आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
निमंत्रण
न. बोलावणें; आमंत्रण. [सं.] निमंत्रणें-उक्रि. बोलावणें; आमंत्रण करणें; येण्यास सांगणें. [निमंत्रण] निमं- त्रित-वि. बोलाविलेला; निमंत्रण दिलेला; याच्या उलट आगंतुक.
निमंत्रण nimantraṇa n (S) Inviting; an invitation.
निमंत्रण n An invitation.
(सं) न० बोलावणें, आमंत्रण.
संबंधित शब्द
अक्षत
स्त्री. १ अभिमंत्रित केलेले किंवा अभिमंत्रित करण्या- साठीं घेतलेले तांदूळ; लग्न, मुंज इ॰ चें आमंत्रण देण्याकरतां घेतलेले तांदूळ. २ लग्न-मुंज प्रसंगींच्या आमंत्रणाकरतां मिरवणूक निघते ती (देवास आणि शिष्ट लोकांस अक्षत देण्यासाठीं). ३ कापळीं लावलेल्या गंधांत काळ्या रंगाचा जो टिकला लानतात तो किंवा तें गंध. ४ (सामा.) तांदूळ. वाप्र -वाटाण्याच्या अक्षता लावणें = साफ नाकारणें; (वाटणे वाटोळे असल्यामुळें कपाळास चिकटून राहत नाहींत म्हणून). अक्षत कढणें-फिरविणें-निघणें- समारंभाचें निमंत्रण करण्याकरतां मिरवणूक निघणें. अक्षत टाकणें- १ एखाद्या घरावर अक्षत टाकून आंतील लोक काय बोलतात तें ऐकणें. हा एक शकून पाहण्याचा प्रकार आहे. २ (देवावर) पूजेकरतां आव्हान केलेल्या देवतेचें विसर्जन करणें. ३ एखाद्या गोष्टीवरील सत्त्व सोडून देणें. ४ लग्नांत वधूवरांवर तांदूळ टाकणें; लग्न लावणें. ‘अक्षत टाकिली जैसी । मांदिये वरी ।’ –ज्ञा १८.७२३. अक्षत देणें- विवाहादिसमारंभास निमंत्रण करणें. अक्षत घेणें- निमंत्रणाचा स्वीकार करणें. डोक्यावर अक्षत(ता)पडणें- विवाह होणें. ॰टाकणें- लग्न लावणें, करून देणें. तोंडावर अक्षत पडणें- मनसोक्त, वाटेल तसें बोलणें. अक्षत भरणें- शेंस भरणें. ‘अक्षत भरिली भाणा । दुजा ब्राह्मण मेहुणा । आला होता पाहुणा । स्त्रियेस मूळ ।’-दा ३.३.१०. अक्षत लावणें- (घरास, चुलीस) घरांतील सर्व माणसांस, कुटुंबास भोजनास बोलावणें केल्यामुळें चूल न पेटविणें. अक्षत लावणें- (वेशीस) गांव- भर-सर्व लोकांस आमंत्रण करणे. अक्षत लावणें- १ भाकीत करणें. २ गुंतवून घेणें; प्रयुक्त होणें. अक्षत वाहणें- (मूर्तीवर) अभिमंत्रित तांदूळ देवावर टाकणें-वाहणें. म्ह॰ या या माझ्या कपाळाच्या अक्षता पहा = दुसऱ्याला विनाकारण हांक मारणाऱ्या किंवा बोलवणाऱ्या मनुष्याबद्दल रागानें म्हणतात. वरतीं अक्षता, मध्यें गोपीचंदन खालीं रक्षा (अंगारा)-तोंडाशीं हिरवा, मध्यें गोपीचंदनासारखा मऊ व तळाशीं रक्षा झालेला असा भात; चांगला न शिजलेल्या भाताचें विनोदप्रचुत, खुबीदार वर्णन. वैष्णवीभात पहा. – वि. १ अभंग; इजा न झालेला; शाबूत; धडधाकट; संबंध. ‘अक्षतधनु तोंवरि हें वीरशिरोरत्न नावरायाचें’-मोद्रोण ३.१२१. २ पतिसमागम न झालेली (स्त्री); तीन पुनर्भूंपैकी. पुनर्भू पहा. अनुप- भुक्त स्त्री. [सं. अ + क्षत]
अक्षत
स्त्री. १. तांदळाचा न मोडलेला दाणा. २. अभिमंत्रित केलेले किंवा अभिमंत्रित करण्यासाठी घेतलेले तांदूळ; लग्न, मुंज इ. समारंभात उत्सवमूर्ती व्यक्तींच्या डोक्यावर टाकण्याकरिता, देवतांच्या कपाळी लावण्याकरिता किंवा लग्न, मुंज इत्यादीचे आमंत्रण देण्याकरिता घेतलेले तांदूळ. ३. लग्न–मुंज प्रसंगीच्या आमंत्रणाकरिता निघणारी मिरवणूक (देवास आणि शिष्ट लोकांस अक्षत देण्यासाठी). ४. कपाळावर लावलेल्या गंधात काळ्या रंगाचा जो टिकला लावतात तो किंवा ते गंध. ५. (सामान्यतः) तांदूळ. [सं.] (वा.) अक्षत काढणे, अक्षत फिरविणे, अक्षत निघणे– समारंभाचे निमंत्रण करण्याकरिता मिरवणूक निघणे. अक्षत घेणे – निमंत्रणाचा स्वीकार करणे. अक्षत टाकणे – १. एखाद्या घरावर अक्षत टाकून आतील बोलणे ऐकणे. हा शकून पाहण्याचा एक प्रकार आहे. २. (देवावर) पूजेसाठी आवाहन केलेल्या देवतेचे विसर्जन करणे. ३. एखाद्या गोष्टीवरील हक्क सोडून देणे. ४. लग्नात वधूवरांवर तांदूळ टाकणे; लग्न लावणे : ‘अक्षत टाकिली जैसी । मांदिये वरी ।’ –ज्ञा १८·७२३. अक्षत देणे– विवाहादी समारंभास निमंत्रण करणे. डोक्यावर अक्षत पडणे, डोक्यावर अक्षता पडणे – विवाह होणे तोंडावर अक्षत पडणे, तोंडावर अक्षता पडणे – मनसोक्त वाटेल तसे बोलणे. अक्षत भरणे – शेस भरणे; भांगात कुंकू वा अक्षत भरणे : ‘अक्षत भरिली भाणा । दुजा ब्राह्मण मेहुणा । आला होता पाहुणा । स्त्रियेस मूळ ।’ – दास ३·३·१०. चुलीस अक्षत लावणे – १. घरातील सर्व माणसांस, कुटुंबास भोजनास बोलावणे केल्यामुळे चूल न पेटवणे. २. (वेशीस) गावभर, सर्व लोकास आमंत्रण करणे. ३. भाकीत करणे. ४. गुंतवून घेणे; प्रयुक्त होणे. अक्षत वाहणे – (मूर्तीवर) अभिमंत्रित तांदूळ देवावर टाकणे, वाहणे. वाटाण्याच्या अक्षता लावणे – साफ नाकारणे. (वाटाणे वाटोळे असल्यामुळे कपाळास चिकटून राहत नाहीत म्हणून).
बोलाव(वि)णें, बोलाविणें
सक्रि. १ हांक मारणें. २ आमंत्रण देणें; निमंत्रण करणें. -न आमंत्रण; निमंत्रण बोला- वणूक-न. (साष्टी-कोळी) बोलावणें; आमंत्रण. 'सगळे देवांना बोलावणूक काय केली ।' -मसाप १.२. बोल(ला)वणेकरी- पु. १ बोलावणारा, आमंत्रण देणारा. २ निमंत्रित लोकांना जेवणाला बोलविणारा मनुष्य.
वीर
पु. योद्धा; लढवय्या; शूर पुरुष; उत्साही मनुष्य (लढाईत, दुसऱ्याची आपत्ति दूर करण्यांत किंवा दान करण्यांत). 'आणीकही द्रौपदीकुमर । हे सकळही महारथी वीर । मिती नेणिजे परी अपार । मीनले असती ।' -ज्ञा १.१०२. २ नवरसांपैकीं एक:-उत्साह, शौर्य, पराक्रम दाखविणारा भाव. ३ ज्याचा कोणी पूर्वज लढाईंत मेला असून, जो फाल्गुन वद्य प्रतिपदेचे दिवशीं, योद्ध्याच्या समारंभांनें देवदर्शनासाठीं जातो असा. ४ वरील मृत मनुष्याचा देवांमध्यें बसविलेला टांक. 'वीर बैसविला देव्हारां ।' -दावि ६३. ५ मोठ्या मनुष्याची मरणोत्तर दशा. -बदलापूर ४९२. ६ विशेषनाम, हुद्दा किंवा वर्णनपर नांव यांस जोडून येतो; त्यावेळीं पुढारी, प्रमुख, श्रेष्ठ असा अर्थ होतो. उदा॰ रघुवीर; कुरुवीर; यदुवीर; दैत्यवीर; कपिवीर; भक्तवीर; वदान्यवीर इ॰ 'तैसा तुका वैष्णववीर । अवीट आवडी त्याची थोर । मोजुनि त्याहि कृष्णवीर । स्वहस्तें चौगुणें घेती वर.' ७ एक पदवी. कोण- तेही धाडस, उत्साह, औदार्य, परोपकार, जनकल्याण इ॰ गुणा- विषयीं प्रसिद्ध असलेल्या पुरुषास लावतात. उदा॰ वीर नरीमन, वीर वामनराव.-वि. १ शूर; पराक्रमी. २ वैराग्यशील. [सं.] सामाशब्द- ॰कंकण-न. वीर पुरुषाचा मान म्हणून, पराक्रमाचें द्योतक असें मनगटांत घातलेलें कडें. 'वीर कंकण घालितां नाकीं । परी तें शोभा पावेना कीं ।' -दा ७.९.१५. ॰कन्या-स्त्री. (वीर पुरुषाची मुलगी) युद्धप्रिय, धाडशी, खंबीर मनाची स्त्री. वीर- भार्या, वीरपत्नी, वीर भगिनी हे समधर्मी शब्द होत. [सं.] ॰कल्लु-पु. (गो.) वीराचा दगड; वीरगळ. [का. कल्लु = दगड] ॰गड-पु. घोसाळा किल्ला. शिदि १५१. ॰गंठी-(महानु.) वीरगुंठी पहा. 'विरली रुळती वीरगंठी ।' -दाव २४४. ॰गर्जना- स्त्री. वीराच्या आरोळ्या (आव्हान, उत्तेजन देणाऱ्या). [सं.] ॰गांठ-स्त्री. विशिष्टप्रकारची केसांची गांठ; वीरगुंठी पहा. 'बासींगे हीरेयाची जोती मीरवती वीती वीरगांठी ।' -धवळेपू ६९. ॰गुंठी-स्त्री. विशिष्ट प्रकारनें केंस बांधणें; वीराला शोभण्या- सारखी डोक्यावरील केंसाची गांठ. 'अविरळ कुरळांची मस्तकीं वीरगुंठी ।' -सारुह ८.११८. 'सरसावुनी वीरगुंठी ।' -मुसभा ७. १७; -ह १९.३७. ॰घंटा-स्त्री. दौंडी पिटण्याचें साधन अशी घंटा; एकच वाद्य. 'डौंडीची ढवंस ढोला । वीरघंटा तांबकिया ।' शिशु १०२६. ॰घोषणा-स्त्री. वीरगर्जना; योद्ध्यांना युद्धास निमंत्रण. [सं.] ॰जननी-स्त्री. जिची मुलें शूर, पराक्रमी आहेत अशी स्त्री; वीरमाता. [सं.] ॰जयंतिका-जयंति-स्त्री. युद्ध- प्रसंगी किंवा युद्धांत विजय मिळाल्यावर योद्ध्यांनीं केलेला नाच; युद्धनृत्य. [सं.] ॰ठाण-न. वीरासन. [सं. वीरस्थान] ॰दृष्टि- स्त्री. (नृत्य) डोळे लाल करणें, बुबुळें उंच नेणें; डोळ्याचा मध्य- भाग विकासित करणें (वीरसाचा अभिनय). ॰पट्ट-पु. वीराचें ललाटपदक; शिरताज. ॰पत्नी-स्त्री. वीराची भार्या, बायको; वीरकन्या पहा. [सं.] ॰पाण-न-न. युद्धापूर्वीं किंवा युद्ध चालत असतांना, जोर येण्यासाठीं वीरांनीं नवचैतन्यवर्धक पेय पिणें. [सं.] ॰पीर-वि. १ बोंबल्या; अरेराव; रगडमल्ल; धटिंगण माणूस. २ (प्रंशसार्थी) उत्साही, धाडसी माणूस. ॰प्रसू-स्त्री. शूर अशा पुत्रांना प्रसवणारी स्त्री; वीरमाता. [सं.] ॰भगिनी- स्त्री. वीराची बहीण. [सं.] ॰भद्र-पु. १ दक्षयज्ञाचा विध्वंस करण्यासाठीं शंकरानीं जटेपासून निर्माण केलेला वीर पुरुष; अकरा रुद्रांपैकीं एक. २ (ल.) उग्र स्वरूपाचा व विनाशक प्रवृत्तीचा मनुष्य. ३ शिवगणांचा एक वर्ग. ४ लिंगायत लोकांमधील एक विशेष दीक्षा. ५ रागीट, हट्टी व सुधारणार नाहीं अशा मुलास म्हणतात. [सं.] ॰भाग-पु. वीराचा भाग; शूर पुरुषाचा वस्तू. 'मी तंव तुझेचि अर्धांग । केविं शिशुपाळ शिवेल माझे आंग । तूं शिरावरी असतां श्रीरंग । मी वीरभाग यदुवीरा ।' -एरुस्व ४. १६. ॰भार्या-स्त्री. वीरपत्नी; वीराची बायको; वीरकन्या पहा. [सं.] ॰भाषण-न. वीराची भाषा; वीराचें वचन. [सं.] ॰माता-स्त्री. शूरांची आई; वीरजननी पहा. [सं.] ॰मुष्टि-पु. मद्रासइलाख्यांतील एक भिकाऱ्यांची जात. हे लोक शारीरिक करा- मतीचे खेळ करून पैसे मिळवितात. हे लिंगायत धर्माचे आहेत. ॰रस-पु. वीराला युक्त अशी भावना, विकार; नवरसांपैकीं एक, याचे चार विभाग पडतात:-विद्या, युद्ध, दया व दान. वीररसाचें उदा॰ गर्वोक्ति फाल्गुन वदे जगदेकराया । आहे मशीं कवण तो झगडा कराया । म्यां कालखंज वधिले अतुलप्रतापी । पौलोमही असुर गोसुर विप्रतापी ।' -वामन, भीष्मप्रतिज्ञा. [सं.] ॰राणा- वि. वीरश्रेष्ठ. 'पाठी धरा वाहक वीरराणा । चाले करें वोढुनि चाप- बाणा ।' -मुरामायण अयोद्ध्या. ॰वाद-पु. वीराचें प्रतिपक्षीयास युद्धासाठीं केलेलें आव्हान; युद्धास निमंत्रण. [सं.] ॰विलास- पु. वीराची क्रीडा. -वि. वीरांना ज्यांपासून विलास (आनंद) होतो असा (अर्जुन). 'हारपलें दावूनि जैसा । मागु सरे वीर- विलासा । ज्ञानाचि कळस वळघे तैसा । कर्मप्रसादा ।' -ज्ञा १५. ५८६. ॰वृत्ति-स्त्री. वीराची प्रकृति-शौर्य, पराक्रम. 'तयाचि तुलगासवें । वीरवृत्तीचेनि थावें ।' -ज्ञा १.१२७. ॰वैष्णव-पु. १ वैष्णवांचें आचार कडकडीत पाळणारा एक वर्ग. याच्याप्रमाणें वीरशैव असा एक वर्ग आहे. २ वैष्णववीर; कट्टर, थोर वैष्णव. 'तैसा तुका वैष्णववीर । अवीट आवडी त्याची थोर ।' [सं.] ॰शय्या-स्त्री. रणभूमि. [सं.] ॰शैव-पु. लिंगायतांचा एक वर्ग. ॰श्री-१ अंगांत संचरणारें शौर्यांचें वारें; स्फुरण; वीराचें यश; अब्रू. २ शौर्य. 'कीं अतिथीविण भोजन । कीं वीरश्रीविण रण ।' [सं.] ॰सभा-स्त्री. योद्ध्यांची सभा. [सं.] ॰सू-स्त्री. वीरमाता; वीरजननी पहा. [सं.] ॰हंता-वि. वीरांचा पराभव करणारा किंवा त्यांस ठार करणारा. ॰क्षेत्र-न. बडोदें. 'वीरक्षेत्रीं महाराज प्रथुत्तम खंडेराव राजे बहादूर ।' -गापो ११. ॰क्षेत्री- पु. क्षत्रीयवीर. 'वरी विराजे वीर-क्षेत्री । हरिश्चंद्र नृपनाथ ।' -मुहरिश्चंद्रख्यान नवनीत पृ. १८३. वीराशंसन-न. युद्धांतील वीरांनां प्रिय अशी जागा; प्राणावर बेतण्याचा जेथें प्रसंग येतो अशी धोक्याची जागा. [सं.] वीरासन-न. १ डावा गुढघा मोडून व उजवा उभा करून, किंवा दोन्ही गुढगे जमीनीस टेंकून बसणें; आसनाचा एक प्रकार. योद्ध्याचीं बसण्याची रीत (युद्धांत बाण सोडतांना, दरबारांत किंवा सभेंत बसणें झाल्यास). (क्रि॰ घालणें, धरणें). २ वीराची बसावयाची जागा, आसन इ॰ ३ रणभूमि. [वीर + आसन] वीरेंवीर-क्रिवि. एकूणएक वीर. 'वीरेंवीर बुडाला । अवघा हळकल्लोळ जाला । महारुद्र खवळला । ज्ञाते लोक जाणती ।' -दावि ४९६. [वीर + वीर]
अभिमंत्रण
न. १. मंतरणे; मंत्र म्हणून विशिष्ट संस्कार करणे; सुसंस्कृत करणे; मंत्राने पवित्र करणे; भारणे. २. आमंत्रण; निमंत्रण; बोलावणे; हाक मारणे. [सं.]
अभिमंत्रण
न. १ मंतरणें; मंत्र म्हणून विशिष्ट संस्कार करणें; सुसंस्कृत करणें; मंत्रानें पवित्र करणें; भारणें. २ आमंत्रण; निमंत्रण; बोलावणें; हांक मारणें. [सं. अभि + मन्त्र्]
आह्वान
न. १ आमंत्रण; बोलावणें; पाचारणें; आमंत्रणें. २ सामन्यास, वादविवादास, युद्धास, निमंत्रण; (इं.) चॅलेंज. 'मी त्यांस आह्वान करून सांगतों कीं जी काय माझी निंदा कराव याची असेल ती घारपुरे यांनीं खुशाल करून घ्यावी.' -केले १.३६३. ३ नांव; संज्ञा; नांव देणें. [सं. आ + ह्वे]
आखत, आखता
स्त्री. १. अक्षता; तांदूळ: ‘इअेते ओवाळोनि आखतां ।’ − शिव ८१७. २. अक्षतापूर्वक निमंत्रण : ‘आणिखी उदीयांची आखत लाविली.’ − लीचपू. ४१५. [सं. अक्षत्]
आमंत्रण
न. १. निमंत्रण; बोलावणे; पाचारण; आवतण; आवहान. (क्रि. करणे, देणे). २. आमंत्रणाला निघालेली मंडळी. [सं.]
आमंत्रण
न. १ निमंत्रण; बोलावणें; पाचारण; आंवतण; आव्हान. (क्रि॰ करणें; देणें) २ आमंत्रणाला निघालेली मंडळी. [सं. आ + मन्त्र्] ॰पत्रिका-स्त्री. बोलावणें करण्याचें पात्र; कुंकुम- पत्रिका; लग्नचिठ्ठी इ॰
आंबेभोजन
न. आंबरसाचे जेवण : ‘तवं तेथ संन्यासियासि परीक्षा निमंत्रण आंबेभोजन मांडले असे’ − लीच ३·६२.
आव्हान
न. १. आमंत्रण; बोलावणे; पाचारणे. २. सामन्यास, वादविवादास, युद्धास निमंत्रण : ‘मी त्यांस आव्हान करून सांगतों की जी काय माझी निंदा करावयाची असेल ती घारपुरे यांनीं खुशाल करून घ्यावी.’ − लोटिकेले १·३६३. २. नाव; संज्ञा; नाव देणे. (वा.)
आवतण
न. निमंत्रण; बोलावणे. [सं. आमंत्रण]
दावत
(स्त्री.) हिंदी अर्थ : भोज, बुलावा. मराठी अर्थ : निमंत्रण.
घरटी, घरटीस
क्रिवि. (कों.) प्रत्येक घरागणीक; घरो- घर; प्रत्येक घरीं; एकहि घर न वगळतां; 'त्यानें घरटीस पांच पांच रुपये दिले, घेतले.' 'खोजेवाडीस घरटी काठी चालू आहे इतका नारूचा उपद्रव डोळ्यांनीं पाहिला.' -खेया २५. ॰आमं- त्रण-न. गांवांतील प्रत्येक घरीं दिलेलें जेवणाचें निमंत्रण, बोलावणें.
इच्छामरणी, इच्छामृत्यू
वि. मरण स्वतःच्या स्वाधीन असलेला; इच्छा होईल तेव्हा मृत्यूस निमंत्रण करणारा; इच्छामरणाचा ईश्वरी प्रसाद असणारा : ‘ख्यातयशस्वी इच्छामृत्यू तुम्ही कुरुकुळांत वासवसे ।’− मोउद्योग ११·८७.
मेहमानी
(स्त्री.) हिंदी अर्थ : दावत, भोज. मराठी अर्थ : निमंत्रण, जेवण, पाहुणचार.
नेवता
पु. आमंत्रण; निवतण (क्रि॰ देणें; करणें). [सं. निमंत्रण हिं.]
निबता
पु. (व.) आमंत्रण. [निमंत्रण]
निमंत्रणें
निमंत्रणें nimantraṇēṃ v c (निमंत्रण) To invite; to summon.
निवंतण
न. (व.) जेवावयास बोलावणें; आमंत्रण. [सं. निमंत्रण]
रिवायत
स्त्री कथा; कीर्तन; प्रवचन. 'सर्वं मुसल- मानांना हरिपूर या गांवी रिवायतीसाठीं निमंत्रण आलें होतें.' -के १३.४.१९३७. [अर. रिवायत-कथा गोष्ट]
तलब नामा
(पु.) हिंदी अर्थ : सूचना पत्र, बुलावा पत्र, सूचना. मराठी अर्थ : निमंत्रण पत्र, आज्ञापत्र.
उल्फा भोजन
न. लग्नानंतरचे भोजन :– ‘लग्नानंतर उल्फा भोजनाचे निमंत्रण येते.’ –ऐरापुविवि १९१.
वाण आमंत्रण
सर्वसाधारणपणें निमंत्रण. आमंत्रण पहा.
इच्छा
स्त्री. १ वासना; वांछा; आशा; आकांक्षा; मनोगत; मनीषा; आवड. सामाशब्द-इच्छापूर्वक; इच्छापुरःसर इ॰ २ (गणित) इच्छांक; त्रैराशिकांतील प्रमाणसजातीय राशि. आद्यंक, मध्यांक व अंत्यांक किंवा इच्छांक हीं तीन पदें असतातच, चवयें इच्छाफल (उत्तर) काढावयाचें असतें. उ॰ पांच रुपयांस दोन मण, तेव्हां चार रुपयांस किती? येथें पांच हें प्रमाण व चार ही इच्छा. [सं. इष्] ॰तृप्त- क्रिवि. इच्छेची तृप्ति होईपावेतों; इच्छा परिपूर्ण होईपर्यंत. ॰तृप्ति- स्त्री. मनीषा सिद्धीस जाणें; हेतु, वासना सफल होणें. ॰दान-न. इच्छिलेलें दान देणें; इच्छा पुरी करणें. ॰दानी-वि. इच्छादान करणारा; ज्याची जी इच्छा असेल ती पुरविणारा. 'तुका म्हणे इच्छा दानी । पुरवी आवडीची धनी ।' ॰पूर्ति-स्त्री. इच्छेची फलद्रुपता, पूर्तता; इच्छातृप्ति. ॰फल-न. (गणीत) त्रैराशिकांतील चौथें पद (उत्तर). मध्यपद आणि इच्छांक यांचा गुणाकार करून त्यास आदिपदानें भागिलें असतां इच्छाफल येतें. ॰भंग-पु. इच्छेची पूर्ति न होणें; अशा निष्फळ होणें; निराशा. ॰भोजन-न. १ तृप्ति होई- पावेतों जेवणें. २ भरपूर जेवण. ३ इच्छित पदार्थ (ब्राह्यणांस) खाऊं घालणें. ॰मरण-न. इच्छेस येईल तेव्हां मरण येणें, मरणें; पाहिजे तेव्हां मरण आणण्याची शक्ति. ॰मरणी-मृत्यु-वि. पु. इच्छा होईल तेव्हां मृत्यूस निमंत्रण करणारा; इच्छामरणाचा ईश्वरी प्रसाद असणारा. 'ख्यातयशस्वी इच्छामृत्यु तुम्ही कुरु कुळांत वासवसे ।' -मोउद्योग ११.८७. ॰लाभ-पु. इच्छित वस्तूची प्राप्ति; इष्टलाभ. ॰वान्-वि. इच्छा असणारा; इच्छायुक्त. ॰विनाश-पु. इच्छाभंग; इच्छादमन; आत्मसंयम. ॰विलास- विहार-पु. मानेल तेव्हां, मानेल तें खेळणें, मनसोक्त विलास, चैन करणें. ॰शक्ति-स्त्री. इच्छेचें सामर्थ्य; संकल्पशक्ति; इच्छा हीच शक्ति; (इं.) विल्पॉवर. ॰सिद्ध-वि. इच्छेप्रमाणें सिद्ध किंवा असिद्ध ठरवितां येण्यासारखा. ॰स्वातंत्र्य-न. इच्छेची स्वतंत्रता; प्रवृत्तिस्वातंत्र्य. ॰क्षय-पु. इच्छाविनाश पहा.
सांग
स्त्री. धा नाम. १ सांगणें; सांगणी; निरोप. (क्रि॰ सांगणें). 'प्रियवधुसि वराला सांगता सांग झाला.' -आमा ९.२ आज्ञा; हुकूम. [सांगणें] ॰कामी-म्या-वि. १ स्वतःची बुद्धी न चालवितां नुसतें सांगितलेलें काम करणारा; वेळेप्रमाणें वागण्याची अक्कल नसणारा (निंदाव्यंजक उपयोग). २ ज्यानें नुसतें सांगि- तलेलें काम करावयाचें आहे असा; नुसता तंतोतंत हुकूम पाळला पाहिजे असा. (वाप्र.) सांगितल्या कामाचा दिल्या भाक- रोचा-केवळ सांगितलेलेंच काम करणारा व मिळेल तें खाणारा. ॰सरभरा-स्त्री. १ बोलण्यानें, (एखाद्याबद्दल) गौरवानें सांगून, शिफारस करून मदत करणें. 'त्यानें स्वतः कांहीं दिलें नाहीं पण माझी सांगसरभरा अशी केली कीं माझें लग्न झालें.' २ मदतीच्या थापा देणें; शाब्दिक मदत. 'होय, हा माझा माबाप खरा. ह्यानें असें करीन तसें करीन, हें देईन तें देईन म्हणतां माझी सांगसरभरा केली.' ॰सुगरण-सुग्रण-वि. नुसती बोलण्यांत हुषार; तोंडपाटिलकी करणारी स्त्री. 'मावशी म्हणजे सांगसुग्रण, चुलीजव- ळच्या नुसत्या गप्पा.' ॰सुगराई-सुग्राईस्त्री. बोलण्यांत शहाणा पणा. सांगणा-वि. निरोप्या; बोलावणेंकरी. -ख्रिपु २.४.१२. [सांगणें] सांगणी-क्रि. १ शिकवण; आदेश; सूचना. २ सांगणें; बोलणें; निरोप (क्रि॰ सांगणें). ३ शिकवण्याची, समजूत देण्याची पद्धत. सांगणीचा-वि. १ वधूपक्षीयांनीं वधूकरितां द्रव्य किंवा कांहीं मोबदला न घेतां तिचा केलेला (वाङ्निश्चय, विवाह). २ अशाप्रकारें विवाहित (कन्या). सांगणें-अक्रि. १ कळविणें; कथणें. २ करण्याविषयीं आज्ञापिणें; सुचविणें (काम, मामलत, अधिकार, रोजगार, चाकरी इ॰). ३ बोलावणें, निमंत्रण करणें (भोजन, समारंभ इ॰ स). ४ शिकविणें; समजावणें (अध्ययन, ग्रंथ, विद्या इ॰). ५ म्हणून दाखविणें (विद्या- र्थ्यास शिक्षकास, धडा इ॰). [प्रा. संघइ-तुल॰ सं. सांगतिक = गोष्टी सांगणारा; मनु ३.१०३.] (दुखणीं, संकटें, कुकर्मे इ॰ नीं) (अवघड, कठीण, जड) सागणें-(त्यांचा) परि- णाम कठीण होणें. सांगून येणें-विवाहासाठीं देऊं करणें (मुलगी). 'माझ्या भावास एक मुलगी सांगून आली आहे.' सांगणोवांगणी, सांगा(गी-गो)वांगी, सांगा- सांगी-स्त्री. १ प्रत्यक्ष प्रमाण नसतां एकानें दुसर्यास, दुसर्यानें तिसर्यास सांगण्याची परंपरा; ऐकीव गोष्ट; गप्पा. 'सांगणो- वांगणीचें काम नव्हे । आपुल्या अनुभवें जाणावें ।' -दा १०. १०.५३. २ गप्पा छाटणें; बकवा करणें. ३ एखादी गोष्ट अनेकांना सांगणें; बोभाटा करणें. [सांगणें द्वि.] म्ह॰ सांगा- सांगीं वडाला वांगी. सांगता-वि. सांगणारा. 'हरिकथेची महिमा कैसी । आदरें पुसतां सांगत्यासी ।' -एभा ३.५८७. सांगवा-पु. (माण. क.) निरोप. 'मला तुमचा सांगवा पोंचला नाहीं.' सांगी-स्त्री. सांग पहा. १ निरोप. २ उपदेश; समजावणी. 'दुष्टांच्या सांगीवरून आथेल्लोची दुर्गति झाली.' -विवि ८.४.८२. ३ आज्ञा; हुकूम. सांगिजणें-सांगणें; सांगि तलें जाणें. -विपू २.७९. 'कसें कार्या या तुम्हीं सांगिजे तें ।' -र ३८. 'मग आणिक उपचारु केला तेहीं । तो सांगिजैलु आतां ।' -शिशु ७७२.