आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
उपरोध
पु. १ प्रतिबंध; अडथळा; अडचण; जुलूम; त्रास. 'हेंही उपरोधें करणें । तरी आर्तभय हरणें ।' -ज्ञा १३.२८८. 'गांवा- जवळ जर तुम्ही सैन्य उतरलें तर ग्रामस्थांस उपरोध होईल.' २ भीड; संकोच; शंका; चोरी. 'तुका म्हणे अहो रखुमाईच्या वरा । उपरोध; कां धरा माझा आतां ।' -तुगा १२४३. 'जें काम पडेल तें मला सांगीत जा, हे थोर यांस कसें सांगावें, असा उपरोध बाळगूं नका.' ३ आग्रह; हट्ट. 'बाळक स्तनपानीं उपरोधु करी' -ज्ञा ११.७९. ४ व्याजोक्तीचें, छद्मी भाषण; मर्मीं लागेल असें भाषण; टोचून बोलणें; आडून, घालून पाडून बोलणें.' उपरोधु जी सन्मुख । तुजसीं करूं ।' -ज्ञा ११.५४३.
उपरोध uparōdha m (S) Restraint, repression, hinderance. Ex. गांवाजवळ जर तुम्ही सैन्य उतरलें तर ग्रामस्थांस उ0 होईल; जें काम पडेल तें मला सांगीत जा हे थोर ह्यांस कसें सांगावें असा उ0 बाळगूं नका. 2 Restrainedness (of speech); repressed and covered intimation; backward and dark insinuation; sly taunting and twitting; irony, sarcasm.
उपरोध m Restraint. Irony, sarcasm. Restrainedness (of speech).
(सं) पु० संकोच, धक्का, शंका.
उपरोध
पु. १. व्याजोक्तीचे छद्मी भाषण; मर्मी लागेल असे भाषण; टोचूनबोलणे; आडून, घालूनपाडून बोलणे : ‘उपरोधु जी सन्मुख । तुजसीं करूं।’ – ज्ञा ११·५४३. २. प्रतिबंध; अडथळा; अडचण; जूलूम; त्रास : ‘हेंही उपरोधें करणें । तरी आर्तभय हरणें ।’ – ज्ञा १३·२८९. ३. भीड; संकोच; भीती; शंका; चोरी : ‘तुका म्हणे अहो रखुमाईच्या वरा । उपरोध कां धरा माझा आतां ।’ – तुगा १२४३. ४. आग्रह; हट्ट : ‘बालक स्तनपानीं उपरोधु करी ।’ – ज्ञा ११·७९. [सं.]
संबंधित शब्द
उरोध
पु. उपरोध; औपरोधिक भाषण; व्याजोक्ति. 'उरोधु वादुबळु । प्राणीतापढाळु । उपहासु चाळु । वर्मस्पर्शु ।।' -ज्ञा १३. २७०. [उपरोध अप.]
उरोध
पु. व्याजोक्ती; उलट अर्थी बोलणे; उपरोध. [सं. उपरोध]
औपरोधिक
वि. उपरोधयुक्त; गुप्त; गूढ; ज्यांतील खरा अर्थ गर्भित असून शब्दार्थ किंवा वाच्यार्थ निराळा असतो असें; वर्मी; छद्मी (भाषण इ॰); शालजोडींतील (मारणें). [सं. उपरोध]
कर्मविपर्यास
पु. व्याजोक्ति, उपरोध.
खो(खों)च
स्त्री. १ ठोका; घाव; खोंक; बोंच. २ खंड; खांच. ३ पुढें आलेलें टोंक; कांटा; अणकुची; खोचाटा. ४ (ल.) व्यापारांतील तोटा; नुकसान; धक्का. ५ रोष; असंतोष. 'मज- विषयीं त्यांचे मनांत खोंच आली. '६ गाण्यातील स्वरभेद, खुबी. 'त्या ख्यालामध्ये त्यानें दहा खोंची घेतल्या.' ७ खुबी; मर्म; तात्पर्य, रस (गोष्ट, बनाव, प्रसंग, भाषण यांतील) 'त्याच्या बोलण्याची खोंच माझ्या लक्षांत आली.' ८ व्यंगोक्ति; व्याजोक्ति; उपरोध. ९ बाणांचा टप्पा. 'पुढें बाणाच्या खोचेचे तफावतीनें उभें राहिले.' -इमं २८९. [सं. कुच्] (वाप्र.) ॰मारणें-मर्मभेदक टीका करणें. 'मोठमोठ्या इंग्रजी ग्रंथकारांची कोणास खोंचा मारण्याची रीत किती संभावितपणाची व रामबाण असते हें ठाऊक असेलच.' -नि ९. सामाशब्द- ॰कील-वि. संकुचित; अडच- णीचें; कोंदट. ॰खांच-स्त्री. खांचखोंच (वर्णव्यत्यास) पहा.
खोच
स्त्री. १. ठोका; घाव; खोक; बोच. २. खंड, खाच. ३. पुढे आलेले टोक; काटा; अणकुची; खोचाटा. ४. (ल.) व्यापारातील तोटा; नुकसान; धक्का. ५. रोष; असंतोष. ६. व्यंगोक्ती; व्याजोक्ती; उपरोध. ७. बाणांचा टप्पा : ‘पुढें बाणाच्या खोचेचे तफावतीनें उभे राहिले.’ - इमं २८९. [सं. कुच] (वा.) खोच मारणे - मर्मभेदक टीका करणे : ‘मोठमोठ्या इंग्रेजी ग्रंथकारांची कोणास खोंचा मारण्याची रीत किती संभावितपणाची व रामबाण असते हें ठाऊक असेलच.’ - नि ९.
नोक
स्त्री. (क्क.) १ (सुई, काठी इ॰चें) टोंक; अणी; फळ (भाल्याचें). 'सखे तूं पातळ पुतळी फोक । नको मारूं नयनाची नोक ।' -होला १७८. २ (ल.) मुद्दा; खुबी; तात्पर्य (गोष्ट, भाषण यांतील) ध्यानांत धरण्यासारखी गोष्ट, लक्षण; वैशिष्ठ्य; विशिष्ट ढब; पद्धत. 'त्याचे बोलण्यांत नोक आहे.' ३ छानी; नोकझोक; नखरा; ऐट. 'करितात कवन गातात मधुर नोकिंत.' -प्रला १३२. ४ किंचित् सूचना; खोंच; चुणुक; टोला; उपरोध; व्यंगोक्ति. (क्रि॰ दाखविणें; मारणें; लावणें) झोंबणारें भाषण. 'ऐकोनि स्त्रीयेचा नोक थोरू । शस्त्र घेऊनि सत्वरू । धावतां फिटला पितांबरू । तें नृपवरू स्मरेना ।' -एभा २६.७१. 'बरें आजचा दिवस तुम्ही मौजा करा. इतकी नोक मारून गेला.' [फा.नौक्] ॰झो(झों)क-स्त्री. १ व्यंगोक्ति; टोला. नोक अर्थ ४ पहा. 'अशीं भाषणें नोके-झोकेचीं जाटांनीं हीं भाऊ- साहेबांकडे सांगून पाठविली.' -पाब ७. नोकानोकी पहा. २ ढब; नखरा; थाटमाट (पोशाख, भाषण, चालणें वगैरेंत). (क्रि॰ संभाळणें). 'वक्तृत्व म्हणजे नुसतें बोलणेंच नव्हे, तर उंच व मनोवेधक स्वर, अंगविक्षेपाचा नोक झोक...' -नि २९६. ३ तंटा; भांडण; धकाधकी; झोंबाझोंबी. ४ चुणुक; दाखविलेली झुळूक. (क्रि॰ दाखविणें). 'हा नोकझोक दाखवून गेला.' ५ इशारा; अंधूक सूचना. (क्रि॰ दाखविणें). ॰दार-वि. १ टोंकदार; अण- कुचीदार. 'द्रोण केळीचे चांगले दोहों काड्याचे नोकदार लावावे.' -पया २९१. २ झोंबणारें, तिखट; तीव्र (भाषण इ॰). ३ ऐट- दार; झोकदार; नखरेबाज (बस्तु वगैरे). 'शिपाइबानिचा डौल मजेचा झोक नोकदार ।' -मृ १८. ४ खुबीदार. नोकानोकी- स्त्री. १ व्यंगोक्तींनीं व खोंचदार सूचना, इषारा इ॰नीं झालेली बोलाचाली. २ नोकझोक अर्थ ३ पहा.
नोक
स्त्री. १. (सुई, काठी इ.चे) टोक; अणी; फळ (भाल्याचे) २. मुद्दा; खुबी; (गोष्ट, भाषण यांतील) तात्पर्य, ध्यानात धरण्यासारखी गोष्ट; लक्षण; वैशिष्ट्य; विशिष्ट ढब, पद्धत. ३. नोकझोक; नखरा; ऐट : ‘करितात कवन गातात मधुर नोकिंत.’ - प्रला १३२. ४. किंचित सूचना; खोच; चुणूक; टोला; उपरोध; व्यंगोक्ती. (क्रि. दाखवणे, मारणे, लावणे); झोंबणारे भाषण : ‘ऐकोनि स्त्रियेचा नोक थोरू । … तें नृपवरू स्मरेना ।’ - एभा २६·७१. ५. टोचणी; नेट; तगादा. [फा. नौक्]
उपरोधाचा
उपरोधाचा uparōdhācā a उपरोधी or उपरोधीक a (उपरोध S) Repressed and covered; concealed under the guise of irony; dark and sarcastic--speech.
व्याजोक्तिपूर्ण ( लेखन)
हेटाळणी, व्यंजना, विडंबन, टवाळी, वक्रोक्तिपूर्ण, टर, टेर, बोचक लागट लेखन, वरवर स्तुति पर्यवसान निंदेत, व्याजस्तुति, गर्भित निंदा, जोडे मारले, शालजोडींतले दिले, गालिप्रदान, चिमटे काढून विटंबना, उपरोध, उपहास, दोषदर्शन, तिर्यक् लेखन, आडून गोळीबार, वरवरच सोज्वळ, निर्भत्सना, माकडचेष्टा, मुद्दाम भ्रष्ट नक्कल, तिरकस टीका, आडवें घेतलेंय, शर्करावरगुंठित कोयनेल.
व्यंजक
वि. सूचक; ज्ञापक; व्यक्त करून दाखविणारा. -ज्ञा १.४०२. [सं.] व्यंजन-न. १ (व्या.) स्वरहित कका- रादि वर्ण प्रत्येकी. २ अनुस्वाराचें किंवा अनुनासिकाचें अक्षरा- वरील चिन्ह. ३ तोंडिंलावणें; चटणी, लोणचे इ॰ ४ व्यंग्योक्ति; औपरोधिक भाषण. ५ खूण; चिन्ह; अभिज्ञान. -वि. व्यक्त; चिन्हित. 'एके अंगीं भिन्नपणीं । जीव शिव वादिन्नले दोनी । तेणें झाली व्यंजन स्तनी ।' -एरुस्व ७४०. व्यंजन(ना)संबंध-पु. (न्याय] स्पष्ट आणि सूचित गोष्टिंतील संबंध; वाच्यार्थ आणि व्यंग्यार्थ यांनधील संबंध. व्यंजना-स्त्री. उपरोध; गर्भिंतार्थ; ध्वनि; सूचना. [सं.]