मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

उपसर्ग      

पु. १. उपद्रव; त्रास; पीडा; विघ्न; उपाधी : ‘तेथें दैत्यीं, उपसर्ग केला लोकां । रचिली द्वारका तुका म्हणे ।’ – तुगा ९९. २. दुश्चिन्ह; अनिष्टसूचक गोष्ट (उत्पात, उल्कापात इ.) [सं. उप + सृज्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पु. १. (व्या.) शब्दांच्या मागे लागणारे अव्यय; उपपद. उदा. अति, अनु, उप, परा, प्रति, सम् इत्यादी. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उपसर्ग

उपसर्ग m A particle prefixed to roots, &c. Annoyance, molestation, harassment. A portent. Bye-product.

वझे शब्दकोश

उपसर्ग upasarga m (S) A particle prefixed to roots &c., as प्र, परा, उप, अभि, अनु, an inseparable preposition. 3 Laxly. Troubling, worrying, oppressing; annoyance, molestation, harassment. 2 A portent; a prodigy boding evil.

मोल्सवर्थ शब्दकोश

पु. १ (व्या.) धातूंच्या मागें लागणारें अव्यय, उपपद. उ॰ अति; अनु; उप; परा; प्रति. सम् इ॰ २ उपद्रव; त्रास; पीडा; विघ्न. 'तेथें दैत्यीं उपसर्ग केला लोकां । रचिली द्वारका तुका म्हणे ।' -तुगा ९९. ३ दुश्चिन्ह; अनिष्टसूचक गोष्ट (उत्पात, उल्कापात इ॰). [सं. उप + सृज् = उत्पन्न करणें]

दाते शब्दकोश

(सं) पु० उपद्रव, संबंध. २ शब्दाचे अगोदर लागणारा प्रत्यय.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

संबंधित शब्द

उपसर्ग. १. व्यंजनादी शब्दांपूर्वी लागणारा, सामान्यतः नकार, अभाव, अल्पत्व, अनौचित्य आणि अन्यत्व दाखविणारा उपसर्ग. अन्याय (नकार); अधर्म (अभाव); अगोड (अल्पत्व); अवेळ (अनौचित्य); अहिंदू (अन्यत्व). स्वरादी शब्दांपूर्वी त्याचे रूप ‘अन्’ असे होते : अनर्थ, अनपेक्षित, व्यंजनांनी सुरू होणाच्या शब्दांपूर्वी क्वचित त्याचे हे रूप वापरलेले आढळते. अनहित, अनमोल. २. मराठीत ‘अ’ हा उपसर्ग क्वचित अतिशयत्व दाखवतो. अघोर, अचपळ. ३. मूळ स्थितीला जाणे : असुजणे = सूज उतरणे; अहारणे = सुटे होणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

१ वर्णमालेंतील पहिला स्वर. या वर्णाचें सर्वांत जुनें स्वरूप अशोकाच्या गिरनार शिलालेखांत सांपडतें-ओझा; ज्ञाको.२ पु. ब्रह्मा; विष्णु; महेश; सूर्य; अग्नि; वायु; ब्रह्म; मोर. ३ उपसर्ग नका- रार्थीं प्रकार सातः (अ) त्यासारखें पण तें नव्हे. 'अब्राह्मण' (ब्राह्मणा- सारखा पण ब्राह्मण नव्हे); 'अचक्षुदर्शन'. (आ) अप्राशस्त्य; अयो- ग्यता; अनुचितपणा. 'अकाल' (अयोग्य काल); 'अवेळ' (अयोग्य वेळ); 'अपथ्य'. (इ) निषेध; प्रतिषेध. 'अदर्शन' (ई) अभाव. 'अज्ञान'; 'अक्रोध'. (उ) त्याहून इतर, किंवा भेद. 'अमनुष्य' (मनु- ष्येतर, जनावर वगैरे). (ऊ) अल्पत्व; कमीपणा. 'अबोल्या'.'अनु- दरा' (कृशोदरी); 'अशिजा (अर्धवट शिजलेला). (ॠ) विरोध; उलटे- पणा. 'अधर्म'; 'अनीति'. ४ निरर्थक. 'अघोर' (घोर); 'अपरोक्ष' (पाठीमागें). ५ क्रिवि. मूळ स्थितीला जाणें. 'असुजणें' (सूज उतरणें).

दाते शब्दकोश

उ      

उपसर्ग उलट क्रिया, विरोध, अभाव, अपकर्ष इ. अर्थी क्रियापदांना लागणारा एक उपसर्ग. उदा. उसवणे, उवळणे, उलगडणे इ. उ      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दुर्

अ. दुष्टपणा; वाईटपणा, कठिणपणा, दुःख इ॰कांच्या वाचक शब्दापूर्वीं योजावयाचा उपसर्ग. जसें:-दुराचार = वाईट वर्त- णूक; दुर्लभ = मिळण्यास कठिण; दुस्सह = सहन करण्यास कठिण इ॰. याचीं संधिनियमानुरूप दुर्, दुस्, दुष्, दुश् इ॰ रूपें होतात. जसें:- दुर्लभ दुष्कर, दुश्चल, दुस्सह, दुस्साध्य, दुराचार, दुरंत इ. हा उपसर्ग जोडून अनेक सामासिक शब्द बनतात. त्यांपैकीं कांहीं येथें दिले आहेत. दुरंत-वि. १ अपार; अनंत; अमर्याद; अंत लागण्यास कठिण असा (मोह, माया इ॰). २ अतिशय कठिण; तीव्र (दुःख इ॰). [दुर् + अंत = शेवट] दुरतिक्रम-वि. ओलांडून जाण्यास कठिण; दुस्तर; दुर्लंघ्य. २ असाध्य. [दुर् + अतिक्रम = ओलांडणें] दुरत्यय-यी-वि. १ नाश करून टाकण्यास कठिण. २ प्रतिबंध करण्यास, टाळण्यास कठिण; अपरिहार्य. ३ असाध्य (दुःख, आजार, रोग इ॰). अप्रतीकार्य (अडचण, संकट). ४ मन वळ- विण्यास कठिण असा (मनुष्य); दुराराध्य. [दुर् + अत्यय = पार पडणें, जाणें इ॰] दुरदृष्ट-न. दुर्दैव; वाईट अदृष्ट. 'कीं आड आलें दुरदृष्ट माझें ।' -सारुह १.१०. [दुर् + अदृष्ट] दुरधिगम्य- वि. १ समजण्यास कठिण; दुर्बोध; दुर्ज्ञेय. २ दुष्प्राप्य; मिळण्यास कठिण; दुर्गम. [दुर् + सं. अधि + गम् = मिळविणें] दुरभिमान-पु. पोकळ, वृथा, अवास्तव अभिमान; फाजील गर्व. [दुर् + अभिमान] दुरवबोध-वि. दुर्बोध; गूढ. [दुर् + सं. अव + बुध् = जाणणें] दुरा- कांक्षा-स्त्री. दुष्प्राप्य वस्तूचा अभिलाष. [दुर् + आकांक्षा = इच्छा, अभिलाष] दुराग्रह-पु. हट्ट, लोकविरोध, शास्त्रविरोध, संकटें इ॰ कांना न जुमानतां एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरविण्याचा हट्ट; अनिष्ट आग्रह. 'न सुखद दुराग्रह सखा हा सर्वाऽनर्थ गेह ठक राया ।' -मोकर्ण ४६.५०. [दुर् = वाईट + आग्रह = हट्ट] दुराग्रही-वि. दुरा- ग्रह धरण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा; हेकेखोर; हटवादी; हट्टी. [दुराग्रह] दुराचरण, दुराचार-नपु. निंद्य, वाईट, वागणूक; दुर्वर्तन; दुष्ट आचरण. [दुर् = दुष्ट + सं. आचरण = वर्तन] दुराचरणी, दुराचारी-वि. निंद्य, वाईट, दुष्ट वर्तनाचा; बदफैली. [दुराचार] दुरात्मत्व-न. १ दुष्ट अंतःकरण; मनाचा दुष्टपणा. २ दुष्ट कृत्य. 'किमपि दुरात्मत्व घडलें ।' [दुर् = दुष्ट + आत्मा = मन] दुरात्मा- वि. दुष्ट मनाचा (मनुष्य); खट; शठ. [दुर् + आत्मा] दुरा- धर्ष-वि. जिंकण्यास, वर्चस्वाखालीं आणण्यास कठिण. [दुर् + सं. आ + धृष् = जिंकणें] दुराप-वि. मिळविण्यास कठिण; दुर्लभ; अप्राप्य. 'राया, भीष्माला जें सुख, इतरां तें दुराप, गा, स्वापें ।' -मोभीष्म ६.२९. दुराप(पा)स्त-वि. घडून येण्यास कठिण; दुर्घट; असंभाव्य. 'वाळूचें तेल काढणें ही गोष्ट दुरापस्त आहे.' [दुर् + सं. अप + अस् = ] दुराराध्य-वि. संतुष्ट, प्रसन्न करण्यास कठिण, अशक्य; मन वळविण्यास कठिण. 'मोक्षु दुराराध्यु कीर होय । परि तोही आराधी तुझे पाय ।' -ज्ञा ११.९९. [दुर् + सं. आराध्य] दुराशा-स्त्री. निरर्थक, फोल, अवास्तव आशा, दुष्प्राप्य गोष्टीची आशा दुष्ट वासना. 'आम्हास अन्न खावयास मिळेना आणि पालखींत बसण्याची दुराशा धरावी हें चांगलें नव्हे.' 'दुराशागुणें जो नव्हे दैन्यवाणी ।' -राम १६८. [दर् + आशा] दुरासद-वि. कष्टानें प्राप्त होणारें; जिंकण्यास, मिळण्यास कठिण. [दुर् + सं. आ + सद = मिळ विणें] दुरित-न. पाप; पातक; संचितकर्म. 'पुन्हां न मन हे मळो दुरित आत्मबोधें जळो ।' -केका ११९. [दुर् + सं. इ = जाणें] दुरुक्त-न. वाईट, दुष्टपणाचें, अश्लील भाषण; शिवी; अपशब्द; दुर्भाषण; अश्लील बोलणें. [दुर् + उक्ति = बोलणें] दुरुत्तर-न. अप मानकारक, उर्मटपणाचें उत्तर; दुरुक्ति. [दर् + उत्तर] दुरुद्धर-वि. खंडण करण्यास, खोडून काढण्यास कठिण असा (पूर्वपक्ष, आक्षेप, आरोप). 'या सिद्धांतावर दोष दिला हा सर्वांस दुरुद्धर आहे.' [दुर् + सं. उद् + धृ = काढून टाकणें; वर, बाहेर काढणें] दुरूह-वि. दुर्बोध; गूढ; अतर्क्य. 'ईश्वरानें सृष्टि कशी उत्पन्न केली हें सर्वांस दुरूह आहे.' [दुर् + सं. ऊह् = अनुमानणें] दुर्गत-वि. गरीब; दिन; दरिद्री; लाचार. 'झांकी शरपटलानीं आढ्य जसा दुर्गतांसि वस्त्रांनीं ।' -मोभीष्म ९.६५. [दुर् + सं. गत = गेलेला] दुर्गति-स्त्री. १ दुर्दशा; वाईट स्थिति; संकटाची, लाजिरवाणी स्थिति; अडचण; लचांड. २ नरक; नरकांत पडणें. [दुर् + गति = स्थिति] दुर्गंध- गंधी-पुस्त्री. घाण; वाईट वास. -वि. घाण वास येणारें [दुर् = वाईट + सं. गंध = वास] ॰नाशक-वि. (रसा.) दुर्गंधाचा नाश करणारें; (इं.) डिओडरंट्. [दुर्गध + सं. नाशक = नाश करणारा] दुर्गंधिल-वि. (रासा.) आर्सेनिक व मेथिल यांच्या संयोगापासून बनलेला विषारी, दुर्गंधी (पदार्थ) (इं.) कॅको- डिल्. दुर्गम-वि. जाण्यास कठिण (स्थळ, प्रदेश इ॰). [दुर् + सं + गम् = जाणें] दुर्गुण-पु. वाईट गुण; दोष; अवगुण; दुर्मार्गाकडील कल. (क्रि॰ आचरणें). [दुर् + गुण] दुर्गुणी-वि. वाईट गुणांचा; अवगुणी; दुराचरी; दुर्वर्तनी. [दुर्गुण] दुर्घट-वि. धड- वून आणण्यास, घडून येण्यास, सिद्धीस नेण्यास कठिण. [दुर् + सं. घट् = घडणें, घडवून आणणें] दुर्घटना-स्त्री. अशुभ, अनिष्ट गोष्ट घडणें; आकस्मिक आलेलें संकट, वाईट परिस्थिति. [दुर् + सं. घटना = स्थिति] दुर्घाण-स्त्री. दुस्सह घाण; ओरढाण; उग्रष्टाण. [दुर् + घाण] दुर्जन-पु. वाईट, दुष्ट मनुष्य. [दुर् + जन = मनुष्य, लोक] दुर्जय-वि. १ जिंकण्यास कठिण. २ दुस्साध्य; दुस्तर. [दुर + सं. जि = जिंकणें] दुर्जर-वि. पचविण्यास, विरघळ- ण्यास कठिण. [दुर् + सं. जृ = जिरणें] दुर्दम-वि. दमन करण्यास, वर्चस्वाखालीं आणण्यास कठिण. 'तिला इंग्लंडांतील प्रबल व दुर्दम प्रजाजनांच्या अडथळ्याशिवाय दुसरें कोणतेंच नियमन नसे.' -पार्ल ६. [दुर् + दम्] दुर्दर्श-वि. दिसण्यास, पाहण्यास कठिण; अतिशय अस्पष्ट. [दुर् + सं. दृश् = पाहणें] दुर्दशा-स्त्री. अवनतीची, अडचणीची, संकटाची, वाईट, दुःखद स्थिति; दुर्गति; दुःस्थिति. 'भिजल्यामुळें शालजोडीची दुर्दशा जाली.' [दुर् + दशा = स्थिति दुर्दिन-न. १ वाईट दिवस. २ अकालीं अभ्रें आलेला दिवस. ३ वृष्टि. -शर. [दुर् + सं. दिन = दिवस] दुर्दैव-न. कमनशीब; दुर्भाग्य. 'कीं माझें दुर्दैव प्रभुच्या मार्गांत आडवें पडलें ।' -मोसंशयरत्नमाला (नवनीत पृ. ३४९). -वि. कम- नशिबी; अभागी. [दुर् + दैव = नशीब] दुर्दैवी-वि. अभागी; कम- नशिबी. [दुर्दैव] दुर्धर-पु. एक नरकविशेष. [सं.] दुर्धर- वि. १ धारण, ग्रहण करण्यास कठिण. २ दुस्साध्य; दुष्प्राप्य. ३ (काव्य) (व्यापक) बिकट; खडतर; असह्य; उग्र; कठिण. 'तप करीत दुर्धर । अंगीं चालला घर्मपूर ।' ४ भयंकर; घोर; भयानक. 'महादुर्धर कानन ।' [दुर् + सं. धृ = धरणें, धारण करणें] दुर्धर्ष- वि. दुराधर्ष; दमन करण्यास, वर्चस्वाखालीं आणण्यास कठिण; दुर्दम्य; अनिवार्य. [दुर् + धृष् = जिंकणें, वठणीवर आणणें] दुर्नाम- न. अपकीर्ति; दुष्कीर्ति; बदनामी. [दुर् + सं. नामन् = नांव] दुर्नि- मित्त-न. अन्याय्य, निराधार कारण, सबब, निमित्त. [दुर् + निमित्त = कारण] दुर्निर्वह-वि. १ दुःसह; असह्य; सहन करण्यास कठिण; निभावून जाण्यास, पार पडण्यास कठिण (अडचण, संकट). २ दुस्साध्य; दुष्कर; [दुर् + सं. निर् + वह्] दुर्निवार, दुर्निवा- रण-वि. १ निवारण, प्रतिबंध करण्यास कठिण; अपरिहार्य; अनि- वार्य. २ कबजांत आणण्यास कठिण; दुर्दम्य. [दुर् + नि + वृ] दुर्बल-ळ-वि. १ दुबला; अशक्त; असमर्थ. २ गरीब; दीन; दरिद्री. 'ऐसें असतां एके दिवशीं । दुर्बळ द्विज आला परियेसीं ।' -गुच ३८.७. [दुर् + बल = शक्ति] दुर्बळी-वि. (काव्य.) दुर्बळ पहा. दुर्बुद्ध-वि. १ दुष्ट बुद्धीचा; खुनशी वृत्तीचा. २ मूर्ख; मूढ; मंदमति; ठोंब्या. [दुर् + बुद्धि] दुर्बुद्धि-स्त्री. १ दुष्ट मनोवृत्ति; खुनशी स्वभाव; मनाचा दुष्टपणा. 'दुर्बुद्धि ते मना । कदा नुपजो नारायणा ।' -तुगा ७९८. २ मूर्खपणा; अनिष्ट परिणामकारक बुद्धि. -वि. दुष्ट मनाचा; दुर्बुद्ध पहा. [दुर् + बुद्धि] दुर्बोध-वि. समजण्यास कठिण (ग्रंथ, भाषण इ॰) [दुर् + बोध् = समजणें, ज्ञान] दुर्भग-वि. कमनशिबी; दुर्दैवी; भाग्यहीन. [दुर् + सं. भग = भाग्य] दुर्भर-वि. भरून पूर्ण करण्यास कठिण; तृप्त करण्यास कठिण (पोट, इच्छा, आकांक्षा). 'इंद्रियें वज्रघातें तपे उष्ण वरी ज्वाळ । सोसिलें काय करूं दुर्भर हे चांडाळ ।' -तुगा ३५४. -न. (ल.) पोट. 'तरा दुस्तरा त्या परासागरातें । सरा वीसरा त्या भरा दुर्भरातें ।' -राम ८०. [दुर् + सं. भृ = भरणें] दुर्भ्यक्ष्य-वि. खाण्यास कठिण, अयोग्य; अभ्यक्ष्य. [दुर् + सं. भक्ष्य = खाद्य] दुभोग्य-न. कमनशीब; दुर्दैव. -वि. दुर्दैवी; अभागी. [दुर् + सं. भाग्य = दैव] दुर्भावपु. १ दुष्ट भावना; कुभाव; द्वेषबुद्धि. २ (एखाद्याविषयींचा) संशय; वाईट ग्रह; (विरू.) दुष्टभाव. [दुर् + भाव = भावना, इच्छा] दुर्भाषण-न. वाईट, अपशब्दयुक्त, शिवीगाळीचें बोलणें; दुर्वचन पहा. [दुर् + भाषण = बोलणें] दुर्भिक्ष-न. १ दुष्काळ; महागाई. २ (दुष्काळ इ॰ कांत होणारी अन्नसामुग्री इ॰ कांची) टंचाई; कमीपणा; उणीव. [सं.] ॰रक्षित-वि. दासांतील एक प्रकार; आपलें दास्य करावें एतदर्थ दुष्काळांतून वांचविलेला (दास, गुलाम इ॰). -मिताक्षरा-व्यवहारमयूख दाय २८९. [दुर्भिक्ष + सं. रक्षित = रक्षण केलेला] दुर्भेद-वि. बुद्धीचा प्रवेश होण्यास कठिण; दुर्बोध. 'तैसें दुर्भेद जे अभिप्राय । कां गुरुगम्य हन ठाय ।' -ज्ञा ६.४५९. [दुर् + सं. भिद् = तोडणें] दुर्भेद्य-वि. फोडण्यास, तुकडे करण्यास कठिण (हिरा; तट). [दुर् + सं. भेद्य = फोडण्यासारखा] दुर्मति-स्त्री. १ दुर्बुद्धि; खाष्टपणा; कुटिलपणा. २ मूर्खपणा; खूळ; वेडेपणा. -पु. एका संवत्सराचें नांव. -वि. १ दुष्ट बुद्धीचा; खाष्ट स्वभावाचा. २ मूर्ख; खुळा; वेडा. [दुर् + मति = बुद्धि, मन] दुर्मद-पु. दुराग्रहीपणा; हेकेखोरी; गर्विष्ठपणाचा हटवादीपणा. 'किती सेवाल धन दुर्मदा' -अमृतपदें ५८. -वि. मदांध; मदोन्मत्त; गर्विष्ठ. 'सावियाचि उतत होते दायाद । आणि बळिये जगीं दुर्मद ।' -ज्ञा ११.४८०. [दुर् + मद = गर्व] दुर्मनस्क, दुर्मना-वि. खिन्न; उदास मनाचा; विमनस्क; दुःखित. [दुर् + सं. मनस् = मन] दुर्मरण-न (वाघानें खाऊन, पाण्यांत बुडून, सर्प डसून इ॰ प्रकारांनीं आलेला) अपमृत्यु; अपघातानें आलेलें मरण; अमोक्षदायक मरण. [दुर् + मरण] दुर्मि(र्मी)ल-ळ- वि. मिळण्यास कठिण; दुर्लभ. [दुर् + सं. मिल् = मिळणें] दुर्मुख- पु. एका संवत्सराचें नांव. -वि. १ घुम्या; कुरठा; तुसडा; आंबट तोंडाचा. २ तोंडाळ; शिवराळ जिभेचा. 'दुर्मुखी स्त्रीचा त्याग करून । संन्यास ग्रहण करावा ।' [दुर् + मुख] दुर्मुखणें- अक्रि. तोंड आंबट होणें; फुरंगुटणें; गाल फुगविणें; (एखाद्या कार्याविषयीं) उत्साहशून्यतेची चर्या धारण करणें. 'खायास म्हटलें म्हणजे हांसत येतात आणि उद्योगाचें नांव घेतलें म्हणजें लागलेच दुर्मुखतात.' [दुर्मुख] दुर्मुखला-वि. आंबट चेहर्‍याचा; घुम्या; कुरठा; तुसडा. [दुर्मुख] दुर्मेधा-वि. १ मंदबुद्धीचा. २ दुष्ट स्वभावाचा; दुर्मति. [दुर् + सं. मेधा = बुद्धि] दुर्योग-पु. सत्ता- वीस योगांतील अशुभ, अनिष्ट योगांपैकीं प्रत्येक. [दुर् + योग] दुर्लंघ्य-वि. १ ओलांडता येण्यास कठिण; दुस्तर (नदी इ॰). २ मोडता न येण्यासारखी, अनुल्लंघनीय (आज्ञा, हुकूम, शपथ इ॰) ३ निभावून जाण्यास कठिण (संकट, अडचण इ॰). ४ घालविण्यास, दवडण्यास, क्रमण्यास, नेण्यास कठिण (काळ, वेळ इ॰). [दुर् + सं. लंघ्य = ओलांडावयाजोगें] दुर्लभ-वि. मिळण्यास कठिण; अलभ्य; दुर्मिळ; दुष्यप्राप्य; विरळा. 'अलीकडे आपलें दर्शन दुर्लभ जालें. दुर्ललित-न. चेष्टा; खोडी. 'आमच्या विविध दुर्ललिताबद्दल गुरुजींनीं कसें शासन केलें...' -आश्रमहारिणी ७. [दुर् + सं. ललित = वर्तन, चेष्टा] दुर्लक्ष-न. लक्ष नसणें; हयगय; निष्काळजी- पणा; गफलत; अनवधान. -वि. १ लक्ष न देणारा; अनवधानी; गाफील; बेसावध, 'तुम्ही गोष्ट सांगीतली पण मीं दुर्लक्ष होतों म्हणून ऐकिली नाहीं.' २ दिसण्यास, समजण्यास कठिण; 'ईश्वराचें निर्गुण स्वरूप दुर्लक्ष आहे.' [दुर् + सं. लक्ष्य] दुर्लक्षण- न. १ (मनुष्य, जनावर इ॰ कांचें) अशुभसूचक लक्षण, चिन्ह; दुश्चिन्ह; दोष; वाईट संवय; खोड; दुर्गुण. 'हा घोडा लात मारतो एवढें यामध्यें दुर्लक्षण आहे.' [दुर् + लक्षण = चिन्ह] दुर्लक्षण-णी- वि. १ दुर्लक्षणानें, वैगुण्यानें युक्त (मनुष्य, घोडा इ॰). (विरू.) दुर्लक्षणी. २ दुर्गुणी; दुराचारी; दुर्वर्तनी. दुर्लक्ष्य-वि. १ बुद्धीनें, दृष्टीनें अज्ञेय; अगम्य. २ दुर्लक्ष इतर अर्थीं पहा. [दुर् + सं. लक्ष्य] दुर्लौकिक-पु. अपकीर्ती; दुष्कीर्ति; बेअब्रू; बदनामी; कुप्रसिद्धि. [दुर् + लौकिक = कीर्ति] दुर्वच, दुर्वचन, दुर्वाक्यन. १ वाईट बोलणें; दुर्भाषण; अशिष्टपणाचें, अश्लील, शिवीगाळीचें भाषण. २ अशुभ, अनिष्टसूचक भाषण. [सं. दुर् + वचस्, वचन, वाक्य = बोलणें] दुर्वह-वि. १ वाहण्यास, नेण्यास कठिण. २ सोसण्यास, सहन करण्यास कठिण. [दुर् + सं. वह् = वाहणें, नेणें] दुर्वाड- वि. अतिशय मोठें; कठिण. -शर. प्रतिकूल. [दुर् + वह्] दुर्वात- उलट दिशेचा वारा. 'तुज महामृत्युचिया सागरीं । आतां हे त्रैलोक्यजीविताची तरी । शोकदुर्वातलहरी । आंदोळत असे ।' -ज्ञा ११.३४८. [दुर् + सं. वात = वारा] दुर्वाद-पु. वाईट शब्द; दुर्वच; वाईट बोलणें; भाषण. 'हां गा राजसूययागाचिया सभासदीं । देखतां त्रिभुवनाची मांदी । कैसा शतधा दुर्वादी । निस्तेजिलासी ।' -ज्ञा ११.१०१. [दुर् + वाद = बोलणें] दुर्वारवि. दुर्निवार; अनिवार्य; टाळण्यास, प्रतिकार करण्यास कठिण; अपरिहार्य. २ आवरतां येण्यास कठिण; अनिवार; अनावर. [दुर् + वारणें] दुर्वास-पु. १ (व.) सासुरवास; कष्ट; त्रास; जाच. [दुर् + वास = राहणें] दुर्वासना-स्त्री. वाईट इच्छा; कुवासना; दुष्प्रवृत्ति. [दुर् + वासना] दुर्विदग्ध-वि. विद्येंत न मुरलेला तथापि विद्येचा गर्व वाहणारा; अर्ध्या हळकुंडानें; पिवळा झालेला. [दुर् + सं. विदग्ध = विद्वान्] दुर्विपाक-पु. वाईट परिणाम. [दुर् + सं. विपाक = परिणाम] दुर्विभावनीय-वि. समजण्यास, कल्पना करण्यास कठिण. [दुर् + सं. विभावनीय = कल्पना करतां येण्यासारखें] दुर्वृत्ति-स्त्री. दुराचारी; दुर्व्यसनी; दुर्वर्तनी. [दुर् + सं. वृत्त = वागणूक] दुर्वत्ति-स्त्री. दुराचरण; भ्रष्टाचार; बदफैली. [दुर् + सं. वृत्ति = वर्तन] दुर्व्यसन-न. दुराचरणाची संवय; द्यूत, मद्यपान, वेश्यागमन इ॰कांसारखें वाईट व्यसन. 'दुर्व्यसन दुस्तरचि बहु सूज्ञासहि फार कंप देतें हो' -वत्सलाहरण. [दुर् + व्यसन] दुर्व्यसन-नी-वि. वाईट व्यसन, संवय लागलेला; दुराचारी; बदफैली. (प्र.) दुर्व्यसनी. दुर्व्रात्य-वि. अतिशय दुष्ट; व्रात्य; खोडकर; खट्याळ; (मुलगा अथवा त्यांचें आचरण). [दुर् + व्रात्य = खोडकर, द्वाड] दुर्हृद, दुर्हृदय-वि. वाईट, दुष्ट मनाचा. [दुर् + सं. हृदु, हृदय = मन] दुर्ज्ञेय-वि. समजण्यास कठिण; गूढ; गहन. 'ही पद्धत कशी सुरू झाली असावी हें समजणें दुर्ज्ञेय आहे.' -इंमू ७६. [दुर् + सं. ज्ञेय = समजण्याजोगें] दुःशक- वि. करण्यास कठिण; अशक्यप्राय. [दुस् + सं. शक् = शकणें] दुःशकुन-पु. अपशकुन; अनिष्टसूचक चिन्ह. [दुस् + शकुन] दुश्शील, दुःशील-वि. वाईट शीलाचा; दुराचरणी. [दुस् + शील] दुश्चरित्र-न. पापाचरण; दुष्कृत्य. [दुस् + चरित्र] दुश्चल-वि. (अक्षरशः व ल.) पुढें जाण्यास, सरसावण्यास, चालण्यास कठिण. [दुस् + सं. चल् = चालणें] दुश्चि(श्ची)त-वि. १ (काव्य) अयोग्य, चुकीचा, अपराधी (माणूस, कृत्य). 'अंगुष्ठ धरुनि मस्तकपर्यंत । अखंड दुश्चित आचरलों ।' २ खिन्न; उदास; दुःखी. 'राजा प्रजा पिडी । क्षेत्री दुश्चितासी तोडी ।' -तुगा २९८४. [सं. दुश्चित अप.] दुश्चित्त-वि. १ खिन्न; दुर्मनस्क; दुःखित; उदास; उद्विग्न. 'अबदुल्याची खबर ऐकतां मनांत झाले दुश्चित ।' -ऐपो १३२. २ क्षुब्ध. 'परी कुंडलिनी नावेक दुश्चित्त होती । ते तयातें म्हणे परौती ।' -ज्ञा ६.२३८ [दुस् + चित्त = मन] दुश्चिंत- वि. (काव्य) खिन्न; दुःखी; उदास; दुश्चित्त अर्थ २ पहा. 'डोळे लावुनियां न होतों दुश्चिंत । तुझी परचीत भाव होती ।' [दुश्चित अप.] दुश्चिन्ह-न. अशुभ, वाईट लक्षण; अपशकुन. 'दुश्चिन्हें उद्भवलीं क्षितीं । दिवसा दिवाभीतें बोभाति ।' [दुस् + चिन्ह] दुश्शाप-पु. वाईट, उग्र, खडतर शाप. [दुस् + शाप] दुश्शासन-पुविना. दुर्योधनाचा भाऊ. -वि. व्यवस्था राख- ण्यास, अधिकार चालविण्यास कठिण. [दुस् + शासन = अधिकार चालविणें] दुष्कर-वि. १ करण्यास कठिण; बिकट; अवघड. 'म्हणोनि अभ्यासासि कांहीं । सर्वथा दुष्कर नाहीं ।' -ज्ञा १२.११३. २ दुष्परिणामकारक. -मोल. [दुस् + सं. कृ = करणें] दुष्कर्म-न. वाईट, पापी, दुष्टपणाचें कृत्य; कर्म. [दुस् + कर्म] दुष्कर्मा, दुष्कर्मी-पु. दुष्ट कृत्य करणारा; पापी; दुरात्मा. [दुस् + कर्मन्] दुष्काल-ळ-पु. अतिवृष्टि किंवा अनावृष्टि होऊन पिकें बुडून अन्नाची वाण पडते तो काळ; दुकाळ; महागाई. 'जैसा रोगिया ज्वराहूनि उठिला । कां भणगा दुष्काळु पाहला ।' -ज्ञा ११.४२८. [दुस् + काल] म्ह॰ दुष्काळांत तेरावा महिना = दुष्का- ळांत वर्षाचे बारा महिने काढतां काढतांच मुष्कील पडते. अशा वेळीं अधिक मास (तेरावा महिना) आला म्हणजे संकटातं भर पडते असा अर्थ. दुष्कीर्ति-स्त्री. अपकीर्ती; बदनामी; बेअब्रू. [दुस् = कीर्ति] दुष्कृत-ति-नस्त्री. १ पापकर्म; वाईट कृत्य. 'आणि आचरण पाहातां सुभटा । तो दुष्कृताचा कीर सेल वांटा ।' -ज्ञा ९.४१६. २ कृतींतील. वागणुकींतील दुष्टपणा. [दुस् + कृत- ति] दुष्प्रतिग्रह-पु. जो प्रतिग्रह (दानाचा स्वीकार) केला असतां, स्वीकारणारा अधोगतीस जातो तो; निंद्य प्रतिग्रह; अशुभप्रसंगीं केलेलें दान स्वीकारणें; वाईट कृत्याबाबत स्वीकारलेलें दान इ॰. उदा॰ वैतरणी, शय्या, लोखंड, तेल, म्हैस हे दुष्प्रतिग्रह होत. [दुस् + सं. प्रतिग्रह = दान स्वीकारणें] दुष्प्राप-प्य-वि. दुर्लभ; मिळण्यास कठिण; विरळा; दुर्मिळ. [दुस् + सं. प्र + आप् = मिळ- विणें] दुस्तर-वि. तरून जाण्यास, पार पडण्यास कठिण. 'समुद्रापेक्षां हा संसार मला दुस्तर वाटतो.' -न. (ल.) संकट. 'थोर वोढवलें दुस्तर । तुटलें सासुरें माहेर ।' -एरुस्व ८.५५. [दुस + सं तृ = तरणें] दुस्पर्श-वि. स्पर्श करण्यास कठिण, अयोग्य. [दुस् + सं. स्पृश् = स्पर्श करणें] दुस्संग-पु. दुष्टांची संगत; कुसंगति. [दुस् + संग] दुस्सह-वि. सहन करण्यास कठिण; असह्य. [दुस् + सं. सह् = सहन करणें] दुस्सही-वि. (प्र.) दुस्सह स्सह अप.] दुस्साध्य-वि. १ सिद्धीस नेण्यास, साधावयास कठिण. 'थोर वय झाल्यावर विद्या दुःसाध्य होते.' २ बरा करण्यास कठिण (रोग, रोगी). आटोक्यांत आणण्यास कठिण (शत्रु, अनिष्ट गोष्ट, संकट इ॰). [दुस् + सं. साध्य = साधण्यास सोपें] दुस्स्वप्न-न. १ अशुभसूचक स्वप्न. २ (मनांतील) कुतर्क, आशंका, विकल्प. [दुस् + स्वप्न] दुस्स्वभाव-पु. वाईट, दुष्ट स्वभाव. -वि. वाईट, दुष्ट स्वभावाचा. [दुस् + स्वभाव]

दाते शब्दकोश

नि

अ. एक उपसर्ग. याचे कांहीं अर्थः १ खातरी; निखाल- सपणा. २ नकार; अभाव; राहित्य. जसें निकोप; निकामी. ३ अतिशयिता. जसें:-निमग्न; इ॰. कधीं हा उपसर्ग निरर्थक, अनवश्यक असाहि लागतो. [सं. निर्]

दाते शब्दकोश

प्र

एक उपसर्ग; हा उपसर्ग शब्दांस लागून पुढील मुख्य अर्थ होतात-(अ) अधिक गति. (आ) आधिक्य; प्रकर्ष; अतिशयता (फार, पुष्कळ इ॰)श्रेष्ठता; उच्चपणा. [सं.]

दाते शब्दकोश

एक उपसर्ग, हा प्रकर्ष ह्नणजे अधिकत्व दाखवितो; जसें, प्रताप.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

उप      

अ.       एक उपसर्ग. हा पुढील अर्थी योजतात. १. अनुगमन. उदा. उपदेश, उपालंभ. २. अधिकपणा. उदा. उपपरार्ध. ३. हीनपणा, गौणत्व. उदा. उपस्त्री, उपपत्नी, उपपुराण. दुय्यम; गौण. उदा.उपसचिव, उपायुक्त. ५. कमी प्रतीचा, तीव्रतेचा, गुणाचा. हा आम्लात किंवा त्या रसायनात (प्राणवायूचा) कमीपणा आहे असे दाखवतो. उदा. नत्रस अम्लापेक्षा उपनत्रस अम्ल हे कमी अम्लजन असते. ६. समीपता; सान्निध्य. उदा. उपकंठ, उपनदी, उपांत्य. ७. पहिलेपणा. उदा. उपक्रम. ८. दाक्षिण्य; आदर. उदा. उपचर्या. ९. साम्य. उदा. उपधातू, उपव्याघ्र. १०. शेवट; नाश. उदा. उपरती. ११. विकार. उदा. उपलेप. १२. स्वीकार. उदा. उपगम, उपाकर्म. १३. व्यापणे. उदा. – उपहास. १४. समूहत्व; संमेलन; संकलन. उदा. उपार्जन. १५. शक्ती. १६. अध्ययन; अध्यापन. उदा. उपाध्याय. १७. उद्योग. १८. कडे; वर; खाली. उदा. उपनयन. १९. निरर्थक, स्वार्थी म्हणूनही कधी हा उपसर्ग लागतो. अप या उपसर्गाचे काही अर्थ याचेही आहेत.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आ      

उपसर्ग.       व्यंजनादी शब्दापूर्वी सामान्यतः पुढील अर्थाने − (अ) लघुता; अल्पता; कमीपणा. उदा. ओष्णम् = कोंबट (उष्णम् = कढत, ओष्णम् = किंचित, उष्ण = कोंबट). (आ) व्याप्ती; प्रसार; वाढ. उदा. + आभोग = समृद्धी, पूर्णता. (भोग = सुख, आभोग = अधिक भोग, भोगाची वाढ). (इ.) उपक्रमाची मर्यादी (अमुक पासून) उदा. आसमुद्रात् = समुद्रापासून, आजन्मतः = जन्मापासून. (ई) अवसान; मर्यादा; अंतीची मर्यादा. (अमुकपर्यंत, पावेतो). उदा. आजानु = गुडघ्यापर्यंत, आमरण = मृत्यूपर्यंत, आकर्ण = कानांपर्यंत. (उ) अंतर्भूत व समाविष्ट मर्यादा. उदा. आक्रमण = व्यापून टाकणे. (क्रम = जाणे, चालणे, पाऊल टाकणे). आसकलात् ब्रह्म = ब्रह्म वस्तुमात्र व्यापून आहे. (आ+सकल = सर्व). (ऊ) अतिरिक्त; अकारण, वाजवीपेक्षा अधिक; निरर्थक; द्विरुक्ती. उदा. आभास, आप्राण, आल्हाद, आघात (भास, प्राण, ल्हाद, घात याप्रमाणेच अर्थ). (ए) आ लावल्याने शब्दाचा अर्थ वाढतो, मर्यादित होतो, बदलतो किंवा फिरविला जातो. उदा. आग्रह (ग्रह = देणे, घेतल्यानंतर त्यालाच चिकटून राहणे). = हेका; आचार (चर् = घालणे) = शास्त्राप्रमाणे वागणूक ठेवणे; आगमन (गमन = जाणे) = जवळ येणे; येणे; आमोद (मोद = आनंद) = सुवास; आकृति (कृति = कृत्य) = मूर्ती; स्वरूप; आकार.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

इ      

उपसर्ग. स्थानाचा नजिकपणा दाखवण्याकडे उपयोग. उदा. इ−कडे, इ−थे, इ− तका इ. इ      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

१ वर्णमालेंतील दुसरें अक्षर. याचा अक्षरविकास साधारण अ सारखाच झाला आहे. २ संस्कृत शब्दाच्या मागें जेव्हां हें अक्षर उपसर्ग म्हणून लागतें तेव्हां त्याचे पुढील अर्थ होतात- (अ) लघुता; अल्पता; कमीपणा. उ॰ ओष्णम् = कोंबट (उष्णम् = कढत, ओष्णम् = किंचित् उष्ण-कोंबट) (आ) व्याप्ति; प्रसार; वाढ. उ॰ आभोग = समृद्धि; पूर्णता. (भोग = सुख, आभोग = अधिक भोग, भोगाची वाढ). (इ) उपक्रमाची मर्यादा (अमूकपासून). उ॰ आसमुद्रात् = समुद्रापासून, आजन्मतः = जन्मापासून. (ई)अवसानमर्यादा; शेवटची, अंताची मर्यादा (अमूकपर्यंत, पावेतों)उ॰ आफलोदय = फलप्राप्ति होईपर्यंत; आजानु = गुडघ्यापर्यंत; आकर्ण; आमरण = मृत्यूपर्यंत. (उ) अंतर्भूत व समा- विष्ट मर्यादा. उ॰ आक्रमण (क्रम् = जाणें, चालणें, पाऊल टाकणें) = व्यापून टाकणें, आसकलात् ब्रह्म = ब्रह्म वस्तुमात्र व्यापून आहे. (आ + सकळ = सर्व). (ऊ) अतिरिक्त; अकारण, वाजवीपेक्षां अधिक; निरर्थक; द्विरुक्ति. उ ॰ आभास, आघ्राण, आह्लाद, आघात, (भास, घ्राण, ह्लाद, घात, याप्रमाणेंच अर्थ ). (ए) आ लावल्यानें शब्दाचा अर्थ वाढतो, मर्यादित होतो, बदलतो किंवा फिरविला जातो उ ॰ आग्रह(ग्रह = घेणें-घेतल्यानंतर त्यालाच चिकटून राहणें) = हेका. आचार (चर् = चालणे) = शास्त्राप्रमाणें वागणूक ठेवणें. आग- मन (गमन = जाणें) = जवळ जाणें, येणें.आमोद (मोद = आनंद) = सुवास.आकृति (कृति = कृत्य ) = मूर्ति; स्वरूप; आकार.

दाते शब्दकोश

आबाद

[फा. आबाद्] समृद्ध; सम्पन्न; सुरक्षित; स्वस्थ. “आपला ज़ागा आबाद ठेवितों” (दिमरा २।१५७) “तुम्ही खातर्जमा राखोन मौजे मज्कुरीं आबाद राहणें, फौजेचा उपसर्ग तुम्हांकडे कांहीं लागणार नाही” (राजवाडे १०।४३३).

फारसी-मराठी शब्दकोश

अभि      

उपसर्ग व शब्दयोगी अव्यय.       १. सारखेपणा, साम्य, सादृश्य. उदा. अभिरूप, अभिराम (याप्रमाणे). २. सान्निध्य. उदा. अभ्यग्नी, अभिचर, अभिमुख (पुढे, समोर याअर्थी). ३. वेगळेपणा; पृथकत्व (निरनिराळ्या प्रकारे, वेगवेगळे) ४. संयोग; विवक्षितपणा (संबंधी, विषयी). उदा. अभिधान. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अभि

उपसर्ग व शब्दयोगी अव्यय. १ सारखेपणा, साम्य, सादृश्य. उ. अभिरूप; अभिराम (याप्रमाणें, असें). २ सान्निध्य उ॰ अभ्यग्नि; अभिचर; अभिमुख; (पुढें; म्हणून). ३ वेगळे पणा; पृथकत्व (निरनिराळ्या प्रकारें, वेगवेगळे,) ४ संयोग; विव- क्षितपणा (संबंधीं, विषयीं.) उ. अभिधान; [सं. अभि; तुल. ग्री. अम्फि; लॅ. ऑब; झेन्द. अइबि; गॉ. बि; ओल्ड हायजर्मन. बी]

दाते शब्दकोश

अद

वि. अर्धा; निमा; शब्दांना हा उपसर्ग म्हणून लागतो. जसें:-अदकोस; अदखंडी; अदगज; अदघडी; अदतोळा; अदधडी; अदपाव; अदमण; अदशेर; इ॰. [सं. अर्ध; गु. अद-ध; पं. हिं. अद, आद; कों. अद]

दाते शब्दकोश

अद, आद      

वि.       अर्धा; निम्मा; शब्दांना हा उपसर्ग म्हणून लागतो. जसे : – अदघडी, अदपाव, अदशेर इ.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अधि

शअ. नेहमीं नामाशीं संयुक्त असणारा उपसर्ग. वर; वरचढ (स्थल, परिमाण, गुण यानें). उ॰ अधिपति.

दाते शब्दकोश

अधि      

अ.       नेहमी नामाशी संयुक्त असणारा उपसर्ग; वर; वरचढ; आधिक्य; अधिकृतता या अर्थी (स्थल, परिमाण, गुण याने). उदा. अधिपती. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आहा, आहे      

स्त्री.       ज्वाला; आंच; उपद्रव; उपसर्ग; पीडा : ‘लागे शोकाग्निची न या आहे ।’ − मोशल्य १·२८. पहा : आही

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आहा-हे

स्त्री. ज्वाला; आंच; उपद्रव; उपसर्ग; पीडा. 'लागे शोकाग्निची न या आहे.।' -मोशल्य १.२८. आही पहा.

दाते शब्दकोश

अहल

पु. त्रास; उपसर्ग. 'नबाबानीं बहुत अहल सोसून यात्रा उत्तम प्रकारें आमची केली.' -पेद २.२. [अर.]

दाते शब्दकोश

अहल      

पु.       त्रास; उपसर्ग : ‘नवाबांनी बहुत अहल सोसून यात्रा उत्तम प्रकारें आमची केली.’– पेद २·२. [फा. हाल]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आमद्रफ्त; आमद्रफ्ती

(स्त्री.) [फा. आमद्-रफ्त्] ये-जा; दळणवळण; वाहतुकीची ज़कात; रहदारीचा पर्वाना; मुभा; मोकळीक. “हजारों मनुष्यांची आमद्रफ्त; त्यांत असा चोरून जो येणार तो कोणे स्वरूपानें व कसा येतो हें कशावरून समजावें?” (राजवाडे ७।१३५). “सुखरूप आमद्रफ्त होऊं देत नाहींत” (राजवाडे ३।८८). “रसदेची वगैरे आमद्रफ्ती होऊ नये” (राजवाडे १०।१९६). “मार्गी येतां जातां आमद्रफ्तीचा उपसर्ग न लावणें” (राजवाडे १५।२३०). “तो किल्ला घेतला म्हणजे दोतून ज़हाजे येण्यास आमद्रफ्ती जाली” (खरे ८।४३५४).

फारसी-मराठी शब्दकोश

आमद्रफ्त, आमद्रफ्ती

स्त्री. १ ये जा; रहदारी; दळ- णवळण. 'हजारों मनुष्यांची आमद्रफ्त, त्यांत असा चोरून जो येणार तो कोणे स्वरूपानें व कसा येतो हें कशावरून समजावें' -रा ७.१३५. २ व्यापारी मालाची ने आण व त्यावरील जकात 'सुखरूप आमदरफ्त होऊं देत नाहींत. -रा ३.८८. 'मार्गीं येतां जातां आमद्रफ्तीचा उपसर्ग न लावणें' -रा १५.२३०. ३ रहदा- रीची परवानगी, मुभा, मोकळीक. 'तो किल्ला घेतला म्हणजे दर्यां- तून जहाजें येण्यास आमद्रफ्ती जाली' -ख ८.४३५४. [फा. आमद् = येणें + रफ्त = जाणें]

दाते शब्दकोश

आमद्रफ्त, आमद्रफ्ती      

स्त्री.       १. ये जा; रहदारी; दळणवळण : ‘हजारों मनुष्यांची आमद्रफ्त, त्यांत असा चोरून जो येणार तो कोणे स्वरूपानें व कसा येतो हे कशावरून समजावे.’ − मइसा. ७•१३५. २. व्यापारी मालाची ने−आण व त्यावरील जकात : ‘मार्गी येतां येतां आमद्रफ्तीचा उपसर्ग न लावणें’ − मइसा. १५·२३०. ३. रहदारीची परवानगी, मुभा, मोकळीक. [फा. आमद्‌=येणे+रफ्त=जाणे]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अनु

अ. एक उपसर्ग. अर्थः १ मागून, पश्चात, उ॰ अनुगमन, अनुचर. २ सारखा; प्रमाणें; बरहुकूम. उ॰ अनुरूप. ३ खालीं (ल.) खालोखाल; दुय्यम प्रकारचा; पेक्षां हलका. उ॰ अनुकल्प. ४ मिळून; बरोबर. उ॰ अनुकंपन. [सं.]

दाते शब्दकोश

अनु      

अ.       एक उपसर्ग. १. मागून; पश्चात. उदा. अनुगमन; अनुचर. २. सारखा; प्रमाणे; बरहुकूम. उदा. अनुरूप. ३. खाली (ल.) खालोखाल; दुय्यम प्रकारचा; पेक्षा हलका. उदा. अनुकल्प. ४. मिळून; बरोबर. उदा. अनुकंपन. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अनुयोगित्व

न. अभियोग; प्रथमचा हल्ला; प्रथम आपण होऊन केलेली चढाई.' राजकारणाच्या युद्धांत प्रज़े- कडे व त्यांच्या पुढाऱ्याकडे केवळ प्रतियोगित्वाचा मान असतो. अनुयोगित्वाचा म्हणजे प्रारंभींची चढाई किंवा हल्ला करण्याचा मान सरकारकडे असतो.' -टिच २.१ 'टिळकांनीं ज्या द्विदशवार्षिक युद्धांत प्रमुखपणें मरेपर्यंत भाग घेतला तें युद्ध लॉर्ड कर्झन यांनीं अनुयोगित्वानें सुरू केलें व प्रज़ेनेंहि प्रतियोगित्वानें तें चालू ठेवलें.'-टिच २.३४. [सं.] [हा चुकीचा उपयोग आहे; वास्तविक अभियोगित्व पाहिजे. अनु हा उपसर्ग पाठीमागून होणाऱ्या क्रियेला लावतात.प्रथम चढाईला अभियोग शब्द योग्य आहे तेव्हां अभियोगित्व पाहिजे.]

दाते शब्दकोश

आफत; आफती

(स्त्री.) [अ. आफत्] आपत्ती; आपदा. “पादशाहीवर आफत पडली ऐसें झालें” (चित्रगुप्त ३५). “अगोदर पर्जन्याची आफती-त्याजवर फोज़ाचे उपसर्ग जाले” (राजबाडे १०।८८).

फारसी-मराठी शब्दकोश

अति      

क्रिवि.       पुष्कळ; फार; अधिक; जास्त; अतिशय. (शब्दापूर्वी हा उपसर्ग पुढील काही अर्थांनी योजतात.) वरचढ; सरस; मागे टाकणारा; पलीकडे. वरून. उदा. अतिकठीण – क्रोधी – गर्व – मिष्ट – मृदू – वास्तववाद इ. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अति

क्रिवि. पुष्कळ; फार; अधिक; जास्त; अतिशय. 'हा अति बोलतो.' म्ह॰ १ अति सर्वत्र वर्जयेत् = कोणतेंहि वाजवीपेक्षां जास्त करणें टाळावें. २ अति तेथें माती. -शअ. (नामापुर्वीं हा उपसर्ग पुढील कांहीं अर्थानीं योजतात.) वरचढ; सरस; मागें टाकणारा; पलीकडे; वरून. उ॰ अति कठीन-क्रोधी-गर्व-मिष्ट-मृदु इ॰

दाते शब्दकोश

औपसर्गिक

औपसर्गिक aupasargika a S Portentous. 2 Relating to उपसर्ग.

मोल्सवर्थ शब्दकोश

अव

शअ. बाहेर; पासून खालीं; पासून दूर, लांब. -उपसर्ग १ न्यूनता; र्‍हास; कमीपणा. उ॰ अवदशा. २ अनादर. उ०अवज्ञा, अवमान. ३ निश्चय. उ॰ अवधारण. ४ विस्तार; व्याप; पसारा. उ॰ अवकीर्ण. ५ आधार. उ॰ अवलंब. ६ खालीं; खालीं जाणे. उ॰ अवतार, अवगाह. शिवाय अप पहा. [सं.]

दाते शब्दकोश

आव

वि. (व.) निर्भेळ; ताजें; कोरें; जसें-आवचें दूध = निरसें-निर्भेळ दूध. [सं. अव = शुद्धतादर्शक उपसर्ग?]

दाते शब्दकोश

बाबतीवाला

वि. वतनदार; हक्कदार. 'त्यांच्या कमकुवतपणामुळें यांचा वगैरे मनस्वी उपसर्ग गांवास लागला.'

दाते शब्दकोश

बे

शअ. वांचून; विरहित; अभाव दाखविणारा उपसर्ग. याचा फारशी किंवा हिंदी शब्दांशीं समास होतो व हा शब्द नेहमीं पूर्वपद असतो. [फा. बी; तुल॰ सं. विना; हिं. बिन] ज्यांच्या पूर्वपदीं बे शब्द येतो असे अनेक सामासिक शब्द आहेत. त्यांतील कांहीं पुढें दिले आहेत. सामाशब्द- ॰अकली-वि. मूर्ख; बेवकूब. [फा. बी + अक्ल्] ॰अदब-बी-स्त्री. अपमान; असभ्यता; अमर्यादा; अनादर. [फा. बी + अदबी] ॰अदाई-स्त्री. स्वामिद्रोह; विरोध. अबरु-अब्रू-स्त्री. दुर्लौकिक; अपकीर्ति; फजिती. [फा. बी + आब्रू] अबस-क्रिवि. वृथा; व्यर्थ; निष्फळ. ॰आब-पु. अपमान; बेअब्रू. -वि. अपमान झालेला. [फा. बी + आब्] ॰आराम- वि. अस्वस्थ; आजारी. [फा. बी + आराम्] ॰आरामी-स्त्री. अस्वास्थ्य. [फा.] ॰इज्जत-ती-स्त्री. अप्रतिष्ठा. ॰इज्जती-वि. गैरअबरूदार; हलकट. [फा.] ॰इतबार-पु. गैरविश्वास; गैरभरंवसा. [फा.] ॰इतल्ला-क्रिवि. गैरमाहीत; बे-दखल; बडतर्फ. 'त्याचे कार्कून बे-इतल्ला केले.' -रा १०.११०. [फा.] ॰इनसाफ- इनसाफी-पुस्त्री. अन्याय; न्यायाचा अभाव. -वि. अन्यायाचा; अन्यायी. [फा.] ॰इमान-इमानी, बेमान-वि. कृतघ्न; अप्रामाणिक; बेभरंवशाचा. [फा. बी + ईमान् = अधर्मी] ॰इमानी- इमानकी-स्त्री. खोटेपणा; अप्रामाणिकता; कृतघ्नता; विश्वास- घातकीपणा. ॰इलाज-वि. निरुपाय; नाइलाज. [फा.] ॰उजूर- क्रिवि. १ कांहीं न सांगतां; बिनतक्रार. 'या दिवसांत पोटास न मिळे तेव्हां लोक चाकरी बे-उजूर कैसी करितील? '-रा १०.५७. २ विलंबरहित; बेधडक. [फा.] ॰कदर-क्रिवि. निर्धास्तपणें. ॰कम-ब-कास्त-क्रिवि. कांहीं कमी न करतां; साद्यन्त; जसेंच्यातसें. [फा. बी + कम् + उ + कास्त्] ॰करारी- स्त्री. अनिश्चिती; तहमोड. 'त्याजकडून बेकरारीच्या चाली सुरू होतात.'-रा ७.१९ ॰कस-वि. नि:सत्त्व; कमजोर; बेचव; शुष्क. ॰कानू-स्त्री. अन्याय; जुलूम. ॰कानून-कानू-वि. बेकायदेशीर; कायद्याचा भंग करून केलेलें. [फा.] ॰कायदा-पु. कायदेभंग; कायद्यासंबंधाचा अभाव. ॰कायदा-कायदेशीर- वि. नियमबाह्य; गैरकायदेशीर; जुलमी; नियमाचें उल्लंघन करणारा; नियमाला सोडून असलेला [फा. बी + काइदा] ॰कार-वि. १ निरुद्योगी; बे-रोजगारी; रिकामा. २ (व.) निरर्थक; व्यर्थ; उगाच. ३ (ल.) हैराण; निरुपयोगी. 'तिन्ही मोर्चे मिळोन निमे माणूस दुखणियानीं बेकार आहे.' -पेद ३.१८ [फा.] ॰कार- चावडी-स्त्री. (को.) रिकामपणाच्या, निरर्थक गप्पागोष्टी. ॰कारी- स्त्री. रिकामपणा; निरुद्योगीता; बेरोजगारपणा. [फा. बीकारी] ॰किलाफ-पु. मैत्री; सख्य; संशयनिवारण. [अर. खिलाफ् = वैर] ॰कुबी-स्त्री. मूर्खपणा; गाढवपणा; मौखर्य. [फा. बेवकुफी] ॰कुसूर-क्रिवि. न. चुकतां; बिलाकसूर; पूर्णपणें. [फा. बी + कुसूर्] ॰कूब-वि. मूर्ख; वेडगळ; वेडझंवा [फा. बेवकुफ] ॰कैद-स्त्री. शिस्तीचा अभावं; स्वैर वर्तन; अव्यवस्थितपणा; कायदा, नियम किंवा शिस्त यांचे उल्लंघन. -वि. बेशिस्त; स्वैर; अनियंत्रित. -क्रिवि. स्वैरपणानें; कोणत्याहि तर्‍हेचा कायदा किंवा नियम न मानतां. [फा. बी + कैदी] ॰कैदी-वि. स्वैर; कायदा, नियम, नियंत्रिण इ॰ न पाळणारा; बेशिस्त. ॰कौली-वि. बिगर कौलाचा; अभयपत्रविरहित. ॰खत्रे-क्रिवि. निःशंकपणें. 'बेखत्रे हुजूर यावें.' -जोरा १०५. ॰खबर-क्रिवि. असावध; गाफीलपणें. [फा. बी + खबर्] ॰खबर्दार-वि. गैरसावध. [फा.] ॰खर्च-खर्ची-वि. १ खर्च केल्याशिवाय झालेलें, केलेलें; फुकटंफाकट. २ खचीं जवळ नाहीं असा; निर्धन; कृपण. [फा. बी + खर्च्] ॰खातरी-स्त्री. अविचार. 'चार कोटींची मालियत जवळ असतां कंजूषपणानें सर्दारास बेखात- रीनें निरोप दिल्हा.' -जोरा १०९. गर्द-वि. वृक्षरहित; झाडी नसलेलें. 'मुलूख अगदीं वीसपंचवीस कोसपर्यंत बे-गर्द, वेचिराख जाहला.' -पाब १४ [फा. बगिर्द] ॰गार-गारी-बिगार, बिगारी पहा. ॰गुन्हा-पु. गुन्ह्यापासून मुक्तता, सुटका.-वि. गुन्हा नसलेला; अपराधांतून मुक्त झालेला. -क्रिवि. गुन्हा नसतांना. 'बक्षीस बेगुन्हा कैद केलें. ' -जोरा १०५ [फा.] ॰गुमान-नी-वि. बेपर्वा; गर्विष्ठ; उन्मत्त; निःशंक; मुर्वत नसणारा. [फा. बेगुमान्] ॰चतुर-वि. मूर्ख. ॰चरक-क्रिवि. निर्भयपणें; धडाक्यानें; निर्भीडपणें; बेधडक. ॰चव-वि. रुचिहीन; कवकवीत; नीरस; निचव. ॰चाड-वि. चाड नसलेला; लज्जाहीन; उद्धट. ॰चिराख- ग-वि. दीपहीन; ओसाड; उध्वस्त; वस्तीरहित; उजाड. [फा. बी + चीराघ् = दिवा] ॰चूक-वि. बिनचूक; बरोबर; चुका केल्या- शिवाय. [फा. बी + हिं. चूक] ॰चैन-वि. अस्वस्थ; कांहींहि सुचत नाहीं असा [फा. बी + हिं चैन] ॰चोबा-पु. खांबाशिवाय असलेला लहान तंबू. [फा. बीचोबा] ॰छूटपणा-पु. आळा, बंध नसणें; स्वैराचार; स्वच्छंदीपाणा. ॰जबाब-क्रिवि. उद्धट- पणानें; बेपर्वाईनें (बोलणें, उत्तर देणें). [फा. बी + जवाब्] ॰जबाबदार-वि. स्वतःवरची जोखीम न ओळखणारा; जोखीम न ओळखून स्वैर वागणारा. बेजबाबदार राज्यपद्धति-स्त्री. लोकमतास जबाबदार नसलेली राज्यपद्धति. ॰जबाबी-वि. १ उद्धट; उर्मट; बेमुर्वतखोर. २ तासाचे ठोके न देणारें (घड्याळ). [फा. बी + जवाब् = निरुत्तर] ॰जबर-क्रिवि. निर्भयपणें; निःशंक- पणें; बेधडक; जोरानें; उठाव करून; धाक न बाळगतां. 'आमच्या भले लोकांनीं बेजबर घोडीं घालून कित्तूरकरास मोडून वोढ्यापर्यंत नेऊन घातला. ' -ख ५.२३८८ [फा.] ॰जात-वि. (अशिष्ट) हलक्या किंवा निराळ्या जातीचा. ॰जान-वि. निर्जीव; ठार. [फा.] ॰जाब-वि. बेगुमान; बेमुलाजा; बेजबाबदार. [फा.] ॰जाबता-पु. अन्याय; ठरावाविरुद्ध गोष्ट; अविचारी भाषा. 'आम्ही टोंचून घेणार नाहीं, असेना असे मरून जाऊं असे बेजाबता बोलत होते.' -टिकळचरित्र, खंड १. ॰ज्यहा-जा- जहा-वि. फाजील; अनाठायीं; अनुचित; अयोग्य; अमर्याद; अकालीन; रुष्ट; उधळपट्टीचा. [फा.बी + जा] बेजार-वि. १ हैराण; त्रस्त; दमलेले; थकलेला (श्रम, दुःख, कटकट यांमुळें). २ दुखाण्यानें हैराण झालेला; दुखणाईत. [फा. बिझार्] बेजारी- स्त्री. त्रास; हैराणी; थकवा. ॰डर-न. ड्रेडनॉट नांवाचें जंगी लढाऊ जहाज. -वि. न भिणारी; न डरणारा. बेडर पहा. [हिं. डर] ॰डौल-वि. कुरूप; बेढब; घाट किंवा आकार चांगला नसलेला. ॰ढंग-पु. दुराचरण; स्वैराचार; बेताल वागणूक; सोदेगिरी. [हिं.] ॰ढंग-गी-वि. दुराचरणी; व्यसनी; स्वैराचारी. [हिं.] ॰ढब- वि. बेडौल; कुरूप; विक्षिप्त; ढबळशाई; चांगला घाट, आकार नसलेला; ओबडधोबड. [हिं.] ॰तकबी-वि. असमर्थ; ना-तवान. [फा. बेतक्विया] ॰तकसी(शी)र, बेतक्शी(तकसी)र- स्त्री. अपराधापासून, गुन्ह्यापासून, भुक्तता. -वि. निरपराधी; नाहक; निर्दोषी. [फा. बी + तक्सीर] ॰तमा-स्त्री. १ निर्लोभि वृत्ति. २ बेफिकीरपणा; बेपरवा; उदासीनपणा. -वि. १ निर्लोभी; निरिच्छ. २ बेपरवा; बेगुमान; गर्विष्ठ; निष्काळजी; बेसावध; काळजी, कळकळ न बाळगणारा. -क्रिवि. बेगुमानपणें. 'खांद्यावर टाकून पदर बोले बेतमा । लग्नाच्या नवऱ्याशीं बोले बेतमा ।' -पला. [फा] ॰तमीज-वि. (ना.) उद्धट; असभ्य. [फा. बे + तमीज] ॰तर्तुद-स्त्री. तजविजीचा अभाव; अव्यवस्था. ॰तर्‍हा-स्त्री. असाधारणपणा; वैलक्षण्य; चमत्कारिकपणा. -वि. विलक्षण; चमत्कारिक; असाधारण; भारी; अतिशय. 'याउपर उपेक्षा करून कालहरण केलियास नाबाबाचे दौलतीस बे-तर्‍हा धक्का बसेल.' -रा. ५.१६६. [फा. बी + तरह्] ॰ताब-वि. असमर्थ; क्षीण; हतधैर्य. ' मातुश्री अहल्याबाई यांस शैत्यउपद्रव होऊन पांचसात दिवस बे-ताब होती.' -मदाबा १.२१८ [फा. बी + ताब्] ॰ताल- ळ-वि. १ गायनांत तालाला सोडून असलेलें (गाणें-बजावणें). २ ताल सोडून गाणारा, वाजविणारा. ३ (ल.) अमर्याद; अनियं- त्रित; स्वैर; उधळ्या. [हिं.] ॰तालूक-वि. गैरसंबंधीं; संबंध नसलेला; भलता. [फा. बे + तअल्लुक = संबंध] ॰दखल-वि. १ अधिकारच्युत; बेईतल्ला. २ गैरमाहीत. [फा. बी + दख्ल्] ॰दम-वि. दम कोंडला जाईपर्यंत; निपचीत पडेपावेतों दिलेला (मार); थकलेला; दमलेला; निपचीत. [फा.] ॰दरद-दी-दर्द- दर्दी-वि. १ बेफिकीर; बेगुमान; मागेंपुढें न पाहणारा; भय न बाळगितां स्वच्छंदपणें वागणारा. २ बारीकसारीक विचार न पाहणारा. ३ निर्घृण; क्रूर; दया नसलेला. [फा.] ॰दस्तूर-पु. अन्याय; नियमाविरहित गोष्ट; गैरशिरस्ता. ॰दस्रतूई-स्त्री. (गो.) उधळेपणा. [फा.] ॰दाणा-दाना-पु. १ आंत बी नाहीं असें द्राक्ष. हें लहान, गोड, गोल, बिनबियांचें असतें. २ सुकविलेलें द्राक्ष; किसमिस. [फा.] ॰दाणा डाळिंब-न. दाण्यांत बीं नसलेलें डाळिंब. ॰दाद-स्त्री. बेबंदशाही; अन्याय; जुलूम. [फा.] ॰दार-क्रिवि. जागृत; तयार. 'नबाब बेदार जाले.' -रा ७.८३ [फा.] ॰दावा-पु. सोडचिठ्ठी; नामागणी; हक्क सोडणें. ॰दावा पत्र-फारखती-नस्त्री. हक्क सोडल्याबद्दल, नसल्याबद्दल लिहून दिलेला कागद; सोडचिठ्ठी. ॰दिक(क्क)त-क्रिवि. बेलाशक; बिनहरकत; बिनतक्रार; बेउजूर; निःशंकपणें. [फा.] ॰दिल- दील-वि. उदासीन; असंतुष्ट; दुःखी कष्टी. [फा.] ॰दील होणें-बिथरणें. ॰दिली-स्त्री. १ असंतुष्टता; औदासीन्य; निरु त्साह. २ रुष्टता; मनाचा बेबनाव. ॰दुवा-स्त्री. अवकृपा; शाप. [अर.] ॰धडक-क्रिवि. बिनघोक; निर्धास्तपणें; निर्भय; बेलाशक. [हिं.] ॰धरी-वि. धरबंद नसलेला; नियंत्रण नसलेला; मोकाट; स्वैर. [बे + धर] ॰नवा-वि. अधीर; असहाय; निर्धन; भुकेला. 'पादशहा बेनवा होऊन खानास लिहीत. ' -मराचिथोर ५३. [फा.] ॰नहाक-नाहक-क्रिवि. विनाकारण; उगीचच्याउगीच; कारण नसतांना; हक्कनहक्क, हक्कनाहक्क पहा. ॰निगा-स्त्री. दुर्लक्ष; अपरक्षण. [फा.] ॰निसबत-क्रिवि. बेलाशक; काहींहि विचार न करतां; मनांत कोणातीहि शंका न बाळगतां; बेपर्वाइनें; एकदम. [फा.] ॰निहायत-न्याहत-क्रिवि. निःसीम; अपार; परकाष्ठेचा. [फा.] ॰पडदा-वि. १ पडदा नसलेला; उघडपणें; कोणत्याहि तऱ्हेची गुप्तता न राखतां. २ (ल.) मानखंडित. क्वचित् नामाप्रमाणें उपयोग करितात. -पु. १ उघड गोष्ट; २ (ल.) मानखं डना. [फा.] ॰परवा-पर्वा-वि. निष्काळजी; निर्भय; बेगुमान. [फा.] ॰परवाई-पर्वाई-स्त्री. निष्काळजीपणा; बेगुमानी; स्वैरावृत्ति. [फा. बी + पर्वाई; तुला॰ सं द्विप्रव्राजिनी] ॰पाया- वि. गैरकायदा; नियमाविरुद्ध. ॰फंदी-वि. १ व्यसनी; दुराचारी; स्वैर. बेशुद्ध. २ खट्याळ; उच्छृंखल; खोडकर (मूल). ॰फाम-वि. १ बेसावध; बेशुद्ध. २ निश्चिन्त; गाफिल; अनावर; मस्त; तुफान; बेभान. 'शत्रू माघार गेला म्हणून बेफाम नाहीं, सावधच आहों.' -ख ७.३३१०. [फा. बी + फह्म्] ॰फामी-स्त्री. गैर- सावधपणा; गाफिली; निश्चिन्ती; खातर्जमा; दुर्लक्ष. ' या विश्वा- सावर बेफामी जाली याजमुळें दगाबाजीनें निघोन गेला. ' -दिमरा १.२५२. ॰फायदा-वि. गैरफायदेशीर; तोट्याचें; अव्यवस्थित. ॰फिकि(की)र-स्त्री. निष्काळजीपणा. -वि. १ निष्काळजी; बेपर्वा; अविचारी. २ निश्चिंत; निर्धास्त; संतुष्ट. [फा. बी + फिक] ॰फिकिरी-स्त्री. निष्काळजीपणा; गाफिली; निःशकपणा. ॰बंद- पु. अराजकता; शिस्तीचा अभाव; गोंधळ. 'हुजरातीमध्यें बेबंद सर्वथा हिऊं देऊं नये.' -मराआ १४ -वि. अव्यवस्थित; मुक्त; व्यवस्था, बंदोबस्त, कायदा, शिस्त इ॰ नसलेला; बेशिस्त; अराजक. [फा.] ॰बंदशाई-ही, बेबंदाई-बंदी-स्त्री. १ अव्यवस्था; गोंधळ; मोंगलाई; अनायकी; अंदाधुंडी; अराजकता. २ जुलूम. ' सांगुं किती दुनियेवर बेबंदी । ही मस्लत खंदी । ' -राला १०६. ॰बदल-वि. १ बदललेला. २ बंडखोर. 'गुलाम कादर- खान पादशहासी बेबदल होऊन... ' -दिमरा १.२००. [फा.] ॰बनाव-पु. भांडण; तेढ; तंटा; बिघाड. ॰बर्कत-स्त्री. अवनति; हलाखी; तोटा. [फा.] ॰बहा-वि. अमोल; किंमत करतां येणार नाहीं असें. [फा.] ॰बाक-वि. निर्भीड; बेडर. [फा.] ॰बाक-ग, बेबाकी-स्त्री. अशेष फडशा; कर्जाची पूर्ण फेड. -वि. निःशेष; संपूर्ण; कांहींहि शिल्लक, बाकी न ठेवतां फेडलेलें (कर्ज). [फा.] ॰बारत-स्त्री. बेइतबार; अविश्वास. ॰बुनियाद-बुन्याद-स्त्री. अन्याय; राखरांगोळी; नाश. 'आम्ही मदारुल महाम व फारांसीस तिघे मिळून इंग्रेजांची बेबुनियाद करूं.' -रा १०.१९९ [फा. बुनियाद् = पाया] ॰बुदी-बुद-स्त्री. १ नाश; खराबी; अभाव. २ नाबूद. [फा.] ॰भरंवसा-भरोसा-पु. अविश्वास; संशयितपणा; खात्री नसणें. [हिं.] ॰भरोशी-वि. खात्री किंवा भरंवसा अगर विश्वास ठेवतां येणार नाहीं असा; फसव्या. ॰मजगी-स्त्री. वितुष्ट; अरुचि; बेबनाव. 'पादशहांची व गुलामकादार यांची बेमजगी होऊन... 'दिमरा १.१९९. [फा.] ॰मनसबा-मन्सबा- पु. अविचार; खराब मसलत. [फा.] ॰मब्लग-मुब्लक- मोब्लक-वि. असंख्य; अपरिमित. [अर. मब्लघ्] ॰मारामत- स्त्री. नादुरुस्ती. 'आरमाराची बेमरामत जाली.' -वाडसमा २.१९५ -वि. नादुरुस्त; दुरुस्तीची जरूर असलेलें; दुरुस्तीवांचून असलेलें; अव्यवस्थित. [फा.]॰ मर्जी-स्त्री. इतराजी; अवकृपा; मर्जीविरुद्ध वर्तन. [फा.] ॰मलामत-वि. कीर्तिवान्. [अर. मलामत = दूषण] ॰मस्लत-स्त्री. अविचार. ' स्त्रीनायक, बालनायक आणि बेमस्लत, तीन गोष्टी येके ठिकाणीं; चौथा अहंकार; तेव्हां ईश्वर त्या सर्दारीची अब्रू ठेवील तर ठेवो. ' -खपल २.७० [फा.] ॰मान-मानी-मानकी-गी-बेइमान इ॰ पहा. ॰मानगिरी - स्त्री. बेइमानी; हरामखोर. ॰मार-वि. १ किंवा हल्ला करतां न येण्यासारखा (किल्ला). २ अतिशय; कमालीचा; जोरदार; विपुल; भरपूर, बेसुमार इ॰. उदा॰ बेमार-पाऊस-वारा-ऊन्ह-धूळ- लढाई-पीक-धान्य-आंबे इ॰ (पडतो-सुटला-पडतें-उडते-चालती-झालें-पिकले इ॰ क्रियापदांस जोडून उपयोग). ३ आजारी; दुखणाईत. ४ थकलेला; दमलेला; बिमार. ५ (व.) वस्ती नसलेलें; उपयोगांत नसलेलें (घर, वस्तु). [फा.] ॰मारी-स्त्री. १ आजार; आजारीपण; दुखणें. २ शिणभाग; थकवा; अशक्तता. ॰मालूम- वि. माहीत न होण्याजोगें; दिसणार नाहीं, ओळखतां येणार नाहीं, शोधतां येनार नाहीं असें; जाणण्यास कठिण; हुबेहुब. 'नवीन माहितीचा जुन्या पद्धतीशीं बेमालूम सांधा जोडणें कठिण आहे.' -टि ४.२७१ [हिं.] ॰मुनासीब-मुनास्रब-वि. अयोग्य; गैरवाजवी; बुद्धीला न पटणारे; अयुक्त. [हिं.] ॰मुन्सफी-स्त्री. अन्याय. 'हिंदू मुसल्मान, ईश्वराचे घरचे दोन्ही धर्म चालत असतां मुसल्मानानें हिंदूचे जाग्यास उपद्रव करावा हे बे-मुन्सफी.' -पया १० [फा.] ॰मुरवत-मुर्वत-क्रिवि. असभ्यपणें शिष्टाचाराला सोडून; भीड, पर्वा इ॰ न बाळगतां. [फा.] ॰मुरवत-ती, ॰मुर्वत-ती-वि. कठोर; निर्दय; निर्भीड; निर्भय; बेमुलाजा. [फा.मुरुवत् = माणुसकी] ॰मुलाजा-मुलाहिजा- क्रिवि. कांहीं न पाहतां; दयामाया सोडून; निष्ठूरपणें; बेमुर्वतपणें. [अर.मुलाहझा = पर्वा, विचार] ॰मोताद-वि. बेसुमार; असंख्य; अपरिमित. [अर. मुअत्द्द = संख्या, परिमित] मोयीं(ई)न- मोइनी-मोहीन-वि. १ अनियमित; ठरावबाह्य. २ अपरिमित; असंख्य. [फा. बी + मुअय्यन्] ॰मोहर-स्त्री. बिन शिक्क्याचें; शिक्का नसलेलें; गैरमोहरबन्दी.'कित्येक दफ्तरें सर्वमोहर व कितेक बे-मोहरेची.'-रा, खलप २.९. [फा.] ॰मोहीम-- वि.मोहीम न करणारा; उपजीविकेकरतां किंवा धंद्या-उद्योगा- करितां खटपट न करणारा; घरबशा; बाहेर न जाणारा. [फा.] रंग-पु. विरस; खराबी; मौजेचा (मान, कींती, सौदर्य इ॰चा) भंग; अपमान; फजीति. -वि. ज्याचा रंग बिघडला आहे असा. [हिं.] ॰राजी-वि. असंतुष्ट. [फा.] ॰रुख्सत-क्रिवि. पर्वा- नगीवांचून. [अर. रुख्सत् = परवानगी] ॰रू(रों)ख-पु. १ दुसरी- कडे तोंड फिरविणें; दिशा बदलणें. २ प्रेमाचा अभाव. -वि. अप्रसन्न; उदासीन; रुष्ट; विन्मुख. [फा. रुख् = दिशा] ॰रोजगार-री- वि. निरुद्योगी; बेकार; रिकामा. [फा.] ॰लगाम-मी-वि. १ लगाम नसलेला. २ लगामाला दाद न देणारा. ३ (ल.) अनियंत्रित; स्वैर; मोकाट; बेताल. ४ आडवळणी; जाण्यायेण्यास सोयीचें नसलेलें; एकीकडे असलेलें; गैरसोयीचें (शेत, घर). -क्रिवि. एकीकडे; एका बाजूला; आडरस्त्यावर. [फा. बी + लिगाम्] ॰लगामीं पडणें- १ भलत्या मार्गाला लागणें; बहकणें; स्वैर बनणें. २ हयगय होणें; आबाळ होणें. ॰लाग-पु. निरुपायाची किंवा नाइलाजाची स्थिति. 'माझा बेलाग झाला.' -वि. १ जो घेण्याला किंवा ज्यावर मारा करण्याला कठीण आहे असा; दुःस्साध्यं; अवघड; बळकट (किल्ला). २ दुःस्साध्य; दुराराध्य; अप्राप्य; आचरण्यास कठीण असा (विषय). ३ सुधारण्याला कठीण; निरु- पायाचा; दुःसाध्य (रोग, विषय). -क्रिवि. १ मदतीवांचून; उपायावाचून; निरुपायानें; नालाजानें. २ निराधार; आधारावांचून. ३ तडकाफडकीं; ताबडतोब; एका क्षणांत. [फा. बी + म. लागणें] ॰वकर-वक्र-वि. फजीत; मानखंडित; अपमानित. [फा. बीवकर्] ॰वकरी-स्त्री. मानखंडना; अप्रतिष्टा; निर्भर्त्सना. [फा.] ॰वकूब (फ)बेकूब-वि. मूर्ख; खुळसट; अजाण; अडाणी अज्ञान. [फा. बेवकूफ] ॰वकूबी-फी-स्त्री. मूर्खपणा; मूढता. ॰वजे-स्त्री.(व.) गैरसोय; गैरव्यवस्था; गैररीत; विलक्षण प्रकार. [बिवजेह] ॰वतन- क्रिवि. हद्दपार; जलावतन. [अर. वतन् = जन्मभूमि] ॰वसवसा- वस्वसा-वस्वास-क्रिवि. निर्भयपणें; निश्चिन्त; शांतपणें; बे- दिक्कत; निर्भीडपणें. [अर. वस्वास, वस्वसा = भीति, काळजी] ॰वारशी-वारशीक-वारीस-वि. ज्यावर कोणाचा हक्क, वारसा नाहीं असा; निवारशी; योग्य हक्कदार, मालक किंवा वारसा नसलेला. [अर. वारिस् = वडीलोपारर्जित संपत्तीचा हक्कदार] ॰वारसा-पु. वारसाहक्क नसणें; वारस नसणें. ॰वारा-पु. कर्ज- फेड; कामकाज उरकून टाकणें; उलगडा; सांठा, पैसाइ॰ चा निकाल लावणें. [हिं.] ॰शक-वि. १ निर्धास्त; निःशंक; धीट. २ निर्लज्ज. -क्रिवि. १ निःशंकपणें; बेलाशक; निःसंशय २ निर्लज्जपणें. [फा. बी + शक्क्] ॰शरम-श्रम-वि. निर्लज्ज; पाजी; निलाजरा [फा. बे + शर्म्] ॰शरमी-श्रमी-स्त्री. निर्लज्जपणा; पाजीपणा. ॰शर्त- स्त्री. बिनशर्तपणा. -क्रिवि. बिनशर्त; अट न ठेवतां; आढेवेढे न घेतां. [अर. शर्त् = अट, नियम] ॰शिरस्ता-पु. गैरवहिवाट; गैररीत; वहिवाटीच्या विरुद्ध. [फा. सर्रिश्ता = वहिवाट, नियम] ॰शिस्त-स्त्री अव्यवस्था -वि. गैरशिस्त; अव्यवस्थित; अनि- यमित (मनुष्य, वर्तन, भाषण). [फा.] ॰शुद्ध-वि. गैरसावध; (मूर्च्छा इ॰ कांनीं) शद्धिवर, भानावर नसलेला; धुंद; अचेतन; जड. [फा. बी + सं. शुद्धि] ॰शुभह-क्रिवि. निःसंशय. 'बेशुभह शिकस्त खाऊन फरारी होतील.' -पया ४८२.[फा] ॰शौर- वि. बेअकली; मुर्ख; बेवकूब. [अर शुऊर् = अक्कल] ॰सतर- वि. अप्रतिष्ठित; मानखंडीत. [अर. सित्र = पडदा] ॰सनद- सनदी-वि. बेकायदेशीर; सनदेविरहीत. 'श्रीमंत दादासाहेब येऊन त्या उभयतांसी सलूक करणार नाहींत व बेसनद पैसाही मागणार नाहींत.' -रा ६.३८२. ॰समज-पु. (ना.) गैरसमज. -वि. अडाणी. [हिं.] ॰सरंजाम-वि. सामुग्रीविहीन; शिबंदी शिवाय. [फा.] ॰सरम-स्त्रम-(अशिष्ट) बेशरम पहा. ॰सावध- वि. १ लक्ष नसलेला; तयार नसलेला; निष्काळजी; गैरसावध. २ बेशुद्ध; शुद्धीवर नसलेला. [हिं.] ॰सुमार-वि. अमर्याद; अति- शय; अपरिमित; मर्यादेच्या, अंदाजाच्या बाहेर. [फा. बीशुमार्] ॰सुमारी-स्त्री. अपरिमित. ॰सूर-वि. बदसूर; सुरांत नस- लेला (आवाज-गाण्याचा, वाजविण्याचा). [हिं.] ॰हंगाम-पु. १ अवेळ; भलता काळ-वेळ. २ (ल.) दंगा. 'हे बेहंगाम कर- णार.'-ख १२०५. [फा.] ॰हतनमाल-हतन्माल-हन- तमाल-पु. बेवारशी म्हणून सरकारांत जमा झालेला माल, संपत्ति. [फा. बी + तन् + माल्] ॰हतन-मावशी--स्त्री. बेहतनमाल व बटछपाई या संबंधींच्या कामाचें खातें. ॰हतर-हत्तर-हेत्तर- वि. अधिक चांगले; श्रेयस्कर.[फा. बिह्त्तर; तुल॰ इं. बेटर] ॰हतरी-हेत्तरी-स्त्री. बरेपणा; सुधारपणा. ॰हद-द्द-स्त्री-स्त्री. परा- काष्ठा; अमर्यादपणा; अतिशयितता; बेसुमारपणा. -वि अतिशय; पराकाष्टेचा; बेसुमार; अमर्याद; निःस्सीम. [फा. बी + हद्द] ॰हया, हय्या-वि. उद्धट; निर्लज्ज; बेशरम; निलाजरा. [फा.] ॰हाल- पु. दुर्दशा. -वि.दुर्दशाग्रस्त; दुःखार्त. 'चिमट्यानें मांस तोडून बेहाल करून मारिला.'-जोरा ८५. [फा. बी + हाल्] ॰हिक्मत- स्त्री. मुर्खपणा. [हिं.] ॰हिम्मत-ती-स्त्री. भ्याडपणा. [हिं.] वि. हतधैर्य; भ्याड; भित्रा. ॰हिसा(शे)ब-वि. १ अयोग्य; गैरविचाराचें; अनुचित. २ अगणित; हिशोबाबाहेरील; हिशोब करतां येणार नाहीं असें. [फा.] ॰हुकूमी-स्त्री. अवज्ञा; बंडखोरी. ॰हुजूर-क्रिवि. १ एखाद्याच्या गैरहजेरीत. २ (चुकीनें) एखा- द्याच्या समक्ष. [फा.] ॰हुर्म(रम)त-ती-स्त्री. अप्रतिष्ठा; मान- खंडना; अपमान; अकीर्ति. -वि. मानखंडीत; पत घालवून बसलेला; मान नाहींसा झालेला. [फा.] ॰हुशार-वि. गाफील; गैरसावच. ॰हुशारी-स्त्री. बेसावधपणा; गाफिलगिरी. [फा.] ॰होश-ष- वि. बेशुद्ध; धुंद; तर्र; गाफील; मुर्ख; विचारशक्ति नाहींशी झालेला. [फा. बीहोश्] ॰होशी-स्त्री. बेशुद्धी.

दाते शब्दकोश

बे-

[फा. बी] वांचून; अभाव दाखविणारा उपसर्ग.

फारसी-मराठी शब्दकोश

बे-बुदी; बे-बूद

(स्त्री.) नाश; खराबी. “मनस्वी उपसर्ग गांवास लागोन गांवची बेबुदी जाहली” (खरे ९६६).

फारसी-मराठी शब्दकोश

दस्तक

(पु.) [फा. दस्तक्] पर्वाना; लायसेन्स. “ऐशास मार्गानें जकातीविशीं वगैरे हरएक विशीं उपसर्ग होऊं नये. ये विशीं दस्तक द्यावें” (खरे ८|४२४९).

फारसी-मराठी शब्दकोश

दुर्      

अ.       दुष्टपणा; वाईटपणा, कठीणपणा, दुःख इ. च्या वाचकशब्दापूर्वी योजावयाचा उपसर्ग. उदा. दुराचार = वाईट वर्तणूक; दुर्लभ = मिळण्यास कठीण. इ. याची संधिनियमानुसार दुर्, दुस्, दुष्, दुश् इ. रूपे होतात.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

हरगी(घी)ज-स

क्रिवि. १ हरहमेश; नेहमीं. 'तेथें तुम्हांकडून उपसर्ग हरगी, होऊं नये.' -वाडदुबा. २ मुळींच; बिलकूल. 'सप्तरसीचा त्ह हरगीस होत नाहीं.' -पेद ६.१९०. 'जे मजला मानिती । माझ्या विचारें वर्तती । ते हरगीस झोला न पवती ।' -रामदिवटा ६. [फा. हर्गिझ्]

दाते शब्दकोश

जात

क्रिवि. गुणविशेषणाचे पूर्वी जोर येण्यासाठीं एक या शब्दासह लाविलेला उपसर्ग. जसें-एकजात पांढरा-पिवळा-मऊ = पूर्ण पांढरा पूर्ण पिवळा, पूर्ण मऊ. [जात = प्रकार]

दाते शब्दकोश

झळ बडविणें

उपसर्ग लागणें.

दाते शब्दकोश

कानू

स्त्री. १ (कायदा) अट; नियम; ठराव. म्ह॰ कान द्यावा पण कानू देऊं नये (ही म्हण खंडकर्‍यांत प्रचलित आहे) = कांहीं झालें तरी नवीन कराचें ओझें येऊन पडूं नये म्हणून यत्म करावा. 'त्यांनीं अशी कानू कधीं आपणावर चढवून घेतली नाहीं ते आतां कसें कबूल करितील.' -ख २.६१३. २ हक्क; रीत; वहिवाट. 'कान देऊं पण कानू सोडणार नाहीं.' ३ बाजारांत विक्रीला आलेल्या जीन्नसावरील द्यावयाचा कर, पट्टी. 'हल्ली सालोसाल नजरेची कानू गांवगन्नास बसविली ते दूर करावी.' -ऐटि २.४१. ४ नियम; कायदा. 'पूर्वापार यास माफ असतां हालीं कानू करावयास कायी गरज.' -रा २०.३६०. [अर. कानून्; तुल॰ इं. कॅनन] ॰कनात-स्त्री. चाल; रीत; कायदा; हक्क. ॰काननात-कर, पट्टी वगैरे. 'वेठी, जेठा व बाजे कानू-कान- नातीचा उपसर्ग न देणें.' -रा २०.३६०. [कानू + काननात (कानुन्चें अव.)] ॰कायदा-पु. (राजशासन) कायदेकानू, नियम, ठराव वगैरेनां समुच्चयानें योजितात. [कानू + कायदा] ॰जापतापु. सरकारी कायदेकानूंचें पुस्तक, कोड. कानूंचें पुस्तक. ॰बाब-स्त्री. एक कर. पूर्वीं मराठी मुलुखांत जमीनदार हा कर बसवीत असत.

दाते शब्दकोश

कानूकाननात      

स्त्री. अव.       कर, पट्टी वगैरे : ‘वेठी, जैठा व बाजे कानूकाननातीचा उपसर्ग न देणें.’ - मइसा २०·३६०.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कानू-काननात

(स्त्री.) [अ. कानूनात् अनेक व. कानूनचें] पट्टी. “वेढी, जेठा व बाजे कानू-काननातीचा उपसर्ग न देणें” (राजवाडे २०।३६०).

फारसी-मराठी शब्दकोश

कड      

अव्यय धातू. शब्दयोगी अव्ययासारखा वापरला जाणारा ‘बाजू’ या अर्थाचा अव्यय धातू. त्याला १. समीपतादर्शक इ− , दूरत्वदर्शक ति, संबंधदर्शक जि− आणि प्रश्नदर्शक कुणी− हे उपसर्ग लागून स्थलवाचक अव्यये बनतात. २. चा, ला, ईल, ऊन आणि ए हे प्रत्यय लागून शब्दयोगी अव्यये बनतात. जसे :– तिकडचा, तिकडला, तिकडील, तिकडून, तिकडे इ. आणि गावाकडचा, घराकडला, शहराकडील, पूर्वेकडून इ. [काते. कडे] कडई रांद्या      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कडका      

पु.       १. अतिशयपणा; तीक्ष्णपणा; भर; तीव्रता (उन्ह, थंडी इ. चा). २. एकाएकी झालेली तीव्र वेदना (अंग भाजले, प्लॅस्टर घातले असताना होते तशी.). ३. कडकडाट; गर्जना (मेघांची); दणदणाट; खडखडाट; घोष; गजर (अनेक वाद्यांचा) : ‘टाळी भजनाचा करवूनि कडका ।’ – दावि २६८. ४. जोराचे भांडण; रागाचा आवेश : ‘आला क्रोधाचा कडका ।’ – दावि ३१४. ५. ओरडा; रड (अतिवृष्टी, अनावृष्टी, दुष्काळ, साथ, परचक्र वगैरेबद्दल), पहा : कडाखा व तडाखा ६. त्रास; उपसर्ग : ‘त्याचा कडका त्यांनी कुणाला लावू दिला नाही.’ – आआशे १८२.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कु

कु       उपसर्ग. वाईटपणा दाखविणारे, अपकर्ष सुचविणारे अव्यय. हे समासात नामांच्या पूर्वी योजतात : ‘आणि कुकर्मी संगति न व्हावी ।’ – ज्ञा २·२६६. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कु      

उपसर्ग. वाईटपणा दाखविणारे, अपकर्ष सुचविणारे अव्यय. हे समासात नामांच्या पूर्वी योजतात : ‘आणि कुकर्मी संगति न व्हावी ।’ – ज्ञा २·२६६. [सं.] कु      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खेकटे      

न.       रोगाची साथ; पीडा; उपसर्ग.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खेंकटें

न. १ उलाढाल; बेत; मसलत; युक्ती; उपाय; उपजीविकेसाठीं अंगिकारलेलें पंचाइतींचें काम किंवा लचांड. 'संसार चालविण्यासाठीं हजार खेंकटीं करावीं लागतात.' २ अडचण; अड; नड; लचांड; कचाट; कुलंगडें; उपाधि; व्याधि; पीडा (कुटुंब, कारखाना, मनुष्य यांची). ३ तुफान; बालंट. ४ गोंधळ; गुंतागुंत; घोटाळा (कामाचा). (क्रि॰ करणें; होणें; उलगडणें; निस्तारणें). 'त्वां माझ्या कामाचें खेंकटें केलें परंतु त्यानें माझ्या कामाचें खेंकटें उलगडलें किंवा निस्तारिलें.' ५ रोगाची साथ; पीडा; उपसर्ग. 'खोकल्याचें-पडशाचें-तापाचें-खेंकटें' [सं. संकट-षंकट-खंकट-खेकटें?] ॰खोर-खेंकट्या-वि. हिकमती; उलाढाल्या; (पोटासाठीं) खेंकटीं करणार. खेंकट्यास मेंकटें-शेरास सव्वा शेर.

दाते शब्दकोश

खेटा      

पु.       धक्काबुक्की; मारामारी : ‘...किल्ल्यावरून व पेठेजवळून शेंपनास गोळे मारावे, याप्रमाणें खेटे जाले.’ - ऐलेसं ४३८०. (वा.) खेटा करणे - कटकट करणे; उपसर्ग देणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खिसा      

पु.       १. हिंसाचार; दंगा : ‘लोक असलिया खिसा होईल म्हणून गावांतच राहवून दिवाण, लोक व गोत यैसे तिसाचालिसाक जणानसी वेस (वेशीस) जाऊन बसले.’ - शिचसाखं २·१६६. २. बोलाचाली; तंटा; उपसर्ग; त्रास : ‘तनखेविषयींचा जाब बोलून खिसा झाला.’ - होकै २. ३. गत; स्थिती; अवस्था. (व.) पहा : खिस्सा [फा. किस्सा]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खिसा

पु. १ बोलाचाली; तंटा; उपसर्ग; त्रांस. ' तनखे- विषयींचा जाब बोलून खिसा झाला. ' -हौकै २. २ (व.) गत; स्थिति , अवस्था. खिस्सा पहा [अर. किस्सा]

दाते शब्दकोश

नड      

स्त्री.       १. अडथळा; प्रतिबंध; हरकत; अडचण. २. उपाधी; त्रास; उपसर्ग; उपद्रव. (क्रि. पडणे, होणे). ३. गरज (क्रि. काढणे). [सं. नड्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नड

स्त्री. १ अडथळा; प्रतिबंध; हरकत; अडचण; व्याघात; व्यवधान. २ उपाधि; त्रास; उपसर्ग; उपद्रव. (क्रि॰ पडणें; होणें). 'त्याच्या घरीं पाव्हण्यांची नड फार आहे.' ३ गरज. (क्रि॰ काढणें). 'माझी एवढी नड काढाल तर पहा.' [सं. नड् = गर्दी, दाटी होणें, सांचणें]

दाते शब्दकोश

नडाव

पु. (क्व.) १ अडचण; नड; प्रतिबंध; अडथळा. २ त्रास; उपद्रव; उपसर्ग. [नड]

दाते शब्दकोश

निर्

एक अव्यव आणि उपसर्ग. याचे कांहीं अर्थ. १ खातरी; हमी; आश्वासन. २ नकार; अभाव. [सं.]

दाते शब्दकोश

निर

(सं) एक उपसर्ग, ह्याचा उपयोग नकारार्थीं किंवा अतिशयार्थीं होतो.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

परि

एक संस्कृत उपसर्ग, प्रत्यय. हा अर्थ धातु आणि धातु- साधित नामें यांना लागतो. याचे कांहीं अर्थ:-१ जिकडे तिकडे; सभोंवार; चहूंकडे. 'परितः' 'परित्वा' परिभ्रमण' २ आणखी; खेरीज. 'परिपाक' 'परिपाठ' ३ विरुद्ध; उलट. 'परिच्छिन्न' ४ अतिशय; फार. 'परिशुद्ध' ५ परिपूर्ण. 'परिपक्व' इ॰.

दाते शब्दकोश

प्रति

एक उपसर्ग (अभि याच्या उलट). याचे अर्थ पुढीलप्रमाणें होतात. १ ऐवजीं; बदला; च्या जागीं. २ प्रत्येकीं; दर एकास. 'प्रतिगृहास पांच पांच रुपये दिले.' ३ दिशा; उद्दिष्ट स्थल; कडे, दिशेनें; वर. ४ परत; माघारीं; पुन्हां. ५ तुल्य; समान; तद्रूप; प्रमाणें. 'तो ब्राह्मण प्रतिसूर्य आहे.' -शअ. दिशा, गमनोद्दिष्ट दाखविणारा प्रत्यय. स; ला; कडे; प्रत पहा. 'योजी हिताप्रति निवारुनि पापकर्में ।' -वामनस्फुट श्लोक-नवनीत १४६. [सं.]

दाते शब्दकोश

(सं) श० प्रत, कारणें. २ एक उपसर्ग: हा, प्रत्येक, प्रतिकूल, उलट, ह्या अर्थी येतो; जसें, प्रतिवर्ष, प्रतिस्पर्धी, प्रतिध्वनि.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

प्रतिपाल / प्रतिपाळ

(सं) श० प्रत, कारणें. २ एक उपसर्ग: हा प्रत्येक, प्रतिकूल, उलट ह्या अर्थी येतो; जसें प्रतिवर्ष, प्रतिस्पर्धी, प्रतिध्वनि.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

फकडी

स्त्री. १ फुलांच्या पाकळ्यांची रांग, ओळ किंवा घेर. २ ऐकरी पाकळीचें फुल किंवा फुलझाड. उदा॰ जास्वंद. ह्याच्या उलट गेंद. -वि. १ संख्यावाचक उपसर्ग लावून बनणारें विशेषण. जसें:-एक फकडी = ऐकरी पाकळ्यांचें , दुफकडी = दुहेरी पाकळ्याचें; तिफकडी; चौफकडी, बहुफकडी; अनेक फकडी इ॰ २ ऐकरी पाकळीचें.

दाते शब्दकोश

सह

उपसर्ग. याचा अर्थ १ संगति; संबंध; साहचर्य. २ जोड; संयोग; योग. ३ वाढ; आधिक्य. ४. पूर्णता; पुरतेपणा; संपू- र्णता.-क्रिवि. बरोबर; संगतीनें; जोडीनें. ॰कार-कारिता-पुस्त्री. सहाय्य; मदत; भागीदारी (काम करण्यांत, क्रिया करण्यांत). ॰कारीपु. सहाय्यक; मदतनीस; सोबती; भागीदार; जोडीदार. ॰कारी पतपेढीस्त्री. अनेक लोकांनीं संयुक्त जबाबदारीवर व पतीवर कर्ज काढून परस्परांस साह्य करण्याकरितां चालविलेली पेढी. ॰कारी-मंडळ-मंडळी-संस्था-नस्त्री. अनेक लोकांनीं मिळून एकत्र सामुच्चयिक जबाबदारी कार्य करण्याकरितां चालविलेली संस्था, ॰गमन-न. १ सती जाणें; पतीबरोबर स्त्रीनें त्याच्या चित्तेवर स्वतःस जाळून घेणें; पती दूर मरण पावला असल्यास पळसाच्या पानांच्या वगैरे त्याच्या प्रतिमे- बरोबर चितारोहण करणें. २ (सामान्यतः) बरोबर जाणें; संग- तीनें जाणें; सोबतीनें जाणें. ॰चर-पु. सांगाती; सोबती; मित्र. 'सहचरु मनोधर्मु । देवाचा जो ।' -ज्ञा १७.३३. -वि. बरो- बर जाणारा. ॰चरी-स्त्री. १ पत्नी; लग्नाची बायको; २ मैत्रीण; सखी; सोबतीण. ॰चारिणी-स्त्री. धर्मपत्नी; स्त्री; (लग्नाची) बायको. ॰धर्मचरिणीस्त्री. पत्नी; विवाहित स्त्री; लग्नाची बायको. ॰धर्मिणी-स्त्री. पत्नी; विवाहित स्त्री. ॰पान-न. एकत्र पिणें; एकत्र पान करणें. ॰भागीदार-पु. एकत्र कुटुंबांतील भागीदार; पातीदार; वांटेकरी. ॰भोजन-न. पंक्तिव्यवहार; एकत्र भोजन; एका पंक्तींत अन्नग्रहन करणें. ॰मरण-न. सहगमन; सती जाणें. ॰यात्रा-स्त्री. सहगमन. 'साध्वीची सहयात्रा म्हणती ।' -मोमंभा १.६८. ॰वर्तमान- शअ. बरोबर; सहित; संगतीनें; जोडीनें. ॰वास-पु. १ एकत्र राहणें; साहचर्य; एक ठिकाणीं राहणें. २ परिचय; मैत्री; ओळख; संगत. ॰वासणें-उक्रि. १ एकत्र राहणें; संगत, सोबत असणें; उपयोगांत, असणें; नोकरी, चाकरी निमित्त जवळ राहणें. २ परिचय, सराव, संवय होणें; निकट सहवास, उपयोग इत्यादी- मुळें स्वभाव, गुणधर्म, गुणदोष इ॰ माहीत होणें; अनुभव येंणें. ॰वासीवि. १ निकट राहणारा. २ एक ब्राह्मण पोटाजात. ॰संपादक-पु. दुय्यम संपादक; संपादकाचा मदतनीस, सहायक 'दिवेकर हे मराठा पत्राचें सहसंपादक आहेत.' -के २७. ५.३०. ॰सवेदन-न. एकदम ज्ञान, जाणीव होणें; दूर अंतरावर असलेल्या दोन व्यक्तींच्या मनांत एकच विचार येणें, एकाच प्रका- रची स्फूर्ति होणें; विचारांची देवाण घेवाण होणें. (इं.) टेलीपथी. -साक्रेटीस संवाद १६३. ॰हिस्सेदार-पु. समाईक कुटुंबांतील भागीदार. सहाध्यायीपु. बरोबर अध्ययन करणारा; सम- कालीन विद्यार्थी; गुरुबंधु. सहानुभाव, सहानुभूति-पुस्त्री. वर्ण्यवस्तूशीं तद्रूपता; वर्ण्य वस्तूस होणारे भाव स्वतःस होणें. सहोक्ति-स्त्री. एक अलंकार, मुख्य गोष्टीबरोबर आनुषंगिक गोष्टीचा चमत्कारजनक उल्लेख. सहोढपु. विवाहबरोबर येणारा मुलगा; विवाह करतेसमयीं पूर्वपतीचा किंवा उदरांत असणारा मुलगा; द्वादशविध पुत्रांपैकीं एक. सहोदरवि. एकाच आईच्या पोटीं जन्मलेला; एकोदर; समानोदर; सख्खा (भाऊ). 'माय बाप तुका म्हणे सहोदर । तोंवरीच तीर न पावतां ।' -तुगा ४६. 'जें काळकूटाचें सहोदर ।' -ज्ञा १०.१९२.

दाते शब्दकोश

सम्

संस्कृत उपसर्ग. याचे अर्थ. १ संयोग; मिलाफ; युक्तता; सहवास. उदा॰ संयोग, संमेलन. २ जमाव; समूह; संधान. उदा॰ संग्रह, संभार. ३ सौंदर्य; शोभन; उत्कृष्टता; ऋजुता. उदा॰ संमार्जन. ४ प्रकृष्टता; आतिशय्य; प्राशस्त्य; प्राचुर्य. उदा॰ समाराधन, संदीपन. ५ साहचर्य; एकसमयत्व. उदा॰ संगति, संमति.

दाते शब्दकोश

शंसक, शंसा, शंसणें, शंसित, शस्त

काव्यांत नित्य येणारे हे शब्द, नेहमींच्या प्रचारांत 'प्र' हा उपसर्ग लागून येतात. उदा॰ प्रशंसक वगैरे पहा. [सं. शंस् = स्तुती करणें]

दाते शब्दकोश

शूद्र

पु. चातुर्वंण्यांतील चवथा वर्ण व त्या वर्णांतील व्यक्ति. इतर तीन वर्ण ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य हे होत. हा वर्ण विराट् पुरुषाच्या पायांपासून उत्पन्न झाला अशी समजूत आहे. २ (ल.) हा शब्द उपसर्ग रूपानें दुसऱ्या शब्दांस लाविला असतां त्या शब्दानें व्यक्त होणाऱ्या पदार्थाचा काळसर, धूसर, असा प्रकार दर्शविला जातो. उदा॰ शूद्र हिरा = काळसर, मंद तेजाचा हिरा. तसेंच शूद्र भांग-सबजी-पिंपळ = काळी भांग-सबजी-पिंपळ वगैरे. [सं.] ॰दोक-न. शूद्राचा स्पर्श झालेलें वस्त्र, पात्र, पाणी वगैरे [शूद्र + उदक] ॰मुखी-वि. १ पांढऱ्या कपाळाचा; कपा- ळास गंध नसलेला. २ पांढरे पायांचा व कपाळावर कोणतीहि खूण, चिन्ह नसलेला (घोडा). ॰लोक-वि. शूद्राचा स्पर्श झालेलें वस्त्र, पात्र, पाणी वगैरे. शूद्री-स्त्री. शूद्राची स्त्री; शूद्र जातीची स्त्री. -वि. शूद्रासंबंधीं, शूद्राचें (भाषा, वेष, रीत, विधि वगैरे). शूद्रोदक-न. शूद्रदोक पहा.

दाते शब्दकोश

ति

वि. (प्र.) तीन; संख्यावाचक उपसर्ग, प्रत्यय; जसें- तिमजला, तिकोनी = तीन मजल्यांचा, तीन कोपर्‍यांचा. [सं. त्रिः; प्रा. ति] सामाशब्द-तिकटणें-न. १ शेतामध्यें तीन बांध (वरोळ्या) एका ठिकाणीं असतात तें ठिकाण. २ तीन रस्ते एकत्र मिळ- तात तें ठिकाण. ३ तीन काठ्या वगैरे एकत्र बांधून केलेली रचना; तिकटी. [त्रिकूट] तिकटी-स्त्री. १ तीन काठ्या जुळवून केलेली एक त्रिकोणाकृति रचना. २ त्रिकोण. [सं. त्रिकाष्ठ; प्रा. तिकठ्ठ. त्रिकूट] तिकटें-न. १ लांकडी त्रिकोण (स्मशानांत अग्नि नेण्यासाठीं, विहिरीतून पदार्थ काढण्यासाठीं इ॰ केलेला तीन कामट्या, लांकडे यांचा). २ त्रिदळ; त्रिखंड पान (पळस, बेल, निगुडी इ॰चें). ३ तीन पानांची पत्रावळ. ४ (पंढरपूरकडे) तिफण; तीन नळकांड्यांची पाभर. ५ लांकडाची तिवई. (गो.) तीन काठ्यांची घडवंची. [सं. त्रिकाष्ठ; प्रा. तिकट्ठ. तुल. त्रिकूट] तिकडी-वि. तीन कड्यांची. 'जैं कहीं अवचटें । हे तिकडी सांखळ तुटे ।' -ज्ञा १६. ४३८. [ति = तीन + कडी] तिकळा-ळी-ळें-वि. तिखुळा पहा. तिकांडी-स्त्री. एक गवत. 'तिकांडी घोडेकुसळी ।' -गीता २. ५२८६. [ति = तीन + कांडें = पेर] तिकांडें-ढ्या-न. मृगशीर्ष नक्षत्रपुंजांतील तीन तारे; शिवाचा बाण. लुब्धक पहा. [सं. त्रिकांड] तिकुटी-स्त्री. त्रयी; तिघांची जोडी; त्रिकूट. 'गुणीं देवां त्रयी लाविली । गुणीं लोकीं तिकुटी पाडिली ।' -माज्ञा १८.८१७. [सं. त्रिकूट] तिकोनी-वि. तीन कोपर्‍यांचा-कोरांचा-कोनांचा. [सं. त्रिकोण] तिक्कई-स्त्री. तिर्खई; एकदम तीन तीन खडे घेऊन सागरगोटे; खडे इ॰ खेळण्याचा मुलींचा खेळ. याप्रमाणें दुर्खई; पांचखई इ॰ संज्ञा. [सं. त्रिक; म. तिक + ई प्रत्यय] तिक्कल- स्त्री. गंजिफांच्या खेळांत अनुक्रमानें लागलेलीं एकाकडे आलेलीं तीन पानें. तिक्का-पु. तीन चिन्हें असलेलें गंजिफांचें पान; तिव्वा. तिखणी-स्त्री. (घराचे) तीन खण, भाग. -वि. तीन खण अस- लेलें; तीन खणी (घर इ॰). [ति = तीन + खण] तिखळा-ळी- ळें-तिखुळा-ळी-ळें पहा. तिखुळा-ळी-ळें-वि. तीन मुलगे अथवा मुलींच्या पाठीवर झालेला (मुलगा, मुलगी किंवा सामा- न्यतः मूल). तिगस्त-न. १ गेल्या वर्षाच्या मागचें वर्ष. 'तिगस्त बाकी-वहिवाट इ॰.' २ गंजिफांच्या खेळांतील एक संज्ञा, डावां- तील एक विशिष्ट काल; गंजिफांच्या खेळांत तिन्ही खेळणारांचा एक तरी हात होणें. [तीन + फा. गस्त = गत] तिगस्तां-क्रिवि. गेल्याच्या मागील सालीं. [तिगस्त] तिगुण-वि. १ त्रिगुण. २ तिप्पट. [सं. त्रिगुण अप.] तिगुणी-वि. तिहेरी; त्रिगुणात्मक. 'जो अविद्येचिया चिंधिया । गुंडूनि जीव बाहुलिया । खेळवीतसे तिगुणिया । अहंकाररज्जु ।' -ज्ञा १८.९१५. तिघई-वि. तीन गस्ते असलेलें, एकापुढें एक तीन वठारें असलेलें (घर). तिघड- पु. (राजा) तीन आंबे, नारळ इ॰चा घड. तिघड-वि. (कों.) दर तीन लोटे बांधून झाले म्हणजे एक खापेकडाची जुळी वग- ळावी अशा रीतीनें लोटे बांधलेली (रहाटाची माळ). -क्रिवि. माळ तिघड होईल अशा रीतीनें (बांधणें). तिघडी-स्त्री. १ तिहेरी घडी (कापड, कागद इ॰ची). २ तिहेरी घडी घातलेली, तिपदरी वस्तु. -वि. तीन घड्या घातलेली. [ति = तीन + घडी] तिघस्त-न. तिगस्त अर्थ २ पहा. तिजवर-पु. १ तिसर्‍यांदा लग्न करीत असलेला माणूस. २ तीन लग्नें केलेला मनुष्य. [तिजा + वर] तिधारा-री-वि. १ तीन धारा-कडा असलेला. 'तिधारां अंदु फीटलियां । चरणींचिआ ।' -शिशु ७१६. २ तीन कांठ किंवा काड्या असलेलें (धोतर इ॰). [ति + धारा] तिधारी- निवडुंग-पुन. एक जातीचा निवडुंग. याच्या पेरास तीन कांट्यांच्या रांगा असतात; याच्या उलट फड्यानिवडुंग. तिधारें- न. नकसगाराचें एक हत्यार. तिपट-वि. (सामा.) तिप्पट पहा. तिपटी-स्त्री. तिप्पट संख्या अथवा परिमाण. तिपडें-न. (नाट्य) बकर्‍याचे केंस वळून गंगावनाच्या आकाराची स्त्री नटाकरितां तयार केलेली तीनपदरी वेणी. -पौराणिक नाटकाचा काळ. तिपदरी- वि. तीन घड्यांचें किंवा तीन पदर असलेलें (कापड; दोर इ॰). तिपाई-(व.) तीन पायांची घडवंची; तिवई. (बिडाचा कार- खाना) डेरा तयार करण्यासाठीं मातींत रोंवण्याचे लांकडी धीरे व गोलाकार लोखंडी गज. तिपाठी-वि. तीन वेळां वाचून, ऐकून पाठ म्हणणारा. तिपांडी-स्त्री. (कों.) तीन पांड भातजमीनीची प्रत्येक वीस पांडांच्या बिघ्यामागें रयतेस दिलेली जमीनीची सूट. तिपानी-स्त्री. एक लहान वेल. श्वास, व्रण, विष यांची नाशक. -वगु ४.१. -वि. तीन पानें असलेलें; त्रिदल (झाड, अंकुर). [सं. त्रिपर्णी] तिपायी-स्त्री. तिवई. -वि. तीन पाय असलेलें (जनावर; वस्तु). [तीन + पाय] तिपिकी-वि. एका वर्षांत तीन पिकें देणारी (जमीन). तिपुडी-वि. १ तीन कप्पे, खण असणारी (पेटी). २ तीन पूड असलेला मृदुंग. [सं. तिपुटी] तिपेडणें- सक्रि. तीन पेड देणें; वळणें. तिपेडी-ढी-वि. तीन पेडांनीं केलेली (दोरी, वेणी इ॰). तिपेरीस्त्री. नाचणीची एक हळवी जात. हिच्या काडास तीन पेरें आलीं म्हणजे कणीस येतें. -वि. तीन सांधे, पेरीं असलेलें (बोट इ॰). तिप्पट-स्त्री. तीन पट संख्या; तिप्पटपणा. -वि. १ तीनदां जमेस धरलेली (संख्या) त्रिगुणित. २ तीन घड्यांचे; तिपदरी (कापड इ॰) तिफण-णी-न.स्त्री. तीन नळ्या, फण असलेली पाभर, पेरण्याचें यंत्र. [ति + फण] तिफण- स्त्री. (व.) चार एकर (जमीन). तिफसली-वि. तीन पिकें ज्या जमिनींत निघतात ती जमीन. तिफांटा-पु. जेथें रस्ता, नदी. किंवा झाडाच्या खोडाच्या तीन बाजू फुटतात ती जागा. तिफांशी- सी-वि. १ तीन फाशांनी खेळावयाचा (सोंगट्यांचा एक खेळ). २ तीन फाशांनीं युक्त (दोरी इ॰). [ति + फास] तिबक-स्त्री. खेळांत विटी उडली असतां खालीं पडण्यापूर्वी दांडूनें तीनदां मारणें. 'हबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडूं । खेळू विटी दांडू ।' -भज ११३. [ति + ध्व. बक्?] तिबंदी-स्त्री. दोन वरखां (पानां) चा एक बंद याप्रमाणें तीन बंदांची केलेली कागदाची घडी. तिब्राद- वि. (पोर्तु.) तिप्पट. [पोर्तु. त्रेस्दो ब्रादो] तिमजला-ली- वि. १ तीन मजल्यांची (इमारत). २ तीन, तिहेरी काठांचा (शेला, धोतर इ॰). ३ तीन तळ (डेक) असलेलें (जहाज). तिय्यम-वि. तिसर्‍या दर्जाचें. 'दुय्यम, तिय्यम अधिकारी.' -सूर्यग्र ३४. तिय्या-पुस्त्री. (पत्त्यांचा खेळ). तिर्री; तीन ठिपक्यांचे पान. [ति = तीन] तिरकानी-रेघ-ओळ-स्त्री. कागदाच्या पडलेल्या चार मोडींपैकीं तीन मोडींमध्यें काढलेली रेघ. [सं. त्रि-तिर् + कान, रेघ] तिवई-स्त्री. १ तीन पायांची घडवंची; तिपाई. २ (कों.) तिवटें; भाताचीं रोपें उपटतांना शेतांत बसण्याठीं घेतात ती पायांची तीन घडवंची. तिपाई पहा. [सं. त्रिपदी; प्रा. तिवई] तिवटणां-(महानु) तीन वाटा मिळ- तात ती जागा; चौक; नाका; तिवठा. 'कलियुगाचा तिवटणां.' -भाए १०९. [सं. त्रि + वर्त्मन्; प्रा. तिवट्ट] तिवटी-स्त्री. (गो. कों.) अवयवाची वक्रता. 'पाय तिवटीं पडला.' [सं. त्रिवर्कि; प्रा. तिवट्टी] तिवटें-तिवई अर्थ २ पहा. तिवठा-पु. १ तीन रस्ते मिळतात ती जागा. २ तिवडा अर्थ १,२ पहा. [सं. त्रि + वर्त्मन्; प्रा. तिंवट्ट] तिव(वं)डा-पु. १ मळणी कर- ण्याकरितां खळ्याच्या मध्यभागीं पुरलेला खांब. 'हनुमंत तिवडा मध्यें बळें । पुच्छ पाथी फिरवितसे ।' -रावि २०.१९५. ३ शेतांत धान्य वारवण्यासाठीं उपयोगांत आणावयाची एक तीन पायांची घडवंची. ३ एक ताल अथवा गति. [सं. त्रि + पद] तिवण-१ त्रिदळ. २ तिहेरी घडी, पदर (कापडं, कागद इ॰ ची). तिव- णता-वि. (राजा.) तिघडी; तिहेरी; तिपदरी (कागद; कापड वगैरे). तिवणा-वि. तीन पानांचा; त्रिदळ. 'त्रिविध अहं- कारु जो एकु । तो तिवणा अधोमुखु । डिरु फुटे ।' -ज्ञा १५.९५. -एभा ११.१८८. [सं. त्रिपर्ण; प्रा. तिवण्ण] तिवधां-पु. अनेक गांवांच्या सीमा ज्या ठिकाणीं मिळतात ती जागा. [सं. त्रि + बंध किंवा वृंद; प्रा. तिबंद] तिवनी-स्त्री. (व.) (पळसाचें) त्रिदळ; तिवण. तिवनें-न. तिघांचा समुदाय. तिवनें-वि. तीन पानांचें. तिवण-णा पहा. [सं. त्रिपर्ण; प्रा. तिवण्ण] तिवल-पु. (तीन वेळ) दीड आणा. [तीन + वेळ = अर्धा आणा] तिवळी- स्त्री. (गो.) पोटावर पडणारी तीन वळ्यांची आठी. त्रिवळी पहा. [सं. त्रि + वली] तिंवा-पु. (गो.) दगडाचा अगर मातीचा केलेला चुलीचा पाय. २ तिव्हा; तिवई; तिनपायी; तिवारी (ज्यावर उभें राहून उपणतात ती). तिवडा अर्थ २ पहा. [सं. त्रि + पदा; प्रा. तिवय] तिवाट-ठा-पु. तीन रस्ते एकत्र मिळण्याची जागा. तिवठा पहा. फाटाफूट; ऐक्यभंग. 'केला तुवां देखत भर्तृघात । क्षणें तिवाटा रचिल्या तिघांत ।' -वामन, भरतभाव ७. [त्रि + वर्त्मन्; प्रा. तिवट्ट म. तिवाट] तिवारा-पु. (माळवी) तीन दारें असलेला दिवाणखाना. [सं. त्रि + द्वारिका; प्रा. ति + वारिआ; हिं. तिबारा] तिवारी-स्त्री. (व.) तिवडा अर्थ २ पहा. तिन- पायी (जीवर उभें राहून उपणतात ती) तिवा पहा. तिवाशी- वि. तीन वाशांचें केलेलें (घर, खोपट इ॰ उपहासार्थी). [तीन + वांसा] तिवाळ-स्त्री. एकसंध विणलेले तीन पंचे; तीन पंच्यांचें कापड; चवाळें पहा. तिवाळी-स्त्री. एक कापडाची जात. -मुंव्या १२३. [ति + आळें] तिवेती-वेत-वि. तीनदां व्यायलेली (गाय इ॰) [ति + वेत] तिवेळा-ळां-ळीं-क्रिवि. तिन्हीवेळां; सकाळीं, दुपारी, संध्याकाळीं; त्रिकाळ. तिव्वा-वा-पु. (गंजिफा, पत्त्यांचा खेळ) तिर्री; तीन ठिपके असलेलें पान. तिव्हडा, तिव्हा-पु. तिवडा अर्थ २ पहा. तिव्हाळ-पु. (महानु.) तीन रस्ते एकत्र होतात ती जागा; तिवाठा. 'तेथचि तिव्हाळां प्रकास- दर्शन ।' -ॠ ११८. तिशिंगी-वि. तीन शिंगांचा (पशु). [तीन + शिंग] तिशेंड्या-पु. (डोक्यावरच्या तीन शेंड्यांवरून) मारवाडी (निंदाव्यंजक शब्द). [ति + शेंडी] तिसडी-स्त्री. १ तीन वेळां अथवा तिसर्‍यांदा तांदूळ कांडणें. तिसडीनें सडणें. २ (ल.) बारीक चौकशी; छडा [तीन + सडणें] तिंसड-डा- डी-वि. तीन वेळ सडलेले (तांदूळ). [ति = तीन = सडणें] तिसढ-स्त्री. तिसर्‍यानदां करणें (काम इ॰) तिसड-वि. तीन थानांचें (जनावर). [तीन + सड] तिसाला-लां-विक्रिवि. लागो- पाठ तीन वर्षांसंबंधीं; तीन वर्षांकरितां; त्रैवार्षिक (हिशेब, बाकी इ॰). [हिं.] तिस(सा)रणी-स्त्री. तिसारणें पासून धातुसा- धित नाम. -क्रिवि. तिसर्‍यांदा. तिस(सा)रणें-सक्रि. तिस- र्‍यांदा करणें. -अक्रि. (कोंबडा) तिसर्‍यांदा आरवणें. [तिसरा] तिसुती-स्त्री. १ तिहेरी, तीन पदरी-फेरी दोरा; दोरी (जानवे इ॰ चा). 'तिसुतीला पीळ भरून झाला आहे, आतां नऊसुती करा- वयाची आहे.' २ तीन कुटुंबांचा आपापसांतील लग्नसंबंध. तिर- कूट अर्थ ३ पहा. -वि. तीन सुतांची, धाग्यांची, पदरांची (दोरी). [तीन + सुती] तिस्ती-स्त्री. (प्र.) तिसुती. (कों.) (जानव्याचें) पातीवर मोजलेलें सूत गुंडाळून ठेवतात ती गुंडाळी. [सं. त्रि + सूत्र, त्रिसुती] तिहोत्रा-पु. दरमहा दरशेंकडा तीन असा व्याजाचा दर. [तीन + उत्तर]

दाते शब्दकोश

उद्, उत्      

अ.       एक उपसर्ग. १. वरचढपणा; श्रेष्ठत्व; वर्चस्व. उदा. उत्तर, उद्‌वाहन, उद्‌गार, उद्दिष्ट. २. वियोग; विभाजन; बिघाड; दूरीकरण; अपसारण (पासून-मधून). उदा. उत्सर्जन, उत्क्षेपण. ३. वर; ऊर्ध्व; उंच. उदा. उत्थान, उत्तिष्ठ. [सं. उद्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उद्-त्

एक उपसर्ग अर्थ-१ वरचढपणा; श्रेष्ठत्व; वर्चस्व. उ॰ उत्तर; उद्वाहन; उद्गार; उद्दिष्ट. २ वियोग; विभाजन; बिघाड; दूरी- करण; अपसारण; (पासून-मधून). उ॰ उत्सर्जन; उत्क्षेपण. ३ वर; ऊर्ध्व; उंच. उ॰ उत्थान; उत्तिष्ठ. [सं. उद्; तुल. झें उश्; हि. उअस् = ओस्-ओइस्]

दाते शब्दकोश

उजूर      

पु. पहा : अरुता, आक्षेप. १. सबब; सबब सांगण्याचा हक्क; विरोध : ‘देव मजूर देव मजूर । नाहीं उजूर सेवेपुढें ॥’- तुगा ३७००. २. तक्रार; आक्षेप : ‘उजूर असेल तरी हुजूर एणें.’ -मइसा १५·१५९. ३. अडथळा; उपसर्ग; हरकत; विलंब : ‘सेवकास आज्ञा होईल त्या आज्ञेस उजूर नाहीं.’ -मइसा १०·२२६. ४. हक्क; अधिकार; वाजवी काम. ५. खोळंबून राहणे; विचार करणे; वर पाहणे. ६. अपेक्षा : ‘परंतु पट्टणाहून दुसरे परवाना यावयाचे उजूर करून ठेविले आहे’ -ऐलेसं ३९८१.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उप

अ. एक उपसर्ग-अर्थः १ अनुगमन. उ॰ उपदेश, उपा- लंभ. २ अधिकपणा. उ॰ उपपरार्ध. ३ हीनपणा; गौणत्व. उ॰ उपत्नी, उपपत्नी, उपपुराण. ४ कमी प्रतीचा, तीव्रतेचा, गुणाचा. (इं.) हायपो; हा अम्लांत किंवा त्या रसायनांत (प्राणवायूचा) कमीपणा आहे असें दाखवितो. उ॰ नत्रस अम्ल (नायट्रस अॅसिड) पेक्षां उपनत्रस अम्ल (हायपोनायट्रस अॅसिड) हें कमी अम्लजन असतें. ५ समीपता; सान्निध्य. उ॰ उपकंठ, उपनदी, उपांत्य. ६ पहिले- पणा. उ॰ उपक्रम. ७ दाक्षिण्य; आदर. उ॰ उपचर्या. ८ साम्य. उ॰ उपधातु, उपव्याघ्र. ९ शेवट; नाश. उ॰ उपरति. १० विकार उ॰ उपलेप. ११ स्वीकार. उ॰ उपागम, उपाकर्म. १२ व्यापणें. उ॰ उपहास. १३ समूहत्व; संमेलन; संकलन. उ॰ उपार्जन. १४ शक्ति. १५ अध्ययन; अध्यापन; उ॰ उपाध्याय. १६ उद्योग. १७ कडे; वर; खालीं. उ॰ उपनयन. १८ निरर्थक म्हणूनहि कधीं हा उपसर्ग लागतो. अप या उपसर्गाचे कांहीं अर्थ याचेहि आहेत.

दाते शब्दकोश

उपाधि

(सं) स्त्री० त्रास, उपसर्ग. २ विशेषण, पदवी.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

पुस्त्री. १ शुद्धस्वरूप पदार्थावर अन्यरूपता भासवि- ण्यास कारणीभूत असणारें पदार्थांतर. उ॰ रंग द्रव्यानें पाण्यास रंगीत स्वरूप येतें, येथे रंगद्रव्य हा उपाधि होय. 'आकारविशेषरूप उपाधि झाला म्हणजे सुवर्ण अंलकारादि व्यपदेश पावतें.' २ कोणेका पदार्थापासून विलक्षण कार्य उत्पन्न होण्यास प्रयोजक असें कांही एक; (सामा.) कारण, उत्पादक, प्रवर्तक, परिणामकारक, कार्य- कारक गोष्ट. उ॰ अग्नीपासून धूर होतो त्यास आर्द्रेंधनसंयोग उपाधि होय. ३ प्रसंग; कारण; निमित्त; प्रयोजन. ४ विशेष गुण- धर्म; गुणविशेष. ५ पदवी; टोपण नांव; अन्वर्थक नांव; विशेषण (आवडीनें किंवा उपहासानें दिलेलें). ६ (वेदांत) जग; माया; बाह्यपाश; संग. 'करिती नावडतेयां त्याग । उपाधींचे ।' -ज्ञा १७. ३६२. ७ प्रपंच; संसार. 'जीवु तैसा उपाधि । आवडे लोकां ।' -ज्ञा ४.२१. ८ विकार; विचार. -आगमसार पंचिका १.२.५०. ९ त्रास; अडथळा; उपसर्ग; अडचण; आपत्ति; संकट; भानगड; लचांड; लिगाड. 'रायाच्या मनीं नव्हतें, पडूं नये उपाधीला ।' -ऐपो ४१०. 'राजकीय बाबतींत अशा उपाधी म्हणजे लोकांचा असं- तोष, आग्रह...ह्याच होत.' -टि ३.२५९. १० (रामदासी) चळ- वळ; खटपट. 'उपाधीसी विस्तारावें । उपाधींत न सांपडावें ।' -दा ११.५.९. 'सांकडीमधें वर्तों जाणे । उपाधीमधें मिळों जाणे ।।' -दा ११.६.१३. [सं.] ॰निरास पु. उपाधि नाहींशी करणें.

दाते शब्दकोश

उपाधि, उपाधी      

पु. स्त्री.       १. पदार्थाच्या स्वरूपात, प्रकृतिधर्मात बदल घडवून आणणारे द्रव्य, वस्तू. उदा. रंगद्रव्याने पाण्यास रंगीत स्वरूप येते. येथे रंगद्रव्य हा उपाधी होय. २. एखाद्या पदार्थापासून विशेष कार्य निर्माण होण्यास कारणीभूत असे काही एक; (सामा.) कारण, उत्पादक, प्रवर्तक, परिणामकारक, कार्यकारक गोष्ट. उदा. अग्नीपासून धूर होतो त्याला आर्द्रेंधनसंयोग उपाधी असे म्हणतात. ३. प्रसंग; कारण; निमित्त; प्रयोजन. ४. विशेष गुणधर्म; गुणविशेष. ५. (वेदांत) जग; माया; बाह्यपाश; संग : ‘करिती नावडतेया त्याग । उपाधीचा ॥’ –ज्ञा १७·३६२. ६. प्रपंच; संसार : ‘जीवु तैसा उपाधि । आवडे लोकां ॥’–ज्ञा ४·२१. ७. विकार; विचार. ८. त्रास; अडथळा; उपसर्ग; उपद्रव; अडचण; आपत्ती; संकट; भानगड; लिगाड : ‘रायाच्या मनीं नव्हतें, पडूं नये उपाधीला ।’ –ऐपो ४१०. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उपद्रव

उपसर्ग, पीडा, झंझट, भुर्दंड, क्लेश, कष्ट, उच्छाद, भुणभूण, गांजवणूक, टुमणे, झक्कू, कटकट, टोचणी, आग्रह, नेटा, जोरा, लचांड, गंडांतर, कर्मकटकट, परपीडा शुक्लकाष्ठ, दुःखास कारण, विनाकारणचें बाळंतपण, फुकट भागोटा, नसते विघ्न, व्यर्थ शीण व झीज, सौख्यास तडा, पायांतला कांटा, शरीरक्लेशास-मनोव्यग्रतेस कारण, मनाला ताण, गळ्यांतली घोरपड, उशाशी साप, जोड्यांतला विंचू , निखारा, त्रासाचें मूळ, हे संकट, ही वाहती जखम, हे उलट्या तोंडाचे गळू, यांच्यापासून 'काका मला वांचवा' म्हणण्याची वेळ येते, नसते खेंगटें, तोंड बांधून बुक्क्यांचा मार, हा आडून गोळीबार, छळणे, गांजणे. त्रास देणे, सतावणे, पीछा करणे, पीडा देणे, त्रस्त करून सोडणे, जाच करणे.

शब्दकौमुदी

उपसळी      

पु. १. उपसर्ग; त्रास; उपद्रव; उद्वेग

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उपसळो

पु. १ उपसर्ग; त्रास; उपद्रव; उद्वेग (उंदीर, मांजर, कुत्रा वगैरेपासून होणारा). २ कटकट; त्रास (मुलें वगैरेंचा); छळवाद; सतावणी; (क्रि॰ आणणें; देणें). [सं. उप + शल्य]

दाते शब्दकोश

उत्      

अ.       एक उपसर्ग. वर, उंच, बाहेर, श्रेष्ठ या अर्थी शब्दास जोडतात. उदा.- उत्क्रांती, उत्तीर्ण इ. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

वि

१ शब्दाच्या पूर्वीं लागणारा एक उपसर्ग. हा (अ) वियोग, असंधान (उदा॰ विगतस विघटन); (आ) पराङ्मुखता, प्रतिकूल्य (उदा॰ विसदृश, विमनस्क); (इ) जाति, भेद (उदा॰ विभाग), (ई) वैरुध्य; वैपरीत्य (उदा॰ विलोम), ह्या अर्थांचा द्योतक आहे. २ केव्हां केव्हां स्पष्टाकरणार्थ अगर निरर्थकहि जोडतात. ३ वैशिष्ट्य; आधिक्य (उदा॰ विनिपात; विहित). 'विनिर्मिलें झांकण अज्ञतेचें ।' -वामन, स्फुटश्लोक ४ (नवनीत पृ. १३३). [सं.]

दाते शब्दकोश

विधान

न. १ स्थापना; आधान; स्वाधीन करणें; ठेवणें; कर्तव्य. 'तेथें राजा कौंडण्यपती । विधान स्थिति करितसे ।' -एरुस्व ५.१४. 'पलंगी पुतळ्याचें करा ग विधान ।' -प्रला १३९. २ सांगणें; कथन; अस्तिनास्ति पक्षीं म्हणणें मांडणें. 'धर्म- शिक्षणाची आवश्यकता नाहीं असें बेधडक विधान करणें या सारखें धाडस नाहीं.' -केले १.१४९. ३ आदेशणें; नियम घालणें, स्थापित करणें. ४ आज्ञा; नियम; अनुशासन. 'मनुष्यावाचूनि विधाना । विषय नाहीं ।' -ज्ञा १५.१७८. ५ (कार्यास, कृत्यास, कामास) लावणें; नेमणूक; योजना. 'जे ते वैदिक विधानीं । योग्य म्हणौनि ।' -ज्ञा १८.८१९. ६ विधि; पद्धति; क्रिया. उदा॰ पूजाविधान; होम विधान; व्रत विधान. 'यज्ञीचें विधान सरे ।' -ज्ञा ४.१५०. 'प्रायश्चित्ताची विधानें । सांगेन ऐका स्थिर मनें ।' -गुच २८.८०. ७ (व्या.) उपसर्ग, प्रत्यय लावणें. [सं. धा = ठेवणें]

दाते शब्दकोश

विपसळो

पु. (विरू.) उपसळो; उपद्रव; पीडा; त्रास (उंदीर, कुत्री वगैरेचा). [सं. उपसर्ग]

दाते शब्दकोश

वर्दळ

स्त्री. १ त्रास; उपसर्ग. वरदळ पहा. २ वापर. ३ येजा; राबता. ॰घालणें-वाद, भांडण करणें. 'मेलमनच्या हातचा भात व बिस्कुटें झोडून श्रीशंकराचार्यांशीं वर्दळ घालीत बसण्यांत कांहीं अर्थ नाहीं.' -आगर ३.१४३.

दाते शब्दकोश

वेध

पु. १ मोती, माणिक इ॰ ना भोंक पाडण्याची क्रिया, छिद्र करण्याची क्रिया. २ छिद्र; भोंक; वेज. ३ भेद; दृष्टि, बाण, गोळी इ॰ नीं एखाद्या लक्ष्यावर केलेलां परिणाम; लक्ष्य पदार्था- वर झालेला परिणाम. ४ सूर्यग्रहणाच्या पूर्वी चार प्रहर आणि चंद्रग्रहणाच्या पूर्वी तीन प्रहर अशी धर्मशास्त्राप्रमाणें असलेली ग्रहणसंबंधीं दोषाची व्याप्ति. या कालांत भोजन इ॰ निषिद्ध आहे. ५ (ज्यो.) खस्थ पदार्थांचें क्षितिजापासून किंवा खस्वस्तिका- पासून असलेलें कोनात्मक आणि कालात्मक अंतर. ६ मुख्य तिथिनक्षत्राचा दुसर्‍या तिथिनक्षत्राच्या त्या दिवशीं सकाळीं किंवा संध्याकाळीं असणार्‍या अंशात्मक भागानें येणारा गुणदोष- प्रयोजक संबंध. 'आज मंगळवारी दशमी तीन घटिका आणि एकादशी पडली सत्तावन घटिका म्हणून ह्या एकादशीला दशमीचा वेध आहे.' ७ सप्तशलाकादि चक्राचे ठायीं एकशलाकादिगत जीं नक्षत्रादिक असतात त्यांतून एकीकडचे नक्षत्रांदिकांवर जो कोणीं ग्रह असतो त्याचा दुसरीकडचे नक्षत्रादिकांवर जो दृष्टिपात असतो तो. एका नक्षत्रानें दुसर्‍यासमोर येण्यानें होणारा परिणाम. (एक वस्तु दुसर्‍या समोर अगदीं समरेघेंत आली असली म्हणजे तें अशुभ मानतात. यामुळें घराचा दरवाजा व दिंडीदरवाजा हे समोरा समोर नसतात, किंवा एक खिडकी दुसरीच्या समोर नसते). (यावरून पुढील अर्थ). ८ अटकाव; अडचण; विरोध; उपसर्ग; पाय- बंद; अडथळा. जातो खरा पण वेध न आला म्हणजे बरा.' ९ एखाद्यावर असलेल्या कार्याच्या भारामुळें, काळजी-यातनामुळें त्याला स्वतंत्रपणें वागतां न येणें. 'प्रपंचाचा वेध ज्याच्या पाठी- मागें आहे त्याला खेळ-तमाशे कोठून सुचतील ?' १० चाल लेल्या कामांत अडथळा आल्यानें झालेला खोळंबा.' माझ्या कामांत वेध आला.' ११ काळजी; निकड; चिंता; घोर; पुढें करावयाच्या गोष्टीचें आधीं लागलेलें व्यवधान. 'ह्या कामाचा मला वेध असा लागला कीं रात्रीं मला झोंप आली नाहीं.' १२ ध्यास; छंद; नाद; आकर्षण; चटका; ओढा.' जडें पाटीं धावैती वेधें । आनंदे ढुलति चतुष्पदें ।' -ऋ ३६. -ज्ञा १३.४१०. -एरुस्व ६.५. -तुगा ११७. १३ तळें, विहीर इ॰चा खोलपणा. १४ प्रवेश; शिरकाव. 'एक एकासीं होय वेध । परि प्राप्तीविण नव्हे बोध ।' १५ नेम (बाण इ॰ चा). १६ सूक्ष्म, लक्ष- पूर्वक अवलोकन; ठाव घेणें. १७ चित्ताकर्षकपणा. 'वेधे परि- मळाचें वीक मोडे । जयाचेनि ।' -ज्ञा ६.१५.१८ चिंतन. -ज्ञा १८.९६१. [सं. विध् = छिद्र पाडणें] ॰घेणें-करणें-दुर्बीण इ॰ साधनांनीं खस्थपदार्थाची स्थिति, गति, इ॰ मापणें किंवा ठरविणें, अवलोकन करणें.

दाते शब्दकोश

वेळ

पुस्त्री. १ कालविभाग; काळ. २ आतांचा काळ व कांहीं कार्य होण्याचा काळ यांमधील अवकाश, अंतर. 'पेरे होण्यास अझून वेळ आहे म्हणून अधीं घरें शाकारून घ्या.' ३ फुरसत; न गुंतलेला, रिकामा वेळ. 'माझे पाठीसीं काम आहे वेळ सांपडल्यास येईन.' ४ अपेक्षित किंवा योग्य कालापेक्षां जास्त काळ; उशीर (क्रि॰ लावणें, लागणें). 'मला शाळेंत जाण्यास वेळ झाला.' 'वेळ लावला-ली, वेळ लागला-ली.' ५ (स्त्री.) समय; हंगाम; विशिष्ट काल. 'ही वेळ पोथी वाचा- वयाची नव्हे.' ६ दिवसाचा अर्ध भाग; सकाळ किंवा दुपार. ७ तीस घटिकांच्या (रात्रीं किंवा दिवसां.) आठ विभागांपैकीं एक. अमृत, उद्योग, काळ (मृत्यु), चंचळ (चोर), रोग, लाभ, शुभ आणि स्थिर वेळ. यांखेरीज इतर पुष्कळ प्रकारच्या वेळा आहेत, उदा॰ अंधेरी-घोर-घात-राक्षस-वेळ, जाती-येती वेळ इ॰. ८ मुहूर्त. ९ प्रसंग; संधी. -क्रिवि. वेळां पहा. 'तो दिव- सास तीन वेळा जेवतो.' [सं. वेला] ॰दवडणें-व्यर्थ, निष्फळ वेळ घालविणें. ॰मारून नेणें-प्रसंगीं कमीपणा येऊं न देणें; युक्तीनें प्रसंग साजरा करणें; वाणी राखणें. 'केवळ शब्दामात्रें वेळ मारून न नेतां कृति करून दाखविली पाहिजे.' -निचं. ॰वाहणें-बरें किंवा वाईट होण्यास समय अनुकूल होणें. सामा- शब्द- ॰अवेळ-स्त्री. उचित किंवा अनुचित, अनुकूल किंवा प्रतिकूल असा काळ, प्रसंग (विवक्षित कामाविषयींचा). 'वेळ अवेळ आहे चार रुपये जवळ अधिक अंसु द्या.' -क्रिवि. वेळ किंवा अवेळ न पाहतां; वाटेल त्यावेळीं. 'वेळ अवेळ बाहेर जातोस परंतु एथें पिशाचांचा उपद्रव भारी आहे.' ॰काळ-पु. काळ- वेळ पहा. (क्रि॰ येणें; जाणें; गुदरणें; पडणें; टळणें). वेळा काळाला कामास येणें-प्रसंगविशेषीं, अडीअडचणीला उपयोगी पडणें. वेळणेवारचा, वेळणेवारी-विक्रिवि. वेळेप्रमाणें; वेळेनुसार; वेळेच्या चांगल्यावाईट गुणांप्रमाणें व भाषा किंवा कृति याच्या प्रकारानुसार घडणारी (गोष्ट इ॰). अनिष्ट परि- णामाच्या, कृतीच्या, वचनाच्या प्रसंगीं योजतात. 'वेळणेवारचा उगाच तूं बोलतोस काय म्हणून.' [वेळ आणि वार] ॰(अ)न- सार-(वेळेनसार) -वेळेनुसार पहा. ॰नावारीं-क्रि. बरी- वाईट वेळ न पाहतां. वेळअवेळ पहा. म्ह॰ वेळ ना वारीं गाढव आलें पारीं. [वेळ + ना + वार] ॰प्रसंग-पु. काळकल्ला, बळकुबल, वेळअवेळ पहा. ॰भर-क्रिवि. १ सारा दिवस; वरचेवर. 'वेळ भर करसी वेरझारा धाक याचा वाटे मजप्रती ।' -होला ९८. २ अर्धा दिवस पर्यंत. ३ बऱ्याच वेळपर्यंत. ॰मारणारा-माऱ्या- वि. समयसूचक; प्रसंगावधानी. ॰वारींक्रिवि. वेळवारीं पहा. ॰साधणारा-साधु-वि. १ संधी साधून काम करणारा. २ वक्तशीर. वेळा-स्त्री. १ हंगाम; समय; विशिष्ट काळ. २ आवृत्ति- वाचक गणनाकाळ. वेळां-क्रिवि. संख्याचक किंवा गुणवाचक उपसर्ग लावून आवृत्ति दाखविण्यासाठीं योजतात. उदा॰ एक- तीन-बहुत-किती-वेळां. 'एक वेळां सोसीन, दोन वेळां सोसीन, तिसऱ्यानें बोलशील तर तोंडांत खाशील.' वेळाईत-वि. वेळेवर, संकटप्रसंगीं सहाय्य करणारा, मदततीस धांवणारा; कैवारी. -विउ ११.२८. 'तुका म्हणे देव भक्तां वेळाईत । भक्त ते निश्चित त्याचि यानें ।' -तुगा २२७५. [वेळ + आगत ? तुल॰ सिं. वेलाइतो = वेळेवर] वेळपत्रक-न. आगगाड्या, आगबोटी, शाळा इ॰ च्या कार्याचा वेला दाखविणारा तक्ता. (इं.) टाईम-टेबल. वेळाप्रकाशक-पु. (गणित) पट दाखविणारी संख्या; वार संख्याक; गुणक. वेळायित-वेळाईत पहा. 'धावला राघव वेळायितु ।' -दावि १४३. वेळावणें-अक्रि. आबाळणें; वेळेवर गरजेच्या गोष्टी न मिळाल्यानें खंगणें (पीक, जनावर, मूल इ॰). वेळवेळ-स्त्री. १ वेळअवेळ पहा. २ (क) विलंब; उशीर. 'तो अलीकडे वेळावेळानें येऊं लागला आहे.' [वेळ + अवेळ] वेळेन(नु)सार-क्रिवि. १ वेळ, प्रसंग याला अनु- सरून. २ वेळप्रसंगीं; कधींकधीं. वेळेवारचा-वि. वेळेवर अस- लेला. कधीं वेरेवाळचा असा अशुद्ध प्रयोग येतो. वेळेवारीं- क्रिवि. योग्य वेळीं; वेळ टळण्याच्या आधीं; वेळेचा अतिक्रम न होतां. 'तुला चाकरी सोडणें असल्यास वेळेवारींच सांग, नाहींतर आयते वेळेस फसवशील.' वेळोवेळां-क्रिवि. १ वरचेवर; वारं- वार. २ वेळ येइल त्याप्रसंगीं; प्रत्येक वेळीं. [वेळ द्वि.]

दाते शब्दकोश