मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

तुंबडी

तुंबडी f The bowl of mendicants. A cupping instrument. तुंबडी भरणें Get one's fill of riches, food &c. तुंबडी लावणें Stick closely and perseveringly to.

वझे शब्दकोश

स्त्री. १ शरीरांतील दुषित रक्त किंवा वायू काढावयाचें नळीसारखें यंत्र; रक्तशोषक यंत्र. (क्रि॰ लागणें; लावणें). 'विष शोषिलें संपूर्ण । दिग्धही गेलें सरोन । सर्वांगीच्या शिरा ओढून । तुंबडी एकचि लागली ।' -ह ४.१८४. २ गोसावी, बैरागी इ॰ चें लांकडी किंवा भोपळ्याचे भिक्षापात्र. 'बाजीरावनाना । तुंबडीभर देना ।' ३ भोपळा असलेलें एक तंतुवाद्य [तुंबी] ॰भरणें-१ पुष्कळ जेवणें; आपल्या पदरांत पाहिजे तितकें पाडून घेणें. २ अयोग्यप्रकारे पुष्कळ पैसा खाणें. 'मुक्या जनावरांच्या तोंडांतले काढून तूं आपली तुंबडी भरली, त्याचे पातक कोठोरे फेडशील?' -रंगराव. ॰लावणें-१ पिच्छा, पाठ पुरविणें. २ वित्त, शक्ति इ॰ चें शोषण करणे.म्ह॰ रिकामा न्हावी कुडाला तुंबड्या लावी. समाशब्द- ॰बाबा-पु. गोसावी (तुंबडी वापरणारा). 'तो तुंबडीबाबा घालीतसे फेरी । नृत्य करी त्यापुढें ।'

दाते शब्दकोश

तुंबडी tumbaḍī f (तुंब S) A cupping instrument. 2 The bowl or dish of mendicants. Usually part of a hollowed gourd, or of wood. 3 A stringed instrument of music. It has one gourd, whereas बीन has two. तुं0 भरणें g. of s. To get one's fill of riches, food &c. तुं0 लावणें (To apply a cupping glass unto.) To stick closely and perseveringly unto.

मोल्सवर्थ शब्दकोश

स्त्री० पिशवी. २ रक्त काढण्याचें हत्यार.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

स्त्री. तंगी; टंचाई. -शर.

दाते शब्दकोश

तुंबडी      

स्त्री.       १. शरीरातील दूषित रक्त किंवा वायू काढण्याचे नळीसारखे यंत्र; रक्तशोषक यंत्र. २. गोसावी, बैरागी इ.चे लाकडी किंवा भोपळ्याचे भिक्षापात्र. ३. भोपळा लावलेले तंतुवाद्य. (वा.) तुंबडी भरणे – १. पुष्कळ जेवणे; आपल्या पदरात पाहिजे तितके पाडून घेणे. २. अयोग्यप्रकारे पुष्कळ पैसा खाणे. तुंबडी लावणे – १. पिच्छा, पाठ पुरवणे. २. वित्त, शक्ती इ.चे शोषण करणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

स्त्री.       तंगी; टंचाई. – शर.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

संबंधित शब्द

चोचा      

पु.       १. तुंबडी, रोंबी लावण्यापूर्वी वस्तरा इत्यादिकांनी मारलेली फासणी. २. औषधाकरिता दिलेली डागणी : ‘आणि मुलाच्या पोटावर शंभर चोचे मारतात.’ − स्मृतिचित्रे १२७. ३. डाग दिल्याने कातडीवर पडलेली खूण; डाग; गूल. सामान्यतः अनेकवचनी प्रयोग. उदा. चोचे देणे, मारणे. ४. हत्याराने वृक्ष इ. वर केलेले क्षत.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चोंचा

पु. १ तुंबडी, रोंबी लावण्यापूर्वीं वस्तरा इ॰ कानीं मारलेली फांसणी. २ औषधाकरितां दिलेली डागणी. ३ डाग दिल्यानें कातडीवर पडलेली खूण; डाग; गूल; सामान्यतः अनेक वचनी प्रयोग. उदा॰ चोचे देणें, मारणें. [चोंच]

दाते शब्दकोश

कडू भोपळा      

१. कडवट रुचीचा भोपळा; दुध्या भोपळ्याची एक जात. याचा उपयोग सतार, वीणा वगैरे वाद्यांच्या व सांगड, तुंबडी इत्यादीच्या कामी करतात. २. (ल.) दासीपुत्र. ३. (ल.) पंक्तिबाह्य, हलक्या जातीचा, बहिष्कृत माणूस. कडू भोपळी      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कूड

पु. १ बांबूच्या कामट्या, कारवी, रिपाड, तट्ट्या इत्या- दींवर चिखल लिंपून तयार केलेली भिंत. (क्रि॰ घालणें). 'तों तृणाचें कुड घातलें ।' -ह १६.१००. [सं. कुड्य; प्रा. कुड्ड] २ कुंपण; वई (कांट्यांचें, झाडांचें). ॰म्ह-रिकामा न्हावी कुडाला तुंबडी लावी.

दाते शब्दकोश

कूड kūḍa m (कुड्य S A wall.) A wall of slight sticks, laths, slittings of bamboo &c. plastered over with mud; a wall of wattle and dab. v घाल. Pr. रिकामा न्हावी कुडाला तुंबडी लावी. 3 f The body. Used mostly in contrad. from the soul or animating principle, or in anger and revilingly, and thus in a manner corresponding to the use in English of Carcass. 2 A fence (as of young trees widely planted); a loose or thin fence.

मोल्सवर्थ शब्दकोश

मध्रा

स्त्री. अव. (एव. मघर-रूढ नाहीं) भाजलेल्या जागे- वर तुंबडी लाविल्यानें तेथें उत्पन्न होतात ते फोड. [मधुरा]

दाते शब्दकोश

पोत

स्त्री. (कु.) तुंबडी (शरीरांतील दूषित रक्त काढून टाकण्यासाठीं बांधतात).

दाते शब्दकोश

फासणी, फांसडी, फांसणी

स्त्री. १ (तुंबडी लावण्या- पूर्वीं) रक्त वाहण्यास सुरुवात व्हावी म्हणून केलेला बारीक छेद; घाय; चीर (बहुधा अनेकवचनी प्रयोग). 'फाड रक्त फासणी । गुल्लडागांची जाचणी ।' -दा ३.७.३३. 'जैसें खांडूक झालें हाता- वर । त्यावरी फासण्यांचें मार ।' २ छेदन; कापणें. (क्रि॰ करणें) दुःखावर फांसड्या टाकणें-मारणें-दुःखावर डाग देणें.

दाते शब्दकोश

रोमें

न. तुंबडी; दूषित रक्त काढण्याचें साधन; रोंबें पहा.

दाते शब्दकोश

रोंबें, रोंबी

न. स्त्री. (कों.) दूषित रक्त काढण्याची तुंबडी.

दाते शब्दकोश

स्वार्थी

स्वार्थांध, मतलबी, मतलबसिंधु, स्वार्थशास्त्री, स्वार्थ साधू, स्वार्थ-परायण, संधि-साधू, पोटार्थी, स्वहितदक्ष, पोटभरू, स्वहितनिष्ठ, स्वार्थ-लोलुप, आत्महितदक्ष, आत्मकेंद्रित, पंक्तिपठाण, आप्पलपोट्या, उपट्या, आपमतलबी, आत्मकामी, आपले घर भरणारा, स्वार्थाने लडबडलेला, आपल्या पोळीवर तूप ओढील, आपले घोडें पुढे दामटील, दुस-याला नाडून स्वतः नटणारा, कापल्या बोटावर पाणी टाकणार नाहीं, आधीं पोटोबा मग विठोबा, उडत्या पांखरांचीं पिसें मोजणारा, स्वत:ची तुंबडी भरतो, आम्ही खावें आम्ही प्यावे जमाखर्च तुमचे नांवें, तुम्ही आम्ही भाऊ भाऊ तुमचें आमचें आम्हीच खाऊ, तुमचे पोहे आमचा कोंडा फुंकून फुंकून खाऊं, मी खाईन खोबरें तूं करवंटी कुरतड.

शब्दकौमुदी

तुमडी

स्त्री. तुंबडी पहा. तुमडीची चाल-स्त्री. पोवा- ड्यांच्या चालीचा एक प्रकारचा. -गापो १०६.

दाते शब्दकोश

तुंबडीबावा

तुंबडीबावा tumbaḍībāvā m (Because they carry a तुंबडी) A familiar term for a गोसावी. Ex. तो तुं0 घालीतसे फेरी ॥ नृत्य करी त्यापुढें ॥.

मोल्सवर्थ शब्दकोश

वेंतस, वेंतूस

न. शरीरांतून रक्त काढावयाचें एक साधन- विशेष; तुंबडी.

दाते शब्दकोश

नळी      

स्त्री.       १. (सामा.) दोन्ही तोंडे खुली असून मध्ये पोकळ असणारा धातूचा, लाकडाचा, वेळूचा लांब तुकडा. २. बंदूक; ज्यात दारू ठासतात तो बंदुकीचा भाग. ३. मूत्रनलिका. ४. श्वासनलिका; अन्नमार्ग; गळा; कंठ : ‘वासनेहातीं बांधवी नळी ।’ – तुगा २७९९. ५. (विणकाम) धोटा; गणा किंवा कांडी ज्यात ठेवतात ते टोपण; कोश. ६. फुंकणी. (कु.) ७. पहा : नळकुटी १. ८. नाकपुडीचे छिद्र. ९. नळीच्या आकाराचे कौल. याचे एक तोंड जास्त रुंद व दुसरे किंचित निमुळते असते. १०. पाभरीच्या फणाला बसवलेल्या बांबूच्या पोकळ तुकड्यांपैकी प्रत्येक. याचे एक टोक फणाच्या भोकात व दुसरे चाड्यात बसवलेले असते. यातून बी जमिनीत पडते. ११. डोंगरातील अरुंद खिंड, मार्ग. १२. (ल.) बंदूकवाला. (बार, घोडा इ. शब्दांच्या लाक्षणिक अर्थांप्रमाणेच हा अर्थ.) १३. पळ; धूम. (गो.) [सं. नलक, नलिका] (वा.) नळीचे वऱ्हाड करणे–स्वतःची तुंबडी भरणे. नळी नख देणे, नळी दाबणे–१. एखाद्याची निर्वाहाची साधने नष्ट करणे. २. निष्ठुरपणे वागवणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

नळी

स्त्री. १ (सामा.) दोन्ही तोंडें पोकळ असून मध्यें पोकळ असणारा धातूचा, लांकडाचा, वेळूचा लांब तुकडा. नळ पहा. २ बंदूक; ज्यांत दारू ठासतात तो बंदुकीचा भाग; नलिका. ३ मूत्रनलिका. ४ श्वासननलिका; अन्नमार्ग; गळा; कंठ. 'पहा त्या हिरण्यकश्यपें अपुलियेचि नळीं । बसविला नरसिंह पाचारीनी ।' -निगा ५३. 'वासनेहातीं बांधवी नळी ।' -तुग २७९९. ५ (विणकाम) धोटा; गणा किंवा कांडी ज्यांत ठेवतात तें टोपण; कोश. ६ (कु.) फुंकणी. 'नळी फुंकिली सोनारें ।' ७ मोरी; गटार. ८ गुडघ्यापासून घोड्यापर्यंत हाड; नळगुडी; नडगी. ९ (हात, पाय, मांड्या यांच्या) लांब हाडांपैकिं प्रत्येक. १० नाकपुडीचें छिद्र. ११ नळीच्या आकाराचें कौल. याचें एक तोंड जास्त रुंद व दुसरें किंचित निमुळतें असतें. १२ पाभरीच्या फणास बसविलेला बांबूच्या पोकळ तुकड्यांपैकीं प्रत्येक. याचें एक टोंक फणाच्या भोंकांत व दुसरें चाड्यात बसविलेलें असतें व यांतून बीं जमीनींत पडतें. १३ डोंगरांतील अरुंद खिंड, मार्ग. १४ (ल.) बंदूकवाला (बर, घोडा इ॰ शब्दांच्या लाक्षणिक अर्था- प्रमाणेंच हा अर्थ आहे). १५ (गो.) पळ; धूम. [नळा] ॰काढप-(गो.)पळ काढणें; धूम ठोकणें. नळीचें वर्‍हाड करणें-(स्वतःची) तुंबडी भरणें; तळीराम गार करणें. नळीं नख देणें, नळी दाबणें-१ (एखाद्याच्या) पोटावर पाय देणें, निर्वाहाचीं साधनें नष्ट करणें. २ निष्ठुरतेनें वागविणें. ॰निमटणें- नरडी दाबणें; प्राण घेणें. 'सूर्योदयो जाहल्यापाठीं । समूळ अंधारातें घोटीं । खद्योताची नळी निमटी । नक्षत्रकोटी तत्काळ गिळी ।' -एभा १३.४२२. नळीवर नेसणें-(धोतर, लुगडें इ॰) गुडघ्याच्यावर नेसणें. नळीचें कुलूप-न. जुन्या काळचें वाटोळें गावंठी कुलूप. हें लांब सळईच्या किल्लीनें उघडतें. याच्या उलट विलायती तर्‍हेचें. 'बेडकीचें' कुलूप. नळीचें पीस-न. बारीक निमुळत्या नळीच्या आकाराचें साळूचें पीस. 'सड, केंस, लव, पिसें, नळीचीं पिसें... इतके आच्छादनाचे प्रकार आहेत.' -मराठी ६ वें पुस्तक, पृ. ८(१८७५). नळीदार कौल-कऊल-न. मातीचे अर्धनळीच्या आकाराचें कौल; याच्या उलट थापीव कौल. नळीदार चोळणा-पु. पायांच्या नडग्या झांकणारी, घोट्यापर्यंत लांब असलेली विजार, पायजमा. नळ्या गंधक-पु. कांडीच्या आकाराचा गंधक.

दाते शब्दकोश

फूल

न. १ पुष्प; मोहोर. २ ठिणगी (विशे. लोखंडाची); फुलासारखा अग्नीचा आकार (शोभेचे दारूकामांतील). ३ कपडावरील बारीक लव; केंस, तंतु; ज्या कापडांना फूल आहे अशीं कापडें बहु- तेक डबल पन्ह्यांचीं असतात. ४ (अव. प्रयोग) (गाय, घोडा, इ॰ च्या अंगावरील) पांढरे ठिपके. ५ पावसाळ्यांत दगडावर, लांकडावर उगवणारी छत्रीसारख एक वनस्पति. ६ बुबुळावर दिसणारा पांढरा ठिपका; शुक्ल हा एक नेत्ररोग आहे. ७ एक विशिष्ट रानवनस्पति. ८ उदाचें धुरकट; उदाचा जमलेला धूर. ९ जस्ताची लाही. १० सुपारीची चांगली कातरण; चांगली कातरलेली सुपारी. ११ बिबा पेटवून त्याच्या तेलाचा पाडलेला थेंब. १२ ओव्यापासून बनविलेलें एक औषध. १३ अंडाशय; ज्यांत गर्भ तयार होतो तो पोटाचा भाग. (सामा.) गर्भाशय. (क्रि॰ वांकडें पडणें). १४ (कों.) घाण पाण्यांत झालेले चक्राकार किडे. १५ स्फटिक. -शर. १६ (खा.) देशी दारू. १७ घन स्वरूपांतून द्रव रूपांत न जातां वायुरूपांत गेलेला पदार्थ. १८ सोनें, रूपें इ॰ धातूचीं किंवा हस्तिदंत, कापड लाकूड, कागद इ॰ कांची शोभेकरितां केलेली पुष्पा- कृति; फुलासारखी वस्तु, दागिना. [सं.; प्रा. फुल्लें; फूल] म्ह॰ आकाशीचें फूल त्याचें कुणाएवढें खूळ. ॰चल(ळ)णें-योनि, गर्भाशय स्थानभ्रष्ट होणें. ॰झडून जाणें-१ फुलवरा गळणें. २ गालिचा इ॰ ची लव निघून जाणें. (दिव्याला.) ॰देणें-दिवा माल- विणें. (दिवा मालविण्यासाठीं त्यावर फूल टाकीत असें संस्कृत काव्यावरून दिसतें). ॰नाहीं फुलाची पाकळी देणें-आपल्या ऐपतीप्रमाणें यथाशक्ति देणें; (भरपूर योग्य रक्कम, मोबदला देण्याची ऐपत नसल्यामुळें कांहीं थोडा भाग देतांना प्रयोग). ॰बाहेर पडणें-निघणें-(गुप्त गोष्ट) बाहेर फुटणें; जाहीर होणें. ॰येणें- (वांई) उन्हानें तापून जमीन सकस होणें. ॰वाहणें-लग्नांत मुलगी वरास अर्पण करणें; कन्यादान करणें. फुलांत घालून ठेवणें-राखणें-जपणें-अत्यंत काळजीपूर्वक व दक्षतेनें ठेवणें; नेणें. फुलार्‍यास येणें-फूल येणें. फुलें चढविणें-मुंडावळ बांधणें. -बदलापूर १४७ फुलें देणें-(ल.) बाह्यात्कारें मान्यता देणें; सन्मान करणें. 'मसलत ठीक केली, आणि उगेच फुलें द्यावी म्हणोन शिंदे होळकर व सुरजमल जाट यांस विचारणा केली.' -भाब ११६. फुलें माळणें-१ (कु.) पहिल्या गरोदरपणांत स्त्रीची पांचव्या महिन्यांत ओटी भरणें. २ फुलांची माळ करणें. फुलें विकलीं(वेंचलीं) तेथें गोवर्‍या विकणें-जेथें पूर्वीं वैभवानें दिवस घालविले तेथें द्ररिद्री स्थितींत राहणें; वैभवाचा काळ जाऊन दारिद्र्य येणें. सामाशब्द- फूलक(का)री-पु. माळी. ॰कारी-स्त्री. प्रत्येक अक्षरापूर्वीं फूल शब्द जोडून बोलण्याची, लिहिण्याची सांकेतिक भाषा. -वि. ज्यावर फुलाच्या आकृती आहेत असें (कापड, कागद इ॰). ॰कोबी-स्त्री. एक प्रकारची भाजी; कोबीचा एक प्रकार. (इं.) कॉली फ्लॉवर. ॰गुडे-पु. (गो.) हळदीकुंकू, फळफळावळ देण्याचा एक सौभाग्यचिन्हाचा प्रकार; फुलविडे. ॰गोटा-पु. एक प्रकारची रवाळ पिठीसाखर. ॰चोचे- पुअव. तुंबडी लावण्याच्या जागेवर फासण्या मारतात त्या. (क्रि॰ घेणें; देणें; मारणें). ॰छडी-स्त्री. फुलांनीं गुंफिलेली छडी, काठी; फुलांचा छडीदार गुच्छ. फूलजी-पु. गर्वानें ताठलेला, अहंमन्य माणूस (फुलाप्रमाणें फुगणारा, ताठणारा व दिमाख दाखविणारा मनुष्य). फूलझगरें-न. १ गोंवर्‍यांचा विस्तव. २ जळते निखारे. ॰झडी-फूलबाजी; एक प्रकारचें शोभेचें दारूकाम. (ल.) नाजुक स्त्री. 'कंठामध्यें पिक दिसे अशिग तूं रूपसुंदर फुलझडी ।' -होला १०४. [फूल + झडणें (पडणें)] ॰झाड-१ फुलें येणारें झाड; ज्याचें फूल हेंच मुख्य आहे असें (कण्हेर, जास्वंद, मोगरा इ॰) झाड; याच्या उलट फळझाड. २ एक प्रकारचें शोभेचें दारूकाम. [फूल + झाड] ॰धर-पु. माळी. -शर ॰दान-दाणी- नस्त्री. फुलें ठेवावयाचें भांडें. (इं.) फ्लॉंवर पॉट. [फूल + फा. दान्] ॰दावरी-स्त्री. एक फूलझाड व त्याचें फूल. ॰पगडी-स्त्री. १ लहान, सुंदर व भारी किंमतीचें पागोटें. २ (ल.) हलकी, क्षुद्र वस्तु. ॰पगर-न. डोक्यांत घालण्याचा फुलाच्या आकाराचा दागिना. ॰पत्री-स्त्री. (व्यापका) देवाला वाहण्याच्या उपयोगी फुलें, पानें इ॰. ॰पांखरूं-न. चित्रविचित्र पंखाचा फुलांवर उडत असणारा बारीक प्राणी; पतंग याच्या चार अवस्था असतात:-१ अंडें, २ अळी किंवा सुरवंट, ३ कोश, ४ फुलपांखरूं. ह्याच्या पुष्कळ जाती आहेत. ॰पात्र-न. पाणी पिण्याचें भांडें; रामपात्र (हें पितळी असून याचा आकार साधारणतः फुलासारखा असतो). ॰फासणी-ण्या-फूलचोचे पहा. ॰बडवा-पु. (महानु.) फुलें पुरविणारा. 'फुलबडवा ऋतिपति ।' -शिशु ५१. [फूल + सं. बटुक; प्रा. बटुअ; म. बडवा] ॰बरडा-बर्डा-पु. झाडावरून कच्ची काढून शिजवून वाळविलेली एक प्रकारची सुपारी. बरडा पहा. ॰बाग-पुस्त्री. फुलांसाठीं केलेला बाग. [फूल + बाग] ॰बाजी-स्त्री. १ कागदाच्या नळींत शोभेची दारू भरून तयार केलेला दारूकामांतील एक प्रकार. ही पेटविली असतां फुलें गळताना दिसतात. २ (थट्टेनें) तंबाखूची विडी. ॰बाडी-स्त्री. फुलबाग 'करीं धरून सुहृज्जन फुलबाडीमधें शिरली ।' -राला ५५. [फूल + बा-वाडी. सं. पुष्पवाटिका] ॰बासन-वासन-न. उंची जिन्नस कापड मळूं नये म्हणून त्याला गुंडाळलेलें साधें कापड; बासन. ॰बाळ्या-स्त्रीअव. बाळ्यांचा प्रकार ।' -अफला ५५. ॰बिसणा- णी-नी-वि. १ अतिशय नाजुक, कोमल. २ पोशाखी; नुसता ऐट मारणारा; मिजासी; अक्कडबाज; छेलछबेला. 'त्याच्यानें श्रमाचें काम होत नाहीं तो फूलबिसनी आहे.' [फूल + हिं. बिसणी = नाजूक, छबेला] ॰माळी-पु. फुलारी; माळी. ॰मेंगा- पु. षंढ; नपुंसक; हिजडा. ॰वात-स्त्री. फुलाच्या आकाराची कापसाची वात. ही निरांजनांत लावतात. ॰विडे-पुअव. (गो.) हळदीकुंकवाचा समारंभ फुलगुडे पहा.॰सर-पु. फुलांचा हार 'फुलां फुलासरां लेख चढे । द्रुतीं दुजी अंगुळी न पडे ।' -ज्ञा १८.५७. फुलांची जाळी-स्त्री. फुलें गुंफून केलेली डोक्यावर बांधावयाची जाळी. फुलार माळी-पु. माळ्यांची पोटजात; फूलमाळी पहा. फुलारी-पु. माळी, फुलमाळी. 'तों फुलारी आला ते वेळां । तेणें हरिकंठीं घातल्या माळा ।' -ह १९.५९. -स्त्री. १ फुलकरी भाषा, फुलकारी पहा. २ (व.) फुलांची परडी. फुललें-वि. (प्रा.) फुलाचें. फुलोडी-स्त्री. फुलाप्रमाणें नाजूक स्त्री. फूलझडी पहा. 'चाले ठुमकत ती मादवान फुलोडी ।' -प्रला ९३. फुलसाखर-स्त्री. उंसाचा रस आटवून थोडा पातळ राहिला असतां मडक्यांत भरून घडवंचीवर ठेवल्यावर आंतील काकवी गळून वरील भागांत जी पांढरी साखर होते ती. -कृषि ४८२.

दाते शब्दकोश

कडु-डू

वि. १ कडवा (गोडाचे उलट, कडूनिंबाच्या चवी- प्रमाणें). २ बेचव; पित्तविकारामुळें बदलणारी (जिभेची रुचि). ३ न. रुचणारें; अप्रिय; कठोर (वाक्य, भाषण इ॰). 'आधीं कडु मग गोड.' ४ ज्यास कीड लागत नाही, जें कीड खात नाहीं असें (विशिष्ट झाड, वनस्पति). ५ जारज संतति (गोडच्या उलट). ६ गोड नसणारें; अशुद्ध (विशिष्ट तेल). ७ कठिण, गांठ्याळ (बाभळीच्या लांकडाचा आंतील भाग; नार; वरचा भाग ठिसूळ, नरम किंवा गोड असतो). ८ निर्दय; कडक; ताठर (माणूस, स्वभाव). ९ नापीक; लागवडीला प्रतिकूल (जमीन). १० झोंबणारी; कडक; तिखट (विशिष्ट भाजी). -न. १ (ल.) अफू. २ कात (रात्रीच्या वेळेस काताचें नांव घ्यावयाचें नाहीं म्हणून त्याबद्दल म्हणतात). ३ मृताशौच; कडू विटाळ या शब्दाचा संक्षेप. -स्त्री. डोळ्याचें दुखणें (डोळ्यांत माती गेल्यानें, जाग्रण केल्यानें येणारें). (क्रि॰ येणें. उ॰ डोळ्यांला कडू येणें). -पु. १ दासीपासून झालेली संतति; अनौरस, जारज संतति; लेकवळा (याच्या उलट गोड). 'त्याच्या राज्यांत मल्हारराव नामक त्याच्या एका कडू सापत्न भावानें जें बंड माजविलें होतें...' -हिंक ८४. २ पाटाची संतति [सं. कटु; प्रा. कडु; गु. कडवु; हिं. कडुवा; सिं कडो] ॰इंद्रा- यण-न. कुंपणावरील एक वेल; ह्याचीं फळें तांबडीं, विषारी व रुचीस कडू असतात; कवंडळ; इंद्रावण; इंद्रवारुण; कडूवृदांवन. २ (ल.) तुसडा, माणूसघाण्या; एकलकोंडा माणूस. ॰करांदा- पु. एक कडवट तपकिरी रंगाचा कंद. ॰कारलें-न. १ कारलें. २ (ल.) वाईट स्वभावाचा व न सुधारणारा माणूस. 'तो एक कडूं कारलें आहे, त्याची संगत धरूं नको म्हणजे झालें.' म्ह॰ कडू कारलें, तुपांत तळलें, साखरेंत घोळलें तरी तें कडू तें कडूच.' ॰कारळी-ळें-स्त्रीन. कारळे तीळासारखें औषधी बीं; कडू जिरें; काळें जिरें. याचें झाड दोन तीन हात उंच असून ह्यास बोंडें येतात व त्यांत बीं असतें. हें कृमिनाशक आणि वातनाशक आहे. -शे ९.२३४. ॰काळ-पु. वाईट दिवस; अडचणीची स्थिति; साथ; दुष्काळ; दुर्गति. (क्रि॰ येणें; असणें; चालणें; वाहणें; जाणें; टळणें; चुकणें; चुकविणें). ॰घोसाळें-न. घोसा- ळ्याची एक जात. -शे ९.२३५. ॰जहर-वि. अतिशय कडू; विषासारखें कडू. ॰जिरें-कडू कारळी पहा. ॰झोंप-स्त्री. अपुरी झोंप; झोंपमोड; झोंपेचें खोबरें. (क्रि॰ करणें). ॰तेल-न. १ करंजेल. करंजाच्या बियांचें तेल. २ उंडिणीचें तेल (हेट.) पुन्नागफळांचें तेल. ४ (सामा.) न खाण्यापैकीं तेल (चोखटेल किंवा गोडें तेल याच्या उलट). ॰दोडका-पु. १ कडवट दोडका. २ दासीपुत्र; लेकवळा. ३ (ल.) पंक्तिबाह्य; जाति- बहिष्कृत माणूस. कडू भोपळा पहा. ॰दोडकी-स्त्री. भाद्रपद महिन्यांत फुलणारी एक वेल; दिवाळी; हिचीं पानें औषधी असून. फळास दिवाळें म्हणतात. -शे ९.२३५. ॰निंब-पु. बाळनिंब; बाळंतनिंब; हा वृक्ष फार मोठा असून सर्वत्र होतो. याचीं पानें गुडीपाडव्याला खातात. हा अनेक व्याधींवर उपयोगी आहे. याचें लांकूड इमारतीच्या उपयोगी आहे. आर्यवैद्यकांत याला रसायन म्हटलें आहे. म्ह॰ १ गूळ चारणारापेक्षां निंब चारणारा बरा होतो. २ (कर्‍हेपठारी) कडू निंबाच्या झाडा- खालून उठून आला = ज्याच्या जवळ कांहीं पैसा नाहीं असा; भणंग; (उपहासार्थी योजितात). ॰पडवळ-न. कडू असलेलें पडवळ. -शे ९.२३५. ॰पाणी-न. १ पाण्यांत कडूनिंबांचे किंवा निरगुडीचे टहाळे घालून उकळलेलें पाणी (यानें आजार्‍यास, बाळंतिणीस वगैरे स्नान घालतात). २ विटाळ संपल्यानंतर बायका ज्या पाण्यानें डोक्यावरून स्नान करतात तें पाणी. अशा स्नानालाहि म्हणतात. (क्रि॰ घेणें). ३ मृताशौच किंवा कडूविटाळ संपल्यानंतर माण- सानें स्नानार्थ घ्यावयाचें पाणी. (येथें कडू म्हणजे दुःखदायक प्रसंगाशीं आलेला संबंध). (क्रि॰ घेणें). ४ भाजीपाला शिजविलेलें पाणी. ॰पाणी काढणें-(बायकी वाप्र.) वरील विटाळ फिट- ल्याचें स्नान झाल्यानंतर तें स्नान नाहींसें करण्यासाठीं पुन्हां दुसर्‍या साध्या पाण्यानें स्नान करणें किंवा अंगावर पाणी घेणें. ॰पाला- पु. कडू पाण्यांत घालावयाचीं करंज, लिंब, निर्गुडी, जांभळी इ॰ चीं पानें. ॰भोपळा-पु. १ कडवट रुचीचा भोपळा; दुध्या भोपळ्याची एक जात (याचा उपयोग सतार, वीणा, वगैरे वाद्यांच्या कामीं व सांगड, तुंबडी इ॰ च्या कामीं करतात). २ (ल.) दासीपुत्र. ३ (ल.) पंक्तिबाह्य; हलक्या जातीचा; बहिष्कृत माणूस. ॰भोपळी-स्त्री. कडू भोपळ्याची वेल; कडू भोपळा अर्थ १ पहा. -शे ९.२३६. ॰वट-टु-वि. (काव्य) कडवट पहा. 'कैलासवन कडुवट । उमावन तुरट ।' -शिशु ६१५. 'जैसा निंब जिभे कडुवटु ।' -ज्ञा १८.१८६. 'कडुवट हरिनामे वाटती पापियाला ।' -वामन, नामसुधा १.४.३४. ॰वाघांटी- स्त्री. कडवट फळें येणारी एक वनस्पति; आषाढी द्वादशीस हिच्या फळांची भाजी करतात. ॰विख-वि. कडूजहर; विषाप्रमाणें कडू. ॰विटाळ पु. १ मृताशौच; सुतक. २ बाळंतपणाचा विटाळ; बाळंतिणीला येणारा दहा दिवसांचा विटाळ; जननाशौच. (क्रि॰ येणें; जाणें; सरणें; फिटणें;). ॰वृंदावन-न. कडू इंद्रायण पहा. 'कडू वृंदावन । साखरेचें आळें ।' -तुगा.

दाते शब्दकोश