आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
निका
वि. १ पवित्र; शुद्ध. 'तुझा गोंधळ निका अंबे कोणी वर्णूं न शके हो ।' -भज १७. २ चांगला; योग्य. 'येरू म्हणे मुहूर्त आहे निका ।' 'राज्यायोग्यचि केवळ तप मात्र करावया बहु निका मी ।' -मोभीष्म ११.३. ३ उत्तम; लायक; उत्कृष्ट; सुंदर. ४ बरोबर; नक्की; नेमका. 'हे श्रोतयांची आशंका । पाहतां प्रश्न केला निका ।' -दा १०.७.१४६. ५ खरा; सत्य. 'म्हणे जय जय जी रघुनायका । सत्यप्रतिज्ञा शब्द निका । तरी मज वरावें रविकुळटिळका । अंतरसाक्ष जाणोनी ।' -वेसीस्व ४.८२. ६ निर्भेळ; शुद्ध; भेसळ नसलेलें. 'हें दूध निकें आहे.' -क्रिवि. स्पष्टपणें; निक्षून; स्पष्ट; उघड; धडधडीत. 'निकें निरोपिलें तुम्ही.' [अर. नकी-क = शुद्ध; स्वच्छ]
निका nikā a ( or A Pure, clean &c.) Pure, holy, chaste, good: also exact, just, correct, right. See नकी. Ex. येरू म्हणे मुहूर्त्त आहे निका ॥ मनाचिया निकें देखिलिया ॥ ठायां संवके ॥ The mind gets accustomed to whatever place it discerns to be pure or good. Also आतां बोलिजे तसें आयिका ॥ हा गीता भावोनिका ॥; also बांधिति गौळिणी तुज भा- विका ॥ तयांसी भिवूनि वागसी निका ॥. 2 Used as ad Positively, unreservedly, outright, clean, smack. Ex. निकें निरोपिलें तुम्ही ॥. 3 a Sometimes used literally for Pure or unadulterated; as हें दूध निकें आहे.
निका a Pure, holy, right. ad Positively, unreservedly, outright. a Pure or unadulterated.
पु. मुसालमानांतील हलक्या प्रतीचें लग्न; पाट; मोह- तूर. 'कुणबिणीची पोर रंगरेजाशीं निका लावण्याचें केलें.' -वाडसमा ३.२५९. [अर. निकाह्]
निका nikā m ( A) An inferior sort of marriage (amongst Muhammadans).
निका m An inferior sort of marriage (amongst Mohammedans).
(आ) नि० नक्की, निर्भेळ. २ मुसलमानाचें पाटाचें लग्न.
निका
वि. १. पवित्र; शुद्ध : ‘तुझा गोंधळ निका अंबे कोणी वर्णूं न शके हो ।’ – भज १७. २. चांगला; लायक; योग्य : ‘राज्यायोग्यचि केवळ तप मात्र करावया बहु निका मी ।’ – मोभीष्म ११·३. ३. उत्तम; उत्कृष्ट;सुंदर. ४. बरोबर; नक्की; नेमका : ‘हे श्रोतयांची आशंका । पाहती प्रश्न केला निका I’ – दास १०·७·१४६. ५. खरा; सत्य : ‘म्हणे जयजयजी रघुनायका । सत्यप्रतिज्ञा शब्द निका ।’ – वेसीस्व ४·८२. ६. शुद्ध; भेसळ नसलेले.
पु. मुसलमानांतील दुय्यम प्रतीचे लग्न; पाट; मोहतूर. [अर. निकाह्]
निका
(पु.) [अ. निकाह] विवाह (मुसल्मानाचा). “निकाह” (दिमरा २।९५)
[फा. नेक्] चाङ्गला, सुन्दर; उत्कृष्ट.
संबंधित शब्द
निकें
वि. निका. १ नेटकें; बरवें; बरें; नीट; चांगलें. 'पायाचे प्रसादेन कृपेन निकें असो ।' -पंच. 'एवं पक्षत्रया माझारि । निकें काये असे मुरारी ।' -रास ४.३०२. २ खरें निश्चित; नक्की. 'ऐसें वचन कचें बोलिलें । देवीं तें निकें मानिलें ।' -कथा १.५. ५१. ३ पूर्ण; सर्व. 'आली कष्टदशा, घडो मरणही, कीं तेज गेलें निकें ।' -वामन स्फुटश्लोक नवनीत १३४. -न. हित. -माज्ञा २.२८. -उद्गा. बरें; फार उत्तम; ठीक. 'निकें म्हणोनि पंडुनृपती । कुंती नेऊनि एकांतीं ।' -मुआदि २७.२२१. [निका]
आगमिक
वि. आगम जाणणारा, वेदशास्त्र जाणणारा : ‘तो आगमिक, पुजा करू निका जाणे.’ − लीच १•१९
चुकता
वि. पुरा केलेला; बाकी नसलेला (हिशेब); फेड- लेलें (कर्ज); निकालास लावलेला; तोडलेला; मिटविलेला (कज्जा, दावा, खटला). [चुकणें] ॰करणें-करून देणें संक्रि. १ निका- लास लावणें. 'सरकारची बाकी चुकती केली.' 'सावकाराचा पैका, वांट्याचा कज्जा, लोकांचें कर्ज, माझा हिशेब त्यानें चुकता करून दिला.' २ बाकी राहिलेला (हिशेब); शिल्लक असलेलें (कर्ज); वादग्रस्त अललेला (वाटा); अंगावर असलेला (हप्ता); निकालास न लावलेला. 'चुकते रुपये दिले.' 'चुकता पगार लष्करास मिळाला.' 'चुकती बाकी दिली.' चुकता पैका, हिशेब वाटा, हप्ता इ॰.' [चुकणें]
देशधडी or स
देशधडी or स dēśadhaḍī or sa ad (देश & धडी Verge.) In the state of wandering from country to country in beggary and wretchedness. v हो, लाग, मिळव. Ex. ह्यासीं उपाय योजावा निका ॥ दे0 करावा तुका ॥.
एकटिका
क्रिवि. एकट, एकटका पहा. ‘तो गातां तरि एक- टिका । परि स्वरें पुरुतां नीका ।।’ –शिशु १६८. [एक + ट + क]
जथा
पु. १ समूह; तांडा; मंडळी. २ कुटुंब; वंश; जात; कूळ; टोळी. 'सूर्यवंशी जथा निका ।'-वेसीस्व ६.५२. [सं. यूथक; हिं. जथा] ॰जथ-पत-थ-स्त्री. १ समूह ढीग; एकत्र; जमाव; युक्तिप्रयुक्तीनें केलेला (पैशांचा) संचय. २ एकत्र आणणें, सर्व बाजूंनीं गोळा करणें (अस्ताव्यस्त पडलेले पदार्थ). ३ धंदा किंवा काम. यांच्यासाठीं केलेली सर्व तऱ्हेची उपाययोजना. ॰बंध- क्रिवि. एकदम; एकत्र. ॰वळ-स्त्री १ जथा अर्थ २ पहा. २ (आनुवंशिकता रोग, दुर्गुण, इ॰ ची) दाखवितांना विशेषतः उपयोग करितात. जथेकरी-पुअव. शेतकर्यांच्या टोळ्या. जथेवार-क्रिवि. कुळवार. जथो-पु. (चि.) ज्या वधूवरांचें लग्न व्हावयाचें त्यांचीं वडील आणि धाकटीं भांवडें आई-बाप इ॰ चा समूह. (लग्न जुळविण्यापूर्वीं पहाण्याचें एक आवश्यक कृत्य). -मसाप २.३६५.
जथा
पु. १. समूह; थवा; तुकडी; तांडा; घोळका; समुदाय; मंडळी : ‘दातेसाहेबांनी आमचा हा जथा चक्क एका मजुराच्या घरीच उतरविला होता’ − गणगोत २०६. २. कुटुंब; वंश; जात; कुळ; पिढी; टोळी; ‘सूर्यवंशी जथा निका ।’ − वेसीस्व ६·५२. ३. घाणा; एका कृतीसाठी लागणाऱ्या मालाचे प्रमाण. [हिं.; सं. यूथिका]
कोक
पु. चक्रवाक पक्षी. 'मी कोक झालों निका ।' -आसेतु २६. 'प्रार्थावा पुत्रांहीं स्वपिता स्वसुखार्थ तपन कोकांहीं ।' -मोसभा ६.७७. [सं.]
कोक
पु. चक्रवाक पक्षी : ‘मी कोक झालों निका ।’ -आसेतु २६. [सं.]
मशाए(य)ख, मषायक
पु. धर्मात्मा; धर्मशास्त्रज्ञ. 'अलीजाह यांनीं कोणी मशाएख पीर-जादा आहे त्याचे लेकीशीं निका लाविला.' -रा ५.१०७. [अर. मशाइख्]
मशाएख; मशायख
(पु.) [अ. मशाइख्] धर्मात्मा. “अलीजाह यांनीं कोणी मशाएख पीर-ज़ादा आहे त्याचे लेकीशी निका लाविला” (राजवाडे ५।१०७). “त्या ठिकाणीं हुसेनी साहेब म्हणून मशायख पीर-ज़ादा आहे” (राजवाडे ५|११२).
निगदुला
निगदुला nigadulā a (A reviling formation from निका Exact, and दुला after the fashion of वेडदुला &c.) Rigidly or formally sparing in eating; abstemious with prudery or overnicety.
वि. नखरे करीत थोडेसेंच खाणारा; चोखंदळ; शिष्टपणानें हात आंखडून जेवणारा. [निका = निश्चित + दुला = दुल्हा, वेडा]
निके
वि. १. नेटके; बरवे; बरे; नीट; चांगले. २. पहा : निका ५. ३. पूर्ण; सर्व : ‘आली कष्टदशा, घडो मरणही, कीं तेज गेलें निकें ।’ – वामन स्फुट श्लोक नवनीत १३४.
निकी
स्त्री. चांगुलपण. -वि. निका पहा. -ज्ञा १३.५१२. 'मृत्युकाळ काठी निकी । बैसे बळियाचें मस्तकीं ।' -दा ३.९.६.
नीक-का
निका (-वि.) अर्थ २ पहा. 'फुण आमुसीं नोंकौनि बोलने । हें नीकें नोह्णे।' -शिशु ९२०.
निखानेमाचा
निखानेमाचा nikhānēmācā a (निका or निक्खळ & नेम) Regular, constant, settled, of fixed and sure recurrence. Used with such words as उकाडा-उचापत-पाहुणा- अतीत-भिकारी-पाऊस-वारा. 2 Used as ad decl as हा नि0 येतो-जातो-खातो &c.
वि. नियमित; नेहमींचा; ठराविक; काय- मचा; खात्रीचा; पुनःपुनः येणारा (उकडा, उचपात, पाहुणा, अतीत, भिकारी, पाऊस, वारा इ॰ शब्दांबरोबर योजतात). याचा क्रियाविशेषणाप्रमाणेंहि उपयोग करतात. जसें-हा निखाने- माचा येतो, जातो, खातो. [निका, निक्खळ + नेम]
पाट
(सं) पु० बसावयाची फळी, आसनविशेष. २ कालवा. ३ पट्टें. ४ हजामतीचा पट्टा. ५ पुनर्विवाह, निका.
पुरुतां
क्रिवि. (महानु.) पुरता पहा. 'तो गातां तरी एक- टिका । परी स्वरें पुरुतां नीका ।' -शिशु १६८.
पूर्विका
स्त्री. पूर्व पीठीका; वंशाची हकीकत. पूर्वज; वाड- वडील. 'प्रश्न केला बरवा निका । सांगेन आतां तुज विवेका । अत्रिऋषीची पूर्विका । सृष्टिपासोनि सकळ ।' -गुच ४.३. [पूर्व]
शादी
(स्त्री.) [फा. शादी] लग्न समारम्भ; विवाह; निका.
स्त्री. मुसलमानाचें लग्न; लग्नसमारंभ; विवाह; निका. [फा. शादी]
सानुराग
वि. सप्रेम; प्रेमळ. -पु. अनुराग; प्रेम. 'परि मनीं आथी निका । सानुरागु ।' -ज्ञा ४५७. [स + अनुराग]
शकुन
पुन. १ शुभाशुभ चिन्ह; भविष्य सूचक चिन्ह किंवा वस्तु; (शब्द, दर्शन इ॰ रूप) लक्षण. 'एका नाकें बहु- सिंका । सहदेव म्हणे शकुन निका ।' २ ज्या लक्षणचिन्हावरून- गोष्टीवरून ज्योतिषी, भविष्य कथन करतो ती. ३ कौल; देवानें दिलेलें उत्तर. ४ अनुकूल गोष्टी होण्याबद्दल केलेली प्रार्थना, स्तोत्र, मंत्र. ५ एक पक्षी. [सं.]
शकुन śakuna m n (S) An omen, a prodigy, a portent, a prognostic generally. Pr. एका नाकें बहु शिंका सहदेव म्हणे शकुन निका. 2 The point or matter upon which an astrologer &c. is consulted and required to foreshow futurity. 3 The oracle or response delivered. 4 A sort of hymn sung to solicit favorable events.
स्थूल-ळ
वि. १ मोठा; जाडा; थोर. २ ओबडधोबड; अगडबंब; मोठा व खडबडीत, लठ्ठ, ठोकळ. ३ दाट; गर्द. ४ जड; मंद; मुर्ख. ५ जड; दृश्य; साकारच याचे उलट सूक्ष्म. [सं. स्था = राहणें] ॰देह-शरीर-पु.न. वस्तुमात्राचें पंचभूतात्मक शरीर; जड देह. लिंगदेहाच्या उलट; धिप्पाड शरीर. याचा उपयोग विशेषणाप्रमाणें करतात. ॰दृष्टि-स्त्री. मनुष्यदृष्टि; अज्ञा- नदृष्टि; मायितदृष्टि. 'ते सहसा मुद्रा सोडिली । स्थू्लदृष्टीची जव- निका फेडिली ।' -ज्ञा ११.१२१. २ देहच आत्मा असें मानणें; जड दृष्टि. ॰बुद्धि-वि. जडबुद्धि; ढोबळ समजूत असलेला. ॰भोग-पु. जागृतीमधील प्रत्यक्ष भोग ॰मान-न. ढोबळ माप, अंदाजी मोजमाप; तर्क. २ दीर्घ कालमर्यादेनें मोजणें, गणना करणें; सूक्ष्ममानाचे उलट. ३ आकारमान पहा; ठोकळमान. ॰वाद-पु. आत्मा हेंच शरीर असा वाद. ॰वादी-वि. असा वाद करणारा. ॰सूक्ष्म-न. १ विश्व; सृष्टि; जगत्. 'तें कर्ता कर्म कर्मफळ । ये त्रिपुटी येकी केवळ । वांचूनि कांहींचि नसे स्थूळ- । सूक्ष्मीं इये ।' -ज्ञा १८.८११. २ पंचभूतात्मक जड व वासना- त्मक लिंगशरीर. -वि. थोर व लहान; जड व अजड.
तुक, तुकवा
न. १. महत्त्व; वजन; योग्यता : ‘तैसा मी जेतुला आघवा । तेंचि तुक तयां चिया सद्भावा ।’ – ज्ञा ९·२६१. २. तोल; जोख; वजन : ‘द्यावें संभाळूनी समतुक भावें । आपणहि खावें त्यांचे तुके ।’ – तुगा ३१. ३. तुलना; बरोबरी : ‘विप्रवर सुते क्षत्रिय उतरेल तुझ्या न हा ययाति तुकीं ।’ – मोआदि १०·७०. [क.तूक] (वा.) तुका आणणे – पूर्ण मान्य करून घेणे : ‘श्री गणेश माहात्म्यार्थ निका । धरोनि हे संजीवनी टीका । मी बोलिलो संक्षेप हे तुका । आणिजे तुका संतजनी ॥’ – गणेशपुराण, संजीवनी टीका, पृ. ८५.
विल्हा, विल्हे
पुस्त्री. १ वर्ग; भाग; खातें (मूळाक्षरांचें). २ (सामान्यतः) प्रकार; दर्जा; विभाग. ३ (किल्ला, भाग यास) जोडलेला, सामाविष्ट केलेला भाग; अंकित प्रदेश; प्रांत. [अर. विल्हा] विल्हे करणें-लावणें-१ निकालास लावणें; निका- लांत काढणें. २ लिहिणें; व्यवस्थित मांडणें. 'दुसाला दप्तरीं विल्हें लावला.' -वाडबाबा २.८५. विल्हेस लागणें-व्यवस्था लागणें; बंदोबस्त होणें. 'तुका म्हणे तरी लागलों विल्हेसी ।' -तुगा १८४५. विल्हेस लावणें-वर्गवारीनें, प्रतवारीनें, प्रकारानुरूप लावणें; व्यवस्था लावणें; जम बसविणें. विल्हेस लावणें-देणें- करणें-हवालीं, स्वाधीन, तांब्यांत देणें, करणें; सुपूर्त करणें. विल्हेवाट, विल्हय-स्त्री. १ उधळपट्टी; वासलात; फडशा; निकाल; धूळधाण. 'एकीची विल्हेवाट लावून दुसरी बरोबर सर्व सोहळें.' -टि ४.१३५. २ व्यवस्था; रचना; मांडणी; योग्य योजना. विल्हेवार-क्रिवि. वर्गवारीनें; जातवारीनें; खातेवारीनें; शिस्तवार; क्रमानें. विल्हेवारी-स्त्री. १ वर्गवारी; खातेवारी; वर्गीकरण; निवड. २ वर्णानुक्रमरचना. 'प्रकृत कोशाची रचना, त्यांतील गुणदोष, यांतील सारी नांवे यांचे विल्हेवारीनें दिले आहेत.' -नि १४४.
येर or येरू
येर or येरू yēra or yērū pron (Poetry. येरू, येरी, येरें m f n) Other, the other, that one, the person mentioned. Ex. सीता म्हणे लक्षमणा धाव ॥ येरू म्हणे राक्षसी- माव ॥; also येरू म्हणे मुहूर्त्त आहे निका ॥.
पर
न. १ ब्रह्म; परमेश्वर. 'पर सुखाची उर्मी ।' -ऋ १. २ वस्तु (ब्रह्म). 'आतां अर्जुना आणिक कांहीं एक । सांगेन मी आइक । जे विचारें पर लोक । वोळखिती ।' -ज्ञा २.१२५. ३ -पु. शत्रु; अरि. 'कुरु कटकाला बहु भय देती गर्जुनि सिंहसे पर ते ।' -मोभीष्म ५.६२. [सं.] -वि. १ आत्मीय नव्हे असा; परका; परकीय; विदेशी. (समासांत) परचक्र-देश-मुलुख इ॰ २ दुसरा; इतर; भिन्न; निराळा; वेगळा. 'आप आणि पर नाहीं दोन्ही ।' -तुगा २११७. 'कपटादरें वळो पर, परि परमेश्वर कसा वळेल हरी ।' -मोउद्योग ७.१०. ३ संबंध असलेला; अनुसरणारा; (एखाद्यास) वाहिलेला; आधिन; जोडलेला. 'ज्ञानपर शास्त्र तुम्ही कर्मपर लावूं म्हणतां तर लागणार नाहीं.' 'लोकनिंदापर भाषण करूं नयें.' ४ अद्भुत; असाधारण; अपूर्व. ५ श्रेष्ठ; उच्च; थोर. 'जो पतीहून पर ।' -रास १.२६७. ६ नंतरचा. -क्रिवि. पलीकडे. 'ईश्वर स्वरूप मायेचे पर आहे.' ज्याच्या पूर्वपदीं हा शब्द येतो असे अनेक तद्धित व सामासिक शब्द आहेत. त्यांतील कांहीं पुढें दिले आहेत. परका-खा-वि. १ दुसरा; बाहेरचा; परकीय; अनो- ळखी (माणूस). २ नवीन; निराळी; वेगळी (वस्तु) [सं. परकीय] परकाई-खाई-स्त्री. १ परकेपणा (माणसाचा). २ नवलाई; नावीन्य (वस्तूचें). [परका] ॰कामिनी-स्त्री. दुसऱ्याची बायको; परदारा; परस्त्री. 'मन हें ओढाळ गुरूं परधन परकामिनीकडे धावें ।' -मोरोपंत (कीर्तन १.२४.) ॰काय(या)प्रवेश-पु. मंत्रादि सिद्धीनें आपला देह सोडून एखाद्या प्रेतांत किंवा दुसऱ्याच्या देहांत शिरणें; ती विद्या. परकी, परकीय-वि. १ परका पहा. अनोळखी; नवीन (माणूस). २ दुसऱ्यासंबंधीं; दुसऱ्याचा. परकीया-स्त्री. दुसऱ्याची बायको (प्रेमविषयक तीन वस्तूंपैकीं एक). ॰कोट-पु. एक तटाच्या बाहेरचा दुसरा तट; पडकोट. ॰क्रांति-स्त्री. (ज्यो.) क्रांतिवृत्ताचा वांकडेपणा. ॰गति-स्त्री. स्वर्ग. 'परगति पावों पाहसि, पर पदरीं फार पाहिजे शुचिता ।' -मोआदि २४.५६. ॰गमन-न. स्वस्त्री किंवा पति सोडून दुसऱ्याशीं व्यभिचार करणें; व्यभिचार. ॰गृह-घर-न. १ दुसऱ्याचें घर. २ दुस- ऱ्याच्या घराचा आश्रय घेणें. 'तो फार गर्भश्रीमंत आहे, त्याला परगृह माहीत नाहीं.' ३ व्यभिचार; परगमन पहा. ॰घर निवारण-न. इतःपर दुसऱ्याच्या मदतीची आवश्यकता न पडेल अशी स्थिति (देणगी). ॰गोत्री-वि. निराळ्या गोत्राचा. 'श्राद्धास परगोत्री ब्राह्मण बोलवावे.' ॰चक्र-१ स्वारी करणारें सैन्य. २ शत्रूची स्वारी, हल्ला, चढाई. 'परचक्र कोठें हरिदासांच्या वासे । न देखिजे तद्देशे राहातिया ।' -तुगा ६४६. ३ परकीय अंमल, ताबा. ॰छंद-वि. दुसऱ्याच्या स्वाधीन, ताब्यांत अस- लेला; दुसऱ्याच्या तंत्रानें मर्जीनें चालणारा; पराधीन. ॰तंत्र- वि. १ दुसऱ्याच्या स्वाधीन, ताब्यांत असलेला; दुसऱ्याच्या तंत्रानें चालणारा. २ (ल.) शरीर. 'हा लोकु कर्में बांधिला । जो पर तंत्रा भूतला । तो नित्ययज्ञातें चुकला । म्हणोनियां ।' -ज्ञा ३.८४. ॰तत्त्व-न. परब्रह्म. 'तैसी प्रकृति हे आड होती । ते देवेंचि सारोनि परौती । मग परत्व मझिये मती । शेजार केलें ।' -ज्ञा ११.७६. ॰तीर-न. (नदी इ॰च्या) पलीकडचा, दुसरा कांठ, तीर. ॰त्र-न. १ परलोक; याच्या उलट अरत्र. 'म्हणोनि देवो गोसावी । तो धर्माधर्मु भोगवी । आणि परत्राच्या गांवी । करी ते भोगी ।' -ज्ञा १६; ३०६; -दा २.४.१९. २ (महानु.) परमे- श्वर पद; परमार्थ. 'कव्हणी परत्र पाहौनि न बोले । निःप्रपंचु ।' -ऋ ४४. -क्रिवि. नाहींतर; अन्यथा; अन्यत्र. ॰त्रगति-स्त्री. दुसरी स्थिति; परलोक; स्वर्ग. (क्रि॰ साधणें; होणें; मिळणें). ॰त्र साधन-न. परलोक किंवा स्वर्ग मिळविणें. ॰त्व-न. १ दूरपणा; पलीकडे असणें. २ परकेपणा; दुजा भाव. ३ दुसरेपणा. 'म्हणोनि परत्वें ब्रह्म असें । तें आत्मत्वें परियवसे । सच्छब्द या रिणादोषें । ठेविला देवें ।' -ज्ञा १७.३७७. ॰थडी-परतीर पहा. 'त्यासि भवार्णवपरथडी । तत्काळ रोकडी मी पाववीं ।' -एभा १७.४४०. 'क्रमावी पावोनि परथडी ।' -सिसं ८.२७२. ॰थळ्या-वि. परस्थ. 'पंच ब्राह्मण वगैरेस विडे देऊन नंतर परथळ्या कोणीं असल्यास त्यास विडा देतात.' -बदलापूर ३७. [पर + स्थल] ॰दरबार-न. पेशव्यांच्या बरोबरीच्या राजांस किंवा त्यांच्या वकीलांस वगैरे पेशव्यांकडून दिलेल्या नेमणुका, जवाहीर, कापड वगैरे नोंदण्याचें हिशेबाचें सदर. ॰दार-पु. दुसऱ्याची बायको. [सं. परदारा] ॰दार-न. परद्वार; व्यभिचार परद्वार पहा. ॰दारगामी-वि. परदारा भोगणारा; व्यभिचारी. ॰दारा-स्त्री. दुसऱ्याची बायको; परदार. 'परदारादिक पडे । परी विरुद्ध ऐसें नावडे । मग शेळियेचेनि तोंडें । सैंघ चारी ।' -ज्ञा १४.२२९. 'परदारा परधन । आम्हां विषसमान ।' ॰दुःखेन दुःखित-वि. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखित होणारा. 'परदुःखेन दुःखिता विरला.' ॰देश-पु. १ स्वदेशाहून भिन्न देश; परकीय देश. २ दुसऱ्या देशांत केलेला प्रवास. ॰देशी-पु. १ परका; दुसऱ्या देशांतील माणूस; स्वदेश सोडून परदेशांत आलेला मनुष्य इ॰ २ उत्तरहिंदुस्थानी माणूस; पुरभय्या. -वि. परका. दुसऱ्या देशांतील (माल) ॰द्वार-न. १ परदारागमन पहा. स्वस्त्रीखेरीज अन्य स्त्रीशीं (वेश्या सोडून) गमन करणें; व्यभि- चार. 'वालभे परद्वार केलें । कोढी कोणी होय ।' -ज्ञा १६.३०५. २ पतीखेरीज अन्य पुरुषाशीं कुलीन स्त्रीनें केलेलें गमन; जारकर्म. (क्रि॰ करणें) 'घरस्वामि सोडुनी नारि ज्या परद्वार करिती ।' -होला १६६. ॰द्वारी-वि. व्यभिचारी; जारकर्म कराणारी (स्त्री, पुरुष). 'मैद भोंदु परद्वारी । भुरटेकरी चेटकी ।' -दा २.३.३१. ॰धन-न. १ दुसऱ्याचा पैसा. 'परदारा परधन । आम्हां विषस- मान ।' २ (ल.) मुलगी. कारण लग्न झाल्यावर ती परक्याची होते. ॰धारजिणा-वि. (निंदार्थी) दुसऱ्याच्या उपयोगीं पडणारा; दुसऱ्याला फायदेशीर, उपकारक (स्त्री, मुलगा, नोकर). ॰नार-नारी-स्त्री. दुसऱ्याची बायको. 'परधन परनारी । आम्हां विषाचिया परी ।' 'परनार विषाची धार घात करि जीवा ।' ॰न्यास-वि. वाटेल त्यास शिव्या इ॰ देण्यास लावणारा. (एक वातविकार). ॰पाकरुचि-वि. नेहमीं दुसऱ्याच्या घरीं जेवणारा; परान्नभोजी. [पर + पाक + रुचि] ॰पांडित्य-न. (निंदार्थी) (स्वतः त्याप्रमाणें न वागतां) दुसऱ्याला उपदेश करणें. ॰पार-पु. १ पलीकडचा कांठ-किनारा; परतीर. 'तेथ भक्त संत सज्ञान नर । स्वयें पावविशी परपार ।' -एभा २०.५. २ (भवाच्या पलीकडचा तीर) मोक्ष. 'जेणें पाविजे परपार । तिये नावं यात्रा पवित्र ।' -एभा २१.५८. ॰पीडा-स्त्री. १ दुसऱ्याला त्रास, दुःख देणें. 'परपीडेसारखें पाप नाहीं.' (क्रि॰ करणें; देणें). २ दुसऱ्याचें दुःख. ॰पुरुष-पु. १ परका माणूस. २ (बायकी) नवरी, भाऊ, इ॰ जवळचे आप्त सोडून इतर माणूस. ३ ईश्वर; परमेश्वर. ॰पूर्व स्त्री-स्त्री. स्वैरिणी. व्यभिचारिणी स्त्री. ॰पेठ-स्त्री. १ दुसरें गांव. २ हुंडीची तिसरी प्रत; एक हुंडी गहाळ झाली असतां दुसरी देतात तिला पेठ म्हणतात व तीहि गहाळ झाली तर जी तिसरी देतात ती. ॰बुद्धि-स्त्री. दुसऱ्याची बुद्धि, अक्कल. -वि. दुसऱ्याच्या बुद्धीनें, तंत्रानें चालणारा. ॰भाग्योपजीवी-वि. दुसऱ्याच्या नशीबावर जगणारा; आश्रित; पोष्य; पराधीन. ॰मार-पु. दुसऱ्याच्या नाश. 'प्रतिष्ठीन परमारु । यागवरी ।' -ज्ञा १६.३६०. ॰मार्ग-पु. १ परमेश्वराचा मार्ग; परमार्थ. 'जेथ कैवल्य वस्तु सांटवे । परमार्गु वाहाति सदैवें । जेआंलागिं ।' -ऋ १००. २ महानुभाव धर्म. 'तो नमस्करूं परमार्गु । दातारांचा ।' -ऋ ६. ॰मुलूख-पु. परदेश. ॰रत-वि. व्यभिचारी (स्त्री, पुरुष). ॰राज्य-न. १ दुसऱ्यांचें, परक्या लोकांचें राज्य; परकीय सरकार. २ परकीय लोकांचा अंमल, ताबा. याच्या उलट स्वराज्य. ॰रूपसंधि-पु. (व्या.) दोन्ही स्वरांच्या जागीं पुढला स्वर मात्र होतो असा संधि. ॰लक्ष्मी नारायण-वि. उसन्या, दान मिळालेल्या संपत्तीवर डौल मिरवणारा. ॰लोक-पु. १ मृत्यू- नंतर प्राप्त होणारा लोक, ठिकाण (स्वर्ग, नरक, इ॰); मृत्यूनंतरची स्थिति. २ (व्यापक) अक्षय सुखकल्याणाच्या जागा प्रत्येकीं (कैलास, वैकुंठ. इ॰) ॰लोकवासी होणें-मरणें; मृत्यु पावणें. ॰वधू-स्त्री. दुसऱ्याची भार्या; परदारा. ॰वश-वि. दुसऱ्याच्या ताब्यांत असणारा; पराधीन; परतंत्र. ॰वशता-स्त्री. पारतंत्र्य; पराधीनता. 'फारचि बरी निरयगति, परवशता शतगुणें करी जाच ।' -मोविराट १.५६. ॰वस्तु-स्त्री. १ उत्कृष्ट वस्तु; श्रेष्ठ वस्तु. 'विद्येसारखी परवस्तु नाहीं.' -न. परब्रह्म. [सं.] ॰शय्या- स्त्री. व्यभिचार; परपुरुषाशीं त्याच्याच घरीं संग करणें. ॰शास्त्र- न. (महानु.) श्रेष्ठ शास्त्र; ब्रह्मविद्या; अध्यात्म. 'आक्षेप परिहारीं निर्धारू । करितां परशास्त्र विचारू ।' -ऋ २३. ॰स्त-स्थ-वि. १ परक्या गावांत किंवा देशांत रहाणारा; परगांवचा. २ (ल.) तटस्थ; तिऱ्हाईत; निःपक्षपाती. ॰स्त्री-स्त्री. आपल्या स्त्रियेवांचून इतर स्त्री; दुसऱ्याची बायको. 'नका लाऊं जिवलगा प्रीत तुम्ही परस्त्रीचे ठाई ।' -होला १०८. ॰स्थळ-न. दुसरी जागा, स्थळ. (ज्याच्या विरुद्ध निकाल झाला तो दुसरी कडील निका- लाची खटपट करतांना वापरतो). ॰स्व-न. दुसऱ्याची मालमत्ता, धन. ''नातरी परस्वापहारें । जें सुख अवतरे ।' -ज्ञा १८.८०७. ॰स्वाधीन-वि. परतंत्र; परवश. म्ह॰ परस्वाधीन जिणें व पुस्तकी विद्या उपयोगी नाहीं. ॰हस्तगत-वि. दुसऱ्याच्या हातांत गेलेलें.
महत्
वि. १ मोठा; बडा; विस्तृत. २ (ल.) थोर; वरच्या दर्जाचा; उत्कृष्ट; कोणत्याहि गुणांत श्रेष्ठ. जसें-महाबुद्धिमान्, महालबाड; महासोदा. महत् हा शब्द कर्मधारय आणि बहुव्रीहि समासांत महा असा होतो आणि तत्पुरुष समासांत तसाच राहतो. जसें-महादेव, महाबाहु व महत्पूजा; महत्सेवा. ३ अतिशय; फार; अत्यंत. जसें-महाप्रचंड; महातीक्ष्ण इ॰ [सं.] महतामहत्-वि. (व.) मोठ्यांतला मोठा; सर्वांत मोठा. महत्तत्व-न. सत्व, रज, तम या तीन गुणांची साम्यावस्था; मूळमाया; गुणसाम्य. 'सत्त्वगुणापासून महत्तत्व उत्पन्न झालें.' -टिले ४.३६१. महत्तमसाधारण भाजकपु. दिलेल्या सर्व संख्यांना पूर्ण भाग जाईल अशी सर्वांत मोठी संख्या. महदंतर-न. फार मोठें अंतर, तफावत; वेगळेपणा. महदहंबुद्धि-स्त्री. महत्तत्त्व; अहंकार- बुद्धि. 'एवं महदहंबुद्धि । मनें महाभूत समृद्धि ।' -माज्ञा १५.१०५. महदादिदेहांत-क्रिवि. महत्तत्त्वापासून स्थूलदेहापर्यंत. 'महदादि देहांतें । इयें आशेषेंही भूतें ।' -ज्ञा ९.६७. महद्ब्रह्म-न. मूळ ब्रह्म. 'तया महद्ब्रह्मातें व्याली । दैविकी इच्छा ।' -ज्ञा ११.५११. महद्भूत-वि. विलक्षण; असामान्य; चमत्कारिक. महद्वर्त्त-न. गोलाचें वर्तुळ; खगोलीय वृत्त. महती-स्त्री. मोठेपणा; महत्त्व. 'त्याचेनि माझी त्रैलोकीं ख्याती । मज महती त्याचेनी ।' -एभा १४.२६९. महतीवीणा-स्त्री. नारदाच्या वीणेचें नांव. महत्त्व-न. मोठेपणा; योग्यता; लौकिक; प्रतिष्ठा; किंमत. महती पहा. 'रायाजी पाटिल महत्त्व रक्षी ।' ऐपो ३२. उतरणें- योग्यता; प्रतिष्ठा; कमी होणें. ॰वाढविणेंफुशारकी, बढाई मारणें. ॰दर्शक-वि. पदार्थाचें माप, लांबी, रुंदी इ॰ दाखवि- णारें (परिमाण). ॰मापन-न. गणितशास्त्राचा एक विभाग; आकारमान मोजण्याची विद्या; मापनशास्त्र. महत्त्वकांक्षा- -स्त्री. मोठेपणाची इच्छा, हांव; जिगीषा. 'कर्तबगार लोकांच्या वेडाला महत्त्वाकांक्षा म्हणतात.' -विधिलिखित २१. महा-वि. १ महत् पहा. २ थोर; बडा. 'हे एक महा आहेत.' 'तो काय एक महा आहे.' ॰अर्बुद-न. एक हजार दशकोटि ही संख्या. ॰ऊर-पु. (अप.) महापूर; अतिशय मोठा पूर. ॰एकादशी- स्त्री. आषाढशुद्ध व कार्तिक शुद्ध एकादशी. ॰कंद-पु. १ मोठ्या जातीचा कंद. २ लसूण. ॰कल्प-पु. ब्रह्मदेवाच्या शंभर वर्षांचा काल; ब्रह्मदेवाचें आयुष्य; महाप्रलय; कल्प पहा. ॰काल-ळ- पु. १ प्रलय काळचा शंकराचा अवतार. 'महाकाळ उभा चिरीन बाणीं ।' २ बारा ज्योतिर्लिंगांपैकीं एक (उज्जनी येथील). ॰काली-स्त्री. १ पार्वती. २ प्रचंड तोफ; महाकाळी. -शर. ॰काव्य-न. वीररसप्रधान, मोठें, अभिजात, रामायण-महा- भारताप्रमाणें काव्य; (इं.) एपिक. 'आर्ष महाकाव्यांत कोण- कोणते गुण असावे याबद्दल पुढें विवेचन येईलच.' ॰काश-न. अवकाश; अफाट पोकळी. याच्या उलट घटाकाश, मठाकाश. [महा + आकाश] ॰कुल-कुलीन-वि. थोर, उच्च कुलांतील; कुलीन. ॰खळें-न. मोठें अंगण. ॰गाणी-नी-वि. गानकुशल. 'उत्तर देशींच्या महागणी । गुर्जरिणी अतिगौरा ।' -मुरुंशु १२२. ॰गिरी-पु. मोठा पर्वत; हिमालय. 'किं मक्षिकाचेनि थडकें । महागिरी पडों शकें ।' -एकनाथ-आनंदलहरी ४२. -स्त्री. १ तीनशें खंडीपर्यंत वजन नेणारें जहाज, गलबत; मालाचें तारूं; 'सबब त्यांजकडे दोन महागिऱ्या भरून गवत व एक महागिरी- भर लांकडे देविलीं असें,' -समारो ३.१६. २ मोठें तारूं; शिबाड; बतेला. ॰ग्रह-ग्राह-पु. मोठी सुसर; मोठा मगर. 'गज करवडी महाग्राह ।' -एरुस्व १०.८० -एभा २०.३५०. ॰जन- पु. १ काही गुण, विद्या इ॰ मुळें थोर, श्रेष्ठ माणूस. 'परंतु हृदयीं महाजन भयास मी मानितों ।' -भक्तमयूरकेका ७५. ३ व्यापारी; उदमी; सावकार. ३ गाव, कसबा इ॰ तील व्यापाराला नियम, शिस्त घालून देणारा, त्यावर देखरेख करणारा व कर वसूल करणारा सरकारी अधिकारी. ह्या अर्थीं महाजनी असाहि शब्द आहे. ४ पंच ॰जनकी-स्त्री. महाजनांचे काम, अधिकार. ॰डोळा-पु. एक मासा. -प्रणिमो ८१. ॰तल-न. सप्तपातालांपैकीं एक; नाग व असुर यांचें स्थान. ॰ताप-पु. (तंजा.) शोभेच्या दारूचा एक प्रकार; चंद्रज्योति. महताब पहा. ॰तेज-न. १ ब्रह्म २ सूर्य. 'हें अपार कैसेनि कवळावें । महातेज कवणें धवळावें.' -ज्ञा १.७४ महात्मा-पु. १ महानुभव पंथांतील व्यक्ति. ३ मोटा धैर्यवान, पराक्रमी मनुष्य. 'तैसें महात्मा वृक्षमुळीं । असावें खांड देउळीं ।' -भाए ४९३. गौतमबुद्ध, गांधी यांस संबोधितात. -वि. १ थोर मनाचा; उदार; महानुभाव. 'परते धर्म महात्मा, स्तविला बहु नारदादि साधूंनीं ।' -मोभीष्म १.९९. [महा + आत्मा] ॰दंदी- वि. महामत्सरी; कट्टर द्वेष्टा. 'छंदी फंदि महादंदि । रावण पडिला तुझ्या बंदि ।' -ज्ञानप्रदीप २६६. [सं. महाद्वंद्वी] ॰दशा-स्त्री. (ज्योतिष) कुंडलीतींल मुख्य ग्रहाची बाधा अंतर्दशा पहा. ॰दान- न. (मोठें दान) हत्ती इ॰ षोडशदानांपैकीं एक; षोडशमहादानें पहा. ॰देव-पु. १ शंकर; शिव. 'महादेव म्हणावया कारण । ब्रह्मयासि. जाण या हेतू ।' -एभा १३.२७९. २ (विणकाम) हातमागाच्या फणीचा मरचा अवयव, दांडा फळी. हा आणि तळाचा दांडा किंवा पार्वती मिळून फणीची चौकट होते या फणीच्या चौकटीस महादेवपार्वती किंवा हात्यादांडी असेंहि म्हणतात. ॰देवाचें देणें- न. कंटाळवाणें व दीर्घकाल टिकणारें काम. ॰देवापुढचा-वि. (शब्दशः) नंदी; (ल.) मूर्ख; निर्बुद्ध. ॰देवी-स्त्री. १ पार्वती; दुर्गा. २ एक प्रकारची वनस्पति. हिचें बीं महादेवाच्या पिंडीच्या आकाराप्रमाणें असतें. ॰देवी सहादेवी-स्त्री. (माण.) चैत्री पौर्णिमेस तिन्हीसांजचे वेळीं एखाद्या भिंतीवर जीं महादेवी सहादेवी म्हणून दोन गंधाचीं बाहुलीं काढून त्यांची पूजा कर- तात तीं. -मसाप ४.४.२५९. ॰दैव-(माण.) सर्व जातींचे लोक. ॰द्वार-न. (मंदिराचा किंवा राजवाड्याचा) बाहेरचा किंवा मुख्य दरवाजा. 'भक्त गर्जती महाद्वारीं । त्यांसी द्यावे दर्शन ।' -भूपाळी विठ्ठलाची पृ २२. ॰द्वीप-न. (मोठें बेट) खंड. 'तयाफळाचे हें महाद्वीप । पातली प्रभु ।' -ज्ञा १६.३२. ॰नदी-स्त्री. मोठी नदी; उगमापासून शंभर योजनांवर वाहात जाणारी नदी. ॰न मी-स्त्री. १ आश्विन शुद्ध नवमी; नवरात्राचा शेवटचा दिवस. २ रामनवमी. -शास्त्रीको ॰नवरात्र-न. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून विजयादशमीपर्यंतचा काल. ॰नस- पु. स्वयंपाकघर. ॰नक्षत्र-न. सूर्यनक्षत्र ॰नाड-पु. महाजना- सारखा एक वतनदार. 'महाजन व महानाड पेठ मजकूर याचें नांवें सनद कीं,' -थोमारो १.५४. [महा + नाड-डु] ॰निंब-पु. एक प्रकारचें झाड. ॰निद्रा-स्त्री. मरण; मृत्यु. 'तिसरें प्रमाण महा- निद्रा म्हणजे मृत्यु हें होय?' -टि ४.४८१. महानुभाव-पु. श्रीचक्रधरानें स्थापिलेला एक द्वैतवादी पंथ. या पंथात श्रीकृष्ण- भक्ति प्रमुख आहे. [महा + अनुभाव] -वि. १ ज्यानें कामक्रोधादि विकार जिंकले आहेत असा; महात्मा. २ उदार, थोर पुरुष. एवं पिंडारकीं ऋषि सर्व । शापानुग्रही महानुभाव ।' -एभा १.३३६. ३ प्रशस्त अनुभवाचा; ब्रह्मानुभवी. 'ऐसे जे महानुभाव । जे दैविये प्रकृतीचें दैव ।' -ज्ञा ९ १९४. ४ विद्या, बुद्धि, पराक्रम इ॰ गुणांनीं श्रेष्ठ मनुष्य; महाप्रतापी. ॰नेटका-वि. परिपूर्ण; पूर्णपणे; व्यवस्थित. 'यज्ञ मुनिचा राखे महानेटका ।' -मोरामायणें त्रिःसप्तमंत्रमय रामा- यण ३. ॰नैवेद्य-पुन. पंचपक्वान्नमय अन्नाचें ताट वाढून देवाला दाखवितात तो नैवेद्य (साखर, दूध इ॰चा छोटा नैवेद्य होतो). ॰न्यास-पु. पूजा करतांना शरीराच्या विवक्षित भागांना स्पर्श करून करावयास न्यास. याचाच दुसरा प्रकार लघुन्यास. ॰पड-पु. (महानु.) महापट; ध्वज. 'आहो जी देवा । पैलु देखिला महा- पडांचा मेळावा ।' -शिशु १०३३. [महापट] ॰प(पं)थ-पु. १ मृत्यु; मरण; मृत्यूची वाट. 'न देशील सत्यवंत । तरी करीन हाचि महापंथ ।' -वसा ६.८. २ निर्याणाचा मार्ग. 'लागले महापंथी तत्काळाची ।' -एभा ३१.२९८. ॰पद-न. ब्रह्मपद. 'कीं श्रुति हे महापदीं । पैठी जाहली ।' -ज्ञा १३.३७१. ॰पद्म-पु. १ एकं, दहं, शतं ह्या श्रेणींतील तेराव्या स्थानची संख्या (एकावर बारा शून्यें इतका आकडा) २ कुबेराच्या नवनिधींपैकीं एक निधि. नवविधी पहा. ॰पातक-न. ब्रह्महत्या, दारू पिणें, सुवर्णाची चोरी, गुरूच्या पत्नीबरोबर किंवा स्वतःच्या मातेबरोबर संभोग आणि यापैकीं एखादें पातक करणाराशीं मैत्री, अशा पांच मोठ्या पातकांपैकीं प्रत्येक. ॰पातकी-वि. १ ज्याच्या हातून महापातक घडलें आहे असा. २ अत्यंत पापी; दुराचारी. म्ह॰ अवसानघातकी महापातकी. ॰पाप-पी-महापातक-की पहा. ॰पीठ-न. विष्णूच्या चक्रानें झालेले शक्ती-पार्वतीच्या शरीराचे तुकडे ज्या ठिकाणीं पडले असें मानतात त्या अत्यंत पवित्र स्थानापैकीं प्रत्येक. अशीं स्थानें साडेतीन आहेत. तुळजापूर, मातापूर आणि कोल्हापूर, हीं तीन व अर्धे सप्तशृंग. औट पीठ पहा. ॰पुरुष-पु. १ ईश्वर. २ साधु- पुरुष; सत्पुरुष; ब्रह्मनिष्ठ मनुष्य. 'महापुरुषाचें चित्त । जालिया वस्तुगत ।' -ज्ञा १३. ७८९. ३ मेलेल्या ब्राह्मणाचें पिशाच्च. ॰पू(पु)जा-स्त्री. व्रतसमाप्ति इत्यादि विवक्षित प्रसंगास अनुसरून करतात ती मोठी पूजा. ॰पूर-पु. नदीस येणारा मोठा पूर, लोंढा. 'महापूरें झाडें जाती । तेथे लव्हाळे राहती ।' -तुगा १०४३. ॰प्रयास-पु. मोठे परिश्रम, कष्ट, प्रयत्न, खटाटोप. ॰प्रलयपु. १ प्रत्येक ४३२००००००० वर्षांनीं होणारा सर्व जगाचा नाश. २ ब्रह्मदेवाच्या शंभर वर्षांनीं होणारा सर्व (देव, ब्राह्मण, साधू, ब्रह्मा यासह) विश्वाचा नाश. 'जो ब्रह्याच्या स्थूळ देहाचें मरण । तो महाप्रलय जाण ।' महाकल्प पहा. ॰प्रयासपुअव. फार मोठे कष्ट, श्रम, प्रयत्न. ॰प्रसादपु. १ धार्मिक किंवा देवाच्या उत्सवा- नंतर वाटतात तो फुलें, मिठाई, जेवण इ॰ रूप प्रसाद. २ देव, गुरु इ॰पासून मिळालेली प्रसादाची वस्तु (कृपा, अनुग्रह म्हणून). ३ (शब्दशः व ल.) मोठी कृपा, अनुग्रह 'महाप्रसादाचेनि हरिखें । सप्रेम सुखें डुल्लती ।' ॰प्रस्थानन. (मोठा प्रवास) १ यथार्थ ब्रह्मज्ञानानंतर येणारा मृत्यु. २ (ल) मरण; मृत्यु ॰प्राणपु. १ मोठ्या जोरानें व प्रयासानें केलेला उच्चार: हकारयुक्त उच्चार २ जोरानें आणि प्रयासानें उच्चारण्याचा वर्ण. जसें-ख, घ, छ, झ, ठ, ढ, थ, ध, फ, भ, आणि ह अल्पप्राण आणि बाह्य प्रयत्न पहा. ॰फणी-पु. मोठा साप. ॰फल-ळ-न. मोठे, उत्कृष्ट फळ; नारळ. फणस इ॰ ॰बलि-ळी-पु. पिशाच्चादिकांस संतुष्ट कर- ण्यासाठीं मांस, अन्न इ॰ चा बलि, अर्पण करावयाचा पदार्थ ॰बळी-वि. अत्यंत प्रबळ, सामर्थ्यवान्. 'महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळें ।' -मारुतिस्तोत्र. ॰बळी बुटी-स्त्री. रुंदट पानाचें आलें. ॰भाग-वि. १ अतिशय भाग्यवान् 'नित्य निष्काम अतिप्रीतीं । मज भजती महाभाग ।' -एभा २४ ३३५. २ सद्गुणी; सद्वर्तनी. ॰भारत-न. व्यासप्रणीत कौरव-पांडवाच्या युद्धाचें भारतीयांचे पवित्र असें एक महाकाव्य; महापुराण ॰भूत-न. पृथ्वी, आप तेज, वायु आणि आकाश ह्या पंचमहाभूतांपैकीं प्रत्येक. 'तरी होसी गा तूं परब्रह्म । जें या महाभूता विसंवतें धाम ।' -ज्ञा १०. १४९. ॰भेड-वि. अत्यंत भितराः भेकड. 'मग विरा- टाचेनि महाभडें उत्तरें ।' -ज्ञा ११ ४६९. ॰मणि-पु. मौल्यवान् रत्न; हिरा, माणिक इ॰ 'कांचोटी आणि महामणी । मेरू मषक सम नव्हे ।' -ह १ ८४. ॰मति-मना-वि. थोर अंतःकरणाचा; उदार मनाचा; महात्मा. ॰मंत्र-पु. निरनिराळ्या देवतांचा मुख्य मंत्र. जसें-गायत्री हा ब्राह्मणाचा महामंत्र. 'महामंत्र आत्मप्रा- प्तीची खाणी ।' ॰मंत्री-पु. मुख्यप्रधान; मुख्य मंत्री सल्लागार. ॰महोपाध्याय-पु. मोठ्या शास्त्राला देतात ती एक सन्मानाची सरकारी पदवी. ॰म/?/त्र-पु. हत्ती हांकणारा; महात. 'मुरडावया मत्त हस्ती । महामात्र दोन्हीं हस्तीं । अंकुश हाणी तैसा श्रीपती । मर्मोद्धाटनें करितसे ।' -यथादी २.१६. ॰माया-स्त्री. १ पार्वती; दुर्गा. २ जगदुत्पादक शक्ति; सर्व संसाराला, प्रपंचाला कारणीभूत अशी देवता; आदिमाया; मूलप्रकृति ३ जहांबाज कजाग बायको. ॰मार-पु. मोठा मार, फटका. 'शुक्रबाणाचा महामारु ।' -मुवन ३.३८. ॰मारी-स्त्री. १ महामृत्यु. 'तेथ अचेतना झुंजारीं । न मरत्या महामारीं ।' -एभा २८.२५०. २ (ल.) प्राणसंकट. 'तिचेनि योगें महामारी पातली हे जाणिजे ।' -मुवन ७.१८७. ३ पटकी या सांथीचा रोग. ४ या रोगाची अधिष्ठात्री, दुर्गादेवी. ५ जिवापाड श्रम; शिकस्तीचा प्रयत्न. ६ हाणाहाणी; मारामारी; मोठें युद्ध. 'दोघे झुंजतां महा- मारी' -मुवन ३.३६. 'तैसी मांडिली महामारी ।' -कथा २.२.६०. ॰मृत्यू-पु. मरण; मृत्यू (अपमृत्युविषयीं बोलतांना उपयोग) जसें- 'अपमृत्यूचा महामृत्यु झाला.' ॰मृत्युंजय- (वैद्यक) एक औषध. ॰यंत्र-न. तोफ. ॰यज्ञ-याग-पु. मोठा यज्ञ; पंच महायज्ञांपैकीं प्रत्येक; पंचमहायज्ञ पहा. 'तरी महायाग- प्रमुखें । कर्मे निफज नाही अचुकें ।' -ज्ञा १८. १६६. ॰यात्रा- स्त्री. १ काशीयात्रा. २ (ल.) मरण; मृत्यु. 'आधीं पेशवाई सकट सगळ्यांना महायात्रेला धाडीन.' -अस्तंभा १६२. महा- प्रस्थान पहा. ॰रथ-रथी-पु. १ शस्त्रास्त्रांत प्रवीण असून दहा हजार धनुर्धारी योद्ध्यांबरोबर एकटाच लढणारा योद्धा. 'महारथी श्रेष्ठ । द्रुपद वीरु ।' -ज्ञा १.९८. २ (ल.) अत्यंत शूर, कर्तब- गार पुरुष किंवा मोठा वक्ता. ॰रस-न. १ ब्रह्म. २ पक्वान. -मनको. ॰राज-पु. १ सार्वभौम राजा; सम्राट. २ (आदरार्थी) श्रेष्ठ माणूस. ३ जैन, गुजराथी वैष्णव लोकांचा गुरु. ॰रात्रि- स्त्री. महाशिवरात्र माघ वद्य चतुर्दशी. ॰राष्ट्र-नपु. मराठे लोकाचा देश; उत्तरेस नर्मदानदी, दक्षिणेस कर्नाटक, पूर्वेस तैलंगण आणि पश्चिमेस समुद्र यांनीं मर्यादित असलेला प्रदेश; मुंबई इलाख्यां- तील एक विभीग. ॰राष्ट्र-राष्ट्रीय-वि. महाराष्ट्रदेशासंबंधाचे (लोक, भाषा, रिवाज इ॰). ॰राष्ट्र-भाषा-स्त्री. मराठी भाषा; संस्कृत-प्राकृत भाषेपासून झालेली एक देशी भाषा. ॰राष्ट्री- एक जुनी प्राकृत भाषा. ॰रुख-पु. एक प्रकारचे झाड; महावृक्ष. 'कर्वत लागला महारुखा । म्हणे पुढती न दिसे निका ।' -मुआदि ३३.२९. ॰रुद्र-पु. १ रुद्राभिषेकाचा एक प्रकार; अकरा लघुरुद्र; लघुरुद्राच्या उलट शब्द महारुद्र. २ मारुती. 'महारुद्र आज्ञेप्रमाणें निघाला ।' -राक १.१. ॰रुद्रो-पु. (गु.) बाजरीची मोठी जात हिचें काड फार उंच होतें -कृषि २७७. ॰रोग-पु. १ अत्यंत दुःखदायक असा रोग. याचे आठ प्रकार आहेत-वात- व्याधि, अश्मरी, कृछ्र, मेह, उदर, भगंदर. अर्श आणि संग्रहणी. कांहींच्या मतें हे नऊ आहेत; त्यांत राजयक्ष्मा हा एक जास्त असून कृछ्राऐवजीं कुष्ठ व संग्रहणीच्या ऐवजीं ग्रहणी अशीं नांवें आहेत. २ रक्तपिती; गलित कुष्ठ. महार्घ-वि. १ महाग; दुष्प्राप्य. 'महार्घ येथें परमार्थ जाला ।' -सारुह १.२१. २ मौल्यवान् [सं. महा + अर्घ] महार्णव-पु. मोठा समुद्र; महासागर. 'वनीं रणीं शत्रु-जलाग्निसंकटी । महार्णवीं पर्वत-वास दुर्घटीं ।' -वामन स्फुट श्लोक ३५. (नवनीत पृ. १३७.) -न. १ (ल.) मोंठें, दीर्घकाल चाललेलें भांडण; युद्ध; लढाई. 'दोघां मांडलें महार्णव । दाविती बळ प्रौढीगौरव ।' -निगा २४. २ प्रसिद्धि; डांगोरा; जघन्यत्व. ३ लहान काम, प्रकरण, गोष्ट इ॰ ला मोठें रूप देऊन सांगणें; राईचा पर्वत करणें. 'एवढ्याशा गोष्टीचें त्वां लागलेंच महार्णव केलेंस.' [सं. महा + अर्णव] ॰लय-पु. १ आश्रयस्थान; आश्रम; धर्मशाळा. २ देऊळ. ३ परमात्मा. ४ भाद्रपद वद्यपक्षां- तील पितरांप्रीत्यर्थ केलेलें श्राद्ध; पक्ष; मृतपितृकानें भाद्रपद शुद्ध पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत दररोज करावयाचें श्राद्ध. हें रोज करणें अशक्य असल्यास १५ दिवसांतून एका उक्त दिवशीं करावें. [महा + आलय] ॰लक्ष्मी-स्त्री. १ विष्णुपत्नी २ अश्विन शुद्ध अष्टमीस पूजावयाची एक देवता, त्या देवतेचे व्रत. ३ भग- वती; कोल्हापूरची देवी. ४ (ना.) ज्येष्ठागौरी; भाद्रपद शुद्ध नव- मीस पूजा करावयाच्या देवता. ॰लिंग-न. बारा ज्योतिर्लिंगांपैकीं प्रत्येक. ॰वटी, माहावटी-स्त्री. राजमार्ग. 'हे कपटाची कस(व)टी । अनृत्याची माहावटी ।' -भाए ७५५. ॰वस्त्र-न. उंची, सुंदर वस्त्र; प्रतिष्ठित वस्त्र; शालजोडी इ॰ ॰वाक्य-न. वेदांतील जीवब्रह्माचें ऐक्य दाखविणारें तत्त्वमसि आदि वाक्य हीं चार वेदांची चार आहेत. 'तो महावाक्याचेनि नांवें । गुरुकृपे- चेनि थांवें ।' -ज्ञा १८.४०४. २ गायत्री मंत्र. ॰वात-पु. (तासीं ८० मैल वेगाचा) सोसाट्याचा वारा; झंझावत; तुफान. 'महावात सूटला म्हणुनि का कंप येत भूघरा ।' -सौभद्र. ॰विषुव-न. मेष संपात; हरिपद. ॰वृत्त-न. ज्या वृत्ताची पातळी गोलाच्या मध्य बिंदूतून जाते तें वृत्त; मोठें वर्तुळ. ॰वोजा-वि. मोठ्या थाटांची; तेजस्वी. 'संतोषोनी महाराजा । सभा रचित महवोजा ।' -गुच ३४. ९७. [महा + ओजस्] ॰व्याधि-पु. महारोग; रक्तपिती. ॰शब्द- पु. बोंब; शंखध्वनि. ॰शय-पु. १ थोर पुरुष; महात्मा, २ मोठ्या माणसांस महाराज रावसाहेब याप्रमाणे संबोधावयाचा शब्द. [सं. महा + आशय; बं. मॉशे; फ्रें मुस्ये (माँसिय)] ॰शिवरात्र-त्रि-स्त्री. माघ वद्य चतुर्दशी. ॰शून्य-न. जें कांहींच नाहीं असें जें शून्यास अधिष्ठानरूप ब्रह्म तें; परब्रह्म. 'आतां महा- शून्याचिया डोहीं । जेथ गगनासीचि ठावो नाहीं ।' -ज्ञा ६. ३१५. ॰महाष्टमी-स्त्री. अश्विन शुद्ध अष्टमी. ॰सरणी-स्त्री. स्वर्गमार्ग. ' होउनि सुयोधनाचा शोकार्त वरो पिता महास- रणी ।' -मोभीष्म ११.१५. ॰सागर-पु. पृथीवरील पाण्याचा सागराहून मोठा सांठा; मोठासमुद्र. उदा॰ हिंदी महासागर. ॰सिद्धांत-पु. एकमेवाद्वितीयं ब्रह्म हा मुख्य सिद्धांत. 'आणि महासिद्धांतापासीं । श्रुति हारपती शब्देंसीं ।' -ज्ञा १५.४३४. ॰सिद्धि-स्त्री. अष्टमहासिद्धी पहा. 'जेथ महासिद्धींचीं भांडारें । अमृताचीं कोठारें ।' -ज्ञा ६.३२१. ॰सुख-न. ब्रह्मसुख; ब्रह्म साक्षात्कार. 'जेथ परमानंदु केवळु । महासुखाचा ।' -ज्ञा १.१४. ॰स्म(श्म)शान-न. काशीक्षेत्र. 'सदाशिव बैसता निजासनीं । महाश्मशानीं निजवस्ती ।' -एभा २.३१. ॰क्षेत्र-न. काशी- क्षेत्र. -रा ३.४७६. ॰महेंद्र-पु. १ हिंदुस्थानांतील पर्वताच्या सात रांगांपैकीं एक. २ इंद्राचें नांव. 'हें महेंद्रपदही पाविजेल । परि मोह हा न फिटेल ।' -ज्ञा २.६५. [महा + इंद्र] महेश, महेश्वर-पु. शिव; शंकर. [महा + ईश्वर] महेश्वरी पातळ-न. महेश्वर नांवाच्या गांवी (इंदूर संस्थान) तयार झालेलें वस्त्र, पातळ. 'आधींच कंबर बारिक त्यावर महेश्वरी पातळ कसलें ।' -होला ८९. महोत्सव, महोत्साह-पु. मोठा उत्सव; आनंद- दायक प्रसंग. [महा + उत्सव] महोदधि-पु. १ महासागर; मोठा समुद्र. ' महोदधीं कां भिनले । स्त्रोत जैसे ।' -ज्ञा १५.३१७. २ हिंदीमहासागर [महा + उदधि] महोदय-पु. माघ किंवा पौष महिन्यांत सोमवारी सूर्योदयीं अमावस्यारंभ श्रवण नक्ष- त्राचा मध्य आणि व्यतिपाताचा शेवट यांचा योग; एक मोठें पर्व. [महा + उदय] महौजा-वि. तेजस्वी; ज्याचें तेज मोठें आहे असा; सामर्थ्यवान् 'पुरुष श्याम महौजा ओढित होता बळेंचि मजला जो ।' -मोवन १३.८८. [महा + ओज] महान्-वि. १ मोठा; विस्तृत; थोर. २ उशीरा पिकणारें (धान्य, पीक); गरवें ३ दोन किंवा अनेक वर्षें टिकणारें (झाड, मिरची, कापूस, पांढरी तूर इ॰).