मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

ध्रुवपद

ध्रुवपद dhruvapada n (S) The position or place of the polar star. 2 fig. An abiding or an elevated position. 3 Popularly ध्रुपद. ध्रुवपदीं बसविणें To set or place permanently or fixedly: also to exalt or set on high.

मोल्सवर्थ शब्दकोश

ध्रुवपद n The position of the polar star. An abiding or an elevated position. ध्रुवपदीं बसविणें To set or place permanently or fixedly, also to exalt or set on high.

वझे शब्दकोश

(सं) न० (ध्रुपद पहा.)

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

ध्रुवपद      

न.       १. ध्रुवबाळाला दिलेले अढळ स्थान. २. ध्रुवताऱ्याचे स्थान,पद. ३. (ल.) शाश्वत टिकणारे, वैभवाचे उच्च स्थान, पद. ४. पहा : ध्रुपद [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

संबंधित शब्द

डागुरबाणी

स्त्री. एक ध्रुवपद गायनपद्धति (ब्रिजचंद हा ध्रुवपद गाणारा प्रसिद्ध ब्राह्मण होऊन गेला. तो दिल्लीजवळ डागूर नांवाच्या लहान गांवचा राहणारा. त्याच्या नांवावरून हें नांव पडलें). [हिं.]

दाते शब्दकोश

अढळ      

न.       अविनाशपद; स्थिरपद; ध्रुवपद; मोक्ष : ‘शरण येती त्यांचे न विचारिसी दोष न मागता त्यांस अढळ देसी ॥’ – तुगा ८६८.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अकडकडवे

न. गाण्यातील पालुपद; ध्रुवपद; आंकणकडवे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आंकणकडवे      

न.       १. गाण्यातले पालुपद; ध्रुवपद; पेडाबंद २. (ल.) एकदा नाकारलेली गोष्ट पुन्हा पुन्हा काढणे; विनंती करणे; ठरलेली गोष्ट पुन्हा उपस्थित करणे. ३. जपमाळ घेणे; घोळणे; तुणतुणे गाणे; घोकणे. ४. एखाद्याच्या भाषणात वारंवार येणारा शब्द; पादपूरण; वाक्यपूरण.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अंकणकडवें

न. गाण्याचें पालुपद; ध्रुवपद. आंकणकडवें पहा.

दाते शब्दकोश

बाणी

स्त्री. पद्धति, रीति (गाणें, वाचन इ॰ ची); ध्रुवपद गायनाची पद्धति. ह्या बाण्या चार आहेत. त्या-खंडार, नोहार, डागुर व गौडार ह्या होत. [सं. वाणी] ॰चा-वि. चांगल्या आवाजानें पुराण वगैरे सांगणारा, गाणारा. ॰दार-वि. (गायन, वाचन इ॰) मोहक रीतीचें; आकर्षक पद्धतीचें.

दाते शब्दकोश

चतरग, चतरंग, चतुरंग      

पु. पु.       (संगीत) चार अंगांनी नटलेला हा गमतीदार गायन प्रकार आहे. ह्यात तराणा, सरगम, तिवट म्हणजे तबल्याचे बोल व ख्याल अशा चार प्रकारांची रचना असते. पहिल्या भागात गीताचे शब्द, दुसऱ्यात तराण्याचे बोल, तिसऱ्यात सरगम व चौथ्या भागात मृदुंगाच्या बोलांची छोटीशी परन असते. ख्याल, टप्पा, ठुमरी याप्रमाणे गायकीचा एक प्रकार : ‘गायकीमध्यें ध्रुवपद (ध्रुपद १), ख्याल, होरी... चतरग... हे प्रकार गवर्इ वर्गात ज्ञात आहेत.’ - ज्ञाशिं १६७.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ध्रुपद

न. १ (संगीत) संगीतांतील चिजेचा एक प्रकार. अस्ताई, अंत्रा व आभोग असें यांत तीन भाग असतात. ध्रुवपद अर्थ ३, ४ पहा. २ (गाण्याचें, पदाचें) पालुपद, अकडकडवें. एखाद्याच्या मागें ध्रुपद धरणें-एखाद्याच्या मगें उभें राहून, ध्रुपद पालुपद म्हणून) गाण्याची साथ करणें, त्याची री ओढणें. 'हरिकीर्तन करितां नित्य । तुकया मागें ध्रुपद धरित ।'

दाते शब्दकोश

(सं) न० ध्रुवपद, पालुपद. २ ध्रुपद, छंदविशेष.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

धुमाळी

वि. १ धुमाळ तालासंबंधी, सारखा (ध्रुवपद, चाळ, गति). २ अखंडीत; चालू असलेली; चपल (गति, गति- मान पदार्थ). -स्त्री. ताल. धुमाळ पहा.

दाते शब्दकोश

झील

स्त्री० झिलई. २ ध्रुवपद, पालुपद.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

झील ओढणें

अ० ध्रुवपद, पालुपद म्हणणें २ हांजी हांजी करणें, अनुवाद करणें.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

खंडारवाणी खंडारी, खंडारवानी, खंडारी      

स्त्री.       (संगीत) एक गायनपद्धती. ध्रुवपद गाणारा प्रसिद्ध राजा सन्मुखलिंग खंडारा गावी राहत असे. म्हणून त्याच्या ध्रुवपदगान पद्धतीस म्हणतात.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खंडारवाणी-खंडारी

स्त्री. (संगीत) एक गायनपद्धति. ध्रुवपद गाणारा प्रसिद्ध राजा सन्मुखसिंग खंडार गांवीं राहत असे म्हणून त्याच्या ध्रुवपदगानपद्धतीस म्हणतात. [खंडार]

दाते शब्दकोश

नोहारवाणी

स्त्री. (संगीत) एक ध्रुवपदगायनपद्धति. (प्रसिध्द ध्रुवपद गायक श्रीचंद हा नोहारगांवीं रहात असे त्या- वरून).

दाते शब्दकोश

पालुपद

न० प्रथमपद, ध्रुपद, ध्रुवपद, पालोपद, अखंड कडवं.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)