मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

निडळ, निडल, निढळ, निढल, निढाळ, निढाल      

न.       कपाळ; ललाट : ‘कांठमोरा त्याचे निडळीं रुतला ।’ – पंच ४·१.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

निढळ or निढाळ

निढळ or निढाळ niḍhaḷa or niḍhāḷa n (नि & ढळणें To move. Unmoving or unalterable.) The brow or forehead (as having man's inevitable destiny inscribed on it). Ex. पंढरीची वाट पाहे निरंतर ॥ निढळावरी कर ठेवूनिया ॥.

मोल्सवर्थ शब्दकोश

निढळ      

न.       कपाळ; डोके. [सं. निटिल]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

संबंधित शब्द

निड(ढ-ढा)ळ-ल

न. कपाळ; लल्लाट पहा. 'कांठमोरा त्याचे निडळीं रुतला ।' -पंच ४.१ 'पाहें पां चंदनाचेनि अंगानिळें ।शिवतिलें निंब होते जे जवळें । तींहीं निर्जिवींही देवांचीं निडळें । बैसणी केली ।' -ज्ञा ९.४८४. -वि. दुर्दैवी; निराधार. 'मी पांगुळ परदेसी । निढळ पडलों एकला ।' -भावि १६.५१. [सं. निटिल; प्रा. णिडाल, णडाल; सिं. निराड्ड] निढळचे, निढळींचे घामाचा-वि. स्वकष्टार्जित व न्यायानें मिळविलेला (पैसा);

दाते शब्दकोश

निडळ

निडळ niḍaḷa n Properly निढळ.

मोल्सवर्थ शब्दकोश

निढाळ

निढळ or निढाळ n The brow or forehead.

वझे शब्दकोश