तेरा मराठी शब्दकोशांमधील ३,००,८७५ शब्दांचा एकत्रित संग्रह
शब्दार्थ
शारीरिक
शारीरिक a — &c.
अशक्तता (शारीरिक)
निःशक्तता, दौर्बल्य, दुबळेपणा, शक्तिहीनता, शिथिलता, सामर्थ्यहीनता, विकलांगता, त्राणाभाव, क्षीणबल, पूर्वीचा तकवा नाहीं, अंगांत त्राण राहिलें नाहीं, ताकद संपुष्टांत आली, जोर खचला, दौर्बल्याने झपाटले, हाडांच्या पिंजऱ्यांत बळ उरलें नाहीं, अवसान गेलें, आडव्याचें उभें होतां येईना, जड शरीर जागचें हालेना, गात्रें शिथिल झाली.
संबंधित शब्द
शरीर
न. १ देह; काया; वपु. २ गुह्येंद्रियाबद्दल संकेतानें म्हणतात. [सं.] ॰कमावणें-बलवृद्धि करणें; शरीराची निगा राखणें, जोपासना करणें; शरीर सुदृढ करणें. 'शरीर कमावून बसावयाचें पण अक्कल गमावून बसावयाचें.' -राजसंन्यास १५. ॰वेंचणें-परोपकाराकडे देह झिजविणें. सामाशब्द- ॰कष्ट-पुअव. शारीरिक श्रम, हाल, अपेष्टा; देहकष्ट. ॰कळा-कांति-स्त्री. शरीराचें तेज टवटवी, तजेला. [सं.] ॰दंड-पु. १ तप आचरून किंवा अन्य रीतीनें देहाला दिलेले श्रम; कष्ट; देहदंड. २ शारीरिक शिक्षा; मारणें इ॰. [सं.] ॰पाटव-न. शरीराचा निरोगीपणा; सुस्थिति; आरोग्य; सुदृढता. [सं.] ॰प्रकृति-स्त्री. १ प्रकृति- मान; शरीराची ठेवण; स्वभाव. २ देहाचें आरोग्य; स्वास्थ्य. [सं.] ॰भाव-पु. १ शारीरिक प्रकृति; स्वभाव; शारीरिक अवस्था. 'व्याध करी साष्टांग नमस्कार । मुखे म्हणे जयजयकार । तों शरीरभाव पालटला ।' -शिली २. २ अहंभाव. -मनको. [सं.] ॰भोग-पु. १ शारीरिक कष्ट, यातना, रोगपीडा इ॰. (सामा.) दुखणें; दुखापत. २ शारीरिक विलास, करमणूक, ऐष- आराम. (क्रि॰ भोगणें). ३ प्रारब्धप्राप्त देहपीडा. ४ शरीराला होणारें, सुखदुःख. [सं.] ॰यष्टि-स्त्री. शरीर; अंगकाठी; शरीर- ठेवण, घडण. [सं.] ॰संपत्ति-स्त्री. १ आरोग्य; स्वास्थ्य; निरोगीपणा. २ शरीरांतील जोम; उत्साह, शक्ति. [सं.] ॰संबंध-पु. १ सोयरिकीमुळें जडणारा संबंध; आप्तपणा; सोयरीक; सोयरगत; नातें. २ विवाहसंबंध; लग्न (लग्नचिठ्ठींत वापरतात). ३ हातघाई; मारामारी; धक्काबुक्की, लगट. ॰संबंधावर येणें-हातघाईवर येणें; नारामारी, धक्काबुक्की करणें; लगट करणें. ॰संबंधी- वि. सोयरीकसंबंधीं; विवाहामुळें नातें जडलें आहे असा. ॰सांडोवा-पु. देहाचें निंबलोण; देह ओवाळून टाकणें. 'यालागीं शरीरसांडोवा कीजे । सकल गुणांचे लोण उतरिजे ।' -ज्ञा ९. ३८१. [शरीर + सांडणें] ॰स्वास्थ-न. शरीराची सुस्थिति; आरोग्य; शारीरिक सुख. [सं.] शरीराची ढगळ-स्त्री. शरी- राची झीज; कृशपणा (हगवण इ॰ मुळें आलेला); शरीराची खराबी. शरीराची दामटी-स्त्री (अजारीपणामुळें) शरीराला आलेली हीन अवस्था; कृषता; खराबी शरीराची धलपी- ढळपी-स्त्री. (रोगानें) शरीर कृश, काठीप्रमाणें होणें. शरीरी- वि. १ देहधारी; देही; देह धारण करणारा. २ शरीरासंबंधी; शरीराचें; शारीरिक. -पु. देहधारी सजीव प्राणी. [सं.] शारीर, शारीरक-न. १ शरीरविषयक शास्त्र; शारीरशास्त्र. २ गातांना कंप घेण्याचें कौशल्य. -वि. १ दैहिक; देहासंबंधीं; शरीरी पहा. -गीर १४२. शारीरव्रण-पु. सहजव्रण; स्वाभाविक व्रण; याच्या उलट आगंतुक व्रण. शारीरशास्त्र-न. शरीरविषयक शास्त्र. (इं.) अ/?/नाटमी. [सं.] शारीरिक-वि. शरीराचा; शरीरासंबंधीं शरीरी पह. याच्या उलट मानसिक. [सं.]
कायिक
वि. शारीरिक; देहाविषयींचे. [सं.] ॰वाचिक- मानसिक-वि. शारीरिक, शाब्दिक व अंतःकरणाविषयक (पाद- सेवेन, पूजा, भक्ति, शुश्रुषा, सेवा इ॰). ॰वृद्धि-व्याज-स्त्री. (शारीरिक श्रमाच्या प्राप्तीला अनुसरून) दररोज अगर मासिक द्यावयाचें व्याज; कायिक व्याज, याऐवजीं कालिक व्याज-वृद्धि असेंहि म्हणतात.
जडवामन
पु. (मानस.) कंठस्थ ग्रंथींच्या जन्मजात अवक्रियेमुळे निर्माण होणारा मानसिक मंदनाचा एक चिकित्सात्मक प्रकार. अशा व्यक्तीचा शारीरिक विकास विकृत स्वरूपाचा, शारीरिक क्रिया सीमित व दोषपूर्ण असतात.
कष्ट
पु. १. शारीरिक श्रम; त्रास; आयास; प्रयत्न; मेहनत; परिश्रम चलनवलन : ‘कष्टेंविण फळ नाहीं । कष्टेंविण राज्य नाहीं ।’ - दास १८·७·३. २. थकवा; शीण; श्रम (शारीरिक, मानसिक); दुःख; अस्वस्थता (सामान्यतः अव. प्रयोग). ३. दुःख; व्याधी; संकट. [सं.]
कष्ट
पु. १ शारीरिक श्रम; त्रास; आयास; प्रयत्न; मेह- नत; परिश्रम. 'कष्टेंविण फळ नाहीं । कष्टेंविण राज्य नाहीं ।' -दा १८. ७. ३. २ थकवा; शीण; श्रम (शारीरिक; मानसिक); दुःख; अस्वस्थता (सामान्यतः अव. प्रयोग). ३ दुःख; व्याधि; संकट. [सं. कष् = घांसणें] ॰करी -पु. मजूर; अंगमेहन- तीचे, दगदगीचें, हलक्या दर्जाचें काम करणारा; कामकरी.
अंग
न. (अप.) आंग. १ शरीर; देह. 'पै जयाचेनि अंगसगें ।' -ज्ञा ९.२६९. 'अंगाला वारा लागेल, आंत जा !' २ अवयव; इंद्रिय; गात्र. 'अति क्षीणता पावलीं सर्व आंगें.' -दावि २४२. ३ (ल.) कोणत्याहि गोष्टीचा घटक, विभाग. 'हत्ती, रथ, घोडेस्वार आणि पायदळ हीं प्राचीन काळीं सैन्याचीं चार अंगें समजलीं जात असत.' ४ बाजू; दिशा. दारा अंग = (व.) दरवाज्यामागें किंवा जवळ. 'आठै आंगें पोळती । वसूधरेचीं ।' -शिशु ७४८. 'किल्ल्याचें आंग भिउनि फिरंग भार हा पळतो कानड्याचा.' -ऐपो १८३. 'तुमचें पागोटें मागल्या अंगानें बैडौल दिसतें.' ४ वेदांग; वैदिक वाङ्मयापैकीं विशिष्ट ग्रंथ- समूहास संज्ञा. उदा॰ शिक्षा, ज्योतिष, निरुक्त, इ. ५ एखाद्या कामांत असलेला हात, घेतलेला भाग किंवा संबंध. 'त्या मसलतींत रामाजीपंतांचें अंग आहे.' ६ चोरून मदत किंवा मिलाफ; आश्रय; फुस. 'ह्या चोराला कोतवालाचें अंग आहे.' 'ही सासूबरोबर भांडते, हिला नवर्याचें अंग आहे.' ७ अधि- ष्ठान; ठिकाण; शरीर; देह (एखाद्या गुणदोषाचा कर्ता, पात्र). 'ही चोरी ज्याचे अंगीं लागेल त्यास मी शासन करीन,' 'त्याच्या अंगीं चित्रकलेचा गुण आहे.' ८ (एखाद्या वस्तूचा किंवा कार्याचा) गौण, अप्रधान; भाग. उ॰ विवाहामध्यें होम हा प्रधान आहे, अवशिष्ट कर्में अंगें होत. ९ खूण. 'अनुभवाचीं आंगें जाणें ।' -दा ५.९.२२. १० आंतड्याचा गुदद्वाराबाहेर येणारा भाग, किंवा प्रसूतीनंतर योनीच्या बाहेर येणारा भाग. (सामा.) गुदद्वार. 'आंगीं सारी बर्फ कुणाच्या छत्री गाजर मुळा । मेणबत्तीचा खेळ चालला' -विक्षिप्त १.१३५. ११ विशिष्ट काम करण्याची पात्रता, ताकद, क्षमता, बुद्धि. १२ आपल्या बाजूचा माणूस (मोठ्या अधिकावरील); पुरस्कर्ता, तरफदारी करणारा; वशिला 'दरबारांत अंग असल्यावांचून क्रांतिवृत्तावरचा बिंदु, अंश. (अस्तलग्नाच्या उलट). १४ (संगीत) प्रबंधाचा पोटविभाग; रागवाचक स्वरसमुदाय; हे विभाग सहा आहेत:- स्वर, विरुद्ध, पद, तेनक, पाट, ताल. १५ (ताल) तालाचें मात्रानियमानें झालेलें कालप्रमाण हीं अंगें सात आहेत:-अणु- द्रुत, द्रुतविराम, लघु, लघुविराम, गुरु व प्लुत. १६कौशल्य; चातुर्य; कल. 'त्याला गाण्याचें अंग आहे.' १७ मगधाच्या पूर्वेचा जुना बंगाल देश; सध्यांचे मोंघीर, भागलपूर, पूर्णिया इ॰. जिल्हे यांत येतात. याचा उल्लेख अथर्ववेदांत आलेला आहे. पुढील काळीं शोण, गंगा या नद्यांच्या आसपासचा प्रदेश; कर्णाचें राज्य. १८ आचारांग सूत्रांपैकीं एक जैन आगम ग्रंथ. १९ स्वतः, खुद्द. आंगें असाहि प्रयोग आढळतो. 'दीप वांचूनि दिवा लाहे । तै आंग भुललाचि कीं ।' -अमृ ३.२०. 'राहोनि गुप्त धृष्ट- द्यूम्नें तच्छोध लाविला आंगें ।' -मोआदि ३४.१८. २० प्रकार. 'घालाघालीचें आंग सांधौं कैसें । चालितां बिंबु न दिसें ।' -शिशु १००६. 'कारभाराचें सांगावें अंग कैसें ।' -दा ११.५.२३. -शअ. (व.) कडे. उ॰ 'भिंतीअंग' (वाप्र.) ॰ओढविणें- आपल्या आंगावर घेणें; स्वतः पुढें होणें; (एखाद्या कार्योत- कडे). 'आपुलेंचि अंग तुम्हीं वोडविलें । त्याचें निवारिलें महा दुःख ।' ॰काढणें-काढून घेणें-१ स्वतः एखाद्या कामांतून माघार घेणें; संबंध तोडणें (एखाद्या कामांतून). 'मी त्या कामांतून आपलें अंग काढून घेतलें आहे.' २ (कु. गो.) दच- कणें. 'आंग काडप.' ॰घालणें-१ हात घालणें; मदत करणें; मन घालणें. 'या कामांत तूं जर अंग घातलेंस तर फार सोय होईल.' २ दुःखामुळें (जमिनीवर पडणें.) 'ऐकोनियां आंग घाली पृथ्वीवरी ।' -दा ३.५.३०. ॰घासणें-झीज सोसणें. 'परांजप्यांनीं प्रामाणिकपणानें अंग घासून... स्वतःची स्कीम करून कार्यास लागावें' -केले १.२६३. ॰घेणें-भरणें-१ लठ्ठ होणें. २ (गो. 'आंग घेवप.') (कामांत) भाग घेणें. ॰न घेणें-पुढें न सरसावणें; भाग न घेणें. ॰चढणें-सदरांत पडणें; वर्गांत येणें. 'जें विधीसी नातुडे । तें निषेधाचें अंग चढे ।' -एभा ७.६९. ॰चढून येणें-(व.) ताप भरणें, चढणें. ॰चोरणें-जोगावणें-१ अंग राखून काम करणें; टंगळमंगळ करणें; चुकारपणा करणें. 'संत सेवेसी अंग चोरी ।वृष्टी न पडो तयावरी ।' २ शरीराचा भाग आकुंचित करणें (मार चुकविण्या- साठीं). 'असा अंग चोरतोस म्हणून नीट लागत नाहीं.' ॰जड करणें-(गो. 'अंग जड करप') एखाद्या कामांत भाग घेण्याचें टाळूं पहाणें. ॰जड जाणें-(गो. 'आंग जड जापव.') अंगावर कांटा उभा राहणें. ॰झांकणें-लपविणें- स्वतःची बाजू किंवा भाग (कामांतील) दाबून, गुप्त ठेवणें. ॰झाडणें-साफ नाहीं म्हणून सांगणें; नाकबूल करणें. 'आंग झाडिती न ममें । येणें बोलें ।' -ज्ञा १७.३७२. ॰टाकणें-१ अशक्त होणें; वाळणें. 'आई गेल्यापासून बाळानें अंग टाकलें आहे.' २ जोरानें देह जमिनीवर टाकणें. ३ विश्रांती- साठीं आडवें होणें; कसें तरी अस्ताव्यस्त पसरणें. 'घरीं जाऊन केव्हां अंग टाकीन असें मला होतें.' ॰टेकणें-आश्रय करणें. 'योगें आंग टेकिलें योगीं ।' -अमृ ९.२६. ॰दर्शविणें- एखाद्या गोष्टींत किंवा व्यवहारांत हात किंवा संबंध आहे असें भासविणें. ॰दाखविणें-एखाद्या कामांत कौशल्य दाखविणें; फड जिंकणें. ॰न दाखविणें-अंग असल्याचें लपविणें; मागें रहाणें, जबाबदारी टाळणें. (गो. आंग दाखैना जापव.') ॰देणें-१ मदत करणें; हातभार लावणें. २ प्रवृत्त होणें; वळणें. 'सुखा अंग देऊं नये ।' ॰दोडपणें, दुडपणें, दुमडणें- (गो. 'आंग दोडप.') अंगं चोरणें. ॰धरणें-१ ताठरणें; संधिवातानें शरीर आंखडणें. २ लठ्ठ होणें; ताकद येणें. ॰मरणें- अर्धांगवायूनें शरीर अथवा एखादा अवयव बधिर होणें. ॰मारणें- १ अंग चोरणें पहा. २ जोरानें अंग आंत घुसविणें. 'मीं दाटींतून अंग मारलें.' ॰मुरडणें-मुरडणें; मागें पहात दिमा- खानें जाणें; ठमक्यानें जाणें; 'नवी साडी नेसून पोर पहा कशी अंग मुरडीत चालली आहे.' ॰मोडून काम करणें- खपणें; श्रम करणें; अतिशय मेहनत करणें; जिवाकडे न पाहतां काम करणें; जीव पाखडून काम करणें. ॰मोडून येणें-तापानें अंगावर कांटा येणें; कणकणणें; कसकसणें. 'तदुपरि अविलंबे आंग मोडून आलें ।' -सारूह ३.५७. ॰येणें-(गो. 'आंग यॅवप.') १ लठ्ठ होणें. २ प्रसूति समयीं गुह्यांग बाहेर येणें. ॰रक्षण करणें, राखणें-वांचविणें-अंग चोरणें; आपला बचाव करणें. 'यश रक्षावें न आंग लेंकांहीं ।' -मोउद्योग १०.६१. 'वत्सें भीमें एकें काय करावें? न अंग राखावें ।' -मोभीष्म ३.४. ॰सांवरणें-१ तोल सांवरणें., २ गेलेली ताकद पुन्हां मिळविणें; पूर्व स्थितीवर येणें. ॰सोडणें- (गो. 'आंग सोडप') खंगत जाणें. ॰हलकें होणें-(गो. आंगं ल्हवु जावप.') हायसें वाटणें; (जबाबदारींतून) मोकळें झाल्याबद्दल समाधान वाटणें. 'अंगा-नें आरंभ होणा रे वाप्र. -खांद्यावरचें-(बायकी) (ल.) दागदागिने. -खालची, खालची बायको-स्त्री. राख; उपस्त्री. -खालीं घालणें- स्वतःच्या चैनीसाठीं अथवा उपभोगासाठीं राखणें (वेश्या, परस्त्री, इ॰). -खालीं पडणें-१ सवयीचें होणें. २ भोग देणें; रतिसुख देणें-वेणें. -चा आंकडा होणें-आंकडीनें पेटके येणें; अंग वांकडें होणें. -चा आळापिळा करणें-१ अंग पिळवटणें; आळेपिळे देणें. २ अतिशय श्रम करणें. -चा खकाणा करणें-(व.) संताप करून घेणें. -चा खुर्दा होणें- (श्रमानें) अतिशय श्रमानें अंग ठणकणें; गलितगात्रें होणें; मणके ढिले होणें. -चा हुरपळा-भडका होणें-अंग अतिशय तापणें (तापानें, संतापानें); लाही होणें; आग होणें. -ची आग-लाहकी-होळी होणें-रागानें, संतापानें अंगाची आग होणें. -ची चौघडी करणें-१ शरीराच्या चार घड्या करणें (डोंबार्याच्या कसरतींत). २ सर्व अंग पोटाशीं घेऊन निजणें (थंडी, ताप इ॰ मुळें). -ची लाही होणें-अंगाचा हुरपळा होणें पहा. १ उन्हानें अतिशय अंग तापणें; काहिली होणें; भडका होणें. २ अतिशय संताप येणें (जोंधळा इ॰ धान्याची भाजून लाही होते त्याप्रमाणें); 'तें तिजला खपलें नाहीं । अंगाची झाली लाही ।' -विक १७. -ची लाही करणें- संतापविणें; खिजविणें; भाजणें; जाचणें. -चें आंथरूण करणें- स्वतःबद्दलची काळजी सोडून सर्व प्रकारच्या संकटांना तोंड देणें; एखाद्याचें काम करण्यासाठीं स्वतःच्या जीविताची पर्वा न करणें. 'त्याचें लग्न व्हावें म्हणून म्या अंगाचें अंथरूण केलें तरी त्यानें त्याचा कांहीं उपकार मानला नाहीं.' -चें आंथरूण होणें- (तापामुळें) अशक्तता येणें; उठवणीस येणें; मरगळीस येणें. -चें कातडें काढून जोडा शिवणें-(एखाद्याविषयीं) अतिशय कृतज्ञता, आदरबुद्धी दाखविणें. -चे चकदे काढणें- (मांसाचे तुकडे करून काढणें) जोरानें बेदम मरणें; अंगाची सालडी काढणें. -चे-चा तिळपापड होणें-रागानें शरीराची लाही होणें. 'मी दहांच्या तोंडून ऐकलं आणि माझ्या अंगाचा असा तिळपापड झाला कीं सांगतां पुरवत नाहीं.' -मोर १५. -चे धुडके उडविणें-(शरीराच्या) लकतर्या काढणें; चेंदा- मेंदा करणें; फार झोडपणें. 'त्या बदमाषानें त्याच्या अंगाचे नुसते धुडके उडविले.' -चें पाणी करणें-होणें-अतिशय श्रम करणे (त्यामुळें अंगास पाणी, घाम येणें). 'अंगाचें पाणी करूनच या हतभाग्या आयुष्याचे दिवस मला लोटले पाहिजेत.' -पाव्ह ९९. -च्या चिंध्या करणें-१ (व.) अंग ओरखडणें. २ त्रास देणें. -अंगांत मांग शिरणें-शरिरांत अतिशय क्रोधाचा संचार होणें. (मांग हा फार क्रूर समजला जातो यावरून). -त येणें-वारें शिरणें-१ भूतसंचार होणें. २ अति उत्कंठेनें काम करणें. -त शीळकळा येणें-(माण.) अंगांत देव येणें, वारें येणें. -निराळा-बाहेर-टाकणें-झोंकणें- सोडणें-झिडकाविणें-(कामधंदा, जबाबदारी) सोडून देणें; माथ्यावर, अंगावर न घेणें. 'पेशव्यांनीं आम्हाला आंगाबाहेर टाकलें आहे.' -अस्तंभा २४. -निराळें करणें-अंगाबाहेर टाकलें पहा. -बरोबर होणें, -त बसणें-एखादा कपडा अंगास बरोबर बसणें, ठीक होणें, बेताचा होणें; -ला लावणें- १ अंगांला तेल वगैरे चोपडणें. 'नवी नवरी म्हणून अंगाला लावीन म्हटलें; नाहीं !' -झांमू. २ बाळंतिणीचें अंग रगडणें, चोळणें. (एका) -वर असणें-होणें- एका कुशीवर निजणें किंवा आनं- दानें अंग रोमांचित होणें. 'वृत्तश्रवणें आला सर्वांगीं आमुच्या पहा कांटा ।' -मोकर्ण १८.१. -वर काढणें- आजार वगैरे सोसणें. -वर कोसळणें-कोसळून पडणें-ओघळणें- १ रागानें एखाद्याच्या अंगावर चालून जाणें, पडणें. २ संकट आपत्ति वगैरे गुदरणें; जबाबदारी येणें; आपत्तींत सांपडणें. -वर गोण किंवा गोणी येणें-(व.) अंगावर जोखीम किंवा जबाबदारी येणें. -वर घेऊन-स्वतःवर जबाबदारी घेऊन; आपलें म्हणून; कैवार घेऊन (क्रि॰ करणें; बोलणें; सांगणें; पुसणें; विचारणें). -वर घेणें-१ मुलास प्यावयास घेणें, देणें; थान देणें. २ स्वतःवर जबाबदारी घेणें. ३ आपला म्हणणें, अतिशय प्रीति दाखविणें. -वर तुटणें-तुटून पडणें-हल्ला करणें; धांवून जाणें; एकदम चालून जाणें. -वर देणें-जामिनकी किंवा गहाण न घेतां वैयक्तित जबाबदारीवर कर्ज वगैरे. -वर देणें-बांधणें-भरणें-पोसणें-करणें इ॰-स्वतःच्या जबाब- दारी-साधन-संचयावर देणें, बांधणें वगैरे. -वर पडणें-येणें- १ शिरावर पडणें; विक्रींत नफा होईल म्हणून जो माल खरेदी केला तो अडीअडचणीमुळें. भाव उतरल्यामुळें आपल्याजवळ पडून राहणें; तोटा भरून देण्याची जोखीमदारी अंगावर येणें. २ गळ्यांत येणें; एखादा धंदा अगर काम करण्यास भाग पडणें. ३रागानें चालून जाणें; वसकन अंगावर येणें. ४हल्ला करणें; चालून येणें. -वर पिणें, खाणें-(मुलानें) स्तनप्राशन करणें; स्तनप्राशन करण्याइतकें लहान असणें. -वर शेकणें-तोटा होणें (व्यापारांत); बुड येणें (रुपये, व्यवहार, इ॰ ची); कुमांड येणें. -वरचें-वि. दूध पिणारें (मूल). -वरचें जाणें- (बायकी) महिन्याच्या महिन्यास तरून स्त्रीच्या शरीरांतून जसें दूषित रक्त बाहेर जातें तसें अवेळीं जाऊ लागलें; धुपणी रोग होणें. -वरचें तोडणें-तान्ह्या मुलाचें अंगावर पिणें बंद करणें. -वरून वारा जाणें-अर्धांगवायु होणें. 'भूतपिशाच्य लागलें । अंगावरून वारें गेलें ।' -दा ३.७.५५. -स कुयला लागणें- मत्सरानें किंवा संतापानें हिरवा-निळा होणें; मिरच्या लागणें; अतिशय राग येणें. -स झोबणें-(व.) अंगास स्पर्श करणें; धरणें. -स मुंग्या येणें-वातादि विकारामुळें अंगाला एक प्रका- रची बधिरता येणें. -स बसतें येणें-अंगाला बरोबर बसेल असें होणें (कपडा इ॰). 'नोकरलोकांच्या अंगास बसते येतील असे पोषाख करण्यांत यावेत.' -खानगींतील नोकरांचे पोषाख (बडोदें) ७ -स-अंगीं-येणें- १ व्यापारांत बूड येणें; नुक- सान होणें; ठोकर बसणें. 'मिरच्यांचा व्यापार अंगास आला.' २अंगांत बाणणें. 'मराठीच्या अंगीं आलेली क्षीणता क्षणता क्षणमात्रहि झांकली जाणार नाही.' -नि. -स येणें-होणें-अंगाबरोबर होणें. -स-आंगीं-लावणें-१ पुष्टिकारक होणें; लठ्ठ होणें. २एखादा दोष किंवा गुन्हा अंगावर शाबीत होणें, लागू होणें. 'तेथें व करितां चोरी । आंगीं लागे ।' -दा ६.१.७२. ३तोटा सोसावा लागणें; ठोकर बसणें; अंगावर शेकणें. -स लावणें- १ (बायकी) स्नानाच्या अगोदर तेल व हळद अंगाला लावणें, चोळणें. २बाळंतिणीच्या अंगाला तेल लावणें. -स लावणें- लादणें-चिकटविणें; शाबीत करणें (गुन्हा, अपराध). -आंगीं- यानें आरंभ होणारे वाप्र. -असणें-जवळ, पदरीं असणें; ठायीं असणें. 'हा दोष माझ्या आंगीं नाहीं.' -आणणें-१ आपल्या- वर घेणें; ताबा घेणें. २ आपल्या ठिकाणीं असूं देणें; स्वाधीन राखणें. 'हा गुण आंगीं आणण्याचा प्रयत्न कर.' ॰आद- ळणें-अंगास चिकटणें, कोसळणें. 'अंगीं आदळतो शोक.' -दावि ४२३. अंगीं(एका आंगीं)-अंगें-उणा-वि. १आई- बाप मेलेला; पोरका; विधवा; विधुर. २ व्यंगी; लुळा; कमीपणा असलेला; एका पायानें लंगडा; ३(ल.) सरळ, ताठ नसलेला; उणेपणा असलेला; कमजोर बाजू असलेला; लुच्चा; जाणून- बुजून अपराधी. म्ह॰ आंगीं उणा तर जाणे खाणाखुणा = ज्याला आपला कमीपणा ठाऊक आहे तो लोकांची टीका आपल्याला चिकटवून घेतो. ॰खिळणें-शरीरांत भिनणें. ॰घुमारणें-भूत लागणें; अवसर येणें. आणि आंगीं घुमारिलें.' -दावि १५६. -चा उतारा-वि. अंगावरून ओवाळून दिलेला, काढून टाकलेला जिन्नस (वस्त्र, अलंकार इ॰). 'तुझें अंगीचा उतारा । तो मज देई गा दातारा ।' -भज ४२. -ची सावली करणें-(स्वतः- चा) आश्रय देणें. 'आपुलिये अंगींची सावली । अहोरात्र करुनि तया रक्षी ।' -जिरणें-सरावाचें होणें; मुरणें. -ताठा भरणें- गर्विष्ठ होणें. 'अंगीं भरलासे ताठा । वळणीं न ये जैसा खुंटा ।' -तुटणें-अशक्त होणें; वाळणें; रोड होणें (मूल). -नसणें- १ जातीनें अनुभव, माहिती नसणें. २स्वतःचा नसणें; मुळचा नसणें. 'इतका उद्धटपणा त्याच्या आंगीं नाहीं.' -पडणें- १ सहाय, पक्षपात करणें. 'हा अविद्येचा अंगीं पडे.' -अमृ ६.६. २ संवय होणें. अंगीं मुरणें पहा. -फुटणें- १ लठ्ठ होणें; गुब- गुबीत होणें. २ एखादा रोग अंगावर स्पष्ट दिसणें, वाहणें (रक्त- पिती इ॰). -बसणें-सुगम असणें; संवय होणें. -बिर्हाड देणें-करणें-शरीरांत थारा देणें; हृदयांत, अंतःकरणांत बाळगणें; आस्त्रा देणें (दुर्गुण, पापवासना इ॰ ना). -माशा मारणें-आळशी बनणें. -(माशीं) भरणें-लठ्ठ होणें. -मिरच्या, कुयले, लागणें-झोंबणें- (एखाद्यानें मर्म काढलें असतां) रागानें जळफळणें. -मुरणें-१ संवयीचा होणें. २ हाडीं शिरणें; शरीरांत (ताप) भिनणें. ३ जिरणें; बाहेर न येणें (देवी, गोवर). -येणें-अंगांत भुताचा संचार होणें; अवसर येणें; भूत- बाधा होणें. 'शूद्र येक त्याचे आंगीं आला बोले ।' -रामदासी २.११. -लागणें-अन्न पचणें; लठ्ठ होणें. 'त्याच्या अंगीं अन्न लागलें.' -वाजणें-(बाजणें) अंगांत शिरणें; शोभणें. 'थोर- पण अंगीं वाजे नाना' -दावि ६५. अंगीं-गें-१ स्वतः, जातीनें. म्ह॰ 'अंगें केलें तें काम । पदरीं असे तो दाम ।' 'अंगें करिताती आपण । दोघे जण मिळोनी ।' -एभा ७.५७८. 'अंगें धावे कार्यासमान ।' -नव १६.१७५. २ च्या वतीनें, मार्फत (प्रतिनिधी). दादा अंगे वयनी सोयरी. अंगें, आंगें- शअ. जवळ; बाजूस. 'पाण्याचा तांब्या बापूचे आंगें होता.' -बाळ २.६८. म्ह॰ १ अंगीं (माझ्या इ॰) का माशा मेल्या आहेत = काय (मी) आळशी आहें, का माझा धंदा काय माशा मारीत बसण्याचा आहे? २ आली अंगावर तर घेतली शिंगावर = सहजासहजीं, आगाऊ न ठरवितां एखादी गोष्ट अंगा- वर येऊन पडली असतां, आडवी आली असतां ती करणें (बैलाच्या शिंगांच्या टप्प्यांत कोणी आला तर तो त्याला शिंगावर घेण्याला कमी करीत नाहीं यावरून, आयता मिळालेला फायदा करून घेणें हा अर्थ). ३ अंगापेक्षां बोंगा मोठा; अंगापेक्षां बोंगा, कोठें जासी सोंगा = (शरीरापेक्षां धोतराचा अथवा लुगड्याचा पुढचा भाग मोठा) खर्यापेक्षां जास्त योग्यतेची ऐट मारणें. सामाशब्दः ॰अंग, आंगप्रत-क्रिवि. पृथक् पृथक्; अलग अलग; इसमवार; प्रत्येकीं. ॰उद्धार-पु. (प्र.) अंगोद्धार. १ (काव्य) शरीराची, देहाची मुक्तता. २ तीर्थांत स्नान करणें; तीर्थस्नान; देहशुद्धि. ३ (योग) पोटांतील आंतडीं तोंडांतून बाहेर काढून स्वच्छ करणें; धौती; धुतीपुती. [अंग + उद्धार] ॰उधार-वि. अंगावर दिलेलें, केलेलें (कर्ज, उधारी); स्वतःच्या पतीवर केलेली उधारी. ॰ओलाचें-न. (कों.) जिच्यांत पाणी सांठविण्याची शक्ति आहे असें शेत, जमीन; उन्हाळ्यांत पाणी न देतां हिच्यांतून पीक काढतात. ॰कंप-पु. शरीरास कंप सुटणें; थर- कांप होणें. [सं.] ॰कल-पु. शरीराचा तोल, वांक. [सं.] ॰कवळी-स्त्री. (काव्य) आलिंगन; मिठी; पक्कड. 'परस्परें अंगकवळी होतां । आनंदिलीं उभयतां ।' -मोल. [अंग + कव- ळणें] ॰कष्ट-पु. शारीरिक श्रम. [सं.] ॰कळा-स्त्री. शरीराचें तेज, कांति; मुसमुशीतपणा (निरोगावस्थेंत). ॰काठी-स्त्री. अंगबांधा; अंगयष्टि; शरीराचा बांधा, ठेवण. (अंगलट-लोट- ठेवण-वटा-वठा-वळण हें शब्द शरीराचें स्वरूप, कांति, भरदार- पणा इ॰ दाखवितात तर अंगकाठी-बांधा-यष्टी हे रचना, बांधणी दाखवितात). ॰काडू-ढू-ढ्या-वि. अंग काढणारा; पळपुट्या; जबाबदारी टाळून निसटूं पाहणारा (संकट, अडचणी असतांना); काम चुकारू; माघार घेणारा. [अंग + काढणें] ॰कार्श्य-न. शरी- राचा लुकडेपणा; सडपातळपणा; कृशता. [सं.] ॰गडी-पु. पोटां- तील भिडू; पित्त्या; (सोंगट्या, पत्ते इ॰ खेळांत) भिडूंचा तोठा असतां आपणच त्यांच्या वाटचें खेळणें, म्हणजे आपणच एक कल्पित भिडू आहों असें मानणें. ॰ग्रह-पु. आचके, पेटका, गोळा येणें. [सं.] ॰चपळाई-चापल्य-स्त्रीन. अंगांतील चपळपणा; स्वतःसिद्ध चापल्य. ॰चुकाऊ-र-रू, -चोर-वि. कामांत कुचराई करणारा; मनापासून, नेटानें काम न करणारा. 'अंगचोर वाग्वीर-पटूंचें पेव कसें फुटलें ।' -सन्मित्र समाज मेळा पृ. १३. १९२९. ॰च्छाया-स्त्री. १अंगाची सावली. २(ल.) आश्रय. 'तंव वैकुंठपिठींचें लिंग । जो निगमपणाचा पराग । जिये जयाचेनि हें जग । अंगच्छाया ।' -ज्ञा १७.४६. ॰छेद-विच्छेद-स्त्री. शरीराचा एखादा अवयव कापणें. [सं.] ॰ज-वि. अंगापासून झालेला. -पु. स्वतःचा पुत्र; मुलगा; औरस. ॰जा-स्त्री. स्वपुत्री. ॰जड-वि. जड शरीराचा; लठ्ठ; फोपसा; अगडबंब; मंद; आळशी. ॰जूठ-स्त्री. मल्लयुध्द; कुस्ती; झटापट. [सं. अंग + युध्द -जुध्द-जुट्ठ] ॰जोर-पु. अंगबळ; शरीराची ताकद, शक्ति. (असे धेडगुजरी समास मराठी भाषेंत पुष्कळ झाले आहेत). [सं. अंग + फा. जोर] ॰झाप-स्त्री. पेंढार्यांपैकीं कोणी एखादा पेंढारी झटापटींत मारला गेल्यास त्याला तात्पुरती मूठमाती देण्याची जी चाल होती तीस म्हणत. ठग लोकांत, त्यानीं मारलेल्याला तात्पुरती मूठमाती देण्याची पध्दत; पुढें त्या मृताला सवडीनें नीट लपवून ठेवीत. [अंग + झापणें-झांकणें] ॰झोंक-पु. शरीराचा तोल, कल. [अंग + झोंक] ॰झोल-पु. (काव्य) छातीवरील बंदांचा लांब अंगरखा. ॰ठसा-ठाण-ठेवण-पुनस्त्री. अंगाची ठेवण; अंग- काठी. 'भीमा ऐसा अंगठसा । माझिये दृष्टी दिसतसे ।' -मुसभा ६. १५३. २ (ल.) बळ; सैन्य. -होकै १ ॰ठोळा-ळी-पु. स्त्री. हातांच्या किंवा पायाच्या बोटांत घालावयाचें एक वेढें, वेढणें. (मराठ्यांत स्त्रिया व मुलें बहुधा वापरतात). [अंगुष्ठ] ॰तुक- न. अंगाचें वजन. 'तरी लोहाचें आंगतुक । न तोडितांचि कनक । केलें जैसें देख । परिसें तेणें ।' -ज्ञा १७.२१६. [अंग + तुक] ॰तोल -पु. अंगझोंक पहा. ॰त्राण-न. शरीरसंरक्षक साधन; चिलखत; बख्तर; कवच. 'गोधांगुळें घालिती हस्तीं । अंगत्राणें बांधिलीं ।' -पांप्र ३२.६५. ॰त्वानें-त्वें क्रिवि. (अंगत्व याची तृतीया) प्रतिनिधि म्हणून; एखाद्या करितां; एखाद्याच्या नांवानें-तर्फें-आश्र- यानें, मार्गदर्शकत्वाखालीं; वतीनें. 'मला न फावल्यास मी आपल्या अंगत्वानें दुसरा कोणी पाठवीन.' ॰दट-वि. १ अंगास घट्ट बसणारें, दाटणारें. २दृढ; बळकट. 'आत्मविषयीं आंतुवट । साधन जें आंगदट ।।' -ज्ञा १६.४५. -पु. (कर्ना.) अंगर- ख्याच्या आंत घालावयाची कोपरी. [सं. अंग + दृढ] ॰देण्या- वि. प्रत्यक्ष शेत कसणारा शेतकरी; शारीरिक श्रम करणारा पक्ष. ॰देवता-स्त्री. उपदेवता (कर्मांतील जी मुख्य देवता तिच्या अंगभूत असणारी). २ (ल.) सेवक; चाकर; भोंवतालची मंडळी. [सं.] ॰धट-वि. उद्धट; असभ्य; शिरजोर. [अंग + धुष्ट] ॰ध(धि)टाई-स्त्री. १ केवळ शारीरिक बळ. पाशवी बळ, शक्ति (चातुर्य, युक्ति यांच्या विरुद्ध). २ रानटी जुलूम; आंग- मर्दी. ॰धार-आंगधार पहा. ॰धुणें-न. १ (बायकी) स्नान; अंघोळ. २ (व.) न्हाणीघर. ॰न्यास-पु. देवतास्थापनेच्या वेळीं, धर्मविधि करतांना निरनिराळे मंत्र म्हणून देवतेच्या प्रतिमेला ६ किंवा १६ स्थानीं स्पर्श करावयाचा विधि; संध्या वगैरे कर- तांना स्वतःच्या शरीराच्या निरनिराळ्या स्थानीं स्पर्श करावयाचें कर्म. [सं.] ॰परिवर्तन-न. उलटें करणें (शरीर इ॰); एका बाजूवरून दुसर्या बाजूला वळणें. 'आषाढमासीं शयन ।भाद्रपद- मासीं अंगपरिवर्तन । कार्तिकीं उद्बोधन ।' [सं.] ॰पात-पु. १शरीराचा र्हास; लुकडेपणा; क्षीणता. २ (कड्यावरून) स्वतःस खालीं लोटून घेणें. ३ शरीरास किंवा एखाद्या अवयवास पक्षघात होणें. ४ अंग बाहेर येणें (गुह्येंद्रियाचा भाग). [सं.] ॰पांथी- स्त्री. खासगत वांटा; सरकतीच्या व्यवहारांत सावकारानें आपली सरकत ठेवली असतां सावकारीचे पांथीहून निराळी सरकतीसंबंधें जी त्याची नफ्याची पांथी असते ती. २ अंगवांटा. [अंग + पंक्ती] ॰पिळा-मोड-पु. अंगादिक पिळणें; आळस आला असतां किंवा भूतसंचारामुळें अंगास दिले जाणारे आळेपिळे; आळोखेपिळोखे; तापानें अंग कसकसणें. ॰पीडा-बाधा-स्त्री. नैसर्गिक विकार; शरीरास जडलेली व्याधि किंवा रोग (भूत- पीडेच्या उलट). [सं.] ॰प्रत्यंग-न. अवयवांसकट शरीर; पूर्ण शरीर. [सं.] ॰प्रस्थान-न. प्रत्यक्ष प्रवासास निघण्यापूर्वीं एखाद्या शुभ मुहुर्त साधण्यासाठीं आपलें घर सोडून जवळपास दुसर्याच्या घरीं स्वतः रहावयास जाणें. [सं.] ॰बल न. शारी- रिक शक्ति; ताकद; अंगधटाई. 'अवनीतीनें वर्तो नये । आंग- बळें ।' -दा २.२.२२. [सं.] ॰बांधा-पु. शरीराची ठेवण. ॰भंग-पु. १ अंगाचे सांधे धरणें; अशक्तपणा वाटणें. २ अंग- विक्षेप; शरीराचे निरनिराळे चाळे, हावभाव, चेष्टा. 'अंगभंग बहु दाविती रंगीं । रामरंग सुखसिंधु तरंगीं ।' ॰भंगवात-पु. अंगभंग रोग; ज्यामुळें हा रोग होतो तो वातदोष. ॰भर-भार-क्रिवि. शरीराच्छादनापुरतें (वस्त्र). 'अंगभर वस्त्र, पोटभर अन्न.' -पु. (ल.) शक्ति; जोर. 'एर्हवीं प्राप्तें मतांतरें । थातंबूनि आंगभरें ।' -ज्ञा १३.३१८. ॰भर होणें-(ना.) १ फजिती ॰उडणें. २भार होणें. ॰भा-स्त्री. अंगकांति. 'अंगभा विलोकितां तटस्थ जाहली सभा ।' -(अनंत) सीतास्वयंवर ८९. ॰भूत- वि. एखाद्या वस्तूचा भाग, अंश; अवलंबी; समाविष्ट; तदंत- र्गत; संबंधीं; आश्रयी. 'सीमंतपूजन हें विवाहाचें अंगभूत होय.' 'ज्वराच्या अंगभूत अरुचि असतेच.' [सं.] ॰मर्दन- न. अंग रगडणें; चंपी; मालिश. [सं.] ॰मर्दाई-मर्दी-स्त्री. पौरुष; शक्ति; केवळ शारीरिक बळ; अंगधटाई. [सं. अंग + फा. मर्दी = पौरुष] ॰मस्ती-पाशवी शक्ति; दांडगाई; उद्धटपणा. [सं. अंग + फा. मस्ती = दांडगाई] ॰मार्दव न. शरीराचा नाजूकपणा. [सं.] ॰मास-न. (व्यापकपणें) शरीर या अर्थीं 'माझें अंगमास दुखतें.' 'तिचें अंगमास शेकलें पाहिजे.' ॰मेह- नत-स्त्री. शारीरिक श्रम; प्रत्यक्ष कष्ट. [सं. अंग + अर. मिहनत् = श्रम, कष्ट] ॰मेहनती-त्या-वि. शारीरिक कष्ट करून पोट भरणारा; कष्टाळू; पोषाखीच्या उलट. २स्वतःशेत कसणारा; शेतकरी. ॰मेळ-पु. अंगसंग; संबंध. 'तियेचेनि अंगमेळें ।' -विपू १.१०३. [अंग + मिळणें] ॰मोड-स्त्री. अतिशय मेह- नत करणें; कष्ट करणें; सक्त मेहनत. ॰मोडा-पु. १ आळेपिळे (आळस घालविण्यासाठीं). (क्रि॰ देणें.) 'निद्रेनें व्यापिली काया ।आळस आंगमोडे जांभया ।' -दा १८.९.२. २ ताप भरण्यापूर्वीं अंग कसकसणें; अंग मोडून येणें. (अव. अंगमोडे. 'अंगमोडे येऊं लागले.' [अंग + मोडणें; बं. अंगमोडा] ॰यष्टी-रचना-स्त्री. शरीराचा बांधा, ठेवण. [सं.] ॰रस- पु. वनस्पतीच्या पानांचा, पाणी न घालतां काढलेला रस; आप- रस पहा. [सं-] ॰राख्या-वि. अंग राखून काम करणारा (आळसामुळें, अप्रामाणिकपणानें); अंगचोर; चुकार. ॰राग- पु. १ सुंगधी उटणें; उटी; लेप; चोपडण 'श्रमघर्मानें रणिं वीरांचा अंगराग पसरला ।' -सुसु नाटक २१. २ उटीचें द्रव्य (अरगजा, केशर, इ॰). [सं.] ॰रेटा-पु. अंगानें दिलेला, शरीरानें दिलेला धक्का, ठोसा. 'गाड्यास अंगरेटा दे म्हणजे चालता होईल.' [अंग + रेटणें] ॰रेटाई-स्त्री. अंगाची धक्का- बुक्की; मस्ती; ठोसेठोशी; अंगधटाई. ॰रोग-पु. शरीरास होणारा स्वाभाविक रोग (पिशाच्चबाधेनें किंवा देवतापराधानें न होणारा). ॰लग-वि. १ (जात, मैत्री, नोकरी इ॰ संबंधानें) जडलेला; संबंधीं; संबंध असलेला. २ जिव्हाळ्याचा; जवळचा; -पु. १ नातेवाईक; स्नेही. 'तुझा पिता तरी विरोचन । तो आमुचा अंगलग जाण ।' -कथा २.६.८८. 'अवघे अंगलग तुझे वधियेले वीर ।' -तुगा ३९२. २ समागम. 'संताचेनि अंगलगें । पापातें जिणणें गंगें ।' -ज्ञा १२.१७७. ३ आश्रय; साहाय्य. 'परब्रह्मींचेंनि अंगलगें । सृष्ट्यादि कार्य माया करूं लागे।' -विउ ११.१६. 'देवा मंदराचेनि अंगलगें ।' -ज्ञा ११. २५७. ॰लट-लोट-वटा-वठा-स्त्री. पु शरीराची ठेवण, कांति, तेज. अंगकाठी पहा. 'तेची अंगलट गोरी आसा' 'माझी आंगलट त्यावेळीं कांहींशीं पातळ होती' -विवि ११.८.२०४. [सं. अंगयष्टिः; प्रा. अंगलठ्ठी-अंग लट; किंवा अंग + लोष्ट] ॰लट घेणें-स्वतः होऊन जबाबदारी पत्करणें. ॰लट येणें- १ अंगास चिकटणें; तोट्यांत येणें. २ अंगाला चिकटणें; धक्काबुक्की करणें; खोडी काढणें. (अंगलट जाणें असाहि प्रयोग आढळतो). ॰लीन- वि. अंगांत मुरलेलें; शरीरांत गुप्त असलेलें. 'सद्वैद्यें जैसें दोषा । अंगलीना ।' -ज्ञा १६.४२. ॰लेणें-न. अंगावरचा दागिना; अलंकार. 'नाना अळंकार अंगलेणीं ।' -सप्र २.५. ॰लोट १ अंगलट पहा. २ अंगभार; अंगाचें वजन, पतन. 'मस्तकीं वाहती करुनि मोट ।भूमीं टाकिती जैसा घट । तळीं पाषाण होती पिष्ट । आंगलोटें दोघांच्या ।।' -मुसभा ७.३२. ॰वख-पु. अंगप्रदेश. 'जलतेया गिरिचेया आंगवखां ।' -राज्ञा ११.४२०. [अंग + वक्ष?] ॰वटा-क्रिवि.स्वाधीन. [अंग + वत्] ॰व (वा)टा-शेतांत उत्पन्न झालेल्या मालाच्या तीन (शेतमालक, बैल-नांगर मालक व शेत कसणारा) वांट्यांपैकीं शेत कसणार्याचा वांटा. [अंग + वाटा] ॰वण-स्त्री. १ सरा- वाच्या योगानें आलेली योग्यता; संपादन केलेली कार्यक्षमता; वाकबगारी. ' ऐसी अंगवण नाहीं मज देवा । '-तुगा ४४९५. 'वातात्मजासि म्हणे यदुनंदन । जरी तुज असेल आंगवण । यांतून एक स्त्रीरत्न । तुवां घ्यावें स्वेच्छेनें ।।' -जै ११.६. २ पराक्रम; शौर्य; जोर; उत्साह. (व.) खटपट; प्रयत्न. आंगवन असाहि प्रयोग. 'जळो तुमचें दादुलेपण । नपूंसकाहूनि हीन । वृथा गेली आंगवण । काय वदन दावितां ।।' -एरुस्व ८.६. ' नीलजां कैची आंगवण ।।' -उषा १४२३. ३ शरीरावस्था. 'तंव भीम- सेनाची आंगवण ।। कृष्णधर्म पाहाती ।' -जै ६.७०. ४ देवीचा वण; तीळ; चट्टा. (क्रि ॰ पडणें, उठणें, येणें, जाणें ). ५ उपा- सना; भक्ति; (गो.) (देवाला केलेला ) नवस. 'कीं वीरश्रीची धरितां अंगवण । प्रताप विशेष वाढे पै ।' -रावि ११.६. ६ सराव; नित्यक्रम; वहिवाट. 'ऐसें करितां पापाचरण । तयासी आलें वृद्धपण । पुत्र जाहाले अति दारुण । तरी आंगवण न सांडी ।।' -रावि १.१११. ७(ल.) साहाय्य; मदत. 'या परी चतुरंग- सेना । मिसळली रणकंदना । आपुलालिया अंगवणा । गज रथ रणा आणिती' -एभा ३०.११७. ८ द्वंद्व युद्ध; झुंज. ' तेआं भीड भीमसेना । जुंझतां बहुती आंगवणा । परतिजे ऐसी हांव कह्वणा । उपजेचिना ।।' -शिशु ८७८.[अंगवलन किंवा अंगापण-अंगा- वण] ॰वणा-वि. शूर. 'तो अक्रूर आंगवणा पुढां चाले ।' -शिशु ५४५. ॰वत-सामर्थ्य; अभिमान. 'आतां हा जळता वारा कें वेंटाळे । कोणाही विषा भरलें गगन गिळे । महाकालेंसि खेळें । आंगवत असे' -ज्ञा ११. ४०५ ॰वला-वि. जवळचा; अनुकूल; स्वाधीन. ॰वसा-(झाडाचें) साल, पाला, शेंडा. 'अशोकाचे अंगवसे । चघळिले कर्हेनि जैसे ।' -ज्ञा ११. ४१४. ॰वसें-न. रूप. ? -मनको. ॰वस्त्र-न. १ उपरणें; उत्तरीय; उपवस्त्र. ' नुसत्या अंगवस्त्रानिशीं तो घराबाहेर पडला.'२ लंगोटी (गौरवार्थी). [सं.] ३ (ल.) प्रेमपात्र; ठेवलेली स्त्री; रखेली; उपस्त्री. [अंगना + उपस्त्री = आंगोवस्त्रि-आंगोवस्त्र असा हा शब्द बनला आहे. वस्त्र (कपडा) याशीं याचा कांहीं संबंध नाहीं असें राजवाडे म्हणतात-भाअ १८३२ ] 'मला तर असें आठवतें आहेकीं, त्या वेळच्या खाजगी शाळेच्या एका मास्त- रास सकाळची शाळा असतां शाळेंतील विद्यार्थी त्याच्या आंग- वस्त्राच्या घरांतून कित्येकदां बोलावून आणत असत !' -टि ४. २९१. वाप्र. एका अंगवस्त्रानें निघणें-भाऊबंदांशीं बेबनाव होऊन एक उपरण्यानिशीं कांही एक तनसडी न घेतां घराबाहेर निघणें. ॰वळ-पु. आगवळ, आगूळ. अगवळ पहा. -नागा १२८. (-शर) ॰वळण- पु. अंगलट; अंगाची, शरीराची ठेवण. ॰वळणीं पडणें-सरावाचें होणें (हा शब्द प्रथमा विभक्तींत क्वचित योजितात). 'जी भाषा आम्ही...बोलतो त्यांतील शब्दांचे उच्चार आमच्या आंगवळणीं पडलें असल्यामुळें...' -टि ४. ४०१. ॰वळा-पु १ अंगाचे आळेपिळे; आळसामुलें येणारी जांभई. अंगपिळा पहा. २ मुलांची चळवळ. ३ सांगाती, सोबती; संबंधी; सहवासी. 'नित्य त्या सेवकाजवळा । अंगें अंग- वळा तूं होशी ।' -एभा ६३९४. ४ अंगकाठी. ॰वळेकार-वि. भारी; शक्तिमान्. 'सेजवळ सहवासी । आंगवळे-कारूं विश्वासी ।' -शिशु ५०५. ॰वाटा-पु. १ अंगवटा पहा. २ (व्यापारधंदा) भांडवल उभारल्याखेरीज प्रत्यक्ष काम करणा- राचा वांटा. ३ अंगपांथी पहा. ॰वाटेकरी-पु. अंगवाटा घेणारा. ॰वाण-पु. (कु.) नवस 'देवाक आंगवाण केली हा.' [अंग + वाणी] ॰वात-पु. चालतांना वेगानें उत्पन्न होणारा वारा; अंगवारा; गतिमान् वस्तूपासून उत्पन्न होणारा वायू. ॰वाला- वि. (गो.) अंगांत घालण्याचा; आंगाचें. ॰विकार-विकृति- पु. स्त्री. शारीरिक रोग. ॰विक्षेप-पु. हावभाव; अभिनय; चाळा; अंगचेष्टा; हातवारे. [सं.] ॰वृद्धि-स्त्री. शरीराची वाढ (रोगामुळें झालेली-अंतर्गळ, अंडवृद्धि; इ॰). [सं.] ॰वेग- पु. १ शरीराचा वेग; चालण्याचा जोर अंगवात. २ शरीर वाढत असतांना त्याला आंतून मिळणारा जोर. ॰वैकल्प-न. १ शरी- राचा अधूपणा; लुळेपणा; व्यंग. २(ल.) (धार्मिक विधींतील महत्त्वाचा भाग गाळल्यामुळें) येणारी न्यूनता; अपूर्णता; दोष; वैगुण्य. ॰श:-क्रिवि. एकेक भाग घेऊन; भागशः; खंडशः. ॰शैंथिल्य-न. शरीराचा ढिलेपणा; थलथलीतपणा; मांद्य (अंग- दार्ढ्य याच्या उलट). ॰संकोच-पु. १ शरीराचें आकुंचन; अंग चोरणें. 'किं अंगसंकोचें पारधी । टपोनि तत्काळ मृग साधी ।' २ आकुंचनाची स्थिति; आकुंचन; संकुचितपणा. [सं.] ॰संग-पु. १ शरीराचा संयोग, मीलन; अंगस्पर्श. 'दीपाचिया अंगसंगा । कोण सुख आहे पतंगा ।' -एभा ८.७४. 'दुरून बोल, अंगसंग कामाचा नाहीं.' २ संभोग; मैथुन; रतिसुख. 'घडे भक्ति जैसी मनाच्या प्रसंगें । न. साधे तसी माझ्या अंगसंगें ।' ३ हातघाई; अंगलट; लठ्ठालठ्ठी; कुस्ती. [सं.] ॰सफाई-स्त्री. शरीराची अथवा कामाची चपळाई; अंगचापल्य. [सं. अंग + फा. सफाई] ॰सरकती-पु. अंगवांटेकरी पहा. ॰संस्कार- पु. १ अभ्यंगस्नान वगैरे; शरीरावर संस्कार. २ अंगस्पर्श; शरीरसंयोग. [सं.] ॰सामर्थ्य-न. शारीरिक बळ; अंगजोर. [सं.] ॰साळ्या-वि. नाणें पाडण्याचें काम न करतां इतर कामें करणारा सोनार. (टंकसाळ्याच्या विरुद्ध). अकसाळ्या पहा. ॰सिक-न. अंगावरील वस्त्र. 'आंगसिकें वेढुं भणौनि । सर्वज्ञांचीं ।।' -ॠ ७०. 'आंगसीकें दिह्नली उदारें । भणे कवी भास्करू ।।' -शिशु २३२. ॰सुख-न. रतिसुख; संभोगसुख. 'द्यावा निजांगसुख लाभ वधूजनांतें ।' [सं.] ॰सुटका-स्त्री. १ एखाद्या संकटांतून किंवा आडचणींतून कांहीं नुकसान किंवा इजा न होतां सुटणें. २ मुक्तता. 'हेंकाम मी पतकरलें आहे यांतून माझी अंगसुटका झाल्याशिवाय तुम्हांकडे कसा येऊं?' ॰सुस्ती-स्त्री. शरीरमांद्य; जाड्य. ॰सूट-वि. चपळ; हलक्या अंगाचा; सुटसुटीत; मोकळा. ॰सौष्ठव-न. शरीराचा बांधे- सूदपणा; सौंदर्य. [सं.] ॰स्तनें-न. लेंकरूं. -शर? ॰स्वभाव- पु. जन्मजात अथवा उपजत स्वभाव; नैसर्गिक वृत्ति. [सं.] ॰हार-पु. (नृत्य) सहा किंवा सहापेक्षां जास्त करणांचा समु- दाय. हे अंगहार ३२ आहेत:-स्थिरहस्त; पर्यस्तक; सूचीविद्ध; अपविद्ध; आक्षिप्त; उद्धट्टित; विष्कंभ; अपराजित; विष्कंभापसृत; मत्ताक्रीड; स्वस्तिकरेचित; पार्श्वस्वस्तिक; वृश्चिकापसृत; भ्रमर; मत्तस्खलित; मदाद्विलसित; गतिमंडल; परिच्छिन्न; परिवृत्त; वैशाख रेचित; परावृत्त; अलातक; पार्श्वच्छेद; विद्युद्भांत; उद्वृत्तक; आलीढ; रेचित; आच्छुरित; आक्षिप्तरेचित; संभ्रांत; अपसर्प व अर्धनिकुट्टक. ॰हीन-वि. व्यंग; न्यून; अपूर्ण; अवयवरहित (शरीर). 'कां अंगहीन भांडावें । रथाची गति ।।' -ज्ञा १७. ३८९. -पु. मदन. -स्त्री. वेश्या; पण्यांगना. 'अंगहीन पडपे । जियापरी ।' -ज्ञा १७.२५६.
आधिव्याधि
स्त्री. मानसिक व शारीरिक दुःख. [आधि + व्याधि]
आधिव्याधि, आधिव्याधी
स्त्री. मानसिक व शारीरिक दुःख. [सं.]
अध्यात्म
न. १. आत्म्याबद्दलचे ज्ञान; ब्रह्मज्ञान; अधिभूतापासून परिणाम पावलेली भावना; सामर्थ्य; वेदान्त : ‘तेथ अध्यात्माचे नवलपण पुरे ।’ – ज्ञा ७·१७७. २. शरीरस्थित त्वंपदवाच्य आत्मा. ३. प्रत्येक वस्तूचा स्वतःचा मूळ भाव (स्वभाव). ४. परमात्म्यासंबंधी निरूपण. वि. १. आत्मविषयक; आत्म्यासंबंधी; आत्म्याबद्दलचे; शारीरिक; शरीर, इंद्रिये व प्राण यांपासून होणारे : ‘तैसे अधिभूताधिदेवां । अध्यात्मादि उपद्रवां । पातलेया पांडवा । गिळूनि घाली ॥’ –ज्ञा १६·१९५. २. अध्यात्मासंबंधी; वेदान्तविषयक. [सं.]
अध्यात्म
न. १ आत्म्याबद्दलचें ज्ञान; ब्रह्मज्ञान; अधिभूतापासून परिणाम पावलेली भावना, सामर्थ्य; वेदांत. 'तेथ अध्यात्म्या नवलपण पुरे ।' -ज्ञा ७.१७७; 'येरवीं देवर्षिही अध्यात्मगातां ।' -ज्ञा १०.१५७. २ शरीरस्थित (त्वंपदवाच्य) आत्मा. ३ प्रत्येक वस्तूचा स्वत:चा जो मूळ भाव (स्वभाव). ४ परमात्म्यासंबंधी निरूपण. 'आज पुराणांत कथा नव्हती अ॰च निघालें. '-वि. १ आत्मविषयक;आत्म्यासंबंधी;. आत्म्याबद्दलचें; शारीरिक; शरीर, इंद्रियें व प्राण यांपासून होणारें. 'तैसें अधिभूताधिदैवां । अध्या- त्मादि उपद्रवां । पातलेया पांडवा । गिळूनि घाली ।।' -ज्ञा १६. १९५ २ अध्मात्मासंबंधी; वेदांतविषयक. [सं.] ॰विद्या- शास्त्र-ज्ञान-वेदांतशास्त्र; ब्रह्मविद्या; उपनिषदांत सांगितलेलें ज्ञान [सं.]
आघाती मनोविकृती
स्त्री. (समाज.) शारीरिक अथवा मानसिक आघात, अपघात इत्यादीमुळे निर्माण होणारी मनाची विकृत अवस्था.
अखोरी
वि. १. न खोरलेला; न खोदलेला : ‘अखोरी अबोटी जन्म परमेश्वरासि देयावे ॥’ चक्रसू २९·२२३. २. राखेने झाकलेल्या अग्नीप्रमाणे; अप्रज्वलित. ३. (ल.) शारीरिक विकाराची सेवना न करता. [क. अक्कुलिसु]
अनुभाव
पु. १. योग्यता; मान्यता; प्रभाव; माहात्म्य; अधिकार; सामर्थ्य; मोठेपणा. २. (साहित्य) एकभाव; आंतरिक भावावस्थेचा शारीरिक आविष्कार. उदा. भ्रूभंग; मनोवस्थेची बाह्य चिन्हे; आविर्भाव. पहा : भाव; २. तेज; कांती; शौर्य; वैभव. [सं.] अनुभाविक
अनुनाद
पु. १. प्रतिध्वनी. २. (भावनिक) आवेगामुळे शारीरिक क्रियांमध्ये होणारी गुंतागुंत व तज्जन्य ध्वनी. ३. तोंड किंवा स्वररज्जूंच्या हालचाली आणि नाकपुडीतून येणारा ध्वनी; यातून निर्माण होणारा आवाज; आवाजाचा खणखणीतपणा. [सं.]
अंगबल
न. शारीरिक शक्ती; ताकद; अंगधिटाई : ‘अवनीतीने वर्तो नये । आंगबळें ।’ – दास २·२·२२. [सं.]
अंगभोग
पु. शारीरिक उपचार, नितणे. २. उपभोग; भोजन : ‘मनाचा प्रसाद तुजलागी केला । अंगभोग अपुला घेउनि राहे’ – नाम १४८२.
अंगदेण्या
वि. प्रत्यक्ष शेत करणारा शेतकरी; शारीरिक श्रम करणारा वर्ग.
अंगधिटाई
स्त्री. १. केवळ शारीरिक बळ; पाशवी बळ, शक्ती (चातुर्य, युक्ती यांच्या विरुद्ध). २. रानटी जुलूम.
अंगिक
वि. १ अंगासंबंधीं; शारीरिक. २ अंगचें; स्वभा- विक. अंगभूत 'जयाचेनि आगिकें तेजें ।' -ज्ञा ६. ११०. -न. शरीरावयव; अंगुलि. 'कीं अंगिका अंगुष्टद्वया जवळें । गर्भिचेया लावण्या आठांगुळें ।' -ॠ ८७. २ सामर्थ्य; बल. 'जे आपुलेनि आंगिकें । त्रिविधपणाचेनि अंकें ।' -ज्ञा १८. ५२४. ३ अंगचा स्वभाव. 'हिंवलीं जैसी आंगिकें । हिंवों नेदी निजांग ।' -ज्ञा १७. २२९. ॰पण-१ स्वभावधर्म. 'कोण्ही म्हणती साय जैसी दुधावरी । तैसी ब्रह्मीं मायेची असे उजरी । क्षणें लपे क्षणें प्रगटे साईचें परी । आंगींच्या अंगिकपणें ।।' -स्वानुदिन १३.१.५६. ॰भाव-पु. १ शरीराची आकृति, ठब; आकार; ठेवण. 'स्मृति तेचि अवयव । देखा अंगीकभाव ।' -ज्ञा १.४२. २ सामर्थ्य.
अंगिक
वि. १. अंगासंबंधी; शारीरिक. २. अंगचे; स्वाभाविक; अंगभूत : ‘जयाचेनि आंगिके तेजें ।’ – ज्ञा ६·११०.
आंगकीर्तीचा
वि. शारीरिक. (गो.)
आंगकीर्तीचा
वि. (गो.) शारीरिक. [सं. अंग + कीर्ति]
अंगकष्ट
पु. शारीरिक श्रम. [सं.]
अंगमेहनत
स्त्री. शारीरिक श्रम; कष्ट.
अंगमेहनती, अंगमेहनत्या
वि. १. शारीरिक कष्ट करून पोट भरणारा; कष्टाळू. २. स्वतः शेत कसणारा; शेतकरी.
अंगमर्दाई, अंगमर्दी
स्त्री. पौरुष; शक्ती; केवळ शारीरिक बळ; अंगधटाई.
अंगसामर्थ्य
न. शारीरिक बळ; अंगजोर. [सं.]
अंगविकार
पु. शारीरिक रोग. [सं.]
अंगविकृति, अंगविकृती
स्त्री. शारीरिक दोष, व्यंग. [सं.]
अस्वास्थ्य
न. १ स्वास्थ्याचा अभाव; असमाधान; असं- तोष; असुख. २ शारीरिक व्याधि किंवा विकृति; प्रकृति बरी नसणें. ३निर्धनता; दारिद्रय. [सं.]
अस्वास्थ्य
न. १. स्वास्थ्याचा अभाव; असमाधान; असंतोष; असुख. २. शारीरिक व्याधी किंवा विकृती; प्रकृती बरी नसणे. [सं.]
आत्मपीडानंद
पु. (वै.) स्वतःला होणाऱ्या शारीरिक अथवा मानसिक वेदनांतून आनंद उपभोगण्याची प्रवृत्ती. एक मानसिक विकृती. [सं.]
आत्मसुख
न. १. स्वतःचे (शारीरिक किंवा मानसिक) सुख; आपल्या ठिकाणीच सुख. २. ब्रह्मज्ञानापासून होणारे सुख.
अवलक्षणी
वि. १ दुर्गुणी; खोडसाळ. २ अरिष्टकारक; दुश्विन्हाचें; अवकृपेचें; औप्तातिक. ३ शारीरिक व्यंग असलेला; कुरूप; विद्रूप. [सं.]
अवलक्षणी
वि. १. दुर्गुणी; खोडसाळ. २. अरिष्टकारक; दुश्चिन्हाचे; अवकृपेचे; औत्पातिक. ३. शारीरिक व्यंग असलेला; कुरूप; विद्रूप. [सं.]
अवशिष्ट बेकारी
स्त्री. (अर्थ.) शारीरिक किंवा मानसिक दुर्बलतेमुळे येणारी बेकारीची परिस्थिती.
बाहु
१ सबंध हात; भुज. २ वरचा हात; दंड. ३ सरळ- रेषांनीं बनलेल्या आकृतीची बाजू; बहुकोणाची बाजू. ४ काटकोन त्रिकोणाचा पाया. ५ भुज शब्द अर्थ ५ पहा. ६ (नृत्य.) खांद्यापासून मनगटापर्यंतचा भाग. नृत्यामध्यें बाहूच्या योगानें केले जाणारे पुढील दहा अभिनय सांगितले आहेत- १ अधोमुख, २ ऊर्ध्व- संस्थ, ३ तिर्य्क, ४ अंचित, ५ अपविरुद्ध, ६ प्रसारित, ७ स्वस्तिक, ८ उद्वेष्टित, ९ मंडळगति व १० पृष्ठानुसारी. [सं.] ॰ज-पु. क्षत्रिया. 'प्रभु बाहुजकुलमाणि ।' -आय २८. [वै. 'बाहूराजन्यःकृतः ।' -ऋग्वे १०.१०८.] ॰दंडपु. १ वरचा हात; दंड; २ सबंध हात. 'हीरांगदें शोभति बाहुदंडी ।' -सारुह ८.१५२. [सं.] ॰बल- बळ-न. शरीरसामर्थ्य; मनगटांतील ताकद-शक्ति; कपट, मंत्रतंत्र युक्ति इ॰ निरपेक्ष केवळ शारिरीक शक्ति. [सं.] ॰भूषण-न. दंडांत बांधण्याचा अलंकार. [सं.] ॰मूल-न. खाक; काख; बखोटा. [सं.] ॰युद्ध-न. द्वंद्वयुद्ध; मल्लयुद्ध; कुस्ती. [सं.] ॰वट-न. १ हात. -शर. २ दंडावरील दागिना. 'वांकि, बाहुवटें, बाजुबंद, बाळी ।' -आपू १८. ॰वीर्य-न. बाहुबल. [सं.] ॰स्फुरण- न. बाहूनां स्फुरण चढणें; हात शिवशिवणें (युद्धाकरतां इ॰). [सं.] बाहुटा-टी-पु. न. १ बाहुमूला(खाके) पासून कोपरा- पर्यंतचा हात. २ खांद्याच्या सांध्याचा भाग; बखोटा. ३ स्त्रियांचें एक बाहुभूषण; वांकी. बाहुळा-पु. (राजा.) बखोटा; बाव्हळा; बाहू-पु. हात; भुज. (अशुद्ध) बाहूझोंबी-स्त्री. द्वंद्वयुद्ध; कुस्ती. 'तुम्हीं बाहूझोंबी घेतां म्हणोन ।' -ह १९.१४०. बाहू- फुगणें-(एक शौर्याचें लक्षण) हात फुरफुरणें. बाहे-पु. १ बाहु; हात. 'सप्राणें आफळली बाहे ।' -उषा १४.१९. २ (ल.) आधार. 'मोडूनि श्रद्धेची बाहे ।' -ज्ञा १७.४१४.
भुज
पु. १ सगळा बाहु (खांद्यापासून हाताच्या बोटांच्या टोकांपर्यंत). २ भूमितीच्या बहुकोणी आकृतीची एक बाजू. ३ काटकोनत्रिकोणांत कर्ण आणि कोटि यांच्याशिवाय राहिलेली तिसरी बाजू. ४ दोन किंवा चार काटकोनांची भरती; तीन काट- कोनांची पुरवणी. ५ समवृत्ताच्या ध्रुवांतून जाणार्या मंडलाच्या धनुष्याची ज्या; ग्रहाचें समवृत्तापासून अंतर. ६ वळण; बांक. ७ राशिचक्रांत नव्वद अंश किंवा त्याहून कमी अंतर. ८ (सामा.) बाजू. [सं.] सामाशब्द- ॰ज्या-स्त्री. धनूची ज्या (इं.) साईन. [सं.] ॰दंड-पु. वरचा, अथवा सगळा बाहु. 'प्रचंड डावा भुजदंड भारी सव्यें करें थापटी कैठभारी ।' -वामन कालियामर्दन ४६. ॰बंध-पु. बाहुभूषण. [सं.] ॰प्रतिभुज-पु. चतुष्कोणांच्या दोन समोरासमोरच्या बाजू. [सं.] ॰बल-ळ-न. १ बाहूचें सामर्थ्य. २ शारीरिक बळ, शक्ति, युक्ती, कुशलता यांच्या उलट. 'भुजबळें त्राहाटून । उर्वीवरी झाडीत ।' ॰भोंवरी- स्त्री. घोड्याच्या खांद्यावरील केसाचा भोंवरा. -वि. खांद्या- वर भोंवरा असलेला (घोडा); खोडिलखांद. ॰वट-वटा-नपु. १ खांद्याचा सांधा. (क्रि॰ उखळणें, हिसकणें, दुखवणें) २ पाटणीच्या दोन कड्यांमध्ये बसवावयाची फळी. [भुज + वत्]
चाप
पु. १ कापसाचे गठ्ठे दाबांत घालण्याचें एक यंत्र. २ शारीरिक दुःख अगर तीव्र वेदना देणारें एक यंत्रसाधन (कान, अंड वगैरे ठिकाणीं लावतात). ३ (कु.) उंदरास दाबून मारण्याचा लोखंडी सांपळा. [सं. चप् = दाबणें] ॰लावणें-छळ करणें; गांजणूक करणें.
चाप
पु. १. कापसाचे गठ्ठे दाबात घालण्याचे एक यंत्र. २. शारीरिक दुःख अगर तीव्र वेदना देणारे यंत्रसाधन (कान, अंड वगैरे ठिकाणी लावतात). ३. उंदरास दाबून मारण्याचा लोखंडी सापळा. ४. मळसूत्र फिरवल्याने हवा दाब घालण्याचे साधन. [सं. चप्] (वा.) चाप लावणे – १.सापळ्यात अडकवणे : ‘कोमिन्टांग पक्षाला चाप लावण्यासाठी …’ – माओ १४३. २. चिमटा लावणे; छळ करणे : ‘रुपये बेजरब चापा लावून घ्यावे. मजुरी घ्यावी.’ – ऐको ३०४. ३. रचून ठेवणे. (कर.)
छळ
पु. १. त्रास; पीडा; शारीरिक वा मानसिक इजा पोचवणे; दुःख देणे; अत्याचार; जुलूम. २. कपट.
दाह
पु. १. जळण्याची, जाळण्याची क्रिया; दहन; जाळणे. २. रोगजन्य शारीरिक उष्णता; ताप; तलखी; जळजळ. ३. तीक्ष्ण व उष्ण मद्य प्राशन करण्याने होणारा, उष्णता उत्पन्न करणारा रोग. - योर १·७१४. ४. (ल.) संताप. ५. आग; भडका. [सं.]
दाह
पु. १ जाळण्याची, जळण्याची क्रिया; दहन; जाळणें. 'अग्निदाहो न संबवे ।' -ज्ञा २.१४६. 'प्रेताचा दाह केला आणि मग स्नान केलें.' २ रोगजन्य शारीरिक उष्णता; तप्तता; ताप; तलखी, जळजळ. 'ज्वरानें आज भारी दाह होतो.' 'दाह झाला म्हणजे मगजास किंवा मणक्याच्या रज्जूस विशेष चेतना होऊन हातपायांस आंचके येतात.' -बालरोगचिकत्सा १४. ३ तीक्ष्ण व उष्ण मद्य प्राशन करण्यानें होणारा, उष्णता उत्पन्न करणारा रोग. हा सात प्रकारचा आहे. यानें रक्त प्रकुपित होतें, अंग तापतें, तहान लागते, डोळे लाल होतात, अंगावर विस्तव पसरल्यासारखें वाटतें. -योर १.७१४. ४ (ल.) संताप. ५ आग; भडका. दाहा असें अशुद्ध रूपहि प्रचारांत आहे. [सं.] ॰जाळ-पु. उन्हाच्या झळी- मुळें प्रखरतेमुळें होणारा (शरीराचा) दाह; जळंजळ, आग. [सं. दाह + म. जाळ]
दैहिक
वि. देहासंबंधी; शारीरिक; कायिक. [सं.]
दैहिक
वि. देहासंबंधीं; शारीरिक; कायिक. [सं.]
दंड
पु. १ काठी; सोटा; छडी; सोडगा; दंडा. २ मार; शिक्षा (शारीरिक). ३ शिक्षा म्हणून घेतलेला पैसा; याचे राजदंड, ब्रह्मदंड जातिदंड असे तीन प्रकार आहेत. सरकारी न्यायपद्धतीनें गुन्हा शाबीत झाला म्हणजे शिक्षेदाखल सर कारांत भरावयास पैसा. ४ खांद्यापासून कोंपरापर्यंतचा हात. ५ केलेल्या, पाडलेल्या भागांच्या खुणांकरितां शेतांत किंवा बागांत घातलेला मातीचा उंचवटा; बांध; गडगा; पाणी जाण्यासाठीं दोहों बाजूंस उंचवटा करून पाडलेली सरी, पाट; (बे.) नदीकिनारा; कांठ; (वस्त्राचे) दोन तुकडे जोडण्याकरितां घात- लेली शिवण. (क्रि॰ घालणें). [प्रा. दंडी = जुन्या वस्त्राचा सांधा] ६ लांबी मोजण्याचें परिमाण, चार हातांची काठी. २००० दंड म्हणजे एक कोस. ७ वेळेचें परिमाण, चोवीस मिनिटें. ८ पैलवानांच्या व्यायामाचा एक प्रकार; जोर. 'आनंत्या नित्यनेम उठतो दंड सवाशें काढितो ।' -ऐपो ६७. (यावरून) एखादें कठिण काम अथवा प्रचंड उद्योग. (क्रि॰ काढणें; पेलणें). ९ क्रमानें उतार असलेली किंवा निमुळती पण लांबट टेंकडी, सोंड (पर्वताची). १० डोंग- राच्या माथ्यापासून पायथ्यापर्यंत असलेला उतार, ओघळ, अरुंद वाट; दंडवाट. ११ पर्वताच्या रांगेची एक लहान शाखा; डोंग- राच्या माथ्यापासून तों पायथ्यापर्यंत वांकडीतिकडी गेलेली खड- कांची ओळ. १२ (कवाईत वगैरे प्रसंगीं केलेला) सैन्याच्या रचनेचा एक प्रकार; रांग; फरा; व्यूह. 'तया दंडीं क्षोभलें । लोकत्रय ।' -ज्ञा १.१६५. १३ ताठ उभें राहण्याची अवस्था. १४ जिंकणें, ताब्यांत, कह्यांत आणणें. १५ अपराधाबद्दल शिक्षा म्हणून घेतलेलें द्रव्य, पैसा; जातींत परत घेण्यासाठीं दिलेलें प्रायश्चित्त. १६ रताळीं, ऊस इ॰ लाव- ण्याकरितां मातीचा केलेला लांबट उंचवटा, वरंबा. १७ तडाका. 'निंदा निस्तेज दंडी । कामलोभावर पडी ।' -ज्ञा १३.४९४. १८ हिंसा. 'ऐसा मनें देहें वाचा । सर्व संन्यासु दंडाचा ।' -ज्ञा १३.३१०. १९ पाठीचा कणा. 'माजी उभारलेनि दंडे । शिरकमल होय गाढें ।' -ज्ञा ६.२०२. [सं.] (वाप्र.) आवळणें, बांधणें, दंडाला काढण्या लावणें-चतुर्भुज करणें; कैद करणें. ॰थोपटणें-१ कुस्ती खेळण्यापूर्वीं दंड ठोकणें; कुस्तीस सिद्ध होणें. २ (ल.) साहसानें अथवा कोणासहि न जुमानतां एखादें कार्य करण्यास उभें राहणें. ॰थोपटून उभें राहणें-(ल.) वाग्युद्धास तयार होणें. ॰दरदरून फुगणें-आपल्याशीं कुस्तीला योग्य असा गडी पाहिला म्हणजे पहिलवानाचे दंड स्फुरण पावून फुगणें. ॰फुर- फुरणें-मारामारीची, कुस्तीची वगैरे उत्कट इच्छा होऊन दंड स्फुरण पावणें. भरणें-तालीम वगैरेमुळें दंड बळकट व जाड होणें. ॰भरणें-शिक्षेदाखल पैसा देणें. दंडास दंड लावून- घांसून-क्रिवि. बरोबरीच्या नात्यानें; सारख्या सन्मानानें. दंडाला माती लावणें-कुस्तीला तयार होणें (कुस्तीपूर्वी दंडास माती लावतात). दंडपासून साधित शब्द- दंडादंडी-स्त्री. मारामारी; काठ्यांची झोडपाझोडपी; कुस्ती; झोंबी. [दंड] दंडायमान-वि. १ (अखंडित काठीप्रमाणें) निर्मर्याद; अपार (वेळ, काळ). २ मध्यें पडलेला; आडवा पडलेला, पसरलेला. [सं.] दंडारणा-पु. सोटा; सोडगा; बडगा. -वि. जाड; स्थूल; घन (वस्तु); बळकट; मजबूत; जाड (मनुष्य, पशु). दंडारा-ळा-वि. (शिवण) ज्यास दंड घातला आहे असें; मध्यें शिवण असणारें (वस्त्र, कपडा). [दंड] दंडावणें-अक्रि. थंडीनें अथवा अवघड श्रमानें ताठणें (शरीर, अवयव). [दंड] दंडासन-न. आळसानें (जमीनीवर) पाय ताणून पसरणें, निजणें; सरळ हात- पाय पसरून आळसानें पडणें. (क्रि॰ घालणें). [सं. दंड + आसन] दंडार्ह-वि. दंड्य; दंड करण्यास योग्य. [सं.] दंडित-वि. १ शिक्षा केलेला. दंड केलेला. २ (ल.) निग्रह केलेला; वश केलेला; मारलेला; ताब्यांत आणलेला. [सं.] दंडिता-वि. १ शिक्षा करणारा; मारणारा; शिक्षा करितो तो. [सं.] दंडिया-पु. १ बारा ते पंधरा हात लांबीचें धोतर, लुगडें. २ बाजाराचा बंदो- बस्त करणारा छोटा अधिकारी; पोलीस मुकादम. [हिं.] दंडी- पु. १ दंड धारण करणारा; संन्याशी. २ द्वारपाल. ३ -स्त्री. अर्ध्या दंडापर्यंत बाह्या असणारी चोळी. [सं.] -वि. १ दंड धारण करणारा. २ दंड म्हणजे उभी जाड शिवण असलेला (कपडा). दंडी-स्त्री. मेण्यासारखें, चार माणसांनीं उचलावयाचें टोपलीचें वाहन. डोंगर चढतांना हींत मनुष्य बसतो व हमाल ही खांद्यावर वाहतात. [हि.] दंडुका-पुस्त्री. (काव्य) हाताचा पुढचा भाग. -मोको. दंडुका, दंडुकणें, दं(दां)डूक, दंडोका-पुन. सोटा; बडगा; दांडकें; काठी; लांकडाचा लहानसा जाड तुकडा; शिपायाच्या हातांतील सोटा. [सं. दंड] दंडुकेशाही-स्त्री. मारहाण किंवा जुलूम करून अंमलगाज विण्याची पध्दति; पाशवी बल; दांडगाई. 'पोलिसांची दंडुकेशाही अलीकडे फारच बोकाळली आहे.' -केसरी १६-४-३०. दंडुक्या- वि. काठीनें मार देण्यास संवकलेला; दांडगा; जबरदस्त. दंडेरा- वि. दंडारा पहा. दंडेल-ली-वि. दांडगा; अरेराव; अडदांड; झोंड; मुख्यत्वें, जो कर्ज परत फेडण्यास नाकबूल असतो तो; दंडुक्या (मनुष्य). दंडेली-स्त्री. अरेरावीची वर्तणूक; दंडेलपणा; दांडगाई; जबरदस्ती; अन्याय; सामर्थ्याचा दुरुपयोग (मुख्यत्वें देणें न देण्यासंबंधीं). दंड्य-वि. १ शिक्षा करण्यास योग्य. २ दंड करण्यास योग्य. [सं.] दंड्याप्रमाणें-क्रिवि. शिरस्त्याप्रमाणें. सामाशब्द- ॰थडक-स्त्री. खांद्याच्या बाहेरच्या भागानें केलेला आघात. [सं. दंड + थडक] ॰दास-पु. दंडाबद्दल गुलाम होऊन राहिलेला मनुष्य. [सं.] ॰धारी-पु. यम. 'नुपेक्षी कदां कोपल्या दंडधारी ।' -राम २७. -वि. १ हातांत काठी असलेला. २ (ल.) संन्यासी. ॰नायक-पु. कोतवाल; पोलिसांचा अधिकारी. 'सवे सारीतु पातीनिलें । दंडनायका पाशीं ।' -शिशु ५०४. ॰नीति- स्त्री. १ नीतिशस्त्र; नीति; संसारांतील वर्तुणुकीचे आणि व्यवहाराचे कायदे, नियम. यालाच दंडनीति, अर्थशास्त्र, व्यवहारशास्त्र, दृष्टार्थ- शास्त्र, हे जवळजवळ पर्यायशब्द आहेत. २ (कायदा) शिक्षा करून दाबांत ठेवण्याचें शास्त्र. हें राजनीतीच्या चार भागांपैकी चवथें होय. ३ अर्थशास्त्र, आन्वीक्षिकी पहा. [सं.] ॰पत्र-न. न्यायांत खोटा ठरला म्हणजे त्यापासून दंड घेण्याचें पत्र. [सं.] ॰पक्ष (करण)-न. (नृत्य) पाय ऊर्ध्वजानु करणें व त्यावर उजवा हात लताख्य करीत राहणें. [सं.] ॰संयुतहस्त-पु. (नृत्य) हात हंसपक्ष करून बाहू पसरून एका हातानें दुसर्या हातास एकदां कनिष्ठिकेपासून आरंभ करून आंतील बाजूनें बाहेरच्या बाजूस विळखा घालणें; नंतर कनिष्ठिकेपासूनच पण बाहेरील बाजूनें प्रारंभ करून आंतील बाजूस विळखा घालणें. [सं.] ॰पाणी-पु. शिव; यम. -वि. ज्याच्या हातांत दंड आहे असा; धट्टाकट्टा व दांडगा; गलेलठ्ठ व झोंड; आडदांड. [सं.] ॰पाद-(आकाशी, चारी)- वि. (नृत्य) नूपुरपाय पुढें पसरून क्षिप्त करणें म्हणजे कुंचित पाय उचलून दुसर्या पायाच्या बाहेरील बाजूस पोटर्यांचें स्वस्तिक होईल अशा प्रकारें टांचेच्या भारावर टेकणें व मग तें स्वस्तिकां- तील पाऊल उचलून पसरणें व खालीं टाकतांना अंचित करून दुसर्या पायांत अडकविणें. [सं.] ॰पारुष्य-न. १ कडक, कठोर शिक्षा. २ काठीनें हल्ला करणें; छड्या मारणें; ठोंसे देणें; मारणें (हात, पाय, शास्त्र इ॰ कांनीं). ३ (कायदा) हल्ला; भय प्रदर्शक रीतीनें हात किंवा काठी उगारणें, मारणें. [सं.] ॰पूपिकान्याय-पु. (उंदरानें काठी नेली त्या अर्थीं तिला बांधलेली पोळी खाल्ली हें उघडच होय यावरून) कार्यकारण, अंगउपांग, प्रधानअप्रधान यांचा न्याय; ओघाओघानेंच प्राप्त झालेली गोष्ट. उदा॰ राजाचा जय झाल्यानंतर त्याच्या सेनेचा जय अर्थांतच दंडपूपिकान्यायानें होतो. [सं. दंड = काठी + पूपिका = पोळी + न्याय] ॰प्रणाम-पु. साष्टांग नमस्कार;;लोटांगण. 'दंड प्रणाम करोनिया ।' -गुच ९.९. ॰प्राय-वि. दंडासारखा; साष्टांग (नमस्कार). 'करी दंडप्राय नमन ।' -गुच ४१.१४. ॰फुगडी- स्त्री. (मुलींचा खेळ) परस्परांच्या दंडांना (किंवा खांद्यांना) धरून उभ्यानें फुगडी खेळण्याचा एक प्रकार. [दंड + फुगडी] फुगई- फु(पु)रोई-स्त्री. १ दंडासाठीं केलेली जप्ती; दंड. २ (अधि- कार्यानें) बेकायदेशीर बसविलेला दंड; बेकायदेशीर दंड बसविणें. (क्रि॰ घेणें; देणें; भरणें). ॰वळी, कोपरवळी-स्त्री. (व.) (दंडावरची) वांक; स्त्रियांचा एक अलंकार. [दंड + वेली] ॰वाट-स्त्री. १ (उजाड, भयाण असा) लांबच लांब रस्ता; जवळपास गांव, वस्ती नाहीं असा रस्ता. २ टेकड्यांच्या कडेनें गेलेली अरुंद पायवाट. ३ एकमेकास मिळणारे रस्ते. ॰वान्- वि. काठी, दंड, वेत्र इ॰ हातांत घेणार. [सं.] ॰विकल्प- पु. शिक्षेची अदलाबदल; शिक्षा कमी द्यावी कीं अधिक द्यावी याविषयीं विचारणा. [सं.] ॰सरी-स्त्री. (बागेमध्यें) पाणी जाण्याकरितां खणलेला लहानसा पाट, चर, खाचण; तसर्यांच्या बाजूचा पाट. [दंड + सरी] ॰स्नान-न. घाई घाईनें केलेलें अर्धवट स्नान; नद्यादिकांच्या ठिकाणीं अंग न चोळतां केकळ दंड मात्र भिजतील अशा प्रकारचें केलेलें स्नान; काकस्नान; पाण्यांत एक बुचकळी मारून केलेलें स्नान. [सं.]
दंड
पु. १. काठी; सोटा; छडी; सोडगा. २. लिंग. ३. मार; (शारीरिक) शिक्षा. ४. शिक्षा म्हणून घेतलेला पैसा. सरकारी न्यायपद्धतीने गुन्हा शाबीत झाला म्हणजे हा आकारला जातो. ५. खांद्यापासून कोपरापर्यंतचा हात. ६. केलेल्या, पाडलेल्या भागांच्या खुणांसाठी शेतात किंवा बागेत घातलेला मातीचा उंचवटा; बांध; गडगा; पाणी जाण्यासाठी दोन्ही बाजूंना उंचवटा करून पाडलेली सरी; पाट; नदीकिनारा; काठ. (बे.) ७. लांबी मोजण्याचे परिमाण; चार हातांची काठी. २००० दंड = १ कोस. ८. वेळेचे परिमाण; चोवीस मिनिटे. ९. पैलवानांच्या व्यायामाचा प्रकार; जोर (यावरून) एखादे कठीण काम अथवा प्रचंड उद्योग. (क्रि. काढणे, पेलणे). १०. क्रमाने उतार असलेली किंवा निमुळती पण लांबट टेकडी, सोंड (पर्वताची). ११. डोंगराच्या माथ्यापासून पायथ्यापर्यंत असलेला उतार, ओघळ, अरुंद वाट; दंडवाट. १२. पर्वतरांगेची एक लहान शाखा; डोंगराच्या माथ्यापासून पायथ्यापर्यंत वाकडीतिकडी गेलेली खडकांची ओळ. १३. (कवायत वगैरे प्रसंगी केलेला) सैन्यरचनेचा एक प्रकार; रांग; फरा; व्यूह. १४. ताठ उभे राहणे. १५. जिंकणे; ताब्यात, कह्यात आणणे. १६. अपराधाबद्दल शिक्षा म्हणून घेतलेली रक्कम; जातीत परत घेण्यासाठी दिलेले प्रायश्चित्त. १७. रताळी, ऊस इ. लावण्यासाठी मातीचा केलेला लांबट उंचवटा, वरंबा. १८. तडाका : ‘निंदा निस्तेज दंडी कामलोभावर पडी ।’ - ज्ञा १३·४९४. १९. हिंसा : ‘ऐसा मनें देहें वाचा । सर्व संन्यासु दंडाचा ।’ - ज्ञा १३·३१०. २०. पाठीचा कणा : ‘माजी उभारलेनि दंडे । शिरकमल होय गाढें ।’ - ज्ञा ६·२०२. २१. (वस्त्राचे) दोन भाग, तुकडे जोडण्यासाठी घातलेली शिवण. (क्रि. घालणे). [प्रा. दंडी = जुन्या वस्त्राचा सांधा]. [सं.] (वा.) दंड आवळणे, दंड बांधणे, दंडाला काढण्या लावणे - कैद करणे. दंडथोपटणे - १. कुस्ती खेळण्यापूर्वी दंड ठोकणे;कुस्तीला सिद्ध होणे. २. (ल.) साहसाने अथवा कोणालाही न जुमानता एखादे कार्य करायला उभे राहणे. दंड थोपटून उभे राहणे - (ल.) वादाला, विरोधाला तयार होणे. दंड दरदरून फुगणे, दंड फुरफुरणे - आपल्याशी कुस्तीला योग्य असा गडी पाहिला म्हणजे पहिलवानाचे दंड स्फुरण पावणे, फुगणे. दंडाला माती लावणे - कुस्तीला तयार होणे (कुस्तीपूर्वी दंडाला माती लावतात).
दंडन, दंडना
न. स्त्री. १. (शारीरिक) शिक्षा. २. खंडणी; दंड घेणे. ३. (ल.) मारणे; दमन, निग्रह करणे (वासना इ. चा). [सं.]
दंडन-ना
नस्त्री. १ (शारीरिक) शिक्षा; शासन. २ खंडणी; दंड घेणें. ३ (ल.) मारणें; दमन, निग्रह करणें, (वासना इ॰). [सं.]
दुख(खा)विणें
उक्रि. १ दुर्भाषण, अपकार इ॰ कानीं मनु- ष्यास व्यस्थित करणें, दुःख देणें. २ खणणें, उकरणें, चेंगरणें, खर- डणें, खापलणें, कापणें इ॰ प्रकारें इजा करणें; शारीरिक पीडा देणें. ३ (फळें, झाडें, जमीन इ॰) पृष्ठभागावर किंचित जाया करणें. [दुःख]
दुखार्ती
स्त्री. रोग; शारीरिक अस्वस्थता; इजा; दुःख.
दुखार्त्ती
स्त्री. रोग; शारीरिक अस्वस्थता; इजा; दुःख.
दुखणे
न. शारीरिक व्यथा; विकृती; आजार; व्याधी; रोग. [सं. दुःख]
दुखणें
पु. शारीरिक व्यथा; विकृति; अस्वस्थता; आजार; व्याधि; पीडा; रोग. 'ज्या दिवशीं हरिचरितश्रवण नसे त्यांत मज दहा दुखणीं ।' -मोकृष्ण ८३.१३. [सं. दुःखन; प्रा. दुक्खण] (वाप्र.) ॰काढणें-१ दुखण्याची व्यथा सहन करणें. 'दुखणें काढावें पोरांनीं आणि भूक काढावी गुरांनीं.' २ एखाद्याच्या आजारांत त्याची शुश्रूषा करणें. ॰घेणें-१ आजारी होणें. २ आजारी असल्याचें ढोंग करणें; बळेनें दुखणें आणणें. दुख- ण्याचें अंग असणें-अंगांत आजाराचा थोडा-फार अवशेष असणें; आजार पूर्णपणें बरा झालेला नसणें. दुखण्यास पडणें- आजारी होणें. म्ह॰ देणें आणि दुखणें हीं कोणासहि आवडत नाहींत. सामाशब्द- दुखणेकरी-पु. दुखणाईत मनुष्य. ॰बाहणें-न. (व्यापक) ताप, आजार इ॰. [दुखणें द्वि.]
दुखवणे, दुखावणे, दुखविणे, दुखाविणे
सक्रि. १. दुर्भाषण, अपकार इ.नी माणसाला दुःखी करणे. २. खणणे, उकरणे, चेंगरणे, खरडणे, खापलणे, कापणे इ. प्रकारे इजा करणे; शारीरिक पीडा देणे. ३. फळे, झाडे, जमीन इ. च्या पृष्ठभागावर प्रहार करणे.
धावणारा
पु. १. (क्रिकेट) शारीरिक इजेमुळे फलंदाज धावू शकत नसेल तर त्याच्यासाठी धावणारा खेळाडू. २. खेड्यांतून भराभर चालत जाऊन पत्रे पोचवणारा; (इं.) रनर.
धडप(फ)डणें, धडबडणें
आक्रि. १ (संताप इ॰कांमुळे) हातपाय आदळणें, आपटणें; चरफडणें. २ (शारीरिक दु:ख इ॰ कांनीं) तडफडणें; तळमळणें; बेचैनपणें वळवळणें; लोळणें. ३ परा- कांठीं) खटपट, प्रयत्न, खटाटोप करणें. ४ अव्यवस्थित रीतीनें काष्ठेची खटपट, प्रयत्न, खटाटोप करणें. ४ अव्यवस्थित रीतीनें पडणें.-शर. [सं. अध उत्पतनं-धडपडणं- धाड- पडणें धड- पडणें. -भाअ १८३५: म. धडपड] धडपडून उठणें-खड- बडून, एकदम उठणें, उठून उभें राहणें.
धडप(फ)डया
स्त्रीअव. (शारीरिक दु:ख, संताप इ॰ कानीं) हातपाय आपटणें; तडफडणें; चडफडणें. (क्रि॰ देणें; खाणें). [धडपड]
घायाळ
वि. १. जखमी झालेला; शस्त्राचे वार ज्याच्या अंगावर झाले आहेत असा; शारीरिक वा मानसिक आघाताने, घावाने, व्याकूळ झालेला : ‘रण तुंबळ, घुमतें घायाळ, गणती नाहीं मुडद्यांची ।’ – ऐपो १८५. २. (ल.) (दाव्यात, वादात) चीत, कुंठित, प्रतिहत केलेला; पराजय, कुप्रसिद्धी इ. कारणांमुळे मानखंडना पावलेला. ३. कमजोर झालेला (रोग, शत्रू इ.). ४. (लाजिरवाण्या कृत्यामुळे) मान खाली घालणारा; समाजात (आपले) तोंड लपवणारा. [सं. घात + इल्ल]
हिंसणें
उक्रि. (काव्य) हिंसा करणें; इजा करणें; ठार मारणें; खून करणें. [सं. हिष्कन] हिंसक, हिंस्त्र-वि. १ खुनी; हत्त्यारी; घातक. २ (ल.) क्रूर; उग्र; भयंकर (व्याघ्र- सिंहादि प्राणी). हिंसा-स्त्री. १ हत्त्या; खून; ठार मारणें. २ इजा; पीडा; दुखापत. हिंसेचे तीन प्रकार-मानसिक (द्वेष; मत्सर इ॰), शाब्दिक (शिव्या; शाप), शारीरिक (वध, खून). [सं.] हिंसांलु-वि. हिंसक पहा.
हळह(हा)ळ
स्त्री. १ हूरहुर; वित्ताची अस्वस्थता; अस्वास्थ्य; मोठी काळजी (शारिरीक. मानसिक). (क्रि॰ लागणें. वाटणें; करणें). 'नाहीं भक्तीचें बळ । तंचवरी हळहळरे हळहळरे ।' २ खेद; पश्चाताप. (क्रि॰ लागणें; करणें). ३ चिंता; त्रास; दगदग. [सं. हलहल किंवा हरहर !] ॰खळबळ-स्त्री. चिंता आणि त्रास; हळहळ पहा. हळहळण-अक्रि. हुरहुर वाटणें; खेद, शोक करणें; त्रस्त असणें. हळहळाट-पु. हाहा; कार; थयथयाट. 'अस्त्रें नोहे प्रळय अचाट । कीं प्रळयरुदाचा हळ- हळाट ।' -नव ४.८१. हळहळीचा माल-पु. विकणारास फार मनस्ताप देणारा पीडादायक माल. हळहळीत-वि. अस्वस्थ; चिंताग्रस्त; त्रस्त.
हमाल
पु. १ ओझें वहाणारा मनुष्य; मजूर. २ पालखी इ॰ वाहून नेणारा माणूस; भोई. ३ अफूच्या बोंडांतील रसाचा घट्ट गोळा होण्यासाठीं तो रस तांब्याच्या पत्र्यावर तुडवून मळण्याचें काम करणारा इसम. हें काम हा इसम माजूमच्या कैफांत करतो. [अर. हम्माल्] हमाली-स्त्री. १ हमालाचा पेशा, धंदा, कामगिरी. २ हमालाची मजुरी. ३ बिन डोक्याचें- अक्कलेचें काम; केवळ शारीरिक कष्ट. हमाली चाकरी-स्त्री. १ हमाली धंदा. २ मुख्यतः निरोप आणणें-पोहोंचविणें एवढी नोकरी. ३ हातावरचें काम; आज आहे उद्यां नाहीं असा रोजगार. ४ हलकें काम.
हृदयपालट
पु. मनाच्या वृत्तींत बदल; मनाचा पालट. 'शारीरिक काँग्रेसीकरण झालें म्हणून आंतरिक वैचा- रिक क्रांती उर्फ हृदयपालट थोडाच होणार आहे.' -के १८. ८.१९३९.
जैव मनोविज्ञान
(मानस.) शारीरिक कारणांमुळे निर्माण झालेल्या मानसिक घटनांचा अभ्यास. जैवमिति, जैवमिती
जिस्मानी
(वि.) हिंदी अर्थ : शरीर संबंधी. मराठी अर्थ : शारीरिक.
जिस्मी
(वि.) हिंदी व मराठी अर्थ : व्यक्तिगत, शारीरिक.
जीवभौतिकी
न. (वन.) भौतिक (वास्तव) शास्त्राच्या दृष्टिकोनातून केलेला सजीवांचा अभ्यास. तापमान, आर्द्रता, वातावरणाचा दाब. समुद्रसपाटीपासून उंची इत्यादी घटकांचा सजीवांवर होणारा परिणाम अथवा त्यांच्या प्रतिक्रिया; भौतिक नियमाप्रमाणे घडून येणाऱ्या काही शारीरिक प्रक्रिया.
जन्मजात
वि. १. जन्मापासून असलेले; बाह्यपरिस्थितीमुळे प्राप्त न झालेले; उपजत; स्वाभाविक. उदा. शारीरिक फरक, भेद. २. जननद्रव्यी (जननद्रव्यासंबंधी). [सं.]
जोरबळ
न. शारीरिक बल; पाशवी शक्ती; आडदांडपणा; दांडगाई; जुलूम.
जराजीर्ण
वि. वृद्धत्वामुळे शारीरिक व मानसिक दुर्बलता आलेला.
जुलूम
जबरदस्ती, बळजोरी, सक्ती, अत्याचार, मुस्कटदाबी, बळजबरी, जाचणें, जाच, छळवाद मांडणें, सतावणें, ताप देणें , सक्तीची मागणी, अन्यायी वागणूक, शारीरिक पीडा देणें, सामर्थ्यानें दडपणें , इच्छा डावलणें, शक्तीचा दबाव टाकून नमवणें, मनाविरुद्ध वागणूक, इच्छेविरुद्ध संमति मागणें, जबरी-संभोग.
झीज
स्त्री. १. (दागिने, भांडी, यंत्र, धातू इ.ची) वापरण्याने, घर्षणाने होणारी घस; काही अंश कमी होणे; वजनात उणेपणा. २. (ल.) शारीरिक कष्ट. ३. (व्यापार, व्यवहार इ.तील) घस; नुकसान; बूड. (क्रि. खाणे, बसणे, येणे.) : ‘त्याच्या करितां मी बरीच तनमनधनानें झीज सोसली.’ – टिसू ३. ४. (सामा.) क्षय; नाश. [सं. क्षीय]
झीज
स्त्री. १ (दागिने, भांडीं इ॰ कांची) वापरण्यानें, घर्षणानें होणारी घस; कांहीं अंश कमी होणें; वजनांत उणेपणा. २ (ल.) शारीरिक कष्ट. ३ (व्यापार, व्यवहार इ॰ कांतील) घस; नुकसान; बूड. (फि॰ खाणें; बसणें; येणें). 'त्याच्या करितां मी बरीच तनमनधनानें झीज सोसली.' -टिसू ३. ४ (सामा.) क्षय; नाश. [झिजणें]
झिजणी
स्त्री. १ झिजण्याची, कमी कमी होत जाण्याची क्रिया; रोडावणें; क्षीण होणें. २ क्षयरोग; झिरफणी. झिजविणें- सक्रि. १ झिजण्यास लावणें; घर्षण इ॰ कानें कमी करणें. २ घसव- टून जाणें; घस, झीज सोसणें; झरविणें; काचविणें. ॰म्ह आपणास झिजवावें तेव्हां दुसर्यास रिझवावें = स्वतः शारीरिक, सांपत्तिक झीज सोसल्यावांचून दुसर्यास खूष करतां येणार नाहीं. [झिजणें]
काया
स्त्री. देह; शरीर; रूप; आकार; अंग : ‘याति वृक्षवल्ली होत्या कोमेलिया । त्यासि कृष्णें काया दिव्य दिली ।’ - तुगा ५२. [सं. काय] (वा.) काया दाखविणे, काया दिसणे, काया पाहणे - (रोगी व वैद्य, पती-पत्नी अथवा पुनर्विवाहाला अनुकूल असलेली विधवा यांच्या संबंधी प्रयोग करतात) अंग उघडे करणे. काया झाकणे, काया उघडी टाकणे, काया उघडी पडणे - या वाक्प्रचारात काया शब्दाने शरीराचा जो भाग सभ्याचारानुसार अवश्य झाकला पाहिजे त्याचा बोध होतो. हा शब्दप्रयोग स्त्रियांच्या बोलण्यात येतो. अंग, आंग (देह, शरीर, तनु नव्हे.) या शब्दांनाही वरील वाक्प्रचारात तोच अर्थ निघतो. काया पडणे - मरणे. काया पालटणे, काया फिरणे, काया बदलणे - आजारानंतर शरीर सतेज होणे. कायावाचामने करून - शारीरिक, शाब्दिक, मानसिक यांनी युक्त; शरीराच्या सर्व अवयवांनी, इंद्रियांनी व मनाच्या कल्पनांनी युक्त; सामान्यतः सर्व प्रकारांनी मनःपूर्वक (एखादे कृत्य करणे.).
कायिक
वि. शारीरिक; देहाविषयीचे प्राकृतिक. [सं.]
कायिकवृद्धी, कायिकव्याज
स्त्री. (शारीरिक श्रमाच्या प्राप्तीला अनुसरून) दररोज अगर मासिक द्यायचे व्याज. याऐवजी कायिकव्याज किंवा कायिक वृद्धी असेही म्हणतात.
कायक्लेश
पुअव. शारीरिक दुःखें; अंगमेहनत; श्रम; कष्ट. [सं. काय + क्लेश]
कमरजोर
पु. शारीरिक बळ (पैसा, मित्र, बुद्धी यांच्या बलाहून भिन्न).
कंप
पु. १. थरकाप; कापरे; हलणे; थरथरणे; वात, भय यामुळे शरीर, वृक्ष आदींना जे चलन मिळते ते : ‘मस्तक आदरी शिरो । भागी कंप ॥’ - ज्ञा १३·७५७. २. (ल.) धाक; दहशत; भीती : ‘आणि जयाचा अहा कंपु । तापसांसी ॥’ - ज्ञा १८·१०५७. ३. (संगीत) गाताना कंठातून निघणारा कापरा आवाज. तान; स्वरनलिकांचे थरथरणे; भाषिक ध्वनीला घोष हा गुण देणारी शारीरिक क्रिया. (क्रि. कंपणे.) [सं.]
कर्मसंन्यास
पु. १. कर्माचा त्याग; नित्यनैमित्तिकादी कर्मे करण्याचे सोडून देणे. २. शारीरिक सोडून इतर सर्व कर्मांचा त्याग (शांकरमत) : ‘शंकराचार्यांच्या ग्रंथात कर्मसंन्यासच प्रतिपाद्य आहे.’ − टिसू ५. [सं.]
कृच्छ्र
न. १ एक प्रायश्चित. २ शारीरिक दुःख; कष्ट; तप. 'माझेनि उद्देशें संपूर्ण । तपसाधन कृच्छ्रादिक ।' -एभा १७. ४२०. ३ मूत्रकृच्छ्र; मूत्रावरोध. ४ पहिले दिवशीं एकदां जेवण; दुसरे दिवशीं सायंकाळीं जेवण; तिसरे दिवशीं न मागतां आपो- आप मिळेल तें खाणें व चौथ दिवशीं उपोषण याप्रमाणें क्रमानें १२ दिवस करण्याचें व्रत. 'अथवा एकांतरा कृच्छ्री !' -ज्ञा १७. ३६४. कृच्छ्राचे १ पाद, २ अर्ध, ३ पादोन, ४ अति, ५ कृच्छ्राति कृच्छ्र, ६ सांतपन, ७ तप्त, ८ शीत, ९ पराक इ॰ प्रकार आहेत. [सं.] ॰चांद्रायण-न. चंद्रकलेप्रमाणें चढउतारानें जेवणांतील घांस खाण्याचें कृच्छ्रप्रायश्चित्त. 'कृच्छ्रचांद्रायणें झालीं वेडीं ।' -एभा १२.२७. कृच्छ्रे करून-क्रिवि. नाखुषीनें; कष्टानें; (देणें; करणें इ॰).
कृच्छ्र
न. १. एक प्रायश्चित्त; २. शारीरिक दुःख; कष्ट; तप : ‘माझे नि उद्देशें संपूर्ण । तपसाधन कृच्छ्रादिक ।’ - एभा १७·४२०. ३. पाप. ४. पहिल्या दिवशी एकदा जेवण, दुसऱ्या दिवशी सायंकाळी जेवण, तिसऱ्या दिवशी न मागता आपोआप मिळेल ते खावे व चौथे दिवशी उपोषण याप्रमाणे क्रमाने १२ दिवस करण्याचे व्रत : ‘अथवा एकांतरा कृच्छ्रीं ।’ - ज्ञा १७·३३४. [सं.]
क्षय
पु. १ झीज; ऱ्हास; अवनति; नाश. म्ह॰ सुखानें पुण्याचा क्षय दुःखानें पापाचा क्षय. २ नायनाट; लय; नाश; तोटा; अस्तित्व नाहिंसें होणें; लोप. 'पाप-पुण्य-कुल-धर्म-राज्य-क्षय.' ३ एक रोग; शारीरिक ऱ्हास; राजयक्ष्मा. ४ सूर्य, चंद्र यांच्या बिंबाचा ऱ्हास; तिथिक्षय. ५ पृथ्वी- प्रळय; लय. ६ (बीजगणित) ऋणसंख्या-याच्या उलट वृद्धि- धन-संख्या. ७ साठ संवत्सरांपैकीं शेवटचें संवत्सर. ८ सूर्यो- दयानंतर प्रवृत्त जे तिथि, नक्षत्र, योग इ॰ दुसऱ्या सूर्योदया- पूर्वी संपणें. 'तिथिक्षय.' [सं.] ॰कार-पु. कफक्षय; क्षय- रोगांतील खोकला. ॰गामी-वि. ऱ्हास पावणारा; उत्तरोत्तर खालावलेला; मृत्युपंथास लागलेला. याच्या उलट वृद्धिगामी. ॰तिथि-स्त्री. १ आज सूर्योंदयानंतर सुरू झालेली व उद्यां सूर्योदयापूर्वीं संपणारी चांद्रमानांतील तिथि; सूर्योदयीं नस- णारी तिथि. २ मृत माणसाची महिन्याची किंवा वर्षाची मृत्युतिथि, दिवस (चांद्रमानाची). ॰दिवस-पु. क्षयतिथि. ॰पक्ष-पु. दर महिन्यांतील दुसरा पंधरवडा; वद्यपक्ष; कृष्ण- पक्ष. ॰मास-पु. ज्या महिन्यांत दोन संक्रांती येतात तो आमावास्यांत मास. हा क्वचित येतो. क्षयमास कार्तिक, मार्ग- शीर्ष, पौष या तीन महिन्यांत येतो. इतर महिन्यांत येत नाहीं. -ज्योतिषसार ७. ॰रोग-पु. राजयक्ष्मा; रोगराज यानें शरीरांतील सर्व धातू उत्तरोत्तर क्षीण होऊन मृत्यु येतो; हा असाध्य मानतात. ॰रोगी-वि. वरील रोग झालेला. ॰वृद्धि-स्त्री. १ ऱ्हास-उत्कर्ष; उतरती-वाढती कळा; कम- तरता-बढती; कमी होणें-वाढणें. २ (बीजगणित) ऋण- वृद्धिसंख्या; उणें-अधिक संख्या. ॰सूतक-न. (काव्य) मृताशौच; अशौच. क्षयाह-पु. क्षयतिथि अर्थ २ पहा. क्षयिष्णु-वि. नश्वर; अशाश्वत; नाश पावणारें; ऱ्हास पावण्या- जोगें. क्षयी-वि. १ क्षयिष्णु. २ क्षयरोगी.
खाणे
उक्रि. १. भक्षण करणे. २. गिळंकृत करणे; लाच खाणे; हरामखोरीने किंवा लबाडीने हडप करणे. ३. गिळणे; गट्ट; करणे; ग्रासणे; चट्ट करणे; ग्रासून टाकणे, पूर्णपणे वश करणे (औषध, मनुष्य). ४. संपवणे; फस्त करणे. ५. गाळणे, टाकणे, सोडणे (बोलण्यात अथवा लिहिण्यात अक्षरे.) ६. चावणे; डसणे. उदा. ‘साप खाई पोट रितें’ - दुसऱ्याला चावल्याने सापाचे पोट भरत नाही. कुत्री, विषारी किडे, जिवाणू यांच्या चावण्यालाही लावतात. तसेच शारीरिक अस्वच्छतेबद्दल योजतात. जसे :- मळ खातो, उवा खातात, पिसवा खातात = उवा, पिसवा ह्या माझे डोके खातात म्हणजे चावतात, त्रास देतात. ७. तोडणे; टोचणे; मनाला बोचणे (पाप, गुन्हा, मन, पापबुद्धी) : ८. (ल.) कुरतडणे; डिचवणे; तोडणे (वाईट अन्न, पित्त, मानहानीचे भाषण.) ९. एखाद्या जोखमीच्या कामाने एखाद्याचा नाश करणे. १०. मारणे; बळकावणे. ११. भोगणे; सेवणे (विसावा. चैन) १२. सोसणे; सहन करणे. (मार, उष्णता, थंडी) १३. आत घेणे. (हवा.) [सं. खादन] १४. घेणे (शपथ). १५. पराभव होणे. [सं.] १६. खर्च करणे. [सं.] [सं. खादन] (वा.) खा खा करणे, खा खा लागणे, खा खा सुटणे, खाईन खाईन करणे - अधाशीपणा करणे; खाण्यासाठी धाधावलेला असणे. खाऊन ढेकर देणे - दुसऱ्याच्या वस्तूचा अभिलाष धरून ती हडप करणे, गिळंकृत करणे. खाण्या तुटणे - क्षुधा किंवा पचनशक्ती कमी होणे. खाण्यापिण्याचे दिवस, खायाप्यायाचे दिवस - तारुण्यातील आनंदाचे व उल्हासाचे दिवस; आयुष्यातील सुखाचे दिवस. जीव खाणे, प्राण खाणे, डोके खाणे - दुसऱ्याला फार त्रास देणे. खाऊ की गिळू करणे, दात ओठ खाणे - अतिशय रागावणे. खायला उठणे - एखाद्यावर हल्ला करणे. खाल्ल्या घरचे वासे मोजणे - कृतघ्न होणे; उपकारकर्त्याचे ऋण विसरणे.
खाणें
उक्रि. १ भक्षणें, जेवणें. २ तनाखोरी करणें; गिळंकृत करणें; लांच खाणें; हरामखोरींने किंवा लबाडीनें आत्मसात् करणें. ३ गिळणें; गट्ट करणें; ग्रासणें; चट्ट करणें. ४ घेणें; फस्त करणें (इमारत सामानसुमान संपविते तसें). 'त्या घरानें हजार वांसे खाल्ले' ५ सोसणें; सहन करणें (मार, उष्णता, थंडी). 'त्यानें एक छडी खाल्ली.' ६ आंत घेणें (हवा); ७ घेणें (शपथ); ८ ग्रासून टाकणें, पूर्णपणें वश करणें. (औषध, मनुष्य). ९ पराभव करणें. 'काशीकरानें रंगनाथशास्त्र्यास एका क्षणांत खाऊन टाकलें.' १० गाळणें, टाकणें, सोडणें (बोलण्यांत अथवा लिहिण्यांत अक्षरें) ११ चावणें; डसणें. 'साप खाई पोट रितें' = दुसर्यास चावल्यानें सापाचें पोट भरत नाहीं. (कुत्रीं, विषारी किरडें, किडे, जीवाणूं यांच्याहि चावण्यास लावतात. तसेंच शारीरिक अस्वच्छतेबद्दल योज- तात. 'मळ खातो, उवा खातात, पिसा खातात.' = उवा, पिसा ह्या माझ डोकें (डोकसें, डोसकें, शीर) खातात म्हणजे चावतात, त्रास देतात. १२ तोडणें; टोचणें; मनाला बोचणें (पाप, गुन्हा, मन, पाप बुद्धि). 'कीं पापियासि निज पातक जेंवि खातें ।' १३ (ल.) कुरतडणें; डवचणें; तोडणें (वाईट अन्न, पित्त, मानहानीचें भाषण). १४ एखाद्या जोखमीच्या कामानें एखाद्याचा नाश करणें; 'या कंत्राटानें त्याला पुरें खाल्लें.' १५ खर्च करणें. 'तूं माझा अर्धा तास खाल्लास' १६ मारणें; बळकावणें. 'वजिरानें उंट खाल्ला.' १७ भोगणें; सेवणें (विसावा, चैन). -अक्रि. १ भक्षणें; भक्षणें आणि जगणें; अन्न घेणें, घालणें (भोजन करणें असा या क्रियापदाचा अर्थ होत नाहीं. 'जेवणें' पहा). २ दुखणें (डोकें, डोसकें, डोई, शीर, माथा, कपाळ इ॰) -अकर्तुक क्रि. (ला. शीं जोडून). कोणी खातो, तोडतो अशी आंत भावना वेदना, होणें. [सं. खादन; प्रा. खाण; सिं. खाइणु; तुल॰ फा. खाईदन = कुरतडणें] (वाप्र.) खाईन खाईन करणें-अधाशीपणा करणें; खाण्यास धाधावलेला असण; खा खा करणें. खाऊन ढेकर देणें-दुस- र्याच्या वस्तूचा अभिलाष धरून ती आपलीशी करणें, गिळंकृत करणें, आत्मसात करणें. खाण्यामुळें हीनशक्त होणें- खाण्याच्या अभावामुळें अशक्त होणें. खाण्यां तुटणें-क्षुधा किंवा पचनशक्ति कमी होणें. खायाप्यायाचे दिवस-तारुण्यां- तील आनंदाचे व उल्हासाचे दिवस; आयुष्यांतील सुखाचे दिवस जीव-प्राण-खाणें-दुसर्यास फार त्रास देणें. दांत ओंठ खाणें-अतिशय रागावणें म्ह॰ १ खाई त्याला खवखवे (खव खवणें म्हणजे घशांत कंडू सुटणें यावरून) = जो वाईट काम करतो त्याच्या पोटांत तें डांचत असतें असा अर्थ; चोराच्या मनांत चांदणें. २ खाईन तर तुपाशी नाहीं तर उपाशी = मी म्हणेन तें ऐकलें तर ठीक आहे, नाहींतर मी रुसून बसणार असा हट्ट घेऊन बसणें याअर्थीं.
खट्टा
पु. १ कमरेचा सांधा; पाठीचा शेवटचा मणका; कमरेचें हाड (जड ओझें वाहिल्यानें, किंवा बराच वेळ ताठ बसून लिहिण्यानें जें दुःख किंवा ताठरपणा येतो त्यास अनुलक्षून याचा उपयोग करतात.) 'ओझीं वाहातां वाहतां त्याचे कम- रेचा खट्टा मोकळा झाला.' २ (व्यापक) अति ताठरपणा; स्वतःची शक्ति किंवा महत्त्व याविषयीं घमेंड. (क्रि॰ मोडणें; मोकळा करणें; तोडणें; जिरविणें; उतरविणें; पुरविणें). 'कामदार अंमलदाराचा खट्टा तोडला' -गापो १०८. 'म्या त्याचा खट्टा मोडला ।' = ताठा नाहींसा केला. या अर्थानें या शब्दाचे पुढील शब्दांशीं संयोग करतातः-कमरेचा-पाठीचा-मानेचा- मनगटाचा-हातापायांचा-हिंवतापाचा-गलांडाचा-वाईचा-पाव. साचा-उन्हाचा-पटकीचा-वार्याचा-पडशाचा खट्टा मोडला- मोकळा- ढिला झाला. (ताठरपणा, कणखरपणा, आवेश इ॰ इंद्रियांचे व अवयवांचे गुण, शारीरिक रोग, यांना अनुलक्षूनहि निरनिराळ्या अर्थानें हा शब्द लागतो).
मेहनत-ती
स्त्री. १ कष्ट; श्रम; आयास. 'अन्तोजीनें मेहनती केली.' -ब्रच १०५. २ मजुरी; कामधंदा. ३ मजुरीचें मोल, वेतन. [अर. मिहनत्] सामाशब्द-॰मजुरी-स्त्री. भाड्यानें किंवा पैसा घेऊन शारीरिक श्रम करणें. ॰मशागत-स्त्री. १ (व्यापक.) कष्ट; श्रम; निगा; प्रयत्न. २ शेत वगैरेची नांगरणी, बेणणी, खुरपणी इ॰ कामें. [अर. मिह्त्न + मशक्कत] मेहनताना-पु. श्रमाचा मोबदला; मजुरी; पगार. [अर.] मेहनती-त्या, मेहनती खपती-वि. मेहनत करण्याचा स्वभाव असलेला; श्रमी; उद्योगी; कष्टाळू; खटपटी.
मण(न)गट
न. १ हाताचा पंजा आणि कोपर यां- मधील भाग; (सामा.) मणिबंध; पंज्याचा सांधा. २ पाऊल व पायाची नळी यांच्यामधील सांध्याचें हाड; घोटा; पायाचा डोळा; गोफा. ३ घोड्याच्या पायाचा सांधा. ४ (ल.) उपाय; मार्ग; योग्यता (शक्ति, पैसा, विद्या इ॰ची). [सं. मणि + कट] ॰म्ह ज्याच्या मणगटास जोर तो बळी. ॰घेणें-बोंबा मारणें; बोंबलणें. ॰धरणें-एखाद्या कांहीं अपराधांत पकडणें; आरोप ठेवणें. मणगटांत-मणगटास जोर असणें-द्रव्य, अधि- कार, योग्यता, शारीरिक शक्ति इ॰ बाबतींत समर्थ असणें. मणगटावर केंस येणें-हातांतील जोर नाहीसा होणें; एखादें काम करावयाला असमर्थ असणें. मणगटावर गोणी पडणें- येणें-(ल.) एखादे कष्टाचे किंवा जबाबदारीचें काम लादलें जाणें. मणगटावर तेल-तेल चुना घालणें-ओतणें-बोंबा मारणें; बोंबलत सुटणें (कांहीं एक विद्येविषयी अज्ञ). मणगटावर तेल घातलें पाहिजे-मूर्ख, अडाणी मनुष्यास उद्देशून योजि- तात. मणगटासारखें मणगट पाहून कन्या द्यावी, मणगटासारखें मणगट पहावें-शरीर, पैसा, परिस्थिति इ॰ बाबतींत कन्येशीं जुळणारा वर पहावा. मणगटाशीं मणगट घासणें-एखाद्याशीं बरोबरी, स्पर्धा करणें. मणगटी-स्त्री, लहान मुलांच्या मणगटांत घालण्याचा मण्यांचा एक अलंकार.
निरोध
पु. १. प्रतिबंध; अटकाव; कैद; अडथळा. २. नियमन; संयमन; बंधन; प्रतिकार. ३. संततिनियमन व लैंगिक संबंधातील सुरक्षितता या कारणांसाठी पुरुषांनी शारीरिक संबंधाच्या वेळी वापरण्याचे साधन.
नवससायास
पु. अव. एखाद्या कार्याच्या सिद्धीसाठी देवाकडे केलेली मागणी; नवस व शारीरिक कष्ट, प्रयत्न इ.
पावित्र्य
न. मानसिक व शारीरिक शुद्धपणा; शुचिता; पवित्रपणा. 'ब्राह्मणजात पावित्र्य, शुद्धता व स्वच्छपणा यांस जितकी जपते तितकी इतर कशांसहि जपत नसेल.' -ज्ञाको (प) ११०. [सं.]
प्राणिज
वि. प्राण्यापासून उत्पन्न झालेलें. [सं. प्राणी + ज = उत्पन्न झालेलें] ॰अन्न-न. प्राण्यापासून उत्पन्न झालेलें अन्न; मांसादि भक्ष्य. (इं.) अ/?/निमल फूड. ॰उष्णता-स्त्री. शरीराची उष्णता; शारीरिक उष्णता; अंगाची उष्णता. (इं.) अ/?/निमल हिट. ॰कोटि-स्त्री. प्राणिजाति. (इं.) अ/?/निमल किंगडम. ॰द्रव्य- पदार्थ-नपु. प्राण्यापासून उत्पन्न झालेलें द्रव्य. (इं.) अ/?/निमल मॅटर. प्राणिया-पु. प्राणी. 'जें शास्त्रें वाचूनि आणिकें । प्राणिया स्वमोलु न देखे ।' -ज्ञा १७.३५. [प्राणी]
प्रकोप
पु. १ कफ, वात, पित्त इ॰ शारीरिक दोषांची अति- शय वाढ, आधिक्य, वर्चस्व. पित्तप्रकोप. वातप्रकोप, धातुप्रकोप इ॰ २ दंगा; बंड. ३ चित्तक्षोभ; राग; क्षुब्धता; क्रोध. [सं.]
पुळण
न. (कु.) शारीरीक दोष उत्पन्न करणारा खाण्याचा पदार्थ; जखम; फोड इ॰ मध्यें पू उत्पन्न करणारा. पुलन पहा. [पू] पुळणास येणें-जखम; गळूं; फोड इ॰ पूमय होणें.
ऋतुस्रावचक्र
न. (वै.) एका मासिक पाळीनंतर दुसऱ्या मासिक पाळीची सुरुवात होईपर्यंतच्या काळात होणाऱ्या शारीरिक बदलांचे चक्र. सामान्यतः हा चांद्रमासकाल (२८ दिवस) असतो.
संप्राप्ति
स्त्री. शारीरिक विकारांचें ज्ञान. विकृतेंद्रियविज्ञान.
स्वस्त
वि. शांत; स्वस्थ; सुखी; शारीरिक व मानसिक सौख्य भोगणारा. [सं. स्वस्थ] स्वस्तावणें-अक्रि. शांत होणें, समाधानी बनणें.
स्वस्थ
वि. १ सुखी; समाधानी; तृप्त; निरोगी. २ उगा; स्तब्ध; निश्चयी; शांत; (शारीरिक, मानसिक दृष्ट्या). ३ (चुकीनें) सवंग. ४ निश्चयी; करारी. [सं. स्था = राहणें] स्वस्थता- स्त्री. सुख; निश्चलता; शांतता; फुरसत. स्वस्थावणें-अक्रि. शांत होणें; स्थिरावणें. स्वस्थावणें-क्रि. १ शांत करणें; संतुष्ट करणें. २ (चुकीनें) सवंग करणें. स्वास्थ्य-स्थ-न. १ प्रकृति, धंदा इ॰ त सौख्य; समाधानीपणा. २ उपजीविकेचें सुखाचें साधन; (इनाम, जीवन इ॰). ३ आत्मविश्वास. ४ आरोग्य; आराम.
तान
स्त्री. १ तहान; तृष्णा; पाणी पिण्याची इच्छा. (प्र.) तहान पहा. २ (ल.) (एखाद्या वस्तूविषयीं, गोष्टीविषयीं) अति लोभ; हव्यास; उत्कंठा; अनावर इच्छा. ३ लहान मुलास होणारा एक उष्णताजन्य विकार. [सं. तृष्णा; प्रा. तण्हा; म. तहान] (वाप्र.) ॰घालणें-धरणें-लहान मुलाच्या तान रोगावर (अंगाला थंडावा येण्याकरितां पानें इ॰ बांधून) उपाय करणें. सामाशब्द- ॰भूक- स्त्री. १ तहान आणि भूक. २ (व्यापक) शारीरिक गरजा, वासना इ॰. 'आपलें दर्शन मला होतांच माझी तानभूक मोडली.' ॰मोड-स्त्री. तहानमोड पहा. ॰लाडू-पु. १ तहान लाडू पहा. २ (गो.) तहान भागणारें पेय. तानेजणें-अक्रि. (बे.) (जनावर इ॰) तहानेनें युक्त होणें.
तळमळ
स्त्री. १ (ज्वर, शारीरिक, मानसिक दुःख इ॰ काच्या योगानें होणारी) अस्वस्थता; तडफड; तगमग; चडफड; बेचैन अवस्था; हैराणी. 'तळमळ निववीरे रामकारुण्यसिंधु ।' -रामदास, करुणाष्टक (नवनीत पृ १७०). २ हुरहुर; चुटपुट; काळजी. ३ पश्चात्ताप; पस्तावा; अनुताप. [तळणें + मळणें ? दे. तडमड]
तळमळ
स्त्री. १. (ज्वर, शारीरिक, मानसिक दुःख इ.ने होणारी) अस्वस्थता; तडफड; तगमग; चडफड; बेचैन अवस्था; हैराणी. २. हुरहुर; चुटपुट; काळजी. ३. पश्चात्ताप; पस्तावा; अनुताप.
उन्हाळा
पु. १.ज्या दिवसांत ऊन कडक असते ते दिवस; फाल्गुनापासून ज्येष्ठापर्यंतचे चार महिने. २. उष्मा; उकाडा. ३. वारंवार मूत्र विसर्जन करावे अशी भावना व जळजळ होणे; शारीरिक पीडा; उष्णतेचा विकार. (क्रि. लागणे). ४. आईबापावाचून उघडे पडणे; निराश्रितपणा; पोरकेपणा. ५. नाहीसे होणे; नाश पावणे; अभाव; करपणे; जळणे; खराब होणे (शेत, बाग, मळा वगैरे) : ‘प्रीतीचा उन्हाळा राया ।’ – संग्रामगीते ८१. [सं. उष्णकाल] (वा.) उन्हाळा करणे – नाश करणे; उजाड करणे : ‘मी म्हणतें नुसते दागिने नेले असते तरी बरें. पण घराचा उन्हाळा केला.’ – नामदेव नाटक. ७६. उन्हाळे पाहणे – १. वयाने जास्त असणे. २. जास्त अनुभव असणे.
उपजत
क्रिवि. १ जन्मतः; जन्मापासून; उ॰ उपजत आंधळा रोगी-मुंका-शाहणा लंगडा वगैरे. 'मांजर...याचें भय मुलांमध्यें जसें स्वाभाविक, उपजत असतें.' -नीति २६४. -वि. स्वाभाविक; जातीची; निसर्गतः प्राप्त; उ॰ उपजत बुद्धि-खोड-स्वभाव. ॰रांगणें-१ उपजल्यापासूनच रांगणें. २ एखाद्या वस्तूची एकदम भारी किंमत सांगणें. ३ एखाद्या अडचणीला तोंड देण्याची आपली लायकी एकदम हमखास सांगणें. ॰खोड-स्त्री. जन्मल्यापासून असलेला दुर्गुण खोड-व्यंग (शारीरिक, मानसिक). ॰गुण-पु. स्वाभाविक, अंगचा, जातीचा धर्म; जन्मापासूनचा गुण. ॰बागी-वि. मूळचाच, जाती- चाच घोड्यावर बसण्यांत पटाईत. [उपजत + हिं. बाग = लगाम, बागी = स्वार; सं. वाजी = घोडा] ॰स्वभाव, अंगस्वभाव-पु. जन्मतः असलेले गुणधर्म-स्वभाव; स्वाभाविक प्रवृत्ति.
उपजत खोड
जन्मल्यापासून असलेला दुर्गुण (शारीरिक, मानसिक). उपजत गुण
वेथा
स्त्री. १ व्यथा; दुःख; शारीरिक किंवा मानसिक पीडा. 'औषध नेघे असोन वेथा ।' -दा २.१.२२. २ संकट. 'वेथा मोठी रावणा ।' -वेसीस्व ४.१०२. [सं. व्यथा]
विदेह
पु. १ जनक राजा. २ एक देश. ३ एक नगर. -वि. १ देहरहित; अशरीर. 'विदेहासि देहधर्म । आरोपिती ।' -ज्ञा ९.१५६. २ देहातीत; मुक्तदेह; देहाचा विसर पडलेला; देह असून नसल्यासारखा. 'तैसा देहींच जो असे । विदेह दृष्टि ।' -ज्ञा १८. ४३५. [सं. वि + देह] ॰मुक्त-वि. जीवंतपणीच मुक्त झालेला. 'अचेतन ते विदेह मुक्त । ' -दा ७.६.४६. ॰मुक्ति-स्त्री. ब्रह्म- लोकांतील अखेरची मुक्त अवस्था. 'ब्रह्मलोकीं जाऊन जेथें अखेर मुक्ति मिळत असल्यामुळें विदेहमुक्ति अशीं दुसरीं नांवें आहेत ।' -गीर २९५. ॰स्थिति-स्त्री. १ देह व आपण निराळे अशी मानण्याची प्रवृत्ति, मनाची अवस्था. २ देहाची स्मृति नष्ट झालेली अवस्था; ज्ञानी पुरुषाची निर्विकल्प स्थिति, समाधि. 'तुकयास उबग न येई चित्तीं । विदेह स्थिति जाहाला ।' विदेही-वि. १ देहातीत; देहभान विसरलेला. २ शारीरिक अथवा ऐहिक विषयांची आसक्ती नष्ट झालेला.
विकळाप
स्त्री. (गो.) हातवारे; विलाप; शारीरिक हालअपेष्टा.
व्यथक
वि. व्यथा देणारा; दुःखद. [सं.] व्यथा-स्त्री. दुःख (शारीरिक किंवा मानसित); क्लेश; आधिव्याधि. 'र्पै पायीं काटा नेहटे । तंव व्यथा जीवीं उमटे ।' -ज्ञा १६.१५९. 'या भवीं रामदास । थोर पावतो व्यथा ।' -राक (नवनीत पृ. ४४९). [सं.] व्यथानक-नीक-वि. १ रोगी; दुःखी; नादुरुस्त. २ त्रासदायक; पीडा देणारें (मूल.) व्यथित-वि. दुःखित; पीडित; आर्तं. व्यथिष्ट-वि. फार दिवसाची व्यथा असलेला; नेहमीचा दुखणेकरी.
व्यूह
पु. सैन्याची रचना याचे विविध प्रकार आहेतः दंड-भोग-मंडल-असहत-शकट-मकर-पताका-व्यू्ह. 'तसें दळ दुर्घर । नाना व्यूहीं परिकर ।' -ज्ञा १.९१. २ शत्रुपराजयार्थ युक्ति, मसलत. ३ (सामा.) कट; कारस्थान; विभू. (क्रि॰ रचणें; ढासळून टाकणें). 'या माझ्या मूर्ख मुलांना कांहीं सांगि- तलें नाहीं तर हा माझा व्यूह ढांसळून टाकील.' -गुप्तमंजूष. ३ मूर्ति; शरीर. 'पूजिला जी श्रीपती । चतुमूर्ती व्यूहरूपें ।' -एभा ६.११६. [सं.] ४ (योग. तत्त्व.) शारीरिक किंवा इंद्रियांची विशिष्ट रचना. ॰चतुष्टय-न. सैन्यरचनेचे चार प्रकार-दंड, भोग, मंडल, असंहत इ॰.
मानस
नपु. १ मन; चित्त; बुद्धीचें स्थान; बुद्धिशक्ति. २ अन्तःकरण; मनोविकाराचें स्थान. 'मानस माझें मोहिलें या देवें ।' ३ इच्छा; प्रवृत्ति. ४ हेतु; उद्देश. ५ (कायम) ध्वनित, गर्भित मान्यता. ६ हिमालय पर्वतांतील मानसरोवर. 'न क्षोभे जेवि मानसी हंस ।' -मोसभा १.९६. -वि. मनासंबंधी; मनाचा. [सं.] ॰पुत्र-पु. १ शरीरापासून नसून केवळ इच्छामात्रेंकरून निर्माण केलेला पुत्र. २ (ल.) पुत्राप्रमाणें अत्यंत प्रिय मनुष्य. [सं.] ॰पूजा-स्त्री. १ गंधपुष्पादिक पदार्थ मनाचेच कल्पून भावनामय केलेला पूजा; मानसिक पूजा. 'मानसपूजा अगत्य व्हावी ।' -दा ४.५.३१ [सं.] ॰शास्त्र-न. मनाचें स्वरूप, त्याच्या प्रक्रिया इ॰ संबंधी शास्त्र. [सं.] ॰सरोवर-न. हिमालयांतील एक प्रख्यात सरोवर. ॰सृष्टि-स्त्री. मनाची सृष्टि; काल्पनिक चित्रें; मनानें बनविलेल्या आणि मनांत असणाऱ्या आकृती व रूपें. [सं.] मानसिक-न. १ पराकाष्टेचें अल्पत्व; निवळ कल्पना. 'मरु देशांत पाण्याचें मानसिक.' २ एखाद्या गोष्टीविषयीं होणारा संदेह. 'त्याचें येण्याचें असल्या पावसांत मानसिकच दिसतें नांहीं.' -शाको. वि. १ मनाचा; बुद्धिचा; मनांत असणारा; मनसंबंधीं. 'स्वप्न हा मानसिक प्रपंच होय.' २ काल्पनिक; अयु- क्तिक. ३ संशयित; अनिश्चित; निवळ कल्पनीय. [सं.] ॰जुलूम- पु. मनाविरुद्ध गोष्ट करण्यास भाग पाडणें. 'शारीरिक जुलमापेक्षां मानसिक जुलूम अतिशय भयंकर असतो. ' -टि ३.१३९.
नवस
पु. १ इच्छित कार्य सिद्धीस जावें म्हणून देवाची प्रार्थना करून कार्यसिद्धि झाल्यास देवास (एखादी) वस्तु अर्पण करण्याची प्रतिज्ञा. 'दूर प्रिय जन वसती । देखाया करिति नित्य नवस नव सती ।' -मोकृष्ण ४७.७७. २ त्या प्रतिज्ञेंतील अर्पणविषयभूत पदार्थ. [सं. नमसित; प्रा. णमसिअ; णवसिअ. (सं. नमस = अनुकूल; कृपादृष्टियुक्त)] म्ह॰ (व.)नवसाचा भोपळा चारीवाटा मोकळा = नवस करून झालेल्या मुलाच्या दुर्वर्तनाबद्दल म्हणतात. २ 'जरी नवसें पुत्र होती । तरी कां करावा लागे पती ।' -तुगा. (वाप्र.) (एखादी गोष्ट इ॰काविषयीं-बद्दल-करितां-साठीं- स्तव, एखाद्या गोष्टीचा) नवस करणें-एखादी गोष्ट सिद्धीस नेण्याबद्दल ईश्वरास प्रार्थणें व कांहीं वस्तु अर्पण करण्याचा संकल्प करणें. २ (ल.) (एखाद्या गोष्टीबद्दल) मोठ्या ऊत्कंठेनें याचना करणें; ती गोष्ट अत्यंत उत्सुकतेनें इच्छिणें. ॰देणें-(व.) मार देणें. ॰पुरणें-(एखाद्याचें) इष्ट कार्य (नवस केल्यामुळें) सिद्धीस जाणें. ॰फळास येणें-इष्ट मनोरथ सिद्धीस जाणें. 'आजि पुरले नवस ।' -तुगा. ॰फेडणें-नवस फळाला आल्यावर, पूर्ण झाल्यावर देवास वस्तु इ॰ अर्पण करण्याची जी प्रतिज्ञा केली असेल ती पार पाडणें. -साचा-वि. नवसानें प्राप्त झालेला. -साचा नाऱ्या-पु. (व.) (उप.) नवस करून झालेला मुलगा (हा पुढें वाईट निघाल्यास त्याला उद्देशून योजण्याचा वाक्प्रचार). -सास पावणें- (नवस केलेल्या देवतेनें नवस करणाराचे) मनोरथ पूर्ण करणें. नवसें मागितलें, मुळावर आलें-(मुलगा व्हावा म्हणून नवस केला त्याप्रमाणें मुलगा झाला पण तो आईबापांच्या मुळावर आला या अर्थीं) अतिशय उत्सुकतेनें इच्छिलेली वस्तु नुकसानकारक झाल्यास हा वाक्प्रचार योजतात; (व.) नवसाचा नाऱ्या. सामाशब्द- ॰देव-पु. ज्यास नवस केला असेल तो देव; नवसाला पावलेला देव. ' वृद्धाचारीचे पूजिले देव । नवसदेवाहि दिधलें गौरव । ' -दावि ३३. ॰नवसणें-नवस करणें पहा. 'कवण नवस नवसूं आतां । कृष्ण नाथ प्राप्तीसी । ' -एरुस्व २.४२. ॰सायास-पु. (एखाद्या कार्याच्या सिद्धीकरितां करावा लागणारा) नवस; ईश्वराराधना व शारीरिक कष्ट इ॰; दुःखकष्ट; हाल- अपेष्टा; प्रयत्न इ॰. [नवस + आयास]
मेख
स्त्री. १ खुंटा; खुंटी. २ खोंच; रहस्य; गूढ गोष्ट. 'तुकारामबोवाची मेख' ३ लोखंड इ॰ धातूचा खिळा. ४ अलं- कारार्थ दातांत बसविलेली सोन्याची चूक. ५ (ल.) धष्टपुष्ट व बळकट मनुष्य, पशु. [फा. मेख्] म्ह॰-१ सोन्याची मेख आणि तमाशा देख. २ तुम्ही आम्ही एक कंठाळीला मेख.' (वाप्र.) ॰ठेवणें-एखाद्या करार, कबुलायत करतांना त्यांत विशिष्ट खोंच, अट घालणें, ठेवणें. ॰बसणें-अडवणूक, अटकाव होणें; मेखल्लें जाणें. ॰मारणें-१ जोरानें, पुरतेपणी थांबविणें, बंद करणें; अडकवून ठेवणें (चालू व्यापार, धंदा काम, इ॰) २ प्रतिपक्ष्याचें कांहीं न चालेल अशी तजवीज करून ठेवणें, विघ्न आणणें. ॰सोसणें- घेणें (हातावर)-(वाईट कृत्यें करण्यांत किंवा त्यांजबद्दल, दुःख भोगण्यांत) अतिशय धैर्य, रांकटपणा, सोशीकपणा असणें. मेखलणें-उक्रि. १ (घोडा, बैल इ॰) मेखेस, खुंट्यास बांधणें; गुंतविणें. २ (ल.) चालतें काम थांबविणें, बंद पाडणें. [मेख] मेखा उचटणें-उचलणें-उपटणें-खांद्यावर घालणें-देणें ताबडतोब बिदाई करणें; काढून देणें; घालवणें; उचाटणें, निखळणें. मेखा घेणें-१ (आपल्या तंबूकरितां गांवच्या सुताराकडून) फुकट व जुलूम करून, मेखा घेणें. यावरून २ (ल.) बळजबरी करणें; जुलमानें घेणें, सूड घेणें; जुलमानें आपली हानि भरून काढणें. मेखेवर बसविणें-सरळ, नम्रपणें न वागतां वांकडी गोष्ट सांगणें. मेख(क)चू-सू-पु. मेख ठोकण्याची मोगरी; तंबूच्या मेखा ठोकण्याचा ठोकळा. -वाडसमा १.२३३. [हिं. मेखचू] मेखसूं मेखस-न. १ ओबडधोबड अशी मेख; मोठी मेख. २ मोठा व लांब लोखंडाचा खिळा. [मेख] मेखला-स्त्री. बैल- गाडीच्या जोखडाच्या खुंट्या प्रत्येकी. मेखाटणीस-मेखा- टीस बसणें-हट्ट धरणें, धरून बसणें; पुरता पिच्छा पुरवणें; पाठीस लागणें (तगादेदार, सरकारी अधिकारी, खमक्या मालक इ॰नीं). मेखाटणें-सक्रि. १ मेख, खुंटी मारून बांधणें; खिळून टाकणें. २ (ल.) ठोकणें; चोपणें; तासडणें; सतावून त्रास देणें. [मेख, मेखाटी] मेखाटी-स्त्री. मेख; खुंटी (बहुदा मेखाट्या असा अनेकवचनीं उपयोग करतात. [मेख] (वाप्र.) ॰खांदा- डास देणें-एकदम काढून देणें, घालविणें; वाटेला लावणें. ॰घेणें-१ वेठीस धरून काम करून घेणें. २ ठोकणें; तासडणें; भर्त्संणें; अतिशय गांजणें. मेख्या-वि. खमक्या; शारीरिक किंवा मानसिक प्रचंड शक्तीनें प्रतिपक्षीयास दाबून टाकणारा; प्रतिपक्षी- यावर दरारा बसविणारा; वस्ताद; पुरून उरणारा; खंबीर. [मेख]
भाव
पु. १ भक्ति; श्रद्धा; निष्ठा; खात्रीची; भावना. 'माझें मज देती तैसें । परि आनानीं भावीं ।' -ज्ञा ९.३५३. 'असे हो जया अंतरीं भाव जैसा ।' -राम ३५. २ हेतु; अर्थ; मन; अंतःकरणप्रवृत्ति; उद्देश. 'न कळे तो तया सांगितला भाव । आपणासी ठाव नंदाघरीं ।' -तुगा १०. ३ अभिप्राय; आशय; धोरण; वळण; झोंक; गर्भितार्थ. 'रूप तसें विविध तिहीं कां केलें स्पष्ट सांग भावातें ।' -मोसभा ७.६६. ४ मनोविकार; मनोवृत्ति; भावना. जसें-शत्रु-बंधु-क्रोध-दुष्ट-भक्ति-मित्र-भाव. ५ अस्तित्व; असणें. 'एवं कोणेहि परी । अज्ञानभावाची उजरी ।' -अमृ ७.७७. 'जेथें धनाचा भाव तेथें विद्येचा अभाव असें प्रायः असतें.' ६ प्रत्यय किंवा अनुबंध यामुळें होणार्या फेरफाराशिवाय असणारा शुद्ध धात्वर्थ; धातूचा मूळ अर्थ. उदा॰ चाल इ॰ धातूपुढें णें हा प्रत्यय चाल धातूचा मूळ दाखवितो. ७ भावकुंडलींतील बारा स्थानांपैकीं प्रत्येक; स्थान. कुंडली पहा. ८ नैसर्गिक स्थिति, धर्म, स्वभाव; प्रकृति. जसें-सत्वभाव; तमोभाव; रजोभाव. 'म्हणोनि सात्विक भावांची मांदी । कृष्णाआंगी अर्जुना आधीं ।' -ज्ञा ८.५६. ९ विकार, वृत्ति, राग, क्रिया, चित्तवृत्ति, हावभाव इ॰ चा वर्ग. ह्याचे पांच प्रकार आहेत. विभाव, अनुभाव, व्यभिचारी भाव, सात्त्विकभाव, स्वार्थीभाव. पैकीं विभाग, अनुभाव व स्थायीभाव हे अनुक्रमें रसाचीं कारणें, कायें व पूर्वरूपें आहेत. १० जीवाची स्थिति, दशा, अवस्था. जसें-उत्पत्ति, स्थिति, लय इ॰ 'ऐसें म्हणे त्यजुनि भाव अहो जिवाचे ।' -वामन भरतभाव ५८. १२ (शब्दाचा) धर्म, गुण, अस्तित्व, विषय, संबंध, अधिकार, अवस्था इ॰ ची स्थिति; संस्कृतांतील ता आणि त्व व प्राकृतांतील पण, पणा, की हे प्रत्यय लागून झालेला शब्दाचा अर्थ. जसें-ब्राह्मणाधिष्ठित भाव तो ब्राह्मणपणा; उग्र-क्रूर-दृढ-सौम्य-शत्रु-बंधु-भाव. 'जयाचेनि संगे ब्रह्मभावो । भ्रांतासहि ।' -ज्ञा ६.१०२. १२ जन्म; अस्ति- त्वांत येणें; उत्पत्ति. १३ (तर्क) पदार्थ. भाव किंवा भावरूप पदार्थ सहा आहेत-द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष आणि समवाय. सातवा पदार्थ अभाव. १४ रति; प्रेम (काव्यातील वर्णनाचा किंवा नाट्य प्रयोगाचा विषय). १५ क्षमता; शक्ति; सामर्थ्य; पराक्रम (शारीरिक किंवा मानसिक). १६ माया; मिष; कपट; आव. 'ध्यान केल्याचा भाव करितो.' -कमं १. १७ लक्षण; प्रकार. 'द्वितीयाध्यायीं ब्रह्मोत्पत्ति । चारी युगांचे भाव कथिती ।' -गुच ५३.२०. १८ इच्छा. 'हाची भाव माझिया जीवा । पुरवी देवा मनोरथ ।' -तुगा ६९९. १९ आवड. 'दुर्योधनें विषान्नें वाढविलीं भीम जेवला भावें ।' -मोआदि १९.१३. २० (नृत्य) अभिनय पहा. [सं. भू-भाव] म्ह॰ जसा भाव तसें फळ. ॰पाहणें- (ना.) परीक्षा करणें; अनुभव घेणें. 'मी सार्यांचा भाव पाहिला. या जगांत कोणी कोणाचें नाहीं.' ॰भाजणें- १ दुष्ट हेतु तडीस नेणें.' २ एकाद्यानें केलेलें दुष्ट भाकित प्रत्ययास येणें. ॰सोडणें- १ (भुतानें) पछाडलेल्या माणसास सोडणें. २ मरणें; गतप्राण होणें. ३ नाशाच्या मार्गांत असणें. भावाचा भुकेला-भक्ति, श्रद्धा यांकरितां भुकेला. 'भावाचा भुकेला श्रीपति । आणिक चित्तीं नावडे त्या ।' सामाशब्द- ॰कर्तरि-वि. जेथें क्रियेचा केवल भाव तोच कर्ता असतो आणि क्रियापद नेहमीं नपुंसकलिंगी एक- वचनीं असतें असा (प्रयोग). उदा॰ मला कळमळतें. ॰कर्तृक- वि. (व्या.) भावकर्तरी प्रयोगाचें (क्रियापद). ॰कुंडली-स्त्री. (ज्यो.) तनु, धन इ॰चीं १२ स्थानें दाखविण्यासाठीं बारा राशींचीं घरें ज्यावर दाखविलीं आहेत असें वर्तुळ. कुंडली पहा. ॰गर्भ- पु. १ ग्रंथांतील सारांश. २ अंतस्थ हेतु. ॰गर्भ-गर्भित-वि. १ ध्वनित; गर्भित अर्थाचा. २ ध्वनित अर्थ ज्यांत आहे असें; दिसतो त्यापेक्षां अधिक अर्थ असलेलें (भाषण, लेख इ॰). ॰चलित- वि. (ज्यो.) तन्वादिस्थानीं असून अंशे करून चलित झाला तो (सूर्य किंवा इतर ग्रह). ॰भक्ति-भगत-स्त्री. १ मनः- पूर्वक, श्रद्धा-प्रेमयुक्त, निष्कामपणें केलेली भक्ति; याच्या उलट भयभक्ति. २ एखाद्याविषयीं वाटणारें अत्यंत प्रेम; मनाची ओढ. ॰वाचक नाम-न. (व्या.) प्राणी किंवा पदार्थ यांच्या गुण- धर्माचा बोध करून देणारें नाम. [सं.] ॰वाचकसंख्या-स्त्री. जात नसणारी संख्या; संख्या किंवा परिमाणें यांचा हिस्सा, पट. ॰शबल-न. भावनाविकारांचा गोंधळ; कालवाकालव; अनेक रसांचें मिश्रण. -वि. गोंधळलेल्या भावनांचा. [सं.] ॰शुद्धि-स्त्री. अतःकरणशुद्धि. 'तेणें भावशुद्धीचिया वाटे । विखुरलें विकल्पाचे कांटे ।' -ज्ञा ७.१७०. ॰संकर-पु. मिश्र, संकीर्ण भावना, मनो- विकार. [सं.] ॰संधि-पु. निरनिराळ्या, परस्परविरूद्ध भावना असलेल्या मनाची धरसोडपणाची अवस्था; अंतःकरणांतील मिश्र रसप्रकार. [सं.] ज्ञ-वि. आशय, अभिप्राय जाणणारा; गुणज्ञ. 'पाहातयां भावज्ञां फावती गुण । चिंतामणीचे ।' -ज्ञा ६.२१. भावांतर-न. अर्थांतील फरक, विसंगतपणा. [सं. भाव + अंतर] भावाभाव-पु. अस्तित्वनास्तित्व; खरेंखोटें; चैतन्य आणि जड. 'भावाभावारूप स्फुरे । दृश्य जें हें ।' -ज्ञा १८.११८६. [सं. भाव + अभाव] भावाभास-पु. १ कृत्रिम प्रेम; कवि किंवा नाटककार यांनीं केलेलें प्रेमाचें खोटें वर्णन किंवा प्रदर्शन. २ चुकीचा समज, ग्रह, कल्पना. [भाव + आभास] भावार्थ-पु. १ तात्पर्यार्थ; सारांश. २ भक्तिसार. 'ग्रंथ वदावया निरूपणीं । भावार्थ- खाणी जयामाजी ।' -व्यं २. ३ श्रद्धा; विश्वास; भाव. 'जयाचा भावार्थ जैसा । तयास लाभ तैसा ।' -दा १.१.३८. ४ अंतःकर णाची निष्कपट वृत्ति; प्रामाणिकपणा. -क्रिवि. खरोखर; निःसंशय. 'तो भावार्थ गांवास गेला, मी आपल्यापाशीं का खोटें सांगेन' भावार्थी-वि. १ भाविक. २ साधा; भोळा; सरळ स्वभावाचा. भावि(वी)क-वि. १ श्रद्धावान्; निष्ठावंत. २ संतुष्ट होणारा. 'तिहीं यज्ञभाविकीं सुरीं । जे हे संपत्ति दिधली पुरी ।' -ज्ञा ३.१०४. ३ भक्तियुक्त अंतःकरणाचा. भावि(वी)कजन, भावीजन- पु. श्रद्धायुक्त, निष्ठावंत अंतःकरणाचा. मनुष्य. 'अद्यापि दीपाचे झळ्ळाळ । भावीकजन देखति ।' भावित-वि. १ कल्पिलेलें; चिंतिलेलें; कल्पित. २ ज्यावर भावना किंवा संस्कार केले आहेत असें (औषध). [सं.] भाविला-वि. संस्कार केलेला. -शर. भावी-वे प्रयोग-पु. (व्या.) जेथें कर्त्यावरून अथवा कर्मावरून क्रियापद बदलत नाहीं व सामान्यतः त्याचें रूप नपुसकलिंगी एक वचनी असतें असा प्रयोग. 'मी त्यास मारिलें.' भावुक-न. १ श्रृंगारिक बोलणें. २ कल्याण; हित; क्षेम. 'ऐसा भक्तमयूर चात- कहि जो नेणें दुजीं भावुकें ।' -मोकृष्ण ५५.५१. भावु(वू)क- वि. भक्तियुक्त; निष्ठावंत; भाविक. 'असोत तुज आमुचीं सकल भावुकायुर्बळें ।' -केका ६४. भावेभक्ति-स्त्री. भावभक्ति पहा. भावो-पु. भाव पहा. 'म्हणोनि मज आत्मयाचा भावो । जिहीं जियावया केला ठावो ।' -ज्ञा १०.१४१. भावो सरणें- वाटूं लागणें. -शर. 'तेथ आदिसा पासौनि पार्था । आइ- किजे ऐसीचि अवस्था । दुणावली हे यदुनाथा । भावों सरलें ।' -माज्ञा ६.४८७. (पाठ). भाव्य-वि. उपासना करण्यास योग्य. 'जो इया लटकिया भूतग्रामा । भाव्यु सदा ।' -ज्ञा ९.८४.
बहिः; बही
क्रिवि. बाहेर; बाहेरच्या बाजूस. (समासांत) बहिः प्रदेश; बहिर्भाग; बहिष्कार इ॰ [सं.] ॰करण-न. चक्षुरादि वरकरणी प्रीति, माया. [सं.] बहिरंग-न. बाह्य स्वरूप. -वि. परका; अपरिचित; दूरचा; आपल्या कुळाच्या, अनुयायांच्या विस्तारांत नसलेला. याच्या उलट अंतरंग. [सं.] ॰रंगपरीक्षण- न. विशेष खोलांत न जातां वरवर केलेलें आलोचन. [सं.] ॰रंगो- पासन-न. बाह्य उपासना. ही संपद्विधि, आरोपविधि, संवर्गविधि व अध्यासविधि अशी चार प्रकरची आहे; कर्मभक्ति. [सं.] ॰रवसा-पु. बाहेरची (भूत, पिशाचांची) बाधा. ॰बहिरवा (र्वा) स, बहीरवास-पु. १ बाहेर राहणें. २ (महानु.) बाहेरच्या उपयोगाचें नेसावयाचें वस्त्र; उत्तरीय वस्त्र 'चोखट बहिरवास वेढीति ।' -पूजावसर. [सं.] ॰रानीं-क्रिवि. उघडया मैदानांत; मोकळेपणें (भटकणें). ॰रायाम वात-पु. एक प्रकारचा धनुर्वात. यांत रोग्याची छाती पुढें येऊन पाठीकडे कमान होते. अंतरायाम वात पहा. [सं.] ॰रुपद्रव-बहिरवसा पहा. [सं.] ॰बहिर्कोप- पु. (प्र. बहिःकोप) वरपांगी धारण केलेला खोटा राग. [सं.] बहिर्गृह-न. पडवी; ओसरी; ओटी; ढेलच-ज; देवडी. [सं.] ॰र्दंत-पु. ओठाच्या बाहेर आलेला दांत. [सं.] ॰र्दाह-पु. शरीराची काहली; याच्या उलट अंतर्दाह. [सं.] ॰दिशेस- भूमीस जाणें-अक्रि. शौचास जाणें. ॰र्द्वार-न. व्यभिचार; रांडबाजी. बहिःप्रकृति-स्त्रीअव. राज्यकारभाराचें एक अंग. कोश, राष्ट्र; दुर्ग, बल आणि प्रजा इ॰ याशिवाय अंतःप्रकृति प्रकृति अर्थ ७ पहा. [सं.] ॰र्भाव-पु. बाह्य भाव, डौल. स्थिति, देखावा, हेतु [सं.] ॰र्भूत-वि. बाह्य; बाहेरील. 'मनाची गणना कोण्हीं इंद्रियांत करितात कोणी त्याहून बहिर्भूत असें गणतात.' [सं.] ॰र्भूमीची व्यथा-स्त्री. (ल.) हगवणीचा उपद्रव ॰र्मुख-वि. बाहेर तोंड असलेला ; बाह्य, प्रापंचिक गोष्टींकडे कल असलेला; विषयासक्त. याच्या उलट अंतर्मुख. [सं.] ॰लंब-वि. विशाल कोणाचा. ॰र्लापिका-कोडें; गूढ; ज्याच्या अर्थपूरणा- साठीं बाहेरचें पद इ॰ घ्यावें लागतें अशी कूट कविता. अंतर्लापि- केच्या उलट. [सं.] ॰र्वक्रपृष्ठ-न. गोलाचें पृष्ठ बाहेरच्या बाजूनें पाहिलें असतां दिसणारा आकार. -सूर्य ८. ॰वर्ती-वि. बाहेर राहणारा, असणारा. २ (ज्यो) श्रेष्ठ; सूर्याभोंवती होणार्या पृथ्वी. प्रदक्षिणेच्या मंडलाबाहेर असणारा (ग्रह). बुध, शुक्र या शिवाय बाकीच्या ग्रहांस बहिर्वर्तीग्रह म्हणतात. [सं. ] ॰र्विकार-पु. १ (ल.) उपदंश; गर्मी. २ बाह्य, शारीरिक आजार [सं.] ॰र्व्यसन-न बहिर्द्वार पहा. [सं.] ॰र्व्यसनी-वि. व्यभिचारी; रंडीबाज. [सं.] बहिस्त्रिक(करण)-न. नृत्याचा एक प्रकार. बहिःस्नेह-पु. दिखाऊ, खोटी प्रीति, ममता. [सं.]
धनु
पुन. १ धनुष्य. 'मुसळाचें धनु नव्हे हो सर्वथा । पाषाण पिळितां रस कैंचा ।' -तुगा ४२१०. २ कापूस पिंजण्या- साठीं वापरण्यांत येणारें धनुष्य. ३ वर्तुळाचा अर्धा भाग; वर्तुल- खंड. ४ मेषादि राशीपासून नववी रास. ५ चार हातांचें परिमाण; चार हात लांबी. 'धनु रे धनु भणतु । राऊतें बरवतांति ।' -शिशु ५६५. धनुकणें-उक्रि. (कापूस) पिंजणें, कांतणें. धनुक- धनुष्य. 'पांच सतें धनुका । उचलीली येके वेळें ।' -उषा १३. ॰कली- १ लहान धनुष्य. २ धनकुंबी; गलोल. ३ कापूस पिंजण्याचें धनुष्य. धनुःफल, धनुष्फलक-न. वृत्त परिघाच्या विवक्षित खंडाची मापणी; वर्तुलखंडाचें माप; ज्याफल. [सं.] धनुरासन-न. पोटावर उपडें निजून हात पाठीकडे नेऊन पाय उचलून दोन्ही पाय दोन्ही हातांनीं टाचांशीं घट्ट धरावे. नंतर डोक्याकडे व पायाकडे तोल निरनिराळ्या वेळीं झुकेल असें करावें. त्याच्यायोगें अन्नपचन होतें. धनर्गुण-पु. धनुष्याची दोरी; ज्या. [सं.] धनुर्धर-धारी-वि. १ धनुष्य धारण करणारा; धनुष्यानें लढणारा; तिरंदाजी करणारा. 'तेथ बाणवरी धनुर्धर । वर्षताती निरंतर ।' -ज्ञा १.१६६. २ (ल.) शास्त्र, कला इ॰ कांत निपुण; पंडित; तज्ज्ञ. [सं.] धनुर्मध्य-पु. (धनुष्याचा मध्य) धनुष्याच्या दोरीस ज्या ठिकाणीं बाण लावितात ती जागा. [सं.] धनुर्मार्ग-पु. वक्ररेषा [सं.] धनुर्मास-पु. १ (ज्यो.) धनुराशींत सूर्य येतो तो काल. यावेळीं धन संक्रांत असते. २ (ल.) या राशीस सूर्य असतां सकाळीं धनुर्लग्न आहे तोंपर्यंत देव नैवेद्यादि पूर्वक करावयाचें भोजन; झुंझुरमास. [सं.] धनुवाड, धनुवाड-धनुर्धारी; धनुष्य धारण करणारा. 'दोघे धनुर्वाडे संपूर्ण । तुज मारिती विंधोन बाण ।' -भारा किष्किधा १.३५. 'धर्मु तो अवघेयां वडिलु । अर्जुनु धनुवाडा कुशलु ।' -गीता १.३१४. धनुर्वात-पु. ज्यांत शरीर धनुष्याकृंति होतें तो वातविकार. याचे अंतरायामवात व बहिरायामवात असे दोन प्रकार आहेत. [सं.] धनुर्विद्या-स्त्री. लक्ष्य भेदण्याचें व तीर मारण्याचें शास्त्र; धनुष्य वापरण्याची विद्या. [सं.] धनुर्वेद-पु. एक उपवेद; धनुर्विद्या; भारतीयांचें युद्धशास्त्र. या वेदांत शस्त्रें, अस्त्रें, युद्ध करण्याचे प्रकार वाहनें इ॰ अनेक गोष्टीचें विवेचन केलें आहे. 'आइकें कुटिलालकमस्तका । धनुर्वेदत्र्यंबका ।' -ज्ञा १०.२१५. [सं.] धनुशाखा-स्त्री. एक वेलि. हिच्या तंतूपासून धनुष्याच्या दोर्या करीत. धनुष्कोटि-पुस्त्री. १ धनुष्याचें टोक. २ रामेश्वराजवळचें एक तीर्थस्थान. धनुस्तंभ-पु. शारीरिक विकार; एकाएकीं झटका येऊन अंग धनुष्याप्रमाणें वांकणें; धनुर्वात.
जोर
पुन. १ जोम; शक्ति; ताकद; बळकटी. २ स्थैर्य; दार्ढ्य; गंभीरपणा; दमदारपणा; सहनशक्ति (सजीव प्राणी, वस्तु यांची). ३ वेग; शक्ति; आघात; झपाटा; गतीचा वेग (वारा, बंदुकीची गोळी यांचा). ४ जुलुम; जबरदस्ती; अन्याय. ५ दाब; ताण; नेट; वजनाचा भार. 'सगळे भोई सारखे असले तर बरे, नाहीं तर ठेंगणा असतो त्याचे खांद्यावर भारी जोर येतो.' ६ जोष; पूर्ण वेग; भर (रोग, पाऊस, थंडी यांचा). ७ तालमींतील एक व्यायामविशेष; दंड. (क्रि॰ काढणें). ८ (नाविक) पूर; समु- द्राची भरती (विशेषतः पोर्णिमा-अमावास्येच्या दिवशींची); भांग; उधाण. ९ (यंत्रशास्त्र) प्रेरकशक्ति. १० महत्त्व; भर. या गोष्टीवर गव्हर्नरसांहेबांनीं बराच जोर दिला होता.' -केले १.१९९. [फा. झोर्; अर. जौर्] (वाप्र.) ॰करणें-लावणें-जोरास येणें = जबरदस्तीनें वागणें; अडथळा करणें; शक्तीची, बलात्काराची गरज उत्पन्न करणें; तडीस नेण्यास, उरकण्यास कठिण करणें, जाणें 'आज पावेतों रुपये देतों देतों म्हणत होता पण अतां जोरास आला त्यापेक्षां उपास घातले पाहिजेत.' ॰देणें-१ पुष्टी; मदत, आधार देणें. २ महत्त्व देणें; विशेष उल्लेख, निर्देश करणें. म्ह॰ जोर थोडा, आणि घुस्सा बडा. -भाब २४. सामाशब्द- जोराचा-वि. नेटाचा; अति मोठा. ॰कस-दार-वान-वि. १ दंड काढणारा. २ पहिलवान; ताकदवान; बळकट; सशक्त. ॰गत-स्त्री. (राजा.) उधाण; उसाण; भांग; समुद्राची भरती (अमावास्या व पौर्णिमेची). 'पुनवेच्या व जोरगतीच्या दिवशीं भरतीच्या वेळीं मानसेचीं दारें बंद केल्यावरसुद्धां काय बिशाद होती.' -सह्याद्री ९४. ॰जबरी-स्त्री. जुलुम; जबरदस्ती. ॰तलप-ब-स्त्री. १ (कायदा) हजर राहण्यासाठीं जोराचें बोलावणें. २ अन्यायपूर्वक हरण; बलत्कारानें हरण; बलात्कार. 'जोरतलबेनें ऐवज शिंदे यांनीं आणिला म्हणून वार्ता आहे.' -ख ९.४९८४. 'माझें मनांत आलें तर येईन, तुमचे जोरतलपेस भिणार नाहीं.' ॰तलपी-बी-स्त्री. जुलूम; जबरदस्ती. -वि. १ जुलमाचें; जबरीचें; जोराचें; बलात्का- राची (हजेरी. पैसा उकळणें यासंबंधीं मागणी). 'त्यापेक्षां अंमल जोरतलबीचा सुरू करावा.' -मराचिथोशा ७७. २ मग्रूर; अरेराव. 'कोठें जोरतलबा महाल असतील, हरामखोरांस तंबी पोहोंचावून पैसा वसूल करून देणें.' -मदबा १.११८. -पेद ६.१४८. [फा] ॰तलबीटीप-सर-स्त्री. पत्त्यांच्या खेळांतील एक संज्ञा. ॰बळ- न. शारीरिक बल; पाशवी शक्ति; आडदांडपणा; दांडगाईचा जोर, बळ; शुद्ध दांडगाई; जुलूम. [फा. झोर् + सं. बल] ॰पट्टी-स्त्री दोन थरास जोडणारी पट्टी 'जरूर पडल्यास वरवंड्या जोर- पट्टीनें जोडाव्या.' -मरॅट १३. ॰बेजोर-बेजौर-क्रिवि. जोरा- वारीनें; जबरदस्तीनें. 'इंग्रज घाट चढोन येऊन जोरबेजोर होसकट्टयाचें ठाणें घेतलें.' -ख ९.४४५४. 'प्रधानाच्या फौजेनें बदामीचा किल्ला जोरबेजोर फत्ते केला.' -ख ८.४०९०.
प्रकृति
स्त्री. १ शरीर किंवा मन ह्यांचा मूळस्वभाव; मूळ- धर्म, अवस्था, स्थिति; स्वभाव; शरीर; तब्यत. वैद्यशास्त्रांत सात प्रकारच्या प्रकृती सांगितल्या आहेत:-वातज, पित्तज, कफज, वात पित्तज, वातकफज, कफपित्तजप्रकृति आणि समधातु किंवा सम- प्रकृति, ह्यांशिवायहि बर्याच प्रकारच्या प्रकृति आहेत. उदा॰ ऊष्ण सीत-उग्र-मंद-कोमलप्रकृति इ॰ २पदार्थमात्राचा मूळ- धर्म, मूळस्वभाव किंवा मूळस्थिती. 'जंव प्रकृतीचें अधिष्ठान । तंव सांडी मांडी हें अज्ञान ।' -ज्ञा ३.५३ 'तियें आघवींचि मागुतीं । जिंवत भेटली प्रकृती ।' -ज्ञा ११.६६६. ३(तत्त्व) विश्वाच्या उत्पत्तीचें कारण; मूळकारण; समावायीकारण; ह्याच्या उलट अध्यात्मिक कारण; सर्व सृष्टींतील पदार्थांचें मुख्य मूळ. 'जगांतील सर्व पदार्थांचें जें हें मूलभूत द्रव्य त्यास सांख्यशास्त्रांत प्रकृति असें म्हणतात.' -गीर १५५. ४ (वेदांत) माया; आदि- माया; ब्रह्माची जग उत्पन्न करण्याची इच्छाशक्ति; अविद्या. 'म्हणोनि आघवें । मागील मज आठवे । मी अजुही परि संभवें । प्रकृतियोगें ।' -ज्ञा ४.४४. ५ (व्याकरण) शब्दाचें किंवा धातूचें प्रत्यय लागण्यापूर्वींचें मूळ रूप. ६ पृथ्वी, आप्, तेज, वायु, आकाश, मन, बुद्धि आणि अहंकार हे आठ पदार्थ; अष्टविधा- प्रकृति. ह्यापैकीं पहिले पांच, ज्यांस पंचमहाभूतें असें म्हणतात, त्यांचा पंचसूक्ष्मभूतांशी (गंध, रस, रूप, स्पर्श आणि शब्द इ॰ शीं) मूलकारण म्हणून संबंध लावून व मन, बुद्धि अहंकार तसेच ठेवून दुसरी अष्टविधा प्रकृति होते. पंचमहाभूतें पहा. ७ राज्य- कारभाराचीं सात अंगे-स्वामी, अमात्य, सुहृद्, कोश, राष्ट्र, दुर्ग, आणि बल. ह्यांत आणखी प्रजेचा अंतर्भाव करितात. पहिल्या सातांना सप्तविधाप्रकृति व आठांना अष्टविधाप्रकृति असें म्हणतात. ह्याचाहि पुन्हां अंतःप्रकृति (स्वामी, अमात्य आणि सुहृद् ) व बहिःप्रकृति (कोश, राष्ट्र, दुर्ग बल आणि प्रजा) असे भेद आहेत. ८ प्रजा; रयत. 'दुसरे दिवशीं प्रकृति प्रार्थिति येऊनि आपुल्या पतितें ।' -मोवन १३.१०४. ९ एक छंद. १० कांहीं एक व्यवहा- राचा सामान्यतः चाललेला प्रकार. [सं.] (वाप्र.) ॰ताळ्या- वर येणें-(आजार, राग , द्वेष इ॰ मुळें झालेला) तब्यतीचा बिघाड, मनःसंताप इ॰ नाहींसा होणें. प्रकृतीचा ताळ बिघ- डणें-नासणें-सोडणें, प्रकृतीनें ताळ सोडणें-टाकणें- ताळ्यांतून जाणें-१ तब्यत बिघडणें; शरीराचा जोम, कस, स्वास्थ्य, तेज इ॰ कमी होणें, नाहींसें होणें २ भांडण्यास सुरवात करणें, होणें, रागावणें; क्रोधाविष्ट होणें. प्रकृतीनें चालणें- जाणें-वागणें-असणें-एखाद्याच्या मर्जीप्रमाणें, स्वभाव, मन, इच्छा. इ॰ प्रमाणें वागणें; (आपल्या) स्वभावानुरूप, मर्जीप्रमाणें वागणें. प्रकृतीवर टाकणें-ठेवणें-असूं-देणें-आजार वगैरे नैसर्गिक रित्या बरा होऊं देणें. सामाशब्द- ॰गत-वि. प्रकृतीच्या किंवा मायेच्या स्वाधीन झालेला; मायोपाधिक. 'आणि हाचि प्रकृतिगतु । सुखदुःखभोगी हेतु । -ज्ञा १४.३४. ॰ज-वि. उप- जत; जन्मतः; स्वाभाविक. '...भय मुलामध्यें प्रकृतिज असतें.' -नीति २६४. ॰दोष-पु. जन्म, मृत्यु इ॰ शारीरिक विकार. 'तैसा मनुष्य लोकाआंतु । तो जरी जाहला प्राकृतु । तर्ही प्रकृति- दोषाची मातु । नेणिजे तेथ ।' -ज्ञा १०.७९. ॰परिहार-पु. प्रकृतीसंबंधींचा सर्व विचार, खुलासा, स्पष्टीकरण. 'तयावरी सप्तमीं । प्रकृतिपरिहार उपक्रमीं । भजति जे पुरुषोत्तमीं । ते बोलिले चार्ही ।' -ज्ञा १०.२८.॰पुरुष-पु. १ जगताच्या उत्पत्तीस कारणीभूत असलेले माया व आदिपुरुष. 'सृष्टीला आदिकारण प्रकृतिपुरुष ।' २ स्त्रीपुरुष. 'प्रकृतिपुरुष चालिले मेळ । श्रीगुरुदेवदर्शना ।' -सप्र ८.४०. ॰प्रलय-पु. कल्पांतीं होणारा सृष्टीचा विलय; महाप्रलय. ॰मंत-वि. शरीरानें युक्त; शरीरवान्. 'नातरी प्रकृतिमंतु होऊनी । इंद्रिय लळा देउनी ।' -ज्ञा ३.१९४.॰विकार-पु. माया- कार्य; जग.॰विकृतिभाव-पु. प्रकृति व विकृति यांचा परस्पर- संबंध. ॰स्वभाव-पु. १ मनुष्याचा मूळस्वभाव. २ पदार्थांच्या अंगचा नैसर्गिक गुणधर्म. प्रकृत्यंश-पु. (ज्योतिष) कोणत्याहि गोलाच्या अंगीं असलेला जडपदार्थाचा अंश. [प्रकृति + अंश]
कमर
स्त्री. १ कंबर; कटि; मध्य; माज. २ (जंबियाचा एक डाव) आपल्या हातांतील जंबियानें जोडीदाराच्या उजव्या बाजूच्या कमरेवर कनवटीजवळ मारणें. [फा. कमर्, तुल. सं. ककुद्मती] ॰कचका-पु. गुडघ्यानें पाठींत मारलेला ठोसा, गुद्दा, धक्का. (क्रि॰ मारणें-देणें-बसणें-बसविणें) ॰कोट-(कंबर- कोट)-पु. (ना.) कंबरेपर्यंत लांब असलेला व अंगास घट्ट होणारा कोट, अंगरखा. हा आडाणी लोक वापरतात. ॰खुलाई-स्त्री. (हिं.) अपराधी कुळाकडे खंड, गुन्हेगारी वगैरे कारणाकरितां आलेल्या शिपायास कंबर सोडावयाकरितां द्यावें लागणारें द्रव्य. (सरकारी शिपाई हा पैसा त्रास देऊन उकळून घेतो, एरवीं गुन्हे- गाराला कांहीं देहधर्म इ॰ हि करून देत नाहीं). ॰खोडा-पु. (मल्लविद्या) कुस्तींतील एक पेच. आपला एक पाय जोडीदाराच्या पोटाखालीं घालून त्या पायाचा आपला पंजा आपल्या दुसर्या पायाच्या गुढघ्याच्या लवणींत धरून जोडीदाराला आवळून घुसमटून त्याला चीत करणें. [कमर + खोडा] ॰गुर्दा-पु. कम- रेम बांधावयाची गदा. -इम १०. [कमर + गुर्दा] ॰ठाव- वि. १ कमरेपर्यंत, कमर वुडेल इतकें (पाणी वगैरे); कंबरभर. -पु. २ कमरेइतकी पाण्याची खोली. ॰तार्यो-पु. (ना.) मुलांचा एक मैदानी खेळ. ॰पट्टा-ट्टी-पुस्त्री. १ कमरेभोंवती घालावयाचा सोन्याचा किंवा चांदीचा पट्टा; स्त्रियांचा एक दागिना. २कमरबंद. [कमर + पट] ॰पाईक-पु. (गो.) शूद्रांपैकीं एक जात ॰बंदी-पु. १करगोटा. २ काचा, कमरेस बांधावयाची वस्तू. ३ तरवार लटकविण्यासाठीं कमरेस बांधावयाचा पट्टा; दाली. ४ कांहीं अंगरख्यास असणारा कमरेजवळ बांधावयाचा बंद. ५ कमरपट्टा पहा. [फा. कमर् + बंद्, सं. बंध.] -वि. सिद्ध; तयार; कटिबद्ध (एकादें काम करावयासाठीं). 'आजि कमरबद होवोनि.' -मसंगी ५०. ॰बंदगी-बंदी-स्त्री. १ सिद्धता; तयारी; मुस्तेदी (युद्धाची. ग्रामांतराची वगैरे). 'तमाम खुषकींतील सरदारानीं एकदिल होऊन इंग्रजांचे तंबीवरी कमरबंदी केली.' -रा १०.१९९. २ तयार होणें; सिद्ध होणें; काचा बांधणें (गांवास जाणें, युद्धास जाणें वगैरेसाठीं). ॰बस्ता-पु. १ सिद्धता; तयारी, सज्जता. कमर- बंदी पहा. (क्रि॰ करणें, बांधणें). 'कास कासली वरून ज्यानें कमर- बस्ता केली.' -ऐपो ७०. २ कमरपट्टा काचा; कमर; बांधावयाचे वस्त्र. [फा. कनर् + बस्ता; सं. वस्त्र] ॰बस्ती-स्त्री. कमरबंदी. 'वर- कड कंबरबस्ती करून । कल्पिल्या मार्गी चालिले ।।' -नव १५. ८९. [फा. कमर् + बस्ती] ॰मोड-स्त्री (स्वतःची कंबर मोडणें). -वि. १ (ल.) अति मेहनतीचें, दगदगीचें. २ कमरमोड होण्या- सारखें. [फा. कमर् + मोड] ॰मोडकाम-न. अति श्रम पडणारें काम; अति कष्टाचें काम. ॰मोडी इरलें-न. ज्याचा खालचा भाग थोडा आंतील बाजूस वळविला आहे (इरलें घेतलेला मनुष्य खाली वांकल्यास जो वळलेला भाग पाठीच्या खालीं येईल) असें इरलें. [फा. कमर् + मोडणें + इरलें] ॰सरी-स्त्री. (गो.) घराचे वांसे वाकूं नयेत म्हणून मध्यें आडवें घालतात तें लांकूड. भिंती- वरील सर. -कमरेचा कांटा-पाठीच्या कण्याचा अगदीं शेव- टचा मणका, याच्या उलट मानेचा कांटा. (क्रि॰ ढिला होणें = अगदीं गळून जाणें; फार त्रास होणें). -खवाट-टा-नपु. कुल्ल्याचा भाग; मांडीचा सांधा; ढुंगण. -जोर-पु. शारीरिक वळ (पैसा. मित्र, बुद्धि यांच्या बळाहून भिन्न). -ढिला-वि. १ शक्तिहीन; निर्बळ; कमजोर. २ नपुंसक; नेभळा; पुरुषत्व- हीन. -सांधा-पु. कमरेचा खवाटा; कुल्ल्याचा भाग; ढुंगण. -ची कमान-स्त्री. कुबड; वांकलेलें शरीर. 'कमरेची कमान झाली तरी मी तरुण आहे असे त्याला वाटतें.' ॰कसणें- (वाप्र.) सिद्ध होणें; तयार होणें; काच्यानें कमर बांधणें. संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास या उभयतां महा- राजांच्या विद्यमान वंशजांनीं कंबर कसली पाहिजे.' -सासं २. १८०. ॰खचणें-१ अशक्त होणें; कमरेंत जोर नसणें; कमर निर्जीव होणें. २ (ल.) उत्साह, आशा, धैर्य सुटणें; हिंमत, धमक नाहींशी होणें. -रेचे टाके ढिले होणें-अति श्रमित होणें; फार कष्ट होणें; दमणें. 'यामुळें सार्या नोकरांच्या कम- रेचे टांके (पांचसहा तासांत अगदीं) ढिले होऊन जातात.' -आगर ३.४५. ॰ताठणें-आजारामुळें किंवा अशक्तपणामुळें कमर हालविण्याची शक्ति न राहाणें; एकसारखें बसून किंवा उभें राहिल्यानें कमरेस ताठरपणा येणें. ॰धरणें-कमर दुखणें किंवा ताठणें; कमरेंत उसण भरणें. ॰बसणें-कमर खचणें; धैर्यहीन होणें; घाबरणें. ॰बांधणें-सिद्ध होणें; तयार राहणें; उत्साह बाळगणें (एखाद्या कामास). 'पुढें वंशवृद्धी करण्यास्तव कंबर बांधा ।' -प्रला १३१. 'तेव्हां अजून जोंवर हे संकट अनिवार्य झालें नाहीं तोंवरच तिच्या कैवार्यांस कंबर बांधण्यास अवकाश आहे.' -नि ६. ॰भरणें-१. कबर धरणें पहा. २ (चांभार- धंदा) टांच व टाळा यांमधील भागांत भर टाकणें. ॰मोडणें- १ कमर खचणें पहा. २ टुमकत-मुरडत चालणें. 'चालतां कमर ठुमकत चमकत मोडितें ।' -प्रला १५७. ॰वांकणें-१ कुबड निघणें; वातादि विकारामुळें शरीराची कमान होणें. 'कुब्जेची कमर सतरा ठिकाणीं वांकली होती.' २ क्षीण हीणें; अशक्त, दुर्बल होणें; पोंक येणें. ॰सोडणें-१ कमरेचा बंद ढिला करणें; काढून टाकणें. २ पोषाख उतरणें. ३ (ल.) विश्रांति घेणें; जामानिमा उतरणें. 'सोडीना कंमर कधीं काढीना पायजमा ।' -प्रला ६४.
वीर
पु. योद्धा; लढवय्या; शूर पुरुष; उत्साही मनुष्य (लढाईत, दुसऱ्याची आपत्ति दूर करण्यांत किंवा दान करण्यांत). 'आणीकही द्रौपदीकुमर । हे सकळही महारथी वीर । मिती नेणिजे परी अपार । मीनले असती ।' -ज्ञा १.१०२. २ नवरसांपैकीं एक:-उत्साह, शौर्य, पराक्रम दाखविणारा भाव. ३ ज्याचा कोणी पूर्वज लढाईंत मेला असून, जो फाल्गुन वद्य प्रतिपदेचे दिवशीं, योद्ध्याच्या समारंभांनें देवदर्शनासाठीं जातो असा. ४ वरील मृत मनुष्याचा देवांमध्यें बसविलेला टांक. 'वीर बैसविला देव्हारां ।' -दावि ६३. ५ मोठ्या मनुष्याची मरणोत्तर दशा. -बदलापूर ४९२. ६ विशेषनाम, हुद्दा किंवा वर्णनपर नांव यांस जोडून येतो; त्यावेळीं पुढारी, प्रमुख, श्रेष्ठ असा अर्थ होतो. उदा॰ रघुवीर; कुरुवीर; यदुवीर; दैत्यवीर; कपिवीर; भक्तवीर; वदान्यवीर इ॰ 'तैसा तुका वैष्णववीर । अवीट आवडी त्याची थोर । मोजुनि त्याहि कृष्णवीर । स्वहस्तें चौगुणें घेती वर.' ७ एक पदवी. कोण- तेही धाडस, उत्साह, औदार्य, परोपकार, जनकल्याण इ॰ गुणा- विषयीं प्रसिद्ध असलेल्या पुरुषास लावतात. उदा॰ वीर नरीमन, वीर वामनराव.-वि. १ शूर; पराक्रमी. २ वैराग्यशील. [सं.] सामाशब्द- ॰कंकण-न. वीर पुरुषाचा मान म्हणून, पराक्रमाचें द्योतक असें मनगटांत घातलेलें कडें. 'वीर कंकण घालितां नाकीं । परी तें शोभा पावेना कीं ।' -दा ७.९.१५. ॰कन्या-स्त्री. (वीर पुरुषाची मुलगी) युद्धप्रिय, धाडशी, खंबीर मनाची स्त्री. वीर- भार्या, वीरपत्नी, वीर भगिनी हे समधर्मी शब्द होत. [सं.] ॰कल्लु-पु. (गो.) वीराचा दगड; वीरगळ. [का. कल्लु = दगड] ॰गड-पु. घोसाळा किल्ला. शिदि १५१. ॰गंठी-(महानु.) वीरगुंठी पहा. 'विरली रुळती वीरगंठी ।' -दाव २४४. ॰गर्जना- स्त्री. वीराच्या आरोळ्या (आव्हान, उत्तेजन देणाऱ्या). [सं.] ॰गांठ-स्त्री. विशिष्टप्रकारची केसांची गांठ; वीरगुंठी पहा. 'बासींगे हीरेयाची जोती मीरवती वीती वीरगांठी ।' -धवळेपू ६९. ॰गुंठी-स्त्री. विशिष्ट प्रकारनें केंस बांधणें; वीराला शोभण्या- सारखी डोक्यावरील केंसाची गांठ. 'अविरळ कुरळांची मस्तकीं वीरगुंठी ।' -सारुह ८.११८. 'सरसावुनी वीरगुंठी ।' -मुसभा ७. १७; -ह १९.३७. ॰घंटा-स्त्री. दौंडी पिटण्याचें साधन अशी घंटा; एकच वाद्य. 'डौंडीची ढवंस ढोला । वीरघंटा तांबकिया ।' शिशु १०२६. ॰घोषणा-स्त्री. वीरगर्जना; योद्ध्यांना युद्धास निमंत्रण. [सं.] ॰जननी-स्त्री. जिची मुलें शूर, पराक्रमी आहेत अशी स्त्री; वीरमाता. [सं.] ॰जयंतिका-जयंति-स्त्री. युद्ध- प्रसंगी किंवा युद्धांत विजय मिळाल्यावर योद्ध्यांनीं केलेला नाच; युद्धनृत्य. [सं.] ॰ठाण-न. वीरासन. [सं. वीरस्थान] ॰दृष्टि- स्त्री. (नृत्य) डोळे लाल करणें, बुबुळें उंच नेणें; डोळ्याचा मध्य- भाग विकासित करणें (वीरसाचा अभिनय). ॰पट्ट-पु. वीराचें ललाटपदक; शिरताज. ॰पत्नी-स्त्री. वीराची भार्या, बायको; वीरकन्या पहा. [सं.] ॰पाण-न-न. युद्धापूर्वीं किंवा युद्ध चालत असतांना, जोर येण्यासाठीं वीरांनीं नवचैतन्यवर्धक पेय पिणें. [सं.] ॰पीर-वि. १ बोंबल्या; अरेराव; रगडमल्ल; धटिंगण माणूस. २ (प्रंशसार्थी) उत्साही, धाडसी माणूस. ॰प्रसू-स्त्री. शूर अशा पुत्रांना प्रसवणारी स्त्री; वीरमाता. [सं.] ॰भगिनी- स्त्री. वीराची बहीण. [सं.] ॰भद्र-पु. १ दक्षयज्ञाचा विध्वंस करण्यासाठीं शंकरानीं जटेपासून निर्माण केलेला वीर पुरुष; अकरा रुद्रांपैकीं एक. २ (ल.) उग्र स्वरूपाचा व विनाशक प्रवृत्तीचा मनुष्य. ३ शिवगणांचा एक वर्ग. ४ लिंगायत लोकांमधील एक विशेष दीक्षा. ५ रागीट, हट्टी व सुधारणार नाहीं अशा मुलास म्हणतात. [सं.] ॰भाग-पु. वीराचा भाग; शूर पुरुषाचा वस्तू. 'मी तंव तुझेचि अर्धांग । केविं शिशुपाळ शिवेल माझे आंग । तूं शिरावरी असतां श्रीरंग । मी वीरभाग यदुवीरा ।' -एरुस्व ४. १६. ॰भार्या-स्त्री. वीरपत्नी; वीराची बायको; वीरकन्या पहा. [सं.] ॰भाषण-न. वीराची भाषा; वीराचें वचन. [सं.] ॰माता-स्त्री. शूरांची आई; वीरजननी पहा. [सं.] ॰मुष्टि-पु. मद्रासइलाख्यांतील एक भिकाऱ्यांची जात. हे लोक शारीरिक करा- मतीचे खेळ करून पैसे मिळवितात. हे लिंगायत धर्माचे आहेत. ॰रस-पु. वीराला युक्त अशी भावना, विकार; नवरसांपैकीं एक, याचे चार विभाग पडतात:-विद्या, युद्ध, दया व दान. वीररसाचें उदा॰ गर्वोक्ति फाल्गुन वदे जगदेकराया । आहे मशीं कवण तो झगडा कराया । म्यां कालखंज वधिले अतुलप्रतापी । पौलोमही असुर गोसुर विप्रतापी ।' -वामन, भीष्मप्रतिज्ञा. [सं.] ॰राणा- वि. वीरश्रेष्ठ. 'पाठी धरा वाहक वीरराणा । चाले करें वोढुनि चाप- बाणा ।' -मुरामायण अयोद्ध्या. ॰वाद-पु. वीराचें प्रतिपक्षीयास युद्धासाठीं केलेलें आव्हान; युद्धास निमंत्रण. [सं.] ॰विलास- पु. वीराची क्रीडा. -वि. वीरांना ज्यांपासून विलास (आनंद) होतो असा (अर्जुन). 'हारपलें दावूनि जैसा । मागु सरे वीर- विलासा । ज्ञानाचि कळस वळघे तैसा । कर्मप्रसादा ।' -ज्ञा १५. ५८६. ॰वृत्ति-स्त्री. वीराची प्रकृति-शौर्य, पराक्रम. 'तयाचि तुलगासवें । वीरवृत्तीचेनि थावें ।' -ज्ञा १.१२७. ॰वैष्णव-पु. १ वैष्णवांचें आचार कडकडीत पाळणारा एक वर्ग. याच्याप्रमाणें वीरशैव असा एक वर्ग आहे. २ वैष्णववीर; कट्टर, थोर वैष्णव. 'तैसा तुका वैष्णववीर । अवीट आवडी त्याची थोर ।' [सं.] ॰शय्या-स्त्री. रणभूमि. [सं.] ॰शैव-पु. लिंगायतांचा एक वर्ग. ॰श्री-१ अंगांत संचरणारें शौर्यांचें वारें; स्फुरण; वीराचें यश; अब्रू. २ शौर्य. 'कीं अतिथीविण भोजन । कीं वीरश्रीविण रण ।' [सं.] ॰सभा-स्त्री. योद्ध्यांची सभा. [सं.] ॰सू-स्त्री. वीरमाता; वीरजननी पहा. [सं.] ॰हंता-वि. वीरांचा पराभव करणारा किंवा त्यांस ठार करणारा. ॰क्षेत्र-न. बडोदें. 'वीरक्षेत्रीं महाराज प्रथुत्तम खंडेराव राजे बहादूर ।' -गापो ११. ॰क्षेत्री- पु. क्षत्रीयवीर. 'वरी विराजे वीर-क्षेत्री । हरिश्चंद्र नृपनाथ ।' -मुहरिश्चंद्रख्यान नवनीत पृ. १८३. वीराशंसन-न. युद्धांतील वीरांनां प्रिय अशी जागा; प्राणावर बेतण्याचा जेथें प्रसंग येतो अशी धोक्याची जागा. [सं.] वीरासन-न. १ डावा गुढघा मोडून व उजवा उभा करून, किंवा दोन्ही गुढगे जमीनीस टेंकून बसणें; आसनाचा एक प्रकार. योद्ध्याचीं बसण्याची रीत (युद्धांत बाण सोडतांना, दरबारांत किंवा सभेंत बसणें झाल्यास). (क्रि॰ घालणें, धरणें). २ वीराची बसावयाची जागा, आसन इ॰ ३ रणभूमि. [वीर + आसन] वीरेंवीर-क्रिवि. एकूणएक वीर. 'वीरेंवीर बुडाला । अवघा हळकल्लोळ जाला । महारुद्र खवळला । ज्ञाते लोक जाणती ।' -दावि ४९६. [वीर + वीर]
कर्म
न. १ एखादें काम, कृत्य. 'हें कर्म झालें समरांत जेव्हां । होतास कोठें रणभीरु तेव्हां ।' -वेणीसंहार ३. २. स्नान- संध्या, यज्ञयागादि धार्मिक विधि; याचे नित्य, नैमित्तिक व काम्य असे तीन भेद आहेत. ३ सांप्रतच्या आयुष्यांतील कृति, चाल, आचार, वर्तणूक; यावरून दैव किंवा नशीब अशा अर्थानें योजतात-येथें दैव म्हणजे पूर्वजन्मार्जित पापपुण्याचा भोगवटा होय; पूर्वजन्मकृत आचरण; संचित. 'अरे अरेकर्मा । बारा वर्षें झालीं याच धर्मा ।।' 'या व्यापारांत मीं साफ बुडालों, माझें कर्म ! दुसरें काय ?' 'कर्मबलिवंत', 'कर्मबलवत्तर' 'घोर-कठिण कर्म' या संज्ञा कर्माचें (दैवाचें) वर्चस्व, काठिण्य, निष्ठुरता दाखवितात. ४ विशिष्ट काम; नैतिक कर्तव्य; जाति, धंदा वगैरेंनीं मान- लेलें आवश्यक कृत्य. ५ (व्या.) कर्त्यानें अमुक क्रिया केली हें दाखविणारा शब्द; कर्तृविषयक व्यापाराचें कारक; कर्माची विभक्ति प्रायः द्वितीया असते. 'रामा गाय बांधतो' यांत गाय हें कर्म. ६ उद्योग; कामधंदा; नेमलेलें, विशिष्ट प्रकराचें काम. ७ सुरतक्रिडा; मैथुन; रतिसुख; संभोग. 'त्यानें तिच्याशीं कर्म केलें.' ८ सामान्य क्रिया; ऐहिक व्यापार; मायिक क्रिया. 'माया हा सामान्य शब्द असून तिच्याच देखाव्याला नामरूपें व व्यापाराला कर्म हीं विशिष्टार्थक नामें आहेत.' -गीर २६०. [सं.] (वाप्र.) कर्म दोन पावलें पुढें-नशीब नेहमीं आपल्यापुढें धांवत असतें. ॰आड ठाकणें-कर्म आडवें येणें; आपत्ति ओढवणें. 'अन्न घेवोनि जों निघाली । तों कर्म आड ठाकलें ।' -ह १६.१३०. कर्मानें ओढणें-ओढवणें-दैवाचा पाश येऊन पडणें; दैवाधीन होणें. -नें जागें होणें-दैव अनुकूल होणें. -नें धांव घेणें-दैव पुढें येणें; दैवाकडून प्रतिबंध, अडथळा होणें. -नें पाठ पुरविणें- उभें राहणें-दैवानें मोडता, अडथळा घालणें; कर्म ओढवणें. -नें मागें घेणें-सरणें-दैवानें साहाय्यने करणें; केल्या कर्माचें फळ-न. केलेल्या कृत्याचा परिणाम. 'केल्या कर्माचें फळ बापा । ऐश्वर्य तुज देतील ।' -अमृत, नव ४४३. (सामाशब्द) ॰कचाट- न. प्रारब्धामुळें मागें लागलेलें दुर्दैव, संकट, विपन्नावस्था; कर्म- कटकट; पूर्व जन्मीचें पाप, भोग. 'प्राणी कष्टकष्टोंचि मेले । कर्मकचाटें ।' -दा १८.८.२०. [सं. कर्म + म. कचाट] ॰कटकट- खटखट-स्त्री. १ प्रारब्धयोगानें वांट्यास आलेलें किंवा गळ्यांत पडलेलें व कंटाळा येण्याजोगें कोणतेंहि काम; वरचेवर त्रास देणारें, डोकें उठविणारें, अडथळा आणणारें काम किंवा व्यक्ति; कोणतीहि नशीबीं आलेली पीडा, त्रास, छळ, जाच वगैरे. २ (ल.) जिकिरीचें, नावडतें काम; व्याद. 'मी म्हातारा झालों, माझ्यामागें ही शिकविण्याची कर्म कटकट कशाला ?' 'आतां त्यांची कर्मकटकट आपणांस कशाला हवी' -नि ६७. ३ (ल.) भांडण; तंटा; कटकट. 'तुम्हां दोघांत नेहमीं इतकी कर्मकटकट चालत असते.' -भा ३७. ॰कट्टो-वि. (गो.) हतभागी; कर्मकरंटा. ॰कथन-नी-न. १ कर्मकथा; कर्माची कहाणी. २ (ल.) दुर्दैवी प्रसंगकथन; दुःखदकथा; कर्मकथा पहा. 'ऐसी आमुची कर्मकथनी । तें अनायासें आलें सर्व घडोनी ।' -मक २६. १८५. [सं.] ॰कथा-स्त्री. १ प्रारब्धामुळें भोगलेल्या दुःख, त्रास, दगदग, वगैरेची दुसर्याजवळ सांगितलेली गोष्ट, वृत्तांत, कहाणी. २ आत्मश्लाघेचें किंवा रिकामटेकडें भाषण; बाता. ३ एखाद्या प्रसंगाची किंवा कृत्याची खरी व इत्थंभूत हकीकत. ४ कंटाळवाणें, निरर्थक भाषण, बडबड. [सं.] ॰कपाट-न. कर्म- कचाट पहा. [सं.] ॰कहाणी-स्त्री. कर्मकथा पहा. ॰कांड- न. त्रिकांड वेदांतील यज्ञासंबंधींचा कर्ममार्गदर्शक व आचारनिद- र्शक भाग; -मंत्र व ब्राह्मणें मिळून जो वेदभाग त्यास कर्मकांड व उपनिषदांस ज्ञानकांड म्हणतात. 'कर्म कांड तरी जाणें । मुखोद्गत पुराणें ।' -ज्ञा १३.८२८. २ धर्मकर्में, आचारविचार, संस्कार वगैरेना व्यापक अर्थानें हा शब्द लावितात. (सामा.) आन्हिक; नित्यनैमित्तिक आचार. 'कृष्णगीत रुचतां श्रवणातें । कर्मकांड रुचि न दे कवणातें ।।' 'आतां आपलें कर्मकांड अगदीं एकाबाजूस ठेवावें.' -चंद्रगुप्त ३५. ३ कंटाळवाणी, निरर्थक बडबड; कर्मकथा. (क्रि॰ गाणें; सांगणें; बोलणें). ॰कार-वि. १ (गो.) कर्मनिष्ठ. २ शिल्पी; लोहार. [सं.] ॰काल-ळ-पु. धर्मकार्यें करण्यास उचित असलेला काळ, वेळ, समय. [सं.] ॰केरसुणी-स्त्री. कर्मरूपी केर सरसकट झाडणारी, कर्मापासून सोडविणारी केरसुणी. 'तेव्हां तेचि श्रद्धा होये । कर्मकेरसुणी ।' -ज्ञा १७.६४. ॰गति- स्त्री. दैव; प्रारब्ध; नशीब. दैवगति पहा. [सं.] ॰चंडाळ- चांडाळ-पु. (कृत्यानें) निवळ चांडाळ. १ अतिक्रूर, पाषाणहृदयी माणूस. २ स्वैर वर्तनी; धर्मलंड; दुरात्मा. [सं.] ॰चोदना- स्त्री. कर्म करण्याची प्रेरणा. 'कर्मचोदना व कर्मसंग्रह हे शब्द पारिभाषिक आहेत.' -गीर ८३५. [सं.] ॰ज-वि. कर्मापासून उत्पन्न झालेलें. 'सकळ यज्ञ कर्मज' -ज्ञा ८.४६. [सं.] ॰जड-पु. कर्मठ लोक. 'तिन्हीं लोकांचा शास्ता । ईश्वर तो मी नियंता । येणें कर्मजडांची वार्ता । अनीश्वरता छेदिली ।' -एभा १०.६२१. ॰जात-न. सर्व प्रकारचें कर्म; सर्व तर्हेचे व्यापार. 'मग सस्य फळपाकांत । तैसें निमालिया कर्मजात । आत्मज्ञान गिंवसित । अपैसें ये ।' -ज्ञा १८.१२९. [सं.] ॰जीव-वि. (गो.) बारीक, लहान प्राणी. ॰दक्ष-वि. धर्माचार व विधि यांत निपुण; कर्मठ; कर्मशील; कर्मनिष्ठ, कर्मिष्ठ यांसारखा उपयोग. 'कर्मदक्षा कर्ममोचका । जयराम कोदंड भंजना ।' [सं.] ॰धर्म-न. (क्क.) पु. (यासमासांतील धर्म शब्द जरी पुल्लिंगी असला तरी बहुतेक सर्व समास नपुंसकलिंगीच आहेत; कारण यांतील प्रधानार्थ कर्म शब्दापासूनच निघालेला असून धर्म शब्द केवळ जोडशब्द आहे) वर्तन; वर्तनक्रम; कृत्य; आचरण. 'जसें ज्याचें कर्मधर्म तशी त्यास फलप्राप्ति,' 'कर्माधर्मानें कोण्ही संपत्ति भोगतो आणि गादीवर बसतो, कोण्ही फांशी जातो.'; 'कोण्हाच्या कर्मधर्मांत कोण्हाचा वांटा नाहीं.' = प्रत्येकाला स्वतःच्या कृत्याबद्दल झाडा दिला पाहिजे. ॰धर्मगुण-पु. कर्म- धर्माचा प्रभाव, शक्ति. कर्मधर्मसंयोग पहा. [सं.] ॰धर्मविर- हित-वि. धर्माज्ञा, धार्मिक व्रतें व कृत्यें ज्यानें सोडलीं आहेत किंवा जो त्यापासून मुक्त झाला आहे असा; ऋषि किंवा साधुजन यांना चांगल्या अर्थीं व उच्छृंखल व धर्मलंड यांना वाईट अर्थीं लावतात. 'आम्हीं कर्मातीत झालों म्हणती' या शब्दाचा अर्थ दोन्हीं प्रकारचा म्हणजे चांगला व वाईटहि आहे. 'झालों कर्म- धर्मविरहित । मना आवडे तो भोग भोगित ।' [सं.] ॰धर्म- संयोग-धर्मयोग-पु. १ स्वतःचें दैव आणि सत्कर्म यांचा संयोग; भाग्य व सदाचार यांचें ऐक्य (पूर्वजन्मार्जित आणि इहजन्मार्जित सत्कृत्यांचें फळ मिळून) २ अकल्पित मेळ; यदृच्छा; प्रारब्धयोग. ॰धर्मसंयोगानें-क्रिवि. अचानक; चम- त्कारिक किंवा अकल्पित मेळ मिळून येऊन; प्रसंगोपात्त; प्रारब्ध- योगानें. 'कर्मधर्मसंयोगानें मी अगदीं सहज बाहेर गेलों तों माझी नजर तिच्याकडे गेली.' -मायेचा बाजार. 'कर्मधर्मसंयोगानें तुमची गांठ पडली आहे तर गोड बोलून काळ लोटावा.' ॰धारय समास-पु. (व्या.) वक्त्याच्या मनांत उभय शब्दांचा भाव ज्यांत समान असतो किंवा उभय शब्दांचा परस्पर उप- मानोपमेयभावसंबंध ज्यांत असतो तो; विशेष्य-विशेषणांचें सान्निध्य असून त्यांचा जो समास घडतो तो; उदा॰ 'भक्तिमार्ग = भक्ति तोच मार्ग, किंवा भक्तिरूप जो मार्ग तो; भवसागर; संसारा- टवि; काळपुरुष.' -मराठीभाषेचेंव्या. २७५. तत्पुरुषसमासाचा एक भेद. [सं.] ॰निष्ठ-वि. कर्मठ पहा. 'जया लाभाचिया आशा । करूनि धैर्यबाहूंचा भरंवसा । घालीत षट्कर्मांचा धारसा । कर्मनिष्ठ ।' -ज्ञा ६.४७४. [सं.] ॰निष्ठा-स्त्री. १ कर्मावर निष्ठा. २ कर्म- योग. 'वैदिक धर्मांत...दोन मार्ग...आहेत, पैकीं एका मार्गास...ज्ञाननिष्ठा व... दुसर्यास कर्मयोग किंवा संक्षेपानें नुसता योग अगर कर्मनिष्ठा असें म्हणतात. -गीर ३०१. [सं.] ॰न्यास-पु. १ कर्म किंवा कृत्यें त्याग (पुढील जन्मीं हित व्हावें किंवा फळ मिळावें म्हणून). २ फलन्यास; कर्मा- पासून मिळणार्या फलाविषयींच्या इच्छेचा किंवा आशेचा त्याग; निष्कामकर्म. [सं.] ॰फल-न. प्रारब्धापासून मिळणारें फळ; पूर्वजन्मीं केलेल्या पापपुण्याचें चांगलें अगर वाईट असें या जन्मीं भोगावें लागणारें फळ. 'सांडूनि दुधाचि टकळी । गोंवारी गांवधेनु वेंटाळी । किंबहुना कर्मफळीं । तैसें कीजे ।' -ज्ञा १८.१७४. [सं.] ॰फुटका-वि. भाग्यहीन; दुर्दैवी; कमनशिबाचा; अभागी. [कर्म + फुटणें] ॰फुटणें-सक्रि. दुर्दैव ओढवणें; गोत्यांत येणें; नुकसान होणें. ॰बंध-पु. फलाशेनें केलेल्या कर्मामुळें प्राप्त झालेलें बंधन; प्रारब्धप्राप्त स्थिति; मायिक पसारा; ऐहिक मायापाश; प्रपंच; संसार. 'जो पहुडला स्वानंदसागरीं । कर्मबंधीं न पडे तो ।' [सं.] ॰बंधु-पु. व्ययसायबंधु; समव्यवसायी; एकाच प्रकारचें काम करणारा. [सं.] ॰भुवन-न. कर्मरूप घर. 'तेथ न्यावो आणि अन्यावो । हा द्विविधु साधूनि आवो । उभवितां न लवी खेंवो । कर्मभुवनें ।' -ज्ञा १८.४५५. [सं.] ॰भूमि, भूमिका -स्त्री. १ इहलोक; मृत्युलोक; यज्ञादि धार्मिक कृत्यें जेथें करतां येतात ती जागा; कर्म करावयाचें क्षेत्र; रंगभूमि (मर्त्यांची). 'जेथें मनाचा प्रवेशु नाहीं । त्यांची पायवाट ते ठायीं । ऐसें स्वइच्छा विचारितां महीं । आले ते पाही कर्मभूमीसी' -एभा २.१८४. 'परम प्रतापी दशरथपिता । कर्मभूमीस येईल मागुता ।' -रावि १६.८६. [सं.] २ प्राधान्यानें भारतवर्ष. -हंको. ॰भोग-पु. भवितव्य- तेच्या नियामानुरूप मिळणारीं सुखदुःखें सोसणें; दैवाची भरपाई; पूर्वसंचितानुरूप या जन्मीं प्राप्त होणारी स्थिति. 'माझा कर्मभोग चुकत नाहीं.' [सं.] ॰भ्रष्ट-वि. धर्मशास्त्रविहित नित्यनैमित्तिक कर्मांचें आचरण न करणारा; धर्माज्ञा व धर्मकर्म परिपालनाविषयीं उदासीन; कर्तव्यच्युत; कर्तव्यपराङ्मुख. [सं.] ॰मार्ग-पु. १ स्नानसंध्या इ॰ कर्में करण्याची रीत; यज्ञयागादि कर्मरूप ईश्वर- प्राप्तीचा किंवा मोक्षाचा साधनीभूत मार्ग; सत्कृत्यें केल्यानें व धर्माचरणानें मोक्षाला जाण्याचा मार्ग. २ धर्मकृत्यें करण्याचा खरा मार्ग. ३ श्रौत म्हणजे यज्ञयागादि कार्मांचा मार्ग. 'भारतीय तत्त्वज्ञानांत मोक्षाचे कर्ममार्ग, ज्ञानमार्ग व भक्तिमार्ग असे तीन मार्ग सांगितले आहेत.' -ज्ञाको क १३२. [सं.] ॰मार्गी-वि. कर्ममार्गानें जाणारा; जो निष्ठापूर्वक धर्माचरण करून परमेश्वर- प्राप्तिविषयीं झटतो तो. [सं.] ॰मुक्ति-स्त्री. स्नानसंध्यादि नित्य नैमित्तिक कर्में करण्याची आवश्यकता ज्या स्थितींत उरत नाहीं अशी अवस्था; नैष्कर्म्यसिद्धि [सं.] ॰मोचक-वि. कर्ममार्गा- पासून मुक्त करणारें; ऐहिक सुखदुःखापासून सोडविणारें. 'कर्म- दक्षा कर्ममोचका । जयराम कोदंडभंजना ।' [सं.] ॰मोचन- न. कर्ममार्गापासून मुक्तता. ॰योग-पु. १ प्रारब्ध; दैव; यदृच्छा; योगायोग. २ दैवगतीनें घडणारी गोष्ट. -शर. ३ व्यापार; चळवळ किंवा कार्य करण्याचें तत्त्व. -ज्ञाको क १३५. ४ ज्ञान हेंच जरी मोक्षसाधन असलें तरी कर्मशून्य राहणें कधींच शक्य नसल्यामुळें त्यांचें बंधकत्व नाहींसें होण्यास कर्में कधींहि न सोडतां शेवट- पर्यंत तींच निष्कामबुद्धीनें करीत राहण्याचा जो योग तो. -टिसू ४७-४८; याला इंग्रजींत एनर्जीझम असा प्रतिशब्द गीतारह- स्यांत सुचविला आहे. -गीर ३०१ वरील टीप. या योगाचें जें शास्त्र त्यास कर्मयोग म्हणतात व तें आचरणारा तो कर्मयोगी). 'बलवंत (टिळक) कर्मयोगी' -सन्मित्रसमाज मेळा पद्यावली १९२९, पद १. [सं.] ॰लंड-वि. धर्मशास्त्रविहित नित्यनैमित्तिक विधींचें पालन न करणारा; धर्मभ्रष्ट; धर्मविधि व धर्माज्ञेचा धिक्कार करणारा, उपहास करणारा [सं.] ॰लोप-पु. नित्य धार्मिक क्रमां- तील एखादें कर्म सोडणें, न करणें; दीर्घकालपर्यंत नित्य अगर नैमित्तिक कर्मविधि न करणें. [सं.] ॰वाचकधातुसाधित- न. मूळ धातुस 'ला' किंवा 'लेला' हे प्रत्यय लाविले असतां होणारें धातुसाधित. उ॰ केलेला, दिलेला. परंतु यांत 'पढ' धातूचा गण वर्ज्य करून हे प्रत्यय लावितेंसमयीं सकर्मक धातूस 'ई' आगम होतो. उदा॰ ठेविला, अर्पिला, आकर्षिलेला. -मराठी- भाषेचें व्याकरण १७३. [सं.] ॰वाद-पु. १ धर्मविहित कर्मां. नींच मोक्षप्राप्ति होते असें मत. २ मनुष्यास विशिष्ट जन्मांत जें सुखदुःख मिळतें तें त्याच्या पूर्व जन्मांतील कृत्यांचें फल होय असा युक्तिवाद; कर्माचें फळ भोगणें ही कल्पना. -ज्ञाको क १३६. [सं.] ॰वादी-पु. कर्मवादावरच भिस्त ठेवून त्याचें समर्थन करणारा माणूस [सं.] ॰वासना-स्त्री. दैनिक धर्मकृत्यांबद्दलची इच्छा, आवड. [सं.] ॰विधि-पु. (अनेकवचनींहि प्रयोग होतो) धर्मसंबंधीं कृत्यें वगैरेचे नियम, पध्दति, रीति, मार्ग; कोणत्याहि विशिष्ट प्रकारच्या धर्मकृत्याचें सूत्र किंवा विधान. [सं.] ॰विपाक-पु. १ पूर्व जन्मीं केलेल्या पुण्य, पाप वगैरे कृत्यांचें फल पुढील जन्मीं हटकून यावयाचें हा सिद्धांत. २ कर्माची फलनिष्पत्ति; परिणाम. [सं.] ॰वीर-पु. कार्यकर्ता; पराक्रमी मनुष्य. 'कर्मवीर निघुनी गेलो' -संग्राम ४९. [सं.] ॰वेग- कर्माचा वेग-पु. दैवाचा किंवा प्रारब्धाचा जोर, झपाटा, सामर्थ्य, धक्का; पूर्वसंचिताचा प्रभाव. 'कलालाचा भोवरा । जैसा भवे गरगरा । कर्मवेगाचा उभारा । जोंवरी ।' 'जेथें कर्माचा वेग सरे । तेथें धांव पुरे ।' [सं.] २ (अनेक वार केलेल्या) कृत्यांचा जोर, सामर्थ्य, प्रचोदन; संवयीचा जोर; स्वाभाविक प्रेरणा; 'कर्मवेग भलत्याकडे ओढून नेईल.' ॰शील-वि. कर्मा- सक्त; धर्मानें वागणारा; शास्त्रानें संगितलेलीं सर्व धर्मकर्में जो मनापासून काळजीपूर्वक करतो तो. [सं.] ॰संगी-वि. कामांत, धर्मानुष्ठानांत, व्रतनियमनांत सतत गढलेला; याच्या विरुद्ध ज्ञानाभ्यासी [सं.] ॰संग्रह-पु. निरनिराळे व्यवसाय, व्यापार; आपण ज्या क्रिया करतों त्या; मानसिक क्रियेच्या तोडाची बाह्य, प्रत्यक्ष क्रिया. 'कर्मसंग्रह या शब्दानें त्याच मानसिक क्रियेच्या तोडीच्या बाह्य क्रिया दाखविल्या जातात.' -गीर ८३६. [सं.] ॰संचय-पु. कर्मसंग्रह; मनुष्याचे अनेकविध व्यापार, क्रिया; चलनवलनादि कृत्य 'तैसेंचि कर्ता करण कार्य । हा कर्मसंचयो ।' -ज्ञा १८.५१२. [सं.] ॰संन्यास-पु. १ कर्मांचा त्याग; नित्य नैमित्तिकादि कर्में करण्याचें सोडून देणें. २ शारीरिक सोडून इतर सर्व कर्मांचा त्याग (शांकरमत). 'शंकराचार्यांच्या ग्रंथांत कर्मसंन्यासच प्रतिपाद्य आहे.' -टिसू ५ [सं.] ॰सूत्र-न. नित्य धर्मकर्माची व त्यासंबंधीं नियमांची मालिका; कर्तव्यकर्म- परंपरा. 'भवपाश तोडिते शस्त्र । ज्ञान ईश्वराचें विचित्र । परि जिवाचें कैसें कर्मसूत्र । जे अनावडी तेथें विषयीं ।' ॰हीन- वि. धार्मिक नियम, विधि न पाळणारा; धार्मिक नियमाबद्दल काळजी न करणारा. [सं.] म्ह॰ कर्मणो गहना गति: = नशि- बाची गति जाणणें शक्य नाहीं (एखादी वाईट गोष्ट अकल्पित घडली म्हणजे दैववादी मनुष्य ही म्हण म्हणतो.)