मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

वांछा

(सं) स्त्री० इच्छा, आशा.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

संबंधित शब्द

आकांक्षा      

स्त्री.       १. इच्छा; आशा; वांछा. २. गरज; अपेक्षा; मागणी; ३. एखादी गोष्ट व्हावी अशी तीव्र इच्छा; ४. तर्क; शंका; संशय. ५. आक्षेप; हरकत; उत्तरपक्ष. ६. तपास; शोध. ७. (भाषा.) वाक्याचा अर्थ सुसंगतपणे लागण्यासाठी वाक्यातील शब्दांचे परस्परावलंबित्व. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

आकांक्षणे      

सक्रि.       ईर्षा करणे; इच्छा करणे; वांछा करणे; अपेक्षा करणे : ‘जाहला यालागीं जो कांहीं । आकांक्षी ना ।’ − ज्ञा १२·१९३.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अनासक्ति, अनासक्ती      

स्त्री.       कर्मफळाची अपेक्षा न करणे; वांछा, वासना नसणे; विरक्ती. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अपेक्षा

स्त्री. १ इच्छा; वांछा; आकांक्षा; वासना. 'ऐसी अपेक्षा जालिया । बद्ध मुमुक्षुते आलिया ।' -ज्ञा १८.१४४१. २ गरज; कारण; प्रयोजन; जरुरी; मागणी. ॰करणें-(मिळण्याच्या) आशेनें किंवा इच्छेनें पाहणें, बघणें, शोधणें; मार्गप्रतीक्षा करणें; इच्छा करणें. ॰बुद्धि-जी. आकांक्षा; मनीषा; आशा (कांहीं मिळण्याची). (क्रि॰ धरणें, ठेवणें, करणें.) [सं.]

दाते शब्दकोश

आरजु      

स्त्री.       इच्छा; महत्त्वाकांक्षा; वांछा : ‘दिल्लीत काबीजात जाल्यास वजारतची आरजु सुजाअतदौलास आहे व पातशहास तक्तावर बसावे हे जरूर. तेव्हा ते तुमचे मुद्दे मान्य करतील.’ − ऐसंसा ७•४४.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

बोचांडणें

अक्रि. (व.) तृप्ति होणें; वासना शमणें; इच्छा तृप्त होणें. [सं. वांछा ?]

दाते शब्दकोश

दोहद      

न.       १. गरोदर स्त्रीची इच्छा, वासना; डोहाळा : ‘दोहद कैसा सुंदरि, सांग तुझें काय इच्छितें स्वांत ।’ – मोमंत्ररामायण उत्तरकांड २३३. २. (ल.) झाडांना बहर येण्यासाठी आवश्यक स्थिती; त्यांची मनीषा, वांछा. उदा. बकुलास दोहद मधाची गुळणी. [सं.दौहृद]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दोहद

न. १ गरोदर स्त्रीची इच्छा, वासना; डोहाळा. 'दोहद कैसा सुंदरि, सांग तुझें काय इच्छितें स्वांत ।' -मोमंत्ररामा- यण, उत्तरकांड २३३. २ (ल.) झाडांना भर येण्यापूर्वीची स्थिति; त्यांची मनीषा, वांछा. 'अशोकास स्त्रियांचा पादाघात हें दोहद आहे आणि बकुलास दोहद मद्याची गुळणी.' [सं.]

दाते शब्दकोश

गर्भारपण

गर्भिणी-गर्भार झाली, दिवस राहिले, दिवस गेले, पोट वाढलें, गर्भ राहिला, विटाळशी बसायची थांबली, पोटांत मूल वाढू लागले, पोटाशी आली, तिला अलीकडे हवं-नको व्हायला लागले होते, प्रीति साफल्याचे घबाड माप मिळाले, गोड जाणीव होऊ लागली, ते गोड गुपित फार काळ लपेना, वेलीला फळ धरले, दोहोंमध्ये तिसरें येणार असे दिसूं लागले, आतां आपण काही येथे दोघेच नाही! 'वाढती' जबाबदारी, नाजूक अवस्थेत, तो नऊ महिने नऊ दिवसांचा काळ, चिंचांवर वांछा जाऊं लागलीय् ! सकाळच्या त्या ओकारीने आशा सफल झाल्या, कूस उजवणार असे वाटू लागले.

शब्दकौमुदी

इच्छा

स्त्री. १ वासना; वांछा; आशा; आकांक्षा; मनोगत; मनीषा; आवड. सामाशब्द-इच्छापूर्वक; इच्छापुरःसर इ॰ २ (गणित) इच्छांक; त्रैराशिकांतील प्रमाणसजातीय राशि. आद्यंक, मध्यांक व अंत्यांक किंवा इच्छांक हीं तीन पदें असतातच, चवयें इच्छाफल (उत्तर) काढावयाचें असतें. उ॰ पांच रुपयांस दोन मण, तेव्हां चार रुपयांस किती? येथें पांच हें प्रमाण व चार ही इच्छा. [सं. इष्] ॰तृप्त- क्रिवि. इच्छेची तृप्ति होईपावेतों; इच्छा परिपूर्ण होईपर्यंत. ॰तृप्ति- स्त्री. मनीषा सिद्धीस जाणें; हेतु, वासना सफल होणें. ॰दान-न. इच्छिलेलें दान देणें; इच्छा पुरी करणें. ॰दानी-वि. इच्छादान करणारा; ज्याची जी इच्छा असेल ती पुरविणारा. 'तुका म्हणे इच्छा दानी । पुरवी आवडीची धनी ।' ॰पूर्ति-स्त्री. इच्छेची फलद्रुपता, पूर्तता; इच्छातृप्ति. ॰फल-न. (गणीत) त्रैराशिकांतील चौथें पद (उत्तर). मध्यपद आणि इच्छांक यांचा गुणाकार करून त्यास आदिपदानें भागिलें असतां इच्छाफल येतें. ॰भंग-पु. इच्छेची पूर्ति न होणें; अशा निष्फळ होणें; निराशा. ॰भोजन-न. १ तृप्ति होई- पावेतों जेवणें. २ भरपूर जेवण. ३ इच्छित पदार्थ (ब्राह्यणांस) खाऊं घालणें. ॰मरण-न. इच्छेस येईल तेव्हां मरण येणें, मरणें; पाहिजे तेव्हां मरण आणण्याची शक्ति. ॰मरणी-मृत्यु-वि. पु. इच्छा होईल तेव्हां मृत्यूस निमंत्रण करणारा; इच्छामरणाचा ईश्वरी प्रसाद असणारा. 'ख्यातयशस्वी इच्छामृत्यु तुम्ही कुरु कुळांत वासवसे ।' -मोउद्योग ११.८७. ॰लाभ-पु. इच्छित वस्तूची प्राप्ति; इष्टलाभ. ॰वान्-वि. इच्छा असणारा; इच्छायुक्त. ॰विनाश-पु. इच्छाभंग; इच्छादमन; आत्मसंयम. ॰विलास- विहार-पु. मानेल तेव्हां, मानेल तें खेळणें, मनसोक्त विलास, चैन करणें. ॰शक्ति-स्त्री. इच्छेचें सामर्थ्य; संकल्पशक्ति; इच्छा हीच शक्ति; (इं.) विल्पॉवर. ॰सिद्ध-वि. इच्छेप्रमाणें सिद्ध किंवा असिद्ध ठरवितां येण्यासारखा. ॰स्वातंत्र्य-न. इच्छेची स्वतंत्रता; प्रवृत्तिस्वातंत्र्य. ॰क्षय-पु. इच्छाविनाश पहा.

दाते शब्दकोश

इच्छा      

स्त्री.       १. वासना; वांछा; आशा; आकांक्षा; मनोगत; मनीषा; आवड. सामा. शब्द − इच्छापूर्वक; इच्छापुरःसर इ. २. (ग.) इच्छांक; त्रैराशिकातील प्रमाणसजातीय राशी. आद्यांक, मध्यांक व अंत्यांक किंवा इच्छांक ही तीन पदे असतातच. चवथे इच्छाफल (उत्तर) काढावयाचे असते. उदा. पाच रुपयांस दोन मण, तेव्हा चार रुपयास किती? येथे पाच हे ‘प्रमाण’ व चार ही ‘इच्छा’ [सं. इष्]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

जिंकणें

उक्रि. १ पराभव करणें; पादाक्रांत करणें; पाडाव करणें. २ जय मिळविणें; यशस्वी होणें; (लढाई, खटला, खेळ यांत). ३ कह्यांत ठेवणें; ताबा मिळविणें; सुटका करून घेणें; स्वाधीन ठेवणें (झोंप, क्षुधा, तहान, रोग). ४ दडपणें; दाबून टाकणें; कांहीं चालूं न देणें (विकार, वांछा, मनोवृत्ति, लोभ, इष्क, भोगेच्छा यांचें). 'त्यानें काम जिंकला.' ५ चढ करणें; सरशी करणें; आपल्या गुणांनीं इतर पदार्थ हलके करणें. 'तुझे मुखानें चंद्रशोभा जिंकली.' ६ सोडविणें; उलगडणें; फोड करणें; उत्तर देणें, काढणें; करणें. (कोडें). ७ न्यायतः मिळविणें; स्वत्व सिद्ध करणें (विवादास्पद किंवा इतर द्रव्य). 'त्यानें पंचाइतेमध्यें दोन गांव जिंकिले.' -अक्रि. १ संकटांतून मुक्त होणें; निभावून जाणें. 'एवढें लग्न यथास्थित तडीस गेलें म्हणजे जिंकलें.' २ पराभूत होणें; जित होणें. जुनें रूप 'जिंकण्हें' असें आहे. 'संग्रामातें जिंकण्हारू' -गीता १.५३५. [सं. जी] (वाप्र.) (ऊब) जिंकणें-अनोळखीमुळें एखाद्याच्या श्रेष्ठतेबद्दल भय वाटत असतां तें ओळखीमुळें नाहींसें होणें; भय वाटनासें होणें; भीति जाणें. 'नवा राजा झाला तेव्हां प्रजा जवळ जायाला वचकत असे पण आतां ऊब जिंकली.'

दाते शब्दकोश

जिव्हालौल्य

जिभेचे चोचले, खाण्याची वांछा, रसनेच्या चवीढवी, चटोर जीभ, फार चटकफटक खाणीं सदांचीं, दररोज नवें पक्कान पाहिजे आहे, आचार्यापेक्षां आचार्याची निवड मोठ्या कसोशीनें होते ! चारी ठाव जेवणाशिवाय भागत नाहीं, तिखटमिखट मसाल्याचे षोकी, भज्यांचा वास आला कीं तोंडाला पाणी सुटलेंच ! आज बटाटेवडा उद्यां दहींवडा; रोज नवे प्रकार पाहिजेत, सारखें स्वयंपाक-घरांत लक्ष.

शब्दकौमुदी

जयिष्णु, जयिष्णू      

वि.       जय मिळविण्याची इच्छा असलेला : ‘पराभूत वांछा, जयिष्णू ईर्षा ।’ – अंया ११८.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

लोभ

(सं) पु० आशा. २ प्रेम. ३ वांछा.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

मोहर

स्त्री. (महानु.) मनोरथ; इच्छा; मनकामना; वांछा. 'तयाची मोहर दंडायमान.' -आचारभाष्य.

दाते शब्दकोश

निरिच्छ

उदासीन, निष्काम, वैरागी, वासनाहीन, लोभापासून अलिप्त, वांछा नसलेला, फलापेक्षा न ठेवणारा, इच्छानाश झालेला, मोह नसलेला, मनाने न चिकटलेला, इच्छेची वखवख गेलेली, आशारहित वृत्तीनें राही, फलाशारहित, अभिलाषा लोपली, तृप्तीची ढेकर आधींच दिली आहे.

शब्दकौमुदी

उरता      

स्त्री.       अपेक्षा; वांछा; इच्छा : ‘त्यास आपले अभयेपत्राकरिता । उरता धरली आहे.’ –पेद.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

वंदारुता

स्त्री. वंदन करावें अशी इच्छा; आदर; भक्ति. 'वांछा सज्जनसंगमीं गुरुकुळीं वंदारुता नम्रता ।' -वामन स्फुट- श्लोक (नवनीत पृ. १३७). [सं.]

दाते शब्दकोश

फल

न. १ फळ (वृक्षादिकांचें). (याचे लक्षणेनें पुष्कळ अर्थ निघतात). २ (ल.) संतान; संतति; प्रजा ३ फायदा; लाभ. ४ प्राप्ति; उत्पत्ति; निष्पत्ति; कोणताहि व्यापार, क्रिया यापासून निष्पन्न होणारी गोष्ट. ५ परिणाम; शेवट; अखेर. 'तसेंच त्या लेखाचें अगर ग्रंथाचें कांहीं फल.' -गीर २२. ६ (गणित) त्रैराशिकांतील दुसरें व चवथें पद; दिलेलें प्रमाण, दर व उत्तर; प्रमा- णांक व उत्तरांक. ७ भाला, बाण इ॰ शस्त्राचें टोंक, अग्र; हत्याराचें पातें. ८ नांगराचा फाळ. ९ वर्तुळाचें क्षेत्रफळ. [सं.] सामा- शब्द-॰ग्रंथपु. शकुन, मुहूर्त, लक्षणें इ॰ कांचीं शुभाशुभ फलें सांगणारा फलज्योतिषाचा भाग, असा ज्योतिषग्रंथ. ॰ज्योतिष- न. ग्रहांच्या व नक्षत्रांच्या विशिष्ट स्थितीमुळें मनुष्यावर होणारें परिणाम सिद्धांतरूपानें सांगणारें शास्त्र; ज्योतिष (ज्योतिष हा शब्द खगोलविद्या आणि खगोलांपासून मिळणार्‍या फलांचें ज्ञान या दोहोंसहि लावितात तेव्हां फलज्योतिष ही संज्ञा इंग्रजी अ/?/स्ट्रा- लॉजीला प्रतिशब्द म्हणून नवीन बनविण्यांत आली). ॰त्यागी-वि. आपल्या श्रमाचें फळ (तें मिळण्याच्या वेळींच) मुद्दाम सोडणारा; फलाची इच्छा न करणारा. ॰द-द्रूप-प्रद-वि. १ फल देणारें; फायद्याचें( काम, प्रयत्न, युक्ति, उपाय). 'निगमागमद्रुमफळ । फलप्रद ।' -ज्ञा १८.२. २ फायदेशीर, परिणामकारक झालेला; सफळ; गुणावह. 'सफल फलद कर्म त्याज संन्यास साचा । म्हणुनि उमज होतो कथेच्या रसाचा ।' ॰प्रदान-न. विवाहांतील एक समा- रंभ वाङ्निश्चयाच्या वेळीं नवरीच्या ओटींत नवर्‍याच्या बापानें नारळ वगैरे घालणें. ॰न्यास-पु. आपण केलेल्या कृत्याबद्दल किंवा विशिष्ट सत्कृत्याबद्दल मिळणार्‍या बक्षिसाची आशा सोडणें; त्यावर हक्क न सांगणें; फलत्याग; निष्कामकर्म. ॰भोग्य-वि. फलांच्याद्वारां, निष्पत्तीवरून, उपभोग घेतां येणारें (फळझाड, पैसा, वतनवाडी); ह्याच्या ऊलट स्वतःभोग्य. ॰मान-न. फलनिष्पत्ति. ॰वांछा- च्छा-स्त्री. फळाची, परिणामाची इच्छा; मोबदल्याची आशा. याच्या उलट फलन्यास. 'त्यजुनिहि फलवांछा काम्यकर्में करीती । प्रिय हरिस नव्हे ते सर्व ह्या लोकरीती ।' -वामन, कात्यायनी व्रत ७०. ॰वान्-वि. फलप्रद फलद्रूप. ॰शर्करा-स्त्री. फळांपासून काडलेली साखर; (इं.) फ्रुक्टोज. ॰श्रुति-स्त्री. १ व्रत, स्त्रोत, इ॰ पुण्यकारक कृत्यापासून मिळणारें फळ सांगणारें शास्त्र, ग्रंथविभाग. २ फल; फायदा; निष्पत्ति. 'गोष्ट झाली खरी पण आतां रागें भरून फलश्रुति काय?' [फल + श्रुति = शास्त्र] ॰क्षम-क्षेम-वि. १ फलें धारण करण्यास योग्य; फलद. (शब्दशः व ल॰). २ फलदायक; लाभप्रद; कल्याणप्रद. [सं.फलक्षम] फलाकांक्षा-स्त्री. फलेच्छा, आशा; फलवांच्छा. [सं. फल + आकांक्षा]-कांक्षो-वि. फलाची, मोबदल्याची इच्छा करणारा. फलाफल-न. फायदा-तोटा; नफा- नुकसान. [फल + अफल] फलाशा-स्त्री. फल मिळण्याची इच्छा, आशा (सुपरिणाम, बक्षीस इ॰ची). फलाहार-पु. थोडा उपाहार करणें; फराळ; फळफळावळ, पोहे, इ॰ पदार्थ खाणें; असल्या पदार्थांचें भोजन. [सं. फल + आहार] फलित-न. गर्भित अर्थ; ध्वनि. -वि. १ फळ आलेला (वृक्षलता इ॰). २ (ल.) फायदेशीर, फलद्रूप झालेला. ३ ध्वनित; गर्भित; अध्याहृत (गूढ अर्थ इ॰). [सं.] ॰प्रेरणा-स्त्री. दोन किंवा अधिक प्रेरणांच्या इतकेंच कार्य करणारी प्रेरणा; फलोन्मुख प्रेरणा; परिणत प्रेरणा. (इं.) रिझल्टंट. -यंस्थि ६. फलितार्थंपु. १ गर्भितार्थ; ध्वनितार्थ. 'म्हणोनि ते बुद्धि रचूं । मतवाद हे खांचू । सोलींव निर्वचूं ।फलितार्थुचि ।' -ज्ञा १३.१०४९. २ फलश्रुति; अर्थ २ पहा. [फलित + अर्थ] फलोत्पत्ति-स्त्री. फायदा; नफा; किफायत. [फल + उत्पत्ति] फलोदय-पु. फळ येणें, दिसूं लागणें. [सं. फल + उदय]

दाते शब्दकोश