मराठी बृहद्कोश

तेरा मराठी शब्दकोशांमधील ३,००,८७५ शब्दांचा एकत्रित संग्रह

शब्दार्थ

आसुरी बुद्धि, आसुरी बुद्धी      

स्त्री.       प्रकृतीचा एक भेद. प्राकृतिक बुद्धी. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अभिलाष बुद्धि, अभिलाष बुद्धी      

स्त्री.       अपहार करण्याची इच्छा.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अंगची बुद्धि, अंगची बुद्धी      

स्त्री.       उपजत शहाणपण.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अस्खलित बुद्धि, अस्खलित बुद्धी      

स्त्री.       तर्कशुद्ध, अचूक विचारसरणी; कधी न चुकणारा तर्क, ज्ञान.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उपजत बुद्धि, उपजत बुद्धी      

जन्मतःच काही गोष्टी करण्याची प्राणिमात्रांची प्रेरणा; न शिकवता केवळ प्रेरणेने करता येणाऱ्या गोष्टी : ‘जी उपजतबुद्धी असते तिला अनुसरून त्यांची दिनचर्या असते.’ – लोटिव्या २५८. उपजत रांगणे      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

बुद्धि

स्त्री. १ पदार्थाच्या स्वरूपाचें ज्ञान करून देणारी, सारासार विचार करणारी व एखाद्या गोष्टीचें आकलन करणारी मानसिक शक्ति. २ ज्ञान; जाणीव; आकलन; शहाणपण; समज. 'चांग तें उराउरीं मागों । देवासि कीं बुद्धि सांगों ।' -ज्ञा ११.५४९. ३ विचार; निश्चय; मन; मत. 'काल देतों म्हणाला, आज बुद्धि फिरली.' 'जयास नाहीं दृढबुद्धि । तो एक मूर्ख ।' -दा २.१.३७. ४ मत; समजूत; अमुक गोष्ट अमुक गोष्ट अमुक रूपाची किंवा गुणाची आहे असा ग्रह. 'हा निळ्याचा दुसरा । या बुद्धी हातु घातला विखारा ।' -ज्ञा ९.१४८. ५ इच्छा; भावना; अंतःकरणप्रवृत्ति. (क्रि॰ होणें). 'कोणत्या वेळीं काय बुद्धि होईल हें कोणीं सांगावें ?' ६ बेत; संकल्प; युक्ति; उपाय; इलाज. ' त्यास हें सांगावें वर्तमान । तो बुद्धि पूर्ण सांगेल ।' ७ (समासांत) भाव; दृष्टी; नजर. जसें-अपकार-उपकार-तिरस्कार-पूज्य-हित-बुद्धि; काच-काष्ठ-चर्म-बुद्धी. गुरु-पितृ-मातृ-मित्र-शत्रु-बुद्धि. ८ मानणें; समजणें. [सं.] म्ह॰ ज्यास बुद्धि नाहीं त्यास भांडवल नाहीं. (वाप्र.) ॰फांकणें- १ गोंधळणें; आच्श्रर्यचकित होणें. २ ज्ञान, आकलन वाढणें. ॰सांगणें-शहाणपणाच्या गोष्टी सांगणें; उपदेश करणें. बुध्दीनें स्वर्गास जाणें-नुसत्या ज्ञानाच्या जोरा- वर मोठीं कृत्यें करणें व श्रेष्ठत्व संपादन करणें. बुद्धीस लागणें- एखाद्याच्या तंत्रानें चालणें, इच्छेनुसार वागणें. बुध्दीशीं वैर करणें-स्वतःच्या अंतःकरणाच्या सदिच्छेविरुद्ध प्रयन्त करणें; मनांत येतें त्याप्रमाणें न वागणें. बुध्दीचा खंदक-पु. पूर्ण मूर्ख माणूस. बुध्दीचा खोटा-वि. दुष्ट; वाईट मनाचा. तुल॰. 'पाखरूं हे मारणें बुद्धि खोटी । ' -र ११ बुध्दीचा जड-वि. मंद बुद्धीचा. बुध्दीचा सागर-पु. १ अत्यंत विद्वान, हुषार माणूस. 'भले बुद्धिचे सागर नाना । ऐसे नाहीं होणार ।' -ऐपो ४३९. २ (ल.) अत्यंत मठ्ठ व मूर्ख मनुष्य. बुध्दीचा विकास- बुद्धीचा विशाळपणा. 'बायकापोरांच्या ऐवजीं देशाचा संसार करण्याची बुद्धि होणें हा त्या बुद्धीचा विकास आहे.' -टिसू १६८. सामाशब्द- ॰कौशल-ल्य-न. बुद्धीचा चलाखपणा; विलक्षण हुषारी; बुद्धीची तीव्रता. [सं.] ॰गम्य-वि. बुद्धीनें जाणतां येण्या जोगें; तर्क्य. गम्य पहा. [सं.] ॰ग्रह-पु. मनाची समजूत; जाणीव; मत. ॰ग्राह्य-वि. बुद्धीला ग्रहण करतां येण्यासारखे; बुद्धिगम्य. [सं.] ॰चापल्य-न. बुद्धीची तीव्रता; चलाखपणा; तरतरीतपणा. [सं.] ॰चाळक-वि. (काव्य) मनास किंवा इच्छेस चालना देणारा. [सं. बुद्धि + चालक] ॰तत्त्व-न. महत्तत्व. 'उभयसंगु पहिलें । बुद्धितत्त्व प्रसवलें ।'-ज्ञा १४.९१. [सं.] ॰नीत-स्त्री. उपदेश, सल्ला, उपाय, मार्ग इ॰ विषयीं सूचना. ॰पाटव-न. बुद्धीचा तीव्रपणा, चलाखपणा. [सं.] ॰पुरःसर-पूर्वक-क्रिवि. मुद्दाम; जाणूनबुजून; बुद्धया. 'बुद्धिपुरःसर पाप केलें आणि सहज घडलें यांत अंतर आहे.' [सं.] ॰पुरस्कर-क्रिवि. (अप.) बुद्धिपुरःसर पहा. ॰प्राबल्य-न. बुद्धीची पूर्ण वाढ, परीपक्वदशा. [सं.] ॰प्रामाण्यावाद-पु. मानवी बुद्धि हेंच सर्व ज्ञानाचें प्रमाण व उगमस्थान आहे असें मानणारें मत. (इं.) रॅशनॅलिझम्. ॰बळ-न. १ बुद्धीचें सामर्थ्य, शक्ति. २ ज्यांत बुद्धीची शक्ति लागते असा एक खेळ. यांत लष्करी डावपेंचाची भाषा असून पटा- वर मोहरीं मांडून हा खेळ खेळण्यांत येतो. देशी व युरोपियन अशा याच्या दोन तर्‍हा आहेत. 'जेंवि बुद्धिबळें वाडें कोडें । मिथ्या राजा प्रधान हत्ती घोडे ।' -भारा. बाल. ११.२४९. ३ बुदबळ पहा. ॰बोध-पु. जीव आणि ईश्वर. 'भेदनदीचां दोहीं थडीं । आरडातें विरहवेडी । बुद्धिबोध । ' -माज्ञा १६.५. ॰भेद-पु. १ हेतूचा, उद्देशाचा बदल. २ मनाचा, मनोवृत्तीचा बदल; मतपालट. ३ वैमनस्य; द्वेष; कलह. 'बुद्धिभेद उत्पन्न करणारे वाद उत्पन्न होऊन दुही माजते. ' -टि २.४३४. [सं.] ॰भ्रंश-पु. १ विचारशक्तीचा नाश; मानसिक गोंधळ; भ्रम. ' बुद्धिभ्रंम होऊनि रावणें । सीताहरण पैं केलें ।' २ बुद्धिभेद पहा. [सं.] ॰मंद-वि. ज्याची बुद्धि जड आहे असा; जडबुद्धि. ॰मांद्य-न. बुद्धीचा जडपणा; मंदत्व. [सं.] ॰मंतं-वंत-मान्-वान्-वि. तीव्र बुद्धीचा; हुशार; तरतरीत; शहाणा; तैलबुद्धि. ॰योग-पु. १ निष्कामकर्मयोग. 'आतां बुद्धियोगु निश्चित । अवधारी पां ।' -ज्ञा २.२३०. २ ज्ञानयोग. [सं.] ॰वाद-पु. उपदेश; सल्ला; शिफारस; सूचना. (क्रि॰ सांगणें; करणें). 'एके यतीनें येवोनी । बुद्धिवाद सांगितला ।' -गुच ३३.५. [सं.] ॰विलास-पु. १ कल्पनेचा खेळ. २ मनाचें किंवा बुद्धीचें भटकत फिरणें. [सं.] ॰विषय-पु. १ बुद्धीनें जाणलेली, समजलेली गोष्ट. २ बुद्धिग्राह्य गोष्ट; मानसिक शक्तीनें ग्रहण करण्याजोगी, मानसिक शक्तीच्या ग्रहणाचा विषय होणारी गोष्ट. [सं.] ॰वैभव-न. बुद्धीचें श्रेष्ठत्व, उच्चपणा, शक्ति. [सं.] ॰स्थ-वि. उद्देशिलेलें; योजिलेलें.कल्पिलेलें. [सं.] ॰स्वातंत्र्य-न. स्वतंत्र विचार; मनोवृत्तीचा मोकळेपणा. 'ईश्वर मनुष्यास बुद्धिस्वातंत्र्य देतो. ' -टि २.४२२ बुद्धयंकित-वि. बुद्धीच्या आज्ञेंत राहणारा; बुद्धीवश. [सं.बुद्धि + अंकित] बुद्ध्यतीत- वि. बुद्धीच्या आटोक्याबाहेरील; बुद्धीला न समजेल असें. [सं. बुद्धि + अतीत] बुध्द्यारूढ-वि. समजलेलें; जाणलेलें. [बुद्धि + आरूढ] बुद्ध्या-क्रिवि. १ मुद्दाम; जाणूनबुजून; बुद्धिपूर्वक. २ मनानें; स्वेच्छेनें; जाणीव असतांना (समासांत उपयोग). [बुद्धि]

दाते शब्दकोश

बुद्धि buddhi f (S) pop. बुद्ध f The understanding or intellect. 2 Wisdom, sense, judgment. Pr. ज्यास बुद्धि नाहीं त्यास भांडवल नाहीं; शिकिवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी बहुत दिवस पुरत नाहीं; अधीं बुद्धि जाती मग वैभव जातें. 3 Purpose, intention, mind. Ex. काल देतों म्हणाला आज बुद्धि फिर- ली; or काशीहून माघारें यावें असी मला तेव्हां बुद्धि झाली. 4 Opinion or notion; mental determination or view respecting. 5 The will and affections; the heart considered as the seat or motor of good and evil emotions, purposes, or actions. Pr. बुद्धीसारखें फळ. 6 A device, contrivance, scheme; an expedient or a way devised. Ex. त्यास हें सांगावें वर्त्तमान ॥ तो बुद्धि पूर्ण सांगेल ॥. 7 बुद्धि, in the sense of Mind, view, regard, reckoning, account, estimation, is much and elegantly used in comp.; as अपकार-उपकार-उपेक्षा-तिरस्कार-निंद्य-पूज्य-हित- अहित-बुद्धि Deeming or considering as an injury, as a benefit or a service, as a matter worthy to be overlooked or treated lightly, as to be scornfully rejected, as blamable, as adorable, &c. &c. Also in the sense of Holding, apprehending, understanding, mentally accepting; as काच-काष्ठ-चर्म-जल- पाषाण, मृतिका-बुद्धि Holding (a substance) to be glass, wood, leather &c.; also as गुरु-पितृ-मातृ- भ्रातृ-मित्र-शत्रु-बुद्धि Holding to be (or as) one's Guru, father, mother, brother &c. 8 Compounds are numerous; as द्वेषबुद्धि, प्रेमबुद्धि, ममताबुद्धि, वैर- बुद्धि, स्नेहबुद्धि, करुणाबुद्धि, लोभबुद्धि, मोहबुद्धि A heart or will or intention of malice, of love, of fondness &c., i.e. malice &c. as awake and acting; also as अहंकारबुद्धि, विनयबुद्धि or नम्रबुद्धि, क्रौर्यबुद्धि, पारुष्यबुद्धि A disposition of pride, humility, ferocity &c., i.e. proudmindedness, humblemindedness &c. Other compounds requiring explanation or, because of establishment in the language or of great serviceableness, demanding insertion, appear in their order; and others, such as बुद्धिविकार, बुद्धिविकास, बुद्धितरंग, बुद्धिप्रकाश, बुद्धिप्रसार, बुद्धिसागर, बुद्धयादर्श, and thus endlessly, can be created at the need or the will of the speaker.

मोल्सवर्थ शब्दकोश

बुद्धि f The intellect. Wisdom. Purpose. Mental determination. Opinion. A device. बुद्धिस लागणें Act under the guidance of.

वझे शब्दकोश

मैंदू, खोपडी, डोकें, भेजा, अक्कल, चलाखी, हुषारी, चातुर्य, टाळकें, डोचकें, मस्तिष्क, समंजसपणा, समज, बुद्धिवैभव, बुद्धितेज, शहाणपण, विद्वत्ता, पांडित्य, ज्ञान, तीव्र बुद्धिमत्ता, अंगची बुद्धि, विषयग्रहणशक्ति, ता वरून ताकभात ओळखणे, डोकेबाजपणा.

शब्दकौमुदी

(सं) स्त्री० मति, अंतःकरणवृत्ति, धारणाशक्ति.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

निष्टंक बुद्धी निश्चयेंसीं

दृढ बुद्धी निश्चयासह सदाच (ज्ञानेश्वरी अध्याय १२, ओवी ९७)

ज्ञानेश्वरीमधील कठीण शब्दांचे अर्थ (राज्य मराठी विकास संस्था प्रकाशित)

सदसद्विवेक बुद्धि

सदसद्विवेक बुद्धि f Conscience.

वझे शब्दकोश

बुद्धि चोरणें

मतिभ्रंश करणें; गैरसमज करणें. 'त्यांनी माझी बुध्य चोरली कीं गुराखी खेळायाचा किला आहे कांहीं मातबर नाहीं म्हणून हातरोखा केला.' -पेद ६.५२.

दाते शब्दकोश

बुद्धि गहाण ठेवणें

समजत असूनहि अडाण्या- प्रमाणें वागणें; प्रज्ञाहत असणें

दाते शब्दकोश

बुद्धि पालटणें-फिरणें

विचार बदलणें; विचार पालट होणें.

दाते शब्दकोश

बुरणुस बुद्धि

स्त्री. जडबुद्धि; मंदबुद्धि; जीर्णबुद्धि. (बुरणुसांत खिळा खुपसून वर काढला तरी भोंक राहत नाहीं यावरून). 'हा ठराव वाचल्यावर अगदीं बुरणुसं बुद्धीच्या माणसाला कळेल.' -के १९.१२.१९३९.

दाते शब्दकोश

परप्रत्ययनेय बुद्धि

वि. दुसर्‍याच्या बुद्धिप्रमाणें, तंत्राप्रमाणें वागणारा; दुसर्‍याचें ऐकणारा; स्वतः कोणत्याहि गोष्टीबद्दल निश्र्चित मत नसणारा किंवा स्वतंत्रपणें कृति न करणारा. [सं.]

दाते शब्दकोश

संबंधित शब्द

चित्त

न. मन; अन्तःकरण; बुद्धि; वृत्त्यात्मक अन्तःकरण पंचकांतील चवथा अवयव; मनोवृत्ति, विकार, भावना, राग इ॰ कांचें अधिष्ठान मानलेलें हृदयस्थान. 'जे वस्तूचा निश्चयें केला । पुढें तेंचि चिंतूं लागला । तें चित्त बोलिल्या बोला । येथार्थ मानावें ।' -दा १७.८.८. [सं.] (वाप्र). ॰उडून जाणें अक्रि. १ घाबरणें, उदास होणें; मन न रमणें. (कर्त्याची षष्टी असते). 'तें ऐकून महाराजांचें चित्त उडून गेलें.' -चंद्र १३४. २ एखाद्या गोष्टी- विषयीं मन विटणें; नावड उत्पन्न होणें. ॰पुरविणें-वि. लक्ष्य देणें; लक्ष्यपूर्वक ऐकणें. चित्तांत खाणें-अक्रि. मनास लागणें; वाईट वाटणें. सामाशब्द-॰क-वि. हुषार; चलाख; अल्पवयस्क असून मोठ्या विषयाकडे चित्त लावण्याचा स्वभाव ज्याचा तो. चित्तंगम-वि. हृदयंगम; मनोवेधक; हृदयस्पर्शी. 'माझीं मी निवडूनि अर्पिलिं फुलें अत्यंत चित्तंगम ।' -टिक १५२. ॰गेह-न. हृदयरूपी घर; मन हेंच घर; मन. 'विकल्प प्रवेशला ते समयीं । चित्तगेहीं कैकेयीच्या ।' -रावि ९.१६१. [सं. चित्त + गेह = घर] ॰चतुष्टय न. मन, बुद्धि, चित्त व अहंकार या चारांचा समुदाय. चित्तचतुष्टय डाहाळिक । कोंभैजेतो ।' -ज्ञा १५.९७. 'चित्त- चतुष्ठ्यय चमत्कार । मन बुद्धी चित्त अहंकार ।' एभा २२.३५०. -एभा ३.११२. [सं. चित्त = मन + चतुष्टय = चारांचा समुदाय] ॰चमत्कार-पु. आश्चर्य; अचंबा; सानंदाश्चर्य. [सं. चित्त + चमत्कार] ॰चाळक-वि. १ इच्छेचें, मनोवृत्तींचें नियमन करणारा (ईश्वर). 'चित्तचाळक विटेवरला । तो हरि माझ्या मनीं भरला ।' 'जयजय सकळ चित्तचाळका ।' २ मन रमविणारा; मनोरंजक; मन चाळविणारा, विकारयुक्त करणारा. [सं. चित्त + चालक] ॰चोर-चोरटा-वि. मन हरण करणारा; चित्ताकर्षक. [सं. चित्त + चोर] ॰ज-पु. मदन; कामदेव; मनांत जन्मणारा (मदन). [सं. चित्त = मन + ज = जन्मणारा] ॰जडसंयोग-पु. आत्मा आणि शरीर यांचा संयोग. [सं. चित्त = चैतन्य + जड = स्थूल (शरीर, देह) + सम् + योग = एकत्र येणें] ॰निग्रह-पु. मनाचें संयमन, नियमन; मन ताब्यांत ठेवणें. [सं. चित्त + निग्रह = ताब्यांत, दाबांत ठेवणें] ॰निर्वृत्ति-स्त्री. मनाची शांति; चित्ताची विश्रांति. [सं. चित्त + निर् + वृत्ति] ॰पावन-पु. चितपावन पहा. ॰पोळ्या- पु. चितपावनांना तुच्छतेनें, उपहासानें संबोधण्याचा शब्द. ॰प्रसन्न-वि. समाधानी; संतुष्ट; शांत चित्ताचा. [सं. चित्त + प्रसन्न = तुष्ट, शांत] ॰भ्रंश-पु. १ मानसिक शक्तींचा भंग; म्हतारचळ. २ देहभानाचा नाश; चित्तभ्रम; डोकें ठिकाणावर नसणें; डोकें फिरणें. [सं. चित्त + भ्रंश] ॰भ्रामक-वि. मनाला मोहून टाकणारा; चित्ताकर्षक; मन वेडें करणारा. [सं. चित्त + भ्रामक] ॰लहरी- स्त्रीअव. मनस्तरंग; मनाची हुक्की; मनोविकार; मनाचे छंद, तरंग, विलास इ॰ 'ब्रह्मानंद सागरीं । वीराल्या चित्तलहरी ।' [सं. चित्त = मन + लहरी = लाटा, तरंग] ॰विभ्रम-पु. मन बहकणें; बुद्धि- भ्रंश; मन ठिकाणावर नसणें. [सं. चित्त = मन + वि = विरुद्ध + भ्रम = फिरणें] ॰वृत्ति-स्त्री. १ लक्ष्य; मन. 'चित्तवृत्ति ठिकाणीं नाहीं फिरली, बदलली. उडून गेली.' २ मनाच्या लहरी, तरंग, परि- भ्रमण, उड्डाण. 'चित्तवृत्ती घटकेघटकेंत पालटतात.' [सं. चित्त = मन + वृत्ति = वर्तन, वागणें, असणें] ॰वेधक-वि. मन आकर्षिणारा; मन हलवून सोडणारा; अन्तःकरणास भिडणारा; हृदयंगम; [सं. चित्त + वेधक = वेधणारा] ॰वैकल्य-न. मनोभ्रम; बुद्धि- भ्रंश; मन बहकून जाणें. [सं. चित्त + वैकल्य = विकलता, भ्रम, पंगुपणा] ॰शुद्धि-स्त्री. मनाचा शुद्धपणा, पवित्रपणा; मनाचें रागद्वेषादि वाईट भावनांपासून अलिप्त राहणें. 'चित्तशुद्धि नस- लिया जाणा । एकांतीं मांडिती देवार्चना । पुढें आठवी मन- कामना । तें रानोरान हिंडवी ।' [सं. चित्त + शुद्धि] ॰संकोच- पु. १ मनोनिग्रह; मनावरील दाब. २ (विनयामुळें होणारा) मनाचा लाजाळूपणा; भीडस्तपणा; शालीनता. [सं. चित्त + संकोच = आंखूडपणा; भिडस्तपणा] ॰समाधान न. मनाचें स्वास्थ्य; चित्ताची शांति; संतुष्टता. [सं. चित्त + सम् + आ + धा अन] ॰स्थैर्य-न. मनःस्वास्थ्य; मनाची स्थिरता, शांति. [सं. चित्त + स्थैर्य = स्थिरता] ॰हीन-वि. मन ठिकाणावर नसणारा; मनावर योग्य संस्कार नसलेला; अप्रबुद्ध. 'तें आघवेंचि गेलें वाया । जे चित्तहीन ।' -ज्ञा ९.१७८. [सं. चित्त = मन + हीन = टाकलेलें, वाईट क्षुद्र] ॰चित्ताची आर्द्रता-स्त्री. मनाचा कोंवळे- पणा; चित्ताची मृदुता. चित्ताथिला-वि. सजीव; विचारी; चित्तसंपन्न. 'मा मी तव चित्ताथिला । आणि श्रीगुरु ऐसा दादुला ।' -ज्ञा १८.१७.३२. चित्तैकाग्र्‍य-न. मनाची एका- ग्रता, एकतानता. [सं. चित्त + ऐकाग्र्‍य = एकाग्रता]

दाते शब्दकोश

आत्मौपम्यबुद्धि, आत्मौपम्यबुद्धी      

स्त्री.       सर्वत्र आपल्यासारखी बुद्धी; सर्वत्र आत्मतत्त्व असल्याची बुद्धी : ‘सर्वांभूती एक आत्मा किंवा आत्मौपम्य बुद्धी या तत्त्वानें व्यावहारिक नीतिधर्माची जशी उपपत्ती लागते, तशी दुसऱ्या कोणत्याच तत्त्वानें लागत नाहीं.’ − गीर ३८२. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दुष्ट

वि. १ दुसर्‍याचा घातपात करावा किंवा तें न जम- ल्यास मत्सर तरी करावा अशा स्वभावाचा; वाईट बुद्धीचा. २ पापी; दुराचारी; नीच; अनाचारी. ३ दावेदार; शत्रु. 'मी आलों असतों पण माझा दुष्ट तेथें आहे.' ४ खराब; दोषयुक्त (हवा, ठिकाण इ॰). [सं.] ॰प्रतिग्रह-पु. ज्यापासून दान घेऊं नयें म्हणून सांगितलें आहे अशा अपात्र व्यक्तीपासून स्वीकारलेलें दान; अमंगल प्रसंगीं स्वीकारलेलें दान. जसें:-शय्यादान इ॰ दुष्टहेतुमूलक दानाचा स्वीकार करणें; दुष्प्रतिग्रह पहा. [दुष्ट + सं. प्रतिग्रह = दान स्वीकारणें] ॰बुद्धि-स्त्री. पापवासना; अधमपणाची बुद्धि. -वि. पापी; नीच; अधम; वाईट बुद्धीचा. [दुष्ट + बुद्धि] ॰भाव-पु. १ मत्सर; द्वेष; शत्रुत्व. २ कुभाव; गैरसमज; विकल्प. [दुष्ट + भाव] ॰मानस-न. दुष्ट बुद्धि; दुष्टपणा; नीचपणा. -वि. पापी; अधम; दुष्ट अंतःकरणाचा. [दुष्ट + मानस = मन] ॰व्रण-पु. १ गळूं; फिसकें; बेंड. २ नाडीव्रण. [दुष्ट + सं. व्रण = फोड, जखम] ॰स्वप्न-पुन. १ अशुभसूचक स्वप्न. २ (मनाला डवंचणारी) अनिष्ट शंका, कल्पना. [दुष्ट + सं. स्वप्न] दुष्टाई-स्त्री. १ दुष्टपणा; नीचपणा; अधमपणा. २ खराबपणा; घाणेरडेपणा; दोषयुक्तता. ३ मत्सर; द्वेष; दावेदारी. (क्रि॰ करणें; धरणें; बाळगणें). याअर्थीं दुष्टावा, दुष्टायकी हेही शब्द रूढ आहेत. दुष्टात्मा-वि. दुष्ट अंतःकरणांचा; पापी; अधम. [दुष्ट + सं. आत्मन् = मन] दुष्टायकी-स्त्री. दुश्मनगिरी; शत्रुत्व; द्वेष; दावेदारी. दुष्टावा-पु. १ दुष्टपणा. २ दावेदारी; वैर; द्वेष. 'सरकारनें खादीचा दुष्टावा कां करावा ?' -के १.७३.०. दुष्टोत्तर-न. दुरुत्तर; उद्धटपणाचें, अपमानकारक, शिवीगाळीचें उत्तर. 'बोलें सदां दुष्टोत्तर । जेणें खोंचें जिव्हर ।' [दुष्ट + उत्तर]

दाते शब्दकोश

कुशग्रबुद्धिँ-मति

स्त्री. दर्भाग्राइतकी तीक्ष्ण बुद्धि; अत्यंत तीक्ष्ण बुद्धि; वि. तीक्ष्ण बुद्धीचा. [सं. कुश + अग्र + बुद्धि]

दाते शब्दकोश

मति

स्त्री. १ बुद्धि; जाणण्याची शक्ति. 'कशी हीन झाली तुझी मति ।' -ऐपो १४६. २. मन; अंतःकरण. ३ विचार; हेतु. बुद्धि पहा. [सं.] ॰चालणें-आकलन होणें. 'आपली बरीच मति चालते.' -विवि ८.३.४७. ॰प्रकाश-वि. ज्ञानवान; बुद्धि- वान. 'विनायका अभयदाता । मतिप्रकाश करीं मज ।' -गुच १.११. ॰भ्रम-विभ्रम-पु. चूक; चुकीचा समज; बुद्धिभ्रंश. 'तियें मूर्ख मतिभ्रमें । मी कर्ता म्हणे ।' -ज्ञा ३.१७८. ॰मंद-वि. बुद्धीनें कमी; जड बुद्धीचा; मठ्ठ. [सं.] ॰मान्-वंत-वि. बुद्धिमान्; शहाणा; धूर्त. 'तंव एकीं मतिवंतीं । या बोलाचिया खंतीं ।' -ज्ञा १३.४०.

दाते शब्दकोश

(सं) स्त्री० बुद्धि, धारणाशक्ति.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

परमार्थ

पु. १ ईश्वरसाधनरूप पुरूषार्थ; मोक्ष; सद्गति. २ ब्रह्मज्ञान. 'ऐसी जगीं सुरस कथा । जे जन्मभूमि परमार्था । मुनि सांगे नृपनाथा । जन्मेजया ।' -ज्ञा १.४८. ३ केवल सत्य; सत्यांश. याच्या उलट माया, असत्य. 'कवि वर्णनप्रसंगीं मुखा- पेक्षां चंद्रास केवल तुच्छ करतात परंतु परमार्थ पाहतां मुख तें मुख व चंद्र तो चंद्र.' -क्रिवि. सद्धेतूसाठीं; धर्मार्थ. जसें:-परमार्थ-इनाम- गांव-औषध. म्ह॰ प्रपंचाला धन परमार्थाला वैराग्य. पर- मार्थतः-क्रिवि. सत्यतः; खऱ्या दृष्टीनें; प्रामाणिकपणें (भाषण, वर्तन). ॰दृष्टी-स्त्री-. परमार्थाची आसक्ति इच्छा. -वि. पर- मार्थाची बुद्धि असलेला. ॰प्राप्ति-स्त्री. ब्रह्मप्राप्ति; मोक्ष. ॰बुद्धि- स्त्री. १ कपटादि रहित भावार्थरूप बुद्धि; (व्यापक) सत्य, पावित्र्य, अकृत्रिमता, अहेतुकात इ॰ बद्दल योजतात. २ दैवी प्रेम; शुद्ध, पवित्र भक्ति; आत्म्याचा परमार्थाकडे ओढा. ॰भिक्षा-स्त्री. धर्माकरितां, धार्मिक विचारानें मागितलेली भिक्षा. ॰साधन-न. १ परमार्थ मिळविणें, प्राप्त करून घेणें. २ परमार्थ मिळविण्याचा उपाय; साधन. परमार्थी-वि. १ प्रपंचापेक्षां ईश्वरसाधनरूप मार्गाकडे जास्त लक्ष लावणारा; ब्रह्मप्राप्तीसाठीं झटणारा. २ भावार्थी; कळकळीचा; प्रामाणिक; निष्कपट.

दाते शब्दकोश

सद्बुद्धि

स्त्री. १ चांगली, शुद्ध बुद्धि, मन, विचार. २ सत्प्रवृत्ति; नीतिपरायणता; न्यायपरायणता; योग्य दिशेकडे कल. वि. चांगली बुद्धि, प्रवृत्ति, विचार, मन असलेला. [सं.सत् + बुद्धि]

दाते शब्दकोश

तैल

न. तेल पहा. -वि. तेलापासून केलेलें; तेलासारखें. [सं.] ॰चित्र-न. तेलाच्या रंगानीं काढलेलें चित्र. (इं.) ऑईलपेंटिंग. [सं.] ॰पक्व-पाचित-वि. तेलामध्यें तळून केलेला (जिन्नस). ॰बुद्धि-स्त्री. कुशाग्र, तरतरीत बुद्धि; कांहीं एक विषयाचा यत्किंचित् अंश गृहीत झाला असतां त्या सर्व विषयाला व्यापणारी अशी बुद्धि (तेलाचा बिंदु पाण्यावर पडला असतांना तो पसरतो यावरून). -वि. अशा प्रकारच्या बुद्धीचा; फार विद्वान, हुषार. [सं. तैल + बुद्धि] ॰यंत्र-न. तेल वापरून त्या पासून शक्ति उत्पन्न करणारें यंत्र, इंजन. (इं.) ऑईल एंजिन. ॰वायु-पु. कर्ब आणि प्राण ह्यांच्या मिश्रणानें उत्पन्न होणारा वायु. (इं.) एथिलीन. तैलाभ्यंग-पु. शरीर तेलानें माखणें; स्नानापूर्वीं अंगास तेल लावणें; न्हाणें. [सं.]

दाते शब्दकोश

पोर

पु. लहान मुलगा; पोरगा. १ -स्त्री. लहान मुलगी; पोरगी. लहान मूल; बच्चा. २ जनावराचें लहान पिल्लूं; पाडस; बछडें. -वि. (गो.) पोरका; अनाथ. [सं. पुत्रक; का. पोर] म्ह॰ पोरा आणि बुद्धि तेरा. ॰कट-वि. पोरासारखें; पोराला शोभणारें. पोरका-वि. १ लहान मुलाचें; मुलाला, शोभणारें; भव्य, गंभीर, प्रौढ इ॰ नव्हें तें (भाषण, वस्त्र इ॰). २ (कों.) आईबापांवांचून असलेला; अनाथ. उदा॰ 'बापपोरका, आई- पोरका.' ॰किडा-पु. धान्य खाणारा एक लहान किडा; टोका; क्षुद्र कीटक. ॰खाद्या-वि. जिचीं मुलें लवकर मरतात अशी (स्त्री). ॰खेळ-पु. १ मुलांचा इटीदांडू इ॰ खेळ. २ पोरासारखें हसणें, उड्या मारणें इ॰ ३ घेणें देणें इ॰ व्यवहारांचें मर्यादा सोडून मनस्वी वर्तन. ४ (ल.) सहज करतां येणारी गोष्ट पोरगा-पु. १ मुलगा; पोर. २ खिजमतगार पोर; पोर्‍या; लहान वयाचा नोकर. ३ स्त्रीवेष घेतलेला नाचणारा पोर. ४ लेकवळा; गुलाम [पुत्रक] पोरगी- स्त्री. मुलगी. पोरगें-न. लहान मूल. ॰गळ-वि. पोरकट पहा. ॰चेष्टा-स्त्री. पोरखेळ अर्थ २ व ३ पहा. मुलाचें नाचणें, बागडणें. ॰जिन्नस-पुस्त्री. (निंदार्थी) लहान मुलगा; पोरसौदा; पोर. पोरटा-टी-टें-पुस्त्रीन. (निंदार्थी किंवा रागानें) पोरगा-गी-गें; कारटा. ॰पिसा-वि. १ पोरांचा अतिशय शोकी; मुलांची फार आवड असणारा. २ अपत्यप्राप्तिसाठीं अतिशय उत्कंठित झालेला. ॰पिसें-न. १ पोरांचा बेसुमार शोक. २ अपत्यप्राप्तिसाठीं बे- सुमार उत्कंठा. ॰बुद्धि-स्त्री. अपक्व बुद्धि. -वि. अपक्वबुद्धीचा. ॰वट-वि. पोरांचा आचारविचारासारखा; पोरकट पहा. [पोर + वत्] ॰वडा-वाडा-वंडा-पु. पोरांचा समुदाय; सुळसुळाट; मुलांचा पुष्कळ भरणा असलेलें कुटुंब; घर, गांव, राज्य इ॰ च्या कारभारामध्यें प्रौढ, अनुभवी मनुष्य नसल्यामुळें होणारी अव्य- वस्था, किंवा अननुभवी लोकांचें प्राधान्य. 'नुस्ता पोरवडा घरीं न कवडा चित्तीं बरा नीवडा ।' -असु ५. [पोर + वाडा = घर] ॰वय-न. लहानपण; लहान वय. 'संसार सुखास अहल्या आंचवली पोरवयांत ।' -विक १६ ॰वाला-वि. १ मुलेंबाळें असलेला (कुटुंबी पुरुष-स्त्री). २ (ल.) लेंकुरवाळें; फांटे फूट- लेलें (हळकुंड). ॰समजूत-स्त्री. लहान मुलाची बुद्धि; अल्प समजूत. ॰सौदा-पु. लहान मुलगा; पोरजिन्नस. 'हा पोरसौदा असून बरा शहाणा आहे.' -वि पोरवय; मुलासारखा. [पोर + फा; सौदा = माल] पोरांडी-डें-स्त्रीन. (उपहासानें) पोर वडा पहा. [पोर + रांड] -वि. पोरें व बायका मात्र आहेत असें. [सं. पुत्ररंड] पोरापोरका-वि. आईबाप आणि मित्र नस- लेला; अनाथ (मुलगा). [पोरका + पोर] पोरापोरीं, पोरा- सोरीं-क्रिवि. १ पोरांमध्यें; पोरांकडून; पोरांनीं. २ एका मुलापासून दुसर्‍या मुलाला अशा रीतीनें वंशपरंपरेनें (वतन, वारसा इ॰ जाणे). पोरीटोरी-स्त्रीअव. (निंदार्थीं) मुली. 'पोरीटोरी गोरी काळी सार्‍या पाहुनि कविराय बाला ।' -राला ५४. पोरेंबाळें-लेकरें- सोरें-नअव. मुलें लेकरें; (व्यापक) मुलेंबाळें. [सं. पुत्रक + सोद- रक] पोरी-वि. (कु.) पोरका; आईबाप नसलेला. पोरोडा- पोरवडा पहा. पोर्या, पोर्‍या-पु. १ पोरगा अर्थ १ ते ३ पहा. २ (कों.) पोरकिडा. ३ (प्र.) पोहरा पहा. ४ बताणा, बच्चा पहा.

दाते शब्दकोश

पोर pōra n A child. Pr. पोरा आणि बुद्धि तेरा Children are fickle and flighty. 2 m A little boy. 3 f A little girl. 4 n Applied to a pup, cub, whelp &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

घृत

न. तूप; आज्य. 'अथवा इंद्रियें आणि प्राण । हेचि यज्ञोपचारभरण । अज्ञान घृत ।' -ज्ञा ९.२४०. 'घृत सोडुनि कोण करिल आ तेला ।' -मोउद्योग ६.३५. [सं.] ॰कुंभ- -पु. (काव्य). कामातुर प्रियकरा-रमणाबद्दल कवि हा शब्द वापरतात. [घृत + कुंभ = घडा] ॰कुमारी-स्त्री. कोरफड; कुमारी; कुवारकांडें; कुंवारी. [सं.] ॰कु(क)ल्या-स्त्री. १ (भोजनाच्या वेळीं) पानांत वाहणारे तुपाचे पाट; यावरून. २ (ल.) (जेवणांत) तुपाची व इतर पक्वान्नांची समृध्दि, चंगळाई; चमचमीत जेवण. वाजसनेयी संहितेंत (६.१२) हा प्रयोग येतो. [सं. घृत + सं. कुल्या = नदी, पाट] ॰कुल्ल्या मधुकुल्ल्या-स्त्री. १ (तुपाचे पाट व मधाचे पाट) तूप व गोड पदार्थ यांची चंगळ, रेलचेल, समृद्धि. २ (ल.) मिष्टान्नाचें सुग्रास व चमचमीत भोजन. 'पुराणांचा शिमगा जेव्हांपासून सुरू झाला व भटांच्या घृतकुल्या मधुकुल्या देशांत प्रवृत्त झाल्या तेव्हापासून...कौशल्य चट सारें पार वाहून गेलें.' -नि. [घृतकुल्या + मधु + कुल्या] ॰धेनु-स्त्री. तुपाचा गोळा घेऊन त्यास गाय कल्पून त्याची पूजा करून ब्राह्मणास दान करतात ती. [घृत + धेनु = गाय] ॰पक्व-पाचित-वि. तुपांत तळलेलें, शिजविलेलें (खाद्य). [घृत + सं. पक्व-पाचित = शिजलेलें, शिजविलेलें] ॰बुद्धि-स्त्री. बुद्धिचा जडपणा; मंद, जड बुद्धी; बुद्धीची ग्राहकशक्ति तीव्र नसणें. (पाण्यांत तुपाचा थेंब थिजतो किंवा फार हळू हळू पसरतो यावरून); याच्या उलट तैलबुद्धि (कारण तेलाचा थेंब पाण्यावर फार जलद पसरतो). २ -वि. मंदबुद्धीचा; तल्लख बुद्धि, ग्रहणशक्ति नसणारा. [घृत + बुद्धि] ॰विपाक-पु. (रसा.) तूप खतखतणें, फसफसणें, रासायनिक विकृति पावणें. साखरेचा दुग्धविपाक व नंतर घृतविपाक होऊं देऊन...' -सेंपु २.५.४. [घृत + विपाक = विकृति] ॰श्राध्द-न. तीर्थयात्रा करण्याच्या उद्देशानें घराहून निघतांना करावयाचें श्राद्ध. यांतील मुख्य द्रव्य घृत (तूप) असतें म्हणून यास हें नांव आहे. -तीप्र परिशिष्ठ २. पृ. २. घृताम्ल-न. (रसा.) गाईच्या लोण्यांत असलेलें एक अम्ल. कॉडलिव्हर ऑईल व दुसर्‍या कांहीं चरब्या व कांहीं उद्भिज्ज कोटींतहि हें सांपडतें. दधिजाम्ल. (इं.) ब्युटिरिक अॅसिड. -सेंपू २.५४. [घृत + अम्ल = अॅसिड]

दाते शब्दकोश

गुण

पु. १ मनोधर्म किंवा पदार्थाचा धर्म; त्यांतील बल; तेज; सत्त्व; अंतःस्थित धर्म; विद्या, कला, सत्य, शौर्य इ॰ धर्म. 'एवं गुण लक्षण ।' -ज्ञा १७.१३१. २ (न्यायशास्त्र) रूप, रस, गंध, स्पर्श, संख्या, परिमाण, पृथक्त्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व, गुरुत्व, द्रवत्व, स्नेह, शब्द, बुद्धि, सुख, दुःख, इच्छा, दोष, प्रयत्न, धर्म, अधर्म, संस्कार हे २४ धर्म. ३ सृष्ट, उत्पन्न केलेल्या वस्तूंचा धर्म. हे गुण तीन आहेत; सत्व, रज, तम. हे ब्रह्मा, विष्णु, शिव यांचें अनुक्रमें लक्षण दर्शवितात. 'गुणीं देवां त्रयी लाविली' -ज्ञा १८.८१७. ४ उत्कृष्टता; योग्यता; व्यंगा- पासून अलिप्तता; निर्दोषता. ५ उपयोग; फायदा; नफा; फल; लाभ. ६ निघालेलें फल, वस्तु, परिणाम, निपज; उत्पन्न. ७ (अंकगणित) गुणून आलेलें फळ; गुणाकार. ८ दोरी; रज्जू. 'हें कर्माचे गुणीं गुंथलें ।' -ज्ञा १३.११०२. 'मुक्तमोती लग संपूर्ण । गुणेविण लेइलासे ।।' -एरुस्व १.३९. ९ प्रत्यंचा; धनु- ष्याची दोरी. 'गेला लक्ष्मण किष्किंधेते गुण जोडुनि चापातें ।' -मोरामा १.५११. १० (समासांत) -पट; प्रमाण; गुणाकार. जसें-अष्टगुण = आठपट; सप्तगुण, इ॰. 'शतकोटिगुणें तदधिक गमला शर निकर विखरितां पार्थ ।' -मोभीष्म ३.५६. ११ उतार; कमीपणा (रोगाचा). १२ (अंकगणित) गुणक. १३ (भूमिती) वर्तुळखंडाची ज्या. १४ दिव्याची वात. 'पै गुणु तेतुला खाय ।' -ज्ञा १३.७१९. १५ परीक्षा उतरण्यासाठीं ठरवि- ण्यांत आलेले संख्यांक; (इं.) मार्क. १६ (व्याक.) संधि करतांना वगैरे स्वराच्या रूपांत होणारा फेरफार. [इचा ए, उचा ओ, ऋचा अर्, लृचा अल्] १७ वधुवरांचें घटित पाहण्याचे अंक. हे ३६ असतात. १८ (ल.) रोग; व्याधि. म्ह॰ अठरा गुणांचा खंडोबा. १९ प्रभाव; परिणाम. 'संपत्ति हें एका तर्‍हेचें मद्य आहे, तें आपला गुण केल्याखेरीज बहुधा सोडणार नाहीं.' -नि ५३. [सं.] (वाप्र.) ॰आठविणें-(मृत, गैरहजर मनु- ष्याच्या) चांगल्या गोष्टी स्मरणें; त्यांचा उल्लेख करणें. ॰उध- ळणें-पसरणें-पाघळणें-स्वाभाविक वाईट, दुष्ट स्वभाव बाहेर पडणें; वाईट गुणांचें आविष्करण करणें. 'पत्र पुरतें झाल्या- वर सदाशिवराव म्हणाले हे आपल्या मातोश्रींनीं कसे गुण उध- ळले पहा!; -रंगराव. ॰काढणें-१ दुर्गुण काढून टाकणें. २ यथेच्छ झोडपणें. 'बोलाचालीनंतर त्यांचे गुण चांगलेच बाहेर काढले.' ॰घेणें, देणें-पिशाचादि बाधा न व्हावी म्हणून देवा- दिकांपासून कौल घेणें, देणें. ॰दाखविणें, गुणावर येणें-खरा स्वभाव दाखविणें. ॰शिकविणें-मारून शहाणा करणें; गुण काढणें ॰सोडणें-विसरणें-सन्मार्ग सोडून वाईट मार्गास लागणें. गुणाची चहा करणें-होणें-सद्गुणावर प्रीति करणें, असणें; चांगल्या गोष्टींचा सन्मान करणें. गुणाची माती करणें- सद्गुणांचा, बुद्धीचा दुरुपयोग करणें; अंगच्या चांगल्या गोष्टी, बुद्धि नासणें. गुणा येणें-सगुण होणें. 'गुणा आला विटेवरी । पीतांबर धारी सुंदर जो ।' -तुगा ७. गुणास येणें-पडणें- १ लागू होणें; फळणें; इष्ट परिणाम होणें. २ चांगल्या रीतीनें वागणें. म्ह॰ १ ढवळ्या शेजारीं बांधला पोंवळा वाण नाहीं पण गुण लागला. २ गुणाः पूजास्थानम् । = गुणामुळे माणसाला आदर प्राप्त होतो; जेथें गुण तेथें आदर. सामाशब्द-गुणक, गुणकांक-पु. (गणित) ज्या संख्येनें गुणतात ती संख्या. गुणक-वि. १ हिशेब ठेवणारा; गणना करणारा. २ मध्य गुणक; विशिष्ट शक्तीचें, गुणाचें मान दाखविणारा वर्ण, जात. [सं.] ॰कथा-स्त्री. १ ईश्वराच्या गुणांचें कीर्तन, प्रशंसन. 'गुणकथा श्रवणादि साधनें । करुनि सेवटीं आत्मनिवेदन.' २ (सामा.) गुण, ईश्वरी देणगी, स्वधर्म इ॰ विषयीं स्तुति. गुणकप्रमाण- न. (गणित) गुणाकारानें वाढणारें संख्येचें प्रमाण. १.४.८. १६. इ॰ प्रमाण; (इं.) रेशिओ. ॰कर-कारक-कारी-गुण- कारीक-वि. (अशुद्ध) १ गुणावह; गुण करणारें, देणारें. २ परिणामी; प्रभावी. गुण-कर-वि. (काव्य) गुणसंपन्न; बुद्धि, सुलक्षण, सद्गुण यांनीं युक्त (मूल). ॰गंभीर-वि. चांगल्या गुणांनीं युक्त. 'उदारधीर गुणगंभीर ।' [सं.] ॰गहिना-स्त्री. गुणवती व रूपवती स्त्री. 'जेव्हां जिवाला वाटेल तुमच्या आतां पाहिजे गुणगहिना ।' -सला ६. ॰गान-गाणें-न. गुणांचें स्तवन, गायन, प्रशंसा, प्रशस्ति; गुणकथा. [सं.] ॰ग्रहण-न. गुण ओळ- खणें; गुणाची चहा; गुणीजनांचा परामर्ष, आदर करणें-उमगणें. [सं.] ॰ग्राम-निधि-पात्र-राशि-सागर, गुणाकर गुणाची रास-खाण-वि. सर्वगुणसंपन्न; सुलक्षणी; सद्गुणी; अनेककलाकोविद. ॰ग्राहक-ग्राही-वि. गुणांचा भोक्ता, चहाता; गुणांचें चीज करणारा; गुण ग्रहण करणारा; दुसर्‍याचे गुण ओळखून संतोष मानणारा. [सं.] ॰घाती-वि. गुणदूषक; निंदक; हेटाळणी करणारा. [सं.] ॰ठेली-स्त्री. गुणांची थैली; गुणखनि. 'सुतारुण्यें तारुण्य गुणठेली ।' -आपू १०. [सं. गुण + स्था-थैली] ॰गुणत:-क्रिवि. गुणाप्रमाणें; गुणा- नुरोधानें. [सं.] गुणत्रय-न. सृष्ट पदार्थांचे सत्त्व, रज, तम हे तीन गुण, धर्म. [सं.] ॰त्रयविरहित-वि. वरील तीनहि गुणां- विरहित असा (ईश्वर); निर्गुण. 'गुणत्रयविरहित अगम्य तूं ।' [सं.] ॰दोष- पुअव. चांगले वाईट गुणधर्म; सुलक्षणें आणि कुल- क्षणें. 'नको माझे कांहीं । गुणदोष घालू ठायीं ।' ॰दोष- परीक्षा-स्त्री. गुणदोषांची चौकशी, छाननी, तपास. ॰धर्म-पु. गुणलक्षण, स्वभाव (बरा किंवा वाईट) गुण अर्थ १ पहा. गुणन-न. १ गुणाकार; मोजणी; गणना. गुणनिधान-निधी-न.गुणांचा साठा; गुणग्राम पहा. 'त्याची कन्या चिद्रत्न लावण्यागुणें गुण- निधान ।' -एरुस्व ३.४६. गुणनीय-वि. गणण्यास, गुण- ण्यास योग्य. ॰पंचक-न. आधिभौतिक वस्तूंचा मूळभूत पांच गुणांचा समाहार (पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश, किंवा शब्द, रूप, रस, गंध व स्पर्श). 'गुण पंचकें धरित्री आथिली ।' ॰परिणाम-पु. मूळ वस्तूचें तात्त्विक स्वरूप कायम राहून त्यास दुसरें नांव-रूप प्राप्त होणें. उदा॰ काथ्याची दोरी होणें, दुधाचें दहीं होणें -गीर २३९. ॰परिणामवाद-पु. त्रिगुणात्मक प्रकृ- तींतील गुणांच्या विकासानें किंवा परिणामानें व्यक्त सृष्टि निर्माण होते असें मत (सांख्य मत). -गीर २३८. ॰भूत-वि. १ गौण; दुय्यम प्रतीचें. २ वरून, पासून निवणारें; अनुकल्पित. ॰माया- स्त्री. त्रिगुणांनीं युक्त असलेली माया. 'मुळीं झालीं तें मूळ माया । त्रिगुण झाले ते गुणमाया ।' -दा ११.१.९. -भज ३५. ॰वचन-वाचक-न. गुण दाखविणारें वचन, शब्द, विशेषण. ॰वंत-वान-वि. गुणसंपन्न. ॰विशेषण-न. (व्या.) विशेषणाचा एक प्रकार; हा नामाचे गुण दाखवितो. ॰वेल्हाळ-ळी- विपुस्त्री. (काव्य.) गुणांनीं आकर्षिलेला-ली; मोहित; परितुष्ट. ॰वैषम्य-न. गुणत्रयांचें (सत्व-रज-तम) विषम मिश्रण. याच्या उलट गुणसाम्य. ॰सुशीळ-वि. (काव्य.) गुणी व शीलवान्; चांगल्या गुणांचा, स्वभावाचा. 'पतिसेवे सदा अनुकूल । सत्य वचनीं गुणसुशीळ ।' ॰स्तुति-स्त्री. गुणांची प्रशंसा. ॰हीन- वि. १ गुणविरहित; गुणाशिवाय. २ दुर्गुणी. ॰क्षोभ(भि)णी- माया-स्त्री. माया; त्रिगुणाची साम्यावस्था मोडणारी (माया); मूळ मायेंतील गुप्त असलेले त्रिगुण जेव्हां स्पष्ट होतात तेव्हां तिला गुणक्षोभिणी म्हणतात. 'पष्ट होती संधी चतुरी । जाणावी गुणक्षोभिणी ।' -दा ९.६.६. गुणज्ञ-वि. गुणग्राहक. जाणता (विद्यादि गुणांचा) पहा. गुणांक-पु. (गणित) गुणाकार. गुणांकभागोत्री-स्त्री. १ गुणाकार व भागाकार. २ (व्यापक) अंकगणित; गणित.;तुझा पंतोजी कांहीं गुणांकभागोत्री शिक- वतो कीं नाहीं?' गुणाकार-पु. १ गुणांक; गुणनाचें फळ; गणिताचा एक प्रकार; गुणकांकानें गुण्यांकास गुणणें. याचे कांहीं प्रकार:-कोष्टकी-धांवरा-बैठा-विविध गुणाकार इ॰ कपटसिंधु पहा. २ गुणणें; गुणांकार करणें. [सं. गुण्; म. गुणणें] गुणा कारक-कारी-वि. गुणकारक-कारी पहा. गुणागुण-पु. गुण आणि अवगुण; गुणदोष. गुणाचा-वि. भलेपणा, चांगले गुण अंगीं असणारा. गुणाची खाणी-रास-स्त्री. अनेक प्रकारचे चांगले गुण अंगीं असणारा; विविध गुणांचा गुणांचें गुणपात्र लेंकरू-न. (ल. उप.) अट्टल लुच्चा; लबाड; सोदा. 'गुणाचें गुणपात्र हातीं फुलपात्र.' गुणाढ्य-वि. १ गुणसंपन्न. २ एक प्रसिद्ध कवि. बृहत्कथेचा कर्ता. [सं.] गुणातीत-वि. गुणवि- रहित; निर्गुण. (ईश्वर) गुणानुवाद-पु. गुणांची वाखाणणी; गुणकीर्तन; प्रशंसा. गणानुवादकीर्तन-न. गुणांचें स्तवन. गुणावह-वि. गुण देणारें; गुणकारक; परिणामी; प्रभावी (औषध वगैरे). गुणांश-पु. १ गुणकारीपणा; प्रभाव; सुपरि- णाम. 'हा जें औषध सांगतो त्याचा गुणांश केवढा? ' २ परि- णाम; फळ; यश. 'त्या औषधानें अद्यापि गुणांश आला नाहीं.' गुणित-वि. (गणित) गुणलेलें. गुणें(ण्या)गोविंदें-दानें- क्रिवि. १ शांततेनें; भांडणतटां न करितां; मुकाट्यानें; आनंदानें; स्वेच्छेने. 'पक्षीही लहान । घरटीं बांधून । गुण्यागोविंदानें नांद- ताती ।।' २ मोठ्या स्नेहानें, ममतेनें. 'गुण्यागोविंदें मला दहा वेळ पलंगावर पालवा ।' -प्रला ३ चांगल्या प्रकारानें, रीतीनें. गुणोत्कर्ष-पु. गुणांचें वैपुल्य, विकास, वाढ. गुणो- त्कीर्तन-न. गुणांचें कीर्तन; गुणानुवाद; प्रशंसा. गुणोत्तर-न. (गणित) संख्यांची, दोन परिणामांची पट, हिस्सा, प्रमाण; भूमितिश्रेणींतील पदांमधील ठराविक अंतर; एका संख्येनें दुसरीस भागिलें म्हणजे दोहोंमधील गुणोत्तर निघतें. गुण्य-क्रि. १ जिला गुणावयाचें ती संख्या. २ गुणण्यास योग्य. [सं. गुण् = मोजणें] गुण्यांक-पु. गुण्य संख्या.

दाते शब्दकोश

गुण guṇa m (S) A quality, attribute, affection, or property, whether of matter or mind; a power, faculty, excellence, virtue; a property inherent or an affection supervenient in the most comprehensive sense. In न्यायशास्त्र twenty-four such properties or affections are enumerated; viz. रूप, रस, गंध, स्पर्श, संख्या, परिमाण, पृथकत्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व, गुरुत्व, द्रवत्व, स्नेह, शब्द, बुद्धि, सुख, दु:ख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, धर्म, अधर्म, संस्कार. 2 A property of created things. They are comprised in three--सत्व, रज, & तम, or principles of truth (reality, actuality, or existence); passion (foulness); and darkness (ignorance); characteristic also, respectively, of ब्रह्मा, विष्णु, & शिव. 3 Excellence, merit, virtue, freedom from fault or blemish. 4 Benefit, advantage, good, gain. 5 Product, effect, matter produced or resulting. 6 The product in multiplication. 7 A rope, cord, or string gen. 8 A bowstring. 9 In comp. Multiplied by, fold; expressing the ratio; as अष्ट- गुण, सप्तगुण, eightfold, sevenfold. 10 Remission or abatement (of a disease). 11 In arithmetic. Multiplier. 12 In geometry. The chord of an arc. गुण अठविणें g. of o. To commemorate the virtues, merits, talents (of a deceased or absent person). गुण उधळणें-पसरणें-पागळणें g. of s. To have one's native vileness breaking forth; to manifest one's evil qualities; to show the cloven hoof. गुण करणें To make promise of future ability or cleverness--a child. गुण काढणें g. of o. To take the vice out of; to thrash soundly. गुण दाखविणें or गुणांवर येणें To drop the mask; to show the cloven hoof; to exhibit the real disposition. गुण शिकविणें To teach, i. e. to render intelligent by a sound beating. गुण सोडणें or विसरणें To leave the path of virtue and take to evil courses. गुणाची चहा करणें To love merit. गुणा- ची चहा होणें in. con. To have a love for excellencies or good qualities. गुणांची माती करणें To misapply and spoil virtues or talents. गुणास येणें or पडणें To succeed; to be effectual; to turn out well. चांगले गुण करणें To behave well.

मोल्सवर्थ शब्दकोश

अक्कल      

शहाणपणा; समज; चातुर्य; बुद्धी; तारतम्य; जाणण्याची शक्ती. [अर. अक्ल] (वा.) अक्कल गुंग होणे – बुद्धी कुंठित होणे; दिङ्मूढ होणे; एखादा कठीण प्रश्न, समस्या सोडविण्याचा मार्ग न सुचल्याने गोंधळात पडणे. अक्कल जाणे – सारासार विचारशक्ती नाहीशी होणे; शहाणपण नाहीसे होणे. अक्कल पाजळणे – (उप.) नको तिथे शहाणपणा दाखवणे : ‘ती अक्कल हितं गावात पाजळा!’ – पडघवली १२५. अक्कल विकत घेणे – पुष्कळ किंमत देऊन शहाणपण शिकणे; धडा शिकणे; फार महाग पडलेल्या अनुभवाने शहाणे होणे. अक्कल शेणात जाणे – शहाणपणा वाया जाणे; निरुपयोगी ठरणे : ‘नुसते वाचून काय करायचे? सारी अक्कल शेणात जायची’ – श्याआ १५०. अक्कल सांगणे – सल्ला देणे. अकलेचा कांदा, अकलेचा खंदक – (उप.) मूर्ख मनुष्य; अतिशहाणा; दीडशहाणा; काही न समजणारा. पहा : अकलेचा कांदा. अकलेचा गधडा – मूर्ख; ढ; मतिमंद; बावळट; ज्याला मुळीच शहाणपण नाही असा; समज कमी असलेला. अकलेचा बंद – दूरदर्शित्व; शहाणपण : ‘चातुर्य : अकलेचा बंद नाही घातला.’ – दास १९·८·१५. अकलेचे तारे तोडणे – मूर्खपणाने बडबडणे; अविचाराने बोलणे. अकलेचे सागर – (उप.) अतिशहाणे : ‘अंताजीपंत कितीकसे मर्द माणोस व अकलेचे सागर आहेत.’ – पुरंदभा १·२३२. अकलेच्या वाटेने पाहणे – तर्क करणे; विचार करणे : ‘गुडीविंड्यास पुढे फौज असता बेदडे येऊन ठरणार नाहींत, हे अकलेच्या वाटेने पाहता दिसते.’ – ऐलेसं १७०२. अक्कलकारा      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अक्ल

(स्त्री.) हिंदी अर्थ : बुद्धि. मराठी अर्थ : बुद्धि.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

अनुसार

वि. प्रमाणें; सारखा; सदृश; अनुरूप; जुळणारा; सामाशब्द -आज्ञेनुसार वर्तन पापानुसार क्लेश, श्रमानुसार लाभ, कालानुसार, योग्यतेनुसार, इ॰. 'तुम्ही बोलाल तदनुसार मी वर्तेन.' 'औषधानुसार गुण आहे.' यांखेरीज कसेतरी बनलेले व्यापक अर्थांचे अनेक सामाशब्द आढळतात. जसें, कामानुसार, काळा- नसार, देशानसार, छंदानसार, अन्नानसार बुद्धि, बुद्धिनसार, मर्जी- नसार, वेळेनसार इ॰. 'कामानुसार माणसाची गरज लागती.' म्ह अन्नानुसार बुद्धि = ज्याचें अन्न खातो त्याप्रमाणें वागतो. -पु. १ अनुसरण; अनुवर्तन; सारखें वागणें. २ क्रम; सरणी; मार्ग. 'जो दाविला तुम्हीं अनुसारा । तो पव्हण्याहूनि पाय उतारा । सोहपा जैसा ।' -ज्ञा ५.१६५. -अ. धोरणानें; क्रमानें; अनुरूप. [सं.]

दाते शब्दकोश

अनुसार anusāra a (S) Like or according to; agreeable or conformable with. In comp. Ex. श्रमानुसार- लाभ, पापानुसारक्लेश, आज्ञानुसार, कालानुसार, सा- मर्थ्यानुसार, योग्यतानुसार, समयानुसार, दैवानुसार, कर्मानुसार, प्रारब्धानुसार, प्रसंगानुसार. Additionally to the above, a multitude of lax or popular compounds occur; as कामानसार (Ex. कामानसार मा- णसाची गरज लागती or का0 खर्चवेच करावा), काळा- नसार, देशानसार, दिवसानसार, आचारानसार (as आ0 फळप्राप्ति), अर्थानसार, स्वभावानसार, छंदानसार, अन्नानसार (Pr. अ0 बुद्धि We learn to imitate him whose bread we eat), भक्तिनसार, बुद्धिनसार, वृत्तिन- सार (After the manner, mood, or disposition of), मर्जिनसार and others. For all let the principle of the formation be studied here.

मोल्सवर्थ शब्दकोश

अंतःकरणपंचक

अंतःकरणपंचक antḥkaraṇapañcaka n S The soul or mind as constituted of अंतःकरण, मन, चित्त, बुद्धि, अहंकार, explained thus; अ0 The soul as pure or mere, unstirring, unwishing, uuthinking, reposing in quietism; मन The soul under the conception of a purpose or desire, or as the subject of an excited affection or passion; चित्त The soul considering, deliberating, devising, thinking; बुद्धि The soul determining, resolving, willing; अहंकार The soul realizing its personality; the conscious अहं or ego.

मोल्सवर्थ शब्दकोश

बाई(इ)ल

स्त्री. १ पत्नी; बायको; लग्नाची किंवा पाटाची स्त्री. 'न म्हणे बाइल याला कीं ठेवा रामकृष्ण बाई लयाला ।' -मोकृष्ण ३९.३२. २ (घाटावर) ठेवलेली स्त्री; रक्षा. [बाई] म्ह॰ लहानपणीं आई आई, थोरपणीं बायला बाई. ॰काम- न. गृहिणींचें काम; घरकाम; घरधंदा. ॰काम्या-वि. केवळ घर- काम किंवा बायकी काम करणारा; त्यांत हुषार (पुरुष). ॰खाट्या- वि. १ स्त्रीलंपट; अति संभोगी; रंडीबाज. २ बायकोमार्‍या; ज्याच्या पुष्कळ बायका मेल्या आहेत असा. [बाईल + खाट] ॰खाद्या-वि. बाईलखाट्या अर्थ २ पहा. [बाईल + खाणें] ॰गांठ-स्त्री. बायकी गांठ; सामान्य गांठ; साधी गांठ. [बाईल + गांठ] ॰पिसा- वि. बाईलवेडा पहा. ॰पिसें-वेड-न. अत्यंत स्त्रीलंपटता; संभोगाबद्दल आसक्ति; रंडीबाजपणा. ॰बडगा-भिडंग-पुन. मुलेंबाळें, गुरेंढोरें, चीजवस्त इ॰ मोठें कुटुंब, खटलें, पसारा (व्यापक अर्थानें). ॰बंदा-बांध्या-बुध्द्या-वि. स्त्रीच्या, बायकोच्या तंत्रानें चालणारा; स्त्रीवश; बायकोचा गुलाम असलेला. ॰बुद्धि- स्त्री. १ बायकी ज्ञान, शहाणपणा, अक्कल, समजूत. २ बायकी मसलत, सल्ला, बेत, विचार. ३ (ल.) कोते व अपरिपक्व विचार. [बाईल + बुद्धि] ॰बोल्या-वि. जनानी आवाजाचा (पुरुष). [बाईल + बोलणें] ॰भाड्या-वि. बायकोवर पैसे किंवा नौकरी मिळविणारा. [बाईल + भाडें] ॰भुला-वि. स्वतःच्या बायकोचा पराकाष्ठेचा शोकी; स्त्रीलंपट; स्त्रीवेल्हाळ. [बाईल + भुलणें] ॰माणूस-न. १ बायकोमाणूस; स्त्री. २ भार्यासक्त किंवा रंडी- बाज मनुष्य. ३ षंढ; नपुंसक. ॰मार्‍या-वि. १ बायकोचा जीव घेणारा. २ बाईलखाट्या अर्थ २ पहा. [बाईल + मारणें] ॰वेड- न. बायकोचें वेड; कामुकता; उत्कट कामवासना. [बाईल + वेड] ॰वेडा-वि. स्वस्त्रीलंपट; विषयवासनेनें भुलून गेलेला; रंडीबाज. [बाईल + वेडा] बायला-ल्या-वि. बाइक्या पहा.

दाते शब्दकोश

बूध

स्त्री. (अशिष्ठ) बुद्धि पहा. 'बरी बूध देवानें मला दिली.' -बाळ २.१०५.[सं. बुद्धि]

दाते शब्दकोश

बूध būdha f (Vulgar for बुद्धि) Wisdom, sense, understanding.

मोल्सवर्थ शब्दकोश

चेतना

स्त्री. १ जीवनशक्ति; प्राणशक्ति; जीव; प्राण. 'म्हणोनि अग्नीविण देहीं । चेतना न थरे ।' -ज्ञा ८.२१४. 'चेतनारूपें इंद्रियवृत्ती । जे चाळिती सर्वदा ।' -एभा १.१७. २ पुरुषत्व; पौरुष; जननशक्ति. ३ आकलनशक्ति; ग्रहणशक्ति; बुद्धि; चित्त; मन; ज्ञानशक्ति. 'विवेकाचें लोपल्या भान । स्तब्ध चेतना होय जाण ।' -एभा २१.२१८. [सं. चेतना = प्राण, बुद्धि] ॰वर्ग-पु. इंद्रियसमुदाय. 'हा चेतनावर्गु आघवा । मरणीं असे टवटवा ।' -ज्ञा ८.२१०. [सं. चेतना + वर्ग = समुदाय] ॰शून्यत्व- न. बधिरपणा; बधिरता. [सं. चेतना + शून्यत्व = अभाव]

दाते शब्दकोश

होश ठिकाने होना

हिंदी अर्थ : बुद्धि ठीक होना । चित्तकी व्याकुलता मिटना । डंड पानेसे भूलका पछतावा होना मराठी अर्थ : बुद्धि जाग्यावर असणें, मन शांत होणे, (शिक्षा मिळाल्यावर ) ! दोषाबद्दल पश्चात्ताप वाटणें.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

जहन

(पु.) हिंदी अर्थ : दिमाग, बुद्धि. मराठी अर्थ : बुद्धि, डोके.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

कुमति

स्त्री. वाईट बुद्धि; दुष्ट बुद्धि. 'सदा चालिजे धर्म- पंथ । सर्व कुमति टाकोनि ।' [सं.]-वि. वाईट बुद्धीचा; दुरात्मा.

दाते शब्दकोश

कुमती, कुमति      

स्त्री.       वार्इट बुद्धी; दुष्ट बुद्धी;

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कूपमंडूकवृत्ति, कूपमंडूकवृत्ती      

स्त्री.       आपल्याला दिसते तेवढेच जग असे मानण्याची बुद्धी; दुसऱ्याचे अस्तित्व, गरजा, विचार, लक्षात न घेण्याची बुद्धी; अतिशय संकुचित वृत्ती. [सल.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

लिंगदेह

लिंगदेह liṅgadēha m S The tenuous or ethereal body; the subtil vehicle of the जीवात्मा or sentient soul, and the causative principle and archetype of the स्थूलदेह the gross and material frame. It consists of मन the heart or seat of feeling, बुद्धि the judgment or discriminating faculty, दशेंद्रिय the ten senses or faculties of perception and action, and पंचप्राण the five vital airs. Ex. सूक्ष्मं मनो- बुद्धि दशेंद्रियैर्युतं प्राणैरपंचीकृत भूतसंभवं ॥. To it are ascribed sentience, intelligence, consciousness, agency &c.; and in this inheres the personality or individuality by which the being is distinguished from the All-pervading, All-upholding essence, the Deity. It is held to be the surviving essence from the dissolution of the preceding birth: hence the innate intelligence of the newborn animal to seek the breast and tocling to its parents. Ex. ज्ञालिया लिंगशरीराचा भंगु ॥ चुके निरयस्वर्गाचा मा र्गु ॥ स्वभावेंचि ॥.

मोल्सवर्थ शब्दकोश

मेधा

स्त्री. १ बुद्धीची तीक्ष्णताः कुशाग्र मति; तीव्र बुद्धि; धारणायिक्त बुद्धि. 'पैं स्वहिता अनुजायिनी । मेधा ते गामी इये जनीं ।' -ज्ञा १०.२७९. २ (श्रद्धा या अर्थीं चुकीनें उपयोग). आवड; चाड; प्रीति. 'तयां बहुत करूनि मेधा । स्वर्गीं आथी ।' -ज्ञा १७.७६. 'त्या मुलावर त्याची मेधा आहे. तितकी याज- वर नाहीं.' [सं.] मेधावी-विनी-वि. बुद्धिमान्; कुशाग्र मतीचा-ची-चें. 'तो भक्तु मेधावी तापिया ।' -ज्ञा १८१५०५. [सं. मेधा]

दाते शब्दकोश

निष्टंक

पु निश्चय; सिद्धांत. 'जीवामाजी निष्टंकु । करिसी जो आत्यंतिकु ।' -ज्ञा १८.१२८१. -वि. १ (काव्य) पक्का; दृढ; निपुण; कुशल. 'हें सैन्य असेल निष्टंक । तरी लोटूनि कोटी दुःख । स्वस्थ जाईल माहेरा ।' -मुवन ७.११६. २ पूर्ण; अखंड. 'अगा मानस हें एक । माझ्या स्वरूपीं वृत्तिक । करूनि घाली निष्टंक । बुद्धि निश्चेयेंसि ।' -ज्ञा १२.९७. ३ निःसंशय; निश्चित. 'गुरु ब्रह्म ऐक्य भावो । निजनिर्वाहो निष्टंक ।' -एभा ३.३४३. -क्रिवि. १ पूर्णपणें; सर्वतः; दरोबस्त; बाकी अथवा शेष न राहतां. २ सर्वथा; सर्वांशीं; पुरतेपणीं; न्यूनाशिवाय; सर्व बाबतींत. ३ केवळ; निवळ; फक्त; मात्र. [सं. निर् + टंक = टांकी] निष्टंकणें- क्रि. १ निश्चय करणें. 'आतां याची बुद्धि वृत्ति । निष्टंकिला कर्म- जातीं ।' -ज्ञा १८.७३१. २ निश्चयानें लावणें, आरोपणें. 'निष्टं- किती गा मोहें । आंधळे ते ।' -ज्ञा १५.३८०.

दाते शब्दकोश

नष्ट

वि. १ नाश पावलेला; नाहींसा, जमीनदोस्त, धुळधाण झालेला; विध्वंसित. २ दुसर्‍याचा नाश, वाईट करण्याचा स्वभाव असणारा; दुष्ट; द्वाड; निर्दय; कठोर. 'तुका म्हणे नष्टा । अबोळण्या तुझ्या चेष्टा ।' -तुगा १४१९. [सं.] ॰खर्च-पु. (गो.) निर- र्थक, घातुक, अनवश्यक खर्च. 'जत्रेंत नष्टखर्च जास्त असतो.' ॰चर्य-र्या-नस्त्री. दुर्दैव; हीन-दीन स्थिति; कष्टदशा; उतरती कळा. [नष्ट + चर्य, चर्या] ॰दिन-दुर्दिन; वाईट दिवस. 'नैषधा कवणैक नष्टदिनीं । विसर पडला शौचाचमनीं ।' -कथा १.९. ३. ॰धन, नष्टेश्वर्य-वि. निर्धन; दरिद्री झालेला. [नष्ट + धन, ऐश्वर्य = संपत्ति] ॰प्रभाव पराक्रम-वीर्य-वि. निर्वीर्य; दुबळा; निर्बल झालेला. ॰बुद्धि-वि. कमकुवत बुद्धिचा; कमी समज असणारा; ज्याची बुद्धि नष्ट झाली आहे असा. [नष्ट + बुद्धि] ॰वंश- वि. निर्वंश झालेला. ॰विवेक-वि. विवेकशून्य; अविचारी; अवि- वेकी. [नष्ट + सं. विवेक = विचार] नष्टात्मज-वि. (ज्याचा) एकहि मुलगा जिंवत राहिलेला नाहीं असा; निपुत्रिक बनलेला. [नष्ट + सं. आत्मज = मुलगा] नष्टेंद्रिय-वि. ज्याचीं इंद्रियें शिथिल, निर्जीव झालीं आहेत असा. नष्टोपाय-वि. दैवहत; अगतिक झालेला; ज्याचे उपाय कुंठित झाले आहेत असा. [नष्ट = नाहींसे झालेले + उपाय]

दाते शब्दकोश

प्रत्यग्बुद्धि

प्रत्यगात्मक झालेली बुद्धी, अंतर्मुखी झालेली बुद्धी (ज्ञानेश्वरी अध्याय १५, ओवी २५८)

ज्ञानेश्वरीमधील कठीण शब्दांचे अर्थ (राज्य मराठी विकास संस्था प्रकाशित)

प्रत्यक्

वि. १ पुढचा; पुढला; नंतरचा; पश्चात्कालीन. २ पश्चिमदिशेकडील. ३ (स्थल, काल, जीव, पदार्थ, भाग इ॰ त) सर्वत्र व्यापून राहणारा; सर्वव्यापी (आत्मा, शिव, जीव यांस जोडून). ४ साक्षात्; प्रत्यक्ष. 'नामया शरण भगवंतासी । भग- वंत तरी प्रत्यक् त्यासी ।' एकनाथ आनंदलहरी ११९. [सं.] ॰ज्योति-स्त्री. आत्मप्रकाश. 'प्रत्यक्ज्योतीची वोवाळणी । करिसी मनपवनाचीं खेळणीं ।' -ज्ञा १२.६. ॰दर्शन-दृष्टी-नस्त्री. मागें पहाणें; पुढें पाहणें; पश्चिमेकडे पाहणें. ॰प्रतीति-स्त्री. आत्म- ज्ञान. ॰बुद्धि-स्त्री. अंतर्मुख झालेली बुद्धि; मी अंतर्यामीं (आत्मा) आहें अशी बुद्धि. 'मग देहाहंतेचें दळें । सांडूनि एकेचि वेळे । प्रत्यक्बुद्धि करतळे । हातवसावे ।' -ज्ञा १५.२५८. ॰बोध-पु. आत्मज्ञान; प्रत्यगात्मा व ब्रह्म एकच आहेत असें ज्ञान. 'जे प्रत्य- ग्बोधाचया माथया । सोहंतेचां मध्यान्हीं आलयां ।' -माज्ञा १६. १०. ॰मुखपण-न. अंतर्मुखवृत्ति. 'येथ प्रवृत्ति वोहटे जिणें । अप्रवृत्तिसी वाधावणें । आतां प्रत्यङ्मुखपणें । प्रचारु दिसे ।' -अमृ ९.२८ प्रत्यगात्मा-पु. १ देहांत व्यापून राहिलेलें ब्रह्म. २ त्वंपदाचें लक्ष्य. ३ कूटस्थ. [प्रत्यकं/?/ + आत्मा] प्रत्यगावृत्ति प्रत्यक्वृत्ति-स्त्री. आत्माकारवृत्ति; अंतर्वृत्ति; अंतर्मुखता; सोहं अशी स्वस्वरूपाकार वृत्ति. 'मग प्रत्यगावृत्तीचीं चोखटें । लाविलीं गंगेचेनि तटें ।' -ज्ञा १८.१०१७. [प्रत्यक् + आवृत्ति, वृत्ति]

दाते शब्दकोश

पश्चिम

स्त्री. १ मावळता; सूर्य मावळण्याची दिशा. 'एथून समुद्र शुद्ध पश्चिम आहे.' २ पश्चिम दिशेचा वारा. -वि. १ पश्चिमेचा पश्चिमेकडील; पाश्चात्त्य. २ पाठीमागचा; नंतरचा; पाश्चात्त्य; अपर; अवर. [सं.] ॰कपाल-न. पश्चिमगोलार्थ. ॰द्वार-न. १ पश्चिमे- कडील, मागील दार, फाटक (शहर, राजवाडा, घर इ॰ चें). २ (ल.) गुद. ३ (संकेतानें) अपानवायु. ॰धान्य-न. १ साल- अखेर, उशीरां पिकणारें धान्य; मागून तयार होणारें धान्य. २ उशीराचें पीक; हिवाळ्यांतील पीक; रबीधान्य पहा. ॰बुद्धि- स्त्री. पश्चात्बुद्धि; मागाहून सुचणारा विचार, बुद्धि. ॰रात्र-स्त्री. उत्तररात्र; मध्यान्हीनंतरची रात्र. ॰वायु-पु. (ल.) पाद; पर्दन; अपानवायु. पश्चिमाग्रा-स्त्री. पश्चिमेकडील अग्र; सूर्य तारा जेथें मावळतो तो क्षितिजबिंदु, पश्चिमदिगंश. पश्चिमास्त- नपु. बुध, शुक्र यांचें पश्चिमेकडे (सूर्यासान्निध्यामुळें) मावळणें, अस्तास जाणें. ॰पश्चिमोदय-पु. बुध व शुक्र हे सूर्यास्तानंतर पश्चिमेकडे दिसणें (पश्चिमेकडे यांचा उदय बरेच दिवस होतो).

दाते शब्दकोश

शअुर

(पु.) हिंदी अर्थ : ढंग. बुद्धि. मराठी अर्थ : रीत, बुद्धि.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

शुद्धि

स्त्री. १ शुद्धता; स्वच्छता; पावित्र्य; निर्मलता; निर्दोषता; निष्पापता. 'तया काळातें नुलंघणें । देशशुद्धिही साधणें ।' -ज्ञा १८.६३६. २ शोधन; स्वच्छ, निर्मल, पवित्र करण्याची क्रिया. उदा॰ देहशुद्धि; पात्रशुद्धि; स्थलशुद्धि. ३ बरोबर, विनचुक, निर्दोष करण्याची क्रिया, किंवा तशी स्थिति; निर्दोषता; निष्पापता; बिनचूकपणा. ४ ऋजुता; सरळपणा; चांगलेपणा; अशुभता; अमंगलता यांपासून अलिप्तता. उदा॰ दिनशद्धि; नक्षत्रशद्धि. ५ देहभान; जागरूकता; सावधानता; स्मृति; चेतना; आठवण; सावधपणा; मूर्छना, बेशुद्धि, भ्रांति, भ्रम यांपासून अलिप्तता. 'यांची कां रे गेली बुद्धी. नाहीं तरायाची शुद्धि ।' -तुगा ३५५. ६ शोध; तपास; विचारणा; खबर; बातमी; वार्ता. 'त्यानें सांगितली त्याला माझी शुद्धि । त्या कवीची बुद्धि समदृष्टि ।' -मोअभंग (नवनीत पृ. २६०). 'जगचि हें होय जाये । तो शुद्धिही नेणें ।' -ज्ञा ५.७९. [सं. शुध्] शद्धीवर आणणें-देहभानावर आणणें; मार्गा- वर आणणें; योग्य दशेप्रत आणणें. शुद्धीवर येणें-देहभाना- वर येणें; सावध होणें; योग्य मार्गावर येणें; दोष, व्यसन टाकून देणें. ॰पत्र-न. १ ग्रंथांतील चुकांची दुरुस्ती दाखविणारें पान, पत्रक; शोधपत्र. २ एखाद्या मनुष्यास पातकक्षालनार्थ प्राय- श्चित्त देऊन शद्ध करून घेतल्याचा दाखला; परधर्मांतील गृह- स्थास प्रायश्चित्तादि विधीनें शुद्ध करून स्वधर्मांत अगर जातींत घेतल्याबद्दलचें प्रमाणपत्र. ॰सूची-स्त्री. शद्धिपत्र; शोधपत्र; चुका व त्यांची दुरुस्ती यांचें पत्रक.

दाते शब्दकोश

तैलबुद्धी      

स्त्री.       कुशाग्र, तरतरीत बुद्धी. काही एक विषयाचा थोडासा अंशही कळला कि त्या संपूर्ण विषयाला व्यापणारी बुद्धी. (तेलाचा बिंदू पाण्यावर पडल्यास तो पसरतो यावरून).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तमीज

स्त्री. १ पद्धतशीरपणा; व्यवस्थितपणा; नीटनेटके- पणा. २ विवेक; जाणीव; बुद्धि. ३ अदब. [अर. तमीझ् = विवेक, ज्ञान, बुद्धि]

दाते शब्दकोश

तरळणे      

अक्रि.       १. (दृष्टी, विचार, बुद्धी इ.) भांबावणे, चंचल होणे, भ्रमणे, चळणे, दिपणे : ‘प्रमाणदिवेयांचेनि बंबाळें । पाता तरळैले वेदांचे डोळें ।’ – शिव ९. २. चंचलपणाने भासणे; प्रकाशणे; चमकणे : ‘कीं अकस्मात दृष्टी तरळली । तैसी ब्रह्मीं मूळमाया ।’ – स्वादि १३·२·९५. ३. खेळणे : ‘जें इंद्रिया आणि बुद्धी । माझारिलिये संधीं । रजोगुणाच्या खांदीं । तरळत असे ।’ – ज्ञा १३·१०४. [सं.तरल]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तरळणें

अक्रि. (दृष्टि, विचार, बुद्धि इ॰) भांबावणें; चंचल होणें; भ्रमणें; चळणें; दिपणें. 'प्रमाणदिवेयांचेनि बंबाळें । पांतां तरळैल वेदांचे डोळें ।' -शिशु ९. 'मुग्धा पतिस पहाया तसि माजी दृष्टि तरळली लाजे ।' -मोअनु ३.६३. २ चंचलपणानें भासणें; प्रकाशणें; चमकणें. 'कीं नेत्रीं बाडुली देखिली । कां ते जळीं प्रतिभा भासली । कीं अकस्मात दृष्टि तरळली । तैसी ब्रह्मीं मूळ- माया ।' -स्वादि १३.२. ९५. ३ खेळणें. 'जे इंद्रियां आणि बुद्धी । माझारिलिये संधीं । रजोगुणाच्या खांदीं । तरळत असे ।' -ज्ञा १३.१०४. [सं. तरल]

दाते शब्दकोश

उपजत बागी      

मूळचाच, जातीचाच घोड्यावर बसण्यात पटाईत. उपजत बुद्धि, उपजत बुद्धी      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पाऊल

न. १ पायाचा घोट्याखालचा भाग; तळवा. 'बोले तैसा चाले । त्याचीं वंदावीं पाउलें.' 'वाजे पाऊल आपुलें । म्हणे मागें कोण आलें ।' 'सुकुमार पाउलें पोळती ।' -मुक्तेश्वर हरिश्चंद्राख्यान १९६ (नवनीत पृ. १९४). २ चालतांना दोन्ही पायांत, पायांच्या तळव्यांत पडणारें अंतर. 'ह्या खोलीची लांबी पंधरा पावलें व रुंदी अकरा पावलें आहे.' ३ पायाच्या तळ- व्याची उमटलेली खूण, ठसा, चिन्ह, आकृति. ४ चालण्याची ढब, गति, तऱ्हा; चाल. 'आमच्या तट्टाला तुर्की पाऊल चांगलें साधलें.' ५ चालण्याचा वेग. 'रामाचें पाऊल हरीच्यापेक्षां सावकाश आहे.' ६ पायाच्या तळव्याची लांबी. 'सगळ्यांचीं पावलें हत्तीच्या पाव- लांत' ७ (ल.) कारस्थान. ८ (ल.) कल; स्वभाव. [सं. पद् = चालणें] (वाप्र.) ॰उचलणें-उचलून चालणें-जलदीनें, झर- झर पावलें टाकून चालणें; त्वरा करणें. ॰ओळखणें-जाणणें समजणें-(एखाद्याचा) स्वभाव, कल इ॰ जाणणें. ॰जपून टाकणें-ठेवणें-एखादी गोष्ट, कृत्य इ॰ विचारपूर्वक करणें; काळजीपूर्वक वर्तन करणें. ॰पडणें-शिरणें-(एखाद्या विष- यांत) गति होणें. ॰पुढें ठेवणें-एखाद्या कार्याचा भार शिरावर घेण्यास तयार होणें. ॰पुढे पडणें-(एखाद्या कार्याची) प्रगति होणें; (कार्य) वाढीस लागणें; पुढें पुढें जाणें; वाढणें. ॰बाहेर टाकणें-अनीतीनें वागणें; वांकडें पाऊल टाकणें. 'पोरीनें पाऊल बाहेर टाकल्यापासून बापानें बाहेर टाकावयाचें सोडलें आहे.' -प्रेमसंन्यास. ॰माघार घेणें-काढणें-(एखाद्या गोष्टीपासून, कार्यापासून) परावृत्त होणें; हटणें; माघार घेणें; पाय काढणें. ॰मोजत चालणें-१ सावकाश चालणें. २ गंभीरपणानें चालणें. ॰वांकडें पडणें-सरळमार्ग सोडून आडमार्गानें, अनीतीच्या मार्गानें जाणें; दुर्वर्तन (व्यभिचारादि) घडणें. 'तरुण विधवांच्या हातून वांकडें पाऊल पडण्याचा संभव असतो, असें म्हणणाऱ्यांनी त्या गोष्टीच्या प्रतिबंधार्थ काय केलें आहे?' वाटेचें पाऊल आड वाटेस पडणें-घडूं नये अशी गोष्ट प्रमादानें घडणें. (एखाद्याच्या) पाउलावर पाऊल ठेवणें-(एखाद्याचें) सर्व गोष्टींत अनुकरण करणें. (पाऊल हा शब्द बऱ्याच अर्थात व वाक्प्रचा- रांत सामान्यतः पाय शब्दाप्रमाणें आहे. आणखी बरींच उदाहरणें व वाक्प्रचार पाय शब्दांत पहा.) म्ह॰ १ चोराचीं पावलें चोर ओळखतो = चोराला चोर पुरतेपणीं ओळखूं शकतो. २ जेथें जावें तेथें पाऊलभर पाणी = अपुरें ज्ञान. सामाशब्द. ॰बुद्धि-बुद्ध- बुध्द्य-स्त्री. १ क्षणिक बुद्धि; मनाची चंचलता; छांदिष्टपणा; लहरीपणा. २ -वि. (क्व.) चंचल मनाचा; छांदिष्ट; क्षणिक वृत्तीचा; लहरी. [पाऊल + बुद्धि] ॰बुध्द्या-वि. पाऊलबुद्धि अर्थ २ पहा. [पाऊल + बुद्धि] ॰मेड-ढ-स्त्री. (गो.) गोठ्याच्या बाजूचा लहान खांब. [पाऊल + मेढ = खांब] ॰वाट-वट-स्त्री. घोडें, गाडी इ॰ ज्या वाटेनें जाऊं शकत नाहीं, फक्त मनुष्यास जातां येईल अशी अरुंद वाट; पायवाट. [पाऊल + वाट]

दाते शब्दकोश

जाणता

वि. १ शहाणा. 'भव बुडवी म्हणुनिच तव भजनीं सनकादि जाणता रमला ।' -मोउद्योग. ६.१. २ जाण, निपुण. ३ तरबेज; हुशार (रोग बरा करण्यांत, सूतिकाशास्त्रांत); पंचा क्षरी; मांत्रिक; वैदू; पशुवैद्य. ४ (ल.) धूर्त; लुच्चा (जसें- चोराचा माग लावणारा, पाण्याचा थांग लावणारा). ५ निवाडा करणारा; न्यायाधीश. ६ एखाद्या गोष्टीचा गौरव करणारा; गुण- ग्राहक; आश्रयदाता. 'शास्त्रविद्येचा आतां कोणी जाणता नाहीं.' ७ (श्रम, उपकार इ॰) ओळखणारा; आभारी होणारा. 'मी नित्यशः विचारपूर्वक लिहिण्याचा श्रम करितों याचा जाणता कोणी नाहीं.' ७ परीक्षा करणारा; परीक्षक; बर्‍यावाइटाची पारख करणारा. ८ वयांत आलेला; सजाण. ९ वडीलधारा (माणूस) [सं. ज्ञा] ॰वर-नवरा-पु. वयांत आलेला नवरा. जाणती- स्त्री. १ बुद्धि. 'धर्माधर्म रूपें जियें । तियें न चोजवितां जायें । जाणती जे कां ।' -ज्ञा १८.७२०. २ (कु.) वयात आलेली, ऋतुमती स्त्री. [सं. ज्ञा] ॰होणें-ऋतुस्नान होणें; न्हातीधुती होणें. ॰कळा-स्त्री. १ परिपक्व, पुर्ण ज्ञानाचें तेज. (जाणपणा आल्यावरचें); बुद्धीची चमक (क्रि॰ येणें). २ बुद्धि (जिवंत प्राण्याची) (कलांपैकीं एक). जीवनकळा, प्रेतकळा ह्यासारखीं आणखी दुसरीं रूपें होतात. ३ अप्रत्यक्ष विषय दर्शन; त्रिजगत आणि त्रिकाल यांमधील गूढ वस्तूचें ज्ञान. ४ ज्याच्यामुळें भूतबाधा जाणली जाते असा एक मंत्र. ॰वधू-नवरी-स्त्री. जाणती अर्थ २ पहा. (क्रि॰ होणें).

दाते शब्दकोश

जुना

वि. १ पुराणा; प्राचीन; पुरातन; अर्वाचीन काळचा नव्हे असा. 'आतां जुनीं माणसें बहुधा राहिलीं नाहींत.' २ फार दिवस वापरलेली (वस्तु); झिजलेला; फाटलेला (जिन्नस). ३ समाप्त होऊन ज्यास बराच काळ झाला असा (व्यापार इ॰). 'तुझे पंक्तिचे जेवणारे जेवून उटून जुने झाले, तरी तुझें जेवण होतच आहे.' [सं. जीर्ण; प्रा. जुण्ण. गु. जुनू] ॰खोड-पु. दणकट; चिवट; टणक, सशक्त (म्हातार्‍या माणसास लावतात) जुनाट-वि. १ जुना; प्राचीन; फार दिवसांचा; जुन्या काळचा. 'आतांचे मनुष्यापेक्षां जुनाट मनुष्य प्रामाणिक.' २ पक्का; पक्क (बुद्धि, विचार, अनुभव झाड). 'या झाडांतलें जुनाटलें झाड पाहून तोडा.' ॰पाना-वि. बराच जुना; जुनापुराणा; वापरलेला; फाटलेला (कपडा, भांडें, घर). ३ जुना अर्थ ३ पहा. ॰पापी- वि. धूर्त, शहाणा (म्हातार्‍याबद्दल वापरतात). ॰पुराण-वि. १ जुनवट; जीर्ण; थकलेला. २ वापरलेला; झिजलेला; जुनापाना. ३ वडील; ज्येष्ठ; फार दिवसांचा (माणूस). ४ बहुतकाळचा; जुना (कामदार, हुद्दा, धंदा, व्यापार). [जुना + हिं. पुराणा] ॰जुना- वणें-अक्रि. १ जून होणें, पक्व होणें; स्थापित होणें; बळावणें; दृढता पावणें (वस्तु, झाड, बुद्धि, अभ्यास, बातमी, रोग इ॰). २ (वाईट अर्थानें) तारुण्यांतील जोर जाणें (बुद्धिचा); उत- रत्या कळेस लागणें. जुनेरें, जुनेर-न. (कों.) जुनें वस्त्र. (विशेषतः बायकांचें जुनें लुगडें).

दाते शब्दकोश

प्रकृति

प्रकृति prakṛti f (S) Constitution or disposition; temperament or temper (whether of body or mind). Seven particular प्र0 are reckoned in वैद्यशास्त्र; viz. वातज or वातप्र0, पित्तज or पित्तप्र0, कफज or कफ- प्र0, वातपित्तप्र0 वातकफप्र0, कफपित्तप्र0, समधातु or समप्र0. There are however many other प्र0; as उष्णप्र0, सीतप्र0, उग्रप्र0, मंदप्र0, क्रूरप्र0, कोमलप्र0, मृदुप्र0, स्वस्थ-सौम्य-तीक्ष्ण-तामस &c. -प्र0. 2 Natural or native state or form. 3 Nature--in philosophy; the passive or material cause of the world; as opp. to the active or spiritual cause. 4 Nature--in mythology; a goddess, the personified will of the Supreme in the creation, and identical with माया and with the शक्ति or personified energy of a deity. माया & अविद्या are the भेद or forms of प्र0. 5 An uninflected word,--the radical form before the affixes are attached. 6 A radical form or predicament of being. Eight are reckoned; viz. पृथ्वी, उदक or अप्, अग्नि or तेज, वायु, आकाश, मन, बुद्धि, अहंकार Earth, water, fire, air, ether, the affections or heart, the understanding or mind, the consciousness or sense of personal being. To the first five of these, termed the gross or solid ele- ments are attached, as respectively related to them, the पंचसूक्ष्मभूतें (viz. गंध, रस, रूप, स्पर्श, शब्द--गंध to पृथ्वी, रस to उदक &c.) the five archetypes or subtil superelementary principles or primordial bases; and the latter three, viz. मन, बुद्धि, अहंकार are repeated; constituting another enumeration of eight, and also termed अष्टप्र0 See पंचमहाभूतें. 7 A requisite of regal administration. Seven are enumerated; viz. King, minister, ally, treasure, territory, forts, army, or स्वामी, अमात्य, सुहृत्, कोष, राष्ट्र, दुर्ग, बल. To these (very considerately) an eighth is added, viz. Subjects or प्रजा. The seven collectively are termed सप्तविधाप्रकृति; the eight, अष्टविधाप्रकृति; and these again are distinguished into अंतःप्रकृति, designating severally स्वामी, अमात्य, & सुहृत्, and बहिर्प्रकृति, designating severally the remaining four or five. प्रकृतीचा ताळ बिघडणें-नासणें-सोडणें or प्रकृतीनें ताळ सोडणें-टाकणें- or ताळांतून जाणें To lose its tone, vigor, health, soundness--the constitution. 2 To begin to quarrel or to rage. प्रकृतीनें चालणें-जाणें- वागणें-असणें g. of o. To walk according to the temper or mind of: also, without g. of o. and with आपल्या, To follow one's own disposition. प्रकृतीवर टाकणें-ठेवणें-असूं देणें To leave to nature (a disease &c.) प्रकृति ताळावर येणें g. of s. To recover one's healthy tone (from sickness, anger, hatred &c.): also to return to the right way.

मोल्सवर्थ शब्दकोश

स्त्री. १ शरीर किंवा मन ह्यांचा मूळस्वभाव; मूळ- धर्म, अवस्था, स्थिति; स्वभाव; शरीर; तब्यत. वैद्यशास्त्रांत सात प्रकारच्या प्रकृती सांगितल्या आहेत:-वातज, पित्तज, कफज, वात पित्तज, वातकफज, कफपित्तजप्रकृति आणि समधातु किंवा सम- प्रकृति, ह्यांशिवायहि बर्‍याच प्रकारच्या प्रकृति आहेत. उदा॰ ऊष्ण सीत-उग्र-मंद-कोमलप्रकृति इ॰ २पदार्थमात्राचा मूळ- धर्म, मूळस्वभाव किंवा मूळस्थिती. 'जंव प्रकृतीचें अधिष्ठान । तंव सांडी मांडी हें अज्ञान ।' -ज्ञा ३.५३ 'तियें आघवींचि मागुतीं । जिंवत भेटली प्रकृती ।' -ज्ञा ११.६६६. ३(तत्त्व) विश्वाच्या उत्पत्तीचें कारण; मूळकारण; समावायीकारण; ह्याच्या उलट अध्यात्मिक कारण; सर्व सृष्टींतील पदार्थांचें मुख्य मूळ. 'जगांतील सर्व पदार्थांचें जें हें मूलभूत द्रव्य त्यास सांख्यशास्त्रांत प्रकृति असें म्हणतात.' -गीर १५५. ४ (वेदांत) माया; आदि- माया; ब्रह्माची जग उत्पन्न करण्याची इच्छाशक्ति; अविद्या. 'म्हणोनि आघवें । मागील मज आठवे । मी अजुही परि संभवें । प्रकृतियोगें ।' -ज्ञा ४.४४. ५ (व्याकरण) शब्दाचें किंवा धातूचें प्रत्यय लागण्यापूर्वींचें मूळ रूप. ६ पृथ्वी, आप्, तेज, वायु, आकाश, मन, बुद्धि आणि अहंकार हे आठ पदार्थ; अष्टविधा- प्रकृति. ह्यापैकीं पहिले पांच, ज्यांस पंचमहाभूतें असें म्हणतात, त्यांचा पंचसूक्ष्मभूतांशी (गंध, रस, रूप, स्पर्श आणि शब्द इ॰ शीं) मूलकारण म्हणून संबंध लावून व मन, बुद्धि अहंकार तसेच ठेवून दुसरी अष्टविधा प्रकृति होते. पंचमहाभूतें पहा. ७ राज्य- कारभाराचीं सात अंगे-स्वामी, अमात्य, सुहृद्, कोश, राष्ट्र, दुर्ग, आणि बल. ह्यांत आणखी प्रजेचा अंतर्भाव करितात. पहिल्या सातांना सप्तविधाप्रकृति व आठांना अष्टविधाप्रकृति असें म्हणतात. ह्याचाहि पुन्हां अंतःप्रकृति (स्वामी, अमात्य आणि सुहृद् ) व बहिःप्रकृति (कोश, राष्ट्र, दुर्ग बल आणि प्रजा) असे भेद आहेत. ८ प्रजा; रयत. 'दुसरे दिवशीं प्रकृति प्रार्थिति येऊनि आपुल्या पतितें ।' -मोवन १३.१०४. ९ एक छंद. १० कांहीं एक व्यवहा- राचा सामान्यतः चाललेला प्रकार. [सं.] (वाप्र.) ॰ताळ्या- वर येणें-(आजार, राग , द्वेष इ॰ मुळें झालेला) तब्यतीचा बिघाड, मनःसंताप इ॰ नाहींसा होणें. प्रकृतीचा ताळ बिघ- डणें-नासणें-सोडणें, प्रकृतीनें ताळ सोडणें-टाकणें- ताळ्यांतून जाणें-१ तब्यत बिघडणें; शरीराचा जोम, कस, स्वास्थ्य, तेज इ॰ कमी होणें, नाहींसें होणें २ भांडण्यास सुरवात करणें, होणें, रागावणें; क्रोधाविष्ट होणें. प्रकृतीनें चालणें- जाणें-वागणें-असणें-एखाद्याच्या मर्जीप्रमाणें, स्वभाव, मन, इच्छा. इ॰ प्रमाणें वागणें; (आपल्या) स्वभावानुरूप, मर्जीप्रमाणें वागणें. प्रकृतीवर टाकणें-ठेवणें-असूं-देणें-आजार वगैरे नैसर्गिक रित्या बरा होऊं देणें. सामाशब्द- ॰गत-वि. प्रकृतीच्या किंवा मायेच्या स्वाधीन झालेला; मायोपाधिक. 'आणि हाचि प्रकृतिगतु । सुखदुःखभोगी हेतु । -ज्ञा १४.३४. ॰ज-वि. उप- जत; जन्मतः; स्वाभाविक. '...भय मुलामध्यें प्रकृतिज असतें.' -नीति २६४. ॰दोष-पु. जन्म, मृत्यु इ॰ शारीरिक विकार. 'तैसा मनुष्य लोकाआंतु । तो जरी जाहला प्राकृतु । तर्‍ही प्रकृति- दोषाची मातु । नेणिजे तेथ ।' -ज्ञा १०.७९. ॰परिहार-पु. प्रकृतीसंबंधींचा सर्व विचार, खुलासा, स्पष्टीकरण. 'तयावरी सप्तमीं । प्रकृतिपरिहार उपक्रमीं । भजति जे पुरुषोत्तमीं । ते बोलिले चार्‍ही ।' -ज्ञा १०.२८.॰पुरुष-पु. १ जगताच्या उत्पत्तीस कारणीभूत असलेले माया व आदिपुरुष. 'सृष्टीला आदिकारण प्रकृतिपुरुष ।' २ स्त्रीपुरुष. 'प्रकृतिपुरुष चालिले मेळ । श्रीगुरुदेवदर्शना ।' -सप्र ८.४०. ॰प्रलय-पु. कल्पांतीं होणारा सृष्टीचा विलय; महाप्रलय. ॰मंत-वि. शरीरानें युक्त; शरीरवान्. 'नातरी प्रकृतिमंतु होऊनी । इंद्रिय लळा देउनी ।' -ज्ञा ३.१९४.॰विकार-पु. माया- कार्य; जग.॰विकृतिभाव-पु. प्रकृति व विकृति यांचा परस्पर- संबंध. ॰स्वभाव-पु. १ मनुष्याचा मूळस्वभाव. २ पदार्थांच्या अंगचा नैसर्गिक गुणधर्म. प्रकृत्यंश-पु. (ज्योतिष) कोणत्याहि गोलाच्या अंगीं असलेला जडपदार्थाचा अंश. [प्रकृति + अंश]

दाते शब्दकोश

कारण      

न.       १. कोणत्याही दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून नसलेले, कार्य घडवण्यास आवश्यक, जे कार्योत्पादक ते; निमित्त; कार्यप्रवर्तक; प्रमाण; आधार; ज्यामुळे एखादी गोष्ट घडते ते. ही कारणे तीन आहेत - समवायी, असमवायी व निमित्त (अंतस्थ किंवा अविभाज्य, दूरस्थ किंवा अप्रत्यक्ष, साधनभूत किंवा आकस्मिक; कारण याचा प्रथमार्थी कर्तृत्व, हेतू, अपेक्षा, प्रेरणा, उद्देश, आधार इतक्या अर्थी प्रयोग होतो) : ‘तयाही बोधा कारण । जाणता मीचि ॥’ - ज्ञा १५. ४३८. २. प्रयोजन; हेतू. ३. गरज, काम, प्रसंग. ४. मुंज किंवा लग्नासारखा कोणताही समारंभ. ५. साधन; उपकरण; घटक; मूलतत्त्व; आद्यद्रव्य. ६. (न्याय) नियतपूर्व; दुसऱ्या कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नसणारे. ७. मसलत : ‘हाता चढे धन । ऐसें रचिले कारण ।’ - तुगा १८४०. ८. कार्य : ‘जाऊं दे सावित्री, मज करूं दे कारण ।’ - वसा ६७. ९. इच्छित वस्तू; सृष्टीचे आद्य तत्त्व : ‘तेथ इच्छा आणि बुद्धि । घडवी अहंकारेंसी आधी । मग तिया लाविती वेधीं । कारणाच्या ॥’ - ज्ञा १३·९६९. १०. साध्य : ‘तें परब्रह्म निर्वाण । जें आत्मविदांचे कारण ।’ - ज्ञा ५·१४९. ११. (वेदांत) महत्तत्त्व, अहंकार व सूक्ष्म पंचमहाभूते (आनंदगिरीचे मत); पंचज्ञानेंद्रिये, त्यांचे पाच विषय मन, बुद्धी व अहंकार इ. (शांकरमत भगवद्गीता १३·२०. बहाणा; सबब. [सं. कृ = करणे] (वा.) कारणी लावणे - कामाला, उपयोगाला लावणे, आणणे (देह, द्रव्य, सामर्थ्य, आयुष्य, जन्म इ.) : ‘कारणीं लावेनि करील सार्थक ।’ - दावि ३९१. कारण पडणे - गरज पडणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ज्ञान

न. १ बुद्धि; विषयाचें आकलन करण्याचें सामर्थ्य २ मनोव्यापाराचा विषय, शास्त्र ३ बातमी; महिती. ४ विषय ग्रहणाचा बुद्धीवर झालेला संस्कार; मनावरचा ठसा, समजूत. ५ ब्रह्मज्ञान; सृष्टींत अनेकप्रकारचे जे अनेक विनाशी पदार्थ आहेत त्या सर्वांत एकच अविनाशी परमेश्वर भरून राहिला आहे असें जाणणें; ब्रह्मात्मैकज्ञान. -गीर ७१३. अध्यात्मविद्या. [सं. ज्ञा = जाणणें] ॰कमळ-न. १ एक रांगोळी काढण्याचा प्रकार. २ (योग) शरीराच्या ठिकाणीं कल्पिलेल्या आठ कमळांपैकीं प्रत्येक. ॰कळा-स्त्री. बुद्धिवैभव; बुद्धिप्रभाव. 'कौशल्य ज्ञानकळा परम ।' २ शहाणपणाचा प्रकाश; बुद्धीची, जाणिवेची भूमिका; जाणण्याची कला. 'आंगीं ज्ञानकळा आली म्हणजे दुराचार घडत नाहीं.' ३ जाणतीकळा पहा. ॰कळेपार-वि. मनुष्याच्या बुद्धीच्या आटो- क्याच्या बाहेर; बुद्धीला अगम्य. ॰कांड-न. त्रिकांड वेदांतील आत्मज्ञानाचें प्रतिपादन केलेला भाग; आरण्यकें व उपनिषदें (यांत यज्ञयागादि कर्म गौण व ब्रह्मज्ञानच काय तें श्रेष्ठ असतें). -गीर २८७. याच्या उलट कर्मकांड. ॰कोश-पु. १ ज्ञानाचा संग्रह, सांठा. २ विविध विषयांची माहिती ज्यांत दिली असते असा कोश; (इं.) एन्सायक्लोपीडिया. ३ मराठींतील असा ग्रंथ. ॰गुरु-पु. १ ज्ञान देणारा, शिकविणारा शिक्षक. २ महावाक्यो- पदेशेंकरून ब्रह्म प्रत्ययास आणून देणारा, मोक्षगुरु. ॰धन-वि. परिपूर्ण ज्ञानस्वरूप असलेला; ज्ञानानें पूर्णपणें भरलेला. 'महाराज राज सद्गुरु ज्ञानघना ।' ॰चक्षु-दृष्टी-प. बाह्येंद्रियांच्या विषया- पलीकडील आत्मस्वरूप जाणण्याचें ज्ञान, बुद्धि, मनःचक्षु. -वि. एतद्विशिष्ट (मनुष्य). ॰जनक-वि. ज्ञान उत्पन्न करणारें. ॰दाता-पु. ज्ञानगुरु. -वि. ज्ञान दान करणारा. ॰दिवा-दीप- पु. बुद्धिरूपी दिवा. 'अंतरिचा ज्ञानदिवा मालवूं नकोरे ।' ॰निष्ठा-स्त्री. ज्ञानोत्तर सर्व कर्मे सोडून देऊन ज्ञानांतच गढून जाण्याची सिद्धावस्थेंतील स्थिति. -गीर ४१२. ॰परंपरा-स्त्री. १ एकामागून एक येणाऱ्या विचारांमुळें, माहितीमुळें झालेलें ज्ञान. २ वाढतें ज्ञान. ॰मठ-मठी-पुस्त्री. १ अध्यात्म ज्ञानाचा अथवा ध्यानयोगाचा अभ्यास करण्यासाठीं बांधलेला आश्रम; एकांतस्थान. २ (ल.) तुरुंग; कारागृह. ज्ञानमठांत बसणें- १ सांसारिक बंधनांतून पराङ्मुख होऊन आध्यात्मिक चिंतनांत काळ घालविणें. २ स्वतःच्या शहाणपणाबद्दल घमेंड, गर्व बाळगणें, ॰मार्ग-पु. ईश्वर प्राप्तीचा वेदांचा शास्त्रोक्त रास्त, मार्ग; अव्य- क्तोपासनेची साधनावस्थेंतील स्थिति दाखविणारी रीत. -गीर ४१२. ॰मार्गी-वि. ज्ञानमार्गाचा अवलंब करणारा; ब्रह्मज्ञानाच्या मागें असणारा. ॰माला(ळ-ळा)-स्त्री. १ स्वाध्यायास प्रारंभ करतांना शिष्या्च्या, पुत्राच्या गळ्यांत गुरूकडून किंवा पित्या- कडून घातली जाणारी माळ. २ ही माळ घालण्याचा संस्कार. ३ (ल) जगाचें ज्ञान; व्यवहारज्ञान. ॰यज्ञ-पु. ज्ञानप्राप्ति; परमे- श्वर स्वरूपाचें ज्ञान करून घेऊन त्या ज्ञानाला अनुरूप अशा आचर- णानें परमेश्वराची प्राप्ति करून घ्यावयाचा मार्ग, साधन. -गीर ६८०. ॰रत्नाची मांदुस-स्त्री. ज्ञानी, शहाणा माणूस, या- बद्दल गौरवानें म्हणतात. [ज्ञान + मांदूस = पेटीं] ॰लक्षण-न. १ ज्ञानसाधनाचें चिन्ह; खूण. २ बुद्धिलक्षण. ॰वल्ली-स्त्री. (थट्टेनें) भांग. ॰वाद-पु. १ (तत्त्वज्ञान) ज्ञानानेंच मोक्ष प्राप्ती होते, मुक्ति मिळते हें तत्त्व; व त्या तत्त्वाचें समर्थन. २ (इं.) ग्नॉस्टिसिझम्. ॰वान्-वि. १ शाहाणा; ज्ञानी. २ अध्यात्मज्ञान असणारा; ब्रह्मज्ञानी. ॰वायु-पु एक वातरोग. हा झाला असतां माणूस गहन विषयावर विद्वत्तापूर्ण बडबड करीत सुटतो. ॰विग्रह-पु. ज्ञानरूपी शरीर असलेली (देवता). ॰विज्ञान-न. १ आध्या- त्मिक ज्ञान आणि आधिभौतिक किंवा शास्त्रीय ज्ञान. २ अध्य- यनापासून मिळालेलें ज्ञान आणि अनुभवजन्य किंवा प्रत्यक्ष ज्ञान. ३ वाङ्मय आणि शास्त्र. ॰शक्ति-स्त्री. १ ज्ञानेंद्रिय पंचक. २ बुद्धिसामर्थ्य. ॰सूर्य, ज्ञानार्क-पु ज्ञानरूपी सूर्य. 'ज्ञानसूर्य उगवला देहामाजी । ॰स्पृश्-वि. ज्ञानाला स्पर्श झालेलें; जाण- लेलें; समजलेलें. ज्ञानांजन-न. ज्ञानरूपी अंजन, काजळ; ज्ञानो- पदेश. 'नयनीं लेईलें ज्ञानांजन.' ज्ञानाभ्यास-पु. अध्यात्म- ज्ञानाचें चिंतन; ब्रह्मज्ञानाचा अभ्यास, चिंतनमनन ज्ञानाभ्यासी- वि. सदोदित ब्रह्मचिंतन करणारा. याच्या उलट कर्मसंगी. ज्ञानार्थ- पु ज्ञानरूप, ज्ञानाचा विषय. 'हे असो आतां वाजटा । तो ज्ञानार्थ करूनि गोमटा ।' -ज्ञा १४.२६. [ज्ञान + अर्थ] ज्ञानाज्ञान-न. पारलौकिक ज्ञान व (अन्यथा) ऐहिक विषयांचें ज्ञान. -ज्ञा १५. ५०३. [ज्ञान + अज्ञान] ज्ञानी-ज्ञानिया-वि. १ ज्ञाता; शाहणा, जाणणारा; विद्वान; सुज्ञ. २ आध्यात्मिक, पारमार्थिक ज्ञान असणाराच ब्रह्मज्ञानी. 'तिज अथार्थी जाणिजे । ज्ञानिया चौथा ।' -ज्ञा ७.१०९; एभा ११.२४९. [सं. ज्ञानिन्] ज्ञानेंद्रिय-न. ज्यांच्याद्वारें वस्तूंचें ज्ञान होतें अशीं त्वचा, नेत्र, जिव्हा, कान, नाक हीं पांच इंद्रियें प्रत्येकीं याच्या उलट कर्मेद्रिय. या पांचांच्या समूहास ज्ञानेंद्रियपंचक म्हणतात. [सं.] ज्ञानोपदेश-पु. अध्यात्मज्ञान; आत्मज्ञान याचा उपदेश, बोध. (क्रि॰ करणें; देणें). [सं.] ज्ञानोपासना-स्त्री. उपासनेचा तिसरा प्रकार. वेद व शास्त्रें यांच्यापापासून ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न, मार्ग, (कर्मोपासना व आत्मोपासना हे उपासनेचे पहिले दोन प्रकार आहेत). [सं.]

दाते शब्दकोश

बाळ, बाळक

न. १ बालक; लहान मूल. २ -पु. मुलगा; शिशु. 'जसा वारावा चपळ बाळ बापानें ।' -मोभीष्म ११.६९. -वि. १ लहान; अल्पवयी. २ मूर्ख. 'पंडित न गमसि जरि बहु पांडित्यहि करिसि दिससि बाळ मला ।' -मोकर्ण ४१.१८ ३ अजाण. 'नुमजे बाळासि किमपि...।' -मोमौसल १.१. [सं. बाल = मूल; बाल + क = बालक] म्ह॰ असतील बाळ तर फेडतील काळ. ॰आंबा-पु. कच्चा किंवा हिरवा आंबा. ॰कडू-डूं- न. १ लहान मुलांना किराईत वगैरे कित्येक कडू औषधें (विशे- षतः सकाळीं) उगाळून पाजतात तें; घुटी. २ (ल.) लहानपणीं मिळालेलें शिक्षण किंवा वळण. बाळकडू असणें-उपजत प्रवृत्ति किंवा गुण असणें; गोडी असणें. 'कोळ्याच्या मुलांना पोहोण्याचें बाळकडूच असतें.' बाळका-पु. गोसाव्याचा शिष्य. [बालक] ॰क्रीडा-स्त्री. लहानपणीचें लहान मुलांचे खेळ. [सं. बालकीडा] ॰खुंट-पु. केळीच्या खुंटास नवीन फुटणारा कोंभ; मोना. ॰गळा-पु. लहान मुलाचा बारीक आवाज; न फुटलेला आवाज. ॰गुंडा-पु. बालगुंडा पहा. ॰गोपाळ-पुअव. १ (कृष्णाचे खेळ- गडी, गवळ्यांचीं पोरें यावरून). लहान मुलें; लहानमोठीं एकत्र जमलेलीं मुलें. २ एकत्र जमलेलीं गांवांतील लहानथोर माणसें. 'महाराज, हे सर्व बाळगोपाळ मिळाले आहेत. त्यांजवर आपण दया करावी.' [बाळ + गोपाल = गवळी] ॰चरित-त्र-न. लहान- पणचें चरित्र; बालक्रीडा. [सं.] ॰छंद-पु. लहान मुलानें घेत- लेला चाळा; हट्ट. [सं.] ॰टोळ-पु. लहान व हिरवा टोळ. ॰टोंक-ढोंक-पु. बगळा. ॰ताड-पु. नर जातीचा ताड. यास फळें येत नाहींत. ॰दशा-स्त्री. बाल्य; बालपण; बाल्यावस्था. 'लोपली उघडे बाळदशा ।' -ज्ञा ६.२६०. [सं.] ॰दांत- पुअव. लहानपणचे किंवा पहिले दांत; दुधाचे दांत. ॰दृष्टि-स्त्री. तारुण्यांतील बारीक व लांबची वस्तु जिनें दिसते अशी दृष्टि; जोमदार दृष्टि. [सं.] ॰पणचें लोणी-न. पहिल्यानें व्यालेल्या वशी-परवर्षी-स्त्री. बालपरवेशी पहा. ॰पाठ-पु. लहानपणीं शिकलेली विद्या. लहानपणींची शिकवण. [सं.] ॰फूट-न. १ बाळआंबा. २ रुपया इ॰ कांस असलेली बारीक चीर. ॰फोक-पु. (नाजुक किंवा कोंवळी फांदी यावरून) तरुण; तरणाबांड; आडबाप्या. ॰बद-बोध-वि. बालबोध पहा. ॰बंद-न. बाळबोध, देवनागरी लिपी. ॰बोध कित्ता-पु. (ल.) उदार धोरण. 'मी मुंबई इलाख्याचा कारभार चालवितांना... एल्फिन्स्टन यांनीं घालून दिलेला बाळबोध कित्ता वळवीन.' -टिले १.४३६. ॰बोध वळण-न. साधी रीत; जुनी, सनातनधर्माची रीत. ॰बुद्धि- स्त्री. मुलाची बुद्धि. -वि. पोरकट समजुतीचा; अज्ञानी; पोरबुद्धि; लेकुरबुद्धि. ॰बेल-न. बेलाचें कोंवळें फळ. ॰ब्रह्मचारी- भाषा-मित्र-इ॰ बालमध्यें पहा. ॰भिकारी-पु. जन्मापासून भिकारी. याच्या उलट गर्भश्रीमंत. ॰भूक-स्त्री. (मुलाची भूक यावरून) वरचेवर, घटकेघटकेला लागणारी भूक. ॰भोंक- न. १ बगळा; बाळढोंक. २ (ल.) लांब मानेचा इसम; लांब- मान्या. ॰भोग-पु. १ प्रातःकाळची पूजा झाल्यानंतर देवाला अर्पण केलेला उपहार. २ (यावरून ल.) लहान मुलांचा सकाळचा फराळ. ३ अशा नैवेद्याचे किंवा फराळाचे पदार्थ. (क्रि॰ देणें; करणें). ४ (सामान्यतः) हिस्सा; वांटा; भाग. (क्रि॰ करणें). ॰मति-स्त्री. अज्ञान. 'रत्ने म्हणोनि भरि इंगळ जेंवि खोळे । घे काळ बाळमति पाहति लोक भोळे ।' -आपू २९. ॰मयाणी- स्त्री. गाडीच्या चाकाच्या आंतील बाजूचा वसू; आंतील वसवी; कणा आखरींत भक्कम करण्याची लोखंडी चाकी (माण) बाळमाइनी ॰मुकी-स्त्री. १ मेजवानीच्या किंवा फराळाच्या वेळीं गुपचूप वानगी म्हणून राखून ठेवलेला एखाद्या जिन्नस किंवा घास. २ असा राखून ठेवलेला नसेल त्यास दंड द्यावा लागणें किंवा दिलेला दंड. (क्रि॰ लागणें). ॰मुंज्या-पु. लहानपणापासून मुंज्या; मोठा झाला असला तरी अविवाहित किंवा ब्रह्मचारी असलेला मनुष्य. ॰रंडा-रांड- विधवा-स्त्री. बालरंडा पहा. ॰राजा-पु. पुंड, धीट किंवा दांडग्या मुलाला लाडिकपणें लावण्यांत येणारा शब्द. [सं.] ॰लेणें- ल्याणें-न. लहान मुलाच्या अंगावर घालावयाचे बिंदली इ॰ दागिने. 'विषयाचें बाळलेणें ।' -शिशु ९२. ॰वाटी-स्त्री. १ सकाळचा अल्पोहार; न्याहारी; बाळभोग. (क्रि॰ झोकणें; चढविणें; करणें; खाणें; होणें). २ वाटा; भाग; हिस्सा. ॰वैद्य- पु. लहान मुलांचा वैद्य. ॰शब्द-पु. लहान मुलांसारखें बोलणें, आवाज, उच्चार. 'बाळशब्दें खेळवील तनुजाला ।' ॰शिरें- न. (कों.) बाळतिणीला तिच्या मुलाकरितां धर्मार्थ दिलेलें दूध भांडीं व इतर आवश्यक वस्तू इ॰ [सं. बाल + क्षीर] ॰सर- स्वती-स्त्री. बालसरस्वती पहा. ॰सवत-स्त्री. (बायकी) लहानपणापासूनची सवत. [बाल + सं. सपत्नी] ॰स्वार-वि. १ लहानपणापासून घोड्यावर बसणारा. २ (ल.) लहानपणापासून एखाद्या शास्त्रांत किंवा उद्योगधंद्यांत प्रवीण असलेला; जन्माभ्यास असलेला. ॰हिरडा-हरडा-डी-हर्तकी-पुस्त्री. बालहरीतकी; कोवळा वाळविलेला हर्डा; हें एक औषधी फळ आहे. चांभारी- हिरडा पहा. [सं. बालहरितकी] बाळांबा-पु. बाळआंबा पहा. बाळाभ्यास, बाळाभ्यासी-बालाभ्यास, बालाभ्यासी पहा. बाळामराई-स्त्री. आंब्याच्या लहान झाडांची बाग. [बाळ + आमराई] बाळायती-वि. बाळ; लहान. 'त्या बाळायती गोपीतें । हरिलें दैत्य वेषें तेथें ।' -रास २.३६०. बाळेभोंक- न. बाळभोंक; बगळा. बाळेभोळे-वि. अज्ञ आणि भोळसर. 'माया दुस्तर शास्त्रप्रसिद्धी । तेथें बाळेभोळे स्थूळ बुद्धी ।' -एभा ३.२२४. बाळोपचार, बाळोपचारी-बालोपचार-री पहा.

दाते शब्दकोश

कारण

न. १ कार्याचे अधिकरणीं नियमेंकरून विद्यमान असून जें कार्योत्पादक तें; निमित्त; कार्यप्रवर्तक; प्रमाण; आधार; ज्यामुळें एखादी गोष्ट घडते तें; हीं तीन आहेत-समवायी, अस- मवायी व निमित्त (अंतस्थ किंवा अविभाज्य, दूरस्थ किंवा अप्रत्यक्ष, साधनभूत किंवा आकस्मिक; कारण याचा प्रथमार्थीं कर्तृत्व, हेतु, अपेक्षा, प्रेरणा, उद्देश, आधार इतक्या अर्थीं प्रयोग होतो). 'तयाही बोधा कारण । जाणता मीचि ।' -ज्ञा १५.४३८. 'ऐसा आहे समाचार । कारण पाहिजे विचार ।' -दा १२.६.२९. २ प्रयोजन; हेतु. ३ गरज; काम; प्रसंग. 'आज पाऊस पडला नाहीं म्हणून छत्रीचें कारण लागलें नाहीं.' ४ मुंज किंवा लग्नासारखा कोणताहि समारंभ. ५ साधन उप- करण; घटक; मूलतत्त्व; आद्यद्रव्य. ६ (न्याय) नियतपूर्व; दुसर्‍या कोणत्याहि गोष्टीवर अवलंबून नसणारें. -न्याप ३४. ७ मसलत. 'हाता चढे धन । ऐसें रचिलें कारण ।' -तुगा १८४०. ८ कार्य. 'जाऊं दे सावित्री, मज करूं दे कारण ।' -वसा ६७. 'करूनी कारण स्वामी यश घ्यावें । पाईका त्या नांवें खरेपण' -तुगा ३७९. ९ इच्छित वस्तु; सृष्टीचें आद्य तत्व. 'तेथ इच्छा आणि बुद्धी घडवी अहंकारेंसीं आधीं । मग तिया लावितां वेधीं । कारणाच्या ।' -ज्ञा १३.९६८. १० साध्य. 'तें परब्रह्म निर्वाण । जें आत्मविदांचें कारण ।' -ज्ञा ५.१४९. ११ (वेदांत) महत्तत्त्व, अहंकार, व सूक्ष्म पंचभूतें (आनंदगिरीचें मत); पंच- ज्ञानेंद्रियें, त्यांचें पांच विषय मन, बुद्धि व अहंकार, (शांकरमत भगवत्गीता १३.२०.).[सं. कृ = करणें] कारणीं लावणें- कामाला, उपयोगाला लावणें. (देह, द्रव्य, सामर्थ्य, आयुष्य, जन्म इ॰). 'कारणीं लावोनि करील सार्थक ।' -दावि ३९१. ॰त्व-न. कारण असणें; कारणरूप असणें. [सं.] ॰देह-शरीर- पुन. देहचतुष्टयापैकीं तिसरा देह. याला अविद्येचें किंवा अज्ञानाचें अधिष्ठान आहे. 'स्थूल सूक्ष्म देहद्वयातें । आणि विपरीत ज्ञानातें । अज्ञानचि प्रसवलें म्हणोनि त्यातें । कारण देह म्हणिजे पैं ।' [सं.] ॰परत्वें-कारण पडल्यास; जरूर लागल्यास. 'कोंडो- भटाबरोबर मात्र ती कारणपरत्वें बोलत होती.' -स्वप २१४. ॰वादी-पु. (कायदा) वादी; फिर्यादी. [सं.]

दाते शब्दकोश

समज

पु. १ बोध; ज्ञान; आकलन; उमज; अवगमन. (क्रि॰ घेणें; धरणें). २ ग्रहणशक्ति; आकलनशक्ति. ३ जाणीव; खातरी; समाधान; बरोबर आकलन; परिज्ञान. ४ ताकीद; माहीती. ५ शहाणपणा; हुशारी; अक्कल; बुद्धि. 'वरहि वरा- यास पाहिजे समज ।' -मोउद्योग १.४१. ६ (ल.) धाक; दपटशा; मारठोक. [सं. सम् + मज्ज्; हिं. समझ] ॰उमज-पु. पूर्ण जाणीव; पूर्ण ज्ञान; वास्तविक बोध. समजणें-सक्रि. १ जाणणें; बोध, आकलन होणें. २ माहीत होणें; ठाऊक होणें; उघड होणें; स्पष्ट दिसणें. ३ अक्रि. पटणें; खात्री होणें; समा- धान होणें; शंकानिरसन होणें. ४ सारख्या सारख्या दिस- णार्‍या गोष्टीमधील सारखेपणा व फरक कोणता हें नक्की आणि पक्केपणानें सांगतां येणें. ॰समजूं लागणें-सज्ञान होणें; कळूं लागणें; कळण्यासारख्या वयांत येणें. समजदार-वि. १ सुज्ञ; विचारी; शाहणा; हुशार. २ चलाख; चांगली ग्रहण- शक्ति असलेला. समजपत्र-न. वाद न करतां समजूत झाल्याचें वादी-प्रतिवादी यांचें संमतिपत्र. समजवाली-वि. समजूत- दार; शाहाणी. 'तूं समजवाली सार्‍यांनीं जुट बांधावी ।' -राला ७३. समजविणें-उक्रि. स्पष्ट करून सांगणें; समजाविणें पहा. ॰समंजस-वि. १ समजूतदार; सुजाण; विवेकी; शाहणा; जाणता. २ बुद्धिवान; हुशार; तीव्र बुद्धीचा. ३ सद्गुणी; सज्जन; भला. ४ योग्य; लायख; बरोबर; शोभेसा समजस-वि. समंजसचा अपभ्रंश प्रथमार्थी. समजावण-णी- स्त्रीन. १ समजूत; स्पष्ट करून सांगणें. २ मन वळविणें; समाधान करणें; समजूत पाडणें; खात्री करणें. (क्रि॰ करणें; होणें). 'कर- उनि स्तन्यपान । स्वबाळांचें समजावण ।' -रास १.५७७. सम- जावशी, समजाविशी, समजावीस, समजी-स्त्री. योग्य प्रकारें समजूत पाडणें; वळणावर, ताळ्यावर आणणें; मनवळवणी; समाधान, खात्री करणें; शंका निरसन करणें; एखाद्यासंबंधीं मन ताळ्यावर आणणें. (क्रि॰ करणें; पाडणें; काढणें). 'समजाविशीस अर्धें मारवाड काबीज केलें होतें तें दरोबस्त त्यांजकडे दिलें.' -भाब १८. 'पडेल समजाविशी तशी करोत कां लाजशी ।' -केका १५.'बसल्या रुसून समजाविसी करिसी बरी.' -होल ५८. 'ह्यासाठीं माझी समजी व्हावी.' -बाळ २.६८. 'पदर पसरून उभी समजील.।' -प्रला १००. समजा- विणें-उक्रि. १ समजूत घालणें; स्पष्ट करणें; फोड करून सांगणें; पटविणें. २ खातरी, समाधान करणें; मन वळविणें, ताळ्यावर आणणें. समजीक, समजीस-समंजस पहा. समजीपत्र- समजपत्र पहा. समजूत-स्त्री. १ ग्राहक शक्ति; बुद्धि; आकलन- शक्ति. २ पूर्णज्ञान; जाणीव; बोध; आकलन. 'लोकांत समजूत व उपयुक्त ज्ञान यांचा बराच प्रसार झाला.' -नि ८. ३ खातरी; समाधान; मनवळवणी. समजाविशी पहा. ४ हुकूम; ताकीद; आज्ञा. 'सरकारचे सल्ल्यानें काम करण्यास त्यांस समजूत दिली.' -टिले १.१.१६०. ॰पाडणें-तडजोड, एकमत, संधि करणें; समाधान करणें; खातरी करणें, पटविणें. ॰दार-वि. समज- दार; समंजस पहा. ॰पत्र-न. १ आपसांत तडजोड झाल्याबद्दल संमतिपत्र, करारनामा, यादी. २ फिर्याद काढून घेण्याबद्दल पत्र, कागद, खत.समजून उमजून-क्रिवि. जाणून बुजून; मुद्दाम; बुद्धया; हेतुपुरस्पर; बुद्धिपुरःसर. समजोती- स्त्री. समजूत. 'मायबापाला करून समजोती ।' -दावि ३५०.

दाते शब्दकोश

हंस

पु. १ एक पक्षी. हा मानससरोवराकडे असतो. बदकापेक्षां मोठा व पांढरा असून दूध आणि पाणि एकत्र केलें असतां त्यांतून दूध निवडून पिणारा, जबर उडणारा, पोहणारा पक्षी असा त्याचा लौकिक आहे. बदक; वरट. २ (ल.) जीवात्मा. 'हंसाविणें कुडी.' -वसा. ३ संन्याशांतील एक भेद; परमहंस ४ ब्रह्म; परमात्मा. ५ विष्णु, सुर्य इ॰ देव. [सं.] ॰कंकणी-पु. (संगीत) एक राग. यांत षड्ज, तीव्र ऋषभ, कोमल गांधार, कोमल मध्यम, पंचम, तीव्र धैवत, कोमल निषाद हे स्वर लागतात. आरोहांत ऋषभ व धैवत वर्ज्य. जाति औडुव- संपूर्ण. वादी पंचम, संवादी षड्ज. गानसमय दिवसाचा तिसरा प्रहर ॰गति-गामिनी-वि. हंसाप्रमाणें चालणारी (स्त्री). ॰ध्वनी-पु. (संगीत) एक राग. यांच षड्ज. तीव्र ऋषभ, तीव्र गांधार, पंचम, तीव्र निषाद हे स्वर येतात. जाति औडुव-औडुव, वादी षड्ज, संवादी पंचम वेळ रात्रीचा पहिला प्रहर. ॰नाद- पु. हंस, बदक यांचा किलकिलाट. ॰पद-न. काकपद (लिखाणांत केलेलें). 'हंसपद देवोनी ओळी । उणें अक्षर रेखिजे मौळी ।' -मुआदि २५.५९. ॰पक्ष(हस्त)-पु. नृत्यांतील एक अंगविक्षेप. आंगठा व करंगळी यांशिवाय सर्व बोटें मिटणें (तीं तळहातास न चिकटतील अशीं वाकविणें), आंगठा कोणत्याहि बोटास न चिकटवितां थोडा वांकविणें करंगळी उभी ठेवणें. 'हंसपक्षी नितबकु ऐसे । भेद सांगतां कथा ठाकैल ।' -भाए ४५८. ॰पुतळी- स्त्री. गळ्यांतील पुतळीचा एक प्रकार. 'हंसपुतळ्या तेज कल्लोळ ।' -देवीदासकृत भामावर्णन ६. ॰बुद्धि-स्त्री. तीव्रबुद्धि; विषय चटकन आकलन करण्याजोगी बुद्धि; तारतम्य बुद्धि -ज्ञानप्रकाश १७-८-३८. -वि. अशा बुद्धीचा. ॰माल-स्त्री. हंसाची रांग, पक्ति. ॰मुख(हस्त)-न. नृत्यांतील एक अंगविक्षेप. आंगठा, तर्जनी व मधलें बोट या तीन बोटांचीं अग्रें एकत्र जुळविणें, करं- गळी व अनामिका हीं उभीं ठेवणें. ॰वाहन-पु. ब्रह्मदेव. ॰वाहिनी-स्त्री. सरस्वती. ॰क्षीरन्याय-विवेक-पु. दूध पाण्याच्या मिश्रणांतून हंस दूध तेवढें काढून पितो अशी समजूत आहे त्याप्रमाणें एखाद्या कृत्यांतील दोषाकडे दुर्लक्ष्य करून त्यांतील गुणांचें ग्रहण करणें. हंसळें-न. (महानु.) हंसाचें चित्र काढलेलें, अगदीं पांढरें स्वच्छ वस्त्र. 'गौवीं मुरळे हसळें ।' -प्रमा ८. हंसात्मा-पु. प्राण्याचा जीवात्मा. 'हंसात्मा प्रगट । दावील सुभट । सद्गुरु वरिष्ठ । तोचि जाणा ।' हंसासन-न. योगशास्त्रांतील एक आसन. प्रथम मयूरासनाप्रमाणें आकृति करून नंतर पाय मयूरासनांतल्याप्रमाणें अ/?/त्रीं न धरतां त्याचीं बोटें जमिनीवर ठेवून स्थिर राहाणें. -संयोग ३४९. हंसी-स्त्री. १ हंसाची मादी. २ तिच्याप्रमाणें चालण्याची गति. 'दाखविती गती नानापरी । उष्ट्री नाकुळी हंसी मयूंरी ।' -जै ४.२२.

दाते शब्दकोश

आत्मा

पु. १ जड सृष्टीपेक्षां अत्यंत भिन्न असें आदितत्त्व; जीवाचें मूलबिंब; निराकार, अमर्त्य, परमात्मा; परब्रह्म. २ प्रत्येक देहमात्राच्या ठिकाणीं त्या त्या देहाची अभिमानी असलेली जाणीव; चैतन्य; प्राण; जीव. ३ मी, आपण, स्वतः एतद्वाचक शब्द. ४ अंतःकरण; स्वभाव; प्रकृति. ५ देह. ६ बुद्धि; समज. ७ (ख्रि.) ज्याला विचार, भावना, इच्छाशक्ति आहेत असें आध्यात्मिक व्यक्तित्व -योहा ३.५.८; ४.२४. 'माझा आत्मा जसा आरसा । पाहो जन त्यामाजि तुला ।' -उसं २८१. [सं. अत् = निरंतर चालणें] ८ (पिंजारी) कापूस पिंजण्याच्या कमानीच्या पंख्याच्या कडेवर एक चामड्याची पट्टी असते. तिच्या आंत वसवलेली घोडी- वजा एक कातड्याची, घडी केलेली पट्टी. हिनें कमानीस असलेली तात ताणून अधिक आवाज निघतो. ॰नंद-पु. विषयसुखापासू नचित आवरून परमात्म्याचें ध्यान केल्यानें होणारें समाधान. ब्रह्मज्ञाना- पासून होणारा आनंद; आत्म्याची जाणीव झाल्यामुळें लाभणारें सुख. भारतीय तत्वज्ञानांत आनंद हा आत्म्याचा एक घटक मानिला आहे. आनंद पहा. [आत्मा + आनंद] ॰नात्मविचार-विवेक- पु. देहाच्या ठायीं शुद्ध निर्विषय जो ज्ञानांश तो मात्र मी, इतर देहा- दिक तें अनात्मा होय म्हणजे मी नव्हे असा विचार; आत्मा आणि अनात्मा यांसंबंधीं विचार. [सं. आत्मा + अनात्मा + विचार, विवेक] ॰नुभव-पु. आत्म्याचा परिचय; आत्मज्ञान; ब्रह्मज्ञान. 'तेथें आत्मानुभव बोलिजे कैसा कवण परि ।' [सं. आत्मा + अनुभव] आत्मानुसंधान-न. १ परमार्थविषयक सत्याकडे, आत्माज्ञानाकडे लागलेलें लक्ष. २ (ल.) अप्पलपोटेपणा. [सं. आत्मा + अनुसंधान] ॰राम-पु १ आत्मा; जीव; अंतःकरण. 'तुम्ही जेवून आत्मा- राम थंड करून घेतलात, मी मात्र उपाशी मेलों' २ विषय- पराङ्मुख व ईश्वराराधनेविषयीं तत्पर; ब्रह्मनिष्ठ; आत्मानंद लाभ- लेला; स्वसंतुष्ट. ३ परमेश्वर; परब्रह्म.'आत्मारामाचेनि विरहें । जेयां जीवीतु न साहे 'ऋ ६. 'जयदेव,जयहेव जय आत्मा, रामा । परमार्थें आरती तुज पूर्णकामा ।।' [आत्मा + राम] आत्मा- र्पण-न. स्वतःला ईश्वरास वाहून घेणें. 'आत्मार्पणाविण हरी वळतो कसा रे ।' [आत्मा + अर्पण] श्रयदोष-पु. (तर्क.) स्वाश्रयावर अवलंबून-विसंबून असणें हा दोष; अन्योन्याश्रय दोष. उ॰ घट हा घटजन्य ज्ञानास कारण होय. [आत्मा + आश्रम + दोष] त्मोन्नति-स्त्री. स्वतःचा उत्कर्ष. 'आधीं आत्मोन्नति, मग देशोन्नति' -त्मोपासना-स्त्री. ध्यान करून परमेश्वराची उपा- सना करणें. कर्मोपासना, ज्ञानोपासना पहा. -त्मौपम्य-न.१ पर- ब्रह्मस्वरूपाशीं एकरूपता. २ आत्म्याशीं आपल्याशीं ऐक्य. आप- परभाव नसणें. ' आत्मौपम्यानें सर्व जग पहावें. -त्मौपम्यबुद्धि- स्त्री. सर्वत्र आपल्यासारखी बुद्धि. 'सर्वाभूतीं एक आत्मा किंवा आत्मौपम्यबुद्धि या तत्त्वानें व्यावहारिक नीतिधर्माची जशी उपपत्ति लागते, तशी दुसर्‍या कोणत्याच तत्त्वानें लागत नाहीं.' -गीर ३८२.

दाते शब्दकोश

यथा

अ. १ जसा-शी-सें; ज्या प्रमाणें. 'यथा राजा तथा प्रजा.' २ या शब्दाचा पुष्कळ संस्कृत शब्दांशीं समास होतो. तेथें याचा अर्थ त्या त्या प्रमाणें, त्याचें उल्लंघन न करितां असा प्रायः होतो व तो शब्द क्रियाविशेषण होतो. अशा तऱ्हेचे कांहीं सामासिक शब्द पुढीलप्रमाणें. [सं.] ॰कथंचित्-अ. १ कसा तरी; कांहीं झालें तरी; चांगल्यावाईट किंवा योग्य अयोग्य मार्गानें. 'त्यानें दिवसभर खपून लिहिलें तर यथाकथंचित् दोनशें ग्रंथ लिहील. ' २ यथाकदांचित्; यदाकदाचित्, कदाचित् कदाचित्; जर शक्य झालेंच तर; शेंकडा एक शक्यतेनें; जगदीं पराकाष्ठेनें. 'एवढा उद्योग उभा राहणें दुर्घटच, पण यथाकथंचित् तो राहिलाच तरी त्यास सहाय्य मिळण्यासारखें नाहीं. ' -नि १११. ॰कथा-क्रिवि. १ योग्य रीतीनें; जसें पाहिजे त्याप्र- माणें; म्हटल्या-सांगितल्या बरहुकूम. २ (विरू.) फार झालें तर; कदाचित्; चुकून. ॰काम-क्रिवि. इच्छेप्रमाणें; मनाजोगें. ॰कामी-कामिनी-पुस्त्री. वि. आपल्या इच्छेनुरूप वागणारा-री; स्वेच्छाचारी; आपल्या मनाप्रमाणें करणारा-री. ॰काल-लीं- ळीं-क्रिवि. योग्यवेळीं; नियमित कालीं; हंगाम साधून. 'पेरणी यथाकालीं झाली म्हणजे पीक चांगलें येतें. '॰क्रम-क्रमें- क्रमानें-क्रिवि. १ क्रमानुसार; क्रमवार; क्रमानुरूप; अनुक्र- मानें; ठरलेला क्रम न सोडतां; ओळीनें. २ शिस्तींत; नियमानें, नियम किवा रीत यांना न सोडतां. ॰गम-क्रिवि. शास्त्रानुसार; यथाशास्त्र; शास्त्रोक्त; शास्त्रांत सांगितल्याप्रमाणें. 'ऐसें कर्म- भेदें मुदलें । फळसुखही त्रिधा जालें । तें हें यथागमें केलें । गोचर तुज ।' -ज्ञा १८.८१०. [यथा + आगम] ॰जात-वि. १ जन्म ल्याप्रमाणें; जसा जन्मला तसा. २ मूर्ख; खुळा; वेडपट इ॰ सूचित अर्थी. ३ स्वभावतः; निसर्गसिद्ध; स्वाभाविक. ॰तथा-अ. कसा तरी; कष्टानें; जेमतेम. 'संसार यथातथा चालला. '॰तथ्य- क्रिवि. जसें असेल तसें; खरें; खरेपणानें. ॰तृप्त-तृप्ति-क्रिवि. भरपूर; मनसोक्त; पाहिजे तितकें. ॰यथाशक्ति-क्त्या, यथानुशक्ति-क्त्या-क्रिवि. शक्तीप्रमाणें; सामर्थ्यानुरूप; एखा- द्याच्या कर्तृत्वाप्रमाणें. [यथा + अनु + शक्ति] ॰निगुती-क्रिवि. यथार्थत्वानें; यथार्थपणें; योग्य रीतीप्रमाणें; यथायोग्य; स्पष्ट. 'ऐक बापा परीक्षिती । तूं तंव सुखाची सुखमूर्ती । भीमकी पाणिग्रहणस्थिती । यथानिगुती सांगेन । ' -एरुस्व १.९. यथानु- क्रम-में, यथानुक्रमानें-क्रिवि. यथाक्रम पहा. ॰न्याय-क्रिवि. न्यायास नीतीस धरून; न्याय्य रीतीनें; योग्यपणें. ॰पद्धति- त-क्रिवि. रीतसर; पद्धतीप्रमाणें; वहिवाटीला अनुसरून. [सं.] ॰पूर्व-क्रिवि. पूर्वींप्रमाणें; पहिल्यासारखें, पूर्ववत्. 'कुपथ्य होतांच दुखणें पुन्हां यथापूर्व झालें. '[सं.] ॰प्रति-त-क्रिवि. मूळ प्रतोप्रमाणें. [सं.] ॰बुध्दि-मति-क्रिवि. आपल्या बुद्धी- प्रमाणें; आपल्या बुद्धीच्या कुवताप्रमाणें; आपल्या ज्ञानाप्रमाणें. यथाभिमत-क्रिवि. इच्छेप्रमाणें; कल्पनेप्रमाणें आपल्या योजनेस अनुसरून. [यथा + अभिमत] ॰मार्ग-क्रिवि. योग्य मार्गानें; नीतिनियमांस धरून; खऱ्या मार्गानें; योग्य प्रकारें. ॰यथा- क्रिवि. १ जसजसा; जसा जसा. तथातथा शब्दाबरोबर प्रयोग. 'यथायथा चंद्रादिक ग्रह येतात तथातथा जप करावा. ' २ कसेंतरी; सरासरी; जितक्यांस तितकें; बेताबाताचें; अल्प. ' त्याचें गणित- ज्ञान म्हणजे यथायथाच आहे.' ॰युक्त, योग्य-क्रिवि. जसें असावें तसें; योग्य तऱ्हेनें; बरोबर रीतीनें; रास्त. ॰रीति-रीत- क्रिवि. रीतीप्रमाणें; रूढीनुसार; प्रचाराप्रमाणें; वहिवाटीस अनु- सरून. [सं. यथा + रीति] ॰रुचि-क्रिवि. आवडीप्रमाणें; इच्छे- प्रमाणें; मनाप्रमाणें. 'दिधलें भोजन यथारुचि । ' -एरुस्व ३.२५. यथार्थ-क्रिवि. १ बरोबर; खरें; जसें घडलें त्याप्रमाणें; वास्त- विक योग्य रीतीनें. 'किंबहुना प्रियपणें । कोणतेंही झकवूं नयें । यथार्थ तरी खुपणें । नाहीं कवणा । ' -ज्ञा १६.१२०. २ अन्वर्थ; नावांप्रमाणें; शब्दाप्रमाणें. उदा॰ भूपाल, जलधि, आतपत्र. हे शब्द यथार्थ होत, कारण प्रत्येक शब्दावरून आपणास त्या शब्दवाचक वस्तूचें वर्णन किंवा माहिती कळते. [यथा + अर्थ] यथार्थबुध्दि-स्त्री. निःपक्षपाती बुद्धि; मनाची समता. -नि ५८३. यथार्ह-क्रिवि. योग्यतेप्रमाणें; शोभेसें. [यथा + अर्ह] ॰लाभ-क्रिवि. मिळकतीप्रमाणें; फायद्याप्रमाणें; उत्पन्नाप्रमाणें. यथावकाश, यथावकाशें-क्रिवि. सवडीप्रमाणें; फुरसतीनें. [यथा + अवकाश] यथावत-क्रिवि. यथायोग्य; जसें आहे तसें 'तसें समस्तही श्रुतिजात । ठाके लाजलें ऐसें निवांत । तें मीचि करी यथावत । प्रकटोनिया । ' -ज्ञा १५.४३५. [सं. यथावत्] यथा- वसर-क्रिवि. प्रसंगानुसार; वेळ सांपडेल त्याप्रमाणें. [यथा + अवसर] ॰विधि-क्रिवि. नियमानुसार; शास्त्रांतील विधींत सांगि- तल्याप्रमाणें; विधीचें उल्लंघन न करितां. ॰विभव-क्रिवि. ऐपती- प्रमाणें; सामर्थ्यानुरूप; मिळकतीला धरून. ॰विभागें-क्रिवि. विभागाप्रमाणें; वांटणीप्रमाणें; हिश्शाप्रमाणें. ॰वृत्त-क्रिवि. घड- ल्याप्रमाणें; जसें झालें तसें; खरेपणानें. ॰शक्ति-क्रिवि. आपल्या शक्तीप्रमाणें; ऐपतीनुसार; कर्तृत्वानुसार. यथांशतः-क्रिवि. वांटणी- प्रमाणें; योग्य प्रमाणानें; निरनिराळ्या हिश्शांप्रमानें; हिशोबानें. [यथा + अंशतः] ॰शास्त्र-क्रिवि. शास्त्रांत सांगितल्याप्रमाणें; शास्त्रमर्यादा न उल्लंघिता. ॰श्रुत-क्रिवि. १ ऐकल्याप्रमाणें; ऐक- लेल्या गोष्टीबरहुकूम. २ जसें शिकला त्याप्रमाणें; आपली बुद्धि न चालवितां फक्त गुरूनें पढविल्याप्रमाणें. ३ काव्याचा अर्थ लाव- तांना फक्त पदांचा अर्थ दिसतो त्याप्रमाणें; यौगिक अर्थानें; व्यंगार्थ लक्षांत न घेतां.' -मभाको ॰संख्य-क्रिवि. संख्येप्रमाणें; यथानु- क्रम; क्रमानें. [यथा + संख्या] ॰संप्रदाय-क्रिवि. संप्रदाया- नुरूप; सामान्य रीतीप्रमाणें; पद्धतीप्रमाणें. ॰संभव-क्रिवि. १ शक्यतेप्रमाणें; अंदाजाप्रमाणें. २ ऐपताप्रमाणें; साधनानुकूलतेप्रमाणें. ॰सांग-क्रिवि. पूर्णपणें; कांहीं न्यून न ठेवतां; कोणतेहि गोष्ट कमी न करतां; अंगोपांगासहित शास्त्रांत सांगितल्याप्रमाणें. 'येथा- सांग रे कर्म तेंही घडेना । घडे धर्म तों पुण्य गाठीं पडेना ।' -राम १००. [यथा + स + अंग] ॰सामर्थ्य-क्रिवि. शक्तीप्रमाणें; यथा शक्ति; कर्तबगारीला साजेसें; ऐपतीप्रमाणें. ॰सुख-क्रिवि. समा धानानें; शांततेनें. ॰सूत्र-क्रिवि. सूत्राप्रमाणें; तंतोतंत त्याप्रमाणें; अगदीं बरोबर तसें. ॰स्थानीं-क्रिवि. योग्य स्थळीं; योग्य ठिकाणीं; उचित जागेवर. [यथा + स्थान] ॰स्थित-क्रिवि. १ कालानुरूप; परिस्थितीप्रमाणें. २ भरपूर; यथेच्छ; रगड; पुरेपूर; पूर्णपणें; जितकें पाहिजें असेल तितकें. 'आज भोजन यथास्थित मिळालें. '३ जसें होतें तसें; यथायोग्य. 'पोथी नीट यथास्थित बांधून ठेव; नाहींतर भिजेल.' ४ पूर्वकुशलावस्था न पालटतां; पूर्वाप्रमाणें. 'आजपर्यंत इकडील वर्तमान यथास्थित जाणून स्वकीय कुशल लिहीत जावें.' ॰ज्ञान-ज्ञानें-क्रिवि. यथामति; ज्ञानाप्रमाणें; एखाद्याच्या समजुतीप्रमाणें. [सं. यथा + ज्ञान] यथेच्छ, यथेच्छा, यथेष्ट-क्रिवि. १ भरपूर विपुल; इच्छेला येईन तसें, तितकें; इच्छेप्रमाणें. 'यथेष्ट पुरतें जरी प्रथम दाम कां साधिती । ' -केका ८७. २ स्वैर; मन मानेल तसें; अनिर्बंधपणें; अनिर्बंध. [यथा + इच्छा; यथा + इष्ट] यथेष्टाचार-पु. मनसोक्त वर्तन; स्वैराचार; अनिर्बंधता; बेछुट वागणूक. [यथा + इष्ट + आचार] यथेष्टाचारी-वि. स्वैराचारी; मन मानेल तिकडे भटकणारा; वाटेल तसें वागणारा. यथेप्सित-क्रिवि. १ इच्छेप्रमाणें; इच्छिल्या- प्रमाणें. २ स्वैरपणें; स्वतंत्रपणें; आपल्या कल्पनेप्रमाणें; वाटेल तसें. [यथा + ईप्सित] यथोक्त, यथोदित-क्रिवि. म्हटल्याप्रमाणें; बोलल्याप्रमाणें; वर्णन केल्याप्रमाणें; दाखवून दिल्याप्रमाणें; आज्ञा केल्यप्रमाणें. [यथा + उक्त, उदित] यथोचित-क्रिवि. योग्य दिसेल तसें; लायकीप्रमाणें; अनुरूप. [यथा + उचित] यथोप- पन्न-क्रिवि. शक्तीप्रमाणें; ऐपतीप्रमाणें; प्राप्प्तीप्रमाणें. 'यथोपपन्न खर्च-दान-भोग-वर्तन-वैभव-खाणें-पिणें' इ॰ [यथा + उपपन्न]

दाते शब्दकोश

दुर्

अ. दुष्टपणा; वाईटपणा, कठिणपणा, दुःख इ॰कांच्या वाचक शब्दापूर्वीं योजावयाचा उपसर्ग. जसें:-दुराचार = वाईट वर्त- णूक; दुर्लभ = मिळण्यास कठिण; दुस्सह = सहन करण्यास कठिण इ॰. याचीं संधिनियमानुरूप दुर्, दुस्, दुष्, दुश् इ॰ रूपें होतात. जसें:- दुर्लभ दुष्कर, दुश्चल, दुस्सह, दुस्साध्य, दुराचार, दुरंत इ. हा उपसर्ग जोडून अनेक सामासिक शब्द बनतात. त्यांपैकीं कांहीं येथें दिले आहेत. दुरंत-वि. १ अपार; अनंत; अमर्याद; अंत लागण्यास कठिण असा (मोह, माया इ॰). २ अतिशय कठिण; तीव्र (दुःख इ॰). [दुर् + अंत = शेवट] दुरतिक्रम-वि. ओलांडून जाण्यास कठिण; दुस्तर; दुर्लंघ्य. २ असाध्य. [दुर् + अतिक्रम = ओलांडणें] दुरत्यय-यी-वि. १ नाश करून टाकण्यास कठिण. २ प्रतिबंध करण्यास, टाळण्यास कठिण; अपरिहार्य. ३ असाध्य (दुःख, आजार, रोग इ॰). अप्रतीकार्य (अडचण, संकट). ४ मन वळ- विण्यास कठिण असा (मनुष्य); दुराराध्य. [दुर् + अत्यय = पार पडणें, जाणें इ॰] दुरदृष्ट-न. दुर्दैव; वाईट अदृष्ट. 'कीं आड आलें दुरदृष्ट माझें ।' -सारुह १.१०. [दुर् + अदृष्ट] दुरधिगम्य- वि. १ समजण्यास कठिण; दुर्बोध; दुर्ज्ञेय. २ दुष्प्राप्य; मिळण्यास कठिण; दुर्गम. [दुर् + सं. अधि + गम् = मिळविणें] दुरभिमान-पु. पोकळ, वृथा, अवास्तव अभिमान; फाजील गर्व. [दुर् + अभिमान] दुरवबोध-वि. दुर्बोध; गूढ. [दुर् + सं. अव + बुध् = जाणणें] दुरा- कांक्षा-स्त्री. दुष्प्राप्य वस्तूचा अभिलाष. [दुर् + आकांक्षा = इच्छा, अभिलाष] दुराग्रह-पु. हट्ट, लोकविरोध, शास्त्रविरोध, संकटें इ॰ कांना न जुमानतां एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरविण्याचा हट्ट; अनिष्ट आग्रह. 'न सुखद दुराग्रह सखा हा सर्वाऽनर्थ गेह ठक राया ।' -मोकर्ण ४६.५०. [दुर् = वाईट + आग्रह = हट्ट] दुराग्रही-वि. दुरा- ग्रह धरण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा; हेकेखोर; हटवादी; हट्टी. [दुराग्रह] दुराचरण, दुराचार-नपु. निंद्य, वाईट, वागणूक; दुर्वर्तन; दुष्ट आचरण. [दुर् = दुष्ट + सं. आचरण = वर्तन] दुराचरणी, दुराचारी-वि. निंद्य, वाईट, दुष्ट वर्तनाचा; बदफैली. [दुराचार] दुरात्मत्व-न. १ दुष्ट अंतःकरण; मनाचा दुष्टपणा. २ दुष्ट कृत्य. 'किमपि दुरात्मत्व घडलें ।' [दुर् = दुष्ट + आत्मा = मन] दुरात्मा- वि. दुष्ट मनाचा (मनुष्य); खट; शठ. [दुर् + आत्मा] दुरा- धर्ष-वि. जिंकण्यास, वर्चस्वाखालीं आणण्यास कठिण. [दुर् + सं. आ + धृष् = जिंकणें] दुराप-वि. मिळविण्यास कठिण; दुर्लभ; अप्राप्य. 'राया, भीष्माला जें सुख, इतरां तें दुराप, गा, स्वापें ।' -मोभीष्म ६.२९. दुराप(पा)स्त-वि. घडून येण्यास कठिण; दुर्घट; असंभाव्य. 'वाळूचें तेल काढणें ही गोष्ट दुरापस्त आहे.' [दुर् + सं. अप + अस् = ] दुराराध्य-वि. संतुष्ट, प्रसन्न करण्यास कठिण, अशक्य; मन वळविण्यास कठिण. 'मोक्षु दुराराध्यु कीर होय । परि तोही आराधी तुझे पाय ।' -ज्ञा ११.९९. [दुर् + सं. आराध्य] दुराशा-स्त्री. निरर्थक, फोल, अवास्तव आशा, दुष्प्राप्य गोष्टीची आशा दुष्ट वासना. 'आम्हास अन्न खावयास मिळेना आणि पालखींत बसण्याची दुराशा धरावी हें चांगलें नव्हे.' 'दुराशागुणें जो नव्हे दैन्यवाणी ।' -राम १६८. [दर् + आशा] दुरासद-वि. कष्टानें प्राप्त होणारें; जिंकण्यास, मिळण्यास कठिण. [दुर् + सं. आ + सद = मिळ विणें] दुरित-न. पाप; पातक; संचितकर्म. 'पुन्हां न मन हे मळो दुरित आत्मबोधें जळो ।' -केका ११९. [दुर् + सं. इ = जाणें] दुरुक्त-न. वाईट, दुष्टपणाचें, अश्लील भाषण; शिवी; अपशब्द; दुर्भाषण; अश्लील बोलणें. [दुर् + उक्ति = बोलणें] दुरुत्तर-न. अप मानकारक, उर्मटपणाचें उत्तर; दुरुक्ति. [दर् + उत्तर] दुरुद्धर-वि. खंडण करण्यास, खोडून काढण्यास कठिण असा (पूर्वपक्ष, आक्षेप, आरोप). 'या सिद्धांतावर दोष दिला हा सर्वांस दुरुद्धर आहे.' [दुर् + सं. उद् + धृ = काढून टाकणें; वर, बाहेर काढणें] दुरूह-वि. दुर्बोध; गूढ; अतर्क्य. 'ईश्वरानें सृष्टि कशी उत्पन्न केली हें सर्वांस दुरूह आहे.' [दुर् + सं. ऊह् = अनुमानणें] दुर्गत-वि. गरीब; दिन; दरिद्री; लाचार. 'झांकी शरपटलानीं आढ्य जसा दुर्गतांसि वस्त्रांनीं ।' -मोभीष्म ९.६५. [दुर् + सं. गत = गेलेला] दुर्गति-स्त्री. १ दुर्दशा; वाईट स्थिति; संकटाची, लाजिरवाणी स्थिति; अडचण; लचांड. २ नरक; नरकांत पडणें. [दुर् + गति = स्थिति] दुर्गंध- गंधी-पुस्त्री. घाण; वाईट वास. -वि. घाण वास येणारें [दुर् = वाईट + सं. गंध = वास] ॰नाशक-वि. (रसा.) दुर्गंधाचा नाश करणारें; (इं.) डिओडरंट्. [दुर्गध + सं. नाशक = नाश करणारा] दुर्गंधिल-वि. (रासा.) आर्सेनिक व मेथिल यांच्या संयोगापासून बनलेला विषारी, दुर्गंधी (पदार्थ) (इं.) कॅको- डिल्. दुर्गम-वि. जाण्यास कठिण (स्थळ, प्रदेश इ॰). [दुर् + सं + गम् = जाणें] दुर्गुण-पु. वाईट गुण; दोष; अवगुण; दुर्मार्गाकडील कल. (क्रि॰ आचरणें). [दुर् + गुण] दुर्गुणी-वि. वाईट गुणांचा; अवगुणी; दुराचरी; दुर्वर्तनी. [दुर्गुण] दुर्घट-वि. धड- वून आणण्यास, घडून येण्यास, सिद्धीस नेण्यास कठिण. [दुर् + सं. घट् = घडणें, घडवून आणणें] दुर्घटना-स्त्री. अशुभ, अनिष्ट गोष्ट घडणें; आकस्मिक आलेलें संकट, वाईट परिस्थिति. [दुर् + सं. घटना = स्थिति] दुर्घाण-स्त्री. दुस्सह घाण; ओरढाण; उग्रष्टाण. [दुर् + घाण] दुर्जन-पु. वाईट, दुष्ट मनुष्य. [दुर् + जन = मनुष्य, लोक] दुर्जय-वि. १ जिंकण्यास कठिण. २ दुस्साध्य; दुस्तर. [दुर + सं. जि = जिंकणें] दुर्जर-वि. पचविण्यास, विरघळ- ण्यास कठिण. [दुर् + सं. जृ = जिरणें] दुर्दम-वि. दमन करण्यास, वर्चस्वाखालीं आणण्यास कठिण. 'तिला इंग्लंडांतील प्रबल व दुर्दम प्रजाजनांच्या अडथळ्याशिवाय दुसरें कोणतेंच नियमन नसे.' -पार्ल ६. [दुर् + दम्] दुर्दर्श-वि. दिसण्यास, पाहण्यास कठिण; अतिशय अस्पष्ट. [दुर् + सं. दृश् = पाहणें] दुर्दशा-स्त्री. अवनतीची, अडचणीची, संकटाची, वाईट, दुःखद स्थिति; दुर्गति; दुःस्थिति. 'भिजल्यामुळें शालजोडीची दुर्दशा जाली.' [दुर् + दशा = स्थिति दुर्दिन-न. १ वाईट दिवस. २ अकालीं अभ्रें आलेला दिवस. ३ वृष्टि. -शर. [दुर् + सं. दिन = दिवस] दुर्दैव-न. कमनशीब; दुर्भाग्य. 'कीं माझें दुर्दैव प्रभुच्या मार्गांत आडवें पडलें ।' -मोसंशयरत्नमाला (नवनीत पृ. ३४९). -वि. कम- नशिबी; अभागी. [दुर् + दैव = नशीब] दुर्दैवी-वि. अभागी; कम- नशिबी. [दुर्दैव] दुर्धर-पु. एक नरकविशेष. [सं.] दुर्धर- वि. १ धारण, ग्रहण करण्यास कठिण. २ दुस्साध्य; दुष्प्राप्य. ३ (काव्य) (व्यापक) बिकट; खडतर; असह्य; उग्र; कठिण. 'तप करीत दुर्धर । अंगीं चालला घर्मपूर ।' ४ भयंकर; घोर; भयानक. 'महादुर्धर कानन ।' [दुर् + सं. धृ = धरणें, धारण करणें] दुर्धर्ष- वि. दुराधर्ष; दमन करण्यास, वर्चस्वाखालीं आणण्यास कठिण; दुर्दम्य; अनिवार्य. [दुर् + धृष् = जिंकणें, वठणीवर आणणें] दुर्नाम- न. अपकीर्ति; दुष्कीर्ति; बदनामी. [दुर् + सं. नामन् = नांव] दुर्नि- मित्त-न. अन्याय्य, निराधार कारण, सबब, निमित्त. [दुर् + निमित्त = कारण] दुर्निर्वह-वि. १ दुःसह; असह्य; सहन करण्यास कठिण; निभावून जाण्यास, पार पडण्यास कठिण (अडचण, संकट). २ दुस्साध्य; दुष्कर; [दुर् + सं. निर् + वह्] दुर्निवार, दुर्निवा- रण-वि. १ निवारण, प्रतिबंध करण्यास कठिण; अपरिहार्य; अनि- वार्य. २ कबजांत आणण्यास कठिण; दुर्दम्य. [दुर् + नि + वृ] दुर्बल-ळ-वि. १ दुबला; अशक्त; असमर्थ. २ गरीब; दीन; दरिद्री. 'ऐसें असतां एके दिवशीं । दुर्बळ द्विज आला परियेसीं ।' -गुच ३८.७. [दुर् + बल = शक्ति] दुर्बळी-वि. (काव्य.) दुर्बळ पहा. दुर्बुद्ध-वि. १ दुष्ट बुद्धीचा; खुनशी वृत्तीचा. २ मूर्ख; मूढ; मंदमति; ठोंब्या. [दुर् + बुद्धि] दुर्बुद्धि-स्त्री. १ दुष्ट मनोवृत्ति; खुनशी स्वभाव; मनाचा दुष्टपणा. 'दुर्बुद्धि ते मना । कदा नुपजो नारायणा ।' -तुगा ७९८. २ मूर्खपणा; अनिष्ट परिणामकारक बुद्धि. -वि. दुष्ट मनाचा; दुर्बुद्ध पहा. [दुर् + बुद्धि] दुर्बोध-वि. समजण्यास कठिण (ग्रंथ, भाषण इ॰) [दुर् + बोध् = समजणें, ज्ञान] दुर्भग-वि. कमनशिबी; दुर्दैवी; भाग्यहीन. [दुर् + सं. भग = भाग्य] दुर्भर-वि. भरून पूर्ण करण्यास कठिण; तृप्त करण्यास कठिण (पोट, इच्छा, आकांक्षा). 'इंद्रियें वज्रघातें तपे उष्ण वरी ज्वाळ । सोसिलें काय करूं दुर्भर हे चांडाळ ।' -तुगा ३५४. -न. (ल.) पोट. 'तरा दुस्तरा त्या परासागरातें । सरा वीसरा त्या भरा दुर्भरातें ।' -राम ८०. [दुर् + सं. भृ = भरणें] दुर्भ्यक्ष्य-वि. खाण्यास कठिण, अयोग्य; अभ्यक्ष्य. [दुर् + सं. भक्ष्य = खाद्य] दुभोग्य-न. कमनशीब; दुर्दैव. -वि. दुर्दैवी; अभागी. [दुर् + सं. भाग्य = दैव] दुर्भावपु. १ दुष्ट भावना; कुभाव; द्वेषबुद्धि. २ (एखाद्याविषयींचा) संशय; वाईट ग्रह; (विरू.) दुष्टभाव. [दुर् + भाव = भावना, इच्छा] दुर्भाषण-न. वाईट, अपशब्दयुक्त, शिवीगाळीचें बोलणें; दुर्वचन पहा. [दुर् + भाषण = बोलणें] दुर्भिक्ष-न. १ दुष्काळ; महागाई. २ (दुष्काळ इ॰ कांत होणारी अन्नसामुग्री इ॰ कांची) टंचाई; कमीपणा; उणीव. [सं.] ॰रक्षित-वि. दासांतील एक प्रकार; आपलें दास्य करावें एतदर्थ दुष्काळांतून वांचविलेला (दास, गुलाम इ॰). -मिताक्षरा-व्यवहारमयूख दाय २८९. [दुर्भिक्ष + सं. रक्षित = रक्षण केलेला] दुर्भेद-वि. बुद्धीचा प्रवेश होण्यास कठिण; दुर्बोध. 'तैसें दुर्भेद जे अभिप्राय । कां गुरुगम्य हन ठाय ।' -ज्ञा ६.४५९. [दुर् + सं. भिद् = तोडणें] दुर्भेद्य-वि. फोडण्यास, तुकडे करण्यास कठिण (हिरा; तट). [दुर् + सं. भेद्य = फोडण्यासारखा] दुर्मति-स्त्री. १ दुर्बुद्धि; खाष्टपणा; कुटिलपणा. २ मूर्खपणा; खूळ; वेडेपणा. -पु. एका संवत्सराचें नांव. -वि. १ दुष्ट बुद्धीचा; खाष्ट स्वभावाचा. २ मूर्ख; खुळा; वेडा. [दुर् + मति = बुद्धि, मन] दुर्मद-पु. दुराग्रहीपणा; हेकेखोरी; गर्विष्ठपणाचा हटवादीपणा. 'किती सेवाल धन दुर्मदा' -अमृतपदें ५८. -वि. मदांध; मदोन्मत्त; गर्विष्ठ. 'सावियाचि उतत होते दायाद । आणि बळिये जगीं दुर्मद ।' -ज्ञा ११.४८०. [दुर् + मद = गर्व] दुर्मनस्क, दुर्मना-वि. खिन्न; उदास मनाचा; विमनस्क; दुःखित. [दुर् + सं. मनस् = मन] दुर्मरण-न (वाघानें खाऊन, पाण्यांत बुडून, सर्प डसून इ॰ प्रकारांनीं आलेला) अपमृत्यु; अपघातानें आलेलें मरण; अमोक्षदायक मरण. [दुर् + मरण] दुर्मि(र्मी)ल-ळ- वि. मिळण्यास कठिण; दुर्लभ. [दुर् + सं. मिल् = मिळणें] दुर्मुख- पु. एका संवत्सराचें नांव. -वि. १ घुम्या; कुरठा; तुसडा; आंबट तोंडाचा. २ तोंडाळ; शिवराळ जिभेचा. 'दुर्मुखी स्त्रीचा त्याग करून । संन्यास ग्रहण करावा ।' [दुर् + मुख] दुर्मुखणें- अक्रि. तोंड आंबट होणें; फुरंगुटणें; गाल फुगविणें; (एखाद्या कार्याविषयीं) उत्साहशून्यतेची चर्या धारण करणें. 'खायास म्हटलें म्हणजे हांसत येतात आणि उद्योगाचें नांव घेतलें म्हणजें लागलेच दुर्मुखतात.' [दुर्मुख] दुर्मुखला-वि. आंबट चेहर्‍याचा; घुम्या; कुरठा; तुसडा. [दुर्मुख] दुर्मेधा-वि. १ मंदबुद्धीचा. २ दुष्ट स्वभावाचा; दुर्मति. [दुर् + सं. मेधा = बुद्धि] दुर्योग-पु. सत्ता- वीस योगांतील अशुभ, अनिष्ट योगांपैकीं प्रत्येक. [दुर् + योग] दुर्लंघ्य-वि. १ ओलांडता येण्यास कठिण; दुस्तर (नदी इ॰). २ मोडता न येण्यासारखी, अनुल्लंघनीय (आज्ञा, हुकूम, शपथ इ॰) ३ निभावून जाण्यास कठिण (संकट, अडचण इ॰). ४ घालविण्यास, दवडण्यास, क्रमण्यास, नेण्यास कठिण (काळ, वेळ इ॰). [दुर् + सं. लंघ्य = ओलांडावयाजोगें] दुर्लभ-वि. मिळण्यास कठिण; अलभ्य; दुर्मिळ; दुष्यप्राप्य; विरळा. 'अलीकडे आपलें दर्शन दुर्लभ जालें. दुर्ललित-न. चेष्टा; खोडी. 'आमच्या विविध दुर्ललिताबद्दल गुरुजींनीं कसें शासन केलें...' -आश्रमहारिणी ७. [दुर् + सं. ललित = वर्तन, चेष्टा] दुर्लक्ष-न. लक्ष नसणें; हयगय; निष्काळजी- पणा; गफलत; अनवधान. -वि. १ लक्ष न देणारा; अनवधानी; गाफील; बेसावध, 'तुम्ही गोष्ट सांगीतली पण मीं दुर्लक्ष होतों म्हणून ऐकिली नाहीं.' २ दिसण्यास, समजण्यास कठिण; 'ईश्वराचें निर्गुण स्वरूप दुर्लक्ष आहे.' [दुर् + सं. लक्ष्य] दुर्लक्षण- न. १ (मनुष्य, जनावर इ॰ कांचें) अशुभसूचक लक्षण, चिन्ह; दुश्चिन्ह; दोष; वाईट संवय; खोड; दुर्गुण. 'हा घोडा लात मारतो एवढें यामध्यें दुर्लक्षण आहे.' [दुर् + लक्षण = चिन्ह] दुर्लक्षण-णी- वि. १ दुर्लक्षणानें, वैगुण्यानें युक्त (मनुष्य, घोडा इ॰). (विरू.) दुर्लक्षणी. २ दुर्गुणी; दुराचारी; दुर्वर्तनी. दुर्लक्ष्य-वि. १ बुद्धीनें, दृष्टीनें अज्ञेय; अगम्य. २ दुर्लक्ष इतर अर्थीं पहा. [दुर् + सं. लक्ष्य] दुर्लौकिक-पु. अपकीर्ती; दुष्कीर्ति; बेअब्रू; बदनामी; कुप्रसिद्धि. [दुर् + लौकिक = कीर्ति] दुर्वच, दुर्वचन, दुर्वाक्यन. १ वाईट बोलणें; दुर्भाषण; अशिष्टपणाचें, अश्लील, शिवीगाळीचें भाषण. २ अशुभ, अनिष्टसूचक भाषण. [सं. दुर् + वचस्, वचन, वाक्य = बोलणें] दुर्वह-वि. १ वाहण्यास, नेण्यास कठिण. २ सोसण्यास, सहन करण्यास कठिण. [दुर् + सं. वह् = वाहणें, नेणें] दुर्वाड- वि. अतिशय मोठें; कठिण. -शर. प्रतिकूल. [दुर् + वह्] दुर्वात- उलट दिशेचा वारा. 'तुज महामृत्युचिया सागरीं । आतां हे त्रैलोक्यजीविताची तरी । शोकदुर्वातलहरी । आंदोळत असे ।' -ज्ञा ११.३४८. [दुर् + सं. वात = वारा] दुर्वाद-पु. वाईट शब्द; दुर्वच; वाईट बोलणें; भाषण. 'हां गा राजसूययागाचिया सभासदीं । देखतां त्रिभुवनाची मांदी । कैसा शतधा दुर्वादी । निस्तेजिलासी ।' -ज्ञा ११.१०१. [दुर् + वाद = बोलणें] दुर्वारवि. दुर्निवार; अनिवार्य; टाळण्यास, प्रतिकार करण्यास कठिण; अपरिहार्य. २ आवरतां येण्यास कठिण; अनिवार; अनावर. [दुर् + वारणें] दुर्वास-पु. १ (व.) सासुरवास; कष्ट; त्रास; जाच. [दुर् + वास = राहणें] दुर्वासना-स्त्री. वाईट इच्छा; कुवासना; दुष्प्रवृत्ति. [दुर् + वासना] दुर्विदग्ध-वि. विद्येंत न मुरलेला तथापि विद्येचा गर्व वाहणारा; अर्ध्या हळकुंडानें; पिवळा झालेला. [दुर् + सं. विदग्ध = विद्वान्] दुर्विपाक-पु. वाईट परिणाम. [दुर् + सं. विपाक = परिणाम] दुर्विभावनीय-वि. समजण्यास, कल्पना करण्यास कठिण. [दुर् + सं. विभावनीय = कल्पना करतां येण्यासारखें] दुर्वृत्ति-स्त्री. दुराचारी; दुर्व्यसनी; दुर्वर्तनी. [दुर् + सं. वृत्त = वागणूक] दुर्वत्ति-स्त्री. दुराचरण; भ्रष्टाचार; बदफैली. [दुर् + सं. वृत्ति = वर्तन] दुर्व्यसन-न. दुराचरणाची संवय; द्यूत, मद्यपान, वेश्यागमन इ॰कांसारखें वाईट व्यसन. 'दुर्व्यसन दुस्तरचि बहु सूज्ञासहि फार कंप देतें हो' -वत्सलाहरण. [दुर् + व्यसन] दुर्व्यसन-नी-वि. वाईट व्यसन, संवय लागलेला; दुराचारी; बदफैली. (प्र.) दुर्व्यसनी. दुर्व्रात्य-वि. अतिशय दुष्ट; व्रात्य; खोडकर; खट्याळ; (मुलगा अथवा त्यांचें आचरण). [दुर् + व्रात्य = खोडकर, द्वाड] दुर्हृद, दुर्हृदय-वि. वाईट, दुष्ट मनाचा. [दुर् + सं. हृदु, हृदय = मन] दुर्ज्ञेय-वि. समजण्यास कठिण; गूढ; गहन. 'ही पद्धत कशी सुरू झाली असावी हें समजणें दुर्ज्ञेय आहे.' -इंमू ७६. [दुर् + सं. ज्ञेय = समजण्याजोगें] दुःशक- वि. करण्यास कठिण; अशक्यप्राय. [दुस् + सं. शक् = शकणें] दुःशकुन-पु. अपशकुन; अनिष्टसूचक चिन्ह. [दुस् + शकुन] दुश्शील, दुःशील-वि. वाईट शीलाचा; दुराचरणी. [दुस् + शील] दुश्चरित्र-न. पापाचरण; दुष्कृत्य. [दुस् + चरित्र] दुश्चल-वि. (अक्षरशः व ल.) पुढें जाण्यास, सरसावण्यास, चालण्यास कठिण. [दुस् + सं. चल् = चालणें] दुश्चि(श्ची)त-वि. १ (काव्य) अयोग्य, चुकीचा, अपराधी (माणूस, कृत्य). 'अंगुष्ठ धरुनि मस्तकपर्यंत । अखंड दुश्चित आचरलों ।' २ खिन्न; उदास; दुःखी. 'राजा प्रजा पिडी । क्षेत्री दुश्चितासी तोडी ।' -तुगा २९८४. [सं. दुश्चित अप.] दुश्चित्त-वि. १ खिन्न; दुर्मनस्क; दुःखित; उदास; उद्विग्न. 'अबदुल्याची खबर ऐकतां मनांत झाले दुश्चित ।' -ऐपो १३२. २ क्षुब्ध. 'परी कुंडलिनी नावेक दुश्चित्त होती । ते तयातें म्हणे परौती ।' -ज्ञा ६.२३८ [दुस् + चित्त = मन] दुश्चिंत- वि. (काव्य) खिन्न; दुःखी; उदास; दुश्चित्त अर्थ २ पहा. 'डोळे लावुनियां न होतों दुश्चिंत । तुझी परचीत भाव होती ।' [दुश्चित अप.] दुश्चिन्ह-न. अशुभ, वाईट लक्षण; अपशकुन. 'दुश्चिन्हें उद्भवलीं क्षितीं । दिवसा दिवाभीतें बोभाति ।' [दुस् + चिन्ह] दुश्शाप-पु. वाईट, उग्र, खडतर शाप. [दुस् + शाप] दुश्शासन-पुविना. दुर्योधनाचा भाऊ. -वि. व्यवस्था राख- ण्यास, अधिकार चालविण्यास कठिण. [दुस् + शासन = अधिकार चालविणें] दुष्कर-वि. १ करण्यास कठिण; बिकट; अवघड. 'म्हणोनि अभ्यासासि कांहीं । सर्वथा दुष्कर नाहीं ।' -ज्ञा १२.११३. २ दुष्परिणामकारक. -मोल. [दुस् + सं. कृ = करणें] दुष्कर्म-न. वाईट, पापी, दुष्टपणाचें कृत्य; कर्म. [दुस् + कर्म] दुष्कर्मा, दुष्कर्मी-पु. दुष्ट कृत्य करणारा; पापी; दुरात्मा. [दुस् + कर्मन्] दुष्काल-ळ-पु. अतिवृष्टि किंवा अनावृष्टि होऊन पिकें बुडून अन्नाची वाण पडते तो काळ; दुकाळ; महागाई. 'जैसा रोगिया ज्वराहूनि उठिला । कां भणगा दुष्काळु पाहला ।' -ज्ञा ११.४२८. [दुस् + काल] म्ह॰ दुष्काळांत तेरावा महिना = दुष्का- ळांत वर्षाचे बारा महिने काढतां काढतांच मुष्कील पडते. अशा वेळीं अधिक मास (तेरावा महिना) आला म्हणजे संकटातं भर पडते असा अर्थ. दुष्कीर्ति-स्त्री. अपकीर्ती; बदनामी; बेअब्रू. [दुस् = कीर्ति] दुष्कृत-ति-नस्त्री. १ पापकर्म; वाईट कृत्य. 'आणि आचरण पाहातां सुभटा । तो दुष्कृताचा कीर सेल वांटा ।' -ज्ञा ९.४१६. २ कृतींतील. वागणुकींतील दुष्टपणा. [दुस् + कृत- ति] दुष्प्रतिग्रह-पु. जो प्रतिग्रह (दानाचा स्वीकार) केला असतां, स्वीकारणारा अधोगतीस जातो तो; निंद्य प्रतिग्रह; अशुभप्रसंगीं केलेलें दान स्वीकारणें; वाईट कृत्याबाबत स्वीकारलेलें दान इ॰. उदा॰ वैतरणी, शय्या, लोखंड, तेल, म्हैस हे दुष्प्रतिग्रह होत. [दुस् + सं. प्रतिग्रह = दान स्वीकारणें] दुष्प्राप-प्य-वि. दुर्लभ; मिळण्यास कठिण; विरळा; दुर्मिळ. [दुस् + सं. प्र + आप् = मिळ- विणें] दुस्तर-वि. तरून जाण्यास, पार पडण्यास कठिण. 'समुद्रापेक्षां हा संसार मला दुस्तर वाटतो.' -न. (ल.) संकट. 'थोर वोढवलें दुस्तर । तुटलें सासुरें माहेर ।' -एरुस्व ८.५५. [दुस + सं तृ = तरणें] दुस्पर्श-वि. स्पर्श करण्यास कठिण, अयोग्य. [दुस् + सं. स्पृश् = स्पर्श करणें] दुस्संग-पु. दुष्टांची संगत; कुसंगति. [दुस् + संग] दुस्सह-वि. सहन करण्यास कठिण; असह्य. [दुस् + सं. सह् = सहन करणें] दुस्सही-वि. (प्र.) दुस्सह स्सह अप.] दुस्साध्य-वि. १ सिद्धीस नेण्यास, साधावयास कठिण. 'थोर वय झाल्यावर विद्या दुःसाध्य होते.' २ बरा करण्यास कठिण (रोग, रोगी). आटोक्यांत आणण्यास कठिण (शत्रु, अनिष्ट गोष्ट, संकट इ॰). [दुस् + सं. साध्य = साधण्यास सोपें] दुस्स्वप्न-न. १ अशुभसूचक स्वप्न. २ (मनांतील) कुतर्क, आशंका, विकल्प. [दुस् + स्वप्न] दुस्स्वभाव-पु. वाईट, दुष्ट स्वभाव. -वि. वाईट, दुष्ट स्वभावाचा. [दुस् + स्वभाव]

दाते शब्दकोश

महत्

वि. १ मोठा; बडा; विस्तृत. २ (ल.) थोर; वरच्या दर्जाचा; उत्कृष्ट; कोणत्याहि गुणांत श्रेष्ठ. जसें-महाबुद्धिमान्, महालबाड; महासोदा. महत् हा शब्द कर्मधारय आणि बहुव्रीहि समासांत महा असा होतो आणि तत्पुरुष समासांत तसाच राहतो. जसें-महादेव, महाबाहु व महत्पूजा; महत्सेवा. ३ अतिशय; फार; अत्यंत. जसें-महाप्रचंड; महातीक्ष्ण इ॰ [सं.] महतामहत्-वि. (व.) मोठ्यांतला मोठा; सर्वांत मोठा. महत्तत्व-न. सत्व, रज, तम या तीन गुणांची साम्यावस्था; मूळमाया; गुणसाम्य. 'सत्त्वगुणापासून महत्तत्व उत्पन्न झालें.' -टिले ४.३६१. महत्तमसाधारण भाजकपु. दिलेल्या सर्व संख्यांना पूर्ण भाग जाईल अशी सर्वांत मोठी संख्या. महदंतर-न. फार मोठें अंतर, तफावत; वेगळेपणा. महदहंबुद्धि-स्त्री. महत्तत्त्व; अहंकार- बुद्धि. 'एवं महदहंबुद्धि । मनें महाभूत समृद्धि ।' -माज्ञा १५.१०५. महदादिदेहांत-क्रिवि. महत्तत्त्वापासून स्थूलदेहापर्यंत. 'महदादि देहांतें । इयें आशेषेंही भूतें ।' -ज्ञा ९.६७. महद्ब्रह्म-न. मूळ ब्रह्म. 'तया महद्ब्रह्मातें व्याली । दैविकी इच्छा ।' -ज्ञा ११.५११. महद्भूत-वि. विलक्षण; असामान्य; चमत्कारिक. महद्वर्त्त-न. गोलाचें वर्तुळ; खगोलीय वृत्त. महती-स्त्री. मोठेपणा; महत्त्व. 'त्याचेनि माझी त्रैलोकीं ख्याती । मज महती त्याचेनी ।' -एभा १४.२६९. महतीवीणा-स्त्री. नारदाच्या वीणेचें नांव. महत्त्व-न. मोठेपणा; योग्यता; लौकिक; प्रतिष्ठा; किंमत. महती पहा. 'रायाजी पाटिल महत्त्व रक्षी ।' ऐपो ३२. उतरणें- योग्यता; प्रतिष्ठा; कमी होणें. ॰वाढविणेंफुशारकी, बढाई मारणें. ॰दर्शक-वि. पदार्थाचें माप, लांबी, रुंदी इ॰ दाखवि- णारें (परिमाण). ॰मापन-न. गणितशास्त्राचा एक विभाग; आकारमान मोजण्याची विद्या; मापनशास्त्र. महत्त्वकांक्षा- -स्त्री. मोठेपणाची इच्छा, हांव; जिगीषा. 'कर्तबगार लोकांच्या वेडाला महत्त्वाकांक्षा म्हणतात.' -विधिलिखित २१. महा-वि. १ महत् पहा. २ थोर; बडा. 'हे एक महा आहेत.' 'तो काय एक महा आहे.' ॰अर्बुद-न. एक हजार दशकोटि ही संख्या. ॰ऊर-पु. (अप.) महापूर; अतिशय मोठा पूर. ॰एकादशी- स्त्री. आषाढशुद्ध व कार्तिक शुद्ध एकादशी. ॰कंद-पु. १ मोठ्या जातीचा कंद. २ लसूण. ॰कल्प-पु. ब्रह्मदेवाच्या शंभर वर्षांचा काल; ब्रह्मदेवाचें आयुष्य; महाप्रलय; कल्प पहा. ॰काल-ळ- पु. १ प्रलय काळचा शंकराचा अवतार. 'महाकाळ उभा चिरीन बाणीं ।' २ बारा ज्योतिर्लिंगांपैकीं एक (उज्जनी येथील). ॰काली-स्त्री. १ पार्वती. २ प्रचंड तोफ; महाकाळी. -शर. ॰काव्य-न. वीररसप्रधान, मोठें, अभिजात, रामायण-महा- भारताप्रमाणें काव्य; (इं.) एपिक. 'आर्ष महाकाव्यांत कोण- कोणते गुण असावे याबद्दल पुढें विवेचन येईलच.' ॰काश-न. अवकाश; अफाट पोकळी. याच्या उलट घटाकाश, मठाकाश. [महा + आकाश] ॰कुल-कुलीन-वि. थोर, उच्च कुलांतील; कुलीन. ॰खळें-न. मोठें अंगण. ॰गाणी-नी-वि. गानकुशल. 'उत्तर देशींच्या महागणी । गुर्जरिणी अतिगौरा ।' -मुरुंशु १२२. ॰गिरी-पु. मोठा पर्वत; हिमालय. 'किं मक्षिकाचेनि थडकें । महागिरी पडों शकें ।' -एकनाथ-आनंदलहरी ४२. -स्त्री. १ तीनशें खंडीपर्यंत वजन नेणारें जहाज, गलबत; मालाचें तारूं; 'सबब त्यांजकडे दोन महागिऱ्या भरून गवत व एक महागिरी- भर लांकडे देविलीं असें,' -समारो ३.१६. २ मोठें तारूं; शिबाड; बतेला. ॰ग्रह-ग्राह-पु. मोठी सुसर; मोठा मगर. 'गज करवडी महाग्राह ।' -एरुस्व १०.८० -एभा २०.३५०. ॰जन- पु. १ काही गुण, विद्या इ॰ मुळें थोर, श्रेष्ठ माणूस. 'परंतु हृदयीं महाजन भयास मी मानितों ।' -भक्तमयूरकेका ७५. ३ व्यापारी; उदमी; सावकार. ३ गाव, कसबा इ॰ तील व्यापाराला नियम, शिस्त घालून देणारा, त्यावर देखरेख करणारा व कर वसूल करणारा सरकारी अधिकारी. ह्या अर्थीं महाजनी असाहि शब्द आहे. ४ पंच ॰जनकी-स्त्री. महाजनांचे काम, अधिकार. ॰डोळा-पु. एक मासा. -प्रणिमो ८१. ॰तल-न. सप्तपातालांपैकीं एक; नाग व असुर यांचें स्थान. ॰ताप-पु. (तंजा.) शोभेच्या दारूचा एक प्रकार; चंद्रज्योति. महताब पहा. ॰तेज-न. १ ब्रह्म २ सूर्य. 'हें अपार कैसेनि कवळावें । महातेज कवणें धवळावें.' -ज्ञा १.७४ महात्मा-पु. १ महानुभव पंथांतील व्यक्ति. ३ मोटा धैर्यवान, पराक्रमी मनुष्य. 'तैसें महात्मा वृक्षमुळीं । असावें खांड देउळीं ।' -भाए ४९३. गौतमबुद्ध, गांधी यांस संबोधितात. -वि. १ थोर मनाचा; उदार; महानुभाव. 'परते धर्म महात्मा, स्तविला बहु नारदादि साधूंनीं ।' -मोभीष्म १.९९. [महा + आत्मा] ॰दंदी- वि. महामत्सरी; कट्टर द्वेष्टा. 'छंदी फंदि महादंदि । रावण पडिला तुझ्या बंदि ।' -ज्ञानप्रदीप २६६. [सं. महाद्वंद्वी] ॰दशा-स्त्री. (ज्योतिष) कुंडलीतींल मुख्य ग्रहाची बाधा अंतर्दशा पहा. ॰दान- न. (मोठें दान) हत्ती इ॰ षोडशदानांपैकीं एक; षोडशमहादानें पहा. ॰देव-पु. १ शंकर; शिव. 'महादेव म्हणावया कारण । ब्रह्मयासि. जाण या हेतू ।' -एभा १३.२७९. २ (विणकाम) हातमागाच्या फणीचा मरचा अवयव, दांडा फळी. हा आणि तळाचा दांडा किंवा पार्वती मिळून फणीची चौकट होते या फणीच्या चौकटीस महादेवपार्वती किंवा हात्यादांडी असेंहि म्हणतात. ॰देवाचें देणें- न. कंटाळवाणें व दीर्घकाल टिकणारें काम. ॰देवापुढचा-वि. (शब्दशः) नंदी; (ल.) मूर्ख; निर्बुद्ध. ॰देवी-स्त्री. १ पार्वती; दुर्गा. २ एक प्रकारची वनस्पति. हिचें बीं महादेवाच्या पिंडीच्या आकाराप्रमाणें असतें. ॰देवी सहादेवी-स्त्री. (माण.) चैत्री पौर्णिमेस तिन्हीसांजचे वेळीं एखाद्या भिंतीवर जीं महादेवी सहादेवी म्हणून दोन गंधाचीं बाहुलीं काढून त्यांची पूजा कर- तात तीं. -मसाप ४.४.२५९. ॰दैव-(माण.) सर्व जातींचे लोक. ॰द्वार-न. (मंदिराचा किंवा राजवाड्याचा) बाहेरचा किंवा मुख्य दरवाजा. 'भक्त गर्जती महाद्वारीं । त्यांसी द्यावे दर्शन ।' -भूपाळी विठ्ठलाची पृ २२. ॰द्वीप-न. (मोठें बेट) खंड. 'तयाफळाचे हें महाद्वीप । पातली प्रभु ।' -ज्ञा १६.३२. ॰नदी-स्त्री. मोठी नदी; उगमापासून शंभर योजनांवर वाहात जाणारी नदी. ॰न मी-स्त्री. १ आश्विन शुद्ध नवमी; नवरात्राचा शेवटचा दिवस. २ रामनवमी. -शास्त्रीको ॰नवरात्र-न. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून विजयादशमीपर्यंतचा काल. ॰नस- पु. स्वयंपाकघर. ॰नक्षत्र-न. सूर्यनक्षत्र ॰नाड-पु. महाजना- सारखा एक वतनदार. 'महाजन व महानाड पेठ मजकूर याचें नांवें सनद कीं,' -थोमारो १.५४. [महा + नाड-डु] ॰निंब-पु. एक प्रकारचें झाड. ॰निद्रा-स्त्री. मरण; मृत्यु. 'तिसरें प्रमाण महा- निद्रा म्हणजे मृत्यु हें होय?' -टि ४.४८१. महानुभाव-पु. श्रीचक्रधरानें स्थापिलेला एक द्वैतवादी पंथ. या पंथात श्रीकृष्ण- भक्ति प्रमुख आहे. [महा + अनुभाव] -वि. १ ज्यानें कामक्रोधादि विकार जिंकले आहेत असा; महात्मा. २ उदार, थोर पुरुष. एवं पिंडारकीं ऋषि सर्व । शापानुग्रही महानुभाव ।' -एभा १.३३६. ३ प्रशस्त अनुभवाचा; ब्रह्मानुभवी. 'ऐसे जे महानुभाव । जे दैविये प्रकृतीचें दैव ।' -ज्ञा ९ १९४. ४ विद्या, बुद्धि, पराक्रम इ॰ गुणांनीं श्रेष्ठ मनुष्य; महाप्रतापी. ॰नेटका-वि. परिपूर्ण; पूर्णपणे; व्यवस्थित. 'यज्ञ मुनिचा राखे महानेटका ।' -मोरामायणें त्रिःसप्तमंत्रमय रामा- यण ३. ॰नैवेद्य-पुन. पंचपक्वान्नमय अन्नाचें ताट वाढून देवाला दाखवितात तो नैवेद्य (साखर, दूध इ॰चा छोटा नैवेद्य होतो). ॰न्यास-पु. पूजा करतांना शरीराच्या विवक्षित भागांना स्पर्श करून करावयास न्यास. याचाच दुसरा प्रकार लघुन्यास. ॰पड-पु. (महानु.) महापट; ध्वज. 'आहो जी देवा । पैलु देखिला महा- पडांचा मेळावा ।' -शिशु १०३३. [महापट] ॰प(पं)थ-पु. १ मृत्यु; मरण; मृत्यूची वाट. 'न देशील सत्यवंत । तरी करीन हाचि महापंथ ।' -वसा ६.८. २ निर्याणाचा मार्ग. 'लागले महापंथी तत्काळाची ।' -एभा ३१.२९८. ॰पद-न. ब्रह्मपद. 'कीं श्रुति हे महापदीं । पैठी जाहली ।' -ज्ञा १३.३७१. ॰पद्म-पु. १ एकं, दहं, शतं ह्या श्रेणींतील तेराव्या स्थानची संख्या (एकावर बारा शून्यें इतका आकडा) २ कुबेराच्या नवनिधींपैकीं एक निधि. नवविधी पहा. ॰पातक-न. ब्रह्महत्या, दारू पिणें, सुवर्णाची चोरी, गुरूच्या पत्नीबरोबर किंवा स्वतःच्या मातेबरोबर संभोग आणि यापैकीं एखादें पातक करणाराशीं मैत्री, अशा पांच मोठ्या पातकांपैकीं प्रत्येक. ॰पातकी-वि. १ ज्याच्या हातून महापातक घडलें आहे असा. २ अत्यंत पापी; दुराचारी. म्ह॰ अवसानघातकी महापातकी. ॰पाप-पी-महापातक-की पहा. ॰पीठ-न. विष्णूच्या चक्रानें झालेले शक्ती-पार्वतीच्या शरीराचे तुकडे ज्या ठिकाणीं पडले असें मानतात त्या अत्यंत पवित्र स्थानापैकीं प्रत्येक. अशीं स्थानें साडेतीन आहेत. तुळजापूर, मातापूर आणि कोल्हापूर, हीं तीन व अर्धे सप्तशृंग. औट पीठ पहा. ॰पुरुष-पु. १ ईश्वर. २ साधु- पुरुष; सत्पुरुष; ब्रह्मनिष्ठ मनुष्य. 'महापुरुषाचें चित्त । जालिया वस्तुगत ।' -ज्ञा १३. ७८९. ३ मेलेल्या ब्राह्मणाचें पिशाच्च. ॰पू(पु)जा-स्त्री. व्रतसमाप्ति इत्यादि विवक्षित प्रसंगास अनुसरून करतात ती मोठी पूजा. ॰पूर-पु. नदीस येणारा मोठा पूर, लोंढा. 'महापूरें झाडें जाती । तेथे लव्हाळे राहती ।' -तुगा १०४३. ॰प्रयास-पु. मोठे परिश्रम, कष्ट, प्रयत्न, खटाटोप. ॰प्रलयपु. १ प्रत्येक ४३२००००००० वर्षांनीं होणारा सर्व जगाचा नाश. २ ब्रह्मदेवाच्या शंभर वर्षांनीं होणारा सर्व (देव, ब्राह्मण, साधू, ब्रह्मा यासह) विश्वाचा नाश. 'जो ब्रह्याच्या स्थूळ देहाचें मरण । तो महाप्रलय जाण ।' महाकल्प पहा. ॰प्रयासपुअव. फार मोठे कष्ट, श्रम, प्रयत्न. ॰प्रसादपु. १ धार्मिक किंवा देवाच्या उत्सवा- नंतर वाटतात तो फुलें, मिठाई, जेवण इ॰ रूप प्रसाद. २ देव, गुरु इ॰पासून मिळालेली प्रसादाची वस्तु (कृपा, अनुग्रह म्हणून). ३ (शब्दशः व ल.) मोठी कृपा, अनुग्रह 'महाप्रसादाचेनि हरिखें । सप्रेम सुखें डुल्लती ।' ॰प्रस्थानन. (मोठा प्रवास) १ यथार्थ ब्रह्मज्ञानानंतर येणारा मृत्यु. २ (ल) मरण; मृत्यु ॰प्राणपु. १ मोठ्या जोरानें व प्रयासानें केलेला उच्चार: हकारयुक्त उच्चार २ जोरानें आणि प्रयासानें उच्चारण्याचा वर्ण. जसें-ख, घ, छ, झ, ठ, ढ, थ, ध, फ, भ, आणि ह अल्पप्राण आणि बाह्य प्रयत्न पहा. ॰फणी-पु. मोठा साप. ॰फल-ळ-न. मोठे, उत्कृष्ट फळ; नारळ. फणस इ॰ ॰बलि-ळी-पु. पिशाच्चादिकांस संतुष्ट कर- ण्यासाठीं मांस, अन्न इ॰ चा बलि, अर्पण करावयाचा पदार्थ ॰बळी-वि. अत्यंत प्रबळ, सामर्थ्यवान्. 'महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळें ।' -मारुतिस्तोत्र. ॰बळी बुटी-स्त्री. रुंदट पानाचें आलें. ॰भाग-वि. १ अतिशय भाग्यवान् 'नित्य निष्काम अतिप्रीतीं । मज भजती महाभाग ।' -एभा २४ ३३५. २ सद्गुणी; सद्वर्तनी. ॰भारत-न. व्यासप्रणीत कौरव-पांडवाच्या युद्धाचें भारतीयांचे पवित्र असें एक महाकाव्य; महापुराण ॰भूत-न. पृथ्वी, आप तेज, वायु आणि आकाश ह्या पंचमहाभूतांपैकीं प्रत्येक. 'तरी होसी गा तूं परब्रह्म । जें या महाभूता विसंवतें धाम ।' -ज्ञा १०. १४९. ॰भेड-वि. अत्यंत भितराः भेकड. 'मग विरा- टाचेनि महाभडें उत्तरें ।' -ज्ञा ११ ४६९. ॰मणि-पु. मौल्यवान् रत्न; हिरा, माणिक इ॰ 'कांचोटी आणि महामणी । मेरू मषक सम नव्हे ।' -ह १ ८४. ॰मति-मना-वि. थोर अंतःकरणाचा; उदार मनाचा; महात्मा. ॰मंत्र-पु. निरनिराळ्या देवतांचा मुख्य मंत्र. जसें-गायत्री हा ब्राह्मणाचा महामंत्र. 'महामंत्र आत्मप्रा- प्तीची खाणी ।' ॰मंत्री-पु. मुख्यप्रधान; मुख्य मंत्री सल्लागार. ॰महोपाध्याय-पु. मोठ्या शास्त्राला देतात ती एक सन्मानाची सरकारी पदवी. ॰म/?/त्र-पु. हत्ती हांकणारा; महात. 'मुरडावया मत्त हस्ती । महामात्र दोन्हीं हस्तीं । अंकुश हाणी तैसा श्रीपती । मर्मोद्धाटनें करितसे ।' -यथादी २.१६. ॰माया-स्त्री. १ पार्वती; दुर्गा. २ जगदुत्पादक शक्ति; सर्व संसाराला, प्रपंचाला कारणीभूत अशी देवता; आदिमाया; मूलप्रकृति ३ जहांबाज कजाग बायको. ॰मार-पु. मोठा मार, फटका. 'शुक्रबाणाचा महामारु ।' -मुवन ३.३८. ॰मारी-स्त्री. १ महामृत्यु. 'तेथ अचेतना झुंजारीं । न मरत्या महामारीं ।' -एभा २८.२५०. २ (ल.) प्राणसंकट. 'तिचेनि योगें महामारी पातली हे जाणिजे ।' -मुवन ७.१८७. ३ पटकी या सांथीचा रोग. ४ या रोगाची अधिष्ठात्री, दुर्गादेवी. ५ जिवापाड श्रम; शिकस्तीचा प्रयत्न. ६ हाणाहाणी; मारामारी; मोठें युद्ध. 'दोघे झुंजतां महा- मारी' -मुवन ३.३६. 'तैसी मांडिली महामारी ।' -कथा २.२.६०. ॰मृत्यू-पु. मरण; मृत्यू (अपमृत्युविषयीं बोलतांना उपयोग) जसें- 'अपमृत्यूचा महामृत्यु झाला.' ॰मृत्युंजय- (वैद्यक) एक औषध. ॰यंत्र-न. तोफ. ॰यज्ञ-याग-पु. मोठा यज्ञ; पंच महायज्ञांपैकीं प्रत्येक; पंचमहायज्ञ पहा. 'तरी महायाग- प्रमुखें । कर्मे निफज नाही अचुकें ।' -ज्ञा १८. १६६. ॰यात्रा- स्त्री. १ काशीयात्रा. २ (ल.) मरण; मृत्यु. 'आधीं पेशवाई सकट सगळ्यांना महायात्रेला धाडीन.' -अस्तंभा १६२. महा- प्रस्थान पहा. ॰रथ-रथी-पु. १ शस्त्रास्त्रांत प्रवीण असून दहा हजार धनुर्धारी योद्ध्यांबरोबर एकटाच लढणारा योद्धा. 'महारथी श्रेष्ठ । द्रुपद वीरु ।' -ज्ञा १.९८. २ (ल.) अत्यंत शूर, कर्तब- गार पुरुष किंवा मोठा वक्ता. ॰रस-न. १ ब्रह्म. २ पक्वान. -मनको. ॰राज-पु. १ सार्वभौम राजा; सम्राट. २ (आदरार्थी) श्रेष्ठ माणूस. ३ जैन, गुजराथी वैष्णव लोकांचा गुरु. ॰रात्रि- स्त्री. महाशिवरात्र माघ वद्य चतुर्दशी. ॰राष्ट्र-नपु. मराठे लोकाचा देश; उत्तरेस नर्मदानदी, दक्षिणेस कर्नाटक, पूर्वेस तैलंगण आणि पश्चिमेस समुद्र यांनीं मर्यादित असलेला प्रदेश; मुंबई इलाख्यां- तील एक विभीग. ॰राष्ट्र-राष्ट्रीय-वि. महाराष्ट्रदेशासंबंधाचे (लोक, भाषा, रिवाज इ॰). ॰राष्ट्र-भाषा-स्त्री. मराठी भाषा; संस्कृत-प्राकृत भाषेपासून झालेली एक देशी भाषा. ॰राष्ट्री- एक जुनी प्राकृत भाषा. ॰रुख-पु. एक प्रकारचे झाड; महावृक्ष. 'कर्वत लागला महारुखा । म्हणे पुढती न दिसे निका ।' -मुआदि ३३.२९. ॰रुद्र-पु. १ रुद्राभिषेकाचा एक प्रकार; अकरा लघुरुद्र; लघुरुद्राच्या उलट शब्द महारुद्र. २ मारुती. 'महारुद्र आज्ञेप्रमाणें निघाला ।' -राक १.१. ॰रुद्रो-पु. (गु.) बाजरीची मोठी जात हिचें काड फार उंच होतें -कृषि २७७. ॰रोग-पु. १ अत्यंत दुःखदायक असा रोग. याचे आठ प्रकार आहेत-वात- व्याधि, अश्मरी, कृछ्र, मेह, उदर, भगंदर. अर्श आणि संग्रहणी. कांहींच्या मतें हे नऊ आहेत; त्यांत राजयक्ष्मा हा एक जास्त असून कृछ्राऐवजीं कुष्ठ व संग्रहणीच्या ऐवजीं ग्रहणी अशीं नांवें आहेत. २ रक्तपिती; गलित कुष्ठ. महार्घ-वि. १ महाग; दुष्प्राप्य. 'महार्घ येथें परमार्थ जाला ।' -सारुह १.२१. २ मौल्यवान् [सं. महा + अर्घ] महार्णव-पु. मोठा समुद्र; महासागर. 'वनीं रणीं शत्रु-जलाग्निसंकटी । महार्णवीं पर्वत-वास दुर्घटीं ।' -वामन स्फुट श्लोक ३५. (नवनीत पृ. १३७.) -न. १ (ल.) मोंठें, दीर्घकाल चाललेलें भांडण; युद्ध; लढाई. 'दोघां मांडलें महार्णव । दाविती बळ प्रौढीगौरव ।' -निगा २४. २ प्रसिद्धि; डांगोरा; जघन्यत्व. ३ लहान काम, प्रकरण, गोष्ट इ॰ ला मोठें रूप देऊन सांगणें; राईचा पर्वत करणें. 'एवढ्याशा गोष्टीचें त्वां लागलेंच महार्णव केलेंस.' [सं. महा + अर्णव] ॰लय-पु. १ आश्रयस्थान; आश्रम; धर्मशाळा. २ देऊळ. ३ परमात्मा. ४ भाद्रपद वद्यपक्षां- तील पितरांप्रीत्यर्थ केलेलें श्राद्ध; पक्ष; मृतपितृकानें भाद्रपद शुद्ध पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत दररोज करावयाचें श्राद्ध. हें रोज करणें अशक्य असल्यास १५ दिवसांतून एका उक्त दिवशीं करावें. [महा + आलय] ॰लक्ष्मी-स्त्री. १ विष्णुपत्नी २ अश्विन शुद्ध अष्टमीस पूजावयाची एक देवता, त्या देवतेचे व्रत. ३ भग- वती; कोल्हापूरची देवी. ४ (ना.) ज्येष्ठागौरी; भाद्रपद शुद्ध नव- मीस पूजा करावयाच्या देवता. ॰लिंग-न. बारा ज्योतिर्लिंगांपैकीं प्रत्येक. ॰वटी, माहावटी-स्त्री. राजमार्ग. 'हे कपटाची कस(व)टी । अनृत्याची माहावटी ।' -भाए ७५५. ॰वस्त्र-न. उंची, सुंदर वस्त्र; प्रतिष्ठित वस्त्र; शालजोडी इ॰ ॰वाक्य-न. वेदांतील जीवब्रह्माचें ऐक्य दाखविणारें तत्त्वमसि आदि वाक्य हीं चार वेदांची चार आहेत. 'तो महावाक्याचेनि नांवें । गुरुकृपे- चेनि थांवें ।' -ज्ञा १८.४०४. २ गायत्री मंत्र. ॰वात-पु. (तासीं ८० मैल वेगाचा) सोसाट्याचा वारा; झंझावत; तुफान. 'महावात सूटला म्हणुनि का कंप येत भूघरा ।' -सौभद्र. ॰विषुव-न. मेष संपात; हरिपद. ॰वृत्त-न. ज्या वृत्ताची पातळी गोलाच्या मध्य बिंदूतून जाते तें वृत्त; मोठें वर्तुळ. ॰वोजा-वि. मोठ्या थाटांची; तेजस्वी. 'संतोषोनी महाराजा । सभा रचित महवोजा ।' -गुच ३४. ९७. [महा + ओजस्] ॰व्याधि-पु. महारोग; रक्तपिती. ॰शब्द- पु. बोंब; शंखध्वनि. ॰शय-पु. १ थोर पुरुष; महात्मा, २ मोठ्या माणसांस महाराज रावसाहेब याप्रमाणे संबोधावयाचा शब्द. [सं. महा + आशय; बं. मॉशे; फ्रें मुस्ये (माँसिय)] ॰शिवरात्र-त्रि-स्त्री. माघ वद्य चतुर्दशी. ॰शून्य-न. जें कांहींच नाहीं असें जें शून्यास अधिष्ठानरूप ब्रह्म तें; परब्रह्म. 'आतां महा- शून्याचिया डोहीं । जेथ गगनासीचि ठावो नाहीं ।' -ज्ञा ६. ३१५. ॰महाष्टमी-स्त्री. अश्विन शुद्ध अष्टमी. ॰सरणी-स्त्री. स्वर्गमार्ग. ' होउनि सुयोधनाचा शोकार्त वरो पिता महास- रणी ।' -मोभीष्म ११.१५. ॰सागर-पु. पृथीवरील पाण्याचा सागराहून मोठा सांठा; मोठासमुद्र. उदा॰ हिंदी महासागर. ॰सिद्धांत-पु. एकमेवाद्वितीयं ब्रह्म हा मुख्य सिद्धांत. 'आणि महासिद्धांतापासीं । श्रुति हारपती शब्देंसीं ।' -ज्ञा १५.४३४. ॰सिद्धि-स्त्री. अष्टमहासिद्धी पहा. 'जेथ महासिद्धींचीं भांडारें । अमृताचीं कोठारें ।' -ज्ञा ६.३२१. ॰सुख-न. ब्रह्मसुख; ब्रह्म साक्षात्कार. 'जेथ परमानंदु केवळु । महासुखाचा ।' -ज्ञा १.१४. ॰स्म(श्म)शान-न. काशीक्षेत्र. 'सदाशिव बैसता निजासनीं । महाश्मशानीं निजवस्ती ।' -एभा २.३१. ॰क्षेत्र-न. काशी- क्षेत्र. -रा ३.४७६. ॰महेंद्र-पु. १ हिंदुस्थानांतील पर्वताच्या सात रांगांपैकीं एक. २ इंद्राचें नांव. 'हें महेंद्रपदही पाविजेल । परि मोह हा न फिटेल ।' -ज्ञा २.६५. [महा + इंद्र] महेश, महेश्वर-पु. शिव; शंकर. [महा + ईश्वर] महेश्वरी पातळ-न. महेश्वर नांवाच्या गांवी (इंदूर संस्थान) तयार झालेलें वस्त्र, पातळ. 'आधींच कंबर बारिक त्यावर महेश्वरी पातळ कसलें ।' -होला ८९. महोत्सव, महोत्साह-पु. मोठा उत्सव; आनंद- दायक प्रसंग. [महा + उत्सव] महोदधि-पु. १ महासागर; मोठा समुद्र. ' महोदधीं कां भिनले । स्त्रोत जैसे ।' -ज्ञा १५.३१७. २ हिंदीमहासागर [महा + उदधि] महोदय-पु. माघ किंवा पौष महिन्यांत सोमवारी सूर्योदयीं अमावस्यारंभ श्रवण नक्ष- त्राचा मध्य आणि व्यतिपाताचा शेवट यांचा योग; एक मोठें पर्व. [महा + उदय] महौजा-वि. तेजस्वी; ज्याचें तेज मोठें आहे असा; सामर्थ्यवान् 'पुरुष श्याम महौजा ओढित होता बळेंचि मजला जो ।' -मोवन १३.८८. [महा + ओज] महान्-वि. १ मोठा; विस्तृत; थोर. २ उशीरा पिकणारें (धान्य, पीक); गरवें ३ दोन किंवा अनेक वर्षें टिकणारें (झाड, मिरची, कापूस, पांढरी तूर इ॰).

दाते शब्दकोश

कच्चा

वि. १ न पिकलेला; हिरवा; कोंवळा (फळ, गळूं, पान इ॰). २ साफसूफ न केलेला; ओबडधोबड (दगड, चित्र, इ॰). ३ अशिजा (भात, भाकरी, रसायन इ॰). ४ अपुरा व पक्का न केलेला; सरासरीचा; ठोकळ (जमाखर्च, काम, इ॰). ५ अपूर्ण; अपक्व; अप्रौढ (कट, मसलत इ॰). ६ अपुरें समजलेलें किंवा मिळविलेलें (शास्त्र, कला). ७ अपुर्‍या ज्ञानाचा; अर्धवट शिक्ष- णाचा (माणूस). 'तो अभ्यासांत कच्चा आहे.' ८ बिन वाकब- गार; अडाणी; संस्कारहीन; यथातथा ज्ञान असलेला. ९ कोता; अप्रौढ; संकुचित (विचार, बुद्धि). १० गौण; लहान; कमी (वजन, माप; इ॰). ११ न टिकणारा; लवकर नाहींसा होणारा (रंग इ॰). १२ सविस्तर; सर्व पोटभेद ज्यामध्यें घेतले आहेत असा (हिशेब). १३ बळकट नाहीं असा (बांधकाम इ॰). 'मातींत घर बांधूं नये, मातीचें काम अगदीं कच्चें असतें.' १४ इयत्तेहून, वाजवी- पेक्षां कमी. 'आम्हीं एका तासांत एक कच्चा कोस चालतों.' १५ कढवून फार घट्ट न केलेला (साखरेचा पाक इ॰). १६ (गणित) त्रैराशिकांतील दुसरें व तिसरें या दोन पदांचा गुणाकार करून येणार्‍या रकमेस कच्चे म्हणतात. नंतर त्यांस प्रथमपदानें भागून आलेल्या भागाकारास पक्के किंवा पक्का म्हणतात (ज्याच्या- मध्यें भारी परिमाणाच्या किंमतीवरून हलक्या परिमाणाची किंमत काढावयाची असते अशा हिशेबांत उपयोग), उ॰ १० शेरांस पांच रुपये, तर १।। पावशेरास किती. येथें ५ व १।। ह्यांचा गुणाकार जो ७ ।। कच्चे. १७ कामामध्यें तोटानफा होईल तो मूळ धन्याचा अशा बोलीनें केलेली (नोकरी, मामलत, इ॰); पगारी (मक्ता न देतां नोकराकडून प्रत्यक्षपणें सारा वगैरे वसूल करण्याच्या पद्धतीला हा शब्द लावितात). कच्चा हा शब्द अपुरा, ओबड- धोबड, अप्रौढ, उणा ह्या अर्थानें शब्दशः व लाक्षणिकरीत्या अनेक प्रकारें योजतात. उ॰ कच्चा मजकूर-लिहिणें-वर्तमान-बातमी-हकिगत-कैफियत-वरवरचें, पक्कें नव्हे तें, कसें तरी तयार केलेलें; अंदाजी. कच्चा ताळा-ताळेबंद-कीर्द-जमाबंदी-बाब-हिशेब-बेरीज' इ॰, = अपुरा; बंद न केलेला, अपूर्ण. [ध्व. कच; हिं. कच्चा; तु॰ सं. कथ्थ = खोटें] ॰अमदानी- स्त्री. एकंदर जमा (खर्च वजा न करितां). ॰अंमल-पु. १ पगार घेऊन केलेली सरकारी (जिल्ह्याची, तालुक्याची) नोकरी, काम; याच्या उलट मक्त्याचा अंमल. कच्चा मोकद्दमा पहा. २ कच्चा अर्थ १७ पहा. ॰असामी-पु. हंगामी, उपरी शेतकरी-मालक; ज्याचा कबजा कायमचा नाहीं असा इसम. ॰आकार-पु. ठोकळ हिशेब, अंदाज; साधारण आढावा. ॰कागद-पु. खळ न लावलेला कागद. ॰करवड-पु. माशाचा एक प्रकार, याचा रस्सा करतात. -गृशि २.४७. ॰खर्च-पु. १ कच्चा हिशेब, टांचण. २ तात्पुरता, कायम नव्हे असा खर्च. 'कच्चे खर्चाचे तमाशे असतील त्यांच्या नाइकानें वेळीं आपले लोकास १० दिवस रजा द्यावी.' -(बडोदें,) कलावंत खातें २०. ३ जुजबी; ठोकळ खर्चाखेरीज खर्च; जो प्रसंगीं होईल तो सामान्य खर्च. ॰खर्डा-पु. १ अंदाज- पत्रक; बजेट (हिशेबाचें); पक्का करण्यापूर्वीचा पहिला खर्डा. २ कुळकर्ण्यानें शेतकर्‍यांकडून आलेल्या रक्कमांचा ठेवलेला हिशेब. ॰खाना-पु. पोळ्या, डाळभात, खिचडी इ॰ जिन्नस. -मसाप १.१०. ॰डांक, डाग-पु. शिसें, जस्त किंवा कथील यानीं दिलेला डांक (चांदीचा नव्हे); तात्पुरता जोड; कस्तर करणें. ॰ताप, ज्वर- पु. साधा ताप; विकोपाला न गेलेला ताप. ॰तोळा-पु. (क.) ९२ गुंजांचा तोळा (पक्का तोळा ९६ गुंजांचा असतो). ॰दोरा- धागा-पु. पटकन् तुटणारा दोरा; पीळ न घातलेला दोरा. ॰पक्का-वि. अंदाजी, ठोकळ आणि त्यावरून केलेला पक्का हे दोन्ही ज्यांत आहेत असा (जमाखर्च, वही, खतावणी इ॰). ॰पाडा- ढा-पु. ठोकळ, तोंडीं, त्रोटक, ठाकठीक न केलेली, कच्ची हकिगत, वर्तमान, साधन (क्रि॰ वाचणें). ॰बटवडा-पु. इसमवार पगारवाटणी (सरकारी नोकर किंवा मजूर यांना); डोईपगार. ॰भरणा-पु. रयतेनें भरलेला सारा, वसूल (ऐन किंवा नक्त). ॰मामला, मामलत-पु. कच्चा अंमल पहा. ॰माल-पु. ओबडधोबड; न कमावलेला; मूळच्या स्वरुपांतील; ज्याचा जिन्नस बनविला नाहीं अशी वस्तु (कापूस, कातडें, बी, वनस्पती इ॰). 'विलायती कारखान्यांत हिंदुस्थानांतून जो कच्चा माल जातो तो बंद झाला.' -के ३१.५.३०. ॰मोकद्दमा-पु. कामामध्यें नफातोटा होईल तो धन्याच्या वाट्याला अशा बोलीनें केलेलें काम, गुमास्तेगिरी; कच्चा अंमल. मक्त्याच्या उलट. ॰रंग-पु. १ धुतला असतां जाणारा, न टिकाऊ रंग; रंग पक्का करण्यासाठीं उकळावा लागतो, तो उकळला नसला म्हणजे त्यास कच्चा रंग म्हणतात. २ तिफाशी सोंगट्यांत काळा अथवा हिरवा रंग. ॰वसूल-पु. रयतेकडून आलेला सारा, खंड (ज्याची वर्गवारी काढली नाहीं असा). ॰शेर-पु. प्रमाणभूत (पक्क्या) शेरापेक्षां कमी असणारा शेर. (क.) १५ रुपये भारांचा शेर. (उलट पक्का ८० भारांचा). ॰कच्ची-स्त्री. (तिफाशी सोंगट्यांत) १ मेलेली पण पुन्हां नुकतीच जिवंत केलेली, नुकतीच बसविलेली सोंगटी; पट फिरून न आलेली सोंगटी. २ हिरवी किंवा काळी सोंगटी. तिफाशीं सोंगट्यांत तांबडा व पिंवळा यांस पक्का व हिरवा व काळा यांस कच्चा रंग अशा संज्ञा आहेत. ३ (ल.) फजिती; मानहानि; अपकीर्ति. ॰असामी-स्त्री. दिवाळें वाजलेला किंवा अपुरीं साधनें असलेला, नालायक सावकार, कंत्राटदार, कूळ, अर्जदार, खंडकरी इ॰. ॰कमाविशी-कमावीस-स्त्री. तैनात घेऊन केलेलें सारावसुलीचें काम; नफातोटा धन्याचा अशा बोलीनें मामलत वगैरे करावयाचा प्रकार; कच्चा अंमल (ह्याच्या उलट मक्त्याची कमाविशी). ॰कुंदी-स्त्री. कपडा भट्टींत न घालतां नुसता धुवून केलेली थंडी इस्त्री. २ धुतलेल्या कपड्यास खळ न लावतां केलेली इस्त्री. [कच्ची + कुंदी = खळ लावणें, इस्त्री करणें] ॰कैद- स्त्री. चौकशीपूर्वीची किंवा अपराध शाबीत होण्यापूर्वीची कैद. २ नजरकैद; साधी कैद. ॰कोंबी करणें-(क.) एखाद्याचें भजन करणें. ॰खोर-पु. सदोदित ज्याची फजिती किंवा पच्ची होते असा माणूस; फजीतखोर. ॰जमाबंदी-स्त्री. एकूण आलेली गांवची जमा (खर्च वेगळा काढून तो वजा न घालतां). ॰जप्ती-स्त्री. (कायदा) दाव्याचा निकाल लागण्यापूर्वी केलेली जप्ती; अवलजप्ती पहा. ॰बाजू-स्त्री. (सोंगट्यांचा खेळ) तिफाशी डावांत काळ्या व हिरव्या सोंगट्या. ॰बुटी-ट्टी-स्त्री. सोनेरी किंवा रुपेरी रंगानें कापडावर काढितात ती बूट, फुलें, खडी. -वि. अशा कापडाचें (पागोटें; अंगा- रखा इ॰); खडीदार. ॰माती-स्त्री. कोरडी, चिक्कणपणा नसणारी माती. ॰मामलत-कच्चा अंमल पहा. ॰मिती-स्त्री. मारवाडी, सावकार हे कर्जाऊ दिलेल्या रकमेची तारीख आदल्या दिव- शींची घालतात ती. याच्या उलट पक्की मिती (कुळाकडून आलेल्या रकमेची तारीख मात्र दुसर्‍या दिवशींची घालतात). ॰मुदत-स्त्री. (सावकारी) हुंडी हातांत पडल्यानंतर अमुक दिवसांतच ती वटविली पाहिजे अशा प्रकारची दिलेली मुदत; ह्याच्या उलट बंदीमुदत ( = हुंडींत दिलेल्या तारखेनंतरची जास्त मुदत). २ हुंडीची ठराविक मुदत भरण्यापूर्वीचा काल; अद्याप संपावयाचा मुदतीचा काल. ॰लढाई-स्त्री. पुरा निकाल न होतां झालेलें युद्ध; दोन्ही पक्षांनीं मध्येंच सोडून दिलेली लढाई; अनिर्णीत लढाई. ॰वहिवाट-स्त्री. कची वहिवाट पहा. ॰शाई-स्त्री. लाख न मिसळलेली, पाण्यानें निघून जाण्यासारखी शाई. ॰सुपारी-स्त्री. न शिजविलेली सुपारी; पोफळ; रोठा. ॰हुंडी-स्त्री. अद्याप न पटलेली किंवा न स्वीकार- लेली हुंडी. ॰कच्चें-वि. न पिकलेलें, व इतर अर्थी कच्चा पहा. ॰अंडें-न. नवीन घातलेलें अंडें; ताजें अंडें. ॰अक्षर-न. खराब व बिन कित्त्याचें अक्षर; वळण नसलेलें अक्षर. ॰इरसाल-न. जिल्ह्यांतून सरकारी खजिन्यांत पाठविलेला शेतसार्‍याचा भरणा. ॰कातडें-न. न कमावलेलें किंवा रंगविलेलें कातडें. ॰खोर-कच्ची- खोर पहा. ॰खातें-न. (हिशेब) ज्या खात्याचें येणें-देणें पुढील सालास उतरावें लागत नाहीं असें खातें; तात्पुरतें खातें. ॰गिरी- स्त्री. कच्चेपणा; अपूर्णता; अपक्वता. 'तुम्ही आधीं कच्चेगिरी केली म्हणून फसला.' ॰चीट-छीट-न. जें धुतलें असतां त्यावरील रंग नाहींसा होतो असें चीट. ॰दूध-१ न तापविलेलें, निरसें दूध. २ नवीन व्यालेल्या जनावराचें पहिल्या बारा दिवसांतील दूध; कोवळें दूध. ॰नाणें-न. चलनी नाण्यांत आलेला सरकारी वसूल (यांत निरनिराळीं नाणीं सरभेसळ आलीं असतात). ॰पान-न. पान- वेलीचें, विड्याचे हिरवें पान (याच्या उलट पक्कें, पिकलेलें पान). ॰पोतें-न. सरकारी चावडींत भरलेला शेतसारा; सरकारी खजि- न्यांत ज्या स्थितींत येतो त्या स्थितींतील वसुली पैसा. ॰बच्चें- न. (अव. कच्चींबच्चीं) मूलबाळ; पोरबाळ; लहान मूल. 'येक म्हणे गा पळोन जावें । तरि कच्चे बच्चे काय करावे ।' -दावि २३२. 'तो चार कच्च्याबच्च्यांचा धनी आहे.' [हिं. कचबच] ॰बारा-पु. (तिफाशी सोंगट्यांत) फांशांवरील एक दान; (एकावर पांच, एकावर सहा व एकावर एक अशा) बारा ठिपक्यांचे दान. ॰मडकें-१ न भाजलेलें मडकें. २ (ल.) अज्ञानी माणूस (मडकें = डोकें, बुद्धि). हें अजून कच्चें मडकें आहे.' -नाम ४. ॰रंग-पु. (तिफाशी सोंगट्यांत) हिरवा व काळा रंग. कच्ची बाजू पहा. ॰रेशीम-न. पाण्यांत न उकळलेलें रेशीम. ॰लोणी-न. कोर्‍या दुधापासून घुसळून काढलेलें लोणी ([दह्याचें नव्हे]) ॰वजन-न. (क.) (सोन्याचें) ९२ गुंजांचा तोळा. कच्चा तोळा पहा.

दाते शब्दकोश

नव

वि. नऊ. नऊ संख्या. 'हे नवरत्नमाळा गोमटी । जो घाली सद्गुरुच्या कंठीं ।' -एभा १०.२३८. [सं. नव; गुज. नव; झें. नवन्; ग्री. एन्नेअ; लॅ. नोव्हेम्; गॉ. निउन; अँसॅ. निगन्, प्राज. निउन; अज. नेउन; प्राप्र. नेविन्त्स; स्लॅ. देवन्ति; लिथु-देव्यन्ति; हिब्र्यू; नओइ; कँब्रि-नव्] ॰कुलपांचें तारूं- न. लढाऊ गलबत. 'विलायत जंजिरा नवकुलपांचें तारूं ।' -विवि ८.३. ५४. ॰तुकड्यांची चोळी-स्त्री. नऊ तुकडे जोडून केलेली चोळी; इच्या उलट अखंड चोळी, तीन तुकड्यांची चोळी. म्ह॰ नवव्या दिवशीं नवी विद्या. सामाशब्द- ॰कोट (टी)नारायण-पु. १ कोट्याधीश; अतिशय श्रीमंत मनुष्य. 'पण हे विचारांचे नवकोटनारायण आचाराच्या बाबतींत मात्र सुदाम्यापेक्षां दरिद्री आसतात.' -प्रेम २१. २ (विपरीत लक्ष- णेनें) अतिशय दरिद्री; कंगाल मनुष्य. -शास्त्रीको. [नव + कोट नारायण] ॰कोटी कात्यायनी(येणी)-चामुंडा-स्त्रीअव. नऊ कोट देवी, कात्यायनी, चामुंडा. 'नवकोटी कात्यायेणीचा विचार । पिंडीं कोठें ।' -दा ९.५. ३१. 'पहावया श्रीकृष्णाचें लग्न । सकळ दैवतें निघालीं सांवरोन । नवकोटी चामुंडा संपूर्ण । चालती वेगें तेधवां ।' -ह २४.१०५. [नव + कोटी + कात्यायनी, चामुंडा] ॰कोण-पु. (भूमिति) नऊ कोपरे असलेली व नऊ बाजूंनीं मर्या- दित आकृति. -वि. नऊ कोन असलेली. [नव + सं. कोण] ॰खंड- खंडें-नअव. १ पृथ्वीच्या नऊ खंडांचा समुदाय. इलावृत्त, भद्राश्व, हरिवर्ष, किंपुरुष, केतुमाल, रम्यक, भरत, हिरण्मय व उत्तरकुरू हीं नवखंडें होत. दुसरेहि पाठभेद आहेत. (अ) भरत, वर्त्त?, राम?, द्रामाळा (द्रमिल, द्रामिल?), केतुमाल, हिरे (हीरक?), विधि- वस?, महि आणि सुवर्ण. (आ) इंद्र, कशेरु, ताम्र, गभस्ति, नाग, वारुण, सौम्य, ब्रह्म, भरत हे नऊ भाग. -हंको. 'नवखंडें सप्तद्वीपें । छपन्नदेशींच्या रायांचीं स्वरूपें ।' -ह २८.६४. [नव + सं. खंड = तुकडा, पृथ्वीचा भाग] ॰खंड पृथ्वी-स्त्री. जींत नऊ खंडें आहेत अशी पृथ्वी. 'नवखंड पृथ्वी व दहावें खंड काशी.' 'नवखंड पृथ्वीचें दान.' ॰खणी-वि. नऊ खणांची. 'दुखणी काय नवखणी माडी नलगे धरा नखेंदु खणी ।' -मोकृष्ण ८३.१३. 'लावण्याची सकळ संपदा सहज उभी नवखणी ।' -पला ४.३४. [नव + खण] ॰गजी-पुस्त्री. १ (नऊ गजी) नऊ गज लांबीचा सोपा. राजदरबारचा भव्य दिवाणखाना; कचेरी; सदर. 'राजा नवगजींत बैसला ।' -ऐपो १७.२ तंबू; डेरा. 'बाडें सुंदर खाबगे नवगज्या सिद्धाच होत्या घरीं ।' -सारुह ३.४५. 'तमाम येऊनु नऊ गजी आसपास येऊनु उतरीले' -इमं ७. नवगोजी पहा. [नव + गज = एक परिमाण] ॰गुणपुअव. बुद्धि, सुख, दुःख, प्रयत्न, इच्छा द्वेष, संस्कार, पुण्य व पाप असे न्यायशास्त्रांत सांगितलेले नऊ गुण. 'बुद्धि सुख दुःख प्रयत्न । इच्छा द्वेष संस्कारण । पुण्य पाप नवगुण । बोलिजेती ।' -विउ ३.४. -वि. नऊपट. ॰गुण-वि. नऊ दोर्‍यांचें (यज्ञोपवीत इ॰). नऊ फेर्‍यांचें. 'नवगुण तव कंठी ब्रह्मसूत्र प्रभा जे ।' -मुरा बालकांड ११३. [नव + सं. गुण = दोरा] ॰गोजी-पु. डेरा. शामियाना. 'उतर तर्फेसी नवगोजी देऊनु उतरिले.' -इमं ७. ॰ग्रह-पुअव. १ सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहू, व केतु हे नऊ ग्रह. २ (उप. निंदार्थी) जूट; टोळकें; टोळी; कंपू. ३ -न. मंगलकार्यारंभीं करतात ती नऊ ग्रहांची पूजा; ग्रहमख. 'दोन्हीं घरीं नवग्रहें झालीं । देवदेवकें पूजिलीं । -कालिका १६.४१. [नव + ग्रह] ॰चंडी-स्त्री. १ देवीची आराधना (विशेषतः तिच्या स्तोत्राचें, सप्तशतीचें नऊ वेळां पठण करून केलेली). 'जर मला पुत्र- प्राप्ति झाली तर देवीची नवचंडी करीन.' -रत्न १.३. २ नवरात्र; नवरात्र पहा. [नव + सं. चंडी = देवी] ॰छिद्रें-नअव. नवद्वारें पहा. ॰जणी-स्त्रीअव. १ नऊ स्त्रिया. २ (ल.) नवविधाभक्ति. 'अत्यंत शहाण्या सुवासिनी । आणिक आल्या नवजणी । कृष्णाची खुतखावणी । त्या जाणोनी वर्तती ।' -एरुस्व १६.४३ ॰ज्वर- पु. दूषित तापाचा एक अतिशय तीव्र प्रकार; हा ताप नऊ दिवसांच्या मुदतीचा व प्रायः घातुक असतो. [नव + सं. ज्वर = ताप] ॰टकें- न. शेराच्या अष्टमांशाचें, (कैली) अर्ध्या पावशेराचें माप. [नऊ + टांक] ॰टांक-न. अदपावाचें वजन. नवटकें पहा. [नव + टांक; गुज. नवटांक; गो नवटांग] ॰द्वारें-नअव. दोन डोळे, दोन कान, दोन नाकपुड्या, तोंड, गुदद्वार व मूत्रद्वार अशीं मानवी शरीराचीं नऊ द्वारें, छिद्रें. 'नवद्वारें देहीं । तो असतुचि परि नाहीं ।' -ज्ञा ५.७५. ॰नाग-पुअव. १ पुराणांतरीं वर्णिलेले अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक व कालीय ह्या नांवांचे नऊ नाग, सर्प. २ नऊ हत्ती. [नव + सं. नाग = सर्प, हत्ती] ॰नाग- सहस्त्रबळी-वि. नऊ हजार हत्तींचें बळ असलेला. [नव + सं. नाग = हत्ती + बळी = बलवान] ॰नागसहस्त्रशक्ती-स्त्री. नऊ हजार हत्तींचें बळ. 'अंगीं जियेस नवनागषस्त्रशक्ति ।' -आपू ३९ [नव + सं. नाग = हत्ती + सं. सहस्त्र = हजार + सं. शक्ति = बळ] ॰नागोर्‍या-पु. (ना.) चेंडूलगोर्‍यांचा खेळ. ॰नाथ-पुअव. मच्छिंद्र, गोरक्ष, जालिंदर, कानीफा, चरपटी, नागेश, भरत, रेवण व गीहिनी हे नवनारायणाचे अवतार मानतात. प्रकाश, विमर्श, आनंद, ज्ञान, सत्यानंद, पूर्णानंद, स्वभावानंद, प्रतिभावानंद, व सुभगानंद असहि पाठभेद आहे. -नव १.३९. ते ४३. -ज्ञाको (न) ३७ ॰नारायण-कवि, हरि, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पला- यन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस, व करभाजन. -नव १.२९ ते ३०. ॰नारीकुंजर-पु. नऊ स्त्रियांनीं आपल्या शरीरन्स निरनिराळ्या प्रकारें पीळ व मुरड देऊन (कृष्णाच्या पुयोगसाठीं) बनवि- लेली हत्तीची आकृती. [नव + सं. नारी = स्त्री + सं. कुंजर = हत्ती] ॰निधि-धी-पुअव. कुबेराचे नऊ खजिने. त्याचीं नावें:-महा- पद्म, पद्म, शंख, मकर, कच्छप, मुकुंद, कुंद, नील, आणि खर्व. 'मोल तुमचिया या श्रीचरणरजाचे न होय निधिनवही ।' -मोमंभा १.११२. [नव + सं. निधी = खजिना, सांठा] ॰महाद्वारे-नअव. नवद्वारें पहा. ॰महारोग-पुअव. राजयक्ष्मा, कुष्ट, रक्तपिती, उन्माद, श्वास, मधुमेह, भगंदर, उदर व मुतखडा हे नऊ दुर्धर व भयंकर रोग. [नव + सं. महायोग = मोठा, भयंकर रोग] ॰रंगी-वि. नऊ रंगांनी युक्त (पदार्थ.) ॰रत्नराजमृगांक-पु. (वैद्यक) एक औषधीं रसायन. [नव + रत्न + राजन् + मृग = हरिण + अंक = चिन्ह] ॰रत्नें-नअव. हिरा, माणिक, मोतीं, गोमेद, इंद्रनील, पाच, प्रवाळ, पुष्कराज, वैडूर्य किंवा तोर्लल्ली हिं नऊ प्रकारचीं रत्नें 'नवरत्नांची आंगठी.' ॰रत्नांचा हार-पु. स्त्रियांचा गळ्यांत घालण्याचा एक बहुमोल हार. ॰रस-पुअव. (साहित्य) साहित्य- शास्त्रांत वर्णिलेले शृंगार, विर, करूण, अद्भुत, हास्य, भया- नक, बीभत्स, रौद्र आणि शांत या नांवांचें नऊ रस. जी दैविकीं उदार वाचा । जैं उद्देशु दे नाभिकाराचा । तैं नवरससुधाब्धीचा । थावो लाभे ।' -ज्ञा १०.७. ज्ञाता जो सरसावला, नवरसां-माझिरि शृंगारसा ।' -रा ५ [नव + सं. रस] ॰रसिका-वि. चलाख; त्र- तरीत; आवेशयुक्त; नऊ रसांनीं भरलेलें, पूर्ण (गान, कवन, कथा, वर्णन, ग्रंथ, श्लोक, गवई, कवि, वक्ता इ॰). [नवरस] ॰रात्र-न. १ (सामा.) नऊ अहोरात्रांचा समुदाय. २ (विशेशार्थाणें) चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंतचा काल (रामाचें नवरात्र); तसेंच अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंतचा नऊ दिवसांचा काल. (देवीचें नव- रात्र) यास प्रतिपदेपासून चंपाषष्ठीपर्यंत सहा दिवस खंडोबाचें नवरात्र असतें. ३ वरील कालांत करतात तो देवाचा, देवीचा उत्सव, पूजा. [नव + सं. रात्रि = रात्र] ॰लख-वि. (काव्य) नऊ लक्ष. 'आकाशांत नवलख तारे आहेत.' [नव + लक्ष = शंभर हजार] ॰लक्षणें-नअव. आचार, विनय, विद्या, प्रतिष्ठा, तीर्थदर्शन, निष्ठा वेदपठन, तपस्या व दान हिं ब्रह्मणाचीं नऊ लक्षणें. -शर. ॰लाखा-ख्या-वि. ज्याच्याजवळ नऊ लक्ष रुपये आहेत असा; लक्षाधीश; अतिशय श्रीमंत. 'अपुल्या पुम्ही घरचें नवलाखे मिजाजी ।' -प्रला १७५ [नव + लाख = शंभर हजार] ॰विध- वि. नऊ प्रकारचें. [वन + सं. विधा = प्रकार, भेद] ॰विधभजन- न. नवविधा भक्ति पहा. 'नवविधभजन घडो । तुझिये स्वरूपें प्रीति जडो ।' ॰विध रत्नें-नअव. नवरत्ने पाह. ॰विधा भक्ति-स्त्री. श्रवण = ईश्वराचें गुणवर्णन, चरित्रें इ॰ ऐकणें; कीर्तन = ईश्वराचें चरित्र वर्णन करणें, वाचणें; स्मरण = ईश्वराचे गुण, चरित्र इ॰ आठवणें; पादसेवन = ईश्वराचे पाय धुणें, चेपणें इ॰ सेवा; अर्चन = पूजा करणें; वंदन = नमस्कार करणें; दास्य = चाकरी करणें; सख्य = ईश्वराशीं सलगी करणें; आत्मनिवेदन = ममत्व सोडून ईश्वरास सर्वस्व, स्वतःला अर्पण करणें. या नऊ प्रकारानीं करावयाची ईश्वराची भक्ति, सेवा. 'श्रवण कीर्तन स्मरण । पाद- सेवन अर्चन वंदन । दास्य सख्य आत्मनिवेदन । हे भक्ति नव- विधा पै ।' -विपू ५.२३. -दा १.१. ३. [सं. नवविधा = नऊ प्रकारची + भक्ति = सेवा] ॰सर-वि. नऊ सरांचा (हार इ॰). नव + सर] ॰सुती-स्त्री. जानवें करण्यासाठीं नऊ पदरी वळून केलेला दोरा. [नव + सुत = दोरा] ॰नवांकित-वि. पुठ्ठ्यावर नवाच्या आंकड्यानें चिन्हित (घोडा). [नव + सं. अंकित = चिन्हानें युक्त] नवास्त्र-वि. नवकोण पहा. [नव + सं. अस्त्र = कोण, कोपरा]

दाते शब्दकोश

पांच

वि. १ अनुक्रमानें चार या संख्येच्या नंतर येणारी संख्या; ५. २ चार या शब्दाप्रमाणेंच थोडकीशी संख्या निर्दिष्ट करतांना योजितात. पंच; निवाडा करणारे. 'बहिणी म्हणे पांचामध्यें घेई आण । मग मी जाईन कळे तेथें ।' -ब ४९४. 'त्याजपाशीं पांच रुपये आहेत.' 'पांच करतील तें आपण करावें.' [सं. पंचन्; प्रा. पंच; हि. पाँच; सिं. पंजो; फ्रेंजि. पंच] पांच तेथें परमेश्वर, पांचामुखी परमेश्वर-पांच शिष्ट लोक म्हणतील तें खरें; एखाद्या गोष्टीची पांच संभावित माणसांनीं शहानिशा करून दिलेला अभिप्राय ईश्वराच्या अभिप्राया- इतकाच ग्राह्य असतो. 'पांचां मुखिं परमेश्वर म्हणुनी तया देउनि माना ।' -टिक १४४. पांचाची पांचबुद्धि किंवा पांचाचे पांच प्रकार-निरनिराळ्या माणसांचीं निरनिराळीं मतें असतात, एकमत होत नाहीं. या अर्थीं. पांचावर धारण बसणें-पूर्वीं लष्करांत रुपयास पांचशेर धान्य झालें म्हणजे अत्यंत दुष्काळाची स्थिति होई व ती फार भयंकर महागाई वाटे यावरून लक्षणेनें- पंचप्राण निघून जातात कीं काय अशी अवस्था होणें; गर्भगळित होणें; अत्यंत विस्मित व भयभीत होणें. पांचांतून उठणें- माणसांतून उठणें; समाजाशीं बेपर्वाईनें वागणें; समाजबाह्य होणें, वर्तन करणें. म्ह॰ माझें घ्या आणि पांचांच न्या. सामाशब्द- ॰अवस्था-स्त्रीअव. जीवानें भोगावयाच्या पांच अवस्था जागृति, स्वप्न, निद्रा, तुर्या व गतावृत्ती अशा पांच अवस्था. 'जागृति स्वप्न आणि निद्रा । गतावृत्ती तुर्या पुत्रा । या पांच अवस्था विचित्रा । असती देहीं ।' -कथा ५.७.२३. ॰कुल-न. (कर.) पांच वस्तूंचा चिंचोके इ॰कांचा समुदाय. 'पांचकुलाचें आठकुल कर.' ॰खाणी-स्त्रीअव. सृष्टीच्या, सृष्ट पदार्थांच्या उत्पत्तीचे पांच प्रकार:-(अ) मानसिक, (आ) जरायुज, (इ) अंडज, (ई) स्वेदज, (उ) उद्भिज. -हंको. [पांच + खाण = उत्पत्तिस्थान] ॰चार नऊ-(तिफांशी सोंगट्यांच्या खेळांत) तीन फाशांवर अनु- क्रमें पांच, दोन व दोन असें पडणारें तिफांशी सोंगट्यांतील दान. ॰जिन्नस-पुअव. (न्यायशास्त्र) न्यायांतील बत्तीस पदार्थांचे खालीलप्रमाणें पांच जिन्नस कल्पिले आहेत:-(अ) पांच भूतें व पांच खाणी मिळून दहा. (आ) पांच कर्मेंद्रियें व पांच प्राण एकूण दहा. (इ) पांच ज्ञानेंद्रियें, मन व बुद्धि मिळून सात. (ई) मूळ माया, विद्या व अविद्या मिळून तीन. (उ) जीव आणि ईश्वर हे दोन. -हंको. ॰तीन आठ-(तिफांशी सोंगट्यांचा खेळ) तीन फांशांवर अनुक्रमें पांच, दोन व एक असें पडणारें दान. ॰दोन सात- (तिफाशी सोंगट्यांचा खेळ) तीन फांशांवर अनुक्रमें पांच, एक व एक मिळून झालेलें दान. ॰धारी, पंचधारी निवडुंग-पुन. पांच कडा, कोरा, धारा असलेली निवडुंगाची एक जात. ॰पंचकें- नअव. (वेदांतशास्त्र) पंचवीस तत्त्वें. यांचे पुढील ओवींत सांगितल्या- प्रमाणें पांचापांचांचे गट आहेत- 'अंतकर्ण प्राणपंचक । ज्ञानेंद्रियें कर्मेंद्रियें पंचक । पांचवें विषयपंचक । ऐसीं हे पांच पंचकें ।' -दा १७.८.१५. [पांच + पंचक = पाचांचा समुदाय, गट] ॰परतणें- न. लग्नानंतर वर वधूला घेऊन घरीं आला कीं तो पांच दिवस आपल्या घरीं राहून वधूसुद्धां परत तिच्या माहेरीं जातो तो प्रकार. -बदलापूर १२०, १५०. [पांच + परतणें] ॰परतावण- स्त्री. (गो.) मांडवपरतणी. ॰पर्यावण-न. (कु.) लग्न लागल्यावर वधू पतिगृहीं गेल्यावर पुनः चार, पांच मंडळीसह वधूवर वधूच्या पितृगृहीं येतात तो विधि, पांच परतणें पहा. ॰पाखांड-नअव. (प्र.) पंचपाखंड, पंचपाखंड पहा. ॰पाखांडी-वि. पंचपाखांडी पहा. ॰पाट-पुअव. एखाद्याची धिंड काढतांना त्याला विद्रूप करण्या- करितां वस्तऱ्यानें त्याच्या डोक्यावरील केसांचे पांच पट्टे काढीत ते. [पांच + पाट = पट्टा] ॰पांडव-पुअव. धर्म, भीम, अर्जुन, नकुळ व सहदेव हे पंडुराजाचे पांच पुत्र. [पांच + पांडव = पंडुचा मुलगा] ॰पाली-पाली भाजी-स्त्री. (राजा.) उडीद, चवळी माठ, पोकळा. इ॰कांचे चार, पांच प्रकारचे पाले एकत्र करून त्यांची केलेली भाजी. ॰पावली-स्त्री. (व.) मंगलकार्यांत तळहात व पाय याना हळद व कुंकू यांचे पट्टे ओढण्याचा विधि. 'वर मायला पांचपावली करा.' ॰पावली-स्त्री. लांब अंतरा- वर असलेल्या देवतेस केलेला नवस कांहीं अडचणीमुळें फेडण्याचा राहिल्यास, लांबणीवर पडल्यास, त्या देवतेच्या स्थानाच्या दिशेनें कांही पावलें चालून जाऊन कांहीं वेळानें घरी परत येण्याचा एक प्रकार, विधि. [पांच + पावलें] ॰पावली-स्त्री. सापाची एक जात. ही हातभरापेक्षां कमी लांब असून बोटभर जाड असते. हिला चार पाय असतात. ही चावली असतां माणसास पांच पावलेंहि चालून जाऊं देत नाहीं म्हणून हीस हें नांव. सापसरडी असेंहि हिचें दुसरें नांव आहे. -बदलापूर ३४८. [पांच + पावलें] ॰पिसें- न. १ वेड; भ्रम; भ्रांति. 'मज तुवां केलें जी तैसें । माझें मीपण धाडूनि देशें । स्तुतिमिषें पांचपिसें । बांधलें वाचे ।' -माज्ञा १८. १८. २ वर्णन. -मनको, -हंको. [पांच = अधिक + पिसें] ॰पोषाख- पु. पोषाखांतील पांच वस्त्रें इ॰. 'शिवाजीमहाराज पांच पोषाख नटला ।' -ऐपो ३२. [पांच + पोषाख] ॰प्रमाणें-नअव. शब्द, आप्तवाक्य, उपमान, अनुमान व प्रत्यक्ष अशीं पांच प्रमाणें. ॰पालव-पुअव. १ पंचप्राण. 'ऐसें अपार तुझें केलें । एकी वाचा काय मी बोलें । परि पांचही पालव मोकलिले । मजप्रती ।' -ज्ञा ११.६३. २ अंतःकरणपंचक:-मन, बुद्धि, चित्त, अहंकार व अंतःकरण. -माज्ञा. (कठीण शब्दांचा कोश). [पाच + पालव] ॰बोटें-नअव. अंगुष्ठ (आंगठा), तर्जनी (अंगठ्याजवळचें बोट) मध्यमा (मधलें बोट), अनामिका (करंगळीजवळचें बोट) व करांगुळी (करंगुळी) हीं हाताचीं पांच बोटें. म्ह॰ पांची बोटें सारखीं नसतात = सर्व मनुष्यें सारख्या स्वभावाचीं नसतात. मूर्ति तितक्या प्रकृती याअर्थीं. ॰भौतिक-वि. पांच महाभूतांनीं बनलेलें (शरीर). 'मग पांचभौतिक संचलें । जेव्हां शरीर असें निदेलें ।' -ज्ञा ५.५३. [पांच + सं. भौतिक = भूतासंबंधीं] ॰वट-वटें-नपु. १ पांचांचा गट, समुदाय. 'ऐसीं पांचवटें जवळिके । करूनि वाहावीति अभिलाषें ।' -ऋ ५५ 'यावरी आदी । पांचवटेयाची बांधी । बांधली प्रभेदीं । पंचभूतिकीं ।' -ज्ञा १३.४६. ॰वटा-पु. पांच वाटा जेथें एकत्र होतात तो प्रदेश, ठिकाण. -शर. [पांच + वाटा] ॰वनी-न्ही-पुअव. पांच प्रकारचे अग्नि-प्रलयानल, विद्युदनल, वडवानल, शिवनेत्रानल व द्वादशादित्यानल 'तैसें पसरलेनि प्रकाशें । सैंघ पांचवनिया ज्वाळांचे वळसे । पडतां ब्रह्मकटाह कोळिसे । होत आहाती ।' -ज्ञा ११.३०५. 'ना ते पांचवने जाळु वेठिले । प्रलयपावकाचें ।' -शिशु ९३५. [पांच + वन्हि = अग्नि] -वि. (महानु.) पांच वर्णांचा; पांच प्रकारचा. 'जें विरहाग्नीचें पाचवनें चीर । नेसों देत असा ।' -भाए १२१. ॰वेउली-ळी-स्त्री. पांच नांग्या असलेली इंगळी. 'हे उघड पांचवेउली । पंचधा आगी लागली ।' -ज्ञा १३.१०६९. [पांच + वेऊळी; विंगळी?] ॰शेरी-स्त्री. १ पांचशेर प्रमाणाचें वजन. २ (ल.) उपजीविका; चरितार्थ. [पांच + शेर] पांचामुखांचा-वि. पांच तोंडें असलेला (महादेव, शंकर). 'चहूं मुखांचा वर्णितां भागला । पांचांमुखांचा तटस्थ राहिला ।' -ह ३.७. पाचोत्रा- पंचुत्रा-पंचुत्री-पुस्त्री. १ पांच वस्तूंचा समुदाय (फळें, पेंढ्या वगैरे). २ (कर.) (कडब्याच्या पेढ्या, विड्या इ॰कांच्या व्यवहारांत) विकतांना शंभरांमागें मोफत द्यावयाचा पाच नगांचा समुदाय. 'पाचोत्र्यासह चार हजार विडी पाठवा.' 'एक हजारा- वरचे दहा पाचोत्रे टाक.' [पांच]

दाते शब्दकोश

पांच pāñca a (पंच S) Five. 2 Used like the word चार for a moderate quantity or number. Ex. त्यापासीं पांच रुपये आहेत; पांच करतील तें आपण करावें; Pr. माझें घ्या आणि पांचांत न्या. पांच तेथें परमेश्वर Vox populi vox Dei. पांचाची पांच बुद्धि or पांचाचे पांच प्रकार Quot homines tot sententiæ: also suus cuique mos. पांचांतून उठणें To become outcast or isolated from society. पांचावर धारण बसणें To be frightened to death (i. e. out of one's five vital airs).

मोल्सवर्थ शब्दकोश

पांच a Five. Pr. माझें घ्या आणि पांचांत न्या. पांच तेथें परमेश्वर Vox populi vox Dei. पांचाची पांच बुद्धि or पांचांचे पांच प्रकार Quot homines tot sententiæ: also suns cuique mos. पांचांतून उठणें To become outcaste or isolated from society. पांचांवर धारण बसणें To be frightened to death (i. e. out of one's five vital airs).

वझे शब्दकोश

अबुध्द

वि. माहीत नसलेलें; न समजलेलें. -ध्दि-ध-वि. मूर्खं; समज नसलेला; शहाणा नसलेला. [सं. अ + बुद्धि]

दाते शब्दकोश

अचाट

वि. फार; अतिशय; विलक्षण; अफाट; लोकोत्तर; बेसुमार; अपरिमित; अतर्क्य; चमत्कारिक; फाजील; अनिर्बद्ध. 'ते दोन्ही शब्द अचाट ।' -ज्ञा १.१४७; 'लाटांवरी अचाटलाटा ।' -एभा २.९४; 'रत्नमुक्तमाणीक राशी । शृंगारादि अचाट ।' -नव २१. १०३; (क्रि॰ बोलणें, लिहिणें, करणें) म्ह॰ १ अचाट खाणें मस- णांत जाणें; २ अचाट बुद्धि खेळवावी बळेंच लक्ष्मी मेळवावी. [सं. अत्यर्थ; प्रा. अच्चत्थ अच्चट्ट-अचाट]

दाते शब्दकोश

अचाट acāṭa a Strange, devious, wild, eccentric, excessive, extravagant;--used freely of persons, actions, qualities. Ex. अ0 रांद्या-शिनळ-बोलणें-लिहिणें- करणें &c.; अ0 बुद्धि-सामर्थ्य-लक्ष्मी-कल्पना-तर्क &c. Pr. अ0 खाणें मसणांत जाणें. Pr. अ0 बुद्धि खेळवावी बळेंच लक्ष्मी मेळवावी. Ex. चाटा पुन्हा बोलसी धीट गोष्टी अचाटा ॥

मोल्सवर्थ शब्दकोश

आदर

पूज्य बुद्धि, मनांत मानणें, भक्तिभाव, श्रेष्ठ समजणें, आदरभाव, मानतों त्याला मी, आदरांजलि वाहणें, पूज्य भाव.

शब्दकौमुदी

आदटणे      

अक्रि.       दबणे; जिरणे; कमी होणे : ‘बुद्धी भ्रम सुटे प्रशस्त न वटे धोका सवे आदटे ।’ − दावि ४३६.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आदटणें

अक्रि. दबणें; जिरणें; कमी होणें. 'बुद्धी भ्रम सुटे प्रशस्त न वटे धोका सवे आदटे ।' -दावि ४३६. [आ + दाटणें- दटणें]

दाते शब्दकोश

आद्यज्ञान      

न.       १. प्रारंभीचे, मूळ ज्ञान; शहाणपण. २. उपजत, अंगचे अथवा जातीचे शहाणपण; नैसर्गिक बुद्धी. ३. मूळ कल्पना. ४. नवीन शोध, शक्कल; प्राथमिक युक्ती, प्रयुक्ती. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आधीं

क्रिवि. अगोदर; पूर्वीं; मूळांत. 'आधींच समुद्र पाहीं । तेथ दुवाडपण कवणा नाहीं ।' -ज्ञा १.११७. ॰बिधीं- चेब(बि)दीं-आदींचे बिदीं पहा. म्ह॰ १ आधीं अननम् मग तननम् = जेवण झाल्यावर गाणें सुचतें. २ आधीं गुंतूं नये मग कूंथूं नये. ३ आधींच बहु बावळी अन् बीचमें खाई भंग. ४ आधींच उल्हास त्यांत आला फाल्गुनमास (आधींच मर्कट तशांतहि मद्य प्याला इ॰) = स्वतःच्या हौसेंत दुसर्‍याच्या उत्तेजनाची भर पडणें. ५ आधीं जाते बुद्धि, मग जातें भांडवल किंवा लक्ष्मी = मनुष्याला वाईट दशा येण्यापूर्वीं भलभलत्या गोष्टी करण्याकडे त्याची प्रवृत्ति होणें. ६ आधीं पोटोबा, मग विठोबा; आधीं स्वार्थ, मग परमार्थ. ७ (व.) आधी मला वाढा मग ओढीन कामाचा गाडा, आतां मी जेवलें हातीपायीं रेवलें = प्रथम जेवणास घाला मग काम करीन असें म्हणावयाचें व जेवल्यानंतर जेवण अंगावर आल्यामुळें निजावयाचें; एकूण केव्हांच काम व्हावयाचें नाहीं. कामचुकार; कामचुचर. ८ आधी होती पतिव्रता मग झाली मुसळदेवता = प्रथम गरीब मग भांडखोर.

दाते शब्दकोश

आधीं, आधींनामधीं, आधींमधीं, आधील, आंधेर, आंधेरकोंडी, आंधेरी

आधीं, आधींनामधीं, आधींमधीं, आधील, आंधेर, आंधेरकोंडी, आंधेरी See under अ. आधींच उल्हास त्यांत फाल्गुन मास Used of a man evilly disposed by nature and encouraged by circumstances to indulge in his mis-doings. आधींच तारें त्यांत शिरलें वारें The same meaning as above. आधीं पोटोबा मग विठोबा The wolf calls for satisfaction before God. First have enough for yourself and then proceed to give away in charity. आधीं बुद्धी जाते मग लक्ष्मी जाते Pride goes before fall.

वझे शब्दकोश

अधीर

वि. १ उतावीळ; चंचळ अस्थिर; घोंटाळलेला; धरसोडया; अनिश्चित. 'कळों ही आली तयाची जोडी । अल्प रोकडी बुद्धि अधिरा ।।' -तुगा ७००. २ धीट नव्हे असा; भ्याड; भेकड. [सं. अ + धीर]. -पु. १ धैर्याचा अभाव; भीति; भ्याडपणा; कमकुवतपणा; 'अधीरें दुणावती कष्टा' -मुआदि २९.१४३. २ उतावीळपणा; चंचलपणा. [सं.]

दाते शब्दकोश

अधृति

स्त्री. अधैर्य; भीति; भय. 'तयासि क्षोभु नाहीं बुद्धि । आणि न पवतां न बाधी । अधृति तयातें ।।' -ज्ञा २.३६०. [सं. अ + धृति.]

दाते शब्दकोश

अधृति, अधृती      

स्त्री.       अधैर्य; भीती; भय : ‘तयासि क्षोभु नाहीं बुद्धि । आाणि न पवतां न बाधी । अधृति तयातें ॥’– ज्ञा २·३५९. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अगत्य

न. १ आस्था; कळकळ; पोटाग; आदर. 'या सुभेदा- रास सर्वांपेक्षां शास्त्रीबोवाचें अगत्य फार आहे.' २ अत्यंत अव- श्यकता; फार जरूरी; टाळतां न येण्यासारखी स्थिति. 'मला तंबा- कूचें अगत्य नाहीं.' 'जें अगत्य होतें तैसें जालें.' -दावि ३५. -क्रिवि. निश्चयेंकरून; अवश्यमेव; खात्रीनें; कसेंहि करून. 'तो तिमा- जीपंतास अगत्य जालें कीं' -भाद्विसंवृ ५४. [सं. अगति]. ॰पूर्वक- क्रिवि. १ निश्चयानें: खात्रीनें; अवश्यमेव. २ बुद्धिपुरस्सर; मुद्दाम. ॰रूप-क्रिवि. मुद्दाम; बुद्धिपुरस्सर; अगत्यपूर्वक. 'सद्विद्या... विरक्त पुरुषें अभ्यासावी । अगत्यरूप ।।' -दा २.८.३२. ॰बुद्धि- स्त्री. ॰वादपु. महत्त्व; जरूरी; काळजी; आवश्यकता वाटणें; भीड; मुर्वत. ॰वादी-वि. एखाद्या गोष्टीबद्दल विशेष तत्पर किंवा उत्सुक असलेला; अमुक जरूरीचें वाटणारा; त्याची तरफदारी करणारा. यांखेरीज अगत्यमेव, अगत्याचा, अगत्यानें, अगत्यास (निकरास) असे प्रयोग होतात. 'आतां अगत्यास आलें.' -यथादी १.२५७.

दाते शब्दकोश

अहंबुध्दि

स्त्री.अहंता; अभिमान; आपलेपणाची जाणीव. [सं. अहम् + बुद्धि]

दाते शब्दकोश

आकालिक

वि. आभाळ; आपल्या डोक्यावर दिसणारी घुम- टाकार पोकळी. हिचा रंग निळसर असतो. ‘आकाश म्हणजे अव- काश पसरला पैस’ –दा १३.७.१. २ वातावरण; अंतराळ. ३ पोकळी-एभा १९.१९३. ४ एक संख्या (शून्य). ५ पंचमहा- भूतांपैकीं शेवटचें. यांत इंधक (ईथर) भरला असून तो ध्वनिवाहक आहे. ६ (वेदांत) निर्गुण स्वरूप. ‘ऐसाही जरी धिंवसा । बांधोनियां आकाशा ।।’ –ज्ञा १२.७४. कांहीं समाशब्द-घटाकाश; मठाकाश; महदाकाश; चिदाकाश इ॰ [सं.] हा शब्द पाताळ शब्दाबरोबर येतो. असे कांहीं वाक्प्रचार. ॰पाताळ एक- गर्वानें फुगून गेलेल्या माणसाबद्दल योजतत. ॰पाताळ एक होणें- अति जोराचा पाऊस पडणें (मोठ्या पावसांत जमीन-अस्मान एक झालेलें दिसतें म्हणून.) ॰पाताळ एक करणें- हलकल्लोळ करणें; आरडा ओरडा करणें; धिंगाणा घालणें (रागानें, हट्टानें). ॰पाताळाचा भेद- दोन वस्तूं- मधील महदंतर दाखविणें. ‘आत्मा आणि बुद्धि हीं जर तूं एक सम- जत असलास, तर आकाश पाताळाचा भेदच तूं नाहींसा केलास असें म्हटलें पाहिजें.’ ला घेरा घालणें-देणें- अचाट कृत्यें करणें; मोठ- मोठे पराक्रम करणें; दिग्विजय करणें; अशक्य गोष्टीस हात घालणें; महत्त्वाकांक्षी होणें. ॰शाची चौघडी करणें- आकाशाला घेरा घालणें. ‘आकाशाची करवले चौघडी । महामेरूची बांधवेल पुडी । शून्याची मुरडवेल नरडी । परी मनाच्या ओढी अनिवार ।।’ -ची दोरी तुटणें- आकाशाची कुऱ्हाड पडणें. ‘तों एकाएकींच आका- शाची दोरी तुटते तैशी गोळी येऊन...उजवे बर्गडींत लागली.’ -भाब ८१. -शींराहणें- वरच्या मजल्यावर, आढयाखालीं राहाणें. -ला गवसणी घालणें- अशक्य गोष्ट करावयास धजणें; आका- शाला घेरा घालणें. -वी कुऱ्हाड-धाड पडणें- दैवी आपत्ति येणें; निसर्गाच्या आपत्ती येणें; अत्यंत मोठी हानि होणें. उ॰ पति मरणें; एकुलता एक पुत्र मरण पावणें. ‘चिटणीस, तुमच्यावर आज आका- शाची कुऱ्हाड कोसळली आहे.’ –स्वप ४४६. म्ह॰ आकाशाची कुऱ्हाड कोल्ह्याच्या दांतांवर. -ची साल काढणें- निष्फळ प्रयत्न करणें. ‘तेणें साली काढावी आकाशाची ।’ –अमृ ६.४७. -तून उतरणें, पडणें किंवा अस्मान फाडून येणें- अघटित घटना दाखविणें. म्ह॰ आकाशांतून पडलों आणि भुईवर सावरलों. –नि ५९८. -ला शिड्या लावणें- शक्तीबाहेर काम करणें. ॰फाटणें- सर्व बाजूंनीं एकदम संकटें येणें. ‘आकाश फाटलें त्याला लावावें ठिगळ कुठोनी ।’ –संग्रामगीतें. हेंच दुसऱ्या शब्दांत उदाहरण. -शास ठिगळ लावणें- निरर्थक प्रयत्न. ‘हरि-भय-दीर्ण नभ करिल धड लावुनि कृष्णसार थिगळाला ।’-मोभीष्म ६.४४. ॰कक्षा- स्त्री. दृश्य क्षितिज. ॰कुसुम- न. खपुष्प; असंभाव्य किंवा अवास्त- विक गोष्ट (सशाच्या शिंगाप्रमाणें). ॰गंगा-नदी- स्त्री. आकाशां. तील नदी; तारांचा एक विशिष्ट समुदाया; अति सूक्ष्म अशा ताऱ्यांचे आकाशांत दिसणारे दोन पट्टे. हे दक्षिणोत्तर गेलेला दिसतात. पहिला पट्टा अगस्ति ताऱ्याच्या पूर्वेस मघांच्या रेखांशांजवळून निघून व्याधाच्या पूर्वेकडून आर्द्रांच्या पश्चिमेस वळतो व तेथून तो ध्रुवाच्या पश्चिमेपर्यंत पसरलेला आहे. दुसरा पट्टा श्रवण नक्षत्राजवळून ध्रुवाच्या पूर्वेकडे गेलेला आहे. पहिल्यापेक्षां दुसरा पट्टा लहान आहे. दुर्बिणीनें दिसणारे यांतील तारे सुमारें दोन कोटी आहेत. ॰गमनविद्या- सिद्धी- स्त्री. यौगिक सिद्धीपैकीं एक; आकाशांत संचार करण्याची माहिती; अर्वाचीन विमानविद्या. ॰दिवा-दीप- पु. आश्विन शुद्ध पौर्णिमेपासून कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत (पितरांना प्रकाश दिसण्या- करितां) भिंगाचा किंवा कागदाचा दिवा (कंदील) करून एखाद्या उंच काठीस किंवा झाडास टांगून लावतात तो. २ खुणेसठीं एखाद्या उंच जागीं लावलेला दिवा. ॰नगर- ढगांच्या विचित्र आकृतींवरून वाट- णारें ढगांतील किंवा आकाशांतील काल्पनिक शहर; (विप्र.) गंधर्वनगर; गंधर्वसृष्टी. ॰पट- पु. ज्यामध्यें अक्षांश, रेखांश, विषुववृत्त, क्रांतिवृत्त, अयनवृत्त, नक्षत्रें, राशी, तारे, यांच्या आकृती दिलेल्या असतात असा नकाशा. यावरून सूर्य, चंद्र, ग्रह, उपग्रह, यांचे मार्ग ठरवितां येतात. [सं.] ॰पथ-मार्ग- पु. १ अंतराळ; आकाशांतून जाणारा रस्ता; यौगिक सिद्धींपैकी एक सिद्धि. ‘दे आकाश पंथें झोंकून । दशदिशा गेले पाषाण ।’ ‘आकाश मार्गी गुप्त पंथ । जाणती योगिये समर्थ ।।’ –दा. २ हवेंतील रस्ता, वाट. ॰पाणी- न. (ल.) ताडी, माडी, इ॰ मादक पेय; ताड, माड हीं झाडें फार उंच असतात व त्यापासून ताडी, माडी काढतात ती त्यांच्या शेंड्याजवळच्या भागापासून काढतात यावरून [सं.] ॰भाषण- न. १ स्वर्गीय देवतांशीं संभाषण; (नाटकांत वगैरे) आकाशाकडे पाहून, देवांना हांक मारून, त्यांचे उत्तर आपण ऐकलेसें दाखवून जें भाषण नाटकांतील व्यक्ति करिते तें. उ॰ ‘हे स्वर्गस्थ देवतांनो !’ २ (नाटकांत) रंगभूमीवर नसलेल्या दुसऱ्या एखाद्या पात्राचे शब्द आपण ऐकत आहों असें रंगभूमीवरील पात्र हावभाव करून सुचवितें व त्यास उत्तर देतें ते शब्द. [सं.] ॰मंडप- पु. आकाशाचें छत; आकाश हाच मांडव. ‘आकाश- मंडप आसडत । नक्षत्रें रिचविती अपार पै ।।’ ॰मंडल- न. खगोल. ॰मापक पु. (शाप.) वातावरणोष्णतास्थित्यंतर मापक यंत्र; किरण- विसर्जनदर्शक यंत्र. (इं.) ईथ्रिओस्कोप. ॰मुनि- पु. उंट (हा वाक्प्रचार उंटाची मान उंच असल्यामुळें पडला.) ॰मूलि- स्त्री. एक. झाडाचा वर्ग (कुंभिका, पुन्नाग, यांचें मूळ जमिनींत नसून अधां- तरीं असतें). जलसंबंधीं वनस्पति. ॰यान-वहन- न. विमान. ॰वल्ली- वेल- स्त्री. १ बांडगुळ; वृक्षरुहा; वृक्षावर वाढणारी वेल. २ शेर वगैरे झाडांवर वाढणारी व बारीक पिवळे तंतू असणारी वेली; सोनवेल; अमरवेल; अंतरवेल. याच प्रकारच्या दुसऱ्या एका वेलीस फुलें येतात. ॰वाणी- स्त्री. १ आकाशापासून निघणारा शब्द; अशरीरिणी वाणी; देववाणी. ‘तुझें हें गाणें म्हणजे आकाशवाणीच मी समजतों.’ –स्वयंवर. २ कोणाकडून एखादी गोष्ट समजली हें जेव्हां सांगावयाचें नसतें तेव्हां म्हणतात. जसें- ‘चिलिट गुणगुणलें.’ ॰वास- पु. वृक्षांदिकांवर राहणें; उंच राहणें.

दाते शब्दकोश

अक्काबार्इ      

१. लक्ष्मीची वडील बहीण. २. दुष्ट, भांडकुदळ स्त्री. ३. (ल.) दारिद्र्य; दुर्दशा; दुर्बुद्धी. (वा.) अक्काबार्इ आठवणे – दुर्बुद्धी होणे; विपरीत बुद्धी होणे. अक्काबार्इचा पाया - दुर्दैवाची, वार्इट स्थिती येण्याची पूर्वचिन्हे. अक्काबार्इचा फेरा – भरभराटीचा, वेगवान काळ जाऊन दारिद्र्य येणे; दुर्दशा; दैन्य. अक्काबार्इची दया – (ल.) दारिद्र्य; दुरवस्था. अक्काबार्इचे पोर – दुर्बुद्धी; दुर्दैव : ‘हे अक्काबार्इचे पोर (१९०१ चे शेतकी बिल) सर्व इलाखा भिकारी करील.’ – लोटिकेले. २·२·२६७. अक्काबार्इचे बाळ – (ल.) कमनशिबी माणूस; दुर्दैवी व्यक्ती. अक्रबपेनी      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अक्कल

(आ) स्त्री० बुद्धि, मति, शहाणपण, वकूब.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

अक्कल; अकल

(स्त्री.) [अ.अक्लू] बुद्धी, शहाणपणा. “अकलेचा कान्दा, अकलेचा खन्दक” = अती शाहणा.

फारसी-मराठी शब्दकोश

अकल

स्त्री. बुद्धि. अक्कल पहा.-राव्य ८.६५.

दाते शब्दकोश

(अक्लके) नाखून लेना

हिंदी अर्थ : बुद्धिसे काम लेना मराठी अर्थ : बुद्धि वापरणें.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

आक्षेपून

क्रिवि. (काव्य) निक्षून; प्रत्यक्ष बजावून; बुद्धि- पुरःसर; मुद्दाम; जाणून बुजून; आवर्जून. [आक्षेप]

दाते शब्दकोश

अलंबुद्धि

अलंबुद्धि alambuddhi f (S अलम् Enough, बुद्धि Sense, feeling.) Satiety, satisfaction, the feeling of being glutted or satisfied.

मोल्सवर्थ शब्दकोश

-स्त्री. समाधान; तृप्ति; तृप्तता; तृप्ततेची भावना; शिसारी. [सं. अलम् = पुरे + बुद्धि]

दाते शब्दकोश

अलंबुद्धि, अलंबुद्धी      

स्त्री.       समाधान, तृप्ती; तृप्तता; तृप्ततेची भावना. [सं. अलम् = पुरे + बुद्धी]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अमान      

स्त्री.       अमान्य करण्याची बुद्धी; अनादरवृत्ती : ‘सर्व शस्त्रविद्या शिकवोन कोणी । परिपूर्ण जाले वदतां ऐकूनि । चेले न लेखिती पडोन अमानीं ।’ – दावि २०१. [सं. अ+मन्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अमान

स्त्री. अमान्य करण्याची बुद्धि; अनादरवृत्ति. 'सर्व शस्त्रविद्या सिकवोन कोणी । परिपूर्ण जाले वदतां ऐकुनी । चेले न लेखिती पडोन अमानीं ।' -दावि २०१. [सं. अ + मन्]

दाते शब्दकोश

आमोला

चोहोंकडून मारा. आमाला पहा. 'आमोलेयांचेआं दळभीडा । पुरतां हातियेरूं कैचा तेह्वडा ।' -शिशु ८८०. 'आमोले उसासितांती रणीं । कटारे वेर्‍हीं ।' -शिशु १०४६. -लेपण-न. मारण्याची बुद्धी; शौर्य. 'भीडला समरंगणीं अमोले पणें ।' -शिशु ९७९.

दाते शब्दकोश

आमोलेपण      

न.       मारण्याची बुद्धी; शौर्य : ‘भीडला समरंगणी आमोलेपणें ।’ − शिव ९७९.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अनिरूप      

वि.       अर्थ विशद करण्यास कठीण : ‘ते अनिरूप कीं निरूपिजे । ऐकतां बुद्धि आणिजे ।’ –ज्ञा १३·१७७; वर्णन करता न येण्यासारखे; न सांगण्यासारखे. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अनिरूप

वि. निरुपण करण्यास कठिण. 'तें अनिरूप कीं निरूपिजे । ऐकतां बुद्धि आणिजे ।' -ज्ञा १३.१७६. [सं. अ + निरुप् = सांगणें]

दाते शब्दकोश

अनन्य

अनन्य ananya a (S) That has no other (object of worship, protector, patron, resource, mind, purpose &c.) Ex. जे विषयपर कामनायुक्त ॥ तुज जे अनन्य भजत ॥. अनन्य forms compounds, such as अनन्य आश्रय -कार्य -चित्त -परायण -बुद्धि -भक्त -साधनं and others. The most valuable occur in order.

मोल्सवर्थ शब्दकोश

अनर्थ

पु. १ अतिशय अनिष्ट गोष्ट; मोठें अरिष्ट. 'आमचें कुटुंब समप्र । कुंभकर्णें ग्रासिलें ठार । थोर अनर्थ मांडिला ।।' २ अव्य- वस्था; थैमान; दंगा किंवा त्यापासून उद्भवणारें दु:ख, संकट, विघ्न. 'हें असो जें सागरु । अनर्थांचा ।।' -ज्ञा ८.१४९. [सं. अ + अर्थ] ३ निरतिशयता; अमर्यादता; अपरंपारता; असामान्यता; अति- शयता. या शब्दाचा उपयोग फार स्वैरपणें केला जातो. उ॰ (अ) 'एक जाउनी सांगती सिते । अनर्थ मांडिला तुझिया सुतें ।' -अनंत लवकु. (आ) 'देऊळ बांधावयाचा यानें अनर्थ मांडिला.' = देऊळ बांधण्याच्या प्रयत्नाची पराकाष्ठा केली. (इ) 'यंदा सस्ताईचा अनर्थ झाला. १५ पायल्या तांदूळ रुपयास मिळतात.' (ई)' त्यानें एका दिवसांत ५०० श्र्लोक लिहून अनर्थ केला.' वरील अर्थी विशेषण व क्रियाविशेषणाप्रमाणें उपयोग. 'हा अनर्थ बोलतो.' 'त्याची अनर्थ बुद्धि.' ४ अर्थहीनता; अर्थशून्यता; निरर्थकता; (ल.) मुर्खपणा.' श्लोकांचा अर्थ सोडून अनर्थ केला. ' ५ पोकळपणा; नि:सत्त्वता; नि:प्तारता. 'जडा अनर्थीत समान साचा । जो अर्थ तो मी प्रियमाणसाचा ।।' ६ शत्रुत्व; वैर. 'मज सांगा वृत्तांत । कीं कृष्णजरासंधा अनर्थ । वाढला कां ।।' -कथा २.२.११. [सं. अ + अर्थ]

दाते शब्दकोश

अनर्थ anartha m (S अ & अर्थ) Any exceeding, overwhelming calamity, e.g. an inundation, an epidemic, a hostile irruption: also the disorder, tumult, or distress occasioned by it. 2 Excess, extravagance, vehemence, boundlessness. It is used with the uttermost freedom, and of all actions, appearances, qualities, things, of which the speaker would express the immoderateness, exorbitance, or superlativeness. Ex. ह्या पोरानें रडण्याचा अ0 मांडिला or रडून अ0 केला This child is bellowing with might and main; देवळ बांधावयाचा ह्यानें अं0 मांडिला He is straining every nerve and employing every means to build the temple; राजानें अ0 माजेवला The Raja has set on foot a grievous oppression. आमचें कुटुंब समग्र ॥ कुंभकर्णे ग्रासिलें ठार ॥ अ0 मांडिला ॥ यंदा सस्ताईचा अ0 झाला पंधरा पायली तांदूळ रुपयास मिळतात; पावसानें अ0 केला; त्यानें एका दिवसांत पांचशें श्र्लोक लिहून अ0 केला. 3 Also used adj & adv in the above sense. Ex. हा अ0 बोलतो; त्याची अ0 बुद्धि. 4 Want or privation of meaning, nonsense. Ex. श्र्लोकाचा अर्थ सोडून अ0 केला. N. B. This last sense is the radical or literal sense, but it is uncommon. The intelligent student will recognise in it the source of the other senses, and will call to mind the similar use of the English word Nonsense. 5 Unsubstantialness, unsatisfactoriness, hollowness, inanity. Ex. जडा अनर्थांत समान साचा॥ जो अर्थ तो मी प्रिय माणसाचा॥ In the midst of dreary vanity, the true and unvarying substance or good--am I, the beloved of man. (An utterance ascribed to Deity.) Oh! si sic omnia.

मोल्सवर्थ शब्दकोश

अनुभवी

वि. १ अनुभव,प्रचीति घेतलेला; अनुभव आलेला. 'ह्या बुद्धी जो अनुभविया ।' -परमा १४.२५.२ ज्यानें उपभोग घेतला आहे असा; ज्यानें उपयोग केला आहे असा. ॰ज्ञान-न. अनुभवानें मिळालेलें ज्ञान; शहाणपण. [सं.]

दाते शब्दकोश

अनुकरण

नक्कल करणें, उसनें घेणें, सहीसही उचलणें, कित्त्या - बरहुकूम घोटणें, तो नमुना पुढें ठेवून चालणें, ती ऐट आणणें, जणूं कांहीं हें त्याचें प्रतिबिंबच ! जणों ही त्याचीच प्रतिकृति ! वळण अनुसरणें, माशी टु माशी, मुळाबरहुकूम करणें, थोड्या फरकानें घेणें, तो करतो तसें करणें, स्वतंत्र बुद्धि न चालवतां पावलावर पाऊल ठेवणें, ब्लू-प्रिंट दोहोंचे एकच, फरक काय तो स्थलाकालाचा, बाकी सर्व एकच.

शब्दकौमुदी

अन्यथामति, अन्यथामती

स्त्री.       विपरीत ज्ञान, बुद्धी : ‘ते वेळीं विश्वस्वप्नासहितें । कोण अन्यथामति निद्रेतें । सांभाळी नुरेचि जेथे । मायाराती ॥’ – ज्ञा १६·११.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अंधारी      

स्त्री.       १. काळ्याकुट्ट ढगांमुळे पडलेला अंधार. २. टांग्याचा घोडा किंवा रहाटाचा, घाण्याचा बैल यांच्या डोळ्यांस लावण्याची झापड. ३. पित्तक्षोभाने डोळ्यांपुढे एकाएकी भासणारा अंधार किंवा चक्कर; मूर्च्छा; तसेच उतारवयामुळे किंवा (ल.) आढ्यतेमुळे डोळ्यांवर येणारी झापड, धुंदी. ४. अंधार, काळोख (क्रि. येणे, पडणे). ५. (ल.) अज्ञान : ‘तेथे अंधारी गेली । मग बुद्धी मावळली ।’ − परभा १०·११.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अंधारी

स्त्री. १ रहाटगाडग्याच्या चाकाच्या दोन दात्यां- मधील जागा; दंतांतर; खांचा. २ कडीपाटाच्या दोन कड्यां- मधील जागा झांकण्याकरितां बसविलेली आडवी फळी; खांडे व दांडे यांच्यामधील फळी. ३ लांकडी जिन्याच्या दोन पायर्‍यां- मध्यें मागच्या बाजूस असलेली पोकळ जागा बंद करण्याकरितां बसवावयाची फळी. 'अंधारी उंच ठेवूं नका.' ४ तुरुंग; अंधार- कोठडी; तळघर. ५ अंधार; काळोख; (क्रि॰ येणें; पडणें). ६ (ल.) अज्ञान. 'तेथें अंधारी गेली । मग बुद्धी मावळली ।' -परमा १०.११. ७ बळद; भिंतींत काढलेलें कपाट; तळघर. ॰कुंधारीं-कोंधारीं -क्रिवि. १ काळोखांत; अंधारात; सांधी- कोंदींत; कोन्याकोपर्‍यांत. २ (ल.) गुप्तपणें; चोरून; आडून; (अंधारी द्वि.). ॰रात्र-स्त्री. वद्य पक्षांतील रात्र; अंधारानें युक्त असलेली रात्र; काळोखी रात्र.

दाते शब्दकोश

अंग      

न.       १. आंग; शरीर; देह : ‘पै जयोचेनि अंगसंगे ।’ – ज्ञा ९·२६९. २. शरीराचा अवयव, इंद्रिय, गात्र : ‘अति क्षीणता पावली सर्व आंगे’ – दावि २४२. मेद, मांस. ३. (ल.) कोणत्याही गोष्टीचा घटक विभाग. ४. वेदांग–वैदिक वाङ्मयापैकी विशिष्ट भागास संज्ञा उदा. शिक्षा, ज्योतिष, निरुक्त इ. ५. बाजू; दिशा : ‘आठै आंगें पोळती । वसुंधरेची ।’ – शिव ७४८. ६. एखाद्या कामात असलेला हात, घेतलेला भाग, एखाद्या कामास आतून दिलेली फूस. ७. अधिष्ठान; ठिकाण; शरीर; देह (एखाद्या गुणदोषाचा कर्ता, पात्र). ८. एखाद्या वस्तूचा किंवा कार्याचा गौण अप्रधान भाग. ९. आतड्याचा गुदद्वाराबाहेर येणारा भाग किंवा प्रसूतीनंतर योनीच्या बाहेर येणारा भाग. १०. विशिष्ट काम करण्याची पात्रता, ताकद, क्षमता, बुद्धी, कौशल्य, चातुर्य. ११. आपल्या बाजूचा मोठ्या अधिकारावरील माणूस; तरफदारी करणारा, वशिला लावणारा माणूस. १२. (ज्यो.) पूर्व क्षितिजावरील क्रांतिवृत्तावरचा बिंदू, अंश. १३. खूण : ‘अनुभवांची आंगें जाणें । योगियांचे खुणे बाणे ।’ – दास ५·९·२२. १४. मगधाच्या पूर्वेचा जुना बंगाल देश. १५. आचारांग सूत्रांपैकी एक जैन आगम ग्रंथ. १६. स्वतः; खुद्द. आंगे असाही प्रयोग आढळतो : ‘राहोनि गुप्त धृष्टद्युम्नें तच्छोध लाविला आंगें ।’ – मोआदि ३४·१८२०. १७. प्रकार : ‘कारभाराचे सांगावे अंग कैसें ।’ – दास ११·५·२३. [सं.] (वा.) अंग ओढवणे – एखादे कार्य आपल्या अंगावर येणे, स्वतःपुढे होणे. अंग काढणे, अंग काढून घेणे – स्वतः एखाद्या कामातून माघार घेणे, संबंध तोडणे. २. बाजूला होणे; भाग घेण्याचे किंवा लक्ष देण्याचे थांबवणे. अंग घालणे – १. हात घालणे; मदत करणे; मन घालणे. २. दुःखामुळे जमिनीवर पडणे : ‘ऐकोनिया आंग घाली पृथ्वीवरी’ – दास ३·५·३०. ३. भाग घेणे; लक्ष देणे. अंग घासणे – झीज सोसणे : ‘परांजप्यांनी प्रामाणिकपणाने अंग घासून... स्वतःची स्कीम करून कार्यास लागावे.’ – केले १·२६३. अंग घेणे – १. लठ्ठ होणे. २. कामात भाग घेणे. अंग भारणे – पहा : अंग घेणे, अंगचटी जाणे, अंगचटी येणे– लगट करणे : मनीच्या अंगचटीला जाऊ नको... – सीपो ४. अंग चढणे – विभागात पडणे; सदरात पडणे; वर्गात येणे : ‘जे विधीसी नातुडे । तें निषेधाचें अंग चढे ।’ –एभा ७·२९. अंग चढून येणे – ताप भरणे, चढणे. (व.) अंग चोरणे– १. अंग राखून काम करणे, टंगळमंगळ करणे, चुकारपणा करणे. २. शरीराचा भाग आकुंचित करणे (मार चुकवण्यासाठी.) अंग जड करणे – एखाद्या कामात भाग घेण्याचे टाळू पाहणे. अंग जड होणे – अंगावर काटा उभा राहणे. अंग जोगावणे– पहा : अंग चोरणे. अंग झटकणे अजिबात संबंध नाही असे सांगणे : ‘गोखल्यांनी आपले अंग झटकले.’ – उकथा ११६–१७. अंग झटकून कामाला लागणे– तयार, तत्पर होऊन, आळस न करता कामाला सुरुवात करणे : ‘सारी मुंबई अंग झटकून कामाला लागली होती.’– मुंदि ३५. अंगझटीला येणे – अंगाशी भिडणे, झोंबणे, चिकटणे : ‘अंगझटीला येतो मेला,’ – सबा ११. गुप्त ठेवणे; संबंध नाही असे बाहेरून दाखवणे. अंग झाडणे – १. साफ नाही म्हणून सांगणे; नाकबूल करणे : ‘आंग झाडिती न ममें । येणे बोलें ।’ – ज्ञा १७·३७२. २. अव्हेरणे. अंग टाकणे– १. अशक्त होणे; वाळणे २. जोराने देह जमिनीवर टाकणे. ३. विश्रांतीसाठी आडवे होणे. ४. कसेतरी अस्ताव्यस्त पसरणे. अंग टेकणे– १. आश्रय करणे : ‘योगें आंग टेकिलें योगी’ – अमृ ९·२६. २. बसणे; विश्रांती घेणे. अंग दर्शवणे– एखाद्या गोष्टीत किंवा व्यवहारात हात किवा संबंध आहे असे भासवणे. अंग दाखवणे– एखाद्या कामात कौशल्य दाखवणे, फड जिंकणे. अंग न दाखवणे – अंग असल्याचे लपवणे; मागे राहणे; जबाबदारी टाळणे. अंग देणे – १. मदत करणे; हातभार लावणे. २. प्रवृत्त होणे, वळणे, अंग दुमडणे, दुडपणे, दोडपणे– अंग चोरणे. अंग धरणे– १. ताठरणे; संधिवाताने शरीर आखडणे. २. लठ्ठ होणे; ताकद येणे. ३. अवयवांची हालचाल करता न येणे. ४. एखादे काम नीट होणे : ‘त्याने बत्ती पेटवण्याचा प्रयत्न केला पण बत्ती अंग धरीना...’ – शेलूक ७. अंग मरणे – अर्धांगवायूने शरीर अथवा एखादा अवयव बधीर होणे. अंग मारणे– १. पहा : अंग चोरणे. २. जोराने अंग आत घुसवणे : ‘मी अंग मारून स्वतःचा बचाव केला.’ – वासिंमाससो ४८. अंग मुरडणे – मुरडणे; मागे पाहात दिमाखाने जाणे; ठमक्याने जाणे. अंग मोडून काम करणे– खपणे; श्रम करणे; अतिशय मेहनत करणे; जिवाकडे न पाहता काम करणे; जीव पाखडून काम करणे. अंग मोडून येणे– तापाने अंगावर काटा येणे; कणकणणे; कसकसणे : ‘तदुपरि अविलंबें अंग मोडून आलें ।’ – सारुह ३·५७. अंग येणे– १. लठ्ठ होणे. २. प्रसूतिसमयी गुह्यांग बाहेर येणे. अंग रक्षण करणे, राखणे, वाचवणे– अंग चोरणे, आपला बचाव करणे : ‘यश रक्षावें न आंग लोकांही ।’ – मोउद्योग १०·६१. अंग लपवणे– पहा : अंग झाकणे. अंग वाचवणे– पहा : अंग रक्षण करणे, अंग सारवणे– १. तोल सावरणे. २. गेलेली ताकद पुन्हा मिळवणे, पूर्व स्थितीवर येणे. अंग सुटणे– लठ्ठ होणे. अंग सोडणे– खंगत जाणे. अंग हलके होणे– हायसे वाटणे; जबाबदारीतून मोकळे झाल्याबद्दल समाधान वाटणे. अंगहीन करणे– डोळे काढणे : ‘गुलाम कादर दिल्लीत येऊन पातशहास अंगहीन करून अमर्यादा केल्या. त्याचे पारिपत्य केले असतां चांगलें, असें जाणून फौज रवाना केली.’ – मदरु २·६०. अंगाखालची बायको – राख, उपस्त्री. अंगाखाली घालणे– स्वतःच्या चैनीसाठी अथवा उपभोगासाठी बाई राखणे. अंगाखाली पडणे– १. सवयीचे होणे. २. भोग देणे, रतिसुख देणे, घेणे. अंगाखांद्याकडे पाहणे – श्रमाचा विचार करणे. अंगाखांद्यावरचे– (बायकी) (ल.) दागिने. अंगाचा आकडा होणे– आकडीने पेटके येणे; अंग वाकडे होणे. अंगाचा आळापिळा करणे– १. अंग पिळवटणे, आळेपिळे देणे. २. अतिशय श्रम करणे. अंगाचा इस्तू करून घेणे– अंगाची आग करून घेणे; संतापणे; फार रागावणे : ‘जरा दिरंग लागला तर इस्तू करून घेतात अंगाचा’ –पाचोळा ६८. अंगाचा खकाणा करणे– संताप करून घेणे. (व.) अंगाचा खुर्दा होणे– अतिशय श्रमाने अंग ठणकणे, गलितगात्र होणे; मणके ढिले होणे. अंगाचा तिळपापड उडणे– संतापाने शरीर तापणे, भयंकर संताप येणे : ‘सखू हे तुझं ऐश्वर्य पाहून तुझ्या भिमावन्संच्या अंगाचा तिळपापड उडायचा.’ – संतस ५९. अंगाचा भडका होणे – पहा : अंगाचा हुरपळा होणे. अंगाचा हावळा होणे– पहा : अंगाचा तिळपापड होणे : संतापानं तिच्या साऱ्या अंगाचा हावळा व्हायचा – वळीव १४१. अंगाचा हुरपळा होणे – अंग अतिशय तापणे; तापाने, संतापाने अंगाची लाही होणे, आग होणे. अंगाची आग होणे– रागाने संतापाने अंगाची आग होणे. अंगाची चौघडी करणे– १. शरीराच्या चार घड्या करणे (डोंबाऱ्याच्या कसरतीत). २. सर्व अंग पोटाशी घेऊन निजणे. (थंडी, ताप इ. मुळे). अंगाची लाहकी होणे– पहा : अंगाची आग होणे. अंगाची लाही करणे– संतापवणे; खिजवणे; भाजणे; जाचणे. अंगाची लाही होणे, अंगाचा हुरपळा होणे – १. उन्हाने अतिशय अंग तापणे; काहिली होणे; भडका होणे. २. अतिशय संताप येणे (जोंधळा इ. धान्याची भाजून लाही होते त्याप्रमाणे) : ‘ते तिजला खपलें नाहीं । अंगाची झाली लाही ।’ – विक १७. अंगाची होळी होणे– पहा : अंगाची आग होणे. अंगाचे आंथरूण करणे– स्वतःबद्दलची काळजी सोडून दुसऱ्यासाठी सर्व प्रकारच्या संकटांना तोंड देणे; एखाद्याचे काम करण्यासाठी स्वतःच्या जीविताची पर्वा न करणे. अंगाचे अंथरूण होणे– आजारपणामुळे अशक्तता येणे; उठवणीस येणे; मरगळीस येणे. अंगाचे कातडे काढून जोडा शिवणे– (एखाद्याविषयी) अतिशय कृतज्ञता, आदरबुद्धी दाखवणे. अंगाचे चकदे काढणे– अंगाचे मांस बाहेर येईल इतक्या जोराने, बेदम मारणे; अंगाची सालटी काढणे. अंगाचे तिळपापड होणे, अंगाचा तिळपापड होणे – १. रागाने शरीराची लाही होणे : ‘मी दहांच्या तोंडून ऐकलं आणि माझ्या अंगाचा असा तिळपापड झाला की सांगता पुरवत नाही.’ – मोप्र १५. २. रागाने बेफाम होणे. अंगाचे धुडके उडवणे– शरीराच्या लक्तऱ्या काढणे; चेंदामेंदा करणे; फार झोडपणे. अंगाचे पाणी करणे– अतिशय श्रम करणे (त्यामुळे अंगास पाणी, घाम येणे.) : ‘अंगाचे पाणी करूनच या हतभाग्या आयुष्याचे दिवस मला लोटले पाहिजेत.’ – पाव्ह ९९. अंगाचे पाणी होणे– घाबरणे; भीती वाटून घाम येणे. अंगाच्या चिंध्या करणे – १. अंग ओरखडणे (व.) २. त्रास देणे. अंगा जाणे – स्वाधीन होणे, बळी पडणे. अंगात बसणे – पहा : अंगाबरोबर होणे. अंगात येणे– १. भूतसंचार होणे, २. अतिउत्कंठेने काम करणे. अंगात वारे शिरणे– पहा : अंगात येणे; कमालीचा उत्साह उत्पन्न होणे. अंगात शीळकळा येणे – अंगात देव येणे, वारे येणे. (माण.) अंगानिराळा टाकणे, अंगानिराळा झिडकारणे, अंगानिराळा झोकणे, अंगानिराळा सोडणे, अंगाबाहेर टाकणे, अंगाबाहेर झिडकारणे, अंगाबाहेर झोकणे, अंगाबाहेर सोडणे – (कामधंदा, जबाबदारी) सोडून देणे; अंगावर न घेणे. अंगानिराळे करणे– पहा : अंगाबाहेर टाकणे. अंगाबरोबर होणे, अंगात बसणे– एखादा कपडा अंगास बरोबर बसणे, ठीक होणे, बेताचा होणे. अंगाला खार लावून घेणे– १. श्रम करणे; मेहनत करणे. २. स्वतःचे नुकसान करून घेणे, स्वतःवर दोष ओढवून घेणे. अंगाला लावणे– अंगाला तेल हळद वगैरे चोपडणे : ‘नवी नवरी म्हणून अंगाला लावीन म्हटले, नाहीं’ – झांमू. २. बाळंतिणीचे अंग रगडणे, चोळणे. अंगावर असणे– १. बाकी असणे; शिल्लक असणे, राहणे. २. लळा असणे. अंगावर असणे, अंगावर होणे– कुशीवर निजणे; पडून राहणे. अंगावर काटा उभा राहणे– भीतीने किंवा आनंदाने अंग रोमांचित होणे : ‘वृत्तश्रवणें आला सर्वांगी आमुच्या पहा काटा ।’ – मोकर्ण १८·१ अंगावर काढणे– (आजार वगैरे) सोसणे; सहन करणे. अंगावर ओघळणे, अंगावर कोसळणे, अंगावर कोसळून पडणे– १. रागाने एखाद्याच्या अंगावर चालून जाणे, पडणे. २. संकट, आपत्ती वगैरे गुदरणे, जबाबदारी येणे; आपत्तीत सापडणे. अंगावर खाणे– पहा : अंगावर पिणे. अंगावर गोण किंवा गोणी येणे – अंगावर जोखीम किंवा जबाबदारी येणे. (व.) अंगावर घेऊन– स्वतःवर जबाबदारी घेऊन; आपले म्हणून; कैवार घेऊन (क्रि. करणे, बोलणे, सांगणे, पुसणे, विचारणे) अंगावर घेणे– १. मुलाला प्यावयास देणे, घेणे; थान देणे, स्तनपान देणे. २. स्वतःवर जबाबदारी घेणे. ३. आपला म्हणणे, अतिशय प्रीती दाखवणे. अंगावर तुटणे, अंगावर तुटून पडणे– हल्ला करणे; धावून जाणे; एकदम चालून जाणे. अंगावर देणे– जामिनकी किंवा गहाण न घेता वैयक्तिक जबाबदारीवर कर्ज वगैरे देणे. अंगावर देणे, अंगावर बांधणे, अंगावर भरणे, अंगावर पोसणे, अंगावर करणे– स्वतःच्या जबाबदारी–साधन–संचय यावर देणे, बांधणे वगेरे. अंगावर पडणे– १. शिरावर पडणे; विक्रीस नफा होईल म्हणून जो माल खरेदी केला तो अडीअडचणीमुळे, भाव उतरल्यामुळे आपल्याजवळ पडून राहणे; तोटा भरून देण्याची जोखीमदारी अंगावर घेणे. २. गळ्यात येणे, एखादा धंदा अगर काम करण्यास भाग पडणे. ३. रागाने चालून जाणे, वसकन अंगावर येणे. ४. हल्ला करणे, चालून येणे. ५. अप्रिय नापसंत वस्तू पत्करावी लागणे. अंगावर पिणे– मुलाने स्तनप्राशन करणे; मूल स्तनप्राशन करण्याइतके लहान असणे. अंगावर येणे – चिडून एकदम ओरडणे : ‘मेल्या कुत्र्यासारखा अंगावर आला.’ – लव्हाळी १८५. अंगावर शेकणे – १. व्यापारात, व्यवहारात तूट येणे, बूड येणे; कुभांड येणे; मोठे अपयश येणे. २. थट्टेचा वाईट परिणाम होणे. अंगावर जाणे, अंगावरचे जाणे – (बायकी) महिन्याच्या महिन्यास तरुण स्त्रीच्या शरीरातून जसे दूषित रक्त बाहेर जाते तसे अवेळी जाऊ लागणे; धुपणी रोग होणे. अंगावरचे तोडणे– ताह्या मुलाचे अंगावर पिणे बंद करणे. अंगावरून जाणे– शेजारून जाणे : ‘अनोळखी माणसासारखं तिच्या अंगावरून जायचं’ – लव्हाळी २०९; अगदी जवळून जाणे. अंगावरून वारा जाणे– अर्धांगवायू होणे : ‘भूतपिशाच्च लागले । अंगावरून वारे गेले ।’ – दास ३·७·५५. अंगाशी येणे– पहा : अंगावर शेकणे : ‘हिटलरनं मास्कोवर केलेला हल्ला साफ अंगाशी आला.’ –लव्हाळी १३६. अंगास कुयला लागणे– मत्सराने किंवा संतापाने हिरवानिळा होणे, मिरच्या लागणे, अतिशय राग येणे. अंगास झोंबणे– (व.) अंगास स्पर्श करणे, धरणे. अंगास बसते येणे– अंगाला बरोबर बसेल असे होणे (कपडा इ.) ‘नोकर लोकांच्या अंगास बसते येतील असे पोशाख करण्यात यावेत’ – रवानगीतील नोकरांचे पोषाख (बडोदे). अंगास मुंग्या येणे– वातादी विकारामुळे अंगाला एक प्रकारची बधीरता येणे. अंगास येणे, अंगी येणे– १. व्यापारात तूट, बूड येणे; नुकसान होणे; ठोकर बसणे. २. अंगात बाणणे : ‘मराठीच्या अंगी आलेली क्षीणता क्षणमात्रही झाकली जाणार नाही.’ – निमा. अंगास लागणे, अंगी लागणे– १. पुष्टीकारक होणे, लठ्ठ होणे. २. एखादा दोष किंवा गुन्हा अंगावर शाबीत होणे, लागू होणे : ‘तेथे न करिता चोरी । आंगी लागे ।’ – दास ६·१·७२. ३. तोटा सोसावा लागणे, ठोकर बसणे, अंगावर शेकणे. अंगास लावणे – पहा : अंगाला लावणे. अंगास लावणे, लादणे–चिकटवणे, शाबीत करणे (गुन्हा, अपराध). अंगी असणे– जवळ, पदरी असणे; ठायी असणे; स्वाधीन असणे. अंगी आणणे– १. आपल्यावर घेणे; ताबा घेणे. २. आपल्या ठिकाणी असू देणे; स्वाधीन राखणे. ३. सवय लावून घेणे. अंगी आदळणे– अंगास चिकटणे, कोसळणे : ‘अंगी आदळतो शोक.’ – दावि ४२३. अंगी खिळणे– रोग, सवय इ. शरीरात भिनणे. अंगी घुमारणे– भूत लागणे, अवसर येणे : ‘आणि आंगी घुमारिले’ – दावि १५६. अंगीची सावली करणे – (स्वतःचा) आश्रय देणे. अंगी जिरणे – सरावाचे होणे, मुरणे. अंगी डसवून बोलणे – मुद्दा अंगी लावून निरुत्तर करणे : ‘मी मुलाजां धरीत नाही. यथार्थ व अंगी डसवून बोलतो म्हणून विषम मानितात.’ – मशिंका ५६५. अंगी ताठा भरणे – गर्विष्ठ होणे. अंगी तुटणे – लहान मूल अशक्त होणे, वाळणे, रोड होणे. अंगी नसणे – १. स्वतःला अनुभव, माहिती नसणे; स्वभावात नसणे. २. स्वतःचा नसणे; मूळचा नसणे. अंगी पडणे – १. पक्षपात करणे : ‘हा अविद्येचा अंगी पडे’ – अमृ. ६·६. २. सवय होणे. पहा : अंगी मुरणे. अंगी फुटणे – १. लठ्ठ होणे; गुबगुबीत होणे. २. एखादा रोग अंगावर स्पष्ट दिसणे, वाहणे (रक्तपिती इ.) अंगी बसणे – सुगम असणे; सवय होणे. अंगी बिऱ्हाड देणे, अंगी बिऱ्हाड करणे – शरीरात थारा देणे; हृदयात अंतःकरणात बाळगणे; आसरा देणे (दुर्गुण, पापवासना इ. ना). अंगी भूत वाढणे – अंगात येणे : ‘तेथे कोणाच्या अंगीं भूतें ग्रह वाढत असतात. त्यांनी काही बाधा आहे म्हणून सांगितले.’ – ऐलेसं १९०४. अंगी भरणे, अंगी माशी भरणे – लठ्ठ होणे. अंगी भिनणे – सवयीचे होणे. अंगी माशा मारणे – आळशी बनणे. अंगी मिरच्या झोंबणे – ‘लागणे – (एखाद्याचे मर्म काढले असता) रागाने जळफळणे. अंगी मुरणे – १. सवयीची होणे. २. हाडी शिरणे; शरीरात (ताप) भिनणे. ३. जिरणे; बाहेर न येणे (देवी, गोवर). अंगी येणे – पहा : अंगात येणे; भूतबाधा होणे : ‘शुद्र येक त्याचे आंगी आला बोले ।’ – रामदासी २·११. अंगी लागणे – १. अन्न पचणे; लठ्ठ होणे; प्रकृतीला अनुकूल होणे. २. फायदा होणे. ३. एखादा आरोप लागू होणे. अंगी लावणे – आरोप करणे: ‘तुम्हीच तो कोणाला तरी दिला असे मी अंगी लावण्याचा प्रयत्न करी.’ – स्मृति १०२. अंगी वाजणे – (बाजणे) अंगात शिरणे; शोभणे : ‘थोरपण अंगी वाजे नाना.’ – दावि ६५.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अंतःकरण

अंतःकरण antḥkaraṇa n (S) The internal and spiritual part of man; the seat of thought and feeling; the mind, the heart, the conscience, the spirit or soul. अं0 चतुष्टय n S The inner man; the spirit or soul considered as subsisting and operating, and in every internal act, in four modes or forms; viz. मन The seat of the affections and passions; the seat of sentiment, desire, purpose; the heart: बुद्धि The discriminating faculty; the intellect, understanding, judgment; the mind: चित्त The reasoning or thinking faculty; the discursive faculty; the reason: अहंकार The seat of perception or consciousness, or the sense of individuality, distinct being or self; the seat of resolve or volition; the will, the अहं or ego, the soul or self. प्रसन्नअंतःकरणेंकरुन With pleased or unhesitating mind; with one's heart or free will; with alacrity or ready consent.

मोल्सवर्थ शब्दकोश

(सं) न० मन, मानस, बुद्धि, दिल.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

अंतःकरणचतुष्ट्य      

न.       मन, बुद्धी, चित्त व अहंकार मिळून होणारे आंतरमन. चार प्रकारांनी भ्रमण करणारा, हालचाल करणारा आत्मा. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अंतःकरणपंचक      

न.       अंतःकरण, मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार यांचा समूह. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आपामरसाधारण

आपामरसाधारण a Common to all classes and descriptions down to the base and vile.-वृत्ति,-भाव,-बुद्धि &c. Impartiality.

वझे शब्दकोश

आपाप-पा

क्रिवि. आपोआप. अपाप पहा. 'पापात्म- बुद्धि धरूनी मरती अपापां ।' -वामन विराटपर्व ५.१८. म्ह॰ आपा- पाचा माल गपापा = जो माल किंवा वस्तु मिळविण्यास श्रम पडले नाहींत ती वस्तु किंवा माल वाटेल तसा खर्च करणें; अन्यायानें मिळविलेलें द्रव्य हवें तसें उधळणें; याच अर्थीं फारसी-माल मुफ्त दिल् बे रहम.

दाते शब्दकोश

अपक      

वि.       १. न पिकलेले; अपरिपक्व; ज्यांची बुद्धी परिपक्व नाही असा : ‘या अपक बुद्धीच्या बालकाला वाटले की, तो एक रत्नस्तंभच असून आपण त्यावर गंडस्थळे घासावी.’ - तीम १२०. [सं. अपक्व]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अपरंपार

वि. अनंत; अमर्याद; असंख्य; अफाट; अगणित (शक्ति. गुण, बुद्धि, पराक्रम. महत्व वगैरे). [सं. अ + पर + पार]

दाते शब्दकोश

अपरंपार      

वि.       अनंत; अमर्याद; असंख्य; अफाट; अगणित (शक्ती, गुण, बुद्धी, पराक्रम, महत्त्व वगैरे); सर्वातीत : ‘विठ्ठल अपरंपार न कळे’ – ज्ञागा १८५. [सं. अ+पर+पार]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आपशुद्धि

स्त्री. १ स्वतःची शुद्धि. 'आपशुद्धि नेणती ।' -दावी ४९६. २ आत्मानात्मविचार. 'दृढ करूनियां बुद्धि । आधीं घ्यावी आपशुद्धी ।।' -दा ६.१०.१२. [सं. आत्मन् + शुद्धि]

दाते शब्दकोश

आपशुद्धि, आपशुद्धी      

स्त्री.       १. स्वतःची शुद्धी : ‘आपशुद्धि नेणती ।’ − दावि ४९६. २. आत्मनात्मविचार : ‘दृढ करूनियां बुद्धी । आधीं घ्यावी आपशुद्धी ॥’ − दास ६·१०·१२. [सं. आत्मन्+शुद्धि]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अपथ्य

न.१ अयोग्य, अपायकारक, रोग्याला वर्ज्य (तेल- कट, तिखट असें) अन्न-पदार्थ; कुपथ्य. 'अपथ्यरुचिरुग्ण तो कटुक ओखदें कोण पी ।' -केका ८९. २ पथ्याला, नियमांना सोडून वागणूक; नियमच्युति. ३ (ल.) अहित; अकल्याण; अमंगल. -वि. अहितकारक; अशुभ; इजा करणारें; न सोसणारें, वर्ज्य (अन्न किंवा वागणूक). [सं.] ॰शील-वि. पथ्य न करणारा. 'जरी अपथ्य- शीळा व्याधी । कळे साधूसी दुर्जनाची बुद्धि ।' -ज्ञा ७.९३.

दाते शब्दकोश

अपथ्यशील      

वि.       पथ्य न करणारा : ‘जरी अपथ्यशीळा व्याधी । कळे साधूसी दुर्जनाची बुद्धी ।’ – ज्ञा. ७·९३.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अपुरा, अपुरता      

वि.       १. पूर्ण न भरलेला; न संपलेला; पुरा न झालेला; कमी असलेला. २. पुरेसा किंवा भरपूर नसलेला; उणा; थोडा; असमर्थ; अयोग्य : ‘मी अपाडे कीर अपुरा ।’ – ज्ञा ६·१४०. ३. अपरिपक्व; अर्धवट, पोरकट : ‘अपुरती बुद्धि पुण्य नाही पाठी ।’ – तुगा १८७८. [सं. अपूर्ण]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अपुरता-अपुरा

वि. १ पूर्ण न भरलेला; न संपलेला; पुरा न झालेला; कमी असलेला. २ पुरेसा किंवा भरपूर नसलेला; उणा; थोडा; असमर्थ; अयोग्य. 'मी अपाडें कीर अपुरा ।' -ज्ञा ६.१४०. ३ अपरिपक्व; अर्धवट; पोरकट. 'अपुरती बुद्धि पुण्य नाहीं गांठीं ।' -तुगा १८७८. [सं. अपूर्ण]

दाते शब्दकोश

अफाट

वि. १ विस्तीर्ण; विस्तृत (स्थळ, अरण्य,तलाव, समुद्र, इमारत, काम). 'जैसा कां अफाट समीर ।' 'ऐसा गाढा आणि अफाटु । आतां कोण करी यया शेवटु ।' -ज्ञा १५.२१३. २ मोठें; अचाट. ३ प्रबळ; अतिशय सामर्थ्यवान्; आश्चर्यकारक; उत्कृष्ट. सामाशब्द- अफाट बुद्धि, अफाटपराक्रम, अफाटसंपत्ति. [सं. अ + स्फुट; अ + फाट = फाटणें?] ॰गुरूं-न १ उनाड, मोकाट जनावर. २ (ल.) अशिक्षित; अडाणी; ठोंब्या; धांगड.

दाते शब्दकोश

अर्धवट (बुद्धीने)

अर्धवेडा, रेम्याडोक्या, बुदधू, रिकामडोक्या, टकुरींत कांहींच नाहीं, भेजा-मेंदूच कमी, डोक्यांत उणा, मेंग्या, पेज्या, अकलेच्या नांवानें शून्य, हाफ्-मॅड, सोंग नुसते! हेड-ऑफिस रिकामें, हें येडं, वेडापिसा, बुद्धिभ्रंश झालेला, देवानें बुद्धि वांटली तेव्हां हे बाहेर गेले होते, खुळचट.

शब्दकौमुदी

अस्मिता      

स्त्री.       १. व्यक्तिमत्त्व; व्यक्तित्व; अहंता; अहंभाव : ‘नुसता पांढरपेशा समाज जरी घेतला तरी अस्मिता आणि त्यांच्या आकांक्षा यांचा अविष्कार हरिभाऊंच्या कादंबऱ्यांतून दृष्टीस पडतो’ – के ७·२·३१. २. एखाद्या विशिष्ट समाजाचे, वर्गाचे व्यवच्छेदक मीपण. ३. (तत्त्व.) द्रष्टा आणि दर्शनशक्ती यांना एकच मानणे अथवा पुरुष (आत्मा) आणि बुद्धी यांच्यात अभेद मानणे. सांख्यात याला ‘मोह’ आणि वेदान्तात याला ‘हृदयग्रंथी’ असे म्हणतात. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अस्त्युत्तर      

न.       १. कोणत्याही गोष्टीवर प्रत्युत्तर; हजरजबाब (वाईट अर्थी). २. एखाद्या गोष्टीच्या सत्यत्वाबद्दल अमान्यता दर्शविणे; ज्या योगाने लोकांचे उपकार–देणग्या कस्पटासमान भासतात. ज्या योगे आपल्यावर अन्याय होतो, मान मिळत नाही, बुद्धी आहे त्यापेक्षा लोक कमी लेखतात असे वाटावयास लागणारा मनाचा कमकुवतपणा, असंतुष्टता कृतघ्नता या संबंधाने प्रयोग करतात.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अस्त्युत्तर

न. १ कोणत्याहि गोष्टीवर प्रत्युत्तर; हरजजबाब (वाईट अर्थीं).'अस्त्युत्तर भान्चोद’ = एक शिवी. २ एखाघा गोष्टीचा सत्यत्वाबद्दल अमान्यता दर्शविणें; ज्या योगानें लोकांचे उपकार- देणग्या कस्पटासमान भासतात, ज्या योगें आपल्यावर अन्याय होतो, मान मिळत नाहीं, बुद्धि आहे त्यापेक्षां लोक कमी लेख- तात असें वाटावयास लागणारा मनाचा कमकुवतपणा-असंतुष्टता- कृतघ्नता-यासंबंधानें प्रयोग करतात.-वि.कृतघ्न [सं. अस्ति + उत्तर]

दाते शब्दकोश

आसुरी-उपाय-उपचार

पु. शेवटचा, धाडसाचा उपाय; आततायीपणाचा, भयंकर उपाय. ॰कर्म-कृत्य-क्रिया-न. स्त्री. एखादें विलक्षण, भयंकर, राक्षसी काम. ॰चिकित्सा-स्त्री. भयंकर, राक्षसी उपाय; शस्त्रक्रिया. जसें-हातपाय तोडणें, डाग देणें वगैरे. ॰निद्रा-स्त्री. गाढ झोंप; वेडी झोंप. ॰बुद्धि-स्त्री. (तत्त्व) प्रकृ- तीचा एक भेद. प्राकृतिक बुद्धि. -गीर १७१. ॰भोजन-न. अधाशीपणाचें जेवण; बेसुमार जेवण. ॰माया-स्त्री. चेटूक; जादू; जुन्या काळांतील राक्षसांचीं अजब कृत्यें-चेष्टा. ॰विवाह-पु. (प्र.) आसुर विवाह. कन्या विकत घेऊन करावयाचा विवाह; मुलीच्या बापास किंवा नातलगास द्रव्य देऊन केलेला विवाह. अष्टविवाह पहा. 'विवाह तंव बहुता परी । पिशाच गांधर्व आसुरी ।' -एरुस्व ४.४२. ॰संपत्ति स्त्री. १ जुलूम जबरदस्तीनें अथवा अन्य मार्गानें जम- विलेली अपार संपत्ति. २ बेसुमार फाजील चैन. ३ कामक्रोध- लोभादि विकारांचें मूळ अशी ऐहिक संपत्ति; याच्या उलट दैवी संपत्ति. [सं.]

दाते शब्दकोश

आत्मा      

पु.       १. ज्यामुळे शरीर जिवंत राहते पण ज्याला शरीरापलीकडे स्वतंत्र अस्तित्व असते असे अपार्थिव व अगोचर तत्त्व; आदितत्त्व; निराकार, अमर्त्य परमात्मा. २. सर्व विश्वात भरलेले चैतन्य; परब्रह्म. ३. ज्यामुळे स्वतःच्या भिन्नपणाची जाणीव होते असे तत्त्व; चैतन्य; प्राण. ४. मी, स्वतः याबद्दल वापरण्यात येणारा शब्द. ५. स्वभाव, प्रकृती; अंतःकरण. ६. देह. ७. बुद्धी; समजशक्ती. ८. ज्याला विचार, भावना, इच्छाशक्ती आहेत असे आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व : ‘माझा आत्मा असा आरसा । पाहो जन त्यामाजि तुला ।’ − उसं २८१. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आतुडणें

अक्रि. १ (काव्य) सांपडणें; स्वाधीन होणें. 'कट- कटा क्षुद्र मंडळांतु आंतुडलों ।' -पंचतंत्र १.३९. २ (ल.) आकलन होणें; समजणें. 'माझें मजचि वो आतुडलें गुज ।' -निगा ७४. 'जे मना आकळितां कुवाडें । घाघुसितां बुद्धी नातुडे ।' -ज्ञा ५.६७. ३ लाभणें; प्राप्त होणें; हातीं येणें. 'न करितां भगवद्भक्ति । सज्ञा- नाहि नातुडे मुक्ती ।' -एभा ३.१८६. 'तो देवेंद्रपदा चढे । सुर- वधूसंभोग तया आतुडे ।' -निमा १.१७. ४ संबंध येणें; निकट येणें; स्पर्शणें. 'मां साक्षात् तुं शामसुंदर । आंतुडलासी कीं ।' -रास १.१०३२. [द्रा. आतु = धारण करणें; जवळ असणें.]

दाते शब्दकोश

अथिलीथडी      

स्त्री.       १. अलीकडील बाजू २. (ल.) आस्तिक्य बुद्धी.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आथिलीथडी

स्त्री. अलीकडील बाजू; (ल.) आस्तिक्य बुद्धि. [सं. अस्ति + तट]

दाते शब्दकोश

औरंग

(पु.) हिंदी अर्थ : राजसिंहासन, समझ, छल. मराठी अर्थ : राजसिंहासन बुद्धि, कपट.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

अवघडणें

अक्रि. १ अडचणींत-संकटांत सांपडणें, पडणें. २ पेचांत सांपडणें; गोंधळणें; भांबावणें; घाबरणें; मति गुंग होणें. ३ अडकून राहणें; खोड्यांत पडणें; गोत्यांत येणें; अटकेंत पडणें; पंचायतींत, तारांबळींत सांपडणें. ४ एखाद्याची निकड लागणें; गैरसोय होणें; नेट लागणें; तगादा लागणें. ५ अडचणणें; अडणें; अतिशय ताण बसणें; अडथळा होणें; कोंडमारा होणें; कुचंबणें. 'स्वभाव त्यायोगें अवघडला ।' -विक ३. 'ऐसा स्मृतिभ्रंशु घडे । मग सर्वथा बुद्धि अवघडे ।' -ज्ञा २.३२७. ६ (शरीराचें गात्र) भारावाणें; मुंग्या येणें (रक्तप्रवाह बंद झाल्यामुळें); ताठणें. 'याला घे, माझा हात अवघडला.' ७ गरोदरपणामुळें भारावणें. 'शिव- नेरीवर सडा शिंपला अवघडल्या तो हातीं' -शिवमाय (स्वातंत्र्य- शार्दूल).

दाते शब्दकोश

अविचार

आतताईपणा, अविवेक, अविमर्श, तापलेल्या डोक्याची कृति, घिसाडघाईचे निर्णय, घे सुरी नी घाल उरीं, अर्ध्या हळकुंडानें पिवळा, दहा अंक मोजणार नाहीं, हुरळली मेंढी लागली लांडग्याच्या मागें, सारासार बुद्धीनें काळें केलें, जरा दमानें घेणार नाहीं, आले तोंडाला बकलें, विवेकाचा खून, सारासार बुद्धि झाकळणें, योग्य सल्ला पालथा घातला, मनाचे दरवाजे मिटले, विचार आक्रसले, उसळणाऱ्या विकाराचें राज्य झालें.

शब्दकौमुदी

अविनाश

पु. नित्यत्व; शाश्वतता; नाशाचा अभाव; अन- श्वरत्व. -वि. नाशरहित असा; शाश्वत; नित्य; अनश्वर. 'पाहती मज अविनाशातें । तरी कैंचा दिसे ।' -ज्ञा ९.१५२. [सं. अ + वि + नश्] ॰पद-न. मोक्ष; कैवल्य. 'या देहाचेनि साधनें । अवि- नाशपद पावणे ।' -एभा ९.२८१. ॰भाव- पु. नित्यत्वबुद्धि; अविनाशी आहे असा समज. 'तो देखतसे अविनाशभावें । आत्म- बुद्धि ।।' -ज्ञा ४.१२०.

दाते शब्दकोश

आयणी      

स्त्री.       १. इच्छा; हेतू; वासना : ‘तुका म्हणे मन तुमचे चरणीं । एवढी आयणी पुरवावी ।’ − तुगा १६१९. २. मत. ३. मन; बुद्धी : ‘हे सद्‌गुरूची विनवणी । कीं ब्रम्हसुखाची खाणी । परिसतां सप्रेम बोलणीं । रिझली आयणी सज्जनांची ।’ − एभा ४·२३. ४. मालिका; ओळ : ‘तैसी देशी आणि संस्कृत वाणी । एक भावार्थाच्या सुखासनीं । शोभती आयाणी । चोखट आइका ।’ − ज्ञा १०·४५. ५. चातुर्य; युक्ती; रीत : ‘नातरी जाणिवेच्या आयणी करितां दधि कडसणी । मग नवनीत निर्वाणीं । दिसें जैसें ।’ − ज्ञा २·१२९. ६. अभिमान; गर्व : ‘तो (शेष) ही बोलिकेपणें आयणी । बोलतां रसना गेली चिरूनि ।’ − स्वादि १·२·२१. [आइणी, आयनी इतर रूपे.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आयणी

स्त्री. १ इच्छा; हेतु; वासना. 'तुका म्हणे मन तुमचे चरणीं । एवढी आयणी पुरवावी ।' -तुगा १६१९. -निगा २२९. २ मत. ३ मन; बुद्धि. 'हे सग्दुरूची विनवणी । कीं ब्रह्मासुखाची खाणी । परिसतां सप्रेम बोलणीं । रिझली आयणी सज्जनांची ।' -एभा ४.२३. ४ चांगली चाल. -मनको. ५ सामर्थ. -मनको. ६ मालिका; ओळ. 'तैसी देशी आणि संस्कृत वाणी । एका भावा- र्थाच्या सुखासनीं । शोभती आयणी । चोखट आइका ।' -ज्ञा १० ४५. ७ चातुर्य; युक्ति 'नातरी जाणिवेच्या आयणी । करितां दधि कडसणी । मग नवनीत निर्वाणी । दिसें जैसें ।' -ज्ञा २. १२९. ८ अभिमान; गर्व. 'तो (शेष) ही बोलिकेपणें आयणी । बोलतां रसना गेली चिरूनि ।' -स्वादि १.२.२१. (आइणी, आयनी, ऐणी अशीं इतर रूपें.) [सं. आ + या; आयान]

दाते शब्दकोश

अयोग्य (कृति)

लहान तोंडी मोठा घास, पीछे बुद्धि, अवसानाबाहेर उडी, साधनांच्या शुचितेकडे दुर्लक्ष, बाजारांत तुरी अन् भट भटिणीला मारी, खाकेंत कळसा अन् गांवाला वळसा, हातचें सोडून पळत्याच्या पाठीस लागणें, डोळ्यांत केर आणि कानांत फुंकर, आंधळें दळतें अन् कुत्रें पीठ खातें तशांतला प्रकार, आधीं कळस मग पाया, बैल गेला नी झोपा केला.

शब्दकौमुदी

बामण

पु. १ (प्र.) (अशिष्ट) ब्राह्मण. २ बामणजाई; ब्राह्मणांतील एक हलकी जात. ३ (गो.) सारस्वत ब्राह्मण. [सं. ब्राह्मण] म्ह॰ (गो.) बामणाक दिली ओसरी बामण हातपाय पसरी. ॰जण-जणकी, बाह्मण जण-ब्राह्मण शब्दामध्यें पहा. ॰जाई-पु. (व.) ब्राह्मणापासून झालेला विदूर. 'बामणजायाचें एक घर गांवांत आहे.' [सं. ब्राह्मण + जात = झालेला] ॰दंडपु. (कु.) ब्राह्मणांवर बसविलेला कर (हा कर एका काळीं कुडाळ- देशकर आद्य गौड ब्राह्मणांवर पांच वेळ बसविण्यांत आला होता). ॰बुद्ध-स्त्री. (गो.) धूर्तता, मुत्सद्दीपणा. [सं. ब्राह्मण + बुद्धि] बाम(म्ह)णी-वि. पांढरा. (कित्येक झाडें, प्राणी यांच्या पांढर्‍या जातीबद्दल योजितात). बामणी-कांकडी-सरडा-पाल इ॰ बाम(म्ह)णी(ण)हुरडा, बामण वरडा-पु. (कुण.) ब्राह्मणाला दान म्हणून द्यावयाचा जून झालेला आणि भाजण्यास कठीण असा हुरडा; निरुपयोगी जोंधळे. बामुरडा-पु. (तुच्छ- तेनें) ब्राह्मण. बाम्हणी, बामणी-स्त्री. एक लहान झाड (वाम- णीचें लांकूड ओषटाखालीं जाळीत नाहींत).

दाते शब्दकोश

बांधणें

सक्रि. १ आंवळणें; एकत्र करणें; तांगडणें; अडक- वणें. २ गांठ देऊन आवळणें; गांठ मारणें. ३ नाल मारणें; पाय- बंद घालणें(घोड्याला). ५ (पागोट्यास) घड्या घालून नीट आकार देणें; गुंडाळणें. ६ (बांध इ॰ घालून पाणी) अडविणें. ७ (नियम, कायदे, रीति, वेळ इ॰) योजणें; स्थापन करणें; प्रचारांत आणणें. ८ बांधून घेणें; रोधणें; जखडून टाकणें; आखणें (कायद्यानें, निय- मानें).. 'त्याचा सारा वेळ बांधलेला असे.' -नि ९९८. ९ (घर, भिंत, जहाज इ॰) रचणें; उभारणें; बनविणें. १० (धरण, रस्ता इ॰) बांधून पक्का करणें. ११ (काव्य, व्याख्या, ग्रंथ) रचणें; रचना करणें; जुळणी करणें. १२ (तर्क, कल्पना, बुद्धि, युक्ति) योजणें; रचणें; बनविणें; एकत्र करणें. १३ बनविणें; वस्तूंना आकार देणें (जोडे, मिठाई इ॰). १४ (वैर, मत्सर, द्वेष) धरणें; बाळगणें; मनांत ठेवणें. १५ मंत्रानें ताप न येईल किंवा न दिसेल असें करणें; मंत्रानें थांबविणें; बंद करणें. [सं. बंध्; पोर्तु. बदेलार] म्ह॰ बांधली शिदोरी व सांगितलें ज्ञान पुरत नाहीं. बांधली गांठ-स्त्री. बंद केलेली पैशाची पिशवी; राखून ठेवलेले, साठविलेले पैसे; सांठा; संचय. [बांधणें + गांठ] बांधल्या कमरेचा-वि. कमरबंद; तयार; सावध.

दाते शब्दकोश

बौद्ध

बौद्ध bauddha a S Invented, conceived, formed by बुद्धि or the understanding; imaginary, ideal, fictitious.

मोल्सवर्थ शब्दकोश

बद-वक्र

(पु.); बद-बक्री (स्त्री.) अप्रतिष्ठा. “नबाब बुद्धिवन्त होत्साता हे बुद्धी वृद्धापकाळीं करून बद-वक्र करून घेतला” (पारसनीस-ब्रप ४५). “आतां पादशाई बद-वक्रीची, खजिना नाहीं, मुलूख नाहीं अशी जाली (साने-पयाव ३३०).

फारसी-मराठी शब्दकोश

बेबूज

वि. अज्ञान; अडाणी; निर्बुद्ध. 'परंतु लौकिकीं शिवाजीचा नातू खिजमतगारी करितो, तुझी अप्रतिष्ठा, मी बेबूज असें होऊन दोघांचा दुर्लौकिक होईल.' - शामब. भारतवर्ष १८. [बे + बूज = बुद्धि]

दाते शब्दकोश

बिंबग्राही

वि. अल्प; मर्यादित. 'दैनिक वर्तमानपत्राचे संपादक म्हणजे बिंबग्राही मानवी बुद्धि आणि विद्युत् वेगानें धांवणारा काळ यांमधील चुरस. '-मीआले.

दाते शब्दकोश

बोध

पु. १ जाणीव; समजूत; बुद्धि; ग्रह; आत्मबोध. 'म्हणोनि अतिशयें विषयो सेवावा । तैसा बोधु नोहावा ।' -ज्ञा ६.३४८. २ स्पष्टीकरण; विशदीकरण; समजावणी; माहिती सांगणें. ३ चित्सवरूप; ब्रह्मज्ञान; पूर्ण माहिती. 'जे तूंचि तूं सर्वा यया । मा कोणा बोधु कोणा माया । ऐसिया आपेंआप लाघविया । नमों तुज ।' -ज्ञा १४.६. ४ उपदेश; मार्ग; सूचना; परिचित करणें. ५ जागृति; जागेपणाची स्थिति; जागृत अवस्था; प्रबोधित अगर प्रबुद्ध स्थिति. 'जागणें जैसें आना । बोधाचेनि ।' -ज्ञा १५.५२९. ६ फुलांचें उमलणें. [सं. बुध् = जाणणें] ॰गम्य-वि. समजण्याच्या कोटींतलें; ज्ञान होण्याच्या किंवा समज पड- ण्याच्या आटोक्यांत असलेला; याच्या उलट बोधागम्य. ॰नीय- वि. स्पष्ट करून सांगण्यास योग्य; समजविण्यासारखें; शिक- विण्यास योग्य; माहिती करून देण्यासारखें. बोधणें-सक्रि. (काव्य) बोध करणें; स्पष्टीकरण करणें; समजाविणें; शिकविणें; ज्ञान सांगणें; माहिती देणें; उपदेश करणें. 'आतां ऐसियापरी बोधसी । तरी निकें आम्हां करिसी ।' -ज्ञा ३.१३. -अक्रि. जाणणें; समजणें; बोध होणें; ज्ञान होणें; जागृत होणें. 'तो वीवेकु वेठला । किं प्रबोधु बोधला ।' -भाए २५३. [सं.] ॰क- वि. १ समजावून सांगणारा; अर्थ स्पष्ट करणारा. २ उपदेशक; बोध करणारा; शिकविणारा; सुचविणारा. ३ जागृति करणारा; जागें करणारा. ॰शक्ति-स्त्री. दुसर्‍यास बोध करण्याची शक्ति; शिकविण्याची योग्यता; अर्थ स्पष्ट करण्याची लायकी. बोद्धा- वि. जाणणारा; समजणारा. बोधन-ना-नस्त्री. १ बोध करणें; उपदेश करणें; माहिती सांगणें; दिशा दाखविणें; सूचना; मसलत. २ जागृति; जागें करणें. 'अल्ली आदिलशहाचे बोधनेवरून त्या- कडे आले.' -तंजावर येथील मराठी शिलालेख. [ता. बोधनै] बोधपर-वि. उपदेश करणारें; बोध करणारें. बोधलेपण-न. ज्ञान- संपन्नता. 'येणें थोर बोधलेपणें । तयासि गा देहीं असणें ।' -ज्ञा १४.३१८. बोधविणें-सक्रि. जाणविणें; सुचविणें; माहिती करून देणें; समजाविणें; शिकविणें; दाखविणें. बोधव्य, बोध्य-वि. स्पष्ट करण्यास, सांगण्यास, शिकविण्यास शक्य, जरूर, योग्य; बोध करण्यासारखें. बोधा-पु. उपदेश; मार्ग; ज्ञान. [बोध] बोधागम्य-वि. जाणण्यास कठिण; न समजण्यासारखें; अतर्क्य. बोधाभास-पु. १ ज्ञानाचा आभास. २ (ल.) जीव. -हंको. बोधित-वि. बोध केलेला, केला गेलेला; शिक्षित; सांगितलेला; समजाविलेला किंवा समजलेला. बोधिनी-स्त्री. कार्तिक शुद्ध एकादशी. या दिवशीं विष्णु जागृत होतो. -वि. बोध करून देणारी; समजाविणारी. बोध्य-पु. ज्ञानाचा विषय; जाणण्याची गोष्ट, पदार्थ. 'तैसा बोध्यजात गिळीतु । बोधु बोधें ये मज आंतु । मिसळला तेथ साद्यंतु । अबोधु गेला ।' -ज्ञा १८.११०६.

दाते शब्दकोश

बर्कत

[अ. बरकत्] लाभ, यश; भरभराट. “नियत तशी बर्कत” = बुद्धी तशी समृद्धी.

फारसी-मराठी शब्दकोश

बरकत-खत, बर्कत

स्त्री. १ सिद्धि; यश; सुपरिणाम; लाभ. २ यशस्विता; भरभराट; भाग्यशालीपणा. 'ज्याचें दैव अनुकूल नाहीं त्यास कोणत्याही व्यवहारांत बरकट येत नाहीं.' ३ भरभराटीचें आधिक्य; कल्पनेपेक्षां अधिक नफा, प्राप्ति; फायदा (कामांत, धंद्यांत). ४ कोणतीहि वस्तु मापतांना एक या संख्यें- करितां मंगलार्थ उच्चारतात.; लाभ. [सं. भृ-भर; अर. बरकत] म्ह॰ नियत तशी बर्कत = बुद्धि तशी समृद्धि. ॰सोडणें-(शेतानें) आपली मातबरी, सुपीकपणा गमावणें, टाकणें.

दाते शब्दकोश

बुद्ध

पु. १ बौद्ध धर्माचा संस्थापक शाक्यमुनि; गौतमबुद्ध. २ विष्णूचा नववा अवतार; बौद्धावतार. -स्त्री. (अप.) बुद्धि पहा. 'दुसऱ्याची बुद्ध ऐकत निमित्याशी ।' -ऐपो १५७.-वि. १ ज्ञानी; विद्वान. ' तेवीं शुद्ध बुद्ध नित्य मुक्त । हा विसरोनि निजस्वार्थ । ' -एभा १३.२२८. २ जाणला, समजला गेलेला (अर्थ.) [सं. बुध् = जाणणें]

दाते शब्दकोश

बुद्धिभेद / बुद्धिभ्रंश

(सं) पु० दुर्बुद्धि, भ्रम, बुद्धिनाश, विपरीत बुद्धि.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

बुद्धिभ्रंश

(सं) पु० दुर्बुद्धि, भ्रम, बुद्धिनाश, विपरीत बुद्धि.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

बुद्धिमान

तल्लख, हुषार, चाणाक्ष, अक्कलवाला, धूर्ते, चारित्रयाला बुद्धि-वैभवाची जोड, चतुर, कल्पक, चलाख, त्याच्या बुद्धीचे भिन्न भिन्न पैलू, व्यापक व सूक्ष्मग्राही बुद्धि, हें हेरण्याची दूरदृष्टि, याला चमचाभर अक्कल जास्त आहे, कुशाप्र बुद्धीचा, तैलबुद्धीचा, अशिक्षित-पट्टत्व, यांच्याकडे अनंत युक्त्या व क्लृप्त्या आहेत, यांच्या बुद्धीची रग- भूक मोठी.

शब्दकौमुदी

बुद्ध्या

बुद्ध्या buddhyā ad (S Third case of बुद्धि) Purposely, deliberately, intentionally. 2 With the mind, will, or apprehension of. Used in comp. in the same manner and nearly to the same extent as दृष्ट्या, q.v. for exemplification.

मोल्सवर्थ शब्दकोश

बुद्धयारूढ

बुद्धयारूढ buddhayārūḍha a (S बुद्धि & आरूढ. Mounted upon the understanding.) Apprehended or understood.

मोल्सवर्थ शब्दकोश

बुद्वंत

वि. (गो. कर्ना.) बुद्धीनें व अनुभवानें प्रौढ; बुद्धि- वंत पहा.

दाते शब्दकोश

बुध

वि. शहाणा; विद्वान; ज्ञाता; पंडित. 'बुध अन्योन्य म्हणति कां जातां या हाचि नाक-वास वास ।' -मोसभा १.८ -स्त्री. बुद्धी पहा. म्ह॰ आगळ बुध वाणिया पाछळ बुध बाम- णिया. 'विद्येसंबंधीं प्रत्येक गोष्टींत दक्षिणी लोकांचें पाऊल पुढें असून इतरांचें मागें असे, ती स्थिति बदलून आमचे गुजराथी बंधु आगळ बुध वाणिया पाछल बुध बामणिया ही म्हण खरी करूं पाहत आहेत.'-निबंधचंद्रिका. [सं] ॰वंत-पु. १ (कों.) पुढारी; महाजन. -ख्रिपु. २ कर्नाटकांतील बेडगू जातींतील जात- पाटील. -गांगा. ३ बुद्वंत पहा.

दाते शब्दकोश

बुधाजी

पु. बुद्धि. जिवाजी शेखदार बुधाजी कारकून परगणे शरीराबाद.' -एकनाथ भज.

दाते शब्दकोश

भांडवल

न. १ व्यापार, सावकारी इ॰त घातलेला पैसा; द्रव्योत्पादनाचें साधन. २ (ल.) (द्रव्य, बुद्धि, अक्कल इ॰चा) सांठा; ठेवा; पुंजी. 'मागुती करावया भांडवला । बैसला तपीं ।' -कथा ३ ७.७३. [सं. भांड; हिं.] ॰बाहेर पडणें-बेत, कट प्रगट होणें. 'आणि सर्व भांडवल बाहेर पडलें' -चंद्र १३६. ॰शाही- स्त्री. भांडवलवाल्यांचे वर्चस्व. (इं) कॅपिटॅलिझम्. 'झारशाही, शिष्टशाही, दौलतशाही किंवा भांडवलशाई जशी वाईट...' -सुदे १५७.

दाते शब्दकोश

भें

भें bhēṃ n (भय S) Fear, dread, painful apprehension of evil. Pr. शें तों भें हजार तों बाजार लाख तों काख. 2 Ground for fear; danger, risk, hazard, jeopardy. भेनें (often भेणें) or, by contraction, भेन From, with, or by the fear of; by the influence of the apprehension of; occurs much in popular phraseology. Ex. सर्वा भेनें जावें पण प्रारब्धा भेनें कोठें जावें Wemay flee from all fears, dreads, and terrors, but from the fear of Destiny, ah! whither can we flee? रोगाभेन कांहीं गोड लागत नाहीं; देण्याभेन मला कांहीं सुचत नाहीं; पैक्याभेन बुद्धि पालटती; पोटाभेन, तोंडाभेन &c. Pr. गोड गारा असत्या तर कोल्ह्याभेनें न उरत्या.

मोल्सवर्थ शब्दकोश

भ्रंश

पु. १ पतन; पडणें; गळणें. २ (ल.) अपकर्ष; र्‍हास; नाश; च्युत होणें (महत्त्व, दर्जा, जात, सत्ता इ॰ पासून) चळ; वेड; खूळ. जसें-बुद्धि-ज्ञान-वैराग्य-शांति-भ्रंश. [सं.] भ्रंशणें- सक्रि. १ (काव्य) घोटाळ्यांत पाडणें; गोंधळविणें; चुकविणें. २ एखाद्यास त्याच्या स्थानावरून च्युत करणें. -अक्रि. १ गोंधळणें; बुचकळ्यांत पडणें. २ स्थानावरून च्युत होणें; भ्रष्ट होणें; चुकणें; भ्रम पावणें. 'कीं तपोबळें ऋद्धी । पातलिया भ्रंशे बुद्धी ।' -ज्ञा १.१८८. ३ नष्ट होणें; नाहींसें होणें. 'तिमिरविरुद्ध जैसें । दृष्टीचें तेज भ्रंशें ।' -ज्ञा २.५६. भ्रंशित-वि. (विरू.) भ्रष्ट पहा. [सं.]

दाते शब्दकोश

भुलणें

अक्रि. १ स्वतांस विसरणें; वेडा होणें; बुद्धि गमा- वणें; मोहित होणें; लुब्ध होणें. २ बेभान होणें (दारू, संपत्ति, मान, प्रीति इ॰ कांनीं). -उक्रि. विसरणें. 'जयाच्या आद्यंतीं भुलिजे । आपुली वाट ।' -ज्ञा १८.८०८. [सं भ्रश; प्रा. भुल्लइ; हिं. भुलना] भु(भू)लथा(ता)प-स्त्री. १ भरंवसा वाटण्याकरितां मारलेली गप्प. (क्रि॰ देणें). २ फसवणूक. भुलवण-स्त्री. १ (राजा.) भुलविण्याची, मोहविण्याची क्रिया. २ भुरळ; मोहित स्थिति (मंत्र, खुशामत इ॰ कांनीं). (क्रि॰ घालणें, पडणें). ३ भूलपाथ. भुलवणा-वि. मोहित करणारा; भुलविणारा. 'नेणता गोवळीं गोवळा । लाघवी अबळा भुलवणा ।' -तुगा ७३७. भुलवणी-स्त्री. भूल. भुलवण पहा. भुलवि(व)णेंसक्रि. १ विसरण्यास लावणें. २ चुकविणें; घुलकावणी दाखविणें. 'जो सन्मार्गु भुलवी ।' -ज्ञा १८.१०५६. ३ वेड लावणें; मोहविणें; छकविणें; भूल घालणें. 'जैसी मंत्रज्ञातें विवसी । भुलवी कां ।' -ज्ञा २.३१२. (गो.) भुलसांवचें. भुलसा- वणी-स्त्री. (गो.) भूल. भुलाई, भुलावणी-स्त्री. १ फसवणूक; हुलकावणी. भुलाई-स्त्री. (व.) नटवी स्त्री. भुलाभटका-वि. १ बेबंद आणि भटक्या. २ गोंधळल्यानें बहकणारा. [भुलणें + भटकणें] भुली-स्त्री. (काव्य) गुंगी; भुरळ; मोह; भ्रम; विस्मरणशीलता. 'रायासी अंतरी भुली पडली । देखोनियां तियेतें ।' -कथा १.८.१५२. भुलीचें झाड-न. (ल.) मोह भ्रम उत्पन्न करणारें भूत; भुताची बाधा. (क्रि॰ भेटणें). भुलोबा-पु. शेतांत पांखरां- साठीं उभें केलेलें बुजगावणें. भुल्यो-उद्गा. खेळांतील तात्पुरती तहकुबी; थुश्शो. भुल्ल(ल्लु)सचें-अक्रि. (गो.) भ्रंश पावणें; वेड लागणें. [भूल]

दाते शब्दकोश

चाड-डी

स्त्री. १ आवड; गोडी; चटक; छंद. 'दास्यावरि जेआ । आति चाडू ।' -ऋ २४. 'वाईट गोष्टींची आम्हांस चाड लागत चालली आहे.' -विवि ८.४.७४. 'आणि आकर्णी नसली चाड । तरी न लागती गोड भक्तकथा ।' २ जरूरी; इच्छा; गरज. 'जै सायेचिये चाडें । डहुळिजें दुधाचें भांडें ।' -अमृ ७.७४. 'आपुलिये चाडें सज्ञाना । योग्य नोहे ।' -ज्ञा ४.८४. 'कंठ शोषला उदक चाडें ।' -मुआदि २.११४. ३ बुद्धि. ४ पर्वा; भीड; किंमत; मर्यादा; मुरवत; मुलाजा 'आतां याची चाड नाहीं आम्हां भीड ।' -तगा १३०. [सं. चाटु; प्रा. चाडु?] म्ह॰ १ रोग्यासी कुपथ्याची चाड. २ ज्याची लागे चाड तो उडे ताडमाड = ज्याचें लोक फार अगत्य ठेवतात तो आपल्याच तोऱ्यांत असतो.

दाते शब्दकोश

चांच      

वि.       हुशार; चपळ; चलाख; दक्ष (मूल). पहा : चंच : ‘समय न कळे वेडगळ बुद्धी । विजाती ते शुद्धी चांच चाट ।’ - तुगा ३७४१. [सं. चंच]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चांच

वि. हुषार; चपळ; चलाख; दक्ष (मुल). चंच पहा. 'समय न कळे वेडगळ बुद्धि । विजाती ते शुद्ध चांच चाट ।' -तुगा ३७४१.

दाते शब्दकोश

चातुर

वि. १ (काव्य पोवाडे) शहाणा; हुषार; बुद्धि- मान्, समजूतदार; कुशल. 'दादू चातुर बोलला ।' - ऐपो ९६. २ (विशेषतः लावण्यामध्यें) प्रियकर; सखा. [सं. चतुर]

दाते शब्दकोश

चौघे, चौघी      

वि. पु. अव.       १. चारजण; चार आणि चौघे या दोहोंच्या अर्थात थोडासा फरक आहे. चार शब्द सर्वांसाठी वापरतात परंतु चौघे हा शब्द सजीव प्राण्यास उद्देशून − विशेषतः मनुष्यांस उद्देशून वापरतात. २. थोडे; तिघे−चौघे; तीन−चार. ३. जग; जनता; समाज; लोक; जन. उदा. चौघांचा विचार, बुद्धी, रीत. ४. (सांकेतिक) चार वेद : ‘न मनी चौघांचीं उत्तरें । उपवासें नावरे ।’ − ऋव ४४. ५. चार देह; सूक्ष्म, स्थूल, कारण व महाकारण देह; शरीर : ‘राजस विठाबाई माझें ध्यान तुझे पायीं वो । त्यजूनियां चौघांसी लावी आपुलिये सोई वो I’ − तुगा २८९. ६. चार मुक्ती : ‘चौघी जणी तटस्थ पाहती । स्वरूपस्थिती न वर्णवे ।’ − हरिवि ३·२. ७. चार वाचा (परा, पश्यंति, मध्यमा, वैखरी) : ‘कृष्ण वर्णुनिया श्रेष्ठ । चौघे गर्जताती भाट ।’ − एरुस्व ६७६. [सं. चतुर्] (वा.) चौघात बसणे − लोकात, समाजात वावरणे, वागणे; लौकिक राखणे. चौघांवर तान घेणे − १. लोकमत झुगारून देणे; जनतेचा, समाजाचा निर्णय धाब्यावर बसविणे; लोकांवर ताण करणे. २. अधिक उंच तान, लकेर घेणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चौघे-घी

विपुअव. १ चार जण; चार आणि चौघे या दोहोंच्या अर्थांत थोडासा फरक आहे. चार शब्द सर्वसाधारणपणें वापरतात परंतु चौघे हा शब्द सजीव प्राण्यास उद्देशून-विशेषतः मनुष्यांस उद्देशून वापरतात. (-स्त्री = चौघी-चौघ्या; -न. चौघें- चौघीं). २ थोडे; तिघे-चौघे; तीन-चार. ३ जग; जनता; समाज; लोक; जन उदा॰ चौघांचा विचार, बुद्धि, रीत. 'चौघांची वाट ती आमची-आपली वाट.' 'चौघांत जावें लागतें.' 'चौघांत बातमी पसरली.' ४ (सांकेतिक) चार वेद. 'न मनी चौघांचीं उत्तरें । उपवासें नावरे ।' -ऋ ४४. ५ चार देह; सूक्ष्म, स्थूल. कारण व महाकारण देह; शरीर. 'राजस विठाबाई माझें ध्यान तुझे पायीं वो । त्यजूनियां चौघासी लावी आपुलिये सोई वो ।' -तुगा २८९. ६ चार मुक्ती. 'चौघी जणी तटस्थ पाहती । स्वरूपस्थिति न वर्णवे ।' -ह ३.२. ७ चार वाचा (परा, पश्यंति, मध्यमा, वैखरी). 'कृष्ण वर्णुनिया श्रेष्ठ । चौघे गर्जताती भाट ।' -एरुस्व ६७६. [चौ = चार] (वाप्र.) चौघांत बसणें-अक्रि. लोकांत, समाजांत वावरणें, वागणें; लौकिक राखणें. चौघांवर ताना घेणें-(उप.) लोकमत झुगारून देणें; जनतेचा, समा- जाचा निर्णय धाब्यावर बसविणें; अधिक उंच तान, लकेर घेणें; लोकांवर ताण करणें.

दाते शब्दकोश

चेतन

न. १ जागेपणा; जागृति; उद्बोध; सजीवपणा; जिवंतपणा. 'त्याणें झालें मज चेतन । ज्ञानसूर्य प्रकाशून ।' -गुच १९.४. -वि. १ सजीव; जिवंत. २ विषयवेदनक्षम; सचेतन. ३ शुद्धीवर असलेला. [सं. चेतन = प्राणी, बुद्धि, मन] चेतनाचेतन- वि. सजीव व निर्जिव (सृष्टी); जीव (सृष्टी) व जड (सृष्टि) (सचेतन व अचेतन सृष्टी); ईश्वरनिर्मित सर्व (विश्व). [सं. चेतन = जिवंत + अचेतन = जड; निर्जीव]

दाते शब्दकोश

चेतना      

स्त्री.       १. जीवनशक्ती; प्राणशक्ती; जीव; प्राण; जाग; जागृती : ‘म्हणोनि अग्नीविण देहीं । चेतना न धरे ।’ − ज्ञा ८·२१४. २. पुरुषत्व; पौरुष; जननशक्ती. ३. आकलनशक्ती; ग्रहणशक्ती; बुद्धी; चित्त; मन; ज्ञानशक्ती : ‘विवेकाचे लोपल्या भान । स्तब्ध चेतना होय जाण ।’ − एभा २१·२१८. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चिच्छक्ति

स्त्री. सचेतन तत्त्व; शुद्ध चैतन्य; परमात्मा; बुद्धि; मन. [सं. चित् + शक्ति]

दाते शब्दकोश

चिच्छक्ति, चिच्छक्ती      

स्त्री.       सचेतन तत्त्व; शुद्ध चैतन्य; परमात्मा; बुद्धी; मन. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चित्      

स्त्री.       ज्ञान; बुद्धी; चैतन्य; शुद्ध ज्ञान - चैतन्यरूपी ईश्वर; ब्रह्म; आत्मा. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चित्

(सं) स्त्री० ध्यान, ज्ञान, बुद्धि, शक्ति. २ चैतन्य.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

स्त्री. ज्ञान; बुद्धि; चैतन्य; शुद्ध ज्ञान-चैतन्यरूपी ईश्वर; ब्रह्म; आत्मा;मन. [सं. चित् = ब्रह्म, आत्मा, चैतन्य, ज्ञान]

दाते शब्दकोश

चित्त      

न.       मन; अंतःकरण; बुद्धी; वृत्त्यात्मक अंतःकरण पंचकातील चवथा अवयव; मनोवृत्ती, विकार, भावना, राग इत्यादिकांचे अधिष्ठान मानलेले हृदयस्थान : ‘जे वस्तुचा निश्चयें केला । पुढें तेंचि चिंतूं लागला । तें चित्त बोलिल्या बोला । येथार्थ मानावें ।’ - दास १७·८·८. [सं.] (वा.) चित्त उडून जाणे - १. घाबरणे, उदास होणे; मन न रमणे. (कर्त्याची षष्ठी असते) : ‘तें ऐकून महाराजांचे चित्त उडून गेले.’ - चंद्रगुप्त १३४. २. एखाद्या गोष्टीविषयी मन विटणे; नावड उत्पन्न होणे. चित्त पुरविणे - लक्ष देणे; लक्षपूर्वक ऐकणे. चित्तात कुन्हा जाणे, येणे - चित्तात विकल्प येणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चित्तचतुष्ट्य

मन, बुद्धी, चित्त व अहंकार (ज्ञानेश्वरी अध्याय १५, ओवी ९७)

ज्ञानेश्वरीमधील कठीण शब्दांचे अर्थ (राज्य मराठी विकास संस्था प्रकाशित)

चरक or ख

चरक or ख caraka or kha ad In amazement or bewilderment. Ex. माझी बुद्धि or अक्कल च0 झाली or मी च0 झालों.

मोल्सवर्थ शब्दकोश

चरकणें

उक्रि. फाडणें; टरकावणें. -अक्रि. १ फाटल्या- सारखें होणें, वाढणें; अंतःकरण द्विधा होणें, अत्यंत व्यथित होणें; व्याकूळ होणें, व्यप्र होणें; कष्टी होणें. 'सुवर्णें कीं त्याच्या चर- कत असे तो दिनपती ।' -विवि ८.१.२०. २ (भीतीमुळें) भांबावणें; त्रेधा होणें; गोंधळणें; घाबरणें. 'वाघ दृष्टीस पडतांच मी चरकलों.' 'सभेस जातांच त्याची बुद्धि चरकली.' ३ (व.) मनांत समजणें. (प्र.) तरकणें. [ध्व. फाटण्याचा चर आवाज]

दाते शब्दकोश

चरकणें carakaṇēṃ v i (चर!) To undergo, as it were, rending; to be torn mentally; to be affected suddenly and violently (with terror &c.): also to be bewildered or distracted. Ex. वाघ दृष्टीं पडतांच मी चरकलों; सभेंत जातांच त्याची बुद्धि चरकली.

मोल्सवर्थ शब्दकोश

दानिश

(स्त्री.) हिंदी अर्थ : समझ, अक्ल. मराठी अर्थ : लक्ष, बुद्धि.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

दानिश      

बुद्धी; विवेक; अक्कल. दानी      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

देखणा

वि. सुंदर; मोहक; छबडा. 'जानकीचे देखणे नेत्र । सांडोनियां क्षराक्षर ।' -भावार्थ किष्किंधा १३.५९. -पु. पाहणारा; डोळस माणूस. 'मार्गीं अंधासारिखा । पुढें देखणाही जैसा ।' -ज्ञा ३.१५३. देखणाऊ-वि. डौली; दिखाऊ; पोशाकी; सुंदर पण कुचकामाचा. देखणिक-स्त्री. दृष्टोत्पत्ति; दृष्टी. 'बुद्धी तेजापासूनि झाली । म्हणोनि दखणिकेला आली ।' -सिसं २३.

दाते शब्दकोश

देखणिक      

स्त्री.       दृष्टोत्पत्ती; दृष्टी : ‘बुद्धी तेजापासूनि झाली । म्हणोनि देखणिकेला आली ।’ – सिसं २३.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

देवबुद्धि

देवबुद्धि dēvabuddhi f (S) Apprehension of as God; veneration or reverence for or high estimation of: also apprehension of (as of an idol, a mountain, a river, or any object) as veritable deity, not as a stone, a mountain &c.: opp. therefore to पाषाण- बुद्धि, पर्वतबुद्धि &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

देवबुद्धी      

स्त्री.       १. देवाविषयी आस्तिक्यबुद्धी. २. चराचर विश्व देवमय पाहण्याची बुद्धी.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दगड

पु. १ धोंडा; फत्तर; शिला; शस्त्रावांचून सामान्य प्रयत्नांनीं फुटत नाहीं व पाण्यानें विरघळत नाहीं असा पृथ्वीचा अवयवभूत पदार्थ. २ न्हावी लोकांचा वस्तर्‍यास धार लावण्याचा दगड; निष्णा. -स्त्री. मोठा खडक; शिला. हा शब्द आणि या दर्जाचे इतर शब्द उ॰ दगडमाती, धोंडा, माती, कपाळ इ॰ शब्द, जेव्हां एखाद्या माणसाची बुद्धि, ज्ञान, मालमत्ता वगैरे कुचकामाची आहे असें दाखवावयाचें असतें तेव्हां उपयोगांत आणतात. जसें:- त्याला काय येतें दगड ! त्यापाशीं काय आहे माती. -वि. (ल) अज्ञ; अडाणी; मूर्ख; मंद बुद्धीचा (माणूस). 'बोधुनि दगडासि कां न भागावें ।' -मोउद्योग ११.७७. [सं. दृषद्; का. दक्कड = मजबूत] (वाप्र.) ॰उचकणें-(ल.) एखाद्यावर तुफान रचणें; एखाद्याविरुद्ध मसलत करणें. ॰उचलणें-घेणें-हाती-घेणें-फेकणें-मारणें, दगडमार करणें-(ल.) रागानें वेडावून जाणें; बेफाम रागावणें. दगड खाऊन दगड जिरविणें-(कर.) अतिशय सशक्त किंवा प्रखर कोठ्याचा असणें. ॰चहूंकडे टाकून पाहणें-प्रत्येक उपाय अथवा युक्ति योजून पाहणें; सर्व दिशांनीं प्रयत्न करणें. ॰टाकून ठाव पहाणें-घेणें-तळ शोधणें अथवा खोली काढण्याचा प्रयत्न करणें; खुबीदार प्रश्न विचारून दुस- र्‍याच्या मनांतील विचारांची अटकळ करणें. दगडन् धोंडे- (बायकी) सटरफटर क्षुद्र गोष्टी. दगडाखालीं हात सांपडणें- गुंतणें-कांहीं दुःखकारक अडचणींत, पेंचांत, नुकसानकारक कामांत, सांपडणें. दगडा खालून हात काढून घेणें-अडचणींच्या कामांतून स्वतःस युक्तीनें मोकळें करून घेणें. दगडाचा दोर होत नाहीं-भलत्याच वस्तूपासून भलत्याच वस्तूची अपेक्षा करणें या अर्थीं. दगडाची साल काढणें, दगडाचा दोर काढणें- दुष्कर, अद्भुत किंवा अशक्य गोष्ट करणें. दगडाचें नांव धोंडा धोंड्याचें नांव दगड-जेव्हां एखादी गोष्ट इतकी स्पष्ट असते कीं तिच्या संबंधाचा वाद फुकट असतो अशा प्रसंगीं योजतात दगडापरीस ई(वी)ट मऊ-(हाल अपेष्टा इ॰) दोन स्थितींची, गोष्टींची तुलना करून त्यांतल्या त्यांत एक बरी असें दर्शविणें; निरुपाय म्हणून मोठ्या संकटापेक्षां लहान संकट पत्करणें. दगडाशीं गांठ पडणें-कठोर, गळग्रह अथवा न देतें कूळ इ॰ कांच्या तावडींत सांपडणें. दगडाशीं भांडणें-बलाढ्य शत्रु, मोठी अडचण, कठिण काम इ॰ कांशीं झगडणें. दगडास पाझर आणणें-येणें-फुटणें-निघणें, दगडास पान्हा आणणें- नैसर्गिक नडी, अडचणी न जुमानतां आपले हेतू सिद्धीस नेणें; कठिण हृदयाच्या अथवा कंजूष मनुष्यास द्रव आणणें; अशक्य गोष्ट घडवून आणणें; दगडापासून दूध काढणें. सामाशब्द- ॰खाण-णी-स्त्री. दगडांची खाण. ॰घाशा-वि. १ हेंगाडा; रानटी अडाणी; अकुशल (न्हावी, कारागीर इ॰). २ ओबडधोबड, वाईट आकाराचा (जिन्नस). ॰घाशी-स्त्री. १ कठिण, श्रमाचें काम. २ (माण.) दळण्याचें काम खेरीजकरून इतर काम न ऐकणारी स्त्री. -वि. १ श्रमदायक, कष्टकारक, कठिण व दुखःदायक (काम). २ कष्टाळू; हटून, तटून, झटून मेहनत करणारा; उद्योगी. ३ त्रासदायक रीतीनें हट्ट करणारा; आग्रही; घासा- घिश्या. [दगड + घासणें] दगड(डी)चौथ-स्त्री. गणेशचतुर्थी. (या दिवशीं जर चंद्र पाहिला तर चोरीचा आळ येतो म्हणून तो टाळ्ण्यासाठीं दुसर्‍यांच्या घरावर दगड फेंकण्याची जुनी पद्धत होती यावरून रूढ). ॰छाप-पु. शिळाछाप; लिथोग्राफ या इंग्रेजी शब्दास प्रतिशब्द; तें यंत्र; किंवा लिहिण्याची तसली तर्‍हा. ॰तळी-स्त्री. उचलून दुसरीकडे नेतां येण्याजोगें दगडाचें भांडें; दगड कोरून तयार केलेलें ताट, वाटी, दगडी (कढी इ॰ पातळ पदार्थ ठेवण्याची). ॰पोळ-स्त्रीन. (चुना, माती विरहित) नुसत्या दगडांची घातलेली भिंत, गडगा. [दगड + पोळी] ॰पोळें-न. नकली अथवा खोटें पोवळें. ॰फूल-न. पावसाळ्यामध्यें दगडांवर (अथवा लांकडावर) उगवणारी पांढरी वनस्पति. हिचा औषधांत व मसाल्यांत उपयोग करतात. रंग पांढराकाळा मिश्र असतो. [सं. गिरिपुष्पक; हिं पत्थर का फूल; ब. शैलेज; गुज. पत्थरफूल; तेलगु- शैलेयमनेदव्यमु; फा. दहाल] ॰फोड-स्त्री. कठिण आणि कष्टाचें काम; महत्प्रयासाचा उद्योग. वि. १ कठिण; अवघड; दुःखदायक श्रमाचें (काम). २ परिश्रमी; जबरदस्त; प्रचंड (निश्चयाचा प्रयत्न अथवा वर्तन). ३ जोराचें; जाचक; कडक; कटु; राग आणणारें (भाषण). ४ सडसडून पडणारा (पाऊस); भडिमाराचा; तडाक्याचा (मारा). ॰फोडीचें काम-अतिशय अवघड अथवा श्रमाचें काम. ॰फोड्या-वि. १ दगड फोडणारा. २ दगडफोड (-वि.) पहा. ३ हट्टी; आग्रही. कपाळफोड्या पहा. ॰मय-वि. (अप्रशस्त पण रूढ) ज्यामध्यें फार दगड आहेत असा; दगडाळ; (देश, जागा इ॰). ॰माळ ॰रान-पुन. दगडांनी व्यापलेलें, भरलेलें (रान, जमीन, ओसाड प्रदेश). ॰शिवणी-स्त्री. (बायकी.) एक खेळ. यांत एका मुलीनें डाव घेऊन बाकीच्या मुलींनीं दगडावर उभें राहावयाचें व त्या मुली आपआपले दगड बदलीत असतांना डाव घेणार्‍या मुलीनें त्यांनां शिवावयाचें व ज्या मुलीस ती शिवेल त्या मुलीवर डाव जाऊन पूर्वीं जिच्यावर डाव होता तिनें दगडावर उभें राहून खेळावयास लागावयाचें. ॰सर-स्त्री. पावसाची जोराची सर, वृष्टि. [दगड + सर = वृष्टि] ॰ळ-डाळ-वि. दगडांनीं भरलेली; लहान लहान गोटे असलेली; दगडमय (जमीन). म्ह॰ बायको तोंडाळ, शेत दगडाळ. दगडाचा माच, दगडाची माचण-पुस्त्री. दगडांचा अथवा खडकाचा थर. दगडाची छाती-स्त्री. १ (ल.) साहसी, निर्भय, बेदरकार; धैर्यवान् व सोसक मनुष्य. २ धारिष्ट अथवा प्रचंड धैर्य; दृढनिश्चय; दिलेरी. (क्रि॰ करणें). दगडांचें पेंव-न. १ दगडांनीं भरलेलें पेंव. २ (ल.) कठिण; असाध्य काम (लग्न वगैरेचें) करण्यास, सहन करण्यास कठिण व त्रासदायक असें काम, गोष्ट. म्ह॰ दगडाचें पेंव घालतां खळबळ काढतां खळबळ = तयार करण्यास व निस्तारण्यास दोहींसहि अवघड अथवा त्रासदायक काम, गोष्ट. दगडावरची रेघ-स्त्री. कधीं न पुसला जाणारा ठसा; न मोड- णारी चाल; न फिरणारें शासन; खोटे न ठरणारे शब्द; वज्रलेप, कायमची अथवा खात्रीची गोष्ट; याच्या उलट पाण्यावरची रेघ. दगडी-वि. १ दगडाच्या जातीचा; दगडाचा केलेला; दगडासंबंधीं. २ दगडमय; दगडाळ. दगडी आंबा-पु. एका जातीचा आंबा. याची साल जाड असून हा पिकावयास फार दिवस लागतात. दगडी काव-स्त्री. कावेची कठिण जात; लोखंडी काव. दगडी कोळसा-पु. खाणींतून निघणारा कोळसा; हजारों वर्षांपूर्वी पृथ्वीवरील अरण्यें व वनस्पती भूकंपादि कारणानें भूगर्भांत गाडल्या गेल्यावर त्यांच्यावर अनेक रासायनिक क्रिया होऊन त्यांपासून हा कोळसा बनतो. दगडी जोंधळा-शाळू-पु. जोंधळ्याची एक जात. याचें कणीस भरदार असून दाणा कणखर असतो. दगडी निंबू-न. निंबाची एक जात. याची साल जाड असते. याचा उपयोग रंगांत वगैरे करतात. हें खाण्याजोगतें नसतें. दगडी मुरूम-पु. १ मुरुमाची कठिण जात. २ दगडाचे फोडून केलेले लहान लहान तुकडे; बारीक खडी. मुरूम पहा. दगडी सुपारी- स्त्री. सुपारी पहा. दगडी हळद-स्त्री. गर्द तांबड्या रंगाची हळदीची कठिण जात. दगड्या-वि. १ जड; ठोंब्या; मूर्ख टोणपा. २ (मुलांच्या खेळांत) संख्या पुरी करण्याकरितां घेत- लेला काल्पनिक मुलगा; पित्त्या; (कों.) जवरामसणा. दगड्या धोंड्या-पु. दांडगाईनें मनुष्याचें अथवा वस्तूचें नांव विचारणा- रास उत्तरादाखल दिलेलें त्या मनुष्याचें अथवा वस्तूचें नांव.

दाते शब्दकोश

दिमाग़

(पु.) हिंदी अर्थ : मस्तिश्क, भेजा. मराठी अर्थ : मेंदू, बुद्धि.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

दंडळणे      

सक्रि.       १. डळमळणे; चळणे; गडबडणे : ‘नाना चमत्कारें बुद्धि । दंडळू लागे ।’ - दास ५·२·३३. २. भयाने कापणे; घाबरे होणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दंडळणें

सक्रि. १ डळमळणें; चळणें; गडबडणें. 'नाना चमत्कारें बुद्धि । दंडळू लागे ।' -दा ५.२.३३. २ भयानें कापणें; घाबरें होणें. [दंड + वळणें ?]

दाते शब्दकोश

डोके      

न.       १. कोणत्याही प्राण्याचा मेंदू सुरक्षित ठेवणारा, धडाच्या वरचा कवटी असणारा भाग. २. बुद्धी; विचारशक्ती. (क्रि. चालणे). ३. लक्ष; गती. ४. (ल.) अग्रभाग; वरचा भाग; टवका; उंचवट्याचा भाग.५. नांगराचा एक भाग. ६. पहा : डोई २, ३. [क. डवूगे] (वा.) डोके असणे –अक्कल असणे. डोके उचलणे –१. नावलौकिकाला चढणे. २. पुंडावा सुरू करणे. डोके उठणे, उकलणे –डोके दुखू लागणे; त्रास होणे; कटकट होणे : ‘आठ पंधरा दिवस लोकांनी फार कावकाव केली होती. त्याचं डोकं उठलं होतं.’ –रब ४७४. डोके काढणे, वर काढणे –उदयास येणे; वैभवाला चढणे; पुन्हा भरभराटीला येणे. डोके खाजवणे –१. त्रास, उपद्रव देणे. २. आठवण करण्याचा प्रयत्न करणे; आठविणे. डोके चढणे –डोक्याला त्रास होणे; डोके जड होणे; संतापणे. डोके चेंडूप्रमाणे करवू देणे –मानहानी किंवा शिव्याशाप घेणे. डोके टेकणे –१. आग्रहपूर्वक बसविणे, राहण्यास भाग पाडणे. २. थकणे; खचणे; अशक्त होणे. ३. आधार घेणे; आश्रय करणे. ४. हार पत्करणे. डोके ठिकाणावर येणे –शुद्धीवर येणे; शांत होणे; विचार स्थिर होणे. डोके तावणे –अत्यंत परिश्रम, त्रास घेणे. डोके देऊन बसणे, देणे –१. निश्चयाने चिकाटीने एखादे काम करावयास लागणे. २. (निंदार्थी) लोचटपणाने आणखी राहणे, बसणे (पाहुण्याने). ३. एखाद्याला बुडवून पुन्हा शांत असणे, काहीच घडले नाही असे दाखविणे; निर्लज्जपणे वागणे. डोके देणे, मारणे –१. मदत, साहाय्य करणे; कार्यभाग उचलणे. २. निश्चयपूर्वक कामाला बसणे.डोके पिकवणे –सतावणे; अतिशय कटकट करणे. डोके पिटणे –शोक करणे. डोके फिरणे –वेडे होणे; रागाने बेफाम होणे. डोके फोडणे –१. बारीक विचार करणे; डोक्याला त्रास करून घेणे. २. त्रागा करणे.डोके भडकणे –त्वेष, चीड येणे; अत्याचारी बनणे; रक्त तापणे : ‘या अनत्याचारी चळवळींत कुणाचेंहि डोकें भडकूं देतां कामा नये.’ –के २७·५·३०. डोके भणाणणे –अति विचारांमुळे, गोंगाटामुळे काहीच कळेनासे होणे. डोकेमारणे –१. शिरच्छेद करणे. २. नुकसान करणे; बुडविणे; आशा भंग करणे. डोकेहलविणे –प्रत्येक गोष्टीस मान्यता देणे; विरोध न करणे. डोक्याचा चेंडू करणे –सपाटून शिव्या देणे; भडकणे; अति रागावणे. डोक्याचे उखळ करणे–१. आग पाखडणे; संतापणे. २. वाईट रीतीने वागवले असता सहन करणे. डोक्याचे केस नाहीसे करणे –फजिती करणे; रागे भरणे. डोक्याचे खांद्यावर येणे –चिंता, काळजी दूर होणे, हलकी होणे; संकटाचे निराकरण होणे. डोक्याच्या वाटेने कर्ज देणे –१. ताबडतोब कर्ज फेडणे. २. कष्ट, हमाली करून कर्जफेड करणे. डोक्याच्या वाटेने घेणे–नम्रतापूर्वक (साष्टांग नमस्कार घालून) घेणे. डोक्यात किडा सोडणे –नाही तो विचार मनात आणून देणे. डोक्यात मशाल पेटणे –खूप राग येणे. डोक्यात राख (माती) घालणे –फार रागावणे; चरफडणे; त्रागा करणे. डोक्यातून काढून टाकणे –विचार सोडून देणे; स्मरणातून नाहीसे करणे. डोक्याने चालणे –१. अभिमानाने, ताठ्याने चालणे; गर्व होणे; वाहणे. २. शहाणपणाने वागणे. डोक्याने चालत येणे –नम्रपणाने येणे; नम्रपणा धरणे. डोक्याला हात लावून बसणे –स्वस्थ बसून राहणे; निराश होणे. डोक्यावर खापर फोडणे, फुटणे, डोक्यावर हंडी फुटणे – (निरपराधी असता) एखाद्याच्या माथी दोष लावणे; (वाईट कृत्याचा) आळ, आरोप ठेवणे. डोक्यावर घेणे –१. एखादी गोष्ट पत्करणे; त्याची जबाबदारी घेणे. २. वाईटपणा, दोष स्वतःवर घेणे. डोक्यावर चढणे, बसणे –एखाद्याला न जुमानणे; त्याविरुद्ध बंड करणे. डोक्यावर दिवस येणे, सूर्य येणे–दुपार होणे. डोक्यावर धूळ घालणे–१. चिंतेमुळे दुःखित होणे; दुःखाची दुस्सहता दाखवणे. २. एखाद्या कामाच्या पाठीमागे लागल्यामुळे अत्यंत हाल–अपेष्टा भोगणे. डोक्यावर पदर येणे–१. वैधव्य प्राप्त होणे. २. (ल.) लोकांत येण्याची लाज वाटणे. डोक्यावर बसणे–वरचढ होणे; बढती मिळवणे. डोक्यावर बसविणे–(कमी प्रतीच्या व्यक्तीचा) वाजवीपेक्षा जास्त गौरव करणे; त्यांच्या मताने चालणे; अधिक मान देणे; फाजील लाड करणे. डोक्यावर मिरे वाटणे –१. एखाद्याविरुद्ध उठून त्यावर वर्चस्व ठेवणे. २. मुळीच न जुमानणे; वरचढ होणे. डोक्यावर विळविणे–एखाद्यावर चुकीने दोष लादणे; दोषारोप ठेवणे. डोक्यावर हात घेऊन येणे –रिकाम्या हाताने येणे; इच्छित वस्तू न मिळाल्याने निराश होणे. डोक्यावर हात ठेवणे–१. आशीर्वाद देणे. २. फसवणे; लुबाडणे. डोक्यावर हात ठेवून जाणे–सर्वस्वी नागविले जाणे; (रिक्त हस्ते) कफल्लक करून निघून जाणे. डोक्यावरचे केस मोजणे –चिकित्सेने पारख करणे; सूक्ष्म दृष्टीने पाहणी करणे : ‘इंग्रजानी मात्र सर्व लोकांच्या डोक्यावरचे केस मोजून ठेवले होते.’ –लोश ३११. डोक्यावरील पदर काढणे–१. उघडपणे खरे स्वरूप प्रकट करणे. २. निर्लज्जपणे वागणे. डोक्यावरून जाणे–न समजणे; डोक्यात न शिरणे. डोक्यावरून पाणी जाणे –१. अनाथ, निराधार होणे; संकट व नुकसानीमुळे लाचार होणे. २. परिस्थिती हाताबाहेर जाणे; संकट कुवतीबाहेरचे असणे. डोक्यावर हात फिरवणे–फसवणे; लुटणे. (हजारांचे) डोक्यास पाणी लावणे–हजार लोकांना, ते म्हणतील ते करून, खूष ठेवण्याचा प्रयत्न करणे. डोक्यास पाणी लावून ठेवणे –शिक्षा भोगण्यास तयार होणे, सज्ज असणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

डोकें

न. १ सर्वअर्थीं डोई पहा. २ बुद्धि; विचारशक्ति; (क्रि॰ चालणें). ३ लक्ष; गति. ४ (ल.) अग्रभाग; वरचा भाग; टवका; टाळू; उंचवट्याचा भाग. ५ नांगराचा एक भाग. [ ] ॰म्ह-डोकें की फोकें (खोकें). वाक्प्रचार व सामाशब्द यांसाठीं डोई पहा. ॰असणें-अक्कल असणें. ॰उठव्या-हट्टी; त्रासदायक; कटकट्या (भिकारी). ॰कूट-न. (ना.) माथेफोड. ॰खरडणें- तासणें-अकुशलपणानें हजामत करणें. ॰बाज-वि. हुषार; कल्पक. ॰भडकणें-त्वेष, चिड येणें; अत्याचारी बनणें; रक्त तापणें. 'या अनत्याचारी चळवळींत कुणाचेंहि डोकें भडकूं देतां कामा नये.' -के २७.५. ३०. डोक्याचा-पु. (कों.) न्हावी. डोईचा पहा. 'एक राजा सलो तेच्या डोक्यांत सलें शिंग...तें डोक्याच्याला उमगले' -लोक २.२८.

दाते शब्दकोश

दु

अ. अभाव, निकृष्टपणा, दुष्टपणा इ॰ कांचें वाचक दुर् उप सर्गाबद्दल समासांत योजावयाचे मराठी रूप. जसें:-दुकाळ = दुष्काळ; वाईट काळ; दुबळा = बलहीन; दुर्बळ. [सं. दुर्; दु; दुस्; प्रा. दु] दुआळणें-उक्रि. (महानु.) दुखविणें; पिटणें; पीडा देणें. 'तंवं हडपिनी वारिकी दुआळिलीं ।' -शिशु ५५८. [दुआळी] दुआळी-स्त्री. पीडा; क्लेश; दुर्बुद्धि; पीडा करण्याची बुद्धि. -मनको. [दु = वाईट + आळी हेतु, इच्छा ?] दुएत-स्त्री. दुवेत; गर्भपात होणें; दुपावणें; नासवणें; (प्र.) दुवेत पहा. दुकळ-पु. १ दुकाळ; दुष्काळ; महागाई; महर्गता. २ (सामा.) (एखाद्या पदार्थाची) अतिशय दुर्लभता व्हावयाजोगें स्वल्पत्व; उणीव; कमीपणा; अभाव. 'कोंकणांत लांकडास दुकळ नाहीं. 'दुकाळ पहा. [सं. दुस् + काळ; प्रा. दुकाळ] म्ह॰ दुकळांत तेरावा महिना. दुकळणें, दुकळावणें-अक्रि. (क्व.) (निंदार्थीं) (दुष्काळ इ॰ कांमुळें मनुष्य इ॰ कानीं) अन्नाविषयीं हापापणें; लोलुप होणें; बुभुक्षित होणें (अधाशाप्रमाणें खाणारास किंवा घरीं यथेच्छ खावयास असूनही घरोघर जेवणास जाणारास उद्देशून निंदार्थीं प्रयोगांत उपयोग). 'नाहीं दुकळलों अन्ना । परि या मान जना- र्दना ।' -तुगा १०४८. 'असले वाईट आंबे खावयास मी केवळ दुकळावलों नाहीं.' [दुकळ] -ळाचा पाया-पु. १ दुष्काळाचें पूर्वचिन्ह. २ (व्यापक) नाशाचें, दारिद्र्याचें पूर्वललक्षण. दुकळा- वि. (गो.) दुष्काळांतला; दरिद्रीपणानें वागणारा. [दुकळ] दुकाळ-पु. १ महागाई; दुष्काळ. २ (सामा.) (एखाद्या वस्तूची, पदार्थाची) दुर्लभता; अभाव; टंचाई; उणीव. दुकळ दोन्ही अर्थी पहा. [सं. दुष्काल; प्रा. दुकाल] म्ह॰ १ दुकाळीं माळी सुकाळीं साळी = सुकाळाच्या वेळीं साळ्याच्या धंद्याचें महत्त्व वाढतें तर दुकाळांत माळ्याला महत्त्व येतें. २ (कर.) दुकाळांत खाल्लें आणि भांडण्यांत काढलें. दुःकाळ-पु. (महानु.) दुकाळ. 'दारूणसंसारुदुःकाळीं । जेणें परमानंदाची रांकधनी केली ।' -शिशु ५. दुकाळणें-अक्रि. महाग, दुर्लभ, दुर्मिळ होणें. [दुकाळ] दुकाळ्या-वि. दुष्काळग्रस्त; दुकाळानें पीडित झालेला. त्यांस असें जहालें कीं, दुकाळियास मिष्टन्न मिळतें तसें जहालें.' -भाब १८. [दुकाळ]

दाते शब्दकोश

अशी आडवी रेघ. (क्रि॰ मारणें; ओढणें; करणें). दुलंगी पेंच-पु. कुस्तींतील एक पेंच. दुलडी-स्त्री. स्त्रियांच्या गळ्यांत घालण्याचा दोन सरांचा एक दागिना. 'ताईत सांखळी गळाची दुलडी । बाजुबंद जोडी हातसर ।' तुगा २९५९. 'पेट्यांचें येकदाणें, तदुपरि दुलडी कंठदेशीं तयेच्या ।' -सारुह ६.२३. [दु + लड = सर] दुलंड- वि. दोन्ही पक्षांशीं विश्वासघात, बेइमानी करणारा. दुलंडी- दी-पु. (कों.) एका गांवांत राहून दुसर्‍या गांवीं शेती करणारा मनुष्य. दुलांकूडपण-न. एकमेकांवर घासलीं जाणारीं दोन लांकडें तीं समुच्चयानें. 'दुलांकुडपण सांडिलें । आणि आगीपणें मांडिलें । तैंचि आगी जालें । इंधन कीं ।' -अमृ ७.३२. दुलाचा, दुला(ली)च्या, दुलंच्या-स्त्रीअव. दुगाण्या; जनावराच्या मागच्या लाथा; दुमच्या. (क्रि॰ झाडणें). दुलावा-वि-व्या-वि. इकडची गोष्ट तिकडे व तिकडची इकडे सांगून कज्जा लावण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा; कळलाव्या; आगलाव्या. [दु + लावणें] दुल्लड-स्त्री. स्त्रियांचें एक दोन पदरी कंठभूषण. '३३ दुल्लडी मोत्यांची.' -वाडसभा १.५७. दुलडी पहा. दुल्लडी-वि. दोन पदरी; दोन सर असलेलें. दुवक्त-वक्तां-वख्तां-क्रिवि. १ सकाळीं व संध्याकाळीं अशा वेळीं. २ (सामा.) दोनदां; दोन वेळां. 'नित्य घरीं दुवख्ता पाणी भरावें, मग जे होणार तें होतच आहे.' -रा ८.२०१. 'संमेलन सकाळ व दुपार असें दुवक्त भरलें होतें.' -केसरी १४.६.३०. पृ. ३. [सं. दु; फा. दू-वक्त्] दुवारणें- उक्रि. दुसारणें पहा. दुवारा-वि. दोनदां सडलेला, कांडून स्वच्छ केलेला (तांदूळ). [दु + वार = वेळ] दुवारेंन. (राजा.) एक- वार कांडलेल्या साळी पाखडल्यानंतर तांदूळ अधिक स्वच्छ व्हावे म्हणून त्यांना पुन्हां कांडतात ती क्रिया. [दुवार] दुवाळ-स्त्री. (विणकाम) एकसंध विणलेले दोन पंचे; दोन पंचांचें कापड; वातिळ, चवाळें पहा. दुवाळणें-अक्रि. (कु.) एकदां सांगितलेली हकीगत पुन्हां सांगताना किंचित् फेरबदल करून सांगणें. [दु + वेळ] दुवेत-न. १ (गाय, म्हैस इ॰ जनावरांची) दुसरी प्रसूति. २ (गाय, म्हैस इ॰ जनावरांस) दुसर्‍या प्रसूतीच्या वेळीं झालेलें वासरूं; पारडूं. ३ (ल.) (संतापानें म्हणतात) खोडसाळ व द्वाड मूल. [दु + वेत = विणें; प्रसूति] दुवेत-वेती-वि. दोनदां व्यालेली (गाय, म्हैस इ॰). [दु + वेत] दुवेळां-वेळीं-क्रिवि. दोन वेळां; सकाळीं व संध्याकाळीं; दुवख्तां. [दु + वेळ] दुवोत्रा, दुहोत्रा-वि. दुहो- तरा पहा. दुव्वा-पु. गंजिफांतील, पत्त्यांतील दोन ठिपक्यांचें पान. दुशाख-स्त्री. हंड्यांतील दिवे, मेणबत्त्या लावतां येण्यासाठीं एका टोंकास दोन-तीन वांकडी लोखंडी शिंगें लावलेली काठी. प्रसंगविशेषीं मशालीसारखाहि हिचा उपयोग होतो. [दु + शाखा = फांदी, फांटा] दुशाल-दुशालास्त्रीपु. दुहेरी शाल, शालजोडी. 'शालू रंगलाल वर पिवळी दुशाल.' -पला ४.४२. ' मृदुशय्येवर जी पहुडावी ओढुनि तलम दुशाला ।' -विक ५२. [गु. दुशाल] दुशिडी(महागिरी)-पु. दुकाठी, दोन डोलकाठ्यांचें, शिडीचें गल- बत. दुशि(शी)कडे-क्रिवि. १ दोन्ही बाजूंस, अंगांस. २ दोन्ही दिशांनां. दुशिंगी-वि. (गो.) दोन शिंगें असलेलें (जनावर इ॰). [दु + शिंग] दुशोला-पु. जोड शामदान. 'मोमबत्तीचे दुशोला, येकशोला याप्रमाणें जिन्नस ...' -रा ७.१५६. [दु + अर. शुअला = ज्योत] दुसड-स्त्री. (राजा.) तांदूळ स्वच्छ व्हावे म्हणून ते दुसर्‍यांदा कांडण्याची, सडण्याची क्रिया. [दु + सडणें = कांडणें] दुसड-डा-डी-वि. १ दोनदा कांडून स्वच्छ, निर्मळ केलेले (तांदूळ). २ (वर्षांतून) जिच्यांतून दोन वेळां पीक काढलें जातें अशी (जमीन); वर्षाचें पहिलें पीक काढल्या- नंतर त्याच जिराईत जमिनींत त्याच वर्षीं काढलेलें (दुसरें पीक इ॰ दुसोटा पहा). दुसडी-वि. दोनच आचळ जिला आहेत अशी (बकरी इ॰). [दु + सड = स्तन, आचळ] दुसढ-स्त्री. (प्रां.) (सामा.) (एखादें काम इ॰ काची) पुन्हां केलेली आवृत्ति; दुसारणी. [दु + सडणें] दुसरणी-क्रिवि. पुनः; दुसर्‍यांदा; दुसर्‍यानें. दुसरणी, दुसरणें-दुसारणी, दुसारणें पहा. दुसरद-स्त्री. दोन सरहद्दी. दुसरा-पु. दोन सरांचा, दुपदरी हार. 'हा निळ्यांचा दुसरा । या बुद्धी हातु घातला विखारा । कां रत्नें म्हणोनि गारा । वेंची जेंवि ।' -ज्ञा ९.१४८. [दु + सर] दुसा-वि.) खालच्या दाढा आणि दोन दांत आलेला (बैल). दुसांजां-क्रिवि. (राजा.) जेवणाच्या दोन्ही वेळीं; सकाळीं व संध्याकाळीं; दुवेळां. [दु + सांज] दुसाड-डा-डी-वि. दोनदां कांडून स्वच्छ केलेला (तांदूळ); दुसड पहा. दुसार-अ. सोंगट्यांच्या खेळांतील एक पारिभाषिक शब्द. (क्रि॰ उठणें; निजणें; जाणें). दुसारणी- स्त्री. (कों.) एकवार नांगरलेली जमीन दुसर्‍यांदा नांगरण्याची क्रिया; दुसरण्याची क्रिया. [दुसारणें] दुसारणी-क्रिवि. पुन्हां; दुसर्‍यांदा; दुसरणी (-क्रिवि.) पहा. दुसारणें-अक्रि. (कों.) कोंबड्यानें पहांटेस दुसर्‍यांदा आरवणें. दुसारणें-उक्रि. (एखादी गोष्ट) दुसर्‍यांदा क्रियेचा विषय करणें; तीच गोष्ट पुनः करणें. जसें:- शेत पुन्हा नांगरणें, पुस्तक पुन्हा वाचणें इ॰दुसाला- ली-वि. दोन वर्षांचा; चालू व गतसालाचा. 'दुसाला-वसूल-हिशेब-उत्पन्न इ॰' (हें विशेषण लिंगवचनांनीं अविकृत राहतें) 'परगणे पाटोदें येथील हिशेब सन संमान दुसाला दप्तरीं विल्हे लावला नव्हता-' -वाडबाबा २.८५. 'या गांवाची वहिवाट दुसाला आम्ही केली.' [दु + साल = वर्ष] दुसोटा-पु. (देशांत रूढ) नुकतेंच काढून घेतलेल्या पिकाच्या जमीनींतून लागलीच पुनः घेतलेलें पीक. दुसड पहा. 'दुसोट्याचा-हरभरा-गहूं-जमीन-शेत- वावर. -ट्याची-दुसवट्याची पेरणी-स्त्री. दुसोट्याची पिकाची पेरणी. 'दुसवट्याच्या पेरणी करतां जमिनी वजविल्या पाहिजेत.' -शे ३.५. ट्याचें पीक-न. मागलें पीक. दुहस(ज)बी, दुहजी-वि. १ दोन कान, दोन डोळे इ॰ सर्व मुखावयव दिसायाजोगें व भिंत इ॰ काकडे पृष्ठदेश (मागील बाजू) असलेलें भिंत इ॰ कावर काढलेलें (चित्र); दुचश्मी अर्थ १ पहा. याच्या उलट एकचष्मी, एक डोळी इ॰ २ जें दोन्हीकडे लागू पडतें असें (वाक्य, शब्द इ॰). ३ जें एका रूपांत थोडासा फेरबदल करून दुसर्‍या रूपांत सहज दाखवितां येईल असें (चित्र, आकृति आंकडा, इ॰) जसें:-थोडासा फेरबदल केल्यास तीन या आंकड्याचा चार हा आंकडा व नऊ या आंकड्याचा सहाचा आंकडा बनतो त्याप्रमाणें. ४ दोन कामीं योजतां येणारा; दोन कामीं उपयोगी पडणारा (चाकर, घोडा, जनावर, जिन्नस इ॰). [दु + अर. हस्ब्] ॰मत-न. वैकल्पिक मत. दुहाता बगली- वि. (मल्लखांब.) मल्लखांबाच्या बगली उडीचा एक प्रकार. मल्लखांबाच्या बाजूचा हात बगलीप्रमाणें बांधून, दुसरा हात बगलीप्रमाणें न लावतां मल्लखांबाच्या पुढच्या अंगास लावावा. नंतर बगलीप्रमाणें अंग उडवून मल्लखांबास पाय लावून साध्या बगलीप्रमाणें पकड बांधावी व हात सोडून उठावें. नंतर पुनः त्याचप्रमाणें दोन हाताची बगल करीत जावें म्हणजे ही उडी होते. -व्यायाम-मे १९२३. [दु + हात + बगली] दुहार-स्त्री. (प्रां.) १ दुसारणी; दुसारण्याची क्रिया. २ दोन ठिकाणीं असलेला, चालविलेला (रोजगार, व्यवहार, शेती इ॰). [दसार] दुहारणी-स्त्री. आवृत्ति; पुनः तेंच काम करणें; दुसारणी. दुहा- रणें-(विप्र.) दुसारणें पहा. दुहांशी-वि. दोन्ही बाजूंना, कडांना नक्षीदार किनार, हांशे लावलेली (शाल इ॰); याच्या उलट चौहाशी. (दु + हाशिया = काठ, किनार] दुहाळ-स्त्री. (कों.) एकसंधि विणलेली दोन पंचांची जोडी, दुवाळ पहा. दुहिरी, दुहेरा-री-वि. १ दुपदरी (वस्त्र इ॰). २ दुप्पट; द्विगुणित (काम, श्रम इ॰). ३ दोहोंनीं बनलेलें. दुहेरी इष्ट- राशि-राशिक-पुन. (गणित.) ज्यांत अज्ञात, अव्यक्त संख्या दोन किंवा दोनदां घ्याव्या लागतात तें इष्टराशिक. [दुहेरी + इष्ट + राशि] दुहिरी उच्चालकपु. कात्री, आडकित्ता, चिमटा, सांडस इ॰ सारखी जोडतरफ (इं.) डबल् लिव्हर्. -यंस्थि ६६. दुहिरी चौकट-स्त्री. बाह्यांनीं दोन चौकटी जोडून केलेली चौकट; जोड चौकट. दुहिरी डागिना-पु. दोन अवयव असलेला डागिना. दुहिरी पा(फा)सोळीचा-वि. शरीरानें जाडाजुडा असलेला; लठ्ठ; गुबगुबीत; मजबूत बांध्याचा; दुहेरी हाडाचा, अंगकाठीचा (मनुष्य). दुहिरी पाहरा-पु. दोन शिपाई मिळून असलेला, दोन शिपायांचा पाहरा, चौकी; जोड पाहरा. दुहिरी वहिवाट- वही-स्त्री. (जमाखर्चात) दुहेरी जमाखर्च. दुहिरी सरकत- स्त्री. (गणित) दुहिरी सरकत वांटणी. दुहिरी हाडाचा-वि. जोड फांसळीचा; चांगल्या अंगाबांध्याचा, हाडपेराचा. दुही- स्त्री. द्वैत; यादवी; दुई; बेकी; द्वंद्व; भांडण. दुहेरा-वि. दुहिरी. दुहेरी-वि. १ दुपदरी. २ दोन प्रकारचा. ॰तारे-पुअव. एकाच केंद्राभोंवतीं किंवा एकमेकाभोंवतीं फिरणारे दोन तारे; (इ.) बाय- नरी स्टार्स्. ॰तारायंत्र-न. तारेच्या दोन्ही टोंकांला एकाच वेळीं संदेश देणारें तारायंत्र. ॰पाट-पु. (पत्त्यांच्या खेळांत खेळ) इस्पिक राणी-चौकट गुलाम किंवा किलवर राणी-बदाम गुलाम या प्रकारचे दोन जाड (दोन बिझिकें). ॰वक्रीभवन-न. प्रकाशकिरणाची भिन्न पदार्थांतून जातांना दोन वेळां होणारी मार्गच्युति. (इं.) डबल रिफ्रॅक्शन. ॰शह-पु. (बुद्धिबळांचा खेळ) बुद्धिबळांच्या खेळांत एखाद्या मोहर्‍याच्या पगांत असलेलें आपलेंच दुसरें मोहरें खेळून दोन्ही मोहर्‍यांचा प्रतिपक्षीय राजा- वर एकदम केलेला मारा. दुहोतरा, दुहोत्रा-पु. दरमहा दरशेंकडा दोन टक्के व्याजाचा दर.

दाते शब्दकोश

दुआळी      

स्त्री.       पीडा; क्लेश; दुर्बुद्धी; पीडा करण्याची बुद्धी. – मनको.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दुआसन      

न.       घोड्यावरील खोगीर : ‘बुद्धि दुआसन घेतलें कैसें : तिहीं लोकीं ’ – रुस्वन ६४५.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दुर्बुद्धी, दुर्मती      

स्त्री.       १. दुष्ट मनोवृत्ती; खुनशी स्वभाव; मनाचा दुष्टपणा. २. मूर्खपणा; अनिष्टपरिणामकारक बुद्धी.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दुर्भाव      

पु.       १. दुष्ट भावना, भाव, बुद्धी. २. संशय; वाईट ग्रह. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दुशमन, दुश्म(स्म)न, दुम्मान

पु १ शत्रु; वैरी. २ सर्वसाधारण शत्रु. [फा. दुश्मन्] ॰म्ह॰ १ दाहाचा हात दुशमना- वरही पडूं नयें = दहा माणसांनीं एकट्या शत्रूवरहि हात टाकूं नयें. २ दुशमन असावा पण दाणा असावा = शत्रु पुरवेल पण तो समं- जस, उदार, असावा. दुशमनकी, दुशमनगिरी, दुशमनगरी, दुशमनी-स्त्री. १ वैर; शत्रुत्व; द्वेष. २ शत्रुत्वाचें, द्वेषमूलक कृत्य, वागणूक. दुशमनदावा-पु. (सामा.) द्वेष; मत्सर; वैर- बुद्धि. (क्रि॰ करणें; धरणें; बाळगणें; पाळणें). [दुश्मन् + दावा]

दाते शब्दकोश

दुसरा, दुसरे      

पु. न.       दोन सरांचा, दुपदरी हार : ‘हा निळ्यांचा दुसरा । या बुद्धी हातु घातला विखारा ।’ –ज्ञा ९·१४८.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

धारावाहिक      

वि.       १. क्रमाक्रमाने येणारी (दूरदर्शन इ. वरील मालिका). २. एकाच विषयाच्या ठिकाणी बराच वेळ तदाकार, एकरूप झालेली (बुद्धी).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

धारावाहिकबुद्धि

धारावाहिकबुद्धि dhārāvāhikabuddhi f (S धारा, वाहिक, & बुद्धि. An understanding that pursues its object as a stream its course.) Closeness or intentness of thought: undiverted and unintermitting prosecution (of any subject of meditation or study).

मोल्सवर्थ शब्दकोश

धारणा

(सं) स्त्री) धरण्याची शक्ति. २ बुद्धि.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

स्त्री. १ स्मरणशक्ति; बुद्धि. 'ऐसा पुरुष धारणेचा । तोचि आधार बहुतांचा ।' -दा ११.६ १९. २ अष्टांग योगां- तील आठ अंगांपैकीं एक; श्वासनिरोध, चीत्तैकाग्रता व सर्व नैसर्गिक वासनांचा निग्रह इ॰ 'तये स्वरूपीं चित्ता । निर्धारेंसी धारणा धरितां ।' -एभा ७.३५. 'न करितां ध्यान न करितां धारणा । तो नाचे किर्तनामाजी हरी ।' -तुगा २४३३. ३ धैर्य; धीर; मनाचें स्थैर्य.'यदृच्छा आहारू न मिळे । तरी धारणेसि न टळे ।' -एभा ८.३३. ४ तर्‍हा; ढब; विशिष्ट, योग्य पद्धत. ५ सरळ मार्गाचा दृढ अवलंब. ६ चिवटपणा. -पदाव १२२. ६ (व.) कट्टी करण्याचीं मापें; बट्टा. [सं. धृ-धारणा) ॰पटु-वि. स्मरण शक्तीचा धड. [धारणा + सं. पटु = कुशल]

दाते शब्दकोश

धारणा      

स्त्री.       १. स्मरणशक्ती; बुद्धी. २. अष्टांगयोगातील आठ अंगांपैकी एक; श्वासनिरोध, चितैकाग्रता व सर्व नैसर्गिक वासनांचा निग्रह इ. ३. धीर; धैर्य; मनाचे स्थैर्य : ‘यदृच्छा आहारू न मिळे। तरी धारणेसि न टळे ।’ - एभा ८·३३. ४. ढब; तऱ्हा; विशिष्ट, योग्य पद्धत. ५. सरळ मार्ग अवलंबणे. ६. चिवटपणा. ७. कट्टी करण्याची मापे; बट्टा. ८. निष्ठा; श्रद्धा; आदर. ९. समजूत; कल्पना. [सं. धारणा]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

धी

स्त्री. बुद्धि; मन; मति. [सं.]

दाते शब्दकोश

(सं) स्त्री० बुद्धि, मति.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

धी      

स्त्री.       बुद्धी; मती; मन. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

धोरणी      

वि.       दूरवर विचार करण्याची बुद्धी ज्याला आहे असा; धूर्त; दूरदृष्टी असलेला; तर्ककुशल.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

धोरणी

वि. दुरवर विचार करण्याची बुद्धी ज्यास आहे असा; धूर्त; दूरदृष्टी असलेला. अनुसंधानी; तर्क बांधण्यांत हुशार. धोरण पहा. [धोरण]

दाते शब्दकोश

धरसोड

स्त्री. १ कांहीं धरणें, कांहीं सोडणें असा प्रकार; चंचलता; द्विधा वृत्ति; अस्थिर बुद्धि. 'नवी तर्‍हा प्रघातांत आण- तांना धरसोड फार होते. 'विवि ८.७. १२५. २ विचारपूर्वक, निश्चित योजना (निषेधार्थी प्रयोग). 'तूं बोलतोस परंतु तुझ्या मागील आचरणावरून तुझ्या बोलण्यांत धरसोड दिसत नाहीं.' [धरणें + सोडणें]

दाते शब्दकोश

धुरे

वि. अग्रगण्य; श्रेष्ठ. 'तुका म्हणे इच्छा पुरे । ऐसी धुरे हे विठ्ठले ।' -तुगा १०५३. -क्रिवि. पुढें; प्रामुख्यानें. 'ते बुद्धि धुरे करुनी । कर्म करिती चित्त देउन ।' -ज्ञा ५.६१. [धुरा]

दाते शब्दकोश

एकांगी      

वि.       १. एकाच बाजूला सुंदर रंग, बेलबुट्टी वगैरे असलेले (चीट, रेशीम, मलमल, कापड इ.) २. एकालाच पुरेसा (पलंग, चटई इ.). ३. एकच गुण, बुद्धी, व्यवहार, ज्ञान इ. असलेला; एकदेशी; एकाच बाजूकडे लक्ष देणारा; दुसरी बाजू न पाहणारा. ४.कृश; सडपातळ; बारीक.(राजा.) [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

एकांगी

वि. १ एकाच बाजूस सुंदर रंग, वेलबुट्टी वगैरे अस- लेलें (चीट, रेशीम, मखमल, कापड इ॰). २ एकालाच पुरेसा (पलंग, चटई इ॰). ३ एकच गुण, बुद्धि, व्यवहार, ज्ञान इ॰ असलेला; एकदेशी. ४ (राजा.) कृश; सडपातळ; बारीक. [सं. एक + अंग] ॰खण-पु. एक बाजू चांगली असणारा; उलटसुलट बाजू असणारा चोळखण. (उ॰ मुंग्यांचा खण). ॰घर-न. एकाच बाजूस उताराचें छप्पर असलेलें घर; एकघई, एकपाखी घर. ॰झाड- न. एका बाजूस वाढणारें, फुटणारें झाड. ॰पान-न. एकाच बाजूस चांगलें असणारें (विशेषतः केळीचें किंवा विड्याचें) पान (दुसरी बाजू सुरकुतलेली किंवा इतर प्रकारें चांगली नसलेलें). ॰भांडण-न. ज्यांत एकच पक्ष भांडत आहे असें भांडण; भांडणांतील एका बाजू- चीच कैफीयत.

दाते शब्दकोश

एककली-ल्ली

वि. १ हेकेखोर; संकुचित मनाचा; एकाच ठराविक मतांनां, संवयींना, पद्धतींना किंवा गोष्टींना अगदी हट्टानें चिकटून राहणारा; प्रसंगानुसार वागण्याचें ज्ञान नसलेला; कोत्या मनाचा. २ (पाठ करणें, तर्क करणें, हिशेब करणें. कवन करणें इ॰ पैकीं) एकाच विषयाकडे स्वाभाविक कल किंवा बुद्धि असलेला; एकांगी; एकदेशीय. [एक + कल]

दाते शब्दकोश

एकलाधी

स्त्री. ऐक्य; एकमत; एकबुद्धि. ‘मग अहंकारासि एकलाधी । करूनि जीवितावधी । वहाविले बुद्धि । चराचर ।’ –ज्ञा १३.४९. [एकला + धी; किंवा एक + लाधणें]

दाते शब्दकोश

एकलाथी      

स्त्री.       ऐक्य; एकमत; एकरूपता; एकबुद्धी : ‘मग अहंकारासि एकलाधी । करूनि जिवितावधी । वहाविलें बुद्धि । - ज्ञा १३·४९.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गाढ

वि. १ गडद; स्वस्थ; भरपूर (झोंप). २ निबिड; घन (काळोख). ३ अत्यंत; दाट; घोर (अज्ञान). ४ गर्द; दाट; घनघोर (जंगल). ५ घट्ट; मजबूत; दृढ; गच्च; भरपूर. 'रसें गाढीं वरी ढिलीं ।' -ज्ञा १७.१२८. ६ आवळ; तंग; बळ- कट. 'शस्त्रें सुटतील गांढीं ।' -एरुस्व ७.७४. ७ मोठा, पुष्कळ. 'द्वात्रिंशद्धस्तांवरि करिति महागजसमान गाढ केली ।' -मोआदि २८.३६. 'तथापि ते बुद्धि न योच गाढी ।' -सारुह २.१२. ८ शूर; पराक्रमी; खंबीर. 'मानवी वीर गाढा ।' -मुवन १०.४९. ९ उत्कृष्ट; अप्रतिम. 'तुझें सौंदर्य देखोनि गाढें ।' -ह १.३०. [सं.] ॰मूढ-वि. अतिशय गडद; घोर; स्वस्थ; प्रशांत (झोप). 'येक ते गाढमुढीं पडिले । सुषुप्तिमधें ।' -दा १८.९. १९. [सं. गाढ + मूढ]

दाते शब्दकोश

गझावत

स्त्री. पवित्र बुद्धि. [?]

दाते शब्दकोश

गम्य

गम्य gamya a (S) Accessible or attainable, lit. fig.; to be approached, passed, traveled. 2 Goable, reachable, i. e. knowable. Ex. of comp. अनुमानगम्य, अभ्यासगम्य, अनुभवगम्य, इंद्रियगम्य, परिचयगम्य, बुद्धि- गम्य, विचारगम्य, व्यवहारगम्य Cognizable or intelligible--upon inference--through the senses or faculties--through or upon practice--by experience--upon conversancy or acquaintance with--by the force of understanding--through consideration or reflection--through commerce or business, or through transacting or performing. Many others occur, more or less valuable; as उपदेशगम्य Knowable upon instruction afforded; that requires to be explained or taught; गुरूगम्य That demands a Guru or teacher; भावगम्य Knowable through love and attachment of the heart; वादगम्य Knowable upon argumentation or discussion; शास्त्रगम्य Knowable from the Shástras; श्रमगम्य or साधनगम्य Knowable through exertion or toil, or through instruments, measures, means; अध्ययनगम्य, अर्थगम्य, उपभोगगम्य, तर्कगम्य, निर्णयगम्य, ज्ञानगम्य, and others not needing particular explanation. Of the above some few will be found in order; but the general sense and power of the compound and the rule of formation must be learned here. 3 Used as s n Ingress or insight into; acquaintance with (a branch of knowledge).

मोल्सवर्थ शब्दकोश

ग्राह

पु. १ नक्र; मगर; सुसर. २ पाणहत्ती. ३ (सामा.) समुद्रांतील कोणताहि मोठा प्राणी, जलचर. 'गज करवडी महा- ग्राह ।' -एरुस्व १०.८०. ग्राहक, ग्राही, ग्राहिक-वि. १ धरणारा; घेणारा; स्वीकारणारा. २ (ल.) योग्य गुणग्रहण करणारा; चाहता. ३ ज्ञाता; जाणता. 'येथें कोणी ग्राहक असल्यास न्यायशास्त्रांतील विषय काढूं.' (समासांत) गुणग्राहक-रस- ग्राहक इ॰ ४ गिर्‍हाईक; माल विकत घेणारा. 'ग्राहीक पातला परमनिका ।' -मुआदि १८.१२९. ग्राहकबुद्धि-स्त्री. विषय ग्रहणाविषयीं कुशल बुद्धि. -वि. तद्विशिष्ट मनुष्य. ग्राहकी- हिकी, ग्राहिकै-स्त्री. १ गिर्‍हाइकी. २ खरेदी. 'आतां सुखेंसि जीविता । कैची ग्राहिकी किजेल पंडुसुता.' -ज्ञा ९.४९७. ग्राहय-वि. १ मान्य; कबूल. २ स्वीकारणें, घेणें, धरणें, पकडणें वगैरेस योग्य, शक्य, जरूर, पात्र. ग्राह्यांश-पु. तथ्य; सार; मुख्य भाग; चांगला किंवा उपयोगी पडण्याजोगा अंश; तात्प- र्यार्थ. [सं.]

दाते शब्दकोश

गर्द

स्त्री. गरद, गडद धूळ; धुराळा; छाया; काळोखी. 'मनांत संशयाची गर्द आली असेल ती काढून टाकिली म्हणजे साफ कांहींच खत्रा रहात नाहीं.' -रा ५.१६६. -वि. १ दाट (छाया). २ घूलीभूत; गडद; निबीड (झाडी). ३ नष्ट. 'टिपूचें संस्थान गर्द जालें हे सरकारचे दौलतीस चांगलें नाहीं.' -ख ११.६०५६. [फा. गर्द्] ॰होणें-नष्ट होणें. गर्दबाज, गर्दा- बाज-वि. १ घोर; निबीड; दाट; घन; किर्र (झाडी). 'त्या रानाला मारे कीं गर्दबाज झाडी लागून गेली आहे.' २ भरदार; पानांफुलांनीं भरगच्च (झुडूप, वनस्पति). ३ गहिरा; गाढ; काळाकुट्ट (पाऊस, अंधारी, छाया). गर्दबाजी, गर्दाबाजी- स्त्री. निबीडपणा; गर्दी; दाटी (गर्दबाज पहा). गर्देंस मिळ- विणें-धुळीस मिळविणें; नायनाट करणें. 'उपेक्षा केलियानें अन्यायाची बुद्धि होणार असे होते त्यांस मारून गर्देस मिळविले.' -मराआ ५.

दाते शब्दकोश

ग्रह

पु. १ घेणें; स्वीकार; अंगीकार; धरणें. २ चंद्र किंवा सूर्य यांचें ग्रहण (राहूकेतुकडून). ३ सूर्याभोंवतीं फिरणारा गोल (पृथ्वी, बुध, शुक्र, गुरु मंगळ इ॰चा); ज्योतिःशास्त्राप्रमाणें हे (सूर्यासह) नऊ आहेत; (सामा.) केंद्रस्थ, ऊष्ण व देदीप्यमान पदार्थाभोंवतीं फिरणारा, कमी उष्णतेचा परप्रकाश गोल -सूर्य २२; (ग्रहाभोंवतीं फिरणारा तो उपग्रह) ग्रह हा तार्‍याप्रमाणें दिसतो. पृथ्वीच्या दैनंदिन गतीमुळें हा उगवतो व मावळतो आणि स्वतःच्या गतीनें तार्‍यांमधून पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो. परप्रकाश असल्यानें याचें तेज स्थिर असतें. -सृष्टि. ४ एक प्रकारचें पिशाच्च, गिरा. 'जैसा ग्रहातें पंचाक्षरी । अनुमानी कां ।' -ज्ञा २.८५ (यापासून ल.) व्याधि,उपाधि, पीडा इ॰; तापदायक माणूस; खनपटीस बसणारा, पाठीस लागणारा इ॰ बद्दल म्हणतात. ५ कल्पना; भावना; मत. ६ चिकाटी. ७ उमज; अधिगम (एखाद्याच्या अर्थाचा); बुद्धि; अर्थग्रहण; अर्थबोध; धारणा; समजूत. ८ मगर; एक मोठा मासा; ग्राह. 'गज सरो- वरीं ग्रहग्रस्त । स्त्रियांपुत्रीं सांडिला जीत ।' -एभा १२.८५. [सं.] सामाशब्द- ॰कुंडली-स्त्री. पंचांगांतील ग्रहांच्या दशा दाखवि- णारी आकृति. ॰गणित-न. ग्रहांच्या गतीविषयींचें गणित. ॰गति-स्त्री. (फल ज्योतिष किंवा ज्योतिःशास्त्र) १ ग्रहांची गति. २ दृष्टि ग्रहांचा विशिष्ट रिणाम. (मुख्यत्वें माणसाचें नशीब पाहतांना) 'गृहस्थ पडले ग्रहगतीत.' ॰चार-पु. सूर्य किंवा इतर ग्रह यांची गति, भ्रमण ॰जप-पु. ग्रह प्रसन्न होण्यासाठीं त्या त्या ग्रहाच्या विशिष्ट मंत्राचा करावयाचा जप. ॰दशा-स्त्री. मनुष्यादिकांस प्राप्त होणारी शुभाशुभ फलसूचक सूर्यादि ग्रहांची दशा, दृष्टि, अवस्था, काल. ॰दान-न. नवग्रहांना प्रसन्न करण्यासाठीं ब्राह्म- णाला द्यावयाचें दान. ॰पीठ-न. ग्रहमख करण्यासाठीं नवग्रह देवता मांडण्याचा पाट, चौरंग. ॰पीडा-बाधा-स्त्री. १ प्रति- कूल ग्रह किंवा ग्रहयोग यापासून उत्पन्न होणारें दुःख, दारिद्र्य, आजारीपण इ॰. २ भूतपिशाच्च बाधा. ॰बल-न. विवक्षित राशीस ग्रहांची अनुकूलता (विवाह, उपनयन, मंगल कृत्य कर- ण्याविषयीं). ॰मख-यज्ञ-पु. ग्रहांना अनुकूल करून घेण्या- साठीं, ग्रहांच्या प्रीत्यर्थ करावयाचा यज्ञ; ग्रहशांति; नवग्रहांना उद्देशून करावयाचा होम; हा होम विवाह, मुंज व इतर शांतीच्या प्रसंगीं करतात. ॰मंडळ-न. ग्रहगोल; सर्व ग्रहांचें चक्र. ॰मैत्री- स्त्री. वधूवरांच्या पत्रिकांचा मेळ. पत्रिका जुळणें, पटणें. राशींचें स्वामी सात असल्यानें, ज्या राशींत नवरी जन्मली आणि ज्या राशींत नवरा जन्मला, त्या दोन्हीं राशींचा स्वामी एक असणें किंवा एकमेकांस अनुकूल असणें. ॰योग-पु. शुभाशुभदायक ग्रहांचा योग, स्थिति. ॰वैर-न. १ ग्रहांचें शत्रुत्व. २ पत्रिका न जमणें. याच्या उलट ग्रहमैत्री. ॰शांति-स्त्री. ग्रहमख. ॰साधन-न. १ (कोष्टक गणित किंवा दुर्बिण इ॰ यंत्रें यांच्या साह्यानें) ग्रहदशेचा निश्चय; ग्रहाचें स्थळ व गति यांचें शोधन; ग्रहांचे वेध घेणें. २ ग्रहाची आराधना. ॰सारणी-स्त्री. अमुक ग्रह अमुक ठिकाणीं आहे याचा निश्चय करण्याचीं गणितें किंवा कोष्टकें; ग्रहसाधनाचें गणित. ग्रहानुकूल्य-न. ग्रहांची प्रसन्नता, ग्रहबल. ग्रहावेज्ञ-ग्रहपीडा. ग्रहेश-पु. सूर्य.

दाते शब्दकोश

ग्रह      

पु.       १. कल्पना; भावना; मत. २. उमज; समज; बुद्धी; अर्थग्रहण अर्थबोध; धारणा; समजूत. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गति, गती      

स्त्री.       १. जा ये; चळवळ; हालचाल; गमन; धाव; प्रयाण; चाल; प्रगती : ‘रथाची गती ॥’ - ज्ञा १७·३८९. २. वर्तन; वागणूक; चाल; पद्धती : ‘परी ते गती समस्तां । न मनेल ययां ॥’ - ज्ञा २·२०३. ३. आकाशस्थ गोलांचे एकंदर परिभ्रमण, फेरी. ४. ग्रहाची आपल्या कक्षेतील दैनिक फेरी. [सं.] (वा.) गति, गती करणे - पुढे जाणे; प्रगती करणे : ‘इंग्रजी भाषेत बरीच गति केली होती.’ - आत्मवृत्त ६. गति, गती नसणे - एखादा विषय समजण्याची स्वाभाविक बुद्धी नसणे. गति, गती होणे - प्रवेश होणे; समजणे : ‘त्यांची संस्कृतात गती झाली होती.’ – कोरकि ४२९. गतीवर येणे, गतीस येणे - १. कृत्रिम (वेष, मुखवटा) टाकून मुळावर येणे. २. ताळ्यावर येणे; पूर्वीचे वर्तन टाकणे; सुधारणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गतिमति      

स्त्री.       चाल आणि बुद्धी : ‘तेयांचि गतिमति क्षाळली.’ - लीचपू १९८.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गुण      

पु.       १. मनोधर्म किंवा पदार्थाचा धर्म; त्यातील बल; तेज; सत्त्व; अंतःस्थित धर्म; विद्या, कला, सत्य, शौर्य इ. धर्म : ‘एवं गुणलक्षण ।’ –ज्ञा १७·१३१. २. (न्यायशास्त्र) रूप, रस, गंध, स्पर्श, संख्या, परिमाण, पृथकत्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व, गुरुत्व, द्रवत्व, स्नेह, शब्द, बुद्धी, सुख, दुःख, इच्छा, दोष, प्रयत्न, धर्म. ३. उत्कृष्टता; योग्यता; व्यंगापासून अलिप्तता; निर्दोषता. ४. उपयोग; फायदा; नफा; फल; लाभ. ५. निघालेले फल, वस्तू, परिणाम, निपज; उत्पन्न. ६. (ल.) वाईट वळण; वैलक्षण्य. ७. प्रभाव; परिणाम : ‘संपत्ति हें एका तऱ्हेचें मद्य आहे, तें आपला गुण केल्याखेरीज बहुधा सोडणार नाही.’ –नि ५३. [सं.] (वा.) गुण आठविणे – (मृत, गैरहजर मनुष्याच्या) चांगल्या गोष्टी स्मरणे, त्यांचा उल्लेख करणे. गुणउधळणे, गुणपसरणे, गुणपाजळणे, गुणपाघळणे – स्वाभाविक वाईट, दुष्ट स्वभाव बाहेर पडणे; वाईट गुणांचे आविष्करण करणे : ‘पत्र पुरते झाल्यावर सदाशिवराव म्हणाले हे आपल्या मातोश्रींनी कसे गुण उधळले पहा!’ –रंगराव. गुण घेणे, गुण देणे – पिशाच्चादी बाधा न व्हावी म्हणून देवादिकांपासून कौल घेणे, देणे. गुण दाखविणे, गुणगुणावर येणे – खरा स्वभाव दाखवणे. गुणा येणे – सगुण होणे : ‘गुणा आला विटेवरी । पीतांबरधारी सुंदर जो ।’ –तुगा ७. गुण येणे, गुणास येणे, गुणास पडणे – १. लागू होणे; फळणे; सुधारणा होणे; इष्ट परिणाम होणे. २. चांगल्या रीतीने वागणे. गुणाची माती करणे – सदगुणाचा दुरूपयोग करणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गुणकर      

वि.       गुणसंपन्न; बुद्धी, सुलक्षण, सद्‌गुण यांनी युक्त (मूल).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घांघु(घो)सणें, घांगोसणें

उक्रि. १ घासाघीस करणें. २ बारकाईनें शोधणें; चिकित्सापूर्वक छाननी करणें. 'जें मना आक- ळितां कुवाडें । घांघुसितां बुद्धी नातुडे ।' -ज्ञा ५.६७.

दाते शब्दकोश

घांघुसणे, घांघोसणे, घांगोसणे      

उक्रि.       १. घासाघीस करणे. २. बारकाईने शोधणे; चिकित्सापूर्वक छाननी करणे : ‘जे मना आकळितां कुवाडें । घांघुसितां बुद्धी नातुडे ।’ – ज्ञा ५·६७.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घांघवसणे      

सक्रि.       शोध करणे : ‘जें मना कलितां कुवाडें । घांघवसिता बुद्धी नातुडे ।’ – राजा ५·६७.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घारणे      

अक्रि.       १. व्यापणे; चढणे; घेरणे : ‘नेणें आपुले पारिखे । घारलें तें आपुल्या दुःखें ।’ – निगा २८३. २. कैफ इत्यादिकांमुळे उन्मत्त होणे, माजणे; झिंगणे. ३. चढणे; घेरणे; बाधा होणे; बाधणे (विष इ.); पसरणे : ‘परि तें बुद्धि विषयविखें । घारिली होती ॥’ – ज्ञा १०·१५८. ४. शिंपडणे; भिजविणे. [सं. घृ]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घारणें

अक्रि. १ व्यापणे; घेरणें. 'नेणें आपुले पारिखे । घारलें तें आपल्या दुःखें ।' -निगा २८३. २ कैफ इ॰ कां मुळें उन्मत होणें, माजणें. ३ चढणें; घेरणें, बाधणें (विष इ॰); पस- रणें. 'परि तैं बुद्धि विषयविखें । घारिली होती ।' -ज्ञा १०. १५८. 'भव भुजंगाचेनि गरळें । हे जीवजात घारैलें ।' -भाए ७७१. 'त्यासी सर्प नाहीं लागला । मा विखें केवीं तो घारला ।' -एभा २३.५९७. [सं. घृ. प्रा. घार]

दाते शब्दकोश

घडव(वि)णें

उक्रि. १ उत्पन्न करणें; बनविणें. 'तेथ इच्छा आणि बुद्धि । घडवी अंहकारेंसीं आधीं ।' -ज्ञा १३.९६८. २ घडवून आणणें; जुळवून आणणें; साधणें; शेवटास नेणें. ३ तयार करणें; बनविणें. 'तोंड्यांचा जोड तुम्हि । कां घडविल कां घडविला ।' -मसाप २.१.२७. [घडणें प्रयोजक]

दाते शब्दकोश

घडवणे, घडविणे      

उक्रि.       १. उत्पन्न करणे; बनविणे : ‘तेथ इच्छा आणि बुद्धि । घडवी अहंकारेंसीं आधीं ।’ –ज्ञा १३¿९६९. २. घडवून आणणे; जुळवून आणणे; साधणे; शेवटाला नेणे. ३. तयार करणे; बनविणे : ‘तोड्यांचा जोड तुम्हि । कां घडविला कां घडविला ।’ –मसाप २¿१¿२७. ४. घडून येणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घोळणे, घोळविणे      

उक्रि.       १. (धान्य इ. सुपात घालून हलके, बारीक, जड मोठे इ. दाणे निराळे करण्याकरिता) इकडे तिकडे हलविणे; हिंदळणे; पाखडणे. २. (दाणे किंवा अधिक पदार्थांचे) मिश्रण होण्याकरिता ताट, परात, सूप इत्यादिकांत घालून हलविणे; खुंदलणे; ढवळणे; माखणे; लेपणे : ‘ऐक्यें घोळिली बुद्धि कैसी । मानु श्रोत्यांसी वाढविला ।’ – एभा ९·४६३. ३. जोराने ओढणे व ढकलणे; खुदळणे; अपाय होईल अशा तऱ्हेने ओढाताण, हिसकाहिसकी करणे; घोळसावणे. ४. (गंजिफांचा खेळ) गंजिफांची, पत्त्यांची गल्लत करणे; पिसणे. ५. (एखादी गोष्ट) चिंतनाचा, वादाचा, चर्चेचा विषय करणे; वाटाघाट करणे; वादविवाद करणे; विचार करणे; (एखादी गोष्ट) पुनः पुनः मनात आणून मनन करणे, परत परत म्हणणे : ‘निमुटपणें वर पाहू लागली म्हणजे असे वाटे कीं कांहीं तरी तिच्या मनांत घोळत आहे.’ – पाव्ह १८. ६. खोदून खोदून विचारणे; उलटसुलट प्रश्न विचारणे. ७. (एखाद्या कामात) सरावणे; वहिवाटणे; राबत्यास पडणे. ८. (एखाद्या गोष्टीशी, गोष्टीचा) नेहमी प्रसंग पडणे; (एखादी वस्तू उदा. रुपये, दागिने इ.) हातात खेळवणे; इकडून तिकडे देणे, इकडून तिकडे ठेवणे. ९. चोळामोळा करणे; वापरणे; वर्दळीत, वापरण्यात येणे, आणणे. १०. चाळवणे; गोंधळात टाकणे; छकविणे; भुलविणे : ‘घातकी न देखो तैसा दुसरा । घोळितो नृपाला पेचुनी ।’ – दावि ४५७. ११. घुमणे ‘भटोबासांचा भिक्षाशब्द गुजरध्वनि घोळिला उमटे ।’ – स्मृस्थ २१९. १२. त्रास देणे; छळणे; जेरीला आणणे; सतावणे; जाचणे; कष्टविणे : ‘यालागीं दुकाळा करितों मनन । आम्हाहि घोळिला बहुता परीनें ।’ – दावि २७. [सं. घुण् – घूर्ण]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

घोळणें, घोळविणें

उक्रि. १ (धान्य इ. सुपांत घालून हलके, बारीक, जड मोठे इ॰ दाणे निराळे करण्याकरितां) इकडे तिकडे हलविणें; हिंदळणें; पाखडणें. २ (दोन किंवा अधिक पदार्थांचें) मिश्रण होण्याकरितां ताट, परात; सूप इ॰ कांत घालून हलविणें; खुंदळणें; ढवळणें; माखणें; लेपणें. 'ऐक्यें घोळिली बुद्धि कैसी । मानु श्रोत्यांसी वाढविला ।' -एभा ९.४६३. 'लाडवांच्या कळ्या पाकांत घोळून लाडू बांधावे.' ३ जोरानें ओढणें व ढकलणें; खुदळणें; अपाय होईल अशा तर्‍हेनें ओढा- ताण, हिसकाहिसक करणें; घोळसावणें. 'त्या मल्लानें दुसर्‍या गड्यास एक तासभर घोळविलें.' ४ (गंजिफांचा खेळ) गंजिफांची, पत्त्यांची गलत करणें; पिसणें. ५ (एखादी गोष्ट) चिंतनाचा, वादाचा चर्चेचा विषय करणें. वाटाघाट करणें. वादविवाद करणें; विचार करणें, (एखादी गोष्ट) पुनःपुनः मनांत आणून मनन करणें, घाटणें; 'निमुटपणें वर पाहूं लागली म्हणजे असें' वाटे कीं कांहीं तरी तिच्या मनांत घोळत आहे.' -पाव्ह १८. 'त्याच्या मनांत सर्वदा शास्त्र घोळत असतें.' ६ त्रास देणें; छळणें; जेरीस आणणें; सतावणें; जांचणें; कष्टविणें. 'यालागीं दुकाळा करितों मनन । आम्हाहि घोळिला बहुता परीनें ।' -दावि २७. 'लोळावें मांडीवरि तेणें द्रोणादिकांसि घोळवें ।' -मोद्रोण ३.८५. 'त्या श्लोकानें मला चार घटका घोळलें तेव्हां त्याचा अर्थ लागला.' 'घोड्यानें मला दिवसभर घोळलें तेव्हां सांपडला.' 'त्याला दुखण्यानें दोन महिने घोळलें.' ७ (सुतार-सोनारकाम) तासून, घासून, घोटून, गुळगुळीत करणें. 'कुर्‍हाडीचा दांडा अमळसा घोळ, मग चांगला बसेल.' ८ खोदून खोदून विचारणें; उलट सुलट प्रश्न विचारणें; 'चोरास जेव्हां घोळघोळून घेतलें तेव्हां कबूल झाला.' ९ (एखाद्या कामांत) सरावणें; वहिवाटणें; राबत्यास पडणें. 'त्या कामांत मी नवशिका नाहीं, दोन वर्षें घोळलेला आहें.' 'हा घोडा दोन चार दिवस घोळला म्हणजे बसावयास येईल.' १० (एखाद्या गोष्टींशीं, गोष्टीचा) नेहमीं प्रसंग पडणें; (एखादि वस्तु उदा॰ रुपये, दागिने इ॰) हातांत खेळवणें; इकडून तिकडे देणें, इकडून तिकडे ठेवणें. 'हातीं रुपये घोळवण्याजोगा प्रामाणिक माणूस कामावर ठेवावा.' ११ चोळामोळा करणें; वापरणें; वरदळींत, वापरण्यांत येणें, आणणें. 'हा आंगरखा खडखडीत लागतो पण दोन दिवस घोळला म्हणजे मऊ होईल.' १२ चाळविणें; छकविणें; भुलविणें. 'घातकी न देखो तैसा दुसरा । घोळितो नृपाला पेचुनी ।' -दावि ४५७. [सं. घुण्-घूर्ण्:प्रा. घोल्-घुमविणें; हिं. घोलना]घोळ- घोलून, घोळून घोळून-क्रिवि. १ आलटून पालटून; बदल करून; आळीपाळीनें; एकामागून एक. (क्रि॰ करणें, खाणें, घेणें, देणें). 'नित्य एकाच ब्राह्मणास दान देतोस, हें काय ? घोळून घोळून सांगावे.' २ वारंवार, पुन: पुन: घोळण्याची क्रिया करून; पुन: पुन: इकडून तिकडे हलवून, ढकलून, घोळसून, चर्चा- करून, मनांत आणून, उच्चारून, घोळणें याच्या त्या त्या अर्थीं द्विरुक्तिनें क्रिया करून. 'हा मंत्र लोकांच्या तोंडीं आपोआप येतो व तोच घोळघोळून पाठ होऊन जातो.' -सासं २.४०१. [घोळणें द्वि.] घोळीव-वि. १ घोळलेला. घोळणें पहा. २ गुळगुळीत केलेला. 'सर्वांगानें गोल असा घोंळीव हिरा कोणी गिळल्यास त्यापासून इजा होत नाहीं' -पदाव १.७०. ३ (व.) गाळीव; निवडक. [घोळणें] घोळन-क्रिवि. (गो.) एक दिलानें; श्रमविभागानें. घोळवि(व)णेंसक्रि. घोळणें पहा. 'भूदेव पदर- जांत स्वजनाकरवींहि देह घोळविले ।' -मोसभा २.४४. [घोळणें प्रयोजक]

दाते शब्दकोश

घटणें

घटणें ghaṭaṇēṃ v i ( H) To shrink or contract--cloth &c. 2 To decrease or waste--grain &c. by dryage, spillage, leakage. 3 To grow firm, compact, close set--the body or limbs. 4 To become fixed, settled, confirmed--an art or a science by practice or study. 5 To be versed, practised, well exercised and skilled in. Ex. त्या कामामध्यें त्या विद्ये मध्यें मी घटलों or माझा हात घटला or माझी बुद्धि घटली. 6 To befit or beseem; to be suitable or appropriate unto. 7 (Poetry.) To abate or decrease; to subside, go down, be appeased &c. Ex. जैसे भाजि- ले करवटे ॥ तेणें क्षुधा न घटे ॥.

मोल्सवर्थ शब्दकोश

अक्रि. १(कापड इ॰) आक्रसणें; आंखुडणें. २ (धान्य; तेल, तूप, गूळ इ॰ पदार्थ मापांत, वजनांत) कमी होणें. 'दोन मण गूळ आणला त्यांत पांच शेर घटला.' ३(शरीर, अवयव इ॰) बळकट होणें; मजबूत होणें; भरदार बनणें; सुदृढ बनणें. ४(शास्त्राभ्यास, कला, इ॰ व्यासंगानें) घोकून घोकून घोटून घोटून पक्का होणें; दृढता पावणें. 'गांवठी शाळेंतील मुलें अक्षर घटावें म्हणून बखरांच्या नकला करितात.' -विवि. ८.८ १४८. ५ (शास्त्रांत, कलेंत मनुष्यानें) तरबेज, निष्णात, कुशल होणें; सरावणें. 'त्या कामामध्यें मी घटलों, माझा हात घटला, माझी बुद्धि घटली.' ६ योग्य दिसणें; शोभणें; साजणें; सजणें; बेताचें होणें. ७ (काव्य.) कमी होणें; शांत होणें; नाहीशीं होणें; शमणें. 'जैसे भाजिलें करवटें । तेणें क्षुधा न घटे ।' ८ घट्टे पडणें; (शिथिल अवयव) दृढ होणें; झिजणें. 'कटि खांदे वाहतां घटले ।' -मध्वमुनि (नवनीत पृ. ४४६.) [सं. घट्-ट्ट]

दाते शब्दकोश

हेंग(गा)डमत

न. १ अडाणी मत; बुद्धि. २ हट्टीपणा, मंदपणा. ३ हेंगाड. हेंगडाविणें-उक्रि. १ बावळट, हेंगाडा, हट्टी इ॰ ठरविणें; नांवें ठेवणें (भाषण, कृति, व्यवहार इ॰स). २ अवहेलना, विटंबना, कुचेष्टा, कुचाळी करणें. हेंगाड दासी- स्त्री. हट्टी, हेकाड स्त्री. म्ह॰ हेंगाड दासी दादला (ल्या) नाशी.

दाते शब्दकोश

हीन

हीन hīna a (S) Deficient or defective; that wants or is without (in a measure or utterly). Used abundantly in comp.--as द्रव्यहीन, संपत्तिहीन, बुद्धि- हीन, सामर्थ्यहीन, तेजहीन, क्रौर्यहीन. Of such only the most current are inserted in order. 2 Base, low, vile, mean. हीन forms compounds of another class, very valuable, but not suitable to appear in order. Ex. हीनकुल Of low family; हीनकौशल्य Of poor or mean skill; हीनचातुर्य Of poor capacity; हीनदातृत्व Of scanty munificence or liberality; हीनबुद्धि Of feeble understanding or judgement; हीनभाग्य Of poor fortune or destiny; हीनद्रव्य, हीनवक्तृत्व, हीनशक्ति, हीनसामर्थ्य, हीना- वस्था &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

हरणें

उक्रि. १ बलात्कारानें, अन्यायानें नेणें, घेऊन जाणें; उपटेणें; अपहार करणें. २ दूर करणें; नाहीसें करणें; निवारणें (दुःख, शोक, पाप, त्रास, अडचण, दोष, रोग इ॰). 'पै हरूनि कफवात ।' -ज्ञा १४.१९६. ३ जिंकणें; जितणें (बक्षीस). 'त्यानें पहिल्या डावास शंभर रुपये मांडले ते म्यां हरले.' -अकि. १ पराभव पावणें; हटणें (युद्ध, खेळ, वाद इ॰ त). २ अपुरें पडणें; कामास न येणें; निष्फळ होणें (बुद्धि, प्रयत्न, शक्ति, शहाणपणा इ॰). ३ (ल.) फसविणें; भुलविणें. 'लाघवी हरी मेखळे । लोकु जैसा ।' -ज्ञा १५.२४१. [सं. हरण] हरतलेपण-न. अभाव; नसलेपणा. 'हें अथी तरी कायसें हरतलेपण ।' -अमृ ७.१०४.

दाते शब्दकोश

हृदय

न. १ हृत्-द् पहा. २ वक्षःस्थल; छाती. ३ (ल.) मनांतील हेतु; आशय. ४ उद्देश; खोंच; मर्म (भाषण, वाक्य इ॰ तील). [सं.] ॰भरून येणें, दाटणें-गहिंवरणें. 'तों हृदय भरोनी येतें.' -संग्रामगीतें २४. ॰फुटणें-अतिशय दुःख होणें. ॰कमल-हृत्कमल पहा. ॰देश-पु. वक्षःस्थल; छाती. समय हृदयदशा अंचलें नित्य झांकी ।' -सारुह २.५२. ॰मंदिर-न. हृदय; अंतःकरण; वक्षःस्थल. ॰हृदयंगम-वि. चित्ताकर्षक; मोहक; हृद्य; आवडता; सुंदर; मनोहर हृदयवान्-हृदयालु-हृदयी- वि. सकरुण; दयाशील; कोमल अंतःकरणाचा. ॰विश्राम-पु. (मनाचें विश्रांति स्थान) परमेश्वर. ॰शून्य-वि. १ निर्दय; निष्करुण; क्रूर. २ बुद्धि, मनाची शक्ति कमी असलेला. ३ उदासीन; नष्टचित्त; विमनस्क. ॰स्थ-वि. अंतःर्यामी असणारा. हृदयाराम-वि. अंतःकरणास शांति, आराम देणारा; हृदय- विश्राम; देवाचें अभिधान. 'निजजन हृदयारामा ।' हृदयीं- आलिंगणें-हृदयाशीं धरणें; मिठी मारणें.

दाते शब्दकोश

हस्त

पु. १ हात; कर. २ कोंपरापासून मधल्या बोटाचे टोंकापर्यंतची लांबी; तितक्या लांबीचें माप; चोवीस अंगुळींचें परिमाण. ३ हत्तीची सोंड. ४ तेरावें नक्षत्र (अव. प्रयोग). ५ खांबाचा वरचा भाग व त्यावर पेललें जाणारें ओझें किंवा पाखाडी यांमधील ठोकळा, लांकडी चापट तुकडा. ६ (बुद्धि- बळें) एकदां प्याद्यास हात लावला कीं तें खेळलेंच पाहिजे अशी खेळाची रीत, प्रकार (विशेषण, क्रियाविशेषण किंवा उद्गार- वाचक प्रयोग होतात). [सं.] ॰क-पु. १ हात. 'दोन हस्तक व तिसरें मस्तक' यांनीं नमस्कार करणें, एवढेंच काय तें देण्या- सारखें राहिलें आहे अशावेळीं म्हणावयाचा प्रयोग. २ मदत- नीस, हाताखालचा आज्ञांकित माणूस. ३ एखाद्याच्या सांगण्या- वरूंन, चिथावणीनें काम करणारा इसम, गुमास्ता, अडत्या, एजंट ॰कडें -कडगें-न हातातील कडें. 'हस्तकडगें देऊनि कौळिक मागें फिरविले ।' -सप्र ३.७८. ॰कौशल-ल्य-न. हातकसब; हातकामातील नैपुण्य, हातोटी; हाताची कारागिरी; (चित्रलेखन; भरतकाम; विणकाम इ॰तील). हस्तक्पा-हस्तक अर्थ २ व ३ पहा. हस्तक्रिया-स्त्री. हातकाम; हातानें केलेलें काम (अनुष्ठन, रसायन इ॰ प्रसंगीं). ॰गत-वि. हातांत, ताब्यांत गेलेला; स्वाधीन झालेला; हातीं आलेला; काबीज केलेला; स्वाधीन. ॰गुण-पु. हातचा गुण (चांगला, वाईट, काम, धंदा औषध इ॰ प्रसंगीं सुरू करतांना, देतांना). ॰चापल्य- न. हाताची चपळता, हस्तकौशल्य ॰दोष-पु. लेखांत, हाताचे दुर्गुणानें आलेली अशुद्धता; असावधानतेमुळें हातून घडलेली चूक. ॰पगदस्त-स्ता-वि (बुद्धिबळें) एकदां प्याद्यास हात लाविला कीं तें खेळलेंच पाहिजे, किंवा एकदां एखादें प्याद्यें एखाद्या जागीं नेऊन बसविलें कीं तेथेंच ठेविलें पाहिजे अशा कडक नियमान खेळावयाचा प्रकार, पद्धत ज्यांत आहे असा (खेळ, बाज). -क्रिवि. वरील नियमाप्रमाणें (क्रि॰ खेळणें). [हस्त = हात + पग = पट + फा. दैस्त-हात] ॰पत्रक-न थोड- क्यांत माहिती दणारें पत्रक; प्रसिद्धीपत्रक; जाहिरात. ॰परीक्षा- स्त्री. हातानें स्पर्श करून, हात पाहून रोग भविष्य इ॰ सागणें. ॰पाव-पु. खांबाखालील व वरील भाग; पिढें आणि तळखडा. [हात + पाय] ॰मात्रा-स्त्री. हातातील कडी, तोडा इ॰ अलं- कार. 'हस्तमात्रा कर्णमात्रा । कृष्णाजी वोपिल्या विचित्रा ।' -एरुस्व १५.१४९. [सं.] ॰मिलाफ-पु. हस्तादोलन; (इं.) शेकह्यांड. ॰लाघव-न. १ हस्तकौशल्य. २ हाताचा हलकेपणा; हस्तचापल्य. ॰शाखा-स्त्री. अव. हाताचीं बोटें. 'महाकर्कशाकार ताराच देखा । क्षणें लागतां खंडल्या हस्तशाखा ।' -मुरायुद्ध १८०. ॰संकोच-पु. (हात आखडणें), कृपणपणा, चिक्कूपणा. ॰सामुद्रिक-न हातांवरील रेषा पाहून भविष्य सांगण्याचें शास्त्र. हस्तागौर-री-स्त्री. हस्तनक्षत्रीं हतीवर बसविलेली गौरीची मूर्ति. हिचें व्रत असतें त्यास हस्तागौरीव्रत म्हणतात. हत्ती, शंकर, पार्वती, गणपती या चार मूर्ति सोन्याच्या करून त्यांची चौदा दिवस पूजा करून समाप्तीच्या वेळीं हत्तीसह त्या मूर्ती ब्राह्मणांस दान देतात. -गजगौरीव्रत हस्तांतर-न हाताचें अंतर. (ल.) भिन्नपणा. 'तैसा मीचि अज्ञानद्वारें । दिसे परी हस्तां- तरें ।' -ज्ञा १८.११२८. हस्ताक्षर-न. १ स्वतःच्या हातचें, स्वतः लिहिलेलें अक्षर अक्षर. २ स्वतःची सही; स्वाक्षरी. हस्तें-क्रिवि. १ हातानें. २ तर्फे; मार्फत; करावीं. (देणें; घेणें इ॰). 'राघो नारायण यांजकडील जमा रुपये हजार हस्तें दाजीबा ।' हस्तें परहस्तें-क्रिवि. स्वतःच्या हातानें किंवा (व) दुसर्‍याकडून; प्रत्यक्ष अथवा (आणि) अप्रत्यक्ष. हस्तोदक-न १ हाता- वर घ्यावयाचें पाणी. २ जेवणाच्या वेळीं संन्याशाच्या हाता- वर घालावयाचें पाणी. ३ दान देण्याच्या प्रसंगीं उदक सोडण्या- साठीं हातांत घ्यावयाचें, हातावर सोडावयाचें पाणी. 'तो तूं परब्रह्मचि असावें । मज दैवें दिधलासी हस्तोदकें ।' -ज्ञा १०. ३२२. ४ हस्तनक्षत्रीं पडलेला पाऊस. हस्त्य-वि. हाता- संबंधीं; हातचें.

दाते शब्दकोश

हत

वि. १ तडाखा लागलेला; ठोकलेला. २ ठार मार- लेला. ३ (ल.) नाश पावलेला; लोपलेला; खुरटलेला इ॰ अर्थानें समासांत उपयोग. उदा॰ हत-ज्ञान-पराक्रम-दैव-श्री इ॰. [सं. हन्-मारणें] ॰दैव-भाग्य-वि. कमनशिबी; हीनभाग्य; दुर्दैवी. ॰लज्ज-वि. निर्लज्ज; विनयहीन. ॰वीर्य-वि. दुर्बळ; नामर्द; ताकद नसलेला; सत्त्व-गुण-जोम-महत्त्व-सामर्थ्य नाहींसें झालेला (मनुष्य, प्राणी, औषध, वनस्पति इ॰). ॰श्री-वि. संपत्ति, भरभराट, वैभव नष्ट झालेला; कंगाल; गरीबी आलेला. ॰ज्ञान-वि. बुद्धि, समज नष्ट झालेला. हताश-वि. निराश; आशानष्ट; दुर्बळ. [हत + आशा]

दाते शब्दकोश

हुशार

वि. १ बुद्धिमान; चालाख; शहाणा. २ सावध; दक्ष. ३ ताजातवाना; उत्साहयुक्त; तरतरीत (दुखण्यांतून उठल्यानंतर, चांगलें खाऊंपिऊं लागल्यावर). [फा. हुश्यार्] हुशारणें-अक्रि. सावध, जागें होणें; शुद्धीवर येणें; ताळ्यावर येणें. हुशारी-स्त्री. १ चलाखी; बुद्धि; शहाणपणा. २ साव- धानता; सावधपणा; सावधगिरी. ३ तकवा; तरतरी; उल्हास. [फा. हुश्यारी]

दाते शब्दकोश

इच्छिणें

(सं) अ० मानस करणें, बुद्धि होणें, चाहणें.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

इलमती      

स्त्री.       १. होड; पैज : ‘माझा गुरु थोर तुझा लहान । ऐसे भांडती इल्मति लाउन.’— योसं १३·६५. २. बुद्धी.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

इलमति

स्त्री. १ होड; पैज. 'माझा गुरु थोर तुझा लहान । ऐसे भांडती इलमति लाउन' -योसं १३.६५. २ बुद्धि. [फा. इल्म = विद्या]

दाते शब्दकोश

इंद्रिय

न. १ ज्ञानाचें किंवा कर्माचें साधन जो शरीराचा भाग तो. इंद्रियें ११ आहेत. -(अ.) पंचज्ञानेंद्रीयें-डोळे, कान, नाक, रसना व त्वचा हीं अनुक्रमें रूप, शब्द, गंध, रस व स्पर्श यांचें ज्ञान करून देतात. (आ) पांच कमेंद्रियें-पाय, हात, मलद्वार, मुत्रद्वार, व जिव्हा हीं अनुक्रमें गति, देणेंघेणें, मलोत्सर्ग, मूत्रत्याग व बोलणें हीं कर्मे; करतात. व (इ) मन-हें संकल्पविकल्प करतें. 'अकराही इंद्रियवृत्ती । कैशा लागती भगवद्भक्ती ।' -एभा २.२९३. पंचज्ञानेंद्रियें व पंच कर्मेंद्रीयें यांखेरीज पुढील चार अंतरिंद्रियें आहेत-मन, बुद्धि, चित्त आणि अहंकार. (सामा.) इंद्रिय म्हणजे बाह्य वस्तु जाणण्याची साधनशक्ति; आरंभीं इंद्रिय शब्द येऊन होणारे सामासिक शब्द-इंद्रिय- दमन; इंद्रियनिग्रह; इंद्रियनियामक; इंद्रियगोचर; इंद्रियविषय; इंद्रिय- वश; इंद्रियाधीन; इंद्रियजेता; इंद्रियनियामक; इंद्रियनिग्रही; इंद्रीयतर्पण. २ पुरुषाचें जननेंद्रिय; लिंग. [सं.] इंद्रिय हातीं धरणें-जार कर्माचें अतिशय व्यसन असणें; अति विषयासक्त असणें. ॰गम्य-वि. इंद्रियांना आलकन होणारें-कळणारें; इंद्रियगोचर. -यागम्य-वि. इंद्रियांना आकलन न होणारें; इंद्रियागोचर; इंद्रियातीत. ॰ग्राम-पु. १ इंद्रिय- समूह; सर्व इंद्रियें. २ इंद्रियांचें स्थान, शरीर, देह. ॰जुलाब-पु. १ मुत्ररेच; मूत्रढाळ; मूत्राधिक्य होण्याचें औषध. २ बहुमूत्र, मूत्रवृद्धि. ॰दमन-१ इंद्रियांना कह्यांत, स्वाधीन ठेवणें. २ विषया- कडे इंद्रियांचा ओढा नाहींसा करण्याचा योगसाधनादि उपाय. ॰विज्ञानशास्त्र-न. इंद्रियांच्या रचनेची, व्यापारांची माहिती देणारें शास्त्र. (इं.) फिजिऑलॉजी.

दाते शब्दकोश

इंद्रिय indriya n S A sense, a faculty or power by which external objects are perceived: also an organ or a member, a natural instrument by or through which action is performed. Ten are enumerated, viz. त्वगिंद्रिय, चक्षुरिंद्रिय, श्रोत्रेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय. These are called ज्ञानेंद्रिय The five senses. वागिंद्रिय, हस्तेंद्रिय, पादेंद्रिय, गुदेंद्रिय, उपस्थेंद्रिय. These are called कर्मेंद्रिय The organs and members of action. To these ten some add मन The mind. N.B. इं0 signifies, throughout these ten, both the percipient or sensitive principle inherent, and the organ or apparatus by or through which it manifests itself and acts. Another classification is into ज्ञानेंद्रिय. कर्मेंद्रिय, अंतरिंद्रिय Organs of sense or perception, Organs of action, Internal organs. The first are Eye, ear, nose, tongue, skin: the second, Larynx or organ of speech, hand, foot, anus, parts of generation: the third मन, बुद्धि, चित्त, अहंकार q. v. under अंतःकरणचतुष्टय. Some useful compounds are formed with this word; as इंद्रियदमन, इंद्रियनिग्रह, इंद्रियनियम Subduing or restraining the senses and affections; इंद्रियपाटव Sharpness or soundness of the senses and organs; इंद्रियवैकल्य Disorder or derangement of the senses or organs; इंद्रियगोचर, इंद्रियविषय, इंद्रियवश, इंद्रियाधीन, इंद्रिय- जेता, इंद्रियनियामक, इंद्रियनिग्रही, इंद्रियतर्पण, इंद्रिय- पोषण, इंद्रियशमन, इंद्रियशांति. 2 Membrum virile vel pudendum muliebre. क्रोध असावा इंद्रियदमनीं ॥ लोभ असावा ईश्वर- भजनीं ॥ Let us have Anger, but--in subduing our senses and lusts: let us have Desire, but--in worshiping God. इं0 हातीं धरणें To be greatly addicted to fornication or wenching.

मोल्सवर्थ शब्दकोश

ईर

स्त्री. १ चढाओढ; स्पर्धा; चुरस. २ हरकत; अडथळा; तंटा. (क्रि॰ धरणें; येणें). -पया ३२८. 'यासि जो ईरे येईल त्याचे वंशांवरि गाढव असे. मंगळवेढें येथील शिलालेख. ३ बुद्धि- बळांत राजास दुसर्‍याच्या मोहर्‍याचा बसणारा जो शह तो लागू न पडायाजोगी मध्यें आपलें मोहरें प्यादें यांची असण्याची जी स्थिति ती; यावरून पुढील वाक्प्रचार पडले आहेत. ईरेस पडणें सांपडणें-धोक्यांत गोत्यांत सांपडणें; कठिण प्रसंगांत सांपडणें. ईरेस घालणें-स्वतःच्या बचावासाठीं दुसर्‍यास पुढें करणें, धोक्यांत घालणें; किल्ल्याचा दरवाजा फोडतांना त्याला असलेले लांब लांब खिळे हत्तीच्या धडकेबरोबर त्यच्या कपळांत शिरूं नयेत म्हणून मध्यें रोडकासा उंट घालणें. ईरेस पडणें-चढणें- चुरशीनें, अभिमानानें पुढें सरसावणें; कंबर कसून उद्युक्त होणें. 'मोहरे मोहरे इरेसी पडती.' -सप्र २१.५१. 'मोहरा इरेस पडला.' -संग्रामगीतें २९. [सं. ईर् = प्रेरणा करणें]

दाते शब्दकोश

इसाळ-ळा

पु. १ स्पर्धा; स्पर्धेचें-चढाओढीचें वारें; चुरस; चढाओढ; अहमहमिका; हेवा; खुमखुमी. (क्रि॰ धरणें, येणें). 'पद्मदळेंसीं इसाळें । भांडताति जे हे डोळे ।' -ज्ञा १३.५५९. 'बळ देखोनि सर्वागळें । एक नामाच्या इसाळें । गंधर्व राजे बुद्धि- कुशळें । संग्राम त्यासीं मांडिला' -मुआदि २३.९४. २ चीड; तिटकारा. 'वाचे सत्याचा विटाळ । इंद्रियनियमांचा इसाळ ।' -मुआदि १.६७. [सं. ईर्षा]

दाते शब्दकोश

जागता      

वि.       १. जागरूक; सावध; दक्ष. २. तजेलदार; तेजस्वी; टवटवी असणारा; ज्याची सुधारणा आणि रक्षण काळजीपूर्वक होते असा; संस्कृतिसंपन्न; सुस्थितीने युक्त (धर्म, विधी, चाल). ३. तरतरीत; जोमदार (मन, बुद्धी इ.). ४. ताजेतवाने; न गंजलेले; मलिन नसलेले (मिळविलेले ज्ञान). ५. लोकांच्या डोळ्यांपुढे असणारा व ज्याची लोकांना नेहमी आठवण होते असा; आठवणीत राहिलेला (मेलागेला माणूस, गोष्ट, वृत्तान्त, प्रसंग).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जाज्वल, जाज्वल्य      

वि.       १. तेजस्वी; प्रखर (सूर्य, अग्नी). २. चकचकीत; तकतकीत (धातू). ३. गुणकारी; वीर्यवान (औषध, मंत्र). ४. तापट; तल्लख; जहाल; चलाख; उत्साही (माणूस). ५. रागीट; भयंकर; जागृत (देवता). ६. कार्यक्षम; तीक्ष्ण; उच्च दर्जाची (बुद्धी) : ‘त्यांची विचारशक्तीहि मोठी जाज्वल असावी.’ – नि २०६. [सं. ज्वल्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जाज्वल-ज्वल्य

वि. १ तेजस्वी; प्रखर (सूर्य, अग्नि). २ चकचकीत; तकतकीत(धातु). ३ गुणकारी; वीर्यवान(औषध, मंत्र). 'ही मात्रा अशी जाज्वल्य आहे कीं वायु तत्काल उतरील.' ४ तापट; तल्लख; जहाल; चलाख; उत्साही (माणूस) ५ रागीट; भयंकर; जगतीजोत (देवता). ६ मोठी कार्यक्षम; तीक्ष्ण; उच्च दर्जाची(बुद्धि). 'त्यांची विचारशक्तीहि मोठी जाज्वल असावी.' -नि २०६. जाज्वल्यमान-वि १ जाज्वल्य; चककीत; लख- लखीत. २ प्रखर; तेजस्वी (अग्नि). [सं. ज्वल्]

दाते शब्दकोश

जाणीव      

स्त्री.       १. जाणण्याची शक्ती; विषयग्रहणशक्ती; बुद्धी : ‘नातरा जाणिवेच्या आयणी ।’ – ज्ञा २·१२९. २. समज; समजूत; ज्ञान : ‘म्हणोनि जाणीव स्फुरविसी ।’ – परमा १·१३. ३. भावना. [सं. ज्ञा]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जाणीव

स्त्री. १ जाणण्याची शक्ति; विषयग्रहणशक्ति; बुद्धि. 'नातरी जाणीवेच्या आयणी ।' -ज्ञा २.१२९. 'या देहीं जाणीव रूपें करून आत्मस्वरूप राहतें.' २ समज; समजूत; ज्ञान. 'म्हणोनि जाणीव स्फुरविसी ।' -परमा १.१३. 'होईल थोरपण जाणिवेचा भार । दूरावती दूर पाय तुझें ।'. ॰जाणुपण-न. ज्ञान; जाणीव. 'परि एकै कासी थोर अभिमानु । जाणुपणाचां ।' -दाव ३७१.

दाते शब्दकोश

जाणणे      

उक्रि.       १. समजणे; कळणे; ज्ञात असणे; उमजणे; खात्रीपूर्वक माहीत असणे. २. (ल.) ओळखणे; दयेने, मानाने, गौरवाने वागविणे (जुन्या ओळखीच्या दीन, गरीब माणसास). ३. जाणीव असणे; मान्य करणे; मानणे; प्रत्युपकाराची, मोबदला देण्याची बुद्धी असणे. (नोकरी, श्रम, उपकार याबद्दल). ४. गुणविशेष माहीत असणे. ५. लाभानुरूप वागणे. [सं. ज्ञा]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जाणणें

उक्रि. १ समजणें; कळणें; ज्ञान असणें; उमजणें; खात्रीपूर्वक माहीत असणें.'वर्णभेद मनुष्यमात्र जाणतो, पशु जाणत नाहीं.' २ (ल.) ओळखणें; दयेनें,मानानें, गौरवानें वागविणें (जुन्या ओळखीच्या दीन, गरीब माणसास). 'भल्या माणसावर उपकार केला असतां तो जाणतो. ३ जाणीव असणें; मान्य करणें; मानणें; प्रत्युपकाराची, मोबदला देण्याची बुद्धि असणें (नोकरी, श्रम, उपकार याबद्दल) ४ भोगणें; संभोग करणें. ५ गुणविशिष्ट माहीत असणें. 'हा तुम्हांस भला वाटतो पण मी याला पक्का जाणतों.' ६ प्रतिसहकार करणें; लाभानुरूप वागणें. (जनावरांनी). या गाईला खाणें घातलें ती जाणत्ये.' [सं. ज्ञान; प्रा. जाण. फ्रेंजि. जन] न जाणो-कोणास ठाऊक? कोण सांगूं शकेल? असेंहि असेल, असेलहि या अर्थी. जाणत, जाणतजाणत-क्रिवि. जाणूनबुजून; समजूनउमजून; बुद्ध्या; जाणून. जाणतमूर्ख वि. जाणत असून मूर्खपणाचें ढोंग करणारा; ढोंगी मूर्ख. [जाणणें + मूर्ख]

दाते शब्दकोश

जाणती      

स्त्री.       बुद्धी : ‘धर्माधर्म रूपें जियें । तियें न चोजवितां जाये । जाणती जे कां ।’ – ज्ञा १८·७२०. [सं. ज्ञा]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जेनबुद्धि

जेनबुद्धि jēnabuddhi f (जेन Felt, & बुद्धि. An understanding which, as felt closes in upon the holes made by the needle, speedily closes upon and effaces impressions. ) A gross and heavy understanding: also attrib. gross, dull, stolid.

मोल्सवर्थ शब्दकोश

जिहन खुलना

हिंदी अर्थ : बुद्धिका विकास होना मराठी अर्थ : ज्ञान बुद्धि होणें.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

जिज्ञासा

स्त्री. ज्ञानाची इच्छा; कुतूहल; शोधक बुद्धि. [सं.] जिज्ञासु-वि. १ ज्ञानची इच्छा असणारा; शोधक; चौकस. २ अभ्यासी; विद्याव्यासंगी. [सं. ज्ञा-जिज्ञासा]

दाते शब्दकोश

जिज्ञासा      

स्त्री.        ज्ञानाची इच्छा; कुतूहल; शोधक बुद्धी, औत्सुक्य [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ज्ञान (कमी)

लांडी विद्वत्ता, केवळ व्यर्थ निरर्थक बडबडीस कारण, उथळ पाणी, शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी, झगमगाट पण खोली नाहीं, तुटपुंजें ज्ञान, सांठवलेलें शहाणपण, टीचभर मन व गुंजभर माहिती.

शब्दकौमुदी

ज्ञात

वि. समजलेला; जाणलेला; ठाऊक असलेला. [सं. ज्ञा. जाणणें] ॰सिद्धांत-वि. शास्त्राशीं पूर्ण परिचित असलेला. ज्ञातव्य-वि. जाणण्यास, समजण्यास, ठाऊक असण्यास योग्य, शक्य; जाणीव होण्याजोगें. 'तैसें ज्ञानें जेणें । करितां ज्ञात- व्यातें पाहाणें ।' -ज्ञा १८.५३३. ज्ञेय पहा. ज्ञाता-वि. १ जाणणारा; समजणारा; माहिती असलेला; तज्ज्ञ. २ शहाणा; विद्वान्; सुज्ञ; ज्ञानी. [सं. ज्ञा = जाणणें] ज्ञातृत्व-न. १ ज्ञान; वृत्त; माहिती. २ बुद्धि; धारणाशक्ति. 'विशाळ ज्ञातृत्वाची वुद्धी ।' -दा १९.४.२०.

दाते शब्दकोश

जन्मांतरचे ज्ञान, जन्मांतरीचे ज्ञान      

लहान मूल किंवा प्राणी यांच्यामधे दिसून येणारी उपजत बुद्धी.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

ज्ञपित, ज्ञप्त

वि. जाणलेलें; प्रसिद्ध केलेलें; शिकविलेलें. [सं. ज्ञा = जाणणें] ज्ञाप्ति-स्त्री. १ बुद्धि; ज्ञान. २ माहीत असणें; जाणीव. 'म्हणितलें या ज्ञप्ती । अर्वाचीना ।' -ज्ञा १३. ४०. ३ ब्रह्मज्ञानामुळें झालेली जागृति; अंतःकरणांतील स्फुरण. -माज्ञा १८.१२०४.

दाते शब्दकोश

जोत्या

वि. नांगर्‍या; नांगरणारा माणूस; जोत धरणारा गडी; शेतकरी; २ (ल.) गांवढळ; नांगर्‍या. ३ (ल.) मंद- बुद्धि; ढ; अक्षरशत्रु. [जोत; हिं. जोतिआ]

दाते शब्दकोश

जुनाट      

वि.        १. जुना; प्राचीन; फार दिवसांचा; जुन्या काळचा. २. पक्का, पक्व (बुद्धी, विचार, अनुभव, झाड). ३. पुरातन; कालबाह्य.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जुनावणे      

अक्रि.        १. जून होणे; पक्व होणे; पक्के होणे; स्थापित होणे; बळावणे; दृढता पावणे (वस्तू, झाड, बुद्धी, अभ्यास, बातमी, रोग इत्यादी). २. (वाईट अर्थाने) तारुण्यातील जोर जाणे (बुद्धीचा); उतरत्या कळेस लागणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जून

वि. १ कोंवळेपणा गेलेला; निबर; राठ; पक्का झाल्या- मुळें कठिण झालेली (वनस्पति; फळें इ॰). २ (ल.) दृढ; परि- पक्व; घट्ट (चांगल्या व वाईट अर्थीं-समज, समजूत, बुद्धि). [जुना]

दाते शब्दकोश

जून      

वि.       १. कोवळेपणा गेलेला; निबर; राठ; पक्का झाल्यामुळे कठीण झालेली (वनस्पती, फळे इत्यादी). २. (ल.) दृढ; परिपक्व; घट्ट (चांगल्या व वाईट अर्थी - समज, समजूत, बुद्धी). ३. भक्कम; मजबूत; पक्का : ‘बुरजाचा घेर शंभर हात होणें आहे तें काम जून पायावर चढवावें लागतें तें करावयासी लाविलें आहे.’ - पेद ३९·१४९.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

झा(झां)वळ

वि. १ विसराळू; भ्रमिष्ट; भ्रांतिष्ट; अजागळ; झांबर्‍या. 'बुद्धि झावल जयाची । तो तें मानी ।' ग्रंथराज ६.६७. २ विसराळूपणाचें; भ्रमिष्टपणाचें; गबाळपणाचें (वर्तन, भाषण इ॰). ३ अस्पष्ट; अंधुक; संदिग्ध. 'एर्‍हवीं संकल्पाचिये सांज- वेळे । नावेक तिमिरेजती बुद्धिचे डोळे । म्हणोनि अखंडित परि झांवळें । भूतभिन्न ऐसें देखे ।' -ज्ञा ९.७२. [सं. श्यामल?] झावळणें-अक्रि. भ्रमिष्ट होणें. -शर. ॰झावळ-मावळ- वावळ-नस्त्री. झुंजुमुंजु झांजड, झांजडमांजड सर्व अर्थी पहा. -क्रिवि. अंधुकपणें.

दाते शब्दकोश

झावळ, झांवळ      

वि.       १. विसराळू; भ्रमिष्ट; भ्रांतिष्ट; अजागळ; झांबऱ्या : ‘बुद्धि झावल जयाची । तो ते मानी ।’ – ग्रंथराज ६·६७. २. विसराळूपणाचे; भ्रमिष्टपणाचे; गबाळपणाचे (वर्तन, भाषण इत्यादी). ३. अस्पष्ट; अंधुक; संदिग्ध : ‘एऱ्हवीं संकल्पाचिये सांजवेळें । नावेक तिमिरेजती बुद्धीचे डोळे । म्हणोनि अखंडित परि झांवळें । भूतभिन्न ऐसें देखे ।’ – ज्ञा ९·७२.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

झकवाद

पु. १ शुष्क वाद; वितंडवाद. २ लपंडाव; फसवे- गिरीचें भाषण; ठकवाद. ३ मिथ्यावाद; अहितकारी भाषण, उप- देश. 'आणीक कोणाचे झकवादीं । वावरों नेदीं मानसा ।' -मुसभा १२.३४. 'म्हणोनिया स्त्रीयेचे बुद्धी । जो नर लागे झकवादी । तो नासेल अथवा त्रिशुध्दि । पडेल पतनीं ।' -कथा ५.८.४७. [झकण = फसणें + वाद]

दाते शब्दकोश

झरणे      

अक्रि.       १. पाझरणे; बारीक धारेने वाहणे; झिरपणे. २. पाघळणे; चिघळणे. ३. गळणे; टपकणे. ४. (शरीर, आयुष्य, संपत्ती, बुद्धी इ.) कमी होत जाणे; झडणे; झिजणे; क्षीण होणे. [सं.क्षर्‌ - क्षरति, झॄ]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

झरणें

अक्रि. १ पाझरणें; बारीक धारेनें वाहणें; झिरपणें; २ पाघळणें; चिघळणें. ३ गळणें; टपकणें; पाझरणें. उदा॰ तारूं. ४ (शरीर, आयुष्य, संपत्ति, बुद्धि इ॰) कमी होत जाणें; झडणें; झिजणें; क्षीण होणें. 'पुष्कळ गंध उगाळूं नको, खोड झरेल.' [सं. झृ = झरणें; झृ = झिजणें; प्रा. झरण; हिं. झरना; गु. झरवुं]

दाते शब्दकोश

काकळूत, ककळूत मामळूत

स्त्री. १ दया करण्याबद्दल परोपरीची विनवणी; कळवळा उत्पन्न करण्यासाठीं गयावयां करून प्रार्थना, विनंति करणें, करुणा भाकणें. (क्रि॰ करणें). २ करुणा; दया; अनुकंपा; कळवळा. (क्रि॰ येणें; करणें). 'देवाला भक्ताची काकळूत आली. ' ' बा गड्यानों, तुमची मला काकळूत वाटत्ये. ' -बाळ १.७०.८०. ३ दयेमुळें अपराधाची उपेक्षा करण्याची बुद्धि. [सं. काकलि = मंजूळ, बारीक, मृदु; तुल. का. कक्कलाते = प्रेम, दया, काकळूत] काकळुतीस येणें -अंतःकरणाला पाझर फुटविण्यासारख्या रीतीनें गयावयां करणें. काकुळती करणें - १दया येणें; विनवणीनें हृदयाला द्रव येणें, २ अति दीनवाण्या- रीतीनें, पदर पसरून, कळवळ्यानें मागणें. काकुळतां करणें, काकुळती येणें -(राजा.) दया भाकणें; द्रव येईपर्यंत विनवणी करणें. काकळूत वाणा-णी -वि. दीनवाणा; रडवा (स्वर, ध्वनि, वाणी).

दाते शब्दकोश

कालपर्याय      

पु.       कालविपर्यय; विपरीत काल : ‘कालपर्यायेंकडून अशी बुद्धी त्यास निर्माण झाली!’ - ऐलेसं ६६४३.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कामज्वर

कामज्वर m Love-fever. कामदृष्टी f बुद्धि f Lasciviousness.

वझे शब्दकोश

कार्य

न. १ काम; उद्योग; कृति; क्रिया. 'तया नांव धनंजया । कार्य पैं गा ।' -ज्ञा १३.९६९. २ परिणाम; क्रिया; योग. 'जे कार्य ना कारण ।' -ज्ञा १५.७८. 'चुन्यावर आसिडाचें कार्य झाल्यास कार्बानिक आसिड वायु बाहेर पडतो.' -पदाव ११. 'तो कार्यावर दृष्टि देतो.' ३ समारंभ; उत्सव. उ॰ लग्नकार्य. ४ (व्या.) विभक्तीचीं रूपें; विकार. ५ फिर्याद; खटला; मुकद्दमा. ६ (वेदांत) अकरा इंद्रियें व पांच विषय. (आनंदगिरीचें मत). ७ (वेदांत) शरीर (पंच ज्ञानेंद्रियें, त्यांचे पांच विषय, मन, बुद्धि व अहंकार). (शांकरभाष्य भगवद्गीता १३.२०.) -वि. करण्यास योग्य. (वाप्र.) ॰उठणें-काम पार पडणें. 'असें झालें असतां... किती कार्यें उठणारीं आहेत पहा!' -नि ४४०. ॰उरकणें-१ काम पार पाडणें. २ (ल.) रतिसंभोग करणें. कार्यावर दृष्टि देणें-आपल्या ध्येयाचा ध्यास घेणें; आपला उद्देश सिद्ध करण्याकडे लक्ष देणें; काम साधणें. -स लावणें-योग्य कामीं उपयोग करणें. 'त्यानें आपला पैका कार्यास लावला.' सामाशब्द:- ॰कर्ता-वि. १ लोकांचीं कामें करण्यांत तत्पर. २ स्वतःच्या हिमतीवर काम तडीस नेणारा. ॰कारणन्याय-पु. हेतु व परिणाम यांच्या संबंधाचा नियम. [सं.] ॰कारणभाव-पु. फल व तदुत्पादक क्रिया यांचा संबंध. 'ज्या दोन गोष्टींचें आनुचर्य दुसर्‍या कोणत्याहि गोष्टीवर अवलंबून नसतें त्या दोहोंत कार्यकारणभाव असतो.' -न्याप ३४. 'घटाचा आणि मृत्तिकेचा कार्यकारणभाव आहे.' ॰कारी-वि. कार्य करणारा; ब्यापर करणारा; तटस्थ नव्हे तो. ॰कुशल-वि. धंद्या मध्यें चतुर, कल्पक. ॰क्रम-पत्रिका-स्त्रीपु. सभेंत व्हावयाचें काम व त्याचा अनुक्रम दाखविणारा कागद. -सभा ७१. (इं.) अजेंडा. ॰त:-क्रिवि. कांहीं कारणासाठीं, उद्देशामुळें. ॰तत्पर-वि. कार्यांत निमग्न. ॰दर्शक दिशा-स्त्री. (यंत्रशास्त्र) प्रेरणा ज्या दिशेंत कार्य करते ती दिशा. -यंस्थि ४. ॰दर्शक बिंदु-पु. (यंत्र- शास्त्र) प्रेरणेचें कार्य ज्या बिंदुस्थळीं होतें तो बिंदु. -यंस्थि ४. ॰प्रयोजन-न. विवाह, मुंज वगैरे समारंभ किंवा सण यांना व्यापक संज्ञा. ॰भाग-पु. १ काम किंवा पत्करलेलें अंगावर घेत लेलें कार्य; करावयाचें काम; साधावयाचा उद्देश. (क्रि॰ करणें; उरकणें; उचलणें; लोटणें.) २ कामाचा अंश, भाग. ॰भार-पु. १ अंगावर घेतलेलें कामाचें ओझें; जबाबदारी; जोखीम. २ काम; व्यवस्था; कारभार. [सं.] ॰लोभी-वि. कार्यसाधु; काम साधून घेणारा. 'न घालिन भिडेस मी जरिही कार्यलोभी तिला ।' -केका १०. ॰वादी-वादु-साधु-वि. कोणीकडून तरी आपलें कार्य साधण्यासाठीं गोड बोलणारा. ॰वाह-ही-पु. व्यवस्था- पक; जबाबदारीनें कार्य करणारा; संस्थेचा चिटणीस वगैरे. ॰व्यग्र-व्याकुळ-व्यावृत्त-वि. हातांत घेतलेल्या कामानें बेजार झालेला; अडचणींत आलेला; वेढलेला. ॰शरीर-न. कारणशरी- राच्या अनुषंगानें योजावयाचा शब्द; स्थूल शरीर. ॰संपादन- साधन-न. कामाचा उरक; काम तडीस नेणें; काम साधणें, सफल करणें. ॰सिद्धि-स्त्री. शेवटास नेलेलें काम; फलसिद्धि; कामाची पूर्णता. ॰क्षम-वि. काम करण्यांत हुषार; निपुण; प्रवीण; कामाला प्रसंगीं उपयोगी पडणारा; काम करण्यास समर्थ, योग्य. [सं. कार्य + क्षम = समर्थ]

दाते शब्दकोश

कार्य      

न.       १. काम; उद्योग; कर्तव्य; कृती; क्रिया : ‘तया नांव धनंजया । कार्य पैं गा ॥’ - ज्ञा १३. ९७०. २. परिणाम; क्रिया; योग : ‘चुन्यावर आसिडाचे कार्य झाल्यास कार्बानिक आसिड वायु बाहेर पडतो.’ - पदाव ११. ३. समारंभ; उत्सव. उदा. लग्नकार्य. ४. (व्या.) विभक्तीची रूपे; विकार. ५. फिर्याद; खटला; मुकदमा. ६. (वेदांत) शरीर (पंच ज्ञानेंद्रिये, त्यांचे पाच विषय, मन, बुद्धी व अहंकार). (वा.) कार्य उठणे - काम पार पडणे : ‘असे झाले असतां... किती कार्ये उठणारी आहेत पहा ।’ - निमा ४४०. कार्य उभे राहणे - घरी लग्न, मुंज इ. सारखा समारंभ ठरणे. कार्य उरकणे - १. काम पार पाडणे २. (ल.) रतिसंभोग करणे. कार्यावर दृष्टी देणे - आपल्या ध्येयाचा ध्यास घेणे; आपला उद्देश सिद्ध करण्याकडे लक्ष देणे; काम साधणे. कार्यास लावणे - योग्य कामी उपयोग करणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

काट(ढ)शह-हा

पु. (बुद्धिबळ) काढून शह; बुद्धि. बळाच्या खेळांत एखद्या मोहर्‍याच्या पगांत असलेलें आपलेंच दुसरें मोहरें बाजून खेळून प्रतिपक्षीय राजावर मोहर्‍याचा मारा लागू रणें; (सामान्यतः) जरब काढणें. [काढ + शह]

दाते शब्दकोश

कच्चा      

वि.       १. न पिकलेला; हिरवा; कोवळा (फळ, गळू, पान इ.). २. साफसूफ न केलेला; ओबडधोबड (दगड, चित्र इ.). ३. न शिजलेला (भात, भाकरी, रसायन इ.). ४. अपुरा वा पक्का न केलेला; सरासरीचा, ठोकळ (जमाखर्च, काम इ.). ५. अपूर्ण; अपक्व; अप्रौढ (कट, मसलत इ.). ६. अपुरे समजलेले किंवा मिळवलेले (शास्त्र, कला). ७. अपुऱ्या ज्ञानाचा; अर्धवट शिकलेला (माणूस). ८. वाकबगार नसलेला; अडाणी; संस्कारहीन; यथातथा ज्ञान असलेला. ९. कोता; संकुचित (विचार, बुद्धी). १०. गौण; लहान; कमी (वजन, माप इ.). ११. न टिकणारा; लवकर नाहीसा होणारा (रंग इ.). १२. सविस्तर; सर्व पोटभेद ज्यामध्ये घेतले आहेत असा (हिशेब). १३. बळकट नसलेला (बांधकाम इ.). १४. अपेक्षित प्रमाणापेक्षा कमी; अंदाजे. १५. उकळून फार घट्ट न केलेला (साखरेचा पाक इ.). १६. (ग.) त्रैराशिकांतील दुसरे व तिसरे या दोन पदांचा गुणाकार करून येणाऱ्या रकमेला कच्चे म्हणतात. नंतर त्याला प्रथम पदाने भागून आलेल्या भागाकाराला पक्के किंवा पक्का म्हणतात. (ज्याच्यामध्ये भारी परिमाणाच्या किमतीवरून हलक्या परिमाणाची किंमत काढायची असते अशा हिशोबात उपयोग). १७. कामामध्ये तोटा – नफा होईल तो मूळ धन्याचा अशा बोलीने केलेली (नोकरी, मामलत इ.); पगारी (मक्ता न देता नोकराकडून प्रत्यक्षपणे सारा वगैरे वसूल करण्याच्या पद्धतीला हा शब्द लावतात.). १८. कच्चा हा शब्द अपुरा, ओबडधोबड, अप्रौढ, उणा या अर्थाने शब्दशः व लाक्षणिकरीत्या अनेकप्रकारे योजतात. जसे : – कच्चा मजकूर – कच्चे लिहिणे – कच्चे वर्तमान – कच्ची बातमी – कच्ची हकीगत – कच्ची कैफियत = वरवरचे; पक्के नव्हे ते, कसेतरी तयार केलेले; अंदाजी. कच्चाताळा – ताळेबंद – कीर्द – जमाबंदी – घाव – हिशेब – बेरीज इ. = अपुरा, बंद न केलेला, अपूर्ण. [सं. कथ्य = खोटे] [त. पच्चै ] [ध्व.] (वा.) कच्चा खाणे – निकाल लावणे; वाटोळे करणे : ‘नवीन नटी आली. तिने त्याला कच्चा खाल्ला.’ – लव्हाळी १५८.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कच्चे मडके      

न.       १. न भाजलेले मडके. २. (ल.) अज्ञानी माणूस (मडके = डोके, बुद्धी) : ‘हे अजून कच्चे मडके आहे.’ – नाम ४.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

किंचितज्ञान      

न.        तुरळक माहिती; तुटपुंजे ज्ञान; अल्पज्ञान; अल्प समजूत; कोती बुद्धी. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

किंचित्ज्ञान

न. (प्र. किंचिज्ज्ञान) १ तुरकळ माहिती; तुटपुंजें ज्ञान; अल्प ज्ञान. २ अल्प समजूत; कोती बुद्धि. [सं. किंचित् + ज्ञान]

दाते शब्दकोश

कला, कळा      

स्त्री.       १. सौंदर्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण कृतींची निर्मिती. जसे : - नृत्य, नाट्य, शिल्प, चित्र, काव्य इ. २. लिहिणे, वाचणे, गाणे, घोड्यावर बसणे, चित्रे काढणे इ. कौशल्याची कामे. एकूण कला चौसष्ट प्रकारच्या आहेत असे मानतात. ३. चतुराईची यांत्रिक योजना; अशा रचनेचे ज्ञान; चालविण्याची युक्ती; त्यापासून विवक्षित फल उत्पन्न करण्याचे चातुर्य; त्याची गुप्त खुबी, किल्ली, मख्खी; कोणतीही कृती परिणामकारकपणे किंवा आकर्षकपणे करण्याचा गुण, पद्धत. ४. चतुराई; बुद्धिकौशल्य; शोधक बुद्धी; कसब; युक्ती; लीला : ‘तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा । वागवी पांगुळा पायावीण ।’ - तुगा ३६७७. ५. (ताल) मात्रा; नियमानुसार तालाचे झालेले ध्रुवका, सर्पिणी, कृष्णा, पद्‌मिनी, विसर्जिता, विक्षिप्ता, पताका व पतिता. हे आठ भाग. ६. (ताल) खाली; टाळी न वाजविणे. ७. शास्त्राचा व्यावहारिक उपयोग; कोणत्याही उद्दिष्ट विषयाला उद्दिष्ट प्रसंगी शास्त्रीय सिद्धांत लागू करणे. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कलाकौशल्य      

न.       शास्त्र व त्यातील कुशलपणा, चातुर्य; युक्ती; बुद्धी. पहा : कळाकुशलता [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कलाकौशल्य

न. शास्त्र व त्यांतील कुशलपणा; चातुर्य; युक्ति; बुद्धि. कळाकुशळता पहा. [सं. कला + कौशल्य]

दाते शब्दकोश

कळाकुशलता, कळाकौशल्य,      

स्त्री. न.       कसब व चातुर्य; नैपुण्य व करामत; शहाणपणा व बुद्धी.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कला-ळा

स्त्री. १ लिहिणें, वाचणें, गाणें, घोड्यावर बसणें, चित्रें काढणें इ॰ कौशल्याचीं कामें; कला चौसष्ट आहेत. चौसष्ट कला पहा. २ चतुराईची यांत्रिक वगैरे योजना; तिच्या रचनेचें ज्ञान; चालविण्याची युक्ति; त्यांपासून विवक्षित फल उत्पन्न करण्याचें चातुर्य; त्याची गुप्त खुबी, किल्ली, मख्खी; यटक. ३ चतुराई; बुद्धिकौशल्य; शोधक बुद्धि; कसब; युक्ति; लीला. 'तुका म्हणे त्याची कोण जाणें कळा । वागवी पांगुळा पायावीण ।' -तुगा ३६७७. 'तयांत फिरती तरी करिती अप्स- रांच्या कला' -नरहरी, गंगारत्नमाला १४३. (नवनीत पृ. ४३२.) ४ चंद्राच्या बिंबाचा सोळावा भाग; प्रत्येक दिवशीं वाढणारी किंवा कमी होणारी चंद्राची कोर. 'चंद्रासि लागती कळा । उपराग येतो ।' -र २. ५ वेळाचें एक परिमाण सुमारें ८ सेकंदाबरोबर; ३० काष्ठा म्हणजे एक कला. ६ एक अंशाचा (वर्तुळाच्या ३६० व्या भागाचा) एकसाठांशावा भाग. ७ पदार्थमात्राचा (सोळावा किंवा लहानसा) अंश; लेश; लव; तीळ; रज; कण. ८ कांति; टवटवीतपणा; स्वच्छपणा; नितळपणा; सौंदर्य; तेज; चमक (माणसाच्या चेहेर्‍यावरील). 'राजसुकु- मार मदनाचा पुतळा । रविशशि कळा लोपलिया ।' -तुगा २. 'घराची कळा अंगण सांगतें.' ९ सूर्य; पृथ्वी व परप्रकाश खस्त पदार्थ यांमध्यें कोण झाल्यामुळें पृथ्वीवरून त्या पदार्थाची जी कांहीं प्रकाशित व अप्रकाशित आकृति दिसते ती. -सृष्टिशास्त्र १३८. ग्रहाच्या प्रकाशित भागाचा जो अंश आपणांस वाढतांना किंवा कमी होतांना दिसतो तो. -ब्रूस, ज्योतिःशास्त्राचीं मूल- तत्त्वे. १० (प्राणिशास्त्र) शरीरांतील नाजुक त्वचेसारखा पडदा. (इं.) इंटरनल मेंब्रेन. ११ (अश्व) कुच आणि कुष्किका- घोड्याचे अवयव. -अश्वप ६४. १२ (ताल) मात्रा; नियमा- नुसार तालाचे झालेले भाग; हे आठ आहेत-ध्रुवका; सर्पिणी, कृष्णा, पद्मिणी; विसर्जिता; विक्षिप्ता; पताका व पतिता. १३ (ताल) खाली; टाळी न वाजविणें. १४ शास्त्राचा व्यावहारिक उपयोग; कोणत्याहि उद्दिष्ट विषयास उद्दिष्ट प्रसंगीं शास्त्रीय सिद्धांत लागू करणें (शास्त्र याच्या विरुद्ध). -सुकौ १२. [सं.] ॰तीत-वि. अत्यंत सूक्ष्म; अंशाच्या विभागाच्या पलीकडला; मायेच्या पलीकडला. 'कलितकाळ कौतूहल । कलातीत ।' -ज्ञा १८.३. [सं.] ॰निधि-पु. चंद्र. 'आल्हादकारक कलानिधि परंतु न्यून क्षयासहित ।' -सीता स्वयंवर. (नाको.) [सं.]

दाते शब्दकोश

कळणे      

अक्रि.       १. समजणे; उमजणे; जाणणे : ‘कळे साधूसी दुर्जनाची बुद्धि ।’ - ज्ञा ७·९२. २. मनात भरणे, ठसणे. ३. झणझणणे; थरथरणे; चेतनायुक्त असणे; अनुभव, आठवण (विशेषतः दुःखाची) राहणे (शरीरावयव, इंद्रिय). [सं. कलन]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कळणें

अक्रि. १ समजणें; उमजणें; जाणणें. 'कळे साधूसी दुर्जनाची बुद्धि ।' -ज्ञा ७.९३. २ मनांत भरणें; ठसणें. ३ झण- झणणें; थरथरणें; चेतनायुक्त असणें; अनुभव, आठवण (विशेषतः दुःखाची) राहाणें (शरीरावयव, इंद्रिय). [सं. कलन] कळे न कळे इतका -किंचित; अतिशय थोडा; लक्षांत न येण्याइतका अंश. म्ह॰ कळेना वळेना भाजी भाकर गिळेना = अक्षरशत्रु, ठोंब्या माणसाबद्दल वापरतात.

दाते शब्दकोश

कल्पनाशक्ति

(सं) स्त्री० विचारशक्ति, बुद्धि.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

कमरजोर      

पु.       शारीरिक बळ (पैसा, मित्र, बुद्धी यांच्या बलाहून भिन्न).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कणा

पु. १ पृष्ठवंश; मानेपासून माकडहाडापर्यंतचा पाठीचा दांडा; मणक्यांची रांग. २ (ल.) पर्वताची लांबट ओळ. ३ डोंगरा-पर्वतावर चढण्याउतरण्याची पाऊलवाट. ४ दोन्ही बाजूस उतार असलेल्या डोंगराच्या रांगेवरील उंच रस्ता; दंड. रांग पहा. ५ रांगोळी किंवा पिठानें जमिनीवर, भिंतीवर काढलेल्या रेघा व आकृती; गंध, हळदकुंकू यांनीं भिंतीवर काढलेली लांबट रास, ओळ, रांग. ८ मोटेचा सोंडूर ज्यावरून ओढला जातो तें लाबंट चाक. ९ हातराहाटाचें मधलें लांकूड. 'उलट रहाटाच्या कण्याप्रमाणें जागच्या जागीं फिरून फिरून त्यांची बुद्धि निरुपयोगी होते.' -ब्रवि १६. १० गाडीच्या चाकाचा आंस. ११ जहाजाचा खालचा भाग; हा निमुळता व पाठीच्या कण्यासाखा असतो. 'जहाजाचा कणा दगडांत कच्च बसला.' -मदमं १८९. [का. कण = काठी, कणे = उभा किंवा आडवा दांडा, आंस, रूळ (फिरता); वै. सं. कर्णक = दांडा]

दाते शब्दकोश

कणा      

पु.       १. पृष्ठवंश; मानेपासून माकडहाडापर्यंत पाठीचा दांडा; मणक्यांची रांग. २. (ल.) पर्वताची लांबट ओळ; ३. दोन्ही बाजूंना उतार असलेल्या डोंगराच्या रांगेवरील उंच रस्ता; दंड; डोंगरपर्वतावर चढण्याउतरण्याची पाऊलवाट पहा : रांग ४. आधार; ज्यामुळे एखादी गोष्ट टिकते, सावरली जाते असे तत्त्व. ५. मोटेचा सोंडूर ज्यावरून ओढला जातो ते लांबट चाक. ६. हातरहाटाचे मधले लाकूड : ‘उलट रहाटाच्या कण्याप्रमाणे जागच्या जागी फिरून फिरून त्याची बुद्धी निरुपयोगी होते.’ - ब्रवि १६. ७. गाडीच्या चाकाचा आस. ८. जहाजाचा खालचा भाग. हा निमुळता व पाठीच्या कण्यासारखा असतो : ‘जहाजाचा कणा दगडात कच्च बसला.’ - मदमं १८९. [सं. कर्णक = दांडा] (वा.) कणा नसणे − नेभळट असणे : ‘त्या माणसाला काही कणाच नाही. अगदी बुळा आहे बिचारा!’ - वैष्णव १०.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कोल्हेबुद्धी      

स्त्री.       हलकी बुद्धी; लबाडी : ‘...अशा कोल्हेबुद्धीची गोष्ट करीत असतील’ - ऐलेसं ५१६.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कोता

अनुदार आणि कोत्या मनोवृत्तीचा, निरुंद व संकुचित दृष्टिकोनाचा, डबक्यांतला बेडूक, गांवढ्या गांवात गाढवी सवाष्ण ! येथे एरंडही मोठा समजला जातो, लांडी बुद्धि, आक्रसलेल्या मनाचा, याला नाकाच्या शेंड्याच्या पलीकडचे तरी दिसते की नाही ?

शब्दकौमुदी

कपट

न. १ छद्म; लबाडी; लुच्चेगिरी; ढोंग; कावा. २ खोटेपणा; असत्यता. ३ मत्सर; हेवा; कृत्रिम भाव; द्वेष- बुद्धि. ४ (कायदा) फसवणूक; भुलथाप; फसविण्याच्या इराद्यानें केलेलें कृत्य. ॰कुभाव-पु. मत्सर आणि दुष्टबुद्धि; वाईट वासना; द्वेष. ॰नाटक-न. कपटी व्यूह, योजना; कपटीपणाचा खेळ. 'कलह नाटक कपट नाटकापेक्षां पुष्कळ बरं !' -कृयु ११. ॰निंदा-स्त्री. व्याजनिंदा; गर्भित स्तुति; बाहेरून निंदा पण खरी स्तुति. याच्या उलट कपटस्तुति. ॰पाश-फांसा-पु. १ इच्छित दान पडावें म्हणून मंत्रादि विद्येनें बनविलेला खेळाचा फांसा; लबा- डीचे फांसे. 'तरी पांडव जिंकावया बळ । एकयुक्ति आहे सबळ । तरी कपटपाश केवळ । वश मज असती ।' -पांप्र २०.६१. २ फसविण्याकरितां केलेली घटना; कट; गुप्त मसलत. ॰बाब-स्त्री. (कायदा) मत्सरानें किंवा दुष्टपणानें उत्पन्न केलेला निराधार खटला; खोटा खटला. ॰मूर्ति-वि. अति लुच्चा, लबाड मनुष्य; कपटाचा मूर्तिमंत पुतळा. ॰युद्ध-न. १ गनिमि काव्यानें चाल- विलेली लढाई; छद्मी लढाई. २ गनीमिकावा; युद्धाचे कपटी डावपेच. ॰रूप-न. खोटें रूप; लबाडीचा वेष; छद्मवेष; ढोंगी रूप. ॰विद्या-स्त्री. लुच्चेगिरीचे डावपेंच; ठकबाजी; कावा; खोटीं कृत्यें आचरणें. ॰वेष-पु. छद्मवेष; स्वतःचें रूप पालटून घेतलेला अन्य वेष; सोंग. -वि. सोंग घेतलेला; रूप पालटलेला. ॰सिंधु-१ (गणित) गुणाकाराची एक पद्धत; गुणकाच्या पहिल्या आंकड्यानें गुण्यास गुणून आलेल्या गुणाकारांत गुणकाच्या राहि- लेल्या आंकड्यांचा गुणाकार मनांतल्या मनांतच मिळवून एकदम गुणाकार मांडणें. गुणाकार पहा. २ फार कपटी मनुष्य; अतिशय लबाड, खोटा, घातकी मनुष्य. ॰स्तुति-स्त्री. व्याजस्तुति; बाह्यतः स्तुति पण आंतून निंदा; व्याजनिंदा; याच्या उलट कपटनिंदा.

दाते शब्दकोश

कृपा      

स्त्री.       १. दया; मेहेरबानी; करुणा. २. दाखविलेली दया; केलेला अनुग्रह. ३. अनुकूल वृत्ती; अनुग्रह बुद्धी; सद्‌भाव. ४. (भक्ती) ईश्वरी कृपा; अनुग्रह : ‘अंबे तुझी कृपा जोडे । तरी मुकाही वेदशास्त्र पढे ।’ - हरि १·२७. कृपामृत, कृपारस, कृपावृष्टी असे कृपापूर्वपदघटित समास पुष्कळ आहेत. [सं.] (वा.) कृपा करणे - दुसऱ्याचे भले करणे; एखाद्याला हवे ते देणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कुभाव      

पु.       १. वार्इट स्वभाव; संशयी वृत्ती; अविश्वासी स्वभाव. २. मत्सर; द्वेष; खोटी बुद्धी; वरवरचा कुडा भाव.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कुभाव

पु. १ वाईट स्वभाव; संशयीवृत्ति; अविश्वासी स्वभाव. २ मत्सर; द्वेष; खोटी बुद्धि; वरवरचा कुडा भाव.

दाते शब्दकोश

कुमर-री

पुस्त्री. कुमार-री पहा. 'हे रचिले आथि बुद्धि- भंतें द्रुपदकुमरें ।' -ज्ञा १.९४. 'तंव रायाचा ज्येष्ठ कुमर ।' -एरुस्व ६.३९. [सं.]

दाते शब्दकोश

कुशाग्रबुद्धि, कुशाग्रबुद्धी, कुशाग्रमति, कुशाग्रमती      

स्त्री.       दर्भाच्या टोकाइतकी अत्यंत तीक्ष्ण बुद्धी.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कुशल

वि. १ सुखरूप; खुशाल; कल्याणकारक (रोग, दारिद्र्य वगैरे विरहित). २ बुद्धीवान; चतुर; पटु; वाकबगार. [सं. कुश = दर्भ + ला = कापणें; सं. कुश् = प्रकाशणें] ॰पट्टी-स्त्री. राजपुत्राच्या जन्मासारख्या प्रसंगी पाटील वगैरे गांवकामगारांवर जी पट्टी बसविण्यांत येते ती. [कुशल + पट्टी = कर] ॰प्रश्न-पु. वंदन; अभिवादन; दोघे ओळखीचे भेटले असतां; कसें काय? अशा अर्थानें प्रश्न विचारावयाचे वेळीं उपयोग. [सं.]. ॰बुद्धि- वि. कुशल अर्थ २ पहा. ॰क्षेम-पु. आरोग्य व सौख्य; खुशाली व सुख; आयुरारोग्य. [सं.] -लार्थ-पु. क्षेमसमाचार. हा शव्द फक्त पत्रांत येतो जसें- 'स्वकीय कुशलर्थ लिहून पाठवावा.' [कुशल + अर्थ = हकिगत]

दाते शब्दकोश

कूशाग्रबुद्धि

कूशाग्रबुद्धि kūśāgrabuddhi f (S) कुशाग्रमति f (S कुश, अग्र, बुद्धि, मति Acute as the point of the Kusha grass.) Sharpness or quickness of understanding; acumen. 2 Attrib. Sharp &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

कुविचार

माझ्या मनांत सैतानाने कारखाना उघडला होता, अमंगल विचार डोकावत, कुविचारांची भुते घेरूं लागली, ज्यांच्या डोक्यां वरील केस आणि डोक्यांतील सुविचार विरळ झाले होते ! तिला वाटले पोलिस लोक दंडुक्याने गर्दी हटवितात त्याप्रमाणे मनातील विचारांची गैरगर्दी हटवितां येईल तर किती बरें! बिथरलेली मनें, तोटके विचार, बुद्धि कर्मानुसारिणी, अवदसा आठवते, बेलगाम मनाचे थेर सुरू झाले, मनांतले काळेबेरे जाईना, माझ्या मेंदूवर धुरळा बसला.

शब्दकौमुदी

कव

स्त्री. १मिठी; वेंघ; विळखा; वेढा; वेंग; वेंख; खेंव; हस्ताग्राशीं हस्ताग्र मिळवून मध्यें होणारी पोकळी. 'महा कल्पा- परौती । कव घालूनि अवचिती ।' -ज्ञा १३.६१. 'हें झाड माझ्या कवेंत मावत नाहीं.' 'कव मारिलि अबदुल्ल्यानें' -ऐपो १९. 'सोडा कवेंतून मला घेउद्या जरा विसावा तरी' -प्रला १९८. २ मासे धरण्याचीं जाळीं समुद्रांत ज्या डांबांना बांधतात त्या डांबांनीं व्यापली जाणारी जागा. ३(ल.) झडप; उडी. 'करितां आठव । धावोनियां घाली कव ।' -तुगा २५२१. 'सहस्त्रार्जुनानें कव घालून । ग्रीवेशी धरीला दशवदन ।' -रावि २.१२३. 'वरी मांजरें कव घातली ।' -गीता १.२१४५. ४आक्रम; आकलन (उघ- डून विस्तृत केलेलें तोंड, कात्रीचीं दोन पातीं, मन, बुद्धि वगैरेचें क्षेत्र. ५(चि.) फार मोठी; झीट; बेशुद्धि. ॰घालणें -क्रि. १मिठी घालणें, मारणें; झडप घालणें. 'कर्ण धराया धांवे त्या अरिला घालुनि कव चपळाला' -मोकर्ण १४.६५. २(संसारास किंवा कामास) आवडीनें, हौसेनें मनांत थारा देणें; आस धरणें; दृढ इच्छा करणें. 'रुक्मिणी अति सत्वर पातली । चरण सन्नमनीं कव घातली ।' -किंसुदा २८. [सं. क्षेम-म. खेंव-कव?]

दाते शब्दकोश

कव      

स्त्री.       १. मिठी; वेंघ; विळखा; वेढा; खेव; हाताची बोटे एकत्र मिळवून मध्ये होणारी पोकळी : ‘महाकल्पांपरौती कव घालूनि अवचितीं ।’ - ज्ञा १३·६१. २. मासे धरण्याची जाळी समुद्रात ज्या डांबांना बांधतात त्या डांबांनी व्यापली जाणारी जागा. ३. (ल.) झडप; उडी : ‘करितां आठव । धावोनिया घाली कव ।’ - तुगा २५२१. ४. आक्रम; आकलन (उघडून विस्तृत केलेले तोंड, कात्रीची दोन पाती, मन, बुद्धी वगैरेचे क्षेत्र.) ५. (संसाराला किंवा कामाला) आवडीने हौसेने मनात जागा देणे, आस धरणे; दृढ इच्छा धरणे. [सं. क्षेम] (वा.) कव देणे - आलिंगन देणे : ‘आपण कोणास कव देणे नाही.’ - मब ४६. कवेत घेणे - वळसा, विळखा घालणे : ‘धोलपूर जिल्ह्याला कवेत घेऊन चंबळेला समांतर जाताना’ - चंद १.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खाचणे      

उक्रि.       १. कमी करणे; काट मारणे : ‘तैसा दानपुण्यें खांची । गोत्रकुटुंबा वंची । परी गारी भरी स्त्रियेची । उणी हों नेदी ॥’ - ज्ञा १३·७९५. २. खंडण करणे; विंधणे; शस्त्राने वार करणे : ‘म्हणौनि ते बुद्धि रचूं । मतवाद हे खांचूं ।’ - ज्ञा १३·१०५०. ३. श्रमणे; दमणे; थकणे; ‘उच्चैःश्रवा खांचे । खोळणिये ।’ - ज्ञा. ९·३२६. ४. संकटात राहावयास लावणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खांचणें

उक्रि. १ कमी करणें; काट मारणें. 'तैसा दानपुण्यें खांची । गोत्रकुंटुंबा वंची । परी गारी भरी स्त्रियेची । उणी हों नेदी ।' -ज्ञा १३.७९४. २ खंडण करणें. 'म्हणोनि ते बुद्धि रचूं । मत- वाद हे खांचूं । ' -ज्ञा १३.१०४९. -अक्रि. श्रमणें; दमणें; थकणें. ' उच्चैःश्रवा खांचे । खोलणिये ।' -ज्ञा ९.३२६. [खाचं, खचणें]

दाते शब्दकोश

खोपडी, खोपरी      

स्त्री.       १. डोके. २. डोक्याची कवटी, कवची, कपाळ. ३. (उप.) बुद्धी; अक्कल : ‘तुझी खोपडी म्हणजे जबाब नाही!’ - वासू १५७. (वा.) खोपडी साफ करणे, खोपरी साफ करणे - डोके फोडून टाकणे : ‘आमाला शाणपणा शिकवायला लागलास तर तुझी खोपडी साफ करून टाकीन.’ - वासू १७.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खर दिमाग

(वि.) हिंदी अर्थ : गधोंकीसी बुद्धी वाला, मूर्ख. मराठी अर्थ : मठ्ठ, गाढव.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

खर्चणे      

उक्रि.       १. खरचणे; वेचणे; व्यय करणे; घालविणे. २. पैसा देणे; खर्च होईल असे करणे. ३. उपयोगी लावणे, चालविणे (बुद्धी, शहाणपणा). ४. हरण करणे;

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खर्चणें

उत्र्कि. १ खरचणें; वेंचणें; व्यव करणें; सरविणें; घाल- विणें. २ पैसा देणें; खर्च होई असें करणें. ३ उपयोगी लावणें चालविणें (बुद्धि, शहाणपणा). ४ हरण करणें; घेणें. ‘मूर्च्छित करि भीमा ते इतरांचे तो पळें असुं खरचिता ।’ –मोकर्ण ४५.४.

दाते शब्दकोश

खवारी      

स्त्री.       १. अप्रतिष्ठा; बेअब्रू. २. अवकृपा; अवज्ञा : ‘मनस्वी लोकांच्या बुद्धी ऐकोन त्याचें निदर्शन जें खवारी जाली.’ - मइसा ८·१२८. ३. स्वारी. [फा. ख्वारी]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खवारी

स्त्री. अप्रतिष्ठा; अवकृपा; अवज्ञा. ‘मनस्वी लोकांच्या बुद्धी ऐकोन त्याचें निदर्शन जें खवारी जाली.’ –रा ८.१२८. [फा. ख्वारी = नीचपणा; दुःख]

दाते शब्दकोश

खवारी; ख्वारी

(स्त्री.) [फा. ख्वारी] अप्रतिष्ठा; अवकृपा, “मनस्वी लोकांच्या बुद्धी ऐकोन त्याचें निदर्शन जें, खधारी ज़ाली; दुराचरणाचें निदर्शन तुम्हांस आलें” (राजवाडे ८।१२८).

फारसी-मराठी शब्दकोश

लांचाव(वि)णें

उक्रि. १ लांच देणें. २ आमिष दाख- वून वश करणें; फितविणें. 'नां तरि मेघमंडळें । काई चातक लाचविणें ।' -भाए १५; -मोकृष्ण ५८.१८. ३ मोहविणें; लुब्ध करणें. 'प्रकटुनी गुण गोड । रसिकांस लांचवा ।' -मोरा [लांच] लांचुगा-वि. लांचखाऊ; लांच खाणारा. 'लांचुगी बुद्धी सदा देवांसी । तैशी नाहीं तुम्हां सांधूंसी ।' -एभा २ ६४.

दाते शब्दकोश

लेखक ( चांगला )

सर्वंकष बुद्धि, खंदा लेखक, शरिराप्रमाणेंच रसिकताहि उंच नि धिप्पाड आहे, प्रसिद्धीच्या नि आत्मगौरवाच्या या युगांत विनयी व प्रसिद्धि - विन्मुख, अधिकारी साहित्यिक, साहित्य-सागरांतला हा देवमासा, प्रथम श्रेणीचा व जीवनांत मुरलेला, लेखणी-बहाद्दर.

शब्दकौमुदी

मांद्य

न. १ मंदपणा; चेंगटपणा; गतीची, क्रियेची शिथि- लता. २ मंदाई; जाड्य; अशक्तपणा; थंडपणा (शरीरप्रकृति, बुद्धि, मनोवृत्ति इ॰कांचा); मतिमंदपणा; विराग; सुप्ति. ३ मांदगी; मांदेपणा; सुस्ती. ४ मंदपणा; अंधुकता; सौम्यता; मृदुता (दृष्टी, उष्णता, प्रकाश, आवाज, झुळूक यांची). (समासांत) अग्नि- मांद्य इ॰ [सं.]

दाते शब्दकोश

मेण

न. म्यान; कोष; तरवारीचें घर. 'मेण शिकल केली. -ऐपो ४३०. [फा. मियान्] (बाप्र.) ॰करणें-१ म्यानांत तरवार घालणें; कोषित करणें. २ (ल.) झाकणें; वस्त्रादिकांनीं आच्छादित करणें. 'मेण कर आरसा, सख्यांनो, गुलाल भांगीं नका भरूं ।' -प्रला १३६. एका मेणांत दोन सुऱ्या(सामावणें- राहणें)-१ कोणतेहि दोन मोठे राजे, विद्वान्, प्रतिष्ठित पुरुष, परस्पर विरोधी स्वभाव व बुद्धि असलेलीं माणसें, प्रतिस्पर्धी हीं भांडण न करतां शांततेनें एकत्र राहूं शकत नाहींत अशा अर्थीं वापरतात. 'तुकयाची प्रतिष्ठा वाढतां तेथें । त्याचे मनीं द्वेष उप- जत । म्हणे एक मेणांत दोन सुऱ्या निश्चित । समावती कैशा परी ।' २ एक काम दोघांकडे असल्यानें त्या कामाची होणारी दुर्दशा, अव्यवस्था या अर्थीं.

दाते शब्दकोश

मेंचणें

उक्रि. १ मोजणें; मानणें; ऐकणें; जमेंत घेणें; जुमा- नणें; (निषेधार्थीं प्रयोग), मानणें; खिजगणतीस धरणें 'बुद्धि मेचवेना धोंडीं ।' -ज्ञा १४.२४६. 'हा त्याला मेचा- याचा नाही' २ कचरणें; कचणें; भिऊन माघार घेणें. 'मरण जवळि आलें काळ कोणास मेचे ।' -सारुह ४.९०. ३ आटोपणें. ४ इच्छिणें. -मनको. [मे(मो)जणें] मेचून असणें-भिऊन, नमून असणें. 'मी कोणाला मेचून असणारा नाहीं.'

दाते शब्दकोश

मेंदू

पु. १ (अस्थि, मांस यांतील) सारभूत अंश; मज्जा; अंग ठेचलें असतां त्यांतून मांसासारखा निघणारा अंश. २ मगज; ज्ञानतंतुजाल. ३ (ल.) बुद्धि; अक्कल. ४ (ल.) नासल्यामुळें मऊ व स्त्रवणाऱ्या स्थितीप्रत पोचलेलें फळ, मांस इ॰; बागुरडा, विंचू, खेकडा इ॰ प्राणी चिरडल्यानें त्याचा होणारा लगदा. ५ रक्त व पू यांचें मिश्रण. (फोड, गळूं, इ॰ तून स्त्रवणारें). [सं. मेद] ॰निघणें-वासणें-बाहेर पडणें-(श्रमामुळें) टेकीस येणें.

दाते शब्दकोश

मग़ज़

(पु.) हिंदी अर्थ : दिमाग, भेजा. मराठी अर्थ : बुद्धि, डोकें.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

म्हातारपण (मनाचे )

म्हातारपणाचे चोरटे थेर, म्हातारचळ, साठी बुद्धि नाठी, अकालीं वार्धक्य, खप्पी म्हातारी , माझें स्वतःचें काय उरलें आहे ते म्हणजे वार्धक्य आणि जुन्या मधुर स्मृति, वाटतें या देहाला आतां चांगल्या कपड्यांची शाकारणी कशाला ? त्या सरणाऱ्या तारुण्याचे जास्तींत जास्त लाड पुरवीत, वाटे वठू लागलेल्या वृक्षाला खतपाणी कशाला द्यायचे ? या वयाचीं माणसे भिजलेल्या टिपकागदासारखीं असतात; आतां तीं नवीन कांहीं शोषून घेऊं शकत नाहींत, मानसिक शक्ति विगलित होतात, जीवन क्षणभर मारगें पहात त्यांच्याकरितां थांबलें आणि पुढे निघून गेलें.

शब्दकौमुदी

मिज़ाज़

(स्त्री.) [अ. मिझाज्] प्रकृती; तब्यत; बुद्धी. “तस्मात् याची मिज़ाज़ कायम नाही” (खरे ८|३९१५).

फारसी-मराठी शब्दकोश

मिजाज-स

स्त्री. दिमाख; ताठा; ऐट; डौल; अभिमान; २ तब्येत; प्रकृति. ३ बुद्धि. 'तस्मात् याची मिजाज कायम नाहीं. ' -ख ८.३९१५. [अर. मिझाज्] म्ह॰ मिजाज-स बाद शहाची आणि अवलाद भडभुंजाची. (वाप्र.) ॰जाणें-इतराची होणें. ॰ठेवणें-राखणें-तब्येत सांभाळणें. मिजाशींत येणें-चढणें- गर्वानें फुगणें; डौलांत असणें. सामाशब्द- ॰खुशी-स्त्री. खुशाली. ॰खोर-दार, मिजाजी-शी-सी-वि. १ मिजाशीनें वागणारा; चढेलपणानें किंवा प्रतिष्ठितपणानें वागणारा; गर्विष्ठ. २ नाजुक प्रकृतीचा; तब्यती; लहरी. ३ डामडौलाचें; थाटमाटाचें. ॰मान्दगी-स्त्री. प्रकृतीचीं अस्वास्थ्य. 'राजाची व रघोत्तमराव यांचेही मिजाज- मान्दगीकरितां राहिले.' -रा ५.१५७. मिजाण-स्त्री. १ तब्यत; प्रकृति. २ चोखंदळपणा; लहर. [फा.]

दाते शब्दकोश

मन

न. १ चित्त; चित्शक्ति; बुद्धि, विचार, तर्क, स्मृति इ॰ चें अधिष्ठान; अंतःकरणचतुष्टय आणि अंतःकरण पंचक पहा. २ अंतःकरण; हृदय; भाव, रस, विकार इ॰ चें अधिष्ठान; सुखदुः खादिकांचें ज्ञान करून देणारें इंद्रिय. ३ सदसद्विवेकबुद्धि; बरें- वाईट समजण्याची शक्ति; अंतर्याम. 'ज्यांचे मन त्यास ग्वाही देतें.' ४ जाणीव; आत्मबोध; भान; सावधपणा; शुद्धि. ५ संकल्पवि- कल्पात्मक अंतःकरणवृत्ति; इच्छा; निश्चयाशक्ति. 'संकल्प विकल्प तेंचि मन ।' -दा १७.८.६. ६ आवड; अंतःकरणाची ओढ, प्रवृत्ति; खुषी; मर्जी. ७ माया ८ प्रेम; लक्ष. [सं.] 'तुजवरिमन ईंचे यापरी कां इयेला ।' -र ४२. ९. ध्यान. म्ह॰ १ मनीं वसें तें स्वप्नीं दिसे. २ मन राजा, मन प्रजा. ३ मनांत एक, जनांत एक. ४ मनांत मांडे, पदरांत धोंडे. ५ मनीं नाहीं भाव, देवा मला पाव. ६ मनीं वसे तें स्वप्नीं दिसें. ७ मान जना, अपमान मना. ८ मन जाणे पापा माय जाणे मुलाचे बापा. ९ मनास मानेल तो सौदा. (वाप्र.) ॰उठणें-उडणें-आवडेनासा होणें; कंटाळा, तिटकारा, वीट येणें. 'ह्या सखलादी अंगरख्यावरून अलीकडे माझें मन उडालें आहे.' ॰कांपणें-दुःख होणें; भीति वाटणें. 'व्यूढोरस्कादिक नव मेले, मन कांपतें कथायाला ।' -मोभीष्म ९.६२. ॰खचणें- कचरणें-हिंमत सुटणें; हातपाय गळाठणें. ॰खाणें-आपण केलेल्या वाईट कृत्याबद्दल स्वतःलाच वाईट वाटणें; टोंचणी लागणें; पश्चात्ताप होणें. ॰गडबडणें-भीतीनें भरणें; गांगारणें; घाबरणें 'गडबडतें मन वेडें, माणुस मीं मीं म्हणोनि बडबडतें ।' -मोशल्य ४.४९. ॰घालणें-देणें-लावणें-मन एकाग्र करणें; लक्ष लावणें. ॰जाणें-इच्छा होणें. ॰तुटणें-मनांत कंटाळा, अप्रीति उत्पन्न होणें; मन पराङ्मुख होणें. म्ह॰ तुटलें मन आणि फुटलें मोतीं सांधत नाहीं. ॰थोड्यासाठीं निसरडें करणें-क्षुल्लक फायद्या- साठीं निश्चयापासून पराङ्मुख होणें. ॰दुग्ध्यांत पडणें-संशयांत पडणें; गोंधळणें. 'आतां माझें मन दुग्ध्यांत पडलें.' -बाळ २.१९५. ॰धरणें-१ एखाद्याच्या मनाप्रमाणें वागणें. २ हांजी हांजी करणें. 'आदर देखोनि मन धरी । कीर्तीविण स्तुती करी ।' -दा २. १०.२५. ॰पाहणें-मनाची परिक्षा करणें; (एखाद्याच्या) मनाचा कल अजमावणें; एखाद्याचे विचार त्याचें भाषण, वागणूक इ॰ वरून ठरविणें. ॰बसणें-लागणें-(कांहीं गोष्ट करावयास) अनु- कूल होणें; अतिशय आवडणें; आसक्त होणें; प्रिय वाटूं लागणें. 'नको कचा मज टाकुनि जाऊं, तुजवरि मन हें बसलें रे ।' ॰मनाविणें-मन वळविणें; मर्जी संपादणें; अनुकूल करून घेणें. ॰मानेल तसें करणें-इच्छेस येईल तसें करणें; स्वैर वर्तन करणें; स्वच्छंदानें वागणें. ॰मारणें-इच्छा मारणें; इच्छा दाबून ठेवणें. ॰मिळणें-उभयतांच्या आवडीनिवडी सारख्या असणें. 'स्त्री- पुरुषांचीं मनें मिळालीं नाहींत तर त्यांचा संसार सुखावह होऊं । शकत नाहीं.' ॰मुंडणें-इच्छा नाहींशी करणें. 'आधीं मन मुंडा व्यर्थ मुंडितां मुंडा ।' -मृ ६५. ॰मोठें करणें-उदारपणा दाखविणें; थोरपणानें वागणें. ॰मोडणें-एखाद्याची आशा विफल करणें; एखाद्याच्या इच्छेविरुद्ध वागणें; दुःख देणें. 'जयाचेनि शब्दें मन मोडे । तो एक पढतमूर्ख ।' -दा २.१०.६. ॰विटणें-कंटाळा, वीट येणें. 'बहुवीरक्षय घडला, तेणें बहुजीवितास मन विटलें ।' -मोभीष्म ११.७४. मनांत आणणें-संकल्प, निश्चय करणें; मना- वर घेणें. मनांत (मनीं) कढविणें-मनांतल्या मनांत रागानें चूर करणें. जळफळावयास लावणें. 'निजतेजें भानुला मनीं कढवी ।' -मोविराट ३.१२०. मनांत (मनीं) कालवणें-अंतःकरणांत अति शय कष्टी होणें; अतिशय दुःख होणें. 'बहुत दुःख मनीं जरिं कालवें । भिउनि ह्यास तयास न बोलवे ।' मनांत गांठ ठेवणें-मनांत वैरभाव, द्वेषबुद्धि, सूड घेण्याची इच्छा जागृत ठेवणें; अढी धरणें. मनांत गांठ बांधणें-घालणें-नीट ध्यानांत धरून ठेवणें; मनांत गोष्ट पक्की ठेवणें. मनांत चरचरणें-मनास काळजी, भीति वाटणें; दुःख होणें. मनांत ठेवणें-एखादी गोष्ट गुप्त राखणें; वाच्यता न करणें. मनांत नवमण जळणें-मनांतल्या मनांत संतापणें; मनांत द्वेष, सूड घेण्याची इच्छा जागृत ठेवणें. मनांत भरणें-पसंत पडणें; आवडणें. मनांत (मनीं) मांडे खाणें- व्यर्थ मनोरथ करणें; मनोराज्य करणें. मनांत (मनीं) म्हणणें-स्वगत बोलणें; स्वतःशीं पुटपुटणें. मनांतल्या मनांत जळणें-आंतल्या आंत जळफळणें; रागानें धुसमत राहणें. मनांतून उतरणें-आवडेनासा होणें; कंटाळा, वीट येणें. मनानें करणें- (कोणाची सल्ला न घेतां) स्वतःच्या विचारानें करणें. मनानें घेणें-मनाचा ग्रह होणें; मत बनणें. मनाला द्रव येणें-मनांत दया, प्रेम इ॰ कोमल भावना उत्पन्न होणें. मनाला लावून घेणें-अतिशय दुःख वाटणें. 'कल्पनेला सुचतील त्या गोष्टी मनाला लावून घेत बसले म्हणजे खाल्लेलं अन्न सुद्धां अंगीं लागा- यचं नाहीं.' -एक ४३. मनावर घेणें-धरणें-एखादी गोष्ट पत्करणें; तींत मन घालणें; सिद्धिस नेण्यास झटणें. 'झटता तुझा सखा तरि होतें हित, परि न हा मनावरि घे ।' -मोभीष्म ३.३. मनावर लिहून ठेवणें-कायमची आठवण ठेवणें; स्मृति- पटलावर कोरून ठेवणें. मनास (मनां) आणणें-१ लक्ष देणें; मानून घेणें. 'आम्ही वेडें बगडें गातों मनाशीं आणा ।' -ऐपो १४२. २ समजून घेणें. 'म्हणे पैल ते कोण ललना । कां तप करिते आणीं मना ।' -ह २६.२९. ३ मनावर घेणें; महत्त्वाचें मानणें; 'मी रागाच्या वेळीं बोललों तें मनास आणूं नका.' मनास येणें-वाटणें-आवडणें; पसंत पडणें. 'वारूबाई! पाहिलीस कां भावजय? येते का मनास?' -पकोघे. मनीं ठेवणें-गुप्त ठेवणें. 'चाल पुरा, हें मनींच ठेवून ।' -मोविराट ६.५२. मनीं जाण होणें-ओळखणें; जाणणें. मनीं धरणें-वागविणें-लक्ष्यांत असूं देणें. 'ह्यालागीं तुम्हाशीं बोधिलें । मनीं धराल म्हणोनिया ।' मनींमानसीं-मनोमानसीं-मनोमनी नसणें-(एखादी गोष्ट) अगदी मनांत देखील आलेली नसणें; स्वप्नींहि नसणें. मनो मन(य) साक्ष-१ मन मनाची साक्ष देतें. ज्यांना परस्परांविषयीं तिटकारा किंवा प्रेम वाटतें अशा मनुष्यास उद्देशून योजतात; एखाद्या गोष्टीबद्दल एकमेकांचे विचार एकमेकांना अंतर्मनाने कळतात या अर्थीं. २ मन स्वतःसाक्षी आहे; स्वतःच्या मनांतील अभिप्राय, उद्देश, भाव इच्छा इ॰ स्वतःस माहीत असतात. साधित शब्द.- मनाचा-वि. मनासंबंधीं; अंतःकरणाचा. मनाची आशा- ओढ-धांव-स्त्री. मनाचा कल, रोंख. सामाशब्द- ॰उथळा- वि. मोकळ्या मनाचा, साधा; छक्केपंजे न जाणणारा. ॰ओळख- स्त्री. एखाद्याच्या मनाची परीक्षा; स्वभावाविषयीं बनविलेलें मत. 'कोणाशीं वाईट बोलूं नये. कां? तर मनओळख होते.' ॰कपटी- वि. दुष्ट अंतःकरणाचा; लबाड. मनःकल्पित-वि. कल्पनेनें, तर्कानें केलेलें; काल्पनिक. मनकवडा-पु. दुसऱ्याचें मन वेधून घेण्याची शक्ति. 'मन माझें मोहिलेंस नकळे आहे तुझ्यापशीं मन- कवडा ।' -प्रला १६१. -वि. दुसऱ्याच्या मनांतील विचार ओळखणारा. ॰कामना-स्त्री. अंतःकरणांतील इच्छा. [मन + कामना] ॰कुजका-वि. हलक्या मनाचा; दुष्ट; विश्वासघातकी. मनःकृत- करणाचा. मनखोडी-स्त्री. मनोविकार. 'देवनाथ तुज हात जोडि मनखोडी सकळ सांडी ।' -देप ६३. मनच्या मनीं-क्रिवि. मनांतल्या मनांत; आपलें म्हणणें काय आहे हें न सांगतां. ॰गाडून-क्रिवि. मन लावून; अंतःकरणपूर्वक; एकाग्रतेनें. ॰देवता-स्त्री. अंतःकरणांतील देवता. १ मन; अंतःकरणांतील तर्क, आशा इ॰ ची प्रेरक शक्ति (क्रि॰ लवणें; वाहणें). 'यंदा सस्ताई होईल कीं महागाई? तुमची मनदेवता कशी लवते?' २ सदसद्विवेकबुद्धि; न्यायबुद्धि. ॰धरणी-स्त्री. मर्जी संपादन करणें; आर्जव; खुशामत. (क्रि॰ करणें) ॰धरणीचा-वि. दुस- ऱ्याचीं आर्जवें, खुशामत करण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा; मर्जी संपादणारा. ॰पाकुळका, मनाची पाकुळका, मन- पिंगळा-ळी-स्त्री. बऱ्यावाईट गोष्टी करण्याची प्रेरणा करणारी मनांतील देवता; मनोदेवता. मनःपीडा-स्त्री. मानसिक त्रास; दुःख, काळजी इ॰. मनःपूत-क्रिवि. (मनाला जें पवित्र, शुद्ध वाटतें त्याप्रमाणें) मनास येईल तसें; वाटेल तसें. 'कोणी वाटेल तें भलभलतें करूं लागला म्हणजे तो मनःपूत वागतो असें आपण म्हणतों.' -गीर १२५. म्ह॰ मनःपूतं समाचरेत् । मनःपूर्वक- क्रिवि. १ मनापासून २ जाणून बुजून; मुद्दाम. मनःप्रिय-वि. मनाला आनंद देणारें; समाधानकारक. मनभाव-पु. उत्सुकता; श्रद्धा; भक्ति; मनोभाव. 'मनभाव असल्यावांचून कार्य सिद्धिस जात नाहीं.' [सं. मनोभाव] ॰भूक-स्त्री. काल्पनिक, खोटी भूक; नेहमीच्या सरावामुळें वाटणारी भूक. ॰भोळा-वि. साधा; गरीब; निष्कपटी. ॰मन-स्त्री. (व) मनधरणी; खुशामत; आर्जव. ॰मानेसें-क्रिवि. मनास वाटेल तसें; मनःपूत. 'वर्तति मनमानेसें सुरतपदा अपतिका स्त्रिया बटकी ।' -मोसभा ६.२०. ॰मान्य- वि. स्वेच्छाचारी; स्वच्छंदी; बेताल. ॰मिळाऊ-वि. सर्वांशीं मिळून मिसळून राहणारा; गोड स्वभावाचा. ॰मुक्त-क्रिवि. यथेच्छ; अमर्यादपणें; मनमुराद; मनाची इच्छा पूर्ण होईपर्यंत. ॰मुराद- वि. १ मनोहर; आल्हादकारक; आनंददायक. २ विपुल; यथेच्छ; मनसोक्त; मनाची तृप्ति होईल इतकें (जेवणांतील पक्वान्न) [अर. मुराद = ईप्सित] ॰मेळ-वि. १ आवडतें; प्रिय; मनोहर. २ शास्त्र इ॰ चा फारसा विचार न करतां दोन्ही पक्षांच्या संमतीनें झालेलें (लग्न). ॰मोकळ-वि. खुल्या दिलाचा; सरळ; निष्कपट. ॰मोकळें करून-क्रिवि. खुल्या अंतःकरणानें; संकोच, भीति, लाज इ॰ सोडून. ॰मोठा-वि. १ उदार अंतःकरणाचा. २ उदार; सढळ; मोकळ्या हाताचा. ॰मोड-स्त्री. हिरमोड; निराशा. 'नको करूं मनमोड ।' -पला २२.४. ॰मोहतिर-न. मनाचा, मनानें ठरविलेला मुहूर्त; ॰मोहन-वि. मनाला खुष करणारा; रमणीय; आवडता; प्रिय. 'मनमोहन यादवराणा । कोणी जाउनि आणा ।' ॰मौज-स्त्री. १ गमतीचा विचार, कल्पना. २ लहर; नाद; छंद. ॰मौजा-करणें-स्वःच्या (रंगेल, अनिर्बंध) इच्छा तृप्त करणें. ॰मौजी-ज्या-वि. १. लहरी; छांदिष्ट; चंचलबुद्धि. २. मिजास- खोर; दिमाखी. ॰लज्जा-स्त्री. स्वाभविक, नैसर्गिक लाज; मनो- देवतेची टोंचणी; भीति; शरम; शिष्टाचार; संभावितपणा. 'तुला मनलज्जा नाहीं जनलज्जा तर धर.' ॰वळख-स्त्री. मनओळख पहा. ॰मनश्शांति-स्त्री. मनाची शांतता. ॰मनःसंतोष-पु. मनाचें समाधान; मनास होणारा आनंद. मनसमजावणी-समजा वशी-स्त्री. रागावलेल्या, दुःखी, सचित माणसाचें सांत्वन, समा- धान करणें. ॰समजूत-स्त्री. ग्रह; मत; समज; भावना. 'सर्व मनुष्यांची मनसमजूत एकसारखी असत नाहीं.' ॰समर्पण-न. (काव्य) मन अर्पण करणें. मनसाराम-पु. (विनोदानें) मन. 'मनसारामाचे स्वाधीन सर्व इंद्रियें आहेत.' ॰सुटका-स्त्री. मन एखाद्या गोष्टीपासून परावृत्त होणें. ॰सूत्र-न. इच्छानुरूप सत्ता चालविणारें, वागणारें, मन. ॰सोक्त-क्रिवि. यथेच्छ; स्वैर; स्वच्छंद. मनःपूत पहा. 'पशुपक्षी यांचा मनसोक्त व्यवहार आहे.' ॰सोद्दिष्ट-वि. मनांत योजिलेलें, ठरविलेलें, निश्चित केलेलें. मनस्तप्त-वि. १ दुःखदायक. २ अनुतापी; दुःखपीडित. मन- स्ताप-पु. (मनाला होणारा त्रास) दुःख; शोक; पश्चात्ताप; हुर- हुर; खिन्नता इ॰ मन(नः)स्थिति-स्त्री. १ मनाची स्थिति; मान- सिक अवस्था, भावना. २ मन. 'माझी मनस्थिति चंचल आहे.' ॰हलका-वि. दुर्बल; क्षुद्र मनाचा. ॰मनाकळित-वि. मनानें आकलन केलेलें. मनाजीपंत-पु. (विनोदानें) मन. मनाजोगा-वि. जसा हवा तसा; मनासारखा. मनापासून- क्रिवि. खरोखरी; बेंबीच्या देंठापासून; अतिशय; फार. मनापून- क्रिवि. खरोखरीं. मनायोग-ग्य-वि. क्रिवि. स्वेच्छेनें; मर्जीप्रमाणें. मना- सारखा-वि. इच्छेसारखा; आवडीचा; जसा पाहिजे तसा. मनुबाई-स्त्री. मन. मनेच्छ-च्छां-क्रिवि. मनसोक्त; यथेच्छ; मनाचें समाधान होईपर्यंत. 'नदी पुलिनी गंगातिरीं । क्रिडा करिती मनेच्छां ।' [मन + इच्छा] मनेच्छा-स्त्री. मनाची इच्छा; प्रवृत्ति, कल मनेप्सित-न. मनोवांछा; मनाची इच्छा. -. -वि. मनानें इच्छिलेलें; मनोवांछित. [मन + ईप्सित्] मनोगत-न. मनीषा; हेतु; उद्देश; विचार; इच्छा. 'श्रीकृष्णवासातें वांछिती । जाणे श्रीपती मनोगत ।' -एरुस्व १५.१३८. -वि. मनांत असलेलें; ठरविलेलें. 'कुंभाराचा मनोगत जो आकार असतो तो घटावर उत्पन्न होत असतो.' मनोगति-स्त्री. १ मनाची वृत्ति, क्रिया, विचार. २ मनाचा, विचाराचा प्रवेश, पोंच; मनाची धांव; आक- लन. ३ इच्छेचा कल, प्रवृत्ति. 'हा आपल्या मनोगतीनें चालतो- वागतो-करतो.' -वि. मनाप्रमाणें वागणारा, चालणारा; विचारा- प्रमाणें चंचल. -क्रिवि. मनाच्या गतीप्रमाणें; अतिशय, कल्पना- तीत वेगानें. 'आला गेला मनोगती ।' -मारुतिस्तोत्र. मनोगम्य- वि. मनाला जाणतां येण्यासारखें; मनानें आकलन होण्या- सारखें. मनोज-पु. मदन; काम. 'मनोज मध्यस्थ करूं निघाला । ' -सारूह २.६०. मनोजय-पु. मनाचा जय; आत्मनिग्रह; मनो- निग्रह. 'तैसा मनोजयें प्रचारु । बुद्धीद्रियांचा ।' -ज्ञा १६.१८४. मनोजव-वि. मनाच्या गतीनें जाणारा; फार त्वरेनें जाणारा. मनोत्साह-पु. मानसिक उत्साह; आनंद; आवड. 'ज्याचा जसा मनोत्साह तसें तो करितो.' मनोदय-पु. १ हेतु; विचार; आशय. २ इच्छा कल, प्रवृत्ति. मनोद्देश-पु. मनांतील योजना, हेतु, बेत, विचार. मनोधर्म-पु. १ (प्रेम, द्वेष, काम, क्रोध, मत्सर इ॰) अंतःकरणाची भावना, विकार. 'न निघे मनोधर्मीं । अरोचक ।' -ज्ञा १८.६५७. २ मनाची शक्ति (विचार, कल्पना, सदसद्विवेकबुद्धी इ॰). ३ (सामा.) चित्तवृत्ति; मनोगुण. 'आहार मिळाल्या उत्तम । हरिखेजेना मनोधर्म ।' -एभा १८.२३६. ४ मनाचा चंचलता. 'तंव आंतु त्राय मोडे । मनोधर्माची ।' -ज्ञा ६.२११. ५ हेतु; बेत; विचार -वि. मनोगतीप्रमाणें वागणारा. 'सहचरु मनोधर्मु । देवाचा जो ।' -ज्ञा १७.३३. मनोधारण- णा-नस्त्री, मन राखणें; मनधरणी. मनोनिग्रह-पु. मनाला ताब्यांत ठेवणें; मनोजय; संयमन. मनोनीत-वि. मनानें पसंत केलेलें, स्वीकारिलेलें. मनोनुकूल-वि. एखाद्याच्या मनाप्रमाणें; मनाला पसंत पडण्यासारखें. मनोनुभूत-वि. मनानें अनुभविलेलें, सहन केलेलें, उपभोगिलेलें मनोभंग-पु. इच्छा बेत, आशा इ॰ फलद्रूप न होणें; निराशा. मनोभव-पु. १ मदन; काम. २ कामेच्छा; विषयेच्छा. मनोभाव-पु. १ हेतु; विचार. २ भक्ति; श्रद्धा. ३ प्रीति. मनोभावें, मनोभावें करून, मनोभावा- पासून, मनोभावानें-क्रिवि. अंतःकरणपूर्वक; मनापासून; श्रद्धेनें. 'मनोभावें ईश्वराची सेवा करावी.' मनोभिराम-वि. मनाला तुष्ट करणारा; आनंददायक; मोहक; चित्ताकर्षक. 'तेव्हां तरी तारकशक्ति राम । देईल आम्हासि मनोभिराम ।' मनोमय-वि. मनःकल्पित; काल्पनिक; अंतःकरणांतील; मानसिक. मनोमय- कोश-पु. चैतन्याच्या पांच (अन्न-प्राण-मन-विज्ञान-आनंद) कोशांपैकीं तिसरा. पंचकोश पहा. मनोमयसत्यवाद-पु. एकाच वस्तूविषयीं निरनिराळ्या लोकांच्या मनांत सारख्याच कल्पना असतात असें मत; सादृश्यवाद. (इं.) कन्सेप्च्युअ/?/लिझम्. -नीति ४०६. मनोयोग-पु. मन लागणें; लक्ष्य; अवधान. मनोयोग्य- वि. मनपसंत; समाधानकारक; संतोषकारक. मनोरंजक-वि. मनाला रमविणारें; करमणूक करणारें; चित्ताकर्षक. मनोरंजन- न. १ करमणूक; गंमत; मौज. २ मनास वाटणारा आनंद, उल्हास. मनोरथ-पु. इच्छा; बेत; हेतु; उद्देश; योजना. 'तोषूनियां वैकुंठनायक । मनोरथ पूर्ण करील ।' -व्यं ५. मनोरथ-सृष्टी- स्त्री. मनोराज्य; काल्पनिक सृष्टि. मनोरम-वि. १ मनाला रम- विणारें; मोहक. २ आनंददायक; संतोषकारक; मनोरमा-स्त्री. १ सुंदर स्त्री. २ (संकेतानें) बायको; पत्नी. मनोराज्य-न. भावी उत्कर्षाविषयींचे कल्पनातरंग; हवेंतील मनोरे. मनोविकार, मनोविकृति-पुस्त्री. मनांत उद्भवणारे कामक्रोधादि विकार प्रत्येकीं; भावना; मनोवृत्ति. मनोवृत्ति-स्त्री. १ मनाची स्थिति; चित्तवृत्ति; स्वभाव. २ मनाचा व्यापार; विचार, भावना, विकार इ॰ 'ह्या मनोवृत्ति देवपरायण झाल्या.' मनोवेग-पु. मनाची गति; अत्यंत जलद गति. मनोगति पहा. 'मनोवेगें तात्कालीं । पातले विश्वेश्वराजवळी ।' -गुच ४१.१५७ मनोवेद्य-वि. मनानें, अंतःकरणानें जाणतां येण्याजोगें. मनोव्यापार-पु. मानसिक संकल्पादि व्यवहार; विकार, विचार इ॰ मनोहत-वि. निराश; हताश. मनोहर-पु. व्यंकोबाचा प्रसाद (नैवेद्य) -तीप्र २५२. -वि. मोहक; आल्हादकारक; रमणीय; सुंदर. मनोहारी, मनोज्ञ-वि. चित्ताकर्षक; रमणीय; सुंदर; मोहक. मनौनि-क्रिवि. मनापासून; मनांतून 'तैसें मनौनि धनवरी । विद्यमानें आल्या अवसरी ।' -ज्ञा १६.८७. मनौरें-रा-न.पु. मनाची इच्छा. 'कां जे लळेयाचे लळे सरती । मनोरथांचे मनौरे पुरती ।' -ज्ञा ९ ३. बरव्या मनानें-क्रिवि. शुद्ध मनानें; चांगल्या, प्रामाणिक हेतूनें. 'सीता स्वयंवर असें बरव्या मनानें अवलक्षुनि शास्त्र अव- लोकिलें.' मोकळ्या मनानें-क्रिवि. खुल्या दिलानें; स्वतःचें मन, हेतु, भावना इ॰ स्पष्ट रीतीनें सांगून; मन मोकळें करून.

दाते शब्दकोश

मनीषा

(सं) स्त्री० बुद्धि, मति. २ इच्छा.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

मोह

लोभ, लालच, भुरळ, हव्यास, मोहविवशता, विषया कुलता, मनाची सैराट ओढ, भारले जाणे, जाज्वल्य आस, मोहपाश, लालच गोचिडीसारखी चिकटली, भूल पडली, अभ्यंतरांत व्यामोह पेटला, क्षणांत वर्षांचे व्रत मोडलें, जणूं त्याविना खोळंबलेंच होतें ! मन चळलें, अभिलाषेने घेरलें, लाज सुटली, मनानें गुंतला, हांव सुटली, उंदीर हुरळून सांपळ्यांत गेला, बुद्धि अधीर झाली.

शब्दकौमुदी

मर्दणें

सक्रि. १ चोळणें; चेपणें; रगडणें इ॰; मर्दन करणें. २ ठार मारणें. 'तो करावया वेदोद्धार । म्यां मर्दिला शंखासुर ।' -एभा २१.३७३. [सं. मर्दन.] मर्दन-न. १ चोळणें. २ मऊ करण्याची, चूर्ण करण्याची क्रिया; चुरडणें, कुटणें, दळणें, रगडणें इ॰. ३ (काव्य) कत्तल; ठार मारणें; नाश. [सं.] मर्दनं गुण- वर्धनं-(संस्कृत सुभाषित) १ औषधी द्रव्यें जों जों अधिक खलावी तों तों तीं अधिक गुणकारी होतात. २ विद्यार्थ्यास छडी मारल्यानें त्याची बुद्धि अधिक तल्लख होते. मर्दना-स्त्री. स्नान; न्हाणें. 'भणे एथ होए मर्दना । स्वामी माझेया ।' -ऋ ७४. मर्दन्या-पु. अंग रगडणारा. मर्दित-वि. १ मर्दन केलेलें; चोळलेलें; चेपलेलें. २ कुटलेलें.

दाते शब्दकोश

मृत्तिका

स्त्री. १ माती. २ एखाद्या विवक्षित जागेची माती; कांहीं अनुष्ठानांत किंवा शांतिकर्मांत सात प्रकारच्या मृत्तिका सांगितल्या आहेत. त्या:-अश्व, गज, रथ, चतुष्ठथ, गोष्ट, वल्मीक, ऱ्हद अगर संगममृत्तिका. कांहीं लोक गोष्ठ, वेदिका, कितवस्थान, ऱ्हद, कर्षितक्षेत्र, चतुष्पथ, स्मशानमृत्तिका या सप्तमृत्तिका मान- तात. रसायनशास्त्रांत नऊ प्रकारच्या मृत्तिका ,सांगितल्या आहेत. [सं.] ॰होणें-माती होणें; नाश होणें; धुळीस मिकणें. ॰बुद्धि- स्त्री. मातीप्रमाणें मानणें; दुर्मिळ मृत्तिका-स्त्री. (रसा.) कांहीं खनिज पदार्थांत सांपडणारे प्राणिद. या प्राणिदांमध्यें सेरियम, टर्नियम व इटर्नियम हे तीन धातु असतात. मृत्पिंड- पु. मातीचा गोळा. [सं.] मृदावरणशास्त्र-न. भूगर्भशास्त्र; भूस्तरशास्त्र. [सं. मृद् + आवरण + शास्त्र] मृद्घटवत्-क्रिवि. मातीच्या भांड्याप्रमाणें, मडक्याप्रमाणें. 'धरणीवरि आपटिला । चूर्ण झाला मृद्घटवत ।' [सं. मृद् = माती + घट + वत] मृन्मय, मृण्मय-वि. मातीचा बनविलेला.

दाते शब्दकोश

मृत्तिकाबुद्धि

मृत्तिकाबुद्धि mṛttikābuddhi f (S) Apprehension of as earth; low or light estimation of. See under बुद्धि.

मोल्सवर्थ शब्दकोश

मत

न. १ अभिप्राय; मनांतील विचार; निश्चय; कल्पना; भावना; बुद्धि. २ विशिष्ट विचारसरणी. ३ पंथ; मार्ग; पक्ष (धर्म, तत्त्वज्ञान यांतील). ४ पाखंड; पाखंडमंडळ. 'जेणें मतें उच्छेदुनि समस्त । शुद्ध मार्ग वाढविला ।' ५ म्हणणें; सांगणें. 'चालों न देचि मत, करि मन तैशाचेंहि वश्य पाप तिचें ।' -मोमंभा ३. ५२. ६ संमति; मान्यता; अनुमति. ७ निवडीची नोंदणी, हक्क. (इं.) व्होट. 'पुरुषांना मतांचा कैवार तर बायकांना मुलाबाळांचा कैवार.' -नारुक ३.६४. -वि. मान्य; कबूल असलेलें. 'कार्यें दोन्हींहि दासामरतरुसि मतें तें कळें उद्धवास ।' -मोकृष्ण ७१. २. [सं.] ॰देणें-१ एखाद्या वादग्रस्त प्रश्नाच्या निर्णयार्थ सभा- सदानें अनुकूल किंवा प्रतिकूल अभिप्राय देणें. २ निवडणुकींत आपली निवड नोंदणें (इं.) व्होट टाकणें. मतणें-अक्रि. मतें, विचार इत्यादि बाबतींत जुळणें; एकमत होणें. 'दोन आसामीची एक जोडी करून मतून येतां कीं नाहीं?' -सुकौ ७९. ॰दार- वि. मत देण्याचा हक्क असलेला. ॰पत्रिका-स्त्री. १ साक्षीभूत, आधारभूत लेख प्रमाण. 'पुराणें इयेविषीं । मतपत्रिका ।' -ज्ञा १३.६६. २ जीवर मत नोंदतात तो कागद. (इं.) व्होटिंग पेपर. ॰प्रदर्शक- वि. केवळ मताचें दिग्दर्शन करणारा. 'अमुक सभा मतप्रदर्शक स्वरूपाची आहे.' -के १.२३५. ॰मतांतर-न. मतभिन्नता; भिन्न भिन्न मतें. ॰वाद-पु. आग्रह. 'एकाचा मतवाद निश्चितीं । करितां श्रुतिवाक्य व्युत्पत्ती ।' -एभा २६.१८४. ॰वादी-वि. स्वतःच्या मतांविषयीं दुराग्रही. ॰स्वातंत्र्य-न. स्वतःचा अभिप्राय देण्याचें व त्याप्रमाणें वागण्याचें स्वातंत्र्य. 'शिक्षकांच्या मतस्वातंत्र्याचा प्रश्न निघालेला होता.' -केले १. २०३. मताधिकार-पु. मत देण्याचा अधिकार. मता(त्ता) भिमान-पु. स्वतःच्या मताचा अभिमान. मता(त्ता)भिमानी- वि. स्वतःच्या मताचा अभिमान बाळगणारा; मतवादी.

दाते शब्दकोश

नाचार

वि. १ गरीब; कंगाल; दरिद्री. २ लाचार; अस- मर्थ; अनाथ; निराधार; दुर्बळ. 'वर्ते यांच्या बुद्धी तो नर पावेल सत्य नाचारा ।' -(सखारामतनय) रुस्व ५८. नाचार आणि लाचार या दोहोंत फरक करावयाचा झाल्यास तो असा:-नाचार = गरीब; दरिद्री. लाचार = अगतिक. [फा. ना-चार्] ॰गत नाचारी-स्त्री. १ गरीबी; कंगाली; दरिद्रता. २ लाचारी; नाइलाज; निरुपाय; निराधार स्थिति. -वि. नाचार; गरीब.

दाते शब्दकोश

नाचार      

वि.       १. गरीब; कंगाल; दरिद्री. २. लाचार; असमर्थ; अनाथ; निराधार; दुर्बळ : ‘वर्ते यांच्या बुद्धी तो नर पावेल सत्य नाचारा I’ – (सखारामतनय) रुस्व ५८. [फा.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नादणें

अक्रि. १ राहणें; वास करणें; स्थाईक होणें; सुखानें वसति करणें. ' आम्ही त्या गांवांत सात पिढ्या नांदलो.' 'सुखें धृतीचिया धवळारीं बुद्धि नांदे ।' -ज्ञा ६.३७७. २ सुखानें, भरभराटीनें असणें; पुष्कळ दिवसपर्यंत चांगल्या स्थितींत असणें. 'तूं तें सिद्धचि जो नेणें । तो नांदे सर्वज्ञपणें ।' -ज्ञा १७.१४. ३ वसति, गजबजलेलें, भरभराटलेलें असणें (घर, खेडें इ॰). ४ उपयोगी असणें, पडणें; टिकणें; चालणें; शेवटपर्यंत सुखानें जाणें. 'त्यानें युक्ति काढिली, ती कांहीं नांदणार नाहीं.' ५ जमणें; समेटानें चालणें; पटणें; जुळणें; सलोख्यानें असणें. 'त्याचें व आमचें नांदत नाहीं.' 'स्त्री नवर्‍याबरोबर नांदणें.' ६ कबूल असणें, मान्य होणें. 'तो मुलगी देण्यास नांदत नाहीं.' 'हा दहा रुपयाला नांदत नाहीं.' ७ सांठविणें; वागविणें; सांभाळ करणें. [सं. नंद् = आनंद होणें] नांदणूक-स्त्री. १ वसति; रहिवास; स्थाईक होणें; घरदार कुटंबसुद्धां जी पुष्कळ वर्षें स्थिति ती. 'हे मोहमांदूसी माया सदना । नांदणूकी करितात ।' -नव २२.१९२. २ वागणूक. 'ऐसी लोकांची जिये नांदणूक ।' -ज्ञा ९. ५०७. ३ विवक्षित कालपर्यंत टिकाव (कोणेक राज्यांत, कोणाच्या हाताखालीं). नांदणें-न. १ वास; वसति. 'जगद्गुरु महेश्वर प्रभुशिरीं जिचें नांदणें ।' -केका १०९. २ वस्तिस्थान; राहण्याचें स्थळ. 'कीं वृष्णेचें साजणें । लोभाचें नांदणें ।' -भाए ३०९. नांदता-वि. १ लोकवस्तीचा, लोकांनीं वसति केलेला (गांव, घर, जागा). २ लागवडीखालीं असलेली; वहित (जमीन). ३ भरभराटी, चलती असणारा (व्यापारी, सावकार, कूळ). ४ (सामा.) पुष्कळ दिवस व चांगल्या रीतीनें राहणारा; टिकणारा; चांगला टिकाऊ. ५ समृद्ध व सुखी (कुटुंब). नांदतें घर-न. १ मुलाबाळांनीं भरलेलें व ऊर्जितावस्थेत आलेलें घर, कुटुंब; सुखी व समृद्ध कुटुंब. २ राहतें घर (पडित, बंद नव्हे). नांदत्या घराची केरसुणी-स्त्री. स्वतःचा फायदा करुन घेणार्‍या माण- सांची पुढेंपुढें करून सेवा करणारा चाकर, गडी. नांदवट-स्त्री. (कु.) नांदणूक. नांदायला जाणें-(बायकी) नवरी मुलगी पहिल्यानें सासरीं जाणें; पहिलटकरीण सासरीं जाणें. नांदविणें- उक्रि. १ वागविणें; सलोख्यानें सांभाळणें. २ समाविष्ट करणें; अंत- र्भाव करणें, ठेवणें; सांचविणें. 'अजांड शतकोटि ज्या उदरिं सर्वदां नांदवा ।' -केका १७. ३ रूढ होणें; प्रचारांत आणणें. 'नाहीं तें नांदविलें जेजें । मी तूं जगीं ।' -ज्ञा १५.२८०. नांदाविणें- उक्रि. १ नांदणें अर्थ २ पहा. २ नांदणें अर्थ ४ पहा. [नांदणें]

दाते शब्दकोश

नाजुक दिमाग़

(वि.) हिंदी व मराठी अर्थ : कोमल बुद्धि.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

नाटा or ठा

नाटा or ठा nāṭā or ṭhā a (नाट) Vile, bad, naughty, good for nothing. Pr. साठी आणि बुद्धि नाठी. The word is little used or known.

मोल्सवर्थ शब्दकोश

नाटा-ठा

वि. वाईट; खराब; दुष्ट; गचाळ. हा शब्द फारसा प्रचारांत नाहीं. म्ह॰ साठी बुद्धि नाठी. [नाठ किंवा न + स्था?] ॰ळ, नाठळ, नाठ्याळ-वि. १ वाईट; दुष्ट; लबाड (माणूस). 'भलेतरी देऊं गांडीची लंगोटी । नाठाळाच्या काठी देऊं माथा ।' -तुगा २१०८. २ खोडसाळ; अडेल; द्वाड; त्रास- दायक (पशु इ॰). [सं. अनास्थ + आल प्रत्यय. -भाअ १८३२. -राजवाडे] ॰ळणें, नाठळणें-अक्रि. दुर्गुणी, दुष्ट द्वाड होणें, असणें (मनुष्य, पशु). ॰ळी, नाठळी, नाठ्याळी, नाटा- (ठा)ळकी, नाठळकी-स्त्री. वाईटपणा; दुष्टपणा; द्वाडपणा; खोडकरपणा (माणूस, पशु यांचा).

दाते शब्दकोश

नेण

न. अज्ञान; नेणीव पहा. -वि. अज्ञानी; अजाण (मूल). -एभा २४.६. 'जाणोनि कासया होसी नेण ।' -मुसभा १३. १७. [सं. न + ज्ञान] ॰पण-न. १ जाणतेपण इ॰ 'नेणपण सोडूं नये ।' -दा १४.१.४५. २ अज्ञान; न जाणणें. नेणणें-न. (ल. काव्य) अज्ञान; न जाणणें. 'जे नेणणें माझें प्रकाशूनि । अन्यायत्वें मातें दाऊनि । सर्वही सर्वी भजौनि । बुझावीतसे जे ।' -ज्ञा १८.१११४. -अक्रि. न जाणणें; न समजणें; न कळणें. नेणतपण-न. १ अज्ञान. २ बाळपणांतील अज्ञानावस्था. [नेणणें + पण] नेणता-नेण-वि. १ अजाण; समज नसणारा; अननुभवी; मूर्ख. 'नेणता भक्त मी तूझा । बुद्धि दे रघुनायका ।' -राम. २ जाणता. [सं. न + ज्ञान; ज्ञान] नेणीव-स्त्री. (काव्य) अज्ञान; अननुभव; अजाणतेपण. 'तोच म्हणावा राया पंडित । सर्व जाणोनि नेणीव घेत ।' [सं. न + ज्ञान] नेणो-न जाणों. 'कदा नेणों वोढी शरधिंतुनि काढी शर कदा ।' -र ३.

दाते शब्दकोश

नेत

(स्त्री.) [अ. नीयत्] नियत; बुद्धी; निष्ठा. “ज्याची जसी नेत तसी त्यास बर्कत” (इम १०७). “दोलनराव बाबा यांची नेत धन्याजवळ तसीच असेल” (खरे १२|६८१७).

फारसी-मराठी शब्दकोश

नेत      

स्त्री.       १. नियत; बुद्धी : ‘ज्याची जशी नेत तसी त्यास बरकत.’ - इमं १०७. २. निष्ठा : ‘दौलतराव बाबा यांची नेत धन्याजवळ तसीच असेल.’ - ऐलेसं १२·६८१७. ३. नियम; नेम. (व.) [अर.नीयत्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नेत

स्त्री. १ नियत; बुद्धि. 'ज्याची जशी नेत तसी त्यास बरकत.' -इमं १०७. २ निष्ठा. 'दौलतराव बाबा यांची नेत धन्याजवळ तसीच असेल.' -ख १२.६८१७. [अर. नीयत्]

दाते शब्दकोश

नीळ

स्त्री. नील. १ निळीचें झाड. २ निळीचा रंग; (गु.) गुळी. ३ नीलमणी. 'हा निळ्याचा दुसरा । या बुद्धी हातु घातला विखारा । कां रत्नें म्हणोनि गारा । वेंची जेविं ।' -ज्ञा ९.१४८. ४ शेवाळ; न वाहणार्‍या पाण्यावरील शेवाळ. -पु. १ सर्व अंग काळें असलेली एक वानरजात. २ रामाचा एक अनुयायी वानर. 'नळनीळ जांबुवंत । अंगद सुग्रीव बिभीषण भक्त. -वि. निळ्या रंगाचा. [सं. नील] ॰नासणें-रांपणें, निळीचा रंग नासणें-(निळीचा रंग नासला असतां खोटी बातमी उठवावी म्हणजे रंग चांगला होतो अशी समजूत रंगारी लोकांत आहे यावरून). एखादी बातमी निराधार, खोटी म्हणून सांगावयाची असल्यास प्रयोग करतात. ॰रांप-स्त्री. पु (ल.) निराधार बातमी; गप्प. 'नील रांप झाला आहे.' ॰वटस्त्री. १ हिरवें गवत-कुरण-चरण. २ हिरवळ जागा. ३ हिरवटपणा; निळेपणा. -वि. हिरवट, निळसर; अस्मानी (रंगाचा).

दाते शब्दकोश

निमणें

निमणें nimaṇēṃ v i (Poetry.) To cease, end, rest: also to subside or abate; to be appeased, assuaged, mitigated. Ex. सिद्धि बुद्धि धर्म हरिपाठ पावले ॥ प्रपंची निमाले साधुसंगें ॥. 2 fig. To die. Ex. म्हणति शक्र- सुत निमाला; also जैसें निमोन गेल्या देह ॥ मग रोग होय कोण्हा ॥. 3 To be absorbed in.

मोल्सवर्थ शब्दकोश

निर्मळ, निर्मल      

वि.       १. मळ नसलेला; शुद्ध; स्वच्छ; पवित्र. (ल. व शब्दशः) माती नसलेले (वस्त्र); ढग नसलेले (आकाश); कपट नसलेली (बुद्धी) इ. २. निर्भेळ. [सं.निर्मल]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निर्मल-ळ

वि. १ मळ, अपवित्रता नसलेला; शुद्ध; स्वच्छ; पवित्र; (लक्षणेनें व शब्दशः) माती नसलेलें (वस्त्र); ढग नस- सलेलें (आकाश); कपट नसलेली (बुद्धि). इ॰ २ निर्भेंळ; मिश्रण, मिसळ नसलेला. [सं. निर् + मल] ॰वाचणें-स्पष्ट, सुबोध, घडाघडा वाचणें. 'श्रीमंत महाराज पेशवे बसूनि सकळ पाताड वाची निर्मळ ।' -ऐपो २६२.

दाते शब्दकोश

निरोप

पु. १ आज्ञा. 'वेदांचिया निरोपा । आन न कीजे ।' -ज्ञा १६.४५५. 'ब्राह्मण म्हणें श्रीगुरुसी । जो निरोप द्याल मजसी ।' -गुच ३८.३५. २ संदेश; मजकूर. ३ जाण्याची पर- वानगी; रुखसत; जाण्यास दिलेली, घेतलेली परवानगी. (क्रि॰ घेणें; देणें). ४ सन्मानानें केलेला पाठवणी; बोळवण. ५ (गो.) शेतकापणीचा परवाना मालकाकडून मिळण्याच्या वेळीं शेत- कर्‍याकडून मालकास मिळणारी भेट. [सं. निरूपण] (दिव्याला) ॰देणें-दिवा मालविणें.निरोपानिरोपीं-क्रिवि. नुसत्या तोंडी निरोपावरून; निरोप आल्या-पाठविल्यावरून.निरोप्या-वि. १ संदेशवाहक; निरोप सांगणारा, पोंचविणारा. २ ज्याला परि- स्थितीप्रमाणें कामांत फेरफार करण्याचा अधिकार नसून आज्ञेप्रमाणें चालावें लागतें असा. ३ फक्त निरोप सांगण्याच्या उपयोगी; स्वतःची बुद्धि नसणारा.

दाते शब्दकोश

निरोप्या      

वि.       १. संदेशवाहक; निरोप सांगणारा, पोचवणारा. २. ज्याला परिस्थितीप्रमाणे कामात फेरफार करण्याचा अधिकार नसून आज्ञेप्रमाणे चालावे लागते असा. ३. फक्त निरोप सांगण्याच्या उपयोगाचा; स्वतःची बुद्धी नसलेला.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निसर्ग

पु. १ सृष्टी. २ स्वभाव; प्रकृति. ३ स्वाभाविक, नैसर्गिक अवस्था; सहजस्थिति. [सं.] ॰चित्रलेखन-न. पानें, कळ्या, फुलें, झाड, वेल, कीटक वगैरे सृष्ट पदार्थांचीं, देखाव्यांचीं, प्राण्यांचीं चित्रें काढणें; (इं.) लँडस्केप पेंटिंग. ॰नियम-पु. सृष्टि- नियम; सृष्टीचे कायदे, सिद्धांत. ॰वाद-पु. (तत्त्वज्ञान) बुद्धि प्रामाण्यापेक्षां मानवी नैसर्गिक बुद्धीनेंच ईश्वरज्ञान व नीतिज्ञान होईल असें प्रतिपादन करणारें मत. -ज्ञाको (न) ३१०. 'प्रचलित निसर्गवाद जडैक्यवादी नाहीं.'

दाते शब्दकोश

निष्ठा      

स्त्री.       १. दृढ प्रेम; भक्ती; श्रद्धा; दृढासक्ती (मनाची, हृदयाची). २. विश्वास; भरवसा; सत्य; खरी बुद्धी; निश्चय. ३. एकसारखी चाल, आचरण, धंदा. ४. कायम ठाण; जम; अधिष्ठान; स्थापना. ५. शेवट; अखेर; परिणाम; निर्णय; मोक्षदायक स्थिती, मार्ग; शेवटची अवस्था : ‘ज्ञान ही निष्ठा म्हणजे सिद्धावस्थेतील अखेरची स्थिती होऊ शकत्ये.’ - गीर ४१२. ६. अवस्था; स्थिती. ७. मार्ग : ‘अवधारीं वीरश्रेष्ठा । ये लोकीं या दोन्ही निष्ठा ।’ - ज्ञा ३·३५. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निष्ठा

स्त्री. १ दृढ प्रेम, भक्ति; श्रद्धा; दृढासक्ति (मन किंवा हृदय यांची-एखाद्या वस्तूच्या ठिकाणीं). २ विश्वास; भरंवसा; सत्य अशी बुद्धि; निश्चय; अवलंबन. ३ एकसारखी, एका प्रकारची चाल, आचरण, धंदा. ४ कायम ठाण; जम; अधिष्ठान; स्थापना. ५ शेवट; अखेर; परिणाम; निर्णय; मोक्षदायक स्थिति, मार्ग; शेवटची अवस्था. 'ज्ञान ही निष्ठा म्हणजे सिद्धावस्थेंतील अखेरची स्थिति होऊं शकत्ये.' -गीर ४१२. ६ (काव्य) अवस्था; स्थिति. 'तृषा लागली नाथ ओष्ठामृताची । शरीरासि ज्यावीण निष्ठामृताची ।' ७ मार्ग. 'अवधारीं वीरश्रेष्ठा । ये लोकीं या दोन्ही निष्ठा ।' -ज्ञा ३.३५. [सं. नि + स्था] निष्ठावान-वंत-वि. १ आदर, प्रेम, असलेला; आसक्त; दृढभाव असलेला. २ विश्वास ठेवणारा; श्रद्धाळु; स्थिर वर्तनाचा; शाश्वत मार्गाचा; अचंचलवृत्तीचा.

दाते शब्दकोश

नियत

(स्त्री.) [अ. नीयत्] हेतू; बुद्धी; दानत; विचार; वृत्ती; मोईन. “जशी नियेत तशी त्यास बर्कत” (वाड-सनदा १५०). “शहाजीची नियत साम्प्रतकाळी ठीक नाहीं” (दिमरा २|५). “भण्डारा व नन्दादीप चालवावा ऐसा नियेत करून” (राजवाडे १५|१९५). “(श्रीज्ञानेश्वराच्या) या समाधिस्थळीं पूजा पुनस्कार चालिला पाहिजे म्हणून, कैलासवासी महाराज व कैलासवासी मातुश्री जिजाऊ व कैलासवासी राजेसाहेब या त्रिववर्गीनीं आपलाले वेळेस नियत करून दिल्ही” (वाड-सनदा १६८).

फारसी-मराठी शब्दकोश

नियत      

स्त्री.       १. दानत; नीती; शील. २. बुद्धी; हेतू.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नियत

(सं) वि० निश्चित, नियमित. २ चिकटलेला. ३ स्त्री० दानत, बुद्धि.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

नियत, नियेत

स्त्री. नेत पहा. १ दानत; नीति; शील. 'पठाणास नेक, नियत, धर्मयुद्ध यांची माहिती नसतें.' -सूर्योदय ९५. २ बुद्धि; हेतु. 'जशी नियत तशी त्यास बर्कत.' -वाडसनदा १५०. 'शहाजीची नियत सांप्रतकाळीं ठीक नाहीं.' -दिमरा २.५. ३ -स्त्रीपु. वृत्ति; नेमणूक; नियम. 'भंडारा व नंदादीप चालवावा ऐसा नियेत करून ...' -रा १५.१९५. 'समाधिस्थळीं पूजा पुनस्कार चालिला पाहिजे म्हणून ... त्रिवर्गांनीं आपलाले वेळेस नियत करून दिल्ही. -वाडसनदा १६८. [अर. नीयत]

दाते शब्दकोश

नम्र

वि. १ (भार, ओझें इ॰ कानीं) वांकलेला, लवलेला. 'तरुवर सुफलांच्या आगमीं नम्र होती ।' -वृक्षान्योक्ति, कृष्ण- शास्त्री चिपळुणकर. २ विनयशील; लीन; आज्ञाधारक. [सं.] नम्रता-स्त्री. विनय; लीनता. [सं.] नम्रतु-स्त्री. (महानु) नम्रता. 'तरूंची देखौनि नम्रतु ।' -दाव १२८. नम्रबुद्धि-स्त्री. विनयशीलता; लीनपणा; मनाचा सौम्यपणा; गरीबपण. -वि. विनयशील; लीन; सौम्य स्वभावाचा; आज्ञाधारक. [नम्र + बुद्धि = मन] नम्राय-स्त्री. (गो.) नम्रता; विनय. [नम्राई]

दाते शब्दकोश

नवगुण      

पु. अव.       (न्यायशास्त्र) बुद्धी, सुख, दुःख, प्रयत्न, इच्छा, द्वेष, संस्कार, पुण्य व पाप असे नऊ गुण.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पेलणें

सक्रि. १ समतोल राखणें; तोल संभाळून धरणें; स्थिर, समतोलांत राखणें (ओझें, उभी काठी इ॰ ). २ मुद्गल, लेजीम इ॰ शरीर द्दढ करण्यासाठीं फिरविणें. ३ (ल.) निभावणें; झेपणें; रेटणें; पार पाडणें (अडचणींतून); आटपणें; चालविणें; व्यवस्था लावणें (पैसा, शक्ति, बुद्धि इ॰ कांच्या जोरावर ). ४ दामटणें; हाकलणें; पुढें लोटणें (मनुष्य, जनावर); पुढें रेटणें; ढकलणें, धकविणें (सैंन्य); दवडणें; पाठविणें (दूत). ५ लोटणें. 'राम पहाया पेलती ।' -वेसीस्व ९.७३. ६ घर, खांब इ॰ एका अंगावर कलणें. ७ तयार होणें. 'तंव पुढां वाढी पेले । न वेया देहांची ।' -ज्ञा १५.१६०. ८ भरणें. -मनको. [सं. प्रेर् प्रेरण; प्रा. पेरण, पेल्लण; पेल्लइ] पेलाव, पेल-पु. १ उचलणें; तोलणें (वाहून न्यावयाचें ओझें); शरीर पेलणें किंवा समतोल राखणें (उडी मारण्याच्या वेळीं); शरीराचा तोल. २ (यत्नाचा कामाशीं मेळ बसण्याकरितां) निश्चित व संघटित यत्न. [पेलणें]

दाते शब्दकोश

पोकळ

वि. १ भरीव नव्हे तो. २ (ल.) रिकामा; शून्य; फुसका; ढिला; सैल; वरकरणी; अर्थहीन; फोल (वचन); निरर्थक; व्यर्थ (भाषण); बिन फायद्याचा; फोल (धंदा, उद्योग); हलका; सोपा; क्षुद्र (नकाराच्या निषेधार्थी योजतात). 'हें काम कांहीं पोकळ नाहीं !' ३ अनिश्चित; अनिर्णीत; पुरा न केलेला (हिशोब, बाब); मोघम; पुळपुळीत (भाषण). [सं. पुष्कर; हिं. पोला; गु. पोलु] ॰खर्च-पु. हिशोबांतील खर्चाची कल्पित, बनावट, खोटी बाब. ॰जमा-स्त्री. जमेची कल्पित बाब. ॰जमाखर्च-पु. जमेचा व खर्चाचा (न मिटलेला) तसाच पडलेला हिशेब. ॰जमीन- स्त्री. भुसभुशीत जमीन. ॰धोत्र्या-भट-पु. (निंदार्थी) विद्या, धन, बुद्धि या विरहित ब्राह्मण; नुसता धोतरबडव्या मनुष्य. ॰ब्रह्म- न. (ल.) दिखाऊ, पोकळ काम, भाषण, बाब इ॰ ॰सूत्री-वि. नेभळट; गबाळ्या; अव्यवस्थित (मनुष्य). पोकळापोकळ- ळी-वि. पोकळ; (ल.) वरकरणी; निरर्थक; निष्फल; निर्जीव; निकस; रिकामा; लभ्यांश नसलेला. [पोकळ द्वि.] पोकळि(ळी) स्त-वि. १ अनिश्चित; अनिर्णीत; दिखाऊ; हिशेंबांत न धरलेला (जमाखर्च). २ मोघम; निरर्थक; संदिग्ध (भाषण). पोकळी-स्त्री. १पोकळपणा. २ पोकळ जागा; अवकाश; ढिलेपणा. पोकळीस, पोकळाखालीं जाणें-फुकट, व्यर्थ, निष्फळ होणें (एखादी गोष्ट साधण्याचे प्रयन्त). पोकळी (पोळकी)-स्त्री. कागदाची नळी (बाण, काडतुसें ठेवण्याकरितां) पोकळीक-स्त्री. पोकळ- पणा; रितेपणा; व्यर्थपणा.

दाते शब्दकोश

प्रबुद्ध

वि. १ प्रौढ; पूर्णावस्थेला आलेला; पूर्ण वाढ झालेला (मनुष्य, मन, ज्ञान, बुद्धि इ॰). 'ऐसे तिघे जण प्रबुद्ध थोर जाले ।' -पंच १.१. २ (यावरून ल.) अतिशय बुद्धिमान्; शहाणा; विद्वान्; हुषार. 'तरी तैसें हें प्रबुद्धा । सोहोपें नोहे ।' -ज्ञा १७.५०. ३ निद्रितावस्था जाऊन पूर्णपणें जागा, हुशार झालेला (अक्षरशः व ल.); आत्मज्ञान पावलेला. [सं.]

दाते शब्दकोश

प्रचलित

वि. १ भटकणारा; अस्थिर; चलन पावणारा, च्युत. 'प्रचलित न करावी सर्वथा बुद्धि माझी ।' -राम करुणाष्टकें नवनीत १७०. २ चालू; रूढ. [सं.]

दाते शब्दकोश

परीक्षा

स्त्री. १ पारख; शोध; तपास; कसोटीस लावणें; गुणदोष जाणण्याचा व्यापार. 'मला रुपयांची परीक्षा नाहीं, तूं खराखोटा सराफास दाखीव.' २ प्रचीति; अनुभव; कसोटी; दिव्य. ३ (अनुभवानें किंवा परिचयानें आलेली) लायकी; ज्ञान; बुद्धि; कौशल्य. 'वैद्याला रोगाची परीक्षा असावी.' ४ अनु- भवानें मिळविलेलें ज्ञान; अनुभव. ५ विद्यार्थ्याला एखाद्या विष- यांत किती गम्य आहे, त्या विषयाचा अभ्यास कितपत झाला आहे हें लेखी, तोंडी प्रश्न विचातून ठरविणें; असे प्रश्न विचार- ण्याचा व्यापार. [सं.] ॰करणें-प्रयोगानें किंवा तपासणीनें ठर- विणें; पाहणें. ॰घेणें-स्वतःच्या अनुभवानें, स्वतःवरच प्रयोग करून ठरविणें. ॰नळी-स्त्री. (शाप.) प्रयोगानें परीक्षा करण्यासाठीं लागणारी नळीं. (इं.) टेस्टट्यूब. ॰वंत-वान्, परीक्षवंत-वि. पारख असलेला; पारख, निवाडा करणारा; परीक्षक पहा. 'दिव्य रत्नाच्या सभोंवतीं । जोहरी परीक्षवंत जैसे मिळती ।' -संतलीलामृत ३.२. (नवनीत पृ. २४३). परीक्षक-वि. १ परीक्षा घेणारा; कसोटी लावून पाहणारा; तपासणी, शोध करणारा; गुणावगुण पाहणारा; बऱ्यावाइटाचा निवाडा करणारा. 'अंधाने टाकिलें रत्न सुरेख । परी परीक्षक संरक्षिती ।' २ पारखी; कस लावणारा. ३ प्रयोग करणारा; अनुभव, प्रचीति पाहणारा. परीक्षण-न. परीक्षा; पारख; तपासणी; पर्यालोचन; गुणदोषांची पहाणी. 'ग्रंथपरीक्षण.' परीक्षणें-उक्रि. १ परीक्षा पाहणें; प्रयोग करून, कस लावून गुणदोष पाहणें, तपासणें. २ शोध, तलास, चौकशी करणें; निर- खून पहाणें, निरीक्षण. ३ स्वतः अनुभवणें, अजमावणें, प्रचीति पाहणें. परीक्षित-पु. एका राजाचें नांव. अभिमन्यूचा मुलगा. -वि. १ परीक्षा घेतलेलें; तपासून, शोधून पाहिलेलें. २ अनुभवि- लेलें; प्रयोग करून, अनुभव घेऊन पाहिलेलें.

दाते शब्दकोश

परिपक्व

वि. १ पूर्ण पिकलेला; पूर्ण तयार झालेला; पक्का. २ (ल.) प्रौढ. [सं.] ॰बुद्धि-वि. प्रौढ बुद्धि.

दाते शब्दकोश

प्रज्ञा

स्त्री. १ विचारशक्ति किंवा आकलनशक्ति; ज्ञान; शहाणपण. 'अर्जुना येसणें धेंडें । प्रज्ञापसरेंसीं बुडे ।' -ज्ञा १८. २८९. २ बुद्धि; अक्कल; ज्ञान. 'ऐसा हरिखशोकरहितु । जो आत्म- बोधभरितु । तो जाण पां प्रज्ञायुक्तु । धनुर्धर ।' -ज्ञा २.३००. [सं.] ॰चक्षु-पु. १ जन्मांध असलेला. २ धृतराष्ट्र 'म्हणतोसि तूं हि मीही कीं प्रज्ञाचक्षुचें सदा शिव हो ।' -मोउद्योग ६.१२. -वि. जन्मांध असल्यामुळें बुद्धिं हेच ज्याचे डोळे आहेत असा. [सं.] ॰प्रभात-स्त्री. बुद्धिरूप; प्रातःकाळ. 'जयजय आचार्या । समस्त सूरवर्या । प्रज्ञाप्रभातसूर्या ।' -माज्ञा (पाठभेद) १४.१. ॰वान्- वि. शहाणा; हुशार. ॰वेली-स्त्री. बुद्धिरूप वेल 'माझी प्रज्ञावेली वेल्हाळ । काव्यें होय सुफळ ।' -माज्ञा १४.२१. प्रज्ञात-वि. शहाणा; हुशार; बुद्धिवान; धूर्त; तरतरीत. [सं.]

दाते शब्दकोश

(सं) स्त्री० बुद्धि, मति.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

प्रमा

स्त्री. १ यथार्थ ज्ञान; निश्चित ज्ञान. 'जें सकळ भाग्याची सीमा । मोक्षलाभाची जें प्रमा ।' -ज्ञा १८.९०१. २ समजूत; जाणीव; बुद्धि. 'जें देहखंडा नाम आत्मा । ईश्वर पाषाण प्रतिमा । ययापराती प्रमा । ढळो नेणें ।' -ज्ञा १८.५६७. ३ प्रमाण 'अविद्या नाशी आत्मा । ऐसी नव्हे प्रमा ।' -अमृ ६.४१ [सं. प्र + मा = मोजणें]

दाते शब्दकोश

प्रणणें, पर्णणें

सक्रि. १ (काव्य) विवाह करणें; वरणें; पाणिग्रहण करणें (विशेषतः वराकडून). 'स्वयंवरा आली उर्वशी । ते मागौती पाठविली साधुसीं । परी बुद्धि ठेली कैसी । जे हेची प्रणावी ।' -शिशु २०२. 'पर्णूं म्हणती पांचाळपुत्री । तें नावेक- विलोकूं ।' -मुविराट ४१.१८. २ (ल.) स्वीकार करणें; घेणें. 'कौरव प्रणून अपकीर्ति । जाते झाले स्वस्थळां ।' -मुविराट ६. १७०. [सं. परि + नी]

दाते शब्दकोश

प्रतिभा

१ प्रतिबिंब; स्वरूपांतर; छाया. 'जैसें सरोवर आटे । मग प्रतिभा नाहीं ।' -ज्ञा ५.१५६. २ कल्पना; मानसिक प्रतिमा; काल्पनिक चित्र. ३ अनुभव; प्रतीत. 'कीं आत्मराजाचिये सभे । गीते वोडविले खांबे । मज श्लोकप्रतिभे । ऐसे येत ।' -ज्ञा १८.१६६५. ४ उच्च प्रकारचें ज्ञान; अलौकिक बुद्धि; स्फूर्ति. ५ कांति; तेज. ॰वान-शाली-संपन्न-वि. श्रेष्ठ बुद्धिमान; अतिशय हुशार; बुद्धिमान.

दाते शब्दकोश

प्रतिष्ठा

स्त्री. १ मान; कीर्ति; पत; लौकिक; प्रसिद्धी; मोठेपणा; ख्याति. 'नाना पुरतिये प्रतिष्ठेलागीं । सानीव धरूनि आंगीं ।' -ज्ञा १.४६. २ अधिकाराच्या, बहुमानाच्या जागीं एखा- द्याची स्थापना. ३ एखद्या देवतेच्या सन्मानार्थ उभारलेल्या स्मारकाची स्थापना. ४ देवादिकांच्या मूर्तींची यथाविधि स्थापना; प्राणप्रतिष्ठा. 'प्रतिमाप्रतिष्ठेसि पहाहो । प्रकटे आयुर्भावो मंत्रमात्रें ।' -एभा १.१७०. ५ नवीन बांधलेला घरांत राहण्यास जाण्या- पूर्वीं करितात तो विधि; घरभरणी. ६ भ्रष्ट झालेल्या देवादिकांच्या मूर्तीची पुन्हां स्थापना. ७ वसतिस्थान; गृह. ८ डौल; आढ्यता; अभिमान. (क्रि॰ करणें; मिरवणें; बाळगणें). ९ देवळास मिळा- लेली नेमणूक, वर्षासन इ॰ १० हुंडा देऊन मुलीचें लग्न लावणें. ११ आयुष्यांत स्थिर, कायम, स्थायिक होणें. १२ (सामा.) स्थिरता; स्थैर्य; कायमपणा; स्थापना. 'बुद्धी धैर्या होय वसौटा । तरी मनातें अनुभवाचिया वाटा । हळु हळु करी प्रतिष्ठा । आत्मभु- वनीं ।' -ज्ञा ६.३७८. १३ (निंदार्थीं) अप्रतिष्ठा; अपमान. [सं.] म्ह॰ कुचेष्टेवांचून प्रतिष्ठा वाढत नाहीं. पंधरा प्रकारच्या प्रतिष्ठा-दिमाखानें व गर्वानें फुगून जाणें; फाजील, अतोनात डौल; मिजास; आढ्यता. सामाशब्द- ॰नाम, प्रतिष्ठित नाम-न. व्यवहारांत आदरार्थीं योजावयाचें टोपण नांव. (दादा, तात्या, नाना बापू, अण्णा इ॰). व्यवहारिकानांव पहा. ॰वस्त्र-न. १ सभा, दरबार इ॰ ठिकाणीं प्रतिष्ठेनें घेऊन जावयाच्या उपयोगी पोषाख. उंची, भारी, सुंदर, छानछोकीचा पोषाख. २ उंची पोषाखांतील एक वस्त्र.

दाते शब्दकोश

प्रथा

स्त्री. १ रूढि; प्रवात; सर्वसाधारण चाल; पद्धति; सरणी. 'निःसंगत्वादि प्रथा । कैसेन होती ।' -रास १ ६९. २ प्रसिद्धि कीर्ति, प्रख्याति. 'तुझेनि पाडे पाहतां । आणिकाचि काय कथा । पुरुषोत्तम हे प्रथा । तुजचि कां घडली ।' -रास १.९६९. ३ लोकमत; सर्वसाधारण भावना. ४ लोकसमाज. ५ अनुभव; बुद्धि; प्रतीति. 'किंबहुना ऐसी प्रथा । वाढती देखसी पार्था ।' -ज्ञा१८. ५७४. ६स्थिति. -शर. [सं.] म्ह॰ जी प्रथा पडली ती अंगी जडली. प्रथित-वि. प्रसिद्ध; कीर्तिमान्; नावांजलेलें; प्रसिद्ध केलेलें; उघडपणें जाहीर केलेलें. [सं.] प्रतिथि-स्त्री. प्रसिद्ध; सर्वत्र आवड; ख्याति. [सं.]

दाते शब्दकोश

प्रवाह

पु. १ जल, वायु, अग्नि इ॰ची गति किंवा एका दिशेकडे गमन; ओघ; वाहणें. जसें:-जल-उदक-रक्त-दुग्ध- प्रवाह. २ (ल.) कामाकाजाची सरणी, ओघ. ३ भाषणाचा अखंड- पणा; अकुंठित ओघ. ४ कामधंदा; उद्योग; हालचालीचें जीवन. ५ (प्रेम, बुद्धि इ॰चा) कल; झोक; प्रवृत्ति. ६ ओढ; पक्षपात; प्रवृत्ति; धांव. [सं.] प्रवाहांत पडणें-जनसमुदायाच्या वर्तना- प्रमाणें किंवा रूढीप्रमाणें वागणें. सामाशब्द- ॰पतित-वि. (शब्दशः व ल.) प्रवाहांत पडलेला; प्रवाहाप्रमाणें जाणारा; परिस्थितीप्रमाणें वागणारा; गतानुगतिक. 'या कर्मभूमींत कर्म निसर्गतः प्रवाहपतित असून अपरिहार्य आहे.' -ठिसू ५०. ॰पतित कर्तव्य-न. ओघाओघानें आलेलें कार्य; प्रसंगोपात्त कर्म. 'हें प्रवाहपतितकर्तव्य करीत असतां त्यांत कोणास दुखवावें लागल्यास त्याची जबाबदारी आमच्यावर येत नाहीं.' -टि ३. २९२. प्रवाहित्व-न. वाहतें राहण्याचा धर्म; द्रवता; जलरूपता. प्रवाही-वि. वाहणारें; पातळ; द्रवरूप. [सं.] ॰खत-न. जनावराचें मूत्र. प्रवाहे मूत्रित-वि. १ वाहत्या पाण्यांत मुतलेलें. २ (ल.) व्यर्थ, निष्फल केलेली (खटपट, काम, प्रयत्न इ॰). ॰वायु-पु. द्रवरूप, जलरूप वायु. (इं.) लिक्विड गॅसेस.

दाते शब्दकोश

प्रवृत्ति-त्ती

स्त्री. १ प्रस्थापना; व्याप्ति; परिपाठ; प्रघात; रूढी. जसें:-कर्म-काल-देश-धर्म-आचार-प्रवृत्ति. २ चाल; गति; गमन; आरंभ; सुरवात. ३ निमग्नता; चळवळ; हालचाल; एखाद्या कामांत गुंतलेलें असणें. ४ संसार; प्रपंच; संसारांतील आसक्तता; आत्मस्वरूपाचा विसर पडून प्रापंचिक व्यवहारोन्मुखतारूप जीवाची विशेषवृत्ति; बर्हिमुखवृत्ति. याच्या उलट निवृत्ति. 'आंतुला चित्ताचे अंगवरी । प्रवृत्ति पेलोनि माघारी ।' -ज्ञा १६.९१. ५ (ल.) प्रवाह; ओघ; प्रगति. ६ कल; ओढ; धांव; झोक (प्रेम, बुद्धि, मन इ॰चा). ७ आसक्ति; पक्षपात ओढा. ८ कर्ममार्ग. 'तेथें भ्रमेंसहित पळाली भ्रांती । क्रियेसहित गळाली प्रवृत्ति ।' -एभा १३.४२१. ९ प्रेरणा. 'तो साधी चिद्रुपु । कर्मप्रवृत्तिचा संकल्पु ।' -ज्ञा १८. ४५७. १० प्रेरक; प्रेरणाहेतु. 'म्हणोनि ज्ञान ज्ञेय ज्ञाता । हे त्रिविध गा पांडुसुता । होयचि कर्मा समस्तां । प्रवृत्ति येथ ।' -ज्ञा १८.४८५. ११ प्रघात; रूढी. 'तरी हें प्रवृत्तीचें बोलणें । प्रत्ययास आणी उणें ।' -दा ९.७.११. १२ बातमी. -शर. १३ कर्म; क्रिया. [सं. प्रवृत्ति] ॰निमित्त-न. (व्या. न्याय) विशिष्ट अर्थानेंच शब्दाचा उपयोग किंवा रूढि होण्याचें कारण. [सं.] ॰मार्ग-पु. प्रापंचिक व्यवहाराचा मार्ग; ऐहिक सुखासंबंधींचा उद्योग; धार्मिक क्रिया, विधी, आचार इ॰. याच्या उलट निवृत्तिमार्ग. ॰रोचक- वि. प्रवृत्ति करणारें; एखाद्या गोष्टीकडे मन वळविणारें. 'तेवीं वेद बोले जें फळ । तें प्रवृत्तिरोचक केवळ ।' -एभा १८.३६०. ॰स्वातंत्र्य-न. इच्छास्वातंत्र्य.

दाते शब्दकोश

पवाड-डु

पु. १ मोठेपणा; कीर्ति; महत्व. 'हे मारिले ते वर थोडे । आणीकही साधीन गाढे । मग नांदेन पवाडें । येकलाचि मी ।' -ज्ञा १६.३५२. 'कीं हा ईश्वराचा पवाड ।' -दा १.७. ३३. २ विस्तार. 'निश्चळ चंचळ आणि जड । अवघा मायेचा पवाड ।' -दा १२.३.८. ३ ठाव; अवकाश. 'जयाचिये प्रती- तीचा वाखारां । पवाडु होय चराचरा । तो महात्मा धनुर्धरा । दुर्लभु आथा ।' -ज्ञा ७.१३७. ४ इच्छा. 'जे विटे ना सरे । भोगि- तयाचेनि पवाडे पुरे ।' -ज्ञा ८.२६४. ५ ठिकाण. ६ कौशल्य. 'मग फेडूं यया बुद्धी । पवाडु कीजे ।' -अमृ ७.६३. ७ एक काव्य- प्रकार. पोवाडा पहा. [सं. प्रवृद्ध; प्रा. पवड्ढ; तुल॰ सं. प्रवाद]

दाते शब्दकोश

फा(फां)कणें

अक्रि. १ निरनिराळ्या दिशांनीं सर्वत्र पस- रणें; विस्तार पावणें; सर्व जागा व्यापणें.' कर्णींची कुंडलें झग- झगीट । प्रभा फांकत दशदिशा ।' २ विसकटणें. ३ भटकणें; सैरावैरां जाणें; एकावरच केंद्रीभूत होतां चहूंकडे पसरणें (दृष्टि, बुद्धि, ज्ञान, मन इ॰). ४फुलणें. 'एर्‍हवीं जाईचियां फुलां फांकणें ।' -ज्ञा १८.२५७. ५ विषयांतर करणें; पाल्हाळ लावणें. 'कथेसी फांकलों सर्वथा । तो कोपू न मानावा श्रोतां ।' -एभा ९.४३९. ६दूर होणें; वियोग होणें. 'आजी दिसे हरी फांकला यांपाशीं । म्हणऊनी ऐसी परी जाली ।' -तुगा ४५. ७ रुंदावणें; ताणलें जाणें, असणें; रुंद विस्तृत होत जाणें (पाय, शिंगें, फांद्या, रस्ते इ॰). ८ (मन) आकांक्षायुक्त असणें; इच्छा दूरवर पोंचणें, जाणें. ९ वितळणें; आसरणें (घट्ट बेडका). १० पातळ होणें; द्रवणें (थिजलेलें रक्त). ११ वाढणें; वृद्धिंगत होणें. 'तुमचें ऐश्वर्य त्रिजगी फांकें ।' -मुसभा १.३३. १२ प्रकाशित होणें (दिशा). -उक्रि. फोडी करणें; फांकी काढणें. [सं. स्फातीकृत; प्रा. फाई- कय = फैलावलेलें]

दाते शब्दकोश

फाँपावणें, फांपाइणें

अक्रि. १ (झाडाला) भरगच्च पालवी येणें; फोफावणें. २ लठ्ठ होणें; वाढणें; पुष्ट होणें फुगणें (माणूस, जनावर). ३ (ल.) विस्तारणें; फैलावणें. 'देखणें वृत्तीची गजगजा । फांपावत चालली ।' -वेसीस्व ११.२१. 'सद्गुरु अंतरीं विचारी आधीं । म्हणे याचे ठायीं असे दृढ बुद्धि । तेणें हा फांपावला त्रिशुद्धि । यासी कांहीं सुचेना ।' -स्वादि १०.१.४२. [फाप! हिं. फांपना]

दाते शब्दकोश

फहम

(स्त्री.) हिंदी अर्थ : समझ, अक्ल. मराठी अर्थ : बुद्धि, ज्ञान.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

राळ

स्त्री. १ शालनिर्यास; एक ज्वालाग्राही डिंकासारखा पदार्थ. ज्यांपासून हा डिंक निघतो तीं झाडें बंगाल, अबूचा पहाड व उत्तरहिंदुस्तान यांत होतात. २ रातकिडा. हा सरलपक्ष कीटक बिळांत रहातो. याचा रंग उदी असतो. ३ (ल.) नास- लेली, बिघडलेली, विचका झालेली, भंगलेली, फजीती झालेली, मोडलेली स्थिति. पिठाड, पीठ, धूळ, भूसाडा इ॰ पहा. ४ हुर्रे- वडी; फटफजीती. 'झाडाचा पाला समजून राळ करितात.' -कफा प्र २. ५ चांदीसोन्याचा गट. [सं. राल] (वाप्र.) ॰करणें- १ घाबरवून सोडणें, फट फजिती दैना, दुर्दंशा करणें. २ नाश करणें. 'आशा तृष्णा कल्पना काम क्रोध काळ । दुरविलीं शुद्ध बुद्धि केली राळ ।' -तुगा ४०६६. ॰पाट-पु. एखाद्या जिन्न- साला नक्षी काढतांना तो जिन्नस चिकटून रहाण्यासाठीं राळ लाव- लेला चौकोनी, वाटोळा लाकडी तुकडा.

दाते शब्दकोश

ऋद्धि

स्त्री. १ ऐश्वर्य; संपत्ति; भरभराट; समृद्धि; लक्ष्मी. 'का तपोबळें ऋद्धी । पातलिया भ्रंशे बुद्धी ।। ' -ज्ञा १.१८८. २ ऐश्व- र्याचा, भरभराटीचा काळ. [सं.] ॰सिद्धी-स्त्री.अव. १ गणपतीच्या दोन दासी, परिचारिका; सामान्यतः ऋद्धि. ' ऋद्धिसिद्धिसहित महागणपतिभ्यो नमः । ' (विरू.) रुध्दिसिद्धि पहा. २ ऋद्धि आणि सिद्धी (अष्टमहासिद्धि); संपत्ति आणि यश.

दाते शब्दकोश

ऋद्धि, ऋद्धी      

स्त्री.       १. ऐश्वर्य; संपत्ती; भरभराट; योगाने मिळवलेली समृद्धी; लक्ष्मी : ‘कीं तपोबळें ऋद्धी । पातलिया भ्रंशे बुद्धी ।’ − ज्ञा १·१८८. २. ऐश्वर्याचा, भरभराटीचा काळ. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

साग्यालाग्या, सागालागा

वि. १ एखादी योजना, घटना घडवून आणणारा; युक्तिबाज. लागलाव्या पहा. २ लबाड्या, कारस्थानें करण्यांत ज्याची बुद्धि चालते असा. 'पांचसांत सागेलागे जमविले आणि दरोडा घातला.' [सागलाग]

दाते शब्दकोश

शैली

स्त्री. (एका प्रकारच्या बुद्धिबळांच्या खेळांतील राणी व प्रधानाची बायको. ॰बाजी-स्त्री. एक प्रकारचा बुद्धि- बळांचा खेळ. यामध्यें दोन शैली असून पटावर शंभर घरें असतात.

दाते शब्दकोश

सांग

स्त्री. धा नाम. १ सांगणें; सांगणी; निरोप. (क्रि॰ सांगणें). 'प्रियवधुसि वराला सांगता सांग झाला.' -आमा ९.२ आज्ञा; हुकूम. [सांगणें] ॰कामी-म्या-वि. १ स्वतःची बुद्धी न चालवितां नुसतें सांगितलेलें काम करणारा; वेळेप्रमाणें वागण्याची अक्कल नसणारा (निंदाव्यंजक उपयोग). २ ज्यानें नुसतें सांगि- तलेलें काम करावयाचें आहे असा; नुसता तंतोतंत हुकूम पाळला पाहिजे असा. (वाप्र.) सांगितल्या कामाचा दिल्या भाक- रोचा-केवळ सांगितलेलेंच काम करणारा व मिळेल तें खाणारा. ॰सरभरा-स्त्री. १ बोलण्यानें, (एखाद्याबद्दल) गौरवानें सांगून, शिफारस करून मदत करणें. 'त्यानें स्वतः कांहीं दिलें नाहीं पण माझी सांगसरभरा अशी केली कीं माझें लग्न झालें.' २ मदतीच्या थापा देणें; शाब्दिक मदत. 'होय, हा माझा माबाप खरा. ह्यानें असें करीन तसें करीन, हें देईन तें देईन म्हणतां माझी सांगसरभरा केली.' ॰सुगरण-सुग्रण-वि. नुसती बोलण्यांत हुषार; तोंडपाटिलकी करणारी स्त्री. 'मावशी म्हणजे सांगसुग्रण, चुलीजव- ळच्या नुसत्या गप्पा.' ॰सुगराई-सुग्राईस्त्री. बोलण्यांत शहाणा पणा. सांगणा-वि. निरोप्या; बोलावणेंकरी. -ख्रिपु २.४.१२. [सांगणें] सांगणी-क्रि. १ शिकवण; आदेश; सूचना. २ सांगणें; बोलणें; निरोप (क्रि॰ सांगणें). ३ शिकवण्याची, समजूत देण्याची पद्धत. सांगणीचा-वि. १ वधूपक्षीयांनीं वधूकरितां द्रव्य किंवा कांहीं मोबदला न घेतां तिचा केलेला (वाङ्निश्चय, विवाह). २ अशाप्रकारें विवाहित (कन्या). सांगणें-अक्रि. १ कळविणें; कथणें. २ करण्याविषयीं आज्ञापिणें; सुचविणें (काम, मामलत, अधिकार, रोजगार, चाकरी इ॰). ३ बोलावणें, निमंत्रण करणें (भोजन, समारंभ इ॰ स). ४ शिकविणें; समजावणें (अध्ययन, ग्रंथ, विद्या इ॰). ५ म्हणून दाखविणें (विद्या- र्थ्यास शिक्षकास, धडा इ॰). [प्रा. संघइ-तुल॰ सं. सांगतिक = गोष्टी सांगणारा; मनु ३.१०३.] (दुखणीं, संकटें, कुकर्मे इ॰ नीं) (अवघड, कठीण, जड) सागणें-(त्यांचा) परि- णाम कठीण होणें. सांगून येणें-विवाहासाठीं देऊं करणें (मुलगी). 'माझ्या भावास एक मुलगी सांगून आली आहे.' सांगणोवांगणी, सांगा(गी-गो)वांगी, सांगा- सांगी-स्त्री. १ प्रत्यक्ष प्रमाण नसतां एकानें दुसर्‍यास, दुसर्‍यानें तिसर्‍यास सांगण्याची परंपरा; ऐकीव गोष्ट; गप्पा. 'सांगणो- वांगणीचें काम नव्हे । आपुल्या अनुभवें जाणावें ।' -दा १०. १०.५३. २ गप्पा छाटणें; बकवा करणें. ३ एखादी गोष्ट अनेकांना सांगणें; बोभाटा करणें. [सांगणें द्वि.] म्ह॰ सांगा- सांगीं वडाला वांगी. सांगता-वि. सांगणारा. 'हरिकथेची महिमा कैसी । आदरें पुसतां सांगत्यासी ।' -एभा ३.५८७. सांगवा-पु. (माण. क.) निरोप. 'मला तुमचा सांगवा पोंचला नाहीं.' सांगी-स्त्री. सांग पहा. १ निरोप. २ उपदेश; समजावणी. 'दुष्टांच्या सांगीवरून आथेल्लोची दुर्गति झाली.' -विवि ८.४.८२. ३ आज्ञा; हुकूम. सांगिजणें-सांगणें; सांगि तलें जाणें. -विपू २.७९. 'कसें कार्या या तुम्हीं सांगिजे तें ।' -र ३८. 'मग आणिक उपचारु केला तेहीं । तो सांगिजैलु आतां ।' -शिशु ७७२.

दाते शब्दकोश

सार्ष्टिता, सार्ष्ट्य

न. (पंचधा मुक्ति मानतात तेव्हां चवथी मुक्ति). बुद्धि, बल, ऐश्वर्य इ॰ सर्व गुणांत परमेश्वराशीं साम्य; एक प्रकारचा मोक्ष. [सं.]

दाते शब्दकोश

साटी

स्त्री. सट्टा; खरेदीचा करार. 'पाण्यांतील म्हैसीची साटी । करणें हेचि बुद्धि खोटी ।' -दा १०.८.१०. [गु. साटुं = खरेदीविकिचा करार. म. साटें]

दाते शब्दकोश

साठ

वि. ६० ही संख्या; षष्टि. [सं. षष्टि; प्रा. सट्टि] ॰संवत्सर-पुअव. प्रभव, विभव इ॰ साठ संवत्सरांचीं नांवें (हिंदु कालगणनेंतील, संवत्सर पहा). साठळणें-अक्रि. (वयाला साठ वर्षे होणें) म्हतारचळ लागणें; फार वय झाल्यानें बुद्धिभ्रंश होणें. साठियुं-पु. (गुजरात) निळवा; लवकर तयार होणारी जोंधळ्याची जात. -कृषि २६६. साठी-स्त्री. १ साठाचा समुदाय; संच. २ साठ संख्या. 'नाराच साठि आधीं प्रभुतें मग तीन जिष्णुतें ओपी ।' -मोकर्ण ११.१९. ३ साठ वर्षांचें वय. ४ या वयांत होणारी अवस्था; म्हतारचळ. ५ तांदूळ, नाचणी यांची एक जात; साठेरा-री. म्ह॰ साठी आणि बुद्धि नाठी. ॰उलटणें-म्हातारापण येणें. ॰बुद्धि-स्त्री. म्हातार. चळ; बुद्धिभ्रंश. साठें-न. (कु.) साठ दिवसांनी पिकणारें भात. साठेरा-री-वि. १ साठ दिवसांत तयार होणार्‍या भातची एक जात. २ नाचणीची एक जात.

दाते शब्दकोश

साठी

साठी sāṭhī f (साठ) An aggregate of sixty. 2 The age of sixty. Pr. साठी आणि बुद्धि नाठी. 3 The state of second childhood, dotage, superannuation. 4 A kind of rice which ripens in sixty days. 5 (Or साटी) A light and flexile frame (composed of slit bamboos &c.) forming the flooring or deck of boats, lofts &c.; the lathing of a roof &c. 6 The bottom or bed of a गाडा or load-cart.

मोल्सवर्थ शब्दकोश

सौरस

पु. १ गोडी; प्रसाद. 'म्हणउनि मागे कंठीचा सौरस ।' -तुगा ८७८. २ संबंध. 'हें कल्पनेचेनि सौरसें ।' -ज्ञा ९.९१. ३ सामर्थ्य. -ज्ञा १०.६. ४ अभिप्राय. 'आंता अदंभा- चिया वोळखीसी सौरसु देवो ।' -ज्ञा १३.२०१. ५ योग्यता; 'तेथ सौरसेवीण जाय । बुद्धि तयाची ।' -ज्ञा ६.४५९. ६ आसक्ती; हेतु; इच्छा. 'पुरवी सौरस मनींचा ।' -एभा १५६५. ७ यत्न. [सं. सुरस] सौरस्य-सौरहस्य-न. १ सुरसपणा; प्रेमभाव. २ सुरसपणा; चवदारपणा. ३ मैत्री; स्नेहभाव; उत्तमप्रकारचें दळण- वळण.

दाते शब्दकोश

सिद्धप्रज्ञा

अभिजात बुद्धी (ज्ञानेश्वरी अध्याय ६, ओवी ४५४)

ज्ञानेश्वरीमधील कठीण शब्दांचे अर्थ (राज्य मराठी विकास संस्था प्रकाशित)

शिदोरी

शिदोरी śidōrī f (सिद्ध & दोरी Cord of the slung basket or pot.) Victuals or dressed provisions (as carried on a journey, taken or sent to the fields or another's house &c.) Pr. शिकविलेली बुद्धि आणि बांधलेली शि0 सर्वदा पुरत नाहीं. 2 Victuals (given by women to Bráhmans, esp. in the rainy season). 3 Victuals (given to a stranger-child, in order to obtain पुण्य or merit). See the note under शिधा.

मोल्सवर्थ शब्दकोश

शिदोरी, शिधोरी

स्त्री. १ रान, शेत मार्ग इ॰ ठिकाणीं खाण्यासाठीं गाठोड्यांत बांधून घेतलेलें अन्न; प्रवासांत वरोबर घेतलेले खाद्यपदार्थ; 'कथिली विदुरें सन्मति जाणों दिधली तयां शिदोरी ती ।' -मोसभा ७.३८. २ चातुर्मासांत बाय- कांनीं ब्राह्मणांना दान दिलेला शिधा, अन्नपाणी. ३ पुण्य संपा- दण्यासाठीं परक्या मुलांना दिलेलें अन्नपाणी. ४ गुराखी, मजूर शेतांत किंवा कामावर बांधून नेतात तें अन्न. 'काखेसि घेवोनि शिदोरी । गोपाळा सहित श्रीहरि ।' -कथा ४.५.३. [सं. सिद्ध + दोरी] म्ह॰ शिकविलेली बुद्धि आणि बांधलेली शिधोरी (सर्वदा पुरत नाहीं).

दाते शब्दकोश

शिकणें

क्रि. १ विद्या-कला-शास्त्र यासंबंधीं धडे घेणें; विद्या मिळविणें. २ अभ्यास करणें. [सं. शिक्ष्. प्रा. पं. सिखणा. सिं. सिखणु. हिं. सीखना. गु. शिखवुं. बं. शिखिवा. फ्रें. जि. सिक] म्ह॰ शिकलेली बुद्धी आणि बांधलेली शिदोरी (फार वेळ पुरत नाहीं). शिकणाऊ-वि. १ शिकणारा; शिकाऊ; विद्यार्थी; अभ्यासक; नवशिक्या; उमेद- वार. 'लिहिणें पुष्कळ पडलें आहे, कोणी शिकणाऊ कारकून असेल तर लिहावयास आणून बसवा, म्हणजे दोघांचींहि कामें होतील'. २ उपजत नव्हे परंतु अभ्यासानें संपादन केलेलें; गुरूपासून शिकून साध्य केलेलें (गाणें, बोलणें इ॰). शिक वण-णी-स्त्री. १ शिकविण्याची पद्धत; रीत. २ वाईट अर्थानें सुचविणें; फूस देणें; प्रवृत्त करणें. (क्रि॰ लावणें, देणें). ३ उपदेश; शिक्षण; बोध देणें; शिकविणें. ४ शिक्षणाचें वेतन. 'पुष्कळ वर्षे त्याचा चारितार्थ शिकवणीवर चालला होता ।' -नि ६१४. [शिकविणें] शिकवाशिकव-स्त्री. दोन्हीं पक्षांना चिथावणी देऊन त्यांच्यामधील कलह चेतविणें; फूस देऊन भांडण वाढविणें. [शिकविणें द्वि.] शिकविणें-क्रि. १ शिक्षण देणें; आध्यापिणें. २ उपदेश, बोध करणें; पटविणें. ३ (वाईट अर्थानें) उत्तेजन देणें व मनांत भरविणें; चेतविणें; प्रवृत्त करणें. [शिकणें] शिकाऊ-वि. शिकणाऊ पहा.

दाते शब्दकोश

शीळ

वि. श्लील; शुद्ध; सात्त्विक; पवित्र. 'त्यांची शीळ बुद्धि कैसी । सकाम मानसीं स्पर्शेना ।' -भारा. अर. ४.५. [सं. श्रीर]

दाते शब्दकोश

समीक्षण, समीक्षा

नस्त्री. १ सूक्ष्मशोध, तपास; छाननी; बारीक परीक्षा, तपासणी; अवलोकन; न्याहाळणें. २ आत्म- विद्या; बुद्धि; सांख्यशास्त्र.

दाते शब्दकोश

सम-संयोग

दुधांत साखर, रत्नाला सुवर्णाचे कोंदण, आधीं सोन्याचे त्यांत जडावाचें, सुवर्णाला सुगंध, जणूं राम -लक्ष्मणांची जोडी, चंदनी काठीला चांदीची मूठ, किंमती सुरीला शिसवी मूठ, तलम साडीला जरीचा कांठ, सौंदर्याच्या जोडीला बुद्धि, पैशाबरोवर औदार्य, मर्दांचे पोवाडे मर्दांनीं गावेत, चांभाराच्या देवाला खेटराची पूजा, त्या हिडिंबेला हा खवीस भेटला, लाठी लाठीस भेटीस भेट, आंधळ्याला बहिरा भेटला, मणिकांचन न्याय.

शब्दकौमुदी

सन्मति

स्त्री. चांगली बुद्धी; सुविचार; योग्य प्रवृत्ति.-वि. सुविचारी; चांगल्या मनाचा, बुद्धीचा; नीतिमान; समजदार. [सं.]

दाते शब्दकोश

संधान

न. उपाययोजना; शक्ति, युक्ति, साधनें यांची योग्य तरतूद व योजना; एखादें कार्य घडवून आणण्याच्या कामीं प्रयत्न, बुद्धि व शक्ति यांचा योग्य मिलाफ करून योजना २ योग्य रीति, मार्ग, पद्धति (एखाद्या कार्याच्या सिद्धयर्थ). ३ नेम; निशाण; लक्ष्य. 'रिपुकंठीं हा शर लागेल या न संधानें ।' -मोकर्ण ४७.७०. ४ कल, प्रवृत्ति, रोंख (मन, इच्छा, डोळा वगैरेचा). ५ मनाची धारणा; लक्ष्य; अवधान; ध्यान. 'मूळ ग्रंथाचें संधान राखून मग आपलें राखायचें' -नि १९६. ६ कावा; कपट; युक्ति. 'चोर डाक होती गिलचांची नाहीं कळले संधना' -ऐपो ११८. 'करिता जाहला घोर संधान ।' -रावि ३२.११. ७ घबाड; डबोलें; ठेवा. 'आम्हांस मार्गांत कांहीं चांगलेसें मोठें संधान साधेना.' -विवि ८.८.१५४. ८ सुमार; समय; संधि. 'दसर्‍याच्या संधानास मी तुमचे गांवीं येईन.' ९ वग; वशिला; सूत्र. [सं. सभ् + धा] संधानी-वि. हुशार; धूर्त; युक्तिबाज; कावेबाज; संधान लावणारा, बांधणारा.

दाते शब्दकोश

संग्राहक

संग्राहक a That collects, assembles; includes. संग्राहक बुद्धि or धोरण The mentality or the policy of inclusion or comprehension.

वझे शब्दकोश

संगत

चोरापाशीं बसतां तशी बुद्धि होतें; चिंधी पाहून मन धावतें, संगतीनें पंगतीचा लाभ होतो, संगतीवरून मनुष्य ओळखतो, अलीकडे त्यांच्यामध्यें सांपडतो, आवर्तींभोंवतीं हे लोक आहेत, त्याच्या पुठ्ठ्यांत हा, ही जोडी जमली आहे, जा-ये यांचेकडेच फार, यांचीं पावलें एकत्र पडत आहेत, एकत्र आढळतात, तो असेल तेथे हा असतो, एका कळपांतले आहेत ते, एका फोटोंत दोघे आहेत.

शब्दकौमुदी

संज्ञा

स्त्री. १ नांव; अभिमान; आख्या; संकेतशव्द. २ संकेत; खूण; इषारा; चिन्ह. 'आणि आंगी वृद्धाप्यतेची । संज्ञा ये मरणाची ।' -ज्ञा १३.७६१. 'संज्ञा करोनि मातेसी ।' -गुच ११.६१. ३ गायत्री. ४ (व्या.) पारिभाषिक नांव; शास्त्रीय नांव. ५ शुद्धि; चेतना; ज्ञान; बुद्धि. [सं. सम् + ज्ञा = जाणणें] ॰पत्र-न. मुखपृष्ठ; नामपत्र. 'या ग्रंथाच्या संज्ञापत्रावरून तीन ग्रंथांचीं यांत नावें आलीं आहेत.' -नि ४४४. ॰वान्-वि. १ प्राज्ञ; जाणता; विद्वान. २ शुद्धींत असलेला; सावध.

दाते शब्दकोश

संकुचित ( दृष्टिकोन)

जशी माती तशी मति, तात्कालिकाच्या पलीकडे कधीं गेलेच नाहीत, तळ्यांतला बेडूक तो; त्याची विचारसरणी ती काय असायची ? नाकाच्या पुढे फूटभर तरी पाहतील तर ना ? मी व माझे यापलीकडे विचार जात नाहींत, व्यापकते चा अभाव, सर्वांना सामवून घ्यायला लागतें तें नाहीं, पोथ्या-पुराणांपलीकडे गेले नाहीत, चिंचोळे मन, थिट्या जगांतली थिटी बुद्धि.

शब्दकौमुदी

संपन्न

संपन्न sampanna p (S) Possessed of, endowed with, esp. with implication of Copiousness, richness, fullness. In comp. as शास्त्रसंपन्न Master of the Shástras, विद्यासंपन्न, पुत्रसंपन्न, ज्ञानसंपन्न, धनसंपन्न, गुण- संपन्न, आख्यासंपन्न, पुण्यसंपन्न, सैन्य-अश्व-गज-पदाति- रथ-ऐश्वर्य-कीर्त्ति-वृत्ति-वित्त-शक्ति -बुद्धि -विचार -वेदशास्त्र -संपन्न. 2 Prosperous, flourishing, thriving, opulent, affluent. 3 Accomplished, achieved, effected: also attained, obtained, acquired.

मोल्सवर्थ शब्दकोश

संसर

पु. १ संचार; गमन; येजा; वापर. २ पसारा; संगति. ३ चूक; च्युति; प्रमाद. 'तैसे दुर्भेद्य जे अभिप्राय । कां गुरुगम्य हन ठाय । तेथ संसरेवीण जाय । बुद्धि तयाची ।' -ज्ञा ६.४५९. [सं. सम् + सृ] संसरण-न. १ गमन; जाणें; पुढें सरणें; संचार. २ जन्म, स्थिति, लय वगैरे; जगांतील अस्तित्व; आयुष्यांतील व्यापार. ३ आत्म्याचें आगमन बहिर्ग- मन; जीवाचा फेरा; जन्ममरणाचा फेरा. 'तरी जिवांचें संस- रण । कां न चुकिजे ।' संसरणें-अक्रि. १ जगणें व मरणें; जन्म, स्थिति, लय यांतून जाणें; संसारचक्रातून जाणें; भ्रमणें. २ सांवरणें; आटोपणें. 'म्हणोनि असो हें यापरी । तो देखे ज्ञानाची वाखारी । तेणें संसरले निकरी । आपु विश्व ।' -ज्ञा ७. १३५. ३ सरसावणें; उद्युक्त होणें; प्रवृत्त होणें. 'वागोरे सांवरा- वया गोविंदा । संसरलिया ।' -ज्ञा ११.२९६. [सं. सम् + सृ = सरणें] संसरा, संसारा-पु. १ स्थिति; उद्भव; प्रादुर्भाव. 'मोक्षाचा संसारा । उणा नोहे ।' -ज्ञा १४.२८४. 'श्रीरामा आणि दिनकारा । वेगळिकेचा संसरा । क्षीरसागरा आणि क्षीरा । जेणे रीती ।' -स्वादि १.२.९०. २ पसारा; विस्तार. 'कैसा वासनेचा संसरा । देहा हों नेदी उजगरा ।' ज्ञा ५.५४. 'नामरूपाचा संसारा । होय जयातें ।' -ज्ञा १५.७६. ३ लाभ; संगति; जोड. 'कां स्नेहा, सूत्रा, वैश्वानरा । जालियाहि संसारा ।' -ज्ञा १७.३५१. 'बोधाचा हा संसारा । जाला जो आमुतें ।' -ज्ञा १८.१७५८. संसरिसु-क्रिवि. एकदम: तात्काळ. 'कीं अग्नी घातला पोतासु । ऐसें नव्हे संसरिसु । वेंच झाला ।' -अमृ ७.१७७.

दाते शब्दकोश

संत (खोटा)

सर्प उपास करतो; बगळा ध्यान लावतो; उंदीर जागोजाग भटकतो; गाढव राख चोपडतो; कावळा तीन-त्रिकाळ स्नान करतो; उन्मत्त विवस्त्र हिंडतो-म्हणून हे संत ठरत नाहींत ! त्यांची आंतली बुद्धि खोटी व पोटांत वाईट असतें, या सर्व गोष्टी करणा-या संतबुवांची गोष्ट वेगळी नाहीं.

शब्दकौमुदी

श्रद्धा

स्त्री. १ पूज्य बुद्धि; आदर; भक्ति; भाव; निष्ठा. २ आस्तिक्यबुद्धि; विश्वास. 'मग 'मग श्रद्धायुक्त । तेथिंचे आराधन जें उचित ।' -ज्ञा ७.१४९. ३ इच्छा; अभिलाष; हेतु. 'हो कां वामिलिया मिष्टान्ना । परतोनि श्रद्धा न धरी रसना ।' -एभा २०.१०१. 'पहा हो भिकारिणीची चेष्टा । श्रद्धा करितसे राज्य- पदा ।' -कथा १.५.१२. [सं. श्रत् + धा = ठेवणें] ॰जाड्य- न. श्रद्धेबद्दलचा हट्ट; एखाद्या गोष्टीवर विरुद्ध प्रमाण दिसलें तरी हट्टानें विश्वास ठेवणें. ॰भक्ति-स्त्री. १ ईश्वरासंबंधीं प्रेम व विश्वास; निष्ठा व आदर; अंतःकरणांत दृढभाव व बाहेरून पूजा, सत्कार वगैरे. (क्रि॰ करणें; ठेवणें; असणें). श्रद्धालु- ळू, श्रद्दधान, श्रध्दावान-वि. श्रद्धा ठेवणारा; भाविक; विश्वासी. श्रध्देय-वि. श्रद्धा ठेवण्यास योग्य; विश्वसनीय; विश्वासार्ह.

दाते शब्दकोश

स्त्रिया

थोडक्या अकलेवर पुष्कळ काम भागविणें स्त्रियांनाच साधतें, अभिरुचि दोन प्रकारची असते- एक चांगली व एक बायकांची, बायकांची बुद्धि चुली पुरती, रांधा वाढा उष्टीं काढा हेच त्यांचे ध्येय साध्य, बायका फार बोलतात; साहजिकच आहे जीभ हा शब्दच स्त्रीलिंगी आहे ! स्त्रिया शक्य तेव्हां हंसतात आणि वाटेल तेव्हां रडतात, चूल व यांत गर्क प्राणिजात, पुरुषाचा उभा जन्म एका स्त्रीच्या सेवेत जातो आणि ती स्त्री त्याला हाताच्या बोटावर खेळविते, चराचर जग ज्या प्रकृतींत साठविलें आहे ती.

शब्दकौमुदी

सत्त्वहीन

सत्त्वहीन sattvahīna a (S) Devoid of cream, pith, sap, solid substance; also of vigor, virtue, spirit, active principle. See under सत्त्व. Ex. स0 मी बहुतापरी ॥ बुद्धि अघोर असे माझी ॥.

मोल्सवर्थ शब्दकोश

स्थित

वि. असलेलें; थांबलेलें; उभें असलेलें; राहिलेलें. [सं. स्था = राहणें] ॰प्रज्ञ-वि. सिद्ध; ज्याची बुद्धि स्थिर झाली आहे असा.

दाते शब्दकोश

शुद्ध

स्त्री; शुद्धि; अपभ्रंश. शुद्धि पहा. ॰बुद्ध-स्त्री. शुद्धि व बुद्धि; ज्ञान; स्पष्ट जाणीव. -वि. १ (ल.) शुद्ध स्फटिक पहा. निरक्षर; निर्बुद्ध; ढ. २ खलास; निकाल; शून्यवत्. 'घृत नवनीत दधिदुग्ध । खाऊन केलें शुद्धबुद्ध ।' -ह ६. ११७.

दाते शब्दकोश

सुद्धबुद्ध

सुद्धबुद्ध suddhabuddha f (शुद्धि & बुद्धि) Consciousness and right understanding; soundness of sense and mind; sanity and self-possession. A general term. Ex. सु0 आली -गेली -उडाली -हरावली &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

सुध्दबुध्द

स्त्री. शुद्धी (ज्ञान); समजण्याची ताकद, जाणीव; मनाची सुस्थिति. [सं. शुद्धि + बुद्धि]

दाते शब्दकोश

स्वार्थ

पु. १ स्वतःचा फायदा, लाभ; मतलब. २ वाच्यार्थ; मुख्य अर्थ; मुद्दा; (भाषण इ॰ तील). ३ स्वतःची मालमत्ता. ४ (व्याकरण) जेथें क्रियापदानें एखाद्या गोष्टीचें विधान साक्षात होतें म्हणजे एखादी गोष्ट आहे किंवा नाहीं इतकें मात्र समजतें तेथें असणारा अर्थ. [सं.] ॰त्याग-पु. स्वहितावर तिलांजली देणें; स्वतःच्या मतलबावर पाणी सोडणें; स्वतःच्या हिताकडे दुलर्क्ष करून एखादें महत्कार्य करणें. ॰पर- परायण-वि. आपमतलबी; स्वतःचेंच हित पाहणारा. ॰बुद्धि- स्त्री. आपमतलबीपणा. -वि. आपमतलबी. स्वार्थी-वि. १ मूलभूत अर्थाप्रमाणें. २ नेहमीं आपला फायदा पाहणारा; मतलबी.

दाते शब्दकोश

तैलबुद्धि

तैलबुद्धि tailabuddhi f (S तैल Oil, बुद्धि Understanding.) A spreading, diffusive, free understanding; a mind that readily apprehends a subject: also attrib. of a ready understanding.

मोल्सवर्थ शब्दकोश

तारकी पारखी, तारक-पारख

स्त्री. हुषारी; सावध- पणा. 'तारखीपारखीनें रहावें तें न करितां मुक्काम करीत खंडण्या घेत चालिले.' -भाब १०२. -वि. १ धूर्त; चाणाक्ष; हुषार; कुशाग्र- बुद्धि. २ जागरूक; दक्ष; सावध; हुषार; सावधान. -क्रिवि. सावधपणानें; जागरूकतेनें; सावधगिरीनें; जपून. (क्रि॰ वागणें; चालणें; असणें). [तर्क + पारख]

दाते शब्दकोश

तबा आज़माओ

(स्त्री.) हिंदी व मराठी अर्थ : बुद्धि परीक्षा.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

टीका (वाईट )

थोंडे मुद्दे जास्त गुद्दे ! हे शेरे नव्हेत ताशेरे, अतिव्याप्तीचा दोष, तर्कटी अकांडतांडव, बुद्धया धूळफेक, तेढा अर्थ लावून केलेली, एकांगी व पूर्वग्रहदूषित, तर्कदुष्ट व हेतुप्रेरित, अचाट बुद्धि मत्तेचें अफाट प्रदर्शन, मंडनापेक्षां खंडनाकडे बळते, एका बाजूस झुकलेली, सत्यापलाप केला आहे मांगल्याची विटंबना, सज्जनांची टवाळी, दोषदर्शी विवेचन, कावळ्यासारखी पंगुत्वावर टोच, शिव्यांची सरबत्ती किरकोळ दोष मोठा करून दाखवला आहे.

शब्दकौमुदी

टीकाकार (वाईट)

आडांतील बेडूक, दोषदृक् कावळे, कुइकुई करणारे कोल्हे, खंवट खोबरें, भों भों करणारे चार उभे झाले, घूत्कार करणारीं घुबडे, दोन्ही डग-यांवर हात ठेवणारीं वटवाघुळे, चिंतातुर जंतु, क्लुषित, एकांगी, फाजील चिकित्सेखोर, पढिक, संयमाचें वावडे असलेले टीकाकार, यांची दृष्टि कावळ्याची; वृत्ति लांडग्याची; बुद्धि गाढवाची व दांत सापाचे.

शब्दकौमुदी

तीव्र

वि. १ जलाल; झोंबणारा; तिखट. २ (ल.) जालीम; उग्र; भयंकर; प्रखर (आग, स्वभाव). ३ तीक्ष्ण; कुशाग्र (शस्त्राची धार, बुद्धि). ४ मर्मवेधक; खोंचदार (भाषण). [सं.] ॰ऋषभ- गांधार-धैवत-निषाद-पु. (संगीत) रागांचे प्रकार. शुद्ध ऋषभ इ॰ पहा. ॰मध्यम-पु. (संगीत) पांच विकृत स्वरांपैकीं तिसरा स्वर. विकृत स्वर पहा. ॰स्वर-पु. शुद्ध स्वरपेक्षां ध्वनींनें उंच असलेला स्वर. परंतु शुद्ध रि, ग, ध, नि या चार स्वरांचे ध्वनी तीव्र रि,ग, ध, नि स्वरांहून भिन्न नसल्यानें वरील शुद्ध स्वरांसच तीव्र स्वर म्हणतात. तीव्रा-स्त्री. १ (संगीत) पहिल्या श्रुतीचें नांव, २ (ताल) सात मात्रा व तीन विभागांचा एक ताल. तीव्रोष्ण-वि. १ अत्यंत उष्ण. २ (ल.) कडक; जलाल. [सं.]

दाते शब्दकोश

तीव्र

कडक, झणझणीत, सणसणीत, जहाल, भडक, धारदार, टोंकदार, बोंचक, भडकीलें, खोल, लागट, जहरी, खरमरीत, असह्य, वरच्या पट्टीचें, कर्कश, खरखरीत, कांटेरी अणकुचीदार, पाजळलेलें, तल्लख, पाणीदार, तेज, कापील अशी वस्तु, निखरपातें, ही बोंच असह्य आहे, हें दुःख हृदय चिरीत जाते, सणसणीत उत्तर मिळालें, भडक विधाने, धारदार सुरी, बाेंचक उद्गार, भडकीला थाट, खोल पीडा, लागट प्रत्युत्तर, तल्लख बुद्धि, जिभेचे निखरपातें, जहरी फूत्कार, कर्कश किंकाळी, कांटेरी वाट.

शब्दकौमुदी

तीव्र      

वि.       १. जलाल; झोंबणारा; तिखट. २. (ल.) जालीम; उग्र; भयंकर; प्रखर (आग, स्वभाव). ३. तीक्ष्ण; कुशाग्र (शस्त्राची धार, बुद्धी). ४. मर्मवेधक; खोचदार (भाषण).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तमीज      

स्त्री.       १. पद्धतशीरपणा; व्यवस्थितपणा; नीटनेटकेपणा. २. विवेक; जाणीव; बुद्धी. ३. अदब. [फा. तमीझ्‌]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तमीज़

(स्त्री.) हिंदी अर्थ : पहचान, बुद्धि. मराठी अर्थ : विवेक, ज्ञान, क्रियाविशेषण, समझ.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

तोंडलें

न. तोंडलीचें फळ. हीं फळें तुळतुळीत हिरव्या रंगाचीं, सुमारें इंच-अर्धा इंच जाड व दोन तीन इंच लांब अस- तात. यांची भाजी करितात. हें गोड, थंड, मलाचा अवरोध कर णारें, जड, रक्तपित्त, दाह व सूज यांचा नाश करणारें आहें. हें बुद्धि मंद करणारें आहे असें म्हणतात. -योर १.४२. 'म्हणती सद्यःकीर्तिप्रज्ञाघ्नस्पर्श तोंडलें कवि त्या ।' -मोविराट ३.५१. [तोंडली]

दाते शब्दकोश

तर्क      

पु.       १. तर्कशास्त्र; न्यायशास्त्र; प्रत्यक्ष, अनुमान इ. प्रमाणांवरून पदार्थाचा निर्णय समजण्याची विद्या. २. अटकळणे; अनुमानाने जाणणे, ताडणे. ३. अनुमान, सिद्धान्त (क्रि. करणे, बांधणे); अनुमिती. ४. लक्षणदर्शनावरून झालेले एखाद्या पदार्थाचे, गोष्टीचे ज्ञान, कल्पना; अनुमान : ‘अविद्या नाशी तर्का । तैसें होये ।’ – अमृ ६·४५. ५. पूर्वलक्षणांवरून भावी गोष्टीचा केलेला अंदाज, अजमास, अटकळ. ६. अक्कल; बुद्धी; मती. ७. कुकल्पना; मूर्खपणाचा विचार, कल्पना, युक्ती. ८. (ल.) खबर; वर्तमान; वृत्त : ‘कोठें तरी कृष्ण लपवावा । बाहेर तर्क कळो न द्यावा ।’ – ह ३·१७२. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

तर्क

पु. १ तर्कशास्त्र; न्यायशास्त्र; प्रत्यक्ष, अनुमान इ॰ कांवरून पदार्थाचा निर्णय समजण्याची विद्या. 'तरी तर्कु तोचि फरशु । नीतिभेदु अंकुशु । वेदांतु तो महारसु । मोदकु मिरवे ।' -ज्ञा १.११ २ अटकळणें; अनुमानानें जाणणें; ताडणें. ३ अनु- मान; सिद्धांत;अनुमिति; अनुमान, सिद्धांत. (क्रि॰ करणें; बांधणें). ४ लक्षणदर्शनावरून झालेलें एखाद्या पदार्थाचें, गोष्टीचें ज्ञान, कल्पना; अनुमान. 'अविद्या नाशी तर्का । तैसें होये ।' -अमृ ६.४६. 'विचार करूं लागलें म्हणजे अनेक प्रकारचे तर्क उत्पन्न होतात.' ५ पूर्वलक्षणांवरून भावी गोष्टीचा केलेला अंदाज, अज- मास, अटकळ. 'हा तर्क करीत बसण्यापासून आपल्याला लाभ नाहीं.' -कोरकि ३०२. 'यंदा पर्जन्य चांगला लागला त्यावरून स्वस्थता होईल असा तर्क दिसतो.' ६ अक्कल; बुद्धि; मति. 'त्या शास्त्रांत माझा तर्क चालत नाहीं.' ७ कुतर्क; कुकल्पना; मूर्खपणाचा विचार, कल्पना, युक्ति. ८ (ल.) खबर; वर्तमान; वृत्त. 'कोठें तरी कृष्ण लपवावा । बाहेर तर्क कळों न द्यावा ।' -ह ३.१७२. [सं.] सामाशब्द- ॰कौशल्य-न. अनुमान, अटकळ, कल्पना करण्याचें चातुर्य, प्रावीण्य; कल्पनाचातुर्य. [तर्क + सं. कौशल्य = कुशलता] ॰गम्य-वि. तर्कानें जाणतां येणारें; अनुमेय; तर्क्य. [तर्क + सं. गम्य = जाणण्यासारखें] ॰बाज- वि. वादविवादकुशल; कुशाग्रबुद्धि; धूर्त; मर्मज्ञ. [सं. तर्क + फा. बाज] ॰वाद-पु. बुद्धिवाद; बुद्धिप्रामाण्य मानणारा वेदांतांतील एक पंथ. (इं.) रॅशनॅलिझम; [तर्क + वाद] ॰विद्या-स्त्री. १ तर्कशास्त्र; न्यायशास्त्र. २ वादविवादपटुता. ३ अनुमान, अंदाज करण्याची हातोटी, कुशलता. [तर्क + विद्या] ॰शास्त्र-न. प्रत्यक्ष, अनुमान इ॰ कांवरून एखाद्या गोष्टीचा निर्णय, शुद्धाशुद्धा अनुमान करण्याचें शास्त्र; न्यायशास्त्र. तर्क अर्थ १ पहा. 'पाश्चात्त्य देशांत तर्कशास्त्राचा उदय प्रथम प्राचीन ग्रीक लोकांमध्यें झाला.' -ज्ञाको -त २७. ॰ज्ञान-न. अनुमान करण्याची शक्ति. तर्की- वि. १ नैयायिक; तर्कशास्त्रज्ञ. २ मार्मिक; धूर्त; मर्मज्ञ; तारतम्य- ज्ञानी. [तर्क]

दाते शब्दकोश

तरंगणें

अक्रि. १ पाण्यांत न बुडतां केवळ पृष्ठभागावर राहणें; तरणें; तिरणें; पोहणें. 'तरंगावो लागे बुद्धी । विवेकावरी ।' -ज्ञा १४.२२२. २ (ल.) बहकणें; (बोलतांना) वहावत जाणें; मुद्दा सोडून भलतेंच बोलणें. ३ (एखादा खटला, वाद इ॰) निकाल न लागतां भिजत, लोंबकळत, कुंचबत पडणें. ४ (मन इ॰) संशयांत, संदिग्ध स्थितींत असणें. ५ भांबावणें; कुंठित होणें; थांबणें; थबकणें. ६ (एखाद्या व्यक्तीची, गोष्टीची) अपेक्षा धरून खोळंबून राहणें; तिष्ठत बसणें; मार्गप्रतीक्षा करीत थांबणें. 'ज्याप्रमाणें वषट्कराचा घोष चालून इंद्रादि देवता सोमपानाविषयीं तरंगल्या असतां...'-नि ४१६. 'तुमच्या- साठीं ही सर्व मंडळी तरंगली.' [तरंग] तरंगायास- लावणें-(एखादें काम इ॰) निकालांत न काढतां लोंबकळत ठेवणें; संदिग्ध स्थितींत पाडणें. तरंगविणें-सक्रि. १ ताटकळत, खोळंबून ठेवणें. २ (कार्य इ॰) लोंबकळत, भिजत ठेवणें. [तरंगणें]

दाते शब्दकोश

तरतरी

स्त्री. १ (धांवण्यांतील, हालचालींतील) चपळाई; चपलता; त्वरा; चटपट. २ (एखाद्या कार्यांतील, बोलण्यांतील) चलाखी; हुषारी]; जोम; उत्साह; मार्मिकता; चुणचुणीतपणा. ३ (चेहरा, झाड, इ॰ कां वरील) टवटवीतपणा; प्रफुल्लता; तुकतुकी ४ (बुद्धि, शहाणपण इ॰ कांची) चपलता; चलाखी; समयज्ञता. ५ हाजीरजाबाबीपणा; समयसूचकता [तरतर]

दाते शब्दकोश

ठा

नाटा or ठा a Vile, naughty. Pr. साठी आणि बुद्धि नाठी

वझे शब्दकोश

थिल्लर

न. तळें. डबकें. 'आणि मनीं तरी आठविजे । थिल्लरोदकातें ।' -ज्ञा ७.१५२. 'काय थिल्लरीचें पाणी ।' -तुगा ७००. -वि. (ल.) उथळ बुद्धि; अल्पज्ञ; मंद (मनुष्य). [सं. शिथिलतर] थिल्लरोदक-न. डबक्यांतून सांचलेलें पावसाचें पाणी. 'जान्हवीस न्हावया थिल्लरोदक ।'

दाते शब्दकोश

ठकणे      

अक्रि.       फसणे; फसले जाणे; दगा होणे; निराशा होणे; बुडणे (धंद्यात); चुकणे : ‘माझी ठकली वो बुद्धि ।’ - कक १·५·१४२.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

थकणे      

अक्रि.       १. दमणे; शिणणे; चालवेनासे होणे; भागणे. २. शक्ती क्षीण होणे; (रोग, म्हातारपण इ. मुळे) बेजार होणे. ३. मती गुंग होणे; बुद्धी न चालणे. ४. दिवाळे निघणे; पैसा नसल्यामुळे व्यापार थांबणे. ५. कर्जाऊ दिलेली रक्कम बुडणे. [सं. स्थग्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उदार शिक्षण      

न.       उदारपणाचे शिक्षण; ज्यामुळे मनाचा विशेष विकास होतो व बुद्धी व्यापक होते असे शिक्षण.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उगवणे      

उक्रि.       १. ग्रह, नक्षत्रे, वगैरे क्षितिजावर येणे; उदय होणे. २. बीजापासून रोप वर येणे; अंकुर फुटणे; प्रादुर्भूत होणे. ३. गोवर, देवी वगैरे दिसू लागणे; उफणणे; उतणे. ४. नजरेस येणे; प्रकाशणे (बुद्धी, सद्‌गुण); कला, विद्या, व्यवहार इत्यादीमध्ये निष्णात होणे. ५. उमटणे; दृष्टीस पडणे. ६. प्रकट होणे; उत्पन्न होणे : ‘नाना सर्पे उगवले काळ कर्कोट चालिलें ।’ −दावि ५०१. (उप.) वाट पहायला लावणारास, उशीरा येणारास म्हणतात. जसे − उगवलात शेवटी. पहा : उगविणे [सं. उदगमन]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उगवणें

उक्रि. १ ग्रह, नक्षत्रें वगैरे क्षितिजावर येणें; उदय होणें. २ बिजापासून रोप वर येणें; अंकुर फुटणें; प्रादुर्भूत होणें. ३ गोवर, देवी वगैरे दिसूं लागणें; उफणणें; उतणें. ४ नजरेस येणें; प्रका- शणें (बुद्धि, सद्गुण.); कला, विद्या, व्यवहार इ॰ मध्यें निष्णात होणें. 'हा लिहिण्यामध्यें दोन वर्षात चांगला उगवला.' ५ उलगडणें; सुटणें; फोड होणें (गुंतावळ, गुंतलेला दोरा), उकलणें; समजा- विणें; ओळखणें. 'एकाच्या कैवाडें उगवे बहुतांचे कोडें । -तुगा २७४. 'आतां हें अवघेचि उगवे । आणी मनास प्रत्यये फावे ।' -दा १०.२.१५. 'पहा गे येणें नवल केलें । कृष्णदृष्टीच उगवले । ...बिरडें काढिलें निजदृष्टी ।' -एरुस्व १६.७९. ६ उमटणें; दृष्टीस पडणें. ७ प्रकट होणें; उत्पन्न होणें. 'नाना सर्पें उगवले काळ कर्कोट चालिले ।' -दावि ५०१. ८ अडचणींतून मोकळें करणें. 'वाचे मंत्रजप कां अध्ययन करणें । अथवा गुंतलियासी शब्दें उग- वणें ।' -स्वादि ४.३.९५. ९ हिशोबांत जमेच्या व खर्चाच्या रकमांची बरोबरी होणें; तोंडमिळवणी होणें. १० गंध उगाळणें. 'केशर कस्तुरी चंदन उगवा ।' -पला १०७. उगविणें पहा. [सं. उद्गमन; पं. उग्गणा; तुल॰ का. उक्किसु, उक्कु]

दाते शब्दकोश

उन्मेख, उन्मेष      

पु. १. डोळ्यांची उघडझाप; उघडण्याची क्रिया; निमेष (मिटणे) याच्या उलट. २. उघडणे; फुलणे; विकासणे (डोळे, फूल वगैरे). ३. बुद्धीचा विकास; ज्ञानप्राप्ती; ज्ञानसंपादन : ‘तऱ्ही उन्मेखाचिये पेठे । गुणा अवंकणी भरीन बुद्धीचि साटे ।’ – ऋ १४; ‘मग नवी विरूढी फुटेल । उन्मेषाची॥’ – ज्ञा २·७९. ४. ज्ञान; बुद्धी; प्रकाश; जागृती : ‘जयाचेनि विवेककिरणसंगें । उन्मेखसूर्यकांतु फुणगे ।’ – ज्ञा १६·८. ५. तेज; चमक. ६. प्रकटपणा; उघडपणा : ‘जें किरीटीं तुज निकें । तें पूस पां उन्मेखें । मनाचेनि॥’ – ज्ञा २·२८६. ७. (ल.) प्रतिमेचे धुमारे; किरणशलाका. [सं. उन्मेष]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उपासक

पु. उपासना, पूजा करणारा; भक्त; सेवेकरी. [सं. उप + आस् = बसणें] ॰बंधुत्व-न. उपासकांमधील बंधुभाव. 'त्यांच्या मध्यें (उपासकांमध्यें) उपासक बंधुत्वाची बुद्धि जागृत होते.' -टि १.४८७.

दाते शब्दकोश

उपासक बंधुत्व      

न.       उपासकांमधील बंधुभाव : ‘त्यांच्यामध्ये उपासकबंधुत्वाची बुद्धी जागृत होते.’ –लोटिकेले १·४८७.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उपेक्षणे      

उक्रि.       १. उपेक्षा करणे; दुर्लक्ष करणे; हेळसांड करणे; अव्हेर करणे : ‘जेवीं नव्हे या बुद्धी उपेक्षिला ।’ –ज्ञा १०·१६१. २. खिजगणतीत नसणे; त्याग करणे; सोडणे : ‘उपेक्षू नको गूणवंता अनंता । रघूनायका मागणें हेचि आतां ।’ –राक. [सं. उप+ईक्ष्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उपेक्षणें

उक्रि. १ उपेक्षा करणें; दुर्लक्ष करणें; अव्हेर करणें; 'जेवीं नव्हे या बुद्धी । उपेक्षिला ।' -ज्ञा १०.१६१. २ त्याग करणें; सोडणें. 'नाहीं आइकिली मागें ऐसी मात । जे त्वां शरणा- गत उपेक्षिले ।' -तुगा १६३३. 'उपेक्षूं नको गूणवंता अनंता । रघूनायका मागणें हेंचि आतां ।' -राक. [सं. उप + ईक्ष्]

दाते शब्दकोश

उपज्ञा      

स्त्री.       मूळचे ज्ञान; उपजत बुद्धी; आद्यज्ञान. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उपज्ञा

स्त्री. मूळचें ज्ञान; उपजत बुद्धि; आद्यज्ञान [सं. उप + ज्ञा]

दाते शब्दकोश

उपजत      

वि. जन्मतः, जन्मापासून असणारा; सहज; जातीचा; निसर्गतः प्राप्त (गुण, दोष, शरीरप्रकृती वगैरे). उदा. उपजत बुद्धी – दुर्गुम – खोड – स्वभाव.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उपमानवी      

वि. नीतिमत्ता, बुद्धी याबाबतीत सामान्य लोकांपेक्षा खालच्या पातळीवर असणारा (माणूस, व्यक्ती). [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उत्क्रांत

वि. उत्क्रमण केलेला; वर किंवा बाहेर चाललेला; निघून गेलेला; वर उडून चाललेला. [सं.] ॰मति-वि. व्यापक बुद्धीचा; ज्ञानी. -स्त्री. व्यापक, अफाट बुद्धि. 'नाहीं पारु गुरु- भक्ती । परी गा उत्क्रांतमती ।' -ज्ञा १३.४५१. [सं. उत् + कम्-क्रान्त]

दाते शब्दकोश

उठकळ, उठकळा      

स्त्री. १. उठण्यास होणारे कारण; उठण्याची निकड, गरज. (क्रि. आणणे, लावणे, येणे). २. उठण्याची बुद्धी; हुटुटी; सुरसुरी (मनातून किंवा बाहेरच्या काही कारणाने येणे). (क्रि. लागणे, येणे). ३. हकालपट्टी; पराभव. ४. (गाव, कुटुंब इत्यादिकांचे) स्थलांतर; बारा वाटा होणे; एखाद्याने उठून जावे म्हणून लावलेला तगादा. (वा.) उठकळ येणे - दुसरीकडे जाण्याचा हुकूम होणे, भाग पडणे; स्थलांतराचा हुकूम.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उठकळ-ळा

स्त्री. १ उठण्यास होणारें कारण; उठण्याची निकड, गरज. (क्रि॰ आणणें; लावणें; येणें). २ उठण्याची बुद्धि; हुटुटी; सुरसुरी (मनांतून किंवा बाहेरच्या कांहीं कारणानें येणें). (क्रि॰ लागणें; येणें). ३ हकालपट्टी; पराभव. ४ स्थलांतर; बारा- वाट होणें (गांव, कुटुंब इ॰ कांचें) ॰येणें-दुसरीकडे जाण्याचा हुकूम होणें, भाग पडणें. 'हा सुभेदार आला, त्या सुभेदारास उठकळ आली.' [उठणें + कळ]

दाते शब्दकोश

वाढता

वाढता vāḍhatā p a of वाढणें Growing, advancing to maturity. 2 Augmenting or increasing; as वाढता धंदा -रोजगार -चाकरी -मुद्दत -बुद्धि -लक्ष्मी -राज्य -कळा. 3 Given over or to boot;--used of the bángṛí as explained below. 4 unc That serves (the provisions of a meal). Pr. वाढत्यापेक्षां चहाडता गोड Sweeter is the slanderer than the server of food. This form of the proverb is a variation. See the form under चहाडणें. वाढत्या अंगाचा a That grows rapidly. 2 Made to allow room for growing--a garment.

मोल्सवर्थ शब्दकोश

वैन

न. (महानु.) ज्ञान; बुद्धि.

दाते शब्दकोश

वहाविणें

उक्रि. १ वाहवणें पहा. २ लागवड करणें. 'मग अहंकारासि एकलाधी । करूनि जीवितावधी । वहाविलें बुद्धी । चराचर । ' -ज्ञा १३.४९.

दाते शब्दकोश

विचार

पु. १ कल्पनाशक्ति, बुद्धि यांचा व्यापार; शोध; अभ्यासपूर्वक चिंतन; खलबत; चर्चा; तारतम्य; विवेक; तर्क; मनन. २ विवेक, चिंतन, मनन करून केलेला निश्चय, निर्णय, निकाल, मत. ३ विधिनिषेध; महत्त्व; क्षिति. 'तुझे तुज नव्हे शरीर । तेथें इतरांचा काय विचार ।' -दा ३.१०.५३.४ घोटाळा; विवंचना; त्रास; कटकट. 'पृथ्वीप्रलय होतो तैसा विचार जाहला.' -भाब १५. 'मग तुम्हांस विचार भारी पडेल.' -शारो ८१. ५ गोष्ट; हकीकत; खरी स्थिति. 'कळतां तेथिचा विचार ।' -दा ८.८.४३. 'हाराचा सांगावा विचार । तरी वृथा म्हणाल तुम्ही सर्व ।' -शनि १८१. ६ मत; अभिप्राय; बेत. 'परंतु पुजूं नये हा विचार । कोठेंच नाहीं ।' -दा १.६.१३.७ युक्ति; उपाय; मनसुबा; मसलत. 'दयानिधि ऋषेश्वरु । सांगता झाला विचारु ।' -गुच ३४.१६. 'चला आमुचे मंदिरा । बोलो पुढील विचारा ।' -कथा १.३.११८. 'घडून येण्यास कोणता विचार.' -रत्न- कांता २१. ८ वर्णन. 'याहीं वेगळे आणीक गुरु । ऐक तयांचा विचारु ।' -दा ५.२.६९. ९ इच्छा मर्जी; मनोदय. 'तहानामा तुमच्या विचारें केला जाईल ।' -विवि ३.५.१८७६. [सं. वि + चर्] या शब्दाचे अनेक सामासिक शब्द होतात. उदा॰ सारासार विचार-पु. गुणदोष पाहून केलेला विवेक, बनविलेलें मत. सद सद्विचार-पु. योग्य अयोग्य यांची निवड; चांगलें वाईट ठरविणें. कार्याकार्य विचार-पु. साधकबाधक प्रमाणांवरून कर्तव्य किंवा अकर्तव्य तें ठरविणें; करावयास योग्य किंवा अयोग्य यासंबंधी अनुकूल प्रतिकूल प्रमाणांवरून मत बनविणें. याप्रमाणें इष्टानिष्ट- कर्माकर्म-कर्तव्याकर्तव्य-कार्यकारण-गमनागमन-ग्राह्याग्राह्य- धर्माधर्म-पात्रापात्र-पापपुण्य-भक्ष्याभक्ष्य-योग्यायोग्य-वर्ज्या वर्ज्य-वाच्यावाच्य-विधिनिषेध-विहिताविहित-शुभाशुभ-साध्व साधु-संगासंग-विचार इ॰. (वाप्र.) विचार जागविणें-(प्र.) विवेक जागविणें पहा. विचारांत पडणें-चिंता उत्पन्न होणें; काळजी वाटणें. विचारक-वि. विचारी; विचार करणारा; शोधक. विचारगम्य-वि. विचार केल्यानंतर समजण्यासारखें; तपास कर- ण्यासारखें; बुद्धीस आकलन करतां येण्यासारखें; चिकित्सा करतां येण्याजोगें. विचारण-न. १ शोध; चिकित्सा; विवेक. विचा- रणा-स्त्री. १ शोध; चौकशी; विचार; तर्क; कल्पना. 'विचारणा देवाची । ' -दा १६.१०.२८. २ पंचाईत; चिंता; काळजी; गूढ. ३ व्यवस्था; तजवीज. 'लग्नविचारणा न पुसतां मांडली ।' -सप्र २.३७. 'विधियुक्तादि विचारणा सकळिकीं । ' -दावि ७.२.१२. ४ सप्त भूमिकांतील दुसरी भूमिका. -हंको. विचारणीय-वि. १ विचार करण्यासारखें; शोध, तपास, चिकित्सा करण्यासारखें. २ विचारण्यासारखें; ज्याबद्दल माहिती मिळवावयाची आहे असें; प्रश्न करण्याजोगें; प्रष्ठव्य. विचारणें-उक्रि. १ प्रश्न करणें; चौकशी- साठींपुढें मांडणें; चर्चा करण्यासाठीं प्रस्तावना करणें. २ परामर्श घेणें; विचारपूस करणें; पुसणें; परिस्थिति वगैरेसंबंधीं सहानुभूतिपूर्वक किंवा मदत करण्याच्या दृष्टीनें चौकशी करणें. 'मायेबहीण न विचारी । जाहला पापी परद्वारी ।' -दा ३.३.१५. ३ आदर दाखविणें; आज्ञा पालन करणें; काळजीपूर्वक लक्ष्य देणें. ४ महत्त्व देणें; क्षिति बाळ- गणें; पर्वा करणें; किंमत देणें. ५ विचार करणें; चौकशी, तपास, चर्चा करणें; 'लघुपतनकें विचारलें.' -पंच २.१. 'एथ सरासार विचारणें । कवणें काय आचरावें' -ज्ञा १.२४६. 'पुन हें अवघें विचारितां । ऐसें येत असे माझेया चित्ता ।' -भाए ६४.६ चाल- विणें; चालू करणें. 'याचेनि वीर्यें स्त्रियेच्या पोटीं । संतती विचारूं गोमटी ।' -मुआदि २४.३४. विचारणें-अक्रि. चिंतन करणें; मनन करणें; विचार करणें. 'मनीं विचारी लंकानाथ ।' -रावि. 'विचारिल्यावीण करूं नये तें ।' -सारुह ३.२. विचार- पूस-स्त्री. १ वास्तपुस्त; चौकशी; शोध. २ परामर्श; कुशलप्रश्न. (क्रि॰ करणें). [विचारणें + पुसणें] विचार-वंत-वान-शील, विचारी-वि. सुज्ञ; विचार करून वागणारा. ॰शक्ति-स्त्री. बरें- वाईट वगैरे विवेक करण्याचें सामर्थ्य; मननशक्ति. ॰संगति- स्त्री. विचारमालिकेंतील निरनिराळ्या विचारांचा सुसंगतपणा; पर- स्परसंबंध; एकसूत्रता; एका कल्पनेवरून तत्सदृश दुसरी कल्पना सुचते तेव्हां त्या दोहोंमधील साहचर्यसंबंध. ॰संक्रांति-स्त्री. विचारांचें परिवहन; एक विचार दूरस्थ व्यक्तींच्या मनांत एकाच वेळीं येणें. (इं.) टेलेपॅथी. नीतिशास्त्रप्रवेश ३९०. ॰स्थित- वि. विचार करण्यांत, चिंतनांत, मनन करण्यांत निमग्न, गुंग झालेला. 'ऐसें बोलती श्री गुरुनाथु । तंव शिष्य झाला विचारस्थितु ।' ॰क्षम-वि. विचार करण्याचें सामर्थ्य असलेला; विवेकी. विचा- रित-वि. विचार करून ठरविलेलें; निश्चित; बुद्धीनें स्वीकृत. विचार्य-वि. विचार करण्यास योग्य.

दाते शब्दकोश

विचारी

चिंतनशील वृत्तीचा, विचारांचा पक्का, भावनात्मक तशाच विचारात्मक क्षुधा मोठी, बुद्धी चालवितो.

शब्दकौमुदी

विचक्षण

वि. १ ज्ञाता; जाणता; दूरदृष्टि; शहाणा; बुद्धि- मान्. 'साधु हो तुम्ही विवक्षण ।' -मुआदि २०.११५. -ज्ञा ४.८५. 'धूर्त तार्किक विवक्षण ।' -दा १.१.३२. २ चिकित्सक; सूक्ष्मपणें व खोलवर चौकशी करणारा. 'मैंदाचें स्वीकारील कवण- विचक्षण अमूल्य निष्कपट ।' -मोउद्योग ६.४९. [सं. वि + चक्ष = पाहणें] विचक्षण-स्त्री. चिकित्सा; बारकाईची चौकशी; परिक्षा; फोड करून तपास. (क्रि॰ करणें; लावणें; मांडणें). विचक्षणता- स्त्री. चौकसबुद्धि; दूरदृष्टी. 'शोधांनीं एक विचक्षणता प्राप्त होते.' -टिले ४.४३४.

दाते शब्दकोश

विधि-धी

पु. १ नियम; शास्त्राची आज्ञा; वेदविहित क्रिया, कर्म वगैरे. 'विधीतें पाळित । निषधातें गाळित ।' -ज्ञा १२.७७. २ पद्धति; कर्म करण्याची रीत; धार्मिक कृत्याचा प्रयोग. उदा॰ उद्यापनविधि; उपासनाविधि; दामविधि; स्नानविधि; होम- विधि; व्रतविधि; पूजाविधि. 'क्रियाविशेषें बहुतें । न लोपिती विधीतें । निपुण होऊन धर्मातें । अनुष्ठिती ।' -ज्ञा २.२४९. ३ सामान्यतः नियम; आज्ञा; विधान; अनुशासन; आदेश; कल्प. 'विधि हाचि मान्य आहे ।' -मोआदि ४.१४. ४ दैव; प्रारब्ध; नशीब. 'स्थिर न राहे माझी बुद्धि । तरी हा आपुलाचि विधि । सुजाण राया ।' -कथा ६.१९.१५९. ५ ब्रह्मदेव; सृष्टिकर्ता. 'तें निर्मितो विधि विभूषण भूमिकेचें ।' -वामन स्फुटश्लोक (नवनीत पृ १४१). 'अतर्क्य महिमा तुझा गुणहि फार बाहे विधी ।' -केका १४०. ६ शास्त्रवचन; धर्मग्रंथातील वाक्य, आधार; प्रमाण. ७ तऱ्हा; प्रकार; रीत. 'गऱ्हवारे हा विधी । पोट वाढविलें चिंधी ।' -तुगा ६२५. 'लिहिल्या विधे येईन मी त्वरें ।' -होला ३४. ८ योजना; क्रिया. 'कवण कार्याचिये विधि । तुम्ही आलेती कृपानिधि ।' -एरुस्व ३.४३. [सं. विध् = विधान करणें] ॰अंड- न. ब्रह्मांड; विश्व; भूगोल. 'तडतडि विधिअंड त्रास दे...' -वामन- सीता स्वयंवर. [विधि + अंड] ॰किकर-पु. कर्मांचा दास. 'मग विधिकिंकर तो नव्हे ।' -यथादी ३.२२९९. ॰दृष्ट-वि. वेदविहित; शास्त्रोक्त; साधार; सप्रमाण. ॰निषेध-पु. अमुक बरें, अमुक वाईट, अमुक करावें, अमुक करूं नये यासंबंधी नियम; बंधन; नियम; कर्तव्याकर्तव्य. 'एथ सारासार विचारावें कवणे काय आचारावें । आणि विधिनिषेध आघवे । पारुषता ।' -ज्ञा १.२४६. [विधि + निषेध] ॰निषेधातीत-वि. १ ब्रह्मज्ञान प्राप्त होऊन मुक्त स्थितीस गेल्यामुळें ज्यास सामान्य धर्मनियम बंध- नकारक नसतात असा; सर्व नियमांच्या पलीकडे गेलेला. २ (उप.) स्वैर, अनिर्बंध वागणारा. [विधि + निषेध + अतीत] ॰पूर्वक-वि. नियमानुसार; यथासांग; योग्य प्रकारें. [विधि + पूर्वक] ॰भंजक- वि. (व्या.) नियम मोडणारा; सामान्य नियमांत न येणारा; अपवादभूत. [विधि + भंजक] ॰भंजन-न. नियम मोडणें; अप- वाद होणें. ॰मंडळ-न. कायदे, नियम करणारी संस्था, सभा. (इं.)लेजिस्लेटिव्ह कौन्सिल. ॰मंत्र-पु. विधियुक्त मंत्रसंस्कार; निय- मानुसार सर्व धर्मकृत्य. 'मग जाहला विधिमंत्र । चारी दिवसा ।' -कथा १.७.०७. ॰मुख-न. सच्चिदानंद स्वरूपाचे वर्णन. -हंको. ॰युक्त-वि. विधिपूर्वक; शास्त्रोक्त; वेदविहित; शास्त्राज्ञेप्रमाणें. ॰लिखित-लिपी-स्त्री. लल्लाटरेषा; ब्रह्मलिखित. 'आपले सुख खास गमावशील ही विधिलिपी समज.' -कल्याणी, नवयुग. ॰वत्-क्रिवि. विधिप्रमाणें; शास्त्रोक्त; यथायोग्य; वेदविहित पद्धतीप्रमाणें. ॰वाक्य-न. शास्त्रवचन; वेदवचन; वेदवाक्य. ॰वाचक धातुसाधित-न. कर्तव्यबोधक धातुसाधित; नियम घालून देणारें धातुसाधित. उदा॰ करावें; धरावें इ॰. ॰विधान- न. शास्त्राज्ञा किंवा नियम यांस अनुसरून सांगणें, बोलणें, योजणें ठरविणें, वर्तन करणें. [विधि + विधान] ॰विवर्जित-वि. शास्त्र- मर्यादेचें बंधन नसलेला; नियमांपलीकडील 'मज विधिविवर्जिता व्यवहारु । आचारादिक ।' -ज्ञा ९. १५७. ॰विवाह-पु. यथा- विधि लग्न. 'निर्धारेसीं तुझी जाया । मी जाहलेंसे यदुराया । विधिविवाह तुंवा कीजै ।' -एरुस्व ४.१४. ॰विशेषण-न. (व्या) क्रियापदाबरोबर योजलेला गुणवाचक शब्द; विशेषणाचा एक प्रकार. ॰वृत्ति-स्त्री. (निषेधवृत्तीच्या उलट) प्रत्यक्ष कृति, क्रिया करावयासाठीं आज्ञा करण्याची पद्धति, रोख, तऱ्हा, स्थिति, निय- मन. -वि. (निषेधक नव्हे तें) प्रत्यक्ष नियम, कृति, कार्य सांग- णारें; अनुज्ञापक. ॰संकुचित-संकोचित-वि. नियमबाह्य; अप- वादभूत; नियमांत न येणारें ॰संकोच-पु. अपवाद. विद्युक्त- वि. वेदविहित; शास्त्रांत सांगितलेलें; धर्मग्रंथांत सांगितलेलें. 'किती आच्मनें शौच्य विद्यूक्त चाले ।' -दावि १७९.४. -अप विध्योक्त. 'श्रीराम समर्थ विध्योक्त अर्चनें ।' -सप्र ११.१३५. [विधि + उक्त]

दाते शब्दकोश

विकळ

वि. विकल पहा. १ दुःखित; गालितगात्र. 'परम विकळ मी तूं या स्मृती ही उडाल्या ।' -वामन, भामाविलास (नवनीत पृ. ९९). २ विसकटलेला; अस्ताव्यस्त. 'विकळ देखोनि दळभार । मागधवीरीं केला मार ।' -एरुस्व १०.४२. ३ अधू; व्यंग. 'बाण खोंचला अति निगुती । विकळ गेला दोही हातीं ।' -एरुस्व ११.४४. ४ हीन दशा पावलेला; हतबुद्ध; अस- हाय्य. 'निज मंडपीं शिशुपाळ । करीत होता गदारोळ । भीमकी घेऊन गेला गोपाळ । ऐकोन विकळ पडियेला ।' -एरुस्व १२. १. ५ विव्हळ; दुःखी. 'लिंग देखिलें भूमीवर । मनीं विकळ जाहला ।' -गुच ६.१८३. ६ निस्तेज; निःसत्व. 'विकळ वरि शिखंडीतें गुरुसुत...।' -मोभीष्म ८.२१. ७ उलट; विपरीत. 'तंव ग्रह नव्हता सानुकूळ । म्हणोनि तव बुद्धि विकळ ।' -शनि ३७१. ८ उणाख; अपूर्ण. 'जो साम्यचि परी विकळ । तो दृष्टांत नव्हे निर्मल ।' -विपु ७.३३.९ अमेळ; संबंधशून्य; विसंगत. 'आतां जाहालिया भ्रमहत । जैसें पिशाचाचें चित्त । मग इंद्रियांचें चेष्टित । विकळु दिसे ।' -ज्ञा ५.५७. १० जड; अस्पष्ट. 'ययाती म्हणे वाचा विकळ । सांगो जातां होतसे ।' -मुआदि २०.२३७. [सं. विकल] विकळणें-अक्रि. (कों.) १ बुद्धीची ग्राहकशक्ति जाणें, नष्ट होणें (वार्धक्य, विकार इ॰मुळें). 'साधक आळसें विकळे ।' -एभा २०.२०२. २ बारगळणें; भ्रम होणें; वेड्यासारखें, मूर्खा- सारखे चाळे करणें; बडबडणें (विशेषतः म्हाताऱ्यानें, लहान मुलानें). 'तो म्हातारा अलीकडे विकळला, त्याबरोबर तुम्ही कशास बोलतां !' ३ अतिशय विकल, जेर होणें (उष्णतेंनें, श्रमानें), ४ नासणें व फुटणें (दूध, ताक, दहीं). [विकळ] ॰ता-स्त्री. १ शिथिलता; विकलता पहा. 'विकळता उपजत । गात्रांसी ।' -ज्ञा १.१९६. २ व्याकुळता; खेद; दुःख. 'ऐश्वर्यहानीची विकळता । अळुमाळ नाहीं माझिया चित्ता ।' -मुआदि २०.४४. ॰मति- स्त्री. (काव्य) १ बुद्धिभ्रंश; भ्रष्टमति. 'नळाची विकळमति होऊन । तटस्थरूप राहिला ।' -वि. ज्याच्या बुद्धीला विकळता आली आहे असा. विकळा-वि. विवर्ण; निस्तेज; फिकट (वर्ण, चेहरा). [वि + कळा]

दाते शब्दकोश

विमर्श

पु. विचार; तपास; शोध; बुद्धि चालविणें. [सं.]

दाते शब्दकोश

विमत

वि. नापसंत; अपसंत; उलट; विरुद्ध; प्रतिकूल. [सं. वि + मति] विमति-वि. १ बुद्धि चळलेला; भ्रमिष्ट; खुळा; वेडा. २ नापसंति; असंमति; प्रतिकूलता. [सं. वि + मति]

दाते शब्दकोश

विनाश

पु. उच्छिन्नता; नायनाट; विध्वंस; सत्यानाश; पूर्णनाश. [सं.] ॰काल-पु. प्रतिकूल कालदशा; नाशसमय. म्ह॰- विनाशकाले विपरीत बुद्धिः = नष्टकाल आला असतां भलतीच गोष्ट करण्याची बुद्धि होते. विनाशित-वि. नष्ट; उच्छिन्न; विनाशी -वि. १ नाश पावणारें; जें नासतें, कुजतें, बिघडतें तें. २ नाश पावणारें; बिघडविणारें. विनाशोन्मुख-वि. नष्ट होण्याच्या पंथास लागलेलें.

दाते शब्दकोश

विनाशकाल

विनाशकाल m The time of perdition or destruction. विनाशकाले विपरीत बुद्धि Infatuation seizes one when his destruction is impending.

वझे शब्दकोश

विपरीत

वि. १ उलट; विरुद्ध; उफराटें; विचित्र. 'केळि जशा विपरीत तशा उरु पावलें तीं ।' -राधावर्णन अकक २. -ज्ञा १.२१९. 'नये नानाचे मनास जाहलें विपरीत इतरांस ।' -ऐपो ३०६. २ प्रतिकूल; अननुकूल; अप्रसन्न. 'आणि विकारांची जे वारी । ते विपरीत ज्ञानाची परी ।' -ज्ञा १५.५२१. ३ अन्य; भिन्न प्रकारचा. [सं. वि + परि + इ = जाणें] ॰काल-पु. प्रतिकूलसमय; कष्टदशा. ॰भावना-स्त्री. १ विरुद्ध किंवा भिन्न रूप, आकार, स्थितिवगैरे. २ प्रकृतीमध्यें पडलेला फरक. ३ एखाद्यासंबंधी बदललेली वृत्ति, कल्पना वगैरे. ४ (तत्त्व.) देहात्म बुद्धि; जीव व ब्रह्म यांमध्यें भेद आहे किंवा देह हाच आत्मा आहे अशा प्रकारची उलटी समजूत. ॰भोग-पु. पुरुषायित संभोग. 'विपरीत भोग करून मनोरथ कळेल तसा पुरवून ।' -प्रला ११७. ॰राशी-पु. (शाप.) उलट केलेली संख्या. (इं.) इन- व्हर्स फंक्शन. ॰लक्षणा-स्त्री. व्याजोक्ति; औपरोधिक वर्णन. ॰ज्ञान-न. अन्यथाज्ञान; मिथ्याज्ञान; जग सत्य आहे असें म्हणणें. 'विपरीतज्ञान म्हणिजे देखणें । येकाचें येक ।' -दा २०. १.२३. विपरीतज्ञानाचा कोंभ फुटणें-चूक होणें; भ्रम होणें. विपरीतार्थ-पु. परस्पर विरोधी, उलटसुलट अर्थ. 'तरी तितुके हि सत्य देख । विपरीतार्थ न मानिजे ।' विपर्यय-पु. १ विपर्यास; विरुद्धता; उलटेपणा; उरफटेपणा. २ विरुद्ध दशा; प्रतिकूलता (यावरून) कष्टदशा; संकट; चूक; गैरसमज; उलटा- पालट वगैरे. [सं. वि + परि + इ = जाणें] विपर्यस्त-वि. विपरीत केलेलें; विपर्यास केलेलें; उलटलेलें (वाईट अर्थानें). विपर्यास- पु. १ विपरीतपणा; विरुद्धता; उफराटेपणा. २ प्रतिकूलता; विपर्यय पहा. ३ बदल; फरक रूपांतर; अवनति. [सं.]

दाते शब्दकोश

विस(सु)कुसणें

उक्रि. विस्कटणें; विसकळित होणें; गोंध- ळणें; घोटाळणें; बिघडणें. 'एवं द्वैतासी उमसों । नेदी ऐक्यासी विसकुसों ।' -अमृ २.६९. 'तेचि बुद्धि जालिया विसुकुसे । कैसेनि आतां ।' -ज्ञा ८.६७. विसकुस-सें-स्त्रीन. बिघाड; गोंधळ; अस्ताव्यस्तपणा; कासाविसी. विसकूस-वि. गोंधळलेली; विस- कटलेली.

दाते शब्दकोश

विशेषणांचा थारेपालट

व्यवस्थित खोटें, चंद्रमौळी ज्ञान, सल्ला, तुरंट अनुभव, ढळढळीत लपवालपवी, बैलासारखी माजलेली बुद्धि, वांझोट्या सूचना, पांढरें असत्य, गोड नाचक्की, आंखूड-शिंगी सूचना. लुसलुशीत तान, इवलेंसे बोलणे, जाडजूड मत, वाचाळ श्राेते, घोषणांचे खारट तोंडाळ व्याख्यान, गैर-टापटिपीचें वक्तृत्व, थुईथुई संगीत, घोषणांचे फूस्कार, लयबद्ध बोंबा, थाड थाड व्याख्यान, तोफांची बडबड, सुंसाट द्रव्ययाचना, धष्टपुष्ट दर, आकंठ धनलाभ, कोमट प्रकृतीचा, ईशभक्तीचें लचांड, अनुपम ओंगळपणा, भूमिगत भलेपणा, कीर्तीचे देहावसान, हेंगाडे सौंदर्य, गोंधळ- गात्री स्त्री, घसघशीत हास्य, मखमाली प्रेम, शुभ्र वचनें, निरभ्र गात्र, शरिराचा तलम लोभसपणा, पुष्ट आणाभाका, तरणा तगडा उत्साह. तडाखेबंद प्रेम, लालबुंद नखरा, धष्टपुष्ट धोका, चौदा कॅरट प्रेम, रवाळ स्मित, चिरकी ऐट, नखाएवढ्या कारकुनिणी, नवीन डिझाइनचा प्रियकर, लंबेचौडें हास्य, सौंदर्याची टंचाई, मंजुळ दृश्य, अवाच्या सवा प्रेम, भारी दराचें बोलणें, तांबारलेली लग्नाळू मुलगी, प्रेयसीचा फैसल्ला, तरुणींचा कावकाव, मुळूमुळू हंसत, लाजण्या-मुरकण्याची चिखलफेक सुरू झाली, सोपी मुलगी, हेकेखोर गाडी, शान्त दान्त कोल्हे, आरोग्य संपन्न झाड, ठणठणीत प्रकृतीचे डोंगर, सह्याद्रीची उत्कृष्ट शरीरसंपदा, गुडुप्प सौंदर्य, सडाफटिंग डोंगर, बावनकशी ब्राह्मण, पुसट पुसट धुकें, क्षणभंगुर ग्लास, अठरापगड खुर्च्या, रंगांची उधळमाधळ, जुनाट वळणाची गाडी, दिवाणखान्याची चट्टीपट्टी, पद्धतशीर अव्यवस्था, रूढिप्रिय कुत्री, थोराड मोतीं, उत्तंग नाक. आकाशाला टाचलेला काळोख, तोटका पावसाळा, वारेमाप अन्र, धट्टीकट्टी भिंत, मूठमातीच काय ओंजळभर माती, लाल मागण्या, मऊ मऊ प्रकाश, निर्झरांच्या मंजुळ उड्या, परीट्घडी सूर्यादय, थट्टेखोर खिसेकापू, तेजःपुंज बोकड, नखरेबाज संत, बोलका रुपया, मंजुळ चेकर, एकत्र शिवलेलीं विशेषणें, दर्जेदार शिव्या, चुळकाभर ज्ञान, अभिजात ओंगळपणा, गच्च विनोद, चकणा पक्षपात, बुरसटलेला विषय, परंपरेंत शिजलेली लेखणी, मेंदूंतील भगदाड, पावशेर अटी व शर्ती. गढूळ चर्चा, भीमकाय लेखणी, तांबारलेली कोटी, मातट आनंद, शिव्या गुंफल्या, तिरकस टोका, उपमांचा बुजबुजाट, अखंड सौभाग्यवती लेखणी, नवकथांचे घड, अजस्र कौतुक, दाणेपार उद्गार, अष्टवक्र लेखन, गगनचुंबी अज्ञान, किडका सिद्धान्त, शरमाळू लेखणी, झिरझिरीत सत्य, फुटकळ यश, ठणठणीत आदरभाव, अनन्वित लिखाण केलें, धट्टेकट्टे विचार व दाणगट पेन.

शब्दकौमुदी

वीट

पु. १ कंटाळा; ओकारी; तिरस्कार; शिसारी. 'मनीं वीट मानु नये । शिकवणीचा ।' -ज्ञा २.२.१०. -मोभीष्म ४. ५०. २ मेकाड; मोवा; एक रोग. ३ अनादर; अपमान; वाईट प्रकारें वागविणें. बिघाड विचका झालेली स्थिती (मसलती, कामें, पदार्थ इ॰ ची). ४ खेद. 'खेद दरिद्रलिये बुद्धी वीट । तोही नाहीं ।' -ज्ञा १४. ३२८. [विटणें] वीटणें-वीटणें पहा. 'परंतु बहु मंद मी म्हणुनि सत्श्रुती वीटती ।' -केका ५९.

दाते शब्दकोश

विवेचक

वि. विवेचन करणारा; विचारी; तारतम्य पाहणारा. ॰बुद्धि-स्त्री. सारासारविचार. 'विद्यार्थांना कॉलेज सोडायला लावतांना विवेचन बुद्धि जरूर उपयोगांत आणली पाहिजे.' -केले १.३४९.

दाते शब्दकोश

विवेक

पु. १ विचार; तारतम्यबुद्धि; समज; तर्क; बुद्धि. 'मज विवेकु सांगावा । मऱ्हाटा जी ।' -ज्ञा ३.१७. 'जैसा मूर्ति मंत विवेक । तैसा जाण राजा भीमक ।' -एरुस्व १.१२. २ सद- सद्विवेक; संयम; समंजसपणा; चित्तवृत्तिनिरोध. 'मला अन्नाचा तिटकारा आला आहे पण विवेकानें खातो.' ३ (वेदांत) नित्या नित्य, सत्यासत्य, यांमधील भेद जाणण्याचें ज्ञान; साधनचतुष्ट यांतील पहिलें साधन. 'आहे दिठी डोळ्यां विवेकु । अपाडु जैसा ।' -ज्ञा १८.२७३. ४ वाटाघाट, चर्चा वगैरेमुळें होणारा समेट, तह- 'विवेक व्हावया प्रकार दिसत नाहीं.' -खरे १५३९. [सं. विच् = विवेक करणें] ॰जागविणें-तारतम्यबुद्धि जागृत करणें; विचार करणें. 'ते अनुभवी जाणती सम्यक । ज्यांनी विवेक जागविला ।' ॰वंत-विचारी; इष्टानिष्टाची निवड करण्यास समर्थ. 'देखा विवेकवंतु सुविमळु ।' -ज्ञा १.१४. ॰वादी-पु. बुद्धिवादी; तर्क कर्कश; विचारास पटेल तेच मानणारा. (इं.) रॅशनॅलिस्ट. 'तो प्रथम विवेकवादी (रॅशनॅलिस्ट) होता.' -सुदे १६७. ॰सभा- स्त्री. पंडितांनी चर्चा करावयाची जागा. रायगडांत शिवाजीच्या वाड्यांत होती. -शिदि ४१६. ॰हंस-पु. विवेकी पुरुषरूपी हंस. -एभा १.२३. ॰हीन-वि. अविचारी; विचार न करणारा; तार- तम्यबुद्धि नसलेला. विवेकाढ्य, विवेकी-वि. विचारी; न्यायी; तारतम्य जाणणारा; बुद्धिवान; समंजस; शाहणा. 'प्रपंच परमार्थ चालवाल । तरी तुम्ही विवेकी ।' -दा १२.१.२.

दाते शब्दकोश

वक़ूफ़

(पु.) हिंदी अर्थ : ज्ञान, जानकारी, अक्ल. मराठी अर्थ : ज्ञान, माहिती, बुद्धि.

उर्दू - हिंदी - मराठी शब्दकोश (कुलकर्णी - झिकरे)

व्युत्थान

न. उत्थान. उठणें; समाधी अवस्थेंतून बाहेर येणें. 'यालागी समाधि आणि व्युत्थान । या दोन्ही अवस्था सहित जाण । बुद्धि होय ब्रह्मार्पण ।' -एभा ९.२०९. [सं. वि + उत्थान]

दाते शब्दकोश

व्यय

पु. १ खर्च; वेंच. २ नाश. -ज्ञा १५.१२२. ३ एका संवत्सराचें नांव. -वि. नश्वर -एभा २ ३९४. [सं.] ॰बुद्धि- स्त्री. १ खर्चिक स्वभाव; उधळेपणाची प्रवृत्ति. २ (क्व.) औदार्य- बुंद्धि; सढळ हात. ॰वेत्ता-वि. खर्चिक; व्ययबुद्धीचा. 'पार्थ पहाशील सुखें व्ययनेत्ते वित्त वेंचिती यज्ञा ।' -मोकर्ण (नवनीत पृ ३३६). ॰शंकित-वि. कृपण; कद्रू. ॰शील-वि. खर्चींक; उधळ्यां. ॰स्थान-न. (ज्यो.) कुंडालींतील बारावें स्थान. व्ययित-वि. खर्चलेलें; व्यय केलेलें. व्ययी-वि. सढळ हाताचा; खर्चिक.

दाते शब्दकोश

भिकार

न. भिकार्‍यांचा थवा, समुदाय; समुच्चयानें भिकारी लोक. -वि. दरिद्री; भिकारी; कंगाल; जीवनाच्या सामान्य सुखाविरहित (देश, गांव, खेडें); भिकारी; दरिद्री. जसें- भिकारी-राज्य-जमीन-बाग-दौलत-पीक-हंगाम इ॰ [सं. भिक्ष् = मागणें] ॰काम-न. दरिद्री, भिकारी काम. ॰खाना-पु. १ भिकार्‍यांची वस्तीची जागा. २ भिकारी घर, वसतिस्थान. ३ (निंदेनें) भिकारी, दरिद्री मानलेलें घर. ॰खोड-चट-चाळा- स्त्रीपु. अशिष्ट, बिनसंभावित, भिकार्‍यासारखी खोड, चाळा, चाल, रीत, ढंग, संबंध. ॰गंड-न. भिकारी लोक. ॰चेष्टा-स्त्री. हलकट, क्षुद्र, घाणेरडे, गदळ, अयोग्य काम, कृत्य; निवळ रिकामा कार- भार; बेफायदेशीर कृत्य. ॰चोंट-वि. १ (निंदार्थीं) भिकारी; कृपण. २ दरिद्री; तुच्छ; पसंत नसलेला; (किंमत, बळकटी, पृष्ठता, इ॰- कांत) कमी दर्जाचा; अपुरता (पदार्थ). ॰छंद-पु. वाईट नाद, संवय, खोड. ॰टोकार-न. (व्यापक, सामा.) भिकारी लोक; भिकार्‍यांचा व टोळभैरवांचा समुदाय. [भिकारी द्वि.] ॰डा-पु. (तिरस्कारदर्शक) भिकारी. ॰णें-अक्रि. भिकारी, दरिद्री होणें. ॰दासावर हुंडी-स्त्री. अत्यंत गरीब माणसाकडे केलेली पैशाची मागणी, विनंति. ॰पेठ-स्त्री. मालाचा पुरवठा पूर्ण नसलेलें शहर. (समासांत) भिकार-नगरी-पुरी-वस्ती इ॰ ॰बुद्धि-स्त्री. भिकारी- बुद्धि; हलकी कल्पना, युक्ति, तोड, सल्ला, विचार. ॰भास- स्त्री. (गो.) भिकार चेष्टा. ॰भोपळा- वि. दुर्दैवी; कपाळकरंटा. ॰लक्षण-न. हलकट व भिकारी लक्षण, चिन्ह; भिकार चाळा. ॰लाड-पु. (भिकारी करण्यासारखे लाड) अतिशय कौतुक. आणि लालन (प्रायः मुलाचें); मुलास बिघडविण्यासारखे लाड. ॰वाडा-पु. १ भिकार्‍यांची राहण्याची जागा. २ भिकार्‍यांचा समुदाय ३ भिकार दिसणारें घर, इमारत. ॰विकरी-स्त्री. १ भिकार वस्तूंची विकरी. २ थोडकी विकरी; अतिशय लहान प्रमाणांतील किरकोळ विकरी. ॰सौदा-पु. भिकार माल, वस्तु; कोणताहि बेफायदेशीर व्यापार, करार; भिकार खटलें, काम. ॰हट- पु. नीच, हलकट, अयोग्य खवखव, हांव, आग्रह. -री-हाड- न. १ (ल.) भिकारी किंवा गरीब कुळी २ अत्यंत हीन असें जीवित हाडाचें दारिद्र्य हाडींमाशीं खिळलेली दारिद्रता. भिकारी- पु. १ भीक मागणारा मनुष्य. २ दरिद्री, कंगाल मनुष्य. ३ -वि. (निंदार्थी) कवडीमोल; तुच्छ; भिकारी (मनुष्य, स्थळ, वस्तु). ४ हिताची गोष्ट न ऐकणारा; लाभाविषयीं पराङ्मुख; तोटा, नाश करणार्‍या कामाविषयीं तत्पर असा (मनुष्य इ॰). म्ह॰ (व.) भिकार्‍याला ओकार्‍या = भिकार्‍याला आढ्यता फार.

दाते शब्दकोश

ठक

पु. लुच्चा, फसव्या, धूर्त मनुष्य. 'ठकउनि लुटावया पटु ठक जेविं ससार्थवाह सार्थातें ।' -मोसभा ६.८९. -न. (काव्य) तटस्थपणा; आर्श्चयामुळें येणारी एकाग्रता; आश्चर्य; भूल; विस्मृति; दिङ्मूढता. (क्रि॰ पडणें). 'उभा जानकीरमण । वधुसहित सुलक्षण । उभयरूपाचें बरवेपण । पाहाण्या ठक पडिलेसें ।' -वेसीस्व १०.१२१. -वि. तटस्थ. [सं. स्थग, हिं. ठक; ठग] म्ह॰ 'ठकास महाठक भेटला.' ठकडा-डी-डें-ड्या-वि. लुच्चा; सोदा; फसविणार; मोठा ठक. 'म्हणती ठकडा रे कान्हा ।' -तुगा २३०. 'अवघ्या जातीमध्यें ठकडा सोनार । त्या घरीं व्यापार झारी- याचा.' ठकणा-णी-वि. ठकडा पहा. 'कोण मिळाली ठकणी' -अफला ७८. ठकडेपणा-न. फसवेगिरी. 'तें ठकडेपण श्रीपती । न चले मजप्रति सर्वथा ।' -एभा २९.७२८. ॰णूक-स्त्री. फसव- णूक; फसगत; लुच्चेगिरी; लबाडीनें केलेली नागवणूक. ठकणें- अक्रि. १ फसणें; फसले जाणें दगा होणें; निराशा होणें; बुडणें (धंद्यात) चुकणें. 'माझी ठकली वो बुद्धि ।' -कथा १.५.१४२. २ (चुकीनें) थकणें; दमणें; श्रम होणें किंवा पावणें; बंद राहणें; संपणें; सरणें; अंतरणें. 'जरी राजा घरासि ये । तरी बहुत उपेगा जाये । आणि कीर्तीही होये । श्राद्ध न ठके ।' -ज्ञा १७.१८६. ३ -सक्रि. (कों.) दगा देणें; नाडणें; ठार मारणें (असावध किंवा पूर्व तयारी नसतां, सापाच्या दंशानें किंवा चोरांनीं हल्ल्यांत). -अक्रि. आश्चर्यचकित होणें. 'पाहेना तंव चमत्कारें । अवधान ठकलें. । ' ज्ञा ७.२००. [हिं. ठकना] ॰धंदा-पु. फसवेगिरी; सोदेगिरी; लुच्चेगिरी; लुच्चेपणाचा व्यवहार. ॰बाज-वि. ठक अर्थ १ पहा. [हिं.] ॰बाजी-स्त्री. १ ठकधंदा पहा. २ (कायदा) कोणा मनुष्यास फसवून त्याचा माल देण्याविषयीं त्यांचे मन वळविणें. [हिं.] ॰वणी-ठकवणूक-स्त्री. ठकधंदा, पहा. ॰वरा- वि. ठकविणारा; लुच्चा. ठक अर्थ १ पहा. ठकवा-व्या, ठकाऊ, ठकारू(वू), ठकू-वि. ठकवरा पहा. ठकवाठकव-स्त्री. नाना- प्रकारची फसवणूक. ठकवणी पहा. [ठकविणें] ॰विणें-सक्रि. फसविणें; लबाडी करणें. 'सुरांअसुरांते ठकवूनी । महादेव मोहिला ।' -एरुस्व २.१९. [ठकणें] ॰विद्या, ठकूविद्या-स्त्री. फसविण्याची कला; कपटयुत्कि; लबाडी; ठग लोकांचें चातुर्य. ॰व्याज-न. फसवून घेतलेलें व्याज; अमर्याद व्याज. ॰व्यापार-न. कप- टाचा व्यापार, धंदा, उद्योग. ॰सौदा-पु. १ गिर्‍हाईकास ज्या वस्तूनें किंवा मालानें फसविण्यांत आलें तो माल. २ ठकव्यापार पहा.

दाते शब्दकोश

म्हातारा

वि. १ वृद्ध; वयोवृद्ध; वयस्क. 'म्हाताऱ्याने केलें नांव.' २ पुनर्वसु नक्षत्राबद्दल शेतकरी लोक म्हणतात. तसेंच पुष्य नक्षत्राला तरणा अशी संज्ञा देतात. ३ एक प्रकारचें गवत. -बदलापूर १६१. [सं. महत्तर] म्हाताऱ्यास पिंपात ठेविलें पाहिजे किंवा पेटींत अगर कंठाळीत घालून नेलें पाहिजे- आपणाला सल्ला देण्यासाठीं आपणाबरोबर नेहमी वयोवृद्ध माणसें असावयास पाहिजेत. म्हातारपणीं ढोवळा मणी-(व.) म्हातारपणीं कशाला शृंगार हवा. म्हाताऱ्याबगर कोणी जायना-(गो.) म्हातारा मनुष्य असल्याशिवाय कहाणीसारख्या ठराविक गोष्टी पार पाडत नाहिंत. म्हाताऱ्याच्या बायकोस तांबटाच्या रोट्या-म्हतारीला धड खाण्यास अन्न व नेस- ण्यास वस्त्र मिळत नाहीं. तिला उरलेंसुरलेंच खावें लागतें. म्हाताऱ्या माणसाचें लोणचें घालून ठेवावें-सदुपदेश पाहिजे असेल तर म्हाताऱ्या माणसाचा सल्ला घ्यावा. म्हातारखंड-न. म्हातारा शब्दाचें तुच्छतेचें रूप; निंदेनें म्हाताऱ्यास म्हणतात. म्हातार चळ-पु. म्हातारपणीं बुद्धीस होणारी विकृति; म्हातारपणीं होणारा बुद्धिभ्रंश; साठी वुद्धि नाठी; पिसें; चाळे; तारे; म्हातारपणीं बुद्धि बावचळणें. म्हातारडा, म्हातारडुक-वि. थेरडा; मूर्ख म्हतारा अशा अर्खीं; तुच्छतादर्शक म्हातारा या अर्थीं (स्त्री. पुरुष या दोहों- बद्दल उपयोग); म्हातारखंड. म्हाताराकोतारा-वि. म्हातारा (द्विरुक्तीनें); वृद्ध आणि वयस्क; म्हातारा आणि अशाचसारखा. म्हातारी-स्त्री. १ वृद्ध स्त्री; आई; जरठ स्त्री. २ बोडकी; केस भादरलेली विधवा स्त्री (तरुण किंवा म्हातारी कशीहि असो इजबद्दल उपहासार्थी योजावयाचा शब्द) ३ कापसाचा हलका पुंजा किंवा हसकें पीस (हवेंत उडणारें) याजबद्दल योजावयाचा शब्द. रुईच्या फळांतील तंतुसमुदाय. (वाप्र) 'मुलें खेळतांना म्हाताऱ्या उडवितात.' -मराठी ६ वें पुस्तक पु. २४३. म्हातारी मेलीसें होणें-(ल.) अतिशय दुःख होणें. म्हातारीनें कोंबडें झांकून ठेवलें म्हणून उजेडावयाचें रहात नाहीं-केंबडा उजेड- ण्याचे अगोदर आरवतो. यावरून कोंबड्याच्या आरवण्याचा आणि उजेडण्याचा कांहीं कार्यकारणभाव आहे असें मात्र नाहीं. उजाडूं नये म्हणून म्हातारीनें कोंबडें झांकून ठेविलें तरी उजाडावयाचें तें उजाडतेंच. सृष्टिक्रमाप्रमाणें गोष्टी होऊं नयेत म्हणून कितीहि प्रयत्न केला तरी त्या गोष्टी थांबावयाचा नाहींत.

दाते शब्दकोश

आद्य

वि. १ पहिला; आरंभींचा; अगोदरील; उपक्रम, सुर- वात करणारा (वेळ, स्थळ संबंधीं). २ मुख्य; प्रमुख; सर्वोत्कृष्ट. ३ आदि; प्रभृति. 'काशी यात्राद्य यात्रा याणें केल्या आहेत.' -पु. १ आदिपुरुष; परमेश्वर. 'ओं नमोजी आद्या ।' -ज्ञा १.१. [सं.] ॰कवि-कारण-काल-काव्य-देव-धर्म-पुरुष-इ. या सामा- सिक शब्दांपेक्षां आदिकवि-आदिकारण इ॰ शब्द अधिक प्रशस्त. ते पहावें. ॰गोदान-न. मुख्य अनुष्ठान करण्यापूर्वीं प्रायश्चितत्तांग- भूत करावयाचें गाईचें दान. [सं. आद्य + गो + दान] ॰ग्रह-पु. पहिल्याप्रथम एखाद्या विषयीं असणारी होणारी भावना, ग्रह, ठसा, पूर्वग्रह. ॰जंतु-पु (प्राणि.) आदिजीव; (इं. प्रोटोझोआ. ॰नाडी-स्त्री. (ज्यो.) नाडी पहा. ॰पीठ-स्थान-न.१ पूर्वजांची भूमि किंवा स्थळ. २ देवता जेथें प्रथम अवतीर्ण किंवा उपलब्ध झाली तें स्थान. ३ प्राचीन व पूज्य असें क्षेत्र, नगर, स्थळ [सं.] ॰वेद-पु. ऋग्वेद. ॰वेदी-वि. ऋग्वेदी शाखेचा. 'आद्य- वेदी असे आपण ।' -गुच १७.१७. ॰ज्ञान न. १ प्रथमचें, मूळ ज्ञान...शहाणपण. २ उपजत, अंगचें अथवा जातीचें शहाण- पण; नैसर्गिक बुद्धि. ३ मूळ कल्पना. ४ नवीन शोध, शक्कल; प्राथ- मिक युक्ति, प्रयुक्ति. [सं.]

दाते शब्दकोश

ठाकणे      

अक्रि.       १. (उभा या शब्दाने आरंभ होऊन) स्तब्ध राहणे; स्वस्थ उभे राहणे. २. स्वीकारणे : ‘जिंहीं ठाकिलें चरणछत्र ।’ - एभा १९·११४. ३. जवळ येणे; प्राप्त होणे : ‘जैसी नाव थडिये ठाकितां I’ - ज्ञा २·३४९. ४. थांबणे; बंद होणे : ‘जें यमनियम ठाकती । तेथ इंद्रियें सैरा राहाटती ।’ - ज्ञा १·२४९. ५. चेष्टा करणे. ६. मर्जी असणे; आवडणे : ‘मग करूं देवा ठाके तैसें ।’ - ज्ञा ११·३८. ७. पोहोचणे : ‘ठाकावया निजबोधासि ।’ - एभा ७·३५१. ८. गाठणे : ‘तेथें उचलिता पाउलीं । निजबोधाची पव्हे ठाकली ।’ - एभा १०·१९४. ९. पटणे; खरे वाटणे : ‘श्रवण ऐकोनि नास्तिक । देवोचि नाहीं म्हणती देख । आहे म्हणती ते पोटपाइक । आम्हांसि विशेष ठाकेना ।’ - एभा ११·७०३. १०. घडणे; शक्य असणे : ‘ठाके तो करावा जपतप ।’ - एभा १८·३१८. ११. प्रत्यक्ष होणे; अनुभवणे : ‘माझे ठाकावया चिद्रूप ।’ - एभा १९·२५७. १२. नखरेल वागणे; खोटे खोटे वागणे. १३. मस्ती करणे. १४. योग्य होणे; अनेक ठिकाणी असणे, राहणे : ‘आणि बुद्धि होणियेरा सारिखी ठाके ।’ - ज्ञा ११·३९७. (वा.) ठाकून येणे - न विसरता येणे; दत्त म्हणून उभे राहणे : ‘जिवा जन्मदारिद्र ठाकूनि आलें ।’ - मश्लो १३८. [सं. स्था, स्तक्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खाणें

उक्रि. १ भक्षणें, जेवणें. २ तनाखोरी करणें; गिळंकृत करणें; लांच खाणें; हरामखोरींने किंवा लबाडीनें आत्मसात् करणें. ३ गिळणें; गट्ट करणें; ग्रासणें; चट्ट करणें. ४ घेणें; फस्त करणें (इमारत सामानसुमान संपविते तसें). 'त्या घरानें हजार वांसे खाल्ले' ५ सोसणें; सहन करणें (मार, उष्णता, थंडी). 'त्यानें एक छडी खाल्ली.' ६ आंत घेणें (हवा); ७ घेणें (शपथ); ८ ग्रासून टाकणें, पूर्णपणें वश करणें. (औषध, मनुष्य). ९ पराभव करणें. 'काशीकरानें रंगनाथशास्त्र्यास एका क्षणांत खाऊन टाकलें.' १० गाळणें, टाकणें, सोडणें (बोलण्यांत अथवा लिहिण्यांत अक्षरें) ११ चावणें; डसणें. 'साप खाई पोट रितें' = दुसर्‍यास चावल्यानें सापाचें पोट भरत नाहीं. (कुत्रीं, विषारी किरडें, किडे, जीवाणूं यांच्याहि चावण्यास लावतात. तसेंच शारीरिक अस्वच्छतेबद्दल योज- तात. 'मळ खातो, उवा खातात, पिसा खातात.' = उवा, पिसा ह्या माझ डोकें (डोकसें, डोसकें, शीर) खातात म्हणजे चावतात, त्रास देतात. १२ तोडणें; टोचणें; मनाला बोचणें (पाप, गुन्हा, मन, पाप बुद्धि). 'कीं पापियासि निज पातक जेंवि खातें ।' १३ (ल.) कुरतडणें; डवचणें; तोडणें (वाईट अन्न, पित्त, मानहानीचें भाषण). १४ एखाद्या जोखमीच्या कामानें एखाद्याचा नाश करणें; 'या कंत्राटानें त्याला पुरें खाल्लें.' १५ खर्च करणें. 'तूं माझा अर्धा तास खाल्लास' १६ मारणें; बळकावणें. 'वजिरानें उंट खाल्ला.' १७ भोगणें; सेवणें (विसावा, चैन). -अक्रि. १ भक्षणें; भक्षणें आणि जगणें; अन्न घेणें, घालणें (भोजन करणें असा या क्रियापदाचा अर्थ होत नाहीं. 'जेवणें' पहा). २ दुखणें (डोकें, डोसकें, डोई, शीर, माथा, कपाळ इ॰) -अकर्तुक क्रि. (ला. शीं जोडून). कोणी खातो, तोडतो अशी आंत भावना वेदना, होणें. [सं. खादन; प्रा. खाण; सिं. खाइणु; तुल॰ फा. खाईदन = कुरतडणें] (वाप्र.) खाईन खाईन करणें-अधाशीपणा करणें; खाण्यास धाधावलेला असण; खा खा करणें. खाऊन ढेकर देणें-दुस- र्‍याच्या वस्तूचा अभिलाष धरून ती आपलीशी करणें, गिळंकृत करणें, आत्मसात करणें. खाण्यामुळें हीनशक्त होणें- खाण्याच्या अभावामुळें अशक्त होणें. खाण्यां तुटणें-क्षुधा किंवा पचनशक्ति कमी होणें. खायाप्यायाचे दिवस-तारुण्यां- तील आनंदाचे व उल्हासाचे दिवस; आयुष्यांतील सुखाचे दिवस जीव-प्राण-खाणें-दुसर्‍यास फार त्रास देणें. दांत ओंठ खाणें-अतिशय रागावणें म्ह॰ १ खाई त्याला खवखवे (खव खवणें म्हणजे घशांत कंडू सुटणें यावरून) = जो वाईट काम करतो त्याच्या पोटांत तें डांचत असतें असा अर्थ; चोराच्या मनांत चांदणें. २ खाईन तर तुपाशी नाहीं तर उपाशी = मी म्हणेन तें ऐकलें तर ठीक आहे, नाहींतर मी रुसून बसणार असा हट्ट घेऊन बसणें याअर्थीं.

दाते शब्दकोश

उदार

वि. १ मोठ्या मनाचा; कनवाळु; थोर मनाचा; धर्मात्मा. २ मोकळा; धीट; प्रशस्त; उघडया मनाचा; संकोचित, कुढ्या, कृपण, कंजूष, अरुंद याच्या उलट (माणूस, भाषण, स्वभाव, होडी, जागा, गाडी, खोली वगैरे). ३ सढळ; दाता; खर्चिक; दानशील; चिक्कू, कृपण याच्या उलट. 'उदार तोच श्रीमंत कृपण तोच दरिद्री.' म्ह॰ आईजीच्या जिवावर बाईजी उदार. ॰कर्ण- वि. १ कर्णासारखा उदार; दानशूर; मोठा दाता. २ (उप.) कृपण व कंजुष (मनुष्य). ॰धोरण-न. खुल्या दिलाचें, प्रतिपक्षावर अधिक विश्वास ठेवण्याचें, मोठ्या मनाचें धोरण. 'लॉर्ड कर्झन यांच्या कारकीर्दीचें धोरण रिपन साहेबांच्या उदार धोरणाच्या अगदीं उलट झालें आहे. -टि ३.४०. ॰पक्ष पु. (राज.) व्यापक विचारांच्या लोकांचे (लिबरल) मंडळ, पक्ष; प्रागतिक पक्ष; हुजूर (कॉन्झर्व्हेटिव्ह) पक्षाच्या उलट. ॰मतवादी वि. सुधा- रणाप्रिय लोक; प्रागतिक;) (इं.) लिबरल. 'सर्व प्रकारची चौकशी करण्याकरितां लॉर्ड डरहॅम या उदारमतवादी मुत्सद्द्याची रवा- नगी करण्यातं आली.' -वस्व ६४. ॰लक्षण-वि. १ उठाव- दार; रुबाबदार; मर्दानी (चेहरा, लक्षणें). २ भाग्यशाली; मोठेप- णाचीं (लक्षणें, चिन्हें). ॰शिक्षण-न. उदारपणाचें शिक्षण; ज्यामुळें मनाचा विशेष विकास होतो व बुद्धि व्यापक होते असें शिक्षण.

दाते शब्दकोश

लिंग

न. १ पुरुषाचें जननेंद्रिय; निश्न. २ (व्याकरण स्त्रीपुरुषत्वभेद; पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग अशीं तीन लिंगें व्याकरणांत आहेत. ३ शंकराची विशिष्ठ प्रतिमा; ईश्वर- प्रतिमा; शंकर; शिवलिंग. 'दुर्दम काळासि जसा लंघाया विश्व- नायका लिंगा ।' -मोभीष्म ३.३७. ४ आराध्यदैवत., 'तंव वैकुंठ- पिठीचें लिंग । जो निगमपद्माचा पराग । जिये जयाचेनि हें जग । अंगच्छाया ।' -ज्ञा १७.४६. ५ लिंगाईत लोकांच्या नांवा- पुढील प्रतिष्ठावाचक शब्द. उदा॰ सदलिंग; दादलिंग. ६ लिंगा- ईत लोक गळ्यांत बांधतात तो शिवस्वरुप कवचसहित खडा. ७ खूण; चिन्ह; लक्षण; स्वरूपबोधक चिन्ह. 'आतां शांतीचें जी लिंग । तें व्यक्त मज सांग ।' -ज्ञा १६.१३६. ८ (सांख्य मता- प्रमाणें) प्रकृति; सृष्टींतील विच्छक्ति. ९ (ल.) अडथळा; उपाधि; ज्याच्या योगानें मनुष्य बांधला जातो-त्याची स्वतंत्रता जाते- अशी गोष्टी; अडचण; त्रास. (क्रि॰ लागणें; अडकणें; असणें). [सं. लिग् = चालणें, हालणें] लिंगविभक्ति संभाळून बोलणें- व्याकरणशुद्ध बोलणें. ॰देह-शरीर-पुन. सूक्ष्म देह; वासनात्मक शरीर. मन बुद्धि, दशेंद्रियें व पंचप्राण इतक्या सतरा तत्त्वांचा हा देह असतो. 'जालिया लिंगशरीराचा भंगु । चुके निरयस्वर्गाचा मार्गु । स्वभावेंचि ।' ॰भद्र-न. कीर्तिमुखादि विशिष्ट आकृति; यंत्र. 'वोडविजेति लिंगभद्रें । नवीं नवीं ।' -ऋ ७८. ॰भेद- पु. १ सूक्ष्मदेहभेद; लिंगदेहाचा भेद. २ पूज्यांचा उच्छेद. 'हें झुंज नव्हे प्रमादु । एथ प्रवर्तलिया दिसतसे बाधु । हा उघडा लिंग- भेदु । वोढवला आम्हां ।' -ज्ञा २.३१. ३ वैषम्य; विषमता; फरक; भेद. 'तेथ मी नमस्कारा । लागिं उरों दुसरा । तरी लिंग भेद पऱ्हा । जोडूं जावों ।' -अमृ १.५१. ॰भेद विशिष्ट आक- र्षण-न. भिन्न लिंगांच्या माणसांचें परस्परांकडे आकर्षण. 'आतां पुस्तकें वाचून लिंगमेदविशिष्ट आकर्षण असें मा म्हणेन.' -सुदे १०१. (इं.) सेक्स्चुअल अटॅ्क्शन्. ॰वंत, लिंगायत-पु. शिवाचे उपासक. हा एक पंथ आहे. या पंथाचे लोक गळ्यांत लिंग घालतात. ॰व्रण-पु. लिंगक्षत; शिश्नाला पडणारे चट्टे. शरीर- न. लिंगदेह; सूक्ष्मशरीर. याच्या उलट स्थूलशरीर. लिंगाड-वि. (निंदेनें) लिंगाची पूजा करणारा; लिंगाईत. लिंगशा-वि. (कों.) चेंगट्या; धिमा; थंड; मंदगति; आळसट; काम करण्यांत मंद. लिंगस्ता(स्था)ई, लिंगिस्ताई-स्त्री. (कों.) मंदपणा; आळशीपणा; कोणत्याहि कामांतील थंडपणा; धिम्मेपणा; बिलगणें; लिंग- डणें-अक्रि. (अडथळा; अडचण इ॰) चिकटणें; बिलगणें; न निघे असें चिकटणें. लिंगाईत-लिंगवंत पहा. लिंगाध्यास-पु. वासना तादात्म्य. लिंगाईत-पु. लिंगाईत, लिंगवत. लिंग्या-पु. (निंदेनें) लिंगाईत; लिंगडा. 'पंथ क्रमति नित्य बरोबर लिंग्या घेऊनी ।' -प्रला. ३३.

दाते शब्दकोश

क्षण

पु. १ एका मुहूर्ताचा वारावा भाग. ४ मिनिटें; ३० कला. २ सूक्ष्म काळ; किंचित, थोडा वेळ; पळ; निमिष. ३ श्राद्धाच्या आमंत्रणाकरितां ब्राह्मणाच्या हातावर द्यावयाचे दर्भ. (यावरून) ४ ब्राह्मणास श्राद्धाचें आमंत्रण. (क्रि॰ देणें; घेणें). ५ श्राद्धभोजन. 'ब्राह्मण क्षणास बसला-आला-गेला.' [सं.] क्षणणें-क्षण देणें-सक्रि. श्राद्धाकरितां हातांत दर्भ देऊन ब्राह्मणास आमंत्रणा करणें ॰प्रभा-स्त्री. वीज; विद्युल्लता. 'मेघी स्थिरावली क्षणप्रभा ।' ॰बुद्धि-वि. चंचल, अस्थिर, अनिश्चित, मनाचा, बुद्धीचा. ॰भंगुर-वि. एका क्षणांत नाश पावणारा, मोडणारा; नाशवंत; अशाश्वत; क्षणिक. 'अनुभविलेलें क्षणभंगुर सर्वहि जें सुज्ञजन पहातात ।' -मोभीष्म १.१४. ॰भर-भरि-री- क्रिवि. (काव्य) थोडा वेळ; एक क्षण कालापुरतें; पळभर; तिळभर. 'दोघांस न विसंबे क्षणभरी ।' ॰विध्वंसी-वि. (एका क्षणांत विध्वंस होईल असा) क्षणभंगुर; नश्वर. क्षणाक्षणां-क्षणीं, क्षणोक्षणीं-क्रिवि. प्रत्येक क्षणास-क्षणीं; पावलोपावलीं, 'परा- पेक्षा होऊं नये क्षणाक्षणा ।' -दा १४.१.२३. क्षणावधि- पु. थोडा वेळ; एक क्षण; पळ. -क्रिवि. एका क्षणांत; क्षणभर. क्षणिक-वि. एक क्षण टिकणारें; अल्प काळ राहणारें; नाशवंत; नश्वर; चंचल. 'अपेक्षिजे राज्यसुख । जया लागीं तें तंव क्षणिक ।' -ज्ञा १.२६३. क्षणिक बुद्धि-वि. क्षणबुद्धि; चंचल वृत्तीचा-मनाचा. क्षणिक बुद्धि-मति-कल्पना- विचार-निश्चय-स्त्री.पु. थोडा वेळ टिकणारी बुद्धि, मति, इ॰; चंचलपणा; अस्थिरपणा. क्षणे(णै)क-क्रिवि. (काव्य) एक क्षण; थोडा वेळ. 'क्षणेक तेणें मग ती रुसावी ।' -सारुह २.३०.

दाते शब्दकोश

सभा

स्त्री. १ ज्या ठिकाणीं विद्वान्, पंडित, गुणीजन, राजे लोक वगैरे जमतात, बसतात अशी जागा; दरबार; मंत्रगृह; 'राजसभा, ब्रह्मसभा.' 'सभे शिशुपाळ घेतला प्राणें ।' -मुसभा १२.१४४. २ समाज; मंडळी; जमाव; समुदाय; बैठक; आखाडा; मेळा. ३ सभेसंबंधी गाणें. 'तेचि सभा गातों सभेमधिं तेचि सभा गातो' -पला २०.४०. ४ शाळा; धर्मशाळा; दालन 'एका सभेंत रात्रौ निजला...।' -मोवन ४.१११. सभा- जिंकणें-वादविवादांत यश मिळवणें; फड मारून नेणें; आपलें म्हणणें खरें करणें.सभाकंप-पु. सभेमध्यें भरणारें कांपरें; लाजाळूपणा; संकोच. २ मन अपराधी असल्यामुळें वाटणारी भीति व त्यामुळें होणारा थरकांप, गोंधळ. सभांगण-न. १ सभेची जागा. २ रंगण; चौक; मोकळी जागा. 'सजूनि वर वल्लभी तव सभांगणीं नाचतो' -केका ११४. सभांगना-स्त्री. वारांगना; कलावंतीण; नायकीण. 'तक्तराव जिलेवंत नाचती सभांगना आनंदांत' -ऐपो १९९. सभागृह-न कचेरी; दिवाण- खाना; सभेची जागा; दरबारची जाग. सभाचातुर्य- कौशल्य-पाटव-न. शिष्टाचार; सभ्यता; रीतरिवाज; चार मंडळींत वागण्याची योग्य पद्धति व त्यांत दिसून येणारी चांगली बुद्धि. सभाजन-पु. १ सभेंतील सदस्य; मंडळी; समाज; लोक- समुदाय. २ सभासद; सभेंत बसणारा गृहस्थ. सभादीप-दीपक- दिवा-वि. १ श्रावणीच्या दिवशीं ब्राह्मणास अग्निसमक्ष सुवा- सिनी दान करतात तो दिवा. २ सभादीप दान करण्याचा विधि. ३ (ल.) सभाभूषण; सभेचा अलंकार. सभाधिकारी- पु. सभेचा नेता; अध्यक्ष. सभाधीट-वि. सभेमध्यें न भितां, न गोंधळतां भाषण करणारा. सभाधूर्त-वि. सभेमध्यें, दरबारांत वाद, मसलत, मध्यस्थी वगैर कामांत प्रवीण, वाक- बगार, हुशार; सभाकुशल-चतुर-पटु हे पर्याय शब्द आहेत. ॰धैर्य-न. सभेंतील धीटपणा; आत्मविश्वास; धिटाई. ॰धौर्त्य- न. सभेंतील धूर्तता, चातुर्य, कौशल्य. सभाध्यक्ष. सभा- नायक, सभापति-पु. सभेचा प्रमुख, मुख्य, नेता, पुढारी, अध्यक्ष, मुखर, उपद्रष्टा. ॰नियम-पु. सभेसंबंधीं कायदा, निर्बंध, काम चालविण्याविषयीं पद्धति. ॰नीति-स्त्री. सभेसंबंधी नियम, निर्बंध, कायदा, पद्धति. ॰पाण्डित्य-न. तादृश अंगीं विद्यादि असोनसो पण सभादिकांमध्यें भाषणादि करण्याचें सामर्थ्य. केवळ सभेमध्यें ज्ञानाचें प्रदर्शन; वरकरणी दाखविण्याची विद्वत्ता. ॰प्रवेश-पु. १ सभेच्या कामास आरंभ, सुरुवात. २ सभास- दाचा सभेमध्यें येण्याचा पहिला प्रसंग; नवीन सभासदास सभेंत दाखल करून घेणें. ॰भीत-वि. सभेमध्यें लाजणारा; संकोच वाटणारा; धीटपणा नसणारा. ॰भीति-स्त्री. समाजाची, मंड- ळीची भीति, भीड, लाज, संकोच; सभेमध्यें घाबरण्याची संवय. ॰भीरू-वि. सभेमध्यें लाजणारा; संकोची. ॰भूषण-न. सभेचा अलंकार; पंडित, विद्वान मनुष्य; सभेमध्यें शोभणारा. ॰मंडन- न. १ सभेची रोषणाई; सभास्यानाचें अंलकरण. २ सभेचा अलं कार; पंडित, विद्वान मनुष्य; सभेला शोभा आणणारा विद्वान. ॰मंडप-पु. १ सभास्थान; सभेची जागा; मंत्रगृह, दिवाणखाना. २ मंदिराच्या गाभार्‍यापुढें कीर्तन-पुराणादिकांकरितां बांधलेली आच्छादित जागा. ३ गाभार्‍यापुढील मोकळी जागा. ॰मोहन- न नजरबंदी; सभेस चकविण्याची, भुलविण्याची विद्या. 'सभा मोहन भुररी चेटकें । साबरी मंत्र कौटलें अनेकें ।' -दा ५.२. २. ॰रंजन-न. सभेची करमणूक; मंडळीचें मनोरंजन. ॰रत्न-न. सभाभूषण; सभेचा अलंकार. ॰लंकार-पु. सभारत्न. ॰व्यव- स्थापक-वि. सभेची व्यवस्था ठेवणारा; शिस्त राखणारा; सभा व्यवस्थितपणें चालविणारा. ॰व्यवस्थापन-न. सभेची व्यवस्था, व्यवस्थित मांडणी, व्यवस्थित कार्य, शिस्त, देख- रेख. ॰शूर-वि. सभेंत किंवा मंडळींत धीट; आत्मविश्वासी; सभेमध्यें पराक्रम गाजविणारा. ॰संकेत-पु. सभेचे नियम, पद्धति, रूढि. सभासद-पु. १ सदस्य; सभेचा प्रत्येक घटक; सभेमध्यें बसलेला प्रत्येक इसम. २ (ल.) लोकांच्या फिर्यादी दाखल करून घेणारा कचेरींतील कामगार. ३ सभास्थान; सभा- मंडप; सभामंडळ; बैठक. 'तूं या विश्वाची अनादि आदी । बैससीं जिये सभासदीं । तेथें सोयरिकीचिया संबंधीं । रळी बोलों ।' -ज्ञा ११.५४४. ४ पंच; न्यायदानाच्या कामीं मदत करणारा अधिकारी. 'सभासद भलेलोकीं सांगितलें कीं' -भाइ- समं २.६३. ॰स्थान-न. सभेची जागा; सभागृह, मंढप, ॰स्फूर्ति-स्त्री. सभेमध्यें प्रसंगावधान; सभेमध्यें भाषण करतांना येणारें अवसान, स्फुरण. ॰क्षोभ-पु. सभेमध्यें गांगरून जाणें; सभेमध्यें घाबरणें, घोंटाळणें. 'किंवा सभाक्षोम तयास झाला ।' -सारुह ६.९५. सभोचित-वि. सभेमध्यें करावयास, मंडळींत करण्यास योग्य; बैठकींत करण्यासारखें. सभ्य-पु. १ सभासद; प्रेक्षक. सभेंतील योग्य मनुष्य. 'तै गुणदोष सायिखेडें । सभ्युं जैसा ।' -ज्ञा १४.३४३. 'भरत कुल धर्म न बुडो सभ्याला पूस एकदां जागा ।' -मोसभा ४.१०३. 'न वदति सभ्य न पांडव ।' -मोसभा ५.५८. २ पंचाग्निपैकीं एका अग्नीचें नांव. -वि. संभा वित; प्रतिष्टित; शिष्ट; सज्जन.

दाते शब्दकोश

ईश्वर

पु. १ परमेश्वर; जगाचा नियंता; देव. २ शंकर किंवा विष्णु. ३ स्वामी; राजा; सत्ताधीश; अधिराज. ४ आवाढव्यता, विशालता दर्शविण्यासाठीं हा शब्द व्यापकतेनें सामासिक शब्दांत पुढीलप्रमाणें सढळतेनें उपयोजितात; त्यामुळें हे शब्द वेडेवांकडे व कर्णकटु होतात. जसें-डोंगरेश्वर; धोंडेश्वर; खांबेश्वर; वाडेश्वर; पाटेश्वर; नदीश्वर; फुलेश्वर वगैरे. ५ सर्व श्रेष्ठ या अर्थीं शब्दाच्या शेवटीं लाव- तात. जसें-कवीश्वर; योगीश्वर; पर्वतेश्वर. 'तोचि भरंवसेनिसीं । योगी- श्वरू ।' -ज्ञा ६.४७. [सं.] ॰कर्तुत्व-कृति-न. स्त्री. दैवी कृति; ईश्व- राची करणी. ॰कृपा-स्त्री. परमेश्वराची कृपा; ईश्वरीकृपा; ईश्वरीप्रसाद. ॰तनुचतुष्ट्य ब्रह्मांडाचीं चार अंगें-महामाया, अव्याकृति, हिरण्य- गर्भ व विराट. 'महामाया मूळप्रकृती । कारण ते अव्याकृती । सूक्ष्म हिरण्यगर्भ म्हणती । विराट ते स्थूळ ।' -दा १०.१०.१४. ॰दत्त- वि. ईश्वरानें दिलेली; दैवी. ॰नियमित-वि. ईश्वरानें योजिलेलें, ठर- विलेलें. ॰प्राणिधान-न. ईश्वराची आराधना. ॰प्रसाद-पु. देवाची कृपा; ईश्वरकृपा. ॰प्रीति-स्त्री. १ ईश्वराची मर्जी, प्रसन्नता. २ देवाची कृपा; ईश्वरीकृपा. ॰प्रीत्यर्थ-क्रिवि. देवास आवडीचें म्हणून; देवास प्रसन्न करण्यासाठीं (दिलेलें). ॰भक्ति-स्त्री. ईश्वराची पूजा, उपासना, आराधना इ॰. ॰भाव-पु. ईश्वरावर निष्ठा; आस्तिक्य बुद्धि; याच्या उलट अनीश्वरभाव. ॰माया-माव-स्त्री. देवाचा चमत्कार, लीला, कृत्य; देवाची करणी. 'आपण करूं जातां एक । प्रारब्ध घडवी अनेक । ईश्वरमायेचें कौतुक । ब्रह्मादिका न कळेचि (अथवा नेण- वेचि) ॰सत्ता-स्त्री. देवाची नियामक सत्ता; ईश्वरी सामर्थ्य; ईश्व- राचा संकल्प (कांहीं बरें वाईट होण्यास). ॰साक्षात्कार-पु. परमेश्वराचें दर्शन; परमेश्वरी दृष्टांत (अस्तित्वासंबंधीं). ॰सूत्र- न. १ ईश्वरी योजना; ईश्वरी घटना; योगायोग; प्रारब्ध; दैव; नशीब. २ वधूवरांचा परस्पर विवाहसंबंध होण्यास कारणभूत जो ईश्वरी संकल्प तें. -राचा(घरचा)प्राणी-पु. देवानेंच सांभाळ- लेला प्राणी; जिवंत प्राणी; असहाय मनुष्य; ज्यास कोणी आप्त, मित्र नाहीं असा मनुष्य; एखाद्याची कींव किंवा दया येऊन त्यासंबंधानें हा शब्द योजितात. -राचा लाल-पु. देवाच्या मर्जींतला माणूस; ज्याची अतिशय भरभराट होत आहे असा; हरीचा लाल.

दाते शब्दकोश

अन्यथा

क्रिवि. १ नाहींतर; नाहींपेक्षां; एरवीं; असें नसेल तर. 'हें औषध घ्याल तरच गुण पडेल अन्यथा पडणार नाहीं.' २ दुसर्‍या रीतीनें-प्रकारानें-पद्धतीनें; अन्य प्रकारें; वेगळ्या तर्‍हेनें. 'हें वांचूनि पार्था । राहाटों नये अन्यथा ।' -ज्ञा ३.१२६. ३ खोटें; असत्य; मिथ्या; अयथार्थ; अमृत. 'मी खरें असेल तेंच सांगेन, अन्यथा बोलणार नाहीं.' ४ विपरीत; व्यर्थ. 'मीं इतकी मेहनत केली अन्यथा गेली, कांहीं उपयोग झाला नाहीं.' ५ चुकीनें; अयोग्य- पणानें; गैर रीतीनें. [सं.] सामाशब्द:- अन्यथाकारी, अन्यथाचारी, अन्यथाभाषी, अन्यथाभोजी, अन्यथावर्ती. ॰ख्याति-स्त्री. (तत्त्व) एक प्रकारचें विधान; चुकीचें विधान; 'ख्याति' पहा. 'आख्याति अन्यथाख्याती । शून्यख्याती सत्ख्याती । अनिर्वचनीय जे ख्याती । तो वादू निश्चितीं मी उद्धवा ।।' -एभा १६.२०७. [सं.] ॰त्व-न. विपरीत प्रकार. 'जे नेणणें माझें प्रकाशूनि । अन्यथात्वें मातें दाऊनि ।' -ज्ञा १८.१११४. [सं.] ॰दृष्टि-स्त्री. विपरीत ज्ञान. 'अवस्था- त्रय तिन्ही लोक । प्रकाशूनि अशेख । अन्यथा दृष्टि पांथिक । चेव- विलें ।' -ज्ञा १८.१३००. [सं.] ॰बोध-पु. विपरीत ज्ञान, सम- जूत. 'पैं अन्यथाबोधु आघवा । मावळोनि तया पांडवा ।' -ज्ञा १८.९६४. [सं.] ॰भाव-पु. पालट; बदल; अवस्थांतर (विशेषतः वाईट). अपकर्ष; र्‍हास; अधोगति. [सं.] ॰मति-स्त्री. विपरीत ज्ञान, बुद्धि. 'ते वेळीं विश्वस्वप्नासहितें । कोण अन्यथामति निद्रेतें । सांभाळी नुरेचि जेथें । मायाराती ।।' -ज्ञा १६.११. ॰सिद्ध-वि. १ इतर कांहीं उपायांनीं-मार्गानीं साधलेलें-स्थापना केलेलें. २ (तर्क) जो नसला तर गरज भागवितां येईल असा; ज्यावांचून अडणार नाहीं असा. अनवश्यक (जसें मडक्याची माती आणावयास गाढवच पाहिजे असें नाहीं दुसरा आणूं शकेल यावरून व्यापक) कुच- कामाचा; व्यर्थ; फुकट; निरुपयोगी. [सं.]. ३ चुकीनें सिद्ध केलेला (योग्य कारण न देतां). ॰सिद्धि-स्त्री १ कांहींतरीं, निराळ्या उपयानें सिद्ध करणें, साध्य करणें. २ त्याच पूर्वपक्षावरून वेगळा, भलता निर्णय प्रस्थापित करणें. उ॰ 'तूं लहान मूल आहेस सबब ही गोष्ट तुला सांगतां कामा नये; ह्याला उलट उत्तर असें देतां येईल कीं, मी लहान मूल आहे ना, मग तें मला सांगण्याला हरकत नाहीं.' ३ (ल.) चुकीचें अनुमान. ॰ज्ञान-न. विपरीत ज्ञान. 'आतां अन्यथाज्ञानीं । या दोनी अवस्था जया जनीं ।' -ज्ञा १५.५२५. [सं.]

दाते शब्दकोश

अज्ञान

न. १ ज्ञानाचा अभाव; अजाणतेपण. 'नेणे जीव तो अज्ञान ।' -दा ११.१.३४. २ निरक्षरता; अशिक्षितता. ३ मोह; भ्रमात्मक ज्ञान. 'सर्पविषयक भ्रमाचें रज्जुविषयक अज्ञान कारण' 'मी करतों, मी लोकांचें चालवितों इत्यादि अज्ञाना- मुळें जीव मानतात. वस्तुतः पाहिलें असतां ईश्वर करतो-चाल- वितो.' ४ तारतम्यबुद्धीचा अभाव; असमंजसपणा; समज नसणें. 'पाषाणादि जड पदार्थीं अज्ञान राहतें.' ५ मूर्खपणा; अप्रबुद्धता; जडत्व. ६ जीवाच्या सात अवस्थांतील पहिली अवस्था. -वि. १ अडाणी; ज्ञान नसलेला; न शिकलेला; अजाण; जड; मंद. 'कृष्णः- प्राणवल्लभे, किती अज्ञान आहेस?' -पारिभौ १७. २ (कायदा) (अ) विवाह, आंदण, घटस्फोट या बाबतींत सोळा वर्षें पुरीं होण्यापूर्वीं अज्ञान; (आ) इतर बाबतींत अठरा वर्षें पुरीं होण्या- पूर्वीं अज्ञान. (इ.) कोर्टानें पालक नेमला असल्यास एकवीस वर्षें पुरीं होईपर्यंत अज्ञान. (इं.) मायनर. [सं.] ॰गत- स्त्री. भांबावलेली स्थिति; मोहाची-चित्तवैकल्याची अवस्था. 'ते वेळेस मला अज्ञान- गत झाली.' ॰जन- पु. निरक्षर मनुष्य; अविचारी, अज्ञ, जड मनुष्य. ॰तिमिर- पु. अज्ञानांधकार; गाढ अज्ञान. ॰धन- न. (कायदा) वयांत न आलेल्या मनुष्याची किंवा वेड्या मनुष्याची संपत्ति, मालमत्ता. ॰पटल-पडळ- न. (काव्य) आध्यात्मिक अज्ञान; आध्यात्मिक ज्ञानाचा अभाव; ब्रह्म, माया इत्यादिकांच्या संबंधीं वास्तविक ज्ञान नसणें. 'तुझें अज्ञान पटल विरालें । तुज झाली दिव्य दृष्टि ।' ॰पालक- पु. (कायदा) वयांत न आलेल्या मनुष्याच्या मालमत्तेची व्यवस्था पाहणारा किंवा त्याची काळजी वाहणारा. (इं.) गार्डियन. ॰प्राणी- पु. बुद्धिहीन प्राणी; विचार-विवेक नस- लेला प्राणी; पशु. ॰बुद्धि- स्त्री. १ विवेकहीन किंवा मूर्खपणाची समजूत, कल्पना, ग्रह. 'हें तूं म्हणतोस अज्ञानबुद्धीनें.' २ मूर्ख- पणा; बुद्धिहीनता. -वि. मूर्ख; बुद्धिहीन; भोळा; बालक. ॰भुररें- भुरळ- (काव्य) अज्ञानाचा मोह; भ्रम. 'जैं फिटे अज्ञान भुररें' ॰सिद्ध- वि. १ अज्ञानामुळें निश्चित झालेलें, बनलेलें (मत-कल्पना). २ अज्ञानामुळें निश्चित-प्राप्त होणारें; मूर्खपणापासून अवश्य मिळ- णारें (फल-शिक्षा). ३ अडाणी लोकांसहि निश्चित माहीत अस- लेलें. 'तापावर दूध प्यायलें असतां विकार होतो हें अज्ञानसिद्धच.'

दाते शब्दकोश

माठ

वि. १ चापटसर; खालपट; किंचित् उतरतें (छप्पर इ॰); याच्या उलट खर किंवा पाणढाळ. २ टिल्लू; खुजट (मनुष्य, पशु). ३ मंदमति; जडबुद्धि. 'विश्वाचे माठ । त्याचे कपाळीं तें नाट ।' -तुगा ३४६०. [माठणें] ॰घोसाळें-न. घोसा- ळ्याची एक जात. -कृषि ५९५. माठणें-अक्रि. १ (जखम, क्षत इ॰) भरणें आणि बरें होणें. २ झिजणें; बोथटणें (धार, टोंक). ३ उग्रता कमी होणें. -सक्रि. टांकीनें सारखा व गुळगुळीत करणें; साफ करणें (गुंडे, चिरे). ४ हलके हलके ठोकून गुळगुळीत करणें (दागिने, गोठ, कडें, जोडवी इ॰). ५ (धातूच्या नव्या भांड्याचे) पोचे काढणें; साफ करणें. ६ (ल.) ठोकून नरम, वश करणें. माठरणें-अक्रि. १ जड, सुस्त, मठ्ठ होणें. २ डागळणें; सुकणें; कोमेजणें; टवटवी नाहीशीं होणें (वनस्पति इ॰ची). ३ भरून येणें; वरी होणें (जखम); मटारणें. -सक्रि. १ घडणें; आकार, रूप देणें. २ (ल.) आपल्या इच्छेप्रमाणें घडविणे, वळ- विणें. ३ मठारणें या अर्थीहि योजितात. माठलें-न. १ (पळी, चमचा इ॰ कांचें) तोंड. २ समईचें टवळें. ३ ताक करावयाच्या रवीचा माथा, बोंड. ४ लहान मुलाचें चापट व पातळ करभूषण. माठवण- न. १ जखम भरून येण्यासाठीं लावलेले औषध; माठणारें मलम. २ मठारणारा; माठणारा व्रण. माठ(ठा)ळणें-सक्रि. १ (हलकें ठोकून) नव्या भांड्याचे पोचे साफ करणें. २ भांडे घडणें, उतरणें. ३ एखादी वस्तु, भांडे यांवर हलका हात फिरविण्यानें साफ व गुळगुळीत करून त्यास आकार आणणें; हलके हाताच्या चोपानें सारखी करणें (जमीन इ॰). ४ (ल.) आज्ञाधारक करणें; आपल्या इच्छेप्रमाणें वळविणे. -अक्रि. १ बरी होणें; भरणें; मठारणें (जखम). २ मंद, जड होणें (बुद्धि, मन); मठ्ठ होणें; जड, सुस्त, मांदा होणें (शरार,मनुष्य). ३ वाढ खुंटणें; झकाकी, तेज, दम गमावणें (झाड, वनस्पति यांचे). माठा-ठ्या-वि. जड; ठोंब्या; जडबुद्धि; मंदमति. माठी-स्त्री. बायकांच्या हातां- तील धातूची पोकळ बांगडी. माठीव-वि. टांकीनें सारखा व गुळगुळीत केलेला; उत्तम घडलेला (इमरतीचा दगड). माठें-न. (कु.) १ प्रेत जाळलेल्या जागेवरील बांधकाम (मशीद, थडगें, छत्री, वृंदावन इ॰). २ दोन्ही टोकांस उघडी असलेली, पडदी नसलेली शेतांतील पडवी, सोपा इ॰; दुपाखी ढेलच; पडसाळ.

दाते शब्दकोश

अंगचा

अंगचा aṅgacā gen. of अंग used adj Of the body, material, or substance of; not advectitious or extraneous: as अं0 खांब A post or pillar formed out of the material (wood, stone &c.) composing the structure; अं0 जोड Enlargement springing from the main building or article; addition consisting in further development; अंगचें देऊळ A temple carved out of the surrounding substance (rock, earth &c.) 2 Pertaining or relating to self; of one's own body or one's native stock; not derived or acquired. Ex. अंगची कळा Intrinsic or inherent brilliancy or brightness: also native skill, ingenuity, art, cleverness. अं0 मळ (or हातचा मळ) The dirt of one's body. A term used by the receiver of a gift in depreciating it. Ex. अं0 मळ द्यायाचा नाहीं He will not give even the dirt of his body. Used of a miser. 3 Of one's own (making, doing, authorship, origination). 4 Of one's own invention, machination, or evil devising; i.e. forged or fabricated. 5 Peculiar or proper to self; personal, private. NOTE.--In variations or modifications of the above senses numerous valuable words occur. Ex. अं0 कल्पक One naturally inventive or ingenious. अं0 कसबी One that by his personal labor and skill makes the common things, executes the common repairs &c. as occasion arises. अं0 कारिगर or कारागीर-गाणारा-चितारी &c. An artificer, a singer, a painter &c. of Nature's teaching. अं0 झरा A steady spring; a spring independent of supply from rain. अं0 धणी A person free from command or control; one's own master. अं0 लिहिणार One who executes his own writing work (not employing an amanuensis). अं0 वक्ता Eloquent through native talent. अं0 शाहणा Clever or capable by nature. अंगची गोष्ट One's personal affair or concern: also a matter of one's own invention or devising. v सांग. अंगची बुद्धि Native sense or understanding.

मोल्सवर्थ शब्दकोश

जाग

पु. (कों.) १ (कुण.) मृताच्या दहाव्या किंवा बाराव्या रात्रीं केलेलें जाग्रण. अंगात येऊन आपल्या मरणाचें कारण सांगावें, पुरलेल्या पैशाची जागा दाखवावी किंवा आपल्या गुप्त गोष्टी सांगाव्या म्हणून त्याच्या कुटुंबातील माणसें जाग्रण करितात; यावेळीं चार देवझाडें मिळवून वाद्यादि पूर्वक समारंभ करतात. -स्त्री. १ जागृतावस्था; जागरण. (क्रि॰ होणें येणे). २ (राजा.) हालचाल; गडबड, गजबज. (घर, खेडेगांव यांतील) ३ गर्दी; गोंगाट (दाट वस्तींतील, जत्रेंतील). ४ कोण- त्याहि प्राण्याची एखाद्या जागेंतील सतत वस्ति; पाहरा; वचक बसण्याजोगें अस्तित्व. 'त्या रानांत वाघाची जाग होती म्हणून गुरें जात नसत.' 'घरांत मांजराची जाग असली म्हणजे उंदरांचा उपद्रव होत नाहीं.' ५ वस्ती.' यवतेश्वराच्या डोंगरावर मनुष्याची जाग असल्यामुळें तो डोंगर न चढतां..' -स्वप ३६४. ६ (गो.) चाहूल. [सं. जागृ] सामाशब्द- ॰माग-स्त्री. जाग अर्थ ४ पहा. जागणा-वि. जागा; जागृत. जागता-वि. १ जागरूक; सावध; दक्ष २ शक्ति, गुण आणि सामर्थ्य यांनीं युक्त; तात्काल फलदायी; उपासकाला पावणारी (देवाची मूर्ति, मंत्र-तंत्र, औषध).'या गांवचा देव असा जागता आहे कीं, तत्काल धावण्यास पोंचतो.' मंत्र जागता असला तर तत्काल विष उतरेल.' ३ तजेलदार; तेजस्वी; टवटवी असणारा; ज्याची सुधारणा आणि रक्षण काळजीपूर्वक होतें असा; संस्कृतिसंपन्न; सुस्थितीनें युक्त (धर्म, विधि, चाल) ४ तरतरीत. जोमदार (मन, बुद्धि इ॰). ५ ताजेंतवानें; न गंजलेलें; मलिन नसलेलें (मिळविलेलें ज्ञान) ६ लोकांच्या डोळ्यांपुढें असणारा व ज्याची लोकांना नेहमीं आठवण होते असा; अविस्मृत (मेलागेला माणूस, गोष्ट, प्रसंग). जागती जोत-स्त्री. जागता अर्थ २ पहा. कडक; सामर्थ्यानें युक्त अशी देवी, देव, मंत्र, औषध; सद्यः परिणामी, तात्काल फलदायी गोष्ट; खडखडीत दैवत; रामबाण औषध, (पुष्कळ देवस्थानांतून कांहीं विशिष्ट प्रसंगीं मूर्तीच्या अंगांतून ज्योत बाहेर पडते व म्हणून देवत्व नष्ट झालें नसून अद्याप आहे असें मानतात). 'जागती जोती काढिली हनुमान रूपें ।' -सप्र ३४२ [जागती + चाहूल लागतांच जाग येते अशी झोंप. २ डुलक्या घेणें; पेंगणें. ॰भाषा- स्त्री प्रचलित भाषा; जिवंत भाषा. 'संस्कृत जागती भाषा नाहीं. जागणें-अक्रि. १ जागृत राहणें; सावध राहणें; लक्ष ठेवणें. २ निजून उठणें; जागें होणें, असणें; झोंप न घेणें, टाकून देणें. 'सूर्य देखोनि उदयाचळीं । जागिन्नले समस्त ।' -मुआदि २९.१३०. ३ पाहरा करणें; सावधगिरी ठेवणें ४ लक्ष देणें; दख्खल ठेवणें; काळजी घेणें (धंदा, नोकरी, इनाम, शपथ, वचन यांची) 'त्यानें वचन दिलें होतें पण त्यास तो जागला नाहीं' ५ ताजें असणें; म्हटल्यावेळीं तयार असणें; आठवणें; कायम राहणें स्मरणें (अभ्यासिलेलें शास्र इ॰). 'व्यासंगानें श्रुत जागे । -लेलेशास्त्री म्ह॰ १ सारी रात्र जागली आणि शेगावांगीं रांधलीं = व्यर्थ श्रम आणि प्रयत्न २ जागेल त्याची वांठ आणि निजेल त्याला टोणगा. [सं जाग्रु-जागरण] जागर-रण-पुन. १ जागेपणा जागृता- वस्था. 'पोरांचे गडबडीमुळें रात्रीस चारी प्रहर जागर पडला.' २ निद्रा संयमन; देखरेख पाहरा. ३ पोवती (नारळी, श्रावणशुद्ध) पौर्णिमा. ४ देवतेच्या उद्देशानें विवक्षित कालपर्यंत जागण्याचा प्रकार. 'नवरात्रामध्यें देवाजवळ कथा करून मध्यरात्रपर्यंत प्रतिदिनीं जागर करितों.' ५ (गो.) पुरातन कालचें नाटक. ६ पुनरावृत्ति; उजळणी करणें; नवें, ताजें करणें (वेदघोषानें मंत्र). 'मंत्रजागर' [सं. जागृ] ॰घालणें-(माण.) खंडोबाच्या नांवानें वाघ्यामुरळ्या आणून त्यांची पूजा करून त्याना जेवा- वयाला घालून नाचविणें. जागरा-वि. १ भारी जागणारा. २ जागा राहणारा; दक्ष; सावध. जागरूक-वि. १ जागता पहा. २ स्पष्ट; उघड; टिकाऊ. तोंडावर फेंकता येण्याजोगा (पुरावा). ३ जागरणशील. जागरें-न. जागृति; जागेपण. 'नीद मारूनि जागरें । नांदिजे जेंवि ।' -अमृ ४.१. जागल-स्त्री. १ पहारा; राखण; सावधानता. २ पहारेकर्‍याचा पगार. ३ जागरण; जागृ- तावस्था. 'मला रात्रीं जागल घडली.' जागलकी-स्त्री. जाग- ल्याबद्दलची मजुरी; राखणावळ. 'गांवांत घोडें, गाडी मुक्का- माला रात्रीं राहिली तर महार जागले अर्धा आणा जागलकी घेतात.' -गंगा ९७. जागल्या-ळ्या-पु. पहारेकरी; रखवाल- दार; प्रवाश्यांच्या सामानावर पाहरा करणारा खेड्यांतील महार; रामोशी. जागव(वि)णें-उक्रि. १ जागें, जागृत करणें, ठेवणें; जागें राहून काळ काढणें. २ पहारा करणें; नजर ठेवणें, ३ (सामा.) राखणें; पाळणें; ठेवणें, वाक्यरचनेंत याचा पुष्कळ शब्दांशी जोडून उपयोग करितात. जसें-अब्रू-नाम-नांव जागविणें = अब्रू, नांव सांभाळणें; शील राखणें. दिवस जागविणें = दिवस राखणें; त्या दिवशीं जें कर्तव्य, जे विधी करावयाचे असतील ते करणें. नियम- नेम-जागविणें = स्वतः नेम, चाल राखणें; चालविणें. सती जागविणें = सतीची चिता प्रज्वलित ठेवणें, विझूं न देणें. गौर जागविणें = गौरीला, देवीला जागविणें; रात्रभर गौरीप्रीत्यर्थ जागरण करणें. जागसूद-वि. १ ज्याची झोंप चटकन उघडते असा; चटकन् जागा होणारा. २ जागता; सावध. 'तूं जागसूद ऐस मी निजतों.' ३ सावध; गाढ नसलेली (झोंप).

दाते शब्दकोश

दृष्टि, दृष्टी      

स्त्री.       १. नेत्रगोलात असणाऱ्या पाहण्याच्या इंद्रियाचे कार्य; तिने झालेले ज्ञान; पाहण्याचे सामर्थ्य; नजर. २. (ल.) (एखाद्या गोष्टीकडे देण्याचे) लक्ष; अनुसंधान. ३. (ल.) खरे, खोटे जाणण्यास कारणीभूत असणारी मनोवृत्ती; कल; (एखाद्याशी वागण्याचा, एखाद्याकडे पाहण्याचा) रोख. ४. पाषाणाच्या देवाच्या मूर्तीला बसवले जाणारे रुपे इ. चे डोळे. (राजा.) [सं.] (वा.) दृष्टि ओळखणे, दृष्टी ओळखणे– (एखाद्याच्या) नजरेवरूनच, चेहऱ्यावरून त्याचे मनोगत ओळखणे. दृष्टि खालून जाणे, दृष्टी खालून जाणे– (एखादी गोष्ट, वस्तू इ. एखाद्याच्या) डोळ्याखालून, नजरेतून जाणे; स्थूलपणे माहीत असणे. दृष्टि घालणे, दृष्टी घालणे–१. डोळ्याने इशारा करणे. २. (एखाद्या गोष्टीकडे) काळजीपूर्वक पाहणे, लक्ष देणे, मन लावणे : ‘स्वर्गांगनेसीं जरि साम्य आली । परंतु तेथें दृष्टी न घाली ।’ – रामदासी २·४३. दृष्टि चढणे, दृष्टी चढणे–गर्वाने फुगणे; उन्मत्त होणे. दृष्टि चुकणे, दृष्टी चुकणे–विसरणे; गोंधळून जाणे; घोटाळ्यात पडणे. दृष्टि चुकवणे, दृष्टि चोरणे, दृष्टी चुकवणे, दृष्टी चोरणे– (एखाद्याच्या) डोळ्याला डोळा न देणे; नजरेला पडण्याचे टाळणे. दृष्टि चेपणे, दृष्टी चेपणे–डोळ्याला डोळा भिडवणे : ‘गोसावीयांची दृष्टी चेपे ना’ – लीचपू १०७. दृष्टि चोरणे, दृष्टी चोरणे– नजर भारून टाकणे; नजरबंद करणे : ‘कीं पुढिलाची दृष्टि चोरिजे ।’ – ज्ञा १४·५. दृष्टि ठेवणे, दृष्टि देणे, दृष्टि राखणे, दृष्टी ठेवणे, दृष्टी देणे, दृष्टी राखणे – एखाद्या गोष्टीची, वस्तूची काळजी घेणे; लक्ष देणे : ‘ठेवीना गर्भींही दृष्टिस ती नीट जळहि सेवीना ।’ – मोअश्व ४·८. दृष्टि निवळणे, दृष्टी निवळणे– (ल.) गर्व, ताठा, उन्माद, भ्रम नाहीसा होणे. दृष्टि पडणे, दृष्टि लागणे, दृष्टि होणे, दृष्टी पडणे, दृष्टी लागणे, दृष्टी होणे– (एखाद्याच्या) वाईट नजरेची बाधा होणे. दृष्टि फाकणे, दृष्टी फाकणे–१. गोंधळून, भांबावून जाणे. २. नजर बेताल, ओढाळ होणे. दृष्टि फाटणे, दृष्टी फाटणे– (एखाद्याच्या) आकांक्षा, महत्त्वाकांक्षा, हेतू इ. वाढणे, विस्तृत होणे. दृष्टि फिरणे –, दृष्टी फिरणे१. राग येणे : ‘येतां दृष्टी त्याची फिरली म्हणे ।’ – रामदासी २·९८. २. ताठा चढणे; गर्व इ. ने बुद्धी बदलणे; धुंदी चढणे. दृष्टि बंद करणे, दृष्टी बंद करणे–नजर भारून, मोहून टाकणे; दृष्टी चोरणे. दृष्टि मरणे, दृष्टी मरणे–तीच गोष्ट अनेक वेळा पाहून, ऐकून, करून तिच्याविषयीची भीती, आश्चर्य, हिडीसपणा इ. वाटेनासे होणे. दृष्टीचा अंमल –१. पाहण्यात, नजरेत आलेला काळाचा अवधी. २. नजरेचे कार्यक्षेत्र, कर्तबगारी. दृष्टीचा खेळ –नजरेने, दृष्टीने करण्याची चमत्कृतिपूर्ण, कुशलतेची गोष्ट. दृष्टीचा खोटा, दृष्टीचा पापी –दुसऱ्याचे चांगले पाहून मनात जळफळणारा; मत्सरबुद्धीचा. दृष्टीचा पसारा – डोळ्यांना दिसणारे विश्व. दृष्टीचिये आळिवे राहणे –नजरेच्या टप्प्यात राहणे : ‘बाइसे दृष्टीचिये आळिवे राहिली’ – लीचपू १६५. दृष्टीची मुरवत राखणे – (एखाद्याच्या) भावनेला मान देणे; (एखाद्याला) न आवडेल अशी गोष्ट त्याच्यासमोर न करणे. दृष्टीचे पारणे फिटणे –जे पाहण्याविषयी उत्कंठा आहे, ते पहायला मिळाल्यामुळे समाधान पावणे. दृष्टीत न आणणे –न जुमानणे : ‘ऐसें वदोनि आणित नव्हतासि च बा परासि दृष्टींत ।’ – मोमहाप्रस्थानिक २·२०. दृष्टीत न येणे – (एखाद्याला) तुच्छ लेखणे, क : पदार्थ मानणे : ‘ज्याच्या दृष्टींत न ते सहसुत पांडवबळी न कंसारी ।’ –मोकर्ण ६·६६. दृष्टीने शिवणे –डोळ्यांनी पाहणे : ‘म्हणतो नाहीं शिवलों दृष्टी करुनिही धराधवा हविला ।’ – मोआदि २·३. दृष्टीस फाटा फुटणे –दृष्टी फाटणे; दृष्टीचे सामर्थ्य वाढणे : ‘जैसें डोळ्यां अंजन भेटे । ते वेळीं दृष्टीसी फांटा फुटे ।’ – ज्ञा १·२३. आडव्या दृष्टीने पाहणे –वाकड्या काण्या डोळ्याने पाहणे. चार दृष्टी होणे –भेट, नजरानजर होणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अंग

न. (अप.) आंग. १ शरीर; देह. 'पै जयाचेनि अंगसगें ।' -ज्ञा ९.२६९. 'अंगाला वारा लागेल, आंत जा !' २ अवयव; इंद्रिय; गात्र. 'अति क्षीणता पावलीं सर्व आंगें.' -दावि २४२. ३ (ल.) कोणत्याहि गोष्टीचा घटक, विभाग. 'हत्ती, रथ, घोडेस्वार आणि पायदळ हीं प्राचीन काळीं सैन्याचीं चार अंगें समजलीं जात असत.' ४ बाजू; दिशा. दारा अंग = (व.) दरवाज्यामागें किंवा जवळ. 'आठै आंगें पोळती । वसूधरेचीं ।' -शिशु ७४८. 'किल्ल्याचें आंग भिउनि फिरंग भार हा पळतो कानड्याचा.' -ऐपो १८३. 'तुमचें पागोटें मागल्या अंगानें बैडौल दिसतें.' ४ वेदांग; वैदिक वाङ्मयापैकीं विशिष्ट ग्रंथ- समूहास संज्ञा. उदा॰ शिक्षा, ज्योतिष, निरुक्त, इ. ५ एखाद्या कामांत असलेला हात, घेतलेला भाग किंवा संबंध. 'त्या मसलतींत रामाजीपंतांचें अंग आहे.' ६ चोरून मदत किंवा मिलाफ; आश्रय; फुस. 'ह्या चोराला कोतवालाचें अंग आहे.' 'ही सासूबरोबर भांडते, हिला नवर्‍याचें अंग आहे.' ७ अधि- ष्ठान; ठिकाण; शरीर; देह (एखाद्या गुणदोषाचा कर्ता, पात्र). 'ही चोरी ज्याचे अंगीं लागेल त्यास मी शासन करीन,' 'त्याच्या अंगीं चित्रकलेचा गुण आहे.' ८ (एखाद्या वस्तूचा किंवा कार्याचा) गौण, अप्रधान; भाग. उ॰ विवाहामध्यें होम हा प्रधान आहे, अवशिष्ट कर्में अंगें होत. ९ खूण. 'अनुभवाचीं आंगें जाणें ।' -दा ५.९.२२. १० आंतड्याचा गुदद्वाराबाहेर येणारा भाग, किंवा प्रसूतीनंतर योनीच्या बाहेर येणारा भाग. (सामा.) गुदद्वार. 'आंगीं सारी बर्फ कुणाच्या छत्री गाजर मुळा । मेणबत्तीचा खेळ चालला' -विक्षिप्त १.१३५. ११ विशिष्ट काम करण्याची पात्रता, ताकद, क्षमता, बुद्धि. १२ आपल्या बाजूचा माणूस (मोठ्या अधिकावरील); पुरस्कर्ता, तरफदारी करणारा; वशिला 'दरबारांत अंग असल्यावांचून क्रांतिवृत्तावरचा बिंदु, अंश. (अस्तलग्नाच्या उलट). १४ (संगीत) प्रबंधाचा पोटविभाग; रागवाचक स्वरसमुदाय; हे विभाग सहा आहेत:- स्वर, विरुद्ध, पद, तेनक, पाट, ताल. १५ (ताल) तालाचें मात्रानियमानें झालेलें कालप्रमाण हीं अंगें सात आहेत:-अणु- द्रुत, द्रुतविराम, लघु, लघुविराम, गुरु व प्लुत. १६कौशल्य; चातुर्य; कल. 'त्याला गाण्याचें अंग आहे.' १७ मगधाच्या पूर्वेचा जुना बंगाल देश; सध्यांचे मोंघीर, भागलपूर, पूर्णिया इ॰. जिल्हे यांत येतात. याचा उल्लेख अथर्ववेदांत आलेला आहे. पुढील काळीं शोण, गंगा या नद्यांच्या आसपासचा प्रदेश; कर्णाचें राज्य. १८ आचारांग सूत्रांपैकीं एक जैन आगम ग्रंथ. १९ स्वतः, खुद्द. आंगें असाहि प्रयोग आढळतो. 'दीप वांचूनि दिवा लाहे । तै आंग भुललाचि कीं ।' -अमृ ३.२०. 'राहोनि गुप्त धृष्ट- द्यूम्नें तच्छोध लाविला आंगें ।' -मोआदि ३४.१८. २० प्रकार. 'घालाघालीचें आंग सांधौं कैसें । चालितां बिंबु न दिसें ।' -शिशु १००६. 'कारभाराचें सांगावें अंग कैसें ।' -दा ११.५.२३. -शअ. (व.) कडे. उ॰ 'भिंतीअंग' (वाप्र.) ॰ओढविणें- आपल्या आंगावर घेणें; स्वतः पुढें होणें; (एखाद्या कार्योत- कडे). 'आपुलेंचि अंग तुम्हीं वोडविलें । त्याचें निवारिलें महा दुःख ।' ॰काढणें-काढून घेणें-१ स्वतः एखाद्या कामांतून माघार घेणें; संबंध तोडणें (एखाद्या कामांतून). 'मी त्या कामांतून आपलें अंग काढून घेतलें आहे.' २ (कु. गो.) दच- कणें. 'आंग काडप.' ॰घालणें-१ हात घालणें; मदत करणें; मन घालणें. 'या कामांत तूं जर अंग घातलेंस तर फार सोय होईल.' २ दुःखामुळें (जमिनीवर पडणें.) 'ऐकोनियां आंग घाली पृथ्वीवरी ।' -दा ३.५.३०. ॰घासणें-झीज सोसणें. 'परांजप्यांनीं प्रामाणिकपणानें अंग घासून... स्वतःची स्कीम करून कार्यास लागावें' -केले १.२६३. ॰घेणें-भरणें-१ लठ्ठ होणें. २ (गो. 'आंग घेवप.') (कामांत) भाग घेणें. ॰न घेणें-पुढें न सरसावणें; भाग न घेणें. ॰चढणें-सदरांत पडणें; वर्गांत येणें. 'जें विधीसी नातुडे । तें निषेधाचें अंग चढे ।' -एभा ७.६९. ॰चढून येणें-(व.) ताप भरणें, चढणें. ॰चोरणें-जोगावणें-१ अंग राखून काम करणें; टंगळमंगळ करणें; चुकारपणा करणें. 'संत सेवेसी अंग चोरी ।वृष्टी न पडो तयावरी ।' २ शरीराचा भाग आकुंचित करणें (मार चुकविण्या- साठीं). 'असा अंग चोरतोस म्हणून नीट लागत नाहीं.' ॰जड करणें-(गो. 'अंग जड करप') एखाद्या कामांत भाग घेण्याचें टाळूं पहाणें. ॰जड जाणें-(गो. 'आंग जड जापव.') अंगावर कांटा उभा राहणें. ॰झांकणें-लपविणें- स्वतःची बाजू किंवा भाग (कामांतील) दाबून, गुप्त ठेवणें. ॰झाडणें-साफ नाहीं म्हणून सांगणें; नाकबूल करणें. 'आंग झाडिती न ममें । येणें बोलें ।' -ज्ञा १७.३७२. ॰टाकणें-१ अशक्त होणें; वाळणें. 'आई गेल्यापासून बाळानें अंग टाकलें आहे.' २ जोरानें देह जमिनीवर टाकणें. ३ विश्रांती- साठीं आडवें होणें; कसें तरी अस्ताव्यस्त पसरणें. 'घरीं जाऊन केव्हां अंग टाकीन असें मला होतें.' ॰टेकणें-आश्रय करणें. 'योगें आंग टेकिलें योगीं ।' -अमृ ९.२६. ॰दर्शविणें- एखाद्या गोष्टींत किंवा व्यवहारांत हात किंवा संबंध आहे असें भासविणें. ॰दाखविणें-एखाद्या कामांत कौशल्य दाखविणें; फड जिंकणें. ॰न दाखविणें-अंग असल्याचें लपविणें; मागें रहाणें, जबाबदारी टाळणें. (गो. आंग दाखैना जापव.') ॰देणें-१ मदत करणें; हातभार लावणें. २ प्रवृत्त होणें; वळणें. 'सुखा अंग देऊं नये ।' ॰दोडपणें, दुडपणें, दुमडणें- (गो. 'आंग दोडप.') अंगं चोरणें. ॰धरणें-१ ताठरणें; संधिवातानें शरीर आंखडणें. २ लठ्ठ होणें; ताकद येणें. ॰मरणें- अर्धांगवायूनें शरीर अथवा एखादा अवयव बधिर होणें. ॰मारणें- १ अंग चोरणें पहा. २ जोरानें अंग आंत घुसविणें. 'मीं दाटींतून अंग मारलें.' ॰मुरडणें-मुरडणें; मागें पहात दिमा- खानें जाणें; ठमक्यानें जाणें; 'नवी साडी नेसून पोर पहा कशी अंग मुरडीत चालली आहे.' ॰मोडून काम करणें- खपणें; श्रम करणें; अतिशय मेहनत करणें; जिवाकडे न पाहतां काम करणें; जीव पाखडून काम करणें. ॰मोडून येणें-तापानें अंगावर कांटा येणें; कणकणणें; कसकसणें. 'तदुपरि अविलंबे आंग मोडून आलें ।' -सारूह ३.५७. ॰येणें-(गो. 'आंग यॅवप.') १ लठ्ठ होणें. २ प्रसूति समयीं गुह्यांग बाहेर येणें. ॰रक्षण करणें, राखणें-वांचविणें-अंग चोरणें; आपला बचाव करणें. 'यश रक्षावें न आंग लेंकांहीं ।' -मोउद्योग १०.६१. 'वत्सें भीमें एकें काय करावें? न अंग राखावें ।' -मोभीष्म ३.४. ॰सांवरणें-१ तोल सांवरणें., २ गेलेली ताकद पुन्हां मिळविणें; पूर्व स्थितीवर येणें. ॰सोडणें- (गो. 'आंग सोडप') खंगत जाणें. ॰हलकें होणें-(गो. आंगं ल्हवु जावप.') हायसें वाटणें; (जबाबदारींतून) मोकळें झाल्याबद्दल समाधान वाटणें. 'अंगा-नें आरंभ होणा रे वाप्र. -खांद्यावरचें-(बायकी) (ल.) दागदागिने. -खालची, खालची बायको-स्त्री. राख; उपस्त्री. -खालीं घालणें- स्वतःच्या चैनीसाठीं अथवा उपभोगासाठीं राखणें (वेश्या, परस्त्री, इ॰). -खालीं पडणें-१ सवयीचें होणें. २ भोग देणें; रतिसुख देणें-वेणें. -चा आंकडा होणें-आंकडीनें पेटके येणें; अंग वांकडें होणें. -चा आळापिळा करणें-१ अंग पिळवटणें; आळेपिळे देणें. २ अतिशय श्रम करणें. -चा खकाणा करणें-(व.) संताप करून घेणें. -चा खुर्दा होणें- (श्रमानें) अतिशय श्रमानें अंग ठणकणें; गलितगात्रें होणें; मणके ढिले होणें. -चा हुरपळा-भडका होणें-अंग अतिशय तापणें (तापानें, संतापानें); लाही होणें; आग होणें. -ची आग-लाहकी-होळी होणें-रागानें, संतापानें अंगाची आग होणें. -ची चौघडी करणें-१ शरीराच्या चार घड्या करणें (डोंबार्‍याच्या कसरतींत). २ सर्व अंग पोटाशीं घेऊन निजणें (थंडी, ताप इ॰ मुळें). -ची लाही होणें-अंगाचा हुरपळा होणें पहा. १ उन्हानें अतिशय अंग तापणें; काहिली होणें; भडका होणें. २ अतिशय संताप येणें (जोंधळा इ॰ धान्याची भाजून लाही होते त्याप्रमाणें); 'तें तिजला खपलें नाहीं । अंगाची झाली लाही ।' -विक १७. -ची लाही करणें- संतापविणें; खिजविणें; भाजणें; जाचणें. -चें आंथरूण करणें- स्वतःबद्दलची काळजी सोडून सर्व प्रकारच्या संकटांना तोंड देणें; एखाद्याचें काम करण्यासाठीं स्वतःच्या जीविताची पर्वा न करणें. 'त्याचें लग्न व्हावें म्हणून म्या अंगाचें अंथरूण केलें तरी त्यानें त्याचा कांहीं उपकार मानला नाहीं.' -चें आंथरूण होणें- (तापामुळें) अशक्तता येणें; उठवणीस येणें; मरगळीस येणें. -चें कातडें काढून जोडा शिवणें-(एखाद्याविषयीं) अतिशय कृतज्ञता, आदरबुद्धी दाखविणें. -चे चकदे काढणें- (मांसाचे तुकडे करून काढणें) जोरानें बेदम मरणें; अंगाची सालडी काढणें. -चे-चा तिळपापड होणें-रागानें शरीराची लाही होणें. 'मी दहांच्या तोंडून ऐकलं आणि माझ्या अंगाचा असा तिळपापड झाला कीं सांगतां पुरवत नाहीं.' -मोर १५. -चे धुडके उडविणें-(शरीराच्या) लकतर्‍या काढणें; चेंदा- मेंदा करणें; फार झोडपणें. 'त्या बदमाषानें त्याच्या अंगाचे नुसते धुडके उडविले.' -चें पाणी करणें-होणें-अतिशय श्रम करणे (त्यामुळें अंगास पाणी, घाम येणें). 'अंगाचें पाणी करूनच या हतभाग्या आयुष्याचे दिवस मला लोटले पाहिजेत.' -पाव्ह ९९. -च्या चिंध्या करणें-१ (व.) अंग ओरखडणें. २ त्रास देणें. -अंगांत मांग शिरणें-शरिरांत अतिशय क्रोधाचा संचार होणें. (मांग हा फार क्रूर समजला जातो यावरून). -त येणें-वारें शिरणें-१ भूतसंचार होणें. २ अति उत्कंठेनें काम करणें. -त शीळकळा येणें-(माण.) अंगांत देव येणें, वारें येणें. -निराळा-बाहेर-टाकणें-झोंकणें- सोडणें-झिडकाविणें-(कामधंदा, जबाबदारी) सोडून देणें; माथ्यावर, अंगावर न घेणें. 'पेशव्यांनीं आम्हाला आंगाबाहेर टाकलें आहे.' -अस्तंभा २४. -निराळें करणें-अंगाबाहेर टाकलें पहा. -बरोबर होणें, -त बसणें-एखादा कपडा अंगास बरोबर बसणें, ठीक होणें, बेताचा होणें; -ला लावणें- १ अंगांला तेल वगैरे चोपडणें. 'नवी नवरी म्हणून अंगाला लावीन म्हटलें; नाहीं !' -झांमू. २ बाळंतिणीचें अंग रगडणें, चोळणें. (एका) -वर असणें-होणें- एका कुशीवर निजणें किंवा आनं- दानें अंग रोमांचित होणें. 'वृत्तश्रवणें आला सर्वांगीं आमुच्या पहा कांटा ।' -मोकर्ण १८.१. -वर काढणें- आजार वगैरे सोसणें. -वर कोसळणें-कोसळून पडणें-ओघळणें- १ रागानें एखाद्याच्या अंगावर चालून जाणें, पडणें. २ संकट आपत्ति वगैरे गुदरणें; जबाबदारी येणें; आपत्तींत सांपडणें. -वर गोण किंवा गोणी येणें-(व.) अंगावर जोखीम किंवा जबाबदारी येणें. -वर घेऊन-स्वतःवर जबाबदारी घेऊन; आपलें म्हणून; कैवार घेऊन (क्रि॰ करणें; बोलणें; सांगणें; पुसणें; विचारणें). -वर घेणें-१ मुलास प्यावयास घेणें, देणें; थान देणें. २ स्वतःवर जबाबदारी घेणें. ३ आपला म्हणणें, अतिशय प्रीति दाखविणें. -वर तुटणें-तुटून पडणें-हल्ला करणें; धांवून जाणें; एकदम चालून जाणें. -वर देणें-जामिनकी किंवा गहाण न घेतां वैयक्तित जबाबदारीवर कर्ज वगैरे. -वर देणें-बांधणें-भरणें-पोसणें-करणें इ॰-स्वतःच्या जबाब- दारी-साधन-संचयावर देणें, बांधणें वगैरे. -वर पडणें-येणें- १ शिरावर पडणें; विक्रींत नफा होईल म्हणून जो माल खरेदी केला तो अडीअडचणीमुळें. भाव उतरल्यामुळें आपल्याजवळ पडून राहणें; तोटा भरून देण्याची जोखीमदारी अंगावर येणें. २ गळ्यांत येणें; एखादा धंदा अगर काम करण्यास भाग पडणें. ३रागानें चालून जाणें; वसकन अंगावर येणें. ४हल्ला करणें; चालून येणें. -वर पिणें, खाणें-(मुलानें) स्तनप्राशन करणें; स्तनप्राशन करण्याइतकें लहान असणें. -वर शेकणें-तोटा होणें (व्यापारांत); बुड येणें (रुपये, व्यवहार, इ॰ ची); कुमांड येणें. -वरचें-वि. दूध पिणारें (मूल). -वरचें जाणें- (बायकी) महिन्याच्या महिन्यास तरून स्त्रीच्या शरीरांतून जसें दूषित रक्त बाहेर जातें तसें अवेळीं जाऊ लागलें; धुपणी रोग होणें. -वरचें तोडणें-तान्ह्या मुलाचें अंगावर पिणें बंद करणें. -वरून वारा जाणें-अर्धांगवायु होणें. 'भूतपिशाच्य लागलें । अंगावरून वारें गेलें ।' -दा ३.७.५५. -स कुयला लागणें- मत्सरानें किंवा संतापानें हिरवा-निळा होणें; मिरच्या लागणें; अतिशय राग येणें. -स झोबणें-(व.) अंगास स्पर्श करणें; धरणें. -स मुंग्या येणें-वातादि विकारामुळें अंगाला एक प्रका- रची बधिरता येणें. -स बसतें येणें-अंगाला बरोबर बसेल असें होणें (कपडा इ॰). 'नोकरलोकांच्या अंगास बसते येतील असे पोषाख करण्यांत यावेत.' -खानगींतील नोकरांचे पोषाख (बडोदें) ७ -स-अंगीं-येणें- १ व्यापारांत बूड येणें; नुक- सान होणें; ठोकर बसणें. 'मिरच्यांचा व्यापार अंगास आला.' २अंगांत बाणणें. 'मराठीच्या अंगीं आलेली क्षीणता क्षणता क्षणमात्रहि झांकली जाणार नाही.' -नि. -स येणें-होणें-अंगाबरोबर होणें. -स-आंगीं-लावणें-१ पुष्टिकारक होणें; लठ्ठ होणें. २एखादा दोष किंवा गुन्हा अंगावर शाबीत होणें, लागू होणें. 'तेथें व करितां चोरी । आंगीं लागे ।' -दा ६.१.७२. ३तोटा सोसावा लागणें; ठोकर बसणें; अंगावर शेकणें. -स लावणें- १ (बायकी) स्नानाच्या अगोदर तेल व हळद अंगाला लावणें, चोळणें. २बाळंतिणीच्या अंगाला तेल लावणें. -स लावणें- लादणें-चिकटविणें; शाबीत करणें (गुन्हा, अपराध). -आंगीं- यानें आरंभ होणारे वाप्र. -असणें-जवळ, पदरीं असणें; ठायीं असणें. 'हा दोष माझ्या आंगीं नाहीं.' -आणणें-१ आपल्या- वर घेणें; ताबा घेणें. २ आपल्या ठिकाणीं असूं देणें; स्वाधीन राखणें. 'हा गुण आंगीं आणण्याचा प्रयत्न कर.' ॰आद- ळणें-अंगास चिकटणें, कोसळणें. 'अंगीं आदळतो शोक.' -दावि ४२३. अंगीं(एका आंगीं)-अंगें-उणा-वि. १आई- बाप मेलेला; पोरका; विधवा; विधुर. २ व्यंगी; लुळा; कमीपणा असलेला; एका पायानें लंगडा; ३(ल.) सरळ, ताठ नसलेला; उणेपणा असलेला; कमजोर बाजू असलेला; लुच्चा; जाणून- बुजून अपराधी. म्ह॰ आंगीं उणा तर जाणे खाणाखुणा = ज्याला आपला कमीपणा ठाऊक आहे तो लोकांची टीका आपल्याला चिकटवून घेतो. ॰खिळणें-शरीरांत भिनणें. ॰घुमारणें-भूत लागणें; अवसर येणें. आणि आंगीं घुमारिलें.' -दावि १५६. -चा उतारा-वि. अंगावरून ओवाळून दिलेला, काढून टाकलेला जिन्नस (वस्त्र, अलंकार इ॰). 'तुझें अंगीचा उतारा । तो मज देई गा दातारा ।' -भज ४२. -ची सावली करणें-(स्वतः- चा) आश्रय देणें. 'आपुलिये अंगींची सावली । अहोरात्र करुनि तया रक्षी ।' -जिरणें-सरावाचें होणें; मुरणें. -ताठा भरणें- गर्विष्ठ होणें. 'अंगीं भरलासे ताठा । वळणीं न ये जैसा खुंटा ।' -तुटणें-अशक्त होणें; वाळणें; रोड होणें (मूल). -नसणें- १ जातीनें अनुभव, माहिती नसणें. २स्वतःचा नसणें; मुळचा नसणें. 'इतका उद्धटपणा त्याच्या आंगीं नाहीं.' -पडणें- १ सहाय, पक्षपात करणें. 'हा अविद्येचा अंगीं पडे.' -अमृ ६.६. २ संवय होणें. अंगीं मुरणें पहा. -फुटणें- १ लठ्ठ होणें; गुब- गुबीत होणें. २ एखादा रोग अंगावर स्पष्ट दिसणें, वाहणें (रक्त- पिती इ॰). -बसणें-सुगम असणें; संवय होणें. -बिर्‍हाड देणें-करणें-शरीरांत थारा देणें; हृदयांत, अंतःकरणांत बाळगणें; आस्त्रा देणें (दुर्गुण, पापवासना इ॰ ना). -माशा मारणें-आळशी बनणें. -(माशीं) भरणें-लठ्ठ होणें. -मिरच्या, कुयले, लागणें-झोंबणें- (एखाद्यानें मर्म काढलें असतां) रागानें जळफळणें. -मुरणें-१ संवयीचा होणें. २ हाडीं शिरणें; शरीरांत (ताप) भिनणें. ३ जिरणें; बाहेर न येणें (देवी, गोवर). -येणें-अंगांत भुताचा संचार होणें; अवसर येणें; भूत- बाधा होणें. 'शूद्र येक त्याचे आंगीं आला बोले ।' -रामदासी २.११. -लागणें-अन्न पचणें; लठ्ठ होणें. 'त्याच्या अंगीं अन्न लागलें.' -वाजणें-(बाजणें) अंगांत शिरणें; शोभणें. 'थोर- पण अंगीं वाजे नाना' -दावि ६५. अंगीं-गें-१ स्वतः, जातीनें. म्ह॰ 'अंगें केलें तें काम । पदरीं असे तो दाम ।' 'अंगें करिताती आपण । दोघे जण मिळोनी ।' -एभा ७.५७८. 'अंगें धावे कार्यासमान ।' -नव १६.१७५. २ च्या वतीनें, मार्फत (प्रतिनिधी). दादा अंगे वयनी सोयरी. अंगें, आंगें- शअ. जवळ; बाजूस. 'पाण्याचा तांब्या बापूचे आंगें होता.' -बाळ २.६८. म्ह॰ १ अंगीं (माझ्या इ॰) का माशा मेल्या आहेत = काय (मी) आळशी आहें, का माझा धंदा काय माशा मारीत बसण्याचा आहे? २ आली अंगावर तर घेतली शिंगावर = सहजासहजीं, आगाऊ न ठरवितां एखादी गोष्ट अंगा- वर येऊन पडली असतां, आडवी आली असतां ती करणें (बैलाच्या शिंगांच्या टप्प्यांत कोणी आला तर तो त्याला शिंगावर घेण्याला कमी करीत नाहीं यावरून, आयता मिळालेला फायदा करून घेणें हा अर्थ). ३ अंगापेक्षां बोंगा मोठा; अंगापेक्षां बोंगा, कोठें जासी सोंगा = (शरीरापेक्षां धोतराचा अथवा लुगड्याचा पुढचा भाग मोठा) खर्‍यापेक्षां जास्त योग्यतेची ऐट मारणें. सामाशब्दः ॰अंग, आंगप्रत-क्रिवि. पृथक् पृथक्; अलग अलग; इसमवार; प्रत्येकीं. ॰उद्धार-पु. (प्र.) अंगोद्धार. १ (काव्य) शरीराची, देहाची मुक्तता. २ तीर्थांत स्नान करणें; तीर्थस्नान; देहशुद्धि. ३ (योग) पोटांतील आंतडीं तोंडांतून बाहेर काढून स्वच्छ करणें; धौती; धुतीपुती. [अंग + उद्धार] ॰उधार-वि. अंगावर दिलेलें, केलेलें (कर्ज, उधारी); स्वतःच्या पतीवर केलेली उधारी. ॰ओलाचें-न. (कों.) जिच्यांत पाणी सांठविण्याची शक्ति आहे असें शेत, जमीन; उन्हाळ्यांत पाणी न देतां हिच्यांतून पीक काढतात. ॰कंप-पु. शरीरास कंप सुटणें; थर- कांप होणें. [सं.] ॰कल-पु. शरीराचा तोल, वांक. [सं.] ॰कवळी-स्त्री. (काव्य) आलिंगन; मिठी; पक्कड. 'परस्परें अंगकवळी होतां । आनंदिलीं उभयतां ।' -मोल. [अंग + कव- ळणें] ॰कष्ट-पु. शारीरिक श्रम. [सं.] ॰कळा-स्त्री. शरीराचें तेज, कांति; मुसमुशीतपणा (निरोगावस्थेंत). ॰काठी-स्त्री. अंगबांधा; अंगयष्टि; शरीराचा बांधा, ठेवण. (अंगलट-लोट- ठेवण-वटा-वठा-वळण हें शब्द शरीराचें स्वरूप, कांति, भरदार- पणा इ॰ दाखवितात तर अंगकाठी-बांधा-यष्टी हे रचना, बांधणी दाखवितात). ॰काडू-ढू-ढ्या-वि. अंग काढणारा; पळपुट्या; जबाबदारी टाळून निसटूं पाहणारा (संकट, अडचणी असतांना); काम चुकारू; माघार घेणारा. [अंग + काढणें] ॰कार्श्य-न. शरी- राचा लुकडेपणा; सडपातळपणा; कृशता. [सं.] ॰गडी-पु. पोटां- तील भिडू; पित्त्या; (सोंगट्या, पत्ते इ॰ खेळांत) भिडूंचा तोठा असतां आपणच त्यांच्या वाटचें खेळणें, म्हणजे आपणच एक कल्पित भिडू आहों असें मानणें. ॰ग्रह-पु. आचके, पेटका, गोळा येणें. [सं.] ॰चपळाई-चापल्य-स्त्रीन. अंगांतील चपळपणा; स्वतःसिद्ध चापल्य. ॰चुकाऊ-र-रू, -चोर-वि. कामांत कुचराई करणारा; मनापासून, नेटानें काम न करणारा. 'अंगचोर वाग्वीर-पटूंचें पेव कसें फुटलें ।' -सन्मित्र समाज मेळा पृ. १३. १९२९. ॰च्छाया-स्त्री. १अंगाची सावली. २(ल.) आश्रय. 'तंव वैकुंठपिठींचें लिंग । जो निगमपणाचा पराग । जिये जयाचेनि हें जग । अंगच्छाया ।' -ज्ञा १७.४६. ॰छेद-विच्छेद-स्त्री. शरीराचा एखादा अवयव कापणें. [सं.] ॰ज-वि. अंगापासून झालेला. -पु. स्वतःचा पुत्र; मुलगा; औरस. ॰जा-स्त्री. स्वपुत्री. ॰जड-वि. जड शरीराचा; लठ्ठ; फोपसा; अगडबंब; मंद; आळशी. ॰जूठ-स्त्री. मल्लयुध्द; कुस्ती; झटापट. [सं. अंग + युध्द -जुध्द-जुट्ठ] ॰जोर-पु. अंगबळ; शरीराची ताकद, शक्ति. (असे धेडगुजरी समास मराठी भाषेंत पुष्कळ झाले आहेत). [सं. अंग + फा. जोर] ॰झाप-स्त्री. पेंढार्‍यांपैकीं कोणी एखादा पेंढारी झटापटींत मारला गेल्यास त्याला तात्पुरती मूठमाती देण्याची जी चाल होती तीस म्हणत. ठग लोकांत, त्यानीं मारलेल्याला तात्पुरती मूठमाती देण्याची पध्दत; पुढें त्या मृताला सवडीनें नीट लपवून ठेवीत. [अंग + झापणें-झांकणें] ॰झोंक-पु. शरीराचा तोल, कल. [अंग + झोंक] ॰झोल-पु. (काव्य) छातीवरील बंदांचा लांब अंगरखा. ॰ठसा-ठाण-ठेवण-पुनस्त्री. अंगाची ठेवण; अंग- काठी. 'भीमा ऐसा अंगठसा । माझिये दृष्टी दिसतसे ।' -मुसभा ६. १५३. २ (ल.) बळ; सैन्य. -होकै १ ॰ठोळा-ळी-पु. स्त्री. हातांच्या किंवा पायाच्या बोटांत घालावयाचें एक वेढें, वेढणें. (मराठ्यांत स्त्रिया व मुलें बहुधा वापरतात). [अंगुष्ठ] ॰तुक- न. अंगाचें वजन. 'तरी लोहाचें आंगतुक । न तोडितांचि कनक । केलें जैसें देख । परिसें तेणें ।' -ज्ञा १७.२१६. [अंग + तुक] ॰तोल -पु. अंगझोंक पहा. ॰त्राण-न. शरीरसंरक्षक साधन; चिलखत; बख्तर; कवच. 'गोधांगुळें घालिती हस्तीं । अंगत्राणें बांधिलीं ।' -पांप्र ३२.६५. ॰त्वानें-त्वें क्रिवि. (अंगत्व याची तृतीया) प्रतिनिधि म्हणून; एखाद्या करितां; एखाद्याच्या नांवानें-तर्फें-आश्र- यानें, मार्गदर्शकत्वाखालीं; वतीनें. 'मला न फावल्यास मी आपल्या अंगत्वानें दुसरा कोणी पाठवीन.' ॰दट-वि. १ अंगास घट्ट बसणारें, दाटणारें. २दृढ; बळकट. 'आत्मविषयीं आंतुवट । साधन जें आंगदट ।।' -ज्ञा १६.४५. -पु. (कर्ना.) अंगर- ख्याच्या आंत घालावयाची कोपरी. [सं. अंग + दृढ] ॰देण्या- वि. प्रत्यक्ष शेत कसणारा शेतकरी; शारीरिक श्रम करणारा पक्ष. ॰देवता-स्त्री. उपदेवता (कर्मांतील जी मुख्य देवता तिच्या अंगभूत असणारी). २ (ल.) सेवक; चाकर; भोंवतालची मंडळी. [सं.] ॰धट-वि. उद्धट; असभ्य; शिरजोर. [अंग + धुष्ट] ॰ध(धि)टाई-स्त्री. १ केवळ शारीरिक बळ. पाशवी बळ, शक्ति (चातुर्य, युक्ति यांच्या विरुद्ध). २ रानटी जुलूम; आंग- मर्दी. ॰धार-आंगधार पहा. ॰धुणें-न. १ (बायकी) स्नान; अंघोळ. २ (व.) न्हाणीघर. ॰न्यास-पु. देवतास्थापनेच्या वेळीं, धर्मविधि करतांना निरनिराळे मंत्र म्हणून देवतेच्या प्रतिमेला ६ किंवा १६ स्थानीं स्पर्श करावयाचा विधि; संध्या वगैरे कर- तांना स्वतःच्या शरीराच्या निरनिराळ्या स्थानीं स्पर्श करावयाचें कर्म. [सं.] ॰परिवर्तन-न. उलटें करणें (शरीर इ॰); एका बाजूवरून दुसर्‍या बाजूला वळणें. 'आषाढमासीं शयन ।भाद्रपद- मासीं अंगपरिवर्तन । कार्तिकीं उद्बोधन ।' [सं.] ॰पात-पु. १शरीराचा र्‍हास; लुकडेपणा; क्षीणता. २ (कड्यावरून) स्वतःस खालीं लोटून घेणें. ३ शरीरास किंवा एखाद्या अवयवास पक्षघात होणें. ४ अंग बाहेर येणें (गुह्येंद्रियाचा भाग). [सं.] ॰पांथी- स्त्री. खासगत वांटा; सरकतीच्या व्यवहारांत सावकारानें आपली सरकत ठेवली असतां सावकारीचे पांथीहून निराळी सरकतीसंबंधें जी त्याची नफ्याची पांथी असते ती. २ अंगवांटा. [अंग + पंक्ती] ॰पिळा-मोड-पु. अंगादिक पिळणें; आळस आला असतां किंवा भूतसंचारामुळें अंगास दिले जाणारे आळेपिळे; आळोखेपिळोखे; तापानें अंग कसकसणें. ॰पीडा-बाधा-स्त्री. नैसर्गिक विकार; शरीरास जडलेली व्याधि किंवा रोग (भूत- पीडेच्या उलट). [सं.] ॰प्रत्यंग-न. अवयवांसकट शरीर; पूर्ण शरीर. [सं.] ॰प्रस्थान-न. प्रत्यक्ष प्रवासास निघण्यापूर्वीं एखाद्या शुभ मुहुर्त साधण्यासाठीं आपलें घर सोडून जवळपास दुसर्‍याच्या घरीं स्वतः रहावयास जाणें. [सं.] ॰बल न. शारी- रिक शक्ति; ताकद; अंगधटाई. 'अवनीतीनें वर्तो नये । आंग- बळें ।' -दा २.२.२२. [सं.] ॰बांधा-पु. शरीराची ठेवण. ॰भंग-पु. १ अंगाचे सांधे धरणें; अशक्तपणा वाटणें. २ अंग- विक्षेप; शरीराचे निरनिराळे चाळे, हावभाव, चेष्टा. 'अंगभंग बहु दाविती रंगीं । रामरंग सुखसिंधु तरंगीं ।' ॰भंगवात-पु. अंगभंग रोग; ज्यामुळें हा रोग होतो तो वातदोष. ॰भर-भार-क्रिवि. शरीराच्छादनापुरतें (वस्त्र). 'अंगभर वस्त्र, पोटभर अन्न.' -पु. (ल.) शक्ति; जोर. 'एर्‍हवीं प्राप्तें मतांतरें । थातंबूनि आंगभरें ।' -ज्ञा १३.३१८. ॰भर होणें-(ना.) १ फजिती ॰उडणें. २भार होणें. ॰भा-स्त्री. अंगकांति. 'अंगभा विलोकितां तटस्थ जाहली सभा ।' -(अनंत) सीतास्वयंवर ८९. ॰भूत- वि. एखाद्या वस्तूचा भाग, अंश; अवलंबी; समाविष्ट; तदंत- र्गत; संबंधीं; आश्रयी. 'सीमंतपूजन हें विवाहाचें अंगभूत होय.' 'ज्वराच्या अंगभूत अरुचि असतेच.' [सं.] ॰मर्दन- न. अंग रगडणें; चंपी; मालिश. [सं.] ॰मर्दाई-मर्दी-स्त्री. पौरुष; शक्ति; केवळ शारीरिक बळ; अंगधटाई. [सं. अंग + फा. मर्दी = पौरुष] ॰मस्ती-पाशवी शक्ति; दांडगाई; उद्धटपणा. [सं. अंग + फा. मस्ती = दांडगाई] ॰मार्दव न. शरीराचा नाजूकपणा. [सं.] ॰मास-न. (व्यापकपणें) शरीर या अर्थीं 'माझें अंगमास दुखतें.' 'तिचें अंगमास शेकलें पाहिजे.' ॰मेह- नत-स्त्री. शारीरिक श्रम; प्रत्यक्ष कष्ट. [सं. अंग + अर. मिहनत् = श्रम, कष्ट] ॰मेहनती-त्या-वि. शारीरिक कष्ट करून पोट भरणारा; कष्टाळू; पोषाखीच्या उलट. २स्वतःशेत कसणारा; शेतकरी. ॰मेळ-पु. अंगसंग; संबंध. 'तियेचेनि अंगमेळें ।' -विपू १.१०३. [अंग + मिळणें] ॰मोड-स्त्री. अतिशय मेह- नत करणें; कष्ट करणें; सक्त मेहनत. ॰मोडा-पु. १ आळेपिळे (आळस घालविण्यासाठीं). (क्रि॰ देणें.) 'निद्रेनें व्यापिली काया ।आळस आंगमोडे जांभया ।' -दा १८.९.२. २ ताप भरण्यापूर्वीं अंग कसकसणें; अंग मोडून येणें. (अव. अंगमोडे. 'अंगमोडे येऊं लागले.' [अंग + मोडणें; बं. अंगमोडा] ॰यष्टी-रचना-स्त्री. शरीराचा बांधा, ठेवण. [सं.] ॰रस- पु. वनस्पतीच्या पानांचा, पाणी न घालतां काढलेला रस; आप- रस पहा. [सं-] ॰राख्या-वि. अंग राखून काम करणारा (आळसामुळें, अप्रामाणिकपणानें); अंगचोर; चुकार. ॰राग- पु. १ सुंगधी उटणें; उटी; लेप; चोपडण 'श्रमघर्मानें रणिं वीरांचा अंगराग पसरला ।' -सुसु नाटक २१. २ उटीचें द्रव्य (अरगजा, केशर, इ॰). [सं.] ॰रेटा-पु. अंगानें दिलेला, शरीरानें दिलेला धक्का, ठोसा. 'गाड्यास अंगरेटा दे म्हणजे चालता होईल.' [अंग + रेटणें] ॰रेटाई-स्त्री. अंगाची धक्का- बुक्की; मस्ती; ठोसेठोशी; अंगधटाई. ॰रोग-पु. शरीरास होणारा स्वाभाविक रोग (पिशाच्चबाधेनें किंवा देवतापराधानें न होणारा). ॰लग-वि. १ (जात, मैत्री, नोकरी इ॰ संबंधानें) जडलेला; संबंधीं; संबंध असलेला. २ जिव्हाळ्याचा; जवळचा; -पु. १ नातेवाईक; स्नेही. 'तुझा पिता तरी विरोचन । तो आमुचा अंगलग जाण ।' -कथा २.६.८८. 'अवघे अंगलग तुझे वधियेले वीर ।' -तुगा ३९२. २ समागम. 'संताचेनि अंगलगें । पापातें जिणणें गंगें ।' -ज्ञा १२.१७७. ३ आश्रय; साहाय्य. 'परब्रह्मींचेंनि अंगलगें । सृष्ट्यादि कार्य माया करूं लागे।' -विउ ११.१६. 'देवा मंदराचेनि अंगलगें ।' -ज्ञा ११. २५७. ॰लट-लोट-वटा-वठा-स्त्री. पु शरीराची ठेवण, कांति, तेज. अंगकाठी पहा. 'तेची अंगलट गोरी आसा' 'माझी आंगलट त्यावेळीं कांहींशीं पातळ होती' -विवि ११.८.२०४. [सं. अंगयष्टिः; प्रा. अंगलठ्ठी-अंग लट; किंवा अंग + लोष्ट] ॰लट घेणें-स्वतः होऊन जबाबदारी पत्करणें. ॰लट येणें- १ अंगास चिकटणें; तोट्यांत येणें. २ अंगाला चिकटणें; धक्काबुक्की करणें; खोडी काढणें. (अंगलट जाणें असाहि प्रयोग आढळतो). ॰लीन- वि. अंगांत मुरलेलें; शरीरांत गुप्त असलेलें. 'सद्वैद्यें जैसें दोषा । अंगलीना ।' -ज्ञा १६.४२. ॰लेणें-न. अंगावरचा दागिना; अलंकार. 'नाना अळंकार अंगलेणीं ।' -सप्र २.५. ॰लोट १ अंगलट पहा. २ अंगभार; अंगाचें वजन, पतन. 'मस्तकीं वाहती करुनि मोट ।भूमीं टाकिती जैसा घट । तळीं पाषाण होती पिष्ट । आंगलोटें दोघांच्या ।।' -मुसभा ७.३२. ॰वख-पु. अंगप्रदेश. 'जलतेया गिरिचेया आंगवखां ।' -राज्ञा ११.४२०. [अंग + वक्ष?] ॰वटा-क्रिवि.स्वाधीन. [अंग + वत्] ॰व (वा)टा-शेतांत उत्पन्न झालेल्या मालाच्या तीन (शेतमालक, बैल-नांगर मालक व शेत कसणारा) वांट्यांपैकीं शेत कसणार्‍याचा वांटा. [अंग + वाटा] ॰वण-स्त्री. १ सरा- वाच्या योगानें आलेली योग्यता; संपादन केलेली कार्यक्षमता; वाकबगारी. ' ऐसी अंगवण नाहीं मज देवा । '-तुगा ४४९५. 'वातात्मजासि म्हणे यदुनंदन । जरी तुज असेल आंगवण । यांतून एक स्त्रीरत्न । तुवां घ्यावें स्वेच्छेनें ।।' -जै ११.६. २ पराक्रम; शौर्य; जोर; उत्साह. (व.) खटपट; प्रयत्न. आंगवन असाहि प्रयोग. 'जळो तुमचें दादुलेपण । नपूंसकाहूनि हीन । वृथा गेली आंगवण । काय वदन दावितां ।।' -एरुस्व ८.६. ' नीलजां कैची आंगवण ।।' -उषा १४२३. ३ शरीरावस्था. 'तंव भीम- सेनाची आंगवण ।। कृष्णधर्म पाहाती ।' -जै ६.७०. ४ देवीचा वण; तीळ; चट्टा. (क्रि ॰ पडणें, उठणें, येणें, जाणें ). ५ उपा- सना; भक्ति; (गो.) (देवाला केलेला ) नवस. 'कीं वीरश्रीची धरितां अंगवण । प्रताप विशेष वाढे पै ।' -रावि ११.६. ६ सराव; नित्यक्रम; वहिवाट. 'ऐसें करितां पापाचरण । तयासी आलें वृद्धपण । पुत्र जाहाले अति दारुण । तरी आंगवण न सांडी ।।' -रावि १.१११. ७(ल.) साहाय्य; मदत. 'या परी चतुरंग- सेना । मिसळली रणकंदना । आपुलालिया अंगवणा । गज रथ रणा आणिती' -एभा ३०.११७. ८ द्वंद्व युद्ध; झुंज. ' तेआं भीड भीमसेना । जुंझतां बहुती आंगवणा । परतिजे ऐसी हांव कह्वणा । उपजेचिना ।।' -शिशु ८७८.[अंगवलन किंवा अंगापण-अंगा- वण] ॰वणा-वि. शूर. 'तो अक्रूर आंगवणा पुढां चाले ।' -शिशु ५४५. ॰वत-सामर्थ्य; अभिमान. 'आतां हा जळता वारा कें वेंटाळे । कोणाही विषा भरलें गगन गिळे । महाकालेंसि खेळें । आंगवत असे' -ज्ञा ११. ४०५ ॰वला-वि. जवळचा; अनुकूल; स्वाधीन. ॰वसा-(झाडाचें) साल, पाला, शेंडा. 'अशोकाचे अंगवसे । चघळिले कर्‍हेनि जैसे ।' -ज्ञा ११. ४१४. ॰वसें-न. रूप. ? -मनको. ॰वस्त्र-न. १ उपरणें; उत्तरीय; उपवस्त्र. ' नुसत्या अंगवस्त्रानिशीं तो घराबाहेर पडला.'२ लंगोटी (गौरवार्थी). [सं.] ३ (ल.) प्रेमपात्र; ठेवलेली स्त्री; रखेली; उपस्त्री. [अंगना + उपस्त्री = आंगोवस्त्रि-आंगोवस्त्र असा हा शब्द बनला आहे. वस्त्र (कपडा) याशीं याचा कांहीं संबंध नाहीं असें राजवाडे म्हणतात-भाअ १८३२ ] 'मला तर असें आठवतें आहेकीं, त्या वेळच्या खाजगी शाळेच्या एका मास्त- रास सकाळची शाळा असतां शाळेंतील विद्यार्थी त्याच्या आंग- वस्त्राच्या घरांतून कित्येकदां बोलावून आणत असत !' -टि ४. २९१. वाप्र. एका अंगवस्त्रानें निघणें-भाऊबंदांशीं बेबनाव होऊन एक उपरण्यानिशीं कांही एक तनसडी न घेतां घराबाहेर निघणें. ॰वळ-पु. आगवळ, आगूळ. अगवळ पहा. -नागा १२८. (-शर) ॰वळण- पु. अंगलट; अंगाची, शरीराची ठेवण. ॰वळणीं पडणें-सरावाचें होणें (हा शब्द प्रथमा विभक्तींत क्वचित योजितात). 'जी भाषा आम्ही...बोलतो त्यांतील शब्दांचे उच्चार आमच्या आंगवळणीं पडलें असल्यामुळें...' -टि ४. ४०१. ॰वळा-पु १ अंगाचे आळेपिळे; आळसामुलें येणारी जांभई. अंगपिळा पहा. २ मुलांची चळवळ. ३ सांगाती, सोबती; संबंधी; सहवासी. 'नित्य त्या सेवकाजवळा । अंगें अंग- वळा तूं होशी ।' -एभा ६३९४. ४ अंगकाठी. ॰वळेकार-वि. भारी; शक्तिमान्. 'सेजवळ सहवासी । आंगवळे-कारूं विश्वासी ।' -शिशु ५०५. ॰वाटा-पु. १ अंगवटा पहा. २ (व्यापारधंदा) भांडवल उभारल्याखेरीज प्रत्यक्ष काम करणा- राचा वांटा. ३ अंगपांथी पहा. ॰वाटेकरी-पु. अंगवाटा घेणारा. ॰वाण-पु. (कु.) नवस 'देवाक आंगवाण केली हा.' [अंग + वाणी] ॰वात-पु. चालतांना वेगानें उत्पन्न होणारा वारा; अंगवारा; गतिमान् वस्तूपासून उत्पन्न होणारा वायू. ॰वाला- वि. (गो.) अंगांत घालण्याचा; आंगाचें. ॰विकार-विकृति- पु. स्त्री. शारीरिक रोग. ॰विक्षेप-पु. हावभाव; अभिनय; चाळा; अंगचेष्टा; हातवारे. [सं.] ॰वृद्धि-स्त्री. शरीराची वाढ (रोगामुळें झालेली-अंतर्गळ, अंडवृद्धि; इ॰). [सं.] ॰वेग- पु. १ शरीराचा वेग; चालण्याचा जोर अंगवात. २ शरीर वाढत असतांना त्याला आंतून मिळणारा जोर. ॰वैकल्प-न. १ शरी- राचा अधूपणा; लुळेपणा; व्यंग. २(ल.) (धार्मिक विधींतील महत्त्वाचा भाग गाळल्यामुळें) येणारी न्यूनता; अपूर्णता; दोष; वैगुण्य. ॰श:-क्रिवि. एकेक भाग घेऊन; भागशः; खंडशः. ॰शैंथिल्य-न. शरीराचा ढिलेपणा; थलथलीतपणा; मांद्य (अंग- दार्ढ्य याच्या उलट). ॰संकोच-पु. १ शरीराचें आकुंचन; अंग चोरणें. 'किं अंगसंकोचें पारधी । टपोनि तत्काळ मृग साधी ।' २ आकुंचनाची स्थिति; आकुंचन; संकुचितपणा. [सं.] ॰संग-पु. १ शरीराचा संयोग, मीलन; अंगस्पर्श. 'दीपाचिया अंगसंगा । कोण सुख आहे पतंगा ।' -एभा ८.७४. 'दुरून बोल, अंगसंग कामाचा नाहीं.' २ संभोग; मैथुन; रतिसुख. 'घडे भक्ति जैसी मनाच्या प्रसंगें । न. साधे तसी माझ्या अंगसंगें ।' ३ हातघाई; अंगलट; लठ्ठालठ्ठी; कुस्ती. [सं.] ॰सफाई-स्त्री. शरीराची अथवा कामाची चपळाई; अंगचापल्य. [सं. अंग + फा. सफाई] ॰सरकती-पु. अंगवांटेकरी पहा. ॰संस्कार- पु. १ अभ्यंगस्नान वगैरे; शरीरावर संस्कार. २ अंगस्पर्श; शरीरसंयोग. [सं.] ॰सामर्थ्य-न. शारीरिक बळ; अंगजोर. [सं.] ॰साळ्या-वि. नाणें पाडण्याचें काम न करतां इतर कामें करणारा सोनार. (टंकसाळ्याच्या विरुद्ध). अकसाळ्या पहा. ॰सिक-न. अंगावरील वस्त्र. 'आंगसिकें वेढुं भणौनि । सर्वज्ञांचीं ।।' -ॠ ७०. 'आंगसीकें दिह्नली उदारें । भणे कवी भास्करू ।।' -शिशु २३२. ॰सुख-न. रतिसुख; संभोगसुख. 'द्यावा निजांगसुख लाभ वधूजनांतें ।' [सं.] ॰सुटका-स्त्री. १ एखाद्या संकटांतून किंवा आडचणींतून कांहीं नुकसान किंवा इजा न होतां सुटणें. २ मुक्तता. 'हेंकाम मी पतकरलें आहे यांतून माझी अंगसुटका झाल्याशिवाय तुम्हांकडे कसा येऊं?' ॰सुस्ती-स्त्री. शरीरमांद्य; जाड्य. ॰सूट-वि. चपळ; हलक्या अंगाचा; सुटसुटीत; मोकळा. ॰सौष्ठव-न. शरीराचा बांधे- सूदपणा; सौंदर्य. [सं.] ॰स्तनें-न. लेंकरूं. -शर? ॰स्वभाव- पु. जन्मजात अथवा उपजत स्वभाव; नैसर्गिक वृत्ति. [सं.] ॰हार-पु. (नृत्य) सहा किंवा सहापेक्षां जास्त करणांचा समु- दाय. हे अंगहार ३२ आहेत:-स्थिरहस्त; पर्यस्तक; सूचीविद्ध; अपविद्ध; आक्षिप्त; उद्धट्टित; विष्कंभ; अपराजित; विष्कंभापसृत; मत्ताक्रीड; स्वस्तिकरेचित; पार्श्वस्वस्तिक; वृश्चिकापसृत; भ्रमर; मत्तस्खलित; मदाद्विलसित; गतिमंडल; परिच्छिन्न; परिवृत्त; वैशाख रेचित; परावृत्त; अलातक; पार्श्वच्छेद; विद्युद्भांत; उद्वृत्तक; आलीढ; रेचित; आच्छुरित; आक्षिप्तरेचित; संभ्रांत; अपसर्प व अर्धनिकुट्टक. ॰हीन-वि. व्यंग; न्यून; अपूर्ण; अवयवरहित (शरीर). 'कां अंगहीन भांडावें । रथाची गति ।।' -ज्ञा १७. ३८९. -पु. मदन. -स्त्री. वेश्या; पण्यांगना. 'अंगहीन पडपे । जियापरी ।' -ज्ञा १७.२५६.

दाते शब्दकोश

दावा

पु. १ द्वेष; वैर; मत्सर; शत्रुत्व. 'कळी करि सुनि- मळीं परम उग्र दावा नळीं ।' -केका २१. 'आमरण पांडवासी माजा निर्विघ्न चालिला दावा ।' -मोगदा ९.१५. २ भांडण तंटा; कज्जा. ३ (एखाद्या वस्तूवरील) मालकी; न्याय्य अधि- कार, हक्क. 'हें घर म्यां तुला दिलें, याजवर माझा दावा राहिला नाहीं.' ४ (कायदा) न्याय मिळविण्याकरितां, हक्क प्रस्थापित करण्याकरितां दिवाणी कोर्टांत चालविलेला खटला, कज्जा, फिर्याद; (इं.) प्लेंट्. ५ दुसर्‍याच्या विरोधामुळें (एखाद्या पदार्थावर) स्वत्त्व प्रतिपादन करण्याचा व्यापार. 'तो अलीकडे या गांवावर दावा सांगतो.' ६ मागणी. 'राजे आपलें इमान राखून ऐवज अदा करितील तरी व्याजाचा दावा करणार नाहीं.' -पया ४००. ७ हल्ला. 'बळकट झालें म्हणजे..दावे दरवडे करावे.' -मराआ २२. ८ सापाचा डंख. 'सर्प बारा वर्षें दावा राखितो.' [अर. दआवा; गु. दावो] (वाप्र.) ॰उगवणें-घेणें-(एखाद्यानें) केलेल्या अपकरांचा) सूड उगविणें(एखाद्यानें) केलेल्या अप- कारांचें उट्टें काढणें. ॰गाणें-सांगणें-(एखाद्यावर) सूड उगवि- ण्याबद्दल धमकी देणें. ॰तोडणें-कज्जा मिटविणें; (हक्कासंबंधीं भांडणाचा) निकाल लावणें. ॰धरणें-द्वेष करणें; मत्सरबुद्धि बाळ- गणें; डाव, दांत धरणें. ॰रद्द करणें-फिर्याद काढून टाकणें. ॰लावणें-१ शत्रुत्व पुकारणें; भांडणें. २ फिर्याद गुदरणें. ॰साधणें-१ यशस्वी रीतीनें सूड उगवून घेणें. २ फिर्याद जिंकणें. 'म्हणे तुक्यानें साधिला दावा । न्याय सांगावा कवणासी ।' उभा दावा-पु. खडें वैर; तीव्र शत्रुत्व. म्ह॰ जावा जावा आणि उभा दावा. दुस्मान दावा-कट्टें वैर; हाडवैर. सामाशब्द- ॰दरफडा-पु. आरडाओरडा करून धमकावणें; दपटशा देणें; खडसावणें; चरफडाट; दंडेलीचें, उर्मटपणाचें बोलणें. (क्रि॰ करणें; मांडणें; कर्माची षष्ठी योजतांना गाणें ह्या धातूचा प्रयोग). [दावा + दरफडणें] ॰द्वेष-पु. मत्सर; वैर; (सामा.) मत्सर; द्वेष- बुद्धि. (क्रि॰ होणें; करणें) [दावा + द्वेष] ॰हेवा-पु. मत्सर व द्वेष. (प्र.) हेवादावा. [दावा + हेवा] दावेकरी-खोर- दार-वि. १ मत्सर, द्वेष, शत्रुत्व करणारा; वैरी. 'चहूं पादशहाचे आपण दावेदार.' -सभासद ४५. 'पति नव्हे हा दावेकरी । पूर्वींल जन्मांतर साधिलें ।' २ (एखाद्याजवळ आपल्या) हक्काची मागणी करणारा; हक्क सांगणारा; हक्कदार. ३ धनको. ४ पूर्वीच्या काळीं फिर्यादीनें गावचपांयती पुढें फिर्याद केली व पंचायतीनें जर त्याचें भांडण मिटविलें नाहीं व त्या फिर्यादीस सरकारांत अपील करण्याची ताकद नसली तर तो शेजारच्या गांवीं जाऊन राही व तेथून स्वतःच्या गांवांत लुटालूट करीत असे, तशा प्रका- रचा (मनुष्य). [फा. दआवा-दार] दावेदारी, दावेखोरी- स्त्री. १ शत्रुत्व; वैर; द्वेष. २ (एखाद्याविरुद्ध) हक्क असणें; सांगणें हक्कदारी. दावेदादी-वि. द्वेष, मत्सर करणारा; वैरी. [दावेदार] दावेदुश्मन, दावेदुस्मान-पु. शत्रु; वैरी; मत्सर, दावा करणारा.

दाते शब्दकोश

संसार

पु. १. जग; विश्व; सृष्टि; इहलोक; संसृति; मानवी जीवित, अस्तित्व; जगाची स्थिति. 'संसार म्हणजे डोळ्यापुढें दिसणारें सर्व जग किंवा दृश्य सृष्टि असा अर्थ आहे.' -गीर ८०१. 'शिवशिव कदनाची विवसी संसारीं । कवणु नेघे ।' -भाए २२९. २ प्रपंच; व्यवहार; कुटुंबपोषणादि कार्यं; गृहकृत्य; घरकाम. ३ विस्तार; पसारा. 'नवल ऐके धनुर्धरा । कैसा वासनेचा संसारा । देहा होऊं नेदी उजगरा । परी सुखदु:खें भोगी ।' -ज्ञा ५.५४. [सं. सम् + सृ] संसार उभारणें-गृहस्थाश्रम चालविणें; गृह- व्यवस्था पाहणें. 'मुक्ताबाईनें एखाद्याचा संसार नसता का उभा- रला.' -नामना २१. संसार करणें-१ गृहकृत्य करणें; घरां- तील सर्व कामधाम, व्यवहार पाहणें. २ (बे.) ताडाचें पान कापून ताडी मोघ्यांत पाडणें. संसार मांडणें-संसारास सुरवात करणें. संसारास-संसारावर पाणी घालणें-संसाराचा नाश करणें. 'म्हणती आतां संसारा घालूं पाणी । परी अन्न देऊं चक्रपाणी ।' -ह १६.११६. संसार वृथा करणें, जाणें-संसाराचा नाश करणें. 'तुकयाची ज्येष्ठ कांता । मेली अन्न करितां । येणें लज्जा वाटे चित्ता । संसार वृथा गेला कीं ।' संसार हांकणें-संसार चाल- विणें; प्रपंच योग्य रीतीनें करणें. संसाराची मात्रा करणें- सामाशब्द- ॰ओझें-न. प्रपंचाचा भार, जबाबदारी; संसाराची काळजी. 'म्हणे संसारओझें माझें शिरीं । कैसी परी होईल ।' ॰कष्ट-पुअव. प्रपंचातील दु:खें, त्रास, मेहनत, जबाबदारी. ॰चक्र-न. प्रपंचाचा गाडा; संसारयात्रा; नेहमीं संसारांत येणारे निरनिराळे प्रसंग, अनुभव वगैरे. ॰ताप -दु:ख -यातना- पुन. प्रपंचांतील दु:खें, त्रास, कष्ट, श्रम. 'आधींच संसार तापें संतप्त । तो हा सत्समागमें निवत ।'. ॰धंदा-पु. प्रपंचांतील कामें, व्यवहार; उद्योग. 'जेणें उकले आपसा संसारधंदा.' ॰भान-न. प्रपंचांतील लक्ष्य; ऐहिक गोष्टींबद्दल वाटणारा आपलेपणा, प्रेम, आदर. ॰भार-पु. संसाराचें ओझें. ॰भ्रम-पु. संसारांतील माया. पाश; प्रापंचिक गुंतागुंत; ऐहिक गोष्टींसंबंधीं वाटणारें प्रेम व त्यांत गुरफटून राहण्याची बुद्धि. ॰माया-स्त्री. प्रापंचिक गोष्टींसंबंधीं वाटणारा भ्रम; ऐहिक गोष्टींत असणारी क्षणभंगुरता, क्षणिकत्व, परंतु त्यांचेबद्दल सत्त्याचा होणारा भास. 'संसारमाया सांडोनि । दशरथ पावला स्वर्गभुवनीं ।' -रावि ११.१४५. ॰मार्ग-पु. जग; विश्व; सृष्टि; ऐहिक व्यापार, व्यवहार. याच्या उलट पर- मार्थमार्ग. ॰यात्रा-स्त्री. प्रपंचाचा रोजचा क्रम; ऐहिक दिनचर्या; संसारांतील अनेक वरेवाईट प्रसंग; आयुष्यक्रम. ॰रहाटी-स्त्री. जगाचा क्रम; विश्वांत चाललेल्या अनेक घडामोडी; जीवितचक्र. ॰सागर-पु. प्रपंचाचा, सृष्टीचा अफाट विस्तार. ॰सात-स्त्री. संसाररूपी बाजार; प्रपंचाचा बाजार. 'तेवि संसारसातेसी येऊन । जो न करील ईश्वरभजन ।' -महि कथा १६.५. ॰साक्षी-वि. ॰सुख-नन. प्रपंचातील आनंद, सुखोपभोग; ऐहिक सुखोपभोग. संसाराचा गाडा-पु. संसारचक्र; प्रपंच, व्यवहार; जगांतील दिनक्रम. संसाराचें जोखड-न. प्रपंचाची जबाबदारी; संसाराचें ओझें. संसारिक-वि. १ संसारांत दक्ष; आपले रोजचे व्यवहार योग्य तऱ्हेनें करणारा; व्यवहारज्ञ; प्रापंचिक. २ संसारा- संबंधीं; संसारांतील. 'जंव तुझें रूप नोहे दिठे । तंव जगासि संसा- रिक गोमटें ।' -ज्ञा ११.३२१. 'संसारिक हे तुटेना । -दा २. ५.३५. ३ संसारात, प्रपंचांत गढलेला; आपल्या आयुष्यांतील गोष्टींचाच केवळ विचार करणारा; संसारी. 'मागें बोलिला संसा- रिक । त्यागेंविण नव्हे कीं साधक ।' -दा ५.१०.१. संसा- रिया-पु. संसारी; प्रापंचिक. 'आत्मा गुणसंगें । संसारिया ।' -ज्ञा १४.३३. संसारी-वि. १ प्रापंचिक; संसारांत गढलेला; गृहस्थाश्रमी; स्त्रीपुत्र वगैरे असलेला. २ ऐहिक; जगासंबंधी.

दाते शब्दकोश

देह

पु. शरीर; काया; अंग. 'नोळखवे म्यां धरला हातीं । देहा दीप माया लाविली वाती ।' -तुगा ३६८. [सं.] (वाप्र.) ॰उगाळणें-(चाकरी इ॰ कानीं) शरीर झिजविणें. ॰कारणीं लावणें-एखाद्याच्या कार्याकरितां स्वदेह खर्च करणें. कामास लावणें. ॰टाकणें-ठेवणें-गोडणें-मरणें. ॰लोटणें-मूर्च्छा येणें. देहांत असून विदेही-जीवन्मुक्त. देहांत उजेड पडणें-अपराधाबद्दल शिक्षा भोगल्यानें पश्चात्ताप होणें. देहावर असणें-शुद्धींत असणें. देहावर-गाणें-गीत-अभंग-पद- लावणी-कवन-दोन अर्थांचें काव्य. याचा उत्तानार्थ शरीर विषयक असतो व गूढार्थ आत्मा किंवा ब्रह्म यासंबंधीं असतो. देहावर नसणें-मन ठिकाणावर नसणें. देहावर येणें-१ शुद्धीवर येणें. 'देहावरी येथे म्हणती ।' -गुच ५३.६. २ रानटी खोडया अथवा बेबंद चाली टाकून देणें. दहीं देवपण दाखविणें- आणणें-येणें-(एखाद्यानें) मनुष्यरूपी असूनहि, याच जड देहावस्थेंत आपल्यांत दैविक आत्मीय सत्याचें ज्ञान किंवा ब्रह्मज्ञान आहे अशी लोकांस प्रचीति आणून देणें. म्ह॰ देहं वा पातयेत् अर्थं वा साधयेत् = प्राण तरी द्यावा किंवा ध्येय तरी साध्य करावें. सामा- शब्द- ॰खंड-न. साडेतीन हाताचें शरीर. 'जें देहखंडा नाम आत्मा ।' -ज्ञा १८.५६७. ॰त्याग-पु. मरण. ॰त्रय-न. स्थूल, लिंग व कारण या तीन प्रकरचा देह. 'तैसें ज्ञानाग्नि जाळिले । देहत्रयीं निरसलें ।' ॰दंड-दडन-पुन. तपानें केलेलें देहाचें संयमन. २ फांशीची शिक्षा. ॰दृष्टि-स्त्री. मानवी दृष्टि. उदा॰ 'देहदृष्टीनें पाहिला असतां प्रपंच सत्य दिसतो.' ॰द्वय-न. स्थूल आणि सूक्ष्म देह. ॰धर्म-पु. शरीराचीं कृत्रिम व नैसर्गिक कामें, मलमूत्रविसर्जन इ॰ देह धमाचें करणें-शौचास जाणें. देह- धारी-वि. शरीरी; मूर्तिमान्. ॰पात-प्रयाण-पु. शरीराचें पतन; मरण; देहावसान. 'आणि नियता अंतःकरणीं । तूं जाणि जसी देहप्रयाणीं ।' -ज्ञा ८.५. ॰प्रारब्ध-न. नशीबाचा भोग; शरीरभोग. ॰बुद्धि-भाव-स्त्रीपु. १ जीवबुद्धि; देहावरील आसक्ति; अहंभाव; मीपणा, याच्या उलट आत्मबुद्धि. २ (काव्य) चित्ताची सावधानता देहाभिमान; देहतादात्म्य. ॰बुद्धि राहणें- (व.) धडगत रहाणें. ॰भान-न. चित्तशुद्धि; स्वतःची जाणीव; चित्तानुसंधान; मन ठिकाणावर असणें; शांत असणें; विवेकशक्ति असणें. (क्रि॰ असणें; येणें; विसरणें; जाणें). ॰भाव-पु. देहाभिमान. देहबुद्धि पहा. ॰यात्रा-स्त्री. १ देहाचा चरितार्थ; उपजीविका. (क्रि॰ चालणें; होणें; निभणें). २ आयुष्य; जीवन- क्रम. (क्रि॰ संपणें = मरणें). ॰वान-वि. देहधारी पहा. ॰विस- र्जन-न. देहत्याग पहा. ॰शुद्धि-स्त्री. १ प्रायश्चित्तानें शरीराची शुद्धता करणें. २ देहभान पहा. ॰संकल्प-पु. प्राण पणास लावून काम करणें; निकराचा प्रयत्न. ॰संग-पु. देहाचा अहंकार. ॰स्वभाव-पु. १ देहधर्म १ पहा. २ मनुष्याचा नैसर्गिक स्वभाव; जन्मप्रभृति वागण्याची पद्धत. देहाडा-पु. देह. 'पुरला साठीं देहाडा । ऐसें न म्हणे मूढा ।' -तुगा २६८४. देहांत-पु. मृत्यु. देहांत प्रायश्चित्त-न. मृत्युदंड. देहांतर-न. दुसरा जन्म किंवा दुसरा जन्म घेणें; परकाया प्रवेश; एका देहांतून दुसर्‍या देहांत प्रवेश करणें. देहातीत-वि. देहाच्या पलीकडे; अदेह झालेला. देहात्मवाद-दृष्टि-पुस्त्री. अनात्मवाद; जडवाद; देहा- लाच आत्मा मानणें. देहात्मवादा-दृष्टी-वि. जडवादी; देहा- त्यय-पु. देहत्याग. देहादिक कर्में-नअव. १ देहधर्म पहा. 'देहादिक कर्में अभिमान वाटे । तया मी कैं जोडें नारायण ।' २ दया, माया. प्रीति इ॰ मनाच्या वृत्ती. देहाभिमान, देहा- हंकार-पु. शरीराचा अभिमान. देहाभिमानी, देहाहंकारी- वि. देहाभिमान धारण करणारा. देहावसान-न. मृत्यु. देही-वि. १ देहासंबंधीं. २ देहधारी पहा. -पु. देहांत राहणारा जीवात्मा. 'हें रजोगुणाचें दारुण । देही देहियासी बंधन ।' -ज्ञा १४.१७३. देहे-दंड-बुद्धि-भान-शुद्धि-स्वभाव-देहदंड-बुद्धि इ॰ पहा. 'ज्ञात्यासी आणि जिंकिलें । देहबुद्धीनें ।' -दा १९.४.२६.

दाते शब्दकोश

कल्पना

स्त्री. १ मनःपटावर उमटलेलें चित्र किंवा तत्संबंधीं विचार. तत्त्ववेत्त्यांनीं या शब्दाचा पुष्कळ प्रकारें अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. -ज्ञाको. क १८०. एखादी गोष्ट करावी किंवा न करावी याबद्दल अंतःकरणांत जी विशेष वृत्ति उठते ती; विचार 'मना कल्पना ते नको विषयाची' -राम ५. २ योजना; युक्ति; शक्कल; तोड. 'त्या गुप्त कल्पना कोणास कळाव्या । कोणें येऊन आटोपाव्या ।' -दा १९.८.१८. ३ विवक्षित कार्यसिद्धीसाठीं बुद्धीनें योजलेला उपाय. ४ भावना; मनोवृत्ति; समज; ग्रह; कल्पित गोष्ट; मानसिक सृष्टि. ५ तर्क; अनुमान; भास. ६ उद्देश; बेत; हेतु. ७ संशय; शंका; अंदेशा; भय. 'कल्पनेची बाधा नहो कोणे काळीं । ही संत मंडळी सुखी असो ।' -तुगा. वेदशास्त्र संत चार कल्पना घेती साधुजन ।' -ऐपो ३८९. ८ गृहीत धरणें; मानणें; आधारभूत धरणें. 'उपासक उपासनेसाठीं ईश्वरी मूर्तत्वादि कल्पना करितात.' ९शब्द किंवा वाक्य जुळविण्यासाठीं मांडणी, करामत; गोष्टीची रचना; 'पदें जरी ठाऊक असलीं तरी वाक्याची कल्पना करण्यास बोलण्याचा अभ्यास पाहिजे.' १० कला; युक्ति; रहस्य (कल्पक योजनेचें) जुळविण्याची किंवा करण्याची योजना. ११ मनांत उठलेले तरंग; विचार- लहरी. [सं. क्लृप्] ॰पूरित -वि. कल्पनेचा भरपूर विलास असलेलें. 'पाखरास व हलत्या पिंपळ पानास -या कविता कल्पनापूरित आहेत.' -गोविंदाग्रज (हर्षेकृत). ॰बाज -वि. तर्क, अनुमान करण्यांत हुशार, वस्ताद; नवीन नवीन युक्त्या काढणारा; तर्कबाज; सुपीक डोक्याचा. [सं. कल्पना + फा. बाज] ॰रूप - वि. कल्पित; मानीव; कल्पनामात्र; अवास्तविक; ज्यांत खेर असें कांहींच नाहीं असें (प्रपंच, संसार, सुखदुःख, देह, संपत्ति, सृष्टि यांविषयीं योजतात). ॰वाद -पु. नवीन कल्पना, युक्त्या, सारणी, तर्क, तोड काढण्याची किंवा बांधण्याची शक्ति; कल्पना कर- ण्याचें मनाचें सामर्थ्य; बुद्धिसामर्थ्य; भावनेचा जोर. (इं.) आयडिआलिझम्. ॰शक्ति-स्त्री. शोधक बुद्धि; तर्कशक्ति; कल्पनेनें जाणण्याचें सामर्थ्य. ॰साहचर्य -न. (मानसशास्त्र) एखाद्या वस्तूचें प्रत्यक्ष ज्ञान झालें असतां त्यामुळें मागील अनुभवाचें स्मरण होतें ती क्रिया; हें साहचर्य तीन प्रकारचें आहे-सान्निध्य, साम्य, विरोध. -ज्ञाको. क १८०. [सं.] ॰सृष्टि -स्त्री. कल्पनेनें रेखाट- लेलें चित्र, वस्तु; वस्तुतः जागेवर पदार्थ नसतांहि अंतःकरणानें अनेक कल्पना करून स्वप्नमनोरथादिरूप रचिला जो प्रपंच ती; कविकल्पित, चमत्कारावह अद्भुत गोष्टी. ॰सृष्टिप्रिय-वि. कल्पनासृष्टींत रमणारा. (इं.) आयडियालिस्टिक. [सं.]

दाते शब्दकोश

कळा

स्त्री. १ कला या शब्दाचा सर्व अर्थी योजतात. 'कीं हे नाना कळांचे जीवन ।' -दा १.७.२. 'असो सकळ कळा प्रवीण । विद्यमात्र परीपूर्ण ।' -दा. २ किरण; प्रकाश. 'जैसें शारदीयेचे चंद्रकळे- । माजीं अमृत कण कोंवळे ।' -ज्ञा १.५६. ३ तेज. 'तैसें पिंडाचेनि आकारें । तें कळाचिकां अवतरे ।' -ज्ञा ६.२५०. 'जनविजन समान कळा । तेचि आपाद वन- माळा ।' -एरुस्व १.४१. ४ चंद्राचा १६ वा अंश; त्यावरून १६ ही संख्या. 'चंद्रमा कळीं धाला । न दिसे कोणे आंगीं वोसावला ।' -ज्ञा १५.३०३. 'चंद्रासि लागति कळा उपराग येतो ।' -र २. ५ मनस्थिति. 'काय भाव एक निवडूं निराळा । जाणसी तूं कळा अंतरींची ।' -तुगा १६१३. ६ देखावा; दशा. 'दावुनि वैराग्याची कळा । भोगी विषयांचा सोहळा ।' -तुगा २८३५. ७ युक्ति. 'कळा तुजपाशीं आमुचें जिवन । उचित करून देई आम्हां ।' -तुगा ९. ८ चातुर्य; करणी. 'पाव्यामाजीं रागज्ञान । केल्या अति मधुर गायन । तो पाव्याचा नव्हे गुण । कळा जाण गात्याची ।' -एभा १०.२६७. ज्याची कळा तोच जाण ।' -ऐपो १४४. ९ ज्ञान. 'कस्तूरीचा वास घेईल काऊळा । तरिच ती कळा कळे तया ।' -ब ९८. १० हालचाल; चलनवलन. 'शरिरांतुनिया प्राण गळाल्या लोपति सर्व कळा ।' -रत्न ४.३. ११ प्रकार. 'जेवीं माउली देखोनि डोळा । बालक नाचे नाना कळा ।' -एभा ३.५९९. [सं. कला] ॰जाणें -वि. (व.) अवनति होणें; दुर्मुखलेलें दिसणें. 'त्याच्या अठरा कारखान्याच्या गेल्या कळा ।-ऐपो १४२. ॰ईत-वि. कुशल; कलावान (मनुष्य). ॰कळी-स्त्री. मर्म; कौशल्य. 'तेआं जुंझाची कळाकळी । ते देशांचि वेगळी ।' -शिशु ८७९. ॰कांती -स्त्री. (शरीराची, चेहर्‍याची, देहाची) चमक; सतेजता; तेज; टवटवी. 'परम मळीण दिसती । कळाकांती नसे कांहीं ।' ॰कुशलता- कौशल्य-स्त्रीन. कसब व चातुर्य; नैपुण्य व करामत; शहाणपणा व बुद्धि. ॰कुसरी-स्त्री. १ (कुसरी हा शब्द लुप्त झाला असून बहुधा कला शब्दाबरोबर अधिक जोर येण्याकरितां योजितात) चातुर्याची कल्पना; युक्ति; करामत; कुशलतेची रचना; शहाणपणाची योजना. २ कौशल्य; कसब; कारागिरी (गाणें, चित्रकला इ॰ तील). 'पतिच्या संगावांचूनि सर्व स्त्रीच्या वृथा कळाकुसरी ।' -मो. ३ बारीक नक्षीकाम (जीगचें काम, भरतकाम इ॰). [अनेकवचन, कळा = कुशलता + कुसरी] ॰खाऊ-घाण-वि. १ एखाद्याच्या मोठेपणास, अब्रूस काळिमा आणणारा. २ जो दुसर्‍याला मूर्ख बनवितो, घोटाळ्यांत, गोत्यांत आणतो तो. 'घरीं कळाखाऊ अबळा नसावी अशी । अवघा वेळ रागामधीं नागीण धुसधुशी ।' -पला ८०. २ (व्यापक.) शोभा येण्यासाठीं, सौंदर्यासाठीं कोणतीहि गोष्ट केली असतां तिचा ज्यावर परिणाम होत नाहीं अशी व्यक्ति (विशेषतः स्त्रिया व मुलें); घाणेरडा; कळाहीन; मळकट; घाण. 'कळाखाऊ कपडे घालून जर गेलात तर काम कसें होईल? ॰तीन -स्त्री. (व.) कळावंतीण. ॰धर -वि. कलावान; पंडित; विद्वान्. 'जितुके कळाधर पृथ्वीवरी । जे जे आले शाहू नगरीं ।' -निमा (आत्मचरित्र) १.१०६. ॰निधि -पु. १ चंद्र. २ ज्याच्यापाशीं पुष्कळ कला आहेत असा. ॰न्यास -वि. अनेक कलाकौशल्यानें बनविलेलें; नक्षीदार. 'पांचा आंगोळियां विन्यास । कळान्यास मुद्रिका ।' -एरुस्व. १५.५३. ॰पात्र -वि. कळावान; कलावंत. 'विद्यापात्रें कळापात्रें । विशेष गुणांचीं सत्पात्रें ।' -दा १.८.२३. -न. कलावंतीण. 'तों सभेसी आलीं कळापात्रें । श्रीची लीला वर्णिती विचित्रें । त्या गौरविल्या राजीव- नेत्रें । वस्त्रें भूषणें देवोनियां ।' -ह २९.१५१. ॰वंत-वि. कलावंत पहा. ॰वती-वंती-वंतीण-स्त्री. कलावंतीण, कळवंतीण पहा. 'कळावती ते करी दरिद्र । कामिका पाश घालूनि ।' -दावि ४५१. ॰विद-वि. कलावान; कुशल. 'तें कळाविदीं आइकावी । अवधान देओनी ।' -शिशु ६५१. ॰विदपण -न. कुशलता. 'एथ कळाविदपण कळा ।' -ज्ञा २.३७. ॰सूत्र-न. कळसूत्र पहा. ॰सूत्राचा खेळ -पु. कळसूत्री बाहुल्यांचा खेळ. ॰सूत्राची बाहुली -स्त्रि. विशिष्ट प्रकारच्या दोर्‍यांनीं हालाणारी बाहुली. ॰सूत्री-वि. कळसूत्री पहा

दाते शब्दकोश

काम

पु. १ मदनविकार; संभोगेच्छा. 'या कारणें कामें । स्त्रीपुरुष युग्में ।' -ज्ञा १६.३१०. 'कामें हिरतल्या दृष्टी । धनुष्यें गळालीं पै मुष्टी ।' -एरुस्व ७.५५. २ मदन; कामदेव. 'जाळ गळ्यामधिं माळ कशाला व्याळ काम कोपला ।' -राला ८७. ३ इच्छा; स्पृहा; आकांक्षा. 'तुला राम सेवेविणें काम नाहीं ।' -वामन भरतभाव २३ ४ धर्म, अर्थ काम, मोक्ष या चार पुरुषार्थांतील तिसरा (विषयोपभोग). ५ (संस्कृत रचनेंत) आपल्या मना- प्रमाणें वर्तणारा. जसे:-कामवाद = वाटेल तें बोलणारा; कामभक्ष = इच्छेप्रमाणें खाणारा; कामचार = आवडेल तें करणारा इ॰ ६ (संस्कृत रचनेंत तुम् प्रत्ययांत रूपापुढें.) इच्छिणारा; वांछिणारा. जसें:- गंतुकाम = जाऊं इच्छिणारा; भोक्तुकाम = खाऊं इच्छिणारा इ॰ ७ इच्छा; लोभ. 'जे स्वर्गकामु मनीं धरिती ।' -ज्ञा २.२५०. 'करि काम निःकाम या राघवाचें ।' -राम ७७. (वाप्र.) ॰णें- इच्छा करणें. 'जेणें आत्मसुख कामिजे । पंडुकुमरा ।' -ज्ञा ४. १२४. 'त्वा कामिला मानसें ।' -निमा. सुभद्राचंपू ५.१२. 'मज कमाणे हा शुद्धकाम । ज्याचा आराम मज माजीं ।' -एभा ११.७४८. -माथ(थि)णें-कामविकारानें युक्त होणें. 'कामार्थी करिताति युद्ध आपुल्या जातींत कामाथिले ।' -निमा सुभद्राचंपू ६.४. (सामाशब्द) ॰कर-पु. मंदनाचा वेग. 'माया नियंता जो ईश्वर । तो कामकर निवारी ।' -एभा २६.१७८. ॰कळा- स्त्री. कामशास्त्र; कामाचा आवेग. 'हास्य विनोद कमकळा । हें ज्ञान नव्हे ।' -दा ५.५.२९. ॰कांति-स्त्री. मदनासारखी कांति; सुंदर वर्ण, रूप. 'कीं काम कांति धवळारें । काळरात्रीची ।' शिशु ९४६. ॰कारी-वि. मदनाचा वेग उत्पन्न करणारा. 'नसे अंतरीं कामकारी विकारी।' -राम ५०. ॰क्रोध- लोभादि-पुअव. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपूंबद्दल योजावयाचा संक्षेप. 'विकल पडतां प्राक्तन । स्वधर्मीं राहटे कीं मन । कामक्रोध शत्रु संपूर्ण । केले आधीन तुवां कीं ।' -पांप्र १५.१३०. 'परस्त्रीसीं काम निषिद्ध । ब्राह्मणा- वरी नसावा क्रोध । सुहृदयातीसीं मद । सहसाही न करावा ।' -पांप्र १५.१३३. 'सत्संग धरावा आधीं । नायकावी दुर्जनांची बुद्धी । कामक्रोधादिक वादी । दमवाबे निज पराक्रमें ।' -पांप्र ३९.२१. ॰गृह-न. स्त्रियांचें जननेंद्रिय. 'कामिनी कामगृहा- सक्ती । प्राणी प्राणातें स्वयें शिणवीती ।' -एभा ३.२४२. ॰ग्रस्त-पीडित-दग्ध-व्यथित-व्याकुळ-व्याप्त-वश- आकुल-आक्रांत-आतुर-अंध-आधीन-अन्वित-वि. मदन विकारानें क्षुब्ध झालेला (सर्व शब्द समानार्थक आहेत.) [सं.] ॰चेष्टा-स्त्री. शृंगारचेष्टा, क्रीडा; कामविकार उत्पन्न करणारे हावभाव, चाळे. 'कामचेष्टा करी तरळी । मधुर वचन बोलोनियां ।' [सं]. ॰ज्वर-पु. १ मदनाचा वेग. २ मदन- पीडेनें झालेला संताप. ॰ट-वि. मदनानें व्याप्त. 'शिश्न कामट मातलें ।' -गीता २.५०६१. ॰थाळोरें-रोळें-वृषण; अंड- कुली. 'कामथाळोरां पुसाटीं । घालुनि पडे ।' -एभा १४.३८२. [काम + थारोळें] ॰देव-मदन. ॰धेनु-स्त्री. १ (पौराणिक) इच्छिलेली वस्तु तात्काळ देणारी स्वर्गांतील एक गाय. २ (ल.) नेहमीं उपयोगी पडणारा धनी; नानाप्रकारचा हिकमती नोकर; अति- शय उत्पन्न येणारें शेत, झाड; नानाप्रकारचे विषय ज्यांत नमूद केले आहेत असें पुस्तक. 'मना राम कल्पतरु कामधेनु' -राम ६०. 'जयातें कामधेनु माये । तयासि अप्राप्त कांहीं आहे ।' -ज्ञा १.७९. २ पुष्कळ ठिकाणीं उपयोगी पडणारें वस्त्र, वस्तु, पदार्थ. ३ सर्वांना उपयोगी पडणारा माणूस. ४ (ल.) भिक्षा मागण्याची झोळी. (क्रि॰ लाभणें.) ॰निक-न. मनांत कांहीं इच्छा धरून केलेलें व्रत. -वि. इष्ट; आवडण्यासारखें (काम- धंदा). [सं.] ॰पिसा-वि. मदनविकारानें व्याप्त झालेला. 'तया कामपीसा धरी कंठनाळीं ।' -दावि २४३. ॰प्रकोप-पु. कामविकाराचा क्षोभ. [सं.] ॰बाज-वि. विषयासक्त; स्त्रीलंपट; बाहेरख्याली; रंडीबाज. ॰भक्ति-स्त्री. मनांत इच्छा धरून केलेली भक्ति, उपासना; याच्या उलट भावभक्ति. [सं.] ॰मगरमिठी- स्त्री. मदनरूपी मगरानें घातलेली मिठी; तीव्र संभोगेच्छा. ॰मरण- न. इच्छामरण; वाटेल तेव्हां स्वतःला मृत्यु आणण्याची शक्ति. [सं.] ॰मरणी-वि. इच्छामरणी. [सं.] ॰रमण-वि. स्वेच्छेनें विहार करणारा. 'जो सकळ मंगळां मंगळ पूर्ण । जो कां गोकुळीं कामरमण।' -एभा १. २३९. ॰रूप-न. १ इच्छेप्रमाणें धारण करतां येणारें रूप. २ एक देश (आसाममध्यें). -वि. १ इच्छेप्रमाणें रूप धारण करणारा. २ सुंदर; मनोहर; रमणीय; ज्याचें मदनासारखें रूप आहे असा. ॰रूपि-वि. कामरूप (वि.) पहा. ॰शास्त्र- रतिशास्त्र; कोकशास्त्र; स्त्री-पुरुष संभोगाची इतिकर्तव्यता ज्यांत सांगितली आहे तें शास्त्र; शृंगारशास्त्र; स्त्रीपुरुषप्रेमविषयक शास्त्र. [सं.] ॰सदन-स्थान-न. जननेंद्रिय; योनि; उपस्थ. कामांतक-पु. मदनाचा नाश करणारा; शंकर. -मातुर-वि. मैथुनेच्छेनें विव्हळ झालेला-ली. 'जाणितला तिहीं कामातुर नारी । कृष्णभोगावरि चित्त ज्यांचें ।' -अमृत (शुक्रचरित्र) २५. -मानल-ळ-पु. मदनाचा दाह; कामविकाराचा संताप. 'मी कामानळें करून । गेले आहळोन प्राणपती ।' [सं.] -मारी-पु. कामांतक पहा. 'त्या प्रभुयशासि मानी अमृताचें पूर्ण ताट कामारी।' -मो परंतु रामायण. -मालय-कामसदन पहा.

दाते शब्दकोश

दाटणें

अक्रि. १ (द्रव पदार्थ इ॰) घट्ट, दाट होणें; (तांदूळ, साबुदाणा इ॰ शिजतांना) घन, दाट होणें; आवळणें. २ (लहान भांड्यांत भात, साबुदाणा इ॰ शिजतांना) अडचणणें; अडचणल्या- मुळें टणक होणें. ३ गर्दी, चेपाचेप होणें; चिमटणें; खेटणें. 'दैत्यां दानवांचिआं लोथां । दाटला वसुंधरेचा माथा ।' -शिशु १४७. -ज्ञा ९.२१६. 'तेयापासोनि पातकें जेतुलीं । संसारा लोकासी घडली । तीं येतुकीं दाटलीं । तुझ्या अंगीं ।' -ख्रिपु २.४९.१३३. ४ (अंगरखा इ॰ अंगाला) तंग, घट्ट, आवळ होणें; चिकटून बसणें; (लहान जागेंत मोठा पदार्थ समाविष्ट झाल्यामुळें तो त्या जागेंत) गच्च बसणें; अडचणणें. 'ह्या छिद्रांत ही खुंटी दाटते.' ५ भारानें दडपलें, दाबलें जाणें. 'तरी सांगें कां न दाटिजे । धनुर्धरा ।' -ज्ञा ३.१७७. ६ भिणें. 'जरी चोरां सभा दाटे । अथवा मीना गळु घोटे ।' -ज्ञा ७.९४. ७ (ल.) (आनंद, राग, शोक इ॰ भावना अनिवार झाल्यानें गळा, हृदय इ॰) भरून येणें; सग्ददित होणें; कोंडला जाणें. 'प्रेम-शोक दाटणें' 'कंठ दाटणें.' ८ (गर्व इ॰ कानें) फुगणें; ताठणें; भरणें; चढणें. 'जे होते बळवंत आपण असों ऐशा मदें दाटले ।' -मोकृष्ण ५८.२५. ९ भरून जाणें; व्याप्त होणें; व्यापून असणें. 'कीं ब्रह्मगोल वाटे विशिखांहीं दाटला तडा खातो ।' -मोभीष्म ६.४६. १० अडकणें; अडकून पडणें. 'स्थळीं नावा जिया दाटिजे । जळीं तयांचि जेवीं तरिजे ।' -ज्ञा १७.३६६. ११ (व.) भोसडणें; खरड काढणें; धमकावणें. १२ चिकटून बसणें. 'लेंकुरुवें बापातें दाटिती । दादिया हलो नेदिती ।' -ख्रिपु २.४२.६०. -सक्रि. १ (महानु.) पुसणें; पुसून स्वच्छ करणें; परिमार्जणें 'चंदनें श्रीकर उल्लाळिले । वरि उष्णोदकें प्रक्षाळिले । सवेंचि निर्मळा आंचळें दाटिले । सेवकजनीं ।' -ॠ ८४. २ दाबणें; दडपणें. 'दाटिजो पां परि भारें । चित्त न दटे ।' -ज्ञा ६.३६९. ३ खुपसणें; जोरानें आंत शिरकविणें. 'नाहें नावडोनि कांहीं । कामादिकांच्याचि ठायीं । दाटिली जेणें डोई । आत्मचोरें ।' -ज्ञा १६.४४५. [दाट; का. दट्ट, दट्टिसु] दाटून-क्रिवि. १ मुद्दाम; बळेंच; जाणूनबुजून; बुद्धि- पुरस्सर. २ (ल.) खोटेपणानें. काव्यांत दटुनि असेंहि रूप येतें. 'म्या त्याचें कांहीं केलें नसतां त्यानें दाटुन कज्जा काढिला.' ३ उगाच; निष्कारण; विनाकारण. 'देव म्हणे राया तूं दाटुनि धरितोसि कां विषादास ।' -मोभीष्म ११.८. ४ (व.) धमकावून; धाकदप- टशानें. दाटदुपट-स्त्री. (ना.) धाकदपटशा. दाटबळें-क्रिवि. मुद्दाम; बळेंच; जबरीनें; दाटून पहा. [दाटणें + बळ] दाटोदाटीं- क्रिवि. १ बळेंच; सक्तीनें; जबरदस्तीनें. 'रामायण लिहावयासाठीं । श्रीरामें पुरविली पाठी । श्रीराम संचरोनि पोटीं । दाटोदाटीं लिह- वित ।' -भारा किष्किंधा १.९. २ उत्सुकतेनें; उत्कंठित होऊन. 'मम अधरामृताची वाटी । बळें लावितसे वोठीं ।जो न घे दाटो- दाटी । अमृतासाठीं जो न ये ।' -मुरंशु २४९. ३ गर्दीनें; जोरानें; त्वरेनें. 'लग्न लागलियापाठीं । कायसी यादवांची गोष्टी । कार्य करूं दाटोदाटी । आम्ही जगजेठीं । असतां ।' -एरुस्व ६.३५.

दाते शब्दकोश

सिद्ध

पु. १ ईश्वरप्रेरित ग्रंथकार, लेखक. उदा॰ व्यास. २ भूत-भविष्य-वर्तमानाचें ज्ञान असलेला; द्रष्टा; साधु. ३ आणि मादि सिद्धी प्राप्त झालेली; योगी. ४ मुक्त पुरुष. -दा ५.१०. १०. ५ एक उपदेवांचा वर्ग व त्यांतील व्यक्ति. 'येर सुरसिद्ध किन्नर ।' -ज्ञा ११.५०.६. ६ (ज्यो.) एकविसावा योग. [सं.] -वि. १ संपविलेलें; पुरें केलेलें. २ स्थापित केलेलें; सत्य म्हणून दाखवून दिलेलें; पुराव्यानें खरें केलेलें; प्रस्थापित. ३ निकाल केलेलें; तोडलेलें (भांडण, खटला) ४ बनविलेला; तयार केलेला; रचलेला (नियम, घटना, कायदा). ५ पकविलेलें; शिजविलेलें. (अन्न). 'जैसी सिद्धसाध्य भोजनीं । तृप्ती एकी ।' -ज्ञा ३. ३८. ६ घेण्याजोगें; तयार केलेलें (घोटून, द्रव्यें मिसळून- औषध). ७ तयार ठेवलेला, असलेला (कामास योजावयाचा माणूस, जनावर इ॰); मुद्दाम खोळंबला, वाट पहात अस- लेला; राखून ठेवलेला; सज्ज; तयार. ८ कुशल; निष्णात. ९ शाबूत; धडधाकट 'जंव हें सकळ सिद्ध आहे । हात चाला- वया पाय ।' -तुगा ७२९. १० प्रत्यक्ष; मूर्तिमंत 'जरी प्रकटे सिद्ध सरस्वती । तरी मुका आथी भारती ।' -ज्ञा १.७८.११ अकृत्रिम; सहज असणारा. 'नित्यसिद्ध परमशुद्ध माझें स्वरुप शुद्ध जाणती ।' -एभा ११.११२७. १२ पूर्णावस्था प्राप्त झालेले. 'वांचोनि कर्मारंभ उचित । न करितांचि कां सिद्धवत । -ज्ञा ३.४५. १३ (व्या.) गुणधर्मयुक्त; मूर्त. याच्या उलट साधित = अमूर्त. १४ (भाषा.) मूळ; अव्युत्पन्न (शब्द). याच्या उलट साधित शब्द. (समासांत) (सिद्ध शब्द उत्तरपदीं असतांना) -अनुभव-उपाधि-औषधी-क्रिया-न्याय-लोक- व्याकरण-स्वभाव-सिद्ध. ऊन प्रत्ययांत धातुसाधितांपुढे नेहेमीं हा शब्द येतो. उदा॰ करून-भोगून-शिकून सिद्ध. (वाप्र.) सर्वसिद्ध आणि चुलीस पोतेरें-तयारी होण्याच्या फार आधीं तयारी झाल्याचें सांगणाराबद्दल वापरतात. ॰तत्त्व-न. ब्रह्म. ॰ता-स्त्री. तयारी; सर्व सिद्ध असणें. ॰पादुका-स्त्रीअव. ज्या पायांत घातल्यानें वाटेल तिकडे जाण्याची शक्ति प्राप्त होते अशा पादुका. 'करवीर क्षेत्रीं दत्तात्रयें सिद्धपादुका ।' -सप्र ३.२०. ॰पुरुष-पु. १ अणिमादि सिद्धी प्राप्त झालेला; योगी; मांत्रिक. २ ब्रह्मस्वरूपीं विलीन झालेला. ॰प्रज्ञा-स्त्री. पूर्वजन्मांतली या जन्मीं मिळणारी बुद्धि. 'तिये सिद्धप्रज्ञेचेनि लाभे । मनाचि सारस्वतातें दुभे ।' -ज्ञा ६.४५४. ॰मौळी-वि. श्रेष्ठ सिद्ध पुरूष. 'जयजयाजी सिद्धमौळी ।' -गुच २०.२. [सिद्धी + मौली] ॰योग-पु. बाळहिरडे आणि जिरें यांचें चूर्ण. हें अतिसारांत तांदुळाच्या धुवणांतून घेतात. -योर १.४१५. ॰रस-पु. १ अमृत. 'कुंकमाचें भरींव । सिद्धरसाचें वोतींव ।' -ज्ञा ६.२५५. २ पारा. ॰लाडू-पु. संकष्टी चतुर्थींस कणकेच्या उकडीचे केलेले लाडू; मुटकुळीं. -ह ८.१६. ॰वट-पु. कामना पूर्ण करणारा वड. 'त्या सिद्धवटा सावित्री संपूर्ण । सीता देखून नवस करी ।' ॰वत्-क्रिवि. सिद्ध झाल्याप्रमाणें; गृहीत धरून. 'एका विष- याचा वाद पडल्यास इतर विषय सिद्धवत् घ्यावे लागतात.' -वि. (शाप.) गृहीत; खरें मानून चाललेलें. 'सिद्धवत् पदें.' (इं.) पॉस्चुलेट्स. [सं.] ॰साधक-पु. अव. एकाच कपटकारस्थानां- तील मंडळी. आपलें ऐक्य बाहेर समजूं न देतां, संगनमतानें दुसर्‍याला फसविण्यासाठी एकमेकांचा पुरस्कार करणारे (एकानें सिद्ध पुरुष बनावयाचें व दुसर्‍यानें त्याचें स्तोम माजवावयाचें) [सिद्ध + साधक] ॰साधन-न. १ सिद्धीचे अद्भुत चमत्कार दाखविणें; जादू; किमया. २ सिद्ध असलेली वस्तु पुन्हां सिद्ध करण्यास लागणें. तर्कशास्त्रांत हा एक दोष मानला जातो. 'तूं चोर आहेस असें चोरालाच म्हटलें असतां सिद्धसाधन दोष होतो.' ॰स्थाली-स्त्री. पाहिजे तें अन्न पाहिजे तेंव्हा विपुल निघावें अशी (कोणी सिद्ध पुरूषानें दिलेली) थाळी, पात्र. सिद्धणें- क्रि. १ सिद्ध करणें. 'तुलदाइयां बैलां सिद्धंवै ।' -पाटणशिलालेख शके ११२८. २ सिद्धीस जाणें 'मोक्षमूल कृपाजीवन । जेणें सिद्धे ।' -ज्ञाप्र ६१. सिद्धाई-स्त्री. १ चमत्कार; सिद्धसाधन. २ दैवी शक्ति प्राप्त होणें. सिद्धि पहा. सिद्धानुवाद-पु. सिद्ध गोष्टीचें वर्णन 'तरी सिद्धानुवाद लाहों । आवडी करुं ।' -अमृ १०.१२. [सिद्ध + अनुवाद] सिद्धान्न-न शिजणें, इ॰ संस्का- रानें सिद्ध झालेलें अन्न; तयार, खाण्यालायक अन्न [सिद्ध + अन्न] सिद्धार्थ-वि. १ ज्याचा उद्देश, मनोरथ सिद्धीस गेला आहे असा. २ गौतमबुद्ध [सिद्ध + अर्थ] सिद्धार्थी-पु. त्रेपन्नावा संवत्सर. सिद्धावस्था-स्त्री. जीवन्मुक्तावस्था; ब्राह्मी- स्थिति. -गीर ३६७. [सिद्ध + अवस्था] सिध्दाश्रम-पु. १ सिद्धावस्थेस पोंचलेल्या मुनीचा आश्चम. 'जावें सिद्धाश्रमातें ।' -रावि ७.१०. २ हिमालयांतील नरनारायणाश्रम. 'सिद्धाश्र- मासि पावे विश्व जया सिद्ध सादना गाते ।' -मो उद्योग ८.२७. [सिद्ध + आश्रम] सिद्धासन-न योगासनाचा एक प्रकार. कामवासना नाहींशी करण्याला याचा उपयोग होतो. -संयोग ३२३. [सिद्ध + आसन] सिद्धि-स्त्री. १ दैवी शक्ति; अणिमा इ॰ अष्टमहासिद्धी. 'देखें विषय हे तैसे । पावती सिद्धि चेनि मिषें ।' -ज्ञा २.३१३. २ आश्चयकारक, अपूर्व सामर्थ्य, कौशल्य ३ तपश्चर्येचें किंवा देवता भक्तीचें फल. ४ परिपूर्णता; समाप्ति; संपादन; उद्दिष्ट साध्य होणें. 'तें मनोरथ संगें नव्हे । एर्‍हवीं सिद्धि गेलेंचि आहे ।' -ज्ञा १३.१३३. ५ पुराव्यानें स्थापना, संस्थिति; प्रस्थापित होणें (मुद्दा, बाजू, आरोप इ॰). शाबिती. 'अंतःकरणही अनादि । प्रवाहरूपें त्याची सिद्धी ।' -एभा १३.२४५. ६ निर्णय; निकाल; तडजोड (भांडण, खटलें इ॰ ची). ७ घटना; बनावणी; मांडणी (कायदा, नियम, इ॰ ची). ८ सिद्धता; तयारी; (अन्न, औषध इ॰ ची) ९ सज्ज असणें (बदली किंवा इतर काम करण्यास माणूस, जनावर इ॰). १० कौशल्य; नैपुण्य; वाकबकारी (योगसामर्थ्य, किमया इ॰ त). ११ मुक्ति; ब्रह्मस्थिति; निर्वाण. 'तैसें न होणें निपजे । तें नैष्कर्म्य सिद्ध जाणिजे । सर्व सिद्धींत सहजें । परम हेंचि ।' -ज्ञा १८. ९८०. १२ यश; विजय, उत्कर्ष. १३ सामग्री; साहित्य. 'घरीं त्याच्या आहे सर्व सिद्धी ।' -रामदासी २.११८.१२ [सं.] सिद्धीस-आणणें-नेणें-पुरें करणें; तडीस नेणें; यशस्वी रीतीनें पुरें होणें, तडीस जाणें. ॰स्थान-न. मूळ ठिकाण.

दाते शब्दकोश

माया

स्त्री. १ सृष्टि निर्माण करण्यास साधनीभूत अशी ईश्वरशक्ति. 'इंद्रो मायाभिः पुरुरूप ईयते' = इंद्र आपल्या मायेनें अनेक रूपें धारण करतो.' -ऋग्वे ६.४७.१८. -गीर २२१. २ सृष्टिप्रपंच; नामरूपात्मक जगत्; जग हें अमूर्त, नित्य, अद्वि- तीय अशा ब्रह्मतत्त्वापासून उत्पन्न झालें असतां तें द्रव्यमय व भिन्नस्थिति आहे अशी त्याच्या स्वरूपाची ऐंद्रजालिकता. पुराणांत मायेवर चेतनधर्मारोप करून तिला स्त्री व ब्रह्म्याची सहधर्म- चारिणी आणि चुकीनें सृष्टीची रचना व विस्तार मानिलें आहे. ३ कपट; कृत्रिम गारूड; ऐंद्रजाल; मोह घालणारी ईश्वराची शक्ति. 'हे आदिपुरुळाची माया ।' -ज्ञा १.२०३. ४ अवस्तूच्या ठायीं वस्तुत्वबुद्धि; मिथ्या कल्पना; अवस्तूच्या ठिकाणी वस्तुत्वाचा भास; खोटा भ्रम. 'पैल जळ हे माया ।' -ज्ञा १३.१०३०. 'तैसी हे जाण माया ।' -ज्ञा २.१४०. ५ नाशवंत रूप. 'म्हणून विकारी किंवा नाशवंत नामरूपासच माया ही संज्ञा देऊन...' -गार २१७. ६ अविद्या; अज्ञान. 'तैसा विश्वस्वप्रेंसी माया । नीद सांडूनि धनंजया ।' -ज्ञा १८.४०५. ७ स्नेह; प्रेम; ममता. 'तेंवि करिल काय माय मायेतें?' -मोअनुशासन ४.३५. ८ दया; करूणा; अनुकंपा. ९ भांग. [सं.] म्ह॰ माया वेडी गू फेडी = काम कितीहि किळसवाणें, नीच असो, तें करण्यास माया प्रवृत्त करते. (वाप्र.) ॰निवारणें-मायेचें पटल घालविणें, दूर करणें. 'कृपादृष्टीनें पाहसी जया । तयाची माया निवारसी ।' ॰सांख- ळणें-अति प्रेम करणें; अपुर्वाई करणें. मायेक गेल, सेवेक चुकलें-(गो.) माया करायला दुसरीकडे गेलें पण त्यामुळें कर्तव्य चुकल्यें. मायेचें तोंड खालीं-निराळें-माया, ममता ही वरपांगी, दिखाऊ नसून, ती प्रकट होण्यापेक्षां अप्रकट रहा- ण्यांतच विशेष आहे; ममता नम्र असते. मायेंत अटकणें- घोंटाळणें-पडणें-फसणें; मायेनें गुंतणें-गोवणें-गुंडा- ळणें-प्रपंचाच्या फेऱ्यांत सापडणें; प्रवृत्तीमार्ग चालविणें. मायेन मगाळणें-(कु.) द्रव, पाझर फुटणें. सामाशब्द- ॰चक्र-न. माये- प्रमाणें मानलेलें पांचभौतिक जग. 'जय जय मायाचक्रचालका ।' [सं. माया + चक्र] ॰जाल(ळ), मायापाश-नपु. १ जग हें पांचभौतिक असून ब्रह्माहून भिन्न आहे असा विश्वास उत्पन्न करणारें, बुद्धि व इंद्रियें यांवर टाकलेलें मायेंचे जाळें. २ मोह. [सं.] ॰तीत-वि. मायाशक्तीच्या पलीकडे गेलेला (सत्पुरुष, ईश्वर). [सं. माया + अतीत] ॰पटल-पडळ-न. मायेचें घुंगट, आच्छा- दन; जग हें वस्तुतः ब्रह्मच असतांना त्यास भिन्न सत्ता आहे असें भासविणारा मायेनें जगास दिलेला आकार व छटा. [सं. माया + पटल] ॰पुर-न. (ल.) शरीर. ॰ब्रह्म-न. मायावेष्टित ब्रह्म. [सं. माया + ब्रह्म] ॰भान-न. मायेचा भ्रम, झापड. 'निरो- पिलें ब्रह्मज्ञान । जेणें तुटे मायाभान ।' -दा ७.१.६१. [सं.] ॰ममता-स्त्री. दया; माया; स्नेह; प्रीति. ॰मय-वि. मायारूप; मायेनें कल्पित. 'मायामय जग सारें अवघे दोन दिवसांचे वारे ।' [सं.] ॰मयविकार-पुअव. प्रापंचिक बदल; रूपांतरें; घडामोड व स्थित्यंतरें होणारा प्रपंच. 'नव्हते मायामय विकार । तेथें झाला स्फुरणगजर ।' ॰रूपी-वि. १ मायिक; फसवणारें रूप, मुद्रा, आकार असलेला. २ कृत्रिम; बाहेरून सुरेख पण आंतून नीच, वाईट; आंत एक बाहेर एक अशा स्वभावाचा (मनुष्य, सचेतन पदार्थ). [सं.] ॰लांघव-न. जगत् हें ब्रह्म- विस्तार नव्हे तर द्रव्यात्मक सृष्टि आहे अशी मनुष्याची वंचना करण्यांत दिसून येणारें मायेचें कौशल्य; अवस्तूच्या ठिकाणीं वस्तुत्वबुद्धि उत्पन्न करणारें मायेचें कौशल्य. [सं.] मायालु- ळू-वि. १ ममताळू; प्रेमळ. २ (ल.) जादुगार. [सं.] ॰वंत- वि. मायामय. ॰वाद-पु. सर्व बाह्य जग असत्, मायारूप असून या जगाच्या बुडाशीं असणारें ब्रह्मतत्व तेवढेंच सत् आहे असें प्रति- पादणारें मत. मायावादाचा पुरस्कार मुख्यत्वें अद्वैतमतवाद्यांनीं केलेला आहे [सं.] ॰वान्-वंत-वि. मायिक (जगत, सर्व दृश्य विषय.) [सं.] मायावी-वि. १ मांत्रिक; गारुडी. २ मायेचा नियंता (जगांत दिसणाऱ्या त्याच्या अद्भुत कौशला- वरून ईश्वरास म्हणतात). ३ खोटा; वरपंगी; कपटी; लबाड (भाषण, वर्तन, मनुष्य). 'हे अविद्या तरी मायावी ।' -अमृ ६.४३. [सं. माया + विन्(प्रत्यय)] ॰वेष-पु. मायिक देह. 'कीं लेउनि माया- मेषींचें लेणें ।' -ऋ ५. मायाळी-स्त्री. प्रेमळ स्त्री. 'तंव कोणी मायाळी रुदंतीसी ।' -दावि ११५. मायि(यी)क-वि. १ ऐंद्रजालिक; मायेनें रचिलेला. २ जगत् हें वस्ततः अमूर्त आणि ब्रह्मस्वरूप असतां तें पांचभौतिक व सृष्ट आहें असें भासवून वंचना करणारा (जग, जडसृष्टि). ३ खोटा; लटका; असत्य; पोकळ. जसें- मायिक कारभार-धंदा-सुख-दुःख-संपत्ति-दरिद्र-बोलणें- रडणें-करणें. 'आणिक नलगे मायिक पदार्थ ।' -तुगा १०७०. ४ माया करणारा. 'यापरी महीतें मायिक । कोणी नसें मज- लागी ।' -नव २४१६६. [सं. माया + इक (प्रत्यय)] मायि- कवृत्ति-स्त्री. वंचितवृत्ति, स्थिति; जडाच्या ठिकाणीं भासणारें सत्यत्व, सृष्टिभिन्नता, ब्रह्म व माया यांच्या ऐक्यत्वाविषयीं भ्रम. 'मायिकवृत्तींचा झणी धरिसी संग । इंद्रियाचा पांग सांडी रया ।' [सं.] मायेक-वि. मायावी, खोटें. -शर. [मायिक] मायेचा अवतार, मायाअवतार-पु. परमेश्वराचा मायिक अवतार (ईश्वराचे सर्व अवतार. कारण आत्मज्ञान लसलेल्या व मूढ अशा माणसात मात्र हे अवतार खरें भासतात). मायेचा गोंधळ- पु. प्रपंच; संसार. मायेचा पदर-पु. प्रेमाचें बंधन बाळगणारा मनुष्य (पुत्र, भाऊ, बांधव, आई, बाप इ॰). मायेचा पदार्थ- मनुष्य-माणूस-पु. स्नेह, प्रीति असलेला मनुष्य.

दाते शब्दकोश

भेद

पु. १ विभागणें; वेगळे करणें; गट्टी फोडणें; विभक्त करणें. (क्रि॰ करणें). २ विभागलेली, वेगळेपणाची स्थिति. ३ अलग होणें; वेगळेपणा; पृथक्पणा; भिन्नता. 'शिळा स्फटिकाची न पालटे भेदें । दाऊनियां धंदें जैसी तैसी ।' -तुगा १३. ४ फरक; अंतर; दुजा भाव. 'तुज मज जननी हा सर्वथा भेद नाहीं ।' -सारुह २.१०४. ५ फरक करणें; वेगळेपणा करणें; भिन्नता करणें; दुजाभाव. (क्रि॰ करणें). ६ वर्ग; जाति; प्रकार; विभाग; तर्‍हा. 'जरी वेदें बहुत बोलिलें । विविध भेद सूचिले ।' -ज्ञा २.२६०. ७ मतभिन्नतेमुळें आलेलें वितुष्ट; बेबनाव; फाटाफूट; विरोध. 'त्यांतील एक फुटकी कवडी । भेदू पाडी सुहृदांसी ।' -एभा २३.३५४. ८ वैर; स्नेह नाहींसा करणें; शत्रूस जिंकण्याच्या चार प्रकारापैकीं एक. साम, दाम, दंड पहा. ९ एखाद्या गोष्टीपासून परावृत्त होणें, माघार घेणें; मन इ॰ त झालेला बदल, पालट. 'हा चाकरीस कबूल झाला होता तुम्ही ह्याचा भेद केला म्हणून राहीनासा झाला.' १० गुप्त बातमी; रहस्य; फितूरी. 'दिल्लीचा भेद झाडून मजपाशीं आहे.' -भाब २५. ११ (तत्वज्ञान) फरक; वेगळेपणा; भिन्नता. ह्याचे तीन प्रकार आहेत- स्वगतभेद (उदा॰ आंब्याच्या पानांशीं मंजरी भिन्न आहे); सजातीयभेद (उदा॰ आमवृक्ष हा बकु- लाशीं भिन्न आहे); विजातीय भेद (उदा॰ वृक्ष हा दगडाशीं भिन्न आहे). 'विजातीय भेद ते ठायीं । नसे सजातीय भेदू कांहीं । स्वगतभेदू तोही नाहीं । भेदशून्य पाहीं ये रीतीं ।' -एभा ९.१९२. १२ (व्या.) कर्ता कांहीं क्रिया स्वतः करतो किंवा दुसर्‍याकडून करवितो किंवा ती क्रिया करण्याचें कर्त्याला सामर्थ्य आहे हे अर्थ दाखविणारी क्रियापदाच्या रूपांत केली जाते ती भिन्नता. ह्याचे मूळरूप, प्रयोजक व शक्य असे तीन प्रकार आहेत. [सं. भिद् = फोडणें] ॰अर्थ, भेदार्थ-पु. दुसरा हेतु; खरें लपवून दुसरेंच सांगणें. 'तरी तुम्हास भेद अर्थ कासयास दावितें ।' -कचेसुच ५. ॰त्रय- त्रितय-न. भेद अर्थ ११ पहा. तैसा मी पूर्ण पुरातन भेदत्रय नाहीं ।' -देप १०४. [सं.] ॰दृष्टि-बुद्धि-स्त्री. (हें माझें हें दुसर्‍याचें, कार्य निराळें, कारण निराळें इ॰ रूप) दृष्टीची भिन्नता; निराळेपणा. [सं.] ॰प्रत्यय-बुद्धि-पुस्त्री. १ ब्रह्मापासून सृष्टि अगदीं स्वतंत्र आहे असा विश्वास, मत; द्वैतवाद. २ भेददृष्टि पहा. [सं.] ॰भाव-पु. भिन्नत्वाची बुद्धि; परकेपणाची भावना. 'मग ते पाषाण सहसाही । भेद- भाव न धरिती ।' ॰युति-योग-स्त्रीपु. (ज्यो.) योगांत सूर्य व खस्थ पदार्थ ह्यांमधील दक्षिणोत्तर विवर त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजेपेक्षां कमी असलें म्हणजे त्या खस्ताचें बिंब सूर्यबिंबाच्या आड येतें असा योग. -सूर्य २४. ॰वाद-पु. परमात्मा आणि विश्व भिन्न आहेत असें तत्त्व किंवा त्याचें समर्थन; द्वैतवाद. [सं.] ॰वादी-पु. भेदवादाचें समर्थन करणारा; द्वैतवादी. भेदक-न. (कों.) सुपारीचें खांड. -वि. भेद करणारा; विभक्त, पृथक् करणारा. 'दक्ष धूर्त योग्य तार्किक । सत्य साहित्य नेमक भेदक ।' -दा २.८.१३. [सं.] भेदणें-सक्रि. १ विभागणें; विभक्त करणें; वेगळें करणें (शब्दशः व ल). 'मग भेदिलें गुणीं तिहीं ।' -ज्ञा १७.१९१. २ छेदणें; फोडणें; कोरणें. 'जैसा भ्रमर भेदी कोडें । भलतैसें काष्ठ कोरडें ।' -ज्ञा १.२०१. ३ फरक; दुजा भाव करणें. ४ (औषध, विष इ॰ शरीरांत) भिनणें; जिरणें; मिसळणें. ५ आपल्या पक्षाकडे वळविणें; बुद्धिभेद करणें; फितूर करणें. 'तुज भेदिलें परांनी स्पष्ट म्हणुनि बोलसी असें खोटें ।' -मोकर्ण २७.४७. ६ मारणें. 'त्यासमयीं रघुराजें धरिला भेदावया शर क्षितिला ।' -मोमंत्ररा उत्तर कांड ३७०. ७ टोंचणें. 'चापच्छेदी भेदी मर्मीं निर्मी घडींत शतमाया ।' -मोभीष्म ८.२३. भेदन-न. भिन्न, वेगळें करणें; पृथक् करणें. [सं.] भेदनीय-वि. विभक्त, वेगळें, पृथक् करण्यास योग्य, लायक. [सं.] भेदाभेद-पु. भिन्नभाव; भेदभाव; भिन्नता; फरक. 'ब्रह्मस्वरूपीं कांहीं भेदाभेद नाहीं ।' [भेद + अभेद किंवा भेद; द्वि.] भेदि(दी) क-वि. हृदयापर्यंत खोल जाऊन पोंचणारें (वेदांतपर व गूढ अर्थाचें गाणें, पोवाडा, लावणी इ॰). 'टाळ, वीणा, पखवाजावर गोड भजन करावें अथवा भेदिक लावण्या गाव्या...' -खेया ५७. भेदित-वि. विभागलेलें; भिन्न, वेगळें, विभक्त केलेलें. [सं.] भेदी- भेद्या-पु. १ गुह्य, मर्म, अंतस्थ गोष्टी जाणणारा (राज्य, स्थळ, कामधंदा इ॰ च्या). २ असल्या गुह्य गोष्टी फोडणारा; भेद करणारा; फितुरी. 'आधीच शहर खाली आणि नजीबखाना तो केवळ भेद्या.' -भाब २६. भेद्य-वि. भेदावयास योग्य, शक्य; फोडण्या- सारखा; विभागण्यासारखा. [सं.]

दाते शब्दकोश

फेर

पु. १ रंगण; वर्तुलाकार, दौड करीत किंवा इकडे तिकडे फिरणें (घोड्यानें); फेरफटका. (क्रि॰ धरणें; घालणें). २ फरक; भिन्नता; असमानता. ३ भेद; विसंगतपणा तफावत; अंतर ४ (आजार, मनाची स्थिति किंवा वृत्ति इ॰ मध्यें पडलेला) फरक; बदल; पालट. (क्रि॰ पडणें;घेणें) 'त्याचे तापाला फेर पडला.' ५ वांक; वळण; बांक. (रस्ता, काठी इ॰ चा). ६ गाण्यांत निर- निराळे स्वरभेद, खाचखोचा दाखविण्याची शक्ति. 'त्याचे गळ्यांत फेर चांगला आहे.' ७ परीघ (वर्तुळाचा). ८ घेर; घोळ; कांठ (परकर, अंगरखा इ॰ चा). ९ रंगण धरून गाणें व नाचणें. (नागपंच- मीस बायका फेर धरतात तसा). (क्रि॰ धरणें; घालणें; घेणें). १० (राजा.) फेरा; सभोंवती वेष्टणें; वाटोळें गुंडाळणें; वळसा; विळखा; वळ; पीळ (दोरीचा, कापडाचा-काठीभोंवती, स्वतःभोवतीं). ११ बकर्‍याच्या पोटांतील एक भाग. -क्रिवि. पुनः; परत; माघारी. [दे. प्रा. फिरं, फेरण; हिंफेर] (वाप्र.) ॰उलटणें-(चांभारी) उलटा शिवलेला जोडा सुलट करणें. ॰घेऊन मुतणें-वाईटपणांत (शिकवणीवर) ताण करणें. जसें:-कोणी उभ्यानें मुतावयास सांगितलें असतां वाटोळें फिरतफिरत मुतणें. ॰घेणें-(चांभारी) तळ व तजा एके ठिकाणीं शिवणें. ॰जुंपणें-(चांभारी) तळ व तजा एके ठिकाणीं शिवण्यास सुरवात करणें. ॰देणें-फिरवून आणणें. 'चाबूक स्वारांनीं श्रीमंतांचें घोडे फेर देऊन आणावे.' -डुकराची शिकार १४ सामाशब्द- ॰करवत-पु. आढ्याकरवत (पहा). (दोन मनुष्यांनी चालविण्याचा, चौकट असलेला किंवा नस- लेला). ॰गोष्ट-स्त्री. उलट उत्तर; दांडगाईचें, उद्धटपणाचें उत्तर (कनिष्ठ दर्जाच्या मनुष्यानें दिलेलें). ॰घोंगडें-न. १ (एखाद्याची घोंगडी त्याच्या अंगावरून काढून ओढाताण करणें, फाडणें, हिसकणें इ॰ रूप) अवहेलनेनें, अपमानानें वागविणें. २ अशा तर्‍हेनें वागविला गेलेल्या मनुष्याची स्थिति. (क्रि॰ करणें; होणें) ॰घोडी-स्त्री. (ल.) १ चाकरानें, हाताखालच्या मनुष्यानें दांड- गाईनें दिलेलें उत्तर; वरिष्टाशीं उद्धटपणाचें वर्तन (क्रि॰ करणें). २ पुन्हां हल्ला; उलट खाणें (पराभूत शत्रु, परावृत्त संकट यानीं). (क्रि॰ करणें) ॰पगडी-स्त्री. १ फेरघोडी पहा. २ (वाईट अर्थी) सामना; स्पर्धा; चढाओढ. ३ कबूल केलेली गोष्ट न पाळणें. ४ मन फिरणें (वाईट तर्‍हेनें). ५ वाईट मार्गाला लागणें. ६ (शब्दशः) अदलाबदल. ॰बगडी-फेरपगडी (अप.) पहा. ॰घोडें-न. प्रत्युपकार; सूड. (क्रि॰ घेणें). ॰तपासणी-स्त्री. (कायदा) उलट तापसणीनंतर साक्षीदाराची-ज्या पक्षकारानें त्यास हजर केलें त्याकडून झालेली पुन्हां तपासणी. ॰निवडणूक-स्त्री. एकदां निवडून झाल्यानंतर पुन्हां लवकरच करावयाची निवडणूक ॰पत्र- न. पत्राचें उत्तर; पत्रोत्तर. 'फेरपत्र पाठविलें दातीं धरून यावें तृण । -ऐपो ११५. ॰पाळी-स्त्री. १ एकवरून दुसर्‍यावर अशी फिरत येणारी पाळी; बारी. २ पुन्हां आलेली पाळी. ॰पाळीनें- क्रिवि. फेरफेरानें; अदलून बदलून; वारगीपारगीनें. ॰फटका- पु. १ चक्कर; रंगण; घोडयाची रपेट, इकडे तिकडे दौडणें. २ हिंडणें; भटकणें; फिरणें. ३ (ल.) उपयोग; चालविणें; योजणें (स्वतःची बुद्धि, अनुभव). ॰फार-पु. १ फेरबदल; पालट; बदलाबदल; दुरुस्ती. २ फरक; तफावत; अंतर (हिशोबांत, सांगण्यांत, आजारांत, मैत्रींत). [फेर द्वि.] ॰बदल-पु. फरक; फेरफार. ॰बदली- स्त्री. १ अदलाबदल; आलटापालट. २ फौज, तुकडी यांतील शिपा- यांची आपसांतील बदली; पालट; एकानें येऊन दुसर्‍याला मोक- ळीक देणें. ॰मोबदला-मोबादला-पु नगास नग देऊन घेणें; अदलाबदल; विनिमय. ॰लागवड-स्त्री. पुन्हां पेरणी. 'निदान फेर-लागवडीवर सरकारचा हक्क नसावा.' -के १४.६.३०. फेरबसविण्याचें खुरपें-(चांभारी) खुरप्याची एक जात.

दाते शब्दकोश

सत्त्व

न. १ प्रत्येक वस्तुजातांत असलेल्या तीन गुण किंवा धर्म यांपैकीं (सत्त्व, रज, तम) पहिला. हा सर्व सद्गुणांचा द्योतक आहे. 'सत्त्वाथिलियां आंतु । सत्त्व मी म्हणे अनंतु ।' ज्ञा. १०.२८७. २ अस्तित्व; स्थिति; भाव; अर्थत्व. ३ पदार्थ; वस्तु; द्रव्य (ज्याविषयीं कांहीं गुणधर्मांचें विधान करतां येईल असें द्रव्य, वस्तु). ४ कस; सार; अर्क; सारभूत अंश; तत्त्वांश. 'नराच्या ठायीं नरत्व । जें अहंभाविये सत्त्व ।' ज्ञा ७.३५. 'गुळवेलीचें सत्त्व'. ५ बल; तेज; अभिमान; शक्ति; तत्त्व; जीवंतपणा; पाणी. 'दिसतें सत्त्व असें कीं पडतां न चळेल हेमनगहि वर ।' -मोवन ४.२६०. ६ स्वभाव; स्वभाविक गुण- धर्म. 'सत्त्व टाकिती भाग्यवंत सकळ । चोर पुष्कळ सूटले ।' -ह २९.३२. ७ खरेपणा; सद्गुण; थोरपणा. 'आलिया अतितां म्हणतसां पुढें । आपलें रोकडें सत्त्व जाय ।' -तुगा १२४८. 'याचें स्थिर असो सदा सत्त्व ।' -मोसभा. ६.४२. [सं.अस्]सत्त्व घेणें-पाहणेंकसून परीक्षा घेणें; प्रचीति घेणें; एखाद्याचा बाणा किंवा अभिमान किती टिकतो याची परीक्षा पाहणें. सत्त्व सोडणें-बल, कस, जोर, भरीवपणा, स्वाभाविक गुणधर्म नाहींसे होणें (जमीन, औषध, मंत्र, देव, मूर्ति वगैरे संबंधीं योजतात). सत्त्वास जागणें-सत्त्व राखणें; अडचणीच्या प्रसंर्गींहि आपला मूळ स्वभाव, सद्गुण, अभिमान, नीतिधैर्य, वर्तन यांपासून न ढळणें. 'सत्परिचयेंच जडही समयीं सत्त्वास जागलें हो तें ।' -मो. ॰गुण-पु. पदार्थमात्रांतील तीन गुणांपैकीं पहिला गुण. 'शुद्ध नेणीव तमोगुण । शुद्ध जाणीव सत्त्व गुण ।' -दा २०.३.७. ॰गुणी-वि. सत्त्वगुण ज्यांत विशेष आहे असा.॰धीर-वि. सत्य, इमान, औदार्य,पातिव्रत्य इत्यादि सद्गुण निश्चयानें राख णारा; सत्त्व कधींहि न सोडणारा; सद्गुणी; धैर्यशील; दृढनिश्चयी. ॰निष्ठ-वि. सत्त्व न सोडणारा; सद्गुणी; सचोटीचा; प्रमाणिक वगैरे. ॰पर-वि. सत्त्वास जागणारे. 'जे जे असा सत्त्वपर ।' -उषा ६२. ॰मूर्ति-स्त्री. सत्त्वशील; सत्त्वनिष्ठ, सद्गुणी; प्रामाणिक असा मनुष्य. ॰रक्षण-न. सद्गुण, सत्य, मान, इत्यादि गुणांचें परिपालन; अडचणींतहि सत्त्व न सोडणें. ॰वान- वंत-वि. सत्त्वगुणी; बल, धैर्य, कस, सार, तत्त्व असलेला. ॰शील-सीळ-वि. १ सद्गुणी; प्रामाणिक; नीतिनियमानें वागणारा, सत्प्रवृत्त. 'पवित्र आणि सत्त्वसीळ ।' -दा १.८.१९. २ ज्यांतील कस, किंवा गुणधर्म दिर्घ कालपर्यंत टिकतात असा (पदार्थ, वस्तु). ॰शुद्ध-वि. शुद्ध केलेलें; आंतील निकस भाग काढून सतेज केलेलें (औषध वगैरे). ॰शुद्धि -शोधन-स्त्रीन. औषधी, अथवा वनस्पती वगैरेंची विशुद्धि, स्वच्छ करणें; निकस भाग काढून टाकून सतेज करणें. 'तैसी ते सत्त्वशुद्धि । आगळी ज्ञानेंसी वृद्धि ।' -ज्ञा १४.२२२. २ अंतःकरणशुद्धि. 'आतां सत्त्व शुद्धि म्हणिजे । ते ऐशा चिन्हीं जाणिजे । तरी जळे ना विझे । राखोडीं जैसी ।' -ज्ञा १६.७४. ॰संपन्न-वि. सद्गुणी; सद्वर्तनी; बलयुक्त; सत्त्वांशानें परिपूर्ण. ॰स्थ-वि. १ सद्गुणी; नीतिमान्; सदाचारसंपन्न. २ पथ्यकर; पुष्टीकारक; हितकर; शक्तिवर्धक (अन्न,पदार्थ वगैरे) ॰हरण-न. (शब्दशःव ल.) सदगुण, उत्कृष्टपणा, शील, कीर्ति, मान वगैरेची नागवणूक, हिरावून घेणें; त्याचा त्याग करणें; सदाचाराविषयीं लौकिकाची हानि. ॰हानि- स्त्री. (शब्दः व ल.) सद्गुण, सत्यनिष्ठा, निष्कर्ष, सार वगैरेचा नाश. ॰हीन-वि. निकृष्ट; निकस; गुण,तेज, बल रहित; निःसत्त्व; तेजोहीन; तत्त्वभ्रष्ट. 'सत्त्वहीन मी बहुतापरी । बुद्धि अघोर असे, माझी ।' ॰क्ष(क्षे)मु-वि. सत्त्वगुणसंपन्न. 'देहीं सत्त्वक्षेमु । आरु जैसा । '-भाए ३३५. सत्त्वागळा- वि सत्त्विक; 'सत्त्वधीर सत्त्वागळी ।' दा १.८.२२ सत्त्वाथिला-वि. सत्त्वस्थ; सद्गुणी; सत्त्वगुणयुक्त; सात्त्विक. 'सत्त्वाथिलिया आंतु । सत्त्व मी म्हणे अनंतु ।' -ज्ञा १०.२८७. 'सत्त्वथिला शिबिनृपाळा ।' -आशिबि ६६.४. 'त्यागुणें विष्णुभक्त सत्त्वा- थिला' -ह ३४.१०. सत्त्वान्न-न. पथ्यकर व पौष्टिक खाद्य. सत्त्वापत्ति-स्त्री. ज्ञानी जीवाच्या सप्तभूमिकांतील चौथी भूमिका. -हंको. सत्त्वाशुंठी-स्त्री. १ निरनिराळीं औषधी द्रव्यें घेऊन तयार केलेली एक प्रकारची सुंठ. २ आंतील सर्व कस कायम राहील अशा प्रकारें आल्याची बनविलेली सुंठ. ३ ज्यास नेहमीं औषधें द्यावीं लागतात असें रोगट मूल (विशेषणाप्रमाणें उपयोग). सत्त्वाश्रित-वि. सुद्गुणी व सचोटीचा; प्रामाणिक; विश्वासु; नीतिमान; शुद्ध वर्तनाचा. सत्त्वाची चांगुणा-स्त्री. साध्वी, सद्गुणी स्त्री. [श्रियाळस्त्री चांगुणा या विशेषनामावरून] सत्त्वाची सावित्री-स्त्री. पतिव्रता व सद्गुणी स्त्री. [सावित्री या प्रसिद्ध पतिव्रता स्त्रीवरून]

दाते शब्दकोश

कमर

स्त्री. १ कंबर; कटि; मध्य; माज. २ (जंबियाचा एक डाव) आपल्या हातांतील जंबियानें जोडीदाराच्या उजव्या बाजूच्या कमरेवर कनवटीजवळ मारणें. [फा. कमर्, तुल. सं. ककुद्मती] ॰कचका-पु. गुडघ्यानें पाठींत मारलेला ठोसा, गुद्दा, धक्का. (क्रि॰ मारणें-देणें-बसणें-बसविणें) ॰कोट-(कंबर- कोट)-पु. (ना.) कंबरेपर्यंत लांब असलेला व अंगास घट्ट होणारा कोट, अंगरखा. हा आडाणी लोक वापरतात. ॰खुलाई-स्त्री. (हिं.) अपराधी कुळाकडे खंड, गुन्हेगारी वगैरे कारणाकरितां आलेल्या शिपायास कंबर सोडावयाकरितां द्यावें लागणारें द्रव्य. (सरकारी शिपाई हा पैसा त्रास देऊन उकळून घेतो, एरवीं गुन्हे- गाराला कांहीं देहधर्म इ॰ हि करून देत नाहीं). ॰खोडा-पु. (मल्लविद्या) कुस्तींतील एक पेच. आपला एक पाय जोडीदाराच्या पोटाखालीं घालून त्या पायाचा आपला पंजा आपल्या दुसर्‍या पायाच्या गुढघ्याच्या लवणींत धरून जोडीदाराला आवळून घुसमटून त्याला चीत करणें. [कमर + खोडा] ॰गुर्दा-पु. कम- रेम बांधावयाची गदा. -इम १०. [कमर + गुर्दा] ॰ठाव- वि. १ कमरेपर्यंत, कमर वुडेल इतकें (पाणी वगैरे); कंबरभर. -पु. २ कमरेइतकी पाण्याची खोली. ॰तार्‍यो-पु. (ना.) मुलांचा एक मैदानी खेळ. ॰पट्टा-ट्टी-पुस्त्री. १ कमरेभोंवती घालावयाचा सोन्याचा किंवा चांदीचा पट्टा; स्त्रियांचा एक दागिना. २कमरबंद. [कमर + पट] ॰पाईक-पु. (गो.) शूद्रांपैकीं एक जात ॰बंदी-पु. १करगोटा. २ काचा, कमरेस बांधावयाची वस्तू. ३ तरवार लटकविण्यासाठीं कमरेस बांधावयाचा पट्टा; दाली. ४ कांहीं अंगरख्यास असणारा कमरेजवळ बांधावयाचा बंद. ५ कमरपट्टा पहा. [फा. कमर् + बंद्, सं. बंध.] -वि. सिद्ध; तयार; कटिबद्ध (एकादें काम करावयासाठीं). 'आजि कमरबद होवोनि.' -मसंगी ५०. ॰बंदगी-बंदी-स्त्री. १ सिद्धता; तयारी; मुस्तेदी (युद्धाची. ग्रामांतराची वगैरे). 'तमाम खुषकींतील सरदारानीं एकदिल होऊन इंग्रजांचे तंबीवरी कमरबंदी केली.' -रा १०.१९९. २ तयार होणें; सिद्ध होणें; काचा बांधणें (गांवास जाणें, युद्धास जाणें वगैरेसाठीं). ॰बस्ता-पु. १ सिद्धता; तयारी, सज्जता. कमर- बंदी पहा. (क्रि॰ करणें, बांधणें). 'कास कासली वरून ज्यानें कमर- बस्ता केली.' -ऐपो ७०. २ कमरपट्टा काचा; कमर; बांधावयाचे वस्त्र. [फा. कनर् + बस्ता; सं. वस्त्र] ॰बस्ती-स्त्री. कमरबंदी. 'वर- कड कंबरबस्ती करून । कल्पिल्या मार्गी चालिले ।।' -नव १५. ८९. [फा. कमर् + बस्ती] ॰मोड-स्त्री (स्वतःची कंबर मोडणें). -वि. १ (ल.) अति मेहनतीचें, दगदगीचें. २ कमरमोड होण्या- सारखें. [फा. कमर् + मोड] ॰मोडकाम-न. अति श्रम पडणारें काम; अति कष्टाचें काम. ॰मोडी इरलें-न. ज्याचा खालचा भाग थोडा आंतील बाजूस वळविला आहे (इरलें घेतलेला मनुष्य खाली वांकल्यास जो वळलेला भाग पाठीच्या खालीं येईल) असें इरलें. [फा. कमर् + मोडणें + इरलें] ॰सरी-स्त्री. (गो.) घराचे वांसे वाकूं नयेत म्हणून मध्यें आडवें घालतात तें लांकूड. भिंती- वरील सर. -कमरेचा कांटा-पाठीच्या कण्याचा अगदीं शेव- टचा मणका, याच्या उलट मानेचा कांटा. (क्रि॰ ढिला होणें = अगदीं गळून जाणें; फार त्रास होणें). -खवाट-टा-नपु. कुल्ल्याचा भाग; मांडीचा सांधा; ढुंगण. -जोर-पु. शारीरिक वळ (पैसा. मित्र, बुद्धि यांच्या बळाहून भिन्न). -ढिला-वि. १ शक्तिहीन; निर्बळ; कमजोर. २ नपुंसक; नेभळा; पुरुषत्व- हीन. -सांधा-पु. कमरेचा खवाटा; कुल्ल्याचा भाग; ढुंगण. -ची कमान-स्त्री. कुबड; वांकलेलें शरीर. 'कमरेची कमान झाली तरी मी तरुण आहे असे त्याला वाटतें.' ॰कसणें- (वाप्र.) सिद्ध होणें; तयार होणें; काच्यानें कमर बांधणें. संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास या उभयतां महा- राजांच्या विद्यमान वंशजांनीं कंबर कसली पाहिजे.' -सासं २. १८०. ॰खचणें-१ अशक्त होणें; कमरेंत जोर नसणें; कमर निर्जीव होणें. २ (ल.) उत्साह, आशा, धैर्य सुटणें; हिंमत, धमक नाहींशी होणें. -रेचे टाके ढिले होणें-अति श्रमित होणें; फार कष्ट होणें; दमणें. 'यामुळें सार्‍या नोकरांच्या कम- रेचे टांके (पांचसहा तासांत अगदीं) ढिले होऊन जातात.' -आगर ३.४५. ॰ताठणें-आजारामुळें किंवा अशक्तपणामुळें कमर हालविण्याची शक्ति न राहाणें; एकसारखें बसून किंवा उभें राहिल्यानें कमरेस ताठरपणा येणें. ॰धरणें-कमर दुखणें किंवा ताठणें; कमरेंत उसण भरणें. ॰बसणें-कमर खचणें; धैर्यहीन होणें; घाबरणें. ॰बांधणें-सिद्ध होणें; तयार राहणें; उत्साह बाळगणें (एखाद्या कामास). 'पुढें वंशवृद्धी करण्यास्तव कंबर बांधा ।' -प्रला १३१. 'तेव्हां अजून जोंवर हे संकट अनिवार्य झालें नाहीं तोंवरच तिच्या कैवार्‍यांस कंबर बांधण्यास अवकाश आहे.' -नि ६. ॰भरणें-१. कबर धरणें पहा. २ (चांभार- धंदा) टांच व टाळा यांमधील भागांत भर टाकणें. ॰मोडणें- १ कमर खचणें पहा. २ टुमकत-मुरडत चालणें. 'चालतां कमर ठुमकत चमकत मोडितें ।' -प्रला १५७. ॰वांकणें-१ कुबड निघणें; वातादि विकारामुळें शरीराची कमान होणें. 'कुब्जेची कमर सतरा ठिकाणीं वांकली होती.' २ क्षीण हीणें; अशक्त, दुर्बल होणें; पोंक येणें. ॰सोडणें-१ कमरेचा बंद ढिला करणें; काढून टाकणें. २ पोषाख उतरणें. ३ (ल.) विश्रांति घेणें; जामानिमा उतरणें. 'सोडीना कंमर कधीं काढीना पायजमा ।' -प्रला ६४.

दाते शब्दकोश

फल

न. १ फळ (वृक्षादिकांचें). (याचे लक्षणेनें पुष्कळ अर्थ निघतात). २ (ल.) संतान; संतति; प्रजा ३ फायदा; लाभ. ४ प्राप्ति; उत्पत्ति; निष्पत्ति; कोणताहि व्यापार, क्रिया यापासून निष्पन्न होणारी गोष्ट. ५ परिणाम; शेवट; अखेर. 'तसेंच त्या लेखाचें अगर ग्रंथाचें कांहीं फल.' -गीर २२. ६ (गणित) त्रैराशिकांतील दुसरें व चवथें पद; दिलेलें प्रमाण, दर व उत्तर; प्रमा- णांक व उत्तरांक. ७ भाला, बाण इ॰ शस्त्राचें टोंक, अग्र; हत्याराचें पातें. ८ नांगराचा फाळ. ९ वर्तुळाचें क्षेत्रफळ. [सं.] सामा- शब्द-॰ग्रंथपु. शकुन, मुहूर्त, लक्षणें इ॰ कांचीं शुभाशुभ फलें सांगणारा फलज्योतिषाचा भाग, असा ज्योतिषग्रंथ. ॰ज्योतिष- न. ग्रहांच्या व नक्षत्रांच्या विशिष्ट स्थितीमुळें मनुष्यावर होणारें परिणाम सिद्धांतरूपानें सांगणारें शास्त्र; ज्योतिष (ज्योतिष हा शब्द खगोलविद्या आणि खगोलांपासून मिळणार्‍या फलांचें ज्ञान या दोहोंसहि लावितात तेव्हां फलज्योतिष ही संज्ञा इंग्रजी अ/?/स्ट्रा- लॉजीला प्रतिशब्द म्हणून नवीन बनविण्यांत आली). ॰त्यागी-वि. आपल्या श्रमाचें फळ (तें मिळण्याच्या वेळींच) मुद्दाम सोडणारा; फलाची इच्छा न करणारा. ॰द-द्रूप-प्रद-वि. १ फल देणारें; फायद्याचें( काम, प्रयत्न, युक्ति, उपाय). 'निगमागमद्रुमफळ । फलप्रद ।' -ज्ञा १८.२. २ फायदेशीर, परिणामकारक झालेला; सफळ; गुणावह. 'सफल फलद कर्म त्याज संन्यास साचा । म्हणुनि उमज होतो कथेच्या रसाचा ।' ॰प्रदान-न. विवाहांतील एक समा- रंभ वाङ्निश्चयाच्या वेळीं नवरीच्या ओटींत नवर्‍याच्या बापानें नारळ वगैरे घालणें. ॰न्यास-पु. आपण केलेल्या कृत्याबद्दल किंवा विशिष्ट सत्कृत्याबद्दल मिळणार्‍या बक्षिसाची आशा सोडणें; त्यावर हक्क न सांगणें; फलत्याग; निष्कामकर्म. ॰भोग्य-वि. फलांच्याद्वारां, निष्पत्तीवरून, उपभोग घेतां येणारें (फळझाड, पैसा, वतनवाडी); ह्याच्या ऊलट स्वतःभोग्य. ॰मान-न. फलनिष्पत्ति. ॰वांछा- च्छा-स्त्री. फळाची, परिणामाची इच्छा; मोबदल्याची आशा. याच्या उलट फलन्यास. 'त्यजुनिहि फलवांछा काम्यकर्में करीती । प्रिय हरिस नव्हे ते सर्व ह्या लोकरीती ।' -वामन, कात्यायनी व्रत ७०. ॰वान्-वि. फलप्रद फलद्रूप. ॰शर्करा-स्त्री. फळांपासून काडलेली साखर; (इं.) फ्रुक्टोज. ॰श्रुति-स्त्री. १ व्रत, स्त्रोत, इ॰ पुण्यकारक कृत्यापासून मिळणारें फळ सांगणारें शास्त्र, ग्रंथविभाग. २ फल; फायदा; निष्पत्ति. 'गोष्ट झाली खरी पण आतां रागें भरून फलश्रुति काय?' [फल + श्रुति = शास्त्र] ॰क्षम-क्षेम-वि. १ फलें धारण करण्यास योग्य; फलद. (शब्दशः व ल॰). २ फलदायक; लाभप्रद; कल्याणप्रद. [सं.फलक्षम] फलाकांक्षा-स्त्री. फलेच्छा, आशा; फलवांच्छा. [सं. फल + आकांक्षा]-कांक्षो-वि. फलाची, मोबदल्याची इच्छा करणारा. फलाफल-न. फायदा-तोटा; नफा- नुकसान. [फल + अफल] फलाशा-स्त्री. फल मिळण्याची इच्छा, आशा (सुपरिणाम, बक्षीस इ॰ची). फलाहार-पु. थोडा उपाहार करणें; फराळ; फळफळावळ, पोहे, इ॰ पदार्थ खाणें; असल्या पदार्थांचें भोजन. [सं. फल + आहार] फलित-न. गर्भित अर्थ; ध्वनि. -वि. १ फळ आलेला (वृक्षलता इ॰). २ (ल.) फायदेशीर, फलद्रूप झालेला. ३ ध्वनित; गर्भित; अध्याहृत (गूढ अर्थ इ॰). [सं.] ॰प्रेरणा-स्त्री. दोन किंवा अधिक प्रेरणांच्या इतकेंच कार्य करणारी प्रेरणा; फलोन्मुख प्रेरणा; परिणत प्रेरणा. (इं.) रिझल्टंट. -यंस्थि ६. फलितार्थंपु. १ गर्भितार्थ; ध्वनितार्थ. 'म्हणोनि ते बुद्धि रचूं । मतवाद हे खांचू । सोलींव निर्वचूं ।फलितार्थुचि ।' -ज्ञा १३.१०४९. २ फलश्रुति; अर्थ २ पहा. [फलित + अर्थ] फलोत्पत्ति-स्त्री. फायदा; नफा; किफायत. [फल + उत्पत्ति] फलोदय-पु. फळ येणें, दिसूं लागणें. [सं. फल + उदय]

दाते शब्दकोश

वाहणें

उक्रि. १ उचलून नेणें; एका जागेवरून उचलून दुसऱ्याजागीं नेऊन ठेवणें. 'वाहतिये वेळें जड । शिदोरी जैसी ।' -ज्ञा १८.१८५. -एभा ३.८७. 'शीतलजल कलश शीघ्र वाहोन ।' -मोभीष्म १२.४. २ भार सहन करणें, सोसणें; आधार देणें; आश्रय देणें. 'गेल्या पळोनि गायी पृष्ठावरि पुच्छभार वाहोनी ।' -मोविराट ४.८८. ३ मनांत बाळगणें; धरणें. 'परी ते चाड एकी जरी वाहे ।' -ज्ञा ४.१९५. 'वाहतसे हृदयाब्जीं अत्युत्सुक मीं' -मोसंभा २.३२. 'मरे येक त्याचा दुजा शोक वाहे ।' -राम १७. ४ चालू ठेवणें; पुढें चालविणें (व्यवहार, धंदा वगैरे). ५ अर्पण करणें; पूजेमध्यें देणें ठेवणें. 'उडवी किरीट विधिनें जें निर्मुनि यासी वाहिलें होतें ।' -मोकर्ण ४७.७६. 'वाहुनि मस्तक चतणीं ।' -मोअनु ४.५५. ६ (शपथ) घेणें. ७ देऊन टाकणें; स्वत्वनिवृत्ति करणें; टाकून देणें; सोडून देणें; त्याग करणें. ८ काढून देणें; पुढें करणें; स्वतःजवळचे देणें. 'जामीन रहा आणि गाठेचें वाहा.' ९ चढविणें; बसविणें; सज्ज करणें (धनुष्यास गुण वगैरे). 'कैकेयांचीं चापें खंडूनी...अन्य धनुष्यें वाहुनीं ते ।' -मोकर्ण ९.८. 'जो या धनुष्या वाहील गुण ।' -रावि ७.५४. १० (जमीन) कसणें; लागवडीस आणणें; पेरणें; मशागत करणें. 'काय जाहालें न वाहता भुई पेरिजे ।' -ज्ञा ११.१६२. ११ धारण करणें; नेसणें; वापरणें. 'वाहे वल्कल जटा ।' -मोरामायणें २३. 'हे विपरिताक्षित असतीसी नवनवा गुणा वाहे ।' -मोमंभा १.७३. १२ चालविणें; उपयोग करणें. 'जेती घाणे वाहती ।' -पाटण शिलालेख. १३ हल्ला करणें; चाल करणें. 'मग तेणे विक्रमसेनु प्रौढवर्धनावरि सबळु वाहौनु आला ।' -पंच १.३२. चिंता वाहणें-काळजी वाहणें; अस्वस्थता बाळगणें. वाहणें- अक्रि. १ वारा, पाणी हलणें; एका जागेवरून दुसऱ्या जागीं जाणें; सरकणें; पुढें जाणें; गतिमान असणें (सैन्य, पशूंची, गाड्यांची रांग वगैरे). 'वाहे हिममंद सुगंध पवन.' -मोभीष्म ११.८७. २ (नाक, व्रण, गळतें भांडें यांतून) पाणी, पू वगैरे बाहेर बाहेर येणें; स्त्रवणें; पाझरणें; गळणें; ठिबकणें. ३ एका दिशेनें जाणें; लांबवर पसरणें; रांगेनें असणें (रस्ता, किनारा, डोंगराची रांग). 'परमार्गु वाहाती सदैवें । जेआंलागीं ।' -ऋ १००.४ चालू असणें; गति- मान असणें; कार्य करीत राहणें (यंत्र, हत्यार; साधन). ५ तीक्ष्ण असणें; उपयोग होण्याच्या स्थितींत असणें; धार असणें (शस्त्र, हत्यार वगैरे). ६ प्राप्त होणें; चालू असणें. 'रुपयाचें दीड शेर पाणी अशी कठिण वेळा वाहली' -ऐपो २२५. [सं. वह्] वाहता झरा-री-पुस्त्री. जिवंत झरा; ज्यांतून नेहमीं पाणी वाहात असतें असा झरा, प्रवाह. २ चालू प्रवाह, वर्षाव (देणगी, खर्च वगैरेचा); चांलू पुरवठा; रेलचेल; चंगाळी. वाहतवणा-पु. रानांतून चालणारा; प्रवासी. 'आणि जन्मशतांचा वाहतवणा ।' -ज्ञा ७.१२९. वाहत वाटोळें-न. १ जुजवी किंवा तात्पुरती व्यवस्था, दुरुस्ती, उपाययोजना; मिटवामिटव (वाद, भांडण, रोग यासंबंधी कामचलाऊ योजना). २ आरंभ; सुरुवात; चालू हो्ण्याची क्रिया (काम, धंदा वगैरेची). ३ सत्यानाश; पूर्ण नाश; फन्ना; वाटोळें (धंदा, कार्य, व्यवहार, सल्ला वगैरेचा). वाहता- वि. १ मोकळेपणानें वावरणारे, हलणारें, फिरणारें, वागणारें; तीक्ष्ण धारेचें; कुशाग्र (शस्त्र, बुद्धि वगैरे). उदा॰ वाहती कुऱ्हाड. २ चालू; कार्य करीत असलेलें; चालतें; सुरू (काम, धंदा, व्यवहार, कारखाना वगैरे). वाहती घाणा-पु. चालू असलेला, उपयोगांत असलेला तेलाचा घाणा. वाहता झरा, वाहती झरी-वाहत- झरा पहा. वाहता रस्ता-पु. रहदारीचा रस्ता. वाहती- स्त्री. १ प्रारंभ: सुरुवात. २ चाल; वहिवाट; शिरस्ता; प्रघात. वाहतीकूस-स्त्री. गर्भधारणा करण्यास योग्य अशी स्त्रीची अवस्था; मुलें व्हावयास लागण्याची अवस्था. 'एकदां वाहती- कूस झाली म्हणजे वाटेल तितकीं मुलें होतील.' 'पावसाची वाह- तीकूस झाली.' = पावसाळा सुरू झाला. वाहतीगंगा-स्त्री. अनुकूल परिस्थिति; चालू काम; भरभराटलेला धंदा; सुकाळ; चंगळ; संपन्नता. (क्रि॰ चालणें; होणें.) वाहत्यागंगेंत हात धुवून घेणें- अनुकूल काल असेल तों आपलें कार्य साधून घेणें. वाहती धारा- १ तीक्ष्ण पाजळलेली धार (हत्याराची); याच्याउलट पडती धार. २ वाहत असलेला, चालू असलेला पाण्याचा प्रवाह (नदी, ओढा वगैरेचा); पाणी, रस वगैरेचा पडता प्रवाह, झोत. ३ (ल.) धंद्याची, कामाची चलती, भरभराट, घाई, धुमश्चक्री. उदा॰ लढाईची-धर्माची-वादाची-वाहती धार. वाहती वाट-स्त्री. १ रहदारीचा रस्ता; मेकळा, बंद न केलेला रस्ता; चालू रस्ता. २ मुलें होत असलेला स्त्रीचा गर्भाशय, कूस. ३ (ल.) सुरवात; आरंभ; ओनामा (धंदा, व्यवहार इत्यादीचा). वाहतु(तू)क- स्त्री. रहदारी; येजा; वापर; नेआण. -पु. वाहणारा; लाकडाची नेआण करणारा. -नस्त्री. वाहतुकीची मजुरी. वाहतुरा-वि. वाहती; तीक्ष्ण (शस्त्राची धार). वाहतें-वि. चालू; तीक्ष्ण; धारेचें; उपयोगांत असलेलें (शस्त्र वगैरे). वाहतें नांव-न. चालू, व्यावहारिक नांव.

दाते शब्दकोश

बद

वि. वाईट; नीच (विशेषतः समासांत उपयोग). [सं. वध; फा. बद्; इं. बॅड] सामाशब्द- ॰मल-अम्म(म)ल-अमली- पुस्त्री. १ दुष्कर्म; व्यभिचार; अविवाहित स्त्रीशीं गमन. 'सन्तु जाधवीण, तिनें बद-अमल केला.' -ख ८.४२१३. २ हराम खोरी. 'बद-अमली करून बसल्यास रुपये श्रीमन्तांचे सुटतात असें नाहीं.' -ख ७.३७५५. ३ गैरवर्तणूक; जेबंदशाही. 'मुलकांत बद-अमली जाली आहे.' -दिमरा १.२२४. [फा.] ॰अहदी- कौली-स्त्री. १ वचनभंग; शब्दाप्रमाणें वर्तन न करणें. 'टिपू बहादूर यांनीं बद-अहदी केल्यास तिन्हीं सर्कारांनीं एक होऊन त्याची तम्बी करावी.' -रा ७.२. २ गैर-सलूक; अमैत्री. [फा.] ॰कर्म-ख्याली-नस्त्री. बद अम्मल; व्यभिचार [फा] ॰ख्याल- ली-वि. बदफैल; व्यभिचारी. ॰गोई-स्त्री. अपभाषण; निंदा. 'लाइणी-बद-गोई केली.' -रा २०.२२०. [फा.] ॰दिली- स्त्री. १ भ्याडपणा. २ वहीमखोरी. ॰दील-वि. १ भ्याड. २ संशयी; वहीमखोर. -हिंब २६१. [फा.] ॰दुवा-स्त्री. बेदुवा; शाप. 'बद-दुवा दिल्ही कीं या दोघांचा खाणा खराब.' -मदरु १.११८. [फा] ॰नकशा-क्षा-क्ष-नाम-नामी-पुनस्त्री. पाण- उतारा; मानखण्डना; दुर्लौंकिक; अप्रतिष्ठा; बेअब्रू. 'लोकांत बद- नक्ष होय तें न कीजे.' -रा ८.२१३. [फा.] ॰नजर-स्त्री. १ वाईट दृष्टि कुवासना. 'दर्यामध्यें टोपीकरांची बद-नजर.' -वाडमा १.३४०. २. वैर. -ख ७.३५६६. ३ बेभरंवसा; बेविश्वास. [फा.] ॰नाम-वि. बेअब्रू असलेली, झालेला; मान- खण्डित; कुप्रसिद्ध., 'पुढें ऐसी बद-रहा वर्तणूक करून बद-नाम न होणें.' -रा १५.३८१. [फा.] ॰नियत-नेत-नेक-स्त्रीपु. सवामिद्रोह; हरामखोरी. 'महाराजांचे पायाशीं सेनापतीनें बद- नेत धरिला.' -मराचिथोशा ४९. [फा.] ॰नियती-वि. स्वामि- -जोरा ९. ॰फैल-पु. १ कुकर्म; दुर्वर्तन; दुर्व्यसन. २ स्वामि- द्रोह. 'नाहींतर बदफैल करून फन्द कराल तर जावली मारून तुम्हांस कैद करून ठेऊं.' -ऐस्फुले १.२४. ३ -वि. कुकर्मी; रंडीबाज. [अर. फिअल् = कर्म] ॰फैलीस्त्री. १ बदफैलाचें कर्म; (मुख्यत्वें) रंडीबाजी; सोदेगिरी. २ गैरवर्तन. ३ -वि. कुकर्मी; व्यभिचारी; पापाचरण करणारा. ॰बोई-बोय-स्त्री. १ घाण; दुर्गंध. २ (ल.) बेअब्रू; अपमान; दुर्लौकिक. [फा. बदबू] ॰मस्त- वि. १ गर्वानें मत्त झालेला; धुंद; उन्मत्त. २ बंडखोर. 'गलीम बहुत बदमस्त जोरावर जाहला.' -पाब १२. [फा.] ॰मस्ती- स्त्री. १ उद्धटपणा; ताठा; अभिमान; मगरूरी; अरेरावी. २ बंड- खोरी; बंड. [फा.] ॰मामला-ली-पुस्त्री. १ कहराचें व दंडेलीचें वर्तन; दांडगाई (मुख्यत्वें पैशाच्या मागणीचा प्रतिकार करणारांचें). २ अन्याय. 'साष्टीचें ठाणें इंग्रजानें बदमामली करून घेतलें.' -वाडसमा २.१९. ३ हरामखोरी; बेइमानी. ४ गोंधळ; अव्य- वस्था. ५ भित्रेपणा. -वि. १ लुच्चा; हरामखोर. 'इंग्रज फार बद-मामली आहेत.' -रा १२.६. [फा.] ॰मास-श-ष-वि. १ वाईट रीतीनें उपजीविका करणारा. २ (ल.) दुराचरणी; गुंड; पुंड. [फा. मआष = उपजीविका] ॰माशगिरी-स्त्री. गुंडगिरी; पुंडपणा. ॰रंग-पु. १ नष्ट, भग्न झालेला मान, ऐश्वर्य, थाटमाट. २ ऐश्वर्य इ॰ च्या भंगानें झालेला अपमान; मानखंडना; उपहास. ३ बेरंग. ॰रस्ता-रहा-राह-पु. वाईट किंवा गैर चाल, वर्तन; अन्याय. 'हे बदरहाची कैफियत.' -ख ७.३५७०. [फा.] बदराई-राह-हा-ही-वि. १ बदकर्मानें वागणारा; कुमार्गी. 'बदराईच्या पाडी दाढा । लागे तुकयाचा हुंदाडा ।' -तुगा २८२४. २ -क्रिवि. कुमार्गानें. 'कोणी बद-राह वर्ततील तर तुम्हां लोकांनीं बुद्धिवाद सांगावा.' -रा ८.१२६. [फा.] ॰लाभ-नाम- नामी, बदलौकिक-वकर-वकरी-वक्र-वक्री-नपुस्त्री. १ दुर्लौकिक; बेअब्रू; अपकींर्ति; बदनामी. २ अयोग्य आरोप; दोष; ठपका; दुर्निमित्त. (क्रि॰ घालणें; ठेवणें; आणणें; येणें). -वि. कलंकित; दुर्लौकिक झालेला. 'आम्हास बदलाम करूं नये. ' -ख १०.५६२९. 'नबाब बुद्धिवन्त होत्साता हे बुद्धि वृद्धापकाळीं करून बद-वक्र करून घेतला.' -ब्रप ४५. [फा.] ॰वख्त-वि. दुर्दैवी. [फा.] ॰सलूक-पुस्त्री. गैर वर्तणूक; अन्याय. [फा.] ॰सल्ला- स्त्री. वाईट मसलत. ॰सल्लागार-पु. वाईट मसलत देणारा. [फा.] ॰सुरत-वि. अवलक्षणी मुद्रेचा; कुरूप. [फा.] ॰सूर- वि. वाईट स्वराचा, आवाजाचा; बेसूर (गाणें, वाद्य). [फा.] ॰हवई-स्त्री. १ खोटी बातमी; हवेंतील गप्प. -वि. विशेष खोटी; अगदींच वार्‍यावरची. 'अशा बदहवई आवया उठवितील त्यांत जीव नाहीं.' -ख १.१९३. [फा.] ॰हवा-स्त्री. दुर्दिन; वाईट हवा. [फा.]

दाते शब्दकोश

अष्ट

वि. आठ संख्या; सामाश्ब्द-अष्टगुण, अष्टादश, अष्ट- विंशति व पुढील शब्द. [सं. अष्टन्] ॰क न. १ आठ पदार्थांचा समुदाय. २ पाणिनीच्या व्याकरणाचे (सूत्रपाठाचे) आठ विभाग आहेत त्यांतील प्रत्येक. ३ ऋग्वेदसंहितेचे पठणाच्या सोयीकरतां आठ भाग केले आहेत, त्यांतील प्रत्येक. ४ आठ श्लोकांचा समूह; एक काव्यरचनापध्दति. उ॰ मंगलष्टकें, करुणाष्टकें. [सं.] -वि. आठ किंवा आठवा. ॰कपाळ्या-वि. १ अष्टांगें-दोन हात, दोन पाय, दोन गुडघे, वक्षःस्थळ आणि कपाळ इतक्यांचा उपयोग करूनहि ज्यास कांहीं मिळत नाहीं तो. २ (ल.) पूर्णपणें दुर्दैंवी; आपद्ग्रस्त; भद्र्या; कपाळकरंटा. ॰कर्णिका-स्त्री. कमळाच्या पाकळ्या. 'माझें हृदय दिव्य कमळ । जें तेजोमय परम निर्मळ । अष्टकर्णिका अतिकोमळ । मध्यें घननीळ विराजे ।' -ह ३५.१. ॰कुलाचल-पु. मेरूच्या चारी दिशांत जे भारतादि वर्ष आहेत त्या प्रत्येकाची मर्यादा करणारे (नील, निषध, विंध्याचल, माल्यवान्, मलय, गंध- मादन, हेमकूट, हिमालय इ॰) आठ पर्वत. अष्टकोन-नी- ण-णी-वि. आठ कोन-बाजू-असलेली, (वस्तु, आकृति). ॰गंध-न. आठ सुगंधी द्रव्यें (चंदन, अगरु, देवदार, कोष्टको- लिंजन, कुसुम, शैलज, जटांमासी, सुरगोरोचन) एकत्र करून केलेलें गंध; (सामा.) उटणें. ॰गुण-वि. आठपट. -पु. आठ गुण. ब्राह्मणाचे आठ गुण-दया, क्षांति, अनसूया, शौच, अना- यास, मंगल, अकार्पण्य, अस्पृहा. बुध्दीचे आठ गुण- शुश्रूषा श्रवण, ग्रहण, धारण, चिंतन, ऊहापोह, अर्थविज्ञान, तत्त्वज्ञान. ॰गोल-गोली-वि. कांठापदरांवर वेलबुट्टी काढलेला (चौपदरी शेला). 'कोणासी पागोटें परकाळा । कोणी मागती अष्टगोली शेला -भक्तावि. ३०.४१. [सं. अष्ट + गो]. ॰गोळी-क्रिवि. सर्वतर्‍हेनें; एकंदर. ॰घाण-स्त्री. अतिशय दुर्गंधी-घाण. [अष्ट + घ्राण]. ॰ताल- झंपाताल पहा. ॰दल-ळ-वि. आठ पाकळ्यांचें; आठ पानांचें; अष्टकोनी; अष्टभुज. -न. १ कमळाच्या आकाराची काढलेली आठ पाकळ्यांची किंवा भागांची आकृति. 'गर्भे रचिली उदंडें । अष्टदळें । -ऋ ७३. २ एक प्रकारची रांगोळी. ३ (ना.) ताम्हण; संध्या- पात्रा; 'एक अष्टदळ आणवा.' ॰दानें-न. अव. आमान्न, उद- कुंभ, भूमि, गोदान, शय्या, वस्त्र, छत्र, आसन हीं आठ वस्तूंचीं दानें और्ध्वदेहिकांत द्यावयाचीं असतात. ॰दिक्पाल-पु. अंत- रिक्षाच्या आठ दिशा पालन करणार्‍या देवता. जसें-पूर्वेंचा इंद्र, आग्नेयीचा अग्नि, दक्षिणेचा यम, नैऋत्येचा नैऋत, पश्चिमेचा वरुण, वायव्येचा मारुत, उत्तरेचा कुबेर (सोम), ईशान्येचा ईश; अष्ट- दिग्पाल. 'इयेवरी सप्तसागर । मध्यें मेरु महाथोर । अष्टदिग्पाळ तो परिवार । अंतरें वेष्टित राहिले ।।' -दा ४.१०.१. ॰दिग्गज- -पु. ऐरावत, पुंडरीक वामन, कुमुद, अंजन, पुष्पदंत, सार्वभौम, सुम- तीक असे अष्ट दिशांस पृथ्वीचे आधारभूत आठ हत्ती आहेत. [सं.] ॰दिशा-स्त्री. आठ दिशा; दिक्चक्राचे आठ भाग-पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैऋ/?/त्य, पश्चिम, वायव्य, उत्तर, ईशान्य. ॰देह- पु. देहाचे आठ प्रकार-पहिले चार पिंडीं व पुढील चार ब्रम्हांडीं. 'स्थूल, सूक्ष्म, कारण । महाकारण, विराट, हिरण्य । अव्याकृत, मूलप्रकृति जाण । ऐसे अष्ट देह ।' -दा ८.७.४०. ॰धा-वि आठ प्रकारचे; 'भूतें गुण मेळविजे । त्यासी अष्टधा बोलिजे ।' [सं.] ॰धामूर्ति- स्त्री. आठ प्रकारच्या मूर्ती. 'शैली दारुमयी लौही लेप्या लेख्याच सैकती । मनोमयी मणीमयी प्रतिभा अष्टधा स्मृता ।।' -एभा २७.९८-१०३; 'शैली, दारुमयी, लेप्या, लेख्या, सैकती अथवा सूर्यमंडळीं, जळीं, स्थळीं, अष्टमूर्तिस्वरूप श्रीहरीसी पूजावें ।' -अमृतध्रृव ६. अष्टमूर्ति पहा. ॰(देह)प्रकृति-स्त्री. पृथ्वी, पाणी, अग्नि, वायु, आकाश मन, बुद्धि आणि अहंकार मिळून आठ प्रकारे विभागलेली.... प्रकृति.' - गीर ७१५. ॰(विध)प्रकृति-असाहि वाक्प्रचार आहे. सत्व, रज, तम, व मूळ पांच तत्त्वें मिळून आठ प्रकारची प्रकृति. 'पंच भूतें आणि त्रिगुण । ऐसी अष्टधा प्रकृति जाण ।' -दा ६.२.१४. ॰धातू-पु. सोनें, रुपें, तांबें, कथील, शिसें, पितळ, लोखंड, तिखें (पोलाद). कोणी पोलादाच्या ऐवजी पारा धर- तात. 'अष्टधातु सायासें । जेवि विधिजेति स्पर्शें ।' -ऋ २०. ॰धार-वि. आठ धारा असलेलें. 'तंव तेणें साधकें एक अष्टधार आड धरिलें ।' -कृमुरा २२.९६. ॰नायका-नाईका-स्त्री. १ अव. श्रीकृष्णाच्या आठ आवडत्या पत्न्या-रुक्मिणी, सत्यभामा, जांबवंती, कालिंदी (सूर्यकन्या), मित्रवृंदा (अवंतिराजसुता), याज्ञजिती (यज्ञजितकन्या), भद्रा (कैकेयनृपकन्या), लक्ष्मणा (महेंद्रनाथकन्या). २ इंद्राच्या आठ नायका-उर्वशी, मेनका, रंभा, पूर्वचिती, स्वयंप्रभा, भिन्नकेशी, जनवल्लभा, घृताची (तिलोत्तमा). 'अष्टनायिका येऊनि । सर्वा घरीं नृत्य करिती ।' -ह २६.२२८. ३ (साहित्य) वासकसज्जा, विरहोत्कंठिता, स्वाधीनभर्तृका, कल- हातांरिता, खंडिता, विप्रलब्धा, प्रोषितभर्तृका, अभिसारिका. ॰नाग- पु. आठ जातीचे सर्प-अनंत, वासुकी, तक्षक, कर्कोटक, शंख, कुलिक, पद्म, महापद्म. ॰पत्री-वि. १ कोणत्याही विशिष्ट आका- राच्या (क्राऊन, डेमी) छापावयाच्या कागदाचीं आठ पृष्ठें होतील अशा तर्‍हेनें घडी पडणारें छापलेलें (पुस्तक) (इं.) ऑक्टेव्हो. 'पांच पांचशें पानांचे अष्टपत्री सांचाचें एक एक पुस्तक.' ॰पद- पु. १ कोळी वर्गांतील प्राणी-गोचीड, सूतकिडे, विंचू, कातीण वगैरे. (इं.) अर्कनिडा. २ आठ पायांचा काल्पनिक प्राणी. ॰पदरी-वि. आठ पदरांचा (शेला), आठसरांची (माळ), आठ पेडांची, धाग्यांची (दोरी) [सं. अष्ट + पल्लव] ॰पदी स्त्री. १ आठ पदांचा समुदाय. २ आठ चरणांचें एक कवन; कविताप्रकार. ॰पाकूळ न. (लुप्त). आठ पाकळ्यांचें फूल. ॰पाद-अष्टपद पहा. ॰पुत्ना-वि. आठ पुत्र आहेत जिला अशी (स्त्री). सौभाग्यवती स्त्रीला असा आशीर्वाद देतात. ॰पुत्री-स्त्री. विवाहामध्यें वधूला, काठाला हळद लावून नेसावयास दिलेलें शुभ्र वस्त्र. तिला पुष्कळ अपत्यें व्हावींत या इच्छेचें द्योतक. 'फेडिलें मायेचें वधूवस्त्र । अष्टपुत्र्या पीतांबर । नेसली कृष्णमय स्वतंत्र । तेणें सुंदर शोभली ।' -एरुस्व १६.१५. ॰म्ह-अष्टपुत्री मेहुणीकुत्री. ॰पैलू वि. १ ज्याला आठ पैलू (बाजू) आहेत असा (हिरा, रत्न). २ (ल.) हुषार; कलाभिज्ञ; व्यवहारचतुर (इसम). ॰पैलू माळ- (गोफ) स्त्री.घोड्याच्या गळ्यांतील दागिना; आठ पैलू असलेल्या मण्यांची माळ किंवा आठ पदर असलेली माळ. ॰प्रकृति, ॰विधप्रकृति अष्टधाप्रकृति पहा. ॰प्रधान- पु. राज्यकारभारांतील आठ प्रधान-प्रधान, अमात्य, सचीव, मंत्री, डबीर, न्यायाधीश, न्यायशास्त्री, सेनापति. अष्टप्रधानांची पद्धत शिवाजीनें सुरू केली. कांहीं जण वैद्य, उपाध्याय, सचीव, मंत्री, प्रतिनिधी, राजाज्ञा, प्रधान, अमात्य हे आठ मंत्री समजतात 'प्रधान अमात्य सचीव मंत्री । डबीर न्यायाधिश न्यायशास्त्री ।। सेनापती त्यांत असे सुजाणा । अष्टप्रधानीं नृप मुख्य जाणा ।।' हा श्लोक रूढ आहे. ॰फली-ळी,॰फळ-फल- स्त्रीन. अटोफळी पहा. ॰भार पु. ८००० तोळ्यांचा एक भार. असे आठ भार. 'नित्य प्रसवे अष्टभार सुवर्ण । सूर्यासम प्रभा परिपूर्ण ।' -ह २५. १५. ॰भाव पु. अव. (साहित्य.) शरीराचे सत्त्वगुणाचे आठ भाव, प्रकार-स्तंभ, स्वेद, रोमांच, स्वरभंग किंवा वैस्वर्य, कंप किंवा वेपथु, वैवर्ण्य, अश्रुपात, प्रलय. पर्याय-कंप, रोमांच, स्फुरण, प्रेमाश्रु, स्वेद, हास्य, लास्य, गायन. -हंको. 'आठवीया दिवशीं नाश अष्टभावा । अद्वयानुभवासुखें राहे ।।' -ब ११०. 'अष्ट- भावें होऊनि सद्गद । आनंदमय जाहला ।' ॰भैरव पु. भैरव ही शिवगणांतील स्वतंत्र देवता असून तिचीं पुढील आठ स्वरूपें आहेत-असितांग, संहार, रुरु, काल, क्रोध, ताम्रचूड, चंद्रचूड, महा. यांतील कांहीं नांवांऐवजीं कपाल, रुद्र, भीषण, उन्मत्त, कुपति इत्यादि नांवें योजिलेलीं आढळतात. ॰भोग पु. आठ प्रकारचे भोगः- अन्न, उदक, तांबूल, पुष्प, चंदन, वसन, शय्या, अलंकार. ॰म वि. आठवा.-स्त्री. अष्टमा. ॰मंगल वि. (विरू) अष्टमंगळ. १ ज्याचें तोंड, शेपूट, आयाळ, छाती व चार खूर शुभ्र आहेत असा; कित्येकांच्या मतें ज्याचे पाय, शेपूट, छाती व वृषण शुभ्र आहेत व जो कटीप्रदेशीं भोवर्‍यांनीं युक्त (नावांकित) असून ज्याच्या कपाळावर कमलाकृति केसांचें वेटोळें असतें असा (घोडा). २ (सामा.) आठ शुभलक्षणांनीं युक्त असा (घोडा). -न. पुढील आठ मंगल वस्तूंचा समुदाय-ब्राम्हण, अग्नि, गाय, सुवर्ण, घृत, सूर्य, व राजा. कांहींच्या मतें सिंह, वृषभ, गज, पूर्णोदककुंभ, व्यजन, निशाण, वाद्यें व दीप (राज्याभिषेकाच्या समयीं या अष्ट मंगलकारक वस्तू लागतात). ॰मंगलघृत न. वेखंड, कोष्ट, ब्राह्मी, मोहऱ्या, उपळसरी, सेंधेलोण, पिंपळी व तूप या औषधांच्या मिश्रणानें विधियुक्त बनविलेलें तूप. हें बुद्धिवर्धक आहे. -योर २.६७०. ॰महारोग पु. आठ मोठे रोग-वातव्याधि, अश्मरी, कृछ्र (किंवा कुष्ठ), मेह, उदर, भगंदर, अर्श (मूळव्याध), संग्रहणी. महारोग पहा. ॰महासिद्धी- १ अणिमा = शरीर अत्यंत सूक्ष्म होणें; २ महिमा = शरीर मोठें होणें; ३ लघिमा = शरीर वजनांत हलकें होणें; ४ प्राप्ति = सर्व प्राण्यांच्या इंद्रियांशीं त्या त्या इंद्रि- यांच्या अधिष्टात्री देवतांच्या रूपानें संबंध घडणें; ५ प्राकाश्य = ऐकून ठाऊक असलेल्या व स्वर्गादि पारलौकिक स्थानीं, व दिसण्याजोगे इहलोकच्या स्थानीं भोग व दर्शनाचें सामर्थ्य येणें; ६ ईशिता = शक्तीची, मायेची व तिच्या अंशाची ईशाच्या ठिकाणीं व इत- रांच्या ठिकाणीं असणारी प्रेरणा; ७ वशिता = विषय भोगीत असूनहि त्यांच्या ठिकाणीं आसक्त न होणें; ८ प्राकाम्य = ज्या ज्या सुखाची इच्छा करावी तें तें सुख अमर्याद प्राप्त होणें. -एभा १५.४२. ते ४७. ॰मर्यादागिरी- पु. आठ मोठे पर्वत-हिमालय, हेमकूट, निषध, गंधमादन, नील, श्वेत, शृंगवान व माल्यवान. हे जंबुद्रीपांत असून ते त्यांतील नऊ वर्षी (भागां)च्या मर्यादा आहेत. ॰मांगल्य- न. त्रैवर्णिकांचा एक संस्कार. अठांगुळें पहा. ॰मातृका स्त्री. आठ ईश्वरी शक्ती-ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इद्रांणी, कौबेरी, चामुंडा. सामान्यतः कौबेरी सोडून या सात असतात. विवाहादि मंगलप्रसंगीं यांची पूजा करतात. 'वेगे आल्या अष्ट मातृका । एकी चढिन्नली वृश्चिका । वाराही ते सूकरमुखा । वर्‍हाड देखा निघालें ।।' -एरुस्व १४.५८. ॰मांश पु. १ आठवा अंश; भाग. २ (वैद्यक) ज्वर नाहींसा होण्यासाठीं आठभाग पाण्याचे सात भाग आटवून एक अंश उरवितात तो काढा. ॰मी- स्त्री. चांद्रमासांतील प्रतिपदेपासून आठवी तिथी; या महिन्यांतून दोन येतात-शुद्ध व वद्य. ॰मूर्ति स्त्री. पृथ्वी, जल, तेज, वायु, आकाश, सूर्य, चंद्र व ऋत्विज् या परमेश्वराच्या आठ मूर्ती; शंकर; महादेव; अष्टधामूर्ति पहा. ॰योगिनी स्त्री. अव. आठ योगिनी; पार्वतीच्या सख्या; या शुभाशुभ फल देणाऱ्या आहेत-मंगला, पिंगला, धन्या, भ्रामरी, भद्रिका, उल्का, सिध्दा, संकटा. दुसरा पाठ-मार्जनी, कर्पुरा तिलका, मलयगंधिनी, कौमुदिका, भेरुंडा, माताली, नायकी, जया (शुभाचारा). यांत कधीं कधीं सुलक्षणा, सुनंदा हींहि नांवें आढळतात. ॰वक्र अष्टावक्र पहा. ॰वर्ग पु. १ आठ औष- धींचा समुदाय-ऋषभ, जीवक; मेद, महामेद, ऋध्दि, वृध्दि, काकोली, क्षीरकाकोली. २ मौंजीबंधनांत मातृभोजनांत भोजनाच्या वेळीं आठ मुंज्या मुलांना भोजनास बोलावितात तें कर्म ॰वर्ग्य- र्ग्या- पु. अष्टवर्गास जेवणारा बटु; उपनयनाच्या दिवशीं मातृ- भोजनाच्या वेळीं आठ बटू भोजनास बोलावितात ते प्रत्येक. ॰वर्षा- वि. आठ वर्षें वयाची (कुमारिका); (त्यावरून लग्नाला योग्य झालेली) उपवर. ॰वसु- पु. अव. प्रतीमन्वंतरांतील आठ वसू. चालू मन्वंतरांतील धर्मऋषि व दक्षकन्या वसु यांचे पुत्र-धर, ध्रुव, सोम, आप, अनिल, अनल, प्रत्यूष, प्रभास. भागवतांत द्रोण, प्राण, ध्रुव, अर्क, अग्नि, दोष, वसु, विभावसु अशीं नांवें आढळतात. 'इंद्र चंद्र वरुण कुबेर । अष्टवसु गंधर्वकिन्नर ।' -ह २५.१४१ ॰वायन- न. आठ वस्तूंचें दान; हळकुंड, सुपारी, दक्षिणा, खण, सूप, कंठण, धान्य, कांचमणी, या आठ पदार्थांचें वायन (वाण) सौभाग्यसंपादनार्थ लग्नांत आठ ब्राह्मणांपैकीं प्रत्येकाला वधूकडून दिलें जातें. ॰विध समाधि- स्त्री. समाधियोगाचे आठ प्रकार-यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधि. ॰विधा शृंगारनायका- (साहित्य) अष्टनायका पहा. ॰विना- यक- पु. अव. गणतीचीं आठ स्थानें-१ मोरेश्वर गणनाथ, (जेजुरी नजीक मोरगांव जिल्हा पुणें). २ बल्लाळेश्वर (मूळ मुरुड हल्लीं पाली, खोपवली नजीक-जिल्हा कुलाबा). ३ विनायक (कर्जत नजीक मढ-जिल्हा कुलाबा). ४ चिंतामणी (लोणी नजीक थेऊर- जिल्हा पुणें). ५ गिरिजात्मक (जुन्नर नजीक लेण्याद्रि-जिल्हा पुणें). ६ विघ्नेश्वर (जुन्नरनजीक ओझर-जिल्हा पुणें). ७ गणपति (नगर सडकेवर रांजणगांव-जिल्हा पुणें). ८ गजमुख (दौंड नजीक सिध्द- टेक-जिल्हानगर). ॰विवाह- पु. विवाहाचे आठ प्रकार-१ ब्रह्म = सालंकृतकन्यादान; २ गंधर्व = उभयतांच्या अनुमतीनें; ३ राक्षस = जब- रीनें कन्या हरण करून; ४ दैव = यज्ञप्रसंगीं ॠत्विजास कन्यादान करून; ५ आर्ष = गाय, बैल घेऊन कन्यार्पण; ६ प्राजापत्य = धर्माचरणार्थ कन्यापर्ण; ७ असुर = शुक्ल घेऊन; ८ पैशाच = कन्या चोरून आणून पत्नी करणें. सविस्तर माहिती धर्मसिंधु परिच्छेद ३ पूर्वार्ध पहा. ॰सात्विक भाव- अष्टभाव पहा. ॰सावध- वि. पुष्कळ गोष्टींकडे एकदम लक्ष पुरविणारा-देणारा; अष्टवधानी. ॰सिद्धि- अष्टमहा सिद्धि पहा. 'अष्ट सिद्धि चामरें घेऊनी । वरी वारिती अनुदिनीं ।' -ह १.१५. ॰सृष्टी- स्त्री. काल्पनिक, शाब्दिक, प्रत्येक्षा, चित्र- लेपा, स्वप्नी (स्वप्नसृष्टि), गंधर्वा, ज्वरिका (ज्वरसृष्टी), दृष्टी- बंधना. दा- ६.६.५१. [सं.]. ॰क्षार- पु. पळस, निवडुंग, सज्जी, आघाडा, रुई, तीळ, जव व टांकणखार.

दाते शब्दकोश

अठरा

वि. १ एक संख्याविशेष; १८. २ (सांकेतिक) पुराणें (मुख्य पुराणांची संख्या १८ आहे). 'कृष्ण वर्णुनियां श्रेष्ठ । चौघे गर्जताती भाट । अठरा मागध उद्भट । वंशावळी वर्णिती ।।' -एरुस्व ६.७६. तो हा पंढरीचा राणा । पुसा सहा चौं अठरां जणां ।।' -तुगा २५३९. [सं. अष्टादशन्; प्रा. अट्ठदह, अट्ठारस-ह; हिं. अठारह; पं. अठारां; बं. आठार; उ. अठर; गु. अढार; सिं. अडहं]. ॰अखाडे- अखाडा पहा. ॰उपधान्यें- न. अव. सजगुरा, भादली, वरी, नाचणी, बरग, कांग, खपले गहूं, मका, करडई, राजगिरा, मटकी, पावटा, मूग, वाल, कारळा, देवभात, सातू, अंबाडी. (दुसरी गणना) सजगुरा, नाचणी, वरी, मका, मटकी, राजगिरा, शिरस, पांढर- फळी, जिरें, मेथी, वेणुबीज, देवभात, कमलबीज, पाकड, अंबाडी; भेंडीबीज, गोवारी, कुड्याचें बीज, यांमध्ये कोठें कोठें खसखस व पांढरा राळा घालून ही संख्या विसावर नेण्यांत येते. ॰उपपुराणें- उपपुराणें पहा. ॰उपजा(या)ती-स्त्री. अव. अठरापगड जातीं- प्रमाणें ज्या अठरा उपजाती आहेत त्या अशा: भिल्ल, कोळी, मांग, अंत्यज, चांडाळ, पुल्कस, जिनगर, सलतानगर, चर्मक, डोहर (ढोर), भाट, बुरुड, रजक, दांगट, मोचेकरी, खाटिक, लोणारी व कैकाडी. -स्वादि ६.५.३७-३८. ॰कचेरी-स्त्री. (म्है.) राज्य- कारभारांतील सर्व वरिष्ठ खातीं असणारी मोठी कचेरी; सेक्रेटॅरिएट. ॰कारखाने- पु.अव. १ राज्यकारभारांतील खातीं: (अ)उष्टर, खबुतर, जनान, जवाहीर, जामदार, जिकीर, तालीम, तोफ, थट्टी, दफ्तर, दारू, दिवान, नगार, पील, फरास, बंदी, मोदी व शिकार हे अठरा कारखाने (आ) तोप, पील, उष्टर, फरास, शिकार, रथ, जामदार, जवाहीर, जिराईत, नगार, दारू, वैद्य, लकड, इमारती, मुदबख, कुणबिणी, खाजगत, थट्टी. (इ) खजिना, दफ्तर,जामदार, पील, जिराईत, अंबर, फरास, मुदबख, नगार, सरबत, आबदार, शिकार, तालीम, दारू, उष्टर, बकरे, तोप, सराफ. या तीन व आणखीहि कित्येक निरनिराळ्या याद्या सांपडतात. हे सर्व कारखाने सरकारी असून त्यांवर स्वतंत्र अधिकारी असत. सर्वांवर खानगी कारभारी मुख्य असे. 'त्याच्या अठरा कारखान्यांच्या गेल्या कळा । ' -एपो १४२. २ (ल.) मोठ्या संसाराच्या किंवा व्यवहाराच्या शाखा- खातीं. [अठरा + फा. कार्खाना]. ॰खूम- न. लोकांच्या अठरा जाती. सर्व प्रकारचे लोक; अठरापगड जात. 'या गांवांत एक मुकादम नाहीं, अठरा खुमाचे अठरा वेगळाले आहेत;' शिवाय-भाअ १८३४.४७. [अर॰ कौम; फा. खूम = जात,] ॰गुणांचा खंडोबा- पु. (ल.) १ सर्व (दूर्) गुणांनीं भरलेला; लुच्चा किंवा लबाड इसम; अट्टल सोदा. सोळा गुणांच्यावर कडी -जसा नाशिककर हा काशीकरापेक्षां शंभर पटीनें वरचढ तसा हा. २ अक्षयी रोगी; दुखणेकरी; अनेक रोगांनीं- दु:खांनीं व्याप्त. ॰जाती- स्त्री. अव. कुंभार, तेली, कासार, तांबोळी, न्हावी, परीट, कलाल, कोष्टी, झारा (झारेकरी), महार (चांभार), जैन, जती, दुंडे, गुजर, मारवाडी, सोनार, सुतार, हलालखोर (कसाब). -कोको. अठरापगड जाती पहा. ॰टोप(पी)कर- हिंदुस्तानांत आलेले युरोपियन आपल्या निरनिराळ्या देशरिवाजांप्रमाणे टोप्या वापरीत; तेव्हां त्यांना टोपकर असें नांव पडलें. १८ प्रकारचे (युरो- पियन) टोपकर: १ फिरंगी (पोर्तुगीज); २ वलंदेज (हालंड-डच); ३ निविशयान (नार्वेजियन); ४ यप्रेदोर?; ५ ग्रेंग (ग्रीक); ६ रखतार?; ७ लतियान (लाटिन); ८ यहुदिन (ज्यू); ९ इंगरे (इंग्रज); १० फरासीस (फ्रेंच); ११ कसनत्यान (शेटलंडियन केल्टिक?); १२ विनेज (व्हेनेशियन); १३ दिनमार्क (डेन्मार्क; १४ उरुस (आयरिश किंवा रशियन); १५ रुमियान (रुमानियन किंवा रोमन); १६ तलियान (इटालियन); १७ सुवेस (स्विस); १८ प्रेमरयान (पोमेरॅनियन). -भाइ १८३५. दुसरी एक यादी- फिरंगी, इंग्लिश, फ्रान्सीस, सिंध, पावलिस्त, क्रिस्त, ब्रम्हेय, डौन, द्रुप, क्राज, सुस्त, नाग, जर्मिनी, कालील, बांक, चीन, युवरेर, दौंडी. -कोको. यांत नुसते युरोपियन येत नसून हिंदुस्तानाबाहेरील चिनी वगैरेहि लोक येतात 'वडिलांची अठराटोपीकरावर सलाबत आहे.' -विवी. ८.३.५५. ॰तत्वें- न. अव. महान् (बुद्धि), अहं- कार, मन, दहा इंद्रियें आणि पंचतन्मात्रें -गीर १८५. ॰धान्यें- न. मुख्य धान्यें-गहूं, साळ, तूर, जव, जोंधळा, वाटाणा, लाख, चणा, जवस, मसूर, मूग, राळा, तीळ, हरिक, कुळीथ, सावा, उडीद, चवळी. ॰धान्यांचे कडबोळें- न. (भाजणी-अठरा धान्यें भाजून केलेल्या पिठाचा एक खाद्य पदार्थ ). (ल.) १ निरनिराळ्या प्रकारच्या गोष्टीचें मिश्रण. २ अनौरस अपत्य; जारज. ३ भिन्न जातींचा संकर; संकरजात; संकर जातींतील व्यक्ति ॰पगडजात-स्त्री. १ तांबट, पाथरवट, लोहार, सुतार, सोनार, कासार, कुंभार, देवलक (गुरव), धनगर, गौळी, लाडवाणी, जैन, कोष्टी, साळी, चितारी, माली, तेली, रंगारी. -स्वादि ६.५.३५-३६. जशी युरोपियानांत टोप्यांची -अठरा टोप- कर-तशी हिंदु लोकांची पगड्या बांधण्याची तऱ्हा जातीजातींत वेगळी आहे; तेव्हा जितक्या जाती तितके पगड्यांचे प्रकार; या- वरून सर्व जाती किंवा जातींचे लोक; एकूणएक लोक. २ अव्य- वस्थित, मिश्र जनसमूह; नाना धर्मांचा जमाव. 'या यात्रेंत अठरापगड जात मिळाली आहे, तेथें सोंवळें काय पुसतां?' [अठरा + पगडी किंवा पगडा = फाशावरील संख्यावाचक चिन्ह] ॰पद्में वानर- पु. अव. तरुणांचा जमाव, टोळी, सैन्य; वानरसेना. (रामाला मदत करणारीं १८ पद्मे वानरें होतीं). ॰पर्वें- न. अव. महाभारताचीं मुख्य प्रकरणें:-आदि, सभा, वन विराट, उद्योग, भीष्म, द्रोण, कर्ण, शल्य, सौप्तिक, स्त्री, शांति, अनुशासन, अश्वमेघ, आश्रमवासी, मौसल, महाप्रस्थानक व स्वर्गारोहण. ॰पर्वें भारत- न. (ल.) मोठी कंटाळवाणी गोष्ट; लांबलचक, जींत अनेक भारुडें व दुःखप्रसंग भरले आहेत असें कथन; चऱ्हाट. ॰पुराणें-पुराणें पहा. ॰बाबू-लबाड किंवा लुच्च्या लोकांची टोळी; आळशी लोकांचा कंपू; अव्यवस्थित लोकांचे मंडळ; बारभाई. (हल्लीं) कारकून वर्ग. बाबू पहा. [बं. हिं. बाबू = राजेश्री; समान्य; आंइं. इंग्रजी लिहिणारा हिंदु कारकून ] ॰भार वनस्पति-स्त्री. पृथ्वीवरील सर्व वृक्ष-वन- स्पति यांचा समुदाय, 'अठराभार वनस्पतींची लेखणी ।' -व्यं ३१. ॰वर्ण-पु. अठरा (पगड) जाती. यांची एक यादी अशी; ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, कुंभार, गवळी, तेली, पांचाल, (सोनार, सुतार, लोहार, तांबट, पाथरवट, हे पांच मिळून) , कोष्टी, रंगारी, शिंपी, न्हावी, पारधी, महार, धनगर, परीट, मांग व चांभार. ॰विसवे (विश्वे)-वि. अतिशय; बहुतेक परिपूर्ण; जास्त प्रमाणाचें. विश्वा, विसवा पहा. [अठरा विसांश; वीस विसावांचा एक रुक्का, अठरा विसवे म्हणजे दोन विसवा कमी इतकें; बहुतेक पूर्ण] ॰दारिद्र्य (दरिद्र)-न. अतिशय गरिबी. 'त्याच्या घरीं अठरा विश्वे दारिद्र आहे.' 'अठराविश्वे दरिद्र पाणी वाहतें.' ॰विश्वे-पापपुण्य- चौकशी-मुर्ख-धर्म-रोग इ॰ वाक्प्रचार.

दाते शब्दकोश

सम

स्त्री. तालाची पहिली टाळी; तालाच्या प्रारंभींचें मुख्य ठिकाण; गायनवादनाचें महत्त्वाचें स्थान. -न. १ एक अर्था- लंकार; यामध्यें दोन समान वस्तूंची तुलना केलेली असते. २ कोण- त्याहि आकाशस्थ उभ्या वर्तुळाचा ज्या बिंदूंत क्षितिजाशीं छेद होतो तो बिंदु. ३ (भूमिति) मध्यमप्रमाण. ४ साम्य; सारखेपणा. 'ऐसें बोधा आलें जया सम । तया कर्तव्य तें नैष्कर्म्य ।' -ज्ञा ४. १२१. ५ ब्रह्म. -ज्ञा ६.४३. वि. १ सारखा; तुल्य; समान; सदृश. उदा॰ समकाल, समदेश, सम-गति-क्रांति-गुण-गोत्र-जाति-धन-विभाग-शील-बल वगैरे. 'सकळकाळीं समा । सर्व- रूपा ।' -ज्ञा ११.५३३. 'तुळे घालितां वो नये कनकरासी । सम तुकें एक पान तुळसी वो ।' -तुगा १२१. २ एका पातळींतील; सपाट; सरळ; नीट; थेट; एकरूप. ३ दोन या संख्येनें विभाग्य (संख्या) ४ निःपक्षपाती; समदृष्टि; समान अधिकारी. ५ तटस्थ; मित्रत्व अगर शत्रुत्व नसलेला. ६ शांत. 'तैसा आत्मबोधीं उत्तमु । करितां होय जो श्रमु । तोही जेथें समु । होउनि जाय ।'-ज्ञा १८. १०९४. [सं.] ॰उदर-न. (नृत्य) नृत्यप्रसंगीं श्वासोच्छ्वास अजिबात बंद ठेवणें. ॰कपोल-पु. (नृत्य) गालांची स्वाभाविक स्थिति. ॰ग्रह-पु. (ताल) गाण्यास व ताल देण्यास जेथें एकदम सुरुवात होते तें ठिकाण. ॰चिबुक-पु. (नृत्य) खालचे-वरचे दांत मागें पुढें न होतील, हनुवटी सारखी राहील असे ठेवणें. ॰दर्शन-न. (नृत्य) दोन्ही डोळ्यांचीं बुबुळें एका रेषेंत ठेवणें. ॰पाद-न. (नृत्य) पायांची स्वाभाविक ठेवण; जुळलेले पाय. ॰पुट-न. (नृत्य) पापण्यांची स्वाभाविक स्थिति. ॰मान-स्त्री. स्वाभाविक स्थितींत मान ठेवणें. ॰यति-पु (ताल) गायनाचा प्रारंभ, मध्य व अंत या तीन ठिकाणीं लयीची गति सारखी ठेवणें. ॰वक्षःस्थल-न. (नृत्य) उरोभागाची स्वाभाविक स्थिति. ॰अपूर्णाक-पु. (गणित) छेदापेक्षां अंश लहान असतो असा अपूर्णांक. ॰कर्णतुल्य चतुर्भुज-पु. ज्याचे कर्ण व बाजू सारख्या असतात असा चौकोन; समचतुष्कोण; इ. र्‍हाँबस. ॰कर्णायत- पु. दीर्घचतुरस्त्र; दीर्घ चौकोन. ॰कक्ष-वि. समान; बरोबरीचें; सारखे; जोडीचे. ॰कालीन-क-वि. एकाच काळचे; एकाच वेळचे; एककालीन. ॰केंद्र-वि. ज्यांचा मध्यबिंदु एक आहे अशीं (वर्तुळें). ॰कोण-पु. काटकोन; ९० अंशांचा कोन. ॰खात- पु. (भूमिति)चौरस घन पदार्थ. विटेसारख्या आकाराची आकृति. ॰गुणन-न. एका संख्येस त्याच संख्येनें गुणण्याचा प्रकार; संख्येचा वर्ग करणें. ॰घटक-पु (शाप.) सारख्या आकाराचे पदार्थ, (इं.) आयसोमेरॉइड. -वि. सारख्या आकाराचे, रूपाचे. (इं.) आयसोमेरिक. ॰घटकत्व-न. समरूपता. (इं.) आयसोमेरिझम. ॰घर-न. माजघर; मध्यगृह; मधलें दालन, वठार. ॰चतुरस्त्र- वि. (रूढ) समचौरस; चौकोनी; चारी कोन सारखे असलेला. -नपु, चारी कोन सारखे असलेली आकृति. [सं. सम + चतुर् + अस्त्र] ॰चित्त-वि. १ समतोल स्वभावाचा; समदृष्टि; मनाचा कल ढळूं न देणारा. २ तटस्थ; कोणत्याहि विशिष्ट बाजूस मनाचा ओढा नसलेला; उदासीन. ॰चौरस-समचतुरस्त्र पहा. ॰च्छेद-पु. (गणित) सारखा छेद; सामान्य छेद. -वि. ज्यांचे छेद सारखे आहेत असे (अपूर्णांक). ॰च्छेदरूप-न. ज्या- सर्व अपूर्णांकांस सामान्य असा एकच अंक छेदस्थानीं असतो असे अपूर्णांक. ॰तळणें-अक्रि. (सोनारी) सारखी तोलून मध्यावर खूण करणें (सोन्याची कांब वगैरे). [सम + तोलणें] ॰ता-स्त्री. १ सारखेपणा; बरोबरी. २ अभेदबुद्धि; समबुद्धि; तुल्य मानणें. 'पै भय आणि निर्भयता । अहिंसा आणि समता । तुष्टि तप पांडुसुता । दान जे गा ।' -ज्ञा १०.८५. ३ निःपक्ष- पातपणा. ४ ब्रह्मरूपता; तादात्म्य. ॰तुक-वि. समतोल; सारख्या वजनाचें; सारख्या महत्त्वाचें; सारखें. 'तुका म्हणे तुजमध्यें एक भाव । समतुके भार घेऊं पावो उंच ठाव ।' -भज ३३. ॰तुक भाव-पु. बरोबरी; समतोलपणा. घ्या संभाळून समतुकभावें । आपणहि खावें त्याच तुकें द्यावें ।' ॰तोल-वि. १ सारख्या वजनाचा; समभार. २ सारखा; सम; जोडीचा; बरोबरीचा; सारख्या गुणांचा, मोलाचा, रंगाचा, दर्जाचा. ३ शांत; सौम्य; न क्षोम पावणारा (स्वभाव, प्रकृति). समाधान (प्रकृति). ४ सारख्या शक्तीच्या (प्रेरणा). -क्रिवि. दोहींकडे सारखा भार, वजन असलेला. 'होडीमध्यें समतोल बसावें.' ॰पणा-अवस्था-स्थिति-पुस्त्री. एखाद्या पदार्थावर सर्व बाजूंनीं कार्य करणार्‍या प्रेरणा जेव्हां परस्पर समान असतात अशी स्थिति; तुल्यबलता; (इं.) इक्विलिब्रिअम. ॰त्रिभुज-पु. ज्याच्या तिन्ही बाजू सारख्या लांबीच्या आहेत असा त्रिकोण. ॰त्रैराशिक-पुन. ॰त्रैराशि-स्त्री. (गणित) ज्यामध्यें सम प्रमाणें असतात असें त्रैराशिक. याच्या उलट व्यस्त त्रैराशिक. ॰त्व- न समता पहा ॰स्थळ-न. सपाट जागा; मैदान; सपाटी. [सं. सम + तल] ॰दर्शी-वि. निःपक्षपाती; तटस्थ; कोणत्याहि एका बाजूस मनाचा कल नसलेला. ॰दुःख-समदुःखी-वि. ज्यांस एकाच प्रकारची पीडा, त्रास वगैरे आहे असा; दुःखाचा भागी- दार, वांटेकरी. ॰दृष्टि-स्त्री. समानवृत्ति; निःपक्षपातीपणा; निःस्पृहवृत्ति; उदासीन. ॰द्विभुज त्रिकोण-पु. ज्याच्या दोन बाजू सारख्या आहेत असा त्रिकोण. ॰धात-समधातु- वि. समशीतोष्ण; फार थंड नाहीं व उष्ण नाहीं अशी; निरोगी. 'तशी काया समधात सुगंधिक अमोल फुंदाची ।' -प्रला ९०. [सं. सम + धातु] ॰नख(करण)-न. (नृत्य.) पाय जोडून नखें एका रेषेंत ठेवणें. ॰नर-समशंकु पहा. ॰पाद(स्थान)- न. (नृत्य.) सर्व अंग सरळ, सारखें व सौष्ठवांत ठेवून दोन्ही पाय एक ताल अंतरावर व एकाच रेषेंत ठेवणें. ॰पाद भौमि- चारी-स्त्री. (नृत्य.) दोन्ही पावलांत अंतर न ठेवतां तीं एक- मेकांस चिकटवून जमीनीवर एकाच रेषेंत ठेवणें. ॰पादी-वि. (प्राणि) दोन्ही पाय दोहों बाजूस सारखे असणारा (प्राणि). ॰प्रमाण-वि. (गणित) सारख्या प्रमाणांत वाढणारा अथवा कमी होणारा. -छअ १८. ॰फळि-ळी-स्त्री. बरोबरी; स्पर्धा. 'तयासि मांडितां समफळी । न दिसे दुजा ।' -कथा ४.१४. ५. -वि. समबल; समतोल. 'ज्ञाप्र २७५. ॰बुद्धि- स्त्री. सारखे विचार; सारख्या भावना. -वि. १ सारख्या मताचे, कलाचे, वृत्तीचे. २ सर्वांबद्दल सारखीच वृत्ति असणारा; सम- दृष्टि; कोणासहि कमी अधिक, जवळचा दूरचा वगैरे न मानणारा. ॰भाग-पु सारखा वांटा, हिस्सा, पाती. ॰भाग-समभागी- वि. १ सारखा हिस्सा, वांटा, भाग असणारा; सारखा पातीदार. २ सारख्या प्रमाणाचे, आकाराचे, वजनाचे. ॰भाव-पु. १ सारखेपणा; समरूपता; साम्य; एकरूपता. २ बरोबरी; समता. ३ सारखा स्वभाव, वृत्ति, मनोधर्म, प्रकृति, घटना असलेला; साधर्म्य; प्रकृति-प्रवृत्तिसाम्य. -वि. १ सारखा; एकरूप; समवृत्ति; सारख्या स्वभावाचा. २ सहमत; सहकारी; सहोद्देशी. ॰भाररेषा-स्त्री. ज्या ठिकाणीं वातावरणाचा दाब सारखा असतो अशीं पृथ्वीवरील ठिकाणें दाखविणारी रेषा. ॰भुज- चौकोन-पु. ज्या चौकोनाच्या सर्व बाजू सारख्या असतात असा चौकोन. ॰भुजत्रिकोण-पु. ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू सारख्या असतात असा त्रिकोण. ॰मंडल-न. (ज्यो.) समवृत्त; खस्वस्तिक व पूर्व-पश्चिम बिंदू यांमधून जाणारें वृत्त ॰मात्र-वि. सारख्या वजनाचा, आकाराचा, मापाचा. ॰मिति-स्त्री. १ मध्यम माप; दोन मापांमधील काढलेलें मध्यम माप. २ मापाचा सारखेपणा. ॰मूल्यत्व-न. (रसा.) मूल द्रव्यांचा इतर मूलद्रव्यांशीं संयोग होण्याच्या प्रमाणांतील सारखेपणा. (इं.) ईक्वलव्हलेन्सी. ॰योग-पु. उत्तम योग; चांगला जुळून आलेला प्रसंग. 'ऐशिया समयोगाची निरुती ।' -ज्ञा ८.२२१. ॰रस-पु. ऐक्य; तादात्म्य; एकरूपता; ब्रह्मसारूप्य. 'म्हणे तुका समरशी मिळाला जर । तरी कोणासीं उत्तर बोलावें ।' 'तेथ अवभृत समरशीं । सहजें जहालें ।' -ज्ञा. ४. १३८. -वि. १ समतोल वृत्तीचा, प्रकृतीचा, स्वभावाचा; शांत; गंभीर; सुमनस्क. २ समानधर्मी; सारख्या स्वभावाचा, गुण- धर्मांचा, वृत्तीचा. ॰रसणें-अक्रि. १ ऐक्य पावणें; तादात्म्य पावणें; विलीन होणें; तल्लीन होणें. 'तदा महासुखासी सम- रसे तो ।' २ एक होणें; मिसळणें; विरून जाणें; पूर्णपणें एक- रूप होणें. 'जैसा लवणाचा पुतळा । समुद्रामाजीं समरसे ।' -ह २१.२७. 'अलंकारीं हेम समरसे ।' -यथादी २.१२५६. ॰रस्य-न. ऐक्यभाव. 'चित्तगुणी प्रवेशे । चित्तीं असती समरस्यें ।' -भाए ६८२. ॰रास-स्त्री. शेतांतील पिकांची अविभक्त रास; एकत्रित संपत्ति; एकत्र मालमत्ता, जिंदगी. ॰रूप-वि. सारख्या आकाराचे, आकृतीचे, रूपाचे. ॰रूप्य-न. आकारसादृश्य; आकृतीचा, ठेवणीचा सारखेपणा. ॰लंबचतु- र्भुज-पु. ज्याच्या दोन बाजू समांतर आहेत असा चौकोन. ॰वय-वयी-वयस्क-वि. सारख्या वयाचे, उमरीचे. ॰वर्ति- वि. समतेनें वागणारा, असणारा. ॰विषम-न. विसंगति; अप्र- योजकता. 'जो नावरे समें विषमें । चर्मचक्षूंचेनि चामें ।' -ज्ञा १८. ४०१. 'तेथ समविषम न दिसे कांहीं ।' -ज्ञा ८.१७. -वि. बरें- वाईट; अनियमित; योग्यायोग्य; सदोष. ॰वीर्य-वि. १ सारख्या गुणाचें; सारख्या तीव्रतेचें (औषध, वगैरे.) २ सारखे परा- क्रमी, प्रभावी, शूर. ॰वृत्त-न. (ज्यो.) सममंडल; खस्व- स्तिक व पूर्व-पश्चिम बिंदू यांमधून जाणारें वृत्त. (इं.) प्राइम- व्हर्टिकल. ॰शंकु-पु. (ज्योति.) समवृत्तावर सूर्य असतां पडणारी शंकुच्छाया किंवा त्याच्या अक्षांशत्रिज्या. ॰शीतोष्ण -वि. जेथें हवामानांत थंडी व उष्णता यांचें प्रमाण बहुधा सारखें असतें असा (प्रदेश). ॰शीतोष्णकटिबंध-पु. अयनवृत्त व ध्रुववृत्त यांमधील उत्तरेकडील व दक्षिणेकडील त्रेचाळीस अंशांचा पृथ्वीचा भाग. ॰शील-वि. सारख्या स्वभावाचे, प्रवृत्तीचे, वृत्तीचे; एकमेकांस अनुकूल. ॰समान-वि. १ अगदीं सारखा; तुल्य. 'तुकयाची समता जाण । शत्रुमित्र समसमान ।' २ हुबेहुब; एकरूप. ३ सपाट; सारखी; समतल. 'समसमान साधुनि भुई।' दावि २४.५०. ॰सरीवि. सारखे.'राव प्रधान समसरी । दोन पुत्र दोघांसी ।' -शनि २८६. 'प्रपंच परमार्थ समसरी । होय श्रीहरिकृपें ।' -ह २४.७६. [सम + सर] ॰सीम-वि. ज्यांची सीमा, मर्यादा सारखी आहे असे; एकाच ठिकाणीं संपणारे. [सम + सीमा] ॰सूत्र-न. (ज्यो.) समवृत्ताच्या ध्रुवबिंदूमधून जाणारें महावृत्त; क्षितिज. ॰स्थल- न. पटांगण; मैदान; सपाट जमीन; माळ. ॰स्थान-न. क्षिति- जाचा उत्तर किंवा दक्षिण ध्रुवबिंदु. ॰स्वभाव-वि. सारख्या वृत्तीचा; सारख्या प्रकृतीचा; सजातीय; सारख्या घटनेचा; समान गुणधर्मांचा.

दाते शब्दकोश

जन्म

पु. न. १ उत्पत्ति; प्रसव. २ आयुष्यमान. 'मी जन्मांत खोटें बोललों नाहीं.' ३ (समासांत) जन्मापासून, एकंदर आयुष्यभर; जसें-जन्म-करंटा-खोड-गांठ इ॰ [सं. जन् = उत्पन्न होणें] (वाप्र) ॰घेणें-अस्तित्वांत येणें. ॰जाणें-(आळसामध्यें) आयुष्य खर्च होणें. जन्मणें- १ उत्पन्न होणें. जन्मास येणें; निपजणें; उपजणें. २ जन्म देणें जन्म देखणें-पहाणें-येणें- (ल.) ऋतुस्नात होणें; न्हाण येणें. ॰देणें-बाळंत होणें; प्रसूत होणें. जन्माचा-१ जन्मप्रभृति; जन्मापासून. जसे जन्माचा रोग = वंशपरंपरेचा, जन्मापासून असलेला रोग. जन्माचा रोगी = जन्मापासून आजारी. २ जन्मभर टिकणारे; जसें-जन्माचा जोडा- सोबती = अत्यंत ऋणानुबंधी मित्र; पतिपत्नीसंबंध. जन्माचा पत्कर घेणें-एखाद्याच्या पालनपोषणाची जबाबदारी जन्मभर अंगावर घेणें. -चा पाटा वरवंटा घेणें-एखाद्यास जन्मभर पोसणें, त्याच्यासाठीं श्रम घेणें. -ची आठवण राहणें- १ जन्मभर स्मरण ठेवणें; कधींहि विस्मृति न होणें. २ पक्की अद्दल घडणें. -चे कर्मीं-कर्मीं-जन्मांतून एकदां होणारी, वारंवार न होणारी गोष्ट, कृत्य. नामाशीं याचा क्रियाविशेषणासारखा उपयोग करितात. 'त्यानें जन्माचेकर्मी एक मुंज केली परंतु दमडी दमडी दक्षिणा दिली.' तून जाणें-(क.) निरुपयोगी होणें. (कर्तव्यशून्यमाणसा- संबधीं योजतात). जन्मास घालणें-अस्तित्वांत आणणें. ॰घालणारास रडणें-जन्मदात्याच्या नांवानें खडे फोडणें. जन्मास- येणें-अस्तित्वांत येणें. नवा जन्म होणें-एखाद्या भयंकर अप- घातांतून किंवा रोगांतून उठणें. अन्य जन्मीं-दुसर्‍या जन्मांत. ॰म्ह १ जन्मीं नाहीं तें कर्मी (अनिष्ट गोष्ट दाखवितांना म्हणतात). २ जन्मा आला हेला आणि पाणी वाहतां मेला. सामाशब्द- ॰करंटा-वि जन्मापासून दरिद्री, दुर्दैवी. ॰कर्म-न. १ आयुष्यांतील विशेष काम; आश्रमधर्म. २ उत्पत्ति आणि कार्य; आयुष्यांतील एकं- दर हकीकत 'तूं काय समजलास? तुझें जन्मकर्म मला ठाऊक आहे.' ॰काल-ळ-पु. १ जन्माची वेळ. २ जन्मपत्रिका. ३ सर्व आयुष्य. म्ह॰ जी खोड बाळा ती जन्मकाळा. ॰कुटाळ, जन्माचा टाळ-पु. नेहमींचा कुचेष्टा करणारा; नेहमीं कुटाळी करणारा. ॰कुंडळी-स्त्री. ज्या लग्नावर जन्म होतो त्या लग्नकाळ ग्रहांच्या स्थितीचें कोष्टक. ॰कुर्‍हाड-स्त्री. (ल.) नेहमींचा त्रास देणारा गांव कुटाळ सतत त्रास देणारा. ॰खुट-पु. (खोखोचा किंवा खोक- डाचा खेळ) सीमेवरचे, दोन टोंकांवरचे गडी (माणूस किंवा वस्तु). ॰खाड-स्त्री. जन्मापासून लागलेला किंवा हाडीं मासीं खिळलेला दुर्गुण. ॰गांठ-स्त्री. १ जन्मभर टिकणारा संबंध. २ वाढदिवस [सं. जन्म + ग्रंथि] ॰गुण-पु. स्वाभाविक गुणधर्म. ॰चुडेल चुढेल-स्त्री. (निंदार्थी) भांडखोर, कजाग स्त्री ॰जन्मांतरीं- ॰जन्मीं-क्रिवि. पूर्वीपासून झालेल्या सर्व जन्मांमध्यें आणि ह्या जन्मांत अनेक जन्मांत. ॰जुगाक-क्रिवि. (गो.) आजन्मः प्राण असेपर्यत. ॰जुग-वि. जन्मभर पुरेल असें 'जन्मजग हातांत । विभृतिचा गोळा ।' -अमृत १२८. ॰जोड-स्त्री. जन्मभर पुरेल इतका साठा. ॰जोडा-पु. जन्मगांठ पहा. ॰टिपण-न. जन्म- पत्रिका. ॰तः-क्रिवि. १ जन्मापासूनः जन्मामध्यें. 'जन्मतः वाईट गोष्ट मजपासून घडली नाहीं.' २ स्वाभाविक; स्वभावतः 'कोणी जन्मतः शहाणा असतो कोणी पढून होतो.' जन्मतिथि-स्त्री वाढदिवस जन्मकालची मिति. ॰दगदगी-वि. नेहमीं काळजीचा, नेहमींचा चिंताकांत ॰दरिद्री-भिकारी-वि. जन्मापासून भिकारी. ॰दिन-दिवस-पु. वाढदिवस; जन्मतिथि ॰नक्षत्र-न ज्या नक्षत्रावर जन्म झाला तें. ॰नाम-नांव-न. जन्मनक्षत्राच्या संबंधानें अवकहडा चक्रावरून (बारशाच्या दिंवशीं) ठेवलेलें नांव. ॰पंक्ती-पत्र-पत्रिका-पत्री-स्त्रीनस्त्री. जन्माच्या वेळचें वर्ष, तिथि, राशी, कुंडली इ॰ लिहिलेला कागद व त्यावरून सगळ्या जन्मा- मधील घडणार्‍या गोष्टींचें तयार केलेलें कोष्टक; जन्मटिपण 'याची करा जी जन्मपंक्ती ।' -कथा ५.४.१५. ॰पाश-पु. जन्म, आयुष्य संपेपर्यंत मागें लागलेलें संकट, लचांड. ॰प्रभृति-क्रिवि. जन्म झाल्यापासून. ॰भाषा-स्त्री. मातृभाषा; मायभाषा; मूल जन्मापासून जी भाषा बोलतें ती. ॰भूमि-भूमिका-स्त्री. माय- देश; जेथें जन्म झाला ती जागा. ॰मरण-न. जन्मणें आणि मरणें; यांची परंपरा; जन्ममरणाची आवृत्ति. 'पुनरपि जननं पुनरपि मरणं ।' ॰मरणाधीन-वि. जन्ममृत्यूच्या स्वाधीन. ज्या गोष्टीस जन्म व मृत्यु लागलेले आहेत अशी (अशाश्वतपणा दाखविणारी). ॰मर्याद- क्रिवि. मृत्यु येईपर्यंत; सर्व जन्मभर; आजीव ॰मास-पु. ज्या महिन्यांत जन्म झाला तो महिना ॰योग-पु. जन्मकालीन ग्रहांची शुभाशुभ फलसूचक स्थिति. ॰राशि-रास-पुस्त्री. ज्या राशीवर जन्म झाला ती, जन्मकालीं चंद्र ज्या राशीस असेल ती रास ॰रोग-पु. जन्मापासून जडलेला रोग. ॰रोगी-वि. जन्मा- पासून आजारी; नेहमींचा दुखणेकरी. ॰लग्न-न. जन्मकालीं जी राशीउदय पावत असेल ती. ॰लिखित-जन्मपत्र पहा. ॰वर- भर-क्रिवि. आयुष्यभर 'जन्मवरी स्वार्थ केला ।' -दा ३.५.५०. ॰वित-वि जन्म देणारा. ॰व्रती-जन्मभर व्रत घेणारा, आचरणारा. ॰सवाशीण-सौभाग्यवती-स्त्री. १ सौभाग्यानें मरणारी २ (ल.) वेश्या ॰सळ वि. जन्मापासून खोडकर; त्रासदायक (मूल) ॰सांड-स्त्री. जन्मापासून एखाद्या गोष्टी- पासून पराङमुखता (क्रि॰ देणः करणें) ॰साफल्य-सार्थक्य- न आयुष्यांतील ध्येयाची सिद्धी. ॰सावित्री-स्त्री. १ (आशी- र्वाद देतांना) जन्मसवाशीण 'तूं जन्मसावित्री होसी । चंद्रार्कवरी राहसी ।' -कथा १.२..१७०. २ (ल.) पांघरण्याचें किंवा नेसावयाचें जें कधीं धुतलें जात नाहीं असें वस्त्र ॰सोंवळा-वि. १ जन्म सावित्री अर्थ २ पहा. २ (पवित्र समारंभामध्यें) तसलें सोंवळें नेसणारा ॰सौभाग्य-न. जन्मापासून चांगलें नशीब. ॰स्थ- वि. जन्मलग्नामध्यें असलेला जन्माच्या वेळेचा (ग्रहकुंडलींतील). ॰स्थान-न. १ जन्मभूमि. २ जन्मलग्न. ॰स्थानीं लघुशंका करणें-१ मातृगमन; मात्रागमन. २ (ल.) उपकार करणारावर अपकार करणें; कृतघ्नता. ॰स्वभाव-पु. जन्मापासूनची वृत्ति, वागण्याची तर्‍हा. जन्माची प्रकृति. -ची गांठ-विवाहासारखा कधीं न तुटणारा संबंध. -ची जोड-१ जन्मजोड पहा. २ पतिपत्नी-बापलेक संबंध. ची भाकरी-बेगमी-जन्मभर टिक- णारें पोटापाण्याचें साधन. -ची साट-जन्माची भाकर पहा. जन्माचें सार्थक-जन्मांतील ध्येय, उद्देश, हेतु. (क्रि॰ करणें). जन्मांतर-न. १ दुसरा जन्म (मागचा किंवा पुढचा). २ नशीब; दैव 'म्या पालखीत बसावें असें माझें जन्मांतर नाहीं.' ॰आठविणें-लहानपणचे दिवस आठविणें. ॰उपटणें-नशीब चांगलें अथवा वाईट अनुभवास येणें. ॰काढणें-(ल.)-बद्दलचा अस्सल दस्तैवज शोधून काढणें. ॰सापंडणें-मिळणें-हातास लागणें-वरील प्रकरचा दस्तैवज मिळणें, सांपडणें. ॰पाहणें- शोधणें-तपासणें-जन्मपत्रिका पाहणें; संसारांतील कामकाज पाहणें. ॰फुटणें-नशीब फुटणें; दुर्दैव ओढवणें. जन्मांतरीं न घडणें-न होणें-सबंध जन्मांत न होणें. जन्मांतर-कथा- गोष्ट-हकिकत-स्त्री मागच्या आयुष्यांतील गोष्ट किंवा वाईट कृत्य. जन्मांतर(रीं)चा-वैरी-दुष्मन-दावेदार-वि. मागील जन्मामधील शत्रुः याच्या उलट जन्मांतरींचा मित्र, सहकारी. (वाप्र.) जन्मांतरींचा द्वेष-वैर, मैत्री-ऋणानुबंध इ॰ वगैरे. जन्मां- तरचें ज्ञान-न लहान मूल किंवा प्राणी यांच्यामधील दिसून येणारी उपजत बुद्धि जन्मांतरयोग-पु. मागच्या जन्मीं केलेल्या चांगल्या कृत्यामुळें या जन्मीं सुख मिळतें ही कल्पना. जन्मादा- रम्य-क्रिवि. जन्मापासून (आतांपर्यंत). जन्मांध-वि. जन्मा- पासून किंवा उपजत आंधळा. जन्माष्टमी-स्त्री. गोकुळअष्टमी. श्रावण वद्य अष्टमी. जन्माक्षर-न. पंचांगामध्यें अवकहडा चक्रांत जन्मनक्षत्राला जें अक्षर असतें तें. जन्मोजन्म-जन्मीं-क्रिवि. या व पुढील जन्मांत; अनेक जन्मांत; निरंतर. जन्मजन्मांतरीं पहा. जन्मोत्तरी-जन्मोत्री-स्त्री. जन्मपत्र पहा. 'वरिष्ठें वर्तविली जन्मोत्री । यासी दोन पुत्र आणि येक स्त्री ।' -कथा ३.३.७१.

दाते शब्दकोश

पर

न. १ ब्रह्म; परमेश्वर. 'पर सुखाची उर्मी ।' -ऋ १. २ वस्तु (ब्रह्म). 'आतां अर्जुना आणिक कांहीं एक । सांगेन मी आइक । जे विचारें पर लोक । वोळखिती ।' -ज्ञा २.१२५. ३ -पु. शत्रु; अरि. 'कुरु कटकाला बहु भय देती गर्जुनि सिंहसे पर ते ।' -मोभीष्म ५.६२. [सं.] -वि. १ आत्मीय नव्हे असा; परका; परकीय; विदेशी. (समासांत) परचक्र-देश-मुलुख इ॰ २ दुसरा; इतर; भिन्न; निराळा; वेगळा. 'आप आणि पर नाहीं दोन्ही ।' -तुगा २११७. 'कपटादरें वळो पर, परि परमेश्वर कसा वळेल हरी ।' -मोउद्योग ७.१०. ३ संबंध असलेला; अनुसरणारा; (एखाद्यास) वाहिलेला; आधिन; जोडलेला. 'ज्ञानपर शास्त्र तुम्ही कर्मपर लावूं म्हणतां तर लागणार नाहीं.' 'लोकनिंदापर भाषण करूं नयें.' ४ अद्भुत; असाधारण; अपूर्व. ५ श्रेष्ठ; उच्च; थोर. 'जो पतीहून पर ।' -रास १.२६७. ६ नंतरचा. -क्रिवि. पलीकडे. 'ईश्वर स्वरूप मायेचे पर आहे.' ज्याच्या पूर्वपदीं हा शब्द येतो असे अनेक तद्धित व सामासिक शब्द आहेत. त्यांतील कांहीं पुढें दिले आहेत. परका-खा-वि. १ दुसरा; बाहेरचा; परकीय; अनो- ळखी (माणूस). २ नवीन; निराळी; वेगळी (वस्तु) [सं. परकीय] परकाई-खाई-स्त्री. १ परकेपणा (माणसाचा). २ नवलाई; नावीन्य (वस्तूचें). [परका] ॰कामिनी-स्त्री. दुसऱ्याची बायको; परदारा; परस्त्री. 'मन हें ओढाळ गुरूं परधन परकामिनीकडे धावें ।' -मोरोपंत (कीर्तन १.२४.) ॰काय(या)प्रवेश-पु. मंत्रादि सिद्धीनें आपला देह सोडून एखाद्या प्रेतांत किंवा दुसऱ्याच्या देहांत शिरणें; ती विद्या. परकी, परकीय-वि. १ परका पहा. अनोळखी; नवीन (माणूस). २ दुसऱ्यासंबंधीं; दुसऱ्याचा. परकीया-स्त्री. दुसऱ्याची बायको (प्रेमविषयक तीन वस्तूंपैकीं एक). ॰कोट-पु. एक तटाच्या बाहेरचा दुसरा तट; पडकोट. ॰क्रांति-स्त्री. (ज्यो.) क्रांतिवृत्ताचा वांकडेपणा. ॰गति-स्त्री. स्वर्ग. 'परगति पावों पाहसि, पर पदरीं फार पाहिजे शुचिता ।' -मोआदि २४.५६. ॰गमन-न. स्वस्त्री किंवा पति सोडून दुसऱ्याशीं व्यभिचार करणें; व्यभिचार. ॰गृह-घर-न. १ दुसऱ्याचें घर. २ दुस- ऱ्याच्या घराचा आश्रय घेणें. 'तो फार गर्भश्रीमंत आहे, त्याला परगृह माहीत नाहीं.' ३ व्यभिचार; परगमन पहा. ॰घर निवारण-न. इतःपर दुसऱ्याच्या मदतीची आवश्यकता न पडेल अशी स्थिति (देणगी). ॰गोत्री-वि. निराळ्या गोत्राचा. 'श्राद्धास परगोत्री ब्राह्मण बोलवावे.' ॰चक्र-१ स्वारी करणारें सैन्य. २ शत्रूची स्वारी, हल्ला, चढाई. 'परचक्र कोठें हरिदासांच्या वासे । न देखिजे तद्देशे राहातिया ।' -तुगा ६४६. ३ परकीय अंमल, ताबा. ॰छंद-वि. दुसऱ्याच्या स्वाधीन, ताब्यांत अस- लेला; दुसऱ्याच्या तंत्रानें मर्जीनें चालणारा; पराधीन. ॰तंत्र- वि. १ दुसऱ्याच्या स्वाधीन, ताब्यांत असलेला; दुसऱ्याच्या तंत्रानें चालणारा. २ (ल.) शरीर. 'हा लोकु कर्में बांधिला । जो पर तंत्रा भूतला । तो नित्ययज्ञातें चुकला । म्हणोनियां ।' -ज्ञा ३.८४. ॰तत्त्व-न. परब्रह्म. 'तैसी प्रकृति हे आड होती । ते देवेंचि सारोनि परौती । मग परत्व मझिये मती । शेजार केलें ।' -ज्ञा ११.७६. ॰तीर-न. (नदी इ॰च्या) पलीकडचा, दुसरा कांठ, तीर. ॰त्र-न. १ परलोक; याच्या उलट अरत्र. 'म्हणोनि देवो गोसावी । तो धर्माधर्मु भोगवी । आणि परत्राच्या गांवी । करी ते भोगी ।' -ज्ञा १६; ३०६; -दा २.४.१९. २ (महानु.) परमे- श्वर पद; परमार्थ. 'कव्हणी परत्र पाहौनि न बोले । निःप्रपंचु ।' -ऋ ४४. -क्रिवि. नाहींतर; अन्यथा; अन्यत्र. ॰त्रगति-स्त्री. दुसरी स्थिति; परलोक; स्वर्ग. (क्रि॰ साधणें; होणें; मिळणें). ॰त्र साधन-न. परलोक किंवा स्वर्ग मिळविणें. ॰त्व-न. १ दूरपणा; पलीकडे असणें. २ परकेपणा; दुजा भाव. ३ दुसरेपणा. 'म्हणोनि परत्वें ब्रह्म असें । तें आत्मत्वें परियवसे । सच्छब्द या रिणादोषें । ठेविला देवें ।' -ज्ञा १७.३७७. ॰थडी-परतीर पहा. 'त्यासि भवार्णवपरथडी । तत्काळ रोकडी मी पाववीं ।' -एभा १७.४४०. 'क्रमावी पावोनि परथडी ।' -सिसं ८.२७२. ॰थळ्या-वि. परस्थ. 'पंच ब्राह्मण वगैरेस विडे देऊन नंतर परथळ्या कोणीं असल्यास त्यास विडा देतात.' -बदलापूर ३७. [पर + स्थल] ॰दरबार-न. पेशव्यांच्या बरोबरीच्या राजांस किंवा त्यांच्या वकीलांस वगैरे पेशव्यांकडून दिलेल्या नेमणुका, जवाहीर, कापड वगैरे नोंदण्याचें हिशेबाचें सदर. ॰दार-पु. दुसऱ्याची बायको. [सं. परदारा] ॰दार-न. परद्वार; व्यभिचार परद्वार पहा. ॰दारगामी-वि. परदारा भोगणारा; व्यभिचारी. ॰दारा-स्त्री. दुसऱ्याची बायको; परदार. 'परदारादिक पडे । परी विरुद्ध ऐसें नावडे । मग शेळियेचेनि तोंडें । सैंघ चारी ।' -ज्ञा १४.२२९. 'परदारा परधन । आम्हां विषसमान ।' ॰दुःखेन दुःखित-वि. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखित होणारा. 'परदुःखेन दुःखिता विरला.' ॰देश-पु. १ स्वदेशाहून भिन्न देश; परकीय देश. २ दुसऱ्या देशांत केलेला प्रवास. ॰देशी-पु. १ परका; दुसऱ्या देशांतील माणूस; स्वदेश सोडून परदेशांत आलेला मनुष्य इ॰ २ उत्तरहिंदुस्थानी माणूस; पुरभय्या. -वि. परका. दुसऱ्या देशांतील (माल) ॰द्वार-न. १ परदारागमन पहा. स्वस्त्रीखेरीज अन्य स्त्रीशीं (वेश्या सोडून) गमन करणें; व्यभि- चार. 'वालभे परद्वार केलें । कोढी कोणी होय ।' -ज्ञा १६.३०५. २ पतीखेरीज अन्य पुरुषाशीं कुलीन स्त्रीनें केलेलें गमन; जारकर्म. (क्रि॰ करणें) 'घरस्वामि सोडुनी नारि ज्या परद्वार करिती ।' -होला १६६. ॰द्वारी-वि. व्यभिचारी; जारकर्म कराणारी (स्त्री, पुरुष). 'मैद भोंदु परद्वारी । भुरटेकरी चेटकी ।' -दा २.३.३१. ॰धन-न. १ दुसऱ्याचा पैसा. 'परदारा परधन । आम्हां विषस- मान ।' २ (ल.) मुलगी. कारण लग्न झाल्यावर ती परक्याची होते. ॰धारजिणा-वि. (निंदार्थी) दुसऱ्याच्या उपयोगीं पडणारा; दुसऱ्याला फायदेशीर, उपकारक (स्त्री, मुलगा, नोकर). ॰नार-नारी-स्त्री. दुसऱ्याची बायको. 'परधन परनारी । आम्हां विषाचिया परी ।' 'परनार विषाची धार घात करि जीवा ।' ॰न्यास-वि. वाटेल त्यास शिव्या इ॰ देण्यास लावणारा. (एक वातविकार). ॰पाकरुचि-वि. नेहमीं दुसऱ्याच्या घरीं जेवणारा; परान्नभोजी. [पर + पाक + रुचि] ॰पांडित्य-न. (निंदार्थी) (स्वतः त्याप्रमाणें न वागतां) दुसऱ्याला उपदेश करणें. ॰पार-पु. १ पलीकडचा कांठ-किनारा; परतीर. 'तेथ भक्त संत सज्ञान नर । स्वयें पावविशी परपार ।' -एभा २०.५. २ (भवाच्या पलीकडचा तीर) मोक्ष. 'जेणें पाविजे परपार । तिये नावं यात्रा पवित्र ।' -एभा २१.५८. ॰पीडा-स्त्री. १ दुसऱ्याला त्रास, दुःख देणें. 'परपीडेसारखें पाप नाहीं.' (क्रि॰ करणें; देणें). २ दुसऱ्याचें दुःख. ॰पुरुष-पु. १ परका माणूस. २ (बायकी) नवरी, भाऊ, इ॰ जवळचे आप्त सोडून इतर माणूस. ३ ईश्वर; परमेश्वर. ॰पूर्व स्त्री-स्त्री. स्वैरिणी. व्यभिचारिणी स्त्री. ॰पेठ-स्त्री. १ दुसरें गांव. २ हुंडीची तिसरी प्रत; एक हुंडी गहाळ झाली असतां दुसरी देतात तिला पेठ म्हणतात व तीहि गहाळ झाली तर जी तिसरी देतात ती. ॰बुद्धि-स्त्री. दुसऱ्याची बुद्धि, अक्कल. -वि. दुसऱ्याच्या बुद्धीनें, तंत्रानें चालणारा. ॰भाग्योपजीवी-वि. दुसऱ्याच्या नशीबावर जगणारा; आश्रित; पोष्य; पराधीन. ॰मार-पु. दुसऱ्याच्या नाश. 'प्रतिष्ठीन परमारु । यागवरी ।' -ज्ञा १६.३६०. ॰मार्ग-पु. १ परमेश्वराचा मार्ग; परमार्थ. 'जेथ कैवल्य वस्तु सांटवे । परमार्गु वाहाति सदैवें । जेआंलागिं ।' -ऋ १००. २ महानुभाव धर्म. 'तो नमस्करूं परमार्गु । दातारांचा ।' -ऋ ६. ॰मुलूख-पु. परदेश. ॰रत-वि. व्यभिचारी (स्त्री, पुरुष). ॰राज्य-न. १ दुसऱ्यांचें, परक्या लोकांचें राज्य; परकीय सरकार. २ परकीय लोकांचा अंमल, ताबा. याच्या उलट स्वराज्य. ॰रूपसंधि-पु. (व्या.) दोन्ही स्वरांच्या जागीं पुढला स्वर मात्र होतो असा संधि. ॰लक्ष्मी नारायण-वि. उसन्या, दान मिळालेल्या संपत्तीवर डौल मिरवणारा. ॰लोक-पु. १ मृत्यू- नंतर प्राप्त होणारा लोक, ठिकाण (स्वर्ग, नरक, इ॰); मृत्यूनंतरची स्थिति. २ (व्यापक) अक्षय सुखकल्याणाच्या जागा प्रत्येकीं (कैलास, वैकुंठ. इ॰) ॰लोकवासी होणें-मरणें; मृत्यु पावणें. ॰वधू-स्त्री. दुसऱ्याची भार्या; परदारा. ॰वश-वि. दुसऱ्याच्या ताब्यांत असणारा; पराधीन; परतंत्र. ॰वशता-स्त्री. पारतंत्र्य; पराधीनता. 'फारचि बरी निरयगति, परवशता शतगुणें करी जाच ।' -मोविराट १.५६. ॰वस्तु-स्त्री. १ उत्कृष्ट वस्तु; श्रेष्ठ वस्तु. 'विद्येसारखी परवस्तु नाहीं.' -न. परब्रह्म. [सं.] ॰शय्या- स्त्री. व्यभिचार; परपुरुषाशीं त्याच्याच घरीं संग करणें. ॰शास्त्र- न. (महानु.) श्रेष्ठ शास्त्र; ब्रह्मविद्या; अध्यात्म. 'आक्षेप परिहारीं निर्धारू । करितां परशास्त्र विचारू ।' -ऋ २३. ॰स्त-स्थ-वि. १ परक्या गावांत किंवा देशांत रहाणारा; परगांवचा. २ (ल.) तटस्थ; तिऱ्हाईत; निःपक्षपाती. ॰स्त्री-स्त्री. आपल्या स्त्रियेवांचून इतर स्त्री; दुसऱ्याची बायको. 'नका लाऊं जिवलगा प्रीत तुम्ही परस्त्रीचे ठाई ।' -होला १०८. ॰स्थळ-न. दुसरी जागा, स्थळ. (ज्याच्या विरुद्ध निकाल झाला तो दुसरी कडील निका- लाची खटपट करतांना वापरतो). ॰स्व-न. दुसऱ्याची मालमत्ता, धन. ''नातरी परस्वापहारें । जें सुख अवतरे ।' -ज्ञा १८.८०७. ॰स्वाधीन-वि. परतंत्र; परवश. म्ह॰ परस्वाधीन जिणें व पुस्तकी विद्या उपयोगी नाहीं. ॰हस्तगत-वि. दुसऱ्याच्या हातांत गेलेलें.

दाते शब्दकोश

वर

क्रिवि. १ पर्यंत; काल मर्यादा किंवा प्रमाण यापावेतों. उदा॰ आजवर; वर्षावर; पायलीवर; खंडीवर. २ उंच; उच्च प्रदेशीं; उपरि. याच्या उलट खालीं. ३ नंतर; मागून. 'औरंगजेब मेल्यावर कोण गादीवर आला?' ४ अधिक; जास्त. 'त्या सभेंत शंभरावर लोक नव्हते.' ५ शिवाय; आणखी. 'आम्हाकडून काम करून घेतलेंच, वर आम्हाला शिव्या पण दिल्या.' ६ मुळें; कारणानें. 'पुरुषोत्तमरावांचें घर आपणांवरच चाललें आहे.' -इप ३२. ७ अनुरोधानें लक्ष्यविषय करून. 'वाघावर एकटा कसा चालला आहे तो पहा.' 'या विषयावर चार घटका बोलत होता.' ८ परंतु 'हे सारि ते वर थोडे । आणीकही साधील गाढे ।' -ज्ञा १६.३५२. वरता, वरी पहा. [फा. वर; सं. उपरि; प्रा. उवरि तुल॰] ॰डोकें काढणें-ऊर्जितावस्थेस येणें. 'तारा- बाईनें नातवाला सातारची गादी साधून देऊन वर डोकें काढलेलें जिजाबाईला मानवलें नाहीं.' -भक्तमयूर केका ५. ॰तोंड करणें- निर्लज्ज बनणें; लाज न वाटणें. ॰पडणें-(वस्तू, गोष्टी) तत्परतेनें करूं लागणें. 'अलीकडे तो कादंबऱ्यांवर पडला आहे.' ॰पाहणें- लज्जा, शंका, भीति न वाटणें; धीटपणा असणें; उजागरीनें बघणें. 'पापाला वर पाहण्याचा धीर होत नाहीं.' -पुण्यप्रभाव १३७. सामाशब्द- ॰उपचार-पु. अव. १ वरवर सभ्यपणा; शिष्टपणा दाखविणें; खोटी नम्रता; शिष्टचार. २ रोगनिवारणासाठीं बाहेरून शरीराला केलेले उपचार. ॰कडी-वर्चस्व; वरचढपणा. 'राज्यांत मुघोजीची वरकडी झाली कीं आपला तो सूड उगवील अशी कारभाऱ्यांस भीति पडली.' -विवि ८.६.११०. ॰करणी-वि. बाह्य; औपचारिक; कृत्रिक; दिखाऊ; वरकांती; पोकळ (भाषण, कृत्य, इ॰). ॰कर्मी-वि. १ वरकणी पहा. 'याचें असलें बरकर्मी बोलणें तुम्ही जमेस धरूं नका हो !' २ बाहेरचा; आंत ज्याचा प्रवेश नाहीं असा (रोग, औषध). ३ मूळचा झरा नसलेलें (जल इ॰). ४ मूळ नसलेला; उपरी; स्थिरपणा, कायमपणा नसलेला. ५ पोकळ; दिखाऊ; खोंटें. ॰कर्मी आदर-पु. पोकळ, कृत्रिम आदर, भाव; आदरसत्काराचा खोटा देखावा. ॰कांती-कांतीचा-वि. १ दिखाऊ; सुंदर; सुरेख दिसणारा. २ वरकरणी पहा. 'नाहीं शब्द रे बोललास वर- कांतिचा ।' -प्रला १५६. ॰काम-न. प्रत्यक्ष बनावाचें काम न करतां त्याला साधनीभूत असणाऱ्या गोष्टी करणें. उदा॰ स्वयंपाकाला लागणारें साहित्य पुरविणें, धुणेंपाणी इ॰. ॰कोट- पु. थंडी, पाऊस इ॰ साठीं कोटावर घालावयाचा लांब कोट. (इं.) ओव्हरकोट. 'उलट वरकोट आणि हातमोजे हा नेहमींचाच पोषाक होऊन बसला आहे.' -सांस २.२३४. ॰खर्च-पु. १ अधिक, योजलेल्यापेक्षां जास्त खर्च. २ इतर किरकोळ खर्च. ॰खाल-क्रिवि. खालवर; उंचसखल; विषमरीतीनें. ॰घडी-स्त्री. १ वस्त्राची घडी करतांना दर्शनी चांगला भाग यावा म्हणून अमळ बारीक विणून काढलेला पट्टा; वरची चांगली बाजू. २ (शिंपी- काम) बाहेरच्या बाजूला असलेली दुमड. 'वरघडीच्या तळाची ट्रावझर करावयाची असल्यास पांच इंच कापड अधिक घ्यावें.' -काटकर्तन ८. ॰घडीचा-वि. १ बाह्य; वरचा. २ वरघडी असलेलें (वस्त्र). ३ (ल.) दिखाऊ; भपकेदार. ४ कृत्रिम; खोटें. ॰घाट-पु. १ बाहेरचा आकार, घडण; बाह्य; स्वरूप. २ घाटावरचा प्रदेश; सह्याद्रिच्या पूर्वेकडील मुलूख. ॰घाटी-वि. बरघाटासंबंधीं (माणूस, पदार्थ इ॰). ॰घाटीण-स्त्री. घाटा- वरची स्त्री. ॰घाला-पु. जोराचा हल्ला, घाला. 'षड्रिपूवरता वरघाला ।' -दावि ३७९. ॰चढ-वि. सरस; श्रेष्ठ; जास्त; वरच्या दर्जाचा. ॰चढपणा-पु. सरसपणा; श्रेष्ठपणा. ॰चष्मा- श्मा-पु. १ वरचढपणा; वर्चस्व. (क्रि॰ करणें; होणें). 'काके- शियन वर्गाचा दुसऱ्या वर्गावर नेहमी वरचष्मा असे' -मराठी ६.३०६. २ देखरेख करणारा; तपासनीस; वरचा अधिकारी. ३ वर्चस्व गाजविणारा; अधिकार चालविणारा. ॰जोर-वि. श्रेष्ठ. 'सीरजोर वरजोर जोर हा ।' -दावि ३१०. ॰डगला-पु. (वडोदें) वरकोट पहा. -खानो ३. ॰डोळ्या-ळा-वि. १ उलट्या- बाहुल्या असणारा; अदूरदृष्टि; नेत्ररोगी. 'परपुरुषातें नयनीं पाहे । उपजतां वरडोळी होये ।' -गुच ३१.८५.२ आढ्यताखोर; रागीट. ३ टक लावून वर पाहणारा; वर दृष्टि असणारा (निंदार्थीं उपयोग). ॰तडग-न. दागिन्यावरचा तगडाचा अंश. ॰दळ-न. भाजी- बरोबर चव येण्यासाठीं शिजविलेली डाळ. [वर + दाळ] ॰दळ- न. १ घरावर कौलें, गवत इ॰ घालण्यापूर्वीं वांसे, पांजरण इ॰ पसरतात तें. २ वरचें कवच, साल. 'येक वरदळ बरें असतें । कठिण अंतर्त्यागि दिसतें ।' -ज्ञानप्रदीप ८३४. ३ वरचा भाग. 'अंग साजिरें नाकहीन । वरदळ चांग चरण क्षीण.' -एभा ११.१२८५. ४ मुलामा. 'हावभावाचेनि वरदळें ।' -भाए ३४५. -वि. १ वरवरचा; बाहेरचा. 'दाऊनियां वरदळ वेष । मना अंगीं आशा- पाश ।' -निगा २८०. 'वरदळभक्तीं करोनिया नमन ।' -नव १८.१६३.२ दांभिक. 'तुका म्हणे आम्हां तुमचेचि फंद । वरदळ छंद कळों येती ।' -तुगा ५०७. ३ हलकें; नीरस; किरकोळ. [वर + दल] ॰दळ-स्त्रीन. १ उपयोगांत, वहिवाटींत असलेले जिन्नस. 'चोर आले आणि वरदळ नेली.' २ नफा; वर मिळणारा फायदा. 'लाख रुपयें मूळ पुंजी. जें वरदळ मिळेल तें खातों.' ॰दळखर्च-पु. जास्त खर्च. ॰दळ जिंदगी-दौलत-स्त्री. सामान; जंगम माल. वरदळा-ळें-क्रिवि. वरून; बाहेरून. 'सेवन हें शिरसा धरीं । अंतरीं ही वरदळा ।' -तुगा ३२२३. 'तेविं मनुष्य वेशाचें रूपडें । वरदळें दिसे चोखडें ।' -ज्ञाप्र ७५०. वरदळ सामान-१ जंगम माल. २ किरकोळ माल. सामान. ॰दक्षिणा-स्त्री. चोरी इ॰ कानें गेलेला पैसा, पदार्थ परत मिळ- विण्यासाठीं व्यर्थ खर्चलेला पैसा. ॰दूध-न. अंगावरील दुधाखेरीज इतर दूध (लहान मुलास दिलेलें). वरचें दूध पहा. ॰नट-क्रिवि. वरून; वरकांती. 'लई अंतरची खोल मोठी वरनट केवळ सात्विक दिससी ।' -होला ८९. ॰पंग-क-वि. वरवरचा; बाह्यात्कारी (देखावा). 'अथवा वरपंग सारा । पोटीं विषयाचा थारा ।' -तुगा २८३२. ॰पंकाचा-पंगीचा-वि. क्रिवि. वरकरणी; वरकांती पहा. 'कीं वरपंगी जेवि जारीण । दावी भ्रतारसेवा करून ।' ॰पंकी- पंगी-पांगी-क्रिवि. वरवर; बाह्यात्कारी; बाह्यतः 'सामाजिक व धामिंक रीति इंग्रजी शाळेंतला मनुष्य वरपांगी पाळीत असतो.' -टि ४.३७८. [वर + पंख] ॰पंगतीचा-वरपंकी पहा. वर- कांती. 'हा स्नेह नाहीं वरपंगतीचा ।' -सारुह १.३६. ॰पिका- पीक-वि. झाडावर पिकलेला (फलादि पदार्थ) याच्या उलट कोनपिका. ' वरपिका फणस असला तर मला दे. कोनपिका नको, ' [वर + पिकणें] ॰बुजारत-क्रिवि. वरबर; बाह्यतः [वर + हिं. बुझारत] ॰बट्टा-पु. नाणें मोडतांना पडणारा बट्टा. बाहेरबट्टा पहा. ॰वंचाई-स्त्री. बाह्य भपक्यावरून झालेली फसवणूक. [वर + वंचणें] ॰वंचाईचा-वि. वरकर्मी पहा. ॰वर-वरता-वरतीं- क्रिवि. वि. १ आंत प्रवेश न होतां-करतां; बाहेरूनच (खोदणें, चोळणें इ ॰). २ थोडें फार, खोल नव्हे, अंतर्यामी नव्हे अशा रीतीनें. ३ वरकांती-वरपांगी; कृत्रिम; खोटें. 'तो मला वरवर प्रेम दाख- वितो. ' म्ह॰-वरवर माया करती आणि तोंड झांकूनी खाती. ॰वर करणें-केल्यासारखें दाखविणें; करण्याचें ढोंग करणें. वरवर बोलणें- रडणें-हांसणें-रागें भरणें-कृपा करणें इ॰ प्रयोग होतात. ॰वर उपचार-पुअव. बाह्य, दिखाऊ आदरसत्कार; नुसता, पोकळ शिष्टाचार. ॰वळा-पु. वर्चस्व; बलाधिक्य. 'देखोनि वैरियांचा वरवळा । कांपिन्नली भीमकबाळा । ' -एरुस्व ८.५१. ॰वेष-पु. बाह्य वेष; बुरखा; ढोंग. ॰शेर-सर-सांड-स्त्री. भरपूरपणा; महामुरी; तुडुंब होऊन सांडणें. -वि. भरपूर; तुडुंब. ॰सार, ॰सार- पारसार-स्त्री. (व.) संसारोपयोगी सामानसुमान, चीजवस्तु. ॰सोस-पु. श्वास; ऊर्ध्व. (क्रि॰ लागणें). [वर + श्वास] वरचा- वि. बाह्य; वरच्या भागाचा. ॰चें दूध-न. लहान मुलाला आईच्या दुधाऐवजीं-शिवाय गाईम्हशीचें जें दूध घालतात तें. -टि १.२९७. वरता-तीं-तें-शअ. क्रिवि. सर्व अर्थीं वर पहा. १ वर. 'त्यानें जे समयीं वरतें बसावें ते समयीं त्याची बुद्धि मोठी उदार व्हावी. ' -सिंहासनबत्तीशी १. २ आणखी. ३ अधिक. ' त्याहूनि कोटि- योजना वरता । ' -भारा किष्किंधा ११.७९. ४ हून; पेक्षां. ' तरी स्त्री आणि स्त्रैणावरता । दुःसंग सर्वथा असेना । ' -एभा २६.३०२. ५ श्रेष्ठ; उच्चतर. ६ (किनाऱ्याच्या बाजूनें ) उत्तरेकडचा. ७ किनाऱ्यापासून आंत. वरला-वरचा पहा. वरावरी-क्रिवि. १ वरचेवर; वारंवार. -तुगा. -शर. २ झपाट्यानें; निषिमांत. वरि- री-शअ. क्रिवि. वर पहा. १ वर; उंच. 'तूं काइसयावरी आहासि ऐसें । पाहिलें मियां । ' -ज्ञा ११.२७५. २ आणखी. 'ऐसा जात्यंधु अधस्तु । वरि भवरोगी ग्रस्तु । ' -ऋ २. ३ वरवर; बाह्यतः 'सत्य धनंजय कर्मे रूपें दिसतो उगाचि वरि नरसा । ' -मोभीष्म ११.७२. ४ पर्यंत. 'तैसें आस्थेच्या महापुरीं । रिघतांति कोटि- वरि । ' -ज्ञा ७.१३. ' देव जवळ अंतरीं । भेटीं नाहीं जन्मवरी । ' -तुगा. ५ (तृतियेचा प्रत्यय) नें; मुळें. 'तो निर्मत्सरू का म्हणिजे । बोलवरी । ' -ज्ञा ४.११३. वरिवरी-क्रिवि. वरवर पहा. 'अवघे देखिले अधर्मरत । वरीवरी आचार दावित । जैसी शांति मैंदाची । ' -वरीव-वि. श्रेष्ठ; उत्कृष्ट. ' प्रेम देखतांचि दिठीं । मीं घें आपुलियें संवसाठीं । नव्हतां वरीव दे सुखकोटी । नये तरी उठाउठी सेवक होय ।' -एभा १४.१५८. वरिवा-पु. १ वरचढपणा; श्रेष्ठपणा. 'जियें आपुलियां बरवां । नंदनवनातें मागती वरिवां । ' -शिशु २४९. २ शोभा; उत्कृष्टपणा. वरिष्ट-ष्ठ-वि. विद्या, वय इ॰ कानीं श्रेष्ठ; सर्वांत मोठा; श्रेष्ठ. -ज्ञा १.३०. 'ईश्वर तो अति वरिष्ठ । येरू भूतभौतिक अति कनिष्ठ । ' -भाराबाल ११. १६५. ३ अत्यंत मोठे, जड. [सं वरिष्ठ] वरीयान्-वि. श्रेष्ठ (मनुष्य, प्रश्न इ॰;) अत्युत्तम; अत्युत्कृष्ट. -पु. (ज्यो.) १८ वा योग. वरील-वि. वरच्या भागासंबंधीं; वरचा. वरुता-तें- शअ. क्रिवि. वर, वरता-तें पहा. 'पाळा मांडिला शरीरावरुता । ' -नव. ११.१२०. वरून-शअ. १ वरच्या भागापासून. २ साहा- य्यानें; साधनानें; कारणानें. 'तुला म्यां शब्दांवरून ओळखलें. ' ३ परिणामतः; प्रसंगानें; मुळें. ' तूं सांगितल्यावरून मी गेलों. ' ४ पुढून; समोरून; जवळून. 'तो माझे गांवावरून गेला.' ५ पृष्ठ- भागास धरून. ६ नंतर; मागाहून. (कालसापेक्ष प्रयोग). 'स्नान केल्यावरून भोजनास बसलो. ' ७ वर; उपरि. 'झाडांवरून पांखरें बसलीं.' 'घोड्यांवरून सगळीं माणसें बसलीं.' (फक्त अनेक- वचनांत प्रयोग). ८ प्रमाणें. 'आपणांवरून दुसऱ्याला । राखीत जावें । ' -दा १२.१०.२४. ' आपणांवरून जग ओळखावें ' ९ वरील बाजूस; बाह्यप्रदेशीं. 'अंतर्वसन बाह्यवसन कंचुकीवरून प्राव- रण । ' -ह ३४.१६३. वरौता-ती-वि. वर; वरता पहा. -ज्ञा ४.२०९. ' वरौति ऐऔनि आनंदभरें । ' -दाव १८८. ' सुकुमार- पणें भूपति भृंग । धरोनि झेली वरौतें । ' -मुआदि १८.३४. वरौनी-वरून पहा. 'वरौनि कापूरकेळीं । भ्रमरांची झांक ऊठिली । ' -शिशु ६०५.

दाते शब्दकोश

देव

पु. १ ईश्वर; देवता. २ परब्रह्म; परमेश्वर; आदितत्त्व; शिव; जगन्नियंता. ३ मूर्ति; लांकूड दगड, धातु इ॰ कांची मूर्ति; जींत विधिपूर्वक देवत्वाची प्रतिष्ठापना केलेली असते अशी मूर्ति. ४ स्वर्गांत राहणारी इंद्रादि दिव्य पुरुष. ५ (नाटक, काव्य) राजा; श्रेष्ठ. 'तो सहदेवहि देवा ! येतां त्वत्सूनुच्या कृपाणातें । क्षितिवरि पाडी..' -मोकर्ण १४.२८. ६ यक्ष, किन्नर इ॰ उपदेव. अंगांत येणारें वारें. [सं. दिव् = प्रकाशणें; झें. दिव्, दएव = देव; ग्री. झ्यूस, थिऑस्; लॅ, जोव्हिस्; प्रा. आइस्लंडीक. तीवर = देव; प्रा. ज. झिओ; लिथु. देवस्; स्ला. दीना = दिवस] (वाप्र.) ॰देव करितां- क्रिवि. पुष्कळ प्रयत्न, हांजीहांजी, प्रार्थना करून. ॰दिसणें- (व.) हाल होणें. 'बायको मेल्यावर देव दिसतील.' ॰देव्हा- र्‍यांत नसणें-मालक(मन) ठिकाणावर नसणें. ॰नवसाला पावणें-इच्छित फळ मिळणें. 'भूप म्हणे कर्णा हा जरि अर्जुन देव पावला नवसा ।' -मोविराट ३.८८. ॰पावणें-मनाजोगी गोष्ट घडणें. ॰बाप्पा करणें-(बालभाषा) नमस्कार करणें. 'तो देवबाप्पा कर म्हणाला त्याबरोबर तिनें हात जोडून नमस्कार केला.' -सुदे ५ ॰होऊं लागणें-अरेराव, दंडेल होऊं लागणें, होणें. वरचढपणा गाजविणें. देवाकडे जाणें-मरणें. देवाचें नांव घेणें-कार्याला प्रारंभ करणें. देवाची(चे) आण, देवाचेण- स्त्री. देवाची शपथ. देवाच्यान-देवाची आण, शपथ. देवानें ड वी देणें-नकार मिळणें (उजवी = रुकार); मनांत कांहीं हेतु धरून मूर्तीच्या डाव्या-उजव्या अंगास फुलें किंवा अक्षता चिकट- वितात. त्या वरील प्रमाणें पडल्या असतांना समजावयाचा प्रकार. देवानें भरणें, धरणें-भरणें मध्यें पहा. देवानें मारणें-देवाची अवकृपा होणें. देवावरची तुळस, फूल, बेल काढणें- उचलणें-१ देवावरील निर्माल्य काढणें. २ शपथ घेण्याचा एक प्रकार. देवावर हवाला घालणें-देणें-देवावर विश्वास टाकणें, भरंवसा ठेवणें; सर्वस्वी अवलंबून असणें. देवावर हात ठेवणें- शपथ घेणें देवाशीं बसविणें-(गो.) अंगांत वारें, देव आण- ण्यास सांगणें. देवास-ला करणें-देवाची करणी. देवाची इच्छा याअर्थीं एखादें अघटित कार्य घडून आलें असतां तोंडांतून निघणारा उद्गार. देवास पेंचणें-शत्रूवर संकट आणण्यासाठीं देवाला बांधणें. देवासारखा बसणें-चुपचाप बसणें. न देवाय न धर्माय-कोणत्याच चांगल्या कार्याकरितां (पैसा, श्रम) उपयोगी न पडणें. देवास शिताळ देणें-देवाला स्नान घालणें. म्ह॰ १ मानला तर देव नाहीं तर धोंडा. २ (बायकी) देव नाहीं देव्हारीं, धुपाटणेवाला उड्या मारी. ३ देव देतो आन् कर्म नेतं. ४ देवाचें नांव आणि आपला गांव = दुसर्‍याच्या नांवावर स्वतःचा फायदा करणें. सामाशब्द- ॰ऋण-न. देवाचें कर्ज. हें यज्ञयागादिकांनीं फेडतात व त्यामुळें मनुष्यास सुखप्राप्ति होते. या- प्रमाणें दुसरीं ऋषिऋण व पितृऋण हीं अनुक्रमें अध्ययन व तर्पण यांनीं फेडावयाचीं असतात. ॰ऋषि-पु. देवर्षि; नारद. [अप.] ॰कला-ळा-स्त्री. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर तींत येणारें तेज, वैभव, शक्ति इ॰. देवासारखें ओज, कांति. [सं.] म्ह॰ टाकीचे घाव सोसावे तव्हां देवकळ पावावी. ॰कांचन-न. कांचन फूलझाडांतील एक जात किंवा त्याचें फूल. ॰कापशी- कापशीण-स्त्री. कापसाच्या झाडांतील एक प्रकार. याचें फूल जांभळें असतें, याच्या कापसास देवकापूस म्हणतात. याच्या बोंडांत वेणीसारखी एक मोठी बी असते. -कृषि ३८३. ॰कार्य- न. १ देवाची पूजा. २ कुळधर्मानुसार कुळदेवटेची पूजा, अनुष्ठान, जेवण इ॰देवकी-स्त्री. देवस्की पहा. -वि. देव किंवा पिशाच्च यांच्यापासून घडणारी पीडा, बाधा, उपद्रव, भाकीत, शकुन इ॰ देवकी चमत्कार-पुअव. देव पिशाच्च यांचा चमत्कार. याच्या उलट (किंवा याला जोडून) राजकी. अस्मानीसुलतानी याप्रमाणें. ॰कुंडी-स्त्री. (व.) लग्नाचे अगोदरचे दिवशीं बोहल्याच्या जवळ शास्त्रोक्त रीतीनें ठेवावयाचीं मडकीं. ॰कुंभा-पु. (कों.) कुंभा किंवा दुधाणी नांवाचें फूलझाड. ॰कृति-कृत्य-स्त्रीन. १ ईश्वरी करणी; दैविक घटना. २ धार्मिक कृत्य, विधि. ॰केळी-स्त्री. सामान्य कर्दळी नांवाचें फूलझाड. ॰खर्च-पु. देवपूजेचा खर्च किंवा या खर्चाकरितां बसविलेला कर. ॰खळ-अव. (ना.) (तिर- स्कारार्थीं) घरांतील देवाच्या मूर्ती. ॰खोली-स्त्री. देवघर. ॰गण- पु. जन्मनक्षत्रावरून मनुष्याचे देव, मनुष्य व राक्षस असे तीन वर्ग करतात त्यांपैकीं प्रथम. मनुष्यगण पहा. ॰गणपत-न. (सोंग- ट्यांचा खेळ) देवाला द्यावयाचा पहिला हात, दान. ॰गत-ति- स्त्री. १ नशीबाचा फेरा; दैवयोगानें प्राप्त होणारी दशा, स्थिति. २ (ल.) मृत्यु. ३ (गो.) विटाळशी असतांना मेलेल्या स्त्रीचें पिशाच्च. -वि. दैवी (कृत्य, नाश इ॰). ॰गाय-स्त्री. मखमली किडा; गोसाई. मृगाच्या पावसांत यांची उप्तत्ति होते. ॰गांधार-पु. एक राग. यांत षड्ज, तीव्र ऋषभ, कोमल गांधार, कोमल मध्यम, पंचम, कोमल धैवत, कोमल निषाद हे स्वर लागतात. आरोहांत ऋषभ व धैवत वर्ज्य. जाति औडव-संपूर्ण. वादि षड्ज, संवादी पंचम. वेळ दिवसाचा दुसरा प्रहर. ॰गिरी-पु. १ एक राग यांत षड्ज, तीव्र ऋषभ, तीव्र गांधार, कोमल मध्यम, पंचम, तीव्र धैवत, तीव्र निषाद हे स्वर लागतात. जाति संपूर्ण-संपूर्ण. वादी षड्ज. संवादी पंचम, गानसमय दिवसाचा पहिला प्रहर. हा बिलावल रागाचा एक प्रकार आहे. २ दौलताबादचें जुनें नांव. ॰गुरु-पु. बृहस्पति. ॰गृह-घर-न. १ देव ठेवण्याची खोली. २ मंदिर. ॰घाई-स्त्री. देवापुढें ढोल वाजविण्याची विशिष्ट गति, प्रकार.॰घाट-पु. देवळास जाण्यासाठीं बांधलेली वाट-रस्ता. ॰चार-पु. ग्रामदेवीचें दूतरूपी पिशाच्च; पिशाच्चगण. [सं. देव + चार; देवाप्सरस] ॰जन-पु. देवळांतील चाकरनोकर. ॰जी-जी धसाडा-पु. १ माक- डाच्या खेळांतील पुरुषाचे कपडे घातलेला माकड. यांतील माकडीणीला रत्नी म्हणतात. २ (ल.) अडाणी, कुरूप माणूस; विद्रूप मनुष्य. म्ह॰ (व.) देवजीधसाड्या पुंजाइ पाद्री-नवरा हाण. मार करणारा व बायको गरीब असें जोडपें. ॰झाड-न. (कों.) देवानें किंवा पिशाच्चानें झपाटलेला मनुष्य.॰ठिकें-न. गांवांच्या सीमांचा तंटा देवापुढें दिव्य करून तोडल्यामुळें महाराला (इनाम) मिळालेली बिन सार्‍याची जमीन. ॰डांगर-पु. काळा भोंपळा; चाकी. हें फळ दुध्या, मुगा अथवा मुगवा, काशीफळ यांच्याहून निराळें आहें.॰डांगरी-स्त्री. १ देवडांगराचा वेल. २ घोसाळीचा वेल. ३ देवताड. ॰त-न १ देव. २ (ल.) लाडका; आवडता. [सं. दैवत] ॰तरु-पु १ पिंपळ, मंदार, पारिजातक, संतान, कल्पवृक्ष, हरिचंदन यांना उद्देशून लावतात. २ जुनें व पवित्र असें कोणतेहिं झाड. ॰तवार-पु. (रा.) कुळदेवतेच्या पूजेचा दिवस. [देव + सं. तिथिवर-त्योहार-तेहवार-तवार] ॰ताळा-वि. फाजील कर्मठ; देवदेव करणारा.॰ताळें-न फाजील कर्मठपणा. ॰ती/?/-न. तीर्थ पात्र ॰त्तर-त्रा-स्व-न. (कायदा) देवाला दिलेली मिळकत, देणगी.॰त्रयी-स्त्री. ब्रह्मा, विष्णु, महेश. 'जयातें देवत्रयी कहीं नायके ।' -ज्ञा ११.१४७. ॰त्व-न. देव- पण; देवाची स्थिति; अवस्था.॰त्त-पु. १ पांच उपप्राणांपैकीं एक. 'ज्याकरितां जांभया येती । तो म्हणावा देवदत्त ।' -यथादी १८.१००४. २ अर्जुनाचा शंव. 'जाता कुरुकटकावरि वाजविला दिव्य देवदत्त दर ।' -मोविराट ४.२. ३ एक विशेषनाम; बुद्धाचा मेहुणा. -वि. १ देवानें दिलेलें. २ कोणीएक; कोणी तरी उदाहर- णार्थ घेतलेली व्यक्ति. 'देवदत्त लठ्ठ न दिवसा खात नाहीं' ॰दया-स्त्री. १ परमेश्वरी कृपा. २ (ल.) देवाच्या दयेनें प्राप्त झालेली संपत्ति; गुरेंढोरें, मालमत्ता, मुलेंबाळें इ॰. ॰दरबार- न. १ देऊळ. २ सभामंडप. याच्या उलट राजदरबार. 'देवदरबारीं खोटें बोलूं नये.' ॰दर्शन-न. १ देवाचें दर्शन. २ विवाहानंतर सपत्नीक देवाच्या भेटीस जाणें; लग्नानंतरची ओव्हर-वधूवरयात्रा. ॰दार-दारू-पु. हिमालय इ॰ ठिकाणीं उप्तन्न होणारा वृक्ष हा फार उंच व दिसण्यांत सुंदर असतो. हा शें-दोनशें वर्षें वांचतो. जस- जसे हे वृक्ष जून होतात तसतसे बळकट होऊन उपयुक्त होतात. याचें इमारतीलांकूड होतें. यापासून टर्पिनतेल काढतात. लाल, तेल्या, काष्ट इ॰ याचे प्रकार आहेत.॰दारी-वि. देवदाराच्या. लांकडाचें केलेलें; देवदारासंबंधी. ॰दाली-स्त्री. देवडांगरी. ॰दासी-स्त्री. मुरळी; भावीण; दक्षिणेंत देवास वाहिलेली कुमारिका असा अर्थ रूढ आहे. हिचा धंदा देवाची सेवा व नृत्य- गायन करणें. ॰दूत-पु. (ख्रि.) १ देवाचा दूत-निरोप्या जासूद. २ देवाची सेवा करून त्याचा हुकूम बजावणारा स्वर्गीय बुद्धि- विशिष्ट आत्मा; (इं.) एंजल याचा पर्याय. 'जेव्हां मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवानें येईल व त्याजबरोबर सर्व देवदूत येतील तेव्हां तो आपल्या वैभवी राजासनावर बसेल.' -मत्त २५.३१. ॰देव-पु. १ देवपूजा; धार्मिक विधि, आचार किंवा पूजाअर्चा. (क्रि॰ करणें). २ देवांचा देव; विष्णु. महादेव.॰देव करणें- पूजाअर्चा करणें; कळकळीनें प्रार्थना करणें; अतिशय श्रम करणें. ॰देवक-न.देवक पहा. ॰देवतार्चन-न. देवतार्चन पहा. ॰देव्हारा-पु. पुष्कळ देवता, सिद्धपुरुष, साधु यांची भक्ति, प्रार्थना इ॰ करणें (दुखणें वगैरे संकटाच्या निवारणाकरितां). 'देवदेव्हारे केले बहुत । औषधासी नाहीं गणित ।' ॰द्वार-न. १ मंदिराचें दार. २ मंदिर; देवस्थान; पवित्र जागा; धार्मिक कृत्यें करण्याची जागा. ॰धर्म-पु. १ देवदेव; देवपूजा वगैरे. २ कांहीं इष्ट सिद्धीविषयीं किंवा अनिष्ट निरसानार्थ कुलग्रामदेवतादिकांस नवस करणें, कौल लावणें इत्यादि. ३ नैमित्तिक धार्मिक कृत्य याच्या उलट नित्यधर्म. ॰उठविणें-दुसर्‍यानें पिशाचादि क्षुद्र- देवतांमार्फत उत्पन्न केलेली पीडा वगैरे दूर होण्याकरितां शांति वगैरे सारखीं कृत्यें करणें. देवाधर्माचा-वि. देव, पिशाच यांच्यापासून उप्तन्न झालेला (रोग इ॰). याच्या उलट अंग- रोग. देवाधर्मानें टाकलेला-वि. जातिबहिष्कृत; धर्मबाह्य. ॰धान्य-न. १ ज्याचा नैवेद्य देवास अर्पण करावयाचा असें धान्य (तांदूळ, गहूं इ॰). २ रानांत आपोआप उगवणारें देव- भात वगैरे धान्य. ॰धूप-पु. देवापुढें लावावयाचा सुवासिक धूप- ॰नदी-स्त्री. १ (काव्य) गंगा; भागीरथी नदी. 'धर्म म्हणे धर्मा ज्या देवनदी प्रसवली महाभागा ।' -मोशांति ६.३०. २ आकाश- गंगा. ॰न(ना)ळ-पु बोरूची एक जात. 'मीं जाण देवनळही स्वकरीं धराया ।' -र २७. ॰नागरी-स्त्री. बालबोधी (संस्कृत) लिपी; संस्कृत भाषेची व ग्रंथांची लिपि. [देवनगर ] ॰निंदक-वि. देवांची निंदा करणारा; नास्तिक. ॰निंदा-स्त्री. देवांची निंदा. ॰पण-पणा-पुन. १ देवधर्म अर्थ २ पहा. २ देवलाळा. ३ (गो.) अंगांत येऊन प्रश्नांचीं उत्तरें देणें.॰पळही-ळहें-स्त्रीन कापसाची एक जात; देवकापशी; देवकापूस. -ऋ ६८. (टीप)॰पाट-पु. देवाचा व पूजा करण्याकरितां बसण्याचा पाट. ॰पाण-न. (कु.) नैमित्तिक देवस्की; देवपणा. ॰पिसा-वि.देवासाठीं वेडा झालेला. ॰पिसें-पिसा-शी-नस्त्री. फाजील धर्मनिष्टपणा. ॰पूजास्त्री. देवतार्चन पहा.॰पूजा वाढणें-(ल.) मगरूर होणें; थोडीशी प्रतिष्ठा वाढल्यामुळें फुगणें. 'गांड भरे आणि देवपूजा वाढे.' ॰पुरी- स्त्री. १ वाटेल त्या येणार्‍याजाणार्‍यास मोकळीक असलेलें घर. २ (ल.) धर्मशाळा.॰प्रतिष्टा-स्त्री. १ मंदिरांत केलेली नव्या मुर्तींची स्थापना. २ विवाहादि संस्कारांच्या आरंभीं करावयाची देवतांची स्थापना; देवक बसविणें. ॰प्रश्न-पु. १ देवाला कौल लावणें. २ (फलज्योतिष) ग्रह पाहणें. (क्रि॰ करणें; पाहणें; येणें; उतरणें). ॰बाभ(भृ)ळ-स्त्री. कंकर; कंकरी; काळी बाभूळ. सामान्य बाभळीसारखा हिचा वृक्ष मोठा होत नाहीं. फुलें पिवळीं असतात या झाडास लाख येते. पिसाळलेल्या कुत्राच्या कोल्ह्याच्या विषावर उपयोगी आहे. देवबाभळीचें मूळ थंड पाण्यांत १ ते ४ तोळेपर्यंत उगाळून त्यांत पाणी घालून पाजावें. हें प्रत्यहीं दोनदां याप्रमाणें ७ दिवस द्यावें. पथ्य करावें -वगु ४.३०. ॰बुद्धि-स्त्री. १ देवाविषयीं आस्तिक्यबुद्धि. २ चराचर विश्व देवमय पाहण्याची दृष्टि. याच्या उलट पाषण-पर्वतबुद्धि ॰ब्राह्मण-पु. १ यात्रेच्या सांगतेप्रीत्यर्थ ब्राह्मणभोजन घालणें. २ यात्रेच्या ठिकाणीं देवाची पूजा व ब्राह्मणभोजन करणें. ३ लग्न- मुंजीचेपूर्वी प्रथम जेवण करतात तें. ॰भक्ति-स्त्री. १ देवाची सेवा २ (कों.) पिशाच्चउपद्रव नाहींसा करण्यासाठीं अंगारा लावणें; आपल्या अंगीं पिशाच्चाचा संचार करून घेणें इ॰ ॰भक्त्या-वि. पंचाक्षरी; मांत्रिक; देवऋषी. ॰भात-न. आपोआप उगवणारें भात; एक उपधान्य. हें डोंगरांत पाणथळ जागीं पिकतें. उपवासाच्या दिवशीं खातात. ॰भाषा-स्त्री.स/?/त भाषा. ॰भूमि-स्त्री. १ पवित्र भूमि. २ यज्ञयाग करावयाची किंवा जीमध्यें नद्या, मंदिरें वगैरे आहेत अशी पवित्र जागा, प्रांत. ॰भोळा-वि. साधासुधा; निरंतर देवसेवेंत निमग्न असल्यामुळें जगांतील उलाढालीशीं संपर्क नसलेला; सात्त्विक (माणूस). ॰मंगळ-वि. ज्याच्या कटीवर, उरावर. शिरावर व कपाळावर मिळून चार पांच भोवरें असतात असा (घोडा) -अश्वप १.९०.॰मण-मणि-वि ज्याचें ऊर सोडून वरीलभागीं कंठाचें खाली भोंवरा आहे असा (घोडा). हा शुभलक्षणी होय. -अश्वप १९२. 'बाहात्तर खोडी परी देवमण कंटी ।' -तुगा १६७५.॰मात-वि. देवाकडे सर्वस्वीं लक्ष असलेला; धार्मिक. ॰मय-वि. देवरूप बनलेला. ॰माणूस-पु. निरूपद्रवी, विश्वासु, निष्कपटी माणूस. ॰मातृक-वि. पावसाच्या पाण्यानें जेथें पीक होतें असा (देश). याच्या उलट नदी-जलमातृक. ॰मासा-पु. एक प्रकारचा मासा; याची लांबी ४५ ते ८० फूट असून हा मांसाहारी आहे. जबड्याची उंची माणूस उभा राहील इतकी असते. हा शेपटीनें मोठ्या नांवा फोडतो. याचें तेल व जबड्याचें हाड उपयुक्त व किंमतवान असते. ॰मुलुक-पु.नर्म- देच्या उत्तरेकडील हिंदुस्थान देश याच्या उलट राक्षसी मुलुक = दक्षिणहिंदुस्थान. ॰यज्ञ-न. जेवणाच्या पूर्वीं करावयाचा एक यज्ञ; वैश्वदेव; पंचमहायज्ञ पहा. ॰यात्रा-स्त्री. देवाची मिरवणूक. ॰यान-न. देवाकडे नेणारा मार्ग; उत्तरायण. ॰योनि-स्त्री. उपदेव; विद्याधर, अप्सरा, यक्ष, राक्षस, गंधर्व, किन्नर, पिशाच, गुह्यक, सिद्ध, भूत इ॰ ॰रसपण-न. देवऋषी, मांत्रिकपणाचें काम, धंदा. ॰राज-पु. इंद्र. ॰रुखा-पु. ब्राह्मणांतील एक पोटजात. ॰रुखी-स्त्री. १ मंदिरांतील गाभारा. २ (कु.) (देवळांतील देव ठेवण्याचा) कोनाडा. ॰रुषी-शी-लशी-पु. देवभक्त्या पहा. ॰लशी-पु. अंगांतील भूत काढणारा मांत्रिक. ॰रुसकी-रसकी-लसकी-स्त्री. देवरसपण पहा. ॰रूपी- वि. देवाच्या रूपासारखा; देवाच्या रूपांतील देवर्षि-पु. स्वर्गांतील ऋषी. यांत नारद, अत्रि, मरीची, भरद्वाज, तुंबुरु इ॰ चा समावेश होतो. 'शक म्हणे कर हरिहर-विजयांचें आशु गान देवर्षे ।' -मोविराट ६.२४. देवल-लक-पु. १ देवापुढें ठेवलेली दक्षिणा इ॰ वर उदरनिर्वाह करणारा ब्राह्मण. २ दक्षिणा घेऊन धर्मकृत्यें करणारा; भिक्षुक. ३ गुरव. 'कुंभार देवळक तथा धनगर ।' -स्वादि ६. ५.३५. ॰लंड-वि. १ देवास तुच्छ मानणारा. २ नास्तिक. ॰लोक-पु. स्वर्ग. ॰वाणी-स्त्री. १ संकृत भाषा. 'देववाणी गीर्वाण संस्कृत ।' -दावि वेळ. ३८९. २ आकाशवाणी. ॰वेळ-स्त्री. सकाळची वेळ ॰वृक्ष-पु. देवतरु पहा. ॰व्रत-पु. भीष्माचार्य. 'अंतुळें पितृप्रसादें मंडित देवव्रता असामान्य ।' -मोकर्ण ५०.७४. ८.४८. ॰शिल्प-न. मूर्ति, रथ, यज्ञकुंड वगैरे संबंधाचें शिल्प. ॰सभा-स्त्री. इंद्रसभा. ॰साख-पु. एक राग. यांत षड्ज, तीव्र ऋषभ, कोमल गांधार, कोमल, मध्यम, पंचम, कोमल धैवत, कोमल निषाद हे स्वर लागतात. जाति संपूर्ण-संपूर्ण. वादी षड्ज. संवादी मध्यम. गानसमय दिवसाचा पहिला प्रहर. हा एक कानड्या रागाचा प्रकार आहे. ॰साजुज्य-न. देवांत लय होणें; विलीन होणें. ॰साळी-स्त्री. (व) देवभात; न पेरतां उगवलेल्या साळी. ऋषिपंचमीला याचे तांदूळ खातात. देवसू-वि. (राजा. कु.) देवाला दिलेली, वाहिलेली (जमीन, उप्तन्न इ॰) देवस्की- स्त्री. १ देवभक्ति पहा. २ गांवदेवतेचा वार्षिक उत्सव. ३ देवाला कौल लावणें. ॰स्थळ पु. पुण्यभूमि. ॰स्थानन. १ पुण्यभूमि. २ देवाला अर्पण केलेली जमीन किंवा उप्तन्न. ३ देवाचें संस्थान. ॰स्थापन-ना-नस्त्री. देवप्रतिष्ठा पहा. देवस्व-सू-न. देवस्थान अर्थ २ पहा. देवळ-न. देऊळ; मंदिर. [सं. देवालय] देवळची घांट-स्त्री. देऊळघांट पहा. देवळी-स्त्री. १ देवरुखी पहा. २ लहान देऊळ. देवळी-पु. भावीण; तिची संतति. यांच्याकडे दिवें लावणें, वाद्यें वाजविणें इ॰ कामें पिढीजात असतात. यांची स्वतंत्र जात मानितात. देवाईल-न. देऊळ. 'बरें जालें तुझें केलें देवाईल । लेकरें बाईल उपेक्षिली ।' -तुगा ६५५. देवांगण-न. १ देवळांतील अंगण. २ त्या अंगणांत उभे राहून घ्यावयाची शपथ. 'शून्याचीं देवांगणें । प्रमाणासी ।' -अमृ ७.१०२. ३ गंधर्व नगर. ४ मिथ्या कल्पना. देवांगना-स्त्री. १ स्वर्गांतील अप्सरा. २ भावीण; देवळी; देवदासी. देवागार-न. (काव्य.) देवघर. देवांगें-न. (महानु.) पीतांबर. 'काढिलीं देवांगें चांग रत्नें कनक भरिएले परिएळा ।' -धवळे पूर्वार्ध ३९. देवाधर्माचा-वि. देवाधर्मासंबंधीं; पवित्र; धार्मिक (काम, वस्तु, व्यक्ति). देवा- धिदेव-पु. १ देवदेव अर्थ २ पहा. २ विष्णु, महादेव. देवाना प्रियः-१ देवाचा लाडका. २ संन्यासी. ३ (ल.) मूर्ख. देवान्न-न. १ देवभात पहा. २ पक्वान्न इ॰ उत्तम अन्न. 'निंदिती कदान्न इच्छिती देवान्न । पाहाताती मान आदराचा ।' -तुगा २८२७. देवापगा-स्त्री. देवनदी; भागीरथी; गंगा. [सं. देव + आपगा] देवापुढचा(पुढें)देव-पु. १ महादेवापुढचा नंदी. २ (ल.) मूर्खशिरोमणी. देवार्चन, देवावाहन, देवोत्थापन्- देवता खालीं पहा. 'जनार्दनस्वामी करिती देवार्चन ।' -रामदासि २.७२. देवालय-न. देऊळ; मंदिर. देवाज्ञा-स्त्री. (ल.) मृत्यु. (क्रि॰ होणें; येणें). देवींधर्मीं-क्रिवि. १ देवधर्मामध्यें. 'पाटाची बायको देवींधर्मीं उपयोगी पडत नाहीं.' २ देवधर्माला, व्रत वैकल्यें किंवा धार्मिक आचारविचार, धार्मिक उपाय, उपचार करून; प्रश्न पाहून. (क्रि॰ पाहणें, विचारणें). 'हें संकट टळावें म्हणून देवींधर्मीं विचारून पहा.' देवोत्थान-न. चातुर्मास संपल्यावर कार्तिक शुक्ल एकादशीस विष्णूचें जागें होणें आणि उठणें. या एकादशीस प्रबोधिनी एकादशी म्हणतात. [सं.]

दाते शब्दकोश

पोट

पु. १ अन्नाशय, उरापासून बस्तीपर्यंतचा, ज्यामध्यें अन्नोदकादि किंवा गर्भ राहतो तो शरीराचा भाग; बरगडीच्या खालचा व कंबरेच्या वरचा भाग; उदर. २ कोठा; अन्नपचनाचें स्थान; जठर. ३ (ल.) गर्भ; गर्भाशय. 'तुझें ओझें नऊ महिने मी पोटांत वाहिलें हों?' ४ (ल.) गर्भारपण. उदा॰ पोट येयें. ५ (ल.) कोणत्याहि वस्तुचा फुगीर भाग. कोणत्याहि गोष्टीचा पुढें आलेला भाग. उदा॰ घटाचा, पापण्यांचा इ॰; उदा॰ गडव्याचें, घागरीचें पोट. ६ वस्तूचा पोकळ भाग; पोकळी; दरा; खळगी; खांच. ७खोलवा; सांठवा; कव; कवळ; खातें; समावेश करण्याचा गुण, शक्ति; मुख्य किंवा आंतील बाजू; मुख्य कृत्याच्या अंगभूत इतर कृत्यें. नदीच्या पात्राचा मध्य. 'वरप्रस्थान, वाक्दान इ॰ हीं सर्व विवाहाच्या पोटचीं कर्में.' ८(ल.) मन; हृदय; बुद्धीचें, विकाराचें स्थान. 'ज्याच्या पोटीं खर विष, मुखीं आज्य हैय्यंगवीन ।' -वि. वा. भिडे. [सं. पुष्ठ; पुट. दे. पोट्टं; प्रा. पोट्ट; का. होट्टे; तुल॰ हिं. गु.पेट] (वाप्र.) ॰करणें-(जनावर) गाभण राहणें; लठ्ठ बनणें. ॰करणें-फुगणें-येणें-वाढविणें- व्यभिचारानें गर्भार होणें. ॰गळ्याशीं लागणें-फार जेवल्यानें पोट आकंठ भरणें. पोट(टा)चें दुःख काढणें-सोसणें- भुकेची वेदना सोसणें. पोटचें पाडणें-कृत्रिम उपायांनीं गर्भ- पात करणें; पोट पाडणें. ॰जाणें-ढांळणें-ढाळ, रेच, जुलाब होणें. 'हंगलें नाहीं पोट गेलें.' ॰जाळणें-१ (निंदार्थी, वैतागानें) पोट भरणें. 'समर्थाची लाळ घोटूं नकों तर काय करूं. हें पोट जाळावयाचें आहें ना?' २ दुसर्‍याचें नुकसान करून आपला फायदा करून घेणें. ह्या वेळीं मला बढती मिळा- वयाची, पण त्या शंकररावानें आपलें पोट जाळलें ना !' ॰जिरणें-गर्भ शमन होणें; वाढूं लागलेला गर्भ पोटांत जिरणें. 'त्या स्त्रीचें पोट जिरलें.' ॰जिरविणें-झाडणें-पाडणें-मारणें सांडणें-(औषध घेऊन) गर्भपात करणें. ॰तडीस लागणें-पोट गळयाशीं लागणें पहा. ॰दुखणें-(ल.) (दुसर्‍याचें चागलें पाहून) मत्सर वाटणें; असह्य होणें; वाईट वाटणें. 'खरचणाराचें खरचतें आणि कोठवळ्याचें पोट दुखतें.' ॰धरणें-जुलाब बंद होणें. ॰धरूधरून हंसणें-अतिशय हंसणें. ॰नकटें आहे-पोट लाजबीज कांहीं जाणत नाहीं (भूक लागली असतां, वात्सल्यप्रेमानें कळवळा आला असतां). ॰पाठीस लागणें-पोटाला मिळविण्या- साठीं उद्योग करावा लागणें. 'पोट लागलें पाठीशीं । हिंडवीतें देशो- देशीं ।' -तुगा ४१९६. ॰पाठीस लागणें-पातळास, रसा- तळास जाणें, पोटाची पत्रावळ होणें-खावयास न मिळाल्या- मुळें पोट खपाटी जाणें, पोटास खळगी पडणें; पोट-पाठ एक होणें. ॰पिकणें-१ प्रसूत होणें; मूल होणें. 'त्या मुलीचें एकदाचें पोट पिकलें.' २ गर्भार असणें. ॰फुगणें-१ अजीर्णादिकांमुळें पोटांत वायु सांठून पोट मोठें होणें. २ (ल.) एखादी गुप्त बातमी कोणाला तरी सांगण्याला संधि न मिळाल्याकारणानें अस्वस्थता वाटणें. ३ गरोदर होणें. ॰फुटणें-खरोखरी पोट फुटल्याप्रमाणें पोटाला वेदना होणें. 'हंसतां हंसतां आमचीं पोटें फुटलीं.' ॰फोडणें-गुप्त बातमी फोडणें, उघडकीस आणणें. ॰बांधणें-उपासमार करणें; पोटाला चिमटा घेणें. ॰बांधून चाकरी करणें-पैसा जम- विणें-जेवणें-खाणें-खरचणें-पोटास न खातां नोकरी करणें, पैसे जमविणें इ॰ ॰बाहेर पडणें-जेवणाचा खर्च परभारां भागणें. 'त्या व्यापारांत पोट बाहेर पडून दहा रुपये मिळतात.' ॰बाहेर पाडणें-गुप्त गोष्ट चारचौघांत उघडकीस आणणें, फोडणें. ॰बुडणें- चरितार्थाचें साधन नाहींसें होणें. 'यंदा पाऊस चांगला पडला नाहीं, माझें पोट बुडालें.' ॰भर अन्न, अंगभर वस्त्र मिळणें- माणसाच्या निर्वाहाला आवश्यक अशा वस्तू मिळणें. ॰भरणें- १ इच्छा तृप्त होणें; पोटाची गरज भागणें; भरपूर जेवणें. 'माझें पोट भरलें, आतां जिलब्याचा आग्रह करूं नका.' २ चरितार्थ चालविणें. 'माझ्या सामर्थ्यें भरिल आजि पोटातें ।' -मोआदि २६.१४. ॰मोठें करणें-(ल.) दया दाखविणें; कृपाळू होणें. ॰सरणें-सुटणें-१ रेच होणें. ॰सुटणें-१ वातानें दोंद वाढणें; खायला, प्यायला यथेच्छ मिळत असल्यानें दोंद येणें. २ (ल.) उदरनिर्वाहाचा खर्च बाहेर पडणें, अंगावर न पडणें. पोटाखालीं जाणें-येणें-ओढ्या होऊन जाणें; विधवेनें पाट लावला असतां पहिल्या नवर्‍यापासून झालेल्या मुलांनीं तिजबरोबर जाणें. पोटाचा कपोता वळणें-अतिशय रोड, कृश होणें. पोटाचा चाकर, पाईक-पोटाकरितां मजुरी करणारा. पोटाचा डमामा, नगारा होणें-पोटांत वायु धरल्यामुळें पोट फुगणें. पोटाच्यापाठीस लागणें-चरितार्थाचीं साधनें मिळविण्याकडे सर्व वेळ, शक्ति खर्चणें. पोटाचें पाणी होणें-जोराची हगवण लागणें. पोटांत आग पेटणें-अतिशय भूक लागणें. पोटांत कालवणें-पोटांत ढवळणें, पोटांत गडबड होणें. पोटांत कावळे ओरडूं- कोकावूं-तोडूं-टोचूं लागणें, पोटांत कोंबडीं चरूं लागणें-अतिशय भूक लागणें; भुकेनें जीव व्याकूळ होणें. पोटांत खडबडणें-भूक लागणें. पोटांत गोळा उभा राहणें-संकट येणें; भीति वाटणें; पोटांत धस्स होणें. पोटांत घालणें-घेणें, पोटीं घालणें-(अपराध, चूक) क्षमा करणें. 'पोटीं घालावा त्वां, जोडा, माझ्या नसेचि अपराधा ।' -मो. पोटांत जावप- (गो.) पोटांत दुखणें. पोटांत ठेवणें-गुप्त ठेवणें; कोणाला कळूं न देणें. पोटांत-स डोकें घालणें-आश्रय, कृपा संपादणें. पोटांत तडस भरणें-पोटास कळ लागणें (फार खाल्यामुळें). पोटांत तोडणें-(ल.) दयेनें पोटांत कळवळणें; दुःख होणें. 'तुझें गरिबीचें बोलणें ऐकलें म्हणजे पोटांत कसें तडातड तोडतें.' -नामना ११२. पोटांत धाक पडणें-भीति उत्पन्न होणें. 'माझ्या पोटांत धाक पडला आहे.' -मृ ६९. पोटांत धोंडा उभा राहणें-अतिशय भीति वाटणें. 'तिला पहातांच माझ्या पोटांत एवढा थोरला धोंडा उभा राहिला.' -पण लक्षांत कोण घेतो. पोटांत पाय शिरणें-खचून जाणें; भ्रांत होणें; भांबावणें. 'त्याच्या मरणाची खबर ऐकिल्यापासून याचे पायच जणों पोटांत शिरले आहेत.' पोटांत पोट-मुख्याच्या पोटांत असलेला, गौण (मनुष्य, वस्तु). पोटांत पोट करणें-आपल्या उपजीविकेमधून दुसर्‍याचें पोट भरणें. पोटांत पोट चालणें-एकाच्या अन्नांत, निर्वाहांत दुसर्‍याचा समावेश होणें. पोटांत ब्रह्मराक्षस असणें-उठणें- खा खा सुटणें. पोटांत भडभडणें-दुःखानें ऊर भरणें. 'अंध म्हणे या पुत्रव्यसनें पोटांत फार भडभडतें ।' -मोशल्य ४.४९. पोटांत शिरणें-निघणें-१ (दुसर्‍याची) मर्जी संपादन करणें. २ दुसर्‍याच्या गुप्त गोष्टी काढून घेणें. पोटांत शूळ उठणें- सलणें-(ल.) मत्सर, हेवा वाटणें; दुसर्‍याचें बरें पाहून वाईट वाटणें. पोटांतील पाणी न हालविणें-एखादी गोष्ट गुप्त ठेवणें. पोटांतून उगळणें-कळवळा येणें-मायेचा पाझर फुटणें. पोटा येणें-पोटीं जन्म घेणें. पोटा येऊनियां चांग । उत्तमांग पावला ।' -एरुस्व १.७२. पोटाला कुंकू लावणें-(व.) गर्भारणींच भावी संततीचा वरवधूंचा वाङ्निश्चय करणें. पोटाला गांठी देणें-चिक्कूपणानें, दारिद्र्यामुळें पोटाला पुरेसें न खाणें. पोटाला पाटा बांधणें-पोटाला चिमटा घेणें; भुकेच्या वेदना बंद करण्यासाठीं धोतरानें पोट बांधणें. पोटावर उठणें-मारणें- येणें, पोटाआड येणें, पोटावर पाय देणें-मारणें, दुस- र्‍याचें उदरनिर्वाहाचें साधन काढून घेणें; प्राप्ति कमी करणें. पोटावारी नोकरी करणें, राहणें-फक्त जेवण घेऊन नोकरी करणें. पोटा(ट)शीं धरणें-१ प्रेम, ममता करणें. २ मदत करणें; पोषण, सांभाळ करणें. ३ (झाडांसंबंधीं तंट्यांत) झाडास कवटाळून देवाची शपथ घेणें, वाहणें इ॰ पोटा(ट-टि-टे)शीं राहणें- असणें-गर्भार असणें, राहणें. पोटास अन्न ढोंगास वस्त्र मिळणें-निर्वाहाचें अगदीं किमान साधन मिळणें; निर्वाहाच्या अगदीं आवश्यक वस्तू मिळणें. पोटास तडस लागणें-फार जेवल्यामुळें अस्वस्थता वाटणें. पोटास बिब्बे घालणें-चिमटे घेणें-पोटाला न खातां राहणें; उपास काढणें. पोटास येणें- उदरीं येणें; जन्मणें; मूल होणें. 'केला पहा, कसा हा येउनि पोटास घात लोकांनीं ।' -मोउद्योग ४.७९. पोटीं-पोटांत-(आल्याच्या- गेल्याच्या-दिल्याच्या-केल्याच्या) तर्फें, आनुषंगिक. पोटीं उत- रणें-जिरणें. पोटीं खोसणें-(ना.) कनवटीला बांधणें; कडोस्त्रीला लावणें. पोटीं घालणें-अपराध क्षमा, माफ करणें. 'अपराध कोटि पोटीं घालाया मुकुट पाय ते करितों ।' -मोस्त्री ६.६३. पोटीं जन्मणें-(आई-बापापासून) जन्म पावणें; उदरीं येणें. पोटीं धरणें-आवड धरणें; स्वीकारणें. 'पुण्य मार्ग पोटीं धरीं ।' -दा ५.८.२४. पोटीं-पोटांत पडणें-१ भक्षस्थानीं पडणें. २ शरीरांत खिळणें. (रोग, गोवर, देवी, ताप, खरूज इ॰). ३ स्वतःच बळकाविणें (पैका, द्रव्य). ४ जेवणांत खर्च होणें. ५ पोटांत मुरणें, नाहींसें होणें (औषध); (दूध) पोटांत तसेंच राहणें (रेच करणें). पोटीं वागविणें-एखाद्याला सतत आपल्याबरोबर वागवून त्याची काळजी वाहणें. 'हें पांगुळें वागवितोसि पोटीं ।' -सारुह १.८. पोट्यां चालणें-(गो.) मुलानें, पोट सरपटत चालणें. थंडा पोटानें-मित्रभावानें; सलोख्यानें; चिरडीशिवाय; अकसाशिवाय; रागा-क्षोभा-शिवाय. भरल्या पोटीं-पोटानें-जेवणानंतर लागलींच (काम करणें, चालणें इ॰). रिकाम्या पोटीं-पोटानें- जेवल्याशिवाय. म्ह॰ पोटचा(चें) द्यावा पण पाठचा देऊं नये = प्रत्यक्ष आपलें मूलहि सोडावें, पण आश्रयास आलेल्या माणसास सोडूं नये. साधितशब्द-पोटचा-वि. १ औरस; स्वतःचा; स्वजात; एखा- द्याच्या पोटीं जन्मलेलें (मूल). 'पोटचें द्यावें पण पाठचें देऊं नये.' २ पासून जन्मलेला, झालेला. 'हा कोणाच्या पोटचा?' ३ अंतर्भूत, समाविष्ट असलेलें. 'साष्टीच्या पोटचे साठ गांव आहेत.' पोटचा गोळा-लोळा-पु. स्वतःचें पोटचें मूल; पोर; नऊ महिने पोटांत बाळगलेलें मूल. 'विचार पडला कसा पोटचा गोळा तोडावा.' -विक ४०. पोटचें ज्ञान-न. १ नैसर्गिक, उपजत, स्वाभाविक ज्ञान; न शिकतां, संपादितां अंगीं असलेलें ज्ञान. २ अंगची हुशारी, शहाणपण. ३ स्वतःची बुद्धी, अक्कल, समज इ॰ पोटाचा अदळ- वि. शौच्याला लागली असतां क्षणभरसुद्धां धीर धरवत नाहीं असा. (ल.) ढिल्या संवईचा. पोटाचा पाईक-पायक-पु. पोटाचा चाकर; पोटपाईक पहा. सामाशब्द- ॰उक(का)ल-स्त्रीपु. मन मोकळें करणें. (क्रि॰ करणें). ॰कटार-री-स्त्री. १ पोटांत कट्यार, सुरा खुपसून घेऊन आत्महत्त्या करणें; आत्महत्त्या. (क्रि॰ करून घेणें). २ कट्यारीनें दुसर्‍यास भोसकणें. (क्रि॰ करणें) ॰करपी- स्त्री. (बायकी) एक शिवी; पोटजाळी. [पोट + करपणें] ॰करीण- स्त्री. व्यभिचारानें गरोदर झालेली स्त्री. ॰कली-कुली-कूळ- स्त्रीन. १ (निंदार्थी) लहान पोट. २ पोटकुळी पहा. ॰कांब-स्त्री. बांबूची आंतल्या बाजूची चिरटी, कामटी. याच्या उलट पाठकांब. ॰किडा-पु. १ (झाड, फळ इ॰ च्या) आंत राहणारा किडा. २ (ल.) गुप्त गोष्टी, गुह्यें जाणणारा मनुष्य. ॰कुळी-स्त्री. पोटाची बाजू; कनवटी; कडोस्त्री; ज्यावर धोतर, लुगडें आवळलें जातें तो भाग (तेथें कांहीं खोवण्याच्या संबंधानें उपयोग). 'त्याची पोट- कुळी म्यां चांचपून पाहिली.' -क्रिवि. प्रमाणेंहि उपयोग होतो. ॰कूळ-न. (निंदार्थीं) पोट. ॰कूळ-न. दुसर्‍याकरितां जामीन राहणारा मनुष्य; संगतीचा, परिवारांतील माणूस. ॰खण-स्त्री. (कु.) अधाशीपणा. ॰खर्च-पु. खाण्यापिण्याचा, जेवणाचा खर्च; पोटगी खर्च. ॰खर्ची-स्त्री. प्रवास इ॰ प्रसंगीं खाण्यापिण्यासाठीं घेतलेले पैसे. ॰खराब-वि. मध्यें (खडक, वाळवंट, घळ, पायवाट इ॰ मुळें) खराब असलेली, लागवड न होण्याजोगी (जागा, जमीन). ॰खराबा-पु. (कों.) वहित जमीनीच्या पोटीं ओसाड, खराब असलेली जमीन. ॰खीळ-खिळा-स्त्रीपु. १ शिवाळेची आंतील खीळ, याच्या उलटबोळ खीळ. २ आंतील, मधली खीळ, खुंटी. ॰गडी-पु. १ (सोंगट्यांचा खेळ) खेळणाराच्या हाताखालचा व त्यास मदत करणारा गडी; आंगगडी; पित्तू. २ (ल.) मदतनीस; रिकामी झालेली जागा भरून काढणारा गडी. ॰गळ-स्त्री. (राजा.) खाजणाच्या बांधाच्या आंत पाणी सांचणारा चर. ॰गुजारा- पु. नुसती गुजराण; निव्वळ उपजीविका, निर्वाह; क्षुद्रवृत्ति. ॰गुमास्ता-पु. मुख्य गुमास्त्याचा मदतनीस. (इं.) सब्एजंट. ॰घडी-स्त्री. गर्भार आहे असें दिसावें म्हणून वांझोट्या स्त्रीनें पोटावर बांधलेली घडी. ॰घर-न. (सोंगट्यांचा खेळ) पटाच्या बाजूवरील घरांच्या तीन ओळींपैकीं मधल्या ओळींतील शेवटचें (खालचें) घर. ॰चक-पु. मोठ्या शेताच्या अंतर्भूत असलेलें पण दुसर्‍याच्या मालकीचें लहान शेत, जमीनीचा विभाग; शेताचा पोटविभाग. ॰जामीन, पोटचा जामीन-पु. जामीनाच्या पोटांतला जामीन; खाजगी जामीन; आंतील जामीनदार; परत जामीन. ॰जाळ-पु. आईची माया; मातृवात्सल्य; पोटच्या पुत्रा- दिकांचा नाश झाल्यामुळें होणारा शोक. [पोट + जाळ] म्ह॰ पाठजाळ पुरवेल पोटजाळ पुरवत नाहीं. ॰जाळू-वि. (ल.) चहाड- खोर; पोटासाठीं हलकें काम करणारा. 'पोटजाळू माणसांच्या हातून महाराजांचा हेतु सिद्धीस जाईल.' -विक्षिप्त ३.१०७. ॰जीभ- स्त्री. पडजीभ; आंतील बाजूची, घशांतील जीभ. ॰झांकणी-णें- स्त्रीन. (बायकी) १ लग्नांत सुनमुखाच्यावेळीं वराच्या आईकडून वधूच्या आईला लुगडें देण्यांत येतें तें. २ तो विधि. टाळा-पु. (ढोराचा धंदा) दोन अधोडीमधील तुकडा. ॰तिडीक-स्त्री. १ पोटांतील कळ; पोट दुखण्याची वेदना. २ (ल.) कळकळ; आस्था. ॰दुखणें-न. अजीर्ण वगैरे कारणानें पोटांत वेदना होणें; पोटशूळ; मुरडा. ॰दुखा-दुखी-पुस्त्री. १ (कों.) पोटशूळाची व्यथा; नेहमींचें पोट दुखणें. २ (ल.) दुसर्‍याचें बरें पाहून झालेलें दुःख; हेवा; मत्सर. ३ गरज; मागणी; हांव. 'वैद्याची-दलालाची-कार- कुनाची-लांचेची-मिळकतीची-पोटदुखी.' ॰नरपु. मोत्याच्या आंतल्या पडद्याच्याहि आंत जो नर असतो तो. ॰नळ-नअव. पोटांतील नळाचे वर जाणारे आणि खालीं जाणारे भाग; नळाचा आजार, दुखणें. याच्या उलट पाठनळ. ॰पडीत-न. लागवड केलेल्या जमीनीमधला पडीत तुकडा. ॰पाईक-पायक-वि. पोटार्थी; उपजीविकेकरितां काम, नोकरी करणारा; काम करण्याची जरूर असलेला (मनुष्य). ॰पाणी-न. पोटाची तजवीज, व्यवस्था. ॰पु(पू)जा-स्त्री. १ खाणेपिणें; भोजन. (क्रि॰ करणें). २ (ल.) लांच देणें. ॰पोशा-सा-वि. पोटार्थी; पोटभरू; खादाड. 'न करितां आळसी पोटपोसा ।' -दावि ४३७. ॰फुगी-स्त्री. १ व्यभिचार करून गरोदर होणारी, झालेली स्त्री. २ पोट फुगणें; दब्ब होणें; पोटांत गुबारा धरणें. ३ नेहमींचें पोट फुगणें; पोट फुगण्याचा रोग. ४ दुसर्‍याचें चांगलें झालेलें पाहून वाईट वाटणें; हेवा; मत्सर. ५ आकस; खुनस; चुरस. ॰फू(फु)ग-स्त्री. कांहीं गुप्त गोष्ट फोडण्याची उत्कंठा (त्यामुळें पोट फुगणें). [पोट + फुगणें] पोटफुगी झाडणें-गुप्त गोष्ट फोडणें. ॰फोड-स्त्री. १ मन मोकळें करणें. २ गुप्त गोष्ट फोडणें, प्रसिद्ध करणें. ३ एखादें कोडें उकलणें. [पोट + फोडणें] ॰फोडें-वि. एकदां व्यायलेलें (जनावर). [पोट + फोडणें] ॰बंदा-वि. पोटार्थी; फक्त पोटाकरितां काम, चाकरी करणारा. ॰बांधणें-णी-नस्त्री. पोटास बांधण्याचें वस्त्र (विशेषतः बाळंतीण स्त्रियांकरितां, मुलांकरितां). ॰बाबू-पु. १ पोटपोशा; पोटभरू; खादूनंदन; पुखानंद. २ पोटाला मिळालें म्हणजे बाकीच्या गोष्टींविषयीं बेफिकीर असणारा. [पोट + बाबू] ॰बूड-स्त्री. १ निर्वाहाच्या साधनांचा नाश; वृत्तिनाश. २ वाजवी- किंवा अपेक्षित रकमेपेक्षां कमी रक्कम उत्पन्न येणें; नुकसानी. 'अशा बोलीचा व्यापार आम्ही करणार नाहीं, ह्यांत आमची पोट- बूड आहे.' ॰बेरीज-स्त्री. हिशेबाच्या पोटांतील संख्यांची बेरीज. ॰भर-स्त्री. उदरपूरण; तृप्तिस्थिति. -क्रिवि. पोट भरेपर्यंत; (क्षुधेची) तृप्ति होईपर्यंत; (ल.) गरजेची, इच्छेची तृप्ति होईपर्यंत. ॰भरणा-भरती-स्त्री. (राजा. कु.) (अन्नादिकांनीं झालेली) पोटाची भरती; पोट भरणें; क्षुधेची तृप्ति. 'गुरांची पोट-भरती पावसांत होते.' ॰भगई-स्त्री. (ना.) पोट भरेपर्यंत खाणें. ॰भरावा-पु. उदरनिर्वाह. 'पोट भराव्या कारणें । नाना विद्या अभ्यास करणें ।' -दा ६.१. २० ॰भरू-वि. ज्यापासून पुष्टि मुळींच नाहीं पण नुसतें प्राणधारणेंपुरतें पोट भरणारें किंवा रुचकर नसून भरपूर पोट भरणारें (अन्न). ॰भरू-भर्‍या-वि. पोटबाबू पहा. ॰भाडेचिठ्ठी-स्त्री. पोटभाडेकर्‍याकडून घेतलेली भाडेकर्‍यानें खंडचिठ्ठी, भाडेचिठ्ठी (घर इ॰ची). ॰मंडळ-न. मूळ मंडळाची शाखा; मदतनीस मंडळ; पुरवणीमंडळ. 'संयुक्त राज्यघटनेचें एक पोटमंडळ नेमण्यांत आलें.' -के २.१२. ३०. ॰मांडणी-मांडा- वणस्त्री. पोटसर; लग आणि कांबेरे. घराचीं पाखीं न दबावीं म्हणून प्रायः त्यांच्या मध्यजागीं खांबावर लगा घालून उभें केलेलें काम. ॰मारा-पु. उपासमार; पोटाला चिमटा घेणें; पोटाची आबाळ. ॰म्हातारा-वि. पोटाच्या, अन्नाच्या आबाळीमुळें म्हातार्‍यासारखा, अशक्त झालेला. ॰रकम-स्त्री. पोटांतील बाब; पोटांतील सदर, कलम. ॰वहीत-वि. मध्यें मध्यें लागवड केलेली (जमीन). याच्या उलट सबंधवहीत. ॰वाइ(ई)क-वि. पोटभरू पहा. ॰वांटा-पु. पोट वाटणी; मुख्य वांट्यांतील केलेला वाटा. ॰वांटेकरी-पु. पोटवाटणीचा मालक; दुय्यम वांटेकरी. ॰वाढवी- वाढी-स्त्री. व्यभिचारानें गर्भार झालेली स्त्री. [पोट + वाढविणें] ॰शूळ-सूळ-पु. पोटदुखी; मुरडा. ॰सर-पु. पोटमांडणी पहा. ॰सरकत-स्त्री. पोटभागीदारी; पोटवांटा. ॰सरकती-वि. पोट- भागीदार; पोट वाटेकरी. ॰सरू-स्त्री. पोटजाळी; एक शिवी. 'रांड मुलखाची पोटसरू ।' -राला ४६. [पोट + सारणें (दुसर्‍यापूढें)] ॰हिस्सा-पु. पोटवांटा. पोटांतून-क्रिवि. मनापासून; खरो- खरी. 'मला हा बेत कांहीं पोटांतून आवडला नव्हता.' पोटा- पाण्याचा बंदोबस्त-पु. निर्वाहाची केलेली व्यवस्था, तजवीज. पोटार्थीं-पु. पगार न घेतां नुसत्या जेवणावारी राहणारा नोकर. पोटबाबू पहा. [पोट + अर्थी] पोटावर्त-पु. घोड्याच्या पोटावरील भोंवरा. हें अशुभ लक्षण होय. -वि. असें चिन्ह असलेला (घोडा). [पोट + आवर्त] पोटाळ-वि. मोठ्या पोटाचा; ढेरपोट्या; दोंदील (माणूस). पोटाची आग-स्त्री. भूक. 'एखादीनें पोटाच्या आगीमुळें असें केलें तर असो मेलें ?' -फाल्गुनराव. पोट्या-वि. १ पोटभरू पहा. २ पोटचा (मुलगा). ३ (व.) पाटाच्या स्त्रीचा पूर्वघरचा, पाटकरणीबरोबर येणारा मुलगा. 'एक पोट्या मुलगा आईबरोबर आला.

दाते शब्दकोश

धर्म

पु. १ धार्मिक विधियुक्त क्रिया, कर्में; परमेश्वरासंबं- धीचें कर्तव्य; ईश्वरोपासना; परमेश्वरप्राप्तीचीं साधनें; परमेश्वरप्रा- प्तीचा मार्ग, पंथ. 'करितो धारण यास्तव धर्म म्हणावें प्रजांसि जो धरितो ।' -मोकर्ण ४१.८१. २ मनुष्यप्राण्यास सदाचरणास लावणारें व परमेश्वरचिंतनाचा मार्ग दाखवून देणारे ख्रिश्चन, यहुदी, हिंदु, इस्लामी वगैरे पंथ. 'मुख्यमुख्य नितितत्त्वांबद्दल सर्व धर्मांची एकवाक्यता आहे. '३ शास्त्रांनीं घालून दिलेले आचार, नियम; पवित्र विधी, कर्तव्यें. पंचपुरुषार्थांपैकीं एक. ४ दान; परोपकारबुद्धीनें जें कोणास कांहीं देणें, किंवा जें कांहीं दिलें जातें तें; दानधर्माचीं कृत्यें; परोपकारबुद्धि. 'अंधळयापांगळ्यांस धर्म करावा. ' 'महाराष्ट्रीयांपेक्षां गुजराथ्यांत धर्म अधिक.' ५ सद्गुण; शास्त्रोक्त वागल्यानें अंगीं येणारा नौतिक. धार्मिक गुण. 'कर्तव्यकर्म, नीति, नीतिधर्म किंवा सदाचरण यांसच धर्म असें म्हणतात. '-गीर ६५. ६ स्वाभाविक गुण; गुणधर्म; नैसर्गिक प्रवृत्ति. 'गाईनें दूध देणें हा गाईचा धर्म आहे.' 'पृथ्वीस वास येणें पृथ्वीचा धर्म. ' ७ कर्तव्यकर्म; रूढी; परंपरेनें, शास्त्रानें घालून दिलेला नियम उदा॰ दान करणें हा गुहस्थ धर्म, न्यायदान हा राजाचा धर्म, सदाचार हा ब्राह्मणधर्म, धैर्य हा क्षत्रिय धर्म. याच अर्थानें पुढील समास येतात. पुत्रधर्म-बंधुधर्म-मित्रधर्म-शेजार- धर्म इ॰ ८ कायदा. ९ यम. 'धर्म म्हणे साध्वि बहु श्रमलीस स्वाश्रमासि जा मागें ।' -मोविराट १३.६५. १० पांडवांतील पहिला. 'कीं धर्में श्वानू सरता । केला सर्वथा स्वर्गलोकीं ।' -एभा १.१०९. ११ धर्माचरणाचें पुण्य. 'ये धर्मचि, पुत्र स्त्री कोष रथ तुरग करी न सांगतें ।' -मोभीष्म ११.२६. १२ (शाप.) गुण- धर्म' स्वाभाविक लक्षण ' दोन किंवा अधिक पदार्थांचें एकमेकां- वर कार्य घडून त्यांपासून जेव्हां असा नवा पदार्थ उप्तन्न होतो कीं त्याचे धर्म मूळ पदार्थांच्या धर्मांपासून अगदीं भिन्न असतात, तेव्हां त्या कार्यास रसायनकार्य असें म्हणतात.' -रसापू १. (वाप्र.) धर्म करतां कर्म उभें राहणें-पाठीस लागणें-दुसर्‍यावर उपकार करावयला जावें तों आपल्यावरच कांहींतरी संकट ओढवणें. धर्मखुंटीस बांधणें- (जनावराला) उपाशीं जखडून टाकणें; ठाणावर बांधून ठेवणें. [धर्मखुंटी]धर्म जागो-उद्गा. (विशिष्ट गोष्टीचा संबंध पुन्हां न घडावा अशाविषयीं) पुण्य उभें राहो. धर्म पंगु-(कलियुगांत धर्म एक पायावर उभा आहे. त्याचें तीन पाय मागील तीन युगांत गेले. यावरून ल.)धर्म अतिशय दुबळा, अनाथ आहे या अर्थी. धर्माआड कुत्रें होणें- दानधर्माच्या आड येणार्‍याला म्हणतात. धर्माचा- १ धर्मासंबंधीं (पैसा, अन्न इ॰). २ मानलेला; उसना; खरा औरस नव्हे असा (पुत्र, पिता. बहीण इ॰). ३ फुकट; मोफत.'धर्माची राहण्याला जागा दिली आहे.' -पारिभौ २७. धर्माची वाट बिघडणें-मोडणें-एखाद्या दानधर्माचा ओघ थांबणें, थांबविणें. धर्माचे पारीं बसणें-१ दुसर्‍याचे पैसे खर्चीत रिकामटेकडें बसणें; धर्मावर काळ कंठणें. २ सद्गुणांचें चांगलें फल मिळणें; सदाचारामुळें चांगलें दिवस येणें. ३ सदोदित दानधर्म करणें. धर्मकृत्ये आचरणें.धर्मावर लोटणें- टाकणें-सोडणें-एखाद्याच्या न्यायबुद्धिवर सोंपविणें.धर्मा- वर सोमवार सोडणें-स्वतः झीज न सोसतां परभारें होईल तें पाहणें. -संम्ह. धर्मास-क्रिवि. (कंटाळल्यावरचा उद्गार) कृपा- करून; मेहेरबानीनें; माझे आई ! याअर्थीं. 'माझे रुपये तूं देऊं नको पण तूं एथून धर्मास जा ! ' 'मी काम करतों, तूं धर्मास नीज.' धर्मास भिऊन चालणें-वागणें-वर्तणें-करणें-धर्माप्रमाणें वागणें. धर्मास येणें-उचित दिसणें; पसंतीस येणें; मान्य होणें. 'मी तुला सांगायचें तें सांगितलें आतां तुझे धर्मास येईल तें कर.' म्ह॰ १ धर्मावर सोमवार = (दानधर्म करणें). कांहीं तरी सबबीबर, लांबणीवर टाकणें. -मोल. २ धर्माचे गायी आणि दांत कांगे नाहीं. ३ आज मरा आणि उद्यां धर्म करा. ४ धर्मादारीं आणि मारामारी. ५ धर्मस्य तत्वं निहितं गुहायाम् = धर्माचें रहस्य गुहेमध्यें ठेवलेलें असतें. (गुढ किंवा अज्ञेय असतें). धर्माचें खरें तत्त्व गहन, अगम्य आहे. ६ धर्मस्य त्वरिता गतिः = धर्मास विलंब लावूं नये या अर्थीं. सामाशब्द- ॰आई-माता-स्त्री. (ख्रि.) कांहीं चर्चेसमध्यें लहान मुलांचा बाप्तिस्मा होतो तेव्हां त्यांस ख्रिस्तीधर्मास अनुसरून वळण व शिक्षण देण्यांत यावें म्हणून त्यांच्या मातेहून भिन्न अशी जी स्त्री आपणावर जबाबदारी घेते ती. (इं.) गॉडमदर. 'प्रत्येक मुलीला एक धर्मबाप व दोन आया पाहिजेत.' -साप्रा ९०. ॰कर्ता-पु. १ धर्म करणारा; परोपकारी माणूस. २ न्यायाधीश; जज्ज. ३ (दक्षिण हिंदुस्थान) देवळाचा व्यवस्थापक, कारभारी. ॰कर्म-न. १ वर्तन; आचार; एखाद्याचीं कृत्यें. कर्मधर्म पहा. 'ज्याचें त्यास धर्मकर्म कामास येईल.' २ शास्त्रविहित कर्में, आचरण; धार्मिक कृत्यें. [सं. धर्म + कर्म] ॰कर्मसंयोग-पु. प्रारब्धयोग; कर्म- धर्मसंयोग पहा. ॰कार्य-कृत्य-न. धार्मिक कृत्य; परोपकाराचें कार्य; (विहीर, धर्मशाळा इ॰ बांधणें, रस्त्यावर झाडें लावणें; देवळें बांधणें; अन्नसत्रें स्थापणें इ॰). २ धार्मिक विधि, व्रत; धर्मसंस्कार. [सं.] ॰कीर्तन-धर्माचें व्याख्यान-प्रवचन-पुराण. 'किंबहुना तुमचें केलें । धर्मकीर्तन हें सिद्धि गेलें ।' -ज्ञा १८. १७९२. [सं.] ॰कुढाव-पु. (महानु.) धर्मरक्षक. 'कीं धर्म- कुढावेनि शाङ्र्गपाणी । महापातकांवरी सांघीतली सांघनी ।' -शिशु ३५. [धर्म + कुढावा = रक्षण] ॰खातें-न. १ धर्मासाठीं जो खर्च करितात त्याचा हिशेब ठेवणारें खातें; धार्मिक खातें. २ धर्मार्थ संस्था; लोकोपयोगी, परोपकारी संस्था. [सं. धर्म + खातें] ॰खूळ-वेड-न. धर्मासंबंधीं फाजील आसक्ति; अडाणी धर्म- भोळेपणा; धर्माबद्दलची अंधश्रद्धा. [म. धर्म + खूळ] ॰गाय- स्त्री. १ धर्मार्थ सोडलेली गाय. धर्मधेनु पहा. २ चांगली, गरीब गाय. 'कढोळाचें संगती पाहे । क्षणभरी गेलिया धर्मगाये ।' -एभा २६.४२. ॰ग्रंथप्रचारक-पु. (ख्रि.) ख्रिस्ती धर्म शास्त्र व तत्संबंधीं इतर पुस्तकें विकणारा, फेरीवाला; (इं.) कल्पो- र्चर. 'सदानंदराव काळोखे यांनीं एक तप धर्मग्रंथप्रचारकाचें काम मोठ्या प्रामाणिकपणें केलें.' [सं. धर्म + ग्रंथ + प्रचारक] धर्मतः- क्रिवि. धर्माच्या, न्यायाच्या दृष्टीनें; न्यायतः; सत्यतः; खरें पाहतां. ॰दान-न. दानधर्म; धर्मादाय. 'एक करिती धर्मदान । तृणास- मान लेखती धन ।' [सं.] ॰दारीं कुत्रें-न. परोपकाराच्या कृत्यास आड येणारा (नोकर, अधिकारी); कोठावळा. ॰दिवा दिवी-पुस्त्री. धर्मार्थ लावलेला दिवा. 'जे मुमुक्षु मार्गीची बोळावी । जे मोहरात्रीची धर्मदिवी ।' -ज्ञा १६.६५. ॰द्वार-न. कौल मागणें; ईश्वराला शरण येणें. [सं.] ॰धेनु-स्त्री. १ धर्मार्थ सोड- लेली गाय. 'ऐसेनि गा आटोपे । थोरिये आणतीं पापें । धर्मधेनु खुरपें । सुटलें जैसें ।' -ज्ञा १६.३२९. २ हरळी; दुर्वा. -मनको [सं.] ॰ध्वज-पु. १ धर्माची पताका; धर्मचिन्ह; धर्माचा डौल, प्रतिष्ठा; (क्रि॰ लावणें; उभारणें; उभविणें; उडणें). २ (ल) धर्माचा फाजील पुरस्कर्ता. [सं. धर्म + ध्वज] ॰ध्वजी-वि. धर्म- निष्ठेचा आव आणणारा ढोंगी-भोंदू माणूस. ॰नाव-स्त्री. येणार्‍या- जाणारानीं तरून जावें म्हणून नावाड्यास वेतन देऊन नदीवर जी धर्मार्थ नाव ठेवलेली असते ती; धर्मतर; मोफत नाव. [धर्म + नांव] ॰निष्पत्ति-स्त्री. कर्तव्य करणें; धर्माची संपादणूक. [सं.] ॰नौका-पु. धर्मनाव पहा. ॰न्याय-पु. वास्तविक न्याय; निःप- क्षपात, धर्माप्रमाणें दिलेला निकाल. 'तुम्ही उभयतांचें वृत्त श्रवण करून धर्म न्याय असेल तो सांगा.' [धर्म + न्याय] ॰पत्नी- स्त्री. १ विवाहित स्त्री. -ज्ञा १८.९४२. २ सशास्त्र (अग्निहोत्रादि) कर्माकरितां योग्य अशी प्रथम विवाहाची (दोन तीन पत्न्या असल्यास) ब्राह्मण स्त्री. [सं.] ॰पंथ-पु. १ धर्माचा, परो- पकाराचा, सदाचरणाचा मार्ग. 'सदां चालिजे धर्मपंथ सर्व कुमति टाकोनि ।' 'धर्मपंथ जेणें मोडिले । त्यास अवश्य दंडावें ।' २ धार्मिक संग, समाज. 'ख्रिस्तीधर्मपंथ.' [सं.] ॰परायण- वि. क्रिवि. १ परोपकारार्थ; धार्मिककृत्य म्हणून; धर्मासाठीं. २ धर्मार्थ; मोफत; (देणें, काम करणें). ३ पक्षपात न करतां; धर्मावर लक्ष ठेवून (करणें; सांगणें; बोलणें इ॰). 'धर्मपरायण बोलणारे पंच असल्यास धर्मन्याय होईल.' ॰परिवर्तन-न. (ख्रि.) धर्ममतें बदलणें; धर्मांतर. (इं.) कॉन्व्हर्शन. 'नारायण वामन टिळक यांचें १८९५ सालीं धर्मपरिवर्तन झालें.' [सं. धर्म + परिवर्तन] ॰पक्षी-पु. धर्मोपदेशक; पाद्री; पुरोहित. 'तो जातीचा धर्मपक्षी होता.' -इंग्लंडची बखर भाग १.२७२. [धर्म + पक्षी = पुरस्कर्ता] ॰पिंड-पु. १ पुत्र नसणार्‍यांना द्यावयाचा पिंड. २ दुर्गतीला गेलेल्या पितरांना द्यावयाचा पिंड. [धर्म + पिंड] ॰पिता-पु. धर्मबाप पहा. ॰पुत्र-पु. १ मानलेला मुलगा. २ उत्तरक्रियेच्या वेळीं पुत्र नसलेल्यांचा श्राद्धविधि करणारा तज्जा- तीय माणूस; धार्मिक कृत्यांत पुत्राप्रमाणें आचरणारा माणूस. 'धर्मपुत्र होऊनि नृपनायक ।' -दावि ४९१. ३ दत्तक मुलगा, इस्टेटीला वारस ठरविलेला. ॰पुरी-स्त्री. १ तपस्वी, विद्वान वगैरे ब्राह्मण ज्या क्षेत्रांत राहतात तें क्षेत्र; धार्मिक स्थल. २ ज्याच्या घरीं पाहुण्यांचा नेहमीं आदर सत्कार केला जातो तें घर; पाहुण्यांची वर्दळ, रहदारी असणारें घर. [सं.] ॰पेटी-स्त्री. धर्मादाय पेटी; धर्मार्थ पैसे टाकण्यासाठीं ठेवलेली पेटी. (देऊळ; सामाधि; धर्मार्थ संस्था वगैरे ठिकाणीं). [सं. धर्म + पेटी] ॰पाई- ॰पोवई-स्त्री. १ प्रवाशांसाठीं, गरिबांसाठीं अन्न पाणी वगैरे फुकट मिळण्याची केलेली व्यवस्था; धर्मार्थ अन्नोदक दान. २ अशी व्यवस्था जेथें केलेली असते तें ठिकाण; अन्नछत्र; धर्मशाळा. ॰प्रतिष्ठा-स्त्री. १ धर्माचा गौरव; सन्मान; डौल. २ धर्माची स्थापना. 'धर्मप्रतिष्ठा तो सिध्दु । अभयहस्तु ।' -ज्ञा १.१३. [सं.] ॰प्रधान-वि. १ धर्मरूप पुरुषार्थाविषयीं तत्पर; धार्मिक वृत्तीचा. २ धर्म ज्यांत प्रमुख आहे असा (विषय, हेतु इ॰). ॰बंधु-पु. मानलेला भाऊ; भावाच्या जागीं असणारा माणूस; स्वतःच्या धर्माचा अनुयायी; स्वधर्मीय. [सं.] ॰बाप-पु. (ख्रि) कांहीं चर्चेसमध्य लहान मुलांचा बाप्तिस्मा होतो तेव्हां त्यांस खिस्तीधर्मास अनु- सरून वळण व शिक्षण देण्यांत यावें म्हणून जबाबदारी घेणारा पित्याहून निराळा पुरुष. (इं.) गॉडफादर. 'ज्या प्रत्येक मुलाचा बाप्तिस्मा करावयाचा आहे त्याला दोन धर्मबाप व एक धर्मआई पाहिजे.' -साप्रा ९०. [धर्म + बाप] ॰बुद्धि-स्त्री. धर्म करण्याची मनाची प्रवृत्ति; धर्माचरणाविषयीं आस्था. 'या चोराला तुम्ही गरीब मानून घरीं जेवायला घालितां ही धर्मबुद्धि कामाची नव्हे.' [धर्म + बुद्धि] ॰भोळा-वि. १ धर्मावर अंधश्रद्धा असणारा, परम धार्मिक. २ (अनादरार्थी) धर्मवेडा; कट्टर सनातनी. (इं.) सुपरस्टिशस. 'बॅरिस्टर, या धर्मभोळ्या खुळचट लोकांत तुम्ही आपल्या वाईफला एक मिनिटहि ठेवणं म्हणजे तिच्या सगळ्या लाइफचं मातेरं करण्यासारखं आहे.' -सु ८. ॰भ्राता-पु. धर्म- बंधु पहा. ॰मर्यादा-स्त्री. धर्मानें घालून दिलेली मर्यादा, बंधन, शिस्त; धार्मिक नियंत्रण. [सं.] ॰मार्ग-पु. धर्माचा, सदा- चरणाचा, परोपकाराचा मार्ग. [सं.] ॰मार्तंड-पु. १ धर्माचा श्रेष्ठ अनुयायी; पुरस्कर्ता; धर्मभास्कर; एक पदवी. २ (उप.) धार्मिकपणाचें अवडंबर, ढोंग माजविणारा. 'भीतोस तूं कशाला, मोडाया हें सुधारकी बंड । आहोंत सिद्ध आम्हीं पुण्यपुरींतील धर्ममार्तंड ।' -मोगरे. ॰युद्ध-न. युद्धशास्त्राच्या नियमाप्रमाणें चाललेली लढाई; सारखें संख्याबल; सारख्या शस्त्राअस्त्रांनीं सज्ज अशा दोन पक्षांमधील न्यायीपणाचें युद्ध; न्याय्ययुद्ध; निष्कपट युद्ध. 'तों अशरीरिणी वदली उत्तर । धर्मयुद्ध नव्हे हें ।' -पाप्र ४५.३९. [सं] ॰राज-पु. १ यमधर्म. २ जेष्ठ पांडव, युधिष्ठिर युधिष्ठिर हा फार सच्छील असल्यामुळें त्याला धर्माचा अवतार सम जत. ३ (ल.) धर्मनिष्ठ, सात्त्विक मनुष्य ४ धर्माप्रमाणें भोळा- भाबडा माणूस. [सं.] ॰राजाची बीज-स्त्री. कार्तिकशुद्ध द्वितीया; भाऊबीज; यमद्वितीया. [सं. धर्मराज + म. बीज] ॰राज्य-न. ज्या राज्यांत सत्य, न्याय आणि निःपक्षपात आहे असें राज्य; सुराज्य; सुखी राज्य [धर्म + राज्य] ॰लग्न-न. धर्मविवाह पहा. ॰लड- वि. (अश्लील) नास्तिक; धर्मकृत्यें न करणारा; धर्माला झुगारून देणारा. याच्या उलट धर्ममार्तंड. 'सदर ग्रंथांत महाराष्ट्र धर्मलंड अतएव त्याज्य असें एका गंधर्वानें म्हटलें आहे.' -टि ४. [सं. धर्म + लंड = लिंग] ॰लोप-पु. धर्माची ग्लानी; अधर्माचा प्रसार. [सं.] ॰वणी-पु. (कुंभारी) तिलांजळीच्या वेळचा कुंभारी मंत्र. -बदलापूर ७२. [धर्म + पाणी] ॰वाट-स्त्री. १ शरण आलेल्या शत्रूवर दया दाखवून त्यास करून दिलेली वाट. 'तुज युद्धीं कैंचें बळ । धर्मवाट दिधली पळ ।' -एरुस्व ११.३७. २ खुला, मोकळा, बिन धोक, अनिर्बंध रस्ता, मार्ग. [सं. धर्म + वाट] ॰वान्-वि. धार्मिक; परोपकारी; सदाचरणी; सात्त्विक. [सं.] ॰वासना-स्त्री. दानधर्म, धार्मिक कृत्यें करण्याची इच्छा; धर्मबुद्धि. [सं. धर्म + म वासना] ॰निधान-न. धर्माचा खजीना, ठेवा, सांठा. 'रचिलीं धर्मनिधानें । श्रीनिवृत्तीदेवें ।' -ज्ञा ११.९. [सं.] ॰विधि-पु. धार्मिककृत्य, संस्कार. [सं.] ॰विपाक-पु. धार्मिक कृत्यांचा परिणाम, फल. सत्कृत्यांचें फल. विपाक पहा. [सं.] ॰विवाह-पु. गरिबाचें स्वतःच्या पैशानें करून दिलेलें लग्न; धर्मादाय लग्न. [सं.] ॰वीर- पु. १ स्वधर्मार्थ प्राणार्पण करणारा; धर्मासाठीं लढणारा. 'स्वधर्म- रक्षणाकरितां मृत्यूच्या दाढेंत उडी टाकणार्‍या धर्मवीराची ती समाधि होती.' -स्वप १०. २ धर्माचें संरक्षण, संवंधन करणारा; धर्माचा वाली; ही एक पदवीहि आहे. 'धर्मवीर चंद्रोजीराव आंग्रे.' ३ (ख्रि) रक्तसाक्षी. (इं.) मार्टिर. [सं.] ॰शाला-ळा, धर्म- साळ-स्त्री. वाटसरू लोकांना उतरण्याकरितां बांधलेलें घर; धर्मार्थ जागा; पांथस्थांच्या विश्रांतीची जागा. 'मढ मंडप चौबारी । देखे धर्मसाळां ।' -ऋ २०. [धर्म + शाला] ॰शाळेचें उखळ-न. (धर्म- शाळेंतील उखळाचा कोणीहि उपयोग करतात ल.) वेश्या; पण्यां- गना. म्ह॰ धर्मशाळेचे उखळीं येत्याजात्यानें कांडावें. ॰शास्त्र- न. १ वर्णाश्रम धर्माचें प्रतिपादक जें मन्वादिप्रणीत शास्त्र तें आचार व्यवहारादिकांसंबंधीं नियम सांगणारें शास्त्र, ग्रंथ. २ समाजाच्या शिस्तीसाठीं, धार्मिक आचरणाकरितां, सामाजिक संबंधाकरितां (लग्न वगैरे संस्थांबद्दल) विद्वानांनीं घालून दिलेले नियम किंवा लिहिलेले ग्रंथ. धर्माविषयीचें विवेचन केलेला ग्रंथ. ३ ख्रिस्तीधर्माचें शास्त्र. (इं.) थिऑलॉजी. याचें सृष्टिसिद्ध (नॅचरल), ईश्वरप्रणीत (रिव्हील्ड), सिद्धांतरूप (डागमॅटिक), पौरुषेय (स्पेक्युलेटिव्ह), व सूत्रबद्ध (सिस्टिमॅटिक) असे प्रकार आहेत. ४ (सामा.) कायदेकानू. [सं.] ॰शास्त्री-वि. धर्मशास्त्र जाणणारा. [सं.] ॰शिला-स्त्री. सती जाणारी स्त्री पतीच्या चितेवर चढतांना ज्या दगडावर प्रथम उभी राहते तो दगड. या ठिकाणीं उभी असतां ती सौभाग्यवायनें वाटतें. ही शिला स्वर्गलोकची पायरी समजतात. 'धर्म शिलेवर उभी असतांना थोरल्या माधवराव पेशव्यांची स्त्री रमाबाई हिनें नारायणराव पेशव्यांचा हात राघोबांच्या हातीं दिल्याचें प्रसिद्ध आहे.' -ज्ञाको (ध) ४४. 'धर्मशिळेवर पाय ठेविता दाहा शरीरा का करितो ।' -सला ८३. ॰शिक्षण-न. धर्माचें शिक्षण; धार्मिक शिक्षण. 'ज्या धर्म शिक्षणानें पुरुषाचा स्वभाव अभिमानी, श्रद्धाळु, कर्तव्यदक्ष व सत्यनिष्ठ बनेल तें धर्मशिक्षण -टिसू ११६. ॰शील-ळ-वि. शास्त्राप्रमाणें वागणारा; धार्मिक सदाचरणी; सद्गुणी. [सं.] ॰श्रद्धा-स्त्री. धर्माविषयीं निष्ठा; धर्मावर विश्वास. 'राष्ट्रोत्कष स धर्मश्रद्धा पुढार्‍यांच्याहि अंगीं पाहिजें.' -टिसू ११७. ॰संतति-संतान-स्त्रीन. १ कन्यारूप अपत्य (कारण कन्या कुटुंबाबाहेर जाते). २ दत्तक मुलगा. [सं.] ॰सभा- स्त्री. १ न्याय कचेरी; न्यायमंदिर; कोर्ट. २ धार्मिक गोष्टींचा निकाल करणारी मंडळी; पंचायत. [सं.] ॰समीक्षक, ॰जिज्ञासु-पु. (ख्रि.) धर्मसंबंधानें विचार करणारा; शोध कर णारा; पृच्छक. (इं.) एन्क्वायरर. 'धर्म समीक्षकांच्या शिक्षकांना उपयोगी पडतील अशा पुस्तकांची बरीच जरूरी आहे.' -ज्ञानो ७.५. १९१४. [सं.] ॰संमूढ-वि. कर्तव्य कोणतें हें ज्यास निश्चित कळत नाहीं असा. -गीर २५. ॰संस्कार-पु. धार्मिक संस्कार; धर्मविधी. ॰संस्थान-न. १ पुण्य क्षेत्र; धर्माचें, सदाचरणाचें स्थान. २ पूजा, अर्चा वगैरे करण्यासाठीं ब्राह्मणास दिलेलें गांव; अग्रहार. ३ (व्यापक) धर्मार्थ, परोपकारी संस्था, सभा. ॰संस्था- पन, ॰स्थापन-न. १ नवीन धर्मपंथाची उभारणी. 'धर्म स्थापनेचे नर । हे ईश्वराचे अवतार । जाले आहेत पुढें होणार ।' -दा १८.६. २०. २ धर्माची स्थापना; धर्मजागृति. [सं.] ॰सिद्धांत- स्वीकार-पु. (ख्रि.) उपासनेच्या वेळीं आपल्या धर्मश्रद्धेचे आविष्करण करण्याकरितां विवक्षित सिद्धांतसंग्रह म्हणून दाखविणें. (इं.) कन्फेशन् ऑफ फेथ. [सं.] ॰सिंधु-पु. धर्मशास्त्रावरचा एक संस्कृत ग्रंथ. यांत अनेक धर्मकृत्यांचें विवेचन केलेलें असून शुभाशुभ कृत्यांचा निर्णय सांगितला आहे. पंढरपूरचे काशिनाथ अनंतोंपाध्याय यांनीं इ. स. १७९१ त हा रचिला. ॰सूत्रें-नअव. ज्ञान व कर्म- मार्ग यांची संगति लावून व्यावहारिक आचरणाची सांगोपांग चर्चा करणारा प्राचीन ग्रंथ. सूत्रें पहा. [सं.] ॰सेतु-पु. धर्म- मर्यादा. [सं.] ॰ज्ञ-वि. १ धर्मशास्त्र, विधिनियम उत्तम प्रकारें जाणणारा. २ कर्तव्यपर माणूस; कर्तव्य जागरूक. धर्माआड कुत्रें-न. सत्कृत्याच्या, परोपकाराच्या आड येणारा दुष्ट माणूस. धर्मदारीं कुत्रें पहा. धर्माचरण-न. धार्मिक आचार; सदा- चरण. [सं. धर्म + आचरण] धर्माचा कांटा-पु. सोनें वगैरे मौल्यवान जिन्नसाचें खरें वजन लोकांस करून देण्यासाठीं विशिष्ट स्थलीं ठेवलेला कांटा; धर्मकांटा. वजन करवून घेणार्‍यांकडून मिळालेला पैसा धर्मादाय करतात. धर्माचा पाहरा-पु. सकाळचा प्रहर (सूर्योदयापूर्वीं दीड तास व नंतर दीड तास). धर्माची गाय-पु. (धर्मार्थ मिळालेली गाय). १ फुकट मिळालेला जिन्नस. म्ह॰ धर्माचे गायी आणि दांत कां गे नाहीं = फुकटचा जिन्नस किंवा काम क्कचितच चांगलें असतें. २ कन्या; मुलगी (कारण ही दुसर्‍यास द्यावयाची असते). -वि. गरीब निरुपद्रवी मनुष्य. धर्मात्मा-पु. (धर्माचा आत्मा, मूर्तिमत धर्म). १ धर्म- शील, धार्मिक प्रवृत्तीचा माणूस. २ धर्म करण्याकडे ज्याची प्रवृत्ति आहे असा. ज्यानें अनेक धर्मकृत्यें केलीं आहेत असा. [सं.] धर्मादाय-व-पु. १ धर्मार्थ जें दान तें; देणगी; भिक्षा. २ सर- कारांतून धर्मकृत्यांसाठीं प्रतिवर्षीं काढून ठेवलेली रक्कम; या कामीं ठराविक धान्य देण्यासाठीं दर गांवाला काढलेल्या हुकूम. -वि. मोफत; फुकट; धर्मार्थ. -क्रिवि. धर्म म्हणून; दान देण्याकरितां; धर्मार्थ. ॰टाकणें-सोडणें-देणें-धर्मार्थ देणें; दानधर्मासाठीं आपला हक्क सोडणें. धर्मादाय पट्टा-स्त्री. देऊळ, उत्सव इ॰ चा खर्च चालविण्यासाठीं किंवा एखाद्याच्या मदतीसाठीं, लोकांवर बसवितात ती वर्गणी. धर्माधर्मीं-धर्मींनें-क्रिवि. धार्मिक व उदार लोकांच्या मदतीनें अनेकांनीं धर्मार्थ हात लाविल्यानें; फुकट; स्वतः पैसा खर्च करण्यास न लागतां. 'लेखक ठेवून लिहिलें तर पुस्तक होईल नाहींतर धर्माधर्मीं ग्रंथ तडीस जाणार नाहीं.' [सं. धर्म द्वि.] धर्माधर्मीवर काम चाल- विणें-पैसा खर्च न करतां फुकट काम करून घेणें. धर्मा- धर्मीचा-वि. धार्मिक लोकांकडून मिळविलेला; धर्मार्थ (फुकट) मिळविलेला; अनेकांनीं हातबोट लावल्यामुळें संपादित (पदार्थ, व्यवहार). धर्माधिकरण-पु. १ धर्माचारांचें नियंत्रण. २ शास्त्रविधींची पाळणूक होते कीं नाहीं हें पाहाण्यासाठीं, नीति- नियमांवर लक्ष ठेवण्यासाठीं खातें, सभा. ३ धर्मशास्त्रांची अंमल- बजावणी. ४ सरकारी न्यायसभा; न्यायमंदिर. धर्माधिकार-पु. १ धर्मकृत्यांवर देखरेख करण्याचा अधिकार. धार्मिक गोष्टींवर नियंत्रण. २ न्यायाधीश. धर्माधिकरण पहा. [धर्म + अधिकार] धर्माधिकारी-पु. १ धर्मासंबंधीं गोष्टी पहाणारा वरिष्ठ अधि- कारी. धर्माधिकरणाचा अधिकारी. २ न्यायाधीश. धर्माध्यक्ष-पु. सरन्याधीश; धर्मगुरु; राजा. [धर्म + अध्यक्ष] धर्मानुयायी, धर्मानुवर्ती, धर्मानुसारी-वि. १ धर्माप्रमाणें चालणारा, वागणारा; सद्गुणी; सदाचरणी. २ एखाद्या धर्मपंथांतील माणूस. धर्मानुष्ठान-न. १ धर्माप्रमाणें वर्तन; पवित्र, सदाचारी जीवन. २ धार्मिक संस्कार, विधि. ३ धार्मिक कृत्य; सत्कृत्य. धर्मार्थ-क्रिवि. १ परोपकार बुद्धीनें; दान म्हणून देणगी म्हणून. २ मोफत; फुकट. धर्मार्थ जमीन-स्त्री. धार्मिक गोष्टींसाठीं दिलेली जमीन (देवस्थानास किंवा धर्मादायास दिलेली); इनाम जमीन. धर्मालय-न. १ धर्मस्थान; धर्मक्षेत्र; ज्या ठिकाणीं धार्मिक कृत्यें चालतात तें स्थळ. 'जें धर्मालय म्हणिजे । तेथ पांडव आणि माझें ।' -ज्ञा १.८३.२ धर्मशाळा. धर्मावतार-पु. अतिशय सत्वशील व पवित्र माणूस; प्रत्यक्ष धर्म. [धर्म + अवतार] धर्मासन-न. न्यायासन; न्यायाधीश बसण्याची जागा; न्याय- देवतेची जागा. धर्मित्व-वि. गुणित्व. 'जे धर्मधर्मित्व कहीं ज्ञानाज्ञाना असे ।' -अमृ ७.२८३. धर्मिष्ट-वि. धार्मिक; सत्त्वशील; सदाचरणी. धर्मी-वि. १ धर्मानें वागणारा; सदाचरण ठेवणारा; न्यायी; सद्वर्तनी. २ ते ते गुणधर्म अंगीं असणारा. (विषय, पदार्थ). ३ धर्मीदाता; उदार; धर्म करणारा. धर्मीदाता- पु. धर्मकरण्यांत उदार, मोठा दाता (भिक्षेकर्‍यांचा शब्द). धर्मोडा-पु. स्त्रियांचें एक व्रत; चैत्र महिन्यांत ब्राह्मणाच्या घरीं धर्मार्थ रोज नियमानें एक घागरभर पाणी देणें. [धर्म + घडा] धर्मोपदेश-पु. धर्माची शिकवण; धर्मांसंबंधी प्रवचन, उपदेश, धर्मोपदेशक-पु. गुरु; धर्माचा उपदेश करणारा. धर्मोपा- ध्याय-पु. धर्माधिकारी. धर्म-वि. १ धर्मयुक्त; धर्मानें संपादन केलेलें; धर्मानें मिळविलेलें; धर्मदृष्टया योग्य. 'उचित देवोद्देशें । द्रव्यें धर्म्यें आणि बहुवसें ।' -ज्ञा १७.३६०. २ (महानु.) वंद्य. 'जें पांता जालीं धर्म्यें । वित्त रागांसि ।' -ऋ २०. धर्म्यविवाह- पु. धर्मशास्त्रोक्त विवाह; सर्व धार्मिक संस्कारांनिशीं झालेला विवाह.

दाते शब्दकोश

घोडा

पु. १ खूर असलेला एक चतुष्पाद प्राणिविशेष. ह्याचा उपयोग ओझे वाहण्याच्या, गाडी ओढण्याच्या व बसण्याच्या कामीं करतात. ह्याच्या जाती अनेक आहेत. अरबी घोडे जग- प्रसिद्ध आहेत. लहान घोड्यास तट्टू व घोड्याच्या पोरास शिंगरूं म्हणतात. घोड्याच्या आकृतीवरून, गतीवरून, उपयोगा- वरून व लक्षणेनें हा शब्द अनेक वस्तूंस लावतात. २ बुद्धिबळाच्या खेळांतील एक मोहरा. हा सर्व बाजूंनीं दोन सरळ व एक आडवें (अडीच) घर जातो. या मोहर्‍याचा विशेष हा आहे कीं हा इतर मोहर्‍यांच्या डोक्यावरून उडून जातो, तशी गति इतर मोहर्‍यांना नसते. ३ बंदुकींतील हातोडीच्या आकराचा अव- यवविशेष. हा दाबला असतां ठिणगी उत्पन्न होते व बंदूकीचा बार उडतो; चाप. ४ (मुलांचे खेळ) दोन पायांत काठी घालून (तिला घोडा मानून) मुलें धांवतात तो काठीचा घोडा. ५ (उप.) मूर्ख व ठोंब्या असा वयस्क मुलगा; वयानें मोठा पण पोरकट मनुष्य. ६ वस्त्रें, कपडे ठेवण्यासाठीं खुंट्या ठोकलेला खांब; स्नान करणार्‍या माणसाचे कपडे ठेवण्याकरितां जमिनींत रोंवलेली काठी, खांब; (इं.) स्टँड. ७ (ल.) शरीर वाहून नेतात म्हणून पायांस लक्षणेनें (दहाबोटी) घोडा असें संबोधितात; तंगड्या. 'आमचा दोन पायांचा घोडा आम्हाला हवें तेथें वाहून नेईल.' ८ पाळणा टांगण्यासाठीं एका आडव्या लांकडाला चार पाय लावून करतात ती रचना; घोडी. ९ पालखीचा दांडा ज्याला बसविलेला असतो तें दुबेळकें बेचक; पालखीं तबे- ल्यांत वगैरे ठेवतांना ज्यावर ठेवतात तीं दुबळकें असलेलीं लाकडें प्रत्येकीं. १० गाड्याच्या बैठकीच्या चौकटीचीं दोन बाजूंचीं लांब लांकडें प्रत्येकी; गाडीच्या दांडयास आधार द्याव- याचें दुबेळकें. ११ मूल रांगावयास लागलें असतां दोन हात व दोन गुडघे जमीनीला टेकून करतें ती घोड्यासारखी आकृति. (क्रि॰ करणें). १२ मृदंग; पखवाज ठेवण्याची घडवंची; घोडी; (दिवे इ॰ लावण्याची) दोन बाजूस पायर्‍या असलेली घडवंची; (पिंपे, पेट्या ठेवण्याची) लांकडी घडवंची. १३ नारळ सोलण्याचा, शेंड्यास सुरी बसविलेला खांब; नारळ सोलण्याचा एक प्रकारचा सांचा. १४ समुद्राच्या भरतीच्या पाण्याचा चढ, फुगोटी, फुगारा; लाटेचा उंच भाग; नद्यांच्या मुखांतून वर गेलेलें समुद्राच्या भरतीचें पाणी. -सृष्टि ५७. १५ ओबडधोबड असा आंकडा, फांसा, पकड. १६ (ल.) घोडेस्वार. 'तीन हजार घोडा पेशव्यांचे तैनातींत ठेवावा.' -विवि ८.७.१२९. १७ दाराच्या दुहेरी चौकटीच्या वरच्या बाजूचे, परस्पराला जोडणारे दोन लाकडी तुकडे (त्यांच्याच जोडीच्या खालच्या बाजूच्या तुकड्यांस छिली म्हणतात). १८ (खाटीक इ॰ कांचें) साकटणें, सकोटन; खाटकाचा ठोकळा. १९ (मुद्रण) केसी व ग्याली ठेवण्यासाठीं केलेली घडवंचीवजा चौकट. २० फळा, चित्रफलक इ॰ उभा ठेवण्याची लाकडी उभी चौकट. २१ (कों.) रहाटगाडग्याचें कोळबें ज्यावर ठेवतात ती लांकडी चौकट. २२ (पोहोण्याचा) चार भोपळ्यांचा तराफा. २३ (गो.) (विटी दांडूचा खेळ) विटी मारण्याचा एक प्रकार. (क्रि॰ मारणें). [सं. घोटक; प्रा. घोड; गु.घोडो; सिं. घोडो; स्पॅनिश जि. गोरो; अर. घोरा] घोडी-स्त्री. १ घोडा या जातीच्या प्राण्याची मादी. २ सतार, तंबोरा इ॰ तंतुवाद्यांच्या भोपळ्याच्या मध्यावर हस्ती- दंती अगर लांकडाची पाटाच्या आकृतीची एक इंची किंवा दीड- इंची पट्टीची बैठक; तिच्यावरून तारा पुढें खुंटीस गुंडाळलेल्या असतात. ३ मुलांना शिक्षा देण्याकरितां जिला हातानें धरून शिक्षा दिलेला लोंबकळत असतो अशी आढ्यापासून लोंबणारी दोरी, फांसा; मुलांस टांगण्यासाठीं उंच बांधलेली दोरी. अशी शिक्षा पुर्वीं शाळांतून फार देत. (क्रि॰ घेणें; देणें). 'एखाद्या मुलांशी माझं वांकडं आलं कीं, रचलंच त्याच्यावर किटाळ आणि दिलीच त्याला पंतोजीकडून घोडी.' -चंद्रग्र ८०. ४ उभें राहून पखवाज वाजविण्याकरितां पखवाज ठेवावयाची घडवंची. 'इत- क्यांत देवळाच्या एका कोंपर्‍यांत मृदंग ठेवावयाची उंच घोडी सुनंदाला दिसली.' -सुदे २५. ५ गवत इ॰ वाहण्याकरितां खटार्‍यावर उभारलेला सांगाडा, चौकट. ६ फळा जमीनीपासून उच ठेवण्याकरितां व त्याला उतार देण्याकरितां केलेली लांकडी चौकट, सांगाडा. ७ वयस्क असून पोरकटपणा करणारी, खिदड- णारी मुलगी; खिदडी; धांगडधिंगी; भोपळदेवता; घोडकुदळ. ८ (सुतारी) तासावयाचें लांकूड हलूं नये म्हणून त्याला आधार- भूत असें दुसरें लांकूड, चौकट इ॰ सोईनें बसवितात तें. ९ (विणकामांत) सूत उकलण्यासाठीं केलेलें लांकडी चौकटीसारखें साधन. १० (सोनारी) पायांत घालावयाच्या सांखळ्यांच्या कड्या वांकविण्यासाठीं असलेला बोटाइतका जाड असा निमु- ळता मोळा. ११ (हेट. नाविक) पोरकें (लहान) शीड उभें करण्यासाठीं असलेलें कमानीसारखें लांकूड. १२ बंधार्‍याच्या मुखाशीं (पाणी सोडण्याच्या ठिकाणीं) पडद्यासारखी बांधलेली भिंत. हिच्यावरून पाणी जात असतें. १३ (हेट.) गलबताच्या कडेस शौच्यास बसण्याकरितां टांगलेली लांकडी चौकट. १४ सांकटणें; सकोटण. घोडा अर्थ १७ पहा. १५ तीन पायांचें दिवा ठेवण्याचें बुरडी तिकाटणें, तिवई. १६ पाटास जे दोन आडात मारितात ते प्रत्येकी. १७ हत्तीवरील चौकट; हौदा. 'साहेब नौबतीकरितां हत्तींवर लाकडी घोडी घालून...' -ऐरा ९.५०६. १८ उभें खुंटाळें. (इं.) स्टँड. 'तिकोनी खुंट्यांची घोडी आणि रुमाल ठेवावे ' -स्वारीनियम ७०. १९ सामान ठेवण्याचा घोडा. घोडें-न १ सामा (लिंगभेद न धरतां) घोडा या जातीं- तील जनावर. ' कृष्णाकांठचीं घोडीं सडपातळ पण चपळ अस- तात.' २ खटार्‍याच्या साटीच्या चौकटीचीं दोन बाजूंचीं उभीं लाकडें; घोडा अर्थ ९ पहा. घोडकें अर्थ १ पहा. ३ चार भोंपाळे लावलेला पाण्यावर तरंगणारा तराफा. घोडा अर्थ २१ पहा. ४ (व.) गाडीचे दांडे-जूं ज्यावर ठेवतात तें दुबेळकें. घोडा अर्थ ९ पहा. [सं. घोडा] (वाप्र.) घोडा आडवा घालणें- (एखाद्या कार्यात) अडथळा, विघ्न आणणें. 'आणि म्हणूनच तुम्ही घोडा आडवा घातलांत वाटतं ?' -चंद्रग्र ६८. ॰उभा करणें-बांधणें-(घोडा) थोडा वेळ थांबवणें; जरासें थांबणें; घाई न करणें (घाईंत व धांदलींत असणार्‍या मनुष्यास उद्देशून ह्या वाक्प्रचाराचा उपयोग करतात.) ॰काढणें-१ (बांधून ठेव- लेला घोडा बाहेर नेणें) घोडा हांकारणें, पिटाळणें २ (ल.) (एखाद्यानें) पळ काढणें; पोबारा करणें; निसटणें. ॰चाल- विणें-(कर.) (ल.) डोकें खाजवणें; युक्ति लढविणें. ॰टाकणें- घोडा फेंकणें; उडवणें; अंगावर घालणें. 'आरेरे टाकौनि घोडा । भणती यांचिआं जटैं उपडा । ' -शिशु १४१. ॰मैदान जवळ असणें-(घोडा धांवण्यांत कसा काय आहे याची परीक्षा त्यास मैदानांत पळवून करतां येते यावरून) ज्याची परीक्षा करा- वयाची तो पदार्थ, मनुष्य व परीक्षेस लागणारी सामग्री हीं दोन्ही जवळ असणें असा अर्थ होतो; एखाद्या गोष्टीची निरर्थक चर्चा न करतां तिला कसोटीला लावणें, कसोटीचा वेळ किंवा सामुग्री जवळ असणें; हा सूर्य हा जयद्रथ. 'कोरडी बढाई कशाला पाहिजे ? घोडामैदान जवळच आहे.' ॰हांकणें-पळून जाणें; निघून जाणें; पोबारा करणें; घोडा काढणें पहा. 'पंतोजीबुवास पाहून त्या पोरानें घोडा हांकला. 'घोडी काढणें-भरविणें- सक्रि. (माण.) घोडीस घोडा दाखविणें, देणें; घोडी फळविणें. घोडी घेणें-(एखाद्याशीं) घांसणें; कटकट करणें; मत्सरबुद्धीनें दोष काढणें. घोडें उभें करणें-अडथळा आणणें. 'बाळासाहेब नातूसारख्यांनीं विशेष प्रसंगीं एखादें घोडें उभें केलें तरी त्याकडे दुर्लक्ष्य करून ज्यानें त्यानें आपला पंथ सुधारावा.' -आगर ३.१४४. (एखाद्याचें) घोडें थकणें-एखाद्यानें (प्रवास, धंदा, व्यापार, अभ्यास इ॰ कांत) थकून जाणें; हतबल होणें; पुढें रेटण्याची शक्ति न उरणें. (एखाद्यानें आपलें) घोडें पुढें दामटणें-ढकलणें-हांकणें-घालणें-१ इतरांच्या पूर्वीं आपला कार्यभाग साधून घेण्याचा घाईने प्रयत्न करणें. 'या शर्यतींत जो तो आपलें घोडें पुढें दामटायला पहात आहे. -नि. 'ब्रिटिश वसाहतीनीं आपल्या हक्कांचें घोडें पुढें दामटलें.' -सासं २.४४६. २ लुब्रेपणानें दुसर्‍यांच्या संभाषणांत तोंड घालून त्यांच्यावर आपले विचार लादणें. (एखाद्याचें) घोडें मारणें-एखाद्याचें नुकसान करून त्याला राग आणणें (पूर्वीं प्रवासाचें मुख्य साधन घोडें असे. प्रवासाचें घोडें ठार केल्यास त्याचा प्रवास थांबत असे व त्यामुळें त्याचें फार नुकसान होई यावरून) एखाद्याचें फार नुकसान करणें. 'मी काय तुझें घोडें मारलें आहे ?' (आपलें) घोडें पुढें ढकलणें-आपलें काम प्रथम करूं लागणें; आपल्या कामाला महत्व देणें. गांडी- खालचें घोडें-संसारादि निर्वाहक मालमत्ता, वाडी इ॰ आधारभूत मुख्य साधन. म्ह॰ आपले गांडीखालचें घोडें गेलें, मग त्यावर महार बसो कीं चांभार बसो. घोडीं आडवीं घालणें-१ शत्रूवर तुटून पडून त्याच्या चालीला, पळाला अड- थळा करणें. २ (ल.) (एखाद्यास त्याच्या कामांत) संकट, अडथळा, व्यत्यय आणणें. 'जर त्यांणीं आपल्यावर चालून घेतलें तर आम्ही आडवीं घोडीं घालतों. ' -ख ४२९७. घोडीं घालणें-घोड्यांच्या अनीना उचलणें-घोडदळांतील सर्व स्वारांनीं इर्षेनें शत्रूवर एकदम तुटून पडणें. -होकै ३. घोड्याच्या, हत्तीच्या पायांनीं येणें व मुंगीच्या पायांनीं जाणें-(आजार, संकट, अडचण इ॰ च्या संबंधांत हा वाक्प्र- चार योजतात) जलदीनें येणें व धिमेधिमे जाणें; आजार इ॰ जलदीनें येतात पण अतिशय हळू हळू नाहींसे होतात यावरून वरील वाक्प्रचार रूढ आहे. (एखाद्याच्या) घोड्यानें पेण (पेंड)खाणें-या वाक्प्रचारांत पेण = प्रवासांतील टप्पा, मुक्का- माची जागा या ऐवजीं चुकीनें पेंड हा शब्द उपयोगांत आणतात. लांबच्या प्रवासांत निरनिराळ्या टप्प्यांच्या ठिकाणीं घोडीं उभीं राहत. त्यामुळें टप्प्याचें ठिकाण आलें कीं घोडें तेथें अडे, पुढें जात नसे. यावरून वरील वाक्प्रचार एखादें कार्य करतांना कोणी अडून बसल्यास त्यास. 'तुझें घोडें कुठें पेण खातें' असें विचारतांना उपयोगांत आणतात. घोड्यापुढें धावणें-जिकीरीचें, दगदगीचें; कष्टाचें काम करणें. (एखा- द्याच्या) घोड्यापुढें धावणें-एखाद्याची कष्टाची सेवा, चाकरी करणें; (उप.) एखाद्याची ओंगळ खुशामत करणें; एखाद्याची थुंकी झेलणें. घोड्यावर घोडा घालणें-(लिलांव इ॰ कांत) चढाओढ करणें; एखाद्यानें केलेल्या किंमतीपेक्षां अधिक किंमत पुकारणें; उडीवर उडी घालणें. घोड्यावर बसणें-दारू पिऊन झिंगणें;ताठ्यांत असणें. घोड्यावर बसून येणें-घाईनें येणें; आपलें काम तांतडीनें करण्यास दुसर्‍यास घाई करणें. सर घोड्या पाणी खोल किंवा पाणी पी-(घोड्या मागें हट, पाणी खोल आहे. तेथूनच पाणी पी) गोष्ट मोठी कठिण आहे, मागें परततां येणें शक्य आहे तोंच परतावें याअर्थी. म्ह॰ १ घोडा आपल्या गुणानें दाणा खातो = चांगला घोडा खूप काम करून आपल्याला खाद्यहि जास्त मिळवतो. त्याला जास्त देण्यास मालक असंतुष्ट नसतो. यावरून चांगला चकर आपल्या गुणानें व मेहनतीनें मालकाकडून पगार वाढवून घेतो. २ घोडा स्वार (मांड) ओळखतो = बसणारा कच्चा कीं पक्का आहे हें घोडा ओळखूं शकतो. (यावरून), आपला मालक कडक कीं नरम आहे हें हाताखालचीं माणसें ओळखूं शकतात. ३ (व.) जाय रे घोड्या खाय रे हरळी = घोड्याला हरळी खावयास मोकाट सोडल्यास (घोड्याला) तें चांगलेंच होईल, पथ्यावरच पडेल. म्ह॰-१ घोडा मरे भारें शिंगरूं मरे येरझारें = घोडी ओझें किंवा माणूम वाहून नेत असतां तिचें शिंगरूंहि तिच्याबरोबर जात असतें. घोडीच्या प्रत्येक हेलपाट्याबरोबर शिंगरूंहि हेलपाटा खातें. यावरून प्रत्यक्ष काम करणारास श्रम होतातच पण त्याच्या सहवासांत असणारांना सुध्दां जवळ जवळ तितकेच श्रम होतात. २ वरातीमागून घोडें = लग्नाच्या वरातीच्या मिरवणुकींत सर्वांच्या पुढें श्रृंगारलेलें कोतवाली घोडें चालवण्याची चाल आहे. यावरून वरात निघून गेल्यावर मागाहून श्रृंगारलेलें घोडें नेणें व्यर्थ होय किंवा औचित्यास धरून होत नाहीं. त्याप्रमाणें एखादी गोष्ट होऊन गेल्यावर मागाहून तत्संबंधीचीं साधनें जुळविणें व्यर्थ होय. २ माझें घोडें आणि जाऊं दे पुढें = इतरांचें कांहींहि होवो, माझें काम आधीं झालें पाहिजे. स्वार्थी माणसाची निंदा कर- तांना या म्हणीचा उपयोग करतात. समासांत घोडा शब्द पूर्व- पदीं आल्यास त्याचीं घोड किंवा कधीं कधीं घोडे अथवा घोड व घोडे, अशीं दोन्ही रूपें होतात. उ॰-घोडचूक; घोडेखोत; घोड (डे) चिलट इ॰. सामाशब्द-घोडकट, घोडकें-न. (घोड्याला तिरस्काराने लावावयाचा शब्द) रोडकें, अशक्त व थिल्लर घोडें; भटाचा तट्टू. घोडकुदळ-पु. १ (उप.) मुंजीचें वय झालेलें असून मुंज न झालेला मुलगा; घोडमुंज्या. २ -स्त्री. (उप.) उपवर असून लग्न न झालेली दांडगट नाचरी मुलगी; घोडी; घोडगी; भोपळ- देवता; घोडनवरी; घोडी पहा. घोडकूल-न. १ (गो.) लहान घोडें; तट्टू. २ (खा.) ओट्याच्या खांबावर तिरपा टेंकू (कर्ण) देऊन त्यावर कोरलेली घोड्याची आकृति. घोडकें-का-नपु. १ ज्याच्या भरीला करळ्या व तरसे घालून गाड्याची तक्तपोशी, बैठक तयार करतात अशीं चौकटींतील दोन बाजूचीं दोन उभीं लांब लांकडें. २ तेल्याच्या घाण्याच्या कातरीला खिळलेलें व जुंवाचा दोर बांधावयाचें लांकूड. घोडके-ढोरांचा गुरु. -गांगा २६. घोडकेळ-न. (क्क.) एक हलक्या जातीचें भसाडें केळें. [घोडा + केळें] घोडक्या-का-पु.-१ घोड्याचा खिजमतगार; मोतद्दार. 'घोड्यास शिपाई काय करिल घोडका ।' -ऐपो ३७२. २ चाबुकस्वार; अश्वशिक्षक; घोडा अर्थ ९ मधील शेवटचा अर्थ पहा. घोडकोस-पु. (गो.) तीन मैलांचा कोस. घोडगा-गी- पुस्त्री. (उप.) वयानें प्रौढ पण पोरकटपणा, नाचरेपणा अंगीं असलेला मुलगा, मुलगी; घोडा अर्थ ५ पहा. घोडी अर्थ ७ पहा. घोड(डे)गांठ-स्त्री. (बुद्धिबळांचा खेळ). एकमेकांच्या जोरांत असलेली घोड्यांची दुक्कल. घोडचवड-स्त्री. घोडदौड; घोडा चौफेर उडविणें; चवडचाल. 'घोडचवडीखालीं नाना पुण्याला आला.' -ऐपो १६२. [घोडा + चवड = विशिष्ट चाल] घोडचाल-स्त्री. घोड्याची चाल. (ल.) जलद चाल. [घोडा + चाल] घोड(डे)चिलट-न. मोठें चिलट; डांस; मच्छर. घोड- चूक-स्त्री. मोठी व अक्षम्य चूक. घोडचोट्या-वि. १ (मनुष्य). (अश्लील) घोड्याच्या चोटासारखा मोठा चोट ज्याचा आहे असा २ (निंदार्थीं) मुंज न झालेला, वाढलेला मुलगा; घोडकुदळ; घोड- मुंज्या. घोडजांवई-पु. (उप.) मोठ्या वयाचा नवरामुलगा; घोडनवरा. घोडजाळी-स्त्री.(भोंवर्‍यांचा खेळ) विरूद्ध पक्षाच्या भोंवर्‍याला खोंचा देऊन आपला भोंवरा दूर जाऊन फिरत राहील अशा रीतीनें भोंवरा फेकण्याचा प्रकार. [घोडा + जाळी = दोरी] घोडतोंड्या-वि. घोड्याच्या तोंडासारखा लांबट चेहरा अस- लेला; कुरूप; लांबट, ओबडधोबड तोंडवळ्याचा. [घोड + तोंड = चेहरा] घोडदळ-न. १ घोडेस्वारांचें सैन्य; फौज. २ सैन्यां- तील घोडेस्वारांचें पथक, तुकडी. [घोडा + दळ = सैन्य] घोड- दौड-स्त्री. घोड्यासारखें पळणें; घोड्याची दौड; जलद जाणें. [घोडा + दौड = पळणें] घोडनट-न. ज्याचें एक तोंड आढ्यावर व एक लगीवर येऊन दरम्यान तिरपें राहतें असें लांकूड ठोकतात तें. घोडनवरा-पु. (उप.) प्रौढवयाचा नवरामुलगा; घोडजांवई. घोड(डे)नवरी-स्त्री. (उप.) मोठ्या वयाची नवरी मुलगी, वधू; योग्य व सामान्य वयोमर्यादेबाहेर अविवाहित राहिलेली मुलगी. 'हे मोठमोठ्या घोडनवर्‍या घरांत बाळगल्याचे परि- णाम बरं !' -झांमू. घोड(डे)पाळणा-पु. घोड्याला (लांकडी चौकटीला) टांगलेला पाळणा; हलग्याना न टांगतां जमीनीवर घोड्यास अडकविलेला पाळण्याचा एक प्रकार. घोडा ८ अर्थ पहा. घोड पिंपळी-स्त्री. पिंपळीची मोठी जात; हिच्या उलट लवंगी पिंपळी. घोडपुत्र-पु. घोड्याला (विशेषतः बुद्धि- बळांतील घोड्याला) प्रेमानें किंवा प्रतिष्ठेनें संबोधण्याचा शब्द. [घोडा + पुत्र = मुलगा] घोडपेटें-न. १ दोन भोपळे पुढें व दोन मागें बांधून केलेला तराफा; घोडा अर्थ २१ पहा. २ भोंपळ्यावर दोन्ही बाजूस पाय टाकून घोड्यासारखें बसून पाण्यावर तरणें, तरंगणें. घोडबच्य-न. दुबळा घोडा पुष्ट होण्यास एक औषध. 'घोडबच्य पावशेर, राई पावशेर भाजलेलीं काळीं मिरें पावशेर ... मिश्रणापैकीं आतपाव दररोज देत जावें.' -अश्वप १.१७५. घोडबांव-स्त्री. (कु.) घोड्यांना पाणी पितां येईल अशा तर्‍हेनें बांधलेली विहीर. [घोड + बांव = विहीर] घोडबाही- स्त्री. १ दाराच्या दुहेरी चौकटीच्या आंतल्या चौकटींतील दोन्ही बाजूचे खांब. २ खटार्‍याच्या बैठकीच्या चौकटीच्या दोन बाजूंच्या लांब लांकडांपैकीं प्रत्येक; घोडकें, घोडें पहा; [घोडा + बाही = बाजू] घोडबाळ-वि. (उप.) पोरचाळे करणारा प्रौढ पुरुष, स्त्री; पोरकट माणूस. [घोडा + बाळ] घोडब्रह्म- चारी-पु. (उप.) लग्नाचें वय कधींच झालें असूनहि अविवाहित राहिलेला मुलगा; घोडनवरा. [घोडा + ब्रह्मचारी] घोडमल्ली- स्त्री. (बुद्धिबळांचा खेळ) घोड्यानें मात करण्याचा प्रकार. प्रतिपक्षाचें घोडें व राजा आणि आपलें घोडें, राजा व एकच प्यादें राखून प्यादेमात करणें; घोडमात. घोड(डे)मात -स्त्री. (बुद्धिबळांचा खेळ) घोड्यानें राजाला दिलेली मात; घोडमल्ली पहा. [घोडा + फा. मात् = कोंडणें] घोडमाशी-स्त्री. १ मोठ्या आकाराची हिरवी, काळसर माशी. २ (सामा.) मोठी माशी. घोडमासा-पु. एक प्रकारचा मासा; सागराश्व. ह्याचें तोंड कांहींसें घोड्यासारखें दिसतें. यास लांब शेपूट असतें. हा नेहमी उभा पोहतो. घोडमुख-ख्या-पु. १ घोड्याचें तोंड असलेला किन्नर नांवाच्या देवयोनींतील पुरुष. याचें वर्णन पुराणांतरीं सांपडतें. २ (ल.) अगदीं कुरूप, घोडतोंड्या माणूस. 'एक मीर- वलें भुरळें पींगळें । घोडमुखें ।' -दाव २८५. घोडमुंगळा-पु. मोठा व काळा मुंगळा. घोडमुंगी-स्त्री. मोठी, काळ्या जातीची मुंगी. घोड(डे)मुंज्या-पु. उप. १ मुंज होण्याचें वय झालें असून मुंज न झालेला मुलगा. २ लग्न न झालेला प्रौढ मुंज्या. [घोडा + मुंज्या] घोडला-पु. मूल रांगत असतांना त्याची होणारी घोड्यासारखी आकृति. घोडा अर्थ १० पहा. घोडली-स्त्री. (कों. हेट.) (नाविक) शौचास बसण्याकरितां वर्‍यास एक चौकट चार दोर्‍यांनी अडकवितात ती. [घोडा] घोडवळ-स्त्री. १ बांधलेल्या घोड्यांची ओळ, रांग. २ घोड्यांचा तबेला; घोडशाळा; घोडसाळ; यावरून (सामा.) तबेला; 'रोडोला हत्ती घोडवळींतून जाणार नाहीं.' ३ लांबचलांब, ठेंगणें व बेढब घर; मागरघर; दांडसाळ; केवळ तबेल्यासारखें असलेलें घर; कोठडी. ४ (उप.) घोडनवरी. ५ न. झोडपलेल्या, झोडपून दाणे न काढलेल्या धान्याच्या पेंढ्यांची रास, गंजी. [घोडा + ओळ] घोड(डे)वाट-स्त्री. घोड्यांकरितां केलेली, फक्त घोड्याला जातां येईल अशी वाट, रस्ता (विशेषतः डोंगर इ॰ याच्यावरून); उलट गाडीवाट. [घोडा + वाट] घोडविवाह- पु. विषमविवाह. 'आपली नात शोभेल अशा दहा वर्षांच्या पोरीशीं लग्न लावण्यास तयार असतात व असा घोडविवाह करूनहि फिरून समाजांत हिंडण्यास ... त्यांस दिक्वत वाटत नाहीं' -टि ४.९६. [घोडा + विवाह] घोडवेल-स्त्री. (सांकेतिक) घोड्याची लीद; (औषधांत घोड्याच्या लिदीचा उपयोग करा- वयास असल्यास तिचा निर्देश ह्या शब्दानें करतात). घोड- शह-पु. (बुद्धिबळांचा खेळ) घोड्यानें दिलेला शह. [घोडा + शह] घोडशाळा, घोडसाळ-स्त्री. १ घोड्यांचा तबेला; घोडवळ अर्थ २ पहा. [घोडा + शाळा = घर] घोडशिष्य- पु. (निंदार्थीं) विद्यार्जन करूं पाहणारा मोठ्या वयाचा विद्यार्थीं, मोठेपणीं शिकावयास लागणारा मनुष्य. घोडशीर- स्त्री. १ पायाच्या टांचेच्या वरच्या बाजूस असलेली शीर, नाडी; दवणशीत्त; धोंडशीर पहा. २ (क्व.) पायाचा किंवा हाताचा स्नायु. घोडसटवी-स्त्री. १ उग्र स्वरूप धारण केलेली देवी. (क्रि॰ लागणें). २ घोडी व्याल्यापासून सहाव्या दिवशीं करा- वयाची सटवीची पूजा. (एखादीला) ॰लागणें-१ घोडसट- वीप्रमाणें उग्र व विकाळ दिसणें. २ घोटसटवीची बाधा होणें. घोडेखाद-स्त्री. १ घोड्यांचें चरणें; हरळी खाणें. 'या घोडे खादीमुळें माळावर एक काडी राहिली नाहीं.' २ फक्त घोड्यांना चरतां, खातां येईल इतक्या वाढीचें गवत. 'ह्या माळावर मोठें गवत नाहीं, घोडेखाद कोठें कोठें आहे.' [घोडा + खाद = खाणें] घोडेखोत-पु. घोडे भाड्यानें देण्याचा धंदा करणारा; भाड्याच्या घोड्यांचा नाईक. [घोडा + खोत = मक्तेदार] घोडेघाटी-स्त्री. एक प्रकारचें रेशमी कापड. घोडेघास-न. १ विलायती गवत; लसून- घास. २ घोडकुसळी पहा. [घोडा + घास = गवत] घोडेपाऊल- न. एक वनस्पतिविशेष. [घोडा + पाऊल] घोडेराऊत, घोडे- स्वार-पु. घोड्यावरील शिपाई. घोड्याएवढी चूक-स्त्री. फार मोठीचूक; ढोबळ चूक; घोडचूक पहा. घोड्या गोंवर-पु. एक प्रकारचा गोंवराचा आजार; याच्या पुटकुळ्या मोठ्या असतात. [घोडा = मोठा + गोवर] घोड्याचा-पु. (निंदार्थीं) घोड्यावर बसलेला मनुष्य; घोडेस्वार. 'ते पहा घोड्याचे चालले. मागून स्वारी येतीसें वाटतें.' घोड्याचा दाणा-पु. १ (उप.) हरभरा. २ (ल.) बुंदीच्या लाडवास तिरस्कारानें म्हणतात. घोड्याचा पूत-लेंक-पु. (उप.) मूर्ख; गाढव; गद्धा. घोड्याची चाकरी-स्त्री. घोड्यांना दररोज चोळणें, खरारा करणें इ॰ काम. घोड्याची जीभ-स्त्री. (राजा.) एक वनस्पति- विशेष. घोड्याची मुंज, घोड्याचें बारसें-स्त्रीन. एखादा कोठें जावयास निघाला असतां एखाद्या अधिक प्रसंगी व फाजिल चौकशी करणार्‍या माणसानें त्यास कां, कुठें जातां असें विचारलें असतां म्हणतात. घोड्यांचें नाटक-न. (ना.) सर्कस. घोड्याचें मूत-न. १ कुतर्‍याचें मूत; अळंबें; भुईछत्री. २ कुजलेल्या लांकडांतून फुटलेलें अळंबें. घोड्याच्या पाठीवर- क्रिवि. भरधाव; झरकन; त्वरेनें. (क्रि॰ जाणें; करणें). घोड्याच्या पाठीवरचा कोस-पु. कंटाळवाणा व लांब- णीचा कोस; घोड्यावरून गेल्यासच कोसाएवढें व कंटाळवाणें न वाटणारें अंतर.

दाते शब्दकोश