नऊ मराठी शब्दकोशांमधील २,६२,७३६ शब्दांचा एकत्रित संग्रह
शब्दार्थ
धारण
स्त्री. १ (धान्य इ॰चा) खरेदीविक्रीचा चालू दर, बाजारभाव. 'लष्करांत धारण इस्तकबीलपासून सात शेर आठ शेर.' -भाव १४. २ दुष्काळ; महागाई. 'धारणेनें मुलें मेलीं ।' -दावि ३७७ [सं. धृ; का. धारणि; गुज. धारण = वजन] पांचावर धारण बसणें-(भीति इ॰कानें) गर्भगळित होणें, घाबरून जाणें. रुपयास पांचशेर धान्य म्हणजे अत्यंत महागाई होणें, दुष्काळ पडणें अशी स्थिति होती त्यावेळचा वाक्प्रचार. बहुधा सैन्यांतील. म्ह॰ धारण आणि मरण कोणास समजत नाहीं.
न. १ धरणें; संभाळणें; अंगीं बाळगणें; धारण करणें. 'या नांव धृति संपूर्ण । विद्याधारण धृति 'नव्हें ।' -एभा १९.४४४. 'शरसंधानसमयीं डाव्या हातानें धनुष्य धारण करावें लागतें.' २ घेणें; उचलणें; स्वीकारणें. (रीतभात, चाल, मार्ग इ॰) [सं.]
धारण m धारणी f The main post. in poor houses, reaching from the ground to the roof.
धारण f Rate, market or current price. Holding.
धारण dhāraṇa m C or धारणी f C The main post, in poor houses, reaching from the ground to the roof.
धारण dhāraṇa n (S) Holding, having, keeping, maintaining, lit. fig. 2 Taking up or adopting (a fashion, a course).
धारण dhāraṇa f Rate, market or current price. Pr. धा0 आणि मरण कोण्हास समजत नाहीं.
पुस्त्री. (कों. व.) टेंकू; आधारस्तंभ (घराचा अगर इमारतीचा); मोठा, मुख्य खांब. 'रात्रि तैसें पाहलें । हें धारणा जेवीं एक जालें ।' -ज्ञा १४.३५५ 'जेवीं आरें धारण गिळिला ।' -एभा २३.२५९. २ (ल.) (राज्याचा, संसाराचा भार ज्याच्यावर असतो तो) कर्ता पुरुष;' आधारस्तंभ.
स्त्री. समजूत; कल्पना. 'जीवींचिये ऐसी धारण । म्हणोनि पुसावया । जाहलें कारण ।' -ज्ञा ६.३३६. [सं.धृ- धारणा]
(सं) स्त्री० धान्याचा दर, निरख. २ घुसळखांबा. ३ घराचा मध्य आधार खांब.
धारण
न. १. धरणे; सांभाळणे; अंगी बाळगणे; धारण करणे. २. घेणे; उचलणे; स्वीकारणे (रीतभात, चाल, मार्ग इ.). [सं.] (वा.) जमीन धारण करणे - कायदेशीर रीतीने जमिनीचा ताबा घेणे.
स्त्री. १. (धान्य इ. चा) खरेदी -विक्रीचा चालू दर; बाजारभाव : ‘लष्करांत धारण इस्तकबीलपासून सात शेर आठ शेर.’ - भाब १४. २. दुष्काळ; महागाई : ‘धारणेनें मुलें मेलीं ।’ - दावि ३७७. [सं. धृ; गु.] (वा.) पाचावर धारण बसणे - (भीती इ. मुळे) गर्भगळित होणे; घाबरून जाणे.
पु. स्त्री. टेकू; (घराचा वगैरे) आधारस्तंभ; मोठा, मुख्य खांब : ‘जेवीं आरें धारण गिळिला।’ - एभा २३·२५९. २. (ल.) (राज्याचा, संसाराचा भार ज्याच्यावर असतो तो) कर्ता पुरुष.
स्त्री. समजूत; कल्पना : ‘जीवींचिये ऐसी धारण।…जाहलें कारण।’ - ज्ञा ६·३३६. [सं.धृ]
धारन
स्त्री. १. रांग. २. समूह. ३. वळचण. ४. बोळ. (झाडी) [सं. धोरणी; क. धारणी]
धारन
स्त्री. (व.) एक शाकभाजी.
संबंधित शब्द
नग्न
वि. १ वस्त्रहीन; नागवा; नंगा, 'जैसे आपण नग्न भांडकें । जगातें म्हणे ।' -ज्ञा १८.१३५. २ (ल.) दरिद्री; कफ- ल्लक; अकिंचन. [सं.] ॰चक्षु-पु. साधा, उघडा, भिंग, दुर्भिण इ॰ कांचें साहाय्य नसलेला डोळा, नजर; (इं.) नेकेड आय्. 'नग्नचक्षूनें या क्षीरपथाकडे पाहिलें असतां, चोहोंकडें धुकें पस- रलें आहे कीं काय असा भास होतो.' -आगरकर निबंधसंग्रह, आमचें काय होणारा. [नग्न + सं. चक्षुस् = डोळा] ॰दिगं(गां)बर वि. अगदीं पूर्णपणें नागवा; नगीननागवा. [नग्न + सं. दिगंबर = दिशा हेंच वस्त्र ज्याचें तो, नग्न] ॰दीक्षा-स्त्री. नागवें राहण्याचें व्रत. (क्रि॰ घेणें). कांहीं विशिष्ट वर्गांतील गोसावी ही दीक्षा घेतात. [नग्न + दीक्षा = व्रताचा स्वीकार] ॰दीक्षाधारण-न. नग्न दीक्षा स्वीकारणें, अंगीकारणें. (क्रि॰ करणें) [नग्न + दीक्षा + धारण = धारण करणें; स्वीकारणें] ॰दीक्षाधारक-दीक्षा- धारी-वि. नग्नदीक्षेचा स्वीकार केलेला; नग्नदीक्षा धारण करणारा. [नग्नदीक्षा + सं. धारक, धारी = धारण करणारा] ॰वस्त्र- न. लंगोटी; केवळ नागवें राहूं नये म्हणून लोकोपचारार्थ धारण केलेलें वस्त्र. 'काशायांबर नग्नवस्त्र । संन्याशासी हें पवित्र ।' -सप्र ३.१६.
लेणें, लेइणें
सक्रि. १ डोळ्यांत (काजळ) घालणें; कपाळावर (कुंकू) लावणें; अंगावर यथास्थानीं (दागिने) घालणें; धारण करणें. 'पौष्य भूपाळ पत्नी । दिव्य कुंडलें लेइली कर्णीं ।' -मुआदि २.८५. २ (काव्य.) (वस्त्र) नेसणें; परिधान करणें; धारण करणें. 'वस्त्रें सुंदर भूषणें उभयतां लेती नवीं नित्यहो ।' -उमाविलास पृ. ६. भूतकळीं ह्या क्रियापदाचा कर्तरिप्रयोग होतो. उदा॰ पीतांबर परिधान । लेइली अलंकार भूषण ।' -एरुस्व ५.२०. ३ घेणें. लेणार-रा-पु. धारण करणारा; घालणारा. 'कृष्ण असे गोरसचोर । महाकपटी अकर्मी जार । हाच काय मणि लेणारा । जाहल थोर अवघ्यांत ।' -ह २९.२८. लेता-पु. धारण करणारा; लेणार पहा. लेणें-न. १ शरीराला शोभा देणारा कोणताहि पदार्थ-दागिना, कुंकु, काजळ इ॰ 'मग रायें तयां लेणियांचें वृत्त पुसिलें ।' -पंच १.३५. २ चैत्र महि- न्यांत गौरीच्या उत्सवांत भिंतीवर गोपुर इ॰ चें जें चित्र काढतात तें; मंगळागौरीच्या वेळीं देवीला वाहण्याचे कणिकेचे अलंकार. ३ पांडवकृत्य; डोंगर पोखरून त्यांत सभामंडप, देवादिकांच्या मूर्ती इ॰ कोरून तयार केलेली गुहा; कोरीव लेणें. उदा. कार्ल्याचें लेणें, वेरूळचें लेणें. [सं. लेपन-लयण-लेणें. किंवा लेपन-लेवन लेणें; रत्न-लयन-लेणें; प्रा. लेण] लेणेपण-न. अलंकारदशा-अवस्था. 'मुकुटकुंडलें करकंकणें । न घडितां सोनें सोनेंपण । त्याचीं करितां नाना भूषणें । लेणेपणें उणें नव्हेचि हेम ।' -एभा २८.२६३.
लीला-ळा
स्त्री. १ क्रीडा; खेळ; कौतुक; मौज; गुण. 'बुझावी हरीं तेचि लीळा वदावी ।' -वामन, भामाविलास (नवनीत पृ. ९८). २ सहज घडणारी क्रिया; स्वाभाविक गोष्ट- कृति. 'जयांचिये लीलेमाजीं नीति । जियाली दिसे ।' -ज्ञा ९. १९२. ३ (लीलावतार याचा संक्षेप) विष्णूचा अवतार. -क्रिवि. (काव्य) सहज; स्वाभाविकपणें; खेळांतल्याप्रमाणें. 'लीला- कमल घेतां हातीं । कृष्णचरण आठवती ।' -एरुस्व ५.६६. [सं. लीला] लीलाधारी-पु. अवतार घेणारा. ॰चरित्र-न. सहज केलेला चमत्कार. 'रविकुळीं अवतरग्ला श्रीधर । कैसे केलें लीला-चरित्र ।' -रावि १.१०३. ॰मुद्रा-स्त्री. खेळकर किवा आनंदी चेहरा (अर्जदाराच्या केविलवाण्या किंवा आशाळू चेहेऱ्याला उद्देशून कुत्सितपणें उपयोगांत आणण्याखेरीज इतर विशेष उपयोग नाहीं). ॰विग्रह-पु. लीलेनें धारण केलेलें शरीर; भक्तांच्या इच्छा पुरविण्याकरितां देवानें धारण केलेला देह. ॰विग्रही-पु. लीलेनें देह धारण करणारा; मौजेनें देहधारी झालेला. 'तोचि जाहला जी साकार । लीलाविग्रही श्रीकृष्ण ।' -एरुस्व १.२०.लीलांजन-न. नीरांजन. [लीला + अंजन] लीला- धारण-न. लीलावतार-पु. लीलेनें धारण केलेला अवतार; विष्णूनें केवळ लीला म्हणून घेतलेला अवतार [लीला + अवतार] लीलावती-स्त्री. खेळकर-विलासी स्त्री; चंचल बाई; कामचेष्टा करणारी स्त्री. २ भास्कराचार्यांचा गणितशास्त्रावरील (त्यांच्या याच नांवाच्या मुलीला उद्देशून लिहिलेला) सुप्रसिद्ध ग्रंथ.
नट
पु. एक जात व तींतील व्यक्ति; डोंबारी; कोल्हाटी; बहुरूपी; नट हा स्त्रिया इ॰ कांचा वेष धारण करून नाचतो, दोरीवर चालणें, उड्या मारणें इ॰ अनेक प्रकारचे खेळ करून उपजीविका करतो. नाच्या पोर्या; सोंगाड्या. -ज्ञा १४.२९०. 'कृष्णा दारोदारीं नटसा कां मी सुयोध नाचेन?' -मोभीष्ण १.१०३. २ (नाट्य) नाटकांत स्त्रीपुरुष-भूमिकेचें काम करणारा मनुष्य; नाटकी पात्र. ३ नटण्याची संवय, स्वभाव असलेला मनुष्य. ४ उनाड, व्रात्य, कपटी, हरामी मनुष्य. 'ठस ठोंबस खट नट । जगभांड विकारी ।' -दा २.३. ३२. ५ चेष्टा; हावभ व. 'वदतां रददीप्तिस दावि नटें ।' -अकक २. किंकरकृत शुकरंभा संवाद २०. ६ वेष; अवतार; रूप; सोंग. 'धरोनिया रुद्राचा नट । नंदीवरी जाहला उपविष्ट ।' -कथा २.१२. २४. [सं. नट; सिं. नटु] नटामाजी नेटकी जाया- (सुंदर अशा पुरुषनटानें सुंदर स्त्रीचा वेष धारण केला असतां तो जसा कृत्रिम असतो व त्या भूमिकेंतील तशी सुंदर स्त्री जशी दुर्लभ असते त्यावरून) दिसण्यांत अतिशय सुंदर पण बनावट व दुर्लभ अशी वस्तु. (तुल॰) 'कीं नाटामाजील कामिनी ! कीं तममयकुहूची यामिनी । कीं अजाकंठिचे स्तन दोन्ही । तैसे प्राणी व्यर्थ ते ।' -ह १६.३२. सामाशब्द- ॰खट-वि. लुच्चा; सोदा; हरामी. [नट + खट; हिं. नटखट] ॰धारी-वि. नाटकी. 'पाहून लुब्धलों तुसी आतां किती दिवस चाळिवसी नटधारी ।' -होला ८९. [नट + धरी = धारण करणारा] ॰नर्तक-पुअव. (व्यापक) नट, डोंबारी, कोल्हाटी, नाचणारे, सोंगाडे इ॰ समुच्चयानें. [नट + सं. नर्तक = नाचणारा] ॰नागर-वि. नटून, सजून गांवभर हिंडणारा. -शर. [नट + ] ॰नाच-पु. १ उल्लास; उत्कर्ष; प्रताप; आधिक्य. 'हें असो या चिन्हांचा । नटनाचु ठायीं जयाच्या । जाण ज्ञान तयाच्या । हातां चढे ।' -ज्ञा १३.२१५. २ हावभाव; अभिनय; अंग- विक्षेप. 'मातें गाती वानिती । नटनाचें रिझविती ।' -ज्ञा १६. ३६१. [नट + नाच] ॰नाटक-की-पु. १ नाना प्रकारचे चम- त्कारिक खेळ करून दाखविणारा परमेश्वर, श्रीकृष्ण इ॰ देवता. २ नाटकी; सोंगाड्या माणूस. 'नटनाटक ठक बालट हरित ठाउक मज मी न नवी ।' -रासक्रीडा १३. ॰नाट्य-न. १ नाटक इ॰ खेळ; सोंगें. 'नटनाट्य केलें तुम्ही याचसाठीं । कौतुकें दृष्टि निव वावी ।' -तुगा. २ बतावणी; सोंग. 'तरी कां वंचतुक सुमनासि वो । नट नाट्य बरें संपादू जाणसी वो ।' -तुगा १४२. ॰बाज-वि. १ दिमाखानें, ताठ्यानें, नटून चालणारा; अक्कडबाज; नखरेबाज; नटवा. २ दांडगा व धसकट (मनुष्य). [नट + फा. बाझ प्रत्यय] ॰बाजिंदा-वि. नटबाज पहा. [नट + बाजिंदा] ॰बाजी-स्त्री १ दिमाखदारी; अक्कडबाजी. २ नटवेपणा; नखरेबाजी; नखरा. [नट + बाज] ॰बाट-वि. लुच्चा; सोदा; हरामी. [नट + बाट = लुच्चा] ॰मोगरा-पु. नटणारा मनुष्य. 'नटणारे छानछोकी नटमोगरे फारच बोकाळले आहेत.' -इंप १५५. [नट + मोगरा] ॰राज-पु. १ तांडवनृत्य करीत असणारा शंकर, त्याची मूर्ति; नटेश. २ अर्धनारी नटेश्वर, उजवें अंग पुरुषाचें व डावें स्त्रीचें असें स्वरूप. ॰वर-पु. (गु.) नटांत श्रेष्ठ; कृष्ण शंकर; परमेश्वर. नट- नाटकी पहा. [नट + सं. वर = श्रेष्ठ] नटाई-स्त्री. लुच्चेगिरी; सोदे- गिरी; कपट. (क्रि॰ करणें) नटाईस-नटाईवर येणें-लबाडी, लुच्चेगिरी करणें. नटेश, नटेश्वर-पु. १ परमेश्वर; नटवर. २ नटराज पहा. [नट + सं. ईश, ईश्वर] नटोवा-पु. (महानु.) नट; नटवा पहा. 'अंगीचीआं रवरवां; । ढळतां कैसा सांगावा । जैसा रणरंगिचा नटोवा सराऊं करितुसें ।' -शिशु १००४. [नटवा]
घालणें
सक्रि. १ ठेवणें; राखणें; स्थित करणें. 'भंवती अस्त्रीयांची राषणे । तेथें घातली ते राजकुमारी ।' -उषा २१. २४. 'सर्व माल आधीं घरांत घाल.' २ सोडणें; टाकणें; फेकणें; टाकून देणें; फेकून देणें. 'उडी घालतो संकटीं स्वामि तैसा ।' -राम ३७. 'घोडा घालण्याची सोय नसेल अशा खड- काळ व डोंगराळ मुलखांत डुकराची शिकार गोळीनेंच करावी लागते.' -डुकराची शिकार (बडोदें) १. 'त्याला काठीवर भार घालून चालावें लागे.' -कोरकि ३२. ३ उडी टाकणें. 'वणवा मियां आघवा । पांखेंचि पुसोनि घेयावा । पतंगु या हांवा । घाली जेवीं ।' -ज्ञा १४.१९१. 'रागें उमा घातलें आगीं । यालागीं याज्ञिकाचें शिर भंगी ।' -एभा ५.१७७. ४ जडविणें; लावणें; तल्लीन करणें. 'स्वरूपीं घातलें मना । यातनेसि केली यातना ।' -दा ५.९.५४. ५ मारणें; फेकणें; प्रक्षेपणें; फेंकून मारणें. 'अभिमंत्रुनी पंनकासस्त्रें । बाणु घातला ईश्वरें ।' -उषा १६९४. 'इंद्राच्या या कपटी वारांगनेच्या डोक्यांत विश्वामित्रानें जर कमंडलु घातला असता तरच असल्या स्त्रीजातीचा योग्य सन्मान झाला असता.' -नाकु ३.९१. ६ ओतणें. 'दुधांत पाणी घालणे.' ७ पसरणें; बाहेर मांडणें; मांडून ठेवणें; रचणें ठेवणें. 'आकाशीं घातीला मंडप ।' -मसाप २.२६. ८ (आंत) खुपसणें; भोंसकणें. 'घे सुरी घाल उरीं.' ९ (एखाद्या पदार्थांत दुसरा पदार्थ) शिरकावणें, प्रविष्ट करणें; 'पिशवींत पैसे घाल.' १० (एखाद्या कामाला मनुष्य, जनावर) लावणें; जुपणें; नेमणें; योजणें. 'मुलगा पढावयास घातला.' 'तो गडी भात कांडाव- यास घाला.' ११ (दुकान,शाळा, बाजार इ॰) मांडणें; स्थापन- करणें; सुरु करणें. १२ (अंगावर धारण करण्याच्या विवक्षित वस्तु) धारण करणें; परिधान करणें; चढविणें. 'अंगात अंगरखा, डोकींत पागोटें, पायांत जोडा घातला.' 'नाकांत नथ व बोटांत आंगठी घाल.' १३ (अन्न, खाद्यपदार्थ इ॰) वाढणें. मला भात घाल.' १४ एखाद्यावर अनिष्ट संकट आणणें; गोत्यांत आणणें; (एखाद्याच्या) नुकसानीस कारण होणें; गंडा घालणें; (एखाद्यास) बुडविणें.' त्यानें मला दहा रुपयांस घातलें.' १५ (मुल) प्रसवणें; (अंडीं) टाकणें; गाळणें. १६ (प्रश्न, उदा- हरण. कोडें इ॰) सोडवावयास देणें, सांगणें; हिशेब सांगणें. १७ एखाद्यास एखादी गोष्ट करण्यास अथवा न करण्यास शपथ इ॰ देणें; शपथ इ॰ कांचा जोर. आग्रह करणें; शपथ घालणें. १८ बाहेर टाकणें; काढणें; काढून देणें; घालविणें. 'या चोरास प्रथम घराबाहेर घाल.' १९ (दरार,धाक, भीति,भूल इ॰) उत्पन्न करणें; उपस्थित करणें; उठवणें; उद्दीपित करणें. २० (बाद, गोंधळ इ॰) करणें; माजविणें. २१ (भिंत, कूड इ॰) बांधणें; उभारणें; रचणें. २२ (भोजन, समाराधना, ब्राह्मण, मित्र इ॰ कांस) अर्पण करणें; देणें. २३ (एखादें काम) सुरु करणें; आरंभणें. 'तिनें गहूं दळावयास घातले.' 'त्यानें घर बांधावयास घातलें.' २४ (चाल, संप्रदाय) प्रचलित करणें; रूढ करणें. २५ (सणाच्या दिवशीं पुरण इ॰ खाद्यपदार्थ) खावयास, नैवेद्यास सिद्ध करणें. मंगलप्रसंगीं ब्राह्मण जेवावयास घालणें. घालणें हा धातु कांहीं नामास जोडूनहि वापरतात. उदा॰ (गोष्ट) कानावर घालणें; (मुलाला) कित्त्यावर घालणें इ॰ या धातूचे अर्थ अनेक आहेत, पण त्या सर्वांचा भावार्थ ठेवणें; स्थापणें; मांडणें; लावणें असा आहे. [प्रा. घल्ल; जु. का. घल्लणें भांडण, युद्ध, मारामारी; हिं. घालना] (वाप्र.) घालून घेणें-(हट्टानें, जोरानें, वेगासरशीं) स्वतःचें शरीर, अंग खालीं वरून आंत टाकणें, फेकणें; एकदम अंग टाकणें. 'त्याला फेंफरें आलें म्हणजे तो आगींत घालून घेतो.' 'नदी भरतां भरतां घालुनिया घेती ।' -रामदास-रामदासी भा. १५. पृ. २६४. 'भूतळीं भरत घालुनि घे हो । त्या स्थळींहुनि न चित्त निघेहो ।' -वामन भरतभाव ५१. 'हें वर्तमान मल्हारराव यांनीं ऐकतांक्षणींच अंबारींत घालून घेतलें.' -भाब ७४. घालून पाडून बोलणें-वक्रोत्त्कीनें उपरोधिक भाषेंत निंदा करणें, दोष देणें; टोमणा मारणें; खोचून बोलणें. 'टोंचून, घालून. पाडून बोलण्याच्या कामांत बायका पटाईत असतात.' -संगीत मेनका ११. एखाद्यावर घालणें-एखाद्यास दोष देणें, लावणें. 'कष्टी होऊनियां लेखीं । प्रारब्धावरी घालिती ।' -दा १२.२ ५. ह्या धातूचें समासांत घाल असें रूप होतें. घाल- घालणें या क्रियापदाचें समासांत योजावयाचें रूप. यावरून पुढील सामासिक शब्द बनले आहेत. ॰काढ-स्त्री. (कांहीं जिन्नस, सामान इ॰ विशिष्ट ठिकाणीं) पुन्हां पुन्हां घालण्याची व तेथून काढण्याची क्रिया, व्यापार; उपसाउपस; (जिन- सांची) उगीच्या उगीच हालवाहलव करण्याचा व्यापार; चाल- ढकल पहा. [घालणें + पाडणें] ॰घसर-स्त्री. १ लांबणीवर टाकणें; टंगळमंगळ; दिरंगाई; चालढकल. 'आज पाहूं उद्या पाहूं अशी घालघसर केली तर ऐनवेळीं कांहींच करतां यावयांच नाहीं.' -हिंदु(गोवें) १३.८.१९२९. २ रपाटणें; खच्चून भरणें; कोंबणें; ठासणें; कोंदून भरणें. ३ अनास्था; आळसामुळें दुर्लक्ष. 'अध्य- यनाविषयीं घालसघर करशील तर फसला जाशील.' ४ घाल- घुसड शब्दाच्या कांहीं अर्थींहि या शब्दाचा उपयोग करतात. घालघुसड पहा. [घालणें + घसरणें] ॰घसरपणा-पु. चुका करण्याचा स्वभाव; वेंधळेपणा. [घालघसर] ॰घसर्या-वि. दिरं- गाई, टंगळमंगळ; चालढकल करणारा. [घालघसर] ॰घुसड-स्त्री. १ (एखादें काम, धंदा इ॰) स्वैरपणानें, मनसोक्तपणें, दपटणें; पुढें चालवणें, ढकलणें २ (एखादें काम) दडपण्याची, लाट- ण्याची, लोटण्याची क्रिया; वेठ वारून, बिगार काढून, गडबड- गुंडा करून (एखादें काम करण्याची क्रिया. ३ जमाखर्च इ॰ कांत) अव्यवस्थितपणें, लबाडीनें बाबी, रकमा घुसडणें ४ मूळ- ग्रंथांत पदरचा भाग) लबाडीनें दडपून देणें; घुसडणें. ५ गोंधळ; घोटाळा इ॰ नीं युक्त भाषण, व्यवहार; लबाडीचा व्यवहार; लपं- डाव. 'मी वचन मोडून कांहीं घालघुसड केली तर मग त्याला काय समजणार आहे?' -बाल २.१८८. [घालणे + घुसडणें] घालपांड्या-पु. १ बिनदिक्कत (दुसर्याचा) घात, नाश करणारा, कळलाव्या, आगलाव्या, घातकी मनुष्य. २ वरून मात्र बावळा, वेडा दिसणारा पण आंतून कावेबाज असलेला मनुष्य; वेड पांघरणारा मनुष्य; घालवेडा पहा. [घालणें = बुडविणें, नुकसानींत आणणें + पांड्या] घालपिसा-वि. वेडेपणाचें, बावळटपणाचें सोंग, ढोंग करणारा; वेड पांघरणारा; घालवेडा, [घालणें + पिसा = वेडा] घालपिसें-न. वेडाचें ढोंग; बाह्यात्कारी धारण केलेला वेडेपणा, खुळेपणा, बावळेपणा. [घालणें + पिसें] घालफेड-डी-स्त्री. घालफेल; तळमळ; काहिली; (ताप इ॰ नें) जीव कासावीस होऊन शरीराची होणारी चळवळ; घालमेल अर्थ ७ पहा. 'नवकिसलयतल्पीं तीजला नीजवीती । घडिघडि करिते हे भीमकी घालफेडी ।' -सारुह ३.६५. [घालणें + फेडणें] घालफेल-स्त्री. (कों.) (आजारी मनुष्याची होणारी) तळमळ; तगमग; कासाविसी; काहिली; तापाच्या काहिलीमुळें आजारी माणसानें इतस्ततः केलेलें शरीराचें चलन वलन घालमेल-ली-स्त्री. १ (वस्तूंचा, हिशेबाचा, कामांचा) घोंटाळा; अस्ताव्यस्तपणा; अव्यवस्थितपणा; गोंधळ. २ धांदल; गडबड; गर्दी; धामधूम; धुमाळी. ३ सरमिसळ; सर्व एकांत एक मिसळणें; उलथापालथ. ४ (ल.) एकसारखी मसलत, हिकमत, युक्ति, बेत करणें; डावपेंच खेळणें; साहसाच्या धाडसाच्या कामांत स्वतःस गुंतवणें; (उपजीविकेसाठीं) अनेक उलाढाली करणें; मामलत इ॰ व्यवहारांची अदलाबदल, घटवाटना. ५ (एखादें कार्य जुळवून, घडवून आणण्याची अनेक प्रकारची) खटपट; मसलत; गडबड; धांदल. 'तो सध्यां लग्नाच्या घालमेलींत आहे.' ६ सुरळीतपणें चाललेल्या व्यापारांत, क्रमांत झालेला अडथळा, भंग, खळ. 'पथ्यामध्यें घालमेल न झाल्यास गुण येईल.' ७ (ताप इ॰ कांचा योगानें होणारी शरीराची) तग- मग; तळमळ; कासाविसी; काहिली. 'नारायण नांदे जयाचिये ठायीं । सहज तेथें नाहीं घालमेली ।।' -तुगा २९. घालफेल पहा. ८ तगमगीमुळें (आजारी माणसानें चालवलेली शरीराची) चळवळ; चुळबुळ. 'तिचा जीव घालमेल घालूं लागला' -चंद्र १४०. ९ पोटांतील क्षुब्धता, कालवाकालव. १० (पित्तक्षोभामुळें) उसासणें; उसासा येणें; (उकाड्यासुळें, उबार्यामुळें शरी- राचा होणारा) गदका; गदगदणें; चबढब पहा. १२ (व्यवहारांतील, हिशेबांतील) अफरातफर, डावपेंच; घोंटाळा; गोंधळ; छक्केपंजे; लपंडाव; लुच्चेगिरी. १३ (गो.) भानगड. [घालणें + मेळ; हिं. घालमेल; गु. घालमेल] घालमेलणें- घालमेल करणें; उलथापालथ, गोंधळ, घोंटाळा करणें. [घालमेल] घालमेली-स्त्रीअव. (गो.) हेलपाटे; येरझारा; त्यापासून होणारा त्रास. [घालमेल] घालमेल्या-ली-वि. १ घालमेल, चबढब, अव्यवस्था करण्याचा स्वभाव असणारा. २ चळवळ्या; खट- पटी, नाना युक्ती, हिकमती काढणारा, योजणार; उलाढाली; कारस्थानी. [वालमेल] घालवेड-न. वेडाचें सोंग; बाह्या- त्कारीं धारण केलेलें वेडेपण; खुळेपणा; घालपिसें. [घालणें + वेड] घालवेडा-वि. वेडाची बतावणी करणारा; बाहेरून वेड पांघरणारा परंतु आंतून धूर्त, लुच्च्या असलेला. [घालवेड] घाला- घाली-स्त्री. (कामांचा) गोंधळ; धुडगूस; घालमेल. 'घाला- घाली घालिती नित्य सासा । टांकू बाई नेदिती हा उसासा ।।' -सारुह ७.१०६. [घालणें द्वि.] घालामेल-स्त्री. (गो.) व्याकुळता; घालमेल अर्थ ७ पहा. घालामेलचें-अक्रि. (गो.) कासावीस होणें; तगमगणें; व्याकुळ होणें. [घालमेल]
चंडिका, चंडी
स्त्री. १. दुर्गादेवता; महांकाली; भवानी : ‘सुवर्णाचिया चंडिका । सुवर्णशूळेचि देखा ।’ – ज्ञा १८·४४४ २. (ल.) (चंडीसारखी) अति रागीट, कैदाशीण, निर्दय स्त्री. [सं.] (वा.) चंडिकेचा अवतार धारण करणे – अतिशय क्रुद्ध, संतप्त होणे : ‘दादा जाताच मी एकदम चंडिकेचा अवतार धारण केला.’ – अचावा ५२.
चूडा
स्त्री. १ शेंडी. २ मोराच्या डोक्यावरील तुरा; कोणताहि तुरा, गुच्छ, शेखर. ३ (ल.) मुकुट; शिखर; शेंडा. [सं. चूडा = शिखा, शेंडी; प्रा. चूला; तुल॰ हिं. चुटिया, चुटकी, चोटी; गु. चोटली] ॰कर्म-न. चौल; लहान मुलाचें जावळ काढून प्रथम शेंडी ठेवण्याचा विधि. [सं. चूडा + कर्म] ॰मणी-पु. शिरोरत्न; मस्तकीं धारण केलेला मणि, रत्न. 'हस्तें ओढिल वस्त्र चुंबिल तदा चूडामणी मागणें ।' -विठ्ठल, रसमंजरी ६८. (ल.) अत्युत्तम कर्तबगार माणूस, वस्तु; अतिशय निपुण मनुष्य. उ॰ संगीतचूडामणी; चिकित्सकचूडामणी इ॰ [सं. चूडा + मणि] ॰रत्न-न. तुर्यांतील रत्न; मस्तकीं धारण केलेलें रत्न. -वि. (ल.) अग्रेसर; अग्रभागी असणारें. 'जो मातें सेवा किरीटी । तो होय ब्रह्मतेच्या मुकुटीं । चूडारत्न ।' -ज्ञा १४.४००. [सं. चूडा + रत्न]
दाली
स्त्री. १ ज्यांत तलवार अडकवितात तो कमरपट्टा; पडदळें. २ (ल.) दुसर्यास आव्हान करण्याकरितां धारण करा- वयाचें चिन्ह; शिपायाचें एक चिन्ह. (क्रि॰ बांधणें; धरणें). 'धान्यावर दाली धरून क्रिया सोडून आला चालून...।' -ऐपो ३३१. [दाल] दाली बांधणें-१ (एखाद्यास) जिंकण्याला अभिमानानें सज्ज होणें. 'बांधोनिया पुण्यावर कंनर चढती दाली । हिंदुपद घेईन म्हणतो निजाम अल्ली ।' -ऐपो २३१. २ जहागीर देणें. ३ (वरिष्ठानें) कनिष्ठाच्या कमरेस पडदळासह तरवार बांधणें. हा एक प्रकारचा सन्मान मानला जात असे. ॰बंद-वि. १ दालीला तलवार लटकावून सज्ज झालेला. २ दाली हें आव्हा- नसूचक चिन्ह धारण केलेला. [दाली + फा. बंद; प्रत्यय]
धान्न
स्त्री. (गो.) खांब; धारण. [धारण]
धारणी
स्त्री. (कों.) आधाराचा लहान खांब; लहान धारण. [धारण]
धर
पु. १. अडकवून, निरोधून ठेवण्याची, टिकवण्याची शक्ती; (शब्दशः व ल.) चिकटून राहण्याची, धारण करण्याची, जडण्याची शक्ती. २. तोलून धरण्याची, वजन सहन करण्याची शक्ती (पायांची, पायांतील वस्तूंची शक्ती; आधार : ‘कड्यावर बांधकाम केल्यावर चांगला धर लागेपर्यंत कड्याखालची जमीन उकरून खाली उतरावें लागतें.’ – मॅरेट १७. ३. खळ; (प्राण्यांची मलमूत्रविसर्जन इ.व्यापार) दाबून धरण्याची शक्ती; संयमनशक्ती. ४. कष्ट, मानसिक त्रास सोसण्याची शक्ती; तग; टिकाव. ५. बोलण्यात, वागण्यात व विचारांत एकवाक्यता; सुसंगती; व्यवस्थितपणा; मेळ. ६. धीर (क्रि. तुटणे) : ‘धर सर्वांचाहि जेधवां तुटला ।’ – मोगदा १·२. ७. जम; घडी; बस्तान : ‘इकडे अद्यापि पक्का धर बसला असें त्यास वाटत नाही.’ – सूर्यग्र. ८. पर्वत : ‘जो धैर्यें धरसा, सहस्त्रकरसा तेजें तमा दूरसा ।’ र ४. ९. (समासात) धारण करणारा; ठेवणारा; पाळणारा. उदा. जल–चक्र–गंगा–धर इ. १०. काठ; तीर. [सं. धृ]
इटेकरी, इटेबरदार
पु. १ इटा हत्यार धारण करणारा, बाळगणारा शिपाई. -भाअ १८३२. (गो.) इटेकार. [इटा + कर; इटा + फा. बर्दार = धारण करणारा]
मैल
पु. घाण; खळखळ; मल. 'जळती चित्त मैल सर्वथा ।' -विपू १.६९. [सं. मल; सं. मल् = धारण करणें] ॰खोर-वि. मळकट रंगाचा; घाण दडवणारा; मळखाऊ (रंग). मैला-पु. नरक; घाण. [सं. मल् = धारण करणें] मैलो-पु. (कु.) मळ. [म. मैला]
नट
पु. १. एक जात व त्यातील व्यक्ती; डोंबारी; कोल्हाटी; बहुरूपी नट. हा स्त्रिया इ.चा वेष धारण करून नाचणे, दोरीवर चालणे, उड्या मारणे इ.अनेक प्रकारचे खेळ करून उपजीविका करतो. नाच्या पोऱ्या; सोंगाड्या. २. (नाट्य.) नाटकात स्त्री–पुरुष भूमिकेचे काम करणारा मनुष्य, पात्र. ३. नटण्याची सवय, स्वभाव असलेला मनुष्य. ४. उनाड, व्रात्य, कपटी, हरामी मनुष्य : ‘ठस ठोंबस खट नट । जगभांड विकारी ।’ – दास २·३·३२. ५. चेष्टा; हावभाव : ‘वदतां रददीप्तिस दावि नटें ।’ – अकक २ किंकरकृत शुकरंभासंवाद २०. ६. वेष; अवतार; रूप; सोंग : ‘धरोनिया रुद्राचा नट । नंदीवरी जाहला उपविष्ट ।’ – कथा २·१२·२४. [सं.] (वा.) नटामाजी नेटकी जाया– (सुंदर पुरुषनटाने स्त्रीवेष धारण केला तरी तो जसा कृत्रिम असतो व त्या भूमिकेतील तशी सुंदर स्त्री जशी दुर्लभ असते त्यावरून) दिसण्यात अतिशय सुंदर पण बनावट व दुर्लभ अशी वस्तू.
पांघरूण
न. १ पांघरलें जाईल अशा तऱ्हेनें अंगावर घ्यावयाचें, धारण करावयाचें वस्त्र. उदा॰ शेला, शाल, रजई इ॰ 'भक्ति पांघरूण ते माझें सांडलें । मज वोसंडिलें संतजनीं ।' -राम- दास-स्फुट अभंग ४१ (नवनीत पृ. १५३). 'आणलें जरतार पांघ रूण ।' ऐपो ४४३. २ (अनेकवचनीं प्रयोग) पांघरण्याच्या, नेस- ण्याच्या पोषाखाच्या उपयोगाचीं वस्त्रें समुच्चयानें. 'परटाकडचीं पांघरुणें आलीं नाहींत.' ३ (ल.) (आपल्या) निर्वाहाचा, संरक्षणाचा भार ज्यावर आहे असा पुरुष, व्यक्ति, आईबाप, यजमान, आश्रयदाता इ॰ 'राजा राज्याचें पांघरुण' 'आई हें मुलांचें पांघरूण.' [सं. प्रांगावरण? सं. प्रावरण; प्रा. पावरण; पंगुरण-पाइ] ॰करणें-वस्त्रें इ॰ धारण करणें; पोषाख करणें. या अर्थीं वाक्प्रचाराचा प्रयोग अशिष्ट असून प्रायः तो युरोपिय- नांच्या नोकरांत 'कपडा करना' या हिंदी वाक्प्रचाराप्रमाणें रूढ आहे. घालणें, घेणें इ॰ क्रियापदासह प्रयोग शिष्ट आहे. ॰घालणें- (ल.) वाईट गोष्ट, गुन्हा इ॰ छपविणें, झांकण्याचा प्रयत्न करणें, उघडकीस येऊं न देणें. 'ते (गुन्हेगार लोक) आपल्या वर पांघरूण घालणाऱ्या गांवकामगारांना पानसुपारी देतात.' -गुजा ३१. ॰पांघरुणें जाळणें-पत्राचा जबाब मिळण्यासाठीं पूर्वीच्या काळचा धरणें घेण्याचा एक प्रकार; त्रागा करणें. 'खिजमतगारानीं पांघरुणें जाळलीं तथापि हुजूर न आले.' -पया ११८.
त्रिपुंड्र
पुन. शैव आपल्या कपाळावर भस्माचे आडवे तीन पट्टे ओढून करितात तें चिन्ह; रामानुजपंथी वैष्णव आपल्या कपाळावर गोपीचंदनाचे तीन उभे पट्टे लावून करितात तो तिलक, चिन्ह. -वि. कपाळावर भस्माचे आडवे पट्टे किंवा गोपीचंदनाचे तीन उभे पट्टे धारण करणारा. [सं. त्रि + पुंड्र = पट्टा] ॰धारी-वि. कपाळावर त्रिपुंड्र धारा करणारा; रामानुजपंथीय वैष्णव. [सं. त्रि + पुंड्र धारिन् = धारण करणारा]
उहू
पु. १ व्यूहः विभू; कट; युक्ति; बेत; तर्क; कल्पना. (क्रि॰ रचणें.). 'रात्रों जाऊन घर वेढून त्याला धरावें असा उहू रचला.' २ परिस्थितीप्रमाणें मूळ सामान्य रीतीच्या वाक्यांत विशेषा- नुरोधानें केलेला फरक. (उ॰ एकवचनाच्या ठिकाणीं अनेकवचन, पुल्लिंगाच्या ठिकाणीं स्त्रीलिंग, अमुक शब्दाबद्दल विष्णु इ. नांव). 'यज्ञोपवीत धारण करावें हें सामान्यवचन, येथें दोन यज्ञोपवीतें धारण करावीं असा उहू केला पाहिजे.' हेतु कायम ठेवून शास्त्र- वचनांत जरूर तो बदल करणें. ३ प्रथम उल्लेख; प्रस्तावना; परि- स्फोट; विषयाची मांडणी (क्रि. काढणें). 'मी आपण होऊन उहू काढणार नाहीं, तुम्हीं उहू काढा म्हणजे मी मध्यस्थपणें बोलेन.' [सं. ऊह, ऊहा, व्यूह]
उहू, उह
पु. १. व्यूह; विभू; कट; युक्ती; बेत; तर्क; कल्पना (क्रि. रचणे.) २. परिस्थितीप्रमाणे मूळ सामान्य रीतीच्या वाक्यात विशेषानुरोधाने केलेला फरक; हेतू कायम ठेवून शास्त्रवचनात जरूर तो बदल करणे. (उदा. एकवचनाच्या ठिकाणी अनेकवचन, पुल्लिंगाच्या ठिकाणी स्त्रीलिंग, अमुक शब्दाबद्दल विष्णू इ. नाव. यज्ञोपवीत धारण करावें हें सामान्यवचन, येथे दोन यज्ञोपवीते धारण करावी असा उहू केला पाहिजे.). ३. प्रथम उल्लेख; प्रस्ताव; प्रस्तावना; परिस्फोट; विषयाची मांडणी. (क्रि. काढणे.) [सं. ऊह्]
विडंबन-ना
नस्त्री. १ उपहास; फजिती; टवाळी; थट्टा; चेष्टा. एखादी गोष्ट वस्तुतः आहे त्याहून भिन्न स्वरूपांत दर्शवून तिची टवाळी करणें; उपहास करणें; कुचेष्टामिश्रित दोष- दिग्दर्शन. यांत कुचेष्टा हा एकच हेतु नसून विडंबित गोष्ट सुधार- ण्याचाहि हेतु असतो. २ नक्कल; सोंग; बतावणी. ३ दुसऱ्याचें रूप धारण करणें; दुसऱ्याची आकृति धारण करणें. [सं. विडंब्] विडंबित-वि. १ फजित; उपहास केलेला, झालेला. २ ज्याची नक्कल, अनुकरण, बतावणी केली आहे तो.
घालणे
सक्रि. १. ठेवणे; राखणे; स्थित करणे. २. सोडणे; टाकणे; फेकणे; : ‘उडी घालितो संकटीं स्वामि तैसा ।’ – राम ३७. ३. उडी टाकणे : ‘वणवा मियां आघवा । पांखेंचि पुसोनि घेयावा । पतंगु पां हांवा । घाली जेवीं ॥’ – ज्ञा १४·१९१. ४. जडविणे; लावणे; तल्लीन करणे : ‘स्वरुपीं घातलें मना । यातनेसी केली यातना ।’ – दास ५·९·५४. ५. मारणे; फेकणे; प्रक्षेपणे : ‘अभिमंत्रुनी पंनकासस्त्रें । बाणु घातला ईस्वरें ।’ – उषा १६९४. ६. ओतणे. ७. पसरणे; बाहेर मांडणे; रचणे; ठेवणे : ‘आकाशीं घातीला मंडप ।’ – मसाप २·२६. ८. (आत) खुपसणे; भोसकणे. ९. (एखाद्या पदार्थात दुसरा पदार्थ) मिसळणे; प्रविष्ट करणे. १०. (एखाद्या कामाला मनुष्य, जनावर) लावणे; जुंपणे; नेमणे; योजणे. ११. (दुकान, शाळा, बाजार इ.) मांडणे; स्थापन करणे; सुरू करणे. १२. (अन्न खाद्यपदार्थ इ.) वाढणे. जसे :— मला भात घाल. १३. (अंगावर धारण करण्याच्या विवक्षित वस्तू) धारण करणे; परिधान करणे; चढवणे. (वा.) घालून घेणे – (हट्टाने, जोराने, वेगासरशी) स्वतःचे शरीर, अंगावरून खाली किंवा आत टाकणे, फेकणे; एकदम अंग टाकणे : ‘नदी भरतां भरतां घालुनिया घेती ।’ – रामदास – रामदासी भा १५. पृ. २६४. घालूनपाडून बोलणे – वक्रोक्तीने उपरोधिक भाषेत निंदा करणे, दोष देणे; टोमणा मारणे; खोचून बोलणे : ‘टोंचून, घालूनपाडून बोलण्याच्या कामात बायका पटाईत असतात.’ – संगीत मेनका ११. एखाद्यावर घालणे – एखाद्याला दोष देणे, लावणे : ‘कष्टी होऊनियां लेखीं । प्रारब्धावरी घालिती ।’ – दास १२·२·५. [सं. ग्रह्.]
तोंड
न. १ ज्यानें खातां वं बोलतां येतें तो शरीराचा अव- यव; मुख; वदन; तुंड. २ चेहरा; हनुवटीपासून डोक्यापर्यंत मस्तकाचा दर्शनी भाग. ३ (सामा.) (एखाद्या वस्तूचा) दर्शनी भाग; पुढचा-अग्रभाग; समोरील अंग. 'या ओझ्याच्या तोंडीं मात्र चांगल्या चांगल्या पेंढ्या घातल्या आहेत.' ४ (फोड, गळूं इ॰ कांचा) छिद्र पडावयाजोगा, छिद्रासारखा भाग; व्रणाचें मुख. यांतूनच पुढें पू, लस इ॰ वाहतात. ५ (कुपी, तपेली, लोटी इ॰ कांचें) पदार्थ आंत घालावयाचें भोंक; द्वार; मार्ग; मुख. ६ (एखाद्या विषयांत, शास्त्रांत, गांवांत, देशांत, घरांत) शिरकाव होण्याचा मार्ग; प्रवेशद्वार. 'ह्या घराचें तोंड उत्तरेस आहे.' ७ (ल.) गुरुकिल्ली. उदा॰ 'एखाद्या प्रांताचें, देशाचें किल्ला हें तोंड होय.' 'व्याकरण भाषेचें तोंड होय.' ८ (वारा इ॰कांची) दिशा; बाजू. ९ धैर्य; दम; उमेद; एखादें कार्य करण्याविषयींची न्यायतः योग्यता. १० एखाद्या पदार्थाचें ग्रहण किंवा त्या पदार्थाचा एखाद्या कर्याकडे विनियोग इ॰ कांचा आरंभ त्या पदार्थाच्या ज्या भागाकडून करि- तात तो भाग. 'भाकरीस जिकडून म्हटलें तिकडून तोंड आहे.' ११ (युद्ध, वादविवाद इ॰कांसारख्या गोष्टींची) प्रारंभदशा. 'वादास आतां कुठें तोंड लागलें.' १२ (सोनारी धंदा) हातोड्याच्या सगळ्यांत खालच्या बाजूस अडिश्रीच्या बुडासारखा जो भाग असतो तो. यानें ठोकलेला जिन्नस सारखा करून घेतात. १३ (सोनारी धंदा) कांबीस गोल आकार देतांनां तिचीं टोंकें जेथें जुळतात तो भाग. १४ (बुद्धिबळें) डाव सुरू करण्याचा प्रकार; मोहरा. 'वजीराच्या प्याद्याचें तोंड.' [सं. तुंड; प्रा. तोंड] (वाप्र.) ॰आटोपणें, सांभाळणें, आवरणें-जपून बोलणें; बोलण्याला आळा घालणें; अमर्याद भाषण, अभक्ष्यभक्षण यांपासून निवृत्त होणें. ॰आणणें- (आट्यापाट्यांचा खेळ) शेवटची पाटी खेळून जाऊन पुन्हां एक एक खेळत येणें; पाणी आणणें; लोण आणणें. ॰आंबट करणें- (एखाद्यानें) असंतुष्ट, निराशायुक्त मुद्रा धारण करणें. तोंड आहे कीं तोबरा-खादाड किंवा बडबड्या माणसास उद्देशून वापरावयाचा, 'किती खातोस' 'किती बोलतोस' या अर्थाचा वाक्प्रचार. ॰उतरणें-(निराशा, आजार इ॰ कांनीं) चेहरा म्लान होणें, सुकणें, फिका पडणें, निस्तेज होणें. ॰उष्टें करणें-(अन्नाचा) एखादा-दुसरा घांस, एक दोन घांस खाणें; जेवणाचें नुसतें नांव करणें. ॰करणें-बडबड, वटवट, बकबक करणें; उद्धटपणानें, निर्लज्ज- पणानें बोलणें. ॰करून बोलणें-निर्लज्जपणें, आपला (लहान) दर्जा सोडून बोलणें. ॰काळें करणें-(उप.) एखादा ठपका, तोहमत अंगावर आल्यामुळें निघून, पळून, निसटून जाणें; हातावर तुरी देणें; दृष्टीस न पडणें (केव्हां केव्हां तोंड हा शब्द वगळला तरी चालतो. जसें:-त्यांनीं काळें केलें). ॰गोड करणें-१ (एखाद्याला) लांच देणें; खूष करणें. २ मेजवानी देणें; गोड खावयास घालणें. ॰गोरेंमोरें करणें-(कोणी रागें भरल्यामुळें, मनास वाईट वाटल्यामुळें) निराशेची, लाजलेपणाची मुद्रा धारण करणें. ॰घालणें-(दोघे बोलत असतां तिसर्यानें) संबंध नसतां मध्येंच बोलणें. ॰घेऊन येणें-एखाद्यानें एखाद्यावर सोंपविलेलें काम न करतां त्यानें तसेंच परत येणें. 'असें सर्वांनीं न करावें. जो मामलेदार असें करून तोंड घेऊन येईल त्याचें मुखावलोकन न करितां फिरोन सेवा न सांगतां त्यास घरींच बसवावें.' -मराआ २९. ॰घेणें-१ बोंबलत सुटणें; ताशेरा झाडणें; बोंबलपट्टी करणें. २ तोंडांतून लाल गळावी म्हणून पारा इ॰ तोंड आणणारीं औषधें घेणें. तोंड देणें पहा. 'मी वैद्याकडून तोंड घेतलें आहें.' तोंडचा-वि. १ विरुद्ध, उलट दिशेचा; समोरून येणारा (वारा, ऊन, भरती इ॰). २ ज्याची कर्तबगारी केवळ तोंडांतच, बोल- ण्यांतच आहे, क्रियेंत दिसून येत नाहीं असा. 'तोंडचा शिपाई- कारकून-सुग्रण-खबरदार.' ३ तोंडानें सांगितलेला, निवेदन केलेला; तोंडीं केलेला (व्यवहार, हिशेब, पुरावा इ॰). याच्या उलट लेखी. तोंडचा, तोंडींचा घास काढणें-हिरून घेणें-१ (एखा- द्याची) अगदीं आटोक्यांत आलेली वस्तु, पदरीं पडावयास आलेला लाभ हिसकावून घेणें. २ (एखाद्याच्या) अन्नावर पाणी पाडणें; अन्नांत माती कालविणें; पोटावर पाय देणें. तोंडचा-तोंडींचा घांस देणें-(ल.) (एखाद्यास) अतिशय प्रेमानें, ममतेनें वाग- विणें; प्रसंगविशेषीं आपण उपाशी राहून दुसर्यास खावयास देणें. तोंडचा गोड आणि हातचा जड-बोलण्यांत गोड व अघळ- पघळ, पण प्रत्यक्ष पैशाची मदत करण्यांत पूज्य. तोंडचा चतुर- वि. बोलण्यांत पटाईत; वाक्पटु. तोंडचा जार-पु. नुकत्याच जन्मलेल्या मुलाच्या तोंडांतील फेंस; चिकटा; ओंठावरचा जार; जन्मप्रसंगींचा तोंडावरचा पातळ पापुद्रा (विशेषतः तुझ्या, त्याच्या तोंडाचा जार वाळला नाहीं. = तूं, तो अजून केवळ बालक आहेस.' अशा वाक्यांत उपयोग). तोंडचा नीट-वि. १ बोलून भला, चांगला; बोलकाचालका; सौजन्ययुक्त. २ युक्तायुक्त विचार करून बोलणारा. ३ हजरजबाबी; अस्खलित बोलणारा. तोंडचा फटकळ-वि. शिवराळ; उघडतोंड्या; अश्लील, शिवराळ भाषण करणारा. तोंडचा रागीट-वि. जहाल; तिखट; कडक भाषण करणारा. तोंडचा शिनळ-वि. १ इष्कबाज, फंदी म्हणून नांव मिळविण्याची इच्छा करणारा; स्त्रियांची खोटी खुषमस्करी करणारा; स्त्रियांच्या कृपेची खोटीच फुशारकी मारणारा. २ निरर्गल व अश्लील भाषण करणारा; शिवराळ. तोंड(डा)ची गोष्ट-स्त्री. सहजसाध्य, अतिशय सोपी गोष्ट, काम. 'वाघ मारणें तोंडची गोष्ट नव्हे.' तोंड चुकविणें-हातून एखादा अपराध घडला असतां कोणी रागें भरेल या भीतीनें, काम वगैरे टाळण्यासाठीं चुकारतट्टू- पणानें एखाद्यापासून आपलें तोंड लपविणें; दृष्टीस न पडणें; छपून असणें. ॰चे तोंडीं-क्रिवि. प्रत्यक्षाप्रत्यक्ष; तोंडानें; बोला- चालीनें. ॰चे तोंडीं व्यवहार-केवळ तोंडानें बोलून, बोलाचा- लीनें झालेला, होणारा व्यवहार, धंदा. याच्या उलट लेखी व्यव- हार. ॰चें पायचें-न. (कों.) गुरांच्या तोंडास व पायांस होणारा रोग. ॰चे हिशेब-पुअव. कागदांवर आंकडेमोड न करितांमनां- तल्यामनांत कांहीं आडाख्यांच्या; मदतीनें करावयाचे हिशेब. तोंडचें तोंडावरचें पाणी पळणें; उडणें, तोंड कोरडें पडणें-१ (भीतीमुळें) चेहरा फिका पडणें; बावरून,घाबरून जाणें. २ (भीति इ॰ कांमुळें) तोंडांतील ओलावा नाहींसा होणें. तोंड टाकणें-टाकून बोलणें-१ (क्रोधावेशानें) अप शब्दांचा वर्षाव करणें; निर्भर्त्सना करून बोलणें; खरडपट्टी काढणें; अद्वातद्वा बोलणें. 'तूं नोकर-माणसांवर उगीच तोंड टाकलेंस.' २ (घोडा इ॰ जनावरानें) चावण्यासाठीं तोंड पुढें करणें. 'ह्या घोड्याला तोंड टाकण्याची भारी खोड आहे, ती घालविली पाहिजे.' ॰ठेचणारा-फाडणारा-वि. (एखाद्या) उद्धट, बडबड्या माण- सास गप्प बसविण्याची हातोटी ज्यास साधली आहे असा; उद्दामपणानें, गर्वानें बोलणार्या व्यक्तीस रोखठोक उत्तर देऊन चूप बसविणारा. [तोंड + ठेचणें] ॰तोडणें-(ना.) एखादी वस्तु मिळ- विण्याकरितां एखाद्याच्या पाठीस लागणें; त्याच्यापुढें तोंड वेंगा- डणें. ॰दाबणें-लांचलुचपत देऊन (एखाद्याचें) तोंड बंद करणें; (एखाद्यास) वश करणें; गप्प करणें. ॰दाबणारा-वि. लांच देऊन (एखाद्या) प्रतिकूल व्यक्तीस वळविणारा; गप्प बसविणारा. [तोंड + दाबणें = बंद करणें] ॰दाबी-स्त्री. (एखाद्यानें) गुप्त बातमी फोडूं नये म्हणून, प्रतिकूल बोलूं नये म्हणून (त्यास) लांच देऊन त्याचें तोंड दाबण्याची, वश करण्याची क्रिया. 'तो गांवकाम- गारांची तोंडदाबी करतो.' -गुजा २१. [तोंड + दाबणें = बंद करणें] ॰दिसणें-एखाद्याची केलेली निर्त्भर्त्सना दुसरी बाजू न कळतां लोकांच्या नजरेस येणें व आपणच वाईट ठरणें (पण ज्याची निर्भर्त्सना केली असेल त्याचें वर्तन सुधारण्याची आशा नसणें ). 'मी तुला रागें भरलों म्हणजे माझें तोंड मात्र दिसेल, पण तूं आपला आहे तसाच राहणार.' ॰देणें- १ पारा वगैरे देऊन तोंडाच्या आंतील त्वचा सुजविण; तोंड आणविणें. 'वैद्य- बोवा म्हणाले कीं त्याला तोंड दिलें आहे.' २ सैन्याच्या अग्रभागीं राहून शत्रूवर हल्ला करणें. ३ (एखाद्याचा) प्रतिपक्षी होऊन राहणें; लढावयाला सिद्ध होणें. ४ (आट्यापाट्यांचा खेळ शेवटची पाटी खेळून परत येणार्या गड्याकडे पाटी धरणारानें तोंड फिरविणें. ५ एखाद्या गोष्टीला न भितां तींतून धैर्यानें पार पडण्याची तयारी ठेवणें. ॰धरणें-१ अन्नसेवन करण्याची तोंडाची शक्ति आजार वगैरे कारणांमुळें नाहींशी होणें. 'त्याचें तोंड धरलें आहे, त्याला चमच्याचमच्यानें दुध पाजावें लागतें.' २ (एखा- द्याची) बोलण्याची शक्ति नाहींशी करणें. ३ (एखाद्याला आपल्या) तावडींत, कबजांत आणणें. 'मी त्याचें तोंड धरलें आहे, तो आतां काय करणार !' ॰धुवून येणें-(उप.) एखाद्याची विनंति कधींहि मान्य होणार नाहीं असें म्हणून फेटाळून लावतांना योजण्याचा तिरस्कारदर्शक वाक्प्रचार. ॰निपटणें-(आजार, उपवास इ॰ कारणांमुळें एखाद्याचे) गाल खोल जाणें, चेहरा सुकणें. 'महिनाभर हें मूल तापानें आजारी होतें, त्याचें तोंड पहा कसें निपटलें आहे तें.' ॰पडणें-१ सुरवात होणें. 'लढाईस तोंड पडलें.' २ (गळूं इ॰ कांस) छिद्र पडणें; फुटणें; वाहूं लागणें. ॰पसरणें-वेंगाडणें-१ खिन्नपणाची, केविलवाणी मुद्रा धारण करणें. २ हिनदीनपणानें याचना करणें. ॰पाघळणें-१ न बोला- वयाची गोष्ट कोणाएकापाशीं बोलून टाकणें; बडबडणें. २ (ल.) गुप्त गोष्ट बाहेर फोडणें, फुटूं देणें. ॰पाडणें-एखादें कोडें सोड- विण्यास, वेढा फोडण्यास प्रारंभ करणें; भांडणास सुरवात करणें. ॰पाहणें-१ (एखाद्याच्या) आश्रयाची, मदतीची अपेक्षा करून असणें. 'आम्ही पडलों गरीब, म्हणून आम्हांला सावकाराचीं तोंडें पाहण्याची पाळी वारंवार येते.' २ (एखाद्यानें) स्वतःच्या शक्तीचा, कर्तुत्वाचा अजमास करणें. 'तूं असें करीन म्हणतोस, पण आधीं आपलें तोंड पहा !' ३ बोलणाराचें भाषण नुसतें ऐकणें, पण त्यानें सांगितलेलें करावयास किंवा केलेला बोध अनु- सरावयास प्रवृत्त न होतां स्वस्थ बसून राहणें. 'म्हणती हाणा, मारा, पाडा, घ्या, काय पाहतां तोंडा ।' -मोद्रोण ३.१२५. ॰पाहात-बसणें-काय करावें, कसें करावें या विवंचनेंत असणें. ॰पिटणें-बडबड करणें. 'पश्चिमद्वारींचें कवाड । सदा वार्यानें करी खडखड । तैशी न करी बडबड । वृथा तोंड पिटीना ।' -एभा १०.२३१. ॰फिरणें-१ आजारानें, पदार्थाच्या अधिक सेवनानें तोंडाची रुची नाहींशी होणें; तोंड वाईट होणें. २ तोंडांतून शिव्यांचा वर्षाव होऊं लागणें. 'तो रागावला म्हणजे कोणावर त्याचें तोंड फिरेल ह्याचा नेम नाहीं.' ॰फिरविणें-१ तोंडाची चव नाहींशी करणें. २ शिव्यांचा वर्षाव करीत सुटणें. 'तो रागावला म्हणजे तुमच्यावर देखील तोंड फिरवावयाला कचर- णार नाहीं.' ३ वितळत असलेला किंवा तापविला जात अस- लेला धातु इ॰ कानें) रंगामध्यें फरक दाखविणें, रंग पाल- टणें. 'ह्या तांब्यानें अद्याप तोंड फिरविलें नाहीं, आणखी पुष्कळ आंच दिली पाहिजे.' ४ दुसर्याकडे पाहणें; विशिष्ट गोष्टी- कडे लक्ष्य न देतां इतर गोष्टींकडे प्रवृत्ति दाखविणें. ५ गतीची दिशा बदलणें; दुसर्या दिशेला, माघारें वळणें. ॰फुटणें-१ थंडीमुळें तोंडाची बाह्य त्वचा खरखरीत होणें, भेगलणें. २ (एखाद्याची) फजिती उडणें; पत नाहींशी होणें; नाचक्की होणें; अभिमान गलित होण्याजोगा अपमान, शिक्षा इत्यादि होणें. ॰बंद करणें-१ जीभ आवरणें; जपून बोलणें. २ (एखाद्याला) लांच देऊन गप्प बसविणें, वश करून घेणें. ॰बंदावर राखणें- खाण्याला किंवा बोलण्याला आळा घालणें. 'तूं आपलें तोंड बंदावर राखिलें नाहींस तर अजीर्णानें आजारी पडशील.' ॰बांधणें-लांच देऊन (एखाद्याचे) तोंड बंद करणें; (एखाद्यानें) गुप्त गोष्ट फोडूं नये म्हणून पैसे देऊन त्यास गप्प बसविणें. ॰बाहेर काढणें-१ तोंड दाखविणें; राजरोसपणें समाजांत हिंडणें (बहुधां निषेधार्थी प्रयोग). 'तुरुंगांतून सुटून आल्यावर त्यानें आज दोन वर्षांत एकदांहि तोंड बाहेर काढलें नाहीं.' २ फिरण्यासाठीं, कामकाजासाठीं घराबाहेर पडणें. ॰बिघडणें-तोंड बेचव होणें; तोंडास अरुचि उत्पन्न होणें. विटणें. -॰भर-भरून बोलणें- भीड, संकोच, भीति न धरतां मनमोकळेपणानें भरपूर, अघळपघळ बोलणें; दुसर्याचें आणि आपलें समाधान व्हावयाजोगें अघळपघळ बोलणें. ॰भरून साखर घालणें-(एखाद्याचें) तोंड साखरेनें भरणें; (एखाद्याच्या) कामगिरीबद्दल, विजयाबद्दल संतोषादाखल त्याचें तोंड साखरेनें भरणें; (एखाद्याच्या) कामगिरीबद्दल गोड, भरपूर मोबदला देणें. ॰मागणें-(आट्यापाट्यांचा खेळ) लोण घेऊन परत जातांना पाटीवरील गड्यास आपणाकडे तोंड फिर- विण्यास सांगणें. तोंड मागितल्यावर पाटीवरील गडी आपलें तोंड फिरवितो त्यास 'तोंड देणें' म्हणतात. ॰माजणें-१ मिष्टान्न खावयाची चटक लागल्यानें साध्या पदार्थाबद्दल अरुचि उत्पन्न होणें. २ शिव्या देण्याची, फटकळपणानें बोलण्याची खोड लागणें. ॰मातीसारखें-शेणासारखें होणें-(आजारानें) तोंडाची चव नाहींशी होणें; तोंड विटणें, फिरणें; अन्नद्वेष होणें. ॰मिचकणें- दांत, ओंठ खाणें. ॰येणें-१ तोंडाच्या आंतल्या बाजूच्या त्वचेस फोड येऊन ती हुळहुळी होणें व लाळ गळूं लागणें. २ (कर.) लहान मूल बोलूं लागणें. 'आमच्या मुलाला तोंड आलें आहे.' = तो बोलावयास लागला आहे. ॰रंगविणें-१ विडा खाऊन ओंठ तांबडे लाल करून घेणें. २ (ल.) (एखाद्याचें थोबाड) थोबाडींत मारून लाल- भडक करून सोडणें. ॰लागणें-(लढाई, वादविवाद, अंगीकृत कार्य इ॰ कांस) सुरवात होणें. 'तेव्हां युद्धास तोंड लागलें.' -इमं २९०. ॰लावणें-१ (वादविवाद इ॰ कांस) सुरवात करणें. २ प्यावया- साठीं एखादें पेय ओंठाशीं नेणें. ३ ॰वाईट करणें-निराशेची मुद्रा धारण करणें. ॰वाईट होणें-१ तोंडावर निराशेची मुद्रा येणें. २ (ताप इ॰ कांमुळें) तोंडास अरुचि येणें. ॰वांकडें करणें-१ वेडावून दाखविणें. २ नापसंती दर्शविणें. ॰वाजविणें-एकसारखें बोलत सुटणें; निरर्थक बडबड करणें; बकबकणें; वटवट करणें; भांडण करणें. ॰वासणें-१ निराशेनें, दुःखानें तोंड उघडणें व तें बराच वेळ तसेंच ठेवणें. २ याचना करण्यासाठीं तोंड उघडणें, वेंगाडणें. ॰वासून पडणें-शक्तीच्या क्षीणतेमुळें, उत्साह, तेज, वगैरे नष्ट झाल्यामुळें, गतप्राण झाल्यामुळें आ पसरून पडणें. 'तो पडला सिंहनिहमत्तद्विपसाचि तोंड वासून ।' -मोगदा ५.२५. ॰वासून बोलणें-अविचारानें बोलणें. 'ऐसें स्वसख्यांपासीं कां गे वदलीस तोंड वासून ।' -मोउद्योग १३.२०५. ॰विचकणें-दीन मुद्रेनें आणि केविलवाण्या स्वरानें याचना करणें. ॰वेटा(डा)विणें- (काव्य) (एखाद्यास) वेडावून दाखविण्यासाठीं त्याच्यापुढें तोंड वेडेंवाकडें करणें. ॰शेणासारखें पडणें-(लाजिरवाणें कृत्य केल्यानें) तोंड उतरणें; निस्तेज होणें; काळवंडणें. ॰संभाळणें- जपून बोलणें; जीभ आवरणें; भलते सलते शब्द तोंडांतून बाहेर पडूं न देणें; अमर्याद बोलण्यास आळा घालणें. ॰सुटणें- चरांचरां, फडाफडां, अद्वातद्वा बोलूं लागणें. ॰सुरू होणें-बड- बडीला, शिव्यांना सुरवात होणें. ॰सोडणें-१ फडांफडां, अद्वातद्वा बोलूं लागणें; अमर्याद बोलणें. २ आधाशासारखें खात सुटणें; तोंड मोकळें सोडणें. ॰हातीं-हातावर धरणें-तोंडे सोडणें (दोन्ही अर्थीं) पहा. तोंडाचा खट्याळ-फटकळ-फटकाळ-फटकूळ-वाईट-शिनळ-वि. शिवराळ; तोंडाळ; अश्लील बोलणारा. तोंडाचा खबरदार-बहादर-बळकट-वि. बोलण्यांत चतुर, हुषार; बोलण्याची हातोटी ज्याला साधली आहे असा. -तोंडाचा गयाळ, तोंडगयाळ-वि. जिभेचा हलका; चुर- चोंबडा; लुतरा; बडबड्या; ज्याच्या तोंडीं तीळ भिजत नाहीं असा. तोंडाचा गोड-वि. गोड बोलणारा; गोडबोल्या. म्ह॰ तोंडचा गोड हाताचा जड = गोड व अघळपघळ भाषण करणारा पण प्रत्यक्ष कांहींहि मदत, पैसा न देणारा. तोंडाचा जड-वि. रेंगत बोलणारा; फार थोडें बोलणारा; अस्पष्ट भाषण करणारा; तोंडाचा तिखट-वि. खरमरीत, स्पष्ट, झोंबणारें, कठोर भाषण करणारा. तोंडाचा तोफखाना सुटणें-(एखाद्याची) अद्वातद्वा बोल- ण्याची क्रिया सुरू होणें; शिव्यांचा वर्षाव होऊं लागणें. तोंडाचा पट्टा सुटणें-चालणें-अद्वातद्वा बोलणें; शिव्यांचा भडिमार सुरू होणें; तोंडाचा पट्टा सोडणें-(एखाद्यानें) शिव्यांचा भडिमार सुरू करणें; जीभ मोकळी सोडणें; (एखाद्याची) खरडपट्टी आरंभिणें. तोंडाचा पालट-पु. रुचिपालट; तोंडास रुचि येईल असा अन्नांत केलेला फेरबदल; अन्नांतील, खाण्यांतील फरक, बदल. तोंडाचा बोबडा-वि. बोबडें बोलणारा; तोतरा. तोंडाचा मिठा-वि. गोडबोल्या; तोंडाचा गोड पहा. तोंडाचा हलका- वि. चुरचोंबडा; भडभड्या; विचार न करितां बोलणारा; फटकळ. तोंडाचा हुक्का होणें-(व.) तोंड सुकून जाणें. तोंडाची चुंबळ-स्त्री. दुसर्यास वेडावून दाखविण्याकरितां चुंबळीसारखी केलेली ओठांची रचना; वांकडें तोंड. तोंडाची वाफ दघडणें- १ मूर्खास उपदेश करतांना, निरर्थक, निरुपयोगी, निष्फळ भाषण करणें. २ ज्यावर विश्वास बसणार नाहीं असें भाषण करणें; मूर्खपणानें बोलणें; वल्गना करणें; बाता मारणें. (या वाक्प्रचारांत दवडणें बद्दल खरचणें गमविणें, फुकट जाणें, घालविणें, काढणें इ॰ क्रियापदेंहि योजतात). तोंडाचें बोळकें होणें-(म्हातारपणामुळें) तोंडां- तील सर्व दांत पडणें. तोंडाचें सुख-न. तोंडसुख पहा. (वरील सर्व वाक्प्रचारांत तोंडाचा या शब्दाऐवजीं तोंडचा हा शब्दहि वापरतात). तोंडांत खाणें, मारून घेणें-१ गालांत चपराक खाणें; मार मिळणें. २ पराभूत होणें; हार जाणें. ३ फजिती झाल्या- नंतर शहाणपणा शिकणें; नुकसान सोसून धडा शिकणें; बोध मिळविणें. तोंडांत जडणें-थोबाडींत, गालांत बसणें (चपराक, थप्पड इ॰). तोंडांत तीळभर न राहणें-अगदीं क्षुद्र अशी गुप्त गोष्टहि पोटांत न ठरणें; कोणतीहि लहानसहान गोष्ट गुप्त ठेवूं न शकणें. तोंडांत तोंड घालणें-१ (ल.) प्रेम, मैत्री इ॰कांच्या भावानें वागणें; मोठ्या प्रेमाचा, मित्रपणाचा आविर्भाव आणून वागणें. २ एकमेकांचें चुंबन घेणें. तोंडांत देणें-(एखाद्याच्या) थोबाडींत मारणें; गालांत चपराक मारणें; तोंडांत बोट घालणें-(ल.) आश्चर्यचकित, थक्क होणें; विस्मय पावणें. तोंडांत भडकावणें-तोंडांत देणें पहा. तोंडांत माती घालणें-खाण्यास अन्न नसणें; अतिशय हाल, कष्ट सोसावे लागणें. तोंडांत माती पडणें-१ (एखाद्याची) उपा समार होणें. २ मरणें. तोंडात शेण घालणें-(एखाद्याची) फजिती करणें; (एखाद्यास) नांवें ठेवणें; खरडपट्टी काढणें. तोंडांत साखर असणें-(गो.) (एखाद्याचें) तोंड, वाणी गोड असणें; गोड बोलत असणें. तोंडांत साखर घालणें-१ तोंड भरून साखर घालणें पहा. २ (उप.) तोंडांत शेण घालणें. 'सावित्री- बाईच्या तोंडांत लोक जेव्हां फारच साखर घालीत, तेव्हां तिनें दोन तीन जुनेरीं एकत्र शिवून जानकीबाईला द्यावी.' -रंगराव. तोंडांत साखर पडणें-(एखाद्याला) आनंदाचा प्रसंग, दिवस येणें. तोंडांतून ब्र काढणें-(तोंडांतून) अधिक-उणें अक्षर काढणें, उच्चारणें. 'आंतल्याआंत चूर होऊन मेलें पाहिजे, तोंडां- तून ब्र काढण्याची सोय नाहीं.' -विकारविलसित. तोंडानें पाप भरणें, तोंडें पाप घेणें-लोकांचीं पातकें उच्चारणें; लोकांचे दोष बोलून दाखविणें; वाईट बोलण्याची हौस यथेच्छ पुरवून घेणें; लोकांचीं पापें उच्चारून जिव्हा विटाळणें. 'कैसीं वो मानुसें । सपाइनि परंवंसें । तोंडे पाप घेती कांइसें । वायां वीण ।' -शिशु २१६. तोंडापुढें-क्रिवि. अगदीं जिव्हाग्रीं; मुखोद्गत. तोंडा- पुरता, तोंडावर गोड-वि. मधुर पण खोटें बोलणारा; दुतोंड्या; वरवर गोड बोलणारा व आंतून कपटी असलेला; उघडपणें प्रिय भाषण करणारा व मनांत निराळेच असणारा. ताडापुरता मांडा-पु. १ भूक भागेल एवढीच पोळी. २ (ल.) जेमतेम गरज भागेल एवढाच जरूर त्या वस्तूचा पुरवठा. तोंडार मारप- (गो.) (एखाद्याच्या) पदरांत चूक बांधणें; वरमण्यासारखें उत्तर देणें. तोंडार ल्हायो उडप-(गो.) फार जलद, अस्ख- लित बोलणें; लाह्या फुटणें. तोंडाला काळोखी आणणें- लावणें-बेअब्रू, नापत करणें. तोंडाला टांकी दिलेली असणें-देवीच्या खोल वणांनीं तोंड भरलेलें असणें; तोंडावर देवीचे वण फार असणें. तोंडाला पाणी सुटणें-(एखादी वस्तु पाहून तिच्यासंबंधीं) मोह उत्पन्न होणें; हांव सुटणें. तोंडाला पानें पुसणें-फसविणें; चकविणें; छकविणें; भोळसाविणें; भोंदणें; तोंडा- वरून हात फिरविणें. 'त्याच्यावर देखरेख करावयाला चार माणसें होतीं, पण त्यानें सर्वांच्या तोंडाला पानें पुसून आपला डाव साधला.' तोंडाला फांटा फुटणें-मूळ मुद्दा सोडून भलतेंच बोलत सुटणें; हवें तसें अमर्याद भाषण करूं लागणें. तोंडावर-क्रिवि. १ समक्ष; डोळ्यांदेखत. २ (ल.) निर्भयपणें; भीड न धरतां. 'मी त्याच्या तोंडावर त्याला लुच्चा म्हणण्यास भिणार नाहीं.' तोंडावर तुकडा टाकणें-(एखाद्यानें) गप्प बसावें, प्रतिकूल बोलूं नये म्हणून त्याला थोडेसें कांहीं देणें. तोंडावर-ला-तोंड देणें-१ (एखाद्यास) विरोध करणें; विरुद्ध बोलणें. २ (एखाद्यास) उद्धटपणानें, अविनयानें, दांडगेपणानें उत्तर देणें; उत्तरास प्रत्युत्तर देणें. तोंडा- वर तोंड पडणें-दोघांची गांठ पडून संभाषण, बोलाचाल होणें. तोंडावर थुंकणें-(एखाद्याची) निर्भर्त्सना, छीःथू करणें; धिक्कार करणें. तोंडावर देणें-तोंडांत देणें पहा. 'काय भीड याची द्या कीं तोंडावरी ।' -दावि ३०२. तोंडावर नक्षत्र पडणें-(एखाद्यानें) तोंडाळपणा करणें; शिवराळ असणें; नेहमीं अपशब्दांनीं तोंड भर- लेलें असणें. 'ह्याजकरिकां तोंडावर नक्षंत्र पडलेल्या पोरास म्या बोलविलें म्हणून हे मला शब्द लावीत नाहींत.' -बाळ २.१४२. तोंडावर पडप-(गो.) थोबाडींत (चपराक) बसणें, पडणें. तोंडावर पदर येणें-१ वैधव्य प्राप्त होणें. 'तिच्या तोंडावर पदर आला म्हणून ती बाहेर पडत नाहीं.' २ लज्जेनें तोंड लपविण्या- जोगी स्थिति होणें. तोंडावर मारणें-(एखाद्याला) पराभूत करणें. तोंडावर सांगणें-बोलणें-(एखाद्याच्या) समक्ष, निर्भीडपणें, बेडरपणें सांगणें, बोलणें. तोंडावरून-तोंडावर हात फिर- विणें-(एखाद्यास) गोड बोलून, फूसलावून, भुलथाप देऊन फस- विणें; भोंदणें; छकविणें. तोंडाशीं तोंड देणें-(हलक्या दर्जाच्या व्यक्तीनें वरिष्ठाशीं) आपला दर्जा विसरून, बरोबरीच्या नात्यानें, अविनयानें बोलणें, व्यवहार करणें. तोंडास काळोखी-स्त्री. मुखसंकोच; ओशाळगत; गोंधळून गेल्याची स्थिति; बेअब्रू; कलंक. तोंडास काळोखी, काजळी लागणें-(एखाद्याची) बेअब्रू, नाचक्की होणें; दुष्कीर्ति होणें; नांवाला कलंक लागणें. तोंडास काळोखी-काजळी लावणें-(एखाद्याचें) नांव कलंकित करणें; बेअब्रू करणें. 'सुनेनें माझ्या तोंडाला काळोखी लावली.' तोंडास कुत्रें बांधलेलें असणें-ताळतंत्र सोडून, अद्वातद्वा, अपशब्द बोलणें; शिव्या देणें. 'त्यानें तर जसें तोंडाला कुत्रेंच बांधलें आहे.' तोंडास खीळ घालणें-निग्रहपूर्वक, हट्टानें मौन धारण करणें. तोंडास तोंड-न. वादविवाद; वाग्युद्ध; हमरी- तुमरी; धसाफसी. -क्रिवि. समक्षासमक्ष; समोरासमोर; प्रत्यक्ष. तोंडास तोंड देणें-१ तोंडाशीं तोंड देणें पहा. २ मार्मिकपणें, खरमरीतपणें उत्तर देणें. तोंडास पाणी सुटणें-(एखाद्या- वस्तूबद्दल, गोष्टीबद्दल) लोभ, मोह उत्पन्न होणें; तोंडाला पाणी सुटणें पहा. 'पोर्तुगीज लोकांची बढती पाहून तिकडच्या दुसर्या साहसी लोकांच्या तोंडास पाणी सुटलें.' -बाजी. तोंडास तोंड न दिसणें-(पहांटेस) तोंड न ओळखतां येण्याइतका अंधेर असणें (झुंजमुंजु पहाटेविषयीं वर्णन करितांना हा वाक्प्रचार योजतात). 'अद्याप चांगलें उजाडलें नाहीं, तोंडास तोंड दिसत नाहीं.' तोंडास-तोंडीं बसणें-(श्लोक, शब्द इ॰) स्पष्ट, बिन- चूक, भरभर म्हणण्याइतका पाठ होणें. 'तो श्लोक दहा वेळां पुस्तकांत पाहून म्हण, म्हणजे तो तुझ्या तोंडीं बसेल.' तोंडास येईल तें बोलणें-विचार न करितां, भरमसाटपणानें वाटेल तें बोलणें; अद्वातद्वा, अपशब्द बोलणें. तोंडास-तोंडीं लागणें- १ (एखाद्याच्या) तोंडास तोंड देणें; उलट उत्तरें देणें. २ हुज्जत घालणें; वादविवाद करण्यास तयार होणें. (एखाद्याच्या) तोंडा- समोर-क्रिवि. १ (एखाद्याच्या) समक्ष; समोर; डोळ्यांदेखत. २ अगदीं मुखोद्गत; जिव्हाग्रीं. तोंडापुढें पहा. 'हा श्लोक माझ्या अगदीं तोंडासमोर आहे.' तोंडास हळद लागणें-(एखाद्यास) दोष देणें, नापसंती दर्शविणें अशा अर्थीं हा वाक्प्रचार योजितात. तोंडासारखा-वि. (एखाद्याची) खुशामत, स्तुति इ॰ होईल अशा प्रकारचा; एखाद्याच्या खुशामतीकरितां त्याच्या मतास जुळता. तोंडासारखें बोलणें-(एखाद्याची) स्तुति, खुशामत करण्या- करितां त्याच्याच मताची, म्हणण्याची री ओढणें; त्याचें मन न दुखवेल असें बोलणें. तोंडीं आणणें-देणें-(रोग्यास) लाळ गळण्याचें, तोंड येण्याचें औषध देऊन तोंड आणणें. तोंडीं- काढणें-१ ओकारी देणें; वांती होणें. २ (एखाद्यास त्यानें) केलेले उपकार बोलून दाखवून टोमणा मारणें. तोंडीं खीळ पडणें- तोंड बंद होणें; गप्प बसणें भाग पडणें. 'अवघ्या कोल्यांचें मर्म अंडीं । धरितां तोंडीं खीळ पडे ।' तोंडीं घास येणें-(एखा- द्यास) घांसभर अन्न मिळणें; चरितार्थाचें साधन मिळणें; पोटा पाण्याची व्यवस्था होणें. तोंडीं तीळ न भिजणें-१ (तापानें, संतापून ओरडण्यानें, रडण्यानें) तोंड शुष्क होणें, कोरडें पडणें. २ एखादी गुप्त गोष्ट मनांत न राहणें, बोलून टाकणें; तोंडीं तृण धरणें-(एखाद्यानें) शरण आलों. असें कबूल करणें; शरणागत होणें; हार जाणें (दांतीं तृण धरणें असाहि प्रयोग रूढ आहे). तोंडीं देणें-(एखाद्यास एहाद्या माणसाच्या, कठिण कार्याच्या) सपाट्यांत, तडाख्यांत, जबड्यांत, तावडींत लोटणें, देणें; हाल, दुःख सोसण्यास (एखाद्यास) पुढें करणें. तोंडीं-तोंडास पान- पानें पुसणें-(एखाद्यास) छकविणें; लुबाडणें; भोंदणें; अपेक्षित लाभ होऊं न देणें; स्वतःच्या पोळीवर तूप ओढून घेऊन दुसर्यास तोंड पहावयास लावणें. 'त्यानें आपल्या नळीचें वर्हाड केलें आणि सर्वांच्या तोंडीं पान पुसलें.' तोंडीं माती घालणें- (एखाद्यानें) अतिशय दुःखाकुल, शोकाकुल होणें. 'ऊर, माथा बडवून, तोंडीं माती घालूं लागली' -भाव ७५. तोंडीं येऊन बुडणें-नासणें-(एखादी वस्तु, पीक इ॰) अगदीं परिपक्वदशेस, परिणतावस्थेस येऊन, ऐन भरांत येऊन, नाहींशीं होणें, वाईट होणें. तोंडीं येणें-१ (पारा इ॰ औषधानें) तोंड येणें. २ ऐन भरांत, परिपक्व दशेस, पूर्णावस्थेस येणें. तोंडीं-रक्त, रगत लागणें-१ वाघ इ॰ हिंस्त्र पशूला माणसाच्या रक्ताची चटक लागून तो माणसावर टपून बसणें. २ (ल.) लांच-लुचपत खाण्याची चटक लागणें. तोंडीं लागणें-(एखाद्यास एखाद्या वस्तूची, खाद्याची चव प्रथमच कळून त्या वस्तूची त्यास) चटक लागणें; आवड उत्पन्न होणें. 'ह्याच्या तोंडीं भात लागला म्हणून यास भाकर आवडत नाहीं.' तोंडीं लागणें-१ (एखाद्याच्या) तोंडास तोंड देणें; उद्धटपणानें, आपला दर्जा विसरून उलट जबाब देणें. २ हुज्जत घालणें; वादविवादास प्रवृत्त होणें; तोंडास लागणें पहा. 'सुज्ञ आहेत ते दूषकांच्या तोंडीं लागत नसतात.' -नि. ३ (युद्ध, भांडण, इ॰कांच्या) आणीबाणीच्या ठिकाणीं, आघाडीस, अग्रभागीं असणें. तोंडीं लावणें-न. जेवतांना तोंडास रुचि आणणारा भाजी, चटणी इ॰ सारखा मधून मधून खावयाचा चमचमीत पदार्थ. तोंडीं लावणें-१ जेवतांना भाजी, चटणी इ॰ चम- चमीत पदार्थानें रुचिपालट करणें. 'आज तोंडीं लावावयाला भाजीबिजी कांहीं केली नाहीं काय ?' २ विसारादाखल पैसे देणें. तोंडें मागितलेली किंमत-स्त्री. (एखाद्या वस्तूची) दुकान- दारानें सांगितलेली व झिगझिग वगैरे न करितां गिर्हाइकानें दिलेली किंमत. तोंडें मानलेला-मानला-वि. (तोंडच्या) शब्दानें, वचनानें मानलेला (बाप, भाऊ, मुलगा इ॰); धर्माचा, पुण्याचा पहा. तोंडें वांकडीं करणें-वेडावून दाखविणें; वेडावणें. लहान तोंडीं मोठा घांस घेणें-१ (एखाद्यानें) आपल्या आवांक्या- बाहेरचें काम हातीं घेणें. २ (वडील, वरिष्ठ माणसांसमोर) न शोभेल असें, मर्यादा सोडून, बेअदबीनें बोलणें; वडील माणसांस शहाणपण शिकविणें. जळो तुझें तोंड-(बायकी भाषेंत) एक शिवी. स्त्रिया रागानें ही शिवी उपयोगांत आणतात. म्ह॰ १ तोंड बांधून (दाबून) बुक्कयांचा मार = एखाद्याचा विनाकारण छळ होऊन त्यास त्याविरुद्ध तक्रार करतां न येणें; एखाद्यास अन्यायानें वाग- वून त्याविरुद्ध त्यानें कागाळी केल्यास त्यास बेगुमानपणें शिक्षा करणें. 'बायकांचा जन्म म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार, म्हण- तात तें अक्षरशः खरें आहे.' -पकोघे २ (गो.) तोंडाच्या बाता घरा बाईल भीक मागता = बाहेर मोठमोठया गप्पा मारतो पण घरीं बायको भीक मागते. सामाशब्द- तोंड उष्ट-न. एखादा-दुसरा घांस खाणें; केवळ अन्न तोंडास लावणें; तोंड खरकटें करणें. [तोंड + उष्टें] ॰ओळख-स्त्री. परस्परांचा विशेष परिचय नसतां, चेहरा पाहू- नच हा अमुक आहे असें समजण्याजोगी ओळख; (एखाद्याची) चेहरेपट्टी लक्षांत राहून तीवरूनच त्याला ओळखतां येणें; नांव वगैरे कांहीं माहीत नसून (एखाद्याचा) केवळ तोंडावळाच ओळ- खीचा असणें. 'एखाद्याला वाटेल कीं बाळासाहेबांशीं त्याची तोंड- ओळखच आहे.' -इंप ३७. ॰कडी-स्त्री. १ आंतील तुळयांचीं तोंडें बाहेर भिंतींतील ज्या तुळईवर ठेवतात, ती सलग तुळई. २ कौलारू छपराचे वासे ज्या सलग तुळईवर टेकतात ती छपराच्या शेवटीं, टोंकास असलेली तुळई. ३ गुरांचें दावें जिला बांधतात ती कडी. ४ (सोनारी धंदा) दागिन्याची शेवटची कडी, नाकें; ज्यांत फांसा इ॰ अडकवितात ती (सरी इ॰ सारख्या दागिन्याची) टोंकाची, तोंडाची कडी; (जव्याच्या) मण्याच्या वगैरे तोंडाशीं ठेवलेली कडी. ५ (जमाखर्चाच्या वहींतील जमा आणि खर्च या दोहोंबाजूंचा मेळ. हा मेळ = = = अशा दुलांगीनें, (दुहेरी रेषेनें) दाखविण्याचा प्रघात आहे. 'वहीची खात्याची-तारखेची-तोंडकडी' असा शब्दप्रयोग करितात. (क्रि॰ मिळणें; जुळणें; येणें; उतरणें; चुकणें; बंद होणें). [तोंड + कडी] ॰कळा-स्त्री. चेहर्यावरील तजेला; कांति; तेज; टवटवी. (प्र.) मुखकळा. [तोंड + कळा = तेज] ॰काढप-(गो.) उपदंश झालेल्या रोग्यास एक प्रकारचें औषध देऊन त्याच्या तोंडांतून लाळ वाहवितात तो प्रकार. ह्या औषधानें तोंड बरेंच सुजतें. [तोंड + गो. काढप = काढणें] ॰खुरी- स्त्री. (ना.) गुरांचा एक रोग. ॰खोडी-वि. तोंडाळ; टाकून बोलणारा; तोंड टाकणारा; अशी संवय असलेला. 'परम अधम रुक्मी हा महा तोंडखोडी ।' -सारुह ३.७८. [तोंड + खोड = वाईट संवय] ॰घडण-स्त्री तोंडाची ठेवण; चेहरेपट्टी; तोंडवळां. 'या मुलाची बापासारखी तोंडघडण आहे.' [तोंड + घडण = रचना] ॰घशीं- सीं-क्रिवि. १ जमीनीवर पडून तोंड घासलें जाईल, फुटेल अशा रीतीनें. (क्रि॰ पडणें; पाडणें; देणें). 'तो तोंडघसींच पडे करतां दंतप्रहार बहु रागें ।' -मो. २. (आश्रय तुटल्यानें) गोत्यांत; पेचांत; अडचणींत; फजिती होईल अशा तर्हेनें; फशीं (पडणें). [तोंड + घासणें] ॰घशी देणें-दुसरा तोंडघशीं पडे असें करणें. ॰चाट्या-वि. खुशामत करणारा; थुंकी झेलणारा; तोंडासारखें बोलणारा. ॰चाळा-पु. १ तोंड वेडेंवाकडें करून वेडावण्याची क्रिया. २ वात इ॰कांच्या लहरीनें होणारी तोंडाची हालचाल, चाळा. ॰चुकाऊ-वू-व्या, तोंडचुकारू-चुकव्या-वि. (काम इ॰ कांच्या भीतीनें) दृष्टि चुकविणारा; तोंड लपविणारा; नजरेस न पडे असा. [तोंड + चुकविणें] ॰चुकावणी-स्त्री. (एखाद्यापासून) तोंड लपविण्याची, स्वतःस छपविण्याची क्रिया. ॰जबानी-स्त्री. तोंडानें सांगितलेली हकीगत, दिलेली साक्ष, पुरावा. -क्रिवि तोंडी, तोंडानें. [तोंड + फा. झबान्] ॰जाब-पु. तोंडी जबाब. ॰झाडणी-स्त्री. तिरस्कारपूर्ण उद्गारांनीं झिडकारणें; खडका- वणें; खरडपट्टी काढणें. ॰देखणा-ला-वि. आपल्या अंतःकरणांत तसा भाव नसून दुसर्याचें मन राखण्याकरितां त्याला रुचेल असा केलेला (व्यवहार, भाषण, गो इ॰); खुशामतीचा; तोंडासारखा; तोंडपुजपणाचा. 'प्राणनाथ, मला हीं तोंडदेखणीं बोलणीं आव- डत नाहींत.' -पारिभौ ३५. [तोंड + देखणें = पाहणें] ॰देखली गोष्ट-स्त्री.दुसर्याची मर्जी राखण्याकरितां केलेलें, खुशामतीचें भाषण. ॰निरोप-पु. तोंडी सांगितलेला निरोप. 'कृष्णास ते हळुच तोंडनिरोप सांगे ।' -सारुह ४.९. ॰पट्टा-पु. (बायकी). तोंडाचा तोफखाना; अपशब्दांचा भडिमार; संतापानें, जोराजोरानें बेबंदपणें बोलणें. [तोंड + पट्टा = तलवार] ॰पट्टी-स्त्री. (शिवणकाम) तोंडाला शिवलेला पट्टी. 'योग्य तेवढी तोंडपट्टी कातरावी.' -काप्र. १४. ॰पाटिलकी-स्त्री. १ आपण कांहीं न करतां बसल्या जागे- वरून लुडबुडेपणानें दुसर्यांना हुकुमवजा गोष्टी, कामें सांगणें (पाटलाला बसल्या जागेवरून अनेक कामें हुकुम सोडून करून घ्यावीं लागतात त्यावरून). २ (उप.) लुडबुडेपणाची वटवट, बडबड; तोंडाळपणा. 'दुसरें कांहीं न झालें तरी नुसती तोंडपाटिलकी करण्यास कांहीं हरकत नाहीं.' -आगर ३.६१. [तोंड + पाटिलकी = पाटलाचें काम] ॰पाठ-वि. पुस्तकाच्या सहाय्यावांचून केवळ तोंडांनें म्हणतां येण्यासारखा; मुखोद्गत [तोंड + पाट = पठण केलेलें] ॰पालटपुस्त्री. १ (अरुचि घालविण्याकरितां केलेला) अन्नांतील फेरबदल. २ अन्नांत फेरबदल करून अरुचि घालविण्याची क्रिया. [तोंड + पालट = बदल] ॰पिटी-स्त्री. १ (वडील, गुरु इ॰ कांची) आज्ञा न मानतां तिचें औचित्य इ॰ कासंबंधीं केलेली वाटाघाट; (वडिलांशीं, गुरूंशीं) उद्धटपणानें वाद घालणें; उलट उत्तर देणें; प्रश्न इ॰ विचारून अडवणूक करणें. 'गुरूंसी करिती तोंडपिटी ।' -विपू १.५७. २ (दगडोबास शिकविण्याकरितां, विसराळू माणसास पुन्हां पुन्हां बजाविण्याकरितां, थिल्लर जनावरास हांकलण्याकरितां करावी लागणारी) व्यर्थ बडबड, कटकट, वटवट. [तोंड + पिटणें] ॰प्रचिती-प्रचीति-स्त्री. खुशामत करण्याकरितां (एखाद्याच्या) व्यक्तिमाहात्म्यास, भाषणास, अस्तित्वास मान देणें; आदर दाख- विणें. [तोंड + प्रचीति] ॰प्रचीतक्रिवि. १ तोंडासारखें; खुशामतीचें; तोंडापुरतें (भाषण, वर्तन इ॰ करणें) २ माणूस ओळखून, पाहून; माणसामाणसांत तारतम्य ठेवून (बोलणें, चालणें, वागणें). ॰प्रचीत बोलणारा-चालणारा-वागणारा-वि. माणसामाणसांत तारतम्य ठेवून चालणारा, बोलणारा, वागणारा. ॰फटालकी -फटालीस्त्री. तोंडाची निरर्थक बडबड, वटवट, टकळी. [तोंड + ध्व. फटां ! द्वि.] ॰फटाला-ल्या-वि. मूर्खपणानें कांहीं तरी बड बडणारा; बकणारा; वटवट करणारा. [तोंड + ध्व. फटां !] ॰फट्याळ-वि. तोंडाचा फटकळ; शिवराळ; तोंडाळ; बातेफरास; अंगीं कर्तृत्व नसून लंब्या लंब्या बाता झोंकणारा. ॰फट्याळी- स्त्री. शिवराळपणा; तोंडाळपणा; वावदूकता. [तोंडफट्याळ] ॰बडबड्या-बडव्या-वि. निरर्थक वटवट, बडबड करणारा: बकबकणांरा टकळी चालविणारा. ॰बंद -बांधणी-पुस्त्री. गाडीच्या चाकाच्या तुंब्यावरील बाहेरील बाजूचें लोखंडी कडें, पट्टी. आंतील बाजूच्या कड्यास कटबंद असें म्हणतात. [तोंड + बंद = बांधणी] ॰बळ-न. वक्तृत्वशक्ति; वाक्पटुता; वाक्चातुर्य. 'आंगबळ न चांगबळ देरे देवा तोंडबळ.' ॰बळाचा-वि. ज्याला बोलण्याची हातोटी, वक्तृत्कला साधली आहें असा; तोंडबळ अस- लेला; भाषणपटु जबेफरास. ॰बाग-स्त्री. (राजा.) चेहरेपट्टी; चेहर्याची ठेवण, घडण; मुखवटा. ॰बांधणी-स्त्री. १ तोंडबंद पहा. २ (ढोरांचा धंदा) कातड्याच्या मोटेच्या सोंडेच्या टोंकाकरितां बाजूला शिवलेला गोट. ॰भडभड्या-वि. तोंडास येईल तें बड- बडत, बकत सुटणारा; बोलण्याची, बडबडण्याची हुक्की, इसळी ज्यास येते असा; भडभडून बोलणारा. ॰भर-वि. तोंडास येईल तेवढा; भरपूर. 'हॅमिल्टन यांनीं खर्चवाढीबद्दल तोंडभर मगणी केली होती.' -केले १.१९८. ॰मार-स्त्री. १ रोग्यावर लाद- लेला खाद्यपेयांचा निर्बंध, पथ्य. २ एखाद्यास बोलण्याकरितां तोंड उघडूं न देणें; भाषणबंदी. ३ (ल.) (एखाद्याच्या) आशा, आकांक्षा फोल ठरविणें; (एखाद्याचा केलेला) आशाभंग; मनोभंग; निराशा. (क्रि॰ करणें). ॰मारा-पु. १ शेतीच्या कामाच्या वेळीं पिकांत वगैरें काम करतांना गुरांच्या तोंडाला जाळी, मुंगसें, मुसकें बांधणें. २ (एखाद्यास केलेली) भाषणबंदी; खाद्यपेयांचा निर्बंध. ३ (प्र.) तोंडमार. तोंडमार अर्थ ३ पहा. ॰मिळवणी- स्त्री, १ जमा आणि खर्च यांचा मेळ; तोंडें मिळविण्यासाठीं मांडलेला जमाखर्च. २ ऋणको व धनको यांच्यांतील हिशेबाची बेबाकी, पूज्य. ३ मेळ. -शर. ॰मिळवणी खातें- (जमाखर्च) कच्चें खातें (याचें देणें येणें सालअखेर पुरें करून खुद्द खात्यांत जिरवितात). ॰लपव्या-वि. तोंड लपविणारा; छपून राहणारा; दडी मारून बसणारा. ॰लाग-पु. शिंगें असलेल्या जनावरांच्या तोंडास होणारा रोग; यांत लाळ गळत असते. ॰वळख-स्त्री (प्र.) तोंडओळख पहा. ॰वळण-वळा-नपु. चेहरा; चर्या; मुद्रा; चेहर्याची घडण, ठेवण; रूपरेखा; चेहरामोहरा; चेहरेपट्टी; मुखाकृति; मुखवटा. [तोंड + वळ = रचना] ॰वीख-न. (ल.) तोंडानें ओकलेलें, तोंडां- तून निघालेलें, विषारी, वाईट भाषण, बोलणें. [तोंड + विष] ॰शिनळ, शिंदळ-वि. अचकटविचटक, बीभत्स बोलणारा; केवळ तोंडानें शिनळकी करणारा. ॰शेवळें-न. मुंडावळ. -बदलापूर २७७. [तोंड + शेवळें = शेवाळें] ॰सर-क्रिवि. तुडुंब; तोंडापर्यंत; भरपूर. ॰सरता-वि. अस्खलित, तोंडपाठ न म्हणतां येण्या- सारखा; अडखळत अडखळत म्हणतां येण्यासारखा (श्लोक, ग्रंथ इ॰). -क्रिवि. घसरत घसरत; अडखळत; चुका करीत; कसेंबसें; आठवून आठवून. [तोंड + सरणें] ॰सुख-न. १ एखा- द्यानें केलेल्या अपकाराचें शरीरानें प्रतिकार करण्याचें सामर्थ्य नसल्यामुळें केवळ तोंडानें यथेच्छ शिव्यांचा, अपशब्दांचा भडि- मार करून त्यांत सुख मानणें. २ जिव्हा मोकाट सोडून वाटेल तसें बोलण्यांत मानलेलें सुख; यथेच्छ व अद्वातद्वा केलेलें भाषण; (एखाद्याची काढलेली) खरडपट्टी; बोडंती. (क्रि॰ घेणें). ॰सुख घेणें-(एखाद्याची) खरडपट्टी काढणें, हजेरी घेणें; (एखा- द्यावर) शिव्यांचा, अपशब्दांचा भडिमार करणें. ॰सुटका-स्त्री. १ जिभेचा (बोलण्यांतील) स्वैरपणा; सुळसुळीतपणा; वाक्चा- पल्य; जबेफराशी; (भाषण इ॰ कांतील) जनलज्जेपासूनची मोक- ळीक. २ भाषणस्वातंत्र्य; बोलण्याची मोकळीक. ३ तोंडाळपणा; शिवराळपणा. ४ (पथ्य, अरुची, तोंड येणें इ॰ कांपासून झालेली) तोंडाची सुटका, मोकळीक; तोंड बरें होणें; खाण्यापिण्याला स्वातंत्र्य. [तोंड + सुटणें] ॰हिशेबी-वि. अनेक रकमांचा मनांतल्या- मनांत चटकन् हिशेब करून सांगणारा बुद्धिमान (मनुष्य); शीघ्रगणक. ॰तोंडागळा-वि. (तोंडानें) बोलण्यांत, वक्तृत्वशक्तींत अधिक. 'कीं शेषाहूनि तोंडागळें । बोलकें आथी ।' -ज्ञा ९. ३७०. [तोंड + आगळा = अधिक] ॰तोंडातोंडी-क्रिवि. १ समोरासमोर; २ बोलण्यांत; बोलाचालींत. [तोंड द्वि.] ॰तोंडाळ-वि. १ दुसर्या- वर तोंड टाकणारा; शिवराळ; भांडखोर. 'लटिकें आणि तोंडाळ । अतिशयेंसीं ।' -दा २.३.१०. २ बडबड्या; वाचाळ. [तोंड] म्ह॰ हाताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं = शिवराळ माणसा- पेक्षां चोर पुरवतो. ॰तोंडाळणें-उक्रि. बकबक करून गुप्त गोष्ट फोडणें; जीभ पघळणें. [तोंडाळ] ॰तोंडोंतोंड-क्रिवि. तोंडापर्यंत; कंठोकांठ; तुडुंब; तोंडसर.॰तोंडोंळा-पु. तोंडवळा; चेहरेपट्टी. [तोंड + ओळा, वळा प्रत्यय]
अवतार
पु. १. एखाद्या देवतेने मनुष्याच्या किंवा पशूच्या रूपाने किंवा इतर कोणत्याही रूपाने पृथ्वीवर अवतीर्ण होणे; अवतरण. २. (ल.) पवित्र किंवा असाधारण सुप्रसिद्ध माणूस; दैवी अंशाचा माणूसदेवावतार. ३. अघोर कर्म करणारा; महापापी–राक्षस–अवतार. ४. उनाड, उपद्व्यापी, शिरजोर, व्रात्य माणूस, मुलगा; उत्पातीपणा. ५. अवतरण; उतरणे; खाली येणे. ६. प्रस्ताव; उतारा वगैरे अवतरणाचे अर्थ. पहा : अवतरण. ७. (दशावतारावरून) दहा संख्या. दहा आकड्यांबद्दल योजण्यात येणारा सांकेतिक शब्द : ‘अवतार पावेतों.’ – मइसा १२·१२४. ८. आयुष्य; जीवन : ‘अवतार जरी संपेल ।’ – संग्रा. ४८. ९. (उप.) स्वरूप; वेश. १०. नदीचा घाट. ११. तीर्थ. १२. भाषांतर. १३. प्रस्तावना. १४. प्रादुर्भाव. [सं.] (वा.) अवतार घेणे, अवतार धरणे, अवतार धारण करणे–विशिष्ट काम अतिशय जोराने करू लागणे; उच्छृंखलपणे, अव्यवस्थितपणे, दुष्टपणाने, वेडगळपणाने वागणे; उपद्रवकारक वर्तन करणे. अवतार आटोपणे, अवतार संपणे – १. उत्कर्षदशा जाऊन निकृष्टावस्थेस पोहचणे; शून्यत्व पावणे. २. मरणे : ‘पति गेल्यावर आटपला श्वशुराचाही अवतार’ – विक १५. ३. कर्तृत्वशक्ती संपुष्टात येणे; सद्दी संपणे; पराक्रमाचा अंत होणे. अवतार आणणे– उग्र रूप धारण करणे : ‘हिवाळ्याचे दिवस होते. थंडीने कसा अवतार आणला होता.’ – स्मया १४८. अवतार संपूर्ण होणे – मरणे : ‘राजा शाहूचा अवतार संपूर्ण जाहल्यास कोणी खावंद नाही, ऐसे जालें.’ – मइसा ८·२२२
जटा
स्त्री. १ जट अर्थ १ पहा. २ केंसांची गुंतागुंत. (गो) जटि. ३ वैदिक वाङ्मयांतील पठणविषयक एक विकृति. संहितेच्या दोन पदांचा संधि करून म्हणणें त्यास क्रम म्हणतात व त्या दोन पदांच्या पुढील पद त्यास जोडून त्या तीन पदांची संहिता करून तीं तीन पदें उलट म्हणणें. उदा॰ 'अग्निमीळे ईळेग्निमग्नि- मीळे । ईळेपुरोहितं पुरोहितभीळ ईळे पुरोहितं ।' इ॰ [सं. जटा, सटा; फ्रें. जि. जर] सामाशब्द-॰गौर-स्त्री. एक औषधी वन- स्पति. इच्यावर शेवाळ्यासारख्या रेषा असतात व ही गौरीला वाहातात. ॰जूट-पु. केसांचा समूह जटा पहा. 'जटाजूट एका मुगुट माथां शिरीं ।' -तुगा २०५०. ॰धारी-वि. जटा धारण करणारा (शंकर, गोसावी इ॰) ॰पाठी-वि. १ जटेचा पाठ करणारा (जटा अर्थ ३ पहा); अशासारखेच क्रम-घन शाखा-पाठी असे वेदपाठकांचे प्रकार आहेत. २ ज्यांनीं आपल्या जटा पाठीवर सोडल्या आहेत असा. ॰भार-पु. जट अर्थ १ पहा. 'सावरूनिया जटाभार । वरि मुकुट घातला सुंदर ।' ॰मांसी-मावशी-स्त्री. पुष्कळ दिवस टिकणारी वनस्पति. ही हिमालयांत सांपडतें. हिच्या तीन जातींपैकीं सुंगधी जात अधिक उपयोगी असून तिच्या मूळ्यांचें तेल केस काळे होण्याकरितां उपयोगांत आणितात. [सं.] जटाळ्या, जटाळ्याबाबा-वि. जटा धारण करणारा.
धनु
पुन. १ धनुष्य. 'मुसळाचें धनु नव्हे हो सर्वथा । पाषाण पिळितां रस कैंचा ।' -तुगा ४२१०. २ कापूस पिंजण्या- साठीं वापरण्यांत येणारें धनुष्य. ३ वर्तुळाचा अर्धा भाग; वर्तुल- खंड. ४ मेषादि राशीपासून नववी रास. ५ चार हातांचें परिमाण; चार हात लांबी. 'धनु रे धनु भणतु । राऊतें बरवतांति ।' -शिशु ५६५. धनुकणें-उक्रि. (कापूस) पिंजणें, कांतणें. धनुक- धनुष्य. 'पांच सतें धनुका । उचलीली येके वेळें ।' -उषा १३. ॰कली- १ लहान धनुष्य. २ धनकुंबी; गलोल. ३ कापूस पिंजण्याचें धनुष्य. धनुःफल, धनुष्फलक-न. वृत्त परिघाच्या विवक्षित खंडाची मापणी; वर्तुलखंडाचें माप; ज्याफल. [सं.] धनुरासन-न. पोटावर उपडें निजून हात पाठीकडे नेऊन पाय उचलून दोन्ही पाय दोन्ही हातांनीं टाचांशीं घट्ट धरावे. नंतर डोक्याकडे व पायाकडे तोल निरनिराळ्या वेळीं झुकेल असें करावें. त्याच्यायोगें अन्नपचन होतें. धनर्गुण-पु. धनुष्याची दोरी; ज्या. [सं.] धनुर्धर-धारी-वि. १ धनुष्य धारण करणारा; धनुष्यानें लढणारा; तिरंदाजी करणारा. 'तेथ बाणवरी धनुर्धर । वर्षताती निरंतर ।' -ज्ञा १.१६६. २ (ल.) शास्त्र, कला इ॰ कांत निपुण; पंडित; तज्ज्ञ. [सं.] धनुर्मध्य-पु. (धनुष्याचा मध्य) धनुष्याच्या दोरीस ज्या ठिकाणीं बाण लावितात ती जागा. [सं.] धनुर्मार्ग-पु. वक्ररेषा [सं.] धनुर्मास-पु. १ (ज्यो.) धनुराशींत सूर्य येतो तो काल. यावेळीं धन संक्रांत असते. २ (ल.) या राशीस सूर्य असतां सकाळीं धनुर्लग्न आहे तोंपर्यंत देव नैवेद्यादि पूर्वक करावयाचें भोजन; झुंझुरमास. [सं.] धनुवाड, धनुवाड-धनुर्धारी; धनुष्य धारण करणारा. 'दोघे धनुर्वाडे संपूर्ण । तुज मारिती विंधोन बाण ।' -भारा किष्किधा १.३५. 'धर्मु तो अवघेयां वडिलु । अर्जुनु धनुवाडा कुशलु ।' -गीता १.३१४. धनुर्वात-पु. ज्यांत शरीर धनुष्याकृंति होतें तो वातविकार. याचे अंतरायामवात व बहिरायामवात असे दोन प्रकार आहेत. [सं.] धनुर्विद्या-स्त्री. लक्ष्य भेदण्याचें व तीर मारण्याचें शास्त्र; धनुष्य वापरण्याची विद्या. [सं.] धनुर्वेद-पु. एक उपवेद; धनुर्विद्या; भारतीयांचें युद्धशास्त्र. या वेदांत शस्त्रें, अस्त्रें, युद्ध करण्याचे प्रकार वाहनें इ॰ अनेक गोष्टीचें विवेचन केलें आहे. 'आइकें कुटिलालकमस्तका । धनुर्वेदत्र्यंबका ।' -ज्ञा १०.२१५. [सं.] धनुशाखा-स्त्री. एक वेलि. हिच्या तंतूपासून धनुष्याच्या दोर्या करीत. धनुष्कोटि-पुस्त्री. १ धनुष्याचें टोक. २ रामेश्वराजवळचें एक तीर्थस्थान. धनुस्तंभ-पु. शारीरिक विकार; एकाएकीं झटका येऊन अंग धनुष्याप्रमाणें वांकणें; धनुर्वात.
इनाम
न.१ कोणत्याहि अटीशिवाय शाश्वत, वंशपरंपरेची स्थावर अशी देणगी; वृत्ति; इनामांत पुढील प्रकार आहेत. -वतनी (सनदी) व गांवनिसबत. वतनींत गैरउपयोगी (न्हावी, सुतार, चांभार, चौघुला, शेट्या, मांग, कुंभार, पोतदार, महाजन, कुडबुडे जोशी इ॰) व उपयोगी (उपाध्याय, गुरव, गांवज्योतिषी, जंगम, काजी, मुलाणा, मुजावर इ॰), परगणे वतनदार (देशमुख, देशपांडे, देश- कुलकर्णी, नाडगौडा, नाडकर्णी, सरदेसाई, सरदेशपांडे, सरदेशमुख, सरपाटील, निरखीदार, देशगत, घाटपांडे, देसाई), गांवनौकर (पाटील, कुलकर्णी, मतादार, माधवी, महार, तराळ, बळीकर इ॰), क्षेत्रोपाध्ये. गांवनिसबत (पासोडी, देवस्थान, हाडोळी, मावळी, धर्मादाय, देणगी, वतनदारी इ॰). सनदी म्हणजे सरकारी करा- पासून मुक्त व कायमचें दिल्याबद्दल सनद मिळते तें. शराकती दुमाला म्हणजे गांवांतील उत्पन्नांतून गांवकामगाराचा खर्च वजा जातां बाकी राहणार्या उत्पन्नांत सरकाराची हिस्सेरस्सी असते ती. शिवाय अग्रहार, भाकरी, चोळीबांगडी, देवस्थान, कदीम, जदीद, जात, जुडी, कोल्हाटी, मळीकी, राजकीय, साधणूक शेतसनदी, योगक्षेम, इसाफत, नौकरी, वतनीवजीफा, आलतमघा इ॰ इ॰ ऐन इनामतीमध्यें ब्राह्मणांचीं अग्रहारें व बादशहाचे पीर आणि थडगीं, मशिदी आणि देवस्थानें, फकीर इनाम, मोईन, काजी-मुलाणा, फकीर-तपस्वी, अन्नछत्र वगैरे बाबी येत. -भाअ १८३३.१३८. २ देव,ब्राह्मण वगैरेंना दिलेली भूमि वगैरे. ३ मालकी हक्क न देतां देणें, घेणें, खाणें, सोडणें. 'हा माड यानें इनाम खाल्ला.' 'आम्ही गाईचें दूध काढीत नाहीं, वासरे इनाम पितात.' ४ (सामा.) कोणतेंहि बक्षीस; नजर; देणगी. [अर. इन्आम] ॰इक्राम-पु. भेट; देणगी, बक्षीस, वृत्ति. -वाडसभा २.१९६. [अर.] ॰इजाफत- न. देणगी वाढवून देणें; देणगीची वाढ; इनामांत घातलेली भर (कांही कामगिरी केल्याचा मोबदला म्हणून वाढवून दिलेलें इनाम.) ॰इजाफतदार-वि. इनाम इजाफत मिळालेला; वाढलेलें इनाम उपभोगणारा. ॰चिटणावळ-स्त्री. इनामावरील सरकारी बाब किंवा कर. [हिं.] ॰चिठ्ठी-पु १ वेगवेगळ्या इनामांची यादी, तपशील (जिल्ह्यातील किंवा तालुक्यांतील). २ इनामपत्र; इनामपट्टा, इनामखत. ॰चौकशी स्त्री. इनामपाहणी पहा. ॰चौथाई-स्त्री. इनामाचा चौथा हिस्सा (सरकारांत भरणा करा- वयाचा). ॰जमीन स्त्री. एखाद्या मोठया कामगिरीबद्दल सरका- रांतून बक्षीस मिळालेली सारामाफीची जमीन. ॰तिजाई-स्त्री. १ इनाम जमिनीच्या उत्पन्नाचा तिसरा हिस्सा. हा कर सरकार सहा किंवा दहा वर्षांनी वसूल करी. -शारो ४०.२ पूर्ण अथवा सर्वस्वी इनाम नसलेल्या इनामी जमिनीवरील सार्याचा तिसरा भाग. 'इदलशाही दिवाणांत हक्कचौथाई व इनामतिजाईच नव्हती' -रा ३.११७. [फा.] ॰दार-पु. इनाम धारण करणारा; इनामी जमिनीचा मालक; वतनदार. [फा. इन् + आम् + दार] ॰नोकरी-स्त्री. गांव, महाल परगणा यांची महसुली, फौजदारीसंबंधानें गावकी, घरकी कामें करणार्या गांवकामगांरांनां व परगणे अमलदारांना इनाम जें देण्यांत आलें तें; काळीचें उत्पन्न, (स्वामित्व नव्हे;) म्हणजे महसूल घेण्याचा अधिकार; किंवा इनाम जमीन धारण करणार्यांना महसुलाची सर्वस्वीं अथवा अंशतः सूट देण्यांत आली ती. इनाम मिळकती दोन प्रकारच्या असतात. -प्रत्यक्ष (दुमाला) आणि अप्र- त्यक्ष (परभारा). पहिल्या प्रकारांत इनामदारांना सबंध गांव, महाल किंवा गांवांतील सर्व जमीन दुमाला करून देत आणि धारा वसूल करण्याचा राजाधिकार हा त्यांना देत. दुसर्या प्रकारचें इनाम ऐन किंवा नक्त किंवा ऐनजिनसी असे. धारा वसूल करून आपल्या खजिन्यांतून सरकार इनामदारांना जी ठराविक नेमणूक रोकडीनें आदा करी तिला नक्त इनाम म्हणत आणि जमीन धारण करणाराकडून इनामदार परस्पर ठराविक घुगरी म्हणजे दर बिघ्यास किंवा नांगरास धान्याचीं अमुक मापें घेत ती; अथवा बाजारहाटांत विकावयास आलेल्या मालाची शेव-फसकी किंवा वाणगी घेत ती, यांना परभाराहक्क किंवा ऐनजिनसी इनाम म्हणतात. -गागा २९.४०. ॰पट्टी-ताजम-स्त्री. पु. इनामदारावर बसविलेली पट्टी, कर. हा कर दर तीन वर्षांनी जेवढें उत्पन्न असेल तेवढा बसवीत, जेवढें त्या वर्षाचें उत्पन्न असेल तेवढा घेत. ॰पत्र-न. इनाम दिल्यासंबंधींचें खत, सनद; इनाम दिल्याचें राजपत्र; सर- कारनें कोणास इनाम दिल्यास त्याबद्दल पुढील चार सरकारी हुकूम निघत-(अ) खुद्द इनाममदारास, (आ) इनाम गांव अथवा जमीन ज्या परगण्यांत आहे त्या परगण्याच्या मामलेदारास, (इ) त्याच परग- ण्याच्या देशमुख देशपांड्यास, (ई) इनाम असलेल्या गांवच्या पाटील-कुलकर्णी वगैरे मुकदमास. ॰परभारा-पु. सरकारांतून न घेतां परभारें गांवाकडून वसूल करण्यांत येणारें इनाम ॰पासोडी- स्त्री. गांवकामगारांना जी किरकोळ जमीन इनाम देतात त्याबद्दल व्यापकतेनें योजावयाचा शब्द. जसें:-पाटलास पासोडीसाठीं; कुल कर्ण्यास रुमालासाठीं, पोतदारास घोंगडीसाठीं; महारास जोडया- साठीं; भठास धोतरासाठीं, वगैरे इनाम दिलेल्या जमिनीबद्दल. ॰पाहणी-स्त्री. दिलेल्या इनामजमिनींची पाहणी, तपासणी. ॰फैजावी-स्त्री. जमिनीवरील सरकारसार्याच्या एकतृतीयांशाइतका दरसाल सरकारांत करावयाचा भरणा. [अर.]
अंड
न. १ अंडकुली; वृषण. २ कस्तुरीमृगाची कस्तुरी असलेली नाभी; नाफा. ३ कंवठ; अंडें पहा. ४ (व.) रुईचें, सरकी काढलेल्या कापसाचें आंख, [सं.] ॰काढणें-बडविणें- खच्ची करणें (पशूस). अंडाखालीं खाजवणें-हां जी हां जी करणें; खुशामत करणें; लोणी लावणें. ॰गाळणें १ खचणें; लट पटणें; गळाठणें. २ भीतीनें मागें घेणें, राहणें. ॰ब्रह्यांडास- कपाळीं-जाणें-तिरपीट उडणें; पांचावर धारण बसणें; धीर खचणें.॰म्हणजे उंबरफळ म्हणणें-अतिशय मद्दड किंवा मूर्ख असणें; अडाणी, दगड असणें. अंडाचें निवणें करून बसणें-अंडावर अंड घालून बसणें-अंडावर बुक्क्या मारणें-(व.) आळशीपणानें काम न करतां बसून राहाणें; स्वस्थ बसणें. अगदीं आळशी माणसाबद्दल वापरतात.अंडा- वरमूत गळणें-पडणें-(व.) १ अतिशय अशक्त व असहाय्य होणें; निर्बल, कमकुवत असणें. २ (ल.) मेंग्या, भागुबाई, षंढ होणें, असणें. -स येणें-वार्धक्यामुळें कमजोर व मलूल, कम. ताकद होणें; लुळाखुळा होणें. ॰-स लोणी लावणें-हां जी हां जी करणें; मिनतवारी करणें; कांहीं कार्य साधून घेण्यासाठीं फार आर्जव करणें; खुशामत करणें. (दुसर्याच्या) अंडानें विंचू मारणें-दुसर्याच्या नफानुकसानीची पर्वा न करतां त्याजकडून परभारें आपलें काम करून घेणें; पाहुण्याच्या हातानें साप मार- विणें. ॰उबारा-पु. (ल.) माया; गर्भ श्रीमंती. -वि. (नवीन घातलेल्या अंड्याच्या उबेप्रमाणें) उबट; किंचित गरम; कोंबट. ॰कटाह-पु. १ विश्व, ब्रह्यांड; खगोलाचा दृश्य गोलार्ध. २ ब्रह्मांडाभोंवतीं असलेलें अष्टधा प्रकृतीचें आवरण किंवा कवच. 'दुज्या पदें अंडकटाह फोडी ।' -(वामन) नवनीत १११. [अंड + कटाह = कढई] ॰कुली-कुलें-कूल-स्त्रीन. वृषण, अंड; (लहान मुलाचें). २ दोन्हीं वृषणें; सबंध आंड. ॰कोश-ष-पु. अंडावरचें आवरण आंतील वृषणासह; वृषण; अंडाशय. २ ब्रह्मांडकोशाचा संक्षेप. 'भागीरथी अंडकोश फोडून आली.' ॰गडी-१ (सोंगट्या इ॰ खेळ) हाताखालचा खेळगडी, पित्तू. २ पोटांतला गडी, एकादा गडी कमी असतां त्याच्याबद्दल आपणच खेळणें; मुका गडी. ३ मदतनीस; सोबती; अडगडी. ४ हस्तक; बगल्या; सर्व अर्थीं अंगगडी पहा. ॰गोल-गोलक-पु. वृषण; अंड. [सं.] ॰ज-वि. अंडापासून जन्मलेलें. २ अंड्यापासून उत्पन्न होणारा प्राणिवर्ग (पक्षी, सर्प; इ॰). -न. पक्ष्याचें पिल्लूं. 'तूं माझी पक्षिणी मी तुझें अंडज ।' -नामना ६२. [सं. अंड + ज] ॰त्रास-पु. (शब्दशः-अंडकुल्या वर उचलाया- जोगी अवस्था) अतिशय भीति; तिरपीठ; त्रेधा; पांचावर धारण. 'करी अंडत्रासें वरिकर दुजा, जो भय हरी ।' -मृत्तिका- भक्षण (वामन) ४. ॰दोरी-स्त्री. खोगीर आवळतांना जनाव राच्या अंडावरून आवळला जाणारा व पाठीमागें बांडगें यास बांधण्यांत येणारा पट्टा, मुठीची दोरी. ॰धरणी-स्त्री हां जी हां जी; मिन्नतवारी; खुशामत; शेंपूट घोळणी; अंडमळणी पहा. ॰पंचा-पु. अतिशय अरुंद पंचा. ॰बंध-पु. मंदिराच्या शिख- रावरील अंडाकार गोळा; घुमटी. ॰बुली-स्त्री. लहान मुलाच्या करदोड्याच्या किंवा घागर्यांच्या मधोमध घालण्यासाठीं (बुली- सारखा) केलेला सोन्याचा किंवा चांदीचा एक दागिना. ॰मळणी, ॰मळणी-चोंटमळणी-स्त्री. (कुण.) हां जी हां जी; हलकीं कामें करून किंवा फाजील स्तुति करून मर्जी संपादणें; खुशामत. [अंड + मळणें] ॰विकार-विकृति-पुस्त्री. अंडाला होणारा रोग. ॰वृद्धि-स्त्री. अंतर्गळ; अंड वाढणें (वाताच्या उपद्रवानें). ॰स्थिति-स्त्री. प्राणी अंड्यांत असण्याची अवस्था. -प्राणिमो १००.
पट
पुस्त्री. १ बुद्धिबळें किंवा सोंगट्या खेळण्याचें, घरें पाडून तयार केलेलें एक वस्त्र. २ (बडोदें) नांवांचें पत्रक, यादी. रिकार्ड; फेरिस्तपत्रक; विशेष गोष्टींच्या नोंदणीचें लिखाण; नियम किंवा चालीरीती दर्शविणारी यादी किंवा लेख, तक्ता, कोठा. 'नोकर लोकांचे पगार खाजगीच्या पगारपटांतून मिळत असतात.' -चिमा २. ३ (ज्यो.) संक्रातिपट (सूर्य कोणत्या राशीला केव्हां जाणार इ॰ ज्यांत लिहिलें असतें तो ), ग्रहणपट (ग्रहणांविषयीं माहिती असलेला); लग्नपट; मुहूर्तपट इ॰; अनेक कागद एकाखालीं एक चिकटवून ज्यावर नाना प्रकारचीं चित्रें काढलेलीं असतात अशी गुंडाळी. ४ कापड; वस्त्र. 'त्यांत मरेनचि शिरतां काट्यावरि घालितां चिरे पट कीं ।' -मोरविराट ३.४१. ५ जमीनीची अतिशय मोठी वरंघळ; उतरण. ६ पडदा. 'ऐसें वदोनि राघव तीव्र शरांचा क्षणें करूनि पट ।' -मोमंत्ररामायण युद्ध ६८८. ७ (व.) बैल- गाड्यांची शर्यत; शंकरपट. (क्रि॰ खेदणें). ८ पाट; फळी. ९ राजाची गादी; सिंहासन. 'जो दमनशीळ जगजेठी . अकरांचीही नळी निमटी । तो निजसुखाचें साम्राज्यपटीं । बैसे उठाउठीं तत्काळ ।' -एभा १४.१०४. १० गांवचें जमावबंदी किंवा शेत- सारा-यांचें पत्रक. ११ स्थान; ठिकाण. 'लाऊनि बैसवी पटीं । मोक्षश्रियेच्या ।' -ज्ञा ९.४६. -न. दोन, तीन फळ्यांच्या, घडी घालतां येण्यासारख्या झडपाच्या फळ्यांपैंकीं एक फळी, भाग. [सं. पट्ट] ॰कर-न. पटकूर; फटकूर. ॰का-पु. १ वीतभर रुंदीचें व ५।४ हात लांबीचें कमरेस बांधावयाचें कापड. कांचा, कमरपट्टा. २ डोईस बांधावयाचा ८ ते १५ हात लांबाचा फेटा. ॰कुडॉ- पु. (गो.) पापुद्रा. ॰कूर-कुरें-कूळ-न. (निंदार्थी) एकेरी पन्ह्याची घोंगडी किंवा वस्त्र. 'टाकलें पटकूर निजलें बटकूर.' फटकूर पहा. [सं. पट्टकुल] ॰खळणें-सक्रि. (महानु;) आच्छा- दणें; पांघरूण घालणें. धवळे, उत्तरार्ध ६. ॰चीर-न. वस्त्र; पताका; ध्वज. 'टके पटचिरें । तळपती रुचिरें ।' -आसु १३. ॰ल-ळ-न. १ आच्छादन; पडदा; आवरण; आवरणत्वचा. 'प्रथमचि पार्थशरांच्या पटळें तम दाट दाटलें होतें ।' -मोकर्ण १९.३३. २ नेत्रावरील त्वचा. ३ डोळ्यावर रोगानें आलेला दृष्टि- बंधक पडदा, सारा इ॰. ४ (ल.) बुद्धीवर असलेलें आवरण, आच्छादन. जसें-'मोह-माया-अज्ञान-द्वैत-पटल.' 'झाला व्याकुळ दुर्मति आपुलियाचि भ्रमाचिया पटलें ।' -मोसभा ३.३. ५ (सं. समुदाय, राशी, ढीग यावरून) ढग, समूह; राशी; लोट (धूळ, धूर यांचा). ६ फळी. ७ पापुद्रा. पटांतर-वि. परोक्ष; प्रत्यक्ष नव्हे असें. 'आइकिजती पटांतरीं ।' -ज्ञा १६.४२८. पटा- धिकार-पु. पटाचा अधिकार; मूळाच्या कामावरील. देणगीवरील अधिकार, अधिकारपत्र; हक्क किंवा अधिकार धारण करणें किंवा असणें. [पट + अधिकार] पटाधिकारी-वि. हा अधिकार धारण करणारा किंवा असणारा.
चक्र
न. १ रथ, गाडी, इ॰चें चाक; कुंभाराचें चाक. 'मग भवंडीचें दंडे । भ्रमे चक्र ।' -ज्ञा १८.३१०. २ चाकासारखें एक आयुध; विशेषतः विष्णूचें सुदर्शन चक्र. 'कैसें चक्र हन गोविंदा । सौभ्यतेजें मिरवे ।' -ज्ञा ११.६०४. ३ एक खेळणें; चक्री; चकीर; चक्कर. ४ बोटावरच्या वर्तुलाकार रेषा; या शुभ गणतात (याच्या उलट शंखाकृति रेषा अशुभ समजतात). ५ सैन्य; सेनासमूह; जथा; जमाव. 'स्वचक्र, परचक्र.' 'पालाणिजे त्वरित चक्र अशा रवा हो !' -वामन, विराट ५.११. ६ राष्ट्र; देश; भू- प्रदेश; प्रांत; जिल्हा. ७ (संकेत) वडे (खाद्य पदार्थ). ८ (विणकाम) मागाच्या कपाळकाठीच्या शेवटाला अडकविलेलीं दोन चाकें; अथवा कपाळकाठी किंवा ढेकणी यांच्या ऐवजीं ज्या चाकाचा उपयोग करतात तें. नकशीच्या कामाच्या दोर्या-कठांचा चाळा आहे असें लांकडी चाक; ज्यावर सूत गुंडाळतात तें चाक (रीळ). ९ चक्राकार सैन्यरचना; व्यूह. 'चक्रव्यूह.' १० पाण्याचा भोंवरा; आवर्त. ११ भविष्यकथनासाठीं किंवा जातक वर्तविण्याकरितां काढलेली आकृति; कुंडली. १२ (शारीरशास्त्रांत) शरीराचे विभाग; प्राणस्थानें प्रत्येकी एकंदर सहा आहेत; आधार-लिंग-नाभि-हृत्-कंठ-भू-चक्र. षट्चक्रभेद पहा. 'येक सांगती अष्टांग योग । नाना चक्रें ।' -दा ५.४. २४. १३ संवत्सरांचें मंडल, राहाटी, आवृत्ति. १४ (ज्यो.) मंडल; वर्तुल, राशिचक्र; ज्योतिषचक्र. १५ (कुण.) संकट; गोंधळ; घोंटाळा; कोडे; फास. (क्रि॰ चक्रांत घालणें-येणें = फसणें.) १६ (सामा.) मंडलाकार भ्रमण करणारा, खालचा वर-वरचा खालीं होणारा रहाटगाडग्या- प्रमाणें फिरणारा पदार्थ, वस्तु, स्थिति. 'वायुचक्र.' 'संसारचक्र.' १७ राज्यक्रांति. १८ (शाप.) पेशी; पिंड, (इं.) सेल. १९ योगमार्गांत कल्पिलेलें एक चक्र. हीं चक्रें सहा जाहेत. मूलाधार; स्वाधिष्ठान; मणिपूर; अनाहत, विशुद्ध; सहस्त्रार. 'ऊर्ध्व तळौतें खाचें । तया खेवामाजि चक्रांचे । पदर उरती ।' -ज्ञा ६.२३७. २० चक्रवाक पक्षी. 'चक्रापरीच सजलों असतां फिराया ।' -र १७. [सं.] सामाशब्द- ॰गति-स्त्री. वर्तुळाकार (आपल्या भोंवतालीं व पातळींत) गति; चक्रावर्त व गरगर फिरणें. 'नित्य जे उदयास्त होतात ते चक्रगतीनें आणि ग्रहांस राश्यंतर होतें हें स्वगतीनें.' [सं.] ॰चाळ-वि. चमत्कार करणारा; लीलानाटकी. 'तुका म्हणे चक्रचाळें । वेड बळें लाविलें ।' -तुगा २१२४. 'स्वर्ग माळा अंगीं लेईला सुढाळ । कान्हो चक्रचाळ पंढरीचा ।' -निगा ११९. [चक्र + चाळणें] ॰दंड-पु. एक व्यायामपद्धति. दोन्ही हातांचे तळवे जमिनीवर टेकून ते स्थिर ठेवून पायांनीं वर्तुलाकृति फिरणें-व्यायाम मासिक ४.१९२३. चकरदंड पहा. ॰धर-पु. १ सुदर्शन चक्र धारण करणारा; विष्णु. २ महानुभाव पंथांतील प्रमुख महात्मा. [सं. चक्र + धर] ॰नेमीक्रम-पु. फिरणार्या चाकाच्या धांवेचा वरचा भाग खालीं व खालचा भाग वर जातो व पुनः वर खालीं होतो याप्रमाणें परिस्थिति बदलणारा क्रम; उच्च- नीच स्थित्यंतरें; जगाची चांगल्या दिवसांमागून वाईट, नंतर पुन्हां चांगले दिवस अशी रहाटी. [चक्र + नेमि = परीघ + क्रम] ॰पाणी-पु. सुदर्शनचक्र धारण करणारा विष्णु; चक्रधर. 'मनुज तनुज जैसा भूतळीं चक्रपाणी ।' -वामन रुक्मिणीपत्रिका १५. [सं.] ॰पाळणा-पु. यात्रेच्या, जत्रेच्या प्रसंगी टांगलेलें फिरते पाळणे. २ गोलाकार फिरणारा पाळणा, झोला. ॰पाळ-पु. १ प्रांताचा मुभेदार. २ चक्ररक्षक; रथी युद्ध करीत असतां रथाच्या चाकांचें रक्षण व योग्य गतिमध्यें चलन यावर देखरेख करणारा योद्धा. 'कीं दों पार्श्वीं दोघे भीमार्जुन चक्रपाळ जेविं रवी ।' -मोभीष्म ११.५१. [सं. चक्रपाल] ॰भेंड-डी-स्त्री. एक झाड, याचें फळ चक्राकार असतें. चक्करभेंडी पहा. ॰पूजा- स्त्री. चक्राची पूजा करण्याचा खानदेशांतील कुलाचार. ॰भेद-पु. युक्ति; हिकमत; डावपेंच; छक्केपंजे; युक्तिप्रयुक्ति; कावा. [सं. चक्र + भेद; शकटभेद याचा प्रतिशब्द] ॰मंडल(करण)-न. (नृत्य,) ओणवें होऊन गुडघ्याच्या आंतील बाजूनें दोन्ही हातांनीं पायांस विळखा घालणें. [सं.] ॰रक्षक-पु. चक्रपाल पहा. ॰वत्-क्रिवि. चक्रप्रमाणें-सारखा; वर्तुलाकार; गरगर; चक्रा- कार. 'पायीं धरोनि अवलीळा । तारक चक्रवत् भोवंडिला ।' [सं.] ॰वर्तीं-र्त्ती-पु. चक्राचा अधिपति; एका समुद्रापासून दुसर्या समुद्रापर्यंत असलेल्या पृथ्वीचा राजा; समुद्रवलयांकित पृथ्वीचा राजा; सार्वभौम राजा; बादशहा. 'जे चैतन्यचक्रव- र्तींची शोभा । जिया विश्वबिजाचिया कोंभा ।' -ज्ञा ६.२७२. 'पुढें पुढें राघव चक्रवर्ती । संगें प्रिया मानसतापहर्ती ।' -मुरामा [सं.] ॰वर्तिंनी-स्त्री. बादशाहीण; सार्वभौमराज्ञी. 'चक्र- वर्तिंनी श्री महाराणी व्हिक्टोरिया यांस आमची... अशी प्रार्थना आहे कीं.' -टि १.६६७. [सं.] ॰वर्तीघोडा-पु. घोड्याचा एक प्रकार. याच्या नाकाच्या मध्यभागीं भोंवरा असतो. -अश्वप १.२५. ॰वाक-पु. एक पक्षी. यांमध्यें दिवसां नरमादीचें संमीलन व रात्रीं वियोग होतो असा कविसंकेत. 'तया चक्रवाकांचें मिथुन । सामरस्याचें समाधान ।' -ज्ञा १८.८ ॰वाक घोडा- पु. घोड्याचा एक प्रकार. सर्व अंग पिवळें, चारी पाय पांढरें व डोळे श्वेतरंगाचे असा घोडा. -अश्वप १.२५. [सं.] ॰वाट- स्त्री. रथाच्या चाकाची चाकारी. 'परसैन्य देखोनि दृष्टिं । वेगें चालिला जगजेठी । घडघडिल्या चक्रवाटी । उठाउठीं पातला ।' -एरुस्व १०.४४ ॰वाटी-स्त्री. वावटळ. (क्रि॰ धडधडणें). 'घडघडीत चक्रवाटी ।' -उषा ८३१. ॰वाढ-॰वाढ व्याज- स्त्रीन. दर वर्षास अथवा ठरविलेल्या मुदतीस व्याजाचा हिशेब करून तें व्याज मुदलांत मिळवितात आणि ती रक्कम (रास) दुसर्या वर्षाचे किंवा मुदतीचे व्याजासही मुद्दल धरतात, अशा रीतीनें जें व्याज होतें तें; व्याजाला व्याज आका- रणें. ॰वात-पु. सोसाट्याचा वारा; वावटळ. [सं.] ॰वाल-पु. १ क्षितिज; काळी धार २ पृथ्वीच्या भोंवतीं कल्पिलेली पर्व- तांची ओळ, मंडळ. [सं.] ॰वाल-पु. एक पक्षी. [सं.] ॰वाहा-वि. १ चक्र बाळगणारा. २ चक्रधर; विष्णु (कुंभार); 'चक्र वाहा कां देवेंसी । केंवि कुलाळा करूं सरिसी ।' -ऋ ४७. [सं. चक्र + वह्] ॰वृद्धि-स्त्री. चक्रवाढव्याज पहा. [सं.] ॰वेला-स्त्री. (रूढ) चक्रवेळ. फलज्योतिषशास्त्रांतील एक वेळ, मुहुर्त; यावेळीं आरंभ केलेलें कोणतेंहि कार्य फार दिवस रेंगाळत राहतें. [सं.] ॰व्यूह-विभू-विहू-पु. १ एक विशिष्ट प्रकारची सैन्याची वाटोळी रचना; या सैन्यरचनेंत शत्रूचा प्रवेश होऊं शकत नाहीं. 'चक्रव्यूह गुरु द्रोण ।रचिता झाला अद्भुत ।' -पांप्र ४५.४. २ मोठी मसलत; कपटकारस्थान; कट; संकटाचा डाव रचणें; जाळें पसरणें, फार खोल, भानगडीचा, गुंतागुंतीचा केलेला बेत. 'आंक- ड्याचा भ्रामक चक्रव्यूह रचून अभिमन्यूप्रमाणें बुद्धिमान... नेटिव लोकांचा छल व वध करण्यास लॉर्ड कर्झन यांच्या कारकीर्दींत हिंदुस्थानसरकारनें तयार व्हावें...' -टि २.५२३. [सं. चक्र + व्यूह; म. विभू, विहू = व्यूह] चक्राकार-पु. वर्तुळ, चक्रासारखी आकृति. -वि. वाटोळी; चक्राप्रमाणें गोल. [सं.] ॰कार मासा-पु. एक प्रकारचा मासा; (इं.) स्टार फिश. -प्राणिमो १३६. चक्रांकित, चक्रांगीत, चक्रांगद-पु. १ चक्राकार रेषांचीं वर्तुळें, चिन्हें अस- लेला पांढरा दगड; याची देवांश मानून पूजा करण्यांत येते; हा समुद्रकांठी सांपडतो. 'चक्रांगीत चक्रतीर्थाहुनी । घेऊन येती ।' -दा १९.५. ३. 'सीळा सप्तांकित नवांकित । शालिग्राम शकलें चक्रांकित ।' -दा ४.५.६. २ (थट्टेनें) अंगावर देवीचे वण किंवा इतर कांहीं विद्रूपता असणारा इसम. [सं. चक्र + अंकित] चक्रांत- पु. कट; कारस्थान. 'किल्लेदारसाहेबांच्या विरुद्ध त्यानें चक्रांत केला.' -कोराकि ६१. चक्रावळ-चक्रावाळ-१ चक्रवाढ पहा. चक्रावाळ-२ स्त्री. घोड्याचें एक लक्षण; अंगावर अनेक केसांचें भोंवरे असणें; हें घोड्याचें अशुभ लक्षण मानितात. [सं. चक्र + आवलि] चक्रावळ-स्त्री. घोड्याचा एक रोग. -अश्वप २.२५८.
दुर्
अ. दुष्टपणा; वाईटपणा, कठिणपणा, दुःख इ॰कांच्या वाचक शब्दापूर्वीं योजावयाचा उपसर्ग. जसें:-दुराचार = वाईट वर्त- णूक; दुर्लभ = मिळण्यास कठिण; दुस्सह = सहन करण्यास कठिण इ॰. याचीं संधिनियमानुरूप दुर्, दुस्, दुष्, दुश् इ॰ रूपें होतात. जसें:- दुर्लभ दुष्कर, दुश्चल, दुस्सह, दुस्साध्य, दुराचार, दुरंत इ. हा उपसर्ग जोडून अनेक सामासिक शब्द बनतात. त्यांपैकीं कांहीं येथें दिले आहेत. दुरंत-वि. १ अपार; अनंत; अमर्याद; अंत लागण्यास कठिण असा (मोह, माया इ॰). २ अतिशय कठिण; तीव्र (दुःख इ॰). [दुर् + अंत = शेवट] दुरतिक्रम-वि. ओलांडून जाण्यास कठिण; दुस्तर; दुर्लंघ्य. २ असाध्य. [दुर् + अतिक्रम = ओलांडणें] दुरत्यय-यी-वि. १ नाश करून टाकण्यास कठिण. २ प्रतिबंध करण्यास, टाळण्यास कठिण; अपरिहार्य. ३ असाध्य (दुःख, आजार, रोग इ॰). अप्रतीकार्य (अडचण, संकट). ४ मन वळ- विण्यास कठिण असा (मनुष्य); दुराराध्य. [दुर् + अत्यय = पार पडणें, जाणें इ॰] दुरदृष्ट-न. दुर्दैव; वाईट अदृष्ट. 'कीं आड आलें दुरदृष्ट माझें ।' -सारुह १.१०. [दुर् + अदृष्ट] दुरधिगम्य- वि. १ समजण्यास कठिण; दुर्बोध; दुर्ज्ञेय. २ दुष्प्राप्य; मिळण्यास कठिण; दुर्गम. [दुर् + सं. अधि + गम् = मिळविणें] दुरभिमान-पु. पोकळ, वृथा, अवास्तव अभिमान; फाजील गर्व. [दुर् + अभिमान] दुरवबोध-वि. दुर्बोध; गूढ. [दुर् + सं. अव + बुध् = जाणणें] दुरा- कांक्षा-स्त्री. दुष्प्राप्य वस्तूचा अभिलाष. [दुर् + आकांक्षा = इच्छा, अभिलाष] दुराग्रह-पु. हट्ट, लोकविरोध, शास्त्रविरोध, संकटें इ॰ कांना न जुमानतां एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरविण्याचा हट्ट; अनिष्ट आग्रह. 'न सुखद दुराग्रह सखा हा सर्वाऽनर्थ गेह ठक राया ।' -मोकर्ण ४६.५०. [दुर् = वाईट + आग्रह = हट्ट] दुराग्रही-वि. दुरा- ग्रह धरण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा; हेकेखोर; हटवादी; हट्टी. [दुराग्रह] दुराचरण, दुराचार-नपु. निंद्य, वाईट, वागणूक; दुर्वर्तन; दुष्ट आचरण. [दुर् = दुष्ट + सं. आचरण = वर्तन] दुराचरणी, दुराचारी-वि. निंद्य, वाईट, दुष्ट वर्तनाचा; बदफैली. [दुराचार] दुरात्मत्व-न. १ दुष्ट अंतःकरण; मनाचा दुष्टपणा. २ दुष्ट कृत्य. 'किमपि दुरात्मत्व घडलें ।' [दुर् = दुष्ट + आत्मा = मन] दुरात्मा- वि. दुष्ट मनाचा (मनुष्य); खट; शठ. [दुर् + आत्मा] दुरा- धर्ष-वि. जिंकण्यास, वर्चस्वाखालीं आणण्यास कठिण. [दुर् + सं. आ + धृष् = जिंकणें] दुराप-वि. मिळविण्यास कठिण; दुर्लभ; अप्राप्य. 'राया, भीष्माला जें सुख, इतरां तें दुराप, गा, स्वापें ।' -मोभीष्म ६.२९. दुराप(पा)स्त-वि. घडून येण्यास कठिण; दुर्घट; असंभाव्य. 'वाळूचें तेल काढणें ही गोष्ट दुरापस्त आहे.' [दुर् + सं. अप + अस् = ] दुराराध्य-वि. संतुष्ट, प्रसन्न करण्यास कठिण, अशक्य; मन वळविण्यास कठिण. 'मोक्षु दुराराध्यु कीर होय । परि तोही आराधी तुझे पाय ।' -ज्ञा ११.९९. [दुर् + सं. आराध्य] दुराशा-स्त्री. निरर्थक, फोल, अवास्तव आशा, दुष्प्राप्य गोष्टीची आशा दुष्ट वासना. 'आम्हास अन्न खावयास मिळेना आणि पालखींत बसण्याची दुराशा धरावी हें चांगलें नव्हे.' 'दुराशागुणें जो नव्हे दैन्यवाणी ।' -राम १६८. [दर् + आशा] दुरासद-वि. कष्टानें प्राप्त होणारें; जिंकण्यास, मिळण्यास कठिण. [दुर् + सं. आ + सद = मिळ विणें] दुरित-न. पाप; पातक; संचितकर्म. 'पुन्हां न मन हे मळो दुरित आत्मबोधें जळो ।' -केका ११९. [दुर् + सं. इ = जाणें] दुरुक्त-न. वाईट, दुष्टपणाचें, अश्लील भाषण; शिवी; अपशब्द; दुर्भाषण; अश्लील बोलणें. [दुर् + उक्ति = बोलणें] दुरुत्तर-न. अप मानकारक, उर्मटपणाचें उत्तर; दुरुक्ति. [दर् + उत्तर] दुरुद्धर-वि. खंडण करण्यास, खोडून काढण्यास कठिण असा (पूर्वपक्ष, आक्षेप, आरोप). 'या सिद्धांतावर दोष दिला हा सर्वांस दुरुद्धर आहे.' [दुर् + सं. उद् + धृ = काढून टाकणें; वर, बाहेर काढणें] दुरूह-वि. दुर्बोध; गूढ; अतर्क्य. 'ईश्वरानें सृष्टि कशी उत्पन्न केली हें सर्वांस दुरूह आहे.' [दुर् + सं. ऊह् = अनुमानणें] दुर्गत-वि. गरीब; दिन; दरिद्री; लाचार. 'झांकी शरपटलानीं आढ्य जसा दुर्गतांसि वस्त्रांनीं ।' -मोभीष्म ९.६५. [दुर् + सं. गत = गेलेला] दुर्गति-स्त्री. १ दुर्दशा; वाईट स्थिति; संकटाची, लाजिरवाणी स्थिति; अडचण; लचांड. २ नरक; नरकांत पडणें. [दुर् + गति = स्थिति] दुर्गंध- गंधी-पुस्त्री. घाण; वाईट वास. -वि. घाण वास येणारें [दुर् = वाईट + सं. गंध = वास] ॰नाशक-वि. (रसा.) दुर्गंधाचा नाश करणारें; (इं.) डिओडरंट्. [दुर्गध + सं. नाशक = नाश करणारा] दुर्गंधिल-वि. (रासा.) आर्सेनिक व मेथिल यांच्या संयोगापासून बनलेला विषारी, दुर्गंधी (पदार्थ) (इं.) कॅको- डिल्. दुर्गम-वि. जाण्यास कठिण (स्थळ, प्रदेश इ॰). [दुर् + सं + गम् = जाणें] दुर्गुण-पु. वाईट गुण; दोष; अवगुण; दुर्मार्गाकडील कल. (क्रि॰ आचरणें). [दुर् + गुण] दुर्गुणी-वि. वाईट गुणांचा; अवगुणी; दुराचरी; दुर्वर्तनी. [दुर्गुण] दुर्घट-वि. धड- वून आणण्यास, घडून येण्यास, सिद्धीस नेण्यास कठिण. [दुर् + सं. घट् = घडणें, घडवून आणणें] दुर्घटना-स्त्री. अशुभ, अनिष्ट गोष्ट घडणें; आकस्मिक आलेलें संकट, वाईट परिस्थिति. [दुर् + सं. घटना = स्थिति] दुर्घाण-स्त्री. दुस्सह घाण; ओरढाण; उग्रष्टाण. [दुर् + घाण] दुर्जन-पु. वाईट, दुष्ट मनुष्य. [दुर् + जन = मनुष्य, लोक] दुर्जय-वि. १ जिंकण्यास कठिण. २ दुस्साध्य; दुस्तर. [दुर + सं. जि = जिंकणें] दुर्जर-वि. पचविण्यास, विरघळ- ण्यास कठिण. [दुर् + सं. जृ = जिरणें] दुर्दम-वि. दमन करण्यास, वर्चस्वाखालीं आणण्यास कठिण. 'तिला इंग्लंडांतील प्रबल व दुर्दम प्रजाजनांच्या अडथळ्याशिवाय दुसरें कोणतेंच नियमन नसे.' -पार्ल ६. [दुर् + दम्] दुर्दर्श-वि. दिसण्यास, पाहण्यास कठिण; अतिशय अस्पष्ट. [दुर् + सं. दृश् = पाहणें] दुर्दशा-स्त्री. अवनतीची, अडचणीची, संकटाची, वाईट, दुःखद स्थिति; दुर्गति; दुःस्थिति. 'भिजल्यामुळें शालजोडीची दुर्दशा जाली.' [दुर् + दशा = स्थिति दुर्दिन-न. १ वाईट दिवस. २ अकालीं अभ्रें आलेला दिवस. ३ वृष्टि. -शर. [दुर् + सं. दिन = दिवस] दुर्दैव-न. कमनशीब; दुर्भाग्य. 'कीं माझें दुर्दैव प्रभुच्या मार्गांत आडवें पडलें ।' -मोसंशयरत्नमाला (नवनीत पृ. ३४९). -वि. कम- नशिबी; अभागी. [दुर् + दैव = नशीब] दुर्दैवी-वि. अभागी; कम- नशिबी. [दुर्दैव] दुर्धर-पु. एक नरकविशेष. [सं.] दुर्धर- वि. १ धारण, ग्रहण करण्यास कठिण. २ दुस्साध्य; दुष्प्राप्य. ३ (काव्य) (व्यापक) बिकट; खडतर; असह्य; उग्र; कठिण. 'तप करीत दुर्धर । अंगीं चालला घर्मपूर ।' ४ भयंकर; घोर; भयानक. 'महादुर्धर कानन ।' [दुर् + सं. धृ = धरणें, धारण करणें] दुर्धर्ष- वि. दुराधर्ष; दमन करण्यास, वर्चस्वाखालीं आणण्यास कठिण; दुर्दम्य; अनिवार्य. [दुर् + धृष् = जिंकणें, वठणीवर आणणें] दुर्नाम- न. अपकीर्ति; दुष्कीर्ति; बदनामी. [दुर् + सं. नामन् = नांव] दुर्नि- मित्त-न. अन्याय्य, निराधार कारण, सबब, निमित्त. [दुर् + निमित्त = कारण] दुर्निर्वह-वि. १ दुःसह; असह्य; सहन करण्यास कठिण; निभावून जाण्यास, पार पडण्यास कठिण (अडचण, संकट). २ दुस्साध्य; दुष्कर; [दुर् + सं. निर् + वह्] दुर्निवार, दुर्निवा- रण-वि. १ निवारण, प्रतिबंध करण्यास कठिण; अपरिहार्य; अनि- वार्य. २ कबजांत आणण्यास कठिण; दुर्दम्य. [दुर् + नि + वृ] दुर्बल-ळ-वि. १ दुबला; अशक्त; असमर्थ. २ गरीब; दीन; दरिद्री. 'ऐसें असतां एके दिवशीं । दुर्बळ द्विज आला परियेसीं ।' -गुच ३८.७. [दुर् + बल = शक्ति] दुर्बळी-वि. (काव्य.) दुर्बळ पहा. दुर्बुद्ध-वि. १ दुष्ट बुद्धीचा; खुनशी वृत्तीचा. २ मूर्ख; मूढ; मंदमति; ठोंब्या. [दुर् + बुद्धि] दुर्बुद्धि-स्त्री. १ दुष्ट मनोवृत्ति; खुनशी स्वभाव; मनाचा दुष्टपणा. 'दुर्बुद्धि ते मना । कदा नुपजो नारायणा ।' -तुगा ७९८. २ मूर्खपणा; अनिष्ट परिणामकारक बुद्धि. -वि. दुष्ट मनाचा; दुर्बुद्ध पहा. [दुर् + बुद्धि] दुर्बोध-वि. समजण्यास कठिण (ग्रंथ, भाषण इ॰) [दुर् + बोध् = समजणें, ज्ञान] दुर्भग-वि. कमनशिबी; दुर्दैवी; भाग्यहीन. [दुर् + सं. भग = भाग्य] दुर्भर-वि. भरून पूर्ण करण्यास कठिण; तृप्त करण्यास कठिण (पोट, इच्छा, आकांक्षा). 'इंद्रियें वज्रघातें तपे उष्ण वरी ज्वाळ । सोसिलें काय करूं दुर्भर हे चांडाळ ।' -तुगा ३५४. -न. (ल.) पोट. 'तरा दुस्तरा त्या परासागरातें । सरा वीसरा त्या भरा दुर्भरातें ।' -राम ८०. [दुर् + सं. भृ = भरणें] दुर्भ्यक्ष्य-वि. खाण्यास कठिण, अयोग्य; अभ्यक्ष्य. [दुर् + सं. भक्ष्य = खाद्य] दुभोग्य-न. कमनशीब; दुर्दैव. -वि. दुर्दैवी; अभागी. [दुर् + सं. भाग्य = दैव] दुर्भावपु. १ दुष्ट भावना; कुभाव; द्वेषबुद्धि. २ (एखाद्याविषयींचा) संशय; वाईट ग्रह; (विरू.) दुष्टभाव. [दुर् + भाव = भावना, इच्छा] दुर्भाषण-न. वाईट, अपशब्दयुक्त, शिवीगाळीचें बोलणें; दुर्वचन पहा. [दुर् + भाषण = बोलणें] दुर्भिक्ष-न. १ दुष्काळ; महागाई. २ (दुष्काळ इ॰ कांत होणारी अन्नसामुग्री इ॰ कांची) टंचाई; कमीपणा; उणीव. [सं.] ॰रक्षित-वि. दासांतील एक प्रकार; आपलें दास्य करावें एतदर्थ दुष्काळांतून वांचविलेला (दास, गुलाम इ॰). -मिताक्षरा-व्यवहारमयूख दाय २८९. [दुर्भिक्ष + सं. रक्षित = रक्षण केलेला] दुर्भेद-वि. बुद्धीचा प्रवेश होण्यास कठिण; दुर्बोध. 'तैसें दुर्भेद जे अभिप्राय । कां गुरुगम्य हन ठाय ।' -ज्ञा ६.४५९. [दुर् + सं. भिद् = तोडणें] दुर्भेद्य-वि. फोडण्यास, तुकडे करण्यास कठिण (हिरा; तट). [दुर् + सं. भेद्य = फोडण्यासारखा] दुर्मति-स्त्री. १ दुर्बुद्धि; खाष्टपणा; कुटिलपणा. २ मूर्खपणा; खूळ; वेडेपणा. -पु. एका संवत्सराचें नांव. -वि. १ दुष्ट बुद्धीचा; खाष्ट स्वभावाचा. २ मूर्ख; खुळा; वेडा. [दुर् + मति = बुद्धि, मन] दुर्मद-पु. दुराग्रहीपणा; हेकेखोरी; गर्विष्ठपणाचा हटवादीपणा. 'किती सेवाल धन दुर्मदा' -अमृतपदें ५८. -वि. मदांध; मदोन्मत्त; गर्विष्ठ. 'सावियाचि उतत होते दायाद । आणि बळिये जगीं दुर्मद ।' -ज्ञा ११.४८०. [दुर् + मद = गर्व] दुर्मनस्क, दुर्मना-वि. खिन्न; उदास मनाचा; विमनस्क; दुःखित. [दुर् + सं. मनस् = मन] दुर्मरण-न (वाघानें खाऊन, पाण्यांत बुडून, सर्प डसून इ॰ प्रकारांनीं आलेला) अपमृत्यु; अपघातानें आलेलें मरण; अमोक्षदायक मरण. [दुर् + मरण] दुर्मि(र्मी)ल-ळ- वि. मिळण्यास कठिण; दुर्लभ. [दुर् + सं. मिल् = मिळणें] दुर्मुख- पु. एका संवत्सराचें नांव. -वि. १ घुम्या; कुरठा; तुसडा; आंबट तोंडाचा. २ तोंडाळ; शिवराळ जिभेचा. 'दुर्मुखी स्त्रीचा त्याग करून । संन्यास ग्रहण करावा ।' [दुर् + मुख] दुर्मुखणें- अक्रि. तोंड आंबट होणें; फुरंगुटणें; गाल फुगविणें; (एखाद्या कार्याविषयीं) उत्साहशून्यतेची चर्या धारण करणें. 'खायास म्हटलें म्हणजे हांसत येतात आणि उद्योगाचें नांव घेतलें म्हणजें लागलेच दुर्मुखतात.' [दुर्मुख] दुर्मुखला-वि. आंबट चेहर्याचा; घुम्या; कुरठा; तुसडा. [दुर्मुख] दुर्मेधा-वि. १ मंदबुद्धीचा. २ दुष्ट स्वभावाचा; दुर्मति. [दुर् + सं. मेधा = बुद्धि] दुर्योग-पु. सत्ता- वीस योगांतील अशुभ, अनिष्ट योगांपैकीं प्रत्येक. [दुर् + योग] दुर्लंघ्य-वि. १ ओलांडता येण्यास कठिण; दुस्तर (नदी इ॰). २ मोडता न येण्यासारखी, अनुल्लंघनीय (आज्ञा, हुकूम, शपथ इ॰) ३ निभावून जाण्यास कठिण (संकट, अडचण इ॰). ४ घालविण्यास, दवडण्यास, क्रमण्यास, नेण्यास कठिण (काळ, वेळ इ॰). [दुर् + सं. लंघ्य = ओलांडावयाजोगें] दुर्लभ-वि. मिळण्यास कठिण; अलभ्य; दुर्मिळ; दुष्यप्राप्य; विरळा. 'अलीकडे आपलें दर्शन दुर्लभ जालें. दुर्ललित-न. चेष्टा; खोडी. 'आमच्या विविध दुर्ललिताबद्दल गुरुजींनीं कसें शासन केलें...' -आश्रमहारिणी ७. [दुर् + सं. ललित = वर्तन, चेष्टा] दुर्लक्ष-न. लक्ष नसणें; हयगय; निष्काळजी- पणा; गफलत; अनवधान. -वि. १ लक्ष न देणारा; अनवधानी; गाफील; बेसावध, 'तुम्ही गोष्ट सांगीतली पण मीं दुर्लक्ष होतों म्हणून ऐकिली नाहीं.' २ दिसण्यास, समजण्यास कठिण; 'ईश्वराचें निर्गुण स्वरूप दुर्लक्ष आहे.' [दुर् + सं. लक्ष्य] दुर्लक्षण- न. १ (मनुष्य, जनावर इ॰ कांचें) अशुभसूचक लक्षण, चिन्ह; दुश्चिन्ह; दोष; वाईट संवय; खोड; दुर्गुण. 'हा घोडा लात मारतो एवढें यामध्यें दुर्लक्षण आहे.' [दुर् + लक्षण = चिन्ह] दुर्लक्षण-णी- वि. १ दुर्लक्षणानें, वैगुण्यानें युक्त (मनुष्य, घोडा इ॰). (विरू.) दुर्लक्षणी. २ दुर्गुणी; दुराचारी; दुर्वर्तनी. दुर्लक्ष्य-वि. १ बुद्धीनें, दृष्टीनें अज्ञेय; अगम्य. २ दुर्लक्ष इतर अर्थीं पहा. [दुर् + सं. लक्ष्य] दुर्लौकिक-पु. अपकीर्ती; दुष्कीर्ति; बेअब्रू; बदनामी; कुप्रसिद्धि. [दुर् + लौकिक = कीर्ति] दुर्वच, दुर्वचन, दुर्वाक्यन. १ वाईट बोलणें; दुर्भाषण; अशिष्टपणाचें, अश्लील, शिवीगाळीचें भाषण. २ अशुभ, अनिष्टसूचक भाषण. [सं. दुर् + वचस्, वचन, वाक्य = बोलणें] दुर्वह-वि. १ वाहण्यास, नेण्यास कठिण. २ सोसण्यास, सहन करण्यास कठिण. [दुर् + सं. वह् = वाहणें, नेणें] दुर्वाड- वि. अतिशय मोठें; कठिण. -शर. प्रतिकूल. [दुर् + वह्] दुर्वात- उलट दिशेचा वारा. 'तुज महामृत्युचिया सागरीं । आतां हे त्रैलोक्यजीविताची तरी । शोकदुर्वातलहरी । आंदोळत असे ।' -ज्ञा ११.३४८. [दुर् + सं. वात = वारा] दुर्वाद-पु. वाईट शब्द; दुर्वच; वाईट बोलणें; भाषण. 'हां गा राजसूययागाचिया सभासदीं । देखतां त्रिभुवनाची मांदी । कैसा शतधा दुर्वादी । निस्तेजिलासी ।' -ज्ञा ११.१०१. [दुर् + वाद = बोलणें] दुर्वारवि. दुर्निवार; अनिवार्य; टाळण्यास, प्रतिकार करण्यास कठिण; अपरिहार्य. २ आवरतां येण्यास कठिण; अनिवार; अनावर. [दुर् + वारणें] दुर्वास-पु. १ (व.) सासुरवास; कष्ट; त्रास; जाच. [दुर् + वास = राहणें] दुर्वासना-स्त्री. वाईट इच्छा; कुवासना; दुष्प्रवृत्ति. [दुर् + वासना] दुर्विदग्ध-वि. विद्येंत न मुरलेला तथापि विद्येचा गर्व वाहणारा; अर्ध्या हळकुंडानें; पिवळा झालेला. [दुर् + सं. विदग्ध = विद्वान्] दुर्विपाक-पु. वाईट परिणाम. [दुर् + सं. विपाक = परिणाम] दुर्विभावनीय-वि. समजण्यास, कल्पना करण्यास कठिण. [दुर् + सं. विभावनीय = कल्पना करतां येण्यासारखें] दुर्वृत्ति-स्त्री. दुराचारी; दुर्व्यसनी; दुर्वर्तनी. [दुर् + सं. वृत्त = वागणूक] दुर्वत्ति-स्त्री. दुराचरण; भ्रष्टाचार; बदफैली. [दुर् + सं. वृत्ति = वर्तन] दुर्व्यसन-न. दुराचरणाची संवय; द्यूत, मद्यपान, वेश्यागमन इ॰कांसारखें वाईट व्यसन. 'दुर्व्यसन दुस्तरचि बहु सूज्ञासहि फार कंप देतें हो' -वत्सलाहरण. [दुर् + व्यसन] दुर्व्यसन-नी-वि. वाईट व्यसन, संवय लागलेला; दुराचारी; बदफैली. (प्र.) दुर्व्यसनी. दुर्व्रात्य-वि. अतिशय दुष्ट; व्रात्य; खोडकर; खट्याळ; (मुलगा अथवा त्यांचें आचरण). [दुर् + व्रात्य = खोडकर, द्वाड] दुर्हृद, दुर्हृदय-वि. वाईट, दुष्ट मनाचा. [दुर् + सं. हृदु, हृदय = मन] दुर्ज्ञेय-वि. समजण्यास कठिण; गूढ; गहन. 'ही पद्धत कशी सुरू झाली असावी हें समजणें दुर्ज्ञेय आहे.' -इंमू ७६. [दुर् + सं. ज्ञेय = समजण्याजोगें] दुःशक- वि. करण्यास कठिण; अशक्यप्राय. [दुस् + सं. शक् = शकणें] दुःशकुन-पु. अपशकुन; अनिष्टसूचक चिन्ह. [दुस् + शकुन] दुश्शील, दुःशील-वि. वाईट शीलाचा; दुराचरणी. [दुस् + शील] दुश्चरित्र-न. पापाचरण; दुष्कृत्य. [दुस् + चरित्र] दुश्चल-वि. (अक्षरशः व ल.) पुढें जाण्यास, सरसावण्यास, चालण्यास कठिण. [दुस् + सं. चल् = चालणें] दुश्चि(श्ची)त-वि. १ (काव्य) अयोग्य, चुकीचा, अपराधी (माणूस, कृत्य). 'अंगुष्ठ धरुनि मस्तकपर्यंत । अखंड दुश्चित आचरलों ।' २ खिन्न; उदास; दुःखी. 'राजा प्रजा पिडी । क्षेत्री दुश्चितासी तोडी ।' -तुगा २९८४. [सं. दुश्चित अप.] दुश्चित्त-वि. १ खिन्न; दुर्मनस्क; दुःखित; उदास; उद्विग्न. 'अबदुल्याची खबर ऐकतां मनांत झाले दुश्चित ।' -ऐपो १३२. २ क्षुब्ध. 'परी कुंडलिनी नावेक दुश्चित्त होती । ते तयातें म्हणे परौती ।' -ज्ञा ६.२३८ [दुस् + चित्त = मन] दुश्चिंत- वि. (काव्य) खिन्न; दुःखी; उदास; दुश्चित्त अर्थ २ पहा. 'डोळे लावुनियां न होतों दुश्चिंत । तुझी परचीत भाव होती ।' [दुश्चित अप.] दुश्चिन्ह-न. अशुभ, वाईट लक्षण; अपशकुन. 'दुश्चिन्हें उद्भवलीं क्षितीं । दिवसा दिवाभीतें बोभाति ।' [दुस् + चिन्ह] दुश्शाप-पु. वाईट, उग्र, खडतर शाप. [दुस् + शाप] दुश्शासन-पुविना. दुर्योधनाचा भाऊ. -वि. व्यवस्था राख- ण्यास, अधिकार चालविण्यास कठिण. [दुस् + शासन = अधिकार चालविणें] दुष्कर-वि. १ करण्यास कठिण; बिकट; अवघड. 'म्हणोनि अभ्यासासि कांहीं । सर्वथा दुष्कर नाहीं ।' -ज्ञा १२.११३. २ दुष्परिणामकारक. -मोल. [दुस् + सं. कृ = करणें] दुष्कर्म-न. वाईट, पापी, दुष्टपणाचें कृत्य; कर्म. [दुस् + कर्म] दुष्कर्मा, दुष्कर्मी-पु. दुष्ट कृत्य करणारा; पापी; दुरात्मा. [दुस् + कर्मन्] दुष्काल-ळ-पु. अतिवृष्टि किंवा अनावृष्टि होऊन पिकें बुडून अन्नाची वाण पडते तो काळ; दुकाळ; महागाई. 'जैसा रोगिया ज्वराहूनि उठिला । कां भणगा दुष्काळु पाहला ।' -ज्ञा ११.४२८. [दुस् + काल] म्ह॰ दुष्काळांत तेरावा महिना = दुष्का- ळांत वर्षाचे बारा महिने काढतां काढतांच मुष्कील पडते. अशा वेळीं अधिक मास (तेरावा महिना) आला म्हणजे संकटातं भर पडते असा अर्थ. दुष्कीर्ति-स्त्री. अपकीर्ती; बदनामी; बेअब्रू. [दुस् = कीर्ति] दुष्कृत-ति-नस्त्री. १ पापकर्म; वाईट कृत्य. 'आणि आचरण पाहातां सुभटा । तो दुष्कृताचा कीर सेल वांटा ।' -ज्ञा ९.४१६. २ कृतींतील. वागणुकींतील दुष्टपणा. [दुस् + कृत- ति] दुष्प्रतिग्रह-पु. जो प्रतिग्रह (दानाचा स्वीकार) केला असतां, स्वीकारणारा अधोगतीस जातो तो; निंद्य प्रतिग्रह; अशुभप्रसंगीं केलेलें दान स्वीकारणें; वाईट कृत्याबाबत स्वीकारलेलें दान इ॰. उदा॰ वैतरणी, शय्या, लोखंड, तेल, म्हैस हे दुष्प्रतिग्रह होत. [दुस् + सं. प्रतिग्रह = दान स्वीकारणें] दुष्प्राप-प्य-वि. दुर्लभ; मिळण्यास कठिण; विरळा; दुर्मिळ. [दुस् + सं. प्र + आप् = मिळ- विणें] दुस्तर-वि. तरून जाण्यास, पार पडण्यास कठिण. 'समुद्रापेक्षां हा संसार मला दुस्तर वाटतो.' -न. (ल.) संकट. 'थोर वोढवलें दुस्तर । तुटलें सासुरें माहेर ।' -एरुस्व ८.५५. [दुस + सं तृ = तरणें] दुस्पर्श-वि. स्पर्श करण्यास कठिण, अयोग्य. [दुस् + सं. स्पृश् = स्पर्श करणें] दुस्संग-पु. दुष्टांची संगत; कुसंगति. [दुस् + संग] दुस्सह-वि. सहन करण्यास कठिण; असह्य. [दुस् + सं. सह् = सहन करणें] दुस्सही-वि. (प्र.) दुस्सह स्सह अप.] दुस्साध्य-वि. १ सिद्धीस नेण्यास, साधावयास कठिण. 'थोर वय झाल्यावर विद्या दुःसाध्य होते.' २ बरा करण्यास कठिण (रोग, रोगी). आटोक्यांत आणण्यास कठिण (शत्रु, अनिष्ट गोष्ट, संकट इ॰). [दुस् + सं. साध्य = साधण्यास सोपें] दुस्स्वप्न-न. १ अशुभसूचक स्वप्न. २ (मनांतील) कुतर्क, आशंका, विकल्प. [दुस् + स्वप्न] दुस्स्वभाव-पु. वाईट, दुष्ट स्वभाव. -वि. वाईट, दुष्ट स्वभावाचा. [दुस् + स्वभाव]
अभिनव
वि. १ नवीन; नूतन. 'आतां अभिनव वाग्वि- लासिनी' । -ज्ञा १.२१. २ अपूर्व; आश्चर्यकारक; विलक्षण. 'कृष्ण पहावयाच्या लोभा । नयनीं नयनासी निघती जिभा । श्रवण श्रव- णासी वल्लभा । अभिनव शोभा कृष्णाची ।' -एरुस्व १.७६. -न. नवल; आश्चर्य. 'अभिनव करिती सकळ जन । म्हणती वांझेसी गर्भ- धारण ।' -गुच ३९.३३. [सं.]
अभ्र
न. १ मेघ; ढग. 'ना तरी अभ्रवातें हाले ।' -ज्ञा २.३. २ ढगांची काळोखी; आभाळ; मळभ. ३ आकाश; अंतरिक्ष.४ (ल.) संकट. [सं. १ अभ्र (अप + भृ = पाणी धारण करणारा); २ अभ्र = गमन करणें (पाणिनी); फा. अब्र; झेंद अब्र; ग्री. ओंब्रॉस, अ/?/प्रॉस; लॅ. इंबेर.]
आधान
न. १. स्थापना; प्रस्थापना; ठेवणे. २. अग्निहोत्र ग्रहणाचा संस्कार, अग्न्याधान. ३. गर्भाधान या शब्दाचे संक्षिप्त रूप. ४. एखादी वस्तू धारण करणारा; समाविष्ट करून घेणारा. [सं.]
आधार
पु. १. आश्रय; टेका; धीर; (अक्षरशः व लाक्षणिक) धारण करण्याची, सहन करण्याची शक्ती; दिलेला आश्रय. २. निर्वाहाच्या साधनांची मदत; आश्रय; आसरा. ३. (ल.) फूस; मदत; कृपा; संमती; मान्यता; अधिकार. ४. प्रमाण; बळ, ५. (योग.) षटचक्रांपैकी पहिले; शिश्न व गुद यांच्यामधील मूलाधारचक्र; याचा रंग तांबडा व पाकळ्या चार असून पाकळ्यांवर ‘वं, शं, पं, सं’ हे वर्ण असतात : ‘मग कुंडलिनियेचा टेंभा । आधारीं केला उभा ।’ − ज्ञा १२·५१. ६. (व्या.) सप्तमी विभक्तीचा अर्थ अधिकरण (आत, वर, कडे). ७. बांध; धरण. ८. (भूशा.) गृहीत किंवा सिद्धांतात मूलभूत धरलेली गोष्ट. [सं.] (वा.) आधार लावणे − आश्रय देणे; मदत करणे; पाठपुरावा घेणे. आधारास लागणे−(एखाद्या गोष्टीच्या) मुळापर्यंत जाणे; धाऱ्यास लागणे. आधारास लावणे− (एखाद्या गोष्टीचा) शेवटपर्यंत छडा−तपास−शोध करणे, लावणे.
आधार
पु. १ आश्रय; टेंका; धीर; (अक्षरशः व लाक्षणिक) धारण करण्याची, सहनकरण्याची शक्ति; दिलेला आश्रय. 'सर्व जगतास पृथ्वीचा आधार आहे.' सामाशब्द-आधार-गत-चलन-च्युत-भूत-भ्रष्ट-स्थान-स्थित-इ॰ २ निर्वाहाच्या साधनाची मदत; आश्रय; आसरा. 'जवळ पैसा नाहीं आणि कशाचे आधारागर लग्न आरंभावें.' ३ (ल.) फूस; मदत; कृपा; संमति; मान्यता; अधिकार; ४ प्रमाण; बळ. 'तुम्हीं वतन माझें म्हणतां याला आधार कशाचा म्हणाल तर भोगवटा.' ५ (योग.) षट्चक्रांपैकीं पहिलें; शिश्न व गुद यांच्या मधील मुलाधारचक्र; याचा रंग तांबडा व पाकळ्या चार असून त्या प्रत्येकीवर 'वं, शं, षं, सं,' हे वर्ण असतात. 'मग कुंडलि- नियेचा टेंभा । आधारीं केला उभा ।' -ज्ञा १२.५१०. -विउ १.४८. ६ (व्या.) सप्तमी विभक्तीचा अर्थ अधिकरण (आंत, वर, कडे). ॰लावणें-आश्रय देणें; मदत करणें; पाठपुरावा घेणें. -स लावणें-(एखाद्या गोष्टीचा) शेवटपर्यंत छडा-तपास-शोध लावणें-करणें. -स लागणें-(एखाद्या गोष्टीच्या) मूळापर्यंत जाणें; थार्यास लागणें. -स पंथ-पु. एखादी गोष्ट समजण्यासाठीं, सिद्ध करण्यासाठीं लागणारी कारणपरंपरा, साधन, लक्षण; विशेषतः नकारात्मक उपयोग. 'मला ओळखीचा वाटला म्हणून त्यास विचारीत होतों परंतु त्याणें आधारास पंथ लागूं दिला नाहीं.' (क्रि॰ लावणें; लागणें; दिसणें; असणें) म्ह॰ १ 'आधाराला मधार' २ 'म्हातारा नवरा कुंकवाला आधार.' ॰कमळ-चक्र-न. (योग) आधार अर्थ ५ पहा. 'आधारचक्रीं सूक्ष्म प्राण ।' -एभा १२. ३१२. [सं.] ॰द्रुम-पु. आधारचक्र. आधार अर्थ ५ पहा. 'चरणतळें देव्हडीं आधारद्रुमाच्या बुडीं ।' -ज्ञा ६.१९३. पत्र-न. पत्राव- ळीस मधोमध लावलेलें लहानसें वेगळें पत्र; ताटाखालचें पान. २ पोथी-पुस्तकांत दोन्ही बाजूस लावलेला जाड कागद वगैरे पुष्टीपत्र. ३ प्रमाणपत्र; आधारवचन, ॰बहाल-न. ज्यावर छपराचा सर्व भार असतो तें. ॰बिंदु-पु. (शाप.) तरफ; टेकू (इं.) फलक्रम. ॰मुद्रा-स्त्री योगशास्त्रापैकीं दहा मुद्रांतील एक. शोधूनि आधारमुद्रा बरवी ।' -ज्ञा ८.४९. [सं.] ॰शक्ति-१ (योग.) मूलाधारचक्र; आधार अर्थ ५ पहा. 'आधारशक्तीचिया अंकीं ।' -ज्ञा १२.५. २ अधिष्ठान; माया; ब्रह्म.
अधर, अध्धर
वि. १ अधीर; उतावीळ; दम नसलेला; असहिष्णु. २ निराधार; अधांतरीं असलेला; अंतराळीं असलेला. [सं. अ + धृ = धारण करणें]. -क्रिवि, १ अल्लाद; वरचेवर; अधांतरीं; हल- केंच; सैलपणें; २ अचळवी; अरळ; अचानक; ॰ठेवणें-लोंबविणें- अधांतरीं-कांहीं आधार नसतां मध्येंच लोंबत ठेवणें. ॰बसणें- लोंबणें = आधारावांचून असणें, राहणें, लोंबणें.
अध्रीत
वि. धारण न करता येणारे; अतिगहन : ‘हे अध्रीत शास्त्र की गा’ – लीचउ २०४; ६३४.
आहवनीय
वि. अग्निहोत्र्यानें धारण करावयाच्या (गार्हपत्य, दक्षिणाग्नि, आहवनीय या) तीन किंवा पांच अग्नींपैकीं पूर्व बाजूचा अग्नि; इष्टींत व नित्यहोमांत मुख्य याग या अग्नींत करावयाचा असतो. पंचाग्नी पहा. 'आहवनीयादि वन्ही । निक्षेपरूपी हवनीं ।' -ज्ञा १७.३६१. [सं.]
आहवनीय
वि. अग्निहोत्र्याने धारण करावयाच्या (गार्हपत्य, दक्षिणाग्नी, आहवनीय या) तीन किंवा पाच अग्नींपैकी पूर्व बाजूचा अग्नी; इष्टीत व नित्यहोमात मुख्य याग या अग्नीत करावयाचा असतो. : ‘आहवनीयादि वन्ही । निक्षेपरूपीं हवनी ।’ − ज्ञा १७·३६१. [सं.]
ऐमबाझी जमीन
स्त्री. धार्मिक इनाम म्हणून धारण केलेली जमीन. [अर.]
ऐमदार
पु. मुसलमानी राज्यांतील धार्मिंक इनाम धारण करणारा. [अर ऐम + दार]
आकारणे
उक्रि. १. आकारस येणे. २. बोलावणे, आवाहन करणे; आमंत्रण करणे. ३. जमीन इ. ची आकारणी करणे. ४. रंगरूपास आणणे; आकार धारण करणे; विवक्षित स्वरूपास आणणे; आकारास येणे : ‘आवयव आकारले सांग.’ − मुआदि ४·३६. ५. निदान करणे (रोग इ. चे) ६. अंदाज, हिशेब, मुसदा करणे. ७. घेण्याची रक्कम ठरवणे. [सं. आकार]
आकारणें
उक्रि. १ आकारास येणें २ (काव्य) बोलावणें; आव्हान करणें; आमंत्रण करणें. ३ आकारणी करणें (जमीन इ ॰ ची). ४ रंगारूपास आणणें; विवक्षित स्वरूपास आणणें; आकार धारण करणें; आकारास येणें. ‘अवयव आकारले सांग.’-मुआदि. ४.३६. ‘आकारलें रूप असेल जेव्हां’ –सारुह २.३९. ५ निदान करणें (रोग वगैरेंचें). ६ अंदाज, हिशेब, मसुदा करणें. ७ घ्याव- याची रक्कम ठरविणें.
आख्य
वि. नांवाचा; नामधेय, नांव धारण करणारा. उ॰ रामाख्य इ॰ [सं. आ + ख्या]
आख्य
वि. नावाचा; नाव धारण करणारा. उदा. रामाख्य [सं.]
अळवी
स्त्री. (कर्ना.) धान्यारूपी कर्ज. [का. आळवी = जमीन धारण करण्यासंबंधी करार)
आम
वि. सार्वजनिक. सामान्य; सरसकट. 'हा आमरस्ता नाहीं.' दीवाण-इ-आम; जलसा-इ-आम, इ॰ [अर. आम्म = सामान्य] ॰खास-क्रिवि. सर्रास. 'सदर्हूप्रमाणें धारण छ २५ रजबीं आमखास बाजारांत जाळी.' -रा ७.१४७. -पु. दरबार; लोकसभेचा दिवा- णखाना. 'तैसेच आमखासमध्यें कुलवजीर मुस्तेद करून उभे केले' -सभासद ३८. [अर. आम्म + उर्दू खास्स = सामान्य] ॰दार-पु. (अर्वाचीन) प्रांतिक कायदेमंडळाचा सभासद; एम्. एल्. सी.; वरिष्ठ कायदेमंडळाच्या सभासदाला खासदार म्हणतात.
आम-खास
[अ. आम्म्-उ-खास्स् सामान्य व असामान्य] सर्रास. “सदर्हू प्रमाणें धारण छ २५ रजबीं आम-खास. बाज़ारांत जाली” (राजवाडे ७।१४७).
आमखास
क्रिवि. सर्रास : ‘सदर्हूप्रमाणें धारण छ २५ रजबीं आमखास बाजांरात जाली.’ − मइसा ७·१४७.
अन्यमूर्ति
वि. दुसर्या आकाराचा; रूपांतरित; भिन्नरूपी; दुसरा देह धारण केलेला. [सं.]
अन्यमूर्ति, अन्यमूर्ती
वि. दुसऱ्या आकाराचा; रूपांतरित; भिन्नरूपी; दुसरा देह धारण केलेला. [सं.]
अंड
न. १. अंडकली; वृषण. २. कस्तुरीमृगाची कस्तुरी असलेली नाभी. ३. कवठ; प्राणी– पक्ष्यांचा प्रजोत्पादक गोलक. ४. रुईचे, सरकी काढलेल्या कापसाचे आख. (वा.) [सं.] (वा.) अंड काढणे, अंड बडवणे – खच्ची करणे (पशूस). अंड गाळणे – १. खचणे; लटपटणे; गळाठणे. भीतीने मागे घेणे, राहणे. अंड ब्रम्हांडास जाणे, अंड कपाळी जाणे – तिरपीट उडणे; पाचावर धारण बसणे; धीर खचणे; अतिशय घाबरणे. अंड म्हणजे उंबरफळ म्हणणे – अतिशय मथ्थड किंवा मूर्ख असणे; अडाणी दगड असणे. अंडाखाली खाजवणे – हांजी हांजी करणे; खुशामत करणे; लोणी लावणे. अंडावर मूत गळणे, अंडावर मूत पडणे – १. अतिशय अशक्त व असहाय होणे; निर्बल, कमकुवत असणे. (व.) २. (ल.) मेंग्या, भागुबाई, षंढ होणे, असणे. अंडास लोणी लावणे – हांजी हांजी करणे; मिनतवारी करणे; काही कार्य साधून घेण्यासाठी फार आर्जव करणे; खुशामत करणे. (दुसऱ्याच्या) अंडाने विंचू मारणे, दुसऱ्याच्या अंडाने विंचू मारणे – दुसऱ्याच्या नफा-नुकसानीची पर्वा न करता त्याजकडून परभारे आपले काम करून घेणे; पाहुण्याच्या हाताने साप मारविणे. अंडाचे निवणे करून बसणे, अंडावर अंड घालून बसणे, अंडावर बुक्क्या मारणे – आळशीपणाने काम न करता बसून राहणे; स्वस्थ बसणे. अगदी आळशी माणसाबद्दल वापरतात. (व.) अंडास येणे – वार्धक्यामुळे कमजोर व मलूल, कमताकद होणे; लुळाखुळा होणे.
अंडत्रास
पु. (शब्दशः अंडकुल्या वर उचलण्याजोगी अवस्था) अतिशय भीती; तिरपीट, त्रेधा; पाचावर धारण : ‘करी अंडत्रासें वरिकर दुजा, जो भय हरी ।’ – (मृत्तिका भक्षण – वामन).
अंतर्माळ
अंतरमाळ पहा. ॰उडप-क्रि. (गो.) पांचा- वर धारण बसणें; तोंडचें पाणी पळणें; धीर सुटणें. 'तें आय- कनाफुडें म्हजी अंतर्माळ उडली.'
अपरधर्म
पु. परमधर्म; ब्रह्मविद्या मार्ग सोडून इतर मार्ग : ‘अपरधर्माचे धारण यातें विकल्पु बोलिजे’ – लीचउ ३८६.
आराध्य ब्राम्हण
पु. गळ्यात जानवे व लिंगाकृती प्रतिमा घालणारे आणि भस्म व रुद्राक्ष धारण करणारे विशेषतः आंध्र प्रदेशातील शैव ब्राह्मण.
आराध्य-ब्राह्मण
पु. तैलंगणांतील शैव ब्राह्मण; यांच्या गळ्यांत जानवें असून लिंगाकृति प्रतिमा असते. हे भस्म व रुद्राक्ष धारण करतात. मद्रास इलाखा व द. हैद्राबादकडे यांची विशेष वस्ती आहे. आराध्यलिंग-न. उपास्य दैवत; पूजनीय देवता. 'स्वजन- वनचंदना । आराध्यलिंगा ।' -ज्ञा १०. ३ [सं.]
आराइणे
क्रि. १. धारण करणे; धरणे : ‘किंवा मनोभिमान धरिला । तोही आजिची सार्थ झाला । जो गोपीमनें आराइला । कृष्णप्राप्तीलागीं ।’ − रासपं ५·७११.
आराइणें
क्री. १ धारण करणें; धरणें. 'किंवा मनोभिमान धरिला । तोही आजिची सार्थ झाला । जो गोपीमनें आराइला । कृष्णप्राप्तीलागीं ।' -रास ५७११. [प्रा. आराइअ = गृहीत, प्राप्त]
अर्धनरेश
पु. अर्धा पुरुष व अर्धी स्त्री असा देह धारण करणारा शंकर. अर्धनारीनटेश्वर. [सं. ]
अर्धनरेश
स्त्री. अर्धा पुरुष व अर्धी स्त्री असा देह धारण करणारा शंकर; अर्धनारीनटेश्वर. [सं.]
अशरीर, अशरीरी
वि. शरीर नसलेला; देह धारण न करणारा; दैवी.
अष्टांग
पु. १ शरीराचीं आठ अंगें:-दोन हात, उर. कपाळ, दोन नेत्र, ग्रीवा, कटि; दुसरा पर्याय- दोन हात, उर, भाल, दोन पाय, दोन गुडघे; तिसरा-दोन हात, दोन पाय, दोन गुडघे, वाचा, मन; चौथा पर्याय-हात, पाय, गुडघे, छाती, मस्तक, दृष्टि, मन, वाणी. -एभा २०.२९१ २ (सामा.) सर्व शरीर; सबंध देह. अष्टांगीं पहा. 'आरोग्यता तुका पावला अष्टांगीं ।' -तुगा ३९५८. ३ अष्टविध समाधि पहा. 'अष्टांग अभ्यासिला योगु तेणें ।' -ज्ञा ९.४२२. ४. आठपट. ५ वैद्यकशास्त्राचे आठ भाग:-शल्य, शालाक्य, कायचिकित्सा, भूतविद्या, कौमारभृत्य, अगदतंत्र, रसा- यनतंत्र, वाजीकरणतंत्र. ६ स्मृतीचीं अष्टांगें:-कायदा, न्यायाधीश, पंच, लेखक, ज्योतिष, सोनें, अग्नि, पाणी. ७ पूजेचीं अष्टांगें:- पाणी, दूध, तूप, दहीं, दर्भ, तांदूळ, जव, सर्षप. ८ मैथुनाचीं अष्टांगें:- स्मरण, कीर्तन, क्रीडा, दर्शन, गुह्यभाषण, चिंतन, निश्चय, संयोग. ९ बुध्दीचीं अष्टांगें:-शुश्रूषा, श्रवण, ग्रहण, धारण, चिंतन, ऊहापोह, अर्थविज्ञान, तत्त्वज्ञान. ॰नमन-पात-प्रमाण- न. पु. हात, पाय, गुडघे, वक्षस्थल, मस्तक, दृष्टि, मन व वाणी हीं आठ अंगें जमीनीवर टेकून नमस्कार करणें. अतिशय आदरार्थीं नम्रतापूर्वक नमस्कार. -एभा २०.२९१. ॰योग्य- अष्टविध समाधि पहा. 'येक संगती अष्टांगयोग _ नाना चक्रें ।।' -दा ५.४.२४. ॰लवण- न. पादेलोण, ओवा, आमसुलें, आम्लवेतस हीं एकएक भाग, दाल- चिनी, वेददोडे व मिर्यें हीं अर्धा भाग व साखर सर्वच्या बरोबर घालून केलेलें चूर्ण. हें अग्निदीपक आहे. ॰साधन- अष्टविध समाधि पहा. 'योगी करिती अष्टांगसाधन । त्यांसीही नव्हे ऐसें दर्शन । ' -ह ८.१८२. [सं.]
अस्तापदार्थ
पु. जवळ असलेलें साहित्य; जें सामान उपलब्ध असेल तें. 'या प्रांतीं धारण अस्त्यापदार्थे बरीच आहे.' -पेद ३७.२१९. [म. असणें + पदार्थ]
अस्तापदार्थ
पु. जवळ असलेले साहित्य; जे सामान उपलब्ध असेल ते : ‘या प्रांतीं धारण अस्तापदार्थे बरीच आहे.’ – पेद ३७·२१९.
आतळणे
उक्रि. संसर्ग होणे; स्पर्श करणे; शिवणे; भेटणे :‘ते कर्मीं तरी वर्तती । परी कर्मफळा नातळती ।’ − ज्ञा २·२७८. पहा : आतणे २. पावणे; लाभणे :‘तुजहूनि शाल्व पवित्र भला । नाहीं अंबेसी आतळला ।’ − मुसभा ११·४९. ३. धारण करणे; प्राप्त होणे : ‘अगाध महोदधीचें जीवन । आतळे धवळ दुग्धवर्ण ।’ − मुआदि ४·११०. [सं. आप्]
आतळणें
उक्रि.१ (काव्य.) संसर्ग होणें; स्पर्श करणें; शिवणें; भेटणें. 'ते कर्मीं तरी वर्तती । परी कर्मफळा नातळती ।' -ज्ञा २.२७८. -एभा २.४८०. आतणें पहा. २ पावणें; लाभणें. 'तुजहूनि शाल्व पवित्र भला । नाहीं अंबेसी आतळला ।' -मुसभा ११.४९. ३ धारण करणें; पावणें; प्राप्त होणें. 'अगाध महोदधीचें जीवन । आतळे धवळ दुग्धवर्ण ।' -मुआदि ४.११०. [सं. आप् = मिळणें]
आतुडणें
अक्रि. १ (काव्य) सांपडणें; स्वाधीन होणें. 'कट- कटा क्षुद्र मंडळांतु आंतुडलों ।' -पंचतंत्र १.३९. २ (ल.) आकलन होणें; समजणें. 'माझें मजचि वो आतुडलें गुज ।' -निगा ७४. 'जे मना आकळितां कुवाडें । घाघुसितां बुद्धी नातुडे ।' -ज्ञा ५.६७. ३ लाभणें; प्राप्त होणें; हातीं येणें. 'न करितां भगवद्भक्ति । सज्ञा- नाहि नातुडे मुक्ती ।' -एभा ३.१८६. 'तो देवेंद्रपदा चढे । सुर- वधूसंभोग तया आतुडे ।' -निमा १.१७. ४ संबंध येणें; निकट येणें; स्पर्शणें. 'मां साक्षात् तुं शामसुंदर । आंतुडलासी कीं ।' -रास १.१०३२. [द्रा. आतु = धारण करणें; जवळ असणें.]
आवगणे
सक्रि. १. धारण करणे; अंगीकारणे; अंगी आणणे, घेणे; अवगणी घेणे : ‘कीं मानुषपणा आवगला । भणऔनि सत्यलोकां एओ बिहाला ।’ − दाव ३५२.
अवगणे
क्रि. धारण करणे, आच्छादन घेणे : ‘जैसे वीळसी अवगले स्वांग । विमंछाचें ।’ – ज्ञाप्र ७४३. [सं. अप+ग्रह]
क्रि. १. दिसणे; सारखे वाटणे; सादृश्य असणे; भासणे : ‘तो सूत्रधारु राऊ तें अवगला । तो कैसा सांगौं ।’ – शिव. ९९८. २. समजले जाणे; माहीत होणे; ठाऊक होणे; जाणणे. ३. धारण करणे; आचरणे; स्वीकारणे; अंगीकारणे. ४. सोंग घेणे; नटणे : ‘राजसां तामसां भावाची परी । तेहि नटिला तो ॥ ऐसें अवगोनि मुरारी । येतुसें गोकुळा माझारी ।’ – वह २८९·९०. [सं. अव+गम्]
आवगणें
सक्रि. धारण करणें; अंगीकारणें; अंगीं आणणें, घेणें; अवगणी घेणें. 'कीं मानुषपणा आवगला । भणऔनि सत्य- लोकां एओ बिहाला ।' -दाव ३५२. 'अमूर्तुही मूर्ति आवगे ।' -ज्ञा ६.१३१. शिवाय अवगणें पहा. [अव + अंग किंवा अव + गम्]
अवगणें
क्रि. १ दिसणें; सारखें वाटणें; सादृश्य असणें; भासणें. ‘तो सूत्रधारूं राऊ तैं अवगला । तो कैसा सांगौं ।’ –शिशु ९९८. ‘वारणावरी धावला मृगेंद्र । तैसा अवगला वायुपुत्र ।’ २ समजले जाणें; माहीत होणें; ठाऊक होणें; जाणणें. ‘वृत्तांत सर्व अवगला' ३ धारण करणें; आचरणें; स्वीकारणें; अंगीकारणें. 'कां अवगे तरुवरें । भूमिरसु । -ज्ञा १४.२८१. ४ सोंग घेणें, नटणें. 'राजसां तामसां भावाची परी । तेही नटिला तो ।। ऐसें अवगौनि मुरारी । येतुसें गोकुळा माझारी ।' -दाव २८९-९० [सं. अव + गम्]
आवगत
वि. धारण केलेले : ‘आवगतें आंग निवीळे’ − उगी ७६·६०१.
अवळा
पु. १ आवळा; एक तुरट फळ. २ समईच्या उभ्या दांड्याला असणारे वाटोळे वेढे. -ळ्याची मोट स्त्री. तात्कालिक फायद्याकरितां एकत्र जमलेल्या लोकांचा समुदाय, गट. टोळी. म्ह॰ १ अवळा पिकायचा नाहीं, समुद्र सुकायचा नाहीं. = घडण्यास अशक्य अशा गोष्टीबद्दल म्हणतात. २ अवळ्याची मोट बांधणें = (आवळे) एकत्र बांधतां, जुळविंता येत नाहींत, ते निसटून जातात, यावरून) अशक्य गोष्ट करूं पाहणें. ३ अवळा देऊन कोहळा (किंवा बेल) काढणें = थोडयाचा बराच फायदा मिळविणें; आपण थोडें देऊन दुसर्याकडून अधिक घेणें; थोडया मोबदल्यावर पुष्कळाची आशा करणें. (चे)अवळे उघडणें मोठा राग काढणें; अपशब्दांचा भडिमार करणें; ठोकणें; बुकलणें; फाडून खाणें (अवळकाठी कर- तांना अवळे उकलतात त्याप्रमाणें). अवळ्या एवढें पूज्य न. पूर्ण अभाव; शून्य. अवळे शिजणें (कर.) पाचावर धारण बसणें; घाबरणें. [सं. आमलक; प्रा. आमल-ग-य; हिं. आमला; आंवला; बं. आम्ल; गुज. आंवळां; फा. आम्लझ; अर. अमलज्; पंजा. आवला; लॅ. फिलेन्थस् अंब्लिका.]
अवलंबन
न. ग्रहण; स्वीकार; धारण : ‘चित्त अवलंबने वीण ।’ – विसिंपू २·९३. [सं.]
अवलंबन
न. ग्रहण; स्वीकार; धारण; आश्रयण. 'चित्त अव- लबंने वीण ।' -विपू २.९३.
अवलंबणे
उक्रि. १. आश्रय करणे; आधार धरून राहणे. २. पकडणे; लोंबकळणे; धरणे; चिकटणे; कवटाळणे. ३. धारण करणे; उचलणे; स्वीकारणे; पत्करणे; अंगीकारणे.
अवलंबणें
उक्री. १ आश्रय करणें; आधार धरून राहणें. २ पकडणें; लोंबकळणें; धरणें; चिकटणें; कवटाळणें. 'प्रवेशें मौन्य अवलंबून ।' ३ धारण करणें; उचलणें; स्वीकरणें; अंगीकारणें. त्वां बरी युक्ति अवलंबिली पाहि ।'
अवतारी
वि. विप्र. अवतारीक. १ पृथ्वीवर देहधारी, प्राणि- रूप धारण केलेली (देवता). २ अत्यंत पवित्र किंवा बुद्धिमान; सुप्रसिध्द; असामान्य; दैवी अंशाचा; लोकोत्तर (व्यक्ति). 'परि- स्थितीला न जुमानतां राष्ट्राला वळण देणें हे अवतारी माणसांचें कर्तव्य आहे.' अवतारी पुरुष असा रूढ प्रयोग. ३ धाडसी; अति- दुष्ट; उनाड; आडदांड; उग्र; घोरकर्मी (इसम, मुलगा). [अवतार]
अवतारी
वि. (अवतारीकही रूढ.) १. पृथ्वीवर मनुष्यरूप किंवा प्राणीरूप धारण केलेली (देवता). २. अत्यंत पवित्र किंवा बुद्धिमान; सुप्रसिद्ध; असामान्य; दैवी अंशाची; लोकोत्तर (व्यक्ती) अतिदृष्ट; उनाड; आडदांड; उग्र; घोरकर्मी (माणूस). [सं.]
अवतीर्ण
वि. १. मानवी स्वरूप धारण केलेली, अवतार घेतलेली (देवता). २. प्रकट झालेला; पुढे आलेला; जाहीर, ज्ञात झालेला. ३. खाली आलेला; उतरलेला; अधःपात झालेला. [सं.]
अवतीर्ण
वि. १ मानवी स्वरूप धारण केलेली; अवतार घेतलेली (देवता). २ प्रगट झालेला; पुढें आलेला; जाहीर; ज्ञात झालेला. ३ खालीं आलेला; उतरलेला; अधःपात झालेला. [सं.]
बाळंदा-धा
पु. १ मुलें वाढविण्यांत, त्यांची जोपासना करण्यांत भोगावा लागणारा हरएक प्रकारचा त्रास किंवा काढाव्या लगणार्या खस्ता. २ हरएक प्रकारचा त्रास देणारीं मुलें, गुरें, बायका इ॰ खटलें. ३ लहान मुलांचें लेणें; अंगावर घालण्याचे दागिने. [सं. बाल + धा = धारण करणें]
बारा टक्क्याचा दुष्काळ
पु. भयंकर दुष्काळ. प्रत्येक गोष्ट बारा टक्का खेरीज मिळत नाहींशी होणें. बारा टक्क्यास पायलीप्रमाणें धान्य महाग होणें. पांचावर धारण याप्रमाणें. 'बारा टक्क्याचा दुष्काळ पडला. माणसाचा अन्न खावयास मिळेना, माणसें मेली.' -सनदा १४४.
बहिः; बही
क्रिवि. बाहेर; बाहेरच्या बाजूस. (समासांत) बहिः प्रदेश; बहिर्भाग; बहिष्कार इ॰ [सं.] ॰करण-न. चक्षुरादि वरकरणी प्रीति, माया. [सं.] बहिरंग-न. बाह्य स्वरूप. -वि. परका; अपरिचित; दूरचा; आपल्या कुळाच्या, अनुयायांच्या विस्तारांत नसलेला. याच्या उलट अंतरंग. [सं.] ॰रंगपरीक्षण- न. विशेष खोलांत न जातां वरवर केलेलें आलोचन. [सं.] ॰रंगो- पासन-न. बाह्य उपासना. ही संपद्विधि, आरोपविधि, संवर्गविधि व अध्यासविधि अशी चार प्रकरची आहे; कर्मभक्ति. [सं.] ॰रवसा-पु. बाहेरची (भूत, पिशाचांची) बाधा. ॰बहिरवा (र्वा) स, बहीरवास-पु. १ बाहेर राहणें. २ (महानु.) बाहेरच्या उपयोगाचें नेसावयाचें वस्त्र; उत्तरीय वस्त्र 'चोखट बहिरवास वेढीति ।' -पूजावसर. [सं.] ॰रानीं-क्रिवि. उघडया मैदानांत; मोकळेपणें (भटकणें). ॰रायाम वात-पु. एक प्रकारचा धनुर्वात. यांत रोग्याची छाती पुढें येऊन पाठीकडे कमान होते. अंतरायाम वात पहा. [सं.] ॰रुपद्रव-बहिरवसा पहा. [सं.] ॰बहिर्कोप- पु. (प्र. बहिःकोप) वरपांगी धारण केलेला खोटा राग. [सं.] बहिर्गृह-न. पडवी; ओसरी; ओटी; ढेलच-ज; देवडी. [सं.] ॰र्दंत-पु. ओठाच्या बाहेर आलेला दांत. [सं.] ॰र्दाह-पु. शरीराची काहली; याच्या उलट अंतर्दाह. [सं.] ॰दिशेस- भूमीस जाणें-अक्रि. शौचास जाणें. ॰र्द्वार-न. व्यभिचार; रांडबाजी. बहिःप्रकृति-स्त्रीअव. राज्यकारभाराचें एक अंग. कोश, राष्ट्र; दुर्ग, बल आणि प्रजा इ॰ याशिवाय अंतःप्रकृति प्रकृति अर्थ ७ पहा. [सं.] ॰र्भाव-पु. बाह्य भाव, डौल. स्थिति, देखावा, हेतु [सं.] ॰र्भूत-वि. बाह्य; बाहेरील. 'मनाची गणना कोण्हीं इंद्रियांत करितात कोणी त्याहून बहिर्भूत असें गणतात.' [सं.] ॰र्भूमीची व्यथा-स्त्री. (ल.) हगवणीचा उपद्रव ॰र्मुख-वि. बाहेर तोंड असलेला ; बाह्य, प्रापंचिक गोष्टींकडे कल असलेला; विषयासक्त. याच्या उलट अंतर्मुख. [सं.] ॰लंब-वि. विशाल कोणाचा. ॰र्लापिका-कोडें; गूढ; ज्याच्या अर्थपूरणा- साठीं बाहेरचें पद इ॰ घ्यावें लागतें अशी कूट कविता. अंतर्लापि- केच्या उलट. [सं.] ॰र्वक्रपृष्ठ-न. गोलाचें पृष्ठ बाहेरच्या बाजूनें पाहिलें असतां दिसणारा आकार. -सूर्य ८. ॰वर्ती-वि. बाहेर राहणारा, असणारा. २ (ज्यो) श्रेष्ठ; सूर्याभोंवती होणार्या पृथ्वी. प्रदक्षिणेच्या मंडलाबाहेर असणारा (ग्रह). बुध, शुक्र या शिवाय बाकीच्या ग्रहांस बहिर्वर्तीग्रह म्हणतात. [सं. ] ॰र्विकार-पु. १ (ल.) उपदंश; गर्मी. २ बाह्य, शारीरिक आजार [सं.] ॰र्व्यसन-न बहिर्द्वार पहा. [सं.] ॰र्व्यसनी-वि. व्यभिचारी; रंडीबाज. [सं.] बहिस्त्रिक(करण)-न. नृत्याचा एक प्रकार. बहिःस्नेह-पु. दिखाऊ, खोटी प्रीति, ममता. [सं.]
बिरद
न. (विरू.) बिरीद; बिरुद पहा. बिरदाईत-वि. विशिष्ट विद्या, गुण इ॰ मध्यें वाकबगार (पंडित, पुराणीक, गवई, इ॰); कांहीं श्रेष्ठ गुणाबद्दल चिन्ह धारण करतो तो. [सं. विरुद] बिरदावळी-स्त्री. गुण, पराक्रम, श्रेष्ठता इ॰ दर्शक चिन्हांची माळ; बिरुदावली पहा.
बल्लव
पु. १ गोपाळ; गवळी. 'वनीं खेळती बाळ ते बल्लवांचे ।' -वामन, वनसुधा १.१६. २ आचारी; विराटाच्या घरीं भीमानें आचारीपणा करीत असतांना धारण केलेलें नांव. [सं.]
बंदि(दी)स्त-स्ती
स्त्री. १ सामान्यतः इमारत; इमला. २ रचना; बांधणी; घडण (इमारतीची इ॰). ३ व्यवस्थित, निय- मित रचना. ४ बंदोबस्त. 'सदरहू किल्ल्यांची व कोटाची बंदीस्ती करून.' -मसाप २.१४०.५ फाइलीच्या, कागदाच्या पुड- क्यांच्या मुखपृष्ठावर अंक, खूण घालून त्यांचें अंकन, हिशेब करणें. -न. ६ ठराविक वेतन, पगार. [सं. बंध; फ. बंदश्] बंदि(दी)स्त-स्थ-वि. १ कुडलेला; गवंडीकामानें बंद केलेला; बांधलेला. 'ह्या घरांत चार खण बंदिस्त, पांच खण मोकळे.' २ तळें, बंधारा). ३ बांधलेलें; भोंवतीं भितीं घातललें; तटबंदी, गवंडी कामानें सुरक्षित केलेलें (घर, आवार, बाग, वाडगें). ४ ठराविक; नियमित; निश्चित. ५ बंद; निगडित; निरुद्ध. ६ तुरुंगांत टाकलेला; कैद केलेला. ७ स्त्रीसंभोगरहित; नैष्ठिक ब्रह्मचर्य धारण करणारा. ८ सुव्यवस्थित-रचित-नियमित-शासित (राज्य, सैन्य संस्था). ९ चोख; चांगल्या रीतीनें ठेवलेला, चालविलेला, आटोपिलेला (हिशेब, खटलें, काम). १० सुशिक्षित; आकलित; शासित. बंदिस्त लेख-पु. पुस्तकांतील लेख याच्या उलट मोकळालेख. बंदिस्ती-वि. १ मजबूत; भरींव; भरभक्कम चिरेबंदी (इमारत). २ नियमित; व्यवस्थित; बरोबर (वर्तन, क्रिया, काम).
बंधारण
बंधारण bandhāraṇa n (बंध & धारण) A fixed precept for guidance; a law, rule, statute, canon.
न. १ कायदा; शासन; कानू; विधि. २ नियम; मर्यादा; ठराव. '... दुमाले गांव किती व नक्त खर्च किती या विषी बंधारण करून...' -इनाम ५०. ३ (गु.) धारा. ४ (गु.) गोठवण. ५ (गु.) व्यसन. ६ (गु.) पाटा. [सं. बंध + धारण]
बतावणी
स्त्री. १ अभिनय करणें; सोंग घेणें, आणणें; वेष धारण करणें. २ हावभाव; अभिनय; भाषण. ३ सोंग; डोंग; बहाणा; थाप. ४ बजावून सांगितलेली गोष्ट ५ कीर्दीवरून केलेली जमाखर्चाची कच्ची खतावणी. [हिं.] बतावण्या-वि. नट; मुख्यत्वें रंगदार अभिनय करून हस्योत्पादक सोंग आणणारा. [बताविणें] बतावि(व)णें-सक्रि. १ अभिनय व हावभाव करून सोंग आणणें. २ तिखटमीठ लावून सांगणें; अतिशयोक्तीनें किंवा सजवून वर्णन करणें (एखाद्या देवाची, वीराची दंतकथा). (क्रि॰ सांगणें; दाखविणें; बतावून सांगणें-दाखविणें). ३ दाखविणें. ४ धमकी देणें. [हिं. बताना]
भाला
पु. लांब काठीच्या टोकाला पोलादी पातें असलेलें एक शस्त्र. 'साहेल काय वाटे जातो मर्मीं शिरोनि शर भाला ।' -मोभीष्म ८.२६. २ भाल्याच्या लांबीइतकें अंतर, टप्पा. ३ (कों.) ज्यास कोळंबे बसविलेलें असतें असा लाटेला लाविलेला तुकडा. [सं. भल्ल] म्ह॰ खांद्यावर भाला आणि जेवावयास घाला. भाल- काठी-स्त्री. १ भाल्याच्या दांड्याच्या कामीं उपयुक्त अशी काठी २ निवळ दांडा (ज्याचें पातें मोडलें किंवा हरवलें आहे असा). [भाला + काठी] भालाईतपु. भालेकरी पहा. भालदार-पु. राजा सरदार इ॰ बड्या मनुष्याजवळचा छडीदार सेवक; वेत्र- धारी. यांचे काम ललकार्या देणें, बोलावणें करणें, ताकीद करणें इ॰ असतें. 'भांड भाट भालदार भवय्ये ।' -ऐपो २३६. भाल- दारी-स्त्री. भालदाराचें काम; भालदारपणा. भालेकरी-पु. भाला धारण करणारा शिपाई. [भाला + करी] भालेराई-स्त्री. १ भालेरावाची सत्ता, अंमल खाद्यावर भाला टाकून स्वछंदतेनें लूट व जुलूम करणार्या लोकांस भालेराव म्हणत. २ (ल.) कोणताहि साहसी जुलूम ;दरोडेखोरी; पुंडाई. ३ शिरजोरपणाचा व अंदाधुं- दीचा कारभार; बेबंदशाही. 'त्यास पेशजीं भालेराई जाहली.' -समोरा २.२४७.
भरीव
वि. १ भरलेला; लादलेला. २ भरदार; घन; ऐवज- दार; गाभा, रस, दळ इ॰ असलेला; घट्ट व लठ्ठ; पोकळच्या उलट. 'जों जों दिसे उर भरींव तयाशि तों तों ।' -र १५. [सं. भृ = पोसणें, धारण करणें, भरणें] ॰चिवा-पु. चिवा नामक जातीचा नर बांबू; कागदी चिव्याच्या उलट. पोकळ नसलेला बांबू.
भ्रुकुटी
स्त्री. १ भुंवईचें आकुंचन. २ (सामा.) भुंवई. ३ (नृत्य) भुंवईचा एखादा भाग न उचलतां सबंध भुंवई एकदम उचलणें. [सं.] ॰चढविणें-उग्र मुद्रा धारण करणें. ॰भंग-पु. रागानें भिंवया चढविणें; कपाळास आठ्या घालणें. [सं.]
भवानी
स्त्री. १ सौम्य रूप धारण केलेली पार्वती देवी 'देउनि विजय-वर असा झाली अन्तर्हिता भवानी ती ।' -मोभीष्म १.५०. २ बोहणी पहा. [सं.] म्ह॰ सवा रुपयाची भवानी व सोळा रुपयांचा गोंधळ. ॰कवडी-स्त्री. सामान्य कवडी. दही- कवडी, सगुणी कवडी व भवानी कवडी अशा कवडीच्या तीन जाती आहेत.
भय
न. १ भीति; धास्ती; दहशत. २ भीतीचें निमित्त; धोका; जोखीम; संकट. 'या वाटेंत कांहीं भय नाहीं खुशाल जावें.' ३ भंग; नाश; मरण. 'या घरास सागवानी वांसे घाला म्हणजे १०० वर्षें भय नाहीं.' [सं. भी = भिणें; भय] म्ह॰ एक भय दोहा जागीं (दोहों पक्षांत परस्पर भीति असणें). ॰घेणें-सक्रि. घाबरणें. ॰दाखविणें-सक्रि. भीतीचें निमित्त दाखवून भिण्यास लावणें. ॰कंप-पु. भीतीनें कांपणें. [सं.] ॰(यं)कर-वि. भय- जनक; घोर; दारुण; जबरदस्त. [सं.] ॰कातर-वि. भ्यालेला. [सं. भय + कातर] ॰चकित-भीत-भीर-भीरु-वि. भ्यालेला पांचावर धारण बसलेला. [सं.] ॰पीडित-वि. भयानें पीडिलेला. [सं.] ॰प्रदर्शन-न. १ भीतिदायक वस्तु, पदार्थ पुढें दाख- विण्याची ठेवण्याची, क्रिया. २ भिवविण्यासाठीं ठेवलेली कोणतीहि वस्तु; बुजगावणें (लाकडी शिपाई, फटाकडा इ॰). ३ स्वतःस भीति वाटली आहे असें दाखविणें; धास्ती घेणें. [सं.] ॰प्रीति- स्त्री. भयानें उत्पन्न झालेली प्रीति. [सं.] ॰भक्ति, भयेंभक्ति- स्त्री. भयानें उत्पन्न झालेली भक्ति; भावभक्तीहून भिन्न. [सं.] ॰विव्हल-वि. भयानें, धास्तीनें अस्वस्थ, क्षुब्ध झालेला. [सं.] ॰शील, भयाळू-वि. भीरु; शंकेखोर; भ्याड; भित्रट; भित्रा. [सं] ॰सान-वि. (व) भयंकर, भीत्प्रिद. भयाकुल, भयाक्रांत, भयातुर, भयान्वित, भयार्त-वि. भयानें व्याप्त, पीडित असा. [सं.] भयांकृत-वि. (गो.) भयंकर; भयानक. ॰भयाण- न-न. भयपूर्ण उदासपणा; भीति उत्पन्न करणारा ओसाडपणा (ओस पडलेल्या घराचा, भयंकर अरण्याचा). -वि. ओसाड; उदास; उजाडीमुळें भयोत्पादक; घोर. भयानक, भयावह, भयासुर, भ्यासूर-पु. नवरसांपैकीं एक. -वि. भयंकर; घोर; दारुण; भयोत्पादक; भेसूर; भीतिदायक. 'देखे भयानक झांकियेलें डोळे ।' -तुगा २०. [सं.] भयानक(दृष्टि)-स्त्री. (नुत्य.) एखादी भयंकर गोष्ट किंवा एकादें भयंकर श्वापद दृष्टीस पडलें असतां पापण्या निश्चल करून बुबुळें वरच्या बाजूस घालविणें व बाहुल्या चंचल करणें. हिचा उपयोग भयानक रसांत करितात. [सं.] भयाभी(भि)त-वि. भयभीत. भयाभंगास जाणें- अक्रि. तुकडे तुकडे होणें; रानोमाळ होणें; नष्ट, भग्न होणें (राज्य,' सैन्य, संपत्ति). [भय भंग] भयांभयां-क्रिवि. नीच वृत्तीनें; दीनपणानें. (क्रि॰ करणें; करीत जाणें; फिरणें). [भय] ॰करणें- करीत जाणें-करीत फिरणें-अक्रि. अत्यंत नीच वृत्तीनें व विपत्तीनें दारोदार भिक्षा मागत हिंडणें. 'विद्या दरिद्रानें पीडित होऊन लोकांच्या नरकांत बुडून भयांभयां करीत अन्नाचे मागें हिंड- तात.' -बाळ २.१२९. ॰होणें-अक्रि. अत्यंत हीन, दीन होणें, विपन्न स्थितींत असणें.
भ्याला
धास्तावला, टरकला, गर्भगळित झाला, कांपरें भरलें, त-त्त प-प्प करूं लागला, पोटांत वायगोळा उठला, धडकी भरली, तोंडचें पाणी पळाले, गाळण उडाली, पाहून जागच्या जागीं थिजला, सारें ब्रह्मांड आठवलें, विजार पिवळी झाली -भिजली , वचकला, दबकला, नरमला, वरमला, शेपूट घातलें, थरकांप झाला, पाय लटलटूं लागले, जीव टांगणीस लागला, कोठे लपू झालें, नांगीच टाकली, चेहरा पडला, नजर वर करण्याची टाप राहिली नाहीं, चळचळां कापूं लागला, पांचावर धारण बसली, हातांपायांतून शक्ति गेली.
चढ
पु. १ चढण; चढाव; उंच भाग; पर्वतादिकांचा उंच होत गेलेला प्रेदेश. 'आतां सडकेला येथून चढ लागला.' २ बढती; वाढ; उन्नति; संवर्धन; वृद्धि (संपत्ति, स्थिति, हुद्दा, दर्जा, मोल. माप, किंमत, धारण यांची). 'पुण्याचे मापानें मोजलेला पदार्थ कोंकणी मापानें मोजला असतां कांहीं चढ येतो.' ३ वाढावा; बरोबरी होऊन जास्त येणें. ४ वाढवलेली पट्टी, कर; चारावाढी. (क्रि॰ बसवणें; देणें) ५ हल्ला करणें; एखाद्यावर तुटून पडणें; एखाद्यावर चढाव, चाल करणें; हल्ला; मोहीम; चढाई. 'रघोजीच्या सैन्यावर चढ केल्यामुळें त्याच्या सैन्याची धांदल उडाली.' -विवी ८.७.१३३. 'तो प्रथम चढ करून माझे अंगा- वर आला.' ६ वरचष्मा; वर ताण करणें; मागें पाडणें; जिंकणें अतिक्रम; वरचढ; मागें टाकणें 'याणें त्याचे मामलतीवर चढ केला.' ७ पूर. 'उदकाचेनि अति चढें । आकाश न बुडे सर्वथा ।' -एभा २८.३४३. -वि. श्रेष्ठ; श्रेष्ठ दर्जाचा; वरचढ; जिंकणारा. 'एकाहुनि चढ एक जगामधिं थोरपणाला मिरवुं नको ।' 'वोवी चढी दावि वोंवी । कथा वदवी श्रीराम ।।' -भारा किष्किंधा १.५. [चढणें; हिं. पं, गु. चड; सिं. चड्हु] (वाप्र.) ॰देणें- १ भर घालणें; उत्तेजन देणें. 'भाऊसाहेबानें चढ दिला ।' -ऐपो १९०. २ लिलावांत अगोदर किंमत सांगणें; किंमत चढविणें. ॰बसणें-वाढणें; जास्ती होणें. चढावर चढ देणें-जास्तींत जास्त चढणें, वाढणें; वरवर जाणें. चढास-चढीं देणें-उत्ते- जन देणें; काम करण्यास भर देणें. चढीस भरणें, चढीस- चढीं लागणें-१ मोठ्या जोरानें, निश्चयानें, कितीहि संकटें आलीं तरी पिच्छा पुरविणें; पाठीमागें लागणें. २ लिलावांत जास्त किंमत बोलणें. ३ प्रतिस्पर्धेनें, चढा ओडीनें, ईर्षेनें, इरेस पेटून एकादी गोष्ट करणें; इरेस पेटणें. 'उगीच चढीं लागून पांच रुपयांचें कापड पांचशेंस घेऊं नका.' सामाशब्द-॰उतर-उतार-स्त्रीपु. १ चढणें व उतरणें; चढण उतरण; वर जाणें व खालीं येणें. 'विहि रींतलें पाणी आणावयास मला चढउतार करवत नाहीं.' २ जास्तकमी होणें; भरणें व कमी होणें; कमीजास्त प्रमाण होणें. प्रमाण सारखें नसणें (ताप, दुखणें इ॰ चें). ३ उत्कर्षापकर्ष; क्षयवृद्धि. ४ आशा निराशा; एक वेळ दुःखाचा तर एक वेळ समाधा- नाचा विचार. 'म्हणोन मनांत चढउतार करूं लागले. परंतु बाहेर व्यंगोक्ति शब्द बोलेनात.' -भाव १०३. चढण, चढणी- स्त्री. १ चढ; चढाव; चढती; उंच होत गेलेली जागा. 'चढणीस घोडा उतरणीस, रेवणीस रेडा' २ उंचापणा; उभटपणा. चढण उतरण-चढउतर पहा. चढणारी कमान-चढती कमान पहा. 'पेशवाईच्या अस्ताला त्यावेळच्या मुत्सद्द्यांच्या महत्वा कांक्षेची चढणारी कमान नडली.' -अस्तंभा ७.
चढ
पु. १. बढती; वाढ; उन्नती; वृद्धी; संवर्धन (संपत्ती, स्थिती, हुद्दा, दर्जा, मोल, माप, किंमत, धारण यांची). २. वाढावा; बरोबरी होऊन जास्त येणे. (वा.) चढ करणे – वरचढ करणे, लिलावाचे वेळी चढता सवाल करणे; ‘यंदा सोळा सहस्र चढ करून त्याणे मामला केला’ - शेंदुर्णी कागदपत्र १·५. चढ देणे – १. भर घालणे; उत्तेजन देणे : ‘भाऊसाहेबाने चढ दिला ।’ - ऐपो १९. २. लिलावात किंमत चढविणे. चढ बसणे – वाढणे; जास्ती होणे. चढावर चढ देणे – जास्तीत जास्त चढणे, वाढणे, वरवर जाणे.
चढणे
अक्रि. १. वर जाणे; आरूढणे; वर बसणे (डोंगर, टेकडी, घोडा, झाड इत्यादीच्या). २. उंच जाणे, होणे; वाढणे; खूप उंच असणे (इमारत, तारा). ३. वृद्धी पावणे; वाढणे; जास्त होणे; अधिक होणे; फुगणे; मोठा आकार होणे; विस्तृत होणे (समुद्र, संपत्ती, ज्वर). ४. महाग होणे (किंमत, धारण). ५. गर्वाने ताठणे, फुगणे; उन्मत्त होणे. ६. सूर मोठा होणे, वाढणे, उंच होणे (गाताना आवाज, वाद्य इ.). ७. फिरणे; वर जाणे; उलटणे (अम्मल चढला असता, अथवा प्राणोत्क्रमण समयी डोळे). [सं. उच्चलन]
चढणें
अक्रि. १ वर जाणें; ऊर्ध्व गमन करणें. आरूढणें; वर बसणें (डोंगर, टेंकडी, घोडा, झाड इ॰ च्या). २ उंच जाणें, होणें; वाढणें; खूप उंच असणें (इमारत, तारा). ३ वृद्धि पावणें; वाढणें; जास्त होणें; अधिक होणें; फुगणें; मोठा आकार होणें; विस्तृत होणें. (समुद्र, संपत्ति, ज्वर). 'त्या विहिरीस पाणी चढलें' 'कालच्या उपासानें आज पित्त चढलें.' ४ महाग होणें (किंमत, धारण). 'सोन्याचा भाव चढला आहे.' ५ कडक होणें; जलाल होणें; तीव्र होणें (भांग). 'भांग जसजशी छिनावी तसतशी चढती.' ६ अम्मल चढणें; मद चढणें; निशा येणें; उन्माद चढून गिरकी येणें; कैफ येणें (विष, मादक औषधि द्रव्य, विखार, उवाखा इ॰ नीं). 'मला घोटा कधीं चढत नाहीं.' ७ शिरणें; जाणें; शरीर त्यांत जाणें (चोळी, आंगरखा इ॰ अंगांत). (बंदुकींत बाग नटें, संगीन). 'आंगरखा चांगला चढतो पण जोडा चढत नाहीं.' आंत जाणें (खुंटी, खिळा, खीळ). 'ही खुंटी छिद्रांत चडत नाहीं अंमळ तास.' ८ सांचणें; तुंबणें; थकणें; चढत राहणें; हळू- हळू वाढत जाणें (ऋण, शंका, प्रश्न, इ॰). 'माझे वीस दिवस चढले त्यांचा पैसा द्या.' 'माझे पाचशें रुपये त्याजवर चढले.' ९ गर्वानें ताठणें, फुगणें; उन्मत्त होणें. 'एकदां कोठें लढाईंत यश आलें तर ते गृहस्थ अलीकडे चढले आहेत.' १० आच्छादणें; आव रण होणें; वर पसरणें; आक्रमणें (धूळ, काजळ, जंग, वुरसा, शेवाळ). ११ (देवादिकांना) वाहिलें जाणें; अर्पण केलें जाणें. 'झेंडूची फुलें देवास चढत नाहींत.' १२ सूर मोठा होणें, वाढणें, उंच होणें (गाताना आवाज, वाद्य इ॰). १३ फिरणें; वर जाणें; उलटणें (अम्मल चढला असतां, अथवा प्राणोत्क्रमण समयीं डोळे). १४ बसणें; लागणें; लावला जाणें (गिलावा, रंग, लेप, तेल, हात). 'ह्या भिंतीवर शेंदरी रंग चडला म्हणजे चांगली दिसेल.' १५ खुलणें; चकचकीत दिसणें; पूर्णत्वास पोंचणें (रंग किंवा रंगविलेला पदार्थ, वस्तु). 'हिंगुळामध्यें निंबूचा रस पिळला म्हणजे रंग चांगला चढतो.' १६ ताणला जाणें (पखवाज, मृदंग). १७ (धनुष्यास) गुण लावणें; सज्ज करणें. १८ प्राप्त होणें; येणें; लाभणें. 'जेणें करितां महिमा चडे । विरक्तांसी ।' -दा २.९.२. [सं. उच्चलन-प्रा. उच्चडन; चड्ढन; सिं. चड्हणु] म्ह॰ चढेल तो पडेल पोहेल तो बुडेल. चढे, चढ्या, चढत्या घोड्यानिशीं-क्रिवि. (घोड्यावर बसला असतांनाच, एक वेळहि खालीं न उतरतां) एका तडाख्यानें; एका दौडींत; न थांबतां; मोठ्या आवेशानें. 'शत्रु जो आला तो लागलाच चढे घोड्यानिशीं किल्ल्यावर गेला.' 'नादिरशहा याची फौज चढत्या घोड्यानिशीं दिल्लीस पोहोंचली.' -भाव २३.
चक्रधर
पु. १. सुदर्शन धारण करणारा; विष्णू. २. महानुभाव पंथाचे संस्थापक. ३. (ल.) मोटारीचे चाक ताब्यात असलेला; मोटार, बस इत्यादी (ज्याला वळवण्याकरिता मोठे चाक असते अशा) वाहनाचा चालक, ड्रायव्हर : ‘मी चमकून (बसच्या) चक्रधराकडे पाहिले.’ - क्रेबु २३. [सं.] (वा.) चक्रधराचा हाकारा येणे –कैवल्यपदप्राप्ती होणे; देहावसान होणे.
चक्री
पु. कुंभार. 'दे येक म्हणतां कोरी घागरी । हास्य करोनि चक्री अंतरीं । पांच रुपया द्याल जरी । घडा देईन सुंदर वदे ।' -दावि २३५. -वि. चक्र धारण करणारा (विष्णु, कुंभार). 'दिनमणि तव नोहे चंद्रसा रंग चक्री' -मुरामाअरण्य १०१.
चल
(ग.) एखाद्या संचातील कोणत्याही घटकाची किंमत धारण करणारी राशी. [सं.] चलक
चणचणणे
अक्रि. १. चटचटून तापणे : ‘ऊन चणचणत होतं...’ - टारफुला २२१. २. फार वाढणे; चढणे (भाव, धारण). (को.) [सं. चण्]
चणचणणें
अक्रि. १ (कों.) फार वाढणें; चढणें (भाव, दर, किंमत, धारण). २ चुणचुणणें; तिडीक मारणें (जखम, क्षत); वेदनांमुळें लागू होणें; परिणाम होणें (क्षतावर घातलेलें मीठ); व्यथा प्राप्त होणें. ३ कडकडून भूक लागणें; क्षुधा अत्यंत प्रदीप्त होणें. ४ छडी, चाबूक इ॰ च्या फटकार्यानें, तडाख्यानें चणचण असा आवाज होणें; छमछम; फाडफाड लागणें. [चणचण]
चोदबावळा
वि. लबाडीने, लुच्चेगिरीने, बावळी मुद्रा धारण करणारा; वेडाचे सोंग पांघरणारा; ढोंगी.
चोदबावळा
वि. लबाडीनें, लुच्चेगिरीनें, बावळी मुद्रा धारण करणारा; फसवेगिरीनें वेड पांघरणारा; ढोंगी. [चोदणें + बावळा]
चोपूनचापून
क्रिवि. १ (जमीन, भुई इ॰) चांगल्या रीतीनें ठोकून; सपाट, साफ, गुळगुळीत करून. २ (धोतर, उपरणें, फेटा, पटका इ॰) चांगल्या रीतीनें दाबून; चेपून; योग्य रीतीनें धारण करून. 'चोपूनचापून धोतर पागोटें बांधून चालले राजश्री' [चोपून द्वि.]
चोपूनचापून
क्रिवि. १. (जमीन, भुई इ.) चांगल्या रीतीने ठोकून; सपाट, साफ, गुळगुळीत करून. २. (धोतर, उपरणे, फेटा, पटका इ.) चांगल्या रीतीने दाबून; चेपून; योग्य रीतीने वस्त्र इ. धारण करून. [चोपून द्वि.]
चपराशी, चपरासी
पु. चपरास (बिल्ला) धारण करणारा; जासूद; नोकर; शिपार्इ; दूत; हरकारा; पट्टेवाला : ‘मंत्र्यापासून चपराशापर्यंत सर्वांना जें मान्य आहे ते उघड बोलण्याची जरुरी तरी काय?’ - आआआ २७. [क. चपरासी][हिं.]
चपराशी-सी
पु. चपरास (बिल्ला) धारण करणारा; जासूद; नोकर; शिपाई; दूत; हरकारा; पट्टेवाला; सरकारी शिपाई. [हिं.]
चर्तुर्थाश्रम
पु. ब्रह्मचर्य, गार्हस्थ्य, वानप्रस्थ व संन्यास या चार आश्रमांपैकीं शेवटला, म्हणजे संन्यास. [सं.] 'मी आतां संसार सोडून चतुर्थाश्रम धारण करणार.' -विवि १० १०.२२५.
चतुर्थाश्रम
पु. ब्रह्मचर्य, गार्हस्थ्य, वानप्रस्थ व संन्यास या चार आश्रमांपैकी शेवटला, म्हणजे संन्यास : ‘मी आता संसार सोडून चतुर्थाश्रम धारण करणार.’ - विज्ञावि १०·१०·२२५. [सं.]
चूडामणि, चूडामणी
पु. शिरोरत्न; शिरोभूषण; मस्तकी धारण केलेला मणी, रत्न: ‘हस्तें ओढिल वस्त्र चुंबिल तदा चूडामणी मागणें ।’ − विरमं ६८. २. (ल.) अत्युत्तम कर्तबगार माणूस, वस्तू; अतिशय निपुण मनुष्य. उदा. संगीतचूडामणी, चिकित्सकचूडामणी इ. [सं.]
चूडारत्न
न. तुऱ्यातील रत्न; मस्तकी धारण केलेले रत्न.
छद्मनाम
न. (सास.) लेखनासाठी पौराणिक किंवा ऐतिहासिक व्यक्तीचे धारण केलेले नाव. उदा. रामशास्त्री, द्रोणाचार्य. [सं.]
छोलदारी
पु. तिकोनी तंबू किंवा प.ल. [सं. छोरण + धारण हिं. छोरना + धारना. हिं.]
छत्र
न. १ राजचिन्हाची छत्री (विशेषतः पांढर्या रंगाची). २ देवाच्या मूर्ती-प्रभावळीस आंकडा बसवून त्याच्या टोंकावर बसविलेली व देवांच्या डोकीवर येण्यासारखी चांदीची, सोन्याची छत्री. ३ (ल.) आश्रय; संरक्षण. 'रडे गोपिकाबाई एकटी छत्र दिसेना नयनीं । -ऐपो १३५. ४ छत्री (पावसाळ्यांत वापर- ण्याची). ५ (काशी) अन्नसत्र. [सं.] ॰धरणें-स्वारींत अस- तांना राजावर छत्री धरणें; गाढवावरून धिंड काढताना केरसुणीचें छत्र धरणें. 'कैकेयीचें शिरोवपन करून छत्र धरोत कोणीही ।' -रावि १०.१९७. 'मेघांनीं छत्र धरिलें = आकाश मेघाच्छादित झालें.' [सं.] ॰चाभर-राजवैभवाचें चिन्ह; छत्री आणि चौरीः राजचिन्हदर्शक वस्तु. [सं. छत्र + चामर] ॰चाभर-सिंहा- सन-न. राजचिन्हें; राज्यधिकारदर्शक वस्तू. ॰पति-पु. १ सार्वभौम राजा; श्री शिवाजी महाराजांनीं ही पदवी धारण केली होती ती त्यांच्या वंशांत शेवटपर्यंत होती. २ श्री शिवाजी महाराजांनीं पाडलेलें तांब्याचें नाणें. याच्या एका बाजूस दोन आडव्या रेघा असतात व दुसर्या बाजूस 'श्री शिवराज छत्रपति' अशीं अक्षरें असतात. याला दुंदडी पैसा असेंहि नांव होतें, सरा- सरी वीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रांत हें नाणें प्रचारांत होतें. ३ (काशी) अन्नसत्रांत जेवणारा. ॰म्ह-छत्रपति कीं पत्रपति = राजा किंवा भिकारी. ॰बंध-पु. छत्राकार कोष्टकांकित चिन्ह करून प्रति- कोष्टकांत अक्षरें लिहितात त्यांत छ्त्रांतःपति अक्षरें दंडस्थानी जातात, तीं द्विवार वाचलीं म्हणजे श्लोक होतो तो. ॰भंग-पु. वडील माणसाचा मृत्युः मृताच्या आप्तेष्टांकडे समाचारास गेलें असतां (मृत मनुष्य वडील असेल तर) छत्र नाहींसें झालें असें म्हणतात पूर्वकालीं विधवा स्त्रीच्या समाचारास गेल्यावर 'छत्र मोडलें' असें म्हणण्याचा परिपाठ असावा असें कोशार्थावरून दिसतें. 'वैधव्ये नृपनाशे च छत्रभंगः प्रकीर्तितः ।' -त्रिकांडशेष. -मसाप २.३८.
दाली
स्त्री. १. ज्यात तलवार अडकवतात तो कमरपट्टा; पडदळे. २. (ल.) दुसऱ्याला आव्हान देण्यासाठी धारण करण्याचे चिन्ह; शिपायाचे एक चिन्ह. (क्रि. बांधणे, धरणे) : ‘धन्यावर दाली धरून क्रिया सोडून आला चालून...’ - ऐपो ३३१. [सं. दाल] (वा.) दाली बांधणे - १. (एखाद्याला) जिंकण्यासाठी अभिमानाने सज्ज होणे : ‘बांधोनिया पुण्यावर कंनर चढती दाली ।’ - ऐपो २३१. २. जहागीर देणे. ३. वरिष्ठाने कनिष्ठाच्या कमरेला पडदळासह तलवार बांधणे. हा एक प्रकारचा सन्मान मानला जात असे. दाली सोडणे - शस्त्र टाकून शरणागती पत्करणे.
दालीबंद
वि. १. दालीला तलवार लटकावून सज्ज झालेला. २. दाली हे आव्हानसूचक चिन्ह धारण केलेला. [सं. दाल + फा. बंद]
दार
(सं) न० दरवाजा, कवाड. २ एक प्रत्यय, धारण करणारा या अर्थी. ३ भार्या.
(एखादी वस्तु) 'धारण करणारा, बाळगणारा, नेणारा इ॰ अर्थाचा फारशी भाषेंतील प्रत्यय. सामान्यतः हिंदी भाषेंतून मराठींत आलेल्या शब्दास हा प्रत्यय जोडून सामासिक शब्द बनतात. जसें:-जमातदार, फौजदार, चोबदार, भालदार, चौकी- दार, रंगदार, गोलदार, अणीदार, जोरदार इ॰ [फा. दार्]
दार
(एखादी वस्तू) धारण करणारा, बाळगणारा, नेणारा इ. अर्थाचा फारशी भाषेतील प्रत्यय. उदा. जमादार, फौजदार इ. [फा.] दारकस
दारद
क्रि. धारण करतो. –आफ. [अर.]
दाशाह बाशद
क्रि. प्राप्त झाला असेल; धारण केलेलें असावें. –आफ [फा.]
दाशाहशुदह बूद
धारण केलेला होता. –मुधो.
दाशान्
क्रि. धारण करणें. –मुधो. [अर.]
दाटी, दाटि
स्त्री. १. गर्दी; खेचाखेच; चेपाचेप; भीड. २. समुदाय; थवा. ३. (साप इ. ची) लहरी; विळखा; पकड : ‘जरि भवभुजंगाची दाटि । - ऋ ७६. ४. (ल.) दाट मैत्री; घरोब्याचा, सलगीचा संबंध, व्यवहार; घसट. ५. (अंधार इ. चा) घनदाटपणा; काळेकुट्टपणा; घनता; निबिडता. ६. (द्रवपदार्थांचा) दाटपणा; (कागद, कापड, फळी इ. ची) जाडी; जाडपणा. ७. (अंगरखा इ. चा) तंगपणा, आवळपणा; (तंग वस्त्र धारण करणाऱ्याची होणारी) चेंबलेली, अवघडलेली स्थिती. ८. (वदंता, बातमी, मत इ. ची) लोकांतील प्रसिद्धी. ९. (एखादा विषय, भाषण, लेख इ. तील) मुख्य मुद्दा; रोख; भर : ‘सर्व दाटी हिंदुस्तानचे मनसुबी यांवर आहे.’ - मइसा ३·४५०.
दाटी-टि
स्त्री. १ (जनावरें, मनुष्यें, वस्तु इ॰ कांची) गर्दी; खेंचाखेंच; चेपाचेप; भीड. 'करिती युधिष्टिराच्या ज्या ज्या गर्जोनि वाहिनी दाटी ।' -मोभीष्म ९.२. 'दाटी व्योमघटीं सुरां, सुख लुटी घेती जटी धूर्जटी ।' -वामन वनसुधा ४. ३१. २ समुदार्य; थवा. ३ (साप इ॰ काची) लहरी; विळखा; पकड. 'जरि भवभुजंगाची दाटि । जियेचेनि संकेतें उठी ।' -ॠ ७६. ४ (ल.) दाट मैत्री; घरोब्याचा, सलगीचा संबंध, व्यवहार; घसरट. ५ (अंधार इ॰ काचा) घनदाटपणा; काळेकुट्टपणा; घनता; निबिडता. ६ (द्रव पदार्थोचा) दाटपणा; घट्टपणा; (कागद, कापड, फळी इ॰ काची) जाडी; जाडपणा. ७ (अंगरखा इ॰ कांचा) तंगपणा; आवळपणा; (तंग वस्त्र इ॰ धारण करणाराची होणारी) चेपणु- कीची, चेंबलेली, दाबलेली स्थिति. ८ (वदंता, बातमी, मत इ॰ कांची) लोकांतील साधारण व्यक्ति; प्रसृतता; प्रसिद्धि. ९ (एखादा विषय, भाषण, लेख, इ॰ कांतील) मुख्य मुद्दा; रोंख; भर. 'सर्व दाटी हिंदुस्तानचे मनसुबी यांवर आहे.' -रा ३.४५०. दाटण पहा.॰वाटीनें-वाडीनें, दाटोवाडीनें-क्रिवि. दाटून दुटून; एकमेकांशीं खेटून; दाटी, अडचण करून; दाटणीवाटणीनें; कशी तरी दाटी सोसून. (क्रि॰ राहणें; निजणें). 'कसें तरी दाटीवाटीनें आजची रात्र एथेंच निंजू.' [दाटी द्वि.]
देही
वि. १. देहासंबंधी. २. देह धारण केलेला; देहधारी.
दंडी
पु. स्त्री. १. दंड धारण करणारा; संन्यासी. २. द्वारपाल. ३. राजेरजवाडे. ४. अर्ध्या दंडापर्यंत बाह्या असणारी चोळी.
दरक
पु. वंशपरंपरागत सरकारी मोठ्या अधिकाराची जागा; श्रेष्ठ अधिकार, हुद्दा. हे आठ प्रकारचे आहेतः-दिवाण, मुजुमदार, फडणीस, सबनीस, कारखानीस, चिटनीस, जामदार, पोतनीस. [अर.] ॰दार-दरकी असामी-वि. दरक धारण करणारा अधिकारी. यांचे प्रकार:-फडणीस, मुजुमदार, दिवाणजी, बक्षी, सबनीस, वांकनीस, कारखाननवीस, हशमनीस, पोतनीस, गोठ- गस्ते, मुनशी, पागनीस, बारनीस, गडनीस, सभासद, दफ्तरदार, रक्तवान, मोईनदार, पोतदार इ॰. ॰पट्टी-स्त्री. दरकदारांवरील सरकारी कर; मुख्यत्वें देशमुख, देशपांडे यांच्या जमीनीवरील दहा वर्षोनीं एका वर्षाच्या जमाबंदीइतका द्यावयाचा कर. दरकुटें-न. (निंदाव्यंजक) दरक अथवा सरदारी. -देवनाथ. [अर. दरक]
दरकदार, दरकी असामी
वि. दरक धारण करणारा अधिकारी. उदा. फडणीस, मुजुमदार इ.
दर्श
पु. १ अमावस्या. २ या दिवशीं करावयाचें श्राद्ध. [सं.] ॰पूर्णमास-पु. तैत्राग्नि (अग्निहोत्र) धारण करणार्या अग्निहोत्र्यानें पौर्णिमा व अमावस्या यांच्या नंतरच्या प्रतिपदेस करावयाचा याग.
दुर्धर
वि. १. धारण, ग्रहण करायला कठीण. २. दुःसाध्य; दुष्प्राप्य. ३. (व्यापक) बिकट; खडतर; असह्य; उग्र; कठीण. ४. भयंकर; घोर; भयानक. [सं.]
धान्न
स्त्री. खांब; धारण. (गो.)
धाराग्नि
पु. अग्निहोत्र; सतत अग्नि धारण करण्याचें व्रत. [सं. धारा + अग्नि]
धाराग्नी
पु. अग्निहोत्र; सतत अग्नी धारण करण्याचे व्रत. [सं.]
धारी
वि. (समासांत) धारण करणारा; बाळगणारा; घेणारा. जसें:- रूपधारी, यज्ञोपवीतधारी, अवतारधारी, दंडधारी. [सं. धारिन्]
धारी
वि. (समासात) धारण करणारा; बाळगणारा; घेणारा. उदा. रूपधारी, दंडधारी. [सं. धारिन्]
धारक
वि. धारण करणारा; धरणारा; बाळगणारा. समासात उत्तरपदी योजतात. उदा. आज्ञाधारक. [सं. धृ]
धारक
वि. धारण करणारा; धरणारा; बाळगणारा. समा- सांत उत्तरपदीं योजतात. जसें:-आज्ञाधारक = आज्ञा पाळणारा. वस्त्रधारक, शस्त्रधारक, वेत्रधारक, दंडधारक. [सं.धृ]
धारणी
स्त्री. आधाराचा लहान खांब; लहान धारण. (को.)
धारुकें
न. (महानु.) पाण्याची लहान मशक; पात्र. 'पव्हे धारुकें.' -प्रभा १४. [सं. धृ = धारण लरणें]
धार्य
वि. १. धरण्याजोगे; पकडण्यासारखे; मावण्यासारखे. २. घेण्याजोगी, अनुसरण्यायोग्य (पद्धत). ३. धारण करायला, वापरायला योग्य. [सं.]
धार्य
वि. १ धरण्या, पकडण्याजोगें; मावण्याजोगें; आधा- रण्यासारखें. २ घेण्याजोगी, अनुसरण्यास योग्य पद्धत. ३ धारण करण्यास, वापरण्यास योग्य. [सं.]
धनुर्धर, धनुर्धारी, धनुर्वाड, धनुवाड
वि. १. धनुष्य धारण करणारा; धनुष्याने लढणारा; तिरंदाजी करणारा. २. (ल.) शास्त्र, कला इ.मध्ये निपुण; पंडित; तज्ज्ञ. [सं.]
धर
पु. (महानु.) आधार; आश्रय; टेका; खांब. 'अडल्यासी धर'; 'धर्मी धर दीजे.' -सिसू. [सं. धृ = धारण करणें]
पु. १ अडकवून, निरोधून ठेवण्याची, टिकविण्याची शक्ति; (शब्दशः व लक्षणेनें). चिकटून राहण्याची, धारण कर- ण्याची, जडण्याची शक्ति. 'वायुमुळें हाताचा धर गेला.' 'त्या आंब्याला धर नाहीं मोहोर येतांच पडतो.' 'चुना जुना झाला म्हणजे त्याचा धर नाहींसा होतो.' 'त्याचे बुद्धीला धर नाहीं एक श्लोक दहा वेळां सांगितला पाहिजे.' २ तोलून धरण्याची, आधारण्याची, वर सहन करण्याची शक्ति (पायांची, पायांतील वस्तूंची); आधार. 'कड्यावर बांधकाम केल्यावर चांगला धर लागेपर्यंत कड्याखालची जमीन उकरून खालीं उतरावें लागतें.' -मॅरेट १७. 'या विहिरीला धर चांगला आहे.' ३ खळ; तहकूब करण्याची, दाबून धरण्याची शक्ति (प्राण्याचे व्यापार, मलमूत्रविसर्जन इ॰); संयमनशक्ति. ४ कष्ट मानसिक त्रास सोसण्याची शक्ति; तग; टिकाव. ५ (बोलण्यांत, वागण्यांत, विचारांत एकवाक्यता; सुसंगति; व्यवस्थितपणा; मेळ. 'त्याचे भाषणास धर नाहीं, आतां एक बोलेल मग एक बोलेल.' ६ धीर (क्रि॰ तुटणें). 'धर सर्वांचाहि जेधवां तुटला ।' -मोगदा १.२. ७ जम; घडी; बस्तान. 'इकडे अद्यापि पक्का घर बसला असें त्यास वाटत नाहीं.' -सूर्यग्र ८ पर्वत. 'जो धैर्यें धरसा, सहस्त्रकरसा तेजें तमा दूरसा ।' -र ४. ९ (समासांत) धारणकरणारा; ठेवणारा; पाळणारा. उदा॰ जल-चक्र-गंगा-धर इ॰ [सं. धृ] ॰लाहणें-टिकाव धरणें; तुलनेस येणें. 'मेणिका तारा उर्वशी । वोळी धर न लहाती कव्हणीं दीसीं ।' -शिशु ३३१. ॰सुटणें-धैर्य नाहींसें होणें. 'शहाजणें केली परंतु लश्करचा धर सुटला.' -भाब ८८.
धर्म
पु. १ धार्मिक विधियुक्त क्रिया, कर्में; परमेश्वरासंबं- धीचें कर्तव्य; ईश्वरोपासना; परमेश्वरप्राप्तीचीं साधनें; परमेश्वरप्रा- प्तीचा मार्ग, पंथ. 'करितो धारण यास्तव धर्म म्हणावें प्रजांसि जो धरितो ।' -मोकर्ण ४१.८१. २ मनुष्यप्राण्यास सदाचरणास लावणारें व परमेश्वरचिंतनाचा मार्ग दाखवून देणारे ख्रिश्चन, यहुदी, हिंदु, इस्लामी वगैरे पंथ. 'मुख्यमुख्य नितितत्त्वांबद्दल सर्व धर्मांची एकवाक्यता आहे. '३ शास्त्रांनीं घालून दिलेले आचार, नियम; पवित्र विधी, कर्तव्यें. पंचपुरुषार्थांपैकीं एक. ४ दान; परोपकारबुद्धीनें जें कोणास कांहीं देणें, किंवा जें कांहीं दिलें जातें तें; दानधर्माचीं कृत्यें; परोपकारबुद्धि. 'अंधळयापांगळ्यांस धर्म करावा. ' 'महाराष्ट्रीयांपेक्षां गुजराथ्यांत धर्म अधिक.' ५ सद्गुण; शास्त्रोक्त वागल्यानें अंगीं येणारा नौतिक. धार्मिक गुण. 'कर्तव्यकर्म, नीति, नीतिधर्म किंवा सदाचरण यांसच धर्म असें म्हणतात. '-गीर ६५. ६ स्वाभाविक गुण; गुणधर्म; नैसर्गिक प्रवृत्ति. 'गाईनें दूध देणें हा गाईचा धर्म आहे.' 'पृथ्वीस वास येणें पृथ्वीचा धर्म. ' ७ कर्तव्यकर्म; रूढी; परंपरेनें, शास्त्रानें घालून दिलेला नियम उदा॰ दान करणें हा गुहस्थ धर्म, न्यायदान हा राजाचा धर्म, सदाचार हा ब्राह्मणधर्म, धैर्य हा क्षत्रिय धर्म. याच अर्थानें पुढील समास येतात. पुत्रधर्म-बंधुधर्म-मित्रधर्म-शेजार- धर्म इ॰ ८ कायदा. ९ यम. 'धर्म म्हणे साध्वि बहु श्रमलीस स्वाश्रमासि जा मागें ।' -मोविराट १३.६५. १० पांडवांतील पहिला. 'कीं धर्में श्वानू सरता । केला सर्वथा स्वर्गलोकीं ।' -एभा १.१०९. ११ धर्माचरणाचें पुण्य. 'ये धर्मचि, पुत्र स्त्री कोष रथ तुरग करी न सांगतें ।' -मोभीष्म ११.२६. १२ (शाप.) गुण- धर्म' स्वाभाविक लक्षण ' दोन किंवा अधिक पदार्थांचें एकमेकां- वर कार्य घडून त्यांपासून जेव्हां असा नवा पदार्थ उप्तन्न होतो कीं त्याचे धर्म मूळ पदार्थांच्या धर्मांपासून अगदीं भिन्न असतात, तेव्हां त्या कार्यास रसायनकार्य असें म्हणतात.' -रसापू १. (वाप्र.) धर्म करतां कर्म उभें राहणें-पाठीस लागणें-दुसर्यावर उपकार करावयला जावें तों आपल्यावरच कांहींतरी संकट ओढवणें. धर्मखुंटीस बांधणें- (जनावराला) उपाशीं जखडून टाकणें; ठाणावर बांधून ठेवणें. [धर्मखुंटी]धर्म जागो-उद्गा. (विशिष्ट गोष्टीचा संबंध पुन्हां न घडावा अशाविषयीं) पुण्य उभें राहो. धर्म पंगु-(कलियुगांत धर्म एक पायावर उभा आहे. त्याचें तीन पाय मागील तीन युगांत गेले. यावरून ल.)धर्म अतिशय दुबळा, अनाथ आहे या अर्थी. धर्माआड कुत्रें होणें- दानधर्माच्या आड येणार्याला म्हणतात. धर्माचा- १ धर्मासंबंधीं (पैसा, अन्न इ॰). २ मानलेला; उसना; खरा औरस नव्हे असा (पुत्र, पिता. बहीण इ॰). ३ फुकट; मोफत.'धर्माची राहण्याला जागा दिली आहे.' -पारिभौ २७. धर्माची वाट बिघडणें-मोडणें-एखाद्या दानधर्माचा ओघ थांबणें, थांबविणें. धर्माचे पारीं बसणें-१ दुसर्याचे पैसे खर्चीत रिकामटेकडें बसणें; धर्मावर काळ कंठणें. २ सद्गुणांचें चांगलें फल मिळणें; सदाचारामुळें चांगलें दिवस येणें. ३ सदोदित दानधर्म करणें. धर्मकृत्ये आचरणें.धर्मावर लोटणें- टाकणें-सोडणें-एखाद्याच्या न्यायबुद्धिवर सोंपविणें.धर्मा- वर सोमवार सोडणें-स्वतः झीज न सोसतां परभारें होईल तें पाहणें. -संम्ह. धर्मास-क्रिवि. (कंटाळल्यावरचा उद्गार) कृपा- करून; मेहेरबानीनें; माझे आई ! याअर्थीं. 'माझे रुपये तूं देऊं नको पण तूं एथून धर्मास जा ! ' 'मी काम करतों, तूं धर्मास नीज.' धर्मास भिऊन चालणें-वागणें-वर्तणें-करणें-धर्माप्रमाणें वागणें. धर्मास येणें-उचित दिसणें; पसंतीस येणें; मान्य होणें. 'मी तुला सांगायचें तें सांगितलें आतां तुझे धर्मास येईल तें कर.' म्ह॰ १ धर्मावर सोमवार = (दानधर्म करणें). कांहीं तरी सबबीबर, लांबणीवर टाकणें. -मोल. २ धर्माचे गायी आणि दांत कांगे नाहीं. ३ आज मरा आणि उद्यां धर्म करा. ४ धर्मादारीं आणि मारामारी. ५ धर्मस्य तत्वं निहितं गुहायाम् = धर्माचें रहस्य गुहेमध्यें ठेवलेलें असतें. (गुढ किंवा अज्ञेय असतें). धर्माचें खरें तत्त्व गहन, अगम्य आहे. ६ धर्मस्य त्वरिता गतिः = धर्मास विलंब लावूं नये या अर्थीं. सामाशब्द- ॰आई-माता-स्त्री. (ख्रि.) कांहीं चर्चेसमध्यें लहान मुलांचा बाप्तिस्मा होतो तेव्हां त्यांस ख्रिस्तीधर्मास अनुसरून वळण व शिक्षण देण्यांत यावें म्हणून त्यांच्या मातेहून भिन्न अशी जी स्त्री आपणावर जबाबदारी घेते ती. (इं.) गॉडमदर. 'प्रत्येक मुलीला एक धर्मबाप व दोन आया पाहिजेत.' -साप्रा ९०. ॰कर्ता-पु. १ धर्म करणारा; परोपकारी माणूस. २ न्यायाधीश; जज्ज. ३ (दक्षिण हिंदुस्थान) देवळाचा व्यवस्थापक, कारभारी. ॰कर्म-न. १ वर्तन; आचार; एखाद्याचीं कृत्यें. कर्मधर्म पहा. 'ज्याचें त्यास धर्मकर्म कामास येईल.' २ शास्त्रविहित कर्में, आचरण; धार्मिक कृत्यें. [सं. धर्म + कर्म] ॰कर्मसंयोग-पु. प्रारब्धयोग; कर्म- धर्मसंयोग पहा. ॰कार्य-कृत्य-न. धार्मिक कृत्य; परोपकाराचें कार्य; (विहीर, धर्मशाळा इ॰ बांधणें, रस्त्यावर झाडें लावणें; देवळें बांधणें; अन्नसत्रें स्थापणें इ॰). २ धार्मिक विधि, व्रत; धर्मसंस्कार. [सं.] ॰कीर्तन-धर्माचें व्याख्यान-प्रवचन-पुराण. 'किंबहुना तुमचें केलें । धर्मकीर्तन हें सिद्धि गेलें ।' -ज्ञा १८. १७९२. [सं.] ॰कुढाव-पु. (महानु.) धर्मरक्षक. 'कीं धर्म- कुढावेनि शाङ्र्गपाणी । महापातकांवरी सांघीतली सांघनी ।' -शिशु ३५. [धर्म + कुढावा = रक्षण] ॰खातें-न. १ धर्मासाठीं जो खर्च करितात त्याचा हिशेब ठेवणारें खातें; धार्मिक खातें. २ धर्मार्थ संस्था; लोकोपयोगी, परोपकारी संस्था. [सं. धर्म + खातें] ॰खूळ-वेड-न. धर्मासंबंधीं फाजील आसक्ति; अडाणी धर्म- भोळेपणा; धर्माबद्दलची अंधश्रद्धा. [म. धर्म + खूळ] ॰गाय- स्त्री. १ धर्मार्थ सोडलेली गाय. धर्मधेनु पहा. २ चांगली, गरीब गाय. 'कढोळाचें संगती पाहे । क्षणभरी गेलिया धर्मगाये ।' -एभा २६.४२. ॰ग्रंथप्रचारक-पु. (ख्रि.) ख्रिस्ती धर्म शास्त्र व तत्संबंधीं इतर पुस्तकें विकणारा, फेरीवाला; (इं.) कल्पो- र्चर. 'सदानंदराव काळोखे यांनीं एक तप धर्मग्रंथप्रचारकाचें काम मोठ्या प्रामाणिकपणें केलें.' [सं. धर्म + ग्रंथ + प्रचारक] धर्मतः- क्रिवि. धर्माच्या, न्यायाच्या दृष्टीनें; न्यायतः; सत्यतः; खरें पाहतां. ॰दान-न. दानधर्म; धर्मादाय. 'एक करिती धर्मदान । तृणास- मान लेखती धन ।' [सं.] ॰दारीं कुत्रें-न. परोपकाराच्या कृत्यास आड येणारा (नोकर, अधिकारी); कोठावळा. ॰दिवा दिवी-पुस्त्री. धर्मार्थ लावलेला दिवा. 'जे मुमुक्षु मार्गीची बोळावी । जे मोहरात्रीची धर्मदिवी ।' -ज्ञा १६.६५. ॰द्वार-न. कौल मागणें; ईश्वराला शरण येणें. [सं.] ॰धेनु-स्त्री. १ धर्मार्थ सोड- लेली गाय. 'ऐसेनि गा आटोपे । थोरिये आणतीं पापें । धर्मधेनु खुरपें । सुटलें जैसें ।' -ज्ञा १६.३२९. २ हरळी; दुर्वा. -मनको [सं.] ॰ध्वज-पु. १ धर्माची पताका; धर्मचिन्ह; धर्माचा डौल, प्रतिष्ठा; (क्रि॰ लावणें; उभारणें; उभविणें; उडणें). २ (ल) धर्माचा फाजील पुरस्कर्ता. [सं. धर्म + ध्वज] ॰ध्वजी-वि. धर्म- निष्ठेचा आव आणणारा ढोंगी-भोंदू माणूस. ॰नाव-स्त्री. येणार्या- जाणारानीं तरून जावें म्हणून नावाड्यास वेतन देऊन नदीवर जी धर्मार्थ नाव ठेवलेली असते ती; धर्मतर; मोफत नाव. [धर्म + नांव] ॰निष्पत्ति-स्त्री. कर्तव्य करणें; धर्माची संपादणूक. [सं.] ॰नौका-पु. धर्मनाव पहा. ॰न्याय-पु. वास्तविक न्याय; निःप- क्षपात, धर्माप्रमाणें दिलेला निकाल. 'तुम्ही उभयतांचें वृत्त श्रवण करून धर्म न्याय असेल तो सांगा.' [धर्म + न्याय] ॰पत्नी- स्त्री. १ विवाहित स्त्री. -ज्ञा १८.९४२. २ सशास्त्र (अग्निहोत्रादि) कर्माकरितां योग्य अशी प्रथम विवाहाची (दोन तीन पत्न्या असल्यास) ब्राह्मण स्त्री. [सं.] ॰पंथ-पु. १ धर्माचा, परो- पकाराचा, सदाचरणाचा मार्ग. 'सदां चालिजे धर्मपंथ सर्व कुमति टाकोनि ।' 'धर्मपंथ जेणें मोडिले । त्यास अवश्य दंडावें ।' २ धार्मिक संग, समाज. 'ख्रिस्तीधर्मपंथ.' [सं.] ॰परायण- वि. क्रिवि. १ परोपकारार्थ; धार्मिककृत्य म्हणून; धर्मासाठीं. २ धर्मार्थ; मोफत; (देणें, काम करणें). ३ पक्षपात न करतां; धर्मावर लक्ष ठेवून (करणें; सांगणें; बोलणें इ॰). 'धर्मपरायण बोलणारे पंच असल्यास धर्मन्याय होईल.' ॰परिवर्तन-न. (ख्रि.) धर्ममतें बदलणें; धर्मांतर. (इं.) कॉन्व्हर्शन. 'नारायण वामन टिळक यांचें १८९५ सालीं धर्मपरिवर्तन झालें.' [सं. धर्म + परिवर्तन] ॰पक्षी-पु. धर्मोपदेशक; पाद्री; पुरोहित. 'तो जातीचा धर्मपक्षी होता.' -इंग्लंडची बखर भाग १.२७२. [धर्म + पक्षी = पुरस्कर्ता] ॰पिंड-पु. १ पुत्र नसणार्यांना द्यावयाचा पिंड. २ दुर्गतीला गेलेल्या पितरांना द्यावयाचा पिंड. [धर्म + पिंड] ॰पिता-पु. धर्मबाप पहा. ॰पुत्र-पु. १ मानलेला मुलगा. २ उत्तरक्रियेच्या वेळीं पुत्र नसलेल्यांचा श्राद्धविधि करणारा तज्जा- तीय माणूस; धार्मिक कृत्यांत पुत्राप्रमाणें आचरणारा माणूस. 'धर्मपुत्र होऊनि नृपनायक ।' -दावि ४९१. ३ दत्तक मुलगा, इस्टेटीला वारस ठरविलेला. ॰पुरी-स्त्री. १ तपस्वी, विद्वान वगैरे ब्राह्मण ज्या क्षेत्रांत राहतात तें क्षेत्र; धार्मिक स्थल. २ ज्याच्या घरीं पाहुण्यांचा नेहमीं आदर सत्कार केला जातो तें घर; पाहुण्यांची वर्दळ, रहदारी असणारें घर. [सं.] ॰पेटी-स्त्री. धर्मादाय पेटी; धर्मार्थ पैसे टाकण्यासाठीं ठेवलेली पेटी. (देऊळ; सामाधि; धर्मार्थ संस्था वगैरे ठिकाणीं). [सं. धर्म + पेटी] ॰पाई- ॰पोवई-स्त्री. १ प्रवाशांसाठीं, गरिबांसाठीं अन्न पाणी वगैरे फुकट मिळण्याची केलेली व्यवस्था; धर्मार्थ अन्नोदक दान. २ अशी व्यवस्था जेथें केलेली असते तें ठिकाण; अन्नछत्र; धर्मशाळा. ॰प्रतिष्ठा-स्त्री. १ धर्माचा गौरव; सन्मान; डौल. २ धर्माची स्थापना. 'धर्मप्रतिष्ठा तो सिध्दु । अभयहस्तु ।' -ज्ञा १.१३. [सं.] ॰प्रधान-वि. १ धर्मरूप पुरुषार्थाविषयीं तत्पर; धार्मिक वृत्तीचा. २ धर्म ज्यांत प्रमुख आहे असा (विषय, हेतु इ॰). ॰बंधु-पु. मानलेला भाऊ; भावाच्या जागीं असणारा माणूस; स्वतःच्या धर्माचा अनुयायी; स्वधर्मीय. [सं.] ॰बाप-पु. (ख्रि) कांहीं चर्चेसमध्य लहान मुलांचा बाप्तिस्मा होतो तेव्हां त्यांस खिस्तीधर्मास अनु- सरून वळण व शिक्षण देण्यांत यावें म्हणून जबाबदारी घेणारा पित्याहून निराळा पुरुष. (इं.) गॉडफादर. 'ज्या प्रत्येक मुलाचा बाप्तिस्मा करावयाचा आहे त्याला दोन धर्मबाप व एक धर्मआई पाहिजे.' -साप्रा ९०. [धर्म + बाप] ॰बुद्धि-स्त्री. धर्म करण्याची मनाची प्रवृत्ति; धर्माचरणाविषयीं आस्था. 'या चोराला तुम्ही गरीब मानून घरीं जेवायला घालितां ही धर्मबुद्धि कामाची नव्हे.' [धर्म + बुद्धि] ॰भोळा-वि. १ धर्मावर अंधश्रद्धा असणारा, परम धार्मिक. २ (अनादरार्थी) धर्मवेडा; कट्टर सनातनी. (इं.) सुपरस्टिशस. 'बॅरिस्टर, या धर्मभोळ्या खुळचट लोकांत तुम्ही आपल्या वाईफला एक मिनिटहि ठेवणं म्हणजे तिच्या सगळ्या लाइफचं मातेरं करण्यासारखं आहे.' -सु ८. ॰भ्राता-पु. धर्म- बंधु पहा. ॰मर्यादा-स्त्री. धर्मानें घालून दिलेली मर्यादा, बंधन, शिस्त; धार्मिक नियंत्रण. [सं.] ॰मार्ग-पु. धर्माचा, सदा- चरणाचा, परोपकाराचा मार्ग. [सं.] ॰मार्तंड-पु. १ धर्माचा श्रेष्ठ अनुयायी; पुरस्कर्ता; धर्मभास्कर; एक पदवी. २ (उप.) धार्मिकपणाचें अवडंबर, ढोंग माजविणारा. 'भीतोस तूं कशाला, मोडाया हें सुधारकी बंड । आहोंत सिद्ध आम्हीं पुण्यपुरींतील धर्ममार्तंड ।' -मोगरे. ॰युद्ध-न. युद्धशास्त्राच्या नियमाप्रमाणें चाललेली लढाई; सारखें संख्याबल; सारख्या शस्त्राअस्त्रांनीं सज्ज अशा दोन पक्षांमधील न्यायीपणाचें युद्ध; न्याय्ययुद्ध; निष्कपट युद्ध. 'तों अशरीरिणी वदली उत्तर । धर्मयुद्ध नव्हे हें ।' -पाप्र ४५.३९. [सं] ॰राज-पु. १ यमधर्म. २ जेष्ठ पांडव, युधिष्ठिर युधिष्ठिर हा फार सच्छील असल्यामुळें त्याला धर्माचा अवतार सम जत. ३ (ल.) धर्मनिष्ठ, सात्त्विक मनुष्य ४ धर्माप्रमाणें भोळा- भाबडा माणूस. [सं.] ॰राजाची बीज-स्त्री. कार्तिकशुद्ध द्वितीया; भाऊबीज; यमद्वितीया. [सं. धर्मराज + म. बीज] ॰राज्य-न. ज्या राज्यांत सत्य, न्याय आणि निःपक्षपात आहे असें राज्य; सुराज्य; सुखी राज्य [धर्म + राज्य] ॰लग्न-न. धर्मविवाह पहा. ॰लड- वि. (अश्लील) नास्तिक; धर्मकृत्यें न करणारा; धर्माला झुगारून देणारा. याच्या उलट धर्ममार्तंड. 'सदर ग्रंथांत महाराष्ट्र धर्मलंड अतएव त्याज्य असें एका गंधर्वानें म्हटलें आहे.' -टि ४. [सं. धर्म + लंड = लिंग] ॰लोप-पु. धर्माची ग्लानी; अधर्माचा प्रसार. [सं.] ॰वणी-पु. (कुंभारी) तिलांजळीच्या वेळचा कुंभारी मंत्र. -बदलापूर ७२. [धर्म + पाणी] ॰वाट-स्त्री. १ शरण आलेल्या शत्रूवर दया दाखवून त्यास करून दिलेली वाट. 'तुज युद्धीं कैंचें बळ । धर्मवाट दिधली पळ ।' -एरुस्व ११.३७. २ खुला, मोकळा, बिन धोक, अनिर्बंध रस्ता, मार्ग. [सं. धर्म + वाट] ॰वान्-वि. धार्मिक; परोपकारी; सदाचरणी; सात्त्विक. [सं.] ॰वासना-स्त्री. दानधर्म, धार्मिक कृत्यें करण्याची इच्छा; धर्मबुद्धि. [सं. धर्म + म वासना] ॰निधान-न. धर्माचा खजीना, ठेवा, सांठा. 'रचिलीं धर्मनिधानें । श्रीनिवृत्तीदेवें ।' -ज्ञा ११.९. [सं.] ॰विधि-पु. धार्मिककृत्य, संस्कार. [सं.] ॰विपाक-पु. धार्मिक कृत्यांचा परिणाम, फल. सत्कृत्यांचें फल. विपाक पहा. [सं.] ॰विवाह-पु. गरिबाचें स्वतःच्या पैशानें करून दिलेलें लग्न; धर्मादाय लग्न. [सं.] ॰वीर- पु. १ स्वधर्मार्थ प्राणार्पण करणारा; धर्मासाठीं लढणारा. 'स्वधर्म- रक्षणाकरितां मृत्यूच्या दाढेंत उडी टाकणार्या धर्मवीराची ती समाधि होती.' -स्वप १०. २ धर्माचें संरक्षण, संवंधन करणारा; धर्माचा वाली; ही एक पदवीहि आहे. 'धर्मवीर चंद्रोजीराव आंग्रे.' ३ (ख्रि) रक्तसाक्षी. (इं.) मार्टिर. [सं.] ॰शाला-ळा, धर्म- साळ-स्त्री. वाटसरू लोकांना उतरण्याकरितां बांधलेलें घर; धर्मार्थ जागा; पांथस्थांच्या विश्रांतीची जागा. 'मढ मंडप चौबारी । देखे धर्मसाळां ।' -ऋ २०. [धर्म + शाला] ॰शाळेचें उखळ-न. (धर्म- शाळेंतील उखळाचा कोणीहि उपयोग करतात ल.) वेश्या; पण्यां- गना. म्ह॰ धर्मशाळेचे उखळीं येत्याजात्यानें कांडावें. ॰शास्त्र- न. १ वर्णाश्रम धर्माचें प्रतिपादक जें मन्वादिप्रणीत शास्त्र तें आचार व्यवहारादिकांसंबंधीं नियम सांगणारें शास्त्र, ग्रंथ. २ समाजाच्या शिस्तीसाठीं, धार्मिक आचरणाकरितां, सामाजिक संबंधाकरितां (लग्न वगैरे संस्थांबद्दल) विद्वानांनीं घालून दिलेले नियम किंवा लिहिलेले ग्रंथ. धर्माविषयीचें विवेचन केलेला ग्रंथ. ३ ख्रिस्तीधर्माचें शास्त्र. (इं.) थिऑलॉजी. याचें सृष्टिसिद्ध (नॅचरल), ईश्वरप्रणीत (रिव्हील्ड), सिद्धांतरूप (डागमॅटिक), पौरुषेय (स्पेक्युलेटिव्ह), व सूत्रबद्ध (सिस्टिमॅटिक) असे प्रकार आहेत. ४ (सामा.) कायदेकानू. [सं.] ॰शास्त्री-वि. धर्मशास्त्र जाणणारा. [सं.] ॰शिला-स्त्री. सती जाणारी स्त्री पतीच्या चितेवर चढतांना ज्या दगडावर प्रथम उभी राहते तो दगड. या ठिकाणीं उभी असतां ती सौभाग्यवायनें वाटतें. ही शिला स्वर्गलोकची पायरी समजतात. 'धर्म शिलेवर उभी असतांना थोरल्या माधवराव पेशव्यांची स्त्री रमाबाई हिनें नारायणराव पेशव्यांचा हात राघोबांच्या हातीं दिल्याचें प्रसिद्ध आहे.' -ज्ञाको (ध) ४४. 'धर्मशिळेवर पाय ठेविता दाहा शरीरा का करितो ।' -सला ८३. ॰शिक्षण-न. धर्माचें शिक्षण; धार्मिक शिक्षण. 'ज्या धर्म शिक्षणानें पुरुषाचा स्वभाव अभिमानी, श्रद्धाळु, कर्तव्यदक्ष व सत्यनिष्ठ बनेल तें धर्मशिक्षण -टिसू ११६. ॰शील-ळ-वि. शास्त्राप्रमाणें वागणारा; धार्मिक सदाचरणी; सद्गुणी. [सं.] ॰श्रद्धा-स्त्री. धर्माविषयीं निष्ठा; धर्मावर विश्वास. 'राष्ट्रोत्कष स धर्मश्रद्धा पुढार्यांच्याहि अंगीं पाहिजें.' -टिसू ११७. ॰संतति-संतान-स्त्रीन. १ कन्यारूप अपत्य (कारण कन्या कुटुंबाबाहेर जाते). २ दत्तक मुलगा. [सं.] ॰सभा- स्त्री. १ न्याय कचेरी; न्यायमंदिर; कोर्ट. २ धार्मिक गोष्टींचा निकाल करणारी मंडळी; पंचायत. [सं.] ॰समीक्षक, ॰जिज्ञासु-पु. (ख्रि.) धर्मसंबंधानें विचार करणारा; शोध कर णारा; पृच्छक. (इं.) एन्क्वायरर. 'धर्म समीक्षकांच्या शिक्षकांना उपयोगी पडतील अशा पुस्तकांची बरीच जरूरी आहे.' -ज्ञानो ७.५. १९१४. [सं.] ॰संमूढ-वि. कर्तव्य कोणतें हें ज्यास निश्चित कळत नाहीं असा. -गीर २५. ॰संस्कार-पु. धार्मिक संस्कार; धर्मविधी. ॰संस्थान-न. १ पुण्य क्षेत्र; धर्माचें, सदाचरणाचें स्थान. २ पूजा, अर्चा वगैरे करण्यासाठीं ब्राह्मणास दिलेलें गांव; अग्रहार. ३ (व्यापक) धर्मार्थ, परोपकारी संस्था, सभा. ॰संस्था- पन, ॰स्थापन-न. १ नवीन धर्मपंथाची उभारणी. 'धर्म स्थापनेचे नर । हे ईश्वराचे अवतार । जाले आहेत पुढें होणार ।' -दा १८.६. २०. २ धर्माची स्थापना; धर्मजागृति. [सं.] ॰सिद्धांत- स्वीकार-पु. (ख्रि.) उपासनेच्या वेळीं आपल्या धर्मश्रद्धेचे आविष्करण करण्याकरितां विवक्षित सिद्धांतसंग्रह म्हणून दाखविणें. (इं.) कन्फेशन् ऑफ फेथ. [सं.] ॰सिंधु-पु. धर्मशास्त्रावरचा एक संस्कृत ग्रंथ. यांत अनेक धर्मकृत्यांचें विवेचन केलेलें असून शुभाशुभ कृत्यांचा निर्णय सांगितला आहे. पंढरपूरचे काशिनाथ अनंतोंपाध्याय यांनीं इ. स. १७९१ त हा रचिला. ॰सूत्रें-नअव. ज्ञान व कर्म- मार्ग यांची संगति लावून व्यावहारिक आचरणाची सांगोपांग चर्चा करणारा प्राचीन ग्रंथ. सूत्रें पहा. [सं.] ॰सेतु-पु. धर्म- मर्यादा. [सं.] ॰ज्ञ-वि. १ धर्मशास्त्र, विधिनियम उत्तम प्रकारें जाणणारा. २ कर्तव्यपर माणूस; कर्तव्य जागरूक. धर्माआड कुत्रें-न. सत्कृत्याच्या, परोपकाराच्या आड येणारा दुष्ट माणूस. धर्मदारीं कुत्रें पहा. धर्माचरण-न. धार्मिक आचार; सदा- चरण. [सं. धर्म + आचरण] धर्माचा कांटा-पु. सोनें वगैरे मौल्यवान जिन्नसाचें खरें वजन लोकांस करून देण्यासाठीं विशिष्ट स्थलीं ठेवलेला कांटा; धर्मकांटा. वजन करवून घेणार्यांकडून मिळालेला पैसा धर्मादाय करतात. धर्माचा पाहरा-पु. सकाळचा प्रहर (सूर्योदयापूर्वीं दीड तास व नंतर दीड तास). धर्माची गाय-पु. (धर्मार्थ मिळालेली गाय). १ फुकट मिळालेला जिन्नस. म्ह॰ धर्माचे गायी आणि दांत कां गे नाहीं = फुकटचा जिन्नस किंवा काम क्कचितच चांगलें असतें. २ कन्या; मुलगी (कारण ही दुसर्यास द्यावयाची असते). -वि. गरीब निरुपद्रवी मनुष्य. धर्मात्मा-पु. (धर्माचा आत्मा, मूर्तिमत धर्म). १ धर्म- शील, धार्मिक प्रवृत्तीचा माणूस. २ धर्म करण्याकडे ज्याची प्रवृत्ति आहे असा. ज्यानें अनेक धर्मकृत्यें केलीं आहेत असा. [सं.] धर्मादाय-व-पु. १ धर्मार्थ जें दान तें; देणगी; भिक्षा. २ सर- कारांतून धर्मकृत्यांसाठीं प्रतिवर्षीं काढून ठेवलेली रक्कम; या कामीं ठराविक धान्य देण्यासाठीं दर गांवाला काढलेल्या हुकूम. -वि. मोफत; फुकट; धर्मार्थ. -क्रिवि. धर्म म्हणून; दान देण्याकरितां; धर्मार्थ. ॰टाकणें-सोडणें-देणें-धर्मार्थ देणें; दानधर्मासाठीं आपला हक्क सोडणें. धर्मादाय पट्टा-स्त्री. देऊळ, उत्सव इ॰ चा खर्च चालविण्यासाठीं किंवा एखाद्याच्या मदतीसाठीं, लोकांवर बसवितात ती वर्गणी. धर्माधर्मीं-धर्मींनें-क्रिवि. धार्मिक व उदार लोकांच्या मदतीनें अनेकांनीं धर्मार्थ हात लाविल्यानें; फुकट; स्वतः पैसा खर्च करण्यास न लागतां. 'लेखक ठेवून लिहिलें तर पुस्तक होईल नाहींतर धर्माधर्मीं ग्रंथ तडीस जाणार नाहीं.' [सं. धर्म द्वि.] धर्माधर्मीवर काम चाल- विणें-पैसा खर्च न करतां फुकट काम करून घेणें. धर्मा- धर्मीचा-वि. धार्मिक लोकांकडून मिळविलेला; धर्मार्थ (फुकट) मिळविलेला; अनेकांनीं हातबोट लावल्यामुळें संपादित (पदार्थ, व्यवहार). धर्माधिकरण-पु. १ धर्माचारांचें नियंत्रण. २ शास्त्रविधींची पाळणूक होते कीं नाहीं हें पाहाण्यासाठीं, नीति- नियमांवर लक्ष ठेवण्यासाठीं खातें, सभा. ३ धर्मशास्त्रांची अंमल- बजावणी. ४ सरकारी न्यायसभा; न्यायमंदिर. धर्माधिकार-पु. १ धर्मकृत्यांवर देखरेख करण्याचा अधिकार. धार्मिक गोष्टींवर नियंत्रण. २ न्यायाधीश. धर्माधिकरण पहा. [धर्म + अधिकार] धर्माधिकारी-पु. १ धर्मासंबंधीं गोष्टी पहाणारा वरिष्ठ अधि- कारी. धर्माधिकरणाचा अधिकारी. २ न्यायाधीश. धर्माध्यक्ष-पु. सरन्याधीश; धर्मगुरु; राजा. [धर्म + अध्यक्ष] धर्मानुयायी, धर्मानुवर्ती, धर्मानुसारी-वि. १ धर्माप्रमाणें चालणारा, वागणारा; सद्गुणी; सदाचरणी. २ एखाद्या धर्मपंथांतील माणूस. धर्मानुष्ठान-न. १ धर्माप्रमाणें वर्तन; पवित्र, सदाचारी जीवन. २ धार्मिक संस्कार, विधि. ३ धार्मिक कृत्य; सत्कृत्य. धर्मार्थ-क्रिवि. १ परोपकार बुद्धीनें; दान म्हणून देणगी म्हणून. २ मोफत; फुकट. धर्मार्थ जमीन-स्त्री. धार्मिक गोष्टींसाठीं दिलेली जमीन (देवस्थानास किंवा धर्मादायास दिलेली); इनाम जमीन. धर्मालय-न. १ धर्मस्थान; धर्मक्षेत्र; ज्या ठिकाणीं धार्मिक कृत्यें चालतात तें स्थळ. 'जें धर्मालय म्हणिजे । तेथ पांडव आणि माझें ।' -ज्ञा १.८३.२ धर्मशाळा. धर्मावतार-पु. अतिशय सत्वशील व पवित्र माणूस; प्रत्यक्ष धर्म. [धर्म + अवतार] धर्मासन-न. न्यायासन; न्यायाधीश बसण्याची जागा; न्याय- देवतेची जागा. धर्मित्व-वि. गुणित्व. 'जे धर्मधर्मित्व कहीं ज्ञानाज्ञाना असे ।' -अमृ ७.२८३. धर्मिष्ट-वि. धार्मिक; सत्त्वशील; सदाचरणी. धर्मी-वि. १ धर्मानें वागणारा; सदाचरण ठेवणारा; न्यायी; सद्वर्तनी. २ ते ते गुणधर्म अंगीं असणारा. (विषय, पदार्थ). ३ धर्मीदाता; उदार; धर्म करणारा. धर्मीदाता- पु. धर्मकरण्यांत उदार, मोठा दाता (भिक्षेकर्यांचा शब्द). धर्मोडा-पु. स्त्रियांचें एक व्रत; चैत्र महिन्यांत ब्राह्मणाच्या घरीं धर्मार्थ रोज नियमानें एक घागरभर पाणी देणें. [धर्म + घडा] धर्मोपदेश-पु. धर्माची शिकवण; धर्मांसंबंधी प्रवचन, उपदेश, धर्मोपदेशक-पु. गुरु; धर्माचा उपदेश करणारा. धर्मोपा- ध्याय-पु. धर्माधिकारी. धर्म-वि. १ धर्मयुक्त; धर्मानें संपादन केलेलें; धर्मानें मिळविलेलें; धर्मदृष्टया योग्य. 'उचित देवोद्देशें । द्रव्यें धर्म्यें आणि बहुवसें ।' -ज्ञा १७.३६०. २ (महानु.) वंद्य. 'जें पांता जालीं धर्म्यें । वित्त रागांसि ।' -ऋ २०. धर्म्यविवाह- पु. धर्मशास्त्रोक्त विवाह; सर्व धार्मिक संस्कारांनिशीं झालेला विवाह.
धरण
न. १. बांध; बंधारा; नदी–ओढ्याचा प्रवाह अडवून पाणी साठवण्यासाठी घालतात तो बांध किंवा भिंत. २. समुच्चयाने नऊ आणे; पाव होन. ३. गरोदर स्त्रीचा गर्भपात होऊ नये म्हणून तिच्या गळ्यात बांधतात ती औषधी मुळी. ४. सुमारे चोवीस गुंजांइतके वजन. ५. धारण करणे; बाळगणे. ६. आश्रय; टेकण. [क.] (वा.) धरण फुटणे – (अश्लील) विटाळशी होणे.
धरण
न. बांध; बंधारा; नदी-ओढ्याचा प्रवाह अडवून पाणी सांठविण्यासाठीं बांध घालतात तो; पाणी अडविण्यासाठीं बांधलेली भिंत. २ समुच्चयानें नऊ आणे; पाव होन. ३ गरोदर स्त्रीचा गर्भपात होऊं नये म्हणून तिच्या गळ्यांत विशिष्ट औषधी मुळी बांधतात ती. (क्रि॰ बांधणें). ४ सुमारें चोवीस गुंजांइतकें वजन. ५ धारण करणें; बाळगणें ६ आश्रय; टेंकण; धरणें अर्थ ३ पहा. ॰फुटणें-(अश्लील.) विटाळशी होणें-बसणें. ॰मूळ-न. (कों.) झाडाचें मुख्य मूळ (जमीनींत अधिक असणारें); मुळाचा मोठा भाग.
धरणे
अक्रि. १. चिकटून राहणे; बसून राहणे; वियुक्त, वेगळे न होणे. २. बहर किंवा फळे येणे; निर्माण होणे; धारण केले जाणे. ३. फळे टिकणे. ४. गर्भार, गाभण असणे, राहणे (जनावर). ५. अंग लुळे, वाकडे होणे, हालेना–चालेनासे होणे. ६. स्मरणात राहणे. ७. ठरली असणे; निश्चित केली जाणे. ८. निवारणे (पाऊस, थंडी – कपड्याने, घोंगडीने). ९. थांबणे; स्थिर राहणे : ‘तऱ्हीं रणमदें मातलें । राऊंत धरतीचिना ।’ – शिव ९७१. [सं. धृ]
धरणें
अक्रि. १ चिकटून राहणें; बसून राहणें; वियुक्त न होणें. 'त्या भितींस गिलावा धरत नाही.' २ बहार किंवा फळें येणें; निर्माण होणें; धारण केले जाणें. ' यंदा आंबे पुष्कळ धरले; 'भिंतीवर खपले धरले.' ३ फळें टिकणें. समुद्रतीरचे माड बहुत धरतात.' ४ गर्भार राहणें; गाभण असणें (जनावर). ५ गात्र विकृत होणें; अंग लुलें पडणें; हालेना-चालेनासें होणें. 'माझे वायूनें हातपाय धरतात.' 'गांवोगांव गुरें धरलीं.' ६ स्मरणांत राहणें; 'तुम्ही गोष्ट सांगितली परंतु मला धरली नाहीं. ' ७ ठरली असणें; निश्चित केली जाणें. 'ब्राह्मणाला स्नान धरलें आहे.' 'ज्वरास लंघन, पित्तास अन्य उपचार धरला आहे.' ८ वारणें; निवारली जाणें (पाऊस, थं -कपड्यानें, घोंगडीनें). 'घोंगडीनें पाऊस धरत नाहीं आणि पासोडीनें थंडी धरत नाहीं. ९ थांबणें; स्थिर राहणें. 'तर्हीं रणमदें मातलें । राऊंत धरतीचिना ।' -शिशु ९७१. [सं. धृ]
धरणकरी
पु. धरणें धरून बसणारा (कर्जवसुलीसाठीं,) धरणेकरी-दार. धरण खांब-पु. १ घराच्या जमीनीपासून आढ्यापर्यंतचा खांब; धारण. २ (ल) कुटुंबाचा आधारस्तंभ; पोषणकर्ता; कर्तामाणूस.
धरणखांब
पु. १. घराच्या जमिनीपासून आढ्यापर्यंतचा खांब; धारण. २. (ल.) कुटुंबाचा आधारस्तंभ; पोषणकर्ता; कर्ता माणूस.
धर्ता
वि. १. धारक; धारण करणारा; बाळगणारा. २. पकडणारा; धरणारा. [सं. धृ]
धुने
सक्रि. धारण करणे : ‘अवसे पुढिलीये बीजे…फुलौरा धुनीत।’ - रुस्व ४८९.
धुरधुरणें
धुरा धारण करणे, अग्रभागी राहणे (ज्ञानेश्वरी अध्याय १५, ओवी १७२)
ध्वंस, ध्वंसन
पुन. (मोडणें, फुटणें, जळणें इ॰ कारणा- मुळें एखादा पदार्थ इ॰कांचा झालेला) नाश; नासाडी; निर्दळन; जमीनदोस्त होणें, करणें. 'जनाज्ञानांधकाराचा ध्वंस करण्याची परम दीक्षा धारण करून.....' -नि २१. 'मी गेलों तर मागें संसाराचा ध्वंस होईल.' [सं. ध्वंस् = नाश करणें]
गाभ
पु. १ गर्भ (विशेषतः पशूचा). २ मध्य; गाभा. [सं. गर्भ; प्रा गब्भ; फ्रें. जि. खबनी = गर्भार] गाभटणें, गाभ- डणें-अक्रि. गाभ सांडणें पहा. दुवेतणें, गर्भपात होणें. -शे ३०४. ॰सांडणें-टाकणें-१ विणें; गर्भ पडणें. २ पूर्ण काल होण्यापूर्वीं विणें. गाभास जाणें-१ गर्भ धारण करणें. २ विणें; प्रसवणें.
गदा
स्त्री. १ लांब दाड्याचें व टोंकास मोठा गोल जोडलेलें एक प्राचीन आयुध; लोखंडी अर्गळा. 'भीमाला आणुनि दे वृषपर्व्याच्या गदात्तम गदेतें ।' -मोसभा १.६. २ काब. मग लोहदंड गदा घेऊन । दैत्यास मारी मल्लिकार्जुन ।।' ३ (ल.) घाला; हल्ला; धाड (क्रि॰ येणें, आणणें). 'मूळ व्यापारावर इंग्रजानीं गदा आणली.' -के १७-६-३०. ॰धर-वि. गदा धारण करणारा; विशेषतः विष्णु [सं.] ॰युद्ध-न. गदनें करावयाचें परस्पर युद्ध. [सं.]
गहाणदार
वि. तात्पुरते गहाण धारण करणारा; ज्याच्याकडे गहाण आहे तो (इसम).
गंडस्फाटन
न. कपाळमोक्ष; कपाळ फुटणे : ‘आमची पाचाची धारण बसली; गंडस्फाटनच जाले’ - पेद ३२·१९३.
गंडस्फाटण
न. [चुकीनें गांड फाटणें] कपाळमोक्ष; कपाळ फुटणें. 'आमची पंचाची धारण बसली; गंडस्फाटणच जाले.' -पेद ३२.१९३. [गंड = कपाळ; स्फाटण-स्फोटण = भेद]
गोथा
वि. धुरा धारण करणारा; पुढारी; सेनापती; खासा.
गोवर्धन
पु. १. मथुरेजवळची टेकडी. इंद्राने पाडलेल्या पावसापासून गोकुळाच्या रक्षणार्थ श्रीकृष्णाने या टेकडीला करंगळीवर धारण केले व हिच्याखाली गोकुळातील सर्व माणसे व पशू सुरक्षित राहिले. २. कार्तिक शुद्ध प्रतिपदेच्या (बलिप्रतिपदेच्या) दिवशी वल्लभसंप्रदायी लोक भात, शेण, भाजीपाला वगैरेंचा गोवर्धनासारखा पर्वत करून ज्याची पूजा करतात तो. (वा.) गाईच्या तोंडे गोवर्धन निवडणे – पंचायत वगैरे प्रकरणी ज्याचा विषय त्याच्याच तोंडाने वदवून निवाडा करणे.
गर्भगळीत, गर्भगिळीत, गर्भगीळ
वि. १. जिने गर्भ टाकला आहे किंवा जिचा गर्भगळाला आहे अशी. २. (ल.) ज्याची पाचावर धारण बसली आहे असा; घाबरा; भ्यालेला.
घाबरत
भीत, रडत, गाळण उडत, भयभीत, धडकी भरली, घाम फुटला, त्रेधातिरपीट, पांचावर धारण बसली, विजार भिजली, पोटांत वायगोळा उठला ! कसलें काय नि कसलें काय ! भीतीनें ओठ पांढरे पडले, थरकांप उडाला, त्-त्त-पप्पची वेळ आली, फें फें उडाली.
घालपिसे
न. वेडाचे ढोंग; बाह्यात्कारी धारण केलेला बावळेपणा, खुळेपणा.
घेणे
सक्रि. १. मनात आणणे, बाळगणे, ठेवणे (शंका, संशय, तिरस्कार इ.) : ‘मागे हांसति गौळणी हरिपुढें ह्या घेतलीसे भ्रमें ।’ – आकृष्ण ३८. २. आविर्भाव आणणे, पांघरणे; लटके धारण करणे (वेड, सोंग इ.).
घनीभूत
वि. गोळ्याच्या, लगडीच्या रूपाने असलेले; घट्ट झालेले; आकार धारण करणारे : ‘नानाघनीभूत सुवर्ण । जैसें न्याहाळितां साधारण ।’ –ज्ञा १¿४४. [सं.]
घोडसटवी
स्त्री. १. उग्र स्वरूप धारण केलेली देवी. (क्रि. लागणे.) २. घोडी व्याल्यापासून सहाव्या दिवशी करायची सटवीची पूजा. (वा.) एखादीला घोडसटवी लागणे – १. घोडसटवीप्रमाणे उग्र व विक्राळ दिसणे. २. घोडसटवीची बाधा होणे.
घराचा खांब
घराचा खांब m घराचा धारण m घराचें पांघरूण n Terms for the supporter or main prop of a household or family.
घराचा खांब gharācā khāmba m घराचा धारण m घराचें पांघरूण n Terms for the supporter or main prop of a household or family.
हातियर परिजता
शस्त्र धारण करणारा, शस्त्र उगारणारा (ज्ञानेश्वरी अध्याय १०, ओवी २५५)
इनामदार
पु. इनाम धारण करणारा; इनामी जमिनीचा मालक; वतनदार. [फा.]
इटेकरी, इटेबरदार
पु. इटा हत्यार धारण करणारा, बाळगणारा शिपाई.
जिलाब, जिलब
स्त्री. १ समुदाय; लवाजमा; परिवार; इतमाम. २ स्वारी; मिरवणूक (राजा किंवा देव यांची, यांत कोतवाली घोडे, ईटवाले, बोथाटीवाले, बंदुकवाले, भालाईत, सांगवाले, आणि बाणाईत अस सहा प्रकारचे लोक असतात, शिवाय कोतवाली घोडेहि असतात). 'श्रीमंताची भेट घेतली जिलीब चाले मोहरें ।' -ऐपो २८६. [फा. जिलव्, जिलबी] ॰दार-पु. जिलीबमधील माणूस; नोकर; हुजर्या. ॰हुद्दे-पुअव. वरील ईट इ॰ सहा प्रकारचीं शस्त्रें धारण करणारे हुद्देदार. जिलबीस-क्रिवि. स्वारींत पुढें. जिलबीचा घोडा-पु. कोतवाली घोडा.
जिलीबहुद्दे, जिलबहुद्दे
पु. अव. ईटवाले, बोथाटीवाले, बंदूकवाले, भालाईत, सांगवाले, बाणाईत इ. सहा प्रकारची शस्त्रे धारण करणारे हुद्देदार.
जीन
पु. (जीव.) आनुवंशिक गुणधर्म धारण करणारा गुणसूत्राचा लहानसा विशिष्ट भाग. [इं.]
जिणगाणी, जिनगानी, जिनगी
स्त्री. १ जगणें; प्राण धारण रूप स्थिति; जन्म; जीवित्व; अस्तित्व. 'थू त्येच्या जिन- गानीवर.' -गड आला पण सिंह गेला. २ उपजीविका; उदरनिर्वाह. ३ मालमिळकत; इस्टेट; पुंजी; ऐवज (जमीनजुमला, वतनवाडी विर- हित) जिंदगी पहा. 'एकदां दत्तविधान झालें म्हणजे झाडून सार्या जिनगाणीवर आपला कबजा बसलाच ...' -नि ६४०. ४ अब्रू. [फा. झिंदगानी, झिंदगी]
जमीनधारणा
स्त्री. जमीन धारण करणे, जमिनीवर ताबा असणे.
जोकमार
पु. एक क्षुद्र देवता; कामण्णा; कर्नाटक प्रांतांत भाद्रपद शु।। ८ पासून एक पुरुषाकृति मातीचें चित्र बृहत्शिस्न असलेलें व तरवार धारण केलेलें तयार करून टोप- लींत ठेवून गांवांत घरोघर फिरवितात व ज्वारी कपडे वगैरे भीक मागतात. याचा जन्म तराळाचे घरीं व मृत्यु परटाच्या धुण्याच्या दगडावर होतो व परीट सुतक धरतो. या दिवसांत म्हणजे शु।। ८ पासून १५ पर्यंत लहान मुलींचे कडेदोरे तोडून टाकतात व नंतर बळकव्वा देवीपुढें मुलांस नेऊन तिची ओटी भरून मग कडदोरा बांधतात.
जट्याळ
वि. जटा धारण करणारा : ‘जट्याळ गाट्याळ मिळती राशी । केवीं साधुत्व त्यासी मानूं आम्ही ।’ –एभा ५·१७९.
कामरूप
न. इच्छेप्रमाणे धारण करता येणारे रूप.
कात
स्त्री. सापाने टाकलेली त्वचा, मेंग. हे एक प्रकारचे कातडेच आहे. (क्रि. टाकणे.) [सं. कृत्ति = त्वचा] (वा.) कात टाकणे - पुन्हा ताजातवाना होणे; नवे रूप धारण करणे : ‘दादरचा लेडी जमशेटजी रोड झपाट्याने कात टाकीत होता.’ - कलंदर २. कातीला येणे - कात टाकायच्या स्थितीला येणे; वृद्ध होणे.
कडे
शअ. १ बाजूला; दिशेला. 'हातीं धरुनि तियेसी । कडे काढी व्योमकेशी ।' -गुच ३३.११०. 'यंदा तुमच्या कडे धारण कशी आहे?' २ पाशीं; जवळ; ताब्यांत; हातांत; हाताखालीं; दिमतींत; व्यवस्थेत. 'त्याजकडे शंभर शिपाई आहेत.' ३ आंत; खालीं संबंधी; निसबत. 'हा पागेकडे चाकर आहे.' ४ हवालीं; स्वाधीन (करणें, देणें). 'ज्याचें त्याकडे दे.' ५ पक्षाला; वांट्याला. 'सरदारांनी तलवार मारावी, परंतु यश धन्याकड;' कौरव-पांडवांच्या युद्धांत श्रीकृष्ण पांडवांकडे गेला.' ६ हातांत; पाशीं; जवळ. 'त्याकडे माझे रुपये आहेत.' ७ (ल.) पलीकडे; पार. 'स्वामी तारका गुरुनाथा । संसारसागराकडे लावी ।' -गुच ४५.१०६. ८ जबाबदारी; पत्कर. 'हें काम माझ्याकडे लागलें.' ९ (कुण.) काळ, वेळ यासंबंधीं निरर्थक अव्यय; स; ला. 'तूं उद्यांकडे मला भेट.' [का. कडे; म्. कड]
कमाणमारी, कमानमारी
वि. धनुर्धारी; धनुष्यबाण धारण करणारा; तिरंदाज.
कंक
पु. १. बगळा; करकोचा; क्रौंच. बाणाच्या शेवटी याची पिसे लावीत असत : ‘कंक गोमायु मांसभक्षक ।’ – मोआदि. २. अज्ञातवासात धर्मराजाने (पांडव) धारण केलेले नाव. ३. क्षत्रिय. यावरून मराठ्यातील एक आडनाव. उदा. येसाजी कंक. [सं.]
कुळारग
पु. १ खेड्यांतील जमीनदार, वतनदार (समु- च्चयानें); शेतसारा देणारीं कुळें; वतनदार कुळांचा वर्ग, समुदाय २ (गो.) देणेदारांची यादी, जंत्री. -स्त्री. १ कुळांपासून येणें असेलली रक्कम. 'आमची दहा रुपये कुळारग बुडाली.' २ कुळांना आगाऊ दिलेला पैसा. ३ त्यांना आगाऊ पैसे देणें, पैसे वसूल करणें इ॰ व्यवहार, प्रकार. 'आम्ही दहा हजार रुपयांची कुळारग केली.' कुळारगी असेंहि रूप आढळतें. ४ (क.) कुळाकडे विशिष्ट हक्कानें असलेली कायमची जमीन. 'कुळारग व खासगी मिळून पांच बिघे जमीन आहे.' कुळारग वार-वर्ग पहा. -वि. (राजा.) सरकारच्या अधिकाराखालीं शेतकर्यांनीं, कुळांनी वसविलेला (गांव); याच्या उलट खोतीचा (गांव); कुळाकडे असलेली (जमीन) खोतीची नव्हे अशी. [कूळ + आकर-? आगर- आरग] ॰गांव-न. कुळारगीगांव, ज्यांतील सर्व जमिनी कौल- दारांनीं धारण केल्या आहेत व ज्यांची वहिवाट गांवकर्यांच्या संमतीनें गांवकामगार पाहतात तो गांव. ॰पट्टी-स्त्री. कुळवार पट्टी. ॰वार-वर्ग-क्रिवि. प्रत्येक कुळामागें; दर कुळागणीक (खेड्यांतील शेतकर्यांच्या). (याद करणें, वसूल करणें-घेणें, पट्टी, वांधा, हिशेब, बाकी, शेतें इ॰ शीं योजला जाणारा शब्द).
कुळारगी, कुळारगी गाव
वि. ज्यातील सर्व जमीन भाडेपट्ट्याने दिली असून वा ज्या गावातील सर्व जमिनी कौलदाराने धारण केलेल्या असून, ज्याची वहिवाट वा कारभार गावकऱ्यांच्या सहकार्याने गावाचा अधिकारी वर्ग चालवतो असे. (गाव.)
कुमळे
न. १. मिराशीने धारण केलेल्या जमिनीचा खंड, भाडे (कु.) २. नारळ सोलण्याचे भाल्यासारखे, हत्यार; उत्कड. (गो.) २. एक प्रकारची मापाची पद्धत.
कुमळें
पु. १ (कु.) मिराशीनें धारण केलेल्या जमिनीचा खंड, भाडें. २ (गो.) नारळ सोलण्याचें भाल्यासारखें एक हत्यार; उत्कड. ३ एक प्रकारची मापाची पद्धत.
कुणबाव, कुणबावा
पु. १. कुणब्याचे काम; शेती, शेतकी : ‘कुणबाव निर्मिला देवांनीं ।’ - दावि ३४७. २. सरकारला ठरावीक रक्कम - सारा देण्याचे कबूल करून वंशपरंपरा जिंदगीप्रमाणे धारण केलेली वतनी जमीन; अशा तऱ्हेची पद्धत; अशा जमिनीचा द्यावयाचा धारा. ३. पीक.
कुणबाव-बावा, कुणबावा
पु. १ कुणब्याचें काम; शेती; शेतकी. 'कुणबाव निर्मिला देवांनीं' -दावि ३४७. २ सर- काराला ठराविक रक्कम-सारा देण्याचें कबूल करून वंशपरंपरा जिंदगीप्रमाणें धारण केलेली वतनी जमीन, अशा तर्हेची पद्धत; अशा जमिनीचा द्यावयाचा धारा. [कुणबी]
कुंती
पु. भाला धारण करणारा योद्धा; भालाईत : ‘जीस असुख सह्य गमे दे जें भेदूनि हृदय कुंती तें ।’ - मोउद्योग ७·४१
कुंती
पु. भाला धारण करणारा योद्धा; भालाईत. 'जीस असुख सह्य गमे दे जें भेदूनि हृदय कुंती तें' -मोउद्योग ७.४३. -स्त्री. पांडवांची माता. 'विदुरासि भेटल्यावरि भेटे सर्वाप्तराज कुंतीतें ।' -मोउद्योग ७.४३.
कुपीण, कुपीत, कुपीन
स्त्री. लंगोटी; काचा; कौपिन. (क्रि. नेसणे) (वा.) कुपीण, कुपीत, कुपीन लावणे - कौपिन धारण करणे. : ‘.... रागे भरून सिरवा तोडली आधि धोत्रा फाडून कुपीत लाविला.’ - ज्यू १३७. [सं. कौपीन]
कूळ
न. १. कौलदार; खंडकरी; पट्ट्याने जमीन धारण करणारा (सरकारची किंवा शेतमालकाची) २. धनकोचा (सावकाराचा) ऋणको; आरोपीचा जामीन; वैद्याचा रोगी; वकिलाचा पक्षकार; आश्रयदात्याचा पोष्य; ज्याने द्रव्यादी देणे द्यायचे आहे तो; आश्रित (म्हणजे ऋणको, जामीन, रोगी इ.) २. सामान्यतः सरकारला सारा देणारा असामी, असाम्या. ४. गिऱ्हाईक; इसम; व्यक्ती. (गो.) ५. शेतकरी इतर अर्थ व सामासिक शब्द पहा : कुळ [क. कुळ = कर देणारी व्यक्ती]
कूळ
न. १ कौलदार; खंडकरी; पट्ट्यानें जमीन धारण करणारा (सरकारची किंवा शेतमालकाची). २ धनकोचा (सावकाराचा) ॠणको; आरोपीचा जामीन; वैद्याचा रोगी; वकिलाचा पक्षकार; आश्रयदात्याचा पोष्य; ज्यानें ज्याचें द्रव्यादि देणें आहे तो; आश्रित (म्हणजे रिणको, जामीन, रोगी इ॰). ३ सामान्यतः सरकारास सारा देणारा असामी, असाम्या. इतर अर्थ व सामा सिकशब्द 'कुल' शब्दामध्यें पहा. ४ (गो.) गिर्हाईक; इसम; व्यक्ति. सामाशब्द- ॰घडणी-स्त्री. प्रत्येक कुळाची जमीन, साधनसामुग्री, लाग, लागवड व सारा इत्यादि दाखवीणारें, कुळ- कर्ण्यानें तयार केलेलें सरकारी पत्रक, तक्ता. ॰जमा-स्त्री. १ गांव किंवा जिल्ह्यांतील कुळांपासून येणार्या सार्याची रक्कम. २ सावकारानें कुळास किंवा शेतकर्यास कर्जाऊ दिलेली रक्कम. ॰झाडा-पु. गांवांतील खंडकरी किंवा कौलदार यांचा तक्ता. ॰पट-पट्टा-पु. कौलनामा; खंडपत्र. ॰पैसा-पु. कूळजमा अर्थ २ पहा. ॰भरणा-पु. (व्यापक) शेतकरी किंवा कुळें; याच्या उलट अडाणकबाड. ॰रुजुवात-स्त्री. १ कुळानें सरकारी खजिन्यांत भरलेल्या पैशाची चौकशी करून रुजुवात घालणें. २ अशा रीतीनें काढलेला निर्णय. (क्रि॰ करणें; घेणें; पहाणें). ॰वर्ग-पु. १ कुळघडणीच्या अनुरोधानें कुळें अथवा रयत यांच्या जमीनजुमल्यासंबंधानें किंवा त्यांचेकडून येणें असलेल्या पैशाबद्दलचें वर्गीकरण दाखविणारें वार्षिक पत्रक-तक्ता. २ एकाच कुळाचें वरीलप्रमाणें पत्रक-तक्ता. (समासांत) कुळवर्गपट्टी-जमा- बंदी-वसूलबाकी इ॰. ३ कुळारग पहा. ॰वार-क्रिवि. कुळांच्या अनुक्रमाप्रमाणें दर किंवा हर कुळागणिक. याच्या उलट थळ- वार. (समासांत) कूळवार पावत्या-पाहणी-फाजील-वसूल-बाकी-रुजुवात; त्याचप्रमाणें कूळवार-पत्रक-झाडा. ॰वारी, कुळवारी-स्त्री. कुळांचा तक्ता.
कुवारखांब
पु. (बें.) आढें तोलून धरणारा उभा खांब; धारण.
कुवारखांब
पु. आढे तोलून धरणारा उभा खांब; धारण. (बे.)
कवच
पुन. १ कठिण आवरण; बाह्य आच्छादन; फळाची जाड साल; कठिण त्वचा. २चिलखत; अंगत्राण; शरीराचें संरक्षण करणारें एक प्रकारचें पोलादी किंवा चामड्याचें वगैरे साधन. 'जैसें वज्र कवच लेइजे । मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे ।' -ज्ञा २.२३२. 'गोवळीं यश नेलें अमुचें । म्हणोनि कवचें बाणलीं ।' -एरुस्व ८.१०. ३(ल.) कोणतेंहि आच्छादन; प्रावरण; रक्षणसाधन. 'अग्नि ऐसें आहाच । तेजा नामाचें आहे कवच' -ज्ञा ७.३६. नातरी सर्पें कवच सांडिलें' -ज्ञा ८.६६. ४झाडाच्या सालीवर अगर कागदावर मंत्र किंवा तोडगा लिहून हातांत अगर अंगावर धारण करतात तो. ५मंत्रांतील र्हां, र्हीं इत्यादि बीज अक्षर. ६मारुती अगर देवी यांच्या मूर्तीवरील शेंदुराचा थर. हा कांहीं दिवसांनीं सुटून पडल्यास देवानें कवच टाकलें असें म्हणतात. ७ टणक आच्छादन; टरफल; कठिण त्वचा. 'अंड्यावरील कवच' [सं.] ॰टाकणें -क्रि. १कात टाकणें (सापानें). 'नातरी सर्पे कवच सांडिलें ।' -ज्ञा ८.६६. २(ल.) पुनरुज्जीवन होणें; नवा उत्साह येणें; दुखण्यांतून उठणें. ३मूर्तीवरील शेंदुराचा लेप, थर पडणें. ॰कुइरी-ली, ॰कुहिरी-ली-स्त्री. काचकुइली; खाजकुइली- कुइरी. ॰धर वर्ग-वाशी -वि. गोगलगाय, खेकडा, शेंवडे, झिंगे, कांसव या वर्गांतील प्राणी. संधिपाद प्राणी. ह्यांतील; बहुतेकांना शिंगासारखे चार अवयव व दहा पाय असतात. छाती व डोकें मिळून एकच भाग असून मागें पोट असतें. पाठीवर कवचासारखी कठिण कातडी असते. ॰बीज-न. खाजकुइरीचें बीं; हें औषधी आहे.
कवच, कवक
पु. न. १. कठीण आवरण; बाह्य आच्छादन; खोळ; फळाची जाड साल; कठीण त्वचा; सापाची कात. २. चिलखत; अंगत्राण; शरीराचे संरक्षण करणारे एक प्रकारचे पोलादी किंवा चामड्याचे वगैरे साधन : ‘जैसें वज्रकवच लेइजे । मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे ।’ - ज्ञा २·२३२. ३. (ल.) कोणतेही आच्छादन; प्रावरण; रक्षणसाधन : ‘अग्नि ऐसें आहाच । तेज नामाचे आहे कवच ।’ - ज्ञा ७·३६. ४. (वै.) मज्जारज्जूभोवती असणारे दृढ आवरण. ५. झाडाच्या सालीवर अगर कागदावर मंत्र किंवा तोडगा लिहून हातात अगर अंगावर धारण करतात तो. ६. मंत्रातील ऱ्हां, ऱ्हीं इत्यादी बीज अक्षर. विनाशक शक्तींपासून रक्षण करणारे मंत्रसामर्थ्याचे आवरण. ७. मारुती अगर देवी यांच्या मूर्तीवरील शेंदराचा थर. हा काही दिवसांनी सुटून पडल्यास देवाने कवच टाकले असे म्हणतात. सापाची कात. ८. (स्था.) वाडे किंवा किल्ले यांच्याभोवतीची संरक्षक भिंत. [सं.] (वा.) कवच टाकणे - १. कात टाकणे (सापाने) : ‘नातरी सर्पे कवच सांडिलें ।’ - ८·६६. २. (ल.) पुनरुज्जीवन होणे; नवा उत्साह येणे; दुखण्यातून उठणे. ३. मूर्तीवरील शेंदराचा लेप, थर पडणे; खीळ पडणे.
खाल(लि)सा
पु. १ साक्षात् सरकारपासून धारण केलेली अथवा जिच्या वसुलाचा सरकार एकटेंच मालक आहे अशी जमीन, गांव, अथवा प्रांत. २ खोताच्या अभावीं सरकारनें वहिवाटलेल्या जमिनी; जहागीर किंवा इनाम नसलेली जमीन. 'नैबानें कुल बिसादी लुटून खालसा केली.' -रा १५.१३. ३ सरकारजप्त जमीन, गांव. ४ संस्थानाच्या अंमलांतील नसून इंग्रजसरकारचे अंमलाखालील गांव, जमीन. 'मोंगल अंमलांत सांपडलेला महाराष्ट्र, खालसा महाराष्ट्रापेक्षां अधिक दुर्दैवी.' -के १७।५।१९३०. ५ मिरासी खेरीज सरकारच्या वहिवाटीला असलेली कीर्दसार जमीन. -गांगा १३.६ मुसलमानी अमदानीं- तील जमाबंदी खातें. -वि. १ खास सरकारी (जमीन, सैन्य, तोफखाना इ॰). २ संस्थांनी नव्हे असा (प्रांत, जमीन इ॰). ३ सरकारजमा, जप्त. [फा. खलिसा] ॰मुलुक-पु. इंग्रज सर- कारचा प्रांत
खाते
न. १. शासनाचा विशिष्ट विभाग. जसे:- पोलिसखाते, महसूलखाते, गृहखाते. २. रोजकीर्दीवरून तयार केलेला, खतावणीवर दिसणारा किंवा खतावणीवरून काढलेला आणि केलेला हिशोब. (व्यक्तीचा किंवा काम, धंदा यांत घातलेल्या भांडवलाचा); जमाखर्चाची नोंद. ३. असा स्वतंत्र हिशोब दाखवणारा कागद, वही; ४. (ल.) टप्पा; पोहोच; आटोका; आवाका; प्रांत; हद्द (सत्ता, अंमल, शासन यांची) ५. प्रांत; कार्यक्षेत्र; कचेरी; काम; प्रकरण. ६. खातेदाराने धारण केलेला जमिनीचा तुकडा. ७. उधारीचा जमाखर्च; देणेघेणे. [सं. क्षत्रम्] (वा.) खाते ठेवणे - देण्याघेण्याचा व्यवहार चालू ठेवणे.
खातेदार
पु. १. कूळ खेरीज करून दुमाला नसणारी जमीन प्रत्यक्ष धारण करणारा. २. व्यापाऱ्याकडे, वाण्याकडे खाते असणारा.
खिचडी
स्त्री. १. तांदूळ व डाळ एकत्र शिजवून केलेला पदार्थ; साबुदाण्यात भुईमुगाच्या दाण्याचे कूट मिसळून शिजवून केलेला पदार्थ. २. पंचभेळ (निरनिराळी धान्य किंवा भिन्नभिन्न नाणी इ.); सरमिसळ. ३. गीतांबील. ४. (ल.) ज्या गावातील जमिनीचा एक भाग धारेकऱ्याने व एक भाग खोताने धारण केला आहे असा गाव. ५. गर्दी, दाटी. [क. किच(च्च)डी]
खिचडी
स्त्री. १ तांदूळ व डाळ (बहुदा मुगाची) यांची मिसळ (शिजविलेली किंवा बिन शिजविलेली) २ पंचभेळ (निर- निराळीं धान्यें किंवा भिन्नभिन्न नाणीं इ॰ यांची); खिचडमि- चड; गोतांबील; 'श्रीमंतानीं मोहरा-पुतळ्यांची खिचडी वाटली.' ३ ज्यांतील जमीनीचा एक भाग धारेकर्यानें व एक भाग खोतानें धारण केला आहे असा गांव. ४ गर्दी; दाटी. 'यात्रे- मध्यें अनेकजातीय मनुष्यांची खिचडी असत्ये, यामुळें विटाळ होतो.' [दे. प्रा. खिच्च' हिं. खिचडी; सिं. खिचणी; गु. खिचडा; तुल॰ सं. कृसर] ॰वांगी-अव. तुरीच्या डाळीचें पीठ, चण्याचें पीठ व वांगीं यांची भाजी. -गृशि १.४०. ॰बिचडी- स्त्री. अंदाधुंदी; गोंधळ. [खिचडी द्वि.]
खंडा
पु. रुंद पात्याची, दुधारी सरळ तलवार, खड्ग; खांडा पहा. 'खंडा पट्टा सुरे तिरकमान कटार लावून ।' -ऐपो १०९. [सं. खड्ग] ॰ईत-वि. खड्गधारी; खंडा धारण करणारा.
खंडाईत
वि. खड्गधारी; खंडा धारण करणारा.
खंणी
स्त्री. ‘धारण’ - (तंजा.)
खरपड
खरपड kharapaḍa n sometimes खरपाड n sometimes खरपट n (Imit. of the sound of vessels striking against the bottom and sides of an empty well.) A general outcry of difficulty and distress (from want of rain, and thus, from the failure of the crops, the consequent dearth, and the dryness of the tanks and wells). v पड g. of s. Ex. पाण्याचें ख0 पडलें; साल गुदस्तां धान्याचें ख0 पडलें; ख0 पडलें अतिदारुण ॥ दोन पायल्याची झाली धारण ॥. 2 A crag &c. See खरपट n.
खरपट-ड
न. १ (रिकाम्या विहिरीच्या बाजूला अथवा तळाला भांडें आपटल्यानें होणारा आवाज, त्यावरून) अडच- णीची, दुःखाची, हालाची ओरड, हाकाटी (अवर्षणामुळें आणि त्यामुळें पीक न आल्यास उत्पन्न झालेल्या दुष्काळामुळें, तसेंच तळीं, विहिरी यांच्या कोरडेपणामुळें). २ दुष्काळ; अवर्षण. (क्रि॰ पडणें). 'एखादे सालीं खरपड पडलें...म्हणजे तितक्यानेच त्यांची नुकसानी होते. ' -बाळ २.१२८. 'खरपड पडलें अति दारुण । दोन पायल्यांची झाली धारण ।' [सं. क्षर् + पत्]
लेइणें, लेणें
सक्रि. धारण करणें; घालणें; धरणें; नेसणें. 'आपुलेनि सुकूमारपणें । हे न ले परागाचें लेणें ।' -शिशु ६९०. [हिं.]
लेजणें
सक्रि. घातला जाणें; धारण केला जाणें. 'कां हीर कंकण न लेजति बायकांहीं ।' -आसु ५८. [लेणें]
लेवविणें
सक्रि. चढविणें; घालणें; धारण करविणें. 'लेवविलीं पांचपुडी आंगलीं ।' -शिशु ९१. [सं. लेपन]
लीला
लीला līlā f (S) Sport, diversion, pastime or play in general. 2 (Abridged from लीलावतार q.v. infra.) An incarnation of Vishn̤u. Hence लीला- धारण Assumption of an incarnation, and लीला- धारी Assumer of &c.
लटकणें
अक्रि. १ (वरच्या आधारानें) लोंबणें; ओथंबणें. २ हिलगणें; अधांतरीं लोंबणें; लोंबकळणें. [हिं. लटकना] लट- कत चालणें-नखऱ्यानें ठुमकत चालणें; लचकणें. लटकन-पु. (ना. व.) कंदील; टांगता दिवा. [हिं.] लटकविणें-क्रि. टांगणें; लोंबत ठेवणें. लटकावणें पहा. लटकावणी-स्त्री. टांगणी; लोबंणी; लटकत ठेललेली स्थिति. लटकाव(वि)णें-क्रि. १ टांगणें; लोंबत ठेंवणें. २ ऐटीनें, झोकांत अंगावर घेणें, धारण करणें (पागोटें, शाल, दागिना). ३ पटकाविणें; आत्मसात् करणें; लांबविणें (दुसऱ्याचा माल). [हिं. लटकाना]
ल्याणें, ल्याइणें
न. लेणें; अलंकार. -सक्रि. (दागिना, वस्त्र, इ॰) अंगावर धारण करणें; लेणें. 'अळंकार ल्याइले अनेक ।' -मुआदि ४६. ६. [लेणें]
माच
पु. १ माचोळी; माळोंचा; माचा. २ माळा; मांडव; सोपान. 'कीं प्रासादाचेनि मीषें । आकाशा मांच बांधले जैसें ।' -ऋ १६. 'नातरी संहारतेजाचिया ज्वाळा । तोडोनि माचु बांधला अंतराळां ।' -ज्ञा ११.३०३. ३ (को.) पेंढा, गवत, सर्पण इ॰ ठेवण्यासाठीं जमिनीवर धोंडे मांडून किंवा मेढी पुरून त्यांवर आडवींउभीं लांकडे घालून केलेला माळा. ४ आश्रय. ५ ठिकाण. ६ (व.) माकण (पाणी आणण्याची) ७ (व.) आढी (आंबे इ॰ पिकविण्यासाठीं घातलेली). 'आंब्याचा माच' ९ खाट; पलंग. [सं. मच् = धारण करणें; सं. मंच] माचण-स्त्री. लहान माचा.
माहि-ही
स्त्री. छत्र; उंच छत्री. -शर. 'माहि मेघडंब्रें सूर्यापानें ।' -दा ४.५.२०. -पु. मत्स्य वगैरे सन्मानदर्शक चिन्ह; मकरध्वज. 'माहि मोर्तबे तगटी ढाला ।' -सप्र २१.४३. ॰दार- वि. १ माशाचें चिन्ह असलेले निशाण धारण करणारा; मकरध्वजी. २ छत्रधर. [फा.] ॰म(मु)रातब-पु. १ मत्स्य व सोन्याचे दोन गोल मिळून होणारें व हत्तीवरून मिरवावयाचें बहुमानाचें चिन्ह. हा मान फक्त राजांना व मातबर सरदारांना मिळालेला असतो. २ मोगल बादशहाकडून महादजी शिंद्यांनी पेशव्यासाठीं आणिलेलीं सन्मानचिन्हें दोन मुखवटे व दोन अब्दागिऱ्या मिळून मिरवावयाचें एक राजचिन्ह. [फा. माही मगतिब] माही(हि) मोर्तब-न. अलंकार; सरंजाम. 'सरज्या तोरड माहीमोर्तव शिवा- जीला ।' -ऐपो २२. [फा.]
मैळें
न. (महानु.) वस्त्र. 'तया अनुरागाचेया चोळे । रापे ईंद्रियांचे मैळें ।' -भाए ७९६. [सं. मल् = धारण करणें]
माल्हातणें
आश्रय करणे, धारण करणे (ज्ञानेश्वरी अध्याय १४, ओवी १७९)
मालिक मक्बुझा
पु. मध्यप्रांतांत जमीन धारण करण्याची एक पद्धति.
मालकी पद्धति
स्त्री. खेडा जिल्ह्याच्या थासरा ताल क्यांत आढळणारी एक जमीन धारण करण्याची पद्धति. या पद्धतींत मालक सांगतील ते तलाठी सरकानें नेंमावयाचे अस- तात. धार्याच्या उत्पनांतून ७ ते ९ आणेपर्यंत हिस्सा माल- कास मिळतो. शिवाय मालकाकडे कांही सारामाफीची जमीन असते
मौंज
वि. मोळ नांवाच्या गवताचें; मुंज तृणाचें. [सं.] मौंजी-स्त्री. मुंज नांवाचें कटिसूत्र; (मुंज गवताची केलेली असते म्हणून); ब्राह्मणाचें कटिसूत्र; परंतु मुंजविधि किंवा व्रतबंध याजबद्दल सामान्यतः उपयोग; मुंज. र्मौजीबंधन-न. उपनयन; मुंज; यज्ञोपवीत धारण करण्याचा विधि; ब्राह्मणाच्या मुलाचा व्रतबंध विधि. [सं.]
माया
स्त्री. १ सृष्टि निर्माण करण्यास साधनीभूत अशी ईश्वरशक्ति. 'इंद्रो मायाभिः पुरुरूप ईयते' = इंद्र आपल्या मायेनें अनेक रूपें धारण करतो.' -ऋग्वे ६.४७.१८. -गीर २२१. २ सृष्टिप्रपंच; नामरूपात्मक जगत्; जग हें अमूर्त, नित्य, अद्वि- तीय अशा ब्रह्मतत्त्वापासून उत्पन्न झालें असतां तें द्रव्यमय व भिन्नस्थिति आहे अशी त्याच्या स्वरूपाची ऐंद्रजालिकता. पुराणांत मायेवर चेतनधर्मारोप करून तिला स्त्री व ब्रह्म्याची सहधर्म- चारिणी आणि चुकीनें सृष्टीची रचना व विस्तार मानिलें आहे. ३ कपट; कृत्रिम गारूड; ऐंद्रजाल; मोह घालणारी ईश्वराची शक्ति. 'हे आदिपुरुळाची माया ।' -ज्ञा १.२०३. ४ अवस्तूच्या ठायीं वस्तुत्वबुद्धि; मिथ्या कल्पना; अवस्तूच्या ठिकाणी वस्तुत्वाचा भास; खोटा भ्रम. 'पैल जळ हे माया ।' -ज्ञा १३.१०३०. 'तैसी हे जाण माया ।' -ज्ञा २.१४०. ५ नाशवंत रूप. 'म्हणून विकारी किंवा नाशवंत नामरूपासच माया ही संज्ञा देऊन...' -गार २१७. ६ अविद्या; अज्ञान. 'तैसा विश्वस्वप्रेंसी माया । नीद सांडूनि धनंजया ।' -ज्ञा १८.४०५. ७ स्नेह; प्रेम; ममता. 'तेंवि करिल काय माय मायेतें?' -मोअनुशासन ४.३५. ८ दया; करूणा; अनुकंपा. ९ भांग. [सं.] म्ह॰ माया वेडी गू फेडी = काम कितीहि किळसवाणें, नीच असो, तें करण्यास माया प्रवृत्त करते. (वाप्र.) ॰निवारणें-मायेचें पटल घालविणें, दूर करणें. 'कृपादृष्टीनें पाहसी जया । तयाची माया निवारसी ।' ॰सांख- ळणें-अति प्रेम करणें; अपुर्वाई करणें. मायेक गेल, सेवेक चुकलें-(गो.) माया करायला दुसरीकडे गेलें पण त्यामुळें कर्तव्य चुकल्यें. मायेचें तोंड खालीं-निराळें-माया, ममता ही वरपांगी, दिखाऊ नसून, ती प्रकट होण्यापेक्षां अप्रकट रहा- ण्यांतच विशेष आहे; ममता नम्र असते. मायेंत अटकणें- घोंटाळणें-पडणें-फसणें; मायेनें गुंतणें-गोवणें-गुंडा- ळणें-प्रपंचाच्या फेऱ्यांत सापडणें; प्रवृत्तीमार्ग चालविणें. मायेन मगाळणें-(कु.) द्रव, पाझर फुटणें. सामाशब्द- ॰चक्र-न. माये- प्रमाणें मानलेलें पांचभौतिक जग. 'जय जय मायाचक्रचालका ।' [सं. माया + चक्र] ॰जाल(ळ), मायापाश-नपु. १ जग हें पांचभौतिक असून ब्रह्माहून भिन्न आहे असा विश्वास उत्पन्न करणारें, बुद्धि व इंद्रियें यांवर टाकलेलें मायेंचे जाळें. २ मोह. [सं.] ॰तीत-वि. मायाशक्तीच्या पलीकडे गेलेला (सत्पुरुष, ईश्वर). [सं. माया + अतीत] ॰पटल-पडळ-न. मायेचें घुंगट, आच्छा- दन; जग हें वस्तुतः ब्रह्मच असतांना त्यास भिन्न सत्ता आहे असें भासविणारा मायेनें जगास दिलेला आकार व छटा. [सं. माया + पटल] ॰पुर-न. (ल.) शरीर. ॰ब्रह्म-न. मायावेष्टित ब्रह्म. [सं. माया + ब्रह्म] ॰भान-न. मायेचा भ्रम, झापड. 'निरो- पिलें ब्रह्मज्ञान । जेणें तुटे मायाभान ।' -दा ७.१.६१. [सं.] ॰ममता-स्त्री. दया; माया; स्नेह; प्रीति. ॰मय-वि. मायारूप; मायेनें कल्पित. 'मायामय जग सारें अवघे दोन दिवसांचे वारे ।' [सं.] ॰मयविकार-पुअव. प्रापंचिक बदल; रूपांतरें; घडामोड व स्थित्यंतरें होणारा प्रपंच. 'नव्हते मायामय विकार । तेथें झाला स्फुरणगजर ।' ॰रूपी-वि. १ मायिक; फसवणारें रूप, मुद्रा, आकार असलेला. २ कृत्रिम; बाहेरून सुरेख पण आंतून नीच, वाईट; आंत एक बाहेर एक अशा स्वभावाचा (मनुष्य, सचेतन पदार्थ). [सं.] ॰लांघव-न. जगत् हें ब्रह्म- विस्तार नव्हे तर द्रव्यात्मक सृष्टि आहे अशी मनुष्याची वंचना करण्यांत दिसून येणारें मायेचें कौशल्य; अवस्तूच्या ठिकाणीं वस्तुत्वबुद्धि उत्पन्न करणारें मायेचें कौशल्य. [सं.] मायालु- ळू-वि. १ ममताळू; प्रेमळ. २ (ल.) जादुगार. [सं.] ॰वंत- वि. मायामय. ॰वाद-पु. सर्व बाह्य जग असत्, मायारूप असून या जगाच्या बुडाशीं असणारें ब्रह्मतत्व तेवढेंच सत् आहे असें प्रति- पादणारें मत. मायावादाचा पुरस्कार मुख्यत्वें अद्वैतमतवाद्यांनीं केलेला आहे [सं.] ॰वान्-वंत-वि. मायिक (जगत, सर्व दृश्य विषय.) [सं.] मायावी-वि. १ मांत्रिक; गारुडी. २ मायेचा नियंता (जगांत दिसणाऱ्या त्याच्या अद्भुत कौशला- वरून ईश्वरास म्हणतात). ३ खोटा; वरपंगी; कपटी; लबाड (भाषण, वर्तन, मनुष्य). 'हे अविद्या तरी मायावी ।' -अमृ ६.४३. [सं. माया + विन्(प्रत्यय)] ॰वेष-पु. मायिक देह. 'कीं लेउनि माया- मेषींचें लेणें ।' -ऋ ५. मायाळी-स्त्री. प्रेमळ स्त्री. 'तंव कोणी मायाळी रुदंतीसी ।' -दावि ११५. मायि(यी)क-वि. १ ऐंद्रजालिक; मायेनें रचिलेला. २ जगत् हें वस्ततः अमूर्त आणि ब्रह्मस्वरूप असतां तें पांचभौतिक व सृष्ट आहें असें भासवून वंचना करणारा (जग, जडसृष्टि). ३ खोटा; लटका; असत्य; पोकळ. जसें- मायिक कारभार-धंदा-सुख-दुःख-संपत्ति-दरिद्र-बोलणें- रडणें-करणें. 'आणिक नलगे मायिक पदार्थ ।' -तुगा १०७०. ४ माया करणारा. 'यापरी महीतें मायिक । कोणी नसें मज- लागी ।' -नव २४१६६. [सं. माया + इक (प्रत्यय)] मायि- कवृत्ति-स्त्री. वंचितवृत्ति, स्थिति; जडाच्या ठिकाणीं भासणारें सत्यत्व, सृष्टिभिन्नता, ब्रह्म व माया यांच्या ऐक्यत्वाविषयीं भ्रम. 'मायिकवृत्तींचा झणी धरिसी संग । इंद्रियाचा पांग सांडी रया ।' [सं.] मायेक-वि. मायावी, खोटें. -शर. [मायिक] मायेचा अवतार, मायाअवतार-पु. परमेश्वराचा मायिक अवतार (ईश्वराचे सर्व अवतार. कारण आत्मज्ञान लसलेल्या व मूढ अशा माणसात मात्र हे अवतार खरें भासतात). मायेचा गोंधळ- पु. प्रपंच; संसार. मायेचा पदर-पु. प्रेमाचें बंधन बाळगणारा मनुष्य (पुत्र, भाऊ, बांधव, आई, बाप इ॰). मायेचा पदार्थ- मनुष्य-माणूस-पु. स्नेह, प्रीति असलेला मनुष्य.
मेहवासी
स्त्री. गुजराथेंत ज़मीन धारण करण्याची एक पद्धति. मेवासी, मेवाशी.
मळीनलेवा
वि. मलीन वस्त्रें धारण करणारा; मळके कपडे घालणारा; अस्वच्छ वस्त्रांचा. 'एक भवने एक नागवे । वल्कलधारी मळीनलेवे ।' -आरा. अर. ४.४.
मनसब, मन्सब
पु. १ (मुसलमानी अमदानींत) घोड- दळांतील एक अधिकाराची जागा. २ अमुक इतक्या घोडेस्वारांचें पथक पदरीं ठेवण्याचा अधिकार. ३ या हुद्द्याच्या दिमतीसाठीं दिलेली जहागीर. [अर. मन्सब्] ॰दार-पु. मनसब धारण करणारा अधिकारी; एक लष्करी हुद्देदार. [फा. मन्सब्दार्]
मत्स्य
पु. १ मासा; मच्छ; एक जलचर प्राणी. २ एकमेकांना छेदणाऱ्या दोन वर्तुळांत समान असा भाग. ३ मनुष्याच्या तळ- हातावर किंवा तळपायावर रेषांची बनलेली विशिष्ट आकृति. हें चांगल्या नशिबाचें लक्षण समजतात. ४ तीळ (मनुष्य इ॰च्या शरीरावरील). ५ विष्णूचा पहिला अवतार. [सं.] ॰घ्न-पु. मासे मारणारा; धीवर. 'तो मत्स्य मत्स्यघ्न विदारी । तंव लोह निघे त्याचे उदरीं ।' -एभा १.३८४. ॰जयंती-स्त्री. विष्णूनें ज्या दिवशीं मत्स्यावतार धारण केला तो दिवस; चैत्र शुद्ध प्रतिपदा. [सं.] ॰देश-पु. कानपूर, मिरजापूर इ॰ प्रदेश. -अश्वप १.३४. ॰पुराण-न. अठरा पुराणांपैकीं एक. ॰यंत्र-न. १ मच्छयंत्र पहा. २ मासा बसविलेलें, फिरतें वेधण्याकरितां केलेलें यंत्र. मत्स्यावतार-पु. विष्णूच्या दहा अवतारांपैकीं पहिला. [मत्स्य + अवतार] मत्स्यासन-न. पद्मासन घालून नंतर तसेंच पाठीवर उताणें निजणें व हाताचा कवा घालून डाव्या हातानें उजव्या हाताचें बावखड व उजव्या हातानें डाव्या हाताचें बावखड धरणें आणि दोन्ही हातांच्या तिढ्यावर डोकें ठेवणें. -संयोग ३१८. मत्स्याहारी-वि. मासे खाणारा. याच्या उलट शाकाहारी. [सं. मत्स्य + आहारी] मत्स्यी-स्त्री. (काव्य) माशाची मादी. [सं.] मत्स्यीं(त्स्यें)द्रनाथ-पु. नवनाथापैकीं एक. नवनाथ पहा. 'निरालंबदेशीं अनूपम्य राजा । नमस्कार मत्स्यींद्रनाथासि माझा ।' -अकक २.२०२. मत्सेंद्रासन-न. योगशास्त्रांतील एक आसन. मत्स्योदरी-स्त्री. काशी येथील भैरवाच्या देवळा- पर्यंत आलेला गंगा नदीचा पूर. [मत्स्य + उदर]
मुद्राधारक
पु.१ शिक्का धारण करणारा. २ अंगावर मुद्रांचे चिन्ह असलेला. [सं.]
मुसम्मा
वि. नांव धारण करणारा. -मुधो [अर अव. मुसम्मान]
नामधारी
वि. १. नावाजलेला; प्रसिद्ध; स्वतःचे नाव गाजवणारा. २. नुसत्या नावाचा; स्वतः काही काम करत नसताना ज्याच्या नावावर काम चालते असा. ३. एकच नाव असलेला; एकाच नावाचे दोन परस्परांना नामधारक समजतात. ४. विद्या, गुण इ. नसताना निव्वळ मोठे नाव धारण करणारा.
नेहटा
वि. बरोबर योग्य. 'अंगी चंदनाची उटी । तेंच वज्रकवच नेहटी ।' -मुरंशु २६. नेहटीं-क्रिवि. १ नेटानें. 'धारण नेहटीं दृढ राखे ।' -एभा २०.१९७. 'तरी त्वां वारण उभा करून नेहटीं । जाऊन चोहटीं मारावा ।' -भवि ३७.७८. २ निश्च- यानें; खचित. 'कपटें भोगितां ती नेहटीं । झालीं भगें सर्वोगीं ।' -जै ७८.४७. ३ जोराच्या अभ्यासानें. 'महामुद्रा नेहटी साधिती ।' -एभा १३.७१३. इतर अर्थी नेट पहा. ४ खेटून; जवळ. 'मग लाज सोडोनि धूर्जटी । तयेसि करीत असे गोष्टी । उमा असतांहि नेहटी । बैसला देवो ।' -कथा २.५.६४. [नीट]
नग्नवस्त्र
न. लंगोटी; केवळ नागवे राहू नये म्हणून लोकलज्जेस्तव धारण केलेले वस्त्र : ‘काशायांबर नग्नवस्त्र । संन्याशासी हें पवित्र ।’ – सप्र ३·१६.
निन्हव
पु. १. लपवणे; गुप्त ठेवणे : ‘तेराव्या वर्षीं तर ज्यास क्लीब वेष धारण करून स्ववीर्याचा निन्हव करणें भाग पाडलें…’ – नि ८७४. २. यज्ञातील विधी; नमस्काराचा एक प्रकार. [सं. नि+न्हु]
निन्हव
पु. १ अपह्नव; गुप्त ठेवणें. (प्र.) निह्नव पहा. तेराव्या वर्षीं तर ज्यास क्लिब वेष धारण करून स्ववीर्याचा निन्हव करणें भाग पाडलें ...' -नि ८७४. २ यज्ञांतील विधि; नम- स्काराचा अक प्रकार. [सं. निह्नु]
निरग्निक
वि. ज्याने श्रौताग्नी किंवा स्मार्ताग्नी धारण केले नाहीत, ठेवले नाहीत असा. - मिताक्षरा. [सं.]
निरग्निक
वि. ज्यानें श्रौताग्नि किंवा स्मार्ताग्नि धारण केले नाहींत, ठेवले नाहींत असा. -मिताक्षरा [सं.]
नरसिंहावतार
पु. दैत्यराज हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी विष्णूने धारण केलेले सिंहाकृती मनुष्याचे रूप, अवतार. (वा.) नरसिंहावतार घेणे– अतिशय रागावणे; कोपाविष्ट होऊन उग्र रूप घेणे.
नृसिंहावतार
नरसिंहावतार पहा. 'कलुशाची गांठ पड- ल्यावर, ज्यांच्या मसलतीनें त्याला बापाची गादी मिळूं नये असें ठरलें होतें, त्या सर्वांवर संभाजीनें कडक नृसिंहावतार धारण केला.' -संभाजी
नटन
न. १. नटाचे काम; अभिनय; वेष, रूप धारण करणे. २. क्रीडा; लीला. ३. नृत्य; नाच. [सं.]
नटन
न. १ नटाचें काम; अभिनय; वेष, रूप धारण करणें. २ क्रीडा; लीला. 'देतों दैवें स्वगेहीं नटन करुनि आम्हास दावी प्रसिद्धी ।' -अकक २ मंगीश, राधाविलास ८४. ३ नृत्य; नाचणें. [सं.]
नटणे
अक्रि. १. सजणे; वेशभूषा करणे; अलंकार, वस्त्रे इ.नी सुशोभित बनणे. २. एखाद्याचा वेष, रूप धारण करणे; भूमिका घेणे. ३. खेळणे; नाचणे : ‘जैसा गोकुळीं नाचतां मुकुंद । सर्वहि नटों लागले ।’ – दावि ९४. ४. डौल मिरविणे; दिमाख, तोरा दाखविणे : ‘वरी नटती तें फुडें । दरिद्र जाण ।’ – ज्ञा ३·६५. ५. ठमकणे; नखऱ्याने, नटूनथटून, ठमकत चालणे.
नटणें
अक्रि. १ सजणं; वेषभूषा करणें; अलंकार, वस्त्रें इ॰ कांनीं सुशोभित बनण. 'अगनावेष येतो नटून । रंग तुझा लुटा- वया ।' -नव २०.१०८. २ (एखाद्याचा) वेष, रूप, धारण करणें; भूमिका घेणें. 'तैं साकारपणें नटें नटीं । कार्यालागीं ।' -ज्ञा ४.४८. 'तुझें प्रतिबिंबस्वरूप जाण । स्वयें नटेल हुताशन ।' -रावि १५.१३६. 'मी अज अजित सर्वेश्वर । मीच नटलों चरा- चर ।' ३ खेळणें; नाचणें. 'जैसा गोकुळीं नाचतां मुकुंद । सर्वहि नटों लागले ।' -दावि ९४. 'नटे नाटकू त्रीकुटामाजि कैसा ।' ४ डौल मिरविणें; दिमाख दाखविणें. 'तयां कर्मत्यागु न घडे । जे कर्तव्य मनीं सांपडे । वरी नटती तें फुडें । दरिद्र जाण ।' -ज्ञा ३.६५. ५ ठमकणें; नखर्यानें, नटूनथटून, ठमकत चालणें. -उक्रि. नाचविणें; खेळविणें; खेळ दाखविणें. 'स्वमायेचें आड वस्त्र । लावूनि एकला खेळवी सूत्र । बाहेरी नटी छायाचित्र । चौर्याशीं लक्ष ।' -ज्ञा १८.१३०३. [सं. नटन] नटूनथटून- -क्रिवि. १ दिमाखानें; डौलानें; ऐटीनें. २ सजून; थाटमाटम, नट्टा- पट्टा करून. (क्रि॰ चालणें; बसणें). 'नटुनि थटुनि नाचति हे सौभद्र अंक ५. [नटणें द्वि. नटणें + थटणें] नटतकळा-स्त्री. नाट्यकला. 'भरतशास्त्र नटतकळा । ताळस्वर भेद सकळा ।' -निमा १.१४८. [नटणें + कळा = कला]
ओहदा
पु. १ हुद्दा; (मुलकी किंवा लष्करी) अधिकाराचें स्थान; (सरकारी) नेमणूक. २ कर्तव्य; ठराव; हक्क. 'पातशाहा- कडून वस्त्रें घेऊन जावीं हा ओहोदा आमचा आहे' -दिमरा १.१३१. [अर. उह्दा] ॰दार-ओहदेदार-पु. अधिकारी; सरकारी नोकर; हुद्दा धारण करणारा; ऑफिसर.
ओक
पु. एक वृक्ष. मराठी बायबलांत यास अल्ला, अल्लोन, एला, एकोन असे प्रतिशब्द आढळतात. याच्या तीनशें जाती आहेत. याच्या लांकडाचा जहाजें बांधण्याकडे उपयोग करितात. याला मोरू, तिलंगसा, भारू, शिंदर वगैरे नांवें आहेत. याचे हिरवा ओक, करडा ओक, लोमेलोसा ओक, पिंगट ओक असे प्रकार आहेत. युरोपांत २९ मे रोजीं याचीं पानें अंगावर धारण करतात व त्या दिवसाला ओकदिवस म्हणतात. [इं.]
ओवंडकरू, ओवंडेकरी, ओवांडकरी (ओवाण्डकरू, ओवण्डेकरी)
वि. ओवंडा धारण करणारा; परक्या ठिकाणची शेती करणारा.
ओवंडकरू, ओवंडेकरी, ओवांडकरी
वि. ओवंडा धारण करणारा; परक्या ठिकाणची शेती करणारा.
पाखंडवादी
पु. पाखंढी; पाखंडमतास अनुसरणारा; मुख्यसंप्रदायाशीं किंवा मतप्रणालीशीं भिन्न असलेली मत- प्रणालि धारण करणारा किंवा तिचें प्रतिपादन करणारा. [सं.]
पांच
वि. १ अनुक्रमानें चार या संख्येच्या नंतर येणारी संख्या; ५. २ चार या शब्दाप्रमाणेंच थोडकीशी संख्या निर्दिष्ट करतांना योजितात. पंच; निवाडा करणारे. 'बहिणी म्हणे पांचामध्यें घेई आण । मग मी जाईन कळे तेथें ।' -ब ४९४. 'त्याजपाशीं पांच रुपये आहेत.' 'पांच करतील तें आपण करावें.' [सं. पंचन्; प्रा. पंच; हि. पाँच; सिं. पंजो; फ्रेंजि. पंच] पांच तेथें परमेश्वर, पांचामुखी परमेश्वर-पांच शिष्ट लोक म्हणतील तें खरें; एखाद्या गोष्टीची पांच संभावित माणसांनीं शहानिशा करून दिलेला अभिप्राय ईश्वराच्या अभिप्राया- इतकाच ग्राह्य असतो. 'पांचां मुखिं परमेश्वर म्हणुनी तया देउनि माना ।' -टिक १४४. पांचाची पांचबुद्धि किंवा पांचाचे पांच प्रकार-निरनिराळ्या माणसांचीं निरनिराळीं मतें असतात, एकमत होत नाहीं. या अर्थीं. पांचावर धारण बसणें-पूर्वीं लष्करांत रुपयास पांचशेर धान्य झालें म्हणजे अत्यंत दुष्काळाची स्थिति होई व ती फार भयंकर महागाई वाटे यावरून लक्षणेनें- पंचप्राण निघून जातात कीं काय अशी अवस्था होणें; गर्भगळित होणें; अत्यंत विस्मित व भयभीत होणें. पांचांतून उठणें- माणसांतून उठणें; समाजाशीं बेपर्वाईनें वागणें; समाजबाह्य होणें, वर्तन करणें. म्ह॰ माझें घ्या आणि पांचांच न्या. सामाशब्द- ॰अवस्था-स्त्रीअव. जीवानें भोगावयाच्या पांच अवस्था जागृति, स्वप्न, निद्रा, तुर्या व गतावृत्ती अशा पांच अवस्था. 'जागृति स्वप्न आणि निद्रा । गतावृत्ती तुर्या पुत्रा । या पांच अवस्था विचित्रा । असती देहीं ।' -कथा ५.७.२३. ॰कुल-न. (कर.) पांच वस्तूंचा चिंचोके इ॰कांचा समुदाय. 'पांचकुलाचें आठकुल कर.' ॰खाणी-स्त्रीअव. सृष्टीच्या, सृष्ट पदार्थांच्या उत्पत्तीचे पांच प्रकार:-(अ) मानसिक, (आ) जरायुज, (इ) अंडज, (ई) स्वेदज, (उ) उद्भिज. -हंको. [पांच + खाण = उत्पत्तिस्थान] ॰चार नऊ-(तिफांशी सोंगट्यांच्या खेळांत) तीन फाशांवर अनु- क्रमें पांच, दोन व दोन असें पडणारें तिफांशी सोंगट्यांतील दान. ॰जिन्नस-पुअव. (न्यायशास्त्र) न्यायांतील बत्तीस पदार्थांचे खालीलप्रमाणें पांच जिन्नस कल्पिले आहेत:-(अ) पांच भूतें व पांच खाणी मिळून दहा. (आ) पांच कर्मेंद्रियें व पांच प्राण एकूण दहा. (इ) पांच ज्ञानेंद्रियें, मन व बुद्धि मिळून सात. (ई) मूळ माया, विद्या व अविद्या मिळून तीन. (उ) जीव आणि ईश्वर हे दोन. -हंको. ॰तीन आठ-(तिफांशी सोंगट्यांचा खेळ) तीन फांशांवर अनुक्रमें पांच, दोन व एक असें पडणारें दान. ॰दोन सात- (तिफाशी सोंगट्यांचा खेळ) तीन फांशांवर अनुक्रमें पांच, एक व एक मिळून झालेलें दान. ॰धारी, पंचधारी निवडुंग-पुन. पांच कडा, कोरा, धारा असलेली निवडुंगाची एक जात. ॰पंचकें- नअव. (वेदांतशास्त्र) पंचवीस तत्त्वें. यांचे पुढील ओवींत सांगितल्या- प्रमाणें पांचापांचांचे गट आहेत- 'अंतकर्ण प्राणपंचक । ज्ञानेंद्रियें कर्मेंद्रियें पंचक । पांचवें विषयपंचक । ऐसीं हे पांच पंचकें ।' -दा १७.८.१५. [पांच + पंचक = पाचांचा समुदाय, गट] ॰परतणें- न. लग्नानंतर वर वधूला घेऊन घरीं आला कीं तो पांच दिवस आपल्या घरीं राहून वधूसुद्धां परत तिच्या माहेरीं जातो तो प्रकार. -बदलापूर १२०, १५०. [पांच + परतणें] ॰परतावण- स्त्री. (गो.) मांडवपरतणी. ॰पर्यावण-न. (कु.) लग्न लागल्यावर वधू पतिगृहीं गेल्यावर पुनः चार, पांच मंडळीसह वधूवर वधूच्या पितृगृहीं येतात तो विधि, पांच परतणें पहा. ॰पाखांड-नअव. (प्र.) पंचपाखंड, पंचपाखंड पहा. ॰पाखांडी-वि. पंचपाखांडी पहा. ॰पाट-पुअव. एखाद्याची धिंड काढतांना त्याला विद्रूप करण्या- करितां वस्तऱ्यानें त्याच्या डोक्यावरील केसांचे पांच पट्टे काढीत ते. [पांच + पाट = पट्टा] ॰पांडव-पुअव. धर्म, भीम, अर्जुन, नकुळ व सहदेव हे पंडुराजाचे पांच पुत्र. [पांच + पांडव = पंडुचा मुलगा] ॰पाली-पाली भाजी-स्त्री. (राजा.) उडीद, चवळी माठ, पोकळा. इ॰कांचे चार, पांच प्रकारचे पाले एकत्र करून त्यांची केलेली भाजी. ॰पावली-स्त्री. (व.) मंगलकार्यांत तळहात व पाय याना हळद व कुंकू यांचे पट्टे ओढण्याचा विधि. 'वर मायला पांचपावली करा.' ॰पावली-स्त्री. लांब अंतरा- वर असलेल्या देवतेस केलेला नवस कांहीं अडचणीमुळें फेडण्याचा राहिल्यास, लांबणीवर पडल्यास, त्या देवतेच्या स्थानाच्या दिशेनें कांही पावलें चालून जाऊन कांहीं वेळानें घरी परत येण्याचा एक प्रकार, विधि. [पांच + पावलें] ॰पावली-स्त्री. सापाची एक जात. ही हातभरापेक्षां कमी लांब असून बोटभर जाड असते. हिला चार पाय असतात. ही चावली असतां माणसास पांच पावलेंहि चालून जाऊं देत नाहीं म्हणून हीस हें नांव. सापसरडी असेंहि हिचें दुसरें नांव आहे. -बदलापूर ३४८. [पांच + पावलें] ॰पिसें- न. १ वेड; भ्रम; भ्रांति. 'मज तुवां केलें जी तैसें । माझें मीपण धाडूनि देशें । स्तुतिमिषें पांचपिसें । बांधलें वाचे ।' -माज्ञा १८. १८. २ वर्णन. -मनको, -हंको. [पांच = अधिक + पिसें] ॰पोषाख- पु. पोषाखांतील पांच वस्त्रें इ॰. 'शिवाजीमहाराज पांच पोषाख नटला ।' -ऐपो ३२. [पांच + पोषाख] ॰प्रमाणें-नअव. शब्द, आप्तवाक्य, उपमान, अनुमान व प्रत्यक्ष अशीं पांच प्रमाणें. ॰पालव-पुअव. १ पंचप्राण. 'ऐसें अपार तुझें केलें । एकी वाचा काय मी बोलें । परि पांचही पालव मोकलिले । मजप्रती ।' -ज्ञा ११.६३. २ अंतःकरणपंचक:-मन, बुद्धि, चित्त, अहंकार व अंतःकरण. -माज्ञा. (कठीण शब्दांचा कोश). [पाच + पालव] ॰बोटें-नअव. अंगुष्ठ (आंगठा), तर्जनी (अंगठ्याजवळचें बोट) मध्यमा (मधलें बोट), अनामिका (करंगळीजवळचें बोट) व करांगुळी (करंगुळी) हीं हाताचीं पांच बोटें. म्ह॰ पांची बोटें सारखीं नसतात = सर्व मनुष्यें सारख्या स्वभावाचीं नसतात. मूर्ति तितक्या प्रकृती याअर्थीं. ॰भौतिक-वि. पांच महाभूतांनीं बनलेलें (शरीर). 'मग पांचभौतिक संचलें । जेव्हां शरीर असें निदेलें ।' -ज्ञा ५.५३. [पांच + सं. भौतिक = भूतासंबंधीं] ॰वट-वटें-नपु. १ पांचांचा गट, समुदाय. 'ऐसीं पांचवटें जवळिके । करूनि वाहावीति अभिलाषें ।' -ऋ ५५ 'यावरी आदी । पांचवटेयाची बांधी । बांधली प्रभेदीं । पंचभूतिकीं ।' -ज्ञा १३.४६. ॰वटा-पु. पांच वाटा जेथें एकत्र होतात तो प्रदेश, ठिकाण. -शर. [पांच + वाटा] ॰वनी-न्ही-पुअव. पांच प्रकारचे अग्नि-प्रलयानल, विद्युदनल, वडवानल, शिवनेत्रानल व द्वादशादित्यानल 'तैसें पसरलेनि प्रकाशें । सैंघ पांचवनिया ज्वाळांचे वळसे । पडतां ब्रह्मकटाह कोळिसे । होत आहाती ।' -ज्ञा ११.३०५. 'ना ते पांचवने जाळु वेठिले । प्रलयपावकाचें ।' -शिशु ९३५. [पांच + वन्हि = अग्नि] -वि. (महानु.) पांच वर्णांचा; पांच प्रकारचा. 'जें विरहाग्नीचें पाचवनें चीर । नेसों देत असा ।' -भाए १२१. ॰वेउली-ळी-स्त्री. पांच नांग्या असलेली इंगळी. 'हे उघड पांचवेउली । पंचधा आगी लागली ।' -ज्ञा १३.१०६९. [पांच + वेऊळी; विंगळी?] ॰शेरी-स्त्री. १ पांचशेर प्रमाणाचें वजन. २ (ल.) उपजीविका; चरितार्थ. [पांच + शेर] पांचामुखांचा-वि. पांच तोंडें असलेला (महादेव, शंकर). 'चहूं मुखांचा वर्णितां भागला । पांचांमुखांचा तटस्थ राहिला ।' -ह ३.७. पाचोत्रा- पंचुत्रा-पंचुत्री-पुस्त्री. १ पांच वस्तूंचा समुदाय (फळें, पेंढ्या वगैरे). २ (कर.) (कडब्याच्या पेढ्या, विड्या इ॰कांच्या व्यवहारांत) विकतांना शंभरांमागें मोफत द्यावयाचा पाच नगांचा समुदाय. 'पाचोत्र्यासह चार हजार विडी पाठवा.' 'एक हजारा- वरचे दहा पाचोत्रे टाक.' [पांच]
पांच pāñca a (पंच S) Five. 2 Used like the word चार for a moderate quantity or number. Ex. त्यापासीं पांच रुपये आहेत; पांच करतील तें आपण करावें; Pr. माझें घ्या आणि पांचांत न्या. पांच तेथें परमेश्वर Vox populi vox Dei. पांचाची पांच बुद्धि or पांचाचे पांच प्रकार Quot homines tot sententiæ: also suus cuique mos. पांचांतून उठणें To become outcast or isolated from society. पांचावर धारण बसणें To be frightened to death (i. e. out of one's five vital airs).
पांच a Five. Pr. माझें घ्या आणि पांचांत न्या. पांच तेथें परमेश्वर Vox populi vox Dei. पांचाची पांच बुद्धि or पांचांचे पांच प्रकार Quot homines tot sententiæ: also suns cuique mos. पांचांतून उठणें To become outcaste or isolated from society. पांचांवर धारण बसणें To be frightened to death (i. e. out of one's five vital airs).
पाषाणधारी
पु. लिंगायत. हे गळ्यांत पाषाणाचें लिंग धारण करतात यावरून. [सं. पाषाण + धृ-धारण]
पडत(ता)ळणें
अक्रि. १ प्रचीति, परीक्षा पाहणें. ताळा पाहणें; अजमावून पाहणें; तुलना करणें; मेळ पाहणें; रुजुवात करणें; लावून पाहणें; मोजणें; मापणें; तोलणें; वजन करणें (पुन्हा रुजू- वात घेण्याकरितां); गणणें; मोजणें. 'भीष्म पडताळी विद्या- भ्यास ।' -मुआदि ३०.२६. २ पकडणें; हातांत घेणें; धरणें (चालविण्याच्या हेतूनें हत्यार, शस्त्र इ॰); पेलणें; पाजळणें. बाहेर काढणें. 'पडताळूनि सुरी बैसली सेजारीं । यमफासा करीं घेऊनियां ।' -तुगा १.५४३. 'जरासंध आणि भीम । उभे ठाकले गदा पडताळून ।' -ह ३३.८०. 'राजानें पट्टा पडताळिला ।' -एपो १९. ३ सज्ज होणें, पोषाख वगैरे चढविणें, घालणें (जोडे, पागोटें, अंगरखा इ॰). ४ ऐटीनें धारण करणें; गुंडाळणें; लपे- टणें; बांधणें. ५ परत देणें; फेडणें (शिव्या इ॰). 'त्यानें गालिप्रदान केलें तें म्यां आज पडताळलें.' [पर + ताळा]
पेनणें
अक्रि. परिधान करणें; नेसणें; धारण करणें अंगावर घेणें. 'त्यानें चिलखत पेनून भूजबंद आंवळले.' -फांतब ९. पेहरणें पहा.
पिनाकपाणिं
पिनाक नामक धनुष्य धारण करणारा, श्रीशंकर (ज्ञानेश्वरी अध्याय ११, ओवी २०७)
प्राचीन
न. दैव; प्रारब्ध; पूर्वकर्म. 'आणि मातलिया इंद्रि- याचे वेग । कां प्राचीनें खवळले रोग ।' -ज्ञा १६.१९२. -वि. १ पूर्वदिशेकडील. २ पूर्वीचा; अगोदरचा; गतकाळचा; पुरातन; जुना. [सं.] ॰दोरी, प्राचीनाची दोरी-स्त्री. जिचें बरेंवाईट फळ ह्या जन्मांत भोगावें लागतें अशीं पूर्वजन्मांतील कृत्यांची मालिका; प्रारब्धकर्म. 'आपण राहोनियां दूरी । हालवी प्राचीनाची दोरी ।' -एरुस्व १२.३५ ॰लिपिविद्या-स्त्री. प्राचीन लिपी ओळख- ण्याची विद्या. (इं.) पॅलिऑग्रॅफी. ॰संस्कार-पु. प्राक्संस्कार पहा. प्राचीनावीति-स्त्री. उजव्या खांद्यावर टेकलेलें व डाव्या- कुशीवर लोंबणारें असें जानवें असलेली स्थिति. -वि. उजव्या खांद्यावर टेकलेलें आणि डाव्या कुशीवर लोंबणारें जानवें धारण करणारा. [प्राचीन। + अवीतिन्]
प्रदेयागमा
स्त्री. १ एम्. ए. च्या बरोबरीची महिला विद्दापिठाची पदवी. २ ही पदवी धारण करणारी पदवीधर स्त्री. जी स्त्री गृहीतागमा (बी.ए.) स्त्रीस विद्दा शिकवूं शकते अशी स्त्री. [सं.]
परिहित
वि. धारण केलेलें; अंगावर घेतलेलें (वस्त्र इ॰). [सं.]
परजणें
फिरविणे, धारण करणे (ज्ञानेश्वरी अध्याय १५, ओवी २५५)
प्रतिशब्द
प्रतिशब्द pratiśabda m (S) Reverberated or repeated sound, echo. Ex. प्र0 वरि देत अंबर ॥ दशवकत्र हडबडिला ॥. 2 A word formed by reduplication;--as. धोरण from धारण, भिकरी from भाकरी, गिगड from दगड. See under उपशब्द.
पुनस्संधान
न. १ पुनः आवश्यक संस्कार करणें (पहि ल्यात व्यत्यय आल्यानें). २ गृह्याग्नि (गृहस्थानें विवाह झाल्या- दिवसापासून धारण करावयाचा अग्रि) नाहींसा झाल्यास तो पुनः उत्पन्न करण्याचा विधि; कोणताहि संस्कार चूक झाल्यामुळें पुन्हां करणें. ३ (ल.) कोणतेंहि आरंभिलेलें कार्य तडीस न जातां विस कटल्यामुळें पुनः मूळापासून करणें; त्यासाठीं करावी लागणारी खटपट. [सं. पुनः + संधान]
पूतना, पूतनामावशी
स्त्री. १ एक राक्षसी. कंसाच्या सांगण्यावरून ही मायावी रूप धारण करून कृष्णाचा नाश कर- ण्यासाठीं गोकुळांत आली होती. २ (यावरून ल.) त्रासदायक, नावडीत मावशी. ३ दिसण्यांत सुंदर व सभ्य पण अंतर्यामी दुष्ट अशी स्त्री. [सं. पूतना]
फकीर
पु. १ मुसलमानी धर्माचा भिक्षेकरी साधु; यवन भिक्षु; प्रपंच सोडून विरक्त होत्साता ईश्वरभजनीं लागलेला यवन. २ मोहरमामध्यें (हिंदु किंवा मुसलमान) फकीराचा वेष व वृत्ति धारण करणारा इसम; डोल्याच्या दिवसांत त्या प्रीत्यर्थ अंगावर नाडे घालणें, उपास करणें, भिक्षा मागणें इ॰ रूप व्रत करणारा मनुष्य. ३ संसारापासून व जगाच्या त्रासापासून अलिप्त राहणारा इसम. ४ पुढें कोणी नाहीं असा जो संसारात एकाकी तो; फटिंग; सोटभैरव. ५ दरिद्री; भणंग; भिकारी; गरीब; कंगाल. [अर. फकीर्] ॰फुकरा- पु. फकीर, गोसावी वगैरे भिक्षेकरी लोकांबद्दल व्यापक अर्थाचा शब्द; (सामा.) गोरगरीब. '(मन्सूरअल्ली) उदास वृत्तीनें अतीत- अभ्यागत, फकीर-फुकरा यांस द्रव्यदान व अन्नदान करीत आपण जात्या आपले स्वंकर्मीं उजूतवाजू करून सावध होता.' -भाब ५२ [फकीर + फुकरा = फकीरचें अव. गरीबगुरीब प्रमाणें द्विरुक्ति] फकिरी-बाणा-फकिरी पहा.
फणी
स्त्री. १ नागाची फडा. २ -पु. फडा असलेला सर्प. 'शिणलीं सहस्त्र तोंडे । शेषफणी ऐसें धेंडें ।' -तुगा ३७५९. [फणा] फणिमौळि-पु. (महानु.) सर्पश्रेष्ठ. 'सेलारा फणिमौळी । उर्णनाभि झील्लि ।' -भाए २६८. ॰वर-पु. १ श्रेष्ठ सर्प; शेष. २ लक्ष्मण. फणींद्र, फणिंदृ-पु. (महानु.) शेष. 'म्हणौनि उचका फणिंदृ । रची शब्दसागरातें ।' -भाए ९ फणींद्रबाळी-स्त्री. एक दागिना; बाळी. 'नागबाळ्या फणींद्रवाळ्या हातीं हातसर ।' -अफला ५५. फणीपाळ, फणिपाळ-पु. पृथ्वीला आपल्या फणीवर धारण करणारा; शेष. 'पाताळ सांडुनि फणिपाळ ।'
फरकाविणें
क्रि. १ नटवेबाज पणानें डौलानें (फाटेल, पळेल इ॰ काळजी न करतां) शालजोडी इ॰ उंची वस्त्र धारण करणें, नेसणें. २ भडकाविणें (तोंडांत इ॰). फडकाविणें पहा. [ध्व. फर!]
फरश-स
पु. कुर्हाड; कुर्हाडीसारखें शस्त्र; परशु; फरशी. 'फरशी घेऊनि हातीं.' -मुवन १६.५६. [सं. परशु; हिं. फरसा; गु. फरसी] ॰धर-पु. फरस धारण करणारा; परशुराम. 'फरशधरें अतिपराक्रमें कुंभिनी केली निःक्षेत्री ।' -ऐपो २६५. फरशी- स्त्री. १ कुर्हाड; फरश पहा. २ मोठी पटाशी; (कु.) फरसी -वि. परशूचा ठसा असलेला (रुपया इ॰ नाणें). 'देति धाडून करभार ढिगाचे ढिग कोरे फरशी ।' -ऐपो ३०४. [फरश]
राधा
स्त्री. १ कृष्णसखी; अनयाची स्त्री. २ नाचकामाकरितां स्त्रीवेष धारण करणारा पुरुष. राधाईमावशी-स्त्री. (जादूगार व कोल्हाटी लोकांत) नळीच्या तोंडाशीं असलेली नाचणारी बाहुली. ॰नगरी-नगरी रेशीम-न रेशमाची एक जात राधाष्टमी-स्त्री. राधेचा वाढदिवस म्हणून पाळण्यांत येणारी आश्विन वद्य अष्टमी. [सं.] राधेय-पु. राधापुत्र कर्ण.[राधा = एक कोळ्याची स्त्री.]
रेचक
न. ढाळक; जुलाबाचें औषध; सारक औषध. -पु. प्राणायाम करतांना आंत घेतलेला श्वास बाहेर टाकणें; पूरकानें ओढलेला वायु कुंभकांत स्थिर झाल्यानंतर तो सोडणें. -वि. सारक. [सं. रिच् = रिकामा होणों] रिचणें-सक्रि. सोडणें; नाकानें वायु सोडणें. 'वायु जो धारण धरावा । तो जंव फुटेना अव्हासव्हा । तंवचिवरी विरोधावा । मग रेचावा शनै: शनै:।' -एभा २७. १८३. रेचत-न. १ रेचक औषध; सारक औषध. २ रेच; जुलाब; जोराचें मलविसर्जन. रेचित-वि. १ मोकळें केलेलें; सोडलेलें. २ ढाळ झालेला; कोठा साफ झालेला. ॰अंगहार- पु. (नृत्य) उजवा हात रेचित करून शरीराची उजवी बाजू वांक- वून रेचित करणें, ती बाजू ताठ करून पुन्हां डाव्या बाजूस त्याच क्रियांची आवृत्ति करणें. शेवटीं क्रमानें रेचित उरोमंडल व कटि- च्छिन्न करणें. ॰कटि-स्त्री. नृत्यामध्यें दोन्ही पाय अंचित करून कंबर खालीं घालविणें. ॰भुवई-स्त्री. नृत्यामध्यें एखादी भुबई गमतीनें वर उचलिली म्हणजी दुसर्या भुंवईची होणारी स्थिति. ॰मान-स्त्री. नृत्यामध्यें कंबर निवृत्त करूं लागतांच शरीराला एक प्रकारची गति मिळते. त्यावेळीं मानेसहि गति मिळते. ही गति मिळण्यापूर्वीची स्थिति. ॰संयुक्तहस्त-पु. (नृत्य) हंसपक्ष हात वर करून फिरविणें व मग आपल्या समोर पसरून उताणे करणें.
रुद्रावतार
रुद्रावतार rudrāvatāra m An incarnation of रुद्र or शिव. 2 fig. A fiery or ferocious person, a Hotspur. रु0 धारण करणें To fly into a rage.
ऋणपत्रधारक
पु. कर्जरोखा बाळगणारा, धारण करणारा. [सं.]
शाई-ही
वि. १ ताबा, अंमल यासंबंधीं; गुण, स्वभाव, नांव धारण करणारा; मालकीचा. उदा॰ पुणेंशाई, मुंबईशाई, सुरतशाई. २ कडून प्रस्थापित; संबंद्ध; वाच्य-वाचक. उदा॰ शिंदेशाई; होळकरशाई, अप्पाशाई, बाबाशाई. ३ नाणीं, चाली, रीतरिवाज, पद्धती, कायदे वगैरे. उदा॰ शिवशाई, आदिलशाई, इ॰ ४ विशिष्ट जातिगुणादिवाचक. उदा॰ ब्राह्मणशाई, शूद्रशाई, मोंगलशाई, सोदेशाई, शिनळशाई, लबाडशाई. -स्त्री. १ अंमल; सत्ता; अधिकार; आमदानी; कारकीर्द. 'शिंदेशाई पुण्यामध्यें झाली.' २ (राज्य, गांव, लष्कर इ॰ मध्यें राहणारा विवक्षित) जनसमूह; समाज. उ॰ 'सगळ्या शाईंत यासारखा शूर दुसरा कोणी नाहीं.' 'होळकरशाईमधें मल्हारबा होता एकच पूत.' -ऐपो ९०,११०,१२७, इ॰. ३ राजमंडळच राज्य. ४ आणखीं निरनिराळे संकीर्ण उपयोगाचे प्रकार. उदा॰ ढपळशाई, फुकटशाई, बागशाई. लंगडशाई. [फा. शाही] ॰शिरस्ता-पु. १ सार्व- जनिक किंवा सर्वसाधारण चालरीत, पद्धत; रिवाज, रूढी; जन- रीति. २ राजशिरस्ता; राजरीत. 'चांगलें माणूस मिळऊन शाई शिरस्याचें मर्द माणूस पाहून' -समारो १.१३.
साकार
वि. आकार असलेलें; आकारयुक्त; निश्चित आकृति, आकार, देह असणारा. याच्या उलट निराकार. -अमृ १.४. [स + आकार] साकरणें-अक्रि. आकार, देह धारण करणें; मू्र्तिमान होणें. -एभा ६.५६; 'आदि पुरुष हा साकारला ।' -रावि १.
सौभ(भा)ग, सौभाग्य
न. १ सौंदर्य. २ भाग्य; नशीब 'एवढें एक सौभग ।' -ज्ञा १५.१७. ३ ज्याचे योगानें आपणांस मान्यता, शोभा, प्रतिष्ठा, तेज इ॰ लाभतें असा अधिकार, विद्या, वतन, सामर्थ्य इ॰ विषय. ४ सवाष्णपणामुळें काजळ, शेंदूर, कुंकू, मंगळसूत्र, बांगड्या इ॰ वस्तु धारण करण्याचा बायकांचा अधिकार; सुवासिनीत्व. ५ कुंकू, शेंदूर. [सं. सुभग; सौभाग्य] म्ह॰ गौर रुसली आणि सौभाग्य घेऊन बसली = रुसून बसलेल्याची कोण पर्वा करतो अशा अर्थीं योजतात. सौभाग्य मिरविणें लावणें = सौभाग्यवति स्त्रीनें आपला तोरा मिरविणें. सौभा- ग्याचा टिका-सौभाग्याचें चिन्ह, कुंकू. ॰चिन्ह-द्रव्य-न. कुंकू, बांगड्या वगैरे. ॰तंतु-पु. १ मंगळसूत्र. २ (ल.) नवरा. ॰धन-न. नवरा. 'घातला तिच्या दुष्टानें सौभाग्यधनावर घाला ।' -विक १४. ॰वती-स्त्री. सुवासिनी स्त्री. ॰वायन वाण-न. स्वतःला सौभाग्य चिरकाळपर्यंत लाभावें म्हणून सुवा सिनी स्त्रिया सौभाग्यद्रव्यांचें ब्राह्मणांस जें दान (वाण) देतात तें. ॰शुंठी-सुठ-स्त्री. ज्यांत प्रामुख्यानें सुंठ घातलेली असते असा एक औषधी पाक.
संभाळ
पु. रक्षण; प्रतिपाळ; पालन; संगोपन. [स. संभार] संभाळीं करणें-हवालीं करणें; स्वाधीन, सुपूर्त करणें. संभाळणें-उक्रि. १ रक्षण करणें; पाळणें; पोसणें; संगोपन करणें; आश्रय देणें; काळजी घेणें. २ धारण करणें; सोसणें; सहन करणें; वाहणें. (भार, कार्याचा बोजा, ओझें). ३-अक्रि. जपणें; काळजी येणें; सावध राहणें. 'संभाळ, अपथ्य केलेंस तर दुखणें वाढेल.' ४ जाणीव असणें; वाटणे; समजणें. 'डाग दिला तरी संभाळत नाहीं मग चिमटा कोठला संभाळावयाला.' संभाळून घेणें-वागवून घेणें; चालवून घेणें; सोसणें; खपवून घेणें; काणा डोळा करणें.
संध
स्त्री. १ ऐक्य; मिलाफ; संयोग. २ सांधा; जोड; शिवण. ३ फट; चीर; भेग. ४ अवधि; मधला वेळ. ५ गांठ; पेर; सांधा. ६ (ल.) योग्य वेळ; आणीबाणीची वेळ; ऐन प्रसंग 'ढकलुन देतांक्षणीं साघली संध शिपायाला ।' -ऐपो ३१५. ७ मैत्री जुळणें; संबंध दृढ होणें; तह; समेट; तडजोड; पुनर्मीलन. [सं. सम् + धा] -वि. धारण करणारा; युक्त, तद्विशिष्ट; रुळलेला; निगडित; संबद्ध. उदा॰ कपटसंध; वरसंध; अनृतसंध; सत्यसंध.
संतपणा
यतीचें जीवन जगतात, ऋषि-मुनि यांसारखा आचार, विशुद्ध जीवनाचा आदर्श, नीतीबाबत कडकपणा, त्यागी भोगी नव्हे, छाटी कफनी धारण केली, विषयांपासून अलिप्तता, तपोधन, महासुनि आत्मलोप, यांना सुवर्ण मृत्तिकेसमान, संसारांत गुरफटले नाहींत देहाविषयीं, अन सक्ति, उपवास व नेमधर्म यांत काल व्यतीत करीत , अंतर्बाह्य योगी, विशुद्धात्मा, धर्मपरायण, परार्थ हाच स्वार्थ, सदा परहितरत, ज्यांचा अहंकार विरला आहे, सिद्धत्व पावलेला.
सराकर्ता
एक जमीन धारण करण्याची पद्धति. यांत मालक व सरकार यांचे वांटे ६ ते १० आणेपर्यंत असतात.
श्रावणी
(सं) स्त्री० नवीन यज्ञोपवीत धारण करण्याचें कर्म.
श्रीवत्स
न. १ विष्णु. २ विष्णूच्या हृदयावरील पांढऱ्या केसांचा भोंवरा. यासच विष्णूच्या हृदयावरील भृगूच्या लत्ताप्रहा राचें चिन्ह म्हणतात. यासच श्रीवत्सांक, श्रीवत्सलांछन असेहि प्रतिशब्द आहेत. 'श्रीवत्स श्रीनिकेतन । हृदयीं दोहीं भागीं जाण ।' एभा १४.४८१. 'सकळ भूषणांचें भूषण । ब्राह्मणाचा दक्षिण चरण । हृदयीं वाहे नारायण । श्रीवत्सलांछन गोविंद ।' -एरुस्व १.६८. 'हृदयीं श्रीवत्स लांछन । मिरवी भक्तांचें भूषण ।' -तुगा ७२६. श्रीवत्सलांछन-वि. वरील चिन्ह धारण करणारा (विष्णु). 'दक्षिणांगीं विप्रचरण । श्रीवत्सलांछन गोविद ।' -एभा ३०.२०२.
सरंजाम
पु. १ सामानसुमान; साधनसामुग्री; हत्यारें- पात्यारें; उपकरणें. 'पोक्त सरंजाम माफिक ठेवावा.' -वाडशाछ २७१. २ सैन्य, किल्ल्याचा बंदोबस्त वगैरे राखण्याकरितां दिलेली इनामी जमीन; पालखी वगैरे मान मरातब दिला असल्यास त्याच्या खर्चाकरितां दिलेलें इनाम. याचे चौथसरंजाम, जातसरं- जाम व फौजसरंजाम असे तीन प्रकार असत. 'हनोज मुबादलि याचा सरंजाम जाल नाहीं.' -इमं ६५. 'सरंजामपट्टी सरकारा- तून जाहली.' -मात्रै ३. ३ जुळवाजुळव; तयारी; सिद्धता. 'सरं जाम करून डेरे राहुट्या बाहेर दिले. ।' -ऐपो ३९६. [फा.] ॰दार-पु. ज्याच्याकडे सरंजामी इनाम आहे असा असामी. ॰पट-पु. सरंजामासंबंधीं पत्रक. सरंजामी-वि. १ सरंजाम म्हणून दिलेलें. २ सरंजाम धारण करणारा. सरंजामी पद्धति- स्त्री. १ फौजेच्या अधिकार्यांस नक्त पगार वगैरे न देतां फौजेच्या खर्चाकरितां जहागीर देण्याची पद्धति. २ इंग्रज सरकारनें येथील देश्य राजांस कांहीं मुलूख अगर पैका घेऊन फौज पुरविण्याची पद्धति. सरंजामी फौज-स्त्री. इनाम जमीन, जहागीर वगैरे घेऊन सरकारकरितां लष्करी अधिकार्यानें ठेवलेलें सैन्य.
शस्त्र
न. १ हत्यार; आयुध. २ (ल.) ज्यांत एखाद्याचें सामर्थ्य सांठविलेलें आहे असें साधन, पदार्थ, गोष्ट इ॰ जसें- विद्या, सौदर्य, पावित्र्य, लेखणी इ॰ ३ (ल.) नाशक, हारक, मारक वस्तु. औषध इ॰ [सं.] शस्त्र तुळणें-तोलणें-१ योग्य स्थितींत, बरोबर रीतीनें, हत्यार धरणें. २ शस्त्र चालविण्यास उद्युक्त होणें; शस्त्र परजणें. (बर) शस्त्र धरणें-१ त्याचें वाईट करण्या- विषयीं कंबर बांधणें. २ त्यावर हत्यार घेऊन उठणें; हल्ला करणें; दांत धरणें. ॰कार-पु. हत्यारें तयार करणारा. ॰त्राण-न. शस्त्रसंरक्षण कवच; चिलखत; टोप वगैरे. म्यान; आच्छादन. [सं.] ॰पाणि- वि. शस्त्रधारी; हातांत शस्त्र, आयुध असलेला, धारण केलेला; सशस्त्र. [सं.] ॰वैद्य-पु. जखमेवर किंवा रोगावर शस्त्रक्रिया करणारा निष्णात वैद्य; (इं.) सर्जन. शस्त्राभ्यास-पु. लष्करी शिक्षण, विद्या; हत्यारें वापरण्यांत तरबेज होणें. [सं.] शस्त्रास्त्र व्यवहार-पु. १ हत्यार वापरणें; हत्यारांशीं संबंध असणें, येणें, २ (ल.) लढाई, युद्ध इ॰ [सं. शस्त्र + अस्त्र + व्यवहार] शस्त्री- स्त्री. तलवार; कट्यार; सुरी. 'तीस विलोकुनि मानी रामानुज तो मनीं जसी शस्त्री ।' -मोमंत्ररामायण; अरण्य २२.
सुकुडदुम
अक्रि. (ना.) घाबरणें; गडबडणें; सर्द होणें; पांचावर धारण बसणें. [सुकुड = सुकणें, दाबणें, आवरणें + हि. दुम = शेपटी]
तांबट
वि. १ तांबडा; तांबडसर; लाल. २ भगवीं वस्त्रे धारण करणारा. 'जैसे प्रवृत्तिपांथावरि तांबट । तपोनिधि ।' -ऋ १८.
तांबट
वि. १. तांबडा; ताबंडसर; लाल. २. भगवी वस्त्रे धारण करणारा : ‘जैसे प्रवृत्तिपांथावरि तांबट । तपोनिधि ।’ – ऋ १८.
तीर्थपंथ
पु. गोसावी लोकांतील तीर्थ हे पद नावाच्या शेवटी धारण करणारा एक पंथ, भेद.
तोतया
बनावट, खोटा, दुसऱ्याचें सोंग घेणारा, फसवायच्या हेतुन दुस-याची भूमिका वठवणारा, आपण दुसरा कोणी आहों असें भासविणारा, भिन्न व्यक्तिमत्त्व धारण करणारा, दुस-याचें कातडे पांघरून वावरणारा, दुसराच कोणी म्हणून वेळ मारून नेणारा, खोटा पार्ट करणारा, कमअस्सलानें अस्सलाची नक्कल.
त्रेधा
स्त्री. (शक्तीपेक्षां बरेंच मोठें काम अंगावर पड- ल्यामुळें, बरींच कामें उपस्थित झाल्यामुळें एखाद्याची होणारी) धांदल; धांवपळ; गोंधळ; गडबड; तारंबळ; ओढाताण; (श्रमानें आलेला) शीण; भागवटा; ताण; (भीति इ॰ कानीं उडालेली) धांदल; तिरपीट; गाळण; घाबरगुंडी; पांचावर धारण. (क्रि॰ उडणें). -क्रिवि. तीन मार्नांनीं, प्रकारांनी, पद्धतींनीं. [सं. त्रि + धा]
त्रिदंडी
पु. १. ज्याचा त्याग करून पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारता येतो असा संन्यास घेतलेला संन्यासी. २. (ल.) काया, वाचा व मन या तिघांवर ज्याने ताबा मिळवलेला आहे असा तपस्वी पुरुष. ३. तीन दंड धारण करणारा. ४. (ल.) पोकळ आव; ढोंग; सोंग. [सं.]
त्रिदंडी
पु. १ संन्याशांतील एक प्रकार. ह्या प्रकारांतील संन्यासी हा शिखा, सूत्र व कच्छ या तीन वस्तूंचा त्याग करीत नाहीं व यास पुन्हा गृहस्थाश्रमांत येतां येतें. अशी समजूत आहे. २ (ल.) काया, वाचा व मन या तिघांवर ज्यानें ताबा मिळविला आहे असा तपस्वी पुरुष. ३ तीन दंड धारण करणारा. [सं. त्रि + दंड = काठी; निग्रह, ताबा]
तरक
स्त्रीपु. १ (छपराच्या कोपर्याला, लांकडी जिन्याच्या बाजूला, शिडीला, धारण इ॰ कांस) आधार म्हणून दिलेला खांब, तुळई. २ (खांबणी, मोरवा म्हणून झाड इ॰ कांस लावलेला) लांकडाचा भक्कम तुकडा; धीरा. [फा. हिं.]
तरक taraka m f A stout rafter or pole (as for the corners of a roof, for the sides of a flight of stairs, for a ladder, for the धारण or upholding post of a house &c.): also a stout piece of timber or wood (used as a stanchion, or short supporting post to a tree &c.)
तुरंबणे
उक्रि. १. मस्तकावर ठेवणे; धारण करणे. २. घालणे; खोवणे; बांधणे; तुऱ्याप्रमाणे खोवणे : ‘हीं अपकीर्तीची फुलें । कां मस्तकीं तुरंबिसी ।’ – मुसभा १३·६२. ३. हुंगणे; वास घेणे : ‘सांगा परिमळें काय तुरंबावें ।’ – ज्ञा ९·११.
तुरंबणें
उक्रि. १ मस्तकावर ठेवणें; धारण करणें. २ घालणें; खोवणें; बांधणें; तुर्याप्रमाणें खोवणें. 'हिं अपकीर्तीचीं फुलें । कां मस्तकीं तुरंबिसी ।' -मुसभा १३.६२. ३ हुंगणें; वास घेणें. 'सांगा परिमळें काय तुरंबावें ।' -ज्ञा ९.११. [?]
उबजरणे
अक्रि. क्षीण झालेली शक्ती पुन्हा येणे; तजेला येणे; पुनरुज्जीवन होणे; नवीन उत्साह धारण करणे; टवटवीत होणे (प्राणी, वनस्पती) [सं. उत्+जृ]
उबजरणें
अक्रि. क्षीण झालेली शक्ति पुन्हां येणें; पुनरुज्जी- वन होणें; नवीन उत्साह धारण करणें; टवटवीत होणें (प्राणी, वन- स्पती). [सं. उत् + जृ]
उपाकरण, उपाकर्म
न. १. प्रतिवर्षी यज्ञोपवीत धारण करण्याचा विधी; श्रावणी. २. वेदाध्ययनास आरंभ करतेवेळी करायचे कर्म; वेदाध्ययनास आरंभ. ३. साधन; उपक्रम; उपाय : ‘त्यांत त्यांचें उपाकरण हें असें कीं त्यायोगानें भाऊरावांची एकेक कळा ग्रासली जात असे.’ –भाकोच. [सं.]
उपाकरण, उपाकर्म
न. १ प्रतिवर्षीं यज्ञोपवीत धारण करण्याचा विधि; श्रावणी. २ वेदाध्ययनास आरंभ करतेवेळीं करा- वयाचें कर्म; वेदाध्ययनास आरंभ. [सं. उप + आ + कृ]
उपजीवन, उपजीविका
नस्त्री. १ निर्वाह; पोषण; उदर- निर्वाह. २ जगण्याचें साधन; पोट भरण्याचा उपाय (अन्न, भक्ष्य). ३ आश्रय; आधार; रक्षण; पालन; धारण (शरीराचें). ४ रक्ष- णाचें साधन (शक्ति, अन्न इ॰) [सं. उप + जीव्]
उपजीवन, उपजीविका
न.स्त्री १. निर्वाह; पोषण; उदरनिर्वाह. २. जगण्याचे साधन; पोट भरण्याच्या उपाय. (अन्न आणि भक्ष्य.) ३. आश्रय; आधार; रक्षण; पालन; धारण (शरीराचे.) ४. रक्षणाचे साधन. (शक्ती, अन्न इ.) [सं. उप + जीव]
उपनयन
न. विधिपूर्वक विद्याग्रहणासाठी मुलाला गुरुजवळ नेणे; व्रतबंध; प्रथम यज्ञोपवीत धारण करण्याचा विधी; मौंजीबंधन; जानवे घालणे; मुंज. त्रैवर्णिकांस आठव्या वर्षी वेदाधिकारास योग्य करण्यासाठी हा संस्कार करतात. सोळा संस्कारांपैकी एक : ‘या उपरी उपनयन । गुरुद्वारां गायत्री ग्रहण ।’ – एभा १७·२७१. [सं. उप + नी]
उपनयन
न. (गुरू) जवळ नेणें; व्रतबंध; प्रथम यज्ञोपवीत धारण करण्याचा विधि; मौजीबंधन; जानवें घालणें; मुंज; त्रैवर्णिकांस आठव्यावर्षीं वेदाधिकारास योग्य करण्यासाठीं हा संस्कार करतात; सोळा संस्कारांपैकीं एक. 'या उपरी उपनयन । गुरुद्वारां गायत्री- ग्रहण ।' -एभा १७.२७१. [सं. उप = जवळ + नी = नेणें]
उष्णीष
न. पागोटे; शिरोवेष्टण; रुमाल; मंदिल : ‘मेघाचे उष्णीव ती आपल्या शिरोभागी धारण करील.’ –डाली ८०. [सं.]
उत्सर्जन
न. १. टाकणे; त्याग करणे; सोडून देणे.पहा : उत्सर्ग २. वेदाध्ययन थांबविण्याच्या वेळी करायचे कर्म; यज्ञोपवीत धारण करणारांचे एक प्रतिवार्षिक कर्म; श्रावणीतील एक कर्म. [सं.]
उत्सर्जन
न. १ टाकणें; त्याग करणें; सोडून देणें. उत्सर्ग अर्थ १ पहा. २ वेदाध्ययन थांबविण्याच्या वेळी करावयाचें कर्म; यज्ञोपवीत धारण करणारांचें एक प्रातिवार्षिक कर्म; श्रावणींतील एक कर्म. [सं.]
वाइ(ई)णें
सक्रि. १ वाहणें; धारण करणें; चढविणें. 'धनुष्यें वाइलीं हातीं । ' -ज्ञा ११.६८२. -एरुस्व १०.२४. २ देणें; अर्पण करणें. 'तेणें रीतुरायें वाईंलें ।' -भाए ४२८.१३३. 'महा- तपाचा पाउड वाइजेंच । ' -शिशु ११३. 'प्रवृत्तीवरी निगड वाउनि ' -ज्ञा ८.२४. [सं. वह्]
वैशिष्ट्य
न. १ निराळा गुण, विशेषता. २ भिन्नता; फरक; निराळेपणा; पृथकपण. ३ (सामा.) बाळगण्याचा, धारण करण्याचा गुण. [सं.]
वामनाचीं पदें
वामनानें स्वतः बटुमूर्तीचे रूप धारण करून तीन पावलें भूमिदान मागितलें व तें मिळाल्यावर त्याचीं पावलें जशीं अतिशय दीर्घ होऊन सर्व विश्व व्यापून राहिलीं त्यावरून हळुहळू वाढत जाणारी गोष्ट; दीर्घसूत्री कार- भार, फार लांबणारी गोष्ट. 'महालाकडील कजिये म्हणजे वामनाचीं पदें.' -पुद १.२१३.
विटा
पु. एक प्रकारचा भाला; इटा पहा. 'त्यामागें विटे बाण भाले.' -मराचिथोशा ६९. विटेकरी-पु. विटा नांवाचें शस्त्र धारण करणारा; इटेकरी. 'पुढें धावती विटेकरी ।' -ऐपो १४५.
वरण
न. १ लग्न; विवाह. 'पट्ट महिषीचें वरण । भौमा- सुराचें निर्दळण ।' -एभा ३१.३८३. २ नेमणूक; निवड; पसंती. [सं. वृ-वरण] वरणी-स्त्री. १ वधूवस्त्र; अष्टपुत्री. 'ती पिंवळी वरणी नेसली होती.' -झांमू ८१. २ पाळीनें अनेक ब्राह्मणांनीं करावयाचें अनुष्ठान, देवाची आराधना. (क्रि॰ देणें; घेणें). ३ अशा अनुष्ठानाची पाळी, वेळ (दर एकाची). ४ (दवैज्ञ) वरातीच्या वेळीं लागणारें-पांच नारळ, साडी व खण-इ॰ सामान. ५ (देवज्ञ) तेळफळाचा वेळचें सामान (नारळ, खारका, खजूर, बदाम इ॰). -बदलापूर २३६,२४०. ॰लावणें-१ सोय लावणें; पाळी देणें. २ प्राप्तीचें साधन मिळवून देणें. वरणीय-वि. वरावयाचा; निवडावयाचा; वरण्यास लायक, योग्य. वरणें- उक्रि. १ लग्न लावणें; विवाह करणें. 'बाळपणींच सर्वज्ञता । वरी तयातें ।' -ज्ञा ६.४५३. २ नेमणें; अधिकृत करणें. ३ पसंत करणें; स्वीकारणें. -ज्ञा ९.३१०. 'कीं टाकावें सत्वर वपु निजरण धर्म सत्पथा वरुनी ।' -मोभीष्म ११.१०९. ४ धारण करणें; घेणें. -माज्ञा १७.५८. ५ अंगिकारणें; घेणें; स्वीकार करणें. 'पांडवभयें पलायन वरिलें असतां रणीं अनीकांहीं ।' -मोकर्णं १.२३.
व्रत
न. १ स्वतःला लावून घेतलेला एखादा धार्मिक नियम, मेम; देहदंडाचा एक मार्ग. -ह ८.१०. (क्रि॰ घेणें.) २ असा नेम पाळण्याची केलेली प्रतिज्ञा, पण. ३ ब्रीद; प्रतिज्ञा; बाणा. 'नतावनधृतव्रत ज्वलन तूंचि बा धावनीं ।' -केका ६. [सं.] (वाप्र.) तीळ खाऊन व्रत मोडणें-अगदीं क्षुल्लक कारणासाठीं, फायद्यासाठीं बाणा, नेम सोडणें. सामाशब्द- ॰बंध-पु. मुंज; यज्ञोपवीत धारण करणें हें एक प्रकारचें व्रतच आहे. [सं.] ॰भिक्षा- स्त्री. व्रतबंधाच्या आनुषंगिक कर्मांपैकीं एक; भिक्षा मागणें. [सं.] ॰वैकल्य-न. १ व्रताची अपूर्णता; त्यांतील न्यूनता, कमीपणा. २ लहानसहान व्रतें, नेम इ॰ व्रत अर्थ १ पहा. ॰संग्रह-पु. व्रत घेणें; व्रतस्थ असणें. व्रतस्थ, व्रती-वि. १ व्रत पाळीत असलेला; व्रताप्रमाणें कांहीं नेम करणारा. २ स्त्रीसंग न करणारा; ब्रह्मचर्य पाळणारा. 'अमृतराव सात वर्षांचा असतांना त्याची आई स्वर्ग- वासी झाली; तेव्हांपासून बापूसाहेब व्रतस्थ होतें.' -मौनयौवना.
वतन
न. १ वंशपरंपरेची चाकरी, धंदा, अधिकार, नेम- णूक, उत्पन्न; उपजीविकेचे साधन. -गंगा १६. २ मालकीची जागा; जन्मभूमि; घर. ३ इनाम; बक्षीस. 'दिधलों गुरु प्रसाद- प्रभुनें पूर्वोक्तसद्गुणा वतन ।' -मोकर्ण २०. २९. ४ वंशपरंपरा हक्क (जमीन, वृत्ति इ॰ त). [अर. वतन् = जन्मभूमि, घर. तुल॰ सं. वर्तन = उदरनिर्वाह, वेतन] ॰गाडणें-एखाद्या जागीं मालकी, सत्ता असणें (नेहमीं नास्तिपक्षीं उपयोग). 'तूं नित्य येथें येऊनि बसतोस, काय येथें तुझें वतन गाडलें आहे.' ॰गाडलें- न. (गाडलेलें वतन) जुनी किंवा फार दिवस तांब्यात असलेली मिळकत. 'माझी वंशपरंपरा ह्या जागेवर नांदून वतनगाडलें आहे तें मी सोडणार नाहीं' ॰जप्ती-स्त्री. वतनी जमीन किंवा तीवरील उत्पन्नाची जप्ती. ॰दार-पु. वतन असलेला; वतन धारण करणारा. 'वतनदारांची वतनें वतनदारांच्या दुमाला केल्या विरहित पोट- तिडीक लागोन मुलूक मामूर होत नाहीं.' -रा १६.४४ (कायदा) वंशपरंपरेनें सरकारी काम करण्याचा हक्क असणारा इसम. 'तीर्थो- पाध्याय, मंदिरवालें, दरगेवाले, फिरस्ते, हुन्नरी व मनोरंजनाचा धंदा करणारे, भिकारचोरटे वगैरे वतनदार स्वतःला म्हणवितात. ...सर्व गांवकऱ्यांना मग ते कोणत्याहि धंद्यावर पोट चालावोत वतनदार ही सामान्य संज्ञा आहे.' -गांगा १५. [फा.] ॰दार- हिजडा-पु. हिजडा पहा. ॰दारी-दारकी-स्त्री. वतनाचा हक्क, मालकी; वतन असणें. ॰दारीकरी-पु. (वतनदार) (कों.) फार जुना शेतकरी. ॰पत्र-न. वतनाची सनद, दस्तऐवज. ॰बंधु-भाऊ-पु. १ वडिलोपार्जित मिळकतींत हक्क असणारा; भागीदार. २ सह-अधिकारी (वंशपरंपरागत); देशमुखबंधु. वतन- बहिण असाहि शब्द येतो. ॰वाडी-स्त्री. वतन, वतनी शेत, वाडी इ॰ (व्यापकपणें); जमीनजुमला; इस्टेट. 'वतनवाडी पाहून मुलगी देणें तर द्यावी.' वतनी-वि. १ वडलोपार्जित किंवा विकत घेतलेली (जमीन, मालमत्ता इ॰). २ वतनासंबंधी (दस्त- ऐवज, कागदपत्र, इ॰). ३ वतन आहे किंवा जन्म झाला तें (ठिकाण). वतनी मिळकत-स्त्री. (कायदा) वंशपरंपरेने सर- कारी काम करण्याच्या मेहनतान्याबद्दल मिळकत किंवा नफ्त नेमणूक.
अवतार
पु. १ एकाद्या देवतेचें मनुष्याचा किंवा पशूच्या रूपानें किंवा इतर कोणत्याहि रूपानें पृथ्वीवर अवतीर्ण होणें. 'कृष्ण हा देवाचा आठवा अवतार आहे.' विष्णूचे मुख्य दहा अव तार-मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध, कलंकी. ह्यांपैकीं आठ होऊन गेले व नववा चालू आहे; अवतरण. २ (ल.)पवित्र किंवा असाधारण सुप्रसिद्ध माणूस; दैवी अंशाचा माणूस; देवावतार. ३ अघोरकर्म करणारा; महापापी; राक्षस अवतार. ४ उनाड, उपद्व्यापी, शिरजोर, व्रात्य माणूस- मुलगा; उत्पातीपणा. ५ अवतरण; उतरणें; खाली येणे. ६ प्रस्ताव; उतारा वगैरे अवतरणाचे अर्थ. अवतरण पहा. ७ (दशावतारांवरून) दहा संख्या. 'अवतार पावेतों.' -रा १२.१२४. ८ आयुष्य; जीवन. 'अंवतार जरी संपेल ।' -संग्रामगीतें ४८. ९ स्वरूप; वेष. 'आज तुमच्या मुलाचा अवतार पाहण्यासारखा होता !' १०(ख्रि.) इन्कारनेशन या इंग्रजी शब्दाचा पर्याय. प्रभू येशू ख्रिस्ताचें देह- धारण. ख्रिस्ताचें स्वतःचें ऐतहासिक प्रकटीकरण. 'येशू ख्रिस्त... त्याचा अवतार झाल्यापूर्वीं जें काम करीत होता तें तीन प्रकारचें होतें. -ईवि ४१. अवतार शब्दापासून बनलेलीं कांहीं वर्णनात्मक- संकेतवाचक नामें. १ कर्णावतार = विलक्षण उदार माणूस; अतिशय दानधर्मी. २ धर्मावतार = फार न्यायी, सद्गुणी, स्वभावानें सात्त्विक असा मनुष्य. ३ कृष्णावतार = अत्यंत खेळाडु, चैनी, विलासी, गमत्या, चेष्टेखोर मनुष्य. ४ बौद्धावतार = शांत, मौनी माणूस. ५ रामा- वतार = पवित्र, सत्यवादी, निर्मळ, पापभीरु, एकवचनी माणूस. ६ रुद्रावतार-यमावतार = संतापी, उग्र, क्रूर, भयंकर माणूस. ७ वामना- वतार = खुजा, खुरटा मनुष्य. ०घेणें-धरणें-विशिष्ट काम अति- शय करूं लागणें; उच्छृंखलपणें, अव्यवस्थितपणें-दुष्टपणानें-वेड-गळपणानें-वागणें. ०आटोपणें-होणें-संपणें १ उत्कर्षदशा जाऊन निष्कृष्टावस्थेस पोंचणें; शून्यत्व पावणें. २ मरणें. 'पति गेल्या- वर आटपला श्वशुंराचाही अवतार'- विक १५. ०कार्य-कृत्य-न. १ अवतार घेण्याचा उद्योग, कारण, विषय; २ (ल.) आयुष्यांतील मुख्य कर्तव्य. 'आमुचें अवतारकृत्य जाहलें समग्र ।।' [सं]
माव
स्त्री. १ कपट; कृत्रिमता; लबाडी. २ गारूड; गौड- बंगाल; माया. 'विश्वकर्मा येऊनि सत्वर । मावेचें रचिलें वैकुंठपुर ।' ३ खोटेपणा; पोकळपणा; मायिकपणा. 'बाह्यभक्ति मावेचि करी ।' -एभा २.४९०. ४ भ्रम. ५ (गो.) जखम बरी झाल्यानंतर राहणारा वण, चिन्ह. 'माव आसा' = कुऱ्हाडीचा घाव आहे. [सं. माया] म्ह॰ मावेचें मंथन थुंक्याचें काजळ. ॰कर-री-वि. मायावी; कपट करणारा. 'तैसा आतापी मावकर । ऋषीस दावी बहुआदर ।' -रावि १३.१४५. ॰खोर-वि. कपटी. 'जात फिरंग्याची माव- खोर ।' -गापो ८५. ॰भक्ति-स्त्री. खोटी भक्ति. 'भावभक्ति ते नसावी किंचित ।' -दावि. ३२१. मावा-पु. चित्ताकर्षकता; मोहेनी. -शर. [सं. माया] माविक माविय, मावी-वि. मायावी; भ्रामक; लाघवी. 'परि तो मावियांचा राॐ ।' -शिशु ३९४. मावेचा-वि. १ खोटा; कपटाचा; लबाडीचा. २ अवा- स्तव; पोकळ; ढोंगीपणाचा. ३ खोटें; ऐंद्रजालिक; मायावी. मावेचा मृग-पु. (मारीच राक्षसानें मृगाचें रूप धारण केलें होतें यावरून ल.) दिसण्यांत मोहक, मनोहर परंतु आंत पोकळ अशी वस्तु. मावेचें मंथन-न. वऱ्हाडगोष्टी; लग्नगोष्टी; चांभार फट; नसती उठाठेव.
खांदा
पु. १. बाहुटा (बाहुमूलापासून ग्रीवामूलापर्यंत.). २. जू ठेवण्याची जनावराच्या मानेवरील जागा. ३. फांद्या फुटतात तो झाडाच्या खोडाचा भाग. ४. खांद्याचे काम; घाव (खांदकरी लोकांत रूढ). ५. ओझे वाहून नेण्याची पाठीच्या वरची अगर खांद्याची जागा. ६. परिचय; सवयीने आलेली गोष्ट; झालेला अभ्यास; राबता; सराव. (क्रि. पडणे.) ७. लांब फांदी (झाडाची). (कु.) ८. (नाविक) गलबताचा विस्तार करण्यासाठी रोजाच्या पुढील टोकाला जोडतात ती लाकडे. पट्टण व खांदे यांच्यावर फळ्या जोडतात. [सं. स्कंध] (वा.) खांदा टाकणे - जुवाला जनावर जुंपल्यानंतर जू न ओढता जनावराने खाली बसणे. (बे.) खांदा देणे - प्रेताला खांद्यावरून वाहून नेणे. खांदा पडणे - रुळणे; सवय होणे. खांदामेखा देऊन काम करणे - अंग मोडून झटून काम करणे. खांदा येणे - अति श्रमाने बैलाची मान सुजणे. खांद्याखाली पदर टाकणे - स्त्रीने निर्लज्जपणाने वागणे. खांद्याला खांदा भिडविणे - एकजूट करणे. खांद्यावर घेणे - मस्तकी धारण करणे. खांद्यावर मेखा देणे, खांद्यावर गाठोडे देणे - नोकरीवरून, कामावरून बडतर्फ करणे; चंबूगबाळ्यानिशी घालविणे. डोक्यावरचे खांद्यावर येणे - दुस्सह ओझे (कर्ज इत्यादीचे) दिल्याघेतल्यामुळे हलके होणे. खांद्यास लागणे - तिरडीला खांदा देणे.
दंड
पु. १ काठी; सोटा; छडी; सोडगा; दंडा. २ मार; शिक्षा (शारीरिक). ३ शिक्षा म्हणून घेतलेला पैसा; याचे राजदंड, ब्रह्मदंड जातिदंड असे तीन प्रकार आहेत. सरकारी न्यायपद्धतीनें गुन्हा शाबीत झाला म्हणजे शिक्षेदाखल सर कारांत भरावयास पैसा. ४ खांद्यापासून कोंपरापर्यंतचा हात. ५ केलेल्या, पाडलेल्या भागांच्या खुणांकरितां शेतांत किंवा बागांत घातलेला मातीचा उंचवटा; बांध; गडगा; पाणी जाण्यासाठीं दोहों बाजूंस उंचवटा करून पाडलेली सरी, पाट; (बे.) नदीकिनारा; कांठ; (वस्त्राचे) दोन तुकडे जोडण्याकरितां घात- लेली शिवण. (क्रि॰ घालणें). [प्रा. दंडी = जुन्या वस्त्राचा सांधा] ६ लांबी मोजण्याचें परिमाण, चार हातांची काठी. २००० दंड म्हणजे एक कोस. ७ वेळेचें परिमाण, चोवीस मिनिटें. ८ पैलवानांच्या व्यायामाचा एक प्रकार; जोर. 'आनंत्या नित्यनेम उठतो दंड सवाशें काढितो ।' -ऐपो ६७. (यावरून) एखादें कठिण काम अथवा प्रचंड उद्योग. (क्रि॰ काढणें; पेलणें). ९ क्रमानें उतार असलेली किंवा निमुळती पण लांबट टेंकडी, सोंड (पर्वताची). १० डोंग- राच्या माथ्यापासून पायथ्यापर्यंत असलेला उतार, ओघळ, अरुंद वाट; दंडवाट. ११ पर्वताच्या रांगेची एक लहान शाखा; डोंग- राच्या माथ्यापासून तों पायथ्यापर्यंत वांकडीतिकडी गेलेली खड- कांची ओळ. १२ (कवाईत वगैरे प्रसंगीं केलेला) सैन्याच्या रचनेचा एक प्रकार; रांग; फरा; व्यूह. 'तया दंडीं क्षोभलें । लोकत्रय ।' -ज्ञा १.१६५. १३ ताठ उभें राहण्याची अवस्था. १४ जिंकणें, ताब्यांत, कह्यांत आणणें. १५ अपराधाबद्दल शिक्षा म्हणून घेतलेलें द्रव्य, पैसा; जातींत परत घेण्यासाठीं दिलेलें प्रायश्चित्त. १६ रताळीं, ऊस इ॰ लाव- ण्याकरितां मातीचा केलेला लांबट उंचवटा, वरंबा. १७ तडाका. 'निंदा निस्तेज दंडी । कामलोभावर पडी ।' -ज्ञा १३.४९४. १८ हिंसा. 'ऐसा मनें देहें वाचा । सर्व संन्यासु दंडाचा ।' -ज्ञा १३.३१०. १९ पाठीचा कणा. 'माजी उभारलेनि दंडे । शिरकमल होय गाढें ।' -ज्ञा ६.२०२. [सं.] (वाप्र.) आवळणें, बांधणें, दंडाला काढण्या लावणें-चतुर्भुज करणें; कैद करणें. ॰थोपटणें-१ कुस्ती खेळण्यापूर्वीं दंड ठोकणें; कुस्तीस सिद्ध होणें. २ (ल.) साहसानें अथवा कोणासहि न जुमानतां एखादें कार्य करण्यास उभें राहणें. ॰थोपटून उभें राहणें-(ल.) वाग्युद्धास तयार होणें. ॰दरदरून फुगणें-आपल्याशीं कुस्तीला योग्य असा गडी पाहिला म्हणजे पहिलवानाचे दंड स्फुरण पावून फुगणें. ॰फुर- फुरणें-मारामारीची, कुस्तीची वगैरे उत्कट इच्छा होऊन दंड स्फुरण पावणें. भरणें-तालीम वगैरेमुळें दंड बळकट व जाड होणें. ॰भरणें-शिक्षेदाखल पैसा देणें. दंडास दंड लावून- घांसून-क्रिवि. बरोबरीच्या नात्यानें; सारख्या सन्मानानें. दंडाला माती लावणें-कुस्तीला तयार होणें (कुस्तीपूर्वी दंडास माती लावतात). दंडपासून साधित शब्द- दंडादंडी-स्त्री. मारामारी; काठ्यांची झोडपाझोडपी; कुस्ती; झोंबी. [दंड] दंडायमान-वि. १ (अखंडित काठीप्रमाणें) निर्मर्याद; अपार (वेळ, काळ). २ मध्यें पडलेला; आडवा पडलेला, पसरलेला. [सं.] दंडारणा-पु. सोटा; सोडगा; बडगा. -वि. जाड; स्थूल; घन (वस्तु); बळकट; मजबूत; जाड (मनुष्य, पशु). दंडारा-ळा-वि. (शिवण) ज्यास दंड घातला आहे असें; मध्यें शिवण असणारें (वस्त्र, कपडा). [दंड] दंडावणें-अक्रि. थंडीनें अथवा अवघड श्रमानें ताठणें (शरीर, अवयव). [दंड] दंडासन-न. आळसानें (जमीनीवर) पाय ताणून पसरणें, निजणें; सरळ हात- पाय पसरून आळसानें पडणें. (क्रि॰ घालणें). [सं. दंड + आसन] दंडार्ह-वि. दंड्य; दंड करण्यास योग्य. [सं.] दंडित-वि. १ शिक्षा केलेला. दंड केलेला. २ (ल.) निग्रह केलेला; वश केलेला; मारलेला; ताब्यांत आणलेला. [सं.] दंडिता-वि. १ शिक्षा करणारा; मारणारा; शिक्षा करितो तो. [सं.] दंडिया-पु. १ बारा ते पंधरा हात लांबीचें धोतर, लुगडें. २ बाजाराचा बंदो- बस्त करणारा छोटा अधिकारी; पोलीस मुकादम. [हिं.] दंडी- पु. १ दंड धारण करणारा; संन्याशी. २ द्वारपाल. ३ -स्त्री. अर्ध्या दंडापर्यंत बाह्या असणारी चोळी. [सं.] -वि. १ दंड धारण करणारा. २ दंड म्हणजे उभी जाड शिवण असलेला (कपडा). दंडी-स्त्री. मेण्यासारखें, चार माणसांनीं उचलावयाचें टोपलीचें वाहन. डोंगर चढतांना हींत मनुष्य बसतो व हमाल ही खांद्यावर वाहतात. [हि.] दंडुका-पुस्त्री. (काव्य) हाताचा पुढचा भाग. -मोको. दंडुका, दंडुकणें, दं(दां)डूक, दंडोका-पुन. सोटा; बडगा; दांडकें; काठी; लांकडाचा लहानसा जाड तुकडा; शिपायाच्या हातांतील सोटा. [सं. दंड] दंडुकेशाही-स्त्री. मारहाण किंवा जुलूम करून अंमलगाज विण्याची पध्दति; पाशवी बल; दांडगाई. 'पोलिसांची दंडुकेशाही अलीकडे फारच बोकाळली आहे.' -केसरी १६-४-३०. दंडुक्या- वि. काठीनें मार देण्यास संवकलेला; दांडगा; जबरदस्त. दंडेरा- वि. दंडारा पहा. दंडेल-ली-वि. दांडगा; अरेराव; अडदांड; झोंड; मुख्यत्वें, जो कर्ज परत फेडण्यास नाकबूल असतो तो; दंडुक्या (मनुष्य). दंडेली-स्त्री. अरेरावीची वर्तणूक; दंडेलपणा; दांडगाई; जबरदस्ती; अन्याय; सामर्थ्याचा दुरुपयोग (मुख्यत्वें देणें न देण्यासंबंधीं). दंड्य-वि. १ शिक्षा करण्यास योग्य. २ दंड करण्यास योग्य. [सं.] दंड्याप्रमाणें-क्रिवि. शिरस्त्याप्रमाणें. सामाशब्द- ॰थडक-स्त्री. खांद्याच्या बाहेरच्या भागानें केलेला आघात. [सं. दंड + थडक] ॰दास-पु. दंडाबद्दल गुलाम होऊन राहिलेला मनुष्य. [सं.] ॰धारी-पु. यम. 'नुपेक्षी कदां कोपल्या दंडधारी ।' -राम २७. -वि. १ हातांत काठी असलेला. २ (ल.) संन्यासी. ॰नायक-पु. कोतवाल; पोलिसांचा अधिकारी. 'सवे सारीतु पातीनिलें । दंडनायका पाशीं ।' -शिशु ५०४. ॰नीति- स्त्री. १ नीतिशस्त्र; नीति; संसारांतील वर्तुणुकीचे आणि व्यवहाराचे कायदे, नियम. यालाच दंडनीति, अर्थशास्त्र, व्यवहारशास्त्र, दृष्टार्थ- शास्त्र, हे जवळजवळ पर्यायशब्द आहेत. २ (कायदा) शिक्षा करून दाबांत ठेवण्याचें शास्त्र. हें राजनीतीच्या चार भागांपैकी चवथें होय. ३ अर्थशास्त्र, आन्वीक्षिकी पहा. [सं.] ॰पत्र-न. न्यायांत खोटा ठरला म्हणजे त्यापासून दंड घेण्याचें पत्र. [सं.] ॰पक्ष (करण)-न. (नृत्य) पाय ऊर्ध्वजानु करणें व त्यावर उजवा हात लताख्य करीत राहणें. [सं.] ॰संयुतहस्त-पु. (नृत्य) हात हंसपक्ष करून बाहू पसरून एका हातानें दुसर्या हातास एकदां कनिष्ठिकेपासून आरंभ करून आंतील बाजूनें बाहेरच्या बाजूस विळखा घालणें; नंतर कनिष्ठिकेपासूनच पण बाहेरील बाजूनें प्रारंभ करून आंतील बाजूस विळखा घालणें. [सं.] ॰पाणी-पु. शिव; यम. -वि. ज्याच्या हातांत दंड आहे असा; धट्टाकट्टा व दांडगा; गलेलठ्ठ व झोंड; आडदांड. [सं.] ॰पाद-(आकाशी, चारी)- वि. (नृत्य) नूपुरपाय पुढें पसरून क्षिप्त करणें म्हणजे कुंचित पाय उचलून दुसर्या पायाच्या बाहेरील बाजूस पोटर्यांचें स्वस्तिक होईल अशा प्रकारें टांचेच्या भारावर टेकणें व मग तें स्वस्तिकां- तील पाऊल उचलून पसरणें व खालीं टाकतांना अंचित करून दुसर्या पायांत अडकविणें. [सं.] ॰पारुष्य-न. १ कडक, कठोर शिक्षा. २ काठीनें हल्ला करणें; छड्या मारणें; ठोंसे देणें; मारणें (हात, पाय, शास्त्र इ॰ कांनीं). ३ (कायदा) हल्ला; भय प्रदर्शक रीतीनें हात किंवा काठी उगारणें, मारणें. [सं.] ॰पूपिकान्याय-पु. (उंदरानें काठी नेली त्या अर्थीं तिला बांधलेली पोळी खाल्ली हें उघडच होय यावरून) कार्यकारण, अंगउपांग, प्रधानअप्रधान यांचा न्याय; ओघाओघानेंच प्राप्त झालेली गोष्ट. उदा॰ राजाचा जय झाल्यानंतर त्याच्या सेनेचा जय अर्थांतच दंडपूपिकान्यायानें होतो. [सं. दंड = काठी + पूपिका = पोळी + न्याय] ॰प्रणाम-पु. साष्टांग नमस्कार;;लोटांगण. 'दंड प्रणाम करोनिया ।' -गुच ९.९. ॰प्राय-वि. दंडासारखा; साष्टांग (नमस्कार). 'करी दंडप्राय नमन ।' -गुच ४१.१४. ॰फुगडी- स्त्री. (मुलींचा खेळ) परस्परांच्या दंडांना (किंवा खांद्यांना) धरून उभ्यानें फुगडी खेळण्याचा एक प्रकार. [दंड + फुगडी] फुगई- फु(पु)रोई-स्त्री. १ दंडासाठीं केलेली जप्ती; दंड. २ (अधि- कार्यानें) बेकायदेशीर बसविलेला दंड; बेकायदेशीर दंड बसविणें. (क्रि॰ घेणें; देणें; भरणें). ॰वळी, कोपरवळी-स्त्री. (व.) (दंडावरची) वांक; स्त्रियांचा एक अलंकार. [दंड + वेली] ॰वाट-स्त्री. १ (उजाड, भयाण असा) लांबच लांब रस्ता; जवळपास गांव, वस्ती नाहीं असा रस्ता. २ टेकड्यांच्या कडेनें गेलेली अरुंद पायवाट. ३ एकमेकास मिळणारे रस्ते. ॰वान्- वि. काठी, दंड, वेत्र इ॰ हातांत घेणार. [सं.] ॰विकल्प- पु. शिक्षेची अदलाबदल; शिक्षा कमी द्यावी कीं अधिक द्यावी याविषयीं विचारणा. [सं.] ॰सरी-स्त्री. (बागेमध्यें) पाणी जाण्याकरितां खणलेला लहानसा पाट, चर, खाचण; तसर्यांच्या बाजूचा पाट. [दंड + सरी] ॰स्नान-न. घाई घाईनें केलेलें अर्धवट स्नान; नद्यादिकांच्या ठिकाणीं अंग न चोळतां केकळ दंड मात्र भिजतील अशा प्रकारचें केलेलें स्नान; काकस्नान; पाण्यांत एक बुचकळी मारून केलेलें स्नान. [सं.]
गाहा(ह)ण
न. तारण; कर्ज देतांना तें उगवेल किंवा नाहीं यासाठीं विश्वासार्थ जो माल (दागिना, जमीन) घ्यावयाचा तो. २ (कायदा) कर्ज फेडलें जाईल किंवा दिलेलें वचन पुरें होईल अशा- करितां माल तारण देणें. (इं.) प्लेज. 'कर्जानें घेतलेली रक्कम फेडण्या- साठीं किंवा इतर आर्थिक जबाबदारी पार पाडण्यासाठीं तारण म्हणून जेव्हां स्थावर मिळकतीवरील एखादा मालकी किंवा इतर हक्कसंबंध (इंटरेस्ट) मालक दुसर्या इसमाला तबदील करून देतो तेव्हां त्या व्यवहारास गहाण अशी संज्ञा आहे.' -घका २९. [हिं. गहना; तुल॰ सं. ग्रहण?] म्ह॰ सोनें गहाण त्याला मामा जामीन कशास? सामाशब्द- ॰खत-चिठ्ठी-पत्र-रोखा-नस्त्रीनपु. १ ज्या पत्रानें गहाण टाकलेल्या मिळकतीचा कबजा सावकाराला देण्यांत येतो तें. -घका ४.२ विद्यमान किंवा पुढील कर्जाबद्दल एक मनुष्य स्वतःचे मिळकतीवर दुसर्यास कांहीं हक्क उत्पन्न करून देतो असा लेख. -जनरलस्टँपचा कायदा; ऋणको व धनको या दोघांमध्यें झालेला, पैसे व त्याबद्दल गहाण पावल्याचे कबुलीचा, लेख. ॰दार-वि. तात्पुरतें गहाण धारण करणारा; ज्याकडे गहाण आहे तो (इसम). ॰पाहण-गाहाण पहा. [गाहाण द्वि.] ॰लाहण- न. १ ज्यांत कर्जाऊ रक्कम व्याजासह गहाण मालाच्या किंमती- पेक्षां जास्ती होते अशी गहाणाची भानगड, गहाण सोडून देऊन मिटविणें. (क्रि॰ करणें). २ विशेषण किंवा क्रिवि. प्रमाणेंहि उपयोग होतो. ॰वट- क्रिवि. गहाणांत; गहाणासारखी. -वि. गहाण ठेवलेली (वस्तु) [गहाण + वट प्रत्यय] -णाचा व्यापार- रोजगार-पु. गहाणावर पैसे कर्जाऊ देण्याचा धंदा; सावकारी.
विकार
पु. १ विकृत; बदल; स्थित्यंवर; पदार्थाचें रूपां- तर किंवा बदललेलें रूप. 'दहीं हा दुधाचा विकार. वाफ, गारा हा जलाचा विकार. सुवर्णाचा विकार अलंकार. मृत्तिकेचा विकार घट.' २ दुखणें; व्याधि; रोग; अस्वास्थ्य. ३ भाव; उत्थित भावना (कामक्रोधादि); क्षुब्ध मनोवृत्ति; जीवाची स्वाभाविक, निश्चल स्थिति जाऊन आलेला कसलाहि क्षोभ. 'काम-क्रोध-लोभ- मोह-विकार, मनोविकार.' 'तिहीं विरक्तीचि ज्वाला घेतली । तंव विकारांचीं इंधनें पळिपलीं ।' -ज्ञा ४.१२९. ४ विनाश. 'ब्रह्म याचा हेत भवानी सुंदर । अंगुष्ठें विकार आणियेला ।' -ब १२८. ५ विस्तार. -हंको ५१३८. ६ भेद; निरनिराळा प्रकार. 'आणि विकारांची जे वारी । ते विपरीत ज्ञानाची परी ।' -ज्ञा १५.५२१. ७ परिणाम. -ज्ञा १७.५९. [सं.] विकारक, विकारी-वि. (रसा. शाप.) विकार करणारा. १ रासायनिक क्रिया घडवून आणणारा; (इं.) अॅक्टिनिक. २ (तर्क.) ज्यांची क्रिया दुसऱ्यावर घडते तें; (इं.) एजंट. -न्यायप २९. विका- रणें-अक्रि. आकाराला येणें; भिन्नरूप धारण करणें; विकासणें. 'आतां वस्तुजातचि आघवें । मजपासूनि जाणवें । विकारलें असे ।' -ज्ञा ७.५२. विकारवणें-सक्रि. विकारवश करणें. 'बहु प्रकारें विकारवावें, चित्त तयाचें तपोवित्त हळु जपुनि घ्यावें ।' अमृत, शुक्रचरित्र २१. विकारी-पु. साठ संवत्सरांपैकीं तेहती सावा संवत्सर. -वि. विकारयुक्त; दुखणेकरी; आजारी; (रोगानें किंवा मानसिक क्षोभानें) पीडिलेला. ३ विकार करणारें; बाधक. ४ परिवर्तनशील; बदलणारें; विकार पावणारें. ५ नाशवंत. [विकार] विकार-वि. रूपांतर किंवा बदल केला जाण्यास योग्य, शक्य, आवश्यक इ॰ [सं.]
वे(वें)ठ
पु. १. वेट पहा. २ वळलेल्या चऱ्हाटाचे जे अनेक पेढ असतात ते प्रत्येक. वेठण-नन. १ नांगराचें जोखड टेरूंजवळ इसाडास जोडण्याचा दोर; जुंपण व इतर दोर; विण- कर्याच्या राहाटाचा दोरखंड; तेगार. (सामा.) सर्व आउतांस येटक घालण्यास लागणारी दोरी. २ (कों.) सुंभाची जाड दोरी; चऱ्हाट. ३ गाडी इ॰ कामासाठीं जोडणें; गाडीवर संरजाम घालणें. ४ (कुण.) खुबी; सफाई; हातोटी; कसब; उद्योगधंद्यां- तील कौशल्य. ५ वेष्टन पहा. ६ घोड्यावरील मांड. [सं. वेष्टन; प्रा. वेठ्ठण] वेठणें-उक्रि. १ गाडी, नांगर, कुळव इ॰ ला वेठण बांधणें; जोखड आणि इसाड वेठणानें एकत्र बांधून गाडा, नांगर इ॰ कामाला तयार करणें. २ (दोर्या, जोखड इ॰) एकत्र जोडणें, बांधणें, जुंपणें. ३ (सामा.) वेढणें पहा. सज्ज, तयार होणें. वेठला शब्दाच्या द्विरुक्तीनें आठूनवेठून, आठलावेठलां, असे प्रयोग येतात. आठलावेठला-वि. दोर्या, बंद इ॰ नीट बांधून तयार केलेला; व्यवस्थित रीतीनें जोडलेला; सज्ज केलेला -अक्रि. १ वेष्टलें जाणें; बांधलें जाणें. 'आणि पूर्णाहंता वेटलों' -अमृ १०.१५. 'ते भोगावरी न वेठती । त्यागावरी न नुठती ।' -एभा १.४८. २ पोशाख करणें; धारण करणें. 'जैसा जैसा पुरुष वेंठे । तैसी तैसी छाया नटे ।' -एभा २.६६. [सं. वेष्टन; प्रा. वेठ्ठण]
काम
पु. १ मदनविकार; संभोगेच्छा. 'या कारणें कामें । स्त्रीपुरुष युग्में ।' -ज्ञा १६.३१०. 'कामें हिरतल्या दृष्टी । धनुष्यें गळालीं पै मुष्टी ।' -एरुस्व ७.५५. २ मदन; कामदेव. 'जाळ गळ्यामधिं माळ कशाला व्याळ काम कोपला ।' -राला ८७. ३ इच्छा; स्पृहा; आकांक्षा. 'तुला राम सेवेविणें काम नाहीं ।' -वामन भरतभाव २३ ४ धर्म, अर्थ काम, मोक्ष या चार पुरुषार्थांतील तिसरा (विषयोपभोग). ५ (संस्कृत रचनेंत) आपल्या मना- प्रमाणें वर्तणारा. जसे:-कामवाद = वाटेल तें बोलणारा; कामभक्ष = इच्छेप्रमाणें खाणारा; कामचार = आवडेल तें करणारा इ॰ ६ (संस्कृत रचनेंत तुम् प्रत्ययांत रूपापुढें.) इच्छिणारा; वांछिणारा. जसें:- गंतुकाम = जाऊं इच्छिणारा; भोक्तुकाम = खाऊं इच्छिणारा इ॰ ७ इच्छा; लोभ. 'जे स्वर्गकामु मनीं धरिती ।' -ज्ञा २.२५०. 'करि काम निःकाम या राघवाचें ।' -राम ७७. (वाप्र.) ॰णें- इच्छा करणें. 'जेणें आत्मसुख कामिजे । पंडुकुमरा ।' -ज्ञा ४. १२४. 'त्वा कामिला मानसें ।' -निमा. सुभद्राचंपू ५.१२. 'मज कमाणे हा शुद्धकाम । ज्याचा आराम मज माजीं ।' -एभा ११.७४८. -माथ(थि)णें-कामविकारानें युक्त होणें. 'कामार्थी करिताति युद्ध आपुल्या जातींत कामाथिले ।' -निमा सुभद्राचंपू ६.४. (सामाशब्द) ॰कर-पु. मंदनाचा वेग. 'माया नियंता जो ईश्वर । तो कामकर निवारी ।' -एभा २६.१७८. ॰कळा- स्त्री. कामशास्त्र; कामाचा आवेग. 'हास्य विनोद कमकळा । हें ज्ञान नव्हे ।' -दा ५.५.२९. ॰कांति-स्त्री. मदनासारखी कांति; सुंदर वर्ण, रूप. 'कीं काम कांति धवळारें । काळरात्रीची ।' शिशु ९४६. ॰कारी-वि. मदनाचा वेग उत्पन्न करणारा. 'नसे अंतरीं कामकारी विकारी।' -राम ५०. ॰क्रोध- लोभादि-पुअव. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपूंबद्दल योजावयाचा संक्षेप. 'विकल पडतां प्राक्तन । स्वधर्मीं राहटे कीं मन । कामक्रोध शत्रु संपूर्ण । केले आधीन तुवां कीं ।' -पांप्र १५.१३०. 'परस्त्रीसीं काम निषिद्ध । ब्राह्मणा- वरी नसावा क्रोध । सुहृदयातीसीं मद । सहसाही न करावा ।' -पांप्र १५.१३३. 'सत्संग धरावा आधीं । नायकावी दुर्जनांची बुद्धी । कामक्रोधादिक वादी । दमवाबे निज पराक्रमें ।' -पांप्र ३९.२१. ॰गृह-न. स्त्रियांचें जननेंद्रिय. 'कामिनी कामगृहा- सक्ती । प्राणी प्राणातें स्वयें शिणवीती ।' -एभा ३.२४२. ॰ग्रस्त-पीडित-दग्ध-व्यथित-व्याकुळ-व्याप्त-वश- आकुल-आक्रांत-आतुर-अंध-आधीन-अन्वित-वि. मदन विकारानें क्षुब्ध झालेला (सर्व शब्द समानार्थक आहेत.) [सं.] ॰चेष्टा-स्त्री. शृंगारचेष्टा, क्रीडा; कामविकार उत्पन्न करणारे हावभाव, चाळे. 'कामचेष्टा करी तरळी । मधुर वचन बोलोनियां ।' [सं]. ॰ज्वर-पु. १ मदनाचा वेग. २ मदन- पीडेनें झालेला संताप. ॰ट-वि. मदनानें व्याप्त. 'शिश्न कामट मातलें ।' -गीता २.५०६१. ॰थाळोरें-रोळें-वृषण; अंड- कुली. 'कामथाळोरां पुसाटीं । घालुनि पडे ।' -एभा १४.३८२. [काम + थारोळें] ॰देव-मदन. ॰धेनु-स्त्री. १ (पौराणिक) इच्छिलेली वस्तु तात्काळ देणारी स्वर्गांतील एक गाय. २ (ल.) नेहमीं उपयोगी पडणारा धनी; नानाप्रकारचा हिकमती नोकर; अति- शय उत्पन्न येणारें शेत, झाड; नानाप्रकारचे विषय ज्यांत नमूद केले आहेत असें पुस्तक. 'मना राम कल्पतरु कामधेनु' -राम ६०. 'जयातें कामधेनु माये । तयासि अप्राप्त कांहीं आहे ।' -ज्ञा १.७९. २ पुष्कळ ठिकाणीं उपयोगी पडणारें वस्त्र, वस्तु, पदार्थ. ३ सर्वांना उपयोगी पडणारा माणूस. ४ (ल.) भिक्षा मागण्याची झोळी. (क्रि॰ लाभणें.) ॰निक-न. मनांत कांहीं इच्छा धरून केलेलें व्रत. -वि. इष्ट; आवडण्यासारखें (काम- धंदा). [सं.] ॰पिसा-वि. मदनविकारानें व्याप्त झालेला. 'तया कामपीसा धरी कंठनाळीं ।' -दावि २४३. ॰प्रकोप-पु. कामविकाराचा क्षोभ. [सं.] ॰बाज-वि. विषयासक्त; स्त्रीलंपट; बाहेरख्याली; रंडीबाज. ॰भक्ति-स्त्री. मनांत इच्छा धरून केलेली भक्ति, उपासना; याच्या उलट भावभक्ति. [सं.] ॰मगरमिठी- स्त्री. मदनरूपी मगरानें घातलेली मिठी; तीव्र संभोगेच्छा. ॰मरण- न. इच्छामरण; वाटेल तेव्हां स्वतःला मृत्यु आणण्याची शक्ति. [सं.] ॰मरणी-वि. इच्छामरणी. [सं.] ॰रमण-वि. स्वेच्छेनें विहार करणारा. 'जो सकळ मंगळां मंगळ पूर्ण । जो कां गोकुळीं कामरमण।' -एभा १. २३९. ॰रूप-न. १ इच्छेप्रमाणें धारण करतां येणारें रूप. २ एक देश (आसाममध्यें). -वि. १ इच्छेप्रमाणें रूप धारण करणारा. २ सुंदर; मनोहर; रमणीय; ज्याचें मदनासारखें रूप आहे असा. ॰रूपि-वि. कामरूप (वि.) पहा. ॰शास्त्र- रतिशास्त्र; कोकशास्त्र; स्त्री-पुरुष संभोगाची इतिकर्तव्यता ज्यांत सांगितली आहे तें शास्त्र; शृंगारशास्त्र; स्त्रीपुरुषप्रेमविषयक शास्त्र. [सं.] ॰सदन-स्थान-न. जननेंद्रिय; योनि; उपस्थ. कामांतक-पु. मदनाचा नाश करणारा; शंकर. -मातुर-वि. मैथुनेच्छेनें विव्हळ झालेला-ली. 'जाणितला तिहीं कामातुर नारी । कृष्णभोगावरि चित्त ज्यांचें ।' -अमृत (शुक्रचरित्र) २५. -मानल-ळ-पु. मदनाचा दाह; कामविकाराचा संताप. 'मी कामानळें करून । गेले आहळोन प्राणपती ।' [सं.] -मारी-पु. कामांतक पहा. 'त्या प्रभुयशासि मानी अमृताचें पूर्ण ताट कामारी।' -मो परंतु रामायण. -मालय-कामसदन पहा.
गर्भ
पु. १ पोटांतील जीव; पुरुषवीर्य व स्त्रीरज यांपासून तयार झालेला व स्त्रीच्या गर्भाशयांत असणारा पिंड. २ मगज; गीर; मेंदू; काळजाचा बोका; (सामा.) आंतील भाग. ३ (ल.) तत्त्व; कस; तात्पर्य; हांशील; सारांश; ऐवज. 'त्याजवरून येथील गर्भ सर्व अवगत जाहलाच असेल.' -पेद १.४४. ४ व्यापलेली जागा; क्षेत्रफळ. ५ मध्य; केंद्र; मध्यबिंदु. ६ अर्थ; भाव. 'ग्रंथ- श्लोक-वाक्यगर्त' ७ आंतील प्रदेश, बाजू. 'या चौकटीचा गर्म साधा.' ८ गर्भाशयः पोट. 'नाना भरते सिंधुगर्मीं ।' -ज्ञा ११. ६५०. ९ आंतील खाली; बाळंतिणीची खोली. १० देवळाच्या गाभारा समासांत-गर्भ-कवि-गायक-बृहस्पति = उपजत-कवि- गायक-वक्ता इ॰ [सं.] (वाप्र.) ॰गर्भगाळ कोसळणें-गर्भगळित होणें.'गभगळ कोसळला.' -ऐपो ५८. [गभ] ॰संभवणें-समा वणें-राहणें-पोटांत राहणें; गर्भार राहणें; गरोदर होणें. गर्भाचें करणें-होणें-चैनीनें जेवणें; पोटपूजा करणें; आपल्या पिशव्या भरणें. सामाशब्द-॰कर-कर्ता-कारक-जनक-वि. गर्भ धारणेस कारणीभूत होणारा; गर्भस्थापना करणारा. ॰कोश-पु. गर्भाशय; पोटांतील गर्भ राहण्याचें ठिकाण. [स] ॰ग(गि)ळीत- गीळ-वि. १ जिनें गर्भ टाकला आहे किंवा जिचा गर्भ गळाळा आहे अशी. १ ज्याची पांचावर धारण बसली आहे असा; घाबरा; भ्यालेला (बहुधा लाक्षणिक अर्थीं प्रयोग. [गर्भ + गळणें] ॰गलित होणें-(भीतीनें गरोदर स्त्रियांचा गर्भ गळतो त्याव- रून) फार घाबरणें. 'वाघ दृष्टीस पडतांच तो गर्भगळित झाला. ॰गुल्म-न गार्भाच्या वाढीच्या आनुषंगिक मांसग्रंथीची वृद्धि. [स.] ॰गृह-न. गाभारा; माजघर. [सं.] ॰गोळ-पु. गर्भातील मूल. 'जैसा गर्भगोळु उद्यमातें । कोणाही नेणे ।' -ज्ञा ९.३३५. ॰ग्रहण-न. गर्भधारण; गाभ धरणें. [स] ॰घाती-पाती-वि. ज्याने गर्भाचा (वेताचा) घात होतो ते; गर्भाचा घात करणारा. [सं.] ॰चलन-न. गर्भाशयांतील गर्भाची हालचाल, चळवळ किंवा त्यांत प्राणशक्ति येणें. [सं.] ॰च्युत-वि. गाभ पडलेली; धुपावलेली. ॰च्युति-स्त्री. गाभ पडणें; धुपावणें. ॰छाट-पु. १ गर्भाशयांत गर्भाचा नाश. त्यावरून २ (ल समूळ नाश; संहार; गर्भाशयांतील मूल सुद्धां कापणें.-पुस्त्री १ निवड; वेचंणी; टिपणी; निवडलेला भाग. २ कुलुपी गाळ्यांचा स्फोट, धडाका. -वि. गाळ्या, छरे, खिळे, दगड इ॰ नीं भरलेला (कुलुपी गोळा, तोफ). -स्त्री. १ कुलुपी गाळा. २ गरनाळी तोफ. [सं. गर्भ + हिं. छाटना = कापणें, तोडणें] ॰छाट गोळा-पु स्फोटक द्रव्ये भरलेला गाळा; कुलुपी गोळा. ॰छाट ताफ-स्त्री. कुलुपी गोळे भरलेली तोफ; तसले गोळे भरावयाची तोफ; गरनाळी ताफ. ॰छाया-स्त्री. गर्भ- धारणा झाल्याची सूचक खूण, चिन्ह, दर्शन (मुखावरील टवटवी इ॰). 'तत्काळ आली तिस गर्भछाया ।' -सारुह २.२७. 'आंगीं नसतां गर्भछाया । वंध्या डोहळे स गतसे वायां ।' [सं.] ॰दास- दासी-पुस्त्री. जन्मापासून एखाद्याची बटीक, दासी, कुणबीण; तिचें मूल, लेकवळा (मुलगा, मुलगी); दासदासीचा पुत्र किंवा कन्या; दासीपुत्र-पुत्री. [सं.] ॰द्वार-न. गर्भाशयाचें मुख, तोंड. ॰धनी-वि. (चंद्रपुरी) गर्भार. 'हरणी एकटी वनीं । असे रेगभ- धनि । पारधी आला ।' -मासिक मनोरंजन, जुलै १९३२. [गर्भ + धनी] ॰धारणा-न. गर्भ राहणें; गाभण होणें; गरोदर होणें. [सं.] ॰नाडा-स्त्री. नाळ; वार. [सं.] ॰पंडित-पु. १ गर्भात असतांच विद्वान झालेला पुरुष. २ (ल.) अतिशय मूख, अक्षरशत्रु मनुष्य. [सं.] ॰पतन, पात-न. गर्भच्युति; धुपाव; पूर्ण महिने न भरतां गर्भ बाहेर येणें, बाळंत होणें, विणें हा होऊं नये म्हणून लाजाळु धायटीचीं फुलें, कमळाचीं फुलें, मध. लोध्र यांचा काढा कमळाचा कल्क घालून घ्यावा. -योर २.६२५. ॰पोषण- न. गर्भाशयांत गर्भाचे संगोपन. [सं.] ॰पत्र-न. आंतून निघणारें कोंवळ पान. 'तियें अंगवसां गर्भपत्रें ।' -ज्ञा १५.९९. ॰पुट- न. गाभ्याचा पडदा; ज्यांतून सुयरा बाहेर येतो तो भाप. 'कर्पूरकेळीचीं गर्भपुटें ।' -ज्ञा ११.२५०. [सं.] ॰भाव-पु. तात्पर्य; गोषवारा. 'त्या कथेचा गर्भभावो । सांगा मज ।' -कथा १.२.२८. ॰यातना-स्त्री. गर्भांत असतांना त्या प्राण्यानें भोगलेले क्लेश. [सं. गर्भ + यातना] ॰रेशमी-वि. (कांठाशिवाय अंगांत रेशमाचे धागे असलेल (वस्त्र). याच्या उलट गभसुती. ॰वती-स्त्री. गर्भार, गर्भारशी स्त्री. [सं.] ॰वायु-पु. गर्भाचा किंवा गुल्माचा वात. [सं.] ॰वास-पु. १ गर्भाशयांत राहणें. 'नवमास गर्भवासीं । कष्टविलें त्या मातेशीं ।' २ जन्माचा फेरा; मुक्ति नसण. 'तुका म्हणे गर्भवासीं । सुख घालावें आम्हासीं ।' -तुगा ११९३. [सं.] ॰वासी-निवासी-वि. गर्भाशयांत राहणारा; पोटांत असणारा. [सं.] ॰विक सशास्त्र-न. गर्भाची वाढ कसकशी होते इ॰ शिकविणारें शास्त्र. ॰वेदना- स्त्री. स्त्री बाळंत होतांना तिला होणारे कष्ट; प्रसूतियातना. [सं.] ॰वेष्टन-न. गर्भास लपेटणारी अंतरत्वचा; खोळ; वार. [सं.] ॰वोवरा-पु. गर्भ; गर्भांत असलेला जीव. 'देवकीचा गर्भवोवरा । माझा अवताररूप होय ।' -ह ३.२५. [गर्भ + वोवर = घर] ॰शंकु-पु. मृतगर्म बाहेर काढण्याचें शस्त्र. [सं.] ॰शय्या- स्त्री. गर्भाचे विश्रातिस्थान; गर्भाशय. [सं.] ॰शूर-वि. जन्मा पासून धीट; स्वाभाविक धैर्याचा. [सं.] ॰श्राव, स्त्राव-पु. गर्भपात; धुपणें. [सं.] ॰श्रावी-वि. गर्भपात करणारें; गर्भ घाती. [सं.] ॰श्रीमंत, श्रीमान्-वि. जन्मापासून श्रीमंत; वाडवडिलांपासून ज्याच्या घरीं संपत्ति आहे असा पिढी जात श्रीमान. [सं. गर्भ + श्रीमान] ॰संभव-पु. गर्भधारण. [सं.] ॰सुखी-वि. गर्भश्रीमंत; जन्मापासून कशाचीहि ददात नसलेला. 'शिष्य नसावा गर्भसुखी।' -दा ५.३. ३३. ॰सुती-वि. ताणा (उभें सूत) सुताचा व वाणा (आडवें सूत) रेशमाचा असें (वस्त्र) [गर्भ + सूत] ॰सूत्र-न. १ मध्यरेषा; मध्यापासूनची रेषा. २ (ज्यो.) भूम व्यापासन ओढलेली रेघ. ३ केंद्रातून जाणारी कोणतीहि रेघ. [सं.] ॰स्थ-वि. १ गर्भाशयांत असलेला २ मध्यवर्ती आंतील; आंत किंवा मध्यांत बसलेला. ३ (काव्य) गर्भार. 'तिघी राण्या जाहल्या गर्भस्था ।' -रावि ४.२७. ॰स्थान-न. गर्भाशय. [सं.] ॰ज्ञानी-वि. गर्भपंडित; जन्मतः ज्ञानी, विद्वान असलेला. ॰गर्भीं-क्रिवि. पोटात असतांना; जन्मापासून; जन्मास येण्यापूर्वीं. समासांत-गर्मीं अंधळा-रोगी-ज्ञानी- शहाणा-श्रीमंत. गभीं-रोग-राज्य-वैराग्य-पुन. जन्मा पासून रोग इ॰ ॰रोजमुरा-जन्मास येणार्या मुलाची पोटगी इ॰
माचा, माचवा
पु. १ काथ्यानें विणलेला एक विशिष्ट आकाराचा पलंग. 'गणिले कुशशयनोनचि कृष्णेनें हे पलंग हे माचे ।' -मोआदि ३४.२३. २ पलंग; मंचक. 'दूत त्रासासि घेतीं म्हणुनि सुमति ते जोडिती पाय माचे ।' -मोकृष्ण ७२.५३. ३ शेताच्या राखणीसाठीं चार खांबावर केलेली बसण्याची जागा; माळा. ४ माच्याचा खूर. ५ पाण्याचा पाट ओलांडून पलीकडे जाण्यासाठीं केलेली वाट. 'गांवच्या माच्यापाशीं गाडी आली.' -खरादे. [सं. मंचक; प्रा. मंचओ; अप. मंचऊ] माचाड-स्त्री. मोटेनें पाणी वर काढण्याकरितां जिला मोटेचा नाडा (दोर) बांधतात ती मोटेच्या तोंडावरील लाकडी चौकट. माचाळ-न. माचा अर्थ. ३ पहा. माची-स्त्री. १ पर्वताच्या पायथ्याजवळील किंवा पायथा व शिखर यांच्या मधील सपाट जमीन; उपत्यका. २ किल्ल्याच्या तटाखालील उताराचा माग. ३ माचा; खाट. ४ (व.) खुर्ची- सारखे समोर खालीं पाय सोडून बसण्याचा छोटा छकडा. ५ चार खुटांवर आडवीं उभीं लाकडें ठेवून केलेली चवकट. (उन्हांत धान्य इ॰ वाळत घालण्यासाठीं, पेंढा ठेवण्यासाठीं). ६ वासरें, करडें इ॰कांकरितां खुंट व फळ्या पुरून (केलेलें आवार; कोंड वाडा; कोंडण.[सं. मच् = धारण करणें; मंच] माचुं(चों-चो)डा-पु. (कों.) (भात, नाचणी इ॰कांच्या) पेंढ्यांचा बिडा; पेंढी. माचो- पु. (कु.) दोऱ्यांनी विणलेला पलंग, चोपाळा. मामा(चु) ळी-स्त्री. १ पेटी, धान्याचें गोण इ॰ ठेवण्याची घडवंची. २ लहानसा माच; माळोंचा; गवत, पेंढे इ॰ साठीं केलेली उंच जागा.
हक्क
पुन. १ अधिकार; मालकी; वारसा. २ देशमुख, देशपांडे, महाजन इ॰ पिढीजाद महाल-गांव-अधिकार्यांचा गाववसुलींतला किंवा पिकाचा वांटा, हिस्सा; वर्षासन. 'आम्ही मोहिब्बाचे हक्कामध्यें हमेशाचे दर्गामध्यें शुक्रगुजारी करीत असतो.' -ब्रच ५.२४०. ३ (ल.) धंदा; उद्योग; काम. 'झाडावर चढणें हा वानराचा हक्क आहे.' ४ पगार; प्राप्तव्य. 'ज्याजती होईल तितकी किंमत करून त्याच्या हक्कांत धरावी.' -सभासद २३. ५ नेमणूक. 'पाटील कुळकर्णीं यांसी हक्क बांधून दिला.' -सभासद २५. ६ सत्य. [अर. हक्क्] ॰करणें-देहांतशिक्षा करणें. -मदरु १.१६. ॰होणें-मरणें. हक्का-(का)टक्कां(कां)त येणें, हक्काटकास येणें-१ तावडींत, सपाट्यांच सांपडणें; आटो- क्यांत येणें; हातांत-अवसानांत-टप्प्यांत-कक्षेंत-आवांक्यांत- अधिकारांत येणें २ मर्जीस येणें; संमत होणें. ३ आंकड्यांत, हिशेबांत बसणें. हक्काटक्यांत जाणें-गुजरणें-उरकणें- अटपणें-आटोपणें-मरणें-भर तारुण्यांत, ऐन उमेदींत मरणें, नष्ट होणें. ॰अदाव-पु. १ हक्क रुसूम पहा. २ (सामान्यतः) हक्क. ॰जवारी-स्त्री. हक्कदारपणा. -शर. ॰टक-टाक-पु. १ देशमुख इ॰. पिढीजाद गांवकामगारांना रोख द्यावयाचे पैसे. २ (सामान्यतः) हक्क. ॰ताला-उच्च ईश्वर. हकताला पहा. ॰दस्तुरी-स्त्री. १ हक्क आणि वहिवाट; हक्क आणि ठरलेली बलुतीं, वतन. २ (सामान्यतः) हक्क. ॰दार-वि. १ वार्षिक वसुलाचा किंवा पिकाचा अंशतः मालक. २ वारस; वांटेकरी. [फा] ॰दारी-स्त्री. १ हक्कदाराचा भाग, वांटा. २ हक्क धारण करणें; हक्क. ॰माल-पु. सत्तेचा माल; हक्काचें स्वामित्व; आपला योग्य हक्क आहे असा माल. 'हा पदार्थ माझा हक्कमाल आहे, माझा मला द्यावा.' 'बक्षीस कांहीं देणार होतां तें न द्याल तर न द्या पण चाकरीचा पैसा तो तर माझा हक्कमाल आहे.' हक्क- नहक्क, हकनाहक-क्रिवि. १ बरोबर असो कीं नसो; न्यायानें किंवा अन्यायानें; सकारण किंवा अकारण; कशाहि रीतीनें अविचारानें. २ नाहक पहा. [फा. हक्-ना-हक्] ॰रसूम- रुसूम-लाजिमापुअव. १ देशपांडे इ॰ पिढीजात अधिका- र्यांचे हक्क आणि विशेष अधिकार; वतनदारी हक्क वगैरे. २ हक्क व भोगवटा; विशेषाधिकार; कायदेशीर हक्क व प्रस्थापित मालकी. ॰हराम-हरामाचा-वि. वाजवी व न्याय; बरोबर कायदे- शीर. 'हक्क हरामाचा पैसा-अधिकार-वृत्ति-मिळकत.' (हराम शब्दाचा गैर कायदा असा मूळ अर्थ वाईट असतां मराठींत या वाक्प्रचाराला सोवळेंपणा आलेला आहे). हक्काहरामाचा पहा. ॰हलाल-हलालाचा-वि. वाजवी; न्याय्य; कायदेशीर. [अर-हलाल् = कायदेशीर] ॰हवाल-पु. सुस्थिति; भरभराट; (पीक, बाजारभाव, पाऊस, व्यक्ति इ॰ ची). ॰हिशेब-शोब- पु. हक्क आणि येणें; बरोबर, खरा हिशेब-हिशेबी येणें. हक्काचे दाणे-खळें झाल्यावर मळण मातेरें व चांगले दाणें कांहीं महारास सोडावे लागतात तो हक्क. हक्का हिशेबाचा-वि. निर्विवाद हक्काचा, मालकीचा. हक्का हरामाचा-वि. १ न्याय्यान्याय्य रीतीनें मिळविलेला; भल्याबुर्या मार्गानें केलेला (पैसा). २ अन्याय्य; अप्रामाणिक; लबाडीचा (धंदा, काम, पैका इ॰.)
लोळ
पु. लोळण्याची क्रिया; लोळणें. दुःखातिशयानें गड- बडां लोळणें (या अर्थीं रडण्याचा किंवा रडून लोळ घालणें किंवा घेणें असा शब्द-प्रयोग करतात.) २ (ल.) (ताप, लोकांचा उपद्रव इ॰ मुळें) एखाद्याची झालेली दुरवस्था किंवा पीडितपणाची स्थिति; थकवा; अति श्रांत स्थिति; भागोटा. 'पोरानें किंवा तापानें माझ्या जिवाचा लोळ केला.' ३ (लोथ-ध च्या ऐवजीं असण्याचा संभव) लठ्ठ पोटांचें पोर; अगडबंब माणूस, धूस, उंदीर इ॰ मोठा प्राणी; धूड. 'काय हो घुशीचा लोळ सांपडला पिंजऱ्यांत.' ४ अव्यवस्थितपणें बांधलेला गठ्ठा; अव्यवस्थित पदार्थ, चिरगुटें, पोथ्या इ॰ ची रास ढीग. ५ काम, कारभार, कारखाना इ॰ चा पसारा; व्याप. ६ चाळा; वेडेंवांकडे कृत्य, वागणूक. 'वदवती न कवीसहि लोळ ते ।' -वामन, भामाविलास (नवनीत पृ ९९). [लोळणें] निजून लोळ पडणें-पसरणें-एखाद्या मोठ्या ओंड्यासारखें किंवा धोंब्याच्या कपड्यांच्या पसाऱ्याप्रमाणें- गाठोड्याप्रमाणें पसरणें-पडून असणें. (या अर्थीं पांघरूणाचा लोळ कामाचा लोळ इ॰). ॰आकांत-पु. मोठमोठ्यानें ओरडणें; प्रचंड व भयंकर गर्जना; आक्रोश. (क्रि॰ करणें; मांडणें; लावणें; चालविणें; उठणें; होणें). २ जोराचा प्रयत्न; धडपड; अविरत श्रम. ३ आरडाओरड; क्षोम; एखाद्या गोष्टीविषयींची सार्वत्रिक तक्रार; पटकी, पाऊस, दरवडेखोर, माहागाईची धारण इ॰मुळें उत्पन्न झालेली परिस्थिति. 'पेंढाऱ्यांचा-जरीमरीचा-पावसाचा- पाण्याचा-धारणीचा-माहागाईचा-लोळ-आकांत.' [म. लोळणें + आकांत] ॰कंड, लोळकण-स्त्री. १ लोळण; जमिनीवर गड- बडां लोळणें (विशेषतः जरूरीचें काम असतां किंवा जबरदस्ताचा प्रतिकार करतांना); एखादा जबरदस्त मनुष्य दुसऱ्याला त्याच्या इच्छेविरुद्ध ओढून नेत असतां त्यानें पडणें, लोळणें, धडपडणें इ॰ त्याच्या सर्व क्रिया. २ एखाद्याचें मन वळविण्या- करतां त्याच्यापुढें लोळण घेणें; लोटांगण घालणें. (क्रि॰ घेणें, मारणें). 'रांडाच्या पायीं लोळकंड घेणारा बुढ्ढा मूर्ख.' -नारुकु ३.४२. ३ कुत्रीं, मांजरें इ॰ चें बागडतांना एकमेकांवर उड्या मारणें, एक- मेकांच्या अंगावर लोळण घेणें. ॰घोळ-पु. १ (कागद, चिर- गुटें, खाद्यपदार्थ इ॰ ची) कालवाकालव; डिवचाडिवच; कुसकरणी; चुरडणें; घोटाळा; मिश्रण. २ हिशेब, जमाखर्च, कारभार इ॰ ची अव्यवस्था; घोंटाळा; गुंतागुंत; गोंधळ. ३ मनाची अस्वस्थता; गोंधळलेली स्थिति; विसकटलेली स्थिति. (क्रि॰ करणें; होणें). ४ हट्टी किंवा द्वाड पोर जमिनीवर लोळून व हातपाय आपटून करतें तो गोंधळ; हूड किंवा उच्छृंखल पोरानें घेतलेली लोळण; केलेली धडपड-गडगडणें. [लोळणें + घोळणें] ॰पट- स्त्री. लोळण; आजारामुळें आलेली पडून राहण्यासारखी स्थिति; अंथरुणावर पडून लोळणें; एखाद्या साथीनें पुष्कळांना दुखणें येऊन लोळत पडण्याची स्थिति; आजारामुळे आलेली दुर्बलता; हीन- दीनपणाची स्थिति. [लोळणें + पडणें] ॰वडी-स्त्री. निर- निराळ्या डाळींच्या चुरीच्या पिठाची लांबट वळवटी करून ती उकडल्यानंतर तिची केलेली वडी. [लोळणें + वडी]
मृग
पु. १ हरिण; काळवीट. २ सत्तावीस नक्षत्रांपैकीं पांचवें नक्षत्र. ३ मृग नक्षत्राचा पाऊस. ४ सामान्यपणें चतुष्पाद प्राणी; पशु; जनावर. [सं. मृग् = शोधणें] म्ह॰ मृगाचे आधीं पेरावें बोंबेचें आधीं पळावें. सामाशब्द- ॰छाल-छाला-पु. मृगा- जिन; हरिणाचें कातडें. 'शेले शाली शाला दुशाल । स्वीकारा सांडून मृगछाल ।' -नव १७.१३७. ॰जल-ळ-न. अति- उन्हानें जमीन किंवा वाळवंट सडकून तापलें म्हणजे त्या लग- तच्या हवेचे थरहि तापून हलके होतात. ते वर जाऊं लागले म्हणजे हवा पाण्याच्या लाटांप्रमाणें हलूं लागते व ते थर पाण्या- प्रमाणें भासतात अशा रीतीनें होणारा पाण्याचा भास. ॰जल- स्नान-न. अशक्य गोष्ट; खपुष्प. ॰तृषा-तृष्णिका-स्त्री. मृग जळ पिऊन शांत होणारी तृष्णा; अशक्य गोष्ट. ॰नयना- नैना-नेत्री-लोचना-स्त्री. हरिणाच्या डोळ्यांसारखें डोळे अस- लेली स्त्री; सुंदर स्त्री. ॰नाभि-मद-पु. कस्तुरी. 'मृगनामीं रेखिला टिळा ।' -तुगा ४०६९. ॰नीर-न. मृगअळ. ॰पति-राज- वर, मृगेंद्र-पु. (काव्य) पशूंचा राजा; सिंह. ॰बहार-बार- पु. आगोटीच्या सुमारास किंवा मृगनक्षत्राचे वेळीं येणारा बार; पहिला बहर; हत्तीबार, आंबेबार पहा. ॰मद-पु. मृगनाभि पहा. ॰लांच्छन, मृगांक-पु. १ मृगाच्या आकाराचा डाग(चंद्रावरील). २ (काव्य) चंद्र; मृगाची आकृति धारण करणारा. 'कृपेने अंकीं धरिला हरिण । मृगलांछन चंद्रमा ।' -मुआदि ३४.१२. ॰शा- वाक्षी-स्त्री. हरिणाच्या पिलाच्या डोळ्यांसारखे डोळे असलेली, चंचल डोळ्यांची स्त्री; सुंदर डोळ्यांची स्त्री. 'मृगशावाक्षी गुण निधान । उपमा नाहीं स्वरूपातें ।' -शिली १४.१४९. [मृग + शाव = पिलूं + अक्षन् = डोळा] ॰शि(शी)तळाई-शि(शी)तळी- स्त्री. मृगाच्या पावसानें हवेंत आलेला थंडावा. ॰शिर-शीर्ष- न. मृग नक्षत्र. ॰शीर्षक(हस्त)-पु. (नृत्य) मूठ मिटून नंतर आंगठा व करंगळी उभीं करणें. ॰साल-न. मृगनक्षत्राच्या आरंभा- पासून सुरू होणारें वर्ष. या खेरीज दुसरें पाडव्याचें साल, दिवा- ळीचें साल व सुरमन पहा. ॰सेवडी-स्त्री. कृष्णाजिन; हरिणाचें कातडें. 'वरी चोखट मृगसेवडी । माजी धूतवस्त्राची घडी ।' -ज्ञा ६.१८२. मृगांक-पु. चंद्र, मृगलांच्छान पहा. 'उदैला आनंद मृगांकु । मोहा अंधकारीं ।' -भाए २. [मृग + अंक = चिन्ह] मृगाचा किडा-पु. मृगनक्षत्रांत किंवा त्या सुमारास आढळणारा एक तांबडा किडा. मृगांबु-न. मृगजळ. 'ब्रह्मगिरीहूनिं न निघे । आणि समुद्रींही कीर न रिगे । तरी माजीं दिसे वाउगें । मृगांबु जैसें ।' -ज्ञा १५.२३८. [मृग + अम्बु = पाणी] मृगाब्धि, मृगांभ-न. मृगजळ. मृगासन-न. १ बसावयाचें हरिणाचें कातडें २ देवडीच्या दोन बाजूंस असणाऱ्या ओट्यांपैकीं प्रत्येक ओटा. ३ रांगोळीची एक आकृति. ही आठ आठ ठिपक्यांच्या आठ समांतर ओळी व बाजूनें दोनदोन ठिपके देऊन चौपट साधून काढतात. -रंगवल्लिका १.११. मृगी-स्त्री. हरिणी. मृगेंद्र, मृगेश-पु. (काव्य) सिंह. [मृग + इंद्र, ईश] मृगया-स्त्री. शिकार; पारध. [सं. मृग् = शोधणें]
घण
नपु. लोखंड, तांबें इ॰ ठोकण्याचा, घडण्याचा लोखंडी मोठा हातोडा. 'घणाचें घाईं पिटे तैसा ।' -विउ २.७. 'जैसे ऐरणीवरी घण । तैसे हाणिती उसणपण ।' -कथा १.१३. ९८. [सं. घन = लोखंडी गदा; प्रा. घण] म्ह॰ १ हिर्याची परीक्षा घणावांचून होत नाहीं. २ घणाचे घाव सोसील तो हिरा. (हिरा हा अत्यंत कठिण पदार्थ आहे. घण मारल्यानेंहि तो फुटत नाहीं यावरून) = लोकनिंदेला, संकटांना जो जुमानीत नाहीं तोच थोर होय. [वै. सं. घन् = हन. -मसाप राजवाडे-निरुक्त भाषांतर ७८.] ॰करी-पु. (लोहाराच्या दुकानांतील) घण मारणारा मनुष्य, गडी. [घण + करणें] ॰कोरा-वि. १ घणाखालून नुक्ताच निघालेला (रुपया, मोहोरे इ॰ नाणें). २ (ल.) अगदीं कोरा, कोराकरकरीत; कारागिरींतून नुक्ताच बाहेर पडलेला; [घण + कोरा] -णाखालचा-वि. १ घणकोरा; टांकसाळींतून नुक्ताच बाहेर निघालेला (रुपया, नाणें इ॰). २ कोराकरकरीत (जिन्नस); कारागिराच्या हातून नुक्ताच तयार झालेला (जिन्नस, दागिना इ॰ घण-वि. १ दाट; घट्ट; पाण्याचा अंश, द्रवांश कमी असलेलें) (द्रवपदार्थ, मध इ॰) 'या मधापेक्षां हा मध घण आहे.' 'सांभारें घण झालें आहे.' 'घण ताक = दाट ताक. २ अविरल; जोराचा सरीचा अतिशय (पाऊस इ॰ च्या). ३ दाट विणीचा (कपडा, कापड इ॰); घट्ट; विणलेला. ४ किर्र; निबिड; गहन (अरण्य झाडी इ॰). ५ जाड; जाडसर (लांकडाची फळी इ॰). ६ गर्दीचा; दाटीचा; खेंचाखेंच झालेला (मनुष्यांचा जमाव, गर्दी इ॰). ७ हट्टानें मौन धारण केलेला, स्तब्ध. घन पहा. [सं. घन; प्रा. घण; गु. घणो; सिं. घणि] ॰दाट-स्त्री. (काव्य.) गर्दी; खेंचाखेंच; जमाव; समुदाय. 'त्या यमुनातिरीं यादवांची हो घणदाट.' -वि. १ अतिशय दाट; संकीर्ण; गडगच्च. 'जैसे जे क्षेत्र पिकत । तों तों कणसें घनदाट दिसत ।' २ (सामा.) दाट; घट्ट (द्रवपदार्थ); निबिड; गहन; गर्द झाडी, अरण्य); भरगच्च; भरींव; ऐवज- दार (देणग्या, इनाम इ॰). जोराचा (पाऊस). ॰दाट-टी-स्त्री. (काव्य.) जीवश्चकंठश्च स्नेह; दाट परिचय, मैत्री. 'आतांशीं त्याचें व याचें घणदाट आहे.' [घन + दाट] ॰सर-वि. १ दाटसर; बरेंच दाट (ताक इ॰). २ राकट; कणखर (मनुष्य इ॰). जाडाभरडा (कपडा); भक्कम; ऐवजदार; मजबूत; [घण + सर प्रत्यय]
अष्ट
वि. आठ संख्या; सामाश्ब्द-अष्टगुण, अष्टादश, अष्ट- विंशति व पुढील शब्द. [सं. अष्टन्] ॰क न. १ आठ पदार्थांचा समुदाय. २ पाणिनीच्या व्याकरणाचे (सूत्रपाठाचे) आठ विभाग आहेत त्यांतील प्रत्येक. ३ ऋग्वेदसंहितेचे पठणाच्या सोयीकरतां आठ भाग केले आहेत, त्यांतील प्रत्येक. ४ आठ श्लोकांचा समूह; एक काव्यरचनापध्दति. उ॰ मंगलष्टकें, करुणाष्टकें. [सं.] -वि. आठ किंवा आठवा. ॰कपाळ्या-वि. १ अष्टांगें-दोन हात, दोन पाय, दोन गुडघे, वक्षःस्थळ आणि कपाळ इतक्यांचा उपयोग करूनहि ज्यास कांहीं मिळत नाहीं तो. २ (ल.) पूर्णपणें दुर्दैंवी; आपद्ग्रस्त; भद्र्या; कपाळकरंटा. ॰कर्णिका-स्त्री. कमळाच्या पाकळ्या. 'माझें हृदय दिव्य कमळ । जें तेजोमय परम निर्मळ । अष्टकर्णिका अतिकोमळ । मध्यें घननीळ विराजे ।' -ह ३५.१. ॰कुलाचल-पु. मेरूच्या चारी दिशांत जे भारतादि वर्ष आहेत त्या प्रत्येकाची मर्यादा करणारे (नील, निषध, विंध्याचल, माल्यवान्, मलय, गंध- मादन, हेमकूट, हिमालय इ॰) आठ पर्वत. अष्टकोन-नी- ण-णी-वि. आठ कोन-बाजू-असलेली, (वस्तु, आकृति). ॰गंध-न. आठ सुगंधी द्रव्यें (चंदन, अगरु, देवदार, कोष्टको- लिंजन, कुसुम, शैलज, जटांमासी, सुरगोरोचन) एकत्र करून केलेलें गंध; (सामा.) उटणें. ॰गुण-वि. आठपट. -पु. आठ गुण. ब्राह्मणाचे आठ गुण-दया, क्षांति, अनसूया, शौच, अना- यास, मंगल, अकार्पण्य, अस्पृहा. बुध्दीचे आठ गुण- शुश्रूषा श्रवण, ग्रहण, धारण, चिंतन, ऊहापोह, अर्थविज्ञान, तत्त्वज्ञान. ॰गोल-गोली-वि. कांठापदरांवर वेलबुट्टी काढलेला (चौपदरी शेला). 'कोणासी पागोटें परकाळा । कोणी मागती अष्टगोली शेला -भक्तावि. ३०.४१. [सं. अष्ट + गो]. ॰गोळी-क्रिवि. सर्वतर्हेनें; एकंदर. ॰घाण-स्त्री. अतिशय दुर्गंधी-घाण. [अष्ट + घ्राण]. ॰ताल- झंपाताल पहा. ॰दल-ळ-वि. आठ पाकळ्यांचें; आठ पानांचें; अष्टकोनी; अष्टभुज. -न. १ कमळाच्या आकाराची काढलेली आठ पाकळ्यांची किंवा भागांची आकृति. 'गर्भे रचिली उदंडें । अष्टदळें । -ऋ ७३. २ एक प्रकारची रांगोळी. ३ (ना.) ताम्हण; संध्या- पात्रा; 'एक अष्टदळ आणवा.' ॰दानें-न. अव. आमान्न, उद- कुंभ, भूमि, गोदान, शय्या, वस्त्र, छत्र, आसन हीं आठ वस्तूंचीं दानें और्ध्वदेहिकांत द्यावयाचीं असतात. ॰दिक्पाल-पु. अंत- रिक्षाच्या आठ दिशा पालन करणार्या देवता. जसें-पूर्वेंचा इंद्र, आग्नेयीचा अग्नि, दक्षिणेचा यम, नैऋत्येचा नैऋत, पश्चिमेचा वरुण, वायव्येचा मारुत, उत्तरेचा कुबेर (सोम), ईशान्येचा ईश; अष्ट- दिग्पाल. 'इयेवरी सप्तसागर । मध्यें मेरु महाथोर । अष्टदिग्पाळ तो परिवार । अंतरें वेष्टित राहिले ।।' -दा ४.१०.१. ॰दिग्गज- -पु. ऐरावत, पुंडरीक वामन, कुमुद, अंजन, पुष्पदंत, सार्वभौम, सुम- तीक असे अष्ट दिशांस पृथ्वीचे आधारभूत आठ हत्ती आहेत. [सं.] ॰दिशा-स्त्री. आठ दिशा; दिक्चक्राचे आठ भाग-पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैऋ/?/त्य, पश्चिम, वायव्य, उत्तर, ईशान्य. ॰देह- पु. देहाचे आठ प्रकार-पहिले चार पिंडीं व पुढील चार ब्रम्हांडीं. 'स्थूल, सूक्ष्म, कारण । महाकारण, विराट, हिरण्य । अव्याकृत, मूलप्रकृति जाण । ऐसे अष्ट देह ।' -दा ८.७.४०. ॰धा-वि आठ प्रकारचे; 'भूतें गुण मेळविजे । त्यासी अष्टधा बोलिजे ।' [सं.] ॰धामूर्ति- स्त्री. आठ प्रकारच्या मूर्ती. 'शैली दारुमयी लौही लेप्या लेख्याच सैकती । मनोमयी मणीमयी प्रतिभा अष्टधा स्मृता ।।' -एभा २७.९८-१०३; 'शैली, दारुमयी, लेप्या, लेख्या, सैकती अथवा सूर्यमंडळीं, जळीं, स्थळीं, अष्टमूर्तिस्वरूप श्रीहरीसी पूजावें ।' -अमृतध्रृव ६. अष्टमूर्ति पहा. ॰(देह)प्रकृति-स्त्री. पृथ्वी, पाणी, अग्नि, वायु, आकाश मन, बुद्धि आणि अहंकार मिळून आठ प्रकारे विभागलेली.... प्रकृति.' - गीर ७१५. ॰(विध)प्रकृति-असाहि वाक्प्रचार आहे. सत्व, रज, तम, व मूळ पांच तत्त्वें मिळून आठ प्रकारची प्रकृति. 'पंच भूतें आणि त्रिगुण । ऐसी अष्टधा प्रकृति जाण ।' -दा ६.२.१४. ॰धातू-पु. सोनें, रुपें, तांबें, कथील, शिसें, पितळ, लोखंड, तिखें (पोलाद). कोणी पोलादाच्या ऐवजी पारा धर- तात. 'अष्टधातु सायासें । जेवि विधिजेति स्पर्शें ।' -ऋ २०. ॰धार-वि. आठ धारा असलेलें. 'तंव तेणें साधकें एक अष्टधार आड धरिलें ।' -कृमुरा २२.९६. ॰नायका-नाईका-स्त्री. १ अव. श्रीकृष्णाच्या आठ आवडत्या पत्न्या-रुक्मिणी, सत्यभामा, जांबवंती, कालिंदी (सूर्यकन्या), मित्रवृंदा (अवंतिराजसुता), याज्ञजिती (यज्ञजितकन्या), भद्रा (कैकेयनृपकन्या), लक्ष्मणा (महेंद्रनाथकन्या). २ इंद्राच्या आठ नायका-उर्वशी, मेनका, रंभा, पूर्वचिती, स्वयंप्रभा, भिन्नकेशी, जनवल्लभा, घृताची (तिलोत्तमा). 'अष्टनायिका येऊनि । सर्वा घरीं नृत्य करिती ।' -ह २६.२२८. ३ (साहित्य) वासकसज्जा, विरहोत्कंठिता, स्वाधीनभर्तृका, कल- हातांरिता, खंडिता, विप्रलब्धा, प्रोषितभर्तृका, अभिसारिका. ॰नाग- पु. आठ जातीचे सर्प-अनंत, वासुकी, तक्षक, कर्कोटक, शंख, कुलिक, पद्म, महापद्म. ॰पत्री-वि. १ कोणत्याही विशिष्ट आका- राच्या (क्राऊन, डेमी) छापावयाच्या कागदाचीं आठ पृष्ठें होतील अशा तर्हेनें घडी पडणारें छापलेलें (पुस्तक) (इं.) ऑक्टेव्हो. 'पांच पांचशें पानांचे अष्टपत्री सांचाचें एक एक पुस्तक.' ॰पद- पु. १ कोळी वर्गांतील प्राणी-गोचीड, सूतकिडे, विंचू, कातीण वगैरे. (इं.) अर्कनिडा. २ आठ पायांचा काल्पनिक प्राणी. ॰पदरी-वि. आठ पदरांचा (शेला), आठसरांची (माळ), आठ पेडांची, धाग्यांची (दोरी) [सं. अष्ट + पल्लव] ॰पदी स्त्री. १ आठ पदांचा समुदाय. २ आठ चरणांचें एक कवन; कविताप्रकार. ॰पाकूळ न. (लुप्त). आठ पाकळ्यांचें फूल. ॰पाद-अष्टपद पहा. ॰पुत्ना-वि. आठ पुत्र आहेत जिला अशी (स्त्री). सौभाग्यवती स्त्रीला असा आशीर्वाद देतात. ॰पुत्री-स्त्री. विवाहामध्यें वधूला, काठाला हळद लावून नेसावयास दिलेलें शुभ्र वस्त्र. तिला पुष्कळ अपत्यें व्हावींत या इच्छेचें द्योतक. 'फेडिलें मायेचें वधूवस्त्र । अष्टपुत्र्या पीतांबर । नेसली कृष्णमय स्वतंत्र । तेणें सुंदर शोभली ।' -एरुस्व १६.१५. ॰म्ह-अष्टपुत्री मेहुणीकुत्री. ॰पैलू वि. १ ज्याला आठ पैलू (बाजू) आहेत असा (हिरा, रत्न). २ (ल.) हुषार; कलाभिज्ञ; व्यवहारचतुर (इसम). ॰पैलू माळ- (गोफ) स्त्री.घोड्याच्या गळ्यांतील दागिना; आठ पैलू असलेल्या मण्यांची माळ किंवा आठ पदर असलेली माळ. ॰प्रकृति, ॰विधप्रकृति अष्टधाप्रकृति पहा. ॰प्रधान- पु. राज्यकारभारांतील आठ प्रधान-प्रधान, अमात्य, सचीव, मंत्री, डबीर, न्यायाधीश, न्यायशास्त्री, सेनापति. अष्टप्रधानांची पद्धत शिवाजीनें सुरू केली. कांहीं जण वैद्य, उपाध्याय, सचीव, मंत्री, प्रतिनिधी, राजाज्ञा, प्रधान, अमात्य हे आठ मंत्री समजतात 'प्रधान अमात्य सचीव मंत्री । डबीर न्यायाधिश न्यायशास्त्री ।। सेनापती त्यांत असे सुजाणा । अष्टप्रधानीं नृप मुख्य जाणा ।।' हा श्लोक रूढ आहे. ॰फली-ळी,॰फळ-फल- स्त्रीन. अटोफळी पहा. ॰भार पु. ८००० तोळ्यांचा एक भार. असे आठ भार. 'नित्य प्रसवे अष्टभार सुवर्ण । सूर्यासम प्रभा परिपूर्ण ।' -ह २५. १५. ॰भाव पु. अव. (साहित्य.) शरीराचे सत्त्वगुणाचे आठ भाव, प्रकार-स्तंभ, स्वेद, रोमांच, स्वरभंग किंवा वैस्वर्य, कंप किंवा वेपथु, वैवर्ण्य, अश्रुपात, प्रलय. पर्याय-कंप, रोमांच, स्फुरण, प्रेमाश्रु, स्वेद, हास्य, लास्य, गायन. -हंको. 'आठवीया दिवशीं नाश अष्टभावा । अद्वयानुभवासुखें राहे ।।' -ब ११०. 'अष्ट- भावें होऊनि सद्गद । आनंदमय जाहला ।' ॰भैरव पु. भैरव ही शिवगणांतील स्वतंत्र देवता असून तिचीं पुढील आठ स्वरूपें आहेत-असितांग, संहार, रुरु, काल, क्रोध, ताम्रचूड, चंद्रचूड, महा. यांतील कांहीं नांवांऐवजीं कपाल, रुद्र, भीषण, उन्मत्त, कुपति इत्यादि नांवें योजिलेलीं आढळतात. ॰भोग पु. आठ प्रकारचे भोगः- अन्न, उदक, तांबूल, पुष्प, चंदन, वसन, शय्या, अलंकार. ॰म वि. आठवा.-स्त्री. अष्टमा. ॰मंगल वि. (विरू) अष्टमंगळ. १ ज्याचें तोंड, शेपूट, आयाळ, छाती व चार खूर शुभ्र आहेत असा; कित्येकांच्या मतें ज्याचे पाय, शेपूट, छाती व वृषण शुभ्र आहेत व जो कटीप्रदेशीं भोवर्यांनीं युक्त (नावांकित) असून ज्याच्या कपाळावर कमलाकृति केसांचें वेटोळें असतें असा (घोडा). २ (सामा.) आठ शुभलक्षणांनीं युक्त असा (घोडा). -न. पुढील आठ मंगल वस्तूंचा समुदाय-ब्राम्हण, अग्नि, गाय, सुवर्ण, घृत, सूर्य, व राजा. कांहींच्या मतें सिंह, वृषभ, गज, पूर्णोदककुंभ, व्यजन, निशाण, वाद्यें व दीप (राज्याभिषेकाच्या समयीं या अष्ट मंगलकारक वस्तू लागतात). ॰मंगलघृत न. वेखंड, कोष्ट, ब्राह्मी, मोहऱ्या, उपळसरी, सेंधेलोण, पिंपळी व तूप या औषधांच्या मिश्रणानें विधियुक्त बनविलेलें तूप. हें बुद्धिवर्धक आहे. -योर २.६७०. ॰महारोग पु. आठ मोठे रोग-वातव्याधि, अश्मरी, कृछ्र (किंवा कुष्ठ), मेह, उदर, भगंदर, अर्श (मूळव्याध), संग्रहणी. महारोग पहा. ॰महासिद्धी- १ अणिमा = शरीर अत्यंत सूक्ष्म होणें; २ महिमा = शरीर मोठें होणें; ३ लघिमा = शरीर वजनांत हलकें होणें; ४ प्राप्ति = सर्व प्राण्यांच्या इंद्रियांशीं त्या त्या इंद्रि- यांच्या अधिष्टात्री देवतांच्या रूपानें संबंध घडणें; ५ प्राकाश्य = ऐकून ठाऊक असलेल्या व स्वर्गादि पारलौकिक स्थानीं, व दिसण्याजोगे इहलोकच्या स्थानीं भोग व दर्शनाचें सामर्थ्य येणें; ६ ईशिता = शक्तीची, मायेची व तिच्या अंशाची ईशाच्या ठिकाणीं व इत- रांच्या ठिकाणीं असणारी प्रेरणा; ७ वशिता = विषय भोगीत असूनहि त्यांच्या ठिकाणीं आसक्त न होणें; ८ प्राकाम्य = ज्या ज्या सुखाची इच्छा करावी तें तें सुख अमर्याद प्राप्त होणें. -एभा १५.४२. ते ४७. ॰मर्यादागिरी- पु. आठ मोठे पर्वत-हिमालय, हेमकूट, निषध, गंधमादन, नील, श्वेत, शृंगवान व माल्यवान. हे जंबुद्रीपांत असून ते त्यांतील नऊ वर्षी (भागां)च्या मर्यादा आहेत. ॰मांगल्य- न. त्रैवर्णिकांचा एक संस्कार. अठांगुळें पहा. ॰मातृका स्त्री. आठ ईश्वरी शक्ती-ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इद्रांणी, कौबेरी, चामुंडा. सामान्यतः कौबेरी सोडून या सात असतात. विवाहादि मंगलप्रसंगीं यांची पूजा करतात. 'वेगे आल्या अष्ट मातृका । एकी चढिन्नली वृश्चिका । वाराही ते सूकरमुखा । वर्हाड देखा निघालें ।।' -एरुस्व १४.५८. ॰मांश पु. १ आठवा अंश; भाग. २ (वैद्यक) ज्वर नाहींसा होण्यासाठीं आठभाग पाण्याचे सात भाग आटवून एक अंश उरवितात तो काढा. ॰मी- स्त्री. चांद्रमासांतील प्रतिपदेपासून आठवी तिथी; या महिन्यांतून दोन येतात-शुद्ध व वद्य. ॰मूर्ति स्त्री. पृथ्वी, जल, तेज, वायु, आकाश, सूर्य, चंद्र व ऋत्विज् या परमेश्वराच्या आठ मूर्ती; शंकर; महादेव; अष्टधामूर्ति पहा. ॰योगिनी स्त्री. अव. आठ योगिनी; पार्वतीच्या सख्या; या शुभाशुभ फल देणाऱ्या आहेत-मंगला, पिंगला, धन्या, भ्रामरी, भद्रिका, उल्का, सिध्दा, संकटा. दुसरा पाठ-मार्जनी, कर्पुरा तिलका, मलयगंधिनी, कौमुदिका, भेरुंडा, माताली, नायकी, जया (शुभाचारा). यांत कधीं कधीं सुलक्षणा, सुनंदा हींहि नांवें आढळतात. ॰वक्र अष्टावक्र पहा. ॰वर्ग पु. १ आठ औष- धींचा समुदाय-ऋषभ, जीवक; मेद, महामेद, ऋध्दि, वृध्दि, काकोली, क्षीरकाकोली. २ मौंजीबंधनांत मातृभोजनांत भोजनाच्या वेळीं आठ मुंज्या मुलांना भोजनास बोलावितात तें कर्म ॰वर्ग्य- र्ग्या- पु. अष्टवर्गास जेवणारा बटु; उपनयनाच्या दिवशीं मातृ- भोजनाच्या वेळीं आठ बटू भोजनास बोलावितात ते प्रत्येक. ॰वर्षा- वि. आठ वर्षें वयाची (कुमारिका); (त्यावरून लग्नाला योग्य झालेली) उपवर. ॰वसु- पु. अव. प्रतीमन्वंतरांतील आठ वसू. चालू मन्वंतरांतील धर्मऋषि व दक्षकन्या वसु यांचे पुत्र-धर, ध्रुव, सोम, आप, अनिल, अनल, प्रत्यूष, प्रभास. भागवतांत द्रोण, प्राण, ध्रुव, अर्क, अग्नि, दोष, वसु, विभावसु अशीं नांवें आढळतात. 'इंद्र चंद्र वरुण कुबेर । अष्टवसु गंधर्वकिन्नर ।' -ह २५.१४१ ॰वायन- न. आठ वस्तूंचें दान; हळकुंड, सुपारी, दक्षिणा, खण, सूप, कंठण, धान्य, कांचमणी, या आठ पदार्थांचें वायन (वाण) सौभाग्यसंपादनार्थ लग्नांत आठ ब्राह्मणांपैकीं प्रत्येकाला वधूकडून दिलें जातें. ॰विध समाधि- स्त्री. समाधियोगाचे आठ प्रकार-यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधि. ॰विधा शृंगारनायका- (साहित्य) अष्टनायका पहा. ॰विना- यक- पु. अव. गणतीचीं आठ स्थानें-१ मोरेश्वर गणनाथ, (जेजुरी नजीक मोरगांव जिल्हा पुणें). २ बल्लाळेश्वर (मूळ मुरुड हल्लीं पाली, खोपवली नजीक-जिल्हा कुलाबा). ३ विनायक (कर्जत नजीक मढ-जिल्हा कुलाबा). ४ चिंतामणी (लोणी नजीक थेऊर- जिल्हा पुणें). ५ गिरिजात्मक (जुन्नर नजीक लेण्याद्रि-जिल्हा पुणें). ६ विघ्नेश्वर (जुन्नरनजीक ओझर-जिल्हा पुणें). ७ गणपति (नगर सडकेवर रांजणगांव-जिल्हा पुणें). ८ गजमुख (दौंड नजीक सिध्द- टेक-जिल्हानगर). ॰विवाह- पु. विवाहाचे आठ प्रकार-१ ब्रह्म = सालंकृतकन्यादान; २ गंधर्व = उभयतांच्या अनुमतीनें; ३ राक्षस = जब- रीनें कन्या हरण करून; ४ दैव = यज्ञप्रसंगीं ॠत्विजास कन्यादान करून; ५ आर्ष = गाय, बैल घेऊन कन्यार्पण; ६ प्राजापत्य = धर्माचरणार्थ कन्यापर्ण; ७ असुर = शुक्ल घेऊन; ८ पैशाच = कन्या चोरून आणून पत्नी करणें. सविस्तर माहिती धर्मसिंधु परिच्छेद ३ पूर्वार्ध पहा. ॰सात्विक भाव- अष्टभाव पहा. ॰सावध- वि. पुष्कळ गोष्टींकडे एकदम लक्ष पुरविणारा-देणारा; अष्टवधानी. ॰सिद्धि- अष्टमहा सिद्धि पहा. 'अष्ट सिद्धि चामरें घेऊनी । वरी वारिती अनुदिनीं ।' -ह १.१५. ॰सृष्टी- स्त्री. काल्पनिक, शाब्दिक, प्रत्येक्षा, चित्र- लेपा, स्वप्नी (स्वप्नसृष्टि), गंधर्वा, ज्वरिका (ज्वरसृष्टी), दृष्टी- बंधना. दा- ६.६.५१. [सं.]. ॰क्षार- पु. पळस, निवडुंग, सज्जी, आघाडा, रुई, तीळ, जव व टांकणखार.
घेणें
सक्रि. १ स्वीकारणें; अंगीकारणें; (आपल्या) हातांत येईलसा करणें. 'त्यांत घेऊं ये तितुकें घ्यावें ।' -दा १५.९.३२. 'घेयीं तूं मधुपर्क पावन बरें सद्धेमपात्रीं असे ।' -निमा १.१३. २ धरणें; पकडणें; हिसकणें; झोंबाडणें. 'जे घेय हातीं बरवी विपंची ।' -सारुह १.२. ३ लागणें; बसणें; मिळणें (मार इ॰). 'तेथें गेलास तर मार घेशील.' ४ समजणें; मानणें. 'येथ दुजें नाहींचि घेई । सर्वत्र मी गा ।' -ज्ञा १५.४११. ५ ऐकणें. 'वाक्य घेऊनि हरुषली आई ।' -दावि १६०. 'तुवां सजणे हा समाचार घेतां' -र ११. ६ समाविष्ट, प्रविष्ट, अंतर्भूत करणें; आंत येऊं देणें. 'त्या माणसास जातींत घेतलें.' ७ कवटाळणें; कैवार घेणें; पत्करणें; स्वीकारणें; अंगीकारणें; उचलणें (पक्ष, बाजू, धर्म इ॰). 'त्यानें ख्रिस्ती धर्म घेतला.' ८ कबूल, मान्य करणें; मान्यता देणें; संमति, अनुमोदन देणें; ग्राह्य समजणें. 'त्या आशंकेचें ह्यानें समाधान केलें तें तुम्ही घेतलें काय ?' ९ योग्यता, किंमत जाणणें (गुणांची); आदरणें; चांगलें लेखणें (गुणाबरोबर उपयोग). १० मनांत आणणें, बाळगणें, ठेवणें (शंका, संशय, तिरस्कार इ॰). 'मागें हांसति गौळणी हरिपुढें ह्या घेतलीसे भ्रमें ।' -आकृष्ण ३८. ११ आविर्भाव आणणें; पांघरणें; बळेनें धारण करणें (वेड, सोंग इ॰). १२ (भय, रोग, मोह इ॰ कांच्या) ताब्यांत जाणें; (ज्वर, भय, मोह, दुखणें इ॰ कानीं). घेरलें जाणें; व्यथित होणें 'आणि तेणें आपुलेपणाचेनि मोहें । तुम्ही संत घेतले असा बहुवें ।' -ज्ञा ९.१७. 'नुघडि नेत्र घे भीतिला ।' -केका १०. १३ मुकवणें; हरण करणें; नाश करणें; बुडविणें (प्राण, शील इ॰). १४ छाटणें; तोडून टाकणें; कापणें. 'तुझें नाक-कान घेईन.' 'ह्या भोताचे शेंडे चार चार बोटें घेतले म्हणजे पडणार नाहीं.' १५ लागणें; आवश्यकता असणें; खर्ची पाडणें; खपवणें; अटवणें; खाणें (वेळ, स्थळ, शक्ति). 'हें काम दोन वर्षें घेईल.' 'हें गांठाळ लांकूड फोडण्यास फार बळ घेतें.' १६ खडकावणें; खडसणें; ठोक देणें; मारणें. 'मी त्याला भल्लें घेतलें.' १७ विशिष्ट आचरण, वर्तन, कृति करणें (उ॰ शोध, वाद, गांठ, लढाई, माप घेणें); शोध घेणें = तपास करणें; चौकशी करणें; वाद, लढाई घेणें = वाद, लढाई उपस्थित करणें; माप घेणें = मोजणें (लांबी, रुंदी इ॰ मध्यें); उडी घेणें = उडी टाकणें; गांठ घेणें = बांधणें इ॰. १८ हस्तगत करणें; मिळवणें; पैदा करणें; शोधून, मिळवून आणणें; संपादन करणें (खबर, बातमी, चाहूल, पायरव). १९ हातानें देणें; उचलून देणें; जवळ नेणें. (ह्या अर्थीं नेहमी आज्ञार्थींच प्रयोग होतो). 'ती दौत इकडे घ्या.' २० जोडणें; मिळविणें; स्वतःवर आणणें; ओढून घेणें (उपहास, निंदा, मार); विषय होणें (निंदा, मार इ॰ चा). 'अरे पोरा दाटीमध्यें तुडवून घेशील.' 'मारून, हांसून, घांसून, नागवून घेशील.' २१ पलीकडे जाणें; ओलांडणें (डोंगर, विशिष्ट स्थिति); संपविणें; शेवटास नेणें; सिद्धीस नेणें (प्रवास, मजल इ॰). 'त्यानें दहा कोसांची मजल घेतली.' २२ जोडणें; सामील करणें; वाढविणें. 'हा ओटा फार अरुंद झाला, आणखी दोन हात घे.' २३ स्वतःस जोडणें; जडवून घेणें; लावून घेणें (संवय, खोड, व्यसन). २४ आणणें; घालणें; माथीं मारणें; अंगाला चिकटविणें (आरोप, आळ, बालंट, तुफान). २५ (एखाद्या वस्तूनें दुसर्या वस्तूचा स्वतःवर) परिणाम होऊं देणें; विकार पावणें; परिणाम लागू करून घेणें. 'ओलें लांकूड आग घेत नाहीं.' 'तेलकट वस्त्र पाणी घेत नाहीं.' २६ जवळ येऊं देणें, पाजणें. 'ती गाय वासरूं घेत नाहीं.' २७ मारणें; बळी घेणें; नाश करणें. 'ही नदी, हें तळें, ती विहीर वर्षांत एक माणूस घेते.' 'माझा भाऊ भुतानें घेतला.' २८ जाणें; पळून जाणें; एखाद्याचा आश्रय करणें. 'काळयवन भेणें थोर । तेणें घेतलें गिरिकंदर ।' २९ स्थापणें; ठेवणें; आदरानें स्पर्श करणें 'येऊनि तुजजवळीं । चरण घेतिल तव भाळीं ।' -रत्न १७. ३० वळणें; कल होणें; एखादी गोष्ट करावयास तयार होणें (मन इ॰ नी). 'त्यामुळें ह्याचा शब्दशः अर्थ करण्यास आमचें मन घेत नाहीं.' -मसाप २.११७. ३१ (बुद्धिबळांचा खेळ) एकानें दुसर्याचें मोहरें मारणें (कित्येक वेळीं क्रियापदाच्या पुढें घेणें याचें रूप मन सोक्तपणें लावतात. अशा ठिकाणीं तें कारक हा क्रियेचा कर्ता आहे असें दाखवितें; तर कांहीं ठिकाणीं शब्दावर जोर देण्या- करितां त्याचा उपयोग करतात; विशेषतः कर्त्याविषयीं जोरानें बोलावयाचें असल्यास क्रियापादास जोडून घेणें याचा प्रयोग करतात. परंतु सामान्यतः अशा वाक्यरचनेनें विशेष अर्थ ध्वनित होत नाहीं व वाक्य चांगल्या रीतीनें पुरें करण्याकरतांच केवळ याचा उपयोग करतात. 'पोरानें हात पोळून घेतला.' कांहीं वेळां एखादी क्रिया आटोपून, उरकून टाकणें या अर्थीं पूर्वकालवाचक धातुसाधितास घेणें हा शब्द जोडतात. उ॰ स्नान करून घ्या; मी भात शिजवून घेतों; हें तुम्ही शिजवून घ्या. इतक्या ब्राह्मणांस गंध लावून घेतों आणि वाटी स्वाधीन करतों).' घेऊं देणें-या शब्दसंहतीचा उपयोग पूर्वकालवाचक धातु- साधितांना जोडून करतात. अशा वेळीं त्याचा अर्थ एखाद्यास एखाद्या क्रियेचा विषय, त्या क्रियेच्या आधीन होऊं देणें किंवा एखाद्यानें स्वतःकरतां एखादी गोष्ट करणें असा होतो. जसें- 'रडून-जेवून-पिऊन-बसून-उठून-धुवून-घेऊं दे.' घे म्हटल्या, घे म्हटल्यावर-क्रिवि. (जी जी गोष्ट, कृत्य करतां येईल ती ती गोष्ट, कृत्य करण्याला जे धडकावतात अशा अडदांड व तापट लोकांच्या रीतीला अनुलक्षून हा विशिष्ट प्रयोग रूढ झाला आहे) उतावीळपणानें; एकदम; विचार न करतां. 'तो घे म्हटल्या शिव्या देणार नाहीं.' घ्या-क्रि. इकडे पहा; हं पहा (लक्ष्य वेध- ण्याकरतां याचा उपयोग करतात). (घेणें ह्या क्रियापदाचे निरनिराळ्या संबंधांत अनेक प्रयोग होत असल्यानें ह्या स्थळीं सर्व देतां येणें शक्य नाहीं). उत्थापन-वर-चालीवर- जागा-शेवट-तोडीवर-त्वरेवर-घाव-परीक्षा-पाठ-रान-इ॰ अनेक शब्दांना जोडून घेणें या क्रियापदाचा प्रयोग होतो. त्याचप्रमाणें देणें; टाकणें; मारणें; घालणें व पाडणें या धातूं- प्रमाणें अनेक धातुसाधितांना जोडूनहि घेणें शब्दाचा प्रयोग करतात. उ॰ आटोपतां-कांकरतां-चालतां-काढतां-घेणें. श्वास, रजा, सूड इ॰ शब्दांना जोडूनहि घेणें या क्रियापदाचा उपयोग होतो. शिवाय उपयोग करणें; गिळणें; सहन करणेः सोसणें (रोग, व्यसन इ॰); जडवून घेणें इ॰ अनेक अर्थ होतात. म्ह॰ घेऊं जाणतो, देऊं जाणत नाहीं. [सं. ग्रह्; प्रा. गेण्ह; झें. गेरेप्; गॉ. ग्रेइप; जर्म. ग्रेफ; लिथु. ग्रेब्जु; स्ला. ग्रॅबल्जु; हिब्रू ग्रबैम; ग्री. ग्रीफॉस; लॅ. गेरो; पोलि. गार्निआक]
वाहणें
उक्रि. १ उचलून नेणें; एका जागेवरून उचलून दुसऱ्याजागीं नेऊन ठेवणें. 'वाहतिये वेळें जड । शिदोरी जैसी ।' -ज्ञा १८.१८५. -एभा ३.८७. 'शीतलजल कलश शीघ्र वाहोन ।' -मोभीष्म १२.४. २ भार सहन करणें, सोसणें; आधार देणें; आश्रय देणें. 'गेल्या पळोनि गायी पृष्ठावरि पुच्छभार वाहोनी ।' -मोविराट ४.८८. ३ मनांत बाळगणें; धरणें. 'परी ते चाड एकी जरी वाहे ।' -ज्ञा ४.१९५. 'वाहतसे हृदयाब्जीं अत्युत्सुक मीं' -मोसंभा २.३२. 'मरे येक त्याचा दुजा शोक वाहे ।' -राम १७. ४ चालू ठेवणें; पुढें चालविणें (व्यवहार, धंदा वगैरे). ५ अर्पण करणें; पूजेमध्यें देणें ठेवणें. 'उडवी किरीट विधिनें जें निर्मुनि यासी वाहिलें होतें ।' -मोकर्ण ४७.७६. 'वाहुनि मस्तक चतणीं ।' -मोअनु ४.५५. ६ (शपथ) घेणें. ७ देऊन टाकणें; स्वत्वनिवृत्ति करणें; टाकून देणें; सोडून देणें; त्याग करणें. ८ काढून देणें; पुढें करणें; स्वतःजवळचे देणें. 'जामीन रहा आणि गाठेचें वाहा.' ९ चढविणें; बसविणें; सज्ज करणें (धनुष्यास गुण वगैरे). 'कैकेयांचीं चापें खंडूनी...अन्य धनुष्यें वाहुनीं ते ।' -मोकर्ण ९.८. 'जो या धनुष्या वाहील गुण ।' -रावि ७.५४. १० (जमीन) कसणें; लागवडीस आणणें; पेरणें; मशागत करणें. 'काय जाहालें न वाहता भुई पेरिजे ।' -ज्ञा ११.१६२. ११ धारण करणें; नेसणें; वापरणें. 'वाहे वल्कल जटा ।' -मोरामायणें २३. 'हे विपरिताक्षित असतीसी नवनवा गुणा वाहे ।' -मोमंभा १.७३. १२ चालविणें; उपयोग करणें. 'जेती घाणे वाहती ।' -पाटण शिलालेख. १३ हल्ला करणें; चाल करणें. 'मग तेणे विक्रमसेनु प्रौढवर्धनावरि सबळु वाहौनु आला ।' -पंच १.३२. चिंता वाहणें-काळजी वाहणें; अस्वस्थता बाळगणें. वाहणें- अक्रि. १ वारा, पाणी हलणें; एका जागेवरून दुसऱ्या जागीं जाणें; सरकणें; पुढें जाणें; गतिमान असणें (सैन्य, पशूंची, गाड्यांची रांग वगैरे). 'वाहे हिममंद सुगंध पवन.' -मोभीष्म ११.८७. २ (नाक, व्रण, गळतें भांडें यांतून) पाणी, पू वगैरे बाहेर बाहेर येणें; स्त्रवणें; पाझरणें; गळणें; ठिबकणें. ३ एका दिशेनें जाणें; लांबवर पसरणें; रांगेनें असणें (रस्ता, किनारा, डोंगराची रांग). 'परमार्गु वाहाती सदैवें । जेआंलागीं ।' -ऋ १००.४ चालू असणें; गति- मान असणें; कार्य करीत राहणें (यंत्र, हत्यार; साधन). ५ तीक्ष्ण असणें; उपयोग होण्याच्या स्थितींत असणें; धार असणें (शस्त्र, हत्यार वगैरे). ६ प्राप्त होणें; चालू असणें. 'रुपयाचें दीड शेर पाणी अशी कठिण वेळा वाहली' -ऐपो २२५. [सं. वह्] वाहता झरा-री-पुस्त्री. जिवंत झरा; ज्यांतून नेहमीं पाणी वाहात असतें असा झरा, प्रवाह. २ चालू प्रवाह, वर्षाव (देणगी, खर्च वगैरेचा); चांलू पुरवठा; रेलचेल; चंगाळी. वाहतवणा-पु. रानांतून चालणारा; प्रवासी. 'आणि जन्मशतांचा वाहतवणा ।' -ज्ञा ७.१२९. वाहत वाटोळें-न. १ जुजवी किंवा तात्पुरती व्यवस्था, दुरुस्ती, उपाययोजना; मिटवामिटव (वाद, भांडण, रोग यासंबंधी कामचलाऊ योजना). २ आरंभ; सुरुवात; चालू हो्ण्याची क्रिया (काम, धंदा वगैरेची). ३ सत्यानाश; पूर्ण नाश; फन्ना; वाटोळें (धंदा, कार्य, व्यवहार, सल्ला वगैरेचा). वाहता- वि. १ मोकळेपणानें वावरणारे, हलणारें, फिरणारें, वागणारें; तीक्ष्ण धारेचें; कुशाग्र (शस्त्र, बुद्धि वगैरे). उदा॰ वाहती कुऱ्हाड. २ चालू; कार्य करीत असलेलें; चालतें; सुरू (काम, धंदा, व्यवहार, कारखाना वगैरे). वाहती घाणा-पु. चालू असलेला, उपयोगांत असलेला तेलाचा घाणा. वाहता झरा, वाहती झरी-वाहत- झरा पहा. वाहता रस्ता-पु. रहदारीचा रस्ता. वाहती- स्त्री. १ प्रारंभ: सुरुवात. २ चाल; वहिवाट; शिरस्ता; प्रघात. वाहतीकूस-स्त्री. गर्भधारणा करण्यास योग्य अशी स्त्रीची अवस्था; मुलें व्हावयास लागण्याची अवस्था. 'एकदां वाहती- कूस झाली म्हणजे वाटेल तितकीं मुलें होतील.' 'पावसाची वाह- तीकूस झाली.' = पावसाळा सुरू झाला. वाहतीगंगा-स्त्री. अनुकूल परिस्थिति; चालू काम; भरभराटलेला धंदा; सुकाळ; चंगळ; संपन्नता. (क्रि॰ चालणें; होणें.) वाहत्यागंगेंत हात धुवून घेणें- अनुकूल काल असेल तों आपलें कार्य साधून घेणें. वाहती धारा- १ तीक्ष्ण पाजळलेली धार (हत्याराची); याच्याउलट पडती धार. २ वाहत असलेला, चालू असलेला पाण्याचा प्रवाह (नदी, ओढा वगैरेचा); पाणी, रस वगैरेचा पडता प्रवाह, झोत. ३ (ल.) धंद्याची, कामाची चलती, भरभराट, घाई, धुमश्चक्री. उदा॰ लढाईची-धर्माची-वादाची-वाहती धार. वाहती वाट-स्त्री. १ रहदारीचा रस्ता; मेकळा, बंद न केलेला रस्ता; चालू रस्ता. २ मुलें होत असलेला स्त्रीचा गर्भाशय, कूस. ३ (ल.) सुरवात; आरंभ; ओनामा (धंदा, व्यवहार इत्यादीचा). वाहतु(तू)क- स्त्री. रहदारी; येजा; वापर; नेआण. -पु. वाहणारा; लाकडाची नेआण करणारा. -नस्त्री. वाहतुकीची मजुरी. वाहतुरा-वि. वाहती; तीक्ष्ण (शस्त्राची धार). वाहतें-वि. चालू; तीक्ष्ण; धारेचें; उपयोगांत असलेलें (शस्त्र वगैरे). वाहतें नांव-न. चालू, व्यावहारिक नांव.
जानवें
न. १ यज्ञोपवीत (उपनयनचिन्ह-सूत्र) २ (कुंभारी) मडकें चाकावर बनत असतां त्याच्या मध्यभागीं वाटोळी चिकट- वून ठेवतात ती सुंभाची दोरी. -बदलापूर ६६. ३ लसण्या नांवाच्या रत्नावर एखादे वेळीं दिसणारी पांढरी रेघ. ४ (बे.) नांगराचा फाळ व पान जोडणारा लोखंडी वाटोळा तुकडा. ५ (बे.) गांडूळ [सं. यज्ञोपवीत; प्रा. जण्णोवीअ. हिं. पं. जनेऊ] (वाप्र.) ॰तोडावयास उठणें, जानव्यास हात घालणें-अतिशय रागावणें; चिडणें; जानवें तोडण्याचा धाक घालणें. (जानवें तोडलें असतां धर्म जाऊन अपवित्रपणा येतो). ॰मोकळें करणें-उक्तें करणें-सुतकांतून मोकळें होणें; क्रियाकर्म करून शुद्ध होणें; दुसरें शुद्ध जानवें घालणें. ॰सोडविणें-उतरणें-जानव्याच्या जागीं तरवारीचा वार करणें जानवा पहा. ॰धोतर फाडणें-टाकणें- १ अतिशय रागावणें; डोक्यांत राख घालणें. २ निर्लज्ज, बदफैली होणें; बेफाम उधळणें. जानव्याची लाज धरणें, जानव्यास लाजणें-(जानवें पवित्र म्हणून त्याचा मान राखणें). जानवें (धर्म) सांभाळण्यासाठीं तरी दुराचरण न करणें. ॰जानव्याधोत- राची गांठ घालणें-१ अतिशय रागावणें; रागानें बेफाम होणें. २ (तुझ्या, त्याच्या या शब्दांशीं जोडून) दुसर्याच्या (जान- व्याच्या) नाशाची धमकी देणें. जानव्याला जानवें मिळणें- सजातीयांचें ऐक्य होणें, मिलाफ होणें, एक होणें; जात ओळखणें. जानव्यास वस्त्रा बांधणें-(पूर्वीं वादविवादांत जिंकल्यास जयपत्र घेणें किंवा आपण पराजित झाल्यास वस्त्र्यानें जानवें तोडणें असा क्रम असे) यावरून जिंकण्याची प्रतिज्ञा करणें. ॰जोड- पु. पांच जानवीं. जानव्याचा धनी-वि. जानवें धारण करणारा वर्ग (ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य वर्ग).
चंद्र
पु. आकाशांत दिसणारा एक कलायुक्त व सूर्यप्रकाशित गोल; पृथ्वीचा उपग्रह; नवग्रहांतील दुसरा ग्रह; चंद्रमा; चांद; चांदोबा; सोम. २ मुसलमानी तारीख. 'आज चंद्र तेरावा माहे मोहरम.' ३ (ल.) कित्येक गाई, म्हशी इत्यादिकांच्या तोंडा- वर जो पांढरा ठिपका असतो तो. ४ स्त्रिया कपाळावर जी अर्ध- चंद्राकृति गोंदतात ती कोर. ५ मोराच्या पिसांतील डोळा. ६ चंद्रामृत. 'तैसें शरीर होये । जे वेळीं कुंडलिनी चंद्र पिये ।' -ज्ञा ६.२५९. ७ (तंजा.) स्त्रियांच्या नाकांतील एक अलंकार. ८ डोक्यांतील एक चंद्राकार दागिना. [सं.] (वाप्र.) (सुतानें) चंद्र ओवाळणें-द्वितीयेच्या दिवशीं दिसणार्या नूतन चंद्रावरून सूत किंवा दशी ओवाळणें. यामुळें नूतन वस्त्रे मिळतात अशी समजूत आहे. ॰पिकणें-पूर्ण चंद्रबिंबाचा प्रकाश पडणें. 'चंद्र पिकलासे अंबरीं । तें पिक घ्यावें कीं चकोरीं ।' -कथा १.८.६२. ॰मोहरणें- (माण.) चंद्र उगवणें. चंद्रानें कोंबडा करणें-चंद्राला खळें पडणें. म्ह॰ चंद्रम् दिवटे दिवम् थाळी = (व्यंगोक्तीनें) अत्यंत दरिद्रावस्था; ज्याच्या घरांत चंद्र हा दिवटीचें काम करतो व नागवेलीचें पान थाळीच्या ऐवजीं उपयोगी पडतें. सामाशब्द-॰कर-पु. १ चंद्र- किरण. 'हारपती कां चंद्रकर । फांकतां जैसे' -ज्ञा १८.४०६. २ चंद्रकळा लुगडें. 'थाट करुनि मार नेसली चंद्रकरकाळी ।' -मसाप १.१.२. ॰कला-ळा-स्त्री. १ चंद्राची कला; चंद्रबिंबाचा षोडशांश. २ एक प्रकारचें एक रंगी लुगडें (तांबडे अथवा काळें). चंद्रकला गंगा जमुना = उभार व आडवण काळें, किनार एक बाजू हिरवी, एक बाजू तांबडी असें एक स्त्रियांचें वस्त्र. ३ चंद्राचा प्रकाश, किरण. 'जैसें शारदीयेचें चंद्रकळे- । माजीं अमृत कण कोंवळे ।' -ज्ञा १.५६. ॰कांत-पु. एक काल्पनिक रत्न, मणि; चंद्राचे किरण यावर पडले असतां यास पाझर फुटतो असा समज आहे. 'अहो चंद्रकांतु द्रवतां कीर होये । परि ते हातवटी चंद्रीं कीं आहे ।' -ज्ञा ९.२९. ॰कांती-वि. चंद्रकांताचा बनविलेला (चष्मा). [सं.] ॰कोर-स्त्री. चंद्राची कोर; किनार. (कु.) १ चंद्रको- रेच्या आकाराचें एक सुवर्णाचें शिरोभूषण. या कोरेला लागूनच नाग व विष्णुमूर्ति कोरण्याची हल्लीं नवी तर्हा निघाली असून याच्या पुढच्या बाजूस घागर्या लावितात. २ (कों.) कपाळा- वरची कुंकवाची अगदीं बारीक लहान कोर. [चंद्र + कोर; तुल॰ सं. चंद्रकेयूर (-राजवाडे भाअ १८३४)] ॰ग्रहण-न. चंद्रास लाग- णारें ग्रहण. ग्रहण पहा. पृथ्वीच्या छायेंत चंद्र आला असतां त्याला ग्रहण लागतें तें. [सं.] ॰घार-घारी-स्त्री. (विनोदार्थीं) कानशिला- वर लावलेली चपराक; चापटी; मार. (क्रि॰ दाखवणें, देणें). 'मुष्टि- मोदक चंद्रघार्या दिल्या म्हणजे विद्या येते.' [चंद्र + घार (पक्षी)] ॰चकोरन्याय-पु. चंद्र अमृतबिंदु स्त्रवतो व चकोर सेवन करतो त्यावरून असणारा चंद्र व चकोर यांमधील संबंध. ॰चूड- शेखर-पु. महादेव; शंकर. याच्या जटेंत चंद्रकला असते यावरून. [सं.] ॰जोत, ज्योति-स्त्री. १ चंद्रासारखा प्रकाश देणारें दारू- काम; हवाई; याचे निरनिराळे प्रकार आहेत-सफेत, तांबडी, लाल, हिरवीगार, पिवळी, अस्मानी, किरमिजी, गुलेनारा, आबाशाई, जांभळी, नारिंगी, प्याजी. 'चंद्रज्योती चंद्रकार । तेजें अंबर प्रकाशे ।।' -ह २.१२९. २ (व.) मोंगली एरंड. याच्या बिया विषारी असतात, परंतु जाळल्या असतां चंद्राप्रमाणें प्रकाश पडतो. ३ चांदणें; चंद्रप्रकाश. ४ (उप.) कुटुंबांदिकाला लाग- लेला कलंक, डाग. ५ डोळ्यांत घालावयाचें एक औषध. [चंद्र + ज्योति] ॰ज्योत्स्ना-स्त्री. (काव्य) चंद्रप्रकाश, चांदणें. 'मुखीं चंद्रज्योत्स्ना अवयव यथापूर्व बरवे ।' ॰धणी-स्त्री. मनाची तुप्ति. 'जाऊं चोरूं लोणी । आजी घेऊं चंद्रधणी ।' -तुगा २२८. ॰नक्षत्र-न. चंद्राधिष्ठित नक्षत्र [सं.] ॰पर्व-न. चंद्रग्रहणाचा काल, अवधि. [सं.] ॰प्रभा वटी-स्त्री. रससिंदूर, सुवर्णभस्म, अभ्रकभस्म हीं सर्व समभाग, सर्वांबरोबर खैराचा कात, मोचरस घेऊन सर्वांचा एकत्र खल करून सावरीच्या मुळ्यांच्या रसानें एकत्र दोन प्रहर खलून हरभर्याएवढी गोळी करतात ती. ही अतिसारावर गुणकारी आहे. -योर १.४३४. ॰फूल- न. सोन्याचा एक दागिना. -ऐरापु विवि ४२९. ॰बल-ळ- न. १ चंद्राची अनुकूलता. माणसाच्या जन्मराशीला चंद्राचें साहाय्य. २ (ल.) मदत; साहाय्य 'नेदावें चोराशीं चंद्रबळ ।' -तुगा ३२५३. ओढून चंद्रबळ आणणें-१ एखादी गोष्ट इष्ट असतांहि वरपांगीं तिच्याविषयीं अनिच्छा दाखविणें; आढे- वेढे घेणें. 'आजीनें मला हांका मारल्या मी बराच वेळ ऊं ऊं करून ओढून चंद्रबळ आणिलें... शेवटी दुर्गीनें मला ओढून नेलें.' -पकोघे. २ अंगीं प्रतिष्ठा नसतां बळेंच धारण करणें. (एखाद्यास) चंद्रबळ देणें-एखाद्यास कांहीं कार्याविषयीं उत्ते- जन देणें. -तुगा ३२५३. ॰बाळी-स्त्री. (कु.) कानांतील एक मोत्यांचा दागिना. चंद्रपश्वा. यामध्यें चंद्रकोरेप्रमाणें हिरकणी बसवितात. ॰बिंब-न. चंद्राचें बिंब, मंडल, गोल. [सं.] ॰मजकूर-पु. (व.) (विनोदानें) रोजची चंदी. ॰मंडळ-न. १ चंद्रलोक; चंद्रभुवन; चंद्राचें राज्य. २ चंद्रबिंब. 'शुद्ध चंद्रमंडल पाहून स्नान करावे.' [सं.] ॰मणि-पु. एक काल्पनिक रत्न. चंद्रकांत पहा. चंद्रमा-पु. १ चंद्र. 'मुखचंद्री चंद्रमा ।' -एरुस्व ७.१७. २ (तंजा.) एक शिरोभूषण. [सं.] ॰मुखी-वदना- स्त्री. चंद्रासारखें जिचें तोंड आहे अशी रूपवती स्त्री; सुंदर स्त्री. [सं.] ॰मूलिका, मूळ-स्त्रीन. एक वनस्पति. [सं.] ॰मौळी- पु. शंकर. 'उठोनियां प्रातःकाळीं । वदनी वदा चंद्रमौळी ।' -भूपाळी गंगेची ६. 'नाम जपतां चंद्रमौळी । नामें तरला वाल्हा कोळी ।' -तुगा २५२२. -वि. (डोक्यावर चंद्र धारण करणारा) ज्याच्या छपरांतून चंद्रकिरणांचा प्रवेश आंत होतो असें (म्हणजे मोडकळीस आलेलें, जीर्ण झालेलें) घर इमारत; पडक्या घराला व्याजोक्तीनें म्हणतात. [स. चंद्रमौलि = शंकर] म्ह॰ केळीवर नारळी आणि घर चंद्रमौळी. ॰रेखा-स्त्री. चंद्राची कोर. 'पाडि व्याची चंद्ररेखा । निरुती दावावया शाखा ।' -ज्ञा १५.४७०. [सं.] ॰वंती-स्त्री. चांदणें. 'नदीतटीं रात्री न चंद्रवंती ।' -जगन्नाथ (शके १६६९.) राजवाडे ग्रंथमाला ॰विकासी-वि. चंद्रोदयानंतर उमलणारें (कमलादि पुष्प). शाला-स्त्री. उंच माडी; गच्ची. 'चंद्रासही स्पर्शति चंद्रशाळा ।' -सारुह ५.२०. ॰समुद्रन्याय-चंद्रोदयानें समुद्रास भरती येते या न्यायानें. 'वॉसवेल यास या महापंडिताचें (जॉन्सनचें) वक्तृत्वसेवन कर- ण्याची...अतोनात इच्छा होती व इकडे जॉन्सन यासहि कोणी भाविक श्रोता मिळाला असतां चंद्रसमुद्र न्यायानें त्याच्या वाणीस मोठें भरतें येई.' -नि ६८६. ॰सूर-पु. (योगशास्त्र) डाव्या नाकपुडीनें श्वास सोडणें. याच्या उलट सूर्यसूर. ॰सूर्य-पु. (चंद्र आणि सूर्य) इडा व पिंगला या दोन नाड्या. 'चंद्रसू्र्यां बुझा- वणी । करूनि अनुहताची सुडावणी ।' -ज्ञा १२.५४. ॰सूर्य- संपुट-न. वरील दोन नाड्यांचें संगमस्थान. 'बंधत्रयाचीं घरटीं । चंद्रसूर्य संपुटीं । सुये चित्त ।' -ज्ञा १३.५०८. ॰हार-पु. स्त्रियांच्या गळ्यांतील एक अलंकार; सोन्याच्या कड्यांची माळ.
दम
पु. १ श्वास. (ल.) प्राण; जीव. २ धाप; हवावी; सुसकारा; प्रमाणाधिक श्वासोच्छवास; कष्टानें श्वास टाकणें. ३ स्वतः- बद्दलची फाजील कल्पना; अहंमन्यता; अहंकार; महत्त्वाकांक्षा; गर्व; बढाईखोरपणा. ४ क्षण; पळ. ५ जोम; हिम्मत; निश्चय; विश्वास; तेज; धीर. ६ शक्ति; सत्व; चांगलपणा; सामर्थ्य; गुण (औषधांचा). ७ श्वास कोंडून धरण्याची शक्ति; अवसान. 'तुझा दम मोठा म्हणून तूं बुडून राहतोस.' ८ कायम ओलसरपणा, दमटपणा (जमी- नीचा). ९ एखाद्या वाद्यांतील हवा (वाजविण्यासाठीं कोंडलेली, भरलेली). १० वाफ देणें (मंदाग्नीवर ठेवलेल्या अन्नास). ११ धूम; पखवाज, संबळ इ॰ कांचा खर्ज सूर. १२ हिम्मत; जोम; शक्ति; धीर; दृढनिश्चय; सहनशक्ति इ॰ उठावणी करण्याची, प्रोत्साहित करण्याची, पाठपुरावा करण्याची शक्ति (संपत्ति, अधि- कार, उद्योग यांची); व्यापारधंद्यांतील भरभराट; किफायत; व्यापारांतील ऐपतगिरी; गब्बरपणा. १३ धान्याचा सकसपणा; केळीं वगैरे पदार्थांचा (पोटांत) पुष्कळ वेळपर्यंत भूक न लागतां राहण्याचा गुण; जुन्या, वापरलेल्या वस्तूंची अधिक टिकण्याची शक्ति; पुष्कळ वेळ जळत राहण्याची दारूकामाची शक्ति; न तापतां पुष्कळ वेळ बार उडण्याची (तोफ, बंदूक इ॰) शक्ति. १४ झुरका (गुडगुडी, चिलीम इ॰चा). (क्रि॰ घेणें; पिणें खेंचणें; ओढणें; लावणें). १५ जोर; शक्ति. 'पावसानें पिकास दम आला. ' १६ धमकी. [सं. दम्; फा.] (वाप्र.) ॰कोंडणें-१ श्वास कोंडणें; श्वासाचा अवरोध होणें. २ हिंमत, उत्साह खचणें. ॰खाणें-१ थांबणें; श्वास घेणें; थोडा वेळ स्वस्थ बसणें. २ वाट पाहणें; धीर धरणें. ॰घेणें-थांबणें; विश्रांति घेणें. ॰छाटणें-१ श्वासाचा निरोध करणें; श्वास कोंडून धरणें. २ धीर धरणें; सहनशीलपणा धारण करणें. ३ श्वासोच्छ्वास अनियंत्रित चालणें; गुदमरणें; घाबरे होणें. 'कफामुळें दम छाटत नाहीं.' ॰टाकणें-सोडणें-१ आशा, विश्वास. धैर्य सोडणें. २ श्वास घेणें; विश्रांति घेणें. ॰देणें-१ धैर्य देणें; प्रोत्साहित करणें; उत्तेजन देणें. २ धमकी देणें; धाकदपटशा दाखविणें. ३ जोराने खडसावणें; भोसडणें. ४ क्षणभर विसावा घेऊं देणें. ॰धरणें-१ श्वासावरोध करणें; धीर धरणें. २ थांबणें; विसावा घेणें. ३ धैर्य धरणें. ४ कांहीं वेळ वाट पाहणें. ॰पाहणें- (एखाद्याच्या) अवसानाची, शक्तीची परीक्षा घेणें, करणें. ॰भरणें-धमकावणें; खडकावणें; तंबी देणें; भेडसावणें; दहशत घालणें; ताकीद देणें. ॰मारणें-१ झुरका घेणें (गुडगुडी इ॰चा). २ आपल्या करामतीची पराकाष्टा करणें. 'पुन्हां एकदां दम मार म्हणजे ते धोंडा सरकेल.' ३ गट्ट करणें; दाबणें (पैसा, अन्न इ॰). ॰लागणें-जीव खालींवर होणें; जलद, कष्टानें श्वास घेणें; धाप लागणें. ॰सुटणें-धैर्य, विश्वास नाहींसा होणें; धीर खचणें. दमादमानें-सावकाश; शांतपणें; हळू हळू; थांबून. दमावर धरणें-घाईशिवाय किंवा न थकतां एकसारखें काम करणें. एका दमानें-क्रिवि. एका श्वासानें अथवा अव्याहत प्रयत्नानें; एका सपाट्यांत. दमास येणें-थकणें. सामाशब्द- ॰छाट-पु. श्वासोच्छ्वास निरोधाची शक्ति; पुष्कळ वेळ दम कोंडून ठेवणारा माणूस. ॰छाटगोळा-पु. कुलपी गोळा; बाँब. ॰छाट- तोफ-स्त्री. गरनाळ. ॰छाट माणूस-मनुष्य-पु. पुष्कळ वेळ अवरोध करण्याची शक्ति असलेला मनुष्य. दमट, दमकट- कल-वि. १ ओलसर; आंबटओलें; कुंद; आर्द्र (जमीन इ॰). २ हिरवी; रसभरीत (फांदी). ॰टणें-अक्रि. १ ओलसर असणें. २ ओलसर होणें. ॰दाटी-स्त्री. धाकदपटशा. ॰दार-वि. १ ओल- सर; दमट (जमीन). २ ओलट; हिरवें (लांकूड); जमीनींतील भट्टींत तयार केलेला व दमानें जळणारा (कोळसा); सकस; कस- दार (धान्य); नफा होणारें; फायदेशीर (काम, धंदा). ३ धाडसी; अंगांत तेज किंवा पाणी असणारा; नशीबवान; निश्चयी. ४ धीराचा; सहनशील; उत्साही; दीर्घोद्योगी. ५ पैसेवाला; भांडवलवाला; पैशाची ऊब असणारा (सावकार). ६ पुष्कळ व वापरूनहि दणकट, मजबूत राहणारी (वस्तु, वस्त्र). ॰दिलासा-पु. उत्साह; धीर; समाधान. ॰विकरी, दमाची विकरी-स्त्री. उधारीचा धंदा; उधारीची विक्री. ॰सर-वि. दमट पहा. ॰सर्द-वि. १ थंड. २ नामोहरम; पराजित; हतप्रभ. 'अमर्यादकांस शासनें करुन ...दमसर्द केलें.' -राज ८.१२५. ॰सूट-क्रिवि. पहांटेच्या वेळीं.
शरीर
न. १ देह; काया; वपु. २ गुह्येंद्रियाबद्दल संकेतानें म्हणतात. [सं.] ॰कमावणें-बलवृद्धि करणें; शरीराची निगा राखणें, जोपासना करणें; शरीर सुदृढ करणें. 'शरीर कमावून बसावयाचें पण अक्कल गमावून बसावयाचें.' -राजसंन्यास १५. ॰वेंचणें-परोपकाराकडे देह झिजविणें. सामाशब्द- ॰कष्ट-पुअव. शारीरिक श्रम, हाल, अपेष्टा; देहकष्ट. ॰कळा-कांति-स्त्री. शरीराचें तेज टवटवी, तजेला. [सं.] ॰दंड-पु. १ तप आचरून किंवा अन्य रीतीनें देहाला दिलेले श्रम; कष्ट; देहदंड. २ शारीरिक शिक्षा; मारणें इ॰. [सं.] ॰पाटव-न. शरीराचा निरोगीपणा; सुस्थिति; आरोग्य; सुदृढता. [सं.] ॰प्रकृति-स्त्री. १ प्रकृति- मान; शरीराची ठेवण; स्वभाव. २ देहाचें आरोग्य; स्वास्थ्य. [सं.] ॰भाव-पु. १ शारीरिक प्रकृति; स्वभाव; शारीरिक अवस्था. 'व्याध करी साष्टांग नमस्कार । मुखे म्हणे जयजयकार । तों शरीरभाव पालटला ।' -शिली २. २ अहंभाव. -मनको. [सं.] ॰भोग-पु. १ शारीरिक कष्ट, यातना, रोगपीडा इ॰. (सामा.) दुखणें; दुखापत. २ शारीरिक विलास, करमणूक, ऐष- आराम. (क्रि॰ भोगणें). ३ प्रारब्धप्राप्त देहपीडा. ४ शरीराला होणारें, सुखदुःख. [सं.] ॰यष्टि-स्त्री. शरीर; अंगकाठी; शरीर- ठेवण, घडण. [सं.] ॰संपत्ति-स्त्री. १ आरोग्य; स्वास्थ्य; निरोगीपणा. २ शरीरांतील जोम; उत्साह, शक्ति. [सं.] ॰संबंध-पु. १ सोयरिकीमुळें जडणारा संबंध; आप्तपणा; सोयरीक; सोयरगत; नातें. २ विवाहसंबंध; लग्न (लग्नचिठ्ठींत वापरतात). ३ हातघाई; मारामारी; धक्काबुक्की, लगट. ॰संबंधावर येणें-हातघाईवर येणें; नारामारी, धक्काबुक्की करणें; लगट करणें. ॰संबंधी- वि. सोयरीकसंबंधीं; विवाहामुळें नातें जडलें आहे असा. ॰सांडोवा-पु. देहाचें निंबलोण; देह ओवाळून टाकणें. 'यालागीं शरीरसांडोवा कीजे । सकल गुणांचे लोण उतरिजे ।' -ज्ञा ९. ३८१. [शरीर + सांडणें] ॰स्वास्थ-न. शरीराची सुस्थिति; आरोग्य; शारीरिक सुख. [सं.] शरीराची ढगळ-स्त्री. शरी- राची झीज; कृशपणा (हगवण इ॰ मुळें आलेला); शरीराची खराबी. शरीराची दामटी-स्त्री (अजारीपणामुळें) शरीराला आलेली हीन अवस्था; कृषता; खराबी शरीराची धलपी- ढळपी-स्त्री. (रोगानें) शरीर कृश, काठीप्रमाणें होणें. शरीरी- वि. १ देहधारी; देही; देह धारण करणारा. २ शरीरासंबंधी; शरीराचें; शारीरिक. -पु. देहधारी सजीव प्राणी. [सं.] शारीर, शारीरक-न. १ शरीरविषयक शास्त्र; शारीरशास्त्र. २ गातांना कंप घेण्याचें कौशल्य. -वि. १ दैहिक; देहासंबंधीं; शरीरी पहा. -गीर १४२. शारीरव्रण-पु. सहजव्रण; स्वाभाविक व्रण; याच्या उलट आगंतुक व्रण. शारीरशास्त्र-न. शरीरविषयक शास्त्र. (इं.) अ/?/नाटमी. [सं.] शारीरिक-वि. शरीराचा; शरीरासंबंधीं शरीरी पह. याच्या उलट मानसिक. [सं.]
चौसष्ट-ट
वि. ६४ संख्या; साठ आणि चार. [सं. चतुःषष्टि; प्रा. चउसट्ठी; तुल॰ हिं. चौसठ, गु. चौसट-ठ] सामाशब्द- ॰कला-कळा-स्त्रीअव लिहिणें, वाचणें, गाणें, नाचणें, चित्रें काढणें इ॰ चौसष्ट कौशल्याचीं कामें 'चौदा विद्या चौसष्ट काला.' या चौसष्ट कला कोणत्या याबद्दल निश्चित मत नाहीं. सर्व कलांची यादी केल्यास त्या चौसष्टांपेक्षां जास्त भरतील. निरनिराळ्या ग्रंथांतून चौसष्ट कलांची भिन्न भिन्न यादी आहे. श्रीमद्भागवत, शुक्रनीति, वात्सायन कामसूत्र, वार्ताविद्या, दण्डनीति इ॰ कांत चौसष्ट कलांच्या भिन्न भिन्न याद्या आहेत. त्यांपैकीं वात्स्यायन कामसूत्रांतील यादी पुढें दिली आहे-१ गायन. २ वादन. ३ नृत्य. ४ नाट्य. ५ आलेख्य = लिहिणें वगैरे. ६ विशेषकच्छेद्य = निशाण मारणें. ७ तण्डुलकुसुबलिप्रकार = तांदूळ व फुलें यांच्या तर्हेतर्हेच्या आकृती करणें. ८ पुष्पास्तरण = फुलांचे गालीचे काढणें. ९ दशनव- सनांगराग = निरनिराळ्या रंगांनीं दांत सुशोभित करणें, वस्त्रावर वेल- बुटी काढणें, व अंगास उटी लावणें, अंग गोंदणें इ॰ १० मणि- भूमिकर्म = त्रिकोण, चौकोन इ॰ आकृतींनीं जमिनीवर रत्नांची, मण्यांची रचना करणें. ११ शयनरचना = नाना तर्हेच्या बिछायती वगैरे घालणें व बिछायती वस्तू नीटनेटक्या ठेवणें इ॰ १२ उदक- वाद्य = जलतरंग यासारखीं वाद्यें तयार करणें व वाजविणें १३ चित्रयोग = मातीचीं चित्रें तयार करणें १४ माल्यग्रंथनविकल्प = फुलांचे हार, तुरे, गजरे इ॰ तयार करणें १५ शेखरापीडयोजन = तुरे इ॰ नीं मुकुट, टोप, सुशोभित करणें १६ नेपथ्यप्रयोग = नाटकां- तील पात्रें (पडद्या आड) रंगविणें, त्यांना नटविणें इ॰ १७ सुगंध युक्ति = सुवासिक पदार्थ तयार करणें. १८ कर्णपत्रभंग = कानांवर कोंवळ्या पाकळ्या ठेवून ते सुशोभित करणें १९ भूषणयोजन = सोन्याचें अलंकार करणें, घालणें, नीटनेटके ठेवणें इ॰ २० ऐंद्र- जाल = जादुगिरी २१ कौचुमारयोग = अंग रंगवून निरनिराळीं रूपें धारण करणें, बहुरूप्याची कला. २२ हस्तलाघव = हातचलाखी २३ चित्रशाकापूपभक्ष्यविकारक्रिया = नाना तर्हेच्या भाज्या व पक्वान्नें तयार करणें २४ पानासव-रसरागासव योजना = नाना तर्हेचीं पेयें करणें, तर्हेतर्हेच्या रसांचीं पुटें देणे, पदार्थांवर निरनिराळे रंग देणें व मद्य तयार करणें २५ सूचीवाय कर्म = शिवणकला. २६ सूत्रक्रीडा-बाहुल्या नाचविणें, भोंवरे फिरविणें इ॰. २७ वीणाडम- रुक वाद्यवादन = वीणा, डमरु इ॰ वाद्यें वाजविणें. २८ प्रहेलिका = उखाणे जिंकणे २९ प्रतिमाला = भेंड्या लावणें. ३० दुर्वाचकयोग = कठोर वर्णमिश्रित श्लोकपठण ३१ वाचन. ३२ नाटकाख्यायिका- दर्शन = नाटकें, प्रहसनें इ॰ करून दाखविणें. ३३ काव्यसमस्या- पूरण = दुसर्यानें दिलेला अपूर्ण श्लोक़ पुरा करून देणें. ३४ पट्टिकावेत्रबाणविकल्प = छडी, पट्टा, बाण, तलवार इ॰ कांच्या उपयोगांत नपुण्य. ३५ तक्षकर्में = कातरकाम, जाळ्या इ॰ करणें. ३६ तक्षण = सुतारकाम. ३७ वास्तुविद्या = घरें बांधणें. ३८ रौप्य- रत्नपरीक्षा = रत्नें व नाणीं यांची परीक्षा करणें. ३९ धातुवाद = अशोधित धातु शुद्ध करणें इ॰. ४० मणिरागज्ञान = रत्नांनां रंग देंणें इ॰. ४१ आकरज्ञान = खाणी कशा व कोठें सांपडतील इ॰ सांगणें. ४२ वृक्षायुर्वेद = वृक्षांची जोपासना, वाढ व त्यांचें आयुष्य वाढविणें इ॰ विषयीं ज्ञान. ४३ मेषकुक्कुटलावक युद्ध- विधि = एडके, कोंबडे, लावी पक्षी यांच्या झोंब्या लावणें. ४४. शुकसारिकाप्रलापन = पोपट, मैना इ॰ कांना बोलावयास शिकविणें. ४५ उत्सादन = पतंग उडविणें. ४६ केशमार्जनकौशल = केसांना नानाविध तेलें लावणें व त्यांची नानाविधप्रकारें रचना करणें. ४७ अक्षरमुष्टिकाकथन = मनांतील अक्षरें, विचार इ॰ व मुठींत काय आहे तें सांगणें. ४८ म्लेछित कुतर्कविकल्प = करपल्लवी, नेत्रपल्लवी इ॰ भाषांची योजना करणें. ४९ देशभाषाज्ञान = देशभाषा जाणणें. ५० पुष्पवाटिकानिर्मितिज्ञान = बागबगीचे करणें इ॰ चें ज्ञान. ५१ यंत्रमातृकाधारण = गूढ यंत्रें तयार करणें. ५२ मातृकासंवाच्य = मंत्र टाकणें, भारणें. ५३ मानसी काव्यक्रिया = न बोलतां मनां- तल्या मनांत काव्यें रचणें. ५४ अभिधानकोश = अनेक कोशांचें ज्ञान. ५५ छंदोज्ञान = छंदःशास्त्राची माहिती. ५६ क्रियाविकल्प = चमत्कार करून दाखवणें. ५७ वस्त्रगोपन = वस्त्रें नेहमीं नवीं राह- तील अशा युत्तीनें ठेवणें, कापसाचें वस्त्र रेशमी दिसेल असें करणें. ५८ छलितकयोग = खुषमस्करीपणा. ५९ द्यूतविशेष = जुगार, फांसे खेळणें; इ॰. ६० आकर्षक्रीडा = दुसर्याची मत्ता (मंत्रानें) स्वहस्तगत करणें. ६१ बालक्रीडनक = लहान मुलांचीं खेळणीं बनविणें इ॰. ६२ वैनायिकीविद्याज्ञान = विघ्नें नाहींशीं करण्याची जादू, युक्ती इ॰ चें ज्ञान. ६३ वैतालिकी विद्याज्ञान = भूत, वेताळ, पिशाच्च इत्यादिकांविषयीं ज्ञान. ६४ वैजयिक विद्याज्ञान = एका प्रका- रच्या मंत्रविद्येचें ज्ञान. इ॰ -ज्ञाको क १५३. अधिक माहितीकरितां -ज्ञाको भाग १०, कला व -मसाप १.२.७. पहा. [चौसष्ट + कला] चौसष्टी-स्त्री. १ एकाच जातीच्या चौसष्ट वस्तूंचा समुदाय. २ (एका पक्ष्याच्या) एकाच रंगाच्या चार सोंगट्या मारल्या गेल्यानें अंगावर येणारी बाजू; (सोंगट्यांतील) चौबारी. ३ चौसष्ट कला. 'शिणल्या बहुत चौसष्टी । ...स्वरूप तुझें वर्णितां । -ह ३,४. [चौसष्ट] ॰पिंपळी-स्त्री. चौसष्ट प्रहर खलून औषधाकरितां तयार केलेली पिंपळी. [चौसष्ट + पिंपळी] ॰मूर्छना-स्त्रीअव. मूर्च्छनेचे (स्वरभेदाचे) ६४ प्रकार. 'तेणें साही राग छत्तीस भार्या । चौसष्टी मूर्च्छना दावूनियां । अनेक उपरागांच्या क्रिया । गाइल्या तेव्हां रिसानें ।' -हा २५.११९.
कंठ
पु. १. गळा (हनुवटीच्या खालील व खांद्यावरील शरीराचा भाग) : ‘कंठीं झळके माळ मुक्ताफळांची ।’ - गणपतीची आरती. २. (गायन) गळ्यातून निघणारा ध्वनी; आवाज. ३. (पोपट, कबुतर, चिमणा इ.) पक्ष्यातील नराला (तारुण्यावस्था प्राप्त झाली असता) गळ्याभोवती उमटली जाणारी रेषा. (क्रि. फुटणे.) ४. भांडे वगैरेंच्या तोंडासारखा आवळ भाग; काठ. ५. श्वासनलिकेचे वरचे तोंड, नरडे; घसा. [सं] (वा.) कंठ दाटणे, कंठ भरून येणे, कंठ सद्गदित होणे – दुःख किंवा आनंद यांच्या उमाळ्याने घसा दाटणे, त्यामुळे तोंडातून शब्द न निघणे; आवेग येणे; सद्गदित होणे : ‘दासाकडे हनुमंत पाहे । तों गहिवरे कंठ दाटलाहे ।’ -संवि २·८५; ‘सांगू जातां मुखाने । तों कंठ आला भरून ।’ - नल २२·४५. कंठ फुटणे, कंठ बोटणे – (गायन) १. चिरका आवाज होणे; वयात आल्यावर आवाजाचा पोत बदलणे. २. कंठ (अर्थ ल ३) येणे (पोपट इ. पक्षाला). ३. खणखणीत शब्द निघणे. ४. वयात येणे; प्रौढदशा प्राप्त होणे. ५. (ल.) अनुकूल परिस्थितीत स्पष्टपणे, मोकळ्या मनाने बोलणे. कंठ बसणे - घसा बसणे; आवाज (गाण्यात, भाषणात), स्पष्ट न निघणे : ‘उष्ण काळीं तेल तिखट खातां । तेणें बद्धक झालें बहुतां । म्हणती कंठ बसले आतां । नये गातां कीर्तनीं ॥’ - संवि १२·१२२ कंठ शोषणे - (दुःखाने) घसा कोरडा पडणे. कंठ मोकळा करून रडणे - मोठ्याने रडणे, मनमुराद रडणे, ओक्साबोक्शी रडणे; भोकाड पसरणे : ‘मोकळा करूनि कंठ तेधवां । आठवूनिं मनिं जानकीधवा ।’ - (वामन) भरतभाव १४. कंठास प्राण येणे, कंठी प्राण येणे – १. (भीतीने, दुःखाने) अर्धमेले होणे : ‘प्रतिवचन प्रसंगी प्राण कंठास आला ।’ - सारुह २·१०३. २. दुःखाने किंवा भुकेने व्याकूळ होणे. कंठास लावणे - मिठी मारणे; आलिंगन देणे : ‘कंठास त्यास लावून ।’ - संग्राम १५. कंठी प्राण उरणे – आसन्नमरण होणे; धुगधुगी राहणे. कंठी प्राण ठेवणे, कंठी प्राण धरणे, कंठी प्राण राहणे – एखादी इच्छा किंवा आशा सफळ झाल्यावर मरू अशा इराद्याने जीव धरून राहणे : ‘अस्थि शिरा दिसती नयनीं । प्राण कंठी धरिले त्यानीं ।’ - संवि २७·७७; ‘तुम्हाविण कंठी प्राण राहिला असे ॥’ - रत्ना ४०३. कंठी धारण करणे - १. गळ्यात घालणे (माळ, अलंकार इ.). २. जपणे; स्मरण करणे; अतिप्रिय असणे.
आड
अ. १. हा शब्द उपपदाप्रमाणे कित्येक शब्दांना जोडून येतो. याची सविस्तर माहिती अडमध्ये दिलेली आहे. या शब्दाचे अर्थ − (अ) एकीकडे; एका बाजूस; दूर; मार्गाच्या बाहेर; रीती वेगळा, सांधीकोंदीत. उदा. आडमार्ग; आडबाजू. (आ) मधून; वरून; उलट; विरुद्ध; मार्गात (प्रतिबंधरूपाने). उदा. आडदंड या उपपदातील आणि अड उपपदातील अर्थभेद अड मध्ये पहा. २. एखाद्या पदार्थाच्या मागे; पलीकडे; पाठीमागे; पुढे, मागे न दिसेल असा; एका बाजूला : ‘जे नित्य मायापाट आड लावी.’ − सारुह १·५. ३. (दृष्टिरोध करण्याकरिता, प्रवेश प्रतिबंधाकरिता, आश्रय देण्याकरिता; संरक्षण करण्याकरिता) मध्ये येणारा; मार्गात असणारा; मध्यंतरी; मागे : ‘आतां आड उभा राहे नारायणा । दयासिंधुपणा साच करीं ॥’ − तुगा १५६८. ४. एखाद्याच्या छत्राखाली, आश्रयाखाली. उदा. शेताआड चोरी (आपल्याला स्वतःचे शेत आहे तेव्हा दुसऱ्याचे चोरले असा आरोप येणार नाही). ५. द्विरुक्तीने आलेल्या शब्दात आड शब्द आल्यास त्याचा अर्थ प्रत्येक दुसरा; एक टाकून एक असा होतो. उदा. एकाआड एक. ६. (समासात) विवक्षित कालाव्यतिरिक्त. उदा. आडवार; आडसाल; आडदिवस = ठरावीक दिवसांपेक्षा इतर दिवशी. समासात आड याचा अर्थ केव्हा केव्हा अकस्मात असा होतो. (वा.) आड घालणे − १. मध्ये आणणे; रक्षण करण्यासाठी काही मध्यंतरी ठेवणे : ‘तंव आड घातलें आणीकी वीरी’ − उषा ६१६. २. उडी घालणे : ‘कोणी आड घाली काय अथावीं ।’ − ज्ञा ८·२४०. ३. आडकाठी घालणे; अट घालणे : ‘किल्ला हवाला करणे तरी राहेन म्हणून गणेश संभाजीने आड घातला. या करिता झाशी किल्ला हवाला केला.’ − पेद २९·२२. आड घालवणे − आड येणे; अडथळा आणणे; हरकत घेणे : ‘कार्यावर बक्षीस दिल्ह्याने दुसरियाच्याने आड घालवत नाही.’ − आज्ञा ७६. आड जाणे − १. आडरस्त्यास, आडमार्गास लागणे; रस्ता चुकून भलतीकडे जाणे. २. जवळून जाणे; ‘जया आड जातां पार्था । तपश्चर्या मनोरथा । पाखंडियाहि आस्था । समूळ होय ।’ − ज्ञा ६·१६७. आड धरणे − धारण करणे : ‘आड धरुनि गोपुवेषु । वत्से राखे’ − ज्ञा २३४. आड पडणे − १. नमस्कार करणे; विनवणी करणे. २. अडविणे : ‘तिये कडोन येतसे वारा । देखोनि धांवे सामोरा । आड पडे म्हणे धरा । बीजे कीजो ।’ − ज्ञा १३·३७६. ३. मुरकुंडी वळणे : ‘गोपाळ हांसां आडपडतु ।’ − वछा २१७. आड पडप − वामकुक्षीकरिता आडवे होणे. आड लावून घेणे − ओवळ्या लुगड्यानंतर व सोवळे नेसण्यापूर्वी मध्यंतरी लावून घेण्याचे वस्त्र; न्हाताना, आंघोळ करताना लावून घेण्याचे जुनेर; नेसू (गो.) : ‘नव्हे सपातळ आड लावणें ।’ − ज्ञा ६·११४. आड रिगणे − १. आश्रय करणे. २. विरोध करणे : ‘उग्रसेनु आड रिगाला’ श्रीकृष्णच २.
भू
स्त्री. पृथ्वी; जलस्थलमय गोल. 'हांसोनि म्हणे नारद भूवरि तों हेचि दिव्यरुचि राजा ।' -मोसभा १.२२. [सं.] सामाशब्द- ॰कंपपु. धरणीकंप. [सं.] ॰कमळ-न. महाबळेश्वर येथें होणारें एक जातीचें फूल. ॰खंड-न. भूलोकाचा भाग, तुकडा. [सं.] ॰खळें-न. पृथ्वीरूप अंगण, खळें. 'राशी झाल्या भूखळीं ।' -मुआदि ४९.११४. ॰गर्भ-न. १ भुयार. 'कित्येक काळाचे उपवासी । इच्छित होते पंगतीसी । ते पावले मनोरथासी । भूगर्भीचें आले ।' -वेसीस्व १२.५८. २ पृथ्वीचा आंतील भाग, पोट. ॰गर्भवास-पु. गुहा इ॰ स्थलीं राहणें. [सं.] ॰गर्भशास्त्र-न. पृथ्वीच्या पोटांत असणार्या पदार्थांसंबंधीं शास्त्र; भूस्तरशास्त्र. (इं.) जिऑलजी. [सं.] ॰गर्भक्षितिज-न. मूळ, वास्तविक क्षितिज; खगोलक्षितिज. [सं.] ॰गोल-ळ-पु. १ जलस्थलमय गोल. २ पृथ्वीरूप गोल; पृथ्वी. ३ पृथ्वीवरील देशांची माहिती; भूवर्णन. [सं.] ॰गोलशास्त्र-न. पृथ्वीसंबंधीं माहिती देणारें शास्त्र. यांत भूस्तरशास्त्र, वातावरण शास्त्र, निरनिराळ्या देशांची भूस्तरदृष्ट्या सांस्कृतिक व राजकीय विविध माहिती व व्यापारी माल, साधनें, इ॰ माहितीचा समावेश होतो. [सं.] ॰चंपक-पु. भुईचाफ्याचें झाड व त्याचें फूल. [सं.] ॰चर-वि. जमिनीवर फिरणारा, राहणारा; स्थलचर. (जलचर, जलस्थलचर, खेचर, यांच्या उलट). [सं.] ॰चरी-स्त्री. योगाच्या चार मुद्रांपैकीं एक. [सं.] ॰चरी- नयन-पुअव. अधोदृष्टि. 'मूर्ति करावी अति दीन । खेचरी भूचरी जिचे नयन ।' -एभा ११.१२८४. ॰चरी मुद्रा-स्त्री. नासिकाग्रा- वरून भूमीकडे नजर लावणें अशी एक योगांतील मुद्रा. 'कीं भूचरीमुद्रा योगेश्वर ।' -ह ६.८९. [सं.] ॰चुंबकत्व-न. पृथ्वीचा आकर्षण करण्याचा धर्म. (इं.) टेरिस्ट्रिअल् मॅग्नेटिझम्. [सं.] ॰ज्या-स्त्री. भूमध्यापासून भूपृष्टाचें जें अंतर तें. [सं.] ॰तल- ळ-न. १ पृथ्वीचा पृष्ठभाग. २ (सामा.) भूलोक; पृथ्वी. [सं.] ॰तलविद्या-स्त्री. भूपृष्ठासंबंधीं शास्त्र; (इं.) फिजिकल् जॉग्रफी. [सं.] ॰तैल-न. पृथ्वीतून पाझरणारें तेल; शिलातैल. (इं.) पेट्रोलियम्. ॰दिन-नपु. सावनदिन पहा. [सं.] ॰देव-पु. पृथ्वी- वरील देव; ब्राह्मण. 'मिळविली कीर्ति आजवरी । ती बुडेल कीं भूदेवा ।' -विक १६. [सं.] ॰देवी-स्त्री. गांव, शेत, जागा यांची रक्षक देवता. [सं.] ॰धर-पु. १ पर्वत; डोंगर. २ भूगोल मस्तकीं धारण करणारा शेष नामक सर्प. ३ राजा. [सं.] ॰प-पु. १ राजा. २ भूपकल्याण राग. 'दीप भूपकल्याण तूं गातां प्रकाश सार्या स्थळीं पडती ।' -प्रला २३७. ॰पकल्याण-पु. एक राग. ॰पति-पाल(ळ)-पु. राजा. [सं.] म्ह॰ भूपतिर्वा यतिर्वा = मी राजा तरी होईन नाहीं तर यति तरी होईन. ॰परिघ- पु. भूपृष्ठावरून जाणारें मोठें वर्तुळ. [सं.] ॰परिमाण-न. भूमान पहा. [सं.] ॰पृष्ठ-न. १ पृथ्वीचा पृष्ठभाग. २ सपाट जमीन; समथळ. (इं.) ग्राउंडलेव्हल. [सं.] ॰पृष्ठवर्णन-न. (भूशास्त्र) पृथ्वीवर असणार्या दोन मुख्य गोष्टी पाणी व जमीन, त्यांवरील सर्व बाजूनें असणारें वातावरण, याविषयीं शास्त्रीय माहिती व वर्णन; तसेंच त्यांमध्यें दृग्गोचर होणारे निरनिराळे चमत्कार याविषयीं विवेचन ज्यांत केलें असतें तें वर्णन, शास्त्र. [सं.] ॰पृष्ठक्षितिज-न. दृश्य असें क्षितिज. [सं.] ॰भा-स्त्री. (ज्यो.) १ पृथ्वीची छाया. २ शंकुच्छाया. [सं.] ॰भाग-पु. भूगोलाचा एक भाग. [सं.] ॰भा बिंब-न. पृथ्वीच्या छायेचें बिंब. [सं.] ॰भार- पु. भूमीस झालेला (पातकी जनांचा) भार. 'भूभार हराया सार, घेउनि अवतार, अत्रिच्या पोटीं ।' -दत्ताची आरती. [सं.] ॰भुज- पु. राजा. [सं. भू + भुज्] ॰भुजेंद्र-पु. सार्वभौम राजा; राजाधिराज. [सं. भूभुज + इंद्र] ॰भृदरि-पु. इंद्र. [सं. भूभृत् + अरि] ॰भ्रम- पु. पृथ्वीचें भ्रमण, गति (ग्रहांप्रमाणें). [सं.] ॰मकपु. (ना) ग्रामाधिकारी; हा गावांच्या सीमेच्या देवतेची पूजा करतो व सर- कारी कामगार गावीं आले असतां त्यांची व्यवस्था ठेवतो. ॰मंडल-ळ-न. जलस्थलमय पृथ्वीरूप गोल. [सं.] ॰मान- परिमाण-न. पृथ्वीचें मान, माप. [सं.] ॰मिति-स्त्री. (गणित) जमिनीची मापणी; रेखागणित; भूमितींत शास्त्रीय पद्धतीनें चौरस, काटकोन, त्रिकोण वगैरे आकृति काढण्याचे नियम व सिद्धांत यांचें विवेचन केलेलें असतें. [सं.] ॰मितिप्रमाण-मितिश्रेधी- मितिप्रमाणश्रेधी-मितिश्रेढी-स्त्री. (गणित) जींत कांहीं एका विवक्षित पटीनें संख्या वाढतात किंवा कमी होतात ती पंक्ति; रेखागणितश्रेढी. गुणोत्तरानें सारख्या संख्या वाढणें तें. जसें- २, ४, ८, १६ इ॰ [सं.] ॰रमलविद्या-स्त्री. जमिनीवर रेघा किंवा आकृति काढून शकुन पाहण्याची विद्या. ॰रुह-पु. (काव्य) वृक्ष; वनस्पति. 'ठाण न चळे रणींहून । कुठारघायें भूरुह जैसा ।' [सं.] ॰लोक-पु. इहलोक; पृथ्वी. सप्तलोक पहा. [सं.] ॰वैकुंठ-पु. पृथ्वीवरील वैकुंठ; विठ्ठलाचें (कृष्णाचें, विष्णूचें) नित्य वसतिस्थान असलेलें पंढरपूर इ॰ क्षेत्र. 'सकळ तीर्थांचें माहेर । भूवैकुंठ निर्वि- कार ।' -तुगा २५९१. [सं.] ॰व्यास-पु. भूमध्यांतून जाऊन भूपृष्ठास दोहों बाजूस मिळणारी रेषा. ॰शलाका-शिर-स्त्रीन. जमिनीच समुद्रांत गेलेलें टोंक; जमिनीचा चिंचोळा भाग. [सं.] ॰सुर-पु. भूदेव; ब्राह्मण. 'मानुनि वेषें स्नातक भूसुर पूजावया उठे भावें ।' -मोसभा १.९२. [सं.] ॰स्तरशास्त्र-न. यांत पृथ्वी- वरील जमीन, पाणी, खडक यांमध्यें होणार्या घडामोडी व संशोधन, पृथ्वीच्या उदरांत असलेल्या स्थितीबद्दल व द्रव्याबद्दल माहिती, वनस्पति, प्राणी यांचा इतिहास इ॰ गोष्टींचें विवेचन केलेलें असतें, भूगर्भशास्त्र. (इं.) जिऑलजी.
कंठ
न. १ गळा (हनुवटीच्या खालील वं खांद्याच्या वरील शरीराचा भाग). 'कंठीं झळके माळ मुक्ताफळांची' -गणपतीची आरती. २ (गायन) गळ्यांतून निघणारा ध्वनि; आवाजी. 'स्वरा- वरुनि समजे कंठ.' 'तिचा कंठ फार मधुर आहे.' ३ (पोपट, कबूतर, चिमणा इ॰) पक्ष्यांतील नराला तारूण्यावस्था प्राप्त झाली असतां गळयाभोंवतीं जी एक काळी रेषा उमटते ती. (क्रि॰ फुटणें). ४ भांडें वगैरेंच्या तोंडाखालचा आवळ भाग; कांठ. ५ श्वासनलि- केचें वरचें तोंड, मणका; नरडें; घसा. 'दुःखामुळें कंठातून शब्द निघेना.' [सं.] ॰दाटणें-भरून येणें-सद्गदित होणें-दुःख किंवा आनंद यांच्या उमाळ्यानें घसा दाटणें, त्यामुळें तोंडांतून शब्द न निघणें; आवेग येणें; सद्गदित होणें. 'दासाकडे हनुमंत पाहे । तों कंठ आला भरून ।' -नव २२.४५. ॰फुटणें- (गायन) १ चिरका आवाज होणें. 'फार उंच स्वरांत म्हणूं नकोस, कंठ फुटला तर पंचाईत होईल.' २ कंठ (अर्थ ३) येणें (पोपट, इ॰ पक्ष्याला). ३ खणखणीत शब्द निघणें. 'त्याला नुकताच कंठ फुटला आहे.' ४ वयांत येणें; प्रौढदशा प्राप्त होणें. ॰बसणें- घसा वसणें; आवाज (गाण्यांत, भाषणांत) स्पष्ट न निघणें. 'उष्णकाळीं तेल तिखट खातां । तेणें बद्धक जहालें बहुतां । म्हणती कंठ बैसले आतां ।नये गातां कीर्तनीं ।।' -संवि २२.१२२. ॰मोकळा करून रडणें-मोठ्यानें रडणें; मनमुराद रडणें; ओक्साबोक्शी रडणें; भोकाड पसरणें. 'मोकळा करुनि कंठ तेधवां । आठवूनि मनिं जानकीधवा ।, -(वामन) भरतभाव १४. कंठास-कंठी-प्राण येणें-१ (भीतीनें, दुःखानें) अर्धमेलें होणें. 'प्रतिवचनप्रसंगीं प्राण कंठास आला ।' -सारुह २.१०३. २ दुःखानें किंवा भुकेनें व्याकुळ होणें. कंठास लावणें-मिठी मारणें; आलिंगन देणें. 'कंठास त्यास लावून ।' -संग्राम १५. कंठी प्राण उरणें-आसन्नमरण होणें; धुगधुगी राहणें. 'त्याच्या नुसता कंठीं प्राण उरला आहे.' कंठी प्राण ठेवणें, धरणें- राहणें-एखादी इच्छा किंवा आशा सफळ झाल्यावर मरूं अशा इराद्यानें जीव धरून राहणें. 'अस्थि शिरा दिसती नयनीं । प्राण कंठीं धरिले त्यानीं ।' -संवि २०.७७. -हृ २१.७२. 'तुम्हाविण कंठीं प्राण राहिला असे ।।' -रत्न ४.३. 'मुलगा येईपर्यंत म्हाता- र्यानें कंठीं प्राण धरून ठेविला होता.' कंठीं धारण करणें- १ गळ्यांत घालणें (माळ, अलंकार, इ॰). २ जपणें; स्मरण करणें. ३ अति प्रिय असणें. ॰कार्कश्य-न. कर्कश आवाज; आवाजाचा कर्कशपणा. ॰कोकिला-ळा-स्त्री. (ल.) सुकुमार, मधुर आवाजाची स्त्री; पिककंठी. [सं.] ॰गत-वि. १ गळ्यां- तील (दागिना, वस्तू इ॰). २ नेहमीं तोंडपाठ असलेला (अभ्यास, वचन इ॰); मुखोद्गत. ३ गळयाशीं आलेला. [सं.] ॰गत प्राण-वि. धुगधुगी असलेला; ज्याचा प्राण गळयाशीं आला आहे असा. ॰चामीकर न्याय-पु. गळयांत सोन्याचा दागिना असून तो हर- वला अशा समजुतीनें घरभर हिंडणें, समानार्थकः- काखेंत कळसा, गावांला वळसा; गांडीखालीं आरी, चांभार पोर मारी. ॰नाळ- न. गळयाची नळी; मान. 'मग कंठनाळ आटे ।' -ज्ञा ६.२०७. 'तदा कंठनाळांतुनी शब्द झाला' -गणपतिजन्म. [सं.] ॰नाळ चिरणें-गळा कापणें; ठार करणें. ॰पाठ-वि. तोंडपाठ; मुखोद्गत. 'धौम्य म्हणे तुज यावें शास्त्रासह कंठपाठ वेदानीं ।' -मोआदि २.५१. ॰भूषण-न. गळ्यांतील दागिना. ॰मणी-पु. १ गळयां- तील हारामधील मुख्य मणी; गळ्यांतलें रत्न. २ गळ्याचा मणका, घांटी. ३ (ल.) अतिशय लाकडा; गळयांतील ताईत (माणूस, वस्तु). 'आवडते कंठमणी ही.' -संग्राम २९. ॰मर्याद- क्रिवि. गळयापर्यंत. आकंठ पहा. 'आज मी कंठमर्याद जेवलों.' ॰माधुर्य-न. (गायन) सुंदर गळा; गोड आवाज. [सं.] ॰माळ-स्त्री. (गो.) गंडमाळा. ॰रव-पु. आवाज. [सं.] ॰रवानें, ॰रवेंकरून-१ मुद्दाम; निश्चयानें; स्पष्टोक्तीनें. २ मोठमोठ्यानें ओरडून; घसा फोडून; कंठशोष करून. ॰रवोक्त- वि. निश्चयानें संगितलेलें (भाषण इ॰). ॰शोष-पु. १ (तहानेनें) घशाला पडणारी कोरड. २ (ल.) ओरड; उगीच घसा कोरडा करणें; घसाफोड; व्यर्थ समजूत (काढणें); (क्रि॰ करणें). 'वादी प्रतिवादी- कडून अतोनात कंठशोष होत. असतांहि ...' -टि ४.१३१. [सं.] ॰सूत्र-न. १ जानवें. २ मंगळसूत्र. [सं.] ॰स्थ-वि. १ घशांत अडकलेलें (बेडका, प्राण). २ गळ्यांतील (दागिना इ॰) ३ (ल.) जिव्हाग्रीं; पाठ असलेला (अभ्यास, पाठ, इ॰). ४ कंठस्थ वर्ण (गळ्यांतून ज्यांचा उच्चार होतो ते:-अ, आ, क, ख, ग, घ, ङ, ह). [सं.] ॰स्थान-गळा. -वि. कंठस्थ पहा, ॰स्नान-न. १ गळयाखालचें स्नान (विशेषतः बायकांचें), (क्रि॰ करणें). २ (ल.) मान छाटणें; शिरच्छेद करणें. (शिर छाटल्यानें आंतून वाहणार्या रक्तानें होणारें स्नान); नागवणें; लुटणें. (क्रि॰ घालणें). 'धोंडी वाघासारख्या काळपुरुषास ज्यानें कंठस्नान घातलें, त्या वापू गोखल्याच्या पराक्रमाचें वर्णन काय करावें ?' [सं.] ॰कंठाग्र-न. घसा; ध्वनि इंद्रिय. कंठ अर्थ ५ पहा. (सामा- न्यतः सप्तम्यंत प्रयोग), कंठाग्रीं.'कंठाग्रीं संधानीं धरियेला हरी । अवघ्या विखारीं व्यापियेला ।' [सं.] ॰कंठाभरण-न. १ गळ्यांतील एक अलंकार. 'सौभाग्यद्रव्यें कंठाभरणें.' -एरुस्व ६. ८७. २ घोड्याच्या मानेखालीं असलेला शुभदायक भोंवरा. ३ गळयांतील ताईत; प्रिय. कंठावरोध-पु. घसा दाटून येणें; घसा धरणें, बसणें. [सं.]
तीर्थ
न. १ पवित्र स्थळ; कोणतीहि यात्रेची जागा; पवित्र मानलेल्या नद्यांच्या किनार्यावरील पुण्य क्षेत्र. २ पवित्र नदी. ३ पवित्र नदीचें पाणी; ब्राह्मण किंवा संन्यासी यांचें चरणोदक; देव- मूर्तीला स्नान घातलेलें उदक; पवित्र जल; स्नानोदक, पादोदक इ॰. ४ पवित्र क्षेत्राची यात्रा. (क्रि॰ करणें; घडणें). ५ (गौरवार्थी) गुरु; धार्मिक अध्यापक; वडील, पूज्य व्यक्ति. 'तीर्थपाद.' ६ पवित्र प्रदेश, स्थळ. देवतार्थ; ऋषितीर्थ आणि पितृतीर्थ असे या तीर्थ- स्थळांचे तीन प्रकार आहेत. बोटांचा अग्रभाग, तळहाताचा बाहेरील (करंगळीकडचा) भाग व आंतील (अंगठ्याकडचा) भाग हीं अनुक्रमें त्यांचीं स्थानें होत. देव, ॠषि व पितर यांना त्या त्या स्थानांपासून श्राद्धसमयीं व तर्पण करतांना उदक देतात. तळहाताच्या मध्यभागीं एक चवथें अग्नितीर्थ कल्पिलें आहे. मनुष्य धार्मिक विधींत यांतूनच आचमन करतो, ब्राह्मणाला दिलेलें दान अग्नीनें भक्षण करूं नये किंवा दानाग्नीनें ब्राह्मणाचा हात दग्ध होऊं नये म्हणून त्याच्या हातावर याच ठिकाणीं पाणी सोडतात. [सं.] (वाप्र.) ॰करणें-१ गंगादि तीर्थास जाऊन स्नानादि यात्राविधि करणें. २ तीर्थाला भेट देणें. म्ह॰ १ तीर्थी गेल्यावांचून मुंडण होत नाहीं = बर्या बोलानें कोणी ऐकत नाहीं. सोनारानें कान टोंचल्याशिवाय समज पटत नाहीं. २ वाहिली ती गंगा, राहिलें तें तीर्थ = कांहींहि केलें तरी. कोणत्याहि बाजूनें फायदाच. सामाशब्द- ॰काक-पु. (तीर्थाच्या ठिकाणीं अस- लेला कावळा). (ल.) लूट करण्याकरितां, डल्ला मारण्याकरितां सर्वदां टपून बसलेला माणूस; उचल्या; गिधाड; छकवणारा. ॰कुंडी- गं(गिं)डी-पात्री-स्त्री. तीर्थ ठेवण्याचें चंबूसारखें बारीक गळा असलेलें भांडें; तीर्थाचें भांडें. 'हें जाणोनि मानसी । तीर्थागंडी देई कांतेसी । गंगा प्रोक्षून तिघांसी । भोजन देई जाणपां ।' -दत्तपदें १४७. ॰पंक्ति, तीर्थावलि-स्त्री. १ पुण्यक्षेत्रांचा क्रम. २ त्या क्षेत्रांची यादी (पूजादि प्रसंगीं म्हणावयाची आयोध्या, मथुरा, माया इ॰). ॰पंथ-पु १ (गोसावी लोकांतील तीर्थ हें पद नांवाच्या शेवटीं धारण करणारा) एक पंथ, भेद. २ तीर्थक्षेत्राचा मार्ग, वाट. 'प्रभातकाळीं उठुनि कापडी तीर्थपंथ लक्षी ।' -होला (भूपाळी १६.) ॰पाद-पु. मोक्षदाता गुरु; गायत्रीचा उपदेश करणारा गुरु; गुरुपदेश देणारा (पिता). ॰प्रसाद-पु. १ कथा- श्रवण, देवदर्शन यांसाठीं आलेल्यास द्यावयाचें देवावरील निर्माल्य, तीर्थ, अंगारा, खिरापत इ॰ 'आमच्याकडे आज सत्यनारायण आहे, तर आपण तीर्थप्रसादास या.' २ साधुसंतांनीं भक्तगणास, शिष्यांस अनुग्रहार्थ दिलेलें फळ, तीर्थ, अंगारा इ॰ पदार्थ. ॰यात्रा-स्त्री पुण्यक्षेत्रीं जाणें; तीर्थाच्या ठिकाणीं जाणें; तीर्थाटण; क्षेत्रस्थानचा प्रवास. ॰राजपु. १ प्रयाग क्षेत्र. 'तो तीर्थराज प्रगटे जग उद्धराया ।' -सारुह ८.१४६. २ समुद्र. ३ (ल.) सद्गुरु ॰रूप-वि. १ (प्रत्यक्ष तीर्थच या अर्थीं पत्र लिहितांना आरंभीं लिहितात) पिता. २ मातापिता (उभयता); ३ माता पित्यांच्या ठिकाणीं असणार्यास लावावयाची संज्ञा, मायना. ॰वटी-लोटी, तीर्थोटी-स्त्री. तीर्थ ठेवण्याचें भांडें, वाटी. तीर्थ- पात्र [तिर्थ + वाटी] ॰वासी-सू-पु. १ तीर्थाच्या ठिकाणीं राहणारा गोसावी किंवा साधु. २ तीर्थयात्रा करीत फिरणारा गोसावी; बैरागी. ॰विधि-पु. तीर्थश्राद्ध; तीर्थाचे ठिकाणीं करावयाचे क्षौर, श्वाद्ध, तीर्थपूजन, ब्राह्मसंतर्पण इ॰ विधि, धार्मिक प्रकार. ॰श्राद्ध-न. तीर्थाच्या ठिकाणीं करावयाचें सक्षौर श्राद्ध; तीर्थ- विधि. ॰स्वरूप-वि. पत्रांत आई, बाप यांशिवाय इतर वडील नातेवाईकांस किंवा पूज्य वाटणार्या माणसांस लिहिण्यांत येणारी आदराची संज्ञा, मायना. तीर्थाटन-न. अनेक तीर्थयात्रा करीत फिरणें. तीर्थयात्रा पहा. ॰तीर्थोदकन. तीर्थ अर्थ २ ३ पहा. तीर्थोपवास-पु. यात्रेकरूनें तीर्थाच्या ठिकाणीं गेल्यावर प्रथम दिवशीं करावयाचा उपास. तीर्थोपाध्याय-पाध्या-पु. क्षेत्राच्या ठिकाणीं असणारा ठराविक उपाध्याय; धार्मिक विधि सांगणारा तीर्थक्षेत्रींचा ब्राह्मण; पंड्या.
कमाण-न
स्त्री. १ अर्ध वर्तुळ; मेहेराप (इमारतीच्या बांध- कामांतील). (इं.) आर्च. बांधकामाचें वजन सारखें वांटलें जावें म्हणून जें दरवाजे, खिडक्या वगैरेवर गोल, निमगोल इ. प्रकारचें बांधकाम करतात तें. २ धनुष्य; कमठा; मुलतानी कमान (धनुष्य) फार पसिद्ध असून तिची उपमा नेहेमीं देण्यांत येते. 'आली वीरश्री हात कमान घातला ।' -ऐपो ८८. 'मुलतानी भुवया कशा कमाणा जशा बाहार मधीं कुंकाचे टिकलीचा ।' -होला १०४. 'दुरवर कीर्ती हि गोष्ट आर्थी जशी काई कमान मुलतानी ।' -गोपा ७. ३ घड्याळ, कुलूप, उंदराचा सांपळा वगैरेमधील दाब उत्पन्न करणारी पोलादी कंसाकृति अगर वर्तुलाकृति तार किंवा पातळ पट्टीची रचना; स्प्रिंग; आडवी पट्टी. 'घड्याळांतील कमानीचा धर्म सुटण्याचा आहे. ती सारखी सुटण्याचा प्रयत्न करीत असते.' -सुष्टि २८. ४ (पिंजारीधंदा) पिंजारी लोकांचें कापूस पिंजण्याचें हत्यार (धुनुकली). यास तांत लावलेली असते. ५ (सुतारी, कांसारी) सामता फिरविण्यासाठीं हात दीड हात लांब काठीच्या टोकास सुतळी बांधून केलेलें हत्यार, धनुकली. ६ (ल.) इंद्रधनुष्य. 'विलसती गगनांत कमाना ।' -दावि ३७९. ७ (जर- तारी धंदा) तराकांतील फिरकी दाबून धरणारें साधन; कुत्रें. ८ शरीराची विशिष्ट रचना; हात व पाय जमिनीवर टेकून तोंड वर करून पोटाचा भाग उंच उचलणें. ९ बैल गाडीस (ऊन, पाऊस लांगू नये म्हणून) तट्टया घालण्यासाठीं आंतून कळक किंवा वेत याच्या कांबी बांधतात त्या प्रत्येकी. [फा. कमान् = धनुष्य] ॰काढणी- स्त्री. घोड्याचा दागिना. -स्वप ५३. ॰गार-पु. १ धनुष्य बाण तयार करणारा. २ हाड वैद्य. 'खाले माकणीवर पडोन मांडी जाया जाली, मग कमानगार आणोखा बांधली.' -रा ३.११२. [फा. कमान् + गार्] ॰दार-वि. १ मेहेराप, कमान असलेला (अंगरखा, भिंत, वगैरे). [फा. कमान् + दार्] २ ज्याच्या जवळ धनुष्यबाण आहे असा; धनुर्धारी. 'मालजेठी कमान- दार ।' -दावी ६९. ॰मारी-वि. धनुर्धारी; धनुष्य बाण धारण करणारा. चित्रगुप्त ३०.
विश्व
न. जग; सृष्टि. 'तैसें व्यासमति कवळलें । मिरवे विश्व ।' -ज्ञा १.३९. -वि. सर्व; सगळें; अचाट; अगणित. [सं.] ॰कर-विश्वंकर-पु. सृष्टिकर्ता. ॰कर्मा-पु. १ ब्रह्मदेवाचा पुत्र व देवांचा शिल्पकार, सुतार, कारागीर. २ हुषार कारागीर; शिल्पी. ॰कारण-न. (काव्य) सृष्टिनिर्माणकर्ता; ब्रह्मदेव,. ॰कुटुंब- वादी-पु. सर्व जग हें एक कुटुंब असून सर्व असून सर्व लोक त्या कुटुंबातील भागीदार आहेत असें मत असणारा. 'त्याचीं मतें नास्तिक्या- कडे झुकत होतीं व तो जहाल विश्वकुटुंबवादी बनत चालला होता हें सुशीलेला ठाऊक नव्हतें.' -सुदे २०६. ॰कुटुंबी-पु. १ सर्व- सृष्टि हें ज्याचें कुटुंब आहे तो परमेश्वर. २ (ल.) उदार आश्रय- दाता; जनकल्याणकर्ता; मोठ्या कुटुंबाचा धनी. ॰कोश-पु. सर्व विषयांचें ज्ञान देणारा मोठा ग्रंथ. ॰जनीन-जनीय-वि. सर्व- जगास योग्य, सोईस्कर, हितकर, लाभदायक, संबद्ध. ॰जित्-पु. एका यज्ञाचें नांव; जग जिंकणारा. 'ज्या विश्वजित् यज्ञांत यज- मानानें आपलें सर्वस्व दान करावें असें सांगितलें आहे...' -टि ४.५१. ॰जीवन-न. (काव्य) सृष्टीचा प्राण; परमेश्वर. ॰दुनी- स्त्री. सर्वजग; सर्वसृष्टि; सर्व मानवजाति अलमदुनीया याप्रमाणें. 'देवा विश्वदुनीच्या भाग्यानें शेत पिको.' [विश्व + फा. दुनिया] ॰धाया-पु. सृष्टीचा आधार; परमेश्वर. ॰नेत्र-पु. सृष्टीचा, जगाचा डोळा; परमेश्वर. ॰पाल-विश्वंभर-पु. जगाचें पोषण- कर्ता; जगाचें पालन करणारा; परमेश्वर. ॰प्रयत्न-अचाट प्रयत्न; शक्य ते सर्व प्रयत्न. ॰प्रामाण्य-न. सर्व जगाला प्रमाण असें; सर्व जगास योग्य वाटणारें तें. 'जे विश्वप्रामाण्याची मुदी । आणि तुझ्या हातें असे सुबुद्धी ।' -ज्ञा १६.४६८. ॰बाहु-पु. ज्यांचे हात सर्वत्र आहेत असा; परमेश्वर. -ज्ञा १३.८७४. ॰बीज-न. सर्वसृष्टीचें मूळ; आद्यकरण; परमेश्वर. ॰ब्राह्मण-पु. सुवर्णकार; देवशिल्प करणारी जात. ॰भेषज-न. सार्वत्रिक औषध; सुंठ. 'मध आणि विश्वभेषज हे दारूंत मिसळून द्यावेत' -अश्वप २.१३४. ॰मंगल-न. सर्व सृष्टीचें कल्याण, सुख, सुदैव, शुभ. -वि. सर्वजगाचें कल्याण करणारा; शुभदायक. ॰मतिचालक- पु. सर्व जगाच्या मनांत प्रेरणा करणारा; सर्वाच्या बुद्धीस चालना देणारा. ॰मूर्धा-पु. ज्याचें डोकें सर्वत्र आहे असा; परमेश्वर. -ज्ञा १३.८७८. ॰मोहिनी-स्त्री. सर्व जगास भुरळ पाडणारी, भूल- विणारी, मोहून टाकणारी. -ज्ञा १.२१. ॰रचना-स्त्री. सृष्टीची व्यवस्था; घटना. -ज्ञा २.९५. ॰रूप-वि. १ सर्व सृष्टीमधील वस्तूंची रूपें धारण करणारा; सर्व सृष्टीमधील वस्तूंच्या रूपांत असणारा; ब्रह्माचें उपपद. २ व्यापक; महत्त्वाचा. 'म्हणतां जाय पाप । प्रश्न असे विश्वरूप ।' ॰विद्या- लय-न. विद्यापीठ; अनेक विद्यांचें अध्ययन-अध्यापनादि कार्य करणारी संस्था. (इं.) युनिव्हर्सिटी. ॰व्यापक-व्यापी-वि. सर्वव्यापी; सर्वत्र भरून राहिलेलें, सर्व वस्तुमात्रांशीं संबद्ध. ॰व्याप्ति-स्त्री. सर्व सृष्टीमध्यें भरून राहणें. ॰संस्था-स्त्री. (ज्यो.) सूर्य, चंद्र, ग्रह, तारें व इतर आकाशस्थ ज्योती ज्या आकाशाच्या प्रदेशांत कार्य करितात तो प्रदेश. (इं.) युनिव्हर्स. ॰साक्षी-वि. सर्व सृष्टीस पाहणारा. ॰सृट्-पु. सृष्टिकर्ता; जग निर्माण करणारा; ब्रह्मा. विश्वस्तः-क्रिवि. सर्व ठिकाणीं; सर्वत्र. विश्वतश्चुक्षु-पु. ज्याचे सर्वत्र डोळे आहेत असा, ज्याला सर्व दिसतें असा; परमेश्वर. -ज्ञा १३.८७. विश्वतोभय-पु. सर्व बाजूंनी भय उत्पन्न करणारा; परमेश्वर. -एभा २.१०१. विश्वतो- मुख-पु. सर्व बाजूंनीं ज्यास मुखें आहेत असा; परमेश्वर. -ज्ञा ११.२३३. विश्वतोमुखीं- क्रिवि. सर्वांचें तोंडीं; सर्वतोमुखीं; ज्याच्या त्याच्या तोंडीं; सर्वांच्या बोलण्यांत. विश्वाचा जिव्हाळा-पु. १ सृष्टीचाप्राण, जीव. २ (संकेतानें) शिव. विश्वात्मक-वि. सृष्टिस्वरूपी. -ज्ञा १५.५९५. विश्वात्मा-पु. सृष्टीचा प्राण; जगदात्मा; सर्वव्यापी तत्त्व; ब्रह्म. विश्वांप्रि-पु. ज्याचे सर्वत्र पाय आहेत असा. -ज्ञा १३.८७४. विश्वानुसार- वि. सृष्टीतींल पदार्थांप्रमाणें. -ज्ञा १६.१७३. विश्वाभिराम- वि. जगाचा आवडता; जगत्प्रिय; परमेश्वर. विश्वाभिमान-पु. देह हा मी व सर्व सृष्टि माझा भोग्य विषय होय असा अभिमान. विश्वेश-पु. सृष्टिचा स्वामी, मालक; परमेश्वर. -ज्ञा १५.४०. विश्वाशराव-पु. सर्व सृष्टिचा प्रभु; मालक; परमेश्वर. -ज्ञा १८. १८०१. विश्वेश्वर-पु. १ सर्व सृष्टीचा प्रभु; परमेश्वर. २ काशीक्षेत्रांतील मुख्य देवता. विश्वोदयपंथ-पु. माया. विश्वो- द्धार-पु. सर्व सृष्टीचें रक्षण, तारण, उद्धरण. २ सृष्टितारक, रक्षक परमेश्वर.
रड
स्त्री. १ एकसारखें न थांबता रडणें किंवा अशा रड- ण्याची क्रिया. (क्रि॰ घेणें, लावणें, लागणें, चालणें, खळणें, राहणें, आटोपणें). 'या मुलाला सकाळपासून रड लागली आहे.' २ तक्रार; पिरपिर. (क्रि॰ लावणें; चालविणें). [रडणें] सामाशब्द- ॰कथा-कहाणी-स्त्री. लांबलचक करुणास्पद कहाणी; दुःखाची गोष्ट; विपत्तीची कंटाळवाणी हकीकत; (क्रि॰ सांगणें; गाणें). ॰गाणें-न. करुणास्पद कहाणी, गोष्ट, तक्रार इ॰; रडकथा; दुःखाची गोष्ट. ॰गात्या-वि. सदा आपल्या दुःखाच्या रडकथा, गाऱ्हाणीं सांगणारा. [रडणें आणि गाणें] ॰गाऱ्हाणें-न. रड- कथा; रडगाणें; शोकमय कथा. (क्रि॰ सांगणें; गाणें) ॰गेला- वि. रडकथा, रडगाणें सांगण्याची प्रवृत्ति असलेला. [रडका] ॰तोंड्या-वि. ज्याचा सर्वकाल रडण्याचा स्वभाव आहे असा; मेषपात्र; दुर्मुखलेला; नेहमीं रडगाणें कुरकुर करणारा, सांगणारा, [रडणें + तोंड] ॰पंचक-न. नेहमींचें रडगाणें अगर रडकथा, (प्रपंचांतील ओढाताण व दुःख यामुळें) (क्रि॰ गाणें, सांगणें, वाचणें, लावणें, मांडणें). रडारड-स्त्री. कोणी गेला, मेला इ॰ कारणानें मोठें दुःख झालें असतां कोणेकांनीं रडूं लागावें असा जो व्यापार चालतो ती; (सामा.) रडणें; शोक करणें; अनेकांनीं एकदम रडणें. [रडणें] रडारोई, रडारोवी-स्त्री. मोठा शोक व रडणें; छाती, ऊर बडवून रडणें; मोठा आक्रोश; आरडा ओरड. 'काय होईल माझें मांडिलें कवतुक । आदराची भूक रडारोवी ।' -तुगा १५८२. [म. रडणें; हिं. रोना = रडणें] रडुरडु, रडूरडू-नस्त्री. रडण्याची पिरपीर. -क्रिवि. नेहमीं रडत रडत; मुळमुळीत संम तीनें; दीनवाणीपणानें. (क्रि॰ करणें, लावणें, मांडणें). रडू, रडें-न. १ रडण्याची क्रिया. २ रडण्याचा आवेश. (क्रि॰ कोस ळणें). ३ शोक, भय, दुःख, प्रेम, हर्ष इ॰ कारणांनीं अंतःकरण शिथिल होऊन डोळयांत अश्रू येणें, तोंड पसरणें कंठध्वनि निघणें इ॰ विकारविशेष उत्पन्न होणें; रडणें; रुदन. (क्रि॰ येणें). 'देखे मडें येई रडें.' [रडणें] रडया-वि. १ सर्वकाल रडण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा; सर्वदा रडणारा; उत्साहहीन; मंदगतीनें चालणारा; रडतराऊत; रडतोंड्या; दुर्मुखलेला. २ (ल.) चालण्यास, कामास मंद असा (बैल इ॰). ३ हरसबबी (इसम). [रडणें] रडका-वि. १ सदा रडत असणारें (मूल); रडण्याची अगर चिरचिरण्याची संवय असलेला; नेहमीं तक्रार करणारा; गाऱ्हाणें सांगणारा. २ दुःखी; कष्टी; मंद; निराश; निरुत्साही (चेहेऱ्याचा अगर बोलणारा). ३ ज्याचे हातून कोणतेंच काम चांगलें होत नाहीं, तडीस जात नाहीं असा. ४ रडतांना होतो तसा (आवाज, चर्या). ५ ज्याचा चेहेरा, भाषण, काम इ॰ टवटवीत, उत्साहयुक्त किंवा प्रसन्न नाहीं असा. ६ कंटाळवाणें (भाषण इ॰). [रडणें] रडकी गोष्ट-स्त्री. शोकमय किंवा शोकजनक गोष्ट; वाईट गोष्ट. रडकी सूरत-वि. सदा दुर्मुखलेला (इसम); सदा रड्या; नेहमीं रडकी मुद्रा असणारा; रडकी मुद्रा धारण करणारा; रड्या; दुःखी चेहेरा, मुद्रा असलेला. [रडका + अर. सूरत] रडकुंडा- डी-वि. रडावयाच्या बेतास आलेला; डोळे पाण्यानें भरून आले आहेत असा; निस्तेज. [रडणें आणि तोंड] रडकुंडीस येणें- कांहीं कामांत अति त्रासल्यामुळें किंवा दुःख सोसवेनासें झाल्यामुळें आतां रडूं लागावें अशा स्थितीस पोहोंचणें; रडण्याच्या बेतांत येणें; अति दगदगीमुळें रडण्याच्या स्थितीस येणें; रडें कोसळण्या- इतका त्रास होणें. याच अर्थानें जीव रडकुंडीस येणें-रडीस येणें असेंहि म्हणतात. 'ती आजोबाजवळ गेली आणि अगदीं रडकुंडीस येऊन म्हणते कीं, लोक आतां तोंड नाहीं काढूं देत बरं कां ?' -पकोघे. रडकूळ-स्त्री. (गो.) रडकुंडी. रडणें-अक्रि. १ रुदन करणें; अश्रू गाळणें. २ विषाद वाटणें; शोक करणें. ३ (ल.) अपयश येणें; ठेचाळणें; आपटणें; नष्ट होणें; बंद पडणें; अनादरानें बाजूला ढकलला जाणें. 'चार दिवस पाटीलबोवांचा आश्रय होता तोहि रडला, आतां गोंदोबाला भीकच मागितली पाहिजे.' 'बक्षिशी रडो पण पगार तर द्याल कीं नाहीं ?' ४ नुकसान होणें. 'तूं नोकरी सोडलीस तर त्यांत माझें काय रडतें ?' ५ (वैतागानें, निंदेनें) असणें; होणें. 'दोन वर्षें मामलत रडत होती तेव्हां आमच्या मुलानें आम्हाला काय दिले तें तुम्ही पाहि- लेंतच, आतां मामलत गेली, आतां काय देणार फतऱ्या ?' ६ एखादी गोष्ट घडणें, करणें, सुरू करणें या अर्थी तुच्छेतेनें योज- तात. 'मी सावकारी करीन म्हटलें ती रडली. आतां दुसरें कांहीं रडावें.' ७ निंदणें; निर्भर्तिसणें. 'भी त्याला नाहीं दोष देत, मी आपल्या दैवाला रडतों.' -सक्रि. (निंदेनें) चालविणें; करणें. 'दोन वर्षे तूं दुकान रडलास तेवढें बस्स झालें.' [सं. रट्; प्रा. रड] म्ह॰ १ रोज मरे त्याला कोण रडे. २ (व.) रडली तर रडली काय माणिक मोती झडतील ? (ही म्हण रड- णाप्या मुलीला अनुसरून आहे. म्हणजे रडण्याचा एवढा धाक कशाला-या अर्थीं). रडतखडत, रडतरडत, रडत पडत, रडत कसत-क्रिवि. मोठ्या कष्टानें; इच्छेविरुद्ध कसेंबसें; रेंगाळत; आळसल्यासारखें; नाइलाजानें; बिगारीनें; मंदपणानें. रडतगोत्र-न. रड्या वंश; रडी मंडळी अथवा जथावळ; सदो- दित कुरकुरणारी अथवा रडतराऊ व्यक्ति; नेभळट, नेभळा, बिनकर्तबगारीचा, उत्साहरहित मनुष्य. 'त्याचें रडतगोत्र आहे' (म्हणजे तो रडतराऊत आहे). रडत घोडें रडत राऊत, रडत राव-नपु. लोकांच्या सक्तीनें किंवा स्वतःची इच्छा नसतांना कांहीं काम करणारा; रडवा मनुष्य; उत्साह किंवा धमक नसलेला, नेहमीं वाईट अगर संकटाची सबब सांगणारा इसम. रडता राऊत घोडयावर बसविणें-एखाद्या कामास आंबटतोंड्या अगर निरुत्साही मनुष्यास पाठविणें अगर त्यास काम सांगणें; काम करण्याचें मनांत नसणाऱ्यास बळजबरीनें कामास लावणें. 'रडत- राऊत घोड्यावर बसविला तर मेल्याची खबर आणितो.' रडत लक्षुमी-लक्ष्मी-स्त्री. रडतपार्वती; क्षणोक्षणीं कांहीं थोडेसें निमित्त होतांच रडूं लागणारी स्त्री; उत्साहरहित स्त्री. रडता- वि. रडणारा; रडका; रड्या; रडतोंड्या. 'हासती बायको आणि रडता पुरुष कामाची नाहींत.' [रडणें] रडतोंड-न. दुर्मुखलेला चेहरा अगर सुरत. रडवा-वि. रडका; दुःखी; खिन्न; कष्टी; नेहमीं रडण्याची संवय असलेला; सदा तक्रारी कर णारा; कुरकुऱ्या किंवा तशा स्वभावाचा; निराश; दुर्मुखलेला. [रडणें] रडविणें-सक्रि. १ रडावयास लावणें, भाग पाडणें; दुःख देऊन रडीस आणणें. २ दुःखकारक प्रसंगाच्या वर्णनानें किंवा देखाव्यानें कोणेकाला डोळयांतून अश्रु गाळावयास लावणें. ३ (ल.) नाश करणें; वाढ खुंटविणें; उर्जितावस्थेस येऊं न देणें. ४ त्रास देणें; चिडविणें; एखाद्याला रडावयास येईल इतकें छळणें, गांजणें, उपद्रव देणें. 'मला ह्या कामानें पांच वर्षे रडविलें.' ५ आनंदाचा प्रसंग, पाऊस, वारा, रोग, थंडी, ऊन्ह इ॰नीं शेत, रचनाविशेष इ॰च्या रंगाचा भंग करणें.
नर
पु. १ मनुष्य. २ (माणूस, जनावर, पक्षी इ॰ तील) पुरुष; पुरुषजात; सर्वजातीय पुरुष व्यक्तिमात्र. ३ (तुंबजोड इ॰) जोडीच्या पदार्थांतील मोठा पदार्थ. ४ अर्जुन. 'वत्सांच्या बहु शोकीं कृष्णा बुडतां तिला म्हणे नर तो ।' -मोमंभा १.१६. ५ पुराणपुरुष; आदिपुरुष; परमपुरुष. ६ घोडा. 'कोतल नर कोत- वाल वारण मगनमस्त किल करित ।' -ऐपो २००. ७ (ल.) मळ- सूत्री खिळा; दाराच्या झडपानां असलेल्या लोखंडी पट्टींत-मादींत बसणारा चवकटीचा खिळा. ८ (ल.) उंसाच्या चरकांतील तीन लाटांपैकीं मधली किंवा दोन लाटांतील उजवी लाट; नवरा. ९ बुद्धिबळांतील सोंगटी. १० (मुद्रण) (ल.) टंककृतींत पोलादी खिळ्यावर घासून तयार केलेला ठसा; इं. पंच्; याच्या उलट मादी = मेट्रिस. ११ मोती डोळ्यासमोर धरल्यास आंतील बाजूस चिरल्यासारखीं दिसणारी रेघ; करवा पहा. १२ अंकुर; कोंब. -शे ३.६. १३ (कु.) वाशांतील, वाळलेल्या कळकांतील उभा घट्ट तंतु. १४ नखाच्या मुळावरचें उचकटलेलें कातडें. १५ (ज्यो.) उन्नतांश ज्या. [सं. नर = पुरुष, मनुष्य; फा. नर्] (वाप्र.) ॰मोडून नारायण घडणें-(एखादी वस्तु इ॰) घडणें व मोडणें व पुन्हां घडणें; त्याच त्याच गोष्टीची घडामोड करणें. नराचा आंख-पु. (बिडाचा कारखाना) उंसाच्या चरकाच्या मधली वृत्तचिती किंवा नर बसविण्यासाठीं त्याच्या मधोमध असलेल्या भोंकांत बसविण्याचा आंख. नराचें चाक-न. (बिडाचा कार- खाना) चरकांतील वरची पाटली आणि मधली वृत्तचिती यांच्या दरम्यान बसविण्याचें दंतुर चाक. नरो वा कुंजरो वा-(अश्व- त्थामा या नांवाचा मनुष्य कीं हत्ती युद्धांत मारला गेला हें मला माहित नाहीं अशा प्रकारचें गुळमुळीत उत्तर धर्मराजानें द्रोणा- चार्यास देऊन त्यास चकविलें त्यावरून) एखाद्या गोष्टीविषयीं पूर्ण अज्ञान, औदासिन्य इ॰ दर्शविण्याकरितां दिलेलें संदिग्ध उत्तर; कानावर हात ठेवणें; माहीत नाही असें दाखविणें. म्ह॰ १ नरा हराहुन्नरा = मनुष्याला हजारों धंदे व क्लृ/?/प्त्या करतां येण्या- सारख्या आहेत. २ (हिंदी) नर करे तो नरका नारायण होजाय = मनुष्यानें मनावर घेतलें तर तो वाटेल तें कार्य करूं शकेल, किंब- हुना तो ईश्वरहि बनूं शकेल. सामाशब्द- ॰कपाल-न. (मृत) माणसाच्या डोक्याची अस्थिमात्रावशिष्ट कवटी. [सं. नर + सं. कपाल = कवटी] ॰कुंजर-पु. १ गणपति; गजानन; गजवदन. 'ते कंबल आणि अश्वतर । त्याहीं हृदयीं चिंतिला नरकुंजर ।' -कथा ५.६. १२४. २ नरश्रेष्ठ; मनुष्यांत श्रेष्ठ; नरवर. [सं. नर + कुंजर = हत्ती] ॰केसरी-पु. १ नरसिंह. २ सिंहाप्रमाणें शूर मनुष्य; नरश्रेष्ठ. [सं. नर + केसरिन् = सिंह] ॰जन्म-पु. मनुष्य- योनि; मनुष्याचा जन्म. 'नरजन्मामधिं नरा करुनि घे नरनारा- यण गडी ।' -राला ८७. [नर + जन्म] ॰तनु-स्त्री. मनुष्यदेह. 'दैवें नरतनु सांपडली मूढा कशि तुज भुल पडली' -शिवदिन केसरी (नवनीत पृ. ४४६) [नर + सं. तनु = देह] ॰तबेला-पु. (व.) फक्त, पुष्कळ पुरुषच राहतात अशी जागा; पुरुषांचें वठार. [नर + फा. हिं. तबेला] ॰तुरंगम-पु. (ज्यो.) एक नक्षत्र- पुंज. 'सप्तर्षि, ध्रुवमत्स्य, ययाति, नरतुरंगम वगैरे राशींची ओळख मुलांना करून देतां येईल.' -अध्यापन २००. [नर + सं. तुरंगम = घोडा] ॰त्व-न. पौरुषत्व. 'नराच्या ठायीं नरत्व । अहंभाविये सत्व ।' -ज्ञा ७.३५. ॰देव-पति-पु. मनुष्यरूपांतील देव; राजा; नृपति. 'कां तया नरदेव म्हणो नये ।' -दावि ३०५. [नर + सं. देव, पति] ॰देह-पु. नरजन्म; मनुष्याचें रूप. नरतनु पहा. 'नरदेह वायां जाय । सेवीं सद्गुरूचे पाय ।' -तुगा ४४९७. [नर + देह] ॰नारायण-पुअव. विष्णूच्या अंशापासून उत्पन्न झालेले दोन प्राचीन ऋषी. यांचेच अवतार पुढें अर्जुन व श्रीकृष्ण हे झाले अशी पुराणांतरीं कथा आहे. -शर. अर्जुन व श्रीकृष्ण. 'नरनारायण सेनानी, ज्या जगतीं जोड दिसेना ।' -विक ७४. [नर = अर्जुन + नारायण = श्रीकृष्ण] ॰पट्टी, पाटी-स्त्री. आटे पाडावयाची वस्तु घट्ट धरणारें यंत्र. यांत दोन बाजूस हात व मध्यें चपटा भाग असतो. चपट्या भागांत निर- निराळ्या आकारमानांचीं भोंकें असतात. [नर( = नर अर्थ ७ पहा) + पट्टी, पाटी] ॰पति-पु. १ राजा. २ पायदळांतील सैनिकांचा मुख्य. -हंको. [नर + पति] ॰पशु-पु. (निंदार्थीं) पशुप्रमाणें वर्तन करणारा; मुर्ख व अधर्मी मनुष्य; दांडगा व निर्दय मनुष्य; नराधम. [नर + पशु] ॰पातें-न. नखें काढण्याचें यंत्र; नराणी. ॰बलि-पु. १ यज्ञांत बलि द्यावयाचा मनुष्य. २ ज्यांत मनुष्यास बळी देतात तो यज्ञ; नरमेध. [नर + सं. वलि = आहुति] ॰भू-स्त्री. प्राचीन काळीं हिंदूंना माहित असलेल्या जगाचा मध्यभाग; मध्य- वर्ती देश; भरतखंड. [नर + सं. भू = जमीन, पृथ्वी] ॰मादी- स्त्री. १ जोडीच्या दोन पदार्थांतील (युग्मांतील) पुरुष व स्त्री. उदा॰ पायांत घालावयाचे जोडे, बूट, अंगारख्याच्या बाह्या, उंसाच्या चरकांतील लाटा इ॰ यांपैकीं नर मोठा असतो व मादी नरापेक्षां किंचित् लहान असते; दोन वस्तू मिळून होणार्या पदार्थोपैकीं नर हा भारी असून मादींत शिरणारा असतो. उदा॰ बिजागरीचा खिळा, कुरडईच्या सोर्यांतील दट्ट्या इ॰. २ जोडीच्या दोन पदार्थांतील स्त्रीपुरुषसंबंध; लहानमोठेपणा. ३ (व्यापक) (दोन पदार्थ, व्यक्ति इ॰ कांतील) श्रेष्ठकनिष्ठभाव; तरतमभाव; बरेवाईटपणा; उजवा-डावा प्रकार. 'मोत्यांत नरमादी असतच आहे.' ४ उंसाच्या चरकांतील लाटा. ५ बिजागरी. ६ एक प्रकारचें कुलूप. [नर + मादी; फा. नर्मादा] ॰मेध- पु. मनुष्ययज्ञ; ज्यांत नरबली देतात तो यज्ञ. 'युद्धांत पराभव होऊं नये म्हणून प्राचीन ग्रीक, गॉल, सेमाईट व हिंदु लोक नर- मेध करीत असत.' -ज्ञाको न. २६. [नर + सं. मेध-यज्ञ] ॰यान- न. मनुष्यांनीं वाहून नेण्याचें वाहन, बसून जाण्याचें साधन. उदा॰ पालखी, मेणा, डोली, रिक्षा इ॰. 'अश्वगजादि आरोहण । शेष- शयन गरुडासन । महामहोत्सव नरयान । रथोत्सव जाण करावा ।' -एभा २९.२६०. [नर + सं. यान = वहन, वाहन] ॰योनि-स्त्री. नरजन्म; मनुष्ययोनि. [नर + सं. योनि = जन्म] ॰लवंग-स्त्री. लवंगांची एक जात. -मुंव्या १५०. ॰वर-वि. नरश्रेष्ठ; थोर; उदार (मनुष्य). 'नरवर कृष्णासमान ।' -स्वयंवर नाटक. [नर + सं. वर = श्रेष्ठ] ॰वाहन-न. नरयान पहा. [नर + सं. वाहन] ॰सिंह, नरशा, नरशिं(सि)य-पु. १ विष्णूचा चवथा अवतार. 'भाऊनि नरसिंया केला नवस । तो प्रगटोनि स्वप्रीं वदे मातेस ।' -दावि १९. २ (ल.) सिंहासारखा उग्र व पराक्रमी पुरुष; पुरुष श्रेष्ठ. [नर + सं. सिंह] ॰सिंहजयंती-पु. नृसिंहावताराचा दिवस; वैशाख शुद्ध चतुर्दशी. [नरसिंह + जयंती = जन्मदिवस] ॰सिंहाव- तार-पु. दैत्यांचा राजा हिरण्यकशिपु याचा वध करण्यासाठीं श्रीविष्णूनें धारण केलेलें सिंहाकृति मनुष्याचें रूप, अवतार. [नर- सिंह + अवतार = प्रकट होणें, रूप घेणें] ॰सिंहावतार घेणें- (ल.) अतिशय रागावणें; कोपाविष्ट होऊन उग्र स्वरूप धारण करणें. ॰हर-हरदेव-पु. नरसिंह अर्थ १ पहा. [नर + हरि, हर, हरदेव] ॰हरदेवाची पालखी-स्त्री. नरसिंहाची पालखी. हिला उचलण्याचें पुण्य स्वतःला लाभावें म्हणून हिच्या दांडयास खांदा लावण्यास भक्तमंडळी फार उत्सुक असते. तेव्हां साहजिक गोंधळ, अव्यवस्था होते. २ (त्यावरून ल.) जें काम करावयाला बर्याच लोकांची मदत अवश्य आहे व ज्याची जबाबदारी कोणा एका विशिष्ट व्यक्तिवर नसते व जें काम चांगल्या रीतीनें झाल्याची किंवा न झाल्याची कोणी पर्वा करीत नाहीं असें-अर्थांत वेळीं अवेळीं, केव्हां तरी कसें तरी व्हावयाचें-काम; अव्यवस्थित रीतीनें केवळ लोकांच्या मर्जीनुरूप घडून येणारें काम, गोष्ट; बारभाई कारभार. ॰हरी-पु. नरसिंह. [नर + सं. हरि-सिंह] नराधिप, नरेंद्र, नरेश, नरेश्वर-पु. राजा; नृपति. - १५.४५. 'तो बोलता झाला शुकयोगींद्र । परिसता नरेंद्र परीक्षिती ।' -एभा १.१८३. [नर + सं. अधिप, इंद्र ईश, ईश्वर = श्रेष्ठ, पालन- कर्ता, रक्षणकर्ता] नरेंद्रमंडळ-न. माँटफर्ड सुधारणान्वयें दिल्लीस स्थापन केलेलें हिंदी संस्थानिकांचें मंडळ; राजांची सभा. (इं.) चेंबर ऑफ् प्रिन्सेस्. [नरेंद्र । मंडळ = सभा, समिति] नरोत्तम- पु. १ नारायण; पुरुषोत्तम. २ -वि. नरश्रेष्ठ; मनुष्यांत उत्तम असलेला. [नर + उत्तम] नरोबा-पु. नरसिंह; नरहरि. 'नरोबाची कृपादृष्टी । जाल्या कोण्ही नाहीं कष्टी ।' -मध्व ३०६.
ध्यान
न. १ मनन; चिंतन. २ (विशेषतः) अष्टांग योगां- तील वृत्तिनिग्रहरूप अंग, प्रकार; मनाची एकाग्रता. ३ विषयाचें आकलन करण्याची शक्ति; लक्ष्य. 'हि गोष्ट ध्यानांत येत नाहीं.' ४ ईश्वराची मूर्ति किंवा चित्र इ॰ कांत आयुधभेद, वीरासनादि स्थितिभेद, उग्रता, सौम्यपणा इ॰ विशिष्ट गुणयुक्त दाखविलेलें स्वरूप, मुद्रा. 'हें ध्यान उग्र आहे, तें ध्यान सौम्य आहे.' 'सुंदर तें ध्यान उभें विटेवरी । कर कटावरी ठेवूनिया ।' -तुगा १. ५ परमेश्वराचें, एखाद्या देवेतेचें स्वरूपवर्णन करणारी कविता, पद इ॰ ६ (व्यापक) विशिष्ट रूप; ढब; मोडणी; डौल; चिन्ह; तर्हा; पद्धत. 'दोघे जण सावकारी करितात परंतु तें ध्यान निराळें हें ध्यान निराळें.' 'आमच्या गाण्याचें ध्यानच कांहीं निराळें.' ७ (उप.) गबाल व भोळसट मनुष्यः द्वाड व घाणेरडा मुलगा. 'श्रीमंताच्यापुढें हें ध्यान कां उभें राहणार?' -अस्तभा १९१. ८ लक्ष्य; सावधगिरी; अवधान. 'हे गडी खेळतील, विरं- गुळतील तिकडे ध्यान असूं द्या.' ९ स्मरण; आठवण स्मृति. 'हि गोष्ट मी ध्यानांत ठेविली.' १० शरीरावयवांची विषयग्रहणाविषयीं जागृति; भान जाग्यावर असणें; शुद्धि. 'मी निजून उठलों आहें अजून पुरता ध्यानावर आलों नाहीं.' ११ आवड; पसंति. 'म्यां जें केलें तें त्याच्या ध्यानास येत नाहीं.' [सं.] ध्यानांत घेणें, येणें-(एखादी गोष्ट) विचारांत, लक्ष्यांत घेणें. ध्यानांत येणें-(एखादी गोष्ट) पसंत पडणें; आवडणें; बरी अशी वाटणें. 'हें ऐकून मसलत सर्वांचे ध्यानांत आली.' -भाब ५ ध्यानास लागणें-(एखाद्या गोष्टीचा) ध्यास लागणें; (एखादी गोष्ट) डोक्यांत घोळविणें ध्यानींमनीं-क्रिवि. (ध्यानांत-मनांत) १ अंतःकर- णाच्या अनेक अवस्थाभेदांच्या ज्या वृत्ती त्यांपैकीं एका वृत्तींत (अकरणरूपीं प्रयोग). 'आज पाऊस पडेल हें माझ्या ध्यानींमनीं नढ तें म्हणून मी छत्रीवांचून बाहेर पडलों.' २ अवस्थाभेदांनीं होणार्या ज्या अंतःकरणाच्या अनेक वृत्ती त्या सर्वाना व्यापून. याच्या ध्यानींमनीं सर्वदा खेळ, म्हणून स्वप्नांत चावळला तरी बारा, तिरपगडें इ॰ बोलतो.' [ध्यान + मन] सामाशब्द- ॰धारणा- स्त्री. १ (एखाद्या वस्तूचें, मनुष्याचें) बाह्य स्वरूप, चर्या, मुद्रा. २ एकाग्रतेनें केलेलें चिंतन, मनन. (क्रि॰ धरणें; करणें). [ध्यान + धारणा] ॰निष्ठ-वि. ईश्वर स्वरूपाचें ध्यान करण्यांत तत्पर, गढ लेला; एकनिष्ठ, [ध्यान + सं. निष्ठा = निश्चययुक्त श्रद्धा] ॰मुद्रा- स्त्री. १ देवतेचें ध्यान करतेवेळीं धारण करावयाची मुद्रा, शरी- राची ठेवावयाची विशिष्ट स्थिति, बैठक, आसन. २ ध्यान करतें- वेळीं होणारी भ्रुकुटी वाकड्या होणें इ॰ प्रकारयुक्त मुद्रा; चर्या. [ध्यान + सं. मुद्रा = चर्या़] ॰योग-पु. ईश्वरप्राप्तीचें ध्यानरूप, साधन; अमूर्तचिंतन. [ध्यान + योग] ॰ध्यानस्थ-वि. १ ईश्वराचें ध्यान करण्यांत निमग्न झालेला, गढून गेलेला. 'देव आणि भक्त । तन्मय अति ध्यानस्थ ।' २ (अशिष्ट ध्यानस्त) विचार करण्यांत गुंग झालेला; विचारमग्न. 'तुम्हीं गोष्ट सांगितली तेव्हां मी घ्यानस्त होतों म्हणून ऐकिली नाहीं.' [ध्यान + सं. स्था = उभें राहणें]
फल
न. १ फळ (वृक्षादिकांचें). (याचे लक्षणेनें पुष्कळ अर्थ निघतात). २ (ल.) संतान; संतति; प्रजा ३ फायदा; लाभ. ४ प्राप्ति; उत्पत्ति; निष्पत्ति; कोणताहि व्यापार, क्रिया यापासून निष्पन्न होणारी गोष्ट. ५ परिणाम; शेवट; अखेर. 'तसेंच त्या लेखाचें अगर ग्रंथाचें कांहीं फल.' -गीर २२. ६ (गणित) त्रैराशिकांतील दुसरें व चवथें पद; दिलेलें प्रमाण, दर व उत्तर; प्रमा- णांक व उत्तरांक. ७ भाला, बाण इ॰ शस्त्राचें टोंक, अग्र; हत्याराचें पातें. ८ नांगराचा फाळ. ९ वर्तुळाचें क्षेत्रफळ. [सं.] सामा- शब्द-॰ग्रंथपु. शकुन, मुहूर्त, लक्षणें इ॰ कांचीं शुभाशुभ फलें सांगणारा फलज्योतिषाचा भाग, असा ज्योतिषग्रंथ. ॰ज्योतिष- न. ग्रहांच्या व नक्षत्रांच्या विशिष्ट स्थितीमुळें मनुष्यावर होणारें परिणाम सिद्धांतरूपानें सांगणारें शास्त्र; ज्योतिष (ज्योतिष हा शब्द खगोलविद्या आणि खगोलांपासून मिळणार्या फलांचें ज्ञान या दोहोंसहि लावितात तेव्हां फलज्योतिष ही संज्ञा इंग्रजी अ/?/स्ट्रा- लॉजीला प्रतिशब्द म्हणून नवीन बनविण्यांत आली). ॰त्यागी-वि. आपल्या श्रमाचें फळ (तें मिळण्याच्या वेळींच) मुद्दाम सोडणारा; फलाची इच्छा न करणारा. ॰द-द्रूप-प्रद-वि. १ फल देणारें; फायद्याचें( काम, प्रयत्न, युक्ति, उपाय). 'निगमागमद्रुमफळ । फलप्रद ।' -ज्ञा १८.२. २ फायदेशीर, परिणामकारक झालेला; सफळ; गुणावह. 'सफल फलद कर्म त्याज संन्यास साचा । म्हणुनि उमज होतो कथेच्या रसाचा ।' ॰प्रदान-न. विवाहांतील एक समा- रंभ वाङ्निश्चयाच्या वेळीं नवरीच्या ओटींत नवर्याच्या बापानें नारळ वगैरे घालणें. ॰न्यास-पु. आपण केलेल्या कृत्याबद्दल किंवा विशिष्ट सत्कृत्याबद्दल मिळणार्या बक्षिसाची आशा सोडणें; त्यावर हक्क न सांगणें; फलत्याग; निष्कामकर्म. ॰भोग्य-वि. फलांच्याद्वारां, निष्पत्तीवरून, उपभोग घेतां येणारें (फळझाड, पैसा, वतनवाडी); ह्याच्या ऊलट स्वतःभोग्य. ॰मान-न. फलनिष्पत्ति. ॰वांछा- च्छा-स्त्री. फळाची, परिणामाची इच्छा; मोबदल्याची आशा. याच्या उलट फलन्यास. 'त्यजुनिहि फलवांछा काम्यकर्में करीती । प्रिय हरिस नव्हे ते सर्व ह्या लोकरीती ।' -वामन, कात्यायनी व्रत ७०. ॰वान्-वि. फलप्रद फलद्रूप. ॰शर्करा-स्त्री. फळांपासून काडलेली साखर; (इं.) फ्रुक्टोज. ॰श्रुति-स्त्री. १ व्रत, स्त्रोत, इ॰ पुण्यकारक कृत्यापासून मिळणारें फळ सांगणारें शास्त्र, ग्रंथविभाग. २ फल; फायदा; निष्पत्ति. 'गोष्ट झाली खरी पण आतां रागें भरून फलश्रुति काय?' [फल + श्रुति = शास्त्र] ॰क्षम-क्षेम-वि. १ फलें धारण करण्यास योग्य; फलद. (शब्दशः व ल॰). २ फलदायक; लाभप्रद; कल्याणप्रद. [सं.फलक्षम] फलाकांक्षा-स्त्री. फलेच्छा, आशा; फलवांच्छा. [सं. फल + आकांक्षा]-कांक्षो-वि. फलाची, मोबदल्याची इच्छा करणारा. फलाफल-न. फायदा-तोटा; नफा- नुकसान. [फल + अफल] फलाशा-स्त्री. फल मिळण्याची इच्छा, आशा (सुपरिणाम, बक्षीस इ॰ची). फलाहार-पु. थोडा उपाहार करणें; फराळ; फळफळावळ, पोहे, इ॰ पदार्थ खाणें; असल्या पदार्थांचें भोजन. [सं. फल + आहार] फलित-न. गर्भित अर्थ; ध्वनि. -वि. १ फळ आलेला (वृक्षलता इ॰). २ (ल.) फायदेशीर, फलद्रूप झालेला. ३ ध्वनित; गर्भित; अध्याहृत (गूढ अर्थ इ॰). [सं.] ॰प्रेरणा-स्त्री. दोन किंवा अधिक प्रेरणांच्या इतकेंच कार्य करणारी प्रेरणा; फलोन्मुख प्रेरणा; परिणत प्रेरणा. (इं.) रिझल्टंट. -यंस्थि ६. फलितार्थंपु. १ गर्भितार्थ; ध्वनितार्थ. 'म्हणोनि ते बुद्धि रचूं । मतवाद हे खांचू । सोलींव निर्वचूं ।फलितार्थुचि ।' -ज्ञा १३.१०४९. २ फलश्रुति; अर्थ २ पहा. [फलित + अर्थ] फलोत्पत्ति-स्त्री. फायदा; नफा; किफायत. [फल + उत्पत्ति] फलोदय-पु. फळ येणें, दिसूं लागणें. [सं. फल + उदय]
नाम
न. १ नांव; वस्तुमात्राचें नांव. २ (व्या.) पदार्थाचें नांव. सामान्य, विशेष, व भाववाचक असे नामाचे तीन प्रकार आहेत. -पु. १ उभें गंध; तें लावण्याचा ठसा; रेघ. (सामा.) गंध; कपाळावर लावण्याचें चिन्ह. २ (ल.) घोडा; कुत्रा इ॰कांच्या कपाळा- वर उभा पांढरा पट्टा असतो तो. [सं. नाम; फा.नाम्] ॰करण- न. मुलाचें नांव ठेवण्याचा विधि, संस्कार. हा १६ संस्कारापैकीं एक आहे.॰गावडावि. (कु.) अशिक्षितांचा पुढारी. ॰घोष-पु. १ (पूजा इ॰च्या वेळीं) देवाच्या नावांचा केलेला मोठा गजर; नावांचा घोष. 'मग नामघोषें पिटोनि टाळी ।' २ देवाचें नांव घेणें; भजन. ॰जा-स्त्री. मान; महत्त्व; कीर्ति. 'वडीलवडिलापासून स्वामीकार्य प्रसंगें धन्यास संतोषी करून आपली नाम-जा संपादीत आलेस. -रा ८.१३९. [फा. नाम् = नांव + जाह् = हुद्दा] ॰जात-द-स्त्री. १ नियुक्त, नियोजित अधिकारी. २ नेमणूक; जहागीर. 'कांहीं नामजादा चार पांच लक्ष रुपये मिळतील ऐसें आहे.' -पया ९४. ३ स्वारी. 'त्यांनीं शिर्क्यावरी नामजात रवाना केली.' -रा १५.६. ४ एक पदवी. 'रामाजी माहादेव नामजाद प्रांत साष्टी यास.' -वाडबाबा ३.१९. -वि. १ लौकिक- वान; प्रख्यात. 'हुजूर हशम तालुके मजकुरीं नामजाद आहेत.' -वाडसमा ४.१४३. २ नेमलेला; नियुक्त केलेला. 'ते लोक किल्ल्यावर ठेवावयाचे उपयोगी नसल्यास त्यांस दुसरे जागां नाम- जाद पाठविणें.' -वाडसमा १.२७८. [फा. नाम्झाद्] ॰जादी- स्त्री. १ शौर्याचें कृत्य; नांवलौकिक. २ स्वारी; अभिक्रम. 'मग त्यावरी नामजादी करून रताजी रुपाजी जीवें मारिलें.' -इंम ३४. -सभासद ५४. ॰जोग-वि. हुंडींत ज्या माणसाचें नांव व वर्णन लिहिलेलें असेल त्याच्यापासून ओळखपाळख न घेतां हुंडीची रक्कम त्याला देतां येईल अशा प्रकारची हुंडी. (इं.) ऑर्डर चेक. याच्या उलट शहाजोग. ॰दार-वि. १ कीर्तिमान; सुप्रसिद्ध. 'मुसा मुत्रीम नामदार ।' -ऐपो २२२. २ कायदे- कौन्सिलचा सभासद. एक बहुमानार्थी पदवी. (इं.) ऑनरेबल. 'नामदार गोखले.' ॰दारी-स्त्री १ कीर्ति; लौकिक. नाम- जाद-दी पहा. २ कौन्सिलचें सभासदत्व; सन्मानाचा हुद्दा. ॰देव-पु. १ शिंपी जातींतील एक प्रसिद्ध साधु. २ एक शिंपी जातींतील पोटजात. ॰धातु-पु. नामापासून बनलेला धातु. जसें:-शेवटणें; शेंपटणें; समरसणें. ॰धारक-वि. नेहमीं देवाचें नांव घेऊन मुक्ति इच्छिणारा साधक; भक्तिमार्गी; भजनी. 'एथिचेआ नामधारका । विज्ञापन परिवारिआ मार्गिका ।' -ॠ १०३. 'तरले तरति हा भरंवसा । नामधारकाचा ठसा ।' ॰धारक, नामधारी-वि. १ नांवाजलेला; प्रसिद्ध; स्वतःचें नांव गाजविणारा. 'आम्हांजवळ दाहा नामधारी सरदार आहेत.' २ नुस्त्या नांवाचा; स्वतः कांहीं एक कारभार इ॰ करीत नसतां ज्याच्या नांवावर कारभार इ॰ होतात तो. ३ एकच नांव असलेला; एकाच नांवाचे दोन परस्पर. ४ विद्या, गुण इ॰ कांहीं नसतां निव्वळ मोठें नांव धारण करणारा. 'हा नामधारक शास्त्री आहे.' ॰धेय-न. (काव्य) नांव; नाम. -वि. नांवाचा. ॰ना-नी-स्त्री. कीर्ति; प्रसिद्धि; ख्याति. ॰नाईक-पु. (हेट.) आरमारावरचा अधिकारी; यावरून एक आडनांव. ॰निर्देश-पु. नांवाचा उल्लेख; नांव घेऊन सुचविणें, दाखविणें. ॰निशाण-वि. प्रसिद्ध; विख्यात 'राजे बहाद्दर नामनिशाण ।' -ऐपो २७७. ॰बुरदा-वि. (कागद- पत्रांत) उपरि लिखित; उपर्युक्त; वर उल्लेख केलेला [फा.] ॰मत्र- पु. देवाच्या नांवाचा जप. -ज्ञा १७.१०४. ॰रूप-न. नांवरूप पहा. ॰रूपातीत-वि. १ नांव, रूप, वर्णन इ॰काच्या पलीकडचा (हीं नसलेला) (देव). 'जें का अक्षर अव्यक्त । असें नावरूपातीत । शब्देवीण आनंदत । निजे तेथें निज बाळा ।' २ नांव इ॰ घालवि- लेला; दुर्लौकिकाचा; अवनतावस्थेस आलेला. ३ ऐहिक कीर्ति, मान इ॰कांची पर्वा न करणारा; ऐहिक लाभांना तुच्छ मानणारा. [नाम + रूप + अतीत] ॰वर-वि. प्रसिद्ध; नांवाजलेलें. ॰वाचणी- स्त्री. नांवनिशी. 'कथितो नामवाचणी सारी ।' -अमृत ४४. [नाम + वाचणें] ॰वाच्य-पु. (व्या.) तुतीय पुरुष. ॰विधान-न. नामकरण पहा. ॰शेष-वि. १ ज्याचें नुसतें नांव उरलें आहे असा (मृत, अज्ञातावस्थेंतला माणूस). २ अतिशय निकृष्टावस्थेस पोहों- चलेलें (गांव इ॰) ॰संकीर्तन-न. देवाचें नांव घेणें; भजन करणें; नामघोष. ॰सरी-क्रिवि. नामसदृश; नांवासारखें. 'तेही नामाशी नामसरी । म्हणत असतील जरत्कारी ।' -मुआदि ४.१६. ॰स्मरण- न. मनामध्यें देवाचें नांव घेणें-आठवणें. ॰स्मरण भक्ति-स्त्री. उपासनामार्गांतील नवविधा भक्तीपैकीं तिसरी नामा, नाम्नी- (पुस्त्री) वि. नांवाचा-ची. जसेः-हरीपंत नामा एक पुरुष; गंगा नाम्नी कन्या. नामांकित-वि. प्रसिद्ध; विख्यात; लौकिक अस- लेला. नामाथ(थि)णें-अक्रि. १ (काव्य) प्रसिद्धीस येणें; नांव होणें; नांवाजला जाणें. 'आनंदाचेनि नांवें । नामाथें पैं ।' -सिसं ५.११. २ नांव देणें. नामाथिला-वि. नावांजलेला; नामांकित. 'ऐसे नामाथिले वीर ।' -उषा १५९. नामाभिधान-न. १ नांव. 'तेथील पांड्या भावीक पूर्ण । महादाजीपंत नामाभिधान ।' २ नामांकित माणूस. 'हुजुरातींतले नामाभिधानें ।' -ऐपो २६७. [सं. नाम + अभिधान] नामावलि-ळी-ळ-स्त्री. नांवांची यादी. मुख्तत्वें शिव, विष्णु इ॰कांच्या नावांच्या यादीस लावतात. 'प्रेमभरित अंतरांत वदनीं नामावळी गाती ।' -होला १७. नामो-वि. (गो.) नाम लावणारा. (सारस्वत वैष्णवांना उपहा- सानें योजतात). नाम्या-वि. नाम अर्थ ४ पहा. कपाळावर पांढरा पट्टा असणारा (कुत्रा इ॰).
मुद्रा
स्त्री. १ ठसा किंवा शिक्का उठविण्याचें साधन. २ छाप; शिक्का; ठसा. ३ शिक्क्याची आंगठी; ठसा उम- टविण्याची आंगठी; (सामा.) आंगठी. 'हळूच मारुती सद्गुणस- मुद्रा । वर्णी मग मुद्रा मज दावी ।' -मोमीतागीत (नवनीत पृ. २६०). ४ गोसावी लोकांचें लांकडाचें किंवा कासवाच्या पाठीचें कर्णभूषण, 'कान फाडूनिवां मुद्रा ते घालिती । नाथ म्हणविती जगामाजीं ।' -तुगा २८२९. ५ वैष्णव आपल्या अंगावर गोपीचंदनानें शंख. चक्र, रामनाम इ॰ चे उठवितात ते ठसे प्रत्येकी ६ नाणें; विशेषतः रुपया. उदा॰ ताम्रमुद्रा = पैसा; रौप्यमुद्रा = रुपया; सुवर्ण- मुद्रा' = मोहर, पुतळी इ॰ 'ओंवाळूनी श्रीकृष्णासी । अनंत मुद्रा याचकांसी । देऊनि आभर केलें त्यासी । मागों आणिकांसी विसरले ।' -एरुस्व १७.८. ७ चेहेऱ्याची ठेवण; चर्या; तोंडवळा. ८ पूजेच्या वेळीं धेनु, शंख इ॰ रूप करतात ती हाताच्या बोटांची रचना. ९ कर्तृत्वाच्या दृष्टीनें रूप, आकार इ॰ 'ह्याची मुद्रा लहान आहे पण मोठ्या पुरुषाला जें होणार नाहीं तें काम आज ह्यानें केलें.' १० पदार्थ ओळखतां यावा म्हणून त्याच्यावर केलेलें चिन्ह; खूण. ११ कासली नांवाच्या झाडाचें फळ; हें मुद्रेसारखें असतें. १२ योगविद्येंत अथवा धार्मिक विधींत सांगितलेली कम- रेच्यावरील भागाची, हातांच्या बोटांची ठेवण किंवा विशिष्ट मुखचर्या. या मुद्रा चार आहेत. -गोचरी, अगोचरी, चाचरी, व ज्ञान. कोणी कोणी खेचरी, भूचरी, चांचरी, अगोचरी, अलक्षी किंवा अलक्ष्य मुद्रा. अशा मुद्रा मानितात. याशिवाय ध्यानमुद्रा, शांतमुद्रा, काम- मुद्रा, क्रोधमुद्रा इ॰ मुद्रांचे प्रकार आहेत. [सं.] (वाप्र.) ॰देणें-१ दीक्षा देणें (विशेषतः वैष्णव संप्रदायाची). २ वर्म सांगणें; गूढ ज्ञान सांगणें. 'ते मुद्रा श्रीगोरक्षराया । दिधली मीनीं ।' -ज्ञा १८. १७५४. ॰पडणें-वळण येणें; चेहेऱ्यावर आविष्कार होणें. 'बाहेर युक्तीची मुद्रा पडे । तंव आंत सुख वाढे ।' -ज्ञा ६.३५. ॰लावणें- समाप्ती सूचक शिक्का देणें; खूण करणें. 'म्हणोनि नवमींचिया अभिप्रायां । सहसा मुद्रा लावावया । विहाला मी वायां । गर्व कां करूं ।' -ज्ञा १०.३२. सामाशब्द-मुद्रांकित-वि. शिक्का असलेला; चिन्हयुक्त. 'तुका म्हणे तैसा मी एक पतित । परि मुद्रांकित जालों तुझा ।' -तुगा १३७३. मुद्राचिरी-स्त्री. दानपत्र; बक्षीसपत्र (सही शिक्क्याचे). 'तो द्रोण द्रुपदा विनवी नम्रोत्तरी । कीं मज द्यावी मुद्राचिरी । जें वोविला होतासि वक्त्रीं । अर्धराज्याची ।' -कथा ५.११.६९. ॰दोष-पु. १ प्रसन्नतेचा अभाव. २ लज्जा वगैरे सारखा विकार. 'छत्रपते, कर्तबगारीच्या आपल्या जगज्जे- तृत्वापुढें धीटपणें उभें राहताना सुद्धां स्वतांच्या शून्यत्वामुळें मुद्रादोष पतकरावे लागतात.' -शिवचरणी. (पु. पां. गोखलेकृत) ॰धारी-पु. १ सरकारी कागदावर शिक्के मारणारा; सरकारी शिक्का ज्याच्या जवळ असतो तो; शिक्क्यावरील अधिकारी. (ह्या वरून सामा) कोणीहि कोणताहि अधिकार, पदवी इ॰ चें चिन्ह धारण करणारा. 'राजश्री मुद्राधारी व लेखक किल्ले चंदनगड यांसी आज्ञा.' -वाडशाछ १.१२४. २ बाहू, कपाळ, छाती इ॰ वर गोपी- चंदनाच्या मुद्रा ज्यानें लावल्या आहेत असा. (यावरून ल.) ३ वैष्णव. ४ मुद्रा इ॰ लावणारा किंवा करणारा आणि त्यायोगानें आपल्या धार्मिकतेचा गाजावाजा करणारा; दांभिक; भक्तीचा टेंभा मिरविणारा. ५ पूजा किंवा धान्य करण्यास योग्य अशी मुद्रा किंवा आव दाखविणारा. ॰हीन-वि. १ ज्याचा चेहेरा पाहून कोणाला त्याच्या विषयीं आदर किंवा दारात वाटत नाहीं असा. २ ज्याचा चेहरा टवटवीत दिसत नाहीं असा; विद्रूप चेह- ऱ्याचा मुद्रिका-स्त्री. मुद्रा अर्थ १ ते ३ व ५, ६ पहा.
हग
पु. मल; विष्ठा; गू (मनुष्य, पशु इ॰ चा). [सं. हद्] ॰ओक-वकस्त्री. (पटकींतील) जोराचे ढाळ, ओकारी वगैरे. [हगणें + ओकणें] हगटणें-अक्रि. (क्रोध-तिरस्कारार्थी) हगणें. 'ससें उठलें कुत्रें हगटलें.' हगुटणें पहा. हगणवट-न. जना- वराचें गुदद्वार. हगणें-उक्रि. १ मल, विष्ठा शरीराबाहेर टाकणें; मलविसर्जन करणें. २ बाहेर टाकणें, पडणें (डोळ्यांतील चिपडें, पू). ३ वर टाकणें-येणें (समुद्रांतील घाण). ४ वर, बाहेर फेंकणें, येणें (जात्याचा खिळा ढिला झाल्यामुळें पीठ). (हें क्रियापद सकर्मक व अकर्मकहि आहे). म्ह॰ हगल्या पेक्षां निप- टणें बरें. हगंद(दा)री, हगदारी-स्त्री. सार्वजनिक शौचाची जागा; परसाकडेची जागा. जेथें मल, विष्टा, घाण पडते अशी जागा. [हगणें + दरी] ॰मुती-मूत-स्त्री. भीतीनें, तीव्र वेदनेनें मलमूत्र विसर्जनाची होणारी घाई; धास्तीनें मलमूत्र विसर्जन होणें. (क्रि॰ सुटणें; लागणें). हगरड-स्त्री. १ ढेंडाळी; हगवण. २ विष्टा. घाण इ॰ ढीग. हगरडा-रडें, हगिरडा-डें, हगु- रडा-डें-वि. १ शौच्याहून आल्यावर ढुंगण न धुतलेला. २ (ल.) अपुरा; अर्धवट राहिलेला; मध्येंच बंद पडलेला (काम, धंदा इ॰). ३ बिघडलेलें; खराब झालेलें (काम इ॰). ४ घाणे- रडें; ओंगळ; किळसवाणें. ५ क्षुल्लक; निरुपयोगी; बिनकिंमतीचें. हगरा-वि. १ सदोदित हगणारा. २ (ल.) भित्रा; भ्याड. ३ (व्यापक) वाईट; ओंगळ; घाण; किळसवाणी (व्यक्ति, वस्तु, गोष्ट इ॰). ४ क्षुद्र; गबाळ; निरुपयोगी; कुटकामाचा. हगरी- रें-स्त्रीन. १ शौचासाठीं केलेली व्यवस्था; ठाकोली. २ शौचाची लांकडी घडवंची; गलबतावरील मलविसर्जनाची जागा. ३ या घडवंचीचें भोंक. ४ (गुर्हाळ) चुलण्यांतील राख ज्या थारो- ळ्यांतून खालीं पडतें त्याचें भोंक. ५ (हगरी) शेतांत ठिक- ठिकाणीं ठेवलेल्या खताच्या राशी-प्रत्येकीं. ६ शेतांत खत न्याव- याच्या गाडींत खत भरण्यांसाठीं असलेल्या कुरकुलाचें मागील दार, झडप. हगरें-न. (अशिष्ट) १ सोरा; यवक्षार. २ टाईप पाडण्याचें यंत्र. हगली, मुतली, हगलेंमुतलें-स्त्री.न. १ क्षुद्र; बारीकसारीक गोष्टी; लहानसहान चुका, अपराध, गैरवर्तन (दुसर्या- जवळ गार्हाणी केलेलें). २ एखाद्याच्या साध्या, स्वाभाविक, खासगी गोष्टी. (क्रि॰ सांगणें; कानावर घालणें; पाहणें). 'हा दिवाण चाकर लोकांचीं हगलींमुतलीं राजाच्या कानावर घालतो.' ३ (लहान मुलाच्या) हगण्यानें भरलेलें कपडें; गुवेलें. हगवण- स्त्री. अतिसार; वारंवार शौचास होणें. म्ह॰ फुकाची भाजी हग- वणीस काळ. हगवणकर-करी-वि. हगवणीचा आजार अस- लेला. हगवणें-विणें-सक्रि. १ शौचास, परसाकडेस बसविणें (मूल इ॰). २ (ल.) ओशाळणें; लाजविणें; गोंधळविणें; दांत पाडणें. ३ नाश करणें; नायनाट करणें; घाबरून सोडणें; रडकुंडीस आणणें; बिघडविणें (सल्ला, युक्ति, धाडसाचें काम). ४ बलात्का- रानें काढणें; परत देण्यास भाग पाडणें (पैसा इ॰). हगाड- स्त्री. हगंदरी पहा. हगीरडामुतीरडा-वि. हगरडा अर्थ १ पहा. हगिरडें-न. फुरसें (एक जातीचा साप). हगीर-वि. हगरा पहा. हगीरमुतीर-वि. (ल.) घाबरगुंडी झालेला; अतिशय गोंधळलेला; दुःख, भीति इ॰ मुळें देहमान सुटलेला; पांचावर धारण बसलेला. हगुटणें-अक्रि. १ परसाकडेस घाई होणें; परसाकडेस लागणें. २ हगणें; हगटणें पहा. ३ (ल.) गर्भगळित होणें. ४ घाबरगुंडी उडणें; उगीच घाईत असणें. [हग + उठणें] हगूट-पु. परसाकडेची घाई. गुदद्वारावाटे नुकताच बाहेर पड- लेला किंवा पडत असलेला मळ; विष्टा. हगूर-वि. हलका. हगेरा, हगोला-वि. गुवानें भरलेला, बरबटलेला (कपडा). हगेरें, हगोलें-न. गुवानें भरलेलें वस्त्र, दुपटें; गुवेलें. हग्या, हगिया-वि. १ शौचास बसलेला, निघालेला. २ शौचास नेण्याचा (तांब्या, जोडा इ॰). 'दुराणी हगियांसी (जोड्यांनीं) मारूं लागले.' -भाव १४०. ३ हगावयास लावणारा. ४ (ल.) अतिशय जोराचा (मार इ॰).
घन
वि. घण. १ जाड; जाडेंभरडें; घट्ट विणीचें (कापड). २ दाट; फार पातळ नसलेलें (ताक इ॰). ३ दाट; गर्द; निबिड (छाया, झाडी, पालवी इं॰). ४ दुर्भेद्य (अंधार). ५ जाड; बळकट (फळी). ६ घुमेपणानें स्तब्ध असलेला (मनुष्य). ७ गाढ; स्वस्थ (झोंप इ॰). 'ना स्वरूप अवस्थान । ते सुषुप्ति कां घन । जैसी होय ।' -ज्ञा १४.७४. ८ मोठा; जोराचा; मोठ्या सरीचा (पाऊस इ॰). 'इंदिराकळत्रा इंद्रे वर्षतां घन घन घारा ।' -र ६२.९ घट्ट; अप्रवाही; द्रव. वायुरूप पदार्थाविरहित. [सं.] सामाशब्द- ॰घोर-घनाघोर-वि. १ निबिड; दाट; जोराचा (पाऊस, ढग). २ भयंकर; निकराचे; तुंबल; हातघाईचें (युद्ध. लढाई). ३ भडिमाराची; आवेशाची; जोराची (शिवीगाळ). ४ गाढ; स्वस्थ (झोंप.) ५ दाट; निबिड; गर्द (अंधार, झाडी, रान इ॰). ६ दाट; गजबजलेला; खेचाखेंचीचा; गडगच्च (मनु- ष्यांचा जमाव, पीक. फळें इ॰). [घन + घोर = भयंकर] ॰चर्मक- वि. जाड कातडीचा (पाणघोडा इ॰). [सं. घन = जाड + चर्म = कातडें] ॰दाट-वि. १ गडगच्च, निबिड. 'भरला घनदाट हरि दिसें ।' २ घट्ट; पातळ नसलेला (द्रवपदार्थ). ३ (ल.) अतिशय सलगीचा; जिवलग; सलोख्याचा (स्नेहभाव, मैत्री). घनदाट पहा. ४ गजबजलेला; खेंचाखेंचीचा (जमाव, सभा इ॰). 'ऐसी सभा बैसली घनदाट ।' -शनि ८ . घणदाट पहा. [घन = निबिड, किंवा ढग + दाट] ॰दाटणें-गर्दी होणें; खेंचा खेंच होणें. 'सभा घनदाटली विमानीं ।' -देवीचीभूपाळी ३०. [घनदाट] ॰दाटी-स्त्री. १ जीवश्चकंठश्च स्नेह, मैत्री; जिवलग सख्य. २ अतिशय दाटी. घणदाटी पहा. [घनदाट] ॰प्रसारण न. (पदार्थ.) घन पदार्थाचें उष्णतेनें प्रसरण पावणें; आकारमानांत वाढ. (इं.) एक्स्पॅन्शन्. [घन + प्रसरण = पसरणें] ॰रूप द्रव्य- न. घनाकाराचा, लांबी, रुंदी व उंची असलेला पदार्थ; घट्ट, द्रवरूप नसलेला पदार्थ. [घन + रूप + द्रव्य = पदार्थ] ॰वट-वि. १. मजबूत; जाड; घट्ट विणीचें (कापड इ॰). २ (काव्य.) सर्वव्यापक; श्रेष्ठ; सर्वव्यापी; सर्वांचा सारभूत. ३. (काव्य.) जड; भारी; वजनदार. 'मेरूपासाव घनवटें । जी हिंसा जालीं तुकमठें ।' -ऋ ३०. ४ .(काव्य.) भरीव; भरदार; 'कीं भुस बीज एकवट । उपणीतां राहें घनवट ।' -ज्ञा २.१३०. -अमृ २.२१. -एभा ११.१७. -दा ६.१० २२. ५. घट्ट; कठिण. 'गुरु तो वस्तु घनवट । लघुत्वें बोली हळुवट ।' -विड ११ २८. 'कां मी येतुली घनवट ऐसे । पृथ्वीचि जाणें ।' -ज्ञा १०. १९६. घन = दाट + वृत्त किंवा वत्] ॰वटता-स्त्री. भारी- पणा; जडपणा; घट्टपणा. [घनवट] ॰वटपण-न. घट्टपणा; भरींव- पणा; भरदारपणा; घनता. 'शब्दफोल अर्थ असें । घनवटणें ।' -दा ६.१० २०. 'कीं अवधान आणिया श्रवण । कीं पृथ्वी आणि घनवटपण ।' -भावि ४५.१२९ . [घनवट] ॰वाड-वि. निबिड; दाट; गर्द. -शर. [घनवट] ॰विरोध-पु. (पदार्थ.) पदार्थाच्या आकारमानामुळें उत्पन्न होणारी प्रतिबंधक शक्ति. (इं.) व्हॉल्यूमरेझिस्टिव्हिटि. [सं. घन + विरोध = प्रतिबंध] घना कार-पु. भरींव आकार; गोळ्याचा आकार; कगड. 'पुढती तो घनाकारु हारपे । जे वेळीं अलंकार होती ।' -ज्ञा ८.१७३ . [घन = भरींव, घट्ट + आकार = रूप] ॰सर-वि. दाट; पिपुल; ऐवज- दार; भरदार. 'पिकें होतां धान्यें घनसर बरीं स्वस्त विकती ।' -दावि २२५. घणसर पहा. [घन + सर प्रत्यय] घनांधकार- पु. (काव्य.) दाट काळोख; घोर अंधार. 'घनांघकारांत दिवा जसा वनीं ।'-मृच्छकटिक. [घन = दाट + अंधकार = अंधार] घनाज्ञान-न. गाढ, घोर अज्ञान. [सं. घन = गाढ + अज्ञान] घनीकरण-न. (पदार्थ.) पातळ. वायुरूप पदार्थ.) घट्ट करणें. (इं.) कंन्डेन्सेशन. [सं.] घनीभवन-न. (पदार्थ.) पातळ, वायुरूप पदार्थ दाट, घट्ट होणें. उ॰ पाण्याचें बर्फ बनणें, पातळ मेण थिजून घट्ट होणें. (इं.) सॉलिडिफिकेशन्. -भूव २६. [सं.] घनीभूत-वि. गोळ्याच्या, लगडीच्या रूपानें असलेलें; घट्ट झालेलें; आकार धारण करणारें. 'नाना घनीभूत सुवर्ण । जैसे न्याहाळितां साधारण ।' -ज्ञा १.४४. [सं.]
शेत
न. १ धान्य वगैरे लावण्याची जागा; क्षेत्र; लागवड केलेली जमीन. २ पीक; उगवलेलें, पिकलेलें उभें धान्य. ३ शेत- काम; कृषिकर्म; धान्य पिकविण्याचें काम; शेती. ४ नवरात्रांत किंवा चैत्रांत रहू करतात तो; भांड्यांत रुजत घातलेलें धान्य व त्याचे अंकुर. ५ (ल.) उपजीविकेचें साधन; धंदा; व्यवसाय. पोटाची तजवीज. [सं. क्षेत्र; प्रा. छेत्त] शेत उतरणें-कणसें चांगलीं बाहेर पडून भरणें; कणसें, चांगलीं येणें. शेत घरांत ठेवणें-असणें-करणें-खंडानें न देतां शेताची मशागत स्वतः करणें. शेत तोडणें-कोंवळ्या भातात्या रोपावर रोग पडणें- कृषि २३६. शेत सोसणें-भात रोप्याचे केसर पांढरे पडणें; शेत सुकणें, वाळणें; एक रोग. [सं. शुष्] (भरल्या) शेतांतून काढणें-ढकलणें-उठविणें-लाभ होण्याच्या ऐनवेळीं काढून लावणें; हातातोंडाशीं आलेला घास काढून घेणें. ॰आडगरा- पु. वि. नाचणीची एकजात. ॰एरंड-पु. एरंडीचें झाड; सुरती एरंडीचें झाड; सुरती एरंड; मळा एरंडा दुसरा मोगली एरंड, वईएरंड. ॰करी-पु. १ शेतीवर निर्वाह करणारा; शेताची मेहनत करणारा; कृषीवल. २ शेताचा मालक, धनी. ३ शेती; खंडकरी; शेतावर काम करणाराच कर्दा; कूळ. ॰कापशीस्त्री. शेतांत पेरा- वयाचें, उगवणारें कापशीचें झाड. ॰काम-न. शेतीचें काम, धंदा. ॰कामी-काम्या-वि. शेतावर काम करणारा; शेतकीच्या कामीं येणारा, उपयोगी पडणारा; कृषीवल. ॰खप्या-पु. १ केवळ शेतकाम ज्याला माहीत आहे, इतर कांहीं विद्या नाहीं असा मनुष्य; अडाणी, गांवठी मनुष्य; गांवढा. २ शेतकाम करणारा परंतु ज्याचा वास्तविक धंदा शेतकीचा नव्हे, असा ब्राह्मण वगैरे मनुष्य. ॰खेतन. जमीनजुमला; शेती; वत- नवाडी. ॰गणा-पु. शेतजमीनीचा समुदायच लागवडीची जमीन. ॰गहूं-पु. गव्हाची एक जात; पाणी न देतां शेताच्या ओली- वर येणारा गहूं. ॰गी-स्त्री. शेतकाम; कृषिकर्म; जमीनीची मशा- गत, लागवड वगैरे. 'वेठीचे उपाद्रवामुळें रयत परागंदा होत्ये, शेतगी होत नांहीं.' -वाडसमा ३.२२४. ॰घर-न. शेतांतील घर; शेतकामासाठीं शेतांत बांधलेली झोपडी वगैरे. ॰जमीन-स्त्री. लाग- वडीखालील. जमीन. ॰पेढी-स्त्री. शेतकऱ्यास कर्ज देणारी सहकारी पतपेढी. ॰पोत-न. १ सामान्यतः शेती; शेतीखालील जमीन; शेतीवाडी; जमीनजुमला. २ शेतीचीं कामें; कृषिकर्म. [शेत द्वि.] ॰बाडी-स्त्री. शेतभात; शेतीवाडी. ॰भात-शेतीभाती-नस्त्री. शेती; शेतजमीन; शेतीवाडी; सामान्यतः शेतीची जमीन व लाग- वडीचीं कामें यांस व्यापक संज्ञा. ॰मळा-पु. शेती, बागायत वगैरे; जिराईत व बागाईत शेती यांस सामान्य व्यापक संज्ञा. ॰माल-पु. शेतींत पिकणारा माल. ॰वड, शेताड-स्त्री. १ लागवडीची जमीन गांवासभोंवतीची. ॰वड-वडा-१ पु. एक फुलझाड; दुधाणी, कुंभा पहा. २ एक झुडुप. ॰वस्ती-स्त्री. १ (हंगामांत) शेतावरील वास्तव्य, राहणें. २ शेतकरी लोकांची वस्ती, गांव, खेडें; गांवढें गांव. ॰वळी-स्त्री. चांभार लोकांत मामानें बाशिंग बांधल्यावर वर शेजारच्या घरीं जातो हा विधि. ॰वाडी-स्त्री. शेती, लागवडीखालील जमीन, कुरणें, बागायत, आवार, वाडगें वगैरे शेतीसंबंधीं जमीनीस व्यापक शब्द. ॰वार- पत्रक-वारी-नस्त्री. गांवासंबंधीं कुळकर्णी किंवा तलाठी यानें ठेवावयाचें सर्व जमीनीचें शेतांच्या अनुक्रमानें नोंदणीपत्रक, तक्ता. ॰वाळूक-न. शेतांत होणारें एक काकडीसारखें वेलाचें फळ; चिबूड. ॰सनदी-वि. लष्करी अथवा इतर सरकारी कामा- बद्दल पूर्वी सनदेसह शेत मिळत असे, तसें शेत धारण करून नोकरी करणारा. ॰सनदी शिपाई-पु. लष्करी नोकरीबद्दल शेताची सनद मिळालेली सैनिक. 'जेथें किल्ले आहेत तेथें किल्लेदार शेत- सनदी शिपाई ठेवीत.' -नि १०६१. ॰सरी-स्त्री. शेती, पिकें वगैरेस सामान्य व्यापक संज्ञा. 'शेतसरी पिकली.' ॰सारा-पु. जमीनीवरील कर; शेतीवरील कर, महसूल. ॰हेत-न. जमीन- जुमला; शेतवाडी. शेतकी-स्त्री. १ शेतकाम; शेतकऱ्याचा धंदा, व्यवसाय. २ पीक; उभें पीक; शेत. शेताड-डी-शेतवड पहा. शेती-क-स्त्री. १ शेतकी; शेतजमीन. २ शेतलागवडीसंबंधीं कामें. शेती-पु. शेताचा मालक, धनी. -स्त्री. शेतजमीन; शेतकी. शेती पाऊस-पु. पिकांना योग्य असा पाऊस. शेती- भाती-स्त्री. शेतवाडी, जमीन पहा. २ शेतीचीं कामें.
योग
पु. १ जुळणी; जोड; मिलाफ; संग; संयोग; संलग्नता; लग्न. 'योग पुढें भृगुसवें तिचा घडतां ' -मोआदि ३.६. २ परस्पर संबध; ऋणानुबंध; संगत. 'तिला नहाण यावें आणि तिचा दादला मरावा असा योग होता ' (समासांत) कालयोग; दैवयोग; प्रारब्धयोग इ॰ ३ आध्यात्मिक अथवा भाविक भक्ति अगर ध्यान, चिंतन करून होणारें ब्रह्मैक्य; ध्यानपूजा, मानसपूजा, समाधि व त्यासंबंधीं नियम व आसनें; प्राणायागादिक साधनांनीं चित्त- वृत्तीचा किंवा इंद्रियांचा निरोध करणें. ४ मार्ग; साधन; आत्म- साधन या अर्थीं भक्तियोग, कर्मयोग, ज्ञानयोग इ॰ ' संक्षेपानें नुसता योग अगर कर्मनिष्ठा असें म्हणतात. ५ खगोलाचे २७ भाग; ज्यावरून चंद्र सूर्याचें अक्षांक्ष रेखांश मोजतात ते; ते योग असे- विष्कंन; प्रीति, आयुष्मान्, सौभाग्य, शोभन, अतिगंड, सुकर्मा, धृति, शूल, गंड, वृद्धि, ध्रुव, व्याघात, हर्षण, वज्र, सिद्धि, व्यतीपात, वरीयान्, परीघ, शिव, सिद्धि, साध्य, शुभ, शुक्क, ब्रह्मा, ऐंद्र व वैधृति असे २७ योग आहेत. ज्योतिषी २८ योग मानतात. ६ संबंध; जवळ येणें. 'ग्रहांचे कालांश (वस्तुतः भोग) सूर्याच्या इतकें झाले म्हणजे त्याचा सूर्याशीं योग झाला किंवा युति झाली असें म्हणतात. ' -सूर्य २३. ७ उपाय- योजना; वस्तूचा उपयोग, विनियोग; कार्यार्थ साधना, प्रयत्न. ८ इष्टता; योग्यता; समत्व. ९ (गणित) रक्कम; रास; बेरीज. १०. साधन; युक्ति. 'एकच योग (साधन अगर युक्ति) आहे. ' -गीर ५६. ११ मिठी. १२ कवळा. १३ कार्यकुशलता. १४ संधि. 'योग बरवा हा पुन्हां घडेना ।' -दावि २४२. १५ (वैद्यक) इलाज; उपाय; औषध. 'आमवायूवर एरंडेलाचा योग प्रशस्त आहे.' १६ मोठा लाभ. 'मग योग योग ऐसा सहसा उठला वळी महा शब्द । ' -मोकर्ण ७.३५. १७ जारणमारण; जादूटोणा. १८ ईश्वरी संकल्प. १९ समाधिशास्त्र. २० तत्वज्ञान. २१ व्युत्पत्ति; व्युत्पत्तिमूलक अर्थ. २२ सूत्र; नियम; कायदा. २३ (ज्यो.) विशिष्ट तिथि, वार, नक्षत्र यांचें सहचर्य येणें. उदा॰ रविवारीं हस्त आलें असतां त्यास अमृतसिद्धि योग म्हणतात. [सं. युज् = जोडणें] सामाशब्द- ॰च्युत-पु. योगभ्रष्ट. -ज्ञा ६.४४८. ॰धर्म-पु. कर्तव्य; सद्गुण, अथवा योग्याचें विशेष कर्म; त्यापैकीं दहा विशेष आहेत-अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्या, अपरिग्रह (हे पांच यम व) शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर- प्रणिधान (हें पांच नियम होत). दुसरी गणना अशी आहे- अहिंसा, सत्य, अक्रोध, त्याग, शांति, अपैशुन, दया, अलोभ, मार्दव, लज्जा. कांहीं दम, क्षम, अचापल्य, तेज, तितिक्षा, हे यांतच गणतात. ॰निद्रा-स्त्री. विश्वप्रलयानंतरची व विश्वोत्त्पत्तीपूर्वीची ब्रह्मदेवाची झोंप; ईस्वराची निद्रावस्था; योगमाया; सहजस्वरूप- स्थिति. -ज्ञा ५.७८. ॰निष्ठा-स्त्री. योगपरायणता. -ज्ञा २.३१५. ॰पट-पु. १ श्रेष्ठ भोग. २ संन्याशदीक्षेचा एक प्रकार. संन्याशानें धारण करावयाचीं विशिष्ट वस्त्रें. ३ (ल.) संन्यास घेतल्यावर त्यासंबंधीं पाळावयाचे नियम वगैरे. 'ते योगपटाची मवणी । जीवीं अनियम चिंतवणी । ' -ज्ञा १६.३३२. ॰भूमिका-स्त्री. योग्याचीं विशिष्ट अवस्था, स्थिति. 'द्रष्टादृश्यांचिया ग्रासीं । मध्यें उल्लेख विकासी । योगभूमिका ऐसी । अंगीं वाजे । ' -अमृ ७.१८५. ॰भ्रष्ट-वि. योगसाधनांत कांहीं प्रत्यवाय घडल्यामुळें पुनर्जन्म पाव- लेला. ॰माया-स्त्री. ईश्वराची जी मायारूप शक्ति ती; भ्रम; माया; माया व ब्रह्म पहा. ॰मुद्रा-स्त्री. खेचरी, भूचरी, चाचरी, अगो- चरी, आलेख इ॰ पांच योगमुद्रा; यांचीं स्थानें अनुक्रमें नादबिंदु, नासिका, नेत्र, कर्ण व आकाश हीं होत. 'खेचरी भूचरी चाचरी । अगोचरी आलेख यापरी । माजी समरसली खेचरी । नादबिंदूसी । ' -कथा ७.४.७३. ॰राज गुग्गुल-ळ-पु. एक प्रकारचें रसायन; मात्रा. ॰रूढ-वि. व्युत्पतीनें ज्यांचा प्राप्त अर्थ व रूढ अर्थ हे जुळतात असा (शब्द). जसे- अंगरखा; जलधर; पंकज; भूधर. कांहीं शब्द यौगिक, कांहीं रूढ आणि कांहीं योगरूढ असतात. ॰शास्त्र-न. चित्ताची एकाग्रता करण्याच्या साधनासंबंधींचें शास्त्र; ज्यामध्यें प्राणायामादिद्वारां अंतःकरणाच्या एकाग्रतेचा उपाय सांगितला आहे असें सहा शास्त्रांतील एक शास्त्र. ॰सार-पु. विचार. ॰क्षेम-पुन. निर्वाह; चरितार्थ; उदरपोषण. 'यांचे योग- क्षेमाबद्दल मौजे वडू तर्फ पाबल पैकीं इनाम.' -शाछ १.३६. योगक्षेम चालविणें-एखाद्या मनुष्यास पाहिजे असेल तें मिळ- वून देणें; संसाराची एकंदर व्यवस्था पाहणें; उदरनिर्वाहाची तज- वीज करणें. 'जे मला अनन्यभावें शरण येतात त्यांचा योगक्षेम मी चालवितों. ' योगानंद-पु. योगाभ्यासानें होणारा आनंद; पांच आनंदापैकीं शेवटचा. योगाभ्यास-पु. हटयोगादिकांचा अभ्यास, शिक्षण; योगशास्त्राचा अभ्यास; चित्तवृत्तींचा निरोध करून ध्यानादिकांचा केलेला अभ्यास. योगायोग-पु. १ दैव- गति; अनपेक्षित अशी घडलेली कांहीं गोष्ट; बनाव. २ अनुकूल काळ आणि प्रतिकूळ काळ. 'योगायोग पाहून वागावें. ' योगा- रूढ-वि. योगी; योगनिष्णात. 'तोच पुरुष योगारूढ म्हणजे पूर्ण योगी झाला.' -गीता ६९४. ॰योगासन-न. योगाभ्यास करणाऱ्या योग्याची विशेष प्रकारच्या पद्धतीनें वसण्याची रीत. योगिनी-स्त्री. १ दुर्गादेवीची परिचारिका. या ६४ आहेत. २ योगाभ्यासाची स्त्री; जोगीण. [सं.] योगी-पु. १ योगसाधन करणारा; योगमार्गास लागलेला मनुष्य. -ज्ञा ६.३९. २ योगसाध- नांचा उपयोग जादुगिरीच्या रूपानें करून लोकांस चमत्कार दाख विणारा मनुष्य. ' भारतीय वाङ्मयांत योगी याचा अर्थ बडा जादू- गार असा होतो. ' -ज्ञाको (य) ६५. ३ (सामा.) संन्याशी अथवा भक्त. योगेश्वर-पु. १ श्रेष्ठ योगी; सर्वांत श्रेष्ठ प्राणी; नांवाजलेला योगी; भक्त; संन्यासी; साधु. २ कृष्ण.
देह
पु. शरीर; काया; अंग. 'नोळखवे म्यां धरला हातीं । देहा दीप माया लाविली वाती ।' -तुगा ३६८. [सं.] (वाप्र.) ॰उगाळणें-(चाकरी इ॰ कानीं) शरीर झिजविणें. ॰कारणीं लावणें-एखाद्याच्या कार्याकरितां स्वदेह खर्च करणें. कामास लावणें. ॰टाकणें-ठेवणें-गोडणें-मरणें. ॰लोटणें-मूर्च्छा येणें. देहांत असून विदेही-जीवन्मुक्त. देहांत उजेड पडणें-अपराधाबद्दल शिक्षा भोगल्यानें पश्चात्ताप होणें. देहावर असणें-शुद्धींत असणें. देहावर-गाणें-गीत-अभंग-पद- लावणी-कवन-दोन अर्थांचें काव्य. याचा उत्तानार्थ शरीर विषयक असतो व गूढार्थ आत्मा किंवा ब्रह्म यासंबंधीं असतो. देहावर नसणें-मन ठिकाणावर नसणें. देहावर येणें-१ शुद्धीवर येणें. 'देहावरी येथे म्हणती ।' -गुच ५३.६. २ रानटी खोडया अथवा बेबंद चाली टाकून देणें. दहीं देवपण दाखविणें- आणणें-येणें-(एखाद्यानें) मनुष्यरूपी असूनहि, याच जड देहावस्थेंत आपल्यांत दैविक आत्मीय सत्याचें ज्ञान किंवा ब्रह्मज्ञान आहे अशी लोकांस प्रचीति आणून देणें. म्ह॰ देहं वा पातयेत् अर्थं वा साधयेत् = प्राण तरी द्यावा किंवा ध्येय तरी साध्य करावें. सामा- शब्द- ॰खंड-न. साडेतीन हाताचें शरीर. 'जें देहखंडा नाम आत्मा ।' -ज्ञा १८.५६७. ॰त्याग-पु. मरण. ॰त्रय-न. स्थूल, लिंग व कारण या तीन प्रकरचा देह. 'तैसें ज्ञानाग्नि जाळिले । देहत्रयीं निरसलें ।' ॰दंड-दडन-पुन. तपानें केलेलें देहाचें संयमन. २ फांशीची शिक्षा. ॰दृष्टि-स्त्री. मानवी दृष्टि. उदा॰ 'देहदृष्टीनें पाहिला असतां प्रपंच सत्य दिसतो.' ॰द्वय-न. स्थूल आणि सूक्ष्म देह. ॰धर्म-पु. शरीराचीं कृत्रिम व नैसर्गिक कामें, मलमूत्रविसर्जन इ॰ देह धमाचें करणें-शौचास जाणें. देह- धारी-वि. शरीरी; मूर्तिमान्. ॰पात-प्रयाण-पु. शरीराचें पतन; मरण; देहावसान. 'आणि नियता अंतःकरणीं । तूं जाणि जसी देहप्रयाणीं ।' -ज्ञा ८.५. ॰प्रारब्ध-न. नशीबाचा भोग; शरीरभोग. ॰बुद्धि-भाव-स्त्रीपु. १ जीवबुद्धि; देहावरील आसक्ति; अहंभाव; मीपणा, याच्या उलट आत्मबुद्धि. २ (काव्य) चित्ताची सावधानता देहाभिमान; देहतादात्म्य. ॰बुद्धि राहणें- (व.) धडगत रहाणें. ॰भान-न. चित्तशुद्धि; स्वतःची जाणीव; चित्तानुसंधान; मन ठिकाणावर असणें; शांत असणें; विवेकशक्ति असणें. (क्रि॰ असणें; येणें; विसरणें; जाणें). ॰भाव-पु. देहाभिमान. देहबुद्धि पहा. ॰यात्रा-स्त्री. १ देहाचा चरितार्थ; उपजीविका. (क्रि॰ चालणें; होणें; निभणें). २ आयुष्य; जीवन- क्रम. (क्रि॰ संपणें = मरणें). ॰वान-वि. देहधारी पहा. ॰विस- र्जन-न. देहत्याग पहा. ॰शुद्धि-स्त्री. १ प्रायश्चित्तानें शरीराची शुद्धता करणें. २ देहभान पहा. ॰संकल्प-पु. प्राण पणास लावून काम करणें; निकराचा प्रयत्न. ॰संग-पु. देहाचा अहंकार. ॰स्वभाव-पु. १ देहधर्म १ पहा. २ मनुष्याचा नैसर्गिक स्वभाव; जन्मप्रभृति वागण्याची पद्धत. देहाडा-पु. देह. 'पुरला साठीं देहाडा । ऐसें न म्हणे मूढा ।' -तुगा २६८४. देहांत-पु. मृत्यु. देहांत प्रायश्चित्त-न. मृत्युदंड. देहांतर-न. दुसरा जन्म किंवा दुसरा जन्म घेणें; परकाया प्रवेश; एका देहांतून दुसर्या देहांत प्रवेश करणें. देहातीत-वि. देहाच्या पलीकडे; अदेह झालेला. देहात्मवाद-दृष्टि-पुस्त्री. अनात्मवाद; जडवाद; देहा- लाच आत्मा मानणें. देहात्मवादा-दृष्टी-वि. जडवादी; देहा- त्यय-पु. देहत्याग. देहादिक कर्में-नअव. १ देहधर्म पहा. 'देहादिक कर्में अभिमान वाटे । तया मी कैं जोडें नारायण ।' २ दया, माया. प्रीति इ॰ मनाच्या वृत्ती. देहाभिमान, देहा- हंकार-पु. शरीराचा अभिमान. देहाभिमानी, देहाहंकारी- वि. देहाभिमान धारण करणारा. देहावसान-न. मृत्यु. देही-वि. १ देहासंबंधीं. २ देहधारी पहा. -पु. देहांत राहणारा जीवात्मा. 'हें रजोगुणाचें दारुण । देही देहियासी बंधन ।' -ज्ञा १४.१७३. देहे-दंड-बुद्धि-भान-शुद्धि-स्वभाव-देहदंड-बुद्धि इ॰ पहा. 'ज्ञात्यासी आणि जिंकिलें । देहबुद्धीनें ।' -दा १९.४.२६.
रुद्र
पु. १ शंकराचा एक अवतार; शंकर. २ ब्रह्मदेवाच्या कपाळापासून उत्पन्न झालेला देव; देवताविशेष. हे रुद्र अकरा आहेत. अकरा रुद्र पहा. (यावरून ल.) ३ अकरांचा समुदाय; अकरा ही संख्या. ४ रुद्रताल; शिवस्तोत्र; ह्या तालांत अकरा मात्रा व पांच विभाग असतात. ५ अकरावा रुद्र; मारुती; हनुमान. 'चूडा- मणिसह देवी प्रभु आणाया निरोप दे रुद्रा ।' -मोरामायणें १.१८७. -वि. भयंकर; रडविणारा. [सं. रुद = रडणें] ॰काठी-वि. तीन धागे काळे व एक पांढरा, नंतर एक काळा व एक पांढरा असें उभार व आडवणहि त्याच प्रकारचें, किनार कोणतीहि असें (लुगडें). ॰कोप-पु. भयंकर प्रसंग; भयंकर संकट. 'क्षुद्र इतर जे शुद्रचे तयांवरि रुद्रकोप या क्षणीं ।' -ऐपो ३७०. ॰गांठ-स्त्री. कापड विणतांना त्यांत चौकटीसारखें उठविलेलें चिन्ह. ॰गांठी-वि. रुद्र- गांठी असलेलें (लुगडें, वस्त्र इ॰) ॰ताल-पु तालाचा एक प्रकार. रुद्र अर्थ ४ पहा. 'मंगलाचरणाचा एक जिवाचा एक ताल आणि भरतवाक्याला रुद्रताल हा टेवलेलाघ.' -भा ३८. ॰पिशाच-पु.न. १ काशींत केलेल्या पापाचें क्षालन होईपर्यंत (काशींत मेल्यानंतरहि) पिशाच योनींत राहिलेला जीव. २ (ल.) शीघ्रकोपी, अविचारी, रागीट मनुष्य. ॰बलि-पु. रुद्र देव- तांना अर्पण केलेला मांसाचा बली. ॰भूमि-स्त्री. स्मशान; मसणवटी. ॰मळी-स्त्री. (व.) अंधारी; झांपड. 'असा नास चाललेला पाहिला कीं आमच्या डोळ्यांना रुद्रमळी येते.' ॰योनि- स्त्री. १ काशी येथील विश्वेश्वराच्या देवळाबाहेरील खडकांतून गेलेले भुयारासारखा प्रदक्षिणेचा मार्ग ह्या मार्गात मनुष्य मेल्यास तो रुद्रापिशाच होतो. हा मार्गं उतरता आहे व ब्रह्मयोनीचा मार्ग चढावाचा आहे. यावरून ब्रह्मयोनि आणि रुद्रयोनि हे शब्द ज्या घराचे भाग उंचसखल असतात त्याला लावतात. २ लांब व अरुंद गल्ली; बोळवंडी. ब्रह्मयोनि पहा. ॰वात-स्त्री. चार बोटें लांबीची अकरा सुतांची वात. अशा वातींचा लक्ष लावतात. ॰वि(वी)णा-पु. वीण्याचा एक प्रकार. ह्याचा आकार तंबोर्या- सारखा असतो. दांडीचें टोक वळवून पाठीकडे नेलेलें असतें. दांडीच्या मागें शेवटाला एक गोल भोपळा बसविलेला असतो. दांडीवर मेणांत चोविस पडदे पक्के बसविलेले असतात. ह्याला चार तारा असून त्या सा, प, सा, म, ह्या स्वरांत. व आणखी तीन तारा प, सा व तार सा मध्यें लवितात. वाजविण्याचा सर्व प्रकार बीनाप्रमाणें असतो. ॰विंशति-स्त्री. प्रलयकाळ (माधवग्रं- थांत हाच शब्द रुद्रवंश, रुद्रवंशी असा आला आहे.) 'भयानका क्षिति झाली घर-घाली रुद्रविंशति जगिं फांकली ।' -ऐपो ३६८. [साठ संवत्सरांतले शेवटचे वीस संवत्सर रुद्र देव- तेचे म्हणजे संहार देवतेचे असल्यामुळें ते अनिष्ट मानतात.] ॰संख्या-वि. अकरा. 'कृष्णावाळुवंटीं ब्रह्मचारी पूजिले । रुद्र- संख्या नाभिपर्यंत पुरिले ।' -सप्र ३.३७. ॰सावर्णि-चवदा मनु पहा. -गीर ७५२. रुद्राचल-पु. रुद्र नांवाचा पर्वत. [रुद्र + अचल] रुद्राणी-स्त्री. पार्वती. 'शिव भवानी रुद्राणी । कां पां न पावतीच कोणी ।' -एरुस्व ५.७४. रुद्रावतार-पु. १ शिवाचा अवतार; शिवाचें उग्रस्वरूप. २ (ल.) तापट किंवा रागीट मनुष्य; तामसी व्यक्ति. [रुद्र + अवतार] ॰धा ण करणें- संतापणें; अतिशय संतप्त होणों; अति क्रोध येणें. रुद्राक्ष-पु. १ एक वृक्षविशेष आणि त्याचें फळ. याचे मोठे मोठे वृक्ष होतात. पानें गंगेरीसारखीं असतात. हीं झाडें कोंकणांत थोडीं व म्हैसुर- कडे फार आहेत. या झाडाच्या फळांतील बिया तेच रुद्राक्षमणी. याची माळ करून शिवभक्त गळ्यांत धारण करितात. रुद्राक्षाला एक ते सहा मुखें असतात. याच्या आणखी जाती गौरीशंख व रुद्राक्षल अशा आहेत. २ शंकराचा डोळा; शिननेत्र. 'कल्या- णाचे बाण निर्वाण मारा । रुद्राक्षींच्या पावकातुल्य धारा ।' -मुरामायणें बालकांड ११०. [सं. रुद्र = शंकर + अक्षत् = डोळा]
रूप
न. १ बाह्य स्वरूप; देखावा. २ आकार; आकृति; दृश्य पदार्थ. ३ चेहेरा; तोंडवळा; मुद्रा; मुखवटा. ४ (न्याय. शास्त्र) डोळ्यानीं दिसणारे पदार्थाचे रंग आणि आकार हे धर्म; नेत्रा ह्या इंद्रियाचा विषय. ५ नमुना; विशेष मासला; ठराविक ठेवण; विशिष्ट घडण; अवस्था; स्थिति. ६ सौंदर्य; शोभा; तेज; पाणी; भूषण; शोभादायक गुण; बांधेसूदपणा. 'हें काम असें कीं मनुष्यानें जीव देऊन केलें तरी रूप यायचें नाहीं.' ७ मूळ धर्मं; स्वभाव; गुणधर्म; मूळ अवस्था. ८ (व्याकरण) नामाचें अगर धातूचें प्रत्यय इ॰ लावून सिद्ध झालेलें स्वरूप, स्थिति. ९ (व्याकरण) कोणताहि धातु विधि अगर निषेध या अर्थी चालविला असतां त्याचें होणारें रूपांतर. रूपें दोन आहेत-करण- रूप व अकरणरूप. १० तादात्म्य; प्रतिबिंब; सोंग; सारखेपणा; वेष. उदा॰ पितृरूप; पिशाचरूप; वायुरूप; अलंकाररूप. इ॰ ११ (गणित) एक ह्या संख्येची संज्ञा; बीजगणितांत व्यक्त संख्या. १२ एक परिमाण दुसर्या परिमाणांत नेलें असतां होणारा बदल. उदा॰ अडीव रुपयांचें आण्यांचे रूप चाळीस आणे. १३ (वेद्यक) निदानाचा दुसरा प्रकार. १४ एखाद्या कामाचा श्रेयस्कर किंवा प्रशसनीय परिमाण; चीज; फलद्रूपता. 'कृतघ्नाची नोकरी कर- ण्याचें रूप होत नाहीं.' -पु. चंगकांचनी गंजिफांतील सातवा रंग. [सं.] (वाप्र.) ॰करणें-सांगणें; निरूपण करणें; वर्णन करणें. 'जरी प्रज्ञेचेनि आथिलेपणें । श्रीगुरुसामर्थ्या रूप करूं म्हणे ।' -ज्ञा १०.१४. ॰पालटणें-१ आकार बदलणें; निराळी आकृति घेणें; वेश बदलणें. 'असो वानररूप पालटोनि । अणुप्रमाण वेष धरोनि ।' -रावि २९.१०१. २ तोंडवळा; रंग, वर्ण, वेष, सोंग इ॰ बदलणें; चेहरा बदलणें. ॰होणें-एखाद्या कामाचा सुपरिणाम होणें; चीज होणें; श्रेय मिळणें; फलदायी होणें. 'जीव देऊन काम करूं द्या पण त्या कामाचें रूप व्हावयाचें नाहीं.' रूपास- येणें-आकार येणें, उपन्न होणें; नांवारूपास येणें; चांगल्या स्थिती- प्रत येणें; चांगले गुण येऊं लागणें. 'कां इक्षुदंड गाळितां साचार । तयासि सायास लागती फार । सेवटीं रूपास येतां साखर । चवी खाणार जाणती ।' सामाशब्द- ॰कार-न. मूर्ति; प्रतिमा; प्रतीक. -ख्रिपु. ॰बेरूप-न. चांगलें किंवा वाईट रूप. [सं. रूप + विरूप] ॰रंग-पु. बाह्य देखावा; सामान्य स्वरूप; आकृति आणि रंग. रंगरूप पहा. 'रूपरंग चातुर्यकला पाहुनि झालों खुशी ।' ॰रत्नपरीक्षा-स्त्री. नाणीं आणि रत्नें यांची परीक्षा; चौसष्ट- कलांपैकीं ही एक कला आहे. ॰रेखा-षा-स्त्री. १ बाह्य देखावा; बाह्य मर्यादा. २ घाट; आंगलट; घटना; बांधा. ३ आराखडा; कच्चा नकाशा. ॰लावण्य-न. आकाराचें किंवा बांध्याचें सौंदर्य; आकार, चेहरा व ठेवण यांचा मोहकपणा; देखणेपणा. बांधेसूदपणा. ॰लिपी-स्त्री. सारणी; सूत्र. -साठे, रासायनिक परिभाषा (इं.) फॉर्म्युला. ॰वती-स्त्री. सुंदर स्त्री; देखणी स्त्री. [सं.] ॰वान्-वि. १ सुंदर; देखणा; चांगल्या बांध्याचा. २ रूप असलेला; आकृति असलेला; आकारयुक्त. [सं.] ॰विकार-पु. एका रूपांतून दुसर्या रूपांत जाणें; रूपांतर; अवस्थांतर. उदा॰ बेडूक मूळचा जलविहारी. परंतु स्थलविहारी होऊन हवेचें श्वासो- च्छ्वसन करूं लागला. या रूपांतरास रूपविकार म्हणतात. -प्राणिमो ७६. रूपांतर-न. १ अन्य रूप; दुसरें स्वरूप; नवें स्वरूप. २ फरक; बदल. [रूप + अंतर] रूपाभिमान-पु. सौंदर्याचा अभिमान; देखणेपणाबद्दलचा गर्व. [रूप + अभिमान] रूपावलि- ळी-स्त्री. नामें किंवा क्रियापदें यांचीं प्रत्यय लावल्यानंतर होणारीं रूपें दिलेलें पुस्तक. [रूप + आवलि] रूपडें-न. १ (काव्य) सुंदर रूप; गोजिरवाणें रूप; रूप; मूर्ति; मोहक मुख. 'सांवळें रूपडें चोरटें चित्ताचें । उभें पंढंरीचें विटेवरी ।' -तुगा २६३०. २ मुखवटा; मुखटोप; बुरखा. रूपस-न. स्वरूप; सौंदर्य. -वि. (काव्य) चांगल्या आकाराचा; सुंदर; रूपवान्; नीट नेटका; सुरेख; शोभिवंत; देखणा. 'कुष्टी उपहासे रूपसा ।' -मुसभा १५.२७५. रूपी-वि. रूप घेतलेला; त्यासारखा; एखाद्याची आकृति धारण केलेला. समासांत पिशाचरूपी, देवरूपी, दैत्यरूपी. रूपिणी-स्त्री. रूप घेतलेली. 'प्रणवरूपिणी मूळप्रकृति ।'
प्राण
पु. १ देहांतील पांच वायु; प्राण, अपान, व्यान, उदान व समान. २ शरीरांतील पांच वायूंपैकीं पहिला; हृदयांतील वायु. 'तैसी प्राणजयें कर्मेंद्रिया । खुंटे गती ।' -ज्ञा १६.१८३. ३ एक बेचव, रंगहीन व वासरहित वायु. ह्याचें अस्तित्व हवेंत, पाण्यांत कित्येक खनिज पदार्थांत व सेंद्रिय वस्तूंत असते. हा वायु सर्व प्राण्यांस व वनस्पतींस अत्यावश्यक आहे. -ज्ञाको (प) २५५. (इं.) ऑक्सिजन. ४. श्वास; फुफ्फुसांत घेतलेली किंवा सोडलेली हवा; उच्छवास. 'प्राण म्हणजे पुढें जाणारा म्हणजे उच्छवास- वायु. -गीर ६७८. ५ वायु; वारा. ६ जीव. ७ (ल.) अत्यंत प्रिय वस्तु. 'महाराजांचा प्राण तर आपण.' -रत्न २.१. अधिक लाक्षणिक अर्थांसाठीं जीव शब्द पहा. ८ (संगीत) तालास लागणारी आवश्यक आणि महत्त्वाची गोष्ट. हे प्राण दहा आहेत-काल, मार्ग, क्रिया, अंग, ग्रह, जाति, कला, लय, यति व प्रस्तार. [सं.] (वाप्र.) ॰असणें-अत्यंत प्रिय असणें. 'दुर्गादेवीची तर ती खरोखर प्राणच होती.' -बिवि ८.१.६. ॰उरणें-केवळ जगणें; कसें तरी जगणें. ॰ओकणें-१ अत्यंत दुःख करणें. २ एखाद्या गोष्टीचा अतिशय छंद असणें. ॰ओवाळून टाकणें-सर्वस्व अर्पण करणें 'चारुदत्ता, या तुझ्या गुणावरून प्राण ओवाळून टाकावे असें वाटतें.' -मृ ४७. ॰काढून ठेवणें-परोपरीनें विनविणें; हट्ट घेणें. 'करंजा घाल म्हणून प्राण काढून ठेविला पण नाहीं हो ऐकिलें.' -कफा ३. ॰खाणें-अतिशय त्रास देणें; त्रासून सोडणें. 'तू... आमचा दोघांचा प्राण खाल्लास.' -नामना १२३. ॰जाणें-मरणें. ॰ठेवणें-एखाद्या गोष्टीवर अंतःकरणपूर्वक प्रेम करणें; जीव कीं प्राण असणें. ॰डोळ्यांत उतरणें-प्राण जाण्याचा प्रसंग येऊन ठेवणें. 'तरु- णाचे प्राण शेवटीं डोळ्यांत उतरण्याचा प्रसंग येतो.' -भावबंधन पृ. २२. ॰देणें-प्राणत्याग करणें; मरणें. ॰न ठेवणें-प्राण देणें; मरणें. 'मी प्राण ठेवणार नाहीं.' ॰फुटणें-अतिशय उत्कंठा असणें; तीव्र इच्छा होणें. 'तैसें देखावें वाटे पाहावया प्राण फटे ।' दावि १५५. ॰वाहणें-एखाद्यासाठीं सर्वस्व अर्पण करणें. 'प्राण वाहिला पायावरी ।' ॰सोखणें-१ तहानेनें व्याकुळ होणें; तहा- नेनें जीव कासावीस होणें. २ एखाद्या गोष्टीचा ध्यास, रुखरुख लागणें; एखाद्या गोष्टीची तीव्र इच्छा धरणें. ॰सोडणें-प्राण देणें; मरणें. प्राणाचा वाली-जीविताचा मालक; प्राणनाथ; नवरा. प्राणापेक्षां कठीण-मरणापेक्षांहि वाईट. प्राणाशीं गांठ-प्राण धोक्यांत पडणें; प्राणसंकट. (क्रि॰ घालणें; पडणें; होणें). म्ह॰ असंगाशीं संग प्राणाशीं गांठ. प्राणाशीं जाणें- (आकस्मिक घाला आल्यामुळें) प्राणास मुकणें. प्राणें उत्तीर्ण होणें-मरणें. 'तेथ उत्तीर्ण होईल प्राणें । परी तें कमळदळ चिरूं नेणें ।' -ज्ञा १.२०२. प्राणें जाणें-प्राण देणें. 'आतां मी जाईन प्राणें । पुत्रविण व्यर्थ जिणें ।' -कथा १.४.१०१. उघड्या डोळ्यानें प्राण न जाणें-आपल्या डोळ्यांसमोर एखाद्या अन्याय होत असतां स्वस्थ न बसवणें. सामाशब्द- ॰खाऊ- वि. (प्राण खाणारा) प्राणावर बेतणारा; प्राण धोक्यांत येईल इतका कष्टप्रद किंवा त्रासदायक; जीवघेणा; प्राणघेणा. [प्राण + खाणें] ॰घात-पु. १ ठार मारणें; प्राणहत्या; हिंसा. २ (ल.) नाश; विध्वंस. ॰घातक-की-वि. जीवनाचा नाश करणारा; जिवावर बेतणारा; जीव धोक्यांत आणणारा; प्राणघेणा. ॰घेणा- वि. १ प्राण घेणारा; जीव घेणारा. २ (ल.) अतिशय लोचट; अतिशय कष्टप्रद (काम, भिकारी इ॰). 'असली प्राणघेणी लढाई कोठें बोलली आहे काय?' -नि ९१३. [प्राण + घेणें] ॰घोष-पु. (कान बंद केले असतां) कानांत होणारा मोठा आवाज. ॰जय- पु. वायूचा निरोध. 'तैसी प्राणजयें कर्मेंद्रियां । कुंठे गति ।' -माज्ञा १६.१८३. ॰जीवन-न. १ जीवनाचा आधार. २ चरितार्थाचें साधन. ३ पति; प्रियकर; जार. ॰तर्पण-न. प्राणांचें समाधान; भुकेची शांति. 'गुरुआज्ञा जें दीधलें अन्न । तेणें प्राणतर्पण करावें ।' -एभा १७.३०८. ॰त्याग-पु. १ प्राण सोडणें; मरणें. २ प्राण देणें; आपल्या प्राणाचें बलिदान करणें. ॰दान-न. एखाद्याला जिवावरच्या संकटांतून सोडविणें. ॰द्यूत-न. (ल.) भयंकर किंवा कजाखीची लढाई. ॰धर्म-पु. भूक व तहान. -हंको. ॰धारण- धारणा-नस्त्री. १ जिवंत राहणें; जगणें. 'आम्ही कंदमूल खाऊन कसें तरी प्राणधारण करितों.' २ (योग.) श्वासाचा निरोध करणें. ३ जीवन. ॰नाथ-पति-प्रिय-प्यारा-पु. पति; नवरा. 'प्राणनाथाचिया आधीं । विरहणींतें जिणेंही बाधी ।' -ज्ञा १८.९२०. २ जार. ॰नाहो-पु. नवरा; पति. 'होवोनि माझा प्राणनाहो ।' -मुआदि १७.१३६. ॰पंचक-न. प्राण, अपान, व्यान, उदान, समान यांचा समुदाय. ॰पूजा-स्त्री. (ल.) जेवण; भोजन. ॰प्रतिष्ठा-स्त्री. १ दक्षिणाचार विधीच्या प्रसंगीं मंत्रादिकांनीं धातु, काष्ठ, पाषाण इत्यादिकांच्या देवतेच्या मूर्तींत प्राणांची स्थापना करण्याचा विधि. हा चक्षुरुन्मीलन विधीबरोबर करितात. २ स्थापना. 'दक्षिणेंत शिवाजीनें मराठी राज्याची प्राणप्रतिष्ठा केली.' ॰मय-वि. पंचप्राणयुक्त; सजीव. ॰मय- कोश-पु. आत्म्याच्या पंचकोशांपैकीं दुसरा कोश. पंचकोश पहा. ॰मित्र-पु. १ नवरा; पति; जार. २ जिवलग मित्र. 'उत्तरेसि वैश्रवण । प्राणमित्र शिवाचा ।' ॰यात्रा-स्त्री. चरितार्थ; उपजीविका. ॰याम-पु. (प्र.) प्राणायाम पहा. ॰रक्षण-न. जीवितरक्षण; जगणें; प्राणधारणा. ॰लिंग-न. गळ्यांत असलेलें महादेवाचें लिंग. -ख्रिपु. ॰वायु-पु. पंचप्राणांपैकीं पहिला वायु; प्राण पहा. ॰वियोग-पु. मरणसमयीं शरीरापासून झालेला प्राणाचा वियोग ॰विसावा-पु. अत्यंत आवडता मनुष्य (पति, जार, मित्र इ॰). 'प्राणाविसाव्याची भेट इच्छितसें ।' -रत्न ४.३. २ प्राणांचें विश्रांतिस्थान. ॰संकट-पु. प्राणघातक; दारुण, संकट; बिकट परिस्थिति. जिवावरची गोष्ट. ॰सखा-पु. प्राणविसावा. ॰संदेह- पु. दारुण परिस्थिति; प्राण जाईल किंवा राहील अशा तर्हेची संशयास्पद स्थिति; प्राणांतिक संकट. ॰सा-वि. (प्राणाप्रमाणें) अत्यंत आवडता. [प्राण + सा = सादृश्यदर्शक प्रत्यय] ॰सांडण- स्त्री. प्राणाची ओवाळणी. 'ऐसीयावरून प्राणसांडण करूं ।' -दावि १०७. [प्राण + सांडणें] प्राणाचा गिर्हाईक-पु. प्राणघातक शत्रू; हाडवैरी. प्राणांत-पु. १ आयुष्याची अखेर. शेवटची अवस्था; आयुष्याचा अखेरचा काल. २ अत्यंत भयंकर संकट. 'लढाईत जाणें हा केवळ प्राणांत आहे.' ३ (समासांत) प्राणांत-जेवण-यातना-व्यथा-समय. ४ जिवावरची गोष्ट प्राणांशीं गांठ. 'थोर प्राणांत वोढवला ।' ५ आयुष्याचा किंवा प्राणाचा शेवट; मृत्यु; मरण. 'मच्छ तळमळति तुटतां जीवन । प्राणांत वोडवे त्यालागोन ।' [प्राण + अंत = शेवट] प्राणांतदंड-पु. देहात- शासन; फांशीची शिक्षा. प्राणांतबुद्धि-स्त्री. धोक्याचा किंवा घातुक सल्ला. (क्रि॰ सांगणें; सुचविणें) प्राणांति(ती)क-न. जीविताचा शेवट; मरणकाल. -वि. घातक; भयप्रद; प्राण घेणारें; अति संकटमय (अजारीपण, संकट इ॰). [प्राणांत] प्राणांतिक अवस्था-स्त्री. मरण येतें कीं काय अशी स्थिति; प्राणसंकट; जिवावरची गोष्ट. प्राणात्यय-पु. १ (प्र.) प्राणनाश. २ (विरू.) प्राणत्याग. प्राणापदी-स्त्री. (महानु.) प्राणसंकट. 'श्रीकृष्णा सांडिता प्राणापदी जाली । ते सांघों नेणिजे ।' -शिशु २३१. [प्राण + आपदा] प्राणायाम-पु. (योग) भूः, भुवः इ॰ सात व्याहृती म्हणून उजव्या नाकपुडीनें श्वास आंत घेणें, पुनः त्या सात व्याहृती म्हणून श्वास कोंडून धरणें व पुनः त्या व्याहृती म्हणून डाव्या नाकपुडीनें श्वास बाहेर सोडणें. या तीन क्रियांस कुंभक, पूरक व रेचक असें म्हणतात; श्वासाच्या गतीचा निरोध. 'येई प्राणायामाचेनि आडकंठें । वरौता गा ।' -ज्ञा ६.५५. (द्राविडी)प्राणायाम-पु. प्राणायाम करतांना उजव्या हातानें नाकपुडी धरावयाची असते. त्यासाठीं सरळ, समोरून हात न घेतां डोक्याच्या मागच्या बाजूनें हात नेऊन तो पुढें आणून नाकपुडी धरणें. यावरून (ल.) त्रासयुक्त, आडमार्गानें केलेली कोणतीहि गोष्ट. 'वेताळ पंचविशी हा ग्रंथ मूळचा संस्कृत, त्या भाषेंतून याचा तर्जुमा फारसी भाषें झाला, तींतून इंग्रजींत, इंग्रजीतून मराठींत. केवढा द्राविडी प्राणायाम!' -नि. प्राणायामी-वि. प्राणा- याम करणारा. 'एक अपानु प्राणीं अर्पिती । एक दोहोंतेही निरुं- धिती । ते प्राणायामी म्हणिपती । पंडुकुमरा ।' -ज्ञा ४.१४६. प्राणासन-न. (योग.) उजवी मांडी मोडून व डावा पाय जमिनीवर टेकवून बसणें. उजव्या पायाचीं बोटें डाव्या जांघेंत भरून दावा पाय डाव्या हाताच्या खांद्यावरून काढून तो पाय जमिनीवर टेकणें व हात जमिनीवर टेकणें. -संयोग ३३१. [प्राण + आसन] प्राणाहुति-ती-स्त्री. भोजनाच्या आरंभीं पांच प्राणांना देतात ते पांच किंवा सहा घांस. 'तत्प्राण जाण हरिले निजविक्रमानें । प्राणाहुती मागत पांच अनुक्रमानें ।' -आपू ४०. [प्राण + आहुति] प्राणेश, प्राणेश्वर-पु. १ पति; नवरा. वोखटें मरणाऐसें । तेंही आलें अग्निप्रवेशें । परी प्राणेश्वरोद्देशें ।न गणीची सती ।' -ज्ञा १६.१८७. २ जार; उपपति; प्रियकर. ३ प्रभु; स्वामी; मालक. 'आतां मज जाणें प्राणेश्वरासवें । मी माझिया भावें अनुसरलों ।' -तुगा ६८५. [प्राण + ईश, ईश्वर] प्राणेश्वरी-स्त्री. १ प्रकृति. 'जो प्रियूचि प्राणेश्वरी । उलथे आवडीचिये सरोभरीं ।' अमृ १.२. २ बायको. [प्राण + ईश्वरी] प्राणोत्क्रमण-न. प्राण निघून जाणें; मरण; मृत्यु. [प्राण + उत्क्रमण] प्राणोपासना-स्त्री. उपासनेचा एक प्रकार. 'पुरुष विद्या, पर्यकविद्या, प्राणोपासना इ॰ प्रकारची उपासना उपनिष- दांत वर्णिली आहे.' -गीर २०७. [प्राण + उपासना]
नांव
न. १ नाम अर्थ १, २ पहा. 'नांव तुजें नावचि या संसारांभोधिला तरायासी ।' -भक्तमयूरकेका ४०. २ (ल.) कीर्ति; ख्याती; लौकिक; पत; अब्रू; चांगलें नाम. 'सकल म्हणती नांव राखिले । वडिलांचे ।' -दा ३.४.१४. ३ दुर्लौकिक; डाग; कलंक; बदनामी; दुष्कीर्ति; नापत; (क्रि॰ ठेवणें). ४ भांड्यावर नांव घाल- ण्याचें कासारी हत्यार. -बदलापूर ९६. ५ नवरा बायकोनें उखाणा घालून घ्यावयाचें परस्परांचें नांव (क्रि॰ घेणें). [सं. नाम; हिं. नाओं; जुनें हिं. नाऊं; पं. सिं. नाउं; फ्रेंजि. नव; इं. नेम] (वाप्र.) ॰करणें-कीर्ति गाजविणें. ॰काढणें-नांव गाजविणें; प्रसिद्धीस येणें. ॰काढणें-कुरापत काढणें; कळ लावणें. ॰खारणें- उक्रि. (कों.) नांव घेऊन निर्देश करणें; नांवाचा उल्लेख करणें; नांव घेणें. ॰गांव विचारणें-माहिती विचारणें; सामान्य विचारपूस करणें. ॰जळो-भाजो-नांवास हळद लागो-तळतळाट किंवा शाप देण्याचा वाक्प्रचार. ॰ठेवणें व फोडणें-(बायकी) खेळांत एखाद्या वेळीं दोन मुलींस एकदम शिवल्याचा प्रसंग येतो तेव्हां डाव कोणी घ्यावा ह्याविषयीं तंटा होतो त्यावेळीं त्या दोन्ही मुली एकमेकांच्या संमतीनें नांवें बदलून ठेवतात, मग त्यांतील एखाद्या मुलीस आपलीं नांवें सांगून तीं त्यांतील कुठलें नांव मागेल तें तिला देऊन उरलेल्या नांवाच्या मुलीनें डाव घ्यावयाचा असतो. ॰ठेवणें-१ दोष देणें; व्यंग काढणें. म्ह॰ नांव ठेवी लोकाला शेंबूड आपल्या नाकाला = दुसर्याला ज्या दोषाबद्दल नांवें ठेवावयाचीं तोच स्वतांत असणें. २ जन्मलेल्या मुलाचें नामकरण करणें; ॰डहाळ होणें-(ना.) बदनामी होणें. ॰डाहार करणें-(व.) नांव बद्दू करणें. ॰डालणें-(परदेशी तेली) प्रेताच्या सारवलेल्या जागेवर केळीचें पान ठेवून त्यावर प्रत्येक मनुष्यानें मयताचें नांव घेऊन कालवलेल्या भाताचा घांस ठेवणें. -बदलापूर २६७. ॰धुळींत, मातींत, पाण्यांत इ॰ जाणें, मिळणें, पडणें-नांवावर पाणी घालणें पहा. ॰नको-तिटकारा, चिळस, द्वेष दाखविणारा शब्द. ॰न घेणें-अलिप्त राहणें; अंगांस संसर्ग न लागू देणें; दूर राहणें; नांव न काढणें. ॰नाहीं-नसणें-(विद्या, पैसा इ॰कांचा) पूर्णपणें अभाव असणें; नांव, निशाण, खूण कांहीं नसणें. बदलणें-नामोशी पत्करणें (प्रतिज्ञेच्या वेळीं योजतात). 'अमूक झालें तर नांव बदलून टाकीन.' ॰मिळविणें-वाद- विवाद, लढाई इ॰ मध्यें कीर्ति मिळविणें. ॰सांगणें-लावणें- घालणें-देणें-किंमत, शर्ती ठरविणें. ॰सांगणी-वाङ्निश्चयः कुणब्यांतील वधुवरांचीं व त्यांच्या मात्यापित्यांचीं नांवें जातीच्या सभेमध्यें जाहीर करून लग्न ठरविण्याचा समारंभ. ॰सोडणें- टाकणें-त्याग करणें; संबंध सोडणें; इच्छा न करणें. नांवाचा- १ खरा. 'मी तें काम करीन तरच नांवाचा.' २ नामधारी; केवळ नांवापुरता. 'मी जॉन्सनचा नांवाचा मात्र गुरु होतों, खरोखर पहातां तो माझ्याहून वरचढ होता.' -नि ३ चांगलें नांव लौकिक असलेला. नांवाची बोंब पडणें-वाईट गोष्टीला कारणीभूत होणें किंवा एखाद्या तक्रारीचा विषय होऊन बसणें. नांवानें घागर फोडणें-संबंध तोडणें; मेला असें समजणें. 'तियेचेनि नांवें फोडावी घागरी । नाहीं ते संसारी बहिणी म्हणे ।' -ब ४७० नांवानें पाणी तावणें, तापविणें-एखाद्याचा द्वेष करणें, किंवा मरण चिंतणें. नांवानें पूज्य असणें-पूर्ण अभाव असणें. 'विद्येच्या नांवानें जरी आवळ्या एवढें (पूज्य) म्हणतां येणार नांहीं तरी मासला तोच ।' -मधलीस्थिति. नांवानें बोंब मारणें, शंख करणें, खडे फोडणें-एखाद्या विरुद्ध बोभाटा, ओरड करणें. नांवानें भंडार उधळणें-स्तुति करणें. नांवानें शंख-पूर्ण अभाव असणें. नांवानें हांका मारीत बसणें-दुसर्यानें नुक- सान केलें अशी विनाकारण ओरड करीत सुटणें. नांवावर-१ नांवासाठीं-करितां-मुळें-खातर. २ (जमाखर्च) खात्यावर; नांवें. नांवावर गोवर्या फोडणें-घालणें-रचणें-एखाद्याचें वाईट करणें-चिंतणें; शाप देणें (गोवर्या प्रेतास जाळण्यास लागतात). नांवावर पाणी घालणें-कीर्तीवर पाणी सोडणें; चांगलें नांव, लौकिक बुडविणें. नांवावर विकणें-स्वतःच्या नुस्त्या किंवा दुसर्या-मोठ्याच्या नांवाचा फायदा घेणें, त्यावर नांव, प्रसिद्धि मिळविणें; खपणें. नांवास चढणें-कीर्तिमान होणें; लौकिक वाढणें. नांवास देखील नाहीं-शपथेस किंवा नांव घेण्यास देखील नाहीं. याच्या अगोदर 'ज्याचें नांव' हे शब्द जोडतात म्हणजे त्याचा अर्थ अगदीं मुळींच नाहीं असा होतो. 'यंदा पाऊस ज्यानें नांव पडला नाहीं.' ज्याचें नांव तें-(नांव घेण्यास अयोग्य अथवा अमंगल म्हणून ज्याचें नांव घेतलें नाहीं तो अथवा तें) जें पाहिजे असतें अथवा ज्याची आशा केलेली असते तें कधीं न देणार्या, करणार्या मनुष्य-वस्तू इ॰ संबंधीं योजतात. सामाशब्द- ॰कर-री-वि. १ कीर्तिमान; प्रसिद्ध; नावलौकि- काचा. 'वडिल नांवकर मल्हार ऐका गर्दी झाली त्यावरती ।' -ऐपो ३५८. २ दुसर्याचें नांव धारण करणारा; एकाच नांवाचा दुसरा नामधारी. ॰कुल-वि. (ना.) सगळा; एकूण एक. ॰ग्रहण-न. नांव घेणें; उल्लेख करणें; नामनिर्देश (क्रि॰ करणें; घेणें; काढणें). ॰ग्रहण टाकणें-सोडणें-नांव टाकणें पहा. ॰ग्रहण ठाऊक नसणें-नांवा गांवाची कांहींहि माहिती नसणें. ॰धारक-वि. नामधारक अर्थ २ पहा. ॰नट-वि. क्रिवि. पूर्णपणें नष्ट झालेला; बेचिराख झालेला; थांग, पत्ता, माग, खुण, अवशेष नसलेला. 'त्याची गाय गुराख्यानें नांवनट केली.' [नांव + नष्ट] ॰नांगर-पु. पेरणीच्या वेळीं प्रथम नांगर धरण्याचा व निवाड- पत्रांत निशाण्या करतांना प्रथम नांगराची निशाणी करण्याचा पाटील अथवा देशमूख यांचा मान. ॰नांव-वि. (ना.) नावकुल पहा. सबंध सगळा. ॰निशाण-न. सर्व वृत्तांत (कुल, नांव, गांव इ॰). ॰निशाण ठाऊक असणें-कुलशील परंपरा ठाऊक असणें. ॰निशी-स्त्री. १ नांवांची यादी. २ तींत दाखल केलेलें नांव. 'माझी नांवनिशी काढ' [नांव + फा. नविशी] ॰निशीवार- क्रिवि. नांवा बरहुकूम; नांवनिशींतील नांवांच्या अनुक्रमानें. (क्रि॰ घेणें; मागणें). ॰नेम-१ (फलज्यो.) नांवावरून राशी, गण, नक्षत्र इ॰कांची माहिती काढणें. २ अशी काढलेली माहिती. ॰बुडव्या-वि. स्वतःचा लौकिक, पत, किंमत घालविणारा (मनुष्य वस्तु). ॰र(रा)स-स्त्री. १ (फलज्यो.) जन्मकालीन नक्षत्राव- रून नांव ठेवणें किंवा व्यावहारिक नांवावरून नक्षत्रनाम काढणें. 'मग बोलाविले ज्योतिषी । भूमी पाहिली चौरासी । तव दक्षा- चिया नावरासी । घातचंद्र ।' -कथा ३.१०.९९. २ अशा तर्हेनें काढलेलें नांव, कुंडली इ॰ (क्रि॰ काढणें). ३ जन्मनक्षत्रावरून पहावयाचें वधूवरांचें राशी घटित; नांवावरून लग्न जमविणें. (क्रि॰ काढणें; पाहणें; ठरविणें). ॰राशीस येणें, उतरणें, जमणें- मिळणें-नांवांवरून वधूवरांचा घटित विचार केला असतां अनुकूलता येणें, कुंडलींवरून लग्न जमणे. [नांव + राशि] ॰रूपन. १ कीर्ति; अब्रू; पत. नांव अर्थ २ पहा. 'त्यानें त्या लढाईमध्यें नांवरूप मिळविलें.' 'माझें लपो असतेपण । नांवरूपाशीं पडो खंडन ।' २ सार्थक; योग्यस्थानीं विनियोग. 'विद्वानास पुस्तक दिलें असतां त्याचें नांवरूप होतें.' ३ नांव आणि आकार; व्यक्तित्व; स्वतंत्र, वेगळें अस्तित्व. 'जैसें समुद्रास मिळतां गंगेचें आप । तात्काळ निरसे नांवरूप ।' नांवलौकिक-पु. प्रसिद्धिः मोठेपणा; कीर्ति; ख्याति. ॰वार-क्रिवि. नांवाबरहुकूम; नांवनिशीवार पहा. ॰सकी-स्त्री. (कु) लौकिक; कीर्ति; प्रसिद्धि. ॰सता-वि. (कु.) प्रसिद्ध; नांवाजलेला; कीर्तीचा (चांगल्या व वाईट अशा दोन्ही अर्थीं योजतात). नांवानिराळा-वि. अलिप्त; अलग (वाईट नांवापासून); स्वतंत्र; विरहित. 'हा सर्व करून नांवानिराळा.' नांवारूपास आणणें-येणें-प्रसिद्धीस-मान्यतेस आणणें- येणें. नांवें-(जमाखर्च) खर्चाची बाजू; नांवानें; खर्चीं; खर्चाकडे. नांवावर पहा.
सर्व
वि. १. सगळा; सगळे भाग मिळून; सारी रास, संख्या, प्रमाण. २ प्रत्येकजण मिळून; सगळा गट; जमाव; समूह. ३ सगळा काल, अवधि, विस्तार वगैरे. ४ पूर्ण; संपूर्ण; अवघा; पुरता; परिपूर्ण; सबंध; न वगळतां पूर्णांश. [सं. सर्; प्रा. सब्ब; सिं. सभु; पं. सभ; हि. सब. सं. षर्द् = जाणे] ॰कर्ता-वि. सगळें करणारा; उत्पत्तिकर्ता; सगळें बनविणारा; अवघ्याची रचना करणारा. ॰काल-क्रिवि. १ सगळा वेळभर; सर्व अवधि संपेपर्यंत; सर्व वेळीं; विवक्षित सगळा कालभर. २ सतत; नेहमीं; सर्वदा; सदोदित. ॰कालीन-वि. शाश्वत; सर्वकाल टिकणारें. ॰खपी-वि. १ ज्याच्या ठिकाणीं कोणत्याहि वस्तूचा उपयोगी अथवा निरुपयोगी, अवश्य अथवा अनवश्यक अशा सर्व वस्तूंचा खप होतो असा. २ ज्याला कोणतीहि, कसलीहि वस्तु चालते असा. ३ सर्वांकरितां खपणारा, काम करणारा; कोणा- साठींहि परिश्रम करण्यास तयार असा. ॰गत-वि. सर्वव्यापक; सर्वव्यापी; सर्व ठिकाणीं ज्याचें अस्तित्व, वास्तव्य आहे असा. 'चैतन्य आहे सर्वगत । तें तत्त्वज्ञ संत । स्वीकारिती ।' -ज्ञा २. १२६. ॰गामी-वि. सर्वव्यापक; सर्वत्र ज्याचें गमन आहे असा; सगळीकडे जाणारा. ॰गुणसंपन्न-वि. सगळ्या गुणांनीं युक्त; सर्व तऱ्हेनें पूर्ण; सर्व चांगल्या गुणांचें अधिष्ठान. ॰जनीन-वि. सार्वजनिक; सर्व लोकांसंबंधी. ॰जाण-वि. सर्वज्ञ; सगळें ज्ञान असणारा; सर्व जाणणारा. 'काय पूजातें मी नेणें । जाणावें जी सर्व जाणें ।' -तुगा ११५८. ॰जित् वि. १ सर्व जिंकणारा; सर्वांचें दमन करणारा; सर्वांस ताब्यांत ठेवाणारा. २ सर्वांहून श्रेष्ठ; वरिष्ठ. ॰त:-क्रिवि. १ सर्व दिशांनीं; सगळीकडे; सर्व बाजूंनीं; दशदिशां. २ सर्वत्र; पूर्णपणें; विश्वभर. ॰तंत्रस्वतंत्र-वि. अनिर्बंध; स्वैर. 'अशा अघांत्री व सर्व- तंत्रस्वतंत्र लोकांनीं हिंदु महासभेच्या निर्णयाकडे पाहून नाकें मुरडावीं यांत आश्चर्य नाहीं.' -सांस २.१६४. ॰तीर्थ-पु. समुद्र; सागर. 'गंगा न सांडितां जैसा । सर्वतार्थ सहवासा । वरपडा जाला ।' -ज्ञा १८.९०९. ॰तोभद्र-पुन. १ देवता स्थापनेसाठीं एक विशिष्ट मंडल काढतात तें. २ चारी दिशांस द्वारें असलेला प्रासाद, राजवाडा, मंदिर. 'रेखिलीं परिकरें । सपुरें सर्वतो- भद्रें ।'-ऋ ७३. ३ सैन्यरचनेचा एक प्रकार; एक विशिष्ट व्यूह. ४ अनेक प्रश्नांस एकच उत्तर योग्य असतें असें कोंडें, कूट. ५ एक प्रकारचें चित्रकाव्य; कोणत्याहि दिशेनें वाचलें तरी एकच प्रकारचा श्लोक व अर्थ येईल अशी रचना. ॰तोमुखपु. एक सोम- याग, यज्ञ. -वि. सर्व बाजूंनीं तोंड असलेला; कोणत्याहि वाजूनें पाहिलें तरी समोर तोंड येईल असा (देवता, पाणी, आकाश, गोल). ॰त्र-क्रिवि. सर्व ठिकाणीं, स्थळीं, जागीं; सगळीकडे; सर्व दिशांस. 'ईश्वर सर्वत्र आहे.' -वि प्रत्येक; सगळे; सर्व. 'सर्वत्रांस दक्षिणा दिली.' ॰था-क्रिवि. सर्व बाजूंनीं; सर्व मार्गांनीं, दिशांनीं; सर्व उपायांनीं; पूर्णपणें; मुळींच; नि:शेष; निश्चित; खचित; केव्हांहि. 'मज आपणपें सर्वथा नाहीं । मन बुद्धिठायीं । स्थिर नोहे ।' -ज्ञा १.१९५. 'मना सर्वथा पापबुद्धि नको रे ।' -राम ॰थैव-क्रिवि. केव्हांहि; सर्व प्रकारें, दिशांनीं, बाजूंनीं. ॰दर्शी-द्रष्टा-वि. सर्वसाक्षी; सर्व पाहणारा; ज्यास सगळें दिसतें असा. ॰दा-क्रिवि. नेहमीं; सतत; सर्वकाळीं. ॰दु:खक्षय-पु. सर्व दु:खांपासून मुत्त्कता; मोक्ष. ॰धन-न. (गणित) श्रेढींतील सर्व पदांची बेरीज. -छअं १७३. ॰नाम-न. (व्या.) स्वत: विशिष्टार्थद्योतक नसतां पूर्वापरसंबंधानें कोणत्याहि नामाबद्दल योजतां येतो असा शव्द. ॰नियंता-वि. सर्वांवर ताबा चालविणारा; सर्वांचें नियमन करणारा. ॰न्यास-पु. सर्वसंगपरित्याग; सर्वधन, कुटुंब, आप्तेष्ट, संसार वगैरे सर्व गोष्टी सोडून देणें; सर्व ऐहिक गोष्टी टाकून देणें, त्यांपासून अलिप्तता, मुक्तता. ॰पाक-पु. खीर; क्षीर. ॰पित्री अमावास्या-स्त्री. भाद्रपद महिन्यांतील अमावास्या (या दिवशीं सर्व पितरांचें श्राद्ध करितात यावरून). ॰प्रायश्चित-न. सर्व पातकांबद्दल एकाच वेळीं घ्यावयाचें प्रायश्चित्त; सर्व पापांचें परिमार्जन, क्षालन; सर्व दोषां- पासून मुत्त्कता. 'सर्वप्रायश्चित्त घेण्याचा त्यांनीं जो निश्चय केला ...' -आगर ३.१३५. ॰प्रिय-वि. सर्वांचा आवडता; लोकप्रिय; विश्वमित्र. ॰ब्रह्मी-वि. सर्व विश्व ब्रह्मरूप आहे जसें केवळ तोंडानें बोलून एकंकार करणारा आचारभ्रष्ट. 'लेकुरें सर्व ब्रह्मी झालीं.' -सप्र १९.४०. ॰भक्ष-भक्षक-भोत्त्का- वि. वाटेल तें खाणारा; खाण्याच्या कामीं कोणताहि निर्बंध न पाळणारा; स्वच्छ अस्वच्छ, भक्ष्य, अभक्ष्य न पहातां अघोरी- पणें खाणारा. अग्नि, शेळी, कावळा वगैरेसहि हा शव्द लावतात. ॰भांवें-क्रिवि. काया-वाचा-मनें करून; सर्व भावयुक्त. 'तैसा स्त्रीदेहीं जो जीवें । पडोनिया सर्वभावें ।' -ज्ञा १३.७९०. 'जगीं वंद्य तें सर्वभावें करावें' -राम ॰भूतभूतांतर-वि. सर्व वस्तूंच्या ठिकाणीं वास करणारा; सर्वव्यापी; विश्वव्यापीं; विश्वव्यापक (ईश्वर). ॰मय-वि. सर्वव्यापी; सर्वगत (ईश्वर). ॰मान्य-वि. सर्वांस संमत, पसंत, कबूल. ॰मान्य-मान्य इनाम-न. सर्व कर माफ असलेलें इनाम; सर्वांना कबूल असें इनाम; गांवसंवंधीं इनाम; याबद्दल सनद नसते. ॰राष्ट्रीय कायदा-पु. राष्ट्रांराष्ट्रांतील व्यवहार नियंत्रण करणारा नियम. ॰रूप-रूपी-वि. सर्वव्यापी; सर्वांचें स्वरूप आहे असा; विश्वरूपी (ईश्वर) 'अनादि अविकृतु । सर्वरूप ।' -ज्ञा २.१५०. ॰लिंगी- पु. कोणताहि विशिष्ट पंथ न अनुसरणारा बैरागी. ॰वल्लभा-स्त्री. वेश्या; वारांगना. ॰विध-क्रिवि. सर्वप्रकारें. ॰वेत्ता-वेदी-वि. सर्वज्ञ; सर्वसाक्षी; त्रिकालज्ञ. ॰वेषी-वि. बहुरूपी; अनेक प्रका- रचे वेष धारण करणारा. ॰व्यापक-व्यापी-वि. सर्वत्र असणारा; विश्वव्यापी; सर्वत्र भासणारा. ॰व्रणपु. गळूं; करट. ॰श:-क्रिवि. सर्व दिशांनीं, बाजूंनीं, मार्गांनीं, रीतीनीं; पूर्णपणें; निखालस; दरोबस्त; नि:शेष. ॰शाक-ख-स्त्री. १ अनेक प्रकारच्या भाज्या एकत्र करून केलेली भाजी. २ आलें. ॰शास्ता-वि. सर्वांवर सत्ता, अधिकार गाजविणारा. ॰शोधी-वि. सर्वोचें निरी क्षण करणारा; सर्व वस्तूंची परीक्षा घेणारा; जिज्ञासु; चिकित्सक; परीक्षक; शोधक. ॰संगपरित्याग-पु. सर्वसंन्यास; सर्व ऐहिक वस्तूंचा त्याग; पूर्ण वैराग्य, विरक्ति. ॰संग्रह-पु. सर्व वस्तूंचा साठा, संचय; संकीर्ण, मिश्र संचय. ॰सपाट-क्रिवि. अभेद; सर्वत्र सम स्थिति; मोकळें. 'आत्मा नसतां सर्व सपाट चहूंकडे ।' -दा १६.८.१०. ॰संमत-वि. सर्व मान्य; सर्वांस पसंत, कबूल असलेलें. ॰समर्थ-वि. सर्वशक्तिमान; सर्वसत्ताधारी; सर्वा- धिकारी. ॰सह-वि. सर्व सहन करणारा; सर्व गोष्टींचा भार वाहणारा. ॰सहवर्तमान-वि. सर्वांसह; सर्वांस बरोबर घेतलेला; सर्वांनी युक्त. ॰साधन-न. सर्व गोष्टींची सिद्धता; सर्व गोष्टी घडवून आणणें; सर्व कार्यें साधणें, करणें, बनाव बनविणें. ॰साधन- साधनी-वि. सर्व गोष्टी साधणारा, सिद्ध करणारा, घडवून आणणारा. ॰साधारण-सामान्य-वि. सर्वांस लागू होणारा; सर्वांस सम असा; सर्वांचा समावेश करणारा. 'मला नाहीं तुमचे सर्वसामान्य सिद्धांत समजत.' -सुदे ३७. ॰साक्षी- वि. सर्व पाहणारा; सर्व भूतांच्या ठायीं असणारा; ज्यास सर्व दिसतें असा (ईश्वर). 'नसेन दिसलों कसा नयन सर्वसाक्षी रवि ।' -केका ४. ॰सिद्ध-वि. सर्व परिपूर्ण; (सर्व गुणादि- कांनीं युक्त; सर्व लक्षणांनीं युक्त; संपूर्ण; सर्वांग परिपूर्ण (ईश्वर). ॰सिद्धि-स्त्री. सर्व इच्छांची पूर्ति; सर्वकाम पूर्ति. ॰सिद्धार्थ- वि. सर्व इच्छापूर्ति झालेला; सर्व हेतु साध्य झालेला. ॰सुखा- नंद-वि. सर्व सुख व आनंद प्राप्त झालेला; सुखांचा आनंद ज्याच्या ठिकाणीं आहे असा (ईश्वर). ॰सोंवळा-वि. १ नेहमींचा शुद्ध, सोंवळा, पवित्र. जन्मसोंवळा (एखादा मनुष्य स्नान न करतांच सोंवळें नेसला असतां त्यास उपरोधिकपणें म्हणतात). २ नेहमींच पवित्र, शुद्ध, सोंवळें असलेलें (रेशमी वस्त्र, धाबळी वगैरे) (हीं कधीं न धुतलीं तरी सोंवळीं मानण्यांत येतात यावरून). ॰स्पर्शी-वि व्यापक; सर्वांचा समावेशक. 'एकंदर ठराव सर्वस्पर्शी समाधानका- रक केला.' -केले १.३०९. ॰स्व-न. १ सर्व धन; सर्वसंपत्ति; सर्व मालमत्ता, चीजवस्त वगैरे; स्वत:च्या मालकीचें सर्व. 'सर्वस्व हारवावें की जिकावें न भीरु तूं पण हो.' -मोसभा ६.९५. २ तन, मन, धन; 'तैसें सर्वस्वें कर्म अनुष्ठी । परि फळ न सुखे दिठी ।' -ज्ञा १८.५९० मी सर्वस्वयां तैसें । सुभटांसी ।' -ज्ञा १.१११. ३ तत्त्वांश; सार; ॰स्वदंड-पु. सर्व संपत्ति जप्त करणें; सर्व मालमत्ता खालसा करणें; सर्व हिरावून घेणें. ॰स्वहर-हर्ता-हारक-हारी-पु. सर्व धन हरण करणारा, घेणारा, लुबाडणारा. ॰स्वहरण-हार-नपु. सर्व संपत्तीची लूट; सर्व धन हिरावून घेणें; सर्व नाश. ॰स्वामी-पु. १ सर्व बिश्वाचा प्रभू; सर्व सत्ताधारी, जगत्पति; सार्वभौम. २ सर्वस्वाचा मालक, धनि; सर्व वस्तूंचा धनि. ॰स्वीं-स्वें-क्रिवि. १ तनमनधनेंकरून; सर्व वस्तुमात्रासह. २ पूर्णपणें; पुरतेपणीं; एकंदर; अगदीं; सर्व प्रकारें; निखालस. उदा॰ सर्वस्वीं सोदा, लुच्चा, लबाड, हरामी वगैरे. ॰हर- हर्ता-हारक-हारी-वि. सर्व हरण करणारा; लुबाडणारा. ॰हरण-न. संपूर्ण नागवणूक; नाडणूक. ॰ज्ञ-वि. सर्व जाणणारा; त्रिकालज्ञ; पूर्ण ज्ञानी;सर्वसाक्षी; सर्व वेत्ता. 'तुम्हां सर्वज्ञांच्या समाजीं । देयावें अवधान हे माझी । विनवणी सल- गीची ।'-ज्ञा ९.२ सर्वंकष-वि. सर्वांस कसोटीस लावणारा. सर्वाग-न. १ सर्व शरीर; देह; शरीराचे सर्व अवयव. २ सांग- वेद; षडंगसहित वेद. सर्वांगरोग-वात-पु. पक्षघाताप्रमाणें सर्व शरीरास वातविकार होतो तो. -योर १.७५५. सर्वांगा- सन-न. साफ उताणें निजून हात जमीनीवर टेकणें व त्यांवर जोर घेऊन खांद्यापर्यंतचा भाग व पाय वर उचलून ताठ करून स्थिर होणें. -संयो ३५०. सर्वांगीण-वि. सर्व शरीर व्यापणारा; सर्व अंगांसंबंधीं. सर्वांगें-क्रिवि. एकचित्तानें; एकाग्रतेनें. 'जो सर्वांगें श्रोता ।' -दा ७.१.२८. सर्वांची मेहुणी-स्त्री. १ मुरळी; भावीण. २ वेडसर स्त्री. सर्वांतर- वि. सर्वांच्या अंतकरणांत राहणारा. 'मज सर्वांतरानें कल्पिती । अरि मित्र गा ।' -ज्ञा ९.१६६. सर्वांतोडीं-क्रिवि. सर्वां- मुखीं; प्रत्येकाच्या मुखांत; ज्याच्या त्याच्या तोंडांतून. सर्वा- त्मना-क्रिवि. १ मनोभावें करून; अंत:करणपूर्वक; तनमन- धनें करून. 'धन कामासि निजमुख । सर्वात्मना नाहीं देख ।' -एभा २३.४३५. २ पूर्णपणें; सर्वस्वी; निखालस. 'हा सर्वात्मना लबाड आहे.' ३ मुळींच; अगदीं; केव्हांहि; कोण- त्याहि तऱ्हेनें; साफ (नाहीं-निषेधार्थक शब्दाबरोवर उपयोग). 'मजपासून ही गोष्ट सर्वात्मना घडावयाची नाहीं.' -रा ३. ३०१. सर्वात्मा-पु. सर्व प्राणिमात्राच्या ठिकाणीं असलेला जीवात्मा, चैतन्य, (ईश्वर). सर्वाथाई-क्रिवि. सर्वथा (अप- भ्रंश). 'अशा पुण्यरूपें नृप न सोडी भोग सर्वाथाई ।' -ऐपो ४०९. सर्वाधिकार-पु. पूर्ण सत्ता; सर्वांवर सत्ता, ताबा, वर्चस्व. सर्वाधिकारी-पु. प्रमुख; मुख्य; सर्वासत्ताधीश; (म्हैसूरच्या राजाचा हैदरपूर्वी मुख्य प्रधान). सर्वांधीत- वि. सर्व अध्ययन झालेला; सर्व विषय शिकलेला; निष्णात. -शिदि ११८. सर्वानुभूति-स्त्री. सर्व जगाचा, अनेक प्रका- रचा, अनेक गोष्टींचा अनुभव. सर्वान्नभक्षक-भक्षी-भोजी- वि. १ वाटेल तें खाणारा; सर्व प्रकारचें अन्न ज्यास चालतें असा. २ अधाशी; अधोरी. सर्वाबद्ध-वि. सर्व तऱ्हेनें स्वतंत्र; मोकाट; स्वैर; पूर्ण स्वतंत्र; असंबद्ध; नियमांनीं बद्ध नव्हे असे; विसंगत; (मनुष्य, चाल, वागणूक, कार्य, काव्य, भाषण वगैरे). सर्वांर्थीं-वि. सर्व वस्तूंची इच्छा करणारा; लोभी; महत्त्वाकांक्षी वगैरे. सर्वार्थी, सर्वार्थें-क्रिवि. सर्व प्रकारामें; सर्वस्वी; हरतऱ्हेनें; प्रत्येक दृष्टीनें 'वैश्य व्यव- सायांत जाण । दिसतो निपुण सर्वार्थीं ।' सर्वाभ्य-वि. क्रिवि. सर्व प्रकारें; सर्व तऱ्हेचा; सर्व कामांतील. 'सर्वाभ्य कारभारी.' -चित्र २. सर्वारिष्ट-न. सर्व जगावरील सामान्य संकट; सर्वसामान्य पीडा; अनेक लोकांस बाधक किंवा अनेक प्रका- रचें संकट, पीडा, बाधा. सर्वांशिक, सर्वांशी-वि. सर्व भागांशीं संबंध असलेलें; एकदेशीयाच्या उलट. सर्वांशीं- क्रिवि. पूर्णपणें; सर्व प्रकारें; सर्व तऱ्हेनें. सर्वाशीं संपूर्ण, सर्वावयवीं संपूर्ण-वि. सर्व विभागांनीं, अवयवांनीं युक्त; परिपूर्ण; सबंध. सर्वाशुद्ध-वि. अनेक अशुद्धें असलेला; सर्वं प्रकारें दोषयुक्त; चुक्यांनीं भरलेला (ग्रंथ वगैरे). सर्वीय- वि. सर्वांचा; सर्वाशीं संबंध असलेला; सगळ्यांचा; विश्वाचा; जागतिक. सर्वें-नअव. सगळीं. 'दु:ख भोगिलें आपुलें जीवें । तेथें कैचिं होतीं सर्वें ।' -दा ३.१०.४४. सर्वेश, सर्वे- श्वर-पु. १ परमेश्वर; जगदीश. 'तया स्वधर्मी सर्वेश्वरीं । न भजेल जो ।' -ज्ञा ३.१०४. २ सम्राट; सार्वभौम; सर्वाधीश. सर्वेश्वर(री)वाद-पु. विश्वांत सर्वत्र परमेश्वर भरलेला आहे असें मत. (इं.) पॅन थीइझम्. सर्वै-क्रिवि. सर्वहि; पूर्णपणें; सर्वस्वीं. 'अकस्मात तै राज्य सर्वै बुडालें ।' -राम. सर्वो- त्कर्ष-वि. अत्यंत महत्त्वाचें; सर्वोत्तम. 'सांप्रत हे येश आगाध भ्रीनें आपले पदरीं सर्वोत्कर्ष घातलें.' -पेद ३.१८१. सर्वोत्कृष्टवि. १ अत्युत्तम; सर्वोत्तम; सर्वश्रेष्ठ (ईश्वर). २ सत्य; न्याय्य; रास्त. सर्वोपकार-पु. सर्वांचें कल्याण; सर्वावर केलेले उपकार; जमदुपकार सर्वोपकरी-वि. जगास कल्याणकारक: सर्वांस उपकारक लाभदायक. सर्वोपयोगी- वि. सर्व कार्यांस उपयुक्त; कोणत्याहि कामास उपयोगी. सर्वोपरी-क्रिवि. सर्व प्रकारानीं; सर्व रातीनीं; सर्व पद्धतीनीं; सर्व तऱ्हानीं. [सर्व + परी] 'समर्थ जाणोनि सर्वोपरी ।' -मुआदि ३३. २ सर्वोपरी-वि सर्वश्रेष्ठ; वरिष्ठ; उत्कृष्ट; उत्तम. 'शिखराथिलियां सर्वोपरी । मेरु तो मी ।' ज्ञा १०. २२७. -क्रिवि. श्रेष्ठपणें; वरिष्ठपणें; उत्तम रीतीनें. [सर्व + उपरि] सर्वौषधि-स्त्री. शतावरी; एक वनस्पति. सर्ब्यांस- ला-सनाम द्वि. (अशिष्ट) सर्वांचा. 'तो सर्व्यांला मुजरे करतो ।' -ऐपो ४३१.
घर
न. १. राहण्यासाठी बांधलेली जागा; वाडा. २. एका कुटुंबातील (एके ठिकाणी) राहणारी मंडळी; कुटुंब; (सांकेतिक) पुनर्विवाहित स्त्रीला पहिल्या पतीपासून झालेला मुलगा. ३. गृहस्थाश्रमधर्म; संसार; प्रपंच; (ल.) नवरा किंवा बायको. ‘हा जिन्नस घरात दाखवून आणतो.’ –विवि १०·४·७; ‘आमच्या घरांतल्यांनी दादासाहेबांना दारूचें व्यसन लावलें.’ – एकच प्याला. ४. एखाद्या व्यवसायात जुटीने काम करणारी माणसे, मंडळी, संस्था; अडतीची जागा. ५. एखादी वस्तू सुरक्षितपणे ठेवण्यासाठी केलेल धातूचे, लाकडाचे आवरण, वेष्टण, कोश, उदा. चष्म्याचे घर. ६. पेटीतील, टाइपाच्या खणातील कप्पा, खण, खाना. ७. सोंगट्यांच्या, बुद्धिबळाच्या पटावरील, पंचांगातील (प्रत्येक) चौक; चौरस; मोहऱ्याचा मूळचा चौरस; मोहऱ्याचा मारा. ८. (ज्यो.) कुंडलीच्या कोष्टकांतील भावदर्शक स्थान. ९. घराणे; वंश; कुळ. १०. (वर्तमानपत्राचा, पत्रकाचा, कोष्टकाचा) रकाना, सदर : ‘येऊन जाऊन पत्रप्रकाशकास स्वतःचा असा मजकूर दर खेपेस पराकाष्ठा दोन तीन घरें घालणें येतें.’ – नि १५. ११. (मधमाशाचे पोळे वगैरेतील) छिद्र : ‘केळीच्या सोपटाचीं घरें ज्यांनीं पाहिली असतील……..’ – मपु ६·२२५. १२. ठाणे; ठिकाण : ‘कुबल, बांकी घरें । शिवराजाच्या हाता आलीं ।’ – ऐपो ९. [सं. गृह] (वा.) घर आघाडणे – घर जळून खाक होणे. (को.) घर उघडणे – १. लग्न करून संसार थाटणे. २. एखाद्याचे लग्न करून देऊन त्याचा संसार मांडून देणे. घर उभारणे, घर उभे करणे – संसारातील अडचणी दूर करून ते सुरळीत चालू करणे. घर करणे – १. बिऱ्हाड करणे; राहण्यास जागा घेऊन तीत जेवणखाण इ. गोष्टी करायला लागणे. २. (त्रासदायक वस्तूंनी) ठाणे देणे; राहणे; वास्तव्य करणे : ‘माझ्या हृदयांत घर करून बसून त्याने मला घायाळ केलें.’ – बाय ३·३. घर खाली असणे – १. घर मोकळे असणे. २. घरातील पुरुषमनुष्य मृत्यू पावणे : ‘कासीबा देशपांडे यांचा घर खालीं होता. त्याची बायको तिसी कासीबा देशपांड्या गेला.’ – ऐसंसाखं ४·१०७. घर खाली करणे – घर सोडून जाणे; घर मोकळे करून देणे. घर घालणे – (एखाद्याच्या) घराचा नाश करणे. घर घेणे – १. (सामा.) लुबाडणे; लुटणे; नागविणे; बुचाडणे : ‘मग रेणुकेनें बोलिलें । अहो जेऊनि कैसें घेतलें ।’ – कापु २३¿४०. २. (एखाद्याचा) नाश करणे : ‘म्हणती जन्मोनि द्रौपदीनें । आमचें घर घेतलें तिणें ।’ – जै ७१¿९९. ३. (त्रासदायक वस्तू) घर करून बसणे, ठाणे देऊन बसणे. पहा : घर करणे २. घर चालविणे – प्रपंचाची, संसाराची जबाबदारी वाहणे. घर जोडणे – इतर घराण्यांशी, जातींशी, लोकांशी इ. मैत्री, शरीरसंबंध घडवून आणणे; मोठा संबंध, सलोखा उत्पन्न करणे : ‘लक्ष्मीपतीचें घर थोर जोडे ।’ –सारुह २¿१. घर डोक्यावर घेणे – आरडाओरड करून घर दणाणून सोडणे; घरात दांडगाई, कलकलाट, दंगामस्ती करणे. घर तुटणे – मैत्रीचा, नात्याचा संबंध नाहीसा होणे; स्नेहात बिघाड होणे. दुसऱ्याचे घर दाखवणे – १. आपल्या घरी कोणी त्रासदायक मनुष्य आला असता काही युक्तीने त्याला दुसऱ्याच्या घरी लावून देऊन आपला त्रास चुकविणे; (एखाद्याची) ब्याद, पीडा टाळणे. २. घालवून देणे; घराबाहेर काढणे. घर धरणे – १. घरात बसून राहणे; घराच्या बाहेर न पडणे, संकटाच्या, दंगलीच्या वेळी पळून जाणे, पळ काढणे, गुंगारा देणे. २. (रोग इत्यादींनी शरीरावर) अंमल बसविणे; एखादा आजार पक्केपणाने जडणे. ३. चिकटून राहणे; चंचलपणा न करता एकाच ठिकाणी भिस्त ठेवून असणे. ४. (बुद्धिबळात, सोंगट्यात) सोंगटी एकाच घरात ठेवून घर अडविणे. घर धुणे, घर धुऊन नेणे – एखाद्याचे असेल नसेल ते लबाडीने गिळंकृत करणे; हिरावून नेणे; नागविणे; बुचाडणे; लुबाडणे; लुटणे; अगदी नंगा करणे : ‘शंभर वर्षांनी घर धुऊन नेल्यानंतर ही ओळख आम्हांस पटूं लागली आहे.’ –टिव्या. घर निघणे – नवऱ्याला सोडून दुसऱ्या मनुष्याबरोबर नांदणे; दुसऱ्याच्या घरात, कुटुंबात निघून जाणे : ‘माझें घर निघाली.’ – वाडमा २¿२०९. घर नेसविणे – घरावर गवत घालून ते शाकारणे; घर गवत इत्यादिकांनी आच्छादणे; घर शिवणे. घर पाहणे –१. (एखाद्या) घराकडे वक्रदृष्टी करणे; (रोगाचा, मृत्यूचा) घरावर पगडा बसणे; घरात शिरकाव करणे. २. (बायकी) वधूवरांचे योग्य स्थळ निवडणे : ‘सुशील तारेने आपल्या पुण्यबलाच्या साह्याने योग्य घर पाहून….’ – रजपूतकुमारी तारा. ३. घरी जाणे, मुलाबाळांत जाणे. घर पालथे घालणे –हरवलेली वस्तू शोधण्यासाठी घराचा कानाकोपरा धुंडाळणे. घर पुजणे –१. आपले काम करून घेण्यासाठी एखाद्याच्या घरी आर्जवे, खुशामत करण्यास वारंवार जाणे. २. (घरे पुजणे) आपला उद्योग न करता दुसऱ्यांच्या घरी चकरा मारणे. घर फोडणे –१. संसार आटोपणे, आवरणे. २. कुटुंबातील माणसांत फूट पाडणे; घरात वितुष्ट आणणे. ३. घराला भोक पाडून आत (चोरी करण्यासाठी) शिरकाव करून घेणे. घर बसणे –कर्ता मनुष्य नाहीसा झाल्यामुळे, दुर्दैवाच्या घाल्यामुळे कुटुंब विपन्नावस्थेला पोचणे; घरांची वाताहत, दुर्दशा होणे. घर बसविणे –संसार थाटणे; घर मुलाबाळांनी भरून टाकणे. स्त्रीच्या विवाहोत्तर जीवनात या वाक्प्रचाराचा उपयोग करतात. घर बुडणे –१. कुटुंबाची नासाडी, दुर्दशा होणे; कुटुंब धुळीला मिळणे. २. संतती नसल्यामुळे वंशाचा लोप होणे. घर बुडविणे – १. (एखाद्याच्या) कुटुंबाचा विध्वंस करणे; संसाराचा सत्यानाश करणे. २. घराला काळिमा आणणे. घर भरणे – १. दुसऱ्याला बुडवून, त्यांची उपेक्षा करून आपण श्रीमंत बनणे. २. दुसऱ्याचे घर लुटणे व स्वतः गबर होणे. घर भंगणे – कुटुंब मोडणे, विस्कळीत होणे; कुटुंबाला उतरती कळा लागणे; कुटुंबाचा नाश होणे; मंडळीत फूट पडणे. घर मारणे – घर लुटणे. घर मांडणे, थाटणे – (संसारोपयोगी जिन्नसांनी) घर नीटनेटके करणे; घराची सजावट करणे. घर म्हणून ठेवणे – एखादी वस्तू, सामान प्रसंगविशेषी उपयोग पडावी म्हणून संग्रही ठेवणे; प्रत्येक वस्तू जतन करून ठेवणे. घर रिघणे – पहा : घर निघणे. घर लागणे – घर भयाण भासणे. (एखाद्याचा मुलगा अथवा पत्नी वारली असता घरातील भयाण स्थिती वर्णन करताना ह्या वाक्प्रचाराचा उपयोग करतात.) घराचा उंबरठा चढणे – घरात प्रवेश करणे. घराचा खांब, घराचे धारण, घराचे पांघरूण – घरातील कर्ता माणूस; घरातला मुख्य; घरमेढा. घराचा पायगुण –घरामुळे घडणाऱ्या शुभाशुभ गोष्टी; घरातील माणसांची वागणूक, वर्तणूक, वर्तन, शिस्त, घराचे पुण्य पाप. घराचा पायगुणच तसा, घरची खुंटी तशी –कुटुंबातील माणसाची वागण्याची रीत असेल त्याप्रमाणे; एखाद्या कुटुंबातील माणसांची सर्वसाधारण अशा वाईट व्यसनाला, खोडीला, सवयीला उद्देशून म्हणतात. घराचा वासा ओढणे –एखाद्या कामधंद्यासाठी आवश्यक असलेले साधन, वस्तू, गोष्ट नाहीशी करणे; एखाद्या मोठ्या कामातून फार जरुरीचे साधन नाहीसे करणे; अडवणूक करणे. खाल्ल्या घराचे वासे मोजणे –कृतघ्न होणे; केलेला उपकार विसरणे. घरात पैशाचा धूर निघणे, घरात सोन्याचा धूर निघणे –घरची अतिशय श्रीमंती असणे. घराला रामराम ठोकणे –घर सोडून जाणे : ‘आज या घराला रामराम ठोकण्यापेक्षा घटकाभर जुलमाचा रामराम पत्करला.’ –भा ९०. घरावर काट्या घालणे, घरावर गोवरी ठेवणे, घरावर निखारा ठेवणे –एखाद्याच्या कुटुंबाची धूळधाण, बदनामी करणे. घरावर कुत्रे चढविणे – (गोव्याकडे घरावर कुत्रे चढल्यास घर सोडावे लागते यावरून) १. एखाद्याच्या घरात कलागती, भांडणे लावून देणे, तंटे उत्पन्न करणे. २. दुष्टावा करणे; अडचणीत आणणे. घरावर गवत रुजणे –घर ओसाड, उजाड पडणे. घरावर तुळशीपत्र ठेवणे –घरादाराचा त्याग करणे; संसाराबद्दल पूर्णपणे अनासक्त होणे. घरास आग लावणे –एखादे दुष्कृत्य करून घराचा नाश करणे. घरास काटी लागणे –घर उद्ध्वस्त होणे; घरात कोणी न राहणे. घरास काटी लावणे – १. घराच्या भोवती काटे, काटक्या लावून येणे- जाणे बंद करणे. २. घर उजाड, उद्ध्वस्त, ओसाड करणे. घरास येणे – अवस्थेप्रत येणे. घरास हाड बांधणे, घरावर टाहळा टाकणे – (एखाद्याला) वाळीत टाकणे; समाजातून बहिष्कृत करणे; जातीबाहेर टाकणे. घरास राखणे – १. घराचे रक्षण करणारा मनुष्य. २. (ल.) थोडासा संचय, शिल्लक, साठा, संग्रह. घरी बसणे – (एखादा मनुष्य) उद्योगधंदा नसल्यामुळे, सोडून दिल्यामुळे घरी रिकामा असणे; बेकार होणे. घरी पाणी भरणे – (एखादा मनुष्य, गोष्ट) एखाद्याच्या सेवेत तत्पर असणे; त्याला पूर्णपणे वश असणे. घरी बसवणे – अधिकारावरून किंवा कामावरून काढून टाकणे : ‘किचनेरलाही घरी बसविण्याचा त्याचा विचार होता.’ –पम ४०३. घरी येणे – (एखादी स्त्री) विधवा झाल्यामुळे सासरच्या आश्रयाच्या अभावी पितृगृही, माहेरी परत येणे; विधवा होणे : ‘कुटुंब मोठे, दोन बहिणी घरी आलेल्या.’ –मनोरंजन आगरकर अंक.
तोंड
न. १. ज्याने खाता व बोलता येते तो शरीराचा अवयव. २. चेहरा; हनुवटीपासून डोक्यापर्यंत मस्तकाचा दर्शनी भाग. ३. (सामा.) (एखाद्या वस्तूचा) दर्शनी, पुढचा, टोकाचा भाग; समोरील अंग. ४. (फोड, गळू इ.चा) छिद्र पडण्याजोगा, छिद्रासारखा भाग; व्रणाचे मुख. ५. (कुपी, तपेली, लोटी वगैरेंचे) पदार्थ आत घालण्याचे द्वार, मुख. ६. (एखाद्या विषयात, शास्त्रात, गावात, देशात, घरात) शिरकाव होण्याचा मार्ग; प्रवेशद्वार. ७. (ल.) गुरुकिल्ली. उदा. व्याकरण हे भाषेचे तोंड होय. ८. (वारा इ.ची) दिशा, बाजू. ९. धैर्य; दम; उमेद; एखादे कार्य करण्याविषयीची न्यायतः योग्यता. १०. एखाद्या वस्तूचा स्वीकार किंवा विनियोगाचा, उपयोगाचा आरंभ तिच्या ज्या भागाकडून करतात तो भाग. ११. (युद्ध, वादविवाद इ. गोष्टींची) प्रारंभदशा; सुरुवात. १२. (सोनारी धंदा) हातोड्याचा सगळ्यात खालच्या बाजूला अडिश्रीच्या बुडासारखा असणारा भाग. याने ठोकलेला जिन्नस सारखा करून घेतात. १३. (सोनारी धंदा) कांबीला गोल आकार देताना तिची टोके जेथे जुळतात तो भाग. १४. (बुद्धिबळ) डाव सुरू करण्याचा प्रकार; मोहरा. १५. सुरईचे पाणी ओतण्याचे व भरण्याचे तोंड. हे पक्ष्याच्या चोचीप्रमाणे लांब व विविध आकाराचे आढळते. [सं.तुंड] (वा.) तोंड आटोपणे, तोंड सांभाळणे, तोंड आवरणे – जपून बोलणे; बोलण्याला आळा घालणे; अमर्याद भाषण, अभक्ष्यभक्षण यांपासून निवृत्त होणे. तोंड आणणे – (आटापाट्यांचा खेळ) शेवटची पाटी खेळून जाऊन पुन्हा एक एक खेळत येणे; पाणी, लोण आणणे. तोंड आहे की तोबरा – खादाड किंवा बडबड्या माणसाला उद्देशून वापरण्याचा ‘किती खातोस’ ‘किती बोलतोस’ या अर्थाचा वाक्यप्रचार. तोंड आंबट करणे – (एखाद्याने) चेहऱ्यावर असमाधानाचे, निराशेचे भाव आणणे. तोंड उतरणे – (निराशा, आजार इ.ने) चेहरा म्लान होणे, सुकणे, फिका पडणे, निस्तेज होणे. तोंड उष्टे करणे – १. (अन्नाचा) एखाददुसरा घास खाणे. २. ज्या गोष्टीविषयी आपल्याला मुळीच माहीत नाही त्याविषयी बोलणे. तोंड करणे – बडबड, वटपट करणे; उद्धटपणे, निर्लज्जपणे बोलणे. तोंड काटणे – उदयाला येणे; अस्तित्वात येणे. तोंड काळे करणे – (उप.) एखादा ठपका, तोहमत अंगावर आल्यामुळे निघून, पळून जाणे; हातावर तुरी देणे; दृष्टीस न पडणे. तोंड कोरडे पडणे, तोंडचे पाणी पळणे, तोंडचे पाणी उडणे – १. भीतीमुळे चेहरा फिका पडणे; बावरणे; घाबरणे. २ भीतीने घसा सुकणे. तोंड गोड करणे – १. (एखाद्याला) लाच देणे, खूष करणे. २. मेजवानी देणे. तोंड गोरेमोरे होणे – (कोणी रागावले असता, वाईट वाटून) निराशेची, लाजलेपणाची जाणीव चेहऱ्यावर उमटणे. तोंड घालणे – (दोघे बोलत असताना तिसऱ्याने) संबंध नसताना मध्येच बोलणे. तोंड घेऊन येणे – एखाद्याने सोपवलेले काम न करता तसेच परत येणे. तोंड घेणे – बोंबलत सुटणे; ताशेरे झाडणे. तोंड चिघट करनं – वारंवार उपदेश करणे. (झाडी) तोंड चुकविणे – हातून एखादा अपराध घडला असता कोणी रागवेल म्हणून काम टाळण्यासाठी चुकारपणे दृष्टीस न पडणे. तोंड टाकणे – रागातिशयाने अपशब्दांचा वर्षाव करणे; निर्भर्त्सना करणे; खरडपट्टी काढणे; अद्वातद्वा बोलणे. तोंड ठेचणे – तोंडावर मार देऊन गप्प करणे; कह्यात घेणे; गुप्तता राखणे. तोंड तोडणे – एखादी वस्तू मिळवण्यासाठी एखाद्याच्या पाठी लागणे; तोंड वेंगाडणे. (ना.) तोंड दाबणे – लाच देऊन तोंड बंद करणे; एखाद्याला वश, गप्प करणे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार – एखाद्याला तक्रारीचा ब्रही काढू न देता प्रचंड छळ, कोंडमारा करणे. तोंड दिसणे – एखाद्याची केलेली निर्भर्त्सना दुसरी बाजू न कळता लोकांच्या नजरेला येणे व आपणच वाईट ठरणे. तोंड देणे – १. पहा : तोंड घेणे २. २. सैन्याच्या अग्रभागी राहून शत्रूवर हल्ला करणे. ३. (एखाद्याचा) प्रतिपक्षी, शत्रू होऊन राहणे; लढायला सिद्ध होणे. ४. (आट्यापाट्यांचा खेळ) शेवटची पाटी खेळून परत येणाऱ्या गड्याकडे पाटी धरणाराने तोंड फिरविणे. ५. एखाद्या गोष्टीला न भिता त्यातून धैर्याने पार पडण्याची तयारी ठेवणे. तोंड धरणे – १. अन्नसेवन करण्याची तोंडाची शक्ती आजार वगैरे कारणांमुळे नाहीशी होणे. २. एखाद्याची बोलण्याची शक्ती नाहीशी करणे. ३. एखाद्याला आपल्या तावडीत, कबजात आणणे. ४. बोलणे बंद करणे. तोंड धुणे – एखाद्या वस्तूच्या लाभासाठी वाट पाहणे. तोंड धुवून येणे – (उप.) एखाद्याची विनंती कधीही मान्य होणार नाही असे म्हणून फेटाळून लावताना योजण्याचा तिरस्कारदर्शक वाक्यप्रकार. तोंड निपटणे – (आजार, उपवास इ. कारणांनी) गाल खोल जाणे; चेहरा सुकणे. तोंड पडणे – १. सुरुवात होणे. २. (गळू वगैरेला) छिद्र पडणे, फुटणे, वाहू लागणे. तोंड पसरणे, तोंड वेंगाडणे, तोंड विचकणे – १. खिन्नपणाची, केविलवाणी मुद्रा करणे. २. हीनदीनपणाने याचना करणे. तोंड पाघळणे – गुप्त गोष्ट बाहेर फोडणे. तोंड पाडणे – (वादाला, कामाला) सुरुवात करणे. तोंड पाहणे – १. (एखाद्याच्या) आश्रयाची, मदतीची अपेक्षा करून असणे. २. (एखाद्याने) स्वतःच्या शक्तीचा, कर्तृत्वाचा अजमास करणे. ३. बोलणाऱ्याचे आपण नुसते ऐकणे, सांगेल तसे न करता स्वस्थ बसणे. तोंड पाहात बसणे – काय व कसे करावे या विंवचनेत पडणे. तोंड पिटणे – बडबड करणे : ‘तैशी न करी बडबड ।... वृथा तोंड पिटीना ।’ – एभा १०·२३१. तोंड फिरणे – १. आजाराने, पदार्थाच्या अधिक सेवनाने तोंडाची रुची नाहीशी होणे. २. तोंडातून शिव्यांचा वर्षाव होऊ लागणे. तोंड फिरविणे – १. (वितळत असलेला किंवा तापविला जात असलेला धातू इ.ने) रंगामध्ये फरक दाखवणे; रंग पालटणे. २. दुर्लक्ष, अवमान करणे. ३. गतीची दिशा बदलणे; दुसऱ्या दिशेला, माघारे वळणे. तोंड फुटणे – १. फजिती उडणे; पत नाहीशी होणे; नाचक्की होणे; अभिमानाला मोठा धक्का लागण्याजोगा अपमान, शिक्षा होणे. २. सुरुवात होणे (युद्ध, भांडण इ.ला). तोंड बंद करणे, तोंड बांधणे – १. जपून बोलणे. २. (एखाद्याला) लाच देऊन गप्प बसवणे, वश करून घेणे. तोंड बंदावर राखणे – खाण्याला किंवा बोलण्याला आळा घालणे. तोंड बाहेर काढणे – १. राजरोसपणे समाजात हिंडणे. २. फिरण्यासाठी, कामासाठी बाहेर पडणे. तोंड बिघडणे – तोंड बेचव होणे; तोंडाला अरुची उत्पन्न होणे. तोंड भर बोलणे, तोंड भरून बोलणे – भीड, संकोच, भीती न धरता मनमोकळेपणाने भरपूर, अघळपघळ बोलणे. तोंड मागणे – (आट्यापाट्यांचा खेळ) लोण घेऊन परत जाताना पाटीवरील गड्याला आपणाकडे तोंड फिरवायला सांगणे. तोंड माजणे – १. मिष्टान्न खाण्याची चटक लागल्याने साध्या पदार्थाबद्दल अरुची वाटणे. २. शिव्या देण्याची, फटकळपणे बोलण्याची खोड लागणे. तोंड मारनं – १. शब्द देणे. २. आपले म्हणणे सांगणे. तोंड मिचकणे – दात, ओठ खाणे. तोंड येणे – १. तोंडाच्या आतल्या बाजूने त्वचेला फोड येऊन ती हुळहुळी होणे व लाळ गळणे. २. लहान मूल बोलू लागणे. (कर.) तोंड रंगविणे – १. विडा खाऊन ओठ तांबडेलाल करून घेणे. २. एखाद्याने थोबाड थोबाडात मारून रंगवणे. तोंड लागणे – (लढाई, वादविवाद, अंगीकृत कार्य इ.ना) सुरुवात होणे. तोंड वर करून बोलणे – निर्लज्जपणे, आपला दर्जा, पायरी सोडून बोलणे. तोंड वाईट करणे, तोंड वाईट होणे – निराशेची मुद्रा धारण करणे. तोंड वाकडे करणे – १. वेडावून दाखवणे. २. नापसंती दर्शवणे. तोंड वाजविणे – एकसारखे बोलणे; निरर्थक बडबड, बकबक, वटवट करणे; भांडणे. तोंड वासणे – १. निराशेने, दुःखाने तोंड उघडणे व ते बराच वेळ तसेच राहणे. २. याचनेसाठी तोंड उघडणे, वेंगाडणे. तोंड वासून पडणे – शक्तीच्या क्षीणतेमुळे, उत्साह, तेज वगैरे नष्ट झाल्यामुळे, गतप्राण झाल्यामुळे आ पसरून पडणे. तोंड वासून बोलणे – अविचाराने बोलणे : ‘ऐसें स्वसख्यांपासीं कां गे वदलीस तोंड वासन ।’ – मोउद्योग १३·२०५. तोंड शिवले जाणे – एक शब्दही न बोलणे. तोंड शेणासारखे पडणे – (लाजिरवाणे कृत्य केल्याने) तोंड उतरणे, निस्तेज होणे, काळवंडणे. तोंड सांभाळणे – जपून बोलणे; जीभ आवरणे; मर्यादेत बोलणे. तोंड सुटणे, तोंड सोडणे, तोंड सुरू होणे; तोंडाचा तोफखाना सोडणे, तोंडाचा पट्टा सुटणे, तोंडाचा पट्टा सोडणे – अद्वातद्वा बोलणे; शिव्यांचा भडिमार करणे; जीभ मोकळी सोडणे. तोंड सोडणे – अधाशासारखे खाणे. तोंडचा गोड आणि हातचा जड – बोलण्यात गोड, पण प्रत्यक्ष पैशाची इ.मदत करण्यात मागे. तोंडचा घास काढणे, हिरावणे – अगदी आटोक्यात आलेली, जवळजवळ मिळालेली गोष्ट हिसकावली जाणे. तोंडचा घास देणे – एखाद्याला अतिशय प्रेमाने वागवणे; आपली गरज मागे सारून दुसऱ्याची गरज प्रथम भागवणे. तोंडनी भांडी करनं – निष्फळ बोलणे; निरर्थक बडबड करणे. तोंडाचा हुक्का होणे – तोंड सुकून जाणे. (व.) तोंडाची वाफ दवडणे – १. मूर्खाला उपदेश करणे. २. विश्वास न बसण्याजोगे, मूर्खपणाने बोलणे; वल्गना करणे; बाता मारणे. तोंडाचे बोळके होणे – म्हातारपणामुळे सर्व दात पडणे. तोंडाचे भदे करणे – शिवीगाळ करणे. तोंडाचे माडे करणे – थाप्पा मारणे. तोंडात जडणे – थोबाडीत, गालात बसणे. तोंडात तीळ न भिजणे; तीळभर न राहणे – अगदी क्षुद्र अशी गुप्त गोष्टही पोटात न ठरणे, न सांगता न राहवणे. तोंडात तोंड घालणे – १. प्रेम, मैत्री इ. भावांनी वागणे; मोठ्या प्रेमाचा आव आणणे. २. परस्परांचे चुंबन घेणे. तोंडात बोट घालणे – आश्चर्यचकित, थक्क, विस्मित होणे. तोंडात, भडकावणे, देणे – थोबाडीत, चपराक, गालात मारणे. तोंडात माती घालणे – खायला अन्न नसणे; अतिशय हाल, कष्ट सोसावे लागणे. तोंडात माती पडणे, जाणे – १. एखाद्याची उपासमार होणे. २. मरणे. तोंडात मारणे, मारून घेणे – १. पराभूत होणे; हार जाणे. २. फजिती झाल्यानंतर शहाणपणा शिकणे; नुकसान सोसून धडा शिकणे. तोंडात शेण, साखर घालणे – फजिती करणे; नावे ठेवणे : ‘सावित्रीबाईंच्या तोंडात लोक जेव्हां फारच साखर घालीत, तेव्हा तिने दोन–तीन जुनेरी एकत्र शिवून जानकीबाईंना द्यावी.’ – रंगराव. तोंडात साखर असणे – एखाद्याचे तोंड म्हणजे वाणी, बोलणे गोड असणे. (गो.) तोंडात साखर पडणे – आनंदाचा प्रसंग, दिवस येणे. तोंडातून ब्र काढणे – अधिक–उणे अक्षर काढणे, उच्चारणे. नकारात्मक उपयोग. तोंडाने पाप भरणे, तोंडे पाप घेणे – लोकांची पापे, त्यांचे दोष बोलून दाखवणे; वाईट बोलण्याची हौस यथेच्छ पुरवून घेणे; लोकांची पापे उच्चारून जिव्हा विटाळणे : ‘कैसीं वो मानुसें । सपाइनि परंवंसें । तोंडे पाप घेती कांइसें । वायां वीण ।’ – शिव २१६. तोंडापुरता मांडा – (भूक भागेल एवढीच पोळी) जेमतेम गरज भागेल एवढाच जरूर त्या वस्तूचा पुरवठा. तोंडाम्हा मुतनं – गरजेला, संकटात मदतीस न येणे. (अहि.) तोंडार पडप – १. वैधव्य प्राप्त होणे. २. लाजेने तोंड लपवण्याजोगी स्थिती येणे. तोंडार मारप – एखाद्याच्या पदरात चूक बांधणे; वरमण्यासारखे उत्तर देणे. (गो.) तोंडार ल्हायो उडप – (तोंडात लाह्या फुटणे) फार जलद, अस्खलित बोलणे. तोंडाला काळोखी आणणे, फासणे, लावणे – बेअब्रु, नापत करणे. तोंडाला टाकी दिलेली असणे – देवीच्या खोल वणांनी तोंड भरलेले असणे. तोंडाला पाणी सुटणे – एखादी वस्तू पाहून तिच्यासंबंधी मोह उत्पन्न होणे; हाव सुटणे. तोंडाला पाने पुसणे – फसवणे; चकवणे; छकवणे; भोळसावणे; भोंदणे. तोंडाला फाटा फुटणे – मूळ मुद्दा सोडून भलतेच, हवे तसे, अमर्याद बोलत सुटणे. तोंडावर तुकडा टाकणे – एखाद्याने गप्प बसावे, प्रतिकूल बोलू नये म्हणून त्याला काहीतरी देणे. तोंड तोंडावर, तोंडाला तोंड देणे – १. विरोध करणे; विरुद्ध बोलणे. २. उद्धटपणाने, अविनयाने, दांडगेपणाने प्रत्युत्तर देणे. तोंडावर, तोंडाला तोंड पडणे – दोघांची गाठ पडून बोलाचाल, वाद होणे. तोंडावर थुंकणे – एखाद्याची छीः थू, निर्भर्त्सना, धिक्कार करणे. तोंडावर नक्षत्र पडणे – (एखाद्याने) तोंडाळपणा करणे; शिवराळ असणे; नेहमी अपशब्दांनी तोंड भरलेले असणे. तोंडावर मारणे – पराभूत करणे. तोंडावर सांगणे, बोलणे – एखाद्याच्या समक्ष निर्भीडपणे खरे सांगणे. तोंडावर, तोंडावरून हात फिरवणे – गोड बोलून, फूस लावून, भूलथाप देऊन फसवणे; भोंदणे. तोंडाशी तोंड देणे – हलक्या दर्जाच्या व्यक्तीने वरिष्ठांशी आपला दर्जा विसरून, बरोबरीच्या नात्याने, अविनयाने बोलणे, वागणे. तोंडास काळोखी, काजळी लागणे, लावणे – बेअब्रू, नाचक्की, दुष्कीर्ती होणे; नावाला कलंक, बट्टा लागणे. तोंडास कुत्रे बांधलेले असणे – ताळतंत्र सोडून, अद्वातद्वा, अपशब्द बोलणे; शिव्या देणे. तोंडास खीळ घालणे – निग्रहपूर्वक, हट्टाने मौन धरणे. तोंडास तोंड न दिसणे – तोंड न ओळखता येण्याइतका अंधार असणे. तोंडास येईल ते बोलणे, तोंडाला फाटा फुटणे – वाट्टेल तसे बोलणे. तोंडास, तोंडाला, तोंडी लागणे – उलट उत्तरे देणे; हुज्जत घालणे; वादविवादाला तयार होणे. तोंडास हळद लागणे – एखाद्याला दोष देणे; नापसंती दर्शवणे. तोंडासारखे बोलणे – एखाद्याची स्तुती, खुशामत करण्यासाठी त्याच्या म्हणण्याची री ओढणे; आपल्या फायद्यासाठी दुसऱ्याचे मन न दुखावेल असे बोलणे. तोंडी आणणे, देणे – रोग्याला लाळ गळण्याचे, तोंड येण्याचे औषध देऊन तोंड आणणे. तोंडी काढणे – १. ओकारी, वांती होणे. २. (एखाद्याला त्याने) केलेले उपकार बोलून दाखवून टोमणा मारणे. तोंडी खीळ पडणे – तोंड बंद होणे; गप्प बसायला भाग पडणे. तोंडी घास येणे – एखाद्याला घासभर अन्न मिळणे; चरितार्थाचे साधन मिळणे; पोटापाण्याची व्यवस्था होणे. तोंडी तीळ न भिजणे – १. (तापाने, संतापून ओरडण्याने, रडण्याने) तोंड कोरडे पडणे. २. एखादी गुप्त गोष्ट मनात न ठेवणे, बोलून टाकणे. तोंडी देणे – एखाद्याला एखाद्या माणसाच्या, कठीण कार्याच्या झपाट्यात, तडाख्यात, तावडीत हाल, दुःख सोसायला लोटणे, पुढे करणे. तोंडी बसणे – श्लोक, शब्द इ. स्पष्ट, अचूक म्हणता येण्याइतका पाठ होणे. तोंडी येऊन बुडणे, नासणे – एखादी वस्तू, पीक, काम इ. अगदी पूर्णावस्थेला येऊन नाहीसे होणे. तोंडी येणे – १. (पारा इ. औषधाने) तोंड येणे. २. पूर्णावस्थेत, ऐन भरात येणे. तोंडी रक्त लागणे – १. वाघ इ. हिंस्त्र प्राण्यांच्या तोंडाला माणसाच्या रक्ताची चटक लागून ते माणसावर टपून बसणे. २. लाच खाण्याची चटक लागणे. तोंडी लागणे – १. खाद्याची चव प्रथमच कळून त्याची चटक, गोडी लागणे; आवड उत्पन्न होणे. २. (युद्ध, भांडण इ. मध्ये) आणीबाणीच्या ठिकाणी आघाडीला असणे. ३. पहा : तोंडाला तोंड देणे. ४. पहा : तोंडास लागणे. तोंडी लावणे – १. जेवताना भाजी, चटणी इ. चमचमीत पदार्थाने रुचिपालट करणे. २. विसारादाखल पैसे देणे. तोंडे वाकडी करणे – वेडावणे; वेडावून दाखवणे. लहान तोंडी मोठा घास घेणे – १. आपल्या आवाक्याबाहेरचे काम हाती घेणे. २. वडीलधाऱ्या माणसांसमोर न शोभेल असे, मर्यादा सोडून, बेअदबीने बोलणे; मोठ्या माणसाला शहाणपण शिकवणे.
गळा
पु. १. घसा; कंठ; मानेचा पुढील भाग व आतील मार्ग. २. (गायन) सूर; आवाज; कंठ. ३. घागर, बाटली, मडके इ. चा. काठ; मान; तोंड व पोट यांच्यामधील आकुंचित भाग. ४. (सतार) दांडीचे आरंभस्थान. [सं. गल्] गळा उघडा असणे - गळ्यात कोणताही अलंकार (विशेषतः मंगळसूत्र) नसणे. गळा ओरडून पडणे - मोठ्याने शोक करून कंठाला मिठी मारणे. गळा कफणी घालणे - आपल्यासारखा निकाल लावून घेईपर्यंत वैतागाने फकिरासारखे राहणे : ‘त्यावरी तुम्ही वतनाची खबर ऐकोन वतनाकरिता गळा कफणी घालून दरबारास गेलेती.’ - राखं ३·५५. गळा काढणे - मोठ्याने रडणे. गळा कापणे - १. फसविणे; ठकविणे; विश्वासघात करणे. २. उमेद खचवून नाश करणे. ३. गळा कापणे - (शिंपी) गळ्याचे कापड बेतणे. (केसाने) गळा कापणे - वरून मैत्री दाखवून आतून विश्वासघात करून नुकसान करणे. गळा गुंतणे, गळा अडकणे - अडविले, बांधले जाणे; एखाद्या अडचणीत गोवले जाणे. गळा गोवणे - १. प्रतिबंध करणे; अडकविणे; एखाद्याचे हातपाय बांधणे (जुलमाने, वचन इ. घेऊन). गळा गुंतविणे - अडकविणे (त्रासदायक कामकाजात). गळा घालणे - (चर्मकार) जोड्यावर रेशीम भरणे (रेशीम भरण्याचा एक प्रकार). गळा घोटणे - जीव घेणे; मारून टाकणे. गळा जाणे - फाशी जाणे. गळा ताणून बोलणे, गळा तांगडून बोलणे - फाडफाड, खरडून, मोठ्याने बोलणे. गळा तापणे, गळा सुटणे - कंठातील कफ इ. जाऊन टिपेला जाण्याइतका स्वर मोकळा होणे. गळा दाटणे - गहिवरणे; उमाळ्याने घसा दाटणे (दुःख, माया इ. मुळे) : ‘तथ्यप्रभूक्त परिसुनि धर्माचा गहिवरे गळा दाटे ।’ - मोशांति ६·४२. गळा धरणे - १. घसा बसणे (रोग, आंबट, तिखट, खवट इ. पदार्थामुळे). २. थांबविणे; खोटी करणे; हरकत आणणे (बोली, करार यात बेमानपणाने वागून). ३. वाचा बसणे; आवाज नष्ट होणे; निरुत्तर होणे. ४. ताब्यात घेणे : ‘त्वदगुणकीर्तन करितां लज्जा हे पापिणी धरू न गळा ।’ - भक्तमयूरकेका ५८. गळा निवळणे - (गायन) फुटलेला आवाज चांगला होणे, गळा पडणे - आळ घेणे : ‘गळां मोतीं असोन निवाडें । लोकांचिया गळां पडे ।’ - ह २१·२२९. गळा पडणे, गळा फुटणे, गळा बसणे - आवाज घोगरा होणे, चिरकणे. गळा पडणे, गळी पडणे - १. मानेला मिठी मारणे : ‘गेलों गृहासि माता धांवुनियां माझिया गळां पडली ।’ - मोअनु ६·६८. आलिंगन देणे. २. गळ घालणे; निकड लावणे; तगादा लावणे; सक्तीने पाठ पुरविणे. ३. अन्यायाने दोषारोप करणे. ४. शिव्या देत अंगावर तुटून पडणे. ५. एखाद्याच्या अंगावर भार घालणे; लोढणे होणे; फार भीड घालणे; विघ्नासारखे होणे. ६. वाईट सवय, खोड लागणे. गळा पिंजणे - गळा सोलवटणे; आवाज चिरकणे (वांती होऊन किंवा गाताना). गळा बसणे - १. आवाज नीट न उमटणे, न सुटणे. २. मानेत बसणे; थबकट किंवा चपटा होणे (भांडे). गळा बांधणे - आळा घालणे; हातपाय बांधणे, अडकविणे. गळा बांधणे, गळी बांधणे - १. सक्ती करणे; घेण्यास भाग पाडणे. २. अन्यायाने दोषारोप करणे; आळ घेणे; कलंक लावणे. गळा भरणे, गळा भरून येणे - गहिवरणे (मनोविकारांमुळे) व त्यामुळे आवाज कंपित होणे; गुदमरणे; श्वास कोंडणे : ‘असुहृदुदासीनाचे भरले भरतिल न अन्य काय गळे ।’ - मोमीष्म ११·११९. गळा मढणे - गळ्यात बांधणे; एखाद्याच्या अंगावर जबाबदारी टाकणे : ‘बाकीचे वायेदे मुदत लेहून घ्यावी, रुपये त्याच्या गळा मढावे, निशा करून घ्यावी.’ - हिंगणे दप्तर २·१३. गळा मोठा करून रडणे - भोकाड पसरणे; मोठ्याने रडणे. गळा लागणे - (संगीत) आवाज चांगला लागणे; सूर लागणे. गळा सुटणे - १. संकटमुक्त होणे. २. आवाज मोकळा होणे. ३. पाठ पुरविणे; हट्ट घेणे (मूल, तगादेदार, काम घेणारा.) ४. मोठ्याने ओरडणे, डरकणे. गळा सोडविणे - (खाटीक). १. धडापासून मान वेगळी करणे, कापणे : ‘केली हल्ला मधीं शिरला सोडवी गळा कानड्याचा ।’ - ऐपो ३९२. २. एखाद्याला पेचातून मुक्त करणे. गळे कापून नेणे - मुंडकी कापून नेणे : ‘काही गळे कापून नेले म्हणोन वर्तमान आहे.’ - ऐलेसं ३०१२. गळ्याखाली उतरणे - १. गट्ट करणे (लाच, लुच्चेगिरीचा पैसा इ.). २. स्वाधीन होणे; पदरात पडणे. गळ्याचा लाखोटा होणे - घसा बंद होणे, कोंदणे; गुदमरणे. गळ्याची आण, गळ्याची शपथ, गळ्याचेण - गळ्याची शपथ वाहणे, घेणे. गळ्याची फुंकणी होणे - घसा घोगरा होणे, बसणे. गळ्यात असणे - भार पडणे (काळजी, काम, खटपटी इ. चा); अवलंबून असणे. गळ्यात गळा घालणे - सलगीने वागणे; दुसऱ्याच्या कंठाला मिठी मारणे. गळ्यात गोणी येणे - १. अडचण, दुःख यांचे असमंजस उपायांनी निरसन करीत असता उलट जास्त अडचणीत येणे. (जसे :- एखाद्या बैलाने पाठीवरील ओझे लोटून देण्याचा प्रयत्न केला असता ते मानेवर येऊन जास्त ओझे होणे.). २. नुकसानी, तूटबूड अंगावर ओढून घेणे. गळ्यात घालणे - एखाद्याच्या इच्छेविरुद्ध जबाबदारी त्याच्या अंगावर टाकणे; माथी मारणे : ‘जेव्हा तुम्ही हे माझ्या गळ्यातच घातले तेव्हा माझा बेइलाज.’ - मासंवा २·१८२. गळ्यात घोंगडे येणे, गळ्यात लचाड येणे - (डोईवरचे घोंगडे घसरत घसरत गळ्यात आले म्हणजे जीव गुदमरतो त्यावरून) संकट गुदरणे. गळ्यात टाकणे - पहा : गळ्यात घालणे. गळ्यात तंगड्या घालणे - एखाद्याची लबाडी ओळखून त्याचीच फजिती होईल असे करणे. गळ्यात तंगड्या येणे, गळ्यात पाय येणे - सुटण्यास कठीण अशा अडचणीत जास्त गुरफटले जाणे. गळ्यात धनुष्य घालणे - (प्राचीन पद्धत) पराभव करणे व पराभव केल्याची खूण : ‘घालुनि धनुष्य कंठीं धरिला धरि गारुडी जसा अहितें ।’ - मोकर्ण १४·६७. गळ्यात धोतर घालणे - स्वतःचे म्हणणे सिद्ध करण्यासाठी एखाद्यावर सक्ती करणे. गळ्यात पडणे - हिताहिताची, रक्षणाची, पोसण्याची, कर बजावणीची, निस्तरण्याची इ. जबाबदारी अंगावर येणे. गळ्यात बांधणे - आग्रहाने देणे; स्वीकारण्यास भाग पाडणे. गळ्यात मारणे. पहा : गळ्यात घालणे. गळ्यात माळ असणे, गळ्यात माळ घालणे, गळ्यात माळखंड घालणे - १. शिस्त दाखवून काम सोपविणे, हवाली करणे; व्यवहार गळ्यात टाकणे. २. वराने वधू किंवा वधूने वर पसंत करणे, वरणे (माळेचा उपयोग लग्नात होतो यावरून). ३. वारकरी संप्रदायाची खूण आणि विठ्ठलाचा प्रसाद म्हणून तुळशीची माळ गळ्यात घालणे; वारकरी होणे. गळ्यात येणे - अंगावर येणे, बेतणे (धंदा, कारभार, काळजीचे कार्य). गळ्यातला ताईत, गळ्यातला तन्मणी - अत्यंत लाडका, प्रिय. (क्रि. करणे, मानणे, मोजणे, बाळगणे, बनणे, होणे.) : ‘तूं नवऱ्याच्या गळ्यातला ताईत.’ - विवि ८·२·३०. गळ्यात लोढणे अडकविणे, गळ्यात लोढणे बांधणे, गळ्यात लोढणे घालणे, गळ्यात धोंड बांधणे - अडचणीत आणणे; कठीण काम करण्याचा प्रसंग आणणे : ‘राष्ट्रीय पक्ष हा कांहीं जुन्या पक्षाच्या गळ्यांत लोढणें बांधण्यासाठीं निर्माण झालेला नाहीं.’ - लोटिकेले. नको असलेले काम करायला सांगणे; एखाद्याच्या मुक्त संचारावर बंधने येतील अशी बाब त्याच्या माथी मारणे. गळ्यात हात घालणे, गळ्यात हात टाकणे - १. आलिंगन देणे. २. मन अनुकूल करणे, वळविणे; दादा-बाबा करणे. लाडी गोडी लावणे. गळ्यापर्यंत येणे - सहनशक्तीची परमावधी होणे (कष्ट, पीडा, दुःख यात). गळ्याला दोरी लागणे, गळ्याला फास लागणे, गळ्याला रसायण लागणे, गळ्याला तात लागणे - एखाद्या कार्याकडे ओढ लागणे, त्याविषयी अतिशय चिंता लागणे; पेचात असणे; संकटात पडणे : ‘आग्रह करूनि लावू कोणेकाच्या गळ्यां कशी तात ।’ - भक्तमयूरकेका २. गळ्याला लागणे - एखादे काम केलेच पाहिजे अशा अवस्थेला येणे : ‘गळ्याला लागलेली पोर एकदाची कशीतरी उजवावी.’ - परिहरि १७. गळ्यावर गाणे म्हणणे, गळ्यात गाणे म्हणणे - सुरेलपणे शास्त्रीय पद्धतीने व मनमोकळेपणाने गाणे. गळ्यावर बोलणे - वरवर बोलणे; विचार न करता भाषण करणे. गळ्यावर सुरी ठेवणे, गळ्याला नख लावणे - जीव घेण्याची भीती घालणे; अत्यंत संकटात घालणे : ‘कां नख न लाविलें जननी ।’ - मोउद्योग ११·२३. गळ्याशी गळा मिळविणे - १. (गायन) दुसऱ्याच्या सुराशी आपला सूर मिळविणे. २. गळ्यात गळा घालणे. गळ्याशी येणे, गळ्याशी पाणी लागणे - नुकसानीची बाब होणे, परमावधीला पोहोचणे. गळ्यातील कफनी काढणे - मनासारखा निकाल होईपर्यंत त्राग्याने दीनवेष धारण केलेला असेल (पागोटे बांधण्याचे सोडून देणे, श्मश्रू न करता दाढीडोई वाढविणे इ.) तो सोडणे : ‘आपण बादशाहीवर नजर देऊन आमचे गळ्यांतील कफनी काढावी.’ - ऐलेसं ७४८८.
वज्र
पुन. १ इंद्राचें आयुध; (सामा.) अमोघ शस्त्र. २ हिरा. 'माणिक मोती प्रवाळ । पाचि वैडूर्य वज्र नीळ ।' -दा ८. ६.३४.३ वीज; विद्युत्. ४ वज्रतुंड पहा. -पु. १ सत्तावीस योगां- पैकीं पंधरावा. २ जाज्वल्य, दहशत बसविणारा माणूस (योद्धा, शास्त्री). हा शब्द पहिल्या पदीं येऊन पुष्कळ समास होतात कांहींचे अर्थ पुढें दिले आहेत. ॰आंगठी-स्त्री. त्रिकोनाकृति कोंदणांत हिरा व तीन कोनांवर तीन रत्नें बसविलेली अशी आंगठी. -देहु ४९. ॰कपाट-न. वज्राचें, हिऱ्याचें कवाड, दार. 'मुक्तिचे वज्रकपाट । कामीनि हे ।' -भाए ७५६. कवच-न. वज्राचें, वज्रासारखें अभेद्य चिलखत. 'जैसें वज्रकवच लेइजे । मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे ।' -ज्ञा २.१३२; -एभा १५.७. ॰कीट-पु. खवल्या मांजर. ॰कीटकी-स्त्री. (महानु.) एक रोग-जंतु. 'कव्हणा एका अंताचीए सवडी वज्रकीटकी लागली असे ।' -दृष्टांत- पाठ २. ॰कृत-वि. घट्ट; घट्ट बसेल असें केलेलें. ॰गर्भ-स्त्री. एक प्रकारची भिकबाळी. (बं.) गिमडा. -देहु ४५. ॰गांठ-स्त्री. पक्की, न सुटणारी गांठ. 'कर्माच्या वज्रगांटीं । कळासे तो ।' -ज्ञा १८.३९२. ॰घात-पु. १ वज्राचा प्रहार, तडाखा. २ (ल.) मोठा आपत्ति; नुकसान; संकट. ॰चुडेदानचुडेदान पहा. -ह ११.१३७. ॰चूडेमंडित-वि. १ हिऱ्याच्या कंकणांनीं विभूषित, शोभायमान असलेले (हात); 'वजचूडेमंडित हस्त । अवतार मुद्रा दाही झळकत ।' -ह २७.८०. २ पत्रांतून सुवासिनी स्त्रियांस लिहावयाचा मायना. अक्षय टिकणारे चुडे हातांत असणारी; (ल.) अखंड सौभाग्यवती. ॰जिव्ह-वि. खोंचदार, कडक भाषा वापरणारा. ॰जिव्हा-स्त्री. खोंचदार, कडक भाषण. ॰टीक-टीका- स्त्री. स्त्रियांचा गळ्यांतील एक दागिना. ॰तडक-पु. वीज. -ख्रिपु. ॰तुंड-पु. वज्राचा एक जातीचा दगड. स्फटिक, चंद्रकांत आणि अभ्रक या पदार्थांच्या कणांच्या अनियमित मिश्रणानें हा झालेला असतो. (इं.) ग्रॅनाईट. ॰देह-पु. वजाप्रमाणें अभेद्य, बळकट शरीर; रोगरहित, ताकदवान शरीर. ॰देही-वि. असें शरीर अस- लेला; फार बलाढ्य. ॰द्रोह-पु. दीर्घकालचा व फार तीव्र असा द्वेष. ॰द्रोही-वि. हाडवैरी. ॰धर-पु. इंद्र. ॰धार-वि. तीक्ष्ण धार असलेलें; तिखट (शस्त्र). नाद-निर्घोष-पु. विजेचा कड- कडाट. ॰पंजर-पु. (वज्राचा पिंजरा) दुर्भेद्य किल्ला, आश्रयस्थान; निर्भय आसरा. 'तरि शरणांगतां वज्रपंजर । तेहिं कां म्हणवावें ।' -भाए ६१४. -तुगा ७०६. ॰पथ्य-न. फार अवघड, कठिण पथ्य. ॰परीक्षा-स्त्री. १ हिऱ्यांची परीक्षा. २ (ल.) कठिण कसोटी; फार अवघड तपासणी. ॰पाणि-पु. इंद्र. 'कृपा भाकिता जाहला वज्रपाणी ।' ॰पात-पु. १ वज्रायुधाचा प्रहार. २ वीज कोसळणें; पडणें. ॰पाणी-वि. मोठा पातकी. -एभा २७.४९४. ॰प्रयोग- पु. १ फार अवघड प्रयोग, उपाय. २ मांत्रिक जादूगाराचा विशिष्ट मंत्रप्रयोग. ॰प्रहार-पु. वज्रपात पहा. ॰प्रायवि. १ वज्रासा- रखा कठीण (पदार्थ). २ वज्रासारखा अमोघ आघात असणारा (बाण, मुष्टि इ॰). ३ अतिशय वजनदार, खंडण करण्यास अव- घड (मुद्दा). ४ झोंबणारें; मर्मभेदी; हृदयांत सलेल असें (भाषण, इ॰). ॰बटू-पु. एक झाड. -न. त्याचें फळ. बजरबटू पहा. ॰बाण-वि. वज्रासारखे घातक बाण असलेला. ॰बुद्धि-स्त्री. १ खंबीर मन. २ उत्कृष्ट ग्रहणशक्ति. विशेषणासारखाहि उपयोग. ॰मणि-पु. हिरा. ॰मय-वि. १ वज्राचा, हिऱ्याचा केलेला. २ अतिशय कठीण. ॰महाग-वि. अतिशय महाग. ॰महागाई- स्त्री. अतिशयित, भरमसाट महागाई. ॰महाग्या-वि. अतिशय महाग विकणारा. ॰माला-स्त्री. हिऱ्याची माळ. ॰मिठी-स्त्री. फार घट्ट मिठी. 'मग तोंडा कां वज्रमिठी पाडिजे ।' -ज्ञा ७. १५२. ॰मुष्टि-पु. मल्लाचें एक आयुध. हें मुठीला लावतात. -स्त्रीपु. लोखंडासारखी, कठीण मूठ. २ (बडोदें) एक खेळ. -खाला ८०. ३ लुतीचा कांदा. सरण पहां. -वि. १ लोखंडासारखी मारक मूठ असलेली. 'मी वज्रमुष्टि... ।' -स्वयंवर. २ वज्रमुष्टि हत्यारानें लढणारा, हत्यार वापरणारा. ॰मूठ-स्त्री. वज्रमुष्टि पहा. ॰मूली- मूळ-स्त्री, एक झुडूप; रानउडीद. ॰योग-पु. वज्रासन; हट- योग. 'एक वज्रयोग क्रमें । सर्वाहार संयमें ।' -ज्ञा ४.१४७. ॰लेप-पु. १ चुन्यामध्यें कात, गूळ इ॰ सरंजाम घातल्यामुळें दृढता आलेला चुना. २ अशा चुन्याचा दगड इ॰ वर करतात तो लेप. ३ (ल.) अक्षयता; अविनाशता; चिरंतनपणा (वचन, निश्चय, संस्था इ॰ चा). याअर्थी विशेषणासारखा उपयोग; पक्कें; काययचें; स्थिर; अभंग. 'महापापां प्रायश्चित्तविधान । वज्रलेप पूर्ण गुरुवाक्यावज्ञा ।' -भाराबाल ११.२७९. ४ (महानु.) दृढता आणणारा पदार्थ. 'ना तो संशृतीसि ताठ । वज्रलेप ।' -ऋ ११. ॰लेप होणें-पक्कें, कायम होणें. 'आमच्या आजे सासुबाई एकदां कोणाचें नांव घ्यावयाचें नाहीं असें म्हणाल्या कीं मग तें वज्रलेप झालेंच समजावें !' -पकोघे. ॰वाट-स्त्री. (महानु.) वज्राचें वेष्टण. 'काळ लोहें डवरिलें । वज्रवाटीं बांधिलें ।' -शिशु. [सं. वज्र + वृत्त; प्रा. वट्ट] ॰वाणी-स्त्री. कठोर, झोंबणारें भाषण. -वि. असें भाषण करणारा. ॰वीर्य-न. वानराचें वीर्य (शुक्र). हें इतकें उष्ण असतें म्हणतात कीं त्यामुळें दगडहि उलतात. -वि. १ अमोघ, पराक्रमी वीर्याचा (माणूस-ज्याचीं मुलें फार सशक्त आहेत अशा- बद्दल. हें विशेषण योजतात). २ उत्साही; पराक्रमी; निश्चयी; सहनशील; ताकदवान इ॰. ॰शरीर-न. वज्रदेह पहा. ॰शरीरी- वि. वज्रदेही. ॰शलाका-स्त्री. घरावर वीज पडूं नये म्हणून लावतात ती तार. ॰शील-(व.) वरिष्ठ; वरचढ. 'सगळ्या कार- कुनांत तो वज्रशील होऊन बसला.' ॰संकल्प-पु. न फिरणारा निश्चय; दृढनिश्चय. ॰संकल्प-पी-वि. फार दृढनिश्चयी. ॰सांखळ-ळी-स्त्री. अभेद्य, अखंड्य कोटिक्रम. 'तार्किकां- चिया वज्रसांखळा ।' -शिशु २५. ॰हस्त-वि. वज्राप्रमाणें कठीण हाताचा. ॰हस्तेंक्रिवि. फार जोरानें. 'तों मुकुंदरायें काय केलें । वेताचे छडीस पडताळिलें । मारिते जाहले वज्रहस्तें ।' -संवि २०.११६. ॰हृदय-यी-वि. १ कठोर अंतःकरणाचा; अति निर्दय. २ अति निग्रही; निधड्या छातीचा. ॰क्षार-पु. एक औषधी क्षार. मीठ, सेंधेलोण, पादेलोण, टाकणखार, बागडखार, जवखार, सज्जीखार, या खारांचें विशिष्ट कृतीचें केलेलें औषध. वज्रांगी-स्त्री. चिलखत; कवच. 'वज्रांगी लेइला तैशी प्रलयमेघांची ।' -शिशु १००१. -ज्ञा ६.४७५. [वज्र + अंग] वज्राग्नि-पु. १ मूलबंधापासून उत्पन्न होणारी उष्णता; वज्रासनरूप अग्नि. -ज्ञा १२.५०. २ विद्युल्लताग्नि; विजेचा अग्नि. 'वज्राग्नी- चिया जाळीं । करूनि सप्तधातूंची होळी ।' -ज्ञा ११.३७७. [वज्र + अग्नि] वज्राघात-पु. १ वीज पडणें. 'शिरिं वज्राघातचि गमला ।' -संग्रामगीतें १२. २ (ल.) भयंकर संकट, आपत्ति. [वज्र + आघात] वज्राधिकार-पु. अनेक पिढ्या एका कुटुं- बांत असलेला अधिकार. [वज्र + अधिकार] वज्रानल-पु. वीज; विजेचा लोळ. [वज्र + अनल] वज्रांबट-वि. अतिशय आंबट. [वज्र + आंबट] वज्राभ्यास-पु. गुणाकाराचा एका प्रकार; वज्र- वध. [वज्र + अभ्यास] वज्रावळ, वज्राळें-स्त्री. न. एका वेलीच्या बियांची, मण्यांची केलेली माळ. मुलाला दृष्ट लागूं नये म्हणून ही त्याच्या गळ्यांत बांधतात. [वज्र + आवळी] वज्रासन-न. १ (योग.) एक आसन. मुसलमान नमाज पढावयास बसतात त्याप्रमाणें बसून हात जोडणें. -संयोग ३२०. -एभा ६. १२७. २ मूळबंध; आधारबंध. -ज्ञा ८.४९. ३ स्थिर, दृढ- आसन (जसें घोड्यावर). ४ (ल.) दृढपणें धारण करणें (अधिकार, सत्ता). [वज्र + आसन] वज्रास्त्र-न. इंद्राचें आयुध; वज्र; विद्युतास्त्र. [वज्र + अस्त्र] वज्राहत-वि. वज्राचा प्रहार ज्यावर झाला आहे असा. [वज्र + आहत] वज्रिका-वि. (संगीत) दहाव्या श्रुतीचें नांव. वज्री-स्त्री. पाय घांसण्यास उपयोगी असा कठीण, खरखरीत दगड, वीट, धातूचा पदार्थ इ॰ -पु. इंद्र. वज्रेश्वरी, वज्राबाई-योगिनी-स्त्री. एक देवता. वज्रोप- चार-पु. कडक उपचार, उपाय. [वज्र + उपचार]
रान
न. १ जंगल; वन; विशेषत: जंगलांतील खुजा, ठेंगण्या झाडाझुडपांचा समुदाय. २ तळवट; माळ; रुक्ष प्रदेश; नापीक व निर्जन प्रदेश. ३ मनुष्यास उपभोग्य असा भाजी-पाला इ॰ कांहून भिन्न असें तण, गवत, उपद्रवी-निरुपयोगी वनस्पती इ॰ 'भाजीचे वाफ्यांत कोठें कोठें रान रुजलें आहे तें उपटून टाक.' ४ शेतांत उगवणारें गवत; तन. ५ शेत. ६ झाडी; राई; बन; वृक्षवाटिका. 'बंदर किनार्यास सारें नारळींचें रान.' ७ देश; प्रदेश; भाग. 'मारवाडदेश म्हणजे उंटाचें रान.' 'त्या रानचे मनुष्यास हें रान मानत नाहीं.' ८ विदेश; परका मुलुख. 'परस्परें या रानांतील उमराव व रजवाडे यांस पत्रें देऊन तुमची कुमक करवितों.' -भाव १३. ९ (ल.) फार मोठी वाढलेली हजामत. प्रदेश ह्या सामान्य अर्थी रान शब्दा- पूर्वीं विशेषणात्मक शब्द जोडल्यानें त्याचा विशेष अर्थ होतो; उदा॰ डोंगररान; खडकरान; धोंडेरान किंवा गोटेरान; वनजररान गवतरान; माळरान इ॰ तसेंच काळें रान, पांढरें रान, चिक्कणरान काळया-पांढर्या-चिक्कण मातीचा प्रदेश. नवें रान = पूर्वीं जंगल किंवा माळ असून नुकतीच लागवडीस आणलेली जमीन [सं. अरण्य; प्रा. रण्ण] म्ह॰ (गो.) रान झालें लागीं घरां जाली पैस = म्हातारपण प्राप्त होणें, मरण जवळ येणें या अर्थीं. (वाप्र.) ॰उठणें-लोक खवळणें; क्रुद्ध होणें. 'म्युनिसिपल इमारतीवर संयुक्त निशाण लावण्याचा ठराव हुजूरपक्षानें फेटाळला त्यामुळें शहरांतील रान उठलें होतें.' -के २२.७.३०. ॰उठविणें- जागाविणें-पारधीकरितां धडधड आवाज करून सावजांना जागें करणें. झाडींतून पारध, सावज बाहेर हुसकणें. 'रान उठविल्या- शिवाय, जागविल्याशिवाय शिकार कशी सापडेल ?' ॰काढणें- १ जंगल-जमीन लागवडीस आणणें. २ झाडें झोडपून व ओर- डून ओडडून शिकार उठवणें. ३ रानाचा, जंगलाचा शोप लावणें. ॰खवळणें-१ एखाद्यावर खवळणें; उठणें (रान, श्वापदें). २ अतिशय क्षुब्ध होणें, (राग, भूक, लोभ, काम इ॰ कानीं). 'लवकर जेवायला वाढा, आज इकडे रान फार खवळलें आहे.' ॰घेणें-१ रानांत पळून जाणें (गुरांनीं). २ (ल.) वेढंग मार्गाचा स्वीकार करणें; बारगळणें. ३ रानांत शिरणें पहा. ॰बदलणें- सोडणें-पारखें होणें-(ल.) आपलें मन किंवा उद्देश बद- लणें; एखाद्यासंबंधीचा आपला विचार फिरविणें; आपला पूर्वींचा मुद्दा सोडून देणें. ॰भारणें-१ सर्व प्रदेशावर जादू पसरणें; मंत्र टाकणें. 'तमाम गारोडी रान भारतो तसा प्रकार त्यानें केला.' -भाव २४. २ (ल.) यथास्थित पैसे चारणें. ॰मानणें-त्या देशाची हवा इ॰ प्रकृतीस मानवणें, पसंत पडणें. 'कोंकणच्या माणसास हें रान मानवत नाहीं.' ॰हांकणें- (शिकार उठविण्याकरितां) झाडें झोडपणें व आरडाओरड करणें. रानांत, आडरानांत पडणें-एकटें सापडणें; उदास होणें. रानांत शिरणें-(ल.) (संभाषणप्रसंगीं) सरळ मार्ग सोडून अयोग्य गोष्ठी सांगत बसणें; विषयांतर करणें; बहकणें. रानीं रिघणें-अरण्य सोविणें. 'ब्रह्म- सुकाळु लाघला ते ही । जे रानीं रिगाले ।' -ऋ १६. रिकाम्या रानीं-क्रिवि. बेफायदेशीर; व्यर्थ; निरर्थक; फुकट; (बोलणें, चालणें). 'आतां एथें काम नाहीं काज नाहीं. रिकाम्यारानीं कशाला बसावें, रहावें, फिरावें इ॰.' रान या शब्दापुढें पक्षी, पशु व वनस्पति यांचीं नांवें जोडून रानटी किंवा व माणसाळलेला, न लागवड केलेला या अर्थीं बरेच समास होतात. जसें.-रानडुक्कर; रान- मांजर; रानकेळ; रानउडीद; रानतूर; रानपडवळ; रानमटकी; रान- मसूर; रानमाठ; रानमूग इ॰. तसेंच रावआंबा-केळी-कोंबडा-जेवण. या व यासारख्या दुसर्या अनेक सामासिक शब्दांत /?/ ह्याचा रानांत राहणारा किंवा होणारा असा अर्थ होतो; कांहीं विशिष्ट सामाशब्द- ॰आंबा-पु. वृक्षविशेष. ॰आलें-न. रानांत होणारें आलें. ॰आळू-न. तेरें अळूं. हें पर्जन्यकाळीं उगवतें; याचा रंग पाढरा, हें फार थंड आहे याची भाजी चागली होते. ॰कट- वि. खेडवळ; गांवढळ; वनांतील (मनुष्य, पशु). [रान] ॰कंद-पु. एक कंद. ॰करी-पु. रान्या; गवत, ताकूडफाटा इ॰ आणण्याकरितां रानांतच फिरणारा माणूस. ॰काढ्या-वि. शिकार कर- ण्यासाठीं रान काढण्याकरिता लावलेला (मनुष्य); पारध्याकरितां सावज कचाटयांत आणणारा. ॰कांदळ-न. एक वन्य वृक्ष. ॰कापशी-स्त्री. रानांतील कापशीचें झाड; देवकापशी, देवपळ्ही- हून भिन्न व पिळ्हेशीं जुळणारी. हिचें बीं लहान व वाटोळें असून देवकापशीचें मोठें व लांबट असतें. ॰कापूस-पु. रानकापशीचा कापूस. ॰कोवळा-पु. कावळ्याच्या जातींतील जंगली पक्षी. ॰केळ-ळी-स्त्री. केळीची जंगली जात. हिच्या पानावर जेवतात. कांदा उकडून किंवा वाळवून त्याचें पीठ करून खातात; कवदर व ही एकच. कवदर पहा. ॰कौबडा-डी-डें-पुस्त्रीन. जंगली कोंबडा. ॰खरडा-पु. जंगलखरडा पहा. ॰गट-वि. १ खेडवळ; गांवढळ. २ वन्य; लागवडीशिवाय उगवणारा. [रान] ॰गांजा-ज्या-पु. एक औषधी मूळ; सालवण. याचीं पानें बेलाप्रमाणें त्रिदळ असून यास निरनिराळया रंगाचीं फुलें येतात. याचें मूळ सर्व प्रकारचे तापा- वर गुणकारी आहे. ॰गाय-स्त्री. तार्तरी देशांतील गाय; वनगाय. ॰गोवरी-स्त्री. जंगलांत सांपडणारें इतस्तत: पडलेलें शेण, शेणी. याच्या उलट शेण थापटून लावलेली गोवरी. ॰घेवडा-पु. एक वेल. ॰घोळ-स्त्री. घोळ नामक भाजीचा एक प्रकार. हिचें पान रंगानें तांबूस चरबट असतें. ॰चा राजा-पु. भील किंवा कात- करी. ॰चिमणी-स्त्री. १ चिमणीसारखा एक लहान पक्षी. २ जांभळीं व पांढरीं फुलें येणारें एक झाड. ॰जाई-स्त्री. उंच वाढ- णारें वेलासारखें झुडुप. ॰जेवण-न. वनभोजन; रानात किंवा झाडाखालीं केलेलें जेवण. रानट, रानक(ग ट-वि. १ रानांत राहणारा; रानटी; अज्ञानी. 'होतां तापत्रयार्त त्वरित भववनीं रक्षितां रानटाचा ।' -केका १२२. २ आडगांवीं राहणारा; शहर, कचेरी, गरबार इ॰ ठिकाणीं न जाणारा; अडाणी (मनुष्य). ३ जींत भात, गहूं इ॰न येतां गवत फार उगवतें अशी जमीन. ॰टाकळी-स्त्री. टाकळीची एक जात. रानटी-ठी-वि. १ रानासंबंधीं; आपो- आप उगवणारा. २ गांवढळ; खेडवळ; रीतभात नसलेला. [रान] ॰टोणगा-पु. जंगली टोणगा; रेडा. ॰टोळ-पु. टोळाची एक जात. ॰डुक(क्क)र-पुन. भुइमूग, ऊंस, भात इ॰ पिकांचा फन्ना उडविणारें रानटी जनावर. ॰तरवड-पु. तरवडाची एक जात. ॰तीळ-पु. काळा तीळ पहा. ॰तुळस-स्त्री. एक वनस्पति; वैज- यंती, ही तुळशीसारखीच असते. पानें मात्र मोठीं असतात. हिला मंजिर्या येतात. बीं काळें, किंचित् तांबूस व खसखशीएवढें असून पाण्यांत घातलें असतां फुगतें. हें तुकुमराई (सबजाचें बीं) प्रमाणें असतें. यासहि तुकुमराई म्हणतात. ॰र-स्त्री. एक लहान पिवळ्या फुलांचें झुडुप. ॰तेरडा-पु. तेरड्याची एक जंगली जात. ॰दांडगा- वि. आडदांड; रानटी; धिप्पाड; राक्षसी काम करणारा. ॰दांडगे- पुअव. सर्व तर्हेचीं शस्त्रें घेऊन शत्रूचा किंवा लुटारू घाडीचा प्रति- कार करण्याकरितां जाणारा शेतकरी किंवा खेड्यांतील लोकांचा समुदाय. ॰निंबू-न. राननिंबोणीचें फळ. निंबोणी-निंबूण- स्त्री. एक मोठें कोटेरी झाड. ॰निवडुंग-पुन. जंगली निवडुंग. ॰पासरा-पु. दुकानदारीची झिंबड. ॰पाळ-वि. नापीक; भुकिस्त; बरड; माळवजा (भातजमीन). ॰पिंपळ-पु. पारोसा पिंपळ; एक झाड. ॰बाजरी-स्त्री. गवतासारखी वनस्पति. ॰भरी-क्रिवि. रानोमाळ. 'रानभरी झाले साधारण ।' -एभा २३.३१६. ॰भरी- भरू-वि. १ भयभीत; घाबरलेला; पलायमान; परागंदा (पशु, मनुष्य). 'महा वारण जे उन्मत्त । दैत्यें सोडिले तयावरते । तमास प्रल्हाद सिंह दिसत । मग ते होत रानभरी ।' २ (ल.) चैनीकरितां इतस्तत: भटकण्याच्या हेतूनें ज्यानें आपली बायका- पोरें सोडली आहेत असा. [रान + भरणें] ॰भरू होणें-१ रस्ता चुकणें; आडरस्त्यास जाणें. २ गोंधळणें; घाबरणें; घाबरें होणें. ॰भाजी-स्त्री. १ लागवडीशिवाय उगविणारी भाजी. २ वनांत होणारी खाद्य वनस्पति. ॰मटकी-स्त्री. रानांत होणारी मटकी, मठ. ॰मसूर-स्त्री. एक जंगली झाड; हीं झाडें महाबळेश्वराकडे पुष्कळ होतात; ह्यांचें बीं मसुरासारखें असतें. ॰माजर-पुन. जंगली मांजर; मोठा व धाकटा असे याचे दोन मेद आहेत. ॰माणुस- न. १ एक प्रकारचा वानर. २ (ल.) रानटी; खेडवळ माणूस. ॰मूग-पु. रानात होणर्या मुगाची जात. ॰मोगरा-पु. अरुंद पानाची जाई. ॰म्हैस-स्त्री. जंगली म्हैस. ॰रावताण-णी- नस्त्री. रावताण पहा. ॰वट-स्त्री. मोठ्या रस्त्यापासून फुटलेली रानास जावयाची वाट 'पुढच्या आंब्याजवळ वाट उजवी फुटली आहे ती रानवट आहे.' -वि. १ जंगली; लागवड न केलेली व साफ न केलेली (जमीन). २ खेडवळ; गांवढळ; रानटी (मनुष्य). ३ वन्य आपोआप उगवणारा (वृक्ष, वन- स्पती). ॰वत-न. (राजा.) वन्य वृक्षांचें पान; ज्यांचीं पानें सामान्यत: भोजनाकरितां, पुड्याकरितां उपयोगी पडत नाहींत अशा झाडाचें पान. [रान + पत्र] ॰वन-न. (व्यापक) रान; जंगली प्रदेश; रानांच फिरणें, वन्य पदार्थांवर उपजीविका करणें किंवा निर्वाहाकरितां वन्य पदार्थ शोधणें. (क्रि॰ करणें; पाहणें; फिरणें; हिंडणें). 'रानवन मला व्हाव्याचें-किंवा भी करीत असतों.' [रान + वन] रानवा-पु. लागवडीस न आणलेली पडीत जमीन; जंगल; रान. 'गांवाला रानवा असल्यावांचून तृणकाष्ठाची सोय होत नाहीं.' रानवाट-स्त्री. जंगली व रानवट प्रदेशाकडे जाणारी वाट. ॰वाळूक-न. (थट्टेनें, ल.) दगड. ॰वाळूक चारणें-(ल.) दगड मारणें. ॰शकट्ट-पु. एका जातीचें श्वापद. 'रानशकट्ट आणी रीसें ।' -दा ३.७.९. ॰शेकट-पु. रानशेवगा पहा. ॰शेण-शेणी-गवरी-स्त्री. १ रानांत पडलेलें गाई-म्हशीचें वाळलेलें शेण, याच्या उलट वळशेण. २ जेव्हां एखाद्या मनुष्याचें ज्ञान, समज, सामर्थ्य किंवा संपत्ति यासंबंधीं पूर्णपणें निषेध दाख वाववाचा असतो तेव्हां उपमानाप्रमाणें योजलेल्या (शेण, गोवर्या, माती, धूळ, दगड, धोंडा, राख इ॰) शब्दापैकीं हा एक शब्द आहे. उदा॰ त्याला रानशेणीचें पीठ समजतें ? = त्याला काय समजतें ? ॰शेर-पु. एक वनस्पति; हुरा. ॰शेवगा-पु. एक झाड. सामा- न्यत: रानेशर. ॰सठ(ट)वी-स्त्री. सठवीचें रूप धारण करणार्या देवीचें किंवा दुर्गेंचें नांव. 'उच्छिष्टचांडाळी रानसटवी जखणी ।' -ह १३.६८. ॰सावज-न. रानांतील जंगली पशु. 'कीं रानींचें रानसावज उन्मत्त ।' -नव २२.१३१. ॰सिवार-न. शिवारां- तील जंगल. 'गांवचें रानसिवार खोताची सत्ता आहे.' -मसाप २.५९. ॰सोडवण-स्त्री. रान तोडून साफ केल्याबद्दलची जकात. -अस्पृ ३८. ॰सो(व)र-सोरु-पु. रानटुक्कर. 'रानसोवर बळकट ।' -कालिका २२.१९.[रान सूकर-सूअर-वर] ॰हळद- दी-स्त्री. एक वनस्पति. ॰हुरा-पु. सामान्यत: रानशेर. राना- वळी-स्त्री. एक लहान फुलझाड. हिचा औषधांत उपयोग करतात. रानी-परज-स्त्री. सुरतपासून नवापूरपर्यंत राहणारे रानटी लोक. रानोमाळ-क्रिवि. १ रानांत आणि माळांत. २ तजावजा; अव्यवस्थित; अस्ताव्यस्त रीतीन; पांगून. 'तैसे ब्राह्मण रानो- माळ । भयें करूनि फळतात ।' ३ (ल.) पसरल्यासारखें; इकडे तिकडे अस्ताव्यस्त फेकल्यासारखें. 'वार्यानें पोथीचीं पत्रें रानो- माळ झाली.' [रान + माळ] रानोरान-क्रिवि. रानांतून आणि वनांतून; दरीखोर्यांतून; सर्व देशभर. 'माझी गाय चुकली म्हणून मी रानोरान फिरलों' [रान द्वि.] रान्या-वि. रानावनां तील; खेडवळ; गांवढळ; रानकरी; रानट. [रान]
गो
स्त्री. १ गाय. २ बैल (पशु). समासांत-गाईपासून झालेलें; गाईसंबधीं (दुध, चामडें, मांस इ॰). 'अगा गोक्षीर जरी जाहलें । तरी पथ्यासि नाहीं म्हणितलें ।' -ज्ञा २.१८४. [सं.] सामाशब्द- ॰कर्ण- ॰क्रण-न. १ मुलाला दूध पाजावयाचें (गाईच्या कानाच्या आकाराचें) बोंडलें. २ एक वेल व तिचें फूल. ३ बारा ज्योतिर्लिंगांपैकीं एक. हें कुमठें (कानडा जिल्हा) तालुक्यांत आहे. ४ (तजा.) दांड्याचें सारपात्र; कावळा. याचा आकार गोकर्णासारखा असतो. -पु. गाईचा कान. गोकर्णांत येणें- संपुष्टांत, गाकुळांत येणें; संपणें; दरिद्री होणें. गोकर्णिका- कर्णी-स्त्री. एक प्रकारचा लगाम. गोकर्णी-स्त्री. एक वेल, हिचीं फुलें (पांढरीं, निळीं) गाईच्या कानासारखीं असतात. [सं.] गोकु(कू)ल ळ-न. १ श्रीकृष्णाच्या लहानपणच्या वसतीचें गांव. २ गोकुळाष्टमीस नंद, यशोदा, गोप-गोपी, गाईवासरें इ॰ ची पूजा करण्यासाठीं केलेलीं मातीचीं चित्रें. ३ (ल.) स्वैरसं- भोग; व्यभिचार. (क्रि॰ माजविणें). [सं. गा + कुल] गोकु ळांत येणें-१ संकोचित होणें; संपुष्टांत येणें; संपणें. २ आटा- क्यांत येणें (व्यवहार). [विश्वव्यापी कृष्णपरमात्मा ज्याप्रमाणें गोकुळाच्या मर्यादेंत आला त्याप्रमाणें] गोकुळाष्टमी-स्त्री. श्रावण वद्य अष्टमी; या दिवशीं भगवान् श्रीकृष्णाचा जन्म झाला. [सं.] गोकुळासारखें घर-न. मुलाबाळांनीं सुखसंपत्तीनें भरलेलें घर. गोकोश-पु. जमीन मोजण्याचें एक माप: गायीच्या हंबरण्याचा टप्पा; गोरुत; दोन कोसांचें अंतर. गोखडी-स्त्री. गाई उभ्या राहण्याची जागा; गोठण. 'गिलच्यानीं गोखडींत दहा-पांच बैरागी सत्पुरुष होते तेहि बसले ठिकाणीं लबे कले.' -भाब २८ गोखमा-पु. १ गुराखी. २ (ल.) गांवढळ खेड- वळ; शेत्या; नांगर्या. गोखरें, गोखोण-रेब/?/-न. (कों) गुरांनीं खाऊन शिल्लक राहिलेलें गुरांच्या पायाखालचें. निरुपयोगी गवत. 'केळीला गोखरेडाचें खत चांगलें [गौ + खूर] गोखाना- पु. १ सरकारी किंवा एखाद्या मोठ्या माणसाचा गायवाडा; गुरांचें खातें. २ गायठाण; गोठा. [सं. गो + फा. खाना] गोग्र- हण-न. गाईचें हरण, चोरी. 'उत्तरगोग्रहण.' 'तृवां गोग्रह- णाचेनि अवसरें । घातलें मोहनास्त्र एकसरें ।' -ज्ञा ११.४६९. [सं.] गोग्रास-पु. १ जेवण्यास बसण्यापूर्वीं गायीसाठीं राखन ठेवलेला अन्नाचा नैवेद्य. २ गाईसाठीं भिक्षा. [सं.] गोचर-न. गुरचरण; गुरचराई. [सं.] गोचर्म-न. १ गाईच कातडें. २ (ल.) जमीन मोजण्याचें एक माप. गाईच्या चामड्याइतकी जमीन; (गाईच्या कातड्याची वादी काढून तिनें वेष्टिलेली जमीन एका माणसानें राजापासून मागून घेतल्याची एक जुनी गोष्ट आहे तिच्यावरून) तीनशें फुट लांब व दहा फूट रुंद या मानाचें क्षेत्र (यांतील धान्य एका माणसास एक वर्ष पुरतें असा हिशोब आहे). [सं.] गोजरूं गोजी-नस्त्री. (प्रेंमानें किंवा तिरस्कार करतेवेळीं योजना) कालवड; वासरी. गोजिव्हा-स्त्री. एक वनस्पति; गोजबान पाथरी; दवली. [सं.] गोठ(ठा)ण-स्त्रीन,. दुपारीं सावलीसाठीं पाण्याजवळ झाडाखालची बसण्याची गुरांची आखर. जागा; गोठा. 'पशु पीडती पर्जन्यें । गळती गाईंची गोठणें ।' -मुसभा ३.७९. [सं. गोष्ठ, गोस्थान म्ह॰ गोठणीच्या गाई माभळभट दान घेई. = हलवायाच्या घरांवर तुळशीपत्र. गोठण घालून बसणें-सभेत अस्ताव्यस्त बसणें. गोठा-ठो-पु. गुरें बांधण्याची जागा; जना- वरे रहाण्याची जागा. [सं. गोष्ठ; प्रा. गोट्ट] गोठापाणी-न. सकाळीं गोठा झाडणें. गुरांच शेण, मूत काढणें इ॰ गोठ्यांतील व्यवस्थेचें काम गोठाव(वि)णें-सक्रि. गोठणांत गुरें जमविणें; गोठ्यांत गुरें घालणें. गोठी-स्त्री. (कों.) वासरांचा लहान गोठा. गोठ्यौचें-क्रि. (गो.) पशूंचें बसणें. [गोठा] गोथवड-स्त्री. (कों.) गुरांची दावण, ठाण; लांब पडळ; कोटंबा. [सं. गोष्ठ- वत्] गोदंती हरताळ-स्त्री. पिवळा हरताळ. गोदण-स्त्री. (बे.) गुरापुढें वैरण टाकण्याची जागा. [गवादणी] गोदन- न. (माण.) लहान गोठा. गोंदरड-स्त्री. (राजा.) गोठ्यांतील केरकचरा, घाण. गोदान, गोप्रदान-न. ब्राह्मणास गाईचें दिलेलें दान. 'प्राचीन काळीं गाय दान मिळणें सोपें होतें, पावली मिळणें कठीण, पण हल्लीं चार आण्यांत गोप्रदान.' -गांगा १४४. गोदान-न. सोळा संस्कारांपैकीं व समावर्तनाच्या वेळीं करावयाचा एक संस्कार. [सं.] गोधन-न. गुरढोरे किंवा त्यांच्या रूपानें संपत्ति. 'धन्य तीं गोधनें कांबळी काष्ठीका ।' -तुगा २०८. गोधूल मुहूर्त, गोंधळिक, गोंधुळूक-पुन. १ सायंकाळचा (गुर रानांतून परत घरी येत असतां त्यांच्या) चालण्यानें उडालेली धूळ दिसते तेव्हांचा) काळ. २ सुर्यास्ता- पूर्वींची व नंतरचीं ३० पळें यामधील काळ; हा लग्नास शुभ मान- तात. गोरज मुहूर्त. गोधूल लग्न-न. १ गोरज लग्न. गोधूल पहा. २ सूर्यास्तसमयीं उदय पावणारी राशी, लग्न. गोधूलिक-वि. गोधूलसंबंधीं (कार्य. लग्न-मुहूर्त). गोधूळ-ळी-स्त्री. गोधूल पहा. गोप-पु. गुराखी, गवळी जात. व तींतील एक व्यक्ति. 'पूजिति सांग नगा ती रीति । सुखाचीच गोप सांगन गाती ।' -मोकृष्ण २४.७. गोपचार-पु. गायरान; गोचरण. गोपद-न. १ गाईचें पाऊल. २ गाईच्या पावलाचा मार्ग, खूण. ३ आंत पाणी भरलेली गोपदाची खूण, डबकें. गोपद्म-न. चातुर्मास्यांत रांगो- ळीनें गाईचीं पावलें नववधू काढतात व पूजा करतात तें. गोपद- चिन्ह. [सं.] गोपवाडा-पु. गवळीवाडा. ' जो नांदवी उत्कट गोपवाडे ।' -सारुह १.७८. गोपाल-ळ-पु. १ गुराखी; गुरें पाळणारा. २ राजा. ३ भगवान श्रीकृष्ण. ४ एक जात व तींतील व्यक्ति; डोंबारी; हे मनगटानें दगड फोडतात, मोठालीं वजनें उचलतात व कसरतीचे खेळ खेळतात, हें गांवकर्यांचीं गुरें राखो- ळीला घेतात. -गांगां १२२. गोपाष्टमी-स्त्री. कार्तिक शुद्ध अष्टमी या दिवशीं त्यांची व गाईची पूजा करतात. गोपाळकाला-पु. गोकुळअष्टमीच्या उत्सवाच्या व श्रीकृष्णाच्या इतर उत्सवाच्या शेवटीं करावयाचे खेळ, द्यावयाचा प्रसाद,जेवण इ॰; गोकुळा- ष्टमीच्या पारणेच्या दिवशीं दहीहंडी फोडून तींतील प्रसाद वाट- तात तो. गोपाळखेळ-पु. गोपाळ लोकांची कसरत, खेळ; डोंबार्यांचा खेळ. गोपाळीं-क्रिवि. गोरजीं; गोधूललग्नीं. गोपिका, गोपी-स्त्री. गोपालस्त्री; गवळण. 'तुझे कथिति गोपिका विविध तीस बोभाट ते ।' -केका ८६. [सं.] गोप्र- दान-१ गोदान पहा. २ (थट्टेने) शिव्या. 'त्यानें त्यास गोप्र- दानें केलीं.' गोप्रसव-पु. कुनक्षत्रीं जन्मलेलें मूल गाईच्या तोंडापुढें धरतात व असें केल्यानें तें गाईचें मूल होऊन अशुभा- पासून मुक्त होतें, अशा मुलाला म्हणतात. गोप्रसवशांति-स्त्री. कुयोगीं जन्मलेलें मूल गाईच्या मुखांतून जन्मलें अशी भावना धरून कुयोगदोषनाशार्थ करावयाची शांति. गोब्राह्मण-पु. १ गाय आणि ब्राह्मण. २ (ल.) अगदीं साधाभोळा, गरीब ब्राह्मण. गोमय-नपु. गाईचें शेण. 'शुद्ध करूनिया गोमय गोळा । मृति- काकण विरहित ।' [सं.] गोमाशी-स्त्री. घोडे, गाई इ॰ च्या अंगावरील एक मोठी माशी; माशीची एक जात. गोमांस-न. गाईचें मांस; शपथेसारखा किंवा निषेध दाखवीतांना याचा उपयोग करतांत. कारण हिंदूंना गोमांस अगदीं निषिद्ध आहे. 'ही तुमची ठेव मला गोमांसाप्रमाणें आहे.' गोमुख-न. १ तीर्थ इ॰ पवित्र पाणी खालीं पडण्यासाठीं बांधलेलें किंवा बनविलेलें दगडी किंवा धातूचें गाईचें तोंड. २ एका प्रक्रारचें गाईच्या तोंडासारखें वाद्य.'तों वाद्यें शंखभेर्यादी पणवानक गोमुखें ।' -वामन गीतासमश्लोकी १.१३. गोमुखव्याघ्र-पु. १ दिसण्यांत गाई- सारखा सौम्य पण अतिशय क्रूर असा वाघ. २ गाईचें कातडे पांघ- रलेला लांडगा. ३ (ल.) वरून गरीब पण आंतून लुच्चा माणूस. [सं.] गोमुखी-स्त्री. गाईच्या तोंडासारखी काटकोनी जपमा- ळेची पिशवी; हिच्या आंत हात घालून जपाची माळ ओढतात. 'काय मौन धरुनिया गोमुखिला जाळिसी ।' -राला ८७. -पु. (कों.) एक प्रकारच्या नवसांत नियम केल्यामुळें हात न लावतां तोंडानें अन्न उचलून जेवणारा माणूस [सं.] गोमूत्र-न. गाईचें मूत; हे पवित्र मानतात व अपवित्र वस्तूंवर शिंपडून त्या पवित्र करतात. गोमूत्रिका, गोमूत्रिकन्यायगुणाकार-पु. (ज्यो.) गुणाकराचा एक प्रकार. गोमुत्रिकाबंध-पु. काव्याचा एक प्रकार याच्या द्वितीय चरणांत पहिल्या चरणांतील बहुतेक अक्षरें येतात. गोमूत्रवायु-पु. एक नवयुक्त वायु. (इं) आमोनिया. गोमेघ- पु. ज्यामध्यें गाय मारतात तो यज्ञ. [सं.] गोरखी-पु. गुराखी; गुरें (गाई) पाळणारा. 'कवळाचिया सुखें । परब्रह्म झालें गोरखें ।' -तुगा १८१. गोरज पु. गाईची धूळ. गोधूल पहा. 'गोरजें डवरला, मुखचंद्र ।' -ह १८.६३. गोरजमुहूर्त-गोधूलमुहूर्त पहा. गोरस-पु. गाईचें दूध, दहीं, तूप इ॰ गाईपासून होणारे पदार्थ. [सं.] गोरक्ष-रक्षक-पु. १ गुराखी. २ गुरांची रक्षक देवता. ३ नाथपंथांतील गोरखनाथ नांवाची एक प्रसिद्ध व्यक्ति गोरख-गोरखनाथ पहा. गोरक्षण-न. कसायापासून गाय वांच- विणें; गोपालन. गोरा-र्हा-पु. गाईचा पाडा, खोंड; धांडा. गोरुव-न गोवत्स. गोरूं, गोरवा, गोरें-न. (राजा. गो.) ढोर, गुरूं, 'गोरु खडबडी बाहिरी ।' -भाए ३९४. गोरो- चन-ना-नस्त्री. गोवर्धन; हें गोमूत्रापासून किंवा कुपित्थाच्या रूपानें गाईच्या ओकण्यापासून, किंवा गाईच्या डोक्यांत उत्पन्न होतें याचा रंग पिवळा. हें रंग, चित्रें औषधें यांत उपयोगी आहे. 'गोरोचनापरिस गौर असें गणावें ।' -र. ६. (लोक समजूत अशी कीं वाजीकरण किंवा स्त्रियांस मोहविण्यांत गोरो- चनाचा उपयोगी होतो). [सं.] गोवंड-डी, गोवडी-पुनस्त्री. जंगल किंवा डोंगरावरील जनावरांची चरण्यास जाण्याची पाऊ- लवाट; गायवाट.[सं. गोवर्तनी] गोवंडास लागणें-येणें- सरळ रस्त्यास लागणें; चालीस लागणें (माणूस, काम). गोवत्स- पुन. गाईचें वांसरूं. गोवत्स द्वादशी-स्त्री. आश्विन वद्य द्वादशी; या दिवशीं गाईची पूजा करितात. गोवपा-स्त्री. गाईच्या आंत- ड्यावरील आवरण; सामान्यतः गाय, बैल यांच्या चरबीस व हाडांतील मगजासहि म्हणतात. [सं.] गोंवर-पु. १ शेणी; न थापलेलें वाळलेलें शेण, वाळलेल्या शेणाचा चुरा. २ गाईनें खाल्यानंतर उरलेला चारा, गळाठा. ३ (कों.) राब. ४ (हेठ.) उकि- रडा. [सं. प्रा. गोवर] गोवरर्कोडा-पु. गोठ्यांतील केरकचरा; शेणमूत. गोवरी-स्त्री. १ वाळलेल्या शेणाची थापडी; शेणी; गोवर अर्थ १ पहा. २ (कु.) शेणखत. ३ राब भाजण्यासाठीं वाळविलेला शेणगोळा. गोवरीची आग-स्त्री. गोवरी जाळली असतां वर राख दिसते परंतु आंत विस्तव असतो यावरून गुप्त परंतु भंयकर वैर. गोवर्या मसणांत जाणें-वृद्धपण येणें. मरण जवळ येणें; वय होणें. गोवर्धन-पु. १ मथुरेजवळील टेकडी; इंद्रानें पाडलेल्या पावसापासून गोकुळाचें रक्षण करण्यासाठीं श्रीकृष्णनें याला करंगळीवर धारण केलें व याच्या खालीं गोकु- ळांतील सर्व माणसें आणि पशू सुरक्षित राहिलें. २ कार्तिक शुद्ध प्रतिपदेच्या (बलिप्रतिपदेच्या) दिवशीं भात, शेण, भाजी- पाला इ॰ चा वल्लभसंप्रदायी लोक गोवर्धनासारखा पर्वत करून त्याची पूजा करतात तो. -न. १ गोरोचन. २ महाराष्ट्रांतील एक प्राचीन राष्ट्र हल्लींच्या नाशिक जवळच्या भागांत हें असावें. ॰ब्राह्मण-पु. एक महाराष्ट्रीय ब्राह्मण जात. गाईच्या तोंडें गोवर्धन निवडणें-पंचाईत इ॰ प्रकरणीं ज्याचा विषय त्याच्याच तोंडानें निवाडा करणें. गोवळ, गोवळगोठा-पु. (कों.) गोशाला; गायवाडा; गोठा. गोवळ, गोवळा, गोवाळ- ळी-पु. १ गुराखी; गवळी. ' उगला राहे न करी चाळा । तुज किती सांगों रे गोवळा । -तुगा १२९. २ (राजा.) वयानें मोठा पण पोरकट माणूस; दुधखुळा (निंदार्थीं). [सं. गोपाल; प्रा. गोवाल] गोवारी-पु. गुराखी; गवळी. 'तव गाई आलिया रात्रीं । कच नाहीं आला गोवारी ।' -कथा १.५.८२. गोवाल- पुअव. गंगावन; गाईच्या शेंपटीचे केंस.[सं.] गोवेल-पुस्त्री. एक वेल; ही गुरांना विषकारक असते म्हणतात; भारे बांधण्याच्या कामीं हिचा उपयोग होतो. गोवैद्य-पु. गाईचा वैद्य; गुरांचा वैद्य; पशुवैद्य. गोशत-न. १ शंभर गाई. २ शंभर गाई दान देण्याचें कर्म. [सं.] गोशाला-ळा-स्त्री. गोखाना; गोठा पहा. गोष्ठ-पुन. गोठा. गोष्पद-न. १ गाईचें पाऊल, पावलाचें चिन्ह. २ गोवंडी. ३ गोपदाइतकें माप; गाईच्या खुराखालीं समावेश होईल इतकी जमीन. ४ चिखलांत उमटलेलें वं पाण्यानें भरलेलें गाईचें पाऊल. 'गज गोष्पदीं बुडाला हा दैवा सिंधु शोषिला मशकें ।' -मोद्रोण १.२३. 'गोष्पद मानुनि दिनांत शतदां यमुना वोलांडिली । ' -राला ८१. गोष्पदोपम-वि. गोष्पदाप्रमाणें (४) ओलांडून तरून जाण्यास सुलभ; सहजसुलभ; क्षुद्र; सुगम. 'ईश्वरभजन केलें असतां भव गोष्पदोपम होतो.' गोस्फुरण- न. गाईचें अंग थरारणें, गाईनें भोंवरा करणें. [सं.] गोहण- स्त्री. गव्हाण पहा. गाताडी. गोहन-न. (व.) गाईंच्या कळप. [गोधन] गोहण्या-पु. (व.) गुराखी. गोहत्त्या -हनन- स्त्रीन. १ गाईचा वध. २ गोवधाचें पातक. गोहरा-गोहोरा- पु. गोर्हा पहा. म्ह॰-'गोहर्याच्यानें शेत पोराच्यानें संसार होता तर मग काय?' गोहोत-न. (राजा.) १ दाणा, कोंडा, पेंड इ॰ गुरासाठीं शिजविलेलें आंबोण, मिश्रण. २ (ल.) घोंटाळा; खिचडी; गोंधळ. गोक्षुर-पु. १ गोखरू; सराटा. २ गाईचा खूर. ३ गाईची पाऊलवाट; गोवंडी. [सं.]
लोक
पु. १ जन; मनुष्य; मानवजात; जनता; समाज. 'तूं मात्र शहाणा, लोक काय वेडे आहेत?' (सामा.) लोक- मर्यादा-रीति-लज्जा इ॰ (बहुधां अनेकवचनी प्रयोग). २ वर्ग; विशिष्ट समाज, संघ; जाता; (या अर्थीं पूर्वशब्दाशीं समास होऊन उपयोग.) उदा॰ ब्राह्मणलोक, शू्द्रलोक, गवईलोक, शिपाईलोक, देवलोक, पिशाचलोक इ॰ ३ राष्ट्र; देश; राज्य; प्रांत. 'प्रौढ होतां संपूर्ण लोक आले खरेच उदयाला ।' -ऐपो ३०४. -एभा १०. ६०४. ४ राजे, सरदार इ॰ कांजवळ किल्ला, शहर इ॰कांचें रक्षण करण्याकरतां ठेवलेलीं माणसें; सैन्य; संत्री; शिपाईनोकर. ५ भुवन; जग; मानवजात; समूह. 'देहक्रिया आवघी । न करविता होय बरवी । जैसा न चलतेनि रवी । लोकु चाले ।' -ज्ञा ८.१८७. ६ परका माणूस; तिऱ्हाईत इसम; अनोळखी मनुष्य. 'आज आपल्याकडे लोक आले आहेत.' ७ मनुष्य; इसम; माणूस. 'जो दाखवील मजला कृष्णार्जुन तो न लोक सामान्य ।' -मोकर्ण २६. १८. ८ जगाचे, विश्वाचे भाग. प्रामुख्यानें तीन लोक आहेत. स्वर्गलोक, मर्त्य किंवा मृत्युलोक, आणि पाताळलोक. पुढील सप्त- लोकहि मानण्यांत येतात. भूलोक, भुवर्लोक, स्वर्लोक, महर्लोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक. ह्यांशिवाय प्रत्येक देवतेचा एकेक लोक कल्पिलेला आहे. उदा॰ इंद्रलोक, चंद्रलोक, ब्रह्मलोक, विष्णु- लोक इ॰ 'जैं लोकांचीये व्यवस्था न पडे । जैं या त्रिभुवनाचें कांहीं न मांडे ।' -ज्ञा १०.९५. ९ सद्गति; स्वर्गलोक; मरणोत्तर चांगली अवस्था. 'मनुवंशीं जन्मुनियां जालों अनपत्य मीं न लोक मला ।' -मोमंत्ररामायण बालकांड २०. १० प्रदेश; ठिकाण. 'अवधड स्थळीं कठीण लोक । तेथें राहणें नेमक ।' -दा १५.२. २४. [सं.] म्ह॰ १ लोकां सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण = लोकांना उपदेश करावयाचा व स्वतः मात्र त्याप्रमाणें वागा- वयांचे नाहीं. २ लोक आणि ओक. = लोकमत हें अतिशय वाईट, तिरस्करणीय, ओकारीप्रमाणें त्याज्य असें जाहे, या अर्थी उपयोग. लोकांचीं घरें (किंवा दारें) पुजणें-सारखें लोकांच्या घरीं जाणें; या घरांतून त्या घरांत असें नेहमीं लोकाकडे जाणें. सामाशब्द- ॰कथा-स्त्री. १ दंतकथा; लोकांत प्रचलित अस- लेली परंतु ऐतिहासिक आधार नसलेली गोष्ट; कल्पित गोष्ट; परंपरागत गोष्ट. २ एक प्रकारचें वाङ्मय. प्राचीन काळापासून लोकांच्या तोंडीं असलेल्या गोष्टी, कहाण्या; लौकिक सारस्वत. (इं) फोकलोअर. ॰गंगा-स्त्री. समाज; लोकसमुदाय. 'जात- गंगेला व लोकगंगेला भ्यालें पाहिजे.' -भाऊ १९. ॰गान-न. ज्ञानपदगीत; खेडवळ लोकांचें गाणें. ॰ग्रह-पु. लोकमत; लोकांची एखाद्या गोष्टीविषयींची समजूत, कल्पना. ॰चर्चा-स्त्री. जनते- मधील चर्चा; गप्पा; लोकांत चर्चिली किंवा बोलली जाणारी गोष्ट. ॰जवाई-पु. (ना.) जांवई. -शर. ॰तंत्र-न. लोकमत; जनतेचा कल; प्रजेचें म्हणणें, प्रवृत्ति. 'सरकारनें लोकतंत्रानेंच राज्यकार- भार हांकावा.' -केसरी २.१२.३०. -वि. लोकनुवर्ती; लोकांना जबाबदार. 'सरकार हें अधिक लोकतंत्र झालें पाहिजें.' -केले १.६४. ॰त्रय-न. तीन लोक; स्वर्ग, मृत्यु व पाताळ. ॰धार- जिणा-वि. १ लोकमताला मानून वागणारा (परंतु स्वतःच्या किंवा धन्याच्या हिताबद्दल निष्काळजी); स्वतःच्यापेक्षां, स्वकी- यांच्यापेक्षां लोकांच्या हिताला जपणारा. २ लोकांची काळजी करणारा; लोकाभिमुख. ॰नाथ-पु. १ एक औषधी रसायन. २ राजा; देव. 'लोकनाथ, जगन्नाथा. प्राणनाथा पुरातना ।' -मारुतिस्तोत्र. ॰नायक-पु. लोकांचा पुढारी. 'लोकनायकाचें कर्तव्य फारच खडतर आहे.' -टि १.४६७. ॰नियुक्त-वि. लोकांनीं नेमलेला, निवडलेला. ॰नीति-स्त्री. लोकरीत; वागण्याची सामान्य पद्धत; समाजास मान्य गोष्ट; प्रघात; चालरीत. ॰नुत-वि. लोकांकडून प्रशंसा केला गेलेला; लोकांनीं स्तविलेला. ॰परी-स्त्री. लोकरीत. 'लोकपरीनें वर्तती जनीं ।' -दावि २६६. ॰पक्ष-पु. लोकांची बाजू; प्रजापक्ष. याच्याविरुद्ध राजपक्ष, सर- कारपक्ष. 'फेरोजशहांनीं आणीबाणीच्या प्रसंगीं लोकपक्ष संभा- ळला.' -टि १.४२२. ॰पाल-ळ-पु. १ राजा; प्रजेचा पालन कर्ता; नृप. 'म्हणवितां स्वतां लोकपाळा !' -विक ४०. २ इंद्र, यम इत्यादि लोकाचा स्वामी; अष्टदिक्पाल पहा. 'इहीं लोकपाळ केले । लोकपाळीं विविध, लोक स्त्रजिले ।' -ज्ञा १०.१०२; -एभा १०.६०३. ॰प्रवाद-पु. बातमी; लोक- वार्ता; वदंता; किंवदंती; जनप्रवाद (सामान्यत: वाईट अर्थानें). 'लोकप्रवाद कायकाय कंड्या पिकवील तें सांगतां येत नाहीं.' -नि ४३४. ॰प्रवाह-पु. सर्वसाधारण चालरीत, वागणूक; लोक- रीत. ॰प्रशस्त-वि. लोकसंमत; लोकमान्य; रुढीला धरुन. अस- लेला. ॰प्रसिद्ध-वि. १ सर्वप्रसिद्ध; लोकांमध्यें अतिशय माहित असलेला; लोकांमध्यें प्रचलित. २ सर्वसाधारण; सामान्य. ॰प्राणेश-पु. (लोकांच्या प्राणांचा भालक, धनि.) वायु; हवा. ॰बंधु-पु. १ लोकांचा भाऊ; लोकहितकर्ता. 'लोकबंधू जो होय रवी ऐसा ।' -नल. २ सूर्य. ॰बाह्य-वि. १ (लोकांच्या सामान्य वागणुकीहून किंवा समजुतीहून निराळा) विचित्र; विलक्षण; चम- त्कारिक. २ लोकांना प्रिय नसणारें; लोकविरुद्ध. ॰बोली-स्त्री. लोकांचें बोलणें; लौकिक बोली. 'गुणा निर्गुणा आणिलें लोक- बोलीं ।' -दावि २६६. ॰भय-भीति-नस्त्री. जनतेची भीति; लोकप्रवादाची भीति; जनलज्जा. ॰भांड-वि. भांडखोर; बडबड्या. -तुगा. ॰भाषा-स्त्री. १ सामान्य जनतेची भाषा, बोली. २ बोलण्यांतील भाषा; वाक्प्रचार. ३ अडाणी भाषाप्रयोग; असं- स्कृत बोली. ॰मत-न. सामान्य जनसमूहाचा अभिप्राय; लोकांचें म्हणणें; त्यांचे विचार. 'ज्या वसाहतींत लोकमतदर्शक कायदे- मंडळें आहेत त्यांस या कायद्यानें आपल्या शासनपद्धर्तीत फेर- फार करवून घेण्याचे अधिकार देतांना हा निर्बंध घालून ठेवला.' -वस्व १३६. ॰मतानुवर्ती-वि. लोकांच्या मताप्रमाणें असलेला; लोकतंत्राप्रमाणें चालणारा. [लोक + मत + अनुवर्ती] ॰मर्यादा-स्त्री. १ जनरूढी; पडलेली वहिवाट; प्रचार. २ जन- लज्जा. ३ जनाचा मान; लोकांविषयीं आदरभाव. (क्रि॰ राखणें; ठेवणें; पाळणें; धरणें; बावगणें). ॰माता-स्त्री. लक्ष्मी; लोकजननी. 'न सेविती हे जरी लोकमाता ।' -सारुह २. १८. ॰मांदी-स्त्री. लोकांचा समूह; गर्दी. 'त्वरें चालती धांवती लोक मांद्या । पुरी वोस ते रात्र जेथें अयोध्या ।' -मुरामायणें अयोध्या ४३. ॰मान्य-वि. १ लोकांना मान्य; प्रिय. २ लोकांचा पुढारी नेता. 'लोकमान्य हा शब्द उच्चारतांच मनांतून ही पदवी तुम्ही मान्यच करतां.' -केले १.२७६. बाळ गंगाधर टिळक यांना लाव- ण्यांत आलेली, येणारी पदवी. 'गोखल्यांची इंग्लंडांतील काम- गिरी' -(विश्ववृत्त एप्रिल १९०६) या लेखांत प्रथम वि. का. राज- वाडे यांनीं वापरली. ॰रंजन-न. १ लोकांची करमणूक. २ लोकांना संतोष, सुख होईल असें आचरण; लोकांना खूष ठेवणें. ॰रमण- वि. लोकांनां संतुष्ट करणारा. 'पूर्णब्रह्म स्वयें श्रीकृष्ण । बळी बळिराम लोकरमण ।' -एभा १.२.३. ॰राजक-राज्य- न. लोकमतानुवर्ती शासनसंस्था. (इं.) डेमॉक्रसी. 'लोकराजकाचे दोष त्यांना स्पष्ट दिसत होते.' -महाजनि (मनोरंजन-आगरकर अंक). ॰रीति-रीत-स्त्री. लोकांची वागण्याची पद्धत; जन- रीतिरिवाज; सामान्य वागणूक. ॰लचांड-न. लोकांच्या नाखु- षीनें होणारा त्रास; येणारी अपत्ति, लोकांच्या अवकृपेचें संकट. म्ह॰ सगळें लचांड पुरवेल पण लोकलचांड पुरवणार नाहीं. ॰लज्जा-लाजस्त्री. लोकमर्यादा पहा. १ लोकमताला मानणें; लोकांना जुमानणें. २ जनलज्जा; लोकभय; लोकांची वाटणारी शरम. ॰लोकपाळ-पुअव. १ देशाचे किंवा समाजाचे पुढारी लोक; प्रतिष्ठितवर्ग (व्यापकार्थी). २ राजा व त्याचे अधिकारी (लवाजम्यासह). ३ फौज; शिपाई. ॰वाद-वार्ता-स्त्री. पु. जनवार्ता; वदंता; कंडी; लोकप्रवाद पहा. 'लोकवार्तेला गति मिळाली कीं ती किती फोफावेल याचा नियम नाहीं.' -इंप ३७. ॰विद्या-स्त्री. समाजशास्त्र. -मसाप २.२१९. ॰व्यवहार- पु. लोकप्रवाह; सामान्य रीत; जनरीत; सर्वसाधारण वागणूक. ॰शाही-स्त्री. लोकांच्या सत्तेखालीं त्यांच्या संमतीनें चालणारी व त्यांच्याच हिताची अशी राज्यपद्धति. ॰शिरस्ता-पु. सामान्य परिपाठ; सामान्य रीत; लोकांची वागण्याची पद्धत; राहटी; रूढी. ॰संख्या-स्त्री. एका विशिष्ट स्थानी. राहणाऱ्या एकंदर सर्व लोकांची गणती. ॰संग्रह-पु. समाजव्यवस्थेचें रक्षण; लोकसंस्थेचें संरक्षण; अनेक अनुयायी मिळविणें; लोककल्याण; लोकदीक्षा; स्वतःला निराळ्या रीतीनें वागण्यास प्रत्यवाय नसतांहि लोकांनीं आचारभ्रष्ट होऊं नये म्हणून स्वतःच्या इच्छेविरुद्ध कांहीं आचा- रांचा स्वीकार करून लोकांची जूट राखणें. 'ज्ञानी पुरुषांनीं यथाधिकार धर्मसंस्थापनेसारखीं लोकसंग्रहाचीं कामें करावीं.' -टिसू ५. 'तया लोकसंग्रहालागीं । वर्ततां कर्मसंगीं । तो कर्मबंधु आंगीं । वाजेलनी ।' -ज्ञा ३.१७५. ॰सत्ताक-सत्तात्मक- वि. लोकांची सत्ता असलेलें; लोकमतानुवर्ती; राजा नसून लोकां- कडून राज्यकारभार चालणारी (शासनपद्धति). 'लोकसत्तात्मक राज्यपद्धतींत लोकच राजे असतात.' -गांगा २६. ॰संपादणी- स्त्री. लोकांचीं मनें अनुकूल करुन घेणें; लोकांची खुशामत; लोकांच्या मर्जीकरितां केलेली बतावणी. 'जैसि बहुरुपियांची रावो राणी । स्त्रीपुरुषभावो नाहीं मनीं । परी लोकसंपादणी । तैशीच करिती ।' -ज्ञा ३.१७६. ॰समजूत-स्त्री १ सर्वसाधारण लोकांचें मत; सामान्य समजूत. २ (एखाद्या मनुष्याविषयीचें किंवा पदार्था विषयींचें) लोकांचें यथायोग्य ज्ञान; समाधान; योग्य जाणीव. ३ केवळ लोकांचें समाधान (आपलें किंवा आपल्या बाजूचें समा- धान न मानतां फक्त लोकसमाधान) पहाणें ॰साहित्य-न. लोकांच्या जिव्हाग्रीं परंपरेनें वावरत असलेलें कथात्मक वा गीता- त्मक वाङ्मय. हें लिखित असेलच असें नाहीं. याचीं उदाहरणें- कहाण्या, सावित्रीचें गाणें; कावळाचिमणीच्या गोष्टी; ठकसेनाच्या गोष्टी. इ॰ ॰सिद्ध-वि. लोकांत रुढ असलेलें; लोकांत चालू अस- लेलें; प्रचलित; वहिवाटींत असलेलें. ॰स्थिति-स्त्री. एकंदर जन- तेची सामान्य स्थिति; लोकांची परिस्थिति. 'गाड्या घोड्यांतून हिंडणाऱ्या गृहस्थापेक्षां गरिबांनाच लोकस्थिति अधिक चांगली समजते.' -टि २.८०. ॰स्फीति-स्त्री. लोकप्रसिद्धि. 'स्वामींची नजर खाद्यसमृद्धीवर, त्यांच्या पुरस्कर्त्यांची लोकस्फीतीवर व इतरेजनांची केवळ मौजेवर.' -नि ६१९. ॰हितैषी-वि. जन- तेचें हित इच्छिणारा; लोकांचें कल्याण पाहणारा. [लोक + हितैषी; हित + इष् = इच्छिणें] लोकाग्रणी-पु. लोकश्रेष्ठ; लोकांचा पुढारी; नेता. [लोक + अग्रणी] लोकाग्रह-पु. लोकांची उत्कट इच्छा; जनतेचा आग्रह. लोकाचळ-पु. स्वर्गादि लोकरुपी पर्वत; जगरुप पर्वत. 'एऱ्हवीं जगदाकाराचें सिरें । जें चिरस्थानीयांचे धुरे । ब्रह्म- भुवन गा चवरें । लोकाचळाचें ।' -ज्ञा ८.१५४. [लोक + अचल] लोकाचार-पु. रूढी; लोकांची रीत; प्रघात; वहिवाट; लोकरीत. 'अंतरनिष्ठ तितुके तरले । अंतरभ्रष्ट तितुके बुडाले । बाह्याकारें भरंगळले । लोकाचारें ।' -दा १८.१.२४. लोकांतर-न. परलोक; (स्वर्ग, नरक इ॰) मृत्युलोकाहून निराळा दुसरा लोक. [लोक + अंतर] लोकांतीं-क्रिवि. लोकांमध्यें; जाहीर रीतीनें; उघडउघड. 'एकांतीं लोकांतीं करूं गदारोळ । लेश तोही मळ नाहीं येथें ।' -तुगा १९९१. लोकातीत-वि. अलौ- किक; लोकांवेगळें; या लोकीं न सांपडणारें. [लोक + अतीत] लोकानुकूल्य-न. लोकांची अनुकूलता; जनमान्यता; लोककृपा; लोकप्रसिद्धि. [लोक + आनुकूल्य] लोकापवाद-पु. लोकांनीं केलेली निंदा; जनापवाद; लोकप्रवाद. [लोक + अपवाद] लोकालोक-पु. सप्तद्वीपात्मक पृथ्वीला तटबंदीसारखा असलेला पर्वत; सप्तद्वीपा पृथिवी व सप्तसमुद्र यांना वेढणारा व सूर्य- मंडळापर्यंतचा अवकाश व्यापून टाकणारा असा एक महान् विस्तृत पर्वत. लोकालोकीं-क्रिवि. १ तिऱ्हाइतांकडून तिऱ्हाइतांमार्फत. २ विशेष पुरावा नाहीं अशा प्रकारें लोकांच्या तोंडून ऐकिलेलें. 'ही खबर मी लोकालोकीं ऐकिलेली आहें.' लोकी(कि)क- पु. १ लौकिक; कीर्ति; यश. 'बहु लोकिक सांडूं नये ।' -दा १४.१.६८. २ प्रसिद्धि; चांगल्या किंवा वाईट रीतीनें लोकांस माहीत असणें. -वि. या लोकांतील; 'प्रपंच संपादणें लोकिक ।' -दा २.७.९. [सं. लौकिक] लोकिकीं-क्रिवि. (काव्य) लोकांत; लोकसमुदायांत. 'पुत्रसंतान नस्तां दुःखी । वांज नांव पडिलें लोकिकीं ।' -दा ३.३.३२. लोकेषणा, लोकेशना- स्त्री. १ लोकांनीं आपणास बरें म्हणावें अशी इच्छा; कीर्तींची इच्छा. 'वैराग्यें तनु शुष्क करावें सोडुनि लोकेशना ।' -देप ६७. २ स्वर्गादि लोकांच्या प्राप्तीची इच्छा. ३ लोकांमध्यें चांगली किंवा वाईट प्रसिद्धि; लोकमान्यता किंवा दुर्लौकिक. 'मुलखांत लोकेशना होती.' -पेद २१ ११२. [सं. लोकेषणा] लोकोक्ति-स्त्री. १ म्हण. २ ज्यांचा रूढ अर्थच घ्यावयाचा, शब्दश: अर्थ घ्यावयाचा नाहीं असे शब्द समुच्चयानें; वाक्प्रचार. उदा॰ डोळ्यांत तेल घालून राहणें; डोक्यांत राख घालणें इ॰. ३ (साहित्य) ज्या वाक्याला वाक्प्रचारानें चारुता आली आहे असें वाक्य. 'हरिच्या पुन्हां पुन्हां कां काड्या नाकांत घालिशी शशका ।' [लोक + उक्ति] लोकोत्तर-वि. अलौकिक; असामान्य; असा- धारण. [लोक + उत्तर] लोकोद्धार-पु. मानव जातीचा उद्धार; कल्याण; मोक्ष; जननमरणापासून मानवाची सोडवणूक; लोकांची उन्नति, प्रगति. [लोक + उद्धार] लोकोपकार-पु. केवळ लौकि- काच्या संरक्षणार्थ करण्याचा शिष्टाचार; जी करण्याला शास्त्राज्ञा किंवा आपली इच्छा नसून केवळ लोकमर्जीकरतां आपण करतों ती गोष्ट, कृति. [लोक + उपचार]
पंच
वि. पांच; ५ संख्या. [सं.] ॰उपप्राण-पुअव. पांच वायु:-नाग = शिंक येणारा वायु, कूर्म = जांभई येणारा, कृकल = ढेंकर येणारा, देवदत्त = उचकी येणारा व धनंजय = सर्व शरीरांत राहून तें पुष्ट करणारा व मनुष्य मेल्यावर त्यांचे प्रेत फुगविणारा वायु. 'नाग कूर्म कृकल देवदत्त । पांचवा धनंजय जाण तेथ ।' -एभा १३.३२०. ॰कन्या-स्त्रीअ. पांच सुविख्यात पतिव्रता स्त्रिया; अहल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी. ॰कर्में-नअव. शरीराचीं मुख्य पांच कामें-ओकणें, रक्तस्त्राव होणें, मलोत्सर्ग, मूत्रोत्सर्ग, नाक शिंकरणें इ॰. किंवा गतीचे पुढील पांच प्रकार:-उत्क्षेपण (वर करणें), अपक्षेपण (खालीं करणें), आकुंचन (आखडणें), प्रसारण (पसरणें) व गमन (जाणें). ॰कर्मेंद्रियें-हात, पाय, वाणी, शिश्न व गुद. कर्मेंद्रिय पहा. ॰कल्याण-णी-वि. १ गुडघ्यापर्यंत पांढरे पाय व तोंडावर पांढरा पट्टा असलेला (घोडा) हा शुभ असतो. -अश्वप १.९०. 'पंच कल्याणी घोडा अबलख ।' ३ (उप.) सर्व अवयव विकृत असलेला (माणूस). ३ (उप.) भाड्याचें तट्टू, घोडा (याला दोन्ही टाचांनीं, दोन्हीं मुठींनीं व दांडक्यानें मारून किंवा तोंडानें चक् चक् करून चालवावें लागतें म्हणून). ४ (उप.) ज्याच्या नाकाला निरंतर शेंबूड असून तो वारंवार मणगटांनीं काढून टिरीस पुसत असणारा असा (पोर). ॰काजय-स्त्री. (गो.) पंचखाद्य पहा. ॰कृष्ण-पुअव. (१) महानुभाव संप्रदायांतील ५ कृष्ण-कृष्णचक्रवर्ती, मातापूर येथील दत्त, ऋद्धिपूरचा गुंडम राउळ, द्वारावतीचा व प्रतिष्ठानचा चांग- देव राउळ. -चक्रधर सि. सूत्रें पृष्ठ २१. (२) हंस, दत्त, कृष्ण, प्रशांत व चक्रधर. -ज्ञाको (म) ७७. ॰केणें-न. मसाल्यांतील मिरी, मोहरी, जिरें, हिंग, दगडफूल इ॰ पदार्थ. ॰केण्याचें दुकान-न. छोटेसें किराण्याचें दुकान. ॰केदार-पुअव. केदार, ममद, तुंग, रुद्र, गोपेश्वर. ॰कोटी-स्त्री. उत्तर हिंदुस्थानांतील शंकराचें तीर्थक्षेत्र. ॰कोण-पु. पांच कोनांची एक आकृति. -वि. पांच कोनांची. ॰कोश-ष-पुअव. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय अशीं देहाचीं पांच आवरणें. या कोशांचा त्रिदेहाशीं पुढीलप्रमाणें समन्वय करतात-अन्नमयाचा स्थूलदेहाशीं, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, यांचा सूक्ष्म किंवा लिंगदेहाशीं व आनंदमयाचा कारणदेहाशीं. ॰क्रोशी-स्त्री. १ चार, पांच कोसांच्या आंतील गांवें; एखाद्या क्षेत्राच्या भोंवतालची पांचकोस जमीन. 'पुरलें देशासी भरलें शीगेसी । अवघी पंचक्रोशी दुम- दुमीत ।' -तुगा २६१०. ३ (ल.) या गांवांतील जोशाची वृत्ति. ४ पंचक्रोशी यात्रा पहा. ॰क्रोशी यात्रा-स्त्री. क्षेत्राची विशे- षतः काशी क्षेत्राच्या भोंवतालच्या पांच कोसांतील देवस्थानांना प्रदक्षिणा, तार्थाची यात्रा. ॰खंडें-नअव. आशिया, यूरोप, अमे- रिका, अफ्रिका, ओशियानिया. ॰खाज-जें-खाद्य-नपुन. १ ख या अक्षरानें प्रारंभ होणारे खाण्यायोग्य असे पांच पदार्थ (खारीक, खोबरें, खसखस (किंवा खवा) खिसमिस व खडी साखर). -एभा १.०.४९२. 'पूर्ण मोदक पंचखाजा । तूं वऱ्हाडी आधीं ।' -वेसीस्व ३. २ (गो.) नारळाचा खव, गूळ. चण्याची डाळ इ॰ पांच जिन्नसांचा देवाला दाखवावयाचा नैवेद्य. ३ (कों.) तांदूळ किंवा गहू, काजळ, कुंकू, उडदाची डाळ व खोबरें यांचा भूतपिशाचांना द्यावयाचा बळी; या पांच वाणजिनसा. ॰गंगा- -स्त्री १ महाबळेश्वरांतील एक तीर्थ. येथें कृष्णा, वेणा, कोयना, गायत्री (सरस्वती) व सावित्री यांचा उगम आहे. २ काशी क्षेत्रां- तील एक तीर्थ. 'गंगा भारति सूर्यसूनु किरणा बा धूतपापा तसे । पांची एकवटोनि तीर्थ निपजे ते पंच-गंगा असें ।' -नरहरी, गंगा- रत्नमाला १५७ (नवनीत पृ. ४३३). ३ पंचधारा पहा. (क्रि॰ वाहणें). ॰गति-स्त्री. घोड्याच्या पांच चाली-भरपल्ला किंवा चैवड चाल; तुरकी किंवा गाम चाल, दुडकी, बाजी, आणि चौक चाल. यांचीं संस्कृत नावें अनुक्रमें:-आस्कंदित, धौरितक, रेचित, वल्गित, प्लुत. ॰गव्य-न. गाईपासून निघालेले, काढलेले पांच पदार्थ दूध, दहीं, तूप, गोमूत्र, शेण यांचें मिश्रण (याचा धार्मिक शुद्धिकार्याकडे उपयोग करतात). ॰गोदानें-नअव. पापधेनु, उत्क्रांतिधेनु, वैतरणी, ऋणधेनु, कामधेनु. हीं पंचगोदानें और्ध्वदेहिक कर्मांत करतात. ॰गौड-पु. ब्राह्मणांतील पांच पोट जाती-(अ) गौड, कनोज (कान्यकुब्ज), मैथिल, मिश्र व गुर्जर; किंवा सारस्वत, कान्य- कुब्ज, गौड, उत्कल आणि मैथिल. ॰ग्रंथ-पुअव. यजुर्वेदाचे पांच ग्रंथ-संहिता, ब्राह्मण,आरण्यक, पदें आणि क्रम. ॰ग्रही- स्त्री. एका राशींत पांच ग्रहांची युति. [पंच + ग्रह] ॰तत्त्वें-नअव. पंचमहाभूतें पहा. ॰तन्मात्रा-स्त्रीअव. पंचमहाभूतांचीं मूलतत्त्वें, गंध रस, रूप, स्पर्श, शब्द हे गुण. 'प्रकृति पुरुष महत्तत्त्व । पंच, तन्मात्रा सूक्ष्मभाव ।' -एभा १९.१६८ ॰तीर्थ-नअव. हरिद्वार किंवा त्र्यंबकेश्वर येथील गंगाद्वार, कुशावर्त, बिल्वक, नीलपर्वत आणि कनखल हीं पांच तीर्थें. ॰दंती-वि. पांच दांत असलेला (घोडा), सप्तदंती व अशुभलक्षण पहा. ॰दाळी-स्त्रीअव. तूर, हर- भरा, मूग, उडीद व वाटाणा या पांच धान्यांच्या डाळी. ॰देवी- स्त्रीअव. दुर्गा, पार्वती, सावित्री, सरस्वती व राधिका. ॰द्रविड- पुअव. ब्राह्मणांतील पांच पोटजाती-तैलंग, द्राविड, महाराष्ट्रीय, कर- नाटकी व गुर्जर. ॰द्वयी-स्त्री. १ दक्षिणा द्यावयाच्या रकमेचे (ती कमी करणें झाल्यास) पांच भाग करून त्यांतील दोन किंवा तीन ठेवून बाकीचे वाटणें. २ अशा रीतीनें शेत, काम, रक्कम, वस्तु इ॰ची वांटणी करणें. ॰धान्यें-नअव. हवन करण्यास योग्य अशीं पांच धान्यें-गहूं, जव, तांदूळ, तीळ व मूग. महादेवाला याची लाखोली वाहतात. ॰धान्याचा काढा-पु. हा धने, वाळा, सुंठ, नागर- मोथा व दालचिनी यांचा करतात. ॰धार-स्त्री. १ जेवतांना तूप पडलें न पडलें इतकें कमी वाढणें; तुपाच्या भांड्यांत पांच बोटें बुडवून अन्नावर शिंपडणें. २ झाडास पाणी घालण्याची पांच धारांची झारी. 'जगजीवनाचिया आवडी । पंचधार करी वरी पडी ।' -ऋ ७३. ॰धारा-स्त्री. (विनोदानें) तिखट पदार्थ खाल्ला असता किंवा नाकांत गेला असतां दोन डोळे, दोन नाक- पुड्या व तोंड यांतून वाहणाऱ्या पाण्याच्या पांच धारा. ॰धारें -न. देवावर अभिषेक करावयाचें पांच भोंकांचें पात्र. [पांच + धारा] ॰नख-नखी-वि. १ पांच नखें असलेला (मनुष्य, माकड, वाघ). २ ज्यांचें मांस खाण्यास योग्य मानिलें आहे असे पांच नखें असणारे सायाळ, घोरपड, गेंडा, कांसव, ससा इ॰ प्राणी. 'पंचपंच नखा भक्ष्याः ।' -भट्टिकाव्य ६.१३१. ३ छातीवर, खुरावर पांच उभ्या रेषा असणारा (घोडा). हें अशुभलक्षण होय. -अश्वप १.९५. ४ ज्याच्या चार पायांपैकीं कोणत्याहि एका पायाला फाटा फुटल्या- सारखी आकृति असते असा (घोडा). -अश्वप १.९८. ॰नवटे- पुअव. (राजा. कु.) संसारादिकांचा अनेकांनी मिळून अनेक प्रका- रचा केलेला नाश; (एखाद्या संस्थेंत, मंडळांत झालेली) फाटा- फूट; बिघाड. (क्रि॰ करणें). २ गोंधळ; घालमेल; अडचण. [पंच + नव] ॰पक्वान्नें-नअव. १ लाडू, पुरणपोळी इ॰ पांच उंची मिष्टान्नें. २ भारी, उंची खाद्यपदार्थ, जेवण. ॰पंचउषःकाल- पु. सूर्योदयापूर्वीं पांच घटिकांचा काळ; अगदीं पहाट. 'पंच पंच- उषःकालीं रविचक्र निघोआलें ।' -होला १७ ॰पदी-स्त्री. देवापुढें नित्य नियमाने पांच पदें, अभंग भक्तगण म्हणतात ती. 'पंचपदी राम कलिसंकीर्तन ।' -सप्र २१.३६. ॰पर्व-वि. कोणत्याहि एका पायास फरगड्याची आकृति असणारा (घोडा). -अश्वप १.१०२. १०२. ॰पल्लव-पुअव. आंबा, पिंपळ, पिंपरी, वड व उंबर या किंवा इतर पांच वृक्षाचे डहाळे (किंवा पानें). स्मार्त याज्ञिकांत हे कलशामध्यें घालतात. 'पंचपल्लव घालोनि आंत । आणि अशोकें केलें वेष्टित । नरनारी मिळाल्या समस्त । लग्नसोहळिया कारणें ।' -जै ५६.१४. ॰पाखंड-न. जैन, बौद्ध, चार्वक इ॰ पांच मुख्य प्रकारचीं अवैदिक मतें, संप्रदाय. ॰पाखंडी-वि. वरील पाखंड मतांपैकीं कोणत्याहि मताचा अनुयायी. ॰पात्र-पात्री-नस्त्री. पाणी पिण्याचें किंवा इतर उपयोगाचें नळ्याच्या आकाराचें मोठें भांडें. ॰पाळें-न. लांकडाचें, किंवा धातूचें पांच वाट्या अथवा खण असलेलें पात्र. हळद, कुंकु, इ॰ पूजासाहित्य ठेवण्याच्या उपयोगी; किंवा फोडणीचें सामान ठेवण्याच्या उपयोगी पात्र. (गो.) पंचफळें. ॰पुरुषार्थ-पु. धर्म, अर्थ, काम, मोक्ष (सलोकता, समीपता, सरूपता सायुज्यता) व परमप्रेमरूपा-परानुरक्ति- पराभक्ति हें पांच पुरुषार्थ. 'जैसा ज्यासी भावार्थ । तैसा पुरवी मनोरथ । पढिये पंचपुरुषार्थ । तो हरि नांदत वैकुंठी ।' एभा २४.२७०. ॰प्रमाणें-नअव. शब्दप्रमाण, आप्तवाक्यप्रमाण, अनुमानप्रमाण. उपमानप्रमाण व प्रत्यक्षप्रमाण. ॰प्रयाग-पुअव. नंदप्रयाग, स्कंदप्रयाग, रुद्रप्रयाग, देवेंद्रप्रयाग व कणप्रयाग हे पांच प्रयाग. ॰प्रलय-पु. निद्राप्रलय, मरणप्रलय, ब्रह्म्याचा निद्राप्रलय, ब्रह्म्याचा मरणप्रलय, व विवेकप्रलय. ॰प्रवर-पुअव. ब्राह्मणांत कांहीं पंचप्रवरी ब्राह्मण आहेत त्याचे पांच प्रवर असे-भार्गव, च्यावन, आप्नवान, और्व व जामदग्न्य. प्रवर पहा. ॰प्राण- पु. १ प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. हे पांच प्राण प्राण्याच्या आयुष्यास कारणीभूत आहेत. यांचीं स्थानें आणि कार्यें भिन्न भिन्न आहेत. (क्रि.॰ ओढणें; आकर्षणें; सोडणें; टाकणें लागणें). 'देह त्यागुन पंचप्राणीं । गमन केलें तात्कळीं ।' -मुआदि २८.२४. २ (ल.) अतिशय आवडती, प्रियकर वस्तु. 'तो पंचप्राण धन्याचा ।' -संग्रामगीतें ११९. (एखाद्यावर) पंच- प्राण ओवाळणें-पंचप्राणांची आरती करणें-दुसऱ्या- करितां सर्वस्व, प्राणहि देणें; सर्व भावें करून आरती ओवाळणें; खरी, उत्कटभक्ति किंवा प्रेम दाखविणें. 'पंच प्राणांची आरती । मुक्तीबाई ओवाळती ।' ॰प्राणाहु(व)ती-स्त्री. पांच प्राणांना द्याव- याच्या लहान लहान आहुती किंवा घास या त्रेवर्णिकांनीं भोज- नाच्या आरंभीं द्यावयाच्या असतात. पांच आहुती घेणें म्हणजे घासभर, थोडेंसें खाणें. (क्रि॰ घेणें). [पंच + प्राण + आहुती] ॰बदरी- स्त्रीअव. योग, राज. आदि, वृद्ध, ध्यान. या सर्व बदरी बदरी नारा- यणाच्याच रस्त्यावर आहेत. ॰बाण-पु. (काव्य) मदन; कामदेव. मदनाच्या पाच बाणांसाठीं बाण शब्द पहा. ॰बेऊळी-स्त्री. पांच नांग्यांची इंगळी. -मनको. ॰बेळी-स्त्री. बोंबिल, कुटें इ॰ विक्री- करितां एकत्र मिसळलेले लहान मासे. ॰भद्र-वि. सर्व शरीर पिवळें असून पाय आणि तोंड मात्र श्वेतवर्ण असणारा (घोडा). अश्वप १. २१. ॰भूतातीत-वि. १ पंचभूतांपासून अलिप्त, सुटलेला (मुक्त मनुष्य, लिंगदेह). २ निरवयव; निराकार (ईश्वर). ॰भू(भौ)तिक-वि. पांच तत्त्वांनीं युक्त; जड; मूर्त; सगुण. ॰भूतें-नअव. पंचमहाभूतें पहा. भे(मे)ळ-पुस्त्री. पंचमिसळ पहा. अनेक पदार्थांचें मिश्रण -वि. पांच प्रकार एकत्र केलेलें. 'मोहोरा पंचमेळ बरहुकूम पत्र पुरंदर.' -वाडसमा ३.८३. ॰मघा-स्त्रीअव. १ मघा नक्षत्रांत सूर्य आल्या- नंतरचे पांच दिवस. २ मघापासून पुढचीं पांच सूर्यसंक्रमणाचीं नक्षत्रें. ॰महाकाव्यें-नअव. रघुवंश, कुमारसंभव, माघ, किरात, नैषध हीं पांच मोठीं संस्कृत काव्यें. ॰महातत्त्वांचीं देवस्थानें- १ पृथ्वी = कांचीवरम् (कांची स्टेशन). आप-जंबुकेश्वर (श्रीरंगम् स्टेशनपासून १२ मैल). तेज = अरुणाचल (एम्. एस्. एम्. रेलवेच्या मलय स्टेशन नजीक). वायु = कालहस्ती (वरील रेलवेच्या रेणीगुंठा स्टेशनपासून गुडुर रस्त्यावर). आकाश-चिदांबरम् (चेंगलपट रस्त्यावर). ॰महापातकें-नअव. ब्रह्महत्या, मद्यपान, सुवर्णचौर्य, मात्रागमन किंवा गुरुस्त्रीसंभोग व वरील चार महापात- क्यांची संगत. ॰महापातकी-वि. वरील महापातकें करणारा. ॰महाभूतें-नअव. पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश हीं पांच. गंध, रस, रूप, स्पर्श व शब्द हीं यांचीं अनुक्रमें सूक्ष्मरूपें होत. यांना पंचसूक्ष्मभूतें असें म्हणतात. पंचमहाभूतांचीं हीं मूलकारणें आहेत. ह्यावरून जगदुत्पत्तिविषयक ग्रंथांतून पंचभूत व पंचतन्मात्रा अशा संज्ञा ज्या येतात त्यांचा अर्थ पंचमहा(सूक्ष्म)भूतें असाच होय तन्मात्र पहा. ॰महायज्ञ, पंचयज्ञ-पुअव. ब्रह्मयज्ञ (वेदाध्ययन), पितृयज्ञ (तर्पण), देवज्ञ (होम, वैश्वदेव), भूतयज्ञ (बलि), मनुष्ययज्ञ (अतिथिसंतर्पण). भोजनाच्यापूर्वी ब्राह्मणानें नित्य करावयाचे हे पांच यज्ञ आहि्नकांपैकीं होत. ॰महासरोवरें- नअव. बिंदुसरोवर (सिद्धपूर-मातृगया), नारायणसरोवर (कच्छ- प्रांतीं मांडवी), मानस सरोवर (हिमालयामध्यें उत्तरेस), पुष्कर (अजमीर), पंपासरोवर (एम्. एम्. एस् रेलवेच्या होसपेट स्टेशननजीक). ॰महासागर-पुअव. उत्तर, दक्षिण, हिंदी, पॅसिफिक व अटलांटिक महासागर. ॰माता-स्त्रीव. स्वमाता, सासू, थोरली भावजय, गुरुपत्नी व राजपत्नी. ॰मिसळ-मेळ- पुस्त्री. १ पांच डाळींचें केलेलें कालवण, आमटी. २ पांचसहा प्रकारच्या डाळी किंवा धान्यें यांचें मिश्रण. ३ (ल.) एका जातीच्या पोटभेदांतील झालेल्या मिश्रविवाहाची संतति, कुटुंब, जात; कोण- त्याहि वेगवेगळ्या जातीच्या संकरापासून झालेली जात; संकर- जात. ४ भिन्न भिन्न पांच जातींतील लोकांचा समाज. ५ (ल.) निरनिराळ्या जातींचा एकत्र जुळलेला समाज. -वि. मिश्र; भेस- ळीचें. 'हे तांदूळ पंचमिसळ आहेत.' ॰मुख-पु. १ शंकर. 'चतुर्मुख पंचमुख । वेगें षण्मुख पातला ।' -एभा ६.२५. २ सिंह ॰मुखी-वि. १ उरावर भोंवरा असून त्यांत पांच डोळे असणारा (घोडा). -मसाप २.५५. २ पांच तोंडांचा (मारुती, महादेव, रुद्राक्ष). ॰मुद्रा-स्त्रीअव. (योग) भूचरी, खेचरी, चांचरी, अगोचरी आणि अलक्ष अशा पांच मुद्रा आहेत. 'योगी स्थिर करूनियां तेथें मन । शनै शनै साधिती पवन । पंचमुद्रांचें अतर्क्य विंदान । तें अभ्यासयोगें साधिती ।' -स्वादि ९.३.६२. ॰रंगी-वि. १ पांच रंगांचें (रेशीम, नाडा इ॰). २ धोतरा, अफू, इ॰ पांच कैफी पदार्थ घालून तयार केलेला (घोटा). ॰रत्नीगीता-स्त्री. भगवद्गीता, विष्णुसहस्त्रनाम, भीष्मस्तवराज, अनुस्मृति व गजेंद्र- मोक्ष हे पांच अध्यात्म ग्रंथ. ॰रत्नें-नअव. सोनें, हिरा, नीळ, पाच व मोतीं किंवा सोनें, रुपें, पोवळें, मोतीं, राजावर्त (हिऱ्याची निकृष्ट जात). ॰रसी-वि. १ पांच (किंवा जास्त) धातूंच्या रसापासून तयार केलेली (वस्तु). २ तोफांचा एक प्रकार. 'पंचरशी आणि बिडी लोखंडी ।' -ऐपो २२५. ॰राशिक- राशि-पुस्त्री. (गणित) बहुराशिक; दोन त्रैराशिकें एकत्र करून तीं थोडक्यांत सोडविण्याचा प्रकार; संयुक्त प्रमाणांतील चार पदांपैकीं संयुक्त गुणोत्तरांतील दोन पदें आणि साध्या गुणोत्तरांतील एक पद हीं दिलीं असतां साध्या गुणोत्तरांतील दुसरें पद काढण्याची रीत. ॰रुखी-रुढ-वि. साधारण; सामान्य; रायवळ; अनेक प्रकारचें; जंगली (लांकूड-सागवान, खैर, शिसवी इ॰ इमारतीस लागणाऱ्या पांच प्रकारच्या लांकडाशिवाय). ॰लवणें-नअव. मीठ, बांगडखार, सैंधव, बिडलोण व संचळ. ॰लवी-वि. (गो.) पंचरसी पहा. ॰लोह-न. तांबें, पितळ, जस्त, शिसें व लोखंड यांचें मिश्रण. ॰वकार-पुअव. व नें आरंभ होणारे व प्रत्येकास लागणारे पांच शब्द शब्द म्हणजे विद्या, वपु, वाचा, वस्त्र आणि विभव. 'विद्यया वपुषा वाचा वस्त्रेण विभवेन वा । वकारैः पंच- भिर्हीनो नरो नाप्नोति गौरवम् ।' ॰वक्त्र-वदन-पु. महादेव. 'भक्तोत्सल पंचवदन । सुंदर अति अधररदन ।' -देप २००. याच्या पांच तोंडांचीं नावें:-सद्योजात, तत्पुरुष, अघोर, वामदेव आणि ईशान. ॰वर्ज्यनामें-नअव. आत्मनाम, गुरुनाम, कृपणनाम, ज्येष्ठापत्यनाम व पत्निनाम. या पांच नामांचा उच्चार करूं नयें. ॰विध-वि. पांच प्रकारचें. ॰विशी-स्त्री. १ पंचवीस वर्षांचें वय. २ पंचवीस वस्तूंचा समूह. पहिल्या पंचवीशींतलें पोरगें-तरणाबांड. ॰विषय-पुअव. (कर्ण, त्वचा, चक्षु, रसना, घ्राण या) पांच ज्ञानेंद्रियांचे अनुक्रमें पांच विषय:-शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध. पंचवीस-२५ संख्या; वीस आणि पांच. ॰विसावा-वि. सांख्य मताप्रमाणें मूल-प्रकृत्यादि जीं चोवीस तत्त्वें आहेत त्यांपलीकडील पंचविसावा (आत्मा). 'तूं परम दैवत तिहीं देंवा । तूं पुरुष जी पंचवीसावा । दिव्य तूं प्रकृति- भावा- । पैलीकडील ।' -ज्ञा १०.१५०. ॰शर-पु. पंचबाण पहा. ॰सार-न. तूप, मध, तापविलेलें दूध, पिंपळी व खडीसाखर हे पदार्थ एकत्र घुसळून तयार केलेलें सार. हें विषमज्वर, हृद्रोग, श्वास, कास व क्षय यांचा नाश करतें. -योर १.३५३. ॰सूत्र-सूत्री-वि. १ पांच दोऱ्यांचें, धान्यांचें, रेषांचें. २ सारख्या लांबीच्या पांच सुतांमध्यें केलेलें, बसविलेलें (शाळुंकेसह बनविलेलें शिवलिंग). 'पंचसूत्री दिव्य लिंग करी । मणिमय शिवसह गौरी ।' ॰सूना-स्त्रीअव. कांडण, दळण, चूल पेटविणें, पाणी भरणें, सारवणें यापासून जीवहिंसादि घडणारे दोष. 'पंचसूना किल्बिषें म्हणूनि । एथें वाखाणिती ।' -यथादी ३.२३. ॰सूक्तें-नअव. ऋग्वेद संहितेंतील पुरुषसूक्त,देवासूक्त, सूर्यसूक्त (सौर), पर्जन्यसूक्त व श्रीसूक्त हीं पांच सूक्तें. ॰सूक्ष्मभूतें-नअव. पंचमहाभूतें पहा. ॰स्कंध-पुअव. सौगतांच्या अथवा बौद्धांच्या दर्शनाला अनुसरून मानवी ज्ञानाचे पांच भाग. म्हणजे रूप, वेदना, विज्ञान, संज्ञा व संस्कार. या शब्दांचे विषयप्रपंच, ज्ञानप्रपंच, आलयविज्ञान संतान, नामप्रपंच आणि वासनाप्रपंच ह्या अनुक्रमें पांच शब्दांनीं स्पष्टी- करण केलें आहे. ॰स्नानें-नअव. पांच स्नानें-प्रातः-संगव- माध्यान्ह-अपराण्ह-सायंस्नान. ॰हत्यारी-वि. १ ढाल, तरवार, तीरकमान, बंदूक, भाला किंवा पेशकबज या पांच हत्यारांनीं युक्त. २ चार पाय व तोंड यांचा शस्त्राप्रमाणें उपयोग करणारें (जनावर-सिंह, वाघ इ॰). ३ (ल.) हुशार; योग्य; समर्थ; संपन्न; सिद्ध असा (मनुष्य). ४ (व्यंग्यार्थी) शेंदाड शिपाई; तिसमारखान. ॰हत्त्या-स्त्रीअव. ब्रह्महत्त्या, भ्रूणहत्त्या, बालहत्त्या, गोहत्त्या व स्त्रीहत्त्या. पंचाग्नि-ग्नी-पुअव. १ चारी दिशांना चार पेटविलेले व डोक्यावरील तप्त असा सूर्य मिळून पांच अग्नी. 'पंचाग्नी गोरांजनें । जें प्राप्त नव्हे ।' -दा ५.६.२९. २ शरीरांतील पांच अग्नी. ३ -वि. पांच श्रौताग्नि; धारण करणारा गृहस्थाश्रमी ब्राह्मण. हे पांच अग्नी-दक्षिणाग्नि; गार्हपत्य, आहवनीय, सभ्य व आवसथ्य हे होत. -ग्नि साधन-न. चारी दिशांनां चार कुंडें पेटवून दिवसभर उन्हांत बसणें. हा तपश्चर्येचा एक प्रकार आहे. याला पंचाग्निसेवन, धूम्रपान असेंहि म्हणतात. 'चोहींकडे ज्वलन पेटवुनी दुपारीं । माथ्यावरी तपतसे जंव सूर्य भारी । बैसोनियां मुनि सुतीक्ष्ण म्हणोनि हा कीं । पंचाग्निसाधन करी अबले विलोकी ।' पंचादुयी- दिवी-दुवी-देवी-स्त्री. पंचद्वयी पहा. [अप.] पंचादेवी-स्त्री. शेताच्या उत्पन्नाचे ५ वांटे करून ज्याचे बैल असतील त्याला ३ व दुसऱ्याला (मालकाला) २ वांटे देण्याची रीत. पंचानन-पु. १ शंकर. २ (सामा.) पांच तोंडांची किंवा बाजूंची वस्तु. ३ सिंह. पंचामृत-न. १ दूध, दहीं, तूप, मध आणि साखर या पांचांचें मिश्रण. यानीं देवाच्या मूर्तीला स्नान घालतात. 'पय दधि आणि घृत । मधु शर्करा गुड संयुक्त । मूर्ति न्हाणोनि पंचामृतें । अभिषेक करिती मग तेव्हां ।' २ शेंगदाणे, मिरच्या, चिंच, गूळ, खोबऱ्याचे तुकडे इ॰ पदार्थ एकत्र शिजवून त्यास तेलाची फोडणी देऊन केलेला पदार्थ. ३ एक पक्वान्न; मिष्टान्न. [सं.] म्ह॰ १ जेवावयास पंचामृत आंचवावयास खारें पाणी. २ पंचामृत खाई त्यास देव देई. ॰मृत सोडणें-(बायकी) चातुर्मासांतील पहिल्या महिन्यांत दूध, दुसऱ्यांत दहीं, तिसऱ्यांत तूप, चौथ्यांत मध व पाचव्यांत (अधिकांत) साखर किंवा पांचवा (अधिक) नस- ल्यास चौथ्यांतच मध व साखर यांनीं युक्त असे पदार्थ न खाणें. ॰मृतानें-पंचामृतें न्हाणणें-पंचामृताच्या पदार्थानीं देवास स्नान घालणें. पंचायतन-न. १ शिव, विष्णु, सूर्य, गणपति व देवी या पांच देवता व त्यांचा समुदाय. या पांच देवतांपैकी प्रत्येक देव- तेस प्राधान्य देऊन शिव, विष्णु, गणपति इ॰ चीं पांच पंचायतनें मानण्याचीहि पद्धत आहे. (गो.) पंचिष्ट २ (ल.) एकचित्त असलेले पांच जण. ३ पंचमहाभूतांचें स्थान; शरीर. 'तें अधिदैव जाणावें । पंचायतनीचें ।' -ज्ञा ८.३६. पंचारती, पंचारत- स्त्री. १ तबकांत पांच दिवे ठेवून आरती ओवाळणें. २ आरती करितां लावलेले पांच दिवे. ३ असे दिवे ठेवण्याचें पात्र. पंचाक्षरी-वि. पंचाक्षरीमंत्र म्हणणारा व अंगांतील भूतपिशाच्च काढणारा; देव- ऋषी. 'पंचाक्षरी काढिती समंध ।' ॰क्षरीकर्म-न. पंचाक्षरीमंत्र म्हणून अंगांतील भूत काढणें. ॰क्षरीमंत्र-पु. १ भूतपिशाच्च काढ्ढन टाकण्याचा पांच अक्षरांचा मंत्र. २ ॐ नमःशिवाय हा मंत्र. पंचास्त्र-न. पंचकोण. -वि. पंचकोणी. [सं.] पंचाळ-स्त्री. (विणकाम) १ पांच पंचांकरितां लावलेला ताणा. २ एक शिवी. -वि. १ फार तोंडाळ, बडबड करणारी (स्त्री). पंचीकरण-न. १ पांच महाभूतांपैकीं प्रत्येकाचा कमीजास्त भाग घेऊन त्या सर्वांच्या मिश्रणानें नवा पदार्थ तयार होणें. -गीर १८१. २ आका- शादि पंचभूतें, त्यांचे देहादिकांच्या उत्पत्तीसाठीं ईश्वरशक्तीनें झालेलें परस्पर संमिश्रण. तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ. हा देह किंवा विश्व हें पंचमहाभूतात्मक कसें आहे याचें विवरण करणारा ग्रंथ. पंचीकृत- वि. पांच मूलतत्वें एकत्र झालेली (स्थिती). पंचेचाळ- चाळीस-ताळ-ताळीस-वि. चाळीसामध्यें पांच मिळवून झालेली संख्या; ४५. पंचेंद्रिय-नअव. पांच इंद्रियें. डोळे, कान, नाक, जिव्हा व त्वचा. यांचीं कामें अनुक्रमें-पहाणें, ऐकणें, वास घेणें, चव घेणें व स्पर्श करणें. पंचोतरा-पु. १ दरमहा दरशेकडा पांच टक्के व्याजाचा दर. २ शेंकडा पांच प्रमाणें द्यावयाचा कर. ३ सरकारसारा वसूल करतांना पांच टक्के अधिक वसूल करण्याचा हक्क. ४ सरकाराकरितां शंभर बिघे किंवा एकर जमीन लागवडी- खालीं आणली असतां पाटलाला पांच बिघे किंवा एकर सारा- माफीनें द्यावयाची जमीन. पंचोतरा, पंचोतरी-पुस्त्री. गव- ताच्या शंभर पेंढ्या किंवा आंबे विकत देतांना पांच अधिक देणें. पंचोपचार-पुअव. गंध, पुष्प, धूप, दीप व नैवेद्य या वस्तू व त्या देवाला समर्पण करणें. पंचोपप्राण-पुअव. नाग, कूर्म, कृकल, देवदत्त व धनंजय हे पांच उपप्राण. कूर्म अर्थ ३ पहा. पंचो- पाख्यानी-वि. १ (पांच प्रकरणांचे पंचोपाख्यान नांवाचा विष्णु- शर्म्याचा नीतिपर एक ग्रंथ आहे त्यावरून) अनेक कथा, संदर्भ, उदाहरण, दृष्टांत इ॰ नीं परिपूर्ण. २ कल्पित; विलक्षण; अद्भुत. ३ अभद्र; शिवराळ (स्त्रिया संबंधीं योजितात). पंच्याऐशी- पंच्याशी-वि. ८५ संख्या. पंच्याण्णव-वि. ९५ संख्या. पंच्याहत्तर-वि. ७५ संख्या.
घोडा
पु. १ खूर असलेला एक चतुष्पाद प्राणिविशेष. ह्याचा उपयोग ओझे वाहण्याच्या, गाडी ओढण्याच्या व बसण्याच्या कामीं करतात. ह्याच्या जाती अनेक आहेत. अरबी घोडे जग- प्रसिद्ध आहेत. लहान घोड्यास तट्टू व घोड्याच्या पोरास शिंगरूं म्हणतात. घोड्याच्या आकृतीवरून, गतीवरून, उपयोगा- वरून व लक्षणेनें हा शब्द अनेक वस्तूंस लावतात. २ बुद्धिबळाच्या खेळांतील एक मोहरा. हा सर्व बाजूंनीं दोन सरळ व एक आडवें (अडीच) घर जातो. या मोहर्याचा विशेष हा आहे कीं हा इतर मोहर्यांच्या डोक्यावरून उडून जातो, तशी गति इतर मोहर्यांना नसते. ३ बंदुकींतील हातोडीच्या आकराचा अव- यवविशेष. हा दाबला असतां ठिणगी उत्पन्न होते व बंदूकीचा बार उडतो; चाप. ४ (मुलांचे खेळ) दोन पायांत काठी घालून (तिला घोडा मानून) मुलें धांवतात तो काठीचा घोडा. ५ (उप.) मूर्ख व ठोंब्या असा वयस्क मुलगा; वयानें मोठा पण पोरकट मनुष्य. ६ वस्त्रें, कपडे ठेवण्यासाठीं खुंट्या ठोकलेला खांब; स्नान करणार्या माणसाचे कपडे ठेवण्याकरितां जमिनींत रोंवलेली काठी, खांब; (इं.) स्टँड. ७ (ल.) शरीर वाहून नेतात म्हणून पायांस लक्षणेनें (दहाबोटी) घोडा असें संबोधितात; तंगड्या. 'आमचा दोन पायांचा घोडा आम्हाला हवें तेथें वाहून नेईल.' ८ पाळणा टांगण्यासाठीं एका आडव्या लांकडाला चार पाय लावून करतात ती रचना; घोडी. ९ पालखीचा दांडा ज्याला बसविलेला असतो तें दुबेळकें बेचक; पालखीं तबे- ल्यांत वगैरे ठेवतांना ज्यावर ठेवतात तीं दुबळकें असलेलीं लाकडें प्रत्येकीं. १० गाड्याच्या बैठकीच्या चौकटीचीं दोन बाजूंचीं लांब लांकडें प्रत्येकी; गाडीच्या दांडयास आधार द्याव- याचें दुबेळकें. ११ मूल रांगावयास लागलें असतां दोन हात व दोन गुडघे जमीनीला टेकून करतें ती घोड्यासारखी आकृति. (क्रि॰ करणें). १२ मृदंग; पखवाज ठेवण्याची घडवंची; घोडी; (दिवे इ॰ लावण्याची) दोन बाजूस पायर्या असलेली घडवंची; (पिंपे, पेट्या ठेवण्याची) लांकडी घडवंची. १३ नारळ सोलण्याचा, शेंड्यास सुरी बसविलेला खांब; नारळ सोलण्याचा एक प्रकारचा सांचा. १४ समुद्राच्या भरतीच्या पाण्याचा चढ, फुगोटी, फुगारा; लाटेचा उंच भाग; नद्यांच्या मुखांतून वर गेलेलें समुद्राच्या भरतीचें पाणी. -सृष्टि ५७. १५ ओबडधोबड असा आंकडा, फांसा, पकड. १६ (ल.) घोडेस्वार. 'तीन हजार घोडा पेशव्यांचे तैनातींत ठेवावा.' -विवि ८.७.१२९. १७ दाराच्या दुहेरी चौकटीच्या वरच्या बाजूचे, परस्पराला जोडणारे दोन लाकडी तुकडे (त्यांच्याच जोडीच्या खालच्या बाजूच्या तुकड्यांस छिली म्हणतात). १८ (खाटीक इ॰ कांचें) साकटणें, सकोटन; खाटकाचा ठोकळा. १९ (मुद्रण) केसी व ग्याली ठेवण्यासाठीं केलेली घडवंचीवजा चौकट. २० फळा, चित्रफलक इ॰ उभा ठेवण्याची लाकडी उभी चौकट. २१ (कों.) रहाटगाडग्याचें कोळबें ज्यावर ठेवतात ती लांकडी चौकट. २२ (पोहोण्याचा) चार भोपळ्यांचा तराफा. २३ (गो.) (विटी दांडूचा खेळ) विटी मारण्याचा एक प्रकार. (क्रि॰ मारणें). [सं. घोटक; प्रा. घोड; गु.घोडो; सिं. घोडो; स्पॅनिश जि. गोरो; अर. घोरा] घोडी-स्त्री. १ घोडा या जातीच्या प्राण्याची मादी. २ सतार, तंबोरा इ॰ तंतुवाद्यांच्या भोपळ्याच्या मध्यावर हस्ती- दंती अगर लांकडाची पाटाच्या आकृतीची एक इंची किंवा दीड- इंची पट्टीची बैठक; तिच्यावरून तारा पुढें खुंटीस गुंडाळलेल्या असतात. ३ मुलांना शिक्षा देण्याकरितां जिला हातानें धरून शिक्षा दिलेला लोंबकळत असतो अशी आढ्यापासून लोंबणारी दोरी, फांसा; मुलांस टांगण्यासाठीं उंच बांधलेली दोरी. अशी शिक्षा पुर्वीं शाळांतून फार देत. (क्रि॰ घेणें; देणें). 'एखाद्या मुलांशी माझं वांकडं आलं कीं, रचलंच त्याच्यावर किटाळ आणि दिलीच त्याला पंतोजीकडून घोडी.' -चंद्रग्र ८०. ४ उभें राहून पखवाज वाजविण्याकरितां पखवाज ठेवावयाची घडवंची. 'इत- क्यांत देवळाच्या एका कोंपर्यांत मृदंग ठेवावयाची उंच घोडी सुनंदाला दिसली.' -सुदे २५. ५ गवत इ॰ वाहण्याकरितां खटार्यावर उभारलेला सांगाडा, चौकट. ६ फळा जमीनीपासून उच ठेवण्याकरितां व त्याला उतार देण्याकरितां केलेली लांकडी चौकट, सांगाडा. ७ वयस्क असून पोरकटपणा करणारी, खिदड- णारी मुलगी; खिदडी; धांगडधिंगी; भोपळदेवता; घोडकुदळ. ८ (सुतारी) तासावयाचें लांकूड हलूं नये म्हणून त्याला आधार- भूत असें दुसरें लांकूड, चौकट इ॰ सोईनें बसवितात तें. ९ (विणकामांत) सूत उकलण्यासाठीं केलेलें लांकडी चौकटीसारखें साधन. १० (सोनारी) पायांत घालावयाच्या सांखळ्यांच्या कड्या वांकविण्यासाठीं असलेला बोटाइतका जाड असा निमु- ळता मोळा. ११ (हेट. नाविक) पोरकें (लहान) शीड उभें करण्यासाठीं असलेलें कमानीसारखें लांकूड. १२ बंधार्याच्या मुखाशीं (पाणी सोडण्याच्या ठिकाणीं) पडद्यासारखी बांधलेली भिंत. हिच्यावरून पाणी जात असतें. १३ (हेट.) गलबताच्या कडेस शौच्यास बसण्याकरितां टांगलेली लांकडी चौकट. १४ सांकटणें; सकोटण. घोडा अर्थ १७ पहा. १५ तीन पायांचें दिवा ठेवण्याचें बुरडी तिकाटणें, तिवई. १६ पाटास जे दोन आडात मारितात ते प्रत्येकी. १७ हत्तीवरील चौकट; हौदा. 'साहेब नौबतीकरितां हत्तींवर लाकडी घोडी घालून...' -ऐरा ९.५०६. १८ उभें खुंटाळें. (इं.) स्टँड. 'तिकोनी खुंट्यांची घोडी आणि रुमाल ठेवावे ' -स्वारीनियम ७०. १९ सामान ठेवण्याचा घोडा. घोडें-न १ सामा (लिंगभेद न धरतां) घोडा या जातीं- तील जनावर. ' कृष्णाकांठचीं घोडीं सडपातळ पण चपळ अस- तात.' २ खटार्याच्या साटीच्या चौकटीचीं दोन बाजूंचीं उभीं लाकडें; घोडा अर्थ ९ पहा. घोडकें अर्थ १ पहा. ३ चार भोंपाळे लावलेला पाण्यावर तरंगणारा तराफा. घोडा अर्थ २१ पहा. ४ (व.) गाडीचे दांडे-जूं ज्यावर ठेवतात तें दुबेळकें. घोडा अर्थ ९ पहा. [सं. घोडा] (वाप्र.) घोडा आडवा घालणें- (एखाद्या कार्यात) अडथळा, विघ्न आणणें. 'आणि म्हणूनच तुम्ही घोडा आडवा घातलांत वाटतं ?' -चंद्रग्र ६८. ॰उभा करणें-बांधणें-(घोडा) थोडा वेळ थांबवणें; जरासें थांबणें; घाई न करणें (घाईंत व धांदलींत असणार्या मनुष्यास उद्देशून ह्या वाक्प्रचाराचा उपयोग करतात.) ॰काढणें-१ (बांधून ठेव- लेला घोडा बाहेर नेणें) घोडा हांकारणें, पिटाळणें २ (ल.) (एखाद्यानें) पळ काढणें; पोबारा करणें; निसटणें. ॰चाल- विणें-(कर.) (ल.) डोकें खाजवणें; युक्ति लढविणें. ॰टाकणें- घोडा फेंकणें; उडवणें; अंगावर घालणें. 'आरेरे टाकौनि घोडा । भणती यांचिआं जटैं उपडा । ' -शिशु १४१. ॰मैदान जवळ असणें-(घोडा धांवण्यांत कसा काय आहे याची परीक्षा त्यास मैदानांत पळवून करतां येते यावरून) ज्याची परीक्षा करा- वयाची तो पदार्थ, मनुष्य व परीक्षेस लागणारी सामग्री हीं दोन्ही जवळ असणें असा अर्थ होतो; एखाद्या गोष्टीची निरर्थक चर्चा न करतां तिला कसोटीला लावणें, कसोटीचा वेळ किंवा सामुग्री जवळ असणें; हा सूर्य हा जयद्रथ. 'कोरडी बढाई कशाला पाहिजे ? घोडामैदान जवळच आहे.' ॰हांकणें-पळून जाणें; निघून जाणें; पोबारा करणें; घोडा काढणें पहा. 'पंतोजीबुवास पाहून त्या पोरानें घोडा हांकला. 'घोडी काढणें-भरविणें- सक्रि. (माण.) घोडीस घोडा दाखविणें, देणें; घोडी फळविणें. घोडी घेणें-(एखाद्याशीं) घांसणें; कटकट करणें; मत्सरबुद्धीनें दोष काढणें. घोडें उभें करणें-अडथळा आणणें. 'बाळासाहेब नातूसारख्यांनीं विशेष प्रसंगीं एखादें घोडें उभें केलें तरी त्याकडे दुर्लक्ष्य करून ज्यानें त्यानें आपला पंथ सुधारावा.' -आगर ३.१४४. (एखाद्याचें) घोडें थकणें-एखाद्यानें (प्रवास, धंदा, व्यापार, अभ्यास इ॰ कांत) थकून जाणें; हतबल होणें; पुढें रेटण्याची शक्ति न उरणें. (एखाद्यानें आपलें) घोडें पुढें दामटणें-ढकलणें-हांकणें-घालणें-१ इतरांच्या पूर्वीं आपला कार्यभाग साधून घेण्याचा घाईने प्रयत्न करणें. 'या शर्यतींत जो तो आपलें घोडें पुढें दामटायला पहात आहे. -नि. 'ब्रिटिश वसाहतीनीं आपल्या हक्कांचें घोडें पुढें दामटलें.' -सासं २.४४६. २ लुब्रेपणानें दुसर्यांच्या संभाषणांत तोंड घालून त्यांच्यावर आपले विचार लादणें. (एखाद्याचें) घोडें मारणें-एखाद्याचें नुकसान करून त्याला राग आणणें (पूर्वीं प्रवासाचें मुख्य साधन घोडें असे. प्रवासाचें घोडें ठार केल्यास त्याचा प्रवास थांबत असे व त्यामुळें त्याचें फार नुकसान होई यावरून) एखाद्याचें फार नुकसान करणें. 'मी काय तुझें घोडें मारलें आहे ?' (आपलें) घोडें पुढें ढकलणें-आपलें काम प्रथम करूं लागणें; आपल्या कामाला महत्व देणें. गांडी- खालचें घोडें-संसारादि निर्वाहक मालमत्ता, वाडी इ॰ आधारभूत मुख्य साधन. म्ह॰ आपले गांडीखालचें घोडें गेलें, मग त्यावर महार बसो कीं चांभार बसो. घोडीं आडवीं घालणें-१ शत्रूवर तुटून पडून त्याच्या चालीला, पळाला अड- थळा करणें. २ (ल.) (एखाद्यास त्याच्या कामांत) संकट, अडथळा, व्यत्यय आणणें. 'जर त्यांणीं आपल्यावर चालून घेतलें तर आम्ही आडवीं घोडीं घालतों. ' -ख ४२९७. घोडीं घालणें-घोड्यांच्या अनीना उचलणें-घोडदळांतील सर्व स्वारांनीं इर्षेनें शत्रूवर एकदम तुटून पडणें. -होकै ३. घोड्याच्या, हत्तीच्या पायांनीं येणें व मुंगीच्या पायांनीं जाणें-(आजार, संकट, अडचण इ॰ च्या संबंधांत हा वाक्प्र- चार योजतात) जलदीनें येणें व धिमेधिमे जाणें; आजार इ॰ जलदीनें येतात पण अतिशय हळू हळू नाहींसे होतात यावरून वरील वाक्प्रचार रूढ आहे. (एखाद्याच्या) घोड्यानें पेण (पेंड)खाणें-या वाक्प्रचारांत पेण = प्रवासांतील टप्पा, मुक्का- माची जागा या ऐवजीं चुकीनें पेंड हा शब्द उपयोगांत आणतात. लांबच्या प्रवासांत निरनिराळ्या टप्प्यांच्या ठिकाणीं घोडीं उभीं राहत. त्यामुळें टप्प्याचें ठिकाण आलें कीं घोडें तेथें अडे, पुढें जात नसे. यावरून वरील वाक्प्रचार एखादें कार्य करतांना कोणी अडून बसल्यास त्यास. 'तुझें घोडें कुठें पेण खातें' असें विचारतांना उपयोगांत आणतात. घोड्यापुढें धावणें-जिकीरीचें, दगदगीचें; कष्टाचें काम करणें. (एखा- द्याच्या) घोड्यापुढें धावणें-एखाद्याची कष्टाची सेवा, चाकरी करणें; (उप.) एखाद्याची ओंगळ खुशामत करणें; एखाद्याची थुंकी झेलणें. घोड्यावर घोडा घालणें-(लिलांव इ॰ कांत) चढाओढ करणें; एखाद्यानें केलेल्या किंमतीपेक्षां अधिक किंमत पुकारणें; उडीवर उडी घालणें. घोड्यावर बसणें-दारू पिऊन झिंगणें;ताठ्यांत असणें. घोड्यावर बसून येणें-घाईनें येणें; आपलें काम तांतडीनें करण्यास दुसर्यास घाई करणें. सर घोड्या पाणी खोल किंवा पाणी पी-(घोड्या मागें हट, पाणी खोल आहे. तेथूनच पाणी पी) गोष्ट मोठी कठिण आहे, मागें परततां येणें शक्य आहे तोंच परतावें याअर्थी. म्ह॰ १ घोडा आपल्या गुणानें दाणा खातो = चांगला घोडा खूप काम करून आपल्याला खाद्यहि जास्त मिळवतो. त्याला जास्त देण्यास मालक असंतुष्ट नसतो. यावरून चांगला चकर आपल्या गुणानें व मेहनतीनें मालकाकडून पगार वाढवून घेतो. २ घोडा स्वार (मांड) ओळखतो = बसणारा कच्चा कीं पक्का आहे हें घोडा ओळखूं शकतो. (यावरून), आपला मालक कडक कीं नरम आहे हें हाताखालचीं माणसें ओळखूं शकतात. ३ (व.) जाय रे घोड्या खाय रे हरळी = घोड्याला हरळी खावयास मोकाट सोडल्यास (घोड्याला) तें चांगलेंच होईल, पथ्यावरच पडेल. म्ह॰-१ घोडा मरे भारें शिंगरूं मरे येरझारें = घोडी ओझें किंवा माणूम वाहून नेत असतां तिचें शिंगरूंहि तिच्याबरोबर जात असतें. घोडीच्या प्रत्येक हेलपाट्याबरोबर शिंगरूंहि हेलपाटा खातें. यावरून प्रत्यक्ष काम करणारास श्रम होतातच पण त्याच्या सहवासांत असणारांना सुध्दां जवळ जवळ तितकेच श्रम होतात. २ वरातीमागून घोडें = लग्नाच्या वरातीच्या मिरवणुकींत सर्वांच्या पुढें श्रृंगारलेलें कोतवाली घोडें चालवण्याची चाल आहे. यावरून वरात निघून गेल्यावर मागाहून श्रृंगारलेलें घोडें नेणें व्यर्थ होय किंवा औचित्यास धरून होत नाहीं. त्याप्रमाणें एखादी गोष्ट होऊन गेल्यावर मागाहून तत्संबंधीचीं साधनें जुळविणें व्यर्थ होय. २ माझें घोडें आणि जाऊं दे पुढें = इतरांचें कांहींहि होवो, माझें काम आधीं झालें पाहिजे. स्वार्थी माणसाची निंदा कर- तांना या म्हणीचा उपयोग करतात. समासांत घोडा शब्द पूर्व- पदीं आल्यास त्याचीं घोड किंवा कधीं कधीं घोडे अथवा घोड व घोडे, अशीं दोन्ही रूपें होतात. उ॰-घोडचूक; घोडेखोत; घोड (डे) चिलट इ॰. सामाशब्द-घोडकट, घोडकें-न. (घोड्याला तिरस्काराने लावावयाचा शब्द) रोडकें, अशक्त व थिल्लर घोडें; भटाचा तट्टू. घोडकुदळ-पु. १ (उप.) मुंजीचें वय झालेलें असून मुंज न झालेला मुलगा; घोडमुंज्या. २ -स्त्री. (उप.) उपवर असून लग्न न झालेली दांडगट नाचरी मुलगी; घोडी; घोडगी; भोपळ- देवता; घोडनवरी; घोडी पहा. घोडकूल-न. १ (गो.) लहान घोडें; तट्टू. २ (खा.) ओट्याच्या खांबावर तिरपा टेंकू (कर्ण) देऊन त्यावर कोरलेली घोड्याची आकृति. घोडकें-का-नपु. १ ज्याच्या भरीला करळ्या व तरसे घालून गाड्याची तक्तपोशी, बैठक तयार करतात अशीं चौकटींतील दोन बाजूचीं दोन उभीं लांब लांकडें. २ तेल्याच्या घाण्याच्या कातरीला खिळलेलें व जुंवाचा दोर बांधावयाचें लांकूड. घोडके-ढोरांचा गुरु. -गांगा २६. घोडकेळ-न. (क्क.) एक हलक्या जातीचें भसाडें केळें. [घोडा + केळें] घोडक्या-का-पु.-१ घोड्याचा खिजमतगार; मोतद्दार. 'घोड्यास शिपाई काय करिल घोडका ।' -ऐपो ३७२. २ चाबुकस्वार; अश्वशिक्षक; घोडा अर्थ ९ मधील शेवटचा अर्थ पहा. घोडकोस-पु. (गो.) तीन मैलांचा कोस. घोडगा-गी- पुस्त्री. (उप.) वयानें प्रौढ पण पोरकटपणा, नाचरेपणा अंगीं असलेला मुलगा, मुलगी; घोडा अर्थ ५ पहा. घोडी अर्थ ७ पहा. घोड(डे)गांठ-स्त्री. (बुद्धिबळांचा खेळ). एकमेकांच्या जोरांत असलेली घोड्यांची दुक्कल. घोडचवड-स्त्री. घोडदौड; घोडा चौफेर उडविणें; चवडचाल. 'घोडचवडीखालीं नाना पुण्याला आला.' -ऐपो १६२. [घोडा + चवड = विशिष्ट चाल] घोडचाल-स्त्री. घोड्याची चाल. (ल.) जलद चाल. [घोडा + चाल] घोड(डे)चिलट-न. मोठें चिलट; डांस; मच्छर. घोड- चूक-स्त्री. मोठी व अक्षम्य चूक. घोडचोट्या-वि. १ (मनुष्य). (अश्लील) घोड्याच्या चोटासारखा मोठा चोट ज्याचा आहे असा २ (निंदार्थीं) मुंज न झालेला, वाढलेला मुलगा; घोडकुदळ; घोड- मुंज्या. घोडजांवई-पु. (उप.) मोठ्या वयाचा नवरामुलगा; घोडनवरा. घोडजाळी-स्त्री.(भोंवर्यांचा खेळ) विरूद्ध पक्षाच्या भोंवर्याला खोंचा देऊन आपला भोंवरा दूर जाऊन फिरत राहील अशा रीतीनें भोंवरा फेकण्याचा प्रकार. [घोडा + जाळी = दोरी] घोडतोंड्या-वि. घोड्याच्या तोंडासारखा लांबट चेहरा अस- लेला; कुरूप; लांबट, ओबडधोबड तोंडवळ्याचा. [घोड + तोंड = चेहरा] घोडदळ-न. १ घोडेस्वारांचें सैन्य; फौज. २ सैन्यां- तील घोडेस्वारांचें पथक, तुकडी. [घोडा + दळ = सैन्य] घोड- दौड-स्त्री. घोड्यासारखें पळणें; घोड्याची दौड; जलद जाणें. [घोडा + दौड = पळणें] घोडनट-न. ज्याचें एक तोंड आढ्यावर व एक लगीवर येऊन दरम्यान तिरपें राहतें असें लांकूड ठोकतात तें. घोडनवरा-पु. (उप.) प्रौढवयाचा नवरामुलगा; घोडजांवई. घोड(डे)नवरी-स्त्री. (उप.) मोठ्या वयाची नवरी मुलगी, वधू; योग्य व सामान्य वयोमर्यादेबाहेर अविवाहित राहिलेली मुलगी. 'हे मोठमोठ्या घोडनवर्या घरांत बाळगल्याचे परि- णाम बरं !' -झांमू. घोड(डे)पाळणा-पु. घोड्याला (लांकडी चौकटीला) टांगलेला पाळणा; हलग्याना न टांगतां जमीनीवर घोड्यास अडकविलेला पाळण्याचा एक प्रकार. घोडा ८ अर्थ पहा. घोड पिंपळी-स्त्री. पिंपळीची मोठी जात; हिच्या उलट लवंगी पिंपळी. घोडपुत्र-पु. घोड्याला (विशेषतः बुद्धि- बळांतील घोड्याला) प्रेमानें किंवा प्रतिष्ठेनें संबोधण्याचा शब्द. [घोडा + पुत्र = मुलगा] घोडपेटें-न. १ दोन भोपळे पुढें व दोन मागें बांधून केलेला तराफा; घोडा अर्थ २१ पहा. २ भोंपळ्यावर दोन्ही बाजूस पाय टाकून घोड्यासारखें बसून पाण्यावर तरणें, तरंगणें. घोडबच्य-न. दुबळा घोडा पुष्ट होण्यास एक औषध. 'घोडबच्य पावशेर, राई पावशेर भाजलेलीं काळीं मिरें पावशेर ... मिश्रणापैकीं आतपाव दररोज देत जावें.' -अश्वप १.१७५. घोडबांव-स्त्री. (कु.) घोड्यांना पाणी पितां येईल अशा तर्हेनें बांधलेली विहीर. [घोड + बांव = विहीर] घोडबाही- स्त्री. १ दाराच्या दुहेरी चौकटीच्या आंतल्या चौकटींतील दोन्ही बाजूचे खांब. २ खटार्याच्या बैठकीच्या चौकटीच्या दोन बाजूंच्या लांब लांकडांपैकीं प्रत्येक; घोडकें, घोडें पहा; [घोडा + बाही = बाजू] घोडबाळ-वि. (उप.) पोरचाळे करणारा प्रौढ पुरुष, स्त्री; पोरकट माणूस. [घोडा + बाळ] घोडब्रह्म- चारी-पु. (उप.) लग्नाचें वय कधींच झालें असूनहि अविवाहित राहिलेला मुलगा; घोडनवरा. [घोडा + ब्रह्मचारी] घोडमल्ली- स्त्री. (बुद्धिबळांचा खेळ) घोड्यानें मात करण्याचा प्रकार. प्रतिपक्षाचें घोडें व राजा आणि आपलें घोडें, राजा व एकच प्यादें राखून प्यादेमात करणें; घोडमात. घोड(डे)मात -स्त्री. (बुद्धिबळांचा खेळ) घोड्यानें राजाला दिलेली मात; घोडमल्ली पहा. [घोडा + फा. मात् = कोंडणें] घोडमाशी-स्त्री. १ मोठ्या आकाराची हिरवी, काळसर माशी. २ (सामा.) मोठी माशी. घोडमासा-पु. एक प्रकारचा मासा; सागराश्व. ह्याचें तोंड कांहींसें घोड्यासारखें दिसतें. यास लांब शेपूट असतें. हा नेहमी उभा पोहतो. घोडमुख-ख्या-पु. १ घोड्याचें तोंड असलेला किन्नर नांवाच्या देवयोनींतील पुरुष. याचें वर्णन पुराणांतरीं सांपडतें. २ (ल.) अगदीं कुरूप, घोडतोंड्या माणूस. 'एक मीर- वलें भुरळें पींगळें । घोडमुखें ।' -दाव २८५. घोडमुंगळा-पु. मोठा व काळा मुंगळा. घोडमुंगी-स्त्री. मोठी, काळ्या जातीची मुंगी. घोड(डे)मुंज्या-पु. उप. १ मुंज होण्याचें वय झालें असून मुंज न झालेला मुलगा. २ लग्न न झालेला प्रौढ मुंज्या. [घोडा + मुंज्या] घोडला-पु. मूल रांगत असतांना त्याची होणारी घोड्यासारखी आकृति. घोडा अर्थ १० पहा. घोडली-स्त्री. (कों. हेट.) (नाविक) शौचास बसण्याकरितां वर्यास एक चौकट चार दोर्यांनी अडकवितात ती. [घोडा] घोडवळ-स्त्री. १ बांधलेल्या घोड्यांची ओळ, रांग. २ घोड्यांचा तबेला; घोडशाळा; घोडसाळ; यावरून (सामा.) तबेला; 'रोडोला हत्ती घोडवळींतून जाणार नाहीं.' ३ लांबचलांब, ठेंगणें व बेढब घर; मागरघर; दांडसाळ; केवळ तबेल्यासारखें असलेलें घर; कोठडी. ४ (उप.) घोडनवरी. ५ न. झोडपलेल्या, झोडपून दाणे न काढलेल्या धान्याच्या पेंढ्यांची रास, गंजी. [घोडा + ओळ] घोड(डे)वाट-स्त्री. घोड्यांकरितां केलेली, फक्त घोड्याला जातां येईल अशी वाट, रस्ता (विशेषतः डोंगर इ॰ याच्यावरून); उलट गाडीवाट. [घोडा + वाट] घोडविवाह- पु. विषमविवाह. 'आपली नात शोभेल अशा दहा वर्षांच्या पोरीशीं लग्न लावण्यास तयार असतात व असा घोडविवाह करूनहि फिरून समाजांत हिंडण्यास ... त्यांस दिक्वत वाटत नाहीं' -टि ४.९६. [घोडा + विवाह] घोडवेल-स्त्री. (सांकेतिक) घोड्याची लीद; (औषधांत घोड्याच्या लिदीचा उपयोग करा- वयास असल्यास तिचा निर्देश ह्या शब्दानें करतात). घोड- शह-पु. (बुद्धिबळांचा खेळ) घोड्यानें दिलेला शह. [घोडा + शह] घोडशाळा, घोडसाळ-स्त्री. १ घोड्यांचा तबेला; घोडवळ अर्थ २ पहा. [घोडा + शाळा = घर] घोडशिष्य- पु. (निंदार्थीं) विद्यार्जन करूं पाहणारा मोठ्या वयाचा विद्यार्थीं, मोठेपणीं शिकावयास लागणारा मनुष्य. घोडशीर- स्त्री. १ पायाच्या टांचेच्या वरच्या बाजूस असलेली शीर, नाडी; दवणशीत्त; धोंडशीर पहा. २ (क्व.) पायाचा किंवा हाताचा स्नायु. घोडसटवी-स्त्री. १ उग्र स्वरूप धारण केलेली देवी. (क्रि॰ लागणें). २ घोडी व्याल्यापासून सहाव्या दिवशीं करा- वयाची सटवीची पूजा. (एखादीला) ॰लागणें-१ घोडसट- वीप्रमाणें उग्र व विकाळ दिसणें. २ घोटसटवीची बाधा होणें. घोडेखाद-स्त्री. १ घोड्यांचें चरणें; हरळी खाणें. 'या घोडे खादीमुळें माळावर एक काडी राहिली नाहीं.' २ फक्त घोड्यांना चरतां, खातां येईल इतक्या वाढीचें गवत. 'ह्या माळावर मोठें गवत नाहीं, घोडेखाद कोठें कोठें आहे.' [घोडा + खाद = खाणें] घोडेखोत-पु. घोडे भाड्यानें देण्याचा धंदा करणारा; भाड्याच्या घोड्यांचा नाईक. [घोडा + खोत = मक्तेदार] घोडेघाटी-स्त्री. एक प्रकारचें रेशमी कापड. घोडेघास-न. १ विलायती गवत; लसून- घास. २ घोडकुसळी पहा. [घोडा + घास = गवत] घोडेपाऊल- न. एक वनस्पतिविशेष. [घोडा + पाऊल] घोडेराऊत, घोडे- स्वार-पु. घोड्यावरील शिपाई. घोड्याएवढी चूक-स्त्री. फार मोठीचूक; ढोबळ चूक; घोडचूक पहा. घोड्या गोंवर-पु. एक प्रकारचा गोंवराचा आजार; याच्या पुटकुळ्या मोठ्या असतात. [घोडा = मोठा + गोवर] घोड्याचा-पु. (निंदार्थीं) घोड्यावर बसलेला मनुष्य; घोडेस्वार. 'ते पहा घोड्याचे चालले. मागून स्वारी येतीसें वाटतें.' घोड्याचा दाणा-पु. १ (उप.) हरभरा. २ (ल.) बुंदीच्या लाडवास तिरस्कारानें म्हणतात. घोड्याचा पूत-लेंक-पु. (उप.) मूर्ख; गाढव; गद्धा. घोड्याची चाकरी-स्त्री. घोड्यांना दररोज चोळणें, खरारा करणें इ॰ काम. घोड्याची जीभ-स्त्री. (राजा.) एक वनस्पति- विशेष. घोड्याची मुंज, घोड्याचें बारसें-स्त्रीन. एखादा कोठें जावयास निघाला असतां एखाद्या अधिक प्रसंगी व फाजिल चौकशी करणार्या माणसानें त्यास कां, कुठें जातां असें विचारलें असतां म्हणतात. घोड्यांचें नाटक-न. (ना.) सर्कस. घोड्याचें मूत-न. १ कुतर्याचें मूत; अळंबें; भुईछत्री. २ कुजलेल्या लांकडांतून फुटलेलें अळंबें. घोड्याच्या पाठीवर- क्रिवि. भरधाव; झरकन; त्वरेनें. (क्रि॰ जाणें; करणें). घोड्याच्या पाठीवरचा कोस-पु. कंटाळवाणा व लांब- णीचा कोस; घोड्यावरून गेल्यासच कोसाएवढें व कंटाळवाणें न वाटणारें अंतर.
घर
न. १ रहावयासाठीं बांधलेली जागा; वाडा. २ एका कुटुंबांतील (एके ठिकाणीं) राहणारी मंडळी; कुटुंब. ३ गृहस्था श्रमधर्म; संसार; प्रपंच. 'त्याला नोकरी लागतांच त्यानें स्वतंत्र घर थाटलें' ४ एखाद्या व्यवसायांत जुटीनें काम करणारीं माणसें, मंडळी, संस्था; अडतीची जागा. ५ (उंदीर, चिचुंदरीं इ॰ काचें) बीळ; घरटें. ६ एखादा पदार्थ शिरकवण्यासाठीं केलेला दरा, भोंक, खोबण, खांचण. 'भिंतीस घर करून मग खुंटी ठोक.' ७ (मालकाच्या इच्छेविरुद्ध मिळविलेलें, बळकावलेलें) वस्तीचें ठिकाण. 'कांट्यानें माझ्या टाचेंत घर केलें.' ८ एखादी वस्तु सुरक्षितपणें ठेवण्यासाठीं केलेलें धातूचें, लांकडाचें आवरण, वेष्टण, कोश. उ॰ चष्म्याचें घर. 'माझ्या चष्म्याचें घर चामड्याचें आहे.' ९ पेटींतील, टाइपाच्या केसींतील कप्पा, खण, खाना. १० सोंगट्याच्या, बुद्धिबळांच्या पटावरील, पंचांगा- तील (प्रत्येक) चौक; चौरस; मोहर्याचा मुळचा चौरस; मोहर्याचा मारा. 'राजा एक घर पुढें कर' 'घोडा अडीच घरें (एकाच वेळीं) चालतो.' ११ (ज्यो.) कुंडलीच्या कोष्टकां- तील सूर्य, चंद्र इ॰ ग्रहांचें स्थान. १२ घराणें; वंश; कुळ. 'त्याचें घर कुलीनांचें आहें.' 'त्याच्या घराला पदर आहे.' = त्याच्या वंशात परजातीची भेसळ झाली आहे.' १३ उत्पत्तिस्थान; प्रांत, प्रदेश, ठिकाण, ठाणे (वारा, पाउस, प्रेम, विकार, रोग इ॰ काचें); 'सर्वज्ञतेचि परि । चिन्मात्राचे तोंडावरी । परि ते आन घरीं । जाणिजेना ।' -अमृ ७.१३०. 'कोंकण नारळाचें घर आहे.' १४ रोग इ॰ कांच्या उत्त्पतीचे कारण, मूळ, उगम, जन्मस्थान, खाण. 'वांगें हें खरजेंचें घर आहे.' 'आळस हें दारिद्र्याचें घर आहे.' १५ वादांतील आधारभूत मुद्दा, प्रतिष्ठान. गमक, प्रमाण. १६ सतार इ॰ वाद्यांतील सुरांचें स्थान; सनईसारख्या वाद्याच्या दोन भोकांमधील अंतर; सता- रीच्या दोन पडद्यांमधील अंतर. १७ शास्त्र, कला इ॰ कांतील खुबी, मर्म, रहस्य, मख्खी, किल्ली. 'तुम्ही गातां खरे पण तुमच्या हातीं गाण्याचें घर लागलें नाहीं.' 'गुणाकार, भागाकार हें हिशेबाचें घर.' १८ सामर्थ्य; संपत्ति; ऐपत; आवांका; कुवत. 'जें कांहीं करणें तें आपलें घर पाहून करावें.' १९ मृदंग इ॰ चर्मवाद्यांच्या, वादी, दोरी इ॰ परिच्छेदातनें परिच्छिन्न प्रांत, जागा. २० (संगीत) तान, सूर यांची हद्द, मर्यादा, क्षेत्र. २१ (अडचणीच्या, पराभवाच्या वेळीं) निसटून जाण्या- साठीं करून ठेवलेली योजना; आडपडदा; पळवाट; कवच; 'हा घर ठेवून बोलतो.' २२ खुद्द; आपण स्वतः; स्वतःचा देह- म्ह॰ इच्छी परा तें येई घरा.' २३ (वर्तमानपत्राचा, पत्र- काचा, कोष्टकाचा रकाना, सदर. (इं.) कॉलम. 'येऊन जाऊन पत्रप्रकाशकास स्वतःचा असा मजकूर दर खेपेस पराकाष्ठा दोन तीन घरें घालणें येतें.' -नि १५. २४ वयोमानाचा विभाग; कालमर्यादा. 'हा नवा गृहस्थ पन्नाशीच्या घरांत आला होता.' -कोरकि ३२. २५ (मधमाशीचें पोळें वगैरेतील) छिद्र. 'केळीच्या सोपटाचीं घरें ज्यांनी पाहिली असतील' -मराठी सहावें पुस्तक पृ. २२५. (१८५७) २६ ठाणें; ठिकाण. 'कुबल, बांकी घरें । शिवराजाच्या हाता आलीं' -ऐपो ९. २७ बायको; स्वस्त्री. 'घरांत विचारा.' घर उघडणें पहा. [सं. गृह; प्रा. घर; तुल॰ गु. घर; सिं. घरु; ब. घर; आर्मेंजि. खर; फ्रेजि. खेर; पोर्तु. जि केर.] (वाप्र.) ॰आघाडणें-(कों.) घर जळून खाक होणें. ॰उघडणें-१ लग्न करून संसार थाटणें. 'नारोपंतांनी आतां घर उघडलें आहे, ते पूर्वीचें नारोपंत नव्हत!' २ एखा- द्याचें लग्न करून देऊन त्याचा संसार मोडून देणें. 'सदुभाऊंनीं आपली मुलगी त्या भटाच्या मुलास देऊन त्याचें घर उघडलें' ॰करणें-१ विर्हाड करणें; रहावयास जागा घेऊन तींत जेवण- खाण इ॰ व्यापार करावयास लागणें. 'चार महिनें मी खाणाव- ळींत जेवीत असे, आतां घर केलें आहें.' २ (त्रासदायक वस्तूंनीं) ठाणें देणें; रहाणें; वास्तव्य करणें. 'कांट्यानें माझ्या टांचेंत घर केलें.' 'माझ्या हृदयांत घर करून बसून त्यानें मला घायाळ केलें.' -बाय ३.३. ॰खालीं करणें-घर सोडून जाणें; घर मोकळें करून देणें. 'गावांत प्लेगचें मान वाढतें असल्यामुळें सर्वानी आपापलीं घरें खालीं केलीं.' ॰घालणें- (एखाद्याच्या) घराचा नाश करणें. ॰घेणें-१ (सामा.) लुबा- डणें; लुटणें; नागविणें; बुचाडणें. 'मग रेणुकेनें बोलिलें । अहो जेऊनि कैसें घर घेतलें ।' -कालिकापुराण २३.४०. 'ज्या ठिकाणीं वादविवादाचा किंवा भांडणाचा काहीं उपयोग नसतो त्या ठिकाणीं पडून घर घेणें यांतच मुत्सद्दीपणा असतो.' -चंग्र ८४. २ (एखाद्याचा) नाश करणें. 'म्हणती जन्मोनि द्रौपदीनें । आमचें घर घेतलें तिणें ।' -जै ७१.९९. ३ (त्रासदायक वस्तु) घर करून बसणें, ठाणें देऊन बसणें; घर करणें अर्थ २ पहा. ॰चालविणें-प्रपंचाची, संसाराची जबाबदारी वाहणें. म्ह॰ घर चालवी तो घराचा वैरी. ॰जोडणें-इतर घरण्यांशीं, जातीशीं, लोकांशीं इ॰ मैत्री, शरीरासंबंध घडवून आणणें; मोठा संबंध, सलोखा उत्पन्न करणें. 'लक्ष्मीपतीचें घर थोर जोडे ।' -सारुह २.१. याच्या उलट घर तुटणें. ॰डोईवर घेणें-आरडा ओरड करून घर दणाणून सोडणें; घरांत दांडगाई, कलकलाट, धिंगामस्ती करणें. 'वडील माणसें घरीं नाहींत हें पाहुन मुलांनी घर डोईवर घेतलें.' ॰तुटणें-मैत्रीचा, नात्याचा संबंध नाहींसा होणें; स्नेहांत बिघाड होणें. (दुसर्याचें) ॰दाखविणें- १ आपल्या घरीं कोणी त्रासदायक मनुष्य आला असतां कांहीं युक्तीनें त्याला दुसर्याच्या घरीं लावून देऊन आपला त्रास चुकविणें; (एखाद्याची) ब्याद, पीडा टाळणें. २ घालवून देणें; घराबाहेर काढणें. ॰धरणें-१ घरांत बसून राहणें; घराच्या बाहेर न पडणें (संकटाच्या, दंगलीच्या वेळीं पळून जाणें, पळ काढणें, गुंगारा देणें, निसटणें याच्या उलट). २ (रोग इ॰ नीं शरीरावर) अंमल बसविणें; एखादा आजार पक्केपणानें जडणें. 'दम्यानें त्याच्या शरीरांत घर धरलें.' ३ चिटकून राहाणें; चंचलपणा न करतां एकाच ठिकाणीं भिस्त ठेवून असणें. ४ (बुद्धिबलांत, सोंग- ट्यांत) सोंगटी एकाच घरांत ठेवून घर अडविणें. ॰धुणें,धुवून नेणें-१ एखाद्याचें असेल नसेल तें लबाडीनें गिळंकृत करणें; हिरावून नेणें; नागविणें; बुचाडणें. 'तुम्ही कारकुनावर फार भरंवसा टाकून राहूं नका, तो संधि सांपडल्यास तुमचें घर धुवावयास कमी करणार नाहीं.' २ नागविणें; लुबाडणें; लुटणें; अगदीं नंगा करणें. 'शंभर वर्षांनीं घर धुवून नेल्यानंतर ही ओळख आम्हांस पटूं लागली आहे.' -टिव्या. घर ना दार देवळीं बिर्हाड-फटिंग, सडा, ज्याला घरदार नाहीं अशा भणंगास उद्दे- शून अथवा ज्याला बायकामुलांचा संसाराचा पाश नाहीं अशाला उद्देशून या शब्दसंहतीचा उपयोग करतात. ॰निघणें-(स्त्रीन) नव- र्याला सोडून दुसर्या मनुष्याबरोबर नांदणें; (सामा.) दुसर्याच्या घरांत, कुटंबांत निघून जाणें. 'माझें घर निघाली.' -वाडमा २. २०९. ॰नेसविणें-घरावर गवत घालून तें शाकारणें; घर गवत इ॰ कानीं आच्छादणें; (कों.) घर शिवणें. ॰पहाणें-१ (एखाद्याच्या) घराकडे वक्रदृष्टी करणें; (रोगाचा, मृतत्युचा) घरावर पगडा बसणें; घरात शिरकाव करणें). 'कालानें एखाद्याचें घर पाहिलें कीं तें बुडालेंच म्हणून समजावें.' 'म्हातारी मेल्याचें दुःख नाहीं पण काळ घर पाहतो.' २ (बायकी) वधूवरांचें योग्य स्थळ निवडणें. 'सुशील तारेनें आपल्या पुण्यबलाच्या साह्यानें योग्य घर पाहून... ... ...' -रजपूतकुमारी तारा- (आनंदी रमण.) ॰पालथे घालणें-(घर, गांवइ॰) १ हरव- लेली वस्तु शोधण्यासाठीं घराचा कानाकोपरा धुंडाळणें. 'त्या बाईनें आपला सोन्याचा फुटका मणि शोधण्यासाठीं सारें घर पालथें घातलें.' २ सर्व घरांत; गावांत हिंडणें; भटकणें. 'त्या मुलाला रांगतां येऊं लागल्यापासून तें सारें घर पालथें घालूं लागलें आहें.' ॰पुजणें-१ आपलें काम करून घेण्यासाठी एखा- द्याच्या घरीं आर्जवें, खुशामत करण्यास वारंवार जाणें. २ (घरें पुजणें) आपला उद्योग न करतां दुसर्यांच्या घरीं भटक्या मारणें. ॰फोडणें- १ संसार आटोपणें, आंवरणें. २ कुटुंबातील माणसात फूट पाडणें; घरात वितुष्ट आणणें. 'बायका घरें फोड- तात.' ३ घरास भोंक पाडून आंत (चोरी करण्यासाठीं) शिर- काव करून घेणें; घर फोडतो तो घरफोड्या. ॰बसणें-कर्ता मनुष्य नाहींसा झाल्यामुळें, दुर्दैवाच्या घाल्यामुळें कुटुंब विपन्ना- वस्थेस पोहोंचणें; घराची वाताहत, दुर्दशा होणें. ॰बसविणें- संसार थाटणें; घर मुलाबाळानीं भरून टाकणें (स्त्रीच्या विवाहोत्तर जीवनाच्या बाबतींत या वाक्प्रचाराचा उपयोग करतात). 'माझी बायको मेली म्हणून मीं मुलाचें लग्न करून दिलें, म्हटलें कीं सून तरी घर बसविल.' ॰बुडणें-१ कुटुंबाची नासाडी, दुर्दशा होणें; कुटुंब धुळीस मिळणें. २ संतति नसल्यामुळें वंशाचा लोप होणें. ॰बुडविणें-१ (एखाद्याच्या) कुटुंबाचा विध्वंस करणें; संसाराचा सत्यनास करणें. २ घरास काळिमा आणणें. ॰भंगणें-कुटुंब मोडणें, विस्कळित होणें; कुटुंबास उतरती कळा लागणें; कुटुंबाचा नाश होणें; मंडळीत फूट पडणें. 'बापलेकांत तंटे लागस्यामुळें तें घर भंगले.' ॰भरणें-१ दुसर्यास बुडवून, त्यांची उपेक्षा करून आपण श्रीमंत बनणें. २ दुसर्याचें घर लुटणें, धुणें. व स्वतः गबर होणें. घर भलें कीं आपण भला-लोकांच्या उठा- ठेवींत, उचापतींत न पडतां आपल्या उद्योगांत गर्क असणारा (मनुष्य). ॰मांडणें-थाटणें-(संसारोपयोगी जिन्नसांनीं) घर नीटनेटकें करणें; घराची सजावट करणें. ॰मारणें-घर लुटणें. घर म्हणून ठेवणें-एखादी वस्तु, सामान प्रसंगविशेषीं उपयोगी पडण्याकरितां संग्रही ठेवणें; प्रत्येक वस्तु जतन करून ठेवणें. ॰रिघणें-घर निघणें पहा. 'घर रिघे जाई उठोनि बाहेरी ।' ॰लागणें-घर भयाण भासणें (एखाद्याचा मुलगा अथवा पत्नी वारली असतां घरांतील भयाण स्थिति वर्णिताना ह्या वाक्प्रचा- राचा उपयोग करतात). घराचा उंबरठा चढणें-घरांत प्रवेश करणें. 'जर तूं माझ्या घरची एखादीहि गोष्ट बाहेर कोणाला सांग- शील तर माझ्या घराचा उंबरठा चढण्याची मी तुला मनाई करीन.' घराचा पायगुण-घरांतील माणसांची वागणूक, वर्तणूक, वर्तन, शिस्त; घराचें पुण्य पाप. घराचा पायगुणच तसा, घरची खुंटी तशी-कुटुंबांतील माणसाची वागण्याची रीत असेल त्याप्रमाणें; एखाद्या कुटुंबांतील माणसांच्या सर्वसाधारण अशा वाईट व्यसनास खोडीस, संवयीस उद्देशून म्हणतात. घराचा वासा ओढणें- ज्याच्यामुळें एखादें काम, धंदा चालावयाचें व जें नसल्यास बंद पडावयाचें असें साधन, वस्तु, गोष्ट ओढणें; एखाद्या मोठया कामांतून फार जरूरीचें साधन नाहींसें करणें; अडबणूक करणें. 'आमच्या मंडळींतून पाटीलबुवानीं रामभाऊस फितविलें, आतां आम्हीं काय करूं शकूं! त्यानीं आमच्या घराचा वासाच ओढला. खाल्ल्या घराचे वासे मोजणें-कृतघ्न होणें; केलेला उपकार विसरणें. घरांत, घरीं- (ल.) पतीनें पत्नीबद्दल शिष्ट- संप्रदायानें वापरण्याचा शब्द. याच्या उलट पत्नी नवर्या संबंधीं बोलतांना 'बाहेर' या शब्दाचा उपयोग करते. 'तुम्हांला पदार्थ दिला तर घरांत मनास येणार नाहीं.' 'हा जिन्नस घरांत दाखवून आणतों.' -विवि १०.५-७.१२७. घरांतले-विअव. (बायकी) नवरा; पति; तिकडचे; तिकडची स्वारी. 'आमच्या घरांतल्यांनीं दादासाहेबांना दारूचें व्यसन लावलें.' -एकच प्याला. घरांतील मंडळी-स्त्री. (सांकेतिक) बायको; पत्नी. 'पाहूं घरांतील मंडळीस कसाकाय पसंत पडतो तो.' -विवि ७. १०. १२७. घरांत पैशाचा-सोन्याचा धूर निघणें-निघत असणें-घरची अतिशय श्रीमंती असणें; घरांत समजणें- कुटुंबांतील तंटा चव्हाट्यावर न आणणें; घरांतल्याघरांत तंटा मिटविणें; आपापसांत समजूत घडवून आणणें. घराला राम- राम ठोकणें-घर सोडून जाणें. 'आज या घराला रामराम ठोकण्यापेक्षां घटकाभर जुलमाचा रामराम पतकरला.' -भा ९०. घरावर काट्या घालणें-गोवरी ठेवणें-निखारा ठेवणें- एखाद्याच्या कुटुंबाची धूळधाण, बदनामी करणें; घरावर कुत्रें चढविणें- (गोव्याकडे घरावर कुत्रें चढल्यास घर सोडावें लागतें यावरून) १ एखाद्याच्या घरांत कलागती. भांडणें लावून देणें, तंटे उत्पन्न करणें. २ दुष्टावा करणें; अडचणींत आणणें. घरावर गवत रुजणें- घर ओसाड, उजाड पडणें. घरास आग लावणें-(ल.) एखादें दुष्कृत्य करून घराचा नाश करणें. घरास कांटी लागणें-घर उध्वस्त होणें; घरांत कोणी न राहणें. घरांस कांटी लावणें-१ घराच्या भोवतीं कांटे, काटक्या लावून येणें-जाणें बंद करणें. २ (ल.) घर उजाड, उध्वस्त, ओसाड करणें. घरास हाड बांधणें, घरावर टाहळा टाकणें- (एखाद्यास) वाळींत टाकणें; समाजांतून बहिष्कृत करणें; जाती- बाहेर टाकणें. (शेत, जमीन, मळा, बाग) घरीं करणें- स्वतः वहिवाटणें. घरीं बसणें-(एखादा मनुष्य) उद्योगधंदा नसल्यामुळें, सोडून दिल्यामुळें घरीं रिकामा असणें; बेकार होणें. 'तो एक वर्ष झालें घरीं बसला आहे.' (एखाद्याच्या) घरीं पाणी भरणें-(एखादा मनुष्य, गोष्ट) एखाद्याच्या सेवेंत तत्पर असणें; त्यास पूर्णपणें वश असणें. 'उद्योगाचे घरीं । ऋद्धिसिद्धि पाणीभरी.' घरीं येणें-(एखादी स्त्री) विधवा झाल्यामुळें सासरच्या आश्रयाच्या अभावीं पितृगृहीं, माहेरीं परत येणें; विधवा होणें. 'कुटुंब मोठें, दोन बहिणी घरीं आलेल्या.' -मनोरंजन आगरकर अंक. घरीं तसा दारीं देवळीं तसा बिर्हाडीं, घरीं दारीं सारखाच-सर्व ठिकाणीं सारखाच वागणारा; (सामा.) सर्वत्र उपद्रवकारक असलेला (मनुष्य, मूल); जसा स्वतःच्या घरीं उपद्रवकारक तसाच दुसर्याच्या घरीं उपद्रवकारक असलेला (मनुष्य, मुलगा). आल्या घरचा-वि. पुनर्विवाहित स्त्रीस पहिल्या नवर्यापासून झालेला (मुलगा). म्ह॰ १ घर फिरलें म्हणजे घराचे वांसेहि फिरतात = (एखाद्या) घरांतल्या मुख्याची खपा मर्जी, नाराजी झाली तर घरांतलीं लहानमोठीं नोकरचाकर सर्वच माणसें त्याच्या विरुद्ध उठतात. सामाशब्द- ॰असामी-स्त्री १ वतनवाडी; जमीनजुमला; मालमत्ता. २ घरकामासंबंधाचा मनुष्य; घराकडचा माणूस. ॰कज्जा-पु. घरां- तील तंटा; कौटुंबिक भांडण; गृहकलह. ॰करी-पु. पत्नीनें नवर्यास उद्देशून वापारावयाचा शब्द; घरधनी; कारभारी; यज- मान; घरमालक. 'माझे घरकरी गांवाला गेले.' ॰करीण- स्त्री. पतीनें पत्नीविषयीं वापरावयाचा शब्द; कारभारीण. 'माझ्या घरकरणीला तिच्यामुळें आराम वाटतो.' -कोरकि ३१५. २ घरधनीण; घरची मालकीण; यजमानीण. ॰कलह-पु. घरांतील भांडण; घरांतील माणसांचें दायग्रहणादिविषयक भांडण; आपसां- तील भांडण; अंतःकलह. ॰कसबी-पु आपल्या अक्कलहुषारीनें घरगुती जरूरीचे जिन्नस घरच्याघरीं तयार करणारा व घरची मोडतोड दुरुस्त करणारा मनुष्य; घरचा कारागीर; बाहेर काम करून उपजीविका न करणारा माणूस. ॰कहाणी-काहणी-स्त्री. (वाईट अर्थीं उपयोग) घरांतल्या खाजगी गोष्टीचें कथन. ॰कान्न-स्त्री. (गो.) घरधनीण; बायको; घरकरीण. [सं. गृह + कान्ता]. ॰काम-न. घरगुती काम. घरासंबंधीं कोणतेंहि काम; प्रपंचाचें काम. 'बायकांचा धंदा घरकामाचा लावतात.' ॰काम्या-वि. घरांतील कुटुंबांतील किरकोळ कामें करण्यास ठेवलेला नोकर, गडी; घरांतील काम करणारा. [घरकाम] ॰कार-री-पु. (गो. कु.) १ नवरा, पति. २ घरचा यजमान; घरधनी; मालक. [सं. गृह + कार] घरकरी पहा. ॰कारणी-पु. घरचें सर्व काम पाहणारा; कारभारी, दिवाणजी; खाजगी कारभारी. ॰कुंडा-पु. (कों.) १ पक्ष्याचें घरटें; कोठें. २ (ल.) आश्रय- स्थान; 'आम्हीं तुझ्या विश्रांतीचा घरकुंडा सोडतांच हे आमचे अद्वैतज्ञानाचे पांख आम्हांस तोलत नाहींसे होऊन आम्ही खालीं पडों लागलों.' -दादोबा, यशोदा पांडुरगी. [सं. गृह + कुंड] ॰कुबडा-कुबा-कोंबा-घरकोंग्या-कोंडा-कुंडा-कोंघा-कोंबडा-घुबड-पु. (घरांतला घुबड, कोंबडा इ. प्राणी) (दुबळ्या व सुस्त माणसाला-प्राण्याला तिरस्कानें लावावयाचा शब्द). नेहमीं घरांत राहाणारा; एकलकोंड्या; माणुसघाण्या; चारचौघांत उठणें, बसणें, गप्पा मारणें इ॰ ज्यास आवडत नाहीं असा, कधीं बाहेर न पडणारा मनुष्य; घरबशा. ॰कुल्ली- वि. (गो.) बहुश; घराबाहेर न पडणारी (स्त्री.); घर- कोंबडी. ॰केळ-स्त्री. (प्रां.) गांवठी केळ. घरीं लावलेलीं केळ. ॰खटला-लें-पुन १ घरचा कामधंदा; गृहकृत्य; प्रपंच, शेतभात इ॰ घरासंबंधीं काम. २ घराची, कुटुंबाची काळजी, जबाबदारी- अडचणी इ॰ ३ गृहकलह; घरांतील भांडण. ॰खप्या-वि. घरांतील धुणें, पाणी भरणें, इ॰ सामान्य कामाकरितां ठेवलेला गडी; घरच्या कामाचा माणूस; घरकाम्या पहा. [घर + खपणें = काम करणें, कष्ट करणें] ॰खबर-स्त्री. घरांतील व्यवहारांची उठाठेव-चौकशी; घराकडची खबर, बातमी. 'उगाच पडे खाटे वर तुज कशास व्हाव्या घरखबरा ।' -राला २२. [घर + खबर = बातमी] ॰खर्च-पु कुटुंबपोषणाला लागणारा खर्च; प्रपंचाचा खर्च. ॰खातें-न. घरखर्चाचें मांडलेलें खातें; खानगी खातें. ॰खास(ज)गी-वि. घरांतील मालमत्ता, कामें कारखाना इ॰ संबंधीं; घरगुती बाबीसंबंधीं; घरगुती, खासगी व्यवहारबाबत. ॰गणती-स्त्री. १ गांवांतील घरांची संख्या. २ गांवांतील घरांची मोजणी, मोजदाद. ३ गांवांतील घरांच्या मोजणीचा हिशेब, तपशील. (क्रि॰ करणें; काढणें) [घर + गणती = मोजणी] ॰गाडा- पु. संसाराचीं कामें; जबाबदारी; प्रपंचाची राहाटी; प्रपंच; संसार; घरखटला. (क्रि॰ हांकणें; चालवणें; सांभाळणें). ॰गुलाम-पु. घरांतील नोकर; गडी. 'चौदाशें घरगुलाम मुकले या निजपा- यांला ।' -ऐपो ३१३. ॰गोहो-पु. चुलीपाशीं, बायकांत, आश्रि- तांत शौर्य दाखविणारा मनुष्य; गेहेशूर; घरांतील माणसांवर जरब ठेवणारा पण बाहेर भागुबाईपणा करणारा पुरुष. [घर + गोहो = नवरा, पुरुष] ॰घरटी-स्त्री. दारोदार; एकसारखी फेरी घालणें (क्रि॰ करणें). 'चंद्र कथुनि मग महेंद्रगृहीं घरघरटी करित वायां ।' -आमहाबळ १९.१ ॰घाला-ल्या, घरघालू-वि. १ खोड साळ; फसवाफसवी करणारा; बिलंदर. 'भिजल्या पोरी कशी होरी ग हे घरघाली ।' -राला ४०. २ कुळाची अब्रू घालवणारा; घर- बुडव्या; दुसर्याचें घर बुडविणारा किंवा व्यसनादिकांनी आपलें घर बुडवून घेणारा. 'कशी घरघाली रांड बसली आम्हां गिळून ।' -राला ४६. ३ सर्व नाश करणारा. 'भयानका क्षिति झाली घर- घाली रुद्रविंशति जगिं फांकली ।' -ऐपो ३६८. [घर + घालणें; तुल॰ गु. घरघालु = द्रोही, खर्चीक] ॰घुशा-सा-वि. सर्व दिव- सभर उदासवाणा घरांत बसणारा; घरबशा, घरकोंबडा; घरकु- बडा पहा. [घर + घुसणें] ॰घुशी-सी-स्त्री. नवर्याचें घर सोडून दुसर्याच्या घरांत नांदणारी; दुसर्याचा हात धरून गेलेली विवा- हित स्त्री. 'कोण धांगड रांड घरघुशी ।' -राला ७८. [घर + घुसणें] ॰घेऊ-घेणा-वि. घराचा, कुटुंबाचा नाश, धुळधाण करणारा; घरघाला; घरबुडव्या; दुसर्यास मोह पाडून, फसवून त्याचें घर बळकावणारा. 'जळो आग लागो रे ! तुझि मुरली हे घरघेणी ।' -देप ८०. 'लांबलचकवेणी, विणुन त्रिवेणी, घर- घेणी अवतरली ।' -प्रला १११. [घर + घेणें] ॰चार, घरा- चार-पु. १ कुटुंबाची रीतभात; घराची चालचालणूक; कौटुं- बिक रूढी, वहिवाट. म्ह॰ घरासारखा घरचार कुळासारखा आचार. २ गृहस्थधर्म; संसार; प्रपंच. -जै १०६. 'दुःखाचा घरचार निर्धन जिणें भोगावरी घालणें ।' -किंसुदाम ५०. [सं. गृहाचार; म. घर + आचार = वर्तन] ॰चारिणी, ॰चारीण- स्त्री. (काव्य.) गृहपत्नी; घरधनीण; यजमानीण; घरमालकीण. 'शेवटीं नवनीत पाहतां नयनीं । घरचारिणी संतोषे ।' [सं. गृहचा- रिणी] ॰जमा-स्त्री. घरावरील कर; घरपट्टी. घरजांव(वा)ई- पु. बायकोसह सासर्याच्या घरीं राहणारा जांवई; सासर्यानें आपल्या घरींच ठेवून घेतलेला जांवई; सासर्याच्या घरीं राहून तेथील कारभार पाहणारा जांवई. 'तो संसाराचा आपण । घर जांवई झाला जाण । देहाभिमानासि संपूर्ण । एकात्मपणमांडिले ।।' -एभा २२.५९२. [घर + जांवई] ॰जांवई करणें-सक्रि. १ (एखाद्यास) सर्वसंपत्तीसह कन्यादान करणें; जांवयाला घरीं ठेवून घेणें, त्याला आपली जिंदगी देणें. 'त्याला त्यांनीं घरजां वईच केला आहे.' -इंप २७. २ (उप.) एखादी उसनी घेत- लेली वस्तु लाटण्याच्या हेतूनें, मालकानें परत मिळण्याविषयीं तगादा लावीपर्यंत, ठेवून घेणें. ॰जांवई होऊन बसणें-अक्रि. आपल्यावर सोपविलेल्या कामाचा किंवा धंद्याचा नफा किफायत आपल्याच कामीं लावणें, आपणच घेऊन टाकणें. ॰जिंदगी, जिनगानी-स्त्री. १ घरांतील सामानसुमान, उपकरणीं, भांडी- कुंडीं, द्रव्याव्यतिरिक्त इतर मालमत्ता; घरांतील जंगम चीजवस्त; मिळकत. २ (सामा.) मिळकत; इस्टेट. 'पादशहाची घरजि- नगानी समग्र लुटून.' -ख ८.४२२४. [घर. फा. झिंदगी, झिंद- गानी = मालमत्ता,जन्म,संसार] ॰जुगूत-जोगावणी-स्त्री. १ काटकसर; मितव्यय; थोडक्यांत घराचा निर्वाह. २ घरांतील जरूरीची संपादणी; कसाबसा निर्वाह. 'एक म्हैस आहे. तिणें घर जुगूत मात्र होत्ये.' -शास्त्रीको [घर + जुगुत = युक्ति + जोगवणी = प्राप्तीची व खर्जाची तोंडमिळवणी] ॰टका-टक्का-पु. घरपट्टी घरजमा; घरावरील कर. ॰टण-णा-घरठाण अर्थ २ घरवंद पहा. ॰टीप-स्त्री. १ गांवांतील घरांची गणती. (क्रि॰ करणें; काढणें). २ घरमोजणीचा हिशेब, तपशील; घरगणती पहा. [घर + टीप = टिपणें, लिहिणें] (वाप्र.) ॰टीप काढणें-करणें- घेणें-(ल.) (शोधीत, लुटीत, मोजीत, आमंत्रण देत) गांवां- तील एकहि घर न वगळता सर्व घरांची हजेरी घेणें; कोणतीहि क्रिया, रोग, प्रादुर्भाव गांवांतील एकहि घर न वगळतां होणें. 'यंदा जरीमरीनें ह्या गांवाची घरटीप घेतली.' ॰टोळ- स्त्री. (कों.) प्रत्येक घराचा झाडा, झडती. 'त्या गांवची घरटोळ घेतली तेव्हां चोर सांपडला.' घरडोळ पहा. ॰ठा(ठ)ण- न. १ घर ज्या जागेवर बांधलेलें आहे ती इमारत बांधून राहण्याच्या कामासाठीं उपयोगांत आणलेला जमीनीचा विभाग. -लँडरेव्हिन्यू कोड. २ मोडलेल्या घराचा चौथरा; पडक्या घराची जागा. घरवंद पहा. [सं. गृहस्थान; म. घर + ठाणा-ण] ॰ठाव-पु. १ नवरा; पति; संसार. 'मुदतींत आपल्याकडे नांदण्यास न नेल्यास मी दुसरा घरठाव करीन.' २ अनीति- कारक आश्रय; रखेलीचा दर्जा; रखेलीस दिलेला आश्रय. 'निरांजनीला मुंबईंत एका गुजराथी धनवानानें चांगला घरठाव दिला होता.' -बहकलेली तरुणी (हडप) ८. ॰डहुळी-डोळी, -डोळा-स्त्री. १ घराचा झाडा, झडती, झडती; बारीक तपासणी. 'मग थावली ते वाहटुळी । सैंघ घेऊनि घरडहुळी । -ज्ञा ६.२१६. 'तया आधवियांचि आंतु । घरडोळी घेऊनि असें पाहतु ।' -ज्ञा ११.५८६. २ प्रत्येक घराची केलेली झडती. (क्रि॰ घेणें). [घर + डहुळणें = ढवळणें] ॰डुकर-न. १ गांवडुकर; पाळीव डुकर. २ निंदाव्यजक (कुटुंबांतील) आळशी, निरुद्योगी स्त्री. [घर + डुकर] ॰तंटा-पु. गृहकलह; घरांतील भांडण. [घर + तंटा] ॰दार-न. (व्यापक) कुटुंब; घरांतील माणसें, चीचवस्त इ॰ प्रपंचाचा पसारा, खटलें; [घर + दार] (वाप्र.) घरदार खाऊन वांसे तोंडीं लावणें-सारी धनदौलत नासून, फस्त करून कफल्लक बनणें; ॰दार विकणें-घर व त्यांतील मालमत्ता विकणें; सर्व स्थावर जिंदगी घालविणें. म्ह॰ एक पाहुणा म्हणजे घरदार पाहुणें = एका पाहुण्यासाठीं कांहीं मिष्टान्न केलें तर तें घरांतील सर्व मंडळींस वाढावें लागतें. ॰देणें-न. घरपट्टी; घरटका. ॰धणी- नी-पु. १ यजमान; गृहपति; घरांतील कर्ता माणूस. 'निर्वीरा धरणी म्हणे घरधणी गोंवूनी राजे पणीं ।' -आसी ५२. २ पति; नवरा; घरकरी. 'मग घरधन्यास्नी पकडूनश्येनी न्ये.' = बाय २.२. ॰धंदा-पु. घरांतील कामधाम; गृहकृत्य. [घर + धंदा] ॰धनीण-स्त्री. १ घरमालकीण; यजमानीण. २ पत्नी; बायको; घरकरीण. 'माझी घरधनीण फार चांगली आहे.' -विवि ८.२. ४०. ॰नाशा-वि. घराचा, कुटुंबाचा नाश, धुळधाण कर णारा; घरघाल्या. [घर + नासणें] ॰निघ(घो)णी-स्त्री. १ घरनिघी पहा. २ (क्क.) घरभरणी अथवा गृहप्रवेश शब्दाबद्दल वापर- तात. केव्हां केव्हां या दोन्हीहि शब्दांबद्दल योजतात. [घर + निघणें] ॰निघी-स्त्री. वाईट चालीची. दुर्वर्तनी, व्यभिचा रिणी स्त्री; घरांतून बाहेर पडलेली, स्वैर, व्यभिचारिणी स्त्री. 'कीं घरनिघेचें सवाष्णपण ।'-नव १८.१७२. [घर + निघणें = निघून जाणें, सोडणें] ॰निघ्या-पु. १ स्वतःचें कुटुंब, घर, जात सोडून दुसर्या घरांत, जातींत जाणारा; दुर्वर्तनी, व्यभिचारी मनुष्य. २ एखाद्या व्यभिचारिणी स्त्रीनें बाळगलेला, राखलेला पुरुष; जार. [घर + निघणें] ॰पटी-ट्टी-स्त्री. १ घरटका; घरदेणें; घरावरील कर; हल्लींसारखी घरपट्टी पूर्वीं असे. मात्र ती सरकारांत वसूल होई. पुणें येथें शके १७१८-१९ मध्यें घरांतील दर खणास सालीना ५ रु. घरपट्टी घेत. मात्र घरांत भाडेकरी किंवा दुकानदार ठेवृल्यास घेत. स्वतःचें दुकान असल्यास, किंवा भाडे- करी नसल्यास घेत नसत. -दुसरा बाजीराव रोजनिशी २७९- ८०. 'पंचाकडे घरपट्टी बसविण्याचा अधिकार आला.' -के १६.४. ३०. २ एखाद्या कार्याकरितां प्रत्येक घरावर बसविलेली वर्गणी. [घर + पट्टी = कर] ॰पांग-पु. निराश्रितता; आश्रयराहित्य. 'तंव दरिद्रि- यासी ठाव तत्त्वतां । कोणीच न देती सर्वथा । जेथें घरपांग पाहतां । बाहेर घालिती पिटोनि ।।' -ह २९.३५. [घर + पांग = उणीव] ॰पांड्या-पु. घरांतल्याघरांत, बायकांत बडबडणारा, पांडित्य दाखवणारा. [घर + पांड्या = गांवकामगार] ॰पाळी-स्त्री. (सरका- रला कांहीं जिन्नस पुरविण्याची, सरकाराचा विवक्षित हुकूम बजावण्याची, भिकार्यांना अन्न देण्याची इ॰) प्रत्येक घरावर येणारी पाळी, क्रम. [घर + पाळी] ॰पिसा-वि. ज्याला घराचें वेड लागलें आहे असा; घरकोंबडा; घरकुंडा; [घर + पिसा = वेडा] ॰पिसें-न. घराचें वेड; घरकुबडेपणा; घर सोडून कधीं फार बाहेर न जाणें. [घर + पिसें = वेड] ॰पोंच, पोंचता-वि. घरीं नेऊन पोंचविलेला, स्वाधीन केलेला (माल). [घर + पोहोंच विणें] ॰प्रवेश-पु. नवीन बांधलेल्या घराची वास्तुशांति करून त्यांत रहावयास जाण्याचा विधि. (प्र.) गृहप्रवेश पहा. [म. घर + सं. प्रवेश = शिरणें] घरास राखण-स्त्री. १ घराचें रक्षण करणारा मनुष्य. २ थोडासा संचय, शिल्लक, साठा, संग्रह. 'सगळा गूळ खर्चूं नको घरास राखण थोडकासा ठेव.' घर म्हणून पहा. ॰फूट-स्त्री. आपसांतील दुही, तंटेबखेडे; गृहकलह; घर, राज्य इ॰ कांतील एकमतानें वागणार्या माणसांमध्यें परस्पर वैर. द्वेषभाव. [घर + फूट = दुही, वैर] ॰फोड-स्त्री. घरांतील माणसांत कलि माजवून देणें, कलागती उत्पन्न करणें. [घर + फोडणें = फूट पाडणें] ॰फोडा-स्त्री. १ (कायदा) एखाद्याच्या घरांत त्याच्या संमतीवाचून कुलूप-कडी काढून, मोडून किंवा मार्ग नाहीं अशा ठिकाणीं मार्ग करून (चोरी करण्याकरितां) प्रवेश करणें; (पीनलकोडांतील एक गुन्हा). २ घराची भिंत वगैरे फोडून झालेली चोरी. (इं.) हाउस् ब्रेकिंग. [घर + फोडणें] ॰फोड्या-वि. १ घरांत, राज्यांत फूट पाडणारा, दुही माजविणारा; घरफूट कर. णारा. २ घरें फोडून चोरी करणारा. [घर + फोडणें] ॰बंद-पु. १, (कों.) घरांची वस्ती, संख्या. 'त्या शहरांत लाख घरबंद आहे. [घर + बंद = रांग] २ घराचा बंदोबस्त; घरावरील जप्ती; घर जप्त करणें; घराची रहदारी बंद करविणें; चौकी-पहारा बसविणें. 'एकोनि यापरी तुफान गोष्टी । क्रोध संचरला राजयापोटीं । पाहारा धाडूनि घरबंदसाठीं । ठेविला यासी कारागृहीं ।' -दावि ४५६. [घर + बंद = बंद करणें] ॰बशा-वि. उप. घरकोंबडा; घरांत बसून राहणारा. [घर + बसणें] ॰बसल्या-क्रिवि. घरीं बसून; नोकरी, प्रवास वगैरे न करतां; घरच्याघरीं; घर न सोडतां. (ल.) आयतें; श्रमविना. (क्रि॰ मिळणें; मिळवणें). 'तुम्ही आपले पैसे व्याजीं लावा म्हणजे तुम्हांला घरबसल्या सालीना पांचशें रुपये मिळतील.' ॰बाडी-स्त्री. बेवारसी घरांचें भाडें (ब्रिटीशपूर्व अमदानींत, कांहीं शहरांतून सरकार हें वसूल करीत असे). घरवाडी पहा. ॰बार-न. घरदार; घरांतील मंडळी व माळमत्ता; संसार; प्रपंचाचा पसारा. 'तेवि घरबार टाकून गांवीचे जन ।' -दावि ४१२. 'घरबार बंधु सुत दार सखे तुजसाठिं सकळ त्यजिले ।' -देप २७. [सं. गृह + भृ; म. घर + भार; हिं घरबार; गु. घरबार] ॰बारी-पु. १ कुटुंबवत्सल; बायकोपोरांचा धनी; गृहस्थाश्रमी; संसारी. 'भार्या मित्र घरबारिया ।' -मुवन १८.७१. २ घरधनी; घरकरी; नवरा; पति. 'कां रुसला गे माझा तो घरबारी ।' -होला १४८. [सं. गृह + भृ; म. घरबार; हिं. घरबारी; गु. घरबारी] म्ह॰ ना घरबारी ना गोसावी = धड संसारीहि नाहीं कीं बैरागी नाहीं अशा मनुष्याबद्दल योजतात. ॰बारीपणा-पु. गृहस्थ- पणा; कर्तेपणा. 'पुरुषास घरबारीपणा प्राप्त होतो.' -विवि ८.२. ३५. [घरबारी] ॰बुडवेपणा-पु. १ घराचा नाश करण्याचें कर्म. २ देशद्रोह; स्वदेशाशीं, स्वदेशीयाशीं, स्वराज्याशीं बेइमान होणें. 'हा प्रयत्न त्यांच्या इतर प्रयत्नाप्रमाणेंच घर- बुडवेपणाचा आहे हें आम्ही सांगावयास नकोच.' -टि १.५४८. [घर बुडविणें] ॰बुडव्या-वि. अत्यंत त्रासदायक; दुसर्याच्या नाशाची नेहमीं खटपट करणारा; घरघाल्या; स्वतःच्या, दुसर्याच्या घरादारांचा नाश करणारा; देशद्रोही. [घर + बुडविणें] ॰बुडी, ॰बुड-स्त्री. १ (एखाद्याच्या) संपत्तीचा, दौलतीचा नाश; सर्वस्वाचा नाश. २ एखादें घर, कुटुंब अजिबात नष्ट होणें; एखाद्या कुळांचें, वंशाचें निसंतान होणें. [घर + बुडणें] ॰बेग(ज) मी-स्त्री. कुटुंबाच्या खर्चाकरितां धान्यादिकांचा केलेला सांठा, पुरवठा, संग्रह; प्रपंचासाठीं केलेली तरतूद. [घर + फा. बेगमी = सांठा] ॰बेत्या-पु. (राजा.) घराची आंखणी करणारा. (इं.) इंजिनिअर. [घर + बेतणें] ॰बैठा-वि. घरीं बसून करतां येण्या- सारखें (काम, चाकरी, धंदा); बाहेर न जातां, नोकरी वगैरे न करतां, स्वतःच्या घरीं, देशांत करतां येण्याजोगा. २ घरांत बसणारा (नोकरी, चाकरीशिवाय); बेकार. -क्रिवि. (सविभक्तिक) घरीं बसून राहिलें असतां; घरबसल्या पहा. [घर + बैठणें] ॰भंग- पु. १ घराचा नाश, विध्वंस. 'जिवलगांचा सोडिला संग । अव- चिता जाला घरभंग ।' -दा ३.२. ६०. २ (ल.) कुळाचा, कुटुंबाचा नाश; कुलनाश. [घर + भंग] ॰भर-वि. (कर्तुत्वानें, वजनानें) घर, कुटुंब भरून टाकणारा-री; घरांत विशेष वजन असणारा-री; घरांतील जबाबदार. -क्रिवि. घरांत सर्व ठिकाणीं, सर्वजागीं. 'त्यानें तुला घरभर शोधलें.' [घर + भरणें] ॰भरणी- स्त्री. १ गृहप्रवेश; नवीन बांधलेल्या घरांत राहण्यास जाण्याच्या वेळीं करावयाचा धार्मिक विधि; वास्तुशांति; घररिघणी पहा. २ पतीच्या घरीं वधूचा प्रथम प्रवेश होताना करण्याचा विधि; नव- वधूचा गृहप्रवेश; गृहप्रवेशाचा समारंभ; वरात; घररिगवणी; घर- रिघवणी. 'वधूवरें मिरवून । घरभरणी करविली ।' -र ४८. ॰भरवण-णी-स्त्री. (गो. कु.) गृहप्रवेश; वरात; घरभरणी अर्थ २ पहा. [घर + भरवणें] ॰भाऊ-पु. कुटुंबांतील मनुष्य; नातलग; कुटुंबांच्या मालमत्तेचा, वतनवाडीचा वांटेकरी; हिस्सेदार; दायाद. ॰भाट-पु. १ (कु.) घराच्या आजूबाजूची आपल्या माल- कीची जागा, जमीन; घरवाडी; विसवाट. २ (गो.) घराशेजा- रचा, सभोंवारचा नारळीचा बाग. [घर + भाट] ॰भांडवल- न. १ कुटुंबांतील मालमत्ता, जिंदगी, इस्टेट. २ एखाद्याचा खाजगी द्रव्यनिधि, ठेव; उसना काढलेला, कर्जाऊ काढलेला पैसा, द्रव्यनिधि याच्या उलट. [घर + भांडवल] ॰भांडवली- वि. घरच्या, स्वतःच्या भांडवलावर व्यापार करणारा. [घर- भांडवल] ॰भाडें-न. दुसर्याच्या घरांत राहण्याबद्दल त्यास द्यावयाचा पैसा, भाडें. [घर + भाडें] ॰भारी-पु. (प्र.) घरबारी. १ घरबारी पहा. २ ब्रह्यचारी, संन्यासी याच्या उलट; गृहस्था- श्रमी. ॰भेद-पु. कुटुंबाच्या माणसांतील आपसांतील भांडण, तंटा; फाटाफूट; घरफूट. ॰भेदी-द्या-वि. १ स्वार्थानें, दुष्टपणानें परक्याला, शत्रूला घरांत घेणारा; फितूर; देशद्रोही. २ घरचा, राज्याचा, पक्का माहितगार; घरचीं सर्व बिंगें ज्यास अवगत आहेत असा. म्ह॰ घरभेदी लंकादहन = घरभेद्या मनुष्य लंका जाळण्यार्या मारुतीप्रमाणें असतो. ३ घरांतील, राज्यांतील कृत्यें, गुप्त बातम्या बाहेर फोडणारा; घर फोडणारा. 'घरभेद्या होऊनि जेव्हां ।' -संग्रामगीतें १४०. ४ घरांत, कुटुंबांत, राज्यांत, तेटें, कलह, लावणारा. ॰भोंदू-वि. १ लोकांचीं घरें (त्यांना फसवून) धुळीस मिळवणारा. २ (सामा.) ठक; बिलंदर; प्रसिद्ध असा लुच्चा; लफंगा (मनुष्य). [घर + भोंदू = फसविणारा] ॰महार- पु. राबता महार. ॰मारू-र्या-वि. शेजार्यास नेहमीं उपद्रव देणारा; शेजार्याच्या नाशविषयीं नेहमीं खतपट करणारा. ॰माशी-स्त्री. घरांत वावणारी माशी; हिच्या उलट रानमाशी. ॰मेढा-मेंढ्या-पु. घरांतील कर्ता, मुख्य मनुष्य; कुटुंबाचा आधारस्तंभ; घराचा खांब पहा. [सं. गृह + मेथि; प्रा. मेढी; म. घर + मेढा = खांब] ॰मेळीं-क्रिवि. आपसांत; घरीं; खाजगी रीतीनें; आप्तेष्टमंडळीमध्यें (तंठ्याचा निवडा. तडजोड करणें). 'घरमेळीं निकाल केला.' [घर + मेळ; तुल॰ गु. घरमेळे = आप- सांत] ॰मोड-स्त्री. मोडून तें विकणें. 'कांहीं दिवसपर्यंत येथें घरमोडीचा व्यापार उत्तम समजला जात होता.' -टि १. १६९. [घर + मोडणें] ॰राखण-स्त्री. १ (प्रा.) घराची पाळत; रक्षण; पहारा. २ घरराखणारा; घरावर पहारा ठेवणारा. [म. घर + राखणें] ॰राख्या-वि. घराचें रक्षण करणारा; घराचा पहा- रेकरी; घरराखण. [घर + राखणें] ॰रिघणी, ॰रिघवणी-स्त्री. १ बांधलेल्या घरांत प्रवेश करतेवेळीं करावयाचा धार्मिक- विधि घरभरणी अर्थ १ पहा. २ घरचा कारभार; घरकाम. 'रचून विविध देहकुटी । तो घररिघवणी परिपाठी ।' -विपू ७. १२८. [घर + रिघणें = प्रवेश करणें] ॰रिघणें-घरांत येणें, प्रवेश करणें. 'घररिघे न बाहतां भजकाच्या ।' -दावि १६१. ॰लाठ्या-वि. (महानु.) घरांतील लाठ्या, लठ्या; घरपांड्या; गृहपंडित; घरांत प्रौढी मिरविणारा; रांड्याराघोजी. 'ऐसेआं घरलाठेआं बोला । तो चैद्यु मानवला ।' -शिशु ८९९. [घर + लठ्ठ?] ॰वट-ड-स्त्री. १ (कु. गो.) एखाद्या कुटुंबाची सर्वसाधारण, समायिक जिंदगी, मालमत्ता; कुटुंबाचें, संस्थेचें सर्वसाधारण काम, प्रकरण. घरोटी पहा. २ (गो.) कूळ; कुटुंब; परंपरा. ३ अनुवंशिक, रोग, भूतबाधा इ॰ आनुवांशिक संस्कार. [सं. गृह + वृत्त; प्रा. वट्ट] ॰वण-न. (कों.) घरपट्टी; घरासंबंधीं सरकार देणें. ॰वणी- न. घराच्या छपरावरून पडणारें पावसाचें पाणी. याचा धुण्याकडे उपयोग करतात. [सं. गृह. म घर + सं. वन, प्रा. वण = पाणी] ॰वंद-पु. (राजा.) घरटणा; पडक्या घराचा चौथरा; पडलेल्या घराची जागा. -वि. घरंदाज; कुलीन; खानदानीचा. 'शहर पुणें हरहमेष भरलें वाडें बांधिती घरवंदानी ।' -ऐपो ४२०. [गृहवंत?] ॰वरौते-स्त्री. १ घरवात; प्रपंच; संसारकथा; घरवात पहा. २ -न. वनरा- बायको; दापत्य; जोडपें. 'तीं अनादि घरवरौतें । व्यालीं ब्रह्मादि प्रपंचातें ।' -विउ ६.५ 'पुढती घरवरौतें । वंदिलीं तिये ।' -अमृ १.४९. [गृह + वृत्-वर्तित्] ॰वसात-द- स्त्री. १ वसति; रहाणें; वास; मुकाम. २ घराची जागा आणि सभोंवतालचें (मालकीचें) आवार, परसू, मोकळी जागा, अंगण. [घर + वसाहत] ॰वांटणी, ॰वांटा ॰हिस्सा- स्त्रीपु. घराच्या मालमत्तेंतील स्वतःचा, खाजगी, हिस्सा, भाग. [घर + वांटणी] ॰वाडी-स्त्री. (कों.) ज्यांत घर बांधलेलें, असतें तें आवार; वाडी. कोणाच्या अनेक वाड्या असतात, त्यापैकीं जींत धन्याचें घर असतें ती वाडी. [घर + वाडी] ॰वात-स्त्री. संसार; प्रपंच; संसाराच्या गोष्टी; प्रपंचाचा पसारा; घरवरौत; घरकाम. 'घरवातें मोटकीं दोघें । जैं गोसावी सेजे रिगे । दंपत्यपणें जागे । स्वामिणी जें ।।' -अमृ १.१३. 'ऐसी तैं घरवात वाढली । खातीं तोंडें मिळालीं ।' -दा ३.४. ६. [सं. गृहवार्ता] ॰वाला-वि. १ घराचा मालक. २ (खा.) नवरा; घरधनी; पति. [घर + वाला स्वामित्वदर्शक; प्रत्यय; तुल॰ गु. घरवाळो] ॰वाली- वि. (खा.) बायकों; पत्नी; घरधनीण. 'माझ्या घर- वालीनें साखर पेरतांच त्यानें सर्व सांगितलें ।' -राणी चंद्रावती ५३. [घर + वाली; गु. घरवाळी] ॰वासी-वि. कुटुंबवत्सल; प्रपंचांत वागणारा. [घर + वास = राहणें] ॰वेडा- वि. १ घरपिसा. २ बाहेर राहून अतिशय कंटाळल्यामुळें घरीं जाण्यास उत्सुक झालेला; (इं.) होमसिक्. ॰शाकारणी-॰शिवणी-स्त्री. घरावरील छपराची दुरुस्ती करणें; घरावर गवत वगैरे घालून पाव- सापासून संरक्षणाची व्यवस्था करणें; घराच्या छपराचीं कौलें चाळणें. [घर + शाकरणें, शिवणें] ॰शोधणी-स्त्री. १ स्वतःचीं खाजगी कामें पहाणें. २ स्वतःच्या साधनसामर्थ्याचा विचार करणें; स्वतःची कुवत अजमावणें. [घर + शोधणें] ॰संजोग- पु. १ एखाद्या कामास लागणारा घरचा संरजम. 'त्या हरदा- साचा घरसंजोग आहे.' = कीर्तनास लागणारीं साधनें तबला, पेटी, टाळ इ॰ हीं त्या हरदासाच्या घरचींच आहेत. २ काटकसरीचा प्रपंच; घरजुगूत; घरव्यवस्था. ३ सुव्यवस्थित घरांतील सुखसोयी, समृद्धता. [घर + सं. संयोग, प्रा. संजोग + सरंजाम] ॰संजो- गणी-स्त्री. घरसंजोग अर्थ २ पहा. घरजुगूत; काटकसर; मितव्यय. ॰समजूत-स्त्री. घरांतल्याघरांत, आपआपसांत स्नेह भावानें. सलोख्यानें केलेली तंट्याची तडजोड, समजावणी. ॰संसार-पु. कुटुंबासंबंधीं कामें; घरकाम; प्रपंच. ॰सारा-पु. घरावरील कर; घरपट्टी; घरटक्का. [घर + सारा = कर] ॰सोकील- वि. घरीं राहून खाण्यास सोकावलेला; घरीं आयतें खाण्यास मिळत असल्यानें घर सोडून बाहेर जात नाहीं असा; घराची चटक लागलेला (बैल, रेडा इ॰ पशु). [घर + सोकणें] ॰स्थिति- स्त्री. १ घराची स्थिति; घरस्थीत पहा. २ गृहस्थाश्रमधर्म; संसार; प्रपंच. 'ॠषीस अर्पिली कन्या शांती । मग मांडिली घरस्थिति ।' -कथा ३.३. ६३. [सं. गृहस्थिति] ॰स्थीत-स्त्री. घराची, कुटुं- बाची रीतभात, चालचालणूक, वर्तक, आचार, स्थिति. म्ह॰ अंगणावरून घरस्थीत जाणावी = अंगणाच्या चांगल्या किंवा वाईट स्थितीवरून त्या घारांतील मंडळीचा आचार कसा आहे तें समजतें. शितावरून भाताची परीक्षा या अर्थी. [घर + स्थिति अप.] घराचा खांब, घराचा धारण, घराचें पांघरूण-पुन. (ल.) घरांतील कर्ता माणूस; घरांतला मुख्य; घरमेढ्या. घराचार-पु. १ संसार; प्रपंच; गृहस्थाश्रमधर्म; घरकाम. 'परी अभ्यंतरीं घराचार माडें ।' -विपू ७.१३८. 'यापुरी निज नोवरा । प्रकृती गोविला घरचारा ।' -एभा २४.३२. -कालिकापुराण ४.३५. २ (ल.) पसारा; व्याप 'तेथ वासनेचा घराचार । न मांडे पैं ।' -सिसं ४.२०७. ३ घरां- तील मंडळींची राहटी, रीतभात, आचरण, वागणूक, व्यवहार. 'वंध्यापुत्राचा घराचार । तैसा जीवासि संसार ।' -एभा २६. ३०. [सं. गृह + आचार] घराचारी-वि. १ घरंदाज. २ नवरा; पति; घरकरी; ददला. 'ऐशिया स्त्रियांचे घराचारी । खराच्या परी नांदती ।' -एभा १३.२१४. [घराचार] घरास राखण- स्त्री. १ घरांचें रक्षण करणारा मनुष्य. २ थोडासा संचय, शिल्लक, सांठा, संग्रह. 'सगळा गूळ खर्चू नको घरास राखण थोडकासा ठेव.' घर म्हणून पहा. घरींबसल्या-क्रिवि. घरबसल्या पहा. घरोपाध्या-पु. कुलोपाध्याय; कुलगुरु; कुलाचा पुरोहित, भटजी. [घर + उपाध्याय; अशुद्ध समास]