मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

लुटणें

लुटणें v t Plunder, strip; rob.

वझे शब्दकोश

लुटणें luṭaṇēṃ v c (लुंठन S) To plunder, pillage, despoil, strip; to rob (a multitude, or of many things, or with violence or law-braving openness). Persons, property, and repositories or places are indifferently the object of the verb. Ex. भक्तिबळें कसा हा परमेश्वर आजि अर्जुनें लुटिला.

मोल्सवर्थ शब्दकोश

अ० लुबाडणें, हिसकावून घेणें.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

सक्रि. १ अपहार करणें; लुबाडणें; लूट करणें; नुक- सान करणें; नाश करणें; नागविणें; धन हरण करणें; बळजबरीनें किंवा कायद्याच्या जोरावर एखाद्याला किंवा एखाद्याची वस्तु हरण करून नेणें. २ एखाद्याला जिंकणें; त्याचें सर्वस्व हरण करणें. 'भक्ति बळेंचि पहा हो परमेश्वर आजि अर्जुनें लुटिला ।' -मोउद्योग.? [सं.लुंठन; लुठ् = चोरणें] लुटविणें-सक्रि. १ लुटणेंचें प्रयोजक रुप. २ (लुटष्यास परवानगी देणें.) भरभक्कम लुटारु; उधळ्या. [हिं.] लुटा-पु. लुटारू. 'कोठें कैचें आले लुटे । वायां झाले टाळकुटे ।' (रामदास मूर्खपंचक (नवनीत पृ. १५८). लुटाऊ-वि. लुटून आणलेला लुबाडलेला; लुटीचा. लुटार-न. १ लुटारु लोकांची टोळी. २ लुटारु लोकांची जात- वर्ग; लुटारु लोक. लुटारा-री-रु-वि. लुटणारा; लुबाडणारा; दरोडा घालणारा. 'गांवोगांवचे आले लुटारी । तीं धरुन घेऊन जाती ।' -ऐपो २५९. लुटालूटस्त्री. सर्वत्र चाललेला लुटण्याचा प्रकार. सार्वत्रिक लूट; नाश; जाळपोळ इ॰

दाते शब्दकोश

संबंधित शब्द

वाट

स्त्री. १ रस्ता; मार्ग. 'कीं भीष्में धरिली ती वरिलीच तुझ्याहि वाट लेकांहीं ।' -मोभीष्म १.२८. २ (ल.) वर्तनक्रम; पद्धती; परिपाठ; तऱ्हा; प्रकार; रीत. 'पहिली जी नीट वाट वाहो ती ।' -मोआश्रम १.९. ३ (ल.) उपाय. 'मग पोट भराया काढिली वाट ।' -दावि ८१. ४ (ल.) परिणाम; गति; निकाल. 'माझ्या फिर्यादीची वाट काय झाली कोण जाणें.' ५ बेंबीच्या खालीं पोटांत वाटीच्या आकाराचा जो उंचवटा येतो तो (ही सरली म्हणजे पोट दुखूं लागतें). [सं. वाट, पथिवस्तु निवाटःस्यात् । -त्रिकडांशेष. वर्त्मन्; प्रा. वठ्ठ; हिं. वाट] (वाप्र.) ॰करणें-क्रि. १ मार्ग करून देणें. २ (ल.) वर्तनक्रम ठरविणें; मार्गं दाखवून देणें; व्यवस्था, मांडणी वगैरे करणें. ३ नाहींसा करणें; दूर करणें. 'तेव्हेळीं शिशुपाळाचें राऊत । पारकेयांवरी वाट करितु ।' -शिशु ९६४. ॰घडणें-परिणाम होणें; गति होणें; मार्ग निघणें. 'अद्वैतशास्त्र नावडे यासी । पुढें वाट घडेल कैसी ।' ॰चुकणें-आकस्मिक भेटणें; अनेक दिवसांनीं घरीं आलेल्यास म्हणतात. 'आज फारा दिवसांनीं वाट चुकला.' -मोर १३. ॰धरणें-१ मार्ग अडविणें, रोखून धरणें. 'एवढ्या रानामध्यें जाण । वाट धरून बैससी कोण ।' -रावि. २ मार्गप्रतीक्षा करणें; वाट पहाणें. ॰पाडणें-वाटेंत चोरी करणें; लुटणें; दरोडा घालणें. 'किरातसंगे वाट पाडित ।' -रावि. १.१०५. ॰पाहणें-मार्गप्रतिक्षा करणें; खोळंबून राहणें; वाटेकडे डोळे लावून बसणें. ॰मारणें- मार्गांत गांठून लुटणें; वाटेंत दरोडा घालणें. ॰लागणें-निकाल लागणें; उरकणें; संपणें; खलास होणें; विल्हेस लागणें; दूर होणें; नष्ट होणें. ॰लावणें-१ निकालांत काढणें; विल्हेवाट करणें. २ खाऊन टाकणें; संपविणे. ३ मोडून तोडून टाकणें; नाश करणें; ४ मार्गांतून दूर करणें; हांकलून देणें. ॰वावारणें-१ निरर्थक खेप घालणें; व्यर्थ हेलपाटा घालणें. ॰वाहणें-रहदारी असणें; चालू असणें; वाटसरू, प्रवासी वगैरेनीं गजबजलेला असणें; वापर असणें. 'तुका म्हणे वाहे वाट । वैकुंठींची घडघडाट ।' ॰वाहती करणें- वाट मोकळी करणें; घालवून देणें; वाटेस लांवणें. 'मग जाणतया जें विरू । तयाची वाट वाहती करू ।' -ज्ञा १६.५७. ॰सरणें- आंत्रमार्ग निरुद्ध होणें. 'या धक्क्यानें क्षुधामांद्य होणार बहुधा वाट सतली असेल.' -मौनयौवना. ॰सुधारणें-पळणें; चालतें होणें; पाय काढणें. 'आपली वाट सुधार कसा.' -तोबं १७. ॰होणें-परिणाम, गति होणें; निकाल लागणें. चार वाटा- करणें-उधळणें; दूर दूर करणें; विखुरणें; पळविणें; घालविणें. चारहि वाटा मोकळ्या, बारा वाटा मोकळ्या-पूर्ण स्वातंत्र्य; सर्व जग फिरावयास मोकळें असणें; स्वैरस्थिति; अनि- र्बंध गति. तिवाटांची माती येत नाहीं समजत नाहीं- पूर्ण अज्ञान; कांहीं न समजणें. देखली वाट पाहणें-करणें- गेल्या मार्गानें परत येणें. मधल्या वाटेस-दोहोंच्या मध्यें; दोहों मार्गांपैकीं केणताहि न पतकरतां, कोणाचाहि फायदा न घेतां (क्रि॰ येणें; जाणें; नेणें; आणणें). वांकडी वाट करणें-आड- वळणास जाणें; मुद्दाम मार्ग सोडून जाणें; वळसा घेणें. वाटा घेणें-क्रि. लुटणें; लुबाडणें. 'तुजकारणें चोर घेती वाटा । तूं झुंजविली वीरा सुभटा ।' -कालिका १४.६६. वाटा लावणें- वाटेस लावणें पहा. 'लाटून वाटा लोविलें । विचारें अविचारासी ।' -दा ५.९.४८. 'बळें लावितो लोभ दाटूनि वाटा ।' -दावि ३६४. वाटेग लावणें-(गो.) रस्ता धरणें. 'हांगा बसूं नाका वाटेग लागा.' वाटेचा पाय-वाटेचें पाऊल आड वाटेस पडणें- कुमार्गास लागणें; चुकी होणें. वाटे जाणें-खोडी करणें; कुचेष्टा करणें. वाटे-वाटेस लावणें-१ मार्गास लावणें; रास्त मार्ग, दाखविणें. २ निरोप देणें; पाठवणी करणें; रवानगी करणें. ३ हांकून देणें; घालविणें. वाटेवर आणणें-ताळ्यावर आणणें; सुधारणें; योग्य मार्गावर आणणें. 'गंगे जा वायेवरि आण, अभय द्यावया न हा भागे ।' -मोउद्योग १३.५६. वाटेवर पडणें-सहज प्राप्य असणें; सुलभ असणें; सुसाध्य असणें. 'माझी मुलगी वाटेवर पडली आहे ' -भाव १२. वाटेवर येणें-शुद्धीवर येणें; योग्य मार्गास लागणें; ताळ्यावर येणें; व्यवस्थित वागूं, बोलूं, करूं लागणें; वर्तनक्रम सुधारणें. वाटेस जाणें-खोडी करणें; कुरा- पत काढणें; त्रास देणें. वाटेस लागणें-१ चालू होणें; योग्य मार्गानें जाणें. २ नाहींसें होणें; संपणें. वाटेस लावणें-१ योग्य मार्गास लावणें. 'सर्वत्र धर्म रक्षक राजे आहेत लाविती वाटे ।' -मोकर्ण २९.४६. २ निरोप देणें; पाठवणी करणें; हांकून लावणें. सामाशब्द- ॰करी-काढू-काढ्या-पु. वाटाड्या; रस्ता दाख- विणारा; मार्गदर्शक. ॰खर्च-खचीं-पुस्त्री. प्रवासांत खर्चावया- करितां लागणारा पैसा; प्रवासखर्च. 'जरी हा वाटखर्चीस पीठ देतां ।' -कचेसुच ५. ॰घेणा-पु. वाटमाऱ्या; लुटारू. 'वाटघेणा वाल्हा कोळी । अजामेळा पडतां जळीं ।' -निगा १२७. ॰चा चोर-पोर-पु. कोणीहि अनोळखी मनुष्य; उडाणटप्पु; भटक्या. ॰चा वाटसरू-पु. अनोळखी प्रवासी; कोणताहि संबंध नस- लेला मनुष्य; कोणीहि प्रवासी; पांथस्थ; वाटेनें जाणारा-येणारा. ॰चाल-स्त्री. प्रवास. ॰चालन-न. (कातकरी) लग्नाच्या दुसऱ्या दिवशीं वधूस वरगृहीं नेतात त्यावेळीं वाटेंत देण्यांत येणारी दारू. -बदलापूर ११९. ॰तीट-स्त्री. आक्रमावयाच्या मार्गांतील अड- चणी, संकटें वगैरेस उद्देशून म्हणतात; रस्ते व त्यांतील संभाव्य विघ्नें इ॰ 'वाटेतिटेनें संभाळून जा.' ॰पाडी-स्त्री. दरोडा. -गुजा. [वाट द्वि] पाडिया-पाडो-डू-ड्या-पु. वाटमाऱ्या; लुटारू; चोर; दरवडेखोर. 'म्हणे आजि वाटपाडिया । कैशी दया उपजली ।' -दे कृष्णजन्म १९. 'वाटपाड्यासी कैसी भाया ।' -ह २.१९१. ॰भेट-स्त्री. रस्त्यांत पडलेली गांठ; आकस्मिक भेट. ॰माणूस-पु. सामान्य मनुष्य; कोणत्याहि दर्जाची व्यक्ति; रस्त्यावरील मनुष्य. -नवाकाळ १६.८.२७. ॰मार-स्त्री. १ रस्तालूट; रस्त्यावरील हल्ला. २ रस्त्यावर मित्रत्वानें थांबविणें, अडविणें. ३ (बुद्धिबळ) प्यादें दोन घरें जात असतां मध्येंच एक घर आल्यासारखें धरून मारणें. ॰मारू-माऱ्या-पु. ठग; लुटारू; रस्तेलूट करणारा. ॰मार्ग-पु. रस्ता; मार्ग; रीत; पद्धति; सामान्य नियम; साधारण व्यवहार, क्रम इत्यादि वाचक सामान्य शब्द- प्रयोग. वाट पहा. ॰मार्ग करणें-घालणें-दाखविणें- पाडणें-शिकवणें-सांगणें-सामान्यतः दिशा दाखविणें, सांगणें; उपदेश करणें; सल्ला देणें. ॰मार्गीं-पु. प्रवासी; पांथस्थ. ॰वाटमार्गीं लागणें-१ योग्य दिशेनें जाणें; मार्गावर येणें. २ मृत्यूपंथास लागणें. ॰वाटमार्गी लावणें-१ योग्य दिशा दाख- विणें; मार्ग दाखविणें. २ निरोप देणें; पाठवणी करणें; वाटेस लावणें. ॰वणी-न. १ वाटेंतील पाणी; गटारांतील, रस्त्यांत वाहणारें पाणी. 'नाहीं आड ना विहीरवणी । घाला वाटेचें वाटवणी । विनोद मेहुणीं मांडीला ।' -एरुस्व १२.१४८. २ (सांकेतिक- स्त्रियांमध्यें रूढ) मूत्र. ॰वधा-पु. वाटमाऱ्या. 'किंबहुना ते चुकले । वाटवधेया ।' -ज्ञा ७.१७४.१३.५४७. ॰वधें-न. वाट- मार; वाटमाऱ्या धंदा; वाटेंतील अडथळा, विघ्न. 'तया इंद्रादि पदें । करिताति वाटवधें ।' -ज्ञा १२.६१. ॰शेक-क्रिवि. रस्त्याचे बाजूनें; दुतर्फा; वाटेनें. ॰सखा-पु. प्रवासांतील सोबती. ॰सर- सरू-सारू-सुरू-पु. प्रवासी; पांथस्त; मुशाफरी; रस्त्यानें जाणारा. वाटाडी-ड्या-पु. रस्ता दाखविणारा; मार्गगर्शक. वाटेकरू-पु. वाटाड्या. 'किंभक्तीचा वाटेकरू । ज्ञानाचा निडारू ।' -भाए २५२. वाटेचा चोर-वाटेचा वाटसरू-पु. कोणीहि जाणारायेणारा सामान्य मनुष्य. 'वाटेच्या वाटसरूला देखील हें समजेल.' -अस्तंभा ३. वाटेचें सोवळें-न. (बायकी) सोंवळें वस्त्र नेसून मार्गक्रमण केल्यास त्या सोंवळ्यास दोष लागतो या- वरून त्या वस्त्रास म्हणतात. वाटेंतील कांटा-पु. अडथळा; विघ्न. 'फडणविसांनीं आपल्या वाटेंतील वगंभटाचा कांटा नाहींसा केला.' -अस्तंभा ६८.

दाते शब्दकोश

अंबर

पु. धान्य ठेवण्यासाठीं भिंतींत केलेली कोठडी; धान्यागार; कोठार; बळद. २ (ल.) खजिना. 'जें मागशील तें देईन भरला अंबर ।' -सला १.३०. [फा. अंबार] ॰लुटणें- धान्याचा सांठा उधळपट्टीनें खर्चणें; लुटारुनें धान्य लुटणें. ॰खाना-पु. अठरा कारखान्यांतील एक; धान्यागार; कोठार. 'अंबरखाना चांगला । वक्त गैरवक्त कामाला । तेचि राजा शोभला । जगतीं तळीं ।' -भाअ १८३४. याच्या कामाबद्दल इऐ २२. २४. पहा. [फा.]

दाते शब्दकोश

अंबर ambara m ( P) A perpendicular cavity in the wall of a house, as a receptacle for corn. अं0 लुटणें To consume the stock of corn wastefully.

मोल्सवर्थ शब्दकोश

बुचाड(ट)णें

सक्रि. १ (अंगावरचें वस्त्र, अलंकार इ॰) जोरानें हिसकणें; ओढून काढणें; नागविणें. २ (ल.) लुटणें; लुबाडणें. ३ (पानें, पिसें इ॰) ओरबाडून काढणें. [बुचा] ॰गोबाडणें -उक्रि. पूर्णपणें लुटणें; सर्वस्वी नागविणें [बुचाडणें द्वि.]

दाते शब्दकोश

लंका

स्त्री. १ रावणाची राजधानी. २ सिंहलद्वीप; सीलोन बेट. ३ राक्षस, वानर, झाडें इ॰ कांच्या दारूच्या केलेल्या आकृती; दारूचीं झाडें. ४ (विनोदानें, निंदेनें) लहान पोरगी. (व.) केस पिंजारलेली, कुंकू नीट नसलेली गयाळी मुलगी. ५ जारिणी, स्वैरिणी स्त्री. [सं.] म्ह॰ १ (व.) लंकेंत जन्मले तितके राक्षसच = वाईट कुळांत चांगलीं माणसें जन्मणें शक्य नाहीं, याअर्थी. २ लंकेत, लंकेस सोन्याच्या विटा = लंकेंत पुष्कल सोनें असलें तरी त्याचा आपणास काय उपयोग? (मिळकतीप्रमाणें खर्चहि जास्त या अर्थानेंहि वापरतात). (वाप्र.) ॰लुटणें- अवाढव्य संपत्ति मिळणें. ॰होणें-(गो.) सौंदर्यवान, सालंकृत होणें, सामाशब्द- ॰दहनसारंग-पु. (संगीत) एक राग. यांत षडज, तीव्र ऋषभ, कोमल गांधार, कोमल मध्यम, पंचम, कोमल निषाद हे स्वर लागतात. धैवत स्वर वर्ज्य. जाति षाडव-षाडव. वादी ऋषभ. संवादी पंचम. गानसमय मध्याह्न. [सं.] ॰लूट- स्त्री. अगणित संपत्ति मिळविणें; लंका लुटणें पहा. लंकेची पार्वती- स्त्री. (लंकेला जाऊनहि गोसाविणीच्या वेषांत असणारी शिवपत्नी, पार्वती) १ जिच्या अंगावर एकहि दागिना नाहीं अशी उंच व रोडकी स्त्री. २ (सामा.) अलंकाररहित सवाष्ण स्त्री. ज्यावर खोगीर, जीन वगैरे कांहीं नाहीं असा रोडका घोडा. लेंकश्वर- पु. लंकाधिपति रावण. 'अहो रानींचिया पालेखोइरा । नेवाणें करविजे लंकेश्वरा ।' -ज्ञा ११.२३. [लंका + ईश्वर] लंकोदय-पु. तारे, ग्रह, राशी यांचा सीलोनांतील उदयकाल यास चरसंस्कार करून वाटेल त्या ठिकाणचे त्या त्या खगोलांचे उदयकाल काढतां येतात. कारण या शहरावरून पहिलें याम्योत्तरवृत्त जातें अस मानतात. हें उज्जयिनीच्या याम्योत्तरवृत्तावर आहे. 'मेषाचा लंकोदय चार घटका अडतीस पळें.'

दाते शब्दकोश

लंका laṅkā f (S) The capital of रावण in Ceylon. The name is extended also to the island which, according to the Hindús, is larger and more distant from the continent than in reality. It is thus placed in the Eastern ocean south of Ceylon, and is, according to Wilford, the peninsula of Malacca. 2 Figures of giants, monkeys, trees &c. made of gunpowder (as fireworks). लंका लुटणें (To plunder Lanká.) To obtain vast treasures.

मोल्सवर्थ शब्दकोश

लूट

स्त्री १. लुटण्याची क्रिया. २ लुटण्यानें मिळालेलें जें कांहीं तें; लुटून आणिलेलें द्रव्य इ॰ ३ सढळपणानें केलेला खर्च (गरिबांना घातलेलें जेवण, दिलेलें दान इ॰). ४ विपुलता; समृद्धि; लयलूट; भरमसाटपणा. [लुटणें] ॰मारणें-लूट करणें; लुटणें. ॰फाट-फूट-लबाड-स्त्री. लूट; लुबाडणी; नासधूस. 'शत्रूच्या मुलखांतून लूटफाट करून विजयी होऊन आलेलें सैन्य...' -स्वप. ३६. [लूट द्वि.]

दाते शब्दकोश

लूट lūṭa f (लुटणें) Robbing, plundering, spoiling. 2 Booty, spoil, plunder. 3 fig. Wasteful or lavish distribution or serving out. 4 Exceeding plentifulness; overflowing abundance.

मोल्सवर्थ शब्दकोश

फस्त

वि. पस्त पहा. लुटणें, जाळणें, खाणें इ॰ द्वारां पूर्ण विध्वंस, नाश, फडशा, निश्शेष झालेला; उध्वंस्त; ओसाड. (क्रि॰ लुटणें; जाळणें; पाडणें; खाणें; नेणें; करून ताकणें व निर्दलन, लूट; फन्ना आणि नासाडी या अर्थांचीं प्रियापदें). 'पेंढ्यार्‍यांनीं गांव लुटून फस्त केला.' [फा. पस्त्]

दाते शब्दकोश

बोड, बोडसें

न. (कुत्सितार्थी) डोकें; टकलें; टाळकें; डोचकें; डोसकें; टकुरें; बोडकें. [सं. बुध्न; का. बोट्ट; तेलगु. बोळी, बोडी = हजामत केलेलें डोकें] बोड करणें- १ हजामत करणें. २ खोड मोडणें; नरम करणें. बोडका-वि. १ डोक्यास कांहीं एक न घातलेला; उघड्या डोक्याचा. २ डोकीवरील केंस काढलेला. 'डोई बोडका शिखा नष्ट ।' -नव १८.३३. २ ज्या योगानें एखाद्या पदार्थाच्या शिरोभागीं शोभा येते तें नसलेला; शेंड्यावर, शिखरा- वर, डोक्यावर कांहीं नसलेला. उदा॰ शेंड्यावांचून झाड; शिंगा- वांचून गाय; बोटाशिवाय हात, पाय; डोक्यावर केंस नसलेली स्त्री; झाडाशिवाय टेकडी; छप्पर नसलेलें घर इ॰ त्याप्रमाणें ज्याची बायको मेली आहे असा; विधुर. [सं. बुध्न; का. बोट्ट] म्ह॰ हातीं धरल्यास रोडका, शेंडी धरल्यास बोडका. ॰कांदा- पु. पाती नसलेला कांदा. याच्या उलट पातीचा कांदा. ॰देवी- स्त्री. विधवा स्त्री. ॰निवडुंग-पु. निवडुंगाच्या अनेक जातींपैकीं एक जात. बोडकाविणें-सक्रि. १ झाड इ॰ च्या फांद्या तोडून नुसता खुंट उभा ठेवणें; झाड भुंडें करणें; छाटणें. २ सर्वस्वी लुटणें; नागविणें. ३ हजामत करणें. बोडकी-स्त्री. केशवपन केलेली स्त्री; विधवा स्त्री. म्ह॰ बोडकी आरशांत पाहे, सहदेव म्हणें कांहीं तरी आहे. बोडकूल, बोडकें-न. १ (निंदार्थीं) डोचकें. २ बोडकी. बोडकें भात, बोडका-नपु. एक प्रकारचें भात; कोथिंबिरें भात बोडणें-सक्रि. १ (निंयेदें) हजामत करणें; मुंडणें; वपन करणें. २ शेंडा छाटणें; भुंडा करणें. ३ बुचाडणें; नागविणें; लुटणें. ४ खरडपट्टी काढणें; भोसडणें; फजीती करणें. 'सोंगाच्या नरकाडी । तुका बोडोनिया सोडी ।' -तुगा २८१९. [का. बोडिसु] बोडणी- स्त्री. १ हजामत २ लूट; नागवण. ३ खरडपट्टी; ताशेरा. 'झाली बोडणी विटंबना ।' -तुगा ७३०. बोडंती-स्त्री. बोडणी. बोड- भद्र-न. (गो.) भद्राकरण; हजामत. बोडविसुळणी-स्त्री. बोडणी. बोडसा-सें-पुन. (निंदार्थीं) डोचकें.

दाते शब्दकोश

घर

न. १ रहावयासाठीं बांधलेली जागा; वाडा. २ एका कुटुंबांतील (एके ठिकाणीं) राहणारी मंडळी; कुटुंब. ३ गृहस्था श्रमधर्म; संसार; प्रपंच. 'त्याला नोकरी लागतांच त्यानें स्वतंत्र घर थाटलें' ४ एखाद्या व्यवसायांत जुटीनें काम करणारीं माणसें, मंडळी, संस्था; अडतीची जागा. ५ (उंदीर, चिचुंदरीं इ॰ काचें) बीळ; घरटें. ६ एखादा पदार्थ शिरकवण्यासाठीं केलेला दरा, भोंक, खोबण, खांचण. 'भिंतीस घर करून मग खुंटी ठोक.' ७ (मालकाच्या इच्छेविरुद्ध मिळविलेलें, बळकावलेलें) वस्तीचें ठिकाण. 'कांट्यानें माझ्या टाचेंत घर केलें.' ८ एखादी वस्तु सुरक्षितपणें ठेवण्यासाठीं केलेलें धातूचें, लांकडाचें आवरण, वेष्टण, कोश. उ॰ चष्म्याचें घर. 'माझ्या चष्म्याचें घर चामड्याचें आहे.' ९ पेटींतील, टाइपाच्या केसींतील कप्पा, खण, खाना. १० सोंगट्याच्या, बुद्धिबळांच्या पटावरील, पंचांगा- तील (प्रत्येक) चौक; चौरस; मोहर्‍याचा मुळचा चौरस; मोहर्‍याचा मारा. 'राजा एक घर पुढें कर' 'घोडा अडीच घरें (एकाच वेळीं) चालतो.' ११ (ज्यो.) कुंडलीच्या कोष्टकां- तील सूर्य, चंद्र इ॰ ग्रहांचें स्थान. १२ घराणें; वंश; कुळ. 'त्याचें घर कुलीनांचें आहें.' 'त्याच्या घराला पदर आहे.' = त्याच्या वंशात परजातीची भेसळ झाली आहे.' १३ उत्पत्तिस्थान; प्रांत, प्रदेश, ठिकाण, ठाणे (वारा, पाउस, प्रेम, विकार, रोग इ॰ काचें); 'सर्वज्ञतेचि परि । चिन्मात्राचे तोंडावरी । परि ते आन घरीं । जाणिजेना ।' -अमृ ७.१३०. 'कोंकण नारळाचें घर आहे.' १४ रोग इ॰ कांच्या उत्त्पतीचे कारण, मूळ, उगम, जन्मस्थान, खाण. 'वांगें हें खरजेंचें घर आहे.' 'आळस हें दारिद्र्याचें घर आहे.' १५ वादांतील आधारभूत मुद्दा, प्रतिष्ठान. गमक, प्रमाण. १६ सतार इ॰ वाद्यांतील सुरांचें स्थान; सनईसारख्या वाद्याच्या दोन भोकांमधील अंतर; सता- रीच्या दोन पडद्यांमधील अंतर. १७ शास्त्र, कला इ॰ कांतील खुबी, मर्म, रहस्य, मख्खी, किल्ली. 'तुम्ही गातां खरे पण तुमच्या हातीं गाण्याचें घर लागलें नाहीं.' 'गुणाकार, भागाकार हें हिशेबाचें घर.' १८ सामर्थ्य; संपत्ति; ऐपत; आवांका; कुवत. 'जें कांहीं करणें तें आपलें घर पाहून करावें.' १९ मृदंग इ॰ चर्मवाद्यांच्या, वादी, दोरी इ॰ परिच्छेदातनें परिच्छिन्न प्रांत, जागा. २० (संगीत) तान, सूर यांची हद्द, मर्यादा, क्षेत्र. २१ (अडचणीच्या, पराभवाच्या वेळीं) निसटून जाण्या- साठीं करून ठेवलेली योजना; आडपडदा; पळवाट; कवच; 'हा घर ठेवून बोलतो.' २२ खुद्द; आपण स्वतः; स्वतःचा देह- म्ह॰ इच्छी परा तें येई घरा.' २३ (वर्तमानपत्राचा, पत्र- काचा, कोष्टकाचा रकाना, सदर. (इं.) कॉलम. 'येऊन जाऊन पत्रप्रकाशकास स्वतःचा असा मजकूर दर खेपेस पराकाष्ठा दोन तीन घरें घालणें येतें.' -नि १५. २४ वयोमानाचा विभाग; कालमर्यादा. 'हा नवा गृहस्थ पन्नाशीच्या घरांत आला होता.' -कोरकि ३२. २५ (मधमाशीचें पोळें वगैरेतील) छिद्र. 'केळीच्या सोपटाचीं घरें ज्यांनी पाहिली असतील' -मराठी सहावें पुस्तक पृ. २२५. (१८५७) २६ ठाणें; ठिकाण. 'कुबल, बांकी घरें । शिवराजाच्या हाता आलीं' -ऐपो ९. २७ बायको; स्वस्त्री. 'घरांत विचारा.' घर उघडणें पहा. [सं. गृह; प्रा. घर; तुल॰ गु. घर; सिं. घरु; ब. घर; आर्मेंजि. खर; फ्रेजि. खेर; पोर्तु. जि केर.] (वाप्र.) ॰आघाडणें-(कों.) घर जळून खाक होणें. ॰उघडणें-१ लग्न करून संसार थाटणें. 'नारोपंतांनी आतां घर उघडलें आहे, ते पूर्वीचें नारोपंत नव्हत!' २ एखा- द्याचें लग्न करून देऊन त्याचा संसार मोडून देणें. 'सदुभाऊंनीं आपली मुलगी त्या भटाच्या मुलास देऊन त्याचें घर उघडलें' ॰करणें-१ विर्‍हाड करणें; रहावयास जागा घेऊन तींत जेवण- खाण इ॰ व्यापार करावयास लागणें. 'चार महिनें मी खाणाव- ळींत जेवीत असे, आतां घर केलें आहें.' २ (त्रासदायक वस्तूंनीं) ठाणें देणें; रहाणें; वास्तव्य करणें. 'कांट्यानें माझ्या टांचेंत घर केलें.' 'माझ्या हृदयांत घर करून बसून त्यानें मला घायाळ केलें.' -बाय ३.३. ॰खालीं करणें-घर सोडून जाणें; घर मोकळें करून देणें. 'गावांत प्लेगचें मान वाढतें असल्यामुळें सर्वानी आपापलीं घरें खालीं केलीं.' ॰घालणें- (एखाद्याच्या) घराचा नाश करणें. ॰घेणें-१ (सामा.) लुबा- डणें; लुटणें; नागविणें; बुचाडणें. 'मग रेणुकेनें बोलिलें । अहो जेऊनि कैसें घर घेतलें ।' -कालिकापुराण २३.४०. 'ज्या ठिकाणीं वादविवादाचा किंवा भांडणाचा काहीं उपयोग नसतो त्या ठिकाणीं पडून घर घेणें यांतच मुत्सद्दीपणा असतो.' -चंग्र ८४. २ (एखाद्याचा) नाश करणें. 'म्हणती जन्मोनि द्रौपदीनें । आमचें घर घेतलें तिणें ।' -जै ७१.९९. ३ (त्रासदायक वस्तु) घर करून बसणें, ठाणें देऊन बसणें; घर करणें अर्थ २ पहा. ॰चालविणें-प्रपंचाची, संसाराची जबाबदारी वाहणें. म्ह॰ घर चालवी तो घराचा वैरी. ॰जोडणें-इतर घरण्यांशीं, जातीशीं, लोकांशीं इ॰ मैत्री, शरीरासंबंध घडवून आणणें; मोठा संबंध, सलोखा उत्पन्न करणें. 'लक्ष्मीपतीचें घर थोर जोडे ।' -सारुह २.१. याच्या उलट घर तुटणें. ॰डोईवर घेणें-आरडा ओरड करून घर दणाणून सोडणें; घरांत दांडगाई, कलकलाट, धिंगामस्ती करणें. 'वडील माणसें घरीं नाहींत हें पाहुन मुलांनी घर डोईवर घेतलें.' ॰तुटणें-मैत्रीचा, नात्याचा संबंध नाहींसा होणें; स्नेहांत बिघाड होणें. (दुसर्‍याचें) ॰दाखविणें- १ आपल्या घरीं कोणी त्रासदायक मनुष्य आला असतां कांहीं युक्तीनें त्याला दुसर्‍याच्या घरीं लावून देऊन आपला त्रास चुकविणें; (एखाद्याची) ब्याद, पीडा टाळणें. २ घालवून देणें; घराबाहेर काढणें. ॰धरणें-१ घरांत बसून राहणें; घराच्या बाहेर न पडणें (संकटाच्या, दंगलीच्या वेळीं पळून जाणें, पळ काढणें, गुंगारा देणें, निसटणें याच्या उलट). २ (रोग इ॰ नीं शरीरावर) अंमल बसविणें; एखादा आजार पक्केपणानें जडणें. 'दम्यानें त्याच्या शरीरांत घर धरलें.' ३ चिटकून राहाणें; चंचलपणा न करतां एकाच ठिकाणीं भिस्त ठेवून असणें. ४ (बुद्धिबलांत, सोंग- ट्यांत) सोंगटी एकाच घरांत ठेवून घर अडविणें. ॰धुणें,धुवून नेणें-१ एखाद्याचें असेल नसेल तें लबाडीनें गिळंकृत करणें; हिरावून नेणें; नागविणें; बुचाडणें. 'तुम्ही कारकुनावर फार भरंवसा टाकून राहूं नका, तो संधि सांपडल्यास तुमचें घर धुवावयास कमी करणार नाहीं.' २ नागविणें; लुबाडणें; लुटणें; अगदीं नंगा करणें. 'शंभर वर्षांनीं घर धुवून नेल्यानंतर ही ओळख आम्हांस पटूं लागली आहे.' -टिव्या. घर ना दार देवळीं बिर्‍हाड-फटिंग, सडा, ज्याला घरदार नाहीं अशा भणंगास उद्दे- शून अथवा ज्याला बायकामुलांचा संसाराचा पाश नाहीं अशाला उद्देशून या शब्दसंहतीचा उपयोग करतात. ॰निघणें-(स्त्रीन) नव- र्‍याला सोडून दुसर्‍या मनुष्याबरोबर नांदणें; (सामा.) दुसर्‍याच्या घरांत, कुटंबांत निघून जाणें. 'माझें घर निघाली.' -वाडमा २. २०९. ॰नेसविणें-घरावर गवत घालून तें शाकारणें; घर गवत इ॰ कानीं आच्छादणें; (कों.) घर शिवणें. ॰पहाणें-१ (एखाद्याच्या) घराकडे वक्रदृष्टी करणें; (रोगाचा, मृतत्युचा) घरावर पगडा बसणें; घरात शिरकाव करणें). 'कालानें एखाद्याचें घर पाहिलें कीं तें बुडालेंच म्हणून समजावें.' 'म्हातारी मेल्याचें दुःख नाहीं पण काळ घर पाहतो.' २ (बायकी) वधूवरांचें योग्य स्थळ निवडणें. 'सुशील तारेनें आपल्या पुण्यबलाच्या साह्यानें योग्य घर पाहून... ... ...' -रजपूतकुमारी तारा- (आनंदी रमण.) ॰पालथे घालणें-(घर, गांवइ॰) १ हरव- लेली वस्तु शोधण्यासाठीं घराचा कानाकोपरा धुंडाळणें. 'त्या बाईनें आपला सोन्याचा फुटका मणि शोधण्यासाठीं सारें घर पालथें घातलें.' २ सर्व घरांत; गावांत हिंडणें; भटकणें. 'त्या मुलाला रांगतां येऊं लागल्यापासून तें सारें घर पालथें घालूं लागलें आहें.' ॰पुजणें-१ आपलें काम करून घेण्यासाठी एखा- द्याच्या घरीं आर्जवें, खुशामत करण्यास वारंवार जाणें. २ (घरें पुजणें) आपला उद्योग न करतां दुसर्‍यांच्या घरीं भटक्या मारणें. ॰फोडणें- १ संसार आटोपणें, आंवरणें. २ कुटुंबातील माणसात फूट पाडणें; घरात वितुष्ट आणणें. 'बायका घरें फोड- तात.' ३ घरास भोंक पाडून आंत (चोरी करण्यासाठीं) शिर- काव करून घेणें; घर फोडतो तो घरफोड्या. ॰बसणें-कर्ता मनुष्य नाहींसा झाल्यामुळें, दुर्दैवाच्या घाल्यामुळें कुटुंब विपन्ना- वस्थेस पोहोंचणें; घराची वाताहत, दुर्दशा होणें. ॰बसविणें- संसार थाटणें; घर मुलाबाळानीं भरून टाकणें (स्त्रीच्या विवाहोत्तर जीवनाच्या बाबतींत या वाक्प्रचाराचा उपयोग करतात). 'माझी बायको मेली म्हणून मीं मुलाचें लग्न करून दिलें, म्हटलें कीं सून तरी घर बसविल.' ॰बुडणें-१ कुटुंबाची नासाडी, दुर्दशा होणें; कुटुंब धुळीस मिळणें. २ संतति नसल्यामुळें वंशाचा लोप होणें. ॰बुडविणें-१ (एखाद्याच्या) कुटुंबाचा विध्वंस करणें; संसाराचा सत्यनास करणें. २ घरास काळिमा आणणें. ॰भंगणें-कुटुंब मोडणें, विस्कळित होणें; कुटुंबास उतरती कळा लागणें; कुटुंबाचा नाश होणें; मंडळीत फूट पडणें. 'बापलेकांत तंटे लागस्यामुळें तें घर भंगले.' ॰भरणें-१ दुसर्‍यास बुडवून, त्यांची उपेक्षा करून आपण श्रीमंत बनणें. २ दुसर्‍याचें घर लुटणें, धुणें. व स्वतः गबर होणें. घर भलें कीं आपण भला-लोकांच्या उठा- ठेवींत, उचापतींत न पडतां आपल्या उद्योगांत गर्क असणारा (मनुष्य). ॰मांडणें-थाटणें-(संसारोपयोगी जिन्नसांनीं) घर नीटनेटकें करणें; घराची सजावट करणें. ॰मारणें-घर लुटणें. घर म्हणून ठेवणें-एखादी वस्तु, सामान प्रसंगविशेषीं उपयोगी पडण्याकरितां संग्रही ठेवणें; प्रत्येक वस्तु जतन करून ठेवणें. ॰रिघणें-घर निघणें पहा. 'घर रिघे जाई उठोनि बाहेरी ।' ॰लागणें-घर भयाण भासणें (एखाद्याचा मुलगा अथवा पत्नी वारली असतां घरांतील भयाण स्थिति वर्णिताना ह्या वाक्प्रचा- राचा उपयोग करतात). घराचा उंबरठा चढणें-घरांत प्रवेश करणें. 'जर तूं माझ्या घरची एखादीहि गोष्ट बाहेर कोणाला सांग- शील तर माझ्या घराचा उंबरठा चढण्याची मी तुला मनाई करीन.' घराचा पायगुण-घरांतील माणसांची वागणूक, वर्तणूक, वर्तन, शिस्त; घराचें पुण्य पाप. घराचा पायगुणच तसा, घरची खुंटी तशी-कुटुंबांतील माणसाची वागण्याची रीत असेल त्याप्रमाणें; एखाद्या कुटुंबांतील माणसांच्या सर्वसाधारण अशा वाईट व्यसनास खोडीस, संवयीस उद्देशून म्हणतात. घराचा वासा ओढणें- ज्याच्यामुळें एखादें काम, धंदा चालावयाचें व जें नसल्यास बंद पडावयाचें असें साधन, वस्तु, गोष्ट ओढणें; एखाद्या मोठया कामांतून फार जरूरीचें साधन नाहींसें करणें; अडबणूक करणें. 'आमच्या मंडळींतून पाटीलबुवानीं रामभाऊस फितविलें, आतां आम्हीं काय करूं शकूं! त्यानीं आमच्या घराचा वासाच ओढला. खाल्ल्या घराचे वासे मोजणें-कृतघ्न होणें; केलेला उपकार विसरणें. घरांत, घरीं- (ल.) पतीनें पत्नीबद्दल शिष्ट- संप्रदायानें वापरण्याचा शब्द. याच्या उलट पत्नी नवर्‍या संबंधीं बोलतांना 'बाहेर' या शब्दाचा उपयोग करते. 'तुम्हांला पदार्थ दिला तर घरांत मनास येणार नाहीं.' 'हा जिन्नस घरांत दाखवून आणतों.' -विवि १०.५-७.१२७. घरांतले-विअव. (बायकी) नवरा; पति; तिकडचे; तिकडची स्वारी. 'आमच्या घरांतल्यांनीं दादासाहेबांना दारूचें व्यसन लावलें.' -एकच प्याला. घरांतील मंडळी-स्त्री. (सांकेतिक) बायको; पत्नी. 'पाहूं घरांतील मंडळीस कसाकाय पसंत पडतो तो.' -विवि ७. १०. १२७. घरांत पैशाचा-सोन्याचा धूर निघणें-निघत असणें-घरची अतिशय श्रीमंती असणें; घरांत समजणें- कुटुंबांतील तंटा चव्हाट्यावर न आणणें; घरांतल्याघरांत तंटा मिटविणें; आपापसांत समजूत घडवून आणणें. घराला राम- राम ठोकणें-घर सोडून जाणें. 'आज या घराला रामराम ठोकण्यापेक्षां घटकाभर जुलमाचा रामराम पतकरला.' -भा ९०. घरावर काट्या घालणें-गोवरी ठेवणें-निखारा ठेवणें- एखाद्याच्या कुटुंबाची धूळधाण, बदनामी करणें; घरावर कुत्रें चढविणें- (गोव्याकडे घरावर कुत्रें चढल्यास घर सोडावें लागतें यावरून) १ एखाद्याच्या घरांत कलागती. भांडणें लावून देणें, तंटे उत्पन्न करणें. २ दुष्टावा करणें; अडचणींत आणणें. घरावर गवत रुजणें- घर ओसाड, उजाड पडणें. घरास आग लावणें-(ल.) एखादें दुष्कृत्य करून घराचा नाश करणें. घरास कांटी लागणें-घर उध्वस्त होणें; घरांत कोणी न राहणें. घरांस कांटी लावणें-१ घराच्या भोवतीं कांटे, काटक्या लावून येणें-जाणें बंद करणें. २ (ल.) घर उजाड, उध्वस्त, ओसाड करणें. घरास हाड बांधणें, घरावर टाहळा टाकणें- (एखाद्यास) वाळींत टाकणें; समाजांतून बहिष्कृत करणें; जाती- बाहेर टाकणें. (शेत, जमीन, मळा, बाग) घरीं करणें- स्वतः वहिवाटणें. घरीं बसणें-(एखादा मनुष्य) उद्योगधंदा नसल्यामुळें, सोडून दिल्यामुळें घरीं रिकामा असणें; बेकार होणें. 'तो एक वर्ष झालें घरीं बसला आहे.' (एखाद्याच्या) घरीं पाणी भरणें-(एखादा मनुष्य, गोष्ट) एखाद्याच्या सेवेंत तत्पर असणें; त्यास पूर्णपणें वश असणें. 'उद्योगाचे घरीं । ऋद्धिसिद्धि पाणीभरी.' घरीं येणें-(एखादी स्त्री) विधवा झाल्यामुळें सासरच्या आश्रयाच्या अभावीं पितृगृहीं, माहेरीं परत येणें; विधवा होणें. 'कुटुंब मोठें, दोन बहिणी घरीं आलेल्या.' -मनोरंजन आगरकर अंक. घरीं तसा दारीं देवळीं तसा बिर्‍हाडीं, घरीं दारीं सारखाच-सर्व ठिकाणीं सारखाच वागणारा; (सामा.) सर्वत्र उपद्रवकारक असलेला (मनुष्य, मूल); जसा स्वतःच्या घरीं उपद्रवकारक तसाच दुसर्‍याच्या घरीं उपद्रवकारक असलेला (मनुष्य, मुलगा). आल्या घरचा-वि. पुनर्विवाहित स्त्रीस पहिल्या नवर्‍यापासून झालेला (मुलगा). म्ह॰ १ घर फिरलें म्हणजे घराचे वांसेहि फिरतात = (एखाद्या) घरांतल्या मुख्याची खपा मर्जी, नाराजी झाली तर घरांतलीं लहानमोठीं नोकरचाकर सर्वच माणसें त्याच्या विरुद्ध उठतात. सामाशब्द- ॰असामी-स्त्री १ वतनवाडी; जमीनजुमला; मालमत्ता. २ घरकामासंबंधाचा मनुष्य; घराकडचा माणूस. ॰कज्जा-पु. घरां- तील तंटा; कौटुंबिक भांडण; गृहकलह. ॰करी-पु. पत्नीनें नवर्‍यास उद्देशून वापारावयाचा शब्द; घरधनी; कारभारी; यज- मान; घरमालक. 'माझे घरकरी गांवाला गेले.' ॰करीण- स्त्री. पतीनें पत्नीविषयीं वापरावयाचा शब्द; कारभारीण. 'माझ्या घरकरणीला तिच्यामुळें आराम वाटतो.' -कोरकि ३१५. २ घरधनीण; घरची मालकीण; यजमानीण. ॰कलह-पु. घरांतील भांडण; घरांतील माणसांचें दायग्रहणादिविषयक भांडण; आपसां- तील भांडण; अंतःकलह. ॰कसबी-पु आपल्या अक्कलहुषारीनें घरगुती जरूरीचे जिन्नस घरच्याघरीं तयार करणारा व घरची मोडतोड दुरुस्त करणारा मनुष्य; घरचा कारागीर; बाहेर काम करून उपजीविका न करणारा माणूस. ॰कहाणी-काहणी-स्त्री. (वाईट अर्थीं उपयोग) घरांतल्या खाजगी गोष्टीचें कथन. ॰कान्न-स्त्री. (गो.) घरधनीण; बायको; घरकरीण. [सं. गृह + कान्ता]. ॰काम-न. घरगुती काम. घरासंबंधीं कोणतेंहि काम; प्रपंचाचें काम. 'बायकांचा धंदा घरकामाचा लावतात.' ॰काम्या-वि. घरांतील कुटुंबांतील किरकोळ कामें करण्यास ठेवलेला नोकर, गडी; घरांतील काम करणारा. [घरकाम] ॰कार-री-पु. (गो. कु.) १ नवरा, पति. २ घरचा यजमान; घरधनी; मालक. [सं. गृह + कार] घरकरी पहा. ॰कारणी-पु. घरचें सर्व काम पाहणारा; कारभारी, दिवाणजी; खाजगी कारभारी. ॰कुंडा-पु. (कों.) १ पक्ष्याचें घरटें; कोठें. २ (ल.) आश्रय- स्थान; 'आम्हीं तुझ्या विश्रांतीचा घरकुंडा सोडतांच हे आमचे अद्वैतज्ञानाचे पांख आम्हांस तोलत नाहींसे होऊन आम्ही खालीं पडों लागलों.' -दादोबा, यशोदा पांडुरगी. [सं. गृह + कुंड] ॰कुबडा-कुबा-कोंबा-घरकोंग्या-कोंडा-कुंडा-कोंघा-कोंबडा-घुबड-पु. (घरांतला घुबड, कोंबडा इ. प्राणी) (दुबळ्या व सुस्त माणसाला-प्राण्याला तिरस्कानें लावावयाचा शब्द). नेहमीं घरांत राहाणारा; एकलकोंड्या; माणुसघाण्या; चारचौघांत उठणें, बसणें, गप्पा मारणें इ॰ ज्यास आवडत नाहीं असा, कधीं बाहेर न पडणारा मनुष्य; घरबशा. ॰कुल्ली- वि. (गो.) बहुश; घराबाहेर न पडणारी (स्त्री.); घर- कोंबडी. ॰केळ-स्त्री. (प्रां.) गांवठी केळ. घरीं लावलेलीं केळ. ॰खटला-लें-पुन १ घरचा कामधंदा; गृहकृत्य; प्रपंच, शेतभात इ॰ घरासंबंधीं काम. २ घराची, कुटुंबाची काळजी, जबाबदारी- अडचणी इ॰ ३ गृहकलह; घरांतील भांडण. ॰खप्या-वि. घरांतील धुणें, पाणी भरणें, इ॰ सामान्य कामाकरितां ठेवलेला गडी; घरच्या कामाचा माणूस; घरकाम्या पहा. [घर + खपणें = काम करणें, कष्ट करणें] ॰खबर-स्त्री. घरांतील व्यवहारांची उठाठेव-चौकशी; घराकडची खबर, बातमी. 'उगाच पडे खाटे वर तुज कशास व्हाव्या घरखबरा ।' -राला २२. [घर + खबर = बातमी] ॰खर्च-पु कुटुंबपोषणाला लागणारा खर्च; प्रपंचाचा खर्च. ॰खातें-न. घरखर्चाचें मांडलेलें खातें; खानगी खातें. ॰खास(ज)गी-वि. घरांतील मालमत्ता, कामें कारखाना इ॰ संबंधीं; घरगुती बाबीसंबंधीं; घरगुती, खासगी व्यवहारबाबत. ॰गणती-स्त्री. १ गांवांतील घरांची संख्या. २ गांवांतील घरांची मोजणी, मोजदाद. ३ गांवांतील घरांच्या मोजणीचा हिशेब, तपशील. (क्रि॰ करणें; काढणें) [घर + गणती = मोजणी] ॰गाडा- पु. संसाराचीं कामें; जबाबदारी; प्रपंचाची राहाटी; प्रपंच; संसार; घरखटला. (क्रि॰ हांकणें; चालवणें; सांभाळणें). ॰गुलाम-पु. घरांतील नोकर; गडी. 'चौदाशें घरगुलाम मुकले या निजपा- यांला ।' -ऐपो ३१३. ॰गोहो-पु. चुलीपाशीं, बायकांत, आश्रि- तांत शौर्य दाखविणारा मनुष्य; गेहेशूर; घरांतील माणसांवर जरब ठेवणारा पण बाहेर भागुबाईपणा करणारा पुरुष. [घर + गोहो = नवरा, पुरुष] ॰घरटी-स्त्री. दारोदार; एकसारखी फेरी घालणें (क्रि॰ करणें). 'चंद्र कथुनि मग महेंद्रगृहीं घरघरटी करित वायां ।' -आमहाबळ १९.१ ॰घाला-ल्या, घरघालू-वि. १ खोड साळ; फसवाफसवी करणारा; बिलंदर. 'भिजल्या पोरी कशी होरी ग हे घरघाली ।' -राला ४०. २ कुळाची अब्रू घालवणारा; घर- बुडव्या; दुसर्‍याचें घर बुडविणारा किंवा व्यसनादिकांनी आपलें घर बुडवून घेणारा. 'कशी घरघाली रांड बसली आम्हां गिळून ।' -राला ४६. ३ सर्व नाश करणारा. 'भयानका क्षिति झाली घर- घाली रुद्रविंशति जगिं फांकली ।' -ऐपो ३६८. [घर + घालणें; तुल॰ गु. घरघालु = द्रोही, खर्चीक] ॰घुशा-सा-वि. सर्व दिव- सभर उदासवाणा घरांत बसणारा; घरबशा, घरकोंबडा; घरकु- बडा पहा. [घर + घुसणें] ॰घुशी-सी-स्त्री. नवर्‍याचें घर सोडून दुसर्‍याच्या घरांत नांदणारी; दुसर्‍याचा हात धरून गेलेली विवा- हित स्त्री. 'कोण धांगड रांड घरघुशी ।' -राला ७८. [घर + घुसणें] ॰घेऊ-घेणा-वि. घराचा, कुटुंबाचा नाश, धुळधाण करणारा; घरघाला; घरबुडव्या; दुसर्‍यास मोह पाडून, फसवून त्याचें घर बळकावणारा. 'जळो आग लागो रे ! तुझि मुरली हे घरघेणी ।' -देप ८०. 'लांबलचकवेणी, विणुन त्रिवेणी, घर- घेणी अवतरली ।' -प्रला १११. [घर + घेणें] ॰चार, घरा- चार-पु. १ कुटुंबाची रीतभात; घराची चालचालणूक; कौटुं- बिक रूढी, वहिवाट. म्ह॰ घरासारखा घरचार कुळासारखा आचार. २ गृहस्थधर्म; संसार; प्रपंच. -जै १०६. 'दुःखाचा घरचार निर्धन जिणें भोगावरी घालणें ।' -किंसुदाम ५०. [सं. गृहाचार; म. घर + आचार = वर्तन] ॰चारिणी, ॰चारीण- स्त्री. (काव्य.) गृहपत्नी; घरधनीण; यजमानीण; घरमालकीण. 'शेवटीं नवनीत पाहतां नयनीं । घरचारिणी संतोषे ।' [सं. गृहचा- रिणी] ॰जमा-स्त्री. घरावरील कर; घरपट्टी. घरजांव(वा)ई- पु. बायकोसह सासर्‍याच्या घरीं राहणारा जांवई; सासर्‍यानें आपल्या घरींच ठेवून घेतलेला जांवई; सासर्‍याच्या घरीं राहून तेथील कारभार पाहणारा जांवई. 'तो संसाराचा आपण । घर जांवई झाला जाण । देहाभिमानासि संपूर्ण । एकात्मपणमांडिले ।।' -एभा २२.५९२. [घर + जांवई] ॰जांवई करणें-सक्रि. १ (एखाद्यास) सर्वसंपत्तीसह कन्यादान करणें; जांवयाला घरीं ठेवून घेणें, त्याला आपली जिंदगी देणें. 'त्याला त्यांनीं घरजां वईच केला आहे.' -इंप २७. २ (उप.) एखादी उसनी घेत- लेली वस्तु लाटण्याच्या हेतूनें, मालकानें परत मिळण्याविषयीं तगादा लावीपर्यंत, ठेवून घेणें. ॰जांवई होऊन बसणें-अक्रि. आपल्यावर सोपविलेल्या कामाचा किंवा धंद्याचा नफा किफायत आपल्याच कामीं लावणें, आपणच घेऊन टाकणें. ॰जिंदगी, जिनगानी-स्त्री. १ घरांतील सामानसुमान, उपकरणीं, भांडी- कुंडीं, द्रव्याव्यतिरिक्त इतर मालमत्ता; घरांतील जंगम चीजवस्त; मिळकत. २ (सामा.) मिळकत; इस्टेट. 'पादशहाची घरजि- नगानी समग्र लुटून.' -ख ८.४२२४. [घर. फा. झिंदगी, झिंद- गानी = मालमत्ता,जन्म,संसार] ॰जुगूत-जोगावणी-स्त्री. १ काटकसर; मितव्यय; थोडक्यांत घराचा निर्वाह. २ घरांतील जरूरीची संपादणी; कसाबसा निर्वाह. 'एक म्हैस आहे. तिणें घर जुगूत मात्र होत्ये.' -शास्त्रीको [घर + जुगुत = युक्ति + जोगवणी = प्राप्तीची व खर्जाची तोंडमिळवणी] ॰टका-टक्का-पु. घरपट्टी घरजमा; घरावरील कर. ॰टण-णा-घरठाण अर्थ २ घरवंद पहा. ॰टीप-स्त्री. १ गांवांतील घरांची गणती. (क्रि॰ करणें; काढणें). २ घरमोजणीचा हिशेब, तपशील; घरगणती पहा. [घर + टीप = टिपणें, लिहिणें] (वाप्र.) ॰टीप काढणें-करणें- घेणें-(ल.) (शोधीत, लुटीत, मोजीत, आमंत्रण देत) गांवां- तील एकहि घर न वगळता सर्व घरांची हजेरी घेणें; कोणतीहि क्रिया, रोग, प्रादुर्भाव गांवांतील एकहि घर न वगळतां होणें. 'यंदा जरीमरीनें ह्या गांवाची घरटीप घेतली.' ॰टोळ- स्त्री. (कों.) प्रत्येक घराचा झाडा, झडती. 'त्या गांवची घरटोळ घेतली तेव्हां चोर सांपडला.' घरडोळ पहा. ॰ठा(ठ)ण- न. १ घर ज्या जागेवर बांधलेलें आहे ती इमारत बांधून राहण्याच्या कामासाठीं उपयोगांत आणलेला जमीनीचा विभाग. -लँडरेव्हिन्यू कोड. २ मोडलेल्या घराचा चौथरा; पडक्या घराची जागा. घरवंद पहा. [सं. गृहस्थान; म. घर + ठाणा-ण] ॰ठाव-पु. १ नवरा; पति; संसार. 'मुदतींत आपल्याकडे नांदण्यास न नेल्यास मी दुसरा घरठाव करीन.' २ अनीति- कारक आश्रय; रखेलीचा दर्जा; रखेलीस दिलेला आश्रय. 'निरांजनीला मुंबईंत एका गुजराथी धनवानानें चांगला घरठाव दिला होता.' -बहकलेली तरुणी (हडप) ८. ॰डहुळी-डोळी, -डोळा-स्त्री. १ घराचा झाडा, झडती, झडती; बारीक तपासणी. 'मग थावली ते वाहटुळी । सैंघ घेऊनि घरडहुळी । -ज्ञा ६.२१६. 'तया आधवियांचि आंतु । घरडोळी घेऊनि असें पाहतु ।' -ज्ञा ११.५८६. २ प्रत्येक घराची केलेली झडती. (क्रि॰ घेणें). [घर + डहुळणें = ढवळणें] ॰डुकर-न. १ गांवडुकर; पाळीव डुकर. २ निंदाव्यजक (कुटुंबांतील) आळशी, निरुद्योगी स्त्री. [घर + डुकर] ॰तंटा-पु. गृहकलह; घरांतील भांडण. [घर + तंटा] ॰दार-न. (व्यापक) कुटुंब; घरांतील माणसें, चीचवस्त इ॰ प्रपंचाचा पसारा, खटलें; [घर + दार] (वाप्र.) घरदार खाऊन वांसे तोंडीं लावणें-सारी धनदौलत नासून, फस्त करून कफल्लक बनणें; ॰दार विकणें-घर व त्यांतील मालमत्ता विकणें; सर्व स्थावर जिंदगी घालविणें. म्ह॰ एक पाहुणा म्हणजे घरदार पाहुणें = एका पाहुण्यासाठीं कांहीं मिष्टान्न केलें तर तें घरांतील सर्व मंडळींस वाढावें लागतें. ॰देणें-न. घरपट्टी; घरटका. ॰धणी- नी-पु. १ यजमान; गृहपति; घरांतील कर्ता माणूस. 'निर्वीरा धरणी म्हणे घरधणी गोंवूनी राजे पणीं ।' -आसी ५२. २ पति; नवरा; घरकरी. 'मग घरधन्यास्नी पकडूनश्येनी न्ये.' = बाय २.२. ॰धंदा-पु. घरांतील कामधाम; गृहकृत्य. [घर + धंदा] ॰धनीण-स्त्री. १ घरमालकीण; यजमानीण. २ पत्नी; बायको; घरकरीण. 'माझी घरधनीण फार चांगली आहे.' -विवि ८.२. ४०. ॰नाशा-वि. घराचा, कुटुंबाचा नाश, धुळधाण कर णारा; घरघाल्या. [घर + नासणें] ॰निघ(घो)णी-स्त्री. १ घरनिघी पहा. २ (क्क.) घरभरणी अथवा गृहप्रवेश शब्दाबद्दल वापर- तात. केव्हां केव्हां या दोन्हीहि शब्दांबद्दल योजतात. [घर + निघणें] ॰निघी-स्त्री. वाईट चालीची. दुर्वर्तनी, व्यभिचा रिणी स्त्री; घरांतून बाहेर पडलेली, स्वैर, व्यभिचारिणी स्त्री. 'कीं घरनिघेचें सवाष्णपण ।'-नव १८.१७२. [घर + निघणें = निघून जाणें, सोडणें] ॰निघ्या-पु. १ स्वतःचें कुटुंब, घर, जात सोडून दुसर्‍या घरांत, जातींत जाणारा; दुर्वर्तनी, व्यभिचारी मनुष्य. २ एखाद्या व्यभिचारिणी स्त्रीनें बाळगलेला, राखलेला पुरुष; जार. [घर + निघणें] ॰पटी-ट्टी-स्त्री. १ घरटका; घरदेणें; घरावरील कर; हल्लींसारखी घरपट्टी पूर्वीं असे. मात्र ती सरकारांत वसूल होई. पुणें येथें शके १७१८-१९ मध्यें घरांतील दर खणास सालीना ५ रु. घरपट्टी घेत. मात्र घरांत भाडेकरी किंवा दुकानदार ठेवृल्यास घेत. स्वतःचें दुकान असल्यास, किंवा भाडे- करी नसल्यास घेत नसत. -दुसरा बाजीराव रोजनिशी २७९- ८०. 'पंचाकडे घरपट्टी बसविण्याचा अधिकार आला.' -के १६.४. ३०. २ एखाद्या कार्याकरितां प्रत्येक घरावर बसविलेली वर्गणी. [घर + पट्टी = कर] ॰पांग-पु. निराश्रितता; आश्रयराहित्य. 'तंव दरिद्रि- यासी ठाव तत्त्वतां । कोणीच न देती सर्वथा । जेथें घरपांग पाहतां । बाहेर घालिती पिटोनि ।।' -ह २९.३५. [घर + पांग = उणीव] ॰पांड्या-पु. घरांतल्याघरांत, बायकांत बडबडणारा, पांडित्य दाखवणारा. [घर + पांड्या = गांवकामगार] ॰पाळी-स्त्री. (सरका- रला कांहीं जिन्नस पुरविण्याची, सरकाराचा विवक्षित हुकूम बजावण्याची, भिकार्‍यांना अन्न देण्याची इ॰) प्रत्येक घरावर येणारी पाळी, क्रम. [घर + पाळी] ॰पिसा-वि. ज्याला घराचें वेड लागलें आहे असा; घरकोंबडा; घरकुंडा; [घर + पिसा = वेडा] ॰पिसें-न. घराचें वेड; घरकुबडेपणा; घर सोडून कधीं फार बाहेर न जाणें. [घर + पिसें = वेड] ॰पोंच, पोंचता-वि. घरीं नेऊन पोंचविलेला, स्वाधीन केलेला (माल). [घर + पोहोंच विणें] ॰प्रवेश-पु. नवीन बांधलेल्या घराची वास्तुशांति करून त्यांत रहावयास जाण्याचा विधि. (प्र.) गृहप्रवेश पहा. [म. घर + सं. प्रवेश = शिरणें] घरास राखण-स्त्री. १ घराचें रक्षण करणारा मनुष्य. २ थोडासा संचय, शिल्लक, साठा, संग्रह. 'सगळा गूळ खर्चूं नको घरास राखण थोडकासा ठेव.' घर म्हणून पहा. ॰फूट-स्त्री. आपसांतील दुही, तंटेबखेडे; गृहकलह; घर, राज्य इ॰ कांतील एकमतानें वागणार्‍या माणसांमध्यें परस्पर वैर. द्वेषभाव. [घर + फूट = दुही, वैर] ॰फोड-स्त्री. घरांतील माणसांत कलि माजवून देणें, कलागती उत्पन्न करणें. [घर + फोडणें = फूट पाडणें] ॰फोडा-स्त्री. १ (कायदा) एखाद्याच्या घरांत त्याच्या संमतीवाचून कुलूप-कडी काढून, मोडून किंवा मार्ग नाहीं अशा ठिकाणीं मार्ग करून (चोरी करण्याकरितां) प्रवेश करणें; (पीनलकोडांतील एक गुन्हा). २ घराची भिंत वगैरे फोडून झालेली चोरी. (इं.) हाउस् ब्रेकिंग. [घर + फोडणें] ॰फोड्या-वि. १ घरांत, राज्यांत फूट पाडणारा, दुही माजविणारा; घरफूट कर. णारा. २ घरें फोडून चोरी करणारा. [घर + फोडणें] ॰बंद-पु. १, (कों.) घरांची वस्ती, संख्या. 'त्या शहरांत लाख घरबंद आहे. [घर + बंद = रांग] २ घराचा बंदोबस्त; घरावरील जप्ती; घर जप्त करणें; घराची रहदारी बंद करविणें; चौकी-पहारा बसविणें. 'एकोनि यापरी तुफान गोष्टी । क्रोध संचरला राजयापोटीं । पाहारा धाडूनि घरबंदसाठीं । ठेविला यासी कारागृहीं ।' -दावि ४५६. [घर + बंद = बंद करणें] ॰बशा-वि. उप. घरकोंबडा; घरांत बसून राहणारा. [घर + बसणें] ॰बसल्या-क्रिवि. घरीं बसून; नोकरी, प्रवास वगैरे न करतां; घरच्याघरीं; घर न सोडतां. (ल.) आयतें; श्रमविना. (क्रि॰ मिळणें; मिळवणें). 'तुम्ही आपले पैसे व्याजीं लावा म्हणजे तुम्हांला घरबसल्या सालीना पांचशें रुपये मिळतील.' ॰बाडी-स्त्री. बेवारसी घरांचें भाडें (ब्रिटीशपूर्व अमदानींत, कांहीं शहरांतून सरकार हें वसूल करीत असे). घरवाडी पहा. ॰बार-न. घरदार; घरांतील मंडळी व माळमत्ता; संसार; प्रपंचाचा पसारा. 'तेवि घरबार टाकून गांवीचे जन ।' -दावि ४१२. 'घरबार बंधु सुत दार सखे तुजसाठिं सकळ त्यजिले ।' -देप २७. [सं. गृह + भृ; म. घर + भार; हिं घरबार; गु. घरबार] ॰बारी-पु. १ कुटुंबवत्सल; बायकोपोरांचा धनी; गृहस्थाश्रमी; संसारी. 'भार्या मित्र घरबारिया ।' -मुवन १८.७१. २ घरधनी; घरकरी; नवरा; पति. 'कां रुसला गे माझा तो घरबारी ।' -होला १४८. [सं. गृह + भृ; म. घरबार; हिं. घरबारी; गु. घरबारी] म्ह॰ ना घरबारी ना गोसावी = धड संसारीहि नाहीं कीं बैरागी नाहीं अशा मनुष्याबद्दल योजतात. ॰बारीपणा-पु. गृहस्थ- पणा; कर्तेपणा. 'पुरुषास घरबारीपणा प्राप्त होतो.' -विवि ८.२. ३५. [घरबारी] ॰बुडवेपणा-पु. १ घराचा नाश करण्याचें कर्म. २ देशद्रोह; स्वदेशाशीं, स्वदेशीयाशीं, स्वराज्याशीं बेइमान होणें. 'हा प्रयत्न त्यांच्या इतर प्रयत्नाप्रमाणेंच घर- बुडवेपणाचा आहे हें आम्ही सांगावयास नकोच.' -टि १.५४८. [घर बुडविणें] ॰बुडव्या-वि. अत्यंत त्रासदायक; दुसर्‍याच्या नाशाची नेहमीं खटपट करणारा; घरघाल्या; स्वतःच्या, दुसर्‍याच्या घरादारांचा नाश करणारा; देशद्रोही. [घर + बुडविणें] ॰बुडी, ॰बुड-स्त्री. १ (एखाद्याच्या) संपत्तीचा, दौलतीचा नाश; सर्वस्वाचा नाश. २ एखादें घर, कुटुंब अजिबात नष्ट होणें; एखाद्या कुळांचें, वंशाचें निसंतान होणें. [घर + बुडणें] ॰बेग(ज) मी-स्त्री. कुटुंबाच्या खर्चाकरितां धान्यादिकांचा केलेला सांठा, पुरवठा, संग्रह; प्रपंचासाठीं केलेली तरतूद. [घर + फा. बेगमी = सांठा] ॰बेत्या-पु. (राजा.) घराची आंखणी करणारा. (इं.) इंजिनिअर. [घर + बेतणें] ॰बैठा-वि. घरीं बसून करतां येण्या- सारखें (काम, चाकरी, धंदा); बाहेर न जातां, नोकरी वगैरे न करतां, स्वतःच्या घरीं, देशांत करतां येण्याजोगा. २ घरांत बसणारा (नोकरी, चाकरीशिवाय); बेकार. -क्रिवि. (सविभक्तिक) घरीं बसून राहिलें असतां; घरबसल्या पहा. [घर + बैठणें] ॰भंग- पु. १ घराचा नाश, विध्वंस. 'जिवलगांचा सोडिला संग । अव- चिता जाला घरभंग ।' -दा ३.२. ६०. २ (ल.) कुळाचा, कुटुंबाचा नाश; कुलनाश. [घर + भंग] ॰भर-वि. (कर्तुत्वानें, वजनानें) घर, कुटुंब भरून टाकणारा-री; घरांत विशेष वजन असणारा-री; घरांतील जबाबदार. -क्रिवि. घरांत सर्व ठिकाणीं, सर्वजागीं. 'त्यानें तुला घरभर शोधलें.' [घर + भरणें] ॰भरणी- स्त्री. १ गृहप्रवेश; नवीन बांधलेल्या घरांत राहण्यास जाण्याच्या वेळीं करावयाचा धार्मिक विधि; वास्तुशांति; घररिघणी पहा. २ पतीच्या घरीं वधूचा प्रथम प्रवेश होताना करण्याचा विधि; नव- वधूचा गृहप्रवेश; गृहप्रवेशाचा समारंभ; वरात; घररिगवणी; घर- रिघवणी. 'वधूवरें मिरवून । घरभरणी करविली ।' -र ४८. ॰भरवण-णी-स्त्री. (गो. कु.) गृहप्रवेश; वरात; घरभरणी अर्थ २ पहा. [घर + भरवणें] ॰भाऊ-पु. कुटुंबांतील मनुष्य; नातलग; कुटुंबांच्या मालमत्तेचा, वतनवाडीचा वांटेकरी; हिस्सेदार; दायाद. ॰भाट-पु. १ (कु.) घराच्या आजूबाजूची आपल्या माल- कीची जागा, जमीन; घरवाडी; विसवाट. २ (गो.) घराशेजा- रचा, सभोंवारचा नारळीचा बाग. [घर + भाट] ॰भांडवल- न. १ कुटुंबांतील मालमत्ता, जिंदगी, इस्टेट. २ एखाद्याचा खाजगी द्रव्यनिधि, ठेव; उसना काढलेला, कर्जाऊ काढलेला पैसा, द्रव्यनिधि याच्या उलट. [घर + भांडवल] ॰भांडवली- वि. घरच्या, स्वतःच्या भांडवलावर व्यापार करणारा. [घर- भांडवल] ॰भाडें-न. दुसर्‍याच्या घरांत राहण्याबद्दल त्यास द्यावयाचा पैसा, भाडें. [घर + भाडें] ॰भारी-पु. (प्र.) घरबारी. १ घरबारी पहा. २ ब्रह्यचारी, संन्यासी याच्या उलट; गृहस्था- श्रमी. ॰भेद-पु. कुटुंबाच्या माणसांतील आपसांतील भांडण, तंटा; फाटाफूट; घरफूट. ॰भेदी-द्या-वि. १ स्वार्थानें, दुष्टपणानें परक्याला, शत्रूला घरांत घेणारा; फितूर; देशद्रोही. २ घरचा, राज्याचा, पक्का माहितगार; घरचीं सर्व बिंगें ज्यास अवगत आहेत असा. म्ह॰ घरभेदी लंकादहन = घरभेद्या मनुष्य लंका जाळण्यार्‍या मारुतीप्रमाणें असतो. ३ घरांतील, राज्यांतील कृत्यें, गुप्त बातम्या बाहेर फोडणारा; घर फोडणारा. 'घरभेद्या होऊनि जेव्हां ।' -संग्रामगीतें १४०. ४ घरांत, कुटुंबांत, राज्यांत, तेटें, कलह, लावणारा. ॰भोंदू-वि. १ लोकांचीं घरें (त्यांना फसवून) धुळीस मिळवणारा. २ (सामा.) ठक; बिलंदर; प्रसिद्ध असा लुच्चा; लफंगा (मनुष्य). [घर + भोंदू = फसविणारा] ॰महार- पु. राबता महार. ॰मारू-र्‍या-वि. शेजार्‍यास नेहमीं उपद्रव देणारा; शेजार्‍याच्या नाशविषयीं नेहमीं खतपट करणारा. ॰माशी-स्त्री. घरांत वावणारी माशी; हिच्या उलट रानमाशी. ॰मेढा-मेंढ्या-पु. घरांतील कर्ता, मुख्य मनुष्य; कुटुंबाचा आधारस्तंभ; घराचा खांब पहा. [सं. गृह + मेथि; प्रा. मेढी; म. घर + मेढा = खांब] ॰मेळीं-क्रिवि. आपसांत; घरीं; खाजगी रीतीनें; आप्तेष्टमंडळीमध्यें (तंठ्याचा निवडा. तडजोड करणें). 'घरमेळीं निकाल केला.' [घर + मेळ; तुल॰ गु. घरमेळे = आप- सांत] ॰मोड-स्त्री. मोडून तें विकणें. 'कांहीं दिवसपर्यंत येथें घरमोडीचा व्यापार उत्तम समजला जात होता.' -टि १. १६९. [घर + मोडणें] ॰राखण-स्त्री. १ (प्रा.) घराची पाळत; रक्षण; पहारा. २ घरराखणारा; घरावर पहारा ठेवणारा. [म. घर + राखणें] ॰राख्या-वि. घराचें रक्षण करणारा; घराचा पहा- रेकरी; घरराखण. [घर + राखणें] ॰रिघणी, ॰रिघवणी-स्त्री. १ बांधलेल्या घरांत प्रवेश करतेवेळीं करावयाचा धार्मिक- विधि घरभरणी अर्थ १ पहा. २ घरचा कारभार; घरकाम. 'रचून विविध देहकुटी । तो घररिघवणी परिपाठी ।' -विपू ७. १२८. [घर + रिघणें = प्रवेश करणें] ॰रिघणें-घरांत येणें, प्रवेश करणें. 'घररिघे न बाहतां भजकाच्या ।' -दावि १६१. ॰लाठ्या-वि. (महानु.) घरांतील लाठ्या, लठ्या; घरपांड्या; गृहपंडित; घरांत प्रौढी मिरविणारा; रांड्याराघोजी. 'ऐसेआं घरलाठेआं बोला । तो चैद्यु मानवला ।' -शिशु ८९९. [घर + लठ्ठ?] ॰वट-ड-स्त्री. १ (कु. गो.) एखाद्या कुटुंबाची सर्वसाधारण, समायिक जिंदगी, मालमत्ता; कुटुंबाचें, संस्थेचें सर्वसाधारण काम, प्रकरण. घरोटी पहा. २ (गो.) कूळ; कुटुंब; परंपरा. ३ अनुवंशिक, रोग, भूतबाधा इ॰ आनुवांशिक संस्कार. [सं. गृह + वृत्त; प्रा. वट्ट] ॰वण-न. (कों.) घरपट्टी; घरासंबंधीं सरकार देणें. ॰वणी- न. घराच्या छपरावरून पडणारें पावसाचें पाणी. याचा धुण्याकडे उपयोग करतात. [सं. गृह. म घर + सं. वन, प्रा. वण = पाणी] ॰वंद-पु. (राजा.) घरटणा; पडक्या घराचा चौथरा; पडलेल्या घराची जागा. -वि. घरंदाज; कुलीन; खानदानीचा. 'शहर पुणें हरहमेष भरलें वाडें बांधिती घरवंदानी ।' -ऐपो ४२०. [गृहवंत?] ॰वरौते-स्त्री. १ घरवात; प्रपंच; संसारकथा; घरवात पहा. २ -न. वनरा- बायको; दापत्य; जोडपें. 'तीं अनादि घरवरौतें । व्यालीं ब्रह्मादि प्रपंचातें ।' -विउ ६.५ 'पुढती घरवरौतें । वंदिलीं तिये ।' -अमृ १.४९. [गृह + वृत्-वर्तित्] ॰वसात-द- स्त्री. १ वसति; रहाणें; वास; मुकाम. २ घराची जागा आणि सभोंवतालचें (मालकीचें) आवार, परसू, मोकळी जागा, अंगण. [घर + वसाहत] ॰वांटणी, ॰वांटा ॰हिस्सा- स्त्रीपु. घराच्या मालमत्तेंतील स्वतःचा, खाजगी, हिस्सा, भाग. [घर + वांटणी] ॰वाडी-स्त्री. (कों.) ज्यांत घर बांधलेलें, असतें तें आवार; वाडी. कोणाच्या अनेक वाड्या असतात, त्यापैकीं जींत धन्याचें घर असतें ती वाडी. [घर + वाडी] ॰वात-स्त्री. संसार; प्रपंच; संसाराच्या गोष्टी; प्रपंचाचा पसारा; घरवरौत; घरकाम. 'घरवातें मोटकीं दोघें । जैं गोसावी सेजे रिगे । दंपत्यपणें जागे । स्वामिणी जें ।।' -अमृ १.१३. 'ऐसी तैं घरवात वाढली । खातीं तोंडें मिळालीं ।' -दा ३.४. ६. [सं. गृहवार्ता] ॰वाला-वि. १ घराचा मालक. २ (खा.) नवरा; घरधनी; पति. [घर + वाला स्वामित्वदर्शक; प्रत्यय; तुल॰ गु. घरवाळो] ॰वाली- वि. (खा.) बायकों; पत्नी; घरधनीण. 'माझ्या घर- वालीनें साखर पेरतांच त्यानें सर्व सांगितलें ।' -राणी चंद्रावती ५३. [घर + वाली; गु. घरवाळी] ॰वासी-वि. कुटुंबवत्सल; प्रपंचांत वागणारा. [घर + वास = राहणें] ॰वेडा- वि. १ घरपिसा. २ बाहेर राहून अतिशय कंटाळल्यामुळें घरीं जाण्यास उत्सुक झालेला; (इं.) होमसिक्. ॰शाकारणी-॰शिवणी-स्त्री. घरावरील छपराची दुरुस्ती करणें; घरावर गवत वगैरे घालून पाव- सापासून संरक्षणाची व्यवस्था करणें; घराच्या छपराचीं कौलें चाळणें. [घर + शाकरणें, शिवणें] ॰शोधणी-स्त्री. १ स्वतःचीं खाजगी कामें पहाणें. २ स्वतःच्या साधनसामर्थ्याचा विचार करणें; स्वतःची कुवत अजमावणें. [घर + शोधणें] ॰संजोग- पु. १ एखाद्या कामास लागणारा घरचा संरजम. 'त्या हरदा- साचा घरसंजोग आहे.' = कीर्तनास लागणारीं साधनें तबला, पेटी, टाळ इ॰ हीं त्या हरदासाच्या घरचींच आहेत. २ काटकसरीचा प्रपंच; घरजुगूत; घरव्यवस्था. ३ सुव्यवस्थित घरांतील सुखसोयी, समृद्धता. [घर + सं. संयोग, प्रा. संजोग + सरंजाम] ॰संजो- गणी-स्त्री. घरसंजोग अर्थ २ पहा. घरजुगूत; काटकसर; मितव्यय. ॰समजूत-स्त्री. घरांतल्याघरांत, आपआपसांत स्नेह भावानें. सलोख्यानें केलेली तंट्याची तडजोड, समजावणी. ॰संसार-पु. कुटुंबासंबंधीं कामें; घरकाम; प्रपंच. ॰सारा-पु. घरावरील कर; घरपट्टी; घरटक्का. [घर + सारा = कर] ॰सोकील- वि. घरीं राहून खाण्यास सोकावलेला; घरीं आयतें खाण्यास मिळत असल्यानें घर सोडून बाहेर जात नाहीं असा; घराची चटक लागलेला (बैल, रेडा इ॰ पशु). [घर + सोकणें] ॰स्थिति- स्त्री. १ घराची स्थिति; घरस्थीत पहा. २ गृहस्थाश्रमधर्म; संसार; प्रपंच. 'ॠषीस अर्पिली कन्या शांती । मग मांडिली घरस्थिति ।' -कथा ३.३. ६३. [सं. गृहस्थिति] ॰स्थीत-स्त्री. घराची, कुटुं- बाची रीतभात, चालचालणूक, वर्तक, आचार, स्थिति. म्ह॰ अंगणावरून घरस्थीत जाणावी = अंगणाच्या चांगल्या किंवा वाईट स्थितीवरून त्या घारांतील मंडळीचा आचार कसा आहे तें समजतें. शितावरून भाताची परीक्षा या अर्थी. [घर + स्थिति अप.] घराचा खांब, घराचा धारण, घराचें पांघरूण-पुन. (ल.) घरांतील कर्ता माणूस; घरांतला मुख्य; घरमेढ्या. घराचार-पु. १ संसार; प्रपंच; गृहस्थाश्रमधर्म; घरकाम. 'परी अभ्यंतरीं घराचार माडें ।' -विपू ७.१३८. 'यापुरी निज नोवरा । प्रकृती गोविला घरचारा ।' -एभा २४.३२. -कालिकापुराण ४.३५. २ (ल.) पसारा; व्याप 'तेथ वासनेचा घराचार । न मांडे पैं ।' -सिसं ४.२०७. ३ घरां- तील मंडळींची राहटी, रीतभात, आचरण, वागणूक, व्यवहार. 'वंध्यापुत्राचा घराचार । तैसा जीवासि संसार ।' -एभा २६. ३०. [सं. गृह + आचार] घराचारी-वि. १ घरंदाज. २ नवरा; पति; घरकरी; ददला. 'ऐशिया स्त्रियांचे घराचारी । खराच्या परी नांदती ।' -एभा १३.२१४. [घराचार] घरास राखण- स्त्री. १ घरांचें रक्षण करणारा मनुष्य. २ थोडासा संचय, शिल्लक, सांठा, संग्रह. 'सगळा गूळ खर्चू नको घरास राखण थोडकासा ठेव.' घर म्हणून पहा. घरींबसल्या-क्रिवि. घरबसल्या पहा. घरोपाध्या-पु. कुलोपाध्याय; कुलगुरु; कुलाचा पुरोहित, भटजी. [घर + उपाध्याय; अशुद्ध समास]

दाते शब्दकोश

अपहरण

न. हिरावून घेणें; लुटणें; लुबाडणें; नागविणें. [सं.]

दाते शब्दकोश

अवा

पु. विरू. आवा. १ कुंभाराची भट्टी. २ भाजावयाच्या किंवा भाजलेल्या मडक्यांची रास. 'आवा भाजलियावर । घेऊनि जाई सत्वर ।' -भवि ९.१७०. ॰लुटणें भाजलेल्या मडक्यांची रास करून तिचें पंचोपचारें पूजन करून सुवासिनिंकडून लुटविणें. (चा)॰उतरणें-१ मडक्याची भट्टी नीट भाजून निघणें. २ स्वतःचीं सर्व मुलें जगून प्रौढदशेस येणें. ३ उपाय सफल होणें. म्ह॰ ज्यानें न. पाहिला अवा त्यानें पाहिला दिवा = अशक्य गोष्टी सांगणें. [का. आवी = कुंभाराची भट्टी. तुल॰ सं. आपाक; हिं. आवा]

दाते शब्दकोश

अवलुंठन

न. १ लोळण; लोळण्याची क्रिया; लुंठन. २ लुटणें या अर्थीं चुकीनें वापरतात. [सं. अव + लुठ्]

दाते शब्दकोश

बुचाडणें

अ० लुबाडणें, लुटणें.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

बुचकणें

उक्रि. १ ओरबाडणें; बुचाडणें. २ (ल.) लुटणें; नागविणें. ३ (कु.) (धान्याची रास, पीठ इ॰)वरचेवर हात घालून बिघडविणें; चिवडणें.

दाते शब्दकोश

चाटणें

उक्रि. १ जिभेने ग्रहण करणें; जिभेने खाणें. २ (ल.) ओझरता स्पर्श होणें; घांसून जाणें (गोळा, गोळी, बाण). ३ (ल) नागवणें; लुबाडणें.' मोंगलांचे दग्यामुळें रयत चाटली गेली.' -वडमा २.६९. [ध्व. चट्;प्रा. दे. चट्ट = चाटणें; हिं.] (वाप्र.) चाटलें आणि बाटलेसें होणें-सुखाच्या थोड्याशा सेवनाबद्दल जितक्या शिक्षा किंवा प्रायश्र्चितें असतील तीं भोगणें. चाटून पुसून खाणें-सारें खाऊन टाकणें; ताट निपटणें. चाटून पुसून जेवणें-उदासीन वृत्तीनें, चव न घेतां जेवणें. चाटूनपुसून नेणें-सपशेल लुटणें; निव्वळ नागविणें; निःशेष नेणें.

दाते शब्दकोश

चूड

स्त्री. १ चुडी; उजेडासाठीं पेटविलेली नारळीच्या झापांच्या पातींची, सणकाड्यांची, गवताची जुडी. 'तीं (झाडें) कांहीं आणून डोमिंगोनें एक चूड बनविली.' -पाव्ह ३२. २ (भात पेरणीच्या वेळीं हातांत धरून लावण्याचा) भाताच्या रोपांचा झुबका. [जुडी, जूड; तुल॰ फा. सुडु सुडि = गवताची पेंढी; दे. चुडुली] ॰उचलणें-धरणें-लावणें-सक्रि. (ल.) एखाद्यावर खोटा आरोप, बालंट उभारणें. ॰फिरविणें-सक्रि. (ल.) प्रजेची दुर्दशा होईल अशा तर्‍हेनें देश, गांव इ॰ लुटणें, जाळणें, पोळणें.

दाते शब्दकोश

हाज़म करणें

[अ. हाझिम्=पळविणारा] लुटणें. “रस्ता हाज़म करून ठेविला आहे” (राजवाडे ११|४५).

फारसी-मराठी शब्दकोश

हबक

स्त्री. १ धक्का बसण्याची जागा; नुकसानीचा धंदा, व्यापार. २ आलेलें नुकसान; तोटा. (क्रि॰ येणें; बसणें; देणें). ३ वाईट प्रसंग; अडचण; त्रास; लचांड; कटकट (क्रि॰ येणें) ४ धक्का; आचका; हिसका; हबका. (क्रि॰ बसणें). [ध्व.] हबकणें-उक्रि. १ जोरानें हलविणें; धक्का देणें, बसणें; हिसकणें. २ (ल.) लुबाडणें; लुटणें; बुचाडणें. ३ जोरानें खालीं आदळणें; आपटणें. हबका-पु. १ धक्का; हबक (४) पहा. (क्रि॰ बसणें; देणें, मारणें). 'गाड्यावर बसून चाललें म्हणजे अंगास हबके बसतात.' २ तोटा; हबका अर्थ २ पहा. ३ जोरानें पाण्याचा शिपका मारणें (भात इ॰ वर); हपका पहा. (क्रि॰ मारणें, टाकणें). हबकी-स्त्री. १ धक्का; हबक अर्थ ४ पहा. २ (ल.) तोटा; हबक अर्थ २ पहा.

दाते शब्दकोश

हजाम

पु. न्हावी; नापित. [अर. हज्जाम्] हजामत- स्त्री. १ हजामाचें काम; श्मश्रू; (डोक्यावरील व चेहर्‍यावरील) केंस काढण्याची क्रिया. २ (ल.) ताशेरा; खरडपट्टी; बोडंती; चांगल्या शिव्या देऊन केलेली कानउघाडणी. ३ लुटणें; लुबाडणें; वागवणूक (क्रि॰ करणें).

दाते शब्दकोश

हरण

न. १ जबरदस्तीनें नेणें; लुटणें; अपहार. २ नाश; घात करणें; दूर करणें; नाहीसें करणें (पाप, रोग, भास इ॰). (समासांत) पापहरण; दुःखहरण; दोषहरण इ॰. 'कुळ- हरणीं पातकें ।' -ज्ञा १.२२९. ३ (गणित) भागाकार. [सं.] हरणीय-वि. लुटून नेण्यास योग्य; हरण करण्याजोगी (वस्तु इ॰).

दाते शब्दकोश

झांबड

स्त्री. झांपड; अंधार; काळोख. (क्रि॰ पडणें). [झांपड] झांब(बा)डणी-स्त्री. हिसकावून घेणें; लुटमार; लुटा- लूट; नागवणूक. [झोंबडणें] झांब(बा)डणें-उक्रि. १ हिसकावून घेणें; हिसडणें; हिसकणें; जोरानें ओढणें. 'शिरींचा पडोनियां मुगुट । दाहाही झांबाडिले कंठ ।' -भारा, किष्किंधा १६.१३६. २ लुटणें; लुबाडणें; नागविणें; बुचाडणें. [झोंबडणें] झांबडाझांबड- -स्त्री. १ जोराची हिसकाहिसक, ओढाताण, झोंबाझोंबी. २ लुटा- लूट. [झांबड द्वि.]

दाते शब्दकोश

स्त्री. १ हिसकावून घेणें. २ (ल.) लुबाडणें; लुटणें; लूट. [झोंबड]

दाते शब्दकोश

झोंबाडणें

सक्रि, १ जोरानें, दांडगाईनें हिसकावून घेणें; धसकफसक करणें. २ लुटणें; नागविणें; लुबाडून घेणें; चोरी करणें. [झोंबणें] झोंबाडा-पु. झोंबण्याचा प्रकार. जबरीनें पकडणें, घेणें; घाला; हिसकावून घेणें; धाड; झेप. (क्रि॰ घालणें; करणें; घेणें; मारणें). २ चोर; लुटारू; दरवडेखोर. [झोंबाड]

दाते शब्दकोश

खाद

स्त्री. १ खाद्य; अन्न; खाणें; भक्ष्य; आहार. २ चांगलें खाणेंपिणें, पौष्टिक अन्न. ३ कुरतडणें (उंदरांचें); (पक्ष्यांनी फळें) चोंचावणें, टोंचें मारणें. ४ (शेतांच्या पिकावर धाड घाल णार्‍या गुरांचें) अधाशीपणाचें खाणें. ५ (गांवकामगारांनीं लोकांपासून) उकळणें; लुटणें; (साकारी कामगारांनीं) लांच खाणें; चावणें. 'या गावांमध्यें पाटलाची शंभर रुपये खाद आहे.' ६ कूरतुडलेला जिन्नस, चोंचावलेलें फळ, खाण्याचें पीक, उकळलेला पैका-माल इ॰. ७ जळ (आटवितांना विस्तवानें खाणें). [सं. खाद्य; तुल॰ फा.खा = (समासांत) चघळणें, कुरतुडणें] म्ह॰ १ खाद तशी लात = खाण्यासारखी शक्ति. २ कारकुनाचें लिहिणें उंदिराची खाद = कोणत्याही व्यवहारांत कार- कुनानें काढलेली आपली कसर. ३ खाद आहे तर लाध आहे. ४ खाद हरी व्याध.

दाते शब्दकोश

खोरपणें

उक्रि. (प्रां.) नासाडी करणें; लुटणें; नागवणें; तोडणें. [खोरें; सं. क्षुरप्र; प्रा. खुरप्प]

दाते शब्दकोश

लग्गा मारणें

डल्ला मारणें; हात मारणें; लुबाडणें; लुटणें. [लागणें-लग्गा]

दाते शब्दकोश

लखलो(लू)ट, लखालू(लो)ट

स्त्रीपु. वैपुल्य; प्राचुर्य; रेलचेल. -वि. क्रिवि. विपुल; प्रचुर; रेलचेल. [लाख + लुटणें, लोटणें]

दाते शब्दकोश

लखलोट or लखलूट, लखालूट

लखलोट or लखलूट, लखालूट lakhalōṭa or lakhalūṭa, lakhālūṭa or लखालोट a & ad (लाख & लुटणें or लोटणें) Copious, overabundant, overflowingly plentiful. 2 Used as s f (लखलोट is also m) Copiousness, exuberance, the extravagance of plenty. Note. The words are low or familiar.

मोल्सवर्थ शब्दकोश

लुबाडणें

स० लुटणें, जबरीनें घेणें, उपटणें.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

सक्रि. हरण करणें; लुटणें; नागविणें; लुंगारणें; दुसऱ्याची वस्तु त्याच्या इच्छेविरुद्ध, त्याची परवानगी नसतां उपटणें. लुबाडणी-स्त्री. लूट; लुबाडणूक; नागवणूक.

दाते शब्दकोश

लुचाडणें

सक्रि. लुबाडणें; दुसऱ्याची वस्तु बळजबरीनें हस्तगत करणें; बुचाडणें; लुटणें; नागविणें. 'दिवाणाचे शिपाई, काजीचे शिपाई वगैरेनीं तीं वांगीं लुच्चाडून घेतलीं.' -तीप्र ८७. लुचाडणी, लुचाडणूक-स्त्री. लूट; लुबाडणें; लुटारूपणा; नागवणूक.

दाते शब्दकोश

लुगारणें, लुंगाडणें

सक्रि. लुटणें; लुबाडणें; नागविणें; फसवून घेणें. लुगारणी, लुंगाडणी, लुगारा-स्त्री. लूट; नागवणूक; फसवणूक; लुबाडणें. लुगारी-रू, लुंगाड्या-वि. लुटारू; लुटणारा; नागविणारा; पेंढारी; विशेषतः टिपूकडील कानडी पेंढारी किंवा बाजारखुणगे. हे लोक शत्रूकडील लष्करांत लुटालूट करीत. -ख २०९३.

दाते शब्दकोश

लुंघणें

अक्रि. लूट केली जाणें; लुटका जाणें; नासधूस होणें (मनुष्य, मालमत्ता इ॰ची). लुंघविणेंसक्रि. लूट, नासधूस जाळपोळ, नाश करणें; लुटणें; लुबाडणें.

दाते शब्दकोश

लुसणें

सक्रि. (महानु.) लुटणें; आकर्षणें; ओढून घेणें. 'मज निद्रिस्थातें खाणौरियें । लुसौनि नेति ।' -ऋ ५५.

दाते शब्दकोश

लुटार

लुटार luṭāra n (लुटणें) A multitude of plunderers: also the plunderer-class considered collectively.

मोल्सवर्थ शब्दकोश

लुटारा, लुटारी, लुटारू

लुटारा, लुटारी, लुटारू luṭārā, luṭārī, luṭārū a (लुटणें) That plunders, pillages, robs.

मोल्सवर्थ शब्दकोश

लुटविणें

लुटविणें luṭaviṇēṃ v c Causal of लुटणें q. v. 2 (To give permission to people to plunder one's self.) To give profusely or liberally.

मोल्सवर्थ शब्दकोश

नाडणूक

स्त्री. १ बुचाडणें; लुटणें, लुबाडणें; फसवणूक. नागवण पहा. २ अतिशय फसविणें; नागविणें; नाश करणें. ३ (संकटांत, अडचणींत सांपडल्यामुळें) दुर्दशा होणें; जुलुमाखालीं दडपलें जाणें; छळ; गांजणूक. [नाडणें]

दाते शब्दकोश

नागवण-वणूक, नागवणें

स्त्रीन. १ लुटालूट; दरोडा; लुबाडणें. (चोर, राजा इ॰नीं). २ सरकारी खंड; दंड. 'मग राजा पुसेल आपणाकारण । तरी पडेल नागवण तें देऊं ।' -भवि ५४. १५४. ३ व्यापारांतील तोटा. ४ (सामा.) द्रव्यहानि; बुडणूक. (क्रि॰ घेणें; घालणें). ५ द्रव्यापहारामुळें होणारी दुर्दशा; लुबाड- ल्यामुळें झालेली अवस्था. 'न पाविजे कदा उन्मत्त झालिया । दंभ तोचि वायां नागवण ।' -तुगा २१. ६ लूट. 'विषयदेशींचें नागवणें । आणीत जे ।' -ज्ञा १८.४६४. -एरुस्व १२.३८. [नागविणें] म्ह॰ (गो.) समर्थाची सांठवण दुर्बळाची नागवण. नागवणा-वि. नागविणारा. 'नाहीं माझे मनीं । पोरें रांडा नाग- वणी ।' -तुगा ३११७. नागविणें-उक्रि. १ नागवें, वस्त्रहीन करणें. -ज्ञा ११.४६९. २ लुटणें; जुलूम करणें; लुबाडणें; बुचाडणें. 'साध्वी शांति नागविली ।' -ज्ञा ३.२९१. ३ फसविणें. 'नाग- विले भगवे योगी । समाधिभ्रमें ।' -ज्ञा १६.२९८. -अक्रि. लुटला, लुबाडला जाणें. 'बहु पांगविलों बहु नागविलों । बहु दिस झालों कासावीस ।' -तुगा १५०५. [नागवें करणें]

दाते शब्दकोश

ओरपणें

उक्रि. १ जोरानें भुरका मारणें; भूरक्याचा आवाज काढून खाणें. २ (डहाळीचीं पानें फुलें इ॰) ओरबा- डणें; (जटा झालेल्या केसांतून दोर्‍यांतून इ॰) जोरानें बोटें ओढणें; (शेत जमीन) वरवर नांगरणें; त्यांतील गवत, झुडूपें, कुंदा इ॰ काढणें. ३ (दुखावलेल्या भागावर डागण्यासाठीं) ताप- विलेली लोखंडाची सळई जलदीनें ओढणें. सर्दीसारख्यावर उपाय-पावसाळ्यांत दिवसभर गारठ्यांत राहिल्यामुळें पायास होणारी सरदी घालविण्यासाठीं तळव्यावर ओला कपडा ठेवून अगर ताक लावून वरून तापविलेली लाल लोखंडाची सळई वगैरे फिरविणें. ४ जोरानें, ओबडधोबड रीतीनें बोचकारणें; खाजवणें. ५ (ल.) लुटणें; नाश करणें; बुचाडणें; नागवणें. [सं. ओरंफ = जोराचा ओरखडा (धातु रफ्-रंफ् = जाणें); दे. ओरंपिअ = तासलेलें; नष्ट]

दाते शब्दकोश

ओसडणें

उक्रि. (मावळी) लुटणें; नागविणें. [सं. अव- शातन; प्रा. ओसाडण?]

दाते शब्दकोश

पस्त

क्रिवि. पूर्णपणें; संपूर्णतेनें; सर्वस्वी; निखालसपणें; निःशेष; साफ (नाश करणें, फन्ना उडविणें इ॰ अर्थाच्या क्रिया- पदां बरोबर योजतात.) उदा॰ लुटणें; नागविणें; बुचाडणें; घर धुणें. [फा. पस्त्-खालीं, अवनत (ल.) जमीनदोस्त] ॰करणें- नाश करणें; खलास करणें; नागवणूक करणें; समूळ नाश करणें. 'सफेजंग लढाई करून कृष्णराव खटावकर यास मोडून पस्त केलें.' -रा ४.३२. 'वरकड त्याचें लष्कर अवघें लुटून पस्त केलें.' -ख ५.२४०६. ॰खाणें-चाटूनपुसून सर्व खाणें; निखालस खाऊन टाकणें. ॰चोरणें-प्रत्येक चीजवस्त चोरून नेणें; घर धुवून नेणें. ॰जाळणें-जाळून राख करणें.

दाते शब्दकोश

पस्त pasta ad (Misapplied from P Low or down.) Utterly, totally, completely;--used with various verbs of destruction or consumption;--with लुटणें To pill, fleece, strip;--with चोरणें To steal every item; to leave an empty house;--with जाळणें To burn to ashes;--with खाणें To eat up;--with करणें To destroy, consume, devour, strip, annihilate, extirpate &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

उगाणणें

क्रि. १ हिशेब देणें. झाडा देणें 'परी परमात्मया चक्रवर्ती । उगाणिती जंव हातीं ।'-ज्ञा १८.७४३. ३ अर्पण करणें; हवालीं करणें. 'तीं गोपवत्सें उगाणलीं । गोपनाथासीं ।' -कथा ४.३.२६५. ४ मुक्त करणें; सोडविणें (पाप इ॰ कां पासून); 'उगाणिलीं जन्ममरणें.' ४ लुटणें. 'सभेसि राजा उगाणवी । तै मृत्यूची पदवी मस्तका आली ।' -एभा १.२११. ५ शुन्य होणें. 'तेथ उगाणलें क्रियाकर्म । लाजा विराले धर्माधर्म ।' -एभा २३. ७००. [सं. उद्ग + ग्रहण; प्रा. उग्गाहण]

दाते शब्दकोश

मान

स्त्री. १ ग्रीवा; गळ्याचा मागचा भाग. २ गळ्यास होणारा रोग. ३ (अशुद्ध) गळा. 'घास मानेंत अडकला.' ४ (नृत्य) नृत्यांतील मानेच्या चलनवलनाचें प्रकार (सम, नत, अंचित, कुंचित, रेचित. पार्श्वोंन्मुख, निवृत्त, त्र्यस्त व उन्नत हे ते नऊ प्रकार होत). [सं. मन्या; फ्रेजि. मेन] (वाप्र.) ॰अडकणें-पेंचात, संक- टांत सापडणें. ॰कंबर एक करप-(गो.) मान खाली वांक- वून कामास लागणें. ॰कांट्यावर नसणें-(एखाद्यानें) अति गर्विष्ठ, उद्दाम किंवा मगरूर असणें. ॰कापणें-१ एखाद्याच्या उपजीविकेच्या साधनाचा नाश करणें; मुंडी मुरगाळणें. २ विश्वा- सघात करणें; फसविणें. ३ मोठी हानि करणें. ॰खालीं घालणें- १ डोकें खाली घालणें; नांगी पडणें. २ (ल.) अपमान सहन करण्याचा प्रसंग येणें. ॰चोळणें-(व.) कांकूं करणें. ॰टाकणें-थकणें; शक्तिहीन, निर्बल होणें. ॰टोकाविणें-मानेंने खुणा करणें. ॰डोल- वणें-हालविणें-१ रुकार, पसंती, प्रशंसा करण्यासाठीं मान हालविणें; पसंती दर्शविणें; वाहवा, कौतुक करणें. २ कबूल करण्यास भाग पाडणें. ॰ताठ ठेवणें-स्वाभिमान राखणें. ॰तुकविणें- वाहवा, कौतुक करणें. 'काय जिंणे जर न घडे करणी तुकवी जिचेस जग मान ।' -विक ६५. ॰धरणें-सक्रि. १ (ल.) ऐन आणीबाणीच्या प्रसंगी एखाद्यास अडविणें. २ -अक्रि. मानेस कांहीं विकृति झाल्यामुळें ती आखडणें, इकडे तिकडे वळवितां न येणें. ॰(मुंडी) मुरगाळणें-१ (एखाद्याचा) आशाभंग करणें; नाश करणें. २ पूर्णपणें लुटणें. ॰मोडणें-१ (राखून ठेवलेला पैसा इ॰) नाइलाजास्तव किंवा नाखुषीनें खर्च करणें. 'पाचशें रुपयांची मान मोडली तेंव्हा लग्न झालें.' २ थोडक्या खर्चासाठीं मोठ्या नाण्याला हात लावणें. 'चार पैशांकरितां रुपयाची मान मोडावी लागली.' ॰वर करणें-१ गरिबींतून वैभवास चढणें; दिमाख दाखविणें. २ दुखण्यांतून उठणें; डोकें वर करणें. ॰वर न करणें-लज्जेनें किंवा नम्रपणें वागणें. ॰वांकडी करणें-१ संमति अथवा रुकार दाख- विण्यासाठीं डोकें एकें बाजूस वळविणें. २ असंमति दर्शविणें. ॰वाक- विणें-कबूल करणें; मान्यता दाखविणें; अनुसरणें. 'ह्या परिस्थि- तीसच मान वांकविली पाहिजे.' ॰सोडविणें-एखाद्यास अड- चणींतून, पेंचातून मुक्त करणें. (खालच्या) मानेंनें चालणें- पाहणें-१ नम्रतेनें, विनयानें, सलज्जतेनें चालणें. २ खालीं मान घालून, लाजेनें चालणें. मानेवर सुरी ठेवणें-एखाद्याला धमकी देणें, भिवविणें; नाश करावयास सिद्ध होणें. मानेस-मानगु- टीस बसणें-१ गळीं लागणें; खपाटीस बसणें. २ (भूत, पिशाच्च वगैरेनीं) झपाटणें; पछाडणें. ३ गळ्यांत लादणें; डोईवर ओझें पडणें; अवश्य कर्तव्य असणें (करावयाचें काम) सामाशब्द- ॰खुंट- खोडा-नपु. ओढाळ जनावराची मान व पुढचा एक पाय यांस एके ठिकाणीं बांधलेली दोरी. [मान + खूंट] ॰खुरी-स्त्री. (नेमाड) गुरांचा एक रोग; तोंडखुरी पहा. -शे. ११.३२. ॰गु(गो)टी-स्त्री. (तिरस्कारार्थी) मान; बोकांडी; अपकार, निग्रह इ॰ दाखविणाऱ्या क्रियापदाशींच फक्त जोडून योजतात. 'वाघानें मानगुटी फोडली- धरली-सोडली.' 'हा त्याचे मानगोटीस बसला.' ॰पुळी-स्त्री. (कों.) कांकर रोग. ॰मोड-स्त्री. १ मान दुखावणें. २ लिहिणें, शिवणें इ॰ कां करितां एकसारखी मान वांकवून करावयाचे परि- श्रम, यातायात, दगदग. ३ अपमान; मानहानि; मानभंग. ४ उभी उतरण. [मान + मोडणें] ॰मोडा-पु. (गो.) माशाची एक लहान जात. ॰मोडी-स्त्री. १ अतिशय उभ्या चढणीची जागा. २ (नेमाड) गुरांचा एक रोग. -शे ११.३. ३ (व.) इन्फ्ल्युएन्झा रोग. १९१८ सालीं ही सांथ आली होती, त्यास मानमोडीचें साल म्हणतात. ४ -वि. अतिशय उभ्या चढाचा (रस्ता, डोंगर). ॰मोडें-न. (नुकताच संसार करूं लागणारा तरुण, गरिबींतून बाहेर निघालेला, दुखण्यांतून उठलेला मनुष्य, झपाट्यानें पक्व दशेस येणारी वनस्पति इ॰ कांची) नाशक, विघातक, विध्वंसक अशी स्थिति, अवस्था.' या वांग्या कांहीं टवटवीत दिसूं लागल्या होत्या इतक्यांत काय मानमोडें आलें तें कळेना.' -शास्त्रीको. [मान + मोडणें] ॰वळा-ळी-पुस्त्री. मानेवरील आंखूड केसांची रेषा (प्रायः अनेकवचनी प्रयोग). [मान + ओळ] मानेचा कळस किंवा कांटा-पु. डोकें. (क्रि॰ ढळणें; पडणें; खाली येणें) मानेचा कळस म्हणजे पाठीच्या कण्याचें वरचें अग्र, मणका अशी प्रायः समजूत आहे. मानेचा कांटा ढळणें-अक्रि. मृत्यू, मूर्च्छा इ॰ समयीं मानेचें अवसान नाहीसें होऊन डोकें एका बाजूस वळणें, पडणें. मानेचा खाखोटा-पु. गळ्याची घांटी; कंठमणि. मानेची पन्हळी-स्त्री. डोक्याच्या पाठीमागच्या बाजूस माने- वर असलेली पोकळी, खळगी.

दाते शब्दकोश

झाडणें

उक्रि. १ (केरसुणी इ॰ नीं) केरकचरा काढून साफ करणें; जागा निर्मळ करणें. २ हसडणें; झटकणें; झटक्यानें हलविणें (ओलें वस्त्र, शेंडी इ॰); (हात, पाय, डोकें इ. कांस) झटका देणें. 'झाडितां आपला हात । तंव आंगासि असे जडित ।' -परमा १०.१९. ३ लोटून देणें. 'त्यांतें उडोनि झाडी झाले ते चूर्ण जेविं नगपातें ।' -मोवन १२.२९. ४ काढून टाकणें; नाहींसें करणें. 'लोक पारखुन सोडावे । राजकारणें अभिमान झाडावे ।' -दा ११. ५ (विस्तव इ॰ कांस) पंख्यानें वारा घालणें; झड- पणें. ६ खरडपट्टी काढणें; खडसावणें; निर्भर्त्सना करणें. 'बाळूला आणि नंद्याला लक्ष्मीकाकूंनीं चांगलेंच झाडलें.' -सुदे ५२. ७ (मागणाराचा, भिकार्‍याचा) निषेध करणें; मनाई करणें; साफ नाकारणें; बंदी करणें. 'अंतींच स्मरावें श्रीरामराम । ऐसा कितेका जडला भ्रम । असो गृहस्थानें भजनप्रेम पाहोनि मस्तक झाडिला ।'-दावि २०२. ८ (सरकार, सावकार इ॰ कांची) बाकी काढून टाकणें; देणें बेबाक करणें. 'धन्याची बाकी हळु हळु झाडा ।' -भज १३४. ९ (अंगातील भूत, पिशाच इ॰) काढणें; हाकलून लावणें. १० (बंदूक इ॰) उडविणें; गोळी मारणें. -अक्रि. (बंदूक इ॰ कांनीं उडतांना हात इ॰ अवयवास) हिसडा, झटका देणें. [सं. झाटन; प्रा. झाडण; हिं. झाडना; जुका. झडिसु = टाकणें, फेंकणें; झाडणें = केरसुणी; फेकणें] ॰झट- कणें-उक्रि. केरसुणी इ॰ कानीं झाडून, फटके देऊन, धूळ उडवून साफ करणें, निर्मल करणें. झाडझपट-झटक-स्त्री. १ (व्यापक) धूळ, केर इ॰ काढण्याचा, झाडण्याचा, झटकण्याचा व्यापार; झाड- झूड; सडासंमर्जन. २ (ल.) (व्यापक.) चोरीच्या म्हणून समजल्या जाणार्‍या लुबाडणें लुटणें इ॰ सर्व क्रिया. 'त्यानें आजपावेतों झाडझपट करून पोट भरलें.' ३ लुटालूट; धूळधाण; दाणादाण. 'पेंढार्‍यांनीं त्या गांवांत जाऊन झाडझपट केली.' [झाडणें + झपाटणें] झाडझुड-स्त्री. झाडझपट अर्थ १ पहा. 'माझी झाड- झूड होईतों तूं पाणी घेऊन ये.' [झाडणें द्वि.] झाडपट्टी- स्त्री. १ जमीनीचा सारा किंवा घरपट्टी याबद्दलची बाकी चुकती करण्याची अखेरची मागणी. २ (उप.) खरडपट्टी; खडसावणी; बोडंती. (क्रि॰ करणें). [झाडणें + पट्टी = कर] झाडपाखड-स्त्री. १ (धान्य इ॰) सुपानें पाखडण्याची, झटकण्याची, साफ कर- ण्याची क्रिया. २ (ल.) कवडीकवडीचा हिशोब देणें-घेणें. [झाडणें + पाखडणें] झाडपि(पी)ड-स्त्री. झाडझूड; झाडलोट. 'झाडपीडी करूनि मानऊं संताला ।' -दावि ३५३. [झाडणें द्वि.] झाड- पिड्या-वि. देऊळ, मंदिर इ॰ कांची झाडझूड, साफसूफ करणारा. [झाडपिड] झाडपोतें-न. कर्जफेडीचा शेवटचा हप्ता. [झाडणें + पोतें] झाडफूक स्त्री. (ना.) अंगारा; धुपारा; मांत्रिकाकडून करवयाचा मंत्रोपचार. (क्रि॰ करणें). [झाडणें + फुंकणें] झाड- फेड-स्त्री. (राजा.) झाडझूड; झाडलोट. [झाडणें + फेडणें] झाड- बाकी-स्त्री. १ (कर्ज, अन्नसामुग्री इ॰ कांची) पूर्ण निःशेषता; बेबाक; निरानिपटा. २ कर्जफेडीचा शेवटचा हप्ता. (क्रि॰ करून टाकणें; करणें). [झाडणें + बाकी] झाडलोट-स्त्री. केर काढणें, सारवणें इ॰; झाडझूड. [झाडणें + लोटणें] झाडलोट्या-वि. झाड- लोट करणारा. -मसाप २.४.३९७. [झाडलोट] झाडवण-स्त्रीन. झाडण्याची क्रिया. -पु. (काव्य.) १ झाडणारा. 'चोखामेळा म्हणे मी तुमचा । झाडवण साचा म्हणवितों ।' २ केरसुणी; झाडू. [झाडणें; प्रा. झाडवण] झाडसारव, झाडवणसारवण, झाडसारवण-स्त्री. (समुच्चयानें); (घर इ॰) झाडणें व शेणानें सारवणें इ॰ क्रिया; साफसुफी. 'झाडसारवण...वगैरे...करतांना त्यांचीं अंगें उकिरड्यासारखीं होत असतील यांत काय नवल !' -नाकु ३.९. [झाडणें + सारवणें] झाडून-क्रिवि. एकंदर सर्व; यच्चयावत्; एकूणएक; एकहि न वगळतां. 'यदुसचिव पौरमुख्य द्रुत आणविले सभेंत झाडूनी ।' -मोमौसल २.२९. -पया ७९. [झाडणें]

दाते शब्दकोश

चोरी

स्त्री. १ चोरण्याची क्रिया; चोराचें कर्म; (कायदा) दुसर्‍याला नकळत चीजवस्तु लंबविणें; मालकाच्या परवानगी वांचून त्याच्या ताब्यांतून जंगम माल अप्रामाणिकपणें नेणें. २ गुप्तपणें केलेलें (भलतेंच) कर्म; चोरटें कर्म, वृत्ति; लपूनछपून केलेली गोष्ट; छपावणी. ३ (एखादी गोष्ट) छपविणें; दाबणें; दडपून ठेवणें; गुप्त ठेवणें; वगळणें; बाजूस ठेवणें. ४ मनाई; आड- काठी; प्रतिबंध; नियंत्रणा; न करण्याची, बोलण्याची, दडपून टाकण्याची जरूरी, आवश्यकता; संयमन. (क्रि॰ होणें; असणें). 'श्रीमंतांना जवळ पैसा व लत्ताकपडा असून त्यांचा उपभोग घेण्याची चोरी झाली होती.' -गुजराथचा इतिहास. 'आमच्या जवळ दागिने असून ते ह्या खेडेगांवच्या राहणीमुळें अंगावर घाल- ण्याची सुद्धां चोरी झाली आहे.' ५ अन्याय; अपराध. 'अशी काय केली ईश्वरा तुझ्या घरिं चोरी ।' -प्रल १६४. [सं. चौरिका; प्रा. चोरिआ; हिं. चोरी; बं. चुरि] म्ह॰ १ चोरीचे चौदा हात = चोरीचा माल फार स्वस्त विकला जातो; चोरलेलें कापड रुपयाला चौदा हात देखील देतां येतें. २ शेताआड चोरी आणि दादल्या आड शिंदळकी (चालली आहे). ॰चकारी- चपाटी-स्त्री. चोरी; दरोडा; उचलेगिरी; सोदेगिरी; बदमाषी; ठकबाजी. [चोरी द्वि.] ॰चा माल-पु. चोरलेला माल, वस्तु. ॰रीची बाब-स्त्री. १ चोरून आणलेली वस्तु; चोरीशीं संबंध अस- लेली गोष्ट. २ काळीबेरी गोष्ट; काळेंबेरें; जीबद्दल उघड बोलतां येत नाहीं अशी गोष्ट; संशयास्पद कृत्य. ३ ज्याचें खरें स्वरूप आपणांस कळलेलें नाहीं असा व्यवहार, बाब इ॰; गुप्त गोष्ट. ॰छपी-क्रिवि. चोरून लपून; लपून छपून; चोरून. [चोरणें + छपणें] ॰मारी-मोरी-स्त्री. चोरणें, मारणें, लुटणें, ठोकणें इ॰ व्यापार, धंदा; दरोडेखोरी; सोदेगिरी; ठकबाजी; चोरीचपाटी 'तो चोरी- मारी करून पोट भरतो.' [चोरी + मारी = मारणें] ॰लबाडी स्त्री. चोरी आणि फसवेगिरी; चोरी आणि लबाडी.

दाते शब्दकोश

डोई

स्त्री. १ डोकें; मस्तक. २ (ल.) प्रत्येक माणूस; व्यक्ति; इसम. 'दर डोईस एक पैसा द्यावा.' ३ पूर्वज; मूळ पुरुष; पिढी. 'त्या गांवांत माझ्या पांच डोया झाल्या.' डोकें पहा. (वाग्र.) ॰उचलणें-नांवलौकिकास चढणें. ॰उठणें-डोकें दुखूं लागणें (कोंकणांत डोकें उकलणें म्हणतात). ॰उठविणें-त्रास, उपद्रव देणें. ॰करणें-हजामत करणें. ॰(वर) काढणें-उदयास येणें; वैभवास चढणें. ॰खाजविणें-१ त्रास, उपद्रव देणें. २ आठवण करण्याचा यत्न करणें; आठवणें. ॰चा चेंडु करणें-(चेंडूप्रमाणें डोकें हालविणें) १ सपाटून शिव्या देणें; भडकणें; अति रागावणें. २ (डोकें चेंडूप्रमाणें करवूं देणें) मानहानी किंवा शिव्याशाप घेणें. ॰चें उखळ करणें-१ आग पाखडणें; संतापणें. २ वाईट रीतीनें वागविलें असतां सहन करणें. ॰चे केस नाहींसे करणें- फजीति करणें; रागें भरणें. ॰डोईचें खांद्यावर येणें-चिंता, काळजी दूर होणें, हलकी होणें; संकटाचें निराकरण होणें. ॰चे वाटेनें कर्ज देणें-(कर्ज देण्याकरिता डोक्यानें चालणें). १ ताबडतोब कर्ज फेडणें; २ कष्ट, हमाली करून कर्जफेड करणें. ॰चे वाटेनें घेणें-नम्रतापूर्वक (साष्टांग नमस्कार घालून) घेणें, स्वीकारणें. ॰चे वाटेनें देणें-नम्रतापूर्वक देणें. ॰टेकणें-१ अत्याग्रह करून (जेवावयास वगैरे) बसविणें, राहविणें. २ थकणें; खचणें; अशक्त होणें. ३ आधार घेणें; आश्रय करणें. ॰ठिकाणावर येणें-शुद्धीवर येणें. डोईंत राख घालणें-फार रागावणें; चर- फडणें; त्रागा करणें. ॰ताविणें-उन्हांत डोकें तापवून घेणें; अत्यंत परिश्रम, त्रास घेणें. ॰देऊन बसणें, डोई देणें-१ निश्चयानें, चिकाटीनें एखादें काम करण्यास बसणें; २ (निंदार्थीं) लोचटपणानें आणखी राहणें, बसणें (पाहुण्यानें). ३ एखाद्याला बुडवून पुन्हां शांत असणें, कांहींच घडलें नाहीं असें दाखविणें; निर्लज्जपणें वागणें. ॰देणें-मारणें-१ मदत करणें; सहाय्य करणें; २ निश्चयपूर्वक कामास बसणें. ॰नें चालणें-अभिमानानें, ताठ्यानें चालणें; गर्व होणें, वाहणें. ॰नें चालत येणें-नम्रपणानें येणें; नम्रपणा धरणें. ॰पिटणें-शोक करणें. ॰फोडणें-१ बारीक रीतीनें विचार करणें; डोक्याला त्रास करून घेणें. २ त्रागा करणें. ॰फिरणें-१ वेडें होणें. २ रागानें बेफाम होणें. ॰भणाणणें-डोकें फिरणें; भ्रमणें. ॰मारणें-१ शिरच्छेद करणें. २ नुकसान करणें; बुडविणें; आशा भंग करणें. ॰वर खापर-हंडी-फोडणें-फुटणें-(निरपराधी असतां) एखाद्याच्या माथीं दोष लावणें; (वाईट कृत्याचा). आळ, आरोप ठेवणें. ॰वर घेणें-१ एखादी गोष्ट पत्करणें; त्याची जबाबदारी घेणें. २ वाईटपणा, दोष स्वतःवर घेणें. ॰वर चढणें- एखाद्याला न जुमानणें; त्याविरुद्ध बंड करणें. ॰वर दिवस- सूर्य-येणें-दुपार होणें. ॰वर धूळ घालणें-१ चिंतेमुळें दुःखित होणें; दुःखाची दुस्सहता दाखविणें. २ एखाद्या कामाच्या पाठीमागें लागल्यामुळें अत्यंत हालअपेष्टा भोगणें. ॰वर पदर येणें-१ वैधव्य प्राप्त होणें. २ (ल.) लोकांत येण्याची लाज वाटणें. ॰वर बसणें-१ एखाद्याला न जुमानणें; विरुद्ध उठाव करणें. २ वरचढ होणें; बढती मिळविणें. ॰वर बसविणें-(बायको चाकर, मुलगा यांचा) वाजवीपेक्षां जास्त गौरव करणें, त्यांच्या मतानें चालणें; अधिक मान देणें; फाजील लाड करणें. ॰वर मिरे वाटणें-१ एखाद्याविरुद्ध उठून त्यावर वर्चस्व ठेवणें. २ मुळींच न जुमानणें; वरचढ होणें. ॰वर विळविणें-एखाद्यावर चुकीनें दोष लादणें; दोषारोप ठेवणें. ॰वर शेकणें-व्यापारांत नुकसान होणें; धंदा अंगावर येणें. ॰वर हात घेऊन येणें-रिकाम्या हातानीं येणें; इच्छित वस्तु न मिळाल्यानें निराशा होणें. ॰वर हात ठेवणें-१ आशीर्वाद देणें. २ (ल.) फसविणें; लुबाडणें. ॰वर हात ठेवून जाणें-सर्वस्वीं नागविले जाणें; (रिक्त हस्तें) कफल्लक होऊन निघून जाणें. ॰वर हात फिरविणें-फसविणें; लुटणें. ॰वर होणें-वरचढ होणें; जास्त अधिकार मिळणें. ॰वरून पाणी जाणें-१ अनाथ, निराधार होणें. संकट व नुकसानीमुळें लाचार होणें. २ कळस, पराकाष्ठा, शिकस्त होणें. ॰स पाणी लावून ठेवणें-शिक्षा भोगावयास तयार होणें, सज्ज असणें. (हजारांचे) डोईस पाणी लावणें-हजार लोकांना-ते म्हण- तील तें करून, खूष ठेवण्याचा प्रयत्न करणें. ॰म्ह डोई धरला तर बोडका हातीं धरला तर रोडका (ज्याच्यापासून कोणत्याहि प्रकारें कांहींहि निष्पन्न होणार नाहीं अशा मनुष्याविषयीं ह्या म्हणीचा उपयोग करितात). सामाशब्द- ॰ओझें-पेंडकें-भारा-नपु. डोक्यावरचें, डोक्यावर वाहून नेण्याजोगें ओझें. ॰खरड्या- ताशा-वि. (निंदार्थी) न्हावगंड; हजाम. डोईचा-पु. (बायकी- सांकेतिक) न्हावी. ॰जड-वि. १ श्रेष्ठ; प्रसिद्ध; सन्मान्य; भारी; वजनदार. २ अति मेहनतीचें; दुर्निर्वह; कठिण; भारी (काम). ३ न जुमानणारा; बेपर्वा; बडखोर; बेसनदशीर. ॰थडक-स्त्री. कपाळावरचें टेंगूळ. ॰पट्टी-स्त्री. माणुसपट्टी; दर व्यक्तीवरील कर (जिझियासारखा कर). ॰फोड-स्त्री. (डोकें फोडणें). १ डोक्याला दिलेला श्रम. (मूर्खमाणसाला शिकविण्याप्रमाणें). २ उरस्फोड, त्रासदायक, कंटाळवाणें, जिकीरीचें काम; कपाळकूट.

दाते शब्दकोश

कंठ

न. १ गळा (हनुवटीच्या खालील वं खांद्याच्या वरील शरीराचा भाग). 'कंठीं झळके माळ मुक्ताफळांची' -गणपतीची आरती. २ (गायन) गळ्यांतून निघणारा ध्वनि; आवाजी. 'स्वरा- वरुनि समजे कंठ.' 'तिचा कंठ फार मधुर आहे.' ३ (पोपट, कबूतर, चिमणा इ॰) पक्ष्यांतील नराला तारूण्यावस्था प्राप्त झाली असतां गळयाभोंवतीं जी एक काळी रेषा उमटते ती. (क्रि॰ फुटणें). ४ भांडें वगैरेंच्या तोंडाखालचा आवळ भाग; कांठ. ५ श्वासनलि- केचें वरचें तोंड, मणका; नरडें; घसा. 'दुःखामुळें कंठातून शब्द निघेना.' [सं.] ॰दाटणें-भरून येणें-सद्गदित होणें-दुःख किंवा आनंद यांच्या उमाळ्यानें घसा दाटणें, त्यामुळें तोंडांतून शब्द न निघणें; आवेग येणें; सद्गदित होणें. 'दासाकडे हनुमंत पाहे । तों कंठ आला भरून ।' -नव २२.४५. ॰फुटणें- (गायन) १ चिरका आवाज होणें. 'फार उंच स्वरांत म्हणूं नकोस, कंठ फुटला तर पंचाईत होईल.' २ कंठ (अर्थ ३) येणें (पोपट, इ॰ पक्ष्याला). ३ खणखणीत शब्द निघणें. 'त्याला नुकताच कंठ फुटला आहे.' ४ वयांत येणें; प्रौढदशा प्राप्त होणें. ॰बसणें- घसा वसणें; आवाज (गाण्यांत, भाषणांत) स्पष्ट न निघणें. 'उष्णकाळीं तेल तिखट खातां । तेणें बद्धक जहालें बहुतां । म्हणती कंठ बैसले आतां ।नये गातां कीर्तनीं ।।' -संवि २२.१२२. ॰मोकळा करून रडणें-मोठ्यानें रडणें; मनमुराद रडणें; ओक्साबोक्शी रडणें; भोकाड पसरणें. 'मोकळा करुनि कंठ तेधवां । आठवूनि मनिं जानकीधवा ।, -(वामन) भरतभाव १४. कंठास-कंठी-प्राण येणें-१ (भीतीनें, दुःखानें) अर्धमेलें होणें. 'प्रतिवचनप्रसंगीं प्राण कंठास आला ।' -सारुह २.१०३. २ दुःखानें किंवा भुकेनें व्याकुळ होणें. कंठास लावणें-मिठी मारणें; आलिंगन देणें. 'कंठास त्यास लावून ।' -संग्राम १५. कंठी प्राण उरणें-आसन्नमरण होणें; धुगधुगी राहणें. 'त्याच्या नुसता कंठीं प्राण उरला आहे.' कंठी प्राण ठेवणें, धरणें- राहणें-एखादी इच्छा किंवा आशा सफळ झाल्यावर मरूं अशा इराद्यानें जीव धरून राहणें. 'अस्थि शिरा दिसती नयनीं । प्राण कंठीं धरिले त्यानीं ।' -संवि २०.७७. -हृ २१.७२. 'तुम्हाविण कंठीं प्राण राहिला असे ।।' -रत्न ४.३. 'मुलगा येईपर्यंत म्हाता- र्‍यानें कंठीं प्राण धरून ठेविला होता.' कंठीं धारण करणें- १ गळ्यांत घालणें (माळ, अलंकार, इ॰). २ जपणें; स्मरण करणें. ३ अति प्रिय असणें. ॰कार्कश्य-न. कर्कश आवाज; आवाजाचा कर्कशपणा. ॰कोकिला-ळा-स्त्री. (ल.) सुकुमार, मधुर आवाजाची स्त्री; पिककंठी. [सं.] ॰गत-वि. १ गळ्यां- तील (दागिना, वस्तू इ॰). २ नेहमीं तोंडपाठ असलेला (अभ्यास, वचन इ॰); मुखोद्गत. ३ गळयाशीं आलेला. [सं.] ॰गत प्राण-वि. धुगधुगी असलेला; ज्याचा प्राण गळयाशीं आला आहे असा. ॰चामीकर न्याय-पु. गळयांत सोन्याचा दागिना असून तो हर- वला अशा समजुतीनें घरभर हिंडणें, समानार्थकः- काखेंत कळसा, गावांला वळसा; गांडीखालीं आरी, चांभार पोर मारी. ॰नाळ- न. गळयाची नळी; मान. 'मग कंठनाळ आटे ।' -ज्ञा ६.२०७. 'तदा कंठनाळांतुनी शब्द झाला' -गणपतिजन्म. [सं.] ॰नाळ चिरणें-गळा कापणें; ठार करणें. ॰पाठ-वि. तोंडपाठ; मुखोद्गत. 'धौम्य म्हणे तुज यावें शास्त्रासह कंठपाठ वेदानीं ।' -मोआदि २.५१. ॰भूषण-न. गळ्यांतील दागिना. ॰मणी-पु. १ गळयां- तील हारामधील मुख्य मणी; गळ्यांतलें रत्न. २ गळ्याचा मणका, घांटी. ३ (ल.) अतिशय लाकडा; गळयांतील ताईत (माणूस, वस्तु). 'आवडते कंठमणी ही.' -संग्राम २९. ॰मर्याद- क्रिवि. गळयापर्यंत. आकंठ पहा. 'आज मी कंठमर्याद जेवलों.' ॰माधुर्य-न. (गायन) सुंदर गळा; गोड आवाज. [सं.] ॰माळ-स्त्री. (गो.) गंडमाळा. ॰रव-पु. आवाज. [सं.] ॰रवानें, ॰रवेंकरून-१ मुद्दाम; निश्चयानें; स्पष्टोक्तीनें. २ मोठमोठ्यानें ओरडून; घसा फोडून; कंठशोष करून. ॰रवोक्त- वि. निश्चयानें संगितलेलें (भाषण इ॰). ॰शोष-पु. १ (तहानेनें) घशाला पडणारी कोरड. २ (ल.) ओरड; उगीच घसा कोरडा करणें; घसाफोड; व्यर्थ समजूत (काढणें); (क्रि॰ करणें). 'वादी प्रतिवादी- कडून अतोनात कंठशोष होत. असतांहि ...' -टि ४.१३१. [सं.] ॰सूत्र-न. १ जानवें. २ मंगळसूत्र. [सं.] ॰स्थ-वि. १ घशांत अडकलेलें (बेडका, प्राण). २ गळ्यांतील (दागिना इ॰) ३ (ल.) जिव्हाग्रीं; पाठ असलेला (अभ्यास, पाठ, इ॰). ४ कंठस्थ वर्ण (गळ्यांतून ज्यांचा उच्चार होतो ते:-अ, आ, क, ख, ग, घ, ङ, ह). [सं.] ॰स्थान-गळा. -वि. कंठस्थ पहा, ॰स्नान-न. १ गळयाखालचें स्नान (विशेषतः बायकांचें), (क्रि॰ करणें). २ (ल.) मान छाटणें; शिरच्छेद करणें. (शिर छाटल्यानें आंतून वाहणार्‍या रक्तानें होणारें स्नान); नागवणें; लुटणें. (क्रि॰ घालणें). 'धोंडी वाघासारख्या काळपुरुषास ज्यानें कंठस्नान घातलें, त्या वापू गोखल्याच्या पराक्रमाचें वर्णन काय करावें ?' [सं.] ॰कंठाग्र-न. घसा; ध्वनि इंद्रिय. कंठ अर्थ ५ पहा. (सामा- न्यतः सप्तम्यंत प्रयोग), कंठाग्रीं.'कंठाग्रीं संधानीं धरियेला हरी । अवघ्या विखारीं व्यापियेला ।' [सं.] ॰कंठाभरण-न. १ गळ्यांतील एक अलंकार. 'सौभाग्यद्रव्यें कंठाभरणें.' -एरुस्व ६. ८७. २ घोड्याच्या मानेखालीं असलेला शुभदायक भोंवरा. ३ गळयांतील ताईत; प्रिय. कंठावरोध-पु. घसा दाटून येणें; घसा धरणें, बसणें. [सं.]

दाते शब्दकोश