मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

भट

पु. १ ब्राह्मण, परंतु विशेषतः प्रायः भिक्षुकीवर निर्वाह करणारा. २ जोशी; ज्योतिषी; गणक. 'घटका तिथि भट सांगतां बरवा आहे मुहूर्त।' -ऐपो १३२. ३ भक्षुक ब्राह्मणाच्या नांवापुढें लावावयाचा प्रतिष्ठादर्शक शब्द. जसें-रामभट इ॰. [सं. भट्ट] म्ह॰ भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी. ॰गोसावी- पु. संसाराचा त्याग करूंन धर्मनिष्ठ बनलेल्या ब्राह्मणास आदरार्थीं म्हणतात. ॰पण, भटकी-नस्त्री. गांवचें उपाध्येपण. 'करितां भटपण आधीं आला मजला उमाप तिटकारा ।' -स्फुटआर्या. ॰मार्ग-पु. (महानु.) महानुभावपंथ. 'नको गा सींगणाः मज भटमार्गीचा उपदेसु असेः' -नागदेवाचार्यस्मृति १७३. भटजी- पु. सामान्यतः ब्राह्मणांस आणि विशेषतः वैदिकास संबोधण्याचा शब्द. भटभाई-पु. उपहासार्थीं ब्राह्मणांस संबोधण्याचा शब्द. भटी-वि. भटासंबंधीं; भटांचा. भटुरगा-पु. (निंदेनें) गुणहीन भटजी, भट. भट्टू-पु. (निंदेनें) भट. म्ह॰ भादव्यांत भट्टू आश्विनांत तट्टू (पुष्ट होतात). भटोबा-पु. व्यवहारज्ञान नस- लेला ब्राह्मण. भटोरखाना-पु. (निंदेनें) ब्राह्मणांचा समुदाय, संघ. [भटोर, भट + खाना] भटोरा-पु. (निंदेनें) भट.

दाते शब्दकोश

पु. (गो.) लांकूड इ॰ पोंखरून नाश करणारा किडा. ॰पडप-अक्रि. किडे पडणें; अळ्या पडणें (लोणचें इ॰ कांत). भट पडो-उद्गा. जळो, मरो या अर्थीं, रागानें व तिरस्कारानें योजावायाचा शब्द (कदाचित भट म्हणजे लांकुड पोखरणारा किडा याच अर्थी येथें भट शब्द असून चुकीनें ब्राह्मण असा अर्थ घेतला गेला असवा). म्ह॰ तुम्हा कामांत भट पडो = कार्याचा नाश होवो. [हिं. भट-भट्टी = जाळून नाश करणारी]

दाते शब्दकोश

भट bhaṭa m (S) A Bráhman, esp. one that subsists by begging. Pr. भटास दिल्ही ओसरी आणि भट पाय पसरी. 2 S A warrior.

मोल्सवर्थ शब्दकोश

पु. योद्धा; लढवय्या. 'आम्हाकडील जो भट म्हणसी तो करुनि संगरा मेला ।' -मोभीष्म ५.१८. [सं. भट]

दाते शब्दकोश

भट m A Brahman, esp. one that subsists by begging. भटाचा उभा दांडा आडवा दांडा Used of one who shifts and veers, ever adapting himself to his occasions and circumstances. A warrior.

वझे शब्दकोश

(सं) पु० योद्धा, वीर. २ भट्ट, भटजी, उपाध्याय.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

पु. गोमांतकांत सारस्वतेतर ब्राह्मणांस म्हणतात.

दाते शब्दकोश

भादवा भट

भादवा भट bhādavā bhaṭa m A भट or Bráhman invited and entertained in the month भादवा. Pr. भादवे भट्टू आखाडी तट्टू.

मोल्सवर्थ शब्दकोश

भट पडो

भट पडो bhaṭa paḍō ( H To fall into a kiln or furnace. ) An exclamation of anger or disgust, equivalent to the phrases in English, Burn it! hang it! rot it!

मोल्सवर्थ शब्दकोश

भट पडो Burn it! hang it! rot it!

वझे शब्दकोश

संबंधित शब्द

बलुतेदार or बलुता

बलुतेदार or बलुता balutēdāra or balutā or त्या m (बलुतें &c.) A public servant of a village entitled to बलुतें. There are twelve distinct from the regular Governmentofficers पाटील, कुळकरणी &c.; viz. सुतार, लोहार, महार, मांग (These four constitute पहिली or थोरली कास or वळ the first division. Of three of them each is entitled to चार पाचुंदे, twenty bundles of Holcus or the thrashed corn, and the महार to आठ पाचुंदे); कुंभार, चाम्हार, परीट, न्हावी constitute दुसरी or मधली कास or वळ, and are entitled, each, to तीन पाचुंदे; भट, मुलाणा, गुरव, कोळी form तिसरी or धाकटी कास or वळ, and have, each, दोन पाचुंदे. Likewise there are twelve अलुते or supernumerary public claimants, viz. तेली, तांबोळी, साळी, माळी, जंगम, कळवांत, डवऱ्या, ठाकर, घडशी, तराळ, सोनार, चौगुला. Of these the allowance of corn is not settled. The learner must be prepared to meet with other enumerations of the बलुतेदार (e. g. पाटील, कुळ- करणी, चौधरी, पोतदार, देशपांड्या, न्हावी, परीट, गुरव, सुतार, कुंभार, वेसकर, जोशी; also सुतार, लोहार, चाम्हार, कुंभार as constituting the first-class and claiming the largest division of बलुतें; next न्हावी, परीट, कोळी, गुरव as constituting the middle class and claiming a subdivision of बलुतें; lastly, भट, मुलाणा, सोनार, मांग; and, in the Konkan̤, yet another list); and with other accounts of the assignments of corn; for this and many similar matters, originally determined diversely, have undergone the usual influence of time, place, and ignorance. Of the बलुतेदार in the Indápúr pergunnah the list and description stands thus:--First class, सुतार, लोहार, चाम्हार, महार; Second, परीट, कुंभार, न्हावी, मांग; Third, सोनार, मुलाणा, गुरव, जोशी, कोळी, रामोशी; in all fourteen, but in no one village are the whole fourteen to be found or traced. In the Panḍharpúr districts the order is:--पहिली or थोरली वळ (1st class); महार, सुतार, लोहार, चाम्हार, दुसरी or मधली वळ (2nd class); परीट, कुंभार, न्हावी, मांग, तिसरी or धाकटी वळ (3rd class); कुळकरणी, जोशी, गुरव, पोतदार; twelve बलुते and of अलुते there are eighteen. According to Grant Duff, the बलतेदार are सुतार, लोहार, चाम्हार, मांग, कुंभार, न्हावी, परीट, गुरव, जोशी, भाट, मुलाणा; and the अलुते are सोनार, जंगम, शिंपी, कोळी, तराळ or वेसकर, माळी, डवऱ्यागोसावी, घडशी, रामोशी, तेली, तांबोळी, गोंधळी. In many villages of Northern Dakhan̤ the महार receives the बलुतें of the first, second, and third classes; and, consequently, besides the महार, there are but nine बलुतेदार. The following are the only अलुतेदार or नारू now to be found;--सोनार, मांग, शिंपी, भट गोंधळी, कोर- गू, कोतवाल, तराळ, but of the अलुतेदार & बलुते- दार there is much confused intermixture, the अलुतेदार of one district being the बलुतेदार of another, and vice versâ. (The word कास used above, in पहिली कास, मध्यम कास, तिसरी कास requires explanation. It means Udder; and, as the बलुतेदार are, in the phraseology of endearment or fondling, termed वासरें (calves), their allotments or divisions are figured by successive bodies of calves drawing at the कास or under of the गांव under the figure of a गाय or cow.)

मोल्सवर्थ शब्दकोश

बलु(लों)तें

न. १ गांवांतील बारा वतनदारांना अथवा हक्क- दार कारूंना शेतांवर त्यांच्या हक्काबद्दल गांवकर्‍यानीं नेमून दिलेला धान्याचा, बागाइताच्या उत्पन्नाचा वांटा; गांवकर्‍यांच्या गरजा भागविण्यासाठीं कारूंना कुणब्याकडून मेहनताना म्हणून मिळणारा पिकाचा वंशपरंपरागत वांटा. २ (कांहीं ठिकाणीं) पाटील कुळकर्णी इ॰ गांवच्या पिढीजात कामगारांचा हक्काचा वांटा. ३ वरील बारा वतनें:-कांहीं महारबलुतीं (मुसलमानी व मराठी राज्यांत मिळणारीं):- १ सितादेवी किंवा उभ्या उसाचा भाग. २ वेशी- वरची देणगी. ३ शिमगीपौर्णिमेस होळीचा नैवेद्य. ४ बेंदूर- आषाढी पौर्णिमेला धान्य. ५ हातशेकणें = गुर्‍हाळावरील भट्टीचें बलुतें. ६ मृत जनावरांचे अवशेष. ७ घरट्टक्का. ८ दफनाचे खड्डे खणण्याचे पैसे. ९ खळ्यावरील दाणे. १० पेवाच्या तळाचे दाणे. इ॰ -अस्पृ ३७. 'येश जय प्रताप कीर्ती । हे अयोध्येचीं बलुतीं ।' -वेसीस्व ६.६३. [का. बल = उजवा + कुड = देणें; बलुता = उजव्या हाताचा हक्क म्हणून देणें] बलु(लो)तेदार, बलु(लो) त्या, बलु(लो)लौता-पु. बलुत्यावर हक्क असणारा गांवचा वतनदार; सरकारी कामगार पाटील, कुळकर्णी इ॰ कांहून हे भिन्न असून बारा आहेत:- १ सुतार, २ लोहार, ३ महार, ४ मांग (ही पहिली किंवा थोरली कांस किंवा वळ. यांपैकीं तिघांचा धान्याचे चार पाचुंदे किंवा कणसासह २० पेंढयांवर हक्क आहे व महाराचा ८ पांचुंद्यावर हक्क आहे), ५ कुंभार, ६ चांभार, ७ परीट, ८ न्हावी (ही दुसरी किंवा मधली कास किंवा वळ. या प्रत्येकाचा तीन पाचुंद्या. वर हक्क आहे), ९ भट, १० मुलाणा, ११ गुरव, १२ कोळी (ही तिसरी किंवा धाकटी कास किंवा वळ. या प्रत्येकास दोन पाचुंदे मिळतात). याप्रमाणें पुढील बारा अलुते आहेत:-तेली, तांबोळी, साळी, माळी, जंगम, कळावंत, डवर्‍या, ठाकर, घडशी, तराळ, सोनार, चौगुला. हेहि हक्कदार आहेत (मात्र यांचा हक्क ठराविक नाहीं). कांहीं ठिकाणीं पुढीलप्रमाणें बलुतेदार आढळतात:- पाटील, कुलकर्णीं, चौधरी, पोतदार, देशपांड्या, न्हावी, परीट, गुरव, सुतार, कुंभार, वेसकर, जोशी. यांत सुतार, लोहार, चांभार, कुंभार ही पहिली कास. न्हावी, परीट, कोळी, गुरव ही मधली कास आणि भट, मुलाणा, सोनार, मांग ही तिसरी कास होय. कोंकणांतील बलुतेदार यांहून थोडेसे निराळे आहेत; इंदापूर परग- ण्यांतील बलुतेदार पुढीलप्रमाणें आढळतात:-पहिली कास-सुतार, लोहार, चांभार, महार. दुसरी कास-परीट, कुंभार, न्हावी, मांग. तिसरी कास-सोनार, मुलाणा, गुरव, जोशी, कोळी, रामोशी. एकूण १४. पंढरपूर प्रांतांतील बलुतेदार:-थोरली वळ -महार, सुतार, लोहार, चांभार. मधली वळ-परीट, कुंभार, न्हावी, मांग. धाकटी वळ-कुळकर्णी, जोशी, गुरव, पोतदार. ग्रँटडफ याच्या मतानें-सुतार, लोहार, चांभार, मांग, कुंभार, न्हावी, परीट, गुरव, जोशी, भाट, मुलाणा हे बलुतेदार व सोनार, जंगम, शिपी, कोळी, तराळ, वेसकर, माळी, डवर्‍यागोसावी, घडशी, रामोशी, तेली, तांबोळी, गोंधळी हे अलुतेदार आहेत. पुष्कळ जागीं महारास पहिल्या, दुसर्‍या किंवा तिसर्‍या वळींत धरतात. हल्लीं आढळणारे अलुतेदार किंवा नारू:-सोनार, मांग, शिंपी, भट, गोंधळी, कोरगू, कोतवाल, तराळ हे आहेत. तथापि अलुतेदार व बलुतेदार हे निर- निराळ्या जिल्ह्यांत वेगवेगळे आहेत; त्यामुळें त्यांची एकवाक्यता होणें कठिण. वरील कास म्हणजे, गांव ही गाय असून तिचें पीक ही कास होय; आणि बलुतेदार म्हणजे, हीं या गाईच्या कासेला पिणारीं वासरें. 'अहो जीवु एथ उखिता । वस्तीकरु वाटे जातां । आणि प्राणु हा बलौता । म्हणोनि जागे ।' -ज्ञा १३.३४. [सं. बली + अपत्य = बलुत्या ?]

दाते शब्दकोश

भाटु

पु. भट; भिक्षुक 'नामे खवणा भाटु आला ।' -पंच १.४३. [भट]

दाते शब्दकोश

तीथ

स्त्री. १ तिथि पहा. २ श्राद्धदिन. [सं. तिथि] (वाप्र.) ॰धरणें-नेमणें-ठरविणें-लग्न वगैरेचा मुहूर्त निश्चित करणें; कार्याचा दिवस ठरविणें. ॰पालन-१ तिथिपालन पहा. ॰वार -पु. सणवार; शुभवार. 'आम्ही नित्य जात नाहीं, तीथवार आला तर जातों.' म्ह॰ तीथ आहे तर भट नाहीं, भट आहे तर तीथ नाहीं = एखाद्या कार्याला दोन गोष्टींची आवश्यकता असते पण पुष्कळदां त्या दोहोंपैकीं एकच अनुकूल असते, दोन्ही एक- दम नसतात.

दाते शब्दकोश

न. इकडेतिकडे करणें; चुकविणें भट- कणें; विनाकारण खेपा घालणें. [इकडे + तिकडे]

दाते शब्दकोश

अप्रतिभट

पु. दुसरी तोड किंवा जोड नसलेला योध्दा; दुसरा प्रतिस्पर्धी नाहीं असा; सेनापति. [सं. अ + प्रति + भट = योध्दा]

दाते शब्दकोश

आषाढी

स्त्री. आषाढ महिन्यांतील शुद्ध एकादशी. शिवाय आखाडी पहा. म्ह॰ (व.) आषाढीं तट, श्रावणीं भट, भादवीं कुणबट (माजतात).

दाते शब्दकोश

अष्टाधिकार

अष्टाधिकार aṣṭādhikāra m pl (S) The eight main offices or posts of a village: viz. जलाधिकार Office of bringing or supplying water to public officers and travellers; स्थलाधिकार Office of determining and pointing out the several places of residence, i. e. the office of पाटील or Headman; ग्रामाधिकार Office of supervision of the village trade and general business; कुललेखन Office of keeping the accounts of the Ryots with Government, and of preserving the public records; ब्रह्मासन Office of a sort of bailif, bailiwick; दंडविधिनियोग Office of magistrate or justice; पौरोहित्य Office of the family or village-priest; ज्योतिषी Office of the village-astronomer. The above lofty designations are according to the following authoritative Shlok--जलाधि- कारश्र्च स्थलाधिकारो ग्रामाधिकारः कुललेखनंच ॥ ब्र- ह्मासन दंडविधेर्नियोगो पौरोहितं ज्योतिषनष्टमेवं ॥ 1 ॥ but the popular or vulgar terms are 1 कोळीपणा (concrete is कोळी), 2 पाटिलकी (पाटील), 3 दे- शमुखी, महाजनकी, &c. (देशमुख with महाजन &c.), 4 कुळकरण (कुळकरणी), 5 वर्त्तकी (वर्त्तक), 6 धर्माधिकार (धर्माधिकारी), 7 उपाधीक or भटपणा (उपाध्या or भट), 8 जोशीपणा (जोशी). 2 Applied humorously to express the daily operations or business of the body--ablution, inunction, eating, evacuating, sleeping &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

अयोग्य (कृति)

लहान तोंडी मोठा घास, पीछे बुद्धि, अवसानाबाहेर उडी, साधनांच्या शुचितेकडे दुर्लक्ष, बाजारांत तुरी अन् भट भटिणीला मारी, खाकेंत कळसा अन् गांवाला वळसा, हातचें सोडून पळत्याच्या पाठीस लागणें, डोळ्यांत केर आणि कानांत फुंकर, आंधळें दळतें अन् कुत्रें पीठ खातें तशांतला प्रकार, आधीं कळस मग पाया, बैल गेला नी झोपा केला.

शब्दकौमुदी

बैठा भात

बैठा भात baiṭhā bhāta m Boiled rice that has absorbed all its water.

मोल्सवर्थ शब्दकोश

बाजार

पु. १ मंडई; दाट; पण्यवीथिका; दुकानें मांडून क्रयविक्रय जेथे चालतो तो; पेठ; गंज (बाजार, हाट व गंज यांच्या अर्थांत थोडा भेद आहे. बाजार म्हणजे रोज किंवा आठवडयानें किंवा नियमित वारीं भरणारा. हाट म्हणजे फक्त नियमित वेळींच भरणारा बाजार व गंज म्हणजे बाजारपेठ. २ खरेदीविक्री, क्रय- विक्रयाकरितां जमलेला समुदाय. ३ (ल.) प्रसिद्धि; बोभाटा; बभ्रा; गवगवा. ४ (ल.) गोंधळ; पसारा; अव्यवस्था; अव्यवस्थित कुटुंब किंवा घर. ५ (ल. कु.) मासळी. [फा. बाझार] म्ह॰ बाजारांत तुरी भट भटणीला मारी. (वाप्र.) ॰करणें-पाहिजे असलेली वस्तु बाजा- रांत जाऊन विकत आणणें, घेणें. ॰मांडणें-अनेक पदार्थ इतस्ततः अव्यवस्थितपणें पसरणें. ॰भरविणें-अनेक माणसें-ज्यांचा कांहीं उपयोग नाहीं परंतु घोंटाळा मात्र होतो अशीं-एके ठिकाणीं गोळा करणें. ॰भरणें-(ल.) कलकलाट करणें; गोंधळ माजविणें; पसारा पसरणें. गेला बाजार तरी-किमानपक्षीं; निदान; कमीतकमी; बाजार होऊन गेल्यावर विकला तरी. 'गेला बाजार तरी त्या पागोटयाचें पांच रुपयें मिळतील.' बाजारच्या भाकरी भाजणें-नसत्या उठाठेवी करणें; लुडबुड करणें; विनाकारण मध्येंच तोंड घालणें. (वेड्यांचा) बाजार पिकणें-बलबलपुरी होणें; सर्वच मूर्ख माणसें जमणें; टमटम राज्य होणें. बाजारांत पांच पायलीनें (विकणें मिळणें)-अत्यंत स्वस्त दरानें; माती- मोलीनें (नकारार्थीं योजना) उभ्या बाजारांत-भर बाजारांत; सर्वांसमक्ष (जाहीर करणें, सांगणें). सामाशब्द- ॰अफवा- अवाई-गप्प-बातमी-स्त्री. निराधार बातमी; कंडी; निराधार वार्ता; चिलमी गप्प. [फा. बाजार + अर्थ. अफवा, अवाई, गप्प] ॰करी-वि बाजारांत विकणारा किंवा विकत घेणारा (मनुष्य); दुकानदार किंवा गिर्‍हाईक. [बाजार + करणें] ॰खोर-वि. (नाग.) जगाला तमाशा दाखविणारा; खाजगी गोष्टी चवाठ्यावर आणणारा. [फा.] ॰चलन-चलनी-वि. बाजारांत चालू असलेलें, चालणारें (नाणें). ॰निरख-पु. १ बाजारभाव; बाजारांतील दर, -वि. अठ्ठ्ल; बिलंदर. 'बाजारनिरखा सोदा.' -क्रिवि. प्रसिद्धपणें; सर्व लोकांत; गाजावाजा करून; बेइज्ज्त करून. (नेहमीं वाईट अर्थानें उपयोग). (क्रि॰ करणें). 'त्याची बाजारनिरख फजिती झाली.' ॰पट्टा-पु. (गुळाची अडत) कसर; दरशेंकडा साधारणतः १२ आणेप्रमाणें कापलेली रक्कम. ॰फसकी-गी-स्त्री. बाजारांत विक्री- साठीं येणार्‍या मालावरील सरकारी पट्टी (पसाभर धान्य घेणें). ॰बट्टा-पु. प्रमाण मानलेल्या नाण्याशीं बाजारांतील इतर नाण्यांचे दर, प्रमाण. ॰बसका-पु. बाजारांतील दुकानांवरील कर. -वाडमा ९.७०. ॰बसवी-बसणी-बुणगी-बुंदगी, बाजाराचीखाट, बाजारीण-वि. वेश्या; कसबीण. [फा. बाझार + सं. उपवेशनी] ॰बसव्या-वि. (ल.) निर्लज्ज; अडाणी व दांडगा; शिवराळ व भांडखोर; असभ्य. ॰बुणगें-न. १ फौजेबरोबर असणारी अवांतर माणसें; फौजेबरोबर असणारे दुकानदार इ॰ गैरलढाऊ लोक; कर खान. २ कामाशिवाय जमलेला मनुष्यसमुदाय. ३ (ल.) फट- कुर्‍यांचा अगर चिंधोट्यांचा गठ्ठा; कतवार; निपटारा; सामुग्री. [फा. बाजार बुन्गाह्] ॰बैठक-स्त्री. बाजारांतील किंवा यात्रेंतील दुकाना- वरील कर. ॰भरणा-भरती-पुस्त्री. १ बाजारांत फक्त ठेवण्याच्या किंमतीची परंतु मोलहीन, कुचकामाची वस्तु; खोगीरभरती. २ (ल.) नीच व निरुपयोगी मनुष्य. ॰भाव-पु. बाजारांत चालू असलेला दर; बाजारनिरख. ॰महशूर-वि. बाजारांत लहानापासून थोरापर्यत सर्वांना माहित असलेला; गाजावाजा झालेला; प्रसिद्ध. ॰वाडा-पु. १ बाजार भरण्याची जागा; मंडई. २ (ल.) अव्य- वस्थित कुटुंब किंवा घर. ॰शिरस्ता-पु. बाजारांतील सामान्य वहिवाट, चाल, (रिवाज दर इ॰ चा). [बझार + फा. सर्रिश्ताह्] ॰हाट-स्त्री. बाजारपेठ; बाजारखरेदी. बाजारी-वि. १ बाजारा- संबंधीं; बाजारचा; पेटेंतील. २ ऐकीव. 'कागदो पत्रींचें वर्तमान नव्हे बाजारी आहे.' -ख. ८.३९७६. ३ (ल.) नीच; हलकट; असंभावित; लुच्चा. ४ सामान्य; साधारण; भिकार; वाईट (वस्तु).

दाते शब्दकोश

बारमाशी

बारमाशी bāramāśī a (बारा & मास) Pertaining to the twelve months; perennial, annual. बारमाशी आंबा-फणस-फूल A mango- jack- flower- tree bearing throughout the year. बारमाशी भट A Bráhman constant as a guest, visitor, petitioner &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

बेल

पु. बिल्ववृक्ष, शंकराला बेल प्रिय असल्यामुळें हें झाड पवित्र मानलें जातें. याला त्रिदालें येतात. या झाडाचीं फळें, पानें, साल व मुळ्या औषधी आहेत. २ बेलाच्या झाडाचें पान. -न. बेलफळ. [सं. बिल्व] ॰घालणें-(व.) (ल.) विनाकारण गांवांत भट- कणें. ॰काचरी-स्त्री. कोंवळ्या बेलफळाचे वाळविलेले कातळे, काप (हे औषधी आहेत). ॰पत्र-न. बेलाचें (त्रिदल) पान. (घरावर, मालावर, पदार्थावर) ॰पत्र ठेवणें-वस्तूवरचा हक्क सोडणें. ॰पत्री रुपया-पु. बेलाच्या पानाच्या छापाचा रुपाया. ॰पानी टीक-टिका-स्त्री. स्त्रियांचा गळ्यांत घालण्याचा एक दागिना; या दागिन्यांतील प्रत्येक पेटी बिल्वदळासारखी असते. बिल्वदळी टिका असेंहि म्हणतात. ॰फळ-न. १ बिल्व वृक्षाचें फळ. २ बेलफळाच्या आकाराची तपकिरीची डबी. या फळाच्या कवचीची केलेली, तपकीर इ॰ ठेवण्याची पेटी, डबी इ॰. ॰भंडार- पु. १ देवावरील बेल व भंडार हातानें उचलून करण्याचा शपथ- विधी. २ अशा रीतीनें घेतलेली शपथ; देव साक्ष ठेवून घेतलेली आणभाक. (क्रि॰ काढणें; उचलणें). [बेल + भंडार = हळदीची पूड] ॰वात-स्त्री. तीन सुतांची पीळ घालून केलेली, चार बोटें लांबीची वात; ह्या वाती एक लक्ष करून देवापुढें जाळतात.

दाते शब्दकोश

भात

भात bhāta n Rice in the husk. Rice when slightly husked is called करड, when better or fully husked, तांदूळ, when boiled, भात m. भात as m for जोंध- ळ्याचा भात is also Boiled grains of Holcus sorhum. 2 fig. A mess of corrupt and squashy fruits; a rotting sore &c. उन्हउन्हा भातासारिखा दडपणें or चेपणें To oppressgrievously. भात सोडावा पण सात सोडूं नये Let go your dinner, but let not your company go (on the road unattended). भात भरणें To dine or meal. Ex. माझ्या घरीं भात भरायाला या Take your rice with me to-day.

मोल्सवर्थ शब्दकोश

भात bhāta f P Credit, repute, good name. v राख, संभाळ, ठेव, g. of o.

मोल्सवर्थ शब्दकोश

भाट

भाट bhāṭa f n A place in the sea or a river which appears at low water; a shoal, shallow, sand- bank. 2 n C also भाटलें n C An elevated and level spot occurring in arable land; dry therefore and fit only for the inferior grains. 3 f C Ground prepared for sugarcane: also a plantation of sugarcanes.

मोल्सवर्थ शब्दकोश

भाट bhāṭa m ( H) A class of people or an individual of it. They are minstrels or bards. 2 fig. An empty chatterer.

मोल्सवर्थ शब्दकोश

पु. १ राजे, रजवाडे, सरदार इ॰चीं स्तुतिस्तोत्रें गाणा- रांची एक जात व तींतील व्यक्ति. 'भाट वेताळ बंदीजन ।... निज शस्त्रास्त्रीं चालिले ।' -जै १०.४१. हा एक अलुतेदार असून घराण्यांच्या वंशावळी ठेवणें, लग्नें जमविणें, खालच्या वर्गांच्या लोकांस लग्नाचा मुहूर्त काढून देणें अशीं याचीं कामे असत. -भाचसंवृ ६४. २ स्तुतिपाठक. 'दिगंतीचे भूपति । भाट होऊनि वाखाणती ।' -ज्ञा २.२१२. -वि. व्यर्थ, पोकळ बडबड करणारा (माणूस) [सं भट् = बोलणें; हिं.] भाटकीस्त्री. (कु) भाटपक्षी; एक प्रकारचा पक्षी (इं.) लार्क, भाटणें-सक्रि वाजविणें. -शर. भाटवोळापणा-पु. व्यर्थ बडबड. 'जळो ऐसी ब्रीदावळी । भाटवोळीपणाची ।' -तुगा ९७७. भाटि(टी)व-स्त्री. स्तुति; गुणवर्णन 'जयाचिये भाटिवेलागीं । मी कपिल जाहलों ।' ज्ञा १३.९७५. भाटिवकी-स्त्री. स्तुतिपाठकता. 'ज्याच्या पदासि वरदेवसमाज याची । तेही मुखीं करिति भाटिवकी जयाची ।' -आसी ७०.

दाते शब्दकोश

भाता

भाता bhātā m (भस्त्रा S) A bellows. v फुंक. 2 A quiver. 3 A kind of leather-bag in which soldiers and travelers carry their cooking utensils &c. 4 Skin peeling off, a scab. 5 ( H) Vulgar for भत्ता.

मोल्सवर्थ शब्दकोश

भड(डु)वा

पु. १ कलावंतीण नाचतांना किंवा गातांना मृदंग वाजवून साथ करणारा तिचा नोकर, साजिंदा. २ (ल.) कुटण्या. ३ स्त्री भाड्यानें देणारा. ४ (ग्राम्य.) एक शिवि; अप- शब्द. [सं. भर्याट, भट् (भाटूक = भाड्यानें देणें); हिं. भडुआ; बं भेडुया]

दाते शब्दकोश

भडखळ-ळी

स्त्री. १ रणभूमि. 'भडखळीं राहुनि घे आदळु । विचारेंसीं ।' -भाए ३६४. २ पहाऱ्याची जागा. [भट + स्थळ ?]

दाते शब्दकोश

भडखंबा-भा

पु. (महानु.) रणभूमीवर शेंदूर लावून उभा- केलेला खांब; विजयस्तंभ. 'तैसा प्रमदाचा भडखंबा । पुतळियेचेनि मिसें कीजे उभा ।' -भाए ३६०. [सं. भट + स्तम्भ ?]

दाते शब्दकोश

भटाचा उभा दांडा अडवा दांडा

भटाचा उभा दांडा अडवा दांडा bhaṭācā ubhā dāṇḍā aḍavā dāṇḍā A phrase founded upon a story about a cunning भट, and used in describing the course of one who shifts and veers, ever adapting himself to his occasions or circumstances.

मोल्सवर्थ शब्दकोश

भटाळलेला

(निंदार्थी प्रयोग) ब्राह्मणी वर्चस्वा- खालील; ब्राह्मणांचा विशेष संपर्क झालेला; ब्राह्मणाप्रमाणें आचारविचार असलेला (ब्राह्मणेतर). [भट]

दाते शब्दकोश

भटी

भटी bhaṭī a Relating to a भट or mendicant-Bráhman.

मोल्सवर्थ शब्दकोश

भटी a Relating to a भट.

वझे शब्दकोश

भट-कण-कन-कर-दिशीं

भट-कण-कन-कर-दिशीं bhaṭa-kaṇa-kana-kara-diśīṃ &c. (भट!) Outright, flat, smack, sharp &c., i.e. promptly or quickly. 2 See भड-कण.

मोल्सवर्थ शब्दकोश

भटोरा

भटोरा bhaṭōrā m A contemptuous or light form of the word भट.

मोल्सवर्थ शब्दकोश

भटोरखाना

भटोरखाना bhaṭōrakhānā m (भटोर or भट & खाना) A term of contempt for an assembly or a multitude of Bráhmans.

मोल्सवर्थ शब्दकोश

भट्ट

भट्ट m A learned man. See भट.

वझे शब्दकोश

पु. (व.) मोठा वानर; वानरांच्या कळपांतील नर. [हिं. बडा; सं. भट?] भडेराक्षस-पु. राक्षसी, रानटी, मांग हृद- याच्या क्रूर माणसास तिरस्कारानें म्हणतात. [हिं. बडा + राक्षस]

दाते शब्दकोश

पु. १ विद्वान, विद्यावान् मनुष्य. २ ही एक पदवी असून ती विद्वान् ब्राह्मणाच्या नांवास जोडतात. ३ भट; भिक्षेवर निर्वाह करणारा ब्राह्मण. [सं.] भट्टाचार्य-पु. विद्वान् ब्राह्मणास गौरवार्थीं म्हणतात. [सं.]

दाते शब्दकोश

भट्ट bhaṭṭa m (S) A learned or literary man, one conversant with the philosophical systems. The word is added as a title to the names of learned Bráhmans. 3 (Used for भट) A Bráhman, esp. one that subsists by begging.

मोल्सवर्थ शब्दकोश

भट्टू

भट्टू bhaṭṭū m A contemptuous or light form of the word भट. Pr. भादव्यांत भट्टू आश्विनांत तट्टू (पुष्ट होतात).

मोल्सवर्थ शब्दकोश

चंचुप्रवेश

पु. अल्प शिरकाव होणें; किंचित पगडा बसणें; थोडीशी वाट, वाव मिळणें; थोडा हात शिरकणें. 'त्यांचा बंदो- बस्त चांगला यामुळें राज्यांत कोणाचा चंचुप्रवेश होत नाहीं.' [सं. चंचु + प्रवेश] ॰म्ह-चंचुप्रवेशे मुसलप्रवेशः = चोंच खुपसण्या- इतकी जागा मिळाली पुरे कीं हळू हळू मुसळ जाण्याइतकी मोठी जागा करतां येते. प्रथम थोडासा अवकाश मिळाला म्हणजे तेवढ्यावर जास्त मिळवितां येतें; भटाला दिली ओसरी भट हात पाय पसरी या अर्थीं. चंचूप्रेवेश करणें-थोडासा हात घालणें, आंत किंचित् शिरकाव करणें.

दाते शब्दकोश

दापणें

सक्रि. १ दाबणें; दटावणें; दपटशा, जबर देणें. २ नाश करणें; ठार मरणें. 'दापिती अन्योन्य बळें वीर जसें व्याघ्र धेनुकळपातें ।' -मोकर्ण ३०.७७. 'भटासि भट संगरीं परि न कातरां दापिती ।' -केका ७९ ३ इतर अर्थांसाठीं दाबणें पहा. [सं. दम्]

दाते शब्दकोश

देयकार      

पु.       शूद्र भट. (गो.)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दोडकी भात

दोडकी भात dōḍakī bhāta n A kind of rice; the same as दोडका.

मोल्सवर्थ शब्दकोश

दरारा

पु. १ जोराचें खडसावणें; धमकी. २ धाक; दब- दबा; भीति; अधिकार इ॰ ची छाप (क्रि॰ दाखविणें; बसविणें; बसणें). 'कौरव भट भीतिकथन होय सुरांतहि महा दरारा हो ।' -मोभीष्म ४.५०. [सं. दर; हिं.]

दाते शब्दकोश

गरा      

पु.       १. फळाचा गर असलेला फणसातील भाग; आठळी भोवतालचा विशिष्ट खाण्याचा अंश. ‘जसे बरे गरे बहु कपी भट ।’ – मोसीतागीत १४१. २. दाणेदार कणीक, रवा. ३. उसाचा करवा; गंडेरी. (कर.) [सं. गृ, गर्भ]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

गरा

पु. १ फळाचा गर असलेला फणसांतील भाग; आठळी विशिष्ट खाण्याचा अंश. गर्‍यांत बी-आठळी असते. 'जसे बरे गरे बहु कपी भट ।' -मोसीतागीत १४१. (नवनीत पृ. २६१). २ दाणेदार कणीक, रवा. ३ (क.) उंसाचा करवा; गंडेरी. [गर]

दाते शब्दकोश

गयावळ      

पु.       १. यात्रेकरूंची तीर्थयात्रा करविणारा भिक्षुक, पंड्‌या; पुजारी : ‘गयावळ ते गंगेचे । गंगापूतें ।’ - दावि ४७४. २. (ल.) आचारविचारहीन, भ्रष्ट माणूस; धर्मशास्त्राप्रमाणे न चालणारा; मलिन; आचारहीन भिक्षुक, भट. ३. निष्ठुर माणूस. (गो.) ४. (ल.) लोचट.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

हातोळा

पु. (खा.) पाणिग्रहण; विवाहांत लग्नघटिका भरल्यानंतर भट टाळी देतो त्यावेळीं वधूचे हात वरानें धराव- याचा विधि. वधूपित्यानें कन्यादान केल्यावर हा हातोळा सुटतो. -संशोधन. -ऐलेच २४९. [हात]

दाते शब्दकोश

इनामपासोडी

इनामपासोडी ināmapāsōḍī f A comprehensive term for the minor grants of land (to the village-officers): as that to the पाटील (in lieu of, and, thus, bearing the name of पासोडी); that to the कुळकरणी (in lieu of a रुमाल); that to the पोतदार (in lieu of a घोंगडी); that to the भट or जोशी (in lieu of a धोतर); that to the महार (in lieu of a जोडा).

मोल्सवर्थ शब्दकोश

झटणे      

अक्रि.       १. (एखाद्या गोष्टीविषयी) नेटाचा प्रयत्न करणे; आटोकाट यत्न करणे; मनापासून श्रम घेणे : ‘धराया रायाचे भट झटत येतांचि जवळी ।’ - मोकृष्ण ६२·३४. २. (लढाईत, भांडणात एखाद्याच्या अंगाशी) भिडणे; झोंबणे; लगट करणे; तुटून पडणे : ‘तो गज गदाप्रहारें धृष्टद्युम्नें झटोनि लोळविला ।’ - मोशल्य ३·३७. [सं.झट्‌]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

झटणें

अक्रि. १ (एखाद्या गोष्टीविषयीं) नेटाचा प्रयत्न करणें; आटोकाट यत्न करणें; मनापासून श्रम घेणें; 'धराया रायाचे भट झटत येतांचि जवळी ।' -मोकृष्ण ६२.३४. २ (लढाईत, भांडणांत एखाद्याच्या अंगाशीं) भिडणें; झोंबणें; लगट करणें; तुटून पडणें. 'तो गज गदाप्रहारें धृष्टद्युम्नें झटोनि लोळ- विला ।' -मोशल्य ३.३७. [सं. झट् = गुंतागुंत होणें]

दाते शब्दकोश

का(कां)चणें

अक्रि. १ घर्षणानें कमी होणें, झिजणें. 'तुज जवळि भल्यांचा काय सन्मान काचे ।' -सारुह ६.१०५ २ (ल.) झिजणें; झडणें; कृश होणें; वाळणें. (भूक, तहान, काळजी, दुःख, आजार यांमुळें). ३ भिणें; धाकणें. 'परि झाले हरिवरि करि वर जातां जेविं तेविं भट काचे ।' -मोकर्ण ४३.६६.; -उक्रि. गांजणें; छळणें; त्रास देणें. [सं. कच् किंवा कांच् = बांधणें; कांचन = बंधन; म. काच]

दाते शब्दकोश

काचणे      

अक्रि.       १. घर्षणाने कमी होणे, झिजणे : ‘तुज जवळि भल्यांचा काय सन्मान काचे ।’ - सारुह ६·१०५. २. (ल.) कृश होणे; वाळणे (भूक, काळजी, दुःख, आजार यांमुळे.). ३. भिणे; धाकणे : ‘परि झाले हरिवरि करि वर जातां जेविं तेविं भट काचे ।’ - मोकर्ण ४३·६६. उक्रि. गांजणे; छळणे; शरीराला घासून किंवा आवळल्याने वेदना होणे : ‘ते दोर आता खांद्याला काचेनासे झाले.’ - एको २. [सं. कच्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कामील      

वि.       कमाल; कमाल आकार : ‘मौजे कायगाव ज्याची कामील जमा चार हजार पाचशे एकसष्ट हा गाव नारायण भट यास इमान बक्षीस दिले.’ - नादीपा ६७.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कुळेवारी      

पहा : कुळवारी : ‘गावोगाव एकेक भट कामगार पाठवून, बाकी राहिलेल्या शूद्रांची कुळेवारी करून.’ - जोफु ८२. कुळैवा      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

खैरभट

खैरभट khairabhaṭa m A Bráhman so named from his strength and prowess. Being attacked by robbers he uprooted a Khyr-tree and dispersed them. Hence used of any one of remarkable strength, a Hercules, a Samson. 2 Applied also to a coarse and illiterate भट fit only to teach trees; a hedge-parson.

मोल्सवर्थ शब्दकोश

खालाडी भात

खालाडी भात khālāḍī bhāta n C Rice raised upon land just reclaimed from the wilderness. Ex. शिंवार तोडून भाजावळ करून खालाडी भात करितात.

मोल्सवर्थ शब्दकोश

खळभट

खळभट khaḷabhaṭa m (खळ & भट) A term for an obstinate and dogged fellow gen. 2 See खळेभट.

मोल्सवर्थ शब्दकोश

पु. धान्याच्या खळ्यावर मळणी चालू असतां तेथें भिक्षा मागून निर्वाह करणारा ब्राह्मण; निरक्षर ब्राह्मण, विद्येचा पोकळ डौल दाखविणारा माणूस; ग्रामपंडित. [खळें + भट]

दाते शब्दकोश

खतखता भात

खतखता भात khatakhatā bhāta m (Imit.) Stale boiled rice reboiled with buttermilk &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

खटनट

स्त्री. काळजी; त्रास; उपद्व्याप (पालन-पोष- णाचा, अन्नाच्छादनाचा). (क्रि॰ काढणें; सोडणें). कटकट; भांडण-तंटा. -वि. १ टाकाऊ; नासलेला; वाईट साईट; ओंगळ- सोंगळ; नासका. २ लुच्चा;ठक; दुष्ट. 'खटनट येकवटिले । चोरटे पापी ।' -दा १९.३.८. [खट + नट] म्ह ॰ खटनट त्याला गिर्‍हाईक भट. खटनट्या-वि. भांडखोर; घासाघीस करणारा.

दाते शब्दकोश

खटनट khaṭanaṭa a (खट by redup. or खट & नट) Vile, worthless, damaged, blemished, bad. Used largely, also laxly or comprehensively, as वाईटसाईट, ओंगळसोंगळ, नासकाकुजका &c. 2 ( H) Roguish, scampish, villainous. Pr. ख. त्याला गिऱ्हा- ईक भट. 3 or खटनट्या a Wrangling, contentious.

मोल्सवर्थ शब्दकोश

मोहोबत

स्त्री. प्रेम. मोहबत पहा 'भट करी बटकिशीं मोहबत ।' -अफला ६९.

दाते शब्दकोश

मवास

पु. १ लुटारूंच्या टोळीचा नायक; स्वतंत्र अधि- पति, राजा इ॰. 'परंतु जमीनदार मवास मोठमोठे आहेत.' -इमं २६१. २ लुटारू; बंडखोर; चोर. 'संपत्तिस तो मवास येउनि ।' -अमृत २७. ३ अनिर्बद्ध वागणारीं, आडदांड, भट- कणारीं गुरेंढोरें, बदमाष लोक इ॰ समुच्चयानें. ४ लुटारूंची टोळी. [अर मुआसी] मवाशी-सी-स्त्री. लुटारूंची राहणी, सरणी; लुटारूपणा. -पया ८३. -पु. बंडखोर; लुटारू; पुंड. मवास पहा. [अर. मुआसी]

दाते शब्दकोश

ओल्लो

उद्गा. ओहो. ! आश्चयार्थी उद्गार. 'ओल्लो, बचं- भट, आम्ही तुमचीच इच्छा केली होती.' -मोर २२. [इं. ओ + लो = पहा]

दाते शब्दकोश

ओसरा, ओसरी

स्त्री. माजघराच्या पुढील अगर मागील, तीन बाजूंनी भिंत असलेली मोकळी जागा; ओटी; पडवी; सोपा. 'पृथ्वी रुसोनि ओसरां राहे ।' -एभा २२.४१०. 'ओवरा ओसरी भूमि...' -वसा १४. [सं. अवसर; दे. ओस- रिआ; हिं. उसारा = देवडी, ओवरी] म्ह॰ भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी.

दाते शब्दकोश

पांड्या

पांड्या pāṇḍyā m A half-grown tiger. 2 A village-officer. He is employed in the customs &c. The term is understood by Shúdras of the कुळकरणी. 3 ( H) A title of Bráhmans of the पंचगौड division (Hindustání Bráhmans); the भट or family or personal priest amongst the भय्या or पर- देशी people.

मोल्सवर्थ शब्दकोश

पायतांदूळ

पायतांदूळ pāyatāndūḷa m pl At Shúdra-weddings. Cleaned rice is put into two पांटी or शिपतर or पत्रावळ &c; the bridegroom and bride are made to stand, each upon one of the piles; and in that position the लग्न or marriage-junction is effected by the officiating जोशी or भट, of whom this rice becomes a perquisite. By him it is ordinarily transferred to the महार. In some districts, cleaned rice (or wheat or जोंधळे) is cast by the company, at the very moment of लग्न, upon the bodies of the bridegroom and bride. This, being gathered up afterwards at their feet, is called पायतांदूळ, and is a perquisite of the वेसकर महार.

मोल्सवर्थ शब्दकोश

पहाता

पु. प्रेक्षक; पाहणारा. 'तर्कित होते निज पर भट विधु कीं रवि असें पहाते ज्या ।' -मोभीष्म १.३९. [पाहणें]

दाते शब्दकोश

पंत

पु. १ अष्टप्रधानांतील प्रत्येक मंत्री याच्या पाठीमागें लावावयाची मानाची पदवी अगर किताब. जसें:-पंत प्रति- निधि, पंत अमात्य. २ शास्त्राचें अध्ययन न केलेल्या पण कार- कुनी इ॰ करणाऱ्या गृहस्थ ब्राह्मणाच्या नांवापुढें लावतात; गृहस्थ धर्मी ब्राह्मण (शास्त्री, भट नव्हे असा). ३ बहुमानाची पदवी. जसें:-केसोपंत, मोरोपंत. आंध्र प्रांतांत पंतलु (पंताचें अव.) असें रूप येतें. ४ पंतोजी; शिक्षक. 'अर्भकाचे साठीं । पंतें दातीं धरली पाटी ।' -तुगा २१८०. [सं. पंडित याचें संक्षिप्त रूप. हें बनारस- कडे अजून या अर्थीं योजितात] ॰प्रधान-पु. पेशवा; मुख्य प्रधान; अष्टप्रधान पहा.

दाते शब्दकोश

रुचणें

अक्रि. १ आवडणें; गोड लागणें; 'ध्यान रुचो प्रभुचेंचि जसें रुचतें शिशुच्या पय अन्न मनातें ।' -मोरामायणें १. २९७. २ शोभणें; शोभून दिसणें; योग्य दिसणें; बरोबर वाटणें. 'तुम्ही पिढीचें भट; तुम्ही प्रसंगीं भिक्षा मागितली तरी रुचेल पण आम्हां गृहस्थाला लोक हांसतील.' ३ (चुकीनें उपयोग) रुतणें [सं. रुच् = आवडणें]

दाते शब्दकोश

सांद-दी

स्त्री. (व.) १ बोळ. २ अंगण; परसूं. 'सांदीकडे विहीर आहे.' ३ आड बाजू; सांधीकोंपरा. 'भट करी बटकीशी मोहबत । दप्तर पडलें सांदींत ।' -अफला. सांध पहा. [सं. संधि]

दाते शब्दकोश

सडेल भात

सडेल भात saḍēla bhāta m (Boiled rice corrupted.) A term for a corrupting wound or sore; for a soft scorbutic character of flesh; for a stinkard or nasty fellow &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

श्म(स्म)शान

न. मसण; प्रेतें जाळण्याची, पुरण्याची जागा. [सं. शव + शयन] ॰कर्म-न. प्रेतसंस्कार; उत्तरक्रिया; दहन विधि. ॰निद्रा-स्त्री. मृत्यु; मरण. (अखेरची झोंप). ॰भट- पु. प्रेतसंस्कार करणारा ब्राह्मण; प्रेतदहनप्रसंगींचे मंत्र सांगणारा ब्राह्मण. ॰भाजन-न. १ प्रेताभोंवतीं ज्या भांड्यानें पाणी फिरवितात तें भांडें, मडकें. २ (ल.) टाकाऊ, निरुपयोगी, क्षुद्र वस्तु. ॰भूमि-मी-स्त्री. मसण; मसणवटा; प्रेतें जाळण्याची किंवा पुरण्याची जागा. ॰भोजन-न. प्रेतसंस्काराच्या वेळीं स्मशानांत करावयाचें जेवणच उत्तरक्रियेच्या अथवा और्ध्वदेहि- काच्या वेळीं ब्राह्मणांस घालावयाचें मृताच्या प्रीत्यर्थ जेवण. ॰मित्र-पु. मरणापर्यंत, स्मशानांत जाईपर्यंत ज्याची मैत्री टिकते असा सोबती, सहचर (जन्मोजन्मींचा मित्र नव्हे). ॰मैत्री-स्त्री. मरणापर्यंत टिकणारें साहचर्य, सख्य. ॰रुदन- रोदन-न. १ स्मशानांतील रडणें; वायफळ, वृथा केलेला शोक (स्मशानांत कोणी ऐकून सांत्वन करूं शकत नाहीं याकरितां). २ केवळ तात्कालिक शोक; मनापासून नव्हे पण वरवरचा शोक. ॰वास-पु. स्मशानांत राहणें; जगापासून अलिप्त राहणें; सर्व संग परित्याग करणें; सर्व सोडून एकटें राहणें. ॰वासी-वि. १ स्मशानांत राहणारा. २ शंकराचें विशेषण. 'स्मशानवासी भूषण भयंकर पिंगट मुगुटीं जटा ।' -प्रभाकर लक्ष्मीपार्वती संवाद. ॰वैराग्य-न. एखाद्याच्या मरणामुळें उत्पन्न झालेली तात्का- लिक विरक्ति; संसाराबद्दल केवळ स्मशानांत उत्पन्न झालेली उदा- सीनता. प्रेतदहनास आलेल्या मनुष्यास वाटणारी संसाराबद्दलची असारता. ॰विरक्त-वि. वैरागी; स्मशानविरक्ति झालेला. ॰विरक्ति-स्त्री. स्मशानवैराग्य. ॰साधन-न. पिशाच्चादिक वश व्हावें म्हणून स्मशानांत केलेलें जपजाप्य; मंत्रांचा प्रयोग वगैरे.

दाते शब्दकोश

स्थिरवासर , स्थिरवार

पु. मंदवार; शनिवार. 'कार्तिक शुद्ध द्वादशी स्थिरवासरे क्षेत्रिय कुलवतंस श्री- राजाराम छत्रपति स्वामी याणी वृत्तिपत्र दिल्हे यैसे जे.' -पेद ३१.६०. 'ज्येष्ठ बहुल त्रयोदसी स्थिरवासरे वेदमूर्ती गोपाल- भट बिन रामभट गिजरे वास्तव्य कसबे कर्‍हाड यांनी वसंत- गडाच मुकामी येऊन विदित केले की.' -रा २१.८२. [सं.]

दाते शब्दकोश

स्वरूप

न; खरी योग्यता; महत्व; थोरपणा. 'हे भट आमचे पुरातन आश्रित यांचे स्वरूप तुम्हीं चित्तांत आणले नाहीं.' -आठइति ९६. [सं.] -क्रिवि. स्वतः; प्रत्यक्ष. 'त्यास स्वामीचे आगमन श्रीकृष्णातीरीं स्वरूपच कालें करून होणार, पुढें दर्शनाचा विचार परस्परें घडावा.' -पेद २४.९२.

दाते शब्दकोश

टाकणे      

सक्रि.       मिळविणे; गाठणे; पकडणे; ठाकणे; जवळ जाऊन पोचणे; प्राप्त करणे; जवळ करणे : ‘तरि हें जैसें नीगैल तैसें तुम्ही यांतें टाकाल?’ – लीचपू ४४४; ‘भट गोसावी यांतें टाकीत जाति : परि टाकतिना :’ – लीचउ ८४. [सं. टक्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

टाकणें

अक्रि. गांठणें; पकडणें. 'भट गोसावी यांतें टाकीत जातिः परि टाकतिनाः' -लीच ३ पृ ८४.

दाते शब्दकोश

उद्भट

वि. १ शूर; धाडसी; बलवान्; धारिष्टवान; धैर्याचा. 'राजकुमर वीर उद्भट । -मुआदि ३१.२९. २ प्रचंड; अफाट; मोठा; विस्तृत. 'आंसडोनि बळउद्भटें । मधें उधडिला तडतडाटें ।' -मुसभा ७.५५. ३ श्रेष्ठ; उत्कृष्ट; थोर; प्रख्यात. 'जे स्वगुणीं उद्भट । घेऊनि सत्व चोखट ।।' -ज्ञा १४.२१८. ४ कठिण; कठोरः खड- तर. 'पुराणीं उपदेश साधन उद्भट । आम्हां सोपी वाट वैकुंठींची ।।' -तुगा २११९. ५ उन्मत्त; उद्धट पहा. [सं. उद् + भट]

दाते शब्दकोश

उकावणे      

क्रि.       १. वर येणे; चढणे; उंच होणे : ‘मग मनीं उगलाचि उकावसी ।’ − दावि १३२. २. इरेस पेटणे; भरीस पडणे : ‘वदे भट नृपापुढें उकावला चढोवढें ।’ − बसवकृत महाबळचरित्र ६. [सं. उत्+क्रम् = वर चढणे.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उठणें

अक्रि. १ उभें राहणें. बसणें त्याच्या उलट. २ (ल.) वर याणें; आकाशांत वर जाणें (धूर, धुरळा). ३ जागें हणें; शुद्धी वर येणें (झोपेंतून, मुर्च्छेतून). ४ बरखास्त होणें, संपणें (सभा, बैठक वगैरे). 'चार वाजले म्हणजे कचेरी उठते !' ५ (सैन्य वगैरे) चालू होणें; बाहेर पडणें; सज्ज होणें; हल्ला करणें. 'भट दशसहस्त्र उठले जे आज्ञाकर सुयोधानाचे हो !' -मोभीष्म ६.६१. ६ उडून जाणें (एखाद्यावरील मन,प्रेम); उद्विग्न होणें; त्रासणें; कंटाळणें. ७ बंड करणें (एखाद्या विरुद्ध); सामना देण्यास तयार होणें. 'दुर्जन ज्याचें अन्न खातो त्याजवरच उठतो.' ८ स्पष्ट दिसणें; उमटणें. (ठसा, रंग, छाप वगैरे). 'उत्तम गुण तत्काळ उठे ।' -दा १९.६.२०. ९ वर येणें; दिसावयास लागणें; बाहेर पडणें; उद्भवणें (पुरळ, सांथ. संकट, बातमी वगैरे). १० दुखावयास लागणें; (डोकें, कपाळ, मस्तक; शीर, त्याचप्रमाणें दाढ, दांत, कान, हात, पाय, या संबंधीही क्वचित उपयोग करतात). 'निघाल्या देवी आणि गोवर । उठलें कपाळ लागला ज्वर ।' -दा ३.२.२६. ११ ताजेंतवानें होणें; फुलणें; टवटवीत होणें; आनंदित होणें; (मनुष्य, प्राणी, वन- स्पती वगैरे); खुलून दिसणें (रंग वगैरे.). १२ आकसानें आळ घेणें; कुभांड रचणें (मनुष्यावर; घराण्यावर वगैरे). १३ खुणा पडणें; उठून दिसावयास लागणें (वण, वळ, चाबकाचा मार, दांताचा चावा). १४ करवणें; उरकणें; पार पडणें (काम वगैरे). 'माझ्याच्यानें पहिल्यासारखें कामही उठत नाहीं.' -विवि ८.८.१५३. १५ वस्ती वगैरे उठून जाणें; ओसाड पडणें. १६ उत्पन्न होणें. 'उठती घन- पटळें । नाना वर्णे ।' -ज्ञा ८.३०. 'शब्द पडसाद उठला । म्हणे कोण रे बोलिला ।' १७ (व.) खर्च होणें; खलास होणें; संपून जाणें. 'इतके तांदूळ आजच्या आज उठतील.' म्ह॰ उठणे- वाल्याचें उठतें कोठीवाल्याचें पोट दुखतें.' १८ पूर येणें. 'जसें महाप्रळयीं जळ । उठलिया भरे ब्रम्ह गोळ ।' -विउ ११.८६. १९ वाढणें. 'चार शिंपणी लागोपाठ सांपडतांच पहिल्यापेक्षां चार बोटें भाजी उठली. ' २० प्रवृत्त होणें (वाईट करण्यास). 'मी इतकें बोलतांच तो जीव ध्यावयास उठला.' २१ क्षोभ होणें (पित्ता- दिकांचा). २२ नवीनच गोष्ट प्रसिद्ध होणें; प्रचारांत येणें. 'बारा- वर्षांचे मागलें देणेंघेणें कोणी देऊं नये, मांगू नये असें हें अलीकडे नवेंच उठलें.' २३ एखाद्यानें लौकिकानुरूप मर्यादा सोडून वर्तन करणें. २४ उभें होणें; तयार होणें (इमारत वगैरे.) 'तैं राजवाडा उठे.' -विक ११.२५ वाटणें; मनांत येणें. 'झोंबी घ्यावी ऐसें उठे ।' -दा २.६.१५. [सं. उत् + स्था; प्रा. उठ्ठ; सिं. उथणु; जिप्सी सीगन उष्टी; जिप्सी फ्रेंच उट्ठी] उठून जाणें-१ परवानगीशिवाय निघून जाणें; पळून जाणें; रागानें चालतें होणें. 'त्याची थट्टा सुरु होतांच तो मंडळींतून उठून गेला.' माणसांतून उठून जाणें-१ रीतभात सोडणें; अनीतीच्या मार्गाला लागणें. २ परपुरुषाबरोबर निघून जाणें (स्त्रियांच्या बाबतींत). 'खरेंच कां रूपमाया सेनापती उठून गेल्या.' -बाय ४.३. उठून दिसणें- स्पष्टपणें नजरेस येणें. नित्य उठून, रोज उठून- क्रिवि. दररोज नेमानें; नित्य; रोजच्यारोज. उठला ठाव देववत नाहीं-उठून जेवावयाचें पानहि मांडतां येत नाहीं (इतक्या निर्बलतेचें द्योतक).

दाते शब्दकोश

वैष्णवी भात

वैष्णवी भात vaiṣṇavī bhāta n The vertical sectarial token on the forehead of a वैष्णव or follower of विष्णु. It is described thus --वरतें अक्षता मध्यें गोपीचंदन खालीं रक्षा Grains of raw rice on the top, in the middle, the earth गोपीचंदन, at the bottom, ashes.

मोल्सवर्थ शब्दकोश

विटंबणें-बिणें

उक्रि. १ उपहास, थट्टा, फजिती करणें; अनमानणें; चेष्टा करणें; लाजविणें. 'विटंबिलें भट । दिला पाठी वरी पाट ।' -तुगा २३६. २ बिघडवणें; कुरूप करणें. 'रूप विटंबील श्रीपती ।' -एरुस्व १६.२७. [सं. विडंब्] विटंब-पु. विटंबना; फजिती; चेष्टा. 'वोहरेवीण वाधावणें । तो विटंबु गा ।' -ज्ञा १३.८३७. विटंबना-णा-स्त्री. फजिती; मानहानि; अप्रतिष्ठा. 'काय विटंबना सांगों किती । पाषाण फुटती ऐसें दुःख ।' -तुगा २२६०. विटंबवाणें-वि. अपमानकारक; मानहानीचें. 'त्या कृष्णासी सोयरिक करणें । तेंचि आम्हां विटंबवाणें ।' -एरुस्व २.२७.

दाते शब्दकोश

वण

न. (प्र.) वन पहा. 'तेव्हां तो भट एक वण मागें टाकतो तों दुसरें पुढें येतें.' -मसाप १.२. -स्त्री. वनचराई. पाहणी इ॰ च्या सरकारी कागदपत्रांतून म्हैस शब्दामागें याचा योग होतो (वनचराई आकारावयाची या अर्थानें). 'वण म्हशी चौदापैकीं मयत तीन बाकी जमा अकरा.' [सं. वन] ॰मस-म्हैस- (वण + म्हैस) वनचराईचा आकार. 'हल्लीं वणमस (म्हशीमागें एक रुपया...) भरूनसुद्धा श्रावणापासून जनावरें घरी बांधून ठेविलीं आहेत.' -खेया. -वाडमा १.११२. वणी देणें-(कों.) वनांत नेऊन मारणें. -लोक २.३१.

दाते शब्दकोश

गया

स्त्री. बिहार प्रांतांतील एक हिंदूंचें (व बौद्धधर्मींयांचेंहि) पुण्यक्षेत्र. येथें विष्णूनें गयासुरास ठार मारलें व त्याच्या विनंती- वरून त्याच्या पाठीवर एक यज्ञ केला. येथें विष्णूचें एक पाऊल उमटलें आहे, त्याची पूजा करून मृत पितरांस पिंड दिला आणि तेथील गयावळानें (पिंड देणारास) 'तेरे पितर सरग भये' असें म्हटलें म्हणजे पिंड देणाराच्या पितरांस स्वर्ग प्राप्त होतो व पुन्हां (श्राद्धप्रसंगीं) पिंडदान करण्याचें कारण पडत नाहीं असें हिंदूलोक मानितात. गौतम (बुद्धावस्था) प्राप्त झाल्यानंतर) येथें राहून उपदेश करीत असे म्हणून बौद्धधर्मीय लोकहि यास पुण्यक्षेत्र मानतात. ॰वर्जन-न. (अप.) गयावर्दन-वर्धनः गयेस जाऊन करावयाचें पिंडप्रदान व तीर्थश्राद्ध. 'पितर उद्धरावे आपण । गयावर्जन करोनियां ।' -एभा २३.३७८. [गया + वजन] ॰वळ- पुत्र-पु. १ गयेंतील यात्रेकरूंची तीर्थयात्रा करणारा भिक्षुक, पड्या; पुजारी. 'गयावळ ते गंगेचे । गंगापूतें' -दावि ४७४. २ (ल.) आचारविचारहीन, भ्रष्ट माणूस; धर्मशास्त्राप्रमाणें न चालणारा; मलीन; आचारहीन भिक्षुक, भट. ३ चिक्कू; घालवेडा, वेड पांघरलेला मनुष्य. ४ बावळट. गयाळी पहा. म्ह॰ बुवा गयावळ आणि बाई चंद्रावळ. ५ (गो.) निष्ठुर माणूस.

दाते शब्दकोश

शंख

पु. १ समुद्रांत रहाणारा एक प्राणी. २ अशा प्राण्याचें घर; त्याचें अस्थिरूप शरीर, कवच. याचा देवावर पाणी घाल- ण्यासाठीं किंवा युद्धांत वाजविण्यासाठीं अपयोग करितात. 'मोत्यें म्हटलीं म्हणजे शिंपांचीं पोरें आणि शंखांचे भाचे.' -प्रेमशोधन १५५. ३ एक प्रकारचें वाद्य. 'शंख शृंगें काहळा भेरी' -सप्र ३२. 'काहळ मृदंग शंखभेरी । दुंदुभी दमामे रणमोहरी ।' -जै ६८५. ४ बोटांवर असणाऱ्या शंखाकृति रेघा-रेषा. याच्या उलट चक्र. ५ बोंब; ओरडा; आरडाओरडा; शंखध्वनि. 'शंख करी आक्रोशे' -रावि ३१.१६१. ६ नवनिधींतील एक. ७ एक संख्या; शंकू. ८ कानशिलाजवळचें कपाळावरचें हाड; आंख. 'शंखद्वयीं धरूनि कौकुम कीरवाणी ।' -र १७. ९ घोड्याचा विशिष्ट अवयव. -अश्वप १.६२. १० चौदा रत्नांतील एक; पांचजन्य. 'लक्ष्मी जयास भगिनी आणि तात सिंधु ।... इतके असोन परि शंख फिरे भिकारी ।' ११ (ल.) अभाव; शून्य; पूज्य. 'बुद्धीच्या नांवानें शंख.' १२ शंखासूर (राक्षस) पहा. -वि. १ मूर्ख; अडाणी; ठोंब्या; निरक्षर. २ रड्या; बोंबल्या; अपयश येणारा. ३ स्वच्छ, निर्मळ, पारदर्शक गुण दाख- विणाऱ्या विशेषणापुढें आधिक्यार्थीं योजतात. उदा॰ निर्मळशंख, पाणी. ॰वाजणें-संपणें; न उरणें; पराभूत होणें. 'लाडवांचा शंख वाजला.' 'परिक्षेंत त्याचा शंख वाजला'. ॰करणें-१ बोंब ठोकणें-मारणें; बोंबलणें; बाजा करणें. 'सात्यकि निघे, म्हणे कुरु- भट गो हूं शंख करुनि मुख सुजवा ।' मोद्रोण ११.३५. -रावि ३१.१६. २ (ल.) मोठ्यामोठ्यानें ओरडणें. 'पैशाच्या कलशावर नजर ठेवून वकील शंख करीत असतो.' -संगीत सत्तेचे गुलाम २१. ॰करावयास लावणें-बोंबलत वसविणें; कांहीं न देणें. 'विश्वामित्राला शंख करावयाला लावून इंद्रसभेचा रस्ता धरला.' -नाकु ३.७८. ॰तीर्थ-न. १ देवपूजेंत अभिषेकानंतर देवावर शंखांतून शिंपावयाचें पाणी. २ (ल.) फाल्गुनवाद्य; बोंब. [सं.] ॰तीर्थ घेणें-शंखध्वनि करणें; बोंब मारणें. 'बापलेकांचें भांडण जाहलें । लेकीं बापास मारिलें । तंव ते मातेनें घेतलें । शंखतीर्थ ।' -दा ३.५.१९. ॰द्राव-पु. १ शंखापासून काढलेला द्रव; रस. २ ज्यांत शंख इ॰ विरघळतात असा द्रावक रस. (क्रि॰ करणें; पाडणें). ३ (शाप.) लवणजाम्ल. (इं.) म्युरिअ/?/टिक अॅसिड. -पदाव ११. ॰धारी-पु. दोन शिंपले एकावर एक बसून झालेली शंखाकार कवचघटना. -प्राणिमो ९२. [सं. शंखधृ] ॰ध्मा-पु. १ (शंख वाजविणारा) (ल.) उद्धट, आडदांड माणूस. २ निरक्षर; शंखोबा. [सं. शंख + ध्मा = वाजविणें] ॰ध्वनी-पु. १ शंखाचा आवाज. २ दुःखोद्रेकामुळें बोंबलणें; बोंब; पांचजन्य. 'पायाला चटका लागतांच त्यानें शंखध्वनि केला' -अस्तंभा १७१. ॰निवासी-वि. शंखांत रहाणारा (प्राणी). ॰पुष्पी-स्त्री. एक- प्रकारचें गवत; विष्णुक्रांता [सं.] ॰भस्म-न. शंखापासून केलेलें रसायन; हें शूळनाशक आहे. शंखाचें प्राणिद. -संयोग १.५६. ॰मणि-पु १ शंखाचा मणि, मोती. २ (ल.) दिसण्यांत गोरागोमटा परंतु अक्कलशून्य मनुष्य. [सं.] ॰वाटिका-वटी- भस्म-स्त्री. शंखापासून केलेलें एक औषध. हें संग्रहणी व शूल यांवर देतात. [सं.] ॰वणी-न. १ शंखांतील पाणी (देवावर घालण्यासाठीं). २ स्वच्छ, निर्मल पाणी. ३ (ल.) पाणी घातलेलें दूध, ताक, दहीं इ॰. ताकवणी पहा. ॰शिरोमणि-पु. मूर्ख; ठोंब्या; अक्कलशून्य मनुष्य. 'सर्व पिढींत शंखशिरोमणि किंवा फार विद्वान एकादाच निघतो.' ॰स्फुरण-न. १ शंख- नाद. २ (ल.) बोंब; आरडाओरड. 'लल्लाट पिटोनि करतळें । शंखस्फुरणें करीतसे ।' -मुहरिचंद्राख्यान (नवनीत पृ. १९७). 'हा जेणें करी शंखस्फुरण' -एभा २३.५३५. शंखावाती- स्त्री. बोंब. 'न पेरितां जाण शेती । शिमग्यावीण शंखावाती ।' -मुरंश ८०. शंखासारखें-वि. स्वच्छ; निर्मळ. 'ह्या टांक्याचें पाणी शंखासारखें आहे !' शंखासुर-पु. १ एका दैत्याचें नांव. २ एक फुलझाड. ३ त्या फुलझाडाचें फूल; राजतुरा. शंखा- हुली-स्त्री. एक वेल. हीस 'सांखवेल' म्हणतात. शंखपुष्पी पहा. -वगु ५ ७८. शंखिनी, शंखीण-स्त्री. १ स्त्रियांच्या चार जातींपैकीं एक; उंच, सडक केसांचीं, तामसी व कामुक स्त्री. २ (निंदार्थी) थोडें दूध देणारी गाय. ३ गोगलगाय. शंखो- दक-न. देवांच्या मूर्तींवर शिंपडण्याचें शंखांतील पाणी. [सं.] शंखोला-पु. शंखाचा एक प्रकार. -भूशास्त्र ५३. शंखोबा-पु. ठोंब्या; मूर्ख मनुष्य, शंखध्मा पहा. शंख्या-पु. १ शंखोबा. २ अक्काबाईचें बाळ; अपयशी माणूस; कमनशिबी माणूस. शंख्यासोमाल-सोमलांत एक भेद.

दाते शब्दकोश

काम

न. १ गोष्ट; कार्य; व्यापार; कृत्य. २ धंदा; उद्योग; हातीं घेतलेला व्यवसाय. 'तुमच्या मुलाला काय काम आहे?' ३ क्रिया; कृति करण्याचा व्यापार. 'कर्माचें काम सरे । विरमे मन ।' -ज्ञा ७.१७७. ४ सामान्यतः कोणताहि व्यवहार, बाबत; 'या कामांत माझा एक वांटेकरी आहे.' ५ गरज; प्रसंग; प्रयोजन. 'सध्यां मला चाकूचें काम नाहीं.' ६ उपयोग; पात्रता; उपयुक्तता; सोईस्करपणा. 'हें हत्यार त्याच्या कामास पडेल.' [सं. कर्म; प्रा. कम्म; सिं. कमु; हिं. गु. काम; सीगन कम] (वाप्र.) ॰काढणें- १ सपाटून त्रास देणें; मन मानेल तसें वाग- विणें; सतावणें; छळणें. २ (ल.) खोड मोडणें; कुंठित करणें; नक्षा उतरणें; खरडपट्टी काढणें; जेरीस आणणें. ३ ठार मारणें. 'सन १८७३ सालीं होन्याकोळ्यानें बंड केलें व मारवाड्यांचें काम काढलें.' -गुजा ५९. ॰चोरणें-अंग राखून, कुचराईनें रेंगाळत, काम करणें. ॰नसणें-निरुपयोगी, निष्फळ होणें; (एखाद्या वस्तूची) गरज नसणें. ॰बजावणें-करणें; पार पाडणें; तडीस नेणें. ॰मनावर घेणें-१ महत्वाचें समजणें; किंमत देणें. २ करण्याविषयीं उद्युक्त होणें; कळकळीनें झटणें. ॰साधणें-वाटेल तें झालें तरी काम तडीस नेणें, संपविणें, पुरें करणें. कामात काम करून घेणें-उकरणें-मोठें काम चाललें असतां त्याच्या साधनांनीं त्याच जातीच्या लहानशा प्रकारचें काम साधून घेणें. 'कामांत काम भज मना राम ।' -मांत पडणें-१ एखाद्या कामांत, धंद्यांत, व्यवसायांत भाग घेणें, पत्करणें. २ पराभूत होणें; अयशस्वी होणें (उद्योगांत, धंद्यांत). -मांत पाणी शिरणें- व्यवहारांत, धंद्यांत तोटा होणें. -मांतून जाणें-निरुपयोगी होणें. -मा नये-(काव्य) उपयोगी नाहीं. -मा येणें-उपयोगी पडणें. 'सहदेव मात्र कामा आला करि विक्रम प्रकाम रणीं ।' -मोकर्ण ३८.३१. 'तुला कामा येतील वेल्हाळे ।' -र १२. -माला येणें-१ पत्करणें; सहन केलें जाणें. 'तूं अशा रीतीनें वागलास तर तें माझ्या कामाला येणार नाहीं.' २ उपयोगी पडणें. 'कठिण समय येतां कोण कामासि येतो?' -र १०. -माला-स येणें-लढाईंत स्वामीकार्यार्थ मरण येणें. -मावर पडणें-१ उपयोगी होणें. २ योग्य होणें; बरोबर असणें (कृति, रीत, काम इ॰). कामीं असणें-१ (व.) कामावर असणें. २ नोकर असणें. -मीं येणें-कामाला-स येणें पहा. 'गोखल्यांच्या निशाणाभोंवतीं पांचशें वीर कामीं आले.' -विवि. १०.१०.२२९. -मीं लावणें-१ उपयोग करणें. २ वेठीस धरणें. म्ह॰ १ (क.) काम करत्या बैलाला मारणें = ऐकणा- रालाच पुन्हां पुन्हां काम सांगणें. २ (गो.) काम केल्यावर दान दिवप = काम केल्यावर दाम (मजुरी) देणें. ३ खांदा देऊन काम करणें = झटून, मनःपूर्वक काम करणें. ४ कामांत भट पडणें = काम बिघडणें. ५ कामापुरता मामा, ताकापुरती आजी (गरज सरो वैद्य मरो याअर्थी) काम साधून घेण्यापुरतें गोड गोड बोलणें. (सामाशब्द) ॰करी-पु. मजूर; हेलकरी; नोकर. [सं. कर्म + कर] ॰करी वर्ग-पु. मजुरांचा समुदाय; मजूर लोक. ॰करी संघ- पु. मजुरांचें मंडळ; मजुरांची संस्था; जूट. ॰कर्दा-पु. कार्यकर्ता. 'बहुकामकर्दा म्हणावी शहाणा ।' -दावि १४७. ॰काज-न. लहानमोठें काम; कोणतेंहि काम, धंदा. ॰कारभार-पु. कोर्ट- कचेरींतील किंवा सरकारी कामकाज. ॰गत-स्त्री. १ कामगिरी; उद्योग; करावयाचें काम. 'म्यां घरची कामगत पत्करली.' २ मजुरांचा मेळा. ॰गार-पु. १ सरकारी नोकर (मंत्री, चिट- णीस, एखाद्या दर्जाचा अधिकारी). 'राजसे समस्त सुरवर । ते तंव माझे कामगार ।' -कथा ३.४.१९. २ सामान्यतः वरिष्ठ प्रतीचा मजूर (कारखान्यांतील). ३ कार्यकर्ता. 'कामगार आणि आंगचोर । येक कैसा ।' -दा १२.७.२९. [कर्मकार] ॰गिरी-गारी-स्त्री १ कामधंदा; करावयाचें काम; उरकावयाचें काम. २ काम उरकणें, करणें; बजावणी; ३ कारागिरी; करामत. 'कामगारी व्हावयाची असल्यास त्याप्रमाणें नायब खानगी कारभारी यास कळवून...' -कलावंतखातें (बडोदें) ४२. ४ विशेष काम. [काम + फा. गिरी] ॰चलाऊ-वि. तात्पुरता उपयोगी पडणारा; वेळ मारून नेतां येण्यासारखा; खपण्या- सारखा; साधारण. ॰चुकार-रू-चुकवू-व्या-वि. कामाची टोलवाटोलवी करणारा; सोंगाड्या; कुचराई करणारा; चुकार- तट्टू, अंगचोर. ॰चोरपणा-पु. अंगचोरी. 'त्यांच्यांत काम- चोरपणा अधिक असता तर ते खात्रीनें अधिक काळ जगले असते. -विचारविलास १०८. ॰जोड-वि. कामांत तत्पर; कामांत गढलेला (क्वचित प्रचार पण दामजोड = पैशाकडे दृष्टि असणारा, याच्या विरुद्ध हा शब्द योजतात). ॰झोड्या-वि. सपाटून काम करणारा; ओबडधोबडपणें काम संपविणारा; दडपून काम करणारा. [काम + झोडणें] ॰ठ-ठा-नस्त्री. दुकान; व्यापार. 'तेव्हां कर्ता रिगे कामठां । कर्तुत्वाच्या ।' -ज्ञा १८.३५८. २ (व.) कारखाना; यंत्र; टांकसाळ. 'गांवाखातीये औधे मिळौनि कामठा घालिती ।' -चक्रधर सिद्धांतसूत्र ८९. 'गुणत्रयाच्या पडतें । कामठां जे ।' -ज्ञा १५.४८०. [कर्म + स्थान] ॰ठ-वि. (राजा.) उद्योगी; मेहनती. [कर्मठ] ॰दार पु. सरकारी नोकर; अधिकारी; अंमल- दार. ॰धंदा-कामकाज पहा. ॰बोध-पु. कामोद नांवाचा एक- राग; राग पहा. ॰लाट्या-वि. कसें तरी करून काम उरकविणारा (मजूर). [काम + लाटणें] ॰वट-न. १ कामकरी; मजूर. 'येक भाणवसीं कामवटें ।' -उषा ७.७३. २ कौशल्य. 'कीं विश्वकर्म्याचें कामवट । खांब सोडविले निघोट ।' -कालिका पुराण ६.१८. ॰साधु वि. आपमतलबी; स्वार्थी; स्वतःचें तेवढें काम करून घेणारा. ॰सू-वि. नेहमीं काम करणारा; कष्टाळु; काम करण्यांत पटाईत; उद्योगी; व्यासंगी. [कर्मशूर-कामसूअ-कामसू-भाइ १८३४.] कामाकार-पु. अंकितपणा. 'आणि ज्ञानाचेनि कामा- कारें ।' -ज्ञा १६.६०. -माचा-वि. १ उपयुक्त; कामाला उपयोगी पडणारा (पदार्थ, माणूस) २ कामांत गुंतलेला (ज्याला कामधंदा आहे असा); उद्योगी; रिकामा नव्हे तो. -माचा गाडा -पु. १ येईल तें काम करणारा माणूस; मेहनतीचें काम करणारा पुरुष. २ भरपूर काम. (क्रि॰ ओढणें.) -माचा जड-वि. आळशी; मंद; धिम्मा; सुस्त. -मारा-री-रें-पुन. कामकरी; सेवक; दास; दासी; चाकर. 'माझी होतील कामारीं ।' -ज्ञा १६. ३५३. 'वेद तयाचे सेवक । विधिविवेक कामारी ।' -एभा ७.१११. 'नाना उपचारीं । सिद्धी वोळगती कामारी ।' -तुगा २७८. जेआचिये घरींचीं कामारी ।' -दाव २७८. 'जैसी ते कामारी दासी पाहें ।' -ब ४६९. 'लागले लक्षावधि कामारी ।' -कृमुरा ६१.१०६. [कर्मकार-री] -मारीपण-न. सेवावृत्ति; दास्यत्व. 'इया कामारिपणें भुक्ति मुक्ति । देती भाविक जनांसि ।' -स्वानु १०.१.८.

दाते शब्दकोश

पाय

पु. १ (शब्दशः व लक्षणेनें) पाऊल; पद; चरण. ईश्वर, गुरु, पति, धनी इ॰स उद्देशून विनयानें म्हणतात. 'मला तरी हे पाय सोडून राहिल्यानें चैन का पडणार आहे ?' -कोरकि २०. २ तंगडी. ३ कंबरेपासून तों खालीं बोटापर्यंतचा सर्व भाग; चालण्यास साधनभूत अवयव. ४ (ल.) पायाच्या आकाराची, उपयोगाची कोणतीहि वस्तु. (पलंग, चौरंग, खुर्ची, टेबल, पोळपाट इ॰चा) खूर. ५ डोंगराचा पायथा, खालचा, सपाटीचा भाग. ६ अक्षराचा किंवा पत्राचा खालचा भाग. ७ झाडाचें मूळ. ८ चवथा भाग; चतुर्थांश; चरण; पाद. ९ शिडीची पायरी; पावका; पायंडा. १० (ल.) कारण; लक्षण; चिन्ह; रंग. 'मुलाचे पाय पाळण्यांत दिसतात.' [सं. पाद; प्रा. पाअ; सिं. पाओ, पाय; फा. पाए; हिं. पाव] (वाप्र.) ॰उचलणें-भरभर चालणें; न रेंगाळणें. ॰उतारा-र्‍यां आणणें-येणें-नम्र करणें, होणें; तोरा, अभिमान कमी करणें, होणें. ॰काढणें-१ निघून जाणें; निसटणें; नाहींसें होणें. 'वैराग्यलहरीचा फायदा घेऊन पन्हाळ- गडावरून रातोरात पाय काढला.' -भक्तमयूरकेकावली पृ. ३. २ (व्यवहारांतून) अंग काढून घेणें. ॰कांपणें-घाबरणें; भिणें; भीति वाटणें; भयभीत होणें. ॰खोडणें-खुडणें-खुडकणें- निजतांना पाय अंगाशीं घेणें. ॰खोडणें-मरणसमयीं पाय झाडणें, पाखडणें. ॰घेणें-प्रवृत्ति होणें; इच्छा होणें. 'त्या कामाला माझा पाय घेत नाहीं.' ॰तोडणें-(ल.) एखाद्याच्या कामांत विघ्न आणणें. ॰दाखविणें-दर्शन देणें; भेट देणें. 'तो मज दावील काय पाय सखा ।' -मोविराट ६.११८. ॰देणें- १ पायाचा भार घालून अंग चेपणें. २ तुडविणें; उपद्रव देण्या- साठीं, कुरापत काढण्यासाठीं एखाद्याला पायानें ताडन करणें. ३ पाय लावणें; पायाचा स्पर्श करणें. ॰धरणें-१ पायां पडणें; शरण जाणें; विनंति करणें; आश्रयाखालीं जाणें. २ अर्धांगवायु इ॰ रोगांनीं पाय दुखणें. ॰धुवून-फुंकून टाकणें-ठेवणें- (ल.) मोठ्या खबरदारीनें, काळजीनें वागणें; मागें-पुढें पाहून चालणें, वागणें. ॰धुणें-१ संध्यावंदनादि कर्मापूर्वीं किंवा बाहेरून आल्याबरोबर पादप्रक्षालन करणें. २ कोणाची पूजा वगैरे कर- तांना, आदरसत्कारार्थ त्याचे पादप्रक्षालन करणें. ३ (बायकी) (ल.) लघवी करणें; मूत्रोत्सर्गाला जाणें; (मूत्रोत्सर्जनानंतर हात- पाय धुण्याची चाल बायकांत रूढ आहे त्यावरून). ॰न ठरणें- सारखें हिंडणें; भटकत रहाणें; विश्रांति न मिळणें; पायाला विसावा नसणें. ॰निघणें-मुक्त होणें; मोकळें होणें; बाहेर जाणें. पडणें. 'ह्या गांवांतून एकदां माझा पाय निघो म्हणजे झालें.' -विवि ८.११.२०९. ॰पसरणें-१ अधिकार प्रस्थापित करणें; पूर्णपणें उपभोग घेणें; अल्प प्रवेश झाला असतां हळूहळू पूर्ण प्रवेश करून घेणें. २ मरणें (मरतांना पाय लांब होतात यावरून). 'शेवटीं म्हातार्‍या आईपुढें त्यानें पाय पसरले.' म्ह॰ १ भटास दिली ओसरी, भट हातपाय पसरी. २ अंथरूण पाहून पाय पसरावेत. ॰पसरून निजणें-निश्चिंत, आळशी राहणें; निरुद्योगी असणें. ॰पोटीं जाणें-भयभीत होणें; अतिशय भीति वाटणें. निजलेला मनुष्य भीतीनें हातपाय आंखडून घेतो यावरून. 'जंव भेणें पाय पोटीं गेले नाहीं ।' -दावि १६०. ॰फांलटणें-पाय झिजवणें; पायपिटी करणें; तंगड्या तोडणें; एखादें काम करण्यासाठीं कोठें तरी फार दूरवर किंवा एकसारखें पायानें चालत जाणें. 'कांहीं लाभ नसतां उगींच पाय फांसटीत चार कोस जातो कोण ?' ॰फुटणें- १ विस्तार पावणें; वाढणें. 'पहिल्यानें तुझें एक काम होतें, नंतर दुसरें आलें, आतां तिसरें. आणखी त्याला किती पाय फुटणार आहेत कोणास ठाऊक ?' २ हळूच नाहींसा होणें; चोरीला जाणें (वस्तु). ३ थंडीच्या योगानें किंवा जळवातानें पाय भेगलणें, चिरटणें. ॰फोडणें-भलतीकडे नेणें; विषयांतर करणें; मुद्याला सोडून अघळ- पघळ बोलणें; फाटे फोडणें. ॰भुईशीं(ला)लागणें-१ (एखाद्या कामास) कायमपणा येणें; निश्चितपणा येणें. २ जिवावरच्या संकटांतून वांचणें. ॰मोकळा करणें-होणें १ अडचणींतून बाहेर पडणें, काढणें. २ फेरफटका करणें; पायांचा आंखडलेपणा नाहींसा करणें, होणें. ॰मोडणें-१ पायांत शक्ति नसणें. २ निराशेमुळें गलितधैर्य होणें; निराश होणें. 'माझा भाऊ गेल्यापासून माझे पाय मोडले.' ३ एखाद्याच्या कामांत हरकत आणणें; धीर खचविणें; मोडता घालणें; काम करूं न देणें. ४ (नगरी) एखाद्या मुलाच्या पाठीवर त्याच्या मातेस कांहीं दिवस जाणें; गरोदर राहणें. 'नरहरीचे पाय मोडले कां ?' (त्याच्या पाठीवर कांहीं दिवस गेले आहेत काय ?) ॰येणें-चालतां येणें; (लहान मूल) चालूं लागणें. ॰रोवणें- स्थिर, कायम होणें. ॰लागणें-पाय भुईशीं लागणें पहा. (वर) ॰येणें-प्रतिबंध, अडचण होणें, येणें. पोटावर पाय येणें = उदर- निर्वाहाचें साधन नाहीसें होणें. ॰वरपणें-ओरपणें-(कर.) चिंचपाण्यांच पाय बुडवून ते तापलेल्या तव्यावरून ओढणें व पुन्हां चिंचपाण्यांत बुडविणें, याचप्रमाणें पांच दहा मिनिटें सारखें करीत रहाणें (डोळ्यांची जळजळ यासारखा विकार नाहींसा होण्यावर हा उपाय आहे). [ओरपणें पहा] ॰वळणें-१ दुसरी- कडे प्रवृत्ति होणें; मुरडणें; वळले जाणें (प्रेम इ॰). २ वातविकारानें पायांत वेदना उत्पन्न होणें; पाय तिडकूं लागणें; गोळे येणें. ॰वाहणें-एखाद्या स्थलीं जाण्याचा मनाचा कल, प्रवृत्ति होणें. ॰शिंपणें-(मुलाला पायावर घेऊन दूध पाजण्यापूर्वीं स्वतः) पाय धुणें. 'ते माय आगोदर पाय शिंपी ।' -सारुह १.५३. ॰शिवणें-पायांस स्पर्श करणें; पायाची शपथ वाहणें. पायां- खालीं तुडविणें-१ दुःख देणें; क्लेश देणें छळ करणें. २ कस्पटाप्रमाणें मानणें; मानहानि करणें. पायाचा गू पायीं पुसणें-(ल.) कोणत्याहि घाणेरड्या गोष्टीची घाण जास्त वाढूं न देतां तिचा ताबडतोब बंदोबस्त करणें. पायांचा जाळ-पायांची आग-पायांचें पित्त मस्तकास जाणें-अतिशय रागावणें; क्रोधाविष्ट होणें; संतापणें. पायांची बळ भागविणें-व्यर्थ खेपा घालणें, फिरणें; निरर्थक कार्यास प्रवृत्त होणें. पायांजवळ येणें-(आदरार्थीं) एखाद्याकडे जाणें, येणें, भेटणें. पायानें जेवणें-खाणें-अत्यंत मूर्ख, वेडा असणें, होणें. पायानें लोटणें-तिरस्कार करणें; अवहेलना करणें. 'म्हणतो युधिष्ठिर नको पायें लोटूं मला अवनतातें ।' -मोउद्योग ८.१८. पायां पडणें-पायांवर डोकें ठेवणें; नमस्कार करणें; विनविणें; याचना करणें. 'उत्तर म्हणे नको गे ! पायां पडतों बृहन्नडे ! सोड !' -मोविराट ३.७४. पायांपाशीं पाहणें-जवळ असेल त्याचाच विचार करणें; अदूरदृष्टि असणें; आपल्याच परिस्थितीचा, आपल्या- पुरताच विचार करणें. पायांपाशीं येणें-पायाजवळ येणें पहा. पायांला-त, पायांअढी पडणें-(म्हातारपणामुळें) चालतांना एका पायाला दुसरा पाय घासणें. पायांला खुंट्या येणें- एकाच जागीं फार वेळ बसल्यानें पाय ताठणें. पायां लागणें- पायां पडणें. 'मीं पायां लागे कां । कांइसेयां लागीं ।'- शिशु २२४. पायांवर कुत्रीं-मांजरें घालणें-(ल.) अतिशय प्रार्थना व विनवण्या करून एखाद्यास कांहीं काम करावयास उठ- विणें. पायांवर घेणें-मूल जन्मल्यावर त्यास स्वच्छ करण्यासाठीं न्हाऊं घालणें व जरूर तें सुईणीचें काम करणें. पायांवर नक्षत्र पडणें-सदोदित फिरत असणें; एकसारखे भटकणें; पायाला विसांवा नसणें. 'काय रे, घटकाभर कांहीं तुझा पाय एका जागीं ठरेना, पायावर नक्षत्र पडलें आहे काय ?' पायांवर पाय टाकून निजणें-चैनींत व ऐटींत निजणें. पायांवर पाय ठेवणें-देणें- एखाद्याच्या पाठोपाठ जाणें; एखाद्याचें अनुकरण करणें. पायांवर भोंवरा असणें-पडणें-एकसारखें भटकत असणें; भटक्या मारणें. पायावर नक्षत्र पडणें पहा. पायावर हात मारणें- पायाची शपथ घेणें. -नामना ११०. पायाशीं पाय बांधून बसणें-एखाद्याचा एकसारखा पिच्छा पुरवून कांहीं मागणें. पायांस कुत्रें बांधणें-(ल.) शिव्या देत सुटणें; भरमसाट शिव्या देणें; फार शिवराळ असणें. पायांस पाय बांधणें-एखाद्याच्या संगतींत एकसारखें रहाणें. पायांस भिंगरी-भोंवरा असणें- पायांवर भोंवरा असणें पहा. पायांस-पायीं लागणें-नमस्कार करणें; पायां पडणें. 'तूं येकली त्वरित जाउनि लाग पायीं ।' -सारुह ८.११२. पायांस वहाण बांधणें-बांधलेली असणें-एकसारखें भटकत राहणें; पायपीट करणें. पायीं-क्रिवि. १ पायानें; पायाच्या ठिकाणीं. 'भूपें हळूच धरिला कलहंस पायीं' -र १०. [पाय] २ मुळें; साठीं; करितां. 'काय जालें देणें निघालें दिवाळें । कीं बांधलासि बळें ऋणेंपायीं ।' -तुगा ८४५. (कुण.) 'कशापायीं' = कशाकरतां; कां. पाईं. [सं. प्रीतये; प्रीत्यर्थ] पायीं बांधणें-(हत्ती इ॰च्या पायाशीं बांधणें या शिक्षेवरून) हानि, पराभव करण्यास तयार असणें. आपले पाय माझ्या घरीं लागावे-(आदरार्थीं ल.) आपण माझ्या घरीं येऊन मला धन्य करावें. आपल्या पायांची धूळ माझ्या घरीं झाडावी- (नम्रपणाचें आमंत्रण) माझ्या घरीं आपण यावें. आपल्या पायांवर धोंडा पाडून-ओढून घेणें-आपलें नुकसान आप- णच करून घेणें; आपल्या हातांनीं स्वतःवर संकट आणणें; विकत श्राद्ध घेणें. एका पायावर तयार-सिद्ध असणें-अत्यंत उत्सुक असणें. 'बाजीराव शिपाई आहेत तसा माही आहें. त्यांच्याप्रमाणेंच हा प्रतिनिधि योग्य प्रसंगीं पाहिजे त्या मोहिमेवर जाण्यास एका पायावर सिद्ध आहे.' -बाजीराव. घोड्याच्या- हत्तीच्या पायीं येणें आणि मुंगीच्या पायीं जाणें- (आजारीपण, संकट, बिकट परिस्थिति इ॰) ही येतांना जलदीनें येतात पण जावयास दीर्घकाळ लागतो. याच्या उलट श्रीमंतीबद्दल म्हणतात. चहूं-दोहें पायांनीं उतरणें-(शिंगरू, वांसरूं, पाडा इ॰नीं) चार किंवा दोन पांढर्‍या पायांसह जन्मणें. जळता पाय जाळणें-एखाद्या कामांत, व्यवहारांत, व्यापारांत नुकसान होत असतांहि तो तसाच चालू ठेवणें. त्या पायींच-क्रिवि. ताबड- तोब; त्याच पावलीं. भरल्या पायांचा-(रस्त्यांत चालून आल्या मुळें) ज्याचे पाय (बाहेरून आल्यामुळें धुळीनें वगैरे) घाणेरडे झाले आहेत असा. 'तूं भरल्या पायांचा घरांत येऊं नकोस.' भरल्या पायांनीं, पायीं भरलें-क्रिवि. बाहेरून चालून आल्यावर पाय न धुतां; घाणेरड्या पायानीं. (बाहेरच्या दोषासह; स्पृष्टा- स्पृष्टादि दोष किंवा भूतपिशाच्चादि बाधा घेऊन). 'मुलाच्या जेवणाच्या वेळेस कोणी पायीं भरलें आलें भरलें आलें म्हणून आज हें मूल जेवीत नाहीं.' 'ज्या घरीं बाळंतीण आहे त्यांत एकाएकीं पायीं भरलें जाऊं नये.' मागला पाय पुढें न घालूं देणें-(ल.) केलेली मागणी पुरविल्याशिवाय पुढें पाऊल टाकूं न देणें; मुळींच हालूं न देणें. मागला पाय पुढें न ठेवणें-मागितलेली वस्तु दिल्याशिवाय एखाद्यास सोडावयाचें नाहीं, तेथून जाऊं द्यावयाचें नाहीं असा निश्चय करणें. मागील पाय पुढें नाहीं पुढील पाय मागें नाहीं-हट्टीपणा; करारीपणा; ठाम निश्चय; जागच्या- जागीं करारीपणानें ठाव धरून बसणें याअर्थीं उपयोग. मागल्या पायीं येणें-एखादें काम करून ताबडतोब परत येणें; त्याच पावलीं परत येणें. म्ह॰ १ पाय धू म्हणे तोडे केवढ्याचे ? २ पाय लहान मोठा, न्याय खरा खोटा. ३ पायांखालीं मुंगी मर- णार नाहीं (निरुपद्रवी माणसाबद्दल योजतात). ४ (व.) पायावर पाय हवालदाराची माय = आळशी स्त्रीबद्दल योजतात. ५ पायींची वहाण पायींच छान-बरी (हलक्या मनुष्यास फाजील महत्त्व देऊं नये या अर्थीं). 'मज पामरा हें काय थोरपण । पायींची वहाण पायीं बरी ।' -तुगा ५३५. ६ हत्तीच्या पायांत सग- ळ्यांचे पाय येतात. सामाशब्द- ॰आंग-न. (व.) गर्भाशय. ॰उतार-रा-पु. नदींतून पायीं चालत जाण्यासारखी वाट. 'एर्‍हवी तरी अवधारा । जो दाविला तुम्हीं अनुसारा । तो पव्ह- ण्याहूनि पायउतारा । सोहपा जैसा ।' -ज्ञा ५.१६५. -वि. १ पायांनीं ओलांडून जांता येण्याजोगा. २ पायीं चालणारा; पायदळ. 'आम्ही गाडदी लोक केवळ आम्ही पायउतारे.' -भाब १००. [पाय + उतार] ॰उतारां-रा-क्रिवि. पायीं; पायानें. (क्रि॰ येणें; जाणें; चालणें). 'पायउतारा येइन मागें पळभर ना सोडी ।' -सला २०. पायउतारा होणें-येणें-(ल.) शिव्यागाळी, भांडण करण्यास तयार होणें. ॰कडी-स्त्री. पायांतील बेडी. 'तुम्ही हातकड्या, पायकड्या घातल्या.' -तोबं. १२६. [पाय + कडी] ॰क(ख)स्त-स्त्री. पायपीट; एकसारखें भटकणें; वणवण; [पाय + कष्ट, खस्त] ॰कस्ता-पु. एका गांवीं राहून दुसर्‍या गांवचे शेत करणारें कूळ; ओवंडेकरी. 'दर गांवास छपरबंद व पायकस्ता देखील करार असे.' -वाडबाबा १.२२९. [फा. पाएकाश्त] ॰कस्ता, पायींकस्ता-क्रिवि. पायीं जाऊन; पायांनीं कष्ट करून; ओवं- ड्यानें. 'आसपास गांव लगते असतील त्यांनीं पायीं कस्ता शेतें करून लागवड करावी ...' -वाडबाबा २.८३. ॰काळा-पु. (कों.) (सामान्यतः) कुणबी; नांगर्‍या; शेतावरचा मजूर. [पाय + काळा] ॰खाना-पु. शौचकूप; संडास; शेतखाना. [फा. पाए- खाना] ॰खिळॉ-पु. (गो.) पायखाना पहा. ॰खुंट-खुंटी- पुस्त्री. जनावर पळून जाऊं नये म्हणून त्याच्या गळ्यास व पायास मिळून बांधलेली दोरी, किंवा ओंडा; लोढणें. [पाय + खुंट, खुंटी] ॰खोळ-पु. लाथ. 'कां वैद्यातें करी सळा । रसु सांडी पायखोळां । तो रोगिया जेवीं विव्हळा- । सवता होय ।' -ज्ञा १७.१०१. २ शेतखाना ? [गो. पायखिळॉ] ॰खोळा-ळां-क्रिवि. पायतळीं; पायदळी. 'चंदन चढे देवनिढळा । येक काष्ठ पडे पायखोळा ।' -मुरंशु ३७९. ॰खोळणी-वि. शेतखान्याची ? 'जैसी पाय- खोळणी मोहरी । भरणाश्रय आमध्यनीरीं । तैसा द्रव योनिद्वारीं । म्हणोनि सदा अशौच ।' -मुरंशु ३५४. [गो. पायखिळॉ = शेतखाना] ॰गत-न.स्त्री. १ बिछान्याची पायाकडची बाजू; पायतें. 'सर- कारनें खडकवासल्याचें धरण बांधून आमच्या पायगतची नदी उशागती जेव्हा नेऊन ठेवली...' -टि २.१७४. २ (डोंगर, टेंकडी, शेत इ॰चा) पायथा; पायतरा. ३ पलंग, खाट यांचें पायांच्या बाजूकडील गात. [पाय + सं. गात्र] ॰गत घेणें-बाज इ॰च्या पायगतच्या दोर्‍या ओढून बाज ताठ करणें, ताणणें. ॰गम-पु. (व.) पाया; पूर्वतयारी; पेगम पहा. 'आधीं पासून पायगम बांधला म्हणजे वेळेवर अशी धांदल होत नाहीं.' ॰गुण-पु. (पायाचा गुण) एखाद्याचें येणें किंवा हजर असणें व त्यानंतर लगेच कांहीं बर्‍यावाईट गोष्टी घडणें यांच्यामध्यें जोडण्यांत येणारा काल्पनिक कार्यकारणसंबंध; बरेंवाईट फळ; शुभाशुभ शकुन. हातगुण शब्द याच अर्थाचा पण थोडा निराळा आहे. एखाद्या माणसाचें काम, कृत्य यांशीं हातगुणाचा संबंध जोडतात. 'धनाजीला नौकरीला ठेवल्यापासून हंबीरराव पुनः पूर्वींच्या वैभवाला चढले, आणि धनाजीचा हा पायगुण समजून त्याला प्यार करूं लागले.' -बाजीराव १२७. ॰गुंता-पु. अडचण; आड- काठी; अडथळा; पायबंद. पायगोवा पहा. 'दिल्लीस गेले आणि तिकडेच राहिले तर मग यत्न नाहीं. यास्तव समागमें पायगुंता विश्वासराव यास द्यावें' -भाव १०७. 'हीं मायेचीं माणसं स्वारींत जवळ असलीं कीं पायगुंता होतो.' -स्वप ४८. [पाय + गुंतणें] ॰गोवा-पु. १ पायगुंता; एखाद्या जुंबाडांत पाय अडकल्यामुळें होणारी अडचण; पायामुळें झालेली अडवणूक. २ (ल.) अडचण; अडथळा; नड; हरकत; आडकाठी; अटकाव. 'निरोपण सुपथीं आडथळा । पायगोवा वाटे सकळा ।' -मुसभा. २.९५. 'देवधर्म तीर्थ करावयास चिरंजीवाचा पायगोवा होईल यैसे आहे' -पेद ९.११. ३ शत्रूच्या सैन्याला पिछाडीकडून अडविणें. [पाय + गोवणें] ॰घड्या-स्त्रीअव लग्नांत वरमाय व मानकरिणी यांना त्यांच्या जानवास घर पासून वधूमंडपीं आणतांना त्यांच्या रस्त्यवर आंथराव- याच्या पासोड्या (मोठ्या सत्काराचें चिन्ह). पायघड्या घाल- ण्याचें काम परिटाकडे असतें. 'वाजंत्री पायघड्याशिरीगिरी विहिणी चालती ।' -वसा ५३ [पाय + घडी] ॰घोळ-वि. पायापर्यंत पोंचसें (वस्त्र.). 'कौसुंभरंगी पातळ । नेसली असे पायघोळ ।' -कथा १.११.११२. -क्रिवि. दोन्ही पाय झाकले जातील असें (नेसणें) पायांवर घोळे असें. [पाय + घोळणें] ॰चंपा-स्त्री. पाय चेपणें; सेवेचा एक प्रकार. 'हातदाबणी, पाय पी, विनवणी, चोळणी इत्यादि प्रकार करण्याचे अपूर्व प्रसंग जुन्या लोकांच्या परिचयाचे नव्हते असे ते सांगतात.' -खेया २८. [पाय + चंपी = चेपणीं] ॰चळ-पुस्त्री. अशुभ, अपशकुनी पाऊल. पायगुण; कोणत्याहि कार्याचा बिघाड, विकृति, संकटाची वाढ इ॰ होण्याचें कारण रस्त्यावरून जाणारा एखादा अपशकुनी माणूस किंवा भूत असें समजतात; पायरवा. [पाय + चळ] ॰चाल- स्त्री. पायानें चालणें, चालत जाणें; चरणाचाल. 'कीं येथ हे हळुच चालत पायचाली ।' -सारुह ८.१४४. [पाय + चाल] ॰चाळ- पु. १ विनाकारण केलेली पायांची हालचाल. २ (विणकाम) पायांच्या हालचालीमुळें हातमागास दिलेली चालना किंवा अशा रीतीनें चालणारा माग ३ अपशकुनी पायगुण; पायचळ. [पाय + चाळा] ॰चोरी-वि. धार काढतांना मागील पाय वर उचल- णारी (गाय, म्हैस इ॰). [पाय + चोरी] ॰ज(जा)मा-पु. विजार; तुमान; चोळणा; सुर्वार. [फा. पाएजमा] ॰जिभी- जिब-जीब-स्त्रीन. बारिक घागर्‍या असलेला पायांत घालण्याचा एक दागिना; तोरडी; पैंजण. वर्‍हाडांत अद्याप पायजिबा घालतात. 'सोन्याचें पायजिब तळीं ।' -राला ५६. [फा. पाएझेब्] ॰टा-पु. १ पायरी (शिडी, जिना इ॰ची). २ विहिरींत उतर- ण्यासाठीं केलेले कोनाडे किंवा बांधीव विहीरींत बांधकामाच्या बाहेर येतील असे पुढें बसविलेले जे दगड ते प्रत्येक; नारळाच्या झाडास वर चढतांना पाय ठेवण्यासाठीं पाडलेली खांच. ३ पाय- वाट; पाऊलवाट. ४ (ल.) वहिवाट; पायंडा; शिरस्ता; प्रघात. (क्रि॰ पडणें; लागणें; बसणें). ५ चाकाच्या परिघाचा प्रत्येक तुकडा, अवयव; पाटा. ६ (मोटेच्या विहिरीच्या) थारोळ्याच्या दोन्ही बाजूचे दगड, प्रत्येकी. [पाय + ठाय] ॰टांगी-स्त्री. (ना.) खालीं पाय सोडून बसतां येईल अशी योजना असणारी बैलगाडी. रेडू. [पाय + टांगणें] ॰ठ(ठा)ण-ठणी-नस्त्री. पायरी; पायटा पहा. 'हीं चार पांच चढुनी हळु पायठाणें ।' -केक २५. [सं. पदस्थान; म. पाय + ठाणें] ॰ठा-पु. १ चाकाच्या परिघाचा अव- याव; पाटा. २ (राजा.) सपाट जमीन भाजून तेथें नाचणी इ॰ पेरण्यासाठीं तयार केलेलें शेत. ३ ज्यांत मोटेचे सुळे, बगाडाचे खांब बसवितात ते विहिरींचे, भोंके पाडलेले दोन दगड. [सं. पदस्थ; पाय + ठेवणें] ॰त(ता)ण-न-न. (अशिष्ट.) १ जोडा; जुता; कुणबाऊ जोडा; पादत्राण. (सामा.) पायांत घालण्याचें साधन 'विठ्ठल चिंतण दिवसारात्रीं ध्यान । होईन पायतन त्याचे पायीं ।' -तुगा ११२७. 'स्त्रीपट चोरूनि पळे तेव्हां कैंचीं नळास पायतणें ।' -मोवन ४.१५५. २ (कों.) वाहाणा; चेपल्या. [सं. पादत्राण; प्रा. पायत्ताण] ॰बसविणें-(चांभारी धंदा) जोडा व्यवस्थित करणें. पायतर-पायतें पहा. ॰तरे-न. पायरी. 'एथ अग्नी हें पहिलें पायतरें । ज्योतिर्मय हें दुसरें ।' -ज्ञा ८.२२३. [पाय + थारणें] ॰तांदूळ-पुअव. (पायाखालचें तांदूळ) साधे, स्वच्छ तांदूळ निरनिराळ्या दोन पाटींत, शिपतरांत (ब्राह्मणेतरांत) किंवा पत्रावळींवर (ब्राह्मणांत) ठेवतात व त्यांवर नियोजित वधूस व वरास लग्नासाठीं उभे करितात. या तांदुळांवर उपाध्यायाचा हक्क असतो. पण ते बहुधां तो महारास देत. वधूवराच्या मस्तकावर तांदूळ, गहूं किंवा जोंधळे जे टाकतात, ते जे नंतर एकत्र करितात त्यांसहि पायतांदूळ असें म्हणतात. ह्या तांदुळांवर वेसकर-महाराचा हक्क असतो. [पाय + तांदूळ] ॰तर(रा)-ता-थर(रा)-था- पायतें-थें-पुन. १ बिछान्याची पायगताची बाजू. २ (टेंकडी, शेत, बगीचा इ॰ची) पायगत; पायतळची बाजू. [सं. पाय + थारणें; पादांत; म. पायतें] ॰थण-न-न. (विरू.) पायतण पहा. ॰थरी-स्त्री. (खा.) दुकानाच्यापुढें लांकडी किंवा दगडी तीन चार पायर्‍या असतात त्यांपैकीं प्रत्येक पायरी; पायटा. ॰दळ-न. पायानें चालणारी फौज; पाइकांचें सैन्य; पदाति. [पाय + दळ (सं. दल-सैन्य)] ॰दळ-ळीं-क्रिवि. जाण्यायेण्याच्या वाटेवर; पायानें तुडविलें जाईल असें (पडणें). 'फुलें कुसकरिलीं कुणिग मेल्यानें पायदळी तुडविलीं.' -उषःकाल १२८. ॰दळणीं-क्रिवि. पायाखालीं; पायदळीं. (कि॰ पडणें). [सं. पाददलन] ॰दान- न. (व.) तांग्याच्या, बैलगाडीच्या मागच्या बाजूस पाय ठेवण्या साठीं केलेली जागा. [सं. पाद + दा = देणें, दान] ॰दामा-पु. १ पक्षी पकडण्याचें जाळें. २ फूस लाविणारा पक्षी; ससाणा. -मराचिथोशा ३३. [फा. पाय्दाम्; सं. पाद + दाम = दावें] ॰द्दाज-न. पाय पुसणें; पायपुसें; हें बहुतेक काथ्याचें केलेलें असतें. [पाय] ॰धरणी-स्त्री. १ पायां पडणें; अत्यंत नम्रतेची, काकुळतीची विनवणी; पराकाष्ठेचें आर्जव. 'कशीहि पायधरणी मनधरणी करा- वयास तयार झालो.' -भक्तमयूरकेका प्रस्तावना १६. [पाय + धरणी] ॰धूळ-स्त्री. १ पायाची, पायास लागलेली, धूळ. 'नाचत बोले ब्रीदावळी । घेऊन लावी पायधुळी ।' -दा २.७.४१. २ स्वतःबद्दल दुसर्‍याशीं तुलना करतांना, बोलतांना (गुरु, इ॰कांजवळ) नम्रता- दर्शक योजावयाचा शब्द. [पाय + धूळ] (एखाद्यावर) ॰धूळ झाडणें-(एखाद्याच्या घरीं) आगमन करणें; भेट देणें; समाचार घेणें (गौरवार्थीं प्रयोग). 'मज गरिबावर पायधूळ झाडीत जा.' 'जगीं जरी ठायीं ठायीं पायधूळ झाडुन येई ।' -टिक ५. ॰पायखळी-स्त्री. पाय धुणें. 'तयापरी जो अशेषा । विश्वा- चिया अभिलाषा । पायपाखाळणिया देखा । घरटा जाला ।' -ज्ञा १८.६५१. [सं. पादप्रक्षालन; प्रा. पायपक्खालण; म. पाय + पाखाळणी] ॰पाटी-पांटी-स्त्री. लग्नाच्या वेळीं पायतांदुळांनीं भरलेली पांटी, शिपतर इ॰. [पाय + पांटी] ॰पा(पां)टीचे तांदूळ-पुअव. पायतांदूळ पहा. ॰पिटी-पीट-स्त्री. विनाकारण चालण्याचे श्रम; वणवण; इकडे तिकडे धांवाधांव. 'बहु केली वणवण । पायपिटी झाला सिण ।' -तुगा २००. [पाय + पिटणें] ॰पुसणें, ॰पुसें-न. पायपुसण्यासाठीं दाराशीं ठेविलेली काथ्याची जाड गादी; पायद्दाज; पायपुसण्याचें साधन. (महानु.) पायें पुसणें. 'तया वैराग्याचें बैसणें । शांभव सुखाचें पायेंपुसणें ।' -भाए ८११. [पाय + पुसणें] ॰पेटी-स्त्री. हार्मोनियमचा एक प्रकार. हींत पायानें भाता चालविण्याची योजना केली असल्यानें दोन्ही हातांनीं पेटी वाजवितां येते. याच्या उलट हातपेटी. [पाय + पेटी] ॰पैस-(व.) पाय टाकण्यास जागा. [पाय + पैस = प्रशस्त] ॰पोश-स-पु. (ल.) जोडा; वहाण; चप्पल; पादत्राण. 'सालाबादप्रमाणें ऐन जिन्नस पायपोसाचे जोडच यापासून घेत जाणें.' -दा २०१२. [फा. पाय्पोश्; सं. पाद + स्पृश्] ॰पोस- जळाला, गेला-तुटला-कांहीं पर्वा नाहीं, हरकत नाहीं, शष्प गेलें याअर्थीं वाक्प्रचार. 'एका महारुद्राची सामग्री राधाबाई काय लागेल ती पुण्याहून माळशिरसास पाठवील न पाठवील तरी आमचा पायपोस गेला ! तीन महारुद्र करून आम्हींच श्रेय घेऊं.' -ब्रप २७३. ॰पोस मारणें-मानहानि करणें; निर्भर्त्सना करणें. ॰पोस दातीं धरणें-अत्यंत लीन होऊन क्षमा मागणें; याचना करणें; आश्रय घेणें. ॰पोसासारिखें तोंड करणें-फजिती झाल्यामुळें तोंड वाईट करणें; दुर्मुखलेलें असणें. कोणाचा पाय- पोस कोणाच्या पायांत नसणें-गोंधळ उडणें (पुष्कळ मंडळी जमली असली आणि व्यवस्था नसली म्हणजे ज्याचा जोडा त्याला सांपडणें मुष्किल होतें त्याजवरून). ॰पोसखाऊ-वि. खेटरखाऊ; हलकट; अत्यंत क्षुद्र; निर्लज्ज (मनुष्य). [पाय + पोस + खाणें] ॰पोसगिरी-स्त्री. जोड्यांनीं मारणें; दोन पक्षांतील व्यक्तींनीं केलेली जोड्यांची मारामारी; जोडाजोडी. (क्रि॰ करणें; मांडणें; चालणें). [फा.] ॰पोसपोहरा-पु. जोड्याच्या आका- राचा विहिरींतून पाणी काढण्याचा पोहरा. [पायपोस + पोहरा] ॰पोसापायपोशी-स्त्री. परस्परांतील जोड्यांची मारामारी; जोडाजोडी; पायपोसगिरी. ॰पोशी-स्त्री. दर चांभारापासून दर- साल एक जोडी नजराणा घेण्याचा पाटील-कुलकर्णीं इ॰चा हक्क. ॰पोशी-वि. पायपोसाच्या डौलाचें, घाटाचें बांधलेलें पागोटें. ॰पोळी-पुस्त्री. १ (तापलेली जमीन, खडक, वाळू इ॰वरून चालल्यामुळें) पाय भाजणें. २ (ल.) मध्याह्नीची वेळ. ३ जमी- नीची तप्तावस्था; जमीन अतिशय तापलेली असणें. 'एव्हां पाय- पोळ झाली आहे संध्याकाळीं कां जाना ?' [पाय + पोळणें] ॰फळें-न. (राजा.) ओकतीच्याजवळ पाय देण्यासाठीं बस- विलेली फळी. [पाय + फळी] ॰फोडणी-स्त्री. १ घरीं रोग्यास पहाण्याकरितां आल्याबद्दल वैद्यास द्यावयाचें वेतन; वैद्याच्या भेटीचें शुल्क. २ पायपोळ. [पाय + फोडणें] ॰फौज-स्त्री. (गो.) पाय- दळ. [पाय + फौज] ॰बंद-पु. १ घोड्याचे मागचे पाय बांध- ण्याची दोरी. 'एक उपलाणी बैसले । पायबंद सोडूं विसरले ।' -जै ७६.६०. २ अडथळा; बंदी. 'इंग्रज व मोंगल यांस तिकडे पायबंद जरूर पोंचला पाहिजे.' -वाडसमा १.१६. ३ (फौजेच्या पिछाडी वर) हल्ला करून व्यत्यय आणणें. 'रायगडास वेढा पडला, आपण पायबंद लावावा म्हणजे ओढ पडेल. रायगडचा वेढा उठेल.' -मराचिथोशा ३४. ४ संसाराचा पाश. [फा. पाएबंद्] ॰बंद लावणें-लागणें-घालणें-देणें-पडणें-आळा घालणें, बसणें; व्यत्यय आणणें, येणें; अडथळा, बंदी असणें, करणें. 'भलत्या आशा व आकांक्षा यांना इतिहासदिशास्त्रांकडून पायबंद पडेल.' -विचावि ५२. 'निजामाला पायबंद लागणें शक्यच नाहीं.' -भाऊ (१.१) २. ॰भार-पु. पायदळ. याच्या उलट अश्वभार, कुंजरभार, रथभार इ॰ 'अश्वरथ कुंजरा । गणित नाहीं पाय- भारां ।' -कथा १.२.५९. [पाय + भार] ॰मर्दी-स्त्री. भरभर ये जा करणें; चालणें; धांवाधांवी, धांवपळ करणें; एखाद्या कामा- वर फार खपणें. 'पायमर्दी केली तेव्हां काम झालें .' (क्रि॰ घेणें; करणें). [फा. पाएमर्दी = धैर्य; निश्चय] ॰मल्ली-म(मा)ली- मेली-स्त्री. १ सैन्य, गुरें इ॰नीं केलेली देश, शेत इ॰ची नासाडी; पायांखालीं तुडविणें; नासधूस; तुडवातुडव. 'आपले सरकारची फौज मलक महमदखान वगैरे गेले आहेत त्यांनीं पायमाली केली आहे.' -दिमरा १.१५०. २ शत्रूनें आपला मुलुख लुटला असतां, तहांत त्याच्या कडून त्या लुटीबद्दल घेण्यांत येणारा दंड किंवा खंडणी. (सामा.) मोबदला; भरपाई. 'सर्व आमचे कर्ज सरकारांतून कारभारी देतील तेव्हां काय पायमल्ली दहापांच लक्ष रुपये (वजा) घालणें ती घालावी.' -ख ९.४८५४. 'शेतकर्‍यांस नुकसानीदाखल पायमली देण्यांत येत असते.' -हिंलइ १७४. ३ (ल.) दुर्दशा; अपमान; हेटाळणी; अवहेलना. (क्रि॰ करणें; होणें). 'आमच्या भाषेची अशी पायमल्ली व्हावी हा मोठा चमत्कार नव्हे काय ?' -नि ११३ ४ नाश; नुकसान. 'महादजी गदाधर यांनीं दरबारची जुनी राहटी राखिली नाहीं, याजमुळें पायमाली आहे.' -रा ८.२०१. [फा. पाएमाली; सं. पाद + मर्दन; म. पाय + मळणें] ॰मळणी-स्त्री. सारखी चाल, घसट, वहिवाट; एकसारखें चालणें वहिवाट ठेवणें. 'जो रस्ता सध्यां बिकट व अडचणीचा वाटतो तोच पुढें पाय- मळणीनें बराच सुधारेल.' -नि. ४२९. [पाय + मळणें] ॰मांडे- पु. (काव्य.) पायघड्या पहा. 'विषयसुख मागें सांडे । तेचि पायातळीं पायमांडे ।' -एभा ८.६. -वेसीस्व १०.१९. ॰मार्ग- पु. १ पायवाट; पाऊलवाट. २ जमीनीवरचा रस्ता; भूमिमार्ग; खुष्कीचा मार्ग. ह्याच्याउलट जलमार्ग. ॰माल, पामाल-वि. पायमल्ली केलेला, तुडविला गेलेला; उध्वस्त; नष्ट. [फा. पाएमाल्] ॰मोजा-पु. पायांत घालावयाचा विणून तयार केलेला पिशवी- सारखा कपडा. हा पाऊस, थंडी, वारा यांपासून पायाचा बचाव करण्यासाठीं वापरतात. [पाय + मोजा] ॰मोड-स्त्री. १ प्रवासाला निघालेल्या किंवा चालत असलेल्या मनुष्यास जाऊं न देणें. २ अशी केलेली थांबवणूक; थांबवून ठेविलेली स्थिति. [पाय + मोडणें] ॰मोडें-न. १ (कों.) उत्साहभंग, अडथळा करणारी गोष्ट; (हातीं घेतलेल्या किंवा घ्यावयाच्या कामांत) एखाद्याचा उत्सा- हाचा, आशांचा बींमोड; तीव्र निराशा. २ आयुष्यांतील अडचणी अडथळें, संकटें इ॰ वाढत्या व्यवहाराची गति कुंठित होण्यास निमित्त. 'हें पोर अमळ चालूं लागलें म्हणजे खोकला, पडसें अशीं अनेक पायमोडीं येतात.' [पाय + मोडणें] ॰मोडें घेणें- (हातीं घेतलेल्या कार्यापासून) भीतीनें पारवृत्त होणें. ॰रव-पु. वरदळ; वहिवाट; दळणवळण; पायंडा. पैरव पहा. 'आणीकही एक पहावें । जें साधकीं वसतें होआवें । आणि जनाचेनि पायरवें मैळेचिना ।' -ज्ञा ६. १७२. -स्त्री. १ पायतळ; पायदळ; पाय ठेवण्याची जागा. 'रावण जंव भद्रीं चढे । तवं मुगुट पायरवीं पडे ।' -भारा बाल ७.५. २ (राजा.) चाहूल; सांचल. ३ पाय- वाट; रस्ता. ४ प्रवेश. 'प्रथम चाकरीस येतों म्हणून नम्रतेनें पायरव करून घेतली' -ऐटि १.२९. ५ दृष्ट; नजर; बाहेरवसा; भूतबाधा; पायरवा; पायचळ पहा. 'करंज्यांस पायरव लागून लागलीच सरबत झालें.' -कफा ४. ६ पायगुण. 'घरांत आल्या- बरोबर लागलेंच करंजांचें सरबत झालें. काय हा पायरव !' -कफा ४. ७ पैरव पहा. [सं. पाद + रव; पाय + रव; हिं. पैरव] ॰रवा- पु. १ पायरव; शिरस्ता; पायंडा. 'त्या माणसाचा येथें येण्याचा पायरव आहे.' २ पायचळ; दृष्ट लागणें. 'विहिरीवर तुझी मूल तिनीसांजची गेली होती तेथें तिला बाहेरचा पायरवा झाला.' -वेड्यांचा बाजार. ॰रस्ता-पु. १ पायवाट. २ जमीनीवरचा रस्ता, पायमार्ग. [पाय + रस्ता] ॰रहाट-पु. (अल्पार्थी) रहाटी-स्त्री. पायानें पाणी लाटण्याचा रहाट; रहाटगाडगें. [पाय + रहाट] ॰रावणी-स्त्री. पायधरणी; विनवणी, रावण्या पहा. 'देवकी बैसविली सुखासनीं । लागल्या वाजंत्राच्या ध्वनी । विंजणें वारिती दोघीजणी । पायरावणीं पदोपदीं ।' -एरुस्व १६.३२. [पाय + रावण्या] ॰लाग-पु. १ गुरांच्या पायांस होणारा एक रोग. हा गुरांच्या तोंडावर व पायांवर परिणाम करितो. २ स्त्रियांना होणारी पिशाचबाधा. (एखाद्या स्त्रीकडून भूत पायीं तुडविलें गेल्यास तें तिला पछाडतें अशी कल्पना आहे). [पाय + लागणें] ॰वट-स्त्री. १ रहदारीचा रस्ता आहे असें दाखविणार्‍या पावलांच्या खुणा; पावलांच्या खुणा. २ पायगुण. 'नेणों कोणाचा पायवट जाहला । एक म्हणती समय पुरला । एक म्हणती होता भला । वेनराव ।' -कथा ६.५.९१. [पाय + वठणें] ॰वट-(प्र.) पायवाट पहा. ॰वट-टा-पु. (महानु.) पाय; पायाच्या शिरा; (टीप-ओहटळ पांचाहि मुख्य शिरांचा सांगातु ऋ ८८). 'समसा गुल्फाचा उंचवटा । श्रीप्रभुचिया पायवटा ।' -ऋ ८८. ॰वणी-न. चरणों- दक; चरणतीर्थ; ज्या पाण्यांत एखाद्या ब्राह्मणानें किंवा पवित्र विभूतीनें पावलें बुडविलीं आहेत किंवा धुतलीं आहेत असें पाणी. 'करितां तापसांची कडसणी । कवणु जवळां ठेविजैल शूलपाणी । तोहि अभिमानु सांडूनि पायवणी । माथां वाहे ।' -ज्ञा ९.३७२. 'कोणी राम देखिला माजा । त्याचें पायवणी मज पाजा ।' [पाय + वणी- पाणी] ॰वाट-स्त्री. १ पाऊलवाट; पायरस्ता. 'तिकडे जय; तुज देतिल मेरूचे पायवाट आजि कडे ।' -मोभीष्म ११.४५. २ जमीनीवरचा, खुष्कीचा मार्ग; भूमिमार्ग. याच्या उलट जलमार्ग. 'समुद्रावरी सैन्य ये पायवाटें ।' -लोपमुद्रा वामन-नवनीत १०८. [पाय + वाट] ३ (गो.) पालखी देवालयांत शिरण्यापूर्वीं धोब्या- कडून घालण्यांत येणारा धुतलेला पायपोस. ॰वाट करणें-उत- रून, ओलांडून जाणें. 'पायवाट केले भवाब्धी ।' -दावि ३३०. 'भवसिंधु पायवाट कराल.' -नाना १३५. ॰शिरकाव-पु. १ प्रवेश मिळवणें. २ मिळालेला प्रवेश. [पाय + शिरकाव] ॰शूर-वि. चालण्याच्या, वाटेच्या कामीं अतिशय वाकबगार; निष्णात. 'कोळी लोक कंटक व पायशूर असल्यानें त्यांना जंगलांतील वाट ना वाट माहीत असते.' -गुजा ६०. ॰सगर-पु. (खा. व.) पायवाट; पाऊलवाट; पायरस्ता. [पाय + संगर = लहान वाट] ॰सर-पु. पायरी; पाय ठेवण्याची (जिना इ॰ची) जागा, फळी. [पाय + सर = फळी] ॰सूट-वि. चपळ; चलाख; भरभर चालणारा [पाय + सुटणें] ॰सोर-पु. (गो.) पायगुण. ॰स्वार-वि. (उप.) पायीं चालणारा; पादचारी; पाईक. [पाय + स्वारी] पायाखायला-वि. (कों.) (पायांखालील) सापांची भीति, उपद्रव असलेलें (अरण्य, रस्ता). पायाखायलें-न. १ (कों.) फुरसें; साप. २ सर्पदंश. पायाखालची वाट-स्त्री. नेहमीं ज्या वाटेनें जाणें येणें आहे अशी वाट; अंगवळणी पडलेली वाट. पायाचा-वि. पायदळ (शापाई). 'पायांचे भिडतां । तोडिति जानिवसे जे ।' -शिशु १०४५. पायाचाजड-वि. १ हळुहळु चालणारा; मंदगतीनें चालणारा. २ चांगलें चालतां न येणारा. पायाचा डोळा-पु. घोटा. पायाचा नक्की कस-पु. (मल्लविद्या) एक डाव. आपला पाय जोडीदाराच्या बगलेंतून जोडीदाराच्या मानेवर घालून मान फिरवून मानेवर घातलेल्या पायाच्या पंजानें मानेस दाब देऊन मारणें, किंवा चीत करणें. [पाय + कसणें] पायाचा नरम-वि. (बायकांप्रमाणें मऊ पाय असलेला) षंढ; नपुंसक. पायांचा पारवा-पु. (पारव्याप्रमाणें गति असलेला) जलद, भरभर किंवा पुष्कळ चालणारा मनुष्य पायाचा फटकळ-वि. लाथा मार- णारें, लाथाड (जनावर) पायाचा हुलकस-पु. (मल्लविद्या) जोडादारानें खालीं येऊन आपला एक पाय धरला असतां आपला दुसरा पाय जोडीदाराच्या बगलेंतून घालून आपल्या पायाच्या पंजानें त्याच्या कोपराजवळ तट देऊन आपला दुसरा हात त्याच्या बगलेंतून देऊन जोडीदाराचा हात आपल्या पायाच्याअटीनें धरून तो पाय लांब करून हातानें काढिलेला कस जास्त जोरानें मुरगळून चीत करणें. पायाची करंगळी-स्त्री. पायाच्या बोटां- पैकीं सर्वात लहान असलेले शेवटचें बोट. पायांची माणसें- नअव. पायदळ. 'पायाच्या माणसांची सलाबत फौजेवर.' -ख ३५९४. पायाची मोळी-स्त्री. (मल्लविद्या) एक डाव. (मागें पाय बांधून गड्यास मारणें याला मोळी म्हणतात). जोडीदाराचा एक पाय उचलून आपल्या माडीच्या लवणीत दाबून ठेवावा. दुसर्‍या हातानें जोडीदाराचा दुसरा पाय धरून जोडीदाराच्या दोन्ही पायांस तिढा घालून मुरगळून मारणें. पायांचे खुबे- पुअव. पाठीच्या कण्याच्या खालच्या बाजूकडील वेडावाकडा, बळकट आणि घट्ट असा हाडाचा सांगाडा. -मराठी ६ वें पुस्तक (१८७५) २५३. पायाचें भदें-न. अनवाणी चालून पायांस खडे वगैरे बोचून पाय खरखरीत होणें; पायाची खराबी; पाय खडबडीत होणें. 'चालतांना पायांचें भदें होऊं नये म्हणून पाव लांकरिता कातड्याचें वेष्टण तयार करण्याचें काम....' -उषा- ग्रंथमालिका (हा येथें कोण उभा). पायांच्या पोळ्या-स्त्रीअव. तापलेल्या जमीनीवरून चालल्यामुळें पोळलेले पाय; पायपोळ. (क्रि॰ होणें, करून घेणें). पायांतर-न. पायरी. [पाय + अंतर] पायापुरती वहाण कापणारा-वि. कंजुष; कृपण; कवडीचुंबक; अतिशय जपून खर्च करणारा. पायां पैस-स्त्री. पायापुरती मोकळी जागा. (अगदीं गर्दी, दाटी संबंधीं वापरतांना प्रयोग). [पाय + पैस (अघळपघळ, मोकळी)] पायींचा पारवा-पु. पायांचा पारवा पहा.

दाते शब्दकोश

वारा

पु. १ वात; चलित वायु; हवा; न दिसणारें परंतु स्पर्शास समजणारें पंचमहाभूतांतील एक तत्त्व. -ज्ञा १५.३७६. २ (ल.) वीरश्री; स्फुरण. 'शिंद्यांना भरला वारा ।' -संग्रामगीतें ७३. ३ संचार; अंगांत येणें. 'कंपु नोहे आंगी वारा । जगदंबेचा ।' -ऋ ६५. [सं. वा = वाहणें] (वाप्र.) ॰घालणें-पंखा, चवरी वगैरे साधनानीं हवेस चलन देऊन वारा लागेल असें करणें. ॰घेणें- खाणें-पिणें-१ (वासरें वगैरे) मोकाट सैरावैरा पळूं लागणें; उड्या मारूं लागणें. २ (ल.) निर्बंध झुगारून देऊन स्वैर वर्तन करणें; मोकाट सुटणें; अद्वातद्वा वागणें. 'स्वरूप तुमचें पाहून पापिणी जीव आमचा प्याला वारा ।' -होला १०२. 'तेणें करून रांगडे बहुत वारा प्याले ।' -पेद २१.१७७. ॰न घेणें किंवा न पडूं देणें-अगदीं अलिप्त, दूर राहणें; किंचितहि संबंध न येऊं देणें; संसर्ग टाळणें. ॰पडणें-वारा वहावयाचा बंद होणें. ॰पिणें-१ वारा घेणें पहा. २ दुःखी, उदासीन, उत्साहहीन, खिन्न, उद्विग्न होणें. ॰फिरणें-मत बदलणें; स्थिति पालटणें. ॰मोकळा करणें- सोडणें-अपानवायु सोडणें; पादणें. ॰मोकळा होणें, सरणें- अपानवायु सुटणें; पश्चिमद्वारें वायु बाहेर पडणें; पादणें. 'वारा सरतां मोठी फजीति ।' -दा १८.१०.२०. ॰वाजणें-वारा वाहणें; जोराचा गार वारा सुटणें. 'वारा वाजतां करपती ओलीं पिकें ।' -दा ९.८.२९. ॰वाजेल-वाहील तशी पाठ करावी- ओढवावी, द्यावी, वारा पाहून पाठ द्यावी, वारावाहेल तसें करावें-पाठीवर घ्यावा-१ वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर जावें, वारा बाहील त्या दिशेनें जावें, वाऱ्याच्या अनुरोधानें जहाज हांकरावें. २ (ल.) वेळ पडेल तसें, प्रसंग ओळखून वागावें. ॰होणें-वाकाहक होणें. 'हळहळ बहु झाली होय संसार वारा ।' -सारुह ३.७३. वाजता वारा लागूं न देणें-किंचितहि त्रास न सोसणें; स्वतःस अणुमात्र तोशीस लागूं न देणें; अजीबात त्रास टाळणें. वाऱ्याचा उपद्रव-पु. १ हवेंतील फरकामुळें होणारी पीडा, बाधा. २ पटकीची साथ. वाऱ्याचा बुंद-पु. हवेचा अल्पांश; किंचित्हि वायुचें वाहणें; बारीकशी झुळूक (बहुधा नास्तिपक्षी ). वाऱ्याची मोट-स्त्री. (ज्याप्रमाणें वारा एका गाठोड्यांत बांधणें अशक्य त्याप्रमाणें) परस्परांपासून दूर व भिन्न अशा अनेक वस्तु अथवा व्यक्ति एकत्र आणण्याची व ठेवण्याची क्रिया; अनिर्बंध वस्तूंचें एकत्रीकरण. (हें अशक्यप्राय असतें) ॰बांधणें-क्रि. अशक्य गोष्ट करूं जाणें. वाऱ्याचें घोडें-न. (वाऱ्यानें चालणारें) जहाज; गलबत; नौका. वाऱ्याबरोबर- शीं भांडणें-अतिशय भांडखोरपणा करणें; लसते कलह उकरून काढणें. वाऱ्याला लाथा मारणें-निष्फळ काम करणें. वाऱ्या वर टाकणें-अजिबाद सोडून देणें; टाकून देणें; पूर्णपणें त्याग करणें; हयगय, दुर्लक्ष करणें. वाऱ्यावर भारे बांधणें-मनोराज्य करणें. वाऱ्यावर वरात भुसावर चिठी-भूसपर ठेंगा- बेजबेबदारीचें, निष्काळजीचें काम (वरात म्हणजे पैसा देण्या- विषयीं चिठ्ठी. ती वाऱ्यावर देणें म्हणजे कांहीं तरी करणें); ताळ- मेळ नसलेली गोष्ट करणें. वाऱ्यावर सरणें-१ कुठें तरी भट- कणें; वहावत जाणें; कांहीं तरी भरमसाट बोलत सुटणें. २ अवखळ होणें; आडदांडपणा करणें; स्वैर वागणें. वाऱ्यावशीं-वाऱ्या- सोई-वाऱ्याबाग-क्रिवि. वाऱ्याच्या गतीच्या अनुरोधानें; प्रवाहाबरोबर; प्रवाहाच्या दिशेनें. वाऱ्यास उभा न करणें-राहूं न देणें-न राहणें-स्वतःपासून दूर ठेवणें; संबंध न ठेवणें; संसर्ग टाळणें. वाऱ्यास देणें-उपणणें; वारवणें; वारसंडणें. सामाशब्द- वारापाणी-न. १ वारा व पाणी यांच्या सुलभतेमुळें क्षुल्लकत्व दर्शक दुर्लक्षित, उपेक्षित स्थिति; अवहेलना; उपेक्षा; हेटाळणी; किर- स्कार; हेळसांड. 'मी बोलतों याचें उगीच वारापाणी करून टाकूं नको.''झालें वारापाणी वज्र तव भयेंचि देव कां पावे ।' -मोअश्व १.१०६. २ -नस्त्री. निरवानिरव; वारासार; फेड; भागवा- भागवी (कर्ज-वाम वगैरेची). ३ निरास; निवारण; अनिष्ट निर- सन. ४ हवापाणी; मोकळी स्वच्छ हवा; एखाद्या ठिकाणचें हवा- मान; आबहवा. 'चार दिवस वारापाणी खा मग बरा होशील.' [वारा + पाणी] वारें-न. १ वारा; विशेषतः वाहणारा, हलणारा वारा. २ साथ; प्रसार; प्रादुर्भाव (रोग वगैरेचा). उदा॰ पटकीचें वारें; खोकल्याचें वारें. (क्रि॰ चालणें; वाहणें; वाजणें; सुटणें). 'वारीं रोग्याची वाजतीं ।' -दावि ३७७. ३ संचार; अंगांत येणें; पिशाच्चबाधा. (क्रि॰ येणें; भरणें.) 'अंगीं घेऊनियां वारें दया देती । तयां भकतांहातीं चाट आहे. ।' -तुगा २८४२. 'वारें निराळें बोलें । देहामध्यें भरोनि डोले ।' -दा ९.८.२२. ४ झांक; छटा; चर्या; सूरत; गुणसमुच्चय. (विशिष्ट गोष्टीकडे कल, आवड, विशिष्ट बौद्धिक सामर्थ्य, कौशल्यदर्शक). 'कारकुनीचें वारें.' ५ लहर; लाट; ऊर्मि; प्रवृत्ति; कल. उदा॰ प्रीतीचें-ममतेचें-रागाचें- शोकाचें-आनंदाचें-वारें. ६ जोम; उत्साह; सामर्थ्य; आनुवंशीक ओज, तेज, रग वगैरे. उदा॰ तारुण्याचें-बळाचें-शक्तीचें- वारें. 'हिंदुलोकांत स्वातंत्र्याचें वारें कसें तें माहित नाहीं.' -नि. 'अंगीं भरलें नूतन वारें ।' -विक ३. ७ सामान्यतः एखादी चम- त्कारिक कल्पना, वेड, खूळ वगैरे. 'सुधारणेचें वारें महाराजांच्या डोक्यांत शिरलें' -टिले ४.३३६. ८ स्पर्श; वास. 'एका राज्य- व्यवस्थापकानें राज्यास संपत्तीचें वारें लागूं नयें म्हणून कडक कायदे केले.' -नि ५४. ९ अंश; भाग. 'त्यातलें बिलकुल वारें ऐन साठीच्या अंमलातहि प्रस्तुत ग्रंथकाराचे ठिकाणीं आढळत नाहीं.' -नि. १० आविर्भाव; देखावा; आव; अवसान. 'चोरा- पुढें त्यानें पहिलवानगिरीचें वारें अंगीं आणण्याचा प्रयत्न केला.' ११ अर्धांगवायु; पक्षपात. 'वारीं अंगावरून जातीं ।' -दा ९.८. २९. ॰फिरणें-बदल होणें; पालटणें; वर्तणूक निराळीं होणें. 'गोविंदरावास नोकरी लागल्यापासून सखूबाईचें वारें फिरलें.' ॰लागणें-संसर्ग होणें; संगति लागणें; संबंध येणें. 'संपत्तीचें वारें आजपर्यंत कसें तें मुळींच लागलें नाहीं असे देश पृथ्वीवर पुष्कळ आहेत.' वारें सुटणें-परिस्थिति, वातावरण उत्पन्न होणें. 'कायदे- भंगाचें हिंदुस्थानांत वारें सुटलें.' -के १२.७.३०. ॰सूत्र-न. (गो.) पिशाच्चाचा फेरा. वारेघशीं-क्रिवि. उघड्यावर; वाऱ्या- वर; हवेवर. 'रसाची घागर तुळशीपाशीं उतरलीं व वारेघशीं ठेविली.' -खरादे ६९. वारेमाप-क्रिवि. १ प्रमाणाबाहेर; भलती- कडेच; बेअंदाज; बेछूट. २ बेताल; असंबद्ध; विसंगत; अद्वातद्वा (बोलणें, भाषण). वारेलग-क्रिवि. वाऱ्याच्या प्रवाहांत, झोतांत. 'कां वारेलगें पांखिरूं । गगनीं भरे ।' -ज्ञा १३.३१४. वारे- हळक-वि. वारा लागून वाळलेलें; वाऱ्यावर टाकून वाळलेलें.

दाते शब्दकोश

हात

पु. १ हस्त; बाहु; खांद्यापासून बोटांपर्यंत शरीराचा भाग. कोपरापासून बोटांपर्यंतचा भाग. २ कोपरापासून मधल्याबोटाच्या टोकापर्यंतचें माप. 'हा पंचा साडेचार हात भरला.' ३ उजवी किंवा डावी बाजू, तरफ. 'आमचें घर वाड्याचे उजव्या हातास आहे.' ४ ताबा; आटोका; अधिकार; खातें. 'तुझें काम करणें माझ्या हातीं नाहीं.' (कारक विभक्तींत प्रयोग). ५ स्वतः व्यक्तिगत मनुष्य. 'अपराधावांचून शिवी देणें हें माझ्या हातानें घडणार नाहीं.' ६ स्वामित्व; कबजा; मालकी; ताबा. 'साप्रंत माझ्या हातीं पैसा नाहीं.' ७ हातानें वाजविण्याच्या वाद्यावर मारलेली हाताची थाप. ८ डाव; खेळ (काठी, लाठी, पट्टा इ॰ शस्त्रांचा). 'पट्ट्याचे दोन हात करून दाखव.' ९ कर्तृत्वशक्ति; अंग; हस्तकौशल्य (एखाद्या विषयांतील, कलेंतील). 'त्याचा चित्र काढण्याचा हात चांगला आहे.' १० कुलुपाची किल्ली; चावी. 'कुलवाचा हात इकडे दे बघूं.' ११ सोंगट्या, पत्ते इ॰ खेळांतील डाव, खेळण्याची पाळी, खेळ; खेळणारा गडी. 'अजून आमच्यांतील एक हात खेळवयाचा आहे.' १२ हस्तक; मदतनीस; साहाय्यक; हाताखालचा मनुष्य. १३ ज्यावर दंड, जोर काढावयाचे तो लांकडी, दगडी ठोकळा; हत्ती १४ (रंग देणें, सारवणें इ॰ कामीं) वरून हात फिरविणें; हातानें दिलेला थर, लेप. १५. ठोंसा; तडाखा; हस्तक्रिया (भिन्नभिन्न प्रसंगीं त्या त्या अर्थांनीं) १६ (तेली-घाणा) कातरीस जोडलेला वांकडा लाकडी तुकडा. १७ हात टेकावयासाठी, हातानें धरावयाचा कोणताहि पदार्थाचा भाग. 'खुर्चींचे-रहाटाचे-हात. १८ हाताच्या आका- राची कोणतीहि वस्तु. १९ (सोनेरी) हातांतील दागिना सैल करण्याचें एक हत्यार. २० (नृत्य) दोन हातांनीं मिळून करा- वथाचे अभिनयाचे प्रकार. हे ४० प्रकारचे आहेत. २१ (शिंपी) कापड मोजण्याचें बारा तसूंचें एक माप; गज. २२ पान्हा (नट- बोलट फिरविण्याचा). [सं. हस्त; प्रा. हत्थ; हिं. गु. हाथ; ब. हात; आर्में. जि. हथ, अथ; पॅलेस्टाईनजि. हस्त; पोर्तुंजि. बस्त] म्ह॰ १ हात ओला तर मैत्र भला-नाहींतर पडला अबोला- जोपर्यंत माणूस दुसर्‍यास देत असतो तोंपर्यंत त्याच्याशीं सगळे मित्रत्वानें वागतात. २ हात घशांत घातला तरी कोरडाच = कितीहि मदत केली तरी बेइमान राहणारा. ३ हातपाय रोड्या, पोट लोड्या; हातपाय काड्या, पोट ढेर्‍या = पोटाचा तटतटीतपणा व अवयवांचा रोडकेपणा. ४ हात फिरे तेथें लक्ष्मी फिरें, तोंड फिरे तेथें अवदसा फिरे = उद्योगी माणसाचा हात श्रीमंती आणतो तर नुसत्या बडबड्याच्या हातून कांहींच होत नाहीं उलट दारिद्र्य येतें. ५ आपला हात जगन्नाथ (जगन्नाथपुरीस आपल्या हातानें वाटेल तेवढा प्रसाद घेतां येतो त्यावरून) वाटेल तेवढें व तसें घेणें; प्राचुर्य. ६ हातचें सोडून पळत्याचे पाठीस लागूं नये = जें खात्रीनें आपलें आहे (आपणांस मिळावयाचेंच आहे) तें सोडून जें अनिश्चित आहे तें मिळविण्याच्या नादीं लागूं नये. ७ हातच्या कांकणास आरसा कशाला ? (हातांतील कांकण डोळ्यानें दिसण्या- सारखें आहे, आरसा आणणें वेडेपणा) = जी गोष्ट उघड सिद्ध आहे ती दाखविण्यास पुराव्याची जरूरी नाहीं. ८ हातपाय र्‍हावलें काम करूं वायले = नाइलाज होणें. ९ हातपाय लुलें तोंड चुरचुरां चाले = अशक्त पण तोंडाळ, मुजोर माणूस. १० हातभर लांकूड नऊ हात ढलपी = अतिशयोक्ति करणें. ११ हातांत नाहीं अडका बाजारांत चालला धडका = जवळ कवडीं नाहीं पण डौल बादशहाचा. (वाप्र.) ॰आंखडणें-देण्यासाठीं पुढें केलेली वस्तु एकदम मागें घेणें; देण्याचें प्रमाण कमी करणें, बंद करणें. ॰आटोपणें-मारणें इ॰ हातांनीं करावयाची कोणतीहि क्रिया बंद करणें. ॰आवरणें-१ हात आटपणें. २ कोणत्याहि कृत्यापासून परावृत होणें. 'ऐकेल वचन माझें आवरिल द्वेषिकाळ हात रणीं ।' -मोकर्ण ४६.४४. ॰इचकणें-(व.) हात मोडणें. ॰उगारणें-उचलणें-(एखा- द्यास) मारावयास प्रवृत होणें. ॰उचलणें-१ स्वयंस्फूर्तीनें, आपण होऊन बक्षीस देणें. २ हातीं घेणें (काम, धंदा). ॰ओढविणें- १ घेण्यासाठीं झांप टाकणें. २ विटंबना, करण्यासाठीं तुच्छता दर्शविण्यासाठीं तोंडापुढें हात करणें. ॰ओंवाळणें-तुच्छता दर्शविणें. ॰करणें-१ लाठी मारणें; शस्त्राचा वार करणें. हात टाकणें. 'स्त्रीचे अंगावर हात करूं नये.' २ पट्टा, बोथाटी वगैरेचे डाव करणें; फिरविणें. ३ वादविवाद, युद्ध करणें. ॰कापून-देणें- गुंतणें-लेखी करारकरून स्वतःस बांधून देणें. ॰खंडा असणें- एखादें कार्य (हुन्नर) हमखास पार पाडण्याचें कौशल्य, पटाईत- पणा अंगीं असणें. ॰गहाण ठेवणें-उजवा हात देवास वाहून कोणत्याहि कामीं त्याचा उपयोग करावयाचा नाहीं असा नवस करणें. २ कोणत्याही कामास हात न लावणें. ॰घालणें-१ (एखादें काम) पत्करणें; करावयास घेणें. २ एखादी वस्तु घेणें, धरणें, शोधणें यासाठीं हात पुढें करणें. 'मग विभु वसनासी त्याचिया हात घाली ।' -आनंदतनय. ३ (एखाद्या कामांत, व्यवहांरांत) ढवळाढवळ करणें; आंत पडणें. ॰घेणें-(पत्त्यांचा खेळ) हुकूम मारून अगर भारी पान मारून दस्त करून घेणें. ॰चढणें-प्राप्त होणें. 'अनुताप चढविया हात । क्षणार्धं करी विरक्त ।' -एभा २६.२०. हाताचा आंवळा-मळ, हातचें कांकण-उघडउघड गोष्ट; सत्य. ॰चा मळ-अत्यंत सोपें कृत्य; हात धुण्यासारखें सोपें काम; अंगचा मळ. ॰चालणें-१ हातांत सत्ता, सामर्थ्य, संपत्ति असणें, मिळविणें, मिळणें. १ एखादी गोष्ट करतां येणें. 'कशिद्यावर माझा हात चालत नाहीं.' ॰चाल- विणें-हत्यार चालविणें (संरक्षणार्थ). 'न्यायाच्या अभावीं ज्याला त्याला हात चालवावेसें वाटणें रास्तच होईल.' -टि १. २२. ॰चेपणें-लांचाचे पैसे मुकाट्यानें एखाद्याचे हातांत देणें. ॰चोळणें-फार राग आला असतां तळहात एकमेकांवर घासणें; कुंठितगति होऊन स्वस्थ बसावें लागणें. 'शल्य सुयोधन वाक्यें कोपे चोळी करें करा...।' -मोकर्ण २१.१३. ॰जोडणें-१ नमस्कार, प्रार्थना, विनंति करणें. २ शरण जाणें, येणें. 'अपराध फार केले परि आतां हात जोडिले स्वामी ! ।' -मोआर्याकेका. ३ नको असलेला पदार्थ हात जोडून आर्जवानें दूर सारणें; अव्हे- रणें. 'दानश्री त्याहुनि बहु दुग्धासहि हात जोडितो मीन ।' -मोबृहद्द ८. ॰झाडणें-१ झिडकारणें; नापंसत ठरविणें. २ निराशेनें सोडून देणें. ३ एखादें काम उरकून मोकळें होणें. ॰टाकणें-१ पोहतांना पाण्यावर हात मारणें. २ (एखाद्यावर) प्रहार करणें; मारणें. 'बायकोमाणसाच्या अंगावर हात टाकणें तुम्हाला शोभत नाहीं.' ॰टेकणें-१ काम करण्यास असमर्थ असल्यानें पराभव पावल्याचें कबूल करणें. २ म्हातारपणानें अशक्त होणें. ३ दमणें; थकणें; टेकीस येणें. ॰तोडणें-स्वतःच्या लेखानें आपणांस बांधून घेणें. ॰थावरणें-हात आवरणें; आटो- पणें. '...थावरूनि हातरणीं ।' -मोस्त्री ६.५१. ॰दाखविणें- दावणें-१ हस्तसामुदिक जाणण्यासाठीं जोशापुढें तळहात करणें. २ अहितकारक परिणाम करणें. ३ स्वतःची शक्ति, सामर्थ्य दाख- विणें. 'शक्रादि देव असते तरि त्यांसहि दावितोंचि हात रणीं ।' -मोभीष्म ३.४. ४ नाडीपरीक्षा करण्यासाठीं वैद्यापुढें हात करणें. ५ हातानें एखादी वस्तु दर्शविणें. ६ बडवून काढणें; पारिपत्त्य करणें; सूड घेणें; उट्टें काढणें. म्ह॰ हात दावून अवलक्षण चिंतणें, करणें. ॰दाबणें-लांच देणें. 'त्यानें आपल्यास मदत करावी म्हणून त्याचे हात दाबावे असें एकदां मनांत येतें.' -विवि १०. ९ २१०. ॰देणें-१ मदत करणें; तारणें. 'घडतां अधःपतन मज पुण्यें देतिल न हात परिणामीं ।' -मोआदि १९.३२. २ चोरणें; उचलेगिरी करणें. ३ खाद्यापदार्थावर ताव मारणें. ४ (बायकी, छप्पापाणी) छप्पू घातलेल्या मुलीस इतर मुलीनीं (तिनें उठावें म्हणून) हस्तस्पर्श करणें. ॰धरणें-१ अडविणें; हरकत करणें; स्पर्धा करणें; बरोबरी करणें. २ लांच देणें. ॰धरून जाणें- विवाहित स्त्रीनें एखाद्या परपुरुषाबरोबर पळून जाणें; जाराबरोबर निघून जाणें. ॰धुणें-(ल.) एखाद्या कामांतून आपलें अंग काढून घेणें. ॰धुवून पाठीस लागणें-एखाद्या नाश करण्याविषयीं हट्टानें प्रवृत्त होणें; चिकाटी धरून एखाद्याचा पाठलाग करणें. ॰न बनणें-(व.) विटाळशी होणें; गुंता येणें. ॰नाचविणें-चेष्टा करण्यासाठीं दुसर्‍याचे तोंडापुढें हातवारे करणें. हात ओवाळणें पहा. ॰पडणें-१ एखादें काम अनेकांनीं लागून संपविणें; एखादा खाद्यपदार्थ अनेकांनीं एकसमयवच्छेनेंकरून फन्ना करणें. २ (ना.) जिवंतपणीं भेट नाहीं पण दहनापूर्वी तरीं प्रेताचें दर्शन होणें. ॰पसरणें-भीक मागणें. ॰पाय खोडणें-१ अवयव आंख- डणें; विव्हल होणें. २ एखाद्यास प्रतिबंध, अडचण करणें. ॰पाय गळणें-गाळणें-१ अशक्त होणें; रोडावणें. २ खचून जाणें; नाउमेद होणें; गलितधैर्य होणें. ॰पाय गुंडाळणें-१ अंत- काळच्या वेदनांनीं हातपाय आंखडणें; कियाशक्ति रहित होणें. २ हरकत, अडथळा करणें. ॰पाय चोळणें-१ सूड घेण्याची प्रतिज्ञा करणें; चरफडणें. २ रागानें तरफडणें; शिव्याशाप देणें. ॰पाय झाडणें-१ हातपाय गुंडाळणें अर्थ १ पहा. २ सुटकेसाठीं हातापायांचा उपयोग करणें. ३ धडपड करणें; चरफडणें. ॰पाय ताणणें-सुखानें, निष्काळजीपणानें हातपाय पसरून पडणें. ॰पाय धोडावप-(गो.) आटापिटा करणें. ॰पाय पसरणें- १ हातपाय गुंडाळणें अर्थ १ पहा. २ मर्यादेच्या, आटोक्याच्या बाहेर जाणें; जास्त जास्त व्याप वाढविणें; पसारा वाढविणें. म्ह॰ भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी. ३ काम होत नसल्यास सबबी सांगणें; कामांत आळस करणें (काम करीन असें वचन दिलें असतां). ४ मागणी वाढत जाणें, अधिकाधिक आक्रमण करणें. ॰पाय पाखडणें-अंतकाळच्या वेदनेनें, फार संतापानें हातपाय झाडणें. ॰पाय पांघरून-पोटाळून बसणें-आळशा- सारखें बसणें; जेठा मारून बसणें. ॰पाय फुटणें-१ उधळपट्टी सुरू होणें; संपत्तीला (जाण्यास) पंख फुटणें. 'दौलतीला अलीकडे हातपाय फुटुं लागले आहेत.' ३ लुच्चेगिर्‍या करण्यांत तरबेज होणें. २ थंडीनें हातपायास भेगा पडणें. ॰पाय फोडणें-लावणें- फुटणें-लागणें-१ मूळ गोष्टींत, अंदाजांत भर घालणें; वाढ विणें. २ नटविणें; थटविणें; अलंकृत करणें. ३ मागून वाढविणें (काम, दर, खर्च इ॰). ४ लबाड्या इ॰ नीं सजवून उजळून दाखविणें. ॰पाय मोकळे करणें-फेरफटाका करून हातपाय सैल, हलके करणें; फिरणें; सहल करणें. ॰पाय मोडणें-मोडून येणें-टाकणें-१ तापापूर्वीं अंग मोडून येणें; निरंगळी येणें. २ बलहीन, निःसत्त्व करून टाकणें; हरकत घेणें. ॰पाय सोडणें -अंतकाळच्या वेदनांनीं हातपाय ताणणें, ताठ होणें. ॰पाय हालविणें-उद्योग, परिश्रम, कष्ट इ॰ करणें; स्वस्थ न बसणें. ॰पोचणें-कृतकृत्य होणें (ढुंगणाला हात पोंचणें असा मूळ प्रयोग). ॰फाटणें-रुची वाढणें. 'जेथें जिव्हेचा हातु फाटे ।' -ज्ञा १८.२४९. ॰फिरणें-लक्ष जाणें; व्यवस्थित ठेवण्याची काळजी घेणें; साफसफाई करणें. ॰फेरविणें-१ लहान मुलास प्रेमानें कुरवाळणें. 'प्रेमें मजवरुनि हात फिरवूनी ।' -मोउद्योग १३.१८३. २ पुन्हां उजळणी, उजळा देणें. ॰बसणें-१ एक- सारखें लिहीत, वाचीत इ॰ राहणें. २ अक्षरांचें वळण बसणें; तें पक्कें होणें. ३ एखादें काम उत्तम प्रकारें करतां येणें; मनांत ठसणें; विशिष्ट क्रिया करण्याची सफाई हातास प्राप्त होणें. ॰बांधणें-१ मर्यादा घालणें; स्वैर होऊं न देणें. २ अडथळा आणणें. ॰बोट लावणें-भार लावणें-मदत करणें. ॰भिजणें-१ दक्षणा देणें; (गो.) हात भिजविणें. २ लांच देणें; हात ओले करणें. ॰मारणें-१ बळकाविणें (पैसा इ॰) देणें. २ अधाशीपणानें खाणें; ताव मारणें. ३ एखाद्या वस्तूवर विविध क्रिया करणें. ॰मिठ्ठीला येणें-(माण.) हाताहातीं होईपर्यंत भांडणें. ॰मिळविणें-१ घाव घालणें. 'तस्कारानें जलदीकरून हात मिळविला जाऊन ।' -ऐपो ३९०. २ (कुस्ती) सलामी घेणें. ॰मोडणें-१ असहाय्य, मित्रहीन होणें. २ मिळत असलेली देणगी, बक्षीस नाकारणें. ॰राखणें- कुचराई करणें. ॰राखून खर्च करणें-काटकसरीनें खर्च करणें. ॰लागा ना-(गो.) विटाळशी होणें. ॰लावणें-मदत करणें. ॰वसणें-क्रि. हस्तगत होणें. 'ते ज्ञाननिष्ठा जेथें हातवसे ।' -ज्ञा १८.१२४८; -भाए २४०. ॰वहाणें-१ हत्यार चालविणें. 'परि परमप्रिय अर्जुन त्यावरि याचा न हात वाहेल ।' -मोउद्योग १२.५४. २ प्रवृत्त होणें; कार्य करणें. ॰वळणें-१ सराव, परि- पाठ इ॰ नें हातास सफाई येणें. २ (एखाद्या गोष्टीस, कृत्यास) प्रवृत्त होणें. ॰सैल सोडणें-सढळपणें खर्च करणें. ॰सोडणें-१ पूर्वीप्रमाणें कृपा, लोभ न करणें. २ संगति. ओळख सोडणें. ॰हातांत देणें-लग्न लावणें. 'एखाद्या तरुणीचा हात माझ्या हातांत दे.' -भा ४९. ॰हालवीत येणें-काम न होतां रिकामें परत येणें. हातणें-क्रि. सारवणें. हाताखालीं घालणें-देख. रेखीखालीं, अंमलखालीं, कबज्यांत, ताब्यांत घेणें. हातां चढणें- प्राप्त होणें. 'जरी चिंतामणी हातां चढे ।' -ज्ञा ३.२३; -एभा १०.२८२. हाताचें पायावर लोटणें-आजची अडचण उद्यां- वर ढकलणें; आजचें संकट लांबणीवर टाकणें. हाताचे लाडू होणें-खरजेनें हाताच्या मुठी वळणें, त्या न उघडणें. हाताच्या धारणेनें घेणें-मारणें; बुकलणें. हातांत कंकण बांधणें- एखाद्या गोष्टीची प्रतिज्ञा करणें; चंग बांधणें (यजमानानें यज्ञ करावयाच्या पूर्वी हातांत दीक्षासूत्र बांधण्याच्या चालीवरून). हातांत हात घालणें-१ लांच देणें. २ मैत्रीच्या भावानें वागणें, प्रेम करणें. ३ विवाहसंबंध घडवून आणणें. ४ विवाहित स्त्रीनें परपुरुषाशीं संबंध ठेवणें; निघून जाणें. हातातोंडाशीं गांठ पडणें-१ घास तोंडांत पडणें; खावयास सुरुवात करणें; जेवणा- खेरीज इतरत्र लक्ष न जाणें. २ एखाद्या कार्यास घाईनें आरंभ होणें. ३ बोंब मारणें. हातातोंडास येणें-१ तारुण्यावस्था प्राप्त होणें (लग्न झालेली स्त्री, तरुण मुलगा इ॰). २ फल देण्याच्या स्थितीस येणें. हातापायांचा चौरंग होणें-पेटके वगैरेमुळें हातपाय आंखडणें. हातापायांचे डगळें होणें- पडणें-मोडणें-अशक्तपणानें अंगास कंप सुटणें; अंग शिथिल होणें. हातापायांचे ढीग पडणें-होणें-भीतीनें, आजारानें अशक्त असहाय्य होणें. हातापायांच्या फुंकण्या होणें- अशक्ताता, निर्बलता येणें. हाता(तीं) पायां(यीं) पडणें- १ गयावया करणें; प्रार्थना करणें. २ शरण जाणें; नम्र होणें; दया याचिणें. हाताबोटावर येणें, हातावर येणें-आतां होईल, घटकाभर्‍यानें होईल अशा स्थितीस येणें; हस्तगत कबज्यांत, साध्य होण्याच्या अगदी बेतांत असणें. हाताला चढणें-प्राप्त होणें. 'संसार कशाचा जरि न हाताला चढली ।' -राला ११२. हाताला येईल तें-जें कांहीं हातांत सांपडेल तें; ज्याचेवर हात पडेल तें. हाताल लागणें-गमावलेल्या, फुकट गेलेल्या, नासलेल्या, बिघडलेल्या वस्तूंतून अल्प अंश मिळणें. 'कापडांत पैसें घालूं नका, त्यांतून हाताला कांहीं सुद्धां लागणार नाहीं.' हाताला वंगण लावणें-लांच देणें. -राको १३३७. हाताला हात लावणें-१ पति पुण्याहवाचनादि धर्मसंस्कारास बसला म्हणजे पत्नीनें त्याच्या हातास नुसता हात लावणें (म्हणजे तिलाहि त्याचें फळ मिळतें). २ स्वतः कांहीं न करतां दुसर्‍यानें केलेल्या कामाच्या फळांत वांटेकरी होणें; दुस- र्‍याच्या कार्याला अनुमति देणें. हातावर असणें-पूर्णपणें साध्य असणें. हातावर घेणें-आणणें-काढणें-तारण, गहाण न ठेवतां पैसे उसनें आणणें, काढणें, घेणें. हातावर तुरी देणें-देऊन पळून जाणें-हातावर हात देऊन-मारून पळणें-पळून जाणें-फसविणें; डोळ्यादेखत फसवून पळून जाणें; देखत देखत भुल- विणें. 'सुभद्रा काबीज करण्यासाठीं श्रीकृष्ण परमात्म्याच्या मदतीनें बलिरामाच्या हातावर ज्या तुरी दिल्या... तें पाहून तरी आम्हांस कधीं विषाद झाला आहे काय ?' -आगर. हातावर दिवस काढणें-लोटणें-मोठ्या कष्टानें संसार चालविणें. हातावर धरणें-हातांवर संभाळीत राहावयास लावणें (मुलीनें). 'यानें मला सकाळपासून हातावर धरिलें.' हातावर पाणी पडणें- भोजनोत्तर आंटवणें. 'हातावर पाणी पडलें कीं चालला बाहेर.' हातावर पिळकणें-लांच देणें. हातावर पोट भरणें-संसार करणें-अंगमेहनत, भिक्षा, नौकरी करून उपजीविका करणें. हातावर मिळविणें-मिळवावें व खावें अशा स्थितींत राहणें. हातावर येणें-जवळ येऊन ठेपणें. हातावर येणें-लागणें- दूध देऊं लागणें-थानास वासरूं न लावतां किंवा पान्हवण (सरकी इ॰) पुढें न ठेवतां जनावरानें दूध देणें, पान्हवणें. हातावर शीर घेऊन असणें-कोणतेंहि धाडसाचें कृत्य कर- ण्यास सदां सिद्ध असणें. हातावर हात चोळणें-रागानें तळ- हात एकमेकांवर घासणें; चरफडणें. 'इंद्रें स्वतातघातक पाठीसीं घातला म्हणोनि करें । कर चोळी...' -मोआदि ७.४०. हाता- वर हात मारणें-१ एखादी गोष्ट, सट्टा इ॰ पटला म्हणजे दुस- र्‍याचे हातावर आपला हात मारणें. २ वचन देणें. हातास हात लावणें-(देणार्‍याच्या, घेणार्‍याचे हातास स्पर्श होणें) द्रव्यलाभ होणें. हातास-हातां-हातीं चढणें-प्राप्त होणें. 'तो किल्ला माझ्या हातीं चढला.' 'नवनींत मंथनावांचून । हातां न चढे सहसाहि ।' हातीं धरणें-१ स्वतःच्या देखरेखीखालीं घेणें; एखाद्यास आपल्या आश्रयाखालीं घेणें. २ निरंकुशपणें मोकाट सोडणें (जीभ, तोंड, पोट इ॰ इंद्रियें). हातीं धोंडे घेणें-१ विरुद्ध उठणें. २ वेड्यासारखें करणें. हातींपायीं (अन्न इ॰) डेवणें-धावणें-येणें-रेवणें-जाड्य, सुस्ती येणें; शिव्या देण्यास तयार होणें. हातींपायीं उतरणें-सुटणें-मोकळी होणें-सुखरूपपणें बाळंत होणें हातींपायीं पडणें, लागणें- अतिशय विनवण्या, काकुळत्या करणें. हातीं भोपळा घेणें- देणें-भिक्षा मागणें, मागावयास लावणें. आडव्या हातानें घेणें-१ चोरून; चोरवाटेनें घेणें. २ झिडकारणें; भोसडणें; तुच्छता दाखविणें; कचकावून खडकाविणें; मारणें. आडव्या हातानें घेणें, चारणें-बाजूनें, तोंडांत हात घालून खाऊं घालणें; औषधोपचार करणें (घोडा इ॰स). (देणें-चोरून देणें-मारणें- मागल्या बाजूनें मारणें-ठोकणें). एका हाताचीं बोटें पण सारखीं नाहींत-सारख्या परिस्थितींतील माणसें असलीं तरी त्यांच्यांत थोडाफार फरक असतो. दोहों हाताचे चार हात करणें-होणें-लग्न करणें, होणें या हाताचे त्या हातावर- क्रिवि. ताबडतोब; जेव्हांचे तेव्हांच (दुष्कृत्याची फेड लवकर व खात्रीनें मिळते या अर्थीं). या हाताचें त्या हातास कळूं न देणें-अत्यंत गुप्तपणें करणें. रिकाम्या हातानें-जरूं- रीच्या साधनां-उपकरणां-सामग्रीखेरीज; कांहीं काम न करतां. याचा हात कोण धरीसा आहे ? -याच्या वरचढ, बरो- बरीचा कोण आहे ? याचा हात धरण्याची शक्ति कोणास आहे ? हातांत काय तागडू मिळाला-(व) कोणता फायदा झाला ? हातांत नारळाची आई (नरोटी) देणें-भिक्षा मागावयास लावणें. सामाशब्द- ॰अनार-पु. शोभेच्या दारूचा एक प्रकार. ॰इंद-न. (कों.) खेंकडे पकडण्याचें जाळें. ॰उगावा-पु. १ एखाद्या किचकट, अडचणीच्या कामांतून, धंद्यांतून अंग काढून घेणें. २ सूड; पारिपत्य. (क्रि॰ करणें). ३ कर्जाची उगराणी; घातलेलें भांडवल परत मिळविणें. [हात + उगवणें] ॰उचल-स्त्री. १ पेढींतून स्वतःची रक्कम आतां थोडी मग अशा रीतीनें खर्चण्यास घेणें. २ मूळ भांडवल; मुद्दल. उचल मध्यें पहा. ॰उचला-वि. १ आप- खुषीनें, हात उचलून दिलेला (पदार्थ). २ ज्याचा स्वतः करण्याबद्दल पत्कर घेतला आहे असा (व्यवहार, उद्योग). ॰उसना-ना-वि. थोडा वेळ उसना घेतलेला; लवकर परत करण्याच्या बोलीनें आणलेला (त्यामुळें लेख इ॰ लिहून न घेत दिला-घेतलेला). ॰उसणें-नें-न. थोड्या मुदतींत परत कर- ण्याच्या बोलीनें (लेख करून न देतां) उसनी घेतलेली रक्कम. ॰कडी-स्त्री. हातांतील बेडी. 'मन सिंतरील विवेकासीं । यालागी हात कडिया दोहींसीं ।' -एभा २३.९५१. ॰कर- वत-पुस्त्री. हातानें चालविण्याची लहान करवत. ॰करवती- स्त्री. लहान हात करवत. ॰करीण-स्त्री. अचळाला हात लावतांच (वासरूं न सोडतां किंवा आंबोण न ठेवतां) पान्हा सोडून दूध देणारी गाय; म्हैस. इच्या उलट पान्हावणकरीण. ॰कापें-न. (गो.) लांडी, बिन बाह्यांची बंडी. ॰काम-न. हस्तकौशल्याचें काम (यांत्रिक कामाच्या विरुद्ध); हस्तव्यवसाय. (इं.) हँडफ्रॅक्ट. ॰कैची-कचाटी- स्त्री. आलिंगन; मिठी. ॰खंड-वि. १ मधून मधून कामांत सोडवणूक करणारा; मदतनीस (मूल, मित्र, शेजारी); अडल्या वेळीं आपल्या कामीं उपयोगी पडणारा. २ हात खंडा पहा. [हात + खंड = खळ, विसावा] ॰खंडा-वि. निष्णात, करतलामलकवत् असलेली; म्हणाल त्यावेळीं तयार (विद्या, कला). ॰खर्च-पु. किरकोळ खर्च; वरखर्च. ॰ख(खं)वणी- स्त्री. लहान खवणी. ॰खुंट-खुंटा-पु. (विणकाम) वशारन पसरलेल्या लांबीपाशीं असलेल्या समोरच्या खांबापासून मागा पाशीं बसण्याच्या जागेजवळ उजवीकडे दोरी बांधावयाची खुंटी. ॰खुरपणीचें लोणी-न. हातखुरप्या नारळाचें खोबरें. ॰खुरपा-वि. हातानेंच आंतील खोबरें खरवडून काढण्याजोगा (कोंवळा नारळ). ॰खुरपें-न. १ हातखुरपा नारळ. २ गवत काढण्याचा लहान विळा. ॰खे(खो)रणें-न. कलथा; उलथणें; झारा. (क्रि॰ लावणें-अन्नास, पैक्यास = पैका उकळण्याचा सपाटा). म्ह॰ हातखेरणें असतां हात कां जाळावा. ॰खेवणें-न. १ हातवल्हें. २ मदतनीस; हाताखालचा माणूस. ॰खेव्या-व्या-पु. हातखेवणें अर्थ २ पहा. ॰खोडा-पु. हात अडकविण्याचा सांपळा. 'चंद्रसूर्याचा हातखोडा । काळा कैसेनि घालिजे ।' -भाए ५४९. ॰गाडी-स्त्री. हातानें ढकलून चालविण्याची गाडी. ॰गुंडा-धोंडा-पु. १ हातानें फेकण्या-उचलण्या-जोगा दगड. 'कुश्चीतभावाचे हातगुंडे ।' -ज्ञाप्र २६५. २ असला दगड हातानें जेथवर फेंकला जाईल तितकें अंतर. ॰गुण-पु. (बरेंवाईट करण्याचा योग, गुण) नशीब; हातीं (काम, माणूस) धरणाराचा प्रारब्धयोग. हस्तगुण पहा. ॰घाई-स्त्री. १ हातानें वाजवावयाचें वाद्य जोराजोरानें, आवेशानें वाजविणें. २ (ल.) उतावळेपणा; जोराची हाल चाल. (क्रि॰ हातघाईवर, हातघाईस येणें-मारामारी करणें). ॰चरक-पु. १ हातानें फिरवून रस काढावयाचा चरक. २ हात घाणी. ॰चलाख-वि. चोर; उचल्या. ॰चलाकी-खी-स्त्री. हस्तचापल्य; लपवाछपवी; नजरबंदीचा कारभार (गारुडी, सराफ इ॰ चा). ॰चाळा-पु. १ हाताचा अस्थिरपणा; चुळबुळ; हातानें कांहीं तरी उगीच करीत रहावें अशी लागलेली खोड; हातचेष्टा. (क्रि॰ लागणें). २ अशा प्रकारानें होणारें नुकसान. (क्रि॰ करणें). ३ सदोदित हात गुंतलेला असणें; त्यांत निमग्न असणें (वाढता धंदा, व्यापार, खेळ इ॰ त); देवघेवीचा मोठा उद्योग. ॰चिठी-चिटी-ट्टी-स्त्री. १ अधिकार्‍यानें शिक्का- मोर्तब न करतां आपल्या हातच्या निशाणीनेंच पुरी केलेली चिठी, हुकूम. २ कोणाहातीं पाठविलेली चिठी-चपाटी. ॰चे हातीं- च्या हातीं, हातोहातीं-किवि. लेगच; ताबडतोब; आतांचे आतां; क्षणार्धांत पटकन् (करणें, घडणें). 'ही गडी हाताचे हातीं जाऊन येईल.' 'हाताचे हातीं चोरी-लबाडी-शिंदळकी' इ॰. ॰चोखणें-चुंफणें-न. तान्ह्या मुलास चोखण्यासाठीं हातांत देण्याची वस्तु. ॰जतन-स्त्री. हातानें केलेली मशागत (मालीस इ॰); रोज वक्तशीर घेतलेली काळजी. 'हा घोडा नुसत्या हातजतनानें इतका हुशार आहे.' ॰जुळणी-स्त्री. (ठाकुर) लग्न लागल्यानंतर मुलानें मुलीचे दोन हात धरणें. -बदलापूर १३८. ॰झाड-स्त्री. आपोआप उगवलेलें नसून मुद्दाम लाविलेलें झाड. ॰झाडणी-स्त्री. राग, तिरस्कार इ॰ नें हात झटकणें. ॰झालणा-पु. हातजाळें; हातविंड. ॰झोंबी-स्त्री. परस्परांचे हात धरून केलेली झटापट; हिसकाहसकी; झगडा. ॰तुक-न. १ हातानें वजन करणें. 'नव्हती हाततुके बोल ।' -तुगा ३४२३. २ अटकळ; अजमास. 'मग त्यागु कीजे हात- तुकें ।' -ज्ञा १८.१३१. ॰दाबी-स्त्री. लांच. 'मालकानें हात- दाबी केली म्हणजे माल त्यांना परत देतात.' -गुजा ६७. ॰धरणें-न. (खा.) सोधणें; स्वयंपाकघरांतील भांडीं उतरणें इ॰ चें फडकें. ॰धरणी माप-न. माप भरतांना त्याचे शेवटास डावा हात धरून, मापापेक्षां थोडें जास्त धान्य घेऊन केलेलें माप. बोटधरणी माप पहा. ॰धुणी-स्त्री. १ राजाच्या हात- धुणारास दिलेलें इनाम इ॰. २ स्वयंपाकघरांतील मोरी. ॰धोंडा- पु. १ हातानें उचलण्याजोगा धोंडा. २ धोंडा हातानें फेंकला असतां जेथवर जाईल इतकें अंतर; टप्पा. ॰नळा-पु. हातांत धरून सोडण्याचा, शोभेची दारू भरलेला नळा. ॰नळी-स्त्री. चपटें कौल. ॰निघा-गा-हातजतन पहा. हातजपणूक. ॰नेट- क्रिवि. १ (व.) हाताचा जोर, भार देऊन. २ (व.) हाता- जवळ. ॰पडत-पात-वि. हातीं असलेलें; अगदीं जवळ असणारें; लागेल त्यावेळीं ताबडतोब मिळणारें. ॰पहार-स्त्री. हातभर लांबीची पहार. ॰पा-हातोपा-पु. अंगरखा इ॰ ची बाही. ॰पाटिलकी-स्त्री. १ हातानें ठोकणें; चोपणें, बदडणें. तोंड- पाटिलकीचे उलट. २ बोलण्यापेक्षां प्रत्यक्ष कृति, काम. 'तोंड- पाटिलकी सगळ्यांस येते हातपाटिलकी कठीण.' ३ हस्तचापल्य; उचलेगिरी. ॰पाणी-न. १ लग्नांत रासन्हाणीचे वेळीं वधूच्या सासूनें तिचे हातांवर ओतावयाचें पाणी. (क्रि॰ घालणें). २ लग्नांत मांडव परतण्याचे दिवशीं सासूनें सुनेची बोहोल्यावर ओटी भरून, किंवा मांडवांत न्हातेवेळीं नवर्‍यानें केशरी रंगांत बुडवून तिचे हातांत घालवयाची अंगठी. ३ लग्नांत मुलाच्या हाताखालीं मुलीचा हात ठेवून त्यांवर समंत्रक पाणी घालणें. -बदलापूर २०५. ॰पान-पु. कोंका पडण्यापूर्वींचें केळीचें पान. ॰पान्हा- पु. हातकरीण गाय, म्हैस इ॰ नें सोडलेला पान्हा (वासरूं किंवा अंबोण दाखविल्याशिवाय). हातपान्ह्यास लगाणें, येणें, हातपान्ह्याची गाय इ॰ प्रयोग. ॰पालवी-स्त्री. हात पोंहो- चेल इतक्या उंचीवरील पाला. ॰पावा-वि. (कों.) हाताच्या आटोक्यांतील, हात पोहोंचेल इतक्या उंचीवरील (वेलीचें फूल इ॰ किंवा खोली-विहिरींतील पाणी इ॰). [हात + पावणें] ॰पिटीं-स्त्री. १ झोंबाझोंबी; गुद्दागुद्दी. २ (ल.) हातघाईची मारामारी. 'तंव राउतां जाली हातपीटी ।' -शिशु ९६८. [हात + पिटणें] ॰पेटी-स्त्री. हातानें भाता चालवून वाजवावयाची बाजाची पेटी; हार्मोनियम. २ सरकारी कामाचे कादगपत्र ठेवण्याची पेटी. -स्वभावचित्रें २४. ॰पाळी-स्त्री. चेंडूफळीचा एक प्रकारचा खेळ. -मखेपु ५६. ॰फळ-न. (बे.) मेर ओढण्याचें फळ. ॰फळी, हातोफळी-क्रिवि. हातोहातीं; लवकर. ॰बळ-न. हस्तसामर्थ्य. 'हातबळ ना पायबळ, देरे देवा तोंडबळ.' ॰बांधून डंकी-स्त्री. (कुस्ती) जोडीदारास खालीं आणल्यावर त्यानें आपला एक पाय धरला तर आपण दुसर्‍या पायानें जोडीदाराचे पाठीवरून झोंका घेऊन उडी मारून त्यास चीत करणें. ॰बेडी-स्त्री. कैद्याच्या हातांत अडकवावयाची बेडी; हातकडी. ॰बोनें-न. हातांत घेत- लेलें भक्ष्य. 'बुद्धीचेनि शाकें । हातबोनें निकें ।' -ज्ञा ६.२८२. ॰बोळावन-स्त्री. हातांनीं मार्गाला लावणें. 'जाणो नेदी योग्यता । ग्रहीं हातबोळावन करितां ।' -भाए ३४९. ॰भाता-पु. हातांत घेऊन फुंकावयाचा भाता; लहान भाता. ॰भार-पु. मदत; साहाय्य (विशषतः द्रव्याचें). (क्रि॰ लावणें). ॰भुरकणा- भुरका-वि. हातानें भुरकून खावयाजोगा (पेयपदार्थ). ॰भुर- कणें-भुरकें-वरील प्रकारचा पातळ पदार्थ. ॰भेटी-स्त्री. प्रेमानें हातांत हात घालणें. -एभा २८.५९२. ॰मांडणी-स्त्री. पैसे पावल्याची पोंच म्हणून पैसे नेणार्‍याची खतावणीवर घेतलेली सही. ॰मात-स्त्री. हात टेकणें. ॰मेटी हेटीमेटी-क्रिवि. आळसांत; निरुद्योगीपणानें; हातांवर व गुडघ्यावर टेकून रमतगमत (दिवस इ॰) घालविणें. 'दिवस गेला हातमेटीं चांदण्या खाली कापूस वेटी.' ॰रगाडा-पु. उसाचा हातचरक. ॰रवी-स्त्री. घुसळखांब, मांजरी यांचे विरहित हातानेंट फिरविण्याची लहानरवी. ॰रहाट- पु. हातानें ओढून पाणी काढण्याचा लहान रहाट. ॰रिकामी- स्त्री. विधवा स्त्री. -बजलापूर १७४. ॰रिती-वि. (महानु.) रिकामी विधवा. -स्मृतिस्थळ. ॰रुमाल-पु. १ तोंड वगैरे पुसण्याचा लहान रुमाल. २ नित्योपयोगी कागदपत्रें ठेवण्याच्या दप्तराचा रुमाल; चालता रुमाल; त्यांतील कागदपत्रांचें बंडल. ॰रोखा- पु. दस्तक; चिठी; आज्ञापत्र. 'पाराजीपंत वाघ यांस हातरोखा वरचेवर पाठवून अति आग्रहें अंतरवेदींत घालविलें.' -भाव १०२. ॰लाग-पु. हाताचा टप्पा. ॰लागास-लागीं येणें-असणें- कक्षा, आंवाका, आटोका, अवसान इ॰ त येणें, असणें. ॰लागा- लाग्या-वि. अनुकूल असणारा. 'तुमचे हातलागे लोक असतील.' -वाडबाबा १.६. ॰लावणी-स्त्री. १ वेश्येचा चिरा उतरणें; कौमार्यभंग. (क्रि॰ करणें). २ हाताची पेरणी; लागवण. -वि. हातपेरणीचें. ॰लावा-व्या-वि. हाताळ; चोरटा; चोरी करण्या- साठीं हात फुरफुरत असलेला. ॰वजन-न. १ जिन्नस हातांत घेऊन केलेलें वजन. २ अशाप्रकारें वजन काढण्याची लायकी. ॰वटी- हातोटी-स्त्री. १ हस्तकौशल्य; हस्तचातुर्य. २ (सामा.) कसब; नैपुण्य; चलाखी. 'अहो चंद्रकांतु द्रवता कीर होये । परि ते हात- वटी चंद्री कीं आहे ।' -ज्ञा ९.२९. ३ विशिष्ट पद्धत, रीत, प्रकार. [हिं.] भाषणाची-पोहण्याची-व्यापाराची इ॰ हातोटी. ॰वडा- हातोडा-पु. सोनार, कासार इ॰ चें ठोकण्याचें हत्यार. ॰वडी हातोडी-स्त्री. लहान हातोडी. ॰वणी-न. १ हात धुतलेलें पाणी. २ (कों.) हातरहाटाचें पाणी पन्हाळांतून जेथें पडतें तेथील जमीनीचा उंच केलेला भाग; हातणी. ॰वल्हें-न. हातानेंच वल्हवावयाचें लहान वल्हें. ॰वश-वि. हस्तगत. ॰वशी-स्त्री. हात उगारणें. -शर. ॰वळा, हातोळा-पु. हातवटी पहा. म्ह॰ गातां गळा; शिंपता मळा, लिहितां हातवळा. ॰वारे-पु.अव. हातानीं केलेलें हावभाव; हाताची हालचाल. ॰विंड-न. (राजा.) हाता झालणा पहा. ॰विरजण-न. अजमासानें घातलेलें विरजण ॰विरजा-विरंगुळा-वि. कामांत मदत करण्याच्या लायक, लायकीस झालेला (पुत्र, शिष्य, उमेदवार इ॰) [हात + विरजणें] ॰शिंपणें-न. सोडवणी न देतां शेलणें इ॰ साधनानें भाजी- पाल्यास उडवून द्यावयाचें पाणी; असें पाणी शिंपणें. ॰शेकणें-न. (उसाचा चरक) चुलाण्यांत जाळ घालणारास त्याच्या मेहनती बद्दल द्यावयाचा गूळ. ॰शेवई-स्त्री. हातानें वळलेली शेवई; याचे उलट पाटशेवई. ॰सर-न. बायकांचा हातांतील एक दागिना, गजरा. 'हे पाटल्या हातसरांस ल्याली ।' -सारुह ६.२६. ॰सार- वण-न. खराटा, केरसुणी न घेतां हातानें जमीन इ॰ सारवणें. ॰सुख-न. १ दुसर्‍यास, शत्रूस हातानें मारूंन त्यामुळें अनुभवि- लेलें सुख (क्रि॰ होणें). २ हातानें दिलेला मार. ॰सुटका-स्त्री. १ एखाद्या व्यवहारांतून, धंद्यांतून स्वतः अंग काढून घेणें; मोकळें होणें. २ हातविरजा पहा. ३ हाताचा सढळपणा. ॰सुटी-स्त्री. औदार्य. 'हे हातसुटीक्षीरसागरा । वांचौनि नाहीं ।' -भाए ७६९. ॰सुतकी-स्त्री. पाथरवटाचें दगड फोडण्याचें हत्यार. ॰सूत-न. चातीवर हातानीं काढलेलें सूत. ॰सोकी(के)ल-सोका-वि. हाताच्या संवयीचा; अंगाखांद्यावर घेण्यास संवकलेला. 'केल कुत्रा हातसोंका ।' 'घडो नेदि तीर्थयात्रा.' -तुगा २९५४. ॰सोडवण-नस्त्री. हातसुटका अर्थ १,२ पहा. ॰सोरा-र्‍या सुरा-र्‍या-पु. कुरड्या इ॰ करण्याचा सांचा. ॰हालवणी-स्त्री. प्रवाशांवरील एक जुना कर (त्यांच्या हात हालवण्याच्या क्रियेबद्दल हा कर असे). हातचा-वि. १ हातानें दिलेला; स्वाधीनचा; हातांतला; हातानें निर्मिलेली, मिळविलेली, दिलेली (वस्तु, काम, उत्पादन इ॰). 'शुद्राचे हातचें पाणी स्नानसंध्येस घेऊं नये.' 'रोग्यास औषध देणें मनुष्याच्या हातचें आहे-आयुष्य घालणें नाहीं.' २ (अंकगणित) पूर्णांकाची बेरीज करतांना बेरजेच्या संख्येंतला अंक ज्या स्थानाचा त्या स्थानीं मिळविण्याकरितां उरलेला अंक. (क्रि॰ येणें; रहाणें; ठेवणें). ३ लवकर हातीं येणारें; अवसानांतील. ४ ताब्यांतील; कबजांतील. म्ह॰ 'हातचें सोडून पळत्याचे पाठीस लागूं नये.' ॰चा पाडणें-१ हातां- तील सोडणें. २ एखाद्यास त्याचे ताब्यांतील वस्तू्स मुकविणें. ॰चा-धड-नीट-वि. नीटनेटकें काम करणारा (लेखक, कारागीर). ॰चा फोड-पु. फार प्रिय माणूस. तळहाताचा फोड पहा. ॰चा मळ-पु. सहज घडणारी गोष्ट. 'सरळ, सोपी आणि बालिकाबोध भाषा कशी वापरावी हें म्हणजे माझ्या हाताचा मळ आहे.' -कीच. ॰चा सुटा-वि. सढळ हाताचा. हातवा-पु. १ (बायकी) गौरीपूजनाचे सणांत हळदीकुंकवानें हात भिजवून जमिनीवर छाप मारणें. २ लग्नांत नवर्‍याच्या मिरवणुकीच्या मागें धरावयाचा कणकेचा दिवा. ३ घोड्याचा खरारा, साफ करण्याचा काथ्याचा पंजा. ४ काडवात मनको. ५ (कर्‍हाड) न्हाणवली बसवितांना, मखर बांधावयाचे ठिकाणीं, कुंकू पाण्यांत भिजवून हातानें पांच उलटे पांच सुलटे ठसें उठविणें. हातळ, हाताळ-ळु-वि. चोरण्याची संवय असलेला; चोर; भामटा. हातळणें, हाताळणें-उक्रि. १ हात लावणें; चोळ- वटणें; चिवडणें, २ हाताळ माणसानें वस्तू् चोरणें. हातळी, हाताळी, हाताळें-स्त्रीन. १ घोड्याचा काथ्या इ॰ चा खरारा. २ भात्याची बोटांत, हातांत अडकवावयाची चामड्याची वादीं. ३ (कर.) भाकरी. हाता-पु. हातांत राहील इतका जिन्नस, पसा (फळें, फुलें इ॰ पांच-सहा इ॰ संख्येचा संच एकेक वेळ हातांत घेऊन बाजूस ठेवतात). हाताखालचा-वि. १ मदतनीस; हाता- खालीं काम करणारा. २ उत्तम परिचयाचा; माहितींतील. ३ हातां- तील; कबज्यामधील; स्वाधीन. ४ दुय्यम; कमी दर्जाचा. हाता- खालीं-क्रिवि. १ सत्तेखालीं; दुय्यम प्रतींत. २ स्वाधीन. ३ जातांजातां; हातासरशीं; सहजगत्या. 'मी आपला घोडा विका वयास नेतोंच आहे, मर्जीं असली तर हाताखालीं तुमचाहि घोडा नेईन आणि विकीन.' हाताचा उदार, मोकळा, सढळ- वि. देणगी इ॰ देण्यांत सढळ. हाताचा कुशल-वि. हस्त कौशल्यांत निपुण, प्रवीण. हाताचा जड-बळकट-थंड-वि. १ चिक्कू; कृपण. म्ह॰ हाताचा जढ आणि बोलून गोड. २ मंद (लेखक). हाताचा जलद-वि. काम करण्यांत चलाख हाताचा फटकळ-वि. फटाफट मारणारा; मारकट. हाताचा बाण-पु. वर्चस्व, पगडा, वजन पाडणारें कृत्य, गोष्ट (क्रि॰ गमावणें; दवडणें; सोडणें). हाताजोगता-वि. १ हातांत बसेल; मावेल; धरतां येईल असा. २ हात पोहोचण्याजोगें. हाता- निराळा-वेगळा-वि. १ पूर्ण; पुरा; सिद्ध केलेला; पुन्हां हात लावण्याची जरूरी राहिली नाहीं असें (काम, धंदा इ॰). 'हा दुर्निवह कोश एकदां हातानिराळा झाला म्हणजे दुसरें काम घेतां येईल.' २ -क्रिवि. एकीकडे; बाजूस. 'कामापुरती भांडीं वहिवाटींत ठेवा वरकड हातानिराळीं ठेवा.' हातापद्धति-स्त्री. दलाल माल घेणार्‍याच्या हातावर रुमाल टाकून गुप्तरीतीनें मालाची किंमत माल घेणार्‍याकडून अजमावतो ती पद्धत. हाताची थट्टा-स्त्री. थट्टेंनें मारणें (थापटी इ॰); चापट देणें. (तोंडी थट्टा नव्हे्). हाता(तो)फळी-स्त्री. गुद्दागुद्दी; मारामारी; कुस्ती; हातझोंबी; धक्काबुक्की. 'मजसीं भिडे हातोफळी ।' -ह १९.१४३. -क्रिवि. पटकन्; चट्दिशी; तत्काळ; हातावर हात मारून. [हात + फळी] हातावरचा संसार-हातावरचें पोट-पुन. मजुरी, कामधंदा करून स्वतःचें कसेंतरी पोट भरणें (क्रि॰ करणें; चालविणें) थोड्या पगाराची, कष्टाची नोकरी करून उदरनिर्वाह. हातावीती- क्रिवि. हातोहात पहा. 'सर्वज्ञ हातावीती पुढें जाती ।' -पुच. हातासन-न. हातवटी. 'अन्योपदेशाचेनि हातासनें ।' -ज्ञा ६.११९. हातासरसां-क्रिवि. त्याच हातानें, प्रकारानें; तसेंच; त्याच बरोबर; चालू कामांत आहे तोंच. 'उष्टी काढतो आहेस तों हातासरशीं भांडीं घास मग हात धू.' हातिणें-अक्रि. मारणें. -मनको. हातिवा-स्त्री. काडवात. 'उजळोनि दिव्य तेजा हातिवा ।' -ज्ञा १६.२३. हातुवसीया-विय एक हात अंतरा- वरील. 'हातवसिया कळागंगा पार्वती ।' -धवळे ३१ हातोणी- स्त्री. (व.) खरकटें पाणी; हातवणी. हातोपा-हातपा पहा. हातोपात-ती-क्रिवि. एका हातांतून दुसर्‍या हातांत. वरचेवर; हातोहात. -ज्ञा १८.१५६. हातोरी-क्रि. (ना.) हातानें; साहा- य्यानें. हातोवा-पु. (महानु.) अंजली; ओंजळ. 'हातोवा केवि आटे अंभोनिधि ।' -भाए २१७. हातोसा-पु. मदत; हातभांर. (क्रि॰ देणें), हातोहात-ती-क्रिवि. १ हातचेहातीं; हातोपात. २ चटकन्; भरदिशीं. (क्रि॰ येणें = मारामारी करणें). 'हिंवांळ्याचे दिवसांत दुपार हातोहात भरतें.' हातोळा-हात- वळा पहा. हातोळी-स्त्री. (व.) लग्न. हात्या-पु. १ पाणर- हाटाचा दांडा. २ घोडा घासण्याची पिशवी; खरारा. हाताळी अर्थ १ पहा. ३ मागाच्या फणीची मूठ. ४ काहिलींतील गूळ खरवड- ण्याचें खुरपें. ५ (कर.) मोठी किल्ली.

दाते शब्दकोश