आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
संबंधित शब्द
गोहो
पु. १ (घरगुती भाषा) नवरा, पति; घो. 'सुखें वोळंब दावी गोहा । माझे दुःख नेणा पाहा ।।' -तुंगा २९५७. २ बाप्या; तरणाताठा, वयांत आलेला माणूस, गोखमा. ३ वस्ताद; मारतापीर; मारक 'मी त्याचा गोहो आहे. मजपुढें येऊं द्या.' 'हें औषध पित्ताचा गोहो आहे.' ४ तोडीस तोड; शेरास सव्वाशेर; सवाई. [सं. गोध = पति. गुह्; प्रा. दे. गोह = योद्धा, पुरुष, मुखिया]
दाते शब्दकोश
घो-घोव
पु. (रा. बे. गो.) १ नवरा. २ पुरुष; गोहो पहा. [प्रा. गोह = पुरुष, जार]
दाते शब्दकोश
शुदामद, शुदामत
स्त्री. वहिवाट; पद्धति; चाल. 'कान- गोह याचे दप्तरी शुदामद आहे.' -रा ६.५५४. [फा. शुद + आमद]
दाते शब्दकोश