मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

हिंग

पु. अति उग्र वासाचा एक चीक. हा मसाला, फोडणी इ॰ त घालतात. [सं. हिंगु] ॰लावणें-लावून विचारणें-मानणें-मोजणें-(नकारार्थी प्रयोग) मानणें; आदर देणें; महत्त्व देणें (हिंग महाग असल्यानें महत्त्वाच्या पदार्थांतच वापरतात, यावरून). ॰हगणें-रोग इ॰ नीं झिजणें; रोडावत जाणें; पिचत पडणें. हिंगडा-पु. १ हलक्या प्रकारचा हिंग; वाईट हिंग. २ (निंदार्थीं) हिंग. हिंगणें वाफणें- उक्रि. १ (पदार्थांस प्रथम हिंग लावून मग फोडणी देतात त्यावरून लक्षणेनें-नकारार्थीं प्रयोग करून) करावयाचें कृत्य अपुरें असणें; आरंभहि नसणें. 'अझून शेत हिंगलें नाहीं वाफलें नाहीं; इतक्यांत पट्टी काय म्हणून केली.' 'रोजगा- राचा ठिकाणा नाहीं अझून हिंगला नाहीं वाफला नाहीं.' २ (शेतजमीन) वाफणें पहा. ३ शेत भांगलणें. ४ अजारांतून बरें होऊं लागणें. [हिंग + वाफ] हिंगतूप-धूप-पु. अव. नेहमीं होणारा संसाराचा किरकोळ खर्च (विशेषतः देवधर्म, जेवण- खाण इ॰ चा). (क्रि॰ जाणें; उडणें; खरचणें). (पैसा कसा उडतो हें दाखवितांना वापरतात). 'हिंगतुपास-तुपाखालीं- वारी-त्यानें सर्व संपत्ति उडविली.' हिंगरडूं-रूड-न. हिंग खाल्ल्यामुळें व्रणावर उठणारें बेंड; हिंगरडें. हिंगवणी-न. हिंग लावलेलें पाणी. हिंगाचा अंगारा-पु. बाळंतिणीचे पांचवे व सहावें दिवशीं हिंग व हळद पाण्यांत कालवून बाळंतिणीस व घरांतील मुलाबाळांस लावतात तो अंगारा. हिंगाचा खडा-पु. १ एखादी त्रासदायक, निष्कारण फाटे फोडणारी व्यक्ति, वस्तु. २ गडबड्या, तल्लक माणूस. हिंगाचा वास-पु. संपत्ति, शक्ति, अधिकार इ॰ नाहींसें होऊन मागें राहिलेला निव्वळ लौकिक; काप गेलें, भोंकें राहिली या अर्थीं. म्ह॰ हिंग गेला पण हिंगाचा वास राहिला. हिंगाचें पोतें-न. वरील लौकिकवान् व्यक्ति. हिंगा-लोण्याचा-वि. (ना.) अशक्त व नाजूक प्रकृतीचा. हिंगाष्टक-न. सुंठ, मिरें, पिंपळी, ओवा, सैंधव, जिरें, शहाजिरें व हिंग या आठ औषधांचें समभाग चूर्ण. हें जठराग्नि प्रदीप्त करतें. [हिंग + अष्टक] हिंगु- पु. हिंग व त्याचें झाड. [सं.] हिंगुनिर्यास-पु. हिंग. हिंगुरडें-हिंगरडूं पहा.

दाते शब्दकोश

हिंग hiṅga m (हिंगु S) Assafœtida. हिंग लावणें or हिंग लावून विचारणें -मानणें -मोजणें &c. To call or regard as one's own. (Because hing is applied to an article of food which is to be eaten.) हिंग हगणें To be wasting away under disease: also to pine away.

मोल्सवर्थ शब्दकोश

हिंग m Asafætida. हिंग लावणें Call or regard as one's own.

वझे शब्दकोश

(सं) पु० हिंगु, वघार, औषधिविशेष.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

क्रिवि. (व. कुणबाऊ) इकडे. हंगें; हिंगे पहा. [का. ई-हीगे]

दाते शब्दकोश

हिरा हिंग

हिरा हिंग hirā hiṅga m (Green assafœtida.) A term applied, from its glistening or bright color, to assafœtida of a fine quality.

मोल्सवर्थ शब्दकोश

खिरींत सराटा, खिरींत हिंग

खिरींत सराटा, खिरींत हिंग A dead fly in a precious ointment; a dark spot in a mass of fairness or goodness.

वझे शब्दकोश

खिरीत हिंग, खिरीत सराटा      

चांगल्या मनुष्यांतील वाईट माणूस, समाजातील त्रासदायक माणूस; समाजकंटक; उपाधी; ब्याद; काटा; (बायकी भाषा) विरूप माणूस; चांगल्या, नाजूक वस्तूंतील वाईट व भसाडी वस्तू; समानशील मंडळीतील प्रतिकूल व्यक्ती; वस्तू.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

संबंधित शब्द

करंबट

स्त्री. १ एक प्रकारची चटणी; आलें धुवून त्यांत मीठ, हिंग घालून वाटून दह्यांत कालवून केलेली चटणी. २ आवळ- काठी, केळफूल वगैरे पदार्थांत हिंग, जिरें, मिरें, अमसूल, मीठ घालून वांटून केलेली चटणी. ३ (कु.) आंबा, काजू यांच्या फोडीस मीठ, मसाला लावून केलेलें लोणचें. [सं. करंभ = मिश्रण, दध्योदन, मिश्र पदार्थ, खाद्य]

दाते शब्दकोश

करंबट      

स्त्री.       १. एक प्रकारची चटणी; आले धुऊन त्यात मीठ, हिंग घालून वाटून दह्यात केलेली चटणी. २. आवळकाठी, केळफूल वगैरे पदार्थात हिंग, जिरे, मिरे, आमसूल, मीठ घालून वाटून केलेली चटणी. ३. आंबा, काजू यांच्या फोडींना मीठ, मसाला लावून केलेले लोणचे. (कु.) [सं. करंभ = मिश्रण, दध्योदनमिश्र पदार्थ, खाद्य]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अडगई

स्त्री. महाळुंग सोलून, शिजवून त्यांत दही, हिंग, मीठ वगैरे घालून केलेलें रायतें, कोशिंबिर. [?]

दाते शब्दकोश

अडगई      

स्त्री.       महाळुंग सोलून, शिजवून त्यात दही, हिंग, मीठ वगैरे घालून केलेले रायते; कोशिंबीर; लिंबू आदि फळांची साले व आले, इ. चे लोणचे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अग्निमुख      

न.       १. पाचक औषधी – हिंग १ भाग, वेखंड २ भाग, पिंपळी ३ भाग, सुंठ ४ भाग, ओवा ५ भाग, हिरडेदळ ६ भाग, चित्रकमळ ७ भाग व कोष्ठ ८ भाग यांचे चूर्ण. २. देव. ३. ब्राह्मण. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अल्कक्षार      

मूलक्षार. : हिंग हा एक अल्कक्षार आहे.’ – पाकसिद्धी ६६. अल्काव      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

बोजवार

पु. भाजींत, लोणच्यांत घालण्याचा हिंग, जिरें, मिरीं, हळद इ॰ घालून केलेला मसाला. [सं. वेसवार]

दाते शब्दकोश

बोळ

न. १ एक प्रकारचा औषधी चीक, डिंक. ह्याचे प्रकार:-(अ) पांढराबोळ व बाळंतबोळ. (आ) काळा, कडू बोळ, एलिया. (इ) रक्त्या, तांबडा, हिरा बोळ. (ई) भेसा बोळ. (उ) कातबोळ हे आहेत (नुसत्या बोळ ह्या शब्दानें काळाबोळ समज- तात). 'जेणें प्रथमचि तुजला लागला बोळ खावा.' -मोकृष्ण २१३. 'क्षीरीमध्यें हिंग दुधामध्यें बोळ । तिथेंचि वोंगळ नशा केला ।' -तुगा ३०७५. २ दाट झालेलें दहीं शाई, रंग इ॰ ३ धान्य, फळें इ॰ मधील गाळ साळ; टाकाऊ भाग; गदळ. ४ (गो.) अंड्यांतील बलक; बोळप्तो ५ चिकण मातीचा एक प्रकार. -वि बोथट. 'माझा चाकू बोळ आहे.' [सं. बोल] ॰घालणें- घालीत बलणें-फार फार बोलून, हुज्जतघालून छाती दुखवून घेणें (आणि छातीवर बोळ घालण्याचा प्रसंग येणें). (एखाद्या कामांत) ॰घालणें-पाजणें-पाडणें-देणें-काम बिघडविणें; कामाची खरबी करणें.

दाते शब्दकोश

चावटी

स्त्री. (काव्य) चावटाई, चाऊटी पहा. (क्रि॰ करणें; पिटणें). 'तैसा मीं जरीं तुम्हांप्रती । चावटी करीतसें बाळमती ।' -ज्ञा ९.१६. 'कथी चावटीचे बोल । हिंग क्षिरीं मिथ्या फोल ।' -तुगा ३०४४.

दाते शब्दकोश

चपका

पु. १ मोरचूत. टाकणखार, काव इत्यादि लावून दागिना किंवा सोनें तावणें व तें विस्तवांत घालणें. (क्रि॰ देणें). २ उजळा, जिल्हई देण्याची एक तर्‍हा, रीत, पद्धत. ३ दहीं, ताक वगैरेचा आंबटपणा मोडण्यासाठीं तापविलेल्या पळींत तेल, जिरें, हिंग, मोहर्‍या वगैरे घालून ती पळी दहीं इ॰ कांत बुडविणें किंवा घालणें; फोडणी. [चप हिं. चपकाना]

दाते शब्दकोश

चपका      

पु.       दही, ताक वगैरेचा आंबटपणा मोडण्यासाठी तापविलेल्या पळीत, तेल, जिरे, हिंग, मोहऱ्या वगैरे घालून ती पळी दह्यात वगैरे बुडवणे किंवा घालणे; फोडणी.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गोडवणी      

स्त्री.       गोडे पाणी : ‘हिंग पडतांचि रांजणी । गोडवणी होय हिंगवणी ।’ - भारा बाल १०·३६.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गरम

वि. १ ऊष्ण; ऊन. (शब्दशः व ल.) २ कडक; तिखट; रागीट. ३ लोंकरीचें उबदार (कापड इ॰). 'थंडीचे दिवसांत गरम कपडे अंगांत घालावे.' ४ दाट (बातमी इ॰). 'डेरेदाखल होतात म्हणून आवई गरम होती.' -रा १.५४. ५ रुष्ट; संतप्त. 'तो मजवर फार गरम झाला.' [फा. गर्म्] (वाप्र.) ॰होणें-(ल.) रागावणें; संतापणें. सामाशब्द- ॰नरम-वि. १ फार ऊन किंवा थंड नाहीं असें (वस्तु इ॰). २ (ल.) कडक व सौम्य; निष्ठुर व दयाळु; कधीं कडक व कधीं शांत (मनुष्य, स्वभाव, भाषण). ३ नवेंजुनें; उत्तममध्यम; चांगलें व सामान्य. ॰बाजारी-स्त्री. १ फार मागणी; भारी किंमत; व्यापारांत तेजी. २ श्रीमंत होण्याची संधि साधणें. 'मध्यस्थ लोकांनीं गरमबाजारी करून ...' -दिमरा २.२८२. [फा. गर्म् + बाझारी] ॰मसाला-पु. १ भाजीला घालण्याचा धने, हळकुंड, दालचिनी, हिंग इ॰चा कच्चा मसाला. २ उष्ण व शक्तिवर्धक औषधें, मसाले. [हिं.]

दाते शब्दकोश

गरममसाला      

पु.       १. भाजीला घालण्याचा धने, हळकुंड, दालचिनी, हिंग इ. चा कच्चा मसाला. २. उष्ण व शक्तिवर्धक औषध, मसाले. [हिं]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

हिंगाचा वास

हिंगाचा वास hiṅgācā vāsa m (Smell or odor of assafœtida.) A term for the repute (of wealth, strength, authority, capacity &c.) when, the wealth &c. being departed, the repute is all that remains. Pr. हिंग गेला पण हिंगाचा वास राहिला.

मोल्सवर्थ शब्दकोश

हिंगारी

हिंगारी hiṅgārī f (हिंग or Canarese, but current in the Solápúr districts.) The रब्बी or Vernal crops: opp. to मुगारी.

मोल्सवर्थ शब्दकोश

हिंगाष्टक

हिंगाष्टक hiṅgāṣṭaka n (हिंग & अष्टक) A medicinal preparation of about eight ingredients, assafœtida being the principal.

मोल्सवर्थ शब्दकोश

हिंगडा

हिंगडा hiṅgaḍā m (हिंग) An inferior sort of assafœtida: also spoiled or damaged assafœtida. 2 Applied abusively or revilingly to assafœtida in general.

मोल्सवर्थ शब्दकोश

हिंगरूड

हिंगरूड hiṅgarūḍa n हिंगरडूं n (हिंग) A bump arising upon a wound or sore through the eating of assafœtida.

मोल्सवर्थ शब्दकोश

हिंगतूप

हिंगतूप hiṅgatūpa & हिंगधूप Formations with हिंग Assafœtida, तूप Clarified butter, and धूप Frankincense--three articles of household-consumption in continual requisition; representing here therefore, comprehensively, the minor and miscellaneous and constantly recurrent expenditures of a family under the heads of Board and Idol-worship. The use is confined to the oblique cases, and in phrases with such verbs as जाणें, उडणें, खरचणें &c.; when statement is to be made of small expenses contracted, or illustration is to be adduced of the slipperiness of money. Ex. हिंगातुपास or हिंगातुपाखालीं, or हिंगातुपावारी त्यानें सगळी संपत्ति उडविली. Also हिंगाधुपास, हिंगाधुपा- खालीं &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

हिंगुरडें

हिंगुरडें hiṅguraḍēṃ m (हिंग) A bump or callosity esp. as supervening upon a wound or sore through the eating of assafœtida.

मोल्सवर्थ शब्दकोश

हिंगवणी

हिंगवणी hiṅgavaṇī n (हिंग & पाणी) Water-solution of assafœtida.

मोल्सवर्थ शब्दकोश

हिंगवणी n Water-solution of हिंग.

वझे शब्दकोश

हिरा

पु. एक पांढर्‍या रंगाचें महारत्न. परब, विलंबी, मुखलासी, पलचा इ॰ याचे प्रकार आहेत. [सं. हीरक, हीर] म्ह॰ हिरा तो हिरा गार ती गार = थोर व हलका कोण हें तेव्हांच ओळखूं येतें. ॰दिवा-पु. पुरा मूर्ख. ॰बोळ-पु. एक प्रकारचा बोळ; कातबोळ. ॰हिंग-पु. चकाकणारा उत्कृष्ट हिंग. हिरे- खाण-स्त्री. हिर्‍यांची खाण. हिरेदिवे-पु. अव. मकरसंक्रांतीस ब्राह्मणास, दोन दिवे व दोन आरसे बायका दान देतात ते.

दाते शब्दकोश

कोचक(का)ई

स्त्री. मोठे व जून झालेले आंवळे उकडून त्यांतील बिया काढून टाकून त्यांत मीठ, हिंग, जिरें वगैरे घालून केलेला पदार्थ; किंवा वाळवून वड्या तयार करतात तीं. [का. कोच्चु = तुकडे करणें, पूड, चूर्ण + काई = फळ]

दाते शब्दकोश

कोथांमेथां

न. (चि.) १ धने, हिंग, जिरें, मोहरी, इत्यादि फोडणीचें सामान. २ समुच्चयार्थी, किरकोळ धान्य.

दाते शब्दकोश

कोथेमेथे      

न.       धने, हिंग, मेथी इ. जिन्नसांचा समुच्चय. (को.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कोथेंमेथें

न. (कों.) धने, हिंग, मेथी इ॰ जिन्नसांचा समुच्चय. [कोथिंबीर (धने) + मेथ्या]

दाते शब्दकोश

खडा

पु. १ लहान दगड; गोटी; गोटा; धोंड्याचा बारीक तुकडा; दगडाचा लहान खंड. २ कळी (चुन्याची); तुकडा (गोंद, हिंग, कात, खडीसाखर इ॰ चा); अलंकारांतील, अंगठींतील मणी, रत्न. 'एकेक खडा निवडक हातीं लागला.' -विवि १०.५- ७.१२७. ३ मळाचा लहान पण कठिण गोळा; (सामा.) गड्डा; गोळा; पिंड. ४ गुळाची लहान ढेप. [सं. खंड; सिं. खडो] (वाप्र.) ॰उडणें-(गुडगुडी ओढतांना तींतील खडा वर उडतो त्या- वरून) सर्वस्वी संपणें; खर्च होणें (द्रव्य, वस्तु). ॰टाकून ठाव घेणें-(पाण्याची खोली ठोकळमानानें खडा टाकून पाहतात यावरून) एखाद्या कामाचा कल जाणावयाचा असतां सहजपणें एखादा शब्द टाकून कामाची माहिती काढणें; आपलें काम होईल कीं नाहीं याचा अजमास पाहणें. खडानखडा माहिती असणें.-एखाद्या कामांतील बारीक सारीक सर्व गोष्टी माहीत असणें. ॰फुटणें-खडक फुटून पाण्याचा ओघ सपाटून बाहेर येणें. 'नदीचा खडा अजून फुटला नाहीं.' खडेखाणें-खस्ता खाणें; कष्ट करणें; त्रास सहन करणें (दगदगीच्या कामांत). ॰खावविणें-चारणें- त्रास देणे;सतावणें; बेजार करणें. ॰घासणें-फोडणें(नांवानें)- १ एखाद्याची निंदा करणें; तक्रार करणें. २ (नांवाशिवाय) खूप कष्ट करणें; दगदग करणें. ॰मोजणें-खडे मांडून हिशोब करणें (कागदावर लिहितां येत नसल्यामुळें). खड्या खड्यानीं डोकें फुटणें-अनेक बारीकसारीक गोष्टींमुळे दिवाळखोर बनणें, भिकेस लागणें (एकाच गोष्टीमुळें नव्हे). खड्यांनीं डोकें फोडणें-दगडानीं मारून गाईला ठार केलें असतां प्रायश्चित्तादाखल त्या व्यक्तीचा दगडांनीं डोकें फोडून वध करणें. खड्यासारखा निवडणें-१ एखाद्याला कुचकामाचा म्हणून बाजूला सारणें, करणे; निरुपयोगी ठरविणें. २ चट्कन् वेगळा काढणें, ओळखणें. 'राहतां राहतां सुशिक्षितांचा वर्ग राहिला व त्यांस मोर्ले यांनीं शत्रू म्हणून खड्यासारखें निवडून काढलें आहें.' -टिव्या ५. खड्या- सारखा बाहेर पडणें-निरुपयोगी म्हणून बाजूला सरणें.

दाते शब्दकोश

खडा      

पु.       १. लहान दगड; गोटी; गोटा; धोंड्याचा बारीक तुकडा; दगडाचा लहान खंड. २. कळी (चुन्याची); तुकडा (गोंद, हिंग, कात, खडीसाखर इत्यादीचा); अलंकारातील, अंगठीतील मणी, रत्न : ‘एकेक खडा निवडक हातीं लागला.’ - विवि १०·५७·१२७. ३. मळाचा लहान पण कठीण गोळा; (सामा.) गड्डा; गोळा; पिंड. ४. गुळाची लहान ढेप. [सं. खंड] (वा.) खडा उडणे - १. (गुडगुडी ओढताना तिच्यातील खडा वर उडतो त्यावरून) सर्वस्वी संपणे; खर्च होणे (द्रव्य, वस्तू). २. आजाराने बेजार होणे; काम करून थकून जाणे. खडा टाकून ठाव घेणे, खडा टाकून पाहणे - (पाण्याची खोली ठोकळमानाने खडा टाकून पाहतात यावरून) अंदाज घेणे; सहजपणे एखादा शब्द टाकून कामाची माहिती काढणे; आपले काम होईल की नाही याचा अजमास पाहणे. खडा न खडा माहिती असणे - एखाद्या कामातील बारीकसारीक सर्व गोष्टी माहीत असणे. खडा होणे - खड्यासारखे घट्ट परसाकडे होणे. खडा पहारा देणे - सतर्कपणे, सावधपणे लक्ष देणे, (विशेषतः सुरक्षिततेसाठी.) खडा फुटणे - खडक फुटून पाण्याचा ओघ सपाटून बाहेर येणे. खडे खाणे - खस्ता खाणे; कष्ट करणे; त्रास सहन करणे (दगदगीच्या कामात.) खडे खावविणे, चारणे - पराभव करणे; त्रास देणे; सतावणे; बेजार करणे. खडे घासणे, फोडणे - १. एखाद्याची निंदा करणे; तक्रार करणे. २. (नावाशिवाय) खूप कष्ट करणे; दगदग करणे. खडे मोजणे - खडे मांडून हिशोब करणे (कागदावर लिहिता येत नसल्यामुळे). खड्याखड्यांनी डोके फुटणे - अनेक बारीकसारीक गोष्टींमुळे दिवाळखोर बनणे, भिकेला लागणे (एकाच गोष्टीमुळे नव्हे.) खड्यासारखा निवडणे, बाजूला करणे, टाकणे, सारणे - १. एखाद्याला कुचकामाचा म्हणून बाजूला सारणे, करणे; निरुपयोगी ठरविणे. २. चटकन वेगळा काढणे, ओळखणे : ‘राहतां राहतां सुशिक्षितांचा वर्ग राहिला व त्यांस मोर्ले यांनीं शत्रू म्हणून खड्यासारखें निवडून काढलें आहे.’ - टिव्या ५.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खीर

खीर khīra f (क्षीर S through H) A dish composed of rice, cocoanut-scrapings, milk, sugar, and spices. Pr. जेथें खीर खाल्ली तेथें राख खावी काय? खिरींत or खिरीमध्यें सरांटा (A thorn of सरांटा or a splinter in ricemilk.) A term for a troublesome person in an assembly or a community, a plague or pest, a thorn: also for an ill-favored man amidst a company of women: also for a rough, coarse, or bad thing gen. falling amidst fine or good things: also for one opposer or objector amongst persons compliant or concurrent. खिरींत हिंग (Assafœtida in ricemilk.) A term for a vile person or thing amongst or in good persons or things; "a dead fly in precious ointment."

मोल्सवर्थ शब्दकोश

लोणचें

न. १ आंबे, लिंबे इ॰ चिरून त्यांत मीठ, माहेरी, हिंग इ॰ घालून खारवून केलेलें तोंडीलावणें. २ दोन्ही बाजूकडून खेळणारा गडी. (खा.) लोणसान. [सं. लवण] लोणच्या- वि. सालीला जाड व आंबट असा (आंबा.) (जाड सालीच्या आंब्याचें लोणचें जास्त दिवस टिकतें).

दाते शब्दकोश

माहेश्वरधूप

पु. सरक्या, मोराचीं पिसें, रिंगणींचीं फळें, शिलारस, दालचिनी, जटामांसी, मांजराची विष्टा, नखला, वेखंड, केस, सापाची कात, हस्तिदंत, शिंग, हिंग व मिरीं या सर्व वस्तू समभाग घेऊन त्यांची केलेली धुरी. स्कंदोन्माद, पिशाच्च, राक्षस व देवग्रह यांचे आवेश व तज्ज्ञन्य ज्वर यांचा नाश करण्यास ही धुरी उत्तम आहे. -योर १.३८५. [सं.]

दाते शब्दकोश

मिसळा-ळा

-स्त्री. पु. १ मिश्रण; मिसळलेली स्थिति; भेळ. २ एकत्र मिसळलेला समूह. ३ मंडळी; संघ. ४ सख्य; मैत्री. [सं. मिश्रण] मिसळ-वि. मिसळलेला; एकत्र झालेला. [सं. मिश्रित] मिसळण-स्त्री. मिसळलेली स्थिति; मिश्रपणा. न. १ मिश्रण करण्याकरतां मिसळलेली वस्तु; मिश्रणांतील निरनिराळे पदार्थ. २ मिश्रण; भेसळ. ३ फोडणींत घालण्यासाठीं एकत्र केलेले धने, मोहऱ्या, कारळें इ॰ पदार्थ. ॰काढणें-कारळें, मोहऱ्या, हळद, मेथ्या, हिंग इत्यादि जिन्नस वेगवेगळे काढून ठेवणें. [मिसळणें] मिसळणी-स्त्री. मिसळणें; एकत्र करणें. मिसळणें-न. मिस- ळण; धनें, मोहऱ्या, कारळें, मेथ्या इ॰ चें फोडणींत घालण्याचें मिश्रण. मिसळणे-अक्रि. मिश्रण होणें; एकत्र होणें. -सक्रि १ एकत्र करणें. २ (ल. काम किंवा लढाई) जोरामें करणें; त्वेषानें करणें. मिसळवणी-न. कोकंबसारांत मिसळून वाढविलेलें ताक. [मिसळ + पाणी]

दाते शब्दकोश

मोहरी

स्त्री. फोडणींत घालतात ती वाटोळ्या आकाराची करड्या रंगाची राई; मोहरीचें झाड हातभर उंच वाढतें. मोह- राच्या महत्त्वाच्या-दान जाती (१) शिरसू-यापासून कडवें तेल काढतात. (२) राई ही शरीर विलेपनाकरितां उपयोगांत आण- तात. मोहरी इतका जीव-(दुखण्यामुळें) जीव मोहोरीच्या आकाराप्रमाणें किंवा राईप्रमाणें अगदी लहान होणें. मोहरवणी- न. तोंडी लावण्यासाठीं आंब्याच्या कैऱ्यांच्या फोडी, हिंग, मोहोऱ्या, मीठ इ॰ चें मिश्रण केलेलें असतें तें; लोणचें वगैरे प्रमाणें याचा उपयोग करतात. [मोहरी + पाणी] मोहरीफेस- (व.) मोहऱ्यांचें बारीक भुरका पाणी टाकून फेणवून साल काढून अंब्याच्या बारीक फोडी त्यांत घालून केलेलें एक प्रकारचें लोणचें.

दाते शब्दकोश

मसाला

पु. १ कांहीं खाद्य, पेय, औषध इ॰ अधिक गुण- कर व रुचिकर करण्याठीं घालतात ते पदार्थ समुच्चयानें (भाजींत हिंग, जिरें इ॰-खिरींत,लाडूंत लवंग, वेलदोडे इ॰-जनावरांच्या पौष्टिक औषधांत गूळ, मैदा, भांग इ॰) २ तोंडीं लावणें; खार; लोणचे; व्यंजन. ३ (सामा.) मिश्रणांतील द्रव्यें. जसें चुन्याचा मसाला, रंगाचा मसाला. ४ सरकारनें जवानीसाठीं बोलाविलेल्या आरोपीपासून न्यान देण्यापूर्वीं घेतलेला पैसा, खर्च. 'त्याजवरून सरकारांतून राजश्री बाळाजी महादेव याजकडे मनसबीविशीं पत्र दिल्हें त्यांनीं आपल्यास मसाला करून आणिले.' -थोमारो २.१५२. ५ वसूल करावयास गेलेल्या शिपायाला सरकारी चिठ्ठींत लिहिलेलें द्यावें लागतें तें द्रव्य. 'त्याजवर कोपायमान होऊन ढालाईत व दहा हजार रुपये मसाला करून पाठविले.' -भाव १०१.६ निरनिराळ्या निमित्तानें बसविलेले दंड, दस्त. 'त्या- वरून तुम्हीं लोहवाडीच्या पाटलास वीस रुपये मसाला घेतला.' -वाडबाबा २.७८. ७ सामान; सामुग्री; साहित्य. ८ (ओतकाम) डांबर आणि विटकर यांचा एकजीव करून केलेली ओतकामाची माती. [अर. मसालिह; मस्लहत्चें अव.] मसालेदार-वि. मसाल्यानें युक्त; मसाला घालून स्वादिष्ट केलेला (खाद्य, पेय इ॰ पदार्थ).

दाते शब्दकोश

नीर

न. पाणी; जल. -ज्ञा ७.९१. -एभा १.१२४. 'नीर- क्षीरालिंगनरूपी स्नान तुला तें घालोनी ।' -सौभद्र अंक ४. [सं. का. नीरु] ॰मोर-न. फोडणीचें ताकपाणी, ताकांत बरेंच पाणी घालून त्यांत लिंबाचा रस पिळतात व सुंठ, हिंग, मीठ इ॰ मिसळतात. -गृशि १.४७६. कर्नाटकांत याला 'नीरमज्जिगे' म्हणतात. ॰क्षीरविवेक-पु. क्षीरनीर विवेक पहा.

दाते शब्दकोश

नीरमोर      

न.       फोडणीचे ताकपाणी. ताकांत बरेंच पाणी घालून त्यांत लिंबाचा रस पिळतात व सुंठ, हिंग, मीठ इ. मिसळतात. - गृशि १·४७६.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पापड

पु. उडीद वगैरेच्या डाळीच्या पिठांत हिंग इ॰ मसाला घालून तें भिजवून लाटून व उन्हांत वाळवून (विस्तवावर भाजून) तोंडी लावावयास पोळीसारखी केलेली चकती. [सं. पर्पट; प्रा. पप्पड] ॰खार-पु. (पापडांत घालावयाचा) एक क्षार; साजीक्षार; सज्जीखार. इं. कंट्रीअल्कली. ॰पीठ-न. पापड, चटणी इ॰करितां केलेलें (मुख्यतः उडदाच्या डाळीचें) पीठ; डांगर.

दाते शब्दकोश

पन्याकार

पुअव. (कों.) १ भाजी इ॰ पदार्थ रुचकर व्हावा म्हणून त्यास हिंग, जिरें, मिरीं इ॰कांनीं करावे लागणारे अनेक संस्कार. २ अशा संस्कारांनीं तयार केलेले पदार्थ. ३ पाहुण्यांची उत्कृष्ट सरबराई, जेवण्याची व्यवस्था. ४ (ल.) तिखटमीठ लावून फुगवून सांगणें (एखादा प्रसंग. गोष्ट). ५ बढाईखोरपणा; आत्म- प्रौढी. [अन्य(पन्य) + प्रकार; किंवा सं. पण्य + कृ]

दाते शब्दकोश

फोडणी

स्त्री. १ तेल किंवा तूप तापवून त्यांत हिंग, मोहरी, कारळे, मेथ्या, हळद इ॰ पदार्थ तळून त्याचा चुरका भाजी, आमटी इ॰पदार्थांस खमंगपणा, स्वाद येण्याकरतां देतात ती. २ (ल.) विडा (यांत लवंगा वगैरे फोडणीचे कांहीं पदार्थ अस- तात).' चूर्णावीण फोडणी घाली वदनीं ।' -मुक्ते. मुर्खाचीं लक्षणें २२. ३ फोडणें; विभागणें; भाग करणें; तुकडे करणें. [फोडणें] ॰देणें-(ल.) झाडून टाकणें; रागानें बोलणें. 'यानां आतां चागली फोडणी द्यावी असें मनांत आणून मी गर्जना केली.' -नाकु ३.३९ ॰दाना-पु. (काशी.) चिवडा.

दाते शब्दकोश

रामठ-ठा

पु. हिंग. 'जरी कर्पूरचूर्णें मिश्रित केला । तरी रामठा अंगीं दुर्गंधी ।' -जै ४०.१३.

दाते शब्दकोश

रोडगा

पु रोटगा; रोट. आठ भाग गव्हाचें पीठ व एक भाग हरभऱ्याचें पीठ घेऊन त्यांत ओंवा, हिंग, मीठ, तूप घालून त्याची जाड पोळी निखाऱ्यावर भाजली म्हणजे हा रोडगा होतो -योर १ ७५.

दाते शब्दकोश

सार

न. चिंच, अमसूल इ॰ अंबट पदार्थ पाण्यांत कोळून त्याला हिंग, मसाला इ॰ लावून करतात तें कालवण; एक प्रका- रचें अंबट वरण. 'वडे नसती वावडे, सार आवडे ।' -अमृ ३५. [द्रा. साऊ; सं. सार]

दाते शब्दकोश

तेलमीठ

तेलमीठ tēlamīṭha n Oil and salt. Used in obl. cases, तेलामिठाखालीं-वारीं &c., exactly as हिंगतूप or हिंग- धूप q.v.

मोल्सवर्थ शब्दकोश

उपसामग्री, उपसाहित्य      

स्त्री. न.       किरकोळ उपकरणे; सामान; साहित्य; सामग्री; द्रव्य वगैरे : ‘करावया बैसला हवन । तेथे उपसामग्री आणून । जगन्माता देत असे॥’; स्वयंपाकातील उपसाहित्य म्हणजे मीठ, मिरची, हिंग इत्यादी साहित्य. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उपसामग्री-साहित्य

स्त्रीन. किरकोळ उपकरणें; सामान; साहित्य; सामग्री; द्रव्यें वगैरे. 'करावया बैसला हवन । तेथें उप- सामग्री आणून । जगन्माता देत असे ।।' स्वयंपाकांतील उपसाहित्य म्हणजे तांदूळ, कणीक सोडून मीठ, मिरची, हिंग इ॰ साहित्य. [सं.]

दाते शब्दकोश

वास

पु. १ गंध; परिमळ; पुष्पादिकाचा बरावाईट गंध; दर्प. २ (ल.) झांक; छटा; स्वाद; अंश; सुगावा; खूण; अस्तित्वाचा दर्शक अंश वगैरे. 'तिला क्रोधाचा वास काय आला.' -नारुकु ३.८४. ३ अवशिष्ट अंश; अल्पांश; लेश; किंचितहि भाग. 'विहिरींत पाण्याचा वास नाहीं.' ४ हिंग. (रात्रीचे वेळीं सांकेतिक नांव). [सं. वास् = गंध सुटणें] वास काढणें-घेणें-पाहणें-शोधणें-लावणें-माग काढणें; सुगावा, पत्ता लावणें. वास निघणें-लागणें-पत्ता लागणें; सांपडणें. वास मारणें-दुर्गंध येणें; घाण येणें. वास सुटणें-चांगला वास येणें; सुगंध येणें; दरवळणें; घमघमाट सुटणें. वासाचा-वि. झांक, छटा, रूप. गुण वगैरे असलेला. वासाचें पोतें-न. १ (पदार्थाचा अभाव असून केवळ वास राहिला आहे अशी वस्तु यावरून ल.) श्रीमंती जाऊन गरीब झालेला मनुष्य; गरीब मनुष्य. २ (वास असलेली वस्तु यावरून ल.) श्रीमंत, गबर मनुष्य. वासकट, वासट-वि. १ दुर्गंधयुक्त; घाणेरा; वाईट वास येणारा. २ वाशेरा-ळा पहा. वासन-न. सुवासिक करण्याची क्रिया; गंधयुक्त करण्याची क्रिया; सुगंधित करणें. [सं. वास्] वास- वारा-पु. अत्यंत अल्प अंश; केवळ वास. (निषेधात्मक उपयोग) [वास + वारा] वासळणें-अक्रि. (फळें वगैरे पक्वदशेस आल्यामुळें) गंध पसरणें; दरवळूं लागणें; (पर्याय) वासाडणें. [वास] वासाळ-वि. वाशेरा-ळा पहा. वासित-वि. सुगंधित; सुगंधयुक्त; वास लावलेलें. [वास]

दाते शब्दकोश

वेसवार

पु. १ दोन तीन प्रकारच्या डाळी, धने, हळद, मिरच्या इ॰ पदार्थ तळून किंवा भाजून भाजी इत्यादिकावर घालण्यासाठीं त्याचें जें कूट करतात तो मसाला. २ मेतकूट. ३ (कों.) कच्चा मसाला. 'मांस व वेसवार यांचीं पोटीसें वाता- र्बुदावर बांधावीं.' ऱ्योर २.२६१. [सं. वेशवार] वेस- वाराचें लोणचें-न. मोहऱ्या, मेथ्या, हिंग, हळद इ॰ चें चूर्ण आंत घालून करतात तें लोणचें.

दाते शब्दकोश

सुकणा

पु. (कु.) एक जातीचा पक्षी. सुकणें-अक्रि. १ वाळणें; शुष्क होणें; ओलावा नाहींसा होणें. २ नदी, खाडी इ॰ मधील पाणी कमी होणें, पात्र कोरडें पडणें. ३ आजारी- पणामुळें शरीर क्षीण होणें; वाळणें. [सं. शुष् = वाळणें] म्ह॰ (गो.) सुकलेलें पान न्हयं झालेले सांग = निरुपयोगी माणसास भलतेंच काम सांगणें. सुकणावळ-स्त्री. सुकल्यामुळें झालेली द्रवपदार्थाची खराजी. सुकतळ-न. जोड्यांत पावलाचा घाम शोषून घेण्यासाठीं घातलेला चामड्याचा तुकडा; घामोळें; खोगि- राच्या खालचें घामोळें; अंगरखा इ॰ कामध्यें कांखेंत असल्या प्रका- रचें घातलेलें जोड कापड. [सुकणें + तळ] सुकताव-पु. भट्टींत सोनें तापवून हवेनें आपोआप थंड होऊं देण्याची क्रिया. याच्या उलट पाणताव (पाणी ओतून थंड करणें). [सुका + ताव] सुकती-स्त्री. नदी, समुद्र इ॰ची ओहोटी; पात्र कोरडें होणें. सुकती भरती- स्त्री. समुद्र इ॰ चें पाणी उतरणें व चढणें. सुकवडापु. उड- दाचे पिठांत मिरें, सुठें, हिंग इ॰ घालून तळलेला वडा. सुकवण- न. १ धान्य इ॰ सुकविणें; वाळवण. २ वाळविण्याची मजुरी. -स्त्री. जीर्ण स्थिति; अशक्तता. सुक(ख)वत-स्त्रीन. वाळलेलें केलीचें पान. सुकवणी-स्त्री. १ क्षयरोग; क्षीणता. २ (व.) एक प्रकरची गवती चटई. सुकविणें-सक्रि. १ वाळविणें. २ (ल.) निस्तेज करणें. -मोस्त्री ४.३९. सुकवें-न.(को.) करपलेलें पीक; वाळलेलें शेत. सुका-वि. १ सुकलेलें; वाळलेलें. २ (ल.) लाभ- रहित, उत्पन्नरहित; पोकळ; निरर्थक; अर्थहीन; कसहीन. ३ कोरडा, जेवणाशिवाय (पगार). [सं. शुष्क; तुल॰ फ्रेंजि. शुको] सुका- कूल-न. एक जातीचें फळ. मिस्त्री. सुकाट-न. (कु.) वाळवि- लेला कोलबी जातीचा एक मासा; सुंगाट. सुकाट(ठ)णक-वि. कोरंडा ठणठणीत (जमीन). सुकाड-पु. १ सुकंडा पहा. २ शेतांतील पांखरांसाठीं उभें केलेलें बुजगावणें. सुकाताव-पु. १ भुकेमुळें होणारा पोटाचा भडका; भुकेमुळें होणारी व्याकुळता. २ शुष्क पाहुणचार; निरर्थक फेरफटका; साफ नाकबुली; खरडपट्टी; धसमुसळेपणा. (क्रि॰ देणें; बसणें). ३ सुकताव पहा. सुका दुक(ष्का)ळ-पु. पावसाच्या अभावामुळें पडलेला दुष्काळ. सुका लफडा-डें-पुन. निरर्थंक व्याद, त्रास, अडचण, भांडण इ॰. सुकाळें-न. (गो.) सुकें तळें. सुकी(कें) केळ, सुकेळ- न. सोलून तूप लावून वाळविलेलें केळें. सुकी(क्)खरूज-स्त्री. कोरडी, पू नसलेली खरूज. सुकेड-स्त्री. (राजा.) वाळलेली बाजू, जागा. [सुका + कड] सुको जामोर-(गो.) फायद्या- शिवाय काम करणें. सुक्खा-वि. (राजा.) सुका पहा. सुक्यो पोळ्यो-(गो.) हवेतेल बंगले मनचे मांडे.

दाते शब्दकोश

पंच

वि. पांच; ५ संख्या. [सं.] ॰उपप्राण-पुअव. पांच वायु:-नाग = शिंक येणारा वायु, कूर्म = जांभई येणारा, कृकल = ढेंकर येणारा, देवदत्त = उचकी येणारा व धनंजय = सर्व शरीरांत राहून तें पुष्ट करणारा व मनुष्य मेल्यावर त्यांचे प्रेत फुगविणारा वायु. 'नाग कूर्म कृकल देवदत्त । पांचवा धनंजय जाण तेथ ।' -एभा १३.३२०. ॰कन्या-स्त्रीअ. पांच सुविख्यात पतिव्रता स्त्रिया; अहल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी. ॰कर्में-नअव. शरीराचीं मुख्य पांच कामें-ओकणें, रक्तस्त्राव होणें, मलोत्सर्ग, मूत्रोत्सर्ग, नाक शिंकरणें इ॰. किंवा गतीचे पुढील पांच प्रकार:-उत्क्षेपण (वर करणें), अपक्षेपण (खालीं करणें), आकुंचन (आखडणें), प्रसारण (पसरणें) व गमन (जाणें). ॰कर्मेंद्रियें-हात, पाय, वाणी, शिश्न व गुद. कर्मेंद्रिय पहा. ॰कल्याण-णी-वि. १ गुडघ्यापर्यंत पांढरे पाय व तोंडावर पांढरा पट्टा असलेला (घोडा) हा शुभ असतो. -अश्वप १.९०. 'पंच कल्याणी घोडा अबलख ।' ३ (उप.) सर्व अवयव विकृत असलेला (माणूस). ३ (उप.) भाड्याचें तट्टू, घोडा (याला दोन्ही टाचांनीं, दोन्हीं मुठींनीं व दांडक्यानें मारून किंवा तोंडानें चक् चक् करून चालवावें लागतें म्हणून). ४ (उप.) ज्याच्या नाकाला निरंतर शेंबूड असून तो वारंवार मणगटांनीं काढून टिरीस पुसत असणारा असा (पोर). ॰काजय-स्त्री. (गो.) पंचखाद्य पहा. ॰कृष्ण-पुअव. (१) महानुभाव संप्रदायांतील ५ कृष्ण-कृष्णचक्रवर्ती, मातापूर येथील दत्त, ऋद्धिपूरचा गुंडम राउळ, द्वारावतीचा व प्रतिष्ठानचा चांग- देव राउळ. -चक्रधर सि. सूत्रें पृष्ठ २१. (२) हंस, दत्त, कृष्ण, प्रशांत व चक्रधर. -ज्ञाको (म) ७७. ॰केणें-न. मसाल्यांतील मिरी, मोहरी, जिरें, हिंग, दगडफूल इ॰ पदार्थ. ॰केण्याचें दुकान-न. छोटेसें किराण्याचें दुकान. ॰केदार-पुअव. केदार, ममद, तुंग, रुद्र, गोपेश्वर. ॰कोटी-स्त्री. उत्तर हिंदुस्थानांतील शंकराचें तीर्थक्षेत्र. ॰कोण-पु. पांच कोनांची एक आकृति. -वि. पांच कोनांची. ॰कोश-ष-पुअव. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय अशीं देहाचीं पांच आवरणें. या कोशांचा त्रिदेहाशीं पुढीलप्रमाणें समन्वय करतात-अन्नमयाचा स्थूलदेहाशीं, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, यांचा सूक्ष्म किंवा लिंगदेहाशीं व आनंदमयाचा कारणदेहाशीं. ॰क्रोशी-स्त्री. १ चार, पांच कोसांच्या आंतील गांवें; एखाद्या क्षेत्राच्या भोंवतालची पांचकोस जमीन. 'पुरलें देशासी भरलें शीगेसी । अवघी पंचक्रोशी दुम- दुमीत ।' -तुगा २६१०. ३ (ल.) या गांवांतील जोशाची वृत्ति. ४ पंचक्रोशी यात्रा पहा. ॰क्रोशी यात्रा-स्त्री. क्षेत्राची विशे- षतः काशी क्षेत्राच्या भोंवतालच्या पांच कोसांतील देवस्थानांना प्रदक्षिणा, तार्थाची यात्रा. ॰खंडें-नअव. आशिया, यूरोप, अमे- रिका, अफ्रिका, ओशियानिया. ॰खाज-जें-खाद्य-नपुन. १ ख या अक्षरानें प्रारंभ होणारे खाण्यायोग्य असे पांच पदार्थ (खारीक, खोबरें, खसखस (किंवा खवा) खिसमिस व खडी साखर). -एभा १.०.४९२. 'पूर्ण मोदक पंचखाजा । तूं वऱ्हाडी आधीं ।' -वेसीस्व ३. २ (गो.) नारळाचा खव, गूळ. चण्याची डाळ इ॰ पांच जिन्नसांचा देवाला दाखवावयाचा नैवेद्य. ३ (कों.) तांदूळ किंवा गहू, काजळ, कुंकू, उडदाची डाळ व खोबरें यांचा भूतपिशाचांना द्यावयाचा बळी; या पांच वाणजिनसा. ॰गंगा- -स्त्री १ महाबळेश्वरांतील एक तीर्थ. येथें कृष्णा, वेणा, कोयना, गायत्री (सरस्वती) व सावित्री यांचा उगम आहे. २ काशी क्षेत्रां- तील एक तीर्थ. 'गंगा भारति सूर्यसूनु किरणा बा धूतपापा तसे । पांची एकवटोनि तीर्थ निपजे ते पंच-गंगा असें ।' -नरहरी, गंगा- रत्नमाला १५७ (नवनीत पृ. ४३३). ३ पंचधारा पहा. (क्रि॰ वाहणें). ॰गति-स्त्री. घोड्याच्या पांच चाली-भरपल्ला किंवा चैवड चाल; तुरकी किंवा गाम चाल, दुडकी, बाजी, आणि चौक चाल. यांचीं संस्कृत नावें अनुक्रमें:-आस्कंदित, धौरितक, रेचित, वल्गित, प्लुत. ॰गव्य-न. गाईपासून निघालेले, काढलेले पांच पदार्थ दूध, दहीं, तूप, गोमूत्र, शेण यांचें मिश्रण (याचा धार्मिक शुद्धिकार्याकडे उपयोग करतात). ॰गोदानें-नअव. पापधेनु, उत्क्रांतिधेनु, वैतरणी, ऋणधेनु, कामधेनु. हीं पंचगोदानें और्ध्वदेहिक कर्मांत करतात. ॰गौड-पु. ब्राह्मणांतील पांच पोट जाती-(अ) गौड, कनोज (कान्यकुब्ज), मैथिल, मिश्र व गुर्जर; किंवा सारस्वत, कान्य- कुब्ज, गौड, उत्कल आणि मैथिल. ॰ग्रंथ-पुअव. यजुर्वेदाचे पांच ग्रंथ-संहिता, ब्राह्मण,आरण्यक, पदें आणि क्रम. ॰ग्रही- स्त्री. एका राशींत पांच ग्रहांची युति. [पंच + ग्रह] ॰तत्त्वें-नअव. पंचमहाभूतें पहा. ॰तन्मात्रा-स्त्रीअव. पंचमहाभूतांचीं मूलतत्त्वें, गंध रस, रूप, स्पर्श, शब्द हे गुण. 'प्रकृति पुरुष महत्तत्त्व । पंच, तन्मात्रा सूक्ष्मभाव ।' -एभा १९.१६८ ॰तीर्थ-नअव. हरिद्वार किंवा त्र्यंबकेश्वर येथील गंगाद्वार, कुशावर्त, बिल्वक, नीलपर्वत आणि कनखल हीं पांच तीर्थें. ॰दंती-वि. पांच दांत असलेला (घोडा), सप्तदंती व अशुभलक्षण पहा. ॰दाळी-स्त्रीअव. तूर, हर- भरा, मूग, उडीद व वाटाणा या पांच धान्यांच्या डाळी. ॰देवी- स्त्रीअव. दुर्गा, पार्वती, सावित्री, सरस्वती व राधिका. ॰द्रविड- पुअव. ब्राह्मणांतील पांच पोटजाती-तैलंग, द्राविड, महाराष्ट्रीय, कर- नाटकी व गुर्जर. ॰द्वयी-स्त्री. १ दक्षिणा द्यावयाच्या रकमेचे (ती कमी करणें झाल्यास) पांच भाग करून त्यांतील दोन किंवा तीन ठेवून बाकीचे वाटणें. २ अशा रीतीनें शेत, काम, रक्कम, वस्तु इ॰ची वांटणी करणें. ॰धान्यें-नअव. हवन करण्यास योग्य अशीं पांच धान्यें-गहूं, जव, तांदूळ, तीळ व मूग. महादेवाला याची लाखोली वाहतात. ॰धान्याचा काढा-पु. हा धने, वाळा, सुंठ, नागर- मोथा व दालचिनी यांचा करतात. ॰धार-स्त्री. १ जेवतांना तूप पडलें न पडलें इतकें कमी वाढणें; तुपाच्या भांड्यांत पांच बोटें बुडवून अन्नावर शिंपडणें. २ झाडास पाणी घालण्याची पांच धारांची झारी. 'जगजीवनाचिया आवडी । पंचधार करी वरी पडी ।' -ऋ ७३. ॰धारा-स्त्री. (विनोदानें) तिखट पदार्थ खाल्ला असता किंवा नाकांत गेला असतां दोन डोळे, दोन नाक- पुड्या व तोंड यांतून वाहणाऱ्या पाण्याच्या पांच धारा. ॰धारें -न. देवावर अभिषेक करावयाचें पांच भोंकांचें पात्र. [पांच + धारा] ॰नख-नखी-वि. १ पांच नखें असलेला (मनुष्य, माकड, वाघ). २ ज्यांचें मांस खाण्यास योग्य मानिलें आहे असे पांच नखें असणारे सायाळ, घोरपड, गेंडा, कांसव, ससा इ॰ प्राणी. 'पंचपंच नखा भक्ष्याः ।' -भट्टिकाव्य ६.१३१. ३ छातीवर, खुरावर पांच उभ्या रेषा असणारा (घोडा). हें अशुभलक्षण होय. -अश्वप १.९५. ४ ज्याच्या चार पायांपैकीं कोणत्याहि एका पायाला फाटा फुटल्या- सारखी आकृति असते असा (घोडा). -अश्वप १.९८. ॰नवटे- पुअव. (राजा. कु.) संसारादिकांचा अनेकांनी मिळून अनेक प्रका- रचा केलेला नाश; (एखाद्या संस्थेंत, मंडळांत झालेली) फाटा- फूट; बिघाड. (क्रि॰ करणें). २ गोंधळ; घालमेल; अडचण. [पंच + नव] ॰पक्वान्नें-नअव. १ लाडू, पुरणपोळी इ॰ पांच उंची मिष्टान्नें. २ भारी, उंची खाद्यपदार्थ, जेवण. ॰पंचउषःकाल- पु. सूर्योदयापूर्वीं पांच घटिकांचा काळ; अगदीं पहाट. 'पंच पंच- उषःकालीं रविचक्र निघोआलें ।' -होला १७ ॰पदी-स्त्री. देवापुढें नित्य नियमाने पांच पदें, अभंग भक्तगण म्हणतात ती. 'पंचपदी राम कलिसंकीर्तन ।' -सप्र २१.३६. ॰पर्व-वि. कोणत्याहि एका पायास फरगड्याची आकृति असणारा (घोडा). -अश्वप १.१०२. १०२. ॰पल्लव-पुअव. आंबा, पिंपळ, पिंपरी, वड व उंबर या किंवा इतर पांच वृक्षाचे डहाळे (किंवा पानें). स्मार्त याज्ञिकांत हे कलशामध्यें घालतात. 'पंचपल्लव घालोनि आंत । आणि अशोकें केलें वेष्टित । नरनारी मिळाल्या समस्त । लग्नसोहळिया कारणें ।' -जै ५६.१४. ॰पाखंड-न. जैन, बौद्ध, चार्वक इ॰ पांच मुख्य प्रकारचीं अवैदिक मतें, संप्रदाय. ॰पाखंडी-वि. वरील पाखंड मतांपैकीं कोणत्याहि मताचा अनुयायी. ॰पात्र-पात्री-नस्त्री. पाणी पिण्याचें किंवा इतर उपयोगाचें नळ्याच्या आकाराचें मोठें भांडें. ॰पाळें-न. लांकडाचें, किंवा धातूचें पांच वाट्या अथवा खण असलेलें पात्र. हळद, कुंकु, इ॰ पूजासाहित्य ठेवण्याच्या उपयोगी; किंवा फोडणीचें सामान ठेवण्याच्या उपयोगी पात्र. (गो.) पंचफळें. ॰पुरुषार्थ-पु. धर्म, अर्थ, काम, मोक्ष (सलोकता, समीपता, सरूपता सायुज्यता) व परमप्रेमरूपा-परानुरक्ति- पराभक्ति हें पांच पुरुषार्थ. 'जैसा ज्यासी भावार्थ । तैसा पुरवी मनोरथ । पढिये पंचपुरुषार्थ । तो हरि नांदत वैकुंठी ।' एभा २४.२७०. ॰प्रमाणें-नअव. शब्दप्रमाण, आप्तवाक्यप्रमाण, अनुमानप्रमाण. उपमानप्रमाण व प्रत्यक्षप्रमाण. ॰प्रयाग-पुअव. नंदप्रयाग, स्कंदप्रयाग, रुद्रप्रयाग, देवेंद्रप्रयाग व कणप्रयाग हे पांच प्रयाग. ॰प्रलय-पु. निद्राप्रलय, मरणप्रलय, ब्रह्म्याचा निद्राप्रलय, ब्रह्म्याचा मरणप्रलय, व विवेकप्रलय. ॰प्रवर-पुअव. ब्राह्मणांत कांहीं पंचप्रवरी ब्राह्मण आहेत त्याचे पांच प्रवर असे-भार्गव, च्यावन, आप्नवान, और्व व जामदग्न्य. प्रवर पहा. ॰प्राण- पु. १ प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. हे पांच प्राण प्राण्याच्या आयुष्यास कारणीभूत आहेत. यांचीं स्थानें आणि कार्यें भिन्न भिन्न आहेत. (क्रि.॰ ओढणें; आकर्षणें; सोडणें; टाकणें लागणें). 'देह त्यागुन पंचप्राणीं । गमन केलें तात्कळीं ।' -मुआदि २८.२४. २ (ल.) अतिशय आवडती, प्रियकर वस्तु. 'तो पंचप्राण धन्याचा ।' -संग्रामगीतें ११९. (एखाद्यावर) पंच- प्राण ओवाळणें-पंचप्राणांची आरती करणें-दुसऱ्या- करितां सर्वस्व, प्राणहि देणें; सर्व भावें करून आरती ओवाळणें; खरी, उत्कटभक्ति किंवा प्रेम दाखविणें. 'पंच प्राणांची आरती । मुक्तीबाई ओवाळती ।' ॰प्राणाहु(व)ती-स्त्री. पांच प्राणांना द्याव- याच्या लहान लहान आहुती किंवा घास या त्रेवर्णिकांनीं भोज- नाच्या आरंभीं द्यावयाच्या असतात. पांच आहुती घेणें म्हणजे घासभर, थोडेंसें खाणें. (क्रि॰ घेणें). [पंच + प्राण + आहुती] ॰बदरी- स्त्रीअव. योग, राज. आदि, वृद्ध, ध्यान. या सर्व बदरी बदरी नारा- यणाच्याच रस्त्यावर आहेत. ॰बाण-पु. (काव्य) मदन; कामदेव. मदनाच्या पाच बाणांसाठीं बाण शब्द पहा. ॰बेऊळी-स्त्री. पांच नांग्यांची इंगळी. -मनको. ॰बेळी-स्त्री. बोंबिल, कुटें इ॰ विक्री- करितां एकत्र मिसळलेले लहान मासे. ॰भद्र-वि. सर्व शरीर पिवळें असून पाय आणि तोंड मात्र श्वेतवर्ण असणारा (घोडा). अश्वप १. २१. ॰भूतातीत-वि. १ पंचभूतांपासून अलिप्त, सुटलेला (मुक्त मनुष्य, लिंगदेह). २ निरवयव; निराकार (ईश्वर). ॰भू(भौ)तिक-वि. पांच तत्त्वांनीं युक्त; जड; मूर्त; सगुण. ॰भूतें-नअव. पंचमहाभूतें पहा. भे(मे)ळ-पुस्त्री. पंचमिसळ पहा. अनेक पदार्थांचें मिश्रण -वि. पांच प्रकार एकत्र केलेलें. 'मोहोरा पंचमेळ बरहुकूम पत्र पुरंदर.' -वाडसमा ३.८३. ॰मघा-स्त्रीअव. १ मघा नक्षत्रांत सूर्य आल्या- नंतरचे पांच दिवस. २ मघापासून पुढचीं पांच सूर्यसंक्रमणाचीं नक्षत्रें. ॰महाकाव्यें-नअव. रघुवंश, कुमारसंभव, माघ, किरात, नैषध हीं पांच मोठीं संस्कृत काव्यें. ॰महातत्त्वांचीं देवस्थानें- १ पृथ्वी = कांचीवरम् (कांची स्टेशन). आप-जंबुकेश्वर (श्रीरंगम् स्टेशनपासून १२ मैल). तेज = अरुणाचल (एम्. एस्. एम्. रेलवेच्या मलय स्टेशन नजीक). वायु = कालहस्ती (वरील रेलवेच्या रेणीगुंठा स्टेशनपासून गुडुर रस्त्यावर). आकाश-चिदांबरम् (चेंगलपट रस्त्यावर). ॰महापातकें-नअव. ब्रह्महत्या, मद्यपान, सुवर्णचौर्य, मात्रागमन किंवा गुरुस्त्रीसंभोग व वरील चार महापात- क्यांची संगत. ॰महापातकी-वि. वरील महापातकें करणारा. ॰महाभूतें-नअव. पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश हीं पांच. गंध, रस, रूप, स्पर्श व शब्द हीं यांचीं अनुक्रमें सूक्ष्मरूपें होत. यांना पंचसूक्ष्मभूतें असें म्हणतात. पंचमहाभूतांचीं हीं मूलकारणें आहेत. ह्यावरून जगदुत्पत्तिविषयक ग्रंथांतून पंचभूत व पंचतन्मात्रा अशा संज्ञा ज्या येतात त्यांचा अर्थ पंचमहा(सूक्ष्म)भूतें असाच होय तन्मात्र पहा. ॰महायज्ञ, पंचयज्ञ-पुअव. ब्रह्मयज्ञ (वेदाध्ययन), पितृयज्ञ (तर्पण), देवज्ञ (होम, वैश्वदेव), भूतयज्ञ (बलि), मनुष्ययज्ञ (अतिथिसंतर्पण). भोजनाच्यापूर्वी ब्राह्मणानें नित्य करावयाचे हे पांच यज्ञ आहि्नकांपैकीं होत. ॰महासरोवरें- नअव. बिंदुसरोवर (सिद्धपूर-मातृगया), नारायणसरोवर (कच्छ- प्रांतीं मांडवी), मानस सरोवर (हिमालयामध्यें उत्तरेस), पुष्कर (अजमीर), पंपासरोवर (एम्. एम्. एस् रेलवेच्या होसपेट स्टेशननजीक). ॰महासागर-पुअव. उत्तर, दक्षिण, हिंदी, पॅसिफिक व अटलांटिक महासागर. ॰माता-स्त्रीव. स्वमाता, सासू, थोरली भावजय, गुरुपत्नी व राजपत्नी. ॰मिसळ-मेळ- पुस्त्री. १ पांच डाळींचें केलेलें कालवण, आमटी. २ पांचसहा प्रकारच्या डाळी किंवा धान्यें यांचें मिश्रण. ३ (ल.) एका जातीच्या पोटभेदांतील झालेल्या मिश्रविवाहाची संतति, कुटुंब, जात; कोण- त्याहि वेगवेगळ्या जातीच्या संकरापासून झालेली जात; संकर- जात. ४ भिन्न भिन्न पांच जातींतील लोकांचा समाज. ५ (ल.) निरनिराळ्या जातींचा एकत्र जुळलेला समाज. -वि. मिश्र; भेस- ळीचें. 'हे तांदूळ पंचमिसळ आहेत.' ॰मुख-पु. १ शंकर. 'चतुर्मुख पंचमुख । वेगें षण्मुख पातला ।' -एभा ६.२५. २ सिंह ॰मुखी-वि. १ उरावर भोंवरा असून त्यांत पांच डोळे असणारा (घोडा). -मसाप २.५५. २ पांच तोंडांचा (मारुती, महादेव, रुद्राक्ष). ॰मुद्रा-स्त्रीअव. (योग) भूचरी, खेचरी, चांचरी, अगोचरी आणि अलक्ष अशा पांच मुद्रा आहेत. 'योगी स्थिर करूनियां तेथें मन । शनै शनै साधिती पवन । पंचमुद्रांचें अतर्क्य विंदान । तें अभ्यासयोगें साधिती ।' -स्वादि ९.३.६२. ॰रंगी-वि. १ पांच रंगांचें (रेशीम, नाडा इ॰). २ धोतरा, अफू, इ॰ पांच कैफी पदार्थ घालून तयार केलेला (घोटा). ॰रत्नीगीता-स्त्री. भगवद्गीता, विष्णुसहस्त्रनाम, भीष्मस्तवराज, अनुस्मृति व गजेंद्र- मोक्ष हे पांच अध्यात्म ग्रंथ. ॰रत्नें-नअव. सोनें, हिरा, नीळ, पाच व मोतीं किंवा सोनें, रुपें, पोवळें, मोतीं, राजावर्त (हिऱ्याची निकृष्ट जात). ॰रसी-वि. १ पांच (किंवा जास्त) धातूंच्या रसापासून तयार केलेली (वस्तु). २ तोफांचा एक प्रकार. 'पंचरशी आणि बिडी लोखंडी ।' -ऐपो २२५. ॰राशिक- राशि-पुस्त्री. (गणित) बहुराशिक; दोन त्रैराशिकें एकत्र करून तीं थोडक्यांत सोडविण्याचा प्रकार; संयुक्त प्रमाणांतील चार पदांपैकीं संयुक्त गुणोत्तरांतील दोन पदें आणि साध्या गुणोत्तरांतील एक पद हीं दिलीं असतां साध्या गुणोत्तरांतील दुसरें पद काढण्याची रीत. ॰रुखी-रुढ-वि. साधारण; सामान्य; रायवळ; अनेक प्रकारचें; जंगली (लांकूड-सागवान, खैर, शिसवी इ॰ इमारतीस लागणाऱ्या पांच प्रकारच्या लांकडाशिवाय). ॰लवणें-नअव. मीठ, बांगडखार, सैंधव, बिडलोण व संचळ. ॰लवी-वि. (गो.) पंचरसी पहा. ॰लोह-न. तांबें, पितळ, जस्त, शिसें व लोखंड यांचें मिश्रण. ॰वकार-पुअव. व नें आरंभ होणारे व प्रत्येकास लागणारे पांच शब्द शब्द म्हणजे विद्या, वपु, वाचा, वस्त्र आणि विभव. 'विद्यया वपुषा वाचा वस्त्रेण विभवेन वा । वकारैः पंच- भिर्हीनो नरो नाप्नोति गौरवम् ।' ॰वक्त्र-वदन-पु. महादेव. 'भक्तोत्सल पंचवदन । सुंदर अति अधररदन ।' -देप २००. याच्या पांच तोंडांचीं नावें:-सद्योजात, तत्पुरुष, अघोर, वामदेव आणि ईशान. ॰वर्ज्यनामें-नअव. आत्मनाम, गुरुनाम, कृपणनाम, ज्येष्ठापत्यनाम व पत्निनाम. या पांच नामांचा उच्चार करूं नयें. ॰विध-वि. पांच प्रकारचें. ॰विशी-स्त्री. १ पंचवीस वर्षांचें वय. २ पंचवीस वस्तूंचा समूह. पहिल्या पंचवीशींतलें पोरगें-तरणाबांड. ॰विषय-पुअव. (कर्ण, त्वचा, चक्षु, रसना, घ्राण या) पांच ज्ञानेंद्रियांचे अनुक्रमें पांच विषय:-शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध. पंचवीस-२५ संख्या; वीस आणि पांच. ॰विसावा-वि. सांख्य मताप्रमाणें मूल-प्रकृत्यादि जीं चोवीस तत्त्वें आहेत त्यांपलीकडील पंचविसावा (आत्मा). 'तूं परम दैवत तिहीं देंवा । तूं पुरुष जी पंचवीसावा । दिव्य तूं प्रकृति- भावा- । पैलीकडील ।' -ज्ञा १०.१५०. ॰शर-पु. पंचबाण पहा. ॰सार-न. तूप, मध, तापविलेलें दूध, पिंपळी व खडीसाखर हे पदार्थ एकत्र घुसळून तयार केलेलें सार. हें विषमज्वर, हृद्रोग, श्वास, कास व क्षय यांचा नाश करतें. -योर १.३५३. ॰सूत्र-सूत्री-वि. १ पांच दोऱ्यांचें, धान्यांचें, रेषांचें. २ सारख्या लांबीच्या पांच सुतांमध्यें केलेलें, बसविलेलें (शाळुंकेसह बनविलेलें शिवलिंग). 'पंचसूत्री दिव्य लिंग करी । मणिमय शिवसह गौरी ।' ॰सूना-स्त्रीअव. कांडण, दळण, चूल पेटविणें, पाणी भरणें, सारवणें यापासून जीवहिंसादि घडणारे दोष. 'पंचसूना किल्बिषें म्हणूनि । एथें वाखाणिती ।' -यथादी ३.२३. ॰सूक्तें-नअव. ऋग्वेद संहितेंतील पुरुषसूक्त,देवासूक्त, सूर्यसूक्त (सौर), पर्जन्यसूक्त व श्रीसूक्त हीं पांच सूक्तें. ॰सूक्ष्मभूतें-नअव. पंचमहाभूतें पहा. ॰स्कंध-पुअव. सौगतांच्या अथवा बौद्धांच्या दर्शनाला अनुसरून मानवी ज्ञानाचे पांच भाग. म्हणजे रूप, वेदना, विज्ञान, संज्ञा व संस्कार. या शब्दांचे विषयप्रपंच, ज्ञानप्रपंच, आलयविज्ञान संतान, नामप्रपंच आणि वासनाप्रपंच ह्या अनुक्रमें पांच शब्दांनीं स्पष्टी- करण केलें आहे. ॰स्नानें-नअव. पांच स्नानें-प्रातः-संगव- माध्यान्ह-अपराण्ह-सायंस्नान. ॰हत्यारी-वि. १ ढाल, तरवार, तीरकमान, बंदूक, भाला किंवा पेशकबज या पांच हत्यारांनीं युक्त. २ चार पाय व तोंड यांचा शस्त्राप्रमाणें उपयोग करणारें (जनावर-सिंह, वाघ इ॰). ३ (ल.) हुशार; योग्य; समर्थ; संपन्न; सिद्ध असा (मनुष्य). ४ (व्यंग्यार्थी) शेंदाड शिपाई; तिसमारखान. ॰हत्त्या-स्त्रीअव. ब्रह्महत्त्या, भ्रूणहत्त्या, बालहत्त्या, गोहत्त्या व स्त्रीहत्त्या. पंचाग्नि-ग्नी-पुअव. १ चारी दिशांना चार पेटविलेले व डोक्यावरील तप्त असा सूर्य मिळून पांच अग्नी. 'पंचाग्नी गोरांजनें । जें प्राप्त नव्हे ।' -दा ५.६.२९. २ शरीरांतील पांच अग्नी. ३ -वि. पांच श्रौताग्नि; धारण करणारा गृहस्थाश्रमी ब्राह्मण. हे पांच अग्नी-दक्षिणाग्नि; गार्हपत्य, आहवनीय, सभ्य व आवसथ्य हे होत. -ग्नि साधन-न. चारी दिशांनां चार कुंडें पेटवून दिवसभर उन्हांत बसणें. हा तपश्चर्येचा एक प्रकार आहे. याला पंचाग्निसेवन, धूम्रपान असेंहि म्हणतात. 'चोहींकडे ज्वलन पेटवुनी दुपारीं । माथ्यावरी तपतसे जंव सूर्य भारी । बैसोनियां मुनि सुतीक्ष्ण म्हणोनि हा कीं । पंचाग्निसाधन करी अबले विलोकी ।' पंचादुयी- दिवी-दुवी-देवी-स्त्री. पंचद्वयी पहा. [अप.] पंचादेवी-स्त्री. शेताच्या उत्पन्नाचे ५ वांटे करून ज्याचे बैल असतील त्याला ३ व दुसऱ्याला (मालकाला) २ वांटे देण्याची रीत. पंचानन-पु. १ शंकर. २ (सामा.) पांच तोंडांची किंवा बाजूंची वस्तु. ३ सिंह. पंचामृत-न. १ दूध, दहीं, तूप, मध आणि साखर या पांचांचें मिश्रण. यानीं देवाच्या मूर्तीला स्नान घालतात. 'पय दधि आणि घृत । मधु शर्करा गुड संयुक्त । मूर्ति न्हाणोनि पंचामृतें । अभिषेक करिती मग तेव्हां ।' २ शेंगदाणे, मिरच्या, चिंच, गूळ, खोबऱ्याचे तुकडे इ॰ पदार्थ एकत्र शिजवून त्यास तेलाची फोडणी देऊन केलेला पदार्थ. ३ एक पक्वान्न; मिष्टान्न. [सं.] म्ह॰ १ जेवावयास पंचामृत आंचवावयास खारें पाणी. २ पंचामृत खाई त्यास देव देई. ॰मृत सोडणें-(बायकी) चातुर्मासांतील पहिल्या महिन्यांत दूध, दुसऱ्यांत दहीं, तिसऱ्यांत तूप, चौथ्यांत मध व पाचव्यांत (अधिकांत) साखर किंवा पांचवा (अधिक) नस- ल्यास चौथ्यांतच मध व साखर यांनीं युक्त असे पदार्थ न खाणें. ॰मृतानें-पंचामृतें न्हाणणें-पंचामृताच्या पदार्थानीं देवास स्नान घालणें. पंचायतन-न. १ शिव, विष्णु, सूर्य, गणपति व देवी या पांच देवता व त्यांचा समुदाय. या पांच देवतांपैकी प्रत्येक देव- तेस प्राधान्य देऊन शिव, विष्णु, गणपति इ॰ चीं पांच पंचायतनें मानण्याचीहि पद्धत आहे. (गो.) पंचिष्ट २ (ल.) एकचित्त असलेले पांच जण. ३ पंचमहाभूतांचें स्थान; शरीर. 'तें अधिदैव जाणावें । पंचायतनीचें ।' -ज्ञा ८.३६. पंचारती, पंचारत- स्त्री. १ तबकांत पांच दिवे ठेवून आरती ओवाळणें. २ आरती करितां लावलेले पांच दिवे. ३ असे दिवे ठेवण्याचें पात्र. पंचाक्षरी-वि. पंचाक्षरीमंत्र म्हणणारा व अंगांतील भूतपिशाच्च काढणारा; देव- ऋषी. 'पंचाक्षरी काढिती समंध ।' ॰क्षरीकर्म-न. पंचाक्षरीमंत्र म्हणून अंगांतील भूत काढणें. ॰क्षरीमंत्र-पु. १ भूतपिशाच्च काढ्ढन टाकण्याचा पांच अक्षरांचा मंत्र. २ ॐ नमःशिवाय हा मंत्र. पंचास्त्र-न. पंचकोण. -वि. पंचकोणी. [सं.] पंचाळ-स्त्री. (विणकाम) १ पांच पंचांकरितां लावलेला ताणा. २ एक शिवी. -वि. १ फार तोंडाळ, बडबड करणारी (स्त्री). पंचीकरण-न. १ पांच महाभूतांपैकीं प्रत्येकाचा कमीजास्त भाग घेऊन त्या सर्वांच्या मिश्रणानें नवा पदार्थ तयार होणें. -गीर १८१. २ आका- शादि पंचभूतें, त्यांचे देहादिकांच्या उत्पत्तीसाठीं ईश्वरशक्तीनें झालेलें परस्पर संमिश्रण. तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ. हा देह किंवा विश्व हें पंचमहाभूतात्मक कसें आहे याचें विवरण करणारा ग्रंथ. पंचीकृत- वि. पांच मूलतत्वें एकत्र झालेली (स्थिती). पंचेचाळ- चाळीस-ताळ-ताळीस-वि. चाळीसामध्यें पांच मिळवून झालेली संख्या; ४५. पंचेंद्रिय-नअव. पांच इंद्रियें. डोळे, कान, नाक, जिव्हा व त्वचा. यांचीं कामें अनुक्रमें-पहाणें, ऐकणें, वास घेणें, चव घेणें व स्पर्श करणें. पंचोतरा-पु. १ दरमहा दरशेकडा पांच टक्के व्याजाचा दर. २ शेंकडा पांच प्रमाणें द्यावयाचा कर. ३ सरकारसारा वसूल करतांना पांच टक्के अधिक वसूल करण्याचा हक्क. ४ सरकाराकरितां शंभर बिघे किंवा एकर जमीन लागवडी- खालीं आणली असतां पाटलाला पांच बिघे किंवा एकर सारा- माफीनें द्यावयाची जमीन. पंचोतरा, पंचोतरी-पुस्त्री. गव- ताच्या शंभर पेंढ्या किंवा आंबे विकत देतांना पांच अधिक देणें. पंचोपचार-पुअव. गंध, पुष्प, धूप, दीप व नैवेद्य या वस्तू व त्या देवाला समर्पण करणें. पंचोपप्राण-पुअव. नाग, कूर्म, कृकल, देवदत्त व धनंजय हे पांच उपप्राण. कूर्म अर्थ ३ पहा. पंचो- पाख्यानी-वि. १ (पांच प्रकरणांचे पंचोपाख्यान नांवाचा विष्णु- शर्म्याचा नीतिपर एक ग्रंथ आहे त्यावरून) अनेक कथा, संदर्भ, उदाहरण, दृष्टांत इ॰ नीं परिपूर्ण. २ कल्पित; विलक्षण; अद्भुत. ३ अभद्र; शिवराळ (स्त्रिया संबंधीं योजितात). पंच्याऐशी- पंच्याशी-वि. ८५ संख्या. पंच्याण्णव-वि. ९५ संख्या. पंच्याहत्तर-वि. ७५ संख्या.

दाते शब्दकोश

धार

स्त्री. १ जोराचा, वेगाचा (नदी इ॰काचा) प्रवाह. 'तों धारेमाजीं निश्चितीं । नाव गेली तेधवां ।'-ह ९.२६९. 'भोंवरे वळणें आणि धार ।' -दा ३.७ ५२. २ पाणी इ॰ पातळ पदार्थ वरून पडत असतांना, पाऊस पडत असतांना, फुटक्या भांड्याच्या छिद्रांतून द्रवपदार्थ बाहेर पडतांना पाणी इ॰चा दिसणारा दोरीसारखा आकार. ३ तेल. तूप इ॰ पातळ पदार्थ बाजारांत विकण्यास आल्यास त्यांतील कांहीं भाग हक्क म्हणून घेण्याचा पाटील, कुळकर्णी इ॰ गांवकामगारांचा (पूर्वींच्या काळीं असलेला) मान; तेल, दूध वगैरे विकत घेतलें असतां पूर्ण माप झाल्यानंतर वर्तावळा म्हणून घ्यावयाचा थोडासा अंश. ४ धान्य उफणतांना जें हलकें धान्य राशीच्या पली- कडे जाऊन पडतें तें. ५ तेल, तूप इ॰ द्रवपदार्थाचा किंचित् अंश. जसें-दह्याची कवडी, पाण्याचा थेंब; तेलाची, तुपाची धार. ६ (गाय, म्हैस इ॰ जनावराचें ) दूध काढणें. 'धारेची वेळ झाली.' [सं. धारा] ॰उष्ण, धारु(रो)ष्ण-वि. धार काढतांना (दुधास) असणारा उबटपणा ज्याचा निवाला नाहीं असें ताजें (दूध). असलें दूध बलवर्धक व धातुपौष्टिक असतें. 'जेंवि श्वानचर्म पात्राप्रती । गोक्षीर भरिती धारोष्ण ।' -भाराबाल ११.२८. [धारा + सं. उष्ण] ॰काढणें-पिळणें- (गाय, म्हैस इ॰ जनावराचें) दूध काढणें. ॰देणें-उंचावर उभें राहून धान्य इ॰ स्वच्छ करण्याकरितां) टोपलींतून एकसारखें धारेनें खालीं ओतणें, वारवणें. ॰धरणें-(विषार, मोडशी इ॰ उतरण्यासाठीं) मस्तकावर थंड पाण्याची धार सतत पडेल असें करणें. ॰पडणें-(ल.) पाहिजे तितकें द्रव्य, धान्य इ॰ आका- शांतून (घरांत) येऊन वर्षाव होणें, पाऊस पडणें. 'तुम्ही फार खर्च करावयास सांगतां तर माझ्या घरीं कांहीं पैशाची धार पडत नाहीं.' ॰फुटणें-(गाय, म्हैस इ॰काला) पुष्कळ दूध येऊं लगणें. ॰मारून न पाहणें-(एखाद्याला) अगदीं कस्पटाप्रमाणें लेखणें, हिंग लावूनहि न पुसणें, ढुंकूनहि न पाहणें. ॰लागणें-फार वाहूं, गळूं लागणें; गळती, बुळकी लागणें. जसें:-पावसास धान्यास, गुळास, डोळ्यास, नाकातोंडास, गांडीस धार लागली. ॰चारही धारा तोंडांत पडणें-अनेक मार्गांनीं लाभ होणें; विलासाच्या, उपभोगाच्या सर्व गोष्टी मिळणें. म्ह॰ चारही धारा कोणाच्या तोंडांत पडत नाहींत = सर्व सुखें, चांगल्या गोष्टी एकाच्याच वांट्यास कधीं येत नाहींत. धारभर-क्रिवि. थोडेसें, अगदींथोडें (दूध, तूप तेल इ॰ द्रव पदार्थ). कवडी पहा. (सामाशब्द) ॰चिं(ब)पोल- न. (कों.) धान्य वार्‍यावर उफणतांना धान्याच्या राशीच्या पलीकडे पडणारा कोंडा, भूस, फोल, हलकें धान्य. [धार + कों. चिंब + पोल] ॰वणी- न. १ दूध तपवितांना त्यांत जें थोडेसें पाणी घालतात तें. 'जैसें दुग्धामाजी धारवणी । उदक थोडें घालिती ।' -भवि ३.३३६. २ (पाट, प्रवाह इ॰काचें) धारेनें पडणारें, वाहणारें स्वच्छ पाणी. 'डोणींतील पाणी आणूं नकोस; चांगलें धारवणी आण.' [धार + पाणी] ॰वसा-पु. पाण्याचा, नदीचा जोराचा प्रवाह. 'ते नेणपणाच्या वळसां । बुडोनि गेले गा सहसा । येक कर्ममार्गाचे धारवसां । पडिले जन्ममृत्यूच्या ।' -रंयोवा १.४६९. ॰शींव-स्त्री. नदीच्या प्रवाहानें ठरलेली (गावं, शेत इ॰काची) मर्यादा, सीमा. हींत बदलहि होत असतो. 'सायखेड व चांदोडी यांची धारशींव आहें.' [धार + शींव = सीमा]

दाते शब्दकोश

गोड

न. १ षड्रसांतील मधुर रस. २ (व. खा.) मीठ. 'वरण अलोणी झालें गोडाशिवाय बरें लागत नाहीं.' [तुल॰ सं. मिष्ट-मीठ] ३ (वैद्यक) पथ्याला अनुसरून मधुर किंवा साखरेनें युक्त असा पदार्थ 'त्या औषधास गोड वर्ज्य.' -पु. (गो. कों.) गुळ. -वि. १ मधुर (आंबट, तिखट, खारट नव्हे असें); स्वादिष्ट. २ सुवासिक. ३ मंजुळ; सुंदर; साजिरें. ४ मृदु. ५ सौम्य. ६ सुखकारक; संतोषदायक. 'मनास गोड वाटत नाहीं.' ७ नीटनेटकें; नियमित; योग्य; चांगलें; शुद्ध (भ्रष्ट नसलेलें). जसें:-गोड-प्रयोग-उदाहरण-वाक्य-कवन इ॰ ८ (तंजा.) चांगलें; सुरस, चवदार. 'चटणी गोड आहे.' ९ औरस (लग्नाच्या स्त्रीची) संतति; हिच्या उलट कडू (दासीपुत्र-कन्या). १० शुभदायक; मंगलकारक. 'सत्वाचा गोड जाहला अंत ।' -विक ८. [सं. गुड; प्रा. गोडु; फ्रें. पो. जि. -गुडलो, गोळास] (वाप्र.) ॰करून घेणें-कसेंहि असलें तरी गोडीनें, चांगल्या हेतूनें स्वीकारणें; मान देणें; अव्हेर न करणें. ॰गोड गुळचट- अतिशय गोड. दिल्हें घेतलें गोड-मिळून मिसळून वागणें चांगलें. ॰वणें, गोडावणें सक्रि. १ गोड करणें; होणें, खारट, आंबट नाहींसें करणें (जमीन, पाणी, फळें इ॰). २ मिठ्ठी बसणें (गोड पदार्थ खाल्ल्यानें जिभेस). ३ (काव्य) गोडी लागणें; लुब्ध होणें; लालचावणें. 'भक्तीचिया सुखां गोडावली ।' ४ पाड लागणें; पिकणें (फळ). म्ह॰ १ गोड करून खावें मऊ करून निजावें = अडचणींतहि सोय करून घ्यावी. २ गेले नाहीं तंव- वर जड, खाल्लें नाहीं तंववर गोड = माहीत नसलेलें सर्वच चांगलें असतें. सामाशब्द- ॰उंडी-स्त्री. एक झाड. ॰करांदा-पु. खाण्याला गोड लागणारा करांदा; करांदा पहा. ॰गळा-पु. १ (संगीत) गाण्याला मधुर आवाज. २ मधुर गायन, गाणें. ॰घांस-पु. १ जेवणाच्या शेवटीं खाण्यासाठीं ठेवलेला आव- डत्या पदार्थाचा घांस. २ सुग्रास; मिष्ट भोजन. 'त्याचे एथें गोड घांस मिळतो, तो टकून तुमचेकडे कशाला येऊं?' ३ अप्रिय, दुःखद गोष्टीचा शेवट गोड करणारा मुद्दा, प्रकार. ॰घाशा-खाऊ-वि. १ सदां गोड खाण्यास पाहिजे असा; गोड गोड खाण्याची आवड असलेला. २ चोखंदळ; मिमाजी. ॰जेवण-तोंड न. १ वधूपक्षानें वरपक्षास अथवा वरपक्षानें वधूपक्षास दिलेली मेजवानी. २ मृत माणसाचें सुतक धरणार्‍या नातेवाइकांस आणि इष्टमित्रांस, सुतकाच्या १४ व्या दिवशीं (सुतक फिटल्यावर) मुख्य सुतक धरणार्‍यानें दिलेलें (विशेषतः गुळाच्या पक्वान्नांचें) जेवण. ३ पक्वान्नाचें जेवण. 'गोड जेवण केलें तर पाण्याचा शोष लागणारच.' ॰दोडकी स्त्री.(भाजी) घोसाळी; घोषक यांची एक जात हिचीं फुलें पांढरीं असतात. ॰धड-न. नेहमींच्या पेक्षां थोडेसें गोंडाचें चांगलें जेवण; पक्वान्न; मिष्टान्न. 'उद्यां सण आहे, तर कांही तरी गोडधड करा.' ॰निंब-पु. (व.) कढीनिंब. ॰बोल्या-वि. मृदु, सौम्य भाषण करणारा; तोंडचा गोड; दुसर्‍याला आवडेल असेंच बोलणारा. म्ह॰ गोड बोल्या साल सोल्या = बोलणारा मिठ्ठा परंतु मानकाप्या. ॰गोडरें-वि. गोड; गोडवें. 'बायकां गोडरें प्रिय अन्न।' -गीता २.१७५. गोड लापशी-स्त्री. दुधांतील लापशी (ताकांतील नव्हे). ॰वणी स्त्री. गाडें पाणी. 'हिंग पडतांचि रांजणीं । गोडवणी होय हिंगवणी ।' -भारा बाल १०.३६ ॰वा-गोडा-वि. १ सापेक्षतेनें गोड; विद्यमान पदार्थांत-गोष्टींत अधिक, विशेष गोड. २ (ल.) कोरा; असाडा; अपेट; अस्पष्ट; कोंवळा इ॰. ३ ताजें (पाणी, खारट नव्हे असें); क्षारयुक्त नसणारें; मधुर. ४ बिन कांटेरी; किड्यांना प्रिय (झाड, वनस्पति). ५ मऊ; नरम (लांकडाचा नारावांचून बाहेरचा भाग). ६ बिन खारवट; क्षार, लोणा नसणारी (जमीन). ७ गोडें (तीळ, कारळें यांचें तेल याच्या उलट उंडी, करंज यांचें कडवें तेल). ८ सात्त्विक; सुस्वभावी; सौम्य (माणूस). ९ जितें; जीवंत(मांस-मुरदाड, मृत नव्हे असें). १० सौम्य (खाजर्‍या, उष्ण, तिखट, नव्हत अशा सुरण इ॰ भाज्या). ११ मादक नसणारी (हरीक, खडसांबळी इ॰ वनस्पतींतील प्रकार). १२ निर्विष (साप). १३ कोमल; नाजुक; रोगाला बळी पडणारें (शरीर, अवयव), १४ नदींतील, गोड्या पाण्यांतील (मासा). १५ खारवणांतील नस- लेलें; गोड्या जमीनींत तयार केलेलें (गोडें भात). १६ जिव्हा- ळ्याचें; नाजूक; मर्माचें (अंग, गोडें अंग-जांघ, बस्ती, अंड इ॰). १७ खारट नसलेला (दाणा-धान्यांतील). १८ शुद्ध; नेक- जात; भेसळ रक्ताचा नसलेला (मराठा माणूस), कडव्याच्या उलट). गोडवा-पु. स्तुति; प्रशंसा. ॰गोडवा(वे)गाणें- सांगणें-१ दुसर्‍याच्यासाठीं आपण केलेल्या चांगल्या कृत्यांचा पाढा वाचणें; (उपकृत कृतघ्न झाला असतां विशेषतः) दुसर्‍या- वर केलेले उपकार किंवा अनुग्रह यांचा उपन्यास करणें; आपलें एखाद्यावर प्रेम असून तों तें विसरला असतां त्याच्यासंबंधानें आपल्या मुखांतून निघणारें उद्गार. 'जिष्णु म्हणे त्वद्रचितें मज मिळतिल हे न गोडवें दास्यें ।' -मोआदि ३६.७४. २ एका- द्याच्या कृत्यांची स्तुति करणें; प्रशंसा करणें; नांवाजणें. गोडवे-गाणें (सांगणें नव्हे)-औप.) कुरकुर करणें; निंदा करणें. गोडवी--गोडी-स्त्री. भूक व तोंडास रुचि असल्यानें जेवण्या- संबंधींची इच्छा; रुचि; याच्या उलट वीट; कंटाळा; तिरस्कार; गोडशें-न. (गो.) मिठाई. गोडसर-सा-वि. थोडेसें गोड; मधुर. 'जे आंगेचि पदार्थ गोडसे ।' -ज्ञा १७.१२६. ॰सांद (ध)णें-न. दुधांत, गर्‍यांच्या रसांत तयार केलेलें (ताकांतील नव्हें) सांदणें. गोडसाण-स्त्री. (गो.) गोडी.

दाते शब्दकोश

अग्नि

पु. १ विस्तव; आग; अनल. २ पंचमहाभूतांतील एक देवता. ३ जठराग्नि; (ल.) भूक. ४ आग्नेयी दिशा व तिचा अधि- पति. ५ यज्ञीय देवता; गार्हपत्य, आहवनीय व दक्षिणाग्नि असे तीन त्रैताग्नि व सभ्य आणि आवसथ्य मिळून पंचाग्नि. ६ तीन संख्येचा वाचक. ७ चित्रकादि जठाराग्नि प्रदीप्त करणाऱ्या वनस्पती. [सं.]. ॰घेणें-दारूगोळ्याचा मार सहन करणें. ॰देणें-प्रेत जाळणें; उत्तरक्रिया करणें. ॰चा पाऊस पडणें-अग्निवर्षाव होणें; एकदम अनेक संकटें-जुलूम कोसळणें, गुदरणें. ॰आराधना- शत्रूंचीं गांवखेडीं, शेतें-भातें जाळणें. -ख २०९९. ॰कण-पु. विस्तवाची ठिणगी; स्फुल्लिंग; फुणगी. ॰कमळ-न.योगशास्त्रांतील एक संज्ञा. भुवयांच्यामध्यें अग्निनामक कमळ आहे तें विद्युद्वर्ण असून त्याला दोन पाकळ्या आहेत. तेथ 'हं' 'क्षं' हीं बीजचिन्हें आहेत. -बिउ १.५३. ॰कार्य-न. उपनयनानंतर बटूनें ब्रह्मचारी धर्माप्रमाणें करावयाचा होम; अग्नि-उपासना. ॰काष्ठ-न. निखारा; पेटलेलें लांकूड; विस्तव. ॰काष्ठ भक्षणें- १ अग्निप्रवेश करणें; अग्नींत उडी टाकून मरणें. 'अर्जुन म्हणे हेचि शपत । जरी मोडोनि पडेल सेत । तरी मी अग्निकाष्टें भक्षीन सत्य ।' -ह ३२.१६९. २ सती जाणें. 'आपला पति मृत झाल्याची खबर कानीं पडतांच तिनें अग्निकाष्ठें भक्षण करण्याचा निश्चय केला'. ॰काष्ठ अॅसिड- (पायरोलिग्निअस अॅसिड) हें लांकडांतून कच्च्या स्वरूपांत निघतें. -सेंपू २.४२. ॰कुंड-न. होमाच्या वेळीं अग्नि ठेवण्या- करितां केलेला खड्डा, पात्र; वेदी. ॰कुमार-पु. अजीर्ण, कॉलरा, वातजन्य रोग यांवरील पारा, गंधक, बचनाग टांकणखार वगैरेचें केलेलें औषध, रसायन. -योर १.५०२. ॰क्रीडा-स्त्री. दारुकाम; आतषबाजी; दारूगोळ्याचा भडिमार; फटाके, दारू उडविणें. ॰खांब-पु. तप्तलोहस्तंभ; शिक्षेचा एक प्राचीन प्रकार; नरक- यातनांपैकीं एक; यम लोकींची एक शिक्षा. 'तप्तभूमीवरी चाल- विती । अग्निखांबासहि कवळविती ।।'. ॰चक्र-न. १ षट्चक्रांपैकीं एक; अग्निकमळ पहा. -एभा १२.३३५. २ शकुन, फलज्योतिष यांतील एक संज्ञा; शांतिकर्मासाठीं अग्नि कोठें आहे हें पहावयाचें चक्र. शुक्ल प्रतिपदेपासून चालू तिथीपर्यंत मोजून त्या संख्येंत एक मिळवावा व रविवारापासून चालू वारापर्यंतची संख्या मिळवावी व त्या संख्येस ४ नी भागावें. बाकी शून्य किंवा तीन उरल्यास अग्नि पृथ्वीवर असून शुभ होय; २ उरल्यास अग्नि पाताळीं व १ उरल्यास अग्नि स्वर्गलोकीं होय; हे दोन्ही अग्नि शांतिकर्मास अशुभ होत -धसिं २८४. [सं.]. ॰ज खडक-पृथ्वीच्या पोटां- तील अग्नीनें आंतील पदार्थांचा रस होऊन त्यापासून बनणारा खडक; लाव्हा. -भू ७८. ॰ज्वाला-स्त्री. अग्निशिखा; ज्योत; जाळ. ॰तीर्थ-न. तीर्थ पहा. ॰दिव्य-न. दिव्य पहा. ॰नाश- पु. श्रोत स्मार्त अग्नि विझून जाणें; अग्निहोत्रांतील अग्नि नष्ट होणें; (याबद्दल प्रायश्चित घ्यावें लागतें). ॰नौका-स्त्री. आग- बोट; वाफर; स्टीमर. ॰पंचक-न. फलज्योतिषांतील एक योग; हा घातक असून त्यांत अग्नीपासून भय असतें. यासारखेंच चौरपं॰ ,मृत्युपं॰ ,राजपं॰ वगैरे योग आहेत. शुक्ल प्रतिपदेपासून चालू तिथीपर्यंत मोजून त्यामध्यें चालू लग्न मिळवून त्या संख्येस नवानीं भागून बाकी दोन राहिल्यास तें अग्निपंचक होय. हें सर्व गृहकर्मास वर्ज्य मानितात. -मुमा. [सं.]. ॰परीक्षा-स्त्री. अग्नि- दिव्य पहा. ॰पात्र-न. (शिंपी.) इस्त्री यंत्र; कपडा कडकडीत करण्याचें यंत्र; इस्तरी पहा. ॰पुट-न. रसायन, औषधें, मात्रा वगैरे करण्यास त्यांना अग्नीची आंच देऊन जो संस्कार करितात तें. ॰प्रद-वि.पाचक; अग्निवर्धक; अग्निदीपक. ॰प्रवेश-पु. १ स्वतःस जाळून घेणें. २ सती जाणें; अग्निकाष्ठ भक्षणें पहा. 'पुत्रवंत्या स्त्रिया विशेष । तिहिं न करावा अग्निप्रवेश ।।' ॰बाण-पु, दारूनें वर उडवावयाचा बाण; दारूचा बाण; अग्न्यस्त्र. ॰मणी-पु. एक काल्पनिक रत्न; सूर्यमणि; रविकांत. सूर्यकांत मणी पहा. ॰माद्य- न. अपचनाचा रोग; जठराग्नि प्रदीप्त नसणें; भूक न लागणें. ॰मापक-पु. न. अत्युष्णतामान मोजण्याचें यंत्र; पायरॉमीटर. ॰मुख-न. १ हिंग एक भाग, वेखंड २ भाग, पिंपळी ३ भाग, सुंठ ४ भाग, ओवा ५ भाग, हिरडेदळ ६ भाग, चित्रकमूळ ७ भाग व कोष्ठ ८ भाग यांचे चूर्ण. हें अग्निमांद्यावर देतात. -योर १. ४९३. २ देव. ३ ब्राह्मण. ॰यत्र-न. १ बंदूक; तोफ. 'यांच्या अग्नियंत्रशौंडत्वाची तारीफ व्हायला वेळेनुसार चुकायची नाहीं.' -नि ८०८. २ दारूकाम; आतषबाजी. 'भरूनी रजतमाचें औषध । करूनी अग्नियंत्र सन्नद्ध । कृष्णापुढें अतिविनोद । एक प्रबुद्ध दाविती ।।' -एरुस्व १५.११७. ॰रथ-पु. आगगाडी. ॰रोहिणी- स्त्री. काळपुळी पहा. ॰वर्ण-वि. अग्नीसाररखा तांबडा लाल (रंग); रक्तकांति. ॰वर्धक-वि. पाचक. ॰वर्धन-न. पचन; जठराग्नीचें उद्दीपन. ॰विच्छेद-पु. अग्निनाश; पत्नी मृत झाली असतां अथवा इतर कारणांनीं अग्निहोत्र बंद पडणें. (याबद्दल प्रायश्चित्त सांगितलें आहे). ॰वृद्धि-स्त्री. अग्निवर्धन; पचनशक्तीची वाढ; जठराग्नि प्रदीप्त होणें; आहाराचें प्रमाण वाढविणें. ॰शस्त्र-न. बंदूक, तोफ वगैंरे दारूनें उडणारें हत्यार. ॰शाला-स्त्री. अग्न्यागार; अग्निगृह; अग्नि ठेवण्याची जागा; यज्ञशाळा; होमशाळा. ॰शिखा-स्त्री. अग्नीची ज्वाळा; अग्निज्वाळा. ॰ष्टुत्-पु. (ख्रि) 'एंबर डेज' या इंग्रजी शब्दाचा पर्याय; राखेचे दिवस; ज्यांची दीक्षा होणार आहे त्यांच्यासाठीं प्रार्थना करण्याचे दिवस. 'उपोषणमंडळाशिवाय या चर्चच्या प्रार्थनासंग्रहांत अग्निष्टुत्, अनुनय व कित्येक विशिष्ट दिव- सांच्या पूर्वीं करावयाचीं प्रदोषोपोषणें...सांगितलीं आहेत'. -ना वा. टिळक. उ. मं. ३. [सं. अग्नि + स्तु.]. ॰ष्टोम-पु. सप्तसोमसंस्थां (यज्ञा) पैकीं एक; सोमयाग; यज्ञ. ॰ष्वात्त-पु. अव. पितृदेवता, ज्यांस मंत्राग्नि मिळालेला आहे असे; ज्यांनी जिवंतपणीं अग्निहोत्र पाळलें नाहीं असे; मरीचीपुत्रांपैकीं पितर; जिवंतपणीं श्रौताग्नि ज्यांनीं ठेवला नाहीं (अग्निष्टोमादि याग केले नाहींत) असे पितर (सायण). ॰सेवा-स्त्री. अग्नीची उपासना, पूजा. ॰स्थान-न. अग्निकमळ-चक्र पहा. 'आकळलेनी योगें । मध्यमा मध्यमार्गें । अग्निस्थानौनि निगे । ब्रह्मरंध्रा ।।' -ज्ञा ८.९४. ॰होत्र-न. १ श्रौता- ग्नीची उपासना; सकाळसायंकाळ अग्नीला होम देऊन अग्नि सतत राखण्याचें व्रत. २ (थट्टेनें) धूम्रपान; विडी ओढणें. ॰होत्री-पु. अग्निहोत्र पाळणारा; (थट्टा) तंबाकू ओढण्याचें व्यसन असणारा. ॰स्नान-न. (व.) एक तांब्याभर पाण्यांत स्नान करणें.

दाते शब्दकोश