सहा मराठी शब्दकोशांतील २,१८,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
सड
सड saḍa m A stub or stump (of a sugarcane, reed, stalk of corn); a piece of stubble. 2 fig. The membrum genitale (of a bull or a buffalo). 3 fig. A teat or dug. 4 A bristle (as of a hog); a stiff hair or similar thing. 5 f A line of procedure; a course or continuous practice. v ये, चालत ये, चाल, पड. 6 In cases of litigation or dispute. Any writing or oral statement in attestation or evidence of; any certificate, document, testimony, or acceptable account. 7 W A groove or a notch. सड अवळणें (esp. शेळीचें) To wrap up (with a rag containing cowdung) the dugs (esp. of a she-goat) that the young one (the kid &c.) may be debarred from sucking.
सड saḍa f (सडणें) Pounding (of rice &c.) in order to husk.
स्त्री. १ पद्धत; तर्हा; वहिवाट; रूढ गोष्ट. (क्रि॰ येणें; चालत येणें; चालणें; पडणें.) 'ही सड कारकुनांनीं मुसलमान ग्रंथकारांपासून घेतली आहे.' -विवि. १८९६. ८१४८. २ साक्षीदाराची तोंडी अगर लेखी जबानी; पुरावा; दस्तऐवज; कागदपत्र; जुना पुरावा. 'कसबे पैठण येथील सड आली.' -वाडसमारो ६.३२५. ३ (कु.) खोबण; खांच; खचरा; कातरा; खाप. [फा.]
सड m A stump, stub (of a sugarcane, reed &c.) Fig. A teat. f Pounding in order to husk.
पु. १ धस; ठोंब; खुंट; ज्वारी वगैरे कापल्यानंतर शेतांत राहणारा बुडखा, खुंटारा, धसाडी, शल्य. २ (ल.) (अश्लील) जननेंद्रिय; (बैल किंवा रेडा यांचें) लिंग. ३ (ल.) आंचळ; स्तन; आसड; थान. ४ (डुकराचा किंवा इतर प्राण्याचा) राठ केस. सड आवळणें-शेळीचे स्तन कोंकरानें दूध पिऊं नये म्हणून बांधून ठेवणें.
वि. सडा; बोजा नसलेला. 'भाऊचे घोडे सडबेधड गारदी पुढें बिनी धरती ।' -ऐपो १८४.
स्त्री. तांदुळ कांडण्याची क्रिया. [सडणें]
सद
वि. शंभर -आदिलशाही फर्मानें. [फा.]
स्त्री. सभा; समुदाय. 'सावित्रीनें कथिलें तें वृत्त अशेष साधुसद नमुनीं ।' -मोवन १३.१०२. [सं.] सदस्य-पु. १ सभासद; मंडळींतील, सभेंतील व्यक्ती २ यज्ञांतील एक ऋत्विज.
संबंधित शब्द
षट्, षड्, षण्, षष्
वि. सहा संख्या; समासांतहि उपयोग करतात [सं. षट्] (पुढील सामाशब्द 'षट्' या पदाशीं जोडून झालेले आहेत). ॰क-न. सहांचा समुदाय. ॰कर्ण-वि. सहा कानांचा. ॰कर्णी-क्रिवि. तीन इसमांच्या कानीं गेलेली. म्हणजे प्रसिद्धिस, उघडकीस आलेली (दोन माणसांत केलेला म्हणजे चार कानीं गेलेला, गुप्त विचार उघड होत नाहीं, तीन इसमांस तो कळला तर तो फुटतो). (क्रि॰ होणें; फुटणें). ॰कर्म-कर्में-न अव. १ ब्राह्मणांचीं, अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान, प्रतिग्रह हीं कर्में. २ जारण, मारण, उच्चाटन, मोहन, स्तंभन, विध्वंसन हीं मंत्र व तंत्र विद्येंतील कर्में. ३ ब्राह्मणाच्या उप- जीविकेंचीं सहा साधनें-कणवृत्ति, प्रतिग्रह, याचना किंवा भिक्षावृत्ति, कृषि, वाणिज्यवृत्ति, गोरक्ष, वार्धुषिकवृत्ति (साव- कारी). ४ (हटयोग) धौती, कपालभाति, त्राटक, नेति, वस्ति, नौली. ॰कर्मी-वि. षट्कर्में करणारा. ॰कोण-पु. १ सहा कोनी आकृति. २ इंद्राचें वज्र. -वि. सहा कोनांचा. ॰चक्र-पु. अव. (हटयोग) देहाच्या ठायीं असलेलीं सहां पद्या- कार चक्रें-मूलाधार किंवा आधार, लिंग, नाभी, हृत्, कंठ, मूर्ध. यांना पद्में असेंहि म्हणतात. हीं देहाच्या मधील नाडीवर असतात. या नाडीस भागीरथी म्हणतात. तिच्या दोन्हीं बाजूंस दोन नाड्या यमुना व सरस्वती या नांवाच्या आहेत. या चक्रांना आणखीहि इतर नांवें आहेत तीं-कूर्म, अनंतशेष, आधार, अनाहत, अधिष्ठान, नाभी, जठराग्नि, मणिपूर किंवा पद्म, मानस, कर्पूर (याचे शेवटास ब्रह्मरंध्र असतें), गरुड, गोल्हाट, त्रिगांति इ॰ (क्रि॰ भेद करणें). ॰दर्शनें-न. अव. सौर, शाक्त, गाणपत्त्य, शैव, वैष्णव, स्कांद; किंवा सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, मीमांसा व वेदांत ॰पद-पदी-पुस्त्री. १ भ्रमर, भुंगा. २ ऊ. ३ (ल.) घोडेस्वार (घोड्याचे चार व स्वाराचे दोन मिळून सहा पाय म्हणून). -वि. सहा पायांचा (ऊ, टोळ, भुंगा इ॰). -स्त्री. सहा चरणांचें कडवें असलेली कविता. ॰प्रमाण-न. जीव आणि अंतःकरणपंचक मिळून सहांचें प्रमाण. ॰प्रज्ञ-वि. गुण, संपत्ति, सुख, ब्रह्मानंद, जगाची प्रकृति, ब्रह्मज्ञान जाणणारा. अर्थ, पुरुषार्थ पहा. ॰बाहु-वि. सहा हातांचा षड्भुज. ॰शास्त्रें-न. अव. १ (षडंगें) छंद, निरुक्त, व्याकरण, ज्योतिष, शिक्षा, कल्पसूत्र. २ दोन न्याय, दोन मीमांसा, सांख्य, योग; किंवा (षड्दर्शनें) न्याय, वैशेषिक, मीमांसा, वेदांत सांख्य, पातंजल योग. ॰शास्त्रसंपन्न-शास्त्री-वि. १ वरील सहा शास्त्रें जाणणारा. २ (ल.) विद्वान, पंडित. (पुढील सामाशब्द 'षड्' या पदास जोडून आहेत). ॰अंग, षडंग- न. १ दोन हात, दोन पाय, कमर, डोकें हीं शरीराचीं अंगें. २ वेदांचीं व्याकरण, छंद, ज्योतिष, निरुक्त, कल्पसूत्र, शिक्षा हीं उपांगें. ३ -वि. सहा अवयवांचा, अंगभूत वस्तूंचा. ॰अंग- न्यास-पु. हृदय, शिर, शेंडी, शरीर, नेत्र, यांना स्पर्श करून टाळी वाजविणें (पूजा, जप, मंत्रसिद्धि) इ॰ प्रसंगीं म्हणतांना. ॰गुण-पु. अव. संपूर्ण ऐश्वर्य, धर्म, यश, श्री, ज्ञान, वैराग्य हे किंवा धर्म, वीर्य, कीर्ति, द्रव्य, दान, वैराग्य, हे ईश्वराचे संपूर्ण गुण, या गुणांनीं संपन्न तो. षड्गुणैश्वर्य संपन्न-पु. ईश्वर, देव. -वि. १ संधि, विग्रह, यान, आसन, द्वैधीभाव, समाश्रय ही राजनीतीचीं मुख्य अंगें असलेला. २ कोणत्याहि सहा गुणांचा किंवा तत्त्वांचा समुदाय असलेला. ॰अंगुल-ली(ळी)-वि. सहा बोटांचा. ॰ग्रही-स्त्री. एका राशींत सहा ग्रहांची युति. ॰अब्द-न. सहा दिवसांचें प्रायश्चित्त. ॰अक्षर-न. 'कांहीं येत नाहीं'. एखाद्या मूर्खास थट्टेनें योजावयाचा शब्द. ॰अक्षरी मंत्र-न. १ सहा अक्षरांचा कोणत्याहि मंत्र. २ मूर्ख, शंख, अज्ञानी. ॰आनन-पु. १ कार्तीकस्वामी. २ -वि. सहा बाजूंचा. ॰ऊर्मि-स्त्री. अव. शोक, मोह, क्षुधा, तृषा, जन्म, मरण. ॰ज-पु. (संगीत.) सात स्वरांपैकीं पहिला स्वर; गाण्याचे प्रारंभीं, गायक आपल्यास योग्य असा जो ध्वनि मापून घेतो तो. यास ३६ इंच लांबीच्या तारेचा ध्वनि व २४० आंदोलनें पाश्चात्य शास्त्रकारांनीं धरिलीं आहेत. [सं. षट् + ज] ॰ज ग्राम- पु. (संगीत) आठ शुद्ध स्वरांचा समुदाय. ॰दर्शनें-न. अव. 'षट्- दर्शनें पहा. ॰भांतर-न. सूर्यंचंद्राचें अवरोधन; दोहोंमध्यें पृथ्वी येणें. ॰भाव-विकार-रिपु-वैरी-अरी-वर्ग-पु. अव. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे मनुष्याच्या मनाचे शत्रु समजले गेलेले सहा विकार. ॰भाव-पु. अव. जायते (अन्म), अस्ति (अस्तित्व), वर्धते (वाढ), विपरिणमते (प्रौढ होणें), अपक्षीयते (क्षीणता), नश्यति (मृत्यु) हे शरीराचे विकार. ॰भुज-पु. १ षट्कोण. २ -वि. सहा हातांचा किंवा बाजूंचा ॰रस, षड्रस-पु. १ कटु, अम्ल, मधुर, लवण, तिक्त, कषाय हे अन्नाचे रस. २ -वि. स्वादिष्ट, रुचकर (अन्न); असल्या अन्नाच्या मेजवानीस 'षड्सभोजन' म्हणतात. ॰षड्रिपु- वरील 'षड्भाव' पहा. ॰वर्ग-पु. १ 'षड्भाव' पहा. २ -वि. सहा वस्तूंचा समूह. ॰शास्त्री-शास्त्रें-पु न. षट्शास्त्री पहा. षडस्त्र-न. १ षट्कोण. २ -वि. सहा कोनांचा. षड्ऋतु- पु. अव. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरत्, हेमंत, शिशिर. षडैश्वर्य-न. 'षडगुणैश्वर्य' पहा. (पुढील शब्द 'पण्' शीं योजलेले आहेत). ॰मास-पु. सहा महिन्यांचा काल. सहामाही. ॰मास्य-वि. सहा महिन्यासंबंधीं. ॰मुख-पु. षडानन पहा. ॰मुखी-मुद्रा-स्त्री. (हटयोग) कानांचीं २ भोंकें, २ डोळे, २ नाकपुड्या या हातांच्या बोटांनीं दाबून करावयाची एक मुद्रा. (यापुढील शब्द 'षष्' शीं योजलेले आहेत). षष्ठ- वि. सहावें. षष्टी-ष्ठी-स्त्री. १ पंधरवड्यांतील सहावी तीथ. २ सहावी विभक्ति. ३ दुर्गादेवी, सटवी. ४ (ल.) फजीती. -वि. ५ साठ. षष्ठीपूजन-न. प्रसूतीच्या सहाव्या दिवशीं दुर्गा व इतर देवता यांची करावयाची पूजा. षाडव (राग)-पु. ज्यास सहा स्वर लागतात व एक वर्ज्य असतो असा राग. षाडव औडुव-पु. ज्याच्या आरोहांत सहा स्वर व अव रोहांत पांच स्वर लागतात तो राग. षाडवतान-स्त्री. सहा स्वरांची तान. षाडव-षाडव-पु. ज्याच्या आरोहांत सहा व अवरोहांत सहा स्वर असतात असा राग. षाडव-संपूर्ण-पु. ज्याच्या आरोहांत सहा व अवरोहांत सात स्वर असतात तो राग.
आंसड
पु. गाय, म्हैस, इ॰ कांचें थान; सड; अचळ. [म. सड]
खुंट
पु. १ खालीं राहिलेला भाग; खोड; कांड; सोट; बुंधा (झाड, झुडुप, शेपूट, केरसुणी, हजामत झाल्या नंतरचे केंस इ॰ चा). 'समूळ फोडियेले खुंट ।' -एरुस्व १०.७६. २ (मासे मारण्यासाठीं समुद्र किंवा नदी यांत) रोविलेला खांब, डांभ. ३ ज्यामध्यें फाळ बसवितात तें नांगराचें टोंक; खुळसा; कोळसा. ४ गाय, म्हैस यांच्या आचळांतून दुध येण्यास प्रति- बंध करणारा मळ. ५ गोफण, जाळें, शिंकें करण्याकरितां दोरीचे दोन पदर अथवा पेड तिरकस बाहेर ओढले जातात त्यापैकीं शेवटचे तंतू पुन्हां याच रीतीनें बाहेर काढले जाऊन वळले जातात, अशा शेवटच्या तंतूपैकीं प्रत्येकास खुंट म्हणतात. ६ दुध न देणारा जनावराचा सड; मुका, आंधळा सड. ७ पृथ्वीचे चार कोपरे, 'हिंदू देश कोण खुंट चारी ।' -तुगा ११८. 'चार खुंट जहागीर. ८ दणकट शरीराची गाय, म्हैस, जनावर किंवा स्त्री. 'काळवीट खुंट खरे, '-ऐपो २४२. ९ मध्यम आकाराचा केळीचा कोंब, खोड, मोना (मोठया केळीस चिकटलेला किंवा निराळा काढलेला). १० चार रस्त्यांचा चौक; चौहाट; अड्डा. ११ रस्त्याचें टोंक; शेवट. १२ (ल.) कुटुंब; घरदार; त्यापैकीं एक व्यक्ति; वंशाची शाखा; वंशांतील मूल; वंशाचें फल; संतान. १३ बुगडीचें मळसूत्र ज्यांतून जातें तो भाग; बुगडीचा, कुड्यांचा कानां- तील भाग. १४ अंगरख्याच्या बाहीच्या चुण्या जींत एकत्र करतात ती पट्टी अथवा गजासारखी शिवण. १५ (ल.) आधारस्तंभ; आश्रयदाता. १६ (आंधळ्या कोशिंबिरीच्या खेळांत) आंधळ्याचें सोंग घेणाराचें डोळे झांकणारा मुलगा; भोग्या. १७. (गो.) कुंपणाची काटी. १८ (कों.) तुकडा. १९ खोखोच्या खेळांतील न हालणारा गडी. 'होऊनियां खुंट बसा जपून.' -मोग- र्यांची कविता, मराठी तिसरें पुस्तक खेळ ५ पृ. ४८. २० (ढोरधंदा) अत्यंत आखूड सळ. २१ कांठ; कोपरा. 'खेटितां कुंप कांटी खुंट दरडी न पाहे ।' -तुगा ३४९. २२ स्वारी; उतारू (गाडीमधील). २३ खांब; मेढ. 'मग परमस्नेहाचा खुंट उभवोन । गरके घालिती त्यासवें ।' -नव २४.१५५. २४ जनावरास बांधण्यासाठीं जमीनींत गाडलेला लांकडी खुंटा; दांडकें. २५ वाघूर लावण्यासाठीं ठोकलेल्या लांकडाच्या मेढी; खुटला. -वि. (गो.) ताठ; नीट. [सं. कुठ्-कुंठ् = स्तम्भित होणें; प्रा. खुंट; तुल॰ का. कुंटु = लंगडा] (वाप्र.) ॰होणें-हट्ट धरून खुंटा सारखें ताठ व स्तब्ध बसणें. ॰ळणें-वाल इ॰ चा एक एक दाणा लावण्यासाठीं जमीनींत खुंटीनें, किंवा काठीनें टोचा, भोंक पाडणें, टोवणे. खुंटास खुंट उभा राहणें-होणें-एक जातो तोंच त्याच्या जागीं दुसरा येणें; गेलेल्याची जागा नवीन येणारानें भरून काढणें; खंड पडल्याची जागा भरून काढणें. खुंटास खुंट घेणें -जशास तसें करणें; उसनें फेडणें. खुंटासारखा उभा राहणें-असणें-खुंटणें-खुंटाप्रमाणें ताठरणें, ताठ उभा राहणें. ॰म्ह -आजा मेला नातु झाला खुंटास खुंट उभा राहिला. खुंटावरचा कावळा = घरदार, वतनवाडी, बायकामुलें नसलेला, वाटेल तेथें राहणारा माणूस. सामाशब्द ॰कन-कर-दिनीं दिशीं-क्रिवि. तीव्र व हलक्या आवाजानें; खाडदिशीं (दोन काष्ठांचा परस्परांना लागून होणारा शब्द) (क्रि॰ वाजणें). चुटकी, टाळी यांच्या होणार्या आवाजांप्रमाणें शब्द होऊन ॰कळी-स्त्री. बगलकळी; अंगरख्याच्या पाठीमागचा त्रिकोणी तुकडा. बगलेंतील पेशकळी आणि आगा असे दोन तुकडे व खुंट- कळी मिळून अंगरख्याची एक बाजू होते. ॰खुंटण-न. खुंट अर्थ १-२ पहा. ॰पान-न. (राजा.) केळीच्या गाभ्यापासून निध- णारें शेवटचें आणि कोंक्याच्या पूर्वीं येणारें आंखूड पान. ॰बरा-पु. खुंटी. खुंटा पहा. ॰बावली-स्त्री. १ (राजा.) एक प्रकारची बाहुली. २ उंचीवरचा पदार्थ काढण्यासाठीं चवड्यांवर उभें राहणें. (क्रि॰ करणें). अशा रीतीनें खुंटबावलीवर उभें राहणें. ३ (निंदेनें). काम न करणारी व खुंट्यासारखी तिष्ठत रहाणारी स्त्री. ॰बाळी-स्त्री. स्त्रियांचे एक कर्णभूषण. 'खुंटबाळ्या साध्या बाळ्या त्याजवर ।' -अफला ५५. ॰भाजी-स्त्री. विशेष विस्तार व्हावा म्हणून पुन्हां पुन्हां अग्रें खुडून राखिलेली भाजी; खुंटापासून किंवा मुळापासून निघालेला कोंब व त्याची भाजी. ॰रोग-पु १ पुष्कळ दिवस खुंटास बांधून ठेवल्यामुळें पशूंना येणारा रोडके- पणा किंवा होणारा आजार. २ (ल.) अशा बैठेपणापासून होणारा आजार, रोग. ॰रोगी -वि. खुंटरोग झालेला. खुंटला-पु. (व.) गाडीच्या दोन बाजूंस (आंतील सामान बाहेर पडूं नये म्हणून) लाविलेले खुंट प्रत्येकी. ॰सार-वि. (गो.) खुंटासारखा.
सडाका
सडाका saḍākā m (सड! सड! the sound fancied.) A sounding stroke or lash; the pelting or downdashing (of a heavy shower); the crack! crack! whack! whack! (of a sound and hearty caning); the roaring and bellowing (of a storm &c. &c.)
सडका
पु. (पावसाच्या मोठ्या सरीचा होणारा) सड्- सड् असा आवाज. [ध्व.]
सडणें
अक्रि. कुजणें; नासणें; बिघडणें; खराब होणें. [सं. शद्; प्रा. सड; हिं. गु. सडना]
सडसाक्ष-क्षी
स्त्री. लेखी किंवा तोंडी पुरावा; दस्त- ऐवज; दाखले, प्रतिज्ञालेख, जबान्या, वगैरेस व्यापक संज्ञा. सड पहा. [सड + साक्षी]
आचुळ-चूळ, आंचूळ
पु. १ गुराचें थान; सड; आंचळ. २ (विणकाम) विणून झालेल्या कापडाचे उरलेल शेवटचे धागे, ज्यास नवीन ताणा (विणावयाच्या सुताचे उभे धागे) जोडतात ते. या व इतर अर्थीं अचळ; अंचल पहा. [सं. अंचल]
आन
अ. (अडाणी लोकांत) ऐन, अतिशय, सपाटून या अर्थी. उ॰ आन महागाई-उन्ह-पाऊस. इ॰ [ऐन] -उअ. आणि. अन, अन पहा. म्हणौनि आठै सात्विकांचा मेळावा केला आन गेलो. -ऋ ६० (टीप). -वि. दुसरें; निराळें; भिन्न; वेगळें. 'मग आन कांहीं आहे । पापावांचुनी ।' -ज्ञा १.२४८. २ (ल.) विचित्र. 'नाभी बाळे आन करीन.' -उषा २८.१०. अन् अन पहा. [सं. अन्य] ॰आन-क्रिवि. निरनिराळें. 'न करितां सद्*गुरु भजन । नव्हे भववृक्षाचें छेदन । जरी कोटी कोटी साधन । आनआन केलिया ।' -एभा १२.४७२. [सं. अन्य द्वि.]
अंचळ
(सं) पु० गुराचें थान, सड, अचूळ.
आसादन
न. १ ठेवणें; रचणें; मांडणें; लावणें (यज्ञांतील पात्रें-सामुग्री, किंवा जेवणाचीं ताटें, इतर साहित्य). २ मिळ- विणें; संपादणें; प्राप्त करून घेणें. [सं. आ + सद् = बसणें]
अवच्छेद
पु. १ तुकडा; विभाग, विभाजन; भिन्नीकरण; वेगळें करणे; भिन्न करणें. २ वियुक्तावस्था; परिच्छेद-पृथकावस्था; (रेषा, चिन्हें, फटी, वगैरेनीं किंवा वर्ग-योग्यातेनुरूप निरनिराळी सदरें पाडून ). 'तैसीं सिनानीं चारीं पदें । श्लोक श्लोकावच्छेदें ।' -ज्ञा १८.५४. ३ विभागणारी, वेगळें करणारी खूण, चिन्ह, जागा; फाड; चीर; छेद; खाप; खांच; खांड; सड; फट; सांध. (ऽ) अव- ग्रह, (।।) चरणरेघ, इत्यादि सामासिक शब्दांचीं पदें किंवा कवि तेचे चरण दाखविणारीं चिन्हें. ४ उध्दृत करणें; उतारा. ५ व्यतिरेक; वर्जन; व्यवच्छेद; निष्कासन; अवकर्षण. ६ आक्रमण; व्याप्ति; वस्ती (उ॰ पृथ्वीमध्यें गंध, अग्नींत उष्णता, विश्वांत ब्रह्म यांची); स्वभावसिध्द किंवा अविनाशभूत अधिष्ठान (उ॰ आदिभौतिक पदा- र्थांच्या ठायीं घटकावययांचें, सजीव प्राण्याच्या ठायी मृत्यूचें.) 'आहारनिद्राभय जीवावच्छेदेंकरून आहे.' ७ विशेष गुण-धर्म; व्यावर्तक लक्षण; वैशिष्ट्य. ८ सीमा; मर्यादा; अवरोधक पदार्थ किंवा वस्तु. [सं.] अवच्छेदकावच्छेदेंकरून-सर्वांना (व्यक्ति, जाती, वर्ग, पंथ वगैरे) घेऊन किंवा त्या सर्वांचा समावेश करून; सर्वांचा (माणसें, प्रकरणें, गोष्टी वगैरेंचा) स्वीकार करून किंवा त्यांची गणना करून; कोणतेंहि वर्ज्य केलें असतां किंवा कसेंहि व्यक्त केलें असतां. एकसमयावच्छेदेंकरून-एकदम; एकाचवेळीं; एकाच खेपेंत; दुस- रीकडे लक्ष न देतां; विश्रांति न घेतां (करणें, उकरणें). एतत्काला- वच्छेदेंकरून-फक्त्त याच वेळीं, समयीं. शक्त्यवच्छेदेंकरून- (माझी, तुझी) सर्व शक्ति खर्च करून.
अवसाद
पु. १ श्रम; थकवा; ग्लानि; कळमळ. २ औदा- सिन्य; विषाद; खिन्नता. [सं. अव + सद्]
बूज
स्त्री. तूर, मसूर, वाटणा वगैरेचा पाला व सड यांची बुकणी. -चित्रकृषि २.७.
ब्वाम
पु. १ (कु.) बोंम; बोंब. २ स्तनाचे सड.
भगवत्
वि. १ संस्कृत भगवान् याचे नपुंसकलिंगी रूप. २ भगवान् (ईश्वर) या शब्दाचें समासांत होणारें रूप. उदा॰ भगव- त्कृपा = ईश्वरी कृपा, भगवदिच्छा; भागवत्-सेवा; भगवद्रूप; भग- वन्माया, भगवद्भक्ति, भगवद्भजन, भगवत्प्राप्ति इ॰ [सं. भग = ऐश्वर्य + मत्(वत्)] भगवंत-पु. १ परमेश्वर; देव; षड्गुणैश्वर्य- संपन्न ईश्वर. 'यश श्री वैराग्य ज्ञान । ऐश्वर्य औदार्य हे षड् गुण । नित्य वसती परिपूर्ण । तो मी नारायण भगवंत ।' -एभा १५.९७. २ (काव्य) अलौकिक सामर्थ्यवान् ऋषि, साधु इ॰ भगवंतपण- न. ईश्वरत्व (पालन करण्याचा स्वभाव). 'अंगींचें भगवंतपण । आठवीं बापा ।' -ज्ञा ११.४४३. भगवती-स्त्री. १ पार्वती; देवी. २ (ल.) भगवती आई (तांबड्या मिरच्यांची पूड). ३ मृदुंगावर वाजविण्याचा एक ठेका. याचे बोल:-त्ता धिगधी, त्ता धिग धिंत्ता. [सं.]
चौकडणें
अक्रि. उड्या मारणें. 'पुढा चौकडत कस्तुरी मृग । चविरियाचे पाडे उभसिंग । तें सड किसींसा बळिये सैंग । भार सिंग कोंतेकार ।' -नरुस्व ७४५. [सं. चतुर]
चौखूर
क्रिवि. एकदम चारी पाय उचलून (उडी मारणें; पळणें इ॰); चौखुरीं (क्रि॰ उडणें, धांवणें, उडीमारणें, टाकणें) 'चौखूर निघे त्वेषाची । घोड दौड संताजीची ।' -संग्रामगीतें १६. 'घोडा चौखूर उडत चालल आहे.' [चौ + खूर] (वाप्र) ॰दूध काढणें-(गाईच्या, म्हशीच्या) चारी सडांतील दूध काढणें (गाईचे सड व खाटेचे खूर यांमधील कल्पित साम्यावरून हा वाक्प्रचार रूढ झाला आहे.)
दोभ
पु. (कु.) आंचळ; सड. [सं. दुह्; म. दुभणें ?]
दुसडी
दुसडी dusaḍī a (दोन & सड) Having but two teats--a goat &c.
दुसोटा
दुसोटा dusōṭā m (दोन & सड Stubble &c.) A crop raised upon ground whence a crop has just been gathered. Ex. दुसोट्याचा-हरभरा-गहूं-जमीन-शेत- वावर &c.
एकसडी
वि. एकदेंठी; एकच टाहाळा, खांदी असणारा (हरभरा, तूर, मेथीची भाजी वगैरे ). [ एक + सं. सट् = पृथक करणे; प्रा. सड]
एकसडी ēkasaḍī a (एक & सडणें) Once-husked--rice. 2 (एक & सड) Of but one stalk or stem;--as हरभरा, तूर, मेथीची भाजी &c.
हारसडणें
हारसडणें hārasaḍaṇēṃ v c R (A formation from हार & सड Regularity and Evidence.) To reduce within bounds; to contract, by gradual performance or execution, within a small and manageable sphere (a complicate or large business).
किरळ-ळी
नस्त्री. १ जोंधळ्याच्या कोंवळ्या सुरव्यांत उत्पन्न होणारा एक विषारी किडा. हा खाल्ला असतां गुरूं मरतें; त्यामुळें गुराला होणारा रोग. (क्रि॰ लागणें). 'अरे सख्यारे हा मदन अनिवार । ज्यार फार करी किरळा ।' -प्रला ९४. २ जोंधळा, बाजरी यांची कापणी झाल्यावर शेतांत राहिलेले त्यांचे धस, सड. -नपु. ३ नवीन कोंब फुटलेली हरळी. ४ (क.) भरत येणार्या जखमेचा आंतील भाग. (क्रि॰ बांधणें; येणें; धरणें; फुटणें). -न. ५ नेप्तीचें झाड व तिचें फळ. ६ अंकूर; ज्वानी; जोमदारपणा; 'नातु कोंवळें किरळ ।' -यथादी १.२९१.
कुडसारो
पु. (कु.) कापणीनंतर राहिलेले भाताचे सड; धस.
कुसळ
न. १ धान्याचें किंवा गवतांचे कूस, टोंक, सड; धस; तृणाग्र. हें फार बारीक व अणकुचीदार असतें. २ केरकच- र्याचा कण. (क्रि॰ बोचणें; शिरणें; लागणें; अडकणें; मोडणें) 'कुसळें कोरडीं । वारेनें जाती बरडीं ।' -ज्ञा १३.५६६. [सं.कुश.] म्ह॰ दुसर्याच्या डोळ्यातलें कुसळ दिसतें पण आपल्या डोळ्यांतलें मुसळ दिसत नाहीं.
खांड
स्त्री. १ ताली, बंधारा, भिंत यांतील भेग, तडा, चीर भोंक. 'खाचरास खांड पडली.' २ कातरा: सड: दांता; खरा (तरवार, विळा यांच्या धारेवरील). ३ दांतांमधील खिंड. ४ पिवळसर व भरड, हस्तकृतीची साखर. ही थोडी अंबूस असते. 'खाये खीर खांड ।' -तुगा ४२९. -न. १ भक्कम व चौरस किंवा साधी तुळई, तुळवट. २ एखाद्या वस्तूचा तुकडा (सुपारी, बिब्बा, हळकुंड, चंदन, गोवरी इ॰) 'ऐसें ह सेंड्या कडिल खांड ।' -दा २०.३. ४. ३ टोळी; दाटी; कळप (बकरीं, मेंढ्या यांचा). ४ झाडाचा ठोकळा, भाग. ५ शेताचा तुकडा. ६ धान्याचा चुरा; कळण. -वि. १ दाट. २ भंगलेलें. 'असावें का खांड देउळीं ।' -भाए ४९३. [सं. खंड] सामाशब्द-॰क(ग)ळी शिवी-खांड- गाळी-स्त्री. सुवासिनी स्त्रीस रांड, बोडकी या अर्थाची शिवी. [तुल॰ सं. खंडालि = जिचा नवरा दुराचारी आहे अशी स्त्री]. ॰कापी सुपारी-स्त्री. क(का)चरी सुपारी; सुपारी कोंवळी असतां शिजवून व राप (सुपारीच्या काचर्या शिजविलेलें पाणी) शिंप- डून उन्हांत वाळवितात. व काचर्या काढतात अशा सुपारीला खांडकापी म्हणतात. हिलाच चुकीनें 'लवंग काचरीसुपारी' म्हण- तात. खांडकी-स्त्री. दगडाचा फोडलेला मोठा तुकडा; चीप; कळपा; फाडी; इमारतकामांतील खांडकीची पुढील चौरस बाजू घडीव, असून मागील उतरती व अणकुचीदार असते. खांडकें- न. उसाचें कांडे. खांडक्या-वि. (गुर्हाळ) उसाचे तुकडे करणारा; पेरुळ्या. खांडडोह-हो-पु. १ उन्हाळ्यांत नदीचा प्रवाह आटल्यामुळें मध्यें मध्यें प्रवाहाला पडलेले खंड; खंडित डोह. खांडवा; भाट-टी. २ (चुकीने) पाण्याच्या प्रवाहांतील खोल जागा (कोठली तरी). सामान्यतः अनेकवचनी प्रयोग. (क्रि॰ पडणें) ॰तुळई -स्त्री. तुळवट; खांड अर्थ ५ पहा. ॰तोळी -स्त्री. (राजा.) एक पक्वान्न; खांडवी. हें तांदुळाच्या कण्याचें करतात. ॰दोर-पु. (व.) बैलासबांधावयाचा दोर. ॰पासोळा-पु. खुनशी, आकसखोर मनुष्य. [खांड + फासळी] ॰फाडोळी-वि. (व.) एका बाजूस फांसळी कमी असलेलें (जनावर). रागखांडव-पु. एका प्रकारचा मोरंबा. कृति-साल काढलेल्या हिरव्या आंब्याच्या फोडी तुपांत पर- तून खडीसाखरच्या पाकांत शिजवून, मिरीं, वेलदोडे, कापूर यांचा वास लावून बरणींत ठेवणें. -योर १.८०. खांडव-पु. (संगीत) अवरोह. (क्रि॰ करणें). खांडव-पु. लग्नांत विडे, सुपारी वाटण्यासाठीं केलेली कापडाची (खणाची) झोळी. [खंडवस्त्र] खांडव-वा-पु. नदीच्या प्रवाहांत पडलेली भाटी; खांडडोह. ॰वी-स्त्री. वाळविलेल्या खार्या मासळीचा तुकडा. खांडवी- वें-वे-पोळी-बोळी-स्त्रीनपुअवस्त्री. १ (कों.) तांदुळाचा रवा काढून त्यांत गूळ, खोबरें, लवंगा, वेलदोडे इ॰ घालून त्याच्या वाफे वर शिजवलेल्या वड्या, या तुपाबरोबर खातात. २ गूळ, पीठ, नार- ळाचें दूध एकत्र करून शिजवून करतात तें पक्वान्न. ३ (क. सार- स्वत) कानोले. ॰वेल-स्त्री. एक मोठी वेल. ॰साखर-स्त्री. १ एक प्रकारची गुळी साखर. खांड अर्थ ४ पहा. २ खडीसाखर.
खांडणें
उक्रि. १ मोडणें; जोरानें तोडणें; छेदणें; छाटणें; खापणें; काटणें; खंडणें 'समिधा तो खांडु लागला ।' -वसा ६१. २ खणणें; खोदणें. 'उपनिषदर्थाची माळी- । माजीं खांडिलीं' -ज्ञा १८.३५. ३ (ल.) कुरतुडणें; चावणें; खुडखुड करणें (गिळ- लेली माशी). ४ (राजा.) जेवण्याचें पान अथवा द्रोण करण्या- साठीं पोफळीच्या झाडाची पोय, विरी, पानें कातरणें, छाटणें. ५ खांडवीच्या बर्फीच्या वगैरे वड्या, खापा पाडणें. ६ (ल.) निरास करणें. 'मा तर्काचें खुरपें । खांडे कोणा ।' -अमृ ६.२४. ७ (ल.) अडविणें. 'सर्पें वाठ खांडिली' -वसा ५९. ८ वेगळें करणें; पृथक् करणें. 'कां चांचूचेनि सांडसें । खांडिजे पय पाणी राजहंसें ।' -ज्ञा ९ ४४. [स. खंडन] सडा खांडणें-(वांसरूं किंवा करडूं यानीं) सड थान किंचित कुरतडणें, चावणें. म्ह॰ आडवें आलें तें खांडून काढावें.
खु(खुं)टी
स्त्री. १ लांकडी मेख. २ लहान लांकडी खुंट, सोट. धस; सुळका; सड. (क्रि॰ भरणें). 'तीन रात्र खुंटी बांध लीसे ।' -ब ५२. ३ (कों.) शिवेची खूण; खूट; क्षेत्रमर्यादा. ४ (सुतारी धंदा) दोन लांकडांचा साधा जोडण्यासाठीं मारलेली पाचर. ५ (खान.) वखराच्या रुमणीची मूठ. ६ (छापखाना) फर्मा आवळण्यासाठीं ज्या कांड्या ठोकतात, त्या ठोकण्याचें साधन. ७ (खडी काढणें) ठसे उठविण्यासाठीं वरून दाबण्याचा लांकडी दांडा. ८ वस्त्रे वगैरे ठेवण्यासाठीं भिंतीत बसविलेला लहान खुंटा. ९ (गो.) एक दैवत. १० (कों.) इसाडाच्या ज्या टोकांत नांगरखुंट व लुमणी घालतात तेथें ती बाहेर पडूं नये म्हणून इसाडाला भोंक पाडून त्यामध्यें घालावयाचा लांकडी तुकडा, खिटी. [खुंट] (वाप्र.) ॰उपटणें-घालवून देणें; (कामावरून अथवा अधिकारा- वरून) काढून टाकणें; पदच्युत करणें. ॰(आंत)ठेवणें-मारणें- राखणें-थांबविणें, अटकविणें. ॰पिरगाळणें-पिळणें-पिळ- वटणें-मारणें-१ प्रयत्नांत किंवा बेतांत अडथळा आणणें; एखाद्याचें बहुतेक पुरें झालेलें काम नासविणें; बेत हाणून पाडणें. २ खिजविणें; भांडण लावणें; भांडण करण्यास उत्तेजन देणें. ३ आपल्या योजनेच्या किंवा आरंभिलेल्या कार्याच्या विरुद्ध दुंसर्या कोणी खटपट केली असतां ती सफळ होऊं नये म्हणून अगोदरच आपण सावधगिरीनें तजवीज करून ठेवणें. खुंटीस अड- कणें-तहकूब होणें; थांबलें जाणें, राहणें; भिजत पडणें. खुंटीस गाठोडें-गवाळें लागणें-वादविषयक मालमत्तेचा निवाडा न होणें, ती न्यायनिविष्ट असणें; व्यवस्था लागण्याच्या तयारींत असणें; तिकडे लक्ष्य असणें; प्रवेश होणें; बोट शिरकविणें; केवळ उतारकरू असणें; पडशी खुंटीवर तयार ठेवणें; हुद्द्यावर अद्यापी कायम न होणें; घटकोघटकीं बडतर्फीची वाट पहाणें. म्ह॰ (गो.) खुटीक चेपें दवरप = आपण हजर आहों, अशा अर्थाची खूण म्हणून खुंटीला चेपें (टोपी) लावून ठेवणें.
खूर
पु. खुर पहा. १ टाप; शफ; पंचनख पशूवांचून इतर पशूंचें जें पाऊल तें. २ शफाचे दोन भाग. ३ पंलगाचा, खाटेचा, खुर्चीचा पाय. ४ चुलीच्या वरील मातीचे गोळे प्रत्येकी; तुळशीवृंदा- वनावरील चार उंचवट कोपरे प्रत्येकी. ५ खुरकी, खुरमध्यें पहा. ६ गाय, म्हैस यांचा सड. म्ह॰जेथें गाय व्याली तेथेंच खूर खांडावे = संकटाला तेथल्या तेथें तोंड द्यावें. एक खुराचा-वि. सबंध किंवा न फुटलेल्या खुराचा; एकगेळी (घोडा वगैरे). दोन खुराचा-वि. फुटलेल्या खुराचा; गेळें असलेला (बैल वगैरे). ॰मुंडी-खुरमध्यें पहा. ॰पक्का-पु. जनावरांचा एक रोग. -शे ६.१०८.
मंसबदार
पु. १ मुनसफ; न्यायाधीश. २ पंचाईतीचा सभा सद; एक पंच मनसबदार पहा. [फा. मन्सब्दार]
नळांडी
स्त्री. १ मोरी; झांकलेलें गटार. २ (चुन्याची घाणी इ॰कांतील) चाकाच्या गतीनें पडलेला खोल मार्ग, चाकोरी. ३ नदी, ओढा इ॰कांच्या पात्रांत प्रवाहांनें पडलेली ओघळ. ४ सड- केच्या बाजूनें पाणी वाहून जाण्याकरितां केलेली सारणी. ५ पन्हळ. ६ (ल.) डोंगरांतील अरुंद खिंड. ७ (सामा.) अरुंद गल्ली, मार्ग. ८ नळी.
फण
पु. (व.) जोंधळ्याची कापणी केल्यावर त्याचा जमी- नींत उरलेला खुंट, सड. 'जवारीचा फण पायाला लागला.' [का. पणे] ॰कट-न. (व.) जोंधळा, बाजरी इ॰ च्या ताटाचा तुकडा; धसकट.
फुरई, फुरोई
स्त्री. दंड; कर; दंडासाठीं आणलेली वसुली. (सामा.) दंड या पूर्वशब्दाला जोडून योजना. दंडफुरई पहा. 'सद- रहु कौलाशिवाय खंडफुरोईचा जमा आकारता आकारेल.' -वाड समा १.८.
शाद
शाद śāda f n Moss &c. See शेवाळ.
साड
साड sāḍa m (सार S) The heart or core (of wood &c.)
साद
साद sāda m f ए (शब्द S) A hallooing or calling to: also the answer or call returned. v घाल, दे, हाक. 2 It bears in some instances the sense of Sound or voice; as सादपरका, सादपरतलेला, सादबदलला.
पुस्त्री. १ हांक; येण्याविषयीं बोलाविणें. (क्रि॰ घालणें; देणें; हाकणें). 'विपायें वाढे सत्त्व शुद्ध । तेव्हां ज्ञानासी करी साद ।' -ज्ञा १७.६२. २ हाकेला उत्तर; ओ देणें. 'सादु दे कारे पुत्रराया ।' -उषा ६४; -मोअश्व १.२५. ३ प्रतिध्वनि; पडसाद. ४ शब्द; ध्वनि. 'तंव त्या बैलाचा सादु आईकोनि ।' -पंच. ५ (ल.) इच्छा. 'तोचि अभेदु कैसा । हें जाणावया मानसा । साद जाली तरी परियेसा । बोलिजेल ।' -ज्ञा १०.१११. [सं. शब्द; प्रा. सद्द; पं. सद; हिं. गु. साद] ॰घालणें-१ हाक मारणें. -केक १२८. २ (कों.) गागणें. ॰धरणें-पडल्यामुळें किंवा भीतीमुळें रडण्याचा आवाज तोंडातून न निघणें (लहान मुलाचा); श्वास धरणें. ॰परतणें-निराळा आवाज देणें; पिकलेली अवस्था- बदललेल्या आवाजावरून दाखविणें (फळानें, विशेषतः फणसाच्या). -सामाशब्द. ॰परका-ता-वि. १ बदललेल्या आवाजाचा. २ (ल.) पिकलेला. साद परतणें पहा. ॰सादणें-अक्रि. शब्द करणें. 'भणओनि मदनु सादैजें । लेंकरूंपणा लागी ।' -शिशु ३७०. सादविणें, सादाविणें-उक्रि. १ साद घालणें; हांक मारणें. 'वायुदेवातें सादवी । बीजमंत्रें करूनिया ।' -मुआदि २७.१७५; -तुगा ५४. 'करी घेवूनिया सादवी ।' -निगा ११.२ (कर्ना.) ताल धरणें; टिमकी वाजवून साथ करणें. सादु-पु. साद; शब्द. 'तंव त्या बैलाचा सादु आईकौनि साशंकित झाला.' -पंच ३. सादुकारवि. शब्द करणारा. -पंच ३.
साडा
साडा sāḍā m (शाटी S or साडी) A term for the gar- ment called साडी as given to the bride during that portion of the nuptial ceremonies named साडे.
सामाजिक
वि. १ समाजासंबंधी; समाजाची. 'देशाची सामजिक व सांपत्तिक स्थिति राजकीय स्थितीवर अवलंबून असते.' -टिव्या. २ सामुदायिक; सामवायिक. ३ सभेंत बसणारा; सभा- सद; समाजांतील व्यक्ति. 'स्वरचित कवनें जेव्हां तो म्हणे तेव्हां सामाजिकांच्या मनावर च्याचा प्रभाव होत असे.' -नि ३१५. [सं.] ॰चळवळ-स्त्री. समाजसुधारणेसंबंधी कार्य, प्रयत्न इ॰. ॰दर्जा-पु. समाजांतील स्थान, योग्यता, मान. 'कैद्यांचा सामाजिक दर्जा सरकारनें पाहिला पाहिजे.' -के १०.६.३०. ॰बहिष्कार-पु. वाळींत टाकणें: भोंवतालच्या लोकांनी एखा- द्याशीं असहकार करणें; त्याला अन्नपाणी, वाहनें, सुखसावनें मिळूं न देणें. 'सरकारी नोकरावरील सामजिक बहिष्कार सरकार कसा बंद पाडणार ?' -के १७.६.३०.
सांड
सांड sāṇḍa f (षद S) An outlet for superfluous water (as through a dam or mound); a sluice, a floodvent. 2 Suffering to slip out of the memory; losing all care and thought about; dropping. v कर g. of o. Also forbearing or foregoing; pretermitting or passing by. v कर with विषयीं of o. Ex. पुत्राविषयीं-संसाराविषयीं-कामाविषयीं सांड केली. 3 Letting drop and letting go continually; a habit, propensity, or trick of dropping and losing. v लाग. Ex. काय हो तुमच्या भावाला रुप- यांची सांड लागली. 4 Letting alone; leaving to act at will. 5 A forsaken wife. 6 n A thing dropped and lost: also as a dropped on the road; fallen and lying (unowned). सांड करणें g. of o. सांड देणें with स or ला of o. To let pass or go; to pass by unheedingly (an affront, a fault). 2 To reject or cast away. Ex. बाह्य कुटुंबा करी सांड.
सांडणें
सांडणें sāṇḍaṇēṃ v c (षद S) To spill, shed, cast; to cause, by agitation or otherwise, to fall out of or from: also to overturn or to agitate unto spilling or shedding (the vessel). 2 To lose by dropping, mislaying, misplacing. 3 To cast away; to get rid of; to give up; to shake off; to drop. Ex. बळकट घालुनिया कास ॥ सांडी नाशवंताची आस ॥.
सडा
सडा saḍā a (सडणें) Bare, void, free, detached, standing sole or single;--as a person unmarried, or unaccompanied by his wife and family, or having no retinue or baggage on the road, or having no secular embarrassments or engagements, or not entertained in service or occupied in work: also unemployed, unengaged, unhired, or unloaded;--as a vehicle, a beast, a man: clear and free generally from persons or matters entangling and impeding.
सडा saḍā m Sprinkling (as upon a floor) of thin cowdung-wash, colored water &c. v घाल, टाक, दे, शिंप. 2 fig. Scattering profusely (as of fruits or flowers, of rupees amidst a crowd &c.) v टाक, दे. 3 (A bridged from शेणसडा q. v.) 4 R or C Tableland upon the summit or the sides of a hill; esp. a long expanse or sheet of rock upon a hill; an elevated rocky plateau. सडा शिंपणें To sprinkle the cowdung-wash. Ex. एक वेगें झाडीत ॥ एक स्वहस्तें सडा शिंपीत ॥.
सडा saḍā m A twisted and long cord or line, (as that of a paperkite).
सदा
सदा sadā ad (S) pop सदां ad Always. Ex. सदा चालिजे धर्मपंथ ॥ सर्व कुमति टाकोनि ॥. Ex. of comp. सदाकष्टी, सदादुःखी, सदाभोगी, सदारड्या, सदारोगी, सदानंद or दी, सदाशुचि, सदासुखी. Sometimes to intensity or enhance the sense त्रिकाळ is added, as सदात्रिकाळ Perpetually, unfailingly through the three times, morning, noon, and evening; as गायी दुहति सदात्रिकाळ ॥ क्षीर तुंबळ वर्षिति ॥. सदा पीक सदा भीक A phrase descriptive of the perpetual poverty and wretchedness of the Kun̤bí whatever luxuriant crops may crown his fields.
सडा धस
सडा धस saḍā dhasa c A term for a reckless, dash along, tear away person. See धसकनंदन, धसकटराव &c. 2 A term for a person bare and rude, clear of all the entanglements and impediments of social life. See below सडाफटिंग.
सडा कारभार
सडा कारभार saḍā kārabhāra m Free, bare, ungarnished, unvarnished business; straightforward and aboveboard procedure; plain dealing.
सडा मफलीस
सडा मफलीस saḍā maphalīsa a (सडा Single, A Poor.) Single (i. e. unmarried or unaccompanied by his wife) and of the poor and laboring class. Such have half their house-tax remitted, and are designated by this term in revenue-accounts.
सडा फोक
सडा फोक saḍā phōka a Straight and supple; upright and handsome; gracefully erect;--used of persons.
सडा फटिंग
सडा फटिंग saḍā phaṭiṅga m (सडा & फटिंग) A reviling or jocose term for a fellow unencumbered with wife, family, articles of property &c.; a vagabond without a penny or a clout, and free to rove in the wide world before him.
सडा सोट
सडा सोट saḍā sōṭa m (सडा & सोट Long and bare trunk or stem.) An irrisive or scornful term for a single man; a wight without a child or connection to care for or to clog him; a bare stalk, a naked trunk.
सदे
[फा सद् = शम्भर] दर-सदे=दर शेंकड्यास.
सद्गुरु
पु. आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ति करून देणारा, ईश्वरप्राप्तीचा मार्गदर्शक, अज्ञान नाहींसें करणारा उपदेशक, चांगलें ज्ञान, विद्या, उपदेश देणारा गुरु. [सं. सद् + गुरु]
सडघाण
सडघाण saḍaghāṇa f (घाण Stink, सड Adjunct of enhancement.) Marred, spoiled, or ruined state (of food, fruits, articles, affairs, projects).
सडी
स्त्री. पुराव्याकरितां घेतलेली लेखी किंवा तोंडी जबानी. सड पहा. 'प्रथकोंकारें सड्या लिहून घेतल्या.' -वाड- समारो ७.२०४. ॰पत्र-न. दाखला; साक्षीपत्र. 'दाखला लेहून आणलें तें सडीपत्र.' -भाअ १८३४.
स्त्री. बांबूचें कुसळ; धसडी; खुंट. सड पहा.
सडी saḍī f (सडणें) A wasting disease incidental both to man and beast,--a sort of rot. 2 The spawn or feculence of flies settling upon a sore and producing maggots in it, a fly-blow. 3 (Better सड) Any writing or oral statement in attestation or evidence of. 4 A splint of wood, a piece of stubble, grass &c. (as running into the flesh).
सडकाशी
स्त्री जमीनीच्या मशागतीचा एक प्रकार. -केसरी ४.१२.३६. [सड + काशी, काशा ?]
सडकीव
वि. अर्धवट, साधारण सरासरी घडलेला (दगड; दगडकाम, लाकूड, लाकूडकाम). 'कमानीचे दर्शनी दगड सड- कीव असावे.' -मॅरट ८१४. सडकीव जोतें-न. टाकी न लाविलेल्या, माठीव नसलेल्या दगडांचें जोतें.
सडण
न. १ कांडण; कुटणें; मुसळानें घाव घालणें. २ कांडण्यासाठीं, घाव घालण्यासाठीं घेतलेलें धान्य (तांदूळ, डाळ, वर्या इ॰). [सडणें] सडणावळ-स्त्री. सडण्याची, कांडण्याची मजूरी, मोल. सडणी-स्त्री. कांडण; कुटण्याची क्रिया. सडणें- उक्रि. धान्यावरील तूस, फोलकट, कोंडा वगैरे काढून टाक- ण्यासाठीं, कांडणें, कुटणें, मुसळ वगैरेनें घाव घालणें. [सं. सद्]
शिडशिडीत
वि. (राजा) (प्र.) सडसडीत. १ सड- पातळ; कृश; पातळ शरीराचा. २ फडपडीत; मोकळा व रुक्ष (शिजलेला भात वगैरे). [सडा, सडसडीत]
सळ
न. २ पीक कापल्यावर उरणारा धस; सड; कापलेला बुडखा किंवा त्यास फुटलेला अंकुर. [सं. शल्य]
सळाथी
सळाथी saḷāthī f C (सड & आथी old form of असती) A
स्त्री. (कों.) हिरांची केरसुणी; झाडू. [सड + आथी]
संसत्
स्त्री. सभा. [सं. षद् = बसणें]
सरी
स्त्री. १ धातूची तार. २ एक स्त्रियांचा सोन्याचा दागिना. 'सरीसृपी होय सरी गळांची ।' -सारुह २.७२. 'दिसे जैशी सोनियाची सरी ।' -ज्ञा ६.२८६. 'सरीचिताक भोंवरी ।' -तुगा ३७७५. ३ बांबूची बारीक लांब काडी, सड. ४ वाफ्यांच्या रांगेतील पाण्याचा पाट; बागेंतील वाफ्यांची रांग, दंड. ५ विणकामांत दोरे सरल्यामुळें पडणारी विरळ रेषा; दुस्ता. ६ भिंतीच्या माथ्यावरील रेषा, ओल, रांग. ७ लग; खांबावरील सरा. ८ जात्याच्या वरच्या तळीवर वजन ठेवण्यासाठीं केलेला दगडाचा किंवा मातीचा वाटोळा पेंड. ९ जत्रु; मानेचें हाड. १० वाफ्यांतील मातीचा बांधः वाफ्याचे भाग पाडण्याकरितां घातलेला मातीचा वळ; पाटगा; चिरा. [सं. सृ-सर] सरी मारणें-(कांसारी) गोल भांड्यास कड, किनार काढणें, खोदणें. सरी येणें-(व.) गळ्याच्या हाडांत दुखणें; हसळी येणें. सरीचा जोड-पु. एक मुलींचा खेळ. -मुखेपु २८५.
सरक्या
पु. सुतळी; दोरा; पतंगाचा सडा; शणसूत्र; तागाची दोरी. [सड, सर]
षट्
षट् ṣaṭ S Six. As षष् is the word, षट् & षड् are used only in comp. as षटकोण, षटप्रकार, षडस्र, षडगुणित &c.
सटा
स्त्रीअव. केसांचे सड; जटा; घोड्याची आयाळ. 'नृसिंहाच्या दीर्घा पिंवळट सटा पिंगट पिशा.' -नृहरिदर्पण. 'वर्णाया योग्य कशा होती जयाच्या सटा सुराभ्रांस कशा ।' मोकृष्ण ३७.२.
स्तन
न. १ थान; आमा. २ अचळ; सड. [सं. स्तन् = ध्वनि करणें] ॰देणें-थानांतील दूध पाजणें. ॰पात-पु. वार्ध- क्यानें बायकांची थानें लोंबणें. ॰पान-प्राशन-न. थानांतील दूध चोखणें, पिणें (मुलानें, वासरानें). ॰मर्दन-न. (शृंगार) कुचमर्दन; स्तन कुस्करणें; रति प्रकार. स्तन्य-न. थानांतील दूध.
सुरवंट
सुरवंट suravaṇṭa m (सड & वंत? Possessing spikes &c.) A hairy kind of caterpillar.
शूक
पु. न. १ कुसळ; कूस (गवत, धान्य यांचें). २ सड; कंटक; काटा. ३ सुरवंट; एक कुसळांचा किडा. [सं.] ॰दोष-पु. १ ज्यामध्यें कळा, शिलक, चमक, टोंचणी लागते असा रोग (कुष्ठ रोगाची पूर्वावस्था). २ सुरवंट घातलेला लेप, मलम वापरल्यामुळें होणारा रोग. (असा लेप वाजीकरणांत लावतात). ॰धान्य-न. ज्यास पुढें कुसळ असतें अशा जातीचें धान्य (भात वगैरे; याच्या उलट शमीधान्य).
उपनिषद्
न. १ गुरुचरणाजवळ बसून मिळविलेलें ज्ञान; गूढज्ञान. २ वेदांच्या ब्राह्मण ग्रंथांना जोडून असणारा वेदांतपर भाग; वेदसारांश असणारा ग्रंथ; वेदज्ञानकाण्डात्मक भाग. एकंदर १०८ उपनिषदें मानितात. पैकीं पुढील दहा उपनिषदें मुख्य आहेत. -ईश, केन, कठ, प्रश्न, मुंड, मांडुक्य, तित्तिर, ऐतरेय, छांदोग्य व बृहदारण्यक. 'अतिगुह्य ज्ञान परात्पर । जें उपनिषदांचें भांडार ।' -एभा १३.७१२. 'कुंडलें जाहलीं कृष्णश्रवणीं । तीं उपनिषदार्थ किरणीं । झळकताती सतेज ।' -एरुस्व १.५२. [सं. उप + नि + सद् = जवळ बसणें]
उपरम
पु. १ थांबणें; बंद होणें; शेवट; विश्रांति; विराम. 'कासया जयो उपरमु ।' -गीता १.२३४२. 'अहो ज्या सद्- भावें जनन मरणाचा उपरम' २ शांति; विरक्ति; वैराग्य. 'केले होती वृथा श्रम । चित्ता उपरम न होतां ।।' -तुगा ३३१६. ३ आनंद; संतोष. 'ऐसा ज्याच्या नामाचा महिमा । वर्णितां देव पावलें उपरमा ।।' -ह १६.८. 'असो आतां यशोदे माय । गोष्टी याच्या सांगों काय । ऐकतां चित्तां उपरम होय । प्रेम सये नावरे मज ।।' -ह ७.२३७. [सं. उप + रम्]
उसण, उसणव?, उसणावळ, उसन
स्त्री. कमरेंत किंवा पाठींत उठणारी कळ, लचक, तिडीक. (क्रि॰ भरणें; निघणें; चालणें). [प्रा. ऊसण = गतिभंग] उसण उतरणें-१ मंत्र वगैरे टाकून पाठींत भरलेली लचक उतरणें. २ (ल.) एखाद्याचा दिमाख उतरणें; ऐट उतरणें, जिरविणें. ॰मारणें-(गो.) लचकणें; वातानें कळ येणें. [सं. उत् + सद्]
उत्सादन
न. १ पतंग उडविणें (६४ कालंपैकीं एक). २ नाश करणें. ३ वर जाणें, चढणें. ४ नांगरणें दोन-तीनदां किंवा पुरें (शेत). [सं. उत् + सद्]
उत्सन्न
वि. मृत; नष्ट. 'कुलघातकांच्या या वर्णसंकरकार दोषांनीं पुरातन ज्ञातिधर्म व कुलधर्म उत्सन्न होतात.' -गीर ६१०. [सं. उत् + सद्]
विषाद
पु. १ खेद; दुःख; निरुत्साह; निराशा. 'जो घ्राण- संगे विषादु । तोषु देता ।' -ज्ञा २.११७. २ विरक्ति; कंटाळा; तिट- कारा. 'माझा तुला काय विषाद आला ।' -सारुह १.१०. 'विषाद धरिला म्हणो ।' -केका ४२. [सं. वि + षद्] विषादणें-अक्रि. खेद मानणें; दुःखी होणें. 'हें मनांत येऊन अमात्य फारच विषा- ला.' -चंद्रगुप्त १२७. विषादी-स्त्री. खेद उत्पन्न होईल अशी स्थिती, परिणाम. 'चौघांनी भरी करून घातली गोष्ट विषादीला ।' -ऐपो ४१०. -वि. १ खिन्न; निराशा; म्लान. २ लवकर निराश होणारा; निरुत्साही; लवकर कंटाळणारा, विटणारा.
विशद
वि. स्पष्ट; प्रांजल; निर्मल; स्वच्छ; प्रगट; दिसण्याजोगें. 'मुळीं नसतां विशद ।' -दा १७.२.१५; -ज्ञा ९. २१०. २ उघडें; ऐसपैस; मोकळें; विस्तृत. [सं. वि + शद्] विश- दर्थे-क्रिवि. स्पष्टपणें; स्वच्छपणें. 'आपणांस मामल्यापासून मुक्त करावें म्हणून विशदर्थे लिहिलें.' -शारो १.६१.
विषण्ण
वि. खिन्न; दुःखी; म्लान; निरुत्साही. [सं. वि + सद्] ॰दृष्टि-स्त्री. (नृत्य) बुबुळें इकडे तिकडे हालवून मध्येंच स्तब्ध करणें व अधोगत पाहणें.
विवेक
पु. १ विचार; तारतम्यबुद्धि; समज; तर्क; बुद्धि. 'मज विवेकु सांगावा । मऱ्हाटा जी ।' -ज्ञा ३.१७. 'जैसा मूर्ति मंत विवेक । तैसा जाण राजा भीमक ।' -एरुस्व १.१२. २ सद- सद्विवेक; संयम; समंजसपणा; चित्तवृत्तिनिरोध. 'मला अन्नाचा तिटकारा आला आहे पण विवेकानें खातो.' ३ (वेदांत) नित्या नित्य, सत्यासत्य, यांमधील भेद जाणण्याचें ज्ञान; साधनचतुष्ट यांतील पहिलें साधन. 'आहे दिठी डोळ्यां विवेकु । अपाडु जैसा ।' -ज्ञा १८.२७३. ४ वाटाघाट, चर्चा वगैरेमुळें होणारा समेट, तह- 'विवेक व्हावया प्रकार दिसत नाहीं.' -खरे १५३९. [सं. विच् = विवेक करणें] ॰जागविणें-तारतम्यबुद्धि जागृत करणें; विचार करणें. 'ते अनुभवी जाणती सम्यक । ज्यांनी विवेक जागविला ।' ॰वंत-विचारी; इष्टानिष्टाची निवड करण्यास समर्थ. 'देखा विवेकवंतु सुविमळु ।' -ज्ञा १.१४. ॰वादी-पु. बुद्धिवादी; तर्क कर्कश; विचारास पटेल तेच मानणारा. (इं.) रॅशनॅलिस्ट. 'तो प्रथम विवेकवादी (रॅशनॅलिस्ट) होता.' -सुदे १६७. ॰सभा- स्त्री. पंडितांनी चर्चा करावयाची जागा. रायगडांत शिवाजीच्या वाड्यांत होती. -शिदि ४१६. ॰हंस-पु. विवेकी पुरुषरूपी हंस. -एभा १.२३. ॰हीन-वि. अविचारी; विचार न करणारा; तार- तम्यबुद्धि नसलेला. विवेकाढ्य, विवेकी-वि. विचारी; न्यायी; तारतम्य जाणणारा; बुद्धिवान; समंजस; शाहणा. 'प्रपंच परमार्थ चालवाल । तरी तुम्ही विवेकी ।' -दा १२.१.२.
सणसण
स्त्री. गाणें, शीळ घालणें, बाण जाणें, गोळी जाणें वगैरेचा आवाज. सणसणणें-अक्रि. १ सणसण असा आवाज करणें. २ हातास वगैरे झिणझिण्या, स्फुरण येणें. (कठिण पदार्थावर आघात करतांना, टोला मारतांना). [ध्व.] सणसणाट-पु सणसण असा अतिशय आवाज; सणकारा; झणकारा. सणसणीत-वि. १ सणसण आवाज होईइतकें ताप- लेलें, उकळतें (पाणी, दूध, तेल वगैरे). २ झणझणीत; अति- शय तिखट (भाजी, पदार्थ). ३ घट्ट; दाट; भक्कम; दणगट; पीळदार (कापडाची वीण, बांधलेला गठ्ठा, दोरा, मनुष्य, जना- वर वगैरे) ढिलें, सईल, गबाळ नव्हे असें. ४ स्पष्ट; खडखडीत; साफ; सडेतोड; खणखणीत (नकार. उत्तर, जबाब, भाषण, जाबसाल वगैरे). ५ खडखडीत; चुरचुरीत (वाळलेलें वस्त्र वगैरे). ६ खणखणीत; स्पष्ट आवाज करणारें; चोख (नाणें, भांडें वगैरे). सणसर-वि. १ कणखर; मजबूत; भक्कम; ताठ; पीळदार (दोरा, वस्त्र, मनुष्य, जनावर, गठ्ठा, ओंझें वगैरे). 'त्याचा प्रत्येक अवयव सणसर होता.' -वज्राघात १०८. २ खडखडीत; स्पष्ट; सडेतोड; साफ (भाषण उत्तर वगैरे). ३ जोरदार; भरींव; मुब- लक (पाऊस, पीक वगैरे). सणसरून-क्रिवि. (माण.) सड- कून. सणाटा-पु. सनाटा पहा. सणाण-पु. बाण, बंदुकीची गोळी, गाणें, शीळ वगैरेचा सीत्कार, आवाज. सणाणणें-अक्रि सणसण आवाज करणें. सणाणा, सणाणें-वि. तीक्ष्ण; तीव्र; 'कांटे देखोनि सणाणे ।' -ज्ञा ७.१७२. 'शस्त्र केलें जी सणाणें ।' -एभा १२.५८६. 'नखें देखोनि सणाणीं' -मुआदि ६.३७ सणासणी-स्त्री. शस्त्रांची खणाखणी; बाण, गोळ्या वगैरेंचा भडिमार. 'मारामारी, हणाहणी, सणासणी झाली तों अंताजी- पंतास सहेनासें जालें.' -भाब ३३. सण्णाटणें-अक्रि. (ना.) १ ताप चढणें. २ चोपणें.
फटफजिती
फज्जा, जिरली, परवड, धांदल, कढी पातळ झाली ! रग जिरली, खात्री झाली, तीन-तेरा झाले, त्रिधा उडाली, पच्ची झाली, जमिनीवर स्वतःची लांबी मोजली, पासले पडले, सगळाच मुदलांत घोटाळा झाला, गंमतच झाली, खूप केलीत, चेष्टा-मस्करीचा विषय झाले, करायला गेले काय नी वर झाले पाय ! अग अग म्हशी मला कांग नेशी अशी वेळ, बापापरी बाप गेला बोंबलतांना हात गेला ! तेरीबी चूप मेरीबी चूप, आतां काय करतो ? मारुतीची बेंबी गार म्हणायलाच हवी ! तोंड दाखवायला जागा उरली नाहीं, सोळा आणे झाली, हा शेपूटतुटका कोल्हा सर्वांना ताेच सल्ला देणार ! तेल गेलें तूप गेलें हातीं आलें धुपाटणें ! साग्रसंगीत झाली, संगळेच मुसळ केरांत गेलें, चुंबीत आले, नाकधु-या काढाव्या लागल्या, चोरीचा मामला हळूहळू बोंबला, सर्व ऐट गळ्यांत आली, तंगड्यां गळयात आल्या, गुरूचा उपदेश गुरूला फळला, केलें तुका झाले माका ! सड़ा दुस-याला खणला स्वतः आंत गेला, गरगरीत आपटले, सणसणीत आपटा खाल्ली, स्वाभिमान गिळावाच लागला, पळतां भुइँ थोडी झाला, लोटांगण घालाव लागले, रावण पडला उताणा त्याच्या तोंडांत फुटाणा, तो प्रयाेग अंगलट आला, सारेंच ओमफस् झालें, त्याचेच दांत त्याच्या घशांत घातले गेले.
विचार
पु. १ कल्पनाशक्ति, बुद्धि यांचा व्यापार; शोध; अभ्यासपूर्वक चिंतन; खलबत; चर्चा; तारतम्य; विवेक; तर्क; मनन. २ विवेक, चिंतन, मनन करून केलेला निश्चय, निर्णय, निकाल, मत. ३ विधिनिषेध; महत्त्व; क्षिति. 'तुझे तुज नव्हे शरीर । तेथें इतरांचा काय विचार ।' -दा ३.१०.५३.४ घोटाळा; विवंचना; त्रास; कटकट. 'पृथ्वीप्रलय होतो तैसा विचार जाहला.' -भाब १५. 'मग तुम्हांस विचार भारी पडेल.' -शारो ८१. ५ गोष्ट; हकीकत; खरी स्थिति. 'कळतां तेथिचा विचार ।' -दा ८.८.४३. 'हाराचा सांगावा विचार । तरी वृथा म्हणाल तुम्ही सर्व ।' -शनि १८१. ६ मत; अभिप्राय; बेत. 'परंतु पुजूं नये हा विचार । कोठेंच नाहीं ।' -दा १.६.१३.७ युक्ति; उपाय; मनसुबा; मसलत. 'दयानिधि ऋषेश्वरु । सांगता झाला विचारु ।' -गुच ३४.१६. 'चला आमुचे मंदिरा । बोलो पुढील विचारा ।' -कथा १.३.११८. 'घडून येण्यास कोणता विचार.' -रत्न- कांता २१. ८ वर्णन. 'याहीं वेगळे आणीक गुरु । ऐक तयांचा विचारु ।' -दा ५.२.६९. ९ इच्छा मर्जी; मनोदय. 'तहानामा तुमच्या विचारें केला जाईल ।' -विवि ३.५.१८७६. [सं. वि + चर्] या शब्दाचे अनेक सामासिक शब्द होतात. उदा॰ सारासार विचार-पु. गुणदोष पाहून केलेला विवेक, बनविलेलें मत. सद सद्विचार-पु. योग्य अयोग्य यांची निवड; चांगलें वाईट ठरविणें. कार्याकार्य विचार-पु. साधकबाधक प्रमाणांवरून कर्तव्य किंवा अकर्तव्य तें ठरविणें; करावयास योग्य किंवा अयोग्य यासंबंधी अनुकूल प्रतिकूल प्रमाणांवरून मत बनविणें. याप्रमाणें इष्टानिष्ट- कर्माकर्म-कर्तव्याकर्तव्य-कार्यकारण-गमनागमन-ग्राह्याग्राह्य- धर्माधर्म-पात्रापात्र-पापपुण्य-भक्ष्याभक्ष्य-योग्यायोग्य-वर्ज्या वर्ज्य-वाच्यावाच्य-विधिनिषेध-विहिताविहित-शुभाशुभ-साध्व साधु-संगासंग-विचार इ॰. (वाप्र.) विचार जागविणें-(प्र.) विवेक जागविणें पहा. विचारांत पडणें-चिंता उत्पन्न होणें; काळजी वाटणें. विचारक-वि. विचारी; विचार करणारा; शोधक. विचारगम्य-वि. विचार केल्यानंतर समजण्यासारखें; तपास कर- ण्यासारखें; बुद्धीस आकलन करतां येण्यासारखें; चिकित्सा करतां येण्याजोगें. विचारण-न. १ शोध; चिकित्सा; विवेक. विचा- रणा-स्त्री. १ शोध; चौकशी; विचार; तर्क; कल्पना. 'विचारणा देवाची । ' -दा १६.१०.२८. २ पंचाईत; चिंता; काळजी; गूढ. ३ व्यवस्था; तजवीज. 'लग्नविचारणा न पुसतां मांडली ।' -सप्र २.३७. 'विधियुक्तादि विचारणा सकळिकीं । ' -दावि ७.२.१२. ४ सप्त भूमिकांतील दुसरी भूमिका. -हंको. विचारणीय-वि. १ विचार करण्यासारखें; शोध, तपास, चिकित्सा करण्यासारखें. २ विचारण्यासारखें; ज्याबद्दल माहिती मिळवावयाची आहे असें; प्रश्न करण्याजोगें; प्रष्ठव्य. विचारणें-उक्रि. १ प्रश्न करणें; चौकशी- साठींपुढें मांडणें; चर्चा करण्यासाठीं प्रस्तावना करणें. २ परामर्श घेणें; विचारपूस करणें; पुसणें; परिस्थिति वगैरेसंबंधीं सहानुभूतिपूर्वक किंवा मदत करण्याच्या दृष्टीनें चौकशी करणें. 'मायेबहीण न विचारी । जाहला पापी परद्वारी ।' -दा ३.३.१५. ३ आदर दाखविणें; आज्ञा पालन करणें; काळजीपूर्वक लक्ष्य देणें. ४ महत्त्व देणें; क्षिति बाळ- गणें; पर्वा करणें; किंमत देणें. ५ विचार करणें; चौकशी, तपास, चर्चा करणें; 'लघुपतनकें विचारलें.' -पंच २.१. 'एथ सरासार विचारणें । कवणें काय आचरावें' -ज्ञा १.२४६. 'पुन हें अवघें विचारितां । ऐसें येत असे माझेया चित्ता ।' -भाए ६४.६ चाल- विणें; चालू करणें. 'याचेनि वीर्यें स्त्रियेच्या पोटीं । संतती विचारूं गोमटी ।' -मुआदि २४.३४. विचारणें-अक्रि. चिंतन करणें; मनन करणें; विचार करणें. 'मनीं विचारी लंकानाथ ।' -रावि. 'विचारिल्यावीण करूं नये तें ।' -सारुह ३.२. विचार- पूस-स्त्री. १ वास्तपुस्त; चौकशी; शोध. २ परामर्श; कुशलप्रश्न. (क्रि॰ करणें). [विचारणें + पुसणें] विचार-वंत-वान-शील, विचारी-वि. सुज्ञ; विचार करून वागणारा. ॰शक्ति-स्त्री. बरें- वाईट वगैरे विवेक करण्याचें सामर्थ्य; मननशक्ति. ॰संगति- स्त्री. विचारमालिकेंतील निरनिराळ्या विचारांचा सुसंगतपणा; पर- स्परसंबंध; एकसूत्रता; एका कल्पनेवरून तत्सदृश दुसरी कल्पना सुचते तेव्हां त्या दोहोंमधील साहचर्यसंबंध. ॰संक्रांति-स्त्री. विचारांचें परिवहन; एक विचार दूरस्थ व्यक्तींच्या मनांत एकाच वेळीं येणें. (इं.) टेलेपॅथी. नीतिशास्त्रप्रवेश ३९०. ॰स्थित- वि. विचार करण्यांत, चिंतनांत, मनन करण्यांत निमग्न, गुंग झालेला. 'ऐसें बोलती श्री गुरुनाथु । तंव शिष्य झाला विचारस्थितु ।' ॰क्षम-वि. विचार करण्याचें सामर्थ्य असलेला; विवेकी. विचा- रित-वि. विचार करून ठरविलेलें; निश्चित; बुद्धीनें स्वीकृत. विचार्य-वि. विचार करण्यास योग्य.
नळी
स्त्री. १ (सामा.) दोन्ही तोंडें पोकळ असून मध्यें पोकळ असणारा धातूचा, लांकडाचा, वेळूचा लांब तुकडा. नळ पहा. २ बंदूक; ज्यांत दारू ठासतात तो बंदुकीचा भाग; नलिका. ३ मूत्रनलिका. ४ श्वासननलिका; अन्नमार्ग; गळा; कंठ. 'पहा त्या हिरण्यकश्यपें अपुलियेचि नळीं । बसविला नरसिंह पाचारीनी ।' -निगा ५३. 'वासनेहातीं बांधवी नळी ।' -तुग २७९९. ५ (विणकाम) धोटा; गणा किंवा कांडी ज्यांत ठेवतात तें टोपण; कोश. ६ (कु.) फुंकणी. 'नळी फुंकिली सोनारें ।' ७ मोरी; गटार. ८ गुडघ्यापासून घोड्यापर्यंत हाड; नळगुडी; नडगी. ९ (हात, पाय, मांड्या यांच्या) लांब हाडांपैकिं प्रत्येक. १० नाकपुडीचें छिद्र. ११ नळीच्या आकाराचें कौल. याचें एक तोंड जास्त रुंद व दुसरें किंचित निमुळतें असतें. १२ पाभरीच्या फणास बसविलेला बांबूच्या पोकळ तुकड्यांपैकीं प्रत्येक. याचें एक टोंक फणाच्या भोंकांत व दुसरें चाड्यात बसविलेलें असतें व यांतून बीं जमीनींत पडतें. १३ डोंगरांतील अरुंद खिंड, मार्ग. १४ (ल.) बंदूकवाला (बर, घोडा इ॰ शब्दांच्या लाक्षणिक अर्था- प्रमाणेंच हा अर्थ आहे). १५ (गो.) पळ; धूम. [नळा] ॰काढप-(गो.)पळ काढणें; धूम ठोकणें. नळीचें वर्हाड करणें-(स्वतःची) तुंबडी भरणें; तळीराम गार करणें. नळीं नख देणें, नळी दाबणें-१ (एखाद्याच्या) पोटावर पाय देणें, निर्वाहाचीं साधनें नष्ट करणें. २ निष्ठुरतेनें वागविणें. ॰निमटणें- नरडी दाबणें; प्राण घेणें. 'सूर्योदयो जाहल्यापाठीं । समूळ अंधारातें घोटीं । खद्योताची नळी निमटी । नक्षत्रकोटी तत्काळ गिळी ।' -एभा १३.४२२. नळीवर नेसणें-(धोतर, लुगडें इ॰) गुडघ्याच्यावर नेसणें. नळीचें कुलूप-न. जुन्या काळचें वाटोळें गावंठी कुलूप. हें लांब सळईच्या किल्लीनें उघडतें. याच्या उलट विलायती तर्हेचें. 'बेडकीचें' कुलूप. नळीचें पीस-न. बारीक निमुळत्या नळीच्या आकाराचें साळूचें पीस. 'सड, केंस, लव, पिसें, नळीचीं पिसें... इतके आच्छादनाचे प्रकार आहेत.' -मराठी ६ वें पुस्तक, पृ. ८(१८७५). नळीदार कौल-कऊल-न. मातीचे अर्धनळीच्या आकाराचें कौल; याच्या उलट थापीव कौल. नळीदार चोळणा-पु. पायांच्या नडग्या झांकणारी, घोट्यापर्यंत लांब असलेली विजार, पायजमा. नळ्या गंधक-पु. कांडीच्या आकाराचा गंधक.
चोर
पु. १ चोरणारा, चोरी करणारा, दुसर्याची वस्तु त्याला नकळत, जबरदस्तीनें लुबाडणारा माणूस. 'चोर भांडारी करावा । घसरतांच सांभाळावा ।' -दा १९.९.९. २ (एखाद्या- पासून कांहीं गोष्ट, वस्तु इ॰) छपवून, लपवून ठेवणारा; (एखादी गोष्ट स्वतःपाशींच) दाबून ठेवणारा, दडपून टाकणारा. ३ केळफु लांतील फणीच्या दात्यांतील कठिण व पसरट माथ्याची काडी, दांडा. यास कावळा असेंहि म्हणतात. हा भाजीच्या उपयोगी नसतो म्हणून फेंकून देतात. ४ (समासांत) प्रछन्न; गुप्त; लपवि- लेला; छपविलेला; राखून ठेवलेला; खाजगी; आड; बाजूचा; कोंपर्याचा इ॰ अर्थीं. उ॰ चोर-अडसर-अरगळ-कडी-खीळ- गांठ-छिद्र इ॰. असे अनेक सामासिक शब्द बनले आहेत व बनवितां येतात. त्यांपैकीं महत्त्वाचे सामासिक शब्द पुढें दिले आहेत. ५ (गंजिफा, पत्ते, इ॰ खेळांतील परिभाषा) एक पान; प्रत्येक रंगांतील हुकुमाच्या खेरीज इतर पान, पत्ता. 'त्याच्या हातांत एकच बाकी राहिलेला पत्ता हुकूम नसावा तो चोर असावा.' ६ (स्वतःस) मागें राखणारा; चोरून ठेवणारा; अंग काढतें घेणारा, चुकविणारा; चुकार याअर्थीं पुढें चोर शब्द लावून अनेक सामासिक शब्द होतात. उदा॰ कलमचोर = लिहितांना कांहीं गोष्टी राखून ठेवणारा, दाबून ठेवणारा, वगळणारा, चोरून ठेवणारा; सांगितल्यावर हुकूम न लिहिणारा. खांदचोर = १ दुसर्याबरोबर काम करतांना जो आपला खांदा काढता घेतो तो (मनुष्य, पशु इ॰); कामचुकार. २ (ल.) निकडीच्या वेळीं मदत, द्रव्य देण्याचें कर्तव्य न करणारा; तोंडघशीं पाडणारा. चाकरीचोर = लबाडीनें चाकरींत, सेवेंत कुचराई, अंगचोरपणा करणारा. पाठ- चोर = सहज रीतीनें, सहजासहजीं पाठीवर बसूं न देणारा (घोडा); सहजासहजीं पाठीवर ओझें न ठेवूं देणारा (बैल). पायचोर = १ एखाद्या करारांतून, कामांतून गुप्तपणें, गपचिप काढतें घेणारा, अंग काढून घेणारा. २ चोरटेपणानें, हळूच, आवाज होऊं न देतां पाऊल टाकणारा; चाहूल न देणारा. ३ चालण्यांत, पळ- ण्यांत कुचराई करणारा (मनुष्य, घोडा). बळचोर = बळ राखून, जेवढें खर्चावें तेवढें न खर्चून काम करणारा. चुकार; मनःपूर्वक शक्य तितकें शक्तिसामर्थ्य खर्च न करणारा. मतलबचोर = आपला हेतु, बेत गुप्त ठेवणारा; मतलबाचा थांग लागूं न देणारा. मस- लतचोर = १ स्वतःची योजना, मसलत गुप्त ठेवणारा. २ दुस- र्याची मसलत फोडणारा, काढून घेणारा. विद्याचोर = १ शिका- वयाच्या विद्येचा, शास्त्राचा कांहीं भाग विद्यार्थ्यांपासून चोरून ठेवणारा; पुरी विद्या न देणारा (शिक्षक). २ विद्या चोरणारा; चोरून शास्त्रीय ज्ञान, गुह्य संपादन करणारा; नकळत विद्या मिळ- विणारा (शिष्य) इ॰. अंगचोर, कामचोर इ॰ आणखी अनेक सामासिक शब्द आहेत. वरील शब्द कामचोरू, खांदचोरू, अंगचोरू असेहि योजण्याचा प्रघात आहे. [सं.] (वाप्र.) चोरांची दावण देणें-चोरांची दावण बांधून त्यांचीं डोकीं सड- कणें, चाबकानें बडवणें. म्ह॰ १ चोराच्या मनांत चांदणें = चोराला चांदण्याचें भय वाटतें, कारण त्यांत त्याची चोरी उघडकीस येण्याची भीति असते. चोराचें मन नेहमीं त्यास खात असतें. अपराध्याला नसती शंका येत असते. 'वाढति सदगुण तों तों प्रेम करिति लोक पांडवावरि ते । चोरासि चांदणेसें तापचि देतें सुयोधना अरितें ।' -मोसंभा १०. २ चोरावर मोर = एका चोराला लुबाडणारा दुसरा सवाई चोर; एक वरचढ एक; शेरास सवाशेर. 'तो आतां चोरावर मोर होण्याच्या विचारांत गढून गेला होता.' -स्वप २१३. सामाशब्द-॰अंक-अंख-आंख- पु. १ कापडाच्या गांठीवर, कापडावर, विक्रीच्या वस्तूवर घात- लेला, खरी किंमत दाखविणारा, अत्यंत बारीक आंकडा. हा आंकडा दुकानदाराच्या स्वतःच्या उपयोगाकरितां असतो. हा गिर्हाइकास कळवावयाचा नसतो. गिर्हाइकाकरितां किंमतीचा दुसरा मोठा पण खोटा आंकडा दिलेला. २ हस्तलिखित पुस्तकाच्या पानावर घातलेला अनुक्रमाचा बारीक आंकडा. ३ (सामा.) गुप्त आंकडा. [चोर = गुप्त, खासगी + अंक = आंकडा] ॰ओंटी-स्त्री. दिसण्यांत लहान पण फार दूध देणारी (गाईची, म्हशीची) ओटी, कांस. ॰ओंटी भरणें-सक्रि. स्त्रीच्या प्रथम गर्भारपणाच्या तिसर्या किंवा चवथ्या महिन्यांत खासगी रीतीनें (गरोदर स्त्रीस शिंक्याखालीं बसवून) ओटी भरणें. तीन महिने- पर्यंत स्त्री गर्भार आहे हें निश्चित कळूं शकत नाहीं यावरून या समारंभास चोरओटी म्हणतात. ओटीभरण पहा. [चोर = गुप्त + ओटी] ॰ओंवा-पु. एक प्रकारचा ओंवा. ॰कांटा-पु. १ तापाची बारीक कसर; थंडीचा बारीक कांटा; चोरटा ताप. (क्रि॰ येणें; लागणें; भरणें; वाटणें). २ खोटा तराजू. [चोर + कांटा = शहारे, तराजू] ॰काठी-स्त्री. (शिकार) जनावर माण- साळण्याची एक युक्ति. चारपांच मनुष्यें समोरून पन्नास फुटां- वरून घोंगडी पांघरून एकदम ओरडत पळत येऊन जनावराच्या पायांजवळ व तोंडाजवळ येऊन पडतात, लोळतात. व तोंड उघडून त्यास गोंजारतात. या क्रियेस चोरकाठी म्हणतात. -चिमा १५. ॰काम-न. १ कितीहि केलें तरी दुसर्याच्या डोळ्यांत न. भरणारें काम. २ पार पडल्यावर ज्याचे फारच थोडे अवशेष शिल्लक राहतात असें काम. ॰कोनाडा-पु. कोनाड्यांत अस- लेला, सहज न कळणारा दुसरा गुप्त कोनाडा. [चोर = गुप्त + कोनाडा] ॰क्रांत-क्रांति-स्त्री. चोरांची पुंडाई; चोरांनीं केलेली लुटालूट, नासधूस, धुळधाण. [चोर + क्रांति = पुंडाई, बंड] ॰खडी-वि. कोंदणांत बसविलेलें. 'लेईला अलंकार भूषणें परवडी । दिव्य रत्नें चोरखडी खेवणें तयां ।' -निगा १२४. ॰खण-पु. १ (पेटींतील, कपाटांतील) गुप्त कप्पा, खण, पूड. २ घरांतील बिनमहत्त्वाची, बारीक खोली, भाग. [चोर = गुप्त + खण] ॰खाई-स्त्री. मुशाफरावर हल्ला करून लुटण्याच्या सोयीची, खबदाडीची, दर्याखोर्यांतील अडचणीची जागा; अरुंद खिंड. [चोर + खाई = खोलगट जागा] ॰खिंड-स्त्री. चोरांनीं प्रवाशांना लुटण्याच्या सोयीची दोन डोंगरांतील अरुंद वाट. चोरखाई पहा. ॰खिडकी-स्त्री. १ एकांतात बसावयाची लहान खिडकी. २ (ल.). (लेखांतील, भाषणांतील) पकड, सोडवण, छिद्र; (लेखांतून, भाषणांतून) निसटावयासाठीं केलेली संदिग्ध वाक्यरचना, पळवाट ३ प्रसंगविशेषीं निसटून; पळून जाण्यासाठीं केलेली लहान व गुप्त खिडकी. ॰खिसा-पु. आंगरख्याचा, कोटाचा गुप्त खिसा. ॰गल्ली-स्त्री. (चोरांना लपण्याच्या सोयीची) आडगल्ली, बोळ. ॰गस्त-स्त्री. रात्रीं दुसर्याला कळूं न देतां पोलीस लोक मुकाट्यानें जी फेरी घालतात ती; गुप्तपणें घात- लेला रस्त्यावरील फिरता पहारा; मुकी गस्त; वाद्याशिवाय गुप- चुप घातलेली गस्त. याच्या उलट राजगस्त. [चोर + गस्त = पहार्याची फेरी] ॰गस्तीनें-क्रिवि. लपूनछपून; कोणास समजूं न देतां; गुप्तपणें. (क्रि॰ वागणें; येणें; जाणें; फिरणें). याच्या उलट उघड- मराठी. ॰गांठ-स्त्री. गुप्त गांठ; दिसून न येणारी गांठ. ॰घडी- स्त्री. अपुरी घडी; लहान घडी; गिर्हाईक कापड विकत घेतांना त्याची लांबी घड्यांवरून, सळांवरून ठरवितात. म्हणून त्यांना फसविण्यासाठीं व्यापारी एका घडीच्या पोटांत दुसरी लहान अपुरी घडी घालतो ती. ॰घर-न. गुप्त खोली, कप्पा, खण, खाना. ॰घाई-स्त्री. १ चोर आले असतां उडणारी धांदल, घाई. २ (ल.) अतिशय धांदल; धांवपळ. ॰चाऊ(हू)ल-स्त्री. गुप्तपणें ऐकून, पाहून लागलेली एखाद्या माणसाच्या, जनावराच्या अस्ति- त्वाची, हालचालीची चाहूल, कानोसा. [चोर = गुप्तपणें + चाहूल = कानोसा, हालचालीचा आवाज] ॰चिरटा-चिलटा- चिल्लट-पु. चोर वगैरे. 'हल्लीं चोराचिलटांचा इथें फार त्रास आहे.' -भा ५२. 'वेळप्रसंग पडल्यास चोराचिरट्यां- पासून संरक्षण करण्याला उपयोगी पडतील असे शिपाई प्यादे ......वगैरे प्रकारचे लोक त्यांजपाशीं फारच थोडे होते.' -विंध्याचल १११. [चोर + चिलट; किंवा चोर द्वि.] ॰चुंबा-पु. १ गुप्तपणें दिलेला बोळा, दट्ट्या २ (ल.) लांच. (क्रि॰ पडणें; देणें). [चोर + चुंबा = कापडाचा, चिंध्यांचा बोळा, दट्ट्या] ॰जासूद-पु. गुप्त हेर, चार; टेहळ्या; (इं.) डिटेक्टिव्ह. -राव्यको १.१७. ॰ताजवा-पु. खोटी तराजू; चोरकांटा. ॰ताप-पु. हातास न लागणारा परंतु शरीरांत असणारा बारीक ताप; हाडी. ज्वर; तापाचीं सतत असलेलीं बारीक लक्षणें; चोरटा ताप. [चोर + ताप] ॰थरा-पु. (महानु.) खोटें नाणें. चोरमोळा पहा. 'टाकु पाडिला चोरथरा ब्रह्मविद्येचा ।' -भाए ६३५ 'ऐसा प्रपंच टांक चोरथरा । मूढीं सुखभोगाचिया मोहरा ।' -ज्ञाप्र ५८०. ॰दरवाजा-दार-पुन. गुप्त, खाजगी दार; मागचें दार. ॰धाड-धाडा-स्त्रीपु. चोरांनीं केलेला आकस्मिक घाला, हल्ला; दरवडा; डांका. ॰नजर-स्त्री. १ (दुसर्याला) नकळत पाहणें; डोकावून पाहणें, गुप्तपणें टेहळणी करण्याकरितां टाक- लेली नजर; चोरून पाहणें; चोरटी दृष्टि. 'घरांतील बायका चोरनजरेनें जावयाकडे पाहतात.' -मोर २४. २ चोरासारखी मुद्रा, चर्या, दृष्टि. [चोर + नजर = दृष्टि] ॰पडदा-पु. १ आंतील गुप्त पडदा. २ शरीराच्या आंतील पडदा; अंतस्त्वचा ॰पण-न. (बायकी) मुलींच्या खेळांत येणारी चोर होण्याची पाळी. ज्या मुली- वर डाव असतो, ती जर डाव न देतां जाऊं लागली तर इतर मुली तिला आपलें चोरपण दुसरीस देऊन जाण्यास सांगतात, [चोर + पण] ॰पाइकी-स्त्री. चोरून हल्ला करणें. -पया ६६. -शर. [चोर + पाइकी] ॰पाऊल-पाय-न.पु. आवाज न करतां टाकलेलें पाऊल; पावलांचा शब्द न करतां चालणें; चोरटें चालणें; चोर चाहूल. ॰पावलांनीं-क्रिवि. मुकाट्यानें; शब्द न करतां. 'चला चोरपावलांनींच पुरुषोत्तमरावांच्या वाड्यात.' -इंप ३१. ॰पाणी-न. दुखणेकर्यास, नुकतेंच दुखण्यांतून उठलेल्यास-खोलींत स्नान घालण्याकरितां तयार केलेलें औषधि- युक्त तापविलेलें पाणीं. ॰पान्हा-पु. १ धार काढतेवेळीं गाय किंवा म्हैस मुद्दाम कांसेचा संकोच करून दुधाचा कांहीं अंश वासरा- साठीं राखून ठेवते तो. २ असें राखून ठेवलेलें दूध बळजबरीनें काढ- तात तें; गाईनें, म्हशीनें नाखुषीनें दिलेलें थोडें दुध. ३ (ल.) लघवी केल्यानंतर पुन्हां थोडथोडी होणारी लघवी; न कळत लघ- वीस होणें; लघवीस थोडें थोडें होणें; 'तेज सांडूनि जाय नयना । टाळी पडोनि ठाती काना । मुततां लागे चोरपान्हा । तरी देहा- भिमाना वाढवी ।' -एभा २२.५२८. [चोर + पान्हा] ॰पाळत- पाळती-स्त्री. आपण दृष्टीस न पडतां दुसर्याची, दुसर्याच्या घरची, बातमी युक्तीनें काढण्याचा प्रकार; गुप्त रीतीनें ठेवलेली पाळत; पाळत; पाळती पहा [चोर + पाळत = नजर] ॰पेठ- स्त्री. ज्यांत खोटीं वजनें वापरतात व चोरटा धंदा चालतो असा बाजाराचा गांव, पेठ; चोरबाजार. ॰पोर-न. (समुच्चायार्थीं) चोर; उचल्या; भामटा इ॰ लहानसहान चोर्या करणारीं चोरटीं पोरें; उचल्ये इ॰. ॰बातमी-स्त्री. हेराकडून समजलेली गुप्त बातमी; चोरपाळतीनें कळलेली बातमी. -शिदि २६९. ॰भय-न. चोरांपासून उत्पन्न होणारी भीति. ॰भूक-स्त्री. १ थोडी शिल्लक राहिलेली, पूर्णपणें न शमलेली भूक. ३ थोडेसें खाऊन शांत होणारी भूक; किंचित् भूक. (क्रि॰ लागणें; येणें; सुटणें; वाटणें). ॰महाल-पु. १ गुप्त जागा, खोली. २ रखेल्या ठेवलेली जागा; दासीमहाल. ॰म(मु)ळ्या-क्रिवि. लपून छपून; गुप्तपणें; पाळत ठेवून; गुपचूप; गुप्तपणें(टेहळणें). (क्रि॰ पाहणें). ॰मूठ-स्त्री. पकडलेल्या जनावरास तीन दिवस एका जागेवर पडूं देतात, त्यास चोरमूठ म्हणतात. -चिमा ९. ॰मोळा-पु चोरांचा शिक्का; खोटें नाणें; चोरथरा पहा. 'हा चोरमोळा असिका । प्रपंचाचा ठसा लटका । जो प्रवृत्ति पडिला लोकां । अज्ञानांचा ।' -ज्ञाप्र ५४९. 'अवघेचि जालें चोरमोळे । नरदेहावांचौनिया ।' -भाए २४७. [चोर + मोळा; का. मोळे = खिळा; म. मोळा = रीत] ॰रान-न. चोर, लुटारू इ॰ कानीं युक्त असें रान. [चोर + रान] ॰लक्षण-न. चोरटेपणाचा स्वभाव दाखविणारी मुद्रा, नजर, चेहर्याचें वळण, चालण्याची धाटी इ॰; (पाहिलेला मनुष्य) चोर आहे असें दर्शविणारें लक्षण; चोरटेपणाची छाप. [चोर = चोरी करणारा + लक्षण = चिन्ह] ॰वड-वंड, चोरावडा- वंडा, चोरवण-वाण, चोरवें-स्त्रीपुन. चोरांनीं केलेला उत्पात, धुमाकूळ, अनर्थ, नासाडी, लुटालूट; चोर फार माजल्यामुळें उत्पन्न झालेली दुर्दशा. (क्रि॰ सुटणें; मातणें; होणें; माजणें; उठणें; मोडणें; दाबणें; दबणें).[चोर + वड-ण प्रत्यय] ॰वाट-स्त्री. गुप्त वाट, मार्ग. 'किल्ल्यांतून व वाड्यांतून बाहेर पडावयास चोरवाटा असत.' -कोरकि ३९१. ॰वाडा पु. १ चोरांचा अड्डा; चोरांची वस्ती. २ ज्या घरांतील सर्वच माणसें चोराप्रमाणें वागतात तें घर. विद्या-स्त्री. १ गूढ, अज्ञात शास्त्र, कला. २ फारच थोडया लोकांस माहीत असणारी व क्वचितच शिकविली जाणारी विद्या. गुप्त विद्या; ३ जारणमारणाची, जडी- बुटीची विद्या. [चोर + विद्या] ॰वेळ-ळा स्त्री. १ दिवसाच्या किंवा रात्रीच्या तीस घटकांचे प्रत्येकीं तीनपूर्णांक तीन चतुर्थांश घटकेचे असे आठ भाग कल्पिले आहेत त्यास अमृतवेळ, काळवेळ, शुभ- वेळ इ॰ नांवें आहेत. त्या आठांपैकीं एका वेळेस चोरवेळ किंवा चंचल वेळ असें म्हणतात. वेळ पहा. २ ज्या वेळीं चोरांची विशेष भीति असते ती वेळ. ॰शिवण-स्त्री. आंतील, बाहेर न दिसणारी शिवण; गुप्त शिवण. ॰हट्टी-हाटी-स्त्री. चोरवाडा; चोरांचा अड्डा; चोरांचें वसतिस्थान. [चोर + हट्टी = हाट, बाजार] ॰हरकारा-पु. गुप्त दूत. -राव्यको १.१८.[चोर + हरकारा = निरोप देणारा दूत, हलकारा] चोरापोरी-मोरी, चोरींपोरीं-क्रिवि. चोरांनीं आणि चोरट्या उनाड पोरांनीं; चोर, भामटे इ॰ कां कडून (चोरून नेलेला इ॰). 'गुळाची ढेप चोरापोरीं गेली.' [चोर + पोर] चोरामोरा-क्रिवि. चोरट्या मुद्रेनें; चोरटेपणानें; चोरूनमारून. 'असा चोरामोरा किती दिवस वहिवाटणार.' -सूर्यग्र १२९.
दुर्
अ. दुष्टपणा; वाईटपणा, कठिणपणा, दुःख इ॰कांच्या वाचक शब्दापूर्वीं योजावयाचा उपसर्ग. जसें:-दुराचार = वाईट वर्त- णूक; दुर्लभ = मिळण्यास कठिण; दुस्सह = सहन करण्यास कठिण इ॰. याचीं संधिनियमानुरूप दुर्, दुस्, दुष्, दुश् इ॰ रूपें होतात. जसें:- दुर्लभ दुष्कर, दुश्चल, दुस्सह, दुस्साध्य, दुराचार, दुरंत इ. हा उपसर्ग जोडून अनेक सामासिक शब्द बनतात. त्यांपैकीं कांहीं येथें दिले आहेत. दुरंत-वि. १ अपार; अनंत; अमर्याद; अंत लागण्यास कठिण असा (मोह, माया इ॰). २ अतिशय कठिण; तीव्र (दुःख इ॰). [दुर् + अंत = शेवट] दुरतिक्रम-वि. ओलांडून जाण्यास कठिण; दुस्तर; दुर्लंघ्य. २ असाध्य. [दुर् + अतिक्रम = ओलांडणें] दुरत्यय-यी-वि. १ नाश करून टाकण्यास कठिण. २ प्रतिबंध करण्यास, टाळण्यास कठिण; अपरिहार्य. ३ असाध्य (दुःख, आजार, रोग इ॰). अप्रतीकार्य (अडचण, संकट). ४ मन वळ- विण्यास कठिण असा (मनुष्य); दुराराध्य. [दुर् + अत्यय = पार पडणें, जाणें इ॰] दुरदृष्ट-न. दुर्दैव; वाईट अदृष्ट. 'कीं आड आलें दुरदृष्ट माझें ।' -सारुह १.१०. [दुर् + अदृष्ट] दुरधिगम्य- वि. १ समजण्यास कठिण; दुर्बोध; दुर्ज्ञेय. २ दुष्प्राप्य; मिळण्यास कठिण; दुर्गम. [दुर् + सं. अधि + गम् = मिळविणें] दुरभिमान-पु. पोकळ, वृथा, अवास्तव अभिमान; फाजील गर्व. [दुर् + अभिमान] दुरवबोध-वि. दुर्बोध; गूढ. [दुर् + सं. अव + बुध् = जाणणें] दुरा- कांक्षा-स्त्री. दुष्प्राप्य वस्तूचा अभिलाष. [दुर् + आकांक्षा = इच्छा, अभिलाष] दुराग्रह-पु. हट्ट, लोकविरोध, शास्त्रविरोध, संकटें इ॰ कांना न जुमानतां एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरविण्याचा हट्ट; अनिष्ट आग्रह. 'न सुखद दुराग्रह सखा हा सर्वाऽनर्थ गेह ठक राया ।' -मोकर्ण ४६.५०. [दुर् = वाईट + आग्रह = हट्ट] दुराग्रही-वि. दुरा- ग्रह धरण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा; हेकेखोर; हटवादी; हट्टी. [दुराग्रह] दुराचरण, दुराचार-नपु. निंद्य, वाईट, वागणूक; दुर्वर्तन; दुष्ट आचरण. [दुर् = दुष्ट + सं. आचरण = वर्तन] दुराचरणी, दुराचारी-वि. निंद्य, वाईट, दुष्ट वर्तनाचा; बदफैली. [दुराचार] दुरात्मत्व-न. १ दुष्ट अंतःकरण; मनाचा दुष्टपणा. २ दुष्ट कृत्य. 'किमपि दुरात्मत्व घडलें ।' [दुर् = दुष्ट + आत्मा = मन] दुरात्मा- वि. दुष्ट मनाचा (मनुष्य); खट; शठ. [दुर् + आत्मा] दुरा- धर्ष-वि. जिंकण्यास, वर्चस्वाखालीं आणण्यास कठिण. [दुर् + सं. आ + धृष् = जिंकणें] दुराप-वि. मिळविण्यास कठिण; दुर्लभ; अप्राप्य. 'राया, भीष्माला जें सुख, इतरां तें दुराप, गा, स्वापें ।' -मोभीष्म ६.२९. दुराप(पा)स्त-वि. घडून येण्यास कठिण; दुर्घट; असंभाव्य. 'वाळूचें तेल काढणें ही गोष्ट दुरापस्त आहे.' [दुर् + सं. अप + अस् = ] दुराराध्य-वि. संतुष्ट, प्रसन्न करण्यास कठिण, अशक्य; मन वळविण्यास कठिण. 'मोक्षु दुराराध्यु कीर होय । परि तोही आराधी तुझे पाय ।' -ज्ञा ११.९९. [दुर् + सं. आराध्य] दुराशा-स्त्री. निरर्थक, फोल, अवास्तव आशा, दुष्प्राप्य गोष्टीची आशा दुष्ट वासना. 'आम्हास अन्न खावयास मिळेना आणि पालखींत बसण्याची दुराशा धरावी हें चांगलें नव्हे.' 'दुराशागुणें जो नव्हे दैन्यवाणी ।' -राम १६८. [दर् + आशा] दुरासद-वि. कष्टानें प्राप्त होणारें; जिंकण्यास, मिळण्यास कठिण. [दुर् + सं. आ + सद = मिळ विणें] दुरित-न. पाप; पातक; संचितकर्म. 'पुन्हां न मन हे मळो दुरित आत्मबोधें जळो ।' -केका ११९. [दुर् + सं. इ = जाणें] दुरुक्त-न. वाईट, दुष्टपणाचें, अश्लील भाषण; शिवी; अपशब्द; दुर्भाषण; अश्लील बोलणें. [दुर् + उक्ति = बोलणें] दुरुत्तर-न. अप मानकारक, उर्मटपणाचें उत्तर; दुरुक्ति. [दर् + उत्तर] दुरुद्धर-वि. खंडण करण्यास, खोडून काढण्यास कठिण असा (पूर्वपक्ष, आक्षेप, आरोप). 'या सिद्धांतावर दोष दिला हा सर्वांस दुरुद्धर आहे.' [दुर् + सं. उद् + धृ = काढून टाकणें; वर, बाहेर काढणें] दुरूह-वि. दुर्बोध; गूढ; अतर्क्य. 'ईश्वरानें सृष्टि कशी उत्पन्न केली हें सर्वांस दुरूह आहे.' [दुर् + सं. ऊह् = अनुमानणें] दुर्गत-वि. गरीब; दिन; दरिद्री; लाचार. 'झांकी शरपटलानीं आढ्य जसा दुर्गतांसि वस्त्रांनीं ।' -मोभीष्म ९.६५. [दुर् + सं. गत = गेलेला] दुर्गति-स्त्री. १ दुर्दशा; वाईट स्थिति; संकटाची, लाजिरवाणी स्थिति; अडचण; लचांड. २ नरक; नरकांत पडणें. [दुर् + गति = स्थिति] दुर्गंध- गंधी-पुस्त्री. घाण; वाईट वास. -वि. घाण वास येणारें [दुर् = वाईट + सं. गंध = वास] ॰नाशक-वि. (रसा.) दुर्गंधाचा नाश करणारें; (इं.) डिओडरंट्. [दुर्गध + सं. नाशक = नाश करणारा] दुर्गंधिल-वि. (रासा.) आर्सेनिक व मेथिल यांच्या संयोगापासून बनलेला विषारी, दुर्गंधी (पदार्थ) (इं.) कॅको- डिल्. दुर्गम-वि. जाण्यास कठिण (स्थळ, प्रदेश इ॰). [दुर् + सं + गम् = जाणें] दुर्गुण-पु. वाईट गुण; दोष; अवगुण; दुर्मार्गाकडील कल. (क्रि॰ आचरणें). [दुर् + गुण] दुर्गुणी-वि. वाईट गुणांचा; अवगुणी; दुराचरी; दुर्वर्तनी. [दुर्गुण] दुर्घट-वि. धड- वून आणण्यास, घडून येण्यास, सिद्धीस नेण्यास कठिण. [दुर् + सं. घट् = घडणें, घडवून आणणें] दुर्घटना-स्त्री. अशुभ, अनिष्ट गोष्ट घडणें; आकस्मिक आलेलें संकट, वाईट परिस्थिति. [दुर् + सं. घटना = स्थिति] दुर्घाण-स्त्री. दुस्सह घाण; ओरढाण; उग्रष्टाण. [दुर् + घाण] दुर्जन-पु. वाईट, दुष्ट मनुष्य. [दुर् + जन = मनुष्य, लोक] दुर्जय-वि. १ जिंकण्यास कठिण. २ दुस्साध्य; दुस्तर. [दुर + सं. जि = जिंकणें] दुर्जर-वि. पचविण्यास, विरघळ- ण्यास कठिण. [दुर् + सं. जृ = जिरणें] दुर्दम-वि. दमन करण्यास, वर्चस्वाखालीं आणण्यास कठिण. 'तिला इंग्लंडांतील प्रबल व दुर्दम प्रजाजनांच्या अडथळ्याशिवाय दुसरें कोणतेंच नियमन नसे.' -पार्ल ६. [दुर् + दम्] दुर्दर्श-वि. दिसण्यास, पाहण्यास कठिण; अतिशय अस्पष्ट. [दुर् + सं. दृश् = पाहणें] दुर्दशा-स्त्री. अवनतीची, अडचणीची, संकटाची, वाईट, दुःखद स्थिति; दुर्गति; दुःस्थिति. 'भिजल्यामुळें शालजोडीची दुर्दशा जाली.' [दुर् + दशा = स्थिति दुर्दिन-न. १ वाईट दिवस. २ अकालीं अभ्रें आलेला दिवस. ३ वृष्टि. -शर. [दुर् + सं. दिन = दिवस] दुर्दैव-न. कमनशीब; दुर्भाग्य. 'कीं माझें दुर्दैव प्रभुच्या मार्गांत आडवें पडलें ।' -मोसंशयरत्नमाला (नवनीत पृ. ३४९). -वि. कम- नशिबी; अभागी. [दुर् + दैव = नशीब] दुर्दैवी-वि. अभागी; कम- नशिबी. [दुर्दैव] दुर्धर-पु. एक नरकविशेष. [सं.] दुर्धर- वि. १ धारण, ग्रहण करण्यास कठिण. २ दुस्साध्य; दुष्प्राप्य. ३ (काव्य) (व्यापक) बिकट; खडतर; असह्य; उग्र; कठिण. 'तप करीत दुर्धर । अंगीं चालला घर्मपूर ।' ४ भयंकर; घोर; भयानक. 'महादुर्धर कानन ।' [दुर् + सं. धृ = धरणें, धारण करणें] दुर्धर्ष- वि. दुराधर्ष; दमन करण्यास, वर्चस्वाखालीं आणण्यास कठिण; दुर्दम्य; अनिवार्य. [दुर् + धृष् = जिंकणें, वठणीवर आणणें] दुर्नाम- न. अपकीर्ति; दुष्कीर्ति; बदनामी. [दुर् + सं. नामन् = नांव] दुर्नि- मित्त-न. अन्याय्य, निराधार कारण, सबब, निमित्त. [दुर् + निमित्त = कारण] दुर्निर्वह-वि. १ दुःसह; असह्य; सहन करण्यास कठिण; निभावून जाण्यास, पार पडण्यास कठिण (अडचण, संकट). २ दुस्साध्य; दुष्कर; [दुर् + सं. निर् + वह्] दुर्निवार, दुर्निवा- रण-वि. १ निवारण, प्रतिबंध करण्यास कठिण; अपरिहार्य; अनि- वार्य. २ कबजांत आणण्यास कठिण; दुर्दम्य. [दुर् + नि + वृ] दुर्बल-ळ-वि. १ दुबला; अशक्त; असमर्थ. २ गरीब; दीन; दरिद्री. 'ऐसें असतां एके दिवशीं । दुर्बळ द्विज आला परियेसीं ।' -गुच ३८.७. [दुर् + बल = शक्ति] दुर्बळी-वि. (काव्य.) दुर्बळ पहा. दुर्बुद्ध-वि. १ दुष्ट बुद्धीचा; खुनशी वृत्तीचा. २ मूर्ख; मूढ; मंदमति; ठोंब्या. [दुर् + बुद्धि] दुर्बुद्धि-स्त्री. १ दुष्ट मनोवृत्ति; खुनशी स्वभाव; मनाचा दुष्टपणा. 'दुर्बुद्धि ते मना । कदा नुपजो नारायणा ।' -तुगा ७९८. २ मूर्खपणा; अनिष्ट परिणामकारक बुद्धि. -वि. दुष्ट मनाचा; दुर्बुद्ध पहा. [दुर् + बुद्धि] दुर्बोध-वि. समजण्यास कठिण (ग्रंथ, भाषण इ॰) [दुर् + बोध् = समजणें, ज्ञान] दुर्भग-वि. कमनशिबी; दुर्दैवी; भाग्यहीन. [दुर् + सं. भग = भाग्य] दुर्भर-वि. भरून पूर्ण करण्यास कठिण; तृप्त करण्यास कठिण (पोट, इच्छा, आकांक्षा). 'इंद्रियें वज्रघातें तपे उष्ण वरी ज्वाळ । सोसिलें काय करूं दुर्भर हे चांडाळ ।' -तुगा ३५४. -न. (ल.) पोट. 'तरा दुस्तरा त्या परासागरातें । सरा वीसरा त्या भरा दुर्भरातें ।' -राम ८०. [दुर् + सं. भृ = भरणें] दुर्भ्यक्ष्य-वि. खाण्यास कठिण, अयोग्य; अभ्यक्ष्य. [दुर् + सं. भक्ष्य = खाद्य] दुभोग्य-न. कमनशीब; दुर्दैव. -वि. दुर्दैवी; अभागी. [दुर् + सं. भाग्य = दैव] दुर्भावपु. १ दुष्ट भावना; कुभाव; द्वेषबुद्धि. २ (एखाद्याविषयींचा) संशय; वाईट ग्रह; (विरू.) दुष्टभाव. [दुर् + भाव = भावना, इच्छा] दुर्भाषण-न. वाईट, अपशब्दयुक्त, शिवीगाळीचें बोलणें; दुर्वचन पहा. [दुर् + भाषण = बोलणें] दुर्भिक्ष-न. १ दुष्काळ; महागाई. २ (दुष्काळ इ॰ कांत होणारी अन्नसामुग्री इ॰ कांची) टंचाई; कमीपणा; उणीव. [सं.] ॰रक्षित-वि. दासांतील एक प्रकार; आपलें दास्य करावें एतदर्थ दुष्काळांतून वांचविलेला (दास, गुलाम इ॰). -मिताक्षरा-व्यवहारमयूख दाय २८९. [दुर्भिक्ष + सं. रक्षित = रक्षण केलेला] दुर्भेद-वि. बुद्धीचा प्रवेश होण्यास कठिण; दुर्बोध. 'तैसें दुर्भेद जे अभिप्राय । कां गुरुगम्य हन ठाय ।' -ज्ञा ६.४५९. [दुर् + सं. भिद् = तोडणें] दुर्भेद्य-वि. फोडण्यास, तुकडे करण्यास कठिण (हिरा; तट). [दुर् + सं. भेद्य = फोडण्यासारखा] दुर्मति-स्त्री. १ दुर्बुद्धि; खाष्टपणा; कुटिलपणा. २ मूर्खपणा; खूळ; वेडेपणा. -पु. एका संवत्सराचें नांव. -वि. १ दुष्ट बुद्धीचा; खाष्ट स्वभावाचा. २ मूर्ख; खुळा; वेडा. [दुर् + मति = बुद्धि, मन] दुर्मद-पु. दुराग्रहीपणा; हेकेखोरी; गर्विष्ठपणाचा हटवादीपणा. 'किती सेवाल धन दुर्मदा' -अमृतपदें ५८. -वि. मदांध; मदोन्मत्त; गर्विष्ठ. 'सावियाचि उतत होते दायाद । आणि बळिये जगीं दुर्मद ।' -ज्ञा ११.४८०. [दुर् + मद = गर्व] दुर्मनस्क, दुर्मना-वि. खिन्न; उदास मनाचा; विमनस्क; दुःखित. [दुर् + सं. मनस् = मन] दुर्मरण-न (वाघानें खाऊन, पाण्यांत बुडून, सर्प डसून इ॰ प्रकारांनीं आलेला) अपमृत्यु; अपघातानें आलेलें मरण; अमोक्षदायक मरण. [दुर् + मरण] दुर्मि(र्मी)ल-ळ- वि. मिळण्यास कठिण; दुर्लभ. [दुर् + सं. मिल् = मिळणें] दुर्मुख- पु. एका संवत्सराचें नांव. -वि. १ घुम्या; कुरठा; तुसडा; आंबट तोंडाचा. २ तोंडाळ; शिवराळ जिभेचा. 'दुर्मुखी स्त्रीचा त्याग करून । संन्यास ग्रहण करावा ।' [दुर् + मुख] दुर्मुखणें- अक्रि. तोंड आंबट होणें; फुरंगुटणें; गाल फुगविणें; (एखाद्या कार्याविषयीं) उत्साहशून्यतेची चर्या धारण करणें. 'खायास म्हटलें म्हणजे हांसत येतात आणि उद्योगाचें नांव घेतलें म्हणजें लागलेच दुर्मुखतात.' [दुर्मुख] दुर्मुखला-वि. आंबट चेहर्याचा; घुम्या; कुरठा; तुसडा. [दुर्मुख] दुर्मेधा-वि. १ मंदबुद्धीचा. २ दुष्ट स्वभावाचा; दुर्मति. [दुर् + सं. मेधा = बुद्धि] दुर्योग-पु. सत्ता- वीस योगांतील अशुभ, अनिष्ट योगांपैकीं प्रत्येक. [दुर् + योग] दुर्लंघ्य-वि. १ ओलांडता येण्यास कठिण; दुस्तर (नदी इ॰). २ मोडता न येण्यासारखी, अनुल्लंघनीय (आज्ञा, हुकूम, शपथ इ॰) ३ निभावून जाण्यास कठिण (संकट, अडचण इ॰). ४ घालविण्यास, दवडण्यास, क्रमण्यास, नेण्यास कठिण (काळ, वेळ इ॰). [दुर् + सं. लंघ्य = ओलांडावयाजोगें] दुर्लभ-वि. मिळण्यास कठिण; अलभ्य; दुर्मिळ; दुष्यप्राप्य; विरळा. 'अलीकडे आपलें दर्शन दुर्लभ जालें. दुर्ललित-न. चेष्टा; खोडी. 'आमच्या विविध दुर्ललिताबद्दल गुरुजींनीं कसें शासन केलें...' -आश्रमहारिणी ७. [दुर् + सं. ललित = वर्तन, चेष्टा] दुर्लक्ष-न. लक्ष नसणें; हयगय; निष्काळजी- पणा; गफलत; अनवधान. -वि. १ लक्ष न देणारा; अनवधानी; गाफील; बेसावध, 'तुम्ही गोष्ट सांगीतली पण मीं दुर्लक्ष होतों म्हणून ऐकिली नाहीं.' २ दिसण्यास, समजण्यास कठिण; 'ईश्वराचें निर्गुण स्वरूप दुर्लक्ष आहे.' [दुर् + सं. लक्ष्य] दुर्लक्षण- न. १ (मनुष्य, जनावर इ॰ कांचें) अशुभसूचक लक्षण, चिन्ह; दुश्चिन्ह; दोष; वाईट संवय; खोड; दुर्गुण. 'हा घोडा लात मारतो एवढें यामध्यें दुर्लक्षण आहे.' [दुर् + लक्षण = चिन्ह] दुर्लक्षण-णी- वि. १ दुर्लक्षणानें, वैगुण्यानें युक्त (मनुष्य, घोडा इ॰). (विरू.) दुर्लक्षणी. २ दुर्गुणी; दुराचारी; दुर्वर्तनी. दुर्लक्ष्य-वि. १ बुद्धीनें, दृष्टीनें अज्ञेय; अगम्य. २ दुर्लक्ष इतर अर्थीं पहा. [दुर् + सं. लक्ष्य] दुर्लौकिक-पु. अपकीर्ती; दुष्कीर्ति; बेअब्रू; बदनामी; कुप्रसिद्धि. [दुर् + लौकिक = कीर्ति] दुर्वच, दुर्वचन, दुर्वाक्यन. १ वाईट बोलणें; दुर्भाषण; अशिष्टपणाचें, अश्लील, शिवीगाळीचें भाषण. २ अशुभ, अनिष्टसूचक भाषण. [सं. दुर् + वचस्, वचन, वाक्य = बोलणें] दुर्वह-वि. १ वाहण्यास, नेण्यास कठिण. २ सोसण्यास, सहन करण्यास कठिण. [दुर् + सं. वह् = वाहणें, नेणें] दुर्वाड- वि. अतिशय मोठें; कठिण. -शर. प्रतिकूल. [दुर् + वह्] दुर्वात- उलट दिशेचा वारा. 'तुज महामृत्युचिया सागरीं । आतां हे त्रैलोक्यजीविताची तरी । शोकदुर्वातलहरी । आंदोळत असे ।' -ज्ञा ११.३४८. [दुर् + सं. वात = वारा] दुर्वाद-पु. वाईट शब्द; दुर्वच; वाईट बोलणें; भाषण. 'हां गा राजसूययागाचिया सभासदीं । देखतां त्रिभुवनाची मांदी । कैसा शतधा दुर्वादी । निस्तेजिलासी ।' -ज्ञा ११.१०१. [दुर् + वाद = बोलणें] दुर्वारवि. दुर्निवार; अनिवार्य; टाळण्यास, प्रतिकार करण्यास कठिण; अपरिहार्य. २ आवरतां येण्यास कठिण; अनिवार; अनावर. [दुर् + वारणें] दुर्वास-पु. १ (व.) सासुरवास; कष्ट; त्रास; जाच. [दुर् + वास = राहणें] दुर्वासना-स्त्री. वाईट इच्छा; कुवासना; दुष्प्रवृत्ति. [दुर् + वासना] दुर्विदग्ध-वि. विद्येंत न मुरलेला तथापि विद्येचा गर्व वाहणारा; अर्ध्या हळकुंडानें; पिवळा झालेला. [दुर् + सं. विदग्ध = विद्वान्] दुर्विपाक-पु. वाईट परिणाम. [दुर् + सं. विपाक = परिणाम] दुर्विभावनीय-वि. समजण्यास, कल्पना करण्यास कठिण. [दुर् + सं. विभावनीय = कल्पना करतां येण्यासारखें] दुर्वृत्ति-स्त्री. दुराचारी; दुर्व्यसनी; दुर्वर्तनी. [दुर् + सं. वृत्त = वागणूक] दुर्वत्ति-स्त्री. दुराचरण; भ्रष्टाचार; बदफैली. [दुर् + सं. वृत्ति = वर्तन] दुर्व्यसन-न. दुराचरणाची संवय; द्यूत, मद्यपान, वेश्यागमन इ॰कांसारखें वाईट व्यसन. 'दुर्व्यसन दुस्तरचि बहु सूज्ञासहि फार कंप देतें हो' -वत्सलाहरण. [दुर् + व्यसन] दुर्व्यसन-नी-वि. वाईट व्यसन, संवय लागलेला; दुराचारी; बदफैली. (प्र.) दुर्व्यसनी. दुर्व्रात्य-वि. अतिशय दुष्ट; व्रात्य; खोडकर; खट्याळ; (मुलगा अथवा त्यांचें आचरण). [दुर् + व्रात्य = खोडकर, द्वाड] दुर्हृद, दुर्हृदय-वि. वाईट, दुष्ट मनाचा. [दुर् + सं. हृदु, हृदय = मन] दुर्ज्ञेय-वि. समजण्यास कठिण; गूढ; गहन. 'ही पद्धत कशी सुरू झाली असावी हें समजणें दुर्ज्ञेय आहे.' -इंमू ७६. [दुर् + सं. ज्ञेय = समजण्याजोगें] दुःशक- वि. करण्यास कठिण; अशक्यप्राय. [दुस् + सं. शक् = शकणें] दुःशकुन-पु. अपशकुन; अनिष्टसूचक चिन्ह. [दुस् + शकुन] दुश्शील, दुःशील-वि. वाईट शीलाचा; दुराचरणी. [दुस् + शील] दुश्चरित्र-न. पापाचरण; दुष्कृत्य. [दुस् + चरित्र] दुश्चल-वि. (अक्षरशः व ल.) पुढें जाण्यास, सरसावण्यास, चालण्यास कठिण. [दुस् + सं. चल् = चालणें] दुश्चि(श्ची)त-वि. १ (काव्य) अयोग्य, चुकीचा, अपराधी (माणूस, कृत्य). 'अंगुष्ठ धरुनि मस्तकपर्यंत । अखंड दुश्चित आचरलों ।' २ खिन्न; उदास; दुःखी. 'राजा प्रजा पिडी । क्षेत्री दुश्चितासी तोडी ।' -तुगा २९८४. [सं. दुश्चित अप.] दुश्चित्त-वि. १ खिन्न; दुर्मनस्क; दुःखित; उदास; उद्विग्न. 'अबदुल्याची खबर ऐकतां मनांत झाले दुश्चित ।' -ऐपो १३२. २ क्षुब्ध. 'परी कुंडलिनी नावेक दुश्चित्त होती । ते तयातें म्हणे परौती ।' -ज्ञा ६.२३८ [दुस् + चित्त = मन] दुश्चिंत- वि. (काव्य) खिन्न; दुःखी; उदास; दुश्चित्त अर्थ २ पहा. 'डोळे लावुनियां न होतों दुश्चिंत । तुझी परचीत भाव होती ।' [दुश्चित अप.] दुश्चिन्ह-न. अशुभ, वाईट लक्षण; अपशकुन. 'दुश्चिन्हें उद्भवलीं क्षितीं । दिवसा दिवाभीतें बोभाति ।' [दुस् + चिन्ह] दुश्शाप-पु. वाईट, उग्र, खडतर शाप. [दुस् + शाप] दुश्शासन-पुविना. दुर्योधनाचा भाऊ. -वि. व्यवस्था राख- ण्यास, अधिकार चालविण्यास कठिण. [दुस् + शासन = अधिकार चालविणें] दुष्कर-वि. १ करण्यास कठिण; बिकट; अवघड. 'म्हणोनि अभ्यासासि कांहीं । सर्वथा दुष्कर नाहीं ।' -ज्ञा १२.११३. २ दुष्परिणामकारक. -मोल. [दुस् + सं. कृ = करणें] दुष्कर्म-न. वाईट, पापी, दुष्टपणाचें कृत्य; कर्म. [दुस् + कर्म] दुष्कर्मा, दुष्कर्मी-पु. दुष्ट कृत्य करणारा; पापी; दुरात्मा. [दुस् + कर्मन्] दुष्काल-ळ-पु. अतिवृष्टि किंवा अनावृष्टि होऊन पिकें बुडून अन्नाची वाण पडते तो काळ; दुकाळ; महागाई. 'जैसा रोगिया ज्वराहूनि उठिला । कां भणगा दुष्काळु पाहला ।' -ज्ञा ११.४२८. [दुस् + काल] म्ह॰ दुष्काळांत तेरावा महिना = दुष्का- ळांत वर्षाचे बारा महिने काढतां काढतांच मुष्कील पडते. अशा वेळीं अधिक मास (तेरावा महिना) आला म्हणजे संकटातं भर पडते असा अर्थ. दुष्कीर्ति-स्त्री. अपकीर्ती; बदनामी; बेअब्रू. [दुस् = कीर्ति] दुष्कृत-ति-नस्त्री. १ पापकर्म; वाईट कृत्य. 'आणि आचरण पाहातां सुभटा । तो दुष्कृताचा कीर सेल वांटा ।' -ज्ञा ९.४१६. २ कृतींतील. वागणुकींतील दुष्टपणा. [दुस् + कृत- ति] दुष्प्रतिग्रह-पु. जो प्रतिग्रह (दानाचा स्वीकार) केला असतां, स्वीकारणारा अधोगतीस जातो तो; निंद्य प्रतिग्रह; अशुभप्रसंगीं केलेलें दान स्वीकारणें; वाईट कृत्याबाबत स्वीकारलेलें दान इ॰. उदा॰ वैतरणी, शय्या, लोखंड, तेल, म्हैस हे दुष्प्रतिग्रह होत. [दुस् + सं. प्रतिग्रह = दान स्वीकारणें] दुष्प्राप-प्य-वि. दुर्लभ; मिळण्यास कठिण; विरळा; दुर्मिळ. [दुस् + सं. प्र + आप् = मिळ- विणें] दुस्तर-वि. तरून जाण्यास, पार पडण्यास कठिण. 'समुद्रापेक्षां हा संसार मला दुस्तर वाटतो.' -न. (ल.) संकट. 'थोर वोढवलें दुस्तर । तुटलें सासुरें माहेर ।' -एरुस्व ८.५५. [दुस + सं तृ = तरणें] दुस्पर्श-वि. स्पर्श करण्यास कठिण, अयोग्य. [दुस् + सं. स्पृश् = स्पर्श करणें] दुस्संग-पु. दुष्टांची संगत; कुसंगति. [दुस् + संग] दुस्सह-वि. सहन करण्यास कठिण; असह्य. [दुस् + सं. सह् = सहन करणें] दुस्सही-वि. (प्र.) दुस्सह स्सह अप.] दुस्साध्य-वि. १ सिद्धीस नेण्यास, साधावयास कठिण. 'थोर वय झाल्यावर विद्या दुःसाध्य होते.' २ बरा करण्यास कठिण (रोग, रोगी). आटोक्यांत आणण्यास कठिण (शत्रु, अनिष्ट गोष्ट, संकट इ॰). [दुस् + सं. साध्य = साधण्यास सोपें] दुस्स्वप्न-न. १ अशुभसूचक स्वप्न. २ (मनांतील) कुतर्क, आशंका, विकल्प. [दुस् + स्वप्न] दुस्स्वभाव-पु. वाईट, दुष्ट स्वभाव. -वि. वाईट, दुष्ट स्वभावाचा. [दुस् + स्वभाव]
अशुभ
न. १ अमंगलपणा; अनिष्ट; दुर्भाग्यता; दु्र्दैव; अक- ल्याण म्ह॰ अशुभस्य कालहरणं । शुभस्य शीघ्रम. २ अनिष्ट कार्य; अमंगल कार्य. ३ पातक. 'आमुच्या अशुभाशयाचा घातु । करिता चरणधूमकेतू ।' -एभा ६.१११. [सं.] -वि. १ अमंगल; अभद्र; अनिष्ट; प्रतिकूळ (देखावा, सूचना, मतलब, अर्थ, योग, क्रिया, शब्द, खुणा, चिन्हें, लक्षणें वगैरे). ॰कर्म-न. अमंगल किंवा तिरस्करणीय विधि. ॰आचार-पु. १ ज्यांत उत्सव-सुखसोहळा नाहीं अशा तर्हेचें कार्य किंवा समारंभ; विशेषतः औध्वदैहिक क्रिया- उत्तर क्रिया. २ पापाचरण; अनाचार; दुष्कर्म. [सं.] ॰चिन्ह- ॰लक्षण-न. १ अमंगल, अनिष्ट, चिन्ह-लक्षण, छाया, व्यंजन; दुश्चिन्ह; अनिष्ट सूचक गोष्ट. 'अशुभचिन्हें अत्यंत । लंकेमाजि होति बहुत ।'. घोडयाचीं कांहीं अशुभलक्षणें-'अंसुढाळ किंवा अंसुपात, शृंगी, अंजनी (चांदणी), द्वयखुरी, कुखावर्त, एकांगुळ, त्रिकर्णी, थनी, हीनदंती, अंडावर्त, अधिकदंत, काळवदन, विक्राळ, पंचनखी, कराळ, अहीमुख, तुटपट्टा, वाणिया, वाशिंग, आसनखऊ, सर्पिण, कृष्णां- जनी, खानखऊ, गोमीपांच, हरिणांग, पितअंजनी, काखावर्त, सार- भूकण (सारभाजन), एकांडी, काळांजनी, अंगावर्त, दाढशृंखळ, पुसावर्त, श्वेतांजली, लेंडावर्त, शून्यमस्तक, हृदावर्त, नासावर्त, पोटा- वर्त, तळावर्त, शिळावर्त, नेत्रावर्त, भाळलोचन, व्याघ्रकांत, कृष्ण- टाळू, कपिमुख, जानूवर्त, आर्जळ, कर्णमूळ, शिंपला, पंचनखी, मेंढसुख, खरमुख, रावामुख, कौस्तुकी, हयभंग, केरसुण्या, मध्य- दंती, खुंटीउपाड, अश्रुपात, सेनाभंजन, ढाशी, पोटसूळ, खळतो, रातांधळ, लीदखातो, माथेशूळ, पडमुत, रक्तमुततो, पाण्यांत बसतो, चर्हाटें खातो, डसतो, बुजतो. याशिवाय इतर खोडी-उत- रड, चिमटा, डंकी, बोंबल्या, एका अंगावर झुलणें, बसला असतां उठतांना गुडघे टेकून उठणें, मगरूरी करणें, फार हिंसणें, भित्रे पणा, उड्या मारणारा, पळण्याची खोड, लाथ मारणें व भांडखोर, पुढें आलेल्या जिनसावरून उडून जाणें, चावणें, दोन पायावर उभें राहणें, नालबंदी करूं न देणें, पंचवाख, बांधरीनाख (हरिनाख), उपानयन, जीनपाठक, तंगावर्त, मांडवर्त, चित्री, शाखी, दोसीना, रुईकांती, जंबावर्त, पंचपर्व गुदक, पापवर्ण. घोड्याचे कांही अशुभ भोंवरे-असलि, यकूब, सार्फान, सिपलक, सिंगन, कनहसलि, च्छपर- खट (जनाजा), इतलसार, डंखउजाड, संगिनमाक, कुलुंज, सफा- दारा, गातदार, मुरापा, चवडाशुंभ, मुत्लककूलफेदान, मुत्लकूल- लर्जेन, मुलकूलयेसार, मुलकूलयोजान, मुलारत, चारगुल, खालदार, चवदस्त, सिकल, गोवस्तान, कच्छि, तबरंगु, तस्मागर्दन, औसि- कम, मर्दजान, मोथेवाला, चपरहडी, पोतेअलग, पोपेला, पेरोसोन, अक्रबपेसानी, मापिरू, ढपल, सिकालपेसानी, सिकाल, खुंटेउखाड, चांदसुरज, गजदंत, चकावळ, उंटाच्या दांतासारखे दांत असणारा, उंच कपाळाचा, चालतांना बाहेर जीभ काढणारा, पाणी पितानां पाण्यांत फार तोंड बुडविणारा, दाणा खाऊन शिल्लक कांहीं न ठेवणारा, अंडावर गाईसारखें थान, सड व त्यावर केंस असणारा, एकांड्या, अंडांत कोय नसणारा, काळ्या जिभेचा, एका अंगास झुलणारा, छातीवर भोंवरा (वेड फोड) असलेला, कुसगोम, किरका- वदाल, अदमचसव, खांडकुहा, हृदावळ, विषानैनी, पितानी' वगैरे. -अश्वप ९३-१०६. या शब्दांच्या अर्थासाठीं ते ते शब्द पाहणें. ॰वर्तमान-न. वाईट बातमी; अमंगल, अनिष्ट बातमी. '(बिपश- साहेबांच्या) अशुभवर्तमानानें फसून जाण्याइतके मूर्ख आतां आम्ही राहिलों नाही. '-टिले २.५६२. [स.]
दु
अशी आडवी रेघ. (क्रि॰ मारणें; ओढणें; करणें). दुलंगी पेंच-पु. कुस्तींतील एक पेंच. दुलडी-स्त्री. स्त्रियांच्या गळ्यांत घालण्याचा दोन सरांचा एक दागिना. 'ताईत सांखळी गळाची दुलडी । बाजुबंद जोडी हातसर ।' तुगा २९५९. 'पेट्यांचें येकदाणें, तदुपरि दुलडी कंठदेशीं तयेच्या ।' -सारुह ६.२३. [दु + लड = सर] दुलंड- वि. दोन्ही पक्षांशीं विश्वासघात, बेइमानी करणारा. दुलंडी- दी-पु. (कों.) एका गांवांत राहून दुसर्या गांवीं शेती करणारा मनुष्य. दुलांकूडपण-न. एकमेकांवर घासलीं जाणारीं दोन लांकडें तीं समुच्चयानें. 'दुलांकुडपण सांडिलें । आणि आगीपणें मांडिलें । तैंचि आगी जालें । इंधन कीं ।' -अमृ ७.३२. दुलाचा, दुला(ली)च्या, दुलंच्या-स्त्रीअव. दुगाण्या; जनावराच्या मागच्या लाथा; दुमच्या. (क्रि॰ झाडणें). दुलावा-वि-व्या-वि. इकडची गोष्ट तिकडे व तिकडची इकडे सांगून कज्जा लावण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा; कळलाव्या; आगलाव्या. [दु + लावणें] दुल्लड-स्त्री. स्त्रियांचें एक दोन पदरी कंठभूषण. '३३ दुल्लडी मोत्यांची.' -वाडसभा १.५७. दुलडी पहा. दुल्लडी-वि. दोन पदरी; दोन सर असलेलें. दुवक्त-वक्तां-वख्तां-क्रिवि. १ सकाळीं व संध्याकाळीं अशा वेळीं. २ (सामा.) दोनदां; दोन वेळां. 'नित्य घरीं दुवख्ता पाणी भरावें, मग जे होणार तें होतच आहे.' -रा ८.२०१. 'संमेलन सकाळ व दुपार असें दुवक्त भरलें होतें.' -केसरी १४.६.३०. पृ. ३. [सं. दु; फा. दू-वक्त्] दुवारणें- उक्रि. दुसारणें पहा. दुवारा-वि. दोनदां सडलेला, कांडून स्वच्छ केलेला (तांदूळ). [दु + वार = वेळ] दुवारेंन. (राजा.) एक- वार कांडलेल्या साळी पाखडल्यानंतर तांदूळ अधिक स्वच्छ व्हावे म्हणून त्यांना पुन्हां कांडतात ती क्रिया. [दुवार] दुवाळ-स्त्री. (विणकाम) एकसंध विणलेले दोन पंचे; दोन पंचांचें कापड; वातिळ, चवाळें पहा. दुवाळणें-अक्रि. (कु.) एकदां सांगितलेली हकीगत पुन्हां सांगताना किंचित् फेरबदल करून सांगणें. [दु + वेळ] दुवेत-न. १ (गाय, म्हैस इ॰ जनावरांची) दुसरी प्रसूति. २ (गाय, म्हैस इ॰ जनावरांस) दुसर्या प्रसूतीच्या वेळीं झालेलें वासरूं; पारडूं. ३ (ल.) (संतापानें म्हणतात) खोडसाळ व द्वाड मूल. [दु + वेत = विणें; प्रसूति] दुवेत-वेती-वि. दोनदां व्यालेली (गाय, म्हैस इ॰). [दु + वेत] दुवेळां-वेळीं-क्रिवि. दोन वेळां; सकाळीं व संध्याकाळीं; दुवख्तां. [दु + वेळ] दुवोत्रा, दुहोत्रा-वि. दुहो- तरा पहा. दुव्वा-पु. गंजिफांतील, पत्त्यांतील दोन ठिपक्यांचें पान. दुशाख-स्त्री. हंड्यांतील दिवे, मेणबत्त्या लावतां येण्यासाठीं एका टोंकास दोन-तीन वांकडी लोखंडी शिंगें लावलेली काठी. प्रसंगविशेषीं मशालीसारखाहि हिचा उपयोग होतो. [दु + शाखा = फांदी, फांटा] दुशाल-दुशालास्त्रीपु. दुहेरी शाल, शालजोडी. 'शालू रंगलाल वर पिवळी दुशाल.' -पला ४.४२. ' मृदुशय्येवर जी पहुडावी ओढुनि तलम दुशाला ।' -विक ५२. [गु. दुशाल] दुशिडी(महागिरी)-पु. दुकाठी, दोन डोलकाठ्यांचें, शिडीचें गल- बत. दुशि(शी)कडे-क्रिवि. १ दोन्ही बाजूंस, अंगांस. २ दोन्ही दिशांनां. दुशिंगी-वि. (गो.) दोन शिंगें असलेलें (जनावर इ॰). [दु + शिंग] दुशोला-पु. जोड शामदान. 'मोमबत्तीचे दुशोला, येकशोला याप्रमाणें जिन्नस ...' -रा ७.१५६. [दु + अर. शुअला = ज्योत] दुसड-स्त्री. (राजा.) तांदूळ स्वच्छ व्हावे म्हणून ते दुसर्यांदा कांडण्याची, सडण्याची क्रिया. [दु + सडणें = कांडणें] दुसड-डा-डी-वि. १ दोनदा कांडून स्वच्छ, निर्मळ केलेले (तांदूळ). २ (वर्षांतून) जिच्यांतून दोन वेळां पीक काढलें जातें अशी (जमीन); वर्षाचें पहिलें पीक काढल्या- नंतर त्याच जिराईत जमिनींत त्याच वर्षीं काढलेलें (दुसरें पीक इ॰ दुसोटा पहा). दुसडी-वि. दोनच आचळ जिला आहेत अशी (बकरी इ॰). [दु + सड = स्तन, आचळ] दुसढ-स्त्री. (प्रां.) (सामा.) (एखादें काम इ॰ काची) पुन्हां केलेली आवृत्ति; दुसारणी. [दु + सडणें] दुसरणी-क्रिवि. पुनः; दुसर्यांदा; दुसर्यानें. दुसरणी, दुसरणें-दुसारणी, दुसारणें पहा. दुसरद-स्त्री. दोन सरहद्दी. दुसरा-पु. दोन सरांचा, दुपदरी हार. 'हा निळ्यांचा दुसरा । या बुद्धी हातु घातला विखारा । कां रत्नें म्हणोनि गारा । वेंची जेंवि ।' -ज्ञा ९.१४८. [दु + सर] दुसा-वि.) खालच्या दाढा आणि दोन दांत आलेला (बैल). दुसांजां-क्रिवि. (राजा.) जेवणाच्या दोन्ही वेळीं; सकाळीं व संध्याकाळीं; दुवेळां. [दु + सांज] दुसाड-डा-डी-वि. दोनदां कांडून स्वच्छ केलेला (तांदूळ); दुसड पहा. दुसार-अ. सोंगट्यांच्या खेळांतील एक पारिभाषिक शब्द. (क्रि॰ उठणें; निजणें; जाणें). दुसारणी- स्त्री. (कों.) एकवार नांगरलेली जमीन दुसर्यांदा नांगरण्याची क्रिया; दुसरण्याची क्रिया. [दुसारणें] दुसारणी-क्रिवि. पुन्हां; दुसर्यांदा; दुसरणी (-क्रिवि.) पहा. दुसारणें-अक्रि. (कों.) कोंबड्यानें पहांटेस दुसर्यांदा आरवणें. दुसारणें-उक्रि. (एखादी गोष्ट) दुसर्यांदा क्रियेचा विषय करणें; तीच गोष्ट पुनः करणें. जसें:- शेत पुन्हा नांगरणें, पुस्तक पुन्हा वाचणें इ॰दुसाला- ली-वि. दोन वर्षांचा; चालू व गतसालाचा. 'दुसाला-वसूल-हिशेब-उत्पन्न इ॰' (हें विशेषण लिंगवचनांनीं अविकृत राहतें) 'परगणे पाटोदें येथील हिशेब सन संमान दुसाला दप्तरीं विल्हे लावला नव्हता-' -वाडबाबा २.८५. 'या गांवाची वहिवाट दुसाला आम्ही केली.' [दु + साल = वर्ष] दुसोटा-पु. (देशांत रूढ) नुकतेंच काढून घेतलेल्या पिकाच्या जमीनींतून लागलीच पुनः घेतलेलें पीक. दुसड पहा. 'दुसोट्याचा-हरभरा-गहूं-जमीन-शेत- वावर. -ट्याची-दुसवट्याची पेरणी-स्त्री. दुसोट्याची पिकाची पेरणी. 'दुसवट्याच्या पेरणी करतां जमिनी वजविल्या पाहिजेत.' -शे ३.५. ट्याचें पीक-न. मागलें पीक. दुहस(ज)बी, दुहजी-वि. १ दोन कान, दोन डोळे इ॰ सर्व मुखावयव दिसायाजोगें व भिंत इ॰ काकडे पृष्ठदेश (मागील बाजू) असलेलें भिंत इ॰ कावर काढलेलें (चित्र); दुचश्मी अर्थ १ पहा. याच्या उलट एकचष्मी, एक डोळी इ॰ २ जें दोन्हीकडे लागू पडतें असें (वाक्य, शब्द इ॰). ३ जें एका रूपांत थोडासा फेरबदल करून दुसर्या रूपांत सहज दाखवितां येईल असें (चित्र, आकृति आंकडा, इ॰) जसें:-थोडासा फेरबदल केल्यास तीन या आंकड्याचा चार हा आंकडा व नऊ या आंकड्याचा सहाचा आंकडा बनतो त्याप्रमाणें. ४ दोन कामीं योजतां येणारा; दोन कामीं उपयोगी पडणारा (चाकर, घोडा, जनावर, जिन्नस इ॰). [दु + अर. हस्ब्] ॰मत-न. वैकल्पिक मत. दुहाता बगली- वि. (मल्लखांब.) मल्लखांबाच्या बगली उडीचा एक प्रकार. मल्लखांबाच्या बाजूचा हात बगलीप्रमाणें बांधून, दुसरा हात बगलीप्रमाणें न लावतां मल्लखांबाच्या पुढच्या अंगास लावावा. नंतर बगलीप्रमाणें अंग उडवून मल्लखांबास पाय लावून साध्या बगलीप्रमाणें पकड बांधावी व हात सोडून उठावें. नंतर पुनः त्याचप्रमाणें दोन हाताची बगल करीत जावें म्हणजे ही उडी होते. -व्यायाम-मे १९२३. [दु + हात + बगली] दुहार-स्त्री. (प्रां.) १ दुसारणी; दुसारण्याची क्रिया. २ दोन ठिकाणीं असलेला, चालविलेला (रोजगार, व्यवहार, शेती इ॰). [दसार] दुहारणी-स्त्री. आवृत्ति; पुनः तेंच काम करणें; दुसारणी. दुहा- रणें-(विप्र.) दुसारणें पहा. दुहांशी-वि. दोन्ही बाजूंना, कडांना नक्षीदार किनार, हांशे लावलेली (शाल इ॰); याच्या उलट चौहाशी. (दु + हाशिया = काठ, किनार] दुहाळ-स्त्री. (कों.) एकसंधि विणलेली दोन पंचांची जोडी, दुवाळ पहा. दुहिरी, दुहेरा-री-वि. १ दुपदरी (वस्त्र इ॰). २ दुप्पट; द्विगुणित (काम, श्रम इ॰). ३ दोहोंनीं बनलेलें. दुहेरी इष्ट- राशि-राशिक-पुन. (गणित.) ज्यांत अज्ञात, अव्यक्त संख्या दोन किंवा दोनदां घ्याव्या लागतात तें इष्टराशिक. [दुहेरी + इष्ट + राशि] दुहिरी उच्चालकपु. कात्री, आडकित्ता, चिमटा, सांडस इ॰ सारखी जोडतरफ (इं.) डबल् लिव्हर्. -यंस्थि ६६. दुहिरी चौकट-स्त्री. बाह्यांनीं दोन चौकटी जोडून केलेली चौकट; जोड चौकट. दुहिरी डागिना-पु. दोन अवयव असलेला डागिना. दुहिरी पा(फा)सोळीचा-वि. शरीरानें जाडाजुडा असलेला; लठ्ठ; गुबगुबीत; मजबूत बांध्याचा; दुहेरी हाडाचा, अंगकाठीचा (मनुष्य). दुहिरी पाहरा-पु. दोन शिपाई मिळून असलेला, दोन शिपायांचा पाहरा, चौकी; जोड पाहरा. दुहिरी वहिवाट- वही-स्त्री. (जमाखर्चात) दुहेरी जमाखर्च. दुहिरी सरकत- स्त्री. (गणित) दुहिरी सरकत वांटणी. दुहिरी हाडाचा-वि. जोड फांसळीचा; चांगल्या अंगाबांध्याचा, हाडपेराचा. दुही- स्त्री. द्वैत; यादवी; दुई; बेकी; द्वंद्व; भांडण. दुहेरा-वि. दुहिरी. दुहेरी-वि. १ दुपदरी. २ दोन प्रकारचा. ॰तारे-पुअव. एकाच केंद्राभोंवतीं किंवा एकमेकाभोंवतीं फिरणारे दोन तारे; (इ.) बाय- नरी स्टार्स्. ॰तारायंत्र-न. तारेच्या दोन्ही टोंकांला एकाच वेळीं संदेश देणारें तारायंत्र. ॰पाट-पु. (पत्त्यांच्या खेळांत खेळ) इस्पिक राणी-चौकट गुलाम किंवा किलवर राणी-बदाम गुलाम या प्रकारचे दोन जाड (दोन बिझिकें). ॰वक्रीभवन-न. प्रकाशकिरणाची भिन्न पदार्थांतून जातांना दोन वेळां होणारी मार्गच्युति. (इं.) डबल रिफ्रॅक्शन. ॰शह-पु. (बुद्धिबळांचा खेळ) बुद्धिबळांच्या खेळांत एखाद्या मोहर्याच्या पगांत असलेलें आपलेंच दुसरें मोहरें खेळून दोन्ही मोहर्यांचा प्रतिपक्षीय राजा- वर एकदम केलेला मारा. दुहोतरा, दुहोत्रा-पु. दरमहा दरशेंकडा दोन टक्के व्याजाचा दर.
ति
वि. (प्र.) तीन; संख्यावाचक उपसर्ग, प्रत्यय; जसें- तिमजला, तिकोनी = तीन मजल्यांचा, तीन कोपर्यांचा. [सं. त्रिः; प्रा. ति] सामाशब्द-तिकटणें-न. १ शेतामध्यें तीन बांध (वरोळ्या) एका ठिकाणीं असतात तें ठिकाण. २ तीन रस्ते एकत्र मिळ- तात तें ठिकाण. ३ तीन काठ्या वगैरे एकत्र बांधून केलेली रचना; तिकटी. [त्रिकूट] तिकटी-स्त्री. १ तीन काठ्या जुळवून केलेली एक त्रिकोणाकृति रचना. २ त्रिकोण. [सं. त्रिकाष्ठ; प्रा. तिकठ्ठ. त्रिकूट] तिकटें-न. १ लांकडी त्रिकोण (स्मशानांत अग्नि नेण्यासाठीं, विहिरीतून पदार्थ काढण्यासाठीं इ॰ केलेला तीन कामट्या, लांकडे यांचा). २ त्रिदळ; त्रिखंड पान (पळस, बेल, निगुडी इ॰चें). ३ तीन पानांची पत्रावळ. ४ (पंढरपूरकडे) तिफण; तीन नळकांड्यांची पाभर. ५ लांकडाची तिवई. (गो.) तीन काठ्यांची घडवंची. [सं. त्रिकाष्ठ; प्रा. तिकट्ठ. तुल. त्रिकूट] तिकडी-वि. तीन कड्यांची. 'जैं कहीं अवचटें । हे तिकडी सांखळ तुटे ।' -ज्ञा १६. ४३८. [ति = तीन + कडी] तिकळा-ळी-ळें-वि. तिखुळा पहा. तिकांडी-स्त्री. एक गवत. 'तिकांडी घोडेकुसळी ।' -गीता २. ५२८६. [ति = तीन + कांडें = पेर] तिकांडें-ढ्या-न. मृगशीर्ष नक्षत्रपुंजांतील तीन तारे; शिवाचा बाण. लुब्धक पहा. [सं. त्रिकांड] तिकुटी-स्त्री. त्रयी; तिघांची जोडी; त्रिकूट. 'गुणीं देवां त्रयी लाविली । गुणीं लोकीं तिकुटी पाडिली ।' -माज्ञा १८.८१७. [सं. त्रिकूट] तिकोनी-वि. तीन कोपर्यांचा-कोरांचा-कोनांचा. [सं. त्रिकोण] तिक्कई-स्त्री. तिर्खई; एकदम तीन तीन खडे घेऊन सागरगोटे; खडे इ॰ खेळण्याचा मुलींचा खेळ. याप्रमाणें दुर्खई; पांचखई इ॰ संज्ञा. [सं. त्रिक; म. तिक + ई प्रत्यय] तिक्कल- स्त्री. गंजिफांच्या खेळांत अनुक्रमानें लागलेलीं एकाकडे आलेलीं तीन पानें. तिक्का-पु. तीन चिन्हें असलेलें गंजिफांचें पान; तिव्वा. तिखणी-स्त्री. (घराचे) तीन खण, भाग. -वि. तीन खण अस- लेलें; तीन खणी (घर इ॰). [ति = तीन + खण] तिखळा-ळी- ळें-तिखुळा-ळी-ळें पहा. तिखुळा-ळी-ळें-वि. तीन मुलगे अथवा मुलींच्या पाठीवर झालेला (मुलगा, मुलगी किंवा सामा- न्यतः मूल). तिगस्त-न. १ गेल्या वर्षाच्या मागचें वर्ष. 'तिगस्त बाकी-वहिवाट इ॰.' २ गंजिफांच्या खेळांतील एक संज्ञा, डावां- तील एक विशिष्ट काल; गंजिफांच्या खेळांत तिन्ही खेळणारांचा एक तरी हात होणें. [तीन + फा. गस्त = गत] तिगस्तां-क्रिवि. गेल्याच्या मागील सालीं. [तिगस्त] तिगुण-वि. १ त्रिगुण. २ तिप्पट. [सं. त्रिगुण अप.] तिगुणी-वि. तिहेरी; त्रिगुणात्मक. 'जो अविद्येचिया चिंधिया । गुंडूनि जीव बाहुलिया । खेळवीतसे तिगुणिया । अहंकाररज्जु ।' -ज्ञा १८.९१५. तिघई-वि. तीन गस्ते असलेलें, एकापुढें एक तीन वठारें असलेलें (घर). तिघड- पु. (राजा) तीन आंबे, नारळ इ॰चा घड. तिघड-वि. (कों.) दर तीन लोटे बांधून झाले म्हणजे एक खापेकडाची जुळी वग- ळावी अशा रीतीनें लोटे बांधलेली (रहाटाची माळ). -क्रिवि. माळ तिघड होईल अशा रीतीनें (बांधणें). तिघडी-स्त्री. १ तिहेरी घडी (कापड, कागद इ॰ची). २ तिहेरी घडी घातलेली, तिपदरी वस्तु. -वि. तीन घड्या घातलेली. [ति = तीन + घडी] तिघस्त-न. तिगस्त अर्थ २ पहा. तिजवर-पु. १ तिसर्यांदा लग्न करीत असलेला माणूस. २ तीन लग्नें केलेला मनुष्य. [तिजा + वर] तिधारा-री-वि. १ तीन धारा-कडा असलेला. 'तिधारां अंदु फीटलियां । चरणींचिआ ।' -शिशु ७१६. २ तीन कांठ किंवा काड्या असलेलें (धोतर इ॰). [ति + धारा] तिधारी- निवडुंग-पुन. एक जातीचा निवडुंग. याच्या पेरास तीन कांट्यांच्या रांगा असतात; याच्या उलट फड्यानिवडुंग. तिधारें- न. नकसगाराचें एक हत्यार. तिपट-वि. (सामा.) तिप्पट पहा. तिपटी-स्त्री. तिप्पट संख्या अथवा परिमाण. तिपडें-न. (नाट्य) बकर्याचे केंस वळून गंगावनाच्या आकाराची स्त्री नटाकरितां तयार केलेली तीनपदरी वेणी. -पौराणिक नाटकाचा काळ. तिपदरी- वि. तीन घड्यांचें किंवा तीन पदर असलेलें (कापड; दोर इ॰). तिपाई-(व.) तीन पायांची घडवंची; तिवई. (बिडाचा कार- खाना) डेरा तयार करण्यासाठीं मातींत रोंवण्याचे लांकडी धीरे व गोलाकार लोखंडी गज. तिपाठी-वि. तीन वेळां वाचून, ऐकून पाठ म्हणणारा. तिपांडी-स्त्री. (कों.) तीन पांड भातजमीनीची प्रत्येक वीस पांडांच्या बिघ्यामागें रयतेस दिलेली जमीनीची सूट. तिपानी-स्त्री. एक लहान वेल. श्वास, व्रण, विष यांची नाशक. -वगु ४.१. -वि. तीन पानें असलेलें; त्रिदल (झाड, अंकुर). [सं. त्रिपर्णी] तिपायी-स्त्री. तिवई. -वि. तीन पाय असलेलें (जनावर; वस्तु). [तीन + पाय] तिपिकी-वि. एका वर्षांत तीन पिकें देणारी (जमीन). तिपुडी-वि. १ तीन कप्पे, खण असणारी (पेटी). २ तीन पूड असलेला मृदुंग. [सं. तिपुटी] तिपेडणें- सक्रि. तीन पेड देणें; वळणें. तिपेडी-ढी-वि. तीन पेडांनीं केलेली (दोरी, वेणी इ॰). तिपेरीस्त्री. नाचणीची एक हळवी जात. हिच्या काडास तीन पेरें आलीं म्हणजे कणीस येतें. -वि. तीन सांधे, पेरीं असलेलें (बोट इ॰). तिप्पट-स्त्री. तीन पट संख्या; तिप्पटपणा. -वि. १ तीनदां जमेस धरलेली (संख्या) त्रिगुणित. २ तीन घड्यांचे; तिपदरी (कापड इ॰) तिफण-णी-न.स्त्री. तीन नळ्या, फण असलेली पाभर, पेरण्याचें यंत्र. [ति + फण] तिफण- स्त्री. (व.) चार एकर (जमीन). तिफसली-वि. तीन पिकें ज्या जमिनींत निघतात ती जमीन. तिफांटा-पु. जेथें रस्ता, नदी. किंवा झाडाच्या खोडाच्या तीन बाजू फुटतात ती जागा. तिफांशी- सी-वि. १ तीन फाशांनी खेळावयाचा (सोंगट्यांचा एक खेळ). २ तीन फाशांनीं युक्त (दोरी इ॰). [ति + फास] तिबक-स्त्री. खेळांत विटी उडली असतां खालीं पडण्यापूर्वी दांडूनें तीनदां मारणें. 'हबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडूं । खेळू विटी दांडू ।' -भज ११३. [ति + ध्व. बक्?] तिबंदी-स्त्री. दोन वरखां (पानां) चा एक बंद याप्रमाणें तीन बंदांची केलेली कागदाची घडी. तिब्राद- वि. (पोर्तु.) तिप्पट. [पोर्तु. त्रेस्दो ब्रादो] तिमजला-ली- वि. १ तीन मजल्यांची (इमारत). २ तीन, तिहेरी काठांचा (शेला, धोतर इ॰). ३ तीन तळ (डेक) असलेलें (जहाज). तिय्यम-वि. तिसर्या दर्जाचें. 'दुय्यम, तिय्यम अधिकारी.' -सूर्यग्र ३४. तिय्या-पुस्त्री. (पत्त्यांचा खेळ). तिर्री; तीन ठिपक्यांचे पान. [ति = तीन] तिरकानी-रेघ-ओळ-स्त्री. कागदाच्या पडलेल्या चार मोडींपैकीं तीन मोडींमध्यें काढलेली रेघ. [सं. त्रि-तिर् + कान, रेघ] तिवई-स्त्री. १ तीन पायांची घडवंची; तिपाई. २ (कों.) तिवटें; भाताचीं रोपें उपटतांना शेतांत बसण्याठीं घेतात ती पायांची तीन घडवंची. तिपाई पहा. [सं. त्रिपदी; प्रा. तिवई] तिवटणां-(महानु) तीन वाटा मिळ- तात ती जागा; चौक; नाका; तिवठा. 'कलियुगाचा तिवटणां.' -भाए १०९. [सं. त्रि + वर्त्मन्; प्रा. तिवट्ट] तिवटी-स्त्री. (गो. कों.) अवयवाची वक्रता. 'पाय तिवटीं पडला.' [सं. त्रिवर्कि; प्रा. तिवट्टी] तिवटें-तिवई अर्थ २ पहा. तिवठा-पु. १ तीन रस्ते मिळतात ती जागा. २ तिवडा अर्थ १,२ पहा. [सं. त्रि + वर्त्मन्; प्रा. तिंवट्ट] तिव(वं)डा-पु. १ मळणी कर- ण्याकरितां खळ्याच्या मध्यभागीं पुरलेला खांब. 'हनुमंत तिवडा मध्यें बळें । पुच्छ पाथी फिरवितसे ।' -रावि २०.१९५. ३ शेतांत धान्य वारवण्यासाठीं उपयोगांत आणावयाची एक तीन पायांची घडवंची. ३ एक ताल अथवा गति. [सं. त्रि + पद] तिवण-१ त्रिदळ. २ तिहेरी घडी, पदर (कापडं, कागद इ॰ ची). तिव- णता-वि. (राजा.) तिघडी; तिहेरी; तिपदरी (कागद; कापड वगैरे). तिवणा-वि. तीन पानांचा; त्रिदळ. 'त्रिविध अहं- कारु जो एकु । तो तिवणा अधोमुखु । डिरु फुटे ।' -ज्ञा १५.९५. -एभा ११.१८८. [सं. त्रिपर्ण; प्रा. तिवण्ण] तिवधां-पु. अनेक गांवांच्या सीमा ज्या ठिकाणीं मिळतात ती जागा. [सं. त्रि + बंध किंवा वृंद; प्रा. तिबंद] तिवनी-स्त्री. (व.) (पळसाचें) त्रिदळ; तिवण. तिवनें-न. तिघांचा समुदाय. तिवनें-वि. तीन पानांचें. तिवण-णा पहा. [सं. त्रिपर्ण; प्रा. तिवण्ण] तिवल-पु. (तीन वेळ) दीड आणा. [तीन + वेळ = अर्धा आणा] तिवळी- स्त्री. (गो.) पोटावर पडणारी तीन वळ्यांची आठी. त्रिवळी पहा. [सं. त्रि + वली] तिंवा-पु. (गो.) दगडाचा अगर मातीचा केलेला चुलीचा पाय. २ तिव्हा; तिवई; तिनपायी; तिवारी (ज्यावर उभें राहून उपणतात ती). तिवडा अर्थ २ पहा. [सं. त्रि + पदा; प्रा. तिवय] तिवाट-ठा-पु. तीन रस्ते एकत्र मिळण्याची जागा. तिवठा पहा. फाटाफूट; ऐक्यभंग. 'केला तुवां देखत भर्तृघात । क्षणें तिवाटा रचिल्या तिघांत ।' -वामन, भरतभाव ७. [त्रि + वर्त्मन्; प्रा. तिवट्ट म. तिवाट] तिवारा-पु. (माळवी) तीन दारें असलेला दिवाणखाना. [सं. त्रि + द्वारिका; प्रा. ति + वारिआ; हिं. तिबारा] तिवारी-स्त्री. (व.) तिवडा अर्थ २ पहा. तिन- पायी (जीवर उभें राहून उपणतात ती) तिवा पहा. तिवाशी- वि. तीन वाशांचें केलेलें (घर, खोपट इ॰ उपहासार्थी). [तीन + वांसा] तिवाळ-स्त्री. एकसंध विणलेले तीन पंचे; तीन पंच्यांचें कापड; चवाळें पहा. तिवाळी-स्त्री. एक कापडाची जात. -मुंव्या १२३. [ति + आळें] तिवेती-वेत-वि. तीनदां व्यायलेली (गाय इ॰) [ति + वेत] तिवेळा-ळां-ळीं-क्रिवि. तिन्हीवेळां; सकाळीं, दुपारी, संध्याकाळीं; त्रिकाळ. तिव्वा-वा-पु. (गंजिफा, पत्त्यांचा खेळ) तिर्री; तीन ठिपके असलेलें पान. तिव्हडा, तिव्हा-पु. तिवडा अर्थ २ पहा. तिव्हाळ-पु. (महानु.) तीन रस्ते एकत्र होतात ती जागा; तिवाठा. 'तेथचि तिव्हाळां प्रकास- दर्शन ।' -ॠ ११८. तिशिंगी-वि. तीन शिंगांचा (पशु). [तीन + शिंग] तिशेंड्या-पु. (डोक्यावरच्या तीन शेंड्यांवरून) मारवाडी (निंदाव्यंजक शब्द). [ति + शेंडी] तिसडी-स्त्री. १ तीन वेळां अथवा तिसर्यांदा तांदूळ कांडणें. तिसडीनें सडणें. २ (ल.) बारीक चौकशी; छडा [तीन + सडणें] तिंसड-डा- डी-वि. तीन वेळ सडलेले (तांदूळ). [ति = तीन = सडणें] तिसढ-स्त्री. तिसर्यानदां करणें (काम इ॰) तिसड-वि. तीन थानांचें (जनावर). [तीन + सड] तिसाला-लां-विक्रिवि. लागो- पाठ तीन वर्षांसंबंधीं; तीन वर्षांकरितां; त्रैवार्षिक (हिशेब, बाकी इ॰). [हिं.] तिस(सा)रणी-स्त्री. तिसारणें पासून धातुसा- धित नाम. -क्रिवि. तिसर्यांदा. तिस(सा)रणें-सक्रि. तिस- र्यांदा करणें. -अक्रि. (कोंबडा) तिसर्यांदा आरवणें. [तिसरा] तिसुती-स्त्री. १ तिहेरी, तीन पदरी-फेरी दोरा; दोरी (जानवे इ॰ चा). 'तिसुतीला पीळ भरून झाला आहे, आतां नऊसुती करा- वयाची आहे.' २ तीन कुटुंबांचा आपापसांतील लग्नसंबंध. तिर- कूट अर्थ ३ पहा. -वि. तीन सुतांची, धाग्यांची, पदरांची (दोरी). [तीन + सुती] तिस्ती-स्त्री. (प्र.) तिसुती. (कों.) (जानव्याचें) पातीवर मोजलेलें सूत गुंडाळून ठेवतात ती गुंडाळी. [सं. त्रि + सूत्र, त्रिसुती] तिहोत्रा-पु. दरमहा दरशेंकडा तीन असा व्याजाचा दर. [तीन + उत्तर]