नऊ मराठी शब्दकोशांमधील २,६२,७३६ शब्दांचा एकत्रित संग्रह
शब्दार्थ
मोळा
मोळा mōḷā m Way, manner, method, mode of executing or effecting. Ex. लहानपणीं जसा मुलास मोळा लाविला तसा लागतो: also character of deportment or walk; as त्या मुलाला मोळा नाहीं. 2 Style, habits, usage, established course or custom. Ex. ब्राह्मणाचे घरचा मोळा निराळा क्षत्रियाचा नि- राळा. 3 unc A spike or peg; a nail of iron or wood. 4 A muzzle for a calf.
पु. १ वळण; रीत; पद्धत; परिपाठी; वर्तनाची सरणी; चालरीत; वागणुकीची रूपरेषा. 'लहानपणीं मुलास जसा मोळा लाविला तसा लागतो.' 'त्या मुलाला मोळा नाहीं.' मराठमोळा. २ रूढ झालेली पद्धत; रूढी; प्रघात; संवय; चालरीत; पद्धति. 'जळो जळो वोंगळ हा । हा तुमचा मोळा ।' -मध्व १२७. 'ऐसा विप- रीत आहे मोळा । जाणा येथीचा जी गोपाळा ।' -निगा २४५. [सं. मूल-मौलिक?]
मोळा m Way; style. A muzzle for a calf. An iron-nail.
पु. १ ठसा. मुक्तिचा मोळा उमटे ।' -भाए १७०. २ खिळा; खुंटी; लोखंडी किंवा लांकडी मोठी चूक; लहान मेख. [सं. मौलि]
पु० रीत, रिवाज, शिरस्ता, ओळा.
न. मोहाळें पहा. वासराच्या तोंडाला घालतात तें जाळें; वासरास मातेचें दूध पितां येऊं नये म्हणून बांधलेलें मुखबंधन. ॰घालणें-वासरूं अथवा रेडकू त्याच्या मातेबरोबर रानांत चराव- यास सोडतेवेळीं त्याला पितां येऊं नये म्हणून काटे लावलेली म्होरकी घालणें. मोळांडणें-(व.) रग लावणें. पायांस मुंग्या येणें किंवा पाय दुखणें या अर्थींसुद्धा हा शब्द वापरतात. 'इतका वेळ लिहिण्यासाठीं मांडी घालून बसल्यानें पाय मोळांडले.'
मराठी मोळा or मराठमोळा
मराठी मोळा or मराठमोळा marāṭhī mōḷā or marāṭhamōḷā m Ways and practices peculiar to the genuine Maráṭhá. Ex. तुम्ही आपणास पवार म्हणवितां पण तुमच्या घरीं म0 दिसत नाहीं. The peculiar way especially implied by this phrase is The non-appearance of the women of a household before strangers.
ठोकर मोळा
पु. बुटाच्या ठोकरीस मारावयाचा खिळा.
संबंधित शब्द
मोल
न. १ किंमत; दर; मूल्य; द्रव्य; 'असमय मौनें तुमच्या सुज्ञपणाच्या न हानि मोलहो' -मोसभा ५.४६. २ बिदागी; कोणी केलेल्या कामाबद्दल त्याला दिलेली मजूरी; मजू- रीचे पैसे 'मोलें घातलें रडाया ।' -तुगा. -ज्ञा १८.१६७. [सं. मूल्य = मोल] मोल देणें-विकणें. मोलास तुटणें-किंमतींत कमी होणें. 'सोन्याचें कडें घडविलें । तरी काय सोनें मोलास तुटलें' -ह २१.२६१. ॰करी, मोलारी-पु. मजूर; काम- करी; पैसे घेऊन लोकांचीं कामें करणारा माणूस. ॰करीण-स्त्री. कुणबीण; पैसे घेऊन लोकांचीं कामें करणारी स्त्री. -गांगा १०९. ॰कारू-पु. (महानु.) मोल करणारा; गिऱ्हाईक. 'कुडा होय मोलकारू' -भाए ३८१. ॰तोल-न. किंमत; मजूरी; खर्च (मोल द्वि). ॰मजुरी, मजूरी-स्त्री. मजूरी घेऊन केलेलीं लोकांची कामें समुच्चयानें किंवा अशीं कामें करून मिळ- विलेलें द्रव्य; नोकरी; काबाडकष्ट. ॰वान्-वि. १ उपयुक्त; किमतीचें; महत्त्वाचें. 'इतिहासभिज्ञास तें पुस्तक फार मोलवान् होईल.' -टिली ४.४.१. २ गुणग्राही; किंमत करणारा. मोला आगळा-वि. (काव्य) योग्य किंमतीच्या बाहेर किंवा जास्त मौल्यवान्; बहुमोल; भारी किंमतीचें. 'द्रौपदीस दिधले अलंकार । मोला आगळे अपार.' [मोल + आगळा] मोला महागाचा-वि. अतिशय महाग; फार किंमतीचा. [मोल + महाग] मोलारी-पु. सामान्यपणें मोलकरी; पुरुष मजूर. मोलारीण- स्त्री. स्त्री मजूर; मोलकरीण; मोल मजूरीनें काम करणारी स्त्री किंवा बाई. मोलावणें, मोलाविणें-क्रि. १ किमतींत वाढ होणें; किंमत काढणें. २ नुसती किंमत विचारणें; मोल-किंमत, दर लावणें, ठरविणें, करणें. 'खरेदी करण्याकरितां किंवा नुसते मोला- वून अजमावण्याकरितां चाललेला जनसंमर्द.' -हिंदु ११.२.३०.
दडणी, दडणे
स्त्री. न. १. खोदणाऱ्याचे, नकसगाराचे एक हत्यार. २. (सोनारी धंदा) साखळीच्या कडीचा खडबडीतपणा जावा म्हणून कडीवर ठेवून वरून ठोकतात तो टोकाशी अर्धवर्तुळाकार असा किंचित् वाकविलेला मोळा.
दडणी-णें
स्त्रीन. १ खोदणाराचें, नकसगाराचें एक हत्यार. २ (सोनारी धंदा) सांखळीच्या कडीचा खडबडीतपणा जावा म्हणून टोकाशीं अर्धवर्तुळाकार असा किंचित् वांकविलेला जो मोळा त्या कडीवर ठेवून वरून ठोकतात तो. दडणें-कडीचा खडबडीतपणा घालविणें.
एकमोल
न. (कों.) एकमंगल, संकर; गोतमकाला. [एक + मोळा]
गुधडणें
उक्रि. १ गुधड्या घालणें; पायानें तुडविणें; चोळा- मोळा करणें; चिरडणें; उलथापालथ करणें. २ (धसमुसळेपणानें, अव्यवस्थितपणें वापरून) खराब करणें; मळविणें; नासणें (कापड, वस्तु). दामटणें; खुंदळणें; दपटणें. (जनावर). -अक्रि. धुडगूस घालणें; दांडगाई करणें. [का. गुद्द]
घुसमड
स्त्री. १ तुडवणी; गुधडा पाहणें; मर्दन, चोळा- मोळा. २ धुडगूस; धिंगाणा; धिंगामस्ती; धांगडधिंगा. [घुसमटणें]
मौळा
पु. मोळा पहा. कांटा; फळावरील कांटा. 'कनका- चिया फळा । आंतुमाज बाहेरी मौळा । तैसा सबाह्य दुबळा । शुचित्वें जो । ' -ज्ञा १८.६५८.
मोहळ
मोहळ n A bees' nest. See मोळा.
मोळें
न. वासराचें मुखबंध. मोळा पहा.
मराठा
वि. १ मराठी देश, लोक इ॰संबंधीचा; महा- राष्ट्रीय; दक्षिणी. २ महाराष्ट्रांतील क्षत्रिय जात (ब्राह्मण आणि कुणबी यांच्या मधली). यांना कधीं राव, मराठें असें म्हणतात. हे वेदोक्त संस्कार करतात. ३ (सामा.) कुणबी, शूद्र लोकांबद्दल योजावयाचा शब्द. ब्राह्मण-पांढरपेशे आणि अस्पृश्य यांच्या मधला वर्ग. [सं. महाराष्ट्र; प्रा. मरहट्ट, मरठ्ठ] मराठी-स्त्री. महाराष्ट्रांतील मुख्य प्रचलित भाषा. 'मराठी असे आमुची माय- बोली ।' -वि. मराठे लोकासंबंधीचा; मराठ्यांचा. ॰कावा-पु. मराठे लोकांचा स्वाभाविक धूर्तपणा; कावेबाजपणा. ॰भाषा-स्त्री. संस्कृत-प्राकृतापासून झालेली एक भाषा; मराठी. ॰मोळा, मराठमोळा-पु. १ मराठे लोकांतील चालीरीति (समुच्चयानें); बाळबोध वळण. 'तुम्ही आपणास पवार म्हणवितां पण तुमच्या घरीं मराठमोळा दिसत नाहीं.' २ (विशेषतः) मराठ्यांतील बुरखा, पडद्याची चाल; कुलीनपणा; जुनें वळण. 'मराठमोळा तुझा । जपुन चाल लोक छिनाल म्हणतील नको नारी उडवु भुजा ।' -होला १४३. ॰वैखरी-स्त्री.मराठी भाषा. 'मी बोलिलों मराठी वैखरी ।' -विपु. ७.१४७. मराठेशाही-स्त्री. मराठ्यांचें राज्य, अमदानी. 'निपजणार कोण धनाजी । तारण्या मराठेशाही-यापुढें ।' -विक १०. मराठेशाही पागोटें-न. पागोट्याची एक तऱ्हा.
नक्षी
स्त्री. वेलबुट्टी; चित्रविचित्र काम; नक्शी, नक्शी पहा. [नक्शा] नक्षीचा मोळा-पु. (सोनारी) दागिन्यावर नक्षी- काम करण्याच्या उपयोगाचा मोळा; खिळ्यासारखें हत्यार. ॰दार-वि. वेलबुट्टीदार; नक्षी केलेलें. [नक्षी + फा. दार् प्रत्यय]
ओळा
पु. रीत; तर्हा; शिस्त; पद्धत; मोळा. 'हिला कांही ओळां नाहीं, नुसता गोळा आहे.' [ओळ]
ओळा
पु. वळण; रीत; तऱ्हा; शिस्त; पद्धत; मोळा; शिक्षण; सवय : ‘पोरीच्या जातीला कामाचा ओळा अवश्य हवा.’ - कुस ८.
उणें
न.१ कमीपणा; न्यूनता; दोष; व्यंग; अपूर्णता; वैगुण्य. 'दैत्यीं देवां आणिलें उणें ।।' -ज्ञा ९.४५०. 'तया पांडवांचें उणें । कीजेचि ना पुराणें । विश्ववंद्यें ।' -ज्ञा १५.२५. 'जें यादवां येईल उगें ।' -उषा ७८५. 'म्हणे स्वकृतिच्या उणें किमपि एकवर्णी न हो ।।' -केका ६१. -शअ. वांचून; शिवाय; वीण. 'जीव घेतलिया उगें चालों नेणसी साजणें ।।' -अमृ २.३९. 'तैसें आवडतें हिं करणें । न निफजे सीणलेयां हिं उणें ।' -राज्ञा १८.९४०. -वि. उणा पहा. [सं. ऊन; प्रा. ऊण.] ॰आणणें- दोष लावणें; कमीपणा आणणें; लाज- विणें. 'वरि झळकति दिव्य कळस । उणें आणति उडुगणास ।' ॰घेणें- आपल्या कमीपणाबद्दल मनास लावून घेणें; दुःख पावणें; स्वतःला कमी समजणें. ॰पाहणें -काढणें-दोष पाहणें; व्यंग काढणें; नांवें ठेवणें. ॰उत्तर-भाषण- न. अपमानकारक, तिरस्कार- व्यंजक, मानभंग करणारें उत्तर. 'तें गुडघ्याएवढें पोर, पण चुलत्याला उणीं उत्तरें करतें ! हा काय त्यांच्या घरचा मोळा तरी !' ॰म्ह- (व.) उणें असे मनी खसे नकट असे नाक परवसे = ज्याच्यांत कांहीं उणें असतें त्यास दुसरें कोणी बोलत असल्यास, तें मलाच तर उद्देशून बोलत नाहींत ना ? असें वाटतें. ॰दुणें-रें-वि. अपमानकारक; निंदा- व्यंजक; कमीअधिक; पाणउतारा करणारें (भाषण); घालूनपाडून बोल- लेंले; उणादुणा पहा. 'भाऊसाहेब काकासाहेबांना उणेंदुरें बोलत असलेले पाहून नमुताईंना जरा राग आला.' -हाच कां धर्म ३३. ॰पणा-पु. कमीपणा. ॰पाणें-पाताळें-न. दोष. 'एकमेकांची उणींपाणीं काढण्यांतच जर आपला असा वेळ जायचा तर उद्यां रणांगणावर काय होणार.' -डावजिंकला. 'त्याचें कशाला उणेंपाताळें काढतेस ? ' -नामदेव नाटक ७६. ॰पुरें-वि. उणापुरा पहा. १ कमीअधिक; सुमारें; सरासरी; अंदाजें; जवळजवळ. 'आपल्या भेटीला उणेंपुरें वर्ष होत आलें.' २ पूर्णअपूर्ण. 'किती अनुवाद, उण्यापुर्या नकला...आढळून येतात हें लक्षांत येईल' -गीर ५.
घोडी
स्त्री. १. सतार, तंबोरा इ. तंतुवाद्यांच्या भोपळ्यावर एकदीड इंच उंचीची हस्तिदंती अगर लाकडी पट्टीची बैठक. हिच्यावरून तारा पुढे खुंटीला गुंडाळलेल्या असतात. २. पूर्वी शाळेत मुलांना देण्यात येणारी एक शिक्षा. वर उंच आढ्याला बांधलेल्या दोरीवर मुलाला लोंबकळत ठेवण्यात येई. अशा प्रकारच्या शिक्षा देण्याच्या प्रकाराला घोडी देणे असे म्हणत असत : ‘एखाद्या मुलाशी माझं वाकडं झालं की, रचलंच त्याच्यावर किटाळ आणि दिलीच त्याला पंतोजीकडून घोडी.’ – चंद्रग्र ८० (क्रि. घेणे, देणे). ३. उभे राहून पखवाज वाजविता यावा म्हणून तयार केलेली घडवंची : ‘इतक्यात देवळाच्या एका कोपऱ्यात मृदंग ठेवावयाची उंच घोडी सुनंदाला दिसली.’ – सुदे २५. ४. गवत इ. वाहण्याकरिता खटाऱ्यावर उभारलेला सांगाडा, चौकट. ५ जमिनीपासून फळा उंच ठेवण्याकरिता व त्याला उतार देण्याकरिता केलेली लाकडी चौकट, सांगाडा. ६. (सुतारी) जे लाकूड तासायचे असते ते हलू नये म्हणून त्याला आधार देणारे दुसरे लाकूड, चौकट इ. हे लाकूड एका विशिष्ट तऱ्हेने सोयीस्कररीत्या बसवतात. ७. (विणकामात) सूत उकलण्यासाठी केलेले लाकडी चौकटीसारखे साधन. ८. (सोनारी) पायात घालण्याच्या साखळ्यांच्या कड्या वाकविण्यासाठी असलेला बोटाइतका निमुळता खिळा, मोळा. (हेट. नाविक) ९. छोटे शीड उभे करण्यासाठी असलेले कमानीसारखे लाकूड. १०. बंधाऱ्याच्या मुखाशी (पाणी सोडण्याच्या ठिकाणी) पडद्यासारखी बांधलेली भिंत. या भिंतीवरून पाणी जात असते. ११. गलबताच्या कडेला शौचाला बसण्याकरिता टांगलेली लाकडी चौकट (हेट.). १२. साकटणे; सकोटण. १३. दाराच्या दुहेरी चौकटीच्या वरच्या बाजूचे, परस्परांना जोडणारे दोन लाकडी तुकडे. १४. तीन पायांचे दिवा ठेवण्याचे बुरडी तिकाटणे, तिवई. १५. पाटाला खाली मारतात ते (दोन) आडात. १६. हत्तीवरील हौदा, चौकट : ‘साहेब नौबतीकरिता हत्तींवर लाकडी घोडी घालून…’ – ऐरा ९·५०६. १७. उभे खुंटाळे; स्टँड : ‘तिकोनी खुंट्यांची घोडी आणि रुमाल ठेवावे.’ – स्वारीनियम ७०. १८. सामान ठेवण्याचा घोडा. १९. गोट्यांच्या खेळात हरणाराला खेळाच्या शेवटी मिळणारी शिक्षा. [क. कानगुडी = हातपाय बांधणे]
चोर
पु. १ चोरणारा, चोरी करणारा, दुसर्याची वस्तु त्याला नकळत, जबरदस्तीनें लुबाडणारा माणूस. 'चोर भांडारी करावा । घसरतांच सांभाळावा ।' -दा १९.९.९. २ (एखाद्या- पासून कांहीं गोष्ट, वस्तु इ॰) छपवून, लपवून ठेवणारा; (एखादी गोष्ट स्वतःपाशींच) दाबून ठेवणारा, दडपून टाकणारा. ३ केळफु लांतील फणीच्या दात्यांतील कठिण व पसरट माथ्याची काडी, दांडा. यास कावळा असेंहि म्हणतात. हा भाजीच्या उपयोगी नसतो म्हणून फेंकून देतात. ४ (समासांत) प्रछन्न; गुप्त; लपवि- लेला; छपविलेला; राखून ठेवलेला; खाजगी; आड; बाजूचा; कोंपर्याचा इ॰ अर्थीं. उ॰ चोर-अडसर-अरगळ-कडी-खीळ- गांठ-छिद्र इ॰. असे अनेक सामासिक शब्द बनले आहेत व बनवितां येतात. त्यांपैकीं महत्त्वाचे सामासिक शब्द पुढें दिले आहेत. ५ (गंजिफा, पत्ते, इ॰ खेळांतील परिभाषा) एक पान; प्रत्येक रंगांतील हुकुमाच्या खेरीज इतर पान, पत्ता. 'त्याच्या हातांत एकच बाकी राहिलेला पत्ता हुकूम नसावा तो चोर असावा.' ६ (स्वतःस) मागें राखणारा; चोरून ठेवणारा; अंग काढतें घेणारा, चुकविणारा; चुकार याअर्थीं पुढें चोर शब्द लावून अनेक सामासिक शब्द होतात. उदा॰ कलमचोर = लिहितांना कांहीं गोष्टी राखून ठेवणारा, दाबून ठेवणारा, वगळणारा, चोरून ठेवणारा; सांगितल्यावर हुकूम न लिहिणारा. खांदचोर = १ दुसर्याबरोबर काम करतांना जो आपला खांदा काढता घेतो तो (मनुष्य, पशु इ॰); कामचुकार. २ (ल.) निकडीच्या वेळीं मदत, द्रव्य देण्याचें कर्तव्य न करणारा; तोंडघशीं पाडणारा. चाकरीचोर = लबाडीनें चाकरींत, सेवेंत कुचराई, अंगचोरपणा करणारा. पाठ- चोर = सहज रीतीनें, सहजासहजीं पाठीवर बसूं न देणारा (घोडा); सहजासहजीं पाठीवर ओझें न ठेवूं देणारा (बैल). पायचोर = १ एखाद्या करारांतून, कामांतून गुप्तपणें, गपचिप काढतें घेणारा, अंग काढून घेणारा. २ चोरटेपणानें, हळूच, आवाज होऊं न देतां पाऊल टाकणारा; चाहूल न देणारा. ३ चालण्यांत, पळ- ण्यांत कुचराई करणारा (मनुष्य, घोडा). बळचोर = बळ राखून, जेवढें खर्चावें तेवढें न खर्चून काम करणारा. चुकार; मनःपूर्वक शक्य तितकें शक्तिसामर्थ्य खर्च न करणारा. मतलबचोर = आपला हेतु, बेत गुप्त ठेवणारा; मतलबाचा थांग लागूं न देणारा. मस- लतचोर = १ स्वतःची योजना, मसलत गुप्त ठेवणारा. २ दुस- र्याची मसलत फोडणारा, काढून घेणारा. विद्याचोर = १ शिका- वयाच्या विद्येचा, शास्त्राचा कांहीं भाग विद्यार्थ्यांपासून चोरून ठेवणारा; पुरी विद्या न देणारा (शिक्षक). २ विद्या चोरणारा; चोरून शास्त्रीय ज्ञान, गुह्य संपादन करणारा; नकळत विद्या मिळ- विणारा (शिष्य) इ॰. अंगचोर, कामचोर इ॰ आणखी अनेक सामासिक शब्द आहेत. वरील शब्द कामचोरू, खांदचोरू, अंगचोरू असेहि योजण्याचा प्रघात आहे. [सं.] (वाप्र.) चोरांची दावण देणें-चोरांची दावण बांधून त्यांचीं डोकीं सड- कणें, चाबकानें बडवणें. म्ह॰ १ चोराच्या मनांत चांदणें = चोराला चांदण्याचें भय वाटतें, कारण त्यांत त्याची चोरी उघडकीस येण्याची भीति असते. चोराचें मन नेहमीं त्यास खात असतें. अपराध्याला नसती शंका येत असते. 'वाढति सदगुण तों तों प्रेम करिति लोक पांडवावरि ते । चोरासि चांदणेसें तापचि देतें सुयोधना अरितें ।' -मोसंभा १०. २ चोरावर मोर = एका चोराला लुबाडणारा दुसरा सवाई चोर; एक वरचढ एक; शेरास सवाशेर. 'तो आतां चोरावर मोर होण्याच्या विचारांत गढून गेला होता.' -स्वप २१३. सामाशब्द-॰अंक-अंख-आंख- पु. १ कापडाच्या गांठीवर, कापडावर, विक्रीच्या वस्तूवर घात- लेला, खरी किंमत दाखविणारा, अत्यंत बारीक आंकडा. हा आंकडा दुकानदाराच्या स्वतःच्या उपयोगाकरितां असतो. हा गिर्हाइकास कळवावयाचा नसतो. गिर्हाइकाकरितां किंमतीचा दुसरा मोठा पण खोटा आंकडा दिलेला. २ हस्तलिखित पुस्तकाच्या पानावर घातलेला अनुक्रमाचा बारीक आंकडा. ३ (सामा.) गुप्त आंकडा. [चोर = गुप्त, खासगी + अंक = आंकडा] ॰ओंटी-स्त्री. दिसण्यांत लहान पण फार दूध देणारी (गाईची, म्हशीची) ओटी, कांस. ॰ओंटी भरणें-सक्रि. स्त्रीच्या प्रथम गर्भारपणाच्या तिसर्या किंवा चवथ्या महिन्यांत खासगी रीतीनें (गरोदर स्त्रीस शिंक्याखालीं बसवून) ओटी भरणें. तीन महिने- पर्यंत स्त्री गर्भार आहे हें निश्चित कळूं शकत नाहीं यावरून या समारंभास चोरओटी म्हणतात. ओटीभरण पहा. [चोर = गुप्त + ओटी] ॰ओंवा-पु. एक प्रकारचा ओंवा. ॰कांटा-पु. १ तापाची बारीक कसर; थंडीचा बारीक कांटा; चोरटा ताप. (क्रि॰ येणें; लागणें; भरणें; वाटणें). २ खोटा तराजू. [चोर + कांटा = शहारे, तराजू] ॰काठी-स्त्री. (शिकार) जनावर माण- साळण्याची एक युक्ति. चारपांच मनुष्यें समोरून पन्नास फुटां- वरून घोंगडी पांघरून एकदम ओरडत पळत येऊन जनावराच्या पायांजवळ व तोंडाजवळ येऊन पडतात, लोळतात. व तोंड उघडून त्यास गोंजारतात. या क्रियेस चोरकाठी म्हणतात. -चिमा १५. ॰काम-न. १ कितीहि केलें तरी दुसर्याच्या डोळ्यांत न. भरणारें काम. २ पार पडल्यावर ज्याचे फारच थोडे अवशेष शिल्लक राहतात असें काम. ॰कोनाडा-पु. कोनाड्यांत अस- लेला, सहज न कळणारा दुसरा गुप्त कोनाडा. [चोर = गुप्त + कोनाडा] ॰क्रांत-क्रांति-स्त्री. चोरांची पुंडाई; चोरांनीं केलेली लुटालूट, नासधूस, धुळधाण. [चोर + क्रांति = पुंडाई, बंड] ॰खडी-वि. कोंदणांत बसविलेलें. 'लेईला अलंकार भूषणें परवडी । दिव्य रत्नें चोरखडी खेवणें तयां ।' -निगा १२४. ॰खण-पु. १ (पेटींतील, कपाटांतील) गुप्त कप्पा, खण, पूड. २ घरांतील बिनमहत्त्वाची, बारीक खोली, भाग. [चोर = गुप्त + खण] ॰खाई-स्त्री. मुशाफरावर हल्ला करून लुटण्याच्या सोयीची, खबदाडीची, दर्याखोर्यांतील अडचणीची जागा; अरुंद खिंड. [चोर + खाई = खोलगट जागा] ॰खिंड-स्त्री. चोरांनीं प्रवाशांना लुटण्याच्या सोयीची दोन डोंगरांतील अरुंद वाट. चोरखाई पहा. ॰खिडकी-स्त्री. १ एकांतात बसावयाची लहान खिडकी. २ (ल.). (लेखांतील, भाषणांतील) पकड, सोडवण, छिद्र; (लेखांतून, भाषणांतून) निसटावयासाठीं केलेली संदिग्ध वाक्यरचना, पळवाट ३ प्रसंगविशेषीं निसटून; पळून जाण्यासाठीं केलेली लहान व गुप्त खिडकी. ॰खिसा-पु. आंगरख्याचा, कोटाचा गुप्त खिसा. ॰गल्ली-स्त्री. (चोरांना लपण्याच्या सोयीची) आडगल्ली, बोळ. ॰गस्त-स्त्री. रात्रीं दुसर्याला कळूं न देतां पोलीस लोक मुकाट्यानें जी फेरी घालतात ती; गुप्तपणें घात- लेला रस्त्यावरील फिरता पहारा; मुकी गस्त; वाद्याशिवाय गुप- चुप घातलेली गस्त. याच्या उलट राजगस्त. [चोर + गस्त = पहार्याची फेरी] ॰गस्तीनें-क्रिवि. लपूनछपून; कोणास समजूं न देतां; गुप्तपणें. (क्रि॰ वागणें; येणें; जाणें; फिरणें). याच्या उलट उघड- मराठी. ॰गांठ-स्त्री. गुप्त गांठ; दिसून न येणारी गांठ. ॰घडी- स्त्री. अपुरी घडी; लहान घडी; गिर्हाईक कापड विकत घेतांना त्याची लांबी घड्यांवरून, सळांवरून ठरवितात. म्हणून त्यांना फसविण्यासाठीं व्यापारी एका घडीच्या पोटांत दुसरी लहान अपुरी घडी घालतो ती. ॰घर-न. गुप्त खोली, कप्पा, खण, खाना. ॰घाई-स्त्री. १ चोर आले असतां उडणारी धांदल, घाई. २ (ल.) अतिशय धांदल; धांवपळ. ॰चाऊ(हू)ल-स्त्री. गुप्तपणें ऐकून, पाहून लागलेली एखाद्या माणसाच्या, जनावराच्या अस्ति- त्वाची, हालचालीची चाहूल, कानोसा. [चोर = गुप्तपणें + चाहूल = कानोसा, हालचालीचा आवाज] ॰चिरटा-चिलटा- चिल्लट-पु. चोर वगैरे. 'हल्लीं चोराचिलटांचा इथें फार त्रास आहे.' -भा ५२. 'वेळप्रसंग पडल्यास चोराचिरट्यां- पासून संरक्षण करण्याला उपयोगी पडतील असे शिपाई प्यादे ......वगैरे प्रकारचे लोक त्यांजपाशीं फारच थोडे होते.' -विंध्याचल १११. [चोर + चिलट; किंवा चोर द्वि.] ॰चुंबा-पु. १ गुप्तपणें दिलेला बोळा, दट्ट्या २ (ल.) लांच. (क्रि॰ पडणें; देणें). [चोर + चुंबा = कापडाचा, चिंध्यांचा बोळा, दट्ट्या] ॰जासूद-पु. गुप्त हेर, चार; टेहळ्या; (इं.) डिटेक्टिव्ह. -राव्यको १.१७. ॰ताजवा-पु. खोटी तराजू; चोरकांटा. ॰ताप-पु. हातास न लागणारा परंतु शरीरांत असणारा बारीक ताप; हाडी. ज्वर; तापाचीं सतत असलेलीं बारीक लक्षणें; चोरटा ताप. [चोर + ताप] ॰थरा-पु. (महानु.) खोटें नाणें. चोरमोळा पहा. 'टाकु पाडिला चोरथरा ब्रह्मविद्येचा ।' -भाए ६३५ 'ऐसा प्रपंच टांक चोरथरा । मूढीं सुखभोगाचिया मोहरा ।' -ज्ञाप्र ५८०. ॰दरवाजा-दार-पुन. गुप्त, खाजगी दार; मागचें दार. ॰धाड-धाडा-स्त्रीपु. चोरांनीं केलेला आकस्मिक घाला, हल्ला; दरवडा; डांका. ॰नजर-स्त्री. १ (दुसर्याला) नकळत पाहणें; डोकावून पाहणें, गुप्तपणें टेहळणी करण्याकरितां टाक- लेली नजर; चोरून पाहणें; चोरटी दृष्टि. 'घरांतील बायका चोरनजरेनें जावयाकडे पाहतात.' -मोर २४. २ चोरासारखी मुद्रा, चर्या, दृष्टि. [चोर + नजर = दृष्टि] ॰पडदा-पु. १ आंतील गुप्त पडदा. २ शरीराच्या आंतील पडदा; अंतस्त्वचा ॰पण-न. (बायकी) मुलींच्या खेळांत येणारी चोर होण्याची पाळी. ज्या मुली- वर डाव असतो, ती जर डाव न देतां जाऊं लागली तर इतर मुली तिला आपलें चोरपण दुसरीस देऊन जाण्यास सांगतात, [चोर + पण] ॰पाइकी-स्त्री. चोरून हल्ला करणें. -पया ६६. -शर. [चोर + पाइकी] ॰पाऊल-पाय-न.पु. आवाज न करतां टाकलेलें पाऊल; पावलांचा शब्द न करतां चालणें; चोरटें चालणें; चोर चाहूल. ॰पावलांनीं-क्रिवि. मुकाट्यानें; शब्द न करतां. 'चला चोरपावलांनींच पुरुषोत्तमरावांच्या वाड्यात.' -इंप ३१. ॰पाणी-न. दुखणेकर्यास, नुकतेंच दुखण्यांतून उठलेल्यास-खोलींत स्नान घालण्याकरितां तयार केलेलें औषधि- युक्त तापविलेलें पाणीं. ॰पान्हा-पु. १ धार काढतेवेळीं गाय किंवा म्हैस मुद्दाम कांसेचा संकोच करून दुधाचा कांहीं अंश वासरा- साठीं राखून ठेवते तो. २ असें राखून ठेवलेलें दूध बळजबरीनें काढ- तात तें; गाईनें, म्हशीनें नाखुषीनें दिलेलें थोडें दुध. ३ (ल.) लघवी केल्यानंतर पुन्हां थोडथोडी होणारी लघवी; न कळत लघ- वीस होणें; लघवीस थोडें थोडें होणें; 'तेज सांडूनि जाय नयना । टाळी पडोनि ठाती काना । मुततां लागे चोरपान्हा । तरी देहा- भिमाना वाढवी ।' -एभा २२.५२८. [चोर + पान्हा] ॰पाळत- पाळती-स्त्री. आपण दृष्टीस न पडतां दुसर्याची, दुसर्याच्या घरची, बातमी युक्तीनें काढण्याचा प्रकार; गुप्त रीतीनें ठेवलेली पाळत; पाळत; पाळती पहा [चोर + पाळत = नजर] ॰पेठ- स्त्री. ज्यांत खोटीं वजनें वापरतात व चोरटा धंदा चालतो असा बाजाराचा गांव, पेठ; चोरबाजार. ॰पोर-न. (समुच्चायार्थीं) चोर; उचल्या; भामटा इ॰ लहानसहान चोर्या करणारीं चोरटीं पोरें; उचल्ये इ॰. ॰बातमी-स्त्री. हेराकडून समजलेली गुप्त बातमी; चोरपाळतीनें कळलेली बातमी. -शिदि २६९. ॰भय-न. चोरांपासून उत्पन्न होणारी भीति. ॰भूक-स्त्री. १ थोडी शिल्लक राहिलेली, पूर्णपणें न शमलेली भूक. ३ थोडेसें खाऊन शांत होणारी भूक; किंचित् भूक. (क्रि॰ लागणें; येणें; सुटणें; वाटणें). ॰महाल-पु. १ गुप्त जागा, खोली. २ रखेल्या ठेवलेली जागा; दासीमहाल. ॰म(मु)ळ्या-क्रिवि. लपून छपून; गुप्तपणें; पाळत ठेवून; गुपचूप; गुप्तपणें(टेहळणें). (क्रि॰ पाहणें). ॰मूठ-स्त्री. पकडलेल्या जनावरास तीन दिवस एका जागेवर पडूं देतात, त्यास चोरमूठ म्हणतात. -चिमा ९. ॰मोळा-पु चोरांचा शिक्का; खोटें नाणें; चोरथरा पहा. 'हा चोरमोळा असिका । प्रपंचाचा ठसा लटका । जो प्रवृत्ति पडिला लोकां । अज्ञानांचा ।' -ज्ञाप्र ५४९. 'अवघेचि जालें चोरमोळे । नरदेहावांचौनिया ।' -भाए २४७. [चोर + मोळा; का. मोळे = खिळा; म. मोळा = रीत] ॰रान-न. चोर, लुटारू इ॰ कानीं युक्त असें रान. [चोर + रान] ॰लक्षण-न. चोरटेपणाचा स्वभाव दाखविणारी मुद्रा, नजर, चेहर्याचें वळण, चालण्याची धाटी इ॰; (पाहिलेला मनुष्य) चोर आहे असें दर्शविणारें लक्षण; चोरटेपणाची छाप. [चोर = चोरी करणारा + लक्षण = चिन्ह] ॰वड-वंड, चोरावडा- वंडा, चोरवण-वाण, चोरवें-स्त्रीपुन. चोरांनीं केलेला उत्पात, धुमाकूळ, अनर्थ, नासाडी, लुटालूट; चोर फार माजल्यामुळें उत्पन्न झालेली दुर्दशा. (क्रि॰ सुटणें; मातणें; होणें; माजणें; उठणें; मोडणें; दाबणें; दबणें).[चोर + वड-ण प्रत्यय] ॰वाट-स्त्री. गुप्त वाट, मार्ग. 'किल्ल्यांतून व वाड्यांतून बाहेर पडावयास चोरवाटा असत.' -कोरकि ३९१. ॰वाडा पु. १ चोरांचा अड्डा; चोरांची वस्ती. २ ज्या घरांतील सर्वच माणसें चोराप्रमाणें वागतात तें घर. विद्या-स्त्री. १ गूढ, अज्ञात शास्त्र, कला. २ फारच थोडया लोकांस माहीत असणारी व क्वचितच शिकविली जाणारी विद्या. गुप्त विद्या; ३ जारणमारणाची, जडी- बुटीची विद्या. [चोर + विद्या] ॰वेळ-ळा स्त्री. १ दिवसाच्या किंवा रात्रीच्या तीस घटकांचे प्रत्येकीं तीनपूर्णांक तीन चतुर्थांश घटकेचे असे आठ भाग कल्पिले आहेत त्यास अमृतवेळ, काळवेळ, शुभ- वेळ इ॰ नांवें आहेत. त्या आठांपैकीं एका वेळेस चोरवेळ किंवा चंचल वेळ असें म्हणतात. वेळ पहा. २ ज्या वेळीं चोरांची विशेष भीति असते ती वेळ. ॰शिवण-स्त्री. आंतील, बाहेर न दिसणारी शिवण; गुप्त शिवण. ॰हट्टी-हाटी-स्त्री. चोरवाडा; चोरांचा अड्डा; चोरांचें वसतिस्थान. [चोर + हट्टी = हाट, बाजार] ॰हरकारा-पु. गुप्त दूत. -राव्यको १.१८.[चोर + हरकारा = निरोप देणारा दूत, हलकारा] चोरापोरी-मोरी, चोरींपोरीं-क्रिवि. चोरांनीं आणि चोरट्या उनाड पोरांनीं; चोर, भामटे इ॰ कां कडून (चोरून नेलेला इ॰). 'गुळाची ढेप चोरापोरीं गेली.' [चोर + पोर] चोरामोरा-क्रिवि. चोरट्या मुद्रेनें; चोरटेपणानें; चोरूनमारून. 'असा चोरामोरा किती दिवस वहिवाटणार.' -सूर्यग्र १२९.
घोडा
पु. १ खूर असलेला एक चतुष्पाद प्राणिविशेष. ह्याचा उपयोग ओझे वाहण्याच्या, गाडी ओढण्याच्या व बसण्याच्या कामीं करतात. ह्याच्या जाती अनेक आहेत. अरबी घोडे जग- प्रसिद्ध आहेत. लहान घोड्यास तट्टू व घोड्याच्या पोरास शिंगरूं म्हणतात. घोड्याच्या आकृतीवरून, गतीवरून, उपयोगा- वरून व लक्षणेनें हा शब्द अनेक वस्तूंस लावतात. २ बुद्धिबळाच्या खेळांतील एक मोहरा. हा सर्व बाजूंनीं दोन सरळ व एक आडवें (अडीच) घर जातो. या मोहर्याचा विशेष हा आहे कीं हा इतर मोहर्यांच्या डोक्यावरून उडून जातो, तशी गति इतर मोहर्यांना नसते. ३ बंदुकींतील हातोडीच्या आकराचा अव- यवविशेष. हा दाबला असतां ठिणगी उत्पन्न होते व बंदूकीचा बार उडतो; चाप. ४ (मुलांचे खेळ) दोन पायांत काठी घालून (तिला घोडा मानून) मुलें धांवतात तो काठीचा घोडा. ५ (उप.) मूर्ख व ठोंब्या असा वयस्क मुलगा; वयानें मोठा पण पोरकट मनुष्य. ६ वस्त्रें, कपडे ठेवण्यासाठीं खुंट्या ठोकलेला खांब; स्नान करणार्या माणसाचे कपडे ठेवण्याकरितां जमिनींत रोंवलेली काठी, खांब; (इं.) स्टँड. ७ (ल.) शरीर वाहून नेतात म्हणून पायांस लक्षणेनें (दहाबोटी) घोडा असें संबोधितात; तंगड्या. 'आमचा दोन पायांचा घोडा आम्हाला हवें तेथें वाहून नेईल.' ८ पाळणा टांगण्यासाठीं एका आडव्या लांकडाला चार पाय लावून करतात ती रचना; घोडी. ९ पालखीचा दांडा ज्याला बसविलेला असतो तें दुबेळकें बेचक; पालखीं तबे- ल्यांत वगैरे ठेवतांना ज्यावर ठेवतात तीं दुबळकें असलेलीं लाकडें प्रत्येकीं. १० गाड्याच्या बैठकीच्या चौकटीचीं दोन बाजूंचीं लांब लांकडें प्रत्येकी; गाडीच्या दांडयास आधार द्याव- याचें दुबेळकें. ११ मूल रांगावयास लागलें असतां दोन हात व दोन गुडघे जमीनीला टेकून करतें ती घोड्यासारखी आकृति. (क्रि॰ करणें). १२ मृदंग; पखवाज ठेवण्याची घडवंची; घोडी; (दिवे इ॰ लावण्याची) दोन बाजूस पायर्या असलेली घडवंची; (पिंपे, पेट्या ठेवण्याची) लांकडी घडवंची. १३ नारळ सोलण्याचा, शेंड्यास सुरी बसविलेला खांब; नारळ सोलण्याचा एक प्रकारचा सांचा. १४ समुद्राच्या भरतीच्या पाण्याचा चढ, फुगोटी, फुगारा; लाटेचा उंच भाग; नद्यांच्या मुखांतून वर गेलेलें समुद्राच्या भरतीचें पाणी. -सृष्टि ५७. १५ ओबडधोबड असा आंकडा, फांसा, पकड. १६ (ल.) घोडेस्वार. 'तीन हजार घोडा पेशव्यांचे तैनातींत ठेवावा.' -विवि ८.७.१२९. १७ दाराच्या दुहेरी चौकटीच्या वरच्या बाजूचे, परस्पराला जोडणारे दोन लाकडी तुकडे (त्यांच्याच जोडीच्या खालच्या बाजूच्या तुकड्यांस छिली म्हणतात). १८ (खाटीक इ॰ कांचें) साकटणें, सकोटन; खाटकाचा ठोकळा. १९ (मुद्रण) केसी व ग्याली ठेवण्यासाठीं केलेली घडवंचीवजा चौकट. २० फळा, चित्रफलक इ॰ उभा ठेवण्याची लाकडी उभी चौकट. २१ (कों.) रहाटगाडग्याचें कोळबें ज्यावर ठेवतात ती लांकडी चौकट. २२ (पोहोण्याचा) चार भोपळ्यांचा तराफा. २३ (गो.) (विटी दांडूचा खेळ) विटी मारण्याचा एक प्रकार. (क्रि॰ मारणें). [सं. घोटक; प्रा. घोड; गु.घोडो; सिं. घोडो; स्पॅनिश जि. गोरो; अर. घोरा] घोडी-स्त्री. १ घोडा या जातीच्या प्राण्याची मादी. २ सतार, तंबोरा इ॰ तंतुवाद्यांच्या भोपळ्याच्या मध्यावर हस्ती- दंती अगर लांकडाची पाटाच्या आकृतीची एक इंची किंवा दीड- इंची पट्टीची बैठक; तिच्यावरून तारा पुढें खुंटीस गुंडाळलेल्या असतात. ३ मुलांना शिक्षा देण्याकरितां जिला हातानें धरून शिक्षा दिलेला लोंबकळत असतो अशी आढ्यापासून लोंबणारी दोरी, फांसा; मुलांस टांगण्यासाठीं उंच बांधलेली दोरी. अशी शिक्षा पुर्वीं शाळांतून फार देत. (क्रि॰ घेणें; देणें). 'एखाद्या मुलांशी माझं वांकडं आलं कीं, रचलंच त्याच्यावर किटाळ आणि दिलीच त्याला पंतोजीकडून घोडी.' -चंद्रग्र ८०. ४ उभें राहून पखवाज वाजविण्याकरितां पखवाज ठेवावयाची घडवंची. 'इत- क्यांत देवळाच्या एका कोंपर्यांत मृदंग ठेवावयाची उंच घोडी सुनंदाला दिसली.' -सुदे २५. ५ गवत इ॰ वाहण्याकरितां खटार्यावर उभारलेला सांगाडा, चौकट. ६ फळा जमीनीपासून उच ठेवण्याकरितां व त्याला उतार देण्याकरितां केलेली लांकडी चौकट, सांगाडा. ७ वयस्क असून पोरकटपणा करणारी, खिदड- णारी मुलगी; खिदडी; धांगडधिंगी; भोपळदेवता; घोडकुदळ. ८ (सुतारी) तासावयाचें लांकूड हलूं नये म्हणून त्याला आधार- भूत असें दुसरें लांकूड, चौकट इ॰ सोईनें बसवितात तें. ९ (विणकामांत) सूत उकलण्यासाठीं केलेलें लांकडी चौकटीसारखें साधन. १० (सोनारी) पायांत घालावयाच्या सांखळ्यांच्या कड्या वांकविण्यासाठीं असलेला बोटाइतका जाड असा निमु- ळता मोळा. ११ (हेट. नाविक) पोरकें (लहान) शीड उभें करण्यासाठीं असलेलें कमानीसारखें लांकूड. १२ बंधार्याच्या मुखाशीं (पाणी सोडण्याच्या ठिकाणीं) पडद्यासारखी बांधलेली भिंत. हिच्यावरून पाणी जात असतें. १३ (हेट.) गलबताच्या कडेस शौच्यास बसण्याकरितां टांगलेली लांकडी चौकट. १४ सांकटणें; सकोटण. घोडा अर्थ १७ पहा. १५ तीन पायांचें दिवा ठेवण्याचें बुरडी तिकाटणें, तिवई. १६ पाटास जे दोन आडात मारितात ते प्रत्येकी. १७ हत्तीवरील चौकट; हौदा. 'साहेब नौबतीकरितां हत्तींवर लाकडी घोडी घालून...' -ऐरा ९.५०६. १८ उभें खुंटाळें. (इं.) स्टँड. 'तिकोनी खुंट्यांची घोडी आणि रुमाल ठेवावे ' -स्वारीनियम ७०. १९ सामान ठेवण्याचा घोडा. घोडें-न १ सामा (लिंगभेद न धरतां) घोडा या जातीं- तील जनावर. ' कृष्णाकांठचीं घोडीं सडपातळ पण चपळ अस- तात.' २ खटार्याच्या साटीच्या चौकटीचीं दोन बाजूंचीं उभीं लाकडें; घोडा अर्थ ९ पहा. घोडकें अर्थ १ पहा. ३ चार भोंपाळे लावलेला पाण्यावर तरंगणारा तराफा. घोडा अर्थ २१ पहा. ४ (व.) गाडीचे दांडे-जूं ज्यावर ठेवतात तें दुबेळकें. घोडा अर्थ ९ पहा. [सं. घोडा] (वाप्र.) घोडा आडवा घालणें- (एखाद्या कार्यात) अडथळा, विघ्न आणणें. 'आणि म्हणूनच तुम्ही घोडा आडवा घातलांत वाटतं ?' -चंद्रग्र ६८. ॰उभा करणें-बांधणें-(घोडा) थोडा वेळ थांबवणें; जरासें थांबणें; घाई न करणें (घाईंत व धांदलींत असणार्या मनुष्यास उद्देशून ह्या वाक्प्रचाराचा उपयोग करतात.) ॰काढणें-१ (बांधून ठेव- लेला घोडा बाहेर नेणें) घोडा हांकारणें, पिटाळणें २ (ल.) (एखाद्यानें) पळ काढणें; पोबारा करणें; निसटणें. ॰चाल- विणें-(कर.) (ल.) डोकें खाजवणें; युक्ति लढविणें. ॰टाकणें- घोडा फेंकणें; उडवणें; अंगावर घालणें. 'आरेरे टाकौनि घोडा । भणती यांचिआं जटैं उपडा । ' -शिशु १४१. ॰मैदान जवळ असणें-(घोडा धांवण्यांत कसा काय आहे याची परीक्षा त्यास मैदानांत पळवून करतां येते यावरून) ज्याची परीक्षा करा- वयाची तो पदार्थ, मनुष्य व परीक्षेस लागणारी सामग्री हीं दोन्ही जवळ असणें असा अर्थ होतो; एखाद्या गोष्टीची निरर्थक चर्चा न करतां तिला कसोटीला लावणें, कसोटीचा वेळ किंवा सामुग्री जवळ असणें; हा सूर्य हा जयद्रथ. 'कोरडी बढाई कशाला पाहिजे ? घोडामैदान जवळच आहे.' ॰हांकणें-पळून जाणें; निघून जाणें; पोबारा करणें; घोडा काढणें पहा. 'पंतोजीबुवास पाहून त्या पोरानें घोडा हांकला. 'घोडी काढणें-भरविणें- सक्रि. (माण.) घोडीस घोडा दाखविणें, देणें; घोडी फळविणें. घोडी घेणें-(एखाद्याशीं) घांसणें; कटकट करणें; मत्सरबुद्धीनें दोष काढणें. घोडें उभें करणें-अडथळा आणणें. 'बाळासाहेब नातूसारख्यांनीं विशेष प्रसंगीं एखादें घोडें उभें केलें तरी त्याकडे दुर्लक्ष्य करून ज्यानें त्यानें आपला पंथ सुधारावा.' -आगर ३.१४४. (एखाद्याचें) घोडें थकणें-एखाद्यानें (प्रवास, धंदा, व्यापार, अभ्यास इ॰ कांत) थकून जाणें; हतबल होणें; पुढें रेटण्याची शक्ति न उरणें. (एखाद्यानें आपलें) घोडें पुढें दामटणें-ढकलणें-हांकणें-घालणें-१ इतरांच्या पूर्वीं आपला कार्यभाग साधून घेण्याचा घाईने प्रयत्न करणें. 'या शर्यतींत जो तो आपलें घोडें पुढें दामटायला पहात आहे. -नि. 'ब्रिटिश वसाहतीनीं आपल्या हक्कांचें घोडें पुढें दामटलें.' -सासं २.४४६. २ लुब्रेपणानें दुसर्यांच्या संभाषणांत तोंड घालून त्यांच्यावर आपले विचार लादणें. (एखाद्याचें) घोडें मारणें-एखाद्याचें नुकसान करून त्याला राग आणणें (पूर्वीं प्रवासाचें मुख्य साधन घोडें असे. प्रवासाचें घोडें ठार केल्यास त्याचा प्रवास थांबत असे व त्यामुळें त्याचें फार नुकसान होई यावरून) एखाद्याचें फार नुकसान करणें. 'मी काय तुझें घोडें मारलें आहे ?' (आपलें) घोडें पुढें ढकलणें-आपलें काम प्रथम करूं लागणें; आपल्या कामाला महत्व देणें. गांडी- खालचें घोडें-संसारादि निर्वाहक मालमत्ता, वाडी इ॰ आधारभूत मुख्य साधन. म्ह॰ आपले गांडीखालचें घोडें गेलें, मग त्यावर महार बसो कीं चांभार बसो. घोडीं आडवीं घालणें-१ शत्रूवर तुटून पडून त्याच्या चालीला, पळाला अड- थळा करणें. २ (ल.) (एखाद्यास त्याच्या कामांत) संकट, अडथळा, व्यत्यय आणणें. 'जर त्यांणीं आपल्यावर चालून घेतलें तर आम्ही आडवीं घोडीं घालतों. ' -ख ४२९७. घोडीं घालणें-घोड्यांच्या अनीना उचलणें-घोडदळांतील सर्व स्वारांनीं इर्षेनें शत्रूवर एकदम तुटून पडणें. -होकै ३. घोड्याच्या, हत्तीच्या पायांनीं येणें व मुंगीच्या पायांनीं जाणें-(आजार, संकट, अडचण इ॰ च्या संबंधांत हा वाक्प्र- चार योजतात) जलदीनें येणें व धिमेधिमे जाणें; आजार इ॰ जलदीनें येतात पण अतिशय हळू हळू नाहींसे होतात यावरून वरील वाक्प्रचार रूढ आहे. (एखाद्याच्या) घोड्यानें पेण (पेंड)खाणें-या वाक्प्रचारांत पेण = प्रवासांतील टप्पा, मुक्का- माची जागा या ऐवजीं चुकीनें पेंड हा शब्द उपयोगांत आणतात. लांबच्या प्रवासांत निरनिराळ्या टप्प्यांच्या ठिकाणीं घोडीं उभीं राहत. त्यामुळें टप्प्याचें ठिकाण आलें कीं घोडें तेथें अडे, पुढें जात नसे. यावरून वरील वाक्प्रचार एखादें कार्य करतांना कोणी अडून बसल्यास त्यास. 'तुझें घोडें कुठें पेण खातें' असें विचारतांना उपयोगांत आणतात. घोड्यापुढें धावणें-जिकीरीचें, दगदगीचें; कष्टाचें काम करणें. (एखा- द्याच्या) घोड्यापुढें धावणें-एखाद्याची कष्टाची सेवा, चाकरी करणें; (उप.) एखाद्याची ओंगळ खुशामत करणें; एखाद्याची थुंकी झेलणें. घोड्यावर घोडा घालणें-(लिलांव इ॰ कांत) चढाओढ करणें; एखाद्यानें केलेल्या किंमतीपेक्षां अधिक किंमत पुकारणें; उडीवर उडी घालणें. घोड्यावर बसणें-दारू पिऊन झिंगणें;ताठ्यांत असणें. घोड्यावर बसून येणें-घाईनें येणें; आपलें काम तांतडीनें करण्यास दुसर्यास घाई करणें. सर घोड्या पाणी खोल किंवा पाणी पी-(घोड्या मागें हट, पाणी खोल आहे. तेथूनच पाणी पी) गोष्ट मोठी कठिण आहे, मागें परततां येणें शक्य आहे तोंच परतावें याअर्थी. म्ह॰ १ घोडा आपल्या गुणानें दाणा खातो = चांगला घोडा खूप काम करून आपल्याला खाद्यहि जास्त मिळवतो. त्याला जास्त देण्यास मालक असंतुष्ट नसतो. यावरून चांगला चकर आपल्या गुणानें व मेहनतीनें मालकाकडून पगार वाढवून घेतो. २ घोडा स्वार (मांड) ओळखतो = बसणारा कच्चा कीं पक्का आहे हें घोडा ओळखूं शकतो. (यावरून), आपला मालक कडक कीं नरम आहे हें हाताखालचीं माणसें ओळखूं शकतात. ३ (व.) जाय रे घोड्या खाय रे हरळी = घोड्याला हरळी खावयास मोकाट सोडल्यास (घोड्याला) तें चांगलेंच होईल, पथ्यावरच पडेल. म्ह॰-१ घोडा मरे भारें शिंगरूं मरे येरझारें = घोडी ओझें किंवा माणूम वाहून नेत असतां तिचें शिंगरूंहि तिच्याबरोबर जात असतें. घोडीच्या प्रत्येक हेलपाट्याबरोबर शिंगरूंहि हेलपाटा खातें. यावरून प्रत्यक्ष काम करणारास श्रम होतातच पण त्याच्या सहवासांत असणारांना सुध्दां जवळ जवळ तितकेच श्रम होतात. २ वरातीमागून घोडें = लग्नाच्या वरातीच्या मिरवणुकींत सर्वांच्या पुढें श्रृंगारलेलें कोतवाली घोडें चालवण्याची चाल आहे. यावरून वरात निघून गेल्यावर मागाहून श्रृंगारलेलें घोडें नेणें व्यर्थ होय किंवा औचित्यास धरून होत नाहीं. त्याप्रमाणें एखादी गोष्ट होऊन गेल्यावर मागाहून तत्संबंधीचीं साधनें जुळविणें व्यर्थ होय. २ माझें घोडें आणि जाऊं दे पुढें = इतरांचें कांहींहि होवो, माझें काम आधीं झालें पाहिजे. स्वार्थी माणसाची निंदा कर- तांना या म्हणीचा उपयोग करतात. समासांत घोडा शब्द पूर्व- पदीं आल्यास त्याचीं घोड किंवा कधीं कधीं घोडे अथवा घोड व घोडे, अशीं दोन्ही रूपें होतात. उ॰-घोडचूक; घोडेखोत; घोड (डे) चिलट इ॰. सामाशब्द-घोडकट, घोडकें-न. (घोड्याला तिरस्काराने लावावयाचा शब्द) रोडकें, अशक्त व थिल्लर घोडें; भटाचा तट्टू. घोडकुदळ-पु. १ (उप.) मुंजीचें वय झालेलें असून मुंज न झालेला मुलगा; घोडमुंज्या. २ -स्त्री. (उप.) उपवर असून लग्न न झालेली दांडगट नाचरी मुलगी; घोडी; घोडगी; भोपळ- देवता; घोडनवरी; घोडी पहा. घोडकूल-न. १ (गो.) लहान घोडें; तट्टू. २ (खा.) ओट्याच्या खांबावर तिरपा टेंकू (कर्ण) देऊन त्यावर कोरलेली घोड्याची आकृति. घोडकें-का-नपु. १ ज्याच्या भरीला करळ्या व तरसे घालून गाड्याची तक्तपोशी, बैठक तयार करतात अशीं चौकटींतील दोन बाजूचीं दोन उभीं लांब लांकडें. २ तेल्याच्या घाण्याच्या कातरीला खिळलेलें व जुंवाचा दोर बांधावयाचें लांकूड. घोडके-ढोरांचा गुरु. -गांगा २६. घोडकेळ-न. (क्क.) एक हलक्या जातीचें भसाडें केळें. [घोडा + केळें] घोडक्या-का-पु.-१ घोड्याचा खिजमतगार; मोतद्दार. 'घोड्यास शिपाई काय करिल घोडका ।' -ऐपो ३७२. २ चाबुकस्वार; अश्वशिक्षक; घोडा अर्थ ९ मधील शेवटचा अर्थ पहा. घोडकोस-पु. (गो.) तीन मैलांचा कोस. घोडगा-गी- पुस्त्री. (उप.) वयानें प्रौढ पण पोरकटपणा, नाचरेपणा अंगीं असलेला मुलगा, मुलगी; घोडा अर्थ ५ पहा. घोडी अर्थ ७ पहा. घोड(डे)गांठ-स्त्री. (बुद्धिबळांचा खेळ). एकमेकांच्या जोरांत असलेली घोड्यांची दुक्कल. घोडचवड-स्त्री. घोडदौड; घोडा चौफेर उडविणें; चवडचाल. 'घोडचवडीखालीं नाना पुण्याला आला.' -ऐपो १६२. [घोडा + चवड = विशिष्ट चाल] घोडचाल-स्त्री. घोड्याची चाल. (ल.) जलद चाल. [घोडा + चाल] घोड(डे)चिलट-न. मोठें चिलट; डांस; मच्छर. घोड- चूक-स्त्री. मोठी व अक्षम्य चूक. घोडचोट्या-वि. १ (मनुष्य). (अश्लील) घोड्याच्या चोटासारखा मोठा चोट ज्याचा आहे असा २ (निंदार्थीं) मुंज न झालेला, वाढलेला मुलगा; घोडकुदळ; घोड- मुंज्या. घोडजांवई-पु. (उप.) मोठ्या वयाचा नवरामुलगा; घोडनवरा. घोडजाळी-स्त्री.(भोंवर्यांचा खेळ) विरूद्ध पक्षाच्या भोंवर्याला खोंचा देऊन आपला भोंवरा दूर जाऊन फिरत राहील अशा रीतीनें भोंवरा फेकण्याचा प्रकार. [घोडा + जाळी = दोरी] घोडतोंड्या-वि. घोड्याच्या तोंडासारखा लांबट चेहरा अस- लेला; कुरूप; लांबट, ओबडधोबड तोंडवळ्याचा. [घोड + तोंड = चेहरा] घोडदळ-न. १ घोडेस्वारांचें सैन्य; फौज. २ सैन्यां- तील घोडेस्वारांचें पथक, तुकडी. [घोडा + दळ = सैन्य] घोड- दौड-स्त्री. घोड्यासारखें पळणें; घोड्याची दौड; जलद जाणें. [घोडा + दौड = पळणें] घोडनट-न. ज्याचें एक तोंड आढ्यावर व एक लगीवर येऊन दरम्यान तिरपें राहतें असें लांकूड ठोकतात तें. घोडनवरा-पु. (उप.) प्रौढवयाचा नवरामुलगा; घोडजांवई. घोड(डे)नवरी-स्त्री. (उप.) मोठ्या वयाची नवरी मुलगी, वधू; योग्य व सामान्य वयोमर्यादेबाहेर अविवाहित राहिलेली मुलगी. 'हे मोठमोठ्या घोडनवर्या घरांत बाळगल्याचे परि- णाम बरं !' -झांमू. घोड(डे)पाळणा-पु. घोड्याला (लांकडी चौकटीला) टांगलेला पाळणा; हलग्याना न टांगतां जमीनीवर घोड्यास अडकविलेला पाळण्याचा एक प्रकार. घोडा ८ अर्थ पहा. घोड पिंपळी-स्त्री. पिंपळीची मोठी जात; हिच्या उलट लवंगी पिंपळी. घोडपुत्र-पु. घोड्याला (विशेषतः बुद्धि- बळांतील घोड्याला) प्रेमानें किंवा प्रतिष्ठेनें संबोधण्याचा शब्द. [घोडा + पुत्र = मुलगा] घोडपेटें-न. १ दोन भोपळे पुढें व दोन मागें बांधून केलेला तराफा; घोडा अर्थ २१ पहा. २ भोंपळ्यावर दोन्ही बाजूस पाय टाकून घोड्यासारखें बसून पाण्यावर तरणें, तरंगणें. घोडबच्य-न. दुबळा घोडा पुष्ट होण्यास एक औषध. 'घोडबच्य पावशेर, राई पावशेर भाजलेलीं काळीं मिरें पावशेर ... मिश्रणापैकीं आतपाव दररोज देत जावें.' -अश्वप १.१७५. घोडबांव-स्त्री. (कु.) घोड्यांना पाणी पितां येईल अशा तर्हेनें बांधलेली विहीर. [घोड + बांव = विहीर] घोडबाही- स्त्री. १ दाराच्या दुहेरी चौकटीच्या आंतल्या चौकटींतील दोन्ही बाजूचे खांब. २ खटार्याच्या बैठकीच्या चौकटीच्या दोन बाजूंच्या लांब लांकडांपैकीं प्रत्येक; घोडकें, घोडें पहा; [घोडा + बाही = बाजू] घोडबाळ-वि. (उप.) पोरचाळे करणारा प्रौढ पुरुष, स्त्री; पोरकट माणूस. [घोडा + बाळ] घोडब्रह्म- चारी-पु. (उप.) लग्नाचें वय कधींच झालें असूनहि अविवाहित राहिलेला मुलगा; घोडनवरा. [घोडा + ब्रह्मचारी] घोडमल्ली- स्त्री. (बुद्धिबळांचा खेळ) घोड्यानें मात करण्याचा प्रकार. प्रतिपक्षाचें घोडें व राजा आणि आपलें घोडें, राजा व एकच प्यादें राखून प्यादेमात करणें; घोडमात. घोड(डे)मात -स्त्री. (बुद्धिबळांचा खेळ) घोड्यानें राजाला दिलेली मात; घोडमल्ली पहा. [घोडा + फा. मात् = कोंडणें] घोडमाशी-स्त्री. १ मोठ्या आकाराची हिरवी, काळसर माशी. २ (सामा.) मोठी माशी. घोडमासा-पु. एक प्रकारचा मासा; सागराश्व. ह्याचें तोंड कांहींसें घोड्यासारखें दिसतें. यास लांब शेपूट असतें. हा नेहमी उभा पोहतो. घोडमुख-ख्या-पु. १ घोड्याचें तोंड असलेला किन्नर नांवाच्या देवयोनींतील पुरुष. याचें वर्णन पुराणांतरीं सांपडतें. २ (ल.) अगदीं कुरूप, घोडतोंड्या माणूस. 'एक मीर- वलें भुरळें पींगळें । घोडमुखें ।' -दाव २८५. घोडमुंगळा-पु. मोठा व काळा मुंगळा. घोडमुंगी-स्त्री. मोठी, काळ्या जातीची मुंगी. घोड(डे)मुंज्या-पु. उप. १ मुंज होण्याचें वय झालें असून मुंज न झालेला मुलगा. २ लग्न न झालेला प्रौढ मुंज्या. [घोडा + मुंज्या] घोडला-पु. मूल रांगत असतांना त्याची होणारी घोड्यासारखी आकृति. घोडा अर्थ १० पहा. घोडली-स्त्री. (कों. हेट.) (नाविक) शौचास बसण्याकरितां वर्यास एक चौकट चार दोर्यांनी अडकवितात ती. [घोडा] घोडवळ-स्त्री. १ बांधलेल्या घोड्यांची ओळ, रांग. २ घोड्यांचा तबेला; घोडशाळा; घोडसाळ; यावरून (सामा.) तबेला; 'रोडोला हत्ती घोडवळींतून जाणार नाहीं.' ३ लांबचलांब, ठेंगणें व बेढब घर; मागरघर; दांडसाळ; केवळ तबेल्यासारखें असलेलें घर; कोठडी. ४ (उप.) घोडनवरी. ५ न. झोडपलेल्या, झोडपून दाणे न काढलेल्या धान्याच्या पेंढ्यांची रास, गंजी. [घोडा + ओळ] घोड(डे)वाट-स्त्री. घोड्यांकरितां केलेली, फक्त घोड्याला जातां येईल अशी वाट, रस्ता (विशेषतः डोंगर इ॰ याच्यावरून); उलट गाडीवाट. [घोडा + वाट] घोडविवाह- पु. विषमविवाह. 'आपली नात शोभेल अशा दहा वर्षांच्या पोरीशीं लग्न लावण्यास तयार असतात व असा घोडविवाह करूनहि फिरून समाजांत हिंडण्यास ... त्यांस दिक्वत वाटत नाहीं' -टि ४.९६. [घोडा + विवाह] घोडवेल-स्त्री. (सांकेतिक) घोड्याची लीद; (औषधांत घोड्याच्या लिदीचा उपयोग करा- वयास असल्यास तिचा निर्देश ह्या शब्दानें करतात). घोड- शह-पु. (बुद्धिबळांचा खेळ) घोड्यानें दिलेला शह. [घोडा + शह] घोडशाळा, घोडसाळ-स्त्री. १ घोड्यांचा तबेला; घोडवळ अर्थ २ पहा. [घोडा + शाळा = घर] घोडशिष्य- पु. (निंदार्थीं) विद्यार्जन करूं पाहणारा मोठ्या वयाचा विद्यार्थीं, मोठेपणीं शिकावयास लागणारा मनुष्य. घोडशीर- स्त्री. १ पायाच्या टांचेच्या वरच्या बाजूस असलेली शीर, नाडी; दवणशीत्त; धोंडशीर पहा. २ (क्व.) पायाचा किंवा हाताचा स्नायु. घोडसटवी-स्त्री. १ उग्र स्वरूप धारण केलेली देवी. (क्रि॰ लागणें). २ घोडी व्याल्यापासून सहाव्या दिवशीं करा- वयाची सटवीची पूजा. (एखादीला) ॰लागणें-१ घोडसट- वीप्रमाणें उग्र व विकाळ दिसणें. २ घोटसटवीची बाधा होणें. घोडेखाद-स्त्री. १ घोड्यांचें चरणें; हरळी खाणें. 'या घोडे खादीमुळें माळावर एक काडी राहिली नाहीं.' २ फक्त घोड्यांना चरतां, खातां येईल इतक्या वाढीचें गवत. 'ह्या माळावर मोठें गवत नाहीं, घोडेखाद कोठें कोठें आहे.' [घोडा + खाद = खाणें] घोडेखोत-पु. घोडे भाड्यानें देण्याचा धंदा करणारा; भाड्याच्या घोड्यांचा नाईक. [घोडा + खोत = मक्तेदार] घोडेघाटी-स्त्री. एक प्रकारचें रेशमी कापड. घोडेघास-न. १ विलायती गवत; लसून- घास. २ घोडकुसळी पहा. [घोडा + घास = गवत] घोडेपाऊल- न. एक वनस्पतिविशेष. [घोडा + पाऊल] घोडेराऊत, घोडे- स्वार-पु. घोड्यावरील शिपाई. घोड्याएवढी चूक-स्त्री. फार मोठीचूक; ढोबळ चूक; घोडचूक पहा. घोड्या गोंवर-पु. एक प्रकारचा गोंवराचा आजार; याच्या पुटकुळ्या मोठ्या असतात. [घोडा = मोठा + गोवर] घोड्याचा-पु. (निंदार्थीं) घोड्यावर बसलेला मनुष्य; घोडेस्वार. 'ते पहा घोड्याचे चालले. मागून स्वारी येतीसें वाटतें.' घोड्याचा दाणा-पु. १ (उप.) हरभरा. २ (ल.) बुंदीच्या लाडवास तिरस्कारानें म्हणतात. घोड्याचा पूत-लेंक-पु. (उप.) मूर्ख; गाढव; गद्धा. घोड्याची चाकरी-स्त्री. घोड्यांना दररोज चोळणें, खरारा करणें इ॰ काम. घोड्याची जीभ-स्त्री. (राजा.) एक वनस्पति- विशेष. घोड्याची मुंज, घोड्याचें बारसें-स्त्रीन. एखादा कोठें जावयास निघाला असतां एखाद्या अधिक प्रसंगी व फाजिल चौकशी करणार्या माणसानें त्यास कां, कुठें जातां असें विचारलें असतां म्हणतात. घोड्यांचें नाटक-न. (ना.) सर्कस. घोड्याचें मूत-न. १ कुतर्याचें मूत; अळंबें; भुईछत्री. २ कुजलेल्या लांकडांतून फुटलेलें अळंबें. घोड्याच्या पाठीवर- क्रिवि. भरधाव; झरकन; त्वरेनें. (क्रि॰ जाणें; करणें). घोड्याच्या पाठीवरचा कोस-पु. कंटाळवाणा व लांब- णीचा कोस; घोड्यावरून गेल्यासच कोसाएवढें व कंटाळवाणें न वाटणारें अंतर.