ॰बंदर-न. १ लहान किंवा विशेष व्यापारी महत्त्व नसलेलें बंदर. २ गलबतांना तात्पुरतें नांगरण्याला पुरेसें, लहान, किंवा सुरक्षित नसणारें बंदर. ॰बाप्या-पु. बालपण गेलें पण अजून बाप्या झाला नाहीं असा जवान पोऱ्या; तरणा बांड; सोळा सतरा वयाचा मुलगा; प्रौढपणा न आलेला माणूस. ॰बायको-स्त्री. वधूटी; नुकतीच वयांत आलेली मुलगी (बारा-तेरा वर्षांची ); अर्धवट प्रौढ बायको. ॰मुलगा-पु. मुलगा; पोऱ्या ;छोकरा; अडबाप्या. ॰म्हातारापु. म्हातारपणांत प्रवेश करणारा; जरा उतार वयाचा माणूस; मध्यमवयस्क. ॰शहर-न. लहान शहर. 'देऊळ जवळच हांकेवर होतें. आडशहरांतलें तें, किती मोठें असणार?' -सुदे २४. सोंग-न. नाटकांतील दुय्यम किंवा हलका नट; हलकें, गौण पात्र. ॰स्वयंपाक-सैंपाक-पु, चटण्या, कोशिंबिरी, भाज्या वगैंरे; मुख्य पदार्थांखेरीज इतर किरकोळ स्वयंपाक.

दाते शब्दकोश

घोडा

पु. १ खूर असलेला एक चतुष्पाद प्राणिविशेष. ह्याचा उपयोग ओझे वाहण्याच्या, गाडी ओढण्याच्या व बसण्याच्या कामीं करतात. ह्याच्या जाती अनेक आहेत. अरबी घोडे जग- प्रसिद्ध आहेत. लहान घोड्यास तट्टू व घोड्याच्या पोरास शिंगरूं म्हणतात. घोड्याच्या आकृतीवरून, गतीवरून, उपयोगा- वरून व लक्षणेनें हा शब्द अनेक वस्तूंस लावतात. २ बुद्धिबळाच्या खेळांतील एक मोहरा. हा सर्व बाजूंनीं दोन सरळ व एक आडवें (अडीच) घर जातो. या मोहर्‍याचा विशेष हा आहे कीं हा इतर मोहर्‍यांच्या डोक्यावरून उडून जातो, तशी गति इतर मोहर्‍यांना नसते. ३ बंदुकींतील हातोडीच्या आकराचा अव- यवविशेष. हा दाबला असतां ठिणगी उत्पन्न होते व बंदूकीचा बार उडतो; चाप. ४ (मुलांचे खेळ) दोन पायांत काठी घालून (तिला घोडा मानून) मुलें धांवतात तो काठीचा घोडा. ५ (उप.) मूर्ख व ठोंब्या असा वयस्क मुलगा; वयानें मोठा पण पोरकट मनुष्य. ६ वस्त्रें, कपडे ठेवण्यासाठीं खुंट्या ठोकलेला खांब; स्नान करणार्‍या माणसाचे कपडे ठेवण्याकरितां जमिनींत रोंवलेली काठी, खांब; (इं.) स्टँड. ७ (ल.) शरीर वाहून नेतात म्हणून पायांस लक्षणेनें (दहाबोटी) घोडा असें संबोधितात; तंगड्या. 'आमचा दोन पायांचा घोडा आम्हाला हवें तेथें वाहून नेईल.' ८ पाळणा टांगण्यासाठीं एका आडव्या लांकडाला चार पाय लावून करतात ती रचना; घोडी. ९ पालखीचा दांडा ज्याला बसविलेला असतो तें दुबेळकें बेचक; पालखीं तबे- ल्यांत वगैरे ठेवतांना ज्यावर ठेवतात तीं दुबळकें असलेलीं लाकडें प्रत्येकीं. १० गाड्याच्या बैठकीच्या चौकटीचीं दोन बाजूंचीं लांब लांकडें प्रत्येकी; गाडीच्या दांडयास आधार द्याव- याचें दुबेळकें. ११ मूल रांगावयास लागलें असतां दोन हात व दोन गुडघे जमीनीला टेकून करतें ती घोड्यासारखी आकृति. (क्रि॰ करणें). १२ मृदंग; पखवाज ठेवण्याची घडवंची; घोडी; (दिवे इ॰ लावण्याची) दोन बाजूस पायर्‍या असलेली घडवंची; (पिंपे, पेट्या ठेवण्याची) लांकडी घडवंची. १३ नारळ सोलण्याचा, शेंड्यास सुरी बसविलेला खांब; नारळ सोलण्याचा एक प्रकारचा सांचा. १४ समुद्राच्या भरतीच्या पाण्याचा चढ, फुगोटी, फुगारा; लाटेचा उंच भाग; नद्यांच्या मुखांतून वर गेलेलें समुद्राच्या भरतीचें पाणी. -सृष्टि ५७. १५ ओबडधोबड असा आंकडा, फांसा, पकड. १६ (ल.) घोडेस्वार. 'तीन हजार घोडा पेशव्यांचे तैनातींत ठेवावा.' -विवि ८.७.१२९. १७ दाराच्या दुहेरी चौकटीच्या वरच्या बाजूचे, परस्पराला जोडणारे दोन लाकडी तुकडे (त्यांच्याच जोडीच्या खालच्या बाजूच्या तुकड्यांस छिली म्हणतात). १८ (खाटीक इ॰ कांचें) साकटणें, सकोटन; खाटकाचा ठोकळा. १९ (मुद्रण) केसी व ग्याली ठेवण्यासाठीं केलेली घडवंचीवजा चौकट. २० फळा, चित्रफलक इ॰ उभा ठेवण्याची लाकडी उभी चौकट. २१ (कों.) रहाटगाडग्याचें कोळबें ज्यावर ठेवतात ती लांकडी चौकट. २२ (पोहोण्याचा) चार भोपळ्यांचा तराफा. २३ (गो.) (विटी दांडूचा खेळ) विटी मारण्याचा एक प्रकार. (क्रि॰ मारणें). [सं. घोटक; प्रा. घोड; गु.घोडो; सिं. घोडो; स्पॅनिश जि. गोरो; अर. घोरा] घोडी-स्त्री. १ घोडा या जातीच्या प्राण्याची मादी. २ सतार, तंबोरा इ॰ तंतुवाद्यांच्या भोपळ्याच्या मध्यावर हस्ती- दंती अगर लांकडाची पाटाच्या आकृतीची एक इंची किंवा दीड- इंची पट्टीची बैठक; तिच्यावरून तारा पुढें खुंटीस गुंडाळलेल्या असतात. ३ मुलांना शिक्षा देण्याकरितां जिला हातानें धरून शिक्षा दिलेला लोंबकळत असतो अशी आढ्यापासून लोंबणारी दोरी, फांसा; मुलांस टांगण्यासाठीं उंच बांधलेली दोरी. अशी शिक्षा पुर्वीं शाळांतून फार देत. (क्रि॰ घेणें; देणें). 'एखाद्या मुलांशी माझं वांकडं आलं कीं, रचलंच त्याच्यावर किटाळ आणि दिलीच त्याला पंतोजीकडून घोडी.' -चंद्रग्र ८०. ४ उभें राहून पखवाज वाजविण्याकरितां पखवाज ठेवावयाची घडवंची. 'इत- क्यांत देवळाच्या एका कोंपर्‍यांत मृदंग ठेवावयाची उंच घोडी सुनंदाला दिसली.' -सुदे २५. ५ गवत इ॰ वाहण्याकरितां खटार्‍यावर उभारलेला सांगाडा, चौकट. ६ फळा जमीनीपासून उच ठेवण्याकरितां व त्याला उतार देण्याकरितां केलेली लांकडी चौकट, सांगाडा. ७ वयस्क असून पोरकटपणा करणारी, खिदड- णारी मुलगी; खिदडी; धांगडधिंगी; भोपळदेवता; घोडकुदळ. ८ (सुतारी) तासावयाचें लांकूड हलूं नये म्हणून त्याला आधार- भूत असें दुसरें लांकूड, चौकट इ॰ सोईनें बसवितात तें. ९ (विणकामांत) सूत उकलण्यासाठीं केलेलें लांकडी चौकटीसारखें साधन. १० (सोनारी) पायांत घालावयाच्या सांखळ्यांच्या कड्या वांकविण्यासाठीं असलेला बोटाइतका जाड असा निमु- ळता मोळा. ११ (हेट. नाविक) पोरकें (लहान) शीड उभें करण्यासाठीं असलेलें कमानीसारखें लांकूड. १२ बंधार्‍याच्या मुखाशीं (पाणी सोडण्याच्या ठिकाणीं) पडद्यासारखी बांधलेली भिंत. हिच्यावरून पाणी जात असतें. १३ (हेट.) गलबताच्या कडेस शौच्यास बसण्याकरितां टांगलेली लांकडी चौकट. १४ सांकटणें; सकोटण. घोडा अर्थ १७ पहा. १५ तीन पायांचें दिवा ठेवण्याचें बुरडी तिकाटणें, तिवई. १६ पाटास जे दोन आडात मारितात ते प्रत्येकी. १७ हत्तीवरील चौकट; हौदा. 'साहेब नौबतीकरितां हत्तींवर लाकडी घोडी घालून...' -ऐरा ९.५०६. १८ उभें खुंटाळें. (इं.) स्टँड. 'तिकोनी खुंट्यांची घोडी आणि रुमाल ठेवावे ' -स्वारीनियम ७०. १९ सामान ठेवण्याचा घोडा. घोडें-न १ सामा (लिंगभेद न धरतां) घोडा या जातीं- तील जनावर. ' कृष्णाकांठचीं घोडीं सडपातळ पण चपळ अस- तात.' २ खटार्‍याच्या साटीच्या चौकटीचीं दोन बाजूंचीं उभीं लाकडें; घोडा अर्थ ९ पहा. घोडकें अर्थ १ पहा. ३ चार भोंपाळे लावलेला पाण्यावर तरंगणारा तराफा. घोडा अर्थ २१ पहा. ४ (व.) गाडीचे दांडे-जूं ज्यावर ठेवतात तें दुबेळकें. घोडा अर्थ ९ पहा. [सं. घोडा] (वाप्र.) घोडा आडवा घालणें- (एखाद्या कार्यात) अडथळा, विघ्न आणणें. 'आणि म्हणूनच तुम्ही घोडा आडवा घातलांत वाटतं ?' -चंद्रग्र ६८. ॰उभा करणें-बांधणें-(घोडा) थोडा वेळ थांबवणें; जरासें थांबणें; घाई न करणें (घाईंत व धांदलींत असणार्‍या मनुष्यास उद्देशून ह्या वाक्प्रचाराचा उपयोग करतात.) ॰काढणें-१ (बांधून ठेव- लेला घोडा बाहेर नेणें) घोडा हांकारणें, पिटाळणें २ (ल.) (एखाद्यानें) पळ काढणें; पोबारा करणें; निसटणें. ॰चाल- विणें-(कर.) (ल.) डोकें खाजवणें; युक्ति लढविणें. ॰टाकणें- घोडा फेंकणें; उडवणें; अंगावर घालणें. 'आरेरे टाकौनि घोडा । भणती यांचिआं जटैं उपडा । ' -शिशु १४१. ॰मैदान जवळ असणें-(घोडा धांवण्यांत कसा काय आहे याची परीक्षा त्यास मैदानांत पळवून करतां येते यावरून) ज्याची परीक्षा करा- वयाची तो पदार्थ, मनुष्य व परीक्षेस लागणारी सामग्री हीं दोन्ही जवळ असणें असा अर्थ होतो; एखाद्या गोष्टीची निरर्थक चर्चा न करतां तिला कसोटीला लावणें, कसोटीचा वेळ किंवा सामुग्री जवळ असणें; हा सूर्य हा जयद्रथ. 'कोरडी बढाई कशाला पाहिजे ? घोडामैदान जवळच आहे.' ॰हांकणें-पळून जाणें; निघून जाणें; पोबारा करणें; घोडा काढणें पहा. 'पंतोजीबुवास पाहून त्या पोरानें घोडा हांकला. 'घोडी काढणें-भरविणें- सक्रि. (माण.) घोडीस घोडा दाखविणें, देणें; घोडी फळविणें. घोडी घेणें-(एखाद्याशीं) घांसणें; कटकट करणें; मत्सरबुद्धीनें दोष काढणें. घोडें उभें करणें-अडथळा आणणें. 'बाळासाहेब नातूसारख्यांनीं विशेष प्रसंगीं एखादें घोडें उभें केलें तरी त्याकडे दुर्लक्ष्य करून ज्यानें त्यानें आपला पंथ सुधारावा.' -आगर ३.१४४. (एखाद्याचें) घोडें थकणें-एखाद्यानें (प्रवास, धंदा, व्यापार, अभ्यास इ॰ कांत) थकून जाणें; हतबल होणें; पुढें रेटण्याची शक्ति न उरणें. (एखाद्यानें आपलें) घोडें पुढें दामटणें-ढकलणें-हांकणें-घालणें-१ इतरांच्या पूर्वीं आपला कार्यभाग साधून घेण्याचा घाईने प्रयत्न करणें. 'या शर्यतींत जो तो आपलें घोडें पुढें दामटायला पहात आहे. -नि. 'ब्रिटिश वसाहतीनीं आपल्या हक्कांचें घोडें पुढें दामटलें.' -सासं २.४४६. २ लुब्रेपणानें दुसर्‍यांच्या संभाषणांत तोंड घालून त्यांच्यावर आपले विचार लादणें. (एखाद्याचें) घोडें मारणें-एखाद्याचें नुकसान करून त्याला राग आणणें (पूर्वीं प्रवासाचें मुख्य साधन घोडें असे. प्रवासाचें घोडें ठार केल्यास त्याचा प्रवास थांबत असे व त्यामुळें त्याचें फार नुकसान होई यावरून) एखाद्याचें फार नुकसान करणें. 'मी काय तुझें घोडें मारलें आहे ?' (आपलें) घोडें पुढें ढकलणें-आपलें काम प्रथम करूं लागणें; आपल्या कामाला महत्व देणें. गांडी- खालचें घोडें-संसारादि निर्वाहक मालमत्ता, वाडी इ॰ आधारभूत मुख्य साधन. म्ह॰ आपले गांडीखालचें घोडें गेलें, मग त्यावर महार बसो कीं चांभार बसो. घोडीं आडवीं घालणें-१ शत्रूवर तुटून पडून त्याच्या चालीला, पळाला अड- थळा करणें. २ (ल.) (एखाद्यास त्याच्या कामांत) संकट, अडथळा, व्यत्यय आणणें. 'जर त्यांणीं आपल्यावर चालून घेतलें तर आम्ही आडवीं घोडीं घालतों. ' -ख ४२९७. घोडीं घालणें-घोड्यांच्या अनीना उचलणें-घोडदळांतील सर्व स्वारांनीं इर्षेनें शत्रूवर एकदम तुटून पडणें. -होकै ३. घोड्याच्या, हत्तीच्या पायांनीं येणें व मुंगीच्या पायांनीं जाणें-(आजार, संकट, अडचण इ॰ च्या संबंधांत हा वाक्प्र- चार योजतात) जलदीनें येणें व धिमेधिमे जाणें; आजार इ॰ जलदीनें येतात पण अतिशय हळू हळू नाहींसे होतात यावरून वरील वाक्प्रचार रूढ आहे. (एखाद्याच्या) घोड्यानें पेण (पेंड)खाणें-या वाक्प्रचारांत पेण = प्रवासांतील टप्पा, मुक्का- माची जागा या ऐवजीं चुकीनें पेंड हा शब्द उपयोगांत आणतात. लांबच्या प्रवासांत निरनिराळ्या टप्प्यांच्या ठिकाणीं घोडीं उभीं राहत. त्यामुळें टप्प्याचें ठिकाण आलें कीं घोडें तेथें अडे, पुढें जात नसे. यावरून वरील वाक्प्रचार एखादें कार्य करतांना कोणी अडून बसल्यास त्यास. 'तुझें घोडें कुठें पेण खातें' असें विचारतांना उपयोगांत आणतात. घोड्यापुढें धावणें-जिकीरीचें, दगदगीचें; कष्टाचें काम करणें. (एखा- द्याच्या) घोड्यापुढें धावणें-एखाद्याची कष्टाची सेवा, चाकरी करणें; (उप.) एखाद्याची ओंगळ खुशामत करणें; एखाद्याची थुंकी झेलणें. घोड्यावर घोडा घालणें-(लिलांव इ॰ कांत) चढाओढ करणें; एखाद्यानें केलेल्या किंमतीपेक्षां अधिक किंमत पुकारणें; उडीवर उडी घालणें. घोड्यावर बसणें-दारू पिऊन झिंगणें;ताठ्यांत असणें. घोड्यावर बसून येणें-घाईनें येणें; आपलें काम तांतडीनें करण्यास दुसर्‍यास घाई करणें. सर घोड्या पाणी खोल किंवा पाणी पी-(घोड्या मागें हट, पाणी खोल आहे. तेथूनच पाणी पी) गोष्ट मोठी कठिण आहे, मागें परततां येणें शक्य आहे तोंच परतावें याअर्थी. म्ह॰ १ घोडा आपल्या गुणानें दाणा खातो = चांगला घोडा खूप काम करून आपल्याला खाद्यहि जास्त मिळवतो. त्याला जास्त देण्यास मालक असंतुष्ट नसतो. यावरून चांगला चकर आपल्या गुणानें व मेहनतीनें मालकाकडून पगार वाढवून घेतो. २ घोडा स्वार (मांड) ओळखतो = बसणारा कच्चा कीं पक्का आहे हें घोडा ओळखूं शकतो. (यावरून), आपला मालक कडक कीं नरम आहे हें हाताखालचीं माणसें ओळखूं शकतात. ३ (व.) जाय रे घोड्या खाय रे हरळी = घोड्याला हरळी खावयास मोकाट सोडल्यास (घोड्याला) तें चांगलेंच होईल, पथ्यावरच पडेल. म्ह॰-१ घोडा मरे भारें शिंगरूं मरे येरझारें = घोडी ओझें किंवा माणूम वाहून नेत असतां तिचें शिंगरूंहि तिच्याबरोबर जात असतें. घोडीच्या प्रत्येक हेलपाट्याबरोबर शिंगरूंहि हेलपाटा खातें. यावरून प्रत्यक्ष काम करणारास श्रम होतातच पण त्याच्या सहवासांत असणारांना सुध्दां जवळ जवळ तितकेच श्रम होतात. २ वरातीमागून घोडें = लग्नाच्या वरातीच्या मिरवणुकींत सर्वांच्या पुढें श्रृंगारलेलें कोतवाली घोडें चालवण्याची चाल आहे. यावरून वरात निघून गेल्यावर मागाहून श्रृंगारलेलें घोडें नेणें व्यर्थ होय किंवा औचित्यास धरून होत नाहीं. त्याप्रमाणें एखादी गोष्ट होऊन गेल्यावर मागाहून तत्संबंधीचीं साधनें जुळविणें व्यर्थ होय. २ माझें घोडें आणि जाऊं दे पुढें = इतरांचें कांहींहि होवो, माझें काम आधीं झालें पाहिजे. स्वार्थी माणसाची निंदा कर- तांना या म्हणीचा उपयोग करतात. समासांत घोडा शब्द पूर्व- पदीं आल्यास त्याचीं घोड किंवा कधीं कधीं घोडे अथवा घोड व घोडे, अशीं दोन्ही रूपें होतात. उ॰-घोडचूक; घोडेखोत; घोड (डे) चिलट इ॰. सामाशब्द-घोडकट, घोडकें-न. (घोड्याला तिरस्काराने लावावयाचा शब्द) रोडकें, अशक्त व थिल्लर घोडें; भटाचा तट्टू. घोडकुदळ-पु. १ (उप.) मुंजीचें वय झालेलें असून मुंज न झालेला मुलगा; घोडमुंज्या. २ -स्त्री. (उप.) उपवर असून लग्न न झालेली दांडगट नाचरी मुलगी; घोडी; घोडगी; भोपळ- देवता; घोडनवरी; घोडी पहा. घोडकूल-न. १ (गो.) लहान घोडें; तट्टू. २ (खा.) ओट्याच्या खांबावर तिरपा टेंकू (कर्ण) देऊन त्यावर कोरलेली घोड्याची आकृति. घोडकें-का-नपु. १ ज्याच्या भरीला करळ्या व तरसे घालून गाड्याची तक्तपोशी, बैठक तयार करतात अशीं चौकटींतील दोन बाजूचीं दोन उभीं लांब लांकडें. २ तेल्याच्या घाण्याच्या कातरीला खिळलेलें व जुंवाचा दोर बांधावयाचें लांकूड. घोडके-ढोरांचा गुरु. -गांगा २६. घोडकेळ-न. (क्क.) एक हलक्या जातीचें भसाडें केळें. [घोडा + केळें] घोडक्या-का-पु.-१ घोड्याचा खिजमतगार; मोतद्दार. 'घोड्यास शिपाई काय करिल घोडका ।' -ऐपो ३७२. २ चाबुकस्वार; अश्वशिक्षक; घोडा अर्थ ९ मधील शेवटचा अर्थ पहा. घोडकोस-पु. (गो.) तीन मैलांचा कोस. घोडगा-गी- पुस्त्री. (उप.) वयानें प्रौढ पण पोरकटपणा, नाचरेपणा अंगीं असलेला मुलगा, मुलगी; घोडा अर्थ ५ पहा. घोडी अर्थ ७ पहा. घोड(डे)गांठ-स्त्री. (बुद्धिबळांचा खेळ). एकमेकांच्या जोरांत असलेली घोड्यांची दुक्कल. घोडचवड-स्त्री. घोडदौड; घोडा चौफेर उडविणें; चवडचाल. 'घोडचवडीखालीं नाना पुण्याला आला.' -ऐपो १६२. [घोडा + चवड = विशिष्ट चाल] घोडचाल-स्त्री. घोड्याची चाल. (ल.) जलद चाल. [घोडा + चाल] घोड(डे)चिलट-न. मोठें चिलट; डांस; मच्छर. घोड- चूक-स्त्री. मोठी व अक्षम्य चूक. घोडचोट्या-वि. १ (मनुष्य). (अश्लील) घोड्याच्या चोटासारखा मोठा चोट ज्याचा आहे असा २ (निंदार्थीं) मुंज न झालेला, वाढलेला मुलगा; घोडकुदळ; घोड- मुंज्या. घोडजांवई-पु. (उप.) मोठ्या वयाचा नवरामुलगा; घोडनवरा. घोडजाळी-स्त्री.(भोंवर्‍यांचा खेळ) विरूद्ध पक्षाच्या भोंवर्‍याला खोंचा देऊन आपला भोंवरा दूर जाऊन फिरत राहील अशा रीतीनें भोंवरा फेकण्याचा प्रकार. [घोडा + जाळी = दोरी] घोडतोंड्या-वि. घोड्याच्या तोंडासारखा लांबट चेहरा अस- लेला; कुरूप; लांबट, ओबडधोबड तोंडवळ्याचा. [घोड + तोंड = चेहरा] घोडदळ-न. १ घोडेस्वारांचें सैन्य; फौज. २ सैन्यां- तील घोडेस्वारांचें पथक, तुकडी. [घोडा + दळ = सैन्य] घोड- दौड-स्त्री. घोड्यासारखें पळणें; घोड्याची दौड; जलद जाणें. [घोडा + दौड = पळणें] घोडनट-न. ज्याचें एक तोंड आढ्यावर व एक लगीवर येऊन दरम्यान तिरपें राहतें असें लांकूड ठोकतात तें. घोडनवरा-पु. (उप.) प्रौढवयाचा नवरामुलगा; घोडजांवई. घोड(डे)नवरी-स्त्री. (उप.) मोठ्या वयाची नवरी मुलगी, वधू; योग्य व सामान्य वयोमर्यादेबाहेर अविवाहित राहिलेली मुलगी. 'हे मोठमोठ्या घोडनवर्‍या घरांत बाळगल्याचे परि- णाम बरं !' -झांमू. घोड(डे)पाळणा-पु. घोड्याला (लांकडी चौकटीला) टांगलेला पाळणा; हलग्याना न टांगतां जमीनीवर घोड्यास अडकविलेला पाळण्याचा एक प्रकार. घोडा ८ अर्थ पहा. घोड पिंपळी-स्त्री. पिंपळीची मोठी जात; हिच्या उलट लवंगी पिंपळी. घोडपुत्र-पु. घोड्याला (विशेषतः बुद्धि- बळांतील घोड्याला) प्रेमानें किंवा प्रतिष्ठेनें संबोधण्याचा शब्द. [घोडा + पुत्र = मुलगा] घोडपेटें-न. १ दोन भोपळे पुढें व दोन मागें बांधून केलेला तराफा; घोडा अर्थ २१ पहा. २ भोंपळ्यावर दोन्ही बाजूस पाय टाकून घोड्यासारखें बसून पाण्यावर तरणें, तरंगणें. घोडबच्य-न. दुबळा घोडा पुष्ट होण्यास एक औषध. 'घोडबच्य पावशेर, राई पावशेर भाजलेलीं काळीं मिरें पावशेर ... मिश्रणापैकीं आतपाव दररोज देत जावें.' -अश्वप १.१७५. घोडबांव-स्त्री. (कु.) घोड्यांना पाणी पितां येईल अशा तर्‍हेनें बांधलेली विहीर. [घोड + बांव = विहीर] घोडबाही- स्त्री. १ दाराच्या दुहेरी चौकटीच्या आंतल्या चौकटींतील दोन्ही बाजूचे खांब. २ खटार्‍याच्या बैठकीच्या चौकटीच्या दोन बाजूंच्या लांब लांकडांपैकीं प्रत्येक; घोडकें, घोडें पहा; [घोडा + बाही = बाजू] घोडबाळ-वि. (उप.) पोरचाळे करणारा प्रौढ पुरुष, स्त्री; पोरकट माणूस. [घोडा + बाळ] घोडब्रह्म- चारी-पु. (उप.) लग्नाचें वय कधींच झालें असूनहि अविवाहित राहिलेला मुलगा; घोडनवरा. [घोडा + ब्रह्मचारी] घोडमल्ली- स्त्री. (बुद्धिबळांचा खेळ) घोड्यानें मात करण्याचा प्रकार. प्रतिपक्षाचें घोडें व राजा आणि आपलें घोडें, राजा व एकच प्यादें राखून प्यादेमात करणें; घोडमात. घोड(डे)मात -स्त्री. (बुद्धिबळांचा खेळ) घोड्यानें राजाला दिलेली मात; घोडमल्ली पहा. [घोडा + फा. मात् = कोंडणें] घोडमाशी-स्त्री. १ मोठ्या आकाराची हिरवी, काळसर माशी. २ (सामा.) मोठी माशी. घोडमासा-पु. एक प्रकारचा मासा; सागराश्व. ह्याचें तोंड कांहींसें घोड्यासारखें दिसतें. यास लांब शेपूट असतें. हा नेहमी उभा पोहतो. घोडमुख-ख्या-पु. १ घोड्याचें तोंड असलेला किन्नर नांवाच्या देवयोनींतील पुरुष. याचें वर्णन पुराणांतरीं सांपडतें. २ (ल.) अगदीं कुरूप, घोडतोंड्या माणूस. 'एक मीर- वलें भुरळें पींगळें । घोडमुखें ।' -दाव २८५. घोडमुंगळा-पु. मोठा व काळा मुंगळा. घोडमुंगी-स्त्री. मोठी, काळ्या जातीची मुंगी. घोड(डे)मुंज्या-पु. उप. १ मुंज होण्याचें वय झालें असून मुंज न झालेला मुलगा. २ लग्न न झालेला प्रौढ मुंज्या. [घोडा + मुंज्या] घोडला-पु. मूल रांगत असतांना त्याची होणारी घोड्यासारखी आकृति. घोडा अर्थ १० पहा. घोडली-स्त्री. (कों. हेट.) (नाविक) शौचास बसण्याकरितां वर्‍यास एक चौकट चार दोर्‍यांनी अडकवितात ती. [घोडा] घोडवळ-स्त्री. १ बांधलेल्या घोड्यांची ओळ, रांग. २ घोड्यांचा तबेला; घोडशाळा; घोडसाळ; यावरून (सामा.) तबेला; 'रोडोला हत्ती घोडवळींतून जाणार नाहीं.' ३ लांबचलांब, ठेंगणें व बेढब घर; मागरघर; दांडसाळ; केवळ तबेल्यासारखें असलेलें घर; कोठडी. ४ (उप.) घोडनवरी. ५ न. झोडपलेल्या, झोडपून दाणे न काढलेल्या धान्याच्या पेंढ्यांची रास, गंजी. [घोडा + ओळ] घोड(डे)वाट-स्त्री. घोड्यांकरितां केलेली, फक्त घोड्याला जातां येईल अशी वाट, रस्ता (विशेषतः डोंगर इ॰ याच्यावरून); उलट गाडीवाट. [घोडा + वाट] घोडविवाह- पु. विषमविवाह. 'आपली नात शोभेल अशा दहा वर्षांच्या पोरीशीं लग्न लावण्यास तयार असतात व असा घोडविवाह करूनहि फिरून समाजांत हिंडण्यास ... त्यांस दिक्वत वाटत नाहीं' -टि ४.९६. [घोडा + विवाह] घोडवेल-स्त्री. (सांकेतिक) घोड्याची लीद; (औषधांत घोड्याच्या लिदीचा उपयोग करा- वयास असल्यास तिचा निर्देश ह्या शब्दानें करतात). घोड- शह-पु. (बुद्धिबळांचा खेळ) घोड्यानें दिलेला शह. [घोडा + शह] घोडशाळा, घोडसाळ-स्त्री. १ घोड्यांचा तबेला; घोडवळ अर्थ २ पहा. [घोडा + शाळा = घर] घोडशिष्य- पु. (निंदार्थीं) विद्यार्जन करूं पाहणारा मोठ्या वयाचा विद्यार्थीं, मोठेपणीं शिकावयास लागणारा मनुष्य. घोडशीर- स्त्री. १ पायाच्या टांचेच्या वरच्या बाजूस असलेली शीर, नाडी; दवणशीत्त; धोंडशीर पहा. २ (क्व.) पायाचा किंवा हाताचा स्नायु. घोडसटवी-स्त्री. १ उग्र स्वरूप धारण केलेली देवी. (क्रि॰ लागणें). २ घोडी व्याल्यापासून सहाव्या दिवशीं करा- वयाची सटवीची पूजा. (एखादीला) ॰लागणें-१ घोडसट- वीप्रमाणें उग्र व विकाळ दिसणें. २ घोटसटवीची बाधा होणें. घोडेखाद-स्त्री. १ घोड्यांचें चरणें; हरळी खाणें. 'या घोडे खादीमुळें माळावर एक काडी राहिली नाहीं.' २ फक्त घोड्यांना चरतां, खातां येईल इतक्या वाढीचें गवत. 'ह्या माळावर मोठें गवत नाहीं, घोडेखाद कोठें कोठें आहे.' [घोडा + खाद = खाणें] घोडेखोत-पु. घोडे भाड्यानें देण्याचा धंदा करणारा; भाड्याच्या घोड्यांचा नाईक. [घोडा + खोत = मक्तेदार] घोडेघाटी-स्त्री. एक प्रकारचें रेशमी कापड. घोडेघास-न. १ विलायती गवत; लसून- घास. २ घोडकुसळी पहा. [घोडा + घास = गवत] घोडेपाऊल- न. एक वनस्पतिविशेष. [घोडा + पाऊल] घोडेराऊत, घोडे- स्वार-पु. घोड्यावरील शिपाई. घोड्याएवढी चूक-स्त्री. फार मोठीचूक; ढोबळ चूक; घोडचूक पहा. घोड्या गोंवर-पु. एक प्रकारचा गोंवराचा आजार; याच्या पुटकुळ्या मोठ्या असतात. [घोडा = मोठा + गोवर] घोड्याचा-पु. (निंदार्थीं) घोड्यावर बसलेला मनुष्य; घोडेस्वार. 'ते पहा घोड्याचे चालले. मागून स्वारी येतीसें वाटतें.' घोड्याचा दाणा-पु. १ (उप.) हरभरा. २ (ल.) बुंदीच्या लाडवास तिरस्कारानें म्हणतात. घोड्याचा पूत-लेंक-पु. (उप.) मूर्ख; गाढव; गद्धा. घोड्याची चाकरी-स्त्री. घोड्यांना दररोज चोळणें, खरारा करणें इ॰ काम. घोड्याची जीभ-स्त्री. (राजा.) एक वनस्पति- विशेष. घोड्याची मुंज, घोड्याचें बारसें-स्त्रीन. एखादा कोठें जावयास निघाला असतां एखाद्या अधिक प्रसंगी व फाजिल चौकशी करणार्‍या माणसानें त्यास कां, कुठें जातां असें विचारलें असतां म्हणतात. घोड्यांचें नाटक-न. (ना.) सर्कस. घोड्याचें मूत-न. १ कुतर्‍याचें मूत; अळंबें; भुईछत्री. २ कुजलेल्या लांकडांतून फुटलेलें अळंबें. घोड्याच्या पाठीवर- क्रिवि. भरधाव; झरकन; त्वरेनें. (क्रि॰ जाणें; करणें). घोड्याच्या पाठीवरचा कोस-पु. कंटाळवाणा व लांब- णीचा कोस; घोड्यावरून गेल्यासच कोसाएवढें व कंटाळवाणें न वाटणारें अंतर.

दाते शब्दकोश