तेरा मराठी शब्दकोशांमधील ३,००,८७५ शब्दांचा एकत्रित संग्रह
शब्दार्थ
परात्पर
परात्पर parātpara a (S) Most high, supreme;--used of God.
परात्पर a Most high, — of God.
वि. अत्यंत श्रेष्ठ; उच्च (ईश्वर). 'तरि साक्षा- त्परात्परु । जो सकळ प्रमाणां अगोचरु ।' -ऋ ४१. [महानु. टीप-देवता समूहांत पर जी माया तिये पासावही जो पर तो परात्परू]
परात्पर गुरु
पु. परमगुरुचा गुरु. गुरु-परम गुरु- परात्पर गुरु अशी वरचढ परंपरा आहे. [सं.]
संबंधित शब्द
आभास
पु. १ भास. २ सादृश्य; सारखेपणा; प्रतिकृति; प्रति- बिंब. 'कां परता केलिया आरिसा । लोपु जाला तथा आभासा ।' -ज्ञा १५.३७८. 'साकार साभास आभास । चौथें जाणिजे निरा- भास । याहूनि पर तूं परात्पर हंस । तृणावर्त प्राणहरणा ।' -ह २०.१४५. ३ कल्पना; अंदाज; अटकळ; विचार; ग्रह; समजूत; थोडा विश्वास; थोडा खरेपणा वाटणें. 'सांडिजे दुजया नामाचा आभासु ।' -ज्ञा ६.४०. ४ (तर्क.) प्रमाणसादृश्य; बरोबर वाट- णारें पण चुकीचें मत, मुद्दा; चुकीची विचारसरणी. उत्तराभारा; रसा- भास; हेत्वाभास; भावाभास; पक्षाभास पहा. इतर कांहीं सामाशद्ध. करुणाभास; क्रोधाभास; स्नेहाभास इ॰. [सं. आ + भास् = प्रकाशणें]
आनंद
पु. १. हर्ष; सुख; संतोष; उल्हास; समाधान; उत्साह; आल्हाद; प्रमोद. आत्मानंद, ब्रह्मानंद, विषयानंद, विद्यानंद व योगानंद हे पाच आनंद पंचदशीत सांगितले आहेत. २. संन्यासी व गोसावी यांचा एक संप्रदाय : ‘हा (विठ्ठल) भीमातीर दिगंबर । आदिपुरुष परात्पर । आनंद सांप्रदाय थोर । तेथूनिया वाढिला ।’ − हरि. ३६·१९७. ३. साठ संवत्सरांतील ४८ वे संवत्सर. ४. आपल्याला हवे ते घडल्यामुळे होणारी मनाची अवस्था. ५. सुखाची भावना. ६. (ज्यो.) एक शुभयोग.
पश्यंती
स्त्री. (पार, पश्यंती, मध्यमा व वैखरी या) चार वाचांतील दुसरी वाचा; परेपासून हृदयस्थानीं ईषन्मात्र उमट- णारी भासरूप वाणी. परा, मध्यमा, वैखरी पहा. 'जया तुझिया उद्देशासाठीं । पश्यंती मध्यमा पोटीं । सूनि परेंसींही पाठीं । वैखरी विरे ।' -ज्ञा १६.२०. 'वैखरी मध्यमा पश्यंती परा । चहूं वाचातीत क्षराक्षरपरा । तो तूं परात्पर सोयरा । कालियामर्दना श्रीकृष्णा ।' -हवि २०.१२७. [सं.]
उपनिषद्
न. १ गुरुचरणाजवळ बसून मिळविलेलें ज्ञान; गूढज्ञान. २ वेदांच्या ब्राह्मण ग्रंथांना जोडून असणारा वेदांतपर भाग; वेदसारांश असणारा ग्रंथ; वेदज्ञानकाण्डात्मक भाग. एकंदर १०८ उपनिषदें मानितात. पैकीं पुढील दहा उपनिषदें मुख्य आहेत. -ईश, केन, कठ, प्रश्न, मुंड, मांडुक्य, तित्तिर, ऐतरेय, छांदोग्य व बृहदारण्यक. 'अतिगुह्य ज्ञान परात्पर । जें उपनिषदांचें भांडार ।' -एभा १३.७१२. 'कुंडलें जाहलीं कृष्णश्रवणीं । तीं उपनिषदार्थ किरणीं । झळकताती सतेज ।' -एरुस्व १.५२. [सं. उप + नि + सद् = जवळ बसणें]
उपनिषद्
न. १. गुरुचरणाजवळ बसून मिळवलेले ज्ञान; गूढज्ञान. २. वेदांच्या ब्राह्मण ग्रंथांना जोडून असणारा वेदांतपर भाग; वेदसारांश असणारा ग्रंथ; वेदज्ञानकाण्डात्मक भाग. एकंदर १०८ उपनिषदे मानतात. त्यापैकी पुढील दहा उपनिषदे मुख्य आहेत – ईश, केन, कठ, प्रश्न, मुंड, मांडुक्य, तैतिरेय, ऐतरेय, छांदोग्य व बृहदारण्यक : ‘अतिगुह्यज्ञान परात्पर । जे उपनिषदांचे भांडार ।’ – एभा १३·७१२. [सं. उप + नि + सद्]