मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

बरकत-खत, बर्कत

स्त्री. १ सिद्धि; यश; सुपरिणाम; लाभ. २ यशस्विता; भरभराट; भाग्यशालीपणा. 'ज्याचें दैव अनुकूल नाहीं त्यास कोणत्याही व्यवहारांत बरकट येत नाहीं.' ३ भरभराटीचें आधिक्य; कल्पनेपेक्षां अधिक नफा, प्राप्ति; फायदा (कामांत, धंद्यांत). ४ कोणतीहि वस्तु मापतांना एक या संख्यें- करितां मंगलार्थ उच्चारतात.; लाभ. [सं. भृ-भर; अर. बरकत] म्ह॰ नियत तशी बर्कत = बुद्धि तशी समृद्धि. ॰सोडणें-(शेतानें) आपली मातबरी, सुपीकपणा गमावणें, टाकणें.

दाते शब्दकोश

बरकत

बरकत f n Success. Prosperity. Ex. ज्याचें दैव अनुकूल नाहीं त्यांस कोणत्याही व्यवहारांत बरकत येत नाही. Superfluity of good. ब?B सोडणें To lose its richness or fertility.

वझे शब्दकोश

बरकत barakata f n ( A) Success, happy termination, prosperous issue: also successfulness, prosperousness, luckiness. Ex. ज्याचें दैव अनुकूल नाहीं त्यास कोणत्याही व्यवहारांत ब0 येत नाहीं; चोरी करून लाखों रुपये जरीं मेळविले तरीं त्यांत ब0 नाहीं; हा शाहणा उद्योगी आहे परंतु ह्यास ब0 नाहीं. 2 Overplus of good; advantage or benefit above the degree expected (resulting from an undertaking or a business). 3 The word used for the number one in counting or measuring anything, for good luck. ब0 सोडणें To lose its richness or fertility--a soil.

मोल्सवर्थ शब्दकोश

(आ) स्त्री० कमाई, नफा, लाभ, २ यश.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

बर्कत

[अ. बरकत्] लाभ, यश; भरभराट. “नियत तशी बर्कत” = बुद्धी तशी समृद्धी.

फारसी-मराठी शब्दकोश

संबंधित शब्द

लाभ

पु. १ फायदा; प्राप्ति. 'तुज लाभ काय यांत...।' -मोविराट १.१८६. २ धान्य वगैरे मोजतांना बरकत यावी म्हणून एक अशा अर्थानें वापरतात, नंतर दोन, तीन असें म्हणून माप टाकतात; बरकत पहा. ३ (कु.) शेंकड्यावर दिलेला जास्त माल (नारळ वगैरे). (भेटीचा) ॰देणें-मेटणें; भेट घेणें (आदर दर्शविण्यासाठीं योजतात). लाभा येणें-१ लाभणें. २ अनुभ- वास येणें; समजणें. 'जऱ्ही कैसेनि हे लाभा । जायेचि ना ।' -ज्ञा १५.५४२. सामाशब्द- ॰काळ-पु. फायद्याचा, प्राप्तीचा काळ, वेळ, हंगाम; उत्कर्षकाळ. 'जिवाशीं जडविलेल्या जीवासाठीं अंतकाळाला लाभकाळ समजावें लागतें.' -राजसंन्यास ५. उलट शब्द विनाशकाळ; आपत्काळ. ॰गुण-पु. फायदा; प्राप्ति. 'ह्याच्या मैत्रकीनें मला कांहीं लाभगुण नाहीं.' ॰दायक-वि. ज्याच्या संग्रहानें संग्रहकर्त्यास द्रव्यादि लाभ होतो असा (अश्व, नीळ इ॰ पदार्थ, शुभकर्म, व्यापार इ॰); फायदेशीर. ॰द्दष्टी- स्त्री. लाभाची, फायद्याची इच्छा. -वि. ज्याला केवळ फायद्याची इच्छा आहे असा; ज्यांत त्यांत लाभाची अपेक्षा ठेवणारा. [सं.] ॰लोभ-पु. १ (लाभाचा लोभ) कोणेक कार्यामध्यें मला कांहीं प्राप्त होईल असा जो लोभ असतो तो; लोभदृष्टि. २ (लाभ द्वि.) लाभ; प्राप्ति; फायदा (व्यापकार्थी व सामान्यपणें उपयोग). 'मी तीन वर्षें व्यापार करतों परंतु लाभलोभ म्हटला तर कांहीं एक नाहीं.' ३ प्राप्ति किंवा स्नेह; लाभाची अपेक्षा किंवा लोभाची भावना. 'लाभ लोभ धरुन कोण्ही कोण्हाचें काम करतो.' 'लाभा- लोभावांचून कोण कोण्हाला पुसेल.' ॰वेळ-ळा-स्त्री. १ शुभकाल; लाभदायक वेळ किंवा संधी. 'लाभवेळ पाहून काम केलें असतां अवश्य लाभ होतो.' २ दिवसाच्या किंवा रात्रीच्या आठ भागां- पैकीं एका वेळेचें नांव. वेळ पहा. ॰हानि-स्त्री. नफानुकसान; सुखदुःख. 'ज्या लाभहानि जेथें, नेतो बांधोनिकाळ दाव्यानें ।' -मोकर्ण ४७.६९. लाभणें-१ मिळणें; प्राप्त होणें. 'आज मला भेट लाभेल.' संपादन होणें. २ निष्पन्न होणें; उद्भवणें (फायदा, नफा). ३ उपयोगाचें, फायद्याचें असणें; उपयोगी पडणें. ४ शुभ- कारक, लाभदायक होणें-असणें (मुहूर्त, ग्रहबल इ॰ लग्न, मुंज इ॰ करितां). लाभाईत-वि. लाभदायक. 'घरीं येवोनिया आनंदें बोलतीं । कंन्या आम्हाप्रती लाभाईत ।' -ब ४. लाभागळी- वि. लाभदायक. 'बोलती लीळां लाभागळी ।' -दावि १३१. लाभागोभा-पु. (व्यापकार्थी) नफा; फायदा. [लाभ. द्वि.] लाभाचा-वि. फायद्याचा; लाभदायक. 'त्या वांचुनि यांसीं जो करणें संग्राम तो न लाभाचा ।' -मोविराट. लाभालाभ-पु. १ नफानुकसान; नफातोटा. २ दैव; नशीब. [सं. लाभ + अलाभ] लाभालोभा-पु. (कों.) लाभलोभ पहा. लाभालोभाचा- पु. स्नेह किंवा लाभ यांमुळें जोडलेला, गुंतलेला. 'चौघे लाभा- लोभाचे असले म्हणजे निर्वाह होतो.' लाभावळी-स्त्री. अनेक लाभ. 'तो चिन्हें शुभ पाहुनी नृप म्हणे लाभो न लाभावळी ।' -र ३०. [लाभ + आवलि]

दाते शब्दकोश

लाभ lābha m (S) Gain. 2 In measuring out grain &c. the first quantity measured is called लाभ for the sake of good luck; and thence the numbering goes on 2, 3, 4 &c. In this use the word corresponds with बरकत under which see further.

मोल्सवर्थ शब्दकोश

उपयुक्त

फायदेमंद, उपयोगी, नफ्याचे, बरकत आणणारे, बरकत दार, मिळकत देणारे, त्याने काम निभते, तो काम देतो, त्याच्याशिवाय चालत नाही, त्याने गरज भागते, तो एक आधार आहे, पोकळी भरून काढतो, उपयुक्त ?- अरे तो तर महत्त्वाचा भाग ! केंद्र, आंसाप्रमाणे आहे, अधिदैवतच.

शब्दकौमुदी

आवक्श चिंतणे      

आयुष्य चिंतणे; भले पाहणे; कल्याण चिंतणे; आशीर्वाद देणे : ‘ह्यो त्याला बरकत येऊ दे म्हनत आवक्श चिंतत म्होरं जायाचा.’ − उपरा ९९. आवखादा      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

बरकता

बरकता barakatā f (Barquêta. Port.) A little barque or boat, the same with बरकीण or Barquinha.

मोल्सवर्थ शब्दकोश

बरखत

बरखत barakhata f Properly बरकत.

मोल्सवर्थ शब्दकोश

बरखत f Properly बरकत.

वझे शब्दकोश

गनिम(मा)त

स्त्री. लूट; मिळकत; बरकत; विपुलता. [अर. घनीमत्]

दाते शब्दकोश

गनिमत, गनिमात      

स्त्री.       लूट; मिळकत; बरकत; विपुलता. [फा.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

हडसणें

सक्रि. १ हिसकणें; झटकन ओढणें; झटका मारणें; एकदम जोरानें ओढणें. २ आवळून, खेंचून बांधण्यासाठीं जोरानें ओढणें. (क्रि॰ बांधणें). हडसून बांधणें. असाहि प्रयोग रूढ आहे ३ खेंचणें; ठासणें; आपटणें; जमीनीवर आदळणें; ठोकून दाट बसविणें (मागावरील कापड, चटई, साखरेनें वगैरे भरलेलें पोतें इ॰). ४ (कों.) गिर्‍हाइकाला देण्यापूर्वीं लाभ बरकत येवो अशा बुद्धीनें कापड इ॰ माल जमीनीवर, फळीवर, पेटीवर आपटणें (कापडवाल्यांत हा प्रघात विशेष आहे). ५ निक्षून, बजावून सांगणें, बोलणें. [सं. हट] हटसणी-स्त्री. १ हडस- ण्याची क्रिया; झटका; हिसडा. २ ढकलणी; घोळणी. हडसणी- स्त्री. मागावरील कापड ठासण्यासाठीं असणारी एक फळी; फणी. हडसूनखडसून-क्रिवि. १ हडसण्याची क्रिया करून; झडकून; हिसडून; जोरानें ओढून. २ ठोकूनठाकून; हालवून. ३ निक्षून; बजावून. 'हडसून खडसून हें सनंग दिलें.' ४ उघडपणें; राज- रोस; बिनदिक्कत. 'हडसूनखडसून दरवडा घातला.' ५ रोकठोक; स्पष्टपणें; धडधडीत; तोंडावर; निर्भिडपणानें. 'हडसून खडसून जबाब दिला.' ६ सरळपणानें; उघडपणें; हमखास; मनावर बिंबेल अशा रीतीनें.

दाते शब्दकोश

नेत      

स्त्री.       १. नियत; बुद्धी : ‘ज्याची जशी नेत तसी त्यास बरकत.’ - इमं १०७. २. निष्ठा : ‘दौलतराव बाबा यांची नेत धन्याजवळ तसीच असेल.’ - ऐलेसं १२·६८१७. ३. नियम; नेम. (व.) [अर.नीयत्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नेत

नेत f Probity, integrity. Pr. नेत तशी बरकत. Uniform good conduct.

वझे शब्दकोश

नेत nēta f ( A) Probity, integrity, honesty. Pr. नेत तशी बरकत. 2 Uniform good conduct.

मोल्सवर्थ शब्दकोश

स्त्री. १ नियत; बुद्धि. 'ज्याची जशी नेत तसी त्यास बरकत.' -इमं १०७. २ निष्ठा. 'दौलतराव बाबा यांची नेत धन्याजवळ तसीच असेल.' -ख १२.६८१७. [अर. नीयत्]

दाते शब्दकोश

नेत

(स्त्री.) [अ. नीयत्] नियत; बुद्धी; निष्ठा. “ज्याची जसी नेत तसी त्यास बर्कत” (इम १०७). “दोलनराव बाबा यांची नेत धन्याजवळ तसीच असेल” (खरे १२|६८१७).

फारसी-मराठी शब्दकोश

नियामत

स्त्री. १ दया. २ आनंद; सुख; आराम. ३ धन; मिळकत; बर्कत; भरभराट. [फा.]

दाते शब्दकोश

नियत

(स्त्री.) [अ. नीयत्] हेतू; बुद्धी; दानत; विचार; वृत्ती; मोईन. “जशी नियेत तशी त्यास बर्कत” (वाड-सनदा १५०). “शहाजीची नियत साम्प्रतकाळी ठीक नाहीं” (दिमरा २|५). “भण्डारा व नन्दादीप चालवावा ऐसा नियेत करून” (राजवाडे १५|१९५). “(श्रीज्ञानेश्वराच्या) या समाधिस्थळीं पूजा पुनस्कार चालिला पाहिजे म्हणून, कैलासवासी महाराज व कैलासवासी मातुश्री जिजाऊ व कैलासवासी राजेसाहेब या त्रिववर्गीनीं आपलाले वेळेस नियत करून दिल्ही” (वाड-सनदा १६८).

फारसी-मराठी शब्दकोश

नियत, नियेत

स्त्री. नेत पहा. १ दानत; नीति; शील. 'पठाणास नेक, नियत, धर्मयुद्ध यांची माहिती नसतें.' -सूर्योदय ९५. २ बुद्धि; हेतु. 'जशी नियत तशी त्यास बर्कत.' -वाडसनदा १५०. 'शहाजीची नियत सांप्रतकाळीं ठीक नाहीं.' -दिमरा २.५. ३ -स्त्रीपु. वृत्ति; नेमणूक; नियम. 'भंडारा व नंदादीप चालवावा ऐसा नियेत करून ...' -रा १५.१९५. 'समाधिस्थळीं पूजा पुनस्कार चालिला पाहिजे म्हणून ... त्रिवर्गांनीं आपलाले वेळेस नियत करून दिल्ही. -वाडसनदा १६८. [अर. नीयत]

दाते शब्दकोश