आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
जाया, जायां, जांयां
वि. क्रिवि. १. नष्ट. २. खराब; नादुरुस्त : ‘नळ पाण्याचा जागा जागा जाया झाला आहे.’ - समारो १·३४. ३. घायाळ; जखमी : ‘परंतु कोणी जाया जखमी जालें नाहीं.’ - ऐलेसं ८·४३९०. ४. निरुपयोगी : ‘वांझेच्या मैथुनापरी गेले वायां । बांडेल्याचें जायां जालें पीक ।’ - तुगा ३०४६. [अर.] (वा.) जाया देणे, जायां देणे, जांयां देणे - (गाय, दागिने, मालमत्ता इ.) आंदण देणे. (ही देणगी टाकून दिल्यासारखी असते म्हणून).
जाया
स्त्री. बायको; भार्या; पत्नी. 'त्या दुष्टोक्तिश्रवणें धर्माची संकटीं पडे जाया ।' -मोसभा ५.३. 'असे तयाची मग मुख्य जाया ।' -सारुह २.४. [सं.] ॰पती-पु. नवराबायको; दांपत्य. [सं.]
जाया f A wife, the wife of.
जाया jāyā f (S) A wife, the wife of.
(सं) स्त्री० बायको, विवाहित स्त्री, भार्या. २ (फा) वि० जायबंदी, निरुपयोगी.
(वि.) हिंदी अर्थ : बरबाद. मराठी अर्थ : नष्ट.
जाया
स्त्री. बायको; भार्या; पत्नी : ‘त्या दुष्टोक्तिश्रवणें धर्माची संकटी पडे जाया ।’ - मोसभा ५·३. [सं.]
जाया
[अ. झाइअ] नादुरुस्त, घायाळ, निरुपयोगी बिघडलेला. “नळ पाण्याचा जागा जागा ज़ाया झाला आहे” (वाड-समा १1३४). “शेवटी हिन्दूस हिन्दू मिळून काम जाया करितील” (सभासद ३२). जाया-जखमी = घायाळ. “परन्तु कोणी जाया-जखमी जालें नाहीं” (सरे ८ ९०).
नटामाजी नेटकी जाया
नटामाजी नेटकी जाया naṭāmājī nēṭakī jāyā f (The guise of a lovely woman as assumed by a male actor). A term for an object highly attractive but unreal or unattainable.
जाया, जायास
क्रिवि. उसनवट; उसने म्हणून.
संबंधित शब्द
जाया-जायां, जांयां
विक्रिवि. १ नष्ट. २ खराब; नादुरुस्त. 'नळ पाण्याचा जागा जागा जाया झाला आहे.' -वाडसभा १.३४. ३ घायाळ; जखमी. 'परंतु कोणी जाया जखमी जालें नाहीं.' -ख ८.४३९०. ४ निरुपयोगी. 'वांझेच्या मैथुनापरी गेलें वायां । बांडेल्याचें जायां जालें पीक ।' -तुगा ३०४६. [अर. झाइ = नष्टं] ॰देणें-(गाय, दागिने, मालमत्ता इ॰) आंदण देणें. (ही देणगी टाकून दिल्यासारखी असते म्हणून]
बायको
स्त्री० स्त्री,औरत, आऊ, भार्या, जाया.
चोट
स्त्री. १. तडाखा; घाव; दुखापत; शस्त्राने, मुष्टीने केलेला प्रहार; बुक्की; गुद्दा. २. (ल.) हल्ला; धाड. (व.) ३. (ल.) (व्यापारातील, धंद्यातील) धस; तोटा; नुकसान; दुर्दैवाचा घाला. (क्रि. लागणे.) : ‘जब कमाई न होय । चोट साहे धनकी रे ।’ − तुगा ४२९. ४. दैवयोगाने झालेला अकल्पित लाभ; अनपेक्षित रीतीने झालेला फायदा; लाभ. (क्रि. साधणे, लागणे, लावणे.) ५. गारुडी व गावगुंड यांच्या खेळात परस्परांवर डाव लागू झाल्यामुळे होणारी वेदना. ६. (सामा.) जखम; व्यथा : ‘इष्काची काळजामध्ये लागली चोट जी जी I’ − प्रला १९३. [हिं.] (वा.) चोट चालविणे − हल्ला करणे, घाव घालणे, जखम करणे. : ‘पर्वतीस पंतप्रधानांनी वाघावर हत्ती घालून सेर केले. येके हातीने वाघावर चोट चालऊन जाया केले.’ − ऐको ३८६.
दुख(खा)विणें
उक्रि. १ दुर्भाषण, अपकार इ॰ कानीं मनु- ष्यास व्यस्थित करणें, दुःख देणें. २ खणणें, उकरणें, चेंगरणें, खर- डणें, खापलणें, कापणें इ॰ प्रकारें इजा करणें; शारीरिक पीडा देणें. ३ (फळें, झाडें, जमीन इ॰) पृष्ठभागावर किंचित जाया करणें. [दुःख]
गावी
न. परभाणाच्या वर डोलकाठीच्या कळशी- जवळचें शीड. 'गावी परबान जाया झालें.' -थोमारो ९. २३६.
गावी
स्त्री. (नाविक) परभाणाच्या वर डोलकाठीच्या कळशीजवळचे (बहुधा मोठ्या गलबताला लावण्याचे) शीड : ‘गावी परबान जाया झालें.’ –थोमारो ९·२३६.
जाई
स्त्री. बायको : ‘पतीच्या शापाने शिळा झाली अहिल्याबाई । रामाच्या स्पर्शाने उद्धरली गौतमाची जाई’ – जलोसा २४४. [सं. जाया]
जायां, जायास
क्रिवि. उसनवट; उसनें म्हणून. [जाणें] जाया(यां)चा-वि. परत करावयाचा; उसना घेतलेला; जाणें, जायजणा पहा. 'आतां जायांचें जैसें लेणें । आंगावरी आहाच- वाणें ।' -ज्ञा ९.४१२. जायाचा दागिना-ची वस्तु-पुस्त्री. (ल.) मुलगी.
जायबंदा
(फा) वि० निकामी, निरुपयोगी, जाया.
कचकणें
उ० वि० वचकणें, भिणें, घाबरणें. २ मोडणें, जाया होणें.
कमाणगार, कमानगार
पु. १. धनुष्यबाण तयार करणारा. २. हाडवैद्य : ‘खाले माकणीवर पडोन मांडी जाया जाली, मग कमानगार आणोन बांधली.’ - मइसा ३·११२. [फा.]
कुंडली
कुंडली kuṇḍalī f (S) pop. कुंडळी f A figure divided into square, triangular, or circular spaces, drawn to exhibit the position of the sun, planets, and constellations. The twelve ग्रह of कुंडली are तनु, धन, सहज, सुहृत, सुत, रिपु, जाया, मृत्यु, धर्म, कर्म, आय, व्यय. 2 Semicircular or other lines drawn to include parentheses &c., brackets. 3 m S A snake; a circle or ring; a coil; and numerous things of like form.
कुंडली-ळी
स्त्री. १ सूर्य, ग्रह, नक्षत्र यांची दशा दाख- विण्याकरितां चौरस, त्रिकोनी अथवा वर्तुळाकार भाग पाडलेली आकृति. हिचे तनु, धन, सहज, सुहृत्, सुत, रिपु, जाया, मृत्यु, धर्म, कर्म, आय,व्यय असे बारा भाग किंवा कोष्टकें असतात; राशीचक्र. २ प्रक्षिप्त वाक्य दाखविण्यासाठीं काढलेला कंस व इतर रेषा. ३ (गो.) लहान कुंडी. ४ (खा.)वर्तुळाकार व मध्यें भोंक असलेली चापट चक्की, (भोंक पाडण्यासाठीं). ५ कुंडलिनी पहा. 'हें असो तें कुंडली । हृदयांआंतु आली ।' -ज्ञा ६.२७४. -पु. सर्प. 'त्या मणि प्रकाशीत वारुळीं । बैसले किती थोर कुंडली ।' (नवनीत पृ.४२१.) कडी, वर्तुळ, वेटाळें व यांसारख्या इतर अनेक वस्तू. -वि. ज्याच्या कानांत कुंडलें आहेत असा. [सं.]
खंगार, खंगाळ
वि. १. अशक्त; दुर्बल; जाया झालेला; वयोमानाने क्षीण झालेला. (माणूस, प्राणी, झाड.) २. वाईट; नापीक; फलहीन (देश, शेत, पीक वगैरे.).
खंगार-ळ
वि. १ अशक्त; दुर्बल; जाया झालेला; वयो- माननें क्षीण झालेला (माणूस, प्राणी, झाड). २ वाईट; नापीक; फलहीन (देश, शेत, पीक वगैरे). [खंग]
खटारा
पु. गलबताचा एक प्रकार : ‘चार खटारे जाया होते तरी दहा नवे केले जाते.’ - पेद ३३·२२.
लटका
वि० खोटा, असत्य, झूट. २ रिकामा. ३ निरुपयोगी, जाया.
मचवा
पु. एक प्रकारचें लहान गलबत; बलावापेक्षां मोठी होडी. 'बेलापूर येथील बातमीचा मचवा जाया झाला आहे.' -समारो ३. २२०. [पोर्तु. मांचुआ]
मधिलेमालीं
क्रिवि. मधल्यामध्यें; दरम्यान; मध्येंच. 'हें सामान साहेबांचे पदरीचे मधिलेमाली जाया होतें.'-पेद १९.६५. [मध्य.]
नभ
पुन. १ आकाश; अंतराळ; अस्मान. -ज्ञा १४.९. 'नादें कोंदलें अंबर । शब्दकार नभ झालें ।' -एरुस्व ६.२९५. २ मेघ; ढग. [सं. नभस्] ॰कट-न. अभ्रखंड; लहान ढग. 'नभ- कटें धुकंटें कट पाभळी ।' -दावि ८६ ॰चुंबित-वि. गगनचुंबित; आकाशाला भिडणारा; अत्यंत उंच. [नभ + सं. चुंबित] नभस्तल- न. आकाश. [सं. नभस् + तल = तळ] नभ(नभो)मंडप-पु. (काव्य) आकाशरूपी मंडप. 'नभमंडप तेणें उजळला ।' [नभस् + मंडप] नभोमंडल-न. (काव्य.) ज्यांत मेघ संचार करितात तो अंत- राळाचा भाग; आकाश. 'होमधूमशामळें । जालें नभोमंडल काळें ।' [स्. नभस् + मंडल] नभोवाणी-स्त्री. आकाशवाणी. ऐसें वदोनि उठली जाया तों जाहली नभोवाणी । दुष्यंता काय करिसि समजावी अपुली सती राणी ।' -मोंदि ११.७९. [सं. नभस् + वाणी = बोलणें]
नट
पु. १. एक जात व त्यातील व्यक्ती; डोंबारी; कोल्हाटी; बहुरूपी नट. हा स्त्रिया इ.चा वेष धारण करून नाचणे, दोरीवर चालणे, उड्या मारणे इ.अनेक प्रकारचे खेळ करून उपजीविका करतो. नाच्या पोऱ्या; सोंगाड्या. २. (नाट्य.) नाटकात स्त्री–पुरुष भूमिकेचे काम करणारा मनुष्य, पात्र. ३. नटण्याची सवय, स्वभाव असलेला मनुष्य. ४. उनाड, व्रात्य, कपटी, हरामी मनुष्य : ‘ठस ठोंबस खट नट । जगभांड विकारी ।’ – दास २·३·३२. ५. चेष्टा; हावभाव : ‘वदतां रददीप्तिस दावि नटें ।’ – अकक २ किंकरकृत शुकरंभासंवाद २०. ६. वेष; अवतार; रूप; सोंग : ‘धरोनिया रुद्राचा नट । नंदीवरी जाहला उपविष्ट ।’ – कथा २·१२·२४. [सं.] (वा.) नटामाजी नेटकी जाया– (सुंदर पुरुषनटाने स्त्रीवेष धारण केला तरी तो जसा कृत्रिम असतो व त्या भूमिकेतील तशी सुंदर स्त्री जशी दुर्लभ असते त्यावरून) दिसण्यात अतिशय सुंदर पण बनावट व दुर्लभ अशी वस्तू.
नट
पु. एक जात व तींतील व्यक्ति; डोंबारी; कोल्हाटी; बहुरूपी; नट हा स्त्रिया इ॰ कांचा वेष धारण करून नाचतो, दोरीवर चालणें, उड्या मारणें इ॰ अनेक प्रकारचे खेळ करून उपजीविका करतो. नाच्या पोर्या; सोंगाड्या. -ज्ञा १४.२९०. 'कृष्णा दारोदारीं नटसा कां मी सुयोध नाचेन?' -मोभीष्ण १.१०३. २ (नाट्य) नाटकांत स्त्रीपुरुष-भूमिकेचें काम करणारा मनुष्य; नाटकी पात्र. ३ नटण्याची संवय, स्वभाव असलेला मनुष्य. ४ उनाड, व्रात्य, कपटी, हरामी मनुष्य. 'ठस ठोंबस खट नट । जगभांड विकारी ।' -दा २.३. ३२. ५ चेष्टा; हावभ व. 'वदतां रददीप्तिस दावि नटें ।' -अकक २. किंकरकृत शुकरंभा संवाद २०. ६ वेष; अवतार; रूप; सोंग. 'धरोनिया रुद्राचा नट । नंदीवरी जाहला उपविष्ट ।' -कथा २.१२. २४. [सं. नट; सिं. नटु] नटामाजी नेटकी जाया- (सुंदर अशा पुरुषनटानें सुंदर स्त्रीचा वेष धारण केला असतां तो जसा कृत्रिम असतो व त्या भूमिकेंतील तशी सुंदर स्त्री जशी दुर्लभ असते त्यावरून) दिसण्यांत अतिशय सुंदर पण बनावट व दुर्लभ अशी वस्तु. (तुल॰) 'कीं नाटामाजील कामिनी ! कीं तममयकुहूची यामिनी । कीं अजाकंठिचे स्तन दोन्ही । तैसे प्राणी व्यर्थ ते ।' -ह १६.३२. सामाशब्द- ॰खट-वि. लुच्चा; सोदा; हरामी. [नट + खट; हिं. नटखट] ॰धारी-वि. नाटकी. 'पाहून लुब्धलों तुसी आतां किती दिवस चाळिवसी नटधारी ।' -होला ८९. [नट + धरी = धारण करणारा] ॰नर्तक-पुअव. (व्यापक) नट, डोंबारी, कोल्हाटी, नाचणारे, सोंगाडे इ॰ समुच्चयानें. [नट + सं. नर्तक = नाचणारा] ॰नागर-वि. नटून, सजून गांवभर हिंडणारा. -शर. [नट + ] ॰नाच-पु. १ उल्लास; उत्कर्ष; प्रताप; आधिक्य. 'हें असो या चिन्हांचा । नटनाचु ठायीं जयाच्या । जाण ज्ञान तयाच्या । हातां चढे ।' -ज्ञा १३.२१५. २ हावभाव; अभिनय; अंग- विक्षेप. 'मातें गाती वानिती । नटनाचें रिझविती ।' -ज्ञा १६. ३६१. [नट + नाच] ॰नाटक-की-पु. १ नाना प्रकारचे चम- त्कारिक खेळ करून दाखविणारा परमेश्वर, श्रीकृष्ण इ॰ देवता. २ नाटकी; सोंगाड्या माणूस. 'नटनाटक ठक बालट हरित ठाउक मज मी न नवी ।' -रासक्रीडा १३. ॰नाट्य-न. १ नाटक इ॰ खेळ; सोंगें. 'नटनाट्य केलें तुम्ही याचसाठीं । कौतुकें दृष्टि निव वावी ।' -तुगा. २ बतावणी; सोंग. 'तरी कां वंचतुक सुमनासि वो । नट नाट्य बरें संपादू जाणसी वो ।' -तुगा १४२. ॰बाज-वि. १ दिमाखानें, ताठ्यानें, नटून चालणारा; अक्कडबाज; नखरेबाज; नटवा. २ दांडगा व धसकट (मनुष्य). [नट + फा. बाझ प्रत्यय] ॰बाजिंदा-वि. नटबाज पहा. [नट + बाजिंदा] ॰बाजी-स्त्री १ दिमाखदारी; अक्कडबाजी. २ नटवेपणा; नखरेबाजी; नखरा. [नट + बाज] ॰बाट-वि. लुच्चा; सोदा; हरामी. [नट + बाट = लुच्चा] ॰मोगरा-पु. नटणारा मनुष्य. 'नटणारे छानछोकी नटमोगरे फारच बोकाळले आहेत.' -इंप १५५. [नट + मोगरा] ॰राज-पु. १ तांडवनृत्य करीत असणारा शंकर, त्याची मूर्ति; नटेश. २ अर्धनारी नटेश्वर, उजवें अंग पुरुषाचें व डावें स्त्रीचें असें स्वरूप. ॰वर-पु. (गु.) नटांत श्रेष्ठ; कृष्ण शंकर; परमेश्वर. नट- नाटकी पहा. [नट + सं. वर = श्रेष्ठ] नटाई-स्त्री. लुच्चेगिरी; सोदे- गिरी; कपट. (क्रि॰ करणें) नटाईस-नटाईवर येणें-लबाडी, लुच्चेगिरी करणें. नटेश, नटेश्वर-पु. १ परमेश्वर; नटवर. २ नटराज पहा. [नट + सं. ईश, ईश्वर] नटोवा-पु. (महानु.) नट; नटवा पहा. 'अंगीचीआं रवरवां; । ढळतां कैसा सांगावा । जैसा रणरंगिचा नटोवा सराऊं करितुसें ।' -शिशु १००४. [नटवा]
प्रवास
पु. १ स्वदेश सोडून अन्यत्र जाणें; देशाटन; पर- देशसंचार. २ परदेशांत केलेला तात्पुरता वास; परदेशांत प्रवास करतांना राहणें. ३ परदेश. -मनको. [सं.] प्रवासणें-अक्रि. प्रवास करणें; देशाटन करणें; परदेशांत तात्पुरतें राहणें. [प्रवास] प्रवासिक-पु. प्रवासी. 'प्रवासिकांतें स्वगृहा जाया । त्वरा करूनिया नित्य ।' -मेघदूत भाषांतर ८३. (मराठी ६ वें पुस्तक पृ. ४३७). प्रवासी-पु. प्रवास करणारा; मुशाफर; पांथस्थ; उतारू. -वि. कष्टी. 'अश्वत्थ सेवा बहुत दिवस । करितां झालें मी प्रवासी ।' -गुच ३९.३४. [सं.] प्रवाशाचें झाड-न. एक सुंदर पानांचें झाड. -बागेची माहिती पृ. ११६.
पत्नी
स्त्री. लग्नाची बायको; भार्या; जाया; स्त्री. [सं.]
सौभाग्यवती
(सं) स्त्री० सुवासिनी. २ जाया, भार्या.
सौदा
पु. १ व्यापार; व्यवहार; देवघेव; बाजारहाट क्रयविक्रय. २ खरेदी-विक्रीचा माल; जिन्नस. [फा. सौदा] ॰ग(गि)र-पु. व्यापारी-उदमी. 'भिन्न भिन्न सौदागरी । सह- वर्तमान जाया कुमरी ।' -मुसभा २.९१. [फा.] ॰ग(गि)री- स्त्री. सौदा अर्थ पहा. सौदागिराचाधंदा, उद्योग. -वि. व्यापारी; सौदागरासंबंधीं. ॰वणी-स्त्री. सौदा अर्थ १ पहा. ॰सूत-पु. न. सौदा अर्थ १,२ पहा.
सौदागर; सौदागीर
(पु.) [फा. सौदागर्] व्यापारी. “भिन्न भिन्न सौदागरीं । सहवर्तमान जाया कुमरी सुहद् बन्धु सुखनिर्भरीं । वसते झाले जवळिके” (मुक्तेश्वर-सभापर्व २|९१).
शिकस्त
वि. १ पराजित; पराभूत. 'गनिमांनीं कधीं मोंगलाशीं युद्ध करून मोंगल शिकस्त केला नव्हता.' -भाब ८१. २ मोडके; तुटकें; मोडकें तोडकें; भग्न; मोडकळीस आलेलें. (घर, विहिर, इ॰) 'सर्कारचे कारखान्यांतील थोरल्या तोफांची मारगिरी आज रात्रौ सुरू करून दिवाळ शिकस्त जाल्यावर उप- रान्तिक हल्याचा बेत ठरेल.' -ख १२.६२९०. ३ निरुपयोगी; कुचकामाचें; -स्त्री. १ पराभव. 'मीरफैजल्लास त्यांणीं शिकस्त दिल्ही. -ख ७८५. २ मोड; दुर्दशा; भग्नदशा; नष्ट स्थिति; 'राजश्री सुभेदारांकडील लोकाची शिकस्त जाली'. -दिमरा २१६५. 'परंतु सिबाड जाया न जाहली व शिकस्तही न जाहली. -वाडबाबा ४.१४४. [फा.] ॰करणें-१ (कागद, तांव, तक्ता वगैरे घडी घालून चार रकाने पाडणें. ॰खाणे-हार खाणें 'शिकस्त खाऊन तोही फिरला ।' -ऐपो २१०.
संपादणी, संपादणूक
स्त्री. १ अर्जन; मिळविणें; पैदास; कमाई; साधना; सिद्धि. २ बतावणी; निर्वाह; निभावणूक; वेळ मारून नेणें; पुढें केलेली सबब, सोंग पार पाडून नेणें, निभावणें. 'आपुलेचि बोल वाउगे । त्याची संपादणी करणें लागे ।' -दा १.६.२१. 'तुम्ही लटक्याच वार्ता सांगोन । संपादणी करतां गे ।' -ह २७.१८. 'समर्थपणें हे करा संपादणी । नसतेंचि मनीं धरि- ल्याची ।' -तुगां १२९९. ३ नक्कल; सजावट (हरिदास एखाद्या गोष्टीची करतो तशी); योग्य तर्हेनें उभारणी. ४ पात्राचें सोंग; सोंगाची बतावणी; हुबेहुब नक्कल; सोंगास अनुसरून हावभाव. 'नट जेंवी करी जाया वेषें संपादणी. ।' -सिसं ५.१४३. ५ व्यवस्था; समारंभाची साधना, सिद्धि; योग्य तर्हेनें कार्याची उठावणी, पार पाडणें. [सं.सम् + पद्] संपादणें-उक्रि. १ अर्जन करणें; मिळविणें; प्राप्त करून घेणें. २ सिद्धि करणें; तडीस नेणें; पार पाडणें; उरकणें. ३ वतावणी करणें. 'नट नाट्य बरें संपादूं जाणसी वो ।' -तुगा १४२. संपादन-न. १ संपादणें; मिळविणें; जोडणें; प्राप्ति. २ सिद्धि; साधना; कार्यपूर्ति. ३ बता- वणी; निभावणी. संपादनी-संपादनूक-वि. संपादणी, संपा- दणूक पहा. संपादित-वि. मिळविलेलें; प्राप्त; सिद्ध.
टाळा
पु. १. ढकलाढकल; टोलाटोली; पोकळ बढाई. (क्रि.मारणे). २. टाळणे; परिहार; अडथळा; गुंगारा (त्रास, उपद्रव, संकट यांना) : ‘तो निजगुरुसुत म्हणुनि न दे परिभव दे तयासि कवि टाळा ।’ – मोभीष्म ६·५७. (वा.) टाळा देणे – अंग काढणे; विन्मुख होणे : ‘आ समई व्यर्थ मार खाऊन घोडे माणूस जाया करावे हें ठीक नाही. या वेळेस टाळा द्यावा.’ ह्न ऐको ४७१.
कमाण-न
स्त्री. १ अर्ध वर्तुळ; मेहेराप (इमारतीच्या बांध- कामांतील). (इं.) आर्च. बांधकामाचें वजन सारखें वांटलें जावें म्हणून जें दरवाजे, खिडक्या वगैरेवर गोल, निमगोल इ. प्रकारचें बांधकाम करतात तें. २ धनुष्य; कमठा; मुलतानी कमान (धनुष्य) फार पसिद्ध असून तिची उपमा नेहेमीं देण्यांत येते. 'आली वीरश्री हात कमान घातला ।' -ऐपो ८८. 'मुलतानी भुवया कशा कमाणा जशा बाहार मधीं कुंकाचे टिकलीचा ।' -होला १०४. 'दुरवर कीर्ती हि गोष्ट आर्थी जशी काई कमान मुलतानी ।' -गोपा ७. ३ घड्याळ, कुलूप, उंदराचा सांपळा वगैरेमधील दाब उत्पन्न करणारी पोलादी कंसाकृति अगर वर्तुलाकृति तार किंवा पातळ पट्टीची रचना; स्प्रिंग; आडवी पट्टी. 'घड्याळांतील कमानीचा धर्म सुटण्याचा आहे. ती सारखी सुटण्याचा प्रयत्न करीत असते.' -सुष्टि २८. ४ (पिंजारीधंदा) पिंजारी लोकांचें कापूस पिंजण्याचें हत्यार (धुनुकली). यास तांत लावलेली असते. ५ (सुतारी, कांसारी) सामता फिरविण्यासाठीं हात दीड हात लांब काठीच्या टोकास सुतळी बांधून केलेलें हत्यार, धनुकली. ६ (ल.) इंद्रधनुष्य. 'विलसती गगनांत कमाना ।' -दावि ३७९. ७ (जर- तारी धंदा) तराकांतील फिरकी दाबून धरणारें साधन; कुत्रें. ८ शरीराची विशिष्ट रचना; हात व पाय जमिनीवर टेकून तोंड वर करून पोटाचा भाग उंच उचलणें. ९ बैल गाडीस (ऊन, पाऊस लांगू नये म्हणून) तट्टया घालण्यासाठीं आंतून कळक किंवा वेत याच्या कांबी बांधतात त्या प्रत्येकी. [फा. कमान् = धनुष्य] ॰काढणी- स्त्री. घोड्याचा दागिना. -स्वप ५३. ॰गार-पु. १ धनुष्य बाण तयार करणारा. २ हाड वैद्य. 'खाले माकणीवर पडोन मांडी जाया जाली, मग कमानगार आणोखा बांधली.' -रा ३.११२. [फा. कमान् + गार्] ॰दार-वि. १ मेहेराप, कमान असलेला (अंगरखा, भिंत, वगैरे). [फा. कमान् + दार्] २ ज्याच्या जवळ धनुष्यबाण आहे असा; धनुर्धारी. 'मालजेठी कमान- दार ।' -दावी ६९. ॰मारी-वि. धनुर्धारी; धनुष्य बाण धारण करणारा. चित्रगुप्त ३०.
विधि-धी
पु. १ नियम; शास्त्राची आज्ञा; वेदविहित क्रिया, कर्म वगैरे. 'विधीतें पाळित । निषधातें गाळित ।' -ज्ञा १२.७७. २ पद्धति; कर्म करण्याची रीत; धार्मिक कृत्याचा प्रयोग. उदा॰ उद्यापनविधि; उपासनाविधि; दामविधि; स्नानविधि; होम- विधि; व्रतविधि; पूजाविधि. 'क्रियाविशेषें बहुतें । न लोपिती विधीतें । निपुण होऊन धर्मातें । अनुष्ठिती ।' -ज्ञा २.२४९. ३ सामान्यतः नियम; आज्ञा; विधान; अनुशासन; आदेश; कल्प. 'विधि हाचि मान्य आहे ।' -मोआदि ४.१४. ४ दैव; प्रारब्ध; नशीब. 'स्थिर न राहे माझी बुद्धि । तरी हा आपुलाचि विधि । सुजाण राया ।' -कथा ६.१९.१५९. ५ ब्रह्मदेव; सृष्टिकर्ता. 'तें निर्मितो विधि विभूषण भूमिकेचें ।' -वामन स्फुटश्लोक (नवनीत पृ १४१). 'अतर्क्य महिमा तुझा गुणहि फार बाहे विधी ।' -केका १४०. ६ शास्त्रवचन; धर्मग्रंथातील वाक्य, आधार; प्रमाण. ७ तऱ्हा; प्रकार; रीत. 'गऱ्हवारे हा विधी । पोट वाढविलें चिंधी ।' -तुगा ६२५. 'लिहिल्या विधे येईन मी त्वरें ।' -होला ३४. ८ योजना; क्रिया. 'कवण कार्याचिये विधि । तुम्ही आलेती कृपानिधि ।' -एरुस्व ३.४३. [सं. विध् = विधान करणें] ॰अंड- न. ब्रह्मांड; विश्व; भूगोल. 'तडतडि विधिअंड त्रास दे...' -वामन- सीता स्वयंवर. [विधि + अंड] ॰किकर-पु. कर्मांचा दास. 'मग विधिकिंकर तो नव्हे ।' -यथादी ३.२२९९. ॰दृष्ट-वि. वेदविहित; शास्त्रोक्त; साधार; सप्रमाण. ॰निषेध-पु. अमुक बरें, अमुक वाईट, अमुक करावें, अमुक करूं नये यासंबंधी नियम; बंधन; नियम; कर्तव्याकर्तव्य. 'एथ सारासार विचारावें कवणे काय आचारावें । आणि विधिनिषेध आघवे । पारुषता ।' -ज्ञा १.२४६. [विधि + निषेध] ॰निषेधातीत-वि. १ ब्रह्मज्ञान प्राप्त होऊन मुक्त स्थितीस गेल्यामुळें ज्यास सामान्य धर्मनियम बंध- नकारक नसतात असा; सर्व नियमांच्या पलीकडे गेलेला. २ (उप.) स्वैर, अनिर्बंध वागणारा. [विधि + निषेध + अतीत] ॰पूर्वक-वि. नियमानुसार; यथासांग; योग्य प्रकारें. [विधि + पूर्वक] ॰भंजक- वि. (व्या.) नियम मोडणारा; सामान्य नियमांत न येणारा; अपवादभूत. [विधि + भंजक] ॰भंजन-न. नियम मोडणें; अप- वाद होणें. ॰मंडळ-न. कायदे, नियम करणारी संस्था, सभा. (इं.)लेजिस्लेटिव्ह कौन्सिल. ॰मंत्र-पु. विधियुक्त मंत्रसंस्कार; निय- मानुसार सर्व धर्मकृत्य. 'मग जाहला विधिमंत्र । चारी दिवसा ।' -कथा १.७.०७. ॰मुख-न. सच्चिदानंद स्वरूपाचे वर्णन. -हंको. ॰युक्त-वि. विधिपूर्वक; शास्त्रोक्त; वेदविहित; शास्त्राज्ञेप्रमाणें. ॰लिखित-लिपी-स्त्री. लल्लाटरेषा; ब्रह्मलिखित. 'आपले सुख खास गमावशील ही विधिलिपी समज.' -कल्याणी, नवयुग. ॰वत्-क्रिवि. विधिप्रमाणें; शास्त्रोक्त; यथायोग्य; वेदविहित पद्धतीप्रमाणें. ॰वाक्य-न. शास्त्रवचन; वेदवचन; वेदवाक्य. ॰वाचक धातुसाधित-न. कर्तव्यबोधक धातुसाधित; नियम घालून देणारें धातुसाधित. उदा॰ करावें; धरावें इ॰. ॰विधान- न. शास्त्राज्ञा किंवा नियम यांस अनुसरून सांगणें, बोलणें, योजणें ठरविणें, वर्तन करणें. [विधि + विधान] ॰विवर्जित-वि. शास्त्र- मर्यादेचें बंधन नसलेला; नियमांपलीकडील 'मज विधिविवर्जिता व्यवहारु । आचारादिक ।' -ज्ञा ९. १५७. ॰विवाह-पु. यथा- विधि लग्न. 'निर्धारेसीं तुझी जाया । मी जाहलेंसे यदुराया । विधिविवाह तुंवा कीजै ।' -एरुस्व ४.१४. ॰विशेषण-न. (व्या) क्रियापदाबरोबर योजलेला गुणवाचक शब्द; विशेषणाचा एक प्रकार. ॰वृत्ति-स्त्री. (निषेधवृत्तीच्या उलट) प्रत्यक्ष कृति, क्रिया करावयासाठीं आज्ञा करण्याची पद्धति, रोख, तऱ्हा, स्थिति, निय- मन. -वि. (निषेधक नव्हे तें) प्रत्यक्ष नियम, कृति, कार्य सांग- णारें; अनुज्ञापक. ॰संकुचित-संकोचित-वि. नियमबाह्य; अप- वादभूत; नियमांत न येणारें ॰संकोच-पु. अपवाद. विद्युक्त- वि. वेदविहित; शास्त्रांत सांगितलेलें; धर्मग्रंथांत सांगितलेलें. 'किती आच्मनें शौच्य विद्यूक्त चाले ।' -दावि १७९.४. -अप विध्योक्त. 'श्रीराम समर्थ विध्योक्त अर्चनें ।' -सप्र ११.१३५. [विधि + उक्त]