मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

आत्मसमर्पक प्रवृत्ति, आत्मसमर्पक प्रवृत्ती      

स्त्री.       दुसऱ्याच्या हितासाठी स्वतःचे सर्वस्व देण्याचा मनाचा कल.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

प्रवृत्ति

प्रवृत्ति pravṛtti f (S) Establishment, prevalence, currency: also procession or commencement. Ex. of comp. कर्म-काल-देश-धर्म-आचार-मत-शक-संप्रदाय- प्रवृत्ति. 2 Engagedness in; state of being employed about. 3 Activity, occupation, active or worldly life: as opp. to contemplative devotion. See ex. under निवृत्ति. 4 Continuous flow, stream, current, esp. in figurative senses. 5 Tendency; direction or course towards (as of the affections, genius &c.); predilection, propensity, inclination.

मोल्सवर्थ शब्दकोश

(सं) स्त्री० सुरुवात, गति. २ वार्ता, बातमी.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

अवसादन प्रवृत्ति      

स्त्री.       हीन, वाईट प्रवृत्ती.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

प्रवृत्ती

प्रवृत्ती f Prevalent custom. Activity. Tendency.

वझे शब्दकोश

अकिलाट प्रवृत्ती      

स्त्री.       (आयु.) जखमेतील रक्त न गोठणेमुळे व रक्ताचा अखंड प्रवाह चालू राहण्यामुळे होणारा विकार.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

संबंधित शब्द

प्रवृत्ति-त्ती

स्त्री. १ प्रस्थापना; व्याप्ति; परिपाठ; प्रघात; रूढी. जसें:-कर्म-काल-देश-धर्म-आचार-प्रवृत्ति. २ चाल; गति; गमन; आरंभ; सुरवात. ३ निमग्नता; चळवळ; हालचाल; एखाद्या कामांत गुंतलेलें असणें. ४ संसार; प्रपंच; संसारांतील आसक्तता; आत्मस्वरूपाचा विसर पडून प्रापंचिक व्यवहारोन्मुखतारूप जीवाची विशेषवृत्ति; बर्हिमुखवृत्ति. याच्या उलट निवृत्ति. 'आंतुला चित्ताचे अंगवरी । प्रवृत्ति पेलोनि माघारी ।' -ज्ञा १६.९१. ५ (ल.) प्रवाह; ओघ; प्रगति. ६ कल; ओढ; धांव; झोक (प्रेम, बुद्धि, मन इ॰चा). ७ आसक्ति; पक्षपात ओढा. ८ कर्ममार्ग. 'तेथें भ्रमेंसहित पळाली भ्रांती । क्रियेसहित गळाली प्रवृत्ति ।' -एभा १३.४२१. ९ प्रेरणा. 'तो साधी चिद्रुपु । कर्मप्रवृत्तिचा संकल्पु ।' -ज्ञा १८. ४५७. १० प्रेरक; प्रेरणाहेतु. 'म्हणोनि ज्ञान ज्ञेय ज्ञाता । हे त्रिविध गा पांडुसुता । होयचि कर्मा समस्तां । प्रवृत्ति येथ ।' -ज्ञा १८.४८५. ११ प्रघात; रूढी. 'तरी हें प्रवृत्तीचें बोलणें । प्रत्ययास आणी उणें ।' -दा ९.७.११. १२ बातमी. -शर. १३ कर्म; क्रिया. [सं. प्रवृत्ति] ॰निमित्त-न. (व्या. न्याय) विशिष्ट अर्थानेंच शब्दाचा उपयोग किंवा रूढि होण्याचें कारण. [सं.] ॰मार्ग-पु. प्रापंचिक व्यवहाराचा मार्ग; ऐहिक सुखासंबंधींचा उद्योग; धार्मिक क्रिया, विधी, आचार इ॰. याच्या उलट निवृत्तिमार्ग. ॰रोचक- वि. प्रवृत्ति करणारें; एखाद्या गोष्टीकडे मन वळविणारें. 'तेवीं वेद बोले जें फळ । तें प्रवृत्तिरोचक केवळ ।' -एभा १८.३६०. ॰स्वातंत्र्य-न. इच्छास्वातंत्र्य.

दाते शब्दकोश

वासना

स्त्री. १ मनाचा कल; प्रवृत्ति; स्वभाव; चित्त- स्वभाव. 'वासनेंसारखें फल.' 'कर्म करणाऱ्या पुरुषाची वासना किती शुद्ध आहे हें पाहूनच ठरविली पाहिजे.' -गीर ४७९. २ इच्छा; वांच्छा; अंतःकरणप्रवृत्ति. 'चित्तीं धरिली वासना । सिद्धि न्यावी नारायणा ।' 'मना वासना दुष्ट कामा नये रे ।' -राम ४. ३ परिचय; पारंगतता; अभ्यास; ज्ञान; प्रावीण्य; संस्कार. उदा॰ शास्त्रवासना; गणितवासना; न्याय- वासना. 'कांहीं शास्त्राची वासना असली म्हणजे बोलणें प्रौढ पडतें.' ४ मृत्यूसमयीचीं इच्छा; हेतु; आकांक्षा. [सं.] (वाप्र.) ॰ओढाळ असणें-मनाची अनेक ठिकाणीं तीव्र प्रवृत्ति होणें; निरनिराळ्या तीव्र इच्छा उत्पन्न होणें. ॰फजीत होणें-अर्धवट इच्छा पूर्ण होणें; अर्धवट तृप्ति होणें; आकांक्षा विफळ होणें. ॰फोडणें-मोडणें-इच्छेचा नाश करणें; आकांक्षा दडपून टाकणें; सर्व प्रवृत्ति निरोधून टाकणें.

दाते शब्दकोश

भक्ति

स्त्री. १ पूजा; भजन. २ अंतःकरणाची प्रवृत्ति; तत्प- रता; श्रद्धा (धर्ममार्गांत). ३ आवड; प्रीति; शौक; आसक्ति; निष्ठा. ४ ऐक्य. -हंको. [सं.] ॰बसणें-क्रि. मान्य होणें; योग्य, चांगला. उचित वाटणें; प्रीति वाटणें. भक्तीचें दुकान घालणें- मांडणें-पसरणें-करणें-क्रि. भक्तीचा डौल, आव घालणें. भक्तीनें आवडणें-क्रि. पराकाष्ठेचा आनंद होणें; अत्यंत शोकी असणें. ॰प्रेम-न. भक्तीचें प्रेम; भक्तियुक्त प्रीति. आसक्ति. ॰भाव-पु. १ भक्तीचा, पूज्यतेचा भाव; भक्तियुक्त वृत्ति; भक्ति- युक्तता. २ आसक्ति; शौक; प्रवृत्ति. [सं.] ॰मान्-मन्त-वि. १ धार्मिक; भजनशील. २ आसक्त; तत्पर. ३ श्रद्धाळु; निष्ठायुक्त. [सं.] ॰मार्ग-पु १ भक्तीनें मुक्ति मिळविण्याचा मार्ग, संप्रदाय; श्रवण, कीर्तन इ॰ साधनांनीं ईश्वराची केवळ भक्ति केल्यानें मुक्ति मिळूं शकते असें ह्या मार्गाचें तत्व आहे. ज्ञानमार्ग व कर्ममार्ग या दोहोंहून भक्तिमार्ग हा भिन्न आहे. २ भक्तितत्व; भक्तीनें देवत्व मिळविण्याचा प्रकार. ३ विधीकडे, कर्मकांडाकडे लक्ष्य न देतां केलेली भक्ति. [सं.] ॰मार्गी-वि. भक्तिमार्गास अनुसरणारा. [सं.] ॰योग-पु. उपासना. [सं.] ॰वेड-न. भक्ती- शिवाय कांहीं न दिसणें; अंधभक्ति. ॰हीन-वि. भक्तिशून्य; भक्ति नसलेला. भक्तीण-स्त्री. १ भक्ति करणारी स्त्री; विशेषतः देवी, भैरोबा इ॰ देवळांतील झाडलोट करणारी बाई (हिच्या ठिकाणीं रोग बरे करण्याची इ॰ शक्ति असते असें मानतात). २ कलावंतीण. ॰भक्त्या-पु. देवभक्त; देवऋषी.

दाते शब्दकोश

दैव      

न.       १. नशीब; प्रारब्ध; विधिघटना. २. जातपंचायत; जातगंगा; जमात; स्वजातीय लोक. [सं.] (वा.) दैव उघडणे, दैव उपटणे, दैव खुलणे – भरभराट होणे; सुखाची प्राप्त होणे; चांगली ग्रहदशा येणे. दैव उभे राहणे – दैवाचा जोर होणे; प्राक्तनाचा परिणाम घडणे; नशिबाने अकस्मात सुख येणे. दैव काढणे, दैवास चढणे – भरभराट होणे; पुढे येणे. दैव फिरणे – नशीब प्रतिकूल होणे; वार्इट दिवस येणे. दैव शिकंदर असणे – दैव, नशीब बलवत्तर, चांगले असणे. दैवाची परीक्षा करणे, पाहणे – धोका आहे असे समजूनही एखादी गोष्ट करण्याचे साहस, प्रयत्न करणे. दैवाच्या नावाने हाका मारणे – नशिबाला बोल लावणे. दैवातून उतरणे – नष्ट, नामशेष होणे. दैवाने उचल करणे, यारी यणे, हात देणे – नशिबाने मदत करणे. दैवाने उपट खाणे – दैव पराकाष्ठेचे अनुकूल होणे. दैवाने ओढ घेणे, दैव ओढवणे – वार्इट (नुकसानीची) गोष्ट करण्याकडे प्रवृत्ती होणे. दैवाने धाव घेणे, करणे – चांगल्या किंवा वार्इट गोष्टीकडे अकारण प्रवृत्ती होणे. दैवाने मागे पाहणे सरणे, हटणे – नशीब फिरणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दैव

न. १ नशीब; प्रारब्ध; विधिघटना. २ जातपंचायत-गंगा; जमात; स्वजातीय लोक. [सं.] (वाप्र.) ॰उघडणें-उपटणें- खुलणें-भरभराट होणें; सुखाची प्राप्ति होणें; चांगली ग्रहदशा येणें. ॰उभें राहणें-दैवाचा जोर होणें; प्राक्तनाचा परिणाम घडणें; नशीबानें अकस्मात् सुखदुःखाचा प्रसंग येणें. ॰काढणें, देवास चढणें-भरभराट होणें; पुढें येणें. दैवणें-अक्रि. दैव- वान् होणें; उत्कर्षास चढणें. 'वानूं लाधलों तें दुणेन थावें । दैवलें दैव ।' -ज्ञा १६.३१. ॰फिरणें-नशीब प्रथम चांगलें असतां वाईट स्थिति होणें; वाईट दिवस येणें. दैवाची परीक्षा करणें- पाहणें-एखाद्या गोष्टींत पडलें असतां धोका आहे असें समजूनहि ती गोष्ट करण्याचें साहस करणें; प्रयत्न करून पाहणें. दैवाच्या नांवानें हांका मारणें-नशीबाला बोल लावणें. दैवांतून उतरणें-नष्ट होणें; नामशेष होणें (माणूस; वस्तु). दैवानें उचल करणें-यारी येणें-हात देणें-नशीबानें मदत करणें. दैवानें उपट खाणें-(दैव) पराकाष्ठेचें अनुकूल होणें. दैवानें ओढ घेणें, दैव ओढवणें-वाईट (नुकसानीची) गोष्ट करण्याकडे प्रवृत्ति होणें. दैवानें धांव घेण-करणें-चांगल्या किंवा वाईट गोष्टीकडे अकारण प्रवृत्ति होणें.दैवानें मागें घेणें-पाहणें- सरणें-हटणें-नशीब फिरणें. दैवावर हवाला देणें-नशीबावर सोंपविणें; नशीबावर भिस्त ठेवणें. दैवास येणें-नशीबी येणें; दैवानें एखाद्यावर येणें, गुदरणें. दैवास रडणें-नशीबाच्या नांवानें हाका मारणें; प्राक्तनास दोष देणें, बोल लावणें. म्ह॰ १ धड कांट्यावर घालून दैवास रडणें. २ दैव देतें आणि कर्म नेतें = भाग्यानें झालेला उत्कर्ष कांहीं चुकीनें नाहींसा होणें. ३ मनसा चिंतितं कार्यं दैव मन्यत्तु चिंतयेत् = मनानें कांहीं एक ठरविलें असतां नशीबानें दुसरेंच घडतें. सामाशब्द- ॰गत- गति-स्त्री. देवगत पहा. ॰दशा-स्त्री. १ नशीब; प्रारब्ध; नशी- बाचा फेरा. 'जशी दैवदशा असेल तसें घडेल.' २ भाग्य किंवा वाईट स्थिति. ॰प्रश्न-पु. फलज्योतिष; भविष्य; भाकित सांगणें. (क्रि॰ सांगणें; पहाणें; पुसणें; करणें; उतरणें; प्रत्ययास येणें). ॰फुटका-वि. दुर्दैवी; कमनशीबी. ॰योग-पु. दैवघटित; दैवाचा अनुकूल किंवा प्रतिकूलपणा (आकस्मिक, अकल्पित गोष्ट घडली असतां म्हणतात). दैवयोगें करून-क्रिवि. अकस्मात्; यदृछया; नशीबानें. दैवरेषा-स्त्री. लल्लाट रेषा; ब्रह्मलेख (कपाळीं लिहिलेला) प्राक्तन; विधिलिखित. ॰वश-वि. नशीबाच्या आधीन. ॰वशात्-वशें-क्रिवि. दैवयोगेंकरून; दैवगतीमुळें. ॰वाणी-देववाणी पहा. ॰वाद-पु मनुष्याचें सुखदुःख, यशाप- यश इ॰ सर्व नशीबावर अवलंबून आहेत असें मत; नशीबावर सर्वस्वीं हवाला ठेवण्याचें मत. याच्या उलट प्रयत्नवाद. ॰वादा -वि. वरील मताचा; नशीबावर हवाला ठेवणारा. ॰वान्-वि. नशीबवान्; भाग्यवान. ॰विपाक-पु. नशीबाचा खेळ. ॰हत-वि. कमनशीबी; अभागी. 'दैव हत कुणबी उन्मत्त । अपशब्द बोलत तुकयासी ।' 'अहा कैसा मी दैवहत प्राणी' -बालबोध पाहिलें पुस्तक. ॰हीन-वि. अभागी; दैवहत. ॰ज्ञ-वि. १ ज्योतिषी; भविष्य सांगणारा; जोशी. २ एक ब्राह्मण जात. यांचा धंदा सोनारीचा. दैवागळा, दैवा आगळ-वि. (काव्य) थोर नशीबाचा; दैववान्. 'एवढी हांव तो दैवाआगळा । म्हणऊनि करी ।' -ज्ञा १०.३३२. दवावालेख-पु. दैवरेषा पहा. 'दैवाचा लेख पाठमोरा । मला अंतरला म्हणुनियां तुज ऐसा मोहरा ।' -प्रला १५९. दैवाचा-वि. नशीबवान्. दैवाचा खेळ-पु. नशीबाचा खेळ. दैवाचा पुतळा-पु. नशीबान्; भाग्यशाली. 'जाणें भक्तीचा जिव्हाळा । तोचि दैवाचा पुतळा ।' -तुगा २३१०. दैवाचा भोपळा-पु. कमनशीबी; दुर्दैवी (भोपळा हलका व पोकळ असतो यावरून). दैवाची कहाणी-स्त्री. दुर्दैवाची कथा, गोष्ट. दैवाचे ताले-पुअव. भाग्य; दैव दैवरेषा. ताले पहा. 'असे त्याचे दैवाचे ताले कीं कुत्र्यावर नौबत चाले ?' [दैव + अ. ताला] दैवात्-क्रिवि. यदृच्छेंनें; दैववात् दैवाधीन-दैवाधुरोधी- दैवानुसरी-प्रधान-दैववश पहा. दैवावरचा खेळ-पु. यत्न केल्यानंतर नशीबाच्या हवाल्यावर ठेवलेली गोष्ट.

दाते शब्दकोश

घेतावणा

वि. घेण्याकडेच प्रवृत्ति असलेला; याच्या उलट देतावणा. [घेणें + वण-णा प्रत्यय] ॰देतावणा-वि. उसने देण्या- कडे व घेण्याकडे प्रवृत्ति असलेला; यावरून शेजारधर्माचें दळण- वळण ठेवण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा.

दाते शब्दकोश

कल      

पु.       १. ओघ; ओढा; प्रवृत्ती; झोक. २. (ल.) मनाचा किंवा इच्छेचा ओढा; बुद्धीची किंवा स्वभावाची प्रवृत्ती; चित्तवृत्तीचा ओघ; रोख : ‘असत्कार्यी कल नसो मानसाचा ।’ − भजनतरंगिणी ८३. ३. ऱ्हास, ओसरा, उतार यांचा आरंभ (दिवस, विकार, लहर, पूर, अतिरेक यांचा) (क्रि खाणे, पडणे.) : ‘कांहीं कालापूर्वी सुधारणा ऐन शिखरास जाऊन पोंचल्याचें जें मान दिसत होतें त्यास आता कल पडून लोकांच्या मनानें उलट खाल्याची चिन्हें दृष्टीस पडूं लागलीं आहेत’ - निमा ४९०. ४. पातळीचा तिरपेपणा, तिरकसपणा : ‘क्षितिज पातळीशीं उतरणीची सपाटी जो कोन करते त्यास उतरणीचा कल म्हणतात.’ - यंस्थि ९६. ५. मळसूत्राचा तिरपेपणा, चढ, वळण. ६. वळण; रोख; झोक. (क्रि. धरणे = गाडीचे एक चाक खाली व एक चाक उंच झाले असताना उंच झालेल्या चाकाला हात देणे, तोल सांभाळणे) [सं. कल्‌=प्रवृत्त करणे.] (वा.) कल पाहून वागणे - १. एखाद्याच्या तब्येतीप्रमाणे, मर्जीप्रमाणे, हलकेपणा स्वीकारून वागणे; वारा वाहील तशी पाठ देणे. २. प्रसंगी धोरण किंवा योग्यायोग्य विचार पाहून त्याप्रमाणे वागणे. कल बसणे - धोका, धक्का बसणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कल

पु. १ ओघ; ओढा; प्रवृत्ति; झोंक २ (ल.) मनाचा किंवा इच्छेचा ओढा; बुद्धीची किंवा स्वभावाची प्रवृत्ति; चित्त- वृत्तीचा ओघ; रोंख. 'असत्कार्यीं कल नसो मानसाचा ।' -भज- नतरंगिणी ८३. ३ र्‍हास, ओसरा, उतार यांचा आरंभ (दिवस, विकार, लहर, पूर, अतिरेक, यांचा). (क्रि॰ खाणें, पडणें) 'कांहीं कालापूर्वीं सुधारणा ऐन शिखरास जाऊन पोंचल्याचें जें मान दिसत होतें त्यास आतां कल पडून लोकांच्या मनानें उलट खाल्याचीं चिन्हें ...दृष्टीस पडूं लागलीं आहेत...' -नि ४९०. 'एकाच पारड्यांत सगळें वजन पडलें म्हणजे जशी तराजूची दांडी एकाच बाजूस कल खाते ...' -नि ४३९. ४ पातळीचा तिरपेपणा, तिरकसपणा (इं.) इंक्लिनेशन ऑफ दि प्लेन. 'क्षितिज पातळीशीं उतरणीची सपाटी जो कोन करिते त्यास उतरणीचा कल म्हणतात.' -यंस्थि ९६. ५ मळसूत्राचा तिरपेणा, चढ, वळण; (इं.) अँगल ऑफ दि स्क्र्यू; मळसूत्राचा कल. -यंस्थि १०१. ६वळण; रोंख; झोंक (क्रि॰ धरणें = गाडीचें एक चाक खालीं व एक चाक उंच झालें असतां उंच झालेल्या चाकाला हात देणें; तोल सांभाळणे). [सं. कल् = प्रवृत्त करणें] ॰पाहून वागणें- (वाप्र.) एखाद्याच्या तब्बेतीप्रमाणें, मर्जीप्रमाणें हलकेपणा स्वीकारून वागणें; वारा वाहील तशी पाठ देणें. २प्रसंगीं धोरण किंवा योग्यायोग्य विचार पाहून त्याप्रमाणें वागणें.

दाते शब्दकोश

कटाक्ष      

पु.       १. डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाहणे (साभिप्रायाने); अपांगदर्शन; अपांगदृष्टी; डोळा घालणे, डोळा मारणे; वाकडी दृष्टी : ‘काय चंचळु मासा । कामिनीकटाक्षु जैसा ।’ – ज्ञा १४·१७०. २. (ल.) व्यंग्यार्थाचे भाषण; छद्मीपणा; उपरोधिक भाषणाचा रोख. ३. क्रोधदृष्टी; गैरमर्जी; राग; वैर; कलह. ४. मुद्दा; रोख; कल; प्रवृत्ति, (वा.) कटाक्ष वाढणे– वैर निर्माण होणे : ‘राजेश्री मुरारराव याचे व मुसाफरखानाचे कटाक्ष वाढले.’ – पेद २८. १७९. कटाक्ष मिटणे – भांडण संपणे : ‘लक्ष्मीबाई शिंदे व अलिजाबहादर यांचे कटाक्ष मिटत नाही.’ – ऐलेसं ५७५६. कटाक्ष लागणे– भांडण लागणे : ‘जाबतेखान शुक्रतालास आहेत…. त्याचा कटाक्ष लागला आहे.’ – पेदभा २९·८९. ५. मुद्दा; जोर; रोख; कल; प्रवृत्ती : ‘गीतेचा सर्व कटाक्ष याच तत्त्वावर आहे.’ – लोटिकेले ४·५२३. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खोड      

स्त्री.       वाईट प्रवृत्ती, कल; वाईट सवय, चाल; अवगुण; लहर; तबियत; रग. [सं. कोडी] (वा.) खोड ठेवणे - दोष ठेवणे किंवा शोधणे; नावे ठेवणे; छिद्रे बाहेर काढणे किंवा बघणे. खोड मोडणे - ताठा, गर्व कमी करणे; खोडकी जिरवणे; एखाद्याच्या वाईट प्रवृत्ती, सवयी, ओढी त्याला टाकायला लावणे, सोडविणे, घालविणे किंवा त्यासाठी कडक शिक्षा करणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

प्रवाह

पु. १ जल, वायु, अग्नि इ॰ची गति किंवा एका दिशेकडे गमन; ओघ; वाहणें. जसें:-जल-उदक-रक्त-दुग्ध- प्रवाह. २ (ल.) कामाकाजाची सरणी, ओघ. ३ भाषणाचा अखंड- पणा; अकुंठित ओघ. ४ कामधंदा; उद्योग; हालचालीचें जीवन. ५ (प्रेम, बुद्धि इ॰चा) कल; झोक; प्रवृत्ति. ६ ओढ; पक्षपात; प्रवृत्ति; धांव. [सं.] प्रवाहांत पडणें-जनसमुदायाच्या वर्तना- प्रमाणें किंवा रूढीप्रमाणें वागणें. सामाशब्द- ॰पतित-वि. (शब्दशः व ल.) प्रवाहांत पडलेला; प्रवाहाप्रमाणें जाणारा; परिस्थितीप्रमाणें वागणारा; गतानुगतिक. 'या कर्मभूमींत कर्म निसर्गतः प्रवाहपतित असून अपरिहार्य आहे.' -ठिसू ५०. ॰पतित कर्तव्य-न. ओघाओघानें आलेलें कार्य; प्रसंगोपात्त कर्म. 'हें प्रवाहपतितकर्तव्य करीत असतां त्यांत कोणास दुखवावें लागल्यास त्याची जबाबदारी आमच्यावर येत नाहीं.' -टि ३. २९२. प्रवाहित्व-न. वाहतें राहण्याचा धर्म; द्रवता; जलरूपता. प्रवाही-वि. वाहणारें; पातळ; द्रवरूप. [सं.] ॰खत-न. जनावराचें मूत्र. प्रवाहे मूत्रित-वि. १ वाहत्या पाण्यांत मुतलेलें. २ (ल.) व्यर्थ, निष्फल केलेली (खटपट, काम, प्रयत्न इ॰). ॰वायु-पु. द्रवरूप, जलरूप वायु. (इं.) लिक्विड गॅसेस.

दाते शब्दकोश

खोड

स्त्री. १ वाईट प्रवृत्ति, कल; वाईट संवय, चाल; अव- गुण; लहर; तबियत; रग. म्ह॰ १ जित्याची खोड मेल्यावांचून जात नाहीं.' २ 'जी खोड बाळा ती जन्मकाळा' २ अयब; व्यंग; दोष; गोम (घोडा इ॰ जनावराची. घोड्याच्या ७२ खोडी सांगि- तलेल्या आहेत). म्ह॰ 'एक गोरी बहात्तर खोडी चोरी' ३ दोष; बिंग; चूक; अशुद्धता (भाषण, बोलणें यांतील); गोम; तडा; फूट (जिन्नसातील). ४ चोखंदळपणा; लहर; तबियत; मिजाज. म्ह॰ 'दरिद्र्यास खोड असूं नये.' ५ कलंक; डाग; काळिमा. [सं. कूट; म. खोट; का. कोडी = न्यूनता] (वाप्र.) ॰काढणे- १ खिजविणें; चेतविणें; बाहेर काढणें (गुप्त वैर, दुष्टपणा). २ वाटेस जाणें; खोडी करणें. 'वाघाची खोड काढूं नये.' ३ दोष काढून टाकणें. ॰काढणें-करणें-लहानसहान उपद्रव देणें; खाज- विणें; चेतविणें; चिडविणें; राग आणणें. ॰ठेवणें-दोष ठेवणें किंवा शोधणें; नांवें ठेवणें; छिद्रें बाहेर काढणें किंवा बघणें. ॰मोडणें- ताठा, गर्व कमी करणें; खोडकी जिरविणें; एखाद्याच्या वाईट संवई, प्रवृत्ति, ओढी त्याजकडून टाकविणें, सोडविणें, घालविणें; किंवा त्यासाठीं कडक शिक्षा करणें. सामाशब्द-॰कर-वि. १ चेष्टे- खोर; टवाळ; खोड्यांनीं परिपूर्ण. २ वाईट संवयी, चाली, व्यंगें, दोष असणारा. ३ मिजाजखोर; लहरी; तबियती. ॰खत-स्त्री. दोष व वंश; अवगुण व बिजवट; आचारकुळि. (क्रि॰ पहाणें; विचा- रणें; पुसणें). -पु. चाबुकस्वार किंवा गुरेंढोरें विकणारा. [खोड + अर. खत] ॰सर-सा, खोडसाळ-वि. खोडकर. खोटसाळ पहा.

दाते शब्दकोश

मन

न. १ चित्त; चित्शक्ति; बुद्धि, विचार, तर्क, स्मृति इ॰ चें अधिष्ठान; अंतःकरणचतुष्टय आणि अंतःकरण पंचक पहा. २ अंतःकरण; हृदय; भाव, रस, विकार इ॰ चें अधिष्ठान; सुखदुः खादिकांचें ज्ञान करून देणारें इंद्रिय. ३ सदसद्विवेकबुद्धि; बरें- वाईट समजण्याची शक्ति; अंतर्याम. 'ज्यांचे मन त्यास ग्वाही देतें.' ४ जाणीव; आत्मबोध; भान; सावधपणा; शुद्धि. ५ संकल्पवि- कल्पात्मक अंतःकरणवृत्ति; इच्छा; निश्चयाशक्ति. 'संकल्प विकल्प तेंचि मन ।' -दा १७.८.६. ६ आवड; अंतःकरणाची ओढ, प्रवृत्ति; खुषी; मर्जी. ७ माया ८ प्रेम; लक्ष. [सं.] 'तुजवरिमन ईंचे यापरी कां इयेला ।' -र ४२. ९. ध्यान. म्ह॰ १ मनीं वसें तें स्वप्नीं दिसे. २ मन राजा, मन प्रजा. ३ मनांत एक, जनांत एक. ४ मनांत मांडे, पदरांत धोंडे. ५ मनीं नाहीं भाव, देवा मला पाव. ६ मनीं वसे तें स्वप्नीं दिसें. ७ मान जना, अपमान मना. ८ मन जाणे पापा माय जाणे मुलाचे बापा. ९ मनास मानेल तो सौदा. (वाप्र.) ॰उठणें-उडणें-आवडेनासा होणें; कंटाळा, तिटकारा, वीट येणें. 'ह्या सखलादी अंगरख्यावरून अलीकडे माझें मन उडालें आहे.' ॰कांपणें-दुःख होणें; भीति वाटणें. 'व्यूढोरस्कादिक नव मेले, मन कांपतें कथायाला ।' -मोभीष्म ९.६२. ॰खचणें- कचरणें-हिंमत सुटणें; हातपाय गळाठणें. ॰खाणें-आपण केलेल्या वाईट कृत्याबद्दल स्वतःलाच वाईट वाटणें; टोंचणी लागणें; पश्चात्ताप होणें. ॰गडबडणें-भीतीनें भरणें; गांगारणें; घाबरणें 'गडबडतें मन वेडें, माणुस मीं मीं म्हणोनि बडबडतें ।' -मोशल्य ४.४९. ॰घालणें-देणें-लावणें-मन एकाग्र करणें; लक्ष लावणें. ॰जाणें-इच्छा होणें. ॰तुटणें-मनांत कंटाळा, अप्रीति उत्पन्न होणें; मन पराङ्मुख होणें. म्ह॰ तुटलें मन आणि फुटलें मोतीं सांधत नाहीं. ॰थोड्यासाठीं निसरडें करणें-क्षुल्लक फायद्या- साठीं निश्चयापासून पराङ्मुख होणें. ॰दुग्ध्यांत पडणें-संशयांत पडणें; गोंधळणें. 'आतां माझें मन दुग्ध्यांत पडलें.' -बाळ २.१९५. ॰धरणें-१ एखाद्याच्या मनाप्रमाणें वागणें. २ हांजी हांजी करणें. 'आदर देखोनि मन धरी । कीर्तीविण स्तुती करी ।' -दा २. १०.२५. ॰पाहणें-मनाची परिक्षा करणें; (एखाद्याच्या) मनाचा कल अजमावणें; एखाद्याचे विचार त्याचें भाषण, वागणूक इ॰ वरून ठरविणें. ॰बसणें-लागणें-(कांहीं गोष्ट करावयास) अनु- कूल होणें; अतिशय आवडणें; आसक्त होणें; प्रिय वाटूं लागणें. 'नको कचा मज टाकुनि जाऊं, तुजवरि मन हें बसलें रे ।' ॰मनाविणें-मन वळविणें; मर्जी संपादणें; अनुकूल करून घेणें. ॰मानेल तसें करणें-इच्छेस येईल तसें करणें; स्वैर वर्तन करणें; स्वच्छंदानें वागणें. ॰मारणें-इच्छा मारणें; इच्छा दाबून ठेवणें. ॰मिळणें-उभयतांच्या आवडीनिवडी सारख्या असणें. 'स्त्री- पुरुषांचीं मनें मिळालीं नाहींत तर त्यांचा संसार सुखावह होऊं । शकत नाहीं.' ॰मुंडणें-इच्छा नाहींशी करणें. 'आधीं मन मुंडा व्यर्थ मुंडितां मुंडा ।' -मृ ६५. ॰मोठें करणें-उदारपणा दाखविणें; थोरपणानें वागणें. ॰मोडणें-एखाद्याची आशा विफल करणें; एखाद्याच्या इच्छेविरुद्ध वागणें; दुःख देणें. 'जयाचेनि शब्दें मन मोडे । तो एक पढतमूर्ख ।' -दा २.१०.६. ॰विटणें-कंटाळा, वीट येणें. 'बहुवीरक्षय घडला, तेणें बहुजीवितास मन विटलें ।' -मोभीष्म ११.७४. मनांत आणणें-संकल्प, निश्चय करणें; मना- वर घेणें. मनांत (मनीं) कढविणें-मनांतल्या मनांत रागानें चूर करणें. जळफळावयास लावणें. 'निजतेजें भानुला मनीं कढवी ।' -मोविराट ३.१२०. मनांत (मनीं) कालवणें-अंतःकरणांत अति शय कष्टी होणें; अतिशय दुःख होणें. 'बहुत दुःख मनीं जरिं कालवें । भिउनि ह्यास तयास न बोलवे ।' मनांत गांठ ठेवणें-मनांत वैरभाव, द्वेषबुद्धि, सूड घेण्याची इच्छा जागृत ठेवणें; अढी धरणें. मनांत गांठ बांधणें-घालणें-नीट ध्यानांत धरून ठेवणें; मनांत गोष्ट पक्की ठेवणें. मनांत चरचरणें-मनास काळजी, भीति वाटणें; दुःख होणें. मनांत ठेवणें-एखादी गोष्ट गुप्त राखणें; वाच्यता न करणें. मनांत नवमण जळणें-मनांतल्या मनांत संतापणें; मनांत द्वेष, सूड घेण्याची इच्छा जागृत ठेवणें. मनांत भरणें-पसंत पडणें; आवडणें. मनांत (मनीं) मांडे खाणें- व्यर्थ मनोरथ करणें; मनोराज्य करणें. मनांत (मनीं) म्हणणें-स्वगत बोलणें; स्वतःशीं पुटपुटणें. मनांतल्या मनांत जळणें-आंतल्या आंत जळफळणें; रागानें धुसमत राहणें. मनांतून उतरणें-आवडेनासा होणें; कंटाळा, वीट येणें. मनानें करणें- (कोणाची सल्ला न घेतां) स्वतःच्या विचारानें करणें. मनानें घेणें-मनाचा ग्रह होणें; मत बनणें. मनाला द्रव येणें-मनांत दया, प्रेम इ॰ कोमल भावना उत्पन्न होणें. मनाला लावून घेणें-अतिशय दुःख वाटणें. 'कल्पनेला सुचतील त्या गोष्टी मनाला लावून घेत बसले म्हणजे खाल्लेलं अन्न सुद्धां अंगीं लागा- यचं नाहीं.' -एक ४३. मनावर घेणें-धरणें-एखादी गोष्ट पत्करणें; तींत मन घालणें; सिद्धिस नेण्यास झटणें. 'झटता तुझा सखा तरि होतें हित, परि न हा मनावरि घे ।' -मोभीष्म ३.३. मनावर लिहून ठेवणें-कायमची आठवण ठेवणें; स्मृति- पटलावर कोरून ठेवणें. मनास (मनां) आणणें-१ लक्ष देणें; मानून घेणें. 'आम्ही वेडें बगडें गातों मनाशीं आणा ।' -ऐपो १४२. २ समजून घेणें. 'म्हणे पैल ते कोण ललना । कां तप करिते आणीं मना ।' -ह २६.२९. ३ मनावर घेणें; महत्त्वाचें मानणें; 'मी रागाच्या वेळीं बोललों तें मनास आणूं नका.' मनास येणें-वाटणें-आवडणें; पसंत पडणें. 'वारूबाई! पाहिलीस कां भावजय? येते का मनास?' -पकोघे. मनीं ठेवणें-गुप्त ठेवणें. 'चाल पुरा, हें मनींच ठेवून ।' -मोविराट ६.५२. मनीं जाण होणें-ओळखणें; जाणणें. मनीं धरणें-वागविणें-लक्ष्यांत असूं देणें. 'ह्यालागीं तुम्हाशीं बोधिलें । मनीं धराल म्हणोनिया ।' मनींमानसीं-मनोमानसीं-मनोमनी नसणें-(एखादी गोष्ट) अगदी मनांत देखील आलेली नसणें; स्वप्नींहि नसणें. मनो मन(य) साक्ष-१ मन मनाची साक्ष देतें. ज्यांना परस्परांविषयीं तिटकारा किंवा प्रेम वाटतें अशा मनुष्यास उद्देशून योजतात; एखाद्या गोष्टीबद्दल एकमेकांचे विचार एकमेकांना अंतर्मनाने कळतात या अर्थीं. २ मन स्वतःसाक्षी आहे; स्वतःच्या मनांतील अभिप्राय, उद्देश, भाव इच्छा इ॰ स्वतःस माहीत असतात. साधित शब्द.- मनाचा-वि. मनासंबंधीं; अंतःकरणाचा. मनाची आशा- ओढ-धांव-स्त्री. मनाचा कल, रोंख. सामाशब्द- ॰उथळा- वि. मोकळ्या मनाचा, साधा; छक्केपंजे न जाणणारा. ॰ओळख- स्त्री. एखाद्याच्या मनाची परीक्षा; स्वभावाविषयीं बनविलेलें मत. 'कोणाशीं वाईट बोलूं नये. कां? तर मनओळख होते.' ॰कपटी- वि. दुष्ट अंतःकरणाचा; लबाड. मनःकल्पित-वि. कल्पनेनें, तर्कानें केलेलें; काल्पनिक. मनकवडा-पु. दुसऱ्याचें मन वेधून घेण्याची शक्ति. 'मन माझें मोहिलेंस नकळे आहे तुझ्यापशीं मन- कवडा ।' -प्रला १६१. -वि. दुसऱ्याच्या मनांतील विचार ओळखणारा. ॰कामना-स्त्री. अंतःकरणांतील इच्छा. [मन + कामना] ॰कुजका-वि. हलक्या मनाचा; दुष्ट; विश्वासघातकी. मनःकृत- करणाचा. मनखोडी-स्त्री. मनोविकार. 'देवनाथ तुज हात जोडि मनखोडी सकळ सांडी ।' -देप ६३. मनच्या मनीं-क्रिवि. मनांतल्या मनांत; आपलें म्हणणें काय आहे हें न सांगतां. ॰गाडून-क्रिवि. मन लावून; अंतःकरणपूर्वक; एकाग्रतेनें. ॰देवता-स्त्री. अंतःकरणांतील देवता. १ मन; अंतःकरणांतील तर्क, आशा इ॰ ची प्रेरक शक्ति (क्रि॰ लवणें; वाहणें). 'यंदा सस्ताई होईल कीं महागाई? तुमची मनदेवता कशी लवते?' २ सदसद्विवेकबुद्धि; न्यायबुद्धि. ॰धरणी-स्त्री. मर्जी संपादन करणें; आर्जव; खुशामत. (क्रि॰ करणें) ॰धरणीचा-वि. दुस- ऱ्याचीं आर्जवें, खुशामत करण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा; मर्जी संपादणारा. ॰पाकुळका, मनाची पाकुळका, मन- पिंगळा-ळी-स्त्री. बऱ्यावाईट गोष्टी करण्याची प्रेरणा करणारी मनांतील देवता; मनोदेवता. मनःपीडा-स्त्री. मानसिक त्रास; दुःख, काळजी इ॰. मनःपूत-क्रिवि. (मनाला जें पवित्र, शुद्ध वाटतें त्याप्रमाणें) मनास येईल तसें; वाटेल तसें. 'कोणी वाटेल तें भलभलतें करूं लागला म्हणजे तो मनःपूत वागतो असें आपण म्हणतों.' -गीर १२५. म्ह॰ मनःपूतं समाचरेत् । मनःपूर्वक- क्रिवि. १ मनापासून २ जाणून बुजून; मुद्दाम. मनःप्रिय-वि. मनाला आनंद देणारें; समाधानकारक. मनभाव-पु. उत्सुकता; श्रद्धा; भक्ति; मनोभाव. 'मनभाव असल्यावांचून कार्य सिद्धिस जात नाहीं.' [सं. मनोभाव] ॰भूक-स्त्री. काल्पनिक, खोटी भूक; नेहमीच्या सरावामुळें वाटणारी भूक. ॰भोळा-वि. साधा; गरीब; निष्कपटी. ॰मन-स्त्री. (व) मनधरणी; खुशामत; आर्जव. ॰मानेसें-क्रिवि. मनास वाटेल तसें; मनःपूत. 'वर्तति मनमानेसें सुरतपदा अपतिका स्त्रिया बटकी ।' -मोसभा ६.२०. ॰मान्य- वि. स्वेच्छाचारी; स्वच्छंदी; बेताल. ॰मिळाऊ-वि. सर्वांशीं मिळून मिसळून राहणारा; गोड स्वभावाचा. ॰मुक्त-क्रिवि. यथेच्छ; अमर्यादपणें; मनमुराद; मनाची इच्छा पूर्ण होईपर्यंत. ॰मुराद- वि. १ मनोहर; आल्हादकारक; आनंददायक. २ विपुल; यथेच्छ; मनसोक्त; मनाची तृप्ति होईल इतकें (जेवणांतील पक्वान्न) [अर. मुराद = ईप्सित] ॰मेळ-वि. १ आवडतें; प्रिय; मनोहर. २ शास्त्र इ॰ चा फारसा विचार न करतां दोन्ही पक्षांच्या संमतीनें झालेलें (लग्न). ॰मोकळ-वि. खुल्या दिलाचा; सरळ; निष्कपट. ॰मोकळें करून-क्रिवि. खुल्या अंतःकरणानें; संकोच, भीति, लाज इ॰ सोडून. ॰मोठा-वि. १ उदार अंतःकरणाचा. २ उदार; सढळ; मोकळ्या हाताचा. ॰मोड-स्त्री. हिरमोड; निराशा. 'नको करूं मनमोड ।' -पला २२.४. ॰मोहतिर-न. मनाचा, मनानें ठरविलेला मुहूर्त; ॰मोहन-वि. मनाला खुष करणारा; रमणीय; आवडता; प्रिय. 'मनमोहन यादवराणा । कोणी जाउनि आणा ।' ॰मौज-स्त्री. १ गमतीचा विचार, कल्पना. २ लहर; नाद; छंद. ॰मौजा-करणें-स्वःच्या (रंगेल, अनिर्बंध) इच्छा तृप्त करणें. ॰मौजी-ज्या-वि. १. लहरी; छांदिष्ट; चंचलबुद्धि. २. मिजास- खोर; दिमाखी. ॰लज्जा-स्त्री. स्वाभविक, नैसर्गिक लाज; मनो- देवतेची टोंचणी; भीति; शरम; शिष्टाचार; संभावितपणा. 'तुला मनलज्जा नाहीं जनलज्जा तर धर.' ॰वळख-स्त्री. मनओळख पहा. ॰मनश्शांति-स्त्री. मनाची शांतता. ॰मनःसंतोष-पु. मनाचें समाधान; मनास होणारा आनंद. मनसमजावणी-समजा वशी-स्त्री. रागावलेल्या, दुःखी, सचित माणसाचें सांत्वन, समा- धान करणें. ॰समजूत-स्त्री. ग्रह; मत; समज; भावना. 'सर्व मनुष्यांची मनसमजूत एकसारखी असत नाहीं.' ॰समर्पण-न. (काव्य) मन अर्पण करणें. मनसाराम-पु. (विनोदानें) मन. 'मनसारामाचे स्वाधीन सर्व इंद्रियें आहेत.' ॰सुटका-स्त्री. मन एखाद्या गोष्टीपासून परावृत्त होणें. ॰सूत्र-न. इच्छानुरूप सत्ता चालविणारें, वागणारें, मन. ॰सोक्त-क्रिवि. यथेच्छ; स्वैर; स्वच्छंद. मनःपूत पहा. 'पशुपक्षी यांचा मनसोक्त व्यवहार आहे.' ॰सोद्दिष्ट-वि. मनांत योजिलेलें, ठरविलेलें, निश्चित केलेलें. मनस्तप्त-वि. १ दुःखदायक. २ अनुतापी; दुःखपीडित. मन- स्ताप-पु. (मनाला होणारा त्रास) दुःख; शोक; पश्चात्ताप; हुर- हुर; खिन्नता इ॰ मन(नः)स्थिति-स्त्री. १ मनाची स्थिति; मान- सिक अवस्था, भावना. २ मन. 'माझी मनस्थिति चंचल आहे.' ॰हलका-वि. दुर्बल; क्षुद्र मनाचा. ॰मनाकळित-वि. मनानें आकलन केलेलें. मनाजीपंत-पु. (विनोदानें) मन. मनाजोगा-वि. जसा हवा तसा; मनासारखा. मनापासून- क्रिवि. खरोखरी; बेंबीच्या देंठापासून; अतिशय; फार. मनापून- क्रिवि. खरोखरीं. मनायोग-ग्य-वि. क्रिवि. स्वेच्छेनें; मर्जीप्रमाणें. मना- सारखा-वि. इच्छेसारखा; आवडीचा; जसा पाहिजे तसा. मनुबाई-स्त्री. मन. मनेच्छ-च्छां-क्रिवि. मनसोक्त; यथेच्छ; मनाचें समाधान होईपर्यंत. 'नदी पुलिनी गंगातिरीं । क्रिडा करिती मनेच्छां ।' [मन + इच्छा] मनेच्छा-स्त्री. मनाची इच्छा; प्रवृत्ति, कल मनेप्सित-न. मनोवांछा; मनाची इच्छा. -. -वि. मनानें इच्छिलेलें; मनोवांछित. [मन + ईप्सित्] मनोगत-न. मनीषा; हेतु; उद्देश; विचार; इच्छा. 'श्रीकृष्णवासातें वांछिती । जाणे श्रीपती मनोगत ।' -एरुस्व १५.१३८. -वि. मनांत असलेलें; ठरविलेलें. 'कुंभाराचा मनोगत जो आकार असतो तो घटावर उत्पन्न होत असतो.' मनोगति-स्त्री. १ मनाची वृत्ति, क्रिया, विचार. २ मनाचा, विचाराचा प्रवेश, पोंच; मनाची धांव; आक- लन. ३ इच्छेचा कल, प्रवृत्ति. 'हा आपल्या मनोगतीनें चालतो- वागतो-करतो.' -वि. मनाप्रमाणें वागणारा, चालणारा; विचारा- प्रमाणें चंचल. -क्रिवि. मनाच्या गतीप्रमाणें; अतिशय, कल्पना- तीत वेगानें. 'आला गेला मनोगती ।' -मारुतिस्तोत्र. मनोगम्य- वि. मनाला जाणतां येण्यासारखें; मनानें आकलन होण्या- सारखें. मनोज-पु. मदन; काम. 'मनोज मध्यस्थ करूं निघाला । ' -सारूह २.६०. मनोजय-पु. मनाचा जय; आत्मनिग्रह; मनो- निग्रह. 'तैसा मनोजयें प्रचारु । बुद्धीद्रियांचा ।' -ज्ञा १६.१८४. मनोजव-वि. मनाच्या गतीनें जाणारा; फार त्वरेनें जाणारा. मनोत्साह-पु. मानसिक उत्साह; आनंद; आवड. 'ज्याचा जसा मनोत्साह तसें तो करितो.' मनोदय-पु. १ हेतु; विचार; आशय. २ इच्छा कल, प्रवृत्ति. मनोद्देश-पु. मनांतील योजना, हेतु, बेत, विचार. मनोधर्म-पु. १ (प्रेम, द्वेष, काम, क्रोध, मत्सर इ॰) अंतःकरणाची भावना, विकार. 'न निघे मनोधर्मीं । अरोचक ।' -ज्ञा १८.६५७. २ मनाची शक्ति (विचार, कल्पना, सदसद्विवेकबुद्धी इ॰). ३ (सामा.) चित्तवृत्ति; मनोगुण. 'आहार मिळाल्या उत्तम । हरिखेजेना मनोधर्म ।' -एभा १८.२३६. ४ मनाचा चंचलता. 'तंव आंतु त्राय मोडे । मनोधर्माची ।' -ज्ञा ६.२११. ५ हेतु; बेत; विचार -वि. मनोगतीप्रमाणें वागणारा. 'सहचरु मनोधर्मु । देवाचा जो ।' -ज्ञा १७.३३. मनोधारण- णा-नस्त्री, मन राखणें; मनधरणी. मनोनिग्रह-पु. मनाला ताब्यांत ठेवणें; मनोजय; संयमन. मनोनीत-वि. मनानें पसंत केलेलें, स्वीकारिलेलें. मनोनुकूल-वि. एखाद्याच्या मनाप्रमाणें; मनाला पसंत पडण्यासारखें. मनोनुभूत-वि. मनानें अनुभविलेलें, सहन केलेलें, उपभोगिलेलें मनोभंग-पु. इच्छा बेत, आशा इ॰ फलद्रूप न होणें; निराशा. मनोभव-पु. १ मदन; काम. २ कामेच्छा; विषयेच्छा. मनोभाव-पु. १ हेतु; विचार. २ भक्ति; श्रद्धा. ३ प्रीति. मनोभावें, मनोभावें करून, मनोभावा- पासून, मनोभावानें-क्रिवि. अंतःकरणपूर्वक; मनापासून; श्रद्धेनें. 'मनोभावें ईश्वराची सेवा करावी.' मनोभिराम-वि. मनाला तुष्ट करणारा; आनंददायक; मोहक; चित्ताकर्षक. 'तेव्हां तरी तारकशक्ति राम । देईल आम्हासि मनोभिराम ।' मनोमय-वि. मनःकल्पित; काल्पनिक; अंतःकरणांतील; मानसिक. मनोमय- कोश-पु. चैतन्याच्या पांच (अन्न-प्राण-मन-विज्ञान-आनंद) कोशांपैकीं तिसरा. पंचकोश पहा. मनोमयसत्यवाद-पु. एकाच वस्तूविषयीं निरनिराळ्या लोकांच्या मनांत सारख्याच कल्पना असतात असें मत; सादृश्यवाद. (इं.) कन्सेप्च्युअ/?/लिझम्. -नीति ४०६. मनोयोग-पु. मन लागणें; लक्ष्य; अवधान. मनोयोग्य- वि. मनपसंत; समाधानकारक; संतोषकारक. मनोरंजक-वि. मनाला रमविणारें; करमणूक करणारें; चित्ताकर्षक. मनोरंजन- न. १ करमणूक; गंमत; मौज. २ मनास वाटणारा आनंद, उल्हास. मनोरथ-पु. इच्छा; बेत; हेतु; उद्देश; योजना. 'तोषूनियां वैकुंठनायक । मनोरथ पूर्ण करील ।' -व्यं ५. मनोरथ-सृष्टी- स्त्री. मनोराज्य; काल्पनिक सृष्टि. मनोरम-वि. १ मनाला रम- विणारें; मोहक. २ आनंददायक; संतोषकारक; मनोरमा-स्त्री. १ सुंदर स्त्री. २ (संकेतानें) बायको; पत्नी. मनोराज्य-न. भावी उत्कर्षाविषयींचे कल्पनातरंग; हवेंतील मनोरे. मनोविकार, मनोविकृति-पुस्त्री. मनांत उद्भवणारे कामक्रोधादि विकार प्रत्येकीं; भावना; मनोवृत्ति. मनोवृत्ति-स्त्री. १ मनाची स्थिति; चित्तवृत्ति; स्वभाव. २ मनाचा व्यापार; विचार, भावना, विकार इ॰ 'ह्या मनोवृत्ति देवपरायण झाल्या.' मनोवेग-पु. मनाची गति; अत्यंत जलद गति. मनोगति पहा. 'मनोवेगें तात्कालीं । पातले विश्वेश्वराजवळी ।' -गुच ४१.१५७ मनोवेद्य-वि. मनानें, अंतःकरणानें जाणतां येण्याजोगें. मनोव्यापार-पु. मानसिक संकल्पादि व्यवहार; विकार, विचार इ॰ मनोहत-वि. निराश; हताश. मनोहर-पु. व्यंकोबाचा प्रसाद (नैवेद्य) -तीप्र २५२. -वि. मोहक; आल्हादकारक; रमणीय; सुंदर. मनोहारी, मनोज्ञ-वि. चित्ताकर्षक; रमणीय; सुंदर; मोहक. मनौनि-क्रिवि. मनापासून; मनांतून 'तैसें मनौनि धनवरी । विद्यमानें आल्या अवसरी ।' -ज्ञा १६.८७. मनौरें-रा-न.पु. मनाची इच्छा. 'कां जे लळेयाचे लळे सरती । मनोरथांचे मनौरे पुरती ।' -ज्ञा ९ ३. बरव्या मनानें-क्रिवि. शुद्ध मनानें; चांगल्या, प्रामाणिक हेतूनें. 'सीता स्वयंवर असें बरव्या मनानें अवलक्षुनि शास्त्र अव- लोकिलें.' मोकळ्या मनानें-क्रिवि. खुल्या दिलानें; स्वतःचें मन, हेतु, भावना इ॰ स्पष्ट रीतीनें सांगून; मन मोकळें करून.

दाते शब्दकोश

धर्म

पु. १ धार्मिक विधियुक्त क्रिया, कर्में; परमेश्वरासंबं- धीचें कर्तव्य; ईश्वरोपासना; परमेश्वरप्राप्तीचीं साधनें; परमेश्वरप्रा- प्तीचा मार्ग, पंथ. 'करितो धारण यास्तव धर्म म्हणावें प्रजांसि जो धरितो ।' -मोकर्ण ४१.८१. २ मनुष्यप्राण्यास सदाचरणास लावणारें व परमेश्वरचिंतनाचा मार्ग दाखवून देणारे ख्रिश्चन, यहुदी, हिंदु, इस्लामी वगैरे पंथ. 'मुख्यमुख्य नितितत्त्वांबद्दल सर्व धर्मांची एकवाक्यता आहे. '३ शास्त्रांनीं घालून दिलेले आचार, नियम; पवित्र विधी, कर्तव्यें. पंचपुरुषार्थांपैकीं एक. ४ दान; परोपकारबुद्धीनें जें कोणास कांहीं देणें, किंवा जें कांहीं दिलें जातें तें; दानधर्माचीं कृत्यें; परोपकारबुद्धि. 'अंधळयापांगळ्यांस धर्म करावा. ' 'महाराष्ट्रीयांपेक्षां गुजराथ्यांत धर्म अधिक.' ५ सद्गुण; शास्त्रोक्त वागल्यानें अंगीं येणारा नौतिक. धार्मिक गुण. 'कर्तव्यकर्म, नीति, नीतिधर्म किंवा सदाचरण यांसच धर्म असें म्हणतात. '-गीर ६५. ६ स्वाभाविक गुण; गुणधर्म; नैसर्गिक प्रवृत्ति. 'गाईनें दूध देणें हा गाईचा धर्म आहे.' 'पृथ्वीस वास येणें पृथ्वीचा धर्म. ' ७ कर्तव्यकर्म; रूढी; परंपरेनें, शास्त्रानें घालून दिलेला नियम उदा॰ दान करणें हा गुहस्थ धर्म, न्यायदान हा राजाचा धर्म, सदाचार हा ब्राह्मणधर्म, धैर्य हा क्षत्रिय धर्म. याच अर्थानें पुढील समास येतात. पुत्रधर्म-बंधुधर्म-मित्रधर्म-शेजार- धर्म इ॰ ८ कायदा. ९ यम. 'धर्म म्हणे साध्वि बहु श्रमलीस स्वाश्रमासि जा मागें ।' -मोविराट १३.६५. १० पांडवांतील पहिला. 'कीं धर्में श्वानू सरता । केला सर्वथा स्वर्गलोकीं ।' -एभा १.१०९. ११ धर्माचरणाचें पुण्य. 'ये धर्मचि, पुत्र स्त्री कोष रथ तुरग करी न सांगतें ।' -मोभीष्म ११.२६. १२ (शाप.) गुण- धर्म' स्वाभाविक लक्षण ' दोन किंवा अधिक पदार्थांचें एकमेकां- वर कार्य घडून त्यांपासून जेव्हां असा नवा पदार्थ उप्तन्न होतो कीं त्याचे धर्म मूळ पदार्थांच्या धर्मांपासून अगदीं भिन्न असतात, तेव्हां त्या कार्यास रसायनकार्य असें म्हणतात.' -रसापू १. (वाप्र.) धर्म करतां कर्म उभें राहणें-पाठीस लागणें-दुसर्‍यावर उपकार करावयला जावें तों आपल्यावरच कांहींतरी संकट ओढवणें. धर्मखुंटीस बांधणें- (जनावराला) उपाशीं जखडून टाकणें; ठाणावर बांधून ठेवणें. [धर्मखुंटी]धर्म जागो-उद्गा. (विशिष्ट गोष्टीचा संबंध पुन्हां न घडावा अशाविषयीं) पुण्य उभें राहो. धर्म पंगु-(कलियुगांत धर्म एक पायावर उभा आहे. त्याचें तीन पाय मागील तीन युगांत गेले. यावरून ल.)धर्म अतिशय दुबळा, अनाथ आहे या अर्थी. धर्माआड कुत्रें होणें- दानधर्माच्या आड येणार्‍याला म्हणतात. धर्माचा- १ धर्मासंबंधीं (पैसा, अन्न इ॰). २ मानलेला; उसना; खरा औरस नव्हे असा (पुत्र, पिता. बहीण इ॰). ३ फुकट; मोफत.'धर्माची राहण्याला जागा दिली आहे.' -पारिभौ २७. धर्माची वाट बिघडणें-मोडणें-एखाद्या दानधर्माचा ओघ थांबणें, थांबविणें. धर्माचे पारीं बसणें-१ दुसर्‍याचे पैसे खर्चीत रिकामटेकडें बसणें; धर्मावर काळ कंठणें. २ सद्गुणांचें चांगलें फल मिळणें; सदाचारामुळें चांगलें दिवस येणें. ३ सदोदित दानधर्म करणें. धर्मकृत्ये आचरणें.धर्मावर लोटणें- टाकणें-सोडणें-एखाद्याच्या न्यायबुद्धिवर सोंपविणें.धर्मा- वर सोमवार सोडणें-स्वतः झीज न सोसतां परभारें होईल तें पाहणें. -संम्ह. धर्मास-क्रिवि. (कंटाळल्यावरचा उद्गार) कृपा- करून; मेहेरबानीनें; माझे आई ! याअर्थीं. 'माझे रुपये तूं देऊं नको पण तूं एथून धर्मास जा ! ' 'मी काम करतों, तूं धर्मास नीज.' धर्मास भिऊन चालणें-वागणें-वर्तणें-करणें-धर्माप्रमाणें वागणें. धर्मास येणें-उचित दिसणें; पसंतीस येणें; मान्य होणें. 'मी तुला सांगायचें तें सांगितलें आतां तुझे धर्मास येईल तें कर.' म्ह॰ १ धर्मावर सोमवार = (दानधर्म करणें). कांहीं तरी सबबीबर, लांबणीवर टाकणें. -मोल. २ धर्माचे गायी आणि दांत कांगे नाहीं. ३ आज मरा आणि उद्यां धर्म करा. ४ धर्मादारीं आणि मारामारी. ५ धर्मस्य तत्वं निहितं गुहायाम् = धर्माचें रहस्य गुहेमध्यें ठेवलेलें असतें. (गुढ किंवा अज्ञेय असतें). धर्माचें खरें तत्त्व गहन, अगम्य आहे. ६ धर्मस्य त्वरिता गतिः = धर्मास विलंब लावूं नये या अर्थीं. सामाशब्द- ॰आई-माता-स्त्री. (ख्रि.) कांहीं चर्चेसमध्यें लहान मुलांचा बाप्तिस्मा होतो तेव्हां त्यांस ख्रिस्तीधर्मास अनुसरून वळण व शिक्षण देण्यांत यावें म्हणून त्यांच्या मातेहून भिन्न अशी जी स्त्री आपणावर जबाबदारी घेते ती. (इं.) गॉडमदर. 'प्रत्येक मुलीला एक धर्मबाप व दोन आया पाहिजेत.' -साप्रा ९०. ॰कर्ता-पु. १ धर्म करणारा; परोपकारी माणूस. २ न्यायाधीश; जज्ज. ३ (दक्षिण हिंदुस्थान) देवळाचा व्यवस्थापक, कारभारी. ॰कर्म-न. १ वर्तन; आचार; एखाद्याचीं कृत्यें. कर्मधर्म पहा. 'ज्याचें त्यास धर्मकर्म कामास येईल.' २ शास्त्रविहित कर्में, आचरण; धार्मिक कृत्यें. [सं. धर्म + कर्म] ॰कर्मसंयोग-पु. प्रारब्धयोग; कर्म- धर्मसंयोग पहा. ॰कार्य-कृत्य-न. धार्मिक कृत्य; परोपकाराचें कार्य; (विहीर, धर्मशाळा इ॰ बांधणें, रस्त्यावर झाडें लावणें; देवळें बांधणें; अन्नसत्रें स्थापणें इ॰). २ धार्मिक विधि, व्रत; धर्मसंस्कार. [सं.] ॰कीर्तन-धर्माचें व्याख्यान-प्रवचन-पुराण. 'किंबहुना तुमचें केलें । धर्मकीर्तन हें सिद्धि गेलें ।' -ज्ञा १८. १७९२. [सं.] ॰कुढाव-पु. (महानु.) धर्मरक्षक. 'कीं धर्म- कुढावेनि शाङ्र्गपाणी । महापातकांवरी सांघीतली सांघनी ।' -शिशु ३५. [धर्म + कुढावा = रक्षण] ॰खातें-न. १ धर्मासाठीं जो खर्च करितात त्याचा हिशेब ठेवणारें खातें; धार्मिक खातें. २ धर्मार्थ संस्था; लोकोपयोगी, परोपकारी संस्था. [सं. धर्म + खातें] ॰खूळ-वेड-न. धर्मासंबंधीं फाजील आसक्ति; अडाणी धर्म- भोळेपणा; धर्माबद्दलची अंधश्रद्धा. [म. धर्म + खूळ] ॰गाय- स्त्री. १ धर्मार्थ सोडलेली गाय. धर्मधेनु पहा. २ चांगली, गरीब गाय. 'कढोळाचें संगती पाहे । क्षणभरी गेलिया धर्मगाये ।' -एभा २६.४२. ॰ग्रंथप्रचारक-पु. (ख्रि.) ख्रिस्ती धर्म शास्त्र व तत्संबंधीं इतर पुस्तकें विकणारा, फेरीवाला; (इं.) कल्पो- र्चर. 'सदानंदराव काळोखे यांनीं एक तप धर्मग्रंथप्रचारकाचें काम मोठ्या प्रामाणिकपणें केलें.' [सं. धर्म + ग्रंथ + प्रचारक] धर्मतः- क्रिवि. धर्माच्या, न्यायाच्या दृष्टीनें; न्यायतः; सत्यतः; खरें पाहतां. ॰दान-न. दानधर्म; धर्मादाय. 'एक करिती धर्मदान । तृणास- मान लेखती धन ।' [सं.] ॰दारीं कुत्रें-न. परोपकाराच्या कृत्यास आड येणारा (नोकर, अधिकारी); कोठावळा. ॰दिवा दिवी-पुस्त्री. धर्मार्थ लावलेला दिवा. 'जे मुमुक्षु मार्गीची बोळावी । जे मोहरात्रीची धर्मदिवी ।' -ज्ञा १६.६५. ॰द्वार-न. कौल मागणें; ईश्वराला शरण येणें. [सं.] ॰धेनु-स्त्री. १ धर्मार्थ सोड- लेली गाय. 'ऐसेनि गा आटोपे । थोरिये आणतीं पापें । धर्मधेनु खुरपें । सुटलें जैसें ।' -ज्ञा १६.३२९. २ हरळी; दुर्वा. -मनको [सं.] ॰ध्वज-पु. १ धर्माची पताका; धर्मचिन्ह; धर्माचा डौल, प्रतिष्ठा; (क्रि॰ लावणें; उभारणें; उभविणें; उडणें). २ (ल) धर्माचा फाजील पुरस्कर्ता. [सं. धर्म + ध्वज] ॰ध्वजी-वि. धर्म- निष्ठेचा आव आणणारा ढोंगी-भोंदू माणूस. ॰नाव-स्त्री. येणार्‍या- जाणारानीं तरून जावें म्हणून नावाड्यास वेतन देऊन नदीवर जी धर्मार्थ नाव ठेवलेली असते ती; धर्मतर; मोफत नाव. [धर्म + नांव] ॰निष्पत्ति-स्त्री. कर्तव्य करणें; धर्माची संपादणूक. [सं.] ॰नौका-पु. धर्मनाव पहा. ॰न्याय-पु. वास्तविक न्याय; निःप- क्षपात, धर्माप्रमाणें दिलेला निकाल. 'तुम्ही उभयतांचें वृत्त श्रवण करून धर्म न्याय असेल तो सांगा.' [धर्म + न्याय] ॰पत्नी- स्त्री. १ विवाहित स्त्री. -ज्ञा १८.९४२. २ सशास्त्र (अग्निहोत्रादि) कर्माकरितां योग्य अशी प्रथम विवाहाची (दोन तीन पत्न्या असल्यास) ब्राह्मण स्त्री. [सं.] ॰पंथ-पु. १ धर्माचा, परो- पकाराचा, सदाचरणाचा मार्ग. 'सदां चालिजे धर्मपंथ सर्व कुमति टाकोनि ।' 'धर्मपंथ जेणें मोडिले । त्यास अवश्य दंडावें ।' २ धार्मिक संग, समाज. 'ख्रिस्तीधर्मपंथ.' [सं.] ॰परायण- वि. क्रिवि. १ परोपकारार्थ; धार्मिककृत्य म्हणून; धर्मासाठीं. २ धर्मार्थ; मोफत; (देणें, काम करणें). ३ पक्षपात न करतां; धर्मावर लक्ष ठेवून (करणें; सांगणें; बोलणें इ॰). 'धर्मपरायण बोलणारे पंच असल्यास धर्मन्याय होईल.' ॰परिवर्तन-न. (ख्रि.) धर्ममतें बदलणें; धर्मांतर. (इं.) कॉन्व्हर्शन. 'नारायण वामन टिळक यांचें १८९५ सालीं धर्मपरिवर्तन झालें.' [सं. धर्म + परिवर्तन] ॰पक्षी-पु. धर्मोपदेशक; पाद्री; पुरोहित. 'तो जातीचा धर्मपक्षी होता.' -इंग्लंडची बखर भाग १.२७२. [धर्म + पक्षी = पुरस्कर्ता] ॰पिंड-पु. १ पुत्र नसणार्‍यांना द्यावयाचा पिंड. २ दुर्गतीला गेलेल्या पितरांना द्यावयाचा पिंड. [धर्म + पिंड] ॰पिता-पु. धर्मबाप पहा. ॰पुत्र-पु. १ मानलेला मुलगा. २ उत्तरक्रियेच्या वेळीं पुत्र नसलेल्यांचा श्राद्धविधि करणारा तज्जा- तीय माणूस; धार्मिक कृत्यांत पुत्राप्रमाणें आचरणारा माणूस. 'धर्मपुत्र होऊनि नृपनायक ।' -दावि ४९१. ३ दत्तक मुलगा, इस्टेटीला वारस ठरविलेला. ॰पुरी-स्त्री. १ तपस्वी, विद्वान वगैरे ब्राह्मण ज्या क्षेत्रांत राहतात तें क्षेत्र; धार्मिक स्थल. २ ज्याच्या घरीं पाहुण्यांचा नेहमीं आदर सत्कार केला जातो तें घर; पाहुण्यांची वर्दळ, रहदारी असणारें घर. [सं.] ॰पेटी-स्त्री. धर्मादाय पेटी; धर्मार्थ पैसे टाकण्यासाठीं ठेवलेली पेटी. (देऊळ; सामाधि; धर्मार्थ संस्था वगैरे ठिकाणीं). [सं. धर्म + पेटी] ॰पाई- ॰पोवई-स्त्री. १ प्रवाशांसाठीं, गरिबांसाठीं अन्न पाणी वगैरे फुकट मिळण्याची केलेली व्यवस्था; धर्मार्थ अन्नोदक दान. २ अशी व्यवस्था जेथें केलेली असते तें ठिकाण; अन्नछत्र; धर्मशाळा. ॰प्रतिष्ठा-स्त्री. १ धर्माचा गौरव; सन्मान; डौल. २ धर्माची स्थापना. 'धर्मप्रतिष्ठा तो सिध्दु । अभयहस्तु ।' -ज्ञा १.१३. [सं.] ॰प्रधान-वि. १ धर्मरूप पुरुषार्थाविषयीं तत्पर; धार्मिक वृत्तीचा. २ धर्म ज्यांत प्रमुख आहे असा (विषय, हेतु इ॰). ॰बंधु-पु. मानलेला भाऊ; भावाच्या जागीं असणारा माणूस; स्वतःच्या धर्माचा अनुयायी; स्वधर्मीय. [सं.] ॰बाप-पु. (ख्रि) कांहीं चर्चेसमध्य लहान मुलांचा बाप्तिस्मा होतो तेव्हां त्यांस खिस्तीधर्मास अनु- सरून वळण व शिक्षण देण्यांत यावें म्हणून जबाबदारी घेणारा पित्याहून निराळा पुरुष. (इं.) गॉडफादर. 'ज्या प्रत्येक मुलाचा बाप्तिस्मा करावयाचा आहे त्याला दोन धर्मबाप व एक धर्मआई पाहिजे.' -साप्रा ९०. [धर्म + बाप] ॰बुद्धि-स्त्री. धर्म करण्याची मनाची प्रवृत्ति; धर्माचरणाविषयीं आस्था. 'या चोराला तुम्ही गरीब मानून घरीं जेवायला घालितां ही धर्मबुद्धि कामाची नव्हे.' [धर्म + बुद्धि] ॰भोळा-वि. १ धर्मावर अंधश्रद्धा असणारा, परम धार्मिक. २ (अनादरार्थी) धर्मवेडा; कट्टर सनातनी. (इं.) सुपरस्टिशस. 'बॅरिस्टर, या धर्मभोळ्या खुळचट लोकांत तुम्ही आपल्या वाईफला एक मिनिटहि ठेवणं म्हणजे तिच्या सगळ्या लाइफचं मातेरं करण्यासारखं आहे.' -सु ८. ॰भ्राता-पु. धर्म- बंधु पहा. ॰मर्यादा-स्त्री. धर्मानें घालून दिलेली मर्यादा, बंधन, शिस्त; धार्मिक नियंत्रण. [सं.] ॰मार्ग-पु. धर्माचा, सदा- चरणाचा, परोपकाराचा मार्ग. [सं.] ॰मार्तंड-पु. १ धर्माचा श्रेष्ठ अनुयायी; पुरस्कर्ता; धर्मभास्कर; एक पदवी. २ (उप.) धार्मिकपणाचें अवडंबर, ढोंग माजविणारा. 'भीतोस तूं कशाला, मोडाया हें सुधारकी बंड । आहोंत सिद्ध आम्हीं पुण्यपुरींतील धर्ममार्तंड ।' -मोगरे. ॰युद्ध-न. युद्धशास्त्राच्या नियमाप्रमाणें चाललेली लढाई; सारखें संख्याबल; सारख्या शस्त्राअस्त्रांनीं सज्ज अशा दोन पक्षांमधील न्यायीपणाचें युद्ध; न्याय्ययुद्ध; निष्कपट युद्ध. 'तों अशरीरिणी वदली उत्तर । धर्मयुद्ध नव्हे हें ।' -पाप्र ४५.३९. [सं] ॰राज-पु. १ यमधर्म. २ जेष्ठ पांडव, युधिष्ठिर युधिष्ठिर हा फार सच्छील असल्यामुळें त्याला धर्माचा अवतार सम जत. ३ (ल.) धर्मनिष्ठ, सात्त्विक मनुष्य ४ धर्माप्रमाणें भोळा- भाबडा माणूस. [सं.] ॰राजाची बीज-स्त्री. कार्तिकशुद्ध द्वितीया; भाऊबीज; यमद्वितीया. [सं. धर्मराज + म. बीज] ॰राज्य-न. ज्या राज्यांत सत्य, न्याय आणि निःपक्षपात आहे असें राज्य; सुराज्य; सुखी राज्य [धर्म + राज्य] ॰लग्न-न. धर्मविवाह पहा. ॰लड- वि. (अश्लील) नास्तिक; धर्मकृत्यें न करणारा; धर्माला झुगारून देणारा. याच्या उलट धर्ममार्तंड. 'सदर ग्रंथांत महाराष्ट्र धर्मलंड अतएव त्याज्य असें एका गंधर्वानें म्हटलें आहे.' -टि ४. [सं. धर्म + लंड = लिंग] ॰लोप-पु. धर्माची ग्लानी; अधर्माचा प्रसार. [सं.] ॰वणी-पु. (कुंभारी) तिलांजळीच्या वेळचा कुंभारी मंत्र. -बदलापूर ७२. [धर्म + पाणी] ॰वाट-स्त्री. १ शरण आलेल्या शत्रूवर दया दाखवून त्यास करून दिलेली वाट. 'तुज युद्धीं कैंचें बळ । धर्मवाट दिधली पळ ।' -एरुस्व ११.३७. २ खुला, मोकळा, बिन धोक, अनिर्बंध रस्ता, मार्ग. [सं. धर्म + वाट] ॰वान्-वि. धार्मिक; परोपकारी; सदाचरणी; सात्त्विक. [सं.] ॰वासना-स्त्री. दानधर्म, धार्मिक कृत्यें करण्याची इच्छा; धर्मबुद्धि. [सं. धर्म + म वासना] ॰निधान-न. धर्माचा खजीना, ठेवा, सांठा. 'रचिलीं धर्मनिधानें । श्रीनिवृत्तीदेवें ।' -ज्ञा ११.९. [सं.] ॰विधि-पु. धार्मिककृत्य, संस्कार. [सं.] ॰विपाक-पु. धार्मिक कृत्यांचा परिणाम, फल. सत्कृत्यांचें फल. विपाक पहा. [सं.] ॰विवाह-पु. गरिबाचें स्वतःच्या पैशानें करून दिलेलें लग्न; धर्मादाय लग्न. [सं.] ॰वीर- पु. १ स्वधर्मार्थ प्राणार्पण करणारा; धर्मासाठीं लढणारा. 'स्वधर्म- रक्षणाकरितां मृत्यूच्या दाढेंत उडी टाकणार्‍या धर्मवीराची ती समाधि होती.' -स्वप १०. २ धर्माचें संरक्षण, संवंधन करणारा; धर्माचा वाली; ही एक पदवीहि आहे. 'धर्मवीर चंद्रोजीराव आंग्रे.' ३ (ख्रि) रक्तसाक्षी. (इं.) मार्टिर. [सं.] ॰शाला-ळा, धर्म- साळ-स्त्री. वाटसरू लोकांना उतरण्याकरितां बांधलेलें घर; धर्मार्थ जागा; पांथस्थांच्या विश्रांतीची जागा. 'मढ मंडप चौबारी । देखे धर्मसाळां ।' -ऋ २०. [धर्म + शाला] ॰शाळेचें उखळ-न. (धर्म- शाळेंतील उखळाचा कोणीहि उपयोग करतात ल.) वेश्या; पण्यां- गना. म्ह॰ धर्मशाळेचे उखळीं येत्याजात्यानें कांडावें. ॰शास्त्र- न. १ वर्णाश्रम धर्माचें प्रतिपादक जें मन्वादिप्रणीत शास्त्र तें आचार व्यवहारादिकांसंबंधीं नियम सांगणारें शास्त्र, ग्रंथ. २ समाजाच्या शिस्तीसाठीं, धार्मिक आचरणाकरितां, सामाजिक संबंधाकरितां (लग्न वगैरे संस्थांबद्दल) विद्वानांनीं घालून दिलेले नियम किंवा लिहिलेले ग्रंथ. धर्माविषयीचें विवेचन केलेला ग्रंथ. ३ ख्रिस्तीधर्माचें शास्त्र. (इं.) थिऑलॉजी. याचें सृष्टिसिद्ध (नॅचरल), ईश्वरप्रणीत (रिव्हील्ड), सिद्धांतरूप (डागमॅटिक), पौरुषेय (स्पेक्युलेटिव्ह), व सूत्रबद्ध (सिस्टिमॅटिक) असे प्रकार आहेत. ४ (सामा.) कायदेकानू. [सं.] ॰शास्त्री-वि. धर्मशास्त्र जाणणारा. [सं.] ॰शिला-स्त्री. सती जाणारी स्त्री पतीच्या चितेवर चढतांना ज्या दगडावर प्रथम उभी राहते तो दगड. या ठिकाणीं उभी असतां ती सौभाग्यवायनें वाटतें. ही शिला स्वर्गलोकची पायरी समजतात. 'धर्म शिलेवर उभी असतांना थोरल्या माधवराव पेशव्यांची स्त्री रमाबाई हिनें नारायणराव पेशव्यांचा हात राघोबांच्या हातीं दिल्याचें प्रसिद्ध आहे.' -ज्ञाको (ध) ४४. 'धर्मशिळेवर पाय ठेविता दाहा शरीरा का करितो ।' -सला ८३. ॰शिक्षण-न. धर्माचें शिक्षण; धार्मिक शिक्षण. 'ज्या धर्म शिक्षणानें पुरुषाचा स्वभाव अभिमानी, श्रद्धाळु, कर्तव्यदक्ष व सत्यनिष्ठ बनेल तें धर्मशिक्षण -टिसू ११६. ॰शील-ळ-वि. शास्त्राप्रमाणें वागणारा; धार्मिक सदाचरणी; सद्गुणी. [सं.] ॰श्रद्धा-स्त्री. धर्माविषयीं निष्ठा; धर्मावर विश्वास. 'राष्ट्रोत्कष स धर्मश्रद्धा पुढार्‍यांच्याहि अंगीं पाहिजें.' -टिसू ११७. ॰संतति-संतान-स्त्रीन. १ कन्यारूप अपत्य (कारण कन्या कुटुंबाबाहेर जाते). २ दत्तक मुलगा. [सं.] ॰सभा- स्त्री. १ न्याय कचेरी; न्यायमंदिर; कोर्ट. २ धार्मिक गोष्टींचा निकाल करणारी मंडळी; पंचायत. [सं.] ॰समीक्षक, ॰जिज्ञासु-पु. (ख्रि.) धर्मसंबंधानें विचार करणारा; शोध कर णारा; पृच्छक. (इं.) एन्क्वायरर. 'धर्म समीक्षकांच्या शिक्षकांना उपयोगी पडतील अशा पुस्तकांची बरीच जरूरी आहे.' -ज्ञानो ७.५. १९१४. [सं.] ॰संमूढ-वि. कर्तव्य कोणतें हें ज्यास निश्चित कळत नाहीं असा. -गीर २५. ॰संस्कार-पु. धार्मिक संस्कार; धर्मविधी. ॰संस्थान-न. १ पुण्य क्षेत्र; धर्माचें, सदाचरणाचें स्थान. २ पूजा, अर्चा वगैरे करण्यासाठीं ब्राह्मणास दिलेलें गांव; अग्रहार. ३ (व्यापक) धर्मार्थ, परोपकारी संस्था, सभा. ॰संस्था- पन, ॰स्थापन-न. १ नवीन धर्मपंथाची उभारणी. 'धर्म स्थापनेचे नर । हे ईश्वराचे अवतार । जाले आहेत पुढें होणार ।' -दा १८.६. २०. २ धर्माची स्थापना; धर्मजागृति. [सं.] ॰सिद्धांत- स्वीकार-पु. (ख्रि.) उपासनेच्या वेळीं आपल्या धर्मश्रद्धेचे आविष्करण करण्याकरितां विवक्षित सिद्धांतसंग्रह म्हणून दाखविणें. (इं.) कन्फेशन् ऑफ फेथ. [सं.] ॰सिंधु-पु. धर्मशास्त्रावरचा एक संस्कृत ग्रंथ. यांत अनेक धर्मकृत्यांचें विवेचन केलेलें असून शुभाशुभ कृत्यांचा निर्णय सांगितला आहे. पंढरपूरचे काशिनाथ अनंतोंपाध्याय यांनीं इ. स. १७९१ त हा रचिला. ॰सूत्रें-नअव. ज्ञान व कर्म- मार्ग यांची संगति लावून व्यावहारिक आचरणाची सांगोपांग चर्चा करणारा प्राचीन ग्रंथ. सूत्रें पहा. [सं.] ॰सेतु-पु. धर्म- मर्यादा. [सं.] ॰ज्ञ-वि. १ धर्मशास्त्र, विधिनियम उत्तम प्रकारें जाणणारा. २ कर्तव्यपर माणूस; कर्तव्य जागरूक. धर्माआड कुत्रें-न. सत्कृत्याच्या, परोपकाराच्या आड येणारा दुष्ट माणूस. धर्मदारीं कुत्रें पहा. धर्माचरण-न. धार्मिक आचार; सदा- चरण. [सं. धर्म + आचरण] धर्माचा कांटा-पु. सोनें वगैरे मौल्यवान जिन्नसाचें खरें वजन लोकांस करून देण्यासाठीं विशिष्ट स्थलीं ठेवलेला कांटा; धर्मकांटा. वजन करवून घेणार्‍यांकडून मिळालेला पैसा धर्मादाय करतात. धर्माचा पाहरा-पु. सकाळचा प्रहर (सूर्योदयापूर्वीं दीड तास व नंतर दीड तास). धर्माची गाय-पु. (धर्मार्थ मिळालेली गाय). १ फुकट मिळालेला जिन्नस. म्ह॰ धर्माचे गायी आणि दांत कां गे नाहीं = फुकटचा जिन्नस किंवा काम क्कचितच चांगलें असतें. २ कन्या; मुलगी (कारण ही दुसर्‍यास द्यावयाची असते). -वि. गरीब निरुपद्रवी मनुष्य. धर्मात्मा-पु. (धर्माचा आत्मा, मूर्तिमत धर्म). १ धर्म- शील, धार्मिक प्रवृत्तीचा माणूस. २ धर्म करण्याकडे ज्याची प्रवृत्ति आहे असा. ज्यानें अनेक धर्मकृत्यें केलीं आहेत असा. [सं.] धर्मादाय-व-पु. १ धर्मार्थ जें दान तें; देणगी; भिक्षा. २ सर- कारांतून धर्मकृत्यांसाठीं प्रतिवर्षीं काढून ठेवलेली रक्कम; या कामीं ठराविक धान्य देण्यासाठीं दर गांवाला काढलेल्या हुकूम. -वि. मोफत; फुकट; धर्मार्थ. -क्रिवि. धर्म म्हणून; दान देण्याकरितां; धर्मार्थ. ॰टाकणें-सोडणें-देणें-धर्मार्थ देणें; दानधर्मासाठीं आपला हक्क सोडणें. धर्मादाय पट्टा-स्त्री. देऊळ, उत्सव इ॰ चा खर्च चालविण्यासाठीं किंवा एखाद्याच्या मदतीसाठीं, लोकांवर बसवितात ती वर्गणी. धर्माधर्मीं-धर्मींनें-क्रिवि. धार्मिक व उदार लोकांच्या मदतीनें अनेकांनीं धर्मार्थ हात लाविल्यानें; फुकट; स्वतः पैसा खर्च करण्यास न लागतां. 'लेखक ठेवून लिहिलें तर पुस्तक होईल नाहींतर धर्माधर्मीं ग्रंथ तडीस जाणार नाहीं.' [सं. धर्म द्वि.] धर्माधर्मीवर काम चाल- विणें-पैसा खर्च न करतां फुकट काम करून घेणें. धर्मा- धर्मीचा-वि. धार्मिक लोकांकडून मिळविलेला; धर्मार्थ (फुकट) मिळविलेला; अनेकांनीं हातबोट लावल्यामुळें संपादित (पदार्थ, व्यवहार). धर्माधिकरण-पु. १ धर्माचारांचें नियंत्रण. २ शास्त्रविधींची पाळणूक होते कीं नाहीं हें पाहाण्यासाठीं, नीति- नियमांवर लक्ष ठेवण्यासाठीं खातें, सभा. ३ धर्मशास्त्रांची अंमल- बजावणी. ४ सरकारी न्यायसभा; न्यायमंदिर. धर्माधिकार-पु. १ धर्मकृत्यांवर देखरेख करण्याचा अधिकार. धार्मिक गोष्टींवर नियंत्रण. २ न्यायाधीश. धर्माधिकरण पहा. [धर्म + अधिकार] धर्माधिकारी-पु. १ धर्मासंबंधीं गोष्टी पहाणारा वरिष्ठ अधि- कारी. धर्माधिकरणाचा अधिकारी. २ न्यायाधीश. धर्माध्यक्ष-पु. सरन्याधीश; धर्मगुरु; राजा. [धर्म + अध्यक्ष] धर्मानुयायी, धर्मानुवर्ती, धर्मानुसारी-वि. १ धर्माप्रमाणें चालणारा, वागणारा; सद्गुणी; सदाचरणी. २ एखाद्या धर्मपंथांतील माणूस. धर्मानुष्ठान-न. १ धर्माप्रमाणें वर्तन; पवित्र, सदाचारी जीवन. २ धार्मिक संस्कार, विधि. ३ धार्मिक कृत्य; सत्कृत्य. धर्मार्थ-क्रिवि. १ परोपकार बुद्धीनें; दान म्हणून देणगी म्हणून. २ मोफत; फुकट. धर्मार्थ जमीन-स्त्री. धार्मिक गोष्टींसाठीं दिलेली जमीन (देवस्थानास किंवा धर्मादायास दिलेली); इनाम जमीन. धर्मालय-न. १ धर्मस्थान; धर्मक्षेत्र; ज्या ठिकाणीं धार्मिक कृत्यें चालतात तें स्थळ. 'जें धर्मालय म्हणिजे । तेथ पांडव आणि माझें ।' -ज्ञा १.८३.२ धर्मशाळा. धर्मावतार-पु. अतिशय सत्वशील व पवित्र माणूस; प्रत्यक्ष धर्म. [धर्म + अवतार] धर्मासन-न. न्यायासन; न्यायाधीश बसण्याची जागा; न्याय- देवतेची जागा. धर्मित्व-वि. गुणित्व. 'जे धर्मधर्मित्व कहीं ज्ञानाज्ञाना असे ।' -अमृ ७.२८३. धर्मिष्ट-वि. धार्मिक; सत्त्वशील; सदाचरणी. धर्मी-वि. १ धर्मानें वागणारा; सदाचरण ठेवणारा; न्यायी; सद्वर्तनी. २ ते ते गुणधर्म अंगीं असणारा. (विषय, पदार्थ). ३ धर्मीदाता; उदार; धर्म करणारा. धर्मीदाता- पु. धर्मकरण्यांत उदार, मोठा दाता (भिक्षेकर्‍यांचा शब्द). धर्मोडा-पु. स्त्रियांचें एक व्रत; चैत्र महिन्यांत ब्राह्मणाच्या घरीं धर्मार्थ रोज नियमानें एक घागरभर पाणी देणें. [धर्म + घडा] धर्मोपदेश-पु. धर्माची शिकवण; धर्मांसंबंधी प्रवचन, उपदेश, धर्मोपदेशक-पु. गुरु; धर्माचा उपदेश करणारा. धर्मोपा- ध्याय-पु. धर्माधिकारी. धर्म-वि. १ धर्मयुक्त; धर्मानें संपादन केलेलें; धर्मानें मिळविलेलें; धर्मदृष्टया योग्य. 'उचित देवोद्देशें । द्रव्यें धर्म्यें आणि बहुवसें ।' -ज्ञा १७.३६०. २ (महानु.) वंद्य. 'जें पांता जालीं धर्म्यें । वित्त रागांसि ।' -ऋ २०. धर्म्यविवाह- पु. धर्मशास्त्रोक्त विवाह; सर्व धार्मिक संस्कारांनिशीं झालेला विवाह.

दाते शब्दकोश

अभिनती      

स्त्री.       १. एका बाजूला झुकणे. २. (मानस.) पूर्वग्रह; एकाच बाजूला असलेली मनाची प्रवृत्ती; कल. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अभिवृत्ति, अभिवृत्ती      

स्त्री.       मनाचा कल; प्रवृत्ती; एखादी क्रिया करण्यासाठी आवश्यक असलेली मानसिक पूर्वतयारी. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अभियोग्यता      

स्त्री.       कल; योग्यता; प्रवृत्ती. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अधिजालक      

न.       (भौ.) धातुमिश्रणातील अवकाशजालकाची पद्धत. उदा. तांबे व सोने यांच्या मिश्रणात प्रत्येक प्रकारचा अणू हा वाटेल तसा विभागला न जाता योग्य भौमितीय जागा व्यापतो. ही त्याची प्रवृत्ती असते. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आधीं

क्रिवि. अगोदर; पूर्वीं; मूळांत. 'आधींच समुद्र पाहीं । तेथ दुवाडपण कवणा नाहीं ।' -ज्ञा १.११७. ॰बिधीं- चेब(बि)दीं-आदींचे बिदीं पहा. म्ह॰ १ आधीं अननम् मग तननम् = जेवण झाल्यावर गाणें सुचतें. २ आधीं गुंतूं नये मग कूंथूं नये. ३ आधींच बहु बावळी अन् बीचमें खाई भंग. ४ आधींच उल्हास त्यांत आला फाल्गुनमास (आधींच मर्कट तशांतहि मद्य प्याला इ॰) = स्वतःच्या हौसेंत दुसर्‍याच्या उत्तेजनाची भर पडणें. ५ आधीं जाते बुद्धि, मग जातें भांडवल किंवा लक्ष्मी = मनुष्याला वाईट दशा येण्यापूर्वीं भलभलत्या गोष्टी करण्याकडे त्याची प्रवृत्ति होणें. ६ आधीं पोटोबा, मग विठोबा; आधीं स्वार्थ, मग परमार्थ. ७ (व.) आधी मला वाढा मग ओढीन कामाचा गाडा, आतां मी जेवलें हातीपायीं रेवलें = प्रथम जेवणास घाला मग काम करीन असें म्हणावयाचें व जेवल्यानंतर जेवण अंगावर आल्यामुळें निजावयाचें; एकूण केव्हांच काम व्हावयाचें नाहीं. कामचुकार; कामचुचर. ८ आधी होती पतिव्रता मग झाली मुसळदेवता = प्रथम गरीब मग भांडखोर.

दाते शब्दकोश

अधरती      

स्त्री.       अधःपाताची प्रवृत्ती : ‘हा मुख्य परिसावा गुणु : अधरतीचा’ – मूप्र १२२२.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आगलावेपणा      

पु.       भांडण लावून देण्याची, चिथावण्याची, भडकवण्याची प्रवृत्ती.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ऐच्छिक

ऐच्छिक aicchika a (S) Wished or desired. Ex. ऐ0 पदार्थ मिळाला म्हणजे संतोष होतो. 2 Free, optional, voluntary, subject to one's will. Ex. साधूची ऐ0 प्रवृत्ति ऐ0 निवृत्ति. 3 Licentious, wanton, wilful, unregulated by reason. Ex. ऐ0 व्यवहार करूं नये शास्त्रानु- रूप वर्त्तावें. 4 Capricious, arbitrary, fanciful. Ex. हा ऐ0 प्रयोग आहे ह्यास शास्त्रप्रमाण कोठें? 5 Designed, purposed, intentional. Ex. ऐ0 पापाचें प्रायश्चित मोठें.

मोल्सवर्थ शब्दकोश

वि. १ इच्छिलेलें; इष्ट. 'ऐच्छिक पदार्थ मिळाला म्हणजे फार संतोष होतो.' २ मर्जीवर ठेवलेलें; पाहिजे तें; मर्जी- नुसार. 'साधूची ऐच्छिक प्रवृत्ति ऐच्छिक निवृत्ति.' ३ स्वच्छंदी; अविचारी; बेलगाम; उच्छृंखल. 'ऐच्छिक व्यवहार करूं नये शास्रानुरूप वर्तावें.' ४ नियमबद्ध नसलेलें; मर्जीनुरूप; वाटेल तसें; काही तरी; लहरी; अशास्त्रीय. 'हा ऐच्छिक प्रयोग आहे यास शास्राप्रमाण कोठें.' ५ हेतुपुरःसर, बुद्धिपुरःसर केलेलें; पूर्वयोज- नेनुसार, योजून केलेलें; जाणूबुजून केलेलें. 'ऐच्छिक पापाचें प्राय- श्चित मोठे.' [सं.] ॰विषय-पु. परीक्षेकरितां नेमिलेल्या दोन किंवा अधिक विषयांपैकी इच्छेनें घेतलेला विषय.'एम.ए. च्या परीक्षेस देशी भाषा या विषयाची निदान ऐच्छिक म्हणून तरी गणना करण्यांत आली' -केले १.९२

दाते शब्दकोश

ऐल, ऐला, ऐलाड, ऐलाडी, ऐली

वि. अलीकडचा; अलीकडला. 'उताराचिये सांगडी । ठाके ते ऐलीच थडी ।।' -ज्ञा १८.२५५. 'पाहेचि ना तो नाहीं बुडाला । कोरडा आला ऐल तीरा ।' -एभा २८.३२५. क्रिवि. १ या बाजूला; अलीकडे. 'प्रवृत्ति माघौति मोहरे । समाधि ऐलाडी उतरे ।' -ज्ञा ६.१९१. २ आधीं; अगोदर; पूर्वीं. 'तेवि तो उडुनाथ । केवल श्रीकृष्णप्रीत्यर्थ । सांडूनि काळ नियम । ऐलाडचि उदैला ।।' -रास १.१०७. [सं. आदिम; प्रा. आइल्ल] ऐलकांठ, ऐलतीर, ऐलथड-पु.न.स्त्री. अलीकडचा कांठ; जवळचा कांठ; पैलथडी याच्या उलट. 'शोभा समुद्र हेलावे पोटीं । चक्षू पोहणार उठाउठी । ऐलकांठीं चुबकले ।।' -मुसभा २.७७. 'असो आतां त्या अवसरीं । क्षीरसागरीच्या ऐलतीरी । बध्दांजलि करूनि निर्धारी । सुरवर उभे ठाकले ।।' -ह २.६०.

दाते शब्दकोश

अंधानुवाद      

पु.       अंधानुकरणाने वागण्याची प्रवृत्ती.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अंधपरंपरा

स्त्री. १ आंधळ्यांची ओळ, माळ; एका आंधळ्यापासून दुसर्‍या अंधळ्यास प्राप्त होऊन चालत आलेली रीत वगैरे. २ एकाचें पाहून दुसर्‍यानें, त्याचें पाहून तिसर्‍यानें, याप्रमाणें कोणतीहि गोष्ट करण्याचा परिपाठ; गतानुगतिकत्व; खरें खोटें, फायदा तोटा न पाहतां वाडवडील किंवा समाज जसें करीत आला तसें करणें (यावरून अंधपरंपरान्याय निघाला आहे). 'लोकांची सामान्यतः प्रवृत्ति अशी आढळते कीं जो समज एकदां होऊन बसला तो पीछेसी आयी या न्यायानें केवळ अंधपरंपरेनें पुढें चालवावयाचा.' -नि [सं.]

दाते शब्दकोश

अंकुश      

पु.       १. हत्तीला ताब्यात आणण्याचे, एका बाजूला आकडीसारखे वाकवलेले हत्यार; टोचणी : ‘ध्वजवज्रांकुशरेखा । चरणींची सामुद्रिकें देखा ।’ – एरुस्व १·२२. २. आकडी, आंकुशी. ३. जैन यतीच्या हातातील एक उपकरण ज्याने तो देवपूजेकरता वृक्षाची पाने फुले काढतो. ४. दाब; निर्बंध; आकलन; मर्यादा. ५. तुरा, शिरपेच : ‘इये सृष्टी । गंगेसमान माझिये दृष्टीं । जितेंद्रियत्व गुणाचे मुगुटीं । वरी अंकुश खोविला ॥’ –मुआदि २३·७१. ५. अनिष्ट प्रवृत्ती वाढू नयेत म्हणून केलेली कडक योजना, ठेवलेले नियंत्रण. ६. (वन.) टोकाशी आकड्‌यासारखे मागे वळलेले उपांग. : उदा. हिरवा चाफा, वेत.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आपण      

सना. १. स्वतः; हे सर्वनाम मी, तू, तो, आम्ही, तुम्ही, ते किंवा मी स्वतः, तू स्वतः; तो स्वतः, आम्ही स्वतः, तुम्ही स्वतः या बद्दलही योजतात. जसे : ‘म्या त्याला जेऊ घातले मग आपण (स्वतः) जेवायला बसलो.’ याप्रमाणेच अनेकवचनी रूपे − ‘आपण (तुम्ही) येत असाल तर मी येईन.’ इ. २. दरबारी भाषेत बोलणारे राजे, सरदार, मोठे लोक, संपादक वगैरे प्रथमपुरुषी एकवचनी बहुमानार्थी स्वतः या अर्थी व सत्कारपूर्वक भाषणात तू या अर्थी आपण हा शब्द वापरतात. (वा.) आपणावर आणणे, आपणावर वर्तविणे − केलेल्या कृत्यांचे यश किंवा श्रेय आपल्यावर घेणे : ‘सांगतो हळूहळूच अचाटे । आपणाचवरि वर्तवितो ।’ आपणावरून जग ओळखावे – जी आपली वृत्ती किंवा प्रवृत्ती तीच लोकांचीही असे समजावे किंवा गृहीत धरून चालावे. आपणास म्हणविणे – आपण मोठ्या योग्यतेचे, मोठे हुशार, निष्णात असे मिरविणे; प्रौढी सांगणे. आपण      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अराजक

वि. १ राज्यसत्ता नष्ट करूं पाहणारा; बंडखोर; क्रांतिकारक. २ राजसत्ताविरहित, शास्ता नसलेला (देश). [सं.] ॰कत्व-न. बंडाकडे प्रवृत्ति; अराजकपणा; अराजकता. 'एकादी सुधारणा करणें म्हणजे अराजकत्वाकडे पाऊल टाकणें कीं काय असें लोकांस वाटूं लागलें होते.' -इंभू ३१३.

दाते शब्दकोश

अराजकत्व      

न.       बंडाकडे प्रवृत्ती; बेबंदशाही; अराजकता : ‘एखादी सुधारणा करणें म्हणजे अराजकत्वाकडे पाऊल टाकणें कीं काय असे लोकांस वाटू लागले होते’ – इंरामू ३१३.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अस्थितिक      

वि.       (यंअ.) एकाच स्थितीत अगर एकाच दिशेत राहण्याकडे प्रवृत्ती नसणारा; चंचल; अस्थिर. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आत्मिक सहजप्रवृत्ति      

स्त्री.       उपजत अहंकार प्रवृत्ती.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आत्मपीडानंद      

पु.       (वै.) स्वतःला होणाऱ्या शारीरिक अथवा मानसिक वेदनांतून आनंद उपभोगण्याची प्रवृत्ती. एक मानसिक विकृती. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

बाळ, बाळक

न. १ बालक; लहान मूल. २ -पु. मुलगा; शिशु. 'जसा वारावा चपळ बाळ बापानें ।' -मोभीष्म ११.६९. -वि. १ लहान; अल्पवयी. २ मूर्ख. 'पंडित न गमसि जरि बहु पांडित्यहि करिसि दिससि बाळ मला ।' -मोकर्ण ४१.१८ ३ अजाण. 'नुमजे बाळासि किमपि...।' -मोमौसल १.१. [सं. बाल = मूल; बाल + क = बालक] म्ह॰ असतील बाळ तर फेडतील काळ. ॰आंबा-पु. कच्चा किंवा हिरवा आंबा. ॰कडू-डूं- न. १ लहान मुलांना किराईत वगैरे कित्येक कडू औषधें (विशे- षतः सकाळीं) उगाळून पाजतात तें; घुटी. २ (ल.) लहानपणीं मिळालेलें शिक्षण किंवा वळण. बाळकडू असणें-उपजत प्रवृत्ति किंवा गुण असणें; गोडी असणें. 'कोळ्याच्या मुलांना पोहोण्याचें बाळकडूच असतें.' बाळका-पु. गोसाव्याचा शिष्य. [बालक] ॰क्रीडा-स्त्री. लहानपणीचें लहान मुलांचे खेळ. [सं. बालकीडा] ॰खुंट-पु. केळीच्या खुंटास नवीन फुटणारा कोंभ; मोना. ॰गळा-पु. लहान मुलाचा बारीक आवाज; न फुटलेला आवाज. ॰गुंडा-पु. बालगुंडा पहा. ॰गोपाळ-पुअव. १ (कृष्णाचे खेळ- गडी, गवळ्यांचीं पोरें यावरून). लहान मुलें; लहानमोठीं एकत्र जमलेलीं मुलें. २ एकत्र जमलेलीं गांवांतील लहानथोर माणसें. 'महाराज, हे सर्व बाळगोपाळ मिळाले आहेत. त्यांजवर आपण दया करावी.' [बाळ + गोपाल = गवळी] ॰चरित-त्र-न. लहान- पणचें चरित्र; बालक्रीडा. [सं.] ॰छंद-पु. लहान मुलानें घेत- लेला चाळा; हट्ट. [सं.] ॰टोळ-पु. लहान व हिरवा टोळ. ॰टोंक-ढोंक-पु. बगळा. ॰ताड-पु. नर जातीचा ताड. यास फळें येत नाहींत. ॰दशा-स्त्री. बाल्य; बालपण; बाल्यावस्था. 'लोपली उघडे बाळदशा ।' -ज्ञा ६.२६०. [सं.] ॰दांत- पुअव. लहानपणचे किंवा पहिले दांत; दुधाचे दांत. ॰दृष्टि-स्त्री. तारुण्यांतील बारीक व लांबची वस्तु जिनें दिसते अशी दृष्टि; जोमदार दृष्टि. [सं.] ॰पणचें लोणी-न. पहिल्यानें व्यालेल्या वशी-परवर्षी-स्त्री. बालपरवेशी पहा. ॰पाठ-पु. लहानपणीं शिकलेली विद्या. लहानपणींची शिकवण. [सं.] ॰फूट-न. १ बाळआंबा. २ रुपया इ॰ कांस असलेली बारीक चीर. ॰फोक-पु. (नाजुक किंवा कोंवळी फांदी यावरून) तरुण; तरणाबांड; आडबाप्या. ॰बद-बोध-वि. बालबोध पहा. ॰बंद-न. बाळबोध, देवनागरी लिपी. ॰बोध कित्ता-पु. (ल.) उदार धोरण. 'मी मुंबई इलाख्याचा कारभार चालवितांना... एल्फिन्स्टन यांनीं घालून दिलेला बाळबोध कित्ता वळवीन.' -टिले १.४३६. ॰बोध वळण-न. साधी रीत; जुनी, सनातनधर्माची रीत. ॰बुद्धि- स्त्री. मुलाची बुद्धि. -वि. पोरकट समजुतीचा; अज्ञानी; पोरबुद्धि; लेकुरबुद्धि. ॰बेल-न. बेलाचें कोंवळें फळ. ॰ब्रह्मचारी- भाषा-मित्र-इ॰ बालमध्यें पहा. ॰भिकारी-पु. जन्मापासून भिकारी. याच्या उलट गर्भश्रीमंत. ॰भूक-स्त्री. (मुलाची भूक यावरून) वरचेवर, घटकेघटकेला लागणारी भूक. ॰भोंक- न. १ बगळा; बाळढोंक. २ (ल.) लांब मानेचा इसम; लांब- मान्या. ॰भोग-पु. १ प्रातःकाळची पूजा झाल्यानंतर देवाला अर्पण केलेला उपहार. २ (यावरून ल.) लहान मुलांचा सकाळचा फराळ. ३ अशा नैवेद्याचे किंवा फराळाचे पदार्थ. (क्रि॰ देणें; करणें). ४ (सामान्यतः) हिस्सा; वांटा; भाग. (क्रि॰ करणें). ॰मति-स्त्री. अज्ञान. 'रत्ने म्हणोनि भरि इंगळ जेंवि खोळे । घे काळ बाळमति पाहति लोक भोळे ।' -आपू २९. ॰मयाणी- स्त्री. गाडीच्या चाकाच्या आंतील बाजूचा वसू; आंतील वसवी; कणा आखरींत भक्कम करण्याची लोखंडी चाकी (माण) बाळमाइनी ॰मुकी-स्त्री. १ मेजवानीच्या किंवा फराळाच्या वेळीं गुपचूप वानगी म्हणून राखून ठेवलेला एखाद्या जिन्नस किंवा घास. २ असा राखून ठेवलेला नसेल त्यास दंड द्यावा लागणें किंवा दिलेला दंड. (क्रि॰ लागणें). ॰मुंज्या-पु. लहानपणापासून मुंज्या; मोठा झाला असला तरी अविवाहित किंवा ब्रह्मचारी असलेला मनुष्य. ॰रंडा-रांड- विधवा-स्त्री. बालरंडा पहा. ॰राजा-पु. पुंड, धीट किंवा दांडग्या मुलाला लाडिकपणें लावण्यांत येणारा शब्द. [सं.] ॰लेणें- ल्याणें-न. लहान मुलाच्या अंगावर घालावयाचे बिंदली इ॰ दागिने. 'विषयाचें बाळलेणें ।' -शिशु ९२. ॰वाटी-स्त्री. १ सकाळचा अल्पोहार; न्याहारी; बाळभोग. (क्रि॰ झोकणें; चढविणें; करणें; खाणें; होणें). २ वाटा; भाग; हिस्सा. ॰वैद्य- पु. लहान मुलांचा वैद्य. ॰शब्द-पु. लहान मुलांसारखें बोलणें, आवाज, उच्चार. 'बाळशब्दें खेळवील तनुजाला ।' ॰शिरें- न. (कों.) बाळतिणीला तिच्या मुलाकरितां धर्मार्थ दिलेलें दूध भांडीं व इतर आवश्यक वस्तू इ॰ [सं. बाल + क्षीर] ॰सर- स्वती-स्त्री. बालसरस्वती पहा. ॰सवत-स्त्री. (बायकी) लहानपणापासूनची सवत. [बाल + सं. सपत्नी] ॰स्वार-वि. १ लहानपणापासून घोड्यावर बसणारा. २ (ल.) लहानपणापासून एखाद्या शास्त्रांत किंवा उद्योगधंद्यांत प्रवीण असलेला; जन्माभ्यास असलेला. ॰हिरडा-हरडा-डी-हर्तकी-पुस्त्री. बालहरीतकी; कोवळा वाळविलेला हर्डा; हें एक औषधी फळ आहे. चांभारी- हिरडा पहा. [सं. बालहरितकी] बाळांबा-पु. बाळआंबा पहा. बाळाभ्यास, बाळाभ्यासी-बालाभ्यास, बालाभ्यासी पहा. बाळामराई-स्त्री. आंब्याच्या लहान झाडांची बाग. [बाळ + आमराई] बाळायती-वि. बाळ; लहान. 'त्या बाळायती गोपीतें । हरिलें दैत्य वेषें तेथें ।' -रास २.३६०. बाळेभोंक- न. बाळभोंक; बगळा. बाळेभोळे-वि. अज्ञ आणि भोळसर. 'माया दुस्तर शास्त्रप्रसिद्धी । तेथें बाळेभोळे स्थूळ बुद्धी ।' -एभा ३.२२४. बाळोपचार, बाळोपचारी-बालोपचार-री पहा.

दाते शब्दकोश

भर

पु. १ पूर्णता; प्राचुर्य; उत्कर्ष; सीमा; वैपुल्य; कळस; पर्व; ऊत; लोट; बहार; रंग (धान्य, तारुण्य, आरोग्य, मान, संपत्ति, खेळ, उद्योग यांचा).' सति भर आनंदाला जो देतो तोचि भर विलापाला ।' -मोसभा ७.५५. 'गाण्याला आतां भर आला आहे.' २ आवड; कल; मनोवृत्ति (उद्देश, इच्छा, प्रवृत्ति, आवड यांचा). 'पोरंचा प्राय: खेळाकडे भर असतो.' ३ बार (बंदुकीचा). ४ माज; मस्ती; कामुकावस्था (पशूंची). ५ भरतें; उत्तेजन. ६ आवेश. 'यमानें त्या भरांत सावित्रीला पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला.' ७ उत्साह; डौल. 'उभे सडे फौजेंत भरानें । -ऐपो २६७. ९ सपाटा. 'होतां द्विज भोजन भर दुंदुभिचा पळहि तो न रव राहे । ' -मोआश्व ५.१३. ८ भार; ओझें. ' प्रपंच भर घे शिरीं करि कृपा पिता त्यावरी ।' -केका ९४. ९ (दुखण्याचा) जोर; आवेगं (शोकाचा). १० (गो.) नाद; फंद. 'भरीक पडचें.' ११ -स्त्री. भरती; भरताड (गलबताचें, गाडीचें); बुज- लेली स्थिति; बूज (तालीची, जाड भिंतीची); पूरण; उणीव भरून काढणें (संख्येची, परिमाणाची). १२ आधिक्य. 'जेव- णाच्या पदार्थांत कांहीं भर लागल्यास ते बंदरावर विकत घेत असूं.' -पाव्ह ४६. १३ भरून काढण्यासाठीं टाकलेली माती, दगड इ॰ (झाडाच्या मुळांवर, बांधाच्या, भिंतीच्या मध्यें इ॰). 'पडवीची जमीन वीतभर खोल आहे, भर घालून ती ओटीच्या जमीनीबरोबर करावी.' १४ पूरण; पुरी करण्यासाठीं मिळ- विलेली संख्या, परिमाण, तुकडा इ॰ उदा॰ रकमेची, कापडाची मापाची भर. -क्रिवि. (शब्दाच्या पुढें जोडल्यानें) पर्यंत; इतकें; पूर्णपणें. उदा॰ तोळाभर सोनें; कोसभर वाट. मणभर-भयभर-प्रीतिभर-आनंदभर इ॰. साद्यंत, इथून याअर्थीं. उदा॰ तिथून पृथ्वीवर; गांवभर; महिनाभर इ॰ शब्दाच्या मागें जोड- ल्यास परममर्यादेपर्यंत; पूर्णतम, उच्चतम स्थितींत, असा अर्थ होतो. उदा॰ भर-अम्मल-आकार-वैराग्य-हंगाम-पीक-ओझें-कचेरी-अमदानी-दौलत-कोस. 'मूठभर रुपयें दिले = मुठीच्या पूर्णमानाइतके रुपये दिले.' आणि 'भरमूठ रुपये दिले म्हणजे पराकाष्ठा करून मुठींत जितके राहूं शकतील तितके (चोंदूनचोंदून भरून) रुपये दिले असा अर्थ. [सं. भृ = भरणें; पोसणें; भर] ॰करणें- १ भरणें; कंठापर्यंत घालणें; तृप्त करणें; आपण न भोगतां दुसर्‍यास देऊन टाकणें. 'आपण स्वतः खाल्लें नाहीं, दान धर्महि केला नाहीं, शेवटीं चोराची मात्र भर केली !' २ न्यूनता पुरी करणें. ॰घालणें-देणें-उठावणी करणें; उत्तेजन देणें; चेत- वणें. ॰घेणें-आपणांस पुरेसें घेणें.(आपल्या)भरानें चालणें- क्रि. आपल्या स्वतःच्या (अविचारी) मार्गास अनुसरणें; स्वच्छंद वागणें. भरीं घालणें-देणें-प्रवाहांत, मार्गांत टाकणें; चेत- विणें;नादीं लावणें. 'तमोगुणें भरी घातलेसे ।' -तुगा ५३९. भरीचा-वि. १ पूरक; भरपाई करणारा; भरतीचा; पुरवणीचा. २ पुरा करण्यास, भरून काढण्यास पुरेसा असलेला. भरी पडणें- आंत पडणें; सहकारी होणें; भुलून जाणें. भरीस पडणें पहा. भरीं भरणें- १ अतोनात नादीं लागणें; पूर्णपणें ग्रासला जाणें; हांवभरी होणें. 'बहुमास भरीं भरला प्रियसख सचिवांसि विसरला निपट ।' -मोवन ४.९८. २ विनाकारण हट्टास पेटणें. भरीस घालणें- १ न्यूनता नाहींशी करण्यासाठीं कमी असेल तें घालणें. २ चढविणें; उत्तेजन देणें. 'लोकीं भरीस घातलें ।' -दा ३.५.१३. भरीस देणें-तोंडापुढे करणें; नादीं लावणें. 'सर्व उदासीनपणें पाहति आम्हांसि देवुनी भरिला ।' -मोआदि ४.८३. भरीस पडणें- १ भरतीस पडणें; (एखादी गोष्ट, काम, मनुष्य इ॰ च्या) कमीपणा, अडचणी भरूंन काढण्यासाठीं वेंचलें जाणें. 'खर्च होणें; नष्ट होणें; गडप, ग्रस्थ केलें जाणें. 'त्यांची सर्व संपत्ति रांडांचे भरीस पडली.' अभिमानास पेटणें. 'मी बाळपणापासून संसाराच्या भरीस पडलों.' (सकर्मक) भरीस घालणें. भरून येणें- १ मनांतून जाणें; विस्मरण पडणें (शोक इ॰). २ पूर्ण बरी होणें (जखम). सामाशब्द-॰अमदानीस्त्री. पूर्णावस्थेची अमदानी, कारकीर्द. ॰अमलीवि. पूर्णत्वानें सरकारच्या अमलाखालीं असणारा (गांव, जिल्हा, तालुका इ॰). ॰अम्मलपु. पूर्ण अंमल, सत्ता. ॰उभरस्त्री. १ भरणें, उपसणें; भरणें व ओतून टाकणें. २ भरणें आणि रितें करणें उदा॰ एखादा पदार्थ घेतांना मापणें आणि खात्री- करितां तो पुनः मापणें. 'मापाची भरउभर केल्यास मोजलेला दाणा कमीजास्त होतच आहे.' ३ (ल.) मिळवणें व गमावणें, खर्च करणें. 'संसाराची भरउभरच आहे.' ४ (वाईट अर्थानें) उठावणी, मथवणी; उभारणी; मन वळविणें; छाप बसविणें (मत, उद्देश, विचार यांची). ५ (ल.) एखाद्या गोष्टीविषयीं विचार करणें, बोलणें. [भरणें + उभरणें] ॰कचेरी-स्त्री. मनुष्यांनीं पूर्ण भरलेली कचेरी. ॰कवळ्या-पु. (गुर्‍हाळ) एक इसम प्रयम चरकांत कांडें लावतो, व त्यांतील रस निघाल्यावर दुसरा इसम तेंच कांडें पुनः लावून उरलेला रस काढून घेतो. यापैकीं पहिला इसम. -कृषि ४७३. ॰कुंब-कू(खू)म-वि. १ (राजा.) स्थिर, गंभीर, शांत, प्रकृतीचा. २ पुष्कळ. [भर + कुंब] ॰कोंडा-पु. (कु.) तूस (कणि- केंतील). ॰खुम-वि. (गो.) भरभक्कम. ॰खुमी-स्त्री. स्वभा- वाची स्थिरता; विचारीपणा, अमत्तता; गांभीर्य. ॰गच्चा-वि. भरचक्का व भररट्टा पहा. ॰गच्चीवि. सोनेरी, रुपेरी, कलाबतू ज्यांत फार विणली आहे असें (कापड, अशा कापडाचा केलेला अंगरखा इ॰). ॰गच्ची जेवण-न. चांगल्या चमचमीत पदा- र्थांनीं पोट भरणें; आकंठ भोजन. ॰ग(गी)त-स्त्री. १ भरती, भर- ताड (गाडीचें, पोटाचें). २ भरून काढलेली स्थिति (धक्का, बंधारा, जाड भिंत यांची). ३ पूरण; पूर्तता (संख्या, परि- माण यांची). -न. बारदान; भरताड; ओझें; आंतील जिन्नस. (गलबत, गाडी इ॰ च्या) (कों.) पूर्ण. ॰गांव-पुन. दाट वस्तीचा गांव; घरें जवळजवळ असून वस्ती मोठी असलेला भाग. ॰गोणीस्त्री. भरलेली, सबंध गोणी, पोतें; भरजकात बसण्या- जोगी गोणी. ॰गोळी-स्त्री. गोळीचा टप्पा (लांब पल्ल्याच्या बंदुका, तोफा यांच्या). -क्रिवि. २ गोळीच्या अंतरावर, टप्प्यांत. ॰घोसानेंक्रिवि. प्रतिष्टा न गमावितां; ऐटीनें; धौशा वाजवीत; चढ्या घोड्यानिशी. 'भर घोसानें श्रीमंत त्यावर पुण्यास येतां क्षणीं ।' -ऐपो ३९६. ॰चक्का-वि. चांगल्या वस्तूंची चंगळ असणारी (मेजवानी); तब्बल; ओकारी येण्याइतकें; यथेच्छ (भोजन). चिकार; दाट भरलेला; गदगच्च; प्रचुर; विपुल (जेवण- अलंकार, वस्त्र, आंबे, लाडू, पीक, पाऊस, हंगाम, पावसाळा, उन्हाळा). ॰चंदी-स्त्री. १ घोड्यास खाण्यास देण्याचें भरपूर धान्य. २ (ल.) भरपूर अन्न. ॰चौकस्त्री. घोडयाची भरधांव चाल. ॰जमास्त्री. भरजमाबंदी; सर्व जमाबंदी (देश, गांव इ॰ ची -सादिलवार; बूड इ॰ च्या वजा वाटीच्या पूर्वींची). ॰जमीन- स्त्री. पूर्णधारा असलेली जमीन. ॰जरी-वि. पूर्णपणें सोन्या- रुप्याच्या कलाबतूचा केलेला. (कपडा, गोंडा, कापड). ॰जवानी- जा(ज्वा)नी-स्त्री. १ ऐन उमेदीचें वय. २ तारुण्याचा भर. [भर + फा. जवानीं] ॰ज्यहा-ज्याहा-ज्यहा-झ्याल-क्रिवि. भरदवड पहा. ॰डावपु. (गंजिफा व बुद्धिबळ) पूर्ण स्थितींतील डाव (भारी पानें खेळण्याच्या, भारीमोहरीं घेण्याच्या पूर्वींचा). ॰तिन्ही सांज-स्त्री. पूर्ण निन्हिसांजाची वेळ; ऐन संध्याकाळ; याच्या उलट. फुकटी तिन्हिसांज ॰तीर-पु. बाणाच्या फेकीचें अंतर, बाणाचा टप्पा. -क्रिवि. अमुक अंतरावर. ॰तोंडली- स्त्री. सबंध; मसाला भरून केलेली तोंडल्यांची भाजी. ॰दंड- पु. भुर्दंड; दुसर्‍याचा जिन्नस आपल्या हातून हरवला किंवा जमीनकी अंगास आली असतां भरावा लागणारा पैका. ॰दवड- दौड-धांव-पल्ला-धूम-दपट--स्त्री. पु. पूर्णदौड, धांव (घोड्याची, मनुष्याची). -क्रिवि. पूर्ण वेगानें (दडवनें, धांवणें, दपटणें, हांकणें, पिटणें, चालवणें, दामटणें, काढणें, पळणें). ॰दार- वि. १ चांगला भरलेला; दळदार; गरभरू; ठसठसीत. २ पूर्ण वाढ झालेला; पिळदार (माणूस, घोडा, छाती, दंड इ॰). ॰दोन प्रहर-पु. ऐन दुपार. ॰दौलत-स्त्री. संपत्ति आणि वैभव यांची भरती, बहार. ॰धाव-चाल-स्त्री. घोड्याची-जलद चाल; चौपायीं जलद धावत जाणें. ॰नकशी-क्षी-वि. १ पूर्ण नकशीचा (कांठ); असल्या काठांचा (कपडा). २ अतिशय कोरींव काम असलेला (स्तंभ, छत, चौकट इ॰). ॰नवती-स्त्री. ऐन तारुण्याचा, हिंमतीचा भर, कळस, बहर. ॰पंचविशी-स्त्री. मनुष्याची ऐनउमर; प्रौढदशा; पुरुषाची उमेदी, वय. ॰पायी-ई-स्त्री. १ भरपावती (येणें अस- लेल्या रकमेची, सालाची). २ भरपावतीची रसीद; प्रायः भर- पाई भरून पावलों हे शब्द लिहून) केलेला इकरार. ॰पायी (ई)झाली-लिहून देतों-उद्गा. (कंटाळा, अतितृप्ति दाख- विणारे शब्द) बस, पुरें करा. ॰पावलीं-क्रिवि. भरचालीनें भरगतीनें. (क्रि॰ पळणें; धावणें; चालणें; येणें; जाणें). [भर + पाऊल] ॰पितळ-वि. (कु.) पितळ, कलाबतू लावून शोभिवंत केलेलें (पायतन, वहाण) ॰पूड-न वाहणार्‍या फोडावर, उठाणू- वर (हवेंत उघडें पडल्यानें) येणारी पातळ त्वचा. (क्रि॰ धरणें; फुटणें; वाहणें; निचरणें; गळणें). अशा रीतीनें बंद झालेलें सपू- यक्षत. ॰पूर-वि. १ पूर्ण भरलेलें; भरून काढलेले; चोंदलेलें. २ प्रचुर; मुबलक. पूर्ण. ३ गंभीर; भरघोंस (आवाज). [हिं.] ॰पेट- वि. भरपूर. ॰पोट-क्रिवि. १ भरलेल्या पोटानें, पोटावर. २ पोटभर (खाणें, पिणें). ॰पोशाख-पु. विशिष्ट दिवशीं किंवा प्रसंगीं घालवायचा पोशाख; खास पोशाख. ॰बादली-वि. पूर्णपणें सोन्याच्या, रुप्याच्या कलाबतूचा केलेला (गोंडा, कपडा, कापड). ॰बिंदु-पु. आकाशांतील क्रांतिवृत्ताचे विषुवापासून अति दूरचे बिंदु. -सूर्य २१. ॰भक्कम-वि. १ प्रचुर; बहुत; मुबलक. २ अतिशय भरलेला, चोंदलेला; आकंठ भरलेला. ॰भार-पु. पूर्ण भार, वजन. 'गुरूचा भरभार साहावया जाण ।' -एभा १२. ५५९. ॰मजल-स्त्री. १ पूर्ण मजल (प्रवासाची). २ -क्रिवि. भरमजलीनीं (प्रवास करणें). [भर + अर. मन्झिल] ॰मज(जा) लस-स्त्री. भरसभा; भरलेली कचेरी. [भर + अर. मज्लस्] ॰मजला-पु. मोठा व उंच वरचा मजला (घराचा). -वि. मोठा व उंच असा वरचा मजला असलेलें (घर). ॰माहा- क्रिवि सर्व महिना. 'एक भरमाहा घास दाणीयाचे ऐवजीं...' -वाडबाबा १.१७६. ॰मूठ-स्त्री. पूर्ण भरलेली मूठ (धान्य इ॰ कानीं). ॰रट्टा-वि. भरचक्का पहा. भर; मोठा; भक्कम; भारी या अर्थींहि योजतात. उदा॰ भररट्टा मजल-कोस-पल्ला. तबल, जबर, जरब शब्द पहा. ॰रस्ता-पु. हमरस्ता. ॰रास-स्त्री. १ शेतांत पिकलेल्या धान्याची एकत्र केलेली रास, ढीग. (भागीदारांत वांटण्याच्या पूर्वींची). २ (सामा.) रास, ढीग. ॰वयाचा- वि. प्रौढ, पोक्त; भरजवानीचा; ॰वसूल-पु. (देश, ग व, जमीन इ॰ पासून) मिळालेला पूर्ण वसूल. ॰वसुली-वि. ज्याचा भरवसूल (कांहीं वजावाट न होतां) मिळाला आहे असा (गांव, शेत इ॰). ॰वांगीं-नअव. निरनिराळ्या फोडी न करतां चिरून, मसाला भरून केलेली सगळ्या वांग्यांची भाजी. ॰वायकी-स्त्री. (व.) बढाई. ॰शाई-स्त्री. गंभीर आवाज निघण्याकरितां पख- वाजाच्या मध्यभागावर लावलेला शाईचा जाड थर, याच्या उलट पाणशाई. ॰सांड-वि. भरपूर, रगड. ॰सुगी-स्त्री. ऐन हंगाम. ॰हाक-स्त्री. १ भर आवाजानें मारलेल्या हांकेचें अंतर, टप्पा. २ -क्रिवि. अशा अंतरावर, टप्प्यावर.

दाते शब्दकोश

चित्रकाव्य, चित्रगाथा      

न.       केवळ शब्दांच्या रचनेची चमत्कृती असणारे काव्य : ‘तिवारींची प्रवृत्ती चित्रकाव्ये रचण्याकडे फार आहे…’ - सासंचा १४. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चोरमोळा      

पु.       चोरांचा शिक्का; खोटे नाणे : ‘हा चोरमोळा असिका । प्रपंचाचां ठसा लटका । जो प्रवृत्ति पडिला लोकां । अज्ञानांचा ।’ − ज्ञाप्रबो ५४९. पहा : चोरथरा

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चोरटावा      

पु.       चोरटेपणा; चोरवड; चोरी करण्याची प्रवृत्ती : ‘कामगारात टंगळमंगळ व चोरटावा माजून राहिला आहे.’ − गांवगाडा १५३.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दिग्विजय      

पु.       १. दशदिशा, सर्व जग जिंकणे. २. (उप.) अशिष्ट, बेताल कृत्य; वेडेपणाची, आडदांड, आक्रस्ताळी प्रवृत्ती; दंगा; बंड. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

धर्म      

पु.       १. धार्मिक विधियुक्त क्रिया, कर्मे; परमेश्वरासंबंधीचे कर्तव्य; र्इश्वरोपासना; परमेश्वरप्राप्तीची साधने; परमेश्वरप्राप्तीचा मार्ग, पंथ. २. मनुष्याला सदाचरणाला लावणारे व परमेश्वरचिंतनाचा मार्ग दाखवणारे हिंदू, ख्रिश्चन, यहुदी, इस्लामी वगैरे पंथ. ३. समाजव्यवस्थेसाठी शास्त्रांनी घालून दिलेले आचार, नियम, पवित्र विधी, कर्तव्ये. ४. चार पुरुषार्थांपैकी पहिला. ५. सद्गुण; शास्त्रोक्त वागल्याने अंगी येणारा नैतिक, धार्मिक गुण. ६. स्वाभाविक गुण; गुणधर्म; नैसर्गिक प्रवृत्ती. ७. कर्तव्यकर्म; रूढी. ८. कायदा. ९. धर्माचरणाचे पुण्य. [सं.] (वा.) धर्म करता कर्म उभे राहणे, धर्म करता कर्म पाठीस लागणे – परोपकार करीत असता आपणच संकटात पडणे. धर्म खुंटीस बांधणे – (जनावराला) उपाशी जखडून टाकणे; ठाणावर बांधून ठेवणे. धर्माआड कुत्रे होणे – दानधर्माच्या आड येणे. धर्माची वाट बिघडणे, . धर्माची वाट मोडणे – एखाद्या दानधर्माचा ओघ थांबणे, थांबविणे. धर्माच्या पारी बसणे – १. दुसऱ्याचे पैसे खर्च करीत रिकामटेकडे बसणे. २. सद्गुणांचे चांगले फळ मिळणे; सदाचारामुळे चांगले दिवस येणे. ३. सतत दानधर्म करणे; धर्मकृत्ये आचरणे. धर्मावर लोटणे, धर्मावर टाकणे, धर्मावर सोडणे – एखाद्याच्या न्यायबुद्धीवर सोपवणे. धर्मावर सोमवार सोडणे – स्वतः झीज न सोसता परभारे होर्इल ते पाहणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

एकाकार

न. १ मिश्रण; सरभेसळ; मिसळ; खिचडी; एक- रास. २ गोंधळ; गर्दी; बाजार. ३ गोलंकार; एकरूपता; संकर (निरनिराळ्या जातींच्या, दर्जांच्या लोकांचा). ४ ऐक्य; एका- कृति. 'मोडूनियां नामरूपमुद्रा । जीव आणिशी एकाकारा ।' -एभा १९.८. -वि. १ सारखा कल, ओढा, प्रवृत्ति असलेलें (मन, वासना इ॰). २ एका आकाराचे, रूपाचे, घडणीचे. ' जीव शिव एकाकार । तैसे भिनले दोन्ही अधर ।।' -एरुस्व १.५७. ३ एकाग्र; दृढ़; एकनिष्ठ; स्थिर; निश्चल (मन). [सं. एक + आकार]

दाते शब्दकोश

एकवीरा वृत्ति

स्त्री. एकावलंबित्व; कुटुंबांत कर्ता पुरुष असला कीं तो मरेपर्यंत सर्व त्याच्यावर अवलंबून असून त्यास मदत करण्याची अगर त्याचें काम पुढें चालविण्याची प्रवृत्ति नसणें. -नवाकाळ २८.१०.३३. [सं. एक + वीर + वृत्ति]

दाते शब्दकोश

गौण

न. १ न्यून; अभाव; तुटवडा; कमीपणा. २ अपूर्णत्व; हीनता; तफावत. -वि. १ कमी प्रतीचा; हलक्या प्रतीचा; कमी महत्त्वाचा; अप्रधान. २ आनुकल्पिक; गौणभूत; बदला. ३ मुख्य नव्हें तें; दुय्यम. 'मूळबंधाचें लक्षण । वज्रासन गौण । नाम यासी ।।' -ज्ञा ६.१९९. [सं.] ॰मानणें-कमी लेखणे. 'तें तीर्थ घालतां वदनीं । ब्रह्मरस गौणमानी ।' ॰कल्प-पु. १ अमुख्य, अप्रधान हेतु किंवा उद्धेश. २ दुय्यम ध्येय; विकल्प; अनुकल्प; बदला; प्रतिनिधि. ॰पक्ष-१ कमजोर, खालच्या दर्जाचा, अमुख्य,अप्रधान पक्ष, बाजू (वाद, गोष्टी, प्रमेय यांचा). २ गौणकल्प ३ (सामा.) हलका पक्ष, बाजी. ॰मुख- न्याय-पु. तारतम्याचा नियम (मुख्यामुख्य, मौलिक व अलं कारिक, प्रधान अप्रधान यांतील) मुख्य पक्ष संभवत असतां गौण अंगिकारूं नये या अर्थी वापरतात. गौणीवृत्ति-स्त्री. शब्दाची स्वाभिधेय गुणसंबंधामुळें अर्थांतराच्या ठायीं असलेली प्रवृत्ति. [सं.]

दाते शब्दकोश

घाय

स्त्री.त्वरा; जलदी; घाई. (प्र.) घाई पहा. [घाई] सामाशब्द- ॰कूत-स्त्रीन. १ मोठी धांदल; उतावळेपणा; तांतडी. क्रि॰ येणें). २ (एखादें काम करण्याबद्दल) दुसर्‍यास लावलेली निकड, तगादा, नेट, आग्रह. (क्रि॰ लावणें; देणें; करणें; मांडणें). ३ ताप येण्यापूर्वीं होणारी तगमग, काहिली, अस्वस्थता. (क्रि॰ येणें). ४ खाजविण्याची अनिवार प्रवृत्ति, अतिशय कंडू; खाजेची इसळी. (क्रि॰ येणें). [घाय = घाई + कुथणें किंवा आकूत] ॰कुतीस येणें-अक्रि. उतावळेपणाची, घाई करण्याची, लहर येणें; अतिशय घाईला. अडीच कांड्यावर येणें. ॰कुतेपणा-पु. (मनाची) दम न निघण्यासारखी अवस्था; अस्वस्थता; उतावळेपणा; घायकृत करण्याचा स्वभाव. 'त्याचा उतावळेपणा, घायकुतेपणा, प्रेमळपणा व रागीटपणा हे सर्व गुण अतिरेकामुळें हास्यास्पद होतात.' -सुदे १५१. घाय- कुत्या-वि. घायकूत करण्याचा स्वभाव ज्याचा आहे असा; घाई करण्याचा, उतावळेपणाचा स्वभाव ज्याचा तो; हुलहुल्या; स्वतः घायकूत करणारा किंवा दुसर्‍याला घायकूत करावयाला लावणारा. 'परंतु बळवंतराव घायकुत्या माणूस नव्हता.' -भयं- लावणारा. 'परंतु बळवंतराव घायकुत्या माणूस नव्हता.' -भयं- करदिव्य. घायकोत-स्त्री. (माण.) घायकूत पहा.

दाते शब्दकोश

घायकूत, घायकत      

स्त्री.       न. १. मोठी धांदल; उतावळेपणा; तातडी. (क्रि. येणे.) २. (एखादे काम करण्याबद्दल) दुसऱ्याला लावलेली निकड, तगादा, नेट, आग्रह. (क्रि. लावणे, देणे, करणे, मांडणे.) ३. ताप येण्यापूर्वी होणारी तगमग, काहिली, अस्वस्थता. (क्रि. येणे.) ४. खाजवण्याची अनिवार प्रवृत्ती, अतिशय खांज; खाजेची इसळी. (क्रि. येणे.) [सं. हय् + कुथ्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घेतावणा      

वि.       घेण्याकडेच प्रवृत्ती असलेला.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

हुनुक

स्त्री. हौस; प्रवृत्ति; योग्यता. 'कुस्तीची निसर्ग- दत्त प्रेरणा व हुनुक हे गुणहि अवश्य असतात.' -के २९. ११.१९३८.

दाते शब्दकोश

इरादत

स्त्री. इच्छा असण्याचा भाव; प्रवृत्ति. -मुधो. [अर.]

दाते शब्दकोश

जातीयवाद      

पु.       (राज्य.) राष्ट्र किंवा एकूण समाज यापेक्षा आपला धर्म किंवा जात यावर अधिक निष्ठा ठेवण्याची प्रवृत्ती.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जीव      

पु.        मन; प्रवृत्ती; कल, [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जुं, जुंआठा      

पु.       जुगार खेळण्याचे ठिकाण; द्यूत,जुव्वा खेळण्याची जागा : ‘गोसावीयासि सारी जुं खेळावयाची प्रवृत्ति : मग गोसावी प्रतदीनीं जुंआंठेयासि बीजें करीति : सारी जुं खेळावेयाचें वेसन स्वीकरीति :’ - लीचपू १८.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

झड      

स्त्री.       १. (घार, गिधाड इ. हिंस्त्र प्राण्यांची) झडप; झपेट; झाप. २. (ल.) धाव; उडी; (एखादी वस्तू मिळावी म्हणून) उत्कंठेने घातलेली उडी; झेप : ‘झडकरी झड घाली धांव पंचानना रे ।’ - करूणा. ३. एखाद्या वस्तूवर एकाच वेळी अनेकांची प्रवृत्ती; कल. (क्रि. घालणे, करणे, पडणे, लागणे.) ४. (एकामागून एक येणाऱ्या गोष्टींची, माणसांची) माळका; परंपरा. (क्रि. लागणे, पडणे.) [ध्व.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

झड

स्त्री. १ पावसाची एकसारखी वृष्टि; झिंबड; पर्जन्याचा संतत वर्षाव; त्यावरून २ (ल.) एखादया वस्तूचा सारखा वर्षाव. (क्रि॰ लागणें; बसणें). 'भीमावरि न गणुनि शरवृष्टीची झड करी करी लगट ।' -मोद्रोण २.४६. ३ जोराच्या पावसाचे उडणारे तुषार; वावझड; शिंट. ४ (ल.) पावसाचे तुषार आंत येऊं नयेत म्हणून दार, खिडकी, पागोळ्या इ॰ कांवर बसविलेलें झडप, तट्या, पाखाटी, छप्पर, हाथरी (सुपारीच्या झाडाची चुडतें). ५ (घार, गिधाड इ॰ हिंस्त्र प्राण्यांची) झडप; झपेट; झांप. ६ (ल.) धांव; उडी; झडपडा (एखादी वस्तु मिळावी म्हणून घातलेला) उत्कंठेनें घातलेली उडी; झेंप. 'झडकरि झड घाली धांव पंचानना रे ।' -रामदास, करुणाष्टकें (७. नवनीत पृ. १७०.) ७ एका वस्तूवर एकाच कालीं अनेकांची प्रवृत्ति. (क्रि॰ घालणें; करणें; पडणें; लागणें). 'एकच विहीर पडली त्यामुळें सर्व लोकांची झड पडते ' ८ (एकामागून एक येणार्‍या गोष्टींची, माणसांची) माळका; परंपरा (क्रि॰ लागणें; पडणें). [ध्व. प्रा. दे.झडी = निरंतर वृष्टि].

दाते शब्दकोश

झो(झों)क

पु. १ कल; ओळंब्यांतून एकीकडे कलणें; झकणें; तोल (क्रि॰ जाणें). 'डोंगरावरून उतरतांना झोक गेला तर रसातळाला जाण्याची भीति.' २ (ल.) वळण; रोंख; कल; दिशा; मोडणी; रीत; चाल; वृत्ति (सैन्य कुच करतांना, स्वभा- वाची, भाषणाची इ॰). 'वामनरावांचे बोलण्याचा झोक माझे लक्षांत आला.' ३ वार्‍याचा मोठा झोत; वादळाचा तडाखा, झटका. ४ झपाटा (वस्त्राच्या पदराचा). ५ (ल.) भाष- णाचा प्रवाह, वेग. 'कोणी कसाहि शब्द सांगितला तरी हा बोल- ण्याचे झोंकाखालीं नेतो.' 'श्लोक वाचण्याचा झोंक थांबवून अर्थाकडे धांवावें लागतें.' -विवि ८.७.१२४. ६ प्रवृत्ति; तालमान; रीत. 'देशा-काळाचा झोंक पाहून वागावें.' [हिं. झुकणें झोक] ॰विठ्ठी-चिठ्ठी-स्त्री. १ एखाद्यानें, एखाद्यास, एखाद्यावर काम न होण्याजोगी दिलेली चिठ्ठी; रोखा, करारपत्र (ज्यामुळें ती घेणा- राची निराशा होईल असें). २ (ल.) व्यर्थ दिलेला हेलपाटा; कपटवचन; खोटी आशा.(क्रि॰ देणें). ॰पट्टी-स्त्री. पोकळवचन; भूलथाप; फुसलावणी. झोकचिठ्ठी पहा. (क्रि॰ देणें). झोकली बातमी-स्त्री. उडत बातमी; हूल; अफवा.

दाते शब्दकोश

झोक      

पु.       १. कल; ओळंब्यांतून एकीकडे कलणे; झुकणे; तोल. (क्रि. जाणे.) २. (ल.) वळणे; रोख; कल; दिशा; मोडणी; रीत; चाल; वृत्ती (सैन्य कूच करताना, स्वभावाची, भाषणाची इ.). ‘राजबाच्या लक्षांत केसरसिंगाच्या बोलण्याचा झोकच आला नव्हता.’ – स्वस्था १९. ३. वाऱ्याचा मोठा झोत; वादळाचा तडाखा, झटका. ४. झपाटा (वस्त्राच्या पदराचा). ५. (ल.) भाषणाचा प्रवाह, वेग : ‘श्लोक वाचण्याचा झोक थांबवून अर्थाकडे थांबावें लागतें.’ – विज्ञावि ८·७·१२४. ६. प्रवृत्ती; तालमान; रीत. [हिं.] ७. बाज; पद्धत : ‘नानाचा पुढला आयुष्यक्रम फारच निराळ्या झोकावर गेला असता.’ – गणप १०१. ८. डौल.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

झुळूक, झुळकी, झुळक

स्त्री. १ वार्‍याची मंदगति, लहर 'वारेयांची झुळकी आली ।' -शिशु ६१३. २ (ल.) अनु- कूल वेळ, संधि. (क्रि॰ वहाणें). 'व्यापार करीत असावें, एकाद वेळ झुळूक वाहिली म्हणजे फलद्रूप होईल.' ३ अंधुक. अस्पष्ट देखावा; अपूर्ण दृश्य; (वस्तूच्या) आकाराचा किंचित् भास. ४ ओघ; मार्ग; अखंड प्रवाह, चलती, प्रवृत्ति (वारा, विशेष प्रकारची हवा, पाऊस, ऊन्ह, थंडी, व्यापारधंदा, रोगराई, सांथ इ॰ ची). ५ अल्प अनु- भव. ६ तकाकी; चकाकी. -क्रिवि. झुळझुळ पहा. (क्रि॰ वाहणें). [सं. दोल्; प्रा. झुल्ल; ध्व. झुळ]

दाते शब्दकोश

कलणे      

अक्रि.       १. बाजूवर पडणे. एका अंगावर तोल जाणे. कलंडणे; एकारणे; किंचित झोक जाणे; झुकणे; टेकणे. २. (ल.) कमी व्हायला लागणे; उतरणे; मध्यरात्र, मध्यान्हादी जे काल ते काहीसे अतिक्रांत होणे; ऱ्हास होऊ लागणे. ३. (ल.) एखाद्याकडे कल, ओढा, प्रवृत्ती असणे (मन, मर्जी, स्वभाव यांची). ४. कवळणे, गिळणे : ‘जैसा काल कलुं आला : महाकालाते’ - विसिं ९२·२. [सं. कल्‌=प्रवृत्त करणे]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कलणें

अक्रि. १ बाजूवर पडणें; एका अंगावर तोल जाणें; कलंडणें; एकारणें; किंचित झोंक जाणें; झुकणें; टेकणें. [कल] २ (ल.) कमी होण्यास लागणें; उतरणें; मध्यरात्र, माघ्या- न्हादि जे काल ते कांहींसे अतिक्रांत होणें; र्‍हास होऊं लागणें. ३ (ल.) एखाद्याकडे कल, ओंढा, प्रवृत्ति असणें (मन, मर्जी, स्वभाव यांची). [सं. कल् = प्रवृत्त करणें]

दाते शब्दकोश

कंपूशाही      

स्त्री.       काही विशिष्ट हेतूने एकत्र येणे. तेवढ्याच गटाचे हितसंबंध जपणे ही प्रवृत्ती.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कर्मेंद्रिय

न. १ ज्याच्या योगें कोणतें तरी काम होतें व पदार्थाचें ग्रहण, गमन इ. कर्म करतां येतें तें शरीराचें इंद्रिय. ज्ञानेंद्रियाच्या उलट; कर्मेंद्रियें पांच आहेत:-हात, पाय, वाणी, शिश्न व गुद. 'परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती । निरोधुनी ।' -ज्ञा. ३.६४. २ शिश्न; जननेंद्रिय. 'शिनळ पुरुषाचे डोळे काढून त्याचें कर्में- द्रिय छेदीत.' -व्यभिचार निषेधक बोध ८. [सं. कर्म + इंद्रिय] ॰पंचक-वरील पांच इंद्रियांच्या समुदायास म्हणतात.

दाते शब्दकोश

कर्मेंद्रिय      

न.       १. ज्याच्या योगाने कोणते तरी काम होते व पदार्थाचे ग्रहण, गमन इ. कर्म करता येते ते शरीराचे इंद्रिय. कर्मेंद्रिय पाच आहेत : − हात, पाय, वाणी, जननेंद्रिय व गुद : ‘परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती । निरोधुनी ॥’ − ज्ञा ३·६४. २. शिश्न; जननेंद्रिय : ‘शिनळ पुरुषाचे डोळे काढून त्याचें कर्मेंद्रिय छेदित.’ − व्यभिचार निषेधक बोध ८. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कृत्रिमतावाद      

पु.       (मानस.) नैसर्गिक घटनांवर हेत्वारोप करण्याची मुलांमध्ये असणारी प्रवृत्ती. उदा. ढग का हलतात? - त्यांना हलावयाचे किंवा फिरावयाचे आहे म्हणून.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

क्षुद्र

न. न्यून; उणेपणा; वैगुण्य; दोष. -वि. लहान (योग्यता, आकार इ॰ नें); हलकें; क्षुल्लक 'क्षुद्र मत्स्य-प्राणी- ग्राम इ॰.' 'जोडा पुसणें, केर काढणें ही क्षुद्रकर्में तुम्हा सारख्यांनीं जातीनें करूं नयेत.' [सं.] ॰कल्पना-स्त्री. कमी महत्त्वाची; हलकी कल्पना. तर्क, विचार ॰घंटिका-स्त्री. घुगरु; घुंगरांची माळ; घुंगरू लावलेला एक दागिना. 'क्षुद्र घंटिका झळ- कती ।' -वेसीस्व ३.७१. ॰दृष्टि-स्त्री. हलके, बारीकसारीक दोष पाहण्याची प्रवृत्ति; कोतें मन; अनुदार वृत्ति. -वि. उणे पणा काढणारा; क्षुद्रदृष्टि ठेवणारा; क्षुद्रान्वेषी. ॰मेह-पु. लघवी थोडी होणें; अशी होणारी लघवी. ॰रोग-पु. क्षुल्लक रोग, विकार (यांची २०० पर्यंत संख्या आहे). क्षुद्रान्वेषण, क्षुद्रान्वेषी- क्षुद्रदृष्टि पहा. क्षुद्रकक्षुद्र पहा.

दाते शब्दकोश

कटाक्ष

पु. १ डोळ्याच्या कोपर्‍यांतून पाहणें (साभि- प्रायानें); अपांगदर्शन-दृष्टि; डोळा घालणें, मारणें; वांकडी दृष्टि. 'काय चंचळू मासा । कामिनीकटाक्षु जैसा ।' -ज्ञा १४.१७०. २ (ल.) व्यंग्यार्थाचें भाषण; छद्मीपणा; उपरोधिक भाषणाचा रोख. ३ दांत; राग; वैर. 'जेव्हां तेव्हां त्याचा माझ्यावर कटाक्ष ! मी काय त्याचें असें घोडें मारलें आहे?' ४ क्रोधदृष्टि; गैरमर्जी. 'त्यानें माझ्याकडे कटाक्षानें पाहतांच मी भ्यालों.' ५ मुद्दा; जोर; रोख; कल; प्रवृत्ति. 'मोठमोठया रसिकांचाहि वरीलप्रमाणें कटाक्ष आढळेल.' -नि. 'गीतेचा सर्व कटाक्ष याच तत्त्वावर आहे.' -टि ४.५२३. [सं.]

दाते शब्दकोश

कुंभार

पु. १ मातीचीं भांडी घडवून त्यावर उपजीविका करणारी एक जात व तींतील व्यक्ति. १२ एक प्रकारची माशी; कुंभारीण. [सं. कुंभकार] म्ह॰-१ (गो.) कुंभाराक मडकीं धड ना = जिन्नस उत्पन्न करणार्‍याला त्याचें दुर्भिक्ष असतें कारण चांगली मडकीं सर्व विकावयाचीं असतात व स्वतः वापरावयास फुटकें तुटकें घ्यावयाचें अशी प्रवृत्ति असते. २ (गो.) कुंभाराक जवा- हीर = अनधिकार्‍यास अधिकार देणें; अयोग्य माणसाला मौल्य- वान वस्तु देणें. ३ कुंभाराची सून कधीं तरी उकिरड्यावर येईलच = जी गोष्ट निश्चितपणें व्हावयाची ती गोष्ट आज ना उद्यां होणारच. ४ कुंभार कुंभारीण सुखी असेल तर मडक्याला काय तोटा = नवरा-बायको सुखी असतील तर मुलांना काय तोटा. ५ कुंभारणीनें कुंभारणीशीं कज्जा केला आणि गाढवाचा कान पिळला = दोघांच्या भांडणांत तिसरा घुसला असतां त्याला मिळणारें प्रायश्चित्त. ॰काम-न. गाडगी-मडकीं (समुदायानें) लग्नकार्याच्या वेळचीं सुगडें इत्यादि कुंभारानें करावयाच्या वस्तू. कुंभारकी-स्त्री. कुंभाराचा धंदा. ॰कुकुड-कुकडा-पु. भारद्वाज पक्षी. कुकुडकुंभा पहा. ॰क्रिया-स्त्री. शूद्र मेला असतां कुंभार जी त्याची उत्तरक्रिया चालवितो ती. ॰खाणी-स्त्री. कुंभाराची मातीची खाण. ॰गवंडी-पु. गवंडीकाम करणारा कुंभार. ॰घाणी-स्त्री. १ कुंभारानें मळून तयार केलेली माती. २ उंसाच्या चिपाडांत राहिलेला रस काढण्याकरितां उपयोगांत आणलेल्या कुंभाराच्या घाणीवरील कर. ३ कुंभाराच्या घाणी- साठीं दिलेलीं उंसाचीं चिपाडें. कुंभारडा-पु. (तिरस्कारानें) कुंभा रास म्हणतात. कुंभारणी-स्त्री. कुंभाराची बायको. ॰वाडा-पु. कुंभाराची आळी; कुंभारांची वस्ती. -राच्या देवी-माता-स्त्री. टोंचलेल्या देवी; गोस्तनी देवी.

दाते शब्दकोश

खेळशेपणा      

पु.       आळशीपणा; अळंटळं; रेंगाळण्याची किंवा गमण्याची प्रवृत्ती; खेळगडीपणा. (राजा.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

लहर

स्त्री. १ तरंग; लाट (पाण्याची). 'प्रकटति बहुतर लहरी, करि करिवरसा ऱ्हदासि बहु तरल हरी ।' -मोकृष्ण १६. १०. २ शरीरांत उठणारा वेग, पेटका, झटका (मादक, विषारी पदार्थ, विषारी दंश, क्रोध, काम इ॰ कांपासून किंवा मरणकाळीं येणारा).'सोसिल शोकविषाच्या कृष्णा मत्काय हा किती लहरी ।' -मोस्त्री ४.९. ३ शौचाच्या वेळीं होणारी पोटांतील खळबळ; ओसर; शौचाचा आवेग. ४ झगडा, वेदना इ॰ च्या वेळीं होणारी क्रिया; धडपड. ५ वाऱ्याची झुळूक; मंद वायु. ६ हुक्की; एकदम होणारी इच्छा; प्रवृत्ति; कल (मनाचा). 'वामनाची तेव्हां लहर लागली नाहीं.' ७ विशिष्ट जातीच्या सापाच्या गळ्याखालच्या रेषा (ह्या जितक्या असतात तितक्या तो साप चावलेल्या मनुष्यास विषाच्या लहरी येतात अशी लोकांत प्रसिद्धि आहे). ८ नागमोडी सारखी रेषा (कापड, वस्त्र इ॰ वरील विणकामांतील किंवा रंगानें उठवि- लेली). ९ कापड, पोषाख याची नागमोडी घडी. १० आकस्मिक झडप; ग्रासण (झोपेनें). 'झोपेची लहर' ११ छाया; झांक. [सं. लहरी] सामाशब्द- ॰दार-वि. १ छांदिष्ट; लहरी; तबीयती इ॰ २ नामी; सुंदर; लहर दाखविणारा (पोषाख, गाणें, वाजविणें भाषण, कविता इ॰). [लहर] ॰बहर-स्त्री. १ जोम; ज्वानी; भर; अत्युकर्ष. 'नवतीची लहरबहर थोडी.' 'आंब्याची लहरबहर उन्हाळ्यांत असती' २ हुक्की. [लहर + बहर] लहरा- पु. १ (संगीत) छाया; थाट; सूर (विशेषतः तंतुवाद्यावरील) 'कोणत्या रागाचा लहरा आणूं बरें?' २ तान; लेकर. (वाप्र.) ॰मोरणें-छांदिष्टपणानें क्रिडा करण; मौज मारणें. लहरी-स्त्री. १ लाट. २ (काव्य) शरीरांत उठणारा वेग, पेटका. 'काम-क्रोध लहरी' 'लागला म्हणोनि लहरी । भांजेची ना ।' -ज्ञा २. ७१. -तुगा १४०. ३ (व.) चुनडीप्रमाणें नागमोडी रेघा असलेलें स्त्रियांचें नेसण्याच एक वस्त्र. लहर पहा. -वि. छांदिष्ट; चंचल; मनस्वी. [लहर] ॰दार-वि. १ लहरी, नागमोडी (कांठ, वस्त्र इ॰); लाटांसारख्या रेघांचा. 'किनखापे लाल लहरीदार.' -समारो २. ७३. २ छांदिष्ट; लहरी; तऱ्हेबाज; विलक्षण. ३ पाण्याच्या लाटेप्रमाणें वरखालीं होणारें. [लहर + दार] ॰बहरी-वि. छांदिष्ट; लहरी, लहरबहर पहा. [लहरी द्वि.] लहऱ्या पिटणें-(व.) कमालीची उत्सुकता लागणें, दाखविणें. 'जाण्यासाठीं लहऱ्या पिटतो जसा.'

दाते शब्दकोश

लवे-लागणी

स्त्री. (पडवी व शेजार) संबंध; ऋणानुबंध. (ल.) विश्व किंवा प्रवृत्ति आणि माया. 'भणाल लवे लागणिचा । तरि मध्यें लटिका वायांचा ।' -ऋ ४४.

दाते शब्दकोश

मैल

(पु.) हिंदी अर्थ : झुकाव, चाह. मराठी अर्थ : प्रवृत्ति, अिच्छा.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

मानस

नपु. १ मन; चित्त; बुद्धीचें स्थान; बुद्धिशक्ति. २ अन्तःकरण; मनोविकाराचें स्थान. 'मानस माझें मोहिलें या देवें ।' ३ इच्छा; प्रवृत्ति. ४ हेतु; उद्देश. ५ (कायम) ध्वनित, गर्भित मान्यता. ६ हिमालय पर्वतांतील मानसरोवर. 'न क्षोभे जेवि मानसी हंस ।' -मोसभा १.९६. -वि. मनासंबंधी; मनाचा. [सं.] ॰पुत्र-पु. १ शरीरापासून नसून केवळ इच्छामात्रेंकरून निर्माण केलेला पुत्र. २ (ल.) पुत्राप्रमाणें अत्यंत प्रिय मनुष्य. [सं.] ॰पूजा-स्त्री. १ गंधपुष्पादिक पदार्थ मनाचेच कल्पून भावनामय केलेला पूजा; मानसिक पूजा. 'मानसपूजा अगत्य व्हावी ।' -दा ४.५.३१ [सं.] ॰शास्त्र-न. मनाचें स्वरूप, त्याच्या प्रक्रिया इ॰ संबंधी शास्त्र. [सं.] ॰सरोवर-न. हिमालयांतील एक प्रख्यात सरोवर. ॰सृष्टि-स्त्री. मनाची सृष्टि; काल्पनिक चित्रें; मनानें बनविलेल्या आणि मनांत असणाऱ्या आकृती व रूपें. [सं.] मानसिक-न. १ पराकाष्टेचें अल्पत्व; निवळ कल्पना. 'मरु देशांत पाण्याचें मानसिक.' २ एखाद्या गोष्टीविषयीं होणारा संदेह. 'त्याचें येण्याचें असल्या पावसांत मानसिकच दिसतें नांहीं.' -शाको. वि. १ मनाचा; बुद्धिचा; मनांत असणारा; मनसंबंधीं. 'स्वप्न हा मानसिक प्रपंच होय.' २ काल्पनिक; अयु- क्तिक. ३ संशयित; अनिश्चित; निवळ कल्पनीय. [सं.] ॰जुलूम- पु. मनाविरुद्ध गोष्ट करण्यास भाग पाडणें. 'शारीरिक जुलमापेक्षां मानसिक जुलूम अतिशय भयंकर असतो. ' -टि ३.१३९.

दाते शब्दकोश

मौन

न. गप्प किंवा स्तब्ध बसणें; न बोलणें; गुपचुप बसणें; मुकेपणा; निश्शब्दता; विवक्षित कालपर्यंत भाषण न करितां राहण्याचा जो व्यापार तो. 'नकळे हृदयीचें महिमान । जेथें उपनिषदा पडलें मौन । तेथेंही संचरले सज्जन । देहाभिमान सांडोनी । ' -एरुस्व १.३७. २ अबोलपणा; स्तब्धता; अनालापिता; अनाकापवृत्ति. -वि. मुका; न बोलणारा; स्तब्ध किंवा गपचूप बसणारा. [सं.] ॰मुद्रा-स्त्री. शांतपणाची, न बोलण्याची किंवा अबोलपणाची मुद्रा; अबोलपणानें राहण्याची प्रवृत्ति दर्शविणारी चेहऱ्याची ठेवण. [सं.] ॰व्रत-न. कांहीं मुदतीपर्यंत न बोलण्याचा नियम, नेम; कांहीं कालपर्यंत मौन वृत्तीनें राहण्याचें धरलेलें व्रत. (क्रि॰ धरणें.) [सं.] मौनावणें-क्रि. स्तब्ध राहणें; अबोलपणानें असणें; एखाद्यानें स्वतःची शांतवृत्ति राखणें; चुप बसणें, होणें. 'प्रेमें विकासलीं कमळें शुद्ध । गुंजावरती कृष्ण षट्पद । ऐकोनि गंधर्व जाहले स्तब्ध । सामवेद मौनावलें । ' -एरुस्व ३.६. 'स्वंयें शेष मौनावला स्थीर पाहे । ' -राम १५८. मौनी- वि. १ स्तब्ध; मौनव्रत घेतलेला; निश्शब्द; अबोल; अल्पभाषी; अनालापी; भाषणविरक्त. २ जगापासून पराड्मुख होऊन ज्यानें आपलें सर्व विकार (कामक्रोध इ॰) जिंकले आहेत असा; वन- वासी; अरण्यवासी; वानप्रस्थ; ऋषि (धार्मिक). मौन्य-न. १ स्तब्धता; मौन; शांतता. २ मुकेपणा; अबोलपणा; अनालापिता; अनालापवृत्ति. [सं. मौन] मौन्य(न) पणें-क्रिवि. स्तब्ध; मुकाट्यानें. 'बस तुं मौनपणें अथवा उगा । ' -वामनचरित्र १४ (नवनीत प्र. ११०)

दाते शब्दकोश

मिजाज़

(पु.) हिंदी व मराठी अर्थ : प्रवृत्ति, प्रकृति, स्वभाव.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

मोह

पु. १ मूर्च्छा; बेशुद्धि; चित्तभ्रम; भुरळ; भारणी; मोहन; भुलावण; भूल. २ प्रेम; माया, दया, कींव, सहानुभूति इ॰ ना चेतविणाऱ्या विषयांचा क्षुब्ध लोभ; मोहन. 'द्रोणाला दुःशासन कथितां दे भीष्म हानि मोहातें ।' -मोभीष्म ११.१३२.३ सदसद्- विवेकबुद्धीचा, जाणिवेचा लोप; विस्मरण; घोटाळा; मतिभ्रम; भुलवण. 'निजदोषें व्यसनातें पावुनि मोहीं निमग्न नसती कीं ।' -मोकर्ण १.६.४. अज्ञान; मूर्खपणा; आत्मज्ञानाचा अभाव असल्या मुळें जगांतील सर्व विषय, सर्व दृश्य जगत खरें आहे असा भास होऊन त्याचा उपभोग व वैषयिक सुख घेण्याकडे प्रवृत्ति होणें. ५ आवड; शोक; प्रीती; प्रेमाचें वेड; प्रेमाचा अतिरेक. 'परिभूप- पुत्र मोहें केला पहिल्या परीस ही अंध ।' -मोरोपंत. ६ चूक. [सं. मुह्] मोहक-वि. १ भुरळ पाडणारें; भ्रम उत्पन्न करणारें; गुंतविणारें; गुंगविणारे. २ आकर्षक; रमविणारें; चित्त हरण कर- णारें. [सं.] ॰पाश-पु. मोहरूप जो पाश तो; संसाराचें जाळें; भ्रामक विषयांचें बंधन. मोहजाल पहा. ॰यंत्र-न. नळा (शोभेच्या दारूचा); फुलबाजी. 'मोहयंत्री सुमनमाला । अग्निपुष्पें भासती डोळा । फुलें म्हणती अबळा । पाहता डोळां ते राखा ।' -एरुस्व १५.११८. मोहा, मोहाचा-वि. मोहक किंवा उत्कृष्ट गुणाचा-(एका प्रका- रच्या नारळाबद्दल किंवा सुपारीबद्दल उपयोग). मोहाचा नारळ नारळी-माड-सुपारी-पुस्त्री. ज्यांची गोडी इतर नारळ, सुपा- रीपेक्षां अधिक असते तो नारळ, सुपारी इ॰. या नारळाचें खोंबरे गोड असून तें खाल्ल्यावर चोथा रहात नाहीं; सुपारीहि गोड असतें. -कृषि ७०३. मोहाथिणें-क्रि. (काव्य) मोहनी पाडणें; भुरळ किंवा भुलवन पडणें; भुलून जाणें; मोहीत होणें. 'अवश्य म्हणोनि तीर्थेंश्वरी मोहाथिली अनुवादे ।' मोहाळणें-क्रि. मोह पावणें. ॰मोहित-वि. मोह पावलेला; भुललेला; भुरळ पडलेला; मोहानें व्याप्त असा; लुब्ध. मोहरात्रि-स्त्री. श्रावण वद्य अष्टमी. (या रात्रीं कृष्णानें कंसदूतास मोह पाडला यावरून). मोह- जाल-जाळ-न. मायेच्या योगानें संसारांत उत्पन्न होणारा मोहाचा पाश; संसाराचें, जगांतील पसाऱ्याचें जाळें; कुटुंब, इष्ट- मित्र, मालमत्ता व इतर भ्रामक विषय यांची भूल, भुरळ. 'तां घेतले ये मज मोहजाळीं ।' -सारुह १.१९. मोहणें-उक्रि. भुलणें; भुलावणें; वश करून घेणें; वश होणें; मोह पडेल असें करणें; भारणें; व्यामोह उत्पन्न होणें, करणें; भुलविणें; भुलणें; चित्त भ्रमणें, भ्रम- विणें. 'मन मोहिलें नंदाच्या नंदनें ।' मोहन-वि. १ मोहविणारें; आकर्षक. २ भुलविणारें; भूल पाडणारें; भ्रामक. 'एक म्हणे कुब्जेनें लाविला चंदन । त्यांत कांहीं घातलें मोहन । तरीच भुलला जगज्जीवन । कौटिल्य पूर्ण केलें तिनें ।' -ह २१.१७७. -न. १ (वैद्यक) गुंगी आणणें; भूल देणें; बेहोष पाडणें. -ज्ञा १३.९९५. २ भुरळ मूर्च्छा; भ्रम. गुंगी, निद्रा आणणारें औषध. मोहन- भूत-न. एक प्रकारचें भूत, पिशाच. मोहनमाळ-माला-स्त्री. सोन्याच्या मण्यांची गळ्यांत घालावयाची एक विशिष्ट माळ. मोहनास्त्र-न. एखाद्या इसमावर मोहनी टाकण्याचें अस्त्र; जें शत्रूवर सोंडलें असतां त्याला मूर्च्छा येते असें एक अस्त्र. मोह (हि)नी-स्त्री. १ भूल; भुलावण; मोहन. २ मोह घालण्याचीं कृत्यें; वश करण्याचीं किंवा भूल घालण्याचीं, भुलविण्याचीं कृत्यें (क्रि॰ घालणें). एखाद्यास भुलविण्याकरितां उपयोगांत आणण्याचे मंत्र. ३ विष्णूनें अमृतमंथनाच्या वेळीं घेतलेले सुंदर स्त्रीचें रूप. [सं. मुह् = बेशुद्ध होणें] मोहिनी-स्त्री. १ मोहन; प्रलोभन; भुलवन; भुरळणें; चित्तभ्रम; बुद्धिभ्रम; मोह करणारी. २ समुद्र- मंथनप्रसंगीं भगवंतानीं जें मोहिनीचें रूप घेतलें होतें तें; भुरळ पाडणारी. 'कथा भुवन मोहिनी अशि न मोहिनी होय ती ।' -केका १०३. [सं. मुह्] मोहिरें-न. (महानु.) मोहक वस्तु; मोहविणारें 'तो दाउनि माया वेषाचें मोहिरें । जेथ चरित्रें करी' -ऋ ४२

दाते शब्दकोश

मठारणें–ळणें

उ० वि० जखम भरत येणें. २ पात्रादिकांचे खांच खळगे नाहींसे करणें. ३ प्रवृत्ति करविणें. ४ कबूल होईसें करणें.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

मूर्धावसिक्त

वि. ब्राह्मणापासून क्षत्रिय स्त्रीच्या ठिकाणीं झालेला. 'अंबष्ठ आणि मूर्धावसिक्त । प्रवृत्ति आणि सारस्वत । इत्यादि नांवें जे वर्तत । ते जाण समस्त अनुलोमज ।' -एभा २०.३३. [सं.]

दाते शब्दकोश

निकर

पु. १ कार्य करण्याचा सोईचा मार्ग सोडून क्रोधादि आवेशपूर्वक प्रवृत्ति ती; हट्ट. 'निकर असा नये करूं येत जा खुशाल माझे घरीं ।' -होला ११५. २ कहर; गहजब; आकांडतांडव. 'मी सहज विनोदें करुनी । बोलिलों जाण रुक्मिणी । तुवां निकरची लावण्यखाणीं । केला बहुत आम्हांवरी ।' -ह २७.१०६. ३ जोर; आवेश. -ज्ञा ११.५४८. 'आपण निकर करून किल्ला घेतलाच पाहिजे.' -सूर्यग्र ७४. ४ प्रलय; कडेलोट; आत्यंतिक मर्यादे- पर्यंतची स्थिति. 'वदले सुरमुनि करितो नररूपें रुद्र काय हा निकर ।' -मोभीष्म ३.५८. ५ वाईट परिणाम, शेवट. 'थट्टेचा निकर होईल.' -बाळ २.३०. [निकर्ष] ॰करणें-निकरास, निकरावर येणें, जाणें, आणणें, घालणें = हट्ट, पराकाष्ठा करणें; अगदीं शेवट लावण्याच्या अवस्थेस पोंचणें, नेणें इ॰ निकरा जाणें-वाढणें; पेटणें; वर्दळीवर येणें. 'निकरा जाईल रांडोळी । आम्हां आणि रुक्मिया ।' -एरुस्व ६.९. बोलण्याचा-मारण्याचा-रडण्याचा, हसण्याचा निकर-एखाद्या क्रियेचा कडाखा, परा- काष्ठेचा हट्टीपणा; मुख्यत्वें जुंलमाचा, अन्यायाचा कडेलोट, जोर इ॰ 'त्यानें निकर केला मजवर.'

दाते शब्दकोश

निकर      

पु.       १. कामाचा सोयीचा मार्ग सोडून राग इ. आवेशपूर्ण प्रवृत्ती; हट्ट. २. कहर; गहजब; आकांडतांडव : ‘तुवां निकरची लावण्यखाणीं । केला बहुत आम्हांवरी ।’ – ह २७·१०६. ३. जोर; आवेश. ४. प्रलय; कडेलोट; आत्यंतिक मर्यादेपर्यंतची स्थिती : ‘वदले सुरमुनि करितो नररूपें रुद्र काय हा निकर ।’ – मोभीष्म ३·५८. ५. वाईट परिणाम, शेवट : ‘थट्टेचा निकर होईल.’ – बाळ २·३०. [सं. नि+कृष्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निषेध

पु. १ प्रतिषेध; मनाई; बंदी. २ नकार; परवानगी नसणें; शास्त्राची असंमति. 'न ठारे निषेधु आड । न पडे विधीची भीड ।' -ज्ञा १६.१८९. ३ धिक्कार; निंदा. [सं.] ॰मुखें- क्रिवि. नकार घालून; नकारानें (वर्णन इ॰). निषिद्ध, निषे- धित-वि. १ शास्त्र आणि समाज यांनीं मनाई केलेलें, वर्जिलेलें; शास्त्रास, रुढीस असंमत; त्याज्य. २ वर्ज्य; अविहीत; मना केलेलें. निषेधणें-उक्रि. १ मना करणें; वर्ज्य करणें. २ नाकारणें; नाकबूल करणें; न स्वीकारणें; धिक्कार करणें.' ज्याचे अभंग निषेधूनि समस्त । द्विजांनीं बुडविले उदकांत ।' ३ नाकारणें; नाहीं म्हणणें. निषेधवृत्ति-स्त्री. निषेध करण्याची प्रवृत्ति, स्थिति, स्वरूप. याच्या उलट विधिवृत्ति. -वि. १ निषेधाचा; मनाईचा; नकाराचा; अस्वीकार करणारा. २ आभावात्मक; अकरणरूप.

दाते शब्दकोश

निवृत्ति-त्त

स्त्री. १ निवारण पहा. बंद होणें, करणें; निरास; थांबणें; विराम, लय पावणें; राहणें; अडविणें; थांबणें; थांबविणें. (समासांत). आचार-दुःख-खेद-ज्वर-विघ्न-निवृत्ति. 'औषधसेवनानें रोगनिवृत्ति होते.' २ संसारांतील वस्तुमात्राकडून, विषयांपासून ईश्वराकडे वळणें; अंतःकरण परत फिरणें. 'निवृत्ति- सूत्र सोडवणीया । सर्व शास्त्रार्थ पुरवणि या ।' ज्ञा १८.३८. ३ मृत्यु. ४ सांसारिक उपाधींपासून मुक्तता करून घेणें; उपरति; विरक्ति; संन्यास; त्याग. 'वांचूनि स्वर्ग मृत्यु नरकु आथी । तया हेतु प्रवृत्ति निवृत्ती ।' -ज्ञा १८.५६६. ५ मुक्ति; मोक्ष; भगवत्- प्राप्ति. 'साविया स्वस्त चांगु । निवृत्ती वरी ।' -ज्ञा ८.२३७. ६ निवृत्तिमार्ग पहा. ॰मार्ग-पु. एकांतवासाची, ध्यानमग्न अवस्था; जगांतील सर्व उपाधीपासून आणि विहित आचारांपासून परावृत्ति; विहित कर्माचा त्याग. याच्या उलट प्रवृत्तिमार्ग. [सं.]

दाते शब्दकोश

पैस

पु. १ जागा; स्थळ; मोकळी, विस्तृत जागा. 'पैस धरूनी चाला ठाकत ठायीं ठायीं ।' -तुगा ४६३. २ प्रसार; विस्तार; फैलाव. 'एऱ्हवीं विकारचेनि पैसे । करी कीर इंद्रियांचे- याचि ऐसें ।' -ज्ञा ७.४७. ३ पाऊल; मार्ग; प्रवृत्ति. 'जेथ पुढील पैस पारुखे । मागील स्मरावें तें ठाके ।' -ज्ञा ६.६०. -वि. १ प्रशस्त; विशाल; विस्तीर्ण; अघळपघळ; असंकोचित. २ (कों.) दूर; लांब. 'पैस असे तोचि कळे ।' -सिसं ९.२७५. -क्रिवि. दाटी, अडचण न होई अशा रीतीनें; ऐसपैस; प्रशस्तपणें; मोकळे- पणें (बसणें, वस्तु पडणें). -उद्गा. (रस्त्यावरच्या लोकांस संबोधून) दूर व्हा ! बाजू हटा ! रस्ता सोडा ! [सं. प्रसृ; किंवा पार्श्व] पायां पैस नसणें-अतिशय गर्दी असणें. पैसणें-क्रि. १ प्रवेश करणें. 'तरी मज आंत पैसो । दिठी तुझी ।' -ज्ञा ९.७०. २ मरून जाणें. -शर. ३ पसरणें; फैलावणें.

दाते शब्दकोश

पळपटा-ट्या, पळपु़टा-ट्या

वि. १ पळण्याची संवय, प्रवृत्ति, स्वभाव आलेला; पळून जाणारा. २ (अव. उदा॰ पळपटे) पळालेले, पळून जाणारे (लोक). [पळणें]

दाते शब्दकोश

प्रावण्य

न. १ उतार; उतरण; वांकडेपणा. २ (ल.) प्रवृत्ति; कल; झोंक; आसक्ति; ओढ. [सं. प्र + अवनम्]

दाते शब्दकोश

प्रेरण / प्रेरणा

(सं) स्त्री० प्रवृत्ति, उत्तेजन.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

परिपाटी-ठी

स्त्री. १ क्रम; अनुक्रम; व्यवस्था; प्रघात; प्रस्थापित रीत, मार्ग; परिनालिका. 'कार्य भोग्य हें परिपाठी ।' -विपू ३.८६. २ (अंकगणित) संख्यालेखनपद्धति. -वि. व्याव- हारिक; रूढ. 'जरत्कारी नाम परिपाटी । कन्या असेल जयाच्या पोटीं ।' -मुआदि ९.९. [सं. परिपाटी] परिपाठ-पु. १ परिपाठी; चाल; रीत; रुढी, 'आमच्या त्यांचे घरीं जाण्याचा परिपाठ नाहीं' २ प्रघात, वहिवाट 'ह्या गोष्टीचा त्या देशांत परिपाठ आहे.' ३ पद्धत; प्रकार; चाल; रूढी; टूम. (क्रि॰ घालणें). ४ प्रवृत्ति; बळ. 'मत्स्यमैथुन देखित्यासाठीं । खवळल्या कामाच्या परिपाठी ।' -एभा १७.३५१.

दाते शब्दकोश

प्रसक्ति

स्त्री. (न्याय.) लक्ष्यादिकांचे ठायीं लक्षणादिकांची प्राप्ति; प्रवृत्ति; कल; व्याप्ति; योग्य असणें; लागू पडणें. [सं.] प्रसक्तानुप्रसक्तीनेंक्रिवि. (कल्पनांच्या) अनुषंगानें; सान्निध्या- मुळें; चालू प्रसंग सोडून दृष्टांतासाठीं घेतलेल्या दुसर्‍या विषयाच्या अनुरोधानें (बोलणें इ॰); विचाराचा इतर विचाराशीं किंवा विषयाचा इतर विषयाशीं संबंध आल्यामुळें (वादविवादांत विषयां- तराबद्दल योजितात).

दाते शब्दकोश

प्रसन्न

वि. १ संतुष्ट; समाधानयुक्त; अनुकूल प्रवृत्ति अस- लेला; प्रसाधित; आराधित. 'किं कुलांगना लक्ष्मी प्रसन्न ।' -दावि ४५४. २ आनंदी; आल्हादित; प्रफुल्लित. ३ आनंददायक; संतोष देणारें; अनुकूल. ४ स्वच्छ; शुद्ध; साफ; चकचकीत; निरभ्र; धुकें, धूळ इ॰ रहित (आकाश). ५ शांत; निर्मळ; झुळझुळ वाहणारा (प्रवाह, ओढा). [सं.] ॰चित्त-वि. संतुष्ट; आनंदित मनाचा; आनंदी. ॰मुख-वदन-वि. आनंदित व समाधानयुक्त चेहर्‍याचा. ॰मुखराग-पु. (नृत्य) हास्य, शृंगार व अद्भुत रसाचे प्रसंगीं चेहर्‍यावर दाखविलें जाणारें तेज. प्रसन्नार्थत्व-न. अर्थाचें सुल- भत्व; सहजार्थत्व. 'या दोहोंत शृंगाराचा विषय आहे पण आमच्या पंडितास शब्दाचें प्रसन्नार्थत्व व एकार्थत्व कधींहि सहन होत नस- तात. 'नि २७.

दाते शब्दकोश

प्रत्यक्

वि. १ पुढचा; पुढला; नंतरचा; पश्चात्कालीन. २ पश्चिमदिशेकडील. ३ (स्थल, काल, जीव, पदार्थ, भाग इ॰ त) सर्वत्र व्यापून राहणारा; सर्वव्यापी (आत्मा, शिव, जीव यांस जोडून). ४ साक्षात्; प्रत्यक्ष. 'नामया शरण भगवंतासी । भग- वंत तरी प्रत्यक् त्यासी ।' एकनाथ आनंदलहरी ११९. [सं.] ॰ज्योति-स्त्री. आत्मप्रकाश. 'प्रत्यक्ज्योतीची वोवाळणी । करिसी मनपवनाचीं खेळणीं ।' -ज्ञा १२.६. ॰दर्शन-दृष्टी-नस्त्री. मागें पहाणें; पुढें पाहणें; पश्चिमेकडे पाहणें. ॰प्रतीति-स्त्री. आत्म- ज्ञान. ॰बुद्धि-स्त्री. अंतर्मुख झालेली बुद्धि; मी अंतर्यामीं (आत्मा) आहें अशी बुद्धि. 'मग देहाहंतेचें दळें । सांडूनि एकेचि वेळे । प्रत्यक्बुद्धि करतळे । हातवसावे ।' -ज्ञा १५.२५८. ॰बोध-पु. आत्मज्ञान; प्रत्यगात्मा व ब्रह्म एकच आहेत असें ज्ञान. 'जे प्रत्य- ग्बोधाचया माथया । सोहंतेचां मध्यान्हीं आलयां ।' -माज्ञा १६. १०. ॰मुखपण-न. अंतर्मुखवृत्ति. 'येथ प्रवृत्ति वोहटे जिणें । अप्रवृत्तिसी वाधावणें । आतां प्रत्यङ्मुखपणें । प्रचारु दिसे ।' -अमृ ९.२८ प्रत्यगात्मा-पु. १ देहांत व्यापून राहिलेलें ब्रह्म. २ त्वंपदाचें लक्ष्य. ३ कूटस्थ. [प्रत्यकं/?/ + आत्मा] प्रत्यगावृत्ति प्रत्यक्वृत्ति-स्त्री. आत्माकारवृत्ति; अंतर्वृत्ति; अंतर्मुखता; सोहं अशी स्वस्वरूपाकार वृत्ति. 'मग प्रत्यगावृत्तीचीं चोखटें । लाविलीं गंगेचेनि तटें ।' -ज्ञा १८.१०१७. [प्रत्यक् + आवृत्ति, वृत्ति]

दाते शब्दकोश

प्रवर्तक

(सं) वि० प्रेरणा, प्रवृत्ति करणारा.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

प्रवृत्तिनिमित्त

प्रवृत्तिनिमित्त pravṛttinimitta n S (प्रवृत्ति Currency or use, निमित्त Ground. A term in grammar and logic.) The ground or reason of the currency or use (of a word in any particular signification).

मोल्सवर्थ शब्दकोश

पुढि(ढी)ल

वि. १ पुढचा; अगोदरचा-नंतरचा (स्थल कालसंबंधीं); पुढचा पहा. २ अन्य; दुसरा; लोक. 'आपुले अंगीचें मळ । पुढिलीं क्षाळितां सकळ ।' -एभा २३.७२. 'केल्याविण निखंदूं नये । पुढिलांसी कदा ।' -दा २.२.१२. ३ पुढें येणारी; भावी (पिढी, लोक). 'पुढिला सिकवण । ते घ्यावी आपण ।' -दावि १०३. ४ पुढें-खालीं-यानंतर येणारी, सांगितलेली (गोष्ट, मुद्दा इ॰ ). ५ जवळचा. -ज्ञा ३.१७७. [पुढें. तुल॰ सं. पुरस्; अर्धमागधी. पुरिल्ल] सामाशब्द- ॰पाय-पु. प्रवृत्ति; प्रपंचा- कडील वृत्ति. 'ऐसाही जरी विपायें । सांडूनि पुढील पाये । सर्वें- द्रियांसि होये । पाठिमोरा जो ।' -ज्ञा १०.७२. पुढिल्ल्यो- क्रिवि. (कर.) (विटीदांडूचा खेळ) विटीच्या पुढल्या टोकापासून (मोजणें). पुढीं-क्रिवि. पुढयांत; पोटाशीं. 'घेऊन पुढीं नुसती सौख्यांत विडी तोडावी ।' -प्रला १६०.

दाते शब्दकोश

रागिब

(वि.) हिंदी अर्थ : प्रवृत्ति रखनेवाला. मराठी अर्थ : आकृष्ट.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

रड

स्त्री. १ एकसारखें न थांबता रडणें किंवा अशा रड- ण्याची क्रिया. (क्रि॰ घेणें, लावणें, लागणें, चालणें, खळणें, राहणें, आटोपणें). 'या मुलाला सकाळपासून रड लागली आहे.' २ तक्रार; पिरपिर. (क्रि॰ लावणें; चालविणें). [रडणें] सामाशब्द- ॰कथा-कहाणी-स्त्री. लांबलचक करुणास्पद कहाणी; दुःखाची गोष्ट; विपत्तीची कंटाळवाणी हकीकत; (क्रि॰ सांगणें; गाणें). ॰गाणें-न. करुणास्पद कहाणी, गोष्ट, तक्रार इ॰; रडकथा; दुःखाची गोष्ट. ॰गात्या-वि. सदा आपल्या दुःखाच्या रडकथा, गाऱ्हाणीं सांगणारा. [रडणें आणि गाणें] ॰गाऱ्हाणें-न. रड- कथा; रडगाणें; शोकमय कथा. (क्रि॰ सांगणें; गाणें) ॰गेला- वि. रडकथा, रडगाणें सांगण्याची प्रवृत्ति असलेला. [रडका] ॰तोंड्या-वि. ज्याचा सर्वकाल रडण्याचा स्वभाव आहे असा; मेषपात्र; दुर्मुखलेला; नेहमीं रडगाणें कुरकुर करणारा, सांगणारा, [रडणें + तोंड] ॰पंचक-न. नेहमींचें रडगाणें अगर रडकथा, (प्रपंचांतील ओढाताण व दुःख यामुळें) (क्रि॰ गाणें, सांगणें, वाचणें, लावणें, मांडणें). रडारड-स्त्री. कोणी गेला, मेला इ॰ कारणानें मोठें दुःख झालें असतां कोणेकांनीं रडूं लागावें असा जो व्यापार चालतो ती; (सामा.) रडणें; शोक करणें; अनेकांनीं एकदम रडणें. [रडणें] रडारोई, रडारोवी-स्त्री. मोठा शोक व रडणें; छाती, ऊर बडवून रडणें; मोठा आक्रोश; आरडा ओरड. 'काय होईल माझें मांडिलें कवतुक । आदराची भूक रडारोवी ।' -तुगा १५८२. [म. रडणें; हिं. रोना = रडणें] रडुरडु, रडूरडू-नस्त्री. रडण्याची पिरपीर. -क्रिवि. नेहमीं रडत रडत; मुळमुळीत संम तीनें; दीनवाणीपणानें. (क्रि॰ करणें, लावणें, मांडणें). रडू, रडें-न. १ रडण्याची क्रिया. २ रडण्याचा आवेश. (क्रि॰ कोस ळणें). ३ शोक, भय, दुःख, प्रेम, हर्ष इ॰ कारणांनीं अंतःकरण शिथिल होऊन डोळयांत अश्रू येणें, तोंड पसरणें कंठध्वनि निघणें इ॰ विकारविशेष उत्पन्न होणें; रडणें; रुदन. (क्रि॰ येणें). 'देखे मडें येई रडें.' [रडणें] रडया-वि. १ सर्वकाल रडण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा; सर्वदा रडणारा; उत्साहहीन; मंदगतीनें चालणारा; रडतराऊत; रडतोंड्या; दुर्मुखलेला. २ (ल.) चालण्यास, कामास मंद असा (बैल इ॰). ३ हरसबबी (इसम). [रडणें] रडका-वि. १ सदा रडत असणारें (मूल); रडण्याची अगर चिरचिरण्याची संवय असलेला; नेहमीं तक्रार करणारा; गाऱ्हाणें सांगणारा. २ दुःखी; कष्टी; मंद; निराश; निरुत्साही (चेहेऱ्याचा अगर बोलणारा). ३ ज्याचे हातून कोणतेंच काम चांगलें होत नाहीं, तडीस जात नाहीं असा. ४ रडतांना होतो तसा (आवाज, चर्या). ५ ज्याचा चेहेरा, भाषण, काम इ॰ टवटवीत, उत्साहयुक्त किंवा प्रसन्न नाहीं असा. ६ कंटाळवाणें (भाषण इ॰). [रडणें] रडकी गोष्ट-स्त्री. शोकमय किंवा शोकजनक गोष्ट; वाईट गोष्ट. रडकी सूरत-वि. सदा दुर्मुखलेला (इसम); सदा रड्या; नेहमीं रडकी मुद्रा असणारा; रडकी मुद्रा धारण करणारा; रड्या; दुःखी चेहेरा, मुद्रा असलेला. [रडका + अर. सूरत] रडकुंडा- डी-वि. रडावयाच्या बेतास आलेला; डोळे पाण्यानें भरून आले आहेत असा; निस्तेज. [रडणें आणि तोंड] रडकुंडीस येणें- कांहीं कामांत अति त्रासल्यामुळें किंवा दुःख सोसवेनासें झाल्यामुळें आतां रडूं लागावें अशा स्थितीस पोहोंचणें; रडण्याच्या बेतांत येणें; अति दगदगीमुळें रडण्याच्या स्थितीस येणें; रडें कोसळण्या- इतका त्रास होणें. याच अर्थानें जीव रडकुंडीस येणें-रडीस येणें असेंहि म्हणतात. 'ती आजोबाजवळ गेली आणि अगदीं रडकुंडीस येऊन म्हणते कीं, लोक आतां तोंड नाहीं काढूं देत बरं कां ?' -पकोघे. रडकूळ-स्त्री. (गो.) रडकुंडी. रडणें-अक्रि. १ रुदन करणें; अश्रू गाळणें. २ विषाद वाटणें; शोक करणें. ३ (ल.) अपयश येणें; ठेचाळणें; आपटणें; नष्ट होणें; बंद पडणें; अनादरानें बाजूला ढकलला जाणें. 'चार दिवस पाटीलबोवांचा आश्रय होता तोहि रडला, आतां गोंदोबाला भीकच मागितली पाहिजे.' 'बक्षिशी रडो पण पगार तर द्याल कीं नाहीं ?' ४ नुकसान होणें. 'तूं नोकरी सोडलीस तर त्यांत माझें काय रडतें ?' ५ (वैतागानें, निंदेनें) असणें; होणें. 'दोन वर्षें मामलत रडत होती तेव्हां आमच्या मुलानें आम्हाला काय दिले तें तुम्ही पाहि- लेंतच, आतां मामलत गेली, आतां काय देणार फतऱ्या ?' ६ एखादी गोष्ट घडणें, करणें, सुरू करणें या अर्थी तुच्छेतेनें योज- तात. 'मी सावकारी करीन म्हटलें ती रडली. आतां दुसरें कांहीं रडावें.' ७ निंदणें; निर्भर्तिसणें. 'भी त्याला नाहीं दोष देत, मी आपल्या दैवाला रडतों.' -सक्रि. (निंदेनें) चालविणें; करणें. 'दोन वर्षे तूं दुकान रडलास तेवढें बस्स झालें.' [सं. रट्; प्रा. रड] म्ह॰ १ रोज मरे त्याला कोण रडे. २ (व.) रडली तर रडली काय माणिक मोती झडतील ? (ही म्हण रड- णाप्या मुलीला अनुसरून आहे. म्हणजे रडण्याचा एवढा धाक कशाला-या अर्थीं). रडतखडत, रडतरडत, रडत पडत, रडत कसत-क्रिवि. मोठ्या कष्टानें; इच्छेविरुद्ध कसेंबसें; रेंगाळत; आळसल्यासारखें; नाइलाजानें; बिगारीनें; मंदपणानें. रडतगोत्र-न. रड्या वंश; रडी मंडळी अथवा जथावळ; सदो- दित कुरकुरणारी अथवा रडतराऊ व्यक्ति; नेभळट, नेभळा, बिनकर्तबगारीचा, उत्साहरहित मनुष्य. 'त्याचें रडतगोत्र आहे' (म्हणजे तो रडतराऊत आहे). रडत घोडें रडत राऊत, रडत राव-नपु. लोकांच्या सक्तीनें किंवा स्वतःची इच्छा नसतांना कांहीं काम करणारा; रडवा मनुष्य; उत्साह किंवा धमक नसलेला, नेहमीं वाईट अगर संकटाची सबब सांगणारा इसम. रडता राऊत घोडयावर बसविणें-एखाद्या कामास आंबटतोंड्या अगर निरुत्साही मनुष्यास पाठविणें अगर त्यास काम सांगणें; काम करण्याचें मनांत नसणाऱ्यास बळजबरीनें कामास लावणें. 'रडत- राऊत घोड्यावर बसविला तर मेल्याची खबर आणितो.' रडत लक्षुमी-लक्ष्मी-स्त्री. रडतपार्वती; क्षणोक्षणीं कांहीं थोडेसें निमित्त होतांच रडूं लागणारी स्त्री; उत्साहरहित स्त्री. रडता- वि. रडणारा; रडका; रड्या; रडतोंड्या. 'हासती बायको आणि रडता पुरुष कामाची नाहींत.' [रडणें] रडतोंड-न. दुर्मुखलेला चेहरा अगर सुरत. रडवा-वि. रडका; दुःखी; खिन्न; कष्टी; नेहमीं रडण्याची संवय असलेला; सदा तक्रारी कर णारा; कुरकुऱ्या किंवा तशा स्वभावाचा; निराश; दुर्मुखलेला. [रडणें] रडविणें-सक्रि. १ रडावयास लावणें, भाग पाडणें; दुःख देऊन रडीस आणणें. २ दुःखकारक प्रसंगाच्या वर्णनानें किंवा देखाव्यानें कोणेकाला डोळयांतून अश्रु गाळावयास लावणें. ३ (ल.) नाश करणें; वाढ खुंटविणें; उर्जितावस्थेस येऊं न देणें. ४ त्रास देणें; चिडविणें; एखाद्याला रडावयास येईल इतकें छळणें, गांजणें, उपद्रव देणें. 'मला ह्या कामानें पांच वर्षे रडविलें.' ५ आनंदाचा प्रसंग, पाऊस, वारा, रोग, थंडी, ऊन्ह इ॰नीं शेत, रचनाविशेष इ॰च्या रंगाचा भंग करणें.

दाते शब्दकोश

रग़वत

(स्त्री.) हिंदी अर्थ : प्रवृत्ति, चाह. मराठी अर्थ : कल, आवड.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

रोह(हं)क

पु. (काव्य) रोंख; मनाचा कल; प्रवृत्ति. 'परवस्तु चोरावया देख । अखंड लागला असे रोहंक ।' [रोंख]

दाते शब्दकोश

सद्बुद्धि

स्त्री. १ चांगली, शुद्ध बुद्धि, मन, विचार. २ सत्प्रवृत्ति; नीतिपरायणता; न्यायपरायणता; योग्य दिशेकडे कल. वि. चांगली बुद्धि, प्रवृत्ति, विचार, मन असलेला. [सं.सत् + बुद्धि]

दाते शब्दकोश

सहृदय

वि. १ हृदय असलेला; दयाळु; प्रेमळ; सहानु- भूतिक. २ आवड असलेला; प्रवृत्ति असलेला; मन घालणारा; गोडी असणारा.

दाते शब्दकोश

सन्मति

स्त्री. चांगली बुद्धी; सुविचार; योग्य प्रवृत्ति.-वि. सुविचारी; चांगल्या मनाचा, बुद्धीचा; नीतिमान; समजदार. [सं.]

दाते शब्दकोश

संधान

न. उपाययोजना; शक्ति, युक्ति, साधनें यांची योग्य तरतूद व योजना; एखादें कार्य घडवून आणण्याच्या कामीं प्रयत्न, बुद्धि व शक्ति यांचा योग्य मिलाफ करून योजना २ योग्य रीति, मार्ग, पद्धति (एखाद्या कार्याच्या सिद्धयर्थ). ३ नेम; निशाण; लक्ष्य. 'रिपुकंठीं हा शर लागेल या न संधानें ।' -मोकर्ण ४७.७०. ४ कल, प्रवृत्ति, रोंख (मन, इच्छा, डोळा वगैरेचा). ५ मनाची धारणा; लक्ष्य; अवधान; ध्यान. 'मूळ ग्रंथाचें संधान राखून मग आपलें राखायचें' -नि १९६. ६ कावा; कपट; युक्ति. 'चोर डाक होती गिलचांची नाहीं कळले संधना' -ऐपो ११८. 'करिता जाहला घोर संधान ।' -रावि ३२.११. ७ घबाड; डबोलें; ठेवा. 'आम्हांस मार्गांत कांहीं चांगलेसें मोठें संधान साधेना.' -विवि ८.८.१५४. ८ सुमार; समय; संधि. 'दसर्‍याच्या संधानास मी तुमचे गांवीं येईन.' ९ वग; वशिला; सूत्र. [सं. सभ् + धा] संधानी-वि. हुशार; धूर्त; युक्तिबाज; कावेबाज; संधान लावणारा, बांधणारा.

दाते शब्दकोश

संसक्त

धावि. १. संबद्ध; जोडलेला; चिकटलेला; संलग्न; बद्ध. २ आसक्त; तत्पर; पाठीमागें लागलेला; अनुरक्त; पिच्छेस लागलेला; अतिशय प्रवृत्त. ३ निकटचा; सुपरिचित; घनिष्ट संबंध असलेला. [सं. सम् + सिच्] संसक्ति-स्त्री. १ संबंध; निकटपणा. २ आसक्ति; अतिशय प्रवृत्ति; दृढ व्यासंग. ३ दाट परिचय; घसट.

दाते शब्दकोश

संयोग

पु. १ निकट संबंध; संघटन; मीलन; संगम; एकत्र होणें. २ मिश्रण; एकत्रीकरण; मिसळणें; बेरीज. ३ जोड; सांधा; जूग; एकोपा. [सं. सम् + युज्] संयोगप्रीति-स्त्री. (रसा.) पदार्थांतील परस्पराकर्षण; एकत्र होण्याची प्रवृत्ति; (इं) अफिनिटी. संयोगभूमि, संयोगीभूमि-स्त्री. दोन भूप्रदेश जोडणारा जमीनीचा अरुंद पट्टा; संयोगित-धावि. जोडलेलें; एकत्र केलेलें; संयुक्त; सांधलेलें. संयोगी-पु. ब्रह्मचर्यव्रताचा त्याग करून ज्यानें विवाह केला आहे असा गोसावी, किंवा बैरागी; घरभारी. -वि. जोडलेला; जुळलेला.

दाते शब्दकोश

सुक्षोभ

वि. सहज तापणारी; तत्काळ त्वेष येणारी. 'लहान वयांत सहज परिणाम होणारी अंतःकरण प्रवृत्ति सुक्षोभ असून.' -नि. ३७. [सं.]

दाते शब्दकोश

सुप्रवर्ती

क्रिवि. सुप्रवृत्तीनें; सरळपणें. 'खंदक भारी केला आहे. तो कांहीं सुप्रवर्ती गढी देत नाही.' -पेद २.२६. [सं. सु + प्रवृत्ति]

दाते शब्दकोश

सविया

क्रिवि. १ सहज; सहजीं; साहजिकपणें. 'तये काशीपुरी जावया । तीन मार्ग योजिले सविया ।' -स्वादि १०. ४.५८. -अमृ ६.७५. २ आपोआप; तत्काल. 'कल्पना निमे प्रवृत्ति शमे । आंग मन विरमे । सवियाची ।' -ज्ञा ६.२१२. [सं. स्वयम्]

दाते शब्दकोश

तार      

स्त्री.       १. धातू, रेशीम इ. पदार्थांचा तंतू; तात; धागा; दोरा. २. (भिजलेली कणीक, काकवी, मध इ. सारख्या) अर्धवट द्रव किंवा चिकट पदार्थाचा तंतूसारखा अवयव. ३. (मादक पदार्थाच्या सेवनाने येणारा) अंमल; कैफ; उन्माद; नशा. ४. (संपत्ती वगैरेमुळे येणारा) ताठा; धुंदी; मद. ५. (पित्ताधिक्य, जागरण इ. मुळे) डोळ्यांना येणारा जडपणा; मंदपणा; अंधारी. (क्रि. चढणे, येणे, लागणे). ६. (ल.) चित्ताची एकाग्रता; निदिध्यास; तल्लीनता. (क्रि. लागणे) ७. मनाचा कल, प्रवृत्ती; मर्जी. ८. (अशिष्ट) (अनेकवचनी प्रयोग) गुह्यभागावरील रोम. (क्रि. उपटणे). ९. (ल.) (संभाषण, वाद इ. चे) अनुसंधान; संबंध; संगती; ओघ; धोरण. (क्रि. लावणे, लागणे, धरणे, सोडणे, सुटणे). १०. एखाद्या क्रियेचा संतत क्रम, ओघ; परंपरा; अनुबंध. जसे :—कामाची – गाण्याची इ. तार. ११. तारायंत्राने पाठवलेली बातमी, संदेश. १२. कापूस पिंजण्याच्या धनुकलीचा तार, दोर. (खा.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तार

स्त्री. १ धातु, रेशीम इ॰ पदार्थांचा तंतु; तात; धागा; दोरा. २ (भिजलेली कणीक, काकवी, मध इ॰ सारख्या) अर्धवट द्रव किंवा चिकट पदार्थाचा तंतूसारखा अवयव. ३ (मायक पदा- र्थाच्या सेवनानें येणारा) अंमल; कैफ; निशा; उन्माद. 'म्हण तार नाहीं आली तार !' -तोबं ९३. ४ (संपत्ति इ॰कानें येणारा)ताठा; धुंदी; मद. ५ (पित्ताधिक्य, जाग्रण इ॰कांमुळें) डोळ्यांस येणारा जडपणा; मंदपणा; अधेरी. (क्रि॰ चढणें; येणें; लागणें). ६ (ल.) चित्ताची एकाग्रता; निदिध्यास; तल्लीनता (क्रि॰ लागणें). ७ मनाचा कल, प्रवृत्ति. -पु. केंस. 'ज्याचे तार (केंस) पांढरे तो (घोडा) युद्धांत उत्तम.' -अश्वप १.२६. ९ (अनेकवचनी प्रयोग) गुह्यभागावरील रोम. (क्रि॰ उपटणें). 'तारा उपटणारा' असा ग्राम्य प्रयोग. १० (ल.) (संभाषण, वाद इ॰कांचें) अनुसंधान; संबंध; संगति; ओघ; धोरण. (क्रि॰ लावणें; लागणें; धरणें; सोडणें; सुटणें). ११ एखाद्या क्रियेचा सतत क्रम; ओघ; परंपरा; अनुबंध जसें:-कामाची-गाण्याची-पावसाची-नांगरण्याची-लिहिण्याची- वार्‍याच्या वहण्याची-तार. (सामा.) प्रवाह; ओघ. (क्रि॰लावणें; लागणें). १२ (कधीं पु. उपयोग) तारायंत्रानें आलेली, पाठवि- लेली बातमी, संदेश. (इं.) तेलिग्राम शब्दाला प्रतिशब्द. 'डॉक्टर मुजें यांनीं तार केली.' -केसरी १७.५. ३०. १३. -पु. ताव; आवेश. 'गोविंदरावांनीं ऑफिसच्या रागाचा तार आपल्या पत्नी- वर काढला.' [तार्] (वाप्र.) (एखाद्याची) तार ओळखणें- जाणणें-(एखाद्याच्या मनाचा कल, इच्छा, अभिप्राय, धोरण, तर्कानें जाणणें. (एखाद्याची तार) राखणें-संभाळणें-एखाद्याची मर्जी, तबियत राखणें, संभाळणें; मर्जी राखून वागणें. तारा तोडणें- १ (रागानें, उर्मटपणानें) गर्जना करणें; शिरा ताणून बोलणें गर्जणें. २ भलतेंसलतें बोलणें; उद्धटपणानें दुसर्‍याचा अप- मान होईल असें बोलणें. (एखाद्याच्या) तारेस उभा राहणें- तारेनें वागणें, चालणें-(एखाद्याच्या) मर्जीप्रमाणें वागणें, चालणें. तारेस उभा करणें-मर्जीस उतरणें; मनास येणें. तारेस लागणें, असणें-एखाद्या गोष्टीच्या इच्छेंत, विचारांत गुंगून जाणें; त्या तारेंत असणें. सामाशब्द- ॰कशी-स्त्री. १ तार काढणें; तार- कसाचा धंदा. २ (ल.) तारेप्रमाणें ओढून काढणें; छळ; जुलूम; गांजणूक; जाच. (क्रि॰ लावणें; मांडणें; करणें). [फा. तारकशी] ॰कशीं धरणें-(एखाद्यास) दुःखप्रद अशा जाचांत, काचांत करड्या रीतीनें वागविणें; तरवारीच्या धारेवर धरणें; सुळावर वागविणें. [तारकस] ॰कस झीक-पु. (जरतार धंदा) बिन चापडलेली, नुसती रेशमावर गुंडाळलेली तार. ॰कशी-सी- स-वि. १ सोनें, रुपें इ॰ धातूच्या तारांनीं, कलाबतूनें विणलेलें. '(दिल्ली) शहरांत तारकशी कामें व अनेक प्रकारचे नकशी केलेले पदार्थ फार चांगले मिळतात.' -तीप्र ६८. २ ज्याच्या भोंवतीं तारेचें, सुतळीचें जाळें घट्ट विणलेलें आहे असें (भांडे इ॰). ३ तारांचा केलेला -पु सोनें, रुपें इ॰ धातूची तार काढणारा. [फा. तार्कश् (तार + कशीदन् = ओढणें, काढून घेणें)]. ॰खिळा-पु. पोलादाच्या, लोखंडाच्या तारेचा खिळा; तारचूक, ॰घर-न. तारेंने संदेश पाठविण्याचें सरकारी कार्यालय; तारहापिस; (इं.) टेलेग्रॅफ ऑफिस्. -सन १८५७. पृ. ४२७. ॰दान-नी-नस्त्री. (वाद्य) तंबोरा; सतार इ॰ तंतुवाद्यास लावलेल्या तारा जिच्या- वरून ओंवलेल्या असतात ती हस्तिदंताची सछिद्र पट्टी; वांकडा खिळा; घोडी. [फा.] ॰फेणीस्त्री. रवा-सपीटाची तार काढून तिचे चौंगे (वेटोळीं) तुपांत तळून केलेले एक पक्वान्न. -गृशि १.४०६. [तार + फेणी] ॰बंदी-वि. पोतांत सोन्याच्या तारांच्या कलाबतूच्या चौकटी असलेलें (पैठणी इ॰ वस्त्र). 'मुगी पैठणी रेशमी म्यानबंदी । जरी साजिरी पल्लवी तारबंदी ।' -अकक २, किंकरकृत द्रौपदीवस्त्रहरण ८१. [तार + बंद] ॰ब्रश-पु. तारांचा ब्रश; घासून झिलाई (पॉलिश) करण्याची तारेची कुंचली. [तार + इं. ब्रश = कुंचली] ॰तारंतार-क्रिवि. बरोबर; तंतोतंत; पूर्णपणें; सर्वांशी; एकूणएक. तारोतार पहा. (क्रि॰ मोजणें; मापणें; पडताळा भरणें, देणें; (ल.) बोलणें; जेवणें). ॰तारायंत्र-न. विजेच्या साहाय्यानें धातूच्या तारेंतून संदेश पोंचविणारें यंत्र; विद्युत्संदेश- हारक यंत्र; (इं.) टेलिग्राफ्. ॰तारेची बांगडी-स्त्री. जिच्यावर कथलाची तार किंवा वर्ख चढविलेला असतो अशी बांगडी. 'दाट बांगडया पाहती (पाहाहातीं?) ताराच्या भरतां कळ सोसली ।' -पला ४.३५. तारेवरचा नाच-पु. (कर) १ तारेवर चालणें, नाचणें इ॰ २ (ल.) अवघड व जोखमीचें काम. तारोतार-क्रिवि. १ कांठोकांठ तंतोतंत; बरोबर. 'वांई देशांतील गांव निम्मे निम्मे तारोतार व इसाफती व इनाम तरोतार निम्मे वांटून दिलें असे.' -रा ३.६५. २ लागोपाठ; एकसारखें. 'तारोतार त्यानें दोन महिने खेपा घातल्या.' [फा. तार्]

दाते शब्दकोश

तासीर

स्त्री. १ मनाची प्रवृत्ति; स्वभाव; प्रकृति. (परंतु कडकपणा, तिरसटपणा, तलखपणा, जहालपणा, रागीटपणा इ॰ नीं- युक्त या गर्भित अर्थानें प्रायःउपयोग. जसें-'त्याची तासीर काय कठीण हो?' २ (एखादें काम करण्याची एखाद्याची) विशिष्ट पद्धत; सरणी; तर्‍हा; मोड. ३ बंदुका; तोफा इ॰चा भडिमार; फैर; (विरू.) ताशेरा. ताशेरा अर्थ २ पहा. (क्रि॰ झडणें; झाडणें).

दाते शब्दकोश

तबियत तब्य(ब्ये)त

स्त्री. १ प्रकृति; शरीरप्रकृति; शरीर- स्वास्थ्य. २ मनाची प्रवृत्ति; कल; मर्जी; लहर; छंद. [अर. तबी- अत्] (वाप्र.) ॰लागणें-(एखाद्या गोष्टीकडे) मनाचा कल लागणें; मर्जी असणें; मन रमणें. -तीनें चालणें, वागणें, असणें- (एखाद्याच्या) मर्जीप्रमाणें वागणें, चालणें, असणें. -तीनें चालविणें-वागविणें-घेणें वापरणें-(एखाद्या मनुष्याच्या, वस्तूच्या) प्रकृतिमान, मगदूर इ॰ कडे लक्ष्य देऊन वागविणें, वापरणें इ॰ ॰मांदगी-स्त्री. आजार; आजारीपण. 'तबियत मांदगीमुळें बसण्याउठण्याची शक्ती पहिल्याप्रमाणें नाहीं' -रा १२७. [तबियत + मांदगी = आजार]

दाते शब्दकोश

तबियत, तब्यत, तब्येत, तब्बेत      

स्त्री.       १. प्रकृती; शरीरप्रकृती; शरीरस्वास्थ्य. २. मनाची प्रवृत्ती; कल; मर्जी; लहर; छंद. [फा. तबीअत्‌]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उभारा      

पु.       १. इच्छा; मनोविकाराची प्रवृत्ती; उमाळा : ‘वनि व्याघ्र वृकादिक सारे हिंसेचा त्यजति उभारा ।’ –देप ८८·४. २. उसाचा रस कढविताना त्याला येणारी उकळी, ऊत. (क्रि. येणे) : ‘रसास उभारा येतो म्हणजे …रस उतू जाऊ लागतो.’ –कृषि ४७२. (वा.) उभारा धरणे – पुढाकार घेणे; उद्युक्त होणे : ‘परित्राणाय साधूच्या उभारा, धरीं निवठाया सर्व भूमिभारा ।’ –कृष्णजन्म (देवनाथ) ३. [सं. उद्+भृ]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उभारा

पु. १ इच्छा; प्रवृत्ति; उमाळा. 'वनि व्याघ्र वृका- दिक सारे हिंसेचा त्यजति उभारा ।' -देप ८८.४. २ उसाचा रस कढवितांना त्यास येणारी उकळी, ऊत (क्रि॰ येणें). 'रसास उभारा येतो म्हणजे...रस उतूं जाऊं लागतो.' -कृषि ४७२. उभारा धरणें-पुढाकार घेणें; उद्युक्त होणें. 'परित्राणाय साधूच्या उभारा, धरी निवटाया सर्व भूमिभारा ।' -कृष्णजन्म (देवनाथ) ३८. [उद् + भृ-भर]

दाते शब्दकोश

उमका, उमखा      

स्त्री.       उत्कट इच्छा; प्रवृत्ती; आवेग : ‘शिवाय विकत घेण्याची उमका अन् पैसा साऱ्यांच्याच पालकांजवळ नसे.’ –सांज ९०. [सं. उद्+मनीषा]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उमका-खा

स्त्री. उत्कट इच्छा; प्रवृत्ति; आवेग. 'बोलण्याची मला उमका नव्हती.' कोरकि ४६३. [सं. उद् + मनीषा]

दाते शब्दकोश

उपजत

क्रिवि. १ जन्मतः; जन्मापासून; उ॰ उपजत आंधळा रोगी-मुंका-शाहणा लंगडा वगैरे. 'मांजर...याचें भय मुलांमध्यें जसें स्वाभाविक, उपजत असतें.' -नीति २६४. -वि. स्वाभाविक; जातीची; निसर्गतः प्राप्त; उ॰ उपजत बुद्धि-खोड-स्वभाव. ॰रांगणें-१ उपजल्यापासूनच रांगणें. २ एखाद्या वस्तूची एकदम भारी किंमत सांगणें. ३ एखाद्या अडचणीला तोंड देण्याची आपली लायकी एकदम हमखास सांगणें. ॰खोड-स्त्री. जन्मल्यापासून असलेला दुर्गुण खोड-व्यंग (शारीरिक, मानसिक). ॰गुण-पु. स्वाभाविक, अंगचा, जातीचा धर्म; जन्मापासूनचा गुण. ॰बागी-वि. मूळचाच, जाती- चाच घोड्यावर बसण्यांत पटाईत. [उपजत + हिं. बाग = लगाम, बागी = स्वार; सं. वाजी = घोडा] ॰स्वभाव, अंगस्वभाव-पु. जन्मतः असलेले गुणधर्म-स्वभाव; स्वाभाविक प्रवृत्ति.

दाते शब्दकोश

उपजत स्वभाव      

अंगस्वभाव; जन्मतः असलेले गुणधर्म – स्वभाव; स्वाभाविक प्रवृत्ती. उपजनिपज      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उपरदवडा      

पु. १. वाजवीपेक्षा जास्त मागणी; फाजील हाव. २. वरचढपणा; वरचष्मा; वर्चस्व : ‘उगिच गाल फुगवून रूसावें, आला दिवस उपरदवडा ।’ – प्रला १६२. ३. अधिकार; सत्ता; प्रभुत्व. (क्रि. करणे, घेणे, चढवणे, चालवणे, होणे, चढणे, चालणे.) ४. वाजवीपेक्षा जास्त मोबदला, मागणी; थोडे देऊन फार काढण्याची प्रवृत्ती. आवळा देऊन कोहळा काढणे. (क्रि. करणे). ५. एखाद्याचे बरे करू गेल्यास त्यात यश न येऊन याने माझे वाईट केले असा दोष (ठपका) येणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उपरदवडा

पु. १ वाजवीपेक्षां जास्त मागणी; फाजील हांव. २ वरचढपणा; वरचष्मा; वर्चस्व. 'उगिच गाल फुगवून रुसावें, आला दिवस उपरदवडा ।' -प्रला १६२. ३ अधिकार; सत्ता; प्रभुत्व. (क्रि॰ करणें; घेणें; चढवणें, चालविणें; होणें; चढणें; चालणें). ४ वाजवीपेक्षां जास्त मोबदला, मागणी; थोडें देऊन फार काढण्याची प्रवृत्ति. आंवळा देऊन कोहळा काढणें. (क्रि॰ करणें) ५ एखाद्याचें बरें करूं गेल्यास त्यांत यशं न येऊन, यानें माझें वाईट केलें असा दोष (ठपका) येणें. -मनको [उपर + दवडणें] म्ह॰ उपरदवडा खांद्यावर XXX. = वरचढपणा करणारा नेहमीं आपली मिजास चालवितो याअर्थीं.

दाते शब्दकोश

उर्धपथ      

ईश्वराचा मार्ग : ‘जे उर्धपथुनि लोटले । कृपेपासौनि सुटले । ते माया भुलौनी लाविले । प्रवृत्ति मार्गी ।’ –ज्ञाप्र २५०. उर्फ      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उठाण, उठाणे      

न. १. उठवणी; उसळी; उमेद; तीव्र प्रवृत्ती : ‘कीं ते समयीं मनाचें उठाण ।’ -यथादी १०·२५८. २. उन्नतता; उठावदारपणा (स्तनांचा) : ‘उठेत वक्षोरुह हे उठाणें ।’ -सारुह २·५६. [सं. उत्थान्‌]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उठाण-णें

न. १ उठवणी; उसळी; उमेद; तीव्र प्रवृत्ति. 'कीं ते समयीं मनाचें उठाण ।' -यथादी १०.२५८; ११.८८७. २ उन्नतता; उठावदारपणा (स्तनांचा). 'उठेत वक्षोरुह हे उठाणें ।' -सारुह २.५६. ३ सूचक लक्षण; चिन्ह. 'तों देवकीस वरिती वीरश्रीउठाणे ।' -कृष्णजन्म (देवनाथ) २३. [सं.उत्थान; प्रा. उट्टाण; हिं. उठाना]

दाते शब्दकोश

वाधावणें

न. १ वरधावा; वरागमनप्रसंगींचीं मंगलवाद्यें; आगमनसूचक वाद्यवादन; आगमनाची सूचना. 'वोहरेवीण वाधा- वणें । तो विटंबु गा ।' -ज्ञा १३.८३७. 'उभविलीं गुडितोरणें । नगरीं जाहलीं वाधावणें ।' -कथा १.१०.१९०. २ आमंत्रण; मूळ धाडणें. 'येथ प्रवृत्ति वोहटे जिणें । अश्रुतीसीं वाधावणें ।' -अमृ ९.२७. 'कळलें पांडवांचें वाधावणें ।' -गीता १.११९०. वाधावा-पु. १ वरधावा; वरागमनाची सूचना. 'वाधावा सांघो रुक्मिणी ।' -आद्य मराठी कवयित्री २९.३. २ आगमनवार्ता; शुभवर्तमान; वार्ता. 'तो अष्टभोगाचा कुढावा । की ऋतुरायाचा वाधावा ।' -शिशु ६२३. 'पाही आत्मज्ञान सुदिनाचा । वाधावा सांगत या अरुणाचा ।' -ज्ञा १८.९०३. ३ आगमनप्रसंगीचें वाद्य; शुभवाद्य. 'वाधावें वाजती ।' -वसा २८. [वरधावा] वाधावी-पु. वार्ताहर; बातमी आणणारा. 'तये वेळीं वाधा- वियातें । राये हार दिधला उचितें ।' -कथा ७.१०.१३९.

दाते शब्दकोश

विदेह

पु. १ जनक राजा. २ एक देश. ३ एक नगर. -वि. १ देहरहित; अशरीर. 'विदेहासि देहधर्म । आरोपिती ।' -ज्ञा ९.१५६. २ देहातीत; मुक्तदेह; देहाचा विसर पडलेला; देह असून नसल्यासारखा. 'तैसा देहींच जो असे । विदेह दृष्टि ।' -ज्ञा १८. ४३५. [सं. वि + देह] ॰मुक्त-वि. जीवंतपणीच मुक्त झालेला. 'अचेतन ते विदेह मुक्त । ' -दा ७.६.४६. ॰मुक्ति-स्त्री. ब्रह्म- लोकांतील अखेरची मुक्त अवस्था. 'ब्रह्मलोकीं जाऊन जेथें अखेर मुक्ति मिळत असल्यामुळें विदेहमुक्ति अशीं दुसरीं नांवें आहेत ।' -गीर २९५. ॰स्थिति-स्त्री. १ देह व आपण निराळे अशी मानण्याची प्रवृत्ति, मनाची अवस्था. २ देहाची स्मृति नष्ट झालेली अवस्था; ज्ञानी पुरुषाची निर्विकल्प स्थिति, समाधि. 'तुकयास उबग न येई चित्तीं । विदेह स्थिति जाहाला ।' विदेही-वि. १ देहातीत; देहभान विसरलेला. २ शारीरिक अथवा ऐहिक विषयांची आसक्ती नष्ट झालेला.

दाते शब्दकोश

विंवसा

स्त्री. (काव्य) इच्छा; कल; प्रवृत्ति; आकांक्षा. [सं. वि + इष् = इच्छा]

दाते शब्दकोश

विश्वेस्लाम

पु. इस्लामी धर्माचें जागतिकीकरण; सर्व विश्व इस्लाममय करण्याची प्रवृत्ति. 'यांनीं महाराष्ट्रीय चळ- वळीच्या ध्येयांत विश्वेस्लाम प्रसाराचें तत्व घुसडून दिलें.' -ज्ञाको. त. १३५. [सं. विश्व + अर. इस्लाम]

दाते शब्दकोश

वळण

न. १ आकारभेदाचे प्रकार (अक्षर, चित्र, शरीर, अवयव इ॰ चे प्रत्येकी); तऱ्हा; मोड. 'गोंदूनानाच्या अक्षराचें वळण बिवलकारी दिसतें. ' २ वागण्याची रीत, पद्धति, व्यवहार. ३ कल; प्रवृत्ति; झोंक (अंतःकरण, मन इ॰ चा). ४ शिक्षण; शिस्त; व्यवस्था. 'बाळकास वळणांत ठेवावे. ' ५ देणें, घेणें, जाणें, येणें इ॰ व्यवहार व त्यामुळें येणारा संबंध; दळणवळण. 'सरकारांत वळण बांधावें, मग फिर्याद करावी. ' ६ वक्रता; सरळ- पणा नसणें; वांक, (नदी, रस्ता, काठी इ॰चा). ७ डोंगराचें वांकण ८ नद्यादिकांचें पाणी विवक्षित जागीं न्यावयासाठीं बांधतात तें धरण; बांध; माती दगड वगैरेचा वळ. 'उदधीचें वळण फुटें । ' -उषां ९९.२३. ९ वशिला; वजन. (क्रि॰ बांधणें). 'चिंतोपंतांनीं राम शेटजीकडे वळण बांधून नोकरी मिळविली.' १०. वेढा; वळसा. 'दुर्मोच्य काळपाशासम याच्या होय वळण वळयाचें । ' -मोवन ६.२०. [सं. वलन] ॰म्ह-१ वळणाचें पाणी वळणानेंच जाईल. २ पाण्याआधीं वळण बांधावें. (वाप्र.) वळण बांधणें-(ल.) मैत्री संपादन करणें; संधान बांधणें. वळणावर जाणें-अनु- सरणें; प्रमाणें चालणें, वागणें. ' हा अगदीं बापाच्या वळणावर गेला.' सामाशब्द- ॰डळण-दळण-न. दळणवळण पहा. ॰दार-वि. १ चांगला आकार, वळण असलेलें; नीटनेटकें. /?/एकसारखें, व्यवस्थित, शुद्ध (लेखन). घटींव आणि घोंटीव यांपासून हें निराळें आहे. ॰शुद्ध-सूद-वि. प्रमाणशीर; वळणदार. 'तीं कामाच्या सोईकरितां अथवा वळणसूदपणा- करितां सुधारण्यांत आलीं.' -इमूं ३५२. वळणी-स्त्री. वळणें, वळण पहा. वळणीं, वळणीस आणणें-येणें-वठणीस आणणें-येणें पहा. 'तव विक्रमाविणें पळभरिहि न येतींच खळ बळें वळणी । ' -मोनामरसायन. वळणें-उक्रि. १ दिशा बदलणें; फिरवणें. २ राखणें; सांभाळणें (गुरें, मेंढ्या इ॰). 'चला वळूं गाई । बैसो जेऊं एके ठायीं । ' -तुगा २००. ३ बनविणें; घडविणें (पिळून, इतर क्रिया करून). 'संस्कृत इक्षुदंडरस अपार । त्याची प्राकृत हे वळिली साखर । ' -ह १९.२२२. ४ अंकित करणें; वश करणें. 'मातल्या कामभद्रजाती । विवेकांकुशें वळावा । ' -मुआदि १६.११. ५ वळवून, परतवून नेणें, आणणें. 'जन कथिति धेनु कुरुनीं वळिल्या येऊनि उत्तराशेला । ' -मोविराट ६.६३. 'वळल्या हातीवरल्या ढाला । ' -ऐपो २१. ६ वळता करणें, घेणें. -अक्रि. १ घटलें जाणें; चांगलें तयार होणें (अक्षर). २ वळणदार होणें; योग्य रूप घेणें. (चित्र, प्रतिमा इ॰ नीं). ३ वांकणें; कलणें; दिशा, रूप, आकार इ॰ बदलणें. -ज्ञा ११.४८७. ' मडक्याचा कांठ ओला आहे तो वळेल.' 'आकाशीं मेघ करी गर्जना । वळला पर्जन्य सभोंवतां । ' ४ शरीरावयव वायूनें आंत ओढला जाणें, त्याला वेदना होणें; पेटका येणें; वांब येणें. ५ अनुकूल, वश होणें; कबूल होणें. 'वळला न ईश्वरासहि तो दुष्ट वळेल काय इतरांला । ' -मोउद्योग १०.७१. ६ प्रसन्न होणें. 'म्हणे सोसिका नृपा ! वळलों । ' -मोअश्व १.३५. ७ फिरणें; विशिष्ट दिशेनें जाणें. [सं. वलन] वळता देणें-परत देणें, करणें (पैसा, उसनी वस्तु). वळती-स्त्री. १ रानामध्यें गेलेली गुरें परत वळवून आणण्याचा व्यापार. २ गुरें वळून आणण्याची पाळी (गुराखी पोरें खेळत असतां ज्यावर डाव येतो त्यानें गुरें वळावीं असा संकेत). 'वांसुरें चारितां गोविंदा । वळत्या न देसी तूं कदा । ' -ह ३६.५६; -तुगा १७०. ३ एकदम, एकाएकीं आगमन, फेरी. (क्रि॰ येणें). 'दूध उघडें टांकू नको मांजराची जर कोण्हीकडून वळती आली तर खाऊन जाईल. ' ४ उलट चाल, जाण्याचा रोंख, वळण; फेरी. ' गुरें गांवाकडे येत होतीं आतां वळती रानाकडे चालली. ' ५ (जुगार) विशिष्ट दान पडलें असतां घेण्यासाठीं मांडलेलें द्रव्य. ६ छपराचा सुरुवातीचा, तळचा भाग. (क्रि॰ बांधणें). ७ हल्ला चाल. (क्रि॰ करणें). 'मौजे मजकुरावरि डफळेची फौज येऊन वळती केली ते समयीं युद्ध जाहलें.' -वाडशाछ १०७. वळतीस येणें-वळणीस, वठणीस येणें. 'त्यांनीं धनीण वहु दक्ष असें म्हणावें । घेवोनि धाक हृदयीं वळतीस यावें । ' -अर्वाचीन ३८२. वळते करणें-वजा करणें. वळवणी-स्त्री. एक हत्यार; पकड. वळविणें-उक्रि. (वळणें प्रयोजक). १ आकार देणें; घडविणें. २ फिरविणें; कलतें करणें (केंस इ॰). ३ गिरविणें; घटवणें; वळण देणें (कित्ता, खरडा, हस्तव्यवसाय इ॰ ला). ४ तयार करणें (पिळून, विणून ). वळाण-न-न. (प्र.) वळण पहा. वळित, वळीत-स्त्री. १ सुरकुती. 'लपौनि चोर खांचेचां वोहळीं । वळीत- पळिताचें ताडवन घाली । ' -भाए ५२१. २ वळती; परत फिरणें. (क्रि॰ धरणें). 'आतां मोडूनि ठेलीं दुर्गें । कां वळित धरिलें खगें । ' -ज्ञा १३.५८३. ३ वळती पहा. ४ मेलेलें माणूस भूत होऊन घरीं परत येणें. वळींव-वि. १ वळलेलें; पीळ दिलेलें; विणलेलें. २ घट्ट पिळलेलें, वळलेलें; पीळदार. ३ भक्कम; चांगलें मजबूत; घटलेलें (शरीर इ॰) वळीव गवरी-स्त्री. गोळा बनविलेलें शेण; गोल गवरी; थापा-थापटी नव्हे.

दाते शब्दकोश

व्यय

पु. १ खर्च; वेंच. २ नाश. -ज्ञा १५.१२२. ३ एका संवत्सराचें नांव. -वि. नश्वर -एभा २ ३९४. [सं.] ॰बुद्धि- स्त्री. १ खर्चिक स्वभाव; उधळेपणाची प्रवृत्ति. २ (क्व.) औदार्य- बुंद्धि; सढळ हात. ॰वेत्ता-वि. खर्चिक; व्ययबुद्धीचा. 'पार्थ पहाशील सुखें व्ययनेत्ते वित्त वेंचिती यज्ञा ।' -मोकर्ण (नवनीत पृ ३३६). ॰शंकित-वि. कृपण; कद्रू. ॰शील-वि. खर्चींक; उधळ्यां. ॰स्थान-न. (ज्यो.) कुंडालींतील बारावें स्थान. व्ययित-वि. खर्चलेलें; व्यय केलेलें. व्ययी-वि. सढळ हाताचा; खर्चिक.

दाते शब्दकोश

युग

न. १ कृत, त्रेता, द्वापार आणि कलि असे जे विश्वाचे कालमापक चार मोठाले विभाग त्यांपैकीं प्रत्येक. २ मोठा काल- विभाग; वरील चारी कालविभाग मिळून होणारा काल; चारी युगांचा काल. ३ जोडी; दोन वस्तू; युग्म; द्वय. उदा॰ कर्णयुग; वस्त्रयुग इ॰ ४ जोखड; जू; धुरा. -वि चार संख्या (युगें चार मानिलीं त्यावरून). 'नाराच सहस्त्र युग । ' -मोकर्ण ४३.७७. ॰धर्म- पु. १ कालमाहात्म्य; त्या कालांतील लोकांची प्रवृत्ति. कलानुरूप योग्य वर्तन. ॰पत्-क्रिवि. एकत्र; एकदम; एकाच वेळीं. ' घट आणि घटाभाव हे एका अधिकरणीं युगपत् संभवत नाहींत. ' ॰माहात्म्य-न. युगाचा मोठेपणा; युगाचे महत्त्व; युगाचें वैशिष्ट्य; काळाचा गुण, प्रभाव. युगांत-पु. १ युगाचा शेवट. २ प्रलयकाळ; चारी युगांनंतर येणारा प्रलयकाल. ' जैसा सिंहाचिया हांका । युगांतु होय मदमुखा । ' -ज्ञा २.२१५. [युग + अंत] युगादि-पु. युगाचा प्रारंभ, सुरुवात [युग + आदि] युगानुयुग- क्रिवि. कित्येक युगेपर्यंत. [युग + अनुयुग] युगुल, युगल, युगूळ-न. (काव्य) जोडी; द्वय; दोन वस्तू. [सं. युगुल]

दाते शब्दकोश

सहज

वि. १ बरोबर झालेला; बरोबर निपजलेला, उत्पन्न झालेला; सहजात; बरोबर जन्मलेला; एकाच वेळीं असलेला. २ भाऊ; सहोदर; एकाच मातेच्या उदरीं जन्मलेला. ३ स्वाभाविक; जन्मजात; जन्मापासून असलेला; निसर्गसिद्ध; नैसर्गिक; स्वभा- वज. ४ सुलभ; सोपें. 'काशीस जाणें पैशावांचून सहज नव्हे. -क्रिवि. १ कोणताहि उद्देश मनांत न धरितां; निर्हेतुक; उगीच; निष्कारण; स्वाभाविकतः; आपोआप. २ विशेष प्रयत्न न करतां; सुलभतेनें; लीलेनें; साहजिकतेनें; विनाप्रयत्न. ३ विशेष कारण नसतां; निमित्त, प्रसंग, जागा वगैरे कांहीं नसतां. याच शब्दाचे सहजगतीनें, सहजगत्या, सहजरीतीनें, सहजरीत्या, सहजा- खालीं, सहजासहजीं, सहजावारी, सहजावृत्त्या, सहजावृत्तीनें, सहजासहज; सहजांत, सहजानसार इत्यादि पर्यायशब्द होतात. ॰कला-ळा-स्त्री. स्वाभाविक शक्ति. ॰गुण-पु. निसर्गसिद्ध स्वभाव; स्वाभाविक गुणधर्म; उपजत गुण; जन्मजात स्वभावधर्म; देहस्वभाव. 'सहजगुणास न चले उपायें ।' -दा २४.८.३१. 'सहजगुण लोकी न अन्यथा कोणी ।' -मोआदि २.९७. ॰ता-स्त्री. स्वाभाविकता; सहजपणा. ॰ता क्रिवि. स्वभावतः. 'आपण सहजता पूर्णकाम ।' -तुगा ६३०. ॰प्रेरणा-स्त्री. स्वाभा- विक प्रवृत्ति; नैसर्गिक ओढ. ३ (इं.) इंन्स्टिंक्ट. 'त्यांच्या अप- त्यप्रेमाला सहजप्रेरणा या सदरांत घालणारे...' -विचारविलासित. ॰मित्र-पु. जन्मजातमित्र; जन्मापासून सहचर; मामेभाऊ, आतेभाऊ, मावसभाऊ. ॰शत्रु-पु. जन्मापासूनचा वैरी; चुलत भाऊ; सापत्न भाऊ; सावत्रभाऊ. ॰समाधि-स्त्री. मनाची समा- धानी वृत्ति; सविकल्प अगर निर्विकल्प कोणत्याहि वृत्तींत स्वाभा- विक आनंदी, समतोल मनोवृत्ति; मायिक उपाधींतहि स्वस्वरूपीं लीन असणें. 'असोन मायिक उपाधि । तेचि सहज समाधी ।' -दा ११.१.४४. ॰सिद्ध-वि. १ सुलभतेनें झालेलें; सहज उत्पन्न होणारें; सहज साध्य झालेलें. २ सहोत्पन्न; स्वाभाविक; नैसर्गिक; जन्मजात. ॰स्थिति-स्त्री. १ नैसर्गिक स्वभाव, गुणधर्म. २ सरलमार्ग; स्वाभाविक स्थिति. सहजारी-पु. सहजशत्रु. पहा. सहजोदासीन-वि. नात्याचा नव्हे असा; जन्मानें नातें नस- लेलां; स्वाभाविकतः मित्र किंवा शत्रु नसलेला.

दाते शब्दकोश

ओढ      

स्त्री.       १. खेच; आकर्षण; आस्था; लगत; (घट्ट करण्यासाठी किंवा ओढण्यासाठी दिलेला) हिसका. (क्रि देणे.) : ‘इतर धर्माचे पाद्री लोक नीच मानलेल्या लोकांवर प्रेमाचे जाळे पसरवून त्यांस आपल्यात ओढीत. या त्यांच्या ओढीला विरोध करणारा आजपर्यंत कोणी नव्हता.’- दयानंद सरस्वती २३९. २. ताण, जोर, दाब (लांबवण्यासाठी); आवळ. (क्रि. घालणे, बसणे, पडणे.) ३. ओढायचा दोर; ओढण्याचे कोणतेही साधन. ४. ओढत नेण्याचा किंवा वर काढण्याचा पदार्थ. ५. ओढण; वजन; ओढण्याची शक्ती. ६. ज्यावरून ओझे ओढत नेतात तो रस्ता, रस्त्यावर त्या वजनाने उमटणारा चर, रेघ, घासर, खरड. ७. अडचणीची परिस्थिती; पैशाची चणचण; सावकारांचा तगादा, निकड, चिमट. ८. अतिशय मेहनतीमुळे व थकण्यामुळे शरीराला येणारा ताठरपणा. ९. नदी किंवा प्रवाह याचा जोर, ताण. १०. सुरमाडाची पोय. जेथे पावसात किंवा ओलीत एखादा बांधकामाचा भाग येत असेल तेथे याचा बांधायच्या दोरीसारखा उपयोग करतात. ११. कल; प्रवृत्ती; गती; झोक; - कडे प्रयत्न. १२. आकर्षण; मोह; पाश; अंगावर घेतलेले काम वगैरेचा जोर (जग, धंदा, कुटुंब याबाबत); ओढणारी शक्ती. (माया, प्रेम, इच्छा, आशा इ.); कळकळ; स्नेह; सहानुभूती. १३. मागे राहणे; जोराचा विरोध करणे; निष्ठुरपणे प्रतिबंध करणे; वेगाने सुटणे; जोराचा प्रवाह; ओघ. (क्रि. घेणे.) १४. जनावर लावून एका वेळी ओढत आणलेला एक किंवा अनेक लाकडांचा समुदाय. १५. वरील लाकडांना बांधायची दोरी. १६. बैलरहाट किंवा तेल्याचा घाणा यांच्या जोखडाला व बैलाच्या मागे जो वेसनेकड असतो त्याला बांधायची दोरी किंवा दांडी; ओढाळा. १७. तहान. १८. मनाची हौस. (वा.) ओढ असणे- खेचण्याइतका जोर असणे. ओढ काढणे- संकटात दिवस काढणे. ओढ देणे- ताणून धरणे; लांबणे : ‘पुढे दोन वर्षे पावसाने ओढ दिली.’- व्यंमाक १४७.ओढ बसणे- खेचले जाणे; आवळले जाणे; ताण बसणे. ओढ लागणे- तळमळ वाटणे; (एखाद्या ठिकाणी) तीव्रतेने जावेसे वाटणे. ओढी ओढ असणे- दुःखावर दुःख येणे; संकटावर संकट येणे. ओढीत ओढ- (वारणे, करून घेणे इ.) एक संकट भोगत असताना दुसरे वारणे किंवा ओढवूनघेणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उदर

न. १ पोट; कोठा; जठर. 'उकार उदर विशाल ।' -ज्ञा १.१९. २ पोटफुगी; विकारानें फुगलेलें पोट; पोटांतील एक रोग. उ॰ जलोदर; वातोदर; सर्पोदर, वगैरे. ३ (कृषी.) (पाण्याचें अजीर्ण) कांदे, बटाटे इत्यादि भूमिगत पिकास पाणी फार झालें तर सूज येते व तो भाग कुजतो त्यास म्हणतात. -कृषि. १८४. ४ गर्भाशय; कूस; कुक्षि. 'अगा वसुदेवाचिये तपप्राप्तीं । श्रीकृष्ण देवकीउदरा येती ।' -एरुस्व १.१०. 'धन्य धन्य ते कौसल्या सती । उदरासि । आला त्रैलोक्यपति ।' -संवि १८.५. [ सं. उदर; सिं जलंधरु] -राची खांच स्त्री. पोट. 'आपुली खांच उदराची.' -संग्रामगीतें १३३. -रीं येणें (एखादा ग्रह जन्मराशीस येणें); यथेच्छ खाण्या- पिण्यास, उपभोग घेण्यास मिळण्याजोगी दशा येणें (निंदाबोधक). उदरीं शनी, शनैश्वर येणें-(ज्यो.) शनी जन्मराशीस येणें. म्हणजे चांगली दशा प्राप्त होणें; ऐश्वर्य मिळणें. ॰तलधमनी स्त्री. (शारीर.) पोटाजवळची धमनी. ॰तलपाद (प्राणि.) गोगल- गाय इत्यादि पोटानें सरपटणारे प्राणी. [इं. गॅस्टरोपोडा; ग्री. गॅस्टर = पोट; तुल॰ सं. जठर]. ॰दरी स्त्री. पोट; पोटाची खांच. ॰निर्वाह-पूर्ति-पोषण-प्रवृत्ति-वृत्ति-पुस्त्रीन. १ चरि- तार्थ; उपजीविका; पोषण; उदरंभरण; क्षुधाशांति. 'भिक्षा मागुनी क्षेत्राभीतरीं । उदरनिर्वाह करितसे ।।' -नव १३.६०. 'उदर प्रवृत्ति- करणें । मोळ्या आणून विकीतसे ।।' -संवि २१.१४. २ उपजी- विकेचें, चिरितार्थाचें साधन; जीवन; पोटापाण्याची सोय. ३ पोट भरणें; केवळ जगणें; जीव जगविणें; पोट चालविणें (सामा. निंदा- व्यंजक). ॰पिशाच्च पु. अतिशय खादाड; अधाशी; खाबू. उदरंभर-री वि. १ पोटभरू; पोटार्थी; खादाड. 'पीतां मरंद उदरंभर बंभराचें ।' -नल ३८. 'गोसावी लोक ईश्वरप्राप्तीचे नुसतें सोंग आणतात, पण उदरंभर मात्र असतात.' २ स्वार्थसाधु; आपमतलबी. 'बरेच प्रोफेसर... उदरंभरी लोक आहेत' -टि २. ५१४. ३ पोट भरण्याखेरीज कांहीं न करणारा; स्वतःच्या निर्वाहखेरीज अन्यत्र न पहणारा (देश-समाजसेवा इ॰ इतर कांहीं न करणा र्‍यास म्हणतात). ॰भरण-न. अन्न खाणें; जेवणें; भोजन, उदर- निर्वाह पहा. 'उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ।'

दाते शब्दकोश

जन

पु १ माणूस.(व्यक्तिश: व एकत्र) 'तुज नको जन कोण म्हणे असें ।' -र ४७. २ जमाव (माणसांचा (समासांत) मनुष्य- जन = मनुष्यजात; श्वजन = कुत्र्याची जात. ३ जग; लोक 'जैसा जनामाजी खेचरु ।' -ज्ञा ५.९९. म्ह॰ ऐकावें जनाचें करावें मनाचें. ४ (प्र.) पु एव. मी. 'प्रसाद चतुरा कसा तरिं करा बरा हा जन ।' -केक ६३. [सं.] जनकथा-स्त्री (प्रमाणरहित) दंतकथा, गोष्ट; परंपरागत हकीकत; आख्यायिका [सं. जन + कथा] जन- चर्चा-स्त्री. लोकचर्चा, बोलवा. ॰चार-चाल पु. स्त्री. जनाचार; सर्वसामान्य लोकांची चाल, रीत ॰जाहीर वि. जगजाहीर [जन + अर. झाहीर] जनता-स्त्री. लोकसमूह; समाज.' शतयोजनें तदाश्रित जनता ती सर्व दुःख निस्तीर्णा ।' -मोसभा १.२.३. जनदाटी-स्त्री. लोकांची गर्दी. 'तैसी जनदाटी बहु जाली ।' -दावि ४२६. ॰नीति-स्त्री. सामान्य समाजाची नीति; लोकवर्तन. ॰पद- पु. देश; प्रांत. ॰पदधर्म-पु. जननीति पहा. ॰पदभाषा-स्त्री. देशी भाषा. ' गीर्वाण शब्द पुष्कळ जनपद भाषाचि देखतां थोडी ।' -मो मंत्ररामायण, परिभाषा १७. ॰प्रवाद पु बाजार- गप्प; कंडी. ॰प्रवाह-पु. जनरीत. ॰प्रवृत्ति-स्त्री. लोकप्रवृत्ति; लोकांची चालचलणूक, रूढी, प्रघात. ॰मर्यादा-स्त्री. सामान्य चाल, रीत, प्रवृत्ति; लोकरीत. ॰रंजन-न लोकांस आवडेल अशी वृत्ति; लोकांची करमणूक; त्यांस सुख देणें; लोकांचें रंजन; लोकतृप्ति. ॰रव-पु. १ गोंगाट (लोकांचा); बाजारगप्प; कंडी. ॰रीति-रीत-स्त्री. लोकांची चालचलणूक, वागण्याची पद्धति. जनप्रवृत्ति पहा. ॰रूढ वि. लोकांत चालत आलेलें. ॰रुढी-रुढ-स्त्री. लोकांची चाल-रीत. ॰लज्जा-लाज-स्त्री. १ लोकांस काय वाटेल यासंबंधीं आशंका; लोकमताला मान देणें २ लोकांची भीति. ॰लोक-पु १ प्रत्येक मनुष्य. २ सप्तलोकांपैकीं पांचवा लोक. सप्तलोक पहा. ॰वंदती-वाणी-स्त्री जन- प्रवाद पहा. ॰वन-न. संसार आणि अरण्य; गृहस्थाश्रम, आणि वानप्रस्थाश्रम. 'अंहता टाकूनि सर्वस्वें ।जनवन समान भासे ।' ॰वाक्यजनार्दन-सर्व लोकांचें म्हणणें तें देवाचेंच ही समज; पांचामुखीं परमेश्वर. ॰वाढ-स्त्री. दिढी, दुढी. हंगामांत सर्व लोकांनीं योग्य अशी ठरविलेली (आगाऊ दिलेल्या धान्याची) वाढ. ॰वाद- वार्ता-श्रुति-पुस्त्री. जनप्रवाद पहा. ॰व्यवहार-शिरस्ता-पु. जनरूढी, जनरीत पहा. ॰स्थान-न. दंडकारण्यांतील एक ठिकाण. विशेषतः नाशिक जवळचा प्रदेश. 'जनस्थानीं वाट पाहे श्रीराम कृपानिधि।' -सप्र २.७५. जनस्वी-वि. लोकांसारखा वागणारा. 'महायोगी आणि जनस्वी । जनासारिखे ।'-दा १.८.११. जना चार-पु. जनरीत.-क्रिवि. लोक वहिवाटीप्रमाणें. जनापवाद-पु. दोषारोप, ठपका. 'लीलावती शिकतो तो दरिद्री होतो असा जनपवाद मात्र आहे.' ' शर सह्य पार जातां हृदयींच जनापवाद- शर थारे' -मोवन ९.५०. जनींजनार्दन-सर्व लोक हे देव- स्वरूपी आहेत अशी कल्पना. लोकमत हेंच देवांचे मत. 'जनीं जनार्दन म्हणोनी जना । संतुष्ट करावें ।' -दा १८.४.३५. जनीं- मनीं-क्रिवि. (काव्य.) आंत-बाहेरच प्रकट आणि गुप्त. जनीं- वनीं-क्रिवि. गांवांत आणि आणि (अथवा) वनांतरांत; लोकसमाजांत आणि अरण्यांत.

दाते शब्दकोश

ओढ

स्त्री. १ खेंच; आकर्षण; हिसका (घट्ट करण्यासाठीं किंवा ओढण्यासाठीं). (क्रि॰ देणें). 'इतर धर्माचे पाद्री लोक नीच मानलेल्या लोकांवर प्रेमाचें जाळें पसरून त्यांस आपल्यांत ओढीत. या त्यांच्या. ओढीचा विरोध करणारा आजपर्यंत कोणी नव्हता.' -दयानंदसरस्वती २३९. २ ताण, जोर, दाब (लांब- विण्यासाठीं); आंवळ. (क्रि॰ घालणें; बसणें; पडणें). 'तूर- टीच्या पाण्यानें माझ्या दांताला ओढ बसली आहे.' ३ ओढा- वयाचा दोर; ओढण्याचें कोणतेंहि साधन, सामान. ४ओढीत नेण्याचा किंवा वर काढण्याचा पदार्थ. ५ ओढण; वजन; ओढ- ण्याची शक्ति. 'हा दगड सहा बैलांच्या ओढीचा आहे.' ६ ज्या वरून ओझें ओढीत नेतात तो रस्ता; रस्त्यावर त्या वजनानें उमटणारा चर, रेघ, घांसर, खरड. ७ अडचणीची परिस्थिति; पैशांची चणचण; सावकारांचा तगादा, निकड, चिमट. 'या महिन्याला माझी खर्चाची फार ओढ झाली आहे.' ८ अतिशय मेहनतीमुळें व थकव्यामुळें शरीराला येणारा ताठरपणा. ९ नदी किंवा प्रवाह यांचा जोर, ताण. 'इंद्रायणीचे पाण्यास फार ओढ आहे.' १० सुरमाडाची पोय; जेथें पावसांत किंवा ओलींत एखादा बांधकामाचा भाग येत असेल तेथें याचा बांधावयाच्या दोरीसारखा उपयोग करितात तो. ११ कल; प्रवृत्ति; गति; झोंक; -कडे प्रयत्न. 'उदकाची ओढ स्वभावतः खोल प्रदेशाकडे असते.' १२ आकर्षण; मोह; पाश; आंगावर घेतलेलें काम वगैरेचा जोर (जग, धंदा, कुटुंब यांबाबत); ओढणारी शक्ति (माया, प्रेम, इच्छा, आशा इ॰); कळकळ; स्नेह; सहानुभूति. 'कां गे बाई रोड । तर गांवाची ओढ' १३ मागें राहाणें; जोराचा विरोध करणें; निष्ठुरपणें प्रतिबंध करणें; वेगानें सुटणें; प्रवाह, जोराचा ओघ. (क्रि॰ घेणें). १४ जनावर लावून एका वेळीं ओढीत आणलेला एक किंवा अनेक लाकडांचा समुदाय. १५ वरील लाकडांना बांधावयाची दोरी. १६ बैलरहाट किंवा तेल्याचा घाणा यांच्या जोखडास व बैलाच्या मागें जो बेसनेकड असतो त्यास बांधावयाची दोरी किंवा दांडी; ओढाळा. १७ तहान 'मला पाण्याची ओढ लागली आहे.' [उदन्या (तृष्णा)- उडण्ण-ओढणी-ओढ. भाअ १८३४.] १८ मनाची हौस 'प्राणसखे राजसे रोज गडे तुझ्या मनाच्या ओढी । आम्ही तृप्त करुं या घडीं ।' -सला १४. [ओढणें; तुल॰ दे. ओड्डढ = अनुरक्त; सं. अवकर्ष-अउअढ-ओढ; आकृष्ट-आउड्ढ-ओढ; किंवा सं. उपधा ] ॰काढणें-(हिं.) संकटांत दिवस काढणें. एक ओढ किंवा एके ओढीनें-एका हिसक्यासरशी; पहि- ल्यास प्रयत्नास, जोरास, दणक्यांत ओढीं ओढ असणें- दुःखावर दुःख येणें; संकटांत संकट येणें. ओढींत ओढ (वारणें, करून घेणें इ॰)-एक संकट भोगीत असतां दुसरें वारणें किंवा दुसरें ओढवून घेणें. वोढ पहा.

दाते शब्दकोश

पाय

पु. १ (शब्दशः व लक्षणेनें) पाऊल; पद; चरण. ईश्वर, गुरु, पति, धनी इ॰स उद्देशून विनयानें म्हणतात. 'मला तरी हे पाय सोडून राहिल्यानें चैन का पडणार आहे ?' -कोरकि २०. २ तंगडी. ३ कंबरेपासून तों खालीं बोटापर्यंतचा सर्व भाग; चालण्यास साधनभूत अवयव. ४ (ल.) पायाच्या आकाराची, उपयोगाची कोणतीहि वस्तु. (पलंग, चौरंग, खुर्ची, टेबल, पोळपाट इ॰चा) खूर. ५ डोंगराचा पायथा, खालचा, सपाटीचा भाग. ६ अक्षराचा किंवा पत्राचा खालचा भाग. ७ झाडाचें मूळ. ८ चवथा भाग; चतुर्थांश; चरण; पाद. ९ शिडीची पायरी; पावका; पायंडा. १० (ल.) कारण; लक्षण; चिन्ह; रंग. 'मुलाचे पाय पाळण्यांत दिसतात.' [सं. पाद; प्रा. पाअ; सिं. पाओ, पाय; फा. पाए; हिं. पाव] (वाप्र.) ॰उचलणें-भरभर चालणें; न रेंगाळणें. ॰उतारा-र्‍यां आणणें-येणें-नम्र करणें, होणें; तोरा, अभिमान कमी करणें, होणें. ॰काढणें-१ निघून जाणें; निसटणें; नाहींसें होणें. 'वैराग्यलहरीचा फायदा घेऊन पन्हाळ- गडावरून रातोरात पाय काढला.' -भक्तमयूरकेकावली पृ. ३. २ (व्यवहारांतून) अंग काढून घेणें. ॰कांपणें-घाबरणें; भिणें; भीति वाटणें; भयभीत होणें. ॰खोडणें-खुडणें-खुडकणें- निजतांना पाय अंगाशीं घेणें. ॰खोडणें-मरणसमयीं पाय झाडणें, पाखडणें. ॰घेणें-प्रवृत्ति होणें; इच्छा होणें. 'त्या कामाला माझा पाय घेत नाहीं.' ॰तोडणें-(ल.) एखाद्याच्या कामांत विघ्न आणणें. ॰दाखविणें-दर्शन देणें; भेट देणें. 'तो मज दावील काय पाय सखा ।' -मोविराट ६.११८. ॰देणें- १ पायाचा भार घालून अंग चेपणें. २ तुडविणें; उपद्रव देण्या- साठीं, कुरापत काढण्यासाठीं एखाद्याला पायानें ताडन करणें. ३ पाय लावणें; पायाचा स्पर्श करणें. ॰धरणें-१ पायां पडणें; शरण जाणें; विनंति करणें; आश्रयाखालीं जाणें. २ अर्धांगवायु इ॰ रोगांनीं पाय दुखणें. ॰धुवून-फुंकून टाकणें-ठेवणें- (ल.) मोठ्या खबरदारीनें, काळजीनें वागणें; मागें-पुढें पाहून चालणें, वागणें. ॰धुणें-१ संध्यावंदनादि कर्मापूर्वीं किंवा बाहेरून आल्याबरोबर पादप्रक्षालन करणें. २ कोणाची पूजा वगैरे कर- तांना, आदरसत्कारार्थ त्याचे पादप्रक्षालन करणें. ३ (बायकी) (ल.) लघवी करणें; मूत्रोत्सर्गाला जाणें; (मूत्रोत्सर्जनानंतर हात- पाय धुण्याची चाल बायकांत रूढ आहे त्यावरून). ॰न ठरणें- सारखें हिंडणें; भटकत रहाणें; विश्रांति न मिळणें; पायाला विसावा नसणें. ॰निघणें-मुक्त होणें; मोकळें होणें; बाहेर जाणें. पडणें. 'ह्या गांवांतून एकदां माझा पाय निघो म्हणजे झालें.' -विवि ८.११.२०९. ॰पसरणें-१ अधिकार प्रस्थापित करणें; पूर्णपणें उपभोग घेणें; अल्प प्रवेश झाला असतां हळूहळू पूर्ण प्रवेश करून घेणें. २ मरणें (मरतांना पाय लांब होतात यावरून). 'शेवटीं म्हातार्‍या आईपुढें त्यानें पाय पसरले.' म्ह॰ १ भटास दिली ओसरी, भट हातपाय पसरी. २ अंथरूण पाहून पाय पसरावेत. ॰पसरून निजणें-निश्चिंत, आळशी राहणें; निरुद्योगी असणें. ॰पोटीं जाणें-भयभीत होणें; अतिशय भीति वाटणें. निजलेला मनुष्य भीतीनें हातपाय आंखडून घेतो यावरून. 'जंव भेणें पाय पोटीं गेले नाहीं ।' -दावि १६०. ॰फांलटणें-पाय झिजवणें; पायपिटी करणें; तंगड्या तोडणें; एखादें काम करण्यासाठीं कोठें तरी फार दूरवर किंवा एकसारखें पायानें चालत जाणें. 'कांहीं लाभ नसतां उगींच पाय फांसटीत चार कोस जातो कोण ?' ॰फुटणें- १ विस्तार पावणें; वाढणें. 'पहिल्यानें तुझें एक काम होतें, नंतर दुसरें आलें, आतां तिसरें. आणखी त्याला किती पाय फुटणार आहेत कोणास ठाऊक ?' २ हळूच नाहींसा होणें; चोरीला जाणें (वस्तु). ३ थंडीच्या योगानें किंवा जळवातानें पाय भेगलणें, चिरटणें. ॰फोडणें-भलतीकडे नेणें; विषयांतर करणें; मुद्याला सोडून अघळ- पघळ बोलणें; फाटे फोडणें. ॰भुईशीं(ला)लागणें-१ (एखाद्या कामास) कायमपणा येणें; निश्चितपणा येणें. २ जिवावरच्या संकटांतून वांचणें. ॰मोकळा करणें-होणें १ अडचणींतून बाहेर पडणें, काढणें. २ फेरफटका करणें; पायांचा आंखडलेपणा नाहींसा करणें, होणें. ॰मोडणें-१ पायांत शक्ति नसणें. २ निराशेमुळें गलितधैर्य होणें; निराश होणें. 'माझा भाऊ गेल्यापासून माझे पाय मोडले.' ३ एखाद्याच्या कामांत हरकत आणणें; धीर खचविणें; मोडता घालणें; काम करूं न देणें. ४ (नगरी) एखाद्या मुलाच्या पाठीवर त्याच्या मातेस कांहीं दिवस जाणें; गरोदर राहणें. 'नरहरीचे पाय मोडले कां ?' (त्याच्या पाठीवर कांहीं दिवस गेले आहेत काय ?) ॰येणें-चालतां येणें; (लहान मूल) चालूं लागणें. ॰रोवणें- स्थिर, कायम होणें. ॰लागणें-पाय भुईशीं लागणें पहा. (वर) ॰येणें-प्रतिबंध, अडचण होणें, येणें. पोटावर पाय येणें = उदर- निर्वाहाचें साधन नाहीसें होणें. ॰वरपणें-ओरपणें-(कर.) चिंचपाण्यांच पाय बुडवून ते तापलेल्या तव्यावरून ओढणें व पुन्हां चिंचपाण्यांत बुडविणें, याचप्रमाणें पांच दहा मिनिटें सारखें करीत रहाणें (डोळ्यांची जळजळ यासारखा विकार नाहींसा होण्यावर हा उपाय आहे). [ओरपणें पहा] ॰वळणें-१ दुसरी- कडे प्रवृत्ति होणें; मुरडणें; वळले जाणें (प्रेम इ॰). २ वातविकारानें पायांत वेदना उत्पन्न होणें; पाय तिडकूं लागणें; गोळे येणें. ॰वाहणें-एखाद्या स्थलीं जाण्याचा मनाचा कल, प्रवृत्ति होणें. ॰शिंपणें-(मुलाला पायावर घेऊन दूध पाजण्यापूर्वीं स्वतः) पाय धुणें. 'ते माय आगोदर पाय शिंपी ।' -सारुह १.५३. ॰शिवणें-पायांस स्पर्श करणें; पायाची शपथ वाहणें. पायां- खालीं तुडविणें-१ दुःख देणें; क्लेश देणें छळ करणें. २ कस्पटाप्रमाणें मानणें; मानहानि करणें. पायाचा गू पायीं पुसणें-(ल.) कोणत्याहि घाणेरड्या गोष्टीची घाण जास्त वाढूं न देतां तिचा ताबडतोब बंदोबस्त करणें. पायांचा जाळ-पायांची आग-पायांचें पित्त मस्तकास जाणें-अतिशय रागावणें; क्रोधाविष्ट होणें; संतापणें. पायांची बळ भागविणें-व्यर्थ खेपा घालणें, फिरणें; निरर्थक कार्यास प्रवृत्त होणें. पायांजवळ येणें-(आदरार्थीं) एखाद्याकडे जाणें, येणें, भेटणें. पायानें जेवणें-खाणें-अत्यंत मूर्ख, वेडा असणें, होणें. पायानें लोटणें-तिरस्कार करणें; अवहेलना करणें. 'म्हणतो युधिष्ठिर नको पायें लोटूं मला अवनतातें ।' -मोउद्योग ८.१८. पायां पडणें-पायांवर डोकें ठेवणें; नमस्कार करणें; विनविणें; याचना करणें. 'उत्तर म्हणे नको गे ! पायां पडतों बृहन्नडे ! सोड !' -मोविराट ३.७४. पायांपाशीं पाहणें-जवळ असेल त्याचाच विचार करणें; अदूरदृष्टि असणें; आपल्याच परिस्थितीचा, आपल्या- पुरताच विचार करणें. पायांपाशीं येणें-पायाजवळ येणें पहा. पायांला-त, पायांअढी पडणें-(म्हातारपणामुळें) चालतांना एका पायाला दुसरा पाय घासणें. पायांला खुंट्या येणें- एकाच जागीं फार वेळ बसल्यानें पाय ताठणें. पायां लागणें- पायां पडणें. 'मीं पायां लागे कां । कांइसेयां लागीं ।'- शिशु २२४. पायांवर कुत्रीं-मांजरें घालणें-(ल.) अतिशय प्रार्थना व विनवण्या करून एखाद्यास कांहीं काम करावयास उठ- विणें. पायांवर घेणें-मूल जन्मल्यावर त्यास स्वच्छ करण्यासाठीं न्हाऊं घालणें व जरूर तें सुईणीचें काम करणें. पायांवर नक्षत्र पडणें-सदोदित फिरत असणें; एकसारखे भटकणें; पायाला विसांवा नसणें. 'काय रे, घटकाभर कांहीं तुझा पाय एका जागीं ठरेना, पायावर नक्षत्र पडलें आहे काय ?' पायांवर पाय टाकून निजणें-चैनींत व ऐटींत निजणें. पायांवर पाय ठेवणें-देणें- एखाद्याच्या पाठोपाठ जाणें; एखाद्याचें अनुकरण करणें. पायांवर भोंवरा असणें-पडणें-एकसारखें भटकत असणें; भटक्या मारणें. पायावर नक्षत्र पडणें पहा. पायावर हात मारणें- पायाची शपथ घेणें. -नामना ११०. पायाशीं पाय बांधून बसणें-एखाद्याचा एकसारखा पिच्छा पुरवून कांहीं मागणें. पायांस कुत्रें बांधणें-(ल.) शिव्या देत सुटणें; भरमसाट शिव्या देणें; फार शिवराळ असणें. पायांस पाय बांधणें-एखाद्याच्या संगतींत एकसारखें रहाणें. पायांस भिंगरी-भोंवरा असणें- पायांवर भोंवरा असणें पहा. पायांस-पायीं लागणें-नमस्कार करणें; पायां पडणें. 'तूं येकली त्वरित जाउनि लाग पायीं ।' -सारुह ८.११२. पायांस वहाण बांधणें-बांधलेली असणें-एकसारखें भटकत राहणें; पायपीट करणें. पायीं-क्रिवि. १ पायानें; पायाच्या ठिकाणीं. 'भूपें हळूच धरिला कलहंस पायीं' -र १०. [पाय] २ मुळें; साठीं; करितां. 'काय जालें देणें निघालें दिवाळें । कीं बांधलासि बळें ऋणेंपायीं ।' -तुगा ८४५. (कुण.) 'कशापायीं' = कशाकरतां; कां. पाईं. [सं. प्रीतये; प्रीत्यर्थ] पायीं बांधणें-(हत्ती इ॰च्या पायाशीं बांधणें या शिक्षेवरून) हानि, पराभव करण्यास तयार असणें. आपले पाय माझ्या घरीं लागावे-(आदरार्थीं ल.) आपण माझ्या घरीं येऊन मला धन्य करावें. आपल्या पायांची धूळ माझ्या घरीं झाडावी- (नम्रपणाचें आमंत्रण) माझ्या घरीं आपण यावें. आपल्या पायांवर धोंडा पाडून-ओढून घेणें-आपलें नुकसान आप- णच करून घेणें; आपल्या हातांनीं स्वतःवर संकट आणणें; विकत श्राद्ध घेणें. एका पायावर तयार-सिद्ध असणें-अत्यंत उत्सुक असणें. 'बाजीराव शिपाई आहेत तसा माही आहें. त्यांच्याप्रमाणेंच हा प्रतिनिधि योग्य प्रसंगीं पाहिजे त्या मोहिमेवर जाण्यास एका पायावर सिद्ध आहे.' -बाजीराव. घोड्याच्या- हत्तीच्या पायीं येणें आणि मुंगीच्या पायीं जाणें- (आजारीपण, संकट, बिकट परिस्थिति इ॰) ही येतांना जलदीनें येतात पण जावयास दीर्घकाळ लागतो. याच्या उलट श्रीमंतीबद्दल म्हणतात. चहूं-दोहें पायांनीं उतरणें-(शिंगरू, वांसरूं, पाडा इ॰नीं) चार किंवा दोन पांढर्‍या पायांसह जन्मणें. जळता पाय जाळणें-एखाद्या कामांत, व्यवहारांत, व्यापारांत नुकसान होत असतांहि तो तसाच चालू ठेवणें. त्या पायींच-क्रिवि. ताबड- तोब; त्याच पावलीं. भरल्या पायांचा-(रस्त्यांत चालून आल्या मुळें) ज्याचे पाय (बाहेरून आल्यामुळें धुळीनें वगैरे) घाणेरडे झाले आहेत असा. 'तूं भरल्या पायांचा घरांत येऊं नकोस.' भरल्या पायांनीं, पायीं भरलें-क्रिवि. बाहेरून चालून आल्यावर पाय न धुतां; घाणेरड्या पायानीं. (बाहेरच्या दोषासह; स्पृष्टा- स्पृष्टादि दोष किंवा भूतपिशाच्चादि बाधा घेऊन). 'मुलाच्या जेवणाच्या वेळेस कोणी पायीं भरलें आलें भरलें आलें म्हणून आज हें मूल जेवीत नाहीं.' 'ज्या घरीं बाळंतीण आहे त्यांत एकाएकीं पायीं भरलें जाऊं नये.' मागला पाय पुढें न घालूं देणें-(ल.) केलेली मागणी पुरविल्याशिवाय पुढें पाऊल टाकूं न देणें; मुळींच हालूं न देणें. मागला पाय पुढें न ठेवणें-मागितलेली वस्तु दिल्याशिवाय एखाद्यास सोडावयाचें नाहीं, तेथून जाऊं द्यावयाचें नाहीं असा निश्चय करणें. मागील पाय पुढें नाहीं पुढील पाय मागें नाहीं-हट्टीपणा; करारीपणा; ठाम निश्चय; जागच्या- जागीं करारीपणानें ठाव धरून बसणें याअर्थीं उपयोग. मागल्या पायीं येणें-एखादें काम करून ताबडतोब परत येणें; त्याच पावलीं परत येणें. म्ह॰ १ पाय धू म्हणे तोडे केवढ्याचे ? २ पाय लहान मोठा, न्याय खरा खोटा. ३ पायांखालीं मुंगी मर- णार नाहीं (निरुपद्रवी माणसाबद्दल योजतात). ४ (व.) पायावर पाय हवालदाराची माय = आळशी स्त्रीबद्दल योजतात. ५ पायींची वहाण पायींच छान-बरी (हलक्या मनुष्यास फाजील महत्त्व देऊं नये या अर्थीं). 'मज पामरा हें काय थोरपण । पायींची वहाण पायीं बरी ।' -तुगा ५३५. ६ हत्तीच्या पायांत सग- ळ्यांचे पाय येतात. सामाशब्द- ॰आंग-न. (व.) गर्भाशय. ॰उतार-रा-पु. नदींतून पायीं चालत जाण्यासारखी वाट. 'एर्‍हवी तरी अवधारा । जो दाविला तुम्हीं अनुसारा । तो पव्ह- ण्याहूनि पायउतारा । सोहपा जैसा ।' -ज्ञा ५.१६५. -वि. १ पायांनीं ओलांडून जांता येण्याजोगा. २ पायीं चालणारा; पायदळ. 'आम्ही गाडदी लोक केवळ आम्ही पायउतारे.' -भाब १००. [पाय + उतार] ॰उतारां-रा-क्रिवि. पायीं; पायानें. (क्रि॰ येणें; जाणें; चालणें). 'पायउतारा येइन मागें पळभर ना सोडी ।' -सला २०. पायउतारा होणें-येणें-(ल.) शिव्यागाळी, भांडण करण्यास तयार होणें. ॰कडी-स्त्री. पायांतील बेडी. 'तुम्ही हातकड्या, पायकड्या घातल्या.' -तोबं. १२६. [पाय + कडी] ॰क(ख)स्त-स्त्री. पायपीट; एकसारखें भटकणें; वणवण; [पाय + कष्ट, खस्त] ॰कस्ता-पु. एका गांवीं राहून दुसर्‍या गांवचे शेत करणारें कूळ; ओवंडेकरी. 'दर गांवास छपरबंद व पायकस्ता देखील करार असे.' -वाडबाबा १.२२९. [फा. पाएकाश्त] ॰कस्ता, पायींकस्ता-क्रिवि. पायीं जाऊन; पायांनीं कष्ट करून; ओवं- ड्यानें. 'आसपास गांव लगते असतील त्यांनीं पायीं कस्ता शेतें करून लागवड करावी ...' -वाडबाबा २.८३. ॰काळा-पु. (कों.) (सामान्यतः) कुणबी; नांगर्‍या; शेतावरचा मजूर. [पाय + काळा] ॰खाना-पु. शौचकूप; संडास; शेतखाना. [फा. पाए- खाना] ॰खिळॉ-पु. (गो.) पायखाना पहा. ॰खुंट-खुंटी- पुस्त्री. जनावर पळून जाऊं नये म्हणून त्याच्या गळ्यास व पायास मिळून बांधलेली दोरी, किंवा ओंडा; लोढणें. [पाय + खुंट, खुंटी] ॰खोळ-पु. लाथ. 'कां वैद्यातें करी सळा । रसु सांडी पायखोळां । तो रोगिया जेवीं विव्हळा- । सवता होय ।' -ज्ञा १७.१०१. २ शेतखाना ? [गो. पायखिळॉ] ॰खोळा-ळां-क्रिवि. पायतळीं; पायदळी. 'चंदन चढे देवनिढळा । येक काष्ठ पडे पायखोळा ।' -मुरंशु ३७९. ॰खोळणी-वि. शेतखान्याची ? 'जैसी पाय- खोळणी मोहरी । भरणाश्रय आमध्यनीरीं । तैसा द्रव योनिद्वारीं । म्हणोनि सदा अशौच ।' -मुरंशु ३५४. [गो. पायखिळॉ = शेतखाना] ॰गत-न.स्त्री. १ बिछान्याची पायाकडची बाजू; पायतें. 'सर- कारनें खडकवासल्याचें धरण बांधून आमच्या पायगतची नदी उशागती जेव्हा नेऊन ठेवली...' -टि २.१७४. २ (डोंगर, टेंकडी, शेत इ॰चा) पायथा; पायतरा. ३ पलंग, खाट यांचें पायांच्या बाजूकडील गात. [पाय + सं. गात्र] ॰गत घेणें-बाज इ॰च्या पायगतच्या दोर्‍या ओढून बाज ताठ करणें, ताणणें. ॰गम-पु. (व.) पाया; पूर्वतयारी; पेगम पहा. 'आधीं पासून पायगम बांधला म्हणजे वेळेवर अशी धांदल होत नाहीं.' ॰गुण-पु. (पायाचा गुण) एखाद्याचें येणें किंवा हजर असणें व त्यानंतर लगेच कांहीं बर्‍यावाईट गोष्टी घडणें यांच्यामध्यें जोडण्यांत येणारा काल्पनिक कार्यकारणसंबंध; बरेंवाईट फळ; शुभाशुभ शकुन. हातगुण शब्द याच अर्थाचा पण थोडा निराळा आहे. एखाद्या माणसाचें काम, कृत्य यांशीं हातगुणाचा संबंध जोडतात. 'धनाजीला नौकरीला ठेवल्यापासून हंबीरराव पुनः पूर्वींच्या वैभवाला चढले, आणि धनाजीचा हा पायगुण समजून त्याला प्यार करूं लागले.' -बाजीराव १२७. ॰गुंता-पु. अडचण; आड- काठी; अडथळा; पायबंद. पायगोवा पहा. 'दिल्लीस गेले आणि तिकडेच राहिले तर मग यत्न नाहीं. यास्तव समागमें पायगुंता विश्वासराव यास द्यावें' -भाव १०७. 'हीं मायेचीं माणसं स्वारींत जवळ असलीं कीं पायगुंता होतो.' -स्वप ४८. [पाय + गुंतणें] ॰गोवा-पु. १ पायगुंता; एखाद्या जुंबाडांत पाय अडकल्यामुळें होणारी अडचण; पायामुळें झालेली अडवणूक. २ (ल.) अडचण; अडथळा; नड; हरकत; आडकाठी; अटकाव. 'निरोपण सुपथीं आडथळा । पायगोवा वाटे सकळा ।' -मुसभा. २.९५. 'देवधर्म तीर्थ करावयास चिरंजीवाचा पायगोवा होईल यैसे आहे' -पेद ९.११. ३ शत्रूच्या सैन्याला पिछाडीकडून अडविणें. [पाय + गोवणें] ॰घड्या-स्त्रीअव लग्नांत वरमाय व मानकरिणी यांना त्यांच्या जानवास घर पासून वधूमंडपीं आणतांना त्यांच्या रस्त्यवर आंथराव- याच्या पासोड्या (मोठ्या सत्काराचें चिन्ह). पायघड्या घाल- ण्याचें काम परिटाकडे असतें. 'वाजंत्री पायघड्याशिरीगिरी विहिणी चालती ।' -वसा ५३ [पाय + घडी] ॰घोळ-वि. पायापर्यंत पोंचसें (वस्त्र.). 'कौसुंभरंगी पातळ । नेसली असे पायघोळ ।' -कथा १.११.११२. -क्रिवि. दोन्ही पाय झाकले जातील असें (नेसणें) पायांवर घोळे असें. [पाय + घोळणें] ॰चंपा-स्त्री. पाय चेपणें; सेवेचा एक प्रकार. 'हातदाबणी, पाय पी, विनवणी, चोळणी इत्यादि प्रकार करण्याचे अपूर्व प्रसंग जुन्या लोकांच्या परिचयाचे नव्हते असे ते सांगतात.' -खेया २८. [पाय + चंपी = चेपणीं] ॰चळ-पुस्त्री. अशुभ, अपशकुनी पाऊल. पायगुण; कोणत्याहि कार्याचा बिघाड, विकृति, संकटाची वाढ इ॰ होण्याचें कारण रस्त्यावरून जाणारा एखादा अपशकुनी माणूस किंवा भूत असें समजतात; पायरवा. [पाय + चळ] ॰चाल- स्त्री. पायानें चालणें, चालत जाणें; चरणाचाल. 'कीं येथ हे हळुच चालत पायचाली ।' -सारुह ८.१४४. [पाय + चाल] ॰चाळ- पु. १ विनाकारण केलेली पायांची हालचाल. २ (विणकाम) पायांच्या हालचालीमुळें हातमागास दिलेली चालना किंवा अशा रीतीनें चालणारा माग ३ अपशकुनी पायगुण; पायचळ. [पाय + चाळा] ॰चोरी-वि. धार काढतांना मागील पाय वर उचल- णारी (गाय, म्हैस इ॰). [पाय + चोरी] ॰ज(जा)मा-पु. विजार; तुमान; चोळणा; सुर्वार. [फा. पाएजमा] ॰जिभी- जिब-जीब-स्त्रीन. बारिक घागर्‍या असलेला पायांत घालण्याचा एक दागिना; तोरडी; पैंजण. वर्‍हाडांत अद्याप पायजिबा घालतात. 'सोन्याचें पायजिब तळीं ।' -राला ५६. [फा. पाएझेब्] ॰टा-पु. १ पायरी (शिडी, जिना इ॰ची). २ विहिरींत उतर- ण्यासाठीं केलेले कोनाडे किंवा बांधीव विहीरींत बांधकामाच्या बाहेर येतील असे पुढें बसविलेले जे दगड ते प्रत्येक; नारळाच्या झाडास वर चढतांना पाय ठेवण्यासाठीं पाडलेली खांच. ३ पाय- वाट; पाऊलवाट. ४ (ल.) वहिवाट; पायंडा; शिरस्ता; प्रघात. (क्रि॰ पडणें; लागणें; बसणें). ५ चाकाच्या परिघाचा प्रत्येक तुकडा, अवयव; पाटा. ६ (मोटेच्या विहिरीच्या) थारोळ्याच्या दोन्ही बाजूचे दगड, प्रत्येकी. [पाय + ठाय] ॰टांगी-स्त्री. (ना.) खालीं पाय सोडून बसतां येईल अशी योजना असणारी बैलगाडी. रेडू. [पाय + टांगणें] ॰ठ(ठा)ण-ठणी-नस्त्री. पायरी; पायटा पहा. 'हीं चार पांच चढुनी हळु पायठाणें ।' -केक २५. [सं. पदस्थान; म. पाय + ठाणें] ॰ठा-पु. १ चाकाच्या परिघाचा अव- याव; पाटा. २ (राजा.) सपाट जमीन भाजून तेथें नाचणी इ॰ पेरण्यासाठीं तयार केलेलें शेत. ३ ज्यांत मोटेचे सुळे, बगाडाचे खांब बसवितात ते विहिरींचे, भोंके पाडलेले दोन दगड. [सं. पदस्थ; पाय + ठेवणें] ॰त(ता)ण-न-न. (अशिष्ट.) १ जोडा; जुता; कुणबाऊ जोडा; पादत्राण. (सामा.) पायांत घालण्याचें साधन 'विठ्ठल चिंतण दिवसारात्रीं ध्यान । होईन पायतन त्याचे पायीं ।' -तुगा ११२७. 'स्त्रीपट चोरूनि पळे तेव्हां कैंचीं नळास पायतणें ।' -मोवन ४.१५५. २ (कों.) वाहाणा; चेपल्या. [सं. पादत्राण; प्रा. पायत्ताण] ॰बसविणें-(चांभारी धंदा) जोडा व्यवस्थित करणें. पायतर-पायतें पहा. ॰तरे-न. पायरी. 'एथ अग्नी हें पहिलें पायतरें । ज्योतिर्मय हें दुसरें ।' -ज्ञा ८.२२३. [पाय + थारणें] ॰तांदूळ-पुअव. (पायाखालचें तांदूळ) साधे, स्वच्छ तांदूळ निरनिराळ्या दोन पाटींत, शिपतरांत (ब्राह्मणेतरांत) किंवा पत्रावळींवर (ब्राह्मणांत) ठेवतात व त्यांवर नियोजित वधूस व वरास लग्नासाठीं उभे करितात. या तांदुळांवर उपाध्यायाचा हक्क असतो. पण ते बहुधां तो महारास देत. वधूवराच्या मस्तकावर तांदूळ, गहूं किंवा जोंधळे जे टाकतात, ते जे नंतर एकत्र करितात त्यांसहि पायतांदूळ असें म्हणतात. ह्या तांदुळांवर वेसकर-महाराचा हक्क असतो. [पाय + तांदूळ] ॰तर(रा)-ता-थर(रा)-था- पायतें-थें-पुन. १ बिछान्याची पायगताची बाजू. २ (टेंकडी, शेत, बगीचा इ॰ची) पायगत; पायतळची बाजू. [सं. पाय + थारणें; पादांत; म. पायतें] ॰थण-न-न. (विरू.) पायतण पहा. ॰थरी-स्त्री. (खा.) दुकानाच्यापुढें लांकडी किंवा दगडी तीन चार पायर्‍या असतात त्यांपैकीं प्रत्येक पायरी; पायटा. ॰दळ-न. पायानें चालणारी फौज; पाइकांचें सैन्य; पदाति. [पाय + दळ (सं. दल-सैन्य)] ॰दळ-ळीं-क्रिवि. जाण्यायेण्याच्या वाटेवर; पायानें तुडविलें जाईल असें (पडणें). 'फुलें कुसकरिलीं कुणिग मेल्यानें पायदळी तुडविलीं.' -उषःकाल १२८. ॰दळणीं-क्रिवि. पायाखालीं; पायदळीं. (कि॰ पडणें). [सं. पाददलन] ॰दान- न. (व.) तांग्याच्या, बैलगाडीच्या मागच्या बाजूस पाय ठेवण्या साठीं केलेली जागा. [सं. पाद + दा = देणें, दान] ॰दामा-पु. १ पक्षी पकडण्याचें जाळें. २ फूस लाविणारा पक्षी; ससाणा. -मराचिथोशा ३३. [फा. पाय्दाम्; सं. पाद + दाम = दावें] ॰द्दाज-न. पाय पुसणें; पायपुसें; हें बहुतेक काथ्याचें केलेलें असतें. [पाय] ॰धरणी-स्त्री. १ पायां पडणें; अत्यंत नम्रतेची, काकुळतीची विनवणी; पराकाष्ठेचें आर्जव. 'कशीहि पायधरणी मनधरणी करा- वयास तयार झालो.' -भक्तमयूरकेका प्रस्तावना १६. [पाय + धरणी] ॰धूळ-स्त्री. १ पायाची, पायास लागलेली, धूळ. 'नाचत बोले ब्रीदावळी । घेऊन लावी पायधुळी ।' -दा २.७.४१. २ स्वतःबद्दल दुसर्‍याशीं तुलना करतांना, बोलतांना (गुरु, इ॰कांजवळ) नम्रता- दर्शक योजावयाचा शब्द. [पाय + धूळ] (एखाद्यावर) ॰धूळ झाडणें-(एखाद्याच्या घरीं) आगमन करणें; भेट देणें; समाचार घेणें (गौरवार्थीं प्रयोग). 'मज गरिबावर पायधूळ झाडीत जा.' 'जगीं जरी ठायीं ठायीं पायधूळ झाडुन येई ।' -टिक ५. ॰पायखळी-स्त्री. पाय धुणें. 'तयापरी जो अशेषा । विश्वा- चिया अभिलाषा । पायपाखाळणिया देखा । घरटा जाला ।' -ज्ञा १८.६५१. [सं. पादप्रक्षालन; प्रा. पायपक्खालण; म. पाय + पाखाळणी] ॰पाटी-पांटी-स्त्री. लग्नाच्या वेळीं पायतांदुळांनीं भरलेली पांटी, शिपतर इ॰. [पाय + पांटी] ॰पा(पां)टीचे तांदूळ-पुअव. पायतांदूळ पहा. ॰पिटी-पीट-स्त्री. विनाकारण चालण्याचे श्रम; वणवण; इकडे तिकडे धांवाधांव. 'बहु केली वणवण । पायपिटी झाला सिण ।' -तुगा २००. [पाय + पिटणें] ॰पुसणें, ॰पुसें-न. पायपुसण्यासाठीं दाराशीं ठेविलेली काथ्याची जाड गादी; पायद्दाज; पायपुसण्याचें साधन. (महानु.) पायें पुसणें. 'तया वैराग्याचें बैसणें । शांभव सुखाचें पायेंपुसणें ।' -भाए ८११. [पाय + पुसणें] ॰पेटी-स्त्री. हार्मोनियमचा एक प्रकार. हींत पायानें भाता चालविण्याची योजना केली असल्यानें दोन्ही हातांनीं पेटी वाजवितां येते. याच्या उलट हातपेटी. [पाय + पेटी] ॰पैस-(व.) पाय टाकण्यास जागा. [पाय + पैस = प्रशस्त] ॰पोश-स-पु. (ल.) जोडा; वहाण; चप्पल; पादत्राण. 'सालाबादप्रमाणें ऐन जिन्नस पायपोसाचे जोडच यापासून घेत जाणें.' -दा २०१२. [फा. पाय्पोश्; सं. पाद + स्पृश्] ॰पोस- जळाला, गेला-तुटला-कांहीं पर्वा नाहीं, हरकत नाहीं, शष्प गेलें याअर्थीं वाक्प्रचार. 'एका महारुद्राची सामग्री राधाबाई काय लागेल ती पुण्याहून माळशिरसास पाठवील न पाठवील तरी आमचा पायपोस गेला ! तीन महारुद्र करून आम्हींच श्रेय घेऊं.' -ब्रप २७३. ॰पोस मारणें-मानहानि करणें; निर्भर्त्सना करणें. ॰पोस दातीं धरणें-अत्यंत लीन होऊन क्षमा मागणें; याचना करणें; आश्रय घेणें. ॰पोसासारिखें तोंड करणें-फजिती झाल्यामुळें तोंड वाईट करणें; दुर्मुखलेलें असणें. कोणाचा पाय- पोस कोणाच्या पायांत नसणें-गोंधळ उडणें (पुष्कळ मंडळी जमली असली आणि व्यवस्था नसली म्हणजे ज्याचा जोडा त्याला सांपडणें मुष्किल होतें त्याजवरून). ॰पोसखाऊ-वि. खेटरखाऊ; हलकट; अत्यंत क्षुद्र; निर्लज्ज (मनुष्य). [पाय + पोस + खाणें] ॰पोसगिरी-स्त्री. जोड्यांनीं मारणें; दोन पक्षांतील व्यक्तींनीं केलेली जोड्यांची मारामारी; जोडाजोडी. (क्रि॰ करणें; मांडणें; चालणें). [फा.] ॰पोसपोहरा-पु. जोड्याच्या आका- राचा विहिरींतून पाणी काढण्याचा पोहरा. [पायपोस + पोहरा] ॰पोसापायपोशी-स्त्री. परस्परांतील जोड्यांची मारामारी; जोडाजोडी; पायपोसगिरी. ॰पोशी-स्त्री. दर चांभारापासून दर- साल एक जोडी नजराणा घेण्याचा पाटील-कुलकर्णीं इ॰चा हक्क. ॰पोशी-वि. पायपोसाच्या डौलाचें, घाटाचें बांधलेलें पागोटें. ॰पोळी-पुस्त्री. १ (तापलेली जमीन, खडक, वाळू इ॰वरून चालल्यामुळें) पाय भाजणें. २ (ल.) मध्याह्नीची वेळ. ३ जमी- नीची तप्तावस्था; जमीन अतिशय तापलेली असणें. 'एव्हां पाय- पोळ झाली आहे संध्याकाळीं कां जाना ?' [पाय + पोळणें] ॰फळें-न. (राजा.) ओकतीच्याजवळ पाय देण्यासाठीं बस- विलेली फळी. [पाय + फळी] ॰फोडणी-स्त्री. १ घरीं रोग्यास पहाण्याकरितां आल्याबद्दल वैद्यास द्यावयाचें वेतन; वैद्याच्या भेटीचें शुल्क. २ पायपोळ. [पाय + फोडणें] ॰फौज-स्त्री. (गो.) पाय- दळ. [पाय + फौज] ॰बंद-पु. १ घोड्याचे मागचे पाय बांध- ण्याची दोरी. 'एक उपलाणी बैसले । पायबंद सोडूं विसरले ।' -जै ७६.६०. २ अडथळा; बंदी. 'इंग्रज व मोंगल यांस तिकडे पायबंद जरूर पोंचला पाहिजे.' -वाडसमा १.१६. ३ (फौजेच्या पिछाडी वर) हल्ला करून व्यत्यय आणणें. 'रायगडास वेढा पडला, आपण पायबंद लावावा म्हणजे ओढ पडेल. रायगडचा वेढा उठेल.' -मराचिथोशा ३४. ४ संसाराचा पाश. [फा. पाएबंद्] ॰बंद लावणें-लागणें-घालणें-देणें-पडणें-आळा घालणें, बसणें; व्यत्यय आणणें, येणें; अडथळा, बंदी असणें, करणें. 'भलत्या आशा व आकांक्षा यांना इतिहासदिशास्त्रांकडून पायबंद पडेल.' -विचावि ५२. 'निजामाला पायबंद लागणें शक्यच नाहीं.' -भाऊ (१.१) २. ॰भार-पु. पायदळ. याच्या उलट अश्वभार, कुंजरभार, रथभार इ॰ 'अश्वरथ कुंजरा । गणित नाहीं पाय- भारां ।' -कथा १.२.५९. [पाय + भार] ॰मर्दी-स्त्री. भरभर ये जा करणें; चालणें; धांवाधांवी, धांवपळ करणें; एखाद्या कामा- वर फार खपणें. 'पायमर्दी केली तेव्हां काम झालें .' (क्रि॰ घेणें; करणें). [फा. पाएमर्दी = धैर्य; निश्चय] ॰मल्ली-म(मा)ली- मेली-स्त्री. १ सैन्य, गुरें इ॰नीं केलेली देश, शेत इ॰ची नासाडी; पायांखालीं तुडविणें; नासधूस; तुडवातुडव. 'आपले सरकारची फौज मलक महमदखान वगैरे गेले आहेत त्यांनीं पायमाली केली आहे.' -दिमरा १.१५०. २ शत्रूनें आपला मुलुख लुटला असतां, तहांत त्याच्या कडून त्या लुटीबद्दल घेण्यांत येणारा दंड किंवा खंडणी. (सामा.) मोबदला; भरपाई. 'सर्व आमचे कर्ज सरकारांतून कारभारी देतील तेव्हां काय पायमल्ली दहापांच लक्ष रुपये (वजा) घालणें ती घालावी.' -ख ९.४८५४. 'शेतकर्‍यांस नुकसानीदाखल पायमली देण्यांत येत असते.' -हिंलइ १७४. ३ (ल.) दुर्दशा; अपमान; हेटाळणी; अवहेलना. (क्रि॰ करणें; होणें). 'आमच्या भाषेची अशी पायमल्ली व्हावी हा मोठा चमत्कार नव्हे काय ?' -नि ११३ ४ नाश; नुकसान. 'महादजी गदाधर यांनीं दरबारची जुनी राहटी राखिली नाहीं, याजमुळें पायमाली आहे.' -रा ८.२०१. [फा. पाएमाली; सं. पाद + मर्दन; म. पाय + मळणें] ॰मळणी-स्त्री. सारखी चाल, घसट, वहिवाट; एकसारखें चालणें वहिवाट ठेवणें. 'जो रस्ता सध्यां बिकट व अडचणीचा वाटतो तोच पुढें पाय- मळणीनें बराच सुधारेल.' -नि. ४२९. [पाय + मळणें] ॰मांडे- पु. (काव्य.) पायघड्या पहा. 'विषयसुख मागें सांडे । तेचि पायातळीं पायमांडे ।' -एभा ८.६. -वेसीस्व १०.१९. ॰मार्ग- पु. १ पायवाट; पाऊलवाट. २ जमीनीवरचा रस्ता; भूमिमार्ग; खुष्कीचा मार्ग. ह्याच्याउलट जलमार्ग. ॰माल, पामाल-वि. पायमल्ली केलेला, तुडविला गेलेला; उध्वस्त; नष्ट. [फा. पाएमाल्] ॰मोजा-पु. पायांत घालावयाचा विणून तयार केलेला पिशवी- सारखा कपडा. हा पाऊस, थंडी, वारा यांपासून पायाचा बचाव करण्यासाठीं वापरतात. [पाय + मोजा] ॰मोड-स्त्री. १ प्रवासाला निघालेल्या किंवा चालत असलेल्या मनुष्यास जाऊं न देणें. २ अशी केलेली थांबवणूक; थांबवून ठेविलेली स्थिति. [पाय + मोडणें] ॰मोडें-न. १ (कों.) उत्साहभंग, अडथळा करणारी गोष्ट; (हातीं घेतलेल्या किंवा घ्यावयाच्या कामांत) एखाद्याचा उत्सा- हाचा, आशांचा बींमोड; तीव्र निराशा. २ आयुष्यांतील अडचणी अडथळें, संकटें इ॰ वाढत्या व्यवहाराची गति कुंठित होण्यास निमित्त. 'हें पोर अमळ चालूं लागलें म्हणजे खोकला, पडसें अशीं अनेक पायमोडीं येतात.' [पाय + मोडणें] ॰मोडें घेणें- (हातीं घेतलेल्या कार्यापासून) भीतीनें पारवृत्त होणें. ॰रव-पु. वरदळ; वहिवाट; दळणवळण; पायंडा. पैरव पहा. 'आणीकही एक पहावें । जें साधकीं वसतें होआवें । आणि जनाचेनि पायरवें मैळेचिना ।' -ज्ञा ६. १७२. -स्त्री. १ पायतळ; पायदळ; पाय ठेवण्याची जागा. 'रावण जंव भद्रीं चढे । तवं मुगुट पायरवीं पडे ।' -भारा बाल ७.५. २ (राजा.) चाहूल; सांचल. ३ पाय- वाट; रस्ता. ४ प्रवेश. 'प्रथम चाकरीस येतों म्हणून नम्रतेनें पायरव करून घेतली' -ऐटि १.२९. ५ दृष्ट; नजर; बाहेरवसा; भूतबाधा; पायरवा; पायचळ पहा. 'करंज्यांस पायरव लागून लागलीच सरबत झालें.' -कफा ४. ६ पायगुण. 'घरांत आल्या- बरोबर लागलेंच करंजांचें सरबत झालें. काय हा पायरव !' -कफा ४. ७ पैरव पहा. [सं. पाद + रव; पाय + रव; हिं. पैरव] ॰रवा- पु. १ पायरव; शिरस्ता; पायंडा. 'त्या माणसाचा येथें येण्याचा पायरव आहे.' २ पायचळ; दृष्ट लागणें. 'विहिरीवर तुझी मूल तिनीसांजची गेली होती तेथें तिला बाहेरचा पायरवा झाला.' -वेड्यांचा बाजार. ॰रस्ता-पु. १ पायवाट. २ जमीनीवरचा रस्ता, पायमार्ग. [पाय + रस्ता] ॰रहाट-पु. (अल्पार्थी) रहाटी-स्त्री. पायानें पाणी लाटण्याचा रहाट; रहाटगाडगें. [पाय + रहाट] ॰रावणी-स्त्री. पायधरणी; विनवणी, रावण्या पहा. 'देवकी बैसविली सुखासनीं । लागल्या वाजंत्राच्या ध्वनी । विंजणें वारिती दोघीजणी । पायरावणीं पदोपदीं ।' -एरुस्व १६.३२. [पाय + रावण्या] ॰लाग-पु. १ गुरांच्या पायांस होणारा एक रोग. हा गुरांच्या तोंडावर व पायांवर परिणाम करितो. २ स्त्रियांना होणारी पिशाचबाधा. (एखाद्या स्त्रीकडून भूत पायीं तुडविलें गेल्यास तें तिला पछाडतें अशी कल्पना आहे). [पाय + लागणें] ॰वट-स्त्री. १ रहदारीचा रस्ता आहे असें दाखविणार्‍या पावलांच्या खुणा; पावलांच्या खुणा. २ पायगुण. 'नेणों कोणाचा पायवट जाहला । एक म्हणती समय पुरला । एक म्हणती होता भला । वेनराव ।' -कथा ६.५.९१. [पाय + वठणें] ॰वट-(प्र.) पायवाट पहा. ॰वट-टा-पु. (महानु.) पाय; पायाच्या शिरा; (टीप-ओहटळ पांचाहि मुख्य शिरांचा सांगातु ऋ ८८). 'समसा गुल्फाचा उंचवटा । श्रीप्रभुचिया पायवटा ।' -ऋ ८८. ॰वणी-न. चरणों- दक; चरणतीर्थ; ज्या पाण्यांत एखाद्या ब्राह्मणानें किंवा पवित्र विभूतीनें पावलें बुडविलीं आहेत किंवा धुतलीं आहेत असें पाणी. 'करितां तापसांची कडसणी । कवणु जवळां ठेविजैल शूलपाणी । तोहि अभिमानु सांडूनि पायवणी । माथां वाहे ।' -ज्ञा ९.३७२. 'कोणी राम देखिला माजा । त्याचें पायवणी मज पाजा ।' [पाय + वणी- पाणी] ॰वाट-स्त्री. १ पाऊलवाट; पायरस्ता. 'तिकडे जय; तुज देतिल मेरूचे पायवाट आजि कडे ।' -मोभीष्म ११.४५. २ जमीनीवरचा, खुष्कीचा मार्ग; भूमिमार्ग. याच्या उलट जलमार्ग. 'समुद्रावरी सैन्य ये पायवाटें ।' -लोपमुद्रा वामन-नवनीत १०८. [पाय + वाट] ३ (गो.) पालखी देवालयांत शिरण्यापूर्वीं धोब्या- कडून घालण्यांत येणारा धुतलेला पायपोस. ॰वाट करणें-उत- रून, ओलांडून जाणें. 'पायवाट केले भवाब्धी ।' -दावि ३३०. 'भवसिंधु पायवाट कराल.' -नाना १३५. ॰शिरकाव-पु. १ प्रवेश मिळवणें. २ मिळालेला प्रवेश. [पाय + शिरकाव] ॰शूर-वि. चालण्याच्या, वाटेच्या कामीं अतिशय वाकबगार; निष्णात. 'कोळी लोक कंटक व पायशूर असल्यानें त्यांना जंगलांतील वाट ना वाट माहीत असते.' -गुजा ६०. ॰सगर-पु. (खा. व.) पायवाट; पाऊलवाट; पायरस्ता. [पाय + संगर = लहान वाट] ॰सर-पु. पायरी; पाय ठेवण्याची (जिना इ॰ची) जागा, फळी. [पाय + सर = फळी] ॰सूट-वि. चपळ; चलाख; भरभर चालणारा [पाय + सुटणें] ॰सोर-पु. (गो.) पायगुण. ॰स्वार-वि. (उप.) पायीं चालणारा; पादचारी; पाईक. [पाय + स्वारी] पायाखायला-वि. (कों.) (पायांखालील) सापांची भीति, उपद्रव असलेलें (अरण्य, रस्ता). पायाखायलें-न. १ (कों.) फुरसें; साप. २ सर्पदंश. पायाखालची वाट-स्त्री. नेहमीं ज्या वाटेनें जाणें येणें आहे अशी वाट; अंगवळणी पडलेली वाट. पायाचा-वि. पायदळ (शापाई). 'पायांचे भिडतां । तोडिति जानिवसे जे ।' -शिशु १०४५. पायाचाजड-वि. १ हळुहळु चालणारा; मंदगतीनें चालणारा. २ चांगलें चालतां न येणारा. पायाचा डोळा-पु. घोटा. पायाचा नक्की कस-पु. (मल्लविद्या) एक डाव. आपला पाय जोडीदाराच्या बगलेंतून जोडीदाराच्या मानेवर घालून मान फिरवून मानेवर घातलेल्या पायाच्या पंजानें मानेस दाब देऊन मारणें, किंवा चीत करणें. [पाय + कसणें] पायाचा नरम-वि. (बायकांप्रमाणें मऊ पाय असलेला) षंढ; नपुंसक. पायांचा पारवा-पु. (पारव्याप्रमाणें गति असलेला) जलद, भरभर किंवा पुष्कळ चालणारा मनुष्य पायाचा फटकळ-वि. लाथा मार- णारें, लाथाड (जनावर) पायाचा हुलकस-पु. (मल्लविद्या) जोडादारानें खालीं येऊन आपला एक पाय धरला असतां आपला दुसरा पाय जोडीदाराच्या बगलेंतून घालून आपल्या पायाच्या पंजानें त्याच्या कोपराजवळ तट देऊन आपला दुसरा हात त्याच्या बगलेंतून देऊन जोडीदाराचा हात आपल्या पायाच्याअटीनें धरून तो पाय लांब करून हातानें काढिलेला कस जास्त जोरानें मुरगळून चीत करणें. पायाची करंगळी-स्त्री. पायाच्या बोटां- पैकीं सर्वात लहान असलेले शेवटचें बोट. पायांची माणसें- नअव. पायदळ. 'पायाच्या माणसांची सलाबत फौजेवर.' -ख ३५९४. पायाची मोळी-स्त्री. (मल्लविद्या) एक डाव. (मागें पाय बांधून गड्यास मारणें याला मोळी म्हणतात). जोडीदाराचा एक पाय उचलून आपल्या माडीच्या लवणीत दाबून ठेवावा. दुसर्‍या हातानें जोडीदाराचा दुसरा पाय धरून जोडीदाराच्या दोन्ही पायांस तिढा घालून मुरगळून मारणें. पायांचे खुबे- पुअव. पाठीच्या कण्याच्या खालच्या बाजूकडील वेडावाकडा, बळकट आणि घट्ट असा हाडाचा सांगाडा. -मराठी ६ वें पुस्तक (१८७५) २५३. पायाचें भदें-न. अनवाणी चालून पायांस खडे वगैरे बोचून पाय खरखरीत होणें; पायाची खराबी; पाय खडबडीत होणें. 'चालतांना पायांचें भदें होऊं नये म्हणून पाव लांकरिता कातड्याचें वेष्टण तयार करण्याचें काम....' -उषा- ग्रंथमालिका (हा येथें कोण उभा). पायांच्या पोळ्या-स्त्रीअव. तापलेल्या जमीनीवरून चालल्यामुळें पोळलेले पाय; पायपोळ. (क्रि॰ होणें, करून घेणें). पायांतर-न. पायरी. [पाय + अंतर] पायापुरती वहाण कापणारा-वि. कंजुष; कृपण; कवडीचुंबक; अतिशय जपून खर्च करणारा. पायां पैस-स्त्री. पायापुरती मोकळी जागा. (अगदीं गर्दी, दाटी संबंधीं वापरतांना प्रयोग). [पाय + पैस (अघळपघळ, मोकळी)] पायींचा पारवा-पु. पायांचा पारवा पहा.

दाते शब्दकोश

बुडण

स्त्री. १ बुडण्याची जागा (पाणी, काम, व्यापार इ॰ त) (शब्दशः व ल. उपयोग). २ नुकसान; तोटा (व्यापार, उद्योगधंदा इ॰ त). बुडणूक-स्त्री. बुडण्याची क्रिया; बुडलेली स्थिति. (शब्दशः व ल.) बुडणें-अक्रि. १ पाणी इ॰ द्रव पदा- र्थांत खोल जाणें; अंतर्धान पावणें. २ (ल.) (काम, उद्योग, अभ्यास इ॰ त) गढून जाणें; गर्क होणें; निमग्न होणें. 'देहीं जयांची अहंता । बुडोनि ठेली । ' -ज्ञा १५.४२६. ३ (ल) (दुःख, काळजी, चिंता, कर्ज इ॰ नें) व्याप्त होणें; जर्जर होणें; आकुल होणें. 'नता करुनि मुक्तही म्हणसि मी बुडालों रिणें ।' -केका ११. ४ (ल.) (मनुष्य, पीक, गांव, देश, व्यवहार, पैसा इ॰) नष्ट होणें; नाश पावणें; नाहींसें होणें. 'तेवीं समूळ अविद्या खाये । तें ज्ञानही जैं बुडोनि जाये । ' -ज्ञा १५.४४०. ५ निष्फळ होणें; फुकट जाणें; गमावणें; निरुपयोगी होणें. 'समयास जर तुम्ही तेथें पोंहचलां नाहीं तर तिकडील दक्षिणा बुडेल आणि घरचे कामाचा दिवसही बुडेल.' ६ (ल.) (ग्रंथ, नाणें, चाल, धर्म इ॰) बंद पडणें; प्रचारांत नसणें; अंमलांतून जाणें. ७ (दिवस) संपणें; शेव- टास जाणें. ८ (सूर्य इ॰) मावळणें. [सं. बुड् = लेपणें; प्रा. बुड्ड] म्ह॰ चढेल तो पडेल पोहेल तो बुडेल. बुडतठाव-पु. मनुष्य इ॰ बुडून जाण्याइतकी पाण्याची खोली. ह्याच्या उलट छातीठाव, कमरठाव. बुडता-वि. १ बुडणारा; उतरता; र्‍हास पावणारा. जसें बुडता पाया-काळ-व्यापार-धंदा-दौलत इ॰. २ आंत टाकलेला पदार्थ बुडेल इतकें (पाणी, तूप, तेल). [बुडणें] म्ह॰ बुडत्याचा पाय खोलांत-खोलाकडे = खालावलेल्या माणसाची प्रवृत्ति आणखी अपकर्षाकडे होत जाते. बुडता काळ-पु. नुक- सानीचा काळ; र्‍हासकाळ; संकटकाल; पडता काळ. 'बुडत्या काळीं हात देणारे थोडेच.' -विवि ९.८.७१.. बुडता पाया-पु. उतरत्या कळेचा, र्‍हासाचा आरंभ. (क्रि॰ लागणें; होणें). बुडचा-ला- वि. तळचा; बुडाकडील. बुडालेल्या घरचा मोड-पु. कुटुंबां- तील सर्व माणसें मरून जाऊन शिल्लक राहिलेला एकच मनुष्य.

दाते शब्दकोश

फंद

पु. १ कट; बेत; बंड; कारस्थान (बहुधा वाईट गोष्टींचें, सरकार इ॰ च्या विरुद्ध). (क्रि॰ रचणें; करणें; योजणें). 'वादभेद निंदा हे फंद काळाचें । गोवितील वाचे रिकामिकें ।' -तुगा ३५७. 'फसाद लांबविणें मुनासब नाहीं ज्या प्रकारें फंद मोडेल तें करावें.' -रा ५.१७७. २ दुर्गुण; व्यसन; वाईट संवय; ढंग (द्यूत, जुगार, सुरापान, परस्त्रीगमन इ॰). ३ छंद; नाद; खोड. 'दे टाकुनि हे छंद वावुगे फंद विषयाची काय मजा ।' -अफला ६१. ४ प्रेमसंबंध; प्रेमविलास; चोरून परस्त्रीशीं संबंध ठेवणें. 'वाटतो तुशी करावा फन्द । गडे हा पूर्वीचा ऋणानुबन्ध ।' -पला ३२. ५ धुंदी; उन्माद. 'यशाच्या फंदात निमग्न झाले होते. तों गर्वाचें घर खालीं.' -भाब ८२. ६ कौटिल्य; फसवणूक. ७ थट्टा; कुचेष्टा. -शर [फा. फन्द] ॰छंद-पुअव. छक्केपंजें; फसवणूक; ठकबाजी. (प्र.) छंदफंद पहा. ॰फरेब-पु. कौटिल्य; लबाडीचे डावपेंच. 'ब-फजल-इलाहि आँमेहेर्बां दूरंदेश व कुलाह्पोश याचे फंदफरेबास खूब वाकीफ.' -पया ४६३. [फा. फन्द + फरेब] ॰फरेबी-वि. कुटिल; धूर्त; लबाड. ॰फितुरी-फितूर-स्त्रीपु. १ (व्यापक) कट; फितूरी; बंडखोरपणा; दगलबाजी; स्वामिद्रोहाचें कारस्थान; दगा इ॰ २ बंडाळी; क्रांति. ॰फुरई-स्त्री. १ (सामा.) बंडावा; दगलबाजींचीं, स्वामिद्रोहाचीं कृत्यें. २ बंडखोरीबद्दल दंड. [फंद द्वि.] फंदी-वि. १ वाईट नाद असलेला; छंदी; व्यसनी (माणूस). दगलबाज; फंदफितूर करणारा. 'दोघेहि फन्दी व मकरी. त्यांची उपेक्षा करणें सलाह दौलत नाहीं' -रा १९.१००. ३ विलासी; षोकी; चैनी. ४ (व.) लुच्चा. [फंद] ॰छंदी-वि. (प्र.) छंदी- फंदी; दुष्ट कारस्थानें रचण्याकडें प्रवृत्ति असलेला; कुलंगडीं करणारा. ॰फांकडा-वि. छानछोक; नखरेबाज; चैनी; विलासी. [छंद]

दाते शब्दकोश

दान

न. १ देणें; देण्याची क्रिया; धर्मादाय; बक्षीस, देणगी देणें. (समासांत) 'विद्यादान-धनदान-कन्यादान इ॰ २ (कायदा). कांहीं मोबदला न घेतां एखाद्यानें दुसर्‍यास आपली स्थावर किंवा जंगम जिनगी, मिळकत फुकट, धर्मार्थ देऊन टाकण्याचा व्यवहार. -घका ३६. ३ (सामा.) स्वतःच्या मालकीची वस्तु दुसर्‍यास निरपेक्ष बुद्धीनें देणें; देणगी; बक्षीस; धर्मदाय. ४ (सोंगट्यांच्या खेळांत) फासे घरंगळते जमीनीवर टाकून ते स्थिर झाल्यावर त्यांच्या वरील पृष्ठभागांवर दिसणार्‍या ठिपक- क्यांची संख्या; डाव. जसेः-पवबारा तेरा, छ तीन नऊ, दस दोन बारा इ॰ (क्रि॰ पडणें; देणें). ५ माजलेल्या हत्तीच्या गंड- स्थळांतून वाहणारा मद. [सं.] म्ह॰ (गो.) दानावर दक्षिणा = दक्षिणेवांचून दानाची सांगता होत नसते त्यावरून मोठ्या नुकसानीच्या भरीस आणखी थोडेसें नुकसान झाल्यास ही म्हण योजतात. सामाशब्द- ॰धर्म-पु. (व्यापक). पुण्य- प्राप्त्यर्थ केलेले दान; ब्राह्यणभोजन, विहिर खणणें, धर्मशाळा, देवळें बांधणें इ॰ परोपकाराचीं धार्मिक कृत्यें; परोपकारार्थ केलेला द्रव्यव्यय; दान देण्याचें धर्मकृत्य. [दान + धर्म] ॰पत्र-न. देणगीपत्र; देणगीखत; जमीन इ॰ कांचें दान केलें असतां तें चालावें म्हणून दाखल्यासाठीं करून दिलेलें पत्र, सनद. 'दानपत्र धरिलें महानुभावें ।' -दावि ४२७. [दान + पत्र = कागद] ॰पात्र-वि. विद्या, तप इ॰ गुणांमुळें दान देण्यास योग्य अस- लेला (ब्राह्यण, मनुष्य). [दान + सं. पात्र = भांडें; (ल.) योग्य स्थान] ॰प्रतिभू-पु. (कायदा) विकलेल्या मालाबद्दल, कर्जाऊ- उसनवार दिलेल्या पैशाबद्दल ठेवावयाचा जामीन; मालजामीन पहा. [दान + प्रतिभू = जामीन] ॰विधि-पु. १ दान करण्याचा, देण्याचा विधि. २ कर्ज द्यावें कीं देऊं नये यासंबंधीं विचार. 'दानविधि व अदानविधि हे दोन प्रकार धनकोसबंधीं होत.' -ज्ञाको (क) १११. [दान + विधि] ॰वीर-वि. सढळ हातान दान करणारा; दान देण्यांत उत्साही; कर्णासारखा उदार. [दान + वीर] ॰शील-वि. दानधर्माकडे मनाचा कल, प्रवृत्ति असलेला. [दान + शील = स्वभाव] ॰शूर-वि. दान देण्यांत शूर, उत्साही; दानवीर. दानाध्यक्ष-पु. दानधर्मखात्यावरील मुख्य अंमलदार. [दान + अध्यक्ष]

दाते शब्दकोश

नाद

पु. १ आवाज; ध्वनि; शब्द (मुख्यत्वें पुष्कळ वेळ टिकणारा). 'ते दोन्ही नाद भिनले । तेथ त्रैलोक्य बधिरभूत जाहलें ।' -ज्ञा १.१२८. २ (ल.) शोक; छंद; वेड; ध्यास. 'अजुन खुळा हा नाद पुरेसा कैसा होइना ।' शारदा १.१. ३ मध्यमा नावांची वाचा. -अमृ ५.६३. -ज्ञा ६.२७६. ४ श्रवणसुख. [सं. नद् = वाजणें] नादांत असणें, नादी लागणें-भरणें, पडणें, लावणें-एखाद्याच्या विशेष छंदीं लागणें; लगामीं असणें; आशा लावून ठेवणें; कामांत गर्क होणें; गुंतविणें. 'मी गेलों तेव्हां तो लिहिण्याच्या नादांत होता.' 'हा गृहस्थ त्या रांडेच्या नादीं लागला.' ॰जाणें- १ (भांडें वगैरेस तड पडली असतां) आवाज बद्द होणें. २ पत, नांव जाणें; प्रसिद्ध झाल्यामुळें गुप्त गोष्टीचें महत्त्व कमी होणें. ॰तुटणें-वरील प्रकारच्या नादांतून सुटणें, मुक्त होणें. ॰दवडणें, घालविणें-पत, अब्रू, नांव घालविणें; ॰लावणें-छंद, वेड लावणें; अशा लावणें; कच्छपीं, भजनी लावणें; नांदीं लावणें; 'त्यानें देतों असा नाद लाविला आहे.' नादानें नाद-भांडणापासून भांडण. (क्रि॰ होणें; चालणें; वाढणें; लागणें). ॰खार-वि. १ नादिष्ट; छंद घेतलेला; भजनीं लागलेला; एखाद्या गोष्टीचा हव्यास वेतलेला; एकदां ज्या नादास लागला त्याच नादानें चालणारा. २ दुसर्‍यास आशा दाखवून आपल्या भजनीं लावणारा; कह्यांत ठेवणारा. ॰बिन्दुस्थान, नादस्थान, नादबिंद- न. १ ताळू. 'प्रथम नादबिंद मिळवणी होता एकांतर ।' - भज ५६. २ शरीरांतील निरनिराळ्या ठिकाणाहून नाद उत्पन्न होतो असें ठिकाण. अशीं स्थानें तीन आहेत तीः- ह्र्दय, कंठ व शीर्ष. ॰ब्रह्म- न. १ नादरूपानें अवतरलेलें ब्रम्ह; सुस्वर गायन. २ भजनांतील वाद्यांचा मोठा आवाज; दुमदुमाट. 'टाळ वीणा मृदंगघोष । नाद- ब्रह्माची आली मूस ।' ३ वरील वाद्यांच्या घोषामुळें वाटणारा आनंद व त्याचें दिग्दर्शन. 'तंतवितंत घन सुस्वर । ऐसें नादब्रह्म परिकर ।' ॰लुब्ध-वि. १ नाद श्रवणामुळें मोहित झालेला; सुस्वरानें गुंग झालेला. २ गायनानें लवकर मोहित होणारा. नादाची जाति-स्त्री. (संगीत) ज्या योगानें एका नादापासून दुसरा नाद वेगळा करतां येतो अशा प्रकारचा प्रत्येक नादाच्या अंगांतील गुण. ॰वाद-पु. १ भांडणाचा; फाजील व्यर्थ असा मांडलेला वाद; गलका; भाषण इ॰. (क्रि॰ करणें; लावणें; लागणें; तुटणें). २ शोक; छंद; दुरासक्ति; वायफळ प्रवृत्ति. नादा वादांत पडणें-क्षुल्लक लोभांत गुंतणें; नादीं लागणें, भरणें पहा. नादावणें-अक्रि. १ (फुटक्या भांड्याचा) बद्द आवाज होणें; फुटका नाद येणें. २ (ल.) (भांड्यास) ऐब, दोष असणें; फुटकें, व्यंगयुक्त असणें. ३ बाहेर फुटणें; बोभाटा होणें; स्फोट होणें. ४ आसक्त होणें; नादीं, मागें लागणें. ५ नांवाचा बोभाटा, दुष्कीर्ति होणें (व्यभिचार, व्यसन इ॰मुळें); लोकांच्या चर्चेचा विषय होणें. ६ एखाद्याच्या वर्तनामुळें कांहीं नुकसान, तोटा झाला असा समज करून घेऊन त्या माणसासंबंधीं उपरोधिकपणानें रागानें हा शब्द योजतात. नांव गाजविणें, काढणें. उदा॰ 'गाई हात- पान्ह्यास लाविली होती पण मूर्ख नादावला म्हणून दूध देईनासी झाली.' -सक्रि. वाजविणें, नाद करणें (भांडें इ॰चा). नादसळु- पु. वैखरी; आदिवाणि, वाचा. -मनको. नादाळ-ळ्या, नादिष्ट, नादी-नाद्या-वि. १ छांदिष्ट; ध्यास घेणारा; हट्टी. २ नाद- खोर; भजनीं, नादीं लागलेला. नादाळ-वि. मोठा आवाज अस- लेलें (वाद्य इ॰). 'वाजती नादाळ भेरी ।' -वसा ४८. नादाळी-स्त्री. १ अपकीर्ति; बभ्रा; दुष्कीर्ति. २ आळ; आरोप; कुभांड; बालंट (क्रि॰ करणें, घेणें). ३ प्रचंड नाद; गर्जना. [नाद + आळी] नादित-वि. वाजणारें; वाजविलेलें; दुमदुमित; ध्वनित. [नाद] नादेश्वर-पु नादब्रह्म पहा. 'गातां तूं ओंकांर टाळी नादेश्वर ।' -तुगा ३७७९.

दाते शब्दकोश

दिक्, दिग्

स्त्री. १ दिशा. २ मर्यादा. ३ दहा संख्येचा वाचक शब्द. (समासांत) दिक्पाल; दिग्भेद; दिक्साधन. [सं.] ॰अंत-पु. १ (दिगंत) दृश्य क्षितिज. २ पृथ्वीचा शेवट; तिचा सीमांतप्रदेश; अंतिम टोंक. दिगंतीं जाणें-सर्व पृथ्वीवर पसरणें; चोहोंकडे फैलावणें (कीर्ति, सुवास, इ॰). 'या राजाची कीर्ति दिगंती गेली.' ॰अंतर-न (दिगंतर) लांबचा, परका देश- दिशा; दूरदेश. 'दिगंतरावरून माल आला. अंतरी-क्रिवि. पृथ्वीच्या अगदीं शेवटाच्या सीमेपर्यंत; दिगंतीं [कीर्तिं इ॰ पस- रणें) (येथें अंतर हा शब्द अंत याअर्थीं चुकीनें योजिला आहे). ॰अंबर-वि. (दिगंबर) १ दिशा हेंच वस्त्र नेसलेला-म्हणजे नागवा; नग्न. २ महादेव. ३ दत्त्तात्रेय. ४ परमहंस संन्यासी. ५ या नांवाचा जैन धर्मांतील एक पंथ. ॰अंश-न. (दिगंश) सूर्य तारे किंवा इतर ग्रह हे क्षितिजाच्या ज्या बिंदूंत उगवतात किंवा मावळतात तो बिंदु आणि क्षितिजावरील पूर्व किंवा पश्चिम बिंदु यांमध्यें जो कंस होतो तो. (इं.) को-अ/?/झीमथ. ॰कंठ-पु. (दहा दिशांवरून, दहा तोंडांचा) रावण. ॰गज-पु. )दिग्गज) १ पृथ्वीच्या अष्ट दिशांस असणारा व तीस आपल्या डोक्यावर उच- लून धरणारा एकएक हत्ती. ऐरावत, पुंडरीक वामन, कुमुद, अंजन, पुष्पदंत सार्वभौम, प्रतीक अशीं त्यांचीं नांवें आहे. 'पृथ्वी डळ- मळील म्हणौनि । दिग्गज ठेविले दडपण ।" -स्वादि १३.४.२५. २ (ल.) सुंदर व धिप्पाड माणूस. ३ जाडा पंडित; बडाविद्वान्. ४ (थट्टेनें) अवाढव्य, राक्षसी, दांडगा माणूस. ॰चक्र-न. सर्व जग; अखिल विश्व. 'दिग्चक्रीं तेज न माये ।' ॰दर्शन- प्रदर्शन-न. १ किंचित् निर्देश; सूचना; दर्शन; दिशा दाखविणें. २ स्वरूप, पद्धति इ॰ ची स्थूल कल्पना आणून देणें; सामान्य माहिती. ॰दाह-पु. क्षितिजावरील तांबडेपणा, तांबडा प्रकाश. ॰पाल-पु. दिशेचा स्वामी. हे दहा दिशांचे दहा आहेत-इंद्र, अग्नि, यम, निॠ/?/ति, वरुण, वायु, सोम, ईशान, अनंत व ब्रह्मा. ॰बंधन- न. १ (जादु) एक नजरबंदीचा प्रकार. दिशा भारण्याचा जादूगार करीत असलेला देखावा. २ (तंत्रशास्त्र) संध्या, जप इ॰ कर्मांत कराव- याचा एक विधि. ॰भ्रम-भ्रमण-पुन. पृथ्वीवर कोठेंहि भटकणें; दिशोदिशीं फिरणें; दिशाभूल. ॰भ्रांत-वि. हरवलेला; दिशा चुक- लेला; अज्ञात प्रदेशांत फिरणारा. ॰मंडल-न. दिशाचक. ॰लव-पु. दिगंश पहा. ॰विजय-पु. १ दशदिशा, सर्व जग जिंकणें (सैन्य- बलानें किंवा विद्येनें). २ (उप.) अशिष्ट, बेताल कृत्य; वेडेपणाची आडदांडपणाची प्रवृत्ति; आक्रसताळा; दंगा; बंड. 'त्या पोरानें दिग्विजय मांडला.' ॰विजयी-वि. पृथ्वी जिंकणारा; जगज्जेता; बलाढ्य वीर. २ (उप.) व्यसनी; बदफैली; दुराचारी; अर्वाच्य. ॰व्यापी-वि. सर्वव्यापी; सर्वप्रसिद्ध; जागतिक.

दाते शब्दकोश

मांड

पु. १ रचणें; व्यवस्थित ठेवणें (काम, कारखाना यांकरितां-हत्यारें, उपकरणें, साहित्य इ॰). २ केलेली रचना; मांडणी. (क्रि॰ मांडणें). ३ देखावा; व्यवस्था. 'दावूनिया मांड । पुरे न करीती भांड !' -तुगा ३११५. ४ विस्तार; पसारा. ५ वैभव. 'काळीं संहारीना मांड त्याचा सारा मी हरी ।' -मोरा मायणें १.२५२. ६ (गो.) दुकान. ७ (कों. राजा. कु.) पिशा- चादिकांस बलि देण्याचे वेळीं भगतानें देव-देवतांची स्थापना करण्याचा विधि. (क्रि॰ भरणें). ८ होळीच्या सणामध्यें ग्राम- देवतेस कौल लावणें. ८ ठेवलेलेपणा; मांडलेलेपणा; स्थिरा- वलेली स्थिति. (मांडणें या क्रियापदासह उपयोग करतात). ९ (संगीत) एक राग. ह्यांत षड्ज, तीव्र ऋषभ, तीव्र गांधार, कोमल मध्यम, पंचम, तीव्र धैवत, तीव्र निषाद हे स्वर लाग- तात. जाति संपूर्ण-संपूर्ण. वादी षड्ज, संवादी पंचम, गानसमय सार्वकालिक. १० (कों.) झोडलेल्या भाताची रास. [मांडणें] ॰काडप-(गो.) दुकान उघडणें. ॰घालप-(गो.) दुकान स्थापन करणें. मांडणावळ-स्त्री. १ मांडणें, व्यवस्थित ठेवणें याबद्दल द्याव- याचें मोल, किंमत. २ मांडणी; मांडणूक. मांडणी-मांडणूक- स्त्री. १ मांडणें; मोकळेपणीं व व्यवस्थित रीतीनें पसरणें; थाटणें; लावणें; रचणें. 'जमीनीवर प्रथम टाहाळाची मांडणी करावी मग वर गवत घालावें.' २ व्यवस्थित रचना. 'तदन्याय वृक्षपाषाणीं । आणिली ज्यानें गंधर्वमांडणी ।' -नव १९.४८. ३ सागाडा; नुसती बांधणी; बंदिस्ती (इमारतीची). मांडणें-सक्रि. १ मोकळेपणीं व व्यवस्थितपणें पसरणें, ठेवणें, रचणें (काम, धंदा यांकरितां-साहित्य, सामान, जरूरीच्या गोष्टी). २ स्थापन करणें; उघडणें (दुकान, व्यापार). ३ लिहिणें; वहींत दाखल करणें (खर्चाच्या बाबी, टांचण). ४ तयार केलेल्या चिखलांत रोपापाठीमागून रोप याप्रमाणें लावणें; आवटणें (नाचणी, वरी इ॰चीं रोपें-आटवणी करतांना). ५ प्रतिपादणें. 'मना सर्वथा मिथ्य मांडूं नकोरे ।' -राम १९. ६ व्यापणें. 'जी भूतीं भूतळ मांडिलें ।' -ज्ञा ११.२८६. ७ पाळणें. 'देह सांडावा ना मांडावा ।' -एभा २०.१४९. ८ प्रव- र्तंणें; चालविणें; दाखविणें; प्रदर्शित करणें इ॰. 'कज्जा मांडला, सोदेगिरी, मांडली, फजिती मांडली.' ९ कडाक्यानें व यथेच्छ चालू करणें. 'त्यानें गालीप्रदान मांडलें-लत्ताप्रहार मांडला-ढंग मांडेल-चेष्टा मांडल्या.' -अक्रि. १ इच्छेप्रमाणें. वागण्यास संधि मिळणें: फावणें. 'अंधारी रात्र आली म्हणजे चोरांचा मांडतें.' २ बनणें; तयार होणें; निघणें. 'बाजरीच्या कणसांत अझून दाणा मांडला नाहीं.' ३ आरंभ होणें. 'जैसा प्रळयकाळ मांडला ।' -ज्ञा १.१५८. [सं. मंड् = शोभविणें] मांडपूस-स्त्री. मांडणें, नोंद करणें व पुसणें; लिहिणें व तपासणें. 'प्रत्येक वसुलाची लेखी पावती दप्तरांत मांडपूस होत आहे.' -के २०.५.३६. मांडली- स्त्री. मंडण, रचना. 'म्हणौनि निवृत्तीचि मांडली । सूनि प्रवृत्ति- तळीं ।' -ज्ञा १८.७०४.

दाते शब्दकोश

स्व

सना. आपलें आत्मविशिष्ट. -नपु. स्वतः; स्वात्मा; आपण. -न. स्वतःची मालकी; मिळकत. -स्त्री. (बीजगणीत) अधिक रक्कम. -वि. आपलें; स्वतःचें. [सं.] स्वकपोल कल्पित- वि. (चुकीचा प्रयोग) मूलभूत प्रमाण नसतां स्वतःच्या कल्पनेनें रचलेलें; डोक्यांतून काढलेलें. ॰कर्म-न. स्वजातीचें नियुक्त काम, उद्योग, कर्तव्य; स्वतःचें काम. ॰कष्टसंपादित-कष्टार्जित-वि. स्वतःच्या श्रमानें मिळविलेलें. ॰कार्य-न. स्वकर्म पहा. ॰कीय-वि. स्वतःचें; स्वतःच्या मालकीचें; कुटुंबांतील; घराण्याचें. ॰गत-वि. स्वतःचें, स्वतःशीं (बोलणें इ॰). याचे प्रकारः-(अ) रंगभूमी. वर एकट्याच पात्रानें केलेलें भाषाण. (आ) रंगभूमीवर दुसर्‍या पात्राशीं संवाद चालू असतां त्यास ऐकू न जातां प्रेक्षकांना ऐकूं जाईल असें केलेलें भाषण. (इ) रंगभूमीवर अनेकांशी संवाद चालू असतां मध्येंच कांहीं मजकूर फक्त एकाच व्यक्तीस ऐकूं जाईल असा बोलणें इ॰ -वा. म. जोशीकृत. सोयरीक पुस्तकाची प्रस्तावना पृ. ७. ॰गोत्री-वि. स्वतःच्या गोत्रांतील, कुळांतील; आप्तसंबंधीं. ॰च्छंद-पु. स्वतःची इच्छा, हट्ट, हुक्की, लहर. या शब्दापूर्वीं 'आपला' हा शब्द वापरण्याची एक रीत आहे. 'हा आतां आपल्याचा स्वछंदानें वागूं लागला.' -वि. स्वच्छंदी; हट्टी; लहरी; नादिष्ट; स्वेच्छाचारी; स्वतंत्र. ॰जन-नी-पु. स्त्री. स्वतःच्या घराण्यांतील, जातींतील इसम; आप्त; सखा. ॰जात- ति-स्त्री. स्वतःची जात, कुळी. ॰ज्योति-वि. स्वयंप्रकाशित. ॰तंत्र-वि. १ निरावलंबी; अनियंत्रित; मोकळें; स्वैर; स्वतःच्या इच्छेप्रमाणें चालणारा (यावरून पूर्ण वाढीचा). २ (निंदार्थीं) हट्टी; लहरी; स्वेच्छाचारी; मोकाट; नाठाळ. ३ वेगळा; निराळा; बाजूचा. ॰तंत्रता, स्वातंत्र्य-स्त्रीन. स्वाधीनता; मुख्यत्यारी; स्वच्छंदीपणा; निरावलंबीता; स्वैरवृत्ति; अडदांडपणा; अवखळ- पणा. स्वतः-क्रिवि. आपण होऊन; आपणामुळें-पासून-कडून; स्वभावतः; आपोआप; जातीनें; व्यक्तिशः, स्वतः प्रमाण-वि. प्रमाणसाठीं स्वतःखेरीज इतरांची गरज नसलेला; स्वयंसिद्ध (वेद इ॰). स्वतः सिद्ध-वि. १ स्वतः होऊन साध्य झालेलें, तयार झालेलें, उत्पन्न झालें; स्वयंभू (ब्रह्म इ॰). २ स्वयंप्रमाण; स्वयं- सिद्ध. स्वतां-तें-क्रिवि. स्वतः पहा. स्वतां-पु. नवरा (बायकी शब्द). स्वत्व-न. मालकी; धनीपणा; मालकी हक्क; आपले पणाचा धर्म. स्वत्व निवृत्ति, स्वत्वाभाव-स्त्रीपु. आपली मालकी दुसर्‍यास प्राप्त करून देणें; आपला हक्क सोडणें. स्वत्व- बोधन-न. मालकी हक्क प्रस्थापित करणें. स्वत्वहानि-स्त्री. हक्क, पदवी धन, यांचा नाश. स्वोत्पत्ति-स्त्री. मालकी हक्काचें मूळ. स्वदस्तूर-न. १ स्वतःची सही; स्वाक्षरी. २ (कागद, खत इ॰) स्वतःच्या हातानें लिहिणें; स्वतः लिहिलेला मजकूर. स्वदेश-पु. स्वतः राहतो तो देश; मायभूमि; मूळ गांव, जागा स्वदेशपरिधि-पु. पृथ्वीगोलावरील स्थानिक अक्षांशाचें वर्तुळ स्वदेशी-वि. स्वदेशांत उत्पन्न झालेली. (वस्तू). स्वदेशी चळवळ-वि. स्वदेशी माल वापरण्यासंबंधीं लोकांस उपदेश करण्याची क्रिया, प्रचार. स्वधर्म-पु. १ स्वतःचा वर्णाश्रमधर्न कर्तव्य, धंदा. २ पदार्थाचा गुण; नैसर्गिक प्रवृत्ति-स्वभाव इ॰ स्वपरभाव-भेद-पु. आपपर भाव, हें आपलें व हें दुसर्‍याचें हा भेद करण्याची प्रवृत्ती. ॰प्रकाश पु. ब्रह्म -वि. स्वतःच प्रकाशमान होणारा; स्वयंस्फूर्तीनें शिकलेला; स्वप्रभ. स्वभाग- पु. १ आपला वांटा. २ आपलें नशीब. ॰योनि-वि. आईच्या बाजूनें संबंध असलेला. स्वरस-पु. १ अंगरस; पाणी मिसळल्या- खेरीज काढलेला फळांतील रस; नारळांतील पाणी किंवा त्याचें दूध. २ (ल.) भाषण, काव्य इ॰ ची गोडी, माधुर्य. ॰राज्य-न. १ स्वतःचें राज्य; स्वतंत्र राज्य. २ स्वराज्यांतील चौथाईचा कर; गोदा. वरीपासून कृष्णेपर्यंतचा प्रदेश. ३ हिंदुपतपातशाही. ४ लोकांच्या हितासाठीं, लोकनियुक्त अधिकार्‍यांनीं लोकमतास अनुसरून चाल- विलेली राज्यपद्धति. ५ (वेदांत) ब्रह्मैक्य. 'ऐसेनि ब्रह्मैक्या सारिखें । स्वराज्य येतां जवळिकें ।' -ज्ञा १८.१०७२. ॰रुचि- वि. स्वतःच्या आवडीनिवडीप्रमाणें वागणारा; कलाप्रमाणें चाल णारा. ॰वश-वि. स्वतंत्र. मोकळें; स्वैर. ॰वृत्ति-स्त्री. आपला उद्योग, धंदा. २ आपली उपजिविका. ॰संतोषें-षानें- क्रिवि. राजीखुशीनें; बळजबरीनें नव्हे असें (लिहिणें, करणें इ॰) ॰सत्ता-स्त्री. आपला हक्क. ॰सत्ताक-त्मक-वि आपला हक्क असलेलें. ॰संपादित-वि. आपण मिळविलेलें स्वसंपादित मिळकत-स्त्री. जी मालमत्ता वडिलार्जित नसून, वडिलार्जित मालमत्तेची विशेष किंवा मुळींच मदत न घेतां मिळविली ती. ॰संवेद्य-वि. आपण होऊन जाणलें जाणारें; ज्ञानरूप. ॰साक्ष-क्रिवि. समक्ष; डोळ्यासमोर; एकाद्याच्या साक्षीनें. ॰स्त्री-स्त्री. आपली पत्नी, भार्या. ॰स्थान-न. आपली जागा, राज्य. ॰हस्त-पु. स्वतःची सही. ॰हित-न. आपला लाभ, फायदा, नफा.

दाते शब्दकोश

लोक

पु. १ जन; मनुष्य; मानवजात; जनता; समाज. 'तूं मात्र शहाणा, लोक काय वेडे आहेत?' (सामा.) लोक- मर्यादा-रीति-लज्जा इ॰ (बहुधां अनेकवचनी प्रयोग). २ वर्ग; विशिष्ट समाज, संघ; जाता; (या अर्थीं पूर्वशब्दाशीं समास होऊन उपयोग.) उदा॰ ब्राह्मणलोक, शू्द्रलोक, गवईलोक, शिपाईलोक, देवलोक, पिशाचलोक इ॰ ३ राष्ट्र; देश; राज्य; प्रांत. 'प्रौढ होतां संपूर्ण लोक आले खरेच उदयाला ।' -ऐपो ३०४. -एभा १०. ६०४. ४ राजे, सरदार इ॰ कांजवळ किल्ला, शहर इ॰कांचें रक्षण करण्याकरतां ठेवलेलीं माणसें; सैन्य; संत्री; शिपाईनोकर. ५ भुवन; जग; मानवजात; समूह. 'देहक्रिया आवघी । न करविता होय बरवी । जैसा न चलतेनि रवी । लोकु चाले ।' -ज्ञा ८.१८७. ६ परका माणूस; तिऱ्हाईत इसम; अनोळखी मनुष्य. 'आज आपल्याकडे लोक आले आहेत.' ७ मनुष्य; इसम; माणूस. 'जो दाखवील मजला कृष्णार्जुन तो न लोक सामान्य ।' -मोकर्ण २६. १८. ८ जगाचे, विश्वाचे भाग. प्रामुख्यानें तीन लोक आहेत. स्वर्गलोक, मर्त्य किंवा मृत्युलोक, आणि पाताळलोक. पुढील सप्त- लोकहि मानण्यांत येतात. भूलोक, भुवर्लोक, स्वर्लोक, महर्लोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक. ह्यांशिवाय प्रत्येक देवतेचा एकेक लोक कल्पिलेला आहे. उदा॰ इंद्रलोक, चंद्रलोक, ब्रह्मलोक, विष्णु- लोक इ॰ 'जैं लोकांचीये व्यवस्था न पडे । जैं या त्रिभुवनाचें कांहीं न मांडे ।' -ज्ञा १०.९५. ९ सद्गति; स्वर्गलोक; मरणोत्तर चांगली अवस्था. 'मनुवंशीं जन्मुनियां जालों अनपत्य मीं न लोक मला ।' -मोमंत्ररामायण बालकांड २०. १० प्रदेश; ठिकाण. 'अवधड स्थळीं कठीण लोक । तेथें राहणें नेमक ।' -दा १५.२. २४. [सं.] म्ह॰ १ लोकां सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण = लोकांना उपदेश करावयाचा व स्वतः मात्र त्याप्रमाणें वागा- वयांचे नाहीं. २ लोक आणि ओक. = लोकमत हें अतिशय वाईट, तिरस्करणीय, ओकारीप्रमाणें त्याज्य असें जाहे, या अर्थी उपयोग. लोकांचीं घरें (किंवा दारें) पुजणें-सारखें लोकांच्या घरीं जाणें; या घरांतून त्या घरांत असें नेहमीं लोकाकडे जाणें. सामाशब्द- ॰कथा-स्त्री. १ दंतकथा; लोकांत प्रचलित अस- लेली परंतु ऐतिहासिक आधार नसलेली गोष्ट; कल्पित गोष्ट; परंपरागत गोष्ट. २ एक प्रकारचें वाङ्मय. प्राचीन काळापासून लोकांच्या तोंडीं असलेल्या गोष्टी, कहाण्या; लौकिक सारस्वत. (इं) फोकलोअर. ॰गंगा-स्त्री. समाज; लोकसमुदाय. 'जात- गंगेला व लोकगंगेला भ्यालें पाहिजे.' -भाऊ १९. ॰गान-न. ज्ञानपदगीत; खेडवळ लोकांचें गाणें. ॰ग्रह-पु. लोकमत; लोकांची एखाद्या गोष्टीविषयींची समजूत, कल्पना. ॰चर्चा-स्त्री. जनते- मधील चर्चा; गप्पा; लोकांत चर्चिली किंवा बोलली जाणारी गोष्ट. ॰जवाई-पु. (ना.) जांवई. -शर. ॰तंत्र-न. लोकमत; जनतेचा कल; प्रजेचें म्हणणें, प्रवृत्ति. 'सरकारनें लोकतंत्रानेंच राज्यकार- भार हांकावा.' -केसरी २.१२.३०. -वि. लोकनुवर्ती; लोकांना जबाबदार. 'सरकार हें अधिक लोकतंत्र झालें पाहिजें.' -केले १.६४. ॰त्रय-न. तीन लोक; स्वर्ग, मृत्यु व पाताळ. ॰धार- जिणा-वि. १ लोकमताला मानून वागणारा (परंतु स्वतःच्या किंवा धन्याच्या हिताबद्दल निष्काळजी); स्वतःच्यापेक्षां, स्वकी- यांच्यापेक्षां लोकांच्या हिताला जपणारा. २ लोकांची काळजी करणारा; लोकाभिमुख. ॰नाथ-पु. १ एक औषधी रसायन. २ राजा; देव. 'लोकनाथ, जगन्नाथा. प्राणनाथा पुरातना ।' -मारुतिस्तोत्र. ॰नायक-पु. लोकांचा पुढारी. 'लोकनायकाचें कर्तव्य फारच खडतर आहे.' -टि १.४६७. ॰नियुक्त-वि. लोकांनीं नेमलेला, निवडलेला. ॰नीति-स्त्री. लोकरीत; वागण्याची सामान्य पद्धत; समाजास मान्य गोष्ट; प्रघात; चालरीत. ॰नुत-वि. लोकांकडून प्रशंसा केला गेलेला; लोकांनीं स्तविलेला. ॰परी-स्त्री. लोकरीत. 'लोकपरीनें वर्तती जनीं ।' -दावि २६६. ॰पक्ष-पु. लोकांची बाजू; प्रजापक्ष. याच्याविरुद्ध राजपक्ष, सर- कारपक्ष. 'फेरोजशहांनीं आणीबाणीच्या प्रसंगीं लोकपक्ष संभा- ळला.' -टि १.४२२. ॰पाल-ळ-पु. १ राजा; प्रजेचा पालन कर्ता; नृप. 'म्हणवितां स्वतां लोकपाळा !' -विक ४०. २ इंद्र, यम इत्यादि लोकाचा स्वामी; अष्टदिक्पाल पहा. 'इहीं लोकपाळ केले । लोकपाळीं विविध, लोक स्त्रजिले ।' -ज्ञा १०.१०२; -एभा १०.६०३. ॰प्रवाद-पु. बातमी; लोक- वार्ता; वदंता; किंवदंती; जनप्रवाद (सामान्यत: वाईट अर्थानें). 'लोकप्रवाद कायकाय कंड्या पिकवील तें सांगतां येत नाहीं.' -नि ४३४. ॰प्रवाह-पु. सर्वसाधारण चालरीत, वागणूक; लोक- रीत. ॰प्रशस्त-वि. लोकसंमत; लोकमान्य; रुढीला धरुन. अस- लेला. ॰प्रसिद्ध-वि. १ सर्वप्रसिद्ध; लोकांमध्यें अतिशय माहित असलेला; लोकांमध्यें प्रचलित. २ सर्वसाधारण; सामान्य. ॰प्राणेश-पु. (लोकांच्या प्राणांचा भालक, धनि.) वायु; हवा. ॰बंधु-पु. १ लोकांचा भाऊ; लोकहितकर्ता. 'लोकबंधू जो होय रवी ऐसा ।' -नल. २ सूर्य. ॰बाह्य-वि. १ (लोकांच्या सामान्य वागणुकीहून किंवा समजुतीहून निराळा) विचित्र; विलक्षण; चम- त्कारिक. २ लोकांना प्रिय नसणारें; लोकविरुद्ध. ॰बोली-स्त्री. लोकांचें बोलणें; लौकिक बोली. 'गुणा निर्गुणा आणिलें लोक- बोलीं ।' -दावि २६६. ॰भय-भीति-नस्त्री. जनतेची भीति; लोकप्रवादाची भीति; जनलज्जा. ॰भांड-वि. भांडखोर; बडबड्या. -तुगा. ॰भाषा-स्त्री. १ सामान्य जनतेची भाषा, बोली. २ बोलण्यांतील भाषा; वाक्प्रचार. ३ अडाणी भाषाप्रयोग; असं- स्कृत बोली. ॰मत-न. सामान्य जनसमूहाचा अभिप्राय; लोकांचें म्हणणें; त्यांचे विचार. 'ज्या वसाहतींत लोकमतदर्शक कायदे- मंडळें आहेत त्यांस या कायद्यानें आपल्या शासनपद्धर्तीत फेर- फार करवून घेण्याचे अधिकार देतांना हा निर्बंध घालून ठेवला.' -वस्व १३६. ॰मतानुवर्ती-वि. लोकांच्या मताप्रमाणें असलेला; लोकतंत्राप्रमाणें चालणारा. [लोक + मत + अनुवर्ती] ॰मर्यादा-स्त्री. १ जनरूढी; पडलेली वहिवाट; प्रचार. २ जन- लज्जा. ३ जनाचा मान; लोकांविषयीं आदरभाव. (क्रि॰ राखणें; ठेवणें; पाळणें; धरणें; बावगणें). ॰माता-स्त्री. लक्ष्मी; लोकजननी. 'न सेविती हे जरी लोकमाता ।' -सारुह २. १८. ॰मांदी-स्त्री. लोकांचा समूह; गर्दी. 'त्वरें चालती धांवती लोक मांद्या । पुरी वोस ते रात्र जेथें अयोध्या ।' -मुरामायणें अयोध्या ४३. ॰मान्य-वि. १ लोकांना मान्य; प्रिय. २ लोकांचा पुढारी नेता. 'लोकमान्य हा शब्द उच्चारतांच मनांतून ही पदवी तुम्ही मान्यच करतां.' -केले १.२७६. बाळ गंगाधर टिळक यांना लाव- ण्यांत आलेली, येणारी पदवी. 'गोखल्यांची इंग्लंडांतील काम- गिरी' -(विश्ववृत्त एप्रिल १९०६) या लेखांत प्रथम वि. का. राज- वाडे यांनीं वापरली. ॰रंजन-न. १ लोकांची करमणूक. २ लोकांना संतोष, सुख होईल असें आचरण; लोकांना खूष ठेवणें. ॰रमण- वि. लोकांनां संतुष्ट करणारा. 'पूर्णब्रह्म स्वयें श्रीकृष्ण । बळी बळिराम लोकरमण ।' -एभा १.२.३. ॰राजक-राज्य- न. लोकमतानुवर्ती शासनसंस्था. (इं.) डेमॉक्रसी. 'लोकराजकाचे दोष त्यांना स्पष्ट दिसत होते.' -महाजनि (मनोरंजन-आगरकर अंक). ॰रीति-रीत-स्त्री. लोकांची वागण्याची पद्धत; जन- रीतिरिवाज; सामान्य वागणूक. ॰लचांड-न. लोकांच्या नाखु- षीनें होणारा त्रास; येणारी अपत्ति, लोकांच्या अवकृपेचें संकट. म्ह॰ सगळें लचांड पुरवेल पण लोकलचांड पुरवणार नाहीं. ॰लज्जा-लाजस्त्री. लोकमर्यादा पहा. १ लोकमताला मानणें; लोकांना जुमानणें. २ जनलज्जा; लोकभय; लोकांची वाटणारी शरम. ॰लोकपाळ-पुअव. १ देशाचे किंवा समाजाचे पुढारी लोक; प्रतिष्ठितवर्ग (व्यापकार्थी). २ राजा व त्याचे अधिकारी (लवाजम्यासह). ३ फौज; शिपाई. ॰वाद-वार्ता-स्त्री. पु. जनवार्ता; वदंता; कंडी; लोकप्रवाद पहा. 'लोकवार्तेला गति मिळाली कीं ती किती फोफावेल याचा नियम नाहीं.' -इंप ३७. ॰विद्या-स्त्री. समाजशास्त्र. -मसाप २.२१९. ॰व्यवहार- पु. लोकप्रवाह; सामान्य रीत; जनरीत; सर्वसाधारण वागणूक. ॰शाही-स्त्री. लोकांच्या सत्तेखालीं त्यांच्या संमतीनें चालणारी व त्यांच्याच हिताची अशी राज्यपद्धति. ॰शिरस्ता-पु. सामान्य परिपाठ; सामान्य रीत; लोकांची वागण्याची पद्धत; राहटी; रूढी. ॰संख्या-स्त्री. एका विशिष्ट स्थानी. राहणाऱ्या एकंदर सर्व लोकांची गणती. ॰संग्रह-पु. समाजव्यवस्थेचें रक्षण; लोकसंस्थेचें संरक्षण; अनेक अनुयायी मिळविणें; लोककल्याण; लोकदीक्षा; स्वतःला निराळ्या रीतीनें वागण्यास प्रत्यवाय नसतांहि लोकांनीं आचारभ्रष्ट होऊं नये म्हणून स्वतःच्या इच्छेविरुद्ध कांहीं आचा- रांचा स्वीकार करून लोकांची जूट राखणें. 'ज्ञानी पुरुषांनीं यथाधिकार धर्मसंस्थापनेसारखीं लोकसंग्रहाचीं कामें करावीं.' -टिसू ५. 'तया लोकसंग्रहालागीं । वर्ततां कर्मसंगीं । तो कर्मबंधु आंगीं । वाजेलनी ।' -ज्ञा ३.१७५. ॰सत्ताक-सत्तात्मक- वि. लोकांची सत्ता असलेलें; लोकमतानुवर्ती; राजा नसून लोकां- कडून राज्यकारभार चालणारी (शासनपद्धति). 'लोकसत्तात्मक राज्यपद्धतींत लोकच राजे असतात.' -गांगा २६. ॰संपादणी- स्त्री. लोकांचीं मनें अनुकूल करुन घेणें; लोकांची खुशामत; लोकांच्या मर्जीकरितां केलेली बतावणी. 'जैसि बहुरुपियांची रावो राणी । स्त्रीपुरुषभावो नाहीं मनीं । परी लोकसंपादणी । तैशीच करिती ।' -ज्ञा ३.१७६. ॰समजूत-स्त्री १ सर्वसाधारण लोकांचें मत; सामान्य समजूत. २ (एखाद्या मनुष्याविषयीचें किंवा पदार्था विषयींचें) लोकांचें यथायोग्य ज्ञान; समाधान; योग्य जाणीव. ३ केवळ लोकांचें समाधान (आपलें किंवा आपल्या बाजूचें समा- धान न मानतां फक्त लोकसमाधान) पहाणें ॰साहित्य-न. लोकांच्या जिव्हाग्रीं परंपरेनें वावरत असलेलें कथात्मक वा गीता- त्मक वाङ्मय. हें लिखित असेलच असें नाहीं. याचीं उदाहरणें- कहाण्या, सावित्रीचें गाणें; कावळाचिमणीच्या गोष्टी; ठकसेनाच्या गोष्टी. इ॰ ॰सिद्ध-वि. लोकांत रुढ असलेलें; लोकांत चालू अस- लेलें; प्रचलित; वहिवाटींत असलेलें. ॰स्थिति-स्त्री. एकंदर जन- तेची सामान्य स्थिति; लोकांची परिस्थिति. 'गाड्या घोड्यांतून हिंडणाऱ्या गृहस्थापेक्षां गरिबांनाच लोकस्थिति अधिक चांगली समजते.' -टि २.८०. ॰स्फीति-स्त्री. लोकप्रसिद्धि. 'स्वामींची नजर खाद्यसमृद्धीवर, त्यांच्या पुरस्कर्त्यांची लोकस्फीतीवर व इतरेजनांची केवळ मौजेवर.' -नि ६१९. ॰हितैषी-वि. जन- तेचें हित इच्छिणारा; लोकांचें कल्याण पाहणारा. [लोक + हितैषी; हित + इष् = इच्छिणें] लोकाग्रणी-पु. लोकश्रेष्ठ; लोकांचा पुढारी; नेता. [लोक + अग्रणी] लोकाग्रह-पु. लोकांची उत्कट इच्छा; जनतेचा आग्रह. लोकाचळ-पु. स्वर्गादि लोकरुपी पर्वत; जगरुप पर्वत. 'एऱ्हवीं जगदाकाराचें सिरें । जें चिरस्थानीयांचे धुरे । ब्रह्म- भुवन गा चवरें । लोकाचळाचें ।' -ज्ञा ८.१५४. [लोक + अचल] लोकाचार-पु. रूढी; लोकांची रीत; प्रघात; वहिवाट; लोकरीत. 'अंतरनिष्ठ तितुके तरले । अंतरभ्रष्ट तितुके बुडाले । बाह्याकारें भरंगळले । लोकाचारें ।' -दा १८.१.२४. लोकांतर-न. परलोक; (स्वर्ग, नरक इ॰) मृत्युलोकाहून निराळा दुसरा लोक. [लोक + अंतर] लोकांतीं-क्रिवि. लोकांमध्यें; जाहीर रीतीनें; उघडउघड. 'एकांतीं लोकांतीं करूं गदारोळ । लेश तोही मळ नाहीं येथें ।' -तुगा १९९१. लोकातीत-वि. अलौ- किक; लोकांवेगळें; या लोकीं न सांपडणारें. [लोक + अतीत] लोकानुकूल्य-न. लोकांची अनुकूलता; जनमान्यता; लोककृपा; लोकप्रसिद्धि. [लोक + आनुकूल्य] लोकापवाद-पु. लोकांनीं केलेली निंदा; जनापवाद; लोकप्रवाद. [लोक + अपवाद] लोकालोक-पु. सप्तद्वीपात्मक पृथ्वीला तटबंदीसारखा असलेला पर्वत; सप्तद्वीपा पृथिवी व सप्तसमुद्र यांना वेढणारा व सूर्य- मंडळापर्यंतचा अवकाश व्यापून टाकणारा असा एक महान् विस्तृत पर्वत. लोकालोकीं-क्रिवि. १ तिऱ्हाइतांकडून तिऱ्हाइतांमार्फत. २ विशेष पुरावा नाहीं अशा प्रकारें लोकांच्या तोंडून ऐकिलेलें. 'ही खबर मी लोकालोकीं ऐकिलेली आहें.' लोकी(कि)क- पु. १ लौकिक; कीर्ति; यश. 'बहु लोकिक सांडूं नये ।' -दा १४.१.६८. २ प्रसिद्धि; चांगल्या किंवा वाईट रीतीनें लोकांस माहीत असणें. -वि. या लोकांतील; 'प्रपंच संपादणें लोकिक ।' -दा २.७.९. [सं. लौकिक] लोकिकीं-क्रिवि. (काव्य) लोकांत; लोकसमुदायांत. 'पुत्रसंतान नस्तां दुःखी । वांज नांव पडिलें लोकिकीं ।' -दा ३.३.३२. लोकेषणा, लोकेशना- स्त्री. १ लोकांनीं आपणास बरें म्हणावें अशी इच्छा; कीर्तींची इच्छा. 'वैराग्यें तनु शुष्क करावें सोडुनि लोकेशना ।' -देप ६७. २ स्वर्गादि लोकांच्या प्राप्तीची इच्छा. ३ लोकांमध्यें चांगली किंवा वाईट प्रसिद्धि; लोकमान्यता किंवा दुर्लौकिक. 'मुलखांत लोकेशना होती.' -पेद २१ ११२. [सं. लोकेषणा] लोकोक्ति-स्त्री. १ म्हण. २ ज्यांचा रूढ अर्थच घ्यावयाचा, शब्दश: अर्थ घ्यावयाचा नाहीं असे शब्द समुच्चयानें; वाक्प्रचार. उदा॰ डोळ्यांत तेल घालून राहणें; डोक्यांत राख घालणें इ॰. ३ (साहित्य) ज्या वाक्याला वाक्प्रचारानें चारुता आली आहे असें वाक्य. 'हरिच्या पुन्हां पुन्हां कां काड्या नाकांत घालिशी शशका ।' [लोक + उक्ति] लोकोत्तर-वि. अलौकिक; असामान्य; असा- धारण. [लोक + उत्तर] लोकोद्धार-पु. मानव जातीचा उद्धार; कल्याण; मोक्ष; जननमरणापासून मानवाची सोडवणूक; लोकांची उन्नति, प्रगति. [लोक + उद्धार] लोकोपकार-पु. केवळ लौकि- काच्या संरक्षणार्थ करण्याचा शिष्टाचार; जी करण्याला शास्त्राज्ञा किंवा आपली इच्छा नसून केवळ लोकमर्जीकरतां आपण करतों ती गोष्ट, कृति. [लोक + उपचार]

दाते शब्दकोश

पुण्य

न. १ उत्तम आचरण केल्यानें ईश्वरप्राप्तिद्वारां सुख प्राप्त करून देणारा आत्म्याच्या ठिकाणीं असलेला विशिष्ट धर्म; धार्मिक, नैतिक गुण; उत्तम आचरणाचें फळ. २ सत्कृत्य; धार्मिक, परोपकारी कर्म. याच्या उलट पाप. [सं. पुण् = धर्मकृत्य] करणें] (वाप्र.) ॰खरचणें-वाईट कृत्य करणें; वाईट कृत्यांत गुंतणें. पुण्याचा-धार्मिकद्दष्ट्या मानिलेला, कल्पिलेला; धर्माचा (बाप, आई, भाऊ, बहीण, पुत्र इ॰ ). जसें-पुण्याचा बाप, पुण्याची आई इ॰. पुण्याच्या पारीं-पुण्यद्वारीं बसणें, पुण्याचा पार बांधणें-परोपकारी किंवा धार्मिक कृत्यांत नेहमीं गुंतलेलें असणें; पुण्यकृत्यें करणें. सामाशब्द- ॰कर्म-न. पुण्यजनक कर्म; पुण्यकृत्य. [सं. पुण्य + कर्म] ॰काल-पु. संक्रांति, ग्रहण इ॰चा पर्वकाळ; ज्या काळांत पुण्यकृत्य करणारास अधिक फळ मिळतें असा काळ. [सं.] ॰कीर्ति-स्त्री. पुण्यकारक कृत्याची प्रसिद्धि; लैकिक. [सं.] ॰गिरि-पु. (अध्यात्म) ज्ञानाचें स्थान; आज्ञाचक्ररूपी पर्वत. 'नाचतया पुण्यगिरी । चिद्भैरवाच्या खापरीं । मनपवनाची खीचपुरी । वाढूनियां ।' -ज्ञा १८.१०४०. [सं.] ॰जन-पु १ पुण्यवान मनुष्य. 'अहो प्राकृत आणि हीनु । तयाही कीं गुणत्वाचा मानु । परी न म्हणिजे पुण्यजनु । राक्षसु काई ।' -ज्ञा १८.७५०. २ राक्षस. [सं.] ॰तिथि-स्त्री. १ पवित्र दिवस. २ संन्यासी मृत झाला असतां बाराव्या दिवशीं किंवा प्रति- वार्षिक मृततिथीस त्याचे पुत्र-शिष्यादि श्राद्धस्थानीं जें कर्म करि- तात तें किंवा ती तिथि. ३ (सामा.) थोर सत्पुरुषाची प्रतिवार्षिक मृत्युतिथि; श्राद्धतिथि. [सं.] ॰धाम-न. काशी, प्रयाग इ॰ पवित्र स्थान; क्षेत्र. [सं.] ॰नदी-स्त्री. १ पवित्र नदी. २ (ल.) पुण्याचा, सदाचाराचा नदीसारखा जोराचा प्रवाह.[सं. पुण्य + नदी] ॰परायण-वि. पुण्यकृत्यें करण्यास तत्पर असणारा; पुण्यकर्माला वाहिलेला. [सं.] ॰पात्र-न. पुण्याचा विषय; पुण्यशील मनुष्य. ॰पावन-वि. १ पुण्य संपादन करून पवित्र झालेला. २ स्वतःच्या पुण्याईनें इतरांस पवित्र करणारा (कथा, सत्पुरुष, पवित्र स्थान, नदीं, वृक्ष इ॰बद्दल योजितात). 'उखाहरण पुण्यपावन । ऐकावें चित्त देऊन । चित्ररेखा तिची मैत्रिण ।' -स्त्रीगीत. [सं.] ॰पुंज-पु. पुण्याचा सांठा, संचय, राशि. 'स्थावरां गिरींआंतु । पुण्यपुंज जो हिमवंतु ।' -ज्ञा १०.२३४. -एरुस्व १४.५०. [सं.] ॰पुरुष-पु. १ ज्यानें पुण्यसंचय केलेला आहे असा मनुष्य; पुण्यवान् इसम. २ सद्गुणी, सदाचरणी मनुष्य. [सं.] ॰प्रताप-पु. पुण्य कृत्यामुळें, सद्गुणांमुळें आलेली शक्ति, प्रभाव, वजन, मान्यता; लोकोत्तर कार्यास इष्ट असें पुण्यसामर्थ्य. [सं.] ॰प्रतापी-वि. पुण्याचें सामर्थ्य अंगीं असलेला. [सं.] ॰प्राणी-पु. परोपकारी, सद्गुणी, पुण्य- शील मनुष्याबद्दल योजावयाचा शब्द. [सं.] ॰फल-न. सत्कृ- त्यांचें फळ, बक्षीस. [सं.] ॰भूमि-स्त्री. यज्ञादि कर्म करण्याविषयीं शास्त्रानें योग्य म्हणून सांगितलेली भूमि; हिमालय व विंध्य यांमधील प्रदेश; आर्यावर्त. [सं.] ॰मार्ग-पु. पुण्य संपादन करण्याचा मार्ग, रस्ता, पंथ, पद्धत इ॰. [सं.] ॰लोक-स्वर्ग; इहलोक सोडून गेल्यानंतर स्वतःच्या पुण्याईमुळें मिळणारी सुखाची जागा; ब्रह्मलोक. [सं.] ॰वान्-वंत-वि. सद्गुणी; सदाचरणी; नैतिक व धार्मिक गुण असलेला. [सं. पुण्य + वत्] ॰वासना-स्त्री. चांगली इच्छा; सदिच्छा. 'सत्वगुण चित्तीं प्रगटे । ते वेळीं पुण्यवासना उमटे ।' [सं.] ॰वेळ-स्त्री. सकाळची विवक्षित वेळ. ही वेळ पुण्यकारक कृत्यासाठीं शुभ व योग्य मानिली आहि. [पुण्य + वेळ] ॰शील-वि. सत्कृयें करण्याकडे ज्याची प्रवृत्ति आहे असा; सद्गुणी; सद्वर्तनी. [सं.] ॰श्लोक-पु. पुण्यकारक कृत्यानें प्रसिद्ध असलेला मानवी किंवा दैवी पुरुष; ज्याच्या नामस्मरणानें पुण्य लागतें असे संत, देवदेवता यांना हें विशेषण योजितात (धर्मराज, नल, जानकी इ॰ ). [सं. पुण्य + श्लोक = कीर्ति] ॰सामग्री-स्त्री. इष्ट कार्य सिद्धीस नेण्यासाठीं साधन म्हणून असलेला एखादा सद्गुण. [सं. पुण्य + म. सामग्री] ॰क्षेत्र-न पवित्र स्थानः ज्या ठिकाणीं राहिलें असतां, गेलें असतां पुण्य लागतें असें स्थान (काशी, कुरुक्षेत्र इ॰ ). [सं. पुण्य + क्षेत्र] पुण्यात्मा-पु. अत्यंत सद्गुणी व सदाचरणी मनुष्य. [सं. पुण्य + आत्मा] पुण्यपूर्व- न. चांगल्या नैतिक गुणाच्या पुण्यकृत्यापासून उद्भवणारें फल; सुकृत अपूर्व पहा. [सं, पुण्य + अपूर्व] पुण्याई-स्त्री. १ पुण्याचा संचय; पुण्यसामग्री. २ (ल.) सामर्थ्य; वकूब. [पुण्य] (वाप्र.) ॰खर्चणें-आटोकाट प्रयत्न करणें; शिकस्त करणें. 'तो ठराव पास होणेकरितां केतकरांनीं सारी पुण्याई खर्चिली.' -के १६.४.३०. पुण्याह-न. पुण्यकारक, पवित्र दिवस. [सं, पुण्य + अहन्] पुण्याहवाचन-न. १ स्वस्तिवाचन. विवाहादि मंगलकार्यांत प्रारंभीं करतात तें कर्म । २ (ल.) प्रारंभ, सुरुवात. [सं. पुण्य + अहन् + वाचन] पुण्योदक-न. पवित्र पाणीः तीर्थ जसें-तीर्थोदक; पादो- दक इ॰. [सं. पुण्य + उदक] पुण्योदा-पु. पूर्वजन्मीं केलेलें पुण्य फलद्रूप होणें; द्रव्य, मान्यता इ॰ मिळूं लागलें असतां त्याचें कारण सांगतांना हा त्याचा पुण्योदय आहे असें म्हणतात. [सं. पुण्य + उदय]

दाते शब्दकोश

वारा

पु. १ वात; चलित वायु; हवा; न दिसणारें परंतु स्पर्शास समजणारें पंचमहाभूतांतील एक तत्त्व. -ज्ञा १५.३७६. २ (ल.) वीरश्री; स्फुरण. 'शिंद्यांना भरला वारा ।' -संग्रामगीतें ७३. ३ संचार; अंगांत येणें. 'कंपु नोहे आंगी वारा । जगदंबेचा ।' -ऋ ६५. [सं. वा = वाहणें] (वाप्र.) ॰घालणें-पंखा, चवरी वगैरे साधनानीं हवेस चलन देऊन वारा लागेल असें करणें. ॰घेणें- खाणें-पिणें-१ (वासरें वगैरे) मोकाट सैरावैरा पळूं लागणें; उड्या मारूं लागणें. २ (ल.) निर्बंध झुगारून देऊन स्वैर वर्तन करणें; मोकाट सुटणें; अद्वातद्वा वागणें. 'स्वरूप तुमचें पाहून पापिणी जीव आमचा प्याला वारा ।' -होला १०२. 'तेणें करून रांगडे बहुत वारा प्याले ।' -पेद २१.१७७. ॰न घेणें किंवा न पडूं देणें-अगदीं अलिप्त, दूर राहणें; किंचितहि संबंध न येऊं देणें; संसर्ग टाळणें. ॰पडणें-वारा वहावयाचा बंद होणें. ॰पिणें-१ वारा घेणें पहा. २ दुःखी, उदासीन, उत्साहहीन, खिन्न, उद्विग्न होणें. ॰फिरणें-मत बदलणें; स्थिति पालटणें. ॰मोकळा करणें- सोडणें-अपानवायु सोडणें; पादणें. ॰मोकळा होणें, सरणें- अपानवायु सुटणें; पश्चिमद्वारें वायु बाहेर पडणें; पादणें. 'वारा सरतां मोठी फजीति ।' -दा १८.१०.२०. ॰वाजणें-वारा वाहणें; जोराचा गार वारा सुटणें. 'वारा वाजतां करपती ओलीं पिकें ।' -दा ९.८.२९. ॰वाजेल-वाहील तशी पाठ करावी- ओढवावी, द्यावी, वारा पाहून पाठ द्यावी, वारावाहेल तसें करावें-पाठीवर घ्यावा-१ वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर जावें, वारा बाहील त्या दिशेनें जावें, वाऱ्याच्या अनुरोधानें जहाज हांकरावें. २ (ल.) वेळ पडेल तसें, प्रसंग ओळखून वागावें. ॰होणें-वाकाहक होणें. 'हळहळ बहु झाली होय संसार वारा ।' -सारुह ३.७३. वाजता वारा लागूं न देणें-किंचितहि त्रास न सोसणें; स्वतःस अणुमात्र तोशीस लागूं न देणें; अजीबात त्रास टाळणें. वाऱ्याचा उपद्रव-पु. १ हवेंतील फरकामुळें होणारी पीडा, बाधा. २ पटकीची साथ. वाऱ्याचा बुंद-पु. हवेचा अल्पांश; किंचित्हि वायुचें वाहणें; बारीकशी झुळूक (बहुधा नास्तिपक्षी ). वाऱ्याची मोट-स्त्री. (ज्याप्रमाणें वारा एका गाठोड्यांत बांधणें अशक्य त्याप्रमाणें) परस्परांपासून दूर व भिन्न अशा अनेक वस्तु अथवा व्यक्ति एकत्र आणण्याची व ठेवण्याची क्रिया; अनिर्बंध वस्तूंचें एकत्रीकरण. (हें अशक्यप्राय असतें) ॰बांधणें-क्रि. अशक्य गोष्ट करूं जाणें. वाऱ्याचें घोडें-न. (वाऱ्यानें चालणारें) जहाज; गलबत; नौका. वाऱ्याबरोबर- शीं भांडणें-अतिशय भांडखोरपणा करणें; लसते कलह उकरून काढणें. वाऱ्याला लाथा मारणें-निष्फळ काम करणें. वाऱ्या वर टाकणें-अजिबाद सोडून देणें; टाकून देणें; पूर्णपणें त्याग करणें; हयगय, दुर्लक्ष करणें. वाऱ्यावर भारे बांधणें-मनोराज्य करणें. वाऱ्यावर वरात भुसावर चिठी-भूसपर ठेंगा- बेजबेबदारीचें, निष्काळजीचें काम (वरात म्हणजे पैसा देण्या- विषयीं चिठ्ठी. ती वाऱ्यावर देणें म्हणजे कांहीं तरी करणें); ताळ- मेळ नसलेली गोष्ट करणें. वाऱ्यावर सरणें-१ कुठें तरी भट- कणें; वहावत जाणें; कांहीं तरी भरमसाट बोलत सुटणें. २ अवखळ होणें; आडदांडपणा करणें; स्वैर वागणें. वाऱ्यावशीं-वाऱ्या- सोई-वाऱ्याबाग-क्रिवि. वाऱ्याच्या गतीच्या अनुरोधानें; प्रवाहाबरोबर; प्रवाहाच्या दिशेनें. वाऱ्यास उभा न करणें-राहूं न देणें-न राहणें-स्वतःपासून दूर ठेवणें; संबंध न ठेवणें; संसर्ग टाळणें. वाऱ्यास देणें-उपणणें; वारवणें; वारसंडणें. सामाशब्द- वारापाणी-न. १ वारा व पाणी यांच्या सुलभतेमुळें क्षुल्लकत्व दर्शक दुर्लक्षित, उपेक्षित स्थिति; अवहेलना; उपेक्षा; हेटाळणी; किर- स्कार; हेळसांड. 'मी बोलतों याचें उगीच वारापाणी करून टाकूं नको.''झालें वारापाणी वज्र तव भयेंचि देव कां पावे ।' -मोअश्व १.१०६. २ -नस्त्री. निरवानिरव; वारासार; फेड; भागवा- भागवी (कर्ज-वाम वगैरेची). ३ निरास; निवारण; अनिष्ट निर- सन. ४ हवापाणी; मोकळी स्वच्छ हवा; एखाद्या ठिकाणचें हवा- मान; आबहवा. 'चार दिवस वारापाणी खा मग बरा होशील.' [वारा + पाणी] वारें-न. १ वारा; विशेषतः वाहणारा, हलणारा वारा. २ साथ; प्रसार; प्रादुर्भाव (रोग वगैरेचा). उदा॰ पटकीचें वारें; खोकल्याचें वारें. (क्रि॰ चालणें; वाहणें; वाजणें; सुटणें). 'वारीं रोग्याची वाजतीं ।' -दावि ३७७. ३ संचार; अंगांत येणें; पिशाच्चबाधा. (क्रि॰ येणें; भरणें.) 'अंगीं घेऊनियां वारें दया देती । तयां भकतांहातीं चाट आहे. ।' -तुगा २८४२. 'वारें निराळें बोलें । देहामध्यें भरोनि डोले ।' -दा ९.८.२२. ४ झांक; छटा; चर्या; सूरत; गुणसमुच्चय. (विशिष्ट गोष्टीकडे कल, आवड, विशिष्ट बौद्धिक सामर्थ्य, कौशल्यदर्शक). 'कारकुनीचें वारें.' ५ लहर; लाट; ऊर्मि; प्रवृत्ति; कल. उदा॰ प्रीतीचें-ममतेचें-रागाचें- शोकाचें-आनंदाचें-वारें. ६ जोम; उत्साह; सामर्थ्य; आनुवंशीक ओज, तेज, रग वगैरे. उदा॰ तारुण्याचें-बळाचें-शक्तीचें- वारें. 'हिंदुलोकांत स्वातंत्र्याचें वारें कसें तें माहित नाहीं.' -नि. 'अंगीं भरलें नूतन वारें ।' -विक ३. ७ सामान्यतः एखादी चम- त्कारिक कल्पना, वेड, खूळ वगैरे. 'सुधारणेचें वारें महाराजांच्या डोक्यांत शिरलें' -टिले ४.३३६. ८ स्पर्श; वास. 'एका राज्य- व्यवस्थापकानें राज्यास संपत्तीचें वारें लागूं नयें म्हणून कडक कायदे केले.' -नि ५४. ९ अंश; भाग. 'त्यातलें बिलकुल वारें ऐन साठीच्या अंमलातहि प्रस्तुत ग्रंथकाराचे ठिकाणीं आढळत नाहीं.' -नि. १० आविर्भाव; देखावा; आव; अवसान. 'चोरा- पुढें त्यानें पहिलवानगिरीचें वारें अंगीं आणण्याचा प्रयत्न केला.' ११ अर्धांगवायु; पक्षपात. 'वारीं अंगावरून जातीं ।' -दा ९.८. २९. ॰फिरणें-बदल होणें; पालटणें; वर्तणूक निराळीं होणें. 'गोविंदरावास नोकरी लागल्यापासून सखूबाईचें वारें फिरलें.' ॰लागणें-संसर्ग होणें; संगति लागणें; संबंध येणें. 'संपत्तीचें वारें आजपर्यंत कसें तें मुळींच लागलें नाहीं असे देश पृथ्वीवर पुष्कळ आहेत.' वारें सुटणें-परिस्थिति, वातावरण उत्पन्न होणें. 'कायदे- भंगाचें हिंदुस्थानांत वारें सुटलें.' -के १२.७.३०. ॰सूत्र-न. (गो.) पिशाच्चाचा फेरा. वारेघशीं-क्रिवि. उघड्यावर; वाऱ्या- वर; हवेवर. 'रसाची घागर तुळशीपाशीं उतरलीं व वारेघशीं ठेविली.' -खरादे ६९. वारेमाप-क्रिवि. १ प्रमाणाबाहेर; भलती- कडेच; बेअंदाज; बेछूट. २ बेताल; असंबद्ध; विसंगत; अद्वातद्वा (बोलणें, भाषण). वारेलग-क्रिवि. वाऱ्याच्या प्रवाहांत, झोतांत. 'कां वारेलगें पांखिरूं । गगनीं भरे ।' -ज्ञा १३.३१४. वारे- हळक-वि. वारा लागून वाळलेलें; वाऱ्यावर टाकून वाळलेलें.

दाते शब्दकोश

खेळ

पु. १ करमणूक; क्रीडा; मौज; केलि (चित्तविनो- दार्थ केलेली). २ खेळणें-णीं; खेळण्याची वस्तु (बुद्धिबळें, सोंगट्या, भोंवरा, गोट्या इ॰). ३ तमाशा; देखावा; प्रदर्शन. ४ अभ्यास; मेहनत (बुद्धीचा, इंद्रियांचा); व्यापार; क्रिया; चलनवलन (यंत्राचें). ५ खेळण्याची पाळी (एखाद्या खेळांत). ६ चाळा; कृति; खावडाव; वाईट कृत्य. 'म्हणे वांसरा घात झाला असारे । तुझे माउलीचेचि हे खेळ सारे ।' -वामन भरत- भाव १७. ७ नाटकाचा प्रयोग. ८ लीला; कृपा. ९ (ल.) लढाई; युद्ध. 'उलटेल जरी हा खेळ ।' -संग्रामगीतें ४७. १० (गो.) विशेषतः जुगाराचा खेळ; जुगार. [सं. खेल्; हिं. पं. खेल; बं. खेला सीगन, फ्रेंचजिप्सी खेल.] (वाप्र.) ॰करणें-उडवणें; उधळणें; बेपर्वा खर्च करणें; घोटाळा, अव्यवस्था करणें; नासणें; बिघडविणें. ॰करणें-खेळणें-मांडणें-चांगला खेळ किंवा काम करणें; एखादी हुषारीची किंवा शिताफीची गोष्ट साधणें. खेळणें-अक्रि. १ क्रीडा, मौज करणें; स्वतःस रमविणें. म्ह॰ खेळेल तो पोळेल. २ गमणें; अळंटळं करणें; माशा मारीत बसणें. ३ एखादा खेळ खेळणें. ४ वाद्य वाजविणें. ५ (भूत- संचारामुळें) इकडेतिकडे उड्या मारणें. ६ हळू हळू हालणें; झुळ- झुळणें (एखादी वस्तु वार्‍यामध्यें किंवा सूर्यकिरणें पाण्यामध्यें). 'किल्ल्याभोंवतीं; पाणी खेळत असतें.' ७ व्यापार करणें; चालणें; चालत असणें; चलनवलन करणें (यंत्र). ॰लावणें- मांडणें-एखाद्या कटाचा किंवा वाईट मसलतीचा पाया घालणें. ॰व(वि)णें-सक्रि. १ क्रियेंत, व्यापारांत चालू ठेवणें; चालवणें; हलविणें. ' स्वमायेचें आडवस्त्र । लावूनि एकला खेळवी सूत्र ।' -ज्ञा १८.१३०३. २ नाचविणें; आपल्या मर्जीप्रमाणें वागाव- यास लावणें. 'जो ब्रह्मादिकां खेळवी अणेंगीं परी ।' -शिशु १. ३ काम सुरु ठेवणें (यंत्र; वाफेचें यंत्र, हत्यार इ॰चें). ४ रमविणें. सामाशब्द- ॰कर-वि. १ इकडे तिकडे खेळण्यास योग्य; खेळ- ण्याच्या वयांत आलेला. ' दे गे माळणी फुलांचा झेला । माझा नातु खेळकर झाला ।' २ खेळाडू; मौज्या; आनंदी. ३ आग- लाव्या; कळलाव्या; खेळ्या; कज्जेदलाल. ॰करी-पु. तमास- गीर; चित्रें दाखविणारा; मोठ्या लोकांचीं सोंगें आणणारा; बहु- रूपी; दशावतारी. ॰कुडी-स्त्री. १ खेळण्याची चेष्टा; माकड- चेष्टा. २ चाळा; क्रीडा; युक्ति; मौज; थट्टा (मनापासून केलेल्या कृत्याच्या उलट). 'खेळकुडीनें कोणी चोर म्हटलें तरी त्याचा राग मानूं नये. ' ॰कुली-ळी-स्त्री. उपवनांतील पाण्याचे लहान लहान पाट. खेडकुळि पहा. ' रत्नबद्धा खेळकुळिआं जवळी ।' -दाव १५९. 'चित्रविचित्र खेळकुलिया ।' -मुआदि २९. ५०. खेळकू-गड-गर-वि. १ खेळाडू; मौज्या. २ मौज करणारा; क्रीडा करणारा; विनोदी; विदूषक. ३ खेळण्याचें वय झालेलें (मूल). ॰खंडोबा-पु. नाश; सर्वस्वी बिघाड; पूर्ण सत्यानाश; धूळधाण (खंडोबा, झाडाच्या अंगांत संचार करून त्यास रानोमाळ नाचावयास व गडबडां लोळावयास लावतो यावरून). (क्रि॰ करणें). ॰खाना-पु. खेळण्याचा अड्डा; क्लब. 'वयोवृद्ध कामगार सकाळसंध्याकाळ ...... दरबारांत, खेळ- खान्यांत ...... जसा वीरमंत्र देतील ......' -टि १.४१९. ॰गडी-पु. १ खेळांतील सोबती. २ -स्त्री. (कों.) खेळांतील सोबत किंवा मैत्री. 'त्याची व याची लहानपणापासून खेळगडी आहे.' ॰गड्या-वि. (राजा.) खेळांत किंवा गंमतींत व्यर्थ वेळ घालविणारा; खेळ्या; आळशी; छचोर. खेळणी-स्त्री.१ खेळणें, क्रीडा करणें. २ खेळाचा दिवस; (व.) सुटीचा काल 'शाळा सुरु झाल्यापासून ४।५ दिवस खेळणीच असते.' खेळणें-न. १ खेळण्याची वस्तु. २ लहान मुलाच्या पाळ ण्यावर बेगड, कागद, कापडाच्या चिमण्या इ॰ वस्तू बांधतात त्या. ३ सहज प्राप्त होणारी वस्तु. 'आम्हां केलें परब्रह्म खेळणें ।' -एभा १८.३९५. खेळणें (तें), रांगणें (तें)-न. मकरसंक्रां- तीच्या वेळचें एक व्रत, वसा; एका स्त्रीनें दोन नारळ घेऊन 'खेळतें घ्या रांगतें घ्या' असें म्हणून दुसर्‍या स्त्रीस ते नारळ द्यावयाचे व नंतर दुसरीनेंहि असेंच म्हणून दोन नारळ पहिलीला द्यावयाचे. खेळतारांगता-वि. १ खेळण्याच्या व रांगण्याच्या वयांत आलेला (मुलगा). २ शरीरास मोकळी हालचाल करतां येईल असा; अघळपघळ (वस्त्र, दागिना). ३ खेळतां येईल असा नेमस्त; हलका; बेताचा (ताप, देवी, गोंवर, कांजिण्या). खेळतें वारें-न. देव किंवा भूत यांचा, जोराचा संचार, अवसर (याचें भविष्य किंवा शकून समजतो अशी समजूत आहे.) ॰त्या देवी-स्त्रीअव. देवींचा (फोड्यांचा) एक प्रकार. देवी पहा. ॰वणा-वि. खेळासाठीं किंवा चेष्टामस्करीसाठीं ठेव- लेला; बगलबिल्ली; खुषमस्कर्‍या; विदूषक (माणूस, प्राणी, वस्तु, खेळणें, क्रीडामृग इ॰). ॰वणी-स्त्री. प्रिया; मैना; लाडकी स्त्री (विलासी स्त्री किंवा नानाप्रकारे खेळ खेळून पुरुषास आपल्या व्यसनांत अडकविणारी स्त्री); स्त्रीस लडिवाळपणें म्हणावयाचा शब्द. ॰शेपणा-पु. (राजा.) आळशीपणा; अळंटळंपणा; रेंगा- ळण्याची किंवा गमण्याची प्रवृत्ति; खेळगडीपणा. खेळा, खेळि(ळी)या, खेळ्या-वि. (कों. राजा.) १ शिमग्यांत देवाच्या पालखीबरोबर जाणारे, यांचे कापडखेळे व डफखेळे असे दोन प्रकार आहेत; सोंगाड्या; बहुरंग. 'पूर्वीं खेळे बहुत जाहले सृष्टीं ।' -ह १३.४६. २ लग्नांत खेळ खेळणारा. 'तो वीरराज जयांचा खेळा ।' -शिशु ९९८. ३ नेहमीं भलत्यासलत्या कामांत किंवा अन्यायाच्या कृत्यांत गुंतलेला; आगलाव्या; कळ लाव्या; चुगलखोर. ४ फंदफितूर करण्याचा स्वभाव असलेला. ५ खेळाडू. खेळिन्नला-खेळला. 'ब्रह्मांडमंडपीं गोंधळ । खेळि- न्नला संतोषें ।' -मुआदि १.४१४९. खेळी-स्त्री. १ खेळ; माज.२ खेळण्याचा दिवस; सुटीचा काल. ३ खेळण्याची पाळी (बुद्धिबळें). मोहर्‍यानें एका वेळीं केलेली हालचाल, किंवा गति. ४ खेळा पहा. - वि. खेळा; खेळणारी; मौजा मारणारी; चवचाल स्त्री. 'माझी सासु मोठी खेळी ।' -भज ५५. ॰मेळी-स्त्री.१ दाट परिचय; घसट; सलगी. २ मौज; क्रीडा; थट्टामस्करी; रंगेल चेष्टा; गंमत; मौज. ॰मेळीचा, खेळ्यामेळ्या-वि. दाट परिचयाचा, सलगीचा. ॰मेळी, खेळीं मेळीं-क्रिवि. (काव्य) मौजेंत; हास्यविनोदांत किंवा खेळांत; करमणुकींत (काळ घाल- विणें). ' आंता जाऊं खेळीमेळीं । गाई चारावया । ' -तुगा २३०. मौजेनें; विनोदानें, परिहासबुद्धीनें (बोलणें, करणें). 'खेळीमेळी आले घरा गोपीनाथ । गोपाळांसहित मातेपासीं ।' खेळेंमेळें- क्रिवि. परस्परें थट्टा मस्करी करावयाजोग्या परस्परांच्या मित्रभा- वानें. 'एथें करौं या भोजनें । खेळेंमेळें ।' -दाव १९९. 'आहार निद्रादि खेळेंमेळें ।' -एभा १३.५६८. खेळुगा-वि. खेळाडू.

दाते शब्दकोश

पाणी

न. १ उदक; जीवन; जल; सलिल. 'पाणियां छाय दुनावली । परिमळाचि ।' -शिशु ६२८. 'चोखे पाणिया न्हाली ।' -वसा २५. २ पाऊस; पर्जन्य. ३ हत्यारें भट्टींत तापवून नंतर तीं पाण्यांत बुडवून त्यांच्या आंगीं आणिलेली दृढता. (क्रि॰ देणें; चढविणें; उतरणें). ४ (ल. एखाद्याच्या अंगांतील) धमक; अवसान; वीर्य; शक्ति; तेज. 'आलें न रजपुतांचें परि यवनां सर्व हरवितां पाणी ।' -विक ६८. ५ (मोत्यें, रत्न, हिरा इ॰कांचें) तेज; कांति; झकाकी. 'नाना मुक्ताफळांचें पाणी ।' -दा १६.४.१६. ६ चेहऱ्यावरील टवटवी; कांति; तजेला. ७ धातूंचें भांडें इ॰कांस सोनें, चांदी इ॰कांचा देतात तो मुलामा; झिलई. ८ शस्त्र इ॰ घासून त्याच्या धारेस आणलेली तीक्ष्णता; कडकपणा.(क्रि॰ देणें; पाजणें). 'नाना शस्त्रांमधें पाणी ।' -दा १६.४.१६. ९ अब्रू; लौकिक, कीर्त्ति. (क्रि॰ जाणें; उतरणें; चढणें). १० (राग, गाणें इ॰कांची) नीरसता; रुक्षपणा; रसहीनता. ११ (डोळ्यांतील) चमक; तेज. १२ अश्रू. 'दुर्गा देवीच्या डोळ्यांतून पाणी येऊं लागलें.' -विवि ८.३.४९. पाणी याचें समासांत पूर्वपदीं 'पाण' असें रूप होऊन अनेक सामासिक शब्द होतात. उदा॰ पाणकोंबडा, पाणघोडा, पाणलोट इ॰ सामासिक शब्द पहा. [सं. पानीय; प्रा. पाणिअ; गुज. पाणी; हिं. पानी; फ्रें. जिप्सि. पनी; पोर्तु जिप्सी. पानी] (वाप्र.) ॰उतरणें-१ पराभूत, पराजित होणें. 'पाणिपतच्या लढाईनंतर मराठ्यांचें पाणी उतरल्या- नंतर निजमास संधी सांपडली.' -विवि ८.६.१०९. २ अब्रू जाणें; अपकीर्ति होणें. 'ज्या स्नेहानें पाणी उतरतें, तो स्नेह रुपयें पाण्यांत टाकून राखावा, त्यापेक्षां रुपये राखावे हें फार चांगलें आहे.' -बाळ २.३. ३ (डोळे इ॰कांतील) तेज, चमक, कमी होणें. 'तिच्या सतेज डोळ्यांचें पाणी उतरूं लागलें.' -पाव्ह ५४. ॰ओळखणें- जोखणें-(एखाद्याच्या अंगांतील) गुण, धमक, धैर्य, विद्वत्ता इ॰ कल्पनेनें ताडणें. (अंगाचें, रक्ताचें) ॰करणें-अतिशय खपणें; कष्ट करणें; फार मेहनतीनें (एखादें काम, कर्तव्य इ॰) करणें. म्ह॰ रक्ताचें पाणी हाडाचा मणी. ॰काढून टाकणें-सक्रि. (रसा.) (एखाद्या पदार्थांतील) द्रव, द्रवांश नाहींसा करणें, घालविणें. (इं.) डीहायड्रेट्. ॰कोंडणें-(सैन्य इ॰कांचें) पाणी बंद करणें; त्यास पिण्यास पाणी मिळूं न देणें. 'कडबा दाणा बंद कोंडिलें पाणी कहर वर्षला ।' -ऐपो २३६. ॰घालणें-१ (बायकी) (विटाळशी इ॰ स्त्रीस जेवतांना) पाणी वाढणें, देणें. २ (बायकी) (विटाळशीस, बाळंतिणीस स्नान घालून शुद्ध करून घेणें. ३ नाश करणें; खराबी- करणें; गमावून बसणें. 'ह्यानें आपल्या हातानें आपल्या रोजगारावर पाणी घातलें,' ४ (ल.) (एखाद्या गोष्टीच्या) अभिवृद्ध्यर्थ प्रयत्न करणें, जोपासनेबद्दल उपाय करणें. ५ (एखाद्या वस्तूवर) पाणी सोडणें; त्याग करणें. ६ (कों.) सर्पाचें विष उतरविण्यासाठीं सर्प चावलेल्या मनुष्यास मंत्रित पाणी पिण्यास देणें व अंगावर घालणें ७ वृक्ष इ॰कांच्या वाढीला जरूर तें पाणी त्यांच्या मुळांशीं ओतणें. ॰चढणें-महत्त्व प्राप्त होणें; वीरश्री, त्वेष संचरणें. 'थोरासंगें दुर्बळास पाणी चढे ।' -पला ४.१९. ॰छाटणें-कापणें-१ (पोहणारानें, बोटीनें आपल्या अंगच्या जोरानें) पाणी दुभंगलें पुढें सरणें. २ (पोहणाराच्या, नावेच्या) गतीमुळें पाणी दुभंगलें जाणें. ॰जाळणें-(ल.) करडा अंमल चालविणें; क्रूरपणाचीं कृत्यें करणें. ॰जोखणें-ओळखणें-(एखाद्याची) कर्तृत्वशक्ति, धमक, विद्वत्ता, पराक्रम इ॰ अजमावणें. ॰तावणें-(एखाद्याच्या नांवानें, नांवा- वर, नावांविषयी इ॰ शब्दांसह प्रयोग असल्यास-एखाद्याचें) मरण, अनिष्ट इच्छिणें. (शवदहनासाठीं नेतांना तें उचलण्यापूर्वी, पाणी तापवून त्यास स्नान घलितात त्यावरून हा अर्थ). ॰तुटणें-(पोहणाराच्या, नावेच्या गतीनें) पाणी दुभंगलें जाणें. 'पेनोवेणां दळ बहुतें मीनलें । वाटे पाणी तुटलें ।' -शिशु ५७८. ॰तुंबविणें-(धरण इ॰ बांधून) पाणी कोंडून धरणें. ॰तोडणें- पाणी छाटणें अर्थ १ पहा. ॰दाखविणें-(कर.) (शेतकऱ्यांत रूढ) (गुरांस) पाणी पाजून आणणें; पाण्यावर नेणें ॰देखील न घोटणें-(एखाद्याचे) प्राण कंठीं येणें; मरणासन्न होणें; पाणी घशाखालीं उतरण्याइतकाहि अवकाश, धीर नसणें. ॰देणें-१ पोलादाच्या अंगी नरमपणा, कडकपणा, चिवटपणा इ॰ निरनिराळे गुण आणण्यकरितां तें भिन्न भिन्न ठराविक प्रमाणांत तापवून पाण्यांत बुडविणें. या क्रियेचे कडक पाणी, नरम पाणी, जांभळें पाणी, पिवळें पाणी इ॰ निरनिराळे भेद आहेत. -ज्ञाको प ७४. 'पाणी देण्याच्या कृतीनें लोखंडांत फेरफार होतात.' पदाव १.१५५. २ शस्त्र इ॰कांस धार लावणें. ३ (मृताचा) श्राद्धविधि करून (त्याला) तिलांजलि देणें; (सामा.) तर्पण करणें. ॰देणें-सोडणें-१ (एखादी वस्तु इ॰) गमावून बसणें. २ सोडून देणें; आशा सोडणें; (वस्तू इ॰कांचा) उत्सर्ग करणें (एखाद्या वस्तूचें दान देतांना तीवर थोडेसें पाणी-आपला हक्क नाहींसा करण्याचें द्योतक म्हणून-सोडण्याचा प्रघात आहे त्यावरून हा अर्थ). (कर्माला 'वर' अथवा 'ला' हे प्रत्यय लावून प्रयोग). 'मागें एक पुढें एक । दोनी मिळुनि विठ्ठल देख । ऐसी होतांचि मिळणी दिलें संसारासि पाणी ।' -एकनाथ ॰पडणें-फुकट जाणें; निरुपयोगी होणें; खराब होणें; दर्जा, गुण, महत्त्व, उपयुक्तता इ॰ बाबतींत मागें पडणें; नाश पावणें. कर्म- स्थानीं असलेल्या शब्दास 'वर' हें शब्दयोगी अव्यय जोडून प्रयोग जसें:-रोजगारावर-पोटावर-संसारावर-कामावर-स्नेहावर-पाणी पडलें. 'त्या कार्यावर तर सर्वस्वीं पाणीच पडलें असतें .' -इंप ८. ॰पाजणें-१ (मृतास) तिलांजली देणें; प्रेतदहन होत असतांना प्रेताच्या कपाळमोक्षानंतर चितेभोवतीं सच्छिद्र मडक्यानें पाण्याची धार धरणें; श्राद्ध इ॰ करून तर्पण करणें. २ (ल.) (एखाद्यास) मरेमरेतों खूप मारणें, बडवणें. (१ ल्या अर्थावरून रूढ). ३ पराजित करणें; जिंकणें; चीत करणें. ॰पाणी करणें-१ तहानेनें 'पाणी द्या' 'पाणी द्या' असें म्हणत सुटणें; एकसारखें पाणी मागत राहणें. २ (एखादें जनावर मनुष्य इ॰कांस फार) राबवून, पादाडून बेदम करणें. ३ (अन्न, वस्त्र, पदार्थ इ॰कांची) पूर्णपणें नासाडी करणें. ॰पाणी होणें-१ पुनःपुन्हां पाणी पिण्याची प्रवृत्ति (मिष्ठान्न खाण्यानें, उन्हाच्या त्रासानें) होणें. २ (एखाद्या वस्तूचा) नाश, खराबी होणें. 'हे कठोर मांस झडून जाईल तर किंवा याचें पाणी पाणी होईल तर किती बहार होईल.' -विकार- विलसित ॰पिऊन भांडणें-वाद करणें-(ल.) नेटानें व जोराजोरानें, आवेशानें भांडणें. ॰फिरणें-(बडोदें) व्यर्थ, फुकट जाणें; पाणी पडणें पहा. 'सेनापतीच्या चातुर्यावर व सैनिकांच्या शौर्यावर पाणी फिरतें.' सेवामाहात्म्य १०. ॰भरणे-वाहणें- घालणें-(एखाद्याच्या घरीं विद्वत्ता, संपत्ति, विशिष्ट व्यक्ति इ॰कानीं) बटकीप्रमाणें राबणें; दास्य पत्करून राहणें; वश असणें (एखाद्याच्या घरीं या शब्दासह प्रयोग). 'रूपाचेनि आहे । ऐरावतु पाणि वाहे ।' -शिशु ५०८. 'उद्योगाच्या घरीं ऋद्धिसिद्धि पाणी भरी ।' ॰मरणें-१ (एखाद्याचें) धैर्य गळणें; गर्भगळित होणें; धाबें दणाणणें. २ एखाद्या गोष्टींत किंवा हिशेब, भाषण इ॰कांत) खोटेपणा, पोकळपणा, लबाडी इ॰ असणें. ॰मागूं न देणें-एकदम, तडाक्यासरशीं ठार करणें (मरतांना पाण्याकरितां मनुष्य तडफडतो, पाणी मागत असतो त्यावरून हा वाक्प्रचार). 'तुला मी बडविलें तर पाणी मांगू देणार नाहीं.' ॰मारणें- पाणी कापणें-छाटणें पहा. ॰मुरणें-१ (एखाद्याचें भाषण, वर्तन इ॰कांत कांहीं तरी संशयास्पद असा) कमीपणा, वैगुण्य, दोष, मर्मस्थान असणें. २ भिंत वगैरेंत पाणी जिरणें. ॰लागणें-१ वाईट पाणी पिण्यांत आल्यानें आजारी होणें; पाणी बाधणें. 'कैक जणाला पाणी लागलें मासोळी मागें खारी ।' -ऐपो ३५४. २ ज्याची संगति धरली असेल त्याचे किंवा जेथें कांहीं काळ रहिवास आला असेल त्या ठिकाणचे गुणदोष, ढंग अंगीं जडणें. (आंत) ॰शिरणें-(धंदा, रोजगार, काम इ॰कास) अवदशा; उतरती कळा येणें; नासाडी होणें; फसगत होणें; आंत बट्यांत येणें. ॰शोषून घेणें-(रसा.) (एखाद्या पदार्थांतील) द्रव रस शोषून घेणें; (इं.) डेलिक्विस्. ॰सारणें-(व.) आंघोळीसाठीं पाणी उपसणें. ॰सोडणें-१ (ब्राह्मणास दिलेल्या दानावर पाणी सोडलें म्हणजे दानाची सांगता होऊन त्यावरचें आपलें स्वामित्व नाहींसें होऊन ब्राह्मणाकडे जातें या धार्मिक कल्पनेवरून पुढील अर्थ) (एखादी वस्तु) स्वेच्छेनें कायमची देऊन टाकणें; (एखाद्या वस्तूचा) त्याग करणें. 'हे स्त्री नव्हे प्रतिष्ठा तुमची जरि ईस सोडितां पाणी ।' -मोविराट १.१०३. २ (ल.) (एखाद्या वस्तूची) आशा सोडणें, ती गेली असें समजून स्वस्थ बसणें. ३ (एखादी वस्तु, भावना इ॰) नाइलाजास्तव सोडण्यास, तिच्याकडे दुर्लक्ष कर- ण्यास, विसरून जाण्यास, नाश करावयास तयार व्हावें लागणें. 'परि त्याहीं आम्ही त्या प्रेमासि रणांत सोडिलें पाणी ।' -मोद्राण १७.९०. ॰होणें-(एखाद्या वस्तूची) खराबी, नाश होणें; नाहींसें होणें. 'त्या दुःखाचें तुमच्या दर्शनानें पाणीच होऊन गेलें.' -रत्न ५.२. पाण्याआधीं वळण बांधणें-नदी, ओढा इ॰कास पूर येण्यापूर्वींच पुराच्या पाण्याचा निकाल लाव- ण्याची व्यवस्था करणें. २ (ल.) भावी संकटाची उपाययोजना आधींच करून ठेवणें. 'पाण्याआधीं वळण बांधितां उत्तम. नाहीं तर शेणामेणाचे लोखंडाचे जालियावर पुढें भारी पडेल.' -भाव ८३. पाण्याचा कांटा मोडणें-अग्निसंयोगानें पाणी कोमट होणें, करणें (अतिशय थंड पाणी अंगावर घेतल्यास अंगावर कांटा उभा राहतो, किंवा तें अंगाला कांट्याप्रमाणें बोचतें ह्यावरून वरील अर्थ). पाण्यची गार गोठणें-पाणी गोठून बर्फ होणें. पाण्यांत घाम येणें-(एखाद्यानें) अतोनात संतापणें; रागानें अंगाचा भडका होणें. पाण्यांत घालणें-बुडविणें; नाश करणें; खराब करणें. 'संसार घातला पाण्यांत । स्वतें समस्त बुडविलें ।' पाण्यांत जाणें-व्यर्थ होणें; फुकट जाणें. 'नानाची मुत्सद्देगिरी सारी पाण्यांत जात असली तर ...' -नि. पाण्यांत दिसणें-(ल. एखादी व्यक्ति एखाद्याच्या) द्वेषास पात्र होणें, असणें.पाण्यांत पडल्यासारखें होणें-फजीत होणें; लाजिरवाणें होणें. 'मग देवाला लाज वाटली. पाण्यांत पडल्यासारखें झालें.' -नामना ६९. पाण्यांत पाहणें-(एखाद्याचा एखाद्यानें) अतिशय द्वेष करणें (एखाद्याचा कट्टा शत्रु किंवा त्याला ज्याचा अतिशय दरारा आहे अशी व्यक्ति भीतीमुळें त्यास सर्वत्र जळीं, स्थळीं, काष्ठीं, पाषाणीं दिसूं लागते त्यावरून). पाण्यानें वाती पाजळणें-(महानु.) अशक्य गोष्ट शक्य करूं पाहणें. 'अवो दुजी कनुधार लागती । तरि पाणिअ/?/ वाति पाजळती ।' -शिशु ६७५. पाण्यापेक्षां, पाण्याहून पातळ करणें-(एखाद्याची) फजिती, पाणउतारा, तेजोभंग करणें; फार लाजविणें. 'नामचि करि पाण्याहुनि पातळ यश भास्करादि तेजांचे ।' -मोवन १२.५०. पाण्यावर घालणें- नेणें-(कर.) (गुरांना) पाणी पाजण्यासाठीं विहीर, नदी इ॰कांवर नेणें. पाण्यावर लोणी काढणें-(कर. ल.) अतिशय कंजूषपणा करणें. गळ्याशीं पाणी लागणें-१ पाणी गळ्यापर्यंत येणें. २ (कर्ज इ॰ गोष्टींची) पराकाष्ठा होणें. दुसऱ्याच्या ओंजळीनें पाणी पिणें-१ दुसरा पाजील तेवढेंच पाणी पिऊन स्वस्थ बसणें. २ (ल.) दुसरा सांगेल तसें मुकाट्यानें वागणें. उन्हा पाण्यानें घर जाळणें-जळणें-(ल.) खोट्या आरोपानें, निंदेनें रसातळास नेणें, जाणें; (एखाद्याचा) नाश करणें, करूं पाहणें, होणें (अकरण- रूपांत योजितात व हें घडणें अशक्य असें दर्शवितात). खोल पाण्यांत शिरणें-१ आपल्या आवांक्याबाहेरचें काम शिरावर घेणें. २ (एखाद्या गोष्टीची) फाजील चिकित्सा करणें. ३ (एखादें गूढ, गुपित) उकलण्याचा प्रयत्न करणें. पाणी केस तोडतें- पाण्याच्या अतिशय जोराच्या प्रवाहाचें वर्णन करतांना योजितात. पाणी खाल्लेला-वि. पाण्यांत ठेवल्यामुळें आंत पाणी मुरलेला. पाण्यांतील पावप्यादे-जलसंचारांत प्रवीण; आरमारांतील प्रबळ लोक. 'इंग्रज लोंक पाण्यांतील पावप्यादे.' -इतिहाससंग्रह-ऐति- हासिकचरित्र ११५. पाण्यापाण्यानें-क्रिवि. नदीच्या कांठा- कांठानें. पाण्यापेक्षां शीतळ-वि. अत्यंत सोशीक; सौम्य; शांत; गंभीर स्वभावाचा. पाण्यावर-क्रिवि. नदीच्या कांठीं. 'कऱ्हेच्या पाण्यावर.' -ख ३१९३. पाण्यावरचा बुडबुडा, पाण्या वरची रेघ-पुस्त्री. (ल.) क्षणभंगुर, अशाश्वत वस्तु. क्षणभंगुरता- दर्शक इतराहि वाक्प्रचार आहेत ते पुढें दिले आहेत:-जलबुद्बुद; धुळीवरचें सारवण; दुपारची सावली; विजेचें चमकणें; विजेसारखा; वीजच; अभ्रच्छाया; आभाळाची सावली; कमलिनीवरचा बिंदु; काजव्याचा उजेड; खुंटावरचा कावळा; तेरड्याचा रंग (तीन दिवस); शिराळशेटाचें राज्य; आवाहन व विसर्जन बरोबर; औट घटिकेचें राज्य; घडीचें, घटिकेचें घड्याळें; उपळवणी; तृणाचा शेक; पुष्करपत्रतोयतरल; पळतें पीक इ॰. 'चिताडसी कां? चित्र जिवाचें पाण्यावरच्या रेघांनीं ।' -वाग्वैजयंती-गोविंदाग्रज. पाण्यास आश्रय-आसरा-पु. अतिशय तहानेल्यानें उपाशे पोटीं पाणी पिणें आरोग्यदृष्ट्या अनिष्ट असतें, म्हणून आधीं अन्नाचे एक दोन घांस खाऊन नंतर पाणी पितात. अन्नाच्या ह्या दोन-तीन घांसांस, अल्पांशास उद्देशून हा वाक्प्रचार योजतात.म्ह॰ १ पाण्यांत राहून माशांशीं वैर करूं नये = आपल्या कार्यक्षेत्रांतील मंड- ळीशीं वैर करूं नये. त्यांच्याशीं मिळूनमिसळून वागण्यांतच फायदा असतो. २ (हिं.) पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाया वैसा = जशी वेळ येईल तसें वागणें. ३ पाण्यापासून जवळ सोयऱ्यापासून दूर = मनुष्यानें पाण्याच्या जवळ राहणें सोईचें असतें, तसेंच सोयऱ्या- पासून दूर रहावें म्हणजे प्रेमांत बिघाड करणाऱ्या गोष्टी टाळतां येतात. ४ पाण्यांत म्हैस बाहेर मोल = अनिश्चित, आगामी गोष्टी- विषयीं, निरर्थक चर्चेस, चिकित्सेस उद्देशून ही म्हण योजितात. सामाशब्द- पाणआघाडा-पु. आघाड्याची एक जात. हा आघाडा सूज, कफ, खोकला, वायु, शोष यांचा नाश करतो. -वगु १.९. [पाणी + आघाडा] ॰उतार-पु. १ नदींतून चालून जातां येण्याजोगा, कमी पाणी असलेला मार्ग. २ (नदी इ॰काचें) ओसरणें; कमी होणें. 'गंगेसि भंग बहु पाणउतार होतो ।' -र २. [पाणी + उतार] ॰उतारा-पु. १ मानखंडना; तेजोभंग; अपमान; क्षुद्रपणानें लेखून (एखाद्याची) केलेली विडंबना; अवहेलना. २ (क्व) पाणउतार पहा. [पाणी + उतरणें] ॰कणीस-न. ओहळांत, ढोंपरभर पाण्यांत कसईच्या झाडाप्रमाणें होणारें पुरुषभर उंचीचें एक झाड. याचीं पानें बाजरीच्या पानांसारखीं असून याचें कणीस बाजरीच्या कणसासारखेंच असतें. हें कणीस वाळवून त्यावरील कापूस चकमक पेटविण्यास घेतात. हें तेलांत बुडवून पेटविलें असतां काकड्याप्रमाणें जळतें. -वगु ४.६२. रामबाण. ॰कसर-स्त्री. पाटस्थळाच्या पाण्याकरील कर, पट्टी. 'गांवची पाणकसर गेल्यावर्षापासून दीडपट वाढविण्यांत आली.' -के १९.७.३०. [पाणि + कसर] ॰काठी- स्त्री. १ (गो.) विहीरींतून पाणी बाहेर काढण्याचें एक साधन. ओकती पहा. २ (ल. गो.) उठाबशी. [पाणी + काठी] ॰काडो- पु. (कु.) शेतांस पाणी काढून पैरीप्रमाणें आळीपाळीनें वाटून देणारा; पाणकाढा. हा शेतकऱ्यांनीं आपसांत पाण्याविषयी तंटा होऊं नये म्हणून निवडलेला असतो. [पाणी + काढणें] ॰कापड- न. जखमेवर, शरीराच्या कापलेल्या भागावर बांधतात ती ओल्या वस्त्राची चिंधी. [पाणी + कापड] ॰कांदा-कंद-पु. नदींत होणारा एक विशिष्ट कंद. यास नागदवणीच्या फुलासारखीं फुलें येतात. -वगु ४.६३. [पाणी + कांदा] ॰कावळें-न. (विशेषतः गुरांची) गर्भोदकाची पिशवी. पाणकी-स्त्री. पाणी भरण्याची मजुरी कर- णारी स्त्री. 'कुणि विधवा ठेविता घरामधें पाणकी ।' -ऐपो ३६९. पाणकुकडें-कोंबडें-न. घशांत किंवा जिभेच्या खालच्या बाजूस होणारा एक विकार. ॰कुक्कुट-पु. (महानु.) पाणकोंबडा. 'चंद्र चकोरा चोखटीं । वोळे अमृतधारी आतुटी । ते गोडपणें पाण- कुक्कुटी । लाहिजे कैसा ।' -ऋ ५२. [पाणी + सं. कुक्कुट = कोंबडा] ॰कोंबडा-डें-पुन. १ जलचर पक्षी. 'पाणकोंबडे कोंबडे । वडवाघुळा घुबडे ।' -दावि २४४. २ चंद्राभोवतालीं पडणारें खळें. [पाणी + कोंबड] ॰केश-पुअव. शेवाळ. ॰कोंबडी-स्त्री. एक जलचर कोंबडी. ॰कोळी-पु. मासे खाणारा एक पक्षी. -प्राणिमो ५७. ॰क्या-पु. १ लोकांच्या घरीं पाणी भरून त्यावर उपजीविका करणारा मनुष्य. 'एखादा पाणक्या नवरा मिळता तरी पतकरता.' -मोर ३४. २ (ल.) निरक्षर व धटिंगण मनुष्य. [सं. पानीयक-पाणकअ-पाणका-पाणक्या. -राजवाडे (ग्रंथ- माला).] ॰खार-पु. (कों.) उकडआंबे इ॰ खारविण्यासाठीं पाण्यांत मीठ घालून केलेला खार. [पाणी + खार] ॰गहूं-पु. मोटेच्या, पाटाच्या पाण्यानें होणारा गहूं. [पाणी + गहूं] ॰घर- न. १ पाणी तापवून स्नान करण्याकरितां असलेली खोली; न्हाणी- घर. २ विहीर इ॰ खणतांना जेथें पाणी लागतें तो जमिनींतील खोल थर. [पाणी + घर] ॰घोडा-पु. आफ्रिका खंडांत मोठ्या नद्यांत, सरोवरांत आढळणारा एक अजस्त्र पण निरुपद्रवी प्राणी. याचा रवंथ करणाऱ्या प्राण्यांत समवेश होतो. याचा रंग काळसर तपकिरी असतो. याच्या कातड्याच्या ढाली करतात. -ज्ञाकोप ६७. (इं) हिपॉपोटेमस् [पाणी + घोडा] ॰घोणस-पु. पाण्यांत असणारी सापाची एक निरुपद्रवी जात. [पाणी + घोणस] ॰चक्की- स्त्री. पाण्याच्या जोरानें, साहाय्यानें चालणारी चक्की. [पाणी + चक्की] ॰चट-वि. १ ज्यास गोडी कमी आहे असा (द्रव पदार्थ); बेचव. २ (ल.) शुष्क; बाष्कळ; नीरस; अर्थशून्य (बोलणें, लेखन, गाणें, बोलणारा, लिहिणारा, गाणारा इ॰). 'शेवटीं आपल्या निस्सीम भक्तांकडूनहि वरच्या सारख्या पाणचट प्रशंसे- पेक्षां अधिक कांहीं सर्टिफिकीट मिळूं नये ...' -टि १.१.२६४. [पाणी + छटा] ॰चूल-स्त्री. पाणघरांतील, स्नानाचें पाणी इ॰ तापविण्याची चूल. 'तेथें पाणचुलींत विस्तव घालून त्यावर पाणी तापत ठेविलें.' -कोरकि ५१२. [पाणी + चूल] ॰चोरा-रा-पु. गारोड्याजवळील पाणी भरण्याचें सच्छिद्र पात्र. 'पाणचोऱ्याचें दार । वरील दाटलें तें थोर ।' -तुगा २५८३. [पाणी + चोर] ॰जंजाळ-न. (कों.) पर्जन्य, पाण्याचा पूर इ॰कानीं जिकडे तिकडे होते ती जलमय स्थिति. 'बहू पाणजंजाळ देखोनि डोळां ।' -राक १.३२. [पाणी + जंजाळ] ॰जांवई-पु. (थट्टेनें) जांवयाचा भाऊ; पडजांवई. [पाणी + जांवई] ॰झुकाव-पु. पाणी बाजूनें टिपकवून लावण्यासाठीं दरवाज्यावर केलेलें झुकाऊ कारनिस, गलथा; पाणकारनिस. -राको ५९२. [पाणी + झुकविणें] ॰झेली- स्त्री. (चेंडू, विटीदांडू इ॰ खेळांत) झाडावरून खालीं पडतांना किंवा पाण्यांतून चेंडू, कोललेली विटी इ॰ जमिनीवर पडण्यापूर्वीं झेलणें. याच्या उलट आणझेली. [पाणी + झेलणें] ॰टका- टक्का-पु. पाटस्थळ जमिनीवरील एक लहानसा कर. [पाणी + टक्का] ॰टिटवी-स्त्री. तांबडा कल्ला असलेली टिटवीची एक जात. पाणड्या, पाणाडी-ड्या-वि. जमीनींत कुठें किती खोल खणलें असतां पाणी लागेल हें काहीं आडाख्यांच्या सहाय्यानें जाणणारा. [पाणी] पाणढाळ-पु. पाणी वाहून जाण्याजोगा जमीन, छपराचें पाखें इ॰कांस दिलेला, असलेला उंचसा उतार; सखलपणा. -वि. पाणी वाहून जाण्यायोग्या उतारानें युक्त, उंच उतारीची (जमीन इ॰). [पाणी + ढाळ = उतार] ॰ताव-पु. सोनें, चांदी इ॰ तापवून पाण्यांत बुडवून त्याचा कस पाहण्याची पद्धत; याच्या उलट सुकताव = सोनें इ॰ तापवून नुसतेंच थंड करणें. [पाणी + ताव] ॰तीर-पु. (युद्धशास्त्र) स्फोटक व ज्वालाग्राही पदार्थांनीं भरलेलें चिरूटासारखें निमुळत्या आकाराचें एक युद्धोपयोगी साधन. याचा व्यास दीड-दोन फूट असून लांबी सहा यार्ड असते. याच्या आघातानें मोठमोठीं जहाजें समुद्राच्या तळाशीं जातात. (इं.) टॉर्पेडो. -ज्ञाको (प) ६७. 'गेल्या महायुद्धांत योजलेल्या अनेक शस्त्रास्त्रांत पाणतीराचा पहिला नंबर लागेल.' -ज्ञाको. प ६७. [पाणी + तीर = बाण] ॰तुटी-वि. जींतील रसांश, द्रवांश कमी झाला आहे अशी, कांहींशी पिकलेली (पालेभाजी). [पाणी + तुटणें] ॰थरा-पु. घराच्या जोत्याच्या सर्वांत वरच्या थरांतील दगड, चिरा; पाटथर पहा. ॰थरी-स्त्री. १ आंत्रपेशी; प्लीहा. २ प्लीहेचा एक विकार; पोटांतील चीप. ३ प्लीहा, आंत्रपेशी वाढणें. [पाणी + थर] ॰थळ-स्त्रीन. १ पाऊस गेल्यानंतरहि जेथील ओल जात नाहीं व उन्हाळ्यांतहि खणलें असतां पाणी लागतें अशी जमीन. 'आणि पाणथळ असे तेथें भात लावी.' -पाव्ह ११. २ पाटाच्या पाण्यानें भिजणारी जमीन. [पाणी + थळ] ॰दळ-न. (क्व.) पाणथळ अर्थ १ पहा. [पाणी + दळ] ॰दिवड-स्त्रीन.. (कों.) पाण्यांतील सापाची निर्विष जात. [पाणी + दिवड] ॰दोरी-स्त्री. विहीरींतून पाणी काढण्याच्या उपयोगाची दोरी; बारीक दोर. [पाणी + दोरी] ॰नेचा-पु. पाण्यांत. दलदलींत उगव णारी एक वनस्पति; (इं.) हायड्रोटेरिडि. -ज्ञाको. अ २२१. [पाणी + नेचा] ॰पट्टी-स्त्री. पाणकापड पहा. ॰पिकलें, पाण- पीक-न. (कों.) ज्या पिकास सबंध पावसाळ्यांतील पावसाची जरूरी असतें तें पीक; पहिलें पीक; खरीप. याच्या उलट रब्बीचें पीक. [पाणी + पिकणें, पीक] ॰पिता-वि. १ फार पाणी खाल्लेलें; फाजील पावसानें नासलेलें (पिकाचें कणीस इ॰). २ (ल.) पचपचीत; पाणचट; पचकळ; मुळमुळीत (भाषण, कारभार, मस- लत, व्यवहार, गोष्ट, काम इ॰). ३ (झटकन् पाणी पिण्यासारखें) तलख; चलाखीचें; तडफेचें (कृत्य, कृति इ॰). ४ रोखठोक, चोख; स्पष्ट (जबाब, जाब, उत्तर इ॰). [पाणी + पिणें] ॰पिशी-स्त्री. फाजील पावसामुळें न भरलेलें, पोचट राहिलेलें धान्याचें कणीस. ॰पिसा-वि. पर्ज्यनातिरेकामुळें पोंचट, दाणें झडून गेलेलें, दाण्यांनीं न भरलेलें (कणीस इ॰). ॰पिसें-न. वेड; वेडगळपणा; भ्रमिष्टपणा. -शर. -मनको. -वि. वेडगळ; खुळचट. -मनको. [पाणी + पिसें] ॰पेटी-स्त्री. (स्थापत्यशास्त्र) पाण्यांत काम करतेवेळीं पाणी आंत येऊं नये म्हणून कामाभोंवतीं बसविलेली उभ्या फळ्यांची मुंढे मारून केलेली पेटी. (इं.) कॉफरडॅम्. -राको ३६/?/ [पाणी + पेटी] ॰पोई-स्त्री. १ वाटसरूंना, आल्यागेल्यांना पाणी पाजण्या- साठीं केलेली सोय; पन्हेरी. 'येइ भाई येथ पाही । घातलीसे पाणपोई ।' -यशोधन. २ अशा ठिकाणीं आल्यागेल्यांस पाणी देण्याची क्रिया. [पाणी + पोई] ॰फोल-न. (राजा.) भाताच्या फुलांवर पाऊस अतिशय पडल्यामुळें त्यामध्यें होणारें फोल, पोचटपणा; असलें न भरलेलें पोचट कणीस. [पाणी = पाऊस + फोल = पोचटपणा] ॰बुड-स्त्री. पाटाच्या पाण्यानें भिजणाऱ्या जमीनी- वरील कर. [पाणी + बुडणें] ॰बुड-पु. (कों.) पाणकोंबड्यासारखा एक पक्षी. [पाणी + बुड] ॰बुडा-ड्या, पाणिबुड्या- पाणबुड्यी-पु. १ मासे धरणारा कोळी. 'तरी माशालागीं भुलला । ब्राह्मण पाणबुडां रिघाला ।' -ज्ञा १६.४५१. २ पाण्याच्या तळाशीं असलेल्या वस्तू वर काढण्याकरितां पाण्यांत बुडी मारून बराच वेळ पाण्यांत राहण्याचा सराव ज्यास आहे तो; समुद्रांत बुडी मारून मोत्यें वर काढणारा. 'ते वाक्समुद्रिचे पाणबुडे । कीं सारासारसीमेचे गुंडे ।' -ऋ २४. ३ एक प्रकारचा पक्षी. [पाणी + बुडणें] ॰बुडी-स्त्री. १ पाण्यांत मारलेली बुडी; सुरकांडी. (क्रि॰ मारणें). २ पाण्याच्या पृष्ठभागाखालून संचार करणारी युद्धोप- योगी नौका. (इं.) सब्मरीन्. 'तें आरमार पाणबुड्यांच्या आघातामुळें इतउत्तर आपली पूर्वकामगिरी देण्यास कितपत समर्थ राहील....' -टि ३.३.३४८. [पाणी + बुडी] ॰बुडीत-वि. पुरानें, पावसानें जलमय झालेली (जमीन, पीक). [पाणी + बुडणें] ॰बोदाड-वि. (ना.) पाणथळ; दलदलीची (जमीन). [पाणी + बुडणें] ॰भर-भरजमीन-स्त्री. १ नवीनच खोदलेल्या विहि- रीच्या पाण्यानें, ओढ्याच्या, पाटाच्या पाण्यानें भिजणारी शेत जमीन. २ पुराच्या पाण्यानें भिजणारी जमीन. ३ असल्या जमीनीवरील सरकारी सारा. [पाणी + भरणें + जमीन] ॰भर जिराईत-स्त्री. पाटाच्या पाण्यानें भिजणारी परंतु कोरड म्हणून गणली गेलेली जमीन. [पाणभर + जिराईत] ॰भरणीचा- भरीत-भरिताचा-वि. १ पाटाचें पाणी मिळणारें (शेत, मळा इ॰). याच्या उलट कोरडवाय-वाही. २ पाटाच्या, विहिरीच्या पाण्यानें तयार झालेलें, काढलेलें (पीक इ॰). ॰भरा-वि. १ विहिरीच्या, पाटाच्या पाण्याची जरूरी असलेला (गहूं, जोंधळा इ॰). २ सदर पाण्यानें भिजणारी (जमीन). [पाणी + भरणें] ॰भऱ्या-भर्या-पु. पाणक्या; पाणी भरण्याचा धंदा करणारा. [पाणी + भरणें] ॰भाकरी-स्त्री. नदीच्या, तलावाच्या पाण्याच्या पृष्ठभागावर खापऱ्या फेकण्याचा मुलांचा खेळ; भाकरीचा खेळ. 'तें गलबत वाऱ्याच्या सोसाट्यांत सांपडून मुलांच्या पाणभाकरीच्या खेळांतल्या खापरीप्रमाणें भलतीकडे गेलें.' -कोरकि ७७. [पाणी + भाकरी] ॰मांजर-न. मांजरासारखा एक जलचर प्राणी. [पाणी + मांजर] ॰मोट, पाणमोटली-की-मोटळी, पाण्याची मोट-स्त्री. प्रसूतीसमयीं गर्भ बाहेर पडण्यापूर्वी गर्भोदकानें भर- लेली गर्भाशयांतून बाहेर पडणारी पिशवी. (क्रि॰ येणें; पडणें; फुटणें; निघणें) [पाणी + मोट, मोटली = चामड्याची मोठी पिशवी] ॰रस-पु. पूर्वीं रस काढून घेतलेल्या आंब्यांवर पाणी ओतून ते हालवून, चेंदून पुन्हां त्यांपासून काढलेला पाणचट रस. [पाणी + रस] ॰रहाट-पु. पाण्याच्या साहाय्यानें चालणारा रहाट; पाणचक्की. [पाणी + रहाट] पाणरॉ, पाणसर्प-पु. (गो.) पाण्यांत असणारी सापाची एक जात. [पाण + सर्प] पाणलव्हा-पाणलांव-पु. (कों.) पक्षिविशेष; यास निबुड असेंहि म्हणतात. [पाणी + लाव, लांव्हा = पक्षिविशेष] ॰लोट-पु. १ पाणी; वाहून जाईल असा उतार; पाणढाळ २ टेकडीची, डोंगराची उतरती बाजू; उतरण. ३ पाण्याचा जोराचा प्रवाह; लोंढा; झोत; धोत. ४ डोंगरमाथा; जेथें पाणी पडलें असतां तेथें न थांबतां दोहोंबाजूंस वाहून जातें अशी डोंगर माथ्याची धार. उदा॰ सह्याद्रीचा पाणलोट. [पाणी + लोट] ॰वटा-ठा, पाणवथ-वथा-पु. नदी इ॰कांवर गांवचे लोक जेथें पिण्यासाठीं पाणी भरणें, वस्त्रें धुणें इ॰ क्रिया करतात तें ठिकाण. 'दिवसा पाणवठा म्हणुनियां रात्र आम्ही ही धरली ।' -रासक्रिडा १२. 'पौलपट्टणीं येऊनि शुद्ध । पाणवथीं बैसला ।' -नव १८.४३. [पाणि + वर्त्तिकः-वटा] म्ह॰ बारा कोसांवरचा पाऊस, शिंवेचा राऊत, पाणवठ्याची घागर बरोबर गांवांत येतात. ॰वड-स्त्री. पाण्याचे रांजण, घागरी, डेरे इ॰ भरून ठेवण्यासाठीं (घरांत) केलेला ओटा, ओटली. [पाणी + ठाव] पाणवडा- वाडा-पु. पाणवठा पहा. 'क्लेशगांविंचा उकरडां । भवपुरिचां पानवाडां ।' -राज्ञा १६.४०५. [पाणि + वर्त्तिकः] पाणवसा-पु. (कों.) गाई, म्हशी इ॰ गुरांच्या जीवनास हेतुभूत असणारें (गांवचें) पाणी, गवत इ॰ समुच्चयानें; पाणसा. [पाणी + वास] ॰वळ-न. (कों.) पावसाळ्यानंतर कांहीं काळपर्यंत जींत ओलावा टिकून राहतो अशी जमीन; पाणथळ अर्थ १ पहा. २ -वि. बेचव; पाणचट. पाणचट अर्थ १ पहा. [पाणी + ओल] ॰वाट-स्त्री. १ पाणी वाहून जाण्यासारखा उतार; सखल पृष्ठभाग; ओहळ; पाणलोट. 'पाणी पाणवाटें जैसें । आपणचि धांवे ।' -दा ७.९.११. २ पाण्याची वाट. [पाणी + वाट] ॰वारू-पु. (प्राचीन पौराणिक कथांत रूढ) होडी; नाव. [पाणी + वारू = घोडा] ॰शाई- स्त्री. तारस्वार काढण्याकरितां मृदंग इ॰कास लोहकीट इ॰काच्या लुकणाचा, शाईचा देतात तो पातळ थर; याच्या उलट भरशाई. [पाणी + शाई] ॰शेंग-स्त्री. (ल.) मासळी. [पाणी + शेंग] ॰शोष-पु. पाणपोस पहा. [पाणी + सं. शोष = सुकणें] ॰सरकी- स्त्री. पाणसर्‍याचें काम, हुद्दा. पाणसरा पहा. [पाणसरा] ॰सरडें- न. पाण्यांत असणारी एक निर्विष सापाची जात. [पाण + सरडा] ॰सरडें-न. रहाटाची माळ सरूं नये म्हणून बसवितात तें प्रति- बंधक लांकूड. [पाणी + सरा = आडवीतुक्ई] ॰सरा-पु. डोंगराच्या घाटांतील वंशपरंपरागतचा जकातदार. याला वतन व ठराविक हक्क असत. घाटदुरुस्तीचें काम याच्याकडे असे. [पाणी + सरणें ?] ॰सळ-साळ-स्त्री. १ (गवंड्याचा धंदा) बांधकाम इ॰ सम- पातळींत आहे कीं नाहीं हें पाहण्याचें गवंड्याचें साधन; साधणी. (इं.) लेव्हल् बॉटल. २ समपातळी. 'भिंतीचें बांधकाम थराचें असेल तर भिंतीच्या प्रत्येक १८ इंच उंचीस माथा पाणसळींत आणावा व त्यावर पातळ चुन्याचा रद्दा करून घालावा.' -मॅरट १४. ३ पाणी वाहून जाईल असा उतार. [पाणी + सळ] पाणसा-पु. गुराढोरांच्या जीवनोपयोगी असें (एखाद्या ठिका- णचें) गवत व पाणी; पाणवस. 'ह्या गांवचा पाणसा गुरांस मानवत नाहीं.' ॰साप-पु. पाण्यांत असणारी सर्पाची जात. [पाणी + साप] ॰सापूड-स्त्री. घर इ॰कांच्या छपराच्या खालच्या बाजूस वाशांच्या टोंकांजवळ कामट्यांच्या, रिफांच्या, ओंबणाच्या शेवटीं बांधतात ती जाड कामटी; सापूड. [पाणी + सापूड] ॰सासरा-पु. (विनो- दानें) जांवयाच्या भावानें आपल्या भावाच्या सासर्‍यास विनोदानें, थट्टेनें उल्लेखण्याची संज्ञा. जांवयाच्या भावास पाणजांवई असें थट्टेनें म्हणतात त्याप्रमाणेंच हाहि शब्द आहे. ॰सासू-स्त्री. पाण- जांवयानें स्वतःच्या भावाच्या सासूस थट्टेनें उल्लेखण्याची संज्ञा. [पाणी + सासू] ॰साळ-वि. (क्व.) समपातळींत असलेली (जमीन इ॰) [पाणसळ] ॰साळ करणें-जमीन इ॰ समपातळींत आहे कीं नाहीं तें पाहणें. ॰साळ-स्त्री. प्रवासी, वाटसरू इ॰कांना पाणी पुरविण्याच्या सोयीकरतां रस्त्याच्या बाजूस बांधलेली छपरी इ॰; पाणपोई. [पाणी + सं. शाला = घर] ॰साळ, पाण- सळी भात-स्त्रीन. पाटच्या, विहीरीच्या पाण्यावर केलेलें (मळा इ॰तील) भाताचें पीक. [पाणी + साळ] ॰सुरुंग-पु. समुद्रांतील आगबोटी इ॰कांचा नाश करण्याकरितां समुद्राच्या पृष्ठभागाखालीं योजून ठेवण्याचें सुरुंगासारखें आधुनिक युद्धो- पयोगी साधन. 'बंदरांत घातलेल्या पाणसुरुंगांनीं व पाण- बुड्यांनीं हें समुद्रावरील वर्चस्व पोखरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.' -टि ३.३.३५०. [पाणी + सुरुंग] ॰सोस, पाणशोष, पाणसोक-पु. १ ताप इ॰कांत पुनः पुनः लागणारी अतिशय तहान; घशास पडणारी कोरड. २ प्रकृतीला होणारा एक (पुनः पुनः तहान लागण्याचा) विकार. [पाणी + शोष = कोरडें पडणें, होणें] ॰सोळा-पु. दिवडाच्या जातीचा, बांड्या रंगाचा, पाण्यांत राहणारा एक निर्विष साप. -बदलापूर ३४७. पाणि- ढाळ-पु. १ ओहोटी. 'अनुरागाचा निरु ताउनी । पाणिढाळु ।' -ज्ञा ७.९९. २ पाण्याचा ओघ खालीं सोडून देणें. 'पाणिढाळु गिरीशें । गंगेचा केला ।' -ज्ञा १८.१६८८. [पाणी + ढाळणें] पाणीपद-न. (महानु.) तेजाचें स्थान; गांभीर्य; ढाळ. 'परि जाणतां उपहासावें । बोलांचें पाणिपद निहाळावें ।' -शिशु ३६५. [पाणी = तेज + पद = स्थान] पाणिपात्र-न. पाणी प्यावयाचें भांडें. 'एकें हरितलें पाणिपात्र । एकें नेलें पीठ पवित्र ।' -एभा २३.५२०. [पाणि + पात्र = भांडें] पाणिय(ये)डा-पु. (महानु.) पाणवठा. 'आत्मगंगेचां पाणियेडां । थोकला अज्ञान-सीहांचा दडा ।' -भाए १०६. [पाणी + वटा, ठाव] पाणियाडा-डें-ढें- पुन. १ पाण्याचा सांठा; तळें. 'सतरावियेचें पाणियाडें । बळिया- विलें ।' -ज्ञा ९.२१४. 'शुक्रें धरिलें पाणियाडें । अवर्षण पडे बहुकाळ ।' -भाराबाल १.७८. २ जलपात्र. -माज्ञा-कठिणशब्दांचा कोश. [पाणीवडा] पाणिलग-वि. पाण्याच्या सान्निध्यानें राहणारा. 'पाणिलगें हंसें । दोनी चारी सारसें ।' -ज्ञा ६.१७७. [पाणि + लग] पाणिवथा-पु. पाणवठा पहा. पाणिवैद्य-पु. (कों.) विषार इ॰ उपद्रवावर पाणी अभिमंत्रून देणारा वैद्य. [पाणि + वैद्य] पाणीकांजी-न. (व्यापक.) पाणी काढणें व भरणें इ॰ गृहसंबंधीं कामांविषयीं व्यापक अर्थीं योजावयाचा शब्द. [पाणी + कांजी] पाणीचोर-पु. पाणचोर पहा. 'जैसें पाणी चोराच्या द्वारीं । वरील रंध्र दाटिजे जरी ।' -विपू २.६६. [पाणी + चोर] पाणीटाळ-पु. ओहोटी. -हंको, -शर, -मनको. पाणिढाळ अर्थ १ पहा. [पाणी + ढाळ] पाणी तावणें-न. (ना.) आंघोळीचें पाणी तापविण्याचें भांडें किंवा जागा. [पाणी + तावणें] पाणी- दाम-पु. पाणीपट्टी. [पाणी + दाम = किंमत] पाणीदार-वि. १ ज्याच्या अंगीं चांगलें पाणी, तेज आहे असा (हिरा, रत्न, मोत्यें इ॰). २ तीक्ष्ण; चांगल्या धारेचें (शस्त्र इ॰). ३ तेजस्वी; स्वाभिमानी; रग, धमक इ॰कानीं युक्त (मनुष्य, पशु इ॰). [पाणी + फा. दार = युक्त] पाणीपट्टी-स्त्री. म्युनिसिपालिटी इ॰ स्थानिक संस्था नगरवासीयांकडून पाणीपुरवठ्याबाबत घेतात तो कर. 'म्युनिसिपालिटीनें पाणीपट्टी वाढविली.' -के १७.६.३०. [पाणी + पट्टी = कर] पाणीपण-न. पाण्याचा भाव. 'कां गंगा- यमुनाउदक । वोघबळें वेगळिक । दावि होऊनि एक । पाणीपणें ।' -ज्ञा १८.५२. [पाणी + पण = भाववाचक नामाचा प्रत्यय] पाणीपाऊस-पु. १ नद्या, तळीं, विहीरी इ॰कांना पाण्याचा पुरवठा करून देणारा पाऊस. 'पीकपाऊस आहे, पाणीपाऊस अझून नाहीं.' २ पाऊस, पीक इ॰; पाऊसपाणी. [पाणी + पाऊस] पाणीपिसा-वि. स्नान करणें, कपडे धुणें इ॰ पाण्याच्या व्यापारांचें ज्यास वेड आहे असा. पाणीपिसें पहा. 'एक राखे एक शंखे । एक ते अत्यंत बोलके । पाणीपिशीं झाली उदकें । कुश- मृत्तिकें विगुंतलीं ।' -एभा १४.२०९. [पाणी + पिसा = वेडा] पाणीभरा-वि. पाणभरा पहा. पाणीवळ-पु. पाण्यांतला मळ. 'तेणें बहुतीं जन्मीं मागिलीं । विक्षेपांचीं पाणिवळें झाडिलीं ।' -ज्ञा ६.४७१. पाणीशेणी-न. झाड-सारवण, पाणी भरणें इ॰ गृहसंबंधीं स्त्रीनें करावयाचीं कृत्यें समुच्चयानें. [पाणी + शेण] पाणेरा-रें-पुन. पाणी भरलेलीं भांडीं ठेवण्याकरितां केलेली चिरेबंदी ओटली. [पाणी] पाणोटा-ठा, पाणोथा-पु. १ पाणवठा पहा. २ (बे.) नदीचा उतार. [पाणी]

दाते शब्दकोश

तोंड

न. १ ज्यानें खातां वं बोलतां येतें तो शरीराचा अव- यव; मुख; वदन; तुंड. २ चेहरा; हनुवटीपासून डोक्यापर्यंत मस्तकाचा दर्शनी भाग. ३ (सामा.) (एखाद्या वस्तूचा) दर्शनी भाग; पुढचा-अग्रभाग; समोरील अंग. 'या ओझ्याच्या तोंडीं मात्र चांगल्या चांगल्या पेंढ्या घातल्या आहेत.' ४ (फोड, गळूं इ॰ कांचा) छिद्र पडावयाजोगा, छिद्रासारखा भाग; व्रणाचें मुख. यांतूनच पुढें पू, लस इ॰ वाहतात. ५ (कुपी, तपेली, लोटी इ॰ कांचें) पदार्थ आंत घालावयाचें भोंक; द्वार; मार्ग; मुख. ६ (एखाद्या विषयांत, शास्त्रांत, गांवांत, देशांत, घरांत) शिरकाव होण्याचा मार्ग; प्रवेशद्वार. 'ह्या घराचें तोंड उत्तरेस आहे.' ७ (ल.) गुरुकिल्ली. उदा॰ 'एखाद्या प्रांताचें, देशाचें किल्ला हें तोंड होय.' 'व्याकरण भाषेचें तोंड होय.' ८ (वारा इ॰कांची) दिशा; बाजू. ९ धैर्य; दम; उमेद; एखादें कार्य करण्याविषयींची न्यायतः योग्यता. १० एखाद्या पदार्थाचें ग्रहण किंवा त्या पदार्थाचा एखाद्या कर्याकडे विनियोग इ॰ कांचा आरंभ त्या पदार्थाच्या ज्या भागाकडून करि- तात तो भाग. 'भाकरीस जिकडून म्हटलें तिकडून तोंड आहे.' ११ (युद्ध, वादविवाद इ॰कांसारख्या गोष्टींची) प्रारंभदशा. 'वादास आतां कुठें तोंड लागलें.' १२ (सोनारी धंदा) हातोड्याच्या सगळ्यांत खालच्या बाजूस अडिश्रीच्या बुडासारखा जो भाग असतो तो. यानें ठोकलेला जिन्नस सारखा करून घेतात. १३ (सोनारी धंदा) कांबीस गोल आकार देतांनां तिचीं टोंकें जेथें जुळतात तो भाग. १४ (बुद्धिबळें) डाव सुरू करण्याचा प्रकार; मोहरा. 'वजीराच्या प्याद्याचें तोंड.' [सं. तुंड; प्रा. तोंड] (वाप्र.) ॰आटोपणें, सांभाळणें, आवरणें-जपून बोलणें; बोलण्याला आळा घालणें; अमर्याद भाषण, अभक्ष्यभक्षण यांपासून निवृत्त होणें. ॰आणणें- (आट्यापाट्यांचा खेळ) शेवटची पाटी खेळून जाऊन पुन्हां एक एक खेळत येणें; पाणी आणणें; लोण आणणें. ॰आंबट करणें- (एखाद्यानें) असंतुष्ट, निराशायुक्त मुद्रा धारण करणें. तोंड आहे कीं तोबरा-खादाड किंवा बडबड्या माणसास उद्देशून वापरावयाचा, 'किती खातोस' 'किती बोलतोस' या अर्थाचा वाक्प्रचार. ॰उतरणें-(निराशा, आजार इ॰ कांनीं) चेहरा म्लान होणें, सुकणें, फिका पडणें, निस्तेज होणें. ॰उष्टें करणें-(अन्नाचा) एखादा-दुसरा घांस, एक दोन घांस खाणें; जेवणाचें नुसतें नांव करणें. ॰करणें-बडबड, वटवट, बकबक करणें; उद्धटपणानें, निर्लज्ज- पणानें बोलणें. ॰करून बोलणें-निर्लज्जपणें, आपला (लहान) दर्जा सोडून बोलणें. ॰काळें करणें-(उप.) एखादा ठपका, तोहमत अंगावर आल्यामुळें निघून, पळून, निसटून जाणें; हातावर तुरी देणें; दृष्टीस न पडणें (केव्हां केव्हां तोंड हा शब्द वगळला तरी चालतो. जसें:-त्यांनीं काळें केलें). ॰गोड करणें-१ (एखाद्याला) लांच देणें; खूष करणें. २ मेजवानी देणें; गोड खावयास घालणें. ॰गोरेंमोरें करणें-(कोणी रागें भरल्यामुळें, मनास वाईट वाटल्यामुळें) निराशेची, लाजलेपणाची मुद्रा धारण करणें. ॰घालणें-(दोघे बोलत असतां तिसर्‍यानें) संबंध नसतां मध्येंच बोलणें. ॰घेऊन येणें-एखाद्यानें एखाद्यावर सोंपविलेलें काम न करतां त्यानें तसेंच परत येणें. 'असें सर्वांनीं न करावें. जो मामलेदार असें करून तोंड घेऊन येईल त्याचें मुखावलोकन न करितां फिरोन सेवा न सांगतां त्यास घरींच बसवावें.' -मराआ २९. ॰घेणें-१ बोंबलत सुटणें; ताशेरा झाडणें; बोंबलपट्टी करणें. २ तोंडांतून लाल गळावी म्हणून पारा इ॰ तोंड आणणारीं औषधें घेणें. तोंड देणें पहा. 'मी वैद्याकडून तोंड घेतलें आहें.' तोंडचा-वि. १ विरुद्ध, उलट दिशेचा; समोरून येणारा (वारा, ऊन, भरती इ॰). २ ज्याची कर्तबगारी केवळ तोंडांतच, बोल- ण्यांतच आहे, क्रियेंत दिसून येत नाहीं असा. 'तोंडचा शिपाई- कारकून-सुग्रण-खबरदार.' ३ तोंडानें सांगितलेला, निवेदन केलेला; तोंडीं केलेला (व्यवहार, हिशेब, पुरावा इ॰). याच्या उलट लेखी. तोंडचा, तोंडींचा घास काढणें-हिरून घेणें-१ (एखा- द्याची) अगदीं आटोक्यांत आलेली वस्तु, पदरीं पडावयास आलेला लाभ हिसकावून घेणें. २ (एखाद्याच्या) अन्नावर पाणी पाडणें; अन्नांत माती कालविणें; पोटावर पाय देणें. तोंडचा-तोंडींचा घांस देणें-(ल.) (एखाद्यास) अतिशय प्रेमानें, ममतेनें वाग- विणें; प्रसंगविशेषीं आपण उपाशी राहून दुसर्‍यास खावयास देणें. तोंडचा गोड आणि हातचा जड-बोलण्यांत गोड व अघळ- पघळ, पण प्रत्यक्ष पैशाची मदत करण्यांत पूज्य. तोंडचा चतुर- वि. बोलण्यांत पटाईत; वाक्पटु. तोंडचा जार-पु. नुकत्याच जन्मलेल्या मुलाच्या तोंडांतील फेंस; चिकटा; ओंठावरचा जार; जन्मप्रसंगींचा तोंडावरचा पातळ पापुद्रा (विशेषतः तुझ्या, त्याच्या तोंडाचा जार वाळला नाहीं. = तूं, तो अजून केवळ बालक आहेस.' अशा वाक्यांत उपयोग). तोंडचा नीट-वि. १ बोलून भला, चांगला; बोलकाचालका; सौजन्ययुक्त. २ युक्तायुक्त विचार करून बोलणारा. ३ हजरजबाबी; अस्खलित बोलणारा. तोंडचा फटकळ-वि. शिवराळ; उघडतोंड्या; अश्लील, शिवराळ भाषण करणारा. तोंडचा रागीट-वि. जहाल; तिखट; कडक भाषण करणारा. तोंडचा शिनळ-वि. १ इष्कबाज, फंदी म्हणून नांव मिळविण्याची इच्छा करणारा; स्त्रियांची खोटी खुषमस्करी करणारा; स्त्रियांच्या कृपेची खोटीच फुशारकी मारणारा. २ निरर्गल व अश्लील भाषण करणारा; शिवराळ. तोंड(डा)ची गोष्ट-स्त्री. सहजसाध्य, अतिशय सोपी गोष्ट, काम. 'वाघ मारणें तोंडची गोष्ट नव्हे.' तोंड चुकविणें-हातून एखादा अपराध घडला असतां कोणी रागें भरेल या भीतीनें, काम वगैरे टाळण्यासाठीं चुकारतट्टू- पणानें एखाद्यापासून आपलें तोंड लपविणें; दृष्टीस न पडणें; छपून असणें. ॰चे तोंडीं-क्रिवि. प्रत्यक्षाप्रत्यक्ष; तोंडानें; बोला- चालीनें. ॰चे तोंडीं व्यवहार-केवळ तोंडानें बोलून, बोलाचा- लीनें झालेला, होणारा व्यवहार, धंदा. याच्या उलट लेखी व्यव- हार. ॰चें पायचें-न. (कों.) गुरांच्या तोंडास व पायांस होणारा रोग. ॰चे हिशेब-पुअव. कागदांवर आंकडेमोड न करितांमनां- तल्यामनांत कांहीं आडाख्यांच्या; मदतीनें करावयाचे हिशेब. तोंडचें तोंडावरचें पाणी पळणें; उडणें, तोंड कोरडें पडणें-१ (भीतीमुळें) चेहरा फिका पडणें; बावरून,घाबरून जाणें. २ (भीति इ॰ कांमुळें) तोंडांतील ओलावा नाहींसा होणें. तोंड टाकणें-टाकून बोलणें-१ (क्रोधावेशानें) अप शब्दांचा वर्षाव करणें; निर्भर्त्सना करून बोलणें; खरडपट्टी काढणें; अद्वातद्वा बोलणें. 'तूं नोकर-माणसांवर उगीच तोंड टाकलेंस.' २ (घोडा इ॰ जनावरानें) चावण्यासाठीं तोंड पुढें करणें. 'ह्या घोड्याला तोंड टाकण्याची भारी खोड आहे, ती घालविली पाहिजे.' ॰ठेचणारा-फाडणारा-वि. (एखाद्या) उद्धट, बडबड्या माण- सास गप्प बसविण्याची हातोटी ज्यास साधली आहे असा; उद्दामपणानें, गर्वानें बोलणार्‍या व्यक्तीस रोखठोक उत्तर देऊन चूप बसविणारा. [तोंड + ठेचणें] ॰तोडणें-(ना.) एखादी वस्तु मिळ- विण्याकरितां एखाद्याच्या पाठीस लागणें; त्याच्यापुढें तोंड वेंगा- डणें. ॰दाबणें-लांचलुचपत देऊन (एखाद्याचें) तोंड बंद करणें; (एखाद्यास) वश करणें; गप्प करणें. ॰दाबणारा-वि. लांच देऊन (एखाद्या) प्रतिकूल व्यक्तीस वळविणारा; गप्प बसविणारा. [तोंड + दाबणें = बंद करणें] ॰दाबी-स्त्री. (एखाद्यानें) गुप्त बातमी फोडूं नये म्हणून, प्रतिकूल बोलूं नये म्हणून (त्यास) लांच देऊन त्याचें तोंड दाबण्याची, वश करण्याची क्रिया. 'तो गांवकाम- गारांची तोंडदाबी करतो.' -गुजा २१. [तोंड + दाबणें = बंद करणें] ॰दिसणें-एखाद्याची केलेली निर्त्भर्त्सना दुसरी बाजू न कळतां लोकांच्या नजरेस येणें व आपणच वाईट ठरणें (पण ज्याची निर्भर्त्सना केली असेल त्याचें वर्तन सुधारण्याची आशा नसणें ). 'मी तुला रागें भरलों म्हणजे माझें तोंड मात्र दिसेल, पण तूं आपला आहे तसाच राहणार.' ॰देणें- १ पारा वगैरे देऊन तोंडाच्या आंतील त्वचा सुजविण; तोंड आणविणें. 'वैद्य- बोवा म्हणाले कीं त्याला तोंड दिलें आहे.' २ सैन्याच्या अग्रभागीं राहून शत्रूवर हल्ला करणें. ३ (एखाद्याचा) प्रतिपक्षी होऊन राहणें; लढावयाला सिद्ध होणें. ४ (आट्यापाट्यांचा खेळ शेवटची पाटी खेळून परत येणार्‍या गड्याकडे पाटी धरणारानें तोंड फिरविणें. ५ एखाद्या गोष्टीला न भितां तींतून धैर्यानें पार पडण्याची तयारी ठेवणें. ॰धरणें-१ अन्नसेवन करण्याची तोंडाची शक्ति आजार वगैरे कारणांमुळें नाहींशी होणें. 'त्याचें तोंड धरलें आहे, त्याला चमच्याचमच्यानें दुध पाजावें लागतें.' २ (एखा- द्याची) बोलण्याची शक्ति नाहींशी करणें. ३ (एखाद्याला आपल्या) तावडींत, कबजांत आणणें. 'मी त्याचें तोंड धरलें आहे, तो आतां काय करणार !' ॰धुवून येणें-(उप.) एखाद्याची विनंति कधींहि मान्य होणार नाहीं असें म्हणून फेटाळून लावतांना योजण्याचा तिरस्कारदर्शक वाक्प्रचार. ॰निपटणें-(आजार, उपवास इ॰ कारणांमुळें एखाद्याचे) गाल खोल जाणें, चेहरा सुकणें. 'महिनाभर हें मूल तापानें आजारी होतें, त्याचें तोंड पहा कसें निपटलें आहे तें.' ॰पडणें-१ सुरवात होणें. 'लढाईस तोंड पडलें.' २ (गळूं इ॰ कांस) छिद्र पडणें; फुटणें; वाहूं लागणें. ॰पसरणें-वेंगाडणें-१ खिन्नपणाची, केविलवाणी मुद्रा धारण करणें. २ हिनदीनपणानें याचना करणें. ॰पाघळणें-१ न बोला- वयाची गोष्ट कोणाएकापाशीं बोलून टाकणें; बडबडणें. २ (ल.) गुप्त गोष्ट बाहेर फोडणें, फुटूं देणें. ॰पाडणें-एखादें कोडें सोड- विण्यास, वेढा फोडण्यास प्रारंभ करणें; भांडणास सुरवात करणें. ॰पाहणें-१ (एखाद्याच्या) आश्रयाची, मदतीची अपेक्षा करून असणें. 'आम्ही पडलों गरीब, म्हणून आम्हांला सावकाराचीं तोंडें पाहण्याची पाळी वारंवार येते.' २ (एखाद्यानें) स्वतःच्या शक्तीचा, कर्तुत्वाचा अजमास करणें. 'तूं असें करीन म्हणतोस, पण आधीं आपलें तोंड पहा !' ३ बोलणाराचें भाषण नुसतें ऐकणें, पण त्यानें सांगितलेलें करावयास किंवा केलेला बोध अनु- सरावयास प्रवृत्त न होतां स्वस्थ बसून राहणें. 'म्हणती हाणा, मारा, पाडा, घ्या, काय पाहतां तोंडा ।' -मोद्रोण ३.१२५. ॰पाहात-बसणें-काय करावें, कसें करावें या विवंचनेंत असणें. ॰पिटणें-बडबड करणें. 'पश्चिमद्वारींचें कवाड । सदा वार्‍यानें करी खडखड । तैशी न करी बडबड । वृथा तोंड पिटीना ।' -एभा १०.२३१. ॰फिरणें-१ आजारानें, पदार्थाच्या अधिक सेवनानें तोंडाची रुची नाहींशी होणें; तोंड वाईट होणें. २ तोंडांतून शिव्यांचा वर्षाव होऊं लागणें. 'तो रागावला म्हणजे कोणावर त्याचें तोंड फिरेल ह्याचा नेम नाहीं.' ॰फिरविणें-१ तोंडाची चव नाहींशी करणें. २ शिव्यांचा वर्षाव करीत सुटणें. 'तो रागावला म्हणजे तुमच्यावर देखील तोंड फिरवावयाला कचर- णार नाहीं.' ३ वितळत असलेला किंवा तापविला जात अस- लेला धातु इ॰ कानें) रंगामध्यें फरक दाखविणें, रंग पाल- टणें. 'ह्या तांब्यानें अद्याप तोंड फिरविलें नाहीं, आणखी पुष्कळ आंच दिली पाहिजे.' ४ दुसर्‍याकडे पाहणें; विशिष्ट गोष्टी- कडे लक्ष्य न देतां इतर गोष्टींकडे प्रवृत्ति दाखविणें. ५ गतीची दिशा बदलणें; दुसर्‍या दिशेला, माघारें वळणें. ॰फुटणें-१ थंडीमुळें तोंडाची बाह्य त्वचा खरखरीत होणें, भेगलणें. २ (एखाद्याची) फजिती उडणें; पत नाहींशी होणें; नाचक्की होणें; अभिमान गलित होण्याजोगा अपमान, शिक्षा इत्यादि होणें. ॰बंद करणें-१ जीभ आवरणें; जपून बोलणें. २ (एखाद्याला) लांच देऊन गप्प बसविणें, वश करून घेणें. ॰बंदावर राखणें- खाण्याला किंवा बोलण्याला आळा घालणें. 'तूं आपलें तोंड बंदावर राखिलें नाहींस तर अजीर्णानें आजारी पडशील.' ॰बांधणें-लांच देऊन (एखाद्याचे) तोंड बंद करणें; (एखाद्यानें) गुप्त गोष्ट फोडूं नये म्हणून पैसे देऊन त्यास गप्प बसविणें. ॰बाहेर काढणें-१ तोंड दाखविणें; राजरोसपणें समाजांत हिंडणें (बहुधां निषेधार्थी प्रयोग). 'तुरुंगांतून सुटून आल्यावर त्यानें आज दोन वर्षांत एकदांहि तोंड बाहेर काढलें नाहीं.' २ फिरण्यासाठीं, कामकाजासाठीं घराबाहेर पडणें. ॰बिघडणें-तोंड बेचव होणें; तोंडास अरुचि उत्पन्न होणें. विटणें. -॰भर-भरून बोलणें- भीड, संकोच, भीति न धरतां मनमोकळेपणानें भरपूर, अघळपघळ बोलणें; दुसर्‍याचें आणि आपलें समाधान व्हावयाजोगें अघळपघळ बोलणें. ॰भरून साखर घालणें-(एखाद्याचें) तोंड साखरेनें भरणें; (एखाद्याच्या) कामगिरीबद्दल, विजयाबद्दल संतोषादाखल त्याचें तोंड साखरेनें भरणें; (एखाद्याच्या) कामगिरीबद्दल गोड, भरपूर मोबदला देणें. ॰मागणें-(आट्यापाट्यांचा खेळ) लोण घेऊन परत जातांना पाटीवरील गड्यास आपणाकडे तोंड फिर- विण्यास सांगणें. तोंड मागितल्यावर पाटीवरील गडी आपलें तोंड फिरवितो त्यास 'तोंड देणें' म्हणतात. ॰माजणें-१ मिष्टान्न खावयाची चटक लागल्यानें साध्या पदार्थाबद्दल अरुचि उत्पन्न होणें. २ शिव्या देण्याची, फटकळपणानें बोलण्याची खोड लागणें. ॰मातीसारखें-शेणासारखें होणें-(आजारानें) तोंडाची चव नाहींशी होणें; तोंड विटणें, फिरणें; अन्नद्वेष होणें. ॰मिचकणें- दांत, ओंठ खाणें. ॰येणें-१ तोंडाच्या आंतल्या बाजूच्या त्वचेस फोड येऊन ती हुळहुळी होणें व लाळ गळूं लागणें. २ (कर.) लहान मूल बोलूं लागणें. 'आमच्या मुलाला तोंड आलें आहे.' = तो बोलावयास लागला आहे. ॰रंगविणें-१ विडा खाऊन ओंठ तांबडे लाल करून घेणें. २ (ल.) (एखाद्याचें थोबाड) थोबाडींत मारून लाल- भडक करून सोडणें. ॰लागणें-(लढाई, वादविवाद, अंगीकृत कार्य इ॰ कांस) सुरवात होणें. 'तेव्हां युद्धास तोंड लागलें.' -इमं २९०. ॰लावणें-१ (वादविवाद इ॰ कांस) सुरवात करणें. २ प्यावया- साठीं एखादें पेय ओंठाशीं नेणें. ३ ॰वाईट करणें-निराशेची मुद्रा धारण करणें. ॰वाईट होणें-१ तोंडावर निराशेची मुद्रा येणें. २ (ताप इ॰ कांमुळें) तोंडास अरुचि येणें. ॰वांकडें करणें-१ वेडावून दाखविणें. २ नापसंती दर्शविणें. ॰वाजविणें-एकसारखें बोलत सुटणें; निरर्थक बडबड करणें; बकबकणें; वटवट करणें; भांडण करणें. ॰वासणें-१ निराशेनें, दुःखानें तोंड उघडणें व तें बराच वेळ तसेंच ठेवणें. २ याचना करण्यासाठीं तोंड उघडणें, वेंगाडणें. ॰वासून पडणें-शक्तीच्या क्षीणतेमुळें, उत्साह, तेज, वगैरे नष्ट झाल्यामुळें, गतप्राण झाल्यामुळें आ पसरून पडणें. 'तो पडला सिंहनिहमत्तद्विपसाचि तोंड वासून ।' -मोगदा ५.२५. ॰वासून बोलणें-अविचारानें बोलणें. 'ऐसें स्वसख्यांपासीं कां गे वदलीस तोंड वासून ।' -मोउद्योग १३.२०५. ॰विचकणें-दीन मुद्रेनें आणि केविलवाण्या स्वरानें याचना करणें. ॰वेटा(डा)विणें- (काव्य) (एखाद्यास) वेडावून दाखविण्यासाठीं त्याच्यापुढें तोंड वेडेंवाकडें करणें. ॰शेणासारखें पडणें-(लाजिरवाणें कृत्य केल्यानें) तोंड उतरणें; निस्तेज होणें; काळवंडणें. ॰संभाळणें- जपून बोलणें; जीभ आवरणें; भलते सलते शब्द तोंडांतून बाहेर पडूं न देणें; अमर्याद बोलण्यास आळा घालणें. ॰सुटणें- चरांचरां, फडाफडां, अद्वातद्वा बोलूं लागणें. ॰सुरू होणें-बड- बडीला, शिव्यांना सुरवात होणें. ॰सोडणें-१ फडांफडां, अद्वातद्वा बोलूं लागणें; अमर्याद बोलणें. २ आधाशासारखें खात सुटणें; तोंड मोकळें सोडणें. ॰हातीं-हातावर धरणें-तोंडे सोडणें (दोन्ही अर्थीं) पहा. तोंडाचा खट्याळ-फटकळ-फटकाळ-फटकूळ-वाईट-शिनळ-वि. शिवराळ; तोंडाळ; अश्लील बोलणारा. तोंडाचा खबरदार-बहादर-बळकट-वि. बोलण्यांत चतुर, हुषार; बोलण्याची हातोटी ज्याला साधली आहे असा. -तोंडाचा गयाळ, तोंडगयाळ-वि. जिभेचा हलका; चुर- चोंबडा; लुतरा; बडबड्या; ज्याच्या तोंडीं तीळ भिजत नाहीं असा. तोंडाचा गोड-वि. गोड बोलणारा; गोडबोल्या. म्ह॰ तोंडचा गोड हाताचा जड = गोड व अघळपघळ भाषण करणारा पण प्रत्यक्ष कांहींहि मदत, पैसा न देणारा. तोंडाचा जड-वि. रेंगत बोलणारा; फार थोडें बोलणारा; अस्पष्ट भाषण करणारा; तोंडाचा तिखट-वि. खरमरीत, स्पष्ट, झोंबणारें, कठोर भाषण करणारा. तोंडाचा तोफखाना सुटणें-(एखाद्याची) अद्वातद्वा बोल- ण्याची क्रिया सुरू होणें; शिव्यांचा वर्षाव होऊं लागणें. तोंडाचा पट्टा सुटणें-चालणें-अद्वातद्वा बोलणें; शिव्यांचा भडिमार सुरू होणें; तोंडाचा पट्टा सोडणें-(एखाद्यानें) शिव्यांचा भडिमार सुरू करणें; जीभ मोकळी सोडणें; (एखाद्याची) खरडपट्टी आरंभिणें. तोंडाचा पालट-पु. रुचिपालट; तोंडास रुचि येईल असा अन्नांत केलेला फेरबदल; अन्नांतील, खाण्यांतील फरक, बदल. तोंडाचा बोबडा-वि. बोबडें बोलणारा; तोतरा. तोंडाचा मिठा-वि. गोडबोल्या; तोंडाचा गोड पहा. तोंडाचा हलका- वि. चुरचोंबडा; भडभड्या; विचार न करितां बोलणारा; फटकळ. तोंडाचा हुक्का होणें-(व.) तोंड सुकून जाणें. तोंडाची चुंबळ-स्त्री. दुसर्‍यास वेडावून दाखविण्याकरितां चुंबळीसारखी केलेली ओठांची रचना; वांकडें तोंड. तोंडाची वाफ दघडणें- १ मूर्खास उपदेश करतांना, निरर्थक, निरुपयोगी, निष्फळ भाषण करणें. २ ज्यावर विश्वास बसणार नाहीं असें भाषण करणें; मूर्खपणानें बोलणें; वल्गना करणें; बाता मारणें. (या वाक्प्रचारांत दवडणें बद्दल खरचणें गमविणें, फुकट जाणें, घालविणें, काढणें इ॰ क्रियापदेंहि योजतात). तोंडाचें बोळकें होणें-(म्हातारपणामुळें) तोंडां- तील सर्व दांत पडणें. तोंडाचें सुख-न. तोंडसुख पहा. (वरील सर्व वाक्प्रचारांत तोंडाचा या शब्दाऐवजीं तोंडचा हा शब्दहि वापरतात). तोंडांत खाणें, मारून घेणें-१ गालांत चपराक खाणें; मार मिळणें. २ पराभूत होणें; हार जाणें. ३ फजिती झाल्या- नंतर शहाणपणा शिकणें; नुकसान सोसून धडा शिकणें; बोध मिळविणें. तोंडांत जडणें-थोबाडींत, गालांत बसणें (चपराक, थप्पड इ॰). तोंडांत तीळभर न राहणें-अगदीं क्षुद्र अशी गुप्त गोष्टहि पोटांत न ठरणें; कोणतीहि लहानसहान गोष्ट गुप्त ठेवूं न शकणें. तोंडांत तोंड घालणें-१ (ल.) प्रेम, मैत्री इ॰कांच्या भावानें वागणें; मोठ्या प्रेमाचा, मित्रपणाचा आविर्भाव आणून वागणें. २ एकमेकांचें चुंबन घेणें. तोंडांत देणें-(एखाद्याच्या) थोबाडींत मारणें; गालांत चपराक मारणें; तोंडांत बोट घालणें-(ल.) आश्चर्यचकित, थक्क होणें; विस्मय पावणें. तोंडांत भडकावणें-तोंडांत देणें पहा. तोंडांत माती घालणें-खाण्यास अन्न नसणें; अतिशय हाल, कष्ट सोसावे लागणें. तोंडांत माती पडणें-१ (एखाद्याची) उपा समार होणें. २ मरणें. तोंडात शेण घालणें-(एखाद्याची) फजिती करणें; (एखाद्यास) नांवें ठेवणें; खरडपट्टी काढणें. तोंडांत साखर असणें-(गो.) (एखाद्याचें) तोंड, वाणी गोड असणें; गोड बोलत असणें. तोंडांत साखर घालणें-१ तोंड भरून साखर घालणें पहा. २ (उप.) तोंडांत शेण घालणें. 'सावित्री- बाईच्या तोंडांत लोक जेव्हां फारच साखर घालीत, तेव्हां तिनें दोन तीन जुनेरीं एकत्र शिवून जानकीबाईला द्यावी.' -रंगराव. तोंडांत साखर पडणें-(एखाद्याला) आनंदाचा प्रसंग, दिवस येणें. तोंडांतून ब्र काढणें-(तोंडांतून) अधिक-उणें अक्षर काढणें, उच्चारणें. 'आंतल्याआंत चूर होऊन मेलें पाहिजे, तोंडां- तून ब्र काढण्याची सोय नाहीं.' -विकारविलसित. तोंडानें पाप भरणें, तोंडें पाप घेणें-लोकांचीं पातकें उच्चारणें; लोकांचे दोष बोलून दाखविणें; वाईट बोलण्याची हौस यथेच्छ पुरवून घेणें; लोकांचीं पापें उच्चारून जिव्हा विटाळणें. 'कैसीं वो मानुसें । सपाइनि परंवंसें । तोंडे पाप घेती कांइसें । वायां वीण ।' -शिशु २१६. तोंडापुढें-क्रिवि. अगदीं जिव्हाग्रीं; मुखोद्गत. तोंडा- पुरता, तोंडावर गोड-वि. मधुर पण खोटें बोलणारा; दुतोंड्या; वरवर गोड बोलणारा व आंतून कपटी असलेला; उघडपणें प्रिय भाषण करणारा व मनांत निराळेच असणारा. ताडापुरता मांडा-पु. १ भूक भागेल एवढीच पोळी. २ (ल.) जेमतेम गरज भागेल एवढाच जरूर त्या वस्तूचा पुरवठा. तोंडार मारप- (गो.) (एखाद्याच्या) पदरांत चूक बांधणें; वरमण्यासारखें उत्तर देणें. तोंडार ल्हायो उडप-(गो.) फार जलद, अस्ख- लित बोलणें; लाह्या फुटणें. तोंडाला काळोखी आणणें- लावणें-बेअब्रू, नापत करणें. तोंडाला टांकी दिलेली असणें-देवीच्या खोल वणांनीं तोंड भरलेलें असणें; तोंडावर देवीचे वण फार असणें. तोंडाला पाणी सुटणें-(एखादी वस्तु पाहून तिच्यासंबंधीं) मोह उत्पन्न होणें; हांव सुटणें. तोंडाला पानें पुसणें-फसविणें; चकविणें; छकविणें; भोळसाविणें; भोंदणें; तोंडा- वरून हात फिरविणें. 'त्याच्यावर देखरेख करावयाला चार माणसें होतीं, पण त्यानें सर्वांच्या तोंडाला पानें पुसून आपला डाव साधला.' तोंडाला फांटा फुटणें-मूळ मुद्दा सोडून भलतेंच बोलत सुटणें; हवें तसें अमर्याद भाषण करूं लागणें. तोंडावर-क्रिवि. १ समक्ष; डोळ्यांदेखत. २ (ल.) निर्भयपणें; भीड न धरतां. 'मी त्याच्या तोंडावर त्याला लुच्चा म्हणण्यास भिणार नाहीं.' तोंडावर तुकडा टाकणें-(एखाद्यानें) गप्प बसावें, प्रतिकूल बोलूं नये म्हणून त्याला थोडेसें कांहीं देणें. तोंडावर-ला-तोंड देणें-१ (एखाद्यास) विरोध करणें; विरुद्ध बोलणें. २ (एखाद्यास) उद्धटपणानें, अविनयानें, दांडगेपणानें उत्तर देणें; उत्तरास प्रत्युत्तर देणें. तोंडा- वर तोंड पडणें-दोघांची गांठ पडून संभाषण, बोलाचाल होणें. तोंडावर थुंकणें-(एखाद्याची) निर्भर्त्सना, छीःथू करणें; धिक्कार करणें. तोंडावर देणें-तोंडांत देणें पहा. 'काय भीड याची द्या कीं तोंडावरी ।' -दावि ३०२. तोंडावर नक्षत्र पडणें-(एखाद्यानें) तोंडाळपणा करणें; शिवराळ असणें; नेहमीं अपशब्दांनीं तोंड भर- लेलें असणें. 'ह्याजकरिकां तोंडावर नक्षंत्र पडलेल्या पोरास म्या बोलविलें म्हणून हे मला शब्द लावीत नाहींत.' -बाळ २.१४२. तोंडावर पडप-(गो.) थोबाडींत (चपराक) बसणें, पडणें. तोंडावर पदर येणें-१ वैधव्य प्राप्त होणें. 'तिच्या तोंडावर पदर आला म्हणून ती बाहेर पडत नाहीं.' २ लज्जेनें तोंड लपविण्या- जोगी स्थिति होणें. तोंडावर मारणें-(एखाद्याला) पराभूत करणें. तोंडावर सांगणें-बोलणें-(एखाद्याच्या) समक्ष, निर्भीडपणें, बेडरपणें सांगणें, बोलणें. तोंडावरून-तोंडावर हात फिर- विणें-(एखाद्यास) गोड बोलून, फूसलावून, भुलथाप देऊन फस- विणें; भोंदणें; छकविणें. तोंडाशीं तोंड देणें-(हलक्या दर्जाच्या व्यक्तीनें वरिष्ठाशीं) आपला दर्जा विसरून, बरोबरीच्या नात्यानें, अविनयानें बोलणें, व्यवहार करणें. तोंडास काळोखी-स्त्री. मुखसंकोच; ओशाळगत; गोंधळून गेल्याची स्थिति; बेअब्रू; कलंक. तोंडास काळोखी, काजळी लागणें-(एखाद्याची) बेअब्रू, नाचक्की होणें; दुष्कीर्ति होणें; नांवाला कलंक लागणें. तोंडास काळोखी-काजळी लावणें-(एखाद्याचें) नांव कलंकित करणें; बेअब्रू करणें. 'सुनेनें माझ्या तोंडाला काळोखी लावली.' तोंडास कुत्रें बांधलेलें असणें-ताळतंत्र सोडून, अद्वातद्वा, अपशब्द बोलणें; शिव्या देणें. 'त्यानें तर जसें तोंडाला कुत्रेंच बांधलें आहे.' तोंडास खीळ घालणें-निग्रहपूर्वक, हट्टानें मौन धारण करणें. तोंडास तोंड-न. वादविवाद; वाग्युद्ध; हमरी- तुमरी; धसाफसी. -क्रिवि. समक्षासमक्ष; समोरासमोर; प्रत्यक्ष. तोंडास तोंड देणें-१ तोंडाशीं तोंड देणें पहा. २ मार्मिकपणें, खरमरीतपणें उत्तर देणें. तोंडास पाणी सुटणें-(एखाद्या- वस्तूबद्दल, गोष्टीबद्दल) लोभ, मोह उत्पन्न होणें; तोंडाला पाणी सुटणें पहा. 'पोर्तुगीज लोकांची बढती पाहून तिकडच्या दुसर्‍या साहसी लोकांच्या तोंडास पाणी सुटलें.' -बाजी. तोंडास तोंड न दिसणें-(पहांटेस) तोंड न ओळखतां येण्याइतका अंधेर असणें (झुंजमुंजु पहाटेविषयीं वर्णन करितांना हा वाक्प्रचार योजतात). 'अद्याप चांगलें उजाडलें नाहीं, तोंडास तोंड दिसत नाहीं.' तोंडास-तोंडीं बसणें-(श्लोक, शब्द इ॰) स्पष्ट, बिन- चूक, भरभर म्हणण्याइतका पाठ होणें. 'तो श्लोक दहा वेळां पुस्तकांत पाहून म्हण, म्हणजे तो तुझ्या तोंडीं बसेल.' तोंडास येईल तें बोलणें-विचार न करितां, भरमसाटपणानें वाटेल तें बोलणें; अद्वातद्वा, अपशब्द बोलणें. तोंडास-तोंडीं लागणें- १ (एखाद्याच्या) तोंडास तोंड देणें; उलट उत्तरें देणें. २ हुज्जत घालणें; वादविवाद करण्यास तयार होणें. (एखाद्याच्या) तोंडा- समोर-क्रिवि. १ (एखाद्याच्या) समक्ष; समोर; डोळ्यांदेखत. २ अगदीं मुखोद्गत; जिव्हाग्रीं. तोंडापुढें पहा. 'हा श्लोक माझ्या अगदीं तोंडासमोर आहे.' तोंडास हळद लागणें-(एखाद्यास) दोष देणें, नापसंती दर्शविणें अशा अर्थीं हा वाक्प्रचार योजितात. तोंडासारखा-वि. (एखाद्याची) खुशामत, स्तुति इ॰ होईल अशा प्रकारचा; एखाद्याच्या खुशामतीकरितां त्याच्या मतास जुळता. तोंडासारखें बोलणें-(एखाद्याची) स्तुति, खुशामत करण्या- करितां त्याच्याच मताची, म्हणण्याची री ओढणें; त्याचें मन न दुखवेल असें बोलणें. तोंडीं आणणें-देणें-(रोग्यास) लाळ गळण्याचें, तोंड येण्याचें औषध देऊन तोंड आणणें. तोंडीं- काढणें-१ ओकारी देणें; वांती होणें. २ (एखाद्यास त्यानें) केलेले उपकार बोलून दाखवून टोमणा मारणें. तोंडीं खीळ पडणें- तोंड बंद होणें; गप्प बसणें भाग पडणें. 'अवघ्या कोल्यांचें मर्म अंडीं । धरितां तोंडीं खीळ पडे ।' तोंडीं घास येणें-(एखा- द्यास) घांसभर अन्न मिळणें; चरितार्थाचें साधन मिळणें; पोटा पाण्याची व्यवस्था होणें. तोंडीं तीळ न भिजणें-१ (तापानें, संतापून ओरडण्यानें, रडण्यानें) तोंड शुष्क होणें, कोरडें पडणें. २ एखादी गुप्त गोष्ट मनांत न राहणें, बोलून टाकणें; तोंडीं तृण धरणें-(एखाद्यानें) शरण आलों. असें कबूल करणें; शरणागत होणें; हार जाणें (दांतीं तृण धरणें असाहि प्रयोग रूढ आहे). तोंडीं देणें-(एखाद्यास एहाद्या माणसाच्या, कठिण कार्याच्या) सपाट्यांत, तडाख्यांत, जबड्यांत, तावडींत लोटणें, देणें; हाल, दुःख सोसण्यास (एखाद्यास) पुढें करणें. तोंडीं-तोंडास पान- पानें पुसणें-(एखाद्यास) छकविणें; लुबाडणें; भोंदणें; अपेक्षित लाभ होऊं न देणें; स्वतःच्या पोळीवर तूप ओढून घेऊन दुसर्‍यास तोंड पहावयास लावणें. 'त्यानें आपल्या नळीचें वर्‍हाड केलें आणि सर्वांच्या तोंडीं पान पुसलें.' तोंडीं माती घालणें- (एखाद्यानें) अतिशय दुःखाकुल, शोकाकुल होणें. 'ऊर, माथा बडवून, तोंडीं माती घालूं लागली' -भाव ७५. तोंडीं येऊन बुडणें-नासणें-(एखादी वस्तु, पीक इ॰) अगदीं परिपक्वदशेस, परिणतावस्थेस येऊन, ऐन भरांत येऊन, नाहींशीं होणें, वाईट होणें. तोंडीं येणें-१ (पारा इ॰ औषधानें) तोंड येणें. २ ऐन भरांत, परिपक्व दशेस, पूर्णावस्थेस येणें. तोंडीं-रक्त, रगत लागणें-१ वाघ इ॰ हिंस्त्र पशूला माणसाच्या रक्ताची चटक लागून तो माणसावर टपून बसणें. २ (ल.) लांच-लुचपत खाण्याची चटक लागणें. तोंडीं लागणें-(एखाद्यास एखाद्या वस्तूची, खाद्याची चव प्रथमच कळून त्या वस्तूची त्यास) चटक लागणें; आवड उत्पन्न होणें. 'ह्याच्या तोंडीं भात लागला म्हणून यास भाकर आवडत नाहीं.' तोंडीं लागणें-१ (एखाद्याच्या) तोंडास तोंड देणें; उद्धटपणानें, आपला दर्जा विसरून उलट जबाब देणें. २ हुज्जत घालणें; वादविवादास प्रवृत्त होणें; तोंडास लागणें पहा. 'सुज्ञ आहेत ते दूषकांच्या तोंडीं लागत नसतात.' -नि. ३ (युद्ध, भांडण, इ॰कांच्या) आणीबाणीच्या ठिकाणीं, आघाडीस, अग्रभागीं असणें. तोंडीं लावणें-न. जेवतांना तोंडास रुचि आणणारा भाजी, चटणी इ॰ सारखा मधून मधून खावयाचा चमचमीत पदार्थ. तोंडीं लावणें-१ जेवतांना भाजी, चटणी इ॰ चम- चमीत पदार्थानें रुचिपालट करणें. 'आज तोंडीं लावावयाला भाजीबिजी कांहीं केली नाहीं काय ?' २ विसारादाखल पैसे देणें. तोंडें मागितलेली किंमत-स्त्री. (एखाद्या वस्तूची) दुकान- दारानें सांगितलेली व झिगझिग वगैरे न करितां गिर्‍हाइकानें दिलेली किंमत. तोंडें मानलेला-मानला-वि. (तोंडच्या) शब्दानें, वचनानें मानलेला (बाप, भाऊ, मुलगा इ॰); धर्माचा, पुण्याचा पहा. तोंडें वांकडीं करणें-वेडावून दाखविणें; वेडावणें. लहान तोंडीं मोठा घांस घेणें-१ (एखाद्यानें) आपल्या आवांक्या- बाहेरचें काम हातीं घेणें. २ (वडील, वरिष्ठ माणसांसमोर) न शोभेल असें, मर्यादा सोडून, बेअदबीनें बोलणें; वडील माणसांस शहाणपण शिकविणें. जळो तुझें तोंड-(बायकी भाषेंत) एक शिवी. स्त्रिया रागानें ही शिवी उपयोगांत आणतात. म्ह॰ १ तोंड बांधून (दाबून) बुक्कयांचा मार = एखाद्याचा विनाकारण छळ होऊन त्यास त्याविरुद्ध तक्रार करतां न येणें; एखाद्यास अन्यायानें वाग- वून त्याविरुद्ध त्यानें कागाळी केल्यास त्यास बेगुमानपणें शिक्षा करणें. 'बायकांचा जन्म म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार, म्हण- तात तें अक्षरशः खरें आहे.' -पकोघे २ (गो.) तोंडाच्या बाता घरा बाईल भीक मागता = बाहेर मोठमोठया गप्पा मारतो पण घरीं बायको भीक मागते. सामाशब्द- तोंड उष्ट-न. एखादा-दुसरा घांस खाणें; केवळ अन्न तोंडास लावणें; तोंड खरकटें करणें. [तोंड + उष्टें] ॰ओळख-स्त्री. परस्परांचा विशेष परिचय नसतां, चेहरा पाहू- नच हा अमुक आहे असें समजण्याजोगी ओळख; (एखाद्याची) चेहरेपट्टी लक्षांत राहून तीवरूनच त्याला ओळखतां येणें; नांव वगैरे कांहीं माहीत नसून (एखाद्याचा) केवळ तोंडावळाच ओळ- खीचा असणें. 'एखाद्याला वाटेल कीं बाळासाहेबांशीं त्याची तोंड- ओळखच आहे.' -इंप ३७. ॰कडी-स्त्री. १ आंतील तुळयांचीं तोंडें बाहेर भिंतींतील ज्या तुळईवर ठेवतात, ती सलग तुळई. २ कौलारू छपराचे वासे ज्या सलग तुळईवर टेकतात ती छपराच्या शेवटीं, टोंकास असलेली तुळई. ३ गुरांचें दावें जिला बांधतात ती कडी. ४ (सोनारी धंदा) दागिन्याची शेवटची कडी, नाकें; ज्यांत फांसा इ॰ अडकवितात ती (सरी इ॰ सारख्या दागिन्याची) टोंकाची, तोंडाची कडी; (जव्याच्या) मण्याच्या वगैरे तोंडाशीं ठेवलेली कडी. ५ (जमाखर्चाच्या वहींतील जमा आणि खर्च या दोहोंबाजूंचा मेळ. हा मेळ = = = अशा दुलांगीनें, (दुहेरी रेषेनें) दाखविण्याचा प्रघात आहे. 'वहीची खात्याची-तारखेची-तोंडकडी' असा शब्दप्रयोग करितात. (क्रि॰ मिळणें; जुळणें; येणें; उतरणें; चुकणें; बंद होणें). [तोंड + कडी] ॰कळा-स्त्री. चेहर्‍यावरील तजेला; कांति; तेज; टवटवी. (प्र.) मुखकळा. [तोंड + कळा = तेज] ॰काढप-(गो.) उपदंश झालेल्या रोग्यास एक प्रकारचें औषध देऊन त्याच्या तोंडांतून लाळ वाहवितात तो प्रकार. ह्या औषधानें तोंड बरेंच सुजतें. [तोंड + गो. काढप = काढणें] ॰खुरी- स्त्री. (ना.) गुरांचा एक रोग. ॰खोडी-वि. तोंडाळ; टाकून बोलणारा; तोंड टाकणारा; अशी संवय असलेला. 'परम अधम रुक्मी हा महा तोंडखोडी ।' -सारुह ३.७८. [तोंड + खोड = वाईट संवय] ॰घडण-स्त्री तोंडाची ठेवण; चेहरेपट्टी; तोंडवळां. 'या मुलाची बापासारखी तोंडघडण आहे.' [तोंड + घडण = रचना] ॰घशीं- सीं-क्रिवि. १ जमीनीवर पडून तोंड घासलें जाईल, फुटेल अशा रीतीनें. (क्रि॰ पडणें; पाडणें; देणें). 'तो तोंडघसींच पडे करतां दंतप्रहार बहु रागें ।' -मो. २. (आश्रय तुटल्यानें) गोत्यांत; पेचांत; अडचणींत; फजिती होईल अशा तर्‍हेनें; फशीं (पडणें). [तोंड + घासणें] ॰घशी देणें-दुसरा तोंडघशीं पडे असें करणें. ॰चाट्या-वि. खुशामत करणारा; थुंकी झेलणारा; तोंडासारखें बोलणारा. ॰चाळा-पु. १ तोंड वेडेंवाकडें करून वेडावण्याची क्रिया. २ वात इ॰कांच्या लहरीनें होणारी तोंडाची हालचाल, चाळा. ॰चुकाऊ-वू-व्या, तोंडचुकारू-चुकव्या-वि. (काम इ॰ कांच्या भीतीनें) दृष्टि चुकविणारा; तोंड लपविणारा; नजरेस न पडे असा. [तोंड + चुकविणें] ॰चुकावणी-स्त्री. (एखाद्यापासून) तोंड लपविण्याची, स्वतःस छपविण्याची क्रिया. ॰जबानी-स्त्री. तोंडानें सांगितलेली हकीगत, दिलेली साक्ष, पुरावा. -क्रिवि तोंडी, तोंडानें. [तोंड + फा. झबान्] ॰जाब-पु. तोंडी जबाब. ॰झाडणी-स्त्री. तिरस्कारपूर्ण उद्गारांनीं झिडकारणें; खडका- वणें; खरडपट्टी काढणें. ॰देखणा-ला-वि. आपल्या अंतःकरणांत तसा भाव नसून दुसर्‍याचें मन राखण्याकरितां त्याला रुचेल असा केलेला (व्यवहार, भाषण, गो इ॰); खुशामतीचा; तोंडासारखा; तोंडपुजपणाचा. 'प्राणनाथ, मला हीं तोंडदेखणीं बोलणीं आव- डत नाहींत.' -पारिभौ ३५. [तोंड + देखणें = पाहणें] ॰देखली गोष्ट-स्त्री.दुसर्‍याची मर्जी राखण्याकरितां केलेलें, खुशामतीचें भाषण. ॰निरोप-पु. तोंडी सांगितलेला निरोप. 'कृष्णास ते हळुच तोंडनिरोप सांगे ।' -सारुह ४.९. ॰पट्टा-पु. (बायकी). तोंडाचा तोफखाना; अपशब्दांचा भडिमार; संतापानें, जोराजोरानें बेबंदपणें बोलणें. [तोंड + पट्टा = तलवार] ॰पट्टी-स्त्री. (शिवणकाम) तोंडाला शिवलेला पट्टी. 'योग्य तेवढी तोंडपट्टी कातरावी.' -काप्र. १४. ॰पाटिलकी-स्त्री. १ आपण कांहीं न करतां बसल्या जागे- वरून लुडबुडेपणानें दुसर्‍यांना हुकुमवजा गोष्टी, कामें सांगणें (पाटलाला बसल्या जागेवरून अनेक कामें हुकुम सोडून करून घ्यावीं लागतात त्यावरून). २ (उप.) लुडबुडेपणाची वटवट, बडबड; तोंडाळपणा. 'दुसरें कांहीं न झालें तरी नुसती तोंडपाटिलकी करण्यास कांहीं हरकत नाहीं.' -आगर ३.६१. [तोंड + पाटिलकी = पाटलाचें काम] ॰पाठ-वि. पुस्तकाच्या सहाय्यावांचून केवळ तोंडांनें म्हणतां येण्यासारखा; मुखोद्गत [तोंड + पाट = पठण केलेलें] ॰पालटपुस्त्री. १ (अरुचि घालविण्याकरितां केलेला) अन्नांतील फेरबदल. २ अन्नांत फेरबदल करून अरुचि घालविण्याची क्रिया. [तोंड + पालट = बदल] ॰पिटी-स्त्री. १ (वडील, गुरु इ॰ कांची) आज्ञा न मानतां तिचें औचित्य इ॰ कासंबंधीं केलेली वाटाघाट; (वडिलांशीं, गुरूंशीं) उद्धटपणानें वाद घालणें; उलट उत्तर देणें; प्रश्न इ॰ विचारून अडवणूक करणें. 'गुरूंसी करिती तोंडपिटी ।' -विपू १.५७. २ (दगडोबास शिकविण्याकरितां, विसराळू माणसास पुन्हां पुन्हां बजाविण्याकरितां, थिल्लर जनावरास हांकलण्याकरितां करावी लागणारी) व्यर्थ बडबड, कटकट, वटवट. [तोंड + पिटणें] ॰प्रचिती-प्रचीति-स्त्री. खुशामत करण्याकरितां (एखाद्याच्या) व्यक्तिमाहात्म्यास, भाषणास, अस्तित्वास मान देणें; आदर दाख- विणें. [तोंड + प्रचीति] ॰प्रचीतक्रिवि. १ तोंडासारखें; खुशामतीचें; तोंडापुरतें (भाषण, वर्तन इ॰ करणें) २ माणूस ओळखून, पाहून; माणसामाणसांत तारतम्य ठेवून (बोलणें, चालणें, वागणें). ॰प्रचीत बोलणारा-चालणारा-वागणारा-वि. माणसामाणसांत तारतम्य ठेवून चालणारा, बोलणारा, वागणारा. ॰फटालकी -फटालीस्त्री. तोंडाची निरर्थक बडबड, वटवट, टकळी. [तोंड + ध्व. फटां ! द्वि.] ॰फटाला-ल्या-वि. मूर्खपणानें कांहीं तरी बड बडणारा; बकणारा; वटवट करणारा. [तोंड + ध्व. फटां !] ॰फट्याळ-वि. तोंडाचा फटकळ; शिवराळ; तोंडाळ; बातेफरास; अंगीं कर्तृत्व नसून लंब्या लंब्या बाता झोंकणारा. ॰फट्याळी- स्त्री. शिवराळपणा; तोंडाळपणा; वावदूकता. [तोंडफट्याळ] ॰बडबड्या-बडव्या-वि. निरर्थक वटवट, बडबड करणारा: बकबकणांरा टकळी चालविणारा. ॰बंद -बांधणी-पुस्त्री. गाडीच्या चाकाच्या तुंब्यावरील बाहेरील बाजूचें लोखंडी कडें, पट्टी. आंतील बाजूच्या कड्यास कटबंद असें म्हणतात. [तोंड + बंद = बांधणी] ॰बळ-न. वक्तृत्वशक्ति; वाक्पटुता; वाक्चातुर्य. 'आंगबळ न चांगबळ देरे देवा तोंडबळ.' ॰बळाचा-वि. ज्याला बोलण्याची हातोटी, वक्तृत्कला साधली आहें असा; तोंडबळ अस- लेला; भाषणपटु जबेफरास. ॰बाग-स्त्री. (राजा.) चेहरेपट्टी; चेहर्‍याची ठेवण, घडण; मुखवटा. ॰बांधणी-स्त्री. १ तोंडबंद पहा. २ (ढोरांचा धंदा) कातड्याच्या मोटेच्या सोंडेच्या टोंकाकरितां बाजूला शिवलेला गोट. ॰भडभड्या-वि. तोंडास येईल तें बड- बडत, बकत सुटणारा; बोलण्याची, बडबडण्याची हुक्की, इसळी ज्यास येते असा; भडभडून बोलणारा. ॰भर-वि. तोंडास येईल तेवढा; भरपूर. 'हॅमिल्टन यांनीं खर्चवाढीबद्दल तोंडभर मगणी केली होती.' -केले १.१९८. ॰मार-स्त्री. १ रोग्यावर लाद- लेला खाद्यपेयांचा निर्बंध, पथ्य. २ एखाद्यास बोलण्याकरितां तोंड उघडूं न देणें; भाषणबंदी. ३ (ल.) (एखाद्याच्या) आशा, आकांक्षा फोल ठरविणें; (एखाद्याचा केलेला) आशाभंग; मनोभंग; निराशा. (क्रि॰ करणें). ॰मारा-पु. १ शेतीच्या कामाच्या वेळीं पिकांत वगैरें काम करतांना गुरांच्या तोंडाला जाळी, मुंगसें, मुसकें बांधणें. २ (एखाद्यास केलेली) भाषणबंदी; खाद्यपेयांचा निर्बंध. ३ (प्र.) तोंडमार. तोंडमार अर्थ ३ पहा. ॰मिळवणी- स्त्री, १ जमा आणि खर्च यांचा मेळ; तोंडें मिळविण्यासाठीं मांडलेला जमाखर्च. २ ऋणको व धनको यांच्यांतील हिशेबाची बेबाकी, पूज्य. ३ मेळ. -शर. ॰मिळवणी खातें- (जमाखर्च) कच्चें खातें (याचें देणें येणें सालअखेर पुरें करून खुद्द खात्यांत जिरवितात). ॰लपव्या-वि. तोंड लपविणारा; छपून राहणारा; दडी मारून बसणारा. ॰लाग-पु. शिंगें असलेल्या जनावरांच्या तोंडास होणारा रोग; यांत लाळ गळत असते. ॰वळख-स्त्री (प्र.) तोंडओळख पहा. ॰वळण-वळा-नपु. चेहरा; चर्या; मुद्रा; चेहर्‍याची घडण, ठेवण; रूपरेखा; चेहरामोहरा; चेहरेपट्टी; मुखाकृति; मुखवटा. [तोंड + वळ = रचना] ॰वीख-न. (ल.) तोंडानें ओकलेलें, तोंडां- तून निघालेलें, विषारी, वाईट भाषण, बोलणें. [तोंड + विष] ॰शिनळ, शिंदळ-वि. अचकटविचटक, बीभत्स बोलणारा; केवळ तोंडानें शिनळकी करणारा. ॰शेवळें-न. मुंडावळ. -बदलापूर २७७. [तोंड + शेवळें = शेवाळें] ॰सर-क्रिवि. तुडुंब; तोंडापर्यंत; भरपूर. ॰सरता-वि. अस्खलित, तोंडपाठ न म्हणतां येण्या- सारखा; अडखळत अडखळत म्हणतां येण्यासारखा (श्लोक, ग्रंथ इ॰). -क्रिवि. घसरत घसरत; अडखळत; चुका करीत; कसेंबसें; आठवून आठवून. [तोंड + सरणें] ॰सुख-न. १ एखा- द्यानें केलेल्या अपकाराचें शरीरानें प्रतिकार करण्याचें सामर्थ्य नसल्यामुळें केवळ तोंडानें यथेच्छ शिव्यांचा, अपशब्दांचा भडि- मार करून त्यांत सुख मानणें. २ जिव्हा मोकाट सोडून वाटेल तसें बोलण्यांत मानलेलें सुख; यथेच्छ व अद्वातद्वा केलेलें भाषण; (एखाद्याची काढलेली) खरडपट्टी; बोडंती. (क्रि॰ घेणें). ॰सुख घेणें-(एखाद्याची) खरडपट्टी काढणें, हजेरी घेणें; (एखा- द्यावर) शिव्यांचा, अपशब्दांचा भडिमार करणें. ॰सुटका-स्त्री. १ जिभेचा (बोलण्यांतील) स्वैरपणा; सुळसुळीतपणा; वाक्चा- पल्य; जबेफराशी; (भाषण इ॰ कांतील) जनलज्जेपासूनची मोक- ळीक. २ भाषणस्वातंत्र्य; बोलण्याची मोकळीक. ३ तोंडाळपणा; शिवराळपणा. ४ (पथ्य, अरुची, तोंड येणें इ॰ कांपासून झालेली) तोंडाची सुटका, मोकळीक; तोंड बरें होणें; खाण्यापिण्याला स्वातंत्र्य. [तोंड + सुटणें] ॰हिशेबी-वि. अनेक रकमांचा मनांतल्या- मनांत चटकन्‌ हिशेब करून सांगणारा बुद्धिमान (मनुष्य); शीघ्रगणक. ॰तोंडागळा-वि. (तोंडानें) बोलण्यांत, वक्तृत्वशक्तींत अधिक. 'कीं शेषाहूनि तोंडागळें । बोलकें आथी ।' -ज्ञा ९. ३७०. [तोंड + आगळा = अधिक] ॰तोंडातोंडी-क्रिवि. १ समोरासमोर; २ बोलण्यांत; बोलाचालींत. [तोंड द्वि.] ॰तोंडाळ-वि. १ दुसर्‍या- वर तोंड टाकणारा; शिवराळ; भांडखोर. 'लटिकें आणि तोंडाळ । अतिशयेंसीं ।' -दा २.३.१०. २ बडबड्या; वाचाळ. [तोंड] म्ह॰ हाताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं = शिवराळ माणसा- पेक्षां चोर पुरवतो. ॰तोंडाळणें-उक्रि. बकबक करून गुप्त गोष्ट फोडणें; जीभ पघळणें. [तोंडाळ] ॰तोंडोंतोंड-क्रिवि. तोंडापर्यंत; कंठोकांठ; तुडुंब; तोंडसर.॰तोंडोंळा-पु. तोंडवळा; चेहरेपट्टी. [तोंड + ओळा, वळा प्रत्यय]

दाते शब्दकोश

चोर

पु. १ चोरणारा, चोरी करणारा, दुसर्‍याची वस्तु त्याला नकळत, जबरदस्तीनें लुबाडणारा माणूस. 'चोर भांडारी करावा । घसरतांच सांभाळावा ।' -दा १९.९.९. २ (एखाद्या- पासून कांहीं गोष्ट, वस्तु इ॰) छपवून, लपवून ठेवणारा; (एखादी गोष्ट स्वतःपाशींच) दाबून ठेवणारा, दडपून टाकणारा. ३ केळफु लांतील फणीच्या दात्यांतील कठिण व पसरट माथ्याची काडी, दांडा. यास कावळा असेंहि म्हणतात. हा भाजीच्या उपयोगी नसतो म्हणून फेंकून देतात. ४ (समासांत) प्रछन्न; गुप्त; लपवि- लेला; छपविलेला; राखून ठेवलेला; खाजगी; आड; बाजूचा; कोंपर्‍याचा इ॰ अर्थीं. उ॰ चोर-अडसर-अरगळ-कडी-खीळ- गांठ-छिद्र इ॰. असे अनेक सामासिक शब्द बनले आहेत व बनवितां येतात. त्यांपैकीं महत्त्वाचे सामासिक शब्द पुढें दिले आहेत. ५ (गंजिफा, पत्ते, इ॰ खेळांतील परिभाषा) एक पान; प्रत्येक रंगांतील हुकुमाच्या खेरीज इतर पान, पत्ता. 'त्याच्या हातांत एकच बाकी राहिलेला पत्ता हुकूम नसावा तो चोर असावा.' ६ (स्वतःस) मागें राखणारा; चोरून ठेवणारा; अंग काढतें घेणारा, चुकविणारा; चुकार याअर्थीं पुढें चोर शब्द लावून अनेक सामासिक शब्द होतात. उदा॰ कलमचोर = लिहितांना कांहीं गोष्टी राखून ठेवणारा, दाबून ठेवणारा, वगळणारा, चोरून ठेवणारा; सांगितल्यावर हुकूम न लिहिणारा. खांदचोर = १ दुसर्‍याबरोबर काम करतांना जो आपला खांदा काढता घेतो तो (मनुष्य, पशु इ॰); कामचुकार. २ (ल.) निकडीच्या वेळीं मदत, द्रव्य देण्याचें कर्तव्य न करणारा; तोंडघशीं पाडणारा. चाकरीचोर = लबाडीनें चाकरींत, सेवेंत कुचराई, अंगचोरपणा करणारा. पाठ- चोर = सहज रीतीनें, सहजासहजीं पाठीवर बसूं न देणारा (घोडा); सहजासहजीं पाठीवर ओझें न ठेवूं देणारा (बैल). पायचोर = १ एखाद्या करारांतून, कामांतून गुप्तपणें, गपचिप काढतें घेणारा, अंग काढून घेणारा. २ चोरटेपणानें, हळूच, आवाज होऊं न देतां पाऊल टाकणारा; चाहूल न देणारा. ३ चालण्यांत, पळ- ण्यांत कुचराई करणारा (मनुष्य, घोडा). बळचोर = बळ राखून, जेवढें खर्चावें तेवढें न खर्चून काम करणारा. चुकार; मनःपूर्वक शक्य तितकें शक्तिसामर्थ्य खर्च न करणारा. मतलबचोर = आपला हेतु, बेत गुप्त ठेवणारा; मतलबाचा थांग लागूं न देणारा. मस- लतचोर = १ स्वतःची योजना, मसलत गुप्त ठेवणारा. २ दुस- र्‍याची मसलत फोडणारा, काढून घेणारा. विद्याचोर = १ शिका- वयाच्या विद्येचा, शास्त्राचा कांहीं भाग विद्यार्थ्यांपासून चोरून ठेवणारा; पुरी विद्या न देणारा (शिक्षक). २ विद्या चोरणारा; चोरून शास्त्रीय ज्ञान, गुह्य संपादन करणारा; नकळत विद्या मिळ- विणारा (शिष्य) इ॰. अंगचोर, कामचोर इ॰ आणखी अनेक सामासिक शब्द आहेत. वरील शब्द कामचोरू, खांदचोरू, अंगचोरू असेहि योजण्याचा प्रघात आहे. [सं.] (वाप्र.) चोरांची दावण देणें-चोरांची दावण बांधून त्यांचीं डोकीं सड- कणें, चाबकानें बडवणें. म्ह॰ १ चोराच्या मनांत चांदणें = चोराला चांदण्याचें भय वाटतें, कारण त्यांत त्याची चोरी उघडकीस येण्याची भीति असते. चोराचें मन नेहमीं त्यास खात असतें. अपराध्याला नसती शंका येत असते. 'वाढति सदगुण तों तों प्रेम करिति लोक पांडवावरि ते । चोरासि चांदणेसें तापचि देतें सुयोधना अरितें ।' -मोसंभा १०. २ चोरावर मोर = एका चोराला लुबाडणारा दुसरा सवाई चोर; एक वरचढ एक; शेरास सवाशेर. 'तो आतां चोरावर मोर होण्याच्या विचारांत गढून गेला होता.' -स्वप २१३. सामाशब्द-॰अंक-अंख-आंख- पु. १ कापडाच्या गांठीवर, कापडावर, विक्रीच्या वस्तूवर घात- लेला, खरी किंमत दाखविणारा, अत्यंत बारीक आंकडा. हा आंकडा दुकानदाराच्या स्वतःच्या उपयोगाकरितां असतो. हा गिर्‍हाइकास कळवावयाचा नसतो. गिर्‍हाइकाकरितां किंमतीचा दुसरा मोठा पण खोटा आंकडा दिलेला. २ हस्तलिखित पुस्तकाच्या पानावर घातलेला अनुक्रमाचा बारीक आंकडा. ३ (सामा.) गुप्त आंकडा. [चोर = गुप्त, खासगी + अंक = आंकडा] ॰ओंटी-स्त्री. दिसण्यांत लहान पण फार दूध देणारी (गाईची, म्हशीची) ओटी, कांस. ॰ओंटी भरणें-सक्रि. स्त्रीच्या प्रथम गर्भारपणाच्या तिसर्‍या किंवा चवथ्या महिन्यांत खासगी रीतीनें (गरोदर स्त्रीस शिंक्याखालीं बसवून) ओटी भरणें. तीन महिने- पर्यंत स्त्री गर्भार आहे हें निश्चित कळूं शकत नाहीं यावरून या समारंभास चोरओटी म्हणतात. ओटीभरण पहा. [चोर = गुप्त + ओटी] ॰ओंवा-पु. एक प्रकारचा ओंवा. ॰कांटा-पु. १ तापाची बारीक कसर; थंडीचा बारीक कांटा; चोरटा ताप. (क्रि॰ येणें; लागणें; भरणें; वाटणें). २ खोटा तराजू. [चोर + कांटा = शहारे, तराजू] ॰काठी-स्त्री. (शिकार) जनावर माण- साळण्याची एक युक्ति. चारपांच मनुष्यें समोरून पन्नास फुटां- वरून घोंगडी पांघरून एकदम ओरडत पळत येऊन जनावराच्या पायांजवळ व तोंडाजवळ येऊन पडतात, लोळतात. व तोंड उघडून त्यास गोंजारतात. या क्रियेस चोरकाठी म्हणतात. -चिमा १५. ॰काम-न. १ कितीहि केलें तरी दुसर्‍याच्या डोळ्यांत न. भरणारें काम. २ पार पडल्यावर ज्याचे फारच थोडे अवशेष शिल्लक राहतात असें काम. ॰कोनाडा-पु. कोनाड्यांत अस- लेला, सहज न कळणारा दुसरा गुप्त कोनाडा. [चोर = गुप्त + कोनाडा] ॰क्रांत-क्रांति-स्त्री. चोरांची पुंडाई; चोरांनीं केलेली लुटालूट, नासधूस, धुळधाण. [चोर + क्रांति = पुंडाई, बंड] ॰खडी-वि. कोंदणांत बसविलेलें. 'लेईला अलंकार भूषणें परवडी । दिव्य रत्नें चोरखडी खेवणें तयां ।' -निगा १२४. ॰खण-पु. १ (पेटींतील, कपाटांतील) गुप्त कप्पा, खण, पूड. २ घरांतील बिनमहत्त्वाची, बारीक खोली, भाग. [चोर = गुप्त + खण] ॰खाई-स्त्री. मुशाफरावर हल्ला करून लुटण्याच्या सोयीची, खबदाडीची, दर्‍याखोर्‍यांतील अडचणीची जागा; अरुंद खिंड. [चोर + खाई = खोलगट जागा] ॰खिंड-स्त्री. चोरांनीं प्रवाशांना लुटण्याच्या सोयीची दोन डोंगरांतील अरुंद वाट. चोरखाई पहा. ॰खिडकी-स्त्री. १ एकांतात बसावयाची लहान खिडकी. २ (ल.). (लेखांतील, भाषणांतील) पकड, सोडवण, छिद्र; (लेखांतून, भाषणांतून) निसटावयासाठीं केलेली संदिग्ध वाक्यरचना, पळवाट ३ प्रसंगविशेषीं निसटून; पळून जाण्यासाठीं केलेली लहान व गुप्त खिडकी. ॰खिसा-पु. आंगरख्याचा, कोटाचा गुप्त खिसा. ॰गल्ली-स्त्री. (चोरांना लपण्याच्या सोयीची) आडगल्ली, बोळ. ॰गस्त-स्त्री. रात्रीं दुसर्‍याला कळूं न देतां पोलीस लोक मुकाट्यानें जी फेरी घालतात ती; गुप्तपणें घात- लेला रस्त्यावरील फिरता पहारा; मुकी गस्त; वाद्याशिवाय गुप- चुप घातलेली गस्त. याच्या उलट राजगस्त. [चोर + गस्त = पहार्‍याची फेरी] ॰गस्तीनें-क्रिवि. लपूनछपून; कोणास समजूं न देतां; गुप्तपणें. (क्रि॰ वागणें; येणें; जाणें; फिरणें). याच्या उलट उघड- मराठी. ॰गांठ-स्त्री. गुप्त गांठ; दिसून न येणारी गांठ. ॰घडी- स्त्री. अपुरी घडी; लहान घडी; गिर्‍हाईक कापड विकत घेतांना त्याची लांबी घड्यांवरून, सळांवरून ठरवितात. म्हणून त्यांना फसविण्यासाठीं व्यापारी एका घडीच्या पोटांत दुसरी लहान अपुरी घडी घालतो ती. ॰घर-न. गुप्त खोली, कप्पा, खण, खाना. ॰घाई-स्त्री. १ चोर आले असतां उडणारी धांदल, घाई. २ (ल.) अतिशय धांदल; धांवपळ. ॰चाऊ(हू)ल-स्त्री. गुप्तपणें ऐकून, पाहून लागलेली एखाद्या माणसाच्या, जनावराच्या अस्ति- त्वाची, हालचालीची चाहूल, कानोसा. [चोर = गुप्तपणें + चाहूल = कानोसा, हालचालीचा आवाज] ॰चिरटा-चिलटा- चिल्लट-पु. चोर वगैरे. 'हल्लीं चोराचिलटांचा इथें फार त्रास आहे.' -भा ५२. 'वेळप्रसंग पडल्यास चोराचिरट्यां- पासून संरक्षण करण्याला उपयोगी पडतील असे शिपाई प्यादे ......वगैरे प्रकारचे लोक त्यांजपाशीं फारच थोडे होते.' -विंध्याचल १११. [चोर + चिलट; किंवा चोर द्वि.] ॰चुंबा-पु. १ गुप्तपणें दिलेला बोळा, दट्ट्या २ (ल.) लांच. (क्रि॰ पडणें; देणें). [चोर + चुंबा = कापडाचा, चिंध्यांचा बोळा, दट्ट्या] ॰जासूद-पु. गुप्त हेर, चार; टेहळ्या; (इं.) डिटेक्टिव्ह. -राव्यको १.१७. ॰ताजवा-पु. खोटी तराजू; चोरकांटा. ॰ताप-पु. हातास न लागणारा परंतु शरीरांत असणारा बारीक ताप; हाडी. ज्वर; तापाचीं सतत असलेलीं बारीक लक्षणें; चोरटा ताप. [चोर + ताप] ॰थरा-पु. (महानु.) खोटें नाणें. चोरमोळा पहा. 'टाकु पाडिला चोरथरा ब्रह्मविद्येचा ।' -भाए ६३५ 'ऐसा प्रपंच टांक चोरथरा । मूढीं सुखभोगाचिया मोहरा ।' -ज्ञाप्र ५८०. ॰दरवाजा-दार-पुन. गुप्त, खाजगी दार; मागचें दार. ॰धाड-धाडा-स्त्रीपु. चोरांनीं केलेला आकस्मिक घाला, हल्ला; दरवडा; डांका. ॰नजर-स्त्री. १ (दुसर्‍याला) नकळत पाहणें; डोकावून पाहणें, गुप्तपणें टेहळणी करण्याकरितां टाक- लेली नजर; चोरून पाहणें; चोरटी दृष्टि. 'घरांतील बायका चोरनजरेनें जावयाकडे पाहतात.' -मोर २४. २ चोरासारखी मुद्रा, चर्या, दृष्टि. [चोर + नजर = दृष्टि] ॰पडदा-पु. १ आंतील गुप्त पडदा. २ शरीराच्या आंतील पडदा; अंतस्त्वचा ॰पण-न. (बायकी) मुलींच्या खेळांत येणारी चोर होण्याची पाळी. ज्या मुली- वर डाव असतो, ती जर डाव न देतां जाऊं लागली तर इतर मुली तिला आपलें चोरपण दुसरीस देऊन जाण्यास सांगतात, [चोर + पण] ॰पाइकी-स्त्री. चोरून हल्ला करणें. -पया ६६. -शर. [चोर + पाइकी] ॰पाऊल-पाय-न.पु. आवाज न करतां टाकलेलें पाऊल; पावलांचा शब्द न करतां चालणें; चोरटें चालणें; चोर चाहूल. ॰पावलांनीं-क्रिवि. मुकाट्यानें; शब्द न करतां. 'चला चोरपावलांनींच पुरुषोत्तमरावांच्या वाड्यात.' -इंप ३१. ॰पाणी-न. दुखणेकर्‍यास, नुकतेंच दुखण्यांतून उठलेल्यास-खोलींत स्नान घालण्याकरितां तयार केलेलें औषधि- युक्त तापविलेलें पाणीं. ॰पान्हा-पु. १ धार काढतेवेळीं गाय किंवा म्हैस मुद्दाम कांसेचा संकोच करून दुधाचा कांहीं अंश वासरा- साठीं राखून ठेवते तो. २ असें राखून ठेवलेलें दूध बळजबरीनें काढ- तात तें; गाईनें, म्हशीनें नाखुषीनें दिलेलें थोडें दुध. ३ (ल.) लघवी केल्यानंतर पुन्हां थोडथोडी होणारी लघवी; न कळत लघ- वीस होणें; लघवीस थोडें थोडें होणें; 'तेज सांडूनि जाय नयना । टाळी पडोनि ठाती काना । मुततां लागे चोरपान्हा । तरी देहा- भिमाना वाढवी ।' -एभा २२.५२८. [चोर + पान्हा] ॰पाळत- पाळती-स्त्री. आपण दृष्टीस न पडतां दुसर्‍याची, दुसर्‍याच्या घरची, बातमी युक्तीनें काढण्याचा प्रकार; गुप्त रीतीनें ठेवलेली पाळत; पाळत; पाळती पहा [चोर + पाळत = नजर] ॰पेठ- स्त्री. ज्यांत खोटीं वजनें वापरतात व चोरटा धंदा चालतो असा बाजाराचा गांव, पेठ; चोरबाजार. ॰पोर-न. (समुच्चायार्थीं) चोर; उचल्या; भामटा इ॰ लहानसहान चोर्‍या करणारीं चोरटीं पोरें; उचल्ये इ॰. ॰बातमी-स्त्री. हेराकडून समजलेली गुप्त बातमी; चोरपाळतीनें कळलेली बातमी. -शिदि २६९. ॰भय-न. चोरांपासून उत्पन्न होणारी भीति. ॰भूक-स्त्री. १ थोडी शिल्लक राहिलेली, पूर्णपणें न शमलेली भूक. ३ थोडेसें खाऊन शांत होणारी भूक; किंचित् भूक. (क्रि॰ लागणें; येणें; सुटणें; वाटणें). ॰महाल-पु. १ गुप्त जागा, खोली. २ रखेल्या ठेवलेली जागा; दासीमहाल. ॰म(मु)ळ्या-क्रिवि. लपून छपून; गुप्तपणें; पाळत ठेवून; गुपचूप; गुप्तपणें(टेहळणें). (क्रि॰ पाहणें). ॰मूठ-स्त्री. पकडलेल्या जनावरास तीन दिवस एका जागेवर पडूं देतात, त्यास चोरमूठ म्हणतात. -चिमा ९. ॰मोळा-पु चोरांचा शिक्का; खोटें नाणें; चोरथरा पहा. 'हा चोरमोळा असिका । प्रपंचाचा ठसा लटका । जो प्रवृत्ति पडिला लोकां । अज्ञानांचा ।' -ज्ञाप्र ५४९. 'अवघेचि जालें चोरमोळे । नरदेहावांचौनिया ।' -भाए २४७. [चोर + मोळा; का. मोळे = खिळा; म. मोळा = रीत] ॰रान-न. चोर, लुटारू इ॰ कानीं युक्त असें रान. [चोर + रान] ॰लक्षण-न. चोरटेपणाचा स्वभाव दाखविणारी मुद्रा, नजर, चेहर्‍याचें वळण, चालण्याची धाटी इ॰; (पाहिलेला मनुष्य) चोर आहे असें दर्शविणारें लक्षण; चोरटेपणाची छाप. [चोर = चोरी करणारा + लक्षण = चिन्ह] ॰वड-वंड, चोरावडा- वंडा, चोरवण-वाण, चोरवें-स्त्रीपुन. चोरांनीं केलेला उत्पात, धुमाकूळ, अनर्थ, नासाडी, लुटालूट; चोर फार माजल्यामुळें उत्पन्न झालेली दुर्दशा. (क्रि॰ सुटणें; मातणें; होणें; माजणें; उठणें; मोडणें; दाबणें; दबणें).[चोर + वड-ण प्रत्यय] ॰वाट-स्त्री. गुप्त वाट, मार्ग. 'किल्ल्यांतून व वाड्यांतून बाहेर पडावयास चोरवाटा असत.' -कोरकि ३९१. ॰वाडा पु. १ चोरांचा अड्डा; चोरांची वस्ती. २ ज्या घरांतील सर्वच माणसें चोराप्रमाणें वागतात तें घर. विद्या-स्त्री. १ गूढ, अज्ञात शास्त्र, कला. २ फारच थोडया लोकांस माहीत असणारी व क्वचितच शिकविली जाणारी विद्या. गुप्त विद्या; ३ जारणमारणाची, जडी- बुटीची विद्या. [चोर + विद्या] ॰वेळ-ळा स्त्री. १ दिवसाच्या किंवा रात्रीच्या तीस घटकांचे प्रत्येकीं तीनपूर्णांक तीन चतुर्थांश घटकेचे असे आठ भाग कल्पिले आहेत त्यास अमृतवेळ, काळवेळ, शुभ- वेळ इ॰ नांवें आहेत. त्या आठांपैकीं एका वेळेस चोरवेळ किंवा चंचल वेळ असें म्हणतात. वेळ पहा. २ ज्या वेळीं चोरांची विशेष भीति असते ती वेळ. ॰शिवण-स्त्री. आंतील, बाहेर न दिसणारी शिवण; गुप्त शिवण. ॰हट्टी-हाटी-स्त्री. चोरवाडा; चोरांचा अड्डा; चोरांचें वसतिस्थान. [चोर + हट्टी = हाट, बाजार] ॰हरकारा-पु. गुप्त दूत. -राव्यको १.१८.[चोर + हरकारा = निरोप देणारा दूत, हलकारा] चोरापोरी-मोरी, चोरींपोरीं-क्रिवि. चोरांनीं आणि चोरट्या उनाड पोरांनीं; चोर, भामटे इ॰ कां कडून (चोरून नेलेला इ॰). 'गुळाची ढेप चोरापोरीं गेली.' [चोर + पोर] चोरामोरा-क्रिवि. चोरट्या मुद्रेनें; चोरटेपणानें; चोरूनमारून. 'असा चोरामोरा किती दिवस वहिवाटणार.' -सूर्यग्र १२९.

दाते शब्दकोश